Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

देहलीतील आमदारांच्या वेतनात ४०० टक्क्यांनी वाढ !

 • आमदारांना आता प्रतिमास २ लाख १० सहस्र रुपये वेतन मिळणार
 • वेतनात प्रतिवर्षी १० टक्क्यांनी वाढ करण्याचाही प्रस्ताव
 • जनतेच्या तिजोरीवीर डल्ला मारणार्‍या आम आदमी पक्षाच्या शासनाचे खरे स्वरूप !
    नवी देहली - देहलीतील आमदारांच्या वेतनात ४०० टक्क्यांची (४ पटींनी) वाढ सूचवणार्‍या विधेयकाला देहलीच्या आमदारांनी संमती दिली. या निर्णयामुळे देहलीतील आमदारांचे वेतन प्रतिमास ८८ सहस्र रुपयांहून थेट २ लाख १० सहस्र रुपये होणार आहे. आमदारांच्या वेतनात झालेल्या घसघशीत वाढीसमवेतच विविध भत्ते आणि पेन्शन यांमध्येही वाढ करण्यात आली आहे.
१. २ लाख १० सहस्र रुपयांत मूळ वेतन ५० सहस्र रुपये, मतदारसंघ भत्ता ५० सहस्र, वाहन भत्ता ३० सहस्र, संचार भत्ता १० सहस्र आणि खाजगी सचिव भत्ता ७० सहस्र रुपये असे वर्गीकरण करण्यात आले आहे.

केंद्रशासनाकडून गायीच्या कातडीवरील निर्यातीमध्ये सवलत

हिंदूंना संभ्रमित करणारी केंद्रशासनाची भूमिका ! 
गोहत्येविषयी शासनाने नेमकी भूमिका स्पष्ट करणे हिंदूंना अपेक्षित आहे !
     नवी देहली - केंद्रशासनाने आता म्हैस आणि गाय आदींच्या कातडीच्या निर्यातीवर लावण्यात आलेल्या प्रतिबंधात गुपचूप सवलत दिली असल्याचे वृत्त द हिंदू या वृत्तपत्रात नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. ३२ वर्षांपूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांनी केलेल्या विरोधामुळे तत्कालीन इंदिरा गांधी शासनाने यावर प्रतिबंध घातला होता. त्या वेळी त्यांनी गायीच्या कातडीचा वनस्पती तुपात वापर होत असल्याचा आरोप केला होता. या संदर्भात वर्तमान शासनाने धोरणात पालट केल्यामुळे मागील काही काळापासून कातडीच्या निर्यातीत प्रत्येक मासात प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. या वर्षी जानेवारी ते मार्च या काळात जवळपास ३० लक्ष रुपयांची ७४ किलो कातडी निर्यात करण्यात आली, तर एप्रिल ते ऑगस्ट या काळात यात ३६ पट, म्हणजे जवळपास ११ कोटी रुपयांची कातडी निर्यात करण्यात आली.

बाजीराव-मस्तानी चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नका ! - बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांच्या वंशजांची मागणी

 • संजय लीला भन्साळी यांनी अन्य पंथियांवर असे चित्रपट काढण्याचे धाडस कधी दाखवले आहे का ? हिंदु सहिष्णु असल्यानेच कुणीही ऊठसूट त्यांच्या महापुरुषांची विटंबना करतो. याविरोधात हिंदूंनी संघटित होऊन वैध मार्गाने आवाज उठवला पाहिजे !  
 • चित्रपटाच्या विरोधात मध्यप्रदेश उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट
      इंदूर (मध्यप्रदेश) - प्रदर्शनापूर्वीच वादग्रस्त ठरलेल्या संजय लीला भन्साळी यांच्या बाजीराव-मस्तानी या चित्रपटातील मल्हारी या गाण्यावर चक्क बाजीराव पेशवे या अपराजित योद्ध्यालाच नाचतांना दाखवल्याने पेशव्यांचे वंशज संतप्त झाले आहेत. या चित्रपटात पेशव्यांच्या इतिहासाचे विकृतकरण करण्यात आल्याने हा चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नये, अशी याचिका बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांच्या वंशजांनी मध्यप्रदेश उच्च न्यायालयात प्रविष्ट केली आहे. (इतिहासाची निंदानालस्ती रोखण्यासाठी कृती करणारे बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांच्या जागरूक वंंशजांचे अभिनंदन ! - संपादक) वादग्रस्त बाजीराव-मस्तानी या चित्रपटातील पिंगा या गाण्यामुळे अनेकांच्या भावना यापूर्वीच दुखावल्या आहेत.

गुगल मॅपला पराजित करणारी आसाम राज्यातील रस्त्यांची आणि वाहतुकीची दुरवस्था !

     
श्री. रमेश शिंदे
आजच्या आसाम राज्याची कल्पना करायची झाल्यास साधारणपणे २५ वर्षांपूर्वीचा महाराष्ट्र आठवला की झाले. अर्थात् आजचा महाराष्ट्र काही खूप विकसित आहे, अशी धारणा नाही; मात्र २५ वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्राशी तुलना केल्यास आपल्याला आसामचा थोडासा अंदाज येऊ शकतो. आसाम राज्यात प्रवास करतांना किलोमीटर आणि वेळ यांचे गणित कुठेही जमत नाही. आज आपण गुगल मॅप या संकेतस्थळावर गेल्यास तेथे दोन शहरांची नावे देऊन त्यांतील अंतर शोधल्यास जाण्याचा मार्ग, रस्त्याचा प्रकार, वाहतुकीची गर्दी आणि एकूण प्रवासास लागणारा वेळ, अशी सर्व माहिती त्वरित आपल्या समोर येते. ही माहिती इतकी अचूक असते की, कोणालाही न विचारता आपण त्या वेळेत इच्छित स्थळी पोहोचू शकतो; मात्र या अद्ययावत गुगल मॅपचाही पराभव करण्याचा पराक्रम आसाम राज्याने केला आहे ! याची ३ उदाहरणे आसाम राज्यातील आतापर्यंतच्या प्रवासात अनुभवली. ती माहितीसाठी पुढे देत आहे.

मध्यप्रदेश शासनाकडून कुंभपर्वसाठी ८०० कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद

     भोपाळ (मध्यप्रदेश) - मध्यप्रदेश शासनाकडून पुरवणी अंदाजपत्रकात कुंभपर्वसाठी ८०० कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वीही मध्यप्रदेश शासनाकडून कुंभपर्वासाठी अडीच सहस्र कोटी रुपयांहून अधिक तरतदू करण्यात आली होती. या पुरवणी अंदाजपत्रकास मध्यप्रदेश शासनाने संमती दिली. वित्त विभागाने अंदाजपत्रकात कुंभपर्वासाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद केली होती; मात्र राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत झालेल्या चर्चेअंती ती वाढवून ८०० कोटी रुपये इतकी करण्यात आली. याशिवाय या अंदाजपत्रकात नागरी प्रशासन, इंदिरा आवास योजना आदींसाठीही मोठी तरतूद करण्यात आली आहे.

काश्मीरमध्ये चकमकीत १ सैनिक हुतात्मा; २ आतंकवादी ठार

भारत फ्रान्सप्रमाणे आतंकवादाचा बीमोड कधी करणार ?
     श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील पूँछ जिल्ह्यात सैनिक आणि घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असणारे आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत १ सैनिक हुतात्मा झाला, तर सैन्याने २ आतंकवाद्यांना कंठस्नान घातले, अशी माहिती सूत्रांनी दिली. भारत-पाकिस्तान सीमेवर ३ डिसेंबर या दिवशी सायंकाळी सैनिक गस्त घालत असतांना आतंकवादी घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याचे आढळून आले. या वेळी सैनिक आणि आतंकवादी यांच्यात ही चकमक झाली. आतंकवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला आहे. चकमकीनंतर घटनास्थळी जोरदार शोधमोहीम चालू असल्याचे सांगण्यात आले.

चित्रपटातील अश्‍लाघ्य गाणी रहित करा आणि चित्रपट आम्हाला दाखवूनच प्रदर्शित करा ! - बाजीराव आणि मस्तानी यांच्या वंशजांची मागणी

वादग्रस्त बाजीराव-मस्तानी चित्रपटाचे प्रकरण
 बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांच्या वंशजांची पत्रकार परिषदेत मागणी 
 डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे, सामजिक कार्यकर्ते, सौ. शाहीन बहादुर (मस्तानीचे वंशज), 
जुल्फिकार बहादुर नवाब साहेब (मस्तानीचे वंशज), अवैस बहादुर नवाब साहेब, 
उदयसिंह पेशवे (बाजीराव यांचे वंशज), श्रीमंत सरदार सत्यशीलराजे दाभाडे 
(उमाबाईसाहेब दाभाडे यांचे वंशज)
     मुंबई, ४ डिसेंबर - बाजीराव-मस्तानी या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पूर्वी आमच्यासाठी एका विशेष खेळाचे आयोजन करावे, जेणेकरून लोकांच्या मनातील बाजीराव पेशवा, मस्तानी बाईसाहेब आणि काशीबाई यांच्या प्रतिमेचा अन् इतिहासाचा चित्रपटात विपर्यास झालेला नाही, याची आम्हाला खात्री होईल, तसेच पिंगा आणि बाजीराव यांची अश्‍लाघ्य गाणी या चित्रपटातून काढून टाकावीत, अशी मागणी बाजीराव पेशवा आणि मस्तानी यांच्या वंशजांनी ४ डिसेंबर या दिवशी मुंबई प्रेस क्ल्ब येथे पत्रकार परिषद घेऊन केली. या पत्रकार परिषदेला अवैस बहादुर नवाब साहेब, उदयसिंह पेशवे (बाजीराव यांचे वंशज), श्रीमंत सरदार सत्यशीलराजे दाभाडे (उमाबाईसाहेब दाभाडे यांचे वंशज), तसेच सौ. शाहीन बहादुर (मस्तानीचे वंशज) आणि जुल्फिकार बहादुर नवाब साहेब (मस्तानीचे वंशज) उपस्थित होते. पेशवेकालीन स्त्रिया असे कपडे घालत नव्हत्या. बाजीराव हा ५ वा पेशवा असल्याचे दाखवले आहे, तेही चुकीचे आहे, तसेच काशीबाई आणि मस्तानी यांची अशा प्रकारे भेट झाल्याचे दाखवले, तेही चुकीचे आहे, असे त्यांनी या वेळी सांगितले. 

महिला आणि बालविकास मंत्री सौ. पंकजा मुंडे-पालवे यांचे भगवान शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेशबंदी हा स्त्रियांचा अपमान नव्हे !, हे प्रतिपादन योग्य कि अयोग्य ?

     महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी मंत्रालयातील पत्रकार परिषदेत पुढील विधाने केली आहेत.
१. शनिशिंगणापूरच्या शनि मंदिरातील चौथर्‍यावर महिलांना प्रवेशबंदी असेल, तर तो महिलांचा अपमान कसा होईल ? 
२. महिलांच्या प्रवेशबंदीच्या संदर्भात काही प्रथा-परंपरा असतात. त्यामुळे हा वादाचा मुद्दा होऊ शकत नाही.
३. हा प्रश्‍न स्त्री-पुरुष समानतेशी संबंधित नाही. मुलीला जन्मालाच येऊ न देणे, शिक्षण आणि नोकर्‍यांमध्ये महिलांना संधी न देणे, हे विषय स्त्री-पुरुष समानतेशी संबंधित आहेत. 

आय्.एस्.आय.एस्.चे झेंडे फडकवणार्‍या देशद्रोह्यांवर कठोर कार्यवाही करण्याच्या केंद्रशासनाच्या निर्णयाचे अभिनंदन !

आता निर्णयावर तात्काळ कार्यवाही करा !
हिंदु जनजागृती समितीने राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे केंद्रशासनाकडे केली होती मागणी ! 
     मुंबई - लोकसभेत एका प्रश्‍नाचे उत्तर देतांना केंद्रीय गृहराज्यमंत्री हरिभाई चौधरी यांनी नुकतेच 'काश्मीरसह भारतात ज्या ज्या ठिकाणी पाकिस्तानसह आय्.एस्.आय.एस्.चे झेंडे फडकवले जातील, तिथे योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत', असे सांगितले. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असूनही तेथे शत्रूराष्ट्र पाकिस्तानसमवेत आय्.एस्.आय.एस्. या आंतरराष्ट्रीय स्तरावरील आतंकवादी संघटनेचे झेंडे फडकवले जाणे, म्हणजे देशातील काही धर्मांध फुटीरतावाद्यांना भारतीय राजवट मान्य नसून त्यांना क्रूरपणे निरपराधांचे हत्याकांड घडवणारी इस्लामी राजवट मान्य आहे, असा होतो. हे कृत्य भारताची एकात्मता आणि अखंडता यांना धोका निर्माण करणारे, तसेच राष्ट्रद्रोहाचे आहे. त्यामुळे भाजप शासनाने राष्ट्रद्रोही धर्मांधांच्या नांग्या ठेचण्यासाठी उचलेले हे पाऊल अत्यंत स्तुत्य आहे.

शत्रूराष्ट्राचे चाहते देशातच असल्यावर देशाला बाह्यशत्रूंची आवश्यकताच काय ?

    
श्री. भाऊ तोरसेकर
स्वातंत्र्यप्रेमी समाज वा देशाचा शत्रू कुठून, परदेशातून येत नसतो. अवघ्या जगाची सेना एकवटली आणि जगातला महान योद्धा जरी त्या सेनेचा सेनापती असला, तरी त्याला सार्वभौम राष्ट्र पादाक्रांत करता येत नसते. स्वयंभू समाजाचे राष्ट्र्र कधी परकीय शत्रूकडून संपवले जात नाही. त्याला संपवण्यासाठी त्याच समाजात विध्वंसक दगाबाज निर्माण व्हावा लागतो, हे अब्राहम लिंकन यांनी सांगितले होते. हा इशारा शतकापेक्षा अधिक काळ आधी लिंकन याने दिलेला आहे आणि तो इशारा केवळ अमेरिकेलाच लागू होत नाही, तर जगातल्या कुठल्याही देशाला, समाजाला आणि कुठल्याही कालखंडाला लागू पडतो. कालपरवा भारतात काही देशद्रोही हेर वा पाक हस्तक पकडले आहेत, त्यामुळे आपण त्यांच्याविषयी मनात राग धरू शकतो; पण त्यांच्यामुळे देशाची फारशी हानी होत नाही, इतके छुपे हस्तक उजळमाथ्याने आपल्यातच वावरतात. ते भारतियांच्या मनात दुफळी, असुरक्षितता आणि गैरसमज निर्माण करून शत्रूला हातभार लावत असतात. आज ४ - ५ परकीय हस्तक विविध जागी पकडले; म्हणून आपण रागावलेले असू शकतो; कारण त्यांच्याकडून पाकला काही महत्त्वाची माहिती मिळाली आहे. भारतावर कुठे आणि कसे आक्रमण करावे? जिहादी सीमेवर कुठून घुसखोरी करू शकतील, याची माहिती पाकला मिळाली. साहजिकच त्याचा वापर करून पाक घातपाती कारवाया करणार आणि तेव्हा आपले सैनिक, सुरक्षा दले गाफील असणार, याचा राग आला ना? पण आपण किती गाफील आहोत त्याचा पत्ता आहे का ? नित्यनेमाने कोणीतरी गाफील ठेवून शत्रूच्या तोंडी देतो आहे, त्याचे आपल्याला किती भान असते ? शत्रूला हाकलून लावण्याच्या विरुद्ध आवाज उठवणारे आपले हितचिंतक असतात कि शत्रू ?

पुरस्कार वापसीला असहमती दर्शवणार्‍या साहित्य मेळाव्याच्या आयोजकालाच त्यागपत्र देण्यास भाग पाडले !

 • इतरांनाही मतस्वातंत्र्य असते, हे विसरलेले हेकेखोर सहिष्णुतावादी !
 • स्वतःला सहिष्णु म्हणवणार्‍या लेखकांचे असहिष्णु वर्तन !
     बेंगळुरू (कर्नाटक) - भारतात असहिष्णुता वाढत आहे, असे रात्रंदिवस घोकणार्‍या तथाकथित पुरोगामी आणि सहिष्णु लेखकांनी साहित्य मेळाव्याच्या आयोजकाने पारितोषिक-वापसी सूत्रावर अप्रसन्नता व्यक्त केली; म्हणून त्यांची मते असहिष्णु ठरवली आणि त्यांना आयोजक पदावरून त्यागपत्र देण्यास भाग पाडले. असे करून त्यांनी स्वत:च्या असहिष्णुतेचे प्रदर्शन घडवून आणले.

हिंदु राष्ट्राची मागणी लावून धरण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक ! - पू. सत्यवान कदम

उडुपी (कर्नाटक) येथील प्रांतीय हिंदू अधिवेशनाला उत्स्फूर्त प्रतिसाद !
व्यासपिठावर अधिवेशनाच्या तिसर्‍या सत्रातील मान्यवर डावीकडून
अधिवक्ता अशोक, श्री. प्रसन्न कामत, अधिवक्ता राजेश ए. आर्. आणि श्री. प्रभाकर पडियार
    उडुपी (कर्नाटक) - भारताचे विभाजन झाल्यावर अस्तित्वात नसलेले इस्लामी राष्ट्र म्हणून पाकिस्तानची निर्मिती झाली आणि अस्तित्वात असलेला हिंदु देश भारताचा निधर्मी देश म्हणून उदय झाला. तेव्हापासून येथील हिंदू दुय्यम दर्जाचे होऊन कनिष्ठ दर्जाचे जीवन जगत आहेत. आम्हाला धर्मशिक्षण मिळत नाही, तर देशातील बहुसंख्यांक युवकांना निधर्मी शिक्षण देण्यात येत आहे. त्यामुळे सर्वांना धर्मशिक्षण मिळेल, याकडे आपण जातीने लक्ष देणे आवश्यक आहे. त्यासाठी हिंदु राष्ट्र आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे, हे केवळ सांगण्यासाठी नव्हे, तर ही मागणी लावून धरण्यासाठी संघटित झाले पाहिजे, असे प्रतिपादन सनातनचे पू. सत्यवान कदम यांनी केले.

'हॅपी टू ब्लीड' या धर्मविरोधी चळवळीचा पुण्यातही अभिव्यक्तीवाल्यांकडून पुरस्कार !

अभिव्यक्ती गटाकडून पाळीच्या कालावधीत स्त्रियांच्या मंदिरातील प्रवेशबंदीवरून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न ! 
     पुणे, ४ डिसेंबर (वार्ता.) - शबरीमला मंदिराच्या अध्यक्षांनी स्त्रियांच्या मासिक पाळीच्या कालावधीत त्यांना मंदिरात प्रवेशबंदी असण्याचे समर्थन केल्यावर कथित पुरोगामी, तसेच स्त्री मुक्तीवाले यांच्याकडून धार्मिक नियमांवर बोट ठेवून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुण्यातही धार्मिक अज्ञानातून निपजलेल्या 'हॅपी टू ब्लीड' या धर्मविरोधी चळवळीचा अभिव्यक्तीवाल्यांकडून पुरस्कार करण्यात आला. लोकांसाठी काम करत असल्याचे भासवणार्‍या अभिव्यक्ती गटाच्या सदस्यांकडून ३ डिसेंबर या दिवशी येथील गुडलक चौक, नळस्टॉप, कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचा चौक आदी ठिकाणी ही चळवळ राबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. 
     या निमित्ताने धर्मनियमांवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करून पाळीच्या काळातील महिलांच्या मंदिरातील प्रवेशबंदीमुळे महिलांवर अन्याय होत असल्याचा कांगावा करत या संदर्भातील हस्तपत्रके वाटण्यात येत होती. (मासिक पाळीच्या काळात महिलांनी मंदिरात न जाण्याची, तसेच धार्मिक विधी न करण्यामागील भूमिका धर्मशास्त्राने सुस्पष्ट केली आहे; मात्र ती समजून न घेता स्वतःचेच म्हणणे खरे करू पहाणारे त्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीवरच शिक्कामोर्तब करत आहेत. धर्म आणि अध्यात्म यांच्या संदर्भातील सूत्रांसंदर्भात धर्मशास्त्र आणि अध्यात्माचे जाणकार यांचे ऐकायचे कि पुरोगामित्वाची टिमकी वाजवणार्‍यांचे ऐकायचे, हे ठरवण्याइतपत जनता सूज्ञ आहे. - संपादक) 

योग आणि ध्यान केल्यामुळे वैद्यकीय व्यय होतो न्यून !

 • हिंदूंच्या समृद्ध वारशांचे महत्त्व पाश्‍चात्यांना कळते, तर भारतियांना कधी कळणार ?
 • हावर्ड येथील एका वैद्यकीय संस्थेचा निष्कर्ष
     ह्यूस्टन (अमेरिका) - योग आणि ध्यान यांमुळे शारीरिक, मानसिक लाभांव्यतिरिक्त आर्थिक लाभही समोर आले आहेत. एका अभ्यासानुसार योग आणि ध्यान यांसारख्या कृतींचे पालन केल्याने आरोग्याच्या सर्वसाधारण तक्रारींपासून मनुष्य लांब राहून त्याचा वैद्यकीय व्यय अर्ध्याने न्यून होऊ शकतो.

२ धर्मांध भावांना कारागृहात विशेष सुविधा मिळण्यासाठी ५ सहस्र रुपयांची लाच देणार्‍या धर्मांधाला अटक

     धुळे - येथील देवपूर परिसरात रहाणारे मोहसीन इस्माईल पठाण आणि मुसवीर उपाख्य मुसा इस्माइल पठाण या धर्मांधांवर गुन्हा प्रविष्ट होऊन त्यांची न्यायालयीन कोठडीत पाठवणी करण्यात आली होती; मात्र त्यांना कारागृहाच्या नियमबाह्य सुविधा देण्यात याव्यात, यासाठी येथील कारागृह प्रभारी अधीक्षकांना आरोपींचा भाऊ तैसिफ खान ईस्माइल खान पठाण याने ५ सहस्र रुपयांची लाच दिली; मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला लाच देतांना पकडले. यामुळे कारागृहात बंदीवानांना विशेष सुविधा पुरवल्या जात असल्याचेही उघडकीस आले आहे. (अशा लाचखोर धर्मांधांना कठोर शासनच करायला हवे ! - संपादक)

फ्रान्स शासन जिहादी लिखाण सापडलेल्या १६० मशिदींना टाळे ठोकणार !

आतंकवादाचा बीमोड करण्यासाठी भारतीय 
राज्यकर्त्यांनीही अशी कठोर कारवाई करावी, अशी भारतियांची अपेक्षा आहे !
    पॅरिस - शहरात आय.एस्.आय.एस्.च्या आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणानंतर तेथील पोलिसांनी अनेक मशिदींवर छापे मारून त्यांचे अन्वेषण केले. छापा घालण्यात आलेल्या मशिदींमधून सुरक्षा अधिकार्‍यांना मोठ्या प्रमाणात जिहादाचा प्रसार करण्यासाठी वापरली जाणारी साधने सापडली. गेल्या दोन आठवड्यांत ३ मशिदींना टाळे ठोकण्यात आले असून अशा १६० मशिदी पुढील काही मासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.

(म्हणे) कोहिनूर हा पाकच्या पंजाब प्रांताच्या सांस्कृतिक वारशाचा भाग !

 • भारताच्या केवळ भूमीवरच नव्हे, तर त्याच्या अस्मितेशी निगडित प्रत्येक वस्तूवर स्वतःचा हक्क सांगण्याचा पाक नागरिकाचा आटापिटा !
 • कोहिनूर हिरा मिळवण्यासाठी पाकिस्तानमध्ये याचिका
     लाहोर - जगप्रसिद्ध हिरा कोहिनूर भारतामध्ये परत आणण्यासाठी मोदी शासन प्रयत्नशील असतांना या हिर्‍यासाठी पाकमधील एका अधिवक्त्याने येथील न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली आहे. एकेकाळी जगातील सर्वांत मोठा हिरा समजला जात असलेला कोहिनूर हा आंध्रप्रदेशमधील कोल्लुर येथील खाणीमधून काढण्यात आला होता.

कर्नाटक राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणांची छायाचित्रे भ्रमणभाषवरून काढणार्‍या धर्मांधाला अटक !

बेळगाव शहराला आतंकवाद्यांचा धोका ! 
      बेळगाव, ४ डिसेंबर (वार्ता.) - येथील सांबरा आणि हुबळी यांसह कर्नाटकातील विमानतळ आणि रेल्वे स्थानक येथे आतंकवाद्यांचा धोका वाढला आहे. सांबरा विमानतळाची भ्रमणभाषवरून छायाचित्रे घेणारा महंमद हुसेनअली कुरेशी (वय २१ वर्षे) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर मारिहाळ पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. त्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी ९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. त्याने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली असून देशविघातक कारवायांसाठीच त्याने महत्त्वाची ठिकाणे आणि आस्थापने यांची छायाचित्रे घेतल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे कर्नाटक राज्यातील गुलबर्ग्यांपर्यंत पोहोचले आहेत. (यावरून आतंकवाद्यांची पाळेमुळे कुठवर मुरलेली आहेत, हे स्पष्ट होते. आतंकवाद्यांना स्थानिक धर्मांध मुसलमानांचेच साहाय्य मिळत असल्याने त्यांना आतंकवादी कारवाया करणे सोपे जाते, हे मुंबई बॉम्बस्फोट आणि २६/११च्या आक्रमण यांवरून सिद्ध झाले आहे. आतंकवाद्यांवर कठोर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यास केंद्र शासनाला भाग पाडण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन लढा देणे आवश्यक आहे. - संपादक) 

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आमदार निवासाची डागडुजी चालूच !

विधानसभेच्या अध्यक्षांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता 
दुष्काळी परिस्थिती आणि कर्जबाजारी शेतकरी यांसारख्या समस्या समोर असतांना आमदारांनी पैशांची उधळपट्टी करण्यापेक्षा विकासकामांकडे अधिक लक्ष द्यावे, ही जनतेची अपेक्षा !
     नागपूर, ४ डिसेंबर (वार्ता.) - हिवाळी अधिवेशन ४ दिवसांवर येऊन ठेपलेले असतांना आमदार निवासातील इमारत क्रमांक १, २ आणि ३ मधील सर्व खोल्यांमध्ये डागडुजी आणि रंगरंगोटी अजूनही चालूच आहे. कोणत्या आमदारांना कोणती खोली द्यायची, याचाही निर्णय झालेला नाही. गेल्या वर्षीच्या सूचीत पालट होणार आहे. अधिवेशनाच्या काळात अनेक आमदार हे आमदार निवासाकडे फिरकतही नाहीत. आमदार निवासात आमदार आणि त्यांचे स्वीय सचिव रहाणार असतील, तर त्यांना अनुमती देण्यात येईल, अशी माहिती बांधकाम विभागातील अधिकार्‍यांनी दिली.

केरळमध्ये माकपकडून गुलाम अली यांच्या कार्यक्रमांचे आयोजन : शिवसेनेचा विरोध

शत्रूराष्ट्राच्या गझल गायकाचा कार्यक्रम 
आयोजित करणारे अस्मिताशून्य माकपवाले !
     थिरुवनंतपूरम् (केरळ) - केरळच्या मार्क्सवादी कॅम्युनिस्ट पक्षाने राज्यात दोन ठिकाणी पाकिस्तानचे प्रसिद्ध गझल गायक गुलाम अली यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. लोकप्रिय सांस्कृतिक संस्था स्वरलयाकडून आयोजित दोन कार्यक्रमांमध्ये गायक गुलाम अली सहभागी होणार असून या कार्यक्रमांत सहभागी होण्याच्या संदर्भात त्यांनी दुजोरा दिला आहे, असे माकपचे ज्येष्ठ आमदार एम्.ए. बेबी म्हणाले. या कार्यक्रमांना शिवसेनेने विरोध दर्शवला आहे. केरळचे शिवसेना नेते श्री. हरिकुमार म्हणाले, आमच्या पक्षाने कोणत्याही पाकिस्तानी कलाकारांच्या कार्यक्रमांना अनुमती न देण्याचा निर्णय घेतला आहे आणि अजूनपर्यंत यात कोणताही पालट करण्यात आला नाही.

कर्नाटकातील प्रमुख स्थळांची छायाचित्रे घेतांना धर्मांधाला अटक

देशविघातक कारवायांच्या प्रकरणात नेहमीच विशिष्ट 
धर्माच्या लोकांनाच अटक का केली जाते ?, याचे उत्तर निधर्मीवाद्यांनी द्यावे !
    बेळगाव - मारिहाळ पोलिसांनी अटक केलेल्या महंमद हुसेन अली कुरेशी याच्या भ्रमणभाषमध्ये बेळगाव, हुब्बळ्ळी, धारवाडच नव्हे, तर आलमट्टी धरण, विधानसभा आणि बेंगळुरूतील मोठ्या मॉलसह कर्नाटकातील ३६ प्रमुख स्थळांची छायाचित्रे आढळून आली आहेत. सध्या जगभरात मोठ्या प्रमाणात आतंकवादी आक्रमणे होत असल्यामुळे या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. २१ वर्षीय महंमद कुरेशी याला शहरातील प्रमुख स्थळांचे छायाचित्र घेतांना संशयित म्हणून पकडण्यात आले होते. सध्या त्याला पुढील चौकशीसाठी बेळगाव पोलिसांनी गुलबर्ग्याला नेले आहे.

२० टक्के महिलांकडून महिला अत्याचारविरोधी कायद्याचा अपवापर

राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या सुषमा साहू यांचे मत
     पिंपरी - 'महिला अत्याचारविरोधी कायद्याचा २० टक्के महिलांकडून अपवापर करण्यात येतो. हे धक्कादायक असून महिलांवर होणार्‍या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठीच या कायद्याचा वापर व्हायला हवा,' असे मत राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या सुषमा साहू यांनी ३ डिसेंबर या दिवशी मांडले. एका कार्यशाळेत त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, 'अन्याय सहन न करता महिलांनी ई-मेल, लेखी तक्रार किंवा स्पीड पोस्ट या माध्यमांतून आयोगाकडे तक्रार करावी. त्याची छाननी करून आयोग संबंधित पोलिसांना कारवाईचा अहवाल देण्याचे आदेश देईल. बलात्कार, अपहरण आणि सासरचे लोक यांच्याकडून जाळण्याचा प्रयत्न या प्रकरणांविषयी पोलिसांकडून तातडीने कारवाई होत नाही. अशा वेळी महिलांनी पाठपुरावा करायला हवा. महिलांनी आत्मपरिक्षण करून योग्य मार्गाचा अवलंब करावा.'

आळंदी (पुणे) येथील कार्तिकी वारीस प्रारंभ

     आळंदी, ४ डिसेंबर - येथील संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराज यांचा ७१९ वा संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी वारी यांचा प्रारंभ ३ डिसेंबरपासून झाला. पंढरपूर येथून श्री पांडुरंगाच्या पादुका, संत नामदेवराय यांची पालखीसह पादुका यांचे हरिनामाच्या गजरात आगमन झाले. या वारीचा प्रारंभ माऊली मंदिर प्रवेश महाद्वारातील ह.भ.प. हैबतबाबा यांच्या पायरीपूजनाने हरिनाम गजरात झाला. ह.भ.प. हैबतबाबांचे वंशज बाळासाहेब आरफळकर, राजेंद्र आरफळकर, ऋषिकेश आरफळकर, आरफळकर ग्रामस्थ यांच्या हस्ते पायरीपूजनाचा कार्यक्रम झाला. या वेळी आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्‍वस्त डॉ. अजित कुलकर्णी, आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्‍वर वीर, ह.भ.प. नरहरी महाराज चौधरी, ह.भ.प. हैबतरावबाबा दिंडीतील वारकरी आणि नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. ७ डिसेंबर या दिवशी कार्तिकी एकादशी, ८ डिसेंबर या दिवशी माऊलींचा रथोत्सव आणि ९ डिसेंबर या दिवशी माऊलींचा संजीवन समाधीदिन सोहळा होत आहे.

सलमान खान याची शिक्षा कायम ठेवा !

शासकीय अधिवक्त्यांची न्यायालयात मागणी 
     मुंबई - 'हिट अ‍ॅण्ड रन' प्रकरणी चित्रपट अभिनेता सलमान खानने केलेल्या अपिलावर ३ डिसेंबर या दिवशी युक्तीवाद करतांना 'सलमानला दया दाखवू नये, तसेच त्याला सत्र न्यायालयाने ठोठावलेली ५ वर्षांची शिक्षा कायम ठेवावी', अशी मागणी शासकीय अधिवक्ता संदीप शिंदे यांनी उच्च न्यायालयाकडे केली. एकाच्या मृत्यूस उत्तरदायी ठरलेल्या आणि ४ जणांना गंभीर घायाळ केलेल्या सलमानला सत्र न्यायालयाने सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती. या निर्णयाला सलमानने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. 

हिंदूंच्या मेळ्यात मुसलमानांचे वर्चस्व

     आसाम राज्यातील एका ठिकाणी हिंदु जनजागृती समितीने लावलेल्या ग्रंथ प्रदर्शनाच्या ठिकाणी मुसलमान बहुसंख्येचा दबाव इतका होता की, समितीच्या फलकातील हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हे वाक्य झाकून ठेवण्याची विनंती आयोजकांनी केली. काही आयोजकांशी बोलतांना त्यांनी सांगितले की, ४०० हून अधिक स्टॉल्स पैकी ९० टक्के स्टॉल्स मुसलमानांनी घेतले होते. मुसलमानांकडून मनोरंजनाच्या नावाखाली उघडपणे तेथे जुगारासारखी केंद्रे चालू होती, तसेच मेळ्यात मुसलमानांचा उघड संचार असून ते समितीच्या ग्रंथांची चौकशी करून, तुम्ही बाहेरचे दिसता, अशी विचारणा करत होते.

पुणे महानगरपालिकेकडून जेटींग यंत्र भाड्याने घेण्याचा निर्णय

 • भाडेपोटी २ कोटी २० लक्ष रुपये देणार
 • यामुळे पालिकेच्या कारभाराविषयी साशंकता निर्माण झाल्यास त्यात नवल ते काय ?
      पुणे, ४ डिसेंबर - पावसाळ्यात नदी, नाले, गटारे स्वच्छ करण्यासाठी जेटींग यंत्राचा वापर केला जातो. सध्या पुणे महानगरपालिकेकडे ९ जेटींग यंत्रे असून त्यातील ४ यंत्रे पालिकेच्या मालकीची, तर उर्वरित ५ यंत्रेही भाडे तत्त्वावर घेतली आहेत. भाडे तत्त्वावर ही यंत्रे घेण्यापेक्षा आणि शहराचा वाढता विस्तार पहाता आणखी ४ यंत्रे पालिकेच्या मालिकेची घेता येऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक प्रभागाला १ यंत्र उपलब्ध करून देता येईल, असे पालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी स्पष्ट केले होते. असे असतांनाही सर्वपक्षीय सदस्यांनी भाड्याने जेटींग यंत्रे घेऊन कामे करून घ्यावीत, असा हट्ट धरून प्रस्ताव मान्य करून घेतले. यामुळे पालिकेला आता जेटींग यंत्रांसाठी भाडेपोटी २ कोटी २० लक्ष रुपये मोजावे लागणार आहेत.

बाटलीबंद पाणी : एक धगधगती समस्या !

जनतेला शुद्ध पाणी पुरवण्यापेक्षा समस्येच्या खाईत ढकलून
अब्जावधी रुपये व्यय करायला लावणारे जनताद्रोही शासन !
१. बाटलीबंद पाण्याच्या नावावर अब्जावधी रुपयांची उलाढाल !
     देशात बाटलीबंद पाण्याच्या नावावर मनमानी चालली असून पाण्याची विक्री करणारी सहस्रो आस्थापने आहेत. लहान पाकिटांतून पाणी विकणार्‍या लहान आस्थापनांची तर कोणतीच अधिकृत संख्या माहीत नाही. अब्जावधी रुपयांची उलाढाल असणारा हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. आश्‍चर्याची गोष्ट आहे

दप्तराचे ओझे अल्प करण्याकडे ७४ प्रतिशत शाळांचे दुर्लक्ष

दप्तराचे ओझे अल्प करण्याच्या आदेशाचे पालन न 
करणार्‍या शाळांवर शिक्षण प्रशासनाने कठोर कारवाई करावी !
    पुणे, ४ डिसेंबर - उच्च न्यायालय आणि राज्य शासन यांनी वेळोवेळी सूचना देऊनही ७४ प्रतिशत शाळांनी दप्तराचे ओझे अल्प करण्यात दुर्लक्ष केले आहे. (ज्या शाळा उच्च न्यायालय आणि राज्य शासन यांच्या आदेशाला हरताळ फासत असतील, त्या शाळा पालकांच्या तक्रारींना काय वागणूक देत असतील, याचा विचारच न केलेला बरा ! - संपादक) या निर्णयाची २६ प्रतिशत शाळांनीच अंमलबजावणी केली आहे. यामुळे न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याविषयी प्रशासकीय शिस्तभंगाची कारवाई का करू नये, अशी नोटीस संबंधित शाळांचे मुख्याध्यापक आणि संस्थेचे पदाधिकारी यांना पाठवली जाणार आहे, अशी माहिती शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी दिली.

देशहितकारक कणखर धोरणांसाठी भारतीय सेनेला देशभक्त जनतेने प्रकट पाठिंबा द्यावा !

१. उद्दाम पाकिस्तानला भारतीय सेनेने दिलेले सडेतोड उत्तर
     काश्मीर प्रश्‍न सुटला नाही, तर सीमेवर अनेक कारगील निर्माण होतील, अशी धमकी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी दिल्यावर तसे करून तर पहा, तुमचे नाकच कापले जाईल, असे रोखठोक प्रत्त्युत्तर भारतीय सेनेच्या प्रवक्त्याने प्रकटपणे दिले.
२. सैनिकी विचारसरणीला संपूर्ण पाठिंबा आवश्यक !
     कोणत्याही देशाला युद्ध करण्यासाठी देशातील जनतेचा साधन-सामग्रीसह सैन्याला ठाम पाठिंबा असणे आवश्यक ठरतेे.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

एअरोसोल (Aerosol) तंत्रज्ञानातील तज्ञ आणि अभ्यासू, तसेच या विषयाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी यांना आवाहन !

     सोमयाग केल्यानंतर मेघनिर्मिती होऊन १९५ दिवसांनी सोमयाग केलेल्या परिसरात पाऊस पडतो, याचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करण्यासाठी एअरोसोल तंत्रज्ञानातील तज्ञ आणि अभ्यासू, तसेच या विषयाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी यांचे साहाय्य आवश्यक आहे. इच्छुकांनी खाली दिलेल्या पत्त्यांवर संपर्क करावा. 
 (एअरोसोल(Aerosol) म्हणजे काय ?
      सूक्ष्म ठोस कण किंवा द्रव बिंदू आणि हवा किंवा कोणत्याही प्रकारचे वायू यांच्या मिश्रणाला एअरोसोल म्हणतात. धूळ (Dust), धुंध (Haze), धूर (Smoke) ही एअरोसोलची काही उदाहरणे आहेत. (संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/Aerosol ; https://hi.wikipedia.org/wiki/प्रश्‍लिष)) 

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिलेल्या वाहन अनुज्ञप्तीवर स्पेन आणि संभाजीनगर येथील पत्ता

     पुणे, ४ डिसेंबर - येथील एका व्यक्तीच्या वाहन अनुज्ञप्तीवर (परवाना) स्पेन, तर एकाच्या अनुज्ञाप्तीवर संभाजीनगरचा पत्ता नोंदवल्याचा प्रकार उघड झाला आहे. प्रत्यक्षात ही अनुज्ञप्ती पुण्यासाठी काढली होती; पण प्रादेशिक परिवहन कार्यालयाने येथील विमाननगरचा पत्ता देण्याऐवजी स्पेन या देशाचा पत्ता नोंदवला आहे. अन्य एका प्रकरणातही अनुज्ञप्तीवर बाणेर ऐवजी संभाजीनगर येथील पत्ता दिला आहे. डेव्हिड सेलगेयरो हे मूळचे स्पेनचे आहेत. गेली ५ वर्षे ते येथील विमाननगरमध्ये नोकरीसाठी वास्तव्यास आहेत. त्यांनी परिवहन कार्यालयामधून वाहन अनुज्ञप्ती काढले होते. शिकाऊ अनुज्ञप्तीमध्ये (लर्निंग) स्पेन आणि विमाननगर अशा दोन्ही ठिकाणचा पत्ता आहे; परंतु कायम स्वरूपाचे वाहन अनुज्ञप्तीमध्ये फक्त स्पेनचा पत्ता दिला आहे. जब्बीर शेख हेही बाणेर येथे रहात असून त्यांनी बाणेरच्या पत्त्यावर आपली वाहन अनुज्ञप्ती काढली होती; पण वाहन अनुज्ञप्तीवर संभाजीनगरचा पत्ता दिला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाया जात आहे; मात्र प्रशासन याकडे लक्ष देत नाही.

रेल्वे वाहतूक : संबंधित विभागांच्या अयोग्य कृती आणि अडचणी अन् अपघात

     रेल्वेचा उगम इंग्लंडमध्ये वर्ष १७८४ मध्ये झाला. नंतर ईस्ट इंडिया कंपनीने भारताच्या बंदरातील माल चटकन वाहून नेण्यासाठी १६.४.१८५३ या दिवशी मुंबई-ठाणे ही पहिली भारतीय रेल्वे चालू केली. पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर देशात विविध ठिकाणी प्रवासी आणि माल यांची वाहतूक करणार्‍या रेल्वेचे सर्वाधिकार भारतीय रेल्वेकडे देण्यात आले.

शिर्डी येथील साईबाबांच्या चरणी प्रार्थना केल्यावर ४ मासांपूर्वी हरवलेला मुलगा सापडला

तथाकथित निधर्मीवाद्यांना काय म्हणायचे आहे ?
     नाशिक - कल्याण येथून ४ मासांपूर्वी हरवलेला मुलगा वडिलांनी शिर्डी येथील साईबाबांच्या चरणी केलेल्या प्रार्थनेनंतर १ घंट्यातच सापडला. अशी आश्‍चर्यजनक घटना येथे घडली आहे. ४ मासांपूर्वी तो आईवर रागावल्याने घर सोडून निघून गेला. त्यानंतर तो कल्याण, दादर, पुणे, नाशिक अशा प्रकारे फिरत फिरत शिर्डी येथील एका खेळण्यांच्या दुकानात काम करू लागला. पुष्कळ शोधूनही तो सापडत नसल्याने त्याचे कुटुंबीय शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनाला आले. या वेळी त्याच्या वडिलांनी त्याचे छायाचित्र साईबाबांच्या चरणी ठेवले आणि १ घंट्यातच मुलगा सापडला.

पुणे महानगरपालिकेतील पाट्यांवर इंग्रजीऐवजी प्रथम मराठीमध्ये नाव करण्याचा निर्णय

मराठी भाषा संवर्धन समितीने या उपक्रमासह शासकीय आणि 
दैनंदिन जीवनात मराठी भाषा संवर्धनाचे प्रयत्न करावे, ही अपेक्षा !
     पुणे, ४ डिसेंबर - महानगरपालिकेतील विभाग, पदाधिकारी आणि अधिकारी यांच्या नावाच्या अनेक पाट्यांवर प्रथम इंग्रजीत आणि नंतर मराठी भाषेत नाव आहे. प्रत्यक्षात पाटीवर मराठी भाषेमधील नाव प्रथम असणे आवश्यक आहे. त्यामुळे पालिकेतील सर्व पाट्या एकसारख्या करण्यात येणार आहेत, असा निर्णय मराठी भाषा संवर्धन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच आकाशवाणीवर मराठी भाषेसंदर्भात प्रतिदिन १० मिनिटांचा कार्यक्रम पालिकेकडून करण्यात येणार आहे.

रेल्वेत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या धर्मांधाला अटक

अशा वासनांधांना कठोर शासन 
केल्याविना या घटनांना आळा बसणार नाही !
      अकोला - नांदेड-श्रीगंगानगर एक्स्प्रेसच्या शौचालयात एका १५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा धर्मांध रिझवान शाह अयूब शाह याला रेल्वे पोलिसांनी ३ डिसेंबर या दिवशी अटक केली. त्याने शौचालयात तिला कोंडले. तिचे तोंड बांधून तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली; मात्र पोलिसांनी प्रकरण चौकशीत ठेवून पीडित मुलीला मलकापूर येथील गायत्री बालकाश्रमात प्रविष्ट केले. महिला आणि बालकल्याण समितीने मुलीची चौकशी केल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. समितीने दिलेल्या अहवालानंतर रेल्वे पोलिसांनी रिझवानला अटक केली.

बालपणापासून सात्त्विकतेची ओढ असलेली ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कोल्हापूर येथील चि. देवर्षी गजानन नागपुरे (वय ४ वर्षे) !

चि. देवर्षी नागपुरे
      कार्तिक कृष्ण पक्ष दशमी (५.१२.२०१५) या दिवशी कोल्हापूर येथील चि. देवर्षी गजानन नागपुरे हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त चि. देवर्षीच्या आईने तिच्या जन्मापूर्वी जाणवलेली सूत्रे आणि जन्मानंतर तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
चि. देवर्षी हिला सनातन परिवाराच्या
 वतीने वाढदिवसानिमित्त शुभाशीर्वाद !
१. जन्मापूर्वी
१ अ. गर्भधारणेपासून मी सतत सेवेत असल्याने मला उत्साह आणि आनंद जाणवत असे.
१ आ. कोणताही शारीरिक त्रास न होणे : मला कधीही थकवा जाणवत नसे. मला पूर्ण ९ मास (महिने) कोणताही शारीरिक त्रास जाणवला नाही, तसेच मला खाण्यापिण्याची कोणतीही विशिष्ट आवड नव्हती.

फलक प्रसिद्धीकरता

आम आदमी सोडून स्वत:चे भले करणारे म्हणे जनतेचे प्रतिनिधी !
      देहलीतील आमदारांच्या वेतनात ४०० टक्क्यांनी वाढ करणारे विधेयक केजरीवाल शासनाने विधानसभेत संमत केलेे. या निर्णयामुळे देहलीतील आमदारांचे वेतन प्रतिमास ८८ सहस्र रुपयांवरून थेट २ लाख १० सहस्र रुपये होणार आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Dehali ke Kejriwal Sarkarne vidhayakon ke vetan me ki 400 pratishat badhotari.
kya ye aam admi chodkar apnihi bhalai nahi ?
जागो !
देहली के केजरीवाल सरकार ने विधायकों के वेतन में की ४०० प्रतिशत बढोतरी !
क्या यह आम आदमी छोडकर अपनीही भलाई नही ?

महाराष्ट्रातही दारूबंदी झाली पाहिजे !

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी 
दारूबंदीचा चांगला निर्णय घेतला; कारण राज्यात दारूमुळे किती हानी 
होते, याचा त्यांनी अभ्यास केला आणि चांगला निर्णय घेतला त्यांचे आभार !
     महाराष्ट्रात मात्र महसूलमंत्री म्हणतात, दारूबंदी केली, तर शासनाचा ११ सहस्र कोटी रुपयांचा महसूल बुडेल. महसूलमंत्र्यांना आमचे सांगणे आहे की, शासनाचा ११ सहस्र कोटी रुपयांचा महसूल बुडेल; परंतु या राज्यातील जनतेचे ११ लाख कोटी वाचतील, आमच्या माता-भगिनींचा दारूमुळे होणारा छळ अल्प होईल, गुन्हेगारी अल्प होईल, दारूमुळे होणारे अपघात अल्प होतील, जी तरुणपिढी दारूमुळे नष्ट होत आहे, ती कोठेतरी चांगल्या मार्गावर चालेल. शासनाने ठरवले, तर ११ सहस्र कोटी रुपये वेगळ्या मार्गानेही मिळवू शकता. तुम्ही कर (टॅक्स) बुडावणारे जरी पकडले, तरी वर्षाला २२ सहस्र कोटी रुपये मिळतील. त्यामुळे दारूबंदी झालीच पाहिजे !
- श्री. चंद्रकांत गोविंद वारघडे (पाटील), अध्यक्ष, माहिती सेवा समिती, महाराष्ट्र.

झोपतांना वापरायच्या उशीची जाडी किती असावी ?


श्री. निमिष म्हात्रे
    आपण दिवसा जागृत असतो. त्यामुळे कोणतीही हालचाल वा कृती करतांना आपली मानेची अवस्था चुकली, तर ती लगेच पालटता येते; पण रात्री झोपतांना आपण भानावर नसल्याने बराच काळ मान चुकीच्या स्थितीत राहिल्यास सकाळी उठल्यावर मानेत तीव्र वेदना होऊ लागतात. दिवसभरातील कृती करतांना काही चुकले, तर रात्रीच्या विश्रांतीनंतर बरे वाटू शकते; पण रात्री चुकीच्या पद्धतीने झोपल्यास पुढचा पूर्ण दिवस विश्रांती घेण्यात व्यय होतो. हे टाळण्यासाठी झोपतांना उशीची जाडी योग्य प्रमाणात असणे अत्यावश्यक आहे.
१. उशीची जाडी किती असावी, हे कसे ठरवावे ?
अ. जे अधिकतर वेळ पाठीवर झोपतात, त्यांनी पाठीवर उताणे झोपावे आणि डोके अन् मान यांच्याखाली उशी घ्यावी. असे केल्यावर नाकाचे टोक कसे रहाते, हे अन्य व्यक्तीला पहाण्यास सांगावे.

आमदार आदर्श ग्राम योजनेसाठी अजित पवार आणि दिलीप वळसे-पाटील यांच्याकडून गावाची निवडच नाही

अशा लोकप्रतिनिधींकडून गावाचा 
विकास होईल, याचा विचारच न केलेला बरा !
      पुणे, ४ डिसेंबर - केंद्र शासनाच्या आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने आमदार आदर्श ग्राम योजना राबवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रत्येक आमदाराने आपल्या मतदारसंघातील गाव निवडायचे होते. त्याला सप्टेंबर २०१५ पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी अजूनही गावांची निवड केलेली नाही. याविषयी जिल्हाधिकार्‍यांकडून स्मरणपत्रे पाठवूनही त्याची त्यांनी नोंद घेतलेली नाही, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. (असे अशोभनीय वर्तन करणारे सर्वसामान्य लोकांच्या तक्रारीच्या पत्रांना हरताळ फासत नसतील कशावरून ? - संपादक) पुणे जिल्ह्यातील इतर आमदारांनी गावाची निवड करून त्याविषयीचे पत्रे जिल्हा नियोजन विभागाकडे दिली आहेत.

दप्तरापेक्षा बोजड शिक्षणप्रणालीचे ओझे अधिक

      शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे अधिक असल्याची जाणीव झालेल्या शासनाने गेल्या काही मासांपासून विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे न्यून करण्यासाठी राज्यभर युद्धपातळीवर प्रयत्न केले. त्यासाठी गृहपाठ आणि वर्गपाठ यांची वही एकच असावी, शाळेचे वेळापत्रक बनवतांना एका दिवशी वेगवेगळ्या विषयांच्या तासिका न ठेवता एकाच विषयाच्या जोडून तासिका ठेवाव्यात, विद्यार्थ्यांना शाळेत पिण्याच्या पाण्याची बाटली न्यायला लागू नये; म्हणून शाळेत पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून द्यावी इथपासून ते विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तकांऐवजी टॅब पुरवले जावेत, अशा प्रकारच्या नानाविध सूचना या निमित्ताने सुचवण्यात आल्या. हे ओझे न्यून करण्यासाठी शिक्षण विभागाकडून शाळेच्या मुख्याध्यापकांना ३० नोव्हेंबरची मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत संपुष्टात आल्यानंतर यासंदर्भात शिक्षण विभागाकडून शाळांवर देखरेख ठेवण्यात येणार आहे, तसेच ओझे न्यून करण्यासाठी उपाययाजेना न करणार्‍या शाळेचे मुख्याध्यापक, तसेच नियामक मंडळाने ठरवून दिलेले संचालक यांवर कारवाई होणार आहे.

सनातनविरोधी षड्यंत्रामुळे निरपराध साधकांना द्यावी लागली अग्नीपरीक्षा !

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्यासाधकांचे आणि त्यांच्या 
कुटुंबियांचे भीषण अनुभव !
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास, साधकांच्या कुटुंबियांना दिलेले त्रास इत्यादी छळांची मालिका येथे देत आहोत.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले
     काँग्रेस शासनाने पोलीस आणि राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला हाताशी धरून सनातनची कितीही अपकीर्ती करण्याचा प्रयत्न केला, तरी सनातनच्या ६ साधकांची निर्दोष मुक्तता झाल्यावर सत्य समोर आले. निरपराध्यांना कारागृहात घालण्यासाठी षड्यंत्र रचणार्‍या पोलीस यंत्रणेचे खरे स्वरूप उघड झाले. अशा प्रकारे सत्तेचा अयोग्य वापर करणारे काँग्रेस शासन आणि निरपराध्यांना पकडणारी पोलीस यंत्रणा पालटण्यासाठी रामराज्याची अनुभूती देणारे हिंदु राष्ट्र स्थापन करणे, हाच पर्याय आहे. 
      पोलिसांनो, निरपराध साधकांना गुन्हेगार ठरण्यासाठी तुम्ही खोटे साक्षीदार आणि पुरावे उभे केलेत; पण खरा साक्षीदार देवच आहे, हे विसरलात. त्यामुळे देवानेच योग्य साक्ष देऊन सहाही साधकांना निर्दोष मुक्त केले ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३०.११.२०१५)

बालपणापासूनच देवाची ओढ असलेली रत्नागिरी येथील उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची चि. भार्गवी संकेत ठमके (वय २ वर्षे) !

चि. भार्गवी ठमके
      रत्नागिरी येथील सनातनचे साधक श्री. सूर्यकांत पां. ठमके यांची नात आणि सौ. ईश्‍वरी संकेत ठमके यांची कन्या चि. भार्गवी हिचा कार्तिक कृष्ण पक्ष नवमी, कलियुग वर्ष ५११७ (४.१२.२०१५) या दिवशी तिथीनुसार दुसरा वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिच्या कुटुंबियांना तिची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
१. गर्भारपण
१ अ. श्रीरामरक्षास्तोत्र आणि श्रीमारुतिस्तोत्र म्हणत असतांना गर्भही स्तोत्र म्हणत आहे, असे जाणवणे : मी गरोदर आहे, हे कळल्यावर घरच्यांनी मला नियमित प्रार्थना, नामजप आदी आध्यात्मिक उपाय करण्यास सांगितले.

हासन, कर्नाटक येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे धर्माभिमानी श्री. ज्ञानेश्‍वर राव यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

श्री. ज्ञानेश्‍वर राव
     श्री. ज्ञानेश्‍वर राव (वय ५५ वर्षे) हे हासन येथील रहाणारे असून धर्माभिमानी आहेत. ते गेली ७ वर्षांपासून सनातनच्या संपर्कात आहेत. नुकतीच त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले.
      ६० टक्के आणि त्यापुढील पातळी साध्य झालेल्या साधकांच्या गुणवैशिष्ट्यांचे लिखाण केवळ न वाचता त्यात दिलेली गुणवैशिष्ट्ये स्वतःत आहेत का ?, याचा अभ्यास करावा आणि स्वतःमध्ये नसतील, ती गुणवैशिष्ट्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. असे केले, तरच गुणवैशिष्ट्ये छापण्याचे सार्थक होईल. - (प.पू.) डॉ. आठवले (१५.९.२०१४)
१. धर्मकार्यासाठी तत्पर असणे
     दादा मराठा संघाचे हासन तालुक्याचे कार्यदर्शी आहेत.

श्रीकृष्णाने सुचवल्यानुसार त्याचे चित्र काढणारी निपाणी (कर्नाटक) येथील कु. भाग्यश्री कल्लापा लोळसुरे

     गोपींची घागर फोडणारा आणि लोणी चोरणारा श्रीकृष्ण : हे चित्र काढतांना मी गवळणींच्या भावात होते. (१.११.२०१३, सकाळी ११ ते दुपारी १ आणि सायं ७ ते ८)
     श्रुति-स्मृति-पुराणोक्ताच भयंकर विटंबना करणारा, पाश्‍चात्त्यांना सपशेल शरण गेलेला, स्वतःला बुद्धीखोर म्हणवणारा, महामूर्ख, निधर्मी हिंदु समाजासारखा समाज पृथ्वीच्या पाठीवर अन्यत्र कुठे असेल का ? - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, नोव्हेंबर २००९)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
        जग आणि भारत इस्लामी आतंकवाद्यांमुळे त्रस्त असतांना तिकडे लक्ष देण्याऐवजी बुद्धीप्रामाण्यवादी, विद्रोही, अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले इत्यादी धर्मद्रोही हिंदूंमध्येच फूट पाडत आहेत ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
मायेचे आकर्षण
           सततच्या दिव्याकडे कोणाचे लक्ष नसते. लुकलुकणार्‍या दिव्याकडे लक्ष जाते.
भावार्थ : सततचा दिवा म्हणजे आत्मज्योत (ब्रह्म). ही स्थिर असते. लुकलुकणारा दिवा म्हणजे माया. तिच्याकडे सर्वांचे लक्ष चटकन वेधले जाते.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

स्वभावदोषांमुळे घडणार्‍या चुका
तुमच्यातील स्वभावदोष तुम्हाला सांगणारा तुमचा खरा मित्र आणि हितचिंतक असतो.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

आतंकवादाच्या विरोधातील कृतीशील रोष !

    ब्रिटीश संसदेत नुकत्याच झालेल्या वादळी चर्चेनंतर शेवटी ब्रिटनने थेट सिरियावर आक्रमण करून इस्लामिक स्टेट फॉर इराक अ‍ॅण्ड सिरिया अर्थात् आय.एस्.आय.एस्. या जिहादी आतंकवादी संघटनेच्या विरोधात दंड थोपटले. यापूर्वी अमेरिका, फ्रान्स आणि रशिया या राष्ट्रांनीही सिरियावर आक्रमण करून आतंकवादाच्या विरोधात त्यांचा कृतीशील रोष प्रकट केला आहे.
आय.एस्.आय.एस्.चा विस्तारवाद
     अलीकडच्या काही वर्षांत आय.एस्.आय.एस्. ही नव्याने उदयाला आलेली आतंकवादी संघटना आहे. या संघटनेेने प्रथम इराक आणि सिरिया या राष्ट्रांतील महत्त्वाची ठिकाणे स्वत:च्या कह्यात घेतली आणि त्याला इस्लामिक स्टेट घोषित करून टाकले. एवढेच नव्हे, तर या संघटनेच्या म्होरक्या बगदादी याला त्यांचा खलिफाही नेमले. त्या वेळी जगभरातील अन्य राष्ट्रांना हा धोका आज ना उद्या आपल्याही दाराशी येणार आहे, हे ध्यानीमनीही नसेल; पण आता ज्या प्रमाणे सर्व राष्ट्रे आय.एस्.आय.एस्.च्या विरोधात एकवटली आहेत, अशी एकजूट जर तेव्हाच दाखवली असती, तर त्या संघटनेला इराक आणि सिरियाच्या वेशीपर्यंत सीमित ठेवता आले असते; पण दुर्दैवाने तसे झाले नाही. कालांतराने या जिहादी आतंकवादी संघटनेची विस्तारवादाची आसुरी मनीषा वाढत गेली. तोपर्यंतही कुठल्या राष्ट्राला याची दखल घेण्याजोगी झळ बसली नव्हती. हा असूर महाकाय रूप धारण करून लाखो लोकांचे जगणे अवघड करून टाकेल, याची पुसटशीही कल्पना कुठल्याही राष्ट्राला नव्हती.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn