![]() |
डावीकडून श्री. मोतीराम गोंधळी, आधुनिक वैद्य उदय धुरी, श्री. अभय वर्तक आणि श्री. अजय शेलार |
राष्ट्राचे हित आणि सुरक्षा यांसाठी हिंदुत्ववादी संघटनांची राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्याची चेतावणी !
गोरक्षकांना सुरक्षेस्तव शस्त्रपरवाने देण्याची मागणी !
जे हिंदुत्ववादी संघटनांच्या निदर्शनास येते, ते सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या प्रशासनाच्या
लक्षात का येत नाही कि अशा अवैध कृत्यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे ?
मुंबई - येथील सांताक्रूझ (डोमेस्टीक) विमानतळ परिसरातील ए.टी.सी. टॉवरच्या जवळ वाहनतळामध्ये बांबू आणि ताडपत्री यांच्या साहाय्याने अनधिकृत 'शेड' बांधण्यात आली आहे. अशा ठिकाणी प्रतिदिन नमाजपठण केले जात आहे. या शेडमध्ये बाहेरूनही नमाजासाठी लोक येत आहेत. विमानतळ हे अतिसंवेदनशील आणि शांतता क्षेत्र असून कायम आतंकवाद्यांचे लक्ष्य राहिले आहे. याविषयी पोलीस ठाणे आणि संबंधित जी.व्ही.के. आस्थापन यांना याविषयी पत्रव्यवहार करून या विषयाचे गांभीर्य लक्षात आणून दिले आहे. त्यांना याचे गांभीर्य लक्षात आलेले नाही किंवा ते हेतूपुरस्सर या प्रकरणाकडे कानाडोळा करत आहेत. या ठिकाणी धर्मांधांनी काही स्फोटके आणून ठेवली, तर कोणाला कळणारही नाही. त्यामुळे देशाच्या सुरक्षेसाठी या अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी, अशी मागणी हिंद स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. अजय शेलार यांनी मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केली.