Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

प.पू. भक्तराज महाराज यांचा आज महानिर्वाणदिन 
 

सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही ! - केंद्रशासनाची राज्यसभेत स्पष्टोक्ती

पानसरे, दाभोलकर आणि कलबुर्गी यांच्या हत्यांचा एकमेकांशी संबंध नसल्याचाही निर्वाळा
सनातनवर ऊठसूट बंदीची मागणी करून संस्थेची
अपकीर्ती करणार्‍या पुरो(अधो)गाम्यांना सणसणीत चपराक !
      नवी देहली - सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही, असे केंद्रशासनाने २ डिसेंबर या दिवशी राज्यसभेत स्पष्ट केले. केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरात वरील गोष्ट स्पष्ट केली आहे. रिजिजू पुढे म्हणाले, उजव्या विचारसरणीच्या सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही. देशातील शांतता आणि सामाजिक समरसतेवर परिणाम करणार्‍या सर्व संघटनांवर कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या संस्थांचे कायम लक्ष असते. आवश्यकता पडली, तर त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई करण्यात येते.

पंतप्रधानांकडून तमिळनाडूसाठी तात्काळ १ सहस्र कोटी रुपयांच्या साहाय्याची घोषणा

     चेन्नई - मुसळधार पावसामुळे तमिळनाडूत पूरपरिस्थिती निर्माण झाली असून या कठीण काळात भारत शासन पूर्णपणे तमिळनाडूतील जनतेच्या समवेत आहे. तमिळनाडू राज्याच्या साहाय्यासाठी मी तात्काळ १ सहस्र कोटी रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. चेन्नईतील पूरपरिस्थितीची पाहणी केल्यानंतर त्यांनी ही घोषणा केली. नौदलाच्या राजाली एअर स्टेशनवर उतरल्यानंतर त्यांनी त्याच ठिकाणी तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांची, तसेच नंतर राज्यपालांची भेट घेतली.

ओडिशात ६ कुख्यात नक्षलवाद्यांना अटक

स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे होऊनही नक्षलवादाची समस्या सोडवू न शकलेला भारत !
     मलकानगिरी (ओडिशा) - मलकानगिरी जिल्ह्यात पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी या संघटनेच्या ६ नक्षलवाद्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या संघटनेकडून एका सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या सप्ताहाच्या प्रथम दिनीच ही अटक करण्यात आली.
      पोलीस अधीक्षक मित्रभानु महापात्र यांच्यानुसार सीमा सुरक्षा दल, एस्ओजी आणि डीव्हीएफ् यांच्याकडून राबवण्यात आलेल्या संयुक्त मोहिमेत राजलकोंडा वनक्षेत्रातून या नक्षलवाद्यांना जेरबंद करण्यात आले.
     अटक करण्यात आलेल्या देबा कबासी, जगा कबासी, सुकरा कबासी, रामा मदकामी, सोमा पोदियामी आणि गोविंदा खेमुदूया या नक्षलवाद्यांचा लूट, बॉम्बस्फोट, हत्या आदी गुन्हेगारी घटनांमध्ये सहभाग होता, असेही पोलीस अधीक्षक महापात्र यांनी सांगितले.

अखेर उस्मानिया विद्यापिठाकडून गोमांस मेजवानी रहित !

टी. राजासिंह आणि इतर हिंदुत्ववादी यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेला मिळाले यश !
अशा हिंदुविरोधी कार्यक्रमांचे आयोजन करणार्‍या
विद्यार्थ्यांवर आणि त्यांना साथ देणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी !
      भाग्यनगर - उस्मानिया विद्यापिठात १० डिसेंबर या दिवशी काही विद्यार्थी संघटनांनी मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या साहाय्याने आयोजित केलेल्या गोमांस मेजवानीला उस्मानिया विद्यापिठाने अनुमती नाकारली असून असा कुठलाही कार्यक्रम विद्यापिठाच्या आवारात करण्यात येणार नाही, असे स्पष्ट केले. गेले काही दिवस गोरक्षक आणि हिंदुत्ववादी यांनी या मेजवानीला तीव्र विरोध दर्शवला होता. प्रखर हिंदुत्ववादी आणि भाजपचे आमदार टी. राजासिंह यांनीही विद्यापिठात घुसून ही मेजवानी रोखण्यात येईल, असे ठणकावून सांगितले होते.

अमेरिकेच्या कम्युनिटी सेंटरमध्ये मुसलमान आक्रमकांनी केलेल्या गोळीबारात १४ ठार

महाशक्ती असणारी अमेरिकाही दहशतीच्या सावटाखाली !
आतंकवादी आक्रमणाचीही शक्यता
     कॅलिफॉर्निया (अमेरिका) - सॅन बर्नाडिनो येथील एका कम्युनिटी सेंटरमध्ये मेजवानी चालू असतांना मुसलमान आक्रमकांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात १४ जण ठार, तर २० जण गंभीररित्या घायाळ झाले आहेत. यानंतर पोलिसांनी केलेल्या प्रतिआक्रमणात हे दोन्ही आक्रमक ठार झाले आहेत. यात एका महिलेचाही समावेश आहे. ठार झालेल्या या आक्रमकांची नावे सईद रिझवान फारूख (२८ वर्षे) आणि ताशफीन मल्लिक (वय २७ वर्षे) अशी आहेत. (अशी आक्रमणे करणारे मुसलमानच का असतात, याचे उत्तर निधर्मीवाद्यांनी द्यावे ! - संपादक) आक्रमणकर्त्यांनी पोलिसांवरही गोळीबार केल्याचे सांगण्यात आले.

चिंचवड (पुणे) येथे सशस्त्र दरोडा, १ जण गंभीर घायाळ

दरोडेखोरांनी १७ तोळे सोने पळवले
असुरक्षित पिंपरी-चिंचवड !
     चिंचवड - येथील वाल्हेकरवाडीमध्ये ३० नोव्हेंबरच्या रात्री ६ जणांच्या टोळक्याने एका घरात सशस्त्र दरोडा घातला. घरातील महिलेला दरोडेखोरांनी कोयत्याचा धाक दाखवत तिच्या गळ्यातील मंगळसूत्र, हातातील पाटल्या बळजोरीने काढून घेतल्या. त्यानंतर दरोडेखोरांचे लक्ष कपाटातील वस्तू घेण्याकडे गेल्यावर महिलेने ३ मुलांसह तेथून पलायन केले. त्याच वेळी कामावरून परतलेल्या महिलेच्या पतीला दरोडेखोरांच्या आक्रमणाला सामोरे जावे लागले. यामध्ये ते गंभीररित्या घायाळ झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.

हिंदु महासभेच्या वतीने ठाणे येथे तक्रार

धर्मावरील आघातांच्या विरोधात तत्परतेने तक्रार प्रविष्ट करणार्‍या हिंदु महासभेचे अभिनंदन !
बाजीराव-मस्तानी चित्रपटातील मस्तानी गाण्याला विरोध
      ठाणे - इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍या बाजीराव-मस्तानी चित्रपटाच्या विरोधात ३ डिसेंबर या दिवशी हिंदु महासभेच्या वतीने येथील वर्तकनगर आणि नौपाडा पोलीस ठाण्यांत तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. चित्रपटातील मल्हारी या गाण्यास चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी कायमस्वरूपी बंदी घालावी, तसेच इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍या संजय लीला भन्साळी, तसेच अयोग्य भाषेत गाणे लिहिणारे प्रशांत इंगोले यांच्यावर त्वरित कारवाई करावी,

अनेक मुसलमान संघटना आणि व्यक्ती यांनी केला याचिकेत शेवटच्या टप्प्याला हस्तक्षेप !

मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात संतोष पाचलग, नवी मुंबई आणि
शैलेंद्र दीक्षित, पुणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात केलेल्या याचिकांचे प्रकरण
      मुंबई - मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात दाखल केलेल्या जनहित याचिकांच्या सुनावणीमध्ये ३ डिसेंबरला अचानक वेगळे वळण लागले. अनेक मुसलमान संघटना आणि व्यक्ती यांच्या वतीने अनेक अधिवक्त्यांनी याचिकेवरील सुनावणी अंतिम टप्प्यात आली असतांना आपल्यालाही काही म्हणणे मांडायचे आहे, अशी विनंती न्यायालयाला केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती विद्यासागर कानडे आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपिठासमोर ही सुनावणी चालू आहे.

डोंबिवलीचे त्रस्त प्रवासी म्हणतात, आमच्याही मनात देश सोडून जाण्याचा विचार येतो !

देश सोडून जाणे, हे देशावरील समस्यांचा उपाय नव्हे. समस्या 
सोडवण्यासाठी जनतेने संघटित होऊन शासनाला उद्युक्त करायला हवे !
     डोंबिवली (जिल्हा ठाणे) - लोकलमधून प्रवास करणे इतके असुरक्षित बनले आहे की, सकाळी घराबाहेर पडलेली व्यक्ती सुखरूप घरी पोहोचेल, याची शाश्‍वती नाही. आमची मुले दहा वर्षांनंतर मोठी होतील, तेव्हा त्यांना असाच त्रास सोसावा लागेल, अशी भीती वाटते. त्यामुळे देश सोडून जाण्याचा विचार आमच्याही मनात येतो, अशा शब्दांत १ डिसेंबर या दिवशी लोकलमधून पडून मृत्यूमुखी पडलेल्या भावेश नकाते या तरुणाला श्रद्धांजली वाहण्यासाठी जमलेल्या महिला प्रवाशांनी व्यक्त केली.

भाजप राममंदिराच्या नावावर केवळ राजकारण करत आहे ! - नितीश कुमार

भाजप शासनाने राममंदिर शीघ्र बनवून या 
आरोपांना चोख प्रत्युत्तर द्यावे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
    पटना - भाजपवाल्यांची भगवान रामाच्या प्रती अजिबात श्रद्धा नाही. भाजप केवळ राममंदिराच्या नावाने राजकारण करत आहे. भाजप वैयक्तिक राजकीय स्वार्थासाठी राममंदिराचा विषय जिवंत ठेवत आहे, असा आरोप बिहारचे समाजवादी पक्षाचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केला.

अयोध्येत माझ्या हयातीत राममंदिर उभारले जाईल ! - सरसंघचालक

      कोलकाता - अयोध्येत माझ्या हयातीत राममंदिर उभारले जाईल. ते केव्हा आणि कसे बनेल, हे कुणी सांगू शकत नाही; मात्र आशा आहे की, ते माझ्या डोळ्यांदेखत उभारून होईल, असे विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे एका कार्यक्रमात केले. रामंमदिराच्या निर्मितीसाठी नियोजनपूर्वक काम करण्याची आवश्यकताही त्यांनी प्रतिपादित केली.
भागवत पुढे म्हणाले...
१. अयोध्येत राममंदिरासाठी सावधगिरी बाळगून नियोजन करावे लागेल.

(म्हणे) भारतात पाकव्याप्त काश्मीर परत घेण्याची ताकद नाही !

  • अशांना पाकमध्येच पाठवा !
  • जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूख अब्दुल्ला पुन्हा बरळले
    श्रीनगर - पाकव्याप्त काश्मीर भारतात परत घेण्याची देहलीमध्ये एवढी ताकद नसून इस्लामाबादमध्येसुद्धा काश्मीर घेण्याची ताकद नाही, असे विधान नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष तथा जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूख अब्दुल्ला यांनी येथे केले. यापूर्वीही अब्दुल्ला यांनी असे विधान केले होते.
अब्दुल्ला पुढे म्हणाले,
१. पाकव्याप्त काश्मीर हा पाकिस्तानचा भाग असून तो पाकिस्तानचा राहील आणि काश्मीर भारताचा भाग असून तो भारताकडे राहील.

नवाब मलिक यांना जिवे मारण्याची धमकी

     मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना ३ डिसेंबर या दिवशी जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. दुपारी एका आंतरराष्ट्रीय ठिकाणावरून नवाब मलिक यांना भ्रमणभाष आला. कुप्रसिद्ध गुंड रवी पुजारीने हा संपर्क केला असावा, असा अंदाज बांधला जात आहे.
१. नवाब मलिक यांनी दोन दिवसांपूर्वी परमार यांच्या नोंदवहीत इ एस् नावाचा उल्लेख असून, ती व्यक्ती कोण आहे, याची चौकशी कधी केली जाणार, असे प्रश्‍न उपस्थित केले

रहाटणी (पुणे) येथे दोन मंदिरांच्या ५ दानपेट्यांमधील ४० सहस्र रुपयांची चोरी

राज्यातील असुरक्षित मंदिरे !
पुणे - येथील रहाटणी भागातील श्रीराम मंदिर आणि श्री शितळादेवी मंदिर या दोन मंदिरातील दानपेट्या अज्ञात चोरट्यांनी फोडल्या आहेत. ही घटना ३ डिसेंबर या दिवशी पहाटे उघडकीस आली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.
१. पहाटे ३ वाजता गावातील श्रीराम मंदिर आणि श्री शितळादेवी मंदिर यांचा दरवाजा अज्ञातांनी उचकटून मंदिरात प्रवेश केला

मकरसंक्रांतीच्या निमित्ताने धर्मशिक्षण देणारे पत्रक उपलब्ध !

साधकांना सूचना
     सनातन संस्थेच्या वतीने मकरसंक्रांतीच्या निमित्ताने धर्मशिक्षण देणारे ए-५ आकारातील हस्तपत्रक नेहमीच्या संगणकीय ठिकाणावर उपलब्ध करण्यात आले आहे. या पत्रकात मकरसंक्रांतीचे अध्यात्मिकदृष्ट्या महत्त्व, तीळगूळ आणि वाण देण्याचे महत्त्व दिले आहे. वाण देण्यास उपयुक्त होतील असे सनातन-निर्मित लघुग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांची यादीही या पत्रकात देण्यात आली आहे.
     टीप : वरील प्रसारसाहित्यासाठी प्रायोजक मिळवून त्याचा सुयोग्य ठिकाणी वापर करावा.

आरक्षण देशासाठी घातक ! - गुजरात उच्च न्यायालय

आरक्षण संस्कृतीची पाठराखण करणार्‍यांच्या 
डोळ्यांत अंजन घालणारे गुजरात उच्च न्यायालयाचे उद्गार !
    कर्णावती (अहमदाबाद) - जर आपल्याला कुणी विचारले, की देशाला उद्ध्वस्त करणार्‍या किंवा प्रगती रोखणार्‍या २ गोष्टींची नावे सांगा, तर त्या आहेत आरक्षण आणि भ्रष्टाचार, असे गुजरात उच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती जे.एस्. पारदीवाला यांनी पटेल आरक्षण आंदोलनाचे नेता हार्दिक पटेल यांच्या विषयीच्या खटल्याच्या आदेशात हे विधान केले. हार्दिक पटेल यांच्या विरोधात असलेला शासनाच्या विरोधात युद्ध छेडणे हा आरोप रहित करूत देशद्रोहाचा आरोप कायम ठेवण्यात आला आहे. या संदर्भातील सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती जे.एस्. पारदीवाला यांनी निकाल देतांना आरक्षण आणि भ्रष्टाचार या २ सूत्रांना देशविघातक, असे संबोधले आहे.

हिवाळी अधिवेशनात राष्ट्र-धर्मावरील आघातांचे विषय मांडण्यासाठी आमदार श्री. प्रशांत ठाकूर यांना निवेदन

(डावीकडे) आमदार श्री. प्रशांत ठाकूर यांना निवेदन देतांना समितीचे
श्री. नरेंद्र सुर्वे (उजवीकडे) आणि मध्यभागी धर्माभिमानी श्री. सचिन कुलकर्णी
     पनवेल - येथील भाजपचे आमदार श्री. प्रशांत ठाकूर यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एन्.सी.ई.आर्.टी.च्या शालेय पुस्तकातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान आणि इतर जातीवाचक लिखाण काढून टाकण्यात यावे, तसेच कृत्रिम तलावाच्या माध्यमातून होणारे श्री गणेशाचे विडंबन रोखावे,

सांगली येथील आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांना राष्ट्र आणि धर्मपर विषय सादर !

  
आमदार श्री. सुधीर गाडगीळ (उजवीकडून दुसरे) निवेदन वाचतांना आणि शेजारी श्री. नितीन चौगुले
    सांगली - सांगली येथील विधानसभा मतनदारसंघाचे आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्र आणि धर्मपर विषयांची निवेदने सादर करण्यात आली. त्यांनी संबंधित विषय अधिवेशनात उपस्थित करण्याचे आश्‍वासन दिले.

कोल्हापूर प्रादेशिक परिवहन मंडळाकडून अन्यायकारक दंडवसुली ! - संभाजी साळुंखे, बजरंग दल

    
कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत माहिती देतांना बजरंग दलाचे पदाधिकारी आणि अन्य...
  कोल्हापूर- प्रादेशिक परिवहन मंडळाकडून गेल्या काही मांसात वाहन पासिंग करण्यासाठी वाहनधारकांकडून दंडाच्या नावाखाली लूटमार चालू आहे. एप्रिल २०१४ पासून ज्या वाहनांनी विशेषकरून ट्रक, टेम्पो यांनी पासिंग केलेले नाही, अशी वाहने जप्त करून गाडी पासिंग न केल्याविषयी जागेवर दोन सहस्र रुपये दंड, तसेच एप्रिल २०१४ पासून आजतागायत प्रती दिवस ५० रुपये, असा अन्यायी दंड वसूल केला जात आहे,

एम्.आय्.एम्.चे आमदार इम्तियाज जलील यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करून त्यांची आमदारकी रहित करा ! - शिवसेनेची निदर्शने

 राष्ट्रगीताविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याचे प्रकरण
निदर्शने करतांना शिवसैनिक
      सांगली - एम्.आय्.एम्.चे आमदार इम्तियाज जलील यांनी एका दूरचित्रवाहिनीवर बोलतांना राष्ट्रगीताची नौटंकी बंद करा, असे विखारी वक्तव्य केले आहे. यामुळे अनेक राष्ट्रप्रेमींच्या भावना दुखावल्या असून त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करून त्यांची आमदारकी रहित करावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने येथील स्टेशन चौकात ३ डिसेंबर या दिवशी निदर्शने करण्यात आली.

(म्हणे) भारतात सध्या मुसलमानांपेक्षा गाय अधिक सुरक्षित !

काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांचे लोकसभेत वक्तव्य
     या देशात विविध घटनांत हिंदूंनाही त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. त्यांच्या बाजूने थरूर यांनी कधी आवाज उठवला आहे का ?
      नवी देहली - आपल्या देशात सध्या मुसलमानांपेक्षा गाय अधिक सुरक्षित आहे, असे विधान काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी लोकसभेत केले.

पेशावर येथील शाळेवर झालेल्या आतंकवादी आक्रमणाच्या प्रकरणी पाकने चौघा आतंकवाद्यांना फासावर लटकवले !

कुठे घटनेनंतर एका वर्षाच्या आत आतंकवाद्यांना फाशी देणारा पाक,
 तर कुठे वर्षांनुवर्षे आतंकवाद्यांना बिर्याणी खाऊ घालणारा भारत ?
     इस्लामाबाद - पेशावर येथील पाक सैन्याच्या शाळेवरील आतंकवादी आक्रमणाच्या प्रकरणी ४ आतंकवाद्यांना २ डिसेंबर या दिवशी फाशीची शिक्षा देण्यात आली. १६ डिसेंबर २०१४ या दिवशी झालेल्या या आतंकवादी आक्रमणात १३४ मुले मृत्यूमुखी पडली होती.

चित्रपटाच्या पूर्वी राष्ट्रगीतासाठी अवघे ५२ सेकंद का उभे राहू शकत नाही ? - सौ. पंकजा मुंडे-पालवे

      मुंबई - राष्ट्रगीताचा आदर राखायलाच हवा. हॉटेल, शॉपिंग सेंटर, डिस्को इतकेच नाही, तर चित्रपटाच्या तिकिटासाठी रांगेत उभे रहाता. मग त्याच चित्रपटाच्या पूर्वी राष्ट्रगीतासाठी अवघे ५२ सेकंद का उभे राहू शकत नाही, असे महिला आणि बालकल्याणमंत्री सौ. पंकजा मुंडे-पालवे यांनी म्हटले आहे. चित्रपटगृहात राष्ट्रगीताच्या वेळी उभे न रहाणार्‍या मुसलमान कुटुंबाला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. त्या प्रकरणावरून त्यांनी हे आपले मत व्यक्त केले आहे.

मध्य रेल्वेच्या १५ डब्यांच्या गाड्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाही !

      मुंबई - पुष्कळ गर्दीमुळे गेल्या काही दिवसांत रेल्वेच्या अपघातांत वाढ झाली असली, तरी सध्या मध्य रेल्वेच्या १५ डब्यांच्या गाड्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाही. अतिरिक्त गाड्या उभ्या करण्यासाठी आवश्यक असलेली यार्डसाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने मध्य रेल्वेला १५ डब्यांच्या नव्या गाड्या चालवणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नसल्याचे मध्य रेल्वेच्या एका अधिकार्‍याने स्पष्ट केले आहे.

चिन्मय संदेश ज्योती यात्रेचे आज बेळगावात आगमन !

      बेळगाव - गुरुदेव स्वामी चिन्मयानंद यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षानिमित्त काढण्यात आलेल्या चिन्मय संदेश ज्योती यात्रेचे आगमन शुक्रवार, ४ डिसेंबर या दिवशी के.एल.ई. येथे होणार आहे. त्या निमित्ताने भाग्यनगरपर्यंत दुचाकी आणि चारचाकी वाहनांची फेरी काढण्यात येणार आहे. ही ज्योती दुपारी १२ वाजता भाग्यनगर येथील चिन्मय वंदन आश्रम येथे पोहोचणार आहे.

बॅनर्जी यांनी चिदंबरम् यांच्याकडून शिकून माझ्या मालिकेवरील बंदी उठवावी !

  • तस्लीमा नसरीन यांच्या मालिकेवर बंदी घालणे ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी नाही का ? ममता बॅनर्जी यांच्या असहिष्णुतेविषयी तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी का बोलत नाहीत ?
  • लेखिका तस्लिमा नसरीन यांचा बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सल्ला
    कोलकाता - बांगलादेशात धर्मांधांकडून अल्पसंख्यांक हिंदूंवर होत असलेले अत्याचार जगासमोर आणणार्‍या लेखिका तस्लिमा नसरीन यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम् यांच्याकडून शिकण्याचा सल्ला दिला आहे. प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्या पुस्तकावर माजी पंतप्रधान राजीव यांनी लावलेली बंदी चुकीची होती, असे चिदंबरम् यांनी नुकतेच मान्य केले आहे. या पार्श्‍वभूमीवर बॅनर्जी यांनी चिदंबरम् यांच्याकडून शिकून त्यांची चूक मान्य करावी, असे तस्लिमा यांनी म्हटले आहे. तस्लिमा यांनी स्वत: लिहिलेल्या आणि दूरचित्रवाहिनीवर प्रसारित होणार्‍या मालिकेवर बॅनर्जी यांनी बंदी घातली आहे. ही बंदी हटवावी, अशी मागणीही तस्लिमा यांनी बॅनर्जी यांच्याकडे केली आहे.

बाबरी मशिदीच्या पतनदिनी तिरुपती येथील सुरक्षा कडक करणार !

आतंकवादी आक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर 
मंदिरांची सुरक्षा वाढवण्यासारखी वरवरची उपाययोजना 
करण्याऐवजी आतंकवाद्यांच्या विरोधात धडक कृती करणे अपेक्षित आहे !
     तिरुपती - बाबरी मशीद ६ डिसेंबर या दिवशी उद्ध्वस्त करण्यात आली होती. देशातील मुसलमान या दिवशी शोक दिवस पाळतात. या दिवशी देशात आतंकवादी आक्रमणे होण्याची शक्यता असते. या कारणास्तव तिरुपती देवस्थानची सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे. ४, ५ आणि ६ डिसेंबर या दिवशी तिरुपती मंदिरात जंगलातून येणार्‍या मार्गावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे; मात्र या व्यवस्थेचा भाविकांवर विपरीत परिणाम होणार नाही. प्रत्येक वर्षी डिसेंबर मासात मंदिरात भाविकांची गर्दी असते. अनेक भाविक मंदिरात दर्शनासाठी येतांना जंगलातील पायवाटांचा वापर करतात. त्याचा अपलाभ घेऊन कुणी आतंकवादी कारवाया करू नये; म्हणून सतर्कता बाळगण्यात येत आहे.

टी.एस्. ठाकूर भारताचे नवे सरन्यायाधीश

     नवी देहली - सरन्यायाधीश एच्.एल्. दत्तू २ डिसेंबर या दिवशी निवृत्त झाल्याने रिक्त झालेल्या सरन्यायाधीशपदी टी.एस्. ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे. ठाकूर यांची नियुक्ती एक वर्षासाठी करण्यात आली असून ते ४ जानेवारी २०१७ या दिवशी निवृत्त होणार आहेत. लवकरच ते राष्ट्र्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून राष्ट्रपती भवनामध्ये पदाची शपथ घेणार आहेत. ठाकूर यांचा जन्म ४ जानेवारी १९५२ या दिवशी झाला. जम्मू आणि काश्मीरच्या उच्च न्यायालयात ठाकूर यांनी त्यांच्या कारकीर्दीला प्रारंभ केला होता. वर्ष १९९० मध्ये त्यांची जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून निवड झाली होती. त्यांनी कर्नाटक आणि देहली येथील उच्च न्यायालयांत न्यायाधीश म्हणून काम पाहिले आहे. वर्ष २००८ पासून ते देहली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम पहात होते. वर्ष २००९ मध्ये त्यांची निवड सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी झाली होती. आय.पी.एल्. अपहार, तसेच स्पॉट फिक्सिंग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या खंडपिठाचे त्यांनी नेतृत्वही केले आहे.

४ सहस्र २६८ कोटी रुपयांचा डाळघोटाळा झाल्याचा आरोप

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशीची मुंबई ग्राहक पंचायतीची मागणी
      मुंबई - डाळीच्या प्रकरणामध्ये ४ सहस्र २६८ कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून याची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या माध्यमातून चौकशी व्हावी, अशी मागणी मुंबई ग्राहक पंचायतीने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तूरडाळीची किंमत न्यून करण्याच्या संदर्भात केंद्रशासनाने राज्यशासनाला वारंवार निर्देश देऊनही या किमती न्यून झाल्या नाहीत, ही गंभीर गोष्ट आहे, असे पंचायतीने म्हटले आहे. मुंबई ग्राहक पंचायतीने या प्रश्‍नाची तड लावायची ठरवली आहे,
धार्मिक सणांचे पावित्र्य जपण्यासाठी प्रशासनाने घेतलेला स्तुत्य निर्णय
     आळंदी - कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने आळंदी येथे प्रतिवर्षी तमाशांचे फड रंगतात. याविषयी अनेक भाविक आणि वारकरी यांनी असंतोष व्यक्त करून फड बंद करण्याची मागणी केली होती. त्यानंतर यंदा प्रथमच आळंदी नगर परिषद आणि स्थानिक पोलीस यांनी तमाशाच्या फडांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

(म्हणे) चित्रपट कलाकार सर्वांत अधिक अपकीर्त ! - अभिनेता अमिताभ बच्चन

टीका सहन करावी लागेल, अशी विधाने करायची आणि 
टीका झाल्यावर अपकीर्त झाल्याचा गवगवा करायचा !
      मुंबई - चित्रपट कलाकार वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत रहातात. आमच्याविषयीच अधिक चर्चा होत असते. त्यामुळे आम्ही सर्वांत जास्त अपकीर्त आहोत. आमच्यासाठी ही आश्‍चर्याची गोष्ट नाही. टीका सहन करण्याचा सराव आम्ही फार पूर्वीपासून केला आहे, असे अभिनेता अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगवर म्हटले आहे. (अभिनेता अमिताभ बच्चन यांचे हे विधान म्हणजे चोराच्या उलट्या...! - संपादक). अभिनेता शाहरूख खान आणि अभिनेता अमीर खान यांनी देशातील असहिष्णुतेविषयी केलेल्या विधानांच्या अनुषंगाने त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

खोट्या शिक्षक मान्यतेप्रकरणी शिक्षणाधिकार्‍यांनी दिलेला अहवाल केवळ एकपानी !

शिक्षणक्षेत्रातील अनागोंदी !
पुन्हा सविस्तर अहवाल सादर करण्याचा आदेश
      पुणे - सध्या माध्यमिक शिक्षण विभागात शिक्षकांच्या खोट्या नियुक्त्या झाल्याचे प्रकरण चालू आहे. हे गंभीर प्रकार घडत असतांनाच त्याच्या चौकशीविषयी शिक्षण आयुक्तांनी सविस्तर अहवाल देण्याचा आदेश दिला होता. असे असतांनाही जिल्हा शिक्षण अधिकारी हारुण अत्तार यांनी त्या मान्यतांविषयीचा एक पानी मोघम अहवाल शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांना २५ नोव्हेंबर या दिवशी सादर केला.

काँग्रेस शासनाच्या काळात ४० चित्रपटांतील अयोग्य दृश्ये आणि संवाद सेन्सॉर बोर्डने हटवले होते !

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली भाजप शासनाला 
केवळ विरोधासाठी विरोध करण्याचे काँग्रेसचे खरे स्वरूप उघड !
    देहली - सध्याचे चित्रपट परिनिरीक्षण मंडळ चित्रपटांतील चुंबन दृश्ये, अपशब्द आणि अश्‍लील दृश्ये मोठ्या प्रमाणात हटवत आहे, असा आरोप करून भाजप शासनाच्या कार्यकाळातील हे परिनिरीक्षण मंडळ अतीसंस्कारी आहे, असा कांगावा केला जात आहे; मात्र काँग्रेस शासनाच्या काळात वर्ष २०१३-१४ मध्ये तब्बल ४० चित्रपटांतील अशी अनेक दृश्ये तत्कालीन चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने हटवली असल्याचे उघड झाले आहे. मर्डर-३, घनचक्कर, मेगामाइंड, रोबोकॉप, क्विन, रागिनी एम्एम्एस्-२, हेट स्टोरी-२, हम्प्टी शर्मा की दुल्हनिया आणि हाइवे आदी अनेक चित्रपटांतील दृश्यांची काटछाट करण्यात आली होती. सध्याच्या सेन्सॉर बोर्डने २ सहस्रांहून अधिक चित्रपटांना संमती दिली आहे. चित्रपट परिनिरीक्षण मंडळाकडे आता एकही चित्रपट प्रलंबित नाही, असे सूत्रांनी सांगितले.

हिंदूसंघटनानेच आपण हिंदूंवरील अन्याय रोखू शकतो ! - रमेश शिंदे

बिलासीपाडा, जिल्हा धुबरी (आसाम) येथे 
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्याख्यान
व्यासपिठावर डावीकडून श्री. विश्‍वनाथ कुंडू, 
श्री. चित्तरंजन सुराल, बोलतांना श्री. रमेश शिंदे आणि इतर
     बिलासीपाडा (आसाम) - केवळ आसाम राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशभरात आज हिंदूंवर अन्याय होत आहेत. भारतात हिंदू बहुसंख्य असतांना एकीकडे त्यांच्यावर अन्याय केले जातात अन् पुन्हा त्यांनाच असहिष्णु ठरवले जाते. येथे हिंदू लक्षातच घेत नाहीत की, आज ज्या कारणामुळे अल्पसंख्य भारतात वरचढ ठरत आहेत, ते त्यांचे बलस्थान असलेला संघटितपणा जो आता हिंदूंनीही अंगीकारला पाहिजे. हिंदू वेगवेगळ्या गटा-तटांतून राजकीय पक्ष आणि संघटना यांच्यावरच अवलंबून रहात आहेत; त्याऐवजी त्यांनी संघटितपणा अवलंबल्यास एक हिंदू शक्ती उदयास येईल आणि आपोआपच राजकीय पक्ष त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देतील अन् हिंदूंवरील अन्याय दूर होईल, असे वक्तव्य हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले. ते बिलासीपाडा येथील जैन धर्मशाळेतील सभागृहात उपस्थित हिंदुत्ववाद्यांना संबोधित करत होते.

पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांच्याविरुद्ध अब्रूनुकसानीचा फौजदारी खटला

अन्न आणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्यावरील आरोपाचे प्रकरण
     पुणे - नवाब मलिक यांच्याविरुद्ध बापट यांनी अब्रूनुकसानीचा फौजदारी खटला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी शीतल बांगड यांच्या न्यायालयात प्रविष्ट केला. त्यावर येत्या ७ डिसेंबर या दिवशी न्यायालय निर्णय देण्याची शक्यता आहे.
    राष्ट्रवादीचे नबाब मलिक यांनी १९ नोव्हेंबर या दिवशी मुंबई येथे पत्रकार परिषदेत म्हणाले होते की, राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी तूरडाळीचे निर्बंध शिथिल करून डाळ विकण्यास अनुमती देऊन २ सहस्र कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे.

पानसरे हत्या प्रकरणी तपास करणारे पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांची बदली

     कोल्हापूर - कॉ. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी तपास करणारे प्रमुख अधिकारी आणि सनातन संस्थेचे साधक श्री. समीर गायकवाड यांना अटक करणारे कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांची मुंबई पोलीस उपायुक्तपदी बदली झाली. त्यांच्या जागी नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधीक्षक प्रदीप देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
      भारत हे जगाचे देवघर आहे; मात्र इथला हिंदु विकलांग, भ्रष्ट आणि दुर्बल झाला आहे. स्वत्व, आत्मभान आणि राष्ट्रीयत्व गमावलेल्या हिंदूंना जागे करावे लागेल. हिंदुत्व हा आपला प्राण आहे. हिंदु समाजावरील आक्रमण थांबवण्यासाठी हिंदु समाज बलवान होण्याची गरज आहे.

एम्.आय.एम्.चे देशद्रोही इम्तियाज जलील यांची आमदारकी रहित करा ! - मनसे

      पुणे - चित्रपटगृहात वाजवण्यात येणार्‍या राष्ट्रगीताला विरोध करणारे एम्.आय.एम्.चे आमदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेने ३ डिसेंबर या दिवशी मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याच्या समोर संतप्त निदर्शने केली. या वेळी शासनाने जलील यांना देशद्रोही म्हणून घोषित करावे, त्यांना देशवासियांची क्षमायाचना करायला लावावी,
     मुंबई - समुद्रात होणार्‍या डिझेल तस्करीचा प्रयत्न यलो गेट पोलिसांनी हाणून पाडला आहे. इंडोनेशियातून आलेल्या जहाजातून सुमारे ११ सहस्र ३०० लीटर डिझेलची तस्करी पोलिसांनी पकडली असून सहा तस्करांनाही अटक केली आहे.
     अरबी समुद्रात भाऊचा धक्का आणि माझगाव डॉक येथील खोल समुद्रात डिझेलची तस्करी होणार असल्याचे पोलिसांना समजले. त्यांना एक टग आणि त्याच्या बाजूने चार मासेमारी बोटी उभ्या असल्याचे दिसले. डिझेलच्या टाक्यांमध्ये एका बोटीतून डिझेल भरणार्‍या मोहम्मद यासीन लकडावाला, मोनू सिंग, मोनुरुल मंडल, नौशाद कुरेळी, अकबर सुबनिया, आरीफ बाया यांना पोलिसांनी अटक केली. डिझेल ठेवलेली बोटही पोलिसांनी कह्यात घेतली.

फलक प्रसिद्धीकरता

डॉ. फारूख अब्दुल्ला यांची पाकधार्जिणी वृत्ती जाणा !
     पाकव्याप्त काश्मीर भारतात परत घेण्याची देहलीमध्ये एवढी ताकद नसून इस्लामाबादमध्येही काश्मीर घेण्याची ताकद नाही, असे विधान नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारूख अब्दुल्ला यांनी केले.

शनिशिंगणापूर मंदिरात महिलांना चौथर्‍यावर प्रवेश बंदी असेल, तर तो त्यांचा अपमान कसा ठरतो ? - पंकजा मुंडे-पालवे

धर्मशास्त्राला प्राधान्य देणार्‍या पंकजा पालवे-मुंडे यांचे अभिनंदन ! इतरांनी यातून बोध घ्यावा !
     मुंबई - शनिशिंगणापुरातील शनि मंदिरात महिलांना चौथर्‍यावर प्रवेश बंदी असेल, तर तो त्यांचा अपमान कसा ठरतो ? प्रथा-परंपरा पाळल्याच गेल्या पाहिजेत, असे स्पष्ट प्रतिपादन राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी केले. एका पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना पंकजा मुंडे-पालवे यांनी ही भूमिका मांडली. (सर्व स्तरांतून धार्मिक प्रथांना विरोध होत असतांना प्रथा-परंपरांना जपणे, योग्यच आहे, असे ठासून सांगणाचे धाडस राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी दाखवले, हे कौतुकास्पद आहे. - संपादक)

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : National Conference ke neta Dr. Farooq Abdullah ne kaha, Delhi me Pakvyapta Kashmir leneki takad nahi.
Inko Pakme hi bhej do !
जागो !
: नॅशनल कॉन्फरन्सके नेता डॉ. फारूख अब्दुल्लाने कहा, देहलीमें पाकव्याप्त काश्मीर लेने की ताकद नही ।
इनको पाकमेंही भेज दो !

आता ब्रिटनचेही सिरियावर आक्रमण

     लंडन - अमेरिका आणि रशिया नंतर आता ब्रिटनच्या रॉयल एअरफोर्स ने सिरियावर हवाई आक्रमण करण्यास प्रारंभ केला. (आय.एस्.आय.एस्.च्या विरोधात कठोर पावले उचलणार्‍या ब्रिटनकडून भारताने बोध घ्यावा ! - संपादक) २ डिसेंबर या दिवशी ब्रिटनच्या संसदेत मिळालेल्या मान्यतेनंतर अवघ्या एक घंट्यात वायूदलाने रात्री उशिरा टॉरनेडो आणि टायपून फायटर जेट सिरियाच्या दिशेने रवाना केले.

भाजपच्या ५०० मुसलमान उमेदवारांपैकी ४९० उमेदवार पराभूत

गुजरात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक
    कर्णावती (अहमदाबाद) - गुजरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मुसलमान उमेदवारांना तिकीट देण्याचा भाजपचा प्रयत्न साफ फसला. स्थानिक नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकांमध्ये पक्षाने दिलेल्या ५०० उमेदवारांपैकी ४९० मुसलमान उमेदवारांचा पराभव झाला आहे. त्यामुळे केवळ १० उमेदवारच या निवडणुकांमध्ये विजयी होऊ शकले. उना येथे ३६ पैकी ३५ ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. यात पक्षाच्या सर्व १० मुसलमान उमेदवारांचा समावेश आहे. कर्णावतीच्या मुसलमानबहुल भागात भाजपचे सर्व चारही उमेदवार निवडणूक हरले. पक्षाने सुरत वा बडोदा येथे कोणत्याही मुसलमान व्यक्तींना तिकीट दिले नव्हते.

बुहाना (राजस्थान) येथे गोरक्षा दल राजस्थानच्या वतीने आयोजित जनजागृती कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचाही सहभाग !

सीकर (राजस्थान) येथील मार्गदर्शनाला उपस्थित हिंदू
   बुहाना (राजस्थान) - गोरक्षा दल राजस्थान यांच्या वतीने २९ नोव्हेंबर या दिवशी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीही सहभागी झाली होती. समितीचे राजस्थान समन्वयक श्री. गजानन केसकर यांनी उपस्थितांना हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांविषयी संबोधित केले. या कार्यक्रमात गोरक्षा दल जयपूरचे सहप्रभारी श्री. प्रणव स्वामी, गोरक्षा दलाचे श्री. धर्मेंद्रजी, श्री. राजू तंवर, श्री. रवींद्र बुहाना, अधिवक्ता प्रवीण गौड, बुहाना गावचे माजी सरपंच श्री. रतन सिंह, तसेच ३० हून अधिक धर्माभिमानी युवक उपस्थित होते.

रेल्वे वाहतूक : संबंधित विभागांच्या अयोग्य कृती आणि अडचणी अन् अपघात

     
वाचा नवीन सदर
        रेल्वेचा उगम इंग्लंडमध्ये वर्ष १७८४ मध्ये झाला. नंतर ईस्ट इंडिया कंपनीने भारताच्या बंदरातील माल चटकन वाहून नेण्यासाठी १६.४.१८५३ या दिवशी मुंबई-ठाणे ही पहिली भारतीय रेल्वे चालू केली. पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर देशात विविध ठिकाणी प्रवासी आणि माल यांची वाहतूक करणार्‍या रेल्वेचे सर्वाधिकार भारतीय रेल्वेकडे देण्यात आले. या रेल्वे खात्याचा कारभार पहाण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळात एक स्वतंत्र मंत्री नेमलेला असतो.

सनातनविरोधी षड्यंत्रामुळे निरपराध साधकांना द्यावी लागली अग्नीपरीक्षा !

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे आणि त्यांच्या 
कुटुंबियांचे भीषण अनुभव !
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास, साधकांच्या कुटुंबियांना दिलेले त्रास इत्यादी छळांची मालिका येथे देत आहोत

हिंदूंना संपवण्याची भाषा करणारेच असहिष्णुता निर्माण करत आहेत ! - अरविंद पानसरे, राज्य प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

टी.व्ही. ९ वृत्तवाहिनीवरील चर्चासत्र
श्री. अरविंद पानसरे
     मुंबई - देशात घटना घडत असतात. काँग्रेसच्या काळातही घडत होत्या. त्यापूर्वीही घडल्या आहेत. जाणीवपूर्वक असे वातावरण निर्माण केले जात आहे की, असहिष्णुता वाढली आहे. तीन खानांचे लाखो प्रेमी हिंदू आहेत. हा देश असहिष्णु असता, तर हे शक्य झाले असते का ? १५ मिनिटांत हिंदूंना संपवण्याची भाषा करतात, तेच खरे असहिष्णु आहेत. देशात सहिष्णुता आहे; म्हणूनच त्यांना असे बोलायचे धैर्य झाले आहे, असे सडेतोड प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राज्य प्रवक्ते श्री. अरविंद पानसरे यांनी केले. अमीर खानची देश सोडण्याची भाषा योग्य आहे का ? या विषयावर टी.व्ही. ९ वाहिनीवर झालेल्या चर्चासत्रात ते बोलत होते.

भारतातील मुसलमान अन्य देशांतील मुसलमानांकडून कडवी शिकवण घेत आहेत का ?

तवलीन सिंह
     प्रेषितांचा काळ अत्यंत चांगला होता आणि त्या काळात मुसलमानांनी जायला पाहिजे असे वाटणारे मुसलमान जिहादी आतंकवादाचा इस्लाम धर्माशी थेट संबंध आहे, असेच मानतात. पॅरिसवर आक्रमण झाल्यानंतर दोन थापा वारंवार दूरचित्रवाहिन्यांवर मुख्य वेळेत आणि वृत्तपत्रांच्या संपादकियांमध्ये मारल्या जात आहेत. एक म्हणजे जिहादचा इस्लामशी कोणताही संबंध नाही आणि दुसरी सर्व धर्म समान आहेत अन् सर्व धर्मांत वाईट माणसे असतात ती धर्माचा चुकीचा अर्थ लावतात. अशा थापांमुळे ज्यांचा या क्रूर आक्रमणांत दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या स्मृती पुसल्या जात आहेत. तरीही अशी मिथके पसरवणे पुन:पुन्हा चालूच आहे. मुसलमानांची जगातील दुसरी मोठी लोकसंख्या भारतात आहे; मात्र आम्ही सत्याला सामोरे जाण्यास घाबरत आहोत. प्रेषित महंमद यांचा काळ चांगला काळ मानून मुसलमानांनी त्या काळात जावे असे सांगितले जात असले, तरी सत्य हे आहे की, जिहादचा संबंध थेट मुसलमान धर्माशी आहे.

जनलोकपाल आंदोलनाच्या सूत्रावर निवडून आलेल्या आपकडून देहलीत जनलोकपालाविषयी बनवाबनवी !

१. लोकपाल कायदा संमत करण्याविषयी आम आदमी पक्षाचा कानाडोळा !
    कार्ल मार्क्सने असे म्हटले होते की, इतिहासाची पुनरावृत्ती होत असते, पहिल्यांदा शोकात्मिका म्हणून; पण दुसर्‍यांदा मात्र फार्स म्हणून ! भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाच्या संदर्भात सध्या याचाच अनुभव येत आहे. राजधानीत चार वर्षांपूर्वी एक अभूतपूर्व आंदोलन झाले होते. लाखो लोकांसाठी धरणे आंदोलनाचा तो पहिलाच अनुभव होता. त्यातून नवी आशा निर्माण झाली. रामलीला मैदानात खुल्या आकाशाखाली जन्मलेल्या त्या आशेचीच आज दिवसाढवळ्या हत्या केली जात आहे. वाईट गोष्ट अशी की, जे लोक चार वर्षांपूर्वी या आंदोलनाच्या प्रसवक्रियेत दाईची भूमिका पार पाडत होते, ते आज त्याच आंदोलनाचा गळा घोटतांना दिसत आहेत, ही शोकात्मक बाब आहे. त्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाची हत्याच जणू वाढदिवसासारखी साजरी केली आहे, हा तर निव्वळ फार्सच ठरेल. ज्या पक्षाने जनलोकपालच्या सूत्रावर शासन स्थापन केले, निवडणुकीत प्रचाराचे सूत्र केले, तोच पक्ष आता त्या सूत्रावर खुर्ची वाचवण्याची भाषा करत आहे. गेल्या खेपेस जेव्हा आम आदमी पक्षाचे शासन होते, तेव्हा (फेब्रुवारी २०१४) त्यांनी लोकपाल कायद्याच्या सूत्रावर त्यागपत्र दिले होते. त्या वेळी सर्वांना वाटले की, या वेळी शासन स्थापन झाल्यावर हा पक्ष विनाविलंब लोकपाल कायदा संमत करील. त्यानंतर शासन स्थापन होऊन नऊ मास लोटले, तरी आम आदमी पक्षाने त्याकडे कानाडोळा केला. अनेकदा विचारणा झाल्यानंतर शासन त्यावर विचार करत आहे, असे गुळमुळीत उत्तर दिले.

साधनेची सप्तपदी

साहाय्य करू एकमेका होण्या साधनामय संसार ।
टाक पहिले पाऊल, नाम घेत भगवंताचे ।
होईल कल्याण तुझ्या आयुष्याचे ॥ १ ॥

दुसरे पाऊल आहे गं, सत्संगाचे ।
चिंतन सांगून एकमेका साहाय्य करण्याचे ॥ २

कर्जवसुली केव्हा ?

     गेल्या आठवड्यामध्ये अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राष्ट्रीयकृत अधिकोषांचे अध्यक्ष आणि प्रतिनिधी यांच्यासमवेत एक बैठक घेतली. ही बैठक मुख्यत्वे अधिकोषांमधील थकीत, कमकुवत कर्जे आणि त्यामुळे निर्माण झालेली समस्या या निमित्ताने आयोजित केली होती. या बैठकीमध्ये अर्थमंत्र्यांनी अधिकोषांना आपापले ताळेबंद स्वच्छ करण्यावर त्वरित कार्यवाही करण्याची आवश्यकता अधोरेखित केली.

चि.सौ.कां. अश्‍विनी विभांडिक हिला तिचे आई-वडील, सासू-सासरे आणि भावी यजमान यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

     आदर्श आई-वडील, सासू-सासरे आणि पती-पत्नी कसे असतात, याचे उदाहरण कु. अश्‍विनी विभांडिक हिने या लेखात दिले आहे. नवविवाहितांसोबत त्यांच्या कुटुंबियांचीही साधनेत प्रगती होवो, ही कृष्णचरणी प्रार्थना ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२.१२.२०१५)
१. आई-बाबा
१ अ. मुलीचा विवाह म्हणजे गुरुकार्यच असल्याचा भाव ठेवून स्थिर रहाणारे ६२ टक्के पातळी असणारे श्री. धनराज विभांडिक (अश्‍विनीचे बाबा) ! : माझा विवाह निश्‍चित झाला, तेव्हा आई-बाबांचा सर्व काही गुरूंच्या कृपेमुळे होत आहे, असा भाव होता. विवाहाला अल्प दिवस असल्याने माझ्या मनात सर्वकाही व्यवस्थित व्हायला हवे, असे विचार येत होते. मला याचा ताणही होता.

थेट विदेशी गुंतवणुकीचे असेही परिणाम !

   अलीकडेच मोदी शासनाने थेट विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढवले आहे. उदा. पूर्वी विदेशी गुंतवणुकीची मर्यादा २५ टक्के होती, ती आता ७५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. अशी गुंतवणूक वाढ १५ वेगवेगळ्या क्षेत्रांत करायला शासनाने संमती दिली आहे. त्यामुळे विदेशी आस्थापने भारतात भरपूर पैसा ओततील आणि देशात विदेशी चलन वाढेल अन् रुपयाची किंमत न्यून होईल.

साधनेची तळमळ आणि प्रेमभाव असणारे चि. कार्तिक साळुंखे आणि चि.सौ.कां. अश्‍विनी विभांडिक

चि. कार्तिक साळुंखे
चि.सौ.कां. अश्‍विनी विभांडिक
      देहली येथे सेवा करणारे मूळचे डोंबिवली येथील चि. कार्तिक साळुंखे आणि रामनाथी आश्रमात सेवा करणार्‍या मूळच्या खामगाव, बुलढाणा येथील चि.सौ.कां. अश्‍विनी विभांडिक हे आज कार्तिक कृष्ण पक्ष नवमी (४.१२.२०१५) या दिवशी विवाहबद्ध होत आहेत. यानिमित्त सहसाधकांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

आग रामेश्‍वरी, बंब सोमेश्‍वरी !

     शासकीय कर्मचार्‍यांना मनःशांती मिळावी; म्हणून त्यांच्या कार्यालयांत त्यांना योगासने शिकवण्याचा कार्यक्रम चालू झाला; पण या शासकीय कर्मचार्‍यांना योगासने शिकवून त्यांना मनःशांती लाभेल, असे मला वाटत नाही. अलीकडे सर्व शासकीय कार्यालये, वीज महामंडळ, एस्.टी. महामंडळ, बँका अशा सर्वच क्षेत्रांत फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे. शिपायापासून ते साहेबापर्यंत सगळ्यांना टेबलाखालून किंवा टेबलावरूनही पैसे खायला घालावे लागतात, असे प्रत्येक माणूस सांगतो. आपल्या देशातील प्रत्येक माणूस विकला गेला आहे. केवळ शासकीय कर्मचार्‍यांनाच नव्हे, तर कुणालाही सुखाने झोप यायला हवी असेल किंवा त्याला चांगली भूक लागायची असेल, तर त्याने सदाचाराने वागावे. मगच त्याला सुखाची झोप येईल आणि त्यामुळे त्याची प्रकृतीही चांगली राहील. योगासनांना माझा विरोध मुळीच नाही; पण त्यांनी स्वच्छ कारभार केला, तरच ते सुखी होतील अन्यथा रोग एक आणि औषध मात्र दुसरेच असे होईल.
- भारती के. भातखंडे, मुरबाड (संदर्भ : प्रज्वलंत, जुलै २००२)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
 सनातनचे श्रद्धास्थान
गुरूंकडे काय मागावे ?
माझ्याकडे सुख मागू नका, दुःख सहन करण्याचे बळ मागा.
भावार्थ : सुख हे प्रकृतीतील असल्याने अशाश्‍वत असते, म्हणून गुरूंकडे मागू नये. तसेच हेही लक्षात ठेवले पाहिजे की, शाश्‍वत आनंद मिळवून देणे, हेच गुरूंचे खरे कार्य असते. प्रारब्धामुळे दुःख भोगावे लागणार असल्यास, त्या दुःखदायक प्रसंगांमुळे होणारे दुःख सहन करण्याची शक्ती मात्र गुरु निश्‍चित (नक्कीच) देतात; म्हणून ती मागायला आडकाठी (हरकत) नाही
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
      बुद्धीप्रामाण्यवादी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले आणि विद्रोही केवळ धर्मप्रेमींचा द्वेष करायला शिकवतात, तर सनातन संस्था सर्वांवर प्रीती (निरपेक्ष प्रेम) करायला शिकवते.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

साधक
    साधक जेव्हा एखाद्या गोष्टीचा निर्धार करतो आणि निर्धाराला दृढतापूर्वक चिकटून रहातो, तेव्हा उद्दिष्टपूर्ती होणे लांब राहत नाही.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥

(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

रेल्वेतील गर्दीचे बळी !

   मुंबईतील सर्वांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी पोहोचवणार्‍या लोकलगाड्या हा मुंबईकरांच्या इतका जिव्हाळ्याचा विषय आहे की, त्या लोकलगाड्यांतील गर्दीला त्यांनी स्वीकारले आहे. दिवसेंदिवस ही गर्दी भयावह रूप धारण करत असली, तरी तो आपल्या जीवनाचा अविभाज्य भागच आहे, असे मुंबईकर धरून चालले आहेत. अर्थात् त्यावरील उपाययोजना ठाऊक नसल्याने त्यांच्याजवळ दुसरा पर्यायही उपलब्ध नाही. मुंबईतील जवळ जवळ प्रत्येक स्थानकामध्ये रेल्वे डब्यातून उतरून स्थानकाबाहेरील रिक्शातळ किंवा बाजार येथपर्यंत येईपर्यंत अक्षरशः प्रचंड गर्दीच्या लोंढ्यातूनच जावे लागते. मुंबईत प्रतिदिन प्रवास करणार्‍यांनी या गर्दीच्या अडचणीवर त्यांच्या त्यांच्या स्तरावर लोकलगाडीत चढण्या-उतरण्याचे विविध उपाय काढले आहेत आणि त्याचा त्यांना सराव झाला आहे; परंतु या चढण्या-उतरण्याच्या सर्कशीत एखादा चुकला, तर थेट त्याच्या जिवावर बेतते. दोन दिवसांपूर्वी बळी गेलेल्या भावेश नावाच्या तरुणाचे चालत्या रेल्वेडब्यातून पडतांनाचे चित्रीकरण केले गेल्याने हा प्रश्‍न ऐरणीवर आला. या संदर्भात त्याच्या मित्राने व्यक्त केलेली प्रतिक्रिया बोलकी होती. 

धोक्याची घंटा आणि आत्मपरीक्षण !

   बिहार विधानसभा निवडणुकीनंतर आता नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने बर्‍याच मोठ्या प्रमाणात विजय मिळवला आहे. बिहार निवडणुकीत भाजपला अल्प मते मिळाल्यानंतर हा एकूूण पक्षाचा पराभव कि मोदींचा पराभव अशा चर्चा रंगल्या होत्या. मागील तीन निवडणुकांमध्ये गुजरातमध्ये भाजपला निर्विवाद बहुमत मिळाले होते. त्यानंतर आलेल्या मोदी लाटेने भारतीय जनतेत आशेचा किरण निर्माण झाला आणि देशात सत्तांतर झाले. जसजसे दिवस जाऊ लागले तसे देशातील सर्वच क्षेत्रांतील समस्या आणि अडचणी यांसदर्भात कुठे आहेत अच्छे दिन ? असा प्रश्‍न केला जाऊ लागला. महागाईसारख्या प्रश्‍नांमुळे विरोधकांच्या हातात आयते कोलीत मिळाले आहे. काळा पैसा अद्याप तरी भारतात येण्याच्या हालचालींविषयी ठोस माहिती मिळत नसल्याने ती वल्गनाच ठरेल कि काय असे वाटू लागले. राम मंदिर आणि ३७० कलम यांवर भाजप नेत्यांची मतमतांतरे ऐकू येत असल्याने हिंदुत्ववाद्यांमध्येही काहीसे निराशेचे वारे वाहू लागले. त्यात भरीसभर म्हणून विरोधी पक्षांनी दादरी प्रकरण अवास्तव वाढवले. त्यात समाजवादी आणि साम्यवादी यांनी पुरस्कृत केलेली पुरस्कारवापसीची चळवळ आणि प्रसारमाध्यमांकडून शासनाची अपकीर्ती करण्यासाठी राबवली जाणारी असहिष्णुतेची चळवळ यामुळे देशातील शासनविरोधी वातावरणात भर पडली आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn