Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

चेन्नईत पावसामुळे हाहा:कार :१८९ जण मृत्यूमुखी  • साहाय्यासाठी सैन्याला पाचारण    
  • पंतप्रधानांनी बोलावली आपत्कालीन बैठक    
  • पुढील ४८ घंट्यांत आणखी जोरदार पावसाची चेतावणी
अतिवृष्टि: अनावृष्टि: शलभा मूषका: शुका: । 
स्वचक्रं परचक्रं च सप्तैता ईतय: स्मृता: ॥  
                                   - कौशिकपद्धति
अर्थ : धर्माचे पालन न केल्यामुळे अतीवृष्टी, अनावृष्टी (दुष्काळ), टोळधाड, उंदरांचा त्रास, पोपटांचा उपद्रव, आपापसांत लढाया आणि शत्रूचे आक्रमण, अशी सात प्रकारची संकटे (राष्ट्रावर) येतात.
तात्पर्य, प्रजा आणि राजा, दोन्हीही धर्मपालक आणि साधना करणारे हवेत. तरच आपत्काळाची तीव्रता अल्प होईल किंवा आपत्काळ सुसह्य होईल.                                 
चेन्नई (तमिळनाडू) - तमिळनाडूमध्ये पावसाचे थैमान चालूच असून येथे वादळ आणि पावसाने धुमाकूळ घातला आहे. गेल्या मासापासून येथे जोरदार वादळी वारे आणि पाऊस चालू आहे. राजधानी चेन्नईसह राज्यभरात पावसामुळे आतापर्यंत १८९ जण मृत्यूमुखी पडले आहेत. पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले असून शाळा-महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे, तर विमानसेवा ठप्प आणि रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. चेन्नई येथील आपद्परिस्थितीत साहाय्यकार्य करण्यासाठी सैन्यदलाला पाचारण करण्यात आले आहे. १ डिसेंबरला येथे १४ घंट्यांत २० मि.मी. पावसाची विक्रमी नोंद झाली. मागील १०० वर्षांत चेन्नईमध्ये एका दिवसात पडलेला हा सर्वाधिक पाऊस आहे. वेधशाळेने पुढील ४८ घंट्यांत चेन्नईला आखणी जोरदार पावसाचा तडाखा बसण्याची चेतावणी दिली आहे.

गोमातेच्या रक्षणासाठी मरण्याची आणि मारण्याचीही सिद्धता आहे ! - आमदार टी. राजासिंह, भाजप

टी. राजासिंह यांच्या विरोधात गुन्हा नोंद
भाग्यनगर (हैद्राबाद) - गोमातेचे रक्षण करण्यासाठी आम्ही काहीही करायला सिद्ध आहोत. मरण्याची आणि मारण्याचीही आमची सिद्धता आहे. 'भाग्यनगरमध्ये कुणी 'बीफ फेस्टिव्हल' (गोमांस उत्सव) आयोजित करण्याचा प्रयत्न केला, तर भाग्यनगरचे दादरी करून टाकू', अशी चेतावणी भाजपचे गोशामहल येथील विधानसभा मतदारसंघाचे आमदार  टी. राजासिंह यांनी दिली आहे. या प्रकरणी राजासिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात एक सैनिक हुतात्मा

भारत फ्रान्सप्रमाणे आतंकवादाचा बीमोड कधी करणार ?
रायपूर - छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात एक सैनिक हुतात्मा, तर एक जण घायाळ झाला आहे, अशी माहिती अधिकार्यांनी दिली. कांकेर जिल्ह्यातील कोयलीबेडा भागात १ डिसेंबर या दिवशी उशिरा ही घटना घडली. नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात २ सैनिक घायाळ झाले होते. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान एका सैनिकाचा मृत्यू झाला.

जबलपूर येथे देशद्रोही महंमद अन्सारी याला राष्ट्रप्रेमी अधिवक्त्यांनी न्यायालयातच चोपले !

आता राष्ट्रप्रेमींच्या या कृतीलाही कथित धर्मनिरपेक्षतावादी असहिष्णुता ठरवतील !
फेसबूकवर भारताचे अवमानकारक चित्र पोस्ट केल्याचे प्रकरण 
     जबलपूर (मध्यप्रदेश) - येथील मदार छल्ला मोहल्ल्यात रहाणार्‍या आणि येथील जी.एस्. महाविद्यालयात शिकणार्‍या महंमद शहजाद अन्सारी याने त्याच्या फेसबूकवर भारताचे अवमान करणारे चित्र पोस्ट केले होते. त्यामुळे त्याच्या विरोधात हिंदु धर्मसेनेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी त्याला न्यायालयात आणले असता राष्ट्रप्रेमी अधिवक्त्यांनी त्याला चांगलाच चोप दिला. अन्सारी हा काँग्रेस पक्षाची विद्यार्थी संघटना असलेल्या नॅशनल स्ट्युडंट्स युनियन ऑफ इंडियाचा सदस्य आहे. (देशद्रोह्यांचा भरणा असलेल्या काँग्रेसने भारतावर एवढी वर्षे राज्य केले, हे दुर्दैवी ! महंमदवर पक्ष काय कारवाई करणार, हेही पक्षाने जाहीर करावे ! - संपादक) 

गोमांस मेजवानीच्या आयोजकांवर कारवाई करा !

आमदार टी. राजा सिंह यांचा आदर्श इतरही लोकप्रतिनिधींनी घ्यावा !
 तेलंगणच्या उस्मानिया विश्‍वविद्यालयामध्ये आयोजित गोमांस मेजवानीचे प्रकरण प्रखर हिंदुत्ववादी आणि भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांची उस्मानिया विश्‍वविद्यालयाच्या उपकुलगुरूंकडे निवेदनाद्वारे मागणी
उपकुलगुरु श्रीमती रंजीव आचार्य यांना निवेदन देतांना आमदार टी. राजा सिंह
      भाग्यनगर - येथील उस्मानिया विश्‍वविद्यालयामध्ये होणार्‍या गोमांस मेजवानीच्या विरोधात येथील प्रखर हिंदुत्ववादी आणि भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांनी विश्‍वविद्यालयाच्या उपकुलगुरु श्रीमती रंजीव आचार्य यांना निवेदन दिले. या निवेदनात मेजवानीचे आयोजन करणार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 

मंदिरांमध्ये आध्यात्मिक वातावरण राखण्यासाठी भक्तांना वस्त्रांविषयीचे नियम असणे अनिवार्य ! - मद्रास उच्च न्यायालयाचा निर्देश

चेन्नई - देवस्थाने आणि मंदिरे येथे आध्यात्मिक वातावरण राखण्यासाठी भक्तांना वस्त्रांविषयीचे नियम (ड्रेसकोड) लागू करण्याचा निर्देश मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे. मंदिरांत पूजा आणि अभिषेक करण्यासाठी येणार्या  भाविकांना वस्त्रांविषयीचे नियम आखण्याचा आदेश तमिळनाडू शासन आणि धार्मिक संस्था यांना दिला आहे.
इस्लाम धर्मीय व्यक्ती मशिदीत प्रवेश करतांना वस्त्रांविषयी जागरूक असतात. त्यामुळे तमिळनाडूतील मंदिरांमध्ये पूजेसाठी येणार्या् भक्तांमध्ये आध्यात्मिक वातावरण राखण्यासाठी वस्त्रांविषयीचे नियम पाळणे अनिवार्य आहे, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. पुरुषांनी शर्टसह धोतर किंवा पायजमा किंवा साधी 'पॅन्ट' असा पोशाख घालावा, तर महिलांनी साडी किंवा सलवार-चुडीदार असा पोशाख परिधान करावा. लहान मुलांनी पूर्ण अंग झाकले जाईल, असे कपडे घालावेत असे न्यायालयाने सांगितले असून १ जानेवारी २०१६ पासून मंदिरांमध्ये या आदेशाचे पालन करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

अमीर खान आणि त्यांची पत्नी किरण राव यांच्याविरोधात प्रथमदर्शी अहवाल दाखल करा ! - न्यायालयाचे आदेश

     मुजफ्फरपूर (बिहार) - सहिष्णुतेच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या प्रकरणात अभिनेते आमिर खान आणि त्यांची पत्नी किरण राव यांच्या विरोधात प्रथम दर्शी अहवाल दाखल करावा, असा आदेश बिहारमधील एका न्यायालयाने १ डिसेंबर या दिवशी दिला. 
     अधिवक्ता श्री. सुधीर ओझा यांनी अमीर खान आणि त्यांची पत्नी किरण राव यांच्या विरोधात २५ नोव्हेंबर या दिवशी न्यायालयात तक्रार दाखल केली होती.

(म्हणे) 'चित्रपटगृहांमध्ये राष्ट्र्रगीताची आवश्यकता नाही !'

 एम्.आय.एम्.चे आमदार जलील यांचे देशद्रोही फुत्कार
राष्ट्रगीताची आवश्यकताही न समजणारे लोकप्रतिनिधी समाजासमोर काय आदर्श ठेवणार ?
संभाजीनगर - चित्रपटगृहांमध्ये राष्ट्र्रगीत म्हणण्याची आवश्यकता नाही, असे फुत्कार 'एम्.आय.एम्.'चे आमदार इम्तियाज जलील यांनी काढले आहेत. चित्रपटगृहांमध्ये लोक मनोरंजनासाठी जातात, तेथे राष्ट्र्रगीताची आवश्यकता काय ? असा प्रश्न उपस्थित करून चित्रपटगृहांमधील राष्ट्र्रगीत कोणाला राष्ट्र्रभक्त बनवू शकत नाही, असे सामाजिक संकेतस्थळावरील 'पोस्ट'वर जलील यांनी म्हटले आहे. मुंबईतील एका चित्रपटगृहात राष्ट्रगीत चालू झाल्यानंतर उठून उभे न रहाणार्या एका कुटुंबाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यानंतर राष्ट्रगीत विषयावर वाद चालू झाला आहे.

(म्हणे) मुसलमानांच्या देशनिष्ठेवर शंका नको ! - अलिगड विद्यापिठाचे कुलगुरु झमीरउद्दीन शाह

राष्ट्रगीत चालू असतांना उभे न रहाणे, भारतात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणे, देशात पाकचे झेंडे फडकावणे, शासनाच्या निर्णयांना विरोध करणे, वन्दे मातरम् म्हणण्याला विरोध करणे, यालाच मुसलमानांची देशनिष्ठा म्हणायची का ? अलिगड विद्यापिठाचे कुलगुरु नेमके कोणत्या देशनिष्ठेविषयी बोलत आहेत ? 
     अलिगड - 'भारत आमचा देश आहे आणि देशावर मुसलमानांची निष्ठा आहे. त्यामुळे आमच्या देशनिष्ठेविषयी कोणाला शंका उपस्थित करण्याचा अधिकार नाही. जे कोणी देश सोडण्याचा आम्हाला सल्ला देतात त्यांना हा अधिकार कोणी दिला', असा प्रश्‍न अलिगड मुसलमान विद्यापीठाचे कुलगुरु झमीरउद्दीन शाह यांनी केला आहे. 

'आय.एस्.आय.एस्'.च्या तळावर रशियाचे रासायनिक आक्रमण

आतंकवादाचा बीमोड करण्यासाठी आक्रमक धोरण अवलंबणारा रशिया !
     बैरूत,२ डिसेंबर - रशियाच्या विमानांनी 'आय.एस्.आय.एस्'.च्या कह्यात असलेल्या रक्काया ठिकाणावर रासायनिक आक्रमण केल्याचा दावा विविध वृत्त संकेतस्थळांनी केला आहे. एका वृत्तानुसार या आक्रमणात आतंकवाद्यांसह अनेक सामान्य नागरिक ठार झाले आहेत. काही चित्रफितींमध्ये विमानातून पांढरे फॉस्फरस खाली पडतांना दिसत आहे. चित्रफितीच्या सत्यतेला दुजोरा मिळाला नाही; मात्र रक्कामध्ये कार्यरत काही पत्रकारांनी दोन आक्रमणांमध्ये फॉस्फरसचा वापर झाल्याचे स्पष्ट केले. (भारतात आतंकवाद्यांनी अनेकदा आक्रमणे केली आहेत; मात्र रशियाप्रमाणे भारताने आतंकवाद्यांना प्रत्युत्तर दिले आहे का ? - संपादक) 

देशाच्या पोलीस दलातील मुसलमानांची आकडेवारी प्रसिद्ध करण्यास केंद्राचा नकार

     नवी देहली - केंद्रीय गृहखात्याच्या विभागांतर्गत कार्यरत असणारी राष्ट्रीय गुन्हे नोंदणी संस्था गेली १६ वर्षे तिच्या वार्षिक अहवालात देशातील पोलीस दलातील अनुसूची जाती, जमाती आणि मुसलमानांची संख्या उपलब्ध करून देत होती; मात्र या वर्षापासून मुसलमानांची अशी आकडेवारी देण्याचे बंद केले आहे, असे केंद्रीय गृहखात्याच्या सूत्राकडून समजले आहे. 

बॅनर्जी यांनी चिदंबरम् यांच्याकडून शिकून माझ्या मालिकेवरील बंदी उठवावी !

तस्लीमा नसरीन यांच्या मालिकेवर बंदी घालणे ही अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी नाही का ? ममता बॅनर्जी यांच्या असहिष्णुतेविषयी तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी का बोलत नाही ?
 लेखिका तस्लिमा नसरीन यांचा बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सल्ला 
     कोलकाता - बांगलादेशात धर्मांधांकडून अल्पसंख्यांक हिंदूंवर होत असलेेले अत्याचार जगासमोर आणणार्‍या लेखिका तस्लिमा नसरीन यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम् यांच्याकडून शिकण्याचा सल्ला दिला आहे. प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्या पुस्तकावर माजी पंतप्रधान राजीव यांनी लावलेली बंदी चुकीची होती, असे चिदंबरम् यांनी नुकतेच मान्य केले आहे. या पार्श्‍वभूमीवर बॅनर्जी यांनी चिदंबरम् यांच्याकडून शिकून त्यांची चूक मान्य करावी, असे तस्लिमा यांनी म्हटले आहे. तस्लिमा यांनी स्वत: लिहिलेल्या आणि दूरचित्रवाहिनीवर प्रसारित होणार्‍या मालिकेवर बॅनर्जी यांनी बंदी घातली आहे. ही बंदी हटवावी, अशी मागणीही तस्लिमा यांनी बॅनर्जी यांच्याकडे केली आहे.

अन्वेषण सीबीआयकडे सोपवण्याची बिहार शासनाची मागणी

 भगवान महावीर यांच्या मूर्तीच्या चोरीचे प्रकरण
     पाटणा - जामुई जिल्ह्यातील जैन मंदिरातून २ सहस्र ६०० वर्षांपूर्वीची भगवान महावीर यांची मूर्ती चोरीला गेल्याच्या घटनेची केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने चौकशी करावी, अशी मागणी बिहार शासनाने केली आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी याविषयी माहिती दिली. राज्य पोलिसांनी या चोरीचे अन्वेषण परिणामकारक पद्धतीनेच केले आहे; मात्र अशा प्रकरणांचा छडा लावण्यात सीबीआय पटाईत असल्याने राज्यशासनाने सीबीआयची या प्रकरणात चौकशीसाठी मागणी केली आहे, असेही नितीशकुमार म्हणाले. या चोरीप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आहे. २७ नोव्हेंबरला रात्री जैन मंदिरातून या मूर्तीची चोरी झाली होती.

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचा भ्रष्टाचार उघड करणार्‍या किशोर गंगणे यांच्याविरुद्ध १ कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा

* मंदिराच्या सरकारीकरणाचा दुष्परिणाम !
* दाव्यासाठीचा १ लक्ष २७ सहस्रचा व्यय भाविकांच्या अर्पणातून !
हिंदूंनो, या प्रकरणी संबंधितांची योग्य प्रकारे चौकशी होण्यासाठी शासनावर दबाव आणा !
मंदिर संस्थानची ही कारवाई म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखेच आहे.
अशा प्रकारची कारवाई करण्यामुळे मंदिर प्रशासनावर संशय आल्यास वावगे काय ?
     धाराशिव - श्री तुळजाभवानी मंदिरातील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे पुजारी मंडळाचे अध्यक्ष श्री. किशोर गंगणे यांनी उघड केली होती. संस्थानने कारभारातील अनागोंदी आणि भ्रष्टता करणार्‍यांवर कारवाई करण्याऐवजी उलट तो उघड करणार्‍या श्री. गंगणे यांच्या विरोधात धाराशिव येथील जिल्हा न्यायालयात १ कोटी रुपयांच्या अब्रूनुकसानीचा दावा प्रविष्ट केला आहे.

पोलीस अधिकारी कृष्णप्रकाश यांच्यावर असलेल्या विविध आरोपांचा विषय विधानसभेत मांडू ! - शिवसेना आमदार अनिल बाबर

निवेदन स्वीकारतांना (उजवीकडून दुसरे) आमदार श्री. अनिल बाबर आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

निवेदन स्वीकारतांना (उजवीकडून दुसरे) आमदार श्री. राजेश क्षीरसागर आणि अन्य
     विटा - पोलीस अधिकारी कृष्णप्रकाश यांच्यावर जे विविध आरोप आहेत, तो विषय विधानसभेत मांडू, असे आश्‍वासन येथील शिवसेनेचे आमदार श्री. अनिल बाबर यांनी दिले. हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने २ डिसेंबर या दिवशी भेट घेऊन आमदार श्री. बाबर यांना अधिवेशनाच्या कालावधीत विविध विषय मांडण्याच्या संदर्भात निवेदने दिली. त्या वेळी त्यांनी हे आश्‍वासन दिले.

मानखुर्द (मुंबई) येथे धर्मांधाकडून अल्पवयीन मतीमंद हिंदु मुलीचे अपहरण

पोलिसांकडून चुकीची तक्रार नोंद
लव्ह जिहादच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी शासन कृती करणार का ?
     मुंबई - मानखुर्द येथील एकतानगर परिसरातील १६ वर्षीय मतीमंद हिंदु मुलीला धर्मांध मोसिम खान (वय २३ वर्षे) याने २१ नोव्हेंबर या दिवशी लग्नाचे आमिष दाखवून रात्री ९ वाजता पळवून नेले. (हिंदूंनो, आपल्या मुलींना धर्मांधांच्या कह्यातून सोडवण्यासाठी संघटित व्हा ! - संपादक) मोसिमच्या वडिलांचा कुलाबा येथील कारागृहात मृत्यू झाला असून त्यांना स्वतःच्याच मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक झाली होती. मोसिमची आई एका बारमध्ये काम करते.

कुख्यात गुंड अबू सालेमचा कारागृहातील 'नवाबी' थाट कारागृह अधीक्षकांकडून उघड !

देशद्रोही गुन्हेगाराचा हा नवाबी थाट कारागृह अधीक्षकांनी इतकी वर्षे उघड न करणे, हे देशासाठी अत्यंत धोकादायक आहे ! आतंकवाद्याला 'शाही' वागणूक देणार्या  कारागृह प्रशासनातील उत्तरदायींवर शासन काय कारवाई करणार आहे ?
मुंबई - नवी मुंबईतील तळोजा कारागृहात छळ होत असल्याचा आरोप करणार्या गुंड अबू सालेमचा कारागृहातील 'नवाबी' थाट आता उघड झाला आहे. कारागृहातील सालेमचा शाही थाट इतर कुणी नव्हे, तर ज्यांच्यावर सालेमने छळाचा आरोप केला होता, ते कारागृह अधीक्षक हिरालाल जाधव यांनीच उघड केला आहे. सालेमचा छळ केल्याच्या आरोपावरून जाधव यांची सध्या चौकशी चालू आहे. (सालेमने कारागृह अधीक्षकांवर छळाचा आरोप करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा ! - संपादक) १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील आरोपी असलेल्या सालेमला कारागृहात प्रतिदिन अंघोळीसाठी गरम पाणी मिळते. तो कारागृहात सर्रासपणे भ्रमणभाष वापरतो. अन्य कैद्यांसमवेत मेजवान्या झोडतो. 

मंगळुरू (कर्नाटक) येथील श्री सुब्रह्मण्यम् मंदिरात ब्राह्मणांच्या उष्ट्या पत्रावळींवर लोळण घेण्याची प्रथा धर्मसंमत आहे का ?

'मंगळुरू येथील कुक्के श्री सुब्रह्मण्यम् मंदिरात प्रतिवर्षी कार्तिक कृ. षष्ठीला उत्सव असतो. या दिवशी देवतापूजनानंतर प्रथम ब्राह्मणभोजन केले जाते. या वेळी ब्राह्मणांनी भोजन केलेल्या केळीच्या उष्ट्या पत्रावळींवर भाविक लोळण घेण्याची प्रथा आहे. 'यामुळे त्वचारोग बरे होतात', अशी अनुभूतीही भाविकांना येते. काल ही प्रथा पार पडल्यानंतर 'ही प्रथा म्हणजे बहुजनांना तुच्छ लेखण्याचा प्रकार आहे', अशी आवई कर्नाटकमधील पुरोगाम्यांनी उठवली आहे, तर या प्रथेला अंधश्रद्धा ठरवून अंधश्रद्धा निर्मूलनवाद्यांनी विरोध केला आहे. या संदर्भातील सनातनचा दृष्टीकोन पुढे दिला आहे. 
१. मंगळुरू येथील श्री सुब्रह्मण्यम् मंदिरात ब्राह्मणांनी भोजन केलेल्या केळीच्या उष्ट्या पत्रावळींवर भाविक लोळण घेण्याची प्रथा ही एक रूढी आहे. ही रूढी धर्मशास्त्रसंमत नाही; म्हणजेच धर्मशास्त्रात याला कुठलाही आधार नाही. 
२. 'शास्त्रात् रूढिर्बलीयसी ।' म्हणजे 'रूढी शास्त्रापेक्षा अधिक प्रभावी असते.' याविषयी प्राचीन आणि आधुनिक अशा सर्व विधीशास्त्रज्ञांचे याविषयी एकमत आहे. रूढी प्रभावी असण्याचे एकमेव कारण म्हणजे त्याविषयी समाजमनात असलेली श्रद्धा ! 
३. ब्राह्मणांच्या उष्ट्या पत्रावळींवर लोळण घेतल्याने त्वचारोग बरे होण्यामागेही भाविकांची श्रद्धा कारणीभूत असते. गुरुचरित्रात म्हटले आहे, 
मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवज्ञे भेषजे गुरौ । यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवति तादृशी ॥ - श्रीगुरुचरित्र, अध्याय ९, श्लोक ४८
अर्थ : मंत्र, तीर्थस्नान, ब्राह्मण, देव, भविष्यवेत्ता, वैद्य आणि गुरु यांच्या संदर्भात ज्याची जशी श्रद्धा असेल, तशी सिद्धी (फळ) त्याला मिळते. यानुसार ब्राह्मणांविषयी श्रद्धा असलेल्यांना अशा प्रकारची अनुभूती येते.
४. या प्रथेमुळे समाजाची वा व्यक्तीची कोणत्याही प्रकारची शारीरिक, मानसिक आणि आर्थिक हानी होत नाही; उलट या प्रथेमुळे त्वचारोग बरे होत असल्याची अनुभूती अनेकांनी घेतली आहे. त्यामुळे या प्रथेविरुद्ध कांगावा करणे, हे अव्यावहारिक आहे. तरीही पुरोगामी आणि अंधश्रद्धा निर्मूलनवाले माध्यमांना हाताशी धरून त्याला विरोध करतात. या उलट धार्मिक उत्सवात होणार्या अनेक अनुचित प्रकारांमुळे व्यक्ती आणि समाज यांची शारीरिक, मानसिक आणि आर्थिक हानी होते. या अनुचित प्रकारांच्या विरोधात मात्र ही मंडळी 'ब्र'देखील काढत नाहीत. आध्यात्मिक संस्था किंवा धर्माचार्य यांनी या अपप्रकारांना विरोध केल्यास हीच माध्यमे लोकानुनयासाठी विरोध करतात. हा माध्यमांचा आणि पुरोगाम्यांचा दुटप्पीपणा नव्हे का ?' - (परात्पर गुरु) डॉ. आठवले    

महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मांडण्यासाठी जळगाव येथील आमदारांना राष्ट्र-धर्मपर विषयांचे निवेदन

आमदार श्री. चंद्रकांत सोनावणे यांना निवेदन देतांना सनातन संस्थेचे श्री. दत्तात्रेय वाघुळदे

जलसंपदामंत्री श्री. गिरीश महाजन यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. उदय बडगुजर

आमदार श्री. गुलाबराव पाटील यांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी
      जळगाव - महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मांडण्यासाठी येथील आमदार श्री. गुलाबराव पाटील, श्री. चंद्रकांत सोनावणे आणि जलसंपदामंत्री श्री. गिरीश महाजन यांना राष्ट्र-धर्मपर विषयांचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले.
     एन्सीईआर्टीकडून होणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान; मुळा, प्रवरा येथील विजेची ३ सहस्र कोटी रुपयांची थकबाकी वसूल करा;

चंदीगड येथे हिंदु जनजागृती समितीच्या बैठकांना धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

     चंदीगड (हरियाणा) - येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २६ आणि २७ नोव्हेंबर या कालावधीत ३ ठिकाणी हिंदुत्ववाद्यांच्या बैठका पार पडल्या. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या वंदनीय उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकांमध्ये धर्माभिमान्यांनी कृतीशील सहभाग नोंदवला.
१. पहिली बैठक येथील सेक्टर २८ च्या खेडा मंदिर येथे झाली. या बैठकीत देवागय पूजक परिषदेचे अध्यक्ष, परिषदेचे अन्य सदस्य, गढवाल सभा पंचकुलाचे अध्यक्ष, तसेच गढवाल सभा चंदीगडच्या उपाध्यक्षा श्रीमती शांती बहुगुणा उपस्थित होत्या. या बैठकीत शाळा आणि मंदिर यांमध्ये नियमित बालसंस्कारवर्ग घेणे, जिज्ञासूंसाठी सत्संग घेणे, मंदिरांमध्ये नियमितपणे धर्मसत्संगाची ध्वनीचित्रतबकडी (सीडी) दाखवणे आदी निर्णय घेण्यात आले. या बैठकीत उपस्थित पुरोहितांना धार्मिक कृतींमागील शास्त्राविषयी माहिती देण्यात आली. या वेळी सर्व पुरोहितांनी किमान १० घरांमध्ये धर्मशिक्षण देण्याचे दायित्व घेण्याचे मान्य केले. 

'आय.एस्.आय.एस्'.शी संबंध असल्याचे सिद्ध झाल्यास त्यागपत्र देण्यास सिद्ध ! तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांचे पुतीन यांना आव्हान

     अंकारा - रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी तुर्कस्थानवर केलेल्या आरोपाला तुर्कस्थानचे राष्ट्राध्यक्ष रिचप तैयप अर्दोवान यांनी उघड आव्हान दिले असून त्यांच्यावर केलेले आरोप सिद्ध केल्यास ते त्यागपत्र देण्यास सिद्ध असल्याचे म्हटले आहे. 'मोठ्या प्रमाणातील तेल साठ्यांवर जिहादी आतंकवादी संघटना आय.एस्.आय.एस्.चे नियंत्रण आहे. त्यांच्याकडून तुर्कस्थानला इंधन पाठवले जाते. हा इंधन पुरवठा चालू राहावा, यासाठी तुर्कस्थानने रशियाचे विमान पाडले', असा आरोप रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी केला होता. यावर 'तुमच्याकडे कुठला पुरावा असेल, तर तो सर्वांसमक्ष आणावा', असे आव्हान तुर्कस्थानचे राष्ट्राध्यक्ष अर्दोवान यांनी रशियाला दिले. २४ नोव्हेंबर या दिवशी तुर्कस्थानने रशियाचे एस्यू - २४ जेट विमान सिरिया सीमेवर पाडले होते.

विश्‍व हिंदु परिषदेच्या सतर्कतेमुळे पुष्कर मेळ्यात गोवंशाच्या विक्रीत घट

गोवंशहत्या रोखण्याबरोबरच विहिंपने हिंदूंना भेडसवणार्‍या इतर समस्याही मार्गी लावाव्यात, अशी हिंदूंची अपेक्षा आहे ! 
     पुष्कर (राजस्थान) - यावर्षी पुष्कर येथे एक मास चालू असलेल्या मेळ्यात गोवंशांच्या विक्रीत ९४ टक्के घट झाल्याचे आढळून आले आहे. या मेळ्यात व्यापार्‍यांचे सोंग घेऊन काही कसाई गोवंशांची खरेदी करतात आणि नंतर त्यांना पशूवधगृहांत पाठवले जाते. गेल्या दोन वर्षांपासून विश्‍व हिंदु परिषदेचे कार्यकर्ते या व्यापार्‍यांवर लक्ष ठेऊन आहेत. पुष्कर मेळा गोवंश, म्हशी, घोडे, बकर्‍या, उंट, मेंढ्या वगैरेच्या खरेदी विक्रीचे मोठे केंद्र आहे; मात्र गोवंश वगळता इतर पशूंची विक्री सर्वसाधारण प्रमाणात पार पडली.

हिंदु धर्म परिवर्तनशील असल्याने विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालायलाच हवी ! - सौ. नयना भगत, हिंदु जनजागृती समिती

चर्चासत्रात बोलतांना सौ. नयना भगत
शनिशिंगणापूर मंदिराच्या चौथर्‍यावर 
जाऊन एका तरुणीने दर्शन घेतल्याच्या 
प्रकरणी साम वाहिनीवर चर्चासत्र
     मुंबई, २ डिसेंबर - हिंदु धर्म परिवर्तनशील आहे. धर्माने कधीही महिलांवर अत्याचार केलेले नाहीत. वेदनिर्मितीपासून प्रत्येक क्षेत्रात आज महिला आघाडीवर आहेत. केवळ शास्त्र समजून घ्यायला हवे. आपण कितीही पुढे गेलो, तरी विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालायलाच हवी, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्यासौ. नयना भगत यांनी केले. शनिशिंगणापूर मंदिराच्या चौथर्‍यावर जाऊन एका तरुणीने दर्शन घेतल्याच्या घटनेच्या संदर्भात साम वाहिनीने ३० नोव्हेंबर या दिवशी आयोजित केलेल्या चर्चासत्रात बोलत होत्या. या चर्चासत्रात काँग्रेसच्या प्रवक्त्या नीला लिमये, अधिवक्त्या लक्ष्मी यादव, लेखिका नंदिनी आत्मसिद्ध, लेखिका वंदना खरे, अंनिसच्या मुक्ता दाभोलकर, वारकरी संप्रदायाचे अभ्यासक ह.भ.प. माधवदास राठी आणि डॉ. संजय दाभाडे हे सहभागी झाले होते.

तमिळनाडू शासन राजीव गांधी यांच्या मारेकर्‍यांची सुटका करू शकत नाही ! - सर्वोच्च न्यायालय

सीबीआय चौकशी करत असलेल्या प्रकरणांविषयी निर्णय घेण्याचा अधिकार केंद्रशासनाला !
     नवी देहली - दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ७ मारेकर्‍यांची सुटका करण्यास सर्वोच्च न्यायालयाने २ डिसेंबरला स्पष्ट नकार दिला. राजीव गांधी यांच्या हत्याकांडाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) केली आहे. त्यामुळे मारेकर्‍यांना सोडण्याचा निर्णय तमिळनाडू शासन घेऊ शकत नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला. सीबीआय ज्या प्रकरणाची चौकशी करत असेल, त्या प्रकरणी निर्णय घेण्याचा अधिकार केंद्रशासनाला आहे. राज्यशासनाला त्यात हस्तक्षेप करता येणार नाही, तसेच निर्णयही घेता येणार नाही. निर्णय घेण्यापूर्वी राज्यशासनाला केंद्रशासनाची अनुमती घेणे बंधनकारक आहे,

कलबुर्गी यांच्या कुटुंबियांचे संघपरिवाराकडून सांत्वन !

केरळमध्ये ज्या वेळी संघ स्वयंसेवकांच्या हत्या 
झाल्या, त्या वेळी संघाने सांत्वन करणे अपेक्षित होते !
     धारवाड - पुरोगामी विचारवंत एम्.एम्. कलबुर्गी यांच्या हत्येला तीन मास उलटून गेल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्याविषयी दु:ख व्यक्त केले असून कलबुर्गी यांच्या कुटुंबियांना सांत्वनपर पत्र लिहिले आहे. तीन मासानंतर हत्येचे दु:ख व्यक्त करण्याची आवश्यकता संघाला का भासली, याविषयी आता तर्कवितर्कांना उधाण आले आहे. संघाचे स्थानिक नेते श्रीधर नडीगर आणि हर्षवर्धन शीलवंत यांनी कलबुर्गी यांच्या पत्नी उमादेवी यांना भेटून शोकसंदेशाचे पत्र त्यांच्या हाती दिले. संघ मुख्यालयाचे सचिव विकास तेलंग यांची या पत्रावर स्वाक्षरी आहे.

साधकांना सूचना

पुढील ग्रंथ वितरणासाठी उपलब्ध !
     प.पू. डॉक्टर आठवले यांचे कार्य आणि वैशिष्ट्ये (आवृत्ती पहिली) हा ग्रंथ वितरणासाठी उपलब्ध आहे. ३ जुलै २०१४ या दिवशी दिलेल्या सुधारणांप्रमाणे या ग्रंथात सर्व सुधारणा करून हा ग्रंथ वितरित करावा. या ग्रंथाच्या एक्सेल शीट आणि पी.डी.एफ्. धारिका नेहमीच्या ठिकाणी ठेवल्या आहेत.

मुंबई येथील आमदारांनाही राष्ट्र-धर्मपर विषय सादर

आमदार श्री. प्रकाश फातर्फेकर (डावीकडे) यांना निवेदन देतांना श्री. सतीश सोनार
खनिजकर्म कामगार राज्यमंत्री श्री. प्रकाश मेहता (उजवीकडे) यांना निवेदन देतांना श्री. अभय वर्तक
  
राज्यमंत्री श्री. रवींद्र वायकर (डावीकडे) यांना निवेदन देतांना श्री. उदय खानविलकर
     मुंबई - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवडी येथील शिवसेनेचे आमदार श्री. अजय चौधरी, अंधेरी पूर्वचे आमदार श्री. रमेश लटके, विक्रोळीचे आमदार श्री. सुनील राऊत, वांद्रे पूर्वच्या आमदार श्रीमती तृप्ती सावंत, जोगेश्‍वरी पूर्व येथील गृहनिर्माण, उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री श्री. रवींद्र वायकर, चेंबूरचे आमदार श्री. प्रकाश फातर्फेकर, कुर्ला येथील

आगर (जिल्हा पुणे) येथे अवैधरित्या हत्येसाठी नेण्यात येणारे गोवंश पकडले

गुन्हा प्रविष्ट करून दोघांना अटक
शासनाने गोवंशहत्या बंदी कायद्याची कठोरात कठोर अंमलबजावणी करावी, ही गोप्रेमींची अपेक्षा !
     पुणे - येथील जुन्नर-नारायणगाव रस्त्यावरील खोरे वस्ती आगर येथे २९ नोव्हेंबरच्या रात्री १ गाय आणि १ बैल यांची अवैधपणे वाहतूक करणार्‍या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी जुन्नर पोलिसांनी टेम्पो वाहन, वाहनचालक दिनेश धादवड आणि अब्दुल कादीर मुस्तफा कुरेशी यांना कह्यात घेतले आहे.
१. स्थानिक नागरिकांना एक टेम्पो गाय आणि बैल यांना घेऊन जात असल्याचे दिसल्यावर संशय आला.

आय.एस्.आय.एस्.ची भारतात शिरकाव करण्याची धमकी !

आय.एस्.आय.एस्.सारख्या आतंकवादी संघटनांच्या क्रूर कारवायांना 
सामोरे जाण्यासाठी भारतातील हिंदू सिद्ध आहेत का ?
     नवी देहली - इराकस्थित इस्लामिक स्टेट फॉर इराक अ‍ॅण्ड सिरिया अर्थात् आय.एस्.आय.एस्. या जिहादी आतंकवादी संघटनेने भारतात शिरकाव करण्याची धमकी दिली आहे. या संघटनेने फ्यूचर इस्लामिक स्टेट बॅटल्स नामक ऑनलाइन पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यात ही धमकी देण्यात आली आहे. आय.एस्.आय.एस्.ने प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख केला आहे

पुणे जिल्ह्यातील ३०१ अवैध धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात येणार - जिल्हाधिकारी

* ३१ मे २०१६ पर्यंत कारवाई करणार  * प्रशासनाची सिद्धता पूर्ण
हिंदूंनो, तुमच्या धार्मिक स्थळांना अवैध ठरवून त्यांच्यावर
 कारवाई करणार्‍या प्रशासनाला वैध मार्गाने विरोध करा !
     पुणे - पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड विकास प्राधिकरण आणि जिल्ह्यातील वर्ष २००९ अगोदरच्या ३०१ अवैध धार्मिक स्थळांवर कारवाईसाठी जिल्हा प्रशासनाची सिद्धता पूर्ण झाली आहे. ही कारवाई ३१ मे २०१६ पर्यंत करण्यात येणार आहे. वर्ष २००९ नंतरच्या १५ धार्मिक स्थळांवर एका वर्षात कारवाई करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले.

चित्रपटगृहात राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी मुसलमान कुटुंबाकडून क्षमायाचना !

     मुंबई - चित्रपटगृहात राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी संबंधित मुसलमान कुटुंबाने क्षमा मागितली असून चित्रपट पहाण्याच्या मूडमध्ये असतांना अचानक हा प्रकार घडला, असे या कुटुंबाने म्हटले आहे. (हा प्रकार अचानक घडला कि राष्ट्रद्रोहामुळे, ते सर्वश्रुत आहे ! चित्रपट आरंभ होण्यापूर्वी राष्ट्रगीत असते. त्यामुळे प्रेक्षागृहातील अन्य लोक चित्रपटाच्या नादात राष्ट्रगीताला उभे रहात नाहीत, असे होत नाही. जर त्यांना उभे रहाण्याची इच्छा असती, तर निदान इतरांना पाहून तरी ते उभे राहिले असते. त्यामुळे प्रकरण गंभीर होत चालल्याने ही नंतर केलेली सारवासारव आहे. - संपादक)

३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार थांबवा ! - नायब तहसीलदारांना निवेदन

     विटा - ३१ डिसेंबर या दिवशी तीर्थक्षेत्रे, प्रेक्षणीय स्थळे आणि सार्वजनिक ठिकाणी ख्रिस्ती नववर्षोत्सवाच्या नावाखाली होणारे अपप्रकार आणि कुसंस्कार थांबवण्याविषयी संबंधितांना योग्य ते आदेश द्यावेत, अशा मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २ डिसेंबर या दिवशी नायब तहसीलदार श्री. किशोर सानप यांना देण्यात आले.

भारत-बांगलादेश सीमेवर होणारी गो-तस्करी पूर्णपणे रोखा ! - राजनाथ सिंह यांचा सीमा सुरक्षा दलाला आदेश

     नवी देहली - भारत-बांगलादेश सीमेवर होणारी गो-तस्करी पूर्णपणे रोखावी, असा आदेश केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिला आहे. १ डिसेंबर या दिवशी नवी देहलीत पार पडलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. सीमा सुरक्षा दलामुळेच या मार्गावरील गोतस्करी ७० टक्के न्यून झाली असून लवकरच ती १०० टक्के बंद होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
     मुंबई - भावेश याच्या लोकलगाडीतून पडून झालेल्या मृत्यूनंतर २ नोव्हेंबर या दिवशीही दोन जणांना रेल्वे अपघातात जीव गमवावा लागला आहे. सकाळी खोपोली ते ठाणे रेल्वे प्रवासादरम्यान गाडीतून पडून नरेश म्हादू पाटील (वय ३२ वर्षे) या तरुणाचा मृत्यू झाला. त्यानंतर रात्री कोपर-दिवा या स्थानकादरम्यान लोकलमधून पडून नितीन आबा चव्हाण यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची गेल्या तीन दिवसांतील ही चौथी घटना आहे.

काँग्रेस सरकारच्या काळातील न्यायव्यवस्था ही लोकराज्यातील या सरकारने स्वतःसाठीच उभारलेली आहे ! - कु. प्रियांका लोटलीकर (भाद्रपद कृ. २, कलियुग वर्ष ५११२ (२५.९.२०१०))भ्रमणभाष न देता अभ्यास करण्यास सांगितल्याने मुलाने स्वतःला केरोसिनने पेटवले

मुलांच्या भ्रमणभाषच्या वाढत्या वापरावर पालकांनी वेळीच प्रतिबंध आणायला हवा !
     मुंबई - येथील कांदिवली परिसरात भ्रमणभाषवर खेळ खेळणार्‍या १२ वर्षीय मुलाला आईने अभ्यास करण्यास सांगितल्याने त्याने स्वतःवर केरोसिन टाकून जाळून घेतले. यात मुलगा २५ टक्के भाजला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.

फलक प्रसिद्धीकरता

राष्ट्रगीत महत्त्वाचे कि करमणूक महत्त्वाची हेही न समजणारे लोकप्रतिनिधी !
    चित्रपटगृहांमध्ये राष्ट्र्रगीत म्हणण्याची आवश्यकता नाही, असे एम्.आय.एम्.चे आमदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे. चित्रपटगृहांमध्ये लोक मनोरंजनासाठी जातात, तेथे राष्ट्र्रगीताची आवश्यकता काय ? असा प्रश्‍नही जलील यांनी उपस्थित केला आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : MIM ke vidhayak Imtiyaj Jalilne kaha, chitrapatgruhome rashtragan ki avashyakta nahi.
kya Rashtragan ko nakarna desh ke sath gaddari nahi ?

जागो ! : एम्.आय.एम्.के विधायक इम्तियाज जलीलने कहा, चित्रपटगृहोमें राष्ट्रगान की आवश्यकता नही !
क्या राष्ट्रगानको नकारना देशके साथ गद्दारी नही ?

मानसिकदृष्ट्या दुर्बळ बनवणारे शिक्षण !

     विद्यार्थ्यांचे जागृतावस्थेतील ६ घंटे शाळेत असतात. जीवन जगण्यासाठी आजचे शिक्षण अपुरे आहे. आपले संरक्षण करायला शिक्षण अपात्र बनत आहे. आत्महत्येचे वाढलेले प्रमाण हेच सांगत नाही का ? पाठांतर, घोकंपट्टी आणि गुण (मार्क्स) यांच्या मागे धावता-धावता विद्यार्थी जीवनच गमवून बसले आहेत. अभ्यासात हुशार असणारा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी जगातील स्पर्धेत टिकाव धरू शकतोच, असे नाही. माहितीचा भार सांभाळता सांभाळता विद्यार्थ्यांचा जीव घुसमटतो. सर्वांगिण विकासाला पोषक ठरणार्‍या क्षमता आणि कौशल्य यांची विद्यार्थ्यांशी गाठच पडत नाही. क्रमिक पुस्तक घोकणे म्हणजे शिक्षण हा रूढ झालेला विचार भारताच्या विकासाला निश्‍चितच अपायकारक आहे. जी पुस्तके वाचतांना समाजजीवनाचे पुस्तक मिटवावे लागते, ते शिक्षण काय कामाचे? जे शिक्षण बहुविध आव्हानांचा सामना (मुकाबला) करण्याचा आत्मविश्‍वास देत नाही, ते शिक्षण कसले ? ८० ते ९० टक्के गुण मिळवणारी मुले म्हणजे आदर्श विद्यार्थी अशी जी प्रतिमा निर्माण केली आहे, ती व्यवहारोपयोगी आहे का ?

न्यायालयीन खटल्यांचा निपटारा केव्हा ?

     राज्यातील विविध न्यायालयांमध्ये एकूण २९ लक्ष ५१ सहस्र खटले प्रलंबित आहेत. त्यांपैकी मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांची संख्या ३ लक्ष ७६ सहस्रांहून अधिक आहे. यांमधील अनेक खटले ३० वर्षांहून अधिक काळ प्रलंबित आहेत. मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्तींची संमत पदे, कार्यरत न्यायमूर्ती आणि रिक्त पदे विचारात घेतल्यास त्यातील तूट ही अल्प न होता वाढतेच आहे. वर्ष २०१० मध्ये संमत पदे ही ७५, तर कार्यरत न्यायमूर्ती ६१ होते, म्हणजेच १४ न्यायमूर्तींची पदे रिक्त होती. आज ही स्थिती सकारात्मकरित्या पालटण्याऐवजी विषण्ण झाली आहे. सद्यस्थितीला न्यायाधिशांची पदे ९४ संमत असून सध्या ६५ न्यायमूर्ती कार्यरत आहेत. याचा अर्थ २९ पदे रिक्त आहेत. राज्यातील एकूण न्यायाधिशांची १ जानेवारी २०१५ या दिवशी संमत पदे ही २०७२, तर कार्यरत न्यायमूर्ती १७८४ असून २८८ रिक्त पदे आहेत. राज्यातील एकूण प्रलंबित खटले आणि न्यायाधिशांची संख्या पहाता एका न्यायाधिशांवर सरासरी १ सहस्र २०० खटले निकाली काढण्याचे दायित्व आहे. लक्षावधी खटले आणि न्यायाधीश संख्या यामुळे नागरिकांना मिळणारा न्याय केव्हा मिळेल, याविषयी साशंकता आहेच. एक प्रकारे सामान्य नागरिकाला मिळणारा न्याय हा अन्यायच, असे म्हटल्यास वावगे होणार नाही.

पर्यावरण रक्षण आणि भारत !

     पॅरीस येथे पर्यावरण बदलासंबंधीच्या कराराविषयीची जागतिक पातळीवरील सर्वपक्षीय परिषद नुकतीच पार पडली. या परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढत्या जागतिक तापमानाला विकसित राष्ट्रे अधिक उत्तरदायी असून त्यांनी या संदर्भात गांभीर्याने पावले उचलणे आवश्यक असल्याचे सडेतोड वक्तव्य केले. या परिषदेपूर्वी लोकमत समूहाचे राष्ट्रीय संपादक हरिष गुप्ता यांनी एका लेखाद्वारे जागतिक तापमानवृद्धी (ग्लोबल वॉर्मिंग) आणि भारताची भूमिका यांवर प्रकाश टाकला आहे. या लेखाचा संपादित भाग आमच्या वाचकांसाठी येथे देत आहे. यातून विकासामुळे झालेल्या पर्यावरणाच्या हानीमुळे उद्भवणारी आपत्कालीन स्थितीची कल्पना येईल.

भ्रष्टाचारामुळे मेटाकुटीस आलेल्या एका व्यक्तीची कथा आणि व्यथा !

     चाकरीत माझे एका ठिकाणाहून स्थानांतर (बदली) होऊन २ वर्षे झाली. यापूर्वी मी ज्या ठिकाणी होतो, तिथे असतांना मला कटु अनुभवातून जावे लागले. मी स्वच्छ चरित्र असलेला माणूस आहे. मला मिळणार्‍या वेतनाच्या व्यतिरिक्त अन्य पैशाला मी हात लावत नाही. त्यामुळे माझ्या सहकार्‍यांकडून आणि वरिष्ठांकडून मला त्रास देण्यात येत असे. एकदा तर मला मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. त्याविषयी मी पोलिसात तक्रार केली होती; परंतु त्याचा काहीही लाभ झाला नाही. शेवटी कंटाळून मी अन्य ठिकाणी स्थानांंतरासाठी (बदलीसाठी) आवेदन पत्र (अर्ज) दिले. सुदैवाने माझे स्थानांंतर (बदली) झाले. जागा पालटली; पण परिस्थिती तशीच होती. मला या सर्व परिस्थितीचा मानसिक त्रास पुष्कळ होत असे. राहून राहून माझ्या मनाला पुढील दोन प्रश्‍न येतात.
१. हे असे का ? जगात वाईट वागणारी व्यक्ती एवढी सुखात कशी रहाते आणि त्यांना काहीच त्रास कसे होत नाहीत ?
२. मी एवढा चांगला असूनही, मलाच त्रास का ?
(संदर्भ : मनशक्ती, मार्च २००५)

रेल्वे वाहतूक : संबंधित विभागांच्या अयोग्य कृती आणि अडचणी अन् अपघात

    
वाचा नवीन सदर
   रेल्वेचा उगम इंग्लंडमध्ये वर्ष १७८४ मध्ये झाला. नंतर ईस्ट इंडिया कंपनीने भारताच्या बंदरातील माल चटकन वाहून नेण्यासाठी १६.४.१८५३ या दिवशी मुंबई-ठाणे ही पहिली भारतीय रेल्वे चालू केली. पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर देशात विविध ठिकाणी प्रवासी आणि माल यांची वाहतूक करणार्‍या रेल्वेचे सर्वाधिकार भारतीय रेल्वेकडे देण्यात आले. या रेल्वे खात्याचा कारभार पहाण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळात एक स्वतंत्र मंत्री नेमलेला असतो.
   स्वातंत्र्योत्तर काळात राज्यकर्त्यांनी राष्ट्रस्वास्थ्य उत्तम रहाण्यासाठी त्यागपूर्ण जीवन न जगता स्वार्थाला प्राधान्य दिले. उच्चभ्रूंच्या कृतीचे कनिष्ठ वर्गीय जनता नेहमी अनुकरण करते, या नियमानुसार भ्रष्ट लोकप्रतिनिधींच्या वर्चस्वाखालील भारतीय रेल्वे खात्यातही भ्र्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला. त्यामुळे रेल्वे खात्याच्या संचालकांपासून अगदी कनिष्ठ स्तराच्या कर्मचार्‍यांपर्यंत प्रत्येक जण अल्प श्रमात जास्त स्वार्थ कसा साधता येईल, ते पहात आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेपुढे तिकीटविक्रीतील अनुचित व्यवहार, प्रतिदिन अपघातांमुळे होणारे मृत्यू, तसेच आतंकवादी, माओवादी, समाजकंटक यांकडून होणारी आक्रमणे, भ्रष्ट प्रशासकीय यंत्रणेमुळे प्रवाशांची होणारी असुविधा अशा कित्येक समस्या आवासून उभ्या राहिल्या आहेत.

धर्मशास्त्राचे अभ्यासक ह.भ.प. माधवदास राठी यांच्या अभ्यासपूर्ण वक्तव्यांमुळे धर्माला विरोध करणारे गप्प !

१. देव-धर्म न मानणार्‍या वंदना खरे पडल्या तोंडघशी !
    वंदना खरे म्हणाल्या, मी देव आणि धर्म मानत नसून स्त्रीवादी आहे. यावर ह.भ.प. माधवदास राठी त्यांना प्रत्युत्तर देत म्हणाले, जे देव आणि धर्म मानत नाहीत, त्यांनी अशा विषयांवर चर्चा करून काय उपयोग ? अशांनी चर्चाच करू नये. सनातन धर्मपरंपरा मानणार्‍यांनीच अशा गोष्टींचा विचार करायला हवा. यावर खरे यांना गप्प बसण्याविना पर्याय नव्हता.

मनुस्मृतीविरोधात बोलू पहाणार्‍या अधिवक्त्या लक्ष्मी यादव यांना सौ. नयना भगत यांनी दिलेले सडेतोड उत्तर

    अधिवक्त्या लक्ष्मी यादव म्हणाल्या, धर्माने महिलांच्या शोषणाच्या गोष्टी सांगितल्या. मनुस्मृतीमध्येही तसेच दिले आहे. त्यांच्या या विधानावर सौ. भगत यांनी मनुस्मृतीतील उदाहरणे दिली. त्या म्हणाल्या, मनुस्मृतीत म्हटले आहे की, देवाच्या इच्छेने पत्नीला भार्या मिळते, स्वतःच्या इच्छेने नव्हे ! पती जर पत्नीची उपेक्षा करत असेल, उपजीविका चालवत नसेल, तर तिने व्यवसाय करावा ! स्त्रीविना धर्मकार्य होऊ शकत नाही. ही उदाहरणे पहाता मनूने स्त्रियांचे शोषण कुठे केले आहे ? मनुस्मृतीचे पालन केले पाहिजे. सौ. भगत यांनी दिलेल्या अशा प्रकारे सडेतोड उदाहरणांमुळे यादव यांना गप्प बसावे लागले.

धर्मस्थापने करिताच हा तर तुझा अवतार ।

रामायणाचा अभ्यास करून घेतलास छान ।
जगात वाढेल आता सनातन अध्यात्म धर्माचा मान ॥ १ ॥
सारे सूर-असुर येतील शरण तुझ्या चरणी ।
आकाशातून होईल पुष्पवृष्टी, तू होशील विश्‍वाचा धनी ॥ २ ॥
आशेने पहाताहेत रे देवराणा, तुझ्या मुखचंद्राकडे ।
घालताहेत साधक जन प्रत्येक देवाला साकडे ॥ ३ ॥
होऊ दे तुझी इच्छा पूर्ण, गर्जू आम्ही जयतु जयतु ।
हिंदु राष्ट्राची पताका विश्‍वात फडकवणारा जयंत तू, जयंत तू ॥ ४ ॥
इथूनच करते चरणी तुझ्या कोटी कोटी नमस्कार ।
धर्मस्थापने करिताच हा तर तुझा अवतार ॥ ५ ॥
नामातच घेऊन आलास बारशाच्या वेळी जय ।
धर्मस्थापना होताच भारताचा होईल विजय ॥ ६ ॥
आठवतो राणा आम्ही तुला दिन-रात क्षणोक्षणी ।
तुझ्याच नामाचा जपतो माळेतील एक एक मणी ॥ ७ ॥
साधनेची संधी देऊन केलास संचिताचा घडा रिता ।
म्हणूनच कळले राजा जेथे राघव तेथे सीता ॥ ८ ॥
भगवंताच्या पाशीच असतो शक्तीचा वास ।
त्याचसाठी घेऊ सातत्याने देवनामाचा ध्यास ॥ ९ ॥
- पुष्पांजली, बेळगाव (१३.२.२०१५)

आश्रमात पूर्णवेळ सेवेसाठी रहायला आल्यानंतर मुलाने कोणतीच गोष्ट न ऐकणे आणि त्यावर संतांनी सांगितलेल्या उपायांमुळे तो पूर्वीप्रमाणे वागू लागणे

चि. वल्लभ पाध्ये
१. आश्रमात पूर्णवेळ सेवेसाठी रहायला 
आल्यानंतर मुलाने शाळेत येता-जातांना 
पुष्कळ रडणे, किंचाळणे आणि सांगितलेले न ऐकणे
     रामनाथी आश्रमात आम्ही सर्व कुटुंबीय पूर्णवेळ साधना करायला रहायला आलो. त्यानंतर आम्ही चि. वल्लभ (५ वर्षे) याला तेेथे जवळच असलेल्या शाळेत घातले. शाळेच्या पहिल्या दिवसापासून तो शाळेत जाण्यापासून आश्रमात येईपर्यंत पुष्कळ रडत असे. कोणत्याही परिस्थितीत शाळेत जायचे नाही, असा जणूकाही त्याने पणच केला होता. मोठ्याने रडणे, थयथयाट करणे, किंचाळणे, सांगितलेले न ऐकणे हे नित्याचेच झाले होते.
२. मुलाचे सहनशीलतेच्या पलीकडचे वागणे !
     आरंभीचे काही दिवस मला आणि सौ. पूर्वा (पत्नी) हिला वल्लभला शाळेत सोडायला अन् आणायला जावे लागे, तसेच आरंभीचा एक मास (महिना) पूर्वाला केवळ शाळेत नुसते थांबून चालत नव्हते, तर वर्गात त्याच्याच बाकावर बसावे लागत होते. नंतर पूर्वा बाहेर बसू लागली. हळूहळू बाहेर बसते, असे सांगून आश्रमात येऊन त्याला आणायला परत जाऊ लागली. हा सर्व प्रकार आमच्या, विशेषकरून पूर्वाच्या सहनशीलतेच्या पलीकडील होता.

श्रीकृष्णाच्या अनुसंधानात असलेली उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. ईश्‍वरी प्रदीप जोशी (वय साडेतीन वर्षे) !

१. व्यवस्थितपणा
कु. ईश्‍वरी प्रदीप जोशी
अ. कपड्यांच्या घड्या घालायला शिकवल्यावर ती स्वतःचे छोटे कपडे नीट घडी घालून ठेवते, तसेच आई, मी घडी नीट घातली आहे ना ?, असे विचारून त्याची निश्‍चितीही करून घेते. आता ती तिचे ओले कपडेही नीट झटकून दोरीवर वाळत घालते आणि त्यांना चिमटेही लावते.
आ. ती दीड वर्षांची असल्यापासून गादीवर घातलेल्या पलंगपोसाला सुरकुती पडलेली तिला चालत नाही. ती लगेच त्याला ओढून व्यवस्थित करते.
इ. तिला खेळून झाल्यावर सर्व पसारा लगेच आवरून त्या त्या जागी ठेवायचा, असे सांगितले आहे. त्याप्रमाणे ती स्वतःहून सर्व आवरून ठेवते. पहिली खेळणी आवरून ठेवल्यावरच दुसरी खेळणी खेळायला घेते.

संतसेवेची सुवर्णसंधी !

प.पू. दास महाराज यांच्या आश्रमात सेवा करण्यासाठी सेवक दाम्पत्याची आवश्यकता !
     पानवळ-बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील संत प.पू. दास महाराज यांचे निवासस्थान आणि मंदिर परिसर येथील देखभाल करण्यासाठी, तसेच स्वयंपाक करण्यासाठी सेवाभावी वृत्तीने कार्य करणार्‍या सेवक दाम्पत्याची आवश्यकता आहे. जे सेवक दाम्पत्य या संतसेवेच्या सुवर्णसंधीचा लाभ घेऊ इच्छितात, त्यांनी श्री. रूपेश रेडकर यांच्याशी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.
भ्रमणभाष : ८४५१००६०७०
इ-मेल : hinducoordination@gmail.com
प.पू. दास महाराजांच्या आश्रमात दिवसभरात करावयाच्या सेवांचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.
१. आश्रम आणि मंदिर यांची, तसेच परिसराची स्वच्छता
२. स्वयंपाक आणि स्वयंपाकघराशी संबंधित सेवा करणे
३. मंदिरातील आणि परिसरातील देवतांची पूजा करणे
४. आश्रम परिसरातील झाडांना पाणी घालणे आणि त्यांची देखभाल करणे
५. आश्रमात एक गाय पाळण्यात येणार आहे. तिची देखभाल करणे.
६. प.पू. दास महाराज यांची सेवा (औषधे देणे, कपडे धुणे, पायाचे मर्दन करणे आदी)
७. आश्रमासाठी लागणार्‍या वस्तूंची बाजारपेठेतून खरेदी करणे
८. आश्रमात आयोजित करण्यात येणार्‍या रामनवमी आणि हनुमान जयंती या धार्मिक उत्सवांमध्ये सेवा करणे

सर्वांप्रती असलेली कृतज्ञता यथार्थ शब्दांत व्यक्त करून अगत्याने विवाहाचे आमंत्रण देणारी आदर्श विवाहपत्रिका !

 ॥ श्री गणेशाय नमः ॥
कृतानेक सप्रेम नमस्कार वि.वि.
श्रीकृपेकरून
मंगलवाद्यांच्या निनादात,
     नभांगणीच्या तेजस्वी आदित्याच्या आणि सुफलित शारदीय वसुंधरेच्या साक्षीने,
............. येथे,
विवाह मंडपातील वेदघोषांत, मंगलाक्षतांच्या वर्षावात,
श्री कुलस्वामिनीच्या शुभाशीर्वादाने
...... या तिथीला ...... या शुभदिनी,
सूर्योदयात् ...... घटिका ...... पळे, सकाळी / दुपारी ...... वाजून ...... मिनिटे या शुभ मुहूर्तावर
आमची कन्या / आमचा पुत्र,
......

संयमी आणि पत्नीला मानसिक स्तरावर सांभाळून न घेता तत्त्वनिष्ठ राहून आध्यात्मिक स्तरावर साहाय्य करणारे बेंगळुरू येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. श्रीकांत चौधरी (वय ३४ वर्षे) !

श्री. श्रीकांत चौधरी
१. प्रसन्न मुद्रा
    श्रीकांतअण्णा कोणताही प्रसंग घडला, तरी त्यात अडकत नाहीत. त्यांच्या तोंडवळ्यावर ताण किंवा ते त्या प्रसंगाविषयी पुष्कळ विचार करत आहेत, असे दिसत नाही.
२. सेवाभाव
      त्यांना कोणतीही सेवा दिली, तरी ते कधीही मला जमणार नाही, असे सांगत नाहीत. त्यांना स्वतःच्या पुष्कळ सेवा असूनही सेवाकेंद्रात कुणीही कोणतीही सेवा सांगितली, तरी ते इतरांना सेवेत साहाय्य करतात.
- सौ. तारा शेट्टी (साधिका)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.  - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
यासाठी पोलिसांना साधना शिकवणे अत्यावश्यक !
'पोलिसांतील अहंभावामुळे साधकांप्रमाणे चूक कबूल करण्याचा प्रांजळपणा त्यांच्यात नसल्याने ते चुकीच्या मार्गाने भरकटत जातात, निरपराध्याला आरोपी म्हणून पकडतात आणि स्वतःचे पाप वाढवतात !' - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान
मी कोणाचा नाही. माझा कुणी नाही.ज्याचा
 त्याचा तोच मी; म्हणून मी सर्वांचा आहे.
     भावार्थ : मी सर्वस्व गुरुचरणांवर वाहिल्यानंतर मी दुसर्‍या कुणाचा होऊच शकत नाही. गुरूंना अर्पण झाल्यानंतर माझा कुणी असायला मी शिल्लक राहिलोच कुठे ? परंतु सर्वांचा खरा मी एकच आणि सर्वव्यापी असल्यामुळे आता मी सर्वांचा आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)

बोधचित्र


योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

योग्य आचार-विचार
     संस्कृती म्हणजे विद्वत्तापूर्ण चर्चा नसून कायम स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवणे आणि इतरांच्या दु:खाची जाणीव ठेवणे !
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

स्वतःचे दायित्व ओळखा !

     मागील आठवड्यात मुंबईच्या कुर्ला उपनगरातील एका चित्रपटगृहात राष्ट्रगीत चालू असतांना एक मुस्लिम कुटुंब आदराची खूण म्हणून उभे राहिले नाही. त्या कुटुंबाने राष्ट्रगीताच्या संदर्भातील या नियमाचे पालन केले नाही; म्हणून उपस्थित इतर प्रेक्षकांनी आक्षेप घेतला आणि त्या कुटुंबाला चित्रपटगृहाबाहेर जाण्यास भाग पाडले. या सूत्रावर चर्चासत्रे चालू झाली. अशाच एका चर्चासत्रामध्ये एम्.आय.एम्.चे आमदार इम्तियाज जलील सहभागी झाले होते. त्यांनी राष्ट्रगीताच्या संदर्भात नौटंकी असा शब्दप्रयोग केल्यामुळे मनसेचे चित्रपटसेना अध्यक्ष अमेय खोपकर यांनी अर्थात्च आक्षेप घेतला आणि जलील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यापर्यंत प्रकरण गेले. राष्ट्रगीताची धून चालू असतांना भारतीय नागरिकांकडून मोठी तत्परता आणि आदर यांचे प्रात्यक्षिक नेहमी अनुभवता येत असते. राष्ट्रगीताच्या सन्मानाला ते हातावरील फोडाप्रमाणे सांभाळतात.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn