Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

श्री चंद्रशेखरानंद (मध्यप्रदेश) 
यांची आज पुण्यतिथी
सनातनचे पू. डॉ. वसंत आठवले 
यांची आज पुण्यतिथी

भारताला आय.एस्.आय.एस्.पेक्षा सिमीच्या ४ फरारी आतंकवाद्यांकडून अधिक धोका ! - राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा

देशाच्या मुळावर उठलेल्या जिहादी आतंकवादाचा बीमोड 
करण्यासाठी मोदी शासनाने आतातरी कठोर पावले उचलावीत, ही अपेक्षा !
नवी देहली - भारताला सध्या 'इस्लामिक स्टेट फॉर इराक अ‍ॅण्ड सिरिया' अर्थात् आय.एस्.आय.एस्. या जिहादी आतंकवादी संघटनेपेक्षा मध्यप्रदेशमधून फरार झालेल्या सिमीच्या ४ आतंकवाद्यांकडून अधिक धोका आहे, अशी चेतावणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने ('एन्.आय.ए.'ने) दिली आहे. शेख महबूब, अमजद, झाकिर हुसेन आणि महंमद सलीम अशी या चार आतंकवाद्यांची नावे असून ते ऑक्टोबर २०१३ मध्ये मध्यप्रदेशातील कारागृहातून  पळून गेले होते. त्यांच्या समवेत महंमद एजाजुद्दीन आणि महंमद अस्लम हे दोघेही पळून गेले होते. तथापि हे दोघे जण चालू वर्षाच्या आरंभी तेलंगण पोलिसांशी झालेल्या चकमकीत मारले गेले. शर्थीचे प्रयत्न करूनही सुरक्षा यंत्रणांना फरार आतंकवाद्यांना पकडण्यात अपयश आले आहे. 

वेद संस्कृतीवरील संकेतस्थळाचा प्रकल्प रखडला !

केंद्रशासनाने या प्रकरणी तातडीने लक्ष घालून वेद संस्कृतीवरील 
संकेतस्थळाचा प्रकल्प मार्गस्थ करावा, ही अपेक्षा !
वेदांचे ध्वनीमुद्रण करण्याची संमती अजून प्रतीक्षेत 
पुणे, १७ नोव्हेंबर - भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग असलेल्या वेदांच्या जोपासनेसाठी केंद्रशासनाने वेद संस्कृतीवरील संकेतस्थळ (वेब पोर्टल) सिद्ध करण्याची घोषणा केली होती. हे संकेतस्थळ इंदिरा गांधी राष्ट्रीय कला सांस्कृतिक केंद्राच्या वतीने सिद्ध करण्यात येणार होते; परंतु १ वर्ष उलटूनही हा प्रकल्प लालफितीतच अडकला आहे. 

(म्हणे) 'नथुराम गोडसे यांचा गौरव करणारे संकेतस्थळ चालू करणार्यांवर कारवाई करण्याचा आदेश राज्यशासनाला द्यावा !'

 सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांची जनहित (कि धर्मद्रोही ?) याचिकेद्वारे मागणी
गांधी यांच्या हत्येवरून नथुराम गोडसे यांना दूषणे देणार्यांमनी गोडसे यांची देशभक्तीही जाणून घ्यावी !
  मुंबई - गांधी यांची हत्या करणार्यो नथुराम गोडसे यांचा गौरव करणारे www.menathuramgodase.com हे संकेतस्थळ चालू करणार्या संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्याचा आदेश राज्यशासनाला द्यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात १६ नोव्हेंबर या दिवशी प्रविष्ट करण्यात आली. 'नथुराम गोडसे यांचे महत्त्व वाढवण्यासाठी त्यांच्या नावे संकेतस्थळ चालू करणार्यां वर गुन्हा नोंदवण्यात यावा', अशी मागणी जनहित याचिकेद्वारे सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी उच्च न्यायालयात केली आहे. याचिकेनुसार अशा प्रकारचे संकेतस्थळ चालू करून संबंधितांनी देशाविरुद्ध युद्ध छेडले आहे. या संकेतस्थळाच्या पृष्ठावर पुण्याच्या शिवाजीनगरचा पत्ता दिसून येतो. हे संकेतस्थळ नाना गोडसे नावाच्या व्यक्तीने चालू केले आहे. या संबंधीची तक्रार मुंबई आणि पुणे पोलिसांना संगणकीय पत्राद्वारे केली आहे; मात्र अजूनही कारवाई करण्यात आलेली नाही. या याचिकेवरील सुनावणी लवकरच उच्च न्यायालयात होईल. (संदर्भ : दैनिक लोकमत)

कट्टर इमामांची फ्रान्समधून हकालपट्टी करणार ! - फ्रान्सच्या मंत्र्यांची चेतावणी

भारतात मुंबईवर आतंकवादी आक्रमण होऊन ७ वर्षे होऊन गेल्यानंतरही अशी 
कठोर कारवाई एकाही शासनाने केली नाही ! 
     पॅरिस, १७ नोव्हेंबर - पॅरिसवर झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर आता तेथे कट्टर इमामांना फ्रान्समध्ये थारा दिला जाणार नसून त्यांची हकालपट्टी करण्यात येणार असल्याची चेतावणी फ्रान्सच्या मंत्र्यांनी दिली आहे. 
     फ्रान्सच्या मंत्र्यांनी लढ्याविषयी माहिती देतांना सांगितले की, पॅरिसमध्ये १३ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या आतंकवादी आक्रमणात १२९ निष्पाप नागरिक ठार झाले आणि ३५२ जण गंभीर घायाळ झाले. या जिहादी आक्रमणामुळे हादरलेल्या फ्रान्सने आतंकवाद्यांचा एकजुटीने सामना करत त्यांना चोख प्रत्युत्तर द्यायचे ठरवले आहे. त्या पार्श्‍वभूमीवरच फ्रान्सच्या शासनाने आय.एस्.आय.एस्. विरोधात मोहीम चालू करून सिरियातील रक्का येथील आय.एस्.आय.एस्.च्या तळांवर हवाई आक्रमण केले. याचबरोबर आक्रमणकर्त्यांच्या शोधार्थ संपूर्ण फ्रान्समध्ये १६८ ठिकाणी छापे मारले असून आतापर्यंत १०४ जणांना घरात नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.

भारतात पाकिस्तान क्रिकेट संघाच्या सुरक्षेचा प्रश्‍न असल्यामुळे क्रिकेट मालिका खेळणे अशक्य ! - शहरयार खान

शिवसेनेने केलेल्या प्रखर विरोधामुळेच पाकिस्तानचा संघ भारतात क्रिकेटचे सामने खेळण्यास सिद्ध होत 
नाही. यावरून भारतात सुरक्षेचा प्रश्‍न आहे, असे म्हणणे म्हणजे भारत असुरक्षित असल्याचा 
हा कांगावाच आहे !
    इस्लामाबाद, १७ नोव्हेंबर - भारतात आमच्या संघाच्या सुरक्षेचा प्रश्‍न आहे. त्यामुळे भारतात क्रिकेट मालिका खेळणे पाकिस्तानला शक्य नाही, असे स्पष्टीकरण पाकिस्तान क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष शहरयार खान यांनी दिले आहे. डिसेंबर मासात भारत-पाक यांच्यातील क्रिकेट मालिकेचे आयोजन करण्यात येत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पाक क्रिकेट मंडळाला भारतात येऊन सामने खेळण्याचे निमंत्रण दिले होते. त्या पार्श्‍वभूमीवर खान यांनी ही प्रतिक्रिया दिली.

आय.एस्.आय.एस्.च्या विरोधात भूदल उतरवण्यास अमेरिकेचा नकार

     बेलेक (तुर्की) - आतंकवादी संघटना आय.एस्.आय.एस्.च्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे संकेत देणार्‍या अमेरिकेने त्यांच्याविरोधात भूदल उतरवण्यास मात्र नकार दिला. या संदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणाले, आय.एस्.आय.एस्.च्या विरोधात होत असणार्‍या कारवाया अमेरिकेच्या नेतृत्वाखाली होत असल्या आणि त्या प्रभावी ठरत असल्या, तरी त्यांच्याविरुद्ध सिरियात भूदल उतरवणे ही चूक ठरेल.

काश्मीरमधील चकमकीत कर्नल संतोष महाडिक हुतात्मा

काश्मीरमधील आतंकवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मोदी शासन काय पावले उचलणार आहे ?
श्रीनगर - कुपवाडा येथे सैन्य आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत सातारा येथील कर्नल संतोष महाडिक यांना वीरमरण आले. कर्नल महाडिक हे '४१ राष्ट्रीय रायफल्स'चे अधिकारी होते. याशिवाय या आक्रमणात १ पोलीसही घायाळ झाला आहे. हाजीनाका येथील दाट जंगलात आतंकवाद्यांची शोधमोहीम चालू असतांना झालेल्या चकमकीत कर्नल संतोष महाडिक यांना वीरमरण आले. 

मराठवाड्यात वर्ष २०१५ मध्ये ९४५ शेतकर्योंच्या आत्महत्या

आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वांत मोठा आकडा
शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने आतातरी तत्परतेने पावले उचलावीत, ही जनतेची अपेक्षा !
  संभाजीनगर - जानेवारी २०१५ पासून आतापर्यंत केवळ मराठवाड्यातच जवळजवळ ९४५ शेतकर्याांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. आजपर्यंतच्या इतिहासातील हा सर्वांत मोठा आकडा आहे. वर्ष २०१३ पासून दुष्काळ आणि गारपीट अशा संकटांचा सामना महाराष्ट्र करत आहे. यंदा कित्येक जिल्ह्यांत पेरणी झाली नाही. त्यामुळे अनेकांनी आत्महत्येचा पर्याय स्वीकारला. (ही स्थिती पालटण्यासाठी सर्वांनीच धर्माचरण आणि साधना करणे आवश्यक आहे ! - संपादक) दुष्काळ आणि पाणीटंचाई लक्षात घेता राज्याची केंद्राकडे साहाय्याच्या संदर्भात चर्चा चालू आहे, अशी माहिती कृषीमंत्री श्री. एकनाथ खडसे यांनी दिली आहे. राज्याने केंद्राकडे ४००२ कोटी रुपयांची मागणी केली आहे. येत्या १५ दिवसांत केंद्रामध्ये बैठक होऊन त्यावर निर्णय होईल, असेही खडसे म्हणाले.

आय.एस्.आय.एस्.ची अमेरिकेतील वॉशिंग्टनवर आक्रमण करण्याची धमकी

     पॅरिस, १७ नोव्हेंबर - पॅरिसमध्ये १३ नोव्हेंबर या दिवशी आक्रमण झाल्यानंतर फ्रान्सने आय.एस्.आय.एस्.च्या विरोधात मोहीम चालू केली आहे. त्यानंतर अमेरिकेच्या सैन्यानेही सिरियातील तेलाचे शेकडो ट्रक नष्ट केले. या आक्रमणानंतर आय.एस्.आय.एस्.ने एक ध्वनीचित्रफीत प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये एका व्यक्तीने अमेरिकेला धमकी देतांना म्हटले आहे की, सिरियावर आक्रमण करणार्‍या देशांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. ज्याप्रमाणे फ्रान्समध्ये आक्रमण केले, त्याप्रमाणेच अमेरिकेतील वॉशिंग्टनवर आक्रमण करण्यात येईल.

पॅरिस येथे झालेल्या आक्रमणाचा प्रमुख सूत्रधार बेल्जियमचा अब्देल हमीद अबाउड

     पॅरिस, १७ नोव्हेंबर - फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे झालेल्या आक्रमणातील दोन आतंकवाद्यांची ओळख पटली आहे. त्यातील एक मूळचा सिरिया आणि एक फ्रान्सचा नागरिक आहे. त्याचबरोबर या आक्रमणाचा प्रमुख सूत्रधार बेल्जियमचा अब्देल हमीद अबाउड असल्याची माहिती समोर आली आहे. त्याला फ्रान्सच्या पोलीस अधिकार्‍यांनी ओळखले आहे. या आक्रमणातील एक आत्मघाती आक्रमणकर्ता अहमद अल मोहम्मद हा मूळचा सिरियातील असून एका आतंकवाद्याच्या मृतदेहाजवळ त्याचे सिरीया येथील पारपत्र सापडले आहे. ग्रीसमध्ये ऑक्टोबर २०१५ मध्ये आतंकवाद्यांच्या बोटांचे ठसे घेण्यात आले होते, त्याच्याशी त्याचे ठसे जुळत आहेत.

आय.एस्.आय.एस्.च्या विरोधातील युद्धात फ्रान्सला भारताची साथ

आय.एस्.आय.एस्.ला संपवण्यासह भारतातील गल्लीबोळात लपून बसलेल्या 
आतंकवाद्यांचाही शासनाने नायनाट करावा, ही अपेक्षा !
भारताचे गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांची घोषणा
     नवी देहली - आय.एस्.आय.एस्.च्या विरोधात युद्ध करण्याचा निर्णय फ्रान्सने घेतला आहे. आय.एस्.आय.एस्. ही आतंकवादी संघटना संपूर्ण जगासाठी अत्यंत धोकादायक बनली आहे. संपूर्ण जगावर इस्लामचे राज्य प्रस्थापित करण्याची या संघटनेची महत्त्वाकांक्षा आहे. फ्रान्सने या संघटनेला नामशेष करण्याचा निश्‍चय केला आहे. आता भारतही फ्रान्सला आय.एस्.आय.एस्.च्या विरोधातील युद्धात साथ देणार आहे. भारताचे गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी त्या संदर्भातील अधिकृत घोषणा केली. ते म्हणाले, आतंकवादाविरुद्धचे युद्ध हे कोणा एका देशाचे नसून जगातील सर्व देशांनी एकत्रितपणे आतंकवाद संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

आझम खान यांचे आय.एस्.आय.एस्.शी संबंध ! - भाजपचे खासदार साक्षी महाराज

     नवी देहली - पॅरिसमध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर आझम खान यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा भाजपचे नेते साक्षी महाराज यांनी निषेध केला आहे. आझम खान यांचे संबंध जिहादी आतंकवादी संघटना आय.एस्.आय.एस्.शी असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. महाराज म्हणाले, पॅरिसमध्ये शेकडो निष्पाप लोक मारले गेले. त्याविषयी काहीही संवेदना नसणारे खान उलट त्या आक्रमणाचे समर्थन करत आहेत.

क्रांतीकारक भगतसिंह यांचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी लाहोर उच्च न्यायालयात याचिका

कुठे क्रांतीकारक भगतसिंहांचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्नरत असणारे पाकमधील अधिवक्ता 
कुरैशी, तर कुठे शालेय अभ्यासक्रमात भगतसिंहांना आतंकवादी ठरवणारे काँग्रेसचे नेते !
     लाहोर - देशासाठी प्राणाचे बलीदान करणारे क्रांतीकारक भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांचे निर्दोषत्व सिद्ध करण्याच्या दृष्टीने त्यांच्यावर भरण्यात आलेल्या खटल्याची पुन्हा एकदा सुनावणी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका अधिवक्ता इम्तियाज राशिद कुरैशी यांनी येथील उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या तिघांनाही इंग्रज अधिकारी साँडर्स यांची हत्या केल्याप्रकरणी २३ मार्च १९३१ ला फाशी देण्यात आली होती. या खटल्यात उभे करण्यात आलेल्या ४५० साक्षीदारांचे म्हणणे ऐकून न घेताच फाशीचा निर्णय देण्यात आला असल्याच्या सूत्रावर या याचिकेत प्रकाश टाकण्यात आला आहे.

(म्हणे) 'मोदी शासन हटवल्यासच भारत आणि पाक यांच्यात मैत्री शक्य !'

काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांची गरळओक
अय्यर यांची पाकिस्तानी वृत्तवाहिनीला मुलाखत ! 
शत्रूराष्ट्रासाठी स्वदेशाच्या शासनावर टीका करणारे घरभेदी मणिशंकर अय्यर ! अखेरची घरघर लागलेल्या पक्षाच्या नेत्याने देशाचे बहुमतातील शासन हटवण्याची इच्छा व्यक्त करणे, हा विनोद आहे. 
नवी देहली - केंद्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील शासन हटवल्यानंतरच भारत आणि पाकिस्तान यांच्यात मैत्री होऊ शकते, अशी गरळओक काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी येथे एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केली. अय्यर पुढे म्हणाले, "मोदींना हटवल्याविना भारत आणि पाक या दोन्ही देशांमधील चर्चा पुढे जाणे शक्यच नाही. मोदी यांच्याप्रती भारतातील नागरिक फार आशावादी आहेत. मोदी यांच्या उपस्थितीत दोन्ही देशांतील संबंध वाढतील, अशी नागरिकांना आशा आहे; पण मला तसे वाटत नाही. मोदी यांना हटवण्यासाठी आणखी ४ वर्षे वाट पहावी लागणार आहे." काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद यांनीही नुकतेच पाकमध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली होती.

खाजगी आस्थापन चालू करण्यासाठी राहुल गांधी यांनी ब्रिटनचे नागरिकत्व घेतले ! - भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांचा आरोप

यापूर्वी सोनिया गांधी यांनी इटलीचे नागरिकत्व लपवले होते. आता त्यांचे चिरंजीव राहुल गांधी 
यांनीही त्याचीच री ओढली आहे. लोकहो, आणखी किती दिवस या काँग्रेसींना खपवून घेणार 
आहात. जनतेचा विश्‍वासघात करणार्‍यांना कायमचे देशाबाहेर हाकला !
सबळ पुरावे सापडल्यास नागरिकत्व रहित करण्याची पंतप्रधानांकडे मागणी
     नवी देहली, १७ नोव्हेंबर - काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लंडनमध्ये बॅकऑप्स लिमिटेड हे खाजगी आस्थापन चालू करण्यासाठी ब्रिटनचे नागरिकत्व घेतले होते. यासाठी देण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये राहुल गांधी यांनी त्यांची जन्मदिनांक बरोबर नोंदवली आहे; पण राष्ट्रीयत्व ब्रिटीश असे लिहिले आहे. त्यांच्या नावासमोर त्यांचा ब्रिटनमधील पत्ताही आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी हा देशाच्या कायद्याचा भंग करण्याचा प्रकार वाटत असल्याचा आरोप भाजप नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केला आहे.

भारताचे संयुक्त राष्ट्रांतील कायमस्वरूपी सदस्य म्हणून सय्यद अकबरुद्दीन यांची नियुक्ती

     नवी देहली, १७ नोव्हेंबर - भारताचे संयुक्त राष्ट्रांतील कायमस्वरूपी सदस्य म्हणून परराष्ट्र मंत्रालयाचे माजी प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांची १६ नोव्हेंबर या दिवशी नियुक्ती करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकबरुद्दीन यांची निवड केली आहे. 
     परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता म्हणून त्यांच्या कामगिरीची देशभरातून प्रशंसा झाली होती. परराष्ट्र मंत्रालयाचे आतापर्यंतचे सर्वोत्तम प्रवक्ता असे अकबरुद्दीन यांचे कौतुक केले जाते. जानेवारी २०१६ च्या दुसर्‍या आठवड्यामध्ये अकबरुद्दीन हे अशोक पंडित यांच्याकडून सूत्रे स्वीकारतील. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीतील कायमस्वरूपी स्थानासाठी भारत प्रयत्नशील आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या काळामध्ये सय्यद अकबरुद्दीन यांच्यावर हे दायित्व सोपवण्यात आले आहे.

देवनदी गंगेच्या पाण्याच्या वैशिष्ट्यांवर पुन्हा संशोधन !

     नवी देहली - गंगा नदीच्या पाण्यात वर्षानुवर्षे इतक्या मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असूनही नदीचे पाणी दूषित का होत नाही, यावर संशोधकांचे एक पथक संशोधन करणार असल्याची घोषणा आरोग्य मंत्रालय आणि जलसंपदा मंत्रालय यांनी केली. त्यासाठी १५० कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. या संदर्भात नुकत्याच पार पडलेल्या एक दिवसीय कार्यशाळेला भारतातील पाणी क्षेत्रातील २०० तज्ञांनी उपस्थिती लावली होती.

भारतात प्रथमच न्यायालयाकडून सुनावणीसाठी सामाजिक संकेतस्थळाचा वापर

मद्रास उच्च न्यायालयाने स्काईपद्वारे केली सुनावणी आणि इमेलवरून दिला निकाल
     चेन्नई - येथील मद्रास उच्च न्यायालयाने खटल्याच्या सुनावणीसाठी आणि तो निकाली काढण्यासाठी प्रथमच सामाजिक संकेतस्थळांचा वापर केला. न्यायाधिशांनी खटल्याची सुनावणी स्काईप या प्रणालीद्वारे केली, तर खटल्याचा निकाल इमेलद्वारे पाठवला.

वसई (जिल्हा पालघर) येथील खोडियार मातेच्या मंदिरात चोरी

हिंदूंनो, अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांत चोरी झाल्याचे कधी ऐकले आहे का ?
वसई - येथील खोडियार मातेच्या मंदिरातील दानपेटीतून १० सहस्र रुपयांची चोरी करून चोर फरार झालेे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा प्रविष्ट केला असून चोरांचा शोध चालू आहे. १४ नोव्हेंबरला सायंकाळी पुजारी मंदिर बंद करून निघून गेल्यावर काही वेळाने चोरांनी मंदिराचा दरवाजा तोडून आत प्रवेश मिळवला. त्यानंतर दानपेटी घेऊन ते देवळाच्या मागील बाजूस गेले. त्यांनी दानपेटीचे कुलूप तोडून त्यातील १० सहस्र रुपये चोरून पलायन केले.

मुंबईत रॉकेट डोळ्यात घुसल्याने डोळा गमावला

लोकहो, फटाक्यांचे भयावह दुष्परिणाम पहाता त्यांचा वापर करायचा कि नाही, ते वेळीच ठरवा !
मुंबई - दिवाळीत फटाके वाजवण्याचे प्रमाण अल्प झाल्याचे यंदा सांगण्यात येत असले, तरी फटाके वाजवतांना झालेल्या अपघातांचे प्रमाण मात्र वाढले आहे. फटाके वाजवतांना डोळे आणि तोंड भाजल्याने आठ लहान मुलांसह ११ जणांना जे. जे. रुग्णालयात भरती करावे लागले. ४ जणांच्या डोळ्यांत रॉकेट घुसले असून त्यातील तिघांना एक डोळा गमवावा लागला आहे. दिवाळीच्या दिवसात फटाके वाजवतांना जखमी झालेल्या सुमारे २७ जणांना जे. जे. हॉस्पिटलध्ये उपचारांसाठी आणले होते. त्यातील ११ जणांचा प्रामुख्याने तोंडवळा भाजला असून डोळ्यांना गंभीर स्वरूपाच्या इजा झाल्या आहेत.

रामजन्मभूमीत श्रीराममंदिर उभारणे, हीच अशोक सिंघल यांना खरी श्रद्धांजली ठरेल ! - हिंदु जनजागृती समिती

विहिंपचे आंतरराष्ट्रीय संरक्षक आणि हिंदुत्वाचे अध्वर्यु अशोक सिंघल यांच्या निधनामुळे हिंदुत्वाच्या क्षेत्रात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. ते रामजन्मभूमी आंदोलनाचे जनक होते आणि त्यांनी रामजन्मभूमीत श्रीराममंदिर उभे रहाण्यासाठी धर्मसंसदा, संतबैठका, धर्मसभा आदींमधून केलेल्या जागृतीमुळे निद्रिस्त हिंदु समाज जागृत झाला. त्यांच्याच कुशल नेतृत्वाखाली उभारलेल्या लढ्यातून पुढे रामजन्मभूमी मुक्त झाली. या ऐतिहासिक आंदोलनामुळे हिंदुत्वाच्या क्षेत्रात कार्यरत असणार्यांसाठी सिंघल यांचा जीवनपट नेहमीच प्रेरणा देत राहील. भाजप शासनाने रामजन्मभूमीत श्रीराममंदिर उभारल्यास ती अशोक सिंघल यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी म्हटले आहे.

विश्व हिंदु परिषदेचे ज्येष्ठ नेते अशोक सिंघल यांचे निधन

अशोक सिंघल
नवी देहली - विश्व हिंदु परिषदेचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ हिंदुत्ववादी नेते अशोक सिंघल (वय ८९ वर्षे) यांचे १७ नोव्हेंबर या दिवशी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर गुडगावमधील मेदांता मेडिसिटी रुग्णालयात उपचार चालू होते. १८ नोव्हेंबरला दुपारी ४.३० वाजता देहलीतील निगमबोध घाट येथे सिंघल यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रामजन्मभूमी चळवळीचे नेतृत्व करणारे सिंघल सुमारे २० वर्षे विश्व हिंदु परिषदेमध्ये विविध पदांवर कार्यरत होते. प्रकृतीच्या कारणामुळे वर्ष २०११ मध्ये ते अध्यक्षपदावरून पायउतार झाले होते. त्यांच्या जागी डॉ. प्रवीण तोगाडिया यांची नियुक्ती करण्यात आली होती.

थेरगाव (पुणे) येथे 'शिववंदना प्रतिष्ठान'च्या वतीने दीपोत्सव साजरा

     चिंचवड, १७ नोव्हेंबर (वार्ता.) - येथील थेरगाव भागातील डांगे चौक येथे छत्रपति शिवाजी महाराज उद्यानामध्ये शिववंदना प्रतिष्ठानतर्फे १२ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी दीपोत्सव साजरा करण्यात आला. तरुणांमध्ये जाज्वल्य हिंदुत्व वाढावे, त्यांनी हिंदुत्वासाठी वेळ द्यावा आणि हिंदूंचे संघटन व्हावे, या उद्देशाने 'शिववंदना प्रतिष्ठान'तर्फे हा दीपोत्सव गेली ६ वर्षे साजरा करण्यात येत आहे. 

कुटप्पा यांच्या मृत्यूस उत्तरदायी असणार्‍यांवर कठोर कारवाईची निवेदनाद्वारे मागणी

कर्नाटक येथील घटनेचा सातारा येथील हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने तीव्र निषेध 
जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी
     सातारा, १७ नोव्हेंबर (वार्ता.) - कर्नाटकमधील कोडगू येथे टिपू सुलतान जयंतीच्या विरोधात विश्‍व हिंदू परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी आश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, तसेच लाठीमारही केला. या वेळी विश्‍व हिंदू परिषदेचे जिल्हा संयोजक सचिव कुटप्पा यांचा मृत्यू झाला. येथील विश्‍व हिंदू परिषद आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. त्यांच्या मृत्यूला उत्तरदायी असणार्‍यांवर कठोर कारवाई व्हावी, अशा मागणीचे निवेदन या वेळी भारताचे पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री यांच्या नावे जिल्हाधिकारी श्री. अश्‍विन मुद्गल यांना देण्यात आले. 

वैज्ञानिक पी.एम्. भार्गव यांच्या गोमांसाविषयीच्या वक्तव्याचा वैचारिक प्रतिवाद !

  नुकतेच शास्त्रज्ञ पी.एम्. भार्गव यांनी आयुर्वेदानुसार गोमांस हे अनेक व्याधींवर उपाय !, असे विधान केले. या विधानाचा वैचारिक प्रतिवाद येथे देत आहे.
१. आयुर्वेदात गोमांसाचे गुणधर्म दिलेले आहेत कि नाही, हा वाद आता कालबाह्य आणि अव्यवहारिक असणे
   ज्या काळात चरक संहिता लिहिली गेली, त्या काळात लोक गोमांस खात होते, असे थोड्या वेळासाठी गृहीत धरू. त्याकाळची माणसागणिक गोवंशाची संख्या आणि आज असलेली संख्या यात आकाश-पाताळाएवढे अंतर आहे. त्यामुळे त्या काळात गोहत्या होत होती कि नाही, लोक गोमांस खात होते कि नाही, तसेच आयुर्वेदात गोमांसाचे गुणधर्म दिलेले आहेत कि नाही, या वादाला काहीच अर्थ नाही. हे सर्व वाद आता कालबाह्य आणि अव्यवहारिक ठरतात.

राज्यशासन आणि त्यांच्या विभागांची माहिती संकेतस्थळावर अद्ययावत करण्याची मागणी

राज्यशासनाने या प्रकरणी लक्ष घालून संकेतस्थळे अद्ययावत
 करावी आणि त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, ही अपेक्षा !
पुणे, १७ नोव्हेंबर - माहिती अधिकार कायद्याच्या कलम ४ नुसार शासनाच्या प्रत्येक विभागाने दरवर्षी संकेतस्थळावरील माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे. असे असतांना राज्यशासनाचे संकेतस्थळ आणि मंत्रालयातील अनेक विभागांची माहिती अद्ययावत केली नसल्याचे आढळून आले आहे. अनेक विभागांनी २०१२ नंतर माहिती अधिकार कायद्याविषयीचे लिखाण अद्ययावत केले नसल्याचा हा प्रकार माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी उघड केला आहे. (एवढी गंभीर गोष्ट कोणाच्याही लक्षात का आली नाही ? या प्रकरणी संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी. - संपादक) या प्रकरणी त्यांनी राज्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्याकडे तक्रार दिली आहे.

चित्रपटगृहात बॉम्ब ठेवल्याचा दूरभाष करणार्‍या धर्मांधाला अटक

अशा धर्मांधांना पोलिसांनी कठोर शासन करावे, ही अपेक्षा ! 
     मुंबई - कांदिवलीतील एका चित्रपटगृहात बॉम्ब ठेवल्याचा निनावी दूरभाष करणार्‍या मोहमद शेख या धर्मांधाला गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली आहे. त्याला १६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मोहमदने मद्याच्या नशेत पोलीस नियंत्रण कक्षात दूरभाष करून सांगितले की, चित्रपटगृहात बॉम्ब ठेवला असून त्याचा कधीही स्फोट होऊ शकतो. त्यानंतर बॉम्बशोधक पथक, कांदिवली पोलीस आणि गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी गेले. तपासणी केल्यावर बॉम्बची अफवा असल्याचे उघड झाले.

मंगळवेढा (जिल्हा सोलापूर) येथील तीन पोलिसांना फसवणुकीप्रकरणी पाच दिवसांची पोलीस कोठडी

पोलीसच फसवणूक करू लागले, तर जनतेने न्याय तरी कोणाकडे मागायचा ? 
     मंगळवेढा (जिल्हा सोलापूर), १७ नोव्हेंबर - कर्नाटक राज्यातून चडचणहून नाशिककडे १६ लक्ष रुपयांचा गुटखा घेऊन जाणार्‍या टेम्पोला सुरक्षितरित्या पोहोचवण्यासाठी ११ सप्टेंबरच्या रात्री एका चारचाकीचा अपवापर करून फसवणूक केल्याप्रकरणी येथील पोलीस नाईक अमोल घोलवे, राहुल देवकते आणि महिला पोलीस सोनाली इंगोले यांना अटक करण्यात आली असून न्यायाधिशांनी त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक महापौर बंगल्यात ! - मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस

युती शासनाच्या कार्यकाळातच स्मारकाच्या पूर्ततेची घोषणा
मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक महापौर बंगल्यात होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या तृतीय स्मृतीदिनाच्या निमित्त महापौर बंगल्यामध्ये ही पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरेही उपस्थित होते. युती शासनाच्या कार्यकाळातच हे स्मारक पूर्ण होईल, अशी अपेक्षा श्री. फडणवीस यांनी व्यक्त केली.
१. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मुंबईत स्मारक व्हावे, अशी मागणी गेल्या तीन वर्षांपासून होत होती. गेल्या वर्षी बाळासाहेब ठाकरे यांच्या द्वितीय स्मृतीदिनी राज्यशासनाने स्मारकासाठी उच्चस्तरीय समिती नेमली होती. या समितीने मुंबई आणि परिसरातील आठ जागांची पहाणी केली. त्यानुसार महापौर बंगल्यात स्मारक उभारण्याचे निश्‍चित झाले.

शिवतीर्थावरील स्मृतीस्थळाच्या ठिकाणी मान्यवरांकडून आदरांजली अर्पण, तर शिवप्रेमींनी दिली मानवंदना

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा तृतीय स्मृतीदिन
मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तृतीय स्मृतीदिनानिमित्त त्यांना मानवंदना देण्यासाठी राज्यभरातून अनेक शिवप्रेमी शिवतीर्थावरील स्मृतीस्थळाच्या ठिकाणी उपस्थित होते. शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना सहकुटुंब आदरांजली अर्पण केली. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनीही बाळासाहेबांना आदरांजली अर्पित केली. त्यांच्यासमवेत मंत्री सौ. पंकजा मुंडे-पालवे यांच्यासह इतर काही भाजपचे मंत्री उपस्थित होते.
पंतप्रधानांकडूनही आदरांजली अर्पण
    पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली अर्पण करतांना म्हणाले, बाळासाहेब ठाकरे हे नेहमीच जनतेच्या भल्यासाठी झटणारे नेते होते. त्यामुळे त्यांना कार्यकर्त्यांमध्ये कायमच आदराचे स्थान होते.

रामजन्मभूमी हा आमचा जन्माने, कर्माने आणि धर्माने जन्मसिद्ध हक्क आहे ! - पद्मविभूषण स्वामी रामभद्राचार्य महाराज

इचलकरंजी - लोकमान्य टिळकांनी स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, असे म्हटले होते. त्याचप्रमाणे रामजन्मभूमी हा आमचा जन्माने, कर्माने आणि धर्माने जन्मसिद्ध हक्क आहे, असे प्रतिपादन पद्मविभूषण स्वामी रामभद्राचार्य महाराज यांनी पत्रकारांशी बोलतांना केले. शहरातील रामकृष्णा ग्रुपच्या वतीने आयोजित रामकथा ज्ञानयज्ञाच्या निमित्ताने ते येथे आले होते. स्वामी रामभद्राचार्य महाराज पुढे म्हणाले...

मंदिरे वाचवण्यासाठी खासदार चंद्रकांत खैरे केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेणार !

संभाजीनगर - सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संपूर्ण देशभरासाठी असतांना केवळ संभाजीनगरची मंदिरे पाडून प्रशासन हिंदूच्या भावनांशी खेळत आहे. गल्लीपासून देहलीपर्यंत आपले शासन असतांना मंदिर पाडण्याचे पाप घडले, हे दुर्दैवी आहे. याविषयी न्यायालयात आम्ही दाद मागणारच आहोत; पण त्यापूर्वी १८ नोव्हेंबर या दिवशी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांची देहली येथे भेट घेऊन हा दुर्दैवी प्रकार सांगणार आहे, असे शिवसेना उपनेते खासदार श्री. चंद्रकांत खैरे यांनी सिडको येथील अयोध्यानगरातील दुर्गामाता मंदिरात पार पडलेल्या मंदिर विश्‍वस्तांच्या बैठकीत सांगितले.

भविष्यात मॅसेजिंग अ‍ॅपद्वारेच संवाद होण्याची शक्यता

     मुंबई - सध्याच्या काळात 'मॅसेजिंग अ‍ॅप'ची लोकप्रियता वाढत असल्याने भविष्यात या माध्यमातूनच सर्व संवाद होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या ९० कोटी लोक नियमित 'व्हॉट्स अ‍ॅप' वापरतात. वर्षभरात फेसबूक मेसेंजर नियमित वापरणार्‍यांची संख्याही दुप्पट म्हणजे ३५ वरून ७० कोटी झाली आहे. वर्ष २०१८ पर्यंत ८० टक्के 'स्मार्टफोन' वापरणार्‍यांकडे 'मेसेंजिग अ‍ॅप' असतील. त्यामुळे भविष्यात लोक एकमेकांशी चर्चा करण्यासाठी केवळ अ‍ॅपच वापरतील, अशी चर्चा केली जात आहे. (तंत्रज्ञानाच्या जोडीला नैतिक मूल्यांचीही जपणूक झाली, तरच खर्‍या अर्थाने संवाद साधला जाईल ! - संपादक)

मुळा-मुठा नदीपात्रात कचरा उचलण्यासाठी हलक्या थराची जाळी बसवण्यात येणार

पालिकेने या उपाययोजनेसह नदीत प्रतिदिन मिसळले जाणारे लाखो लिटर 
सांडपाणी आणि रसायनमिश्रित दूषित पाणी रोखले जावे, यासाठीही प्रयत्न करावेत ! 
     पुणे, १७ नोव्हेंबर - येथील मुळा-मुठा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. पालिकेच्या हद्दीतील नदीपात्राच्या काही भागांत त्याचे ढीग आढळले आहेत. पालिकेच्या हद्दीजवळच्या गावांतील नाल्यांमधून हा कचरा वाहत येतो. त्यामुळे नदीपात्रातील कचर्‍याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. नदीमध्ये ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो, त्या भागाच्या नदीपात्रात हलक्या थराची जाळी (फिशिंग नेट) बसवण्यात येणार आहे. त्यामुळे नदीपात्रात पडलेला कचरा वेळोवेळी बाहेर काढणे शक्य होणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात 'कमिन्स' या आस्थापनाच्या माध्यमातून आस्थापनांच्या सामाजिक उपक्रमांतर्गत (सीएसआर) हे काम केले जाणार आहे. पुढील टप्प्यात संपूर्ण पात्रात हा प्रयोग राबवला जाईल. त्यासाठी या क्षेत्रातील तज्ञांशी चर्चा असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख किशोरी गद्रे यांनी दिली.

किल्ल्यांच्या निमित्ताने मुलांनी जागवल्या शिवस्मृती !

मिरज येथे पै. विशालसिंग रजपूत मित्रमंडळ यांनी केलेली चित्तोडगडची प्रतिकृती !
     मिरज, १७ नोव्हेंबर (वार्ता.) - दिवाळीत किल्ला करणे, ही बालगोपाळांसाठी पर्वणीच असते. सांगली-मिरज शहरातही किल्ल्यांच्या निमित्ताने मुलांनी प्रतापगड, तोरणागड, रायगड, तसेच अनेक किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवून शिवस्मृती जागवल्या. अनेक किल्ल्यांवर या वेळी अग्रक्रमाने अफझलखानवधाचे मातीचे चित्र ठेवण्यात आले होते. अनेकांनी किल्ल्यांसमवेत त्यांची माहितीही दिली होती. 

मुदत उलटूनही प्रशासनाने कृती न केल्याने हिंदुत्ववाद्यांकडून १८ नोव्हेंबरला आंदोलन

बेळगाव येथील कथित थडगे हटवण्याचे प्रकरण
बेळगाव, १७ नोव्हेंबर (वार्ता.) - खंजर गल्ली येथील कथित थडग्यामुळे संपूर्ण शहराला वेठीस धरण्यात आले आहे. हिंदुत्ववादी संघटना आणि पक्ष यांनी थडगे हटवण्यासाठी प्रशासनाला १६ नोव्हेंबरपर्यंत दिलेली मुदत संपली आहे; मात्र प्रशासनाने कोणत्याच हालचाली केल्या नाहीत. त्यामुळे १८ नोव्हेंबर या दिवशी थडगे हटवण्यासाठी आंदोलन करणार आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जलद कृती दलाची एक तुकडी १६ नोव्हेंबर या दिवशी मुंबईहून बेळगाव येथे दाखल झाली आहे. सैनिकांनी संवेदनशील भागात पथसंचलन केले.
     'सनातनच्या पाठिशी रहाणार्‍या शिवसेना पक्षाचा मी शिवसैनिक आहे. याचा मला अभिमान आहे.'
- श्री. रमेश नाईक, माजी गोवा राज्यप्रमुख, शिवसेना.

हिंदूंच्या संघटनाची आवश्यकता !

     'समीर गायकवाड प्रकरण असो किंवा गोध्रा दंगल किंवा दादरीचा विषय असो. केवळ हिंदूंना लक्ष्य करण्याची संधी हे पुरोगामी शोधत आहेत. हा हल्ला सनातन संस्थेवरील नसून हिंदुत्वावरील, धर्मावरील आहे. त्यामुळे धर्मरक्षणासाठी आपण सर्वांनी संघटित होऊन सनातन संस्थेच्या मागे उभे राहिले पाहिजे.'
- श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती.

गोवंशहत्या बंदी कायद्याच्या वैधतेला आव्हान देणार्‍या याचिकेवरील सुनावणीस उच्च न्यायालयाचा नकार

मुंबई - गोवंश हत्याबंदी कायद्याच्या वैधतेला आव्हान देणार्‍या अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवरील सुनावणीस १६ नोव्हेंबर या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. या खंडपीठापुढे सुनावणी घेता येणार नाही. मी याविषयी लेख लिहिला होता, असे न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी सांगत सुनावणीस नकार दिला. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या खंडपीठापुढे ही याचिका सुनावणीसाठी आली होती. 

ठाणे येथे नथुराम गोडसे बलिदान दिनाचा काँग्रेसकडून निषेध

नथुराम यांच्या पुतळ्याला लाथाबुक्क्यांनी तुडवले
     ठाणे - महात्मा गांधीजींचा मारेकरी असलेल्या नथुराम गोडसेची पुण्यतिथी बलिदान दिवस म्हणून साजरा करणार्‍या हिंदू महासभेचा काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला. १५ नोव्हेंबर या दिवशी ठाणे शहर काँग्रेसच्या वतीने नथुराम गोडसे यांच्या पुतळ्याला जाहीर फाशी देत पुतळ्याचे दहन करण्यात आले. आंदोलकांनी नथुराम यांच्या पुतळ्याला लाथाबुक्क्यांनी तुडवत भाजपविरोधी घोषणाबाजी करून निषेध नोंदवला. येथे हाकेच्या अंतरावर असलेल्या ठाणे नगर पोलीस ठाण्याचा एकही पोलीस पहार्‍यासाठी उपस्थित नव्हता. या आंदोलनात ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार, मनोज शिंदे, महिला अध्यक्ष ज्योती ठाणेकर, सेवादलाचे राजेश जाधव आदी सहभागी झाले होते. नगरसेवक शिंदे म्हणाले की, हा सत्तारूढ भाजपचा छुपा अजेंडा आहे. या देशविघातक नथुरामी प्रवृत्तीला वेळीच आळा घातला नाही, तर यापुढे व्यापक आंदोलन करण्यात येईल.

फलक प्रसिद्धीकरता

आणखी किती सैनिक हुतात्मा झाल्यावर भारतीय 
राज्यकर्ते आतंकवादाच्या विरोधात कठोर पावले उचलणार ? 
     कुपवाडा येथे सैन्य आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत कर्नल संतोष महाडिक यांना वीरमरण आले. कर्नल संतोष महाडिक हे '४१ राष्ट्रीय रायफल्स'चे अधिकारी होते. याशिवाय या आक्रमणात १ पोलीसही घायाळ झाला आहे.

राज्यात ४९ सहस्र सहकारी संस्था केवळ कागदावरच

  • सहकार क्षेत्राचा अनागोंदी कारभार
  • आज सहकारी संस्थांची अवस्था ही सहकार नव्हे, तर स्वाहाकार, अशी झाली आहे. त्या संस्था अवसायनात काढण्याबरोबरच त्या संबंधितांवर चौकशी करून कारवाईही करणे अपेक्षित आहे.
पुणे, १७ नोव्हेंबर - राज्यात २ लक्ष २८ सहस्र नोंदणी झालेल्या सहकारी संस्था आहेत. या संस्थांच्या केलेल्या सर्वेक्षणात ४९ सहस्र ३०४ संस्था बेपत्ता आहेत किंवा त्यांचा ठावठिकाणाच सहकार खात्याला मिळाला नाही. सर्वेक्षणातील या अहवालामुळे राज्यातील २६ प्रतिशत संस्था केवळ कागदावरच असल्याचे आढळून आले आहे. त्या संस्था अवसायनात काढण्याची कार्यवाही चालू करण्यात येणार असल्याची माहिती सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी दिली.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : 
Kupvadame atankiyonke sath hui 
golibarime Col.Santosh Mahadik hutatma ! 
 Atankvadko nashta karneke liye
aur kitne Sainikonko hutatma hona hoga ? 

जागो ! : 
कुपवाडा में आतंकियों के साथ हुई 
गोलीबारी में कर्नल संतोष महाडिक हुतात्मा ! 
 आतंकवाद को नष्ट करने के लिए 
और कितने सैनिकों को हुतात्मा होना होगा ?

अन्य प्रकियेद्वारे माहिती गोपनीय रहात नसल्याने समीर गायकवाड यांना न्यायालयात उपस्थित करणे अत्यावश्यक ! - अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरण
न्यायालय आज निर्णय देणार !
कोल्हापूर, १७ नोव्हेंबर (वार्ता.) - श्री. समीर गायकवाड यांना अत्यंत महत्त्वाची माहिती द्यावयाची आहे. ही माहिती अन्य प्रक्रियेद्वारे गोपनीय राहू शकत नाही. त्यामुळे श्री. समीर यांना न्यायालयात उपस्थित करणे अत्यावश्यक आहे, असा युक्तीवाद श्री. गायकवाड यांचे अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी १७ नोव्हेंबर या दिवशी न्यायालयात केला. यावर शासकीय अधिवक्त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री. आर्.डी. डांगे यांनी १८ नोव्हेंबर या दिवशी त्यावर निर्णय देणार असल्याचे घोषित केले.
     या वेळी न्यायालयात श्री. समीर गायकवाड यांचे अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन, हिंदू विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर, अधिवक्ता श्री. आनंद देशपांडे उपस्थित होते, तर शासकीय पक्षाच्या बाजूने अधिवक्ता चंद्रकांत बुधले आणि खासगी अधिवक्ता विवेक घाडगे उपस्थित होते.
    अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केलेला युक्तीवाद...

बांगलादेशी घुसखोरांच्या अतिरेकी कारवाया दडपणारे पश्‍चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे शासन आणि पोलीस !

उघडपणे होणार्‍या आतंकवादी कारवाया पहाता पश्‍चिम बंगालमध्ये शासन 
अस्तित्वात आहे का, असा प्रश्‍न पडतो !
     वर्ष २०१४ मध्ये ऑक्टोबर महिन्यात पश्‍चिम बंगालच्या वर्धमान जिल्ह्यामध्ये एक बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटामध्ये इंडियन मुजाहिदीन आणि जमाते इस्लामीचे तीन अतिरेकी गंभीर घायाळ झाले. त्यातील दोघांचा मृत्यू झाला आणि एक घायाळ झाला. हा स्फोट तृणमूल काँग्रेसचे नेते नुरुल हुसेन चौधरी यांच्या घरात झाला. हा बॉम्बस्फोट झाल्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणावर आग लागली आणि ही आग विझवण्याकरता पश्‍चिम बंगालचे अग्नीशमन दल अन् पोलीस तिथे पोहोचले. त्या वेळी त्यांना दोन बायकांनी पिस्तुलाचा धाक दाखवत रोखले आणि पुढचा एक तास पोलिसांना त्या घरात प्रवेश करू दिला नाही. या काळात त्यांनी अनेक महत्त्वाची कागदपत्रे, दस्तऐवज, व्हिडिओ ध्वनीचित्र-चकत्या इत्यादी जाळल्या. २ ऑक्टोबर २०१४ या दिवशी झालेल्या बाँबस्फोटाविषयी पश्‍चिम बंगाल शासनाने भारताच्या गुप्तचर संघटना आणि सुरक्षा संस्थांना काहीच सांगितले नाही. गॅस सिलिंडरचा स्फोट झाला असे सांगून हे प्रकरण मिटवण्याचा शासनाचा हीन प्रयत्न होता. सुदैवाने पश्‍चिम बंगाल येथील काही जागृत वर्तमानपत्रांनी ही बातमी समोर आणली.

ब्रिटीश शाळा कह्यात (ताब्यात) घेणारे धूर्त मुसलमान आणि त्याला समर्थपणे तोंड देणारे ब्रिटीश पंतप्रधान !

     बर्मिंगहॅम या ब्रिटनमधील शहरातील काही शाळा धूर्तपणे स्वतःकडे घेण्याचा कट जहाल मुसलमानांनी आखल्याचे लक्षात आल्यावर तत्परतेने ब्रिटीश पंतप्रधानांनी मुसलमानांना चेतावणी दिली आणि लगेच त्याविरोधात कृतीही केली. स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत भारतातील मुसलमान बहुसंख्य असलेल्या हिंदूंच्या सतत कुरापती काढून त्यांना दहशतीखाली ठेवत आहेत; पण त्यांच्यावर कठोर कारवाई करणारे शासन या देशाला अद्याप मिळाले नाही. भारत शासन ब्रिटीश पंतप्रधानांकडून राष्ट्राभिमान शिकतील, तो सुदिन असेल !

हिंदूंनी सहिष्णुता आय.एस्.आय.एस्.कडून शिकायची का ?

श्री. भाऊ तोरसेकर
     मुंबई किंवा महाराष्ट्रात पाकिस्तानी गायक गुलाम अली याचा कार्यक्रम होऊ देणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आणि देशभरच्या पुरोगाम्यांनी किती आक्रंदन केले होते ना ? भारतात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात असहिष्णुता वाढल्याची जाणीव अनेकांना झाली होती. शिवसेनेने काय केले ? तर कार्यक्रमाच्या संयोजकांना आपली विरोधाची भूमिका पटवून दिली आणि त्यांनी कार्यक्रम रहित केला. किती ही अरेरावी आणि हिंसा ना ? मग ज्यांना यात असहिष्णुता दिसली, त्यांच्या व्याख्येनुसार सहिष्णुतेची व्याख्या काय असेल ? कित्येक दिवस सामान्य माणसाला असा प्रश्‍न पडला आहे; पण कुणा पुरोगाम्याने त्याचे उत्तर दिले नाही कि शिवसैनिकांचे शंकानिरसन केले नाही; पण म्हणून प्रश्‍न संपत नसतो. बहुधा इराकमधल्या आय.एस्.आय.एस्.ने भारतीय पुरोगाम्यांच्या वतीने ते उत्तरदायित्व उचलले आणि पॅरिसमध्ये येऊन त्याचे उत्तर दिले.

अध्यात्मातील पहिला धडा : अहंकार नको !

दीपावलीच्या सुट्टीनिमित्त प्रतिदिन वाचा बोधकथा !
१. शूरसेन राजाला अध्यात्म शिकण्याची इच्छा होणे, त्याने आत्मानंद महाराजांना राजवाड्यात घेऊन येण्यास प्रधानाला सांगणे; परंतु महाराजांनी राजाला झोपडीत शिकायला बोलावणे : शूरसेन नावाचा एक राजा होता. त्याने आपले राज्य पुष्कळ वाढवले. त्याची प्रजाही सुखी होती. राजाला आपले शौर्य, राज्य, ऐश्‍वर्य आणि कर्तृत्व इत्यादी गोष्टींचा अभिमान होता. त्याला अध्यात्म शिकण्याची इच्छा झाली. तेव्हा शूरसेनाने आपल्या प्रधानाला बोलावून राज्यातील सर्वश्रेष्ठ अध्यात्मातील आधकारी असलेल्या गुरूंचा मानसन्मान करण्यास आणि अध्यात्म शिकवण्यासाठी त्यांना प्रतिदिन राजवाड्यात घेऊन येण्यास सांगितले.

बस भाडेवाढीला आळा घालणार का ?

     यंदाची दिवाळी अनेकविध कारणाने सर्वांच्या लक्षात राहील. कारण या दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर तेल आणि तूरडाळ यांची साठेबाजी मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे तुरडाळीची किंमत ही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली. त्याचबरोबर राज्य परिवहन महामंडळानेही भाडेवाढ केली. महामंडळाच्या बसगाड्याच्या दिवाळीच्या कालावधीत १७ सहस्र जादा फेर्‍या होणार आहेत. त्याचा होणारा तोटा सहन करता यावा, यासाठी २० ते २५ टक्के हंगामी भाडेवाढ जाहीर केली. ही वाढ ५ ते २५ नोव्हेंबर या कालावधीसाठी करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना अधिक ३० ते ५० रुपये नेहमीच्या प्रवास देयकासाठी द्यावे लागणार आहेत.

विजयनगरच्या हिंदु साम्राज्याचा इस्लामने केलेला पराभव विसरू नका !

     दक्षिण रेल्वेतील होसपेट रेल्वेस्थानकापासून १२ किलोमीटरच्या अंतरावर विजयनगर नावाचे गाव आहे. हे गाव मध्ययुगामध्ये एक विशाल हिंदु साम्राजाची राजधानी होती. या साम्राज्याच्या अंतर्गत दक्षिण भारताचा अधिक भाग होता. त्याच्या अधिपत्याखाली ६० बंदरे (जहाजे थांबण्याचे ठिकाण) होती. त्याच्याकडून वेगवेगळ्या देशांमध्ये पुष्कळ प्रमाणात आयात-निर्यात होत होती. मसाले आणि सुती वस्त्र यांच्या व्यापारावर विजयनगरचा एकाधिकार होता.

महाराष्ट्रात मराठीला मानाचे स्थान देण्यासाठी कठोर धोरणे राबवण्याची आवश्यकता !

    परक्या (इंग्रजी) भाषेची उच्चता देशात राहू दिली, तर ती भाषा ज्यांची (इंग्रजांची) जन्मभाषा आहे, त्यांचे उच्चवर्गातील स्थान आपल्याला मान्य करावे लागेल. म्हणूनच -
अ. देशी भाषेत राज्य चालवणारे शासन लवकर स्थापित करावे.
आ. जो कायदा मराठीत नसेल, तो महाराष्ट्रास बंधनकारक नसावा.
इ. सर्व न्यायाधिशांच्या निवाड्यांची भाषा मराठीच असावी.
ई. मराठी भाषेत महाराष्ट्राचा राज्यकारभार चालणे, म्हणजे देशी भाषांमध्ये राज्य चालवणे, याला मी स्वराज्य मानतो !
- ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर (१९२८) (दैनिक लोकसत्ता, १५.७.२०१२)

इंग्रजाळलेल्या भारतियांनो, स्वभाषा आणि स्वदेशी शिक्षण व्यवस्था यांची अपरिहार्यता ओळखा !

विदेशी पत्रकार : स्वदेशी विद्यापिठांची संख्या इतकी अल्प असतांना स्वदेशी शिक्षणाचे आव्हान देणे योग्य आहे का ?
नेताजी सुभाषचंद्र बोस : तुम्हाला उत्तम जेवण मिळाले नाही, तर तुम्ही विष खाणार का ? आमच्या ज्ञान-विज्ञानाच्या भव्य भांडाराची गुरुकिल्ली संस्कृत किंवा तिच्यावर अवलंबून असणार्‍या भारतीय भाषा आहेत. या गुरुकिल्लीचा उपयोग केल्याविना स्वची जागृती करवून देणारी स्वदेशी शिक्षण प्रणाली कार्यान्वित होऊ शकत नाही. (गीता स्वाध्याय, जानेवारी २०११)

हिंदु राजाने शरणार्थी पार्शींनाही वसाहत करून देणे !

     अरबांनी आठव्या शतकात पर्शियन साम्राज्याचा क्रूर अंत केला. हत्याकांडाला लालसावलेल्या अरबांनी इस्लामचा स्वीकार वा मृत्यू असे दोनच पर्याय पार्शी जनांसमोर ठेवले होते. कित्येकांनी मृत्यू पत्करला. काही लेचेपेचे इस्लामी झाले. काही साहसी, शूर-वीर पळून गेले. रानोमाळ भटकत होते. ते देशोदेशी हिंडत होते. फिरता फिरता त्यांची ती टोळी इ.स. ९३६ मध्ये भारताच्या पश्‍चिम किनार्‍याला गुजरातच्या संजान नावाच्या खेड्याजवळ पोहोचली. सागर तिरावरचे ते गाव हिंदु राजाच्या राज्यात होते. वाजद देव हे त्या राजाचे नाव. सिल्हार वंशाचा तो राजा होता. त्याने त्या पार्शी शरणार्थीचे स्वागत केले आणि त्यांना वसाहतीकरता जागा दिली. - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, १८.२.२०१०)

हिंदुस्थानची अविभाज्यता राखणे, हे आमच्या राजकीय कार्यामध्ये पहिले आणि मुख्य लक्ष्य असले पाहिजे ! - स्वातंत्र्यवीर सावरकर


आश्रमांत केलेल्या महालय श्राद्धाच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती

दत्तगुरूंच्या कृपेनेच केवळ प्रार्थना केल्याने पूर्वजांना गती
मिळणार असल्याने साधिकेने व्यक्त केलेली कृतज्ञता !
     १६.१०.२०१५ या दिवशी देवद आश्रमात श्राद्धविधी होणार असून आपल्या सर्व पितरांना गती मिळण्यासाठी आणि सर्व साधकांना त्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होण्यासाठी प्रार्थना करावी, अशी सूचना आश्रमाच्या फलकावर लिहिली होती. त्या वेळी प.पू. गुरुदेव आणि आश्रम व्यवस्थापनातील सर्व साधक यांच्याप्रती मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. (ती शब्दांत व्यक्त करणे केवळ अशक्य आहे.) त्या वेळी माझ्या मनात पुढील विचार आले, भगिरथाने आपल्या पूर्वजांना गती मिळण्यासाठी १ सहस्र वर्षे तपश्‍चर्या करून गंगामातेला पृथ्वीवर आणून आपल्या ६० सहस्र पूर्वजांना गती मिळवून दिली

साधकांना प.पू. डॉक्टरांना अपेक्षित असे घडवण्याची तीव्र तळमळ असलेले प.पू. पांडे महाराज !

प.पू. पांडे महाराज
१. प.पू. पांडे महाराजांचे मार्गदर्शन मिळाल्याने
 खर्‍या अर्थाने साधनेला प्रारंभ झाल्याचे जाणवणे
     मी देवदला आल्यावर मला माझ्यातील तीव्र अहंभावाची जाणीव झाली. प.पू. पांडे महाराजांचे मार्गदर्शन ऐकल्यावर त्यांचा एकेक शब्द किती खरा आहे, हे माझ्या लक्षात आले आणि माझे अस्तित्वच संपले, असे मला जाणवले. माझी खर्‍या अर्थाने साधना चालू झाली. हे श्रीकृष्णा, मी तुला सर्वस्व दिले, तरी ते थोडेच आहे.

साधकांची श्रद्धा !

परात्पर गुरु डॉ. आठवले
एखाद्या आजारावरील पथ्य किंवा उपचार यासंदर्भात आधुनिक वैद्य (डॉक्टर) आणि संत यांचे सांगणे एकमेकांच्या विरुद्ध असले, तर बुद्धीप्रामाण्यवादी आधुनिक वैद्यांचे, तर साधक संतांचे ऐकतात. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३१.१०.२०१५)

वाईट शक्तींचा त्रास न्यून होण्यासाठी नेहमी आध्यात्मिक उपायांना बसण्यापूर्वी दोष आणि अहं निर्मूलन सारणी लिखाण करा !

     आध्यात्मिक उपायांना बसण्यापूर्वी स्वभावदोष अथवा अहं यांसंबंधीचे प्रसंग (अयोग्य कृती) सारणीत लिहावेत. त्यामुळे साधकाचे मन त्या विचारांतून मोकळे होते, हा प्रयत्न चिकाटीने केल्यास अस्थिर मन हळूहळू स्थिर होऊ लागते. उपायांच्या वेळी मन स्थिर झाल्याने साधकाची आध्यात्मिक उपायांतून चैतन्य ग्रहण करून ते टिकवून ठेवण्याची क्षमता वाढू लागते.

भीती वाटणे हा प्रबळ दोष जाऊन निर्भयता येण्यासाठी सौ. अरुणा पोवार यांनी देवाचे साहाय्य घेऊन केलेली मात

१. लहानपणापासून वाईट शक्तीचे अस्तित्व जाणवून भीती वाटणे : मी ४ - ५ वर्षांची असल्यापासून मला वाईट शक्तीचे अस्तित्व जाणवणे, त्यांचा स्पर्श होणे, त्यांची जाणीव होणे आणि त्यांचा आवाज ऐकू येणे, असे आध्यात्मिक त्रास होत होते. मी जसजशी मोठी होत गेले, तसे हे प्रमाण पुष्कळ वाढले. त्यानंतर भीती वाटणे हा माझा प्रबळ दोष झाला. मी कुठेही एकटी थांबायचे नाही. दिवसा आणि रात्री मला कोणाची तरी सोबत लागत असे. कधी कुठे थोड्या वेळासाठी जरी एकटी थांबले, तरी मला तेथे वाईट शक्तीचे अस्तित्व जाणवत असे.

औषधे घेऊनही उजवा पाय पुष्कळ दुखणे आणि पू. नकातेकाकांसाठी ८ दिवस पोळ्या बनवण्याची सेवा केल्यावर पायाचे दुखणे नाहीसे होऊन व्यवस्थित चालता येऊ लागणे

     २२.८.२०१५ या दिवसापासून माझा उजवा पाय पुष्कळ दुखत होता. पायावर सूज आली होती आणि त्यामुळे पुष्कळ वेदनाही होत होत्या. औषध घेऊनही दुखणे न्यून होत नव्हते. त्यामुळे स्वयंपाकघरातील सेवा करण्यात पुष्कळ अडचणी आल्या. कधीकधी सेवा बसूनही करावी लागली; म्हणून पुष्कळ रडूही यायचे.
     एक दिवस कृष्णाला कळकळीने प्रार्थना करून मी सेवेसाठी गेले. तेव्हा मला किमान पायर्‍या तरी उतरून सेवेला जाता आले. त्या वेळी मला पू. नकातेकाका आश्रमात येणार आहेत, असे समजले.

प्रत्येक कृती सेवा म्हणून करणारे आणि गुरूंप्रती भाव असलेले कर्नाटक मधील श्री. लिंगप्पा गौडा (वय ६१ वर्षे) यांनी गाठली ६३ टक्के आध्यात्मिक पातळी !

      साधनेच्या दृष्टीने आदर्श कुटुंब कसे असावे, याचे उत्तम उदाहरण श्री. लिंगप्पा गौडा आणि सौ. बालक्का गौडा यांनी सर्वांपुढे ठेवले आहे. त्या दोघांनी स्वतः ६० टक्क्यांहून अधिक पातळी गाठली आणि त्याचबरोबर तिन्ही मुलींनाही मंगळुरू आश्रमात सेवेसाठी पाठवून दिले. त्यांचा मुलगाही प्रासंगिक सेवा करतो. त्यांची प्रगती अशीच होवो, अशी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२.११.२०१५)
  
श्री. लिंगप्पा गौडा
   उजिरे, दक्षिण कन्नड, कर्नाटक येथील श्री. लिंगप्पा गौडा (अप्पा) यांचे शिक्षण तिसरीपर्यंत झाले आहे. सनातन संंस्थेचे दक्षिण भारताचे प्रसारसेवक आणि ६५ टक्के आध्यात्मिक स्तर असलेले श्री. रमानंद गौडा यांचे ते सासरे आहेत. त्यांच्यात संयम, सहनशीलता, प्रेमभाव, तळमळ, त्याग, इतरांची काळजी घेणे, नम्रता, मनमोकळेपणा, अहं अल्प असणे आदी गुण आहेत.
     रमानंददादांच्या पत्नी सौ. मंजुळा यांना जाणवलेली त्यांच्या वडिलांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत.

१. समाधानी वृत्ती
     अप्पा आहे त्या परिस्थितीत समाधानी असतात.

अशिक्षित असूनही जिज्ञासा आणि साधनेची तीव्र तळमळ हे गुण असणार्‍या सौ. बालक्का गौडा (वय ५६ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

     साधनेच्या दृष्टीने आदर्श कुटुंब कसे असावे, याचे उत्तम उदाहरण श्री. लिंगप्पा गौडा आणि सौ. बालक्का गौडा यांनी सर्वांपुढे ठेवले आहे. त्या दोघांनी स्वतः ६० टक्क्यांहून अधिक पातळी गाठली आणि त्याचबरोबर तिन्ही मुलींनाही मंगळुरू आश्रमात सेवेसाठी पाठवून दिले. त्यांचा मुलगाही प्रासंगिक सेवा करतो. त्यांची प्रगती अशीच होवो, अशी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२.११.२०१५)
 
सौ. बालक्का गौडा
    सौ. बालक्का गौडा (वय ५६ वर्षे) मागील १४ वर्षांपासून सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करत आहेत. त्यांच्यात मनमोकळेपणा, इतरांचा विचार करणे, प्रेमभाव, नम्रता, इतरांना साहाय्य करणे, सेवाभाव, श्रद्धा आणि भाव हे गुण आहेत. त्यांच्या तीन मुली मंगळुरू सेवाकेंद्रात पूर्णवेळ साधना करतात. सनातन संंस्थेचे दक्षिण भारताचे प्रसारसेवक आणि ६५ टक्के आध्यात्मिक स्तर असलेले श्री. रमानंद गौडा यांच्या त्या सासूबाई आहेत.

सौ. श्रद्धा यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

१. प.पू. डॉक्टर पूर्वी रहात असलेल्या खोलीमध्ये नामजप करतांना डोक्यावर एक छिद्र पडून तेथे चक्र फिरत असल्याचे जाणवणे आणि तेथून देहात चैतन्य येत असल्याचे जाणवणे : २९.९.२०१४ या दिवशी रामनाथी आश्रमातील प.पू. डॉक्टर पूर्वी रहात असलेल्या खोलीमध्ये नामजपाला बसले होते. नामजप एकाग्रतेने आणि संथ गतीने होत होता. त्या वेळी अचानक डोक्याच्या ठिकाणी जोरात एक छिद्र पडून तिथे बराच वेळ एक चक्र पुष्कळ गतीने फिरत असल्याचे जाणवत होते. त्यानंतर छिद्रातून चैतन्य वेगाने देहात जात होते. कुठेतरी खोल पोकळीत आत आत जात आहे, असे वाटत होते.

गुर्वाज्ञा म्हणूनी सत्वर हिंदु राष्ट्र स्थापूया ।

द.र. (भाऊ) पटवर्धन
हिंदु धर्म हा ईश्‍वरनिर्मित ।
३३ कोटी देव हिंदूंचे दैवत ॥
ते दोन प्रमुख तत्त्वे शिकवतात ।
अनेकातून एकात तथा एकातून अनेकात ॥
धर्मशास्त्र सारे शिकूया अन् सर्वांना शिकवूया ।
साधना तथा गुर्वाज्ञा म्हणूनी,

साधकाला सकाळी अंघोळ केल्यावर अनपेक्षितपणे झोप येणे आणि त्याला स्वप्नात गुरुकृपेमुळे साधकांचे रक्षण होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना झाली आहे, असे दिसणे

१. नेहमी सकाळी अंघोळीनंतर झोप येत नसूनही एकदा अनपेक्षितपणे 
झोप येणे आणि स्वप्नामध्ये सूक्ष्मातील प.पू. गुरुदेवांनी मावळ्यांप्रमाणे
वेश घातलेल्या साधकांना हिंदु राष्ट्राची स्थापना करा, असे सांगणे
     ११.७.२०१५ या दिवशी सकाळी ९ वाजता अंघोळ केल्यानंतर मला झोपावेसे वाटले. (एरव्ही मी अंघोळीनंतर झोपत नाही.) त्या वेळी झोपल्यावर थोड्याच वेळात मला एक स्वप्न पडले. त्यात दिसले, माझे सूक्ष्म-शरीर माझ्या स्थूल शरिराला सोडून बाहेर पडले. तेव्हा सूक्ष्मातील प.पू. गुरुदेवांनी मला एका संतांच्या आश्रमाजवळ बोलावले. मी तेथे सूक्ष्म-शरिराने पोचलो.

प.पू. भक्तराज महाराजांच्या गाडीजवळ उपायांना बसल्यावर आलेली अनुभूती

पायात असह्य वेदना होऊन मनात निरर्थक विचार येत असल्याने 
प.पू. भक्तराज महाराजांच्या गाडीजवळ बसणे आणि मन शांत होणे
     मी ऑगस्ट २०१५ मध्ये काही दिवस देवद आश्रमात सेवेसाठी होते. त्या वेळी माझ्या डाव्या पायात असह्य वेदना होत होत्या; म्हणून मी दोन दिवस खोलीत झोपून होते. मी थोडा वेळच सेवा करू शकत होते. ७.८.२०१५ या दिवशी माझ्या मनात दुपारपासून विचारांचे काहूर माजले होते; म्हणून मी दुपारी ३.३० ते ४.३० या वेळेत प.पू. भक्तराज महाराजांच्या (प.पू. बाबांच्या) गाडीजवळ बसले.

झाडीत चावलेल्या किड्यांमुळे झालेले त्रास आणि व्यर्थ ठरलेले औषधोपचार !

१. झाडीत किडे चावल्याने शरिरावर सर्वत्र खुणा दिसून आग होणे
     मी साधारण २ मासांपूर्वी गोव्यातील साकोर्डा येथे जागा बघण्यासाठी गेलो होतो. तेव्हा मला तेथील झाडीत किडे चावले. त्या वेळी त्याविषयी काहीच जाणवले नाही. रात्री कपडे पालटतांना लक्षात आले की, पाय, पाठ आणि पोट येथे सर्वत्र (साधारण ८५ ठिकाणी) कीटक दंशाच्या खुणा होत्या आणि त्याची आग होत होती.
२. औषधोपचारांनी गुण न आल्याने नारळाने दृष्ट काढणे 
आणि यामुळे त्रासाचे प्रमाण ७५ टक्के उणावणे
     यासाठी अनेक प्रकारची औषधे, गोळ्या, मलम आदी उपचार केले, तरी त्यांचा कोणताच लाभ झाला नाही. त्यानंतर आधुनिक वैद्यांनी प्रतिजैविकेही (अँटीबायोटीक्सही) दिली, तरीही त्रास न्यून होत नाही;

संतांप्रती अपार भाव असणार्‍या ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या देवद आश्रमातील श्रीमती सत्यवती दळवीआजी (वय ७९ वर्षे) !

श्रीमती सत्यवती दळवीआजी
१. साधकांना पुष्कळ प्रेम देणार्‍या आजी !
     दळवीआजी पुष्कळ प्रेमळ आहेत. मला आणि खोलीतील अन्य साधिकांना त्या पुष्कळ प्रेम देतात. एकदा मला एका संतांनी प्रसाद पाठवला होता. हे मी आनंदाने आजींना सांगितले आणि सेवेला गेले. थोड्या वेळाने आजींनी विभागातून (स्वयंपाकघरातून) मला बोलावले आणि जवळ घेऊन म्हणाल्या, देवाने मला सांगितले, पोरीने तुला एवढ्या प्रेमाने प्रसाद मिळाल्याचे सांगितले आणि तू तिला जवळही घेतले नाहीस.

दोन व्यक्तींच्या छायाचित्रांतील आश्‍चर्यकारक साम्य !

डॉ. विलास आठवले

श्री. विनोद गादीकर
          येथे श्री. विनोद गादीकर यांचे दैनिक सनातन प्रभातमध्ये १५ जुलै या दिवशी प्रसिद्ध झालेले छायाचित्र दिले आहे. डॉ. विलास आठवले यांचे छायाचित्रही सोबत छापले आहे. दोघांच्या वयात अंतर असूनही छायाचित्रांतील साम्य आश्‍चर्यकारक आहे. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१८.७.२०१५)


साधकांना सूचना

साधकांनो, पू. मेनराय आणि पू. (सौ.) मेनराय यांंच्या ध्यानाच्या पालटलेल्या वेळांत
नामजपाला बसून स्वतःच्या आध्यात्मिक उपायांची परिणामकारकता वाढवा !
     सनातनचे पू. (श्री.) भगवंतराय मेनराय आणि पू. (सौ.) सूरजकांता मेनराय देहली येथील त्यांच्या निवासस्थानी प्रतिदिन ८ घंटे ध्यानाला बसतात. या ध्यानाच्या वेळी साधकांनी इतरत्र कुठेही बसून नामजप केला,
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
सर्व गोष्टींचा कर्ता-करविता असलेल्या देवाचे अस्तित्व नाकारणारे बुद्धीप्रामाण्यवादी !
'कर्त्याशिवाय, म्हणजे कोणीतरी करणारा असल्याशिवाय कोणतीही गोष्ट बनू शकत नाही, उदा. सुतार असल्याशिवाय आसंदी (खुर्ची) बनत नाही. असे असतांना देवाने बनवलेले काही मानव मात्र सर्व गोष्टींचा कर्ता-करविता असलेला 'देव नाहीच', असे म्हणतात !' - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१०.११.२०१५)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सत्याची कास कधीही सोडू नये ! 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      परमेश्‍वराची साथ नित्य रहावी, ही इच्छा असेल, तर कधीही सत्याची कास सोडू नये. सतत सत्याचे अधिष्ठान ठेवावे ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
 सनातनचे श्रद्धास्थान
'भांडे' स्वच्छ हवे 
     तुम्हाला भिक्षा हवी आहे. तुम्ही म्हणता मी दाता आहे, तर तुमचे पात्र चांगले घासून स्वच्छ करून आणा. भांड्यात आधीचे काही खरकटे रहाता कामा नये. नाहीतर तुम्हालाच भिक्षा न्यून (कमी) मिळेल. भिक्षापात्र रिकामे हवे. 
भावार्थ : 'तुमचे पात्र चांगले घासून स्वच्छ करून आणा', याचा अर्थ आपण शुद्ध, निर्मळ अंतःकरणाने बाबांकडे (गुरूंकडे) गेले पाहिजे. 'भांड्यात आधीचे काही खरकटे राहता कामा नये' म्हणजे आपल्यात कुठलाही विषय, वासना किंवा कामना असता कामा नये. 
 (संदर्भ : सनातनचे प्रकाशन 'संत भक्तराज महाराज यांची शिकवण.') 

रणसंग्रामातील फ्रान्स नावाचा योद्धा !

     पॅरिसवरील अत्यंत भीषण आक्रमणातून केवळ दोनच दिवसांत सावरत फ्रान्सने आय.एस्.आय.एस्.वर केलेल्या धाडसी हवाई आक्रमणांना दाद द्यावी लागेल. फ्रान्सच्या या कृतीला कुणी उपटसुंभ व्यक्ती आततायी ठरवील, कुणी अहिष्णु म्हणेल, तर कुणी पुस्तकी विचारवंत त्यांच्यावर अविचारी कृतीचा ठपका ठेवील. वाघाला घायाळ केले की, तो दुप्पट ताकदीने आक्रमण करतो. फ्रान्सची कृती ही घायाळ वाघापेक्षा वेगळी नाही. अन्यायाचा सूड तात्काळ उगवणे म्हणजे नेमके काय असते, हे फ्रान्सने जगाला दाखवून दिले. अर्थात् अशी कारवाई करणारे फ्रान्स हे पहिले आणि एकमेव राष्ट्र नव्हे. यापूर्वी अमेरिकेनेही अफगाणिस्तान आणि इराकमध्ये सैन्य घुसवून शत्रूचा सूपडा साफ केला आहे. भेद इतकाच की, अफगाणिस्तानमधील आतंकवादी एकेकाळी अमेरिकेनेच पोसलेे होते आणि ते डोईजड झाल्यावर त्यांचा नि:पात केला, तर फ्रान्सला अशी कोणतीही स्वार्थी पार्श्‍वभूमी नव्हती.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn