Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सनातन प्रभातच्या रत्नागिरी आवृत्तीचा आज सोळावा वर्धापनदिन


अभय वर्तक यांना गोळ्या घाला ! - डॉ. भारत पाटणकरांच्या विद्रोही मित्राची फेसबूकवर चिथावणीखोर प्रतिक्रिया

पोलीस अधीक्षकांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी
आणि सनातनचे साधक
डॉ. पाटणकर आणि खंडागळे यांना अटक करा ! - सनातन संस्थेची मागणी
मुंबई - 'मी तर म्हणतो वर्तकलाच गोळ्या घालाव्यात, जाऊ द्यात १० जण आत हसत हसत', अशी पोस्ट २८ नोव्हेंबर २०१५ या दिवशी सकाळी राम खंडागळे नावाच्या इसमाने डॉ. भारत पाटणकर यांच्या फेसबूकवर टाकली आहे. अशा प्रकारे डॉ. पाटणकर यांच्या फेसबूक अकाऊंटवरून सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांना गोळ्या घालण्याचे आवाहन त्यांच्याच विद्रोही मित्राने केले आहे. डॉ. पाटणकर यांनी २६ नोव्हेंबर या दिवशी फेसबूक अकाऊंटवर पोस्ट केलेल्या वृत्तावर ही पोस्ट दिली आहे. 

भारत पाटणकर यांच्या फेसबूकवरून मला दिलेल्या खुनाच्या धमकीमुळे पुरोगाम्यांचे खरे स्वरूप उघड झाले आहे ! - अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

जनसंवाद सभेत उपस्थितांशी संवाद साधतांना श्री. अभय वर्तक
कोल्हापूर येथे जनसंवाद सभा
कोल्हापूर - सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना '२५ लाख रुपये देतो', असे सांगणार्यांना शोधा, म्हणजे खरे खुनी सापडतील. अशाच प्रकारचे आमिष डॉ. दाभोलकर खुनाच्या प्रकरणी नागोरी आणि खंडेलवाल यांना राकेश मारिया यांनी दाखवल्याचे त्यांनी सांगितले होते. याचा अर्थ पोलिसांना खरे खुनी माहीत आहेत आणि या सर्वांमागे कोणीतरी वेगळी व्यक्ती कार्यरत आहे. संघर्ष यात्रा, निवेदने, याचिका हा सर्व देखावा आहे, हे मला गोळ्या घालण्याच्या डॉ. भारत पाटणकर यांच्या फेसबूकवरून दिलेल्या धमकीवरून स्पष्ट होते. या धमकीमुळे पुरोगाम्यांचे खरे स्वरूप उघड झाले आहे, असे प्रतिपादन सनातनचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी केले. पुरोगाम्यांनी काढलेली संघर्ष यात्रा आणि निर्धार सभा यांच्या पार्श्वुभूमीवर येथे घेण्यात आलेल्या सनातनच्या जनसंवाद सभेत ते उपस्थितांशी संवाद साधत होते. या सभेला ५५० जिज्ञासू नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. सनातनच्या पू. (कु.) स्वाती खाडये आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांनीही या वेळी उपस्थितांशी संवाद साधला. 

भक्तांनी मंदिरात श्रद्धेने दान केलेल्या गायी दलालांकडून पाठवल्या जातात पशूवधगृहात !

हे आहेत मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! 
काँग्रेसच्या राज्यात हिंदूंच्या मंदिरांसह आता गोमाताही असुरक्षित !
कर्नाटकमधील काँग्रेस शासनाच्या कह्यात असलेल्या मले महादेश्‍वर मंदिरातील प्रकार !
* मंदिर प्रशासन करते गायींचा लिलाव !
* लिलावात विक्री केलेल्या गायी दलाल घेऊन जातात तमिळनाडूतील पशूवधगृहात ! 

  हनुरू (चामराजनगर, कर्नाटक) - येथील प्रसिद्ध मले महादेश्‍वर मंदिरातील श्री मादप्प देवाच्या चरणी भक्तांनी संकल्प करून दान म्हणून दान केलेल्या गायी दलालांकडून कालांतराने पशूवधगृहात पाठवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

असहिष्णुतेच्या सूत्रावरून माकपचे खासदार महंमद सलीम यांचा राजनाथ सिंह यांच्यावर आरोप

असे तथ्यहीन आरोप करणार्या दायित्वशून्य खासदारांवर शासनाने कठोर कारवाई करावी, ही अपेक्षा !
गदारोळानंतर संसदेचे कामकाज स्थगित
नवी देहली - असहिष्णुतेच्या सूत्रावरून लोकसभेत चालू असलेल्या चर्चेमध्ये  मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार महंमद सलीम यांनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यावर केलेल्या आरोपामुळे संसदेत गदारोळ झाला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले. (देशासमोर शत्रूराष्ट्र पाककडून सीमेवर सातत्याने होणारा गोळीबार, महागाई, दुष्काळ, शेतकरी आत्महत्या आदी महत्त्वाचे प्रश्न असतांना 'असहिष्णुते'चा कांगावा करत त्यावर चर्चा करण्यात संसदेचा वेळ वाया दवडून जनतेच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा करणारे साम्यवादी ! - संपादक)

(म्हणे) सरदार पटेल पंतप्रधान झाले असते, तर भारताचाही पाकिस्तान झाला असता !

लेखक कांचा इलया यांची बौद्धिक दिवाळखोरी
मुंबई - सरदार वल्लभभाई पटेल जर भारताचे पहिले पंतप्रधान झाले असते, तर भारतातील लोकशाही व्यवस्था कोलमडून पडली असती आणि या देशाचीही अवस्था पाकिस्तानसारखी झाली असती, असे विधान करून लेखक कांचा इलाया यांनी त्यांची बौद्धिक दिवाळखोरी सिद्ध केली आहे.

आजारी वडिलांच्या सोयीसाठी मुलाने केलेल्या ट्विटनंतर रेल्वेने लगेच केले साहाय्य !

केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांची तत्परता !
जोधपूर - शासकीय कार्यालयातील कामाच्या गतीविषयी काही न बोललेच बरे, अशा बहुतेकांच्या प्रतिक्रिया असतात. त्यातही भारतीय रेल्वेविषयीच्या तक्रारी हा बहुतेक करून सर्वांच्या चर्चेचा विषय असतोे; पण विद्यमान रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांच्या तत्परतेविषयी सध्या जोरदार चर्चा चालू आहे. कर्नाटकहून राजस्थानात रेल्वेने जाणार्‍या पंकज जैन यांच्या एका ट्विट रेल्वेमंत्री सुरेश प्रभु साहाय्याला धावून आले. रेल्वेत एवढ्या गतीने आपल्याला साहाय्य मिळेल, यावर विश्‍वासच नव्हता, अशी प्रतिक्रिया जैन यांनी व्यक्त करून प्रभु यांचे आभार मानले आहेत.

शबरीमला देवस्थानामध्ये महिलांना प्रवेशबंदी योग्य कि अयोग्य ?

'केरळमधील शबरीमला देवस्थानात प्राचीन काळापासून १० ते ५० वर्षे वयोगटातील (या वयोगटातील महिलांना मासिक पाळी असते.) महिलांना प्रवेशबंदी आहे. या संदर्भात एका महिलेने विचारले असता, 'त्रावणकोर देवस्वम मंडळा'चे शासकीय पदाधिकारी  श्री. गोपालकृष्णन् यांनी 'महिला भाविक रजस्वला आहेत कि नाही, हे पडताळणारे यंत्र निर्माण झाले की, त्याद्वारे 'स्कॅन' करून महिलांना मंदिरात प्रवेश दिला जाईल', असे विधान केले होते. या उत्तराच्या निषेधार्थ केरळमधील महाविद्यालयीन विद्यार्थिनी निकिता आझाद यांनी सोशल मीडियावर 'हॅपी टू ब्लीड' ही चळवळ चालू केली आहे. 'एबीपी माझा'सारख्या दूरचित्रवाहिन्यांनी या संदर्भात स्त्रीमुक्तीचा टाहो फोडला. या संदर्भातील सनातनचा दृष्टीकोन पुढे दिला आहे. 

गुजरातमधील भाजप नेत्यांच्या हत्यांची प्रकरणे एन्.आय.एकडे वर्ग

     कर्णावती (गुजरात) - भरुचमधील भाजप नेत्यांच्या दुहेरी हत्याकांडांची तपासणी यापुढे राष्ट्रीय तपास यंत्रणा (एन्.आय.ए) करणार आहे. या हत्याकांडाची चौकशी एन्.आय.एने करावी, अशी विनंती गुजरात पोलिसांनी आठवडाभरापूर्वी केली होती. एन्.आय.एने त्यास संमती दिली असून गुजरात पोलिसांना याविषयीची सूचना देण्यात आली आहे.
     या हत्यांचा तपास सध्या गुजरात पोलिसांचे आतंकवादविरोधी पथक करत आहे. आतापर्यंत या प्रकरणी ७ हून अधिक आरोपींना अटक करण्यात आली आहे.

कुर्ला येथील चित्रपटगृहात राष्ट्रगीताचा अवमान करणार्‍या मुसलमान कुटुंबाला प्रेक्षकांनी चित्रपटगृहाबाहेर काढले !

     कुर्ला - येथील पीव्हीआर् सिनेमागृहात चित्रपटाचा खेळ चालू होण्यापूर्वी नेहमीप्रमाणे राष्ट्रगीतास आरंभ झाला; पण राष्ट्रगीतासाठी चित्रपटगृहातील एक मुसलमान कुटुंब उभेच राहिले नाही. राष्ट्रगीताचा अवमान करणार्‍या या कुटुंबाला राष्ट्रगीत संपल्यानंतर इतर प्रेक्षकांनी घेरले. त्यांच्यात झालेल्या वादावादीनंतर त्या कुटुंबाला चित्रपट न पाहताच चित्रपटगृह सोडणे भाग पडले.

भारतीय अभिजन वर्गाने पश्‍चिमी (अ)सभ्यता आणि (अ)संस्कृती यांच्यासमोर पूर्णपणे शरणागती पत्करली आहे ! - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजीजोपर्यंत माझे घर जळत नाही, तोपर्यंत मी उठणार नाही, ही मानसिकता हिंदूंनी त्यागायला हवी ! - ह.भ.प. शिवणीकर महाराज, पंढरपूर,अमीर यांना ऑनलाईन कानफटात मारणार्‍या संकेतस्थळाला भरघोस प्रतिसाद

असहिष्णुतेविषयीच्या वक्तव्यनंतर अमीर खान यांच्या विरोधातील जनक्षोभ कायम
     नवी देहली - देशात असुरक्षित, असहिष्णु वातावरण असल्याचे देशद्रोही विधान अमीर खान यांनी केल्यानंतर देशभरात त्यांना जनक्षोभाला सामोरे जावे लागत आहे. आता तर संतप्त जनतेने अमीर खान यांना कानफटात मारण्यासाठी एक संकेतस्थळ चालू केले आहे. SlapAamir.com (स्लॅपअमीर डॉट कॉम) नावाच्या या संकेतस्थळाला जनतेचाही भरघोस प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत ८० लाखांच्या वर लोकांनी या संकेतस्थळाला भेट दिली आहे,

६८ वर्षांच्या स्वातंत्र्योत्तर सर्वपक्षीय राज्यकर्त्यांच्या राज्यकारभाराचे फळ ! त्यांना यासंदर्भात काहीही वाटत नाही, हे लक्षात घ्या !

     प्रतिदिन आम्ही महिलांना बरोेबरीचा अधिकार देण्याच्या गोष्टी करतो; मात्र शाळेत शौचालय नसल्यामुळे देशातील ६० टक्के मुली शाळेत जाणे टाळतात, अशी धक्कादायक माहिती ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्सशी (मानवी विकास निर्देंशांक) संबंधित एका अहवालात देण्यात आली आहे.

गोरक्षकांवरील वाढत्या आक्रमणांच्या विरोधात वल्लभगड (हरियाणा) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

वल्लभगढ (हरियाणा) येथे उपविभागीय न्यायदंडाधिकारी श्री. महावीर प्रसाद (उजवीकडे)
यांना निवेदन देतांना (डावीकडून) सौ. सरोज गुप्ता, श्रीमती कुसुम कुलश्रेष्ठ, सौ. उषा रखेजा
वल्लभगड (हरियाणा) - देशभरात सध्या गोरक्षकांवर होणार्‍या आक्रमणांत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. अनेक राज्यांत गोहत्याविरोधी कायदा पारित करण्यात आला असला, तरी गोरक्षणाचे कार्य करणार्‍यांना मात्र कुठलीही सुरक्षा नसल्याने गोतस्करी करणार्‍यांपासून त्यांना धोका निर्माण झाला आहे.

समीर गायकवाड किंवा नागोरी आणि खंडेलवाल यांना लाखो रुपये देऊ करणारा अदृश्य हात हाच संभाजी ब्रिगेडच्या संग्राम साळोखेचा बोलविता धनी ! - अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर, हिंदू विधीज्ञ परिषद

हिंदूंनी अटकेपार झेंडे फडकावल्याची साक्ष देणार्‍या 
शनिवारवाड्यावर पुन्हा एकदा हिंदु राष्ट्र स्थापनेची सिंहगर्जना ! 
पुणे येथील हिंदु धर्मजागृती सभेत दीड 
सहस्रांहून अधिक हिंदूंनी घेतली हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ !
     पुणे, ३० नोव्हेंबर (वार्ता.) - डॉ. दाभोलकर यांच्या मृत्यूच्या प्रकरणात गोवण्यात आलेल्या नागोरी आणि खंडेलवाल यांना गुन्हा मान्य करण्यासाठी ५० लक्ष रुपये देऊ केले होते. पोलीस अशा प्रकारे चुकीच्या लोकांना दाभोलकर हत्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न करत असतांना दाभोलकर कुटुंबियांनी पोलिसांविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित करून त्यांच्या चौकशीची मागणी केली नाही. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचीच पुरोगाम्यांची वृत्ती आहे. समीर गायकवाड यांना २५ लक्ष रुपये देऊ करणारा किंवा नागोरी आणि खंडेलवाल यांना ५० लक्ष देऊ करणारा अदृश्य हात हाच संभाजी ब्रिगेडच्या संग्राम साळोखेचा बोलविता धनी आहे, असे सडेतोड प्रतिपादन करत हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांनी पुरोगाम्यांचे पितळ उघडे पाडले. हिंदूंनी अटकेपार झेंडे फडकावल्याची साक्ष देणार्‍या शनिवारवाडा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पुण्यातील ९६ व्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. अधिवक्ता पुनाळेकर यांनी त्यांच्या भाषणात पुरोगाम्यांची ढोंगी विचारसरणी आणि कृती यांचा खरपूस समाचार घेतला. या सभेमुळे पुन्हा एकदा हिंदूंच्या हृदयात हिंदु राष्ट्र स्थापनेचा दीप प्रज्वलित झाला. हिंदूंची धर्मचेतना जागृत करणार्‍या या सभेला दीड सहस्राहून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते. 

आपल्याला आत्मज्ञान नसेल, तर आपण दुसर्‍याला प्रकाश दाखवू शकत नाही - गुरुवर्य श्री. श्री. भट

प.प. टेंबेस्वामी पुरस्काराने रमल ज्योतिषशास्त्र तज्ञ श्री. चंद्रकांत शेवाळे सन्मानित 
डावीकडून सौ. शेवाळे, डॉ. नामजोशी,
श्री.श्री.भट आणि पुरस्कार स्वीकारतांना श्री. शेवाळे
    डोंबिवली, ३० नोव्हेंबर (वार्ता.) - ज्योतिष हे प्रत्यक्ष अनुभवायचे शास्त्र आहे. त्याचा प्रत्यय स्वत:लाच घ्यावा लागतो. आपल्या आत्म्याशी एकरूप होण्यासाठी प्रत्येकाने अभ्यास करायला हवा, आपले धर्मग्रंथ वाचायला हवे. आत्मज्ञान नसेल, तर आपण दुसर्‍याला प्रकाश दाखवू शकणार नाही. त्यामुळे स्वत: आत्मज्ञान घ्यावे आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन ज्योतिष संशोधन मंडळाचे संस्थापक गुरुवर्य श्री.श्री. भट यांनी केले. ते ज्योतिष संशोधन मंडळ आणि श्रीपाद वेदवेदांग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली येथील ज्ञानेश्‍वर सभागृह येथे २९ नोव्हेंबर या दिवशी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. 

संतप्त ग्रामस्थांकडून निषेध सभा आणि २ घंटे गाव बंद ठेवून निषेध !

श्री शनिशिंगणापूर येथे महिलेकडून श्री शनिदेवाला तेल अर्पण केल्याचे प्रकरण 
 दोषी सुरक्षारक्षकांना निलंबित करणार 
     सोनई, ३० नोव्हेंबर - शनिशिंगणापूर येथे श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर दर्शनासाठी महिलांना प्रवेशबंदी असतांना २८ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी एका महिलेने थेट चौथर्‍यावर जाऊन श्री शनिदेवाला तेल अर्पण केले. ही घटना इतिहासात प्रथमच घडली. या घटनेची वाच्यता होऊ नये, यासाठी विश्‍वस्त मंडळाने झालेल्या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला; परंतु २९ नोव्हेंबर या दिवशी गावकर्‍यांनी केलेल्या आवाहनानुसार निषेध सभा घेण्यात आली. या सभेत गावकर्‍यांनी झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला आणि २ घंटे गाव बंद ठेवण्यात आले. या निषेध सभेत 'ढिसाळ सुरक्षाव्यवस्था आणि विश्‍वस्त मंडळाच्या मनमानीच्या विरोधात तत्काळ राजीनामे द्यावेत', अशी मागणी करण्यात आली.

श्री महालक्ष्मी मंदिरातील आर्द्रता अहवाल लवकरच सुपुर्द करणार !

     कोल्हापूर, ३० नोव्हेंबर (वार्ता.) - श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्‍यातील आर्द्रता नियंत्रणाविषयी अभ्यास करणार्‍या समितीने अहवाल सिद्ध केला आहे. तो २ दिवसांत पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे सुपुर्द करण्यात येणार आहे. 
१. श्री महालक्ष्मीच्या मूर्तीची अभिषेक आणि अन्य कारणांमुळे झीज झाली होती. त्यामुळे मूर्तीचे मूळ स्वरूप नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या मूर्तीला पूर्ववत स्वरूप देण्यासाठी देवस्थान समिती, पुरातत्व विभाग, श्रीपूजक यांच्या सहकार्याने मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्याचा अशास्त्रीय निर्णय घेतला होता. 

शिर्डी येथील श्री साई संस्थानने विमानतळासाठी निधी देण्याचा प्रस्ताव अमान्य ! - संस्थानची त्रिसदस्य समिती

* निधी देण्यास शिर्डीतील सर्वपक्षियांचा तीव्र विरोध 
* संस्थानचा निधी वापरत असल्याविषयी ग्रामस्थांचा संताप 
     शिर्डी, ३० नोव्हेंबर - येथील काकडी विमानतळासाठी शासनाने श्री साईबाबा संस्थानकडे ११० कोटी रुपयांचा प्रस्ताव मांडला होता. संस्थानच्या त्रिसदस्य समितीने नगर येथे झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव अमान्य केला आहे. या वेळी समाधी शताब्दी आणि प्रलंबित विकासकामांना पुरेसा निधी नसल्याचे कारण देण्यात आल्याचे संस्थानच्या विश्‍वसनीय सूत्रांकडून कळते. (शिर्डीमधील प्रलंबित विकासकामेही शासनाने करणे अपेक्षित आहे. त्यासाठीही संस्थानचा निधी वापरला जाणे चुकीचे आहे. संस्थानचा निधी हा भक्तांच्या उद्धारासाठी आणि धर्मशिक्षणासाठी व्यय होणे अपेक्षित आहे. - संपादक) शासनाने आतापर्यंत श्रीसाईबाबा संस्थानच्या तिजोरीतून जलशिवार योजनेसाठी ३४ कोटी आणि जिल्हा रुग्णालयासाठी ४३ कोटी रुपये घेतले आहेत.

अशी झाली शनिवारवाडा (पुणे) येथील हिदु जनजागृती सभा !


सभेपूर्वी वेदमंत्रपठण करतांना श्री. प्रसाद जोशी गुरुजी आणि त्यांचे सहकारी पुरोहित
शंखनाद करून सभेला प्रारंभ करतांना श्री. शशांक सोनवणे
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालतांना
अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर, त्यांच्या मागे प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पू. (कु.) स्वाती खाडये
आमदार सौ. मेधा कुलकर्णी यांचा सत्कार करतांना
पू. (कु.) स्वाती खाडये, समवेत अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर
धर्मजागृती सभेत उपस्थित प.पू. आबा उपाध्ये आणि पू. श्रीमती निर्मला दातेआजी
सभास्थळी लावलेल्या प्रदर्शनाचा लाभ घेतांना हिंदू

उत्तरप्रदेशचे मंत्री आझम खान यांचे असंबद्ध विधान ! (म्हणे) समलैंगिक संबंधांमुळेच संघाचे लोक विवाह करत नाहीत !

   लक्ष्मणपुरी (लखनौ) - समलैंगिक संबंधांमुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक विवाह करत नाहीत, असे वक्तव्य उत्तरप्रदेशचे मंत्री आझम खान यांनी एका कार्यक्रमात केले. यावर भाजपचे नेते कैलाश विजयवर्गीय यांनी आझम खान यांचे मानसिक संतुलन ढळले असून त्यांची वेड्यांच्या इस्पितळात रवानगी करण्याची वेळ आली आहे, असे म्हटले आहे, तर संघाचे विचारवंत राकेश सिन्हा म्हणाले, आझमसारख्या लोकांच्या तोंडाला लागू नये. त्यांनी पॅरिस आक्रमणाचे समर्थन केले आहे आणि भारताच्या विरोधात संयुक्त राष्ट्रांकडे जाण्यासारखी विधाने केली आहेत, अशा व्यक्तींचा विचार करण्यात अर्थ नाही.

आय.एस्.आय.एस्.चा भारताला कितपत धोका ?

     भारतातील काही मुसलमान तरुण आतंकवादी संघटना आय.एस्.आय.एस्.कडे आकर्षित होत आहेत. तरुणांना त्यापासून परावृत्त करणे महत्त्वाचे आहे. पूर्वी आपल्याकडील भरकटलेल्या तरुणाईला नक्षलवाद, माओवाद, लष्कर-ए-तोयबा, हुर्रियत, सिमी, इंडियन मुजाहिदीन, तालिबान, अल् कायदा, लष्कर-ए-दावा आदी संघटना आणि त्यांचे आचार-विचार आकृष्ट करत असत; पण आता युवावर्ग आय.एस्.आय.एस्.च्या नादी लागत आहे. आय.एस्.आय.एस्.पासून भारताला कितपत धोका आहे,

मुंबईत ४३४ ठिकाणी १ सहस्र ३८१ सीसीटीव्ही बसवले

   मुंबई - २०१४ मध्ये मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या प्रमुख घोषणांमध्ये सीसीटीव्हीला प्राधान्य देण्यात आले होते. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे ३० नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यामध्ये १ सहस्र ३८१ सीसीटीव्ही छायाचित्रक दक्षिण मुंबईत बसवण्यात आले आहेत. सप्टेंबर २०१६ पर्यंत हे काम पूर्ण केले जाईल. सीसीटीव्ही बसवण्याचे काम एल्.अ‍ॅन्ड टी. आस्थापनाच्या वतीने करण्यात येणार आहे. मुंबईत ६ सहस्र सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे जाळे उभारण्याची योजना आहे आणि याचे नियंत्रण कक्ष मुंबई पोलीस मुख्यालयात असेल.

संस्कृती संवर्धनासाठी संस्कृत आवश्यक !

     संस्कृत ही सर्वांत प्राचीन, परिपूर्ण, चैतन्यमय आणि देवभाषा आहे. जगातील सर्व भाषांची ती जननी आहे, अशी मान्यता आहे. भारतातील कुठलीही भाषा जरी अभ्यासली, तरी त्यातून संस्कृतचा सुगंध येतो, इतकेच नव्हे, तर पाश्‍चिमात्य भाषेतील प्रचलित शब्दही संस्कृत भाषेतीलच आहेत, असे पश्‍चिमी लोक मानतात. ही देवभाषा आज मरणपंथाला लागली आहे. जगामध्येच काय; पण भारतातही आज केवळ हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या मोजक्याच लोकांना संस्कृत भाषेचे ज्ञान आहे आणि त्यावर प्रभुत्व असणारे लोक पुष्कळच अल्प आहेत.

रेल्वे वाहतूक : संबंधित विभागांच्या अयोग्य कृती अन् अडचणी आणि अपघात

लेखमालिका छापण्यामागील भूमिका
     या लेखमालिकेचे संकलन ख्रिस्ताब्द १९९९ आणि २००० या वर्षभराच्या कालावधीत गोवा आणि महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध वृत्तपत्रांमधील कात्रणांच्या आधारे केले आहे. त्यामुळे या लेखमालिकेत भारतीय रेल्वे खात्याविषयी उद्धृत केलेल्या बहुतांश घटना गोवा आणि सिंधुदुर्ग या ठिकाणच्या असल्या, तरी त्या प्रातिनिधिक आहेत. सर्वच ठिकाणी रेल्वे वाहतुकीची परिस्थिती अल्प-अधिक प्रमाणात याच प्रकारची आहे, हे ही लेखमालिका वाचून वाचकांच्या सहज लक्षात येईल.

भारतात पाकची हेरगिरी, ५ जणांना अटक

देशाच्या अंतर्गत सुरक्षेचे तीनतेरा !
   नवी देहली - भारतात पाकसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणी आय.एस्.आय.च्या ५ जणांना जम्मू आणि कोलकता येथून अटक करण्यात आली. या सर्वांकडून राष्ट्र्ीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये सुरक्षा दले आणि हवाई दलाच्या तैनातीसंबंधीच्या माहितीचा समावेश आहे.
१. जम्मू- काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील रहिवासी कैफेतुल्ला खान उपाख्य मास्टर राजा आणि सीमा सुरक्षा दलाचा कर्मचारी अब्दुल रशीद यांना २९ नोव्हेंबर या दिवशी जम्मू येथील रेल्वे स्थानकावरून देहली पोलिसांनी अटक केली, अशी माहिती देहलीचे संयुक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) रवींद्र यादव यांनी दिली.

शक्तीपेक्षाही स्वाभिमान महत्त्वाचा ! - लोकमान्य टिळक

     १९०८ मध्ये लो. टिळक नाशिक येथे गेले होते. तेव्हा तेथे राममूर्ती सर्कस खेळ करीत होती. एका खेळाला लो. टिळक निमंत्रणावरून गेले. प्रा. राममूर्तींनी लोकमान्यांचा सत्कार केला. आभार मानतांना टिळक म्हणाले, आताच प्रा. राममूर्तींचा उल्लेख इंडियन सँडो असा केलेला तुम्ही ऐकलात. (सँडो नावाचा युरोपातील एक मल्ल त्या काळी प्रसिद्ध होता. - संकलक) हिंदभूमीत भीम, भीष्म आदी शक्तीपुरुष बरेच झाले असूनही आपल्या आजच्या शक्तीसंपन्न पुरुषाला शक्तीदर्शक परकीय नाव आम्ही उगीच का द्यावं ?
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

काश्मीर विश्‍वविद्यालयात पसरत आहे जिहादी आतंकवादाचे विष ! - गुप्तचर संस्था

    नवी देहली - आय.एस्.आय.एस्. या जिहादी आतंकवादी संघटनेच्या व्यतिरिक्त काश्मीर विश्‍वविद्यालयाचे युवक हिजबुल मुजाहिदीन आणि लष्कर-ए-तोयबा यांसारख्या आतंकवादी संघटनाशीही जोडल्या जात असून आतंकवादी होणार्‍यांमध्ये या विश्‍वविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढत आहे, असे गुप्तचर संस्थेच्या एका अहवालात म्हटले आहे. यासाठी विश्‍वविद्यालयाच्या व्यवस्थापनाला उत्तरदायी समजण्यात येत आहे. या युवकांमध्ये आतंकवादाचे विष भरण्याचे काम करणार्‍या आतंकवाद्यांचा छडा लावण्याचे आदेश केंद्रशासनाने राज्यशासनाला दिले आहेत.

फलक प्रसिद्धीकरता

पाकिस्तानी गुप्तहेरांचा भारतातील सुळसुळाट कधी थांबेल ?
   भारतातील महत्त्वाची गोपनीय माहिती चोरल्याप्रकरणी पोलिसांकडून आय.एस्.आय. या पाकच्या गुप्तचर संस्थेच्या ५ हस्तकांना अटक करण्यात आली. या सर्वांकडून राष्ट्र्ीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
     Pakistanki guptachar sanstha ISI ke liye gupta suchnaye churaneke aropme deshme 5 log giraftar
kya aise rashtrase mitrata karna atmaghat nahi ?
जागो !
    पाकिस्तान की गुप्तचर संस्था आइएसआइ के लिए गुप्त सूचनाएं चुराने के आरोप में देश में ५ लोग गिरफ्तार
क्या एैसे राष्ट्र से मित्रता करना आत्मघात नही ?

मिस्टर ओबामा, सव्वा दोनशे वर्षांपूर्वीचा इतिहास आठवा !

श्री. भाऊ तोरसेकर
     आपल्या शत्रूंना उमगले आहे की, आपण सभ्य गृहस्थाप्रमाणे बोलणी करू शकतो. आता आपण मर्दासारखे लढूही शकतो, हे शत्रूला दाखवूया ! - थॉमस जेफ़रसन
१. जिहादमुळेच अमेरिकेला दोन शतकांपूर्वी
 अरबी प्रदेशात घुसावे लागले !
     सध्या सिरीया आणि इराक या परिसरात जे रणकंदन माजले आहे, त्याला आय.एस्.आय.एस्. ही जिहादी संघटना कारणीभूत आहे आणि त्याला अर्थातच पाश्‍चात्त्य प्रगत देश उत्तरदायी आहेत; कारण या श्रीमंत देशांचा डोळा तिथल्या अरबी वा मुसलमान प्रदेशातील भूगर्भात दडलेल्या खनिज तेलावर आहे.

संकल्प आणि ध्येय यांचे महत्त्व !

   
(पू.) श्री. संदीप आळशी
  देवाने आपल्याला अफाट शक्ती असणारे मन हे वरदानस्वरूपात दिले आहे. कोणत्याही कर्मामागे ते कर्म करण्याचा आपल्या मनाचा संकल्प महत्त्वाचा असतो; कारण ते कर्म यशस्वीरित्या पूर्ण करण्याचे बळ संकल्पात असते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १६ व्या वर्षी देशाच्या स्वातंत्र्यासाठी मारिता मारिता मरेतो झुंजेन, हा संकल्प केला होता. या संकल्पाच्या बळावरच पुढे ते अंदमानातील भीषण शिक्षा भोगतांनाही स्थिर राहू शकले आणि स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत अविरत झुंजत राहिले.

पू. (सौ.) सखदेवआजी करत असलेल्या आज्ञापालनाची काही उदाहरणे

पू. (सौ.) सखदेवआजी
१. दोन दिवस नामजप करायला सांगितल्यावर
 न झोपता सलग ४८ घंटे नामजप करणे
      वर्ष २०१४ मध्ये एका राज्यात प्रसार करण्यात येणार्‍या अडथळ्यांच्या निवारणासाठी, तसेच एका संतांसाठी पू. आजींना दोन दिवस नामजप करण्यास सांगितले होते. ३ - ४ दिवसांनी मी सहज पू. आजींना त्यांना झोप लागण्याविषयी विचारले. त्यावर त्या म्हणाल्या, त्या दोन दिवसांत मी झोपलेच नाही. मी का ?, असे विचारल्यावर त्या म्हणाल्या, दोन दिवस नामजप करायला सांगितला होता ना; म्हणून मी सलग २ दिवस नामजप केला. तिसर्‍या रात्री मी झोपले.

बहिणीने भावाला भाऊबिजेच्या दिवशी पाठवलेले भावपूर्ण पत्र

दादा,
भावाचे बीज रोवले जाऊ दे तुझ्या मनी ।
ज्याचा होऊ दे भाववृक्ष ॥
हीच प्रार्थना ।
भाऊबिजेच्या दिनी ॥
 - तुझी बहीण

तळमळीने सेवा करणारे खेड (जिल्हा रत्नागिरी) येथील श्री. कृष्णा धोंडू तटकरीकाका (वय ७६ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

श्री. कृष्णा तटकरी यांचा सत्कार करतांना कु. दीपाली मतकर

मकरसंक्रांत, प्रजासत्ताकदिन आणि श्रीगणेश जयंती यांच्या निमित्ताने सनातन-निर्मित ग्रंथ, तसेच सात्त्विक उत्पादने यांचे अधिकाधिक वितरण करा !

जिल्हासेवक आणि साधक यांच्यासाठी सूचना
     जानेवारी २०१६ मध्ये मकरसंक्रांत, प्रजासत्ताकदिन, तर ११ फेब्रुवारी या दिवशी श्रीगणेश जयंती आहे. यासाठी ग्रंथ, सात्त्विक उत्पादने अधिकाधिक जिज्ञासूंपर्यंत पोचवण्याची सुवर्णसंधी लाभली आहे. या संधीचा लाभ करून घेण्यासाठी साधकांनी पुढे नमूद केलेले ग्रंथ, तसेच प्रसारसाहित्य यांचे अधिकाधिक वितरण करण्यासाठी प्रयत्न करावेत.
१. ग्रंथ (मकरसंक्रांत, श्रीगणेश जयंती यांसाठी)
१. पंचोपचार आणि षोडशोपचार पूजनामागील

आजारपणात नामजप न झाल्याने मन पुष्कळ अस्वस्थ झाल्यावर श्रीकृष्णाने सुचवल्यानुसार त्याचे चित्र काढणारी निपाणी (कर्नाटक) येथील कु. भाग्यश्री कल्लापा लोकसुरे

कृष्णाची बासरी लपवणारी राधा ! : हे चित्र काढतांना मी राधाभावात होते. त्या वेळी
सकाळी आकाशवाणीवर (रेडिओवर) राधा प्यारी दे डारो (डालो) ना बंसी मोरी (प्रिय राधे,
माझी बासरी मला देऊन टाक ना !) हे मीरेचे भजन ऐकले होते. त्यानंतर श्रीकृष्णाच्या कृपेने
हे चित्र सुचले. (१०.११.२०१३, सकाळी ११ ते दुपारी १ आणि सायं. ५ ते रात्री ८)

साधनेत देवदर्शन होण्यापेक्षा मनोलय आणि बुद्धीलय होऊन निर्गुणाकडे प्रवास होणे महत्त्वाचे !

पू. (सौ.) अंजली गाडगीळ
१. सांप्रदायिक व्यष्टी साधना करणार्‍या अनेक व्यक्ती
 साधकांना तुम्हाला देवदर्शन झाले आहे का ?, अशा प्रकारचे
 प्रश्‍न विचारतात; परंतु दर्शनापेक्षाही कृपेला अधिक महत्त्व असणे;
 कारण दर्शन क्षणभंगूर असणे, तर कृपा चिरंतन टिकणे
     बरेच जण साधकांना विचारतात, तुम्ही इतकी वर्षे साधनेत आहात, तर तुम्हाला कधी देवदर्शन झाले आहे का ? यावर दृष्टीकोन असा आहे, देवदर्शन झाले म्हणजेच आपली अध्यात्मात प्रगती झाली आहे, असे नसते, तर दर्शनापेक्षाही कृपेला अधिक महत्त्व असते.

सनातनविरोधी षड्यंत्रामुळे निरपराध साधकांना द्यावी लागली अग्नीपरीक्षा !

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
  • मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे भीषण अनुभव ! 
      सनातन प्रभात नियतकालिकांमध्ये साधकांचे अनुभव आणि अनुभूती असतात. वर्ष २००९ मध्ये अगदी दिवाळीच्या दिवशी, म्हणजे नरकचतुर्दशीच्या आदल्या दिवशी गोव्यातील मडगाव शहरात नरकासुरदहन स्पर्धेच्या जवळ झालेल्या एका स्फोटात सनातनच्या दोन साधकांचा मृत्यू झाला. या प्रकरणात सनातनचे साधक दोषी असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आणि सनातनच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या ६ साधकांना बंदी बनवण्यात आले. ४ वर्षे न्यायालयात चाललेल्या या खटल्यात सनातनचे हे सहाही साधक निरपराध असल्याचे सिद्ध झाले. ४ वर्षे कारागृहात शारीरिक आणि मानसिक असह्य त्रास सहन केल्यानंतर न्यायालयाने या साधकांची ३१.१२.२०१३ या दिवशी निर्दोष मुक्तता केली. कारागृहात असतांना तेथील कर्मचारी, प्रशासन, पोलीस आणि इतर कैदी इत्यादींनी केलेला छळ, तसेच त्यांच्या संदर्भातील अनुभव आणि साधनेच्या बळावर त्या वातावरणाला कारागृहातील साधकांनी अन् समाजाला त्यांच्या कुटुंबियांनी स्थिर राहून कसे तोंड दिले, हे या लेखमालेतून क्रमशः प्रकाशित करत आहोत. यामुळे साधनेचे महत्त्वही वाचकांच्या मनावर ठसेल. त्यामुळे असा कठीण प्रसंग स्वतःवर आल्यास ईश्‍वराने आपले रक्षण करावे, यासाठी साधना करणे किती आवश्यक आहे, हेही लक्षात येईल.

समाजाचा सनातनवर असलेला विश्‍वास दर्शवणारी काही उदाहरणे !

१. माझ्या नोकरीच्या ठिकाणी एका ग्राहकासमवेत जात असतांना त्यांच्याशी सनातनवर होत असलेल्या आरोपांविषयी चर्चा झाली. ते म्हणाले, सनातनला उगाचच फसवत आहेत. यात राजकारण्यांचा डाव आहे, असे वाटते. गोव्यातील काही राजकारण्यांना सनातन आवडत नाही; कारण सनातन आपले पितळ उघडे पाडते, असे त्यांना वाटते. त्यांचे सनातनविषयीचे मत पूर्णपणे सकारात्मक होते.
२. पंचाग वितरणाच्या सेवेनिमित्त एका घरी गेल्यावर घरातील व्यक्तीने विचारले, समीर गायकवाडचे काय झाले ? मी त्यांना म्हटले, त्याच्याविरुद्ध काहीही ठोस पुरावे नसतांना प्रसिद्धीमाध्यमे सर्व चुकीचे दाखवत आहेत आणि उगाचच सनातनवर आरोप करत आहेत. तेव्हा ते म्हणाले, बरोबर आहे. सनातन एवढे चांगले कार्य करते, तरी सनातनवर उगाचच आरोप करतात. असे म्हणून त्यांनी सनातन पंचांगही घेतले.

तिरुवण्णामलई (तमिळनाडू) येथे सप्तर्षि जीवनाडीचे वाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या हस्ते सनातनच्या तमिळ भाषेतील २०१६ या वर्षीच्या पंचांगाचे अनावरण

   तिरुवण्णामलई (तमिळनाडू) - तिरुवण्णामलई (तमिळनाडू) येथे सप्तर्षि जीवनाडीचे वाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या हस्ते सनातनच्या तमिळ भाषेतील २०१६ या वर्षीच्या पंचांगाचे अनावरण २५.११.२०१५ या दिवशी कार्तिक दीपम् महोत्सवाच्या वेळी करण्यात आले. या वेळी सनातनच्या पू. (सौ.) अंजली गाडगीळ या उपस्थित होत्या.
तमिळ भाषेतील पंचांगाचे अनावरण करतांना पू. डॉ. ॐ उलगनाथन्. शेजारी असलेल्या
श्रीविष्णूच्या मूर्तीला घातलेल्या जानव्यालाही पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी पंचांग अडकवून ठेवले !
पंचांगाचे अनावरण करतांनापू. डॉ. ॐ उलगनाथन् यांचा असलेला भाव !
सप्तर्षी जीवनाडीचे वाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी 
सनातनच्या तमिळ भाषेतील २०१६ या वर्षीचे नूतन पंचांग प्रथम 
देवाला दाखवून आणि त्याच्या चरणी अर्पण करून मग केले त्याचे अनावरण !
     तमिळनाडू राज्यातील तिरुवण्णामलई येथील प्रसिद्ध असणार्‍या कार्तिक दीपम् महोत्सवाच्या (त्रिपुरारी पौर्णिमा, २५.११.२०१५ या) दिवशी सायंकाळी ६ वाजता अण्णामलई या प्रत्यक्ष शिवच असणार्‍या पर्वतावर कार्तिक दीप लावला जातो. सर्व भाविकांचे त्या क्षणाकडे लक्ष असते. तेथे दीप प्रज्वलीत झाल्यानंतरच गावातील घराघरांत, दुकानांत, तसेच अगदी मार्गांवरही दीप लावले जातात. हे दृश्य पाहून खरंच, अण्णामलई हे अग्नीक्षेत्र असल्याचे भासते आणि तेजाने उजळलेल्या या दीपज्योतींकडे पाहून ईश्‍वरी राज्यातील पहाटही अशीच प्रसन्न असेल, असे वाटते.

साधकांना सूचना

प्रतिदिन दुर्गा सप्तशती पोथीतील देवीकवच म्हणा !
     आपत्कालात सर्व अवयवांचे रक्षण होण्यासाठी प्रतिदिन सकाळी देवीकवच म्हणावे !, असे महान दत्तयोगी प.पू. सदानंदस्वामींनी प.पू. आबा उपाध्ये यांच्या माध्यमातून साधकांना सांगणे : पुण्यातील महान संत प.पू. आबा उपाध्ये यांच्या माध्यमातून साडे तीन सहस्र वर्षांपूर्वीचे महायोगी श्री सद्गुरु सदानंदस्वामी बोलतात आणि ते या गुरुवाणीच्या माध्यमातून भक्तांना वेळोवेळी संदेशही देत असतात. हल्लीच त्यांची गुरुवाणी ऐकण्याचे सद्भाग्य आम्हाला प्राप्त झाले. त्यांना साधकांच्या आरोग्याविषयी प्रश्‍न विचारला असता, ते म्हणाले, आता हा पृथ्वीवरील अनाचार वाढतच जाणार आहे.

बोधचित्र


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
'श्रद्धा म्हणजे काय ?, हे ज्ञात नसलेले, म्हणे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करतात !' - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मानवी जीवन
     कठीण परिस्थिती आणि संकटे यांना न घाबरता धैर्याने आणि हुशारीने त्यांना सामोरे जाऊन त्यातून मार्ग काढणे, हाच खरा पुरुषार्थ !
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

॥ हरि ॐ तत्सत् ॥


आश्रमाविषयीचा दृष्टीकोन
संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
       आश्रम माझा नाही; पण मी आश्रमाचा आहे.
भावार्थ : आश्रम माझा नाही म्हणजे आश्रमावर माझे स्वामित्व (मालकी) किंवा अधिकार (हक्क) नाही; कारण तो गुरूंचा आहे. मी आश्रमाचा आहे म्हणजे मी गुरूंच्या आश्रमाचा असल्याने आश्रमाची, आश्रमात आलेल्यांची काळजी घेणार व सेवा करणार. या दृष्टीकोनामुळेच आश्रमातील कामे करूनही आश्रमाविषयी प्रेम निर्माण होत नाही, तर प्रीती निर्माण होते.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

महिलांनो, पाश्‍चात्त्यांची बंधने झुगारा !

     शनिशिंगणापूरला एका महिला श्री शनैश्‍वराच्या चौथर्‍यावर गेल्याचे सूत्र पुष्कळ गाजले. त्यावर तथाकथित स्त्रीवादी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्या महिलेचे पुष्कळ कौतुक केले. एका सामाजिक कार्यकर्तीने तर ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी हे क्रांतीचे पाऊल असल्याच्या वल्गना केल्या. कुटुंबाची, समाजाची पर्यायाने धर्माची सर्व बंधने झुगारली म्हणजे आपण मुक्त झालो आणि त्या मुक्त जीवनाचा आनंद उपभोगत आहोत, असे स्त्रीमुक्तीवाद्यांना, महिलांना वाटते. आम्हाला मनुष्य म्हणून पुरुषांच्या बरोबरीने जगू द्या अशी कळकळीची विनंती या महिला करतांना आढळतात. इथे या महिलांच्या लक्षात येत नाही की, स्त्रीसुलभ प्रवृत्तीच्या विरोधात जाऊन पुरुषांशी बरोबरी करणे हे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमता अन् आवश्यकता यांच्या विरोधातील असल्याने त्याचा त्यांना लाभ नव्हे, तर त्रासच होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा !

     समलिंगी संबंधांना विरोध करणारे ३७७ कलम हे योग्य असल्याचे मत देहली येथील सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. यामुळे देशातील कोट्यवधी जनतेने सुस्कारा सोडला असेल, यात शंका नाही. देहली उच्च न्यायालयाने वर्ष २००९ मध्ये समलैंगिक संबंधांना मुभा देणारा निकाल दिला होता. त्यानंतर त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. संघ परिवार आणि भाजप यांनी समलैंगिक संबंधांच्या बाजूने जाणार्‍या निकालावर आक्षेप घेतला होता.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn