Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आतंकवादाच्या विरोधात जगाने एकत्र येणे आवश्यक ! - पंतप्रधान नरेंद्र मोदी

आतंकवादाचा बीमोड करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी भारतियांनाही एकत्र करणे आवश्यक आहे ! 
अंतल्या (तुर्की) - आतंकवादाच्या विरोधात संपूर्ण जगाने एकजूट होणे नितांत आवश्यक आहे, असे प्रतिपादन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले.  तुर्कस्तानमध्ये होणार्या 'जी-२०' देशांच्या परिषदेच्या पूर्वसंध्येला झालेल्या 'ब्रिक्स' देशांच्या (ब्राझिल, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका) बैठकीत ते बोलत होते. आतंकवाद्यांनी पॅरिस येथे केलेल्या आक्रमणाचा त्यांनी पुन्हा एकदा निषेध केला. ब्रिटनचा तीन दिवसीय दौरा संपवून मोदी हे तुर्कस्तान येथे 'जी-२०' देशांच्या परिषदेसाठी दाखल झाले आहेत. या बैठकीस रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादीमार पुतिन यांच्यासह 'ब्रिक्स' राष्ट्रांंचे अन्य प्रमुख उपस्थित होते. मोदी पुढे म्हणाले, पॅरिसमधील भीषण आक्रमणाचा सर्वच राष्ट्रांनी एका सुरात निषेध केला. अशीच एकजूट आता मानवतेच्या मुळावर उठलेल्या आतंकवादाच्या विरोधात लढण्यासाठीही दाखवायला हवी. आतंकवादाच्या आव्हानाच्या विरोधात जागतिक पातळीवर उपाययोजना करण्याची अत्यंत निकड आहे. पॅरिस आणि बैरुत येथील आतंकवादी आक्रमणांनी आतंकवादाच्या समस्येचे गांभीर्य सर्वांना पुन्हा एकदा कळून चुकले आहे. 'ब्रिक्स' देशांनी प्राधान्यक्रमाने या समस्येकडे लक्ष दिले पाहिजे. फेब्रुवारी २०१६ मध्ये 'ब्रिक्स' समूहाचे अध्यक्षपद भारत भूषवणार असून तेव्हा आमच्या कार्यपत्रिकेवर आतंकवादाचे सूत्र अग्रभागी असेल.

(म्हणे) 'मोदी शासन तालिबान्यांप्रमाणेच वागत आहे !'

एम्आयएम्चे आमदार इम्तियाज जलील यांचा मिरज येथील सभेत कांगावा 
१०० कोटी हिंदूंना संपवण्याची भाषा करणे, ही एम्आयएम्च्या नेत्यांची तालिबानी धमकीच नव्हे का ?
मिरज, १५ नोव्हेंबर (वार्ता.) - भाजपच्या काळात निर्दोष मुसलमानांचे खून होत आहेत. पुणे येथे मोहसीन शेख याने दाढी राखली होती; म्हणून त्या तरुणाचा खून झाला. अहमदनगरमध्ये दलित कुटुंबाला जिवंत जाळले गेले. मग तुम्ही तालिबानपेक्षा वेगळे कसे ? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शासन तालिबान्यांप्रमाणेच वागत आहे ! मिरज येथील मुसलमान तरुणांचा उत्साह पाहून यापुढे मिरज येथे एम्आयएम्चे आमदार अकबरुद्दीन ओवैसी आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांचीही सभा घेतली जाईल, असा कांगावा एम्आयएम् पक्षाचे संभाजीनगर येथील आमदार इम्तियाज जलील यांनी केला. 'येत्या वर्षभरात ईश्वरपूर (इस्लामपूर) नगरपालिकेत आमचा झेंडा फडकेल, तसेच मिरजेचा आमदारही आमचाच असेल, असा दावाही त्यांनी केला. येथील किसान चौकात १४ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी ७ वाजता एम्आयएम्च्या वतीने आयोजित केलेल्या सभेला भायखळ्याचे आमदार वारिस पठाण, मुंबईचे नगरसेवक मनोज संसारे, एम्आयएम्चे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख अंजुम इनामदार, पक्षाचे जिल्हाध्यक्ष शाकीर तांबोळी, तालुकाध्यक्ष डॉ. मनोजकुमार कांबळे, शहराध्यक्ष सईद सौदागर आदी उपस्थित होते.  

काँग्रेसकडून गांधींची प्रतिदिन हत्या ! - अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

पनवेल येथे पं. नथुराम गोडसे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने शौर्यदिन समारोहाचे आयोजन
पनवेल, १५ नोव्हेंबर (वार्ता.) - गांधींची हत्या केली म्हणून काँग्रेसचे नेते पंडित नथुराम गोडसे यांना दुषणे देतात. वास्तविक हे काँग्रेसचे नेते गांधींची प्रतिदिन हत्या करत आहेत. गांधींच्या एकाही तत्त्वज्ञानाचा अंगीकार या काँग्रेसींनी केलेला नाही. गांधींनी भ्रष्टाचाराला विरोध केला असतांना काँग्रेसचे नेते मात्र भ्रष्टाचारात आकंठ बुडलेले आहेत, असा घणाघात सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी काँग्रेसवर केला. पनवेल येथील पृथ्वी सभागृहात महाराणा प्रताप बटालियन संघटनेच्या वतीने पंडित नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांच्या पुण्यतिथीच्या पार्श्वभूमीवर 'शौर्यदिन समारोहा'चे आयोजन केले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. या संघटनेकडून वर्ष २००८ पासून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पत्रकार प्रीतमकुमार सिंह त्यागी यांची उपस्थिती लाभली. त्यांच्यासह महाराणा प्रताप बटालियनचे अध्यक्ष श्री. अजयसिंह सेंगर, तसेच हिंदु महासभेचे कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृत्रिम पावसासाठी ६ वर्षे आणि ६२ कोटी रुपये व्यय करूनही फलनिष्पत्ती शून्यच !

      मुंबई - पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने गत ६ वर्षांत कृत्रिम पावसाच्या प्रयोगावर ६२ कोटी रुपये व्यय करूनही त्यातून काही निष्कर्ष निघू शकले नाही, अशी स्पष्ट स्वीकृती मंत्रालयाने माहिती अधिकार कायद्यांतर्गत विचारलेल्या एका प्रश्‍नाला उत्तर देतांना दिली आहे. (पहिला प्रयोग अयशस्वी झाल्यानंतर लगेचच तो बंद का नाही केला ? तो ६ वर्षे का चालू ठेवला ? जनतेची झालेली कोट्यवधी रुपयांची हानीभरपाई संबंधितांकडून वसूल करा ! - संपादक) हा प्रश्‍न इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी वृत्तपत्राने विचारला होता.

उज्जैन (मध्यप्रदेश) येथील कुंभमेळ्यासाठी २ सहस्र ५१५ कोटी रुपयांची तरतूद !

शासनाने कुंभमेळ्यातील धार्मिकता टिकवण्यासाठीही हातभार लावावा, ही अपेक्षा !
५ कोटी भाविक येण्याची शक्यता
उज्जैन - उज्जैन येथे वर्ष २०१६ मध्ये होणार्याच कुंभमेळ्यासाठी मध्यप्रदेश शासनाकडून जय्यत सिद्धता चालू असून यंदाच्या कुंभमेळ्यासाठी तब्बल २ कोटी ५१५ रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद गत कुंभमेळ्याच्या तुलनेत १० पटीने अधिक आहे. जगातील सर्वांत मोठा आध्यात्मिक मेळावा म्हणून या कुंभमेळ्याकडे पाहिले जाते. उज्जैन कुंभमेळ्यासाठी ३ सहस्र ४०० एकर भूमी अधिग्रहित करण्यात आली आहे. 

गायीच्या चामड्यापासून बनवण्यात येणार्‍या बुटावर बंदी आणा ! - रा. स्व. संघाची मागणी

भारतात बहुसंख्य हिंदु असतांना हिंदूंना अशी मागणी का करावी लागते ? मोदी शासनाने 
भारतात संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायदा लागू करावा, ही अपेक्षा !
     नवी देहली, १५ नोव्हेंबर - देशभरात गोमांस बंदी आणण्यासाठीची मागणी चालू असतांना आता गायीच्या चामड्यापासून बनवलेल्या बुटावरही बंदी घालण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी केली आहे. मिंत्रा या संकेतस्थळावरील गायीच्या चामड्याच्या बुटाच्या विक्रीवर संघाने आक्षेप घेतला आहे. यामुळे कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावल्या जात असून मिंत्राने माफी मागावी आणि बुटाची विक्री थांबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 

जगभरातील १०० सर्वश्रेष्ठ अभियांत्रिकी विश्‍वविद्यालयांमध्ये भारतीय विद्यापिठाचा ९९ वा क्रमांक !

भारतीय विद्यापिठाला प्रथमच पहिल्या शंभरीत स्थान !
     यावरून भारतात अस्तित्वात असलेली मॅकॉलेप्रणित इंग्रजाळलेली शिक्षणप्रणाली किती सुमार दर्जाची आहे, हेच स्पष्ट होते ! कुठे विद्यार्थ्यांना जगातील सर्व विद्यांमध्ये पारंगत करून त्यांचा सर्वांगीण उत्कर्ष साधणारी (पण निधर्मी भारतानेच ती नाकारलेली) भारतीय गुरुकुल शिक्षणपद्धत, तर कुठे धड कारकूनही सिद्ध करता येऊ न शकणारी इंग्रजी शिक्षणपद्धत ? आतातरी शासन भारतात गुरुकुल शिक्षणपद्धत लागू करण्याचा विचार करील का ?
     न्यूयॉर्क - जगभरातील १०० सर्वश्रेष्ठ अभियांत्रिकी विश्‍वविद्यालयांमध्ये भारतीय विद्यापिठाला ९९ व्या स्थानी समाधान मानावे लागले आहे. जगातील १०० सर्वश्रेष्ठ विद्यापिठांमध्ये यंदा प्रथमच भारताला स्थान मिळाले आहे. टाइम्स हाइयर एज्युकेशन या संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी ही सूची प्रसिद्ध केली जाते. बेंगळुरू येथील भारतीय विज्ञान संस्थान अर्थात् इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या विश्‍वविद्यालयाला ९९ वे स्थान प्राप्त झाले आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या तुर्कीतील सुरक्षा व्यवस्थेत मोसाद, एम्.आय. ५ यांसारख्या यंत्रणांचाही समावेश !

     नवी देहली - जी-२० परिषदेसाठी तुर्की येथे गेलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल यांनी एक विशेष योजना आखली आहे. तुर्कीच्या अंकारा आणि अंताल्या शहरांमध्ये मोदींच्या सुरक्षेसाठी भारतीय सुरक्षा यंत्रणांसमवेत इस्रायलची गुप्तचर संस्था मोसाद आणि ब्रिटनच्या एम्.आय. ५ या संस्थांचे पोलीस तैनात असणार आहेत. एका इंग्रजी दैनिकाने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे. तुर्कीची राजधानी अंकारामध्ये १० ऑक्टोबरला २ स्फोट झाले होते. त्यात १०२ नागरिक मारले गेले होते. त्यानंतर १३ नोव्हेंबरला रात्री फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये मोठे आतंकवादी आक्रमण झाले. या घटनांनंतर भारतीय सुरक्षा यंत्रणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला. तुर्कीमध्ये जी-२० परिषदेसाठी विविध देशांच्या प्रमुखांसह सुमारे १२ सहस्र नागरिक सहभागी होणार आहेत. काही अनुचित घटना घडलीच, तर पंतप्रधान मोदी यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अन्य पर्याय सिद्ध ठेवण्यात आला आहे.

राम जन्मभूमीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करायला पाहिजे ! - कांची कामकोटी पीठाधीश्वूर श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य श्री स्वामी जयेन्द्र सरस्वतीजी महाराज

कांची कामकोटी पीठाधीश्वर श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य श्री स्वामी जयेन्द्र सरस्वतीजी महाराज यांचा सहस्र चंद्रदर्शन सोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा !
  मुंबई, १५ नोव्हेंबर - विद्यमान काळात सर्वांनी राम जन्मभूमीसाठी एकत्र येऊन काम करायला पाहिजे, असे प्रतिपादन कांची कामकोटी पीठाधीश्वर श्रीमद् जगदगुरु शंकराचार्य श्री स्वामी जयेन्द्र सरस्वतीजी महाराज यांनी नुकत्याच पार पडलेल्या त्यांच्या सहस्र चंद्रदर्शन सोहळ्याच्या वेळी केले. शंकराचार्य श्री स्वामी जयेन्द्र सरस्वतीजी महाराज यांचे ८० व्या वर्षांत पदार्पण झाले. त्याचे औचित्य साधून विश्व हिंदु परीषद आणि बजरंग दल शहर विभाग यांच्या वतीने दादर येथील योगी सभागृहात त्यांच्या सहस्र चंद्रदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला श्री १०८ महामंडलेश्वर स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज, श्री महामंडलेश्वर विंश्वेश्वरानंदजी महाराज, प.पू. प्रज्ञाश्री महेपद्मसागरजी महाराज जैन संप्रदाय, विहिंपचे डॉ. प्रवीण तोगाडिया, तसेच अन्य संघटनांचे प्रमुखही उपस्थित होते. 
     डेहराडून - हिंदूंसाठी अत्यंत पवित्र असलेल्या केदारनाथ मंदिराची प्रवेशद्वारे १३ नोव्हेंबर या दिवशी वेदमंत्रांच्या घोषात आणि विधिवत् पूजाअर्चा पूर्ण करून बंद करण्यात आली. त्यामुळे भाविकांनी केदारनाथाचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच गर्दी केली होती. हिवाळ्यात ही द्वारे बंद करण्यात येतात. भगवान शिवाची मूर्ती पालखीद्वारे उखीमठ येथील ओंकारेश्‍वर मंदिराकडे नेण्यात आली. तेथे या मूर्तीची पूजा करण्यात येईल.

(म्हणे) टिपू सुलतानच्या जयंतीचे भाजप आणि अन्य हिंदुत्ववादी संघटना राजकारण करत आहेत !

स्वांतत्र्यानंतर इतकी वर्षे टिपू सुलतानचे हे वंशज झोपले होते का ? टिपू जयंतीविषयीचा वाद 
कर्नाटकात चिघळल्यावरच यांच्यातील टिपूप्रेम कसे काय जागे झाले ?
क्रूरकर्मा टिपू सुलतानच्या वंशजांचा थयथयाट
क्रूरकर्मा टिपू सुलतानचे वंशज पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार !
      कोलकाता, १५ नोव्हेंबर - टिपू सुलतानच्या जयंतीनिमित्त भाजप आणि अन्य संघटना हे राजकारण करत आहेत. त्याचबरोबर भाजप आणि विश्‍व हिंदु परिषद यांनी टिपू सुलतान यांना अत्याचारी अन् असहिष्णु दाखवून त्यांचा नावलौकिक धुळीस मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकरणी पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन त्यांना हस्तक्षेप करण्यास सांगणार आहोत, असा कांगावा टिपू सुलतानचे वंशज शहजादा अनवर अली शहा यांनी केला आहे.

पाकने ग्वादर बंदराची जमीन चीनला दिली भाडेतत्त्वावर

शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, या पद्धतीने वाढत जाणारी पाकिस्तान आणि चीन यांच्यातील मैत्री 
भारतासाठी अत्यंत घातक आहे. या संकटाला सामोरे जाण्याची सिद्धता भाजप शासनाने करावी !
चीनची अरबी समुद्रातील घुसखोरी वाढणार !
    कराची, १५ नोव्हेंबर - पाकिस्तान आणि चीन यांनी अत्यंत महत्त्वाकांक्षी चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरीडोर या करारावर शिक्कामोर्तब केले आहे. या करारानुसार पाकिस्तानने बलुचिस्तान प्रांतातील ग्वादर बंदराच्या परिसरातील सुमारे २ सहस्र एकर जमीन ४३ वर्षांसाठी चीनला भाडेतत्त्वावर दिली आहे. त्यामुळे चीनची अरबी समुद्रातील घुसखोरी वाढणार असल्याने भारताच्या दृष्टीने ते त्रासदायक ठरणार आहे. विशेष म्हणजे हा प्रकल्प पाकव्याप्त काश्मीरमधून जात असल्याने भारताने याला आक्षेप घेतला आहे.
     हा प्रकल्प ४ कोटी ६ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा असून त्यामुळे चीनसाठी अरबी समुद्रातील प्रवेश करण्याचा मार्ग खुला झाला आहे. करारानुसार चीनमधील काशगर शहर अनेक रस्ते आणि पाईपलाईन यांच्या साहाय्याने ग्वादर बंदराला जोडण्यात येणार आहे. या २ सहस्र एकर जमिनीच्या उपयोगाचे सर्व हक्क चिनी आस्थापनाला देण्यात येणार आहेत, असे वृत्त चिनी प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

पाकव्याप्त काश्मीरमधून जाणार्‍या चीन-पाकिस्तान महामार्गाच्या प्रकल्पास चीन संरक्षण देणार !

  • भारताने तिबेटविषयी भाष्य जरी केले, तरी लगेचच डोळे वटारणारा चीन पाकव्याप्त काश्मीरमध्ये मात्र प्रकल्प उभारतो आणि तरीही भारत काही कृती करत नाही ! 
  • चीनच्या या आगळिकीला वेळीच रोखणे आवश्यक आहे !
                                                               प्रकल्पासच भारताचा विरोध
      इस्लामाबाद - पाकव्याप्त काश्मीरमधून जाणार्‍या चीन-पाकिस्तान महामार्गाच्या प्रकल्पास सुरक्षा पुरवण्याची घोषणा चीनने केली आहे. उभय राष्ट्रांमध्ये एक महामार्ग बांधण्याचा, तसेच पेट्रोलियम पदार्थ वाहून नेण्यासाठी पाईप लाईन निर्मितीचा ४६ बिलियन डॉलर्सचा (सुमारे ३० लाख कोटी रुपये) करार झाला आहे. या प्रकल्पास संरक्षण देण्यासाठी चीन पाकला साहाय्य करणार आहे. या महामार्गामुळे चीनमधील कशागर हे शहर पाकिस्तानातील ग्वादार बंदरास जोडले जाणार आहे. यामुळे चीनला मध्यपूर्व आशिया, आफ्रिका आणि युरोप या खंडांतील राष्ट्रांशी व्यापारी संबंध वाढवणे सोपे जाणार आहे. 
         भारताचा विरोध 
        भारताने पाकव्याप्त काश्मीरवर मालकी हक्क सांगत या प्रकल्पासच विरोध दर्शवला आहे.

कॅनडाच्या शीख संरक्षणमंत्र्यांवर सैनिकाकडून वांशिक टिप्पणी

आतापर्यंतच्या भारतीय राज्यकर्त्यांच्या मिळमिळीत परराष्ट्र धोरणांमुळेच विदेशातील भारतियांना 
मानहानी सहन करावी लागते. मोदी शासन ही परिस्थिती पालटेल, अशी जनतेची आशा आहे !
     टोरांटो, १५ नोव्हेंबर - कॅनडाचे नवनियुक्त संरक्षणमंत्री आणि वंशाने शीख असलेले हरजीत सज्जन यांच्याविषयी एका सैनिकाकडून सामाजिक संकेतस्थळावर वांशिक टिप्पणी केली आहे. या प्रकरणी सैन्याने चौकशी चालू केली आहे. हरजीत सज्जन यांच्याविषयी नेमके काय लिहिण्यात आले आणि ते लिहिणार्‍या सैनिकाचे नाव याविषयी सैन्याने गुप्तता बाळगली आहे. सज्जन यांच्या वंशासंदर्भात एका सैनिकाने अनुचित टिप्पणी फेसबूकवर फ्रेंच भाषेत दिली आहे, असे वृत्त ग्लोब अ‍ॅण्ड मेलने दिले आहे. त्या खात्यावरील ती टिप्पणी लगेचच काढण्यात आली आहे. वांशिक टीका टिप्पणी आणि अशा प्रकारची वर्तणूक लष्कराच्या वातावरणात अजिबात चालणार नाही, अशी सूचना लष्कराने सगळ्या सैनिकांना संगणकीय पत्राद्वारे करण्यात आली आहे. त्याचबरोबर अशा प्रकारचे गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही, अशी तंबीही देण्यात आली आहे.

हवामानातील पालटामुळे भारतीय किनारपट्टीवरील ५ कोटी लोकांचे जीवन धोक्यात येण्याची शक्यता

आपत्काळाची भीषणता !
     वॉशिंग्टन, १५ नोव्हेंबर - मुंबईसह भारतीय किनारपट्टीवरील ५ कोटींहून अधिक लोकांचे जीवन हवामानातील पालटामुळे धोक्यात येण्याची शक्यता आहे. हवामानातील तापमान ४ अंश सेल्सियसवर गेल्यास समुद्राची पातळी वाढून जगभरातील ५० कोटींहून अधिक लोकांच्या वस्त्या बुडण्याची शक्यता आहे, अशी गंभीर चेतावणी अमेरिकेतील क्लायमेट सेंट्रल या संस्थेने दिली आहे. पॅरिसमध्ये ३० नोव्हेंबर ते ११ डिसेंबर या कालावधीत होणार्‍या संयुक्त राष्ट्राच्या हवामान पालट या विषयावरील परिषदेच्या काही आठवड्यांपूर्वीच हा निष्कर्ष काढला आहे. 

रशियन विमान अपघातातील मुख्य सूत्रधार इजिप्तचा मौलवी ! - अहवाल

     लंडन - रशियन जेट विमान अपघातातील मुख्य सूत्रधार इजिप्तचा मौलवी अबू ओसामा अल-मसरी असल्याचे उघड झाले आहे. आय.एस्.आय.एस्.च्या एका गटाचा तो प्रमुख आहे, असे वृत्त संडे टाईम्स्ने प्रसिद्ध केले आहे. काही दिवसांपूर्वी रशियाचे जेट विमान अपघातग्रस्त होऊन २२४ प्रवासी ठार झाले होते. आय.एस्.आय.एस्.च्या या गटाने बाँब पेरून सिनाई येथे हे विमान पाडले होते, असे गुप्तचर विभागाच्या प्रमुखाने आपल्या अहवालात म्हटले आहे.

वेरूळ लेण्यांच्या सुरक्षेविषयी केंद्रीय पुरातत्व विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष

पर्यटकांकडून लेण्यांमधील मूर्तींशी अपप्रकार 
जागतिक वारशाकडे दुर्लक्ष करणार्‍या केंद्रीय पुरातत्व विभागाच्या संबंधितांवर शासनाने योग्य ती कारवाई करावी आणि हा वारसा जपण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करावेत, ही अपेक्षा !
      वेरूळ, १५ नोव्हेंबर - भारतीय शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून वेरूळ लेण्यांकडे पाहिले जाते. जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असलेल्या वेरूळला देश-विदेशातील लक्षावधी पर्यटक भेट देतात. या लेण्यांच्या सुरक्षेचे दायित्व केंद्रीय पुरातत्व विभागाकडे सोपवण्यात आले आहे. असे असतांना मागील काही वर्षांपासून केंद्रीय पुरातत्व विभाग लेण्यांच्या सुरक्षेविषयी अक्षम्य दुर्लक्ष करत आहे. दोन आठवड्यांपूर्वी लेण्यांच्या पायथ्याशी सिलिंडरचा स्फोट झाला होता, तर प्रतिदिन येथे येणारे पर्यटक लेण्यांमधील मूर्तींसमवेत अपप्रकार करत असल्याचे समोर आले आहे. 

लोणावळा (जिल्हा पुणे) येथे गिरीश कर्नाड यांच्या पुतळ्याचे दहन

     लोणावळा, १५ नोव्हेंबर - सध्या कर्नाटकात क्रूरकर्मा टिपू सुलतान यांच्या जयंतीवरून वाद चालू आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिनेता (?) गिरीश कर्नाड यांनी क्रूरकर्मा टिपू सुलतान याची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणारे वक्तव्य केले होते. त्या विधानाच्या निषेधार्थ स्वाभिमान संघटनेच्या वतीने खंडाळा येथे कर्नाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. स्वाभिमानी संघटनेचे लोणावळा शहराध्यक्ष शौकत शेख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. ते म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांपेक्षा थोर राजे आहेत. त्यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. गिरीश कर्नाड जे कर्नाटकात बोलले, ते महाराष्ट्रात येऊन बोलले, तर ते परत जाऊ शकणार नाहीत." (गिरीश कर्नाड यांच्या विरोधात आवाज उठवणार्‍या स्वाभिमान संघटनेचे अभिनंदन ! - संपादक)

ख्रिस्ती तरुणाकडून फेसबूकद्वारे भारतीय महिलेची पावणे तीन लाख रुपयांची फसवणूक

लोकहो, फेसबूकचे दुष्परिणाम आणि ख्रिस्त्यांच्या भूलथापा यांपासून सावध रहा !
   भाईंदर - फेसबूकवर झालेल्या ओळखीचे मैत्रीत रूपांतर झाल्यावर टीम मॅथ्यू या ख्रिस्ती तरुणाने ५४ वर्षीय भारतीय मैत्रिणीची २ लाख ८५ सहस्र रुपयांची फसवणूक केली आहे. महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलीस मित्र आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेत आहेत.
१. टीम मॅथ्यूने आपण ब्रिटनचे नागरिक असल्याचे महिलेला सांगितले. त्याने तिच्या आर्थिक परिस्थितीची पूर्ण माहिती घेतली आणि प्रेमाचे नाटक करून तिला आपल्या पाशात फसवले.
२. मी ऑक्टोबर मासाच्या शेवटी मुंबईत येणार आहे. मला घेण्यासाठी विमानतळावर ये, असे त्याने तिला सांगितले. त्यानुसार महिला विमानतळावर गेली; मात्र मॅथ्यू तेथे आलाच नाही. तेवढ्यात तिला एका महिलेचा भ्रमणभाष आला.

बॉम्बेचे मुंबई होण्यासाठी शिवसेना आंदोलन करण्याच्या सिद्धतेत !

मराठीची मागणी प्रत्येक वेळी लावून धरणार्‍या शिवसेनेचे अभिनंदन ! 
      मुंबई - सध्या बॉम्बे असा शब्द वापरल्या जाणार्‍या प्रत्येक ठिकाणी मुंबई असेच लावले गेले पाहिजे, यासाठी शिवसेना आंदोलन करण्याच्या सिद्धतेत आहे. सर्व शासकीय, निमशासकीय संस्था आणि ऐतिहासिक वास्तू यांच्या नावांसमोरील बॉम्बे हे नाव पालटून तिथे मुंबई लिहावे, यासाठी शिवसेनेचे खासदार प्रयत्न करत आहेत. २० वर्षांपूर्वी बॉम्बेचे मुंबई करण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरली होती. त्यानंतर व्हिक्टोरिया टर्मिनस या हेरिटेज वास्तूचे नाव छत्रपती शिवाजी टर्मिनस असे पालटण्यात आले.

अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अश्‍वारूढ कि सिंहासनाधीश ?

      पुणे, १५ नोव्हेंबर - अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे जागतिक स्मारक उभारण्यात येणार आहे. काही आस्थापनांनी स्मारक उभारण्यासंबंधी सादरीकरण केले. त्यामध्ये एका आस्थापनाने अश्‍वारूढ पुतळा उभारल्यास तो पुढील २०० वर्षे टिकू शकणार नाही, असा दावा केला आणि काही वस्तुस्थितीदर्शक अडचणीही मांडल्या. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अश्‍वारूढ कि सिंहासनाधीश असावा, यावर वाद चालू झाला आहे. या प्रकरणी शासनाने आयएटीकडून समुपदेशन मागवले असून त्यानंतर त्याचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. या स्मारकाच्या उभारणीत ७ समित्यांची सल्लागार म्हणून नेमणूक केली होती, ती संख्याही आता तीन करण्यात येणार आहे. 

ठाणे महानगरपालिका शाळेतील ५०० विद्यार्थी अल्प अध्यापन क्षमतेचे !

विद्यार्थ्यांची आकलन क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करणार 
 सर्वच ठिकाणच्या अशा विद्यार्थ्यांसाठी महानगरपालिकांनी प्रयत्न करणे आवश्यक ! 
     ठाणे - ठाणे महानगरपालिका शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांपैकी ५०० विद्यार्थ्यांची अध्यापन क्षमता अल्प असल्याचे निदर्शनास आले आहे. या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महानगरपालिका प्रयत्न करणार असून यासाठी सामाजिक संस्थेचे साहाय्य घेतले जाणार आहे. 
१. ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळातील १२७ शाळांमधून जवळजवळ ३४ सहस्र विद्यार्थी शिक्षण घेत आहेत; मात्र त्यांपैकी ५०० विद्यार्थ्यांची अध्यापन क्षमता अल्प आहे. बहुतेक विद्यार्थी हे गरीब घरातील असून अभ्यास जमत नसल्याने काही जणांना वर्षानुवर्षे एकाच वर्गात बसावे लागते. पालकांचे दुर्लक्ष आणि अभ्यासाची नसलेली आवड यांमुळे मुले शाळा सोडून देतात; मात्र या आजारावर मात करता येऊ शकते. 

शिक्षण विभागाच्या अन्यायकारी धोरणाच्या विरोधात आदर्श शिक्षकांनी पुरस्कार परत करावेत !

अमरावती येथे शिक्षक संघटनांची अपेक्षा 
अमरावती - येथील शिक्षकांनीही शासनाच्या विरोधात पुरस्कार वापसीचा विचार चालू केला आहे. शिक्षण विभागाच्या अन्यायकारी धोरणाच्या विरोधात आदर्श शिक्षकांनी पुरस्कार परत करावेत. त्यामुळे शासनाचे डोळे उघडतील, अशी शिक्षक संघटनांची अपेक्षा आहे. (साहित्यिकांच्या पावलावर पाऊल ठेवणारे शिक्षक ! - संपादक) 
     सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील रमाकांत गटकळ यांनी तीन दिवसांपूर्वी आदर्श शिक्षक पुरस्कार गटशिक्षणाधिकार्‍यांकडे परत केला. शिक्षकांच्या आंदोलनाने व्यापक स्वरूप घेतले, तर राष्ट्रपती पुरस्कारही परत करून शिक्षकांचे प्रश्‍न राष्ट्रपतीपर्यंत पोहोचू शकतात, अशी या शिक्षकांची भूमिका आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रस्तावित प्रारूप विकास नियोजन आराखड्यात ढोबळ चुकाच !

आराखड्याच्या संदर्भात हलगर्जीपणा करणार्‍या संबंधित 
अधिकार्‍यांवर मुख्यमंत्री कठोर कारवाई करतील का ?
    मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे सिद्ध केलेल्या प्रस्तावित प्रारूप विकास नियोजन आराखडा २०१४ - २०३४नुसार येथील सिद्धीविनायक मंदिराच्या जागी उद्यान दाखवण्यात आले आहे. तसेच महानगरपालिकेसमोरील पत्रकार संघ, प्रेस क्लब आणि काँग्रेस भवन ही शासकीय कार्यालये असल्याचे या प्रारूप आराखड्यात नमूद आहे. यापूर्वीच्या विकास आराखड्यात झालेल्या चुका दुरुस्त करून नवीन आराखडा सिद्ध करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मुदतवाढ दिली होती; मात्र या प्रारूप विकास नियोजन आराखड्यातही अनेक चुका असल्याचा आरोप वॉच डॉग फाउंडेशन या अशासकीय संस्थेचे ग्रॉडफे पिमेंटा आणि निकोलस अल्मेडा यांनी केला आहे.

वरसोली (जिल्हा पुणे) येथे अवैधरित्या उभारलेली उपाहारगृहे आणि निवासगृहे यांच्यावर महसूल विभागाकडून कारवाई

अवैध बांधकाम होत असतानांच ते रोखण्याचा प्रयत्न महसूल प्रशासनाने का केला 
नाही ? अशा प्रकारची बांधकामे होऊ नयेत, यासाठी प्रयत्न करणारे प्रशासन हवे !
पुणे, १५ नोव्हेंबर - येथील मुंबई-पुणे राष्ट्र्रीय महामार्गाजवळ वरसोली गावात बांधकामाची कोणतीही अनुज्ञप्ती न घेता अवैधरित्या निवासगृहे उभारण्यात आली आहेत. त्यामध्ये उपहारगृहे, निवास व्यवस्था, बोर्डिंग आदी चालवणार्‍या मिळकतीवर मावळ महसूल विभागाने कारवाई केली आहे. या कारवाईनंतर त्या निवासगृहांचा वापर बंद करण्यात आला आहे.
येथील वरसोली गावात एका धर्मादाय संस्थेने सुकर भवन नावाने वास्तू उभारली आहे. त्या इमारतीतील खोल्यांचा व्यावसायिक वापर आणि नानुमल भोगराज नावाने उपहारगृह चालू केले होते. हे बांधकाम करताना शासनाची कोणतीही अनुज्ञप्ती घेतली नव्हती. याविषयी मावळ महसूल विभागाने त्या ट्रस्टला अनुज्ञप्तीचे प्रमाणपत्र सादर करण्याची सूचना केली होती; परंतु त्याकडे व्यवस्थापनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे तहसीलदार शरद पाटील आणि मंडल अधिकारी भोकरे यांनी सदर मिळकतीचा पंचनामा केला. ती मिळकत अवैध असल्याचे ठरवत तिचा वापर बंद केला आहे.

अधिकाराचा गैरवापर करून गैरवर्तन करणार्‍या पोलिसांमध्ये वाढ

मुंबई - पोलिसांकडून अधिकाराचा दुरुपयोग होत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 'पोलीस म्हणजे दडपशाही', असा संदेश समाजात जात आहे. यामुळे सामाजिक संकेतस्थळावर पोलीस दलाची प्रतिमा मलीन होत आहे. अशा बेशिस्त वर्तन करणार्‍या अधिकार्‍यांचा बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही. त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त अहमद जावेद यांनी दिला आहे. (आयुक्तांनी गैरवर्तन करणार्‍या पोलीसांवर लवकरात लवकर कठोर कारवाई करावी. जेणेकरून पोलीस दलाची मलीन प्रतिमा पालटून जनतेला त्यांचा आधार वाटेल. त्याच बरोबर पोलीस दलातील सर्वांना धर्मशिक्षण दिल्यास त्यांच्यामध्ये पालट लवकर होईल. - संपादक) 

फलक प्रसिद्धीकरता

आय.एस्.आय.एस्. या आतंकवादी संघटनेचा सामना करण्यासाठी सिद्ध आहात का ?
पॅरिसमध्ये ६ ठिकाणी आत्मघाती आक्रमण करणार्‍या आय.एस्.आय.एस्. या आतंकवादी संघटनेच्या आतंकवाद्याने तुर्की या देशातही आत्मघाती आक्रमण केले. संपूर्ण जगाला इस्लामिक स्टेट बनवण्याचे ध्येय उराशी बाळगणार्‍या या संघटनेचे भारताला कह्यात घेण्याचेही उद्दिष्ट आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Pariske bad ab Turkeyme ISISke atankika atmaghati hamla !
Bharatme Hindu atankvadka shor machanevale is atankvadko kya kahange ?
जागो !
पॅरिस के बाद अब तुर्की में आय.एस्.आय.एस्. के आतंकी का आत्मघाती हमला !
भारत में हिन्दु आतंकवाद का शोर मचानेवाले इस आतंकवाद को क्या कहेंगे ?

अनियमित आहारामुळे मधुमेह

   मुंबई - अरबट-चरबट अशा अनियमित आहारामुळे मधुमेह होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. मधुमेहासाठीच्या सर्वेक्षणात ३६ ते ६५ वयोगटातील ४ सहस्र १०० मधुमेही रुग्णांची पाहणी करण्यात आली. त्यातून हा निष्कर्ष समोर आला आहे. मधुमेह झालेल्यांपैकी ७० टक्के रुग्णांचा आहार हा अनियमित असल्याचा अहवाल अ‍ॅबॉट फूड, स्पाइक्स अ‍ॅण्ड डायबेटिसने सादर केला आहे. मधुमेह झालेल्यांपैकी ४६ टक्के लोक हे स्थूल असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

नाशिक येथे फटाक्यांमुळे शेकडो पक्ष्यांनी जीव गमावला

तथाकथित पर्यावरणप्रेमी आता फटाक्यांना विरोध का करत नाहीत ? 
     नाशिक - यंदाच्या दिवाळीत फटाक्यांमुळे येथील शेकडो पक्ष्यांना जीव गमवावा लागला आहे. पर्यावरणप्रेमींच्या निरीक्षणातून हे वास्तव समोर आले आहे. पक्ष्यांचा अधिवास असलेल्या झाडांच्या परिसरात फटाके फुटू लागल्यावर पक्षी बिथरतात आणि घबराटीने काही मृत्युमुखी पडतात. काही जण आवाजापासून लांब जाण्यासाठी रात्रीच्या अंधाराची पर्वा न करता भरारी घेतात; मात्र अडथळ्यांवर आपटून ते भूमीवर कोसळतात. हे टाळण्यासाठी नाशिकमध्ये अनेक संस्था आणि पक्षीप्रेमी यांनी सामाजिक संकेतस्थळांसह फटाक्यांच्या विरोधात व्यापक मोहीम चालू केली आहे. (मोहिमेद्वारे फटाक्यांना विरोध करणार्‍या नाशिककरांचे अभिनंदन ! - संपादक)

टॅब किंवा स्मार्टफोन वापरण्यातून मुलांची प्रगती खुंटते !

पालकांनो, तंत्रयुगातील साधनांना आपल्या पाल्यांच्या हाती द्यायचे कि नाही, ते वेळीच ठरवा ! 
     मुंबई - टॅब किंवा स्मार्टफोन वापरणारी मुले म्हणजे बुद्धीवान असल्याचे लक्षण नसून तसे करणे म्हणजे मुलांची प्रगती खुंटण्याचे कारण आहे. स्मार्ट फोन किंवा संगणकीय ज्ञानजाल यांमुळे मुलांची स्मरणशक्ती अन् एकाग्रता अल्प होत आहे. अमेरिकेतील संशोधनानुसार स्मार्ट फोन आणि टॅब वापरामुळे अनेकांची स्मृती अल्प होत आहे. (आतातरी पालक एकाग्रता आणि स्मरणशक्ती वृद्धींगत करणार्‍या स्तोत्रपठणाचे महत्त्व लक्षात घेतील का ? - संपादक) 

नर्सरी ते सीनियर केजीपर्यंत मातृभाषेतूनच शिकवा !

या शिफारसीसाठी राज्य शासनाचे अभिनंदन ! 
 राष्ट्रीय शिक्षण धोरणात राज्य शासनाची शिफारस 
     मुंबई - इंग्रजी माध्यमातील 'प्ले ग्रुप', 'नर्सरी' चालवण्याचा शाळांचा व्यवसाय आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. केजीसाठी अभ्यासक्रम सिद्ध करण्यासह नर्सरी ते सीनियर केजीत शिकणार्‍या ३ ते ६ वयोगटातील मुलांना केवळ मातृभाषेतूनच शिक्षण मिळायला हवे, अशी शिफारस राज्य शासनाने नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणासाठी सादर केलेल्या अहवालात केली आहे. या शिफारशीमुळे राज्य शासन किंवा महानगरपालिका यांच्या नियंत्रणाखाली नसलेल्या, तसेच प्रवेशाच्या वेळी पुष्कळ डोनेशन घेऊन पालकांना लुटणार्‍या नर्सरी, तसेच शाळांमधील केजीच्या वर्गांना चाप बसणार आहे. 

समाजाला रसातळाला नेणारे लुटारू, वासनांध आणि अनीतीमान पत्रकार !

१६ नोव्हेंबर या राष्ट्रीय पत्रकारदिनाच्या निमित्ताने...
     पत्रकारितेला लोकराज्याचा चौथा आधारस्तंभ मानले जाते. हा आधारस्तंभ किती ढेपाळलेला आहे, याची समाजाला कल्पना यावी, हाच हा लेख लिहिण्यामागचा हेतू आहे. 
१. विज्ञापन मिळवण्याच्या क्लुप्त्या !
१ अ. पत्रकारांनाच विज्ञापन मिळवण्यास सांगणे 
     पत्रकार म्हणजे सामान्य जनतेच्या समस्या मांडणारा, त्यांना न्याय देणारा, शासनावर अंकुश ठेवणारा असा बहुतेकांचा समज झालेला असतो. वास्तवात आताचा पत्रकार म्हणजे विज्ञापनाद्वारे संबंधित वृत्तपत्राची पैसा गोळा करणारी दलालांची टोळी असते. त्यासाठीच त्यांची नेमणूक असते. पत्रकाराची नियुक्ती करतांना त्याच्यावर महिन्याकाठी लाखभर रुपयांची विज्ञापने आणण्याचे बंधन घातले जाते, अन्यथा त्याच्यावर अकार्यक्षम म्हणून शिक्का मारला जातो. साहजिकच अधिकाधिक विज्ञापने मिळवण्यासाठी पत्रकार कोणत्याही थराला जाऊ शकतात. यातूनच अनेक जण राजकारण्यांचे गुलाम कधी बनतात, हे त्यांचे त्यांनाही समजत नाही. विज्ञापन देणारा राजकारणी चुकीचे करत असला, तरी तो समाजाचा तारणहार कसा आहे ? हे दाखवण्यासाठी हा पत्रकार रक्त आटवत असतो. राजकारण्यांची तळी उचलणारे असे पत्रकार कधीतरी सामान्य जनतेला न्याय देऊ शकतील काय ?
हिंदु धर्मातील संस्कृती जपण्याचे कार्य सनातन संस्था करत आहे. तिच्या पाठीशी सर्वांनी उभे रहावे. गोवर्धन पर्वत हिंदूंचा आहे आणि त्या पर्वताला प्रत्येकाने काठी लावण्याची आवश्यकता आहे ! 
- पू. मोहनबुवा रामदासी, सज्जनगड

शत्रूवर सैनिक आक्रमण करणे, हेच राष्ट्र्रीय शस्त्रबळाचे मुख्य ध्येय ! - स्वातंत्र्यवीर सावरकर

१. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, राष्ट्र्राचे सैन्य शस्त्रास्त्रसज्ज पाहिजे. शत्रूवर सैनिक आक्रमण करणे, हेच राष्ट्र्रीय शस्त्रबळाचे मुख्य ध्येय, मुख्य धर्म आहे. राष्ट्र्राच्या केवळ संरक्षणापुरते शस्त्रबळ जे राष्ट्र्र बाळगते; पण आक्रमणक्षम होईल इतके वाढवीत नाही, त्या राष्ट्र्राची ती निष्ठा एक तर भ्रांत असते, नाहीतर आतून भेकड असते. हा अंतर्गत भेकडपणा लपवण्यासाठी केलेली ती एक वल्गना असते. ज्या राष्ट्र्राचे सैन्यबळ उघडउघडपणे आक्रमणक्षमतेच्या पायावर नि प्रमाणावर रणसज्जतेत उभे असते, त्या राष्ट्र्रास संरक्षणक्षमता असतेच असते. 
२. स्वातंत्र्योत्तर काळात पाकिस्तानने आपल्यावर चार-पाच वेळा आक्रमण केले. आपण फक्त प्रतिकार केला. सावरकर यांच्या संदेशाप्रमाणे आपले सैन्य सतत आक्रमणशील राहिले असते, तर आज काश्मीर प्रश्‍न उरला नसता. - वा.ना. उत्पात (स्वातंत्र्यवीर दीपावली विशेषांक नोव्हेंबर- डिसेंबर २००७, पृष्ठ ४९-५१) 

धर्मग्रंथांना प्रमाणपत्राची आवश्यकता नाही !

     मल्याळम् भाषेतील दैनिक मातृभूमी या वृत्तपत्रात टीकात्मक लेख लिहिणार्‍या एम्.एम्. बशीर नावाच्या लेखकाने नुकतेच स्तंभलेखन करून श्रीरामाचे मानवीकरण करून त्याच्या कृतीला अयोग्य ठरवले. या विरोधात धर्माभिमान्यांनी तीव्र प्रतिक्रिया आणि निषेध व्यक्त केल्यानंतर त्यांनी हे स्तंभलेखन बंद केले. सध्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याखाली कोणीही उठतो आणि देवता, धर्मग्रंथ, धार्मिक कृती यांवर अगदी बेछूटपणे मुक्ताफळे उधळतो. त्याविषयी कोणी ब्रही काढत नाही. त्यावर चुकून एखाद्याने बोलण्याचे धारिष्ट्य केलेच, तर देशात असहिष्णुता वाढीस लागली; म्हणून चारही बाजूंनी टाहो फोडला जातो. 

अतिथीला विन्मुख न पाठवणारा कर्ण

दीपावलीच्या सुट्टीनिमित्त प्रतिदिन वाचा बोधकथा !
     एके दिवशी भगवान श्रीकृष्ण पांडवांशी बोलत असतांना कर्णाच्या औदार्याची वारंवार स्तुती करू लागले. ते अर्जुनाला आवडले नाही. तो म्हणाला, हे श्रीकृष्णा, आमचा मोठा भाऊ धर्मराज याच्यापेक्षा कोणी उदार नाही. मग तू त्याच्यासमोर कर्णाची एवढी प्रशंसा का करतोस ? त्या वेळी ही गोष्ट मी तुला पुढे केव्हातरी समजावीन, असे उत्तर देऊन भगवंताने तो विषय तिथेच संपवला.
     काही दिवसांनी श्रीकृष्ण अर्जुनाला सोबत घेऊन ब्राह्मणाच्या वेशात युधिष्ठिराच्या महालात गेला आणि त्याची भेट घेऊन तो म्हणाला, आम्हाला एक मण चंदनाची सुकी लाकडे हवी आहेत. ती मिळवून देण्याची कृपा करावी. युधिष्ठिराने त्यांना ओळखले नाही. त्याने त्या ब्राह्मणांना बसावयास सांगितले आणि आपल्या सेवकांना चंदनाची सुकी लाकडे घेऊन येण्याची आज्ञा केली.

रस्ते अपघात : एक राष्ट्रीय समस्या !

१६ नोव्हेंबर - रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या जागतिक स्मरणदिनाच्या निमित्ताने...
१. भारतातील रस्ते अपघातांत दरवर्षी पुष्कळ वाढ होणे : भारतात वर्ष १९६१ मध्ये ५ सहस्र अपघातांची नोंद होत होती, त्याच देशात वर्ष २००५ मध्ये १ लाख १० सहस्र अपघात होऊ लागले, म्हणजे ४४ वर्षांत अपघातांमध्ये २२ पट वाढ झाली. असेच चालू राहिल्यास वर्ष २०२५ पर्यंत हा आकडा १५ लाखांपर्यंत पोहोचेल. राष्ट्रीय आकडेवारीनुसार भारतात २००९ मध्ये ३ लाख ७५ सहस्र २१, तर २०१० मध्ये ३ लाख ८४ सहस्र ६४९ बळी रस्ते अपघातांनी घेतले.

आस्थापनांच्या सामाजिक उपक्रमांतर्गत राबवली जाणारी अशास्त्रीय श्री गणेशमूर्तीदान मोहीम

      यंदाच्या वर्षी पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील श्री गणेशमूर्ती विसर्जनघाटांवर काही खासगी आस्थापनांकडून श्री गणेशमूर्तीदान करण्यासाठी भाविकांना आवाहन केले जात होते. इतकी वर्षे अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या काही संघटना असे करायच्या. आता टाटा मोटर्स, कमिन्स, प्राज इंडस्ट्रीज अशी विविध नामांकित आस्थापनेही श्री गणेशमूर्तीदान मोहीम राबवतात. आस्थापनाच्या सामाजिक उपक्रमाच्या अंतर्गत ही आस्थापने सदर मोहीम राबवतात. त्यामुळे होणारे परिणाम, तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे श्री गणेशमूर्ती दान म्हणून घेतल्यानंतर अथवा कृत्रिम हौदामध्ये विसर्जन केल्यानंतर त्या श्री गणेशमूर्तींची विटंबना झाल्याचेही आढळून आले. एकूणच याविषयी माहिती देण्याचा हा अल्पसा प्रयत्न...
स्त्रीचे शरीरसौष्ठव अतिशय बीभत्स रूपात दाखवून स्वतःचे व्यावसायिक स्वार्थ पूर्ण करणारी आजची हीन पत्रकारिता ! : पत्रकारिता आपल्या नैतिक आणि सामाजिक उद्देशांपासून बाजूला होऊन स्वतःचे व्यावसायिक स्वार्थ पूर्ण करण्यामागे लागली आहे. आज पत्रकारिता स्त्रीला विक्रीची वस्तू मानू लागली आहे. तिचे शरीरसौष्ठव अतिशय बीभत्स रूपात दाखवून आपल्या व्यावसायिक हितांसाठी तिचा लिलाव करत आहे. - मंजु आस्मता (मासिक ठेंगेपर सब मार दिया, सप्टेंबर २०१०)

असू दे ध्यास तुझ्या चरणांचा ।

श्री. विनायक शानभाग
प्राण जावा तो आपल्या स्मरणात ।
जन्म घ्यावा तो
आपल्या कीर्तनात ॥ १ ॥

सेवा व्हावी ती आपल्या चरणांची ।
जीवन जगावे ते
आपल्या आज्ञेने

सर्व विश्‍वात सनातनचे आश्रम निर्माण व्हायला हवेत ! - श्री. शिवप्रसाद जोशी

    रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात देव, देश आणि धर्म यांसाठी कार्य चालते. दिवसातील २४ घंटे सनातनच्या आश्रमातील साधकांच्या चेहर्‍यावर चैतन्य दिसते. इतर संघटनात जातीवरून भेदभाव चालतो, असा माझा सामाजिक अनुभव आहे. असा कुठलाही भेदभाव सनातनमध्ये दिसून येत नाही. सर्व जण हिंदु राष्ट्राच्या एका ध्येयाने प्रेरित होऊन कार्य करत आहेत. गोव्यातील प्रत्येक तालुक्यात नव्हे, तर देशात आणि विश्‍वात सनातनचे आश्रम निर्माण व्हायला हवेत. - श्री. शिवप्रसाद जोशी, हिंदु महासभा, गोवा.

योजक हा खरोखरच दुर्लभ असतो !

      योजकस्तत्र दुर्लभः । म्हणजे योजक हा खरोखरच दुर्लभ असतो. योजक जर चतुर असला, भगवन्मय असला, तर सगळ्यांचा, म्हणजे अगदी टाकाऊ समजलेल्याचाही उपयोग करून घेतो. त्याच्यासंदर्भात दुःख वरदान ठरते, तसेच शापही वर ठरतो. तो विषाचा उपयोग रोग हटवण्यासाठी करतो. चतुर माणूस दुःखाला सुख बनवतो आणि शापाचा वर बनवतो.

बोलण्यात नम्रता असणार्‍या आणि त्यागी वृत्तीच्या श्रीमती सिंधु शंकर पानसरे (वय ५९ वर्षे)

श्रीमती सिंधु पानसरे
     हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र प्रवक्ता श्री. अरविंद शंकर पानसरे यांच्या मातोश्री आणि सनातन संस्थेच्या रामनाथी आश्रमात ग्रंथ विभागात सेवा करणार्‍या सौ. मनीषा अरविंद पानसरे यांच्या सासूबाई श्रीमती सिंधु शंकर पानसरे (वय ५९ वर्षे) यांचे ३.११.२०१५ च्या रात्री २.३० वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या घरी राहून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत होत्या. काही काळ त्यांनी सनातनच्या रामनाथी आश्रमात राहून सेवा केली आहे. त्यांचा १३ वा विधी १६.११.२०१५ या दिवशी आहे.

पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांचा प.पू. डॉक्टरांप्रतीचा भाव

पू. डॉ. ॐ उलगनाथन्
१. पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी प.पू. डॉक्टर त्यांचे गुरु असल्याचे 
सांगणे आणि रामनाथी आश्रमात रहाण्याची इच्छा व्यक्त करणे
      जून २०१५ मध्ये पू. डॉ. ॐ उलगनाथन् म्हणाले, प.पू. डॉक्टर माझे गुरु आहेत. त्यांनी मला आश्रमात बोलावून घेतले आणि नाडीवाचन करण्याचे भाग्य दिले. आता माझी एकच प्रार्थना आहे, प.पू. डॉक्टरांनी मला रामनाथी आश्रमातील कुठल्यातरी एका कोपर्‍यात रहायला स्थान द्यावे.
२. पू. डॉ. ॐ उलगनाथन् नवीन असूनही त्यांना रामनाथी
आश्रमाचे महत्त्व समजणे; पण अनेक वर्षे आश्रमात राहूनही
 साधकांना ते लक्षात न आल्याचे प.पू. डॉक्टरांनी सांगणे
     मी प.पू. डॉक्टरांना हे सांगितल्यानंतर ते म्हणाले, पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांना सांग, रामनाथी आश्रम तुमचाच आहे.

आध्यात्मिक भावाला कृष्णाप्रिया बहिणीने भाऊबिजेनिमित्त दिलेली आगळी-वेगळी भेट !

कु. कोमल रगडे
सौ. पार्वती जनार्दन

 ज्योत से ज्योत जगाते जलो,
भाव की गंगा बहाते चलो ।
पू. अनुताईंच्या माध्यमातून ईश्‍वराने दिला ।
पणतीरूपी अनमोल धर्माभिमानी सत्संग॥ १ ॥

प.पू. डॉक्टरांच्या संकल्पाने मिळाले सर्वांना ।
गुरुकृपेचे तेल भरभरून ॥ २ ॥

पू. बिंदाताईच्या माध्यमातून जागवली
      अंतरातील भावज्योत ॥ ३ ॥

कोकिळा व्रताच्या उद्यापनाच्या वेळी केलेल्या हवनातील ज्वाळेत दोन कोकिळांचा आकार सिद्ध झाल्याचे दिसणे

कोकिळा व्रताच्या उद्यापनाच्या वेळी हवनातील ज्वाळेत सिद्ध झालेला कोकीळेचा आकार

मायेतील भाऊबीज आणि आध्यात्मिक भाऊबीज यांविषयी साधिकेचे झालेले चिंतन !

श्रीमती रजनी नगरकर
     १३.११.२०१५ या भाऊबिजेच्या दिवशी पहाटे ध्यानमंदिराला प्रदक्षिणा घालत असतांना मी देवाशी सूक्ष्मातून बोलत होते, तुला आज स्नान घालणार, तुला ओवाळणार. देवाला आपण म्हणतोच ना,
त्वमेव माता च पिता त्वमेव । त्वमेव बन्धुश्‍च सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव । त्वमेव सर्वं मम देव देव ॥
     आता प्रथम प्राधान्य कुणाला द्यायचे ? भावाला कि जन्मोजन्मीच्या भावाला, म्हणजे ईश्‍वराला ? असे माझ्या मनात काही क्षण द्वंद झाले आणि मग मी तुलना करायला लागले. त्या वेळी माझ्या मनात पुढील विचार आले.त्या वेळी मला काही आध्यात्मिक बहिणींची आठवण आली. श्रीकृष्णाने बहिणीला, म्हणजेच द्रौपदीला वस्त्रे पुरवून तिचे रक्षण केले होते. विदुराच्या पत्नीने श्रीकृष्ण घरी आला; म्हणून त्याला आनंदाने केळ्याचे साल भरवले होते. देवा, माझ्या मनात हे विचार चालू असतांना मी तुझ्यासाठी सुवर्ण सिंहासन मांडून तुला सूक्ष्मातून तेल लावायला प्रारंभ केला.

देवा, शिकव अखंड अनुसंधानात रहायला !

सौ. नंदिनी चितळे
     एकदा माझी प.पू. डॉक्टरांची भेट झाली आणि त्यांच्या बोलण्यातून आश्‍वासन मिळाल्यासारखे वाटले. त्या वेळी सुचलेल्या ओळी पुढे देत आहे. 

देवा, आश्‍वासन ते तुझे शब्दांतले ।
सावरे भावना मनातल्या ।
करते सहजच अंतर्मुख ।
घालवी वृत्ती बहिर्मुख ॥ १ ॥

धीर देते लढायला ।
प्रयत्न करत करत जगायला ।
आणि स्थिरतेचा क्षण गाठायला

प.पू. डॉक्टरांवरील अपार श्रद्धा आणि भाव यांमुळे प्रत्येक गोष्टीचे अध्यात्मीकरण करणारी कु. ऐश्‍वर्या जोशी (वय ११ वर्षे) !

कु. ऐश्‍वर्या जोशी
      श्रीकृष्णाने जन्मोत्सवानिमित्त साधकांना शिकता यावे, यासाठी कु. ऐश्‍वर्या जोशी हिच्या मुलाखतीची ध्वनीचित्र-चकती (भाग २) रामनाथी आश्रमातील सर्व साधकांना दाखवली. येणार्‍या आपत्काळाला सामोरे जाण्यापूर्वी साधकांनी हे सर्व शिकून पुढे जावे, ही भगवंताची तळमळ यातून जाणवत होती. कु. ऐश्‍वर्याच्या माध्यमातून भगवंताने आम्हा सर्वांना जे बोधामृत दिले, ते सर्वांपर्यंत पोेहोचवण्यासाठी ही सूत्रे शब्दबद्ध करण्याची संधी दिली, याबद्दल मी पुष्कळ कृतज्ञ आहे.
१. साधकांनी शिकावे आणि पुढे जावे, ही भगवंताची इच्छा 
असल्यानेच ध्वनीचित्रफीत पहातांना पुष्कळ आनंद वाटणे
     कु. ऐश्‍वर्या जोशी एक-एक मुद्दा शिकवत होती. आम्ही सर्व साधक ते ग्रहण करत होतो. मात्र प्रतिदिन काही तरी शिकण्यात आणि आजच्या शिकण्यात पालट होता.

ठाणे येथील दैनिक सनातन प्रभातच्या वाचक श्रीमती राधिका कडवआजी (वय ९३ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी

श्रीमती राधिका कडवआजींचा सत्कार करतांना 
सौ. नम्रता ठाकूर (डावीकडे)
     ठाणे - येथील दैनिक सनातन प्रभातच्या वाचक आणि सातत्याने भावावस्थेत असलेल्या श्रीमती राधिका कडवआजी (वय ९३ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्यानिमित्त सनातनच्या ६२ टक्के पातळीच्या साधिका सौ. नम्रता ठाकूर यांनी २२ ऑक्टोबरला म्हणजेच दसर्‍याच्या शुभदिनी त्यांचा सत्कार केला. सौ. ठाकूर यांनी आजींना श्रीकृष्णाच्या चित्राची चौकट भेट दिली. पातळी घोषित झाल्यावर त्यांचा भाव जागृत झाल्याने आजींना काहीच बोलता आले नाही. या वेळी त्यांचा मुलगा आणि सून यांनी त्यांची गुणवैशिष्ट्ये सांगितली. श्रीमती कडवआजी एका संप्रदायानुसार साधना आणि दत्ताचा नामजप सातत्याने करतात. त्या गेल्या दीड वर्षापासून सनातन प्रभातच्या वाचक आहेत. 

दैनिक सनातन प्रभातमधील लेखात दिल्याप्रमाणे नामजप आणि मुद्रा शोधून उपाय करण्यात स्वावलंबी होण्यातील साधिकेने अनुभवलेला आनंद !

कु. दीपाली पवार
कृष्णा,
     २६.१०.२०१४ या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमध्ये शरिरातील कुंडलिनीचक्रांच्या स्थानी बोटे फिरवून न्यास, मुद्रा आणि नामजप शोधणे या मथळ्यांतर्गत लेख प्रसिद्ध झाला होता. मी तो लेख वाचला; पण तो लेख आणि उपाय शोधण्याची प्रक्रिया मला आकलन झाली नाही. त्या वेळी विचार केला, योग्य वेळ आली की, मला सर्व समजेल. मला तीव्र आध्यात्मिक त्रास आहे. त्यामुळे त्याचा विचार करायला नको.

मुलांचे भावविश्‍व इंग्रजाळलेले होणे, हा इंग्रजी शिक्षणाचा दुष्परिणाम !

परात्पर गुरु डॉ. आठवले
     मुलांना लहानपणापासून इंग्रजी माध्यमाचे शिक्षण दिल्याने त्यांचे भावविश्‍व मातृभाषेप्रमाणे नव्हे, इंग्रजी भाषेतील शिष्टाचाराप्रमाणे अभिव्यक्त होते. २ - ३ दिवसांपूर्वी इंग्रजी माध्यमात शिकत असलेला बालसाधक मला मला पापी द्या, असे म्हणाला. मला पापी द्या हे वाक्य Give me a kiss या इंग्रजी वाक्याप्रमाणे आहे.

सनातन आश्रम म्हणजे रामराज्याची अनुभूती देणार्‍या हिंदु राष्ट्राची छोटी प्रतिकृती ! - श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था, गोवा.

    रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रम म्हणजे सनातन संस्थेचे मुख्यालय ! हा आश्रम म्हणजे रामराज्याची अनुभती देणार्‍या हिंदु राष्ट्राची छोटी प्रतिकृती आहे. या आश्रमाने अनेकांना साधनेत दिशादर्शन करून आमच्या जीवनाचे सार्थक केले आहे. या आश्रमाच्या माध्यमातून विदेशातील कितीतरी जणांना हिंदु धर्म शिकण्याची संधी मिळाली आहे. आश्रमात रहाणारे ४०० साधक शिस्तबद्ध जीवन जगतात. या शिस्तबद्धतेतही साधकांचे आपापसांत निरपेक्ष प्रेम आहे. त्यामुळे सनातन आश्रम हे ४०० सदस्यांचे एक कुटुंबच बनले आहे. ईश्‍वरप्राप्तीच्या माध्यमातून एकसंध समाज निर्माण करता येतो आणि रामराज्याची अनुभूती घेता येते, हे सनातनच्या आश्रमातून अनुभवता येते. माझी आपल्याला विनंती आहे की, आपण सनातनच्या रामनाथी आश्रमाला भेट द्यावी.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
'राष्ट्र-धर्मासंदर्भात काहीएक कर्तव्य नसलेल्यांमध्ये बहुसंख्य पत्रकारही येतात !' - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (९.११.२०१५)           
  'राष्ट्र-धर्मासंदर्भात इतरांना काहीतरी करा, असे शिकवणारे; पण स्वतः काही न करणारे पत्रकार 'लोका सांगे ब्रह्मज्ञान । आपण कोरडा पाषाण ॥' या गटात येतात.' - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (९.११.२०१५)          

बोधचित्र


प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
संतांचे विश्‍लेषण करू नये संतांचा शोध घेऊन काही 
सापडत नाही; कारण तेथे केवळ शून्य असते.
भावार्थ : प्रकृतीतील गोष्टी पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्याद्वारे शोध घेऊन सापडणे शक्य आहे; पण पुरुष, शिव किंवा ब्रह्मतत्त्व यांचा शोध घेता येत नाही; कारण ते पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडचे आहे. संत ब्रह्माशी एकरूप झालेले असल्याने त्यांचा शोध घेऊन काही सापडत नाही.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

स्नेही निर्धन असला, तरी चालेल; पण सदाचारी असावा !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      धनवान स्नेही दुराचारी असेल, तर तो कधीही तुमचा विश्‍वासघात करू शकतो; पण तुमचा स्नेही सदाचारी असेल, तर तो कितीही निर्धन असला, तरी नित्य तुम्हाला साथच देतो. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

पॅरिसवरील आक्रमणाचा धडा !

संपादकीय
    पॅरिसवर झालेल्या आक्रमणामुळे सारे जग सुन्न झाले आहे. १२९ ठार, तर ३५२ हून अधिक नागरिक घायाळ ही थोडीथोडकी संख्या नव्हे. शिवाय तो वारंवार फटाक्यांप्रमाणे बॉम्ब फुटणारा आणि गावागावांमध्ये आतंकवादी आक्रमण होणारा भारत नाही, तर फ्रान्स आहे. त्यामुळेही या अचानक झालेल्या आक्रमणाने खळबळ उडाली आहे. एकापाठोपाठ एक असे सहा ठिकाणी आक्रमण झाल्यामुळे भारतातील मुंबईवर २६/११ या दिवशी झालेल्या आक्रमणाप्रमाणेच हे आक्रमण असल्याचे बोलले जात आहे. जिहाद्यांच्या आक्रमण करण्याच्या पद्धतीत बरेचसे साम्य असले, तरी नंतर घडलेल्या घडामोडींत मोठा भेद आहे. तो भेद जाणून घेतल्यास आपल्याला अजून बराच मोठा पल्ला सर करायचा आहे, हे सहजतेने लक्षात येईल.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn