Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

विनम्र अभिवादन !


लाला लाजपतराय यांचा स्मृतीदिन
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी

फ्रान्सने केलेल्या आक्रमणात सिरियातील आतंकवादी तळ उद्ध्वस्त !

बाणेदार फ्रान्सकडून जिहादी आतंकवाद्यांना दोन दिवसांत सडेतोड प्रत्युत्तर 
कुठे आक्रमण झाल्यावर अन्य राष्ट्रांना पुरावे सादर करत न बसता 
शत्रूवर दोन दिवसांत थेट आक्रमण करणारा बाणेदार फ्रान्स, 
तर कुठे २६/११ प्रकरणी पाकच्या सहभागाविषयी अजूनही पुरावेच सादर करणारा भारत !
पॅरिस - आय.एस्.आय.एस्. या जिहादी आतंकवादी संघटनेच्या आतंकवाद्यांनी पॅरिसमध्ये १३ नोव्हेंबरला केलेल्या भीषण आक्रमणाचा सूड फ्रान्सने आक्रमणाच्या दुसर्याच दिवशी उगवला. जिहादी आतंकवाद्यांना सडेतोड प्रत्युत्तर देत फ्रान्सने १५ नोव्हेंबरला सिरियातील रक्का या आय.एस्.आय.एस्.च्या अधिपत्याखाली असलेल्या शहरावर लढाऊ विमानांतून जोरदार आक्रमण केले. फ्रान्सच्या १० विमानांनी रक्कातील आय.एस्.आय.एस्.च्या प्रशिक्षण केंद्रावर जोरदार आक्रमण करत ते उद्ध्वस्त केले. फ्रान्सच्या या कारवाईला अमेरिकेच्या सैन्यानेही साहाय्य केले. फ्रान्सने सिरियावर आक्रमण करण्यासाठी संयुक्त अरब अमिराती आणि जॉर्डन या देशांतील विमानतळांचा वापर केला. या आक्रमणाच्या वेळी फ्रान्सने आतंकवाद्यांवर २० बॉम्ब फेकले. त्यात आय.एस्.आय.एस्.च्या प्रशिक्षण केंद्राची मोठी हानी झाली आहे.

(म्हणे) 'काश्मीर समस्येवर सार्वमत हाच एकमेव पर्याय !'

काश्मीरवर सातत्याने हक्क सांगणार्या पाकला आणि भारताशी द्रोह करणार्या 
फुटीरतावाद्यांना शासनाने आतातरी धडा शिकवावा, ही अपेक्षा !
नवाझ शरीफ यांचे काश्मीरमधील 
फुटीरतावादी नेत्या असिया अद्राबीला पत्र
इस्लामाबाद - काश्मीरची समस्या सोडवण्यासाठी सार्वमत हाच एकमेव पर्याय आहे, अशी गरळओक पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्या असिया अद्राबी यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. शरीफ गेल्या काही मासांपासून संयुक्त राष्ट्र्रसंघाच्या सर्वसाधारण सभेत, तसेच इतर आंतरराष्ट्रीय व्यासपिठांवर सतत काश्मीरचे सूत्र उपस्थित करत आहेत. यासाठी आभार मानणारे पत्र अद्राबी यांनी शरीफ यांना लिहिले होते. या पत्रास शरीफ यांनी उत्तर दिले.  

राष्ट्रीय पुरस्काराचा मान राखा !

पुरस्कार परत करणार्यांना राष्ट्रपतींच्या कानपिचक्या
नवी देहली - राष्ट्रीय पुरस्कार हे कठोर परिश्रमाचे फळ असते. या सन्मानाचा प्रेमाने सांभाळ करता आला पाहिजे. एखाद्या गोष्टीशी तुम्ही असहमत असाल, तर चर्चा, संवाद या मार्गाने तुमचे म्हणणे व्यक्त करा; पण पुरस्कार परत करणे, हा योग्य मार्ग नाही. पुरस्काराचा मान राखायला हवा, अशा शब्दांत देशात असहिष्णु वातावरण असल्याची ओरड करत पुरस्कार वापसीची मोहीम उघडणार्याव कथित साहित्यिकांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कानपिचक्या दिल्या. राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

नेपाळच्या साम्यवादी पंतप्रधानांनी पुन्हा एकदा गायले चीनचे गोडवे !

एकेकाळी हिंदुराष्ट्र असलेला आणि त्यामुळे भारताशी घनिष्ट मैत्री असलेला नेपाळ आता 
साम्यवाद्यांनी घशात घातल्याने भारताशी वैरभाव पत्करत आहे अन् भारताला पाण्यात 
पहाणार्‍या चीनशी सख्य करत आहे. भारतीय राज्यकर्त्यांनी याकडे गांभीर्याने पहायला हवे !
     काठमांडू - सध्या नेपाळमध्ये जे संकट ओढवले आहे, त्याला सर्वस्वी भारत उत्तरदायी आहे, या शब्दांत नेपाळचे साम्यवादी विचारसरणीचे नवनिर्वाचित पंतप्रधान के.पी. ओली यांनी भारतावर दोषारोप करत दुसरीकडे चीनचे गोडवे गायले आहेत. चीनकडून नेपाळला तेल आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंची निर्यात करण्यात येत असल्याचे स्पष्ट करत त्यांनी चीनचे आभार मानले.

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांकडून कधी चर्चवर वा पाद्रींवर आक्रमण का केले जात नाही ? - संघनेते इंद्रेश कुमार यांचा प्रश्‍न

नक्षलवादी आणि ख्रिस्ती यांच्यात साटेलोटे असल्याचे आरोप !
    रायपूर (छत्तीसगड) - छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांकडून कधी चर्चवर वा पाद्रींवर आक्रमण का केले जात नाही ? असा प्रश्‍न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्र्रीय सुरक्षा जागरण मंचचे मार्गदर्शक इंद्रेश कुमार यांनी पत्रकारांशी बोलतांना उपस्थित केला. तथापि ख्रिस्ती समाजाच्या देशभक्तीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्याचा माझा हेतू नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
    इंद्रेशकुमार हे येथे फोरम् फॉर अवेअरनेस ऑफ नॅशनल सिक्युरिटी या दक्षिण बस्तर भागातील समस्यांशी संबंधित कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आले होते. कार्यक्रमानंतर ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

धर्मावरील घाला कदापि सहन करणार नाही !- खासदार चंद्रकांत खैरे

धर्मावरील आघातांच्या विरोधात किती हिंदु लोकप्रतिनिधी असे ठामपणे उभे रहातात ?
  वेरूळ, १६ नोव्हेंबर - मंदिरावर घाला म्हणजे हिंदु धर्मावरच घाला आहे. सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात हिंदु धर्मावर घाला घालून तो संपवण्याचे काम चालू आहे; मात्र शिवसेना हे कदापि सहन करणार नाही. शिवसेना कायदेशीर मार्गाने प्रशासनाला उत्तर देईलच; परंतु मंदिरे वाचवण्यासाठी प्रसंगी माझे रक्त सांडले, तरी एकाही मंदिराला हात लावून देणार नाही, असे क्षात्रतेजयुक्त प्रतिपादन शिवसेना उपनेते आणि खासदार श्री. चंद्रकांत खैरे यांनी केले. (मंदिरे वाचवण्यासाठी सातत्याने आवाज उठवणारे श्री. चंद्रकांत खैरे यांचा आदर्श सर्वत्रच्या हिंदु लोकप्रतिनिधींनी घेणे आवश्यक आहे ! - संपादक) जगद्गुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज यांच्या २६ व्या पुण्यस्मरणार्थ आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज, इतर संत आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. 

सिरियाच्या कोणत्याही शरणार्थीला अमेरिकेत स्थान देऊ नये !

अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचे आवाहन
     न्यूयॉर्क - पॅरिस येथे झालेले भीषण आतंकवादी आक्रमण पहाता अमेरिकेमध्ये सिरियाच्या कोणत्याही शरणार्थीला स्थान देऊ नये, असे आवाहन अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी येथे केले. पॅरिस येथील आतंकवादी आक्रमणात ठार झालेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ १४ नोव्हेंबर या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत ते बोलत होते. पॅरिस आक्रमणाच्या वेळी ठार झालेल्या नागरिकांच्या हातात जर बंदुका असत्या, तर वेगळेच चित्र दिसले असते, असेही ट्रम्प यांनी सांगितले.

देशात महिलांवरील अत्याचार आणि विवाहित महिलांचे शोषण या घटनांमध्ये चिंताजनक वाढ

धर्मशिक्षणाचा अभाव आणि पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करण्याचे प्रमाण वाढल्याने समाजव्यवस्था 
कशी ढासळत चालली आहे, याचेच हे द्योतक आहे. उत्तम समाजव्यवस्थेसाठी निधर्मी नव्हे, तर 
धर्माधिष्ठित शासनव्यवस्थाच आवश्यक आहे !
    तिरुवनंतपुरम्, १६ नोव्हेंबर - तिरुवनंतपुरम् येथे लैंगिक समतेवर आंतरराष्ट्र्रीय संमेलन भरले आहे. त्यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या भारतात महिलांची स्थिती या अहवालात हे भीषण वास्तव समोर आले आहे. देशात गेल्या ११ वर्षांत महिलांवरील अत्याचाराच्या घटना २००१ च्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त वाढल्या आहेत. त्याचबरोबर विवाहित महिलांच्या शोषणाच्या घटनांमध्ये अडीचपट वाढ झाली आहे. (केंद्रशासनाने या प्रकरणी लक्ष घालून या घटना रोखण्यासाठी कठोर कारवाई आणि आवश्यक उपाययोजना कराव्यात, ही अपेक्षा ! - संपादक)

पेट्रोल आणि डिझेल पुन्हा महागले !

     नवी देहली - पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमतीत लिटरमागे अनुक्रमे ३६ पैसे आणि ८७ पैसे इतकी वाढ आजपासून करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत आंतरराष्ट्र्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती न्यून झाल्या आहेत. गेल्या आठवड्यात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ४० डॉलर अशी न्यून झाली होती. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दरही न्यून होण्याची शक्यता होती; मात्र रुपयाचे अवमूल्यन आणि उत्पादन शुल्कात केलेली वाढ यांमुळे पेट्रोल अन् डिझेल यांच्या दरांत वाढ करण्यात झाल्याचे सांगण्यात आले.

पॅरिसवरील आक्रमण ही क्रियेवरील प्रतिक्रिया ! - आझम खान

आझम खान यांचे वक्तव्य म्हणजे पॅरिस आक्रमणाचे अप्रत्यक्षपणे समर्थनच नव्हे का ?
    रामपूर (उत्तरप्रदेश) - पॅरिसवर झालेले आक्रमण ही क्रियेवरील प्रतिक्रिया आहे, असे विधान उत्तरप्रदेशचे कॅबिनेट मंत्री आझम खान यांनी केले आहे. ते म्हणाले, बॉम्ब टाकले जातात, तेव्हा गरिबांची घरे उद्ध्वस्त होतात, हे अमेरिकेने समजून घेतले पाहिजे. जगाची वाटचाल महायुद्धाच्या दिशेने होत असल्याचे दिसते. जगात तिसर्‍या महायुद्धाची शक्यता दिसत आहे.
   आझम खान यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस आणि भाजप या पक्षांनी टीका केली आहे. काँग्रेसचे नेते संदीप दीक्षित यांनी अमेरिकेला सल्ला देणारे आझम खान सौदी अरेबियाचे नाव घेण्यास का विसरतात ?, असे म्हटले आहे. भाजपचे नेते सिद्धार्थ सिंह म्हणाले, आझम खान एक वरिष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांनी असे विधान करू नये. त्यांनी केलेले वक्तव्य निंदनीय आहे.

पं. नथुराम गोडसे यांच्या जीवनाशी संबंधित माहिती नागरिकांसाठी खुली करावी ! - अखिल भारतीय हिंदु महासभेची केंद्रशासनाकडे मागणी

    मेरठ (उत्तरप्रदेश) - पं. नथुराम गोडसे यांनी मोहनदास गांधी यांची हत्या केली होती; परंतु त्यांनी ती का केली, याविषयीची कारणमीमांसा सर्व नागरिकांना होणे आवश्यक आहे. त्यामुळे गोडसे यांच्या जीवनाशी संबंधित माहिती नागरिकांसाठी खुली करावी, अशी मागणी अखिल भारतीय हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष अभिषेक अग्रवाल यांनी केंद्रशासनाकडे केली आहे. याशिवाय गोडसे यांचे जीवनचरित्र शाळेमध्ये शिकवण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रपतींकडे करण्यात येणार असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.

तमिळनाडूत मुसळधार पावसाचे १२० बळी !

 • वाहतूक ठप्प !                
 • इमारतींमध्ये पाणी शिरले !
 • शाळा-महाविद्यालये बंद !     
 • पावसाचा जोर आणखी वाढणार !

अतिवृष्टि: अनावृष्टि: शलभा मूषका: शुका: । 
स्वचक्रं परचक्रं च सप्तैता ईतय: स्मृता: ॥  - कौशिकपद्धति
अर्थ : धर्माचे पालन न केल्यामुळे अतीवृष्टी, अनावृष्टी (दुष्काळ), टोळधाड, उंदरांचा त्रास, पोपटांचा उपद्रव, आपापसांत लढाया आणि शत्रूचे आक्रमण, अशी सात प्रकारची संकटे (राष्ट्रावर) येतात.
तात्पर्य, प्रजा आणि राजा, दोन्हीही धर्मपालक आणि साधना करणारे हवेत. तरच आपत्काळाची तीव्रता अल्प होईल किंवा आपत्काळ सुसह्य होईल.                  ॐ
चेन्नई - बंगालच्या उपसागरात अल्प दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने दक्षिण भारतातील राज्यांत गेले काही दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका तमिळनाडू राज्याला बसला असून तेथे 'जलप्रलय'सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या अतीवृष्टीत आतापर्यंत १२० जणांचा मृत्यू झाला असून पुढील ३ दिवस आणखी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवल्याने येथील नागरिक भयग्रस्त झाले आहेत.

केरळमध्ये आता रामायण मासच्या धर्तीवर बायबल वाचन मास होणार !

हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठीच कावेबाज ख्रिस्त्यांचे हे षड्यंत्र नाही कशावरून ? स्वत:ची फसवणूक होऊ 
नये, यासाठी हिंदूंनी सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे !
     कोची - गरीब आणि अज्ञानी हिंदूंना फसवून ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करण्यासाठी ख्रिस्ती मिशनरी सतत हिंदु धर्मातील चालीरिती, धर्मग्रंथ आदींची नक्कल करत असतात. कार्तिक मासांत केरळ राज्यातील हिंदु रामायणाचे पारायण करून रामायण मास पाळतात. त्याच धर्तीवर बायबल कमिशन या केरळ राज्यातील संस्थेने डिसेंबर मासात बायबल वाचन मास पाळण्याचे ठरवले आहे. याविषयी माहिती देतांना फादर व्हर्गीस वालीकत्तू म्हणाले, केरळ कॅथॉलिक बिशप कौन्सिलच्या वतीने हा उपक्रम या वर्षीपासून हाती घेण्यात आला आहे. डिसेंबरमध्ये येशू ख्रिस्ताचा जन्म झाला म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. हा कार्यक्रम रामायण मासच्या धर्तीवर आयोजित करण्यात आला आहे का ? असे त्यांना विचारले असता त्यांनी होकार दिला.

अयोध्येत श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी देशभर सामूहिक रामनाम जपाचे आयोजन !

     देहली - यंदाच्या वर्षी कार्तिक पौर्णिमा २०७२, म्हणजेच २५ नोव्हेंबर या दिवशी कारसेवेला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने त्या दिवशी सकाळी ११.१५ ते १२.३० या वेळेत अयोध्येत श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी देशभर सामूहिक रामनाम जपाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सव्वा घंटा चालणारा नामजप ईश्‍वरी प्रेरणेने देशातील प्रत्येक तीर्थक्षेत्र, शहर, तालुका, गाव आणि प्रत्येक चौक येथे आयोजित करण्यात येणार आहे. या वेळी हिंदूंनी एकत्र येऊन राष्ट्रकल्याणासाठी संकल्प करावा, असे आवाहन या कार्यक्रमाचे आयोजक, नामजप समिती, समस्त रामभक्त समुदाय आणि विविध संत, यांच्या वतीने करण्यात आले आहे.

स्वच्छ भारत अभियानासाठी निधी उभारण्याकरिता स्वच्छ भारत उपकर लागू !

नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी शासनाने नागरिकांना 
शिस्त लावल्यास त्याची परिणामकारकता अधिक दिसून येईल !
सेवा कर १४.५० टक्के
     नवी देहली - नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती व्हावी आणि स्वच्छ भारत अभियानासाठी निधी जमा व्हावा, यांसाठी केंद्रशासनाने सेवा करांवर अर्धा टक्का स्वच्छ भारत उपकर लागू केला आहे. त्याची अंमलबजावणी १५ नोव्हेंबरपासून चालू झाली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे आतापर्यंत १४ टक्के असलेला सेवा कर आता १४.५० टक्के झाला आहे. हॉटेल, दूरध्वनी, भ्रमणध्वनी, मोठी निवासगृहे, रेल्वेचे वातानूकुलीत आणि प्रथमवर्ग श्रेणीचे प्रवासदेयक, विमान प्रवास दर, आदींवर हा अधिभार आकारला जाणार आहे. महानगरपालिकेच्याही सेवा करात वाढ होणार असून त्याची अंमलबजावणी करण्याचे परिपत्रक सर्व विभागांतील अधिकार्‍यांना पाठवण्यात आले आहे. या सर्व करांपोटी शासनाला एका वर्षात १ सहस्र कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.

प्रयोगशाळेतील चाचणीत बिसलरीचे बाटलीबंद पाणी सदोष आढळले

     नवी देहली - उत्तरप्रदेशच्या मिर्झापूर येथील प्रयोगशाळेत बिसलरी आस्थापनाच्या बाटलीबंद पाण्याची चाचणी करण्यात आली. या चाचणीत हे पाणी सदोष आढळल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. १८ सप्टेंबर या दिवशी खाद्य विभागाने मिर्झापूरमधील एका दुकानावर छापा मारून बिसलरी आस्थापनाच्या काही बाटल्या जप्त केल्या होत्या. त्या प्रयोगशाळेत परिक्षणासाठी पाठवण्यात आल्या होत्या. त्यांचे परिक्षण केल्यानंतर सिद्ध केलेल्या अहवालातून हे उघड झाले आहे. बाटलीबंद पाणी या परिक्षणात अयशस्वी ठरले. या पाण्याने आवश्यक ते निकष पूर्ण न केल्याचे या चाचणीत समोर आले आहे. त्यामुळे आता खाद्य विभागाने बिसलरी आस्थापनाला नोटीस पाठवण्याची सिद्धता केली आहे.

मुंबईच्या सीमेत २० सहस्र परप्रांतीय मच्छीमार नौकांची घुसखोरी

२६/११ चे मुंबईवरील आक्रमण सागरी मार्गाने झालेले असतांनाही नौकांच्या संदर्भात अक्षम्य 
हलगर्जीपणा करणार्‍या उत्तरदायींवर शासनाने कठोरात कठोर कारवाईच करावी, ही अपेक्षा !
    मुंबई - मुंबई किनार्‍याजवळ सहस्रो परप्रांतीय ट्रॉलर, छोट्या नौका विनाअडथळा येतात आणि मासेमारी करून निघून जातात. याच पार्श्‍वभूमीवर मुंबईच्या सागरी सुरक्षेचा प्रश्‍न जटील होत आहे. अशा परप्रांतीय मच्छीमार नौकांची संख्या २० सहस्र इतकी आहे. (इतक्या मोठ्या प्रमाणात नौका येऊनही संबंधित विभाग याविषयी अनभिज्ञ कसे ? - संपादक) 

पंडित नथुरामांचा अवमान करणे, हे समस्त हिंदूंचा अवमान करण्यासारखे ! - राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे

 •  'नथुराम - अ मर्टीअर सेंट' या इंग्रजी भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन 
 •  कार्यक्रमाच्या वेळी 'युक्रांद'च्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजीद्वारे विरोध 

पुणे, १६ नोव्हेंबर (वार्ता.) - अखंड भारत करून सिंधु नदी वहाणे, ही हुतात्मा पंडित नथुराम गोडसे यांची इच्छा होती. ही इच्छा एका व्यक्तीची नसून ती समस्त हिंदूंची आहे. नथुराम गोडसे यांचा अवमान करणे, हे समस्त हिंदूंचा अवमान करण्यासारखे आहे, ही गोष्ट विरोधकांनी लक्षात घेतली पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी केले. 'हुतात्मा पंडित नथुराम गोडसे इच्छा पत्र न्यासा'च्या वतीने १५ नोव्हेंबर या दिवशी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी हुतात्मा पंडित नथुराम गोडसे यांची ६६ वी पुण्यतिथी त्यांच्या अस्थिकलश पूजनाद्वारे साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी ६६ निरांजने प्रज्वलित करून अस्थिकलशाचे औक्षण करण्यात आले. या वेळी दिवंगत गोपाळ गोडसे यांचे सुपुत्र श्री. नाना गोडसे, त्यांचे पुत्र श्री. अजिंक्य गोडसे आणि गोडसे कुटुंबीय उपस्थित होते, तसेच हिंदुत्ववादी सर्वश्री विद्याधर नारगोलकर, भाग्यनगर येथील डॉ. सीतारामय्या, तसेच कर्नाटक आणि महाराष्ट्र येथील अनेक राष्ट्र्रप्रेमी नागरिक उपस्थित होते. 

आतंकवादाविरुद्धची लढाई ही स्वतंत्ररित्या लढावी लागेल ! - शिवसेना

आतंकवाद समूळ नष्ट करण्याच्या संदर्भात आवाज उठवून भारताला दिशादर्शन करणार्यास शिवसेनेचे अभिनंदन !
  मुंबई, १६ नोव्हेंबर - पाकिस्तान आतंकवादाचे जागतिक आस्थापन आहे, हे सत्य सगळ्यांनी स्वीकारायला हवे; पण जोपर्यंत स्वत:च्या आसंदीखाली बॉम्ब फुटत नाहीत, तोपर्यंत अमेरिका आणि युरोपीय राष्ट्रे यांना भारताची तडफड समजत नाही. आतंकवादाविरुद्धची लढाई ही स्वतःपुरतीच असते, हे सत्य भारताने स्वीकारायला हवे ! ती आपल्याला स्वतंत्ररित्या लढावी लागेल, असे खणखणीत प्रतिपादन १६ नोव्हेंबरच्या दैनिक सामनातून प्रसिद्ध झालेल्या 'पॅरिसचा नरसंहार' या संपादकियाद्वारे केले आहे. 

आय.एस्.आय.च्या पाकिस्तानी हेरास कोलकात्यात अटक !

आतंकवादाने पोखरलेला भारत !
    कोलकाता - पाकिस्तानी हेरखाते आय.एस्.आय.साठी हेरगिरी करत असल्याच्या संशयावरून अख्तर खान उपाख्य महंमद जासिद उपाख्य राजू (वय ५० वर्षे) यास पोलिसांनी चित्तरंजन एव्हेन्यू येथे अटक केली. अख्तर खान याच्याकडून १ लाख ७५ सहस्र रुपये एवढ्या भारतीय चलनाच्या बनावट नोटाही जप्त करण्यात आल्या. पोलीस सहआयुक्त राजीव मिश्र यांनी दिलेल्या माहितीनुसार अख्तरवर कटकारस्थान रचल्याच्या आरोपासह इतर अनेक आरोपांखाली गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली.

गायीच्या मृत्यूच्या निषेधार्थ गावकर्‍यांचा कडकडीत बंद !

कोडोली (जिल्हा कोल्हापूर), १६ नोव्हेंबर (वार्ता.) - ११ नोव्हेंबरच्या रात्री कत्तलसाठी घेऊन जाणारा टेम्पो विहिंप-बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडला होता. यातील गायी नंतर निमशिरगाव येथील गोशाळेत नेण्यात आल्या. कत्तलीसाठी नेण्यात येणार्‍या या गायी अत्यंत दाटीवाटीने टेम्पोत भरल्याने त्यातील एका गायीचा १४ नोव्हेंबर या दिवशी मृत्यू झाला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या कोडोली ग्रामस्थांनी १५ नोव्हेंबर या दिवशी कडकडीत बंद पाळला. यात कोडोली बाजारपेठेतील सर्व व्यापारी, गणेश मंडळे आणि धर्मप्रेमी सहभागी झाले होते.

हिंदु समाजातील गांधीवाद नष्ट करून हिंदुत्ववाद रुजवल्यासच अखंड भारताची निमिर्र्ती ! - राकेश हिंदुस्थानी

ठाणे येथे नथुराम गोडसे बलीदान दिन साजरा
   ठाणे, १६ नोव्हेंबर - प्रत्येक हिंदूने राष्ट्र्र आणि धर्माभिमान जपलाच पाहिजे. अखंड हिंदु राष्ट्र करण्यासाठी हिंदु राजसत्ता मिळवणे, हा हिंदूंचा जन्मसिद्ध अधिकार आहे. हुतात्मा नथुराम गोडसे यांनी देशाची एकात्मता आणि अखंडता टिकून रहावी; म्हणून निदर्शने, मोर्चा, निवेदने, उपोषणे हे पर्याय निवडून ते कृतीशील झाले; पण त्यांचा काहीच परिणाम न झाल्याने त्यांनी गांधी यांची हत्या केली. पंडित नथुरामजी गोडसे यांनी गांधीवध का केला, या मागची त्यांची भूमिका आणि भावना यांविषयीचे सत्य जगासमोर यायलाच हवे. या हुतात्म्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ न देणे, त्यासाठी बलिदान दिन आपण साजरा केलाच पाहिजे. हिंदु समाजातील गांधीवाद नष्ट करून सावरकरवाद अर्थात हिंदुत्ववाद रुजवला, तरच अखंड भारत निर्माण होईल, असे प्रतिपादन हिंदु महासभा महाराष्ट्र युवा प्रभारी श्री. राकेश हिंदुस्थानी यांनी केले. येथील श्रीशिवमंदिराच्या पटागंणात १५ नोव्हेंबर या दिवशी हिंदु महासभेच्या वतीने हुतात्मा नथुराम गोडसे बलिदान दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमातील सनातन प्रभात नियतकालिकांचे कार्यालय, हिंदु धर्मप्रसार करणारा वेबसाईट विभाग, ग्रंथ-निर्मिती विभाग, हिंदूंच्या वृत्तवाहिनीसाठी बनवलेले सनातन कलामंदिर, ईश्‍वरप्राप्तीसाठी कला या दृष्टीकोनातून चालणारा कला-विभाग, वैज्ञानिक उपकरणांद्वारे आध्यात्मिक संशोधन आध्यात्मिक संग्रहालय, सनातन साधक-पुरोहित पाठशाळा, यज्ञशाळा सर्वांनी पहायला हवी.- श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था, गोवा.

कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या अश्‍विनी रमाणे यांची निवड

    कोल्हापूर, १६ नोव्हेंबर (वार्ता.) - येथील महापालिकेच्या महापौरपदासाठी आज सकाळी ११ वाजता निवडणूक पार पडली. महापौरपदी काँग्रेसच्या सौ. अश्‍विनी रमाणे यांची, तर उपमहापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शमा मुल्ला यांनी विजय मिळवला आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत पिठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी काम पाहिले. काँग्रेसच्या सदस्यांनी गुलालाची उधळण करून जल्लोष साजरा केला. अश्‍विनी रमाणे यांनी भाजपाच्या सौ. सविता भालकर यांचा १० मतांनी पराभव केला. या वेळी ८१ पैकी ७७ नगरसेवक सभागृहात उपस्थित होते. महापौरपदाच्या निवडणुकीला शिवसेनेच्या ४ नगरसेवकांनी दांडी मारली होती. या वेळी हात उंचावून मतदान घेण्यात आले. त्यात काँग्रेसच्या अश्‍विनी रमाणे यांना ४४, तर भाजपच्या सौ. सविता भालकर यांना ३३ मते मिळाली. त्यामुळे महापौरपदी काँग्रेसच्या रमाणे विजयी झाल्या.

नगर येथील पारशाखुंट येथे फटाके उडवल्याने धर्मांधांकडून हिंदूंना मारहाण

हिंदूंच्या सणांच्या दिवशी क्षुल्लक कारणावरून हिंदूंना मारहाण करणारे उद्दाम
धर्मांध ! या धर्मांधांना आळा घालण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत, ही अपेक्षा !
नगर, १६ नोव्हेंबर - येथील पारशाखुंट भागात फटाके उडवण्याच्या कारणावरून काही धर्मांधांनी हिंदूंना त्यांच्या घरात घुसून विटा आणि लाकडी दांडक्याद्वारे मारहाण केली, तसेच घरातील वस्तूंचीही तोडफोड केली. ही घटना दिवाळीतील पाडव्याच्या दिवशी, म्हणजेच १२ नोव्हेंबरच्या रात्री ८.३० वाजता घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये परस्परविरोधी गुन्हे प्रविष्ट करण्यात आले आहेत.
१. पारशाखुंट येथील पिंजारगल्लीत धर्मांध आणि हिंदू यांच्यामध्ये वाद चालू आहेत. त्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर पाशु शेख याने मद्यपान करून १२ नोव्हेंबरच्या रात्री किरण बोरुडे यांना शिवीगाळ अन् दमदाटी केली.
२. बोरुडे कुटुंबीय फटाके उडवत असतांना शेख आणि इतर ९ जण विटा अन् लाकडी दांडके घेऊन घरासमोर आले. त्यांनी बोरुडे कुटुंबियांना फटाके न उडवण्याविषयी धमकावले आणि लाथाबुक्के देऊन उपरोक्त साहित्याच्या साहाय्याने मारहाण केली. (यावरून हे आक्रमण पूर्वनियोजित नसेल कशावरून ? - संपादक)

राज्यातील १ कोटी ४४ लाख मुले शिक्षणापासून वंचित

 • राज्य शिक्षण विभागाकडून शिक्षण हक्क अधिकार कायद्याचे उल्लंघन आतातरी शासनाने या प्रकरणात पुढाकार घेऊन सर्वच विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्नशील रहावे !
 • विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी करणार्‍या संबंधितांना याविषयी खडसवायलाच हवे !
मुंबई - शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार राज्यातील सहा ते चौदा वर्षे वयोगटातील बालकांना विनामूल्य आणि सक्तीचे शिक्षण देण्याचे दायित्व राज्यातील शासनावर आहे; मात्र मागील पाच वर्षांत शिक्षण विभागाला ते दायित्व पार पाडता आलेले नाही. त्यामुळे जवळजवळ १ कोटी ४४ लाख मुले शिक्षणापासून वंचित राहिली, असे बाल हक्क आयोगाच्या एका सुनावणीच्या वेळी लक्षात आले. राज्य शासन आणि महानगरपालिकेचा शिक्षण विभाग यांना मुलांच्या शिक्षणासाठी ठराविक वेळेत कार्यक्रम आखण्याचे आदेश दिले होते; मात्र त्यावर राज्य शिक्षण विभागाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही.

प्रशासनाने थडगे न हटवल्यास हिंदुत्ववादी आणि महिला थडगे हटवतील ! - खासदार सुरेश अंगडी यांची चेतावणी

 • कथित थडगे हटवण्यासाठी १८ नोव्हेंबरला आंदोलन
 • हिंदूंनो, वारंवार चेतावणी द्यावी लागू नये, यासाठी संघटित व्हा !
बेळगाव, १६ नोव्हेंबर (वार्ता.) - खंजर गल्ली येथील कथित थडगे हटवण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हा प्रशासनास १६ नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत दिली आहे. प्रशासनाने कथित थडगे न हटवल्यास १८ नोव्हेंबर या दिवशी हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आणि असंख्य महिला खंजर गल्ली येथील कथित थडग्याकडे कूच करून आंदोलन करतील. थडगे न हटवल्यास निर्माण होणार्‍या परिस्थितीस जिल्हा प्रशासन उत्तरदायी असेल, अशी चेतावणी खासदार श्री. सुरेश अंगडी यांनी पत्रकार परिषदेत दिली. (यापूर्वीही हिंदुत्ववादी संघटनांनी कथित थडगे हटवण्यासाठी प्रशासनाला ८ दिवसांची समयमर्यादा दिली होती; मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. वारंवार असे करावे लागू नये, यासाठी हिंदूंनी संघटित होऊन लढा दिला पाहिजे. - संपादक) १५ नोव्हेंबर या दिवशी काडा कार्यालयात ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी आमदार श्री. संजय पाटील उपस्थित होते.

परीक्षा रहित करणार, हा अपसमज ! - शालेय शिक्षण मंत्री

    मुंबई - सर्व शाळांमध्ये परीक्षा घ्यावीच लागेल, अन्यथा विद्यार्थी शिक्षणाकडे दुर्लक्ष करतील, असे राज्य शासनाने नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या आराखड्याविषयी सिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. परीक्षा घेणार नसल्याचे या अहवालात म्हटले नसून त्यासंदर्भात अपसमज झाले आहेत, असे शासनाने सांगितले आहे.
अनुत्तीर्ण झाल्यामुळे शाळा सोडण्याचे विद्यार्थ्यांचे प्रमाण नियंत्रणात आणण्याचा उद्देशही नव्या शिक्षण धोरणात आहे. प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांची स्वतंत्र बैठक घ्यायची, शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन भेट देणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीविषयी पालकांना माहिती व्हावी; म्हणून सामाजिक संकेतस्थळांचा वापर करणे अशा उपायांचाही त्यात समावेश आहे.

उजिरे (कर्नाटक) येथील धर्माभिमानी श्री. संजीव शेट्टीगार (वय ६० वर्षे) यांनी गाठली ६२ टक्के आध्यात्मिकपातळी, तर साधक लिंगप्प गौडा (वय ६२ वर्षे) यांनी ६३ टक्के, त्यांची धर्मपत्नी सौ. बालक्क गौडा (वय ५७ वर्षे)यांनी ६१ टक्के आणि साधिका श्रीमती इंदिरा राव (वय ६८ वर्षे) यांनी गाठली ६३ टक्के आध्यात्मिक पातळी !

श्री. संजीव शेट्टीगार यांचा सत्कार करतांना ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे सनातनचे साधक श्री. रमानंद गौडा
डावीकडून श्री. रमानंद गौडा, श्री. लिंगप्प गौडा, त्यांची धर्मपत्नी सौ. बालक्क गौडा
श्रीमती इंदिरा राव यांचा सत्कार करतांना ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे सनातनचे साधक श्री. रमानंद गौडा
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हिंदूच्या घरासमोरील रांगोळी पुसून हिंदु महिलांना केली धक्काबुक्की !

पाळधी (जळगाव) येथे एका धर्मांधाचा उद्दामपणा !
    पाळधी (जळगाव) - लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजे ११ नोव्हेंबरला येथील श्री. कमलेश सोमाणी यांच्या घराजवळ काढलेली ॐ आणि स्वस्तिक यांचे चिन्ह असलेली रांगोळी इम्रान कालू खाटीक या धर्मांधाने पायाने पुसली. (धर्मांधांचे हिंदूंकडे वक्रदृष्टीने पहाण्याचे धाडस होऊ नये, यासाठी व्यापक हिंदूसंघटनच उभारायला हवे ! - संपादक) घरातील हिंदु स्त्रियांनी त्याला खडसवल्यावर त्याने शिवीगाळ करत धक्काबुक्कीही केली.
१. रांगोळी पुसल्याच्या घटनेनंतर सोमाणी कुटुंबीय तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता इम्रानचे वडील कालू खाटीक यांनी त्यांना तक्रार न करण्याविषयी धमकावले. पोलिसांनी इम्रानला तेथे आणल्यावर त्याने सोमाणी कुटुंबियांशी अरेरावीने बोलण्यास प्रारंभ केला. (पोलीस ठाण्यातही धर्मांध अरेरावीने बोलू शकतात, यावरून धर्मांध पोलिसांनाही जुमानत नाहीत, हे दिसून येते. - संपादक) तरीही हिंदु महिलांनी त्याच्या विरोधात तक्रार नोंदवली. (धर्मांधांच्या अरेरावीला न जुमानणार्‍या हिंदु महिलांचे अभिंदन ! - संपादक)

पुणे येथे महागडे १०६ स्मार्ट भ्रमणभाष चोरणार्‍यांच्या टोळीला अटक

 • राज्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शासनाने तत्परतेने पावले उचलावीत, हीच जनतेची अपेक्षा !
 • भ्रमणभाष शासनाधीन
पुणे, १५ नोव्हेंबर - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील गर्दी ठिकाणच्या नागरिकांना लक्ष्य करून त्यांच्या खिशातील भ्रमणभाष चोरणार्‍या चोरट्यांच्या टोळीला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीकडून अ‍ॅपल, सँमसंग, सोनी या आणि अन्य नावाजलेल्या आस्थापनांचे १०६ स्मार्ट भ्रमणभाष पोलिसांनी शासनाधीन केले आहेत. त्यांची किंमत १० लक्ष रुपये आहे. कोंढव्यातील सराफ बाजार परिसरात ४ जण संशयास्पद फिरत असून ते भ्रमणभाष विकण्याच्या सिद्धतेत असल्याची माहिती पोलीस कर्मचार्‍याला मिळाली. त्यानुसार त्यांनी सापळा रचून दोघांना कह्यात घेतले.

पाचवीपर्यंतचे शिक्षण विद्यार्थ्यांना मातृभाषेतूनच द्यावे !

भावी पिढीचा विचार करून स्तुत्य प्रस्ताव पाठवणारे महाराष्ट्रातील फडणवीस शासन !
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अहवालासाठी महाराष्ट्र शासनाचा प्रस्ताव
मुंबई - विद्यार्थी मातृभाषेतून दिलेले शिक्षण तुलनेने लवकर आत्मसात करतात. यासाठी विद्यार्थ्यांना पाचवीपर्यंतचे शिक्षण त्यांच्या मातृभाषेतच द्यावे, असा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने नव्या शैक्षणिक धोरणाच्या अहवालात सादर केला आहे. राज्यशासनाच्या या प्रस्तावाचे स्वागत केले जात आहे.
केंद्रशासनाच्या वतीने सध्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवण्याचे कार्य चालू आहे. यात केंद्राने तब्बल १४ प्रश्‍नांवर आधारित गाव, तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर चर्चा करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार राज्यशासनाने एक अहवाल नुकताच सादर केला.
या अहवालात म्हटले आहे की, विद्यार्थीदशेत मुले नावीन्यपूर्ण विचार करत असतांना त्यांच्या मातृभाषेतच करत असतात, तसेच मातृभाषेत देण्यात येणारे शिक्षण ते लवकर आत्मसात करतात. त्यामुळे पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेत देणे आवश्यक आहे.

लाला लजपतराय यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने !

पंजाब केसरी लाला लजपतराय म्हणजे अत्यंत धार्मिक कर्मयोगी व्यक्तीमत्त्व ! अन्यायाचा त्वेषाने प्रतिकार केल्याने लवकर स्वातंत्र्यप्राप्ती होईल, या उद्देशाने लाला लजपतराय यांनी ब्रिटिशांशी शेवटपर्यंत नेटाने लढा दिला. स्वातंत्र्यलढ्यात प्रसंगी स्वत:च्या प्राणाची आहुतीही दिली. राजकीय नेतृत्व, शिक्षणप्रसार, आर्थिक साक्षरता तसेच समाजिक सुधारणा क्षेत्रांत भरीव योगदान देणार्‍या लाला लजपतराय (१८६५-१९२८) यांचे या क्षेत्रांतील विचार आजही तंतोतंत लागू पडतात.
ब्रिटिशांच्या दडपशाहीस प्राणपणाने विरोध करणारे लाला लजपतराय !
काँग्रेसमधील मवाळ गटाच्या शांततामय मार्गाने मागणी करणे आणि मिळेल ते पदरात पाडून घेणे, या लाचार नीतीला विटलेल्या जनतेला लाला लजपतराय यांनी नवी दिशा दिली. क्षात्रतेजयुक्त विचारांचा प्रसार करून लाल-बाल-पाल या त्रिकुटाने संपूर्ण देशात नवचैतन्य निर्माण केले. स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार या चतु:सूत्रीचा संबंध भारतियांना अवगत करून ब्रिटिशांना सळो कि पळो करून सोडले. लाला लजपतराय यांनी कायदेमंडळात जाऊन ब्रिटिशांच्या दडपशाहीस विरोध केला, त्याविषयी जनतेने त्यांना पंजाब केसरी किताबाने गौरवले.

फलक प्रसिद्धीकरता

अशा विचारसरणीच्या शरीफ यांच्याशी चर्चेच्या माध्यमातून काश्मीर प्रश्‍न सुटेल का ?
   काश्मीरची समस्या सोडवण्यासाठी तेथे सार्वमताची चाचणी घेणे हाच एकमेव पर्याय आहे, अशी गरळओक पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी काश्मीरमधील फुटीरतावादी महिला नेत्या असिया अद्राबी हिला लिहिलेल्या पत्रात केली आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Kashmirki bahusankhya Muslim janta kashmirka nirnay legi ! - Pak ke PM Sharif
Aise vichardharavale Sharifse keval charcha kar Kashmirka prashna chhutega ?
जागो !
कश्मीरकी बहुसंख्य मुसलमान जनता कश्मीरका निर्णय लेगी - पाकके पंतप्रधान शरिफ
ऐसे विचारधारावाले शरिफ से केवल चर्चा कर कश्मीर का प्रश्‍न छुटेगा ?

भारतीय इतिहास संशोधन केंद्रातील बुद्धीवादी चोर !

     शासनाने एक पुस्तक लिहून घेण्यासाठी ४० लक्ष रुपये व्यय केले असल्याचे आपण कधी ऐकले आहे का किंवा असा एखादा बौद्धिक उपक्रम जो मागील ४३ वर्षांपासून चालू असून त्यावर कोट्यवधी रुपये खर्च होऊनही अद्याप तो पूर्ण झाला नाही ? जर ऐकले नसेल, तर लक्ष देऊन ऐका..
सन्माननीय इतिहासकार आणि विद्वान 
व्यक्ती यांचा उघडपणे होणार्‍या चोरीत सहभाग !
     ICHR ज्याला आपण भारतीय इतिहास अनुसंधान परिषद या नावाने ओळखतो, त्या ठिकाणी अशा बर्‍याच बौद्धिक चोर्‍या झाल्या आहेत. गेल्या ६० वर्षांपासून इतिहासातील शोध, संगोष्ठि, चर्चासत्र, सभासदत्व (फेलोशिप्स), शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप्स) आणि पाठ्यपुस्तकातून हिंदु आणि भारत देश यांच्याविरुद्ध लोकांच्या मनात विष पेरण्याचा ठेका वामपंथी लोकांकडे होता. सत्ताधारी काँग्रेसने कधीही यांच्या विरोधात उपाय तर केले नाहीतच; मात्र त्यांना प्रोत्साहन दिले. गेल्या कित्येक वर्षांपासून उपक्रमांच्या नावावर अशा प्रकारची बौद्धिक चोरी होत आहे.

खराखुरा त्याग

दीपावलीच्या सुट्टीनिमित्त प्रतिदिन वाचा बोधकथा !
१. स्वतःला मोठा त्यागी समजणार्‍या ब्रह्मचार्‍याने स्वतःकडील शेष गोष्टीही अग्नीला समर्पित करून स्वतःकडून सर्वस्वाचा त्याग झाला, असे समजणे : योगवासिष्ठात त्यागाविषयी एक गोष्ट आहे. एक ब्रह्मचारी स्वतःला मोठा त्यागी समजत असे. समस्त बाह्य गोष्टींचा त्याग करून तो अत्यंत सामान्य वस्त्र, आसन आणि कमंडलू घेऊन राही. एकदा त्याच्या गुरूंनी त्याचे डोळे उघडण्याच्या हेतूने त्याला म्हटले, तू कशाचा त्याग केलास ? तू तर काहीच त्याग केला नाहीस. ब्रह्मचार्‍याने विचार केला, मजजवळ तर काहीच नाही. केवळ नेसण्याचे वस्त्र, आसन आणि कमंडलू एवढेच आहे. गुरुदेव का या गोष्टींना अनुलक्षून असे म्हणत आहेत ? असा विचार करून ब्रह्मचार्‍याने त्या सार्‍यांचाही त्याग करण्याच्या इच्छेने समोर अग्नी पेटवला आणि त्यात एकामागून एक त्या सार्‍या वस्तूंची आहूती टाकून तो म्हणाला, आता माझ्याकडून माझ्या सर्वस्वाचा त्याग झाला. 

अद्भुत घटनांच्या जोपासनेसाठी !

    प्राचीन हेमाडपंथीय स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ठ नमुना म्हणजे कोल्हापूरचे श्री महालक्ष्मी मंदिर ! प्रतिवर्षी सूर्याचे दक्षिणायन आणि उत्तरायण चालू झाले की, वर्षातून दोनदा तीन दिवस अस्ताला जाणार्‍या सूर्याची किरणे अनुक्रमे देवीचे चरण, मध्यभाग आणि मुखकमल यांवर पडतात. ही अद्भुत घटना म्हणजेच किरणोत्सव होय. मंदिर बांधतांना केवळ स्थापत्यशास्त्राचाच नाही, तर खगोलशास्त्र आणि भूमिती यांचा किती परिपूर्ण अन् सू्क्ष्म विचार केलेला आहे, याची यातून प्रचीती येते. किरणोत्सवाच्या या सोहळ्यामध्ये मात्र गेल्या काही वर्षांपासून मंदिराच्या आजूबाजूला उभारण्यात आलेल्या इमारती आणि प्रदूषित हवा यांमुळे अडथळे येत आहेत. यंदाच्या वर्षीही पहिल्या दिवशी सूर्यकिरणे देवीच्या चरणांना स्पर्श न करता चांदीचा उंबरा आणि संगमरवरी पायर्‍यांपर्यंत पोहोचून लुप्त झाली. 

संतांबद्दलचा एक गैरसमज

    ईश्‍वरप्राप्तीसाठी तन-मन-धनाचा त्याग करावा लागतो, हे एका संतांचे बोलणे ऐकल्यावर एकजण इतरांना म्हणाले, हे स्वार्थी आहेत; म्हणून धनाचा त्याग करायला सांगतात ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३१.१०.२०१५)

समाजाला रसातळाला नेणारे लुटारू, वासनांध आणि अनीतीमान पत्रकार !

     कालच्या लेखात पत्रकारांच्या विज्ञापन मिळवण्याच्या क्लृप्त्या, खप वाढवण्यासाठी सनसनाटी निर्माण करणारी वृत्ते देतांना पत्रकार समाजहिताला कशी तिलांजली देतात तसेच तुटपुंज्या मानधनामुळे कसे अनैतिक आचरण करतात, हे पाहिले होते. आज आपण त्यापुढील भाग पहाणार आहोत.
४. वासनेने बरबटलेल्या व्यक्तींच्या हातात संपादकपद असणे !
४ अ. वृत्तवाहिनीवर काम देण्याच्या बहाण्याने मुलाखतीला येणार्‍या युवतींकडे शरीरसुखाची 
मागणी करणारा इंग्रजी वृत्तवाहिनीचा कामांध संपादक
     प्रसारमाध्यमांत दिसण्याची हौस अनेकांना असते. त्यामुळे अनेक युवक-युवती वृत्तनिवेदक होण्याचे स्वप्न बाळगत असतात. अशा युवतींना जाळ्यात ओढण्यात एका इंग्रजी वृत्तवाहिनीचा संपादक अतिशय पटाईत होता. गेल्या वर्षी एक मुसलमान युवती या वृत्तवाहिनीवर मुलाखतीसाठी आली होती. मुलाखतीतच त्या संपादकाने युवतीकडे खासगी दूरभाष क्रमांक मागितला. मुलाखत संपल्यानंतर संपादक मंडळाच्या बैठकीत चर्चा करून निरोप कळवतो, असे सांगून त्या संपादकाने तिला निरोप दिला. त्यानंतर दोन दिवसांनी रात्रीच्या वेळी त्या युवतीशी व्हॉटस् अ‍ॅपवरून संपर्क साधला. तिला छायाचित्र पाठवण्यास सांगितले. त्याच्या दुसर्‍या रात्री पुन्हा संपर्क केला, मी बैठकीत चर्चा केली. तुला चांगले वेतन देण्याविषयी मी वरिष्ठांना सांगितले आहे.

पाश्‍चात्त्य प्रसारमाध्यमांना नरेंद्र मोदींविषयी कधीही आपुलकी का वाटणार नाही ?

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंग्लंड दौर्‍याच्या वेळी पाश्‍चात्त्य वृत्तपत्रांतून त्यांच्यावर गरळओक करण्यात आली. भारतात असहिष्णु वातावरण निर्माण झाल्याचा कांगावा करत या प्रसारमाध्यमांनी मोदींना त्यांचा अवमान करणारे काही प्रश्‍नही पत्रकार परिषदेत विचारले. हा केवळ मोदी यांचा अवमान नव्हता, तर संपूर्ण भारतवासियांचा अवमान होता. वर्ष २००२ मधील गुजरात दंगलींसाठीही नरेंद्र मोदींना उत्तरदायी ठरवून त्यांच्यावर गार्डीयन आणि इतर वृत्तपत्रांनी लिखाण केले. या अनुषंगाने पाश्‍चात्त्य प्रसारमाध्यमांनी नरेंद्र मोदी यांच्याविषयी कधीच आपुलकी का वाटणार नाही, यावर प्रकाश टाकणारा प्रसिद्ध वृत्तपत्रीय स्तंभलेखिका मिनाझ मर्चंट यांचा हा लेख येथे देत आहोत.

मूक-बधीर असूनही आनंदी आणि उत्साही असणारा अन् देवाविषयी ओढ असणारा ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून जन्माला आलेला बोईसर, मुंबई येथील चि. वेदांत आनंद पाटील (वय ३ वर्षे ९ मास) !

 
चि. वेदांत आनंद पाटील
माझा लहान मुलगा चि. वेदांत (वय ३ वर्ष ९ मास) याला ऐकू येत नसल्यामुळे बोलताही येत नाही. फेब्रुवारी २०१४ पासून त्याच्यावर उपचार चालू आहेत. त्याला उजव्या कानाने ८० टक्के, तसेच डाव्या कानाने ७० टक्के ऐकू येत नाही, असे आधुनिक वैद्यांनी निदान केले आहे.
  त्याला ऐकू येत नसल्यामुळे भाषा कळत नाही, तसेच त्याला आम्हाला जे सांगायचे असते, ते त्याला सहजपणे सांगताही येत नाही. मला त्याच्याशी पुष्कळ मोठ्याने ओरडून बोलावे लागते.
- श्री. आनंद रामदास पाटील (वेदांतचे बाबा), बोईसर, मुंबई.
१. सतत आनंदी आणि उत्साही असलेला वेदांत !
   चि. वेदांत याचा तोंडवळा सतत आनंदी आणि उत्साही असतो. त्याच्याकडे पाहिल्यावर तो ऐकू आणि बोलू शकत नाही, असे वाटत नाही. त्याचे डोळे बोलके आहेत. - (पू.) कु. अनुराधा वाडेकर

विश्‍वासार्हता गमावून बसलेली प्रशासकीय यंत्रणा आणि नीतीभ्रष्टतेचे टोक गाठलेले लोकप्रतिनिधी

१. निवडणुकांच्या माध्यमातूनही प्रामाणिक लोकप्रतिनिधी आणू शकत नसणे : स्वार्थी, अहंकारी, ढोंगी, धंदेवाईक गुंड आणि सर्वप्रकारे नीतीभ्रष्ट पुढार्‍यांनी केलेली घाण साफ करण्याचा निवडणुका हाच मार्ग आहे काय ? 
२. देशातील सर्वच क्षेत्रातील नेते आणि प्रशासकीय अधिकारी कोट्यवधी रुपयांचे संशयास्पद व्यवहार करत असणे : कोट्यवधी रुपयांचे संशयास्पद व्यवहार करून आपल्या देशाचे अनेक नेते, उद्योगपती, दलाल आणि न्यायसंस्थेसह सर्व थरातील प्रशासकीय अधिकारी उजळ माथ्याने वावरतात. ही सहिष्णु लोकशाही, धर्मनिरपेक्ष लोकशाही, गांधीवादी-समाजवादी लोकशाही कि घटनेच्या चौकटीत आणि कायद्याच्या मर्यादेत राहून नांदत असलेली चोरशाही ?
३. विश्‍वासार्हता गमावून बसलेली प्रशासकीय यंत्रणा आणि नीतीभ्रष्टतेचे टोक गाठलेले लोकप्रतिनिधी यांच्यावर मात करणारे नेतृत्व निवडणुकीच्याच चाकोरीतून आपल्या देशाला मिळेल, असे मानणे ही अंधश्रद्धा नव्हे काय ? 
- डॉ. विनायक मिराशी 
(संदर्भ : प्रज्वलंत, स्वातंत्र्यदिन विशेषांक १९९८)

हिंदूंच्या विरोधातील षड्यंत्र जाणा !

     केवळ आपण हिंदू आहोत म्हणून आपल्याला झोडपण्याचा एककलमी कार्यक्रम हिंदुविरोधी शक्तीकडून राबवला जात आहे; त्यासाठी या पुरोगामी आणि सोशॅलिस्टांना विदेशी ख्रिस्त्यांकडून कोट्यवधी रुपयांचा निधी पुरवला जात आहे. अशाच प्रकारे नरेंद्र दाभोलकर यांनी विदेशातून बेकायदेशीररित्या पैसे मिळवले होते. त्या पैशातून हिंदूंच्या धार्मिक कृतींची आणि प्रथा-परंपरांची अपकीर्ती चालू होती. नियोजनबद्ध रितीने हिंदु धर्म संपवण्याची सुपारी घेतल्यानुसार हे सर्व चालू आहे.
- श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती.
   या पृष्ठावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. जसा भाव तसा देव या उक्तीप्रमाणे देवाप्रती आणि गुरूंप्रती असलेल्या भावामुळे आलेल्या या अनुभूती सर्वांनाच येतील, असे नाही.
- संपादक 

प्रत्येक कृती सुंदर आणि नीटनेटकेपणाने करणार्‍या अन् प्रत्येक परिस्थितीला आनंदाने तोंड देणार्‍या चेन्नईतील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती जानकी राधाकृष्णन् (वय ७४ वर्षे) !

श्रीमती जानकी राधाकृष्णन्
सौ. उमा रविचंद्रन् यांच्या मातोश्री श्रीमती जानकी राधाकृष्णन् (वय ७४ वर्षे) या चेन्नईत रहात असून त्या नेहमी हसतमुख आणि प्रसन्न असतात. आजींचे खाणे, राहणीमान, संगीत ऐकणे, या सर्व सवयी सात्त्विक आहेत. त्या शिस्तप्रिय असून त्यांनी त्यांची मुलगी सौ. उमाक्का आणि मुलगा यांच्यावर उत्तम संस्कार केलेले आहेत. त्यांच्याविषयी जाणवलेली अन्य गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
१. मोजके बोलणे
  त्या आवश्यक तेवढेच बोलतात. त्यांच्या बोलण्यात नम्रता आहे. त्या कोणावरही टीका करत नाहीत.
२. शिस्तप्रिय वृत्ती असल्याने प्रत्येक कृती नीटनेटकेपणाने करणे
आजी अत्यंत शिस्तप्रिय असून त्या प्रत्येक कृती नीटनेटकी आणि परिपूर्ण रितीने करतात.

संतसन्मान सोहळ्याच्या निमित्ताने गुरुभेट, कृष्णभेट अन् संतभेट करून दिल्याविषयी प.पू. गुरुदेवांच्या चरणी अर्पिलेली कृतज्ञता !

प.पू. गुरुदेव,
श्रीचरणांशी साष्टांग नमस्कार.
आज आपण मला सत्संगात बसवून शिकण्याची संधी दिलीत. काही लिहून देण्याचा विचार मनात आला आणि त्याच वेळी कु. माधुरी दुसे हिने सांगितले, आपण विचारले की, मला कसे वाटले ? आणि मी ते सत्संगातही सांगायचे आहे. आपण माझ्या मनातील प्रत्येक गोष्ट ओळखता, याची पुन्हा एकदा मला प्रचीती दिलीत. आपल्याला काही लिहून देण्याची माझी योग्यता नाही; देवाच्या कृपेने सुचवलेली काही सूत्रे लिहून देत आहे.
१. संत पुष्कळ शिकवत असतांनाही स्वतःकडून प्रयत्न होत नसल्याने खंत वाटणे
    बैठक कक्षात प्रवेश करताच मनातील विचार न्यून होऊन मन स्थिर झाले. तेथे बसल्यावर माझ्या मनात एक विचार सतत येत होता, आपल्या साधनेतील मार्गदर्शनात एक सूत्र सांगितले आहे, सत्संगात बसलेल्या लोकांना जो आनंद मिळतो, त्यापेक्षा अधिक आनंद सत्संगाची सिद्धता करणार्‍याला मिळतो.
त्या वेळी माझ्या मनात आले, भराभर शिकण्यातील आनंदासह शिकलेली सूत्रे कृतीत आणून अनुभवायला हवीत. तुम्ही आणि पू. (सौ.) बिंदाताई पुष्कळ शिकवत असता. माझे विशेष प्रयत्न नसतांनाही माझी फाटकी झोळी प्रीतीने भरत आहात ! माझ्या मनाला सतर्क करून चुकांची जाणीव करून देऊन, त्यातून शिकून पुढे जाण्याची प्रेरणा साधकांच्या माध्यमातून सतत देत आहात ! कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याजवळ शब्द नाहीत गुरुदेव ! तुम्हीच शिकवा ना ! मी कसे शिकू ? काय करू ? तुम्हाला अपेक्षित असे प्रयत्न कसे करू ? माझ्यातील दोष आणि अहं यांविरुद्ध कसे लढू ? मला लढता येत नाही ! मी पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे !

बालपणीही धर्माची लाज राखणारे लाला लजपतराय !

१. हिंदु धर्म अशिक्षित आणि निरक्षर धर्म असल्याची निश्‍चिती पटल्याने लाला लजपतराय यांच्या वडिलांनी मुसलमान धर्म स्वीकारण्याचे ठरवणे, मशिदीत जातांना बाळरूपी लाला लजपतरायांनी रडून विरोध करणे, चिकित्सालयात नेल्यावर बाळ आपोआप शांत होणे अन् त्यानंतर वडिलांनी मुसलमान धर्म स्वीकारणे स्थगित
करणे :
आर्य समाजाचे थोर नेते पंजाबकेसरी लाला लजपतराय यांचे चरित्र वाचून आपल्या संस्कृतीवर झालेले आक्रमण किती भयंकर होते, याची कल्पना करू शकतो. लाला लजपतराय यांचे वडील शिक्षक होते. हिंदु धर्मातील त्रुटी (मानसिक स्थिरतेचा विघात करणारी वृत्ती) पाहून हिंदु धर्म अशिक्षित आणि अडाणी धर्म असल्याची धारणा त्यांच्या मनात पक्की झाल्याने ते मुसलमान बनण्यास सिद्ध झाले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल कु. गौरी मुद्गल (वय १५ वर्षे) यांनी अनन्यभावे व्यक्त केलेली कृतज्ञता !

कु. गौरी मुदगल

साधकांनो, प्रत्येक साधक हा सनातन संस्थारूपी शरिराचा एक अंश आहे, हे लक्षात घ्या आणि चुकांविरहित साधना करून आनंद मिळवून धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी प्रयत्नरत रहा !

   
प.पू. परशराम पांडे
आपल्या शरिरातील प्रत्येक अवयव हा शरिराशी संलग्न असतो. त्याच्यावर होणारा आघात किंवा इजा यांचा परिणाम आपल्यावर होत असतो. त्याचप्रमाणे सनातन संस्था (सनातन धर्म) हे परात्पर गुरु आठवले यांचे विराट रूप (शरीर) असून प्रत्येक साधक हा त्या शरिराचा एक अंश (अवयव) आहे; म्हणून साधकांच्या हातून घडलेल्या प्रत्येक चांगल्या-वाईट कृतीचा परिणाम, हा त्या संस्थारूपी (धर्मरूपी) शरिरावर होतो. यासाठी सनातन संस्थेतील प्रत्येक साधकाने कार्य करतांना मी आता व्यक्ती नसून सनातन संस्था (सनातन धर्म) म्हणून कार्य करत आहे, याची जाणीव ठेवावी आणि माझ्याकडून चुका होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.

प.पू. गुरुदेवांच्या दर्शनाने भावविभोर झालेल्या साधिकेने अभंगांतून केलेली आर्त विनवणी !

   भगवंता, प.पू. गुरुदेव, माझ्या सावळ्या विठ्ठला, आज मला तुझी पुष्कळ आठवण येत होती आणि तूच मला आजही दर्शन दिले. भगवंता, मला काहीच येत नाही.
अवताराच्या राशी (टीप) तू उभा विटेवरी ।
शंख, चक्र, गदा, पद्मसहित हरि भगवंता (प.पू. गुरुदेव) ॥
तुज पहाता सामोरी । दृष्टी न फिरे माघारी ॥
माझे चित्त तुझ्या पाया । मिठी पडली पंढरीराया ॥
टीप : आतापर्यंत श्रीकृष्ण, श्रीराम, कूर्म, मत्स्य असे अनेक अवतार झाले.

पंचमहाभूतांच्या देवतांमुळे आश्रमाचे रक्षण होणार असणे

१८.१२.२०१४ या दिवशी सायं. ७.५० वाजता मी नामजप करत असतांना माझ्या मनात पुढील विचार आला. पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश या पंचमहाभूतांच्या देवता, म्हणजे जलदेवता, अग्निदेवता, वायुदेवता इत्यादी आश्रमात येणार आहेत. या देवतांमुळे आश्रमाचे रक्षण होईल. तसेच आपत्काळात साधकांचे रक्षण होईल. ज्या ज्या ठिकाणी या सर्व देवता प्रकट होतील, त्या त्या ठिकाणी सर्व साधकांनी शरणागत भावाने प्रार्थना करावी.
- कु. प्रियांका माकणीकर (१८.१२.२०१४)

देवाच्या कृपेने मुलीचे लग्न चांगल्या प्रकारे पार पडल्याची साधिकेला आलेली अनुभूती !

  १८.१२.२०१४ या दिवशी वर्धा येथील साधिका सौ. सरिता निखार यांच्या मुलीचे लग्न झाले. सौ. निखार या संधीवाताने आणि त्यांचे पती अर्धांगवायूने आजारी असून अन् आर्थिक स्थिती कठीण असूनही देवाच्या कृपेने त्यांच्या मुलीचा विवाह यथासांग पार पडला. त्याबद्दल सौ. निखार यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता पुढे देत आहोत.
१. मुलीचे लग्न ठरल्यावर पैशांच्या विवंचनेत असतांना मुलीच्या स्वप्नात एक साधक येणे आणि त्याने लग्नासाठी पैशाची व्यवस्था मी करतो, असे सांगितल्यावर भाव जागृत होऊन कृतज्ञता व्यक्त होणे : माझ्या मुलीचे लग्न जमले. केवळ कुंकू लावण्याच्या कार्यक्रमापुरती आमची व्ययाची सिद्धता होती. पुढील व्ययाची व्यवस्था करण्यासाठी लग्नाची सात मासानंतरचा (महिन्यांनंतरचा) दिनांक ठरवला; परंतु मी पैशाची जुळवाजुळव कशी करावी ?, या विवंचनेत होते. तेव्हा माझ्या मुलीच्या स्वप्नात एक साधक आले आणि त्यांनी पैशाची व्यवस्था मी करतो. आपण काळजी करू नये, असे सांगितले. हे तिने सांगितल्यावर आपोआप गुरूंप्रती भाव जागृत होऊन माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त होत होती. लग्न निर्विघ्नपणे पार पडेल, याची मला निश्‍चिती वाटत होती.

प्रत्येक प्रसंगाला अत्यंत सोशिक वृत्तीने तोंड देणार्‍या आणि स्मृतीभ्रंश होऊनही सतत नामजप करणार्‍या डोंबिवली येथील कै. सुनंदा धोंडी शेडगे (८४ वर्षे) !

कै. सुनंदा धोंडी शेडगे
सौ. रोहिणी कोरगांवकर, डोंबिवली यांच्या मातोश्री कै. सुनंदा धोंडी शेडगे (८४ वर्षे) यांचा २३.१२.२०१४ या दिवशी मृत्यू झाला. सौ. रोहिणी यांना आईविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहे.
१. सोशिकपणाने प्रपंचाचा गाडा ओढणे
आईचे बालपण गरिबीतच गेले. माझ्या लहानपणीच माझे वडील वारल्याने प्रपंचाचा सर्व भार आईवरच आला. दुसर्‍यांच्या शेतात कामे करून तिने आम्हाला लहानाचे मोठे केले. स्वतः अशिक्षित असूनही आमच्या शिक्षणाकडे तिचे पूर्ण लक्ष असायचे. ती अत्यंत सोशिक होती. काही आजार झाल्यास दुसर्‍याला त्रास नको; म्हणून ती आम्हाला सांगतही नसे. आईने तिच्या सुनांसमवेत भांडण केलेले मी कधीही पाहिले नाही. ती स्वतःची कामे स्वतः करत असे. तिने अत्यंत कष्ट केले. दोन वर्षांपासून तिला काहीच करायला जमत नव्हते.
२. सासूची सर्व सेवा आनंदाने करणे
आईने तिच्या सासूची, म्हणजे माझ्या आजीची ७ वर्षे आनंदाने सेवा केली होती. माझी आजी एका जागी झोपून असल्याने तिचे सर्व जागेवरच करावे लागत असे.

मुंबई येथील आधुनिक वैद्या (कु.) जागृती गुलाटी आणि आधुनिक वैद्य अभिजीत बुधकर यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

   देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील साधिका सौ. स्मिता जोशी यांनी समाजातील दोन साधकांना हेरून त्यांना साधना सांगितली, त्याविषयीचे त्यांचे अनुभव पुढे देत आहोत.
१. आधुनिक वैद्या (कु.) जागृती गुलाटी
   (आधुनिक वैद्या कु. जागृती हिला कुर्ला येथील कोहिनूर रुग्णालयात आदर्श आधुनिक वैद्या (Best Doctor Award) असा पुरस्कार मिळाला आहे.)
१ अ. स्वतः रुग्णाईत असूनही साधिकेची आस्थेने आणि प्रेमाने विचारपूस करणे
   वर्ष २०१४ मध्ये वैद्या (सौ.) सुमन सोनावणे या राजावाडी रुग्णालयात भरती झाल्या होत्या. त्यांच्या शेजारच्याच पलंगावर आधुनिक वैद्या जागृतीताई या स्वतः रुग्णाईत म्हणून भरती झाल्या होत्या. सुमनताईचा हात पुष्कळ दुखत असल्याने त्या अस्वस्थ होत्या. तेव्हा जागृतीताईने स्वतः सुमनताईची आस्थेने आणि प्रेमाने विचारपूस केली, तसेच जागृतीतार्ई इतर रुग्ण, त्यांचे नातेवाइक आणि कर्मचारी या सर्वांशीच प्रेमाने वागतात अन् बोलतात, असे लक्षात आले.

दत्तजयंतीविषयी प्रबोधन करणारे प्रसारसाहित्य उपलब्ध !

दत्तजयंतीच्या निमित्ताने प्रबोधन करणारे पुढील प्रसारसाहित्य नेहमीच्या संगणकीय ठिकाणावर ठेवण्यात आले आहे.
१. ए-५ (पाठपोट) आकारातील प्रबोधनपर हस्तपत्रक
२. गर्दीच्या ठिकाणी लावण्यासाठी २.२५ X ३.५ फूट आकारातील १ फ्लेक्स फलक
या प्रसारसाहित्यासाठी प्रायोजक मिळवून त्याचा सुयोग्य ठिकाणी वापर करावा.

बोधचित्र


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
कुठे आधुनिक लेखकांचे लिखाण, तर कुठे संतांचे लिखाण !
'संत जनाबाई, संत नामदेव महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत ज्ञानदेव, संत सोपानकाका महाराज, संत मुक्ताबाई, संत एकनाथ महाराज, संत गोरा कुंभार, संत चोखामेळा, समर्थ रामदास स्वामी, संत तुकाराम महाराज इत्यादी संत अनेक शतके होऊन गेल्यानंतरही लोकांच्या स्मरणात आहेत; मात्र सध्या जे साहित्यिक त्यांना मिळालेले पुरस्कार परत करत आहेत, त्यांची नावे किती जणांना ज्ञात आहेत ? त्यांनी पुरस्कार परत केल्यानंतर 'त्यांना पुरस्कार मिळाला होता', हे लोकांना समजते आणि काळाच्या ओघात ते विसरूनही जातात.' - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१५.११.२०१५)    

बोधचित्र,


॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
गुरूंकडे काय मागावे ? माझ्याकडे सुख मागू नका, दुःख सहन करण्याचे बळ मागा.
भावार्थ : सुख हे प्रकृतीतील असल्याने अशाश्‍वत असते, म्हणून गुरूंकडे मागू नये. तसेच हेही लक्षात ठेवले पाहिजे की, शाश्‍वत आनंद मिळवून देणे, हेच गुरूंचे खरे कार्य असते. प्रारब्धामुळे दुःख भोगावे लागणार असल्यास, त्या दुःखदायक प्रसंगांमुळे होणारे दुःख सहन करण्याची शक्ती मात्र गुरु निश्‍चित (नक्कीच) देतात; म्हणून ती मागायला आडकाठी (हरकत) नाही.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे ॐ

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

परमेश्‍वरावर श्रद्धा ठेवा !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      एखादी सुसंधी हातातून निसटली, तर परमेश्‍वरावर श्रद्धा ठेवून याची निश्‍चिती बाळगा की, याहीपेक्षा चांगली संधी मला मिळणार आहे. ॐ
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच करा !

    संपादकीय
    प्राथमिक शिक्षणाच्या भाषामाध्यमाचे सूत्र गोव्यात सध्या ऐरणीवर आहे. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून देण्याचे हे सूत्र केवळ गोव्यापुरतेच वादग्रस्त ठरले आहे, असे नाही. आपण भारतीय स्वतंत्र झालो असलो, तरी मेकॉलेप्रणीत शिक्षण घेतलेली मागील पिढी आणि राज्यकर्ते यांमुळे भाषा किंवा संस्कृती या दृष्टीने आपण इंग्रजांचे गुलामच राहिलो आहोत. आपल्या देशातील ग्रामीण भाग मेकॉलेच्या या किडीपासून सुरक्षित होता.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn