Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

टिपू सुलतान जयंतीवादावरून कर्नाटक ४थ्या दिवशीही पेटलेलेच !

ज्या टिपूने त्याच्या सत्ताकाळात लाखो हिंदूंची कत्तल केली, आज त्याच्या मृत्यूनंतर 
शेकडो वर्षांनी टिपूच्या जयंतीच्या नावाखाली टिपूप्रेमींकडून हिंदूंच्या हत्या केल्या 

जात आहेत. हिंदूंचे प्रभावी संघटन हाच यावरील उपाय आहे !
 • देहलीतही तीव्र पडसाद 
 • काही ठिकाणी संचारबंदी
 • विहिंपच्या कर्नाटक बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
     बेंगळुरू - क्रूरकर्मा टिपू सुलतानच्या जयंतीच्या वादावरून कर्नाटक सलग ४थ्या दिवशीही पेटलेलेच आहे. कर्नाटकच्या टिपूप्रेमी काँग्रेस शासनाने टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर १० नोव्हेंबर या दिवशी विहिंपसह अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी शासनाच्या निर्णयाच्या विरोधात आंदोलन केले.

पुसद (यवतमाळ) येथील मौलवीकडून ५० हून अधिक आक्षेपार्ह ध्वनीचित्र-चकत्या जप्त

     मौलवींचे वास्तव आतातरी पोलीस लक्षात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करतील का ? हिंदूंच्या विरोधात तत्परतेने गरळओळ करणार्‍या वृत्तवाहिन्या या घटनेविषयी चर्चासत्रांचे आयोजन का करत नाहीत ? असहिष्णुतेचा कांगावा करत पुरस्कार परत करणार्‍यांना ही कृती असहिष्णुतेला प्रोत्साहन देणारी वाटत नाही का ?
     नागपूर - पुसदमधील तरुणांना जिहादविषयक आणि गोहत्याबंदीच्या विरोधातील ध्वनीचित्र-चकत्या दाखवल्याचा आरोप असलेला मौलवी सलीम मलिक उपाख्य हाफिज मुजीबुर रहेमान याच्या घरातून आतंकवादविरोधी पथकाने काही साहित्य, तसेच ५० हून अधिक ध्वनीचित्र-चकत्या कह्यात घेतल्या आहेत. त्यात आक्षेपार्ह ध्वनीचित्रण असल्याची शक्यता असून त्याद्वारे तो तरुणांना भडकवत असल्याचा संशय आतंकवादविरोधी पथकाला आहे.

हरियाणातील गोमांसबंदीच्या विधेयकावर राष्ट्रपतींकडून संमतीची मोहोर !

मोदी शासनाने आता देशपातळीवर हा कायदा लागू करावा, ही अपेक्षा !
     रोहटक - हरियाणातील बहुचर्चित गोमांसबंदीच्या विधेयकावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संमतीची मोहोर उमटवली असल्याची माहिती हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी येथे दिली. त्यामुळे हरियाणात आता गोमांस खातांना आढळल्यास ५ वर्षांचा कारावास आणि ५० सहस्र रुपयांचा दंड होणार आहे. हरियाणात खट्टर शासन सत्तेवर येताच त्यांनी गोहत्येवर प्रतिबंध आणण्यासाठी गोसंवर्धन-गोसंरक्षण करण्यासाठीचे विधेयक विधानसभेत पारित केले.

माझे रक्त सांडले, तरी चालेल; पण एकाही मंदिराला हात लावू देणार नाही ! - खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेना

चंद्रकांत खैरे यांच्यासारखा धर्माभिमान किती नेत्यांमध्ये आहे ?
      संभाजीनगर - माझे रक्त सांडले, तरी चालेल; पण एकाही मंदिराला हात लावू देणार नाही. प्रशासन हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर घाला घालू पहात आहे. कायद्याच्या लढाईत मंदिरांवर घाला घालणार्‍यांना शासन होईल, यात शंका नाही. त्यामुळे गाफील न रहाता मंदिर बचाव समितीच्या माध्यमातून न्यायालयीन लढ्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन मंदिर बचाव समितीचे संस्थापक अध्यक्ष, शिवसेना उपनेते आणि खासदार श्री. चंद्रकांत खैरे यांनी केले आहे.

आज असलेल्या बालदिनाच्या निमित्ताने...

     बालकांशी काहीएक संबंध नसलेल्या नेहरूंचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा करण्यााऐवजी तो बालकांच्या आरोग्यासाठी आयुर्वेदातील ग्रंथ लिहिणारे महर्षी कश्यप यांच्या नावे साजरा करणे योग्य होईल.

काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांची पाकमध्ये जाऊन भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका !

अशा घरभेदी आणि पाकधार्जिण्या काँग्रेसी नेत्यांना पाकमध्येच हाकला !
पाकच्या सैन्यावर स्तुतीसुमने उघळली !
      इस्लामाबाद - काँग्रेसचे मुसलमान नेते तथा भारताचे माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी पाकमध्ये जाऊन भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. विशेष म्हणजे पाकच्या सैनिकांकडून भारताच्या सैनिकांवर प्रतिदिन आक्रमण करण्यात येत असूनही त्यांनी पाकच्या सैनिकांकडून चालू असलेल्या आतंकवादविरोधी लढ्याचे कौतुक केले. इस्लामाबादच्या जिना इन्स्टीट्युटमध्ये झालेल्या भाषणात ते बोलत होते.

भारतात असहिष्णुतेला थारा नाही ! - पंतप्रधान मोदी

पंतप्रधानांचा ब्रिटन दौरा
      लंडन - भारत हा शांततेचा संदेश देणारे गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी यांचा देश आहे. (भारत हा राम आणि कृष्ण यांचा देश आहे. त्यांच्या अवतारी कार्यामुळेच देश आणि धर्म टिकून आहेत, हे सत्य जगाला सांगायला हवे. - संपादक) भारतात असहिष्णुतेला कोणताही थारा नाही. देशातील प्रत्येक नागरिकाला असलेल्या विचार स्वातंत्र्याचे रक्षण करणे, हे मी माझे कर्तव्य मानतो, असे प्रतिपादन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून आणि पंतप्रधान मोदी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त निवेदन केले.

(म्हणे) पाकमधील हिंदूंवर अत्याचार करणारे मुसलमान असले, तरी त्यांच्यावरही कारवाई करणार !

अत्याचार, धर्मांतर आणि हत्या यांमुळे पाकमधील हिंदूंची संख्या २२ टक्क्यांवरून जेमतेम २ टक्क्यांवर 
आली असतांना त्याविरुद्ध काहीही न करणारे पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची बडबड !
      पाक डावपेचांत भारतापेक्षा हुशार ! पाक जगासमोर आम्ही हिंदूंचे तारणहार आहोत असे खोटे सांगून सहानुभूती मिळवत आहे, तर भारत मात्र तेथील हिंदूंच्या घटत्या लोकसंख्येविषयी अद्याप जागतिक स्तरावरच काय; पण भारतातही मौन बाळगून आहे !
      कराची - मी सर्व समुदायांचा पंतप्रधान असून, हिंदु समुदायावर अत्याचार करणारे मुसलमान समुदायातील असले, तरी त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे फुकाचे विधान पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी येथे केले. दिवाळीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. शरीफ म्हणाले, हिंदु नागरिकांसमवेत अन्याय झाल्यास आम्ही त्यांच्यासमवेतच उभे राहू. अत्याचारग्रस्त नागरिकाचे संरक्षण करण्याचे आमचे दायित्व आहे. अत्याचार करणारा कोणत्याही समुदायाचा असला, तरी आम्हाला काहीही फरक पडत नाही. कमकुवत व्यक्तीला साथ दिली पाहिजे, हेच माझा धर्म मला शिकवतो. आपण एका देशाचे नागरिक आहोत. आपण शक्य तेवढी एकता निर्माण करायला हवी. एकमेकांना साहाय्य करायला हवे. आपण एकमेकांमध्ये भेदभाव करणे देवालाही मान्य नसेल. पाकिस्तान हा सर्व धर्मियांचा देश असून मी सर्व धर्मियांचा पंतप्रधान आहे. (इस्लामी प्रजासत्ताक असलेला पाक सर्वधर्मीयांच्या देश कसा असेल ? आणि असलाच तर त्याची जाणीव पाकच्या राज्यकर्त्यांना आताच कशी काय झाली ? - संपादक)

सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. रामानंद महाराज यांच्या धर्मपत्नी श्रीमती सुशीला (अक्का) यांचे देहावसान

डावीकडून प.पू. रामानंद महाराज आणि श्रीमती सुशीला (अक्का) निरगुडकर
श्रीमती सुशीला (अक्का) निरगुडकर
    इंदूर, १३ नोव्हेंबर (वार्ता.) - सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचे शिष्य प.पू. रामानंद महाराज (दादा) यांच्या धर्मपत्नी श्रीमती सुशीला रामचंद्र निरगुडकर यांचे १२ नोव्हेंबरच्या रात्री २ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्या ८२ वर्षांच्या होत्या. गेल्या अडीच वर्षांपासून त्या आजारी होत्या. या संदर्भात प.पू. भक्तराज महाराज यांच्या भक्तवात्सल्य आश्रमाचे विश्‍वस्त श्री. अनिल जोग यांनी सांगितले की, अक्का देहाने आजारी असतांना त्यांचे चित्त ईश्‍वरचरणी आहे, असे जाणवत होते. आजारपणात त्यांनी कधीही त्यांना त्रास होत असल्याविषयी चिडचीड केली नाही. त्या स्थिर आणि शांत होत्या.
   अक्का यांच्या पार्थिवावर इंदूर येथील रामबाग मधील मुक्तीधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी प.पू. भक्तराज महाराज यांचे अनेक भक्त उपस्थित होते. तत्पूर्वी काही वेळ त्यांचे पार्थिव प.पू. भक्तराज महाराज यांच्या आश्रमात दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. अक्का यांनी संत पूर्णपुरुषोत्तमाचार्य, प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांची सेवा केली होती.

यूसी ब्राऊजर आस्थापनाद्वारे हिंदूंचे आराध्य दैवत प्रभु श्रीराम यांचे घोर विडंबन

साम्यवादी चीनच्या आस्थापनाचा हिंदुद्वेष प्रकट 
यूसी ब्राऊजर या आस्थापनाने प्रसारित केलेल्या
विज्ञापनातील एका प्रसंग. यात युद्धभूमीवर प्रभु श्रीराम
रावणाशी संवाद साधतांना दर्शवण्यात आले आहे. 
     हे छायाचित्रे छापण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावणे, हा उद्देश नसून या आस्थापनांनी केलेले विडंबन समाजाला कळावे, हा उद्देश आहे. - संपादक
     मुंबई - युसी ब्राऊजर या आस्थापनाने दिवाळी या हिंदूंच्या सणाच्या पार्श्‍वभूमीवर एक विज्ञापन प्रसारित केले आहे. आपल्याला माहित आहे का की, दिवाळीच्या रक्षणासाठी राम युसी ब्राऊजरचे साहाय्य घेतो ? या नावाने प्रसारित करण्यात येणार्‍या या विज्ञापनातून हिंदूंचे आराध्य दैवत प्रभु श्रीराम यांचे घोर विडंबन केले आहे. सामाजिक संकेतस्थळांवरून जागृत आणि धर्माभिमानी हिंदू आस्थापनाच्या या हिंदुविरोधी कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध करत आहेत, तसेच सहस्रो हिंदूंनी या आस्थापनाचे अ‍ॅप वापरणे सोडून दिले आहे. आस्थापनाने प्रसारित केलेल्या विज्ञापनात रामायणाचा आणि रामाचा अनादर करण्यात आला आहे. या विज्ञापनात दाखवल्यानुसार एक सामान्य युवक युसी ब्राऊजरच्या साहाय्याने रामायण काळात पोहोचतो. तेथे तो रावणाशी युद्ध करणारे प्रभु श्रीराम आणि हनुमान यांच्याशी अत्यंत अभद्र भाषेत संभाषण करतो. या विज्ञापनात प्रभु श्रीराम आणि हनुमान यांनाही संभाषणाच्या वेळी अभद्र भाषेचा वापर करतांना दाखवले आहे.

तंत्र टी-शर्ट या आस्थापनाकडून हिंदु देवतांचे विडंबन

तंत्र टी-शर्ट आणि यूसी ब्राऊजर या आस्थापनांनी अन्य धर्मीयांच्या श्रद्धास्थानांचे असे विडंबन करण्याचे 
धाडस केले असते का ? हिंदू असंघटित असल्यानेच त्यांच्या श्रद्धास्थानांचे असे विडंबन 
करण्याचे या आस्थापनांचे धाडस होते !
 • टी-शर्टवर छापली हिंदु देवतांची चित्रे आणि धार्मिक चिन्हे 
 •  हिंदु जनजागृती समितीकडून निषेध
तंत्र टी-शर्ट या आस्थापनाने
उत्पादित केलेल्या टी-शर्टवर
छापलेले गणपतीचे छायाचित्र
    हे छायाचित्रे छापण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावणे, हा उद्देश नसून या आस्थापनांनी केलेले विडंबन समाजाला कळावे, हा उद्देश आहे. - संपादक
    मुंबई - ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे असलेल्या आणि इंटरनेटच्या माध्यमातून विक्री करण्यार्‍या तंत्र टी-शर्ट या आस्थापनाने हिंदु देवतांचे घोर विडंबन केले आहे. त्यांनी उत्पादित केलेल्या टी-शर्टवर हिंदु देवतांची चित्रे आणि हिंदूंची धार्मिक चिन्हे छापली असल्याचे उघड झाले आहे. याविषयी जागृत हिंदूंकडून माहिती मिळाल्यानंतर हिंदु जनजागृती समितीने या आस्थापनाला पत्र लिहून ही बाब लक्षात आणून दिली आणि ही विडंबनात्मक उत्पादने बाजारातून त्वरित मागे घेण्याची विनंती केली.

पाळधी (जिल्हा जळगाव) येथे ग्रामपंचायतीच्या इमारतीवर लावलेले टिपू सुलतानचे होर्डिंग काढले !

हिंदु जनजागृती समितीच्या विरोधाचा परिणाम
हिंदूंनो, या यशासाठी ईश्‍वरचरणी कृतज्ञता व्यक्त करा ! सर्वच हिंदूंनी धर्मरक्षणासाठी अशी सतर्कता आणि तत्परता दाखवल्यास अशा कुरापती काढण्याचे धर्मांधांचे धाडस होणार नाही !
    जळगाव, १३ नोव्हेंबर (वार्ता.) - पाळधी (तालुका धरणगाव) गावातील ग्रामपंचायतीच्या इमारतीवर ग्रामपंचायतीचे मुसलमान सदस्य सादिक पटेल यांनी क्रूरकर्मा टिपू सुलतानच्या जयंतीनिमित्त होडिर्र्ंग लावले होते. (हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्‍या क्रूरकर्मा टिपू सुलतानची होर्डिंग लावणार्‍यांची मानसिकता तपासण्याची वेळ आली आहे ! - संपादक) त्यामुुळे हिंदूच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊन गावात धार्मिक तेढ निर्माण होऊ शकते. यामुळे ते काढण्यात यावे, या मागणीच्या हेतूने हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी याविषयी ग्रामस्थांचे प्रबोधन केले. समिती याविषयी निवेदन देणार असल्याचे मुसलमान सदस्य सादिक पटेल यांनी सदर होर्डिंग काढून टाकले.

हिंमत असेल, तर महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांवर बोला !

काँग्रेसचे आमदार नीतेश राणेंचे कर्नाड यांना आव्हान
    मुंबई - कर्नाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची कुणासमवेतही तुलना करू नये. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांपेक्षा थोर राजा होते. हिंमत असेल, तर गिरीश कर्नाड यांनी महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलावे आणि ते परत जाऊ शकतील का, हे बघावे, अशी धमकीवजा चेतावणीच काँग्रेसचे आमदार आणि स्वाभिमानी संघटनेचे संस्थापक नीतेश राणे यांनी दिली आहे. गिरीश कर्नाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या अवमानास्पद विधानाविषयी १३ नोव्हेंबर या दिवशी नीतेश राणे यांनी ट्विटरवरून ही प्रतिक्रिया दिली.

म्हैसुरू (कर्नाटक) जिल्हा प्रशासनाकडून क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती साजरी !

म्हैसुरू प्रशासनाचा हिंदुद्वेष ! 
     म्हैसुरू - म्हैसुरू जिल्हा प्रशासनाने क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती येथील कलामंदिरात कडेकोट पोलीस बंदोबस्तात साजरी केली. जिल्हा प्रशासनाने यंदा प्रथमच टिपूची जयंती साजरी केली आहे. या प्रसंगी म्हैसुरूचे सीर काझी, हजरत मौलाना महंमद उस्मान शरीफ, म्हैसुरू मिली कौन्सिलचे मौलाना महंमद झाफरुल्ला, कामराजनगरचे खासदार आर्. ध्रुवनारायण, आमदार वासू, आमदार एम्.के. सोमशेखर, उपायुक्त सी. शिखा आदी उपस्थित होते. शासनाच्या अल्पसंख्यांक विभागानेही या कार्यक्रमास पाठिंबा दर्शवला होता. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्ह्याचे मंत्री व्ही. श्रीनिवास प्रसाद म्हणाले, टिपू सुलतानचा इतिहास आणि त्याचे योगदान समाजाला सांगण्यासाठी शासनाने त्याच्या जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्याचे ठरवले आहे.

भाजपचे खासदार प्रताप सिंह यांना जिवे मारण्याची धमकी !

      काल म्हैसूरचे भाजप खासदार प्रताप सिंह यांना फेसबूकवरून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यांनी टिपू सुलतान जयंतीच्या कार्यक्रमाला विरोध केला असल्यानेच ही धमकी देण्यात आली होती. या धमकीत म्हटले आहे की, जर तुला कुट्टाप्पा (टिपूच्या जयंतीच्या कार्यक्रमाला विरोध करत असतांना धर्मांधांच्या आक्रमणात मारले गेलेले विश्‍व हिंदु परिषदेचे स्थानिक नेते) यांच्याप्रमाणे मरायचे नसेल, तर विरोध करण्यापूर्वी विचार कर. सिंह यांनी कर्नाटक शासनाच्या या हिंदुद्रोही निर्णयाला विरोध केला होता. ते म्हणाले होते की, राज्यशासन टिपूची जयंती साजरी करून समाजात द्वेषाचे वातावरण निर्माण करत आहे. टिपू एक अत्यंत धर्मांध आणि कट्टरवादी राज्यकर्ता होता आणि तोे हिंदु अन् ख्रिस्ती नागरिकांच्या हत्येस कारणीभूत होता.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यागपत्र द्यावे ! - भाजप

हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्‍या आणि हिंदूंची असंख्य मंदिरे पाडणार्‍या क्रूरकर्मा टिपू सुलतानची 
जयंती साजरी करणे, हा कर्नाटकमधील काँग्रेसी शासनाचा निवळ हिंदुद्वेष होय ! केंद्रशासनाने 
यात त्वरित हस्तक्षेप करून संबंधितांवर कारवाई करावी, ही अपेक्षा !
 • काँग्रेसच्या राज्यात शासकीय धोरणाला विरोध करणार्‍या हिंदूंना मारलेच जाणार का ? 
 • दादरीला अखलाखच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबियांना सहानुभूती दर्शवणारे किती राज्यकर्ते कुट्टाप्पा यांच्या घरी गेले ?
 • दादरी प्रकरणानंतर देशात असहिष्णुता वाढल्याचा डांगोरा पिटणारे कथित मानवतावादी आता मडिकेरी प्रकरणानंतर गप्प का ?
 • उद्या काँग्रेसी राजवटीत बाबर, अकबर, औरंगजेब यांच्याही जयंत्या साजर्‍या होणार का ?
     बेंगळुरू - क्रूरकर्मा टिपू सुलतान याची जयंती साजरी करण्याच्या सूत्रावरून अवघे कर्नाटक पेटले असून ५ दिवसांत तिघा जणांना स्वत:चे प्राण गमवावे लागले आहेत. या क्रूरकर्माच्या जयंतीला हिंदुत्ववादी पक्ष, संघटना आदींनी तीव्र विरोध दर्शवला होता. याचाच एक भाग म्हणून शासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या वेळी झालेल्या धुमश्‍चक्रीत आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या ४ इतकी झाली आहे. या सर्व प्रकरणाला उत्तरदायी असणार्‍या काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांनी त्यागपत्र द्यावे, अशी मागणी भाजपने केली आहे, तर शिवसेना नेते तथा महाराष्ट्र राज्याचे पर्यावरणमंत्री श्री. रामदास कदम यांनी टिपूची तुलना छत्रपती शिवरायांशी करणार्‍या कर्नाड यांच्या अकलेचे ऐन दिवाळीत दिवाळे निघाले आहे. ज्यांना टिपूविषयी कळवळा आहे, त्यांनी थेट पाकमध्ये जावे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

गुजरातमधील भाजप नेत्यांच्या हत्येप्रकरणी सात जिहाद्यांना अटक

धर्मांध जिहाद्यांकडून चालू असलेले हत्याकांड रोखण्यासाठी शासनाचे कडक धोरणच हवे !
गुजरात दंगलीचा सूड उगवण्यासाठी केल्या होत्या हत्या !
      कर्णावती (अहमदाबाद) - गुजरातमधील भरुच येथे २ नोव्हेंबर या दिवशी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शिरीष बंगाली आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे भरुच जिल्हा महासचिव प्रग्नेश मिस्त्री यांची अज्ञात मारेकर्‍यांनी गोळ्या घालून हत्या केली होती. या प्रकरणी गुजरात आतंकवादविरोधी पथकाने ७ जिहाद्यांना अटक केली आहे. 

सनातनला संपवण्याचे षड्यंत्र मोडून काढण्यासाठी सर्व संघटनांनी संघटित व्हायला हवे ! - श्री. रमेश नाईक, माजी गोवा राज्यप्रमुख, शिवसेना.

     हिंदु धर्माचे कार्य करणार्‍या संघटनांना जवळ करणे, हा सध्या गुन्हा मानला जात आहे; मात्र असा गुन्हा करण्यास आम्ही पुन्हा पुन्हा सिद्ध आहोत. हिंदुत्वाच्या विरोधातील विखारी प्रचार मोडून काढण्यासाठी आपण धर्मप्रेमी नव्हे, तर त्याही पुढे जाऊन धर्मवेडे व्हायला हवे.

मडिकेरी (कर्नाटक) येथील क्रौर्य आणि विहिंपचे नेते कुटप्पा यांची हत्या हे काँग्रेसप्रणीत शासनाचे पूर्वनियोजित षड्यंत्रच !

पत्रकार परिषदेत उजवीकडे श्री. प्रमोद मुतालिक आणि शेजारी श्री. गिरीश कुलकर्णी
 • श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांचा आरोप
 • गिरीश कर्नाड ऐवजी शरीफ कर्नाड असे म्हणावे !
बेळगाव, १३ नोव्हेंबर (वार्ता.) - १० नोव्हेंबर या दिवशी कर्नाटकातील कोडगु जिह्यातील मडिकेरी येथे घडलेले क्रौर्य आणि विश्‍व हिंदु परिषदेचे बेंगळुरूचे जिल्हा सचिव डी.एस्. कुटाप्पा यांची हत्या निषेधाहर्र् असून कर्नाटकातील काँग्रेसप्रणीत शासनाने रचलेले हे पूर्वनियोजित षड्यंत्र आहे, असा आरोप श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी ११ नोव्हेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत केला. शासनाच्या कार्यक्रमात अभिनेते आणि साहित्यिक गिरीश कर्नाड जे बडबडले, त्यावरून त्यांना यापुढे शरीफ कर्नाड म्हणावे लागणार आहे. कर्नाड यांनी केंपेगौडा विमानतळाला टिपू सुलतान यांचे नाव देण्याची केलेली मागणी अतिशय चुकीची आहे. गिरीश कर्नाडांसारखे ज्येष्ठ विचारवंत विशिष्ट समाजाचे एजंट असल्यासारखी वक्तव्ये करत असून त्यांनी आपला ज्ञानपीठ पुरस्कार परत द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

दिवाळी ओवाळणीच्या नावाने बळजोरीने वर्गणी मागण्याचा प्रकार

पुणे येथे कचरा गोळा करणार्‍या कामगारांची दंडेलशाही
कामगारांच्या दंडेलशाहीला पालिका प्रशासन आणि आयुक्त कसा आळा घालणार आहेत ? 
असे अपप्रकार करणार्‍या कामगारांवर पालिका आयुक्त काही कारवाई करतील का ?
     पुणे - दिवाळी सणानिमित्त शहरामध्ये घरोघरी जाऊन कचरा गोळा करणार्‍या कामगारांकडून नागरिकांकडे दिवाळी सणाची ओवाळणी मागितली जाते. काही ठिकाणी त्या कामगारांकडून ओवाळणी मागतांना नागरिकांशी विशेषत: महिलांशी वाद घालणे आणि वेळप्रसंगी अश्‍लील, शिवराळ भाषा वापरण्याचे प्रकार घडत आहेत. यासंदर्भात नागरिकांमध्ये तीव्र असंतोष असून कामगारांच्या या दंडेलशाहीला नागरिक कंटाळले आहेत.

टिपू सुलतान म्हणजे निर्दयी राजाच ! - अरविंद सावंत, खासदार, शिवसेना

हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्‍या टिपू सुलतानच्या विरोधात आवाज उठवणार्‍या शिवेसेनेचे अभिंदन !
    मुंबई - टिपू सुलतान १९ व्या शतकातील निर्दयी राजा असून कर्नाटकमधील काँग्रेस शासन विभाजनवादी धोरण राबवत आहे, अशी टीका शिवसेनेचे खासदार श्री. अरविंद सावंत यांनी केला. (हिंदूंनो, काँग्रेसचे खरे स्वरूप जाणा ! - संपादक) ते पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते.
श्री. सावंत पुढे म्हणाले...
१. टिपू सुलतानने हिंदूंचा नरसंहार केला. इस्लामविना अन्य धर्मही अस्तित्वात आहे, यावर टिपू सुलतानचा विश्‍वास नव्हता.
२. कर्नाटक शासनाला स्वातंत्र्याच्या ६७ वर्षांनंतर टिपू सुलतान आठवले, हे त्यांचे विभाजनवादी धोरण आहे.
३. छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना होऊच शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांचा कधीच अवमान केला नाही. धार्मिक स्थळांचे पावित्र्य जपले; मात्र टिपू सुलतान असा नव्हता.

दिवाळीचे कपडे आणि फटाके न घेतल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

अशा प्रलोभनांना विद्यार्थी बळी पडू नयेत, यासाठी विद्यार्थ्यांना धर्मशिक्षण देणे आवश्यक !
सातारा येथील धक्कादायक प्रकार
सातारा - दिवाळीनिमित्त कपडे आणि फटाके न घेतल्याने इयत्ता नववीतील विद्यार्थ्याने रहात्या घरी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. उपचारांसाठी नेण्यापूर्वीच त्याचा मृत्य झाला. पोलिसांनी प्राथमिक माहिती विचारली असता फटाके खरेदी करू न दिल्याने त्याने ही आत्महत्या केल्याचे समजते.

बेकायदा मच्छीमारांविरुद्ध मच्छिमारांच्या समितीकडून आंदोलनाची चेतावणी

     मुंबई - मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मच्छिमारी करणारे बेकायदा ट्रॉलरमालक प्रतीवर्षी १०० कोटी रुपयांचा हप्ता मत्स्य विभागाला देतात. (शासनाने या आरोपांविषयी त्वरित उत्तर देणे अपेक्षित ! - संपादक) या बेकायदा ट्रॉलरमालकांमुळे किनार्‍यावर पारंपरिक मासेमारी करणार्‍या मासेमारांची रोजी-रोटी धोक्यात आली आहे. त्यांंच्यावर तत्काळ फौजदारी गुन्हे नोंद करून बंदी आणावी, अन्यथा १९ नोव्हेंबर या दिवशी दहा सहस्र पारंपरिक नौकामालक जेल भरो आंदोलन करतील,

पुणे शहर आणि परिसरात फटाक्यांमुळे ३० ठिकाणी आगीच्या घटना

      पुणे - शहर आणि उपनगर परिसरात फटाक्यांमुळे ३० हून अधिक ठिकाणी आग लागल्याच्या घटना ११ नोव्हेंबर या दिवशी रात्री घडल्या. फटाक्यांमुळे रास्ता पेठ, फर्ग्युसन रस्ता, कात्रज, संतोषनगर, पाषाण रस्ता यांसह वेगवेगळ्या ठिकाणी रात्री ८ ते १० वाजण्याच्या सुमारास फटाक्यांमुळे आग लागण्याच्या घटना घडल्या. अग्निशामक दलाने केलेल्या प्रयत्नांमुळे आग लगेच आटोक्यात आली

कर्नाड यांना कवी भूषण यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांंविषयीच्या ओळी ठाऊक नसाव्यात ! - रामदास कदम

ज्ञानपीठ विजेते गिरीश कर्नाड याविषयी काही बोलतील का ?
    मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांंविषयीच्या कवी भूषण यांच्या ओळी गिरीश कर्नाड यांना माहिती नसाव्यात; म्हणूनच ऐन दिवाळीत त्यांच्या अकलेचे दिवाळे निघाल्याचा संशय येत आहे, अशा शब्दांत राज्याचे पर्यावरणमंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी ज्ञानपीठ विजेते लेखक आणि ज्येष्ठ नाटककार गिरीश कर्नाड यांच्यावर टीका केली आहे. (राष्ट्रपुरुषांवर चिखलफेक करू पहाणार्‍यांना तत्परतेने खडसवणारे शिवसेना नेते श्री. रामदास कदम यांचे अभिनंदन ! - संपादक) कर्नाड यांना जीवे मारण्याची धमकी योग्य आहे कि नाही, यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणे कितपत योग्य आहे, याचा विचार कर्नाड यांनी करावा, असेही त्यांनी सांगितले. टिपू सुलतान जर हिंदू असता, तर त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा दर्जा मिळाला असता, असे विधान कर्नाड यांनी केले होते. सर्वांनीच विरोध दर्शवल्यावर कर्नाड यांना क्षमाही मागावी लागली.

आज्ञाधारक, निरपेक्ष भाव, तसेच आंतरिक साधनेच्या बळावर अंबाजोगाई येथील सौ. मंदोदरी केंद्रे यांनी गाठली ६१ प्रतिशत आध्यात्मिक पातळी !

सौ. केंद्रे (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना सनातनच्या पू. (सौ.) गाडगीळ
    अंबाजोगाई, १३ नोव्हेंबर (वार्ता.) - आज्ञाधारकपणा, निरपेक्ष भाव, तसेच आंतरिक साधनेच्या बळावर येथील सौ. मंदोदरी बब्रुवान केंद्रे (वय ६५ वर्षे) यांनी ६१ प्रतिशत आध्यात्मिक पातळी गाठली, अशी घोषणा सनातनच्या पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांनी केली. परळी येथील सुप्रसिद्ध ज्योतिर्लिंग वैजनाथ येथे सोमयागातील तिसर्‍या वाजपेय सोमयागाला ७ नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला. त्या निमित्ताने पू. (सौ.) अंजली गाडगीळ परळी येथे आल्या होत्या. सौ. मंदोदरी केंद्रे यांच्या घरीच हा सत्कार करण्यात आला. पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सौ. मंदोदरी केंद्रे यांना प.पू. डॉक्टरांचा प्रसाद आणि शिवाचे चित्र असलेली प्रतिमा भेट दिली. सौ. मंदोदरी केंद्रे या गेली ४० वर्षांहून अधिक वर्षे शिवाचा नामजप करत आहेत, तसेच त्यांची आंतरिक साधना चालू आहे.

महाराष्ट्रात सप्टेंबर २०१५ पर्यंत २ सहस्र १६ शेतकर्‍यांच्या आत्महत्या !

गत ५ वर्षांतील सर्वाधिक संख्या
     मुंबई - देशातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या होण्यात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रात या वर्षीच्या सप्टेंबर मासापर्यंत २ सहस्र १६ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. गत ५ वर्षांतील सरासरीपेक्षा हा आकडा मोठा आहे. सप्टेंबरपासून ३ मासांपर्यंत आणखी किती आत्महत्या होतील, याची चिंता लागून आहे. आत्महत्या रोखण्यासाठी राज्यशासनाने केलेले प्रयत्न अपुरे सिद्ध होत असून शेतकी तज्ञ आणि शेतकरी नेत्यांनी या प्रश्‍नावर सखोल अभ्यास करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले जात आहे.

मंदिराच्या सरकारीकरणाचे महाघातक दुष्परिणाम !

      नाशिक येथील त्र्यंबकेश्‍वर ट्रस्टच्या विश्‍वस्तांना कुंभपर्वात रसायन टाकून मंदिराचे स्मशान करू. याचे दायित्व देवस्थानचे राहील, अशा प्रकारच्या धमक्यांची पत्रे ऑगस्ट २०१५ मध्ये आली होती; मात्र त्र्यंबकेश्‍वर विश्‍वस्तांनी ती ३ मासांनंतर उघड केली आहेत.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या वेळी ३९ कोटी रोकड आणि १ लक्ष ६७ सहस्र लिटर दारू जप्त झाली. यावरून जप्त न केलेले पैसे आणि दारू किती असेल ?

     बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या काळात निवडणूक आयुक्तांनी नेमलेल्या विशेष भरारी पथकांनी ३९ कोटी रुपये आणि १ लक्ष ६७ सहस्र लिटर दारू जप्त केली. मतदारांना खुश करून त्यांची मते विकत करण्यासाठी हा साठा वापरण्यात येत होता.

पुणे जिल्ह्यात २४९ खाणी पर्यावरण खात्याच्या अनुज्ञप्तीविना चालू

      पुणे - पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यात ८२२ खाणी आहेत. त्यामध्ये २४९ खाणमालकांनी पर्यावरण खात्याची अनुज्ञप्ती घेतलेली नाही. अनुज्ञप्ती असलेल्या एकूण ५०६ खाणींपैकी ४५० खाणींचे इटीएस यंत्राच्या माध्यमातून मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. प्रत्यक्षात किती उत्खननासाठी अनुज्ञप्ती देण्यात आली होती, त्यांनी केलेले उत्खनन आदींची माहिती जमा करण्याचे काम चालू आहे.

प्रमोद मुतालिक यांच्या अटकेसाठी निपाणी येथे हिंदुत्ववादी संघटनांकडून निवेदनाद्वारे शासनाचा निषेध !

तहसीलदारांना निवेदन देतांना धर्माभिमानी
      निपाणी (जिल्हा बेळगाव) - श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ येथील विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दल, श्रीराम सेना, हिंदु जनजागृती समिती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदी हिंदुत्ववादी संघटनांच्या धर्माभिमान्यांनी

गुन्हेगारीत धर्मांध आघाडीवर !

      काविळीने ग्रस्त असलेल्या एका युवकाचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयाची नासधूस करण्याची संतापजनक घटना ७ नोव्हेंबर २०१५ या दिवशी चिखली, वास्को येथील कुटीर रुग्णालयात घडली. या मारहाणीच्या संदर्भात संध्याकाळी बायणातील शकील शेख (वय २७ वर्षे), नवाझ शेख (वय २० वर्षे), अनिल पुजारी (वय २५ वर्षे), अफझल गौस (वय १८ वर्षे) या युवकांना अटक करण्यात आली आहे.

मुंबईतील वाहतुकीच्या खोळंब्यावर उपाय म्हणून वाहतूक पोलिसांकडून नवीन हेल्पलाईन कार्यान्वित

      मुंबई - येथे सातत्याने होणार्‍या वाहतुकीच्या खोळंब्यावर उपाय म्हणून वाहतूक पोलिसांनी ८४५४९९९९९९ ही हेल्पलाइन चालू केली आहे. याद्वारे चालकांना साहाय्य करता येईल. ही हेल्पलाईन वाहतूककोंडीवर मात करण्यासह सुरक्षित आणि सुकर प्रवास करण्यासाठीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. या हेल्पलाइन सुविधेमध्ये नागरिकांना व्हॉइस कॉल, व्हॉटस् अ‍ॅप, ई-मेल, एस्एम्एस् आणि ट्रॅफिक अ‍ॅपद्वारे माहिती मिळविता येईल, तसेच तक्रारही नोंदवता येणार आहे.

खोट्या नोटा वितरीत करण्यासाठी आलेल्या २ धर्मांधांना मुंबईत अटक

देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करू पहाणार्‍या धर्मांधांना 
पोलिसांनी कठोर शासन करावे, ही अपेक्षा !
      मुंबई - पाचशे आणि १ सहस्र रुपयांच्या खोट्या नोटा येथे वितरीत करण्यासाठी आलेल्या २ धर्मांधांना पोलिसांनी अटक केली आहे. हुमायून कबीर रायसुद्दीन शेख (वय १९ वर्षे) आणि राजेश शेख अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून ३ लाख ५ सहस्र रुपये किंमतीच्या खोट्या नोटा शासनाधीन केल्या

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंनो, कर्नाटकच्या टिपूप्रेमी काँग्रेसच्या राज्यातील टिपूसमर्थकांचा उच्छाद जाणा !
      सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या जिहादी संघटनेच्या टिपूसमर्थकांनी दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बंट्वाळ येथे आयोजित केलेल्या बैठकीला हिंदूंनी विरोध दर्शवला. या वेळी टिपूसमर्थकांनी केलेल्या हिंसाचारात एका हिंदु युवकाचीही भोसकून हत्या करण्यात आली.


हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Karnatakame Tipusamarthakone aur ek Hinduki hatya ki !
kya Tipupremi congress shasan Tipusamarthakonko dand karega ?
जागो ! : कर्नाटक में टिपूसमर्थकों ने और एक हिन्दु की हत्या की !
क्या टिपूप्रेमी काँग्रेस शासन टिपूसमर्थकों को दंड करेगा ?


भारतातील आतंकवाद्यांविषयी अमेरिकेला कळते, ते भारतीय राज्यकर्त्यांना कळत नाही !

      भाग्यनगर येथील फारूख महंमद (वय ३७ वर्षे) आणि इब्राहिम जुबेर महंमद (वय ३६ वर्षे) या दोघा धर्मांध भावांनी अल्-कायदा या जिहादी आतंकवादी संघटनेला निधी दिल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी अमेरिकेतील फेडरल न्यायालयात त्यांच्यावर आरोप निश्‍चित झाले आहे.

बांगलादेशी तस्करांचा भारतीय सीमेवर चालणारा अवैध व्यापार आणि त्याचे भयानक वास्तव !

१. पश्‍चिम बंगाल आणि बांगलादेश यांच्या सीमेवर संदिग्ध अर्थव्यवस्था निर्माण होणे 
     एक संदिग्ध अर्थव्यवस्था पश्‍चिम बंगाल आणि बांगलादेश यांच्या लांबलचक सीमेवर निर्माण होत आहे. शस्त्रास्त्रे, बनावट चलन, अमली पदार्थ (ड्र्रग्स) आणि दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंचा अवैध व्यापार होत आहे. या अवैध व्यापारात प्रतिदिन ४ लक्ष रुपये आणि पूर्ण वर्षभरात सुमारे ४ लक्ष कोटी रुपये इतकी कमाई होते. 

सांस्कृतिक पुनरुज्जीवनाची आवश्यकता !

     आधुनिकतेच्या नावाखालील जीवनशैलीचा अमेरिकी आविष्कार हा प्रबोधनापेक्षा अमेरिकेतील विज्ञान आणि औद्योगिक क्रांती यांचा परिणाम आहे, याची बीजे त्यात आहेत. 
     सर्व सामाजिक संस्था, नाती यांची मोडतोड आज या संस्कृतीमधून झाली. या पाश्‍चात्त्य राष्ट्रांचा भौतिक विकास एवढा प्रचंड झाला की, आधुनिकीकरण (Modernisation) म्हणजेच पाश्‍चात्यीकरण (Westernisation) असे समीकरण बनते. स्वातंत्र्योत्तर काळातील भारत हा या पाश्‍चात्त्यांंच्या भौतिक प्रगतीने इतका भारावून गेला की, विज्ञानाच्या उसनवारीतून चालू झालेले परावलंबित्व सांस्कृतिक उसनवारी आणि सांस्कृतिक गुलामगिरीत होतांना आज दिसत आहे. भारतीय धर्म संकल्पना ही पाश्‍चात्त्य धर्मसंकल्पनेपेक्षा पूर्णतः भिन्न आहे. भाषांतराच्या प्रभावात धर्माचे रिलिजन झाले आणि म्हणूनच रिलिजनमध्ये अभिप्रेत असलेल्या सर्व चांगल्या-वाईट संकल्पनांचे धर्म या संकल्पनेवर रोपण झाले.

शाहरुख ज्याने भयभीत झालाय, ती असहिष्णुता कोणी शिकवली लोकांना ?

श्री. भाऊ तोरसेकर
     कुठल्याही समाजात वा देशात सार्वजनिक प्रसार-प्रचार माध्यमांचा समाजमनावर मोठा प्रभाव असतो. त्यातून जे सांगितले जाते आणि भासवले जाते, त्यावर समाजमनाची जडणघडण होत असते. अनेकदा तर अतिशय सुप्तपणे अशी माध्यमे लोकमानस घडवण्याचा उद्योग साळसूदपणे करत असतात. चित्रपट त्याचाच एक भाग असतो. संघटित संस्थेला लोकांवर जितका प्रभाव पाडता येत नाही, तितका लोकप्रिय कलावंत वा त्याच्या कलाकृतीचा जनतेवर प्रभाव असतो. लोक अशा कलाकाराचे अनुकरण वा नक्कल करत असतात. १९७० च्या कालखंडात आपण गेलो, तर कान झाकणारे केस राखणारे तरुण आपल्याला दिसायचे. तो अमिताभ, राजेश खन्ना वा ॠषीकपूर यांचा काळ होता. पुढे शाहरुख, सलमान वा ॠतिक रोशनचा जमाना आल्यावर त्यांच्यासारख्या केशभूषा वेशभूषा आपल्याला समाजात दिसू लागल्या. तीच भाषा आणि शब्द कानावर पडू लागले.

लक्ष्याकडे संपूर्ण लक्ष असू दे, तरच यशस्वी व्हाल !

दीपावलीच्या सुट्टीनिमित्त प्रतिदिन वाचा बोधकथा !
द्रोणाचार्य कौरव आणि पांडव यांना बाण मारण्याचे शिक्षण देत होते. या विद्येत शिष्य सिद्ध होऊ लागले. द्रोणाचार्यांनी शिष्यांची परीक्षा घ्यायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी मातीचा एक पक्षी आणला आणि तो एका झाडाच्या शेंड्याजवळ बांधला. सर्व शिष्यांना एकत्र जमवून ते म्हणाले, झाडावरचा तो पक्षी बघा. बाण मारून त्याचे डोके कोण उडवू शकेल, ते पाहूया. द्रोणाचार्य युधिष्ठिराला म्हणाले, पहिली पाळी तुझी. धनुष्याला बाण जोड. त्या पक्षावर नेम धर. युधिष्ठिराने धनुष्याला बाण जोडला आणि पक्षावर नेम धरला. द्रोणाचार्य म्हणाले, आता तुला हे झाड दिसते का ? मी दिसतो का ? तुझे भाऊ दिसतात का ? युधिष्ठिर म्हणाला, मला ते झाड दिसते, आपणही दिसता, हे भाऊही दिसतात आणि हा पक्षीही दिसतो. तेव्हा द्रोणाचार्य म्हणाले, तू पक्षाचे डोके उडवू शकणार नाहीस, बाजूला हो. मग दुर्योधनाची पाळी होती.

नेहरूंचे रहाणीमान आणि विचारसरणीही इंग्रजांसारखीच असल्याने इंग्रजांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून त्यांची निवड करणे

जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीच्या निमित्ताने...
     भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे इंग्रजांनी निवडलेले पंतप्रधान होते. भारताच्या स्वातंत्र्याविषयी ब्रिटनच्या संसदेत विचारविनिमय चालू होता. तेव्हा एका सभासदाने विचारले, पंतप्रधान म्हणून नेहरूंची निवड का केली जात आहे ? तेव्हा दुसर्‍या सभासदाने सांगितले, नेहरू दिसायला भारतीय दिसतात; पण त्यांचे रहाणीमान आणि विचारसरणी आपल्याप्रमाणे आहे. या वाक्यांची कागदपत्रे इंग्लंडच्या संसद भवनातील ग्रंथालयात उपलब्ध आहेत.
( संदर्भ : मासिक तरुण हिन्दु, डिसेंबर २०११)
(विदेशी संस्कृतीचा पगडा असलेला हा पूर्णतः आंग्लाळलेला भारतीय माणूस भारतियांच्या समस्या काय जाणून घेणार ? तथाकथित वैज्ञानिक दृष्टीकोन आणि सुधारणांच्या नावाखाली पाश्‍चात्त्य संस्कृती भारतियांच्या माथ्यावर थोपवण्यात आणि देशाचे सर्वाधिक वाटोळे करण्यात नेहरूंचा फार मोठा वाटा असल्याने त्यांची ही पात्रता ओळखूनच भारतद्वेष्ट्यांनी हेतूपुरस्सर त्यांची पंतप्रधान म्हणून निवड केली होती, हे स्पष्टच आहे. - संकलक)

फटाकेमुक्त सण-उत्सव !

सण-उत्सव आणि फटाके असे समीकरण नाही. आपल्या धर्मशास्त्रातही त्याचा कुठे उल्लेख नाही; मात्र सण-उत्सवात नंतर शिरलेल्या काही विकृत गोष्टींप्रमाणे ही गोष्ट म्हणावयास हरकत नाही. काळ पालटला, तसे उत्सवांचे स्वरूप पालटत गेले. शास्त्रापेक्षा रूढी, प्रथा यांना मान्यता मिळू लागली. अपप्रकारांना उधाण आले. परिणामी मूळ सण-उत्सव साजरे करण्याला बगल मिळून केवळ दिखाऊपणाला महत्त्व आले. सण-उत्सव धर्मसंमत साजरे करण्यापेक्षा गाजावाजा करण्याला प्राधान्य आले. बॅण्ड, डीजे यंत्रणा यांच्या जोडीला फटाक्यांची आतषबाजी करणे, हे सण-उत्सवांचा अविभाज्य भाग बनले.

देशात असहिष्णुतेचे वातावरण असल्याचा कांगावा बिहारच्या निवडणुकांवर प्रभाव पाडण्यासाठीच !

     बिहारच्या निवडणुकीनंतर देशातील असहिष्णुता अचानक संपली आहे. हा एक योगायोग नाही. देहली येथील निवडणुकीपूर्वीही अशीच असहिष्णुतेची राळ उडवण्यात आली. निवडणुकीनंतर लगेच हा प्रकार थांबला. बिहारमधील निवडणुकीपूर्वी खोटा प्रचार करून वातावरण गढूळ बनवण्याचा हा प्रकार म्हणजे बिहारमधील निवडणुका मोकळ्या आणि पारदर्शक वातावरणात होऊ नये, यासाठी रचलेले कारस्थान होते, हे यातून स्पष्ट होते. निवडणुकांवर प्रभाव टाकण्याच्या या कारस्थानाविरुद्ध रिप्रेझेंटेशन ऑफ पिपल्स एक्ट, भारतीय दंड संहितेची संबंधित कलमे आणि भारतीय संविधानाचा भंग करणे या आरोपांखाली जनहित याचिका दाखल झाली पाहिजे. असे प्रकार चालू राहिले, तर देशातील लोकशाही प्रक्रियेवर याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. निरपेक्ष प्रसिद्धीमाध्यमे ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहेत.

सहिष्णुता-असहिष्णुता

सहिष्णु आहेत हिंदु म्हणून सर्वांनाच सामावून घेतात ।
काही जण असहिष्णुता आहे म्हणून पुरस्कार परत करतात ॥
असहिष्णुता आहे, तर पुरस्कार कशाला स्वीकारतात । 
हिंदूंच्या हत्या होतात, तेव्हा हे लोक गप्प का रहातात ॥ 
- श्री. अनिल कुलकर्णी, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

पाकिस्तान हेच भारतातील बहुतांश समस्यांचे मूळ कारण

     पाकिस्तान हेच भारतातील बहुतांश समस्यांचे मूळ कारण आहे. सध्या पाकिस्तानच्या हस्तकांनी काश्मीर आणि उर्वरित भारतातही सर्वत्र, घातपाती कारवायांद्वारे छुपे युद्ध चालवले आहे. या छुप्या युद्धाचा बीमोड करण्यासाठी भारताने सैनिकी कारवाईद्वारे पाकिस्तान जिंकून अखंड हिंदुस्थानची निर्मिती करावी, तसेच देशात समान नागरी संहिता सर्व नागरिकांना लागू करून, देशातील सामाजिक भेदभाव नष्ट करावेत. (संदर्भ : साप्ताहिक प्रज्वलंत, १५.९.२००२)

हिंदु धर्मावरील श्रद्धा निष्प्रभ होणे, हेच हिंदूंमधील राष्ट्रीयतेच्या अभावामागील कारण !

      पूर्णपणे राष्ट्रीयतेचा अभाव हे हिंदूंच्या र्‍हासाचे कारण नसून प्राचीन काळापासून असलेली हिंदु धर्मावरील श्रद्धा निष्प्रभ होत गेली, हे आहे. श्रद्धेच्या सामर्थ्याविना कोणतेही राष्ट्र हुतात्मे निर्माण करू शकत नाही. जो धर्म माणूस आणि राष्ट्र यांना घडवतो, मार्गदर्शन करतो, त्यांचे उत्थान करतो, त्यांना उदात्त बनवतो, उच्च आदर्शांकडे नेतो, सर्वस्व अर्पण करण्याची त्यागाची प्रेरणा निर्माण करतो, असा धर्म दीर्घकाळ आपल्यापासून नाहीसा झाला आहे. - पंजाबकेसरी लाला लजपतराय

७ दिवसांत कावीळ बरी होऊन दीपावलीचा आनंद अनुभवता आल्याबद्दल कु. अमृता मुद्गल (वय १२ वर्षे) हिने प.पू. डॉक्टरांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता !

कु. अमृता मुद्गल
प.पू. डॉक्टर,
     मला कावीळ झाली होती. ती न्यून होण्यासाठी २ मास (महिने) लागतात, असे आधुनिक वैद्य मराठेकाका (आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे), अपर्णाताई (आधुनिक वैद्या (कु.) अपर्णा महांगडे) आणि उज्ज्वलदादा (आधुनिक वैद्य उज्ज्वल कपाडिया) यांनी सांगितले; पण तुम्ही माझी आठवण काढली अन् ७ दिवसांत माझी कावीळ बरी झाली. मला पुष्कळ आनंद झाला. प.पू. डॉक्टर, तुमच्या अपार कृपेमुळेच हे सर्वकाही झाले.
     माझे मन फार दुःखी आणि उदास झाले होते की, रामनाथी आश्रमातील ही पहिलीच दिवाळी आणि ती आजारपणातच जाणार;

आनंदाची दीपावली ।

देवा उघडावे दार, आता उघडावे दार ।
तुझ्या हृदय देवघराचे, उघडावे दार ॥ १ ॥

प्रभात होतेय आता, घालावे म्हणते भक्तीचा सडा ।
सजवीन त्यावर सुरेख भावाच्या रांगोळी कडा

सात्त्विक वातावरण आणि आध्यात्मिक उन्नती यांची ओढ असलेली हडपसर, पुणे येथील ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. क्रांती दशरथ राऊत (५ वर्षे) !

कु. क्रांती राऊत
१. पू. राजेंद्रदादांशी जवळीक वाटणे : कु. क्रांती अडीच ते ३ वर्षांची असतांना देवद आश्रमात आली होती. त्या वेळी तिची पू. राजेंद्रदादांशी भेट झाली होती. ही भेट केवळ २० - २५ मिनिटांची होती. तेव्हापासून तिची पू. दादांशी पुष्कळ जवळीक झाली आहे.
२. संतांमधील ईश्‍वरी तत्त्वामुळे सात्त्विक जीव त्यांच्याकडे आकर्षिले जातात, असे जाणवणे : तिचा आतापर्यंत ज्या ज्या वेळी मला भ्रमणभाषवर संपर्क येतो, तेव्हा ती प्रथम, पू. दादा कुठे आहेत ? मला त्यांच्याशी बोलायचे आहे, असेच विचारते. पू. दादा तिला पुष्कळ जवळचे वाटतात. संतांमधील ईश्‍वरी तत्त्वामुळे सात्त्विक जीव त्यांच्याकडे आकर्षिले जातात,

सिंहस्थपर्वाच्या कालावधीत साधकांच्या व्यष्टी आणि समष्टी सेवेचे दायित्व लीलया पेलून सद्गुरुपदी विराजमान होणारे संतरत्न पू. (कु.) स्वाती खाडये !

       वर्ष २०१५ मध्ये नाशिक येथे झालेल्या सिंहस्थपर्वातील सेवेनिमित्त पू. स्वातीताई (पू. (कु.) स्वाती खाडये) यांच्यासमवेत राहून शिकण्याची अमूल्य संधी मला मिळाली. 
       पू. ताईंच्या गुणांचे वर्णन करायला कुठून आरंभ करावा आणि काय लिहावेे ?, हेच मला कळत नव्हते; कारण त्यांच्याकडून शिकायला मिळणारे प्रत्येकच सूत्र अमूल्य आहे. त्यांच्यामध्ये एवढे गुण आहेत की, त्यांचे कितीही वर्णन केले, तरी ते अल्पच आहे. 

देवराणा तुजसवेची अमुचा हा सुखसंवाद ।

पश्‍चिमेचा हा वारा कशास घालीत होता साद ? ।
कळले कारण त्याचे, देवाचा येणार हो प्रसाद ॥ १ ॥

दीपावलीचा हा आनंद कसा कुणा सांगावा ? ।
देवराणा तूच आमुचा ना, तुझ्यापुढेच गावा

प्रत्येक सेवा भगवंताची सेवा समजून कृतज्ञताभावाने करणार्‍या मुरुडेश्‍वर, कर्नाटक येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त केलेल्या सौ. सुशीला बाबू कामत (वय ६२ वर्षे) !

सौ. सुशीला कामत
     मुरुडेश्‍वर येथील सौ. सुशीला बाबू कामत (वय ६२ वर्षे) यांनी १०.११.२०१४ या दिवशी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त केली. या वयातही त्या सतत क्रियाशील राहून शेतात काम करणे, घरी गोपालन करणे, आदी सेवांत मग्न असतात. २४ घंट्यांत त्या केवळ ५ घंटे विश्रांती घेतात. त्यांच्या गावात असलेल्या पाचही देवस्थानांचा कारभार नीट चालावा; म्हणून त्या स्वतः दायित्व घेऊन प्रयत्न करतात. त्यांनी त्यासाठी विश्‍वस्तांचे नियोजनही केले आहे. त्यांच्यात प्रीतीही आहे.

गुरूंच्या आशीर्वादाने शरणागत भाव, कृतज्ञताभाव आणि निरपेक्ष भाव यांसह केलेली सेवा ईश्‍वराच्या चरणी अर्पण होते, याचे उत्तम उदाहरण असलेल्या पू. (कु.) स्वाती खाडये !

सौ. प्राजक्ता जोशी
     ज्योतिषशास्त्र प्रारब्धात काय आहे, हे सांगते. अध्यात्मशास्त्राच्या एका सिद्धांतानुसार प्रारब्धावर क्रियमाणकर्माने मात करता येते. सत्यवानाचा प्राण नेण्यासाठी आलेल्या यमराजाला सावित्रीच्या साधनेमुळे तसेच परत जावे लागले होते. हे उदाहरण सर्वांना ज्ञात आहेच. पू. (कु.) स्वाती खाडये यांच्या संदर्भातही प्रारब्धावर क्रियमाणकर्माने मात करता येते, हे ज्योतिषशास्त्रावर आधारलेल्या पुढील लेखावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. प्रतिकूल ग्रहांवर मात करून पू. (कु.) स्वाती खाडये यांनी साधनेत कशी प्रगती केली, हे या लेखात अभ्यासपूर्ण पद्धतीने दिले आहे. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
     १६.९.२०१५ या हरितालिकेच्या दिवशी मानस नमस्कार करतांना प.पू. डॉक्टरांनी मला सूक्ष्मातून पू. (कु.) स्वातीताईंच्या पत्रिकेतील सध्याचे ग्रहयोग अभ्यासा, असे सांगितले. त्यानंतर पू. ताईंच्या पत्रिकेचा अभ्यास करण्यापूर्वीच त्या सद्गुरुपदी विराजमान झाल्या असाव्यात, असा विचार माझ्या मनात आला.

प्रेमभाव आणि देवावरील अपार श्रद्धेमुळे भटकळ, कर्नाटक येथील श्रीमती मंजुळा रमेश नायक यांनी ८४ व्या वर्षी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

श्रीमती मंजुळा नायक
     कर्नाटक राज्यातील भटकळ येथील श्रीमती मंजुळा रमेश नायक (वय ८४ वर्षे) यांनी १०.११.२०१४ या दिवशी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त केली. त्या नेहमी प्रसन्न असतात. त्यांच्यात पुष्कळ प्रेमभाव आहे आणि त्या कोणत्याही प्रसंगात सकारात्मक असतात. त्यांची अन्य गुणवैशिष्ट्ये आणि त्यांना लंडन विमानतळावर आलेली अनुभूती पुढे देत आहोत.
१. प्रेमभावामुळे सर्वांना जवळच्या वाटणे
     त्यांच्या घरी कोणी आणि केव्हाही गेले, तरी त्या आपुलकीने अल्पाहाराविषयी विचारतात अन् लगेच गोड खाऊ देऊन प्रेमाने क्षेमकुशल विचारतात. त्यांच्यातील प्रेमभावामुळे त्या त्यांच्या कुटुंबाला, साधकांना आणि समाजालाही अतिशय जवळच्या वाटतात.

पू. स्वातीताईंचे होता आगमन । गुणलक्ष्मीचे झाले दर्शन ॥

कु. मधुरा भोसले
सद्गुरुपदी विराजमान होऊन, आश्रमात आल्या आनंद घेऊन ।
पू. स्वातीताईंचे होता आगमन, गुणलक्ष्मीचे झाले दर्शन ॥
भावभक्तीचे चिलखत घालून, प्रयत्नांचे आयुध घेऊन ।
प्रयत्नांची पराकाष्ठा करून, प्रारब्धावर मात करून ॥ १ ॥

साधनेच्या पथावर चालून, अडचणींवर मात करून ।
अधर्माशी संघर्ष करून, धर्माला विजयी करून ॥
सनातनची रणरागिणी बनून, कर्तव्याची पूर्ती करून ।
सद्गुरुपदी विराजमान होऊन, 
आश्रमात आल्या आनंद घेऊन ॥ २ ॥

देवगड येथील श्री. शेखर आणि सौ. मिनाक्षी इचलकरंजीकर यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे

श्री. शेखर इचलकरंजीकर
सौ. मिनाक्षी इचलकरंजीकर
१. सनातन संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या पहिल्याच प्रवचनानंतर श्री. शेखर आणि ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मिनाक्षी इचलकरंजीकर यांनी लगेचच साधकांना घरी येण्याचे आमंत्रण देणे आणि त्या दिवसापासून ते सनातन संस्थेशी कायमचे जोडले जाणे : वर्ष १९९६ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी प.पू. डॉक्टरांच्या जाहीर सभा आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले होते. आम्ही काही साधक या जाहीर सभांच्या प्रसारासाठी कुडाळहून देवगड येथे जात असू. प्रारंभी देवगड येथे कुणालाही सनातन संस्थेविषयी माहिती नव्हती. त्या वेळी आम्ही आयोजित केलेल्या पहिल्याच प्रवचनात श्री. शेखर आणि सौ. मिनाक्षी इचलकरंजीकर उपस्थित होते.

प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन

प.पू. पांडे महाराज
सत्याला भ्रम समजणे
     आभाळ कुठे आहे ?, असे विचारल्यावर आपण वरती पहातो; पण प्रत्यक्षात आपण आकाशात /अवकाशातच चालत असतो. हे आपल्या लक्षात येत नाही. याला भ्रम म्हणतात. जसे विमानात चालतांना विमानाचा आधार असतो, तसेच आपण या अवकाशात पृथ्वीच्या विमानातून चालत आहोत. - श्री. गोपाळ जोरी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२२.७.२०१५)

ध्यान साधनेची मर्यादा


परात्पर गुरु डॉ. आठवले
१. ध्यान साधनेमुळे स्वभावदोष निर्मूलन होत नाही; म्हणून ध्यान भंग झाल्यावर ऋषि शाप द्यायचे.
२. दुसर्‍यांवर प्रीती करता येत नाही. ती शिकण्यासाठीच ऋषींनी गोप-गोपींचा कृष्णासमवेत जन्म घेतला.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (११.११.२०१५)

एअरोसोल (Aerosol) तंत्रज्ञानातील तज्ञ आणि अभ्यासू, तसेच या विषयाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी यांना आवाहन !

      सोमयाग केल्यानंतर मेघनिर्मिती होऊन १९५ दिवसांनी सोमयाग केलेल्या परिसरात पाऊस पडतो, याचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करण्यासाठी एअरोसोल तंत्रज्ञानातील तज्ञ आणि अभ्यासू, तसेच या विषयाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी यांचे साहाय्य आवश्यक आहे. इच्छुकांनी खाली दिलेल्या पत्त्यांवर संपर्क करावा.
      (एअरोसोल(Aerosol) म्हणजे काय ? : सूक्ष्म ठोस कण किंवा द्रव बिंदू आणि हवा किंवा कोणत्याही प्रकारचे वायू यांच्या मिश्रणाला एअरोसोल म्हणतात.

साधकांना सूचना

साधकांनो, पू. मेनराय आणि पू. (सौ.) मेनराय यांंच्या ध्यानाच्या वेळी नामजपाला
 बसून स्वतःच्या आध्यात्मिक उपायांची परिणामकारकता वाढवा !
     रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातून देहली येथे वास्तव्यास गेलेले सनातनचे पू. (श्री.) भगवंतराय मेनराय आणि पू. (सौ.) सूरजकांता मेनराय त्यांच्या निवासस्थानी प्रतिदिन १० घंटे ध्यानाला बसतात. या ध्यानाच्या वेळी साधकांनी इतरत्र कुठेही बसून नामजप केला,

बोधचित्र


॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान
तीर्थयात्रा
     पंढरपूरला जाऊनसुद्धा पुन्हा आपल्याला परत येण्याची इच्छा होते; म्हणून म्हणतात, इंतजारमें जो मजा है, वह मिलनेमें नहीं ।
भावार्थ :
इंतजारमें जो मजा है, वह मिलनेमें नहीं । म्हणजे पंढरपूरला जाणार, या कल्पनेने वाट पहाण्यात जो आनंद आहे, तो प्रत्यक्ष पंढरपूरला गेल्यावर होत नाही;

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
      मानसिक स्तरावरचा हिंदु धर्माचा प्रसार केवळ हिंदूंनाच एकत्र करू शकतो, तर आध्यात्मिक स्तरावरचा हिंदु धर्माचा प्रसार जगभरच्या सर्व मानवांना एक करून सर्वांना आनंद देऊ शकतो. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (५.११.२०१५)
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

हिंदूंनो, मुसलमान आणि ख्रिस्ती धर्मियांकडून धर्माभिमान शिका !

     रामप्रभु आणि सीतादेवी यांचे चरित्र कलंकित करणार्‍या वनमानव या काव्यावर परिसंवाद होता. संतप्त अप्पा व्यासपिठावर येऊन मोठ्याने ओरडतो, रामचरित्रासंबंधी या नेहरू शासनात मर्यादापुरुषोत्तम राम आणि जगज्जननी सीतादेवी यांच्याविषयी वनमानवासारखे अत्यंत बीभत्स अन् किळसवाणे लेखन होते. अशा प्रकारे रामकथा बीभत्स आणि विकृत करणार्‍या ग्रंथांना माध्यमिक विद्यालये, महाविद्यालये आणि विद्यापिठे यांतून पाठ्यपुस्तक म्हणून मंजुरी मिळते. नेहरू शासन अशा ग्रंथांना पारितोषिके देते आणि सन्मान करते.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

ईश्‍वर सर्वत्र आहे !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     जी गोष्ट उघडपणे करणे अयोग्य वाटते, ती लपून करण्याचा प्रयत्न करणेही अयोग्यच; कारण एखादी अहितकारक गोष्टच उघडपणे करायची टाळली जाते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

चोरट्यांचे अराजक !

संपादकीय 
मायानगरी मुंबईच्या गर्दीत ग्राहकांचे सामान लुटणारी सुरत येथून आलेली टोळी कार्यरत असल्याने दिवाळीची खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी सावध रहावे, असेे वृत्त प्रसारीत झाले होते. पायधुनी, दादर, लालबाग, लिंकिंग रोड यांसारख्या गर्दीच्या भागांत ही टोळी कार्यरत आहे. काही तरी वाद उकरून काढायाचा आणि गोंधळ निर्माण करायचा अन् चोरी करायची अशी त्यांची पद्धत आहे. ठाणे आणि डोंबिवली परिसरात महिलांना पुढे काही तरी गोंधळ झाला आहे, तुमच्या हातातील बांगड्या काढून द्या असे सांगून महिलांच्या हातातील बांगड्या काढून घेण्याचे अनेक प्रकार झाल्याचे उघडकीस आले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn