Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

रावेर (जिल्हा जळगाव) येथे ८ सहस्र धर्मांधांकडून मोर्चा आणि दगडफेक !

धर्मांधांचा वाढता उद्दामपणा पहाता देशात शासन अस्तित्वात आहे का, असा प्रश्‍न पडतो ! 
असहिष्णुतेचा कांगावा करणारे धर्मांधांच्या या कृत्यांविषयी 'ब्र'ही काढत नाहीत ! 
दैनिक लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेल्या आक्षेपार्ह चित्राचे प्रकरण 
     रावेर (जिल्हा जळगाव) - दैनिक लोकमतच्या मंथन पुरवणीत २९ नोव्हेंबरला प्रसिद्ध झालेल्या एका चित्राच्या विरोधात ३० नोव्हेंबरला येथील ८ सहस्र धर्मांधांनी मोर्चा काढला. या वेळी त्यांनी 'अल्ला हो अकबर'च्या घोषणा देत दगडफेक केली. यात ३ बसगाड्यांची हानी झाली आहे. (ही हानी या धर्मांधांकडून कोण भरून घेणार ? - संपादक) या घटनेनंतर पोलिसांचा फौजफाटा वाढवण्यात आला. 
     दैनिक लोकमतच्या पुरवणीत 'तेलाचं स्मगलिंग, कर्जे आणि लूटमार : इसिसचा पैसा' या लेखातील चित्रात उर्दू भाषेतील अक्षरे होती. यावरून लोकमतच्या कार्यालयावर एम्आयएम्च्या ५० कार्यकर्त्यांनी आक्रमण केले होते. 

चिदंबरम् यांनीच 'सनातन'वर बंदी नाकारली होती ! - लोकसभेत गृहराज्यमंत्री रिजीजू यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना उत्तर

राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणार्थ नि:स्वार्थी वृत्तीने कार्य करणार्‍या सनातनवर 
 बंदी येण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किती उतावीळ झाले आहेत, हे लक्षात येते ! 
     नवी देहली - काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम् केंद्रीय गृहमंत्री असतांना 'सनातन संस्थेवर बंदी घालण्याची आवश्यकता नाही', असे मत त्या संबंधीच्या धारिकेवर व्यक्त केले होते, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी १ नोव्हेंबर या दिवशी लोकसभेत स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या भाषणामध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या खुनाचा उल्लेख केला. त्या वेळी त्यांनी सनातन संस्थेचा विषय काढून 'केंद्रीय गृहमंत्रालयाने त्यांच्याकडील सनातन संस्थेच्या संदर्भातील धारिका पहावी. केंद्रीय गृहमंत्रालयाने त्यामध्ये लक्ष घालावे', अशी मागणी केली. त्यावर गृहराज्यमंत्री किरण रिजीजू बोलत होते. लोकसभेमध्ये नियम १९३ अंतर्गत देशातील असहिष्णुतेच्या सूत्रावरील चर्चेला १ नोव्हेंबर या दिवशी पुन्हा आरंभ झाला. त्या वेळी ही प्रश्‍नोत्तरे झाली. 

विकसित देशांनी कार्बन उत्सर्जनाचे दायित्व विकसनशील देशांवर ढकलल्यास, ती नैतिक चूक ! - पंतप्रधान नरेंद्र मोदी

पॅरिस येथे पर्यावरणविषयक आंतरराष्ट्रीय परिषद
      पॅरिस - विकसित देशांनी त्यांच्या समृद्धीसाठी अधिक प्रमाणात कार्बन उत्सर्जन केले आहे; मात्र याचे दायित्व विकसनशील देशांवर ढकलण्याचा प्रयत्न झाल्यास ती या देशांची नैतिकदृष्ट्या चूक ठरेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. गरीब देशांना त्यांच्या अर्थव्यवस्थेला गतीमान करण्यासाठी अशा प्रकारे उत्सर्जन करावे लागले, तरी काही बिघडत नाही, तो त्यांचा अधिकार आहे, असेही मोदी म्हणाले.
     हवामान पालटाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेला ३० नोव्हेंबर या दिवशी पॅरिसमध्ये प्रारंभ झाला. १२ दिवस चालणार्‍या या पर्यावरणविषयक परिषदेत पंतप्रधान मोदी यांच्यासह जगभरातील १५० नेते उपस्थित आहेत. त्यात जगभरातील कार्बन उत्सर्जन प्रमाण न्यून करण्यासाठी चर्चा होणार आहे.

पाकची आय.एस्.आय. आणि आय.एस्.आय.एस्. यांची कार्यपद्धत समान ! - पाक गुप्तहेराची स्वीकृती

पाकच्या गुप्तहेरांचे जाळे नष्ट करण्यासाठी भारत काय करणार ?
     बरेली (उत्तरप्रदेश) - पोलिसांनी मेरठ येथे नुकत्याच अटक केलेल्या महंमद एझाझ या पाकच्या गुप्तहेराने पोलिसांसमोर साक्ष देतांना पाकिस्तानची आय.एस्.आय. आणि आय.एस्.आय.एस्. यांच्या कार्यपद्धतीत समानता असल्याची स्वीकृती दिली आहे.
     एझाझच्या माहितीनुसार पाकच्या आय.एस्.आय.ने त्याची नेमणूक केल्यानंतर त्याला प्रथम बांगलादेशला पाठवले. तेथून त्याला अवैध मार्गाने भारतात पाठवण्यात आले. तेव्हा त्याचे पारपत्र (पासपोर्ट) काढून घेण्यात आले. हीच पद्धत आय.एस्.आय.एस्. वापरात आणते.

आरोपींच्या जामीन अर्जावरील निर्णयासाठी २ मासांची मुदतवाढ

७ वर्षे उलटून गेल्यावरही संथ गतीने चालणारी न्याय प्रक्रिया !
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण
     नवी देहली - वर्ष २००८ मध्ये झालेल्या बहुचर्चित मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह इतर आरोपींच्या जामीन अर्जावर निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रातील विशेष न्यायालयाला आणखी २ मासांची मुदतवाढ वाढवून देण्यात आली आहे, असे न्या. ए. एम्. सप्रे आणि न्या. जे. चेलमेश्‍वर यांनी सांगितले. विशेष न्यायालयाच्या नवीन न्यायाधिशांनी नुकताच कार्यभार स्वीकारला असल्यामुळे या प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर निर्णय घेण्यास आणखी दोन महिन्यांची मुदत वाढवून मागण्यात आली

शालेय अभ्यासक्रमात गीता, वेद आणि अन्य धर्मग्रंथ यांचा समावेश करण्याचा प्रस्ताव नाही ! - स्मृती इराणी

केंद्रशासनाचा हिंदूंना संभ्रमित करणारा निर्णय !
     नवी देहली - शालेय अभ्यासक्रमात गीता, वेद आणि अन्य धर्मग्रंथ यांचा समावेश करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी दिली आहे. (समाजात नैतिकता टिकवायची असेल, तर मुलांना लहानपणापासून गीतेसारखे ग्रंथ शिकवणे अत्यावश्यक आहे. शासन हे लक्षात घेईल का ? - संपादक) सोमवारी लोकसभेत विचारलेल्या एका प्रश्‍नाविषयी दिलेल्या लेखी उत्तरात इराणी यांनी ही माहिती दिली,

"बिहारमध्ये सांप्रदायिक राजकारणाचा पराभव !"

सांप्रदायिक वातावरणात वावरणार्‍यांना त्यापलीकडे काय सुचणार ? 
म्हणूनच सांप्रदायिकतेची काविळ झालेले सायरो मालाबार चर्चचे आर्चबिशप म्हणतात, 
     नवी देहली - बिहारमध्ये भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा झालेला पराभव हा सांप्रदायिक राजकारणाचा पराभव आहे, असे प्रतिपादन फरीदाबाद-देहली सायरो मालाबार चर्चने केले आहे. चर्चच्या आर्चबिशपांचा हा संदेश चर्चच्या बिशपने वाचून दाखवला. देहली आणि फरीदाबादमधील सर्व सायरो मालाबार चर्चमध्ये हा संदेश वाचण्यात आला. 

तमिळनाडूत पुन्हा मुसळधार पाऊस; जनजीवन विस्कळीत

     चेन्नई - तमिळनाडू राज्यात पुन्हा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे येथील मुख्य चौकात रस्ता खचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. अनेक भाग अजूनही पाण्याखाली असून पावसामुळे राज्यातील ७ जिल्ह्यांवर परिणाम झाला आहे. राज्यात अतिवृष्टी आणि पुर यांमुळे आतापर्यंत १८० लोकांचा मृत्यू झाला आहे.

अभ्यासक्रमात संत आणि महापुरुष यांच्या कार्याचा समावेश हवा ! - डॉ. विजय भटकर

     पुणे, १ डिसेंबर - सत्याचे दर्शन घडवणारी 'ज्ञानेश्‍वरी' ही संस्कृतीचा भाग आहे. योगशास्त्र, कुंभमेळा आदींतून आपली संस्कृती प्रतीत होते. योग हे अध्यात्माचे तंत्रज्ञान असून ते आत्मसात करायला हवे. भाषा आणि विज्ञान एकमेकांना पूरक आहे. जिथे चैतन्य तिथे भाषा आणि विज्ञान या दोन्हींचा संगम असतो. आज नागरीकरणाच्या ओघात अनेक संस्कृती लोप पावत चालल्या आहेत. आजची पिढी तंत्रज्ञान शिकते; पण अर्धवट शिक्षण व्यवस्थेमुळेच त्यांना संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम आदी संत आणि थोर महापुरुषांचे कार्य माहीत नाही. त्यामुळेच भारतीय संस्कृतीचा विसर पडत आहे. भावी पिढीला संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात त्याचा समावेश केला पाहिजे, असे संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी सांगितले. 

(म्हणे) 'सनातन संस्था आणि रा.स्व. संघ यांच्यावर बंदी घाला !' - वर्ल्ड फेडरेशन ऑफ डेमॉक्रेटिक यूथ संघटनेचा ठराव

'कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही', तद्वत अशा 
संघटनांच्या चेतावण्यांनी सनातनचे कार्य बंद पडणार नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावे ! 
     कोल्हापूर, १ डिसेंबर (वार्ता.) - देशात धार्मिक आणि जातीय विद्वेषाचे अन् असहिष्णुतेचे वातावरण निर्माण करणारी सनातन संस्था आणि रा.स्व. संघ यांच्यावर बंदी घालण्याचा ठराव 'वर्ल्ड फेडरेशन ऑफ डेमोक्रेटिक यूथ संघटने'च्या १९ व्या सर्वसाधारण सभेमध्ये (असेंब्लीत) करण्यात आला. ही सभा क्युबा मधील हवाना येथे ८ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत असेंब्ली अध्यक्ष निकोलस पापाडिमोनिओ आणि सचिव जिझस मोरा राफेल गोन्झालेज यांच्या उपस्थितीत झाली. तेथे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या संदर्भाने हा विशेष ठराव करण्यात आला आहे, अशी माहिती या संघटनेचे उपाध्यक्ष गिरीश फोंडे यांनी २९ नोव्हेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. 

न्यूजर्सी येथे श्री राधाकृष्ण मंदिरात हेलोवीन साजरा करण्याची योजना !

धर्मशिक्षणाच्या अभावामुळेच मंदिरांमध्ये असे रज-तमात्मक 
कार्यक्रम आयोजित करण्याची दुर्बुद्धी हिंदूंना होते !
धर्माभिमानी हिंदूंचा विरोध
     न्यूजर्सी - अमेरिकेतील न्यू जर्सी राज्यातील लॉरेन्सविल्ले येथील श्री राधाकृष्ण मंदिरामध्ये हेलोवीन हा पाश्‍चात्त्य संस्कृती दर्शवणारा कार्यक्रम साजरा करण्यात येतो. हेलोवीन म्हणजे भुते, हडळ, पिशाच्च यांचा वेश परिधान करून लोक एकत्र जमतात आणि उत्सवाप्रमाणे तो दिवस साजरा करतात.

परमार आत्महत्येच्या प्रकरणातील आरोपी नजीब मुल्लाकडून जितेंद्र आव्हाड यांच्या खात्यात १ कोटी जमा !

     ठाणे - बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येच्या प्रकरणी आरोपी असलेले नगरसेवक नजीब मुल्ला खान यांच्या बँक खात्यातून १ कोटी ७ लक्ष रुपये राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत, अशी खळबळजनक माहिती सोमवारी राज्यशासनाने उच्च न्यायालयाला दिली. (या माहितीवरून आत्महत्या प्रकरणाचे धागेदोरे जितेंद्र आव्हाड यांच्यापर्यंत तर नाहीत ना, असा संशय येण्यास वाव आहे. - संपादक) या प्रकरणी आव्हाड दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे शासनाने उच्च न्यायालयाला सांगितले.

मुंबईतील 'क्राईस्ट द चर्च'चे फादर लॉरेन्स यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप !

कथित आरोपांवरून हिंदु संतांची नाहक अपकीर्ती 
करणारी प्रसारमाध्यमे याविषयी चर्चासत्र घेतील का ? 
     मुंबई - गोवंडी परिसरातील एका चर्चमधील एका फादरने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप एका मुलाने केला आहे. येथील शिवाजीनगर येथील 'क्राईस्ट द चर्च'चे फादर जॉन्सन लॉरेन्स यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे. २७ नोव्हेंबरला रात्री फादरने रात्री ८ वाजण्याच्या सुमारास चर्चमध्येच अनैसर्गिक अत्याचार केल्याचा दावा १३ वर्षांच्या मुलाने केला आहे. या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

आकुर्डी (पुणे) येथे सनातनच्या धर्मरथावरील प्रदर्शनास काही स्थानिकांचा अकारण विरोध !

धर्मरथावरील सनातनच्या प्रदर्शनाला विरोध करणार्‍यांनी
 सनातनचे राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणार्थ चालू असलेले कार्य जाणून घ्यावे ! 
  •  धर्मारथात लावलेले प्रदर्शन बंद करण्यासाठी दडपशाही ! 
  •  स्थानिक धर्माभिमान्यांकडून प्रदर्शन लावण्यासाठी सहकार्य ! 
     आकुर्डी (जिल्हा पुणे), १ डिसेंबर (वार्ता.) - आकुर्डी-चिखली रस्त्यावर धर्मरथावर सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यासाठी काही स्थानिक व्यक्तींनी अकारण विरोध केला. या वेळी काही स्थानिकांनी साधकांवर दांडगाई करत प्रदर्शन बंद करण्यास भाग पाडले. त्याच वेळी स्थानिक धर्माभिमानीही तत्परतेने साहाय्याला आले. त्यांच्या साहाय्याने तेथून जवळच पुन्हा धर्मरथाद्वारे प्रदर्शन लावण्यात आले. (धर्मकार्यास साहाय्य करणार्‍या धर्माभिमान्यांचे सनातनने आभार मानले आहेत ! - संपादक)

हिंदुत्ववादी अधिवक्ता के.व्ही. रमणमूर्ती यांचा भक्ती टीव्ही या तेलगु दूरचित्रवाहिनीकडून सत्कार

      भाग्यनगर - आध्यात्मिक ग्रंथांमध्ये योगदान दिल्याच्या निमित्ताने भक्ती टीव्ही या तेलगु दूरचित्रवाहिनीकडून तेलंगणातील हिंदुत्ववादी अधिवक्ता के.व्ही. रमणमूर्ती यांचा सत्कार करण्यात आला.
     अधिवक्ता रमणमूर्ती यांनी पौराणिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक विषयांवर विविध ग्रंथांचे लेखन केले आहे. यात आंध्रप्रदेश आणि पुडुचेरी येथील विविध गणेश मंदिरांची माहिती देणारा ग्रंथ, विविध हिंदु मंदिरांमध्ये करण्यात येणार्‍या धार्मिक कृती आणि उत्सवांचे विवेचन करणारा ग्रंथ, तसेच श्रीगणेशाच्या संदर्भातील पौराणिक श्‍लोकांचे संकलन इत्यादी ग्रंथांचा समावेश आहे.

भारताला युरेनियम देण्यास ऑस्ट्रेलिया शासनाची मान्यता !

      सिडनी - गेली ८ वर्षे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बोलणी झाल्यानंतर सर्व प्रशासकीय अडथळे आणि धोरणे यांच्यावर मात करून अखेर ऑस्ट्रेलिया शासनाने भारताला युरेनियम देण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे या दोन्ही देशातील संबंध अधिक दृढ होण्यास साहाय्य होईल,

हिंदूंनी व्यक्तीगत हेवेदावे विसरून संघटित झाल्यास हिंदु राष्ट्र लवकर येईल ! - श्री. गंगाधर कुलकर्णी, राज्यसंघटक, श्रीराम सेना

व्यासपिठावर डावीकडून श्री. काशीनाथ प्रभु, श्री. गंगाधर कुलकर्णी, श्री समीराचार्य, श्री. प्रसाद हुंसवाडकर, श्री. व्यंकटरमण
      हुब्बळ्ळी - २००० वर्षांपूर्वी संपूर्ण विश्‍वात केवळ हिंदु धर्मच होता; पण आता हिंदूंची संख्या केवळ १०० कोटी उरली आहे. याला कारण म्हणजे धर्मशिक्षण, संघटनाचा अभाव. यासाठी आपण सर्वांनी व्यक्तीगत हेवेदावे विसरून संघटित झाल्यास हिंदु राष्ट्र लवकर येईल. या पार्श्‍वभूमीवर हिंदूंना दिशादर्शन करण्याचे महत्त्वाचे कार्य हिंदु जनजागृती समिती करत आहे, असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे कर्नाटक राज्यसंघटक श्री. गंगाधर कुलकर्णी यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २९ नोव्हेंबर या दिवशी कर्नाटकातील हुब्बळ्ळी येथील उत्तर कन्नड वैश्य समाज कल्याण सभागृहात एक दिवशीय प्रांतीय हिंदु अधिवेशन पार पडले.

सुविधा न दिल्यास ४ लक्ष भाविक सौंदत्ती यात्रेवर बहिष्कार घालतील ! - करवीर निवासिनी भक्त संघटनेची चेतावणी

     आतापर्यंत किती वर्षे भक्तांना लुटून मंदिरातील कर्मचार्‍यांनी भ्रष्टाचार केला, कोण जाणे ? मंदिर कर्मचार्‍यांकडून हे पैसे वसूल करण्याचे धाडस जिल्हाधिकारी दाखवतील का ? कि त्यासाठी भक्तांना आंदोलन उभारावे लागणार ?
बेळगाव जिल्हा प्रशासनाचे मंदिरातील भ्रष्ट कारभाराकडे दुर्लक्ष !
      कोल्हापूर - बेळगाव जिह्यातील सौंदत्ती येथे २१ ते २४ डिसेंबरअखेर यात्रा होणार आहे. यल्लम्मा यात्रेमध्ये मूलभूत सुविधा पुरवल्या नाहीत, तर महाराष्ट्रातून येणारे सुमारे ४ लक्ष ५० सहस्र भक्त यात्रेवर बहिष्कार घालतील, अशी चेतावणी येथील करवीर निवासिनी रेणुका भक्त संघटनेने बेळगाव जिल्हा प्रशासनाला दिली आहे. बेळगावचे जिल्हाधिकारी एन्. जयराम यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
       संघटनेचे अध्यक्ष सर्वश्री प्रशांत खाडे, उपाध्यक्ष बाबुराव पाटील, सचिव उदय पाटील, सदाशिव सावंत्रे, संजय मांगलेकर, किरण मोरे, सुरेश बिरूंगळे, अनिता पवार,

विश्‍वस्तांनी सुरक्षारक्षकांकडून केवळ क्षमायाचना करणारे पत्र घेतले

या प्रकरणी विश्‍वस्तांनी संबंधित सुरक्षारक्षकांवर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे !
श्री शनिशिंगणापूर येथे सुरक्षारक्षकांनी मद्यप्राशन केल्याचे प्रकरण
      सोनई - नाशिक येथे सिंहस्थ कुंभपर्वाच्या काळात श्री शनिशिंगणापूरच्या मंदिराच्या सुरक्षारक्षकांनी मंदिर परिसरात मद्यप्राशन केले. सुदाम शेटे, सागर येळवंडे, भागवत सोनवणे हे ३ सुरक्षारक्षक कर्तव्य बजावत असतांना मद्यप्राशन करतांना पकडले गेले होते. त्यांना प्रशासनाने नोटिसा बजावल्या. त्या वेळी त्यांनी झालेली चूक मान्य करत आम्ही परत मद्यपान करणार नाही, असे क्षमायाचना करणारे पत्र (माफीनामा) लिहून दिले होते.

शिरवळ (ता. खंडाळा) येथे ७ टन गोमांस पकडले !

गोमांस पकडून देणार्‍या तत्पर आणि सतर्क गोप्रेमींचे अभिनंदन !
एग्रो फूड लिमिटेडच्या नावाने गोमांस विक्री करणार्‍या गोमाफियांचे बिंग फुटले !
     भोर - पुणे-बंगळुरू महामार्गावर शिंदेवाडी (ता. खंडाळा) येथे ७ टन गोमांसाने भरलेला ट्रक शिरवळ येथील गोप्रेमींनी पकडून पोलिसांच्या कह्यात दिला. एग्रो फूड लिमिटेड, इचलकरंजी येथून तुर्भे (मुंबई) कडे गोमांस नेणार्‍या वाहनाची माहिती मिळताच शिरवळ येथील गोप्रेमी सर्वश्री प्रशांत रेवडीकर, केदार हाडके, राहुल हाडके, सागर रवळेकर हे युवक त्वरित एकत्र आले. तालुका पशू वैद्यकीय अधिकार्‍यांच्या नावाने खोटी कागदपत्रे सिद्ध करून गोमांस वाहतूक करणार्‍या गोमाफिया गोरक्षकांमुळे पोलिसांना सापडले. शिरवळ येथील गोप्रेमी प्रशांत रेवडीकर यांनी पोलीस तक्रार नोंदवल्यावर शिरवळ पोलिसांनी समीर मुजावर (वय ३८ वर्षे) आणि शकील पटवेकर (वय ५७ वर्षे) यांना कह्यात घेण्यात आले आहे

मिरज रेल्वे स्थानकाचे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज असे नामकरण करा ! - भाजपचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

जिल्हाधिकारी श्री. शेखर गायकवाड (उजवीकडे)यांना निवेदन देतांना भाजप कार्यकर्ते
     सांगली - मिरजनगरी छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. त्यामुळे मिरज येथील रेल्वेस्थानकाचे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज, असे नामकरण करावे, अशा मागणीचे निवेदन भाजप जिल्हाउपाध्यक्ष श्री. सचिन चौगुले आणि त्यांच्या सहकारी यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी श्री. शेखर गायकवाड यांच्याकडे केली आहे. (मिरज रेल्वे स्थानकाचे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज, असे नामकरण करण्याची मागणी करणार्‍या भाजप जिल्हाउपाध्यक्ष श्री. सचिन चौगुले आणि त्यांचे सहकारी यांचे अभिनंदन !

नाशिक येथे सोनसाखळी चोरणार्‍या धर्मांधांना अटक

अशा धर्मांधांवर कठोर कारवाई झाल्याविना चोरीच्या घटनांना आळा बसणार नाही !
      नाशिक - सोनसाखळी चोरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असतांना पोलिसांनी रीयाज फय्याज इराणी (वय ३२ वर्षे) आणि मुस्लीम यासीन खान इाराणी (वय २६ वर्षे) या धर्मांधांना अटक करून पोलीस कोठडी सुनावली. त्यांनी एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील ४० सहस्र रुपयांची साखळी चोरली होती.


ताजमहल हिंदु मंदिर असल्याचा कोणताही पुरावा शासनाला मिळालेला नाही ! - केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा

पुरावे शोधण्यासाठी काय काय प्रयत्न केले, याचा अहवालही शासनाने हिंदूंसाठी उघड करावा !
     नवी देहली - जगातील आठ आश्‍चर्यांपैकी एक आश्‍चर्य असलेले ताजमहल हे हिंदु मंदिर असल्याचा कोणताही पुरावा शासनाला मिळालेला नाही, अशी माहिती केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी १ डिसेंबरला लोकसभेत दिली. (थोर इतिहासकार श्री. पु.ना. ओक यांनी ताज महाल हे तेजो महालय कसे आहे, याविषयी विस्तृत विवेचन केले आहे. याविषयी पुरावे शोधण्यासाठी केंद्रशासनाने कोणत्या ग्रंथांचा, इतिहासकारांचा आधार घेतला, तेही सांगावे ! - संपादक) याप्रकरणी आग्रा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

काँग्रेसच्या राज्यात झालेली सिंचनातील टगेगिरी कोणी काढावी ? कोणी झाकावी ?

१. माधवराव चितळे समितीने सिंचनाच्या 
घोटाळ्याविषयी सादर केलेला धक्कादायक अहवाल !
सिंचन घोटाळ्याने महाराष्ट्र हादरला. माधवराव चितळे समितीने सिंचनाच्या घोटाळ्याविषयी जो अहवाल सादर केला आहे, तो धक्कादायक आहे. चितळे समितीला शासनाने मर्यादित अधिकार आणि मर्यादित क्षेत्र दिले होते. स्वतः माधवराव चितळे हे अत्यंत शिस्तीचे आणि मर्यादांचे पालन करणारे अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेता चितळे समितीने जो अहवाल दिला आहे, तो अत्यंत धक्कादायक आहे. सिंचन घोटाळ्याची तीव्रता चितळे समितीच्या अहवालावरून लक्षात येते. राज्यशासनाने निवडणुका डोळ्यांसमोर आल्याचे पाहून या अहवालावरील कृती अहवाल सिद्ध करतांना सोयीस्कररित्या मंत्र्यांवर बालंट येणार नाही, याची काळजी घेत केवळ अधिकार्‍यांना या विषयात दोषी ठरवण्याचे कारस्थान केले आहे; मात्र मंत्र्यांचा आशीर्वाद आणि सहभागाविना अखेर कोणत्याही खात्यातील अपहार होऊच शकत नाहीत. सहस्रो कोटींचे अपहार कल्पनेच्या पलीकडचे आहेत.
२. शासकीय खात्यातील काम आणि कंत्राट देण्याची पद्धत
     शासकीय खात्यात कोणतेही काम करायचे झाल्यास त्याचे अंदाजपत्रक आधी सिद्ध करावे लागते. अंदाजपत्रकात कामाची मोजमापे, त्यानुसार मूल्य (दर) आणि अंदाजित रकमांचे गणित घातलेले असते. या अंदाजपत्रकास आधी तंत्रज्ञांकडून तांत्रिक अनुमती मिळवायची असते. अंदाजपत्रकाच्या रकमेनुसार त्या त्या स्तरावरचे अभियंते या अंदाजपत्रकांना तांत्रिक अनुमती (टेक्निकल सँक्शन) देत असतात. तांत्रिक अनुमतीनंतर या प्रकल्पावर अंदाजित केलेला व्यय आणि उपलब्ध निधी इत्यादींचा विचार करून प्रशासकीय मान्यता दिली जाते. त्यानंतर ते काम करून घेण्याचे दोन प्रकार असतात. एकतर शासनाकडे उपलब्ध असलेल्या यंत्रणच्या माध्यमातून ते काम करून घ्यायचे किंवा शासनाकडे नोंदणीकृत कंत्राटदारास त्या कामाचे कंत्राट द्यायचे. हे देतांना कंत्राटदाराकडून निविदा मागवून त्या निविदा विहीत दिवशी विहीत वेळेत उघडून ते काम न्यूनतम (कमीतकमी) पैशात करायला जे कोणी सिद्ध असतील, त्यांना या कामाचे कंत्राट (ऑर्डर) दिले जाते.

नेकनूर (जिल्हा बीड) येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत ११ गायी आणि ९ वासरे शासनाधीन

शासनाने गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोरात कठोर अंमलबजावणी करावी, ही अपेक्षा !
६ धर्मांधांच्या विरोधात गुन्हे प्रविष्ट
     बीड - येथील नेकनूरमधील जनावरांच्या बाजारातून एका टेम्पोमधून गोवंशांना पशूवधगृहाकडे घेऊन जाणार असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश गावडे यांना मिळाली होती. त्यानंतर ११ गायी आणि ९ वासरे यांना घेऊन जाणार्‍या एका टेम्पोला पोलिसांनी पाठलाग करून थांबवले. त्या वेळी पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, ते गोवंश मोमीनपुरा भागातील पशूवधगृहाकडे घेऊन जात होते. या प्रकरणी अतिफ कुरेशी, रफिक कुरेशी, फारूक कुरेशी, इर्शाद कुरेशी, गफार कुरेशी आणि शेख शकील या ६ जणांवर बीड पोलीस ठाण्यात गुन्हे प्रविष्ट केले आहेत

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आलेले विषय विधानसभेत मांडू ! - आमदार शिवाजीराव नाईक

आमदार श्री. शिवाजीराव नाईक (उजवीकडे) यांनानिवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते
शिराळा, (जिल्हा सांगली) - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आलेले विषय योग्य असून या विषयांना वाचा फोडण्यासाठी ते विधानसभेत मांडू, असे आश्‍वासन भाजपचे शिराळा मतदार संघाचे आमदार श्री. शिवाजीराव नाईक यांनी दिले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने त्यांची भेट घेऊन एन्.सी.ई.आर.टीच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास समाविष्ट करण्यात यावा, कृत्रिम हौदात विसर्जन केल्याने गणेशमूर्तींची विटंबना रोखण्यात यावी, अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या तपासाप्रकरणी न्यायालय सीबीआयच्या अन्वेषणावर असमाधानी

     मुंबई - अंनिसचे संस्थापक डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्या प्रकरणांचा तपास अनुक्रमे केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि विशेष तपास पथक (एस्आयटी) या पोलीस यंत्रणा करत आहेत. त्याच्या तपासाविषयी उच्च न्यायालयाने असमाधान व्यक्त केले. दाभोलकर आणि पानसरे यांच्या कुटुंबियांनी शीना बोरा हत्याप्रकरणाच्या प्रमाणे तत्परता या प्रकरणांत का दाखवली जात नाही असा प्रश्‍न न्यायालयासमोर उपस्थित केला.

पुणे महानगरपालिकेच्या विविध खात्यांचे ऑडिट केलेले ९६ अहवाल गहाळ

पालिका प्रशासनाचा अनागोंदी कारभार !
     पुणे - महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेसाठी मुख्य लेखापरीक्षक कार्यालयाच्या कारभाराविषयी विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी लेखी प्रश्‍न विचारला होता. वर्ष २००८-०९ ते २०१४-१५ या कालावधीत दिलेल्या अंकेक्षणाच्या ९५७ अहवालांपैकी विविध खात्यांचे ९६ अहवाल गहाळ झाले आहेत. लेखापरीक्षक विभागाने अहवाल सिद्ध केल्यानंतर तो किमान ५ विभागांना जातो. पाचही विभागांतील ९६ अहवाल गहाळ झाल्याचे समजते. (पालिका प्रशासनाचे उत्तरदायी विभाग आणि संबंधित व्यक्ती यांच्यातच काहीतरी काळेबेरे नसेल कशावरून ? - संपादक)

आऊटलूक नियतकालिकाने राजनाथ सिंह यांची क्षमा मागितली !

     याच वृत्ताच्या आधारे संसदेत गदारोळ करून संसदेचा अमूल्य वेळ आणि पैसा वाया दवडणारे माकपचे खासदार सलीम हे क्षमायाचना करणार का ?
केंद्रीय गृहमंत्री यांच्या तोंडी चुकीचे विधान घालून वृत्तांकन केल्याचे प्रकरण
      नवी देहली - देशाला ८०० वर्षांनंतर हिंदु शासक मिळाला, असे विधान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केल्याचे चुकीचे वृत्त आऊटलूक या नियतकालिकाने छापले होते. याच विधानावरून संसदेत गदारोळ झाला होता. माकपचे खासदार महंमद सलीम यांनी या वृत्ताच्या आधारे संसदेत सिंह यांच्यावर आणि केंद्रशासनावर टीका केली होती. त्यानंतर आऊटलूक या नियतकालिकाने चुकीचे वृत्त प्रकाशित केल्याचे मान्य करत राजनाथ सिंह आणि महंमद सलीम यांची क्षमा मागितली.

राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी एम्आयएम्चे आमदार इम्तियाज जलील यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद !

     मुंबई - राष्ट्रगीताचा अवमान केल्याच्या प्रकरणी एम्आयएम्चे आमदार इम्तियाज जलील यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त आहे. मनसेचे चित्रपटसेना अध्यक्ष अमेय खोपकर यांनी इम्तियाज यांच्या आमदारकीच्या त्यागपत्राचीही (राजीनाम्याचीही) मागणी केली आहे. राष्ट्रगीत म्हणजे नौटंकी असे विधान इम्तियाज जलील यांनी एका वृत्तवाहिनीवर झालेल्या चर्चासत्राच्या वेळी करून राष्ट्रगीताचा अवमान केल्याचा आरोप खोपकर यांनी केला. १ डिसेंबर या दिवशी मनसेने इम्तियाज यांच्याविरोधात निदर्शने केली आणि एम्आयएम्चा झेंडा जाळला.

औंध येथे वाहतूक पोलिसाला दुचाकीस्वाराकडून शिवीगाळ

पोलिसांविषयी वाटणारे भय संपले कि काय ?
      पुणे - येथील औंध गावात वाहतुकीची कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करणार्‍या वाहतूक पोलीस शाखेचे शिपाई शिंगे यांना २७ नोव्हेंबर या दिवशी अज्ञात दुचाकीस्वाराने शिवीगाळ केली. त्यानंतर दुचाकीस्वाराने तेथून पलायन केले. या प्रकरणी चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला. पोलीस शिपाई शिंगे वाहतूक शाखेच्या टेम्पोवर नियुक्तीस आहेत.

असंख्य भाविकांनी घेतले निंगुडगे (जिल्हा कोल्हापूर) येथील श्री कार्तिकस्वामींचे दर्शन

तपोनिधी धर्मगुरु यशवंतगिरीजी महाराज उद्योगपती सरदेसाई यांना आशीर्वाद देतांना
दर्शनाला आलेले भाविक
  मौजे निंगुडगे (तालुका आजरा) - येथे २५ नोव्हेंबर या दिवशी सकाळी ७.३७ वाजता भाविकांच्या उपस्थितीत भगवान श्री कार्तिकस्वामींच्या दर्शनास प्रारंभ झाला. पुणे येथील आदर्श उद्योगपती श्री. बापूसाहेब सरदेसाई यांच्या हस्ते अभिषेक-अग्रपूजा झाल्यावर विधिवत् धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला. वेदमंत्रपठण, मंत्रांचा जयघोष, स्कंदपुराण, महाभारत यांतील श्‍लोकांचे पठण आणि शिवलीलामृत ग्रंथाच्या तेराव्या अध्यायाचे वाचन १७ घंटे अवितर चालू होते. ग्रहादी मंत्रांचा जपही चालू होता. कित्येक किलोमीटर अंतरावरून भाविक श्रद्धेने आणि आनंदाने दर्शन घेत होते. प्रचंड गर्दी होऊनही पोलिसांना न बोलावता ग्रामस्थांच्या वतीने शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले होते.

हिंदु जनजागृती समितीकडून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मांडण्यासाठी मुंबई येथील आमदारांना राष्ट्र-धर्माचे विषय सादर !

डावीकडून शिवसेना शाखाप्रमुख श्री. यशवंत विचले, 
आमदार श्री. सदा सरवणकर, शाखाप्रमुख श्री. अजित कदम 
यांना निवेदन देतांना श्री. हर्षद खानविलकर (उजवीकडे)
डावीकडून श्री. वैभव राऊत, श्री. बेंद्रे, आमदार श्रीमती मनीषा चौधरी
    मुंबई - महाराष्ट्र शासनाच्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्र-धर्माचे विषय मांडले जावेत आणि त्यावर चर्चा होऊन उपाय निघावेत, या हेतूने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने माहिम येथील शिवसेनेचे आमदार श्री. सदा सरवणकर, वरळीचे श्री. सुनील शिंदे, भाजपचे कांदिवली (पूर्व) येथील आमदार श्री. अतुल भातखळकर आणि दहिसर येथील भाजपच्या आमदार श्रीमती मनीषा चौधरी यांना विषय देण्यात आले. दहिसर आणि कांदिवली येथे हिंदु गोवंश रक्षा समितीचे श्री. वैभव राऊत हेही या वेळी उपस्थित होते.

अकोला येथील प्रांतीय हिंदु अधिवेशनाची सांगता

     अकोला - येथील प्रांतीय हिंदु अधिवेशनाची सांगता २९ नोव्हेंबर या दिवशी करण्यात आली. समारोपाच्या वेळी सर्व हिंदुत्ववाद्यांनी संघटितपणे कार्य करण्याचे निश्‍चित केले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलेश टवलारे यांनी वास्तू, नगरे, उपनगरे यांना दिलेली परकीय नावे पालटून ऐतिहासिक नावे द्यावीत, या विषयावर मार्गदर्शन केले. कॉन्व्हेंटमधून होणारे धर्मांतर याविषयी पुसद येथील शिवप्रतिष्ठानचे श्री. महेश काळे यांनी उपस्थितांना माहिती दिली. योग वेदांत सेवा समितीचे श्री. मानव बुद्धदेव यांनी संतांवर होणारी आक्रमणे आणि अत्याचार यांविषयी सांगितले. अधिवक्ता श्री. प्रशांत गोरे यांनी संरक्षणाच्या संदर्भातील कायद्यांविषयी उपस्थितांना माहिती दिली, तर अधिवक्ता श्री. सुरेश कुळकर्णी यांनी अनधिकृत भोंग्यांमुळे ध्वनीप्रदूषण होत असून ते कायद्याच्या विरुद्ध असल्याचे सांगितले.

राष्ट्र आणि धर्म या प्रश्‍नांविषयी येत्या अधिवेशनात आवाज उठवणार ! - आमदार योगेश घोलप, शिवसेना

माजी मंत्री आणि शिवसेना उपनेते श्री. बबन घोलप 
(डावीकडून तिसरे) यांना निवेदन देतांना समितीचे 
कार्यकर्ते आणि समवेत आमदार श्री. योगेश घोलप (डावीकडून चौथे)
   नाशिक - राष्ट्र आणि धर्म याविषयी गंभीर प्रश्‍न आज आपल्यासमोर आहेत. येत्या अधिवेशनात त्याविषयी आवाज उठवणार आहे, असे आश्‍वासन येथील शिवसेनेचे आमदार श्री. योगेश घोलप यांनी दिले. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी श्री. घोलप यांची भेट घेतली. येत्या अधिवेशनात राष्ट्र आणि धर्म याविषयी बाजू मांडण्याची विनंती करत काही गंभीर प्रश्‍नही निदर्शनास आणून दिले. त्यामध्ये एन्.सी.ई.आर्.टी. अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि इतिहास यांना दिलेले स्थान, मुंबई विमानतळातील ए.टी.सी. टॉवरलगतचे अतिक्रमण, श्री गणेशमूर्तीविसर्जन यांसारख्या प्रश्‍नांचा समावेश होता. या वेळी माजी मंत्री आणि शिवसेना उपनेते श्री. बबन घोलप यांनाही सदर विषयांचे निवेदन देण्यात आले.

श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्‍यात अभिषेकाच्या वेळी जाण्यास महिला भाविकांना रोखू शकत नाही ! - श्री महालक्ष्मी मंदिराचे व्यवस्थापक धनाजी जाधव

देवदर्शनाविषयी शास्त्राचे नियम पाळल्यासच खरा लाभ होईल !
 श्री महालक्ष्मी कोल्हापूर
    कोल्हापूर - अभिषेकाच्या व्यतिरिक्त इतर वेळी पुरुषांनीही गाभार्‍यात जाण्यावर निर्बंध आहेत. सगळे गाभार्‍यात गेले, तर कोणालाच दर्शन मिळणार नाही. त्यामुळे अभिषेकाच्या व्यतिरिक्त इतर वेळी सर्वांनाच गाभार्‍यात प्रवेश बंद आहे. श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्‍यात अभिषेकाच्या वेळी जाण्याची भूमिका काही महिला भाविकांनी घेतली, तर आम्ही त्यांना रोखण्याचा प्रश्‍नच येत नाही, असे श्री महालक्ष्मी मंदिराचे व्यवस्थापक श्री. धनाजी जाधव यांनी सांगितले आहे. (भाविकांचे नियंत्रण करता येत नसेल, तर मंदिर समिती आणि तिने घालून दिलेले नियम यांचा काय उपयोग ? यासाठीच भक्तांकडे मंदिराचे व्यवस्थापन द्यायला हवे. तसेच देवस्थान समितीने नियम डावलून गाभार्‍यात शिरणार्‍यांविरुद्ध कारवाईसुद्धा केली पाहिजे. - संपादक)

राज्यातील कैद्यांना योग प्रशिक्षण

पुणे - राज्यातील सर्व कारागृहांमध्ये येत्या एक जानेवारीपासून कैद्यांना योग प्रशिक्षण देण्यात येणार आहे. योगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणार्‍या कैद्यांना शिक्षेत तीन महिन्यांची सवलत दिली जाईल, अशी घोषणा राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (कारागृह) डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी केली.
    येरवडा मध्यवर्ती कारागृहात २७ नोव्हेंबरपासून योग प्रशिक्षण वर्गास प्रारंभ झाला. या वेळी डॉ. उपाध्याय यांनी कैद्यांना योगाविषयी शास्त्रीय माहिती दिली. येरवडा कारागृहाचे उपअधीक्षक कौस्तुभ कुर्लेकर, वरिष्ठ तुरुंग अधिकारी प्रदीप जगताप या वेळी उपस्थित होते. डॉ. उपाध्याय पुढे म्हणाले की, योग म्हणजे मन आणि शरीर जोडण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे मनाची एकाग्रता आणि शरिराची कार्यक्षमता वाढते. मनातील ताणतणाव आणि नकारात्मक विचार कमी होऊन जीवन आनंदी होते.

रिक्शाचालकाकडून वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की आणि शिवीगाळ

    कल्याण - येथील रेल्वे स्थानक परिसरात अयोग्य पद्धतीने रिक्शा उभी केल्याने समज देणार्‍या वाहतूक पोलिसाला उद्दाम रिक्शाचालकाने मारहाण केली आहे. पोलिसाने रिक्शाचालकाला हटकल्यावर त्याने त्यांच्याशीच वाद घालण्यास प्रारंभ केला, तसेच पोलिसाला धक्काबुक्कीही केली. टोचन (टोइंग व्हॅन) कर्मचार्‍यांनी त्यांना रिक्शाचालकाच्या तावडीतून सोडवत रुग्णालयात नेले. याप्रकरणी रिक्शाचालकाच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (पोलिसांनाच धक्काबुक्कीला सामोरे जावे लागत असेल, तर सामान्यांच्या स्थितीचा विचारच न केलेला बरा ! - संपादक)

सनातनविरोधी षड्यंत्रामुळे निरपराध साधकांना द्यावी लागली अग्नीपरीक्षा !

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या 
साधकांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे भीषण अनुभव ! 
     सनातन प्रभात नियतकालिकांमध्ये साधकांचे अनुभव आणि अनुभूती असतात. वर्ष २००९ मध्ये अगदी दिवाळीच्या दिवशी, म्हणजे नरकचतुर्दशीच्या आदल्या दिवशी गोव्यातील मडगाव शहरात नरकासुरदहन स्पर्धेच्या जवळ झालेल्या एका स्फोटात सनातनच्या दोन साधकांचा मृत्यू झाला. या प्रकरणात सनातनचे साधक दोषी असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आणि सनातनच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या ६ साधकांना बंदी बनवण्यात आले.

फलक प्रसिद्धीकरता

कथित आरोपांवरून हिंदु संतांची नाहक अपकीर्ती करणारी प्रसारमाध्यमे याविषयी गप्प का ?
   लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी एका १३ वर्षाच्या मुलाने केलेल्या आरोपावरून गोवंडी (मुंबई) येथील क्राईस्ट द चर्चचे फादर जॉन्सन लॉरेन्स यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
   Mumbaime ek charchke fatherpar 13 salke ladkene kiya yaun attyacharka arop.
Hindu santopar aag ugalnewali media ab chup kyo ?
जागो !
   मुंबई में एक चर्च के फादरपर १३ सालके लडकेने किया यौन अत्याचारका आरोप.
हिंदु संतोंपर आग उगलनेवाली मिडिया अब चूप क्यो ?

सेनापती बापट हे सशस्त्र क्रांतीकारकासह एक उत्तम साधक आणि अनुवादक होते !

      २८ नोहेंबर २०१५ च्या दैनिक सनातन प्रभातमध्ये सेनापती बापट यांच्या संबंधी एक विनम्र अभिवादनाचा लेख वाचला. त्याच्यासंबंधी माझ्या वाचनात आलेल्या काही बाबीही नमूद कराव्याशा वाटतात. सेनापती बापट सशस्त्र क्रांतीकारक होतेच; परंतु त्यांची दुसरी बाजू बहुतेकांना माहीत नाही. ते एक उत्तम साधक आणि अनुवादक होते. त्यानी श्री योगी अरविंद यांच्या The Life Divine या ग्रंथाच्या तीन खंडांचे मराठी अनुवाद केले आहेत. ते दिव्य जीवन या नावाने श्री अरविंद आश्रम, पाँडेचरी येथे प्रकाशित केले आहेत. या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे या तीन खंडांची पृष्ठसंख्या २००० पाने आहेत.

रेल्वे वाहतूक : संबंधित विभागांच्या अयोग्य कृती अन् अडचणी आणि अपघात

  
वाचा नवीन सदर
     रेल्वेचा उगम इंग्लंडमध्ये ख्रिस्ताब्द १७८४ मध्ये झाला. नंतर ईस्ट इंडिया कंपनीने भारताच्या बंदरातील माल चटकन वाहून नेण्यासाठी १६.४.१८५३ या दिवशी मुंबई-ठाणे ही पहिली भारतीय रेल्वे चालू केली. पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर देशात विविध ठिकाणी प्रवासी आणि माल यांची वाहतूक करणार्‍या रेल्वेचे सर्वाधिकार भारतीय रेल्वेकडे देण्यात आले. या रेल्वे खात्याचा कारभार पहाण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळात एक स्वतंत्र मंत्री नेमलेला असतो.
   स्वातंत्र्योत्तर काळात राज्यकर्त्यांनी राष्ट्रस्वास्थ्य उत्तम रहाण्यासाठी त्यागपूर्ण जीवन न जगता स्वार्थाला प्राधान्य दिले. उच्चभ्रूंच्या कृतीचे कनिष्ठ वर्गीय जनता नेहमी अनुकरण करते, या नियमानुसार भ्रष्ट लोकप्रतिनिधींच्या वर्चस्वाखालील भारतीय रेल्वे खात्यातही भ्र्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला. त्यामुळे रेल्वे खात्याच्या संचालकांपासून अगदी कनिष्ठ स्तराच्या कर्मचार्‍यांपर्यंत प्रत्येक जण अल्प श्रमात जास्त स्वार्थ कसा साधता येईल, ते पहात आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेपुढे तिकीटविक्रीतील अनुचित व्यवहार, प्रतिदिनी दिवशी अपघातांमुळे होणारे मृत्यू, तसेच माओवादी, समाजकंटक यांकडून होणारी आक्रमणे, भ्रष्ट प्रशासकीय यंत्रणेमुळे प्रवाशांची होणारी असुविधा अशा कित्येक समस्या आवासून उभ्या राहिल्या आहेत.
हिंदु राष्ट्रात (ईश्‍वरी राज्यात) रेल्वे वाहतूक अशी असेल !
    हिंदु राष्ट्र (ईश्‍वरी राज्य) म्हणजे आदर्श राज्य ! असे राज्य आणण्यासाठी सनातन प्रयत्नरत आहे. या लेखमालिकेत लोकराज्यातील (लोकशाहीतील) भारतीय रेल्वेच्या संदर्भात जे दोष सांगितले आहेत, ते पुढे येणार्‍या हिंदु राष्ट्रातील रेल्वे आस्थापनात नसतील. प्रशासनातील संचालक, अधिकारी, कर्मचारी इत्यादींसह सर्वसामान्य प्रवासी यांना राष्ट्र आणि नागरिक यांच्या सर्वांगीण विचार करतांना त्यागपूर्ण जीवन जगण्याची शिकवण दिली जाईल. तसेच राष्ट्र्र अन् समाज द्रोह करणार्‍यांना शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याप्रमाणे तात्काळ आणि कडक शिक्षा दिली जाईल. थोडक्यात सांगायचे झाल्यास रेल्वेसह सर्वच क्षेत्रांतील आबालवृद्ध व्यक्ती आपल्याशी संबंधित कामधंद्याकडे शीघ्र ईश्‍वरप्राप्तीचे करण्याचे साधन अशा व्यापक दृष्टीकोनातून पहातील. त्यामुळे हिंदु राष्ट्र्रात रेल्वेचा प्रवास सुखकर अन् आनंददायी होईल.

६१ टक्के आध्यात्मिक स्तर असलेल्या आणि महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेल्या चि. वल्लभ राकेश पाध्ये याचा स्तर घोषित झाल्यावर त्याच्या वडिलांची झालेली विचारप्रक्रिया !

श्री. राकेश पाध्ये
     १९.३.२०१५ या दिवशी आमचा मुलगा चि. वल्लभ याचा ६१ टक्के आध्यात्मिक स्तर दैनिक सनातन प्रभातमधून घोषित झाला. सकाळी आम्ही अजून उठलोही नव्हतो. त्या वेळी माझे भाऊ-भावजय त्या दिवशीचे दैनिक घेऊन खोलीत आले आणि चि. वल्लभला उठवून दैनिकातील त्याचे छायाचित्र दाखवू लागले. आम्हालाही प्रथम काय आहे, हे ठाऊक नव्हते. नंतर कळले की, वल्लभ महर्लोकातून जन्माला आला असून त्याची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आहे. सर्वसाधारणपणे ही आनंदवार्ता साधकासाठी विलक्षण आनंद देणारी आहे;

भिकार्‍यांच्या सेवेच्या नावाखाली धर्मांतर करणारे ख्रिस्ती !

     अशिक्षित, गोरगरीब, श्रमिक यांना आर्थिक, वैद्यकीय साहाय्य देऊन, उज्ज्वल भविष्याची स्वप्ने दाखवून आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर घडवण्याचे मिशनर्‍यांचे उद्योग अजूनही चालूच आहेत. आदिवासींची सेवा करून त्यांना ख्रिस्ती बनवण्याचे प्रकार चालू असतांनाच आता या मिशनर्‍यांचे प्रमुख लक्ष्य असाहाय्य भिकारी ठरले आहेत. या बिगरख्रिस्ती भिकार्‍यांची, गर्दुल्ल्यांची सेवा आणि त्यांना साहाय्य करून त्यांचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर घडवण्याची पद्धतशीर मोहीमच सध्या चालू असल्याची माहिती हाती आली आहे.

श्रीकृष्णाने सुचवल्यानुसार त्याचे चित्र काढणारी निपाणी (कर्नाटक) येथील कु. भाग्यश्री कल्लापा लोळसुरे

राधा-कृष्णा : हे चित्र काढतांना मी राधाभावात होते. कृष्णाची बासरी ऐकतांना राधा कशी भावविभोर आणि मंत्रमुग्ध असेल ?, या भावात हे चित्र श्रीकृष्णाच्या कृपेने काढता आले. (११.११.२०१३, सकाळी ११ ते दुपारी १ आणि सायं. ५ ते ८)


इंग्रजी भाषेचे वाढते स्तोम : भारतीय स्थानिक भाषा लोप पावण्याच्या मार्गावर !

     स्वातंत्र्यपूर्व भारताची हिंदु धर्माला जोडलेली नाळ तोडण्यासाठी इंग्रज गव्हर्नर मॅकोलेने लादलेल्या शिक्षणप्रणालीत स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या काँग्रेससह अन्य सर्व पक्षांनी कोणताही पालट न करता तोच पाठ गिरवला. त्यामुळे भारतीय गुरुकुल परंपरा लोप पावलीच; पण भारतीय भाषांमध्ये शिक्षण घेण्यापासून समाज वंचित राहिला. आजमितीला इंग्रजी भाषेचे स्तोम एवढे प्रचंड वाढले आहे की, स्थानिक भाषांमध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या अल्प झाली आहे. स्थानिक भाषा शिकण्याची क्षमता नसलेल्या तरुण पिढीमध्ये राष्ट्र आणि धर्म यांची निकड अल्प झाली असून भारतीय संस्कृतीचा र्‍हास होत आहे.

चोर्‍यांची वाढती व्याप्ती !

      चोर चोरी करून पळाला. यातील चोरीच्या वस्तूंमध्ये आतापर्यंत केवळ दागिने आणि पैसे यांचा समावेश होता; पण आता चोरांच्या चोरीच्या कक्षाही रुंदावत चालल्या आहेत; कारण दागिने आणि पैसे यांची जागा दैनंदिन जीवनातील नानाविध वस्तूंनी घेतली आहे. त्यामुळे कशाची चोरी होईल, याचीच प्रतिदिन धास्ती वाटू लागली आहे. प्रतिदिन होणार्‍या चोर्‍यांमध्ये डाळी आणि कांदा यांच्याही चोरीची भर पडली आहे. स्वयंपाकघरातील पदार्थांची चोरी प्रथमदर्शनी हास्यास्पद वाटत असली, तरी त्या पदार्थांच्या किमती गगनाला भिडल्यानेच अशा प्रकारच्या चोर्‍यांना उधाण आले आहे.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
   या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

मूलभूत सेवांसाठीही शासकीय कर्मचारी आणि अधिकारी यांचे हात ओले (लाच) करावे लागणे !

     सीएम्एस् इंडिया करप्शन स्टडी या संस्थेने अहमदाबाद, मंगळुरू, भुवनेश्‍वर, चेन्नई, देहली, हैदराबाद, गोवा, कोलकाता आणि मुंबई या महानगरांतील झोपडवस्त्यांतून केलेल्या सर्वेक्षणात ८८ टक्केे नागरिकांच्या मते वर्षभरात त्यांना पोलीस दलातील भ्रष्टाचाराचा सर्वाधिक फटका बसला. देहलीत झोपडीची जागा मिळवण्यासाठी पोलिसांना किमान ५०० रुपये, तर कमाल ७००० रुपये इतकी लाच द्यावी लागते.

भाव, आनंद आणि चैतन्य यांची अनुभूती देऊन मनावर कोरली गेलेली प.पू. गुरुदेवांची अपूर्व भेट !

डॉ. निवृत्ती चव्हाण
     १९.३.२०१५ या दिवशी माझे आई-वडील (डॉ. निवृत्ती रामचंद्र चव्हाण आणि सौ. अंजना निवृत्ती चव्हाण) हे तीन दिवसांसाठी रामनाथी आश्रमात आले होते. त्यांची घरी परत जाण्याची वेळ झाली, तरी त्यांचे प.पू. गुरुदेवांच्या भेटीचे नियोजन झालेले नव्हते. आई-बाबांनीही प.पू. गुरुदेवांची भेट असेल का ?, असे विचारले नाही आणि मीही तशी व्यवस्थापनाकडे विचारणा केली नाही. जे असेल, ते स्वीकारायचे. आपण अपेक्षा ठेवायची नाही, असे सर्वांचे मत होते. निघण्याच्या आधी १० मिनिटे आम्हाला निरोप मिळाला. तेव्हा प.पू. गुरुदेवांची भेट असल्याचे कळले. आई-बाबा, मी आणि मोठी बहीण बैठक कक्षात येऊन बसल्यावर आम्ही चौघेच भेटीला आहोत, असे लक्षात आले. काय बोलायचे ? कसे विचारायचे ?, असे प्रत्येकाला वाटत होते; कारण कुणीच काही बोलण्याची वा विचारण्याची सिद्धता केली नव्हती. मग सर्वांनी मिळून प्रार्थना केली, आमच्याकडून जे अपेक्षित असेल, ते तुम्हीच करवून घ्या. या भेटीमध्ये प.पू. गुरुदेवांनी सर्वांकडून अनपेक्षितपणे सर्व सूत्रे बोलून घेतल्याचे जाणवले. या सूत्रांविषयी आमच्यात कधी बोलणे झाले नव्हते. त्यातून बाबांची अंतर्मनाने साधना कशी चालू आहे, याचाही आम्हाला उलगडा झाला.

साधकांशी सहजतेने जवळीक साधून त्यांना अल्पावधीत आपलेसे करणारी आणि प.पू. गुरुदेवांवर पुष्कळ श्रद्धा असलेली कु. माधुरी दुसे !

कु. माधुरी दुसे
१. अल्प कालावधीत जवळीक साधून आपलेसे करणे
       मी आश्रमात नवीनच रहायला आले आणि आम्ही एकाच खोलीत असल्याने मला माधुरीचा सहवास लाभला. तिने थोड्याच काळात जवळीक साधून मला आपलेसे केले. त्यामुळे मनातील प्रत्येक गोष्ट तिला सांगावी, असे वाटू लागले. तिच्याशी बोलल्यावर माझे मन हलके होते, तसेच तिने दिलेले दृष्टीकोन ऐकून साधनेला नवी दिशाही मिळते. कधी एखादा प्रसंग किंवा मनातील विचार यांमुळे मला ताण आला असेल आणि त्याच वेळी माधुरी नुसती समोर दिसली, तरी सर्व ताण निघून जातो.
२. तत्त्वनिष्ठता आणि तळमळ
    माधुरीमध्ये तत्त्वनिष्ठता हा गुण आहे. आश्रमातील कार्यपद्धतींचे ती स्वतः काटेकोरपणे पालन करते आणि इतरांनाही त्याची जाणीव करून देते. खोलीतील वस्तू व्यवस्थित ठेवलेल्या नसल्यास ती लगेच तशी सूचना फलकावर लिहिते. माझ्या चुकांचीही ती मला लगेच जाणीव करून देते. चूक सांगतांना समोरच्या साधकाकडून पुन्हा तशी चूक होऊ नये आणि त्याची प्रगती व्हावी, असा विचार तिच्या मनात असतो. प्रत्येक सेवा परिपूर्ण करण्याची तळमळ असते.

पू. (सौ.) आशालता सखदेवआजी यांच्या खोलीतील फुलांची गंमत !

   
पू.(सौ.) आशालता सखदेव
१९.१०.२०१५ या रात्री ९ वाजता मी पू. (सौ.) सखदेवआजींना तेलाने मर्दन करण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले होते. तेव्हा तेथे मयुरीताई (कु. मयुरी डगवार) आणि कल्याणीताई (कु. कल्याणी गांगण) या उपस्थित होत्या. मयुरीताईने खोलीत ठेवलेली अबोलीची फुले आम्हाला दाखवली. ती २ दिवसांनंतरही टवटवीत होती. पू. आजींना फुले पुष्कळ आवडत असल्याचे मयुरीताईने आम्हाला सांगितले.
    तेवढ्यात कल्याणीताईचे लक्ष पू. आजींच्या पलंगावरील उशीकडे गेले. उशीच्या अभ्य्रावर फुलांची नक्षी होती. कल्याणीताई म्हणाली, ती फुलेसुद्धा खरीच आहेत, असे वाटते ना ! त्यानंतर आमचे लक्ष पू. आजींच्या गादीवर घातलेल्या पलंगपोसावरील फुलांच्या नक्षीकडे गेले. त्यांनी नेसलेल्या साडीवर आणि तेथे ठेवलेल्या आणखी एका साडीवरही फुलांची नक्षी होती. बाजूला दोरीवर वाळत घातलेल्या परकरावरसुद्धा फुलांची नक्षी होती. टेबलक्लॉथवर आणि आसंदीवर हात पुसायला ठेवलेल्या हातरुमालावर, तसेच खिडकीवर वाळत घातलेल्या देवांचे फोटो पुसण्यासाठी वस्त्रावर फुलांचीच नक्षी होती.

साधकांना सूचना

कधीही दूरच्या प्रवासाला निघतांना वाहनाची लिंबाने दृष्ट काढूनच निघा !
     सप्तर्षि जीवनाडीच्या माध्यमातून महर्षींनी प्रवासाला निघतांना वाहनाची दृष्ट कशी काढायची, हे शिकवणे : कधीही दूरच्या प्रवासाला निघतांना वाहनाची लिंबाने दृष्ट काढावी. यासाठी पाच लिंबे बरोबर घ्यावीत. यातील चार लिंबे गाडीच्या चार चाकांखाली ठेवावीत. पाचवे लिंबू उजव्या हातात घेऊन गाडीसमोर उभे रहावे आणि उजव्या हाताने ९ वेळा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने लिंबू गाडीसमोर फिरवावे आणि अशीच कृती लिंबू डाव्या हातात घेऊन करावी; मात्र हे लिंबू घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरवावे. लिंबू फिरवतांना आपल्या इष्ट देवतेला गाडीची दृष्ट निघण्यासंबंधी प्रार्थना करावी आणि नंतर हे लिंबू गाडीसमोरच नारळ फोडतो, तसेच एक हात मारून दोन भागांत फोडावे. लिंबाचा एक भाग आपल्या उजवीकडे आणि दुसरा भाग डावीकडे फेकून द्यावा. हात स्वच्छ धुवावेत आणि मगच प्रवासाला आरंभ करावा.

बोधचित्र


॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
मी कोणाचा नाही. माझा कुणी नाही.
ज्याचा त्याचा तोच मी; म्हणून मी सर्वांचा आहे.
भावार्थ : मी सर्वस्व गुरुचरणांवर वाहिल्यानंतर मी दुसर्‍या कुणाचा होऊच शकत नाही. गुरूंना अर्पण झाल्यानंतर माझा कुणी असायला मी शिल्लक राहिलोच कुठे ? परंतु सर्वांचा खरा मी एकच आणि सर्वव्यापी असल्यामुळे आता मी सर्वांचा आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
हिंदु धर्माभिमान्यांनो, कारागृहात जावे 
लागले तर, या विचाराने मन स्थिर करा ! 
     'हिंदु धर्माभिमान्यांनो, छत्रपती शिवाजी महाराज कसे औरंगजेबाच्या कारागृहात राहिले, स्वातंत्र्यवीर सावरकर कसे अंदमानात राहिले, हे लक्षात ठेवा. त्यामुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी तुम्हालाही कारागृहात जावे लागले, तर मन स्थिर रहायला साहाय्य होईल.' 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मानवी जीवन
     कठीण परिस्थिती आणि संकटे यांना न घाबरता धैर्याने आणि हुशारीने त्यांना सामोरे जाऊन त्यातून मार्ग काढणे, हाच खरा पुरुषार्थ !
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

ग्लोबल वॉर्मिंग !

     सध्या पॅरिस (फ्रान्स) येथे ग्लोबल वॉर्मिंग आणि जल-वायू प्रदूषण या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी जागतिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात १५० हून अधिक देशांचे पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष, उच्चपदस्थ पदाधिकारी उपस्थित आहेत. ग्लोबल वॉर्मिंग हा सर्वांसमोरील सध्या अत्यंत गंभीर प्रश्‍न आहे. पृथ्वीचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. कुठे पूर, तर दुष्काळ, अशी स्थिती आहे. क्षणोक्षणी पालटणार्‍या पर्यावरणामुळे शहर, खेडी, शिवार, नदी, समुद्र सारे काही प्रभावित होत आहे. त्यावर उपाय कसा काढायचा याचीच चिंता सर्वांना आहे. क्लायमेट सेंट्रल या संस्थेच्या अहवालानुसार जर पृथ्वीचे तापमान ४ अंश सेल्सियसने वाढले, तर समुद्राची पातळी ८.९ मीटरने वाढेल.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn