Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

आज गोरक्षनाथ प्रकटदिन
सनातनच्या पू. शालिनी नेनेआजी यांचा आज वाढदिवस

सनातन संस्थेसह हिंदुत्ववादी संघटनांना लक्ष्य केल्यास जशास तसे उत्तर देणार ! - हिंदुत्ववाद्यांच्या बैठकीत चेतावणी

  • सनातनच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाणार्‍या कोल्हापूर येथील हिंदुत्ववाद्यांचे आभार !
  • कॉम्रेड भारत पाटणकर यांना कोल्हापूर जिल्हा बंदी करावी !
  • पुरोगामी संघटनांची मनमानी हिंदुत्ववादी खपवून घेणार नाहीत !
हिंदुत्ववाद्यांच्या बैठकीत बोलतांना श्री. सुनील घनवट आणि उपस्थित हिंदुत्ववादी
कोल्हापूर, २३ नोव्हेंबर (वार्ता.) - कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि प्रा. कलबुर्गी यांच्या हत्या झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर पुरोगामी संघटना शहरात विराट सभा घेऊन या हत्यांचे खापर सनातन संस्था आणि अभिनव भारत या हिंदुत्ववादी संघटनांवर फोडत आहेत. वास्तविक या तिन्ही प्रकरणांची पोलीस चौकशी आणि न्यायालयात खटला चालू असतांनाही पुरोगामी संघटना विनाकारण हिंदुत्ववादी संघटनांना लक्ष्य करून जातीय तेढ निर्माण करत आहेत. त्यामुळे येथून पुढे पुरोगामी संघटनांची मनमानी हिंदुत्ववादी खपवून घेणार नाहीत. त्यांनाही जशास तसे उत्तर देण्यात येईल. पोलिसांनी पुरोगामी संघटनांची विराट निर्धार सभा आणि जाहीर निर्धार परिषदेचा कार्यक्रम रहित करावा.
     तसेच धर्मद्रोही अन् श्रमिक मुक्ती दलाचे कॉम्रेड भारत पाटणकर यांनाही कोल्हापूर जिल्हा बंदी घोषित करावी, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने २२ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या बैठकीत करण्यात आली.
    कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि प्रा. कलबुर्गी यांचे खून झाले. आता खून सत्र थांबलेच पाहिजे. सनातन संस्था आणि अभिनव भारत संघटनांवर कारवाई करा, अशा आशयाचे होर्डिंग्ज शहरात ठिकठिकाणी लावून पुरोगामीवाल्यांकडून समाजात हिंदुत्ववादी संघटनांविषयी अपसमज पसरण्यात येत आहेत. २४ नोव्हेंबरला कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या जन्मदिवसाच्या अनुषंगाने येथे विराट निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. एकच खोटी गोष्ट १०० वेळा सांगून ती खोटी गोष्ट खरी करण्याचा पुरोगामी संघटनांचा डाव आहे. पुरोगामी संघटनांची मनमानी खेळी वाढत चालल्याने त्याविरोधात वैध मार्गाने लढा देण्यासाठी येथील हिंदू एकता आंदोलनाच्या कार्यालयात सायंकाळी ६.३० वाजता ही बैठक पार पडली.
उपस्थित हिंदुत्ववादी संघटना...
     या बैठकीला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजी भोकरे, करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, पतंजली योग समितीचे जिल्हाध्यक्ष श्री. संजय पाटील, हिंदु जनजागृती समितीचे राज्य समन्वयक श्री. सुनील घनवट, श्री. किरण दुसे, श्री. शिवानंद स्वामी, श्री महालक्ष्मी भ्रष्टाचारविरोधी कृती समितीचे श्री. सुधाकर सुतार, धर्माभिमानी संजय पौंडकर आदी धर्माभिमानी उपस्थित होते. प्रारंभी हिंदु जनजागृती समितीचे श्री. मधुकर नाझरे यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट केला.

पुरोगामी संघटनांनी जातीय तेढ निर्माण होतील, अशी होर्डिंग्ज आणि भित्तीपत्रके शहरात लावली !

पुरोगामी संघटनांनी कोल्हापूर शहरात जातीय तेढ निर्माण करणारे लावलेले होर्डिंग्ज्
  • हिंदुत्ववादी संघटनांकडून होंर्डिग्ज काढून टाकण्याची मागणी
  • पुरोगाम्यांचा हिंदुद्वेष !
     कोल्हापूर, २३ नोव्हेंबर (वार्ता.) - २४ नोव्हेंबरला कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने पुरोगामी संघटनांनी दुपारी १२ वाजता दसरा चौक, कोल्हापूर येथे विराट निर्धार सभा आणि सायंकाळी ६ वाजता शाहू स्मारक येथे जाहीर निर्धार परिषद आयोजित केली आहे. त्या अनुषंगाने पुरोगामी संघटनांनी ५ दिवसांपासून शहरात ठिकठिकाणी जातीय तेढ निर्माण करणारे होर्डिंग्ज लावले आहेत. या होर्डिंग्जवर चिथावणीखोर आणि जातीय तेढ निर्माण करणारी माहिती घातली आहे. अशी हिंदूद्वेषी होर्डिंग्ज फलक लावल्याविषयी संबंधित पुरोगामी संघटनांवर कारवाई करावी, अशी मागणी हिंदुत्ववाद्यांनी केली आहे. (अशी चिथावणीखोर होर्डिंग्ज लावून समाजात तेढ पसरवणार्‍या पुरोगामी संघटनांवर पोलिसांनी कठोर करवाई करावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे ! - संपादक)

पॅरिसवरील आतंकवादी आक्रमणाच्या घटनेनंतर माझा ईश्‍वराच्या अस्तित्वावरचा विश्‍वासच उडाला !

कुठल्याही गोष्टीमागे कार्यकारणभाव असतो, हा अध्यात्मातील साधा नियम आहे. 
अध्यात्माचा अभ्यास केल्यावर बुद्धीला पडणारे प्रश्‍न थांबतात आणि मन उद्विग्न होत नाही !
ख्रिस्ती धर्मगुरु आर्चबिशप जस्टीन वेल्बी यांची उद्विग्नता
लंडन - पॅरिसवरील आतंकवादी आक्रमणाच्या घटनेनंतर माझा ईश्‍वराच्या अस्तित्वावर असलेला विश्‍वासच उडाला, अशा शब्दांत ख्रिस्ती धर्माचे धर्मगुरु आर्चबिशप ऑफ कँटरबरी जस्टीन वेल्बी यांनी त्यांची पॅरिस घटनेवरील भावना बोलून दाखवली. बी.बी.सी. या विख्यात वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना ते बोलत होते. आर्चबिशप पुढे म्हणाले, पॅरिसवरील आक्रमण का झाले ? हा प्रश्‍न मीच स्वत:ला विचारत आहे. जेव्हा फ्रान्सच्या पीडितांना ईश्‍वराची आवश्यकता होती, तेव्हा ईश्‍वर कुठे होता ? या घटनेने ईश्‍वराच्या सार्वभौमत्वाविषयी मला शंका उत्पन्न झाली. घटना घडल्याच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे १४ नोव्हेंबरला सकाळी मी चालत असतांना ईश्‍वराला क्षणोक्षणी विचारात होतो की, हे का घडले ? तू तेव्हा कुठे होतास ? मी आणि माझी पत्नी यांनी तेथे ५ वर्षे आनंदात काढली. जेथे आपण जीवनातील अनेक आनंदाचे क्षण व्यतित केले आहेत, ते शहर होरपळत असतांना पहावत नाही. पॅरिसवरील आक्रमणाचे वृत्त कळताच मला तीव्र धक्का बसला. या घटनेमुळे मी फार दु:खी झालो. इंग्लंड आणि वेल्सच्या रोमन कॅथॉलिक चर्चचे कार्डिनल व्हीन्सेंट निकोलस यांनी आतंकवादाचा बीमोड करण्यासाठी कठोर कारवाई करण्याची आवश्यकता प्रतिपादित केली.

काशी विश्‍वनाथ मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या विदेशी महिलांना आता साडी नेसणे बंधनकारक !

इतकी वर्षे हा निर्णय का घेतला नाही ? मंदिरांची सात्त्विकता टिकवण्यासाठी सर्वच मंदिरांत हा निर्णय 
घेतला पाहिजे, तसेच विदेशी पुरुष, भारतीय स्त्री आणि पुरुष या सर्वांनाही हे नियम लागू केले पाहिजेत !
विदेशी महिलांकडून निर्णयाचे स्वागत !
     वाराणसी - जगप्रसिद्ध काशी विश्‍वनाथ मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या विदेशी महिलांना आता साडी नेसणे बंधनकारक करण्यात आले आहे. बहुतांश विदेशी महिला मंदिरात अयोग्य प्रकारचे कपडे परिधान करून येत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. भारतीय महिलांसाठी मात्र हा नियम लागू आहे कि नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. काशी विश्‍वनाथाच्या मंदिरात दर्शनासाठी प्रतिदिन सुमारे ६० सहस्र भाविक येतात. यांपैकी सुमारे ३ सहस्र भाविक विदेशी असतात. काही स्थानिक संघटनांनी मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या विदेशी महिलांच्या पोषाखावर आक्षेप घेत हा प्रकार भारतीय संस्कृतीच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. यावर २१ नोव्हेंबर या दिवशी शासकीय अधिकारी रमेश गोकर्ण यांनी मंदिर परिसरात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर भारतीय संस्कृतीची हानी होईल, असे कपडे परिधान करून मंदिरात जाण्यास अनुमती नाकारण्याचा निर्णय घेण्यात आला. काशी विश्‍वनाथ मंदिरात कमरेचा पट्टा (बेल्ट) वापरण्यास यापूर्वीच बंदी घालण्यात आली आहे.

पाकच्या गोळीबारात सैनिक हुतात्मा !

शत्रूराष्ट्राकडून वारंवार सैनिक मरू देणारा जगातील एकमेव देश भारत !
श्रीनगर - पाक सैन्याने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जम्मू-काश्मीरमधील नौसेरा आणि राजोरी सेक्टरमध्ये २३ नोव्हेंबर या दिवशी गोळीबार केला. यात नियंत्रण रेषेवर तैनात असलेला सीमा सुरक्षा दलाचा एक सैनिक हुतात्मा झाला.
अन्य एका घटनेत आतंकवादी ठार
    कुपवाडामध्ये मागील १० दिवसांपासून सैन्याने चालू केलेल्या ऑपरेशन एन्काऊंटरमध्ये सैनिकांनी एका आतंकवाद्याला ठार केले. हंदवाडा आणि कुपवाडामध्ये ३ आतंकवादी लपले असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी सैन्याला मिळाली होती. यानंतर सैन्याने आतंकवादाविरुद्ध शोधमोहीम हाती घेतली. नुकतेच सैन्याचे पथक आतंकवाद्यांच्या ठिकाणापर्यंत पोहोचल्यावर आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात कर्नल संतोष महाडिक यांना हौतात्म्य आले होते. आतंकवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देत सैनिकांनी २ आतंकवाद्यांना कंठस्नान घातले. यात आतापर्यंत ३ सैनिक घायाळ झाले आहेत. ही मोहीम अजून चालूच आहे.

वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी भाविकांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळून ७ ठार

जम्मू - श्री वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी भाविकांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर जम्मू-काश्मीरमधील कटरा येथे कोसळले. या दुर्घटनेत ७ जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये ६ भाविक आणि एक महिला पायलट यांचा समावेश आहे. २३ नोव्हेंबर या दिवशी ही घटना घडली. हे हेलिकॉप्टर हिमालयन् नावाच्या आस्थापनाचे होते. हेलिकॉप्टरला आग लागून ते कोसळले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे; मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

उत्तर भारतातील अनेक राज्यांत जाणवले भूकंपाचे धक्के

अफगाणिस्तानमध्ये होते भूकंपाचे केंद्र !
      नवी देहली - देहली, जम्मू-काश्मीर यांच्यासह उत्तर भारतातील अनेक राज्यांत रविवार, २२ नोव्हेंबरच्या रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवले. त्यात कुठल्याही प्रकारची जीवित वा आर्थिक हानी झाल्याचे वृत्त नाही. भूकंपाचे केंद्रस्थान अफगाणिस्तानात असल्याने तेथे आणि पाकमध्ये अधिक धक्के जाणवले. रविवारी रात्री ११.४९ वाजता हे भूकंपाचे धक्के जाणवले. त्याचे केंद्र अफगाणिस्तानच्या अश्कशाम भागापासून २२ किलोमीटर अंतरावर होते. अश्कशाम हा भाग अफगाणिस्तान-ताजिकिस्तान सीमेवर आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.९ एवढी होती.

ढाका (बांगलादेश) येथील शिया मुसलमान आणि विदेशी नागरिक यांच्यावर आक्रमण करण्याची आय.एस्.आय.एस्.ची धमकी !

आय.एस्.आय.एस्.सारख्या आतंकवादी संघटनांच्या क्रूर कारवायांना सामोरे 
जाण्यासाठी भारतातील हिंदू सिद्ध आहेत का ?
बंगालमधील युवकांवरही लक्ष !
     बगदाद (इराक) - आय.एस्.आय.एस्. या आतंकवादी संघटनेने ढाका (बांगलादेश) येथील शिया मुसलमान, त्यांची धार्मिक स्थळे, तसेच विदेशी नागरिक यांच्यावर आक्रमण करण्याची चेतावणी दिली आहे. या संघटनेच्या ऑनलाईन टपालात ही धमकी देण्यात आली आहे. बगदादी याच्या नेतृत्वाखाली आय.एस्.आय.एस्. चे जाळे संपूर्ण जगात पोहोचवण्याचे संघटनेने ठरवले आहे. यापूर्वीही इंटेलिजन्स मॉनिटरिंग ग्रूपने बांगलादेशमध्ये आय.एस्.आय.एस्.चा शिरकाव झाल्याची माहिती दिली होती.

महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि गोवा येथील लेखकांचे २५ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत दक्षिणायन्-थिंकींग साऊथ या कार्यक्रमाचे आयोजन

  • तथाकथित विचारवंतांच्या मृत्यूचेही स्वतःच्या प्रसिद्धीसाठी भांडवल करणारे स्वार्थी साहित्यिक !
  • डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि प्रा. कलबुर्गी यांच्या हत्येचे प्रकरण !
पणजी - डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि प्रा. कलबुर्गी यांच्या हत्येच्या प्रकरणी गुन्हेगाराला अटक करण्यास महाराष्ट्र आणि कर्नाटक शासनांना अपयश आल्याच्या कारणास्तव शासनावर दबाव आणण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि गोवा येथील लेखकांनी २५ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत दक्षिणायन्-थिंकींग साऊथ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमांतर्गत पुणे, कोल्हापूर आणि धारवाड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कॉ. पानसरे यांचा २६ नोव्हेंबर या दिवशी, तर प्रा. कलबुर्गी यांचा २८ नोव्हेंबर या दिवशी जन्मदिन असल्याच्या पार्श्‍वभूमीवर उपरोल्लेखित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

अमेरिकेतील न्यू ऑर्लियान्स पार्कमध्ये अंदाधुंद गोळीबार ; १६ जण घायाळ

      न्यूयॉर्क - अमेरिकेतील न्यू ऑर्लियान्स पार्कमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबारात १६ जण घायाळ झाले आहेत. घायाळ नागरिकांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबाराच्या मागील कारण अद्याप समजू शकले नाही. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या पार्कमध्ये चित्रीकरण चालू होते. त्यानंतर काही जण तेथे पार्टी करत होते. त्या वेळी काही जणांनी पार्कमधील नागरिकांवर अचानक अंदाधुंद गोळीबार चालू केला. दोन गटांतील वैमानस्यातून ही घटना घडली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

आय.एस्.आय.एस्.चे पुढील लक्ष्य बांगलादेश !

     बगदाद (इराक) - आय.एस्.आय.एस्.ने स्थापन केलेल्या खिलाफत राज्याच्या सैनिकांचे पुढील लक्ष्य बांगलादेश आहे, असे या संघटनेने म्हटले आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे, फ्रान्ससारखा बलाढ्य देश खिलाफत राज्याच्या सीमेपासून दूर असल्याने स्वत:ला सुरक्षित समजत होता; मात्र खिलाफतच्या केवळ ८ सैनिकांनी पॅरिस शहरावर आक्रमण करून संपूर्ण देशात आणीबाणी घोषित करण्यास भाग पाडले. बांगलादेशमध्ये एका इटालियन नागरिकाची आणि नंतर जपानी नागरिकाची हत्या करून संपूर्ण देशात दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. विदेशी वकिलांतीतील कर्मचारी मोकळे फिरू शकत नाहीत; मात्र तेवढ्यावर समाधान न मानता बांगलादेशातील धर्मनिरपेक्ष शासनाला चांगलाच धडा शिकवणार आहोत. रशियाचे विमान पाडून आम्ही कितीही बलाढ्य राष्ट्राला तोंड देऊ शकतो, हे दाखवून दिले आहे.

श्रीराम मंदिराची स्थापना हीच सिंघल यांना खरी श्रद्धांजली ठरेल ! - सरसंघचालक

     नवी देहली - अयोध्येत श्रीराम मंदिराची स्थापना करणे, हीच सिंघल यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत, असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. विश्‍व हिंदु परिषदेचे नेते अशोक सिंघल यांच्या शोकसभेत ते बोलत होते.
भागवत पुढे म्हणाले,
१. सिंघल दीर्घकाळापासून रामजन्मभूमी आंदोलनाचे नेतृत्व करत होते. त्यांच्या केवळ दोनच इच्छा होत्या. एक म्हणजे अयोध्येत श्रीराम मंदिर स्थापन करणे आणि दुसरी म्हणजे वेदांचा प्रचार-प्रसार करणे.

भारतात छळ होतो, असे वाटणार्‍या मुसलमानांनी खुशाल पाकमध्ये जावे ! - आसामचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य

     गौहत्ती (गुवाहाटी) - भारतात आपला छळ होत आहे, असे ज्यांना वाटते ते भारतीय मुसलमान भारत सोडून कुठेही जाण्यास मोकळे आहेत. पाकिस्तान अथवा बांगलादेश येथे जाण्याची त्यांची इच्छा असेल, तर ते तेथे जाण्यास मोकळे आहेत. त्यांच्यापैकी बरेच जण यापूर्वीच पाकिस्तानमध्ये गेले आहेत, असे विधान आसामचे राज्यपाल पद्मनाभ बाळकृष्ण आचार्य यांनी केले आहे. नुकताच हिंदुस्थान केवळ हिंदूंचाच या त्यांच्या विधानामुळे देशात वाद निर्माण झाला होता. त्याविषयी स्पष्टीकरण देतांना त्यांनी वरील विधान केले.

(म्हणे) लालूप्रसाद यादव यांनीच बलपूर्वक गळाभेट घेतली !

अरविंद केजरीवाल यांचे हास्यास्पद स्पष्टीकरण
     नवी देहली - बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या शपथविधी सोहळ्याला गेलेले देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि लालूप्रसाद यादव यांचे गळाभेटीचे छायाचित्र प्रसिद्ध झाल्यावर केजरीवाल यांच्यावर टीका होऊ लागली. अखेर लालुप्रसाद यादव यांनीच माझी बलपूर्वक गळाभेट घेतली, असे हास्यास्पद स्पष्टीकरण केजरीवाल यांनी या घटनेविषयी दिले.(भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्या लालुप्रसाद यादव यांच्यासह व्यासपिठावर जायचे तरी कशाला ? - संपादक)

गोरक्षकांच्या संरक्षणासाठी कल्याण आणि भिवंडी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

कल्याण येथील आंदोलनात सहभागी हिंदुत्ववादी
     कल्याण - येथे शिवाजी चौकात २२ नोव्हेंबर या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन झाले. या वेळी हिंदुत्ववादी मान्यवरांनी व्यक्त केलेले विचार येथे देत आहोत. 

कोल्हापूर शहरातील १३० अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई होणार !

     कोल्हापूर, २३ नोव्हेंबर (वार्ता.) - येथील वाहतुकीस अडथळा ठरणार्‍या आणि शहरातील पदपाथ, तसेच रस्त्याच्या मध्यभागी उभारण्यात आलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई होणार आहे. कोल्हापूर शहर आणि उपनगरे येथील सुमारे १३० धार्मिक स्थळे ही अनधिकृतपणे उभारण्यात आली आहेत. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने या संदर्भात आदेश काढला असून अनधिकृत मंदिरे आणि मशिदी यांवर कारवाई होणार आहे. कारवाईच्या अंतर्गत ही धार्मिक स्थळे त्या ठिकाणांहून हटवली जाणार आहेत. कारवाईच्या अनुषंगाने महापालिकेने नोटीस काढली असून एका मासाच्या आत या संदर्भातील हरकती आणि सूचना महापालिकेच्या विभागीय कार्यालयाकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

विवाहित हिंदु स्त्रीने धर्मांध प्रियकराच्या साहाय्याने पतीला ठार केले

वसईत लव्ह जिहाद 
     वसई (जिल्हा पालघर) - येथील एका विवाहित हिंदु स्त्रीने धर्मांधासोबतच्या प्रेमात अडसर ठरणार्‍या स्वत:च्या पतीची धर्मांध प्रियकराच्या साहाय्याने हत्या केली. स्वत:चे कृकृत्य उघड होऊ नये, यासाठी पतीचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याला बनाव रचला. (धर्मांधांच्या तथाकथित प्रेमपाशात अडकून स्वत:च्या पतीची हत्या करणार्‍या हिंदु स्त्रीचे हे कृत्य निषेधार्ह आहे. हिंदु स्त्रियांनो, धर्मांधांच्या प्रेमपाशाला न भूलता त्यांच्या विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करा आणि धर्माचरण करून आत्मबळ वाढवा ! - संपादक) 

छेडछाड करणार्‍यांपासून सुटका करतांना मुलगी घायाळ, आईचा मृत्यू

गुन्हेगारांचे नंदनवन बनत असलेले नागपूर ! 
     नागपूर - येथे छेडछाड करणार्‍यांपासून सुटका करण्याच्या प्रयत्नात दुचाकीवरून पडून मुलीच्या आईचा मृत्यू झाला, तर मुलगी गंभीररित्या घायाळ झाली. नागपूर येथे दुचाकीवरून जाणार्‍या मायलेकींचा दुचाकीवरून काही गुंडांनी छेडछाड करण्यासाठी पाठलाग केला. काही अंतर गेल्यावर या गुंडांनी या मायलेकींना गाठले. तेव्हा गुंडांनी या मुलीच्या धावत्या दुचाकीचे हँडल हालवले. तेव्हा मुलगी आणि तिची आई दोघी जणी दुचाकीवरून खाली पडल्या. त्या खाली पडल्यावर गुंड छद्मी हास्य करत निघून गेले. या वेळी मुलीच्या आईचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगी गंभीररित्या घायाळ झाली. या प्रकरणी नागपूर येथील पोलीस पुढील तपास करत आहेत. (नागपूर येथे प्रतिदिन खून, खुनाचे प्रयत्न अशा घटना नित्याच्या झाल्या आहेत. गुन्हेगारांना कोणाचेही भय वाटत नसून ते दिवसाढवळ्या गुन्हे करत आहेत. ही भयावह स्थिती दूर करण्यासाठी पोलिसांनी तत्परतेने पावले उचलणे अपेक्षित आहे ! - संपादक)

हिंदूंनो जागे व्हा, कायद्याचा लढा अटळ आहे ! - खासदार चंद्रकांत खैरे यांचे आवाहन

     संभाजीनगर - मनपाच्या सर्वसाधारण सभेने धार्मिक स्थळांच्या सूचीला स्थगिती दिली. त्याविषयी महानगरपालिकेचे पदाधिकारी आणि नगरसेवक यांचे अभिनंदन करतो. आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. या गोष्टी धार्मिक स्थळे वाचवण्यासाठी सकारात्मक असल्या, तरी न्यायालयात दाखल झालेल्या सूचीवर आक्षेप अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. हिंदूंनो, जागे व्हा, गाफील राहू नका, मंदिरे वाचवण्यासाठी कायद्याचा लढा अटळ आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे उपनेते खासदार श्री. चंद्रकांत खैरे यांनी केले. येथील अनधिकृत मंदिरे पाडण्याच्या संदर्भातील पहिली सूची रहित झाल्यावर येथे पार पडलेल्या मंदिर बचाव समितीच्या बैठकीत ते बोलत होते. 

मध्यप्रदेश येथील ज्योतिर्लिंग आेंकारेश्‍वर येथे सोमयागांतील तिसर्‍या वाजपेय सोमयागास प्रारंभ

सोमयागाचे विधी करतांना मुख्य यजमान अहिताग्नी दीक्षित दाऊलाल
जोशी, त्यांच्या पत्नी सौ. संगीता जोशी आणि अन्य पुरोहित
     मध्यप्रदेश, २३ नोव्हेंबर (वार्ता.) - 'वर्ष २०१६ मध्ये भारतात विपुल सुवृष्टी व्हावी आणि आपत्काळाचे निवारण व्हावे', यासाठी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील श्री योगीराज वेद विज्ञान आश्रमाच्या वतीने अश्‍वमेधयाजी प.पू. नाना काळेगुरुजी यांच्या चैतन्यमय मार्गदर्शनाखाली सौमिक सुवृष्टी योजनेतील २५ सोमयागांचे नियोजन केले आहे. बारा ज्योतिर्लिंगांसहित इतर स्थानीही होणार्‍या या सोमयागांतील तिसर्‍या वाजपेय सोमयागास येथील सुप्रसिद्ध ज्योतिर्लिंग आेंकारेश्‍वर येथे २१ नोव्हेंबरला आरंभ झाला. (शरद ऋतूत होणार्‍या सोमयागास 'वाजपेय सोमयाग' म्हणतात. 'वाज' म्हणजे 'अन्न' आणि 'पेय' म्हणजे 'जल', असा 'वाजपेय' या शब्दाचा अर्थ आहे.) हा सोमयाग मेहताखेडी, नर्मदातट, मध्यप्रदेश येथील भुरानंद आश्रमाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. या सोमयागाचा संकल्प श्री. अरविंद भिडे आणि त्यांच्या पत्नी सौ. भिडे यांच्या हस्ते झाला.

नगर महानगरपालिकेत लक्षावधी रुपयांचा मालमत्ता कर घोटाळा

     नगर, २३ नोव्हेंबर - महानगरपालिकेने ठरवलेल्या करवसुलीच्या कालावधीत नागरिकांनी जमा केलेली रक्कम लिपिक परस्पर हडप करत असल्याची घटना १९ नोव्हेंबर या दिवशी उघडकीस आली होती. यामुळे करसंकलन विभागातील अधिकार्‍यांकडून पडताळणी करण्यात आली. या वेळी एका व्यक्तीने मालमत्ता कराच्या देयकाचे पैसे भरूनही परत देयक आल्याचे प्राथमिक पडताळणीमध्ये आढळून आले. संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत आयुक्त विलास ढगे यांनी चौकशी करण्याचे आदेश उपायुक्तांना दिले होते. (पालिका आयुक्तांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन संबंधितांना कठोर शासन होईल, यासाठी प्रयत्न करावेत, ही अपेक्षा ! - संपादक) त्यामुळे येथील प्रभाग क्रमांक २ मधील पालिका कर्मचारी प्रशांत लोंढे आणि राजू शिरसाठ यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती उपायुक्त अजय चारठाणकर यांनी दिली. (या भ्रष्टाचार्‍यांची छी थू होईल, असे समाजाने केले तर अन्य भ्रष्टाचार्‍यांवर वचक बसेल ! - संपादक)

मद्यधुंद वाहनचालकाचे पोलिसावर आक्रमण !

     ठाणे - मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून अपघात करणार्‍या दोन वाहनचालकांचे भांडण सोडवण्यास गेलेल्या पोलीस कर्मचार्‍याला धक्काबुक्की करून आणि त्याच्या मनगटाचा कडकडून चावा घेऊन एका वाहनचालकाने पळ काढला. अभिराम चौहान या चालकाने २१ नोव्हेंबर या दिवशी रात्री १२ वाजता पोलीस कर्मचार्‍यावर घोडबंदर रोड येथे हे आक्रमण केले. त्याच्यावर कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

मुंबई आणि रायगड पोलिसांची कसून चौकशी !

शीना बोरा हत्याकांड प्रकरण
     मुंबई - शीना बोरा हत्याकांडाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने चालू केल्यापासून रायगड पोलीस आणि मुंबई पोलिसांभोवतीचा फास आवळत चालला आहे. यातील त्यांच्या भूमिकेचाही तपास चालू आहे. एका ज्येष्ठ गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकार्‍याने सांगितले की, रायगडचे तत्कालीन पोलीस अधीक्षक आर्.डी. शिंदे, तत्कालीन उपविभागीय अधिकारी प्रदीप चव्हाण आणि तत्कालीन पोलीस निरीक्षक सुरेश मिरगे यांचीही चौकशी केली जात आहे. तसेच मुंबई पोलिसातील एका अधिकार्‍यावरही लक्ष आहे, असे समजते. 

भ्रष्टाचाराच्या विरोधात नवी यंत्रणा ! - अण्णा हजारे

     पुणे - माझ्या नावाचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर शंभर समित्या बरखास्त केल्या. निःस्वार्थीपणे काम करण्याची सिद्धता असलेल्यांचा समावेश असलेली भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाची यंत्रणा नव्याने उभारली जाणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी येथे दिली. विविध क्षेत्रांत विशेष कार्य करणार्‍यांना धोर्डे पाटील चॅरिटेबल न्यासाच्या वतीने हजारे यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. 

धार्मिक यादवीच्या वाटेवर युरोप !

श्री. भाऊ तोरसेकर
     दोन महिन्यांपूर्वी तरुण भारतमध्ये उलटतपासणी हा रविवारचा स्तंभ लिहायला मी आरंभ केला, तेव्हा माझ्या पहिल्याच लेखाचे भाकड पुराणकथा आणि सत्यकथा असे शीर्षक होते आणि १३ सप्टेंबरला तो प्रसिद्ध झाला होता. नेमक्या दोन महिन्यांनी त्यात वर्तवलेल्या भीतीची १३ नोव्हेंबरला प्रचीती आली. पश्‍चिम आशियातील मुस्लिम अरब निर्वासितांचे लोंढे युरोपकडे धावत होते आणि त्यांना जवळ करायला नजीकच्या अरबी श्रीमंत देशातले सत्ताधीश तयार नव्हते. अशा निर्वासितांपैकी एक कुटुंब बुडाले आणि त्यातल्या कोवळ्या बालकाचा मृतदेह वाहुन किनारी लागलेला बघून जग हळहळले होते.

सावली प्रेमाची !

हिंदु संस्कृतीतील पतीचे धर्मपत्नीविषयीचे भावविश्‍व उलगडणारे पुस्तक !
   
पुस्तक परीक्षण 
    हिंदु धर्मात पती हाच परमेश्‍वर ही शिकवण पतिव्रता स्त्रियांनी धर्मपालन म्हणून आचरणात आणली आणि मोक्षपद प्राप्त केले. सती सावित्री, अनुसुया आदींच्या पातिव्रत्याच्या कथा हिंदु संस्कृतीमध्ये वर्षानुवर्षे वाचायला आणि ऐकायला मिळतात. हिंदु संस्कृतीतील पतीचे धर्मपत्नीविषयी भावविश्‍व उलगडणारी कथा मात्र दुर्लभ म्हणावी लागेल. या पार्श्‍वभूमीवर १ ऑक्टोबर २०१५ या दिवशी प्रकाशित झालेला सावली प्रेमाची हे पुस्तक महत्त्वाचे आहे. हे पुस्तक म्हणजे कै. सुविधा गोखले यांच्या निधनानंतर त्यांचे यजमान श्री. शंकर गोखले यांनी पत्नीविषयी केलेले आत्मनिवेदन होय.

कितीही प्रतिकूल परिस्थिती असली, तरी साधना करणार्‍या जिवाचे रक्षण ईश्‍वर करतोच !

     ख्रिस्ती धर्मात प्रामुख्याने कॅथलिक आणि प्रोटेस्टंट, असे २ प्रमुख पंथ आहेत. कँटरबरीचे आर्चबिशप हे ख्रिस्ती समाजातील प्रोटेस्टंट या पंथाच्या सर्वोच्च स्थानी असतात. या पंथाचे जगात ८ कोटींपेक्षा अधिक लोक आहेत.
    पॅरिसमधील एका आतंकवादी आक्रमणानंतर ख्रिस्ती धर्मातील सर्वोच्च पद धारण केलेले कँटरबरीचे आर्चबिशप पॅरिसवरील आतंकवादी आक्रमणाच्या घटनेनंतर माझा ईश्‍वराच्या अस्तित्वावरचा विश्‍वासच उडाला, असे बीबीसी या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. जर ख्रिस्ती धर्मातील सर्वोच्च पद धारण केलेले कँटरबरीचे आर्चबिशप यांच्या मनातच देवाच्या अस्तित्वाविषयी प्रश्‍न निर्माण होत असेल, तर सर्वसाधारण व्यक्तीचा विचारच न केलेला बरा !
     जगात घडणार्‍या घटनांमागे शारीरिक, मानसिक, बौद्धीक, आध्यात्मिक, अशी अनेक कारणे असतात.
१. प्रारब्ध : प्रत्येक जीव त्याच्या प्रारब्धानुसार जीवनात सुख अथवा दुःख भोगतो. प्रारब्धावर त्याचे काहीच नियंत्रण नसते. आजच्या युगात मनुष्याच्या जीवनात प्रारब्धाचे प्रमाण ६५ टक्के आहे, तर मनुष्याच्या क्रियमाणाचे प्रमाण ३५ टक्के आहे. त्यामुळे त्याने जर चुकीचे क्रियमाण वापरून एखादे गैरकृत्य केले, तर देवाला दोष देऊन काय उपयोग ?

मायेचे स्वरूप ओळखणे कठीण !

दीपावलीच्या सुट्टीनिमित्त प्रतिदिन वाचा बोधकथा !
     मायेला समजणे, ओळखणे फार कठीण असते. एकदा महर्षी नारद भगवान विष्णूला म्हणाले, प्रभो, मला तुम्ही एकदा त्या तुमच्या मायेचे दर्शन घडवा. विष्णु म्हणाला, तथास्तु. काही दिवस गेले. एकदा नारदाला बरोबर घेऊन विष्णु भ्रमणार्थ निघाला. बरेच फिरणे झाल्यावर विष्णूला तहान लागली. तहानेमुळे तो अगदी घाबराघुबरा झाला. तो नारदाला म्हणाला, नारदा, कोठून तरी पाणी आणून माझी तहान भागव बाबा. नारद लगेच पाणी आणायला निघाले. 
     जवळ कोठेही पाणी आढळले नाही. काही अंतरावर एक नदी दिसत होती. नारद नदीकिनार्‍यावर पोहोचले. तेथे एक अतिशय सुंदर तरुणी बसली होती. तिचे रूप पाहून नारद भाळले. नारद तिच्याजवळ गेले. ती रमणी नारदाशी गोड गोड गोष्टी बोलू लागली. ते दोघेही विवाहबद्ध झाले. तिथेच त्यांचा संसार सुरू झाला. त्यांना मुलेबाळे झाली. नारद त्या सर्वांना घेऊन संसाराचा गाडा सुखाने चालवू लागले.

असहिष्णुतेच्या नावाखाली देशद्रोह्यांचे समर्थन करणार्‍या अरुंधती रॉय आणि गिरीष कर्नाड !

डॉ. सच्चिदानंद शेवडे
     एकाच पद्धतीने विचार करणार्‍या आणि स्वत:ला बुद्धीवादी म्हणवून घेणार्‍या दोन विचारवंतांविषयी आज लिहावे लागत आहे. त्यातील अरूंधती रॉय हिला तर महाराष्ट्रातील एका संस्थेने पुरस्कार द्यायचे घोषित केल्याची बोलवा आहे. हे खरे असेल, तर त्या संस्थेचे कार्यकर्ते काहीतरी जाब विचारतील, अशी आशा करूया. अरुंधती रॉयची माहिती आमचे जबलपूर येथील ज्येष्ठ अभ्यासक स्नेही प्रशांत पोळ यांनी दिली, तर कर्नाडांची माहिती आमचे चिरंजीव डॉ. परीक्षित शेवडे यांनी दिली.
१. देशविघातक वक्तव्य करणार्‍या 
तथाकथित विचारवंत अरुंधती रॉय !
      पुरस्कार वापसीची घोषणा करणारी अरुंधती रॉय इन्टलेक्चुअल वर्तुळात वावरते आणि अनेक मासिकांत उलटसुलट लिहीत असते. वर्ष १९९७ मध्ये तिच्या द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या पुस्तकाला बुकर पारितोषिक मिळाले आणि ती प्रकाशझोतात आली. मग त्या पुस्तकाचे काही भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाले. मराठी अनुवाद हा निद्रानाशावरील उत्तम उपाय आहे, एवढे सोडले, तर अन्य काही या बाईने लिहिले नाही. जे लिहिले ते विविध मासिकांतील तिच्या भाषेत एसेज आणि दोन डॉक्युमेंटरींची पटकथा इतकेच होय. या फुटकळ लेखनाच्या जोरावर विचारवंत म्हणून ती आंतरराष्ट्रीय मंचावर अत्यंत आत्मविश्‍वासाने वावरते आणि विदेशी मासिकांत भारताच्या शासनव्यवस्थेचे वाभाडे काढण्याची देशसेवा (?) करत असते. तिचे लेखन साम्यवादाकडे झुकणारे असल्यामुळे असेल; पण पत्रकारांनी तिला इन्टलेक्चुअल विचारवंत, थिंकर वगैरे लेबल्स लावून एक वलय निर्माण केले आहे. अनेकदा देशविघातक वक्तव्ये करूनही भारतीय प्रसारमाध्यमे (मिडिया) तिला डोक्यावर घेतात.

दुष्काळाची पाहणी करणार्‍या केंद्रीय पथकासमोर शेतकर्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न

संभाजीनगर - दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकासमोर परभणी जिल्ह्यातील हरिभाऊ जाधव या शेतकर्‍याने गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अधिकार्‍यांची धावपळ झाली; मात्र जिल्हाधिकार्‍यांनी शेतकर्‍याला सावरले. (आतातरी केंद्रीय पाहणी पथकाने शेतकर्‍यांचे भयाण वास्तव समजून घ्यावे ! - संपादक)
१. नुसती धावती पाहणी काय करता, भरपाई कधी मिळेल ते सांगा, असा आग्रहही धाराशीव येथील शेतकर्‍यांनी केला. या वेळी शेतकरी, पथक, पोलीस आणि अन्य अधिकारी यांच्यात वाद झाला. फुकटचे आणि विचित्र सल्ले देणार्‍या पथकाविषयी शेतकरी संतप्त झाले आहेत.

पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या ज्वालामुखीने सारा समाज भस्म होण्याच्या मार्गावर

१. पाश्‍चात्त्य संस्कृतीचे साजरे डोंगर आणि त्या खाली धुमसणारे सुप्त ज्वालामुखी 
अलीकडे कोणत्याही वर्तमानपत्रात प्रतिदिन हत्या, बलात्कार, स्त्रियांची छेडछाड, विनयभंग, डाका, धाडसी चोरी इत्यादी बातम्या वाचायला मिळतात. त्याचे प्रमाण एवढे वाढले आहे की, सामान्य कुटुंबाला जीवन असुरक्षित वाटू लागले आहे. या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यास शासन असमर्थ झाले आहे.
२. गुन्हेगारी हे अमेरिकी जीवनाचे अंगच होऊन 
बसले असून या गुन्ह्यांना खतपाणी देण्याचे काम स्वतःला सुरक्षित, सुसंस्कृत, सुधारलेला 
समजणारा अमेरिकी समाजच असणे 
    अमेरिकी गुन्हेगाराच्या घड्याळाची टिक्टिक् आता अधिक गतीने होत आहे. २३ मार्च १९८१ च्या टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार अमेरिकेत २४ मिनिटाला १ हत्या आणि १० सेकंदागणिक कुठेतरी लूटमार होते. प्रत्येक ७ मिनिटात एखाद्या स्त्रीवर बलात्कार होतो. चालस् सिबरमनसारखा सुप्रसिद्ध ग्रंथकार म्हणतो, क्राइम इज अ‍ॅज् अमेरिकन अ‍ॅज् जेसी जेम्स (गुन्हेगारी हे अमेरिकन जीवनाचे अंगच होऊन बसले आहे.) या गुन्ह्यांना खतपाणी देण्याचे काम स्वतःला सुरक्षित, सुसंस्कृत, सुधारलेला समजणारा अमेरिकी समाजच आहे, हे आता निर्विवाद झाले आहे. श्री. वारनबर्जर नावाचे सुप्रसिद्ध कायदेपंडित आणि सरन्यायाधीश स्पष्ट म्हणतात की, अमेरिकी शहरात भीतीचे राज्य याच गुन्हेगारांनी आणले आहे आणि त्याचे आतिथ्य आमच्याच सुधारलेल्या समाजाने केले आहे. आज सर्व समाज याच भीतीपोटी अधू झाला आहे, असाही निर्वाळा अमेरिकी जीवनाचा फिजी निरीक्षण अहवाल देत आहे.

हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन धर्मपालन करणे आवश्यक !

       अलीकडे हिंदु मुलींमध्ये कपाळी कुंकू न लावण्याची दुष्ट प्रथा (फॅशनच्या नावाखाली) सर्वत्र पसरत आहे.
    सनातन संस्थेने सनातन प्रभातच्या माध्यमातून फटाके वापरण्याविरुद्ध, नरकासुर प्रतिमादहन प्रथेतील अपप्रकार, सार्वजनिक उत्सवांत बळजबरीने वर्गणी वसूल करणे, या कृत्यांविषयी आवाज उठवला आहे. त्याला मोठ्या प्रमाणात यशही मिळत आहे. तरी कुंकू लावण्याविषयी काही उपाय केल्यास त्यालाही यश मिळू शकते.

आतंकवादी आक्रमणे

इतिहासातील नोंद कि इतिहासजमा ?
     १३ नोव्हेंबर २०१५ हा दिवस फ्रान्सच्या इतिहासात रक्तरंजित दिवस म्हणून उजाडला. आय.एस्.आय.एस्. या आतंकवादी संघटनेने घडवलेल्या बॉम्बस्फोटाने संपूर्ण पॅरिस हादरले. आतंकवादाच्या सावटापासून दूर असलेल्या फ्रान्सला अशा प्रकारचे आक्रमण खरोखरच धक्कादायक होते. या पार्श्‍वभूमीवर तेथील प्रसारमाध्यमे, सक्षम पोलीस यंत्रणा, नागरिक आणि सतर्क शासन यांचे कौतुक करावे तितके थोडे आहे.

बाजीराव-मस्तानी चित्रपटावर बंदी घालण्यात यावी !

सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून इतिहासप्रेमींची मागणी
इतिहासप्रेमी न्यायालयात जाण्याच्या सिद्धतेत !
इतिहासप्रेमींनी चित्रपटाच्या विरोधात उघडलेले फेसबूकचे पान
     पुणे - बाजीराव मस्तानी या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर त्यात इतिहासाचे विकृतीकरण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागला आहे. आता इतिहासप्रेमींनी या चित्रपटाच्या विरोधात सामाजिक संकेतस्थळांवरून मोहीम चालू केली आहे. बॅन द मुव्ही बाजीराव मस्तानी या नावाने एक फेसबूक पान इतिहासप्रेमी श्रद्धा मेहता यांनी सिद्ध केले असून त्याला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (चित्रपटाच्या माध्यमातून होणारे इतिहासाचे विकृतीकरण थांबवण्यासाठी कृतीशील प्रयत्न करणार्‍या इतिहासप्रेमी श्रद्धा मेहता यांचे अभिनंदन ! - संपादक)

राज्यावर पुन्हा गारपिटीचे सावट - हवामान विभाग

दुष्काळ, गारपीट, ऐनवेळी पडणारा पाऊस या संकटांचा सामना करण्यासाठी धर्माचरण करा !
मुंबई - ऐन हिवाळ्यात आलेल्या पावसानंतर राज्यावर गारपिटीचे सावट असणार आहे. २२ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. येत्या २४ घंट्यांत मराठवाड्यात वादळासह गारपीट होणार असल्याचे कृषीमंत्री श्री. एकनाथ खडसे यांनीही म्हटले आहे.

साधकांना सूचना

    पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - कार्तिक शुक्ल पक्ष चतुर्दशी/पौर्णिमा (२५.११.२०१५) सकाळी ७.०९ वाजता
समाप्ती - कार्तिक कृष्ण पक्ष प्रतिपदा (२६.११.२०१५) पहाटे ४.१४ वाजता
उद्या पौर्णिमा आहे.
    इतिहासाचे पान अन् पान साक्षी आहे की, काँग्रेस हिंंदुविरोधी आहे. या भरलेल्या संसदेमध्ये आहे का कोणी हिंदूंचा वाली ? 
(मासिक सावरकर टाइम्स, जून २०१०)

दूरचित्रवाणीचे दुष्परिणाम

     आम्ही मनमोकळे बोलत नाही. विवाहित दांपत्य परस्परांशी, आईबाप मुलांशी, मित्रमंडळी एकमेकांशी, कुणीच कुणाशी भरपूर बोलत नाही, अशी तक्रार पश्‍चिम जर्मनीचे सुविख्यात् चॅन्सलर हलमुट् सेचभिट् यांनी पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीत केली आहे. आम्ही अधिकाधिक अबोल होत आहोत आणि त्याने मला भयभीत केले आहे. परस्परांशी बोलण्यास अधिकाधिक संधी मिळावी; म्हणून चॅन्सलर साहेबांनी सर्व कुटुंबियांना कळकळीची विनंती केली आहे की, आठवड्यातून एकदा तरी दूरचित्रवाणी बंद करा. त्यांच्या निदर्शनास असे आले आहे की, अनेक सद्बुद्ध नागरिकांना दूरचित्रवाणी कार्यक्रमासाठी आपली खाजगी चर्चा लांबणीवर टाकावी लागते. 
- डॉ. त्र्यं.गो. पंडे (टथ, जून १९७८ च्या आधारे) 
(संदर्भ : प्रज्ञालोक, ऑक्टोबर १९७८)
(३७ वर्षांपूर्वीची ही स्थिती आज आणखीन भयानक झाली आहे. आज दूरचित्रवाणीबरोबरच संगणक, भ्रमणभाष आदी अत्याधुनिक उपकरणांमुळे नातेसंबंधांना तडा जात आहे ! - संपादक)
     प्रवाहाच्या बरोबर वहाणारे मुडदे असतात. त्या प्रवाहात स्वतःची दिशा ठरवणारे जिवंत असतात ! - डॉ. सच्चिदानंद शेवडे, राष्ट्रीय प्रवचनकार आणि साहित्यिक, डोंबिवली, ठाणे.

सातारा येथील कै. विमल विश्‍वास सपकाळ यांच्या छायाचित्रामध्ये त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेले पालट

कै. विमल सपकाळ
१. सौ. सुलभा लोंढे (कै. विमल विश्‍वास सपकाळ यांची मुलगी)
अ. छायाचित्रात लाल छटा आल्याचे जाणवते. त्याकडे पाहिल्यावर मन एकाग्र झाले.
आ. आईच्या नाकपुड्या हलल्यासारख्या वाटून ती श्‍वासावाटे जप घेत आहे, असे जाणवले.
इ. आईच्या मासिक श्राद्धाच्या दिवशी घरात चैतन्य आणि आनंद जाणवतो.

फलक प्रसिद्धीकरता

कथित पुरोगाम्यांचा हिंदुद्वेष जाणा !
    कॉ. पानसरे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे कथित पुरोगाम्यांनी समाजात तेढ निर्माण करणारी भित्तीपत्रके लावली. विखारी प्रचार करणार्‍या, बॉम्बस्फोट, खून करणार्‍या सनातन संस्था आणि अभिनव भारत या संस्थांवर बंदी घाला, अशी हिंदुद्वेषी मागणी या भित्तीपत्रकांद्वारे करण्यात आली आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Dhongi adhuniktavadiyonki Hindudveshi mang : hatya karnevali sanatan sansthapar pabandi lao !
Kya aarop karna aur Hindudvesh, yahi adhuniktavad hai ?
जागो ! : ढोंगी आधुनिकतावादीयों की हिंदुद्वेषी मांग : हत्या करनेवाली सनातन संस्था पर पाबंदी लाओ !
क्या आरोप करना और हिंदुद्वेष, यही आधुनिकतावाद है ?

जीवनाची खडतर वाट चालतांना केवळ प.पू. गुरुदेवांच्या कृपेचाच आधार होता, हे सांगणार्‍या आणि कठीण प्रसंगांतही साधनेची तळमळ असलेल्या ६१ टक्के पातळीच्या सौ. अनुराधा तागडे यांनी प.पू. डॉक्टरांना पाठवलेले पत्र !

सौ. अनुराधा तागडे
प.पू. डॉक्टरांच्या चरणी,
शरणागत भावाने, कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी नमस्कार.
१. प.पू. गुरुदेव म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात् श्रीकृष्णच असल्याची निश्‍चिती होणे
     प.पू. गुरुमाऊली, खरोखर तुम्ही कृपाळू आहात, दयाळू आहात, दयेचा सागर आहात ! जगाच्या पाठीवर कुणीही संकटात असतांना धावून जाणारे, अनेक साधकांना अनुभूती देणारे, दुर्धर रोगाने एखादा साधक रुग्णाईत असतांना धीर देऊन त्याला त्या रोगातून बाहेर काढून त्याच्याकडून साधना करून घेणारे, तीव्र प्रारब्धावर मात करायला शिकवणारे आणि कठीण परिस्थितीतही स्थिर राहून आनंदाने सामोरे जाण्यासाठी शक्ती पुरवणारे प.पू. गुरुदेव म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात् श्रीकृष्णच आहेत, याची निश्‍चिती अनेक साधकांच्या अनुभूतीवरून पटेल !
२. दुर्धर रोगाने रुग्णाईत असलेल्या मुलाची आणि सार्‍या कुटुंबाची काळजी घेणार्‍या
 प.पू. गुरुमाऊलीने मुलाची आंतरिक साधना करून घ्यावी, यासाठी प्रार्थना करणे
     प.पू. गुरुमाऊली, डिसेंबर २०१० पासून निखिल (मोठा मुलगा) रुग्णाईत असल्यापासून ईश्‍वर आमची किती काळजी घेत आहे आणि आम्हा सगळ्यांना तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपत आहे, हे मी शब्दांत सांगू शकत नाही. प.पू. पांडे महाराजांनी निरनिराळे त्रास आणि आजार यांवर दिलेल्या मंत्रजपांमुळे अन् उपायांमुळे, तसेच आपल्या कृपाशीर्वादाने निखिलची स्थिती सुधारली. ऑक्टोबर २०१४ पासून तो झोपून आहे. त्याच्या कंबरेखालच्या भागात शक्ती नसल्याने तो उभाही राहू शकत नाही. स्वतःची स्वतः कूसही पालटू शकत नाही, तरीही त्याचा तोंडवळा सतत आनंदी असतो. त्याच्या तोंडवळ्याकडे पाहून तो एवढा रुग्णाईत आहे, असे वाटतच नाही. ते शक्य झाले, केवळ ईश्‍वराच्या कृपेमुळे ! कितीही त्रास झाला, तरी त्याची आंतरिक साधना करून घ्यावी, अशी आपल्या चरणी कळकळीची प्रार्थना आहे.
३. रुग्णालयातील व्ययासाठी पैसा सहजतेने उपलब्ध होणे
     डिसेंबर २०१४ पासून आतापर्यंत त्याला २ वेळा रुग्णालयात भरती करावे लागले. यासाठी लागणारा पैसा आयत्या वेळी कसा उपलब्ध होतो आणि तो प्रश्‍न सहजतेने कसा सुटतो ? याची (श्रीकृष्णाच्या योगक्षेमं वहाम्यहम् या उक्तीची अनुभूती आम्ही सतत घेत आहोत, ते केवळ ईश्‍वराच्याच कृपेमुळे !
४. प.पू. गुरुमाऊलीचे शब्द सतत आठवून त्या बळावर स्थिर आणि आनंदी रहाता येणे
     वर्ष २००९ मध्येे आम्ही रामनाथी आश्रमात रहात असतांना तुम्ही मला सांगितले होते, आपल्याला अजून याची (निखिलची) सेवा करायची आहे. त्याची सेवा करत असतांना मला तुमचे हे शब्द आठवतात आणि त्याची सेवा करतांना पुष्कळ आनंद मिळतो. अनेक जण विचारतात, तुम्ही मुलाची स्थिती अशी असतांना स्थिर आणि आनंदी राहून सर्व कसे करू शकता ? त्या वेळी कृतज्ञतेने ऊर भरून येतो. हे सारे शक्य आहे केवळ आणि केवळ प.पू. गुरुमाऊलीच्या कृपेने !
५. कर्करोग झाल्याने शस्त्रकर्म करावे लागणे आणि कठीण परिस्थितीत सार्‍यांचे साहाय्य लाभणे
     उजव्या काखेत गाठ झाल्यामुळे ३.२.२०१५ या दिवशी मला शस्त्रकर्म करावे लागले. मला कर्करोग झाला आहे, असे निदान झाले. अशा गंभीर स्थितीतही साधक, नातेवाईक यांच्या माध्यमातून तुम्हीच सर्व काही केलेत. अशा कठीण परिस्थितीतही आम्हाला स्थिर ठेवले आणि आनंदी रहाण्यासाठी, तसेच तीव्र प्रारब्धावर मात करण्यासाठी आपणच आम्हाला शक्ती दिलीत अन् देतही आहात. अशा स्थितीत मी निखिलचे काहीच करू शकत नसल्यामुळे यजमानांनाच (श्री. बाळकृष्ण तागडे) त्याच्याकडे बघावे लागते. हे सारे करतांना त्यांची शारीरिक क्षमता आणि मानसिक संतुलन पुष्कळच बिघडते. अशा परिस्थितीत साधनेच्या अनुषंगाने तळमळीने प्रयत्न करण्यात आम्ही उणे पडतो. तुम्हाला अपेक्षित असे प्रयत्न आमच्याकडून करून घ्यावेत. घरात आनंदी आणि साधनेला पोषक वातावरण निर्माण व्हावे, अशी शरणागत भावाने प्रार्थना ! देवा, तुझे अस्तित्व अनुभवता यावे, यासाठी आम्ही काय करू ? आम्ही अज्ञानी, मतीमंद आणि अहंने बरबटलेले आहोत. तुम्हाला अपेक्षित अशी साधना आमच्याकडून होत नाही, याची पुष्कळ खंत वाटते.
६. सार्‍यांच्या आशेचे किरण असलेला चि. प्रणव (नातू) !
     गुरुमाऊली, आपल्याच कृपेने एक आशेचा किरण आहे, तो म्हणजे चि. प्रणव. (चैतन्यचा मुलगा, वय २ वर्षे.) त्याच्याकडे पाहून साक्षात् श्रीकृष्णच आम्हाला आनंद देण्यासाठी आला आहे, असे जाणवते. देवा, तुम्हाला अपेक्षित असे योग्य संस्कार त्याच्यावर व्हावेत. त्याच्यासाठी घरात साधनेला पोषक वातावरण निर्माण व्हावे, अशी तीव्र तळमळ आमच्यामध्येे निर्माण होऊन त्यासाठी योग्य ते प्रयत्न तुम्हीच आमच्याकडून करून घ्यावेत, ही आपल्या चरणी शरण जाऊन प्रार्थना आहे.
     प.पू. गुरुदेव, आपल्याच कृपेने चैतन्यही स्थिर राहून, शांत आणि खंबीरपणे या सर्व प्रसंगांना सामोरे जाऊ शकत आहे. आम्हा सगळ्यांची आध्यात्मिक उन्नती जलदरित्या करून घ्यावी, हीच आपल्या चरणी कळकळीची प्रार्थना आहे.
- सौ. अनुराधा बाळकृष्ण तागडे, पुणे (२.३.२०१५) 

अत्यंत कठीण प्रसंगांतही स्थिर आणि आनंदी रहाणार्‍या सौ. तागडेकाकूंच्या
 घरी सेवा करतांना गुरुकृपेने कोणत्याही परिस्थितीतून तरून जाऊ शकतो,
 हे शिकायला मिळाल्याचे पत्रातून सांगणार्‍या श्रीमती सुनीता देव !
प.पू. डॉक्टरांच्या चरणी,
शरणागत भावाने आणि कृतज्ञताभावाने शि.सा. नमस्कार.
     आपल्याच कृपेने श्री. आणि सौ. तागडे यांच्या घरी सेवेची संधी मिळाली आहे. त्यांचे घर हा आश्रमच आहे, अशा भावाने मी सेवा करत आहे. निखिलची (त्यांच्या मुलाची) स्थिती अतिशय कठीण असूनही तो स्थिर आणि आनंदी आहे. सौ. तागडेकाकूंनी त्याची पुष्कळ सेवा केली. त्यातच त्यांनाही आजार झाला आहे. असे असूनही त्या स्थिर आणि आनंदी आहेत. त्या रुग्णाईत आहेत, असे मुळीच वाटत नाही. त्यांना पाहून मीच घाबरले होते. आपल्या कृपेने घरातील वातावरण, प्रत्येकाची तळमळ आणि भाव मला शिकावयास मिळाला. कोणतीही परिस्थिती असली, तरी गुरुकृपेने आम्ही तरून जाऊ शकतो, हेही शिकायला मिळाले. साधनेच्या दृष्टीने आम्हा दोघींकडून तुम्हीच प्रयत्न करून घ्या, ही प्रार्थना !
- श्रीमती सुनीता देव, सिंहगड रस्ता, पुणे. (९.३.२०१५)
    मजकूर वाचल्यावर सौ. अनुराधा तागडे यांचेच नाही, तर त्यांच्या सर्व कुटुंबाचे कौतुक करावेसे कोणालाही वाटेल; मात्र तेथेच न थांबता सौ. अनुराधा यांच्याप्रमाणे कठीण प्रसंगांना तोंड देऊन साधनेत प्रगती केल्यास त्यांनाही आनंद होईल.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कठीण प्रसंगात स्थिर असणारे आणि साधक अन् संत यांच्याप्रती भाव असणारे उडुपी, कर्नाटक येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. किशोर आचार्य (वय ५९ वर्षे) !

श्री. किशोर आचार्य
१. शांत आणि हसतमुख
     श्री. किशोर आचार्य हे गेल्या १५ वर्षांपासून साधनेत आहेत. ते शांत स्वभावाचे आहेत आणि कितीही कठीण प्रसंग आला, तरी नेहमी हसतमुख असतात.
२. स्थिरता
अ. काही वर्षांपूर्वी त्यांच्यावर अज्ञात व्यक्तीकडून प्राणघातक आक्रमण झाले होते. त्या वेळी ते स्वतः स्थिर होते आणि त्यांनी कुटुंबियांनाही धीर देऊन स्थिर रहाण्यास सांगितले.

मुलाच्या व्रतबंध विधीचे अगत्याने निमंत्रण देणारी पत्रिका !

॥ श्री गणेशाय नमः ॥
॥ कुर्यात् बटोर्मंगलम् ॥
कृतानेक सप्रेम नमस्कार वि.वि.
मना घडवी संस्कार, मना जागवी संस्कार
मना उद्धरी संस्कार, मना तेजवी संस्कार
वेद, विद्या, वर्ण आणि संस्कार यांनी संपन्न अशा आपल्या
संस्कृतीतील सोळा संस्कारांपैकी एक उपनयन संस्कार !

समाधानी वृत्ती आणि नामजपावर अतूट श्रद्धा असलेल्या अन् अध्यात्मातील सर्व तत्त्वे प्रत्यक्ष जीवनात अंगीकारलेल्या आंध्रप्रदेश येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती आंडाळ आरवल्ली (वय ७९ वर्षे) !

श्रीमती आंडाळ आरवल्ली
     श्रीमती आंडाळ रंगनायकाचार्युलू आरवल्ली या वैष्णव संप्रदायानुसार साधना करतात. नामावर त्यांची पुष्कळ श्रद्धा असून त्या अखंड नामस्मरण करण्यात मग्न असतात. त्यांच्या जीवनात अनेक कठीण प्रसंग आले, तरीही न डगमगता नामाच्या बळावर त्यांनी सकारात्मक राहून तोंड दिले. त्या कु. तेजस्वी माडभूषि या साधिकेच्या आजी (आईची आई) आहेत. साधिकेला आजीविषयी जाणवलेली सूत्रे पुढे देत आहोत.

भूस्खलन या विषयाच्या संदर्भातील सेवा करतांना साधिकेला झालेले त्रास

     २३.८.२०१५ या दिवशी दैनिक सनातन प्रभातमध्ये भूस्खलन होण्यामागील आध्यात्मिक कारणे दिली होती. या लेखात भूस्खलनामागे वाईट शक्तींचे मोठे नियोजन आहे, असा उल्लेख आहे. हा लेख इंग्रजी मासिक सनातन प्रभातमध्ये छापण्याचे ठरल्यावर मला पुढील त्रास झाले.

प.पू. गुरुदेवांना भेटल्यावर गुरुमाऊली, तुची कृपेची सावली याची साधिकेला आलेली अद्वितीय अनुभूती !

     प.पू. गुरुदेवांच्या चैतन्यमय सत्संगाचा लाभ आम्हाला मिळाला. तेव्हा त्यांच्या भोवती एक पिवळे वलय दिसत होते. त्यांच्या हास्याने जणु सारी धरित्री आनंदाने नाचत होती. त्यांचा पांढरा पोशाख म्हणजे जणु ढगांनी त्यांच्यातील निवडून दिलेले पांढरेशुभ्र ढग होते. त्यांचा तोंडवळा एवढा तेजस्वी दिसत होता की, सूर्याचे तेजही अल्प असेल ! त्यांच्या बोलण्यात सहजपणा जाणवत होता. त्यांना सर्वांनी साधना करून जन्म आणि मरण

भारतीय संस्कृतीचे आचरण करून मुलीचा वाढदिवस शास्त्रानुसार साजरा करणार्‍या सौ. श्रेया साने !

 
सौ. श्रेया साने
    आधी मी मुलीचा वाढदिवस इतरांप्रमाणेच पाश्‍चात्त्य संस्कृतीनुसार साजरा करत होते. त्या दिवशी प्रथम औक्षण करून नंतर केक कापत असे. सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यावर मला आपल्या संस्कृतीप्रमाणे वाढदिवस का आणि कसा साजरा करायचा ?, हे कळले. तेव्हा आपल्या संस्कृतीप्रमाणेच मुलीचा वाढदिवस साजरा करायचा, असे मी ठरवले.
     माझी मुलगी कु. मनुश्री ही ७ वर्षांची होईपर्यंत तिला केक कापूनच वाढदिवस साजरा करतात, हे ठाऊक होते; कारण सभोवती तसेच वातावरण आहे. देवाच्या कृपेमुळे आम्ही घरातील सर्व जण धर्मशिक्षण वर्गाला जाऊ लागलो.

६४ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. पूर्ती लोटलीकर (वय ५ वर्षे) आणि ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. क्रांती दशरथ राऊत (वय ६ वर्षे) यांचा आध्यात्मिक स्तरावर झालेला संवाद !

कु. क्रांती राऊत
  
कु. पूर्ती लोटलीकर
    २९.११.२०१४ या दिवशी हडपसर, जिल्हा पुणे येथील कु. क्रांती दशरथ राऊत हिने डोंबिवली, जिल्हा ठाणे येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. पूर्ती लोटलीकर हिला दूरभाष केला. त्यांचे दूरभाषवर झालेले संभाषण पुढे देत आहे.
पूर्ती : नमस्कार. माझे नाव कु. पूर्ती लोटलीकर आहे. तुझे नाव काय ?
क्रांती : नमस्कार. माझे नाव कु. क्रांती राऊत आहे.
पूर्ती : तू कुठे रहातेस ?
क्रांती : मी पुण्यामध्ये हडपसरला रहाते. तू कुठे रहातेस ?

३.२.२०१५ या दिवशीचे दैनिक सनातन प्रभात वाचून देवाने वदवून घेतलेले अध्यात्मदृष्ट्या सत्यरामायण !

कृष्ण देवा,
आम्हाला शिकवलेस अध्यात्मदृष्ट्या सत्यरामायण
सांगशील का देवा, कशास पूससी वृक्षलतांना ?
का नाही विचारलेस जटायूंना ? ॥ १ ॥
अहंमुळे बंदिस्त करून नेले दशाननाने । (आज्ञापालन नाही)
बंदीस्त झालो तुझ्या सुवर्णकांचनाच्या
हृदयाच्या मोहाने ॥ २ ॥ (प्रीतीने)
     साधकांनो, उतावळा सो बावळा ! म्हणजे उतावळा बावळट असतो, अशी एक म्हण आहे. साधनेत प्रगती लवकर व्हावी; म्हणून उतावळेपणा करणार्‍यांनो हे लक्षात घ्या ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२३.१०.२०१५)

६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. स्नेहा झरकर (वय १९ वर्षे) हिच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

कु. स्नेहा झरकर
१. स्नेहाच्या संपूर्ण देहातून प्रेमाचा वर्षाव होत आहे, 
असे जाणवून पुष्कळ आनंद वाटणे
     १.६.२०१५ या दिवशी सकाळी स्नेहा देवद आश्रमात आली. त्याच दिवशी स्वतःचे सर्व आवरून ती मला तात्काळ भेटायला आली. मी तिला मिठी मारली. तेव्हा तिच्या संपूर्ण देहातून प्रेमाचा वर्षाव होत आहे, असे मला जाणवले. त्या वेळी मला पुष्कळ आनंद मिळाला आणि माझे शरीर हलके झाल्याचे वाटले.
२. इतरांना आनंद देणे
     माझ्या बहिणी देवद आश्रमात सेवेसाठी आल्या होत्या. ३.६.२०१५ या दिवशी त्या परत जाणार असल्याने स्नेहा आदल्या रात्री ११ वाजता सर्व सेवा पूर्ण करून आम्हाला भेटायला आली. ते पाहून इतरांना आनंद देण्यासाठी ती सतत धडपडत आहे, असे मला वाटले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
      व्यक्तीपेक्षा समाज आणि समाजापेक्षा राष्ट्र महत्त्वाचे आहे, हे न समजणारे व्यक्तीस्वातंत्र्यवाले देशाला विनाशाकडे नेत आहेत ! 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२१.११.२०१५)

बोधचित्र


॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान
गुरु-शिष्य नात्याविषयी गुरूंचा दृष्टीकोन
मी कोणाचा गुरु नाही; पण शिष्य केल्याविना सोडणार नाही.
भावार्थ १ : मी कोणाचा गुरु नाही, यातील मी प्रकृतीतील मीविषयी आहे. शिष्य केल्याविना सोडणार नाही, म्हणजे पुरुषतत्त्वाचा किंवा बाबांच्या गुरूंचा, म्हणजे प.पू. अनंतानंद साईश यांचा शिष्य केल्याविना सोडणार नाही किंवा असा नामजप चालू करून देईन की, सर्वजण नामाचे शिष्य होतील.
भावार्थ २ : गुरु म्हणजे शिव. शिवदशेत मनात विचार येत नाहीत; म्हणूनच मी गुरु आहे हा विचार मनात येऊ शकत नाही. जीवदशेत आल्यावर मी शिष्य आहे एवढाच विचार मनात येतो; म्हणूूनच माझ्या गुरूंकडे मी साधकांना घेऊन जाईन, त्यांना माझ्या गुरूंचे शिष्य करीन.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

योग्य आचार-विचार
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      मानवाचे रूप अल्प काळाचे असते. रूपाला महत्त्व नसून व्यक्तीचे आचार, विचार आणि वागणे यालाच खरे महत्त्व असते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

धक्कादायक वास्तव

संपादकीय 
      नुकतेच १५ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर या कालावधीत जागतिक नवजात बालक काळजी सप्ताह साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंबकल्याण विभागाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार जन्माला आल्यानंतर अवघ्या २४ घंट्यांत मृत्यू पावणार्‍या शिशूंचे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे. प्रतिवर्षी ३ लक्षांहून अधिक नवजात बालकांचा मृत्यू होत आहे. ग्लोबल हंगर इंडेक्सच्या आकडेवारीनुसार जगभरात ५ वर्षांपेक्षा अल्प वयाच्या बालकांच्या मृत्यूंपैकी २४ प्रतिशत मृत्यू भारतात होतात. सर्वांत दाहक वास्तव हे आहे की, जगभरातील नवजात बालकांच्या मृत्यूपैकी ३० प्रतिशत मृत्यू भारतात होतात. त्याही पुढे जाऊन भारतातील चारपैकी एक बालक कुपोषणबाधित असून देशात प्रतिदिन तीन सहस्र मुलांचा कुपोषण आणि कुपोषणामुळे निर्माण होणार्‍या आजारांमुळे मृत्यू होत आहे. अक्षरश: मती सुन्न व्हायी, अशी ही आकडेवारी आहे. भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जात असला आणि त्याच्या लोकसंख्येचा विस्तारही प्रचंड असला, तरी उद्याचे भविष्य किती अंध:कारमय आहे, हेेच ही आकडेवारी सांगते. 
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn