Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आज तुळशीविवाह प्रारंभ

तुळशी विवाह समाप्त 
कार्तिक पौर्णिमा
(२५.११.२०१५)

दाऊदच्या साहाय्याने भारतात दंगली भडकवण्याचा 'आय.एस्.आय.'चा डाव !

शासनाने आता तरी पाकला धडा शिकवण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी अपेक्षा !
छोटा शकील टोळीतील अटकेत असलेल्या आरोपीची पोलिसांना माहिती
नवी देहली - कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिमच्या साहाय्याने भारतात दंगली भडकवण्याचा डाव पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय.एस्.आय.ने आखला आहे. आय.एस्.आय.च्या या कटात 'सिमी' या जिहादी आतंकवादी संघटनेलाही सहभागी करून घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. गुजरातच्या भरूच जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी भाजपच्या २ नेत्यांची हत्या झाली होती. या प्रकरणी कुख्यात गुंड छोटा शकील टोळीतील सय्यद रहमान याला अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीतून ही धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. भारतात दंगली भडकवण्याचा आय.एस्.आय.चा डाव आहे. त्यासाठी विदेशातून आर्थिक साहाय्य करण्यात येत असून दाऊद आणि सिमी संघटना यांना हाताशी धरून भारतात हिंसाचार घडवून आणण्याचा कट रचण्यात आला आहे, असे त्याने सांगितले. विशेषतः दक्षिण भारतातील कट्टर हिंदुत्ववादी नेते, तसेच काही संवेदनशील ठिकाणांना लक्ष्य करण्यात येणार असल्याची स्वीकृती रहमान याने पोलिसांना दिली आहे.

हिंदुस्थान हा केवळ हिंदूंसाठीच आहे ! - आसामचे राज्यपाल आचार्य

गौहत्ती - हिंदुस्थान हा केवळ हिंदूंसाठीच आहे, असे प्रतिपादन आसामचे राज्यपाल पी.बी. आचार्य यांनी एका पुस्तक प्रकाशनाच्या समारंभात केले. 
आचार्य पुढे म्हणाले, 
१. बांगलादेशमधून येथे आलेल्या हिंदु शरणार्थींविषयी आसामला भय बाळगण्याचे काहीच कारण नाही.
२. जगभरातील कुठल्याही देशातील हिंदूने भारतात आश्रय घेणे मुळीच चुकीचे नाही. त्यांना बाहेरचे ठरवले जाऊ नये; मात्र त्यांच्या निवासाचा प्रश्न मोठा असून त्यावर विचार करणे आवश्यक आहे. 
३. तथापि एकाही बांगलादेशी व्यक्तीचे नाव 'नॅशनल रजिस्टर फॉर सिटीझन'मध्ये समाविष्ट होता कामा नये. 

४. पूर्वोत्तर हा धोक्याचा भाग मानला जातो. विविध विचारसरणींचे गट भारताला भयाच्या सावटाखाली ढकलत आहेत. भारताची एकात्मता खंडित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ती खंडित होऊ नये, यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे.

स्वामी विवेकानंद हे भारताचा आत्मा ! - पंतप्रधान नरेंद्र मोदी

कुआलालंपूर (मलेशिया) - स्वामी विवेकानंद हे केवळ एक नाव नाही. सहस्रावधी वर्षांच्या भारतीय संस्कृतीचे आणि सभ्यतेचे ते एक दर्शन आहे. स्वामी विवेकानंद हे भारताचा आत्मा आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. 
आशियाई देशांच्या शिखर परिषदेसाठी मलेशिया दौर्यांवर असलेले पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते २२ नोव्हेंबरला पेटलिंग येथे उभारण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झाले. त्या वेळी ते बोलत होते. रामकृष्ण मिशनने हा पुतळा उभारला आहे. 

मंदिरातील देवता अल्पवयीन असल्याने त्या मंदिराच्या भूमीवर मालकी हक्क स्थापित करू शकतात का ?

याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयाला विचारला प्रश्‍न
      नवी देहली - मंदिरातील देवतांना कायद्याने अल्पवयीन (मायनर) म्हणून मान्यता असल्याने त्या मंदिराला दान दिलेल्या भूमीवर मालकी हक्क स्थापित करू शकतात का ? आणि या भूमीचे मालक मंदिराचे पुजारी अथवा सेवक असू शकतात का ? असे प्रश्‍न याचिकाकर्त्यांनी एका याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयाला विचारले आहेत. 

खंजर गल्ली (बेळगाव) येथील कथित थडग्याचा प्रश्‍न अजूनही चिघळलेलाच

बेळगावमधील लॅण्ड जिहाद !
  • अघोषित संचारबंदी हटवल्याने व्यवहार पूर्ववत् चालू !
  • आता कथित थडग्याभोवतीच पोलिसांचे कडे !
     बेळगाव - कथित थडग्याचा प्रश्‍न सोडवण्यास शासन विलंब लावत असल्याने संतप्त हिंदूनी निषेध मोर्चा काढल्यानंतर येथील खंजर गल्ली भागात पोलिसांनी मोठा फौजफाटा उभा केला होता. त्यामुळे गेले ३ दिवस या भागात अघोषित संचारबंदी लागू केल्याप्रमाणे स्थिती होती. येथील सर्व व्यवहार ठप्प झाले होते; परंतु शुक्रवार, २० नोव्हेंबरला जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत थडग्याचे परीक्षण करण्यासाठी काही तज्ञ मंडळींनी मुदत वाढवून मागितल्याने या प्रश्‍नावर अंतिम निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे या परिसरातील फौजफाटा हालवण्यात आला. तेथील व्यवहार पूर्ववत् चालू झाले. आता केवळ वादग्रस्त थडग्यालाच पोलिसांनी कडे केले आहे.

केजरीवाल यांनी दोषी लालूप्रसाद यादव यांना आलिंगन देणे म्हणजे अण्णा हजारे यांचा विश्वाासघात ! - आपचे बंडखोर नेते शांतीभूषण

नवी देहली - देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमात चारा घोटाळ्यातील दोषी लालूप्रसाद यादव यांना आलिंगन देऊन समाजसेवक अण्णा हजारे यांचा विश्वासघात केला आहे, अशा शब्दांत आम आदमी पक्षाचे बंडखोर नेते शांतीभूषण यांनी केजरीवाल यांच्यावर तोफ डागली. 

भारत असहिष्णु जगाला मार्ग दाखवील ! - राष्ट्र्रपती मुखर्जी

     नवी देहली - सध्या जगभरात अभूतपूर्व असहिष्णुता आणि पराकोटीचा द्वेष पहावयास मिळत आहे. अशा परिस्थितीत भारताची उच्च मूल्ये आणि विचारसरणीच जगाला तारू शकते अन् योग्य मार्ग दाखवू शकते, असे प्रतिपादन राष्ट्र्रपती प्रणव मुखर्जी यांनी केले आहे.
    राष्ट्र्रपती भवनात आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या आंतरराष्ट्र्रीय भारतीय तत्त्वज्ञ संमेलनाचे उद्घाटन मुखर्जी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी उपस्थितांना ते संबोधित करत होते. ३ दिवस चालणार्‍या या संमेलनात जगभरातील भारतीय तत्त्वज्ञ सहभागी झाले आहेत. राष्ट्रपती पुढे म्हणाले, भारत आणि जगापुढील आव्हानांचा सामना करण्यासाठी भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास आवश्यक आहे. विविधतेने भरलेल्या समाजाला एक ठेवण्यासाठीची भारतीय मूल्ये जगभरात पोहोचणे आवश्यक आहे. भारतीय संस्कृती जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. तिचे वेगळेपण आजही कायम आहे. तिच्या विविध प्रवाहांमध्ये ज्ञान, विज्ञान आणि संस्कार यांचे अथांग भांडार दडलेले आहे. जगभरात सध्या भारतीय लोक पोहोचले असून ते त्यांच्या समवेत भारतीय संस्कृती तेथे घेऊन गेले आहेत. विविध क्षेत्रांत त्यांनी त्यांची ओळख निर्माण केली आहे.

इंदूर (म.प्र.) येथे नथुराम गोडसे यांच्या बलीदान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

     इंदूर (मध्यप्रदेश) - शहरातील काछी मोहल्ला भागात असलेल्या हिंदु महासभेच्या कार्यालयात पं. नथुराम गोडसे यांच्या बलीदान दिनाच्या निमित्ताने २१ नोव्हेंबर या दिवशी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईचे महाराणा प्रताप बटालियनचे अध्यक्ष श्री. अजय सेंगर आणि हिंदु महासभेचे महानगर संयोजक श्री. जितेंद्र सिंह ठाकूर उपस्थित होते. या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने काश्मीर आणि बांगलादेश येथील हिंदूंच्या व्यथा दाखवणारे फॅक्ट प्रदर्शन, तसेच सोबत क्रांतीकारकांचेही फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले होते.
    देशापुढील समस्यांकडे भांडवलशाही व साम्यवाद यांच्या दृष्टीकोनातून न पहाता सनातन हिंदु धर्माच्या दृष्टीने पहायला हवे. तरच राष्ट्राचा उद्धार होऊ शकेल !

छत्तीसगडमध्ये ४ महिला नक्षलवाद्यांना कंठस्नान !

नक्षलग्रस्त भारत !
      रायपूर (छत्तीसगड) - छत्तीसगडच्या नक्षलप्रभावीत सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या सैनिकांशी झालेल्या चकमकीत ४ महिला नक्षलवादी ठार झाल्या आहेत. घटनास्थळावरून पोलिसांनी मोठया प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत केला आहे. बस्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक कल्लुरी यांनी ही माहिती दिली. 
       सुकमा आणि दंतेवाडा जवळच्या गादीराम परिसरात नक्षलवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दल आणि छत्तीसगड पोलीस यांनी संयुक्त मोहीम हाती घेतली. त्या वेळी अचानक नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही नक्षलवाद्यांवर गोळीबार केला. जवळपास २ घंटे दोन्ही बाजूंनी गोळीबार चालू होता. त्यात ४ महिला नक्षलवादी ठार झाल्या, तर अन्य नक्षलवादी पसार झाले. घटनास्थळी पोलिसांना महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले. जवळच पडलेली एक ३०३ रायफल, १२ बोअरच्या २ बंदुका आदी साहित्य पोलिसांनी हस्तगत केले आहे. छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या विरोधात चालू असलेल्या कारवाईत गेल्या मासात पोलिसांनी १४ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले होते.

नगरपालिकेने ठराव दिल्यास पंढरपुरात मद्य- मांसबंदी करू ! - एकनाथ खडसे

 कार्तिकी एकादशीनिमित्त महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या हस्ते श्री विठ्ठलाचे पूजन !
यासाठी शासनाने स्वत: पुढाकार घेऊन मद्य-मांसबंदी करावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
पंढरपूर (जिल्हा सोलापूर), २२ नोव्हेंबर (वार्ता.) - मद्य आणि मांस यांवर बंदीसाठी पंढरपूर नगरपालिकेमध्ये मतदान होऊन ठराव झाला, तर तो अमलात आणू, असे महसूलमंत्री श्री. एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले. कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी श्री. खडसे पंढरपूर येथे आले होते. त्यानंतर येथील पत्रकार परिषदेत दैनिक सनातन प्रभातच्या प्रतिनिधीने हरिद्वार, हृषिकेशप्रमाणे पंढरपूर येथे मद्य, मांस विक्रीवर कायमस्वरूपी बंदी आणणार का ?, असा प्रश्न विचारला. त्यास उत्तर देतांना यांनी ही माहिती दिली. २२ नोव्हेंबर या दिवशी कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने श्री. खडसे यांनी सपत्नीक श्री विठ्ठलाची पूजा केली. श्री. खडसे पुढे म्हणाले, कायमस्वरूपी मद्यबंदी करण्याच्या मागणीचा प्रस्ताव शासनाकडे अजून आलेला नाही. या वेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे आणि अन्य प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(म्हणे) 'पोलिसांनी सनातन संस्थेच्या विरोधात 'कोम्बिंग ऑपरेशन' करावे !'

अधिवक्ता प्रकाश आंबेडकर यांचा सनातन संस्थेच्या विरोधात थयथयाट !
पुणे, २२ नोव्हेंबर (वार्ता.) - काही वर्षांपूर्वी पोलिसांनी मागासवर्गीय समाजाच्या वस्त्यांवर 'कोम्बिंग ऑपरेशन' केले होेते. त्यामुळे त्या ठिकाणी पोलिसांची दहशत निर्माण झाली आहे. पोलिसांनी अशाच प्रकारचे 'कोम्बिंग ऑपरेशन' सनातन संस्थेच्या विरोधात करावे. त्यांच्या कार्यकर्त्यांना २४ घंटे बंद करून पोलीस ठाण्यात ठेवा, म्हणजे त्यांच्यातील एक एक जण खरे काय चालू आहे, ते सांगतील, असे सनातनद्वेषी फुत्कार भारिप बहुजन संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता प्रकाश आंबेडकर यांंनी सोडले. (आतापर्यंत विविध अन्वेषण यंत्रणांनी सनातनच्या ४०० हून अधिक साधकांची चौकशी केली आहे. तपासकामात सनातनने या अन्वेषण यंत्रणांना सर्व सहकार्य केले आहे. एका साधकाला केवळ संशयित म्हणून पोलिसांनी कह्यात घेतले आहे. असे असतांना वारंवार सनातनच्या विरोधात नाहक विखारी विधाने करणारे अधिवक्ता आंबेडकर यांनी कधी जिहादी आतंकवादाच्या विरोधात आवाज उठवला आहे का ? - संपादक)

(म्हणे) काँग्रेसला देशद्रोही ठरवणे चुकीचे !

फाळणीसारख्या अनेक देशद्रोही घटनांना काँग्रेस उत्तरदायी असतांनाही 
माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांचे हास्यास्पद विधान
     नवी देहली - काँग्रेस देशद्रोही असून त्यांचे आतंकवादी संघटनांशी संबंध असल्याचा आरोप पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांनी २१ नोव्हेंबर या दिवशी केला. याविषयी काँग्रेसचे नेते तथा माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी अशी टीका करणे अयोग्य आहे, असेे म्हटले आहे. हा संकुचित मनोवृत्तीचा प्रकार आहे. त्यामुळे काँग्रेसला देशद्रोही म्हणणे चुकीचे आहे, असे त्यांनी प्रतिपादित केले. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी बादल यांच्यावर टीका केली आहे. खलिस्तान चळवळीच्या वेळी घटनेची प्रत जाळल्याचा ज्यांना आजही अभिमान वाटतो, त्या बादल यांनी आम्हाला राष्ट्र्रीयत्वाचे धडे देऊ नयेत, असा प्रतिवाद अमरिंदर सिंह यांनी केला आहे. काँग्रेस नेते पी.एल्. पुनिया यांनीही काँग्रेस आतापर्यंत कोणत्याही देशद्रोही कृत्यामध्ये सहभागी नाही, असे म्हटले आहे. (काँग्रेसने निर्माण केलेला काश्मीर प्रश्‍न, पाकधार्जिण्यांचे लांगूलचालन हा देशद्रोह नव्हे का ? - संपादक)

करसवलती बंद केल्यास दलालांना आळा बसेल ! - केंद्रीय अर्थ सचिव

     नवी देहली - करसवलती रहित करण्यासाठीच्या कालबद्ध कार्यक्रमाच्या रूपरेषेचा प्रस्ताव केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने नुकताच सिद्ध केला आहे. आगामी ४ वर्षांत कॉर्पोरेट कराचे दर ३० टक्क्यांहून २५ टक्क्यांपर्यंत न्यून करण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून हा प्रस्ताव सिद्ध केला आहे. कर सवलती रहित केल्यास कॉर्पोरेट कराचे दर न्यून होऊन देशात उद्योगांना प्रोत्साहन मिळेल आणि औद्योगिक क्षेत्रात भारत महत्त्वाचा स्पर्धक बनू शकेल. विविध प्रकारच्या करसवलती टप्प्याटप्प्याने बंद केल्यास दलालांना आळा बसू शकेल, असे मत केंद्रीय अर्थ सचिव शक्तीकांत दास यांनी ट्वीटरद्वारे व्यक्त केले आहे.

(म्हणे) गोमांस व्यापार्‍यांमध्ये ९५ टक्के हिंदू !

आतापर्यंत अवैधरित्या गोहत्या करतांना धर्मांधच पकडले गेले 
असतांना माजी न्यायमूर्ती सच्चर यांचे वक्तव्य
  • भविष्यात गोमांस खाण्याचे सूतोवाच 
  • हिंदुविरोधी वक्तव्य केल्याने विचारवंत आणि शिक्षक यांनी केला निषेध
     मथुरा - भारतात गोमांसाचा व्यवसाय करणार्‍यांमध्ये मुसलमानांपेक्षा हिंदु व्यापार्‍यांची संख्या अधिक आहे. या व्यापारात ९५ टक्के हिंदु व्यापारी आहेत. असे असतांनाही गोमांस खाल्ल्याच्या कारणावरून एका व्यक्तीची केली जाणारी हत्या ही मानवतेची हत्या आहे. खाण्याच्या सवयींना धर्मासमवेत जोडणे योग्य नाही. मीसुद्धा भविष्यात गोमांस खाऊ शकतो, असे वादग्रस्त विधान देहली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांनी केले. मथुरा येथील एका महाविद्यालयात इस्लामवर आयोजित करण्यात आलेल्या परिषदेला ते संबोधित करत होते. (गोमांसाचा व्यापार हिंदू करतात, तर मुसलमान गोहत्या बंदीला विरोध का करतात ? - संपादक) 

पॅरिसमधील आतंकवादी आक्रमणानंतर फ्रान्समध्ये मुसलमानद्वेषात वाढ

फ्रान्समधील मुसलमान नागरिकांची भावना
     पॅरीस - आय.एस्.आय.एस्.ने पॅरिसमध्ये केलेल्या भीषण आतंकवादी आक्रमणानंतर फ्रान्समधील नागरिकांचा मुसलमानांकडे पहाण्याचा दृष्टीकोन द्वेषमय झाल्याची भावना फ्रान्समधील मुसलमान नागरिकांनी व्यक्त केली आहे. सरसकट सर्व मुसलमान आतंकवादी नसतात, सर्व मुसलमानांना आय.एस्.आय.एस्.शी जोडणे अयोग्य आहे, अशा प्रकारची मते तेथील मुसलमान नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहेत. पोलिसांनी येथील ग्रँड मशिदीच्या ठिकाणी नमाजाच्या वेळी शुक्रवारी प्रचंड बंदोबस्त ठेवला होता. मुसलमानांची मेटल डिटेक्टर्सच्या माध्यमातून तपासणी केली जात होती. दरम्यान या आक्रमणांनंतर बुरखाधारी महिला आणि मुसलमान यांच्यावर आक्रमणे होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे सांगितले जात आहे. (सुरक्षेच्या अनुषंगाने काही उपाययोजना केल्यावर लगेच मुसलमानद्वेषात वाढ झाल्याचा कांगावा कशाला करायचा ? - संपादक)

बेल्जियममध्ये आतंकवादी आक्रमणाची शक्यता

     ब्रुसेल्स (बेल्जियम) - बेल्जियममध्ये आतंकवादी आक्रमण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे तेथील सर्व मेट्रो रेल्वे बंद करण्याची घोषणा सार्वजनिक परिवहन विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.
     आतंकवादी आक्रमण कधीही होऊ शकते. ब्रुसेल्समध्ये परिवहन संचालक एस्.टी.आय.बी.ने त्यांच्या संकेतस्थळावर म्हटले आहे की, संघीय अंतर्गत सार्वजनिक सेवेच्या आपत्कालीन केंद्राच्या सल्ल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून आज सर्व मेट्रो रेल्वेस्थानके बंद रहातील. तथापि बसेस मात्र चालू असतील.

जिहादी आतंकवादी आक्रमणानंतर माली (आफ्रिका) येथे आणीबाणी घोषित !

     बमाको (माली) - जिहादी आतंकवाद्यांनी काही दिवसांपूर्वी येथील रॅडिसन ब्लू या हॉटेलवर केलेल्या आतंकवादी आक्रमणानंतर माली शासनाने देशात १० दिवसांसाठी आणीबाणी घोषित केली आहे. या आक्रमणात २७ लोक ठार झाले होते. आक्रमणानंतर देशभरात ३ दिवसांचा राष्ट्र्रीय दुखवटाही पाळण्यात आला. अल्-कायदाशी निगडित अल् मुराबितून या आतंकवादी संघटनेने अल्जेरियाचा आतंकवादी मुख्तार बेलमुख्तार याच्या नेतृत्वाखाली हे आक्रमण केले होते. मालीच्या सैनिकांनी अन्य राष्ट्रांच्या सुरक्षा सैनिकांच्या साहाय्याने बमाको येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये घुसून आतंकवाद्यांचा खात्मा केला होता. या आक्रमणातील अन्य संशयितांचा शोध चालू आहे.

चित्रपटातील त्रुटी दूर करूनच चित्रपटाचे प्रदर्शन करावे ! - श्रीमंत सत्यशीलराजे पद्मसेनराजे दाभाडे

आगामी 'बाजीराव मस्तानी' चित्रपटातील 'पिंगा' गाण्याचे वादग्रस्त प्रकरण 
राजघराण्यातील लोकांचा चित्रपटाला वाढता विरोध !
तळेगाव (जिल्हा पुणे), २२ नोव्हेंबर - संजय भन्साळी यांनी 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटात दाखवलेल्या 'पिंगा' या नृत्यगीतात काशीबाई पेशवे आणि मस्तानी यांचे एकत्र नाचणे, हे न पटण्यासारखे आहे. 'इतिहास' हा इतिहास म्हणूनच दाखवावा आणि चित्रपटातील त्रुटी काढून त्यानंतरच तो चित्रपट प्रदर्शित करावा, अशी मागणी तळेगाव-दाभाडे येथील 'श्रीमंत सरसेनापती सरदार दाभाडे' यांच्या घराण्याचे वंशज श्रीमंत सत्यशीलराजे पद्मसेनराजे दाभाडे यांनी केली आहे. (भन्साळी यांनी अशी चुकीची कृती अन्य धर्मीय राजांंविषयी करण्याचे धाडस केले असते का ? - संपादक) या विषयीचे लेखी निवेदन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिकमंत्री श्री. विनोद तावडे यांना पाठवले आहे.

सोलापूर येथे पोलिसांच्या अनुमतीविना टिपू सुलतानच्या जयंतीनिमित्त धर्मांधांकडून मिरवणूक काढण्याचा प्रयत्न

क्रूरकर्मा टिपू सुलतानचे उदात्तीकरण करणार्या आणि अवैध कृत्ये करणार्या 
त्याच्या वंशजांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
  सोलापूर, २२ नोव्हेंबर - टिपू सुलतान जयंतीच्या निमित्ताने टिपू सुलतान युवक संघटनेच्या वतीने २० नोव्हेंबरला सायंकाळी आदर्शनगर आणि मित्रनगर येथून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकांना पोलिसांनी अनुमती नाकारली होती. या प्रकरणी जोडभावी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे प्रविष्ट करण्यात आले आहेत. 
आदर्शनगर येथून अनुमतीविना मिरवणूक काढल्याच्या प्रकरणी या संघटनेचा अध्यक्ष मुस्ताक पटेल, बाळू नारायण रोमन, सलीम शेख यांच्या विरोधात जोडभावी पोलीस ठाण्यात हवालदार सुनील लाटे यांनी फिर्याद दिली. मित्रनगर येथूनही मिरवणूक काढल्याच्या प्रकरणी जुबेर निसार मुल्ला, सोहेल रहिम शेख यांच्यावरही त्याच पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. 

राष्ट्राचे हित आणि सुरक्षा यांसाठी हिंदुत्ववादी संघटनांचे दादर, अंधेरी आणि ठाणे येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन!

आंदोलन हिंदुत्ववाद्यांचे कि पोलिसांचे ?
अंधेरी येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या बंदोबस्तासाठी अधिक संख्येत आलेले पोलीस !
      सांताक्रूझ (डोमेस्टीक) विमानतळ परिसरातील ए.टी.सी. मनोर्‍याच्याजवळ वाहनतळामध्ये अनधिकृतपणे बांबू आणि ताडपत्रीच्या साहाय्याने बांधण्यात आलेली शेड तात्काळ हटवून तेथे होणारे अनधिकृत नमाजपठण त्वरित बंद करावे; इसिस या आतंकवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी निघालेले भिवंडीतील २० बांगलादेशी युवक, तसेच त्यांना साहाय्य करणारे आणि आश्रय देणारे या सर्वांवर कठोर कारवाई करावी आणि कर्नाटक येथील गोरक्षक, बजरंग दलाचे कार्यकर्ते प्रशांत पुजारी यांची धर्मांधांनी केलेली हत्या, तसेच देशभरातील गोरक्षकांवर सातत्याने होणारी जीवघेणी आक्रमणे पहाता गोरक्षण करणार्‍या कार्यकर्त्यांना स्वसंरक्षणार्थ शस्त्र बाळगण्याची अनुमती मिळावी, या मागण्यांसाठी २१ नोव्हेंबर या दिवशी अंधेरी (पू.) येथील मिरजकर स्मारक चौक, दादर (पू.) येथील स्वामीनारायण मंदिरासमोर आणि ठाण्यातील जांभळी नाका येथे हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.
महत्त्वाचे...!
१. दादर, अंधेरी आणि ठाणे येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदु आंदोलनात विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांसह अनुक्रमे ७०, ६० आणि २५ हून अधिक धर्माभिमानी हिंदू सहभागी झाले होते.
२. या वेळी मोठया संख्येने धर्माभिमानी आणि राष्ट्रप्रेमी हातात फलक घेऊन घोषणा देत उपस्थित होते. अनेकांचे लक्ष वेधून घेणार्‍या या आंदोलनांच्या वेळी अनेक नागरिक रस्ते, सार्वजनिक पूल आदी ठिकाणी थांबून हे आंदोलन पहात होते.
३. ठाणे येथे पाऊस पडत असतांनाही शेवटपर्यंत आंदोलन चालू होते. हिंदुत्ववाद्यांच्या वरील मागण्यांसाठी शासनाला देण्यात आलेल्या निवेदनांवर शेकडो नागरिकांनी या वेळी स्वाक्षर्‍या केल्या.
४. अंधेरी आणि ठाणे येथे स्थानिक पोलिसांचे हिंदुत्ववाद्यांना चांगले सहकार्य लाभले; मात्र दादर येथील आंदोलनात हिंदुत्ववाद्यांना माटुंगा पोलिसांच्या त्रासाला सामोरे जावे लागले.
जमावबंदी, कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण पुढे करत हिंदु जनजागृती समितीचे प्रतिनिधी 
श्री. प्रसाद मानकर यांना पोलिसांनी नोटीस दिली, तसेच आंदोलन लवकर संवण्यास भाग पाडले !
    दादर (पू.) येथील स्वामीनारायण मंदिरासमोर आंदोलन चालू असतांना माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री. बी.एच्. काकड यांनी जमावबंदी, कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण पुढे करत हिंदु जनजागृती समितीचे प्रतिनिधी श्री. प्रसाद मानकर यांना फौजदार दंड प्रक्रिया संहिता कलम १४९ प्रमाणे नोटीस दिली. पोलिसांनी केवळ श्री. प्रसाद मानकर यांना नोटीस दिली असतांनाही तेथील पोलिसांनी हिंदु जनजागृती समितीच्या अन्य कार्यकर्त्यांची नावे आणि इतर माहिती काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यानुसार त्यांची नावेही घेतली.

लोकजागरच्या शिक्षण या विषयावरील अंकाचे प्रकाशन !

सांगली, २२ नोव्हेंबर (वार्ता.) - श्री. प्रवीण कवठेकर संपादित लोकजागरच्या शिक्षण या विषयावरील अंकाचे प्रकाशन ह.भ.प. रमाकांत बोंगाळे महाराज यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या वेळी ह.भ.प. बोंगाळे महाराज म्हणाले, शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. संतांचे शिक्षण आणि साहित्य समाजाला कळले पाहिजे. गेली ७०० वर्षे ज्ञानेश्‍वरी जीवन जगण्याचे तत्त्वज्ञान सांगत आहे. त्याचा अभ्यासक्रमात समावेश व्हावा.
   या प्रसंगी संपादक श्री. प्रवीण कवठेकर म्हणाले, मातृभाषेतून शिक्षण आवश्यक असून लष्करी शिक्षण सक्तीचे करावे. या प्रसंगी भिकाजी पाटील, सांगली जिल्हा वारकरी संप्रदाय संघटनेचे श्री. आनंदराव गोजाराम पाटील, तसेच अन्य वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निंगुडगे (कोल्हापूर) येथे श्री कार्तिकस्वामींची दर्शन-यात्रा

निंगुडगे, ता. आजरा - येथील निंगुडगे बसवाण्णा मंदिरातील श्री कार्तिकस्वामींची बुधवार,२५ नोव्हेंबर २०१५ या दिवशी कृत्तिका नक्षत्र राजयोग पर्वणीवर दर्शन-यात्रा असणार आहे. सकाळी ७.३७ ते उत्तररात्री ४.१४ पर्यंत दर्शनाचा उत्तम योग असून कामनापूर्तीसाठी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानाच्या वतीने करण्यात आले आहे.
    श्री स्कंदपुराणांतर्गत काशीखंडात असे सांगितले आहे की, कार्तिक मासात कृत्तिका नक्षत्राचा योग असतांना योग असतांना जे मानव अर्थात स्त्री-पुरुष, ऋषी-मुनी, तपस्वी, योगी, योगिनी आणि देवाधिदेव आदी भगवान श्री कार्तिकस्वामींचे दर्शन घेतात, ते सात जन्मांपर्यंत धनवान आणि वेद जाणणारे विद्वान (ज्ञानी) होतात. यानुसार विविध इच्छापूर्तींसाठी श्री कार्तिकस्वामींच्या दर्शनाचे महत्त्व आहे. वर्षातून केवळ एकदा या दुर्मिळ पर्वणीवर स्त्रिया श्रद्धापूर्वक आणि भक्तीभावाने दर्शन घेतात.

प्रख्यात संमोहनतज्ञ मनोहर नाईक यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट

आश्रमदर्शन करतांना उजवीकडून दुसरे संमोहनतज्ञ श्री. मनोहर नाईक
रामनाथी - गोरेगाव, मुंबई येथील प्रख्यात संमोहनतज्ञ श्री. मनोहर नाईक यांनी रामनाथी, गोवा येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला नुकतीच सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांच्यासमवेत त्यांचे नातेवाईक आणि अन्य सहकारी उपस्थित होते. सनातन ही एक सर्वोत्तम संस्था आहे, असा अभिप्राय श्री. मनोहर नाईक यांनी आश्रम पाहिल्यानंतर व्यक्त केला.

सावरकरांचा बुद्धीवाद मांडणारी पुरोगामी मंडळी सावरकरांचा हिंदुत्ववाद मात्र अमान्य करतात !

ज्येष्ठ विचारवंत शेषराव मोरे यांचा कथित पुरोगाम्यांच्या सोयीस्करवादावर प्रहार !
     धाराशिव (महाराष्ट्र) - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची धर्मचिकित्सा, म्हणजे धारदार सुरी होती. त्यामुळेच पुरोगामी लोक शाहू, फुले, आंबेडकर यांच्या परंपरेत सावरकरांना कधीही स्थान देत नाहीत. एकतर ही मंडळी सावरकरांच्या बुद्धीवादाचा त्यांना हवा तसा अर्थ काढतात. त्यातही सावरकरांचा बुद्धीवाद मांडणारी ही पुरोगामी मंडळी सावरकरांचा हिंदुत्ववाद मात्र अमान्य करतात, अशा शब्दांत विश्‍व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक शेषराव मोरे यांनी कथित पुरोगाम्यांच्या सोयीस्करवादावर टीका केली. वन्दे मातरम् प्रतिष्ठान, तुळजापूर आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची धाराशिव शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव येथील स्व. प्रमोदजी महाजन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावकरांचे हिंदुत्व या व्याख्यानात ते बोलत होते. 

(म्हणे) सनातनच्या केंद्रांवर छापे न मारल्यास विद्रोह करू !

  • पुरस्कार परत करणार्‍या साहित्यिकांनो, ही असहिष्णुता नव्हे का ?
  • कॉ. पानसरे यांच्या सुनेचे सनातनद्वेषी विधान !  
नगर - सनातनच्या विविध ठिकाणच्या केंद्रांवर शासनाने छापे मारावे. जर सध्याच्या शासनाने हे केले नाही, तर आम्ही त्यांना हे करण्यास भाग पाडणार आहोत. आमचा हा संघर्ष आम्हाला जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आणि जनतेतून उठाव करण्याचा आहे. विद्रोह करण्याचे आम्ही ठरवलेले आहे आणि आम्हाला असे वाटते की, याला यश नक्कीच येईल, असे वक्तव्य कॉ. गोविंद पानसरे यांच्या सून स्मिता पानसरे यांनी येथे केले. पुरोगामी संघटनांनी काढलेल्या संघर्ष यात्रेत त्या बोलत होत्या.

जळगाव येथील प्रांतीय हिंदु अधिवेशनातील वक्त्यांचे मार्गदर्शन

सत्रात सहभागी हिंदुत्ववादी मान्यवर
२१ नोव्हेंबर या दिवशी द्वितीयसत्रातील वक्त्यांचे मार्गदर्शन
मुसलमानांकडून संघटितपणा शिकायला हवा ! - श्री. संदीप फुलपगार
   देवाचे अधिष्ठान नसल्याने आपण यशस्वी होत नाही, याचे भान हिंदु समाजाला नाही. मुसलमानांकडून संघटितपणा कसा असायला हवा, हे हिदूंनी शिकायला हवे. प्रत्येकाने देव भेटण्यासाठी प्रयत्न केल्यावरच देव साहाय्य करेल. या अधिवेशनात सहभागी झाल्यानंतर देवाला भेटल्यासारखा आनंद मिळत आहे. आमचा १० मुलांचा गट हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी सप्ताहातून २ घंटे सेवेसाठी येणार आहे.
संभाजीराजांचा आदर्श ठेवा ! - ह.भ.प. प्रसाद महाराज बागुल
    स्वधर्माविषयी प्रेम असेल, तर समाज काहीही करेल. हिंदु जनजागृती समितीने हिंदु राष्ट्राची दिशा योग्य पद्धतीने कशी करावी, हे सांगितलेले आहे. अशी दिशा आजपर्यंत कुठल्याही हिंदुत्ववादी संघटनेकडे उपलब्ध नाही. साधकाचे आचरण कसे असावे, हे सनातनच्या साधकांकडून शिकायला मिळते. साधू-संत आणि ईश्‍वराचा आशीर्वाद असणारी संघटना म्हणजे हिंदु जनजागृती समिती आहे. संभाजीराजांनी स्वधर्मासाठीच्या ज्या यातना सहन केल्या, त्या आजच्या पिढीला कळल्या, तरच आजची पिढी हिंदु राष्ट्रासाठी लढेल.

॥ हरि ॐ तत्सत् ॥


कर्माचे महत्त्व
कर्माविना तुम्हाला गती नाही; कारण कर्मालाच गती आहे.
भावार्थ : दैनंदिन जीवनव्यापार असो, सुखप्राप्तीच्या साधनांचा शोध असो, दुःख टाळण्याचे उपाय असोत... सारी जगरहाटी, सारे विश्‍वचक्र कर्मामुळेच चालते. आध्यात्मिकदृष्ट्याही मनुष्याचा जन्म ही त्याच्यासाठी कर्मभूमीच आहे; कारण मनुष्य कर्म (साधना) करूनच ईश्‍वरप्राप्ती करून घेऊ शकतो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

धर्माचरणाविषयी हिंदु स्त्रियांमध्ये असणारी पराकोटीची उदासीनता दर्शवणारा प्रसंग !

      डोंबिवली येथे वैश्य समाजाच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याला ५०० महिला उपस्थित होत्या. कार्यक्रम चालू असतांना सूत्रसंचालकाने कुंकू लावून आलेल्या महिलेला हात वर करण्यास सांगितले. आश्‍चर्य म्हणजे ५०० पैकी एकाच महिलेने कुंकू लावले असल्याने तिने हात वर केला. या वेळी तिला भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले.
हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याचाच हा परिणाम
सणापेक्षा वाराला महत्त्व देणारे हिंदू !
     नोव्हेंबर २०१५ मध्ये भाऊबीज शुक्रवारी आल्याने त्या दिवशी मांसाहार करणार असल्याची अनेकांची चर्चा चालू होती. आमच्या शेजारच्या १० पैकी ६ कुटुंबांनी मांसाहार केला होता. त्यात काही सांप्रदायिकांचाही समावेश होता. मांसाहार केलेल्यांपैकी दोघांना याविषयी विचारल्यावर ते म्हणाले, यंदा भाऊबीज शुक्रवारी आली ना !
- श्री. श्रीकृष्ण नारकर, डोंबिवली (पश्‍चिम)

योगदिवस योग केवळ एकच दिवस नव्हे, तर प्रतिदिन कृतीत आणण्याची गोष्ट !

१. एखाद्या विषयाला विशेष महत्त्व देण्यासाठी योगदिवसासारखे दिवस साजरे करण्याची प्रथा रूढ होणे 
आणि तो दिवस संपला की, दुर्दैवाने असे महत्त्वाचे विषय संपतात, अशी परिस्थिती असणे
    २१ जून २०१५ हा दिवस जागतिक योगदिवस म्हणून साजरा झाला. एखाद्या विषयाला विशेष महत्त्व देण्यासाठी अशा प्रकारचे दिवस साजरे करण्याची प्रथा गेली काही वर्षे रूढ झाली आहे. दुर्दैवाने असे महत्त्वाचे विषय तो दिवस संपला की, संपतात. वास्तविक असे विषयही नेहमी अमलात आणण्याची गोष्ट असते. 
    योगाच्या संदर्भात म्हणाल, तर योग हा निश्‍चितच कुतूहलापलीकडे जाऊन गांभीर्याने घेण्याचा विषय आहे. योगसाधना करणार्‍या आणि योग शिकवणार्‍या सहस्रो (हजारो) संस्था देशात अन् परदेशांत आज आहेत. योगदिवसामुळे यामध्ये काही फारसा फरक पडेल, अशी शक्यता नाही. योगदिवसाच्या निमित्ताने भारतातील काही विद्वान आणि राजकारणी यांनी व्यक्त केलेली मते मात्र दु:खदायकच नाहीत, तर हास्यास्पदसुद्धा आहेत.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून लाचखोरांवर १ सहस्र १०० गुन्हे प्रविष्ट

  • कारवाईत १६ कोटी रुपयांची मालमत्ता कह्यात 
  • महसूल विभाग आघाडीवर
पंढरपूर - शासकिय अधिकारी-कर्मचारी विविध कामे करण्यासाठी नागरिकांकडून लाच घेतात. लाचेला आळा घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांत जनजागृती केली होती. यामुळे लाच मागणार्‍यांच्या विरोधात नागरिकांनी तक्रारी केल्या. याची नोंद घेऊन लाचलुचपत विभागाने गेल्या १० मासांत राज्यामध्ये १ सहस्र १०० शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यावर गुन्हे नोंद केले. कारवाईत १६ कोटी रुपयांची मालमत्ता कह्यात घेण्यात आली. कारवाईत महसूल विभाग आघाडीवर आहे. (लाचखोरीची वाढती प्रकरणे आणि लाचखोरांची वाढती संख्या पहाता केवळ कारवाई करून ही लाचखोरी थांबणार नाही. कारवाईच्या जोडीला व्यक्तीची नीतीमत्ता उंचावणारे धर्मशिक्षण सर्वांनाच देणे आवश्यक आहे. - संपादक)

कलियुगात भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांची झालेली दयनीय स्थिती !

दीपावलीच्या सुट्टीनिमित्त प्रतिदिन वाचा बोधकथा !
१. तीर्थक्षेत्रांची स्थिती 
     नारदमुनी सनकादी ऋषींना खिन्न मनाने म्हणाले, पृथ्वी (मनुष्यलोक) हे सर्वांत उत्तम स्थान आहे, असेे समजून मी पुष्कर, प्रयाग, काशी, गोदावरी, हरिक्षेत्र, कुरुक्षेत्र, श्रीरंग, सेतुबंध इत्यादी तीर्थक्षेत्रांच्या यात्रेसाठी निघालो; पण या सर्वच पवित्र ठिकाणी पाखंडीपणा, व्यभिचार इत्यादी कलियुगातील दोषांचा अधिक प्रसार झालेला पाहिला. कंटाळून शेवटी मी मनःशांती मिळवण्यासाठी यमुनेच्या काठी जेथे श्रीकृष्णाने लीला रचली, त्या वृंदावनात गेलो आणि तिथे मी एक विलक्षण आश्‍चर्य पाहिले. 

तूरडाळ आणि कांदा यांच्या पाठोपाठ बासमती तांदूळ महागला

दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यशासनाने धान्यांच्या किंमतींवर नियंत्रण ठेवावे, ही अपेक्षा !
पुणे, २२ नोव्हेंबर - बासमती तांदूळ आणि तांदळाच्या इतर प्रकारची खरेदी करण्यावर शासनाचे नियंत्रण नाही. त्यामुळे गेल्या १० दिवसांमध्ये बासमती तांदळाच्या दरात क्विंटलमागे १ सहस्र रुपयांची दरवाढ झाली आहे. भविष्यात तूरडाळ आणि कांदा यांच्या दराप्रमाणे तांदळाचे दरही आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता येथील मार्केटयार्डमधील तांदळाचे व्यापारी राजेश शहा यांनी व्यक्त केली. सध्याची परिस्थिती पहाता आहे त्या दरापेक्षा अल्प दरात सर्वसामान्यांना तांदूळ उपलब्ध होऊ शकतो. यासाठी शासनाचे नियंत्रण असणे आवश्यक आहे.

आमीर खान यांच्या गाडीच्या धडकेने दुचाकीस्वार जखमी

पाचगणी (जिल्हा सातारा) - येथील खिंगर-राजपुरी रस्त्यावर जन्नीमाता मंदिराशेजारी अभिनेता आमीर खान यांच्या गाडीने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार मनोज तुकाराम गोळे गंभीररीत्या घायाळ झाले. ही घटना २० नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी ७ च्या सुमारास घडली. अपघाताच्या वेळी आमीर खानचा चालक अब्दुल रौफ खान हा गाडी चालवत होता, असे पोलिसांनी सांगितले. ध्वनीचित्रीकरणाच्या निमित्ताने आमीर खान पाचगणी येथे आले आहेत. ते पाचगणी येथे येतांना हा अपघात झाला. यामध्ये श्री. गोळे यांच्या हात, पाय आणि तोंड यांना मार लागला. आमीर यांचे सहकारी, तसेच नागरिक यांनी श्री. गोळे यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले.

पुणे येथे समस्त हिंदु आघाडीच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांचा निषेध

पुणे, २२ नोव्हेंबर (वार्ता.) - माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनी देशातील मोदी शासन हटवल्याविना भारत-पाक संबंध सुधारणार नाहीत, असे देशद्रोही वक्तव्य केले होते. हिंदु आघाडीच्या वतीने अय्यर आणि त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध समस्त आंदोलनाद्वारे करण्यात आला. हे आंदोलन येथील जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी लक्ष्मीबाई पुतळ्याजवळ २० नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी करण्यात आले. या वेळी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी देशद्रोही मणिशंकर अय्यर आणि काँग्रेस यांच्या धिक्काराच्या घोषणा दिल्या. मणिशंकर अय्यर यांची गुणसूत्र पडताळणी (डीएनए टेस्ट) करण्याची मागणीही करण्यात आली. या आंदोलनाच्या वेळी विश्‍व हिंदु परिषदेचे कार्याध्यक्ष दिवंगत अशोक सिंघल यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

सर्व अनधिकृत धार्मिक स्थळांवर दोन वर्षांच्या आत कारवाई करण्याचे गृहविभागाचे आदेश

मुंबई - राज्यातील सर्व अनधिकृत धार्मिक स्थळांवर सहा महिने ते दोन वर्षांच्या आत कारवाई करावी, असे आदेश गृह विभागाने सर्व महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन यांना दिले आहेत.
१. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यशासनाने ५ मे २०११ या दिवशी अनधिकृत धार्मिक स्थळांचे बांधकाम नियमित करणे, स्थलांतरित करणे अथवा पाडून टाकणे, याविषयीचे धोरण निश्‍चित केले आहे.
२. त्यानुसार महापालिका आणि जिल्हा स्तरावरील समित्या यांची कार्यपद्धती स्पष्ट करण्यात आली आहे. त्यासाठी मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक, अमरावती आणि संभाजीनगर या महापालिका स्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या.

२१ वे शतक आशियातील देशांचे ! - पंतप्रधान नरेंद्र मोदी

कुआलालंपूर (मलेशिया) - २१ वे शतक हे आशियातील देशांचे आहे, असे प्रतिपादन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आसिआन परिषदेला ते संबोधित करत होते. पंतप्रधान मोदी मलेशिया आणि सिंगापूर दौर्‍यावर असून या दौर्‍यात दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्र संघटनेच्या (आसिआन) १३ व्या शिखर परिषदेला आणि १० व्या पूर्व आशियाई शिखर परिषदेला ते उपस्थित रहाणार आहेत.

केरळची सद्यस्थिती

१. हे राज्य दक्षिण भारतात आहे. या राज्याच्या राजधानीचे नाव पूर्वी त्रिवेंद्रम होते; पण आता ते थिरूवनंतपुरम् आहे.
२. देशातील पहिली मशीद केरळच्या राजाच्या उदारतेमुळे ९०० वर्षांपूर्वी उभारण्यात आली. आता तेथे सहस्रो मशिदी आहेत. कोझीकोड येथे सर्वांत मोठी मशीद उभारण्यात येत आहे, जिच्यामध्ये ३० सहस्र मुसलमान एकाचवेळी नमाज पढू शकतील. या मशिदीचे नाव आहे शरईमुबारक.
३. १९२०-२२ मध्ये मोपल्यांनी मोठा नरसंहार केला होता. तेव्हा सहस्रो हिंदूंना बलपूर्वक मुसलमान करण्यात आले होते.

ख्रिस्ती आणि मुस्लिम जगतातच होईल संघर्षाचा प्रारंभ !

     जगभरातील जाणकार वाचकांमध्ये सॅम्युल हटिंग्टन हे नाव सुपरिचित आहे. या महान अमेरिकी लेखकाने वर्ष १९९६ मध्ये क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन नावाचे पुस्तक लिहिले. लेखकाच्या जीवनकाळातच या पुस्तकाचा बोलबाला झाला. वर्ष २००८ मध्ये या लेखकाचे निधन झालेे, त्यानंतरही या पुस्तकाची चर्चा आणि औचित्य अल्प झाले नाही. काही दिवसांपूर्वी पॅरिसमध्ये नियतकालिकाच्या कार्यालयावर आतंकवाद्यांनी आक्रमण केले आणि दहा पत्रकारांची हत्या केली, तेव्हापासून हटिंग्टन यांचे पुस्तक पुन्हा चर्चेत आले. संस्कृतींमध्ये संघर्ष होतो, तेव्हा मोठ्या प्रमाणात विनाश ठरलेला असतो आणि भविष्यात या जगाचा विनाश झाला, तर तो सभ्यतांमधील संघर्षातूनच होईल, असे लेखकाचे म्हणणे आहे.

शिपायाकडे २ कोटी रुपये, तर नोकरशहा, नेत्यांकडे किती असतील?

भ्रष्टाचारग्रस्त भारत !
      जर शासकीय कचेरीतील चपराशाकडे (शिपायाकडे) २ कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता, तर मग त्यांच्या वरिष्ठांकड (साहेबांकडे) किती ? राजकीय नेत्यांकडे किती ? असा प्रश्‍न जर शिक्षकांनी तिसरी-चौथीतल्या मुलांना विचारला, तर मुले चटकन उत्तर देतील, शेकडो सहस्रो कोटी ! चपराशी हा शासन व्यवस्थेतला तळागाळातला कर्मचारी. त्यांच्याकडे एवढी काळी माया असेल, तर त्याच्या वरच्या भ्रष्टांकडे नक्कीच काही पट अधिक असणार. साधा हिशोब आहे. सरळसोट गणित आहे.

स्वातंत्र्यवीर दिवाळी विशेषांक राष्ट्रजागृतीचा नंदादीप !

      दिवाळी अंक म्हणजे वाचनसंस्कृतीचे संवर्धन करणारी मराठी भाषेतील चळवळ आहे. साहित्यरसिकांना कथा, काव्य, निबंध, नाट्य, खंडण आदी साहित्याच्या फराळाचा आस्वाद दिवाळी अंकाद्वारे घेता येतो. अलीकडच्या काळात राष्ट्रजागृतीच्या संदर्भातील दर्जेदार साहित्याची जी पोकळी निर्माण झाली आहे, ती भरून काढण्याचे कार्य प्रतिवर्षी स्वातंत्र्यवीर हा दिवाळी विशेषांक करत असतो. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने । शब्दांचीच शस्त्रे यत्न करू ॥ या ब्रीदवाक्याप्रमाणे स्वातंत्र्यवीरचा यंदाचा अंक राष्ट्रजागरण करणार्‍या शिपायासारखा भासतो. संपादक श्री. शंकर गोखले यांचा या अंकातील अग्रलेख छोटा असला, तरी विचारवेधक आहे. त्यात श्री. गोखले लिहितात, आज आपल्या देशापुढे अनेक जटील समस्या उभ्या आहेत. त्यातून देशहिताचाच मार्ग काढणे, हे निश्‍चित सोपे काम नाही. भारतातील आजच्या वादळी परिस्थितीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचे स्थान मार्गदर्शक दीपस्तंभाचे आहे.

आतंकवाद आणि अमेरिकेचा स्वार्थ !

     आतंकवादाचे सावट पुन्हा एकदा गडद होत असल्याचेआय.एस्.आय.एस्.च्या आतंकवाद्यांनी पॅरिसवर केलेल्या आत्मघाती आक्रमणाने स्पष्ट झाले आहे. सहा ठिकाणी झालेल्या या स्फोटांत सव्वाशेहून अधिक जणांचा बळी गेला, शेकडो लोक घायाळ झाले आहेत. या आक्रमणात बळी गेलेल्यांचे आणि घायाळांचे रक्त सुकलेले नसतांनाच पुन्हा आतंकवाद्यांनी पॅरिसवर सशस्त्र आक्रमण केले. या आक्रमणाचा मास्टरमाइंड अब्देलहमीद याच्या शोधासाठी पोलिसांनी टाकलेल्या छाप्याच्या वेळी एकाच ठिकाणी सात मोठे स्फोट झाले. या वेळी एका महिलेने मानवी बॉम्बने स्वत:ला उडवले. या वेळी राबवलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सात आतंकवाद्यांना अटक केली, तर दोघांना ठार मारण्यात पोलिसांना यश आले. त्यात एक अब्देलहमीद असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

२३ नोव्हेंबरपर्यंत उजनीत पाणी न सोडल्यास प्रशासनाच्या विरोधात अवमान याचिका दाखल करणार - आमदार भालके

पंढरपूर - पुणे जिल्ह्यातील ४ धरणांतून उजनी धरणात १०.२० टीएम्सी पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. गेले एक महिना सोलापूर जिल्हा पाण्याची प्रतीक्षा करीत आहे. आणखी किती दिवस वाट पाहायची, असा प्रश्‍न आमदार भारत भालके यांनी केला आहे. सोमवार २३ नोव्हेंबरपर्यंत जर पाणी सोडले नाही, तर उच्च न्यायालयात संबंधित अधिकार्‍यांविरोधात अवमान याचिका दाखल केली जाईल. पाण्याच्या बाबतीत राजकारण आणि भांडण लावण्याचे काम कोणी करू नये. कायद्यानुसार हे पाणी उजणीत सोडण्याचे आदेश आहेत, असे आमदार भालके यांनी पंढरपूर येथे आयोजित पत्रकार परीषदेत सांगितले.

मुंब्रा (जिल्हा ठाणे) येथे मोठ्या प्रमाणात भ्रमणभाषचे अवैध मनोरे

अवैध मनोरे उभारून होईपर्यंत प्रशासन काय करत होते कि त्यांचेही यात काही लागेबांधे आहेत ?
मुंब्रा (ठाणे) - येथे महाराष्ट्र संचार निगम लिमिटेड यांच्याकडून मोठ्या प्रमाणात भ्रमणभाषचे अवैध मनोरे उभे करण्यात आले आहेत. हे १९ नोव्हेंबर या दिवशी उच्च न्यायालयासमोर उघड झाले. त्यांची गंभीर नोंद घेत शासकीय यंत्रणेकडून कायदा हातात घेतला गेल्यास मोठ्या प्रमाणात दंड आकारण्यात येईल, असे न्यायालयाने महाराष्ट्र संचार निगम लिमिटेडला सांगितले आहे. आरिफ नवाज इराकी या मुंब्रा येथील रहिवाशाने या संदर्भात केलेल्या जनहित याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या खंडपिठासमोर सुनावणी झाली. त्या वेळी हे समोर आले. (अवैध मनोरे उभे करणार्‍या संबंधितांवर कठोर कारवाईच व्हायला हवी ! - संपादक)
१. मुंब्य्रात विविध आस्थापनांचे थोडेथोडके नव्हे तर ५८ भ्रमणभाष मनोरे अवैधरित्या उभे राहिल्याचे माहितीच्या अधिकारात मागवलेल्या माहितीत उघड झाले. न्यायालयाने या प्रकरणी वर्ष २०११ मध्ये पालिकेला कारवाईचे आदेश दिले होते. तसेच शुल्काविषयीही काही नियम आखून दिले होते; मात्र या नियमानुसार अर्ज केल्याचा दावा करत इंडस टॉवर्स आस्थापनाने पालिकेच्या कारवाईला स्थगिती मिळवली होती.

सुपरसॉनिक इंटरसेप्टरची यशस्वी चाचणी

बालासोर (ओडिशा) - शत्रूच्या क्षेपणास्त्राचा पाडाव करू शकणार्‍या क्षेपणास्त्रविरोधी प्रणालीची (सुपरसॉनिक इंटरसेप्टर मिसाईल) भारताने २२ नोव्हेंबर या दिवशी यशस्वी चाचणी केली. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम तळा(ओडिशा)वरून बंगालच्या उपसागरात ही चाचणी घेण्यात आली. संरक्षण संशोधन आणि विकास (डी.आर्.डी.ओ.) विभागाने या चाचणीविषयीची माहिती दिली. या क्षेपणास्त्राने लक्ष्याचा अचूक वेध घेतला.

१ आणि २ डिसेंबर या दिवशी देशभरातील अधिकोषांचा संप

मुंबई - स्टेट बँक ऑफ इंडिया व्यवस्थापनाच्या (मॅनेजमेंटच्या) कामगारविरोधी धोरणाविरुद्ध ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज् असोसिएशनच्या वतीने १ आणि २ डिसेंबर या दिवशी देशभरातील अधिकोष (बँका) बंद रहाणार आहेत. देशभरातील अधिकोषांतील जवळजवळ ५ लाख कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत, अशी माहिती असोसिएशनचे सचिव विश्‍वास उटगी यांनी २० नोव्हेंबर या दिवशी आझाद मैदानात पत्रकारांशी बोलतांना दिली.

श्री गजानन महाराज यांच्या पालखी दिंडीतील भजने बंद करण्यासाठी धमकावले !

  •  हिंदू संघटित असते, तर धर्मांध असा उद्दामपणा करू शकले असते का ? यावरून हिंदूसंघटनाचे महत्त्व लक्षात येते !  
  • पाळधी (जळगाव) येथील धर्मांधांचा उद्दामपणा !
पाळधी (जळगाव) - अमळनेर ते शेगाव येथे जाणारी श्री गजानन महाराजांची पालखी दिंडी पाळधी गावात आल्यावर काही धर्मांधांनी शिवीगाळ करत भजने बंद करण्यावरून भाविकांना धमकावले. त्यानंतर भाविकांशी हुज्जत घातली; मात्र भाविकांनी धर्मांधांना न जुमानता भजने चालूच ठेवली. (हिंदूंनो, भक्तीमुळेच धर्मांधांना तोंड देण्याचे आत्मबळ या भाविकांमध्ये आले, हे जाणा ! धर्मांधांच्या धमक्यांना न जुमानता भजने चालू ठेवणार्‍या हिंदूंचे अभिनंदन ! - संपादक) भाविक महिलांनीही शिवीगाळ करणार्‍या धर्मांधांना विरोध केला. (अशा हिंदु स्त्रियाच खर्‍या अर्थाने हिंदु धर्माची शक्ती आहेत ! - संपादक) याविषयी हिंदुत्ववाद्यांना समजताच त्यांनी घटनास्थळी येऊन धर्मांधांना हुसकावले.

इंग्रजाळलेले साहित्य संमेलनांचे अध्यक्ष आणि साहित्यिक !

मराठीपणाची उत्कटता आणि भाषेचा अभिमान नसणे 
     अलीकडे होत असलेल्या साहित्य संमेलनांची बरसात पाहिली की, एका विक्षिप्त आणि विरूप अशा विसंगतीने मन फाटते. अध्यक्षासह सर्व साहित्यिक मराठी भाषा अन् साहित्य यांची ऊर फोडून चर्चा करतांना बुशकोट, पँट आणि बूट इत्यादींनी अलंकृत बनलेले असतात, हा मोठा बेढब संकर आहे. 
   सूत्र हे की, कोणत्या ना कोणत्यातरी पद्धतीने मराठीपण उत्कटतेने व्यक्त झाले पाहिजे. भारतातील इतर भाषांचे साहित्यिक प्रसंगावधान बाळगून आपली वैशिष्ट्ये राखतांना आढळतात. केवळ अपवाद महाराष्ट्राचा दिसतो.
(संदर्भ - प्रज्ञालोक, ऑगस्ट १९९४) 
(सध्या होत असलेल्या साहित्य संमेलनांमधूनही पाश्‍चात्त्य संस्कृतीताच अधिक प्रभाव दिसून येतो. केवळ संमेलनांमधून मराठीचे गोडवे गाणारे प्रत्यक्षात मात्र मराठीच्या जतनासाठी विशेष काही करतांना दिसत नाहीत, हीच शोकांतिका आहे ! - संपादक)
     हिंदूंमध्ये केवळ अस्तित्व आणि जाणीव उरली आहे; पण जागृती नसल्याने हिंदु धर्मावर निरंतर आक्रमणे होत आहेत.
- श्री श्री गुरुनागभूषण शिवाचार्य महास्वामी, कर्नाटक

धर्मांतरित हिंदूंना हिंदु धर्मात परत न घेणे, ही चूक आता तरी सुधारणार का ?

     धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर हा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलेला इतिहाससिद्ध सिद्धांत आहे. या संकटावर मात करण्यासाठी परधर्मात गेलेल्या हिंदूंना शुद्ध करून परत हिंदु धर्मात आणणे, हाच मार्ग श्रेयस्कर ठरतो. परकियांनी जिंकलेली आपली राज्ये आपण युद्ध करून परत मिळवली; परंतु राज्ये परत मिळवल्यानंतर परकीय आक्रमणांनी बाटवलेल्या हिंदूंना मात्र आम्ही परत हिंदु करून घेतले नाही. ही ऐतिहासिक चूक झाली. या चुकीमुळेच इस्लामी आणि इंग्रजी सत्तेने बाटवलेले हिंदू आजही देश विभाजनाच्या कारवायांनी बळी पडत असलेले दिसतात ! - विक्रम सावरकर

गोव्यातील श्रीमती पुष्पा रायकर यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

श्रीमती पुष्पा रायकर
१. वेगाने बोलत असूनही त्याचा सेवेवर परिणाम न होणे
     पुष्पाताई बोलतांना पुष्कळ घाईत बोलतात, तरीही त्यांच्या बोलण्यामध्ये भाव आणि सेवेची पुष्कळ तळमळ असल्यामुळे ताई काय सांगतात, ते समोरच्याला लगेच समजते. ताई विज्ञापन घेणे, नियतकालिकांचे वर्गणीदार करणे, तसेच नियतकालिके आणि सात्त्विक उत्पादन यांचे वितरण करणे, या सेवा करतात; परंतु त्यांच्या बोलण्याच्या या पद्धतीचा सेवेवर परिणाम होत नाही.
२. जास्त सेवा करायला न मिळाल्याने खंत वाटणे
     मडगाव केंद्रात माझे सेवेचे नियोजन काही साधकांसमवेत केले होते, तेव्हा अर्धा दिवस मी पुष्पाताईंसह सेवा केली. त्या वेळी मला पुष्कळ आनंद मिळाला;

भारताची सद्यस्थिती पालटण्यासाठी संत आणि खरे हिंदू यांना महत्त्वाच्या वाटलेल्या हिंदु राष्ट्राच्या पर्यायात चूक ते काय ?

  
श्री. राम होनप
   कपडा अनेक ठिकाणी फाटल्यास मनुष्य नवीन कपडा घेण्याचा पर्याय निवडतो. भारत देशाची आतापर्यंत सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अपरिमित हानी झाली आहे. एकेक घटक दुरुस्त केल्यास त्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतील. त्यामुळे ही परिस्थिती पालटण्यासाठी संतांना आणि खर्‍या हिंदूंना हिंदु राष्ट्राचा पर्याय महत्त्वाचा वाटतो. यात चूक ते काय ? - श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.८.२०१५)

फलक प्रसिद्धीकरता

असे आहे तर सामान्य जनतेला कधीतरी न्याय मिळेल का ?
     ब्रेनमॅपिंग चाचणीत पोलीस सांगतील त्यांची नावे घेतल्यास २५ लक्ष रुपये देऊ अन्यथा तुला फासापर्यंत पोहोचवू, अशी धमकी दिल्याचा गौप्यस्फोट कॉ. पानसरे हत्याप्रकरणी कह्यात घेतलेले सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांनी न्यायालयापुढे केला.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Pansare hatya caseme Sanatanke Sameer Gaikwadne courtme kaha : paisonke badleme kuch logonka Naam bataneke liye mujhpar dabav !
Sameerpar dabav kiska ?
जागो ! : पानसरे हत्या केस में सनातन के समीर गायकवाड ने न्यायालय में कहा : पैसों के बदले में कुछ लोगों का नाम बताने के लिए मुझपर दबाव !
समीर पर दबाव किस का ?

सात्त्विक आवड असणारी आणि कुशाग्र बुद्धीची खानापूर, जिल्हा बेळगाव येथील ५७ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चि. शरण्या संदीप सुतार (वय ३ वर्षे) !

चि. शरण्या सुतार
१. जन्मापूर्वी
१ अ. सनातनच्या ग्रंथातील उपाय नियमित केल्यामुळे आजारी असतांनाही सहनशक्ती मिळून भरपूर आनंद आणि उत्साह वाटणे : शरण्या पोटात असतांना माझ्याकडून सतत प्रार्थना आणि नामजप होत होता. त्या वेळी मी सनातन निर्मित ग्रंथ गर्भसंस्कार पुष्कळ वेळा वाचला आणि त्यामध्ये दिलेले सगळे उपाय, तसेच कापूर आणि उद्बत्तीचे उपाय सतत करत असे. त्यामुळे मी आजारी असूनही सगळे सहन करण्याची शक्ती मिळून मला आनंदी आणि उत्साही वाटायचे.

गुरुकृपा संपादन करण्यात मनाचा अडथळा आणि त्यावरील उपाय

     अध्यात्म हा पूर्ण विषय अर्पणाचा आहे. आपल्याला आपले तन, मन आणि धन सगळेच अर्पण करायचे असते. प्रत्येक साधकाला तन आणि धन अर्पण करता येते; पण मन लवकर अर्पण करता येत नाही. आपली प्रगती आपला मनोलय किती झाला ? यावरच अवलंबून असते. मनाने करणे, इतरांचे न ऐकणे, न स्वीकारणे, आज्ञापालन न करणे, चालढकलपणा असे अनेक दोष आपल्या मनाच्या अडथळ्यांमुळेच असतात. आपल्याला मन सतत फसवत असते, तरीही आपण पुन्हा इच्छेप्रमाणे वागून स्वतःच्या साधनेची हानी करून घेत असतो.

मायेतील गोष्टींमुळे मनात येणार्‍या नकारात्मक विचारांवर मात करण्याविषयी सुचलेली सूत्रे

कु. अजिंक्य वांडरे
१. मनात येणार्‍या अनेक नकारात्मक
 विचारांमुळे सेवेची फलनिष्पत्ती न्यून होणे
     काही जणांना वाटते, मला साधना करायला जमणार नाही. त्यामुळे साधना सोडून द्यावी. व्यवहारात एवढे सुख मिळत असतांना एवढा खटाटोप कशासाठी ? त्यापेक्षा शिक्षण घेऊया. मित्रमैत्रिणींशी मजामस्ती करूया. इथे केवळ स्वभावदोषांचे लिखाण झाले का आणि सत्र झाले का ? एवढेच असते. इच्छा नसूनही मनाविरुद्ध सेवा कशाला करत रहायची ?, असे अनेक विचार साधकांना त्रास देत असतात. तसेच अशा विचारांमुळे साधकांची सेवेची फलनिष्पत्ती न्यून होते.

चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनामध्ये सहभाग घेतल्यानंतर वयाच्या १० व्या वर्षांपासून असलेले तंबाखूचे व्यसन सुटणे

     सिहोरा, सूरत, गुजरात येथील हिंदुत्ववादी श्री. विशालभाई यांनी सांगितले की, चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनामध्ये सहभाग घेतल्यानंतर माझे तंबाखू खाणे सुटले. मी १० वर्षांचा असल्यापासून तंबाखू खात आहे. सकाळी उठल्यानंतर तंबाखू खाऊनच माझ्या दिवसाचा प्रारंभ व्हायचा. आता गुरुदेवांच्या कृपेने ३६ घंटे झाले, तरी मी तंबाखूचे सेवन केले नाही. श्री. विशाल यांना ही अनुभूती अधिवेशनामध्ये सांगा, असे सांगितल्यावर ते म्हणाले, मी आता सांगत नाही. अजून चार दिवस मी अधिवेशनामध्येही आहे. स्वतःवर पूर्ण नियंत्रण मिळाल्यानंतर सांगीन. - श्री. शिवदत्त नाडकर्णी, गोवा
(श्रद्धेने धर्माचरण आणि साधना केल्यास धर्मासंबंधी विविध अनुभव (अनुभूती) येतात, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. धर्म आणि श्रद्धा या गोष्टी वैयक्तिक असल्याने प्रस्तूत लेखात दिलेले अनुभवसुद्धा वैयक्तिकच आहेत. त्यामुळे ते सरसकट लागू होतील अथवा सर्वांनाच ते येतील, असे नाही. - संपादक)

आश्रमातील रहात्या खोलीची स्वच्छता करतांना स्वतःच्या शरिराचीही स्वच्छता करण्याविषयी देवाने दिलेले विचार आणि झालेली विचारप्रक्रिया

श्रीमती रजनी नगरकर
     २३.२.२०१५ या दिवशी आमच्या खोलीची सामूहिक स्वच्छता झाली. त्या रात्री झोप लागत नव्हती; पण मन मात्र काही विचार करत होते. त्यातील देवाने दिलेले विचार पुढे मांडत आहे.
१. खोली स्वच्छता करतांना सूर्यदेवाला प्रार्थना होणे
     खोलीस्वच्छता करतांना खोलीतील सर्व साहित्य काढून उन्हात ठेवले होते. सूर्यदेवाच्या उष्णतेने त्या साहित्यातील काळी शक्ती जाऊन तेथे सात्त्विकता यावी, अशी प्रार्थनाही केली.

मुंबई येथील कु. स्मितल भुजले यांना पडलेली विविध स्वप्ने

१. वर्ष २००४ पासून मला स्वप्नात अनेक देवता, तसेच वेगवेगळी मंदिरे दिसत आहेत. विशेषकरून मला भगवान शंकराची पिंडी बर्‍याच वेळा दिसते. मला निसर्गाचीसुद्धा फार स्वप्ने पडतात.
२. प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. डॉक्टरही माझ्या स्वप्नात आले आहेत. एकदा मला स्वप्नात असे दिसले की, प.पू. डॉक्टर आमच्यासमवेत नवीन घर शोधायला आले आहेत. या स्वप्नात आमच्यासमवेत प.पू. भक्तराज महाराजही होते आणि खरेच त्यानंतर काही दिवसांनी आम्हाला नवीन घर मिळाले.
     जरब बसविणे चांगल्या राज्यकर्त्यासाठी महत्त्वाचे असते. आपल्या लोकशाहीत जरब डेफिसिट आहे. श्रीमंतांना आणि सुप्रसिद्ध लोकांना आपल्या देशात सजा म्हणून होत नाही. - निनाद बेडेकर (धर्मभास्कर, जून २०१५)

स्वतःच्या अडचणींविषयी काहीही न सांगता केवळ गुरूंवर श्रद्धा ठेवून सत्मध्ये रहाणार्‍या ६० टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती शांताक्का (वय ४२ वर्षे) !

श्रीमती शांताक्का गौडा
     श्रीमती शांताक्का गौडा यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. त्यांना घरातून साधनेसाठी विरोध आहे, तरीही त्या मिळालेल्या वेळेचा योग्य वापर करतात. त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.
१. सौ. लता आरेर, धारवाड
१ अ. शिकण्याची वृत्ती : शांताक्का प्रसारात अनुभवी साधकांसह गेल्यावर विषय समजून घेऊन पुढच्या घरात स्वतः सांगण्याचा प्रयत्न करतात.
१ आ. घरातील धान्य आणण्यास दुय्यम प्राधान्य देऊन पंचांगांच्या सेवेला अधिक महत्त्व देणे : शांताक्कांना मिळकत आणि महागाई यांचा मेळ घालणे अत्यंत कठीण झाले होते. त्यांना सेवेसाठी बाहेर जाण्यास पैसे नसायचे. एकदा पंचांगांच्या सेवेला जाण्यासाठी त्यांच्याकडे बसभाड्यासाठीही पैसे नव्हते.

उमगले रुक्मिणीला, त्या तुलसीपत्राने कैसी झाली श्रीहरीची तुला ।

आज तुळशीविवाह प्रारंभ त्यानिमित्ताने... एकदा आम्ही कृष्णाच्या घरी (महालात) गेलो ।
कृष्ण म्हणाला, मला थोडे काम आहे, तू रुक्मिणीकडे जा ॥ १ ॥
वदलो आम्ही रुक्मिणीस, सांग रुक्मिणी, सांग आम्हा,
झाली कैसी एका पत्राने श्रीहरीची तुला ? ॥ २ ॥

तळमळीने साधना करणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या विशाखापट्टणम् येथील सौ. हंसा पटेल !

सौ. हंसा पटेल
१. चिकाटीने साधना करणे
      सौ. हंसाताई (वय ३९ वर्षे) या ५ वर्षांपासून साधनेत आहे. ती विशाखपट्टणम् येथील गाजुवाका येथे रहाते. तेथे सहसाधक किवा सत्संग असे काही नाही, तरीही ती सेवा आणि साधना चिकाटीने करते.
२. विरोध असूनही सेवा करणे
      ताईला सेवेसाठी घरातून बाहेर पडण्यास विरोध आहे, तरीही ती सेवा करते. ती मासातून (महिन्यातून) दोन वेळा विशाखापट्टणम्ला येऊन सात्त्विक वस्तू आणि साप्ताहिक सनातन प्रभात यांचे वितरण करते.

स्वतःच्या देहत्यागाकडे साक्षीभावाने पहाणारे आणि भगवंत हिंदु संस्कृती टिकवीलच, याची निश्‍चिती असलेले प.पू. नाना काळे !

   
प.पू. नाना काळेगुरुजी
  ७ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर २०१५ या कालावधीत परळी येथे सोमयाग चालू असतांना मी प.पू. नाना काळे यांना विचारले, आपण गेल्यानंतर पुढे या यज्ञसंस्कृतीचे जतन कसे होणार, अशी चिंता आम्हाला वाटत आहे.
     प.पू. नाना क्षणभर थांबले आणि म्हणाले, खरंच, आता आमचे वरचे तिकिट भगवंताने काढले आहे. त्यांच्या गुरूंच्या (सद्गुरु गुळवणी महाराज हे प.पू. नानांचे दीक्षागुरु आहेत. - संकलक) आठवणीने त्यांचा कंठ दाटून आला होता. ते गदगदलेल्या स्वरात म्हणाले, आजपर्यंत जशी ही संस्कृती कोणाच्या ना कोणाच्या तरी माध्यमातून टिकली आहे, तशीच ती पुढेही टिकून राहील.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
'बुद्धीप्रामाण्यवाद्यांना 'मला सर्व कळते', असा अहंकार असतो. त्यामुळे काही जाणून घ्यायची जिज्ञासा नसल्याने बुद्धीपलीकडील अध्यात्मशास्त्र त्यांना मुळीच ज्ञात नसते आणि तरीही ते अध्यात्मातील अधिकारी संतांवर टीका करतात !' - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१९.१०.२०१५)

बोधचित्र


प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मानवी जीवन 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     कठीण परिस्थिती आणि संकटे यांना न घाबरता धैर्याने अन् हुशारीने त्यांना सामोरे जाऊन त्यातून मार्ग काढणे, हाच खरा पुरुषार्थ ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

जागतिक समस्या : जिहादी आतंकवाद

संपादकीय 
     गत आठवड्यातील घडामोडींवर दृष्टीक्षेप टाकल्यास एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. सध्या केवळ भारतातच नाही, तर जगभरात जिहादी आतंकवादाने थैमान घातले आहे. कुठे आय.एस्.आय.एस्. म्हणून, तर कुठे बोको हराम म्हणून, तर कुठे केवळ कट्टरपंथी असे संबोधले जाणारे हे मूठभर जिहादी अखिल विश्‍वाची डोकेदुखी बनले आहेत. काही दशकांपूर्वी पाकसारख्या कपटी देशांमुळे आतंकवादाची समस्या केवळ आशिया खंडातच जाणवत असे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn