Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

तुळजापूर देवस्थान समितीची अपहृत भूमी, तसेच अन्य भ्रष्टाचारांच्या प्रकरणी हिंदु जनजागृती समिती न्यायालयीन लढा देणार - अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर, हिंदु विधीज्ञ परिषद

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात 
तुळजापूर देवस्थान समितीकडील २६५ एकर भूमीचा अपहार !
डावीकडून सौ. नयना भगत, अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर आणि श्री. नरेंद्र सुर्वे
मुंबई, २५ नोव्हेंबर (वार्ता.) - महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या तुळजापूर देवस्थान समितीच्या मालकीच्या तुळजापूर तालुक्यातील १५ गावांतील ३ सहस्र ५६८ एकर भूमीपैकी अमृतवाडी येथील २६५ एकर भूमी अवैधरित्या फेरफार करून ७७ लोकांच्या नावावर करण्यात आली, असे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी केलेल्या चौकशीत उघड झाले होते. या प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी चौकशीचे आदेश दिले होते. विधी आणि न्याय खात्याचे संभाजीनगर विभागाचे सहसचिव गिराडकर यांच्या समवेत ५ जणांची चौकशी करून त्याचा अहवाल विधी आणि न्याय खाते, मंत्रालय येथे पाठवला होता. हा अहवाल विधी आणि न्याय खात्याने महसूल खात्याकडे पाठवला; परंतु त्यावर कार्यवाही न होता तो दाबून टाकण्यात आला. अपहृत भूमी परत मिळवण्यासाठी कारवाई न होता अहवाल दडपला जाणे, हे गंभीर आहे. यासाठी हिंदु जनजागृती समिती न्यायालयीन लढा देणार आहे, असे प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केले. येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
    या वेळी तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचारप्रकरणी कोणाला काही माहिती द्यायची असल्यास त्यांनी समितीचे राज्य प्रवक्ता श्री. सुनील घनवट यांना ९४०४९५६५३४ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
     अधिवक्ता श्री. इचलकरंजीकर पुढे म्हणाले, वर्ष २०१० पासून राज्य गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने चालू असलेल्या चौकशीतून गेल्या ५ वर्षांत काहीच निष्पन्न झालेले नाही. त्यामुळे समितीने हिंदु विधीज्ञ परिषदेच्या माध्यमातून उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर येथील खंडपिठासमोर संबंधितांवर कारवाई होण्यासाठी जनहित याचिका प्रविष्ट केली आहे. या प्रकरणी हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य अधिवक्ता श्री. सुरेश कुलकर्णी आणि सदस्य अधिवक्ता श्री उमेश भडगावकर हे न्यायालयात बाजू मांडत आहेत.
या वेळी अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर पुढे म्हणाले,
१. आझाद मैदानात झालेल्या दंगलीच्या विरोधात आम्ही पत्रकारांच्या बाजूने खटला लढवत आहोत. आम्ही लढा देऊन पंढरपूर येथील ३५० एकर भूमी मंदिर समितीच्या कह्यातून पुन्हा मिळवून दिली. हिंदूंच्या मंदिरात आम्ही भ्रष्टाचार होऊ देणार नाही ! भ्रष्टाचार करणार्‍यांना शिक्षा व्हावी, असे कायदे आणण्यासाठी आम्ही लढा देऊ !
२. धर्मादाय आयुक्तांकडूनही काहीच प्रयत्न होत नाहीत. शासन आजही निद्रिस्त आहे. वर्ष २०१० मध्ये आलेल्या या भ्रष्टाचारांच्या प्रकरणांची काहीच चौकशी झालेली नाही. सर्व जिल्हाधिकारी झोपले आहेत का ? शासन या गुन्हेगार जिल्हाधिकार्‍यांना कारागृहात डांबणार का ?

(म्हणे) अमीर खान याला देश सोडून जाण्यास सांगणे, हाही असहिष्णुतेचाच नमुना ! - शरद पवार

कराड - अभिनेता अमीर खान याला देश सोडून जाण्यास सांगायला हा देश त्याची खाजगी मालमत्ता आहे का, असा प्रश्‍न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. अमीर खानला केला जाणारा विरोध आणि त्याला देश सोडून जायला सांगणे, हाही असहिष्णुतेचाच नमुना आहे, असेही ते म्हणाले. पवार यांनी केलेले हे वक्तव्य शिवसेनेला प्रत्त्युत्तर असल्याचे मानले जात आहे. शिवसेनेने अमीर खान यांना सापाची उपमा देत पाकिस्तानातून निघून जायला सांगितले होते. २४ नोव्हेंबर या दिवशी पवार यांनी अमीर खान यांच्याविषयी कोणतीही प्रतिक्रिया न देता त्याच्या सूत्राला बगल दिली होती; मात्र २५ नोव्हेंबर या दिवशी त्यांनी अशा प्रकारे अमीर खान यांचे समर्थन केले. शरद पवार पुढे म्हणाले, अमीर खानच्या विरोधात एवढा गदारोळ माजवण्याची आवश्यकता नाही. देशात धार्मिक वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे अमीर अयोग्य असे काहीच बोलला नाही.

(म्हणे) मी माझ्या मतावर ठाम ! - अमीर खान यांचा उद्दामपणा

  • पुरोगाम्यांची मानसिकता ! मुसलमान देशाच्या विरोधात काहीही बोलले, तर ती सहिष्णुता आणि त्याला हिंदूंनी विरोध केला, तर ती असहिष्णुता, हीच आज पुरोगाम्यांची मानसिकता बनली आहे !
  • अमीर खान यांचे चित्रपट कुणीही पाहू नयेत आणि चित्रपटगृहचालकांनी त्यांचे चित्रपट दाखवू नयेत, ही देशप्रेमींची मागणी !
  • देश सोडण्याचा विचार नसल्याचेही प्रतिपादन
मुंबई - मी माझ्या मतावर ठामच आहे, असे वक्तव्य अभिनेता अमीर खान यांनी येथे केले. त्याचसह माझा किंंवा माझी पत्नी किरण हिचा भारत सोडून जाण्याचा कुठलाही विचार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
अमीर खान पुढे म्हणाले,
१. जे कोणी माझ्या विरोधात आहेत, त्यांनी माझी मुलाखत नीट पाहिलेली नसावी किंवा ते माझी वाक्ये चुकीच्या पद्धतीने सादर करत आहेत.
२. भारत माझा देश आहे आणि येथे जन्माला आल्याविषयी मी स्वत:ला भाग्यवान समजतो.
३. माझ्या बोलण्यावर दिलेली वाईट प्रतिक्रिया म्हणजे माझे म्हणणे योग्य असल्याचा दाखला आहे.
४. जे मला देशद्रोही म्हणत आहेत, त्यांना मला भारताचा अभिमान आहे, असे मी सांगेन आणि त्यासाठी मला इतरांच्या प्रशस्तीपत्राची आवश्यकता नाही.

उत्पादने आणि सेवा यांच्या विक्रीसाठी हिंदु देवतांच्या नावांचा वापर करता येणार नाही ! - सर्वोच्च न्यायालय

गेली १५ वर्षे सनातन जे सांगत आहे, ते आज सर्वोच्च न्यायालयाने सांगितले !
नवी देहली - वस्तू आणि सेवा यांच्या विक्रीसाठी हिंदु देवता अथवा हिंदूंचे धार्मिक ग्रंथ यांच्या नावांचा वापर करता येणार नाही, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. अशा प्रकारच्या गोष्टींना मान्यता दिल्यास जनतेच्या संवेदनक्षमतेवरील विश्‍वासाला तडा जाऊ शकतो, असे न्या. रंजन गोगोई आणि न्या. एन्.व्ही. रामन् यांच्या खंडपिठाने म्हटले आहे. रामायण, कुराण, बायबल, गुरु ग्रंथ साहिब असे अनेक धार्मिक ग्रंथ आहेत. एखादी व्यक्ती वस्तू अथवा सेवा यांच्या विक्रीसाठी अशा धार्मिक ग्रंथांचा ट्रेडमार्क म्हणून वापर करू शकत नाही असेही पीठाने स्पष्ट केले आहे. हिंदु देवतांच्या नावांचा वापर उत्पादनांची विक्री करण्यासाठी करता येणार नसल्याचे भारतीय कायद्यात स्पष्टपणे म्हटले आहे, असेही पीठाने या वेळी सांगितले.
    पाटलीपुत्र (पाटणा) येथील लालबाबू प्रियदर्शी यांनी उदबत्त्या आणि सुगंधी द्रव्ये यांच्या विक्रीसाठी रामायण हा ट्रेडमार्क वापरण्याची अनुमती देण्याची मागणी करणारी याचिका केली होती. त्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने ही बाब स्पष्ट केली.

सहस्रो जणांनी अमीर यांच्या निषेधार्थ स्नॅपडिलचा अ‍ॅप काढून टाकला !

अमीर खान यांच्या बेजबाबदार विधानावर तरुणाई संतप्त
      नवी देहली - देशात असुरक्षित, असहिष्णु वातावरण असल्याचे दायित्वशून्य विधान केलेल्या अमीर खानला संपूर्ण देशभरातून प्रचंड विरोध होत आहे. अमीर यांना प्रथितयश चित्रपट अभिनेता बनवणार्‍या भारतीय तरुणाईनेही अमीर यांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. तरुणाईच्या या संतापामुळे ऑनलाईन विक्री करणार्‍या स्नॅपडिल या आस्थापनाला मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत. अमीर खान हे या आस्थापनाचे अ‍ॅम्बेसॅडर आहेत. त्यामुळे अमीर यांना विरोध दर्शवण्यासाठी आतापर्यंत ८७ सहस्र जणांनी त्यांच्या भ्रमणभाषवरून स्नॅपडिल या आस्थापनाचा अ‍ॅप काढून टाकला आणि या संख्येत प्रचंड गतीने वाढ होत असल्याने लवकरच हा आकडा लाखाच्या घरात पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि प्रा. कलबुर्गी यांच्या खर्‍या खुन्यांना लपवण्यासाठी पुरोगाम्यांचे षड्यंत्र ! - अभय वर्तक, सनातन संस्था

पुरोगाम्यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी कोल्हापूर येथे ३० नोव्हेंबरला जनसंवाद सभा
डावीकडून आधुनिक वैद्य श्री. मानसिंग शिंदे, श्री. सुनील घनवट, 
बोलतांना श्री. अभय वर्तक, श्री. सुधाकर सुतार, श्री. शिवाजीराव ससे
कोल्हापूर, २५ नोव्हेंबर (वार्ता.) - येथे २४ नोव्हेंबरला झालेल्या तथाकथित पुरोगाम्यांच्या निर्धार सभा आणि परिषदेत वक्त्यांनी नेहमीप्रमाणे सनातन संस्था अन् हिंदुत्ववादी संघटना यांच्या विरोधात गरळओक केली. या गरळओकीचा सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्ववादी संघटना जाहीर निषेध करत आहे. सनातन संस्थेवर कोणत्याही प्रकारचे आरोपपत्र आजवर एकाही सुरक्षायंत्रणेने अथवा शासनाने प्रविष्ट केलेले नाही. असे असतांना सनातनला आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न करणार्‍यांना जनतेची दिशाभूल केल्याविषयी अटक करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे आणि प्रा. कलबुर्गी यांची हत्या करणार्‍या खर्‍या खुन्यांना लपवण्यासाठी पुरोगाम्यांनी षड्यंत्र रचलेले आहे, असा घणाघाती आरोप सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी येथील पत्रकार परिषदेत केला.
     २५ नोव्हेंबरला दुपारी १ वाजता शाहू स्मारक येथे आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेत हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री. सुनील घनवट, आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे, हिंदु एकता आंदोलनाचे श्री. शिवाजीराव ससे, श्री. सुधाकर सुतार उपस्थित होते. श्री. सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेचा उद्देश विशद केला.
पुरोगाम्यांच्या सभेतील खोटारडेपणाची माहिती देतांना श्री. अभय वर्तक म्हणाले,
१. श्री. समीर गायकवाड यांना पोलिसांनी अधिवक्ता मिळू दिला नाही, तेव्हा सनातनवर बहुजन समाजाच्या मुलांना चुकीच्या मार्गाला लावले, असा आरोप करणारे कुठे होते ? देशद्रोही आतंकवादी अजमल कसाब आणि याकूब मेमन यांना अधिवक्ता मिळावा, यासाठी दबाव आणणार्‍या या तथाकथित पुरोगाम्यांनी श्री. गायकवाड यांना अधिवक्ता मिळू नये, यासाठी प्रयत्न का केला ?
२. श्री. गायकवाड यांचे वकीलपत्र सांगलीतील रुद्र पाटील यांच्या अधिवक्ता पत्नीने मोठ्या धाडसाने घेतले; मात्र डॉ. भारत पाटणकर काल म्हणाले, श्री. रुद्र पाटील यांनी फरारी झाल्यानंतर कसा काय विवाह केला ? प्रत्यक्षात श्री. रुद्र पाटील यांचा विवाह १० मे २००७ या दिवशी झाला आहे. वर्ष २०११ मध्ये त्यांना पोलिसांनी फरारी घोषित केले आहे. पाटणकरांचे वय झाल्यामुळे कदाचित त्यांची स्मरणशक्ती अल्प झाली असावी; म्हणून ते असे बरळत असावे. त्यामुळेच त्यांच्या सभेकडे कोल्हापूरच्या जनेतेने पाठ फिरवली. एका महिलेची जाहीर सभेत अपकीर्ती करणार्‍या पाटणकर यांनी श्री. रुद्र पाटील यांच्या पत्नीची क्षमा मागितली पाहिजे.

अवैध वास्तव्यास असलेल्या सहस्रो पाकिस्तानी नागरिकांची युरोपातून हकालपट्टी !

भारतीय राज्यकर्ते यातून काही बोध घेतील का ? 
आता याला युरोपातील देशांची असहिष्णुता म्हणणार का ?
      इस्लामाबाद (पाकिस्तान) - सहस्रो पाक नागरिकांना आपल्या देशांमधून बाहेर काढण्याची सिद्धता युरोपमधील देशांनी केली आहे. पाकमधून आलेल्या वैध शरणार्थींना त्यांच्या जागा आणि उपलब्ध करून दिलेली साधनसंपत्ती परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ राजनैतिक अधिकार्‍याने दिली. तसेच युरोपीय संघाचे आयुक्त दिमित्रीज अवरामोपॉलस यांनी पाक दौर्‍यात पाक शरणार्थींच्या युरोपातील संकटाविषयी माहिती दिली.

राममंदिर उभारण्यासाठी कायदा करा ! - डॉ. प्रवीण तोगाडिया

     कर्णावती (अहमदाबाद) - अयोध्येमध्ये राममंदिर उभारण्यासाठी संसदेत कायदा करावा, अशी मागणी विश्‍व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगाडिया यांनी केली. विहिंपचे नेते स्व. अशोकजी सिंघल यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. डॉ. तोगाडिया म्हणाले, राममंदिराची उभारणी हीच स्व. अशोकजी सिंघल यांना खरी श्रद्धांजली ठरेल. सोमनाथ मंदिर उभारण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी ज्या प्रकारे लोकांशी चर्चा न करता न्यायालयाच्या आदेशाची वाट न बघता संसदेमध्ये ठराव आणला, त्याच प्रकारे राममंदिर उभारण्यात यावे, अशी आमची मागणी आहे. या वेळी गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल आणि राज्यपाल ओ.पी. कोहलीही उपस्थित होते.

काश्मीरमध्ये आतंकवादी आक्रमणात १ सैनिक हुतात्मा; ३ आतंकवाद्यांना कंठस्नान

आक्रमण हाच संरक्षणाचा सर्वोत्तम मार्ग आहे, हे शासनाने जाणावे !
श्रीनगर - आतंकवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील तंगधार येथील भारतीय सैन्याच्या ३१ गोरखा रायफल्स या सैनिकी तळावर आक्रमण केले. या आक्रमणात १ सैनिक हुतात्मा झाला. या आक्रमणानंतर सैनिकांनीही आतंकवाद्यांवर प्रतिआक्रमण चालू केले. यात सैनिकांनी ३ आतंकवाद्यांना कंठस्नान घातले. अजूनही ही चकमक चालू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ ते ८ आतंकवाद्यांनी या सैनिकी तळाच्या प्रवेशद्वारावर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारामुळे सैनिकी तळाच्या काही बराकींना आग लागली. आग विझवण्यासाठी अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. ३१ गोरखा रायफल्सचे तळ डोंगर आणि टेकड्यांच्या परिसरात असून हा परिसर पूर्णपणे सैनिकांच्या नियंत्रणात आहे. अत्यंत संवेदनशील असलेल्या या भागात स्थानिक नागरिकांनाही सैनिकांच्या अनुमतीशिवाय प्रवेश मिळत नाही. असे असतांना आतंकवादी तळापर्यंत पोहोचलेच कसे ?, याविषयी आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

उस्मानिया विद्यापिठात मानवाधिकार दिनी गोमांस मेजवानीचे आयोजन

उस्मानिया विद्यापिठाचा हिंदुद्वेष !
      भाग्यनगर - उस्मानिया विद्यापिठातील विद्यार्थ्यांचा एक गट, काही शिक्षक, मानवाधिकारवाले आणि शहरातील इतर विद्यापिठांतील काही विद्यार्थी यांनी १० डिसेंबरला मानवाधिकार दिनी उस्मानिया विद्यापिठामध्ये गोमांस मेजवानीचे आयोजन केले आहे. त्यामुळे उस्मानिया विद्यापीठ परत एकदा वादाचे केंद्र ठरणार आहे. भारतातील काही राजकीय नेते, लेखक, बुद्धिवादी या मेजवानीच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. अरूंधती रॉय, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्दरामय्या आणि तमिळनाडूतील व्ही.सी.के. पक्षाचे नेते थोल तिरुमवलावन् यांना मेजवानीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे, असे या उत्सवाच्या आयोजकांनी सांगितले.

मुसलमानांच्या संमेलनामध्ये बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी सहभागी होणार !

हिंदूंच्या संमेलनात कधी ममता बॅनर्जी सहभागी झाल्या असल्याचे ऐकले आहे का ?
     कोलकाता, २५ नोव्हेंबर जमात-ए-उलेमा-ए-हिंद यांच्या वतीने येथील शाहिद मीनार पटांगणामध्ये २६ नोव्हेंबर या दिवशी मुसलमानांचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. त्यामध्ये प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सहभागी होणार असून त्या सध्या देशामध्ये चालू असलेल्या असहिष्णुतेच्या सूत्रावर बोलण्याची शक्यता आहे. (मुसलमानांच्या मतांसाठी त्यांचे लांगुलचालन करण्याची ही एक क्लृप्ती आहे. बंगालमध्ये ममता(बानो) यांच्या तृणमूल काँग्रेस या पक्षाचीच सत्ता आहे. तेथे मागील काही मासांत झालेले बॉम्बस्फोट पहाता बंगालमधील वातावरण असहिष्णु असल्याचे कुणाच्याही लक्षात येईल. - संपादक) 

अल् कायदा भारतावर आक्रमण करण्याची शक्यता देशभरात अतीदक्षतेची चेतावणी !

     नवी देहली - एकिकडे आय.एस्.आय.एस्. भारतीय युवकांना आकर्षित करून भारतात त्यांचे जाळे विणण्याची आणि भारतात आतंकवादी आक्रमण करण्याची सिद्धता करत आहे, तर दुसरीकडे अल् कायदा ही जिहादी आतंकवादी संघटना भारतात मोठे आतंकवादी आक्रमण करू शकते, अशी शक्यता भारतीय गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर देशभरात सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणांचे अधिकारी अल् कायदा इन इंडियन सबकॉन्टीनेंट(अल् कायदाची भारतात गुप्तपणे कार्य करणारी शाखा)च्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.

पाश्‍चात्त्य संस्कृतीचे वादळ रोखण्यासाठी हे प्रदर्शन अत्यंत लाभदायक ! - सुरेशचंद्र शर्मा

फतेहपूर (राजस्थान) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मशिक्षण 
आणि राष्ट्रजागृती या विषयांवर प्रदर्शन !
     फतेहपूर (राजस्थान) - भारतीय संस्कृतीचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने आणि पाश्‍चात्त्य संस्कृतीचे वादळ रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने लावलेले प्रदर्शन अत्यंत आवश्यक आहे. अशा प्रकारच्या प्रदर्शनांमुळे लोकांना संस्कारक्षम जीवन जगण्याची प्रेरणा मिळेल. त्यांची आपल्या भारतीय संस्कृतीवरील निष्ठा आणखी दृढ होईल आणि ते त्यांच्या दैनंदिन जीवनात त्याचे आचरण करतील, असे प्रतिपादन श्री हनुमानप्रसाद धानुका आदर्श विद्यामंदिरचे मुख्याध्यापक श्री. सुरेशचंद्र शर्मा यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. शर्मा यांच्या विद्यालयात धर्मजागृती आणि राष्ट्ररक्षण या विषयांवर प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. 
    या वेळी समितीचे राजस्थान समन्वयक श्री. गजानन केसकर यांनी आदर्श दिनचर्या, तिथीनुसार वाढदिवस साजरा करण्याचे महत्त्व, देवळात दर्शन कसे घ्यावे आदी विषयांवर थोडक्यात मार्गदर्शन केले. 

अखिल भारतीय धर्मसंघ शिक्षा मंडळाचे महामंत्री श्री जगजीतनजी पांडेय यांची सहकुटुंब वाराणसी येथील सनातनच्या सेवाकेंद्राला भेट

श्री. जगजीतनजी पांडेय (उजवीकडे) यांना सनातनचा
ग्रंथ दाखवतांना श्री. गुरुराज प्रभु
     वाराणसी - अखिल भारतीय धर्मसंघ शिक्षा मंडळाचे महामंत्री श्री. जगजीतनजी पांडेय यांनी सहकुटुंब सनातन संस्थेच्या वाराणसी येथील सेवाकेंद्राला सदिच्छा भेट दिली. या वेळी सनातनचे श्री. गुरुराज प्रभु यांनी सेवाकेंद्रातील साधक, ते करत असलेली साधना, तसेच अध्यात्म विश्‍वविद्यालय या संदर्भात त्यांना माहिती दिली. सनातनचे श्री. दशरथ मसुरकर यांनी त्यांचा सन्मान केला. सेवाकेंद्रातील वातावरण शांत आहे. हे वातावरण अनुभवूनच लक्षात येते की, येथे खरोखरच साधक साधना करतात, असा अभिप्राय श्री. पांडेय यांनी सेवाकेंद्र पाहिल्यावर दिला.

राष्ट्र आणि धर्म या विषयांवरील प्रश्‍नांविषयी संसदेत आवाज उठवणार ! - हरिश्‍चंद्र चव्हाण, खासदार

राष्ट्र आणि धर्म रक्षणाची भूमिका घेणारे खासदार श्री. हरिश्‍चंद्र चव्हाण यांचे अभिनंदन ! 
     
डावीकडून सर्वश्री पराग भुर, शशिधर जोशी,
शैलेश पोटे आणि खासदार श्री. चव्हाण
नाशिक -
दिंडोरी येथील भाजपचे खासदार श्री. हरिश्‍चंद्र चव्हाण यांची हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी भेट घेतली. या वेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी संसदेच्या येत्या अधिवेशनात राष्ट्र आणि धर्म यांविषयी बाजू मांडण्याची विनंती करत काही गंभीर प्रश्‍नही त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामध्ये सनी लिओनच्या अश्‍लील संकेतस्थळामुळे समाजावर होणारा परिणाम, अंनिसला विदेशातून मिळणार्‍या आर्थिक साहाय्याची चौकशी, तसेच एन्.सी.ई.आर्.टी. अभ्यासक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि इतिहास यांना दिलेले स्थान यांसारख्या प्रश्‍नांचा समावेश होता. या वेळी श्री. चव्हाण यांनी या सर्व विषयांचा अभ्यास करून ते येत्या हिवाळी अधिवेशनात मांडण्याचे आश्‍वासन दिले. या वेळी हिंदु जनजागती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. शशिधर जोशी, श्री. पराग भुरे, श्री. माधव कुलकर्णी उपस्थित होते. 

गोरक्षकांना संरक्षण मिळावे ! - हिंदुत्ववादी


नाशिक येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
     नाशिक - येथील जिल्हाधिकारी कार्यलयासमोर समस्त हिंदुत्ववाद्यांनी २४ नोव्हेंबर या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारेे गोरक्षकांना संरक्षण मिळावे, अशी मागणी केली. गोरक्षण करणार्‍या कार्यकर्त्यांवरील वाढती आक्रमणे आणि त्यांचे संरक्षण करण्याविषयी पोलिसांची असमर्थता यांमुळे स्वसंरक्षणार्थ शस्त्र बाळगण्यास अनुमती देण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली. 
     

आतंकवाद्यांना अडवण्यास पोलिसांचे कडे २० पैकी ५ ठिकाणी अयशस्वी

     अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि सर्व सोयीसुविधा असतांना पोलीस आतंकवाद्यांना अडवण्यात अपयशी ठरत असतील, तर त्यांना प्रशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हे लक्षात येते ! 
'ऑपरेशन सागर कवच'च्या सरावातून उघड 
     मुंबई - मुंबईवरील २६/११ च्या आतंकवादी आक्रमणाला ७ वर्षे होत असल्याने त्यानिमित्त राज्यातील समुद्र किनार्‍यांच्या सुरक्षेचे दायित्व पार पाडणार्‍या यंत्रणांपैकी 'ऑपरेशन सागर कवच'ने पोलिसांचा सराव करून घेतला. यात सागरी मार्गाने येण्याच्या २० पैकी पाच महत्त्वाच्या ठिकाणी आतंकवाद्यांच्या गटानेच (पोलिसांमधूनच आतंकवाद्यांचे गट बनवण्यात आले होते.) पोलिसांचे कडे भेदले. (असे अपयश खर्‍या आतंकवादी आक्रमणाच्या वेळी पदरी पडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने प्रयत्न करायला हवेत ! - संपादक) या पाच ठिकाणांमध्ये मुंबईतील फेरी वार्फ, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएन्पीटी), मुंबई पोर्ट ट्रस्ट, ससून डॉक आणि नवी मुंबईतील लॅण्डिंग पॉइंट यांचा समावेश होता. १८ आणि १९ नोव्हेंबर या दिवशी हा सराव घेण्यात आला.

'हिंदुस्थान टाइम्स'च्या विरोधात धर्माभिमानी श्री. विनोद कोठारी यांची पोलिसांकडे तक्रार

 हिंदु जनजागृती समितीचाही विरोध !      
     हिंदु देवतांच्या अनादराच्या विरोधात आवाज उठवणारे श्री. कोठारी यांचे अभिनंदन ! असे धर्माभिमानी सर्वत्र असल्यास हिंदूंच्या देवतांकडे वाकड्या नजरेने पहाण्याची कोणाची हिंमत होणार नाही !  
     मुंबई, २५ नोव्हेंबर - हिंंदूंच्या देवतांची अर्धनग्न आणि अश्‍लील चित्रे काढणार्‍या अंजोली इला मेनन, हिंदूंच्या भावना दुखावणारी चित्रे असणारा लेख प्रसिद्ध करणारे हिंदुस्थान टाइम्सचे संपादक, प्रकाशक आणि मालक यांच्या विरोधात येथील धर्माभिमानी श्री. विनोद कोठारी यांनी कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. २३ नोव्हेंबर या दिवशीच्या हिंदुस्थान टाइम्सच्या एच्.टी.कॅफे या सदरात पान ६ वर अर्धनग्न अवस्थेतील पार्वती, तसेच यशोदामाता यांची चित्रे प्रसिद्ध झाली होती. हिंदू देवतांची अश्‍लील चित्रे काढणार्‍या अंजोली इला मेनन यांनी ख्रिस्त्यांचे श्रद्धास्थान असणार्‍या 'मदरमेरी'ला मात्र पूर्ण पोशाखात दाखवले होते. कुलाबा पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी विश्‍व हिंदु परिषदेचे विभागमंत्री सर्वश्री अरुण कबडी, विशाल पटनी, हरीशजी पिल्ले, रमेश पुरोहित आदी धर्माभिमानी उपस्थित होते. हिंदूंच्या भावना जाणीवपूर्वक दुखावणार्‍यांवर गुन्हे प्रविष्ट करून त्यांना अटक करण्यात यावी, तसेच २६ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०१५ या कालावधीत या विडंबनात्मक चित्रांचे प्रदर्शन भरवणार्‍या मुंबईतील 'आर्ट म्युझिंग्ज' (आर्ट गॅलरी) वरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. 

आडगाव (नाशिक) येथील चोरीस गेलेली मूर्ती सापडली

     पंचवटी (नाशिक) - आडगाव येथील ग्रामदेवता महालक्ष्मीदेवीच्या मंदिरातून २१ नोव्हेंबरच्या रात्री चोरीला गेलेली देवीची मूर्ती सिन्नर तालुक्यातील खोपडी खुर्द शिवारातील शेतात बेवारस स्थितीत आढळून आली आहे. (केवळ मूर्ती सापडून उपयोग नाही, तर तिला बेवारस स्थितीत टाकून देणार्‍या चोरट्यांनाही अटक करून त्यांना कठोर शासन करणे आवश्यक आहे ! - संपादक) चोरट्यांनी मूर्ती पोत्यात घालून याठिकाणी शेतातील झुडपात टाकून दिली असावी, असा पोलिसांचा संशय आहे. महालक्ष्मीदेवी मंदिराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी देवीची पितळेची मूर्ती १५ नोव्हेंबर या दिवशी चोरून नेली होती. याप्रकरणी ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला होता.

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत स्वदेशी जागरण विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : 
२९ नोव्हेंबर 
 विशेषांकाची वाढीव मागणी 
वितरकांनी २८ नोव्हेंबरच्या
 दुपारी ३ पर्यंत 'ईआरपी' प्रणालीत भरावी !

(म्हणे) अमीर यांच्या पत्नीच्या म्हणण्याचा अर्थ शोधला पाहिजे ! - महेश भट

संपूर्ण देशाने अमीर यांना विरोध केला असतांना त्याच्या 
पत्नीच्या बाजूने बोलणारे दिग्दर्शक चित्रपटांतून समाजाला काय दिशा देणार ? 
     मुंबई - अमीर यांची पत्नी अनुभवसमृद्ध महिला आहे. तिच्या म्हणण्याचा नेमका अर्थ आपण शोधला पाहिजे. इतक्या यशानंतरही ती या देशात स्वतःला असुरक्षित का मानते, या प्रश्‍नाचा आपण विचार केला पाहिजे, असे तर्कट विचार हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शक महेश भट यांनी व्यक्त केले आहेत. 'ती चुकीचे बोलत असेल, तर तिला सांगा की, आम्ही असेपर्यंत तुला इथे कुणीही त्रास देणार नाही. तिची भीती योग्य असेल, तर त्यावर उपाय शोधा', असे आवाहन भट यांनी केले.

अमीर खान यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यात निदर्शने

     
     अमीर खान यांच्या वक्तव्याचा निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या समोर निदर्शने करण्यात आली. या वेळी अमीर खान यांचे छायाचित्र जाळण्यात आले.

आम्ही केवळ अभिनेते, खरे 'हिरो' सीमेवरील सैनिक ! - श्रेयस तळपदे, अभिनेता

अभिनेता अमीर खान यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? 
 भारतासारखे सुरक्षित वातावरण अन्य देशात नसल्याचे मत 
     मुंबई - अमीर खान यांच्या वक्तव्यावर मराठी अभिनेता श्रेयस तळपदे याने सांगितले की, देशात असहिष्णु वाटावे, असे वातावरण नाही. देशाविषयी अमीर खान यांचे वक्तव्य दायित्वशून्यतेचे आहे. त्याच्या वक्तव्यामुळे देशातील जनतेपर्यंत अयोग्य विचार गेले. आम्ही 'हिरो' नसून केवळ अभिनेते आहोत. खरे 'हिरो' सीमेवरील सैनिक आणि पोलीस हेच आहेत. तेच रात्रंदिवस तेथे राहून आमचे रक्षण करतात. भारतासारखा सहिष्णु देश दुसरा नाही. आपल्या कुटुंबासाठी भारतासारखे सुरक्षित वातावरण कुठेच नाही. आपली इतरांवर आक्रमण करण्याचीही प्रवृत्ती नाही. आपल्यावर अनेकांनी येऊन राज्य केले; पण आपण तसे केले नाही. मी बर्‍याच गोष्टींना प्रतिक्रिया देत नाही; मात्र अमीर खान यांचे वक्तव्यच असे होते की, आता बोललो नाही, तर कधीच नाही; म्हणून मी या विषयावर प्रतिक्रिया दिली.

असहिष्णुता वाढत असल्याचा साक्षात्कार आताच का ? - विक्रम गोखले

     मुंबई - देशात दलित आणि स्त्रिया यांच्यावरील अत्याचाराच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत; मात्र त्यावर निषेधाचा एकही शब्द न उच्चारणार्‍यांना गेल्या ८-१० मासांत अचानक असहिष्णुता वाढत असल्याचा साक्षात्कार होत आहे, असे सडेतोड प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेता श्री. विक्रम गोखले यांनी केले आहे. एका कार्यक्रमाच्या वेळी ते येथे बोलत होते.

भन्साळी यांच्या बाजीराव मस्तानी चित्रपटाला विरोध वाढला !

इतिहासाचे विकृतीकरण केल्याचा परिणाम !
     मुंबई - श्रीमंत बाजीराव पेशवे आणि मस्तानी या ऐतिहासिक व्यक्तीरेखांवर आधारित संजय लीला भन्साळी यांच्या बाजीराव मस्तानी या आगामी चित्रपटाला होणारा विरोध दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर या चित्रपटात ऐतिहासिक व्यक्तीरेखांचा अवमान होईल, अशी दृष्ये त्यात आढळून आली. संपूर्ण चित्रपटात आणखी काय विकृतिकरण केले असेल, या विचाराने इतिहासप्रेमी, हिंदुत्ववादी यांनी या चित्रपटाला विरोध केला. पेशव्यांचे वंशज, हिंदुत्ववादी संघटना, इतिहासप्रेमी यांनी या चित्रपटातील अवमानकारक दृष्ये काढून टाकण्यात यावी अथवा या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालावी, अशी मागणी केली आहे. न्यायालयातही या चित्रपटाविरोधात याचिका दाखल करण्याचा विचार चालू झाला आहे.
इतिहासप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी पुढील संपर्क पत्त्यावर निषेध नोंदवत आहेत :
भन्साळी प्रॉडक्शन्स, ६०१/बी, स्वाती मित्र, गुलमोहर क्रॉस रोड, जे.व्ही.पी.डी स्कीम, 
जुहू - ४०० ०४९. दूरभाष क्रमांक : (०२२) २६२३५४७०, २६२३४६७५
संगणकीय पत्ता : contact@slbfilms.com
हिंदुत्ववाद्यांना विनंती ! 
राष्ट्रद्रोही आणि हिंदुद्रोही घटनांचा निषेध संयत मार्गाने करा ! 
      हिंदुद्रोह्यांचा निषेध करण्यामागचा मुख्य उद्देश त्यांचे वैचारिक परिवर्तन करणे, हा आहे. त्यामुळे कोणाचाही निषेध करतांना तात्त्विक सूत्रांच्या आधारे वैचारिक स्तरावर करा ! चुकणार्‍या व्यक्तीला तिच्या चुका सांगून योग्य मार्गावर आणणे, हा व्यापक दृष्टीकोन निषेध व्यक्त करण्यामागे हवा !

मुसलमान संघटनेच्या असहिष्णुतेला मलाही सामोरे जावे लागले होते ! - ए.आर्. रेहमान, संगीत दिग्दर्शक

     मुंबई - देशात असहिष्णुता वाढली आहे. एका चित्रपटाच्या संगीतामुळे रझा अकादमीने माझ्या विरोधात फतवा काढला होता. त्यामुळे मुसलमान संघटनेच्या असहिष्णुतेला मलाही सामोरे जावे लागले होते, असे संगीत दिग्दर्शक ए.आर्. रेहमान यांनी म्हटले आहे. 'महंमद' चित्रपटाला संगीत देण्यावरून मलाही धार्मिक कट्टरतावाद्यांचा विरोध सहन करावा लागला होता. कोणत्याही सूत्रावर होणारा विरोध हिंसक नसावा. तुमचा विरोध दर्शवण्यासाठी एक चांगला मार्ग असतो, असे त्यांनी म्हटले आहे. 

अमीर यांच्याशी संबंधित आस्थापनांना फटका !

अमीर यांच्या या वक्तव्याचा फटका 
     अमीर यांचे संबंध असणार्‍या आस्थापनांनाही बसत आहे. अमीर खान हे अनेक आस्थापनांचे 'ब्रँड अ‍ॅम्बेसेडर' आहेत. ते या आस्थापनांचे विज्ञापन करतात. अमीर यांच्या निषेधार्थ या आस्थापनांवर बहिष्कार घालण्यात यावा, असे आवाहन सामाजिक संकेतस्थळांवरून करण्यात येत आहे. याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभत आहे. अमीर खान यांच्याशी संबंधित स्नॅपडील, टाटा स्काय, सॅमसंग, कोकाकोला, टायटन घड्याळे आदी आस्थापनांच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची मोहिम सध्या जोर धरत आहे.

(म्हणे) 'मोदी इंजेक्शन' घेतलेले असहिष्णुतेच्या विषयावर चवताळून का उठतात ? - राजन खान

असहिष्णुतेला राजकीय रंग देऊ पहाणारे लेखक ! 
     पुणे - देशात वाढत्या असहिष्णुतेविषयी अभिनेते आमीर खान आणि शाहरूख खान यांनी केलेले वक्तव्य साधेच आहे. 'मोदी इंजेक्शन' घेतलेले लगेच यावर चवताळून का उठतात, हे कधी थांबणार, असे लेखक राजन खान यांनी म्हटले आहे. 'हा देश कधीच सहिष्णु नव्हता', असेही त्यांनी म्हटले आहे.

देश आपला न वाटणार्‍यांनी 'सत्यमेव जयते'च्या वल्गना करू नयेत !

देशातील कथित असहिष्णूतेच्या कारणावरून देश सोडून 
जाऊ इच्छिणार्‍या अमीर खान याला 'सामना'द्वारे सडेतोड प्रत्युत्तर 
     मुंबई - ज्यांना हा देश आपला वाटत नाही, त्यांनी उगाच देशभक्तीच्या आणि 'सत्यमेव जयते'च्या वल्गना करू नयेत. देशातील असहिष्णू वातावरणामुळे पत्नीने देश सोडून जाण्याचा सल्ला दिला होता, असे देशद्रोही विधान करणार्‍या अभिनेता अमीर खान यांचा २५ नोव्हेंबरच्या दैनिक सामनाच्या संपादकीयमधून शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी खडसवले आहे. 

तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिराची भूमी आणि दानपेटी यांत भ्रष्टाचार करणार्‍यांना दंडीत करा !

हिंदु विधीज्ञ परिषद आणि हिंदु जनजागृती समिती यांचे मंदिरातील 
भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढ्याचे पुढचे पाऊल !
अधिवक्ता
श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर
     पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील भ्रष्टाचार, कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिर देवस्थानातील अपप्रकार यांच्यानंतर आता तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा आम्ही केलेला अभ्यास येथे देत आहोत.
१. देवस्थानचा कारभार हल्लीपर्यंत हैद्राबादच्या 
निजामाच्या नियमावलीनुसार !
     काहींना प्रश्‍न पडेल की, तुळजापूर देवस्थान सरकारी कधी होते ? अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे की, तुळजापूर हे हैद्राबादच्या निजामाच्या राजवटीत होते. आधीची भांडणे निजामाकडे गेल्यामुळे निजामाने देवस्थानची नियमावली केली होती. त्याला कवायत असे म्हणतात. अगदी अलीकडे शासनाने वेगळा नियम काढून अधिकृतरित्या कह्यात घेईपर्यंतही देवस्थानचा कारभार निजामाच्याच कह्यात होता; म्हणजे त्या अर्थाने देवी निजामाच्याच अधिपत्याखाली हल्लीपर्यंत होती आणि त्याचे कोणालाही सोयरसूतक नव्हते. या कवायतीनुसार चाललेल्या कारभारात देवस्थानच्या विश्‍वस्तांमध्ये जिल्हाधिकारी (जो अध्यक्ष आहे), आमदार, तुळजापूरचा नगराध्यक्ष, जिल्हाधिकारी कार्यालयातील लेखाधिकारी, असे सदस्य आहेत. हे विश्‍वस्त शासकीयच आहेत. यात भक्त कुठेच नाहीत. हे दुर्भाग्य आता अधिकृतरित्या शासन पुढे चालवते आहे; कारण शासनाने अधिकृतरित्या हे देवस्थान कह्यात घेतले आहे.

कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात बंदीवानांकडून गांज्याची मेजवानी

  • नागपूर कारागृहात याआधी करण्यात आलेली रेव्ह मेजवानी, आता कोल्हापूर कारागृहातील गांज्याची मेजवानी पहाता राज्यातील कारागृहे ऐषोरामाचे ठिकाण बनल्याचेच दिसते ! दिवसेंदिवस वाढणार्‍या या प्रकारांवर पोलीस प्रशासनाने तत्परतेने वचक ठेवावा, ही जनतेची अपेक्षा !
  • मेजवानीचे बंदीवानांकडून चलचित्रण
कोल्हापूर - येथील कळंबा कारागृहात बंदीवानांनी गांज्याची मेजवानी केल्याचे चलचित्रण सामाजिक संकेतस्थळांवरून उघड झाले आहे. या चलचित्रणात तेथील काही बंदीवान गांजा ओढत काजू, बदाम आणि मटण खात असल्याचे दिसून आले. या प्रसंगाचे चित्रीकरण कारागृहातीलच एका बंदीवानाने भ्रमणभाषच्या साहाय्याने केले आहे. (बंदीवानांना सामान्यांप्रमाणे सर्व सोयीसुविधा पुरवल्या जाणार असतील, तर कारागृह प्रशासनाचा खर्चिक डोलारा हवाच कशाला ? - संपादक) या सर्व वस्तू बंदीवानांना कशा उपलब्ध झाल्या ?, असा प्रश्‍नही उपस्थित झाला आहे. पुण्यातील एका हत्या प्रकरणात आरोपी झालेल्या ३-४ बंदीवानांनी ही मेजवानी केल्याचे समजते. विशेष म्हणजे या बंदीवानांच्या अंगावर गणवेश नाही. (पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून बंदीवानांना मोकळीक देणार्‍या संबंधितांवर कठोर कारवाई करावी ! - संपादक)

अतिथींना इच्छाभोजन करणार्‍या राजा श्रियाळ अन् त्याची पत्नी चांगुणा यांना भगवान शिवाने मुक्ती देणे

दीपावलीच्या सुट्टीनिमित्त प्रतिदिन वाचा बोधकथा !
साधनाभंग होऊ नये; म्हणून राजा श्रियाळ अन् त्याची पत्नी चांगुणा यांनी एकुलत्या एक मुलाचा त्याच्या संमतीने बळी देणे, त्यामुळे प्रसन्न झालेल्या शिवाने मुलगा जीवंत करणे आणि राजा-राणीला मुक्ती देणे : एकदा नारदांनी शिवपार्वतीजवळ कांतिनगरचा राजा श्रियाळ याच्या धार्मिकतेची फार स्तुती केली. ते म्हणाले, श्रियाळने गेली अनेक वर्षे अन्नसत्र चालवले आहे. तेथे अतिथींना इच्छाभोजन दिले जाते. ते ऐकून शंकराने श्रियाळची परीक्षा घेण्याचे ठरवले. शंकर अतिशय घाणेरडे रूप घेऊन श्रियाळच्या घरी गेला आणि मोठ्याने हाक मारली. अतिथीचा आवाज ऐकून राजा श्रियाळ आणि त्याची पत्नी चांगुणा यांनी त्याचे स्वागत केले. तेव्हा तो अतिथी म्हणाला, तुम्ही मला इच्छाभोजन देणार असाल, तरच माझे पाय धरा; नाहीतर तुमचे सत्त्व घेऊन मी परत जातो. तेव्हा त्याच्या म्हणण्यास होकार देऊन त्यांनी अतिथीला घरात नेले. आसनावर बसवून त्याची पूजा करून त्याची इच्छा विचारली. तेव्हा तो म्हणाला, मला नरमांसाचे भोजन हवे आहे आणि ते मांस तुमच्या पाच वर्षांच्या चिलया बाळाचे हवे. ते शिजवतांना तुम्ही रडलात, तर मी उठून जाईन. तेव्हा काय तो विचार करा.

डॉ. आंबेडकर यांना भारताच्या घटनेमध्ये (संविधानामध्ये) नको असलेले दोन एस् : सेक्युलर (धर्मनिरपेक्ष) आणि सोशालिस्ट (समाजवादी)

२६ नोव्हेंबर - संविधानदिनाच्या निमित्ताने...
मूळ संविधानाचे चित्र
     वर्ष २०१५ च्या प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून प्रसारित झालेल्या संविधानाच्या उद्देशासंदर्भातील जाहिरातीमध्ये सेक्युलर आणि सोशालिस्ट हे दोन शब्द गाळल्यामुळे मोठा क्षोभ उसळला. परिणामी प्रसारमाध्यमे हा संविधानाची पायमल्ली करण्याचा अतिशय घृणास्पद प्रकार असल्याचे वृत्त पसरवण्यात मग्न होती.
१. मोदी शासनाने विज्ञापनात सेक्युलर आणि सोशालिस्ट हे 
दोन शब्द गाळल्याविषयी प्रसारमाध्यमांचा थयथयाट !
     द हिंदु या दैनिकात सदर शब्द गाळल्याविषयाच्या वृत्तात अनिता जोशुआ म्हणतात की, गेल्या काही दिवसांमध्ये अल्पसंख्यांकांवर झालेल्या आक्रमणांमुळे या निर्णयाने प्रश्‍नचिन्ह उभे केले आहे. अल्पसंख्यांकांवर आक्रमणे ? कोठे ? गेल्या काही दिवसांमध्ये अशी कोणतीही आक्रमणे अल्पसंख्यांकांवर झालेली नाहीत. अर्थात काही वाद निर्माण झालेले आहेत; परंतु ते बनावट असून त्यांत काहीही तथ्य नाही. परंतु आक्रमणे ? असेच काहीतरी सांगून ही प्रसारमाध्यमे जनतेच्या मनात भीती निर्माण करत असतात.

अनधिकृत मंदिरांवर कारवाई न होण्यासाठी आज शिवसेनेचा महापालिकेवर भव्य निषेध मोर्चा !

कोल्हापूर - शहरातील अनधिकृत मंदिरांवर करण्यात येणार्‍या कारवाईचा निषेध करण्यासाठी २६ नोव्हेंबर या दिवशी सकाळी ११ वाजता शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर भव्य निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्च्यामध्ये शिवसेना-युवासेनेचे पदाधिकारी, करवीर नगरीतील नागरिक आणि हिंदूंनी शिवसेनेचे कार्यालय शिवालय, शनिवार पेठ येथे उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेनेचे विभागप्रमुख श्री. आेंकार परमणे यांनी केले आहे.

स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)चे प्रसारकार्य

१. संकेतस्थळाच्या संदर्भातील संख्यात्मक आढावा 
१ अ. विविध माध्यमांतून संकेतस्थळाला भेट देणार्‍यांची संख्या 

महाराष्ट्रात बॉम्बनाशक पथकांची वानवाच !

मुंबई - येथे बॉम्बनाशक पथकांची आवश्यकता असल्याचे २६/११ च्या आक्रमणानंतर सुरक्षेसाठी गठीत केलेल्या राम प्रधान समितीने वर्ष २००८ मध्येच निदर्शनास आणून दिले होते; मात्र अजूनही बॉम्बनाशक पथकांची संपूर्ण राज्यात वानवाच आहे. (राज्यावर प्रतिदिन आतंकवादी आक्रमणाचे सावट असतांना बॉम्बनाशक पथकांचा तुटवडा असणे, ही दुःस्थितीच म्हणावी लागेल ! - संपादक) २० संवेदनशील जिल्ह्यांमध्ये बॉम्बनाशक पथकांची स्थापना करण्यात यावी, असा प्रस्ताव वर्ष २००९ मध्ये राज्य गृहमंत्रालयाकडे देण्यात आला होता; पण तसे अजून करण्यात आलेले नाही.

भारताला दिशा देण्यात अपयशी ठरलेला लोकराज्याचा चौथा स्तंभ आणि त्याचे घटक !

       अजूनही आपण भारताची घटना सिद्ध करू शकलो नाही. आपली राष्ट्रभाषा निश्‍चित नाही. कुठल्याही राष्ट्रचेतनेचा जन्म झाला नाही कि कुठलीही रचनात्मक सामाजिक क्रांती होऊ शकली नाही, या सर्वांमागे साहित्यिक, लेखक आणि पत्रकार हे घटक प्रामुख्याने उत्तरदायी आहेत. याविषयी डॉ. रामसेवक शुक्ल म्हणतात, लेखक जिवंत असल्याची जाणीव समाजाला नसेल, तर असे लेखक केवळ प्रेतवत आहेत, हे लेखकांनी लक्षात ठेवले पाहिजे. जोपर्यंत समाजात परिवर्तन करणार्‍या लेखणीचे शिपाई निर्माण होणार नाहीत, जन्म घेणार नाहीत, तोपर्यंत या देशाचे भविष्य अंधारातच आहे.

चीनच्या भारतविरोधी कारवायांना प्रत्युत्तर केव्हा ?

     नेपाळच्या हद्दीत असलेल्या सखल भागावर ताबा घेण्याचा भारत प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप नेपाळचे उपपंतप्रधान सी.पी. मैनाली यांनी केला आहे. यात भरीस भर म्हणून माओवादी नेते पुष्पकमल दहल ऊर्फ प्रचंड यांनी भारताला चेतावणी दिली आहे की, भारत-नेपाळ संबंध सौहार्दपूर्ण मार्गाने सुधारावेत; म्हणून नेपाळने सातत्याने प्रयत्न केले आहेत. याउपर भारताची हीच हटवादी भूमिका असेल, तर आम्हीही लढण्यास सज्ज आहोत. नेपाळसारखा एक छोटा देश भारतासारख्या मोठ्या आणि कायम साहाय्य करणार्‍या देशाला आव्हान देतो. तेही कोणाच्या जोरावर, तर अर्थातच त्यामागे चीन आहे, हे समजायला भारतीय नागरिक दूधखुळे नाहीत. 

शिव-शक्ती संगम कार्यक्रमासाठी सांगली जिल्ह्यातून किमान ५ सहस्र स्वयंसेवक जाणार !

सांगली, २५ नोव्हेंबर (वार्ता.) - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने ३ जानेवारी २०१६ या दिवशी पुणे येथे शिव-शक्ती संगम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या संगमासाठी सांगली जिल्ह्यातून किमान ५ सहस्र स्वयंसेवक जाणार आहेत. या कार्यक्रमाची पत्रिका २४ नोव्हेंबर या दिवशी सांगलीचे आराध्य दैवत श्री गणेशाच्या चरणी अर्पण करण्यात आली, अशी माहिती जिल्हा संघचालक श्री. विलास चौथाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी सर्वश्री मनोज पाटील, रमेश कोटीभास्कर, बाळासाहेब पाटील, नितीन देशमाने, जयंतराव रानडे उपस्थित होते.
     श्री. चौथाई पुढे म्हणाले की, पश्‍चिम महाराष्ट्र प्रांताच्या होत असलेल्या या संगमासाठी सुमारे १ लक्ष स्वयंसेवक येतील अशी अपेक्षा आहे. या कार्यक्रमासाठी २०० फूट रुंद आणि १०० फूट लांबीचे भव्य व्यासपीठ सिद्ध करण्याचे काम चालू आहे. हे व्यासपीठ प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक श्री. नितीन देसाई हे करत आहेत. हा कार्यक्रम ४ घंटे चालणार असून यात सरसंघचालक श्री. मोहनजी भागवत हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी या कार्यक्रमात त्यांचे विचार ऐकण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.

अधःपतित आणि अश्‍लील मनोवृत्तीपासून समाजाला वाचवा !

     मासिकांमध्ये सुंदर स्त्रीचे अवयव दाखवणारी छायाचित्रे येतात. त्याविषयी संबंधितांना विचारले, अशा छायाचित्रांच्या ऐवजी तुमच्या नियकालिकात (मॅगझिनमध्ये) सूर्योदय, सूर्यास्त किंवा निसर्गातील नयनरम्य छायाचित्रे का छापत नाही ?, तर त्यांचे म्हणणे असते, मग आमचे नियकालिक खपणार नाही. 
     ही अधःपतित आणि अश्‍लील मनोवृत्ती आहे आणि तिच्यापासून समाजाला वाचवायचे आहे. मातृदेवो भव । ची भावना समजून घेऊन जगदंबेचे काम करण्यात गौरव अनुभवुया ! 
(संदर्भ : तत्त्वज्ञान, जुलै २००९)

सांगोला, जि. सोलापूर येथील सौ. शुभांगी पाटणे यांना आलेल्या अनुभूती

सौ. शुभांगी पाटणे
१. प.पू. गुरुदेवच आधार आहेत, याची जाणीव असल्याने पतीला 
अटक होण्याच्या प्रसंगातही स्थिर राहू शकणार्‍या सौ. शुभांगी पाटणे !
१ अ. पतीला अटक करण्यासाठी पोलीस आले असतांना त्यांनी पतीला घेऊन जाण्यासाठी घाई केल्यावर साधिकेने सूक्ष्मातून प.पू. गुरुदेवांना विचारणे आणि त्यानुसार कृती करणे : माझे यजमान श्री. संतोष पाटणे यांना सांगोला येथील हिंदू-मुसलमान तणावाचे वास्तववादी वृत्त दिल्याने अटक करण्यासाठी ७ पोलीस कर्मचारी आले. यासाठी आम्हाला कायदेशीर साहाय्य करण्यासाठी आमचे अधिवक्ता श्री. नीलेश सांगोलकर यांना पंढरपूर येथून सांगोला येथे येण्यासाठी १ घंटा लागणार होता; म्हणून मी सूक्ष्मातून प.पू. गुरुदेवांना विचारले, प.पू. गुरुदेव, मी पोलिसांना काय उत्तर देऊ ? तेव्हा त्यांनी सांगितले, अजून जेवण व्हायचे आहे,

हिंदु जनजागृती धर्मजागृती सभेला जाण्याची अनेक दिवसांपासून असलेली इच्छा पूर्ण झाल्यामुळे वेगळाच आनंद होणे

कु. वर्षा जबडे
प.पू. गुरुदेव,
तुमच्या चरणी वंदन !
     प.पू. गुरुदेव, मी तुमच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञ आहे. तुम्ही माझी कित्येक वर्षांची हिंदु जनजागृती धर्मजागृती सभेला जाण्याची इच्छा पूर्ण केलीत. घरी असतांना मी कधी धर्मजागृती सभेला गेले नव्हते. २.३.२०१४ या दिवशी म्हापसा, गोवा येथे आश्रमातून धर्मजागृती सभेला गेले होते. देवा, तुम्ही आज मला वेगळाच आनंद अनुभवायला दिलात.

साधकांना सूचना

   पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
काल पौर्णिमा झाली.

फलक प्रसिद्धीकरता

भारत आतंकवाद्यांचा बीमोड कधी करणार ?
    आतंकवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील तंगधार येथील भारतीय सैन्याच्या ३१ गोरखा रायफल्स या सैनिकी तळावर आक्रमण केले. या आक्रमणात १ सैनिक हुतात्मा झाला. मागील आठवड्यात अशाच प्रकारे आतंकवाद्यांशी झालेल्या चकमकीत कर्नल संतोष महाडिक हुतात्मा झाले होते.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
       Kashmirme atankiyonke akramanme 1 sainik hutatma !
   Dadri kandpar chhillanevale aise samay kyo shant baithte hai ?
जागो ! 
       कश्मीरमें आतंकीयोंके आक्रमणमें १ सैनिक हुतात्मा !
   दादरी कांडपर चिल्लानेवाले ऐसे समय क्यों शांत बैठते है ?

शिकण्याची वृत्ती, तळमळ, जिज्ञासा, सेवाभाव, प्रेमभाव असणारे ६१ टक्के आध्यात्मिक स्तर गाठलेले उद्योगपती श्री. अनंत कामत !

  
श्री. अनंत कामत
    १५.६.२०१५ या दिवशी श्री. अनंत कामत यांच्याशी प्रथमच ओळख झाली. त्यांनी माझ्या साधनेविषयी आणि माझ्या घरच्यांविषयी सर्व जाणून घेतले. तेव्हा मी पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय कसा घेतला ?, याविषयी विचारले आणि पुष्कळ जिज्ञासाने त्यांनी जाणून घेतले. मी म्हणाले, माझ्यासारख्या बर्‍याच साधिका आश्रमात आल्या आहेत. तेव्हा ते म्हणाले, हो. मलाही पूर्णवेळ साधक व्हायचे असल्याने मी तुझा अनुभव जाणून घेतला. यातून मनाची सिद्धता कशी होते ?, हे समजले. हे सांगत असतांना त्यांच्यासमवेत एक आसामचे धर्माभिमानी होते. त्यांना ते साधनेचे महत्त्व समजावून सांगत होते.

नामजपाच्या वेळी भाव जागृत स्थितीत प.पू. डॉक्टरांकडे भाव-भक्तीची भीक मागतांना स्फुरलेली कविता !

सौ. गौरी कुलकर्णी
     वर्ष २०१५ च्या गुरुपौर्णिमेच्या आधी एक दिवस नामजप करतांना अकस्मात् प.पू. डॉक्टर काहीतरी बोलत आहेत, असे जाणवले. ते म्हणाले, काय हवे या गुरुपौर्णिमेला ? क्षणाचाही विलंब न होता उत्तर आले भाव !
     प.पू. डॉक्टर, मला भाव-भक्तीची भीक घाला आणि त्यानंतर जप पूर्ण होईपर्यंत माझी भावजागृती होत होती, तसेच प.पू. डॉक्टरांची आठवणही येत होती. आधी माझ्या मनाची स्थिती थोडी हळवी झाली होती. नंतर ती पालटली. तेव्हा मला भाव असेल, तर अष्टांगसाधना आणि सर्वच शक्य आहे, असे वेगवेगळे विचार देव सुचवत होता. या स्थितीत असतांना स्फुरलेली कविता येथे देत आहे.

तळमळीने सेवा करून कृष्णानंदात रममाण होणार्‍या बेंगळुरू येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. नीला वेगाड !

सौ. नीला वेगाड
     सौ. नीला आशिष वेगाड (वय ४० वर्षे) या गेल्या १५ वर्षांपासून सनातनच्या माध्यमातून साधना करत आहेत. त्या वही, पंचांग आणि ग्रंथ यांच्या वितरणाचीही सेवा करतात.
१. प्रेमभाव
     अक्कांच्या घरी कुणीही कधीही गेले, तरी त्या त्यांचा पाहुणचार केल्याविना परत पाठवत नाहीत. एकदा मी त्यांच्या विभागात प्रसारासाठी गेले आणि उशीर झाला. मी त्यांना दूरभाष करून विचारले, तुमच्या घरी थोडा वेळ येऊन ताजेतवाने होऊन गेलो, तर चालेल का ? त्यांनी लगेच होकार दिला आणि आमच्यासाठी अल्पाहाराचे नियोजनही केले.

रामनाथी आश्रमातील सूक्ष्म जगताच्या संशोधनावर आधारित प्रदर्शन पाहिल्यावर जिज्ञासूंनी दिलेले अभिप्राय

अ. संस्कृती संवर्धनासाठी वैज्ञानिक दृष्टीकोनावर आधारित उत्कृष्ट प्रदर्शन ! - श्री. नागेश सीताराम गोसावी, मळा, पणजी, गोवा
आ. प्रदर्शनातून प.पू. डॉ. आठवले यांना आलेल्या अनुभूती अद्वितीय आहेत, असे वाटले. हलणारा आरसा, दैनिकावर कणांची अनुभूती हे सर्व अवाक करणारे आहे. - नारायण बा. राटवड, गोवा
इ. मनाला प्रसन्न वाटले. देवाप्रती भाव निर्माण झाला. मी एक हिंदू आहे, याचा अभिमान वाटला. पुढे जाऊन इतरांप्रमाणे काहीतरी करायला हवे, जेणेकरून आपला धर्म, देव आणि देश समृद्ध होईल.
- श्री. रवळनाथ धर्मा तुळजकर, नागझर पेडणे, गोवा.

सहसाधकांबरोबर असण्याचा आनंद !

 
परात्पर गुरु डॉ. आठवले
    एकच मूल असले, तर त्याला वडिलांची संपत्ती मिळेल; पण भावंडांबरोबर खेळण्याचा आनंद मिळणार नाही ! याउलट साधकांना सहसाधकांबरोबर असण्याचा आनंद आयुष्यभर मिळतो. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१७.१०.०१५)

भाग्यनगर, आंध्रप्रदेश येथील हिंदु समाजाच्या उत्कर्षासाठी कार्य करणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. नरसिंगराव आर्य ! (वय ७५ वर्षे)

श्री. नरसिंगराव आर्य
     भाग्यनगर, आंध्रप्रदेश येथील श्री. नरसिंगराव आर्य हे मासिक सनातन प्रभातचे वर्गणीदार असून गेल्या ५ वर्षांपासून ते सनातन संस्थेच्या संपर्कात आहेत. ते आर्य समाजचे कृतीशील कार्यकर्ते आहेत. विश्‍व हिंदु परिषदेच्या साहाय्याने त्यांनी आतापर्यंत पुष्कळ यज्ञ आणि घरवापसीचे कार्यक्रम केले आहेत. आतापर्यंत हिंदु समाजाच्या उत्कर्षासाठी त्यांनी पुष्कळ यज्ञही केले आहेत. प्रत्येक यज्ञाला अंदाजे ५०० रुपये व्यय येत असून बर्‍याचदा हे यज्ञ ते स्वखर्चाने करतात. त्यांच्यातील जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.

सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमेचे निमंत्रण देणारे होर्डिंग्ज पाहिल्यावर नामजप आपोआप चालू होऊन होर्डिंग्जमधील सात्त्विकतेची अनुभूती घेता येणे

     गुरुपौर्णिमेला दोन दिवस शिल्लक होते. सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमेचे निमंत्रण देणारे होर्डिंग्ज रत्नागिरीत सर्वत्र लावले होते. मी माझ्या मुलीला शाळेत पोहोचवायला जात असतांना मला हे होर्डिंग्ज दिसले. मला त्यांच्याकडे पाहून पुष्कळ आनंद झाला. हे होर्डिंग्ज पाहून सर्व लोक कार्यक्रमाला उपस्थित राहू देत, अशी प्रार्थना झाली आणि माझा आपोआप नामजप चालू झाला. पुष्कळ पुढे गेल्यावर माझ्या लक्षात आले की, माझा नामजप संथ गतीने चालू आहे. या वेळी मनाला शांत वाटत होते. इतर वेळी दुचाकी चालवत असतांना मला प्रयत्नपूर्वक नामजप करावा लागतो. आपल्या होर्डिंग्जमध्ये किती सात्त्विकता आहे आणि गुरूंचे चैतन्य कसे कार्य करते, याची मला त्या वेळी जाणीव झाली.
- सौ. दीपा आैंधकर, रत्नागिरी (३०.७.२०१५)

भावपूर्ण सेवा करणार्‍या आणि कर्तेपणा अर्पण करणार्‍या ६४ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या श्रीमती भारती गलांडेकाकू !

  
श्रीमती भारती गलांडे
   श्रीमती गलांडेकाकू (वय ५० वर्षे) या रामनाथी आश्रमातील स्वयंपाकघरात सेवा करतात. त्यांची प.पू. डॉक्टरांवर दृढ श्रद्धा आहे. त्या प.पू. डॉक्टरांसाठी जेवण बनवण्याची सेवा करतात. ही सेवा करतांना त्यांचा भाव किती उच्च प्रतीचा आहे, हे साधकांना शिकायला मिळते. त्या सतत अनुसंधानात राहून सेवारत असतात. सहसाधिकांना सांभाळून घेणे, काटकसर, प्रेमभाव या गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळतात.

आजारपणात साधिकेचा नामजप न झाल्याने तिचे मन पुष्कळ अस्वस्थ होणे आणि श्रीकृष्णाने सुचवल्यानुसार त्याचे चित्र काढतांना इतर वेळी होणारा शारीरिक त्रास न जाणवणे

कु. भाग्यश्री कल्लापा लोकसुरे
     ६.११.२०१३ या दिवसापासून जवळजवळ संपूर्ण एक मास (महिना) मी आजारी होते. त्यामुळे मी नामजप करू शकत नव्हते. नामजप होत नसल्याने माझे मन पुष्कळ अस्वस्थ झाले होते. काय करावे ?, ते मला कळेना. तेव्हा सहज म्हणून मी श्रीकृष्णाचे चित्र काढण्याचा प्रयत्न करत होते आणि त्या वेळी मला सर्व चित्रे सहज सुचू लागली. जसे श्रीकृष्ण सुचवेल, तशी मी चित्रे काढत गेले. इतर वेळी मला पुष्कळ शारीरिक त्रास होत होते; पण जेव्हा चित्र काढत असे, तेव्हा चित्रात आणि श्रीकृष्णात मन रमल्याने काहीच त्रास जाणवत नव्हते. श्रीकृष्णा, मी तुझी पुष्कळ कृतज्ञ आहे. - कु. भाग्यश्री कल्लापा लोकसुरे, निपाणी

रामनाथी आश्रमावर कमानीसारख्या आकारात निर्माण झालेल्या इंद्रधनुष्यातून महर्षींनी कठीण काळात आम्ही तुमच्याबरोबर आहोत, असे आश्‍वस्त करणे

     पानसरे प्रकरणाच्या संदर्भात सध्या सनातनच्या साधकांना बरेच त्रास सहन करावे लागत आहेत. आश्रमातील साधकांच्या आध्यात्मिक त्रासांत वाढ होणे, सेवा करतांना काहीही न सुचणे, प्राणशक्ती अल्प असणे, वातावरणातील दाब वाढणे, अशा अनेक प्रकारच्या त्रासांना साधकांना सामोरे जावे लागत आहे. तसेच सर्वत्रच्या साधकांच्या मागे पोलिसांनी चौकशीचा ससेमिरा चालू केला आहे.

तमिळनाडूमधील तिरुवण्णामलई येथील कार्तिक दीपम्चे महत्त्व आणि वर्ष २०१५ च्या कार्तिक दीपम् महोत्सवाच्या निमित्ताने सप्तर्षि जीवनाडीच्या माध्यमातून महर्षींनी सनातनच्या कार्याला दिलेला भरभरून आशीर्वाद !

पू. (सौ.) अंजली गाडगीळ
तमिळनाडूमधील तिरुवण्णामलई येथील प्रसिद्ध अण्णामलई
 पर्वत म्हणजे लिंगोद्भव शिवाचे जणू प्रत्यक्ष रूप
     तमिळनाडूमधील तिरुवण्णामलई या गावात अरुणाचल पर्वत आहे. यालाच अण्णामलई असेही म्हणतात. हा पर्वत म्हणजे प्रत्यक्ष शिवच आहे आणि असा पुराणामध्येही उल्लेख आहे. लिंगोद्भव शिवाचे रूप म्हणजेच प्रत्यक्ष अण्णामलई, असे आहे. असे म्हणतात की, कैलासाला जाण्याने मुक्ती मिळते, तर अण्णामलईच्या केवळ स्मरणानेच मुक्ती मिळते. अशी याची ख्याती आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

    
परात्पर गुरु डॉ. आठवले
     कुठे भारतावर वरुणदेवाची कृपा व्हावी; म्हणून काहीच न करणारे शासन, तर कुठे यासाठी बारा ज्योतिर्लिंगे आणि अन्य ठिकाणी यज्ञ करत असलेले श्री योगीराज वेद विज्ञान आश्रमाचे बार्शी, जिल्हा सोलापूर येथील अश्‍वमेधयाजी नाना काळे !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

वाटाड्या
संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
देव वाटाड्या आहे. मार्गात ठेच लागते; कारण मार्गात खाचखळगे असतात. आपण वाटाड्यावर संतापतो, तरी तो सांगतो, पुढे मार्ग चांगला आहे.
भावार्थ : येथे वाटाड्या म्हणजे मोक्षाचा मार्ग दाखविणारे गुरु. ठेच लागते म्हणजे त्रास होतो, आध्यात्मिक प्रगती खुंटते. मार्गात खाचखळगे असतात म्हणजे साधनेत अडचणी असतात. पुढे मार्ग चांगला आहे म्हणजे आध्यात्मिक प्रगती चांगली होणार आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे ॐ

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मनाला साधना करण्याचे वळण लावा 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
        ऋतं वच्मि । सत्यं वच्मि ।, म्हणजे मी यथोचित असेच सांगत आहे; सत्य तेच सांगत आहे. 
स्पष्टीकरण : सत्य पालटू शकते, उदा. देवदत्त तरुण आहे, हे वाक्य आता सत्य असले, तरी देवदत्त वृद्ध झाल्यावर हे वाक्य असत्य ठरते; परंतु ऋत कधीही पालटत नाही, उदा. सूर्य पूर्व दिशेला उगवतो. ऋत म्हणजे न पालटणारे नैसर्गिक सत्य. 
     म्हणजे सत्य आणि नित्य जे असेल, त्याची उपासना करण्याचे वळण मनाला लावावे, म्हणजे साधकांची उन्नती वेगाने होते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

अमीर खान यांचा देशद्रोह !

     चित्रपटातील संवाद वा दृश्ये, मग ती कितीही देशभक्तीने भारलेली असोत, त्याचा वास्तवाशी काडीचाही संबंध नसतो, हे अभिनेता अमीर खान यांनी स्वत:च दाखवून दिले ते बरे झाले. देहलीतील पत्रकारांशी संबंधित एका कार्यक्रमात अभिनेता अमीर खान यांच्याशी संवास साधण्यात आला. पत्रकारांच्या कार्यक्रमात अभिनेत्याची मुलाखत कशासाठी, असा असहिष्णु प्रश्‍न कुणालाही पडता कामा नये ! असो. या कार्यक्रमात खान यांनी देशातील वाढत्या असहिष्णुतेमुळे पत्नीने देश सोडण्याचा समुपदेश (सल्ला) दिला होता, असे विधान केले. यावर देशभरातील राष्ट्रप्रेमींनी खान यांच्यावर सडकून टीका केली. यानिमित्ताने अमीर खान यांचा भारतद्वेष ठळकपणे जनतेसमोर आला.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn