Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आजचे दिनविशेष

आज कार्तिकी एकादशी
आज संत नामदेव महाराज यांची जयंती

पोलीस सांगतील ती नावे घेण्यासाठी २५ लाखांचे आमिष अथवा फाशी देण्याची धमकी ! - समीर गायकवाड यांचा न्यायाधिशांसमोर गौप्यस्फोट

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी समीर गायकवाड 
यांच्या न्यायालयीन कोठडीत ५ डिसेंबरपर्यंत वाढ
काही सामाजिक संघटनांचा पोलिसांवर दबाव !
  कोल्हापूर, २१ नोव्हेंबर (वार्ता.) - ९ ऑक्टोबरला न्यायालयात उपस्थित करत असतांना गाडीतून उतरल्यावर सुनावणीसाठी न्यायालयात नेत असतांना माझ्याजवळ एक व्यक्ती आली. तिने ती पोलीस असल्याचे सांगून 'साहेबांचा निरोप सांगायचा आहे', असे माझ्या कानाजवळ येऊन सांगितले. माझ्या डोक्यावर काळे कापड असल्याने ती व्यक्ती कोण, हे मला ओळखता आले नाही. ती व्यक्ती म्हणाली, "मी पोलीस आहे. आमच्यावर काही सामाजिक संघटनांचा दबाव आहे. (ही आहे पुरोगाम्यांची दडपशाही ! - संपादक) त्यामुळे साहेबांचा निरोप आहे की, तुझी ब्रेनमॅपिंग चाचणी होणार आहे. त्याला तू होकार दे. यात तू आम्ही सांगतो त्यांची नावे घे. तुला २५ लक्ष रुपये देऊ. माफीचा साक्षीदार करू. असे न केल्यास या प्रकरणी आम्ही तुला फासापर्यंत पोहोचवू", असा गौप्यस्फोट कॉ. पानसरे हत्या प्रकरणी संशयावरून कह्यात घेतलेले सनातन संस्थेचे साधक श्री. समीर गायकवाड यांनी न्यायाधिशांसमोर केला. (असा चालतो पोलीस यंत्रणेचा भीषण कारभार ! - संपादक) २१ नोव्हेंबरला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री. अजित यादव यांच्यासमोर 'व्हिडिओ कॉन्फरन्सिंग'द्वारे श्री. समीर यांनी त्यांचे म्हणणे मांडले. 

काँग्रेसला 'राष्ट्रद्रोही' पक्ष घोषित करा ! - पंजाबचे उपमुख्यमंत्री बादल

मोदी शासनाने याविषयी त्वरित योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा !
काँग्रेस पंजाबमध्ये आतंकवादाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप
चंदीगड - काँग्रेस पक्ष आतंकवादाला प्रोत्साहन देत असल्याने काँग्रेसला 'राष्ट्रद्रोही पक्ष' घोषित करावे, अशी मागणी पंजाबचे उपमुख्यमंत्री तथा शिरोमणी अकाली दल या पक्षाचे नेते सुखबीरसिंग बादल यांनी एका पत्रकार परिषदेत केली. या मागणीसाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेणार असल्याचेही बादल यांनी सांगितले.

आय.एस्.आय.एस्.वर आक्रमण करण्यास संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची संमती !

संयुक्त राष्ट्रे - पॅरिसवरील आक्रमणानंतर फ्रान्सने आय.एस्.आय.एस्. या आतंकवादी संघटनेवर आक्रमण करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे सादर केला होता. परिषदेच्या या बैठकीत हा प्रस्ताव एकमताने संमत करण्यात आला.

(म्हणे) भारतातील वातावरण धोकादायक !

खरेतर पाक पोसत असलेल्या आतंकवादी संघटनांचाच आज जगाला धोका निर्माण झाला आहे. 
तरीही भारतातील वातावरण धोकादायक म्हणणे म्हणजे पाकच्या उलट्या बोंबाच !
  • आतंकवाद्यांना पोसणार्‍या पाकचा कांगावा !
  • पाकने रहित केली भारतासोबतची क्रिकेट मालिका ! 
  • हिंदुत्ववादी संघटनांकडून धोका असल्याची ओरड !
     नवी देहली - पाकने या मासाअखेरीस आयोजित करण्यात आलेली भारत-पाक बिझनेस फोरमची बैठक रहित केली आहे. भारतात पाकच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाला हिंदु कट्टरतावादी संघटनांकडून धोका निर्माण होऊ शकतो, असा कांगावा करत ही बैठक रहित करण्यात आल्याचे पाकच्या नवाज शरीफ शासनाने भारताला कळवले, तसेच डिसेंबर मासात आयोजित करण्यात येत असलेली भारत-पाक क्रिकेट मालिकाही रहित केली. पाकच्या एका उच्चपदस्थ अधिकार्‍याने एका इंग्रजी वृत्तपत्राला ही माहिती दिली.

इतिहासाचे विकृतीकरण न वगळल्यास 'बाजीराव-मस्तानी' चित्रपटाला विरोध करू ! - हिंदु जनजागृती समिती

मुंबई - संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'बाजीराव मस्तानी' या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शित झालेल्या ट्रेलर, टिझर, तसेच 'पिंगा पिंगा' या गाण्यातून इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आले आहे. या गाण्यात बाजीरावांची पत्नी काशीबाई आणि मस्तानी यांना एकत्र नृत्य करतांना दाखवण्यात आले आहे. पेशव्यांच्या घरंदाज स्त्रिया अशाप्रकारे अंगविक्षेप करून नाचत नसत. तत्कालीन राजघराण्यातील स्त्रियांनी त्यांच्या हातातील तलवारींनी पराक्रम गाजवून शत्रूला नाचवले आहे. 

'बाजीराव-मस्तानी' या चित्रपटातील 'पिंगा' हे गाणे काढा ! - डॉ. उदयसिंह पेशवे यांची मागणी

भारतात बहुसंख्य हिंदु असतांना हिंदूंना अशी मागणी का करावी लागते ?
चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यासाठी 
मुंबई उच्च न्यायालयात 'ऑनलाईन' याचिका 
पुणे, २१ नोव्हेंबर - पहिले बाजीराव पेशवे हे मराठी राज्याच्या छत्रपतींचे पंतप्रधान होते. अशा पंतप्रधानांच्या कुलीन पत्नीने 'बाजीराव-मस्तानी' या चित्रपटात दाखवलेल्या 'पिंगा' या गाण्यातील दृश्याप्रमाणे नृत्य करणे अशक्य होते. इतिहासामध्ये तसे संदर्भ मिळत नाहीत. त्या काळच्या स्त्रिया अंगभर वस्त्र लपेटून घराबाहेर बाहेर पडत. त्यामुळे लोकांमध्ये जाऊन नृत्य करणे, ही शक्यताही नव्हती. 'पिंगा' गाण्यात दाखवलेले नृत्य हे पारंपरिक नसून ते लावणीसारखे चित्रित करण्यात आले आहे. या गाण्यामुळे कुलीन मराठी स्त्रियांविषयी समाजात अपसमज पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे चित्रपटातून पिंगा हे गाणे काढावे, अशी मागणी पेशव्यांचे वंशज डॉ. उदयसिंह पेशवे यांनी केली आहे. (हिंदूंनो, तुमच्या राष्ट्रपुरुषांचा अवमान करणार्यास चित्रपटांच्या विरोधात वैध मार्गाने आवाज उठवा ! - संपादक)

उज्जैन (मध्यप्रदेश) येथील अखिल भारतीय कालिदास संमेलनात पाश्‍चात्त्य पद्धतीत ऐकवले जाणार संस्कृत श्‍लोक !

देवभाषा संस्कृतचे अशा पद्धतीने होणारे विडंबन करणारे हिंदूच हिंदु धर्माचे खरे वैरी होत ! 
कुठे संस्कृत भाषेचे महत्त्व जाणून त्यावर संशोधन करणारे पाश्‍चात्त्य, 
तर कुठे संस्कृतचे विडंबन करणारे भारतीय तरुण !
      उज्जैन येथे २१ नोव्हेंबर २०१५ पासून चालू होणार्‍या अखिल भारतीय कालिदास संमेलनामध्ये महाकवी कालिदास यांच्या साहित्यातील काही संस्कृत श्‍लोक पाश्‍चात्त्य पद्धतीत ऐकवले जाणार आहेत. काही राष्ट्रीय आणि युवा कलाकार संगीत, नृत्य आणि अभिनय यांद्वारे हा कार्यक्रम सादर करणार आहेत. या संमेलनाचा शुभारंभ ध्रुवा या देशाचा प्रथम संस्कृत बँडच्या वादनाने होणार आहे. त्यामध्ये अनेक युवा कलाकार काही संस्कृत श्‍लोक पाश्‍चात्त्य पद्धतीत ऐकवणार आहेत.

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडून अप्रत्यक्षपणे गोमांस भक्षणाचे समर्थन !

      कोणी शाकाहार करावा कोणी मांसाहार करावा, हे सांगण्याचा शासनाला कोणताही अधिकार नाही.- दिगंबर कामत, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री, गोवा.

काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांची पाकमध्ये जाऊन भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका !

अशा घरभेदी आणि पाकधार्जिण्या काँग्रेसी नेत्यांना पाकमध्येच हाकला !
      काँग्रेसचे मुसलमान नेते तथा भारताचे माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी पाकमध्ये जाऊन भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. विशेष म्हणजे पाकच्या सैनिकांकडून भारताच्या सैनिकांवर प्रतिदिन आक्रमण करण्यात येत असूनही त्यांनी पाकच्या सैनिकांकडून चालू असलेल्या आतंकवादविरोधी लढ्याचे कौतुक केले. इस्लामाबादच्या जिना इन्स्टीट्युटमध्ये झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. जिना इन्स्टीट्युटमध्ये प्रतिवर्षी वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यानांचे आयोजन करण्यात येते. यंदा व्याख्यान देण्यासाठी खुर्शीद यांना निमंत्रित करण्यात आले होते. खुर्शीद यांच्या भाषणाच्या वेळी अनेक देशांचे राजदूत उपस्थित होते. भारतविरोधी वक्तव्ये केल्याच्या प्रकरणी पाकमधील द डॉन, पाक ट्रिब्यून, डेली टाइम्स, पाकिस्तान टुडे आदी माध्यमांनी सलमान खुर्शीद यांच्या वृत्ताला ठळक आणि एकतर्फी प्रसिद्धी दिली.

भारतात प्रथमच न्यायालयाकडून सुनावणीसाठी सामाजिक संकेतस्थळाचा वापर

मद्रास उच्च न्यायालयाने स्काईपद्वारे केली सुनावणी आणि इमेलवरून दिला निकाल
      चेन्नई येथील मद्रास उच्च न्यायालयाने खटल्याच्या सुनावणीसाठी आणि तो निकाली काढण्यासाठी प्रथमच सामाजिक संकेतस्थळांचा वापर केला. न्यायाधिशांनी खटल्याची सुनावणी स्काईप या प्रणालीद्वारे केली, तर खटल्याचा निकाल इमेलद्वारे पाठवला. एम्. जेशू यांनी तमिळनाडूच्या रामनाथपुरम्च्या एका चर्चमध्ये होणार्‍या एका विवाहाला पोलिसांनी सुरक्षा द्यावी, अशी मागणी केली होती; पण त्यांच्या मागणीचा गांभीर्याने विचार झाला नाही. त्यामुळे त्यांनी त्या संदर्भात तातडीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली; पण दिवाळी असल्याने न्यायालयात सुनावणीसाठी कुणीही न्यायाधीश उपस्थित नव्हते. न्यायालयाचे प्रशासकीय न्यायाधीश व्ही. रामा सुब्रह्मण्यम् यांनी मदुरै खंडपिठाचे न्यायाधीश एस्. वैद्यनाथन् यांना स्काईप या प्रणालीद्वारे त्यांच्या निवासस्थानावरूनच सुनावणी पूर्ण करण्याचा आदेश दिला. त्यानुसार त्यांनी या खटल्याची सुनावणी केली. खटल्याशी संबंधित सर्व दस्तावेज स्कॅन करून संगणकीय पत्राद्वारे न्यायाधिशांना पाठवण्यात आले. 

धिर्योला (बैलांची झुंज) कायदेशीर स्वरूप देण्यासाठी शासन प्रयत्नशील !

      गोवा येथे सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यांचा विचार करून धिर्योला (बैलांची झुंज) कायदेशीर स्वरूप देता येते का ? हे पडताळण्यासाठी विधानसभेच्या गृहसमितीच्या नुकत्याच झालेल्या पहिल्या बैठकीत धिर्योशी संबंधित सर्वांची १० डिसेंबरपर्यंत मते जाणून घेण्याचा, तसेच याविषयी धिर्यो खेळल्या जात असलेल्या महत्त्वाच्या गावांमध्ये जाहीर सभाही घेण्याचा निर्णय झाला आहे. विधानसभेच्या गृहसमितीचे अध्यक्ष विष्णु वाघ यांनी ही माहिती दिली.

आय.एस्.आय.एस्. विरोधातील युद्धासंदर्भात अमेरिकेच्या नागरिकांत मतभेद

सिरियात घुसून आतंकवाद्यांचा नायनाट करण्याची अमेरिकेतील ४४ टक्के नागरिकांची मागणी, 
तर ४५ टक्के नागरिकांचा सैन्य कारवाईला विरोध
     वॉशिंग्टन - पॅरिसवर झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर आय.एस्.आय.एस्.च्या विरोधात जगभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अनेक मोठ्या देशांनी या संघटनेचे तळ असलेल्या सिरिया आणि इराक या देशांतील भागांवर करण्यात येणार्‍या हवाई आक्रमणांत वाढ केली आहे. अमेरिकेतील ४४ टक्के नागरिकांनी मात्र केवळ हवाई आक्रमण न करता सिरियात घुसून अमेरिकेच्या सैन्याने या आतंकवाद्यांचा नायनाट करावा, अशी मागणी केल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. मात्र ४५ टक्के लोकांनी सैन्य कारवाईचा विरोध केल्याचेही याच सर्वेक्षणातून उघड झाले आहे.

रशियाचे आय.एस्.आय.एस्.वर जोरदार हवाई आक्रमण

भारत मुंबईसाठी, काश्मीरसाठी पाकवर आक्रमण कधी करणार ?
बॉम्बवर लिहिले आमच्या लोकांसाठी - पॅरिससाठी !
     मॉस्को - रशियाने आय.एस्.आय.एस्.च्या प्रदेशावर करण्यात येणार्‍या हवाई आक्रमणांत वाढ केली. त्यांनी केलेल्या जोरदार आक्रमणांत ६०० हून अधिक आतंकवादी ठार झाल्याचे बोलले जात आहे. आय.एस्.आय.एस्.च्या आतंकवाद्यांनी काही दिवसांपूर्वी सिनाई येथे बॉम्बने रशियाचे विमान पाडले होते. त्यात २२४ जण मारले गेले, तसेच त्यानंतर पॅरिस येथे या आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात १२९ जणांचा बळी गेला. यानंतर रशियाने त्यांच्या हवाई आक्रमणांत वाढ केली. रशियाकडून जे बॉम्ब आय.एस्.आय.एस्.च्या प्रदेशावर टाकण्यात आले, त्यांवर आमच्या लोकांसाठी, पॅरिससाठी अशा आशयाचे संदेश लिहिण्यात आले होते.

मुंबई, पुणे आणि मराठवाडा येथील मुसलमान तरुणांकडून आय.एस्.आय.एस्.चे समर्थन ! - अधिवक्ता एजाझ नक्वी, महा लॉ सोसायटी

आयएस्आयएस्ला सामोरे जाण्यासाठी शासनाने काय सिद्धता केली आहे ?
मराठवाड्यातील २ अधिवक्ते आयएस्आयएस्च्या प्रभावाखाली 
  मुंबई - मुंबई, पुणे आणि मराठवाडा येथील अनेक मुसलमान वस्त्यांमध्ये आयएस्आयएस् या आतंकवादी संघटनेचे समर्थन करणारे तरुण असल्याचे समजते. मराठवाड्यात तर २ अधिवक्तेही या संघटनेच्या प्रभावाखाली असल्याचे आढळले, असे महा लॉ सोसायटीचे अध्यक्ष अधिवक्ता एजाझ नक्वी येथील पत्रकार परिषदेत २० नोव्हेंबर या दिवशी सांगितले. (भारतातील तरुण आय.एस्.आय.एस्.कडे वळणार नाहीत, असे म्हणणार्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? - संपादक)

व्यापमं घोटाळ्याच्या प्रकरणी राज्यपालांना नोटीस !

भ्रष्टाचारग्रस्त भारत !
      नवी देहली - मध्यप्रदेशमधील व्यावसायिक परीक्षा मंडळ अर्थात् व्यापमं घोटाळ्याच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मध्यप्रदेशचे राज्यपाल रामनरेश यादव यांना नोटीस बजावली आहे. भ्रष्टाचाराचे आरोप झालेले असतांनाही यादव यांना राज्यपालपदी काम करता येईल का ? याविषयीची मार्गदर्शक तत्त्वे सिद्ध करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी न्यायालयाने यादव यांना नोटीस बजावली आहे. याशिवाय मध्यप्रदेश शासनालाही याप्रकरणी ३ आठवड्यांत उत्तर देण्याविषयी नोटीस देण्यात आली आहे. यादव यांचा पुत्र शैलेशही याप्रकरणात आरोपी होता; मात्र याप्रकरणात झालेल्या काही गूढ मृत्यूंमध्ये शैलशचाही मृत्यू झाला आहे.

भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ यांना अलाहाबाद जिल्हा प्रवेश बंदी !

     प्रयाग (अलाहाबाद) - येथील विद्यार्थी संघटनेने दिलेल्या निमंत्रणावरून कार्यक्रमासाठी जाणारे भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ यांना अलाहाबाद जिल्हा प्रवेश बंदी करण्यात आली. त्यांना वाटेतच पोलिसांनी अडवले. यामुळे विद्यार्थी संघटना संतप्त झाल्या आहेत.
     योगी आदित्यनाथ यांना अलाहाबाद विद्यापिठाच्या विद्यार्थी संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले होते; मात्र अधिकार्‍यांच्या मते या कार्यक्रमासाठी आवश्यक ती पूर्वानुमती विद्यार्थी संघटनेने घेतली नव्हती, तसेच काही विद्यार्थी संघटनांचा योगी आदित्यनाथ यांच्या येण्याला विरोध होता. त्यामुळे विद्यापिठात तणावाची स्थिती निर्माण झाली. त्या पार्श्‍वभूमीवर आदित्यनाथ यांना जिल्हा प्रवेश बंदी घालण्यात आली. जिल्हा दंडाधिकारी संजयकुमार आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षक इमॅन्युअल यांनी सांगितले, आदित्यनाथ यांनी जिल्ह्यात प्रवेश केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

३१ डिसेंबरला नववर्ष स्वागताच्या निमित्ताने होणारे अपप्रकार थांबवा !

हिंदु जनजागृती समितीची मागणी
     कुडाळ - सध्या पाश्‍चात्य प्रथांच्या वाढत्या अंधानुकरणामुळे आपल्या देशातही नववर्ष गुढीपाडव्या ऐवजी ३१ डिसेंबर या दिवशी मध्यरात्री १२ वाजता साजरे करण्याची कुप्रथा वाढीस लागली आहे. या रात्री युवकांचे मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे, तसेच मद्यपान करून भरधाव वेगाने वाहन हाकणे, कर्णकर्कश ध्वनीवर्धक लावून त्याच्या तालावर अश्‍लील अंगविक्षेप करत नाचणेे, गलिच्छ शिव्या देणे, त्यातून मुलींची छेडछाड करणे आदी प्रकार होतात. एकूणच कायदा अन् सुव्यस्था यांच्यासंदर्भात गंभीर स्थिती निर्माण होते. त्याचा अतिरिक्त ताण प्रशासन आणि पोलीस यांच्यावर येतो.

प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी गाय पाळावी ! - जिल्हाधिकारी राजमणी यादव

वाराणसी येथे गोपाष्टमीनिमित्त गोपूजनाचा कार्यक्रम
भावपूर्णरित्या गोपूजन करतांना गोभक्त
     वाराणसी (उत्तरप्रदेश) - प्रत्येक नागरिकाने किमान एका तरी गायीचे पालन करावे, असे आवाहन वाराणसीचे जिल्हाधिकारी राजमणी यादव यांनी केले. गोपाष्टमीच्या निमित्ताने १९ नोव्हेंबर या दिवशी येथे धर्मसंघ शिक्षा मंडळ या संस्थेचे महामंत्री श्री. जगजीतन् पाण्डेय यांनी गोपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमात ते बोलत होते.
    धर्मसंघ शिक्षा मंडळ प्रतिवर्षी गोपाष्टमीच्या दिवशी गोपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करते. या वेळी कार्यक्रमांतर्गत शोभायात्राही काढण्यात आली होती. या यात्रेत अनेक गोभक्तांनी गोमातांसह स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला. या शोभायात्रेच्या अखेरीस सर्वांनी गोपूजन केले.

स्वत:च्या मिळकतीपेक्षा (ज्ञात उत्पन्नापेक्षा) उच्च स्तराचे राहणीमान असणार्यांतची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला आणि सनातन प्रभातला कळवा !

शासकीय नोकरदारांपैकी अनेकजण इतक्या हुशारीने भ्रष्टाचार करतात की, त्यांना लाच घेतांना रंगेहात पकडणे अशक्य असते. नोकरीतून मिळणार्या उत्पन्नाच्या तुलनेत उच्च राहणीमान असणारे कर्मचारी हे बहुधा या गटातील असतात. त्यामुळे आपल्या कुटुंबातील, नात्यातील आणि परिसरातील असे ज्ञात उत्पन्नापेक्षा उच्च स्तराचे रहाणीमान असणार्या, बंगला, महागड्या गाड्या वापरणार्या, शासकीय कर्मचार्यांसह इतर कोणी आढळल्यास त्यांची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला कळवा. तसे करणे हे आपले राष्ट्राच्या संदर्भातील कर्तव्य आहे आणि ती आपली काळानुसार आवश्यक अशी साधनाही आहे. 
(पत्ता : संपादक, सनातन प्रभात, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा.; फॅक्स क्रमांक : (०८३२) २३१८१०८; 
ई-मेल : dspgoa1@gmail.com)

पुणे येथे एका तरुणीने वाहतूक पोलिसाच्या कानशिलात लगावली

वाहतूक पोलिसांवरील आक्रमणांचे वाढते प्रमाण चिंताजनक 
असून गृह विभागाने त्यावर तातडीने उपाययोजना करावी, ही अपेक्षा !
पुणे, २१ नोव्हेंबर - येथील लष्कर भागातील नेहरू मेमोरियल हॉल चौकामध्ये पोलीस नाईक किशोर शिंदे हे त्यांचे सहकारी प्रमोद कोंडारे आणि महिला शिपाई कुंजीर यांच्यासह वाहतूक नियमन करत होते. १९ नोव्हेंबर या दिवशी दुपारी एक दुचाकीस्वाराने सिग्नलचे उल्लंघन केले. त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याने शिंदे यांच्या अंगावर दुचाकी घालून तो निसटला. त्यापाठोपाठ आलेल्या कल्याणी पोतेकर या तरुणीनेही सिग्नलचे उल्लंघन केले. शिंदे यांनी तिला थांबवले. गाडी बंद करण्याची विनंती करूनही तिने गाडी बंद न केल्याने शिंदे यांनी गाडीची चावी फिरवून ती बंद केली. त्यांच्या या कृतीचा राग आल्याने तरुणीने त्यांच्या कानशिलात लगावली.

श्रीनगर-बारामुल्ला रस्त्यावर स्फोटके सापडली !

श्रीनगर - सुरक्षा रक्षक आणि नागरिकांची सतत ये-जा असलेल्या श्रीनगर-बारामुल्ला रस्त्यावर २१ नोव्हेंबर या दिवशी सकाळी सुरक्षा सैनिकांना अत्याधुनिक स्फोटके सापडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगर-बारामुल्ला रस्त्यावरील लॉवेपोरा भागात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआर्पीएफ्) सैनिक गस्तीवर असतांना त्यांना हा स्फोटकांचा साठा दिसला. त्यांनी तात्काळ बॉम्ब निकामी करणार्या  पथकाला पाचारण केले. स्फोटकांसह एक रॉकेटही आढळले आहे. ही स्फोटके वेळीच सापडल्याने मोठी हानी टळली. सुरक्षा रक्षकांकडून परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

टेंभू, ताकारी, म्हैशाळ पाणी योजनांची वीज थकबाकी शासन भरणार ! - पालकमंत्री

सांगली, २१ नोव्हेंबर (वार्ता.) - ज्या ज्या गावांची टँकरसाठी मागणी असेल त्या गावांना तात्काळ टँकर चालू करण्यात येतील, तसेच आवश्यकतेप्रमाणे गुरांसाठी चारा छावण्याही लगेच चालू करण्यात येतील. सध्या ताकारी, टेंभू, म्हैशाळ या पाणी योजनांची जी वीज थकबाकी आहे, ती थकबाकी शासन शेतकर्‍यांची पिके वाया जाऊ नये म्हणून भरेल; मात्र या शेतकर्‍यांनी वीजदेयक नियमित भरावे, अशी आमची अपेक्षा आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील यांनी २० नोव्हेंबर या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

तात्त्विक माहितीसमवेत प्रायोगिक माहिती न पुरवता वेळ, पैसा आणि नैसर्गिक साधनसंपत्ती यांचा अपव्यय करणारा माहिती अन् तंत्रज्ञान यांविषयी आयोजित केलेला परिसंवाद !

श्री. मंदार गाडगीळ
     अलीकडेच एका राज्यात आयोजित केलेल्या एका परिसंवादाला मी उपस्थित राहिलो होतो. या भव्य परिसंवादाचे आयोजन एका जागतिक कीर्तीचे विश्‍लेषक (अ‍ॅनॅलिस्ट) आणि सल्लागार आस्थापनाने(कन्सल्टिंग कंपनीने) केले होते. परिसंवादाचा विषय होता, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अ‍ॅण्ड हाऊ इंडस्ट्रिज कॅन लिव्हरेज दि एड्व्हान्सेस इन् डिजिटल टेक्नोलॉजी टू ऑटोमेट देअर बिजनेस प्रोसेसेस, गॅदर डेटा फ्रॉम व्हेरियस मशीन्स टू परफॉर्म अ‍ॅनेलिटिक्स टू प्रेडिक्ट फ्युचर बिहेव्हियर अ‍ॅण्ड फेल्युअर्स इफ् एनी सो अ‍ॅज टू मिनिमाइज दि अ‍ॅडव्हर्स इम्पॅक्ट (डिजिटल तंत्रप्रणालीतील नवनवीन शोध आणि या क्षेत्रातील नवनवीन शोधांचा उद्योगधंदे त्यांच्या यंत्रणा स्वयंचलित होण्यासाठी कसा लाभ करून घेऊ शकतात,

नाचण्यास नकार दिल्याच्या कारणावरून ३ पोलीस कर्मचार्‍यांना हॉकी स्टीकने मारहाण

  • जनतेमध्ये पोलिसांविषयी वाटणारे भय संपले कि काय ? 
  • पोलिसांसाठीही असुरक्षित होत असलेले पुणे शहर !  
पुणे, २१ नोव्हेंबर - मित्राच्या वाढदिवसाच्या दिवशी आयोजित केलेल्या मेजवानीत ३ पोलीस कर्मचार्‍यांनी गाण्यावर नाचण्यास नकार दिला. त्यामुळे खैरेवाडी येथील तरुणांनी तीनही पोलिसांना हॉकी स्टीकने गंभीर मारहाण केली, तसेच नंतर त्यांच्यावर दगडफेक केली.
     या प्रकरणी पोलिसांनी श्रीपाद अरुण सोनवणे, बाळ लक्ष्मण गोडांबे, तुषार काशिनाथ गुलमजोर, विजय मधुकर आठवले, देवराम विलास काकडे, सचिन कैलास पासलकर आणि रियाज सय्यद शेख या ७ जणांना अटक केली आहे. ही घटना श्री चतु:शृंगी मंदिराजवळ खैरेवाडी परिसरात १९ नोव्हेंबरच्या रात्री १० वाजता घडली. या प्रकरणी कैलास महामुलकर यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
१. तक्रारकर्ते सध्या शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात, तर शुभम जयवंत देसाई आणि कृष्णा सुरेश ओंबाळे हे दोघे अनुक्रमे कोरेगाव पार्क आणि वारजे पोलीस ठाण्यात बीट मार्शल म्हणून कार्यरत आहेत.

एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून धर्मांध पोलिसाने केला ३ वर्षे बलात्कार

कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार !
संभाजीनगर, २१ नोव्हेंबर - येथील ग्रामीण पोलीस मुख्यालयात जमादार म्हणून कार्यरत असलेल्या कदीर हमीद पटेल याने एका २५ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर त्याने त्या तरुणीवर अत्याचार करत त्याचे ध्वनीचित्रीकरण केले आणि ते चित्रीकरण दाखवण्याची धमकी देत तिच्यावर ३ वर्षे बलात्कार केला. या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. (या प्रकरणी ग्रामीण पोलीस अधीक्षक आणि गृह विभाग यांनी कदीर याच्यावर तत्काळ कठोर कारवाई करावी, ही अपेक्षा ! - संपादक)

पश्‍चिम बंगालमध्ये मुसलमानधार्जिण्या तृणमूल काँग्रेसचे रावणराज्य !

     पश्‍चिम बंगालमधील हिंदूंची विदारक स्थिती पहाता तेथे शासन अस्तित्वात आहे का, असा प्रश्‍न पडतो !
१. मुसलमानांविषयी जे औदार्याचे धोरण स्वीकारले आहे, 
ते पाहून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला
 आता टोटल मुस्लीम काँग्रेस असे म्हणायला हवे !
     ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला (टी.एम्.सी.ला) आता टोटल मुस्लीम काँग्रेस असे म्हणण्याजोगी परिस्थिती बंगालमध्ये निर्माण झाली आहे. मुसलमानांविषयी जे औदार्याचे धोरण स्वीकारले आहे, त्यामुळे सध्या बंगालमध्ये, विशेषतः हिंदु नागरिकांत भीतीचे वातावरण पसरत आहे. सध्या बंगालमध्ये मुसलमान ३० टक्के आहेत आणि या औदार्याच्या धोरणामुळे ही टक्केवारी वाढत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रामनाथ येथील पोलीस मुख्यालयात स्फोट घडवणारा पोलीस बडतर्फ

रामनाथ (अलिबाग) - येथील पोलीस मुख्यालयात स्फोट घडवून सहकार्‍याचा खून करणार्‍या प्रल्हाद पाटील यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३११ तील पोटकलम (२)(बी)च्या तरतुदीनुसार पोलीस अधीक्षक मो. सुवेझ हक यांनी ही कारवाई केली आहे. पोलीस दलातील एका महिला कर्मचार्‍याशी असणार्‍या दोन पोलीस कर्मचार्‍यांच्या विवाहबाह्य संबंधातून २८ ऑक्टोबर या दिवशी प्रल्हाद पाटील याने पोलीस मुख्यालयात दुचाकीत स्फोट घडवून आणला होता. यात नीलेश पाटील या पोलीस कर्मचार्‍याचा मृत्यू झाला होता, तर अन्य एक कर्मचारी घायाळ झाला होता. पोलीस अधीक्षक कार्यालयाने बडतर्फ करण्या विषयीचे परिपत्रक काढले आहे.

सांताक्रूझ विमानतळ परिसरातील अनधिकृत प्रार्थनास्थळ हटवेपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याची हिंदुत्ववाद्यांची चेतावणी

राष्ट्रहित आणि सुरक्षितता यांसाठी हिंदुत्ववादी 
संघटनांच्या वतीने दादर, अंधेरी आणि ठाणे येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !
अंधेरी
ठाणे
दादर
मुंबई - सांताक्रूझ विमानतळ परिसरातील A.T.C. टॉवरच्या जवळ चालणारे अनधिकृत नमाजपठण त्वरित बंद करावे; आयएस्आयएस् या आतंकवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी निघालेले भिवंडीतील २० बांगलादेशी युवक, तसेच त्यांना साहाय्य करणारे आणि आश्रय देणारे या सर्वांवर कठोर कारवाई करावी आणि कर्नाटक येथील गोरक्षक बजरंग दलाचे कार्यकर्ते प्रशांत पुजारी यांची धर्मांधांनी केलेली हत्या, तसेच देशभरातील गोरक्षकांवर सातत्याने होणारी जीवघेणी आक्रमणे पहाता गोरक्षण करणार्‍या कार्यकर्त्यांना स्वसंरक्षणार्थ शस्त्र बाळगण्याची अनुमती मिळावी, या मागण्यांसाठी आज अंधेरी (पू.) येथील मिरजकर स्मारक चौक, दादर पूर्व येथील स्वामीनारायण मंदिरासमोर आणि ठाण्यातील जांभळी नाका येथे सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.

(म्हणे) गोहत्याबंदीमागे ब्राह्मणवादी षड्यंत्र !

प्रा. जावेद पाशा यांचे ब्राह्मणद्वेषी विधान 
      वैदिक भारतात ब्राह्मण हेच गोहत्या समर्थक होते. मग आता ते गोहत्याबंदीचे समर्थक कसे झाले ? यामागे ब्राह्मणवादी षड्यंत्र आहे, असा आरोप प्रा. जावेद पाशा यांनी केला. नागपूर येथे निळाई सामाजिक सांस्कृतिक परिवाराच्या वतीने प्रबोधन अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात गोहत्या बंदीमागचे ब्राह्मणवादी षड्यंत्र आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका हा चर्चेचा विषय होता. या वेळी ते बोलत होते.

मुंबईत प्रति मासाला सरासरी ४०० नवजात बालकांचा मृत्यू

बालमृत्यूंच्या या भयावह आकडेवारीविषयी शासनाने तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक !
सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंबकल्याण विभागाची माहिती
मुंबई - शहरातील बालकांचा संसर्गजन्य, न्युमोनिया, अतिसार, तापाचे विकार आणि श्‍वसनविकार यांमुळे मृत्यू होत आहे. वर्ष २००८ पासून २०१२ पर्यंत ३२ सहस्र ६६४ बालमृत्यू झाले म्हणजेच प्रति मासाला सरासरी ४०० बालमृत्यू झाल्याची नोंद मुंबईत झाली आहे. राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत हे प्रमाण अधिक असल्याचे यातून स्पष्ट होत आहे, अशी धक्कादायक माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने या वर्षी प्रसिद्ध केली आहे.
१. जन्माला आल्यानंतर अवघ्या २४ घंट्यांत मरणार्‍या शिशूंचे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे. भारतात प्रतिवर्षी तीन लाखांपेक्षा जास्त नवजात बालकांचा मृत्यू होत असून यामध्ये शहरी भागातील बालमृत्यूचे प्रमाण चिंताजनक आहे.

दीपावलीच्या सुट्टीनिमित्त प्रतिदिन वाचा बोधकथा !

अकर्मकर्माचे उदाहरण
     संपूर्ण विरक्त असल्याने अनेक स्त्रियांचा पती असलेल्या कृष्णाने आपले ब्रह्मचारित्व आणि फळे खाऊनही ऋषींनी आपले निराहारित्व टिकवणे : वैराग्य दाखवण्यापेक्षा मनातील वैराग्य हे अधिक महत्त्वाचे असते. सर्व गोष्टींचा संपूर्ण उपभोग घेत असूनही श्रीकृष्ण मनातून पूर्णतः विरक्त होता. एकदा यमुनेला पूर आलेला होता. यमुनेच्या पलीकडे आलेल्या निराहारी तपस्वी मुनींना भेट म्हणून कृष्णाने आपल्या मित्राला फळे घेऊन जाण्यास सांगितले. मित्राने विचारले, यमुनेला तर पूर आलेला आहे. एकही नावाडी आपली होडी सोडावयास तयार नाही. मग मी कसा जाणार ? कृष्ण म्हणाला, मी जर आजन्म ब्रह्मचारी असेन, तर तू यमुनेवरून चालत जाऊ शकशील. तो मित्र भूमीवरून चालल्याप्रमाणे पूर आलेल्या यमुनेच्या पात्रातून चालत ऋषींकडे गेला. त्याने ऋषींना फळे अर्पण केली.

पाटबंधारे विभागात घोटाळा करणार्‍या दोषींना त्यांची जागा दाखवू ! - मुख्यमंत्री फडणवीस

सातारा - पाटबंधारे विभागात एवढे घोटाळे झालेत की, ते निस्तरतांना आमचे १ वर्ष गेले. ज्यांनी भ्रष्टाचार केला, त्यांना आम्ही सोडणार नाही. दोषींना फक्त शिक्षाच देणार नाही, तर त्यांना त्यांची जागा दाखवू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. येथे एका कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, भ्रष्टाचार्‍यांवर कारवाई करून थांबणार नाही, तर रखडलेली कामेही पूर्ण करू. राज्यातील सव्वा लाख पोलिसांना घरे नाहीत. त्यांना घरे देणार असून त्यासाठी कितीही व्यय झाला, तरी चालेल. (भ्रष्टाचार्‍यांवर लवकरात लवकर कारवाई करून महाराष्ट्राला भ्रष्टाचारमुक्त करावे, ही जनतेची अपेक्षा ! - संपादक)

तुळजाभवानी मंदिर समितीचे वादग्रस्त आणि भ्रष्ट व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांना नियमबाह्य पद्धतीने पुन्हा मुदतवाढ !

प्रसादाच्या लाडू प्रकरणात अपहार केल्याचा संशय असतांनाही अशा प्रकारची मुदतवाढ दिली 
जाणे म्हणजे माकडाच्या हाती कोलित देण्याचाच प्रकार म्हणावा लागेल !
    तुळजाभवानी मंदिरातील प्रसादाच्या लाडूचे प्रकरण गाजत असतांना मंदिर समितीचे व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांना अनधिकृतपणे आणि नियमबाह्य पद्धतीने मुदतवाढ दिली आहे. लाडू प्रकरणात नाईकवाडी यांचा हात असतांनाही त्यांचीच पुन्हा निवड करण्यात आली आहे. तुळजाभवानी मंदिर समितीचे व्यवस्थापक म्हणून दिलीप नाईकवाडी गेल्या ३५ वर्षांपासून काम पहात आहेत. ते ३१ ऑक्टोबर या दिवशी निवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांचा छोटेखानी सत्कारही करण्यात आला आणि आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे दुसर्‍याच दिवशी ते पुन्हा याच पदावर रुजू झाले. याविषयी चौकशी केली असता त्यांना ११ मासांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती मिळाली. 

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हिंदूच्या घरासमोरील रांगोळी पुसून हिंदु महिलांना केली धक्काबुक्की !

     पाळधी (जळगाव) येथे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजे ११ नोव्हेंबर २०१५ या दिवशी येथील श्री. कमलेश सोमाणी यांच्या घराजवळ काढलेली ॐ आणि स्वस्तिक यांचे चिन्ह असलेली रांगोळी इम्रान कालू खाटीक या धर्मांधाने पायाने पुसली. घरातील हिंदु स्त्रियांनी त्याला खडसवल्यावर त्याने शिवीगाळ करत धक्काबुक्कीही केली. 

फलक प्रसिद्धीकरता

राष्ट्रपुरुषांच्या इतिहासाचे विकृतीकरण करणारा बाजीराव-मस्तानी चित्रपट !
बाजीराव-मस्तानी चित्रपटाच्या विज्ञापनात दाखवण्यात येत असलेल्या पिंगा या गाण्यातून समाजात तत्कालीन कुलीन मराठी स्त्रियांविषयी अपसमज निर्माण होण्याची शक्यता असल्याने हे गाणे काढून टाकण्याची मागणी पेशव्यांचे वंशज डॉ. उदयसिंह पेशवे यांनी केली आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Bajirao-Mastani film me dikhaya galat Itihas ! - Peshvaonke vanshajka dava
Rashtrapurushonke Itihas se khilvad karnevali filmka bahishkar karo !
जागो ! 
बाजीराव-मस्तानी फिल्म में दिखाया गलत इतिहास !
 पेशवाआें के वंशज का दावा राष्ट्रपुरुषों के इतिहास से खिलवाड करनेवाली फिल्म का बहिष्कार करो !

अधर्मी आणि दुर्जन व्यक्तीरेखांचे उदात्तीकरण नको !

सौ. तृप्ती भोसले
     आजकाल सोशल मिडिया अत्यंत प्रभावी माध्यम असल्यामुळे कुठलाही विचार क्षणार्धात लक्षावधी लोकांपर्यंत पोहोचवता येतो. हे माध्यम जेवढे चांगले, तेवढेच त्याचे दुष्परिणामही अनेक आहेत. सध्या धर्मद्रोही आणि हिंदुद्वेष्टे, तसेच जन्महिंदू धार्मिक व्यक्ती किंवा प्रसंग यांविषयीचे विकृत किंवा विडंबन करणारे लिखाण सोशल मीडियाद्वारे एकमेकांना पाठवतांना दिसत आहेत. आपलेच पवित्र धर्मग्रंथ, त्यांतील व्यक्ती, घटना यांचा स्वत:ला पाहिजे तसा अर्थ काढून, प्रसंगी त्याच धाटणीवर एखादा प्रसंग कल्पून किंवा चित्रित करून अत्यंत दायित्वशून्यपणे एकमेकांना पाठवायची टूम निघाली आहे. असाच एक धर्मद्रोही संवाद (अर्थात काल्पनिक) मला व्हॉट्सअ‍ॅपद्वारे प्राप्त झाला.

हिंदु स्त्रियांविषयी अपशब्द उच्चारत शिवीगाळ करणार्‍या धर्मांधाला हिंदूंकडून चोप !

अशा धर्मांधांवर कठोर कारवाई झाल्यासच त्यांच्या उद्दामपणाला आळा बसेल !
मुंबई - छत्रपती शिवाजी रेल्वेस्थानकाकडून येणार्‍या एका लोकलगाडीतील अपंगांच्या डब्यात शिरणारी हिंदु महिला आणि तिची मुलगी यांना पाहून तेथील अपंग धर्मांधाने अश्‍लील भाषेत शिवीगाळ केली, तसेच गणपतीला उद्देशूनही त्याने शिव्या दिल्या. या वेळी तो हिंदूंच्या स्त्रियांवर बलात्कार करा, असे म्हणत होता. (हिंदूंनो, धर्मांधांमध्ये कशा प्रकारे हिंदुद्वेष पेरला जातो, हे लक्षात घ्या ! सार्वजनिक ठिकाणी आज सर्रासपणे बलात्काराची भाषा करणारे धर्मांध उद्या हिंदु स्त्रियांवर ते उघडउघड करण्यासही मागेपुढे पहाणार नाहीत ! - संपादक) या वेळी उपस्थित हिंदु धर्माभिमान्यांनी त्याला स्थानकावर खेचून आणून खडसावले. तरीही त्याने शिवीगाळ चालूच ठेवली. त्याने एका हिंदु युवतीला फलाटावरून रूळावर ढकलण्याचा आणि हिंदूंवर थुंकण्याचाही प्रयत्न केला. या वेळी उपस्थित हिंदूंनी त्याला चोप दिला.

पोलिसांच्या अनुमतीविना टिपू सुलतानच्या जयंतीनिमित्त धर्मांधांकडून मिरवणूक काढण्याचा प्रयत्न

  • धर्मांधांचा उद्दामपणा ! यावरूनच धर्मांध भारतातील कायदा सुव्यवस्थेला मानत नसून त्यांचे आदर्श आणि धर्म यांनाच प्राधान्य देतात, हेच दिसून येते.
  • तीन धर्मांधांना अटक
नगर, २१ नोव्हेंबर - क्रूरकर्मा टिपू सुलतान जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यास सामाजिक बहुद्देशीय प्रतिष्ठानने अनुमती मागितली होती; परंतु पोलिसांनी कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत ती नाकारली होती. पोलिसांनी प्रतिष्ठानला मिरवणुकीऐवजी इतर कार्यक्रम घेण्याची विनंती केली होती. असे असतांनाही प्रतिष्ठानने २० नोव्हेंबर या दिवशी दुपारी ४.३० वाजता क्रूरकर्मा टिपू सुलतानच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्याचा प्रयत्न केला. ही मिरवणूक निघत असतांनाच कोतवाली पोलिसांनी हस्तक्षेप करत मिरवणूक रोखली. या वेळी पोलिसांनी प्रतिष्ठानच्या ३ जणांना अटक केली आहे.

ह.भ.प. श्री ज्ञानेश्वर मैवाळ चातुर्म्यासे महाराजांनी कार्तिकी वारीचे केलेले महात्म्य वर्णन

पांडुरंगाची रथयात्रा
 १. सर्व संतांनी आषाढी आणि कार्तिकी एकादशीचे महत्त्व वर्णन केलेले असणे अन् या दोन वार्या महत्त्वाच्या असून चातुर्मासाची सांगता कार्तिक वारीने होत असल्याने या वारीला भाविकांची पुष्कळ गर्दी होणे
    आषाढी निकट आली की, कार्तिकीचा घाट घातला जातो. सर्व संतांनी आषाढी आणि कार्तिकी एकादशीचे महत्त्व वर्णन केलेले आहे. आषाढी ही देवशयनी आणि कार्तिकी देवस्थानी आहे. याविषयी संतांनी विशेष वर्णन केले आहे. या दोन वार्याक महत्त्वाच्या आहेत. इतर वार्याव नाही झाल्या, तरी चालतील; पण या दोन वार्या  करण्याचे महत्त्व सांगितले आहे. आषाढी आणि कार्तिकी वारी यांच्यात ४ मासांचा कालावधी असतो. यास चातुर्मास म्हणतात. चातुर्मासाची सांगता कार्तिक वारीने होते; म्हणून या वारीला भाविकांची पुष्कळ गर्दी होते. कार्तिक एकादशीला रथसोहळा, द्वादशीला खिरापत, तुळशी विवाह आणि पौर्णिमेला महाद्वार अन् गोपाळपूरला महाकाला घेऊन वारीची सांगता होते.

सनातनविरोधी विखारी प्रचाराच्या प्रतिवादाच्या वेळी आलेला अनुभव !

डॉ. मनोज सोलंकी
      साम्यवादी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या संदर्भात सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना केवळ संशयावरून कोल्हापूर पोलिसांनी अटक केल्यानंतर हिंदुविरोधी प्रसिद्धीमाध्यमांनी गोव्यात सनातनविरोधी वृत्ते देण्याचे सत्र चालू केले. हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्या मोजक्या सनातनविरोधकांच्या सनातन विरोधातील वक्तव्यांना अवाजवी प्रसिद्धी दिली. या हत्येच्या प्रकरणाचे निमित्त साधून हिंदुद्वेष्टे, सनातनद्वेष्टे यांच्याकडून सनातनवर खोटे दोषारोप करून बंदी घालण्याची मागणी करण्यात येत होती. या गढूळ वातावरणात सनातनविरोधी विखारी प्रचार, सनातन संस्थेवर बंदी आणि होणारा विरोध याचा प्रतिवाद करण्यासंदर्भात पत्रकार परिषदा, वृतवाहिन्यांवरील चर्चासत्रे, आंदोलने यांमध्ये सहभाग घेतांना आलेले अनुभव आणि शिकायला मिळालेली सूत्रे मांडत आहे. 

हिंदु राष्ट्र स्थापन करणे, हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच ! - पू. नंदकुमार जाधव, सनातन संस्था

जळगाव येथे प्रांतीय हिंदु अधिवेशन
डावीकडून ह.भ.प. गजानन महाराज राजपूत,
दीपप्रज्वलन करतांना पू. नंदकुमार जाधव,
ह.भ.प. अर्जुन महाराज पांचाळ, अधिवक्ता श्री. गोविंद तिवारी
जळगाव - भारत हे स्वयंभू हिंदु राष्ट्र आहे. हिंदु राष्ट्राचा एक विचार, एक उच्चार आणि एक आचार सर्वत्र एकसमान दिसला पाहिजे, तरच हिंदु राष्ट्राच्या आकांक्षा सफल होतील. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, असे लोकमान्य टिळक म्हणाले होते. त्याच धर्तीवर आज घोषणा करावीशी वाटते की, हिंदु राष्ट्र स्थापन करणे, हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहेे आणि तो आम्ही मिळवणारच !
     त्यासाठी मोठ्या प्रमाणात हिंदूंचे संघटन होणे आवश्यक आहे, तसेच हिंदु विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे, कार्यप्रेरणेचा स्रोत निर्माण व्हावा, यासाठी धर्माभिमानी हिंदूंनी प्रेमभाव आणि जवळीकता निर्माण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे पू. नंदकुमार जाधव यांनी केले आहे. येथे झालेल्या प्रांतीय हिंदु अधिवेशनाच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. येथे २१ आणि २२ नोव्हेंबर या दिवशी प्रांतीय हिंदु अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.

पंढरपूरला आद्य शंकराचार्यांनी 'महायोगपीठ' म्हणण्याचे कारण !

तीर्थक्षेत्र एकतर योगपीठ असते किंवा शक्तीपीठ असते; परंतु शंकराचार्यांनी पंढरपूरला 'महायोगपीठ' म्हटले आहे. तीर्थक्षेत्री भक्त देवाच्या किंवा शक्तीपिठावर देवीच्या दर्शनासाठी जात असतात; मात्र पंढरपूरला पांडुरंग भक्त पुंडलिकाची वाट पहात तिष्ठत उभा आहे. परमेश्वर भक्ताची वाट पहात आहे; म्हणून हे महायोगपीठ आहे. पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये सगुण आणि निर्गुण रूपांचा उत्कृष्ट संयोग (मिलाप) आहे.
- श्री. मुकुंद भगवान पुजारी, पंढरपूर (श्री विठ्ठलाच्या ७ सेवेकर्यांकी श्री विठ्ठलाची पूजा करणारे एक सेवेकरी)      

हिंदूंचे धर्मांतर करण्याचा ख्रिस्त्यांचा आतबट्ट्याचा व्यवहार !

हिंदूंनो, ख्रिस्त्यांचे खरे रूप जाणा !
अरविंद विठ्ठल कुळकर्णी
       भारतात हिंदूंच्या धर्मांतराचे ख्रिस्त्यांचे कार्य दिवसेंदिवस वाढत आहे. त्याला देशावर सर्वाधिक काळ राज्य करणार्‍या काँग्रेसने कधीच विरोध केला नाही. आता केंद्रात सत्तेवर असलेले भाजप शासन या प्रश्‍नाकडे लक्ष देईल, अशी जनतेची अपेक्षा आहे. २६ वर्षांपूर्वी ख्रिस्त्यांची कारस्थाने उघड करणारा प्रज्वलंतमासिकात फेब्रुवारी १९९९ मध्ये प्रसिद्ध ज्येष्ठ हिंदुत्ववादी पत्रकार श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी यांनी लिहिलेला लेख आमच्या वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.
१. ख्रिश्‍चन धर्मगुरु पोप जॉन पॉल यांचा धूर्तपणा ! 
१ अ. विश्‍वावर ख्रिस्त्यांचे राज्य येण्यात आडकाठी येऊ नये, यासाठी पूर्वी अनेक देशांतील अन्य धमिर्र्र्यांवर ख्रिस्त्यांनी केलेल्या अत्याचाराविषयी पोप यांनी त्यांची क्षमा मागणे, हा धूर्तपणा नव्हे का ?

आतंकवादामुळे गेल्या १५ वर्षांत मरण पावलेल्या नागरिकांच्या संख्येत ९ पट वाढ !

     नवी देहली - आतंकवादामुळे गेल्या १५ वर्षांत मरण पावलेल्यांच्या संख्येत ९ पट वाढ झाली आहे. सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथील आर्थिक आणि शांतता संस्थेने सिद्ध केलेल्या जागतिक आतंकवाद निर्देशांक २०१५ या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. या अहवालानुसार, 
१. आतंकवादामुळे वर्ष २००० मध्ये ३ सहस्र ३२९ लोकांचा मृत्यू झाला होता, तर वर्ष २०१४ मध्ये हा आकडा ३२ सहस्र ६५८ इतका झाला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेला याचा मोठा फटका बसला आहे.

कार्तिकी एकादशी

कार्तिकी एकादशीचे महत्त्व म्हणजे या दिवशी श्रीविष्णूला बेल वाहिला तरी चालतो आणि शिवाला तुळस वाहता येते. हे असे का ? एकतर ही गोष्ट हरि आणि हर म्हणजे श्रीविष्णु आणि शिव यांच्यातील अद्वैत दाखवणारी आहे. दुसरे (अध्यात्मशास्त्रीय कारण) म्हणजे कालमाहात्म्यानुसार या दिवशी बेलामध्ये श्रीविष्णूची पवित्रके, तसेच तुळशीमध्ये शिवाची पवित्रके आकर्षित करण्याची क्षमता निर्माण होते. त्यामुळे या दिवशी शिवाला तुळस आणि श्रीविष्णूला बेल वाहता येतो. ईश्वरप्राप्तीसाठी धडपडणार्या भक्तांनी शैव-वैष्णव भेदाच्या आधारे एकमेकांस विरोध करणे, हे त्यांची संकुचित वृत्ती अन् ईश्वराविषयीचे अज्ञान यांचे द्योतक आहे. हे अज्ञान दूर व्हावे, तसेच भक्ताने संकुचित वृत्तीचा त्याग करून (स्वसंप्रदायाच्या सीमा लंघून) श्रीविष्णु आणि शिव यांचे ऐक्य अनुभवावे, हाही या व्रताचा महत्त्वाचा उद्देश आहे; कारण ईश्वर हा संप्रदायांच्याच नव्हे, तर सर्वच बंधनांपलीकडे असतो.
- (पू.) डॉ. चारुदत्त पिंगळे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.      

पंढरीच्या श्री विठ्ठलमूर्तीनेही भोगला असा वनवास !

औरंगजेबाच्या आक्रमणापासून वाचवण्यासाठी देगाव, पंढरपूर येथे श्री प्रल्हाद महाराज बडवे यांनी विठोबाच्या मूर्तीला विहीरीच्या या कोनाड्यात ठेवले होते. (कोनाडा बाणाने दाखवला आहे.)
१. प्राचीनता
    पंढरपूर येथील श्री विठ्ठलाची मूर्ती पुष्कळ प्राचीन आहे. ही तिसर्या शतकातील उदयगिरी लेण्यातील मूर्तीप्रमाणे दिसते; परंतु संतजन आणि भक्तगण यांच्या लाडक्या पंढरीच्या श्री विठ्ठलमूर्तीला अनेकदा वनवासी व्हावे लागले आहे.
२. विजयनगर येथे प्रतिष्ठापना
    दक्षिणेतील विजयनगर साम्राज्याचा राजा रामराया याने १६ व्या शतकाच्या मध्यास पंढरपूरची श्री विठ्ठलमूर्ती विजयनगर येथे नेली आणि तेथे श्री विठ्ठलाचे भव्य मंदिर बांधून त्यात मूर्तीची प्रतिष्ठापना केली.
३. पंढरपूर येथे पुनर्स्थापना
    संत एकनाथांचे पणजोबा भानुदास महाराज यांनी ती मूर्ती विजयनगर येथून पुन्हा पंढरपुरास आणून तिची समारंभपूर्वक मूळ ठिकाणी स्थापना केली.
४. मुसलमानांपासून रक्षण होण्याकरता मूर्ती गुप्त स्थळी हलवणे
    दक्षिणेत मुसलमानांचे वर्चस्व चालू झाल्यावर श्री विठ्ठलमूर्ती आक्रमकांच्या हाती लागू नये; म्हणून वर्ष १६६९ मध्ये ती पंढरपूर येथून हलवून गुप्त स्थळी ठेवण्यात आली. नंतर वर्ष १६७२ मध्ये आषाढीवारीच्या वेळी मूर्ती काडकुसुंबे या गावी न्यावी लागली. ती लपवून ठेवल्यामुळे आक्रमकांच्या हाती लागू शकली नाही.
५. वर्ष १६७५ मध्ये मूर्तीची चोरी झाली. बडव्यांकडून भरपूर रक्कम घेऊन चोरणार्याने ती परत दिली. 
६. १६९४ ते १७१५ या कालावधीत दीर्घकाळ मूर्ती पंढरपूरबाहेर अज्ञातवासात होती.
७. पंढरपुरात पुनश्च प्रतिष्ठापना
    १७१५ मध्ये पंढरपूरच्या मंदिरात ती पुनश्‍च प्रस्थापित झाली. वर्षभरात राजर्षी शाहू महाराजांनी एका अभयपत्राद्वारे पंढरपूर क्षेत्राला सैन्याकडून उपद्रव होणार नाही, अशी ग्वाही दिली. त्यानंतर श्री विठ्ठलाच्या मूर्तीला पुनश्च वनवास भोगावा लागला नाही.    
 - श्री. रमेश सहस्रबुद्धे (श्रीगजानन आशिष, ऑगस्ट २०१०)

इतकी वर्षे झोपलेले भाषा संचालनालय !

       महाराष्ट्र राजभाषा अधिनियमानुसार शासकीय कामकाज मराठीत करणे बंधनकारक आहे. शासकीय कार्यालयांसह वर्गीकृत कार्यालयांनाही मराठीतूनच कामकाज करण्याचे राज्यशासनाचे धोरण आहे. शासनाच्या कार्यालयीन कामकाजात राजभाषा मराठीचा योग्य पद्धतीने वापर होत नसल्याचे भाषा संचालनालयाने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. शासकीय कार्यालयांनी मराठीचा योग्य वापर न केल्यास आता शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. त्याअंतर्गत वेतनवाढ रोखण्यासारख्या शिक्षा संबंधित कार्यालयातील कर्मचार्‍यांना दिल्या जाणार आहेत, अशी माहिती भाषा संचालक डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी दिली.

ढोबळ इतिहासही ज्ञात नसलेले काँग्रेसचे मंत्री !

     टिपू सुलतानचा इतिहास आणि त्याचे योगदान समाजाला सांगण्यासाठी कर्नाटक शासनाने त्याच्या जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्याचे ठरवले आहे. आमचा निर्णय अचानक झालेला नाही. टिपू सुलतान हा निधर्मी, तसेच सहिष्णु शासक होता. 
- व्ही. श्रीनिवास प्रसाद, मंत्री, म्हैसुरू. 

भारतातील आतंकवाद रोखण्यासाठी काही न करणार्‍या भारताने इतर देशांवर टीका करणे हास्यास्पद !

     जगात शांतता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्र्र संघटनेकडून शांती सेनेचा वापर प्रभावीपणे केला जातांना दिसत नाही. संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये सुधारणा केल्या जात नाहीत. परिणामी त्यांच्या या अकार्यक्षमतेची किंमत भारतासारख्या विकसनशील राष्ट्रांना मोजावी लागत आहे. - श्री. अशोक मुखर्जी, भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी राजदूत

ध्वनीप्रदूषणाच्या तक्रारीवर कारवाई न करणारे पोलीस आतंकवाद्यांना रोखू शकतील का ?

      गोव्यात पेडणे ध्वनीप्रदूषण नियंत्रण समितीची बैठक उत्तर गोवा जिल्हाधिकारी नीला मोहनन् आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी स्वप्नील नाईक, पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक यांच्यासोबत झाली होती. या बैठकीत ध्वनीप्रदूषण नियंत्रण समितीच्या सदस्यांनी गेल्या पर्यटन हंगामातील अनेक तक्रारी मांडल्या होत्या. मोरजी, आश्‍वे, मांद्रे, हरमल या किनारी भागात जे संगीताचे कार्यक्रम आयोजित करतात, त्यांनी किमान ५ दिवस अगोदर परवान्यासाठी अर्ज केल्यानंतरच अनुज्ञप्ती देण्यात येईल आणि या अनुज्ञप्तीची प्रत त्याच दिवशी पेडणे ध्वनीप्रदूषण नियंत्रण समितीच्या सदस्यांना पोलिसांकरवी देण्याची सोय करणार, असा निर्णय जिल्हाधिकार्‍यांनी घेतला होता; मात्र या निर्णयाची कार्यवाही अजून झालेली नाही, तसेच ध्वनीप्रदूषण नियंत्रण समितीच्या स्थानिक सदस्यांनी केलेल्या तक्रारींवर पोलिसांकडून कारवाई केली जात नाही.

काँग्रेसचे नेते गांधींची प्रतिदिन हत्या करतात !

     गांधींची हत्या केली म्हणून काँग्रेसचे नेते पंडित नथुराम गोडसे यांना दूषणे देतात. वास्तविक हे काँग्रेसचे नेते गांधींची प्रतिदिन हत्या करत आहेत. गांधींच्या एकाही तत्त्वज्ञानाचा अंगीकार या काँग्रेसींनी केलेला नाही. गांधींनी भ्रष्टाचाराला विरोध केला असतांना काँग्रेसचे नेते मात्र भ्रष्टाचारात आकंठ बुडलेले आहेत. - श्री. अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था.

गोव्यात अमली पदार्थ विक्री करणार्‍या नायजेरियातील टोळीला आवर न घालणारे पोलीस आतंकवाद्यांना रोखू शकतील का ?

      गोव्यातील अमली पदार्थ व्यवसायात नायजेरियातील नागरिकांच्या टोळीचे वर्चस्व निर्माण झाले आहे. यंदाच्या पर्यटन हंगामापूर्वीच नायजेरियाच्या या टोळीने उघडपणे अमली पदार्थ विक्रीचा धंदा चालू केला आहे. यामुळे स्थानिक युवा पिढी वाममार्गाला लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अमली पदार्थ विक्री करणार्‍या या नायजेरियातील नागरिकांच्या टोळीला त्वरित आवर घालण्याची मागणी हरमल गावचे माजी पंच बाबुश फर्नांडिस यांनी केली आहे.

हा पोलिसांचा एकतर्फी विचार नव्हे का ?

      मिरज येथे एम्आयएम्ची सभा होण्याच्या एक दिवस अगोदर शिवसेनेचे मिरज उपतालुकाप्रमुख श्री. विशाल रजपूत यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात जाऊन एम्आयएम्च्या सभेत हिंदु देवता-धर्म, राष्ट्रपुरुष यांच्यावर टीका झाल्यास सभा उधळू, अशी चेतावणी दिली. ही चेतावणी दिल्यावर लगेचच मिरज शहर पोलिसांनी श्री. रजपूत यांचे छायाचित्र काढून त्यांना १४९ ची नोटीस देऊन काही अयोग्य प्रकार झाल्यास तुम्हाला उत्तरदायी धरण्यात येईल, असे सांगितले.
     वाढती गोवंशहत्या रोखण्यासाठी गोरक्षक प्राणप्रणाने लढत असतांना आणि या गोरक्षकांवर आक्रमणे होत असतांना शासनासह या देशातील राष्ट्रीय पक्षांचे नेते झोपा काढत आहेत. 
- श्री. रमेश नाईक, माजी राज्यप्रमुख, शिवसेना, गोवा.

नरकासुर प्रतिमा स्पर्धेतील उघड गुन्हे रोखता न येणारे पोलीस आतंकवाद्यांना रोखू शकतील का ?

        वास्को येथे नरकासुर प्रतिमा स्पर्धा होत असलेल्या जोशी चौकात काही अंतरावर रुग्णालय आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या वेळी ध्वनीयंत्रणा, तसेच वाद्ये वाजवण्यास जिल्हाधिकार्‍यांनी बंदी घातली होती; मात्र ध्वनीयंत्रणा हवीच, यावर अनेक जण अडून राहिल्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी ध्वनीयंत्रणा वापरण्यासाठी अनुमती दिली. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत ध्वनीयंत्रणा वापरून या ठिकाणी स्पर्धा घेण्यात आली. साखळी येथे नरकासुर प्रतिमांच्या स्पर्धा आटोपल्यानंतर पहाटे त्या प्रतिमांचे मुख्य रस्त्याच्या मधोमध दहन करण्यात आले. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन सार्वजनिक ठिकाणी कचरा साठला. या कचर्‍याच्या विल्हेवाटीचा प्रश्‍न निर्माण झाला. याची दखल पंचायतीने घेऊन तो कचरा हटवावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. नरकासुर प्रतिमा रस्त्याच्या मधोमध दहन केली जाऊ नये, यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे सांगितले जात होते; मात्र तरीसुद्धा नरकासुर प्रतिमांचे रस्त्यावरच दहन केल्याचे स्पष्ट झाले. 
     पशूवधगृहांना अनुदान दिले जाते; पण गोशाळा बांधणार्‍यांना कर भरावा लागतो, हे चालणार नाही. - प.पू. प्रज्ञाश्री महेपद्मसागरजी महाराज, जैन संप्रदाय, मुंबई.

डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांना जे कळते, ते भारतीय शासनाला कसे कळत नाही ?

     काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लंडनमध्ये बॅकऑप्स लिमिटेड हे खाजगी आस्थापन चालू करण्यासाठी ब्रिटनचे नागरिकत्व घेतले होते. यासाठी देण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये राहुल गांधी यांनी त्यांची जन्मदिनांक योग्य नोंदवली आहे; पण राष्ट्रीयत्व ब्रिटीश असे लिहिले आहे. त्यांच्या नावासमोर त्यांचा ब्रिटनमधील पत्ताही आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी हा देशाच्या कायद्याचा भंग करण्याचा प्रकार आहे. - डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी, भाजप.

भूलोकीचे वैकुंठ : श्रीक्षेत्र पंढरपूर दर्शन

कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने...
श्रीक्षेत्र पंढरपूर ! चंद्रभागेच्या तटी वसलेले भूतलावरील वैकुंठ ! येथील मुख्य आराध्य दैवत आहे, श्री विठ्ठल म्हणजे पांडुरंग. सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज त्यांच्या एका अभंगात श्री विठ्ठलाचे वर्णन करतांना म्हणतात, 'हात कटेवरी चरण विटेवरी । नवरत्नांचा मुकूट शोभे शिरी । जरीन् म्हणजे जरीचा अंगरखा तंग अंगावरी । बांधियले बाहूबंद नयन हो दंग । आतुर ते पहाण्याला भक्तवृंद ॥ वाट पाहे भक्तांचा गोविंद । श्रीहरि भक्तांचा गोविंद ॥' आषाढी अन् कार्तिकी एकादशीला येथे मोठी यात्रा भरते. या दोन्ही तिथींना लक्षावधी भाविक पंढरपूरची वारी करतात आणि श्री विठ्ठलाच्या नयनमनोहर रूपाचे डोळेभरून दर्शन घेतात. २२ नोव्हेंबर २०१५ या दिवशी कार्तिक एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रा आहे. त्यानिमित्त ३०.८.२००६ रोजी पंढरपूरचा परिसर, तसेच तेथील मंदिरे यांचे आणि पांडुरंगाची महापूजा होतांना पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण येथे छायाचित्रासह प्रसिद्ध करत आहोत.

देवनागरी लिपी सात्त्विक असल्याने अ या अक्षराभोवती सुदर्शनचक्र फिरत असल्याचे जाणवणे

चि. मुकुल प्रभु
     २४.२.२०१५ या दिवशी मी माझ्या ४ वर्षांच्या नातवाला, मुकुलला ए, बी, सी, डी ही इंग्रजी अक्षरे लिहायला शिकवत होते. माझ्या मनात विचार आला, याला देवनागरी लिपी शिकवूया. मी त्याला म्हटले, बाळा, अ काढणे किती सोपे आहे बघ ! असे म्हणून अ काढून दाखवला. अ बघताक्षणी तो म्हणाला, आजी, बघ अच्या मागे सुदर्शनचक्र फिरत आहे. मला आश्‍चर्य वाटले. तो म्हणाला, ते गरगर फिरत आहे. आमचे त्या संदर्भात काहीच बोलणे झाले नव्हते.

सत्यमेव जयतेऐवजी सत्यमेव जयति असे म्हणणे योग्य !

     काँग्रेस, समाजवादी आणि साम्यवादी विचारसरणीच्या लोकांनी सत्यमेव जयते, असे म्हणण्याची प्रथा रूढ केली; पण सत्यमेव जयते असे म्हणणे व्याकरणदृष्ट्या योग्य नाही. त्याऐवजी सत्यमेव जयति असे म्हणायला हवे. सत्यमेव जयति याचा अर्थ सत्याचा विजय होतो, सत्यच जिंकते, असा होतो.
- श्री. सदाशिव श्रीकृष्ण तिवारी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.१०.२०१५)

वक्त्याचा चेहरा आणि बोलणे कसे असावे ?

     चेहरा मनाचा आरसा आहे (Face is mirror of mind), अशा अर्थाची एक म्हण आहे. त्यामुळे विषयाला आवश्यक असा चेहरा असण्यासाठी विषय मनात मुरलेला हवा.
१. अध्यात्मातील मार्गदर्शन करणारा
     याच्या चेहर्‍यावर गांभीर्य नको, तर तो हसरा किंवा भाव व्यक्त होणारा असावा. त्याच्या बोलण्यातही भाव असावा. असा चेहरा असणार्‍याच्या वाणीत चैतन्य असते; म्हणून बोलणे परिणामकारक होते.
२.राष्ट्र आणि धर्म यांविषयी मार्गदर्शन करणारा
     याच्या चेहर्‍यावर क्षात्रवृत्ती दिसली आणि बोलण्यात जाणवली, तर बोलणे परिणामकारक होते.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (४.१०.२०१५)

४.६.२०१५ च्या रात्री रामनाथी आश्रमातीेल साधकांनी अनुभवलेले निसर्गाचे रौद्र रूप आणि त्या संदर्भात आलेल्या अनुभूती

१. श्री. लक्ष्मीनारायण आचार्य
१ अ. कलामंदिराच्या दारातून वीज खोलीच्या आत येऊन गेल्याचे दिसणे आणि नामजप यंत्राचे दोन भाग होणे : रात्री ११ वाजण्याच्या सुमारास विजेचा लखलखाट, ढगांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस यांना आरंभ झाला. मी कलामंदिरातील स्टोअर रूमच्या शेजारच्या मोकळ्या जागेत हेड फोनची दुरुस्ती करत होतो. तेव्हा माझ्या समोर असलेल्या नामजप यंत्रातून पुष्कळ मोठा आवाज ऐकू आला आणि माझ्या डोळ्यांसमोरच त्या यंत्राचे दोन भाग झाले. त्याच वेळी कलामंदिराच्या दारातून वीज खोलीच्या आत येऊन गेली. तेव्हाही ढगांचा भयंकर गडगडाट ऐकू आला.

भक्तीयोग, ज्ञानयोग आणि कर्मयोग यांचा समावेश असलेला अन् सर्व साधनामार्गांचा पाया असलेला गुरुकृपायोग !

परात्पर गुरु डॉ. आठवले
     भक्तीयोगाचे उदाहरण म्हणजे देवाची भक्ती करण्यास शिकवले जाते, ज्ञानयोगाचे उदाहरण म्हणजे योग्य आध्यात्मिक दृष्टीकोन शिकवले जातात आणि कर्मयोगाचे उदाहरण म्हणजे नामजप करत कर्म करण्यास शिकवले जाते. हे सर्व गुरुकृपायोगात शिकवले जाते. हठयोग, कर्मयोग, कुंडलिनीयोग, भक्तीयोग, ज्ञानयोग इत्यादी कोणत्याही मार्गाने साधना करायची असली, तरी गुरुकृपायोगात सांगितलेली अष्टांग साधना व्यष्टी साधनेचा पाया पक्का होण्यासाठी आवश्यक आहे.
१. स्वभावदोष-निर्मूलन
: हे अत्यंत आवश्यक आहे; कारण स्वभावदोष हे साधनेतील मुख्य अडथळा असतात. ते दूर केल्याविना कोणतीही साधना करणे कठीण असते.

ह.भ.प. अनिल बडवे महाराज यांनी आषाढी-कार्तिकी या दोन्ही एकादशींचे केलेले वर्णन

१. आषाढी-कार्तिकी या दोन्ही एकादशी वारकर्यांना अतीमहत्त्वाच्या; म्हणून त्या त्या यात्रांना पंढरीचा घाट दुथडी भरून वहात असणे : वारकरी संप्रदायामध्ये पंढरीच्या वारीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, नामदेवराय या सर्वांनी याचा उद्घोष केलेला आहे. तुकोबाराय म्हणतात, "धरिता पंढरीची वाट । नाही संकट मुक्तीचे ।" आषाढी एकादशीला भगवान निद्रिस्त होतात; म्हणून ती देवशयनी एकादशी, तर कार्तिकी एकादशीला देव जागे होतात; म्हणून ती देवोत्थान एकादशी होय. या मधला काळ तो चातुर्मास; म्हणून या चातुर्मासाचे महत्व आहे. या एकादशी वारकर्यांना अतीमहत्वाच्या म्हणून त्या त्या यात्रांना पंढरीचा घाट दुथडी भरून वहात असतो.

भक्तीचा आनंद देणारी चित्रे रेखाटणार्या सनातनच्या चेन्नई येथील साधिका सौ. उमा रविचंद्रन यांचे 'देवाप्रती भाव कसा असावा ?' हे दर्शवणारे चित्र !

एका बालकाने पांडुरंगाच्या मूर्तीवर छत्री धरणे
द्वापारयुगात इंद्राच्या क्रोधामुळे आलेल्या मुसळधार पावसापासून भगवान श्रीकृष्णाने स्वतःच्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून गोप-गोपी आणि गोमाता यांचे रक्षण केले होते. त्याप्रमाणे आपल्यालाही विठ्ठलाचे (पांडुरंगाचे) भ्रष्टाचाररूपी मुसळधार पावसापासून भक्तीच्या छत्रीने रक्षण करायचे आहे. - सौ. उमा रविचंद्रन, चेन्नई (१२.८.२०१३)

पुंडलिकाचे मंदिर

श्री विठ्ठल मंदिरासमोर असलेले संत पुंडलिकाचे मंदिर

मंदिराच्या शिखराकडे पाहून भाव जागृत झाला. शिखरातून अनेक चैतन्य लहरी बाहेर पडून परत भूमीत विलीन होत असल्याचे जाणवले. समाधीच्या परिसरात असतांना हवेत उचलल्यासारखे होत होते. मन अंतर्मुख झाले व भोळा भाव असणार्यास सर्व वारकर्यां प्रती कृतज्ञतेचा भाव दाटून आला. माझ्यावर उपाय होत आहेत व डोक्यावरील काळे आवरण झपाट्याने दूर होत आहे, असे जाणवले. पुंडलिकाच्या मूर्तीभोवती चैतन्यवलय जाणवले व समाधीस्थानी जमिनीच्या खाली कोनाच्या आकारात चैतन्ययुक्त पिवळ्या प्रकाशाचा झोत जाणवला.गरुडखांब

श्री विठोबाच्या मंदिरातील गरुडखांब
विठोबाच्या मंदिरातील गरुडखांबाभोवती चैतन्याच्या लहरी गोल गोल फिरत होत्या. त्या खांबाला हात लावल्यावर हाताला थंडावा जाणवला. गरुडखांबाला कान लावल्यावर त्यात एक विशिष्ट प्रकारचा ध्वनी लपल्याचे आणि त्या नादाने माझ्या देहाची शुद्धी होत असल्याचे जाणवले. ज्या वेळी मी विठोबाच्या मंदिराच्या भिंतीला पाठ लावली, त्या वेळी भिंतीत मधे मधे चैतन्याचे अनेक प्रवाह लपल्याचे आणि ते जागृत होत असल्याचे जाणवले. काही वेळाने ते चैतन्य माझ्या देहात गेले. 

हिंदूंनो, पंढरपूरच्या पावित्र्यरक्षणासाठी कृतीशील व्हा !

पंढरपूर तीर्थक्षेत्राची पावित्र्यहानी करणार्यांना जसे पाप लागते, तसेच हे महापाप घडत असतांना बघ्याची भूमिका घेतल्यानेही ते लागते; म्हणून पंढरपूरच्या  पावित्र्यरक्षणासाठी कृतीशील व्हा ! वारकरी संप्रदाय आता केवळ भजन, कीर्तन इथपर्यंत मर्यादित न रहाता धर्मरक्षणासाठी कृतीशील झाला आहे. वारकर्यांनी धर्मद्रोही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणि डाऊ प्रकल्प यांना केलेला  विरोध,  ही याची उदाहरणे आहेत. महाराष्ट्रात गोहत्याबंदी कायदा होण्यासाठी वारकरीबंधूंनी राज्यभर जागृती केली होती. आपणही त्यांच्याप्रमाणे निवेदने, स्वाक्षरी चळवळ, जनआंदोलने आदींद्वारे पंढरपूरच्या पावित्र्यरक्षणासाठी कृतीशील होऊया !      


श्री विठ्ठलाच्या पूजेपूर्वी काढावयाच्या सात्त्विक रांगोळ्या

९ ते ५ ठिपके
श्री विठ्ठल हे श्रीविष्णूचेच एक रूप आहे. त्यामुळे श्री विठ्ठलाच्या पूजेपूर्वी, तसेच आषाढी किंवा कार्तिकी एकादशी आदी तिथींना घरी किंवा देवळात श्रीविष्णुतत्त्व आकृष्ट आणि प्रक्षेपित करणार्याश सात्त्विक रांगोळ्या काढाव्यात. अशा काही रांगोळ्या पुढे दिल्या आहेत. अशा रांगोळ्या काढल्यामुळे तेथील वातावरण विठ्ठलतत्त्वाने भारित होऊन त्याचा लाभ सर्वांना होतो. या रांगोळ्यांत पिवळा, फिकट निळा, गुलाबी आदी सात्विक रंग भरावेत.९ ते ५ ठिपके
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ देवतांची तत्त्वे आकृष्ट आणि प्रक्षेपित करणार्याय सात्त्विक रांगोळ्या)श्री विठ्ठलाची महती आणि पंढरपूर महात्म्य

 
अवघ्या महाराष्ट्राला भावभक्तीचे वेड लावणारी मूर्ती म्हणजे पंढरपूरची श्री विठ्ठलमूर्ती. संत ज्ञानेशवर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम यांच्यासारख्या नाना संतांनी श्री विठ्ठलाची उपासना करून भागवतधर्माची पताका जगभर फडकवली. अशा या भक्तांच्या हाकेला धावून येणार्या श्री विठुरायाची महती आणि पंढरपूरचे माहात्म्य कार्तिकी एकादशीनिमित्त आपण पहाणार आहोत.
साक्षात् भक्तीचा ओलावा असणारी पांडुरंगाची मूर्ती
    संत पुंडलिकाच्या आज्ञेवरून हात कटेवर ठेवून विटेवर साक्षीभावात उभी राहून सार्या भक्तांना स्वतःतील मोहमयी अशा चैतन्याकडे आकृष्ट करणारी मूर्ती म्हणजेच पांडुरंगाची मूर्ती. विठ्ठल म्हणजेच भक्तीचा ओलावा, कारुण्याचा सिंधु आणि इतरांना मोक्षाची खात्री देणारे श्री विष्णुतत्व. या मूर्तीत सर्व प्रकारचे भाव पहायला मिळतात. सकाळच्या वेळेत बाल्यभाव, दुपारी तारुण्यभाव, तर सायंकाळच्या वेळेत वृद्धापकाळाकडे झुकलेले करुण भाव दर्शवणारी ही मूर्ती भक्तांच्या हृदयात भक्तीचे अमृत निर्माण करणारी आहे.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
जिसने पायो उसने छिपायो । वो नर सच्चा, वोही गुरुका बच्चा ।
भावार्थ : पायो म्हणजे आत्मानुभूती झाली. छिपायो म्हणजे आत्मानुभूती झाल्याचे कोणाला सांगितले नाही. (अर्थात ती शब्दांत सांगताही येत नाही.) गुरुका बच्चा म्हणजे गुरूचा खरा शिष्य. एखाद्याकडे अनमोल हिरा असला, तर तो काही सर्वांना त्याविषयी सांगत नाही. तसेच अनमोल आत्मानुभूती आलेला त्याविषयी कोणाला काही सांगत नाही. अहंभाव नसल्यामुळेच त्याला ती अनुभूती आलेली असते व म्हणूनच तो तिच्याविषयी बोलत नाही.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

बोधचित्र


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
'चुकीच्या व्यक्तीला पकडले', असा गुन्हा सिद्ध होऊ नये; म्हणून काही पोलीस साम, दाम, दंड आणि भेद या सर्व मार्गांचा वापर करून सत्याला बाजूला सारून असत्याला पुढे आणतात; म्हणून 'असे पोलीस म्हणजे खाकी वेशातील गुंड', असे समाजाला वाटायला आरंभ झाला आहे.' 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (९.११.२०१५)
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मानवी जीवन 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
       परमेश्‍वराने देणगी दिलेल्या देहाचा उपयोग नेहमी सत्कर्मासाठी करावा. इतरांच्या त्रासाला आपला देह कारणीभूत होणार नाही, याची नेहमी काळजी घ्यावी. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

... आता पुरे झाले !

संपादकीय
     जम्मू-काश्मीर राज्यातील कुपवाडा येथे आतंकवाद्यांशी लढतांना सातारा जिल्ह्यातील पोगरवाडी येथील ३९ वर्षीय संतोष महाडिक नुकतेच हुतात्मा झाले. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार झाले, तेव्हा सहस्रोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या आजूबाजूच्या गावांतील लोकांनी त्यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर महाडिक यांच्या पत्नीचे सांत्वन करण्यासाठी गेले असता, ती वीरपत्नी म्हणाली, माझी मुलेही सैन्यातच भरती होतील.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn