Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

गुरुनानक जयंती 
------------------------------------------
प.पू. भगवानदास महाराज यांची पुण्यतिथी 
------------------------------------------ 
कार्तिकस्वामी दर्शन 
------------------------------------------ 
आज त्रिपुरारि पौर्णिमा

(म्हणे) असहिष्णुतेमुळे पत्नीने देश सोडायचा सल्ला दिला !

 • देशातील कथित असहिष्णु वातावरणाच्या संदर्भात अमीर खान यांचा कांगावा !
 • बिहार, उत्तरप्रदेश येथे अमीर खान यांचे फलक जाळले !
 • हिंदु सेनेकडून खान यांच्या घराबाहेर निदर्शने !
 • केजरीवाल, रझा मुराद आदींकडून खान यांची पाठराखण !
मुंबई, २४ नोव्हेंबर - देशातील वाढत्या असहिष्णुतेमुळे पत्नीने देश सोडण्याचा समादेश (सल्ला) दिला होता, असे विधान करत अभिनेता अमीर खान याने पुरस्कार वापसी चळवळीचे समर्थन केले आहे. नवी देहली येथील एका पुरस्कार सोहळ्यात केलेल्या या वक्तव्यानंतर अमीर खान यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. (अमीर खान यांनी खरेच देश सोडून इतर देशांत रहावे. भारतातील हिंदूंपेक्षा तिथे सहिष्णु वृत्तीचे लोक आहेत का, हे त्यांचे त्यांनाच समजेल. - संपादक)
    ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, तसेच परेश रावल यांनी देशाला मातृभूमी मानणारा माणूस देश सोडून जाण्याचा विचारच करू शकत नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त करून अमीर खान यांच्या देशभक्तीविषयी शंका उपस्थित केली आहे. शासकीय विज्ञापनांच्या माध्यमातून अतुल्य भारतची ओळख करून देणार्‍या अमीर खान यांच्यासाठी भारत गेल्या काही मासांमध्ये अचानक असहिष्णु कसा झाला, भारत सोडून त्याची पत्नी कोणत्या देशात जाऊन रहाणार आहे, असे प्रश्‍न खेर यांनी ट्विट करून उपस्थित केले आहेत. पीके चित्रपटामुळे हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्या जाऊनही अमीर खान यांना असहिष्णुतेचा सामना करावा लागला नाही, याची आठवणही परेश रावल यांनी करून दिली आहे.
    मुंबई येथील हिंदु सेनेने अभिनेता अमीर खान यांच्या विरोधात आंदोलनाची चेतावणी दिली असल्याने त्यांच्या घराबाहेर मुंबई पोलीस मोठ्या प्रमाणात पहारा देत आहेत. राज्य राखीव दलाच्या तुकड्याही येथे तैनात केल्या आहेत.
अभिनेते रझा मुराद यांचे समर्थन !
(म्हणे) अमीर असे का बोलला, ते जाणून घ्या !
     अमीर असहिष्णुतेविषयी बोलला, म्हणजे त्याला काहीतरी त्रास झालाच असेल. त्यामुळे त्याला विरोध करण्यापेक्षा तो असे का म्हणाला, हे जाणून घेणे आवश्यक आहे, असे अभिनेता रझा मुराद म्हणाले.
     समाजवादी पक्षाचे आझम खान म्हणतात, अमीरची पत्नी मुसलमान नसून हिंदु आहे. सत्य आहे. मुलांच्या भविष्याचा विचार केला आहे. त्यामुळे त्याला दोष देऊ नका, असे विधान यांनी केले आहे.

तथाकथित पुरोगामीवाल्यांच्या निर्धार सभेत सनातनविरोधी गरळओकीचा फुसका बार !

 • सर्व साम्यवाद्यांच्याच कार्यालयांचे कोंबिंग ऑपरेशन व्हायला हवे; कारण ज्या प्रकारे डाव्या चळवळीतून माकप जन्माला आला आहे, त्याच चळवळीतून नक्षलवादी चळवळ जन्माला आली. आज नक्षलग्रस्त भागांमध्ये जेवढे नक्षलवादी साहित्य मिळणार नाही, तेवढे साहित्य डाव्यांच्या घरात मिळेल. या पार्श्‍वभूमीवर भारत पाटणकर माकपवाल्यांच्या प्रत्येक कार्यालयात आणि कार्यकर्त्यांच्या घराघरांत पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करावे, अशी मागणी करतील का ?
 • नेत्यांमधील मतभेदांमुळे ८०० लोकांची कथित विराट निर्धार सभा विस्कळीत !
 • रुद्र पाटील यांनी फरारी झाल्यानंतर विवाह केल्याचा भारत पाटणकर यांचा जावईशोध !
 • अन्य किरकोळ संघटनांच्या कथित प्रमुखांची सनातन संस्था आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर नेहमीचीच टीका !
कोल्हापूर - सनातन संस्था आणि अभिनव भारत यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठीची कथित विराट निर्धार सभा २४ नोव्हेंबर या दिवशी दुपारी १ ते ३ या वेळेत येथील दसरा चौकात पार पडली. या सभेतील वक्त्यांमध्ये ताळमेळ नव्हता. आंदोलनाची कोणतीही ठोस दिशा, आंदोलनाचा नेमका हेतू, नेमकी वैचारिक बैठक किंवा निर्धार या नेत्यांत नव्हता. त्यामुळे प्रत्येकजण या सभेनंतर काय करायचे ?, यासाठी पुढच्या वक्त्याकडे बोट दाखवून खाली बसायचा. परिणामी ही सभा केवळ सनातनविरोधी गरळओकीच्या प्रदर्शनाचा फुसका बार ठरली. या वेळी श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर म्हणाले की, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य हे अदानी, अंबानी यांच्यासारख्या धनदांडग्यांना आणि सनातन संस्था, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यासारख्या धर्मांध संघटनांना आपले वाटते. व्हॉट्स अ‍ॅप गटात कुणीतरी आम्ही नक्षलवादी आहोत, असे म्हटले की, पोलीस तत्परतेने कारवाई करतात; मात्र जे राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही आहेत, त्यांना संपवले पाहिजे, सर्बियासारख्या देशात आम्ही स्वसंरक्षण प्रशिक्षण घेतले आहे, असे राजरोसपणे लिखाण करणार्‍या सनातन प्रभातवर कारवाई का होत नाही ? आजवर सनातनच्या कुणाचीही चौकशी का केली नाही. (म्हणजे राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही यांना या देशात पोसत रहायचे आणि त्यांना त्यांची कुकृत्ये करू द्यायची, असे भारत पाटणकर यांना सुचवायचे आहे का ? सर्बियासारख्या देशात सनातनचे कार्यच नसतांना स्वसंरक्षण प्रशिक्षण कसे घेणार ? त्यासंदर्भात कोणते लिखाणही सनातन प्रभातने केलेले नाही ! केवळ भूलथापा मारून कार्यकर्त्यांच्या मनात विष पेरण्याचे कामच पाटणकर करत आहेत ! कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येच्या नंतरही सनातनच्या अनेक साधकांची चौकशी केली, त्याची पाने भरभरून अन्य वृत्तपत्रांनी वृत्ते दिलेली असतांना सनातनच्या कुणाचीही चौकशी झाली नाही, असे सरळसरळ खोटे बोलणारे पाटणकर ! - संपादक) सनातनवाल्यांचे कोंबिंग ऑपरेशन करा, अशी आमची फडणवीस शासनाकडे मागणी आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने याचिका आदेशासाठी ठेवली !

मशिदींवरील बेकायदेशीर भोंग्याचे प्रकरण
    मुंबई, २४ नोव्हेंबर (वार्ता.) पुण्याचे एक सामाजिक कार्यकर्ते श्री. शैलेंद्र दीक्षित यांनी मुंबई उच्च न्यायालयात पुण्यातील मशिदींवरील अवैध भोंगे आणि कायद्याची कार्यवाही करण्यामधील पोलिसांची अनास्था यांविषयीची महत्त्वाची माहिती माहितीच्या अधिकारात मिळवली होती. त्यावरून वर्ष २०१४ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. नवी मुंबईच्या मशिदींवरील अवैध भोंग्यांबाबत श्री. संतोष पाचलग यांनी दाखल केलेली याचिका आणि श्री. शैलेंद्र दीक्षित यांची याचिका २४ नोव्हेंबरला एकत्रितपणे सुनावणीसाठी ठेवण्यात आली होती.
     शासनाने आवश्यक ती कारवाई केली नसल्याचे प्रतिपादन श्री. पाचलग यांच्यावतीने बाजू मांडतांना अधिवक्ता श्री. धनुरे यांनी केले, तर शासनाने आपली बाजू मांडावी, असा आदेश उच्च न्यायालयाने वारंवार देऊनसुद्धा शासनाने आपले म्हणणे मांडले नाही, हे अत्यंत गंभीर आहे. पुण्यातील मशिदींवरील अवैध भोग्यांचा विषय तर ऐरणीवर आहेच; तथापि ध्वनीप्रदूषणाचा एकूण कायदा पाहिला, तर सर्वसामान्यांना न्याय मिळणे अवघड आहे.

बाजीराव मस्तानी चित्रपटाला प्रमाणपत्र देऊ नये !

हिंदु जनजागृती समितीची चित्रपट परिनिरीक्षण मंडळाकडे मागणी
     मुंबई - चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांच्या आगामी बाजीराव मस्तानी या चित्रपटचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. यात दाखवण्यात आलेल्या पिंगा या गाण्यातून इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आल्याचे लक्षात आले. बाजीराव, मस्तानी, काशीबाई आदी सत्य व्यक्तीरेखांवर आधारित या चित्रपटात त्यांना ज्याप्रमाणे प्रदर्शित करण्यात आले आहे, त्यातून इतिहासाचे विकृतीकरण तर होतेच; पण मराठी कुलीन स्त्रियांचा अवमानही होतो. त्यामुळे हिंदुत्ववादी, इतिहासप्रेमी यांनी या चित्रपटाला विरोध केला आहे. या चित्रपटाला प्रमाणपत्र देऊ नये, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. तशा आशयाचे पत्र समितीने मंडळाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांना पाठवले आहे.

सनातन संस्थेच्या कोल्हापूर येथील कार्यालयाला हिंदुत्ववाद्यांचे संरक्षण !

 • सनातनच्या कार्यालयाला संरक्षण देणार्‍या हिंदुत्ववाद्यांचे आभार !
 • सनातनच्या कार्यालयासमोर संरक्षणासाठी आलेले हिंदुत्ववादी
कोल्हापूर - येथे पुरोगामी संघटनांनी आयोजित केलेल्या विराट निर्धार परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर येथील शाहूपुरी, ४ थी गल्ली येथे मध्ये असलेल्या सनातन संस्थेच्या कार्यालयाला संरक्षण देण्यासाठी हिंदुत्ववाद्यांनी गर्दी केली. सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हिंदुत्ववाद्यांनी संरक्षण दिले. या वेळी ४ पोलीसही संरक्षणासाठी आले होते.
सनातनच्या कार्यालयाला संरक्षण देणारे धर्माभिमानी हिंदू !

सौदी येथील एका धर्मगुरूने ज्यूविरुद्ध केलेल्या प्रक्षोभक प्रवचनामुळे अमेरिकेने सौदी अरेबियाच्या अमेरिकेतील राजदूताला कडक शब्दात तंबी देणे

     सौदी अरेबियाच्या सरकारच्या माहिती खात्याने एका प्रमुख शासकीय धर्मगुरुने केलेल्या प्रक्षोभक प्रवचनाची ध्वनिफित मिळवली आहे. हे प्रवचन शेख साद अल्-बराईक याने रियाधमधील एका शासकीय मशिदीत दिले होते. त्या ध्वनीफितीचे शीर्षक आहे, माकडाने मशीद बाटवली. येथे माकड म्हणजे ज्यू असा अर्थ आहे. त्या ध्वनीफितीत अल्-बराईकने मुसलमानांना ज्यूंच्या स्त्रियांना बटीक बनवण्याचे आवाहन केले होते.

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने डिसेंबरमध्ये श्रीलंकेत होण्याची शक्यता !

सीमेवर पाककडून प्रतिदिन भारतीय सैनिकांवर गोळीबार होत असतांना पाकशी क्रिकेट 
मालिका खेळणे म्हणजे हुतात्मा सैनिक, तसेच संपूर्ण देशवासीय यांचा अवमान आहे !
     नवी देहली - भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मालिका संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यु.ए.ई.) होणार होती; परंतु फिक्सिंगच्या शंकेमुळे भारताने तेथे खेळायला नकार दिला. यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पाकिस्तानला भारतात खेळण्याचे आमंत्रण दिले; मात्र शिवसेनेच्या विरोधामुळे पाकिस्तानने भारतात क्रिकेट खेळण्यास नकार दिला. यावर उपाय म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी उभय देशांतील क्रिकेट मालिका बांगलादेशात किंवा भारतात खेळवण्याचा पर्याय ठेवला होता. त्यावर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही देशांची क्रिकेट मालिका डिसेंबर मासामध्ये श्रीलंकेत होऊ शकते. या मालिकेची घोषणा २७ नोव्हेंबर या दिवशी होऊ शकते. यात ५ एक दिवसीय सामने आणि २ टी-२० सामन्यांचा समावेश असू शकतो. हवामानाचा विचार करता सामने श्रीलंकेतील कोलंबो आणि कँडी येथेे होण्याची शक्यता आहे.

हरियाणात गोहत्या करणारे आणि गोमांस खाणारे यांना कठोर शिक्षा करणार ! - मनोहरलाल खट्टर, मुख्यमंत्री, हरियाणा

मोदी शासनाने हरियाणातील कायद्याच्या धर्तीवर आता संपूर्ण 
देशात गोहत्याबंदी कायदा लागू करावा, ही अपेक्षा !
     नारनौल (हरियाणा) - हरियाणात आता गोहत्या करणारे आणि गोमांस विकणारे अन् खाणारे यांना संपूर्ण गोहत्याबंदीच्या नुकत्याच अस्तित्वात आलेल्या कायद्यानुसार कठोर शिक्षा करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी येथे दिली. महिलांसाठी येथे चालू करण्यात आलेल्या एका शासकीय महाविद्यालयाचे उद्घाटन खट्टर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. खट्टर पुढे म्हणाले, १९ नोव्हेंबर या दिवशी राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्यानंतर राज्यात गोवंश संरक्षण आणि गोसंवर्धन कायदा लागू झाला. हा कायदा मार्च २०१५ मध्ये सर्वसंमतीने पारित करण्यात आला होता.

काश्मीरमध्ये देशद्रोही आणि धर्मांध फुटीरतावाद्यांनी मुख्यमंत्री मुफ्ती महंमद सईद यांच्या घरावर आक्रमण करून पाकचा झेंडा फडकवला !

 • राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याच घरावर पाकचा झेंडा फडकवला जातो, यावरून फुटीरतावाद्यांची मजल कुठपर्यंत गेली आहे, हे स्पष्ट होते. मोदी शासन आतातरी या देशद्रोही आणि धर्मांध फुटीरतावाद्यांच्या मुसक्या आवळणार आहे का ?
 • आतंकवादी मारला गेल्याच्या निषेधार्थ फुटीरतावाद्यांकडून काश्मीर बंद !
श्रीनगर - सुरक्षा दलांच्या कारवाईत मारला गेलेल्या आतंकवाद्यांच्या अंत्ययात्रेच्या वेळी काही समाजकंटकांनी २४ नोव्हेंबर या दिवशी थेट जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती महंमद सईद यांच्या वडिलोपार्जित घरावर आक्रमण करून पाकचा झेंडा फडकवला.
१. सिलगाम येथे २३ नोव्हेंबर या दिवशी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सैनिकांनी केलेल्या कारवाईत ३ आतंकवादी ठार झाले.
२. सैनिकांच्या या कारवाईच्या विरोधात फुटीरतावाद्यांनी २४ नोव्हेंबर या दिवशी काश्मीरमध्ये बंद पुकारला होता. त्यामुळे काश्मीरमधील अनेक शाळा, महाविद्यालये, दुकाने आदी बंद होती.
३. बंदच्या काळातच मारल्या गेलेल्या आतंकवाद्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेला फुटीरतावादी संंघटनांचे सहस्रावधी समर्थक उपस्थित होते.

प्रसिद्ध कन्नड चित्रपट निर्माते अधिवक्ता मारुति जडियावर यांची सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

     २४ नोव्हेंबर या दिवशी बेंगळुरू येथील प्रसिद्ध कन्नड चित्रपट निर्माते अधिवक्ता मारुति जडियावर यांनी सनातन आश्रमाला सदिच्छा भेट दिली. गोवा येथे चालू असलेल्या आंतराराष्ट्रीय चित्रपट मोहत्सवात सहभागी होण्यासाठी ते आले होते. त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमांतून वेळ काढून त्यांनी रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाला भेट दिली. आश्रमात येण्यासंदर्भात ते म्हणाले, जून २०१५ मध्ये मी सनातन आश्रमात येऊन गेलो होतो. त्या वेळी जातांना मी सनातन-निर्मित गणपतीचे चित्र स्वतःसोबत नेले होते. ते देवघरात ठेवले आहे. मी आणि माझी पत्नी त्या चित्राचे मनोभावे पूजन करत आहोत. तेव्हापासून आम्हाला अनेक आध्यात्मिक अनुभूती आल्या. त्यामुळे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सनातन आश्रमात यायचे मी ठरवलेच होते. त्याप्रमाणे आज मला येथे येता आले. पुढच्या वेळी मी अधिक वेळ काढून सहकुटूंब आश्रमभेटीसाठी येईन.
     अधिवक्ता मारुति जडियावर हे सनातन प्रभातचे नियमित वाचक आहेत. व्यवसायाने वकील आहेत, तसेच आजपर्यंत त्यांनी १२ हून अधिक कन्नड चित्रपटांची निर्मिती केली आहे.

आय.एस्.आय.एस्.च्या विरोधात सैन्य पाठवण्यास पाकचा नकार

भविष्यात आय.एस्.आय.एस्.च्या बाजूने पाकने त्यांचे सैन्य उतरवल्यास आश्‍चर्य वाटायला नको !
     इस्लामाबाद (पाकिस्तान) - आय.एस्.आय.एस्. या क्रूर आतंकवादी संघटनेच्या विरोधात लढण्यासाठी संपूर्ण जग एकवटत असतांना पाकने मात्र आय.एस्.आय.एस्.च्या विरोधात सैन्यकारवाई करण्यास नकार दिला आहे. पाकची ही भूमिका म्हणजे पळपुटेपणा आहे, अशी टीका सर्व बाजूंनी होत आहे. आपल्या कार्यक्षेत्राच्या बाहेर कोणत्याही प्रकारच्या मोहिमेसाठी सैन्य पाठवणार नाही, अशी बोटचेपी भूमिका पाकने घेतली आहे. (आय.एस्.आय.एस्.च्या विरोधात जगातील लहान-मोठे देश आपापल्या परीने लढा देत असतांना पाकने घेतलेली ही भूमिका पाक सातत्याने आतंकवाद्यांना अभय देणारा देश आहे, ही गोष्ट सिद्ध करणारी आहे ! - संपादक) 

नेपाळ येथे मधेशी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ४ ठार

* भारत मधेशींच्या आंदोलनाला बळ देत असल्याचा नेपाळचा पुन्हा आरोप !
* भारताने आरोप फेटाळले ! 
* आतापर्यंत ४० लोकांचे बळी !
     काठमांडू, २४ नोव्हेंबर - नेपाळने नुकत्याच स्वीकारलेल्या धर्मनिरपेक्ष राज्यघटनेत मधेशी नागरिकांच्या अधिकारावर गदा येत असल्याचा आरोप मधेशी समुदायाकडून करण्यात येत आहे. नेपाळ शासनाने ही राज्यघटना मागे घेऊन मधेशी जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी या लोकांकडून करण्यात येत आहे. त्यासाठी गेल्या २ मासांपासून मधेशी आंदोलकांनी भारत-नेपाळ सीमा बंद केली आहे. त्यामुळे नेपाळमध्ये इंधनासह अनेक जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. नेपाळ पोलिसांनी २२ नोव्हेंबर या दिवशी आंदोलकांवर केलेल्या कारवाईत ४ मधेशी नागरिक ठार झाले आहेत. या वेळी १७ आंदोलक आणि २५ पोलीस जखमी झाले आहेत. आंदोलकांनी पेट्रोल बॉम्ब आणि दगडफेक केल्यामुळे गोळीबार केल्याची माहिती नेपाळ पोलिसांनी दिली. आतापर्यंत या आंदोलनात ४० लोकांचे बळी गेले आहेत.

बेल्जियममधील ब्रुसेल्समध्ये २२ ठिकाणी छापे, १६ जणांना अटक

पॅरिस येथील आतंकवादी आक्रमणाच्या प्रमुख सूत्रधारास पकडण्यासाठी पोलिसांची कारवाई
     ब्रुसेल्स, २४ नोव्हेंबर - बेल्जियममध्येही पॅरिसप्रमाणे आतंकवादी आक्रमण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ब्रुसेल्समध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दुसरीकडे पॅरिस आक्रणातील संशयित आतंकवाद्यांना पकडण्यासाठी ब्रुसेल्समध्ये २२ ठिकाणी छापे टाकण्यात आले, तर १६ जणांना अटक करण्यात आली. या कारवाईत पॅरिस येथील आक्रमणाचा प्रमुख सूत्रधार सलाह अब्देसलाम पोलिसांच्या हाती लागला नाही. कडक सुरक्षा आणि पोलिसांची कारवाई यांसाठी राजधानी ब्रुसेल्स ३ दिवस बंद ठेवण्यात आली आहे.

शृंगेरी पिठाधिपती श्री भारतीतीर्थ यांच्याविरुद्ध फेसबूकवरील अवमानकारक लिखाणाने भाविक संतप्त !

हिंदू संघटित झाल्यास त्यांच्या श्रद्धास्थानांचा अवमान करण्याचे धाडस कुणीही करणार नाही !
आरोपीला अटक करण्याची मागणी
     शृंगेरी - शृंगेरी पिठाधिपती श्री भारतीतीर्थ, तसेच श्री शेखर स्वामीजी यांच्याविरुद्ध फेसबूकवर अवमानकारक लिखाण केल्याने भाविक संतप्त झाले आहेत. एका व्यक्तीने श्री भारती तीर्थ आणि श्री शेखर स्वामीजी यांच्या छायाचित्राखाली अवमानकारक टिप्पणी लिहिली आहे. मुन्ना हजार असे या व्यक्तीचे नाव असल्याचे सांगितले जात आहे. ही टिप्पणी वाचल्यानंतर हरीश शेट्टी या भाविकाने शृंगेरी पोलीस ठाण्यात गार्‍हाणे केले, तसेच संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. याशिवाय कारवाई करण्यासाठी जिल्हा प्रशासन, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, तसेच राज्याचे गृहसचिव यांना पत्र पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेत चौकशीला आरंभ केला आहे. ही टिप्पणी हुब्बळ्ळी येथून करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

क्रूरकर्मा टिपू सुलतान हा दक्षिण भारताचा औरंगजेब होता ! - संघाचे मुखपत्र पाञ्चजन्य

     नवी देहली - म्हैसूरचा क्रूरकर्मा शासक टिपू सुलतान हा दक्षिण भारताचा औरंगजेब होता, अशी टीका पाञ्चजन्य या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातील टिपू सुलतान का सच : दक्षिण का औरंगजेब या लेखात करण्यात आली आहे. कर्नाटकमध्ये टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याच्या सूत्रावर आधारित हा लेख असून त्यात कर्नाटक शासनावरही टीका करण्यात आली आहे. कर्नाटक शासनाच्या मुसलमानधार्जिण्या हट्टापायी राज्यात झालेल्या संघर्षात विहिंपचे जिल्हा संयोजक कुट्टाप्पा यांचा मृत्यू झाला होता. 

सिरसी (उत्तर कन्नड) येथे आयोजित जिल्हास्तरीय हिंदू अधिवेशनास उत्तम प्रतिसाद

     सिरसी - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील राघवेंद्र सभा भवन येथे नुकत्याच आयोजित जिल्हास्तरीय हिंदू अधिवेशनास उत्तम प्रतिसाद लाभला. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक तथा सामाजिक कार्यकर्ते श्री. काशीनाथ मूडी यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी व्यासपिठावर हिंदसंघटक श्री. शिवानंद दीक्षित, भाजपच्या सौ. वीणा शेट्टी, सनातन संस्थेचे श्री. काशीनाथ प्रभू आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. विजय रेवणकर हे मान्यवर उपस्थित होते. श्री. रेवणकर यांनी या अधिवेशनाचे प्रास्ताविक केले. या अधिवेशनास ६५ धर्माभिमानी उपस्थित होते.
     याप्रसंगी श्री. मूडी म्हणाले, वर्ष १९५६ मध्ये मी एका तीर्थक्षेत्री गेलो असतांना तेथील एका महात्म्याने मला संत आणि साधक यांच्या नेतृत्वाखाली हिंदु राष्ट्र येणार आहे, असे सांगितले होते. आज हिंदु जनजागृती समितीचे कार्य पाहिल्यास याच्या सत्यतेची प्रचिती येते. 
     सौ. वीणा शेट्टी यांनीही उपस्थितांना साधना करण्याचे, तसेच समितीच्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. 

म्हणे) 'हिंसेला प्रोत्साहन देणार्‍या 'सनातन प्रभात'वर कारवाई का नाही ?'

डॉ. भारत पाटणकर यांचा पुन्हा थयथयाट ! 
संघर्ष यात्रेच्या निमित्ताने आयोजित सभेला ५० पेक्षा अल्प लोक आल्याने सभेचा फज्जा ! 
आपल्याला जनाधार नाही, हे लक्षात घेऊन तरी सनातनविरोधी  मोहिमा 
 बंद करण्याची वैचारिक प्रगल्भता साम्यवाद्यांनी दाखवायला हरकत नाही ! 
     सांगली, २४ नोव्हेंबर (वार्ता.) - सनातन प्रभातमध्ये धार्मिक नक्षलवादी बना, असे चिथावणीखोर आवाहन करण्यात आले होते. यातून रुद्र पाटील आणि समीर गायकवाड यांनी प्रेरणा घेतली नसेल कशावरून ? त्यामुळे हिंसेला प्रोत्साहन देणार्‍या 'सनातन प्रभात'वर कारवाई का नाही ? असा प्रश्‍न श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर यांनी उपस्थित केला. ते २३ नोव्हेंबर या दिवशी सामाजिक अत्याचार प्रतिबंधात्मक चळवळ आणि जातीमुक्ती आंदोलनाच्या वतीने आयोजित संघर्ष यात्रेच्या निमित्ताने येथील स्टेशन चौकात झालेल्या जाहीर सभेत बोलत होते. 

‘बाजीराव-मस्तानी’ या चित्रपटावर बंदी घालण्याची याचिकाकर्त्यांची मागणी

पुणे येथील जिल्हा न्यायालयात याचिका प्रविष्ट 

 • चित्रपटाच्या लक्षवेधी ओळीमुळे सामाजिक तेढ निर्माण होण्याची भीती
 •  पिंगा हे गाणे चित्रपटातून काढण्याची मागणी 

     पुणे, २४ नोव्हेंबर - आगामी 'बाजीराव-मस्तानी' या चित्रपटाला होत असलेला विरोध अधिकच तीव्र होऊ लागला आहे. या चित्रपटाच्या लक्षवेधी ओळीमुळे सामाजिक तेढ निर्माण होण्याची भीती असून त्यावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका येथील जिल्हा न्यायालयात हेमंत पाटील आणि फिरोज शेख यांनी प्रविष्ट केली आहे. या याचिकेत निर्माता दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोन यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. 

'डान्सबार बंदी'साठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका प्रविष्ट !

     संभाजीनगर, २४ नोव्हेंबर - सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच 'डान्सबार'वरील बंदी उठवण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयावर लोकहितासाठी पुन्हा हस्तक्षेप करावा, अशी विनंती करणारी याचिका येथील विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट केली आहे. 

मीरारोड येथे विद्यार्थिनीवर शाळेतच तीन शिक्षकांकडून वर्षभर बलात्कार

शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी आणि नैतिकतेचे पूर्ण अध:पतन झाल्याचे सांगणारी घटना ! 
     ठाणे - मीरारोड येथील एका शाळेत चौथीत शिकणार्‍या नऊ वर्षांच्या चिमुकलीवर तीन शिक्षक मागील एक वर्षभर बलात्कार करत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये ४६ वर्षांचा पीटी शिक्षक आणि २४ अन् २७ वर्षांच्या दोन चित्रकलेच्या शिक्षकांचा समावेश आहे. (शिक्षक आणि विद्यार्थी या नात्यालाच या घटनेमुळे कलंक लागला आहे. असे नीतिमत्ताहीन वासनांध शिक्षक शिक्षण व्यवस्थेतून खड्यासारखे दूर करून शिक्षक आणि विद्यार्थी यांना धर्माचरणाचे धडे देणे आवश्यक आहे. - संपादक) 

समीर गायकवाड यांनी केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी एस्आयटी प्रमुख संजय कुमार कोल्हापुरात येणार !

     कोल्हापूर, २४ नोव्हेंबर - कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित श्री. समीर गायकवाड यांनी पोलिसांवर केलेल्या गंभीर आरोपांची चौकशी करण्यासाठी एस्आयटी प्रमुख संजय कुमार कोल्हापूर येथे येणार आहेत. श्री. गायकवाड यांनी या प्रकरणात पोलिसांनी ते सांगतील, 'ती नावे घेतली, तर २५ लक्ष रुपये देऊ; अन्यथा फाशी देऊ', अशी धमकी दिल्याचा आरोप केला होता. 

मशिदींवरील भोंगे इस्लामविरोधी ! - मुंबईतील मोहमद अली या मुसलमानानेच न्यायालयात अर्जाद्वारे मांडले मत

आतातरी इस्लामविरोधी भोंगे उतरवण्याचे सौजन्य मुल्ला-मौलवी दाखवणार का ? 
     मुंबई, २४ नोव्हेंबर - मशिदींवर लावण्यात आलेले भोंगे इस्लामच्या विरोधात आहेत, असा युक्तीवाद मोहमद अली या मुसलमानानेच मुंबई उच्च न्यायालयात केला आहे. नवी मुंबई येथील श्री. संतोष पाचलग यांनी मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भात जनहित याचिका प्रविष्ट केली आहे. अली यांनी याचिकादारांच्या म्हणण्याचे समर्थन करणारा अर्ज २३ नोव्हेंबर या दिवशी न्यायालयात प्रविष्ट केला आहे. पाचलग यांच्या याचिकेच्यासंदर्भात मुंबई पोलिसांच्या वतीने सप्टेंबरमध्ये उत्तरादाखल प्रतिज्ञापत्र करण्यात आले. त्यानुसार मुंबईत एकूण १ सहस्र २१ पैकी ८३६ मशिदींवरील भोंगे विनापरवाना आहेत, तर २ सहस्र ७७ पैकी ९० मंदिरे, ८८ पैकी २६ गुरुद्वारा आणि २७९ चर्चेसपैकी १० चर्चवर विनापरवाना भोंगे आहेत. यांपैकी एकावरही कारवाई झालेली नाही. 

आय.एस्.आय.एस्. २८ नोव्हेंबरला एअर इंडियाच्या विमानाचे अपहरण करणार

ठाणे येथील एअर इंडियाच्या कॉल सेंटरमध्ये दूरभाषद्वारे धमकी 
आय.एस्.आय.एस्.च्या आतंकवादी कारवायांना सामोरे जावे 
लागू नये, यासाठी शासनाने तत्परतेने कठोर पावले उचलणे अपेक्षित ! 
     ठाणे - आय.एस्.आय.एस्. या आतंकवादी संघटनेतून बोलत असून आम्ही २८ नोव्हेंबर या दिवशी एअर इंडियाच्या विमानाचे अपहरण करणार आहोत, अशा धमकीचा दूरभाष येथील एअर इंडियाच्या कॉल सेंटरमध्ये २० नोव्हेंबरच्या रात्री आला होता. एका अज्ञाताने ही धमकी दिल्याचे समजते. हा दूरभाष मध्यप्रदेशातून केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली असून अधिक चौकशी चालू आहे. या दूरभाषनंतर ठाणे शहरात अनेक मॉल्स, तसेच महत्त्वाची ठिकाणे येथील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

'आय.एस्.आय.एस्.'मध्ये भारतीय मुसलमानांचा आत्मघातकी बॉम्ब म्हणून वापर !

परदेशी गुप्तचर यंत्रणेचा अहवाल 
 आय.एस्.आय.एस्.चे भीषण वास्तव शासन लक्षात घेईल का ? 
     मुंबई - 'आय.एस्.आय.एस्.'मध्ये सहभागी होणार्‍या भारतीय मुसलमानांचा त्यांना फसवून आत्मघातकी बॉम्बसदृश वापर केला जातो. त्यांना तेथे अत्यंत हीन पातळीची वागणूक मिळते, असा अहवाल परदेशी गुप्तचर यंत्रणांनी इतर देशांसह भारतीय गुप्तचर यंत्रणेला पुरवला आहे. 

शासनाने मंदिरे उद्ध्वस्त केली, त्याविरुद्ध आंदोलन करणार ! - अनिल अर्डक, शिवसेना

 • जळगाव येथील प्रांतीय हिंदु अधिवेशनात दुसर्‍या दिवशी झालेली मान्यवरांची भाषणे
 • २२ नोव्हेंबर या दिवशीचे सत्र
जळगाव - छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व गडांवर मंदिरे बांधली आहेत. कारण त्यामुळे सात्त्विकता आणि जाज्वल्य धर्माभिमान निर्माण होतो. आज आपली मंदिरे शासनाच्या अधीन असल्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो. गायी कसायांना विकल्या जातात आणि अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी हा निधी वापरला जातो. यासाठी हिंदूंनी संघटित होऊन माहितीच्या अधिकारातून सर्व माहिती मिळवली पाहिजे आणि सर्व हिंदूंनी जात, संप्रदाय, पक्ष, पद विसरून मोठे जनआंदोलन उभे केले पाहिजे. संभाजीनगर येथे मागील सप्ताहात ५ मंदिरे पाडली गेली; मात्र शहरात ५ अनधिकृत मशिदी उभ्या असूनही त्यांना हात लावायची कुणाचीही हिंमत नाही. याचे कारण आपण हिंदू संघटित नाही, असे प्रतिपादन शिवसेना ग्राहकसंरक्षण मंचचे श्री. अनिल अर्डक यांनी येथे झालेल्या प्रांतीय हिंदु अधिवेशनात केले.
    प्रांतीय अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी गोरक्षा, मंदिर सुरक्षा, स्वसंरक्षण, लॅण्ड जिहाद, अश्‍लीलता या विषयी चर्चा करण्यात आली.
संविधानातील तरतुदी आणि कायदे यांचा योग्य वापर केल्यास 
गोरक्षकांवर गुन्हे नोंद होणार नाहीत ! - नरेंद्र पाटील, गोरक्षा दल, नंदुरबार
     शेतकरी हा २ ते ५ सहस्र रुपयांसाठी गाय कसायांना देतो. गुजरातमध्ये पूर्णपणे गोवंशहत्या बंदी कायदा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात गुजरातहून छुपेपणे गोतस्करी मोठ्या प्रमाणात केली जाते. ती गोतस्करी महिन्याला ४० ते ५० सहस्रांपर्यंत होते. ही गोतस्करी थांबवण्यासाठी नंदुरबार शहरात हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांनी एकत्र येऊन २७ जानेवारी २०१५ या दिवशी एका भव्य मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चाला ४-५ सहस्र हिंदू सनदशीर मार्गाने एकत्र आले होते. महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी लागू होण्यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्थेने खारीचा वाटा उचलला आहे. आपण भारतातील संविधानाच्या तरतूदींचा आणि कायद्याचा योग्यरित्या उपयोग केला, तर गोरक्षकांवर गुन्हे नोंद होणार नाही. हिंदु राष्ट्राची निर्मिती करून गोवंशहत्या बंदीसाठी कायमस्वरूपी उपाय करावा लागेल.

पाकला जशास तसे हेच उत्तर हवे !

     भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी बसने लाहोर यात्रा केली आणि पाकपुढे मैत्रीचा हात केला. या घटनेला आज १६ वर्षे झाली; पण ना पाकने भारताशी मैत्री केली, ना भारताने पाकला धडा शिकवला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मरण या कारणाने आवर्जून होते; कारण त्यांनी शत्रूला कधीच स्वतःवर चाल करून येण्याची संधी दिली नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनीही पाकला जशास तसे उत्तर देणे, हाच उपाय असल्याचे सांगितले होते. अजूनही वेळ गेलेली नाही. भारताने पाकवर स्वारी करून पाकचे अस्तित्व मिटवावे, हीच जनतेची पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींकडून अपेक्षा आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद !

    पश्‍चिम बंगाल राज्यातील बर्फाच्छादित हिमालयाच्या कुशीत दार्जिलिंग जवळील नक्षलबारी गावात २५.५.१९६७ या दिवशी नक्षलवाद्याचा जन्म झाला. तेव्हा त्यांना कोणतेही नाव नव्हते. नक्षलबारीत जन्मलेला म्हणून तो नक्षलवाद. नैसर्गिक संपत्तीने ओतप्रोत भरलेल्या गडचिरोली जिल्ह्याची ओळख नक्षलवाद्यांचे शक्तीस्थान म्हणून झाली आहे. ऑगस्ट महिना क्रांतीचा महिना म्हणून ओळखला जातो. याच महिन्यात म्हणजे, २६.८.१९८२ या वर्षी गडचिरोली जिल्हा उदयास आला आणि त्या पाठोपाठ नक्षल चळवळीचाही या जिल्ह्यात शिरकाव झाला.

हॅलोवीन नावाची विकृती !

     या वर्षी पाश्‍चात्त्य लोकांप्रमाणे भारतात हॅलोवीन नावाची भयंकर अशी कृती करण्याची टूम निघालेली दिसली. शाळा, महाविद्यालये, कार्यालये आणि आस्थापने या ठिकाणी हा कार्यक्रम होतांना आढळला. मुळात हॅलोवीन हा सण नसून अत्यंत भयंकर अशी विकृती रुजू होतांना दिसत आहे. पाश्‍चात्यांच्या मान्यतेनुसार वर्षातील एका विशिष्ट दिवशी पितरांचे आत्मे आपल्या वंशजांकडे येतात, तेव्हा त्यांना आपण ओळखू येऊ नये; म्हणून विविध भूतसदृश, हिंसक प्राण्यांचे तोंडवळे, भीतीदायक अशी वेशभूषा करून त्यांना फसवता येते. त्यांच्या मान्यतेनुसार पितरांना फसवण्याचा हा मार्ग आहे. अशी वेशभूषा करून बसले की, पितरांना आपण ओळखू येणार नाही आणि त्यांच्या त्रासापासून वाचू, अशी अंधश्रद्धा पाश्‍चात्त्य बाळगतात. मुळात पितर हे सूक्ष्म जगतातील असल्यामुळे त्यांना त्यांच्या वंशजांना ओळखण्यासाठी स्थूलातून जाणून घ्यायची आवश्यकता नसते. ते सूक्ष्मातून आपल्या वंशजांना ओळखतात आणि त्या दिवशी आपल्या पुढील गतीसाठी काही प्रयत्न होत आहेत का, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात.

सार्वजनिक सेवा संस्थांच्या दर्जाहीन सेवेमुळे ग्राहकांची होणारी गैरसोय !

१. सार्वजनिक सेवा संस्था म्हणजे शासनाने जनतेच्या सोयीसाठी अंगीकृत केलेल्या सेवा
     सार्वजनिक सेवा संस्था म्हणजे शासनाने जनतेच्या सोयीसाठी अंगीकृत केलेल्या सेवा होय, उदा. भारतीय जीवन विमा, सार्वजनिक क्षेत्रात काम करणार्‍या बँका, राज्य परिवहन (एस्.टी.) महामंडळ, वीज कंपन्या, दूरसंचार निगम, भारतीय रेल्वे इत्यादी सेवा संस्था होय.
२. सार्वजनिक सेवा संस्था देत असलेली सेवा दर्जाहीन आणि बेभरवशाची झाली असणे 
     या सार्वजनिक सेवा संस्था सर्वसामान्य जनतेला दर्जेदार, वेळेत आणि खात्रीलायक सेवा प्राप्त व्हावी, या उद्देशाने शासनाने सार्वजनिक उपक्रमांतर्गत अंगीकृत केलेल्या या कंपन्या निर्माण केल्या आहेत; परंतु आजच्या घडीला या सर्व सार्वजनिक सेवा संस्थाकडून देण्यात येणारी सेवा एवढी दर्जाहीन आणि बेभरवशाची झाली आहे की, ती जनतेला भीक नको; पण कुत्रा आवर अशा स्वरूपाची झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्या संस्थांकडून देण्यात येणार्‍या सेवांच्या बाबतीत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

त्रिगुणांचे कार्य

विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि स्फूर्ती देणार्‍या गोष्टी 
    एक मनुष्य अरण्यातून चालला होता. वाटेत त्याला तीन दरोडेखोरांनी धरले. त्यांनी त्याच्याजवळच्या सर्व चीजवस्तू काढून घेतल्या. एक दरोडेखोर म्हणाला, आता याला जिवंत कशाला ठेवता ? आणि तलवार उपसून तो जवळ येऊन ठेपला. तेव्हा दुसरा दरोडेखोर म्हणाला, याला मारून तरी आपल्याला काय लाभ होणार आहे ? त्यापेक्षा याचे हात-पाय बांधून याला इथेच सोडून देऊ आणि आपण निघून जाऊ. त्याप्रमाणे त्याचे हातपाय बांधून त्याला तिथेच टाकून ते निघून गेले. थोड्या वेळाने त्यांच्यापैकी एकजण परत येऊन म्हणाला, अरेरे, तुला फारच त्रास झाला. थांब मी तुझे हातपाय मोकळे करतो. ती सगळी बंधने सोडून तो दरोडेखोर म्हणाला, चल माझ्याबरोबर, मी तुला रस्त्यापर्यंत सोडून देतो. बरेच अंतर चालून गेल्यानंतर ते दोघे जेव्हा रस्त्यापर्यंत पोहोचले, तेव्हा तो दरोडेखोर म्हणाला, या रस्त्याने सरळ जा. ते पहा तिथे तुझे घर दिसते आहे. तेव्हा तो मनुष्य त्या दरोडेखोराला म्हणाला, दादा, तुम्ही माझ्यावर मोठा उपकार केला. आता तुम्हीही माझ्या घरापर्यंत चला ना. दरोडेखोर म्हणाला, नाही, मी तिथवर येऊ शकत नाही. राजसेवकांना कळले, तर माझी पंचाईत होईल.

एका विवाहाची वैशिष्ट्यपूर्ण निमंत्रणपत्रिका

॥ श्रीकृष्ण ॥
कु. रोहिणी गुरव
प्रती,
---------
---------
    यांस, सप्रेम नमस्कार,
    अचानक विवाह ठरल्यामुळे पत्रिका छापल्या नाहीत. तसेच विवाहाच्या गडबडीमुळे प्रत्यक्ष निमंत्रण द्यायलाही येत नाही, याबद्दल क्षमस्व ! तरी हेच अगत्याचे निमंत्रण मानून विवाहासाठी अवश्य यावे.
दिनांक : २५.११.२०१५
वेळ : सायंकाळी ७.३० वाजता
महत्त्वाचा निरोप : आपली जिव्हाळ्याची उपस्थिती, हाच आमच्यासाठी बहुमूल्य अहेर आहे. अन्य कोणता अहेर आणू नये.
विवाहस्थळ : सर्वांनी आपापल्या घरी जमावे; कारण विवाह माझा नसून तुळशीचा आहे.
निमंत्रक : कु. रोहिणी गुरव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.११.२०१५)

दूरचित्रवाहिन्यांचे घातक परिणाम !

     नागपुरात दूरचित्रवाणीचे (टी.व्ही.) आगमन होणार, असा गाजावाजा अधिक होत आला, त्याप्रमाणे आता झाले आहे. प्रश्‍न हा की, हा निर्णय राजकीय हितसंबंधाचा आहे कि समाजशास्त्रीय निकडीचा आहे ? पाश्‍चात्त्यांचा यासंबंधी कोणता अनुभव आहे, याविषयी १७.५.१९८२ या दिवशी शिकागो येथील टाइम्सने वॉर्निंग फ्रॉम वॉशिंग्टन या मथळ्याखाली लिहिलेला काही मजकूर !

भारताला जातीयवादाच्या आगीत ढकलून देऊन जाळून राख करण्याचे षड्यंत्र ! - सत्यव्रत सामवेदी

१. जातीय जनगणनेचा प्रारंभ 
    ही जातीय जनगणना कशी चालू झाली, हे आपल्या नेत्यांना माहीत आहे का ? ही जनगणना इंग्रज शासनाने वर्ष १८५७ च्या बंडाला घाबरून चालू केली. या बंडामध्ये जवळजवळ सर्व जाती आणि धर्म यांच्या लोकांनी एकजूट होऊन आपल्या प्राणांचे बलीदान दिले होते. मग त्यानंतर भारताला जाती आणि धर्म यांमध्ये विभाजित करण्याचा कट शिजू लागला. वर्ष १८७१ मध्ये आलेला हंटर आयोग हाच वर्ष १९०५ च्या वंगभंगाचे कारण बनला, ज्याचा वर्ष १९४७ मध्ये होत असलेली भारताची फाळणी हा आरंभ होता. ही जातीय जनगणना एवढी राष्ट्रविरोधी होती की, गांधींच्या काँग्रेसने ११.१.१९३१ हा दिवस जनगणना बहिष्कार दिन म्हणून घोषित केला होता. काँग्रेसच्या प्रचंड विरोधामुळेच इंग्रज शासनाने वर्ष १९३१ नंतर जातीय जनगणना बंद केली होती; पण सोनिया गांधी यांच्या काँग्रेसने वर्ष २०१० मध्ये ही जनगणना पुन्हा चालू केली.

विनाकारण टीका करणार्‍यांनो, प.पू. डॉक्टरांचे महान कार्य समजून घ्या !

मुंबई येथील साधिका सौ. नम्रता सावंत यांचा मुलगा
चि. न्योम सावंत (वय १० मास) प्रथम भेटीतच
आजी सौ. राजश्री गावडे यांच्याकडून
प.पू. डॉक्टरांकडे झेपावतांना
     मी दैनिक सनातन प्रभातचा एक निष्ठावंत वाचक आहे. सोबत प.पू. डॉ. आठवले यांचे एक छायाचित्राचे कात्रण पाठवले आहे. मुंबई येथील साधिका सौ. नम्रता सावंत यांचा मुलगा चि. न्योम सावंत (वय १० मास) प्रथम भेटीत आजी सौ. राजश्री गावडे यांच्याकडून प.पू. डॉ. आठवले यांच्याकडे झेपावतांनाचे हे चित्र आहे. 
    या चित्रात प.पू. डॉ. आठवले यांच्या उच्च निरागस अशा चेहर्‍याचे दर्शन होते. त्यातून प.पू. डॉक्टर करत असलेल्या महान कार्याचा परिचय होतो. भावजागृतीही होते. सदर चित्र माझ्या संग्रहासाठी पाठवण्याची कृपा करावी. प.पू. डॉक्टरांवर विनाकारण टीका करणार्‍यांची मती सदर चित्रातून दिसणारा दैवी (सात्त्विक) भाव पाहून पालटेल ! 
- ग.ना. कापडी, पर्वरी, गोवा.

साधकांना सूचना

     पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - कार्तिक शुक्ल पक्ष चतुर्दशी/पौर्णिमा (२५.११.२०१५) सकाळी ७.०९ वाजता
समाप्ती - कार्तिक कृष्ण पक्ष प्रतिपदा (२६.११.२०१५) पहाटे ४.१४ वाजता
आज पौर्णिमा आहे.

माफियांची कुकृत्ये !

१. तारीख माफिया : काही चावट निर्माते नाटक सादर करण्याचे नाटक करून नाट्यगृहांचे तारखा मिळवतात (आरक्षण करतात) आणि नंतर ते अधिक पैसे घेऊन (ब्लॅकने) दुसर्‍या नाटकवाल्या निर्मात्यांना विकतात.
२. पत्रकार (मिडिया) माफिया : हा नतद्रष्ट माफिया स्टिंग ऑपरेशन नावाचे भयानक प्रकार करतो आणि राजकारण्यांना बेजार करतो.
३. कागद माफिया : या माफियातील लोकांनी बोलेरो, सुमो किंवा स्कॉर्पिओ अशा गाड्या चालवत त्यावर प्रेस अशी पाटी (स्टिकर) लावून उच्छाद मांडला. या माफियातील लोकांना पाकिटपासून जाकिटापर्यंत, किटलीपासून बाटलीपर्यंत, कोटापासून नोटांपर्यंत, पत्त्यांच्या कॅटपासून रहाण्याच्या जागेपर्यंत जे जे काही फुकट मिळेल, ते ते सर्व हवे असते. 
(संदर्भ : लोकप्रभा, १८ फेब्रुवारी २०११)
       प्रवाहाच्या बरोबर वहाणारे मुडदे असतात. त्या प्रवाहात स्वतःची दिशा ठरवणारे जिवंत असतात ! 
- डॉ. सच्चिदानंद शेवडे, राष्ट्रीय प्रवचनकार आणि साहित्यिक, डोंबिवली, ठाणे.

राजापूरच्या कृतीशील, उत्साही आणि तळमळ असणार्‍या धर्माभिमान्यांकडून शिकायला मिळालेली सूत्रे

१. सर्व धर्माभिमान्यांनी पुढाकार घेऊन राष्ट्रीय हिंदू 
आंदोलनाचे नियोजन आणि प्रसाराची सेवा करणे

   जुलै २०१५ मध्ये राजापूरचे धर्माभिमानी श्री. नवनीत कुशे, श्री. विनोद गादीकर, श्री. महेश मयेकर यांनी पुढाकार घेऊन राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचे नियोजन आणि प्रसाराची सेवा केली. तिघांनी या सेवांसंदर्भात एकत्र येऊन बैठकही घेतली आणि विषयांचा सरावही एकत्रित केला. श्री. महेश मयेकर आणि श्री. विनोद गादीकर यांनी आंदोलनाचा विषय मांडला.
ज्या देशात विद्वानांना त्रास दिला जातो, तो देश तुटलेली नौका जशी पाण्यात नष्ट होते, त्याचप्रमाणे नष्ट होतो.
- अथर्ववेद (मासिक अभय भारत, १५ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०१०)

फलक प्रसिद्धीकरता

भारतियांनो, देशाची अपकीर्ती करणार्‍यांचे चित्रपट का पहाता ?
    देशातील वाढत्या असहिष्णुतेमुळे पत्नीने देश सोडण्याचा समादेश (सल्ला) दिला होता, असे विधान एका सार्वजनिक कार्यक्रमात करत आणि पुरस्कार वापसी चळवळीचे समर्थन करत अभिनेता अमीर खान याने देशाची अपकीर्ती केली.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
    Badhti asahishnutake karan patnine desh chhodne ki salah di ! - Aamir khan
Bhartiyo, Deshki apkirti karnevalonki film kyon dekhte ho ? 
जागो !
    बढती असहिष्णूता के कारण पत्नीने देश छोडने की सलाह दी ! - आमीर खान
भारतियो, देश की अपकीर्ती करनेवालों की फिल्म क्यों देखते हो ?

स्लीप पॅरॅलिसिस या व्याधीविषयी साधकाला आलेले अनुभव

श्री. सुयोग जाखोटिया
     मी लहानपणापासून थोडीफार साधना करत होतो. लहानपणी मी रामनामाचा जप करत असे. तसेच प्रतिदिन रामरक्षा आणि हनुमानचालिसा म्हणत असे. अध्यात्म आणि देवता यांविषयी मला नेहमीच एक अनामिक ओढ वाटायची. माझ्या वयाच्या १० व्या वर्षी मी आणि माझ्या कुटुंबियांनी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना चालू केली. त्यानंतर मी वाणिज्य शाखेचा पदवीधर झालो आणि मागील ११ वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनासाठी पूर्णवेळ साधक म्हणून सेवा करत आहे. सध्या मी सनातनच्या गोव्यातील रामनाथी येथील आश्रमात सेवा करतो.

रामनाथी आश्रमातील ग्रंथ विभागात झालेली वाईट शक्तींची आक्रमणे आणि साधकांना झालेले त्रास

१. कु. समिधा कामत
१ अ. बंद केलेला संगणक आपोआप चालू होणे आणि साधिकेच्या आसंदीच्या मागे रक्ताचा डाग पडणे : २४.६.२०१५ ते २६.६.२०१५ या कालावधीत मी सेवा झाल्यावर संगणक बंद केला आणि महाप्रसादासाठी गेले. परत आल्यावर पाहिले, तर माझा संगणक चालू होता. माझ्या अनुपस्थितीत कुणी संगणक चालू केला का ? याविषयी मी सहसाधिकांना विचारले; पण कुणीही संगणक चालू केला नसल्याचे त्यांनी सांगितले. या कालावधीत असे २ - ३ वेळा झाले. २६.६.२०१५ या दिवशी सायंकाळी ५ वाजता माझ्या आसंदीच्या डाव्या बाजूच्या लादीवर ३ इंचांचा रक्ताचा डाग पडला होता.

घराच्या भिंतीवर आणि यजमानांच्या सदर्‍यावर फुलपाखरू बसणे

१. २९.१०.२०१४ या दिवशी सकाळी ८.१० वाजता आमच्या घराच्या दिवाणखान्याच्या भिंतीवर हिरव्या रंगाचे आणि लाल रंगाची कड असलेले एक फुलपाखरू बसले होते. ते रात्री ११.३० वाजेपर्यंत, म्हणजेच १५ घंटे २० मिनिटे एकाच जागेवर बसून होते. रात्री ११.३० वाजता ते भिंतीवरून दिवाणखान्याच्या छतावर जाऊन बसले. ते दुसर्‍या दिवशीपर्यंत रात्री ११.३० वाजेपर्यंत, म्हणजे २४ घंटे एकाच जागी बसून होते.

नितांत सहजसुंदर वागण्या-बोलण्यातून आणि स्वतःच्या केवळ अस्तित्वानेच साधकांतील अहंला हरवणारे प.पू. गुरुदेव !

कु. दीपाली पवार
१. प.पू. गुरुदेवांचे सहज येणे आणि सहज 
बोलणे या वागण्यांतून सर्वांच्या मनावर आलेले 
दडपण क्षणात नाहीसे होऊन सर्वांचे तोंडवळे आनंदी होणे
     गुरुदेवा, तू येण्यापूर्वी आम्ही सर्वजण तुझी आतुरतेने वाट पहात होतो. डोळे मिटून शांत बसलो होतो. देव समोर आल्यानंतर त्याच्याशी काय बोलायचे ?, असे विचार त्या वेळी सर्वांच्या मनात येत होते. समोरासमोर बोलायचे म्हटले, तर काहीच सुचत नाही. सर्वांच्या मनावर थोडे दडपण आले होते. काही वेळातच तुझे आगमन झाले. तुझे ते हळूवार येणे आणि हसून सर्वांना म्हणणे, अरे, तुम्ही सर्वजण शांत का बसलात ? एकमेकांशी बोलला नाही का ? तुम्ही सर्वजण समष्टीतले ना ? तुझे सहज येणे आणि सहज बोलणे यामुळे आमच्या सर्वांच्या मनावर आलेले दडपण क्षणात नाहीसे झाले. सर्वांच्या मनावरचा ताण जाऊन तोंडवळे आनंदी झाले.

बेंगळुरू सेवाकेंद्रातील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. विद्या गौडा यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

सौ. विद्या गौडा
१. प्रेमभाव
     ताई बेंगळुरू सेवाकेंद्रात असतांना सर्वांच्या आरोग्याची आणि पथ्याची काळजी घ्यायच्या. त्यांच्या प्रेमभावामुळे पुष्कळ आधार वाटत असे. एक साधकाची प्रकृती बरी नसल्याने त्याला चिकित्सालयात भरती केले होते. त्या वेळी कुणीही साधक उपलब्ध नसल्याने ताईंना त्यांची काळजी घेण्याविषयी सांगितले. त्या वेळी बेंगळुरू हे शहर त्यांच्यासाठी नवीन असूनही कोणतेही कारण न सांगता त्यांनी तत्परतेने सेवा स्वीकारली.

बालपणापासून देवाची ओढ असलेला उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा कणकवली, जि. सिंधुदुर्ग येथील चि. ऐश्‍वर्य विशाल पारकर (वय ७ मास) !

१. जन्मापूर्वी
१ अ. लग्नाला ३ वर्षे होऊनही अपत्य न होणे आणि आध्यात्मिक उपाय अन् आयुर्वेदीय औषधोपचार यांमुळे गर्भधारणा होणे : आमच्या लग्नाला ३ वर्षे होऊनही अपत्य नसल्याने आम्ही वैद्यांकडे जाऊन तपासणी केली; परंतु त्यामध्ये कोणताही दोष आढळला नाही. त्यानंतर आम्ही सनातनचे साधक वैद्य नितिन ढवण यांच्याकडे तपासणीसाठी गेलो. तेव्हा ते म्हणाले, यामागे आध्यात्मिक कारणही असू शकते. त्यामुळे आध्यात्मिक उपाय आणि त्याच्या जोडीला औषधोपचार केल्यास निश्‍चितपणे लवकर गुण येईल.

पू. (सौ.) सखदेवआजींना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

पू. (सौ.) आशालता सखदेव
१. प.पू. डॉक्टरांनी वापरलेल्या डब्यात ठेवलेल्या कागदी 
फुलांना सुगंध येणे आणि ती निर्गुणाकडे जाऊ लागणे
     सौ. प्राजक्ता जोशी यांनी पू. आजींना दिलेली कागदी फुले पू. आजींनी प.पू. डॉक्टरांनी वापरलेल्या डब्यात ठेवली आहेत. त्या फुलांना सुगंध येत आहे आणि फुलेही पांढरट पडली आहेत. कागदी फुले निर्गुणाकडे जाऊन त्यांना सुगंध येत आहे.

नामजप करत असतांना श्रीकृष्णाने ईश्‍वरी राज्याच्या आरंभाविषयी अनुभूती देणे

कु. शिरीन चायना
१. नामजप करतांना विविध नाद ऐकू येणे आणि 
वातावरणात चैतन्य पसरत असल्याचे जाणवणे
     १४.९.२०१५ या दिवशी दुपारी ४.३० वाजता पू. मेनरायकाका नामजप करत असतांना आम्ही काही साधक नामजप करण्यासाठी बसलो होतो. त्या वेळी मला एक मिनिटभर पैजणांचा नाद ऐकू येऊ लागला. त्याच्या पाठोपाठ बासरी आणि सनई यांचे सूर ऐकू येऊ लागले. यासमवेत मधेमधे सतारीचे स्वरही ऐकू येत होते. अशा विविध नादांचा वाद्यवृंद मला जवळजवळ १ घंटा ऐकू येत होता आणि मला पुष्कळ आनंद होत होता. त्यानंतर मला आनंदाने नाचणारे मोर दिसू लागले आणि त्यामुळे वातावरणात पुष्कळ चैतन्य पसरले होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
कुठे ३५०० वर्षांत निर्माण झालेले 
विविध धर्म (पंथ), तर कुठे अनादी हिंदु धर्म !
    गेल्या १४०० वर्षांपूर्वी या जगात एकही मुसलमान नव्हता, २१०० वर्षांपूर्वी या जगात एक ख्रिस्ती नव्हता, २८०० वर्षांपूर्वी या जगात एकही बौद्ध वा जैन नव्हता आणि ३५०० वर्षांपूर्वी या जगात एकही पारसी नव्हता; मग त्यापूर्वी या जगात कोण होते ? केवळ हिंदू होते. हिंदु धर्म हा अनादि आणि अनंत आहे आणि सर्वांचा मूळ धर्म हा हिंदूच आहे. 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र


बोधचित्र


प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

                                 शिष्याचा विश्‍वास
संत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान
    गुरु विश्‍वासावर आहे. आपल्या विश्‍वासावर गुरूंची महती अवलंबून आहे. गुरु तुमच्यापण विश्‍वासावर आहे. तुमच्या विश्‍वासातच गुरु आहे.
भावार्थ : गुरु विश्‍वासावर आहे. आपल्या विश्‍वासावर गुरूंची महती अवलंबून आहे, यातील गुरु हा शब्द बाह्य गुरूविषयी वापरलेला आहे. गुरूवर विश्‍वास असेल, तरच गुरु गुरु म्हणून कार्य करू शकतो. गुरु तुमच्यापण विश्‍वासावर आहे. तुमच्या विश्‍वासातच गुरु आहे, यातील गुरु हा अंतर्यामी असलेला गुरु होय.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

यशप्राप्ती
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      आयुष्यात यश, सुख आणि ईश यांची प्राप्ती होणे, या अतिशय कठीण गोष्टी आहेत, असे न मानता प्रयत्न करत राहिले की, या गोष्टी प्राप्त होतात. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

संघर्ष... कसला आणि कुणाचा ?

संपादकीय
      समाजशास्त्रानुसार समाजात संघर्ष कधी सयुक्तिक ठरतो ? जेव्हा परकीय शक्तींचे विशिष्ट समाजावर आक्रमण होते आणि प्रस्थापितांवर अन्याय होतो, त्या वेळी प्रस्थापित आणि आक्रमक यांच्यात संघर्ष होतो तेव्हा. पुरस्कार वापसीचे नाटक संपत आल्यानंतर आता तथाकथित पुरोगामी म्हणवणार्‍या दलित संघटनांनी स्वकियांच्या विरोधातच संघर्ष करण्यासाठी यात्रा आणि सभा यांचे आयोजन केले आहे. सनातन संस्थेला संपवण्याचा विडाच त्यांनी उचलला आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn