Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

विनम्र अभिवादन !


राजीव दीक्षित

स्वदेशी चळवळीचे पुरस्कर्ते राजीव दीक्षित यांचा आज स्मृतिदिन

नेपाळकडून १३ भारतीय सैनिकांना अटक आणि सुटका !

 • साम्यवादी विचारांच्या नेपाळ शासनाच्या भारतविरोधी कागाळ्या !
 • नेपाळमध्ये ४२ भारतीय वृत्तवाहिन्यांवर बंदी !
    काठमांडू (नेपाळ) - नेपाळमध्ये साम्यवादी विचारांचे शासन सत्तेवर आल्यापासून भारत-नेपाळ संबंधांतील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. नेपाळमध्ये ४२ भारतीय वाहिन्यांच्या प्रक्षेपणावर बंदी घालण्यात आली असून चित्रपटगृहात दाखवण्यात येणारे चित्रपटांचे प्रदर्शनही थांबवण्यात आले आहेत, तसेच नेपाळच्या सीमेत चुकून घुसलेल्या १३ भारतीय सैनिकांना नेपाळ सीमा सुरक्षा दलाने अटक केली असल्याचे वृत्त नेपाळच्या कांतिपूर टाइम्स या वृत्तपत्रात प्रकाशित झाले होते. या १३ सैनिकांची चौकशी करून त्यांची सुटका करण्यात आली.
     भारताच्या सशस्त्र सीमा दलाचे १३ सैनिक तस्करांचा पाठलाग करत असतांना त्यांच्याकडून सीमेचे उल्लंघन झाले आणि ते नेपाळच्या प्रदेशात घुसले. ते सशस्त्र असल्याने नेपाळच्या सीमा सुरक्षा दलाने त्यांना कह्यात घेतले. तेथे त्यांची चौकशी करून ७ घंट्यांनंतर त्यांची सुटका करण्यात आली, अशी माहिती झापा (नेपाळ) येथील जिल्हाधिकारी तेज प्रसाद पौडेल यांनी दिली.

वेल्लूर (तमिळनाडू) येथे क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यास न्यायालयाची सशर्त अनुमती !

    वेल्लूर (तमिळनाडू) - येथे एका मुसलमान संघटनेला क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यास चेन्नई उच्च न्यायालयाने अनुमती दिली आहे.
१. तमिळगा मक्कल जननायक कच्छी या मुसलमान संघटनेने ९ किंवा १० जानेवारी २०१६ या दिवशी क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला.
२. कायदा आणि सुव्यस्थेच्या कारणास्तव पोलिसांनी या कार्यक्रमास अनुमती नाकारली.
३. त्यामुळे या संघटनेने चेन्नई उच्च न्यायालयात धाव घेतली.

(म्हणे) सर्व सैन्य जरी आपल्या साहाय्याला आले, तरी ते काश्मीरमधील आतंकवादी आणि बंडखोर यांच्यापासून आपले रक्षण करू शकणार नाही !

अशांच्या राजवटीत काश्मीरमध्ये फुटीरतावादाला बळ मिळाले नाही, तरच नवल ! असे 
देशद्रोही विधान केल्याविषयी अब्दुल्ला यांच्यावर शासन काय कारवाई करणार आहे ?
पाकव्याप्त काश्मीर हा पाकिस्तानचा भाग असल्याची गरळओक
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांचे फुत्कार
     जम्मू - सर्व सैन्य जरी आपल्या साहाय्याला आले, तरी ते काश्मीरमधील आतंकवादी आणि बंडखोर यांच्यापासून आपले रक्षण करू शकणार नाही. त्यामुळे काश्मीर समस्येविषयी पाकशी चर्चा करून मार्ग काढणे, हाच पर्याय शिल्लक रहातो, असे फुत्कार नॅशनल कॉन्फरन्सचे नेते तथा जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी येथे एका कार्यक्रमात सोडलेे. अब्दुल्ला यांनी २७ नोव्हेंबर या दिवशी पाकने व्यापलेले काश्मीर त्यांच्याकडेच रहाणार आहे आणि भारताकडील काश्मीर आपल्याकडे रहाणार आहे, असे विधान केले होते. यावरून गदारोळ झाला होता. त्यानंतर २८ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी पुन्हा वरील विधान केले.

रशियाने तुर्कस्थानच्या विरोधातील धोरण अधिक आक्रमक केले !

 • तुर्कस्थानशी असलेले सर्व करार मोडले 
 • त्याच्या देशातील नागरिकांना पर्यटनासाठी तुर्कस्थानला जाण्यास बंदी 
     मॉस्को - आय.एस्.आय.एस्.च्या ठिकाणांवर आक्रमण करण्यासाठी गेलेले रशियाचे लढाऊ विमान तुर्कस्थानने पाडल्यानंतर रशियाने तुर्कस्थानच्या विरोधातील धोरण अधिक आक्रमक केले आहे. तुर्कस्थानने रशियाचे विमान पाडल्यानंतर रशिया आणि तुर्कस्थान यांच्यातील संबंध चांगलेच बिघडले आहेत. 
१. रशियाने तुर्कस्थानवर आय.एस्.आय.एस्.चे समर्थन करत असल्याचा आरोप केला आहे. तुर्कस्थानच्या सीमेतून आय.एस्.आय.एस्.करवी पेट्रोलजन्य पदार्थांची तस्करी होण्यात तुर्कस्थानचा हात असल्याचा आरोपही केला आहे. या तस्करीतून आय.एस्.आय.एस्.ला प्रत्येक दिवशी ६६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते, असा दावा रशियाने पुराव्यांसह केला आहे.

जळगाव येथील लोकमतच्या कार्यालयावर एम्.आय.एम्.चे आक्रमण !

ही असहिष्णुता नव्हे का ?
जळगाव - येथील दैनिक लोकमतच्या कार्यालयावर एम्.आय.एम्.च्या ५० कार्यकर्त्यांनी २९ नोव्हेंबरला आक्रमण केले. २९ नोव्हेंबरच्या लोकमतच्या मंथन या पुरवणीत प्रसिद्ध झालेल्या तेलाचं स्मगलिंग, कर्जे आणि लूटमार : इसिसचा पैसा या लेखातील चित्राला विरोध म्हणून हे आक्रमण करण्यात आले. लोकमतच्या अंकाची होळीही करण्यात आली. या घटनेनंतर लोकमतने क्षमायाचना केली आहे.

शनिवारवाड्याच्या साक्षीने हिंदूंमध्ये जागरण !

 • पुणे येथे हिंदु धर्मजागृती सभा 
 • १ सहस्र ५०० हून अधिक उपस्थिती
   
     पुणे येथील हिंदु धर्मजागृती सभेत दीपप्रज्वलन करतांना प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, (डावीकडून) सनातनच्या पू. (कु.) स्वाती खाडये, हिंदु विधीज्ञ परिषदेचे सचिव अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. अभिजीत देशमुख
(सविस्तर वृत्त उद्या वाचा)


जिहादी कट्टरतावादी लोकांशी अंतिम श्‍वास असेपर्यंत लढा देणार !

भारतातील कथित सहिष्णु लेखक असा निर्धार बोलून दाखवण्याचे धाडस करील का ?
बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांचा निर्धार
     नवी देहली - जिहादी कट्टररतावादी लोक माझी हत्या करण्याच्या सिद्धतेत आहेत; परंतु मी जिहादी कट्टरतावादाच्या विरोधातील माझे कार्य अंतिम श्‍वास असेपर्यंत करणार आहे. हा लढा मी अव्याहत चालू ठेवणार आहे. जर का मी जिहाद्यांच्या विरोधातील लिखाण बंद केले, तर तो त्यांचा विजय आणि माझा पराजय असेल, असे परखड मत बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांनी मांडले. टाइम्स आस्थापनाच्या साहित्य महोत्सवाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

भारत पर्यटनासाठी असुरक्षित असल्याचे रशियाचे मत

     मॉस्को - भारत आणि भारतातील गोवा हे राज्य पर्यटनासाठी असुरक्षित असल्याचे रशियाचे म्हणणे आहे. रशियाने त्याच्या सुरक्षित पर्यटनस्थळांच्या यादीतून गोवा आणि भारताला वगळले आहे, अशी माहिती इंटरफॅक्स या वृत्तसंस्थेने दिली आहे. (रशियाला पर्यटनासाठी भारत असुरक्षित का वाटतो, याचे कारणही त्याने स्पष्ट करणे आवश्यक आहे ! - संपादक) रशियाच्या चलनाच्या (रुबल) किमतीत घट झाल्याने आधीच भारतीय आणि विशेष करून गोवा येथील पर्यटन व्यवसायावर परिणाम झाला आहे, त्यातच आता रशियाने घेतलेल्या निर्णयामुळे या व्यवसायाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
     रशियाने यापूर्वीच इजिप्त आणि तुर्कस्थान या देशांना काळ्या देशांच्या सूचीत टाकले आहे. त्यानंतर नुकतीच रशियाने पर्यटनाविषयीची त्याची सुधारित अ‍ॅडव्हायजरी प्रसिद्ध केली. त्यात भारत आणि गोवा राज्य यांना सुरक्षित पर्यटनस्थळांच्या सूचीतून वगळण्यात आले. रशियाच्या माहिती केंद्राने याविषयी गोव्यात २८ नोव्हेंबरला माहिती दिली.

पूर्वअटींशिवाय भारताशी चर्चा करण्यास नवाज शरिफ यांची सिद्धता

     इस्लामाबाद - भारत आणि पाक या दोन्ही देशांत शांतता प्रस्थापित होण्यासाठी आवश्यक असणारी चर्चा कोणतीही पूर्व अट न घालता करण्याची सिद्धता शत्रूराष्ट्र पाकचे पंतप्रधान नवाज शरिफ यांनी दर्शवली आहे. या संदर्भातील वृत्त जीओ न्यूज या पाकच्या वृत्तवाहिनीने प्रसारित केले आहे.
    भारत आणि अफगाणिस्तान यांच्यासह आपल्या अन्य शेजारी देशांसमवेत मैत्रीपूर्ण संबंध टिकवण्यासाठी पाक प्रयत्नशील असल्याचे शरिफ यांनी सांगितले. मालटा देशाची राजधानी असलेल्या वाल्लेट्टामध्ये सध्या कॉमनवेल्थ हेड्स ऑफ गव्हर्नमेंट मिटिंग चालू आहे. या कार्यक्रमासाठी आलेल्या ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्याशी बोलतांना शरिफ यांनी ही भूमिका मांडली. या वेळी उभय देशांतील व्यापार, गुंतवणूक, संरक्षण या सूत्रांवरही चर्चा झाली. पॅरिसवर झालेल्या आतंकवादी आक्रमण प्रकरणी शरिफ यांनी खेद व्यक्त केला आणि पाक या आतंकवाद्यांना दोषीच मानत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शनिशिंगणापूरच्या शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेशबंदी का ?

    महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थानस्थित असलेल्या शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेशबंदी असतांना एका महिलेने चौथरा चढून शनिदेवाला तेलार्पण केले. या घटनेविषयी एबीपी माझा, आयबीएन् लोकमत इत्यादी दूरचित्रवाहिन्या आणि इतर माध्यमे यांवर स्त्रीमुक्ती, पुरुषसत्ताक संस्कृती, मंदिरसंस्कृतीचा प्रतिगामीपणा, बुरसटलेली विचारसरणी आदी दृष्टीकोनांतून चर्चा चालू आहे. हा विषय धार्मिक दृष्टीकोनातून अधिक महत्त्वाचा आहे; म्हणून सनातनचा दृष्टीकोन येथे दिला आहे.
१. शनिशिंगणापूर येथील शनिदेवाची स्वयंभू मूर्ती चौथर्‍यावर उभी आहे. मंदिर व्यवस्थापनाने काही वर्षांपूर्वीच चौथर्‍यावर चढून शनिदेवाला तेलार्पण करण्यास बंदी घातली होती. त्यामुळे सध्या तेथे सर्वच जाती-धर्माचे स्त्री-पुरुष श्री शनिदेवाचे दूरवरून दर्शन घेतात. त्यामुळे तेथे केवळ स्त्रियांना बंदी आहे, असे म्हणणे अयोग्य आहे.
२. अध्यात्मशास्त्रानुसार प्रत्येक देवतेचे कार्य ठरलेले असते. त्या कार्यानुसार त्या देवतेची प्रकटशक्ती कार्यरत असते. शनि ही उग्रदेवता असून तिच्यातील प्रकटशक्तीमुळे महिलांना त्रास होण्याची शक्यता असते. ४००-५०० वर्षांपूर्वी शनिशिंगणापूर येथे शनिदेवाचे मंदिर उभे राहिले. तेव्हापासूनच तेथे स्त्रियांनी चौथर्‍याच्या खालून दर्शन घेण्याची परंपरा आहे.
३. सुवेरसुतक असतांना, तसेच चामड्याच्या वस्तू (बेल्ट, घड्याळाचा पट्टा) आदी परिधान केलेल्या पुरुषांनाही शनिदेवाच्या चौथर्‍यावर प्रवेशबंदी आहे. एवढेच नव्हे, तर चौथर्‍यावर चढण्यापूर्वी पुरुषांनी स्नानाद्वारे देहशुद्धी करणे, तसेच केवळ धूत श्‍वेतवस्त्र परिधान करणे आवश्यक असते. हे नियम पाळणार्‍या पुरुषांनाच शनिदेवाच्या चौथर्‍यावर
प्रवेश आहे.

(म्हणे) महिला या केवळ मुले जन्माला घालण्यासाठी आहेत !

हिंदु संतांच्या वक्तव्यावर चर्चासत्रे घेऊन त्यांची अपकीर्ती करणारी 
निधर्मी प्रसारमाध्यमे आता या विषयावर चर्चासत्रे घेतील का ?
केरळ येथील सुन्नी मुसलमान धर्मगुरु मुसलियार यांची वल्गना
     कोची (केरळ) - लैंगिक समानता ही संकल्पनाच मुळात इस्लामविरोधी आहे. महिला कधीही पुरुषांशी बरोबरी करू शकत नाहीत; कारण महिला या केवळ मुले जन्माला घालण्यासाठी आहेत, असे वक्तव्य ऑल इंडिया सुन्नी जमीयत उल् उलेमाचे प्रमुख मुसलियार यांनी केले. कोझिकोड येथे मुस्लीम स्टुडंट्स फेडरेशनने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. मुसलियार पुढे म्हणाले, महिला मानसिकदृष्ट्या खंबीर नसतात. त्या कधीही संकटाचा सामना करू शकत नाहीत. जगाला नियंत्रित करण्याची क्षमता केवळ पुरुषांमध्येच आहे. लैंगिक समानता ही संकल्पना कधीही वास्तवात येऊ शकत नाही. ही इस्लाम, तसेच मानवताविरोधी तर आहेच; पण बौद्धिकदृष्ट्याही चुकीचे आहे.

केंद्रशासनाच्या सोने गुंतवणूक योजनेत तिरुमला तिरुपती देवस्थान सर्वांत मोठा ठेवीदार होण्याची शक्यता

      नवी देहली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्टोबर २०१५ मध्ये चालू केलेल्या सोने गुंतवणूक योजनेत तिरुमला तिरुपती देवस्थान सर्वांत मोठा ठेवीदार होण्याची शक्यता आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार गुंतवणूक मंडळाकडून होकार आल्यानंतर तिरुमला तिरुपती देवस्थानचे संचालक मंडळ सोन्याच्या गुंतवणुकीचा विचार करील, असे सांगण्यात येत आहे. देशात २० सहस्र टन सोने असल्याचा अंदाज राष्ट्रीय मंडळाने केला आहे; परंतु आतापर्यंत या योजनेच्या अंतर्गत केवळ ४०० ग्रॅम सोने गोळा झाले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील अधिकोषांमध्ये तिरुमला तिरुपती देवस्थानने त्यांच्याकडील सोन्याची गुंतवणूक केली असून त्यात स्टेट बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ हैद्राबाद आणि इंडियन बँक यांमध्ये प्रतिवर्षी दर शेकडा १.५ टक्के व्याज मिळते. प्रतिवर्षी शुद्ध सोन्याच्या ठेवीवर हे व्याज देण्यात येते. केंद्रशासनाच्या सोने गुंतवणूक योजनेंतर्गत सोन्याची गुंतवणूक करणार्‍या संस्थांना आणि व्यक्तींना त्यांच्याकडील अतिरिक्त सोन्यावर २.५० टक्के व्याज मिळू शकते. मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या शासकीय ठेवीवर अनुक्रमे २.२० टक्के अन् २.२५ टक्के व्याज मिळू शकेल, असे रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. मध्यम गुंतवणुकीचा अवधी ५ ते ७ वर्षांचा असून दीर्घ मुदतीसाठी १२ ते १५ वर्षे अवधी असल्याचे सांगण्यात येत आहे.

हिंदूंना संघटित करण्याच्या दृष्टीने शिवमोग्गा (कर्नाटक) येथे जिल्हास्तरीय हिंदू अधिवेशनाचे आयोजन !

व्यासपिठावर डाव्या बाजूने धर्माभिमानी श्री. रवि कामत,
श्रीराम सेनेचे श्री. महेश कोप्प, अंजनेय स्वामी देवळाचे
पुजारी श्री. केशवमूर्ती, सनातन संस्थेच्या सौ. कावेरी
रायकर आणि हिंदु जनजागृती समितीचे
राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद
      शिवमोग्गा (कर्नाटक) - हिंदु धर्मावर सातत्याने होत असलेले आघात उदा. गोहत्या, धर्मांतर, लव्ह जिहाद, हिंदु कार्यकर्त्यांवर होणार्‍या आक्रमणांची प्रकरणे, देवळांचे सरकारीकरण, हिंदूंच्या धर्मग्रंथांचे विडंबन इत्यादी समस्या दूर करण्यासाठी हिंदू राष्ट्र स्थापना हाच एकमेव उपाय आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद यांनी केले. शिवमोग्गा येथील श्री बसवेश्‍वर मंदिराच्या सभागृहात दिनांक २८ नोव्हेंबर या दिवशी हिंदू अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या अधिवेशनात ते बोलत होते. 
      श्रीराम सेनेचे श्री. महेश कोप्प, धर्माभिमानी श्री. रवि कामत, कोटे अंजनेय स्वामी देवस्थानाचे पुजारी श्री. केशवमूर्ती, सनातन संस्थेच्या सौ. कावेरी रायकर, हिंदु जनजागृती समितीचे राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर श्री. गुरुप्रसाद यांनी थोडक्यात अधिवेशनाच्या उद्देशाविषयी उपस्थित हिंदुत्ववाद्यांना माहिती दिली. या अधिवेशनात हिंदुत्ववादी संघटनांचे प्रमुख, हिंदुत्ववादी विचारवंत, हिंदुत्ववादी अधिवक्ते, नियतकालिकांचे संपादक, तसेच धर्माभिमानी हिंदू असे एकूण ६५ हून अधिक जण सहभागी झाले होते.

भारत बांगलादेशला अतिरिक्त १०० मेगावॅट वीज पुरवठा करणार !

     आगरतळा - केंद्रशासनाने बांगलादेशला अतिरिक्त १०० मेगावॅट वीज पुरवठा करण्याची सिद्धता केली आहे. या आधी ५०० मेगावॅट वीजेचा पुरवठा करण्यात येत आहे. एकूण वीजपुरवठा १ सहस्र १०० मेगावॅट करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले आहे. या वीज पुरवठ्यासंबंधी विजेचे दर ठरवण्यासाठी २६ नोव्हेंबर या दिवशी देहलीत भारत आणि बांगलादेश यांच्या अधिकार्‍यांची बैठक झाली. केंद्रशासन अंगीकृत उपक्रम पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही वीज पुरवठ्यासाठी आवश्यक अशी यंत्रणा उभी करण्यासाठी २५० कोटी रुपये व्यय करणार आहे. ही रक्कम बांगलादेश कालांतराने भरून देणार आहे. या यंत्रणेत ४०० किलो व्होल्ट क्षमतेची पारेषण लाईन आणि आवश्यक वीज उपकेंद्र स्थापन करण्यात येईल. तेल आणि नैसर्गिक वायू आयोग हा शासकीय उपक्रम आगरतलाजवळील पलाताना येथे ७२५ मेगावॅट क्षमतेचे वीज निर्मिती केंद्र स्थापन करणार आहे. तसेच उत्तर-पूर्व ऊर्जा आस्थापन १०१ मेगावॅट क्षमतेच्या वीजनिर्मिती केंद्राची स्थापना करणार आहे.

सलमान रश्दी यांच्या सॅटॅनिक व्हर्सेस या पुस्तकावर बंदी घालणे, ही राजीव गांधी यांची चूक होती ! - पी. चिदंबरम्

     नवी देहली - आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लेखक सलमान रश्दी यांच्या सॅटॅनिक व्हर्सेस या पुस्तकावर बंदी घालण्याचा तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या शासनाने घेतलेला निर्णय चुकीचा होता, असे विधान माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम् यांनी एका कार्यक्रमात केले. (असे आहे, तर मग चिदंबरम् यांनी या निर्णयास तेव्हाच का नाही विरोध केला ? या विषयावर इतक्या वर्षांनंतर आता प्रतिक्रिया देऊन काय उपयोग ? - संपादक) राजीव गांधी पंतप्रधान असतांना चिदंबरम् गृहराज्यमंत्री होते. राजीव गांधी यांनी वर्ष १९८८ मध्ये सलमान रश्दी यांच्या सॅटॅनिक व्हर्सेसवर बंदी घातली होती. या पुस्तकावर बंदी घालणारा भारत हा पहिला देश ठरला होता. चिदंबरम् पुढे म्हणाले, या विषयावर माध्यमांनी २० वर्षांपूर्वी माझी प्रतिक्रिया विचारली असती, तरीदेखील ती हीच असती. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही देशावर आणीबाणी लादण्याचा पश्‍चात्ताप झाला होता. वर्ष १९८० मध्ये त्यांनी स्वत: याची स्वीकृती दिली होती. पुन्हा सत्तेवर आल्यास कधीच आणीबाणी लादणार नाही, असे त्यांनी म्हटले होते. लोकांनीही त्यांच्यावर विश्‍वास ठेवून पुन्हा त्यांनाच निवडून दिले. देशातील असहिष्णुता वाढत चालली असून, या बहुसंख्यांकवादाचेही लवकरच पतन होईल.

कुरूक्षेत्र (हरियाणा) येथे पोलिसांशी झालेल्या चकमकीत गोतस्कर ठार

     चंदीगड - कुरूक्षेत्र जिल्ह्यातील ठाणेसर या भागात पोलिसांशी झालेल्या चकमकीत एक गोतस्कर ठार झाला आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने दिली. काही गोतस्कर एका जीपमधून गायींची तस्करी करत होेते. हे लक्षात येताच पोलीस आणि गावकरी यांनी मिळून गोतस्करांना जीप थांबवण्यास सांगितली. यावर गोतस्करांनी पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक गोतस्कर ठार झाला, तर एक जण घायाळ झाला. अन्य ३ गोतस्करांनी पलायन केले.
      भारत जागतिक महासत्ता बनण्यासाठी प्रत्येकाच्या नसानसांत राष्ट्रप्रेम जागृत होण्याची आवश्यकता आहे. - स्व. राजीव दीक्षित यांचे जाज्ज्वल्य विचार

शनिशिंगणापूर (नगर) येथील श्री शनैश्‍वराच्या चौथर्‍यावर चढून महिलेने घेतले दर्शन !

कलियुगात धर्म बुडाला आहे, असे म्हणतात ते याचसाठी ! विज्ञानाचे 
नियम न पाळल्यास जसे दुष्परिणाम होतात, त्याचप्रमाणे धर्मशास्त्राचे नियम
 न पाळल्याने दुष्परिणाम होतात, हे स्त्रीवादी आणि बुद्धीवादी लक्षात घेतील तो सुदीन !
    शनिशिंगणापूर (नगर) - येथील प्रसिद्ध जागृत आणि स्वयंभू श्री शनैश्‍वराच्या चौथर्‍यावर चढून २८ नोव्हेंबर या दिवशी एका महिलेने श्री शनैश्‍वराचे दर्शन घेतले.
१. तमिळनाडू येथील शनीच्या मंदिरावरून अमेरिकेचा उपग्रह जाऊ शकत नाही, असे तीन वेळा सिद्ध झाल्याने अमेरिकेने आता त्याचा मार्ग पालटला आहे, असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. याचे उत्तर बुद्धीवादी देऊ शकतात का ?
२. प्रत्येक देवस्थानच्या काही विशिष्ट धार्मिक परंपरा धर्मशास्त्राचा विचार करूनच पाळल्या गेल्या आहेत. त्या पाळण्यातच सर्वांचे हीत असते.
३. देवस्थान किंवा गाभार्‍यातील उर्जेचा स्त्रियांच्या शरिरावर विपरित परिणाम होऊ नये; म्हणून काही ठिकाणी स्त्रियांना मूर्तीजवळ किंवा गाभार्‍यात प्रवेश नसतो. येथे धर्माने उलट स्त्रीच्या प्रकृतीची काळजीच घेतलेली असते, हे तथाकथित बुद्धीवादी आणि स्त्रीवादी यांच्या लक्षात येत नाही.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मांडण्यासाठी ठाणे येथील आमदारांना राष्ट्र-धर्माचे विषय सादर !

भिवंडी येथील शिवसेनेचे आमदार श्री. रूपेश म्हात्रे (डावीकडून दुसरे) यांना
विषयाचे निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे शिष्टमंडळ
     ठाणे, २९ नोव्हेंबर (वार्ता.) - महाराष्ट्र शासन विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्र-धर्माचे विषय मांडले जावेत आणि त्यावर चर्चा होऊन उपाय निघावेत, या हेतूने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भिवंडी येथील शिवसेनेचे आमदार श्री. रूपेश म्हात्रे, डायघर येथील शिवसेनेचे आमदार श्री. सुभाष भोईर, कल्याण येथील भाजपचे आमदार श्री. नरेंद्र पवार यांना काही विषय देण्यात आले. 

अखिल हिंदु समाजाचे प्रभावी संघटन करून हिंदु वंश हा अजिंक्य आहे, हे सिद्ध करायचे आहे ! - पू. नंदकुमार जाधव, सनातन संस्था

अकोला येथे प्रांतीय हिंदु अधिवेशन 
दीपप्रज्वलन करतांना पू. नंदकुमार जाधव, त्यांच्या डावीकडे श्री. मानव बुद्धदेव, 
ह.भ.प. घोगरे महाराज आणि श्री. श्रीकांत पिसोळकर
     अकोला - 'भारतात हिंदु राष्ट्राच्या पुनर्स्थापनेसाठी संप्रदाय, संघटना, पक्ष, जात, प्रांत आणि भाषा यांत विभागलेल्या अखिल हिंदु समाजाचे प्रभावी संघटन करून आपल्याला हिंदु वंश हा अजिंक्य आहे, हे सिद्ध करायचे आहे. हिंदु राष्ट्राच्या प्रांताप्रांतांतून आलेल्या ध्येयनिष्ठ बंधूंनो, आपला हिंदु राष्ट्राचा एक विचार, एक उच्चार आणि एक आचार सर्वत्र एकसमान दिसला पाहिजे, तरच हिंदु राष्ट्राच्या आकांक्षा यशस्वी होतील,' असे उद्गार सनातन संस्थेचे पू. नंदकुमार जाधव यांनी काढले. येथे झालेल्या प्रांतीय हिंदु अधिवेशनाच्या उद्घाटनाच्या वेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर ह.भ.प. घोगरे महाराज, योग वेदांत समितीचे श्री. मानव बुद्धदेव आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीकांत पिसोळकर उपस्थित होते. यानंतर अकोला येथील पुरोहित श्री. आशुतोष शुक्ल आणि श्री. लौकिक चिटणवीस यांनी वेदमंत्रपठण केले. श्री. गजानन अढाव यांच्या हस्ते व्यासपिठावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदेशाचे वाचन श्री. श्रेयस पिसोळकर यांनी केले. 
      योग वेदांत समितीचे श्री. मानव बुद्धदेव यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी समर्पित भावाने कार्य करण्याची आवश्यकता याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, 'सनातनच्या साधकांकडे पाहिल्यावर समर्पित भावाने कार्य कसे करायचे, हे लक्षात येईल. सनातन संस्थेने पूज्यपाद आसारामजी बापू यांची बाजू परखडपणे मांडली'. धर्मनिरपेक्षतावादाची निरर्थकता आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची आवश्यकता याविषयी ह.भ.प. घोगरे महाराज यांनी मार्गदर्शन केले. या अधिवेशनाला यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती या जिल्ह्यांतील हिंदुत्ववाद्यांची उपस्थिती लाभली. अधिवेशनाच्या दुपारच्या सत्रामध्ये सर्व धर्माभिमान्यांची हिंदु संघटनाविषयी घ्यावयाच्या उपक्रमाविषयी गटचर्चा घेण्यात आली. 
हिंदु जनजागृती समितीच्या आंदोलनामुळे आध्यात्मिक स्तरावरील आंदोलनाची प्रचीती आली ! - संजय ठाकूर, हिंदुत्ववादी
      श्री. नितीन व्यास म्हणाले, सर्वसाधारण व्यक्तीला वाटते की, आंदोलन हिंसेच्या माध्यमातून होते; मात्र राष्ट्रीय हिंदू आंदोलन सनदशीर मार्गाने होणारे; पण आघातांविरुद्ध लढा देणारे आहे. त्यामुळे सर्वसामान्य हिंदु बांधवही त्यामध्ये सहभागी होऊ शकतात. श्री. संजय ठाकूर म्हणाले, यापूर्वी आमच्या आंदोलनाचे स्वरूप भावनिक होते. समितीच्या आंदोलनात सहभागी झाल्यावर आध्यात्मिक स्तरावर आंदोलन कसे करायचे, ते लक्षात आले. कु. प्रतिक्षा कोरगावकर यांनी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचे लाभ आणि त्याचे आयोजन कसे करावे, यासंदर्भात सांगितले. 
 क्षणचित्रे 
 १. पू. नंदकुमार जाधव यांनी दीपप्रज्वलन केले होते. तेव्हापासून ते दुसर्‍या दिवशी दुपारपर्यंत ती समई तशीच तेवत राहिली. 
२. अधिवेशनासाठी सभागृह, भोजन, निवास, ध्वनीक्षेपण व्यवस्था, विद्युत व्यवस्था, तंबूचे साहित्य इत्यादी सर्व धर्माभिमान्यांनी विनामूल्य उपलब्ध करून दिले होेते. 

राज्य परिवहन महामंडळाकडे सात वर्षांपासून २८ लक्ष रुपयांची थकबाकी

     संभाजीनगर - राज्य परिवहन महामंडळाचे (एस्.टी.) थकबाकीदार वाढतच चालले आहेत. तोटा सहन करीत अखंडपणे सेवा देणार्‍या परिवहनाचे पोलीस विभाग, मध्यवर्ती कारागृह आणि राज्य राखीव पोलीस दल (आर्पीएफ्) यांनी २८ लक्ष ७८ सहस्र ७३५ रुपये थकवले आहेत. गेल्या सात वर्षांपासून थकबाकी वसुलीसाठी राज्य परिवहनाचे अधिकारी तिन्ही विभागांचे उंबरठे झिजवत आहेत; मात्र या विभागांकडून केवळ टोलवाटोलवी केली जात आहे. यामुळे ही थकबाकी बुडण्याच्या मार्गावर आहे. (एवढी थकबाकी होईपर्यंत परिवहनाचे अधिकारी काय करीत होते ? आधीच तोट्यात चाललेल्या परिवहनाची थकबाकी लाखांच्या घरात गेल्यावर धावपळ करण्याचा काय उपयोग ? - संपादक)

खंडणी वसुलीच्या प्रकरणी शरणार्थी नक्षलवाद्यास अटक

     आलापल्ली (जिल्हा गडचिरोली) - गेल्या दहा वर्षांपासून नक्षल चळवळ सोडल्यानंतरही खंडणी वसूल करीत असलेल्या एका शरणार्थी नक्षलवाद्यास ग्रामस्थांनी पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. अहेरी तालुक्यातील सुद्धागुडम-उमानूर गावात ही घटना २८ नोव्हेंबर या दिवशी घडली. (यावरून शरणार्थी नक्षलवाद्यांवरही लक्ष ठेवणे आवश्यक आहे, हे स्पष्ट होते. - संपादक) 

चर्चचे अंतिम ध्येय ख्रिस्ती धर्माचा प्रचार करणे, हे आहे ! - केरळ राज्य मुख्य सचिव

'केरळचे झपाट्याने ख्रिस्तीकरण होत आहे', असे का म्हटले जाते, ते या उदाहरणावरून लक्षात येईल ! 
शासन अशांवर काय कारवाई करणार आहे ? 
     कोट्टायम (केरळ) - चर्चचे अंतिम ध्येय ख्रिस्ती धर्माचा प्रचार करणे हे आहे, असे विधान केरळ राज्यातील सर्वोच्च वैधानिक प्रशासकीय अधिकारी अर्थात् केरळ राज्याचे मुख्य सचिव जी.जी. थॉमसन् यांनी केले आहे. ते येथे आयोजित एका ख्रिस्ती धार्मिक सभेत बोलत होते. वरील मत माझे वैयक्तिक असून त्याचा माझ्या पदाशी कोणताही संबंध नाही, अशी मखलाशी करण्यासही थॉमसन् विसरले नाहीत. ऑक्टोबर मासात देहलीतील केरळ हाऊस मध्ये गोमासांचे पदार्थ मिळत असल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला आणि विनाकारण केरळ हाऊसविषयी अफवा पसरवणार्‍या व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले.

अमीर खान यांनी या देशात कमावलेले पैसे येथेच ठेवून देश सोडून जावे ! - प्रभाकर भोसले, श्री शिवकार्य प्रतिष्ठान विक्रोळी

हिंदू अभिनेता अमीर खान यांच्या विरोधात विक्रोळी येथे हिंदुत्ववाद्यांचे आंदोलन
काळे फासलेल्या अमीर यांच्या छायाचित्राला जोडे मारतांना हिंदू
     विक्रोळी - 'ज्या देशाने अमीर खान यांना मोठे केले, ज्या देशामध्ये त्यांनी कोट्यवधी रुपये कमावले, त्यांनीच देशविरोधी वक्तव्ये करून भारतमातेचा अवमान केला आहे. त्यामुळे त्यांनी येथे कमावलेले पैसे येथेच ठेवून देश सोडून जावे', असे प्रतिपादन श्री शिवकार्य प्रतिष्ठानचे श्री. प्रभाकर भोसले यांनी केले. 'अभिनेता अमीर खान यांच्यावर देशद्रोहाचा खटला प्रविष्ट व्हावा', या मागणीसाठी येथे २८ नोव्हेंबर या दिवशी घेण्यात आलेल्या आंदोलनात ते बोलत होते. 
आताच देश सोडून जाण्याची भाषा का ? - मनोज सुर्वे, हिंदू महासभा
     जेव्हा देशावर आतंकवादी आक्रमणे झाली, तेव्हा देश सोडण्याची भाषा अमीर खान यांनी का केली नाही ? काँग्रेसच्या काळात हिंदूंची मंदिरे आणि गोरक्षक यांच्यावर आक्रमणे होत असतांना त्यांना देश सोडावासा का वाटला नाही ? मग आताच त्यांना असे का वाटले ? 

श्री महालक्ष्मी मंदिराचे 'स्पेशल स्ट्रक्चरल ऑडिट' करून पुरातत्व विभागाला अहवाल देण्यात येणार !

     कोल्हापूर, २९ नोव्हेंबर (वार्ता.) - श्री महालक्ष्मी मंदिराच्या बाह्य शिळा निखळू लागल्या आहेत. नुकतेच शनी मंदिरालगतच्या शिळेचा काही भाग कोसळल्याने याची गंभीर नोंद पुरातत्व विभागाने घेतली आहे. वर्षभरात मंदिराला गतवैभव प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने लवकरच मंदिराची पाहणी केली जाणार आहे. मंदिराचे स्पेशल स्ट्रक्चरल ऑडिट करून केंद्रीय पुरातत्व विभागाला अहवाल सादर केला जाणार आहे. त्यामुळे शिल्पवैभवाने नटलेल्या श्री महालक्ष्मी मंदिराचा अमूल्य ठेवा आता संरक्षित होणार आहे. चुना लावून शिल्पवैभव सुरक्षित करण्याचा प्रयत्न मागे करण्यात आला आहे. यामुळे शिल्पवैभव संरक्षित तर झालेच नाही; मात्र आता पूर्णतः खराब होण्याच्या मार्गावर आहे. यापूर्वीही मंदिराच्या अनेक ठिकाणच्या शिळा निसटून बाहेर झुकण्याचे, तसेच कोसळण्याचे प्रकार झाले आहेत; मात्र ते त्या त्या वेळी सिमेंटने आणि लोखंडी बार लावून संरक्षित करण्यात आले आहेत.

सज्जनगड येथील समर्थ रामदास स्वामी यांच्या पादुकांचे सांगलीत आगमन !

पादुकांच्या पालखी मिरवणूकप्रसंगी श्री. हणमंतराव पवार (पालखी घेतलेले) आणि अन्य..
     सांगली, २९ नोव्हेंबर (वार्ता.) - सज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने समर्थ रामदास स्वामी यांच्या पादुकांचा ८० दिवसांच्या प्रचार दौर्‍याचा सांगली शहरातून प्रारंभ झाला आहे. ८० दिवसांचा हा दौरा १० फेब्रुवारी २०१६ अखेरपर्यंत चालेल. या पादुकांच्या आगमनाच्या प्रीत्यर्थ २८ नोव्हेंबर या दिवशी सांगली शहरात श्री गणेश मंदिर ते हरभट रस्ता येथील जुने मुरलीधर मंदिर अशी शोभायात्रा काढण्यात आली. या वेळी आमदार श्री. सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी श्री. शेखर गायकवाड, सर्वश्री गणेश गाडगीळ, श्रीराम कुलकर्णी, तसेच अन्य भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सनातन संस्थेवर होणारे खोटे आरोप आणि त्यामागील वस्तुस्थिती समजावी, यासाठी आज कोल्हापूर येथे जाहीर 'जनसंवाद सभा' !

 • समीर गायकवाड खरेच दोषी आहे का ?
 • हिंदुत्ववादी संघटनांना जाणीवपूर्वक अडकवले जात आहे का? 
 • सनातन संस्थेला आतंकवादी ठरवण्यासाठी कोण प्रयत्न करत आहे ? 
 • सनातनला बळीचा बकरा का बनवला जात आहे ? 
 • सनातन संस्था खरेच संमोहन करते का ? 
 • हिंदूंवरील आघातांच्या विरोधात काय करायला हवे ? 

अवैध गोमांसविक्री बंद करण्यासाठी गेलेले पोलीस आणि हिंदुत्ववादी यांच्यावर धर्मांधांकडून दगडफेक !

केवळ कागदोपत्री असलेली गोमांस बंदी आता प्रत्यक्षातही यावी, हीच हिंदूंची अपेक्षा आहे ! 
राज्यात गोमांस बंदी असूनही सर्रास होणार्‍या गोमांस विक्रीवर शासन स्वतःहून कारवाई का करत नाही ? 
    पुणे, २९ नोव्हेंबर (वार्ता.) - येथील संगमवाडी परिसरातील पाटील इस्टेट या परिसरात अवैध गोमांसविक्री करणार्‍या दुकानांवर छापा मारण्यासाठी गेलेले पोलीस आणि हिंदुत्ववादी यांच्यावर धर्मांधांनी दगडफेक केली. या वेळी हिंदु आणि कुरापतखोर धर्मांध यांच्यात झालेल्या वादंगामुळे परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली. 
१. पाटील इस्टेट येथील ३ दुकानांमध्ये अवैधरित्या गोमांसाची विक्री होत असल्याची माहिती समस्त हिंदु आघाडीच्या कार्यकर्त्यांना मिळाली. 
२. त्यानुसार अवैध विक्री बंद पाडण्यासाठी समस्त हिंदु आघाडीचे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते पोलिसांसमवेत त्या ठिकाणी गेले असता धर्मांधांनी हिंदुत्वनिष्ठांना शिवीगाळ करण्यास प्रारंभ केला. 
३. पोलीस समोर असतांनाच त्यांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना तेथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. काही वेळातच ५०० हून अधिक धर्मांध त्या ठिकाणी जमा झाले आणि त्यांनी दंगल माजवण्याचा प्रयत्न केला. (यावरून धर्मांध कायम आक्रमण करण्याच्या सिद्धतेतच असतात, हेच स्पष्ट होते ! - संपादक) 

संभाजीनगर येथे गोवंशहत्या प्रकरणी एका धर्मांधाला अटक
महानगरपालिकेच्या पथकावर आक्रमण 
    संभाजीनगर, २९ नोव्हेंबर - येथील सिल्लेखाना भागातील गोवंशियांची हत्या केली जात आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या पथकाला मिळाली. या पथकाने २४ नोव्हेंबर या दिवशी पहाटे धाड टाकून गोवंशियांची हत्या करणार्‍यांवर कारवाई केली. या वेळी साथीदार आणि महिला यांनी त्या पथकावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. (यावरून धर्मांधांचे आक्रमण पूर्वनियोजितच होते, हे दिसून येते ! - संपादक) क्रांतीचौक पोलिसांनी वेळीच साहाय्य केल्याने अकबर कुरेशी या कसायाला अटक करण्यात आली. (शासनाने गोवंशहत्या बंदी कायद्याची कठोरात कठोर अंमलबजावणी करावी, ही अपेक्षा ! - संपादक)

अल्पवयीन विद्यार्थिनीशी अश्‍लील चाळे करणार्‍या शिक्षकाला अटक

शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना ! अशा घटनांचे वाढते प्रमाण 
चिंताजनक असून यावर शासनाने कठोर कारवाई आणि उपाययोजना करणे आवश्यक !
    पुणे, २९ नोव्हेंबर - येथील हडपसर भागातील खाजगी शिकवणी घेणारा शिक्षक दिलीप तुकाराम गवळी हा एका अल्पवयीन विद्यार्थिनीशी अश्‍लील चाळे करत असे. तसे करू न दिल्यास तो त्या विद्यार्थिनीला तुझ्या आई-वडिलांना तू अभ्यास नीट करत नसल्याचे सांगून मार द्यायला लावीन, असे धमकावत असे. या प्रकरणी त्या मुलीच्या आईने हडपसर पोलिसांकडे तक्रार दिली असून त्या शिक्षकाला अटक केली आहे. (असे नीतिमत्ताहीन वासनांध शिक्षक शिक्षण व्यवस्थेतून खड्यासारखे दूर करून शिक्षकांना धर्माचरणाचे धडे देणे आवश्यक आहे. - संपादक) त्याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणी अधिक चौकशी केल्यावर आरोपीने तक्रारदाराच्या मुलीसह अन्य २ मुलींसमवेत असे कृत्य केल्याची माहिती पुढे आली आहे.

१ डिसेंबरला जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांचा प्रवचन आणि दर्शन सोहळा


   ईश्‍वरपूर, २९ नोव्हेंबर (वार्ता.) - जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळ वतीने मंगळवार, १ डिसेंबर या दिवशी ईश्‍वरपूर येथील मा. जयंत पाटील खुले नाट्यगृह, उरुण येथे सकाळी ११ वाजल्यापासून अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्यजी श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रवचन आणि दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी अधिकाधिक भाविकांची याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

माध्यमिक शिक्षण विभागातील खोट्या शिक्षक नियुक्त्या

 • शिक्षणक्षेत्रातील अनागोंदी कारभार !
 • १२ शिक्षकांना शिक्षणसेवक म्हणून नियुक्त्यांचे खोटे आदेश
 • शिक्षण उपसंचालकांना चौकशी अहवाल सादर
    पुणे, २९ नोव्हेंबर - सध्या माध्यमिक शिक्षण विभागात बनावट शिक्षक नियुक्त्या झाल्याचे प्रकरण चालू आहे. तत्कालीन माध्यमिक शिक्षण अधिकारी बबन दहिफळे यांच्या कार्यकाळातील हे आदेश आहेत. या प्रकरणी शिक्षण उपसंचालकांनी याविषयीच्या पडताळणीचे आदेश दिले होते. त्यानुसार १२ शिक्षकांच्या नियुक्तींचे खोटे आदेश दिल्याचे स्पष्ट झाले आहे. (एवढ्यावरच न थांबता शिक्षण विभाग प्रशासनाने खोट्या नियुक्तीच्या मुळाशी जाऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी. खोट्या नियुक्त्या रहित करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी. - संपादक) शिक्षणसेवक म्हणून नियुक्त केलेल्या या शिक्षकांना नेमणुकीचे आदेश आणि त्याप्रमाणे वेतन मिळत आहे; परंतु त्यांच्या नियुक्तीचे आदेश कोणत्याही धारिकेमध्ये अथवा शिक्षण अधिकारी कार्यालयात पडताळणीमध्ये आढळून आलेले नाहीत. जिल्हा शिक्षण अधिकारी हसन आत्तार यांनी केलेल्या चौकशीत या खोट्या नियुक्त्यांचे आदेश उघडकीस आले.

एफ्.टी.आय.आय. च्या काळ्या कृत्यांचे श्‍वेतपत्र !

श्री. सुरेश चिपळूणकर
     आज आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा अखेरचा दिवस. गेले काही दिवस FTII (फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया) मधील विद्यार्थी चित्रपट महोत्सवाच्या ठिकाणीही निषेध नोंदवत आहेत. दूरचित्रवाहिनीवरील अभिनेता गजेंद्र चौहान यांची संस्थेच्या अध्यक्षपदी आणि इतर काही सदस्य यांच्या निवडीला या विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे. ते रा.स्व. संघाचे समर्थक असल्याने हा विरोध आहे; परंतु विद्यार्थी गजेंद्र चौहान यांच्या पात्रतेविषयीचे सूत्र उपस्थित करत आहेत. प्रत्यक्षात आतापर्यंतचे FTII संस्थेवरील अध्यक्ष कोण होते आणि त्यांची विचारसरणी काय होती, त्याचा भांडाफोड या लेखातून करत आहोत. यातून विद्यार्थ्यांचे आंदोलन किती स्वार्थी आहे आणि या आंदोलनामागे कोणाचा हात आहे, ते जनतेला समजेल. 

दुय्यम दर्जाचे वक्तव्य करून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आधार घेणे चुकीचे ! - डॉ. संजय उपाध्ये

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची टिमकी वाजवणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
    पुणे, २९ नोव्हेंबर - देशातील नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थच समजलेला नाही. सध्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण केल्यामुळे स्वैराचार बळावला आहे. त्यामुळे कुटुंबव्यवस्थाच उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. सार्वजनिक वक्तव्यापासून हिंदी चित्रपटापर्यंत या स्वातंत्र्याच्या नावाने गोंधळ घातला जात आहे. कोणतेही दुय्यम वक्तव्य करायचे आणि त्याचे स्पष्टीकरण देण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आधार घ्यायचा, हे चुकीचे आहे, असे प्रतिपादन डॉ. संजय उपाध्ये यांनी केले.

गेल्या ९ मासांत पुणे शहरातील अपघातात ३३२ जणांचा मृत्यू

 • प्रतिदिन अपघातात एकाचा मृत्यू
 • शासनाकडून उपाययोजना नाहीत
पुणे, २९ नोव्हेंबर - शहरात वर्ष २०१४ च्या तुलनेत यंदाच्या वर्षी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या ९ मासांत एकूण ३१७ रस्ते अपघात झाले असून त्यात ३३२ नागरिक मृत पावले आहेत. यावरून शहरात होणार्‍या अपघातांत प्रतिदिन एका व्यक्तीचा मृत्यू होत असल्याचे स्पष्ट होते. एखाद्या ठिकाणी सतत अपघात होऊनही तेथे पुनरावृत्ती टाळण्यासाठी संबंधित विभागाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत नाहीत. (अपघातांचे प्रमाण अल्प करण्यास शिस्त, उपाययोजना आणि धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. - संपादक)

नथुराम गोडसे यांना का जागवता ?

     अच्छे दिन (चांगले दिवस) आणण्याच्या सात्त्विक भावनेतून देहली दरबारी गुजरातच्या जादूगाराने आपली सत्ता प्रस्थापित केली. केवळ सत्ताच मिळवली असे नव्हे, तर संसद भवनाला प्रणाम करून पंतप्रधानपदी विराजमान झालेला राष्ट्रभक्त प्रत्यक्ष कार्याला लागला. हा हा म्हणता आजपर्यंत भारत या राष्ट्राकडे नाक मुरडून पहाणारी राष्ट्रे ही व्यक्ती सत्तेत येताच भारतापुढे मैत्रीचा हात पसरून राष्ट्राचा गौरव करतांना दिसू लागली. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात जागतिक योग दिनाचा स्वीकार करून भारताचा बहुमान किती उंचावला, हे सार्‍या जगाला दिसले.

पेठ (जिल्हा पुणे) येथे सार्वजनिकरित्या तुळशी विवाह साजरा

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तुळशीचे आध्यात्मिक महत्त्व विषद
    पेठ, २९ नोव्हेंबर - येथील श्रीराम मंदिरात गावातील सार्वजनिक तुळशी विवाह २३ नोव्हेंबर या दिवशी पार पडला. या विवाह कार्यक्रमाचा प्रारंभी श्रीकृष्णाच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनीही मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात श्रीराम मंदिरापर्यंत आली. त्यानंतर सायंकाळी ६ ते ६.३० या वेळेत हिंदु जनजागृती समितीचे श्री. दिलीप शेटे यांचे तुळशीचे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व या विषयावर व्याख्यान झाले.

आजच्या काळातील पाकिस्तान-बांगलादेशाच्या रूपातील औरंगजेब संपवलेच पाहिजेत ! - पू. भिडेगुरुजी

पू. भिडेगुरुजी
    मुंबई - आजच्या काळातील पाकिस्तान-बांगलादेशाच्या रूपातील औरंगजेब हे संपवलेच पाहिजेत, असे प्रतिपादन पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी विद्यार्थी उत्कर्ष मंडळ, मुंबई आयोजित विवेकानंद व्याख्यानमालेत केले. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, लालबाग येथे आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. या कार्यक्रमाला १ सहस्रांहून अधिक हिंदू उपस्थित होते.
या वेळी पू. भिडेगुरुजींनी केलेले मार्गदर्शन
१. भारताची आजची अवस्था बिकट आहे.
२. छत्रपती शिवाजी महाराजांना आपण पुतळे आणि शिवजयंती यांतच संपवून टाकले.

संविधानाचे धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली राजकारण

     आपल्या देशात लोकशाही असल्याने आवश्यक विषयांवर चर्चा होते, तशी अनावश्यक विषयांवरही चर्चा होऊ लागली आहे. प्रौढ लोकशाही म्हणून भारतात चर्चांना विशेष महत्त्व येऊ लागले आहे. त्याचाच एक भाग म्हणून संसदीय हिवाळी अधिवेशनात संविधानावर दोन दिवसांची चर्चा झाली. त्यावर संसदेत सर्व बाजूंनी सखोल चर्चा होऊ लागली आहे. २६ जानेवारी १९५० पासून देशाची राज्यघटना देशात अमलात आली असली, तरी घटना समितीने हे संविधान स्वीकारले ते २६ नोव्हेंबर १९४९ या दिवशी. हिंदुस्थानी संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याच दिवशी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद आणि पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडे घटना सुपुर्द केली.

वळती (जिल्हा पुणे) येथील श्री जगदंबादेवीच्या मंदिरातील दानपेटीची चोरी

राज्यातील असुरक्षित मंदिरे !
     आंबेगाव (जिल्हा पुणे), २९ नोव्हेंबर - येथील तालुक्यातील वळती गावातील श्री जगदंबादेवीच्या मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडून २ सहस्र रुपये चोरून नेले. या घटनेनंतर मंदिराच्या जवळ असणार्‍या अंगणवाडीच्या दरवाजाचे कुलूप तोडले. चोरट्यांनी तेथील दूरचित्रवाणी संच, धान्य आणि इतर साहित्य असे मिळून २० सहस्र रुपयांचा ऐवज चोरून नेला. मंदिर आणि अंगणवाडी या दोन्ही ठिकाणी अशा प्रकारची चोरी दुसर्‍यांदा घडली आहे.
    देशापुढील समस्यांकडे भांडवलशाही व साम्यवाद यांच्या दृष्टीकोनातून न पहाता सनातन हिंदु धर्माच्या दृष्टीने पहायला हवे. तरच राष्ट्राचा उद्धार होऊ शकेल ! - डॉ. दुर्गेश सामंत.

राज्यशासनाला विमानतळासाठी साईबाबा संस्थानकडून हवेत ११० कोटी

मंदिरांचा पैसा मंदिरांच्याच कार्यासाठी वापरला जावा; म्हणून भक्तांनी प्रयत्नशील रहावे !
नगर - शिर्डी विमानतळासाठी ११० कोटी रुपये द्यावेत, असा राज्यशासनाचा प्रस्ताव साईबाबा संस्थानकडे आला आहे. या प्रस्तावाला शिर्डी ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला असून शिर्डी बंद ठेवून तीव्र आंदोलन छेडण्याची चेतावणी दिली आहे. गावात अगोदर मूलभूत सुविधा द्या, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
१. राज्यातील सर्वांत श्रीमंत असलेल्या साईबाबा संस्थान आणि शिर्डी परिसराचा विकास गेल्या अनेक वर्षांपासून ठप्प आहे. गावात येणार्‍या लाखो साईभक्तांना मूलभूत सुविधासुद्धा मिळत नाहीत.

बालचित्रवाणीतील कर्मचार्‍यांना एक मासात वेतन देण्याचे औद्योगिक न्यायालयाचे आदेश

न्यायालयाला जर यामध्ये लक्ष द्यावे लागत असेल, 
तर शासन आणि प्रशासन नावांचे हत्ती पोसायचेच कशाला ?
   पुणे, २९ नोव्हेंबर - बालचित्रवाणीतील संस्थेतील कर्मचार्‍यांचे १६ मासांचे, म्हणजेच एप्रिल २०१४ पासूनचे थकलेले वेतन एक मासात देण्याचे अंतरिम आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच न्यायालयाने शासनाला अशी तंबी दिली आहे की, निधी उपलब्ध नसल्याचे कारण चालणार नाही.

स्वातंत्र्यासाठी एक पिढी लढते, दुसरी पिढी भोगते आणि तिसरी पिढी गमावते, हा समाजनियम आहे !

     भारत स्वतंत्र झाला, तरी ती शाश्‍वत गोष्ट थोडीच रहाणार आहे ? एक पिढी लढते, दुसरी पिढी भोगते आणि तिसरी पिढी गमावते, हा क्रम खंडित न होता चालू आहे. सगळ्या राजकुलाचा आणि समाजाचा इतिहास या तीन वाक्यात भरला आहे. 
- श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, मुंबई.

तत्परता, परिपूर्णता आणि प्रेमभाव या गुणांचा समुच्चय असणारे ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. अजय प्रजापती !

श्री. अजय प्रजापती
१. प्रेमभाव आणि सहजता : माझी दादाशी यापूर्वी कधीही भेट झाली नव्हती. तो देवदहून रामनाथी आश्रमात रात्री उशिरा पोचला. विभागात मला उशिरा सेवा करतांना पाहून त्याने एकदम सहजतेने झोपायला कधी जाणार ?, असे विचारले. त्याचे हे पहिलेच वाक्य ऐकून मला फार आश्‍चर्य वाटले. याउलट मी काय बोलायचे ?, असा विचार करत होते.

२. इतरांचा विचार करणे : एकदा प्रसारातील एका साधकाला भ्रमणसंगणकासाठी बॅग द्यायची होती. बॅग ठरवतांना मी केवळ तो भ्रमणसंगणक बसेल, अशी बॅग द्यायची, एवढाच विचार केला. भ्रमणसंगणकाला अडचण येऊ नये; म्हणून त्या साधकाने साहित्य ठेवण्यासाठी दुसरी बॅग वापरावी, असे वाटून मी त्या साधकाला तसे कळवले. या संदर्भात दादाला विचारल्यावर त्याने लगेच २ प्रकारच्या बॅग पाठवून सुचवले, त्या साधकाला कोणती सोयीस्कर आहे, हे त्याला ठरवू दे; कारण प्रसारात त्याच्याकडे पुष्कळ साहित्य असते. या प्रसंगात माझा केवळ भ्रमणसंगणकाचाच विचार झाला. त्या साधकाचा विचार झाला नाही. याउलट दादाने दोन्हींचा विचार करून योग्य निर्णय दिला.

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंनो, साम्यवादी विचारांच्या नेपाळ शासनाच्या कुरापती जाणा !
    नेपाळमध्ये साम्यवादी विचारांचे शासन सत्तेवर आल्यापासून भारत-नेपाळ संबंधांतील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. नेपाळमध्ये ४२ भारतीय वाहिन्यांच्या प्रक्षेपणावर बंदी घालण्यात आली असून चित्रपटगृहात दाखवण्यात येणारे चित्रपटांचे प्रदर्शनही थांबवण्यात आले आहेत.

हिंदू तेजा जाग रे !

जागो !
   नेपाल ने भारत के ४२ चॅनल्स के प्रक्षेपण पर लगाई रोक !
क्या साम्यवादी विचारधारा का शासन आने के बाद नेपाल भारतविरोधी हुआ है ?
Jago !
   Nepalne Bharatke 42 channelske prakshepanpar lagayi rok !
Kya Samyavadi vichardharaka shasan aneke bad Nepal Bharatvirodhi hua hai ?

सनातनविरोधी षड्यंत्रामुळे निरपराध साधकांना द्यावी लागली अग्नीपरीक्षा !

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे भीषण अनुभव !
     सनातन प्रभात नियतकालिकांमध्ये साधकांचे अनुभव आणि अनुभूती असतात. वर्ष २००९ मध्ये अगदी दिवाळीच्या दिवशी, म्हणजे नरकचतुर्दशीच्या आदल्या दिवशी गोव्यातील मडगाव शहरात नरकासुरदहन स्पर्धेच्या जवळ झालेल्या एका स्फोटात सनातनच्या दोन साधकांचा मृत्यू झाला. या प्रकरणात सनातनचे साधक दोषी असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आणि सनातनच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या ६ साधकांना बंदी बनवण्यात आले.

रामनाथी आश्रमातील साधकांना आलेला ताप हा युद्धज्वर असल्याचे महर्षींनी सांगणे

     गेले २ - ३ दिवस रामनाथी आश्रमात जवळजवळ ५२ साधक तापाने आजारी आहेत. याचे कारण महर्षींना विचारले असता पू. डॉ. ॐ उलगनाथन् म्हणाले, हा युद्धाचा ज्वर आहे. (यावरून असे लक्षात आले की, सध्या पानसरे प्रकरणात अनेक प्रकारचे आरोप सनातनवर केले जात आहेत. वाईट शक्ती आणि दैवी शक्ती यांमध्ये चाललेले हे एक धर्मयुद्धच आहे. रणांगणावर उभ्या असलेल्या सैनिकरूपी साधकांना याची झळ लागली नाही तरच नवल ! म्हणून महर्षि म्हणतात, साधकांना आलेला ज्वर हा या युद्धाचा परिणाम आहे, म्हणजेच तो युद्धज्वर आहे.)
- (पू.) सौ. अंजली गाडगीळ, तिरुवण्णामलई, तमिळनाडू (२६.११.२०१५, सायं. ७.५९)

पुणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. निखिल तागडे यांच्याविषयी त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे

निखिल तागडे
     कै. निखिल तागडे याचे निधन १७.११.२०१५ या दिवशी झाले. मृत्यूसमयी त्याचे वय ३४ वर्षे होते. वर्ष २००२ ते २००९ पर्यंत तीव्र त्रासावरील उपायांसाठी आश्रमामध्ये राहिला होता. वर्ष २०१२ पासून मल्टिपल स्क्लेरॉसिस या दुर्धर आजाराने तो आजारी होता. सप्टेंबर २०१४ पासून तो पूर्णपणे अंथरुणाला खिळून होता.
१. तोंडवळ्यावरून त्याला इतका गंभीर आजार असल्याचे
 न जाणवणे, तोंडवळा नेहमी तेजस्वी आणि आनंदी दिसणे
     सप्टेंबर २०१४ पासून त्याला त्याचे स्वतःचे असे काहीच करता येत नव्हते. कमरेपासून खाली त्याच्या पायात शक्ती नसल्याने त्याचे सर्व काही जागेवरच होते. अशा स्थितीत त्याचा तोंडवळा तेजस्वी आणि आनंदी असायचा. कधीही त्याचा तोंडवळा त्रासिक, चिडलेला किंवा रडवेला दिसला नाही. त्याच्या तोंडवळ्यावरून त्याला इतका गंभीर आजार झाला आहे, असे जाणवत नव्हते.
२. निखिलच्या आजारपणात जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये
२ अ. आवड-निवड नसणे : त्याला काहीही खायला दिले, तरी चांगले झाले आहे, असे म्हणायचा.
२ आ. परिस्थिती आनंदाने स्वीकारणे : कितीही त्रास झाला, तरी त्याने कोणत्याही प्रकारे तक्रार केली नाही. मला त्रास होत आहे, असे एकदाही म्हटले नाही. अल्पाहार, चहा, जेवण द्यायला उशीर झाला, तरी त्याने कधीही तोंडातून शब्द काढला नाही. त्याचा तोंडवळा सतत आनंदी असायचा.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

   
परात्पर गुरु डॉ. आठवले
    आरोपीला निर्दोष म्हणून सोडतांनाच न्यायाधिशांनी खोटे गुन्हे नोंदवणारे पोलीस, खोटे आरोप करणारे शासकीय अधिवक्ता इत्यादींना कारावासाची शिक्षा द्यायला हवी !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र


॥ हरि ॐ तत्सत् ॥

गुरूंकडे काय मागावे ?
संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
माझ्याकडे सुख मागू नका, दुःख सहन करण्याचे बळ मागा.
भावार्थ : सुख हे प्रकृतीतील असल्याने अशाश्‍वत असते, म्हणून गुरूंकडे मागू नये. तसेच हेही लक्षात ठेवले पाहिजे की, शाश्‍वत आनंद मिळवून देणे, हेच गुरूंचे खरे कार्य असते. प्रारब्धामुळे दुःख भोगावे लागणार असल्यास, त्या दुःखदायक प्रसंगांमुळे होणारे दुःख सहन करण्याची शक्ती मात्र गुरु निश्‍चित (नक्कीच) देतात; म्हणून ती मागायला आडकाठी (हरकत) नाही
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

समाज आणि राष्ट्र यांसाठी प्रत्येकाने निःस्वार्थीपणे आणि कर्तव्यबुद्धीने काम करणे आवश्यक असणे

     आज आपण अनेक हुतात्म्यांच्या आत्मबलीदानाच्या पुण्याची फळे स्वातंत्र्याच्या रूपात भोगत आहोत. आपली पुढची पिढी पारतंत्र्यात अडकून पिचू नये, अशी इच्छा असल्यास प्रत्येकाने समाज आणि राष्ट्र यांसाठी निःस्वार्थीपणे अन् कर्तव्यबुद्धीने थोडे तरी काम केलेच पाहिजे.
- (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (प.पू. डॉक्टरांचे ज्येष्ठ बंधू) (ख्रिस्ताब्द १९९०) 
     आम्हाला स्वातंत्र्य हवे, ते केवळ सुसंस्कृत, संरक्षित असे धर्मजीवन जगता यावे याकरताच हवे ! हिंदु प्रणालीचे सांस्कृतिक धर्मजीवन जगता येत नसेल, तर ते सेक्युलर स्वातंत्र्य काय कामाचे ? - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, १२.२.२००९)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

योग्य आचार-विचार
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      दुसर्‍याच्या आधाराची अपेक्षा करीत राहिलो, तर कधीच उभे रहाता येणार नाही; म्हणूनच धडपडत का होईना; पण स्वत:च्या हिमतीवर उभे राहून स्वावलंबी होणे इष्ट ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

राजिना आणि असहिष्णुता !

संपादकीय
   केरळमधील मुसलमान महिला पत्रकार व्ही.पी. राजिना यांनी कोझीकोडमधील एका मदरशामध्ये जाणार्‍या मुला-मुलींवर होणार्‍या लैंगिक शोषणावर प्रकाश टाकला. त्यानंतर त्यांना धर्मांधांकडून धमक्या मिळणे, त्यांना शिवीगाळ करणे यांसारखे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यांनी त्यांच्या फेसबूकच्या खात्यावर टाकलेली ही माहिती काही ऐकीव किंवा कुठून तरी मिळवलेली नाही, तर त्या मदरशामध्ये स्वतः शिकतांना तेथे शिकवणार्‍या शिक्षकांविषयी आलेले अनुभव त्यांनी लिहिले आहेत. ते वाचतांना हा मदरसा म्हणजे मुलांच्या लैंगिक शोषणाचा अड्डाच आहे, हे आपल्या सहज लक्षात येईल. भारतात मुलांचे लैंगिक शोषण हे कळीचे सूत्र आहे. या पार्श्‍वभूमीवर एका मदरशामध्ये घडलेला हा प्रकार भारतातील वृत्तवाहिन्या, बुद्धीजीवी यांनी उचलून धरणे आवश्यक होते; मात्र तसे काही झालेले नाही.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn