Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।


उस्मानिया विद्यापिठातील गोमांस मेजवानी रहित करावी !

जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी
हिंदुत्ववादी संघटनांची प्रशासनाकडे मागणी
    भाग्यनगर - उस्मानिया विद्यापिठातील विद्यार्थ्यांचा एक गट, काही शिक्षक, मानवाधिकारवाले आणि शहरातील इतर विद्यापिठांतील काही विद्यार्थी यांनी १० डिसेंबरला मानवाधिकार दिनी विद्यापिठामध्ये गोमांस मेजवानीचे आयोजन केले आहे. मेजवानीचा हा कार्यक्रम रहित करावा आणि विद्येचे माहेरघर असणार्‍या विद्यापिठात अशा हिंदुद्वेषी कार्यक्रमांचे आयोजन करणार्‍या विद्यार्थ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी प्रशासनाकडे केली आहे. त्या संदर्भातील एक निवेदन हिंदुत्ववादी संघटनांनी तेथील जिल्हाधिकारी के. निर्मला यांना दिले.

(म्हणे) अभय वर्तक यांना अटक करून त्यांची नार्को चाचणी करा !

  • पोलिसांपेक्षा स्वतःला शहाणे समजणार्‍या पुरोगाम्यांनी तोडले अकलेचे तारे 
  • पुरोगाम्यांचीच नार्को चाचणी करा, अशी हिंदूंची मागणी आहे !
    कोल्हापूर - हिंसेचे जाहीर समर्थन करणार्‍या सनातन संस्थेचे अभय वर्तक यांना तिघांच्या खुनाचे मारेकरी माहीत आहेत. त्यामुळे त्यांना अटक करून त्यांची नार्को चाचणी आणि चौकशी करावी, असे अकलेचे तारे काही पुरोगाम्यांनी येथील एका पत्रकार परिषदेत तोडले. सनातन संस्थेने २५ नोव्हेंबर या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर भयभीत झालेल्या पुरोगाम्यांनी ही भ्याड मागणी केली आहे. (पत्रकार परिषदेत पुरोगाम्यांचे षड्यंत्र उघड करण्याचा प्रयत्न केल्याने पुरोगाम्यांचा जळफळाट झाला आहे. - संपादक)
    ३० नोव्हेंबर या दिवशी सनातन संस्था कोल्हापूर येथे घेत असलेल्या जनसंवाद सभेच्या पार्श्‍वभूमीवर पुरोगाम्यांच्या मनात त्यांचे पितळ उघडे पडेल, अशी भीती निर्माण झाल्याने ते राजश्री शाहू पुतळ्याच्या जवळ त्याच्या निषेधार्थ डोळ्यांना पट्टी बांधून चिंता आंदोलन करणार आहेत. (गाढवावर बसा, कपडे फाडा, मडकी फोडा; पण प्रसिद्धी मिळवा याप्रमाणे चालू असलेले पुरोगाम्यांचे उद्योग ! - संपादक)

(म्हणे) देशातील सध्याच्या वातावरणासाठी असहिष्णुता हा शब्द अपुरा !

पाकप्रेमी आणि भारतद्रोही पत्रकार अरुंधती रॉय यांची दर्पोक्ती !
     भारतद्वेषी रॉय यांना भारतात पुरस्कार दिले जातात, ही भारतियांची अतीसहिष्णुता नव्हे काय ? असहिष्णुतेवरून भडक विधाने करून वारंवार देशातील वातावरण कलुषित करणार्‍या अरुंधती रॉय यांच्यावर शासनाने कारवाई करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे !
    मुंबई - सध्या लोकांना ज्याप्रकारे मारले जात आहे, जाळले जात आहे, या घटना पहाता देशातील परिस्थितीचे वर्णन करण्यासाठी असहिष्णुता हा शब्द अपुरा आहे, असे कुत्सित वक्तव्य देशद्रोही पत्रकार अरुंधती रॉय यांनी केले आहे. (काश्मीरमध्ये लक्षावधी हिंदूंचे शिरकांड झाले, लक्षावधी हिंदू बेघर झाले, तरी पाकप्रेमी अरुंधती रॉय यांना ती असहिष्णुता वाटत नाही; मात्र सध्याचे देशातील वातावरण असहिष्णु वाटते. रॉय इथे सुखनैव राहू शकतात, हीच भारतियांची सहिष्णुता आहे. - संपादक)

पॅरिसवरील आतंकवादी आक्रमणाच्या घटनेनंतर माझा ईश्‍वराच्या अस्तित्वावरचा विश्‍वासच उडाला !

कुठल्याही गोष्टीमागे कार्यकारणभाव असतो, हा अध्यात्मातील साधा नियम आहे. अध्यात्माचा 
अभ्यास केल्यावरच बुद्धीला पडणारे प्रश्‍न थांबतात आणि मन उद्विग्न होत नाही !
ख्रिस्ती धर्मगुरु आर्चबिशप जस्टीन वेल्बी यांची उद्विग्नता 
      पॅरिसवरील आतंकवादी आक्रमणाच्या घटनेनंतर माझा ईश्‍वराच्या अस्तित्वावर असलेला विश्‍वासच उडाला, अशा शब्दांत ख्रिस्ती धर्माचे धर्मगुरु आर्चबिशप ऑफ कँटरबरी जस्टीन वेल्बी यांनी त्यांची पॅरिस घटनेवरील भावना बोलून दाखवली. बी.बी.सी. या वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना ते बोलत होते. आर्चबिशप पुढे म्हणाले, पॅरिसवरील आक्रमण का झाले ? हा प्रश्‍न मीच स्वत:ला विचारत आहे. जेव्हा फ्रान्सच्या पीडितांना ईश्‍वराची आवश्यकता होती, तेव्हा ईश्‍वर कुठे होता ? या घटनेने ईश्‍वराच्या सार्वभौमत्वाविषयी मला शंका उत्पन्न झाली. घटना घडल्याच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे १४ नोव्हेंबरला सकाळी मी चालत असतांना ईश्‍वराला क्षणोक्षणी विचारत होतो की, हे का घडले ? तू तेव्हा कुठे होतास ? मी आणि माझी पत्नी यांनी तेथे ५ वर्षे आनंदात काढली. जेथे आपण जीवनातील अनेक आनंदाचे क्षण व्यतित केले आहेत, ते शहर होरपळत असतांना पहावत नाही. पॅरिसवरील आक्रमणाचे वृत्त कळताच मला तीव्र धक्का बसला. या घटनेमुळे मी फार दु:खी झालो.

नववीतील विद्यार्थिनीवर मित्रांनी बलात्कार करून चलचित्रपट बनवला !

समाजातील नैतिक अध:पतनाचा कडेलोट !
    मुंबई, २८ नोव्हेंबर - नववीत शिकणार्या  एका विद्यार्थिनीवर चार मित्रांनी बलात्कार करून चलचित्रपट बनवला आणि तो सामाजिक संकेतस्थळावर अपलोड केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पिडीत विद्यार्थिनीच्या काकूने हा चलचित्रपट व्हॉटस अॅपवर पाहिल्यावर ही घटना लक्षात आली. या विषयी विद्यार्थिनीच्या पालकांनी तक्रार दिल्यावर अल्पवयीन आरोपींची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की...
१. ८ नोव्हेंबर या दिवशी चारपैकी एका मित्राने घरी कोणी नसल्याची संधी साधत पिडीत विद्यार्थिनीस अभ्यासासाठी घरी बोलावले. या वेळी तिथे अगोदर उपस्थित असणार्या तीन मित्रांनी मिळून तिच्यावर अत्याचार केले. तसेच अत्याचार करतांना त्याचे चित्रीकरणही केले. यातील एक चलचित्रपट काही दिवसांनी व्हॉटस अॅपवर फिरत तो विद्यार्थिनीच्या काकूपर्यंत पोहोचला.
२. त्यानंतर चौकशी केली असता विद्यार्थिनीने तिच्यावरील प्रसंगाची माहिती कुटुंबियांना दिली. (या उदाहरणावरून भारतातील युवा पिढी कुठे जात आहे, यावर गंभीरतेने विचार करण्याची पाळी आहे !  - संपादक)

एम्आयएम् कच्च्या कैद्यांसाठी जामीन देणार !

   गुन्हेगारांना संरक्षण देणारा एम्आयएम् पक्ष ! आतापर्यंत केवळ समाजविघातक बोलणारा हा पक्ष आता तशा कृतीही करू लागला आहे. आता अट्टल गुन्हेगारांचा या पक्षात भरणा झाल्यास नवल वाटायला नको !
    मुंबई - जामीन घेण्याची ऐपत नसल्याने किरकोळ आरोपांवरून राज्यभरातील विविध कारागृहांत बंद असलेल्या कच्च्या कैद्यांसाठी जामीन घेण्याचा निर्णय ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमिन (एम्आयएम्) पक्षाने घेतला आहे. विविध जाती-धर्मांतील अशा कच्चा कैद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. (कैद्यांनी गुन्हे केल्याने त्यांना शिक्षा झाली आहे. त्यांना जामीन देऊन एम्आयएम् पक्ष काय साध्य करणार आहे ? - संपादक)
    राज्यातील कच्च्या कैद्यांच्या पुनर्वसनासाठी संभाजीनगर येथील आमदार इम्तियाज जलील यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी राज्यातील विविध कारागृहांत किरकोळ आरोपांमुळे कैदेत असलेल्यांची सूची अतिरिक्त महासंचालक (कारागृह) यांच्याकडून मागवली आहे.

मीरत (उत्तरप्रदेश) येथे पाकच्या गुप्तचराला अटक

    मीरत (उत्तरप्रदेश) - येथील रेल्वेस्थानकावर २७ नोव्हेंबर या दिवशी महंमद इजाज या पाक गुप्तचराला अटक करण्यात आली. त्याच्याजवळ भारतीय सुरक्षेशी संबंधित अत्यंत महत्त्वाची आणि गोपनीय अशी माहिती सापडली. ही माहिती तो पाकला पुरवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रचंड गर्दीमुळे धावत्या लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू !

    ठाणे, २८ नोव्हेंबर - मुंबईच्या रेल्वेगाडीमधील जीवघेण्या गर्दीने २७ नोव्हेंबर या दिवशी एका तरुणाचा बळी घेतला. प्रवाशांनी खच्चून भरलेल्या रेल्वेगाडीच्या द्वारावर लोंबकळत प्रवास करणार्या भावेश नकाते या तरुणाचा हात सुटून तो रुळावर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. (देशात रेल्वेच्या अपघातात दिवसेंदिवस वाढ होत आहे. ते रोखण्यासाठी शासनाने ठोस उपाय करणे अपेक्षित !  - संपादक)
    सकाळी आठ वाजता कर्जतहून छत्रपती शिवाजी टर्मिनससाठी सुटणार्या रेल्वेमध्ये भावेश डोंबिवली स्थानकात चढला. लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्याने त्याला आत शिरता आले नाही. त्यामुळे डब्याच्या एका दाराच्या खांबाला पकडून तिथे उभा राहिला.  गाडी सुटल्यावर तो आत घुसण्यासाठी बराच प्रयत्न करत होता, प्रवाशांना विनंती करत होता; पण प्रचंड गर्दीमुळे कुणालाच हालता येत नव्हते. उलट आतील गर्दीचा रेटा बाहेरच्या दिशेनेच होता. या रेटारेटीत भावेशचा खांबाचा हात सुटला आणि तो खाली पडून त्याचा मृत्यू झाला. या भयंकर अपघातामुळे रेल्वेच्या प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

मुंबईत जमावाकडून पोलिसाला बेदम मारहाण

पोलीसच सुरक्षित नसतील, तर तेथे सर्वसामान्यांचे काय ?
    मुंबई - २६ नोव्हेंबरच्या रात्री दादर येथे एक भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका पोलीस कर्मचार्याला जमावाने बेदम मारहाण केली; मात्र पोलिसाला मारहाण होत असतांना उपस्थित जमावाने बघ्याची भूमिका घेतली.
    दादर स्थानकाबाहेर फेरीवाल्या नवरा-बायकोचे भांडण चालू होते. भर रस्त्यात नवरा बायकोला मारत होता. शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार दीपक बोलके तिथे मध्यस्थीसाठी गेले. त्या वेळी झालेल्या बाचाबाचीत भांडण करणारे नवरा-बायको आणि त्यांच्या कुटुंबियांनी पोलीस हवालदार बोलके यांच्यावरच आक्रमण केले. या मारहाणीत हवालदार बोलके जखमी झालेत. या प्रकरणी संबंधित फेरीवाल्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असून, एकाला अटक करण्यात आली.

पुणे येथील जिल्हा न्यायालयाने 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटाच्या विरोधातील याचिका फेटाळली

    चक्रावणारा न्याय ! अल्पसंख्यांक मानतात त्या थोर पुरुषांवर जर चित्रपटातून टीका केली असती, तर कदाचित हा निकाल वेगळा लागला असता. हिंदूंनो, तुमच्या थोर पुरुषांवर होणारी चिखलफेक थांबवण्यासाठी कृतीशील व्हा !
याचिकाकर्त्यांना केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाकडे जाण्याचे आदेश
    पुणे, २८ नोव्हेंबर - आगामी बाजीराव-मस्तानी या चित्रपटाला 'मस्तानी ये बाजीराव का प्यार था, अय्याशी नही' अशी लक्षवेधी ओळ (कॅचलाइन) देण्यात आली आहे. ती अयोग्य असून त्या ओळीवरून सामाजिक तेढ निर्माण होण्याची भीती असून त्यावर बंदी घालावी, अशी मागणी करणारी याचिका येथील जिल्हा न्यायालयात हेमंत पाटील आणि फिरोज शेख यांनी अधिवक्ता वाजेद खान बीडकर यांच्याद्वारे प्रविष्ट केली होती. ही याचिका प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस्.एस्. गुलाने यांनी २६ नोव्हेंबर या दिवशी फेटाळून लावली आहे. त्याचबरोबर याचिकाकर्त्यांना केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाकडे जाण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

सावरकरांचा बुद्धीवाद मांडणारी पुरोगामी मंडळी सावरकरांचा हिंदुत्ववाद मात्र अमान्य करतात !

ज्येष्ठ विचारवंत शेषराव मोरे यांचा कथित पुरोगाम्यांच्या सोयीस्करवादावर प्रहार !
      स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची धर्मचिकित्सा, म्हणजे धारदार सुरी होती. त्यामुळेच पुरोगामी लोक शाहू, फुले, आंबेडकर यांच्या परंपरेत सावरकरांना कधीही स्थान देत नाहीत. एकतर ही मंडळी सावरकरांच्या बुद्धीवादाचा त्यांना हवा तसा अर्थ काढतात. त्यातही सावरकरांचा बुद्धीवाद मांडणारी ही पुरोगामी मंडळी सावरकरांचा हिंदुत्ववाद मात्र अमान्य करतात, अशा शब्दांत विश्‍व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक शेषराव मोरे यांनी कथित पुरोगाम्यांच्या सोयीस्करवादावर टीका केली. वन्दे मातरम् प्रतिष्ठान, तुळजापूर आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची धाराशिव शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव येथील स्व. प्रमोदजी महाजन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावकरांचे हिंदुत्व या व्याख्यानात ते बोलत होते.

तुळजापूर देवस्थान समितीचा अपहार आणि भ्रष्टाचार या प्रकरणी हिंदु जनजागृती समितीचा न्यायालयीन लढा !

* तुळजापूर देवस्थान समितीकडील २६५ एकर भूमीचा अपहार ! 
* प्रविष्ट केलेल्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाकडून शासनास म्हणणे मांडण्याचे आदेश
     मुंबई - तुळजापूर देवस्थान समितीच्या मालकीच्या मालकीच्या तुळजापूर तालुक्यातील १५ गावांत ३ सहस्र ५६८ एकर भूमीपैकी अमृतवाडी येथील २६५ एकर भूमीमध्ये अवैधरित्या फेरफार करून ती ७७ लोकांच्या नावावर करण्यात आली, असे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी केलेल्या चौकशीत उघड झाले आहे. या प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. यावर विधी आणि न्याय खात्याचे संभाजीनगर विभागाचे सहसचिव गिराडकर यांच्यासमेवत एकूण ५ जणांनी याची पुढील चौकशी करून त्याचा अहवाल मंत्रालयात विधी आणि न्याय खात्याकडे पाठवला होता. हा अहवाल विधी आणि न्याय खात्याने महसूल खात्याकडे पुढील कारवाई करण्यासाठी पाठवला; परंतु त्यावर कोणतीच कार्यवाही न होता, तो दाबून टाकण्यात आला. अपहृत भूमी परत मिळवण्यासाठी कोणतीच कारवाई न होता अहवाल दडपला जाणे, हे गंभीर आहे. यांसाठी हिंदु जनजागृती समिती न्यायालयीन लढा देणार आहे, असे प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केले. मुंबई येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक स्त्री-भू्रण हत्या

बीड, जळगाव, नगर, बुलढाणा, जालना आणि संभाजीनगर जिल्ह्यांचा समावेश
    कोल्हापूर, २८ नोव्हेंबर (वार्ता.) - राज्यात लेक वाचवा अभियान राबवले जात असतांनाच स्त्री-भ्रूण हत्येच्या घटना वाढतच असून बीड, जळगाव, अहमदनगर, बुलढाणा, कोल्हापूर, जालना आणि संभाजीनगर या सात जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक स्त्री-भ्रूण हत्या झाल्याचे वास्तव महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या ताज्या अहवालातून समोर आले आहे. केंद्रशासनाने महिलांची संख्या अत्यंत अल्प आहे, अशा १०० जिल्ह्यांची नावे घोषित केली होती. त्यातही या जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यातील या सात जिल्ह्यांमध्ये शून्य ते सहा वर्षे वयोगटातील मुला-मुलींचे लिंग गुणोत्तर प्रमाण ८४८ पेक्षा अल्प आहे. (स्त्री-भू्रणहत्येतील घटना रोखण्यामध्ये राज्यकर्त्यांची उदासीनता दिसून येते. या घटनांची काटेकोरपणे पडताळणी आणि चौकशी होत नसल्याने या घटनांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. याला सर्वस्वी शासकीय वैद्यकीय अधिकारी आणि खाजगी आधुनिक वैद्य उत्तरदायी असल्याने या दोघांना आजन्म कारावासाची शिक्षा व्हायला हवी, तरच स्त्री-भ्रूण हत्येच्या घटना रोखता येतील.- संपादक) 
    महाराष्ट्रात ० ते ६ वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींमध्ये प्रति सहस्र मुलींची संख्या २०११ मध्ये ९१८ इतकी खाली घसरली. छुप्या मार्गाने होणार्या स्त्री-भ्रूणहत्या रोखण्यात अजूनही यश मिळालेले नाही. मागील वर्षी महाराष्ट्रात अंदाजे ४ लाख ६८ सहस्र मुलींना गर्भातच मारण्यात आल्याची आकडेवारी समोर आली आहे. या असंतुलनामुळे सामाजिक सुरक्षितता भीती व्यक्त केली जात आहे. स्त्री-पुरुष गुणोत्तर प्रमाण घसरण्याने काही राज्यांमध्ये विवाहविषयक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. तोच धोका महाराष्ट्रालाही असल्याचे दिसून येत आहे. संपूर्ण देशभर 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' अभियान राबवण्यात येत आहे.

फलक प्रसिद्धीकरता

बीफ फेस्टिवल साजरे  करून गोहत्येला प्रोत्साहन देणे, ही कुठली सहिष्णुता ?
    उस्मानिया विद्यापिठातील विद्यार्थ्यांचा एक गट, काही शिक्षक, मानवाधिकारवाले आणि शहरातील इतर विद्यापिठांतील काही विद्यार्थी यांनी १० डिसेंबरला मानवाधिकार दिनी विद्यापिठामध्ये गोमांस मेजवानीचे आयोजन केले आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
    Telangana ke Osmaniya vishvavidyalayke chhatrone kiya Beef festivalka ayojan !
    Beef festivaldvara Gohatyako protsahan dena, kya yahi hai Sahishnuta ?
जागो !
    तेलंगणा कें उस्मानिया विश्‍वविद्यालय के छात्रों ने किया बीफ फेस्टिवल का आयोजन !
    बीफ फेस्टिवलद्वारा गोहत्या को प्रोत्साहन देना, क्या यही है सहिष्णुता ?

भवभूतीप्रमाणे सनातनचे विरोधकांना सांगणे

    ये नाम केचिदिह नः प्रथयन्त्यवज्ञां
    जानन्ति ते किमपि तान् प्रति नैष यत्नः ।
    उत्पस्यते हि मम कोऽपि समानधर्मा
    कालो ह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी ॥ - भवभूती
अर्थ : या जगात जे कोणी आमची अवहेलना करत असतील, तर त्यांना जे काही समजायचे असेल ते समजू दे. आमची ही धडपड त्यांच्यासाठी नाही. केव्हातरी आणि कुठेतरी आमच्या कष्टांची जाण असलेला मनुष्य निश्चितच जन्मेल. ज्याला आमच्या या प्रयत्नांचा पुष्कळ उपयोग होईल; कारण काळ हा अनंत आहे आणि ही पृथ्वीही विशाल आहे. 

स्वदेशी आंदोलनाच्या पुनरुत्थानाची आवश्यकता !

राजीव दीक्षित
     भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक ईस्ट इंडिया आस्थापन गेले; मात्र कणाहीन आणि भ्रष्ट राज्यकर्त्यांच्या सहकार्याने आज ४ सहस्रांहून अधिक विदेशी आस्थापने भारताची लूट करत आहेत. राष्ट्र आणि धर्म अभिमानाचे धडे दिले न गेल्याने आज भारतीय समाजावरही पाश्‍चात्त्य संस्कृतीचा मोठा पगडा आहे. याचा अनुचित लाभ उठवत विदेशी राष्ट्रे भारताला स्वतःची बाजारपेठ बनवून आर्थिकदृष्ट्या दुर्बल करत आहेत. येथील जनतेला देशोधडीला लावत आहे. त्यामुळे बहुराष्ट्रीय आस्थापनांच्या या पारतंत्र्यातून मुक्त होण्यासाठी स्वदेशी आंदोलनाचे प्रणेते श्री. राजीव दीक्षित यांनी त्यांचे अवघे आयुष्य वेचले. या लेखात स्वदेशी आंदोलनाची पार्श्‍वभूमी, अन्य राष्ट्रांची स्वदेशीविषयीची जागरूकता आणि सद्यस्थितीत स्वदेशी आंदोलनाची रूपरेषा कशी असावी, याविषयी स्वदेशी चळवळीचे प्रणेते स्वर्गीय राजीव दीक्षित यांच्या व्याख्यानातून संकलित केलेला भाग प्रसिद्ध करत आहोत.

स्वदेशी बनावटीच्या वस्तूच वापरा ! राष्ट्रीय अस्मिता जागवा !

     पेप्सीकोला, कोलगेट, पॉमेलिव्ह, प्रॉक्टर अ‍ॅन्ड गॅम्बल, बाटा, जॉन्सन अ‍ॅन्ड जॉन्सन, ब्रिटानिया, पाँडस्, नेस्ले, कॅडबरी, ब्रुक बाँड, क्वालिटी, मॅकडोनाल्ड यांसारखी सहस्रो परदेशी आस्थापने त्यांची उत्पादने भारतात विकून सहस्रो कोटी रुपये त्यांच्या देशात घेऊन जातात. लोकहो, राष्ट्रीय संपत्तीची ही लूट थांबवण्यासाठी पुढाकार घ्या ! परदेशी आस्थापनांनी बनवलेल्या वस्तूंवर बहिष्कार घाला आणि प्राधान्याने स्वदेशी बनावटीच्या वस्तूच वापरा !

शत्रूराष्ट्रातील उत्पादने विक्रीस ठेवणारे राष्ट्राभिमानशून्य भारतीय लष्कर !

      लष्कराच्या कॅन्टीनमध्ये बेकरी उत्पादने, हातमोजे, बॅग्ज, विजेर्‍या, खेळणी आणि अन्य वस्तू होत्या; परंतु बहुतांश उत्पादने चिनी बनावटीचीच होती. वस्तूंच्या आवरणावर मेड इन चायना, असे स्पष्टपणे छापलेले होते. १९६२ च्या भारत-चीन युद्धाची आम्हाला संपूर्ण माहिती आहे. या संदर्भात विचारणा केली असता काहीच उत्तर मिळाले नाही. निदान भारतीय लष्कराने तरी दुकानातील चिनी उत्पादनांची विक्री थांबवावी. 
- श्री. सुभाष मुकुंद थरवळ

आर्थिक स्वातंत्र्याविना राजकीय स्वातंत्र्य काहीच कामाचे नाही, हे लक्षात ठेवा !

     अनेक क्रांतीकारकांनी प्राणार्पण केल्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले; मात्र विदेशी आस्थापनांच्या आक्रमणामुळे देश पुन्हा पारतंत्र्यात जात आहे. विदेशी वस्तूंचा वापर करण्याची सवय आपल्याला जडली आहे; मात्र भारताला आर्थिक दिवाळखोरीतून वाचवण्यासाठी आम्हाला आमचे जीवनमान पालटणे आवश्यक आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण झाले, असे आंतरराष्ट्रीय स्तरावर म्हटले जात आहे; मात्र तुमच्या-आमच्यासाठी हे जागतिकीकरण नव्हे, तर हे भारतात पुन्हा वसाहतवाद निर्माण केल्यासारखे आहे. 
(संदर्भ : एका हिंदुत्ववाद्याने प्रसारित केलेले संगणकीय पत्र)

एका एका थेंबाने महासागर बनतो, हे लक्षात ठेवा !

      इतर आशियायी देशांप्रमाणे भारतीय अर्थव्यवस्थेचेही दिवाळे वाजले आहे. भारतातील अनेक उद्योग बंद होत आहेत. भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आपण आताच पावले उचलली नाहीत, तर पुढे परिस्थिती अत्यंत बिकट होऊ शकते. आपण अनेक परदेशी वस्तू खरेदी करून प्रतिदिन ३० सहस्र कोटी रुपये परदेशी आस्थापनांच्या घशांत घालत आहोत. भारतियांनी एक जरी भारतीय बनावटीची वस्तू विकत घेतली, तरी भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचा मोठा परिणाम होणार, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे देशावर आलेले हे संकट रोखण्यासाठी आम्ही काय करणार, असा नकारात्मक विचार करू नका ! तुमच्या छोट्याशा कृतीमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे, हे लक्षात घ्या आणि भारतीय वस्तूंचीच खरेदी करून भारतीय नागरिकाचे कर्तव्य पार पाडा ! स्वदेशी वस्तूंची खरेदी करण्याविषयी तुमचे शेजारी आणि मित्रमंडळी यांच्यामध्येही जागृती करा !

भारताला आर्थिक दिवाळखोरीपासून वाचवण्यासाठी स्वदेशी वस्तूंचा वापर करा !

      पाच मासांपूर्वी एक अमेरिकी डॉलर म्हणजे ३६ रुपये, असे रुपयाचे मूल्य होते. आज मात्र रुपयाचे अवमूल्यन होऊन १ अमेरिकी डॉलर म्हणजे ६७ रुपये झाले आहेत. यावरून अमेरिकेची आर्थिक व्यवस्था बहरत आहे, असे तुम्हाला वाटत असेल, तर ते चुकीचे आहे. अमेरिकेच्या आर्थिक व्यवस्थेशी याचा संबंध नसून मुळात भारतीय अर्थव्यवस्थाच खिळखिळी होत चालली आहे, याचे हे द्योतक आहे. हे थांबवण्यासाठी स्वदेशी वस्तूंचा वापर करून विदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकणे आवश्यक आहे !
      भारत हे जगाचे देवघर आहे; मात्र इथला हिंदु विकलांग, भ्रष्ट आणि दुर्बल झाला आहे. स्वत्व, आत्मभान आणि राष्ट्रीयत्व गमावलेल्या हिंदूंना जागे करावे लागेल. हिंदुत्व हा आपला प्राण आहे. हिंदु समाजावरील आक्रमण थांबवण्यासाठी हिंदु समाज बलवान होण्याची गरज आहे. असे झाले, तरच भारत पुन्हा जगद्गुरुपदी विराजमान होईल ! - श्री. अरविंदराव हर्षे, निवृत्त प्राचार्य, पुणे

भारत असहिष्णु जगाला मार्ग दाखवील, हे खरे आहे; पण तो राजकारण्यांचा भारत नाही, तर हिंदु धर्माचा भारत असेल !

     सध्या जगभरात अभूतपूर्व असहिष्णुता आणि पराकोटीचा द्वेष पहावयास मिळत आहे. अशा परिस्थितीत भारताची उच्च मूल्ये आणि विचारसरणीच जगाला तारू शकते अन् योग्य मार्ग दाखवू शकते. भारत असहिष्णु जगाला मार्ग दाखवील. - प्रणव मुखर्जी, राष्ट्र्रपती.

लोकांना धोकादायक ठरू शकणार्‍या कुत्र्यांना मारण्यास सर्वोच्च न्यायालयाला का सांगावे लागते ? शासनाला स्वत:ला कळत कसे नाही ?

     भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या अनेक तक्रारी आणि त्याविषयीचा प्रश्‍न सोडवण्याची मागणी शासनाकडे सातत्याने करण्यात येत असते. मुंबई आणि केरळ उच्च न्यायालयाने लोकांना धोकादायक ठरू शकणार्‍या कुत्र्यांना मारण्याची अनुमती दिली आहे.

स्वातंत्र्यापासून एकातरी क्षेत्रात एकातरी पक्षाच्या शासनाने म्हणण्यासारखी कामगिरी केली आहे का ?

     शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार महाराष्ट्रातील ६ ते १४ वर्षे वयोगटातील बालकांना विनामूल्य आणि सक्तीचे शिक्षण देण्याचे दायित्व राज्यातील शासनावर आहे; मात्र मागील पाच वर्षांत शिक्षण विभागाला ते दायित्व पार पाडता आलेले नाही. त्यामुळे जवळजवळ १ कोटी ४४ लाख मुले शिक्षणापासून वंचित राहिली, असे बाल हक्क आयोगाच्या एका सुनावणीच्या वेळी लक्षात आले.

वस्तू विदेशी आस्थापनाची (कंपनीची) आहे, हे कसे ओळखाल ?

     मुलांनो, विदेशी वस्तू न वापरता स्वदेशी वस्तूच वापरणे म्हणजे स्वतःच्या देशाचा अभिमान बाळगणे होय. यासाठी कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी ती विदेशी कि स्वदेशी आहे, याची विक्रेत्याकडून माहिती करून घ्या. त्याला ठाऊक नसल्यास उत्पादनाच्या वेष्टनावरून ते उत्पादन विदेशी आहे का, ते ओळखता येते. भारतात सध्या ३ प्रकारच्या विदेशी आस्थापनांच्या वस्तू विक्रीस येतात. 
१. परदेशी आस्थापनाने भारतात थेट निर्यात केलेली वस्तू, उदा. निव्हिया क्रीम, नोकिया भ्रमणभाष (मोबाईल).
२. परदेशी आस्थापनाने भारतात आस्थापन उभारून उत्पादिलेल्या वस्तू, उदा. बाटा इंडिया, नेस्ले इंडिया, पॉन्ड्स इंडिया.
३. परदेशी आस्थापनाने भारतातील आस्थापनाशी करार करून भागीदारी तत्त्वावर उत्पादिलेल्या वस्तू, उदा. किर्लोस्कर कमिन्स, मारुति सुझुकी.
      वस्तूच्या वेष्टनावरून ती स्वदेशी कि विदेशी, हे न कळल्यास मोठ्यांचे साहाय्य घ्या.

स्वदेशी अस्मिता जोपासा !

१. स्वदेशी म्हणजे अर्थशास्त्रदृष्ट्या स्वतःला स्वावलंबी करण्याचे शिक्षण होय.
२. स्वदेशी हा आमचा जीवनमरणाचा संग्राम आहे.
३. स्वदेशी बांधवांविषयी आपल्याला जे काही प्रेम वाटत असेल, त्याचे प्रतीक या स्वदेशी आंदोलनात दिसणार आहे.
- भगिनी निवेदिता (स्व-रूपवर्धिनीचा वार्षिक विशेषांक २०१०)

अंगप्रदर्शन करणार्‍या कपड्यांमुळे महिलांवरील अत्याचार वाढले आहेत, एवढेही मानसशास्त्र न कळणारे शासकीय अधिवक्ते !

    महिला अंगप्रदर्शन करणारे आणि तंग कपडे घालत असल्यामुळे महिलांवर बलात्कार किंवा लैंगिक अत्याचार होतात. त्यामुळे महिलांना अशा प्रकारचे पेहराव करण्यास बंदी करावी. पुरुषांना दोष देण्याऐवजी महिलांवरील अत्याचाराला महिलाच उत्तरदायी आहेत, अशी याचिका श्री. चंद्रकांत पालव यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. याचिकाकर्ते पालव न्यायालयात बोलत असतांना शासकीय अधिवक्त्यांनी पालव यांना जोरदार विरोध केला.

शब्दांचा उच्चारही नीट करता न येणारे बिहारमध्ये राज्य काय करणार ?

      बिहारमध्ये २० नोव्हेंबर २०१५ या दिवशी राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांचे २ पुत्र तेजस्वी आणि तेजप्रताप यांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. तेजस्वी यादव उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी आवश्यक असलेला मजकूर कागदावर लिहिलेला असतांनाही तेजप्रताप यादव यांच्याकडून अपेक्षित शब्दाऐवजी उपेक्षित असा चुकीचा शब्द उच्चारला गेला. त्यामुळे शपथ पूर्ण झाल्यावर राज्यपाल रामनाथ गोविंद यांनी त्यांना त्यांची चूक लक्षात आणून दिली आणि पुन्हा शपथ घेण्यास सांगितले. यानंतर पुन्हा शपथ घेतांनाही त्यांच्याकडून दुसर्‍या एका शब्दाचा उच्चार चुकला. त्या वेळी राज्यपालांनी लगेचच त्यांना थांबवत शब्दाचा योग्य उच्चार काय आहे, ते सांगितले. त्यानंतर त्यांची शपथ पूर्ण झाली.

अभ्यास करतांना वारंवार शिसे तुटूनही स्वतःच्याच देशात बनलेली पेन्सिल वापरणारा जपानी विद्यार्थी !

स्वदेशीविषयी अभिमान असणार्‍या जपानी नागरिकांचा आदर्श ठेवा !
     दुसर्‍या महायुद्धानंतर जपानी लोक औद्योगिकदृष्ट्या सक्षम बनण्यासाठी प्रयत्न करू लागले. त्या काळी अनेक जपानी विद्यार्थी भारतात शिकण्यासाठी येत. त्या वेळी झरण्या (पेन) नव्हत्या. एकदा एका जपानी विद्यार्थ्याला शिक्षकांनी फळ्यावर लिहिलेले सूत्र वेगाने वहीत उतरवणे जमत नव्हते; कारण त्याच्या पेन्सिलचे शिसे वारंवार तुटत होते आणि तो पुनःपुन्हा पेन्सिल तासत होता. त्यामुळे त्याच्या अभ्यासाची हानी होत होती. त्या वेळी तो आणि त्याच्या शेजारी बसलेला भारतीय विद्यार्थी यांच्यात पुढील संवाद झाला. 
भारतीय विद्यार्थी : अरे ! माझ्याजवळ दोन पेन्सिली आहेत. त्यांतली एक पेन्सिल तू घे. ती उत्तम गुणवत्तेची (क्वॉलिटीची) आहे. मेड इन इंग्लंड (इंग्लंडमध्ये बनलेली) आहे. बघ, तुझ्या अभ्यासाची हानी होणार नाही !
जपानी विद्यार्थी : नको ! ती पेन्सिल मी वापरणार नाही. ती काही जपानमध्ये बनलेली नाही. मी ही जपानी पेन्सिलच वापरीन. अभ्यासाची हानी भरून काढण्यासाठी तू मला नंतर तुझी वही दे. मी ही जपानमध्ये बनवलेली पेन्सिल वापरली नाही, तर कोण घेणार ती ? जपानी पेन्सिली विकल्या गेल्या नाहीत, तर आमचा जपानमधील कारखाना कसा चालेल ? आमच्या तरुणांना नोकर्‍या कशा मिळतील ? 
- श्री. सु.ह. जोशी आणि श्री. दिलीप केळकर (कथारूप स्वदेशी या पुस्तिकेतून)

भारतियांनो, स्वभाषा आणि स्वदेशी शिक्षण व्यवस्था यांची अपरिहार्यता ओळखा !

नेताजी सुभाषचंद्र बोस
विदेशी पत्रकार : स्वदेशी विद्यापिठांची संख्या इतकी अल्प असतांना स्वदेशी शिक्षणाचे आव्हान देणे योग्य आहे का ? 
नेताजी सुभाषचंद्र बोस : तुम्हाला उत्तम जेवण मिळाले नाही, तर तुम्ही विष खाणार का ? आमच्या ज्ञान-विज्ञानाच्या भव्य भांडाराची गुरुकिल्ली संस्कृत किंवा तिच्यावर अवलंबून असणार्‍या भारतीय भाषा आहेत. या गुरुकिल्लीचा उपयोग केल्याविना स्वची जागृती करवून देणारी स्वदेशी शिक्षण प्रणाली कार्यान्वित होऊ शकत नाही. (गीता स्वाध्याय, जानेवारी २०११)

स्वतंत्र भारतात स्वदेशी शिक्षण निर्माण करणे आवश्यक असूनही इंग्रजी भाषेला दिलेले प्राधान्य !

      भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत दिसून आले की, इंग्रजांनी मातृभाषेला न्याय देतांनाच महाविद्यालय आणि विद्यापीठ या पातळींवर मातृभाषा डावलून परकीय इंग्रजी भाषेला प्राधान्य दिले. मॅकॉलेने काळेे इंग्रज निर्माण करण्याची सोेय त्या शिक्षणपद्धतीत केली होती. त्यामुळे स्वतंत्र भारताचे स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि देशी अस्मिता यांचे रक्षण करणारे स्वदेशी शिक्षण निर्माण करण्याची आवश्यकता होती. 
- अमृत कासार (दैनिक लोकमत, ६.६.२०११)

लोकहो, देशासमोरील संकटांचा सामना करण्यासाठी स्वदेशीचा पुरस्कार करा !

जनतेला विदेशी गायींचे विषारी दूध, तसेच रसायनमिश्रित तूप, खवा, लोणी इत्यादी पदार्थ खाण्यासाठी भाग पाडणे : कृषी क्षेत्रातील वाढत्या रासायनिक आणि यांत्रिकीकरणाच्या प्रभावामुळे पर्यावरण स्वास्थ्य अन् समृद्धी यांच्या रक्षणकर्त्या गोमातेची उपयोगिता संपुष्टात आणली. आपल्याला विदेशी गायींचे विषारी दूध, रसायनमिश्रित हानीकारक तूप, खवा, लोणी इत्यादी पदार्थ खाण्यासाठी भाग पाडले आहे ! लहान मुलांसाठीचे हवाबंद डब्यातील अन्न, खते आदी अनेक गोष्टी भारतात मोठ्या प्रमाणावर विकल्या जात आहेत !
- श्री. सच्चिदानंद शेवडे, राष्ट्रीय प्रवचनकार (दैनिक सनातन प्रभात (२०.१२.२०११))
     बहुराष्ट्रीय आस्थापने एवढे करून थांबली नाहीत, तर त्यांनी आपल्या उपभोगाच्या वस्तू विकण्यासाठी विकृत आणि संस्कृतीहीन विज्ञापने देऊन आमच्या सुसंस्कृतीवर मोठा आघात केला आहे. (संपादक, गीता स्वाध्याय, मार्च २०११)

काँग्रेस शासनाच्या षड्यंत्रामुळे सनातनच्या निरपराध साधकांना द्यावी लागली अग्नीपरीक्षा !

परात्पर गुरु डॉ. आठवले
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे भीषण अनुभव !
कठीण परिस्थितीतही केवळ साधनेच्या बळावर आनंदावस्था अनुभवणारे सनातनचे साधक
'सनातन प्रभात नियतकालिकांमध्ये साधकांचे अनुभव आणि अनुभूती असतात. वर्ष २००९ मध्ये अगदी दिवाळीच्या दिवशी, म्हणजे नरकचतुर्दशीच्या आदल्या दिवशी गोव्यातील मडगाव शहरात नरकासुरदहन स्पर्धेच्या जवळ झालेल्या एका स्फोटात सनातनच्या दोन साधकांचा मृत्यू झाला. या प्रकरणात सनातनचे साधक दोषी असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आणि सनातनच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या ६ साधकांना बंदी बनवण्यात आले. ४ वर्षे न्यायालयात चाललेल्या या खटल्यात सनातनचे हे सहाही साधक निरपराध असल्याचे सिद्ध झाले. ४ वर्षे कारागृहात शारीरिक आणि मानसिक असह्य त्रास सहन केल्यानंतर न्यायालयाने या साधकांची ३१.१२.२०१३ या दिवशी निर्दोष मुक्तता केली

मडगाव स्फोट प्रकरणात निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांच्या घेतलेल्या मुलाखतीत त्यांना आलेले अनुभव आणि अनुभूती त्यांनी सांगितल्या होत्या. आज रविवार, २९ नोव्हेंबर २०१५ पासून दैनिक सनातन प्रभात मध्ये प्रतिदिन त्याची लेखमाला प्रकाशित करत आहोत. त्या माहितीचे पुस्तकही लवकरच प्रकाशित करणार आहोत.

अरुणाचल प्रदेशमध्ये असुरक्षित बनलेला धर्म, संस्कृती, भाषा आणि पर्यावरण

     अरुणाचलमध्ये धर्म, आस्था, संस्कृती, परंपरा, लोकइतिहास आणि कथा ख्रिस्त्यांच्या तीव्र प्रभावाखाली पालटत राहिलेल्या आहेत. भूमी, गाव आणि मनःस्थिती यांच्या आधारे त्या पुस्तकांमध्ये बंदिस्त होत आल्या आहेत; पण त्यांचे कुणीही ऐकणारे नाही. पक्ष कोणताही असो, आम्ही सगळे आपापला विनाश आणि लुप्त होत जाणारे वृत्तांत लिहिण्यातच व्यस्त आहोत. या परंपरांचा मूळ सुगंध वाचवण्यासाठी काही प्रयत्न केला असता आक्रमक उदारवादी म्हणतात की, हिंदुकरण केले जात आहे.

सनातन संस्था हिंसा शिकवते कि साधना ?, हे जाणून घेण्यासाठी सनातनच्या आश्रमात येण्याचे श्रम सनातनद्वेष्टे घेतील का ?

श्री. कुशल गुरव
१. सनातन हिंसा शिकवते, अशी टीका करणार्‍यांना
 सनातनद्वेष्ट्यांनी सनातनच्या साधकांवर केलेले
 आक्रमण, ही हिंसा वाटत नाही का ?
     अध्यात्माची शिकवण देणार्‍या सनातन संस्थेवर ती हिंसा शिकवते, असे पूर्वग्रहदूषित आरोप पानसरेंच्या हत्येनंतर पुरोगामी आणि सनातनद्वेष्टे करत आहेत. असे मनात येईल ते बोलणे, म्हणजे उचलली जीभ लावली टाळ्याला !, असे आहे. सनातनद्वेष्ट्यांनी १२.१०.२०१५ या रात्री ११ वाजता सनातनच्या साधकांना निवासस्थानी सोडणार्‍या चारचाकी वाहनावर दगडफेक केली आणि पेट्रोलबॉम्बचा मारा केला.
     ब्राझिलमध्ये आज भारतीय गायींचा शेतीसाठी वापर होत आहे. स्वित्झर्लंडमध्ये भारतीय गायींच्या शेणापासून बनवलेले खत वापरून तिथला शेतकरी श्रीमंत झाला आहे. अमेरिकेमध्ये भारतीय गायींच्या शेणाची निर्यात चालू असते, तरीसुद्धा भारतात गायींकडे दुर्लक्ष केले जाते. - श्री. मिलिंद एकबोटे, पुणे (लोकजागर, नोव्हेंबर २०१०)

विदेशींनो, तुमच्या देशात अंधश्रद्धा निर्मूलन समिती नाही, हे भाग्य समजा !

पू. अशोक पात्रीकर
१. पूर्वजांना चुकवण्यासाठी भूत-प्रेतांशी साधर्म्य 
दर्शवणार्‍या वेषभूषा आणि कृती करणारे विदेशी !
     अमेरिका, इंग्लंड आणि अन्य काही देशांत हॅलोविन नावाचा एक उत्सव प्रतिवर्षी ३१ ऑक्टोबर या दिवशी साजरा करण्यात येतो. या दिवशी पृथ्वी आणि भुवलोक यांतील अंतर अल्प होते. त्यामुुळे भुवलोकातील पितर पृथ्वीवर येतात. पितरांनी स्वतःच्या नातलगांना ओेळखू नये; म्हणून हे लोक भूत, प्रेत, चेटकीण, पिशाच, राक्षस यांच्याप्रमाणे दिसण्यासाठी तसे विचित्र पोषाख घालतात. स्वतःच्या घरांच्या प्रवेशद्वारांवरही अशीच भयानक आणि विकृत सजावट करतात. या दिवशी केेलेल्या खाद्यपदार्थांनाही भुता-प्रेतांचे आकार दिलेले असतात. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे त्याचे दुष्परिणाम या लोकांना ठाऊक नाहीत.

पानसरेंच्या हत्येप्रकरणी सनातनच्या रामनाथी आश्रमात प्रवेश मिळवण्यासाठी खोटी कारणे सांगणार्‍या सनातनद्वेषी वृत्तवाहिन्या !

श्री. सुरजित माथूर
     पानसरेंच्या हत्येप्रकरणी सनातनच्या एका साधकाला संशयित म्हणून अटक केल्यानंतर दूरचित्रवाहिन्यांनी साधकांवर ज्या प्रकारे बिनबुडाचे आरोप केले, त्यांत त्यांनी उर्मटपणा आणि हेकेखोेरपणा यांच्या सर्व सीमा पार केल्या. सनातन संस्थेची अपकीर्ती करून संस्थेवर बंदी आणण्यासाठी त्यांनी जंग जंग पछाडले; पण त्यांच्या हाती काहीच लागले नाही. या प्रकरणाच्या वृत्तसंकलनासाठी सनातनच्या आश्रमात येऊ पहाणार्‍या वाहिन्यांच्या प्रतिनिधींची उर्मटपणाची वर्तणूक या लेखात देत आहोत.

पानसरेंच्या हत्येच्या प्रकरणात सनातनला गोवतांना आम आदमीच्या प्रश्‍नांची उत्तरे मिळतील का ?

श्री. अनिल बोकील
१. सनातनच्या एका साधकाला संशयित म्हणून अटक केल्यावर
 सनातनविरुद्धची मोहीम हास्यास्पद अशा कोलांटी उड्या मारणारीच !
     सनातन संस्थेचे साधक श्री. समीर गायकवाड यांना संशयित म्हणून अटक केल्यापासून सनातनच्या विरोधात उघडलेली मोहीम अत्यंत विनोदी वाटते. वृत्तपत्रे, वाहिन्या, अन्य माध्यमे, नेते, पोलीस, समीरच्या विरुद्ध असणारे अधिवक्ते (वकील), अंनिसवाले, विद्रोही, काँग्रेसी, दाभोळकर कुटुंबीय, पानसरे कुटुंबीय, शाम मानव, निखिल वागळे या सर्वांचीच घालमेल खरंच पहावत नाही !

भारतियांनो, स्वाभिमानी आणि खर्‍या अर्थाने स्वतंत्र भारतीय होण्यासाठी हे कराच !

१. इंग्रजीचा वापर टाळून मातृभाषेचा अधिकाधिक वापर करा ! जपान अन् जर्मनी यांसारखे देश इंग्रजीचा वापर न करताही त्यांनी प्रगती केली आहे; तसेच त्यांची आर्थिक सुबत्ता एएए+ मानांकनाची (रेटिंगची) आहे.
२. पेठांत (बाजारांत) मिळणारे विदेशांतील असात्त्विक अन्न आणि केएफ्सी, मॅक्डोनाल्ड, सब-वे यांसारखी विदेशी उपहारगृहे (हॉटेल्स) यांवर बहिष्कार घाला !
३. शीतपेये (उदा. पेप्सी, कोकाकोला, थम्स-अप, लिम्का) विनामूल्य दिल्यासही पिऊ नका ! त्यामध्ये डी.डी.टी. सारखे विष निश्‍चितच असते. तसेच या शीतपेयांच्या बलाढ्य आस्थापनांनी (कंपन्यांनी) जगातील १००हून अधिक देशांना आर्थिक हानी पोहोचवली आहे.

तंत्रज्ञानात भारत मागे पडण्याची कारणे

१. इंग्लंडमधील वस्तूंची विक्री होण्यासाठी पाश्‍चात्त्यांंच्या तंत्रज्ञानाविना
 भारताची प्रगती अशक्य आहे, असे म्हणून भारतातील (वस्त्रनिर्मितीसारखे)
 परंपरागत उद्योगधंदे इंग्रजांनी जाणीवपूर्वक नष्ट करणे
     आमचे कोष्टी २४२५ काउष्ट इतका बारीक धागा तयार करण्यात प्रवीण होते. ते १ ग्रेन इतक्या कापसापासून २९ यार्ड लांबीचा धागा कातू शकत होते. (१ पाऊंड - ७००० ग्रेन) असे कुशल कोष्टी, सहस्रावधी कुंभार तसेच अन्य अनेक कुशलकर्मी लोक इंग्लंडमधील वस्तूंंची विक्री सुलभतेने व्हावी; म्हणून जाणीवपूर्वक निरुद्योगी केले गेले आणि वर आम्हाला असे सांगितले गेले, पाश्‍चात्त्यांंच्या तंत्रज्ञानाशिवाय भारताची प्रगती अशक्य आहे. किती हा दुष्टपणा !

Post titleसंतांच्या सहजावस्थेतील निखळ हास्यातील आनंदाची अनुभूती देणारी सनातनच्या संतांची छायाचित्रे !

डावीकडून पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे, पू. नंदकुमार जाधव आणि पू. (कु.) स्वाती खाडये
आनंदाचे डोही आनंदतरंग । आनंदचि अंग आनंदाचे ॥ 
      या अभंगातून संत तुकाराम महाराज आनंदाच्या स्थितीचे वर्णन करतात. त्यांचा हा अभंग लोकप्रिय आहे. ते म्हणतात, माझे मन म्हणजे आनंदाचे डोह झाले आहे आणि त्यात आनंदाच्या लाटा येतात; कारण आनंदाचे सर्व अंग आनंदच असते. तुकाराम महाराजांनी वर्णिलेली संतांच्या मनाची ही स्थिती शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे. अशाच सनातनच्या संतांच्या सहजावस्थेतील निखळ हास्यातील आनंददायी क्षणांमध्ये सहभागी होऊन त्या आनंदाच्या डोहामध्ये डुंबून जाऊया.

सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचनासंदर्भात नाडीपट्टीवाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी सांगितलेल्या काही अनमोल गोष्टी

पू. डॉ. ॐ उलगनाथन्
१. नाडीपट्टीवरील अक्षरे दिसणे
१ अ. नाडीपट्टीवाचनासाठी सात्त्विक वातावरण आवश्यक असणे : जेथे रज-तम अधिक असते, तेथे नाडीवाचन करणे अशक्य होते; कारण तेथील दूषित वातावरणामुळे नाडीपट्टीवरील अक्षरे फाटल्यासारखी दिसू लागतात. कधी कधी ती इतकी धूसर होतात की, पट्टीवाचन करणे अशक्य होते.
१ आ. महर्षींनी नाडीवाचनापूर्वी ठराविक संख्येने करण्यास सांगितलेला जप पूर्ण झाल्यानंतरच नाडीपट्टीवरील अक्षरे वाचणे शक्य होणे : काही वेळा महर्षी नाडीवाचनापूर्वी ठराविक संख्येने एखादा जप पूर्ण करण्यास सांगतात. जप पूर्ण झाला नसेल, तर नाडीपट्टीवरील अक्षरे दिसत नाहीत. जप पूर्ण झाल्यावर नाडी वाचतांना अक्षरे स्पष्ट आणि प्रकाशमान दिसतात. कधी कधी असे अनुभवास येते की, अगदी जेथे नजर जाईल तेथे भिंतीवर, जमिनीवरही ही अक्षरे स्पष्ट दिसू लागतात. इतकी क्षमता महर्षी त्या जपातून आपल्याला प्राप्त करून देतात. असे कित्येकदा अनुभवास येते.

भ्याड अमीर !

नावाने असलास जरी तू खान अमीर ।
विचाराने मात्र कंगाल झालास ॥
ज्या देशाने बनवले तुला हिरो ।
त्याच भारतभूमीत झिरो ठरलास ॥ १ ॥

देशी खेळ आणि त्यांचे लाभ

     कबड्डी, विटीदांडू, लंगडी, लगोरी, खो-खो, कुस्ती, हत्तीची सोंड, तळ्यात-मळ्यात, आबाधोबी, विषामृत (विष-अमृत), बुद्धीबळ इत्यादी शेकडो देशी खेळ आहेत.
देशी खेळ खेळल्याने होणारे लाभ
१. विदेशी खेळांच्या तुलनेत लवकर खेळून होतात.
२. देशी खेळांच्या साहित्यासाठी व्यय (खर्च) अल्प असतो.
३. देशी खेळांमुळे खिलाडूवृत्ती वाढीस लागते.
४. देशी खेळ खेळल्याने त्यांचे जतन आणि संवर्धन होते, तसेच देशाभिमान वाढतो.
     मुलांनो, देश आणि धर्म यांची सध्याची दुःस्थिती पहाता येती काही वर्षे खेळण्यात फार वेळ गमावणे योग्य नाही. हा वेळ अभ्यास, व्यायाम, क्रांतीकारकांच्या चरित्रांचे वाचन, नामजप, तसेच राष्ट्रकार्य अन् धर्मकार्य यांसाठी वापरला, तर ते अधिक योग्य होईल, हे लक्षात घ्या !

दैवी योगायोग कसे असतात, याचे प्रत्यक्ष उदाहरण : महर्षींच्या सांगण्यावरून पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या जीवनात प.पू. डॉक्टर कसे आले, त्याविषयीची काही मौलिक सूत्रे


पू. डॉ. ॐ उलगनाथन् (उजवीकडे) यांनी
 आणलेल्या सप्तर्षी जीवनाडीपट्टीचे पूजन 
करतांना परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले
पू. (सौ.) अंजली गाडगीळ
१. १९६४ या वर्षीपासूनच महर्षींनी नाडीपट्टीत प.पू. डॉक्टरांचा उल्लेख करण्यास प्रारंभ करणे
    'गेल्या अनेक पिढ्या पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या घराण्यात सप्तर्षी    जीवनाडीपट्टीचे वाचन चालू आहे. १९६४ या वर्षीपासूनच पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या वडिलांना महर्षींनी प.पू. डॉक्टरांच्या संदर्भात सांगण्यास प्रारंभ केला.  
२. १९८७ या वर्षी महर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांना प.पू. डॉक्टरांच्या शोधार्थ घराबाहेर पडण्याची आज्ञा देणे
    १९८७ या वर्षीपासून महर्षींनी प्रत्येक नाडीपट्टीवाचनामध्ये 'पुढे परम गुरुजी तुझ्या जीवनात येणार आहेत आणि ते कार्तिक पुत्रीला (कार्तिक महिन्यात जन्मलेल्या (तमिळ कालगणनेनुसार) आणि कृतिका नक्षत्र असलेल्या पू. सौ. अंजली गाडगीळ यांच्यासंदर्भात हा उल्लेख आहे.) तुझ्याकडे पाठवणार आहेत', याविषयी सांगायला प्रारंभ केला. येथे योगायोग असा की, प.पू. डॉक्टरांच्या जीवनातही प.पू. भक्तराज महाराज १९८७ या वर्षीच आले.  

लोकहो, चिनी मालावर बहिष्कार घालून राष्ट्रकर्तव्य बजावा !

  
   भारताजवळ पुष्कळ साधनसंपत्ती आहे. येथील तरुणवर्गाचे प्रमाण चीनपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. येथील उत्पादनांची जागतिक बाजारपेठेत विश्‍वसनीयता आहे. भारतातील जनतेने चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकला, तर चीन पुष्कळ मोठ्या आर्थिक लाभापासून वंचित होऊ शकतो.

वडाळा, मुंबई येथील साधिका डॉ. (सौ.) मिनू रतन यांच्या भ्रमणभाषमधून काढलेले श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे छायाचित्र निळे येणे

साधिकेच्या यजमानांनी
काढलेले मूळ चित्राप्रमाणे
आलेले छायाचित्र
साधिकेने
काढलेले आणि निळे
आलेले छायाचित्र
     २.८.२०१५ या दिवशी मी रामनाथी आश्रमातून घरी आल्यावर भ्रमणभाषवर आमच्या घरातील श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे छायाचित्र काढले. ते निळ्या रंगात आले. याच वेळी माझ्या यजमानांनी त्यांच्या भ्रमणभाषवर याच प्रतिमेचे काढलेले छायाचित्र मूळ प्रतिमेप्रमाणेच आले. यापूर्वी, तसेच नंतरही माझ्या भ्रमणभाषवर काढलेले कोणतेही छायाचित्र निळे आलेले नाही. - डॉ. (सौ.) मिनू रतन, वडाळा, मुंबई. (१.९.२०१५)
(साधिकेतील भावामुळे तिला छायाचित्र निळे झाल्याची अनुभूती आली. - संकलक)



देवाला वाहिलेली फुले बराच काळ टवटवीत रहाणे, संतांनी दिलेली फुले अनेक वर्षे चांगली रहाणे आणि देवतांच्या किंवा संतांच्या प्रतिमेला घातलेल्या पुष्पमाळांची उंची वाढणे या बुद्धीअगम्य घटनांमागील आध्यात्मिक कारण

कु. प्रियांका लोटलीकर
रोपट्याला सूर्यप्रकाश आणि पुरेसे पाणी मिळाल्यावर त्याला कळ्या येतात अन् त्या कळ्यांतून सुंदर फुले उमलतात. ही उमललेली सुंंदर फुले काही जण फुलदाणीमध्ये सुशोभीकरणासाठी वापरतात, काही जण डोक्यात माळण्यासाठी, तर काही देवाच्या चरणांवर अर्पण करण्यासाठी वापरतात. या फुलांचे आयुष्य फारतर १ ते २ दिवस असेच असते. त्यानंतर ते फूल कोमेजते अथवा त्याचे निर्माल्यात रूपांतर होते. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे; परंतु काही फुले अशीही आहेत, जी त्यांच्या आयुर्मर्यादेपेक्षा अधिक काळ टवटवीत रहातात, तसेच त्यांचा सुगंधही दरवळत रहातो. अशा काही वैशिष्ट्यपूर्ण फुलांच्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. यांच्या संदर्भात नैसर्गिक प्रक्रियेसह अन्य काहीतरी वेगळी प्रक्रिया घडते आणि ती वैशिष्ट्यपूर्ण आहे.

स्वदेशीचा पुरस्कार करणार्‍या राष्ट्रपुरुषांचा आदर्श ठेवा !

१. स्वराज्यासाठी नाणी बनवून देऊ इच्छिणार्‍या लबाड 
इंग्रजाला नकार देणारे छत्रपती शिवाजी महाराज !
     वर्ष १६७४ मध्ये रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला. शिवराय राजसिंहासनावर बसले. परकीय राज्यांचे प्रतिनिधी एकापाठोपाठ एक येऊन राजांना नमस्कार करून भेटवस्तू (नजराणे) देत होते अन् राजसभेत आसनस्थ होत होते.

चीनच्या आर्थिक आक्रमणामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर झालेले भयानक परिणाम

 केवळ १० मासांत भारताच्या ३ लक्ष कोटी रुपयांची लूट करणारा चीन
      वर्ष २००८ च्या जागतिक आर्थिक मंदीच्या वेळी चीनची अर्थव्यवस्था अगदी डळमळीत होण्याच्या मार्गावर होती, त्याच चीनने वर्ष २०११ मध्ये भारताशी ३ लक्ष कोटी रुपयांचा व्यापार केला. या तुलनेत भारत चीनशी केवळ एक तृतीयांश व्यापार करू शकत आहे आणि तेसुद्धा आपली मौल्यवान खनिज संपत्ती अगदीच कवडीमोल (अल्प) किमतीला विकून ! भारत चीनची सर्वांत मोठी बाजारपेठ आणि कच्चा माल पुरवण्याचे साधन बनत आहे. चीन शासन भारताकडून ४० सहस्र कोटी रुपयांची वसुली त्याच्या उत्पादनांच्या माध्यमातून मिळवत आहे. ही रक्कम भारताच्या सैन्याला वेढा घालण्यास पुरेशी आहे. - (साभार : गीता स्वाध्याय, ऑक्टोबर २०११)

विदेशी आस्थापनांनी चालवलेली भारताची लूट

विदेशी आस्थापनांनी देशाला संस्कृतीहीन करण्याचे रचलेले भीषण षड्यंत्र !
     विदेशी आस्थापनांनी आयुर्वेदिक औषधांचे पेटंट घेणे, स्वयंपाकघरात वरण-भात, भाजी असे ताजे अन्न शिजवण्याला पर्याय म्हणून सिद्ध खाद्यपदार्थांची पाकिटे पुरवणे, क्रिकेटची लोकप्रियता वाढवून लोकांना निष्क्रीय बनवणे अशांसारख्या माध्यमांतून देशाला संस्कृतीहीन करण्याचे भीषण षड्यंत्र रचले जात आहे.
- श्री. चित्तरंजन सुराल, रामनाथी आश्रम, गोवा.

परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या ग्रंथांच्या निर्मिती-कार्यात सहभागी व्हा !

१. परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या अध्यात्म
या विषयावरील ग्रंथांच्या निर्मितीचे कार्य लवकरात लवकर करण्याची आवश्यकता !
    सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या धर्म, अध्यात्म, साधना, ईश्‍वरप्राप्तीसाठी कला, आध्यात्मिक संशोधन यांसारख्या विविधांगी विषयांवरील मराठी भाषेतील सुमारे ४००० ग्रंथ लवकरात लवकर अंतिम करणे आणि त्यांचे विविध भाषांत भाषांतर करणे भावी काळाच्या दृष्टीकोनातून अत्यावश्यक झाले आहे. याची कारणे पुढे दिली आहेत.
१ अ. दूरचित्रवाहिन्यांसाठी धर्मशिक्षणाचे कार्यक्रम सिद्ध करणे : विविध दूरचित्रवाहिन्यांसाठी या ग्रंथांतील ज्ञानावर आधारित धर्मशिक्षणाचे कार्यक्रम सिद्ध करता येणार आहेत.
१ आ. आगामी भीषण काळापूर्वी करावयाची सिद्धता : तिसरे महायुद्ध काही वर्षांतच होणार असल्यामुळे डॉ. आठवले संकलित करत असलेल्या ४ सहस्र ग्रंथांच्या संगणकीय धारिका लवकरात लवकर सिद्ध करायच्या आहेत. 

साधक आणि हितचिंतक यांना सूचना

हिंदु वार्तासाठी चित्रीकरण पाठवतांना पुढील काळजी घ्या !
१. सामान्य सूचना
अ. चित्रीकरण स्थिर हातांनी करा. स्टँडचा वापर करून चित्रीकरण केल्यास उत्तम.
आ. एकाच शॉटमध्ये वाईड शॉट (लांबून घेतलेले), क्लोज शॉट (जवळून घेतलेले), पॅन शॉट (कॅमेरा एका टोकाकडून दुसर्‍या टोकाकडे फिरवत), दर्शकांचे शॉट आणि त्यांचे रिटेक (पुन्हा केलेले चित्रीकरण) असे न करता प्रत्येक शॉट स्वतंत्रपणे घ्या. त्यातील चांगले शॉटच हिंदु वार्ताला पाठवा, उदा. आंदोलनाचे चित्रीकरण करत असल्यास आंदोलनासाठी उभे असलेल्यांचे एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत सलग चित्रीकरण करून त्यातच केवळ बोलणार्‍यांचेही चित्रीकरण करण्यापेक्षा उभे असलेल्यांचे चित्रीकरण दोन ते तीन गटांत विभागून आणि बोलणार्‍या प्रत्येकाचे स्वतंत्र चित्रीकरण करावे. त्यामुळे व्हिडिओचा आकार न्यून होऊन तो ई-मेलद्वारे पाठवण्यासही सुलभ होईल.
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे ॐ

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

साधना 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     दैवी कृपेने प्राप्त झालेला आयुष्यातील काळ ऐषारामात न घालविता सतत साधनारत रहाणे, परमेश्‍वरी चिंतनात रहाणे आणि प्राप्त कर्तव्य करणे, हीच जिवंतपणाची लक्षणे होत. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

नोकरी किंवा व्यवसाय करतांना साधना होईल, असे करा !

परात्पर गुरु डॉ. आठवले
    यासंदर्भात थोडक्यात असे म्हणता येईल की, लायक आणि गरजू साधकांना, तसेच धार्मिक संस्थांना अल्प मूल्य घेऊन किंवा विनामूल्य साहाय्य करा. याची काही उदाहरणे येथे दिली आहेत.
१. शिक्षक : लायक आणि गरजू विद्यार्थ्यांना विनामूल्य शिकवणे
२. वैद्य : राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करणार्‍यांवर विनामूल्य उपाय करणे
३. लेखापरीक्षक : संत, साधक, हिंदुत्ववादी, तसेच धार्मिक आणि आध्यात्मिक संस्था यांचे लेखा अहवाल विनामूल्य करणे. पुढे पैशांचा नाही, तर पाप-पुण्याचा हिशोब ठेवता आला पाहिजे.
४. अधिवक्ता : राष्ट्र आणि धर्म प्रेमींची, तसेच सात्त्विक जनांची बाजू मांडणे
५. साहित्यिक : राष्ट्र आणि धर्म यांचे वैचारिक हितरक्षण, तसेच यांसाठी कार्य करणार्‍या व्यक्ती, तसेच संघटना यांना वैचारिक पाठबळ मिळेल अशा साहित्याची निर्मिती करणे
६. व्यापारी : राष्ट्र आणि धर्म कार्य करणार्‍यांना लाभ न मिळवता वस्तू विकणे / अर्पण करणे किंवा धन अर्पण करणे
७. शेतकरी : राष्ट्र आणि धर्म कार्य करणार्‍यांना फळे, फुले आणि धान्य देणे
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
जिवात्मा आणि शिवात्मा म्हणजे काय ?
बाबा : मी कशासाठी जन्माला आलो आहे आणि मला काय करायचे आहे, याचे ज्ञान जिवाला झाले, तर त्या आत्म्याला जिवात्मा म्हणतात. कोणीतरी माझ्याकडून कार्य करवून घेत आहे, याचे ज्ञान झाले की, त्या आत्म्याला शिवात्मा म्हणतात. शिवात्मा शोधणे, म्हणजे खरे ज्ञान. शिवात्मा कार्यकारणभावापुरता जन्माला येतो, तर जीव प्रारब्धभोगामुळे जन्माला येतो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

अनधिकृत आणि अधिकृत !

संपादकीय
     अनधिकृत धार्मिक स्थळे हटवण्याविषयी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला आहे. त्याला अनुसरून विविध शहरांमध्ये कारवाई चालू झाली आहे. संबंधित शहराचे नगरपालिका प्रशासन ही कारवाई करत आहे. काही दिवसांपूर्वी संभाजीनगर या शहरात ही कारवाई करण्यात आली. शिवसेनेचे खासदार श्री. खैरे यांनी मंदिर हटवण्याच्या सूत्रावर आक्षेप घेतल्यावर प्रशासकीय अधिकारी आणि हिंदु भाविक यांच्यात वादावादी झाली. श्री. खैरे यांनी मंदिरे वाचवण्यासाठी रक्त सांडण्याचीही सिद्धता दर्शवली. मंदिरांप्रतीच्या भावापोटी त्यांनी ही सिद्धता दाखवली.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn