Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

पॅरिसमध्ये आतंकवादी आक्रमणात १५५ ठार

जगभराची डोकेदुखी ठरलेला जिहादी आतंकवाद ! 
  • २०० हून अधिक जण घायाळ
  • फ्रान्समध्ये आणीबाणी लागू
  • आठही आतंकवाद्यांचा खात्मा 
  • आय.एस्.आय.एस्.ने दायित्व स्वीकारले
  • फ्रान्सने सिरियाला साहाय्य केल्याचा सूड 
  • हल्लेखोरांकडून अल्लाह-हो-अकबरच्या घोषणा
  • सबंध युरोपमध्ये अतीदक्षतेची चेतावणी 
      पॅरिस - फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये १३ नोव्हेंबरला रात्री १० वाजण्याच्या सुमारास (भारतीय प्रमाण वेळेनूसार मध्यरात्री १ वाजता) आतंकवाद्यांनी ठिकठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणि गोळीबार करून भीषण आतंकवादी आक्रमण केले. आतंकवाद्यांनी पॅरिसमधील स्टेडियम, हॉटेल, कॉन्सर्ट हॉल अशा ६ विविध ठिकाणी आक्रमण करून अवघे फ्रान्स हादरवून सोडले. या आक्रमणात १५५ नागरिक मारले गेले असून २०० हून अधिक जण घायाळ झाले आहेत. आक्रमण करणार्‍या आठही आतंकवाद्यांना फ्रान्सच्या पोलिसांनी कंठस्नान घातले. या भीषण घटनेनंतर फ्रान्समध्ये आणीबाणी लागू करण्यात आली असून देशाच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. याशिवाय ३ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा घोषित करण्यात आला आहे. या आक्रमणानंतर सबंध युरोपमध्ये अतीदक्षतेची चेतावणी देण्यात आली आहे. फ्रान्सचे राष्ट्र्रपती फ्रास्वा ओलांद यांनी त्यांची नियोजित जी-२० परिषद रहित केली आहे. पॅरिसमधील सर्व भारतीय नागरिक सुरक्षित असल्याची माहिती फ्रान्समधील भारतीय दुतावासाने दिली. पॅरिसमधील या आक्रमणानंतर सबंध युरोपमध्ये अतीदक्षतेची चेतावणी देण्यात आली आहे.

आय.एस्.आय.एस्. भारतावर कधीही आक्रमण करील ! - डी. शिवानंदन्, माजी पोलीस आयुक्त

आय.एस्.आय.एस्.च्या क्रूर कारवायांना सामोरे जाण्यासाठी शासनानेे काय सिद्धता केली आहे ?
    मुंबई - आयएस्आयएस् भारतावर आक्रमण करण्याच्या सिद्धतेत आहे. ही संघटना कधीही आक्रमण करू शकते. यासंदर्भात इंटिलिजन्स ब्युरोनेही अनेकदा सांगितले आहे, असे प्रतिपादन येथील माजी पोलीस आयुक्त डी. शिवानंदन् यांनी केले आहे. पॅरिस येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. 
शिवानंदन् पुढे म्हणाले,
१. अशा प्रकारे आतंकवाद्यांनी केलेली आक्रमणे म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने फारच अडचणीचे होते. या आक्रमणांचा सामना करण्यासाठी सतर्कतेच्या जोडीला आवश्यक सोयीसुविधा अन् साधनेही हवीत.

पाकिस्तानला नष्ट केल्याविना देशावरील आतंकवादी आक्रमणे अल्प होणार नाहीत ! - निवृत्त ब्रिगेडीयर हेमंत महाजन

जे लष्कराच्या एका निवृत्त अधिकार्‍याच्या लक्षात येते, ते शासनाच्या लक्षात का येत नाही ? 
या सैन्याधिकार्‍याच्या सल्ल्यानुसार शासनाने कृतीशील व्हावे, ही अपेक्षा !
     पुणे, १४ नोव्हेंबर - पाकिस्तानसमवेत बांगलादेशी घुसखोरही भविष्यात आपल्या देशासाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहेत. गुलाम अली यांच्या गाण्याने किंवा क्रिकेट खेळून पाकिस्तानशी संबंध सुधारतील, असे म्हणणे, ही आपल्याच लोकांची फसवणूक आहे. आपल्याच देेशातील काही देशद्रोही माणसे क्रिकेट आणि गुलाम अली यांच्या कार्यक्रमामुळे पाकिस्तानशी संबंध सुधारतील, असा अपसमज पसरवत आहेत. भारतातील सर्व आतंकवादी कारवायांचे मूळ पाकिस्तानात असून ते उखडल्याविना देशावरील आतंकवादी आक्रमणे अल्प होणार नाहीत, असे खणखणीत प्रतिपादन निवृत्त ब्रिगेडीयर श्री. हेमंत महाजन यांनी केले. भाऊबिजेनिमित्त शहीद मित्र परिवार आणि विधायक पुणे या संस्थेच्या वतीने हुतात्मा जवानांच्या वीरमाता आणि पत्नी यांचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्या वेळी श्री. महाजन बोलत होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष अशोक मेहेंदळे, त्वष्टा कासार मंडळाचे अध्यक्ष राजू पाटसकर, शाहीर हेमंंत मावळे आदी अन्य मान्यवर उपस्थित होते.

उधमपूर आक्रमणातील आणखी २ आतंकवाद्यांना अटक

आतंकवादग्रस्त भारत !
     जम्मू - उधमपूर येथे सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांच्या बसवर करण्यात आलेल्या आक्रमणाच्या प्रकरणात आणखी २ आतंकवाद्यांना अटक करण्यात आली आहे. फैयाज अहमद उपाख्य फैयाल वेल्डर आणि खुर्शीद अहमद अशी या दोघांची नावे असून त्यांनी पाकच्या आतंकवाद्यांना साहाय्य केले होते. फैयाजच्या घरी या आक्रमणाची योजना आखण्यास आली होती, तसेच त्याच्याच घरी सर्व आतंकवाद्यांनी मुक्काम केला होता. हे सर्व आतंकवादी लष्कर-ए-तोयबा या जिहादी आतंकवादी संघटनेशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे.

पाकमधील सिंध प्रांतातील हिंदु जनता पाक सैन्याच्या असहिष्णुतेचे बळी !

अमेरिकेतील सिंधी संघटनेची बराक ओबामा यांच्याकडे तक्रार
     वॉशिंग्टन - पाकिस्तानच्या सिंध प्रांतात पाकिस्तानी सैन्य मानवाधिकारांचे उल्लंघन करत असून तेथील हिंदु जनता ही पाक सैन्याच्या असहिष्णुतेचे बळी ठरत आहे, अशी तक्रार अमेरिकेतील सिंधी संघटनेने अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्याकडे केली आहे. पाकचे सैन्यप्रमुख जनरल राहील शरीफ यांच्या आगामी अमेरिका दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर ही तक्रार करण्यात आली आहे.

विहिंप आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांकडून ७ गायींची सुटका !

असे धर्माभिमानी हिंदू सर्वत्र हवेत !
     कोडोली (जिल्हा कोल्हापूर), १४ नोव्हेंबर (वार्ता.) - ऐन दिवाळीत बोरपाडळेहून निपाणी पशूवधगृहाकडे गायी घेऊन जाणारा टेम्पो हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना येथे आढळला. त्यामुळे विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांसह अन्य गोरक्षकांनी संतप्त होऊन टेम्पोची तोडफोड केली. या कार्यकर्त्यांनी कोडोली पोलिसांच्या साहाय्याने ७ गायींची सुटका केली. टेम्पोचालक तौफिक बेपारी आणि साथीदार अशफाक मोमीन या धर्मांधांना गोरक्षकांनी चोप देऊन पोलिसांच्या कह्यात दिले. (गोमातेचे रक्षण करणार्‍या विहिंप, बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! हिंदूंनो, असाच संघटितपणा दाखवल्यास गोमातेची वाहतूक आणि तिचा वध करण्याचे कोणी धाडस करणार नाही ! - संपादक) कसायांनी दिलेल्या त्रासामुळे टेम्पोतील एका गायीचा मृत्यू झाला आहे.

आतंकवादाला आळा घालण्यात संयुक्त राष्ट्र संघटना अपयशी ! - भारत

जगभरात फोफावलेल्या जिहादी आतंकवादाची सर्वाधिक झळ भारताला बसत आहे. त्याच्याशी 
संयुक्त राष्ट्राला जराही देणेघेणेे नाही. त्यामुळे भारताने जिहादी आतंकवादाचा बीमोड 
करण्यासाठी अन्य राष्ट्रांवर अवलंबून न रहाता स्वबळावर तो मोडीत काढावा !
     संयुक्त राष्ट्रे - जगात शांतता निर्माण करण्यासाठी अस्तित्वात आलेल्या संयुक्त राष्ट्र्र संघटना आतंकवादाला आळा घालण्यात अपयशी ठरत आहे, असा आरोप भारताने केला. शांतता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्र्र संघटनेकडून शांती सेनेचा वापर प्रभावीपणे केला जातांना दिसत नाही. संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये सुधारणा केल्या जात नाहीत. परिणामी त्यांच्या या अकार्यक्षमतेची किंमत भारतासारख्या विकसनशील राष्ट्रांना मोजावी लागत आहे, अशा शब्दांत भारताने संयुक्त राष्ट्र संघटनेला धारेवर धरले. भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी राजदूत अशोक मुखर्जी म्हणाले की... 

'स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)'चे इंडोनेशियामधील प्रसारकार्य

श्री. रेन्डी इकारांतियो
कुता, बाली येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना श्री. रेन्डी इकारांतियो

मार्गदर्शन ऐकतांना बाली येथील जिज्ञासू
१. विविध स्तरांवरील जिज्ञासू उपस्थित असणे
    'देनपासार, बाली येथे १५.८.२०१५ या दिवशी घेतलेल्या 'पूर्वजांचे लिंगदेह (आत्मे)' या विषयावरील जाहीर प्रवचनासाठी ६० नवीन आणि १ यापूर्वी आलेले असे एकूण ६१ जिज्ञासू उपस्थित होते. बाली येथील परिषद हिंदु धर्म, इंडोनेशिया या संस्थेचे प्रमुख श्री. इदा पेदंड सेबाली यांनी प्रार्थना करून या प्रवचनाचे उद्घाटन केले. त्यांनी 'स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)' ची थोडक्यात ओळख करून दिली आणि प्रवचनाचा विषय थोडक्यात सांगितला. सौ. दायू आणि बांगली गुरुकुलातील काही विद्यार्थी यांनी प्रवचनासाठीची सिद्धता करण्यासाठी, उदा. 'एस्.एस्.आर्.एफ्.'चा कापडी फलक लावणे, स्वागतकक्ष उभारणे आणि प्रसारसाहित्याचे छोटेसे प्रदर्शन लावणे, यांसाठी साहाय्य केले. तत्परता आणि संघटितपणा हेे गुण त्यांच्याकडून शिकण्यासारखे होते. या प्रवचनाला गृहिणी, शासकीय कर्मचारी, बाली येथील हिंदु पुरोहित, इतर सांप्रदायांचे भक्त (इस्कॉन, स्थानिक आश्रम इत्यादी), पोलीस अधिकारी, इंडोनेशियाचे अर्थशास्त्र उपमंत्री इत्यादी विविध स्तरांवरील जिज्ञासू आले होते.

बेळगाव येथे समाजकंटकांडून हजरत पीर सिकंदर दर्ग्याची विटंबना !

     बेळगाव, १४ नोव्हेंबर (वार्ता.) - काही समाजकंटकांनी १३ नोव्हेंबरच्या पहाटे ४ ते ५ या कालावधीत किल्ला येथे असलेल्या हजरत बद्रुद्दीन शहाबाबा दर्ग्याच्या उत्तरेला असलेल्या हजरत पीर सिकंदर दर्ग्याची विटंबना केली. या घटनेनंतर किल्ला परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले; मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेविषयी शहाबाबा दर्ग्याचे रफिक अहमद मुजावर यांनी तक्रार प्रविष्ट केली असून पोलिसांनी अज्ञातांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

धर्मविरोधी किंवा आक्षेपार्ह कमेंटचा समावेश अधिक

फेसबूकचा निष्कर्ष
फेसबूकवरच्या कमेंट रोखणारा भारत जगातील प्रथम क्रमांकाचा देश
धर्मनिरपेक्षतेचा डांगोरा पिटणार्‍यांना फेसबूकच्या या शोधाच्या संदर्भात काय म्हणायचे आहे ? 
    मुंबई - फेसबूकवरच्या कमेंट रोखण्यात भारत जगातील प्रथम क्रमांकाचा देश बनला आहे. फेसबूकच्या मते भारतात वर्ष २०१५ मध्ये एखादी कमेंट ब्लॉक करण्याचे प्रमाण ३ टक्क्यांनी वाढले आहे. फेसबूकच्या गव्हर्न्मेंट रिक्वेस्ट रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. भारतात ब्लॉक करण्यात आलेल्या कमेंट धर्मविरोधी किंवा आक्षेपार्ह आहेत. त्या माध्यमांतून भारतात अशांती पसरण्याचा धोका होता, असे फेसबूकने म्हटले आहे. फेसबूकच्या अहवालानुसार वर्ष २०१५ मध्ये जगभरात २० सहस्र ५६८ कमेंट ब्लॉक केल्या गेल्या. त्यात भारतातील कमेंटची संख्या १५ सहस्र १५५ इतकी होती.

५ सहस्रांहून अधिक प्रकरणांतील संवदेनशील माहिती द्या ! - भारताची फेसबूककडे मागणी

     नवी देहली - भारताने फेसबूककडे ५ सहस्र ११५ प्रकरणांतील संवदेनशील माहिती द्यावी, अशी मागणी केली आहे. ही माहिती ६ सहस्र २६८ फेसबूक खात्यांशी संबंधित आहे. फेसबूकने म्हटले आहे की, भारताच्या कायदा अंमलबजावणी संस्थांनी फेसबूकवरील माहिती १५ सहस्र १५५ प्रकरणांत काढून टाकण्यास सांगितली होती. त्यानुसार ती माहिती काढली आहे. किंबहुना ती आता कुणाला पहाता येणार नाही, अशीही व्यवस्था करण्यात आली आहे. वर्ष २०१४ मध्ये ५ सहस्र ८३२ प्रकरणांत फेसबूकवरील माहिती रोखण्यात आली होती. हे प्रमाण आता तिप्पट वाढले आहे.

कुख्यात गुंड दाऊद याला ब्रिटनमध्ये घेरण्याची सिद्धता

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी ब्रिटनला दिले दाऊदविरोधी सर्व पुरावे !
     नवी देहली - वर्ष १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार आणि भारतातील अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेला कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याला ब्रिटनमध्ये घेरण्याची सिद्धता भारत शासनाने केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ब्रिटन दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल दाऊदच्या विरोधातील सर्व पुराव्यांसह ब्रिटनमध्ये गेले आहेत.

भाग्यनगरमध्ये फटाक्यांमुळे ५० हून अधिक जणांच्या डोळ्यांना इजा

फटाक्यांचे दुष्परिणाम ! आणखी अशा किती घटना झाल्यावर शासन 
विनाशकारी आणि प्रदूषणकारी फटाक्यांवर बंदी आणणार आहे ? 
देहली आणि राजस्थान येथे फटाक्यांमुळे आग लागण्याच्या अनेक घटना
     नवी देहली, १४ नोव्हेंबर - देशभरात दिवाळी उत्साहात साजरी केली जात असतांना देहली, राजस्थान आणि भाग्यनगर (हैद्राबाद) येथे फटाक्यांमुळे आग लागणे आणि डोळ्यांना इजा होणे, यांसारख्या घटना घडल्या. ११ नोव्हेंबर या दिवशी देहलीत आगीसंबंधी २९०, तर राजस्थानमध्ये ४० हून अधिक घटनांची नोंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर भाग्यनगरमध्ये ५० हून अधिक लोकांना फटाक्यांमुळे डोळ्यांना इजा झाल्याच्या कारणाने रुग्णालयात उपचारासाठी प्रविष्ट व्हावे लागले.

बेळगाव येथे हिंदुत्ववादी संघटनांकडून शासनाच्या विरोधात निदर्शने !

मडिकेरी येथील लाठीमार घटनेचा हिंदुत्ववादी संघटनांकडून निषेध !
बेळगाव, १४ नोव्हेंबर (वार्ता.) - कर्नाटक राज्यात काँग्रेस शासनाने क्रूरकर्मा टिपू सुलतान याची जयंती साजरी करण्यासाठी दिलेल्या अनुमतीच्या विरोधात मडिकेरी येथे हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला होता. त्यावर पोलिसांनी लाठी आक्रमण आणि समाजकंटकांनी दगडफेक केली. त्यात तिघांचा मृत्यू झाला होता. या घटनेला सर्वस्वी काँग्रेस शासनच उत्तरदायी असल्याचा आरोप करून हिंदुत्ववादी संघटनांनी १३ नोव्हेंबर या दिवशी धर्मवीर संभाजी चौक येथे जोरदार निदर्शने करून शासनाचा निषेध केला. पोलिसांनी निदर्शने करणार्‍या कार्यकर्त्यांना कह्यात घेऊन नंतर त्यांची सुटका केली. (धर्मद्रोही काँग्रेस शासन आणि पोलीस प्रशासन यांच्या विरोधात संघटितपणे आंदोलन करणार्‍या सर्व हिंदुत्ववादी संघटनांचे अभिनंदन ! हिंदूंनो, न्याय मिळेपर्यंत असाच संघटितपणा लढा दिला पाहिजे. - संपादक)
या आंदोलनात विश्‍व हिंदु परिषदेचे जिल्हा संचालक सर्वश्री अच्युत कुलकर्णी, बजरंग दलाचे स्वरूप कालकुंद्रीकर, खासदार सुरेश अंगडी, आमदार संजय पाटील, अधिवक्ता अनिल बेनके, शंकरगौडा पाटील, विलास पवार, धनंजय जाधव, उज्ज्वला बडवाण्णाचे यांसह पदाधिकारी आणि धर्माभिमानी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१. धर्मवीर संभाजी चौक येथे हिंदुत्ववादी संघटनांनी दुपारी १२ वाजता मानवी साखळी करून रस्ता बंद आंदोलन केले. या वेळी शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहतूक दुसर्‍या मार्गाने वळविण्यात आली.

१ सहस्रांहून अधिक नायजेरियन लोकांची दिवा (ठाणे) येथे घुसखोरी

  • वाढत्या घुसखोरीला आळा घालण्यासाठी शासनाने तत्परतेने ठोस पावले उचलावीत, हीच जनतेची अपेक्षा !
  • नायजेरियन लोकांना हाकलण्यासाठी स्थानिकांचे प्रयत्न
ठाणे - एक सहस्रांहून अधिक नायजेरियन लोकांनी दिवा येथे घुसखोरी केली असून अमली पदार्थांचा व्यवसाय करण्यासाठी त्यांनी भाड्याने घरे घेतल्याचेही समजते. (इतक्या मोठ्या प्रमाणात घुसखोरी होईपर्यंत पोलीस आणि प्रशासन काय करत होते ? - संपादक) त्यांना हद्दपार करण्यासाठी संतप्त रहिवाशांनी पुढाकार घेतला असून याविषयी पोलीस उपायुक्त व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण यांना निवेदन देण्यात येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत नायजेरियन लोकांना थारा देण्यात येणार नाही, अशी चेतावणी रहिवाशांनी पोलिसांना दिली आहे.
१. प्रथम मीरा-भाईंदर येथे स्थायिक झालेले नायजेरियन नागरिक तेथे विरोध झाल्यावर दिवा-मुंब्रा या भागात पळून आले.
२. दिवसभर भेंडीबाजार, नरीमन पॉइंट, गेट वे ऑफ इंडिया या परिसरात अमली पदार्थांचा व्यवसाय करून ते रात्री घरी येतात. त्यांनी भाड्याने घरे घेतली आहेत. मुंब्रादेवी कॉलनी, डायघर, गणेशनगर, बी.आर्. नगर, साबेगाव, स्टेशन परिसर या परिसरात तर नायजेरियन नागरिक अवैधरित्या रहात आहेत.
पुणे येथे फटाक्यांच्या आतषबाजीतून ४ पटींनी अधिक वायुप्रदूषण आता कुठे आहेत तथाकथित पर्यावरणवादी ? मानवाच्या शरीरावर विपरीत परिणाम करणार्‍या अशा फटाक्यांवर शासनाने बंदी घालावी, ही अपेक्षा !
पुणे, १४ नोव्हेंबर - फटाकेमुक्त दिवाळी साजरी व्हावी, याकरिता अनेक स्वयंसेवी संस्था आणि संघटना यांच्याकडून आवाहन करण्यात आले. तरीही फटाक्यांपासून होणार्‍या प्रदूषणामध्ये वाढच नोंदवली जात आहे. केंद्र शासनाच्या सफर या संस्थेकडून हवेतील प्रदूषणाची पातळी त्यांच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार फटाक्यांच्या आतषबाजीतून झालेल्या विषारी धुरामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या निकषापेक्षा ४ पटींनी अधिक वायुप्रदूषण झाले आहे. त्याचबरोबर ध्वनीप्रदूषणातही मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे.

छगन भुजबळ यांच्या जमिनीवर सक्तवसुली संचालनालयाची जप्ती

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे चिरंजीव पंकज आणि पुतणे समीर हे संचालक असलेल्या हेक्स वर्ल्ड या आस्थापनाच्या १६० कोटींच्या खारघरस्थित जमिनीवर सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकार्‍यांनी १३ नोव्हेंबर या दिवशी जप्ती आणली.
देविशा इन्फ्रास्ट्रक्चर प्रवर्तक असलेल्या या जमिनीची किंमत सध्याच्या बाजारभावानुसार १६० कोटींच्या घरात आहे, असे ईडीच्या सूत्रांनी सांगितले आहे. ७१ कोटी रुपयांत खरेदी केलेल्या या जमिनीवर हेक्स वर्ल्डचा गृहप्रकल्प उभारण्यात येणार होता. यासाठी पैैसा कसा आला, याचा छडा लावण्यात आला असून मुंबई आणि इतर ठिकाणीही लवकरच अशा प्रकारची जप्तीची कारवाई होण्याची शक्यता आहे, असे या अधिकार्‍यांनी सांगितले.

राज्य परिवहन आगारातील कचरा आणि फटाके यांच्यामुळे दोन बस जळून खाक

आगारप्रमुखांचा निष्काळजीपणा !
    यवतमाळ - येथील आगारातील कचर्‍याच्या ढिगार्‍यावर उभ्या असलेल्या दोन बसेस फटाक्यांच्या आगीने जळून खाक झाल्या. रात्री फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे या कचर्‍याच्या ढिगार्‍याला आग लागली. त्यात परिवर्तन आणि सेमी लक्झरी बस जळून गेल्या. या आगारात असलेल्या कचर्‍याच्या ढिगार्‍यांमुळे आगीच्या घटना घडू शकतात, त्यामुळे हे ढिगारे लवकरात लवकर काढण्याची पूर्वसूचना आगार प्रमुखांना देण्यात आली होती. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. (आगारप्रमुखांच्या निष्काळजीपणामुळे झालेले नुकसान त्यांच्याकडूनच भरून काढावे. असे केल्यासच एसटी आगरातील कामे वेळेत न करण्याचे धाडस कोणी करणार नाही. - संपादक)

धुळे येथे हिंदु जनजागृती समितीच्या तक्रारीनंतर देवतांच्या चित्रांचे फटाके विकणार्‍यावर कारवाई

राष्ट्र आणि धर्मरक्षणासाठी सतर्क अन् तत्पर असणार्‍या हिंदु जनजागृती समितीचे अभिनंदन !
    धुळे - येथे हिंदु जनजागृती समितीने देवतांच्या चित्रांच्या फटाक्यांची विक्री होऊ नये, यासाठी पत्रकार परिषद घेणे, निवेदन देणे इत्यादी माध्यमांतून जनजागृती केली होती; मात्र समितीच्या कार्यकर्त्यांनी अन्य संघटनांच्या कार्यकर्त्यांसह प्रत्यक्ष पाहणी केल्यावर येथील एका दुकानात देवतांची चित्रे असलेले फटाके विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे लक्षात आले. याविषयी समितीच्या तक्रारीनंतर दुकान मालकावर कारवाई करण्यात आली.
१. धुळे येथे लक्ष्मीपूजनच्या दिवशी योग वेदांत सेवा समितीचे डॉ. योगेश पाटील, स्वदेशी जागरण मंचचे श्री. विलास राजपूत, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पंकज बागुल यांना एका दुकानात लक्ष्मीदेवीचे चित्र असलेले फटाके आढळले.
२. हा प्रकार त्यांनी धुळे उप-जिल्हाधिकारी श्री. तुकाराम हुलवळे यांच्या लक्षात आणून दिला. लहान मुलाच्या माध्यमातून फटाक्यांची खरेदी करून ते पोलीस अधिकारी श्री. अनिल वडनेरे यांना दाखवून या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याची तक्रारीद्वारे विनंती करण्यात आली. श्री. वडनेरे यांनी सांगितले की, उप-जिल्हाधिकार्‍यांनी सांगितल्यावर आम्ही गोपनीय शाखेला कळवले आहे.

स्मार्ट पुण्यासाठी ब्रिटनचे सहकार्य ! - ब्रिटनचे पंतप्रधान कॅमेरून

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ब्रिटन दौरा
पुणे, १४ नोव्हेंबर - स्मार्ट सिटी प्रकल्पामुळे भारताचा कायापालट होऊन विकासाला गती मिळेल. या प्रकल्पात पुणे, इंदूर आणि आंध्र प्रदेशची नवीन राजधानी अमरावती या तीन शहरांना ब्रिटनकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. ब्रिटिश आस्थापने यासाठी साहाय्य करतील, असे आश्‍वासन ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी दिले आहे. यामुळे केंद्रशासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पातील पहिल्या २० शहरांच्या यादीत पुण्याचा समावेश निश्‍चित मानला जात आहे.
ब्रिटनच्या दौर्‍यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्यातील चर्चेनंतर १२ ऑक्टोबर या दिवशी संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्या वेळी ते बोलत होते.

मुंब्रा येथे गोप्रेमी चेतन शर्मा यांनी घातलेल्या धाडीत ५० ते ६० गायी आणि बैल यांची कातडी कह्यात

जमिनीवरील कातड्याची पाहणी करतांना गोप्रेमी आणि पोलीस
ठाणे - गोप्रेमी श्री. चेतन शर्मा यांनी शीळ-डायघर पोलीस ठाण्याच्या पोलिसांसह नुकतीच मुंब्रा येथील गोदामावर धाड घातली. या वेळी सुमारे ५० ते ६० गायी आणि बैल यांची कातडी कह्यात घेण्यात आली. धर्मांध अशरफ कुरेशी याला या वेळी अटक करण्यात आली आणि त्याच्या विरुद्ध प्रथम माहिती अहवाल नोंद करण्यात आला. अशरफ कुरेशी याने दिलेल्या माहितीनुसार राजु लंका याच्याविरुद्धही तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांसह डॉ. झुंजारे यांनाही या धाडीविषयी श्री. चेतन शर्मा यांनी पूर्वकल्पना दिल्यामुळे तेसुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.


मुंबई विद्यापिठात सिनेट नसल्याने बृहत् आराखड्याची अजूनपर्यंत घोषणा नाही !

प्रतीवर्षी विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी करणार्‍या संबंधितांना याविषयी खडसवायलाच हवे !
     मुंबई - नवीन महाविद्यालय, तुकड्या आणि अभ्यासक्रम यांसाठी विद्यापिठाकडून ऑक्टोबरमध्ये जाहीर होणारा बृहत् आराखडा नोव्हेंबर मास उजाडूनही घोषित करण्यात आलेला नाही. पुढील प्रक्रियेसाठी ३-४ मासांचा कालावधी गेल्यास यावर्षीही नवी महाविद्यालये, तुकड्या आणि अभ्यासक्रम यांना मान्यता कशी मिळणार, असा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. मान्यतेसाठी सिनेट नसल्यामुळे प्रतीवर्षीप्रमाणे पुन्हा एकदा सहस्रो विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पुष्कळ प्रयत्न करावे लागणार आहेत. 

लोणंद ते पंढरपूर हा रेल्वेमार्ग १०८ वर्षांपासून अपूर्ण

इतकी वर्षे रेल्वे प्रकल्प अपूर्ण रहाणे, हे शासनाला लज्जास्पद !
     सोलापूर, १४ नोव्हेंबर - वर्ष १९१८ मध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीश शासनाने संमत केलेला लोणंद ते पंढरपूर हा रेल्वेमार्ग १०८ वर्षानंतरही पूर्ण होऊ शकला नाही. वर्षानुवर्षे रखडलेला देशातील हा एकमेव मार्ग असून तो निकाली काढण्यात रेल्वे प्रशासन अपयशी ठरल्याचे दिसते. केंद्रशासनाच्या रेल्वे अर्थसंकल्पात या लोहमार्गासाठी कोणत्याच प्रकारचा निधी मिळालेला नाही. मागील ५ वर्षांत तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना याविषयी किमान १० वेळा निवेदन दिले; परंतु काहीच प्रक्रिया होत नसल्यामुळे नागरिकांचा भ्रमनिरास झाला आहे. (याविषयी शरद पवार उत्तर देतील का ? - संपादक) तसेच तत्कालीन रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खर्गे आणि जनार्दन त्रिवेदी यांच्याकडेही पाठपुरावा केला; परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. (असा होता काँग्रेस शासनाचा भोंगळ कारभार ! - संपादक)

१०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नापतोल शॉपिंग आस्थापनातील दोघांना अटक

फसवणूक केलेला सर्व पैसा आस्थापनातील संबंधितांकडून वसूल करण्यात यावा ! 
नवी मुंबईच्या सायबर सेलची कारवाई
     नवी मुंबई - नापतोल या शॉपिंग आस्थापनाने ग्राहकांची १०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आस्थापनातील दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यात विशेष कार्यकारी अधिकार्‍याचाही (सीईओचा) समावेश आहे. नवी मुंबईच्या सायबर सेलने ही कारवाई केली आहे. आस्थापनाने स्वतःचा डेटा अन्य आस्थापनांना विकल्याने इतक्या मोठ्या प्रमाणात हानी झाल्याचे समजते.

बेळगाव येथे अद्यापही तणावाचे वातावरण !

बेळगाव, १४ नोव्हेंबर (वार्ता.) - मडिकेरी येथे झालेल्या दंगलीनंतर हिंदुत्ववादी संघटनांनी घोषित केलेला राज्यव्यापी बंद दिवाळी सणामुळे मागे घेण्यात आला होता; मात्र बंदविषयी संभ्रमावस्था निर्माण झाल्याने शहरात तणावाचे वातावरण पसरले होते.

जळगाव येथे हिंदुत्ववाद्यांच्या सतर्कतेमुळे लक्ष्मीदेवीची चित्रे असलेले फटाके शासनाधीन

हिंदूंनो, अशी सतर्कता प्रत्येकच आघाताच्या वेळी दाखवा !
जळगाव, १४ नोव्हेंबर (वार्ता.) - येथील शीफा होलसेल फटाक्यांच्या दुकानातून लक्ष्मीदेवीचे चित्र असलेल्या फटाक्यांची विक्री होत असल्याचे लक्षात आल्यावर हिंदुत्ववाद्यांनी याविषयी पोलिसांना कल्पना दिली. त्यानंतर गोपनीय शाखेच्या पोलिसांनी ते फटाके शासनाधीन केले आहेत. या वेळी शिवसेनेचे श्री. मोहन तिवारी, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री आशिष गंगवे, प्रणव नागाने, गौरव तांबट, मयुर भदाणे उपस्थित होते.

पंतप्रधानांविषयीच्या अपमानास्पद वक्तव्याचे ध्वनीचित्रीकरण पोलीस निरीक्षकाने व्हॉटस् अपवर पाठवले

   मालेगाव (जिल्हा वाशिम) - मालेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के.आय्.मिर्झा यांनी १२ नोव्हेंबर या दिवशी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या विषयी अपमानास्पद वक्तव्याचे ध्वनीचित्रीकरण (व्हिडीओ) व्हॉटस् अपवर अन्य गटांना पाठवले. याविषयी भाजपच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक तथा पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रार करून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. (कायद्याच्या रक्षकांकडून अशी कृती अपेक्षित नाही ! - संपादक)
भाजपचे तालुका सरचिटणीस मोहन बळी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधून सदर वादग्रस्त ध्वनीचित्रण निदर्शनास आणून दिले. यावर पोलीस उपविभागीय अधिकारी मेघराजन यांनी त्याची तात्काळ नोंद घेणार असल्याचे आश्‍वासन बळी यांना दिले. हे ध्वनीचित्रीकरण पालकमंत्री, खासदार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनाही पाठवण्यात आले आहे.

लोहगाव (पुणे) विमानतळावर २७ लक्ष रुपये किंमतीची सोन्याची बिस्किटे शासनाधीन

सोन्याच्या या वाढत्या तस्करीला शासनाने आळा घालणे अपेक्षित आहे !
     पुणे, १४ नोव्हेंबर - येथील लोहगाव विमानतळावर एक युवक जेट एअरवेजच्या विमानाने गुदद्वारामध्ये सोने लपवून आणणार असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार ११ नोव्हेंबर या दिवशी पहाटे ४.३० वाजता एका युवकाला अटक करण्यात आली. हा युवक केरळ येथील असून त्याची क्ष-किरणांद्वारे पडताळणी केल्यावर ही गोष्ट उघड झाली. त्याने ही सोन्याची बिस्किटे गुदद्वारामध्ये लपवून आणली होती. त्याची किंमत २७ लक्ष ८४ सहस्र रुपये असून ती सव्वा किलो वजनाची आहेत. लोहगाव विमानतळावर अशा प्रकारे सोने शासनाधीन करण्याची गेल्या काही दिवसांतील ही तिसरी घटना आहे.

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी सूचना पाठवण्याचे जनतेला आवाहन

     मुंबई - केंद्र शासनाच्या वतीने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्याचे काम चालू आहे. त्यानुसार केंद्र सरकारने १४ शैक्षणिक प्रकारांवर आधारित विविध प्रश्‍नांवर गाव, तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर चर्चा घडवून ऑनलाइन अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्य शासनाला दिले होते. त्यानुसार वेगवेगळे प्रस्ताव राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले आहेत. यावर नागरिकांकडून २३ नोव्हेंबरपर्यंत सूचना, अभिप्राय आणि शिफारशी मागवण्यात आल्या आहेत. या सूचना विभागाच्या संगणकीय पत्त्यावर मराठी किंवा इंग्रजी भाषेत पाठवाव्यात.

पुणे विभागातील ४१ अनुदानित महाविद्यालये विनाप्राचार्य

महाविद्यालयांना मुख्याध्यापक जर नसतील, तर तेथे विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या शिक्षणाची 
गुणवत्ता आणि कारभार कसा चालत असेल, याचा विचारच न केलेला बरा ! - संपादक
     पुणे, १४ नोव्हेंबर - पुणे विभागातील १६७ अनुदानित महाविद्यालयांपैकी ४१ महाविद्यालये ही विनाप्राचार्य असल्याचे समोर आले आहे. विभागीय उच्च शिक्षण संचालक डॉ. विजय नारखेडे यांनी पुणे विद्यापीठ आणि संबंधित महाविद्यालये यांना प्राचार्यांची पदे भरण्याविषयी पत्रव्यवहार केला आहे. त्यामध्ये राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेचा संदर्भही देण्यात आला आहे. त्याचबरोबर विद्यापीठाने आवश्यक ती कारवाई झाली नसल्याचा आणि पूर्णवेळ प्राचार्य नसल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचाही शेरा देण्यात आला आहे. याविषयी १८ नोव्हेंबरपर्यंत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल देण्याचे निर्देश त्या पत्रातून देण्यात आले आहेत.

मुंबई विद्यापिठाचे विद्यमान कुलगुरू एल्एल्बीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण

परीक्षेत स्वतःच अनुत्तीर्ण होणारे कुलगुरू विद्यापिठातील विद्यार्थ्यांचे भवितव्य काय घडवणार ?
मुंबई - मुंबई विद्यापिठाचे विद्यमान कुलगुरू डॉ. संजय देशमुख एल्एल्बीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. यामुळे मुंबई विद्यापिठाची नाचक्की झाली असून आता राज्यपालांनीच यासंदर्भात निर्णय घ्यावा, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. अनिल गलगली यांनी राज्यपालांकडे पत्र लिहून केली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी विद्यापिठाच्या परीक्षा, नाव नोंदणी विभागाकडे कुलगुरू यांनी दिलेल्या एल्एल्बीच्या परीक्षेची सविस्तर माहिती मागितली होती. त्यातून हे उघड झाले.

पाकमधील हिंदु जनतेचा आक्रोश भारतीय राज्यकर्त्यांना कधी ऐकू येईल ?

फलक प्रसिद्धीकरता
     पाकिस्तानच्या सिंध प्रांतात पाकिस्तानी सैन्य मानवाधिकारांचे उल्लंघन करत असून तेथील हिंदु जनता ही पाक सैन्याच्या असहिष्णुतेचे बळी ठरत आहे, अशी तक्रार अमेरिकेतील सिंधी संघटनेने अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्याकडे केली आहे. 

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Pak ke Sindhme Pak senaka Hinduonpar Atyachar - Americake Sindhi Sangathanka dava
Kya kabhi Bharatme alpasankhyankopar aise atyachar honeka vrutta suna hai ?
जागो ! 
पाक के सिंध में पाक सेना का हिन्दुआेंपर अत्याचार - अमेरिका के सिंधी संगठनका दावा
क्या कभी भारत में अल्पसंख्यंकोपर ऐसे अत्याचार होने का वृत्त सुना है ?

आपल्या सात्त्विक बालकांनी दिवसभरातील प्रत्येक कृती आवडीने करावी, यासाठी त्यांच्यावर श्रद्धा जोपासणारे उत्तम संस्कार करणार्यां सनातनमधील कुशल साधिका-माता !

   काही पालक आपल्या मुलांना एखादी गोष्ट करण्यास आवडत नसेल अथवा त्यांना शिस्त लागावी, यासाठी त्यांना शिक्षा करतात, काही वेळा मारतातही. मुलांना शिस्त लागण्यासाठी असे करणे हे एका टप्प्यापर्यंतच योग्य असून साम, दाम, दंड आणि भेद या चतुःसूत्रीनुसार पालकांनी आरंभी आपल्या मुलांना समजावून सांगणे अधिक आवश्यक आहे.
     मुलांना एखादी गोष्ट करण्यास आवडत नसेल, तर ती आवडण्यासाठी प्रयत्न करणे, तिचे महत्त्व समजूून सांगणे, तसेच त्या कृतीची गोडी लागण्यासाठी ती कशा प्रकारे समजावून सांगायला हवी, याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. हे करतांनाच त्यांच्यावर आध्यात्मिक संस्कार करणे हेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे ठरते. जर संस्कारांना अध्यात्माचा पाया नसेल, तर ते मानसिक स्तरावरच रहातात. यासाठी मुलांना आध्यात्मिक स्तरावर हाताळले पाहिजे.
    अशाच प्रयत्नांचा एक भाग म्हणून नांदेड येथील सौ. शुभांगी शेळके यांनी त्यांच्या मुलीला कु. राधाला (वय ६ वर्षे) स्वतःच एक कविता करून नावडीच्या कृती करण्याची आवड निर्माण केली. त्याचप्रमाणे डोंबिवली येथील सौ. आर्या लोटलीकर यांनी त्यांच्या मुलीला कु. पूर्तीला काही प्रसंगांत आध्यात्मिक स्तरावरील दृष्टीकोन कसे दिले, हे या लेखातून लक्षात येईल.

जर्मनीचा विद्वान मॅक्समुलर यानेही जीवनाच्या अंतिम क्षणी भारताचे पर्यायाने हिंदु धर्माचे श्रेष्ठत्त्व मान्य करणे

आज १५ नोव्हेंबर अर्थात जागतिक तत्त्वज्ञानदिनाच्या निमित्ताने...
     आजही विश्‍वातील अनेक देशांच्या (पौर्वात्य) न्यायव्यवस्थेचा आधार मनुस्मृतीच आहे. विश्‍वातील सर्वश्रेष्ठ आणि निर्दोष व्याकरण ग्रंथ अष्टाध्यायीचे लेखक भारतीय आहेत. संपूर्ण भारताला ख्रिस्ती करण्याच्या उद्देशाने वेदांचा अभ्यास करणारा जर्मन विद्वान मॅक्समुलरलाही जीवनाच्या अंतिम क्षणी असे म्हणणे भाग पडले की, मला जर विचारले की, मानवाने आपले मुख्य गुण आणि शक्ती यांचा विकास, तसेच जीवनाच्या महत्त्वाच्या समस्यांवर सखोल विचार करून समाधानकारक उत्तरे कोणत्या ठिकाणी शोधली, तर ती भारतामध्येच, असे मी सांगेन.

भारताकडे पाकिस्तानपेक्षा अल्प अण्वस्त्रे ! - अमेरिकेतील विचारवंतांच्या एका गटाचा दावा

युद्धसज्ज पाकला सामोरे जाण्यासाठी भारताने काय सिद्धता केली आहे ?
      भारताकडे वर्ष २०१४ मध्ये ११० ते १७५ अण्वस्त्रे बनवण्यास उपयुक्त प्लुटोनियम होते, असे अमेरिकेतील विचारवंतांच्या एका गटाने (थिंक टँकने) म्हटले आहे. या दाव्यानुसार भारताकडे पाकिस्तानपेक्षा खूपच अल्प अण्वस्त्रे आहेत.

हिंदूंवर अत्याचार करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांना बढती ?

     मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी अटक करण्यात आलेल्या साध्वी प्रज्ञासिंह आणि अन्य हिंदुत्ववादी यांंच्यावर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने आरोपपत्र प्रविष्ट केलेले नाही. त्यांना अटक करून ४ वर्षे लोटली, तरी आरोपपत्र प्रविष्ट करता आले नाही. अटकेच्या कालावधीत साध्वी प्रज्ञासिंह यांना अर्वाच्च शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. त्यांना अश्‍लील चित्रफिती दाखवण्यात आल्या.

वैज्ञानिक आणि वैदिक दृष्टीकोनातील भेद, ऋषिऋण आणि काही संशोधकांची खेदजनक सद्यस्थिती !

अश्‍वमेधयाजी
प.पू. नाना काळेगुरुजी
       वर्ष २०१६ मध्ये भारतात विपुल सुवृष्टी व्हावी आणि आपत्काळ निवारण व्हावे, यासाठी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील श्री योगीराज वेद विज्ञान आश्रमाच्या वतीने अश्‍वमेधयाजी प.पू. नाना काळेगुरुजी यांच्या चैतन्यमय मार्गदर्शनाखाली सौमिक सुवृष्टी योजनेत २५ सोमयागांचे नियोजन केले आहे. प.पू. नाना काळेगुरुजी यांनी आजपर्यंत शेकडो सोमयाग, पर्जन्ययाग आदी वैदिक शास्त्रात सांगितलेले विविध यज्ञ केले आहेत. पर्जन्यवृष्टीसाठी वैदिक यज्ञविधींचे उपाय हेच खात्रीलायक आहेत. वर्ष २००६ मध्ये त्यांनी सोमयागाचा पावसावर होणार्‍या परिणामांच्या संदर्भात वैज्ञानिक पद्धतीने संशोधन केले. त्यातील निष्कर्ष अभूतपूर्व होते. आधुनिक वैज्ञानिकांसाठी ते निष्कर्ष आश्‍चर्यकारक होते. ते निष्कर्ष त्यांनी सौमिक सुवृष्टी योजना या नावाने ग्रंथरूपात प्रसिद्ध केले आहेत. हा ग्रंथ इंडियन इन्स्टिट्युट ऑफ ट्रॉपिकल मिटिओरोलॉजीने (आय.आय.टी.एम्.) या संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध केला आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर माहिती जाणून घेण्यासाठी दैनिक सनातन प्रभातच्या प्रतिनिधीने प.पू. नाना काळेगुरुजी यांची भेट घेतली. या वेळी प.पू. काळेगुरुजी यांनी वैज्ञानिक आणि वैदिक दृष्टीकोनातील भेद, ऋषिऋण आणि काही संशोधकांची खेदजनक सद्यस्थिती यांविषयी दिलेली माहिती येथे देत आहोत.

ही आहे वृत्तवाहिन्यांची (अ)विश्‍वासार्हता !

बिहार निवडणुकीविषयी वृत्तवाहिन्यांनी वर्तवलेला अंदाज (एक्झिट पोल) १०० टक्के चुकला !
     बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (रालोआला) २४३ पैकी १२० जागा, तर राजद-जनता दल महाआघाडीला ११५ मिळतील, असा अंदाज (एक्झिट पोल) बहुतांश वृत्तवाहिन्यांनी निवडणूक निकालापूर्वी वर्तवला होता; मात्र प्रत्यक्षात जनता दल महाआघाडीने १७८ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले,

हज यात्रेला ८२६ कोटींचे अनुदान देणारे शासन हिंदूंच्या सणांच्या कालावधीत भाडेवाढ करते, ही शासनाची हिंदूंना दिवाळी भेट !

      दिवाळीच्या तोंडावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एस्टीने) हंगामी भाडेवाढ घोषित केली आहे. ४ नोव्हेंबरपासून १० टक्के भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून लागू होणारी ही भाडेवाढ २५ नोव्हेंबरपर्यंत म्हणजे २० दिवसांसाठी असेल.

महाराष्ट्रातील परळी येथील सुप्रसिद्ध ज्योतिर्लिंग वैजनाथ येथे दीपावलीच्या मुहुर्तावर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी महाभिषेक !

असा विचार आणि त्या संदर्भातील कृती एकतरी राजकारणी करू शकतो का ?
     परळी, १४ नोव्हेंबर (वार्ता.) - अखिल मानवजातीचे जीवन आनंदी व्हावे, यासाठी असणार्‍या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील सर्व विघ्ने दूर व्हावीत, यासाठी महाराष्ट्रातील परळी येथील सुप्रसिद्ध ज्योतिर्लिंग वैजनाथ येथे महादेवाच्या पिंडीवर दीपावलीतील नरकचतुर्दशीच्या शुभदिनी महाभिषेक करण्यात आला. हा महाभिषेक अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या पू. (सौ.) अंजली गाडगीळ, सनातन संस्थेचे आंबेजोगाई येथील साधक श्री. बाळासाहेब (धनंजय) केंद्रे आणि सौ. योगिता केंद्रे, परळी येथील श्री. प्रदीपकुमार आणि सौ. संध्या जयस्वाल यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी अन्य साधकही उपस्थित होते. हा महाभिषेक अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला.

दगडफेक होऊ नये; म्हणून धर्मांधांच्या घरांची आधीच पडताळणी करून दगड नाहीत ना याची काळजी घेतली असती, पोलीस दगडफेकीत जखमी झाले नसते !

     लातूर येथील एका अपहरण प्रकरणातील मुलीच्या शोधासाठी आलेल्या पोलीस पथकावर गोंदी ते वडीगोद्री रस्त्यावर दगडफेक केल्याची घटना २ नोव्हेंबर २०१५ या दिवशी घडली.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

हिंदूंनो, सावधान ! थडग्यातील 'टिपू सुलतान' जिवंत केला जातोय !

श्री. चेतन राजहंस
कर्नाटकमध्ये काँग्रेस शासनाने टिपू सुलतानाची शासकीय जयंती साजरी केल्याने सध्या तेथे हिंदु धर्मियांमध्ये रोष उत्पन्न झाला आहे. हिंदूंची असंख्य मंदिरे उद्ध्वस्त करणार्या क्रूरकर्मा टिपू सुलतानाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणारे हिंदुद्वेषी अभिनेते गिरीश कर्नाड यांना क्षमायाचनाही करावी लागली आहे. टिपू सुलतानचे उदात्तीकरण करणारी ही घटना नवीन नाही. यापूर्वीही दूरदर्शन या शासकीय दूरचित्रवाहिनीवर 'द सोर्ड ऑफ टिपू सुलतान' ही मालिका चालवली होती. ४ वर्षांपूर्वी अकोला महानगरपालिकेतील मुसलमान उपमहापौराने पालिका सभागृहाला टिपू सुलतान हे नाव देण्याचा घाट घातला होता, तेव्हा टिपू सुलतानच्या उदात्तीकरणाचा परामर्श घेण्यासाठी सनातनचे साधक श्री. चेतन राजहंस यांनी सनातन प्रभातमध्ये लिहिलेला लेख आजच्या परिस्थितीलाही तंतोतंत प्रमाणात लागू पडतो; म्हणूनच तो वाचकांसाठी पुन्हा प्रकाशित करत आहोत.

हिंदूंना धार्मिक विधींपासून दूर नेण्यासाठी पुरोहितांवर धमक्यांच्या पत्रांद्वारे अश्‍लाघ्य टीका !

      नाशिक येथील त्र्यंबकेश्‍वर ट्रस्टच्या विश्‍वस्तांना ऑगस्ट २०१५ मध्ये धमक्यांची पत्रे आली. या पत्रांत म्हटले आहे की, मंदिरात भ्रमणभाष वापरण्यासाठी ब्राह्मणांना अनुमती दिली आहे का ? ते भाविकांकडून सहस्रो रुपयांची दक्षिणा घेतात. ब्राह्मणांची येथे सतत ऊठबस होत असल्याने मंत्र पूर्ण होत नाहीत.

हिंदु धर्माचे प्रवक्ते बनू इच्छिणार्‍यांसाठी मार्गदर्शक सूत्रे

(परात्पर गुरु) डॉ. आठवले
१. आगामी काळातील हिंदु धर्माच्या प्रवक्त्यांची आवश्यकता !
     पुढील ३ वर्षे मानसिक आणि वैचारिक (बौद्धिक) स्तरावरील संघर्ष तीव्र होणार आहे. अशा काळात हिंदु धर्माचे वैचारिक संरक्षण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात हिंदु धर्माचे प्रवक्ते लागणार आहेत.
२. दूरचित्रवाहिन्यांवरील चर्चासत्रांमध्ये
 सहभागी झाल्याने होणारे लाभ !
अ. हिंदु धर्माची आणि सत्याची बाजू मांडता येते. त्यातून व्यापक प्रमाणात धर्मजागृती होते.

सनातनविषयी समाजात निर्माण झालेला विश्‍वास आणि धर्मप्रेमींनी सनातनला दिलेला खंबीर पाठिंबा !

पू. (कु.) स्वाती खाडये
सनातनवर नाहक टीका करून तिची 
अपकीर्ती करणारे हे जाणतील का ?
१. हिंदु धर्म आणि सनातन यांच्यावर टीका करणार्‍या 
एका व्यावसायिकाला अन्य संघटनेच्या एका पदाधिकार्‍याने 
रोखणे अन् त्याला दिलेले कंत्राटही रहित करणे !
     एका शहरातील एका दुकानात सनातन प्रभातचा अंक चालू आहे. अंक देण्यासाठी सनातनचे एक साधक तेथे गेले होते. त्याच वेळी त्या दुकानात एका संघटनेचे अध्यक्ष आणि त्यांचे सहकारी दुकान मालकाकडे व्यावसायिक कामासाठी आले होते. या वेळी त्यांच्याशी चर्चा करतांना दुकानमालकाने गोहत्याबंदी कशी चुकीची आहे, याविषयी मत व्यक्त केले.

व्यापक धर्मप्रसार करणारे 'सनातन अॅरन्ड्रॉईड पंचांग !'

श्री. अनित पिंपळे
गेल्या ९ वर्षांपासून हिंदु समाजाला धर्माचरण आणि राष्ट्ररक्षण यांची शिकवण देणारे सनातन पंचांग दिनदर्शिकेच्या स्वरूपात ८ भाषांत प्रसिद्ध होत आहे. भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु प.पू. डॉक्टर यांच्या कृपाशीर्वादाने या पंचांगांना समाजातून प्रतिवर्षी वाढता प्रतिसाद लाभत आहे. यातून प्रेरणा घेत २०१३ या वर्षी अॅचन्ड्रॉईड प्रणाली असलेल्या भ्रमणभाषवर (मोबाईल) हे पंचांग उपलब्ध करण्याचा प्रथम प्रयत्न केला होता. यंदाच्या तिसर्या वर्षीही त्याला वाचकांचा उत्साहवर्धक प्रतिसाद लाभला आहे.
प्रतिसादाचा उंचावलेला आलेख !
    वर्ष २०१३ मध्ये ३ भाषांतील आणि २०१४ मध्ये ८ भाषांतील आवृत्त्या प्रसिद्ध करण्यात आल्या. यंदा २०१५ मध्ये  मराठी, हिंदी, कन्नड, तेलुगु, इंग्रजी, तमिळ, गुजराती आणि ओरीया या ८ भाषांत अॅन्ड्रॉईड पंचांग प्रसिद्ध करण्यात आले आहे. २०१३ या वर्षी सर्व आवृत्त्या मिळून एकूण १ लक्षच्या आसपास, तर २०१४ मध्ये साधारण ६ लक्षच्या आसपास पंचांग डाऊनलोड झाले. १० नोव्हेंबर २०१५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार या वर्षीची एकूण डाऊनलोडची संख्या ८ लक्ष २८ सहस्रांहून अधिक झाली आहे. १७० हून अधिक देशांतील हिंदूंनी या अॅन्ड्रॉईड पंचांगचा लाभ घेतला.

यज्ञाच्या संदर्भात असा विचार आणि त्या संदर्भातील कृती एकतरी राजकारणी करू शकतो का ?

     वर्ष २०१६ मध्ये भारतात विपुल वृष्टी आणि आपत्काळ निवारण व्हावे, यासाठी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील श्री योगीराज वेद विज्ञान आश्रमाच्या वतीने अश्‍वमेधयाजी प.पू. नाना काळेगुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली सौमिक सुवृष्टी योजनेत २५ सोमयागांचे नियोजन करण्यात आले आहे.

टपालापेक्षा संथ गतीच्या सुनावणीसाठीची न्यायव्यवस्था !

      हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी मुख्य न्यायदंडाधिकारी श्री. डांगे यांना अर्ज सादर केला. त्यात त्यांनी मागणी केली की, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित म्हणून अटक केलेले सनातन संस्थेचे साधक श्री. समीर गायकवाड यांना पानसरे हत्या प्रकरणातील ३ महत्त्वाची सूत्रे सांगावयाची आहेत. ती गोपनीय असून रेकॉर्डवर यावीत,

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील विघ्ने दूर होण्यासाठी करणार असलेला उच्छिष्ट गणपति यज्ञ आलेल्या अडचणींमुळे रहित करावा लागणे, हे आपत्काळ आल्याचे द्योतक !

पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ
     तमिळनाडू राज्यातील तंजावर येथील प.पू. रामभाऊस्वामी हे थोर योगी आहेत. ते समर्थ रामदासस्वामी यांच्या परंपरेतील आहेत. ते हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील विघ्ने दूर होण्यासाठी १४, १५ आणि १६ नोव्हेंबर २०१५ हे ३ दिवस उच्छिष्ट गणपति यज्ञ करणार होते; पण ८ नोव्हेंबर २०१५ या दिवशी त्यांचा निरोप आला की, काही अडचणींमुळे हा यज्ञ आता करू शकत नाही. तो डिसेंबर किंवा जानेवारी मासात करू.
      यज्ञ ठरवला असतांना आणि यज्ञाला ६ दिवसच शिल्लक असतांना तो रहित करावा लागणे, असे प्रथमच घडले. आतापर्यंत पुष्कळ यज्ञ झालेले आहेत; पण असे कधीच घडले नव्हते, असे त्यांनी सांगितले. यज्ञ रहित करावा लागण्यासाठीची कारणे बघितली, तर कोणाच्याही लक्षात येईल की, या सत्कार्यात आलेली ती विघ्ने आहेत.

हिंदी आणि इंग्रजी मासिक सनातन प्रभात आता होणार पाक्षिक !

     राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची संख्या वाढत असल्याने सध्या या आघातांची वृत्ते येण्याचा ओघ प्रचंड आहे. हिंदु राष्ट्र निर्मितीला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्र आणि धर्म यासंदर्भात स्फूर्तीदायक प्रसंग घडतांना दिसत आहेत. या सर्व गोष्टींविषयी हिंदूंना अवगत करणे आवश्यक आहे. यासाठीच हिंदी आणि इंग्रजी मासिक पाक्षिक स्वरूपात करत आहोत. हिंदी आणि इंग्रजी पाक्षिक प्रारंभ होण्याचे वर्ष आणि अंक क्रमांक पुढे दिले आहेत. याची वाचकांनी नोंद घ्यावी आणि कृपया वाढीव मूल्य भरून सहकार्य करावे.
हिंदी पाक्षिक 
वर्ष १७ अंक क्र. १ (१ जानेवारी ते १५ जानेवारी २०१६) १६ पानी, मूल्य : ८ रुपये, वार्षिक वर्गणी : १८० रुपये
इंग्रजी पाक्षिक 
वर्ष १० अंक क्र. १० (१ जानेवारी ते १५ जानेवारी २०१६) १२ पानी, मूल्य : ८ रुपये,  वार्षिक वर्गणी : १८० रुपये

सनातन संस्थेविषयी अपप्रचार करणार्‍यांपासून सावध रहा !

     आंध्रप्रदेश येथील एका कार्यकर्त्याने पूर्णवेळ धर्मकार्य करण्याची इच्छा व्यक्त करून सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात काही दिवस वास्तव्य केले. आश्रमातून घरी गेल्यानंतर त्याने सनातन संस्थेविषयी खालीलप्रमाणे अपप्रचार चालू केला.
१. सनातन आश्रमात साधक चहा पितात, शेंडी ठेवत नाहीत; मग या लोकांना धर्मकार्य करण्याचा अधिकार काय ?, असा विकल्प ते पसरवत आहेत.
स्पष्टीकरण : सनातन संस्था सांगत असलेली साधना सांप्रदायिक नाही. त्यामुळे शेंडी ठेवावी आणि चहा पिऊ नये, हे संस्थेला मान्य असले, तरी त्याविषयी संस्था कोणावरही बळजोरी करत नाही.

टिपू सुलतानचे हिंदूंवरील कल्पनातीत भीषण अत्याचार

१. टिपू सुलतानने दक्षिण भारतातील म्हैसुरू राज्याची सत्ता येताच मूळच्या हिंदू राजाचे नाव-गाव पुसून टाकले. म्हैसुरू हे 'इस्लामी राज्य' असल्याचे घोषित केले.
२. टिपू सुलतानने दक्षिण भारतातील हिंदूंची ८ सहस्रांहून अधिक मंदिरे पाडली आणि तेथे मशिदी उभारल्या.
३. वर्ष १९३४ मध्ये पद्मनाभ मेनन या इतिहासकाराने सांगितल्याप्रमाणे टिपूने राज्यातील प्रजेपुढे दोनच पर्याय ठेवले होते. एक म्हणजे 'कुराण' आणि दुसरी 'तलवार' !
४. टिपूच्या अत्याचारी राजवटीत तरुण मुलींचा अमानुष छळ करून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आले. सुंदर आणि तरुण राजस्त्रियांना टिपूने स्वत:च्या जनानखान्यात बंदिस्त केले.
५. टिपूने स्वत:च्या सेनापतीला लिहिलेले पत्र लंडनच्या वस्तूसंग्रहालयात आहे. त्यात टिपू सुलतानने ज्यांचा प्राक्तनावर विश्वास नाही, अशा सर्व काफिरांना पकडून ठार केले पाहिजे, असे सांगितले आहे.
६. २२.३.१७८९ या दिवशी कडंगेरी अब्दुल खादी या सेनापतीला टिपूने लिहिलेल्या पत्रात, १२ सहस्र नास्तिकांना इस्लाममध्ये धर्मांतरित केले आहे. 'नंबूद्री, नायर असा भेद न करता धर्मांतर कर', असा आदेश दिला होता. तसेच 'धर्मांतरित न होणार्यांना ठार केले पाहिजे', असे म्हटले होते.

कधी दंगली झाल्या, तर अशा काँग्रेसवाल्यांना वाचवावे, असे जनतेला वाटेल का ?

     कर्नाटकातील काँग्रेस शासनाकडून १० नोव्हेंबर २०१५ या दिवशी क्रूरकर्मा टिपू सुलतानची २६६वी जयंती साजरी करण्यात आली.

व्यक्तीस्वातंत्र्यवाले या संदर्भात काही बोलत का नाहीत ?

     महिलांची छेडछाड आणि पाठलाग करण्याचा प्रकार हा महिलांच्या शारीरिक अन् मानसिक छळाचाच भाग आहे. असा प्रकार महिलांच्या स्वातंत्र्यावर आणि जगण्याच्या अधिकारावरही गदा आणणारा आहे. - सुशील बाला डगर, देहली महानगर दंडाधिकारी.

दीपावलीच्या सुट्टीनिमित्त प्रतिदिन वाचा बोधकथा !

क्षमा
     क्षमेला मोल नाही. क्षमा हे शस्त्र विलक्षण शक्तीमान आहे. क्षमेत तलवारीच्या धारा बोथट करण्याची क्षमता आहे. क्षमावान असतो, त्याला सगळे सहज साध्य होते. क्षमावान माणसाचे बळ, तेज वाढत असते. अपराध्याला शासन करण्याची क्षमता असूनही जो तसे करत नाही, तोच क्षमावान. क्षमावान बनणे दुबळ्याचे काम नाही. शक्तीशालीच क्षमावान बनू शकतो. क्षमावान माणसाला अहंकारी लोक दुबळा मानतात. वास्तविक अहंकारीच दुबळा असतो. क्षमा ‘ऊर्जा अकारण व्यर्थ होऊ देत नाही.
क्रोधी माणूस दुबळा, तर क्षमावान शक्तीमान असतो.
     एका गावाच्या सीमेवरून एक संत जात असतात. गावाच्या सीमेवर लोक एका स्त्रीला छळत असतात. त्या संतांनी त्यांना विचारल्यावर ते सांगतात, ‘ही स्त्री व्यभिचारी आहे. ही गावाचे दूषण आहे, धर्मशास्त्र सांगते, ‘हिला दगडांनी ठेचून ठार करा. आपण सांगता, पाप्यालाही क्षमा करा. तुम्ही खरे कि धर्मशास्त्र खरे ? क्षमा केली, तर धर्मशास्त्र खोटे ठरेल. दगडांनी ठेचून ठार करायला संमती दिली, तर तुमचे वचन खोटे ठरेल. आम्हाला निर्णय द्या.

बगवाडा, वापी येथील संत पू. इंद्रवदन शुक्ल यांनी दिलेला संदेश आणि त्यांनी वर्णिलेले प.पू. डॉक्टरांचे श्रेष्ठत्व !

पू. इंद्रवदन शुक्ल
२.९.२०१५ या दिवशी बगवाडा, वापी येथील संत पू. इंद्रवदन शुक्ल यांची सनातनचे पू. चारुदत्त पिंगळे यांंनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्या वेळी त्यांचे प.पू. (डॉ.) आठवले यांच्याशी भ्रमणभाषवर बोलणे झाले. संभाषणानंतर पू. पिंगळेकाकांनी गोवा येथे झालेल्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाची, तसेच आश्रमाची छायाचित्रे दाखवल्यावर पू. इंद्रवदन शुक्ल यांना आनंद होत होता. त्यांनी जिज्ञासू वृत्तीने अनेक प्रश्न विचारले. सर्व छायाचित्रे पाहिल्यावर त्यांना पुष्कळ आनंद झाला आणि त्यांनी पू. पिंगळेकाकांना आनंदाने मिठी मारली. 
खरे संतच प.पू. डॉक्टरांसारख्या उच्च कोटीतील संतांना जाणू शकतात, हे पू. इंद्रवदन शुक्ल यांच्या खालील विवेचनावरून लक्षात येते.
१. प.पू. डॉक्टरांची हिंदु राष्ट्र स्थापनेची संकल्पना साकार होणार ! 
'देवाची स्वतःची इच्छा असल्यामुळे भारतात हिंदु राष्ट्र येणारच आहे, तसेच वर्ष २०४२ मध्ये भारत विश्व्गुरु होणार आहे ! सनातन धर्माचा झेंडा (ध्वज) संपूर्ण विश्वोत फडकणार आहे. पुढील दोन वर्षांत जगभर भीषण परिस्थिती उद्भवणार आहे. प.पू. डॉक्टरांची हिंदु राष्ट्र स्थापनेविषयीची संकल्पना साकार होणारच आहे. नरेंद्र मोदींनाही ते मान्य करावे लागेल. 

'स्व'च्या विचारांचा त्याग करायला लावून अंगी व्यापकत्व बाणवण्यास साहाय्यभूत होणारे आश्रमजीवन !

सौ. वृंदा मराठे
'समाजातील बर्याच मंडळींना प्रश्न पडतो की, आश्रमात राहूनच साधना का करायला हवी ? घरी राहूनही ती करता येतेच की ! याचे उत्तर असे की, आश्रमात राहिल्यामुळे साधनेच्या ध्येयाप्रत जाणे सुलभ होते. आश्रमात रहाणार्या  जिवांचे केवळ साधना करणे, हेच एकमेव उद्दिष्ट असल्याने त्यांची साधनेची वाटचाल जलद गतीने होते. घरी रहाणारे आणि साधना न करणारे सर्वसामान्य जीव अन् आश्रमात रहाणारे साधक यांच्या मनोवृत्तींत होत जाणारे पालट खालील सारणीतून स्पष्ट होतात. 

अपघातामुळे भाजलेल्या यजमानांची रुग्णालयात निकराची झुंज चालू असतांना प्रत्यक्ष भगवंतच कसा पाठीराखा होऊन राहिला आणि गुरुमाऊलीच्या अपार कृपेमुळे जीवघेण्या प्रसंगांना कसे तोंड देता आले, याविषयी साधिकेला आलेले अनुभव

'पतीवर दोन्ही पाय गमावण्याचा प्रसंग आल्यावरही भावनाप्रधान सौ. श्रुती नितीन सहकारी किती लवकर भावाच्या स्तरावर राहू शकल्या, हे त्यांच्या या लेखातून लक्षात येईल. पुढे येणार्यार आपत्काळात बर्यावच कुटुंबांवर असे प्रसंग येतील. तेव्हा सौ. सहकारी यांचे उदाहरण आठवल्यास त्या प्रसंगात स्थिर रहाण्यास साहाय्य होईल.' - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२७.८.२०१५)
२५ ऑक्टोबरच्या अंकात आपण श्री नितीन सहकारी यांनी अपघाताच्या प्रसंगावर उत्कट श्रद्धेच्या बळावर मात कशी केली पाहिले. आपण सौ. श्रुती सहकारी यांना आलेल्या अनुभूती पाहुया. 
रामनवमीला, म्हणजे २८.३.२०१५ या दिवशी माझे यजमान श्री. नितीन सहकारी यांना जहाजावर अपघात होऊन त्यांचे दोन्ही पाय गंभीररित्या भाजले. त्यानंतर ४३ दिवस ते वैद्यकीय उपचारांसाठी सायप्रस या देशातील एका रुग्णालयात होते. त्यांच्यासमवेत मीही १ मास तिथे होते. या प्रसंगी अनेक नातेवाइकांनी आपणहून साहाय्य केल्याने त्यांच्यातील चांगुलपणा अनुभवता आला, तसेच देवाच्या कृपेने परक्या देशांतही अनेक जण साहाय्यासाठी धावून आल्याने त्या कठीण प्रसंगावर मात करता आली. या वेळची मनाची स्थिती, स्वभावदोष-निर्मूलन अन् भावजागृती यांसाठी केलेले प्रयत्न आणि देवाच्या कृपेच्या आलेल्या अनुभूती पुढे देत आहे.
१ नोव्हेंबर २०१५ या दिवशीच्या लेखात अपघाताविषयी पूर्वसूचना, मनाची झालेली स्थिती, ईश्वराने केलेले सहकार्य, अनुभूती, भावजागृतीचे प्रयत्न यांविषयी पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया.

सनातनवरील बिनबुडाच्या आरोपांचे खंडन करणारी सनातनचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांची मुलाखत आता हिन्दू वार्ताद्वारे सनातनच्या संकेतस्थळावर उपलब्ध !

साधकांना सूचना 
    १६ सप्टेंेबर २०१५ या दिवशी सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना पोलिसांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या संदर्भात संशयित म्हणून कह्यात घेतले. त्यानंतर लगेचच सनातन विरोधकांनी सनातनवर टीका करण्यास सुरुवात केली. त्यांपैकी काहींनी सनातनवर बंदी घालावी, अशी मागणी केली. प्रसारमाध्यमांनी या काळात या सर्व घटनांना पुष्कळ प्रसिद्धी देत सनातनची मिडिया ट्रायल (प्रसारमाध्यमांतून चालवण्यात आलेला अभियोग) चालविली. काही प्रसारमाध्यमांनी आणि सनातन विरोधकांनी बिनबुडाचे आरोप केले. यामुळे जनमानसात असलेल्या सनातनच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. यासंबंधाने सनातनवरील ठळक आक्षेपांचे खंडन करणारी सनातनचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांच्याशी वार्तालाप या नावाने मुलाखत हिंदू वार्ता द्वारे अपलोड केली असून सनातनच्या संकेतस्थळावर ती ठेवण्यात आली आहे. 
लिंक : goo.gl/go8nU3
(टीप : वरील लिंकमध्ये यू हे अक्षर कॅपिटल आहे याची नोंद घ्यावी.)

बोधचित्र


योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

कुठलेही कर्म मनःपूर्वक करणे हितकारक !
     कर्म करतांना ते छोटे आहे का मोठेे, हे पहाणे महत्त्वाचे नसून प्राप्त कर्म मनःपूर्वक करणे हितकारक आहे.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥

(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बुद्धीची मर्यादा आणि अनुभूतीचे अन् शब्दप्रमाणाचे महत्त्व

      एखाद्याला साखर गोड लागते, असे शब्दांनी समजावून सांगण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी त्याला साखरेची चव कशी आहे, हे बुद्धीला समजणे, त्याची योग्य ती कल्पना करणे अशक्य आहे. साखर गोड लागते, हे शब्दांत न सांगता त्याला साखर खायला दिली, तर साखरेची गोडी लगेच समजते. तसेच अध्यात्म हा विषय बुद्धीने विशेष समजत नाही, तर साधना करून सूक्ष्मातील अनुभूती यायला लागल्या की, खर्‍या अर्थाने कळतो. अनुभूती येईपर्यंत जो कोणी आपल्याला शिकवतो, त्याच्या शब्दांवर विश्‍वास ठेवणे, म्हणजे शब्दप्रमाण मानणे आवश्यक असते, उदा. साखर गोड लागते या शब्दांवर विश्‍वास ठेवावा लागतो. बुद्धीप्रामाण्यवादी शब्दप्रमाण मानत नसल्यामुळे त्यांचे ज्ञान डबक्यात रहाणार्‍या बेडकाने डबक्याला समुद्र समजणे यासारखे असते. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (११.११.२०१५)

पोलिसांनी मुळाशी जाऊन कृती करावी !

परात्पर गुरु डॉ. आठवले
      नरक चतुर्दशीच्या दिवशी सनातन आश्रमावर गुंडांनी आक्रमण करू नये; म्हणून पोलीस प्रशासनाने आश्रमाजवळ ३ - ४ दिवस पोलीस ठेवले होते. याबद्दल सनातन संस्था कृतज्ञ आहे; पण याऐवजी पोलिसांनी मुळाशी जाऊन आतापर्यंत आश्रमावर आक्रमण करणार्‍या गुंडांविरुद्ध कृती केली असती, तर त्यांना हे करावे लागले नसते. एवढेच नव्हे, तर आक्रमण करणारे सूड म्हणून इतर कोणत्याही दिवशी आक्रमण करतील, हे पोलिसांनी ध्यानात घ्यावे ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१०.११.२०१५)

प्रेम

॥ हरि ॐ तत्सत् ॥
संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान

     कोणतीही गोष्ट जगात दिसली पाहिजे, उदा. प्रेम हे जगात दिसले पाहिजे, दाखविले पाहिजे, मग त्यात वास्तविकता असो वा नसो. 
भावार्थ : जग आणि प्रेम हे प्रकृतीतील आहे. प्रेम कृतीतून दाखविता आले पाहिजे, नाहीतर दुसर्‍याला ते कळणार नाही. एकदा एका शिष्याकडे गेले असता, बाबांनी तेथे हातात माळ घेऊन जप केला. मग त्याच्या घरातील त्रासदायक स्पंदने नाहीशी झाली. वास्तविक बाबांच्या केवळ अस्तित्वानेच तसे झाले असते; पण अस्तित्वाचा परिणाम लोकांना दिसत नाही, तर हातात माळ धरून केलेला जप दिसतो, म्हणून बाबांनी तसे केले. या प्रसंगाच्या आधी जवळजवळ वीस वर्षे बाबांनी हातात माळ घेऊन जप केल्याचे कुणी पाहिले नव्हते.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

भारतियांचा अपमान !

      पंतप्रधान नरेंद्र मोदी इंग्लंडच्या दौर्‍यावर गेल्यावर त्यांना गार्ड ऑफ ऑनर मिळाला. त्यांनी इंग्लंडच्या संसदेत भाषण केले. मोदी हे त्यादृष्टीने पहिले भारतीय पंतप्रधान ठरले. यानंतर इंग्लंडचे पंतप्रधान कॅमरून आणि मोदी यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. नंतर दोन्ही पंतप्रधानांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधान कॅमरून यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या कायम सदस्यत्वाचे समर्थन केले आणि भारतातील शंभर शहरे स्मार्ट शहरे म्हणून प्रसिद्ध पावण्यासाठी साहाय्य करण्याचे आश्‍वासन दिले. येथपर्यंत सर्वकाही ठीक घडले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn