Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

मुस्लिम पर्सनल लॉमध्ये पालट करा !

देशात असहिष्णुतेची बोंब ठोकणार्‍यांना मुसलमान महिलांना मिळणार्‍या 
असहिष्णु वागणुकीविषयी काही बोलावेसे का वाटत नाही ? दादरी कांडाचा 
गवगवा करणार्‍यांना मुसलमान महिलांची घुसमट का दिसत नाही ? कथित पुरोगामी 
आता या मुसलमान महिलांना त्यांचा न्याय्य अधिकार मिळवून देण्यास साहाय्य करणार का ?
मुसलमान महिलांची पंतप्रधान मोदी यांच्याकडे मागणी
प्रमुख आक्षेप  
 • मुस्लिम पर्सनल लॉमध्ये लिंगभेदाला प्रोत्साहन !
 • मुसलमान महिलांवर अत्यंत जाचक अटी !
    अलिगड (उत्तरप्रदेश) - मुस्लिम पर्सनल लॉमधील अनेक तरतुदी या महिलांसाठी अत्यंत जाचक आहेत. त्यामुळे त्यात पालट होणे आवश्यक आहे, अशी मागणी भारतीय मुसलमान महिलांचे प्रतिनिधित्व करणारी भारतीय मुस्लिम महिला आंदोलन या संघटनेने पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे. ही संघटना देशातील १३ राज्यांत कार्यरत असून ७० सहस्रांहून अधिक मुसलमान महिला या संघटनेच्या सदस्या आहेत. मुस्लिम पर्सनल लॉचे नियम हे लिंगभेदाला प्रोत्साहन देतात, असे या संघटनेचे मत आहे. त्यामुळे या संघटनेने मुसलमान महिलांशी होणारा भेदभाव बंद होण्याच्या दृष्टीने एक मसुदा बनवला आहे. हा मसुदा संघटनेने मोदी यांच्यासह अन्य काही नेत्यांना पाठवला आहे.

संविधानाची चौकट मोडल्यास देशात अराजक ! - पंतप्रधान मोदी

नवी देहली - संविधानाच्या चौकटीत राहून शासकीय यंत्रणेने काम केले आणि विरोधकांनीही या चौकटीतच आपला विरोध प्रकट केला, तर व्यवस्था आणखी सक्षम होईल; पण संविधानाची चौकट मोडल्यास देशात अराजकाची परिस्थिती निर्माण होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केले.

तमिळनाडूमध्ये पुराचे १८४ बळी

चेन्नई - तमिळनाडूला मुसळधार पावसानंतर आता पुराचाही जोरदार फटका बसला आहे. काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे तेथील किनार्‍यालगतच्या गावांमध्ये पुष्कळ पाणी शिरले आहे. कुडालोर, कांचीपुरम्, चेन्नई या शहरांना पुराचा अधिक प्रमाणात फटका बसला आहे. या पुरामुळे आतापर्यंत १८४ जणांचा बळी गेला असून ४० सहस्रांहून अधिक नागरिक संक्रमण शिबिरात स्थलांतरीत झाले आहेत. १९ दिवसांपासून तेथील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. पुरामुळे चेन्नईतील आर्थिक घडामोडींनाही खिळ बसली आहे.

महाराष्ट्रात तूर्तास मद्यबंदी नाही ! - महसूलमंत्री एकनाथ खडसे

 • जंगलराज अशी ओळख असलेला बिहार मद्यबंदीची घोषणा करू शकतो, तर प्रगतीशील आणि पुरोगामी महाराष्ट्र का नाही ?
 • डान्सबारबंदीसाठी प्रयत्नशील राज्यशासनाची अचंबित करणारी भूमिका !
जळगाव - मद्यविक्रीतून राज्याला ११ सहस्र कोटी रुपयांचा महसूल मिळतो. त्यामुळे उत्पन्नाचा दुसरा पर्याय शोधल्याशिवाय मद्यबंदी करणे अवघड आहे. तूर्तास मद्यबंदी करता येणार नाही, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री श्री. एकनाथ खडसे यांनी दिली आहे. (लाखोंना व्यसनी बनवून त्यांचे संसार उद्ध्वस्त करून मिळालेल्या उत्पन्नाने राज्याचे भले कधी होईल का ? - संपादक)
     बिहारमध्ये १ एप्रिल २०१६ पासून मद्यबंदी होणार आहे. तशी घोषणाच बिहार शासनाने केली आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रातही मद्यबंदी करावी, यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवला आहे; मात्र एकनाथ खडसे यांनी या मागणीवर उत्तर देतांना राज्यात तूर्तास दारुबंदी करणे अशक्य असल्याचे स्पष्ट केले आहे.
स्वतःची सत्ता असतांना मद्यबंदीसाठी काहीही न करणार्‍या 
काँग्रेसचे राधाकृष्ण विखे-पाटील म्हणतात, संपूर्ण राज्यात मद्यबंदी करा !
      केवळ मद्याच्या उत्पादनांतून राज्याचा विकास होईल, हा विचार दुर्दैवी आहे. महसुलासाठी इतर मार्गांचा विचार करावा, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली आहे. ठराविक जिल्ह्यांत मद्यबंदी न करता संपूर्ण राज्यात मद्यबंदी करा. मद्यबंदी राज्याचे धोरण हवे, अशी मागणीही विखे-पाटील यांनी केली आहे.

आणीबाणी लादणारे आज असहिष्णुतेच्या गप्पा मारत आहेत !

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचा काँग्रेसला टोला
नवी देहली - देशावर आणीबाणी लादून देशवासियांचे स्वातंत्र्य हिरावून घेणारेच आज असहिष्णुतेच्या गोष्टी करत आहेत, या शब्दांत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसवर टीका केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त संसदेत संविधानावर दोन दिवसांची चर्चा आयोजित केली होती. २६ नोव्हेंबरला लोकसभेत विरोधकांनी केलेल्या टीकेला राज्यसभेत झालेल्या चर्चेच्या वेळी जेटली यांनी प्रत्युत्तर दिले. ते पुढे म्हणाले, १९७०च्या दशकात भारतात हुकूमशाहीच होती. त्या काळात सामान्य नागरिकांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्यात आले होते. हिटलरचा सहकारी नेहमी हिटलर म्हणजे जर्मनी आणि जर्मनी म्हणजेच हिटलर असे म्हणायचा. काँग्रेसच्याही नेत्याने तेव्हा इंदिरा म्हणजे भारत आणि भारत म्हणजेच इंदिरा असे विधान करून इंदिरा गांधी यांची तुलना हिटलरशी केली होती.

प्रजासत्ताकदिनापर्यंत राज्यातील अनधिकृत फलक काढा ! - उच्च न्यायालय

असे न्यायालयाला वारंवार का सांगावे लागते ? 
अनधिकृत गोष्टींवर शासनाने स्वतःहून कारवाई करणे अपेक्षित आहे !
मुंबई - २६ जानेवारी २०१६ म्हणजे प्रजासत्ताकदिनापर्यंत राज्यातील अनधिकृत फलक काढण्याचा आदेश उच्च न्यायालयाने सर्व पालिका आणि नगरपालिका यांना २६ नोव्हेंबर या दिवशी दिला. तसे न झाल्यास पालिकेला उत्तरदायी धरले जाईल, असेही न्यायालयाने नमूद केले. न्यायालयाने ५ डिसेंबरपासून अनधिकृत फलकांवर कारवाईची विशेष मोहीम चालू करण्याचे आदेश दिले आहेत. सुस्वराज्य फाऊंडेशनच्या वतीने अधिवक्ता उदय वारुंजीकर आणि जनहित मंचचे भगवानजी रयानी यांनी हमीपत्र देऊनही राजकीय पक्षांकडून अनधिकृत फलक लावले जात असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते.
१. न्यायालयाच्या या निर्णयामुळे सर्वच राजकीय पक्षांना चपराक बसणार आहे. अनधिकृत फलक लावणार नाही, अशी हमी देऊनही राजकीय पक्षांकडून सर्रासपणे असे फलक लावले जातात.
२. अनधिकृत फलक लावणार्‍या कार्यकर्त्यांवर कारवाई केली जाईल, अशी हमी देऊनही त्यात अपयशी ठरलेले सत्ताधारी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांच्यासह भाजप पदाधिकारी, मनसेचे दोन कार्यकर्ते यांच्या विरोधात न्यायालयाने अवमान याचिका दाखल करून घेतली.

देशातील महिलांवर होणार्‍या अत्याचारांचे सर्वाधिक गुन्हे पुरोगामी विचारसरणीच्या बंगाल राज्यात !

एक महिला मुख्यमंत्री असलेल्या राज्यात महिलांची स्थिती बिकट असणे चिंताजनक ! भारतीय महिलांनो, अन्य कुणी तुमचे रक्षण करील, या भ्रमात न रहाता अत्याचारांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक सामर्थ्य वाढवा ! यासाठी धर्माचरण आणि साधना करा !
    कोलकाता - एरव्ही देशातील सर्वाधिक आधुनिक आणि पुरोगामी विचारसरणीचे समजले जाणारे बंगाल हे राज्य महिलांवरील गुन्ह्यांत देशात प्रथम क्रमांकावर आहे, अशी माहिती अमन या आंतरराष्ट्रीय संघटनेची बंगाल राज्यातील शाखा स्वयम या स्वयंसेवी संघटनेने दिली आहे. ही संघटना महिलांविषयी घडणार्‍या गुन्ह्यांच्या बाबतीत समाजात जागृती करून ते रोखण्याचा प्रयत्न करते. या संघटनेने देशभरातून गोळा केलेल्या आकडेवारीवरून ही बाब उघड झाली.

वाराणसीत अवैधरित्या रहाणार्‍या बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करावी !

बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात पुढाकार घेणारे हिंदुत्ववादी 
अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी यांचे अभिनंदन ! 
देशात अनेक ठिकाणी बांगलादेश घुसखोरांनी बस्तान बसवले आहे. त्यांच्यावरही शासनाने कारवाई करावी !
हिंदुत्ववादी अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी यांची जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे मागणी
      वाराणसी (उत्तरप्रदेश) - वाराणसी हे भारतातील सांस्कृतिक, आध्यात्मिक, तसेच धार्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र आहे. येथील पंचक्रोशी रोड, पाण्डेयपूर आणि नदेसर येथील धोबी घाटाजवळील मार्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने बांगलादेशमधून अवैधरित्या घुसखोरी करून आलेल्या लोकांची कुटुंबे वास्तव्य करत आहेत. या घुसखोरांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन येथील हिंदुत्ववादी अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले. (जे एका हिंदुत्ववादी अधिवक्त्याला कळते, ते प्रशासनाला का कळत नाही ? अवैधरित्या रहाणार्‍या बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाला निवेदनाची आवश्यकताच का भासते ? प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ? - संपादक) जिल्हाधिकार्‍यांनी घुसखोरांवर उचित कारवाई करण्याचा आदेश दिल्याचे त्रिपाठी यांनी सांगितले.

नमक्कल (तमिळनाडू) येथे विद्यार्थिनींनी वर्गातच मद्यपान करून मद्याच्या नशेत दिली परीक्षा !

धर्मशिक्षणाची नितांत आवश्यकता अधोरेखित करणारी घटना !
७ विद्यार्थिनी शाळेतून निलंबित !
    नमक्कल (तामिळनाडू) - तिरुचेनगोड येथील तमिळनाडू शासनाच्या मुलींच्या उच्च माध्यमिक शाळेत गेल्या आठवड्यात काही विद्यार्थिनींनी वर्गातच मद्यपान करून मद्याच्या नशेत परीक्षा दिल्याचे उघड झाले. इयत्ता ११ वीत शिकणार्‍या या सात विद्यार्थिनींना शाळेतून काढून टाकण्यात आले आहे.
    जिल्हा शिक्षणाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी चौकशी केल्यानंतर कारवाई करण्यात आली. त्यानुसार चार विद्यार्थिनींना वर्गात मद्य पिऊन परीक्षा दिल्याविषयी आणि तीन विद्यार्थिनींना याची माहिती असूनही ती शिक्षकांना न दिल्याविषयी शाळेतून काढून टाकण्यात आले आहे.
     इंग्रजी आणि तमिळ माध्यमाचे इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग असलेल्या या शासकीय शाळेत २ सहस्र ५०० हून अधिक मुली शिक्षण घेतात. गेल्या शनिवारी २१ नोव्हेंबर या दिवशी ही धक्कादायक घटना घडली. त्यानंतर दोन दिवस चौकशी झाल्यानंतर या सात विद्यार्थिनींच्या पालकांना बोलावून त्यांच्या पाल्यांचे प्रताप पालकांच्या कानावर घालण्यात आले आणि त्यांच्याकडे त्यांचे दाखले सुपुर्द करण्यात आले.

अमीर खान यांच्या कानाखाली लगावल्यास मिळेल १ लाख रुपयांचे पारितोषिक !

पंजाबमधील शिवसेनेच्या अध्यक्षांची घोषणा
     लुधियाना (पंजाब) - देशात असहिष्णुता, असुरक्षितता असल्याविषयी अमीर खान यांनी केलेल्या देशद्रोही विधानावरून सध्या देशभर जनक्षोभ उसळला आहे. पंजाबमधील शिवसेनेचे अध्यक्ष राजीव टंडन यांनी अमीर खान यांच्या कानाखाली लगावल्यास १ लाख रुपयांचे पारितोषिक देण्याची घोषणा केली आहे, असे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केले. ही पक्षाची अधिकृत घोषणा नाही, असे शिवसेनेने स्पष्ट केले आहे.

बांगलादेशमध्ये हिंदु देवतांच्या ५ मूर्तींची तोडफोड आणि विटंबना

बांगलादेशमध्ये हिंदू आणि हिंदूंची श्रद्धास्थाने असुरक्षित !
     दुलाल मोंडल (बांगलादेश) - बांगलादेशच्या मुन्शिगंज जिल्ह्यातील श्रीनगर उपजिल्ह्यामध्ये श्री कालीमातेच्या मंदिरातील देवतांच्या ५ मूर्ती २३ नोव्हेंबरला रात्री काही अज्ञातांनी फोडून त्यांची विटंबना केली, अशी माहिती या मंदिराच्या अध्यक्षांनी दिली. मूर्तींची तोडफोड केलेल्यांना अटक करून त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात येईल, असे मुन्शिगंजचे पोलीस अधीक्षक बिप्लब बिजॉय तालुकदार यांनी सांगितले. मूर्तींची विटंबना झाल्याचे कळताच बांगलादेश मायनॉरिटी वॉचने श्रीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महंमद सैदुर रहमान यांच्याशी संपर्क साधून आरोपींना अटक करण्याची मागणी केली. या प्रकरणी पुढील तपास चालू आहे.

गोरक्षकांना स्वसंरक्षणार्थ शस्त्र बाळगण्याची अनुमती द्यावी ! - गोरक्षकांची मागणी

आग्रा (उत्तरप्रदेश) येथे गोरक्षकांचे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
     आग्रा (उत्तरप्रेश) - येथे २२ नोव्हेंबरला भगवान टॉकीज पूलच्या खाली गोरक्षकांनी राष्ट्रीय हिंदू आंदोलन केले. या आंदोलनात गोरक्षकांना स्वसंरक्षणार्थ शस्त्र बाळगण्याची अनुमती मिळावी, तसेच बजरंग दलाचे गोरक्षक श्री. प्रशांत पुजारी यांची हत्या करणार्‍यांवर त्वरित कारवाई व्हावी, अशा मागण्या करण्यात आल्या होत्या. आंदोलनात हिंदु जनजागृती समिती, जय भोलेबाबा गोशाळा, शिवसेना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनांचे कार्यकर्ते, तसेच अन्य हिंदुत्ववादी सहभागी झाले होते. या वेळी सह्यांची मोहीमही राबवण्यात आली.

पोर्तुगालच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाचे कोस्टा

लिस्बन - भारतीय वंशाचे अ‍ॅन्टोनिया कोस्टा हे पोर्तुगालच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. राष्ट्राध्यक्ष नबिल कॅवेको सिल्वा यांनी कोस्टा यांना पंतप्रधानपदाची शपथ दिली. कोस्टा यांचे आजोबा मरिया डी कोस्टा गोव्याचे रहिवासी होते. अजूनही त्यांचे नातेवाईक गोव्यात स्थायिक आहेत.

(म्हणे) पाकव्याप्त काश्मीरवर पाकचाच अधिकार !

काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारुख अब्दुल्ला यांची देशद्रोही गरळओक
श्रीनगर - पाकव्याप्त काश्मीर हा पाकचाच भाग आहे आणि यापुढेही पाकचाच राहील. जम्मू-काश्मीरवर भारताचा अधिकार राहील, असे मत नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी मांडले. (पाकव्याप्त काश्मीरचा जन्म हा पाकच्या भूलालसेच्या आणि तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांच्या चुकीच्या धोरणांमुळे झालेला आहे. तो भारताचाच भाग आहे. पाकप्रेमामुळे अब्दुल्ला यांना तो पाकचा वाटत असेल, तर त्यात आश्‍चर्य नाही. - संपादक) काँग्रेसचे माजी नेते गिरिधारी लाल डोगरा यांच्या २८ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या वेळी डॉ. अब्दुल्ला बोलत होते.

पंतप्रधान मोदींवर आक्षेपार्ह ध्वनीचित्रफीत बनवल्यामुळे परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांना पदावरून हटवण्याची शक्यता

     मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मेरा देश महान ही ७ मिनिटांची ध्वनीचित्रफीत केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी सिद्ध केली आहे. ही ध्वनीचित्रफीत माहिती-प्रसारण मंत्रालयाच्या अनुमतीशिवाय देशातील चित्रपटगृहांमध्ये देण्यात आली. अभिनेता सलमान खान यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या चित्रपटाच्या पूर्वी ही ध्वनीचित्रफीत लावण्याचे आदेश निहलानी यांनी दिले होते. यामुळे शासनाची नाचक्की झाली असल्याने ही ध्वनीचित्रफीत माहिती-प्रसारण खात्याने बंद केली. या कारणास्तव निहलानी यांना पदावरून हटवण्याचा निर्णय झाला असून त्याची केवळ अधिकृत घोषणा बाकी असल्याचे एका अधिकार्‍याने सांगितले आहे.

सिरियावरील आक्रमणाचा ब्रिटनचे पंतप्रधान कॅमरून यांचा प्रस्ताव

     लंडन - आय.एस्.आय.एस्.च्या विरुद्ध युद्ध पुकारलेल्या ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी इराकप्रमाणेच सिरियामध्येही हवाई आक्रमण करण्यासंदर्भातील ३६ पृष्ठांचा प्रस्ताव ब्रिटनच्या संसदेत सादर केला. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली आय.एस्.आय.एस्.च्या विरोधात करण्यात येणार्‍या कारवाईला पाठिंबा देणे ब्रिटनच्या हिताचे आहे, असे कॅमरून यांनी सांगितले.

दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांच्यात नवा आण्विक करार !

      सेऊल (दक्षिण कोरिया) - दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांच्यात झालेल्या नव्या आण्विक करारामुळे उभय देशांतील वर्ष १९७२ चा करार संपुष्टात आला आहे. या करारामुळे द. कोरियाला आण्विक इंधनासंबंधातील संशोधन करण्यास मर्यादित स्वातंत्र्य मिळाल्याचे समजते.

युद्धजन्य स्थितीत पाकलगतच्या ८ महामार्गांचा वापर रनवे म्हणून करण्याची सिद्धता

वायूदलाची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी चर्चा !
     नवी देहली - युद्धजन्य स्थिती निर्माण झाली, तर देशांतर्गत महामार्गांचा उपयोग रनवे (विमानाची धावपट्टी) म्हणून करण्याची इच्छा वायूदलाने व्यक्त केली आहे. युद्ध किंवा अन्य काही आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास देशातील महामार्गांवर विमानेही उतरवता यायला हवीत आणि त्या दृष्टीने आपले महामार्ग सुसज्ज हवेत, असे वायूदलाचे म्हणणे आहे. यासाठी भारतीय वायूदलाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी चर्चा चालू केली आहे. अशा पद्धतीने सुसज्ज महामार्ग निर्माण करण्यासंबंधीची सर्व माहिती वायूदलाने प्राधिकरणाकडून मागवली आहे. असे महामार्ग निर्माण झाल्यास वायूदल त्यांचा वापर धावपट्टीसाठी करील. आरंभी पाकच्या सीमेलगतच्या राज्यांमध्ये असे ८ महामार्ग बनवण्यात येतील की, ज्यांचा धावपट्टी म्हणूनही उपयोग केला जाऊ शकेल.

बाळंतपणाची सुट्टी साडेसहा मास करण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव

     नवी देहली - प्रचलित मेटर्निटी बेनिफिट अ‍ॅक्ट १९६१ या कायद्यात सुधारणा करून नोकरी करणार्‍या महिलांना १२ ऐवजी २६ आठवड्यांची बाळंतपणाची भरपगारी सुट्टी देण्याच्या संदर्भात येथे २४ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या त्रिपक्षीय बैठकीत एकमत झाले. केंद्रीय श्रम मंत्रालयाने आयोजित केलेल्या या बैठकीत केंद्रशासन, केंद्रीय कामगार संघटना आणि सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मूल दत्तक घेणार्‍या मातांना आणि दुसर्‍या महिलेची कूस भाड्याने घेऊन तिच्याकरवी मूल जन्माला घालणार्‍या मातांनाही २० आठवड्यांची बाळंतपणाची सुट्टी मिळावी, असे कामगार संघटनांचे म्हणणे होते; मात्र शासनाने ते मान्य केले नाही.

अरुंधती रॉय यांना मिळणार्‍या पुरस्काराला अभाविपचा विरोध !

देशद्रोही व्यक्तीला मिळणार्‍या पुरस्काराला विरोध दर्शवणार्‍या अभाविपचे अभिनंदन !
      पुणे, २७ नोव्हेंबर (वार्ता.) - अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने यंदाच्या वर्षी देशद्रोही विधाने करणार्‍या अरुंधती रॉय यांना समता पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. या पुरस्काराला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने प्रखर विरोध दर्शवला असून देशद्रोहाचा खटला चालू असणार्‍या रॉय यांना पुरस्कार देण्यात येऊ नये, अन्यथा या विरोधात निदर्शने करण्यात येतील, अशी चेतावणी दिली आहे. (पाकिस्तानधार्जिणी आणि भारतविरोधी वक्तव्ये करणार्‍या रॉय यांना मिळणार्‍या पुरस्काराला विरोध दर्शवणार्‍या अभाविपच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! अशाच प्रकारे देशभक्तांनी अन्य ठिकाणी होणार्‍या देशद्रोह्यांच्या उदात्तीकरणाला चाप लावला, तर देशद्रोह्यांची आणि त्यांची तळी उचलणार्‍यांची पळता भुई थोडी होईल. - संपादक)

हाफिज सईद भारतावर आक्रमण करण्याच्या सिद्धतेत ! - सीमा सुरक्षा दल

सईदला पाकची फूस !
नवी देहली - जमात-उद-दावा या आतंकवादी संघटनेचा प्रमुख आणि २६/११ या आतंकवादी आक्रमणाचा मुख्य सूत्रधार हाफिज सईद हा भारतावर आक्रमण करण्याची सिद्धता करत आहे. त्यासाठी तो भारताच्या सीमेलगतच्या क्षेत्रांना भेट देत आहे, अशी माहिती भारतीय सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक राकेश शर्मा यांनी उघड केली आहे.
शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार भारताच्या सीमेलगतच्या भागातील आतंकवादी आणि भारतविरोधी संघटना यांना भेट देऊन सईद त्यांना भारतावर आक्रमण करण्यासाठी भडकवत आहे. पाकचे सुरक्षा दलही सईदला या आतंकवादी कारवायांसाठी पाठिंबा देत आहे.
आय.एस्.आय.एस्.च्या ३० जिहाद्यांचे काश्मीरमधील घुसखोरीस साहाय्य !
     गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आय.एस्.आय.एस्.ने पाकमधील पेशावर येथून ३० जिहाद्यांची एक टोळी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाठवली आहे. हे जिहादी पाकव्याप्त काश्मीरमधून भारतात घुसखोरी करण्यास साहाय्य करतील. काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मद, लश्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिदीन या आतंकवादी संघटनांची एक संयुक्त बैठक झाली. या बैठकीतच भारतात मोठ्या प्रमाणात घुसखोरी करण्याची योजना आखण्यात आली.

(म्हणे) ज्यांना डोके नाही, ते पंढरपूरला जातात ! - नागराज मंजुळे यांची मुक्ताफळे

लक्षावधी वारकरी भाविक शेकडो वर्षे वारीला जात आहेत, त्यांना डोके नाही,
असे या महाशयांना म्हणायचे असेल, तर यांना मेंदू आहे कि नाही, असा प्रश्‍न पडल्याशिवाय रहात नाही !
     भोर (जिल्हा पुणे), २७ नोव्हेंबर (वार्ता.) - लोक पंढरपूरला का जातात, हे मला कळत नाही. ज्यांना डोके नाही, तेच पंढरपूरला जाऊन विठ्ठलाच्या पायावर डोके ठेवतात, असे भाविक अन् वारकरी यांची खिल्ली उडवणारे वादग्रस्त विधान चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले. (वारकरी आणि भाविक यांच्या श्रद्धेला हिणवणारे नागराज मंजुळे ! विठ्ठलचरणी नतमस्तक होणारे श्रद्धाळू मंजुळे यांना बिनडोक वाटतात, यातच मंजुळे यांची वैचारिक दिवाळखोरी दिसून येते ! - संपादक) येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या पटांगणात आयोजित केलेल्या फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

अमीर खान यांचा चित्रपट पुण्यात प्रदर्शित होऊ देणार नाही !

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा निर्धार !
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते निदर्शने करतांना
      पुणे - देशातील कथित असहिष्णू वातावरणाचा कांगावा करून बायको किरण राव यांच्या आडून देश सोडून जाण्याची इच्छा प्रदर्शित करणार्‍या अमीर खान यांच्या विरोधात अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने संतप्त निदर्शने करण्यात आली. या वेळी खान यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. या प्रसंगी अविनाश कुलकर्णी, योगेश साबणे, अनिरुद्ध पेठकर, आनंद दवे, गणेश वाल्हेकर, लक्ष्मीकांत धडफळे, दुर्वांकूर कापरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रसंगी अमीर खान यांचा एकही चित्रपट पुण्यात प्रदर्शित होऊ द्यायचा नाही, असा निर्धार महासंघाच्या वतीने व्यक्त करण्यात आला. महासंघाच्या वतीने येथील गणेश कला क्रीडा मंदिर येथे क्रांतीसूर्य सावरकर या महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. या महानाट्याच्या प्रारंभी निदर्शने करण्यात आली.


पशूवधगृहाकडे जाणार्‍या ६ गोवंशियांची सुटका

शासनाने गोवंशहत्या बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची आवश्यकता !
      सोलापूर, २७ नोव्हेंबर - आयशर टेम्पोमध्ये क्षमतेपेक्षा अधिक गोवंश कोंबून त्यांची विनापरवाना वाहतूक करणार्‍या शाबीर कुरेशी, वाजिद म. हनिफ कुरेशी आणि पैगंबर अमीनसाब शेख यांच्यावर सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. (अल्पसंख्य धर्मांध गुन्हेगारीत मात्र आघाडीवर ! - संपादक) पोलीस शिपाई राजेंद्र बाबुराव बाबर यांच्या तक्रारीनुसार तपास हवालदार आखाडे करीत आहेत. याविषयी पोलीस शिपाई राजेंद्र बाबर यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी रात्री सव्वादहाच्या वेळी लष्कर परिसरातील कुरेशी गल्ली येथे जाऊन वाहनाची पडताळणी केली असता टेम्पोमध्ये १ बैल, १ गाय, ४ वासरू असे ६ गोवंश सुरक्षेची कोणतीही काळजी न घेतात दाटीवाटीने कोंबून विनापरवाना वाहतूक करीत असल्याचे त्यांना आढळले.

यांचा इतिहासाच्या पुस्तकात समावेश करावा ! - पै. विशालसिंग राजपूत

किल्ला स्पर्धेत विजेत्यांना देण्यात आलेल्या पारितोषिकाची प्रतिकृती
महाराष्ट्र शासनाने अफझलखानवधाचे चित्र आणि सविस्तर धडा
      मिरज, २७ नोव्हेंबर (वार्ता.) - इतिहासद्रोही आणि अल्पसंख्यांकांचे लांगलूचालन करणार्‍या तत्कालीन काँग्रेस-आघाडी शासनाने इतिहासाच्या पुस्तकातून अफझलखानवधाचे चित्र वगळून छत्रपती शिवाजी महाराजांचा सत्य इतिहास दडपण्याचा प्रयत्न केला. या निमित्ताने मी महाराष्ट्र शासन आणि शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांना आवाहन करतो की, त्यांनी अफझलखानवधाचे चित्र आणि सविस्तर धडा पुन्हा एकदा इतिहासाच्या पुस्तकात समाविष्ट करावा. सध्या महाराष्ट्रात अफझलखानवधाचे चित्र जाहीरपणे लावण्यास अजूनही अप्रत्यक्ष बंदी असल्यासारखी स्थिती आहे. ही असंदिग्धताही दूर व्हावी, असे आवाहन शिवसेनेचे मिरज उपतालुकाप्रमुख पैलवान विशालसिंह राजपूत यांनी केले.

इचलकरंजी येथे अमीर खान यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन !

अमीर यांचा एकही चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याची चेतावणी !
     इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर), २७ नोव्हेंबर (वार्ता.) - अगर इस देश मे रहेना होगा...वन्दे मातरम् कहेना होगा, चले जाव, जले जाव...पाकीस्तान चले जाव, अशा घोषणा देत राष्ट्रद्रोही अभिनेता अमीर खान यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ २५ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी विश्‍व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने अमीर खान यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे मलाबादे चौकामध्ये दहन करण्यात आले. त्यांचा एकही चित्रपट शहरात प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी चेतावणी विहिंप आणि बजरंग दल यांनी दिली आहे. या वेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या आंदोलनात सर्वश्री जवाहर छाबडा, शिवजी व्यास, वैभव फडणीस, इराण्णा सिंहासने, सुयोग पवार, गणेश म्हेत्रे, संतोष हत्तीकर, पंढरीनाथ ठाणेकर, सचिन कुरूंदवाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

पितांबरी आरोग्य मंचाच्या वतीने तज्ञ वैद्यांसमवेत परिसंवादाचे आयोजन

     ठाणे - पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि. च्या हेल्थकेअर डिव्हिजनद्वारे पितांबरी आरोग्य मंचाची स्थापना करण्यात आली आहे. सर्वसामान्यांसाठी विविध आरोग्यविषयीच्या उपक्रमांचे आयोजन करणे, हा या मंचाचा मुख्य उद्देश आहे. याच अंतर्गत २९ नोव्हेंबर या दिवशी दुपारी ४.३० ते सायंकाळी ७ या वेळेत सांधेदुखी आणि पंचकर्मोपचार, तसेच निरोगी आयुष्यासाठी आहार-विहार या दोन विषयांवर तज्ञ वैद्यांसमवेत परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या नौपाडा केंद्रातील कै. ग.ल. जोशी वातानुकूलित सभागृहात हा परिसंवाद पार पडणार आहे.

सोलापुरात युवा सेनेकडून अमीर खान यांच्या वक्तव्याचा निषेध

      सोलापूर, २७ नोव्हेंबर - सोलापूर युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा सचिव सुमित साळुंखे अन् उपजिल्हाप्रमुख विशाल गावंडे यांच्या नेतृत्वाखाली अभिनेता अमीर खान यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध चार पुतळा, पार्क चौक येथे करण्यात आला. या वेळी अमीर खान, शाहरूख खान, सलमान खुर्शिद, मणीशंकर अय्यर यांची प्रतिमा गाढवांच्या गळ्यात घालून जाहीर निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. सुमित साळुंखे म्हणाले की, अमीर खान यांनी केलेले वक्तव्य हे देशद्रोही असून युवासेनेकडून अशा वक्तव्याचा जाहीर निषेध करत आहे. या वेळी युवा सेनेने या चित्रपट अभिनेत्यांचे चित्रपट न पाहण्याचे आवाहन केले. या वेळी युवासेनेचे सर्वश्री विशाल गावडे, प्रसाद नीळ, बालाजी चौगुले, रवी कोकुल, कुणाल गावडे, कृष्णा, पंकज काटकर, नीलेश कुसेकर, अजित अंजीखाने, सागर कर्णेकर, अतुल फुल्लेलू, अमर काशीद, प्रसाद साळुंखे, राहूल पवार आदी युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संभाजीनगर येथे शिवक्रांती युवा सेनेकडून अमीर खान यांच्या पुतळ्याचे दहन

     संभाजीनगर, २७ नोव्हेंबर - अमीर खान यांनी २३ नोव्हेंबर या दिवशी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावरून त्याच्यावर अनेकांनी टीका केली आहे. या प्रकरणी येथील शिवक्रांती युवा सेनेने त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. येथील एपीए कॉर्नर परिसरात पुतळ्याचे दहन करण्यात आले. या वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील कोटकर म्हणाले की, येथून पुढे जिल्ह्यात अमीर खान यांचा एकही चित्रपट चालू देणार नाही. या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी अमीर खान यांच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.

महाआरती चालू असतांना छायाचित्रण करण्यावरून लष्करी अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांच्यात खडाजंगी !

मंदिरातील महाआरतीप्रमाणेे पोलीस अन्य धर्मियांच्या उपासनांचे छायाचित्रण करतील का ?
लोंढा आणि खानापूर येथील दंगलीचे प्रकरण
      बेळगाव, २७ नोव्हेंबर (वार्ता.) - लोंढा आणि खानापूर दंगल प्रकरणी न्यायालयाने जामीन संमत केल्यानंतर कारागृहातून सुटका झालेल्या श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी २६ नोव्हेंबर या दिवशी हिंडलगा येथील मिलिटरी विनायक मंदिरात महाआरती केली. महाआरती करतांना मनाई असतांनाही पोलीस अधिकार्‍यांनी त्याचे छायाचित्रण करण्याचा प्रयत्न केला. याला मंदिरात सेवेत असलेले सैनिक आणि अधिकारी यांनी आक्षेप घेतल्याने दोघांमध्ये खडाजंगी झाली.

पतित पावन संघटनेच्या वतीनेही अमीर खान यांच्या विरोधात निदर्शने !

पतित पावन संघटनेचे कार्यकर्ते घोषणा देतांना
अमीर खान यांच्या चित्रपटांवर बहिष्कार घालण्याची संघटनेची मागणी 
      पुणे - पतित पावन संघटनेच्या वतीने २५ नोव्हेंबर या दिवशी येथील अलका चित्रपटगृह चौकात अमीर खान यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. देश सोडून जाण्याची भाषा करणार्‍या अमीर खान यांनी देशाची अपकीर्ती केली आहे. त्यांनी त्वरित गाशा गुंडाळून भारत सोडून जावे, तसेच देशप्रेमी नागरिकांनी त्यांच्या चित्रपटावर बहिष्कार घालावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. या प्रसंगी अमीर खान यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.
      या प्रसंगी संघटनेचे सर्वश्री शिवाजी चव्हाण, मनोज नायर, गोकुळ शेलार, सीताराम खाडे, श्रीकांत शिळीमकर, विजय गावडे, विक्रम मराठे, स्वप्नील नाईक आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

वृक्ष प्राधिकरण समितीकडून उच्च न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्राचे उल्लंघन

महानगरपालिकेसारखी शासकीय संस्था जर उच्च न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्राचे 
पालन करत नसेल, तर पालिकेकडून सर्वसामान्यांना दिलेल्या आश्‍वासनांचा विचारच न केलेला बरा !
पुणे, २७ नोव्हेंबर - पुणे शहरातील पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी वृक्ष प्राधिकरण समिती नेमण्यात आली आहे. या समितीविषयी महानगरपालिकेने उच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्रही सादर केले होते. त्या प्रतिज्ञापत्राचे उल्लंघन समितीकडून होत असल्याचे समोर आले आहे. वृक्ष प्राधिकरण समितीचे कार्य शास्त्रीय पद्धतीने पार पडावे, यासाठी समितीवर जे नगरसेवक निवडले जातील, ते विज्ञान शाखेचे असावेत, असा नियम आहे. या समितीवर केवळ एकच नगरसेवक विज्ञान शाखेचा पदवीधर आहे. काही नगरसेवकांनी तर पदवीचा अभ्यासक्रमही पूर्ण केलेला नाही. तरी या प्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी एका पत्राद्वारे परिसर संस्थेचे रणजित गाडगीळ यांनी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे. (ही गोष्ट पालिका आयुक्तांच्या लक्षात का आली नाही, याविषयी ते सांगतील का ? - संपादक)

पुणे येथील नवी सांगवी आणि निगडी येथे पोलिसांवर गाडी घालण्याचा अन् धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न

 • पोलिसांना समाजकंटकांकडून भय वाटेल, अशी स्थिती निर्माण होणे आणि पोलिसांवर आक्रमण होणे, हे गृह विभागासाठी चिंताजनक !
 • शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांना अटक
    पिंपरी, २७ नोव्हेंबर - निगडी येथे वाहतूक पोलीस कर्मचार्‍यांच्या अंगावर गाडी घालण्याची आणि नवी सांगवी येथे रात्रीची गस्त घालणार्‍या पोलिसांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केल्याची घटना २४ नोव्हेंबर या दिवशी घडली. पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याच्या प्रकरणी निगडी येथील सनी काळोखे, तर सांगवी येथे सूरज विलास जाधव आणि प्रशांत सुखदेव राऊत यांना अटक केली आहे.

सांगली महापालिकेच्या ५०० कोटी रुपयांच्या गैरकारभाराच्या चौकशीचे आदेश

   सांगली, २७ नोव्हेंबर (वार्ता.) - सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेतील वर्ष २००८ ते २०१५ या कालावधीत ५०० कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप भाजप आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांनी केला होता. श्री. गाडगीळ यांनी या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. याची गंभीर नोंद घेत मुख्यमंत्र्यांनी मुख्य लेखाकारांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार ही चौकशी चालू झाली आहे. यात महाआघाडी आणि काँग्रेसच्या काळातील पाणी, भुयारी गटार, घरकुल, वसंतदादा अधिकोषात अडकलेला निधी यांसह अन्य गैरकारभांचा समावेश आहे.

लोंढा आणि खानापूर दंगल प्रकरणातील सर्व धर्माभिमान्यांना जामीन संमत !

    बेळगाव, २७ नोव्हेंबर (वार्ता.) - लोंढा येथे २१ ऑक्टोबर या दिवशी आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत वादावादी होऊन सभेवर दगडफेक झाली होती. याचे पडसाद खानापूर येथेही उमटले होते. या घटनेला कारणीभूत ठरवून पोलिसांनी एकूण ३३ जणांवर विविध कलमांखाली गुन्हे प्रविष्ट करून त्यांना अटक केली होती. त्यांच्यावर खुनी आक्रमण केल्याचा गुन्हा प्रविष्ट करण्यात आला होता. या सर्वांना मुख्य जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश श्री. पी. कृष्णभट्ट यांनी २४ नोव्हेंबर या दिवशी जामीन संमत केला आहे.
    ५० सहस्र रुपयांचे वैयक्तिक हमीपत्र आणि तितक्याच रकमेचा १ जामीनदार, तसेच साक्षीदारांना धमकावू नये, अन्वेषण करणार्‍या अधिकार्‍यांना सहकार्य करणे, अशा प्रकारचा गुन्हा करू नये, मासाच्या दुसर्‍या रविवारी खानापूर पोलीस ठाण्यात उपस्थिती दर्शवावी या अटींवर त्यांना जामीन संमत करण्यात आला आहे. या सर्वांच्या वतीने अधिवक्ता श्री. शामसुंदर पत्तार आणि अधिवक्ता श्री. प्रताप यादव यांनी काम पाहिले. पोलिसांनी वरील दोन्ही घटनांच्या प्रकरणी सर्वश्री रमेश सत्याण्णावर, दीपक मिराशी, दीपक तोरलेकर, प्रवीण मासेकर, पुंडलिक अल्लोळकर, जगदीश बेळंकर, श्रीराम सेनेचे पंडित ओगले, आणि मारुती सुतार यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.

मिरज शहरात रायगड किल्ल्याच्या उभारलेल्या प्रतिकृतीने जागवली ऐतिहासिक स्मृती !

रायगड किल्ल्याची प्रतिकृती
   मिरज, २७ नोव्हेंबर (वार्ता.) - नवीन पिढीला किल्ल्यांचे महत्त्व समजावे, त्यांच्याप्रती इतिहासाविषयी आस्था निर्माण व्हावी, छत्रपती शिवरायांचे कार्य विद्यार्थ्यांसह इतरांपर्यंत पोहोचावे, यांसाठी श्री. राजू शिंदे आणि श्री. धनंजय सूर्यवंशी यांनी रायगडची भव्य प्रतिकृती सिद्ध केली आहे. ही प्रतिकृती ५ जानेवारीअखेर सायंकाळी ५ ते रात्री १० या कालावधीत पहाण्यासाठी उपलब्ध आहे. ही प्रतिकृती आदर्श शिक्षण मंडळाच्या किल्ला भागात असलेल्या शाळेच्या पटांगणात करण्यात आली आहे. या प्रतिकृतीच्या ठिकाणी रायगड किल्ल्याची संपूर्ण माहिती देण्यात आली असून प्रत्यक्ष किल्ल्यावर कोणकोणत्या इमारती होत्या, तेही दाखवण्यात आले आहे. किल्ला पहाण्यासाठी लहान मुलेही मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.

अमीर खान पीके है क्या ?

श्री. नित्यानंद भिसे
१. पीके चित्रपटातील विकृत अभिनयाप्रमाणे प्रत्यक्षातही 
तसेच वागणारे अमीर खान !
      पीके चित्रपटात जेव्हा अमीर खान परग्रहावरून पृथ्वीवर त्यातही भारत भूमीवर उतरतात, तेव्हा त्यांना येथील सर्व जीवसृष्टी आणि राहणीमान नवीन वाटते, त्यामुळे ते त्यांना जसे वाटेल, तसा पेहराव करतात, त्यांना वाटेल तसे ते बोलतात, येथील श्रद्धास्थाने विशेषतः हिंदूंच्या देवता, राष्ट्रभक्ती, देवभक्ती इत्यादी विषयांवर चुकीचा संवाद करतात, त्यांची खिल्ली उडवतात, त्यांचे हे वेडसर वागणे भारतातील लोक निमूटपणे सहन करतात; मात्र प्रत्येक जण त्यांना एकच प्रश्‍न विचारतो, पीके है क्या ? या प्रश्‍नाचा अर्थ आहे की, तू दारू ढोसली आहेस का?, ज्यामुळे तू असा वेडगळासारखा बरळत आहेस.

पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्रमामध्ये पुष्पहारांच्या ऐवजी पुस्तकांनी होणार पाहुण्यांचे स्वागत

 • महानगरपालिकेचा हा निर्णय जरी स्तुत्य असला, तरी योग्य तीच पुस्तके भेट द्यावीत, ही अपेक्षा !
 • कार्यक्रमात शिल्लक रहाणार्‍या सन्मानचिन्हांमुळे सहस्रो रुपये वाया गेल्याचे उघड !
    पुणे, २७ नोव्हेंबर - पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्रमांमध्ये पाहुण्यांचे पुष्पहार आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत, तसेच गौरव करण्याची प्रथा लवकरच बंद होणार आहे. याऐवजी पालिकेच्या कार्यक्रमात महापुरुषांविषयीची पुस्तके किंवा ग्रंथ देऊन पाहुण्यांचा सन्मान केला जाणार आहे. महापौर कार्यालयाने हा निर्णय घेतला असून, त्याची लवकरच अंमलबजावणी चालू होणार आहे.
१. सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ यांचा योग्य सन्मान होतो कि नाही, याची दखल घेतली जात नाही, असे लक्षात आले.
२. शिवाय पुष्पगुच्छांसाठी प्रत्येक कार्यक्रमाला किमान २ सहस्रांहून अधिक रुपये व्यय होतात, तसेच कार्यक्रमांनंतर ते गुच्छ कचर्‍यामध्ये जातात. त्यामुळे पैसेही वाया जातात.

अमीर खान आणि अहिंसक असहिष्णुता !

श्री. अरविंद कुळकर्णी
     या भूमीविषयी आपुलकी आणि दुरावा निर्देशित करणार्‍या दोन विधानांविषयीसध्या देशभर चर्चा चालू आहे. मुंबईचे निवासी असलेले; पण सध्या आसाम, नागभूमी आणि त्रिपुरा या राज्यांचे राज्यपालपद समर्थपणे पेलवणारे पद्मनाभ आचार्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता अमीर खान या दोघांची ती विधाने आहेत. हा देश हिंदूंचा आहे, असे आचार्य म्हणाले आणि या देशात असहिष्णुता वाढत असल्याने आपल्या मुलांच्या सुखरूप भवितव्यासाठी हा देश सोडून दुसर्‍या देशात आश्रयाला जाण्याचा विचार पत्नी करत आहे, असे अमीर यांनी सांगितले. आचार्यांनी या विधानाने घटनाद्रोह केला, अशी टीका काही वर्तमानपत्रांनी केली आहे; परंतु हा देश मुसलमानांचा आणि अन्य अहिंदूंचा नाही, असे विधान त्यांनी केलेले नसल्याने घटनाद्रोहाचा आरोप त्यांच्यावर लावता येणार नाही. हा देश हिंदूंचा आहे, असे जेव्हा म्हटले जाते, तेव्हा हा देश आमचा आहे, असे म्हणायला मुसलमान आणि अन्य हिंद्वेतरांना कोणी अडवलेले नसते. हा देश आमचा आहे, असे मुसलमानांनी म्हणावे; म्हणून हिंदूंनी अपरिमित त्याग केला आहे; पण त्याचा मुसलमानांच्या आडमुठेपणावर थोडाही परिणाम झालेला नाही. 

एकही लढाई न हरता अजिंक्य राहिलेले महापराक्रमी योद्धा बाजीराव पेशवे यांना चित्रपटातून एक प्रेमी म्हणून दाखवण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न !

     शिवछत्रपतींच्या नंतर महाराष्ट्राला लाभलेला एक पराक्रमी योद्धा अशी बाजीराव पेशव्यांची इतिहासात नोंद आहे. केवळ २१ वर्षांत एकही लढाई न हारता ४१ लढाया जिंकलेला बाजीराव यांना संजय लीला भन्साळी यांनी बाजीराव मस्तानी या आगामी चित्रपटात केवळ मस्तानीपुरतेच मर्यादित ठेवून बाजीराव यांना एक प्रेमी असा दाखवण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न केला आहे. भन्साळींनी बाजीराव-मस्तानी या चित्रपटातून एका इतिहासातील प्रसिद्ध योद्ध्याची खिल्ली उडवली आहे. या चित्रपटामुळे बाजीराव पेशवे, काशीबाई आणि मस्तानी यांची प्रतिमा मलीन झाली आहे. पेशवेकाळातील महिलांची भाषा, पेहराव, शालिनता आणि संस्कृती यांविषयी भन्साळी यांना काही माहिती आहे का ? इतिहासाचे विकृतिकरण करून समाजाला चुकीची माहिती देणार्‍या भन्साळी यांचा निषेध करावा तेवढा थोडाच ! 
     या लेखात अधिवक्ता विक्रम एडके यांनी शूरवीर बाजीराव पेशवे यांचा सत्य इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला आहे. एवढ्या महापराक्रमी योद्ध्याची भन्साळी यांनी कशी चुकीची प्रतिमा निर्माण केली आहे, हे लक्षात येईल.

कळंबा कारागृह अधीक्षकपदी शरद शेळके यांची नियुक्ती !

    कोल्हापूर, २७ नोव्हेंबर (वार्ता.) - कळंबा कारागृहातील बंदीवानांनी केलेल्या मेजवानीचे छायाचित्रण सामाजिक संकेतस्थळावरून प्रसिद्ध झाल्यानंतर कारागृह अधीक्षक सुधीर किंगरे यांचे स्थानांतर करण्यात आले. त्यांच्या जागी पुणे येथील शरद शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भगवंत भेटत नसल्याने वामन पंडित जीव देण्यास सिद्ध होणे आणि त्याच क्षणी भगवंत प्रगटणे

बोधकथा !
     वामन पंडितांनी अनेक वर्षे तपश्‍चर्या केली; पण भगवंत प्रगट झाला नाही आणि तत्त्वरूपाने अनुभवही आला नाही. तेव्हा वामन पंडित विचार करू लागले, इतके केले; पण काही झाले नाही, तेव्हा आता जगून काय करायचे ? या अहंकारी शरिराला जिवंत ठेवून काय करायचे ?, असा विचार करून ते उंच पर्वतमाथ्यावर चढले आणि जय श्रीहरि म्हणून खाली उडी घेण्यास सिद्ध झाले. तेवढ्यात श्रीहरि प्रगट होऊन त्यांच्यात पुढील संभाषण झाले.
भगवंत : (आपला डावा हात वामन पंडिताच्या डोक्यावर ठेवत) वामन पंडित, तुझे कल्याण होवो. 
वामन पंडित : भगवंता, तू एवढी तपश्‍चर्या आणि इतक्या कसोटीनंतर भेटलास; पण शास्त्रांत तर म्हटले आहे, भगवंत उजवा हात मस्तकी ठेवतो, मग भगवंता, तू माझ्या डोक्यावर डावा हात का ठेवलास ?

एका मूर्तीकाराच्या कथेचा पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी सांगितलेला भावार्थ

पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
१. मूर्तीकाराच्या शिल्पातील एक चूक 
त्याच्या मुलाने लक्षात आणून देणे
      कु. मधुरा भोसले हिने एक कथा पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांना सांगितली. एका मूर्तीकाराने उत्तम शिल्पकलेचे प्रतीक असलेले एक मंदिर बांधून पूर्ण केले. त्याच्या मुलाने मंदिराच्या बांधकामात एक चूक झाल्याचे वडिलांच्या लक्षात आणून दिले. मंदिराच्या गाभार्‍याच्या मागच्या बाजूला बसवलेला एक दगड पोकळ होता. त्यात पाणी असून आत एक बेडूकही होता. त्यामुळे ठोकल्यानंतर त्या दगडाचा आवाज वेगळा येत होता. 
२. मूर्तीकाराने प्रायश्‍चित्त घेऊन स्वतःच्या मुलाला मूळ 
मंदिराच्या शेजारीच दुसरे मंदिर बांधण्यास सांगणे
     मूर्तीकाराला आपल्या चुकीचे पुष्कळ दुःख झाले. त्याने प्रायश्‍चित्त म्हणून आपले हात तोडून घेतले. त्याने आपल्या मुलाला सांगितले, तू असेच दुसरे मंदिर बांध, तरच माझे प्रायश्‍चित्त पूर्ण होईल. त्या मुलाने वडिलांच्या सांगण्यावरून मूळ मंदिराच्या शेजारीच तसेच दुसरे सुंदर मंदिर बांधले. सध्याच्या मंदिरात एका शिल्पामध्ये एका व्यक्तीच्या डोक्यावर एकावर एक असे सातजण उभे आहेत, असे दाखवले आहे.

कार्यक्षमतेवर आधारित वेतनवाढ रचना करणार का ?

     केंद्रशासनाच्या सेवेतील जवळपास ४७ लक्ष कर्मचार्‍यांना २३.६ टक्के इतक्या वेतनवाढीची शिफारस करणारा ७ वा वेतन आयोग अहवाल सादर झाला. आतापर्यंतचा इतिहास लक्षात घेता, तो केंद्रशासनाकडून स्वीकारला जाणार हे निश्‍चित. सदर वेतन आयोगामुळे ७३ सहस्र ६५० कोटी रुपये अधिक व्यय करावे लागतील, तसेच रेल्वेमधील कर्मचार्‍यांचे वेतन आणि निवृत्तीवेतन यांवर २८ सहस्र ४५० कोटी रुपये आगामी वर्षांत मोजावे लागतील. अशा तर्‍हेने या वेतनवाढीमुळे शासनावर १ लक्ष २ सहस्र १०० कोटी रुपये इतका अतिरिक्त भार वाढेल. वेतनवाढीमुळे तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांचे किमान मासिक वेतन १८ सहस्र रुपये, तर वरिष्ठ अधिकार्‍यांचे कमाल वेतन २ लक्ष ५० सहस्र इतके होईल. देशाच्या सध्याच्या परिस्थितीत वेतन आयोगाच्या या सुधारणा न परवडणार्‍या आहेत. कोणत्याही शासकीय कर्मचार्‍याची वेतनवाढ झाली की, सर्वसामान्य व्यक्तीची प्रतिक्रिया असते, यांना कशाला हवी वेतनवाढ ? कारण शासकीय कर्मचारी म्हटला की, तो सर्वांना अप्रामाणिक आणि कर्तव्यशून्यपणे वागणारा वर्ग असे वाटते आणि असे वाटले, तर वावगे काय ?

पोलिसांना घाबरू नका, त्यांना आवश्यक ते सहकार्य करा !, असे सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षकांना आवाहन का करावे लागते ? पोलिसांनी निरपराध्यांवर दमदाटी करण्याचे बंद केले, सामान्यांच्या तक्रारींची नोंद घेतली, तर असे आवाहन करावे लागणार नाही !

     सर्वसामान्य जनतेच्या रक्षणासाठीच पोलीस आहेत. त्यामुळे पोलिसांना घाबरू नका, त्यांना आवश्यक ते सहकार्य करा, असे आवाहन करत पोलिसांविषयी जनतेच्या मनात असलेली भीती घालवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलिसांनी पोलीसमित्र फेरी काढून जनजागृती केली. पोलीस महानिरीक्षक मुंबई यांच्या आदेशावरून सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना दिलेल्या आदेशानुसार ही फेरी काढण्यात आली.

पुणे शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी स्वतःचे भेटकार्ड आणि लेटरहेड याचे देयक स्वतः भरले

    पुणे, २७ नोव्हेंबर - पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा वासंती काकडे यांनी स्वतःच्या नावाचे भेटकार्ड (व्हिजिटिंग कार्ड) आणि लेटरहेड यांची खाजगी मुद्रणालयातून छपाई करून घेतली होती. त्याचे त्यांनी ४९ सहस्र रुपयांचे देयक शिक्षण मंडळ सदस्यांच्या सभेत मांडले होते. त्यावर सदस्यांनी तीव्र प्रतिक्रिया आणि विरोध केला होता. शेवटी ते वादग्रस्त छपाई देयक वासंती काकडे यांनी स्वत: भरले. यासंदर्भात त्या म्हणाल्या की, मी माझ्या स्वत:च्या पैशाने या देयकाची रक्कम भरली आहे. खरे तर हे देयक शिक्षण मंडळाच्या बैठकीपुढे येणे योग्य नव्हते. (एवढे जर कळत होते, तर मग ते देयक सभेमध्ये मांडायचेच कशाला ? यावरून सभेमध्ये ते देयक सादर करण्याच्या उद्देशाविषयी संशय आल्यास वावगे काय ? - संपादक)

चिंचवडमध्ये तडीपार गुंड आणि त्याच्या साथीदारांकडून दगडफेक

 • असुरक्षित पिंपरी-चिंचवड ! तडीपार करणे, म्हणजे गुन्हेगाराला गुन्हे करण्यास मोकळीक देण्यासारखे आहे ! शासन आणि गृह विभाग यांनी गुन्हेगारी समूळपणे संपवण्यासाठी उपाययोजना काढावी, ही अपेक्षा ! 
 • काही नागरिक घायाळ 
 • दुचाकी आणि चारचाकी वाहनांची हानी
     चिंचवड, २७ नोव्हेंबर - येथील आनंदनगर भागातील झोपडपट्टीवर तडीपार गुंड अविनाश पवार आणि त्याच्या ४ साथीदारांनी दगडफेक केली. त्यांनी काही घरांमध्ये घुसून सामनाची नासधूसही केली आहे. यामध्ये काही नागरिक घायाळ झाले असून ५ दुचाकी आणि ३ चारचाकी वाहनांची हानी झाली आहे. ही घटना २६ नोव्हेंबरच्या रात्री १० वाजता घडली. या वेळी त्यांच्या हातात लोखंडी हत्यार होते.

मंदिरे अनधिकृत ठरवून कारवाई झाल्यास बजरंग दल मंदिरांच्या पाठीशी उभे राहून तीव्र आंदोलन छेडेल ! - विजय धंगेकर

    जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर), २७ नोव्हेंबर (वार्ता.) - जयसिंगपूर नगरपरिषदेकडून नोटिसेद्वारे जयसिंगपुरातील ३५ स्थळांविषयी बांधकाम निष्कासित करणे, स्थलांतरित करणे, तसेच नियमित करणे यांसंदर्भात सूचित करण्यात आले आहे. तरी विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांचा ही धार्मिक स्थळे हटवण्यास अथवा स्थलांतरित करण्यास तीव्र विरोध आहे. ही मंदिरे अनधिकृत ठरवून कारवाई केल्यास बजरंग दल मंदिरांच्या मागे उभे राहून तीव्र आंदोलन छेडेल, असे निवेदन बजरंग दलाचे अध्यक्ष श्री. विजय धंगेकर, तसेच त्यांच्या सहकारी यांनी नगरपरिषद, तसेच पोलीस ठाण्यात दिले आहे.

आपण भारतात जन्मलो, या संस्कृतीत वाढलो, याचा प्रत्येक भारतियाला अभिमान असला पाहिजे !

योगऋषी रामदेवबाबा
       जगाला पहिली भाषा, अर्थव्यवस्था, न्यायव्यवस्था, शिक्षणव्यवस्था, गणित, संस्कृती, आरोग्यशास्त्र आणि सर्वच भारताने शिकवले. आपली संस्कृती एवढी प्राचीन असतांना आपण मात्र सध्या इतर देशांकडे पहातो. २०० वर्षांपूर्वी अ‍ॅलोपथी अस्तित्वात नव्हती, तेव्हा कोणते उपचार केले जात होते ? जग आपल्याकडे शिकायला येते. त्यामुळे आपण या देशात जन्मलो, या संस्कृतीत वाढलो, याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे.
- योगऋषी रामदेवबाबा

फलक प्रसिद्धीकरता

मुसलमान महिलांना कथित पुरोगामी त्यांचा 
न्याय्य अधिकार मिळवून देण्यास साहाय्य करणार का ?
   मुस्लिम पर्सनल लॉ मधील अनेक तरतुदी या महिलांसाठी अत्यंत जाचक आहेत. त्यामुळे त्यात पालट होणे आवश्यक आहे, अशी मागणी भारतीय मुस्लिम महिला आंदोलन या संघटनेने पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Pakvyapta kashmirpe Pakistanka hi adhikar hai ! - Ex CM farukh abdulla
Bharatme aise aur kitne Pakpremi hai ?
जागो !
पाकव्याप्त कश्मीर पे पाकिस्तान का ही अधिकार है ! - पूर्व मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला
भारत में ऐसे और कितने पाकप्रेमी है ?

पुणे येथे पतित पावन संघटना आयोजित किल्ले स्पर्धा पारितोषिक वितरण

पुणे, २७ नोव्हेंबर - पतित पावन संघटनेच्या वतीने किल्ले स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ८ ते १८ या वयोगटातील ६० स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्याचे पारितोषिक वितरण २२ नोव्हेंबर या दिवशी करण्यात आले. या वेळी प्रथम ३ स्पर्धकांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक, रोख रक्कम, तर ६ जणांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
    ही पारितोषिके पतित पावन संघटनेचे महाराष्ट्र्र प्रदेश उपाध्यक्ष श्री. बाळासाहेब भामरे, पुणे शहराध्यक्ष श्री. शिवाजीराव चव्हाण, सनातन संस्थेचे श्री. निरंजन दाते, सर्वश्री विक्रम मराठे, विजय गावडे, श्रीकांत शिळीमकर, स्वप्नील नाईक, ललित खंडागळे, राजू धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या वेळी प्रसिद्ध शिवचरित्र प्रबोधनकार श्री. सौरभ करडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला, तसेच त्यांनी उपस्थितांना दुर्ग (किल्ले) याविषयी मार्गदर्शन केले. या वेळी श्री. निरंजन दाते यांनी बाजीराव-मस्तानीसारख्या इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍या चित्रपटावर बंदी आणली पाहिजे, असे प्रतिपादन केले.
दैनिक सनातन प्रभातचा रंगीत
स्वदेशी जागरण विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : २९ नोव्हेंबर
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २८ नोव्हेंबरच्या दुपारी ३ पर्यंत ईआर्पी प्रणालीत भरावी !

पित्ताशयाच्या शस्त्रक्रियेच्या वेळी आलेले अनुभव आणि अनुभूती

सौ. ऋतुजा स्वप्नील नाटे
     मे २०१५ या मासाच्या दुसर्‍या आठवड्यात मला पोटदुखी चालू झाली. असह्य वेदना होत होत्या. सोनोग्राफी केल्यावर पित्ताशयात खडे असल्याचे निदान झाले आणि त्यातील एक खडा बाहेर आल्याने आतील भागाला सूज आली होती. आधुनिक वैद्यांनी सांगितले, तो खडा तोंडावाटे उपकरणाने काढावा लागेल. सोनोग्राफी केल्यावर आधुनिक वैद्यांनी लवकरात लवकर शस्त्रक्रिया करण्यास सांगितले. हे ऐकून मी थोडी सुन्न झाले; परंतु आम्ही दुसर्‍या आधुनिक वैद्यांचेही मत घेतले असता सर्वच वैद्यांनी शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे सांगितले. तेव्हा मी मनाने शस्त्रक्रिया करण्याचे स्वीकारले. ही शस्त्रक्रिया शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या कठीण होती; पण देवाच्या कृपेने सर्व व्यवस्थित झाले. या कालावधीत आलेल्या अनुभूती येथे देत आहे.
१. शस्त्रक्रियेच्या आधी
१ अ. शस्त्रक्रियेच्या आधी तीन दिवस मेडिक्लेमविषयीचे कागद मिळणे : आमची मेडिक्लेमची पॉलिसी असल्याने व्यय करणे सोपे गेले. माझे बाबा (श्री. उदय खानविलकर) उत्तर भारतात सेवेला गेले होते. बाबा आले, त्याच्या दुसर्‍याच दिवसापासून मला हा त्रास चालू झाला आणि ३ दिवस आधीच आम्हाला मेडिक्लेमचे कागद हातात मिळाले होते. वरील परिस्थिती देवानेच जुळवून आणली होती.

प्रतिकूल परिस्थितीतही सतत भगवंताच्या अनुसंधानात रहाणार्‍या ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या दक्षिण कन्नड येथील श्रीमती शारदा कामतआजी (वय ७४ वर्षे) !

श्रीमती शारदा कामत
१. आजींच्या बोलण्यातून सहजता आणि प्रेमभाव व्यक्त होत असतो.
२. सेवेची तळमळ :
श्रीमती शारदा कामत या १५ वर्षांपासून साधनेत आहेत. आजींचे वय अधिक असूनही त्या क्रियाशील आहेत. आजी नातेवाइकांना आणि शेजार्‍यांना सनातन प्रभातचे वर्गणीदार बनवतात. त्यांना नामजपाचे महत्त्व सांगतात आणि त्यांच्याकडून अर्पण घेतात. गुरुपौर्णिमेच्या वेळी आजी घरोघरी जाऊन निमंत्रण देतात आणि अर्पण गोळा करतात. आता आजींचे वय झाल्याने त्या घरात राहून आश्रमासाठी वाती करून देतात.
३. आजी स्वभावदोष आणि अहं-निर्मूलन यांसाठी प्रयत्न करतात.
४. प्रतिकूल परिस्थितीतही सतत भगवंताच्या अनुसंधानात रहाणे : काही दिवसांपूर्वी आजींच्या पायाला ३ वेळा पुष्कळ लागले होते. त्यांच्या पायाला ९ मास (महिने) बँडेज होते. त्या काळात घरात राहूनही आजी सतत भगवंताच्या अनुसंधानात होत्या. त्यांच्या पायाला जखम झाल्याने स्वतः काही करू शकत नसतांनाही त्या प्रत्येक प्रसंगात सकारात्मक होत्या.
५. कृतज्ञताभाव : आजी सतत प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करतात, तसेच मनात येत असलेले विचार गुरुदेेेेेवांना सांगतात. गुरुदेवच सर्वकाही करवून घेतात, असा त्यांचा भाव असतो.
- श्री. रामानंद गौडा, मंगळुरू (जुलै २०१५)

तळमळीने सेवा करणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या नाशिक येथील सौ. नयना नाईक !

सौ. नयना नाईक
१. कु. तृप्ती गावडे
१ अ. सेवा तळमळीने करणे
१. काकूंना दिलेली प्रत्येक सेवा त्या परिपूर्ण आणि भावपूर्णच करतात.
२. काही कालावधीसाठी काकूंच्या घरी स्वयंपाक बनवण्याची सेवा असायची. तेव्हा काकूंकडे पहाटे पाणी यायचे. तेव्हा काकू स्वतः पहाटे ५ वाजता उठून पाणी भरायच्या. त्यामुळे आम्हाला कोणतीच अडचण येत नव्हती.
३. त्यांच्या वयानुसार त्यांना शारीरिक सेवा जमत नाही, तरीही त्या चहा बनवणे, भाजी निवडणे, दूध तापविणे, आवरणे या सेवा न थकता करतात.
४. काकूंंना कोणीही सेवा सांगितल्यास त्या स्वीकारतात.
५. बैठकीत सांगितलेल्या सूत्रांवर त्या मनापासून प्रयत्न करतात.

प्रेमभावाने सर्वांची मने जिंकणार्‍या ६० टक्के आध्यात्मिक पातळीच्या रत्नागिरी येथील सौ. मीनल खेर !

सौ. मीनल खेर
१. वहिनींचा स्वभाव पुष्कळ प्रेमळ आणि कष्टाळू आहे.
२. आनंदी रहाणे
    अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सतत सकारात्मक राहून आनंदी रहाणे, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.
- सौ. माधुरी दीक्षित, सातारा आणि सौ. रोहिणी ताम्हनकर, देवगड, जि. सिंधुदुर्ग. (सौ. मीनल खेर यांच्या भावजया)
३. प्रेमभाव
अ. आम्ही आजोळी गेल्यावर आमच्यासाठी किती करू ?, असे तिला होत असते. ती वेळात वेळ काढून प्रत्येकाच्या आवडीचे पदार्थ बनवते. कुटुंबियांसाठी ती जेवढे करते, तेवढेच साधकांसाठीही करते. कधी काही पाहिजे असल्यास साधकही हक्काने मामीला सांगू शकतात.
आ. साधकांनाही मामीचा आधार वाटतो. कुणाला कोणतीही अडचण आली की, मामीकडून साहाय्य मिळणार, याची निश्‍चिती असते.
- सौ. मंजिरी आगवेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा; सौ. तनुजा गाडगीळ, सनातन आश्रम, देवद आणि श्री. रूपेश ताम्हनकर, रत्नागिरी (सौ. मीनल खेर यांची भाची आणि भाचा)

जिल्हासेवक आणि साधक यांच्यासाठी सूचना

मकरसंक्रांत, प्रजासत्ताकदिन आणि श्रीगणेश जयंती
यांच्या निमित्ताने सनातन-निर्मित ग्रंथ, ध्वनी-चकत्या,
तसेच सात्त्विक उत्पादने यांचे अधिकाधिक वितरण करा !
    जानेवारी २०१६ मध्ये मकरसंक्रांत, प्रजासत्ताकदिन, तर ११ फेब्रुवारी या दिवशी श्रीगणेश जयंती आहे. यासाठी ग्रंथ, सात्त्विक उत्पादने अधिकाधिक जिज्ञासूंपर्यंत पोचवण्याची सुवर्णसंधी लाभली आहे. या संधीचा लाभ करून घेण्यासाठी साधकांनी पुढे नमूद केलेले ग्रंथ, तसेच प्रसारसाहित्य यांचे अधिकाधिक वितरण करण्यासाठी प्रयत्न करावेत.
१. ग्रंथ (मकरसंक्रांत, श्रीगणेश जयंती यांसाठी)
१. पंचोपचार आणि षोडशोपचार पूजनामागील शास्त्र    
२. पूजेपूर्वीची वैयक्तिक सिद्धता
३. देवपूजेपूर्वीची सिद्धता 
४. पूजासाहित्याचे महत्त्व
५. सण साजरे करण्याच्या पद्धती

स्वतःत हिंदु राष्ट्र आणले, तरच विश्‍वात हिंदु राष्ट्र येऊ शकेल !

श्री. ज्ञानदेव पाटील
    हे श्रीकृष्णा, तूच माझ्याकडून हे चिंतन लिहून घे आणि प.पू. गुरुमाऊलीला अपेक्षित अशी व्यष्टी आणि समष्टी साधना तूच आमच्याकडून करवून घे. विश्‍वव्यापी, ब्रह्मांडनायक अशा गुरुमाऊलींच्या चरणांची सेवा करतांना मला त्यांच्या चरणांची धूळ म्हणून रहाता येऊ दे, अशी तुझ्या चरणी शरणागत भावाने प्रार्थना आहे.
१. रामनाथी आश्रमात समष्टी साधना म्हणून स्वतःमध्ये हिंदु राष्ट्र
निर्माण करण्यासाठी प.पू. गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने प्रयत्न होत असणे
    प.पू. गुरुमाऊलींना अपेक्षित अशी व्यष्टी आणि समष्टी साधना करून स्वतःची प्रगती करून घेणे अन् समष्टी साधना म्हणून स्वतःमध्ये हिंदु राष्ट्र निर्माण करण्यासाठी त्यांच्या आशीर्वादाने प्रयत्न करणे, हे सर्व प्रयत्न रामनाथी आश्रमात होत आहेत. मला तर रामनाथी आश्रमात नियमित जाता येत नाही. मग देवा, मी काय
करू ?, असा विचार मनात येताच देवाने मला पुढील विचार सुचवले.

भक्त पावले-पावलेे टाकीत भक्तीपताका नाचवीत पंढरी जाती ।

देवराणा, देवा, भक्तप्रेमासाठी उभा सदैव तू विटेवरी ।
भक्तप्रेम तुझे सत्य, सत्य देवा नाही वर-वरी ॥
कष्टलास देवा भक्ताघरी, प्रेम तुझे सिद्ध झाले ।
आज सहस्रो-लाखो-कोटी कोेेटी भक्त पंढरी आले ॥ १ ॥
तुझ्या हृदयाच्या वैकुंठात प्रतिष्ठित ते पावले ।
तुझीच पूजा-अर्चा करण्या पंढरी जमले ॥
सांग राणा, तुझ्या प्रेमात असे कोणती जादू ।
भक्त तुझे, संत-महंत तुझे, तुझ्या प्रेमासाठी आले साधू ॥ २ ॥

साधना करतांना गुणांपेक्षा आध्यात्मिक दृष्टीकोन महत्त्वाचे !

पू. संदीप आळशी
    साधना करतांना स्वतःत पुष्कळ गुण (उदा. भाव, प्रेमभाव) असणे, हे बहुतांश वेळा पूर्वसुकृताचे फळ असते. आध्यात्मिक दृष्टीकोन (उदा. दिसेल ते कर्तव्य) हे जिज्ञासा, शिकण्याची वृत्ती आणि साधनेची तळमळ यांद्वारे आत्मसात करावे लागतात. स्वतःत नवनवीन गुण निर्माण करण्यासाठी स्वतःच्या प्रकृतीत पालट घडवावे लागत असल्याने त्यासाठी वेळ लागतो. याउलट दृष्टीकोन बुद्धीने समजून घ्यायचे असल्याने त्यांचा अंगीकार करणेही सोपे असते. योग्य दृष्टीकोन मन आणि बुद्धी यांना परिपक्व बनवतात, तसेच साधनेला योग्य दिशा देतात. त्यामुळे एखाद्यात गुण अल्प असले, तरी त्याने निराश व्हायला नको; गुणांच्या गोडीला सतत दृष्टीकोनांचा अंगीकार करण्याचा प्रयत्न करावा. - (पू.) श्री. संदीप आळशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (२५.११.२०१५)

आजारपणात नामजप न झाल्याने मन पुष्कळ अस्वस्थ झाल्यावर श्रीकृष्णाने सुचवल्यानुसार त्याचे चित्र काढणारी निपाणी (कर्नाटक) येथील कु. भाग्यश्री कल्लापा लोकसुरे

     कृष्णाची बासरी ऐकण्यात तल्लीन झालेली राधा : राधा कृष्णाच्या बासरीच्या सुरांमध्ये भावविभोर झाली आहे. तिला आपल्या कपड्यांचेसुद्धा भान नाही आणि भरलेली घागर पडलेली आहे, याचेही भान नाही. कृष्णाची बासरी ऐकण्यात ती तल्लीन झाली आहे.  

देवद आश्रमातील संतांच्या उपस्थितीमुळे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. कस्तुरी पट्टणशेट्टी यांना आलेल्या अनुभूती

सौ. कस्तुरी पट्टणशेट्टी
१. अनुभूती
१ अ. मी देवद आश्रमात आल्यापासून येथील चैतन्याने भारावून गेले आहे. येथे प्रतिदिन अनेक संतांच्या चैतन्याचा लाभ होत असतो.
१ आ. पू. राजेंद्रदादांच्या बोलण्याने स्वयंपाक विभागातील साधकांना चैतन्य मिळणे आणि घरच्यापेक्षा आश्रमात कामे सहज होणे : पू. राजेंद्रदादा (सनातनचे ६ वे संत पू. राजेंद्र शिंदे) स्वयंपाक विभागात आल्यावर सर्व साधिकांची विचारपूस करतात. त्यांच्याकडून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यामुळे विभागातील साधक आणि साधिका यांंच्यातील सेवेचा उत्साह वाढतो, असे मला जाणवले. मला घरी काम करतांना पुष्कळ शारीरिक त्रास होतो; पण देवद आश्रमात आल्यापासून संतांच्या चैतन्यामुळे त्रास न होता सेवा आपोेआप होतात.

प.पू. डॉक्टरांविषयी प.पू. आबांनी काढलेले उद्गार !

प.पू. आबा उपाध्ये
    ईश्‍वर आणि ईश्‍वरासमान असलेले प.पू. डॉक्टरच केवळ आशीर्वाद देऊ शकतात. आशीर्वाद देणारे आम्ही कोण ? आम्ही केवळ अंतरंगातून आपल्याला सदिच्छा देऊ शकतो ! : पुण्यातील संत प.पू. आबा उपाध्ये यांचा आज सकाळी भ्रमणभाष आला. ते म्हणाले, मी पनवेल आश्रमात गेलो होतो, त्या वेळी काढलेली छायाचित्रे प.पू. डॉक्टरांनी मला आठवणीने पाठवली आहेत. तसेच त्यांनी पाठवलेला खाऊही मिळाला म्हणून त्यांना सांगा. आता बघू त्यांचे आम्हाला केव्हा दर्शन होते ते. तुम्ही आम्हाला पुष्कळच साहाय्य करत आहात. मी त्यांना म्हटले, आबा, तुमच्या कृपेने आम्हा साधकांना तुमच्या सेवेची संधी मिळत आहे. आम्हाला केवळ आपला आशीर्वाद हवा आहे. यावर प.पू. आबा म्हणाले, ईश्‍वर आणि ईश्‍वरासमान असलेले प.पू. डॉक्टरच केवळ आशीर्वाद देऊ शकतात. आशीर्वाद देणारे आम्ही कोण ? आम्ही केवळ अंतरंगातून आपल्याला सदिच्छा देऊ शकतो. त्या वेळी मी प.पू. आबांना म्हटले, आबा, तुम्हालाच तुमची लीला ठाऊक आहे. आम्ही केवळ आपल्या चरणांशीच राहू शकतो.
    यातून एवढ्या मोठ्या संतांच्या अंगी किती नम्रता असते, ते शिकायला मिळाले. - (पू.) सौ. अंजली गाडगीळ, तिरुवण्णामलई, तमिळनाडू. (२५.११.२०१५, दुपारी २)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

विज्ञानाने अध्यात्माला प्रमाणपत्र द्यायची आवश्यकता नाही !
परात्पर गुरु डॉ. आठवले
      विज्ञानवाद्यांनो, हे लक्षात घ्या की, विज्ञानाने अध्यात्माला प्रमाणपत्र द्यायची आवश्यकता नाही, उलट अध्यात्माने विज्ञानाला प्रमाणपत्र दिले पाहिजे; कारण हल्ली समजले जाणारे विज्ञान शेवटी मायेतीलच आहे !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र,


॥ हरि ॐ तत्सत् ॥

देवाकडे ऐहिक सुख मागू नये
संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
मुलाने विष मागितले, तरी आई आणि डॉक्टर त्याला विष देत नाहीत. तसेच देवही ऐहिक सुख देत नाही; कारण त्याला ठाऊक असते की, हे त्याला पेलवणार नाही. म्हणून देवाकडे भीक (ऐहिक सुख) मागण्यात अर्थ नाही.
भावार्थ : देव, म्हणजे गुरु, हे देवापासून दूर नेणारे ऐहिक सुख देत नाहीत. देवापासून दूर जाणे हे साधकाच्या दृष्टीने मरणच होय; म्हणून ऐहिक सुख हे विषासमान मानले आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे ॐ

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

यशप्राप्ती
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
सातत्याने प्रयत्न केल्याशिवाय कशाचीही प्राप्ती होत नाही. यश हे नेहमी प्रयत्नांनाच चिकटून रहाते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

रशियाचे जिद्दी अध्यक्ष पुतीन !

संपादकीय
     रशियाचे लढाऊ विमान तुर्कस्थानच्या सीमेत घुसले, या आरोपाखाली तुर्कस्थान सैनिकांनी ते पाडले. या विमानातील दोन वैमानिकांनी पॅरेशूटच्या साहाय्याने स्वतःचे जीव वाचवले, तरी एका वैमानिकाला सीरियाच्या बंडखोरांनी ठार मारले. जिवंत राहिलेल्या दुसर्‍या वैमानिकाने मात्र तुर्कस्थानचा वचपा घेणार असल्याची शपथ घेतली आहे. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनीही ही गोष्ट गांभीर्याने घेतली असून त्यांनी तुर्कस्थानबरोबर असलेला सैन्यदलाचा करार रहित केला. रशियाच्या नागरिकांनी तुर्कस्थानमध्ये पर्यटनाला जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. तुर्कस्थानने मोठा विश्‍वासघात केला, असे रशिया म्हणत आहे. तुर्कस्थानबरोबर संबंधच नको, असे त्यांना वाटू लागले आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn