Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आजचे दिनविशेष

भाऊबीज

यमद्वितीया

बंगालमधील परिस्थिती देशासाठी आणि हिंदूंसाठी धोकादायक ! - परराष्ट्र्र धोरणाचे अभ्यासक जयंतकुमार रे

     बंगालमधील हिंदूंवर होणारे अनन्वित अत्याचार पहाता, बंगाल भारतात आहे कि पाकमध्ये, असा प्रश्‍न पडतो. बंगालमधील हिंदूंची ही दु:स्थिती जाणून मोदी शासनाने त्यांच्या संरक्षणासाठी योग्य पावले उचलावीत आणि त्यांना छळणार्‍यांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा !
     कोलकाता - बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीने अत्यंत भयंकर स्वरूप धारण केले आहे. तेथील हिंदूंवर होणारे अत्याचार ते निमूटपणे सहन करत आहेत. या विदारक परिस्थितीचे अचूक विश्‍लेषण भारतीय परराष्ट्र्र धोरणाचे तज्ञ अभ्यासक श्री. जयंतकुमार रे यांनी कोलकाता येथून प्रकाशित होणार्‍या आणि सर्वाधिक खपाच्या पायोनिअर या वृत्तपत्रातील लेखात केले आहे.

म्हैसुरू (कर्नाटक) जिल्हा प्रशासनाकडून क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती साजरी !

म्हैसुरू प्रशासनाचा हिंदुद्वेष ! हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्‍या आणि हिंदूंची मंदिरे
पाडणार्‍या क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती साजरी करणे, हा निवळ हिंदुद्वेष होय ! 
केंद्रशासनाने यात त्वरित हस्तक्षेप करून अशांवर कारवाई करावी, ही अपेक्षा !
     म्हैसुरू - म्हैसुरू जिल्हा प्रशासनाने क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती येथील कलामंदिरात कडेकोट पोलीस बंदोबस्तात साजरी केली. जिल्हा प्रशासनाने यंदा प्रथमच टिपूची जयंती साजरी केली आहे. या प्रसंगी म्हैसुरूचे सीर काझी, हजरत मौलाना महंमद उस्मान शरीफ, म्हैसुरू मिली कौन्सिलचे मौलाना महंमद झाफरुल्ला, कामराजनगरचे खासदार आर्. ध्रुवनारायण, आमदार वासू, आमदार एम्.के. सोमशेखर, उपायुक्त सी. शिखा आदी उपस्थित होते.

मी पाकमध्ये कार्यक्रम केले, मग गुलाम अलींना भारतात विरोध का ? - पं. चौरासिया

     नाशिक - भारतात गुलाम अली यांचा कार्यक्रम होऊ दिला जात नाही, याविषयी खरे तर वाईट वाटते. मी पाकिस्तानात जाऊन तेथे २ कार्यक्रम केले आहेत. मग गुलाम अलींचा कार्यक्रम भारतात का होऊ शकत नाही ? त्यांना भारतात विरोध का ?, असा प्रश्‍न ख्यातनाम बासरीवादक पद्मविभूषण हरिप्रसाद चौरसिया यांनी उपस्थित केला आहे.

(म्हणे) आयुर्वेदानुसार गोमांस हे अनेक व्याधींवर उपाय !

वैज्ञानिक पी.एम्. भार्गव यांचे हिंदुद्वेेषी वक्तव्य
हिंदूंच्या ग्रंथांचा सोयीस्कर उपयोग करून हिंदूंची दिशाभूल करण्याचा हा प्रकार आहे !
हिंदु धर्माच्या अभ्यासकांनी याचा योग्य तो प्रतिवाद करून हा अपप्रचार खोडून काढावा !
      चेन्नई - आयुर्वेदातही गोमांसाला महत्त्व असून आयुर्वेदानुसार गोमांस हे अनेक व्याधींवर उपायकारी आहे, असा दावा पेशीय आणि आण्विक जीवशास्त्र केंद्राचे संस्थापक वैज्ञानिक पी.एम्. भार्गव यांनी येथे केला. प्राचीन ग्रंथांमध्येही गोमांसावर बंदी असल्याचा उल्लेख आढळत नाही, असेही त्यांनी सांगितले. भार्गव यांनी चरक संहितेचा दाखला देत गोमांसाचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

भारतात प्रतिवर्षी ९ लाख ३५ सहस्र बालकांचा न्युमोनियामुळे मृत्यू

१२ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या जागतिक न्युमोनिया दिनानिमित्त
न्युमोनियामुळे मोठ्या प्रमाणात होणारे बालमृत्यू रोखू न शकणारे प्रगत 
विज्ञानशास्त्र आणि वैद्यकशास्त्र यातूनच स्वत:ची मर्यादा दर्शवतात !
     मुंबई - बालमृत्यूच्या अतिमहत्त्वाच्या पहिल्या पाच कारणांमध्ये न्युमोनिया असून भारतात पाच वर्षांपेक्षा अल्प वयात मृत्यू पावणार्‍या बालकांपैकी एक तृतीयांश बालकांचा (९ लाख ३५ सहस्र बालकांचा) मृत्यू न्युमोनियामुळे होत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. खरे पहाता त्वरित उपाय केल्यास तो बरा होऊ शकतो; मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने बालमृत्यू वाढत आहे, असे केईएम् रिसर्च सेंटरच्या बालरोगतज्ञांनी सांगितले आहे.

मोदी शासनाने धार्मिक असहिष्णुतेपासून हिंदूंचे रक्षण करावे ! - विहिंप

शासनाने विहिंपच्या या मागणीवर त्वरित कार्यवाही करावी, ही अपेक्षा !
      प्रयाग - मोदी शासनाने धार्मिक असहिष्णुतेपासून हिंदूंचे रक्षण करावे, अशी मागणी विहिंपेचे नेते डॉ. प्रवीण तोगाडिया यांनी केली. कर्नाटकात झालेल्या टिपू सुलतानविरोधी आंदोलनाच्या वेळी विहिंपचे जिल्हा संयोजक कुटप्पा यांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी हे विधान केले आहे.

मोहरमच्या वेळी घातक शस्त्रांचे प्रदर्शन करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करावी !

सतर्क राहून धर्मांधांविरूद्ध कायदेशीर लढा देणार्‍या अधिवक्ता कमलेश चंद्र त्रिपाठी यांचे अभिनंदन ! 
असे हिंदुत्ववादी अधिवक्ता, हीच हिंदु धर्माची खरी शक्ती आहे !
वाराणसीतील हिंदुत्ववादी अधिवक्ता कमलेश चंद्र त्रिपाठी यांची प्रशासनाकडे मागणी
     वाराणसी - मोहरमच्या दिवशी शहरात काढलेल्या ताबूतच्या फेरीत घातक शस्त्रांचे प्रदर्शन केलेल्या धर्मांध युवकांच्या घराची तपासणी करावी, तसेच त्यांच्याजवळील ही घातक शस्त्रास्त्रे जप्त करून त्या युवकांवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी येथील हिंदुत्ववादी अधिवक्ता कमलेश चंद्र त्रिपाठी यांनी एका निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली. या निवेदनाकडे जिल्हाधिकार्‍यांनी गांभीर्याने पहावे, अशी मागणीही त्यांनी केली. (अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाच्या हे स्वतःच का लक्षात येत नाही ? सार्वजनिक ठिकाणी घातक शस्त्रास्त्रे बाळगणार्‍या धर्मांध युवकांवर कारवाई न करणारे प्रशासन कायदा सुव्यवस्था काय टिकवून ठेवणार ? शस्त्रास्त्रे बाळगणार्‍या धर्मांध युवकांसमवेत अशा निष्क्रीय प्रशासकीय अधिकार्‍यांवरही कारवाई करायला हवी ! - संपादक)

आय.एस्.आय.एस्.कडून सिरीयातील २०० बालकांची क्रूरपणे हत्या !

हे संकट भारताच्या दाराशी येऊन ठेपण्यापूर्वीच शासनाने याविरोधात उपाययोजना करणे देशहिताचे आहे ! 
आय.एस्.आय.एस्.चे राक्षसी कृत्य उघड ! 
     बैरूत - आय.एस्.आय.एस्. या जिहादी आतंकवादी संघटनेने सिरियातील अल्-रक्का येथील तबका एयरबेसमध्ये २०० निष्पाप बालकांची निर्घृण हत्या केल्याची एक ध्वनीचित्रफीत उघड झाली आहे. ही हत्या ऑगस्ट २०१४ मध्ये करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. येमेनच्या एका आय.एस्.आय.एस् विरोधी दलाने ही ध्वनिचित्रफीत सामाजिक संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे सामाजिक संकेतस्थळावरून आय.एस्.आय.एस्.वर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. त्या सर्व बालकांना असद यांच्या सैन्याला साहाय्य केल्याच्या आरोपात ठार करण्यात आले आहे. या ध्वनीचित्रफितीमध्ये अनेक मुले अर्धनग्नावस्थेत भूमीवर पालथी झोपलेली दिसत आहेत. त्यानंतर मशीनगन घेतलेले काही आतंकवादी अल्ला-हू-अकबरच्या घोषणा देत गोळ्या चालवत असल्याचे दिसते. त्यानंतर आतंकवादी काही मुलांना निवडून मुलांच्या डोक्यामध्ये गोळ्या घालतांनाचेही दृश्य यात दाखवण्यात आले आहे.

तुळजाभवानी मंदिर समितीचे वादग्रस्त आणि भ्रष्ट व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांना नियमबाह्य पद्धतीने पुन्हा मुदतवाढ !

प्रसादाच्या लाडू प्रकरणात अपहार केल्याचा संशय असतांनाही अशा प्रकारची मुदतवाढ
दिली जाणे म्हणजे माकडाच्या हाती कोलित देण्याचाच प्रकार म्हणावा लागेल !
      तुळजापूर - तुळजाभवानी मंदिरातील प्रसादाच्या लाडूचे प्रकरण गाजत असतांना मंदिर समितीचे व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांना अनधिकृतपणे आणि नियमबाह्य पद्धतीने मुदतवाढ देण्यात आली आहे. लाडू प्रकरणात नाईकवाडी यांचा हात असतांनाही त्यांचीच पुन्हा निवड करण्यात आली आहे. (आतातरी असे अपप्रकार टाळण्यासाठी मंदिरांचे नियंत्रण शासनाकडे नव्हे, तर भक्तांच्या हाती यावे,

इंग्रजी बोलू शकणारे सर्वाधिक नागरिक भारतात !

मॅकॉलेप्रणित शिक्षणप्रणालीने मातृभाषेचा अभिमान निर्माण होऊ न दिल्याचे दुष्परिणाम !
     न्यूयॉर्क - इंग्रजी बोलू शकणार्‍या नागरिकांचे प्रमाण विश्‍वातील अन्य देशांच्या तुलनेत भारतामध्ये सर्वाधिक आहे. मातृभाषा नसणारे किमान २ अब्ज विद्यार्थी इंग्रजी शिकत असून युरोपीय देशांमध्ये दुसरी भाषा म्हणून या भाषेचा वापर केला जातो.

आय.एस्.आय.एस्.च्या जिहाद्यांकडून तब्बल ५४ सहस्रांहून अधिक गुप्तचर अधिकार्‍यांची खाती हॅक

     लंडन - आय.एस्.आय.एस्.च्या जिहादी आतंकवाद्यांनी सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी (सी.आय.ए) आणि फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफ्.बी.आय) या गुप्तचर यंत्रणांच्या तब्बल ५४ सहस्रांहून अधिक अधिकार्‍यांची ट्विटर खाती हॅक केली आहेत. सायबर खिलाफत म्हणवणार्‍या गटाचा प्रमुख जुनैद हुसेन अमेरिका आणि ब्रिटन यांच्या संयुक्त ड्रोन आक्रमणात मारला गेला होता. त्याच्या हत्येचा सूड उगवण्यासाठी ही खाती हॅक करून गुप्तचर अधिकार्‍यांचे संपर्क क्रमांक, तसेच पासवर्डसहित सर्व तपशील मिळवण्यात आतंकवाद्यांना यश आले असून त्यातील काही तपशील त्यांनी त्यांच्या संकेतस्थळावरून उघडही केला आहे.
    हुसेन याच्या मृत्यूनंतर जिहादी गटाची सायबर कृत्ये न्यून झाल्याचे दिसत होते; मात्र आम्ही परत आलो आहोत असे ट्विट करून हा गट पुन्हा सक्रीय झाल्याचे त्यांनी दाखवले आहे. आमच्याकडे जी काही माहिती आहे, ती सर्व प्रसिद्ध करायला आम्हाला काही वर्षे लागतील. युरोपमध्ये आम्ही आमचा झेंडा रोवू, असे या गटाने म्हटले आहे.

इंग्लंडनेे आतंकवादी संघटनांवर लादलेल्या कडक निर्बंधांचा मुसलमानांना पोटशूळ !

भारतानेही यातून योग्य तो बोध घ्यावा !
     लंडन - कट्टरवादापासून देशाला असलेला धोका लक्षात घेऊन पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी इंग्लंडमधील आतंकवादी संघटनांवर लादलेल्या निर्बंधांचा येथील मुसलमानांना पोटशूळ उठला आहे. (कुठे मतांचा विचार न करता देशहिताला प्राधान्य देणारा इंग्लंड, तर कुठे मतपेट्यांसाठी अल्पसंख्यांकांना गोंजारणारे काही भारतीय राज्यकर्ते ! - संपादक) या निर्बंधांमुळे मुसलमानांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून आम्हाला देशप्रेम सिद्ध करण्यासाठी शासनाच्या आणखी कुठल्या अपेक्षांची पूर्ती करावी लागणार आहे ?, असा प्रश्‍न येथील मुसलमान संघटनांनी उपस्थित केला आहे. तथापि हे निर्बंध केवळ जिहादी आतंकवाद्यांवर नसून सर्व आतंकवादी विचारसरणीच्या संघटनांवर आहेत. असे असतांनाही मुसलमानांच्या संघटना या निर्बंधांवर तुटुन पडल्या आहेत. त्यामुळे आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

बिहारमधील पराभवाचे दायित्व निश्‍चित करा ! - अडवाणी

     नवी देहली - बिहार विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाच्या झालेल्या दारूण पराभवाचे दायित्व सामूहिक आहे, असे म्हणणे म्हणजे पराभवासाठी कुणालाही उत्तरदायी न धरण्यासारखे आहे. त्यामुळे या पभरावाचे दायित्व कुणाचे आहे, हे निश्‍चित करा, अशी मागणीवजा सूचना पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरलीमनोहर जोशी, यशवंत सिन्हा आणि शांताकुमार या नेत्यांनी एका संयुक्त पत्रकाद्वारे केली. या नेत्यांनी त्यांच्या पत्रकात कुणाचे नाव नमूद केले नसले, तरी त्यांचा रोख पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्या दिशेने होता, हे बोलले जात आहे.

आसाममध्ये काँग्रेस शासनाच्या अधिपत्याखाली असलेल्या मंदिरातून श्री कालीमातेच्या सोन्याच्या प्राचीन मूर्तीची चोरी !

काँग्रेसच्या राज्यात हिंदूंची मंदिरे असुक्षित ! हे आहेत मंदिर सरकारीकरणाचे
दुष्परिणाम ! हिंदूंनो, शासनाच्या कह्यातून मंदिरांची मुक्तता करण्यासाठी
संघटित होऊन शासनावर वैध मार्गाने दबाव आणा !
     रंगिया (आसाम) - येथील कामरूप जिल्ह्यातील जयंतीपूर येथील श्री कालीमाता मंदिरातील २०० हून अधिक वर्षे जुनी असलेली श्री कालीमातेची सोन्याची मूर्ती अज्ञात चोरट्यांनी चोरल्याची घटना नुकतीच घडली. चोरट्यांनी मंदिराचे प्रवेशद्वार तोडून आत प्रवेश करून ही मूर्ती चोरली. या मूर्तीच्या सोन्याचे बाजारमूल्य सुमारे २ कोटी रुपये होते, अशी माहिती रंगिया पोलीस ठाण्याचे प्रमुख जोगेंद्र बर्मन यांनी दिली. चोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली आहे.

बांगलादेशमधून आसाममध्ये होणारी अवैध घुसखोरी रोखण्यासाठी हझारीका आयोगाच्या शिफारसी !

     नवी देहली - बांगलादेशमधून आसाममध्ये होणार्‍या अवैध घुसखोरीसंबंधात सर्वोच्च न्यायालयाने वरिष्ठ अधिवक्ता उपमन्यु हझारीका यांच्या नेतृत्वाखाली एक आयोग स्थापन केला होता. या आयोगाने अभ्यासाअंती त्यांच्या शिफारसी आणि अहवाल न्यायालयासमोर सादर केला. सर्वोच्च न्यायालयात अनेक जनहित याचिका दाखल केल्या होत्या. त्यामध्ये अशीच घुसखोरी चालू राहिली, तर आसाममधील लोकसंख्या ख्रिस्ताब्द २०४७ मध्ये मुसलमानबहुल होईल अशी आशंका व्यक्त करण्यात आली होती. त्या पार्श्‍वभूमीवर न्यायालयाने या आयोगाची स्थापना केली होती.

बांगलादेशकडून उल्फाचा महासचिव चेतिया भारताकडे सुपुर्द

     नवी देहली - आसाममधील सक्रीय असलेल्या युनायटेड लिबरेशन फ्रन्ट ऑफ आसाम (उल्फा) या आतंकवादी संघटनेचा महासचिव अनूप चेतिया याला बांगलादेशने भारताच्या स्वाधीन केले आहे. 
      सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशमधील कारागृहात गेल्या अठरा वर्षांपासून अनूप चेतिया आहे. त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर बांगलादेशने भारताच्या स्वाधीन करण्याचा निर्णय घेतला. भारतीय उच्चायुक्त के.जी.पी. सिंह यांनी त्याचा ताबा घेतला. चेतिया याच्यावर आसाममध्ये पोलिसांच्या हत्या, अपहरण, बनावट नोटांप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. त्याला वर्ष १९९७ मध्ये बांगलादेशमध्ये बनावट पासपोर्टप्रकरणी अटक करण्यात आली होती. अटकेच्या वेळी त्याच्याकडे सोळा देशांतील चलने सापडली होती.

वीज नसल्यामुळे संतप्त शेतकर्‍यांचा वीज आस्थापनाच्या अधिकार्‍याला घेराव !

जनतेची क्रांतीच्या दिशेने वाटचाल !
अधिकार्‍याच्या कक्षातील (केबिनमधील) दिवे आणि पंखे केले बंद !
     गुना (मध्यप्रदेश) - येथील केंट परिसरातील वल्लभगड, इमझरा, बाल्लापूर या गावांमध्ये २ आठवड्यांपासून वीजपुरवठा बंद असल्याच्या कारणावरून तेथील संतप्त शेतकर्‍यांनी वीज आस्थापनाच्या अधिकार्‍याला घेराव घातला. एवढेच नाही, तर अधिकार्‍याच्या कक्षातील (केबिनमधील) दिवे आणि पंखे बंद केले. आस्थापनाचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर शेतकर्‍यांनी गार्‍हाणे मांडले.

बिहारमध्ये भाजपचा झालेला पराभव, ही माझ्या वडिलांना श्रद्धांजली ! - सरताज

हाच नियम लावला, तर काँग्रेस आणि साम्यवादी यांचे कितीही पराभव झाले, 
तरीही हिंदूंच्या श्रद्धांजली पूर्ण होणार नाहीत !
     दादरी (उत्तरप्रदेश) - आपल्या देशात द्वेषाच्या राजकारणाला जागा नाही, हे बिहारच्या जनतेने दाखवून दिले. बिहारमध्ये लागलेला निवडणुकीचा निकाल हा सांप्रदायिक राजकारणाच्या विरोधात लागलेला असून तीच माझ्या वडिलांना वाहण्यात आलेली श्रद्धांजली आहे, अशी प्रतिक्रिया दादरी हत्याकांडात बळी पडलेल्या महंमद अखलाखचा मुलगा सरताज याने व्यक्त केली आहे. तो असेही म्हणाला की, धर्माच्या नावावर लढून काहीही लाभ होत नाही, याची लोकांना जाणीव झाली पाहिजे. फक्त सत्तेच्या लोभाने देशाचे विभाजन करू नका, असे आवाहन मी देशातील सर्व राजकारण्यांना करतो.

हिंदूंनी एकत्र येऊन धर्माचे रक्षण करणे आवश्यक ! - स्वामी चिदानंदपुरी, केरळ

स्वामी चिदानंदपुरी यांचे हिंदु जनजागृती समितीच्या कार्यास शुभाशीर्वाद !
स्वामी चिदानंदपुरी यांना भेट देतांना
श्री. नंदकुमार कैमल
     एर्नाकुलम् - सध्या भारतातील परिस्थिती अत्यंत बिकट आहे. हिंदूंचे विरोधक असहिष्णुतेचा बाऊ करून धर्मावर आघात करत आहेत. धर्मद्रोही प्रसारमाध्यमे अपप्रचार करून हिंदूंना धर्मापासून दूर नेत आहेत. त्यामुळे हिंदूंनी एकत्र येऊन धर्माचे रक्षण केले पाहिजे, असे प्रतिपादन येथील अद्वैत आश्रमाचे स्वामी चिदानंदपुरी यांनी येथे केले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुदिश पुथलत, श्री. नंदकुमार कैमल आणि सौ. अवनी लुकतुके यांनी नुकतीच स्वामी चिदानंदपुरी यांची भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते. धर्मरक्षणासाठी कार्य करत असलेल्या हिंदु जनजागृती समितीला माझे सदैव आशीर्वाद आहेत, असेही त्यांनी सांगितले. या वेळी स्वामीजींना हिंदु जनजागृती समितीच्या केरळ राज्यातील कार्याविषयी अवगत करण्यात आले. याशिवाय त्यांना हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत हिंदु राष्ट्र्र का हवे ? हा ग्रंथ, तसेच सनातन पंचांग २०१६ भेट देण्यात आले. 

पुरस्कारवापसीमागे राजकारणच ! - प्रमोद मुतालिक

स्वयंभू विशेषांकांचे प्रकाशन करतांना मान्यवर
स्वयंभू दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन
      केडगाव (जिल्हा पुणे) - असहिष्णु वातावरणाविषयी बोलणार्‍यांना हिंदूंवर होणारे अन्याय, अत्याचार असहिष्णू वाटत नाहीत का ? काश्मीरमध्ये जेव्हा हिंदूंचे सामूहिक हत्याकांड झाले, त्या वेळी या मंडळींना पुरस्कार परत करण्याचे का सुचले नाही ? मुंबईमध्ये जेव्हा आतंकवादी आक्रमण झाले, त्या वेळी मुंबईमध्येच रहाणार्‍या शाहरुख खान यांना असहिष्णू का वाटले नाही ? नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून हे सर्व चालू झाले असून हा सर्व राजकीय भाग आहे, असे सांगत श्री. मुतालिक यांनी देशातील कथित असहिष्णू वातावरणाच्या विरोधात पुरोगामी मंडळींनी आरंभलेल्या आंदोलनाचा समाचार घेतला.

वरणगांव (जिल्हा जळगाव) येथील श्री. यशवंत पाटील यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

श्री. यशवंत पाटील यांचा सत्कार करतांना पू. नंदकुमार जाधव (डावीकडे)
      जळगाव - सेवेची तळमळ असलेले आणि स्वभावदोषांवर मात करण्यासाठी झटणारे वरणगाव येथील साधक श्री. यशवंत पाटील यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे, असे सनातनचे पू. नंदकुमार जाधव यांनी ११ नोव्हेंबर या दिवशी घोषित केले. यावेळी उपस्थित सर्व साधक कृतज्ञताभावात न्हाऊन निघाले.

अंबड (जिल्हा जालना) येथे सनातन ग्रंथालयाचे उद्घाटन

ग्रंथालयाचे उद्घाटन करतांना श्री. दिपकसिंह ठाकूर
     जालना - दीपावलीच्या शुभ मुहुर्तावर भाजपचे जालना जिल्हा उपाध्यक्ष श्री. दिपकसिंह ठाकूर यांच्या हस्ते अंबड येथील श्रीपत नारायण मंदिर येथे सनातन ग्रंथालयाचे उद्घाटन झाले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. रवी अंबिलवादे, श्री. किशोर जगताप, सनातनच्या कु. चैताली डुबे, दाढेगाव येथील धर्माभिमानी,

खडकी (पुणे) येथे धर्मांधांकडून पोलीस कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांना लोखंडी रॉडने मारहाण

पोलिसांवर हात उगारणार्‍यांवर कठोर कारवाईची अपेक्षा ! 
     पुणे, १२ नोव्हेंबर - तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या दुकानाचे मालक आणि काही धर्मांध यांची भांडणे सोडवण्यास गेलेल्या पोलीस कर्मचार्‍याला धर्मांधांनी ९ नोव्हेंबर या दिवशी शिवीगाळ केली. तसेच त्याच्या घरात घुसून त्याला आणि त्यांच्या कुटुंबियांना मारहाण केल्याच्या आरोपात खडकी पोलिसांनी ५ धर्मांधांना अटक केली आहे. अरबाज आयुब खान, रिझवान अजीज खान, अब्दुल अजीज खान, अमित प्रकाश काची आणि रौफ करीम शेख अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने १४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

विद्रोही नेते डॉ. भारत पाटणकर यांची अजब आणि तितकीच देशद्रोही मागणी !

      डॉ. भारत पाटणकर यांनी परात्पर गुुरु डॉ. आठवले यांच्या वाक्याची स्वतःला हवी तशी मोडतोड करून बनवलेल्या धर्मद्रोही, देशद्रोही यांना संपवण्यासाठी आतंकवादी आणि नक्षलवादी बना, या वाक्याला विरोध केला आहे. प्रत्यक्षात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अशा प्रकारे कुठलेही लिखाण केलेले नाही. या संदर्भात डॉ. भारत पाटणकर यांच्या देशप्रेमावर मात्र प्रश्‍न उपस्थित होतात;

फटाक्यांमुळे प्रतीवर्षी ६ सहस्र लोकांना अंधत्व

      नागपूर - फटाक्यांच्या अतिउत्साही वापरामुळे प्रतिवर्षी ६ सहस्र लोकांना अंधत्व येत असल्याचे वास्तव देश पातळीवर केल्या गेलेल्या अभ्यासातून समोर येत आहे. यात बाधित होणार्‍यांची संख्या ही २० वर्षांखालील लोकांची अधिक असते. फटाके फोडणार्‍याइतकेच ते बघणार्‍यांनाही त्याचा त्रास होतो; कारण स्फोटामुळे दगड, माती वेगाने डोळ्यांना इजा करतात. फटाके फुटल्यावर निघणारा धूर डोळे, फुफ्फुस आणि त्वचा यांना अपायकारक असतो.

फटाके विकणार्‍या एजन्सी आणि दुकाने यांनी महानगरपालिकेला ३ सहस्र रुपये पर्यावरण स्वच्छता शुल्क द्यावे !

घनकचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी शुल्काचा वापर
राष्ट्रीय लवादाचा आदेश
      मुंबई - कानठळ्या बसवणारे फटाके फोडल्याने होणारे ध्वनी आणि वायू प्रदूषण यांच्या नियमांच्या भंगाची नोंद राष्ट्रीय हरित लवादाने घेतली आहे. फटाके विकणार्‍या एजन्सी आणि दुकाने यांनी महापालिकेला तीन सहस्र रुपये पर्यावरण स्वच्छता शुल्क द्यावे, असा आदेश लवादाने दिला आहे. तसेच या शुल्काचा वापर केवळ फटाके फोडल्याने निर्माण झालेल्या घनकचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी करावा, असेही लवादाने स्पष्ट केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर पालिका प्रशासनाने कठोर कारवाई करावी.

बीड, लातूर, धाराशिव, नांदेड आणि परभणी या जिल्ह्यांत केवळ १ मास पुरेल इतकाच पाणीसाठा

६२२ तलावांनी गाठला तळ 
मराठवाड्यात भीषण पाणीटंचाईचे संकट ! 
अतिवृष्टि: अनावृष्टि: शलभा मूषका: शुका: । 
स्वचक्रं परचक्रं च सप्तैता ईतय: स्मृता: ॥ - कौशिकपद्धति 
अर्थ : धर्माचे पालन न केल्यामुळे अतीवृष्टी, अनावृष्टी (दुष्काळ), टोळधाड, उंदरांचा त्रास, पोपटांचा उपद्रव, आपापसांत लढाया आणि शत्रूचे आक्रमण, अशी सात प्रकारची संकटे (राष्ट्रावर) येतात. तात्पर्य, साधना केली, तरच आपत्काळाची तीव्रता अल्प होईल किंवा तो सुसह्य होईल.

व्यसनमुक्त युवक संघाच्या नूतन कार्यालयाचा उद्घाटन समारंभ

      सातारा - व्यसनमुक्त युवक संघाच्या स्वमालकीच्या नूतन कार्यालयाचा उद्घाटन समारंभ १३ नोव्हेंबर या दिवशी म्हणजेच होणार आहे, अशी माहिती व्यसनमुक्त युवक संघ, महाराष्ट्रचे अध्यक्ष श्री. विलासबाबा जवळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
     फलटण ते पंढरपूर रस्त्यावर पिंपरदपासून १ कि.मी. अंतरावर हे कार्यालय उभारण्यात आले आहे. व्यसनमुक्त युवक संघ गेली १५ वर्षे महाराष्ट्रभर समाज शुद्धी आणि समाजप्रबोधनाचे कार्य नि:स्वार्थपणे करत आहे. राष्ट्राय स्वाहा । इदं न मम् ॥ हे आमचे ब्रीद अंगी बाणवून प्रत्येक युवक कार्यरत आहे.

अडीच कोटी रुपयांच्या निधीचा अपवापर करणार्‍या संबंधितांवर निलंबनाची कारवाई

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शाळेतील प्रकार
     कल्याण - कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शाळा दुरुस्तीसाठी असलेल्या अडीच कोटी रुपयांचा निधी चुकीच्या पद्धतीने वापरण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीच्या चौकशीअंती शिक्षण मंडळाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत कोलते यांच्यासह उप अभियंता एन. जी. चव्हाण आणि कनिष्ठ अभियंता दीपक अहिर यांना निलंबित केले आहे.

आग लागण्यामागे फटाक्यातील रॉकेट हा प्रकार कारणीभूत असल्याची शक्यता

गोरेगाव (मुंबई)  येथे भीषण प्रकार
     मुंबई - येथील गोरेगाव परिसरातील हीना गौर इमारतीतील एका घराला आग लागली. दिवाळीत उडवण्यात येणार्‍या रॉकेटमुळे ही आग लागल्याचे येथील सदस्यांचे म्हणणे आहे. १० नोव्हेंबरच्या रात्री ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी आल्यावर ही आग आटोक्यात आणण्यात आली. आगीत जीवितहानी झाली नसली, तरीही घराची पुष्कळ हानी झाली आहे.

आयुर्वेदशास्त्र जगासमोर आणण्यासाठी 'आयुर्वेद दिन' साजरा करण्यात येईल ! - श्रीपाद नाईक, केंद्रीय आरोग्यमंत्री

असा स्तुत्य निर्णय घेणारे केंद्रीय आरोग्यमंत्री श्री. श्रीपाद नाईक यांचे अभिनंदन ! 
मुंबई - आयुर्वेद ही भारताची प्राचीन परंपरा असून वैद्यांनी ती आजही जोपासली आहे. ही परंपरा आणि आयुर्वेदशास्त्र जगासमोर आणण्यासाठी 'आयुर्वेद दिन' साजरा करण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री श्री. श्रीपाद नाईक यांनी येथे केले. धन्वंतरि जयंतीनिमित्त सांडू फार्मास्युटिकलच्या वतीने चेंबूर येथे आयोजित करण्यात आलेल्या श्री धन्वंतरि पूजन आणि वैद्य सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. 

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने शिवतीर्थावर श्री शिवतीर्थ दिपोत्सव साजरा

      मुंबई - श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, मुंबईच्या वतीने आणि पू. संभाजीराव भिडे गुरूजींच्या प्रेरणेने शिवतीर्थ, शिवाजी पार्क, दादर येथे १० नोव्हेंबर २०१५ या दिवशी सायंकाळी दिपोत्सव साजरा केला.
     हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे शिवतीर्थ, शिवाजी पार्क दादर, मुंबई मध्ये असलेले भव्यदिव्य स्मारक दिपावलीत अंधारात असते.

मडगाव (गोवा) येथील श्रीमती भारती मंगेश प्रभु यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

श्रीमती भारती प्रभु यांचा सत्कार करतांना डॉ. मनोज सोलंकी
      मडगाव - मडगाव, गोवा येथील श्रीमती भारती मंगेश प्रभुु (वय ७८ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. या आनंदवार्तेची भेट देऊन हिंदु जनजागृती समितीचे गोवा राज्य समन्वयक, तसेच ६५ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेलेे डॉ. मनोज सोलंकी यांनी सर्व प्रभु कुटुंबियांचा दिवाळीचा आनंद द्विगुणीत केला. श्रीमती प्रभु यांचा डॉ. मनोज सोलंकी यांच्या हस्ते श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

दिवाळी पहाट नाही, आता हिंदु राष्ट्राची पहाट हवी !

     गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात आयोजित केल्या जाणार्‍या दिवाळी पहाट या संगीत कार्यक्रमांमुळे दिवाळी आणि संगीत कार्यक्रम असे जणू समीकरणच झाले आहे. पुण्या-मुंबईसारख्या शहरांमध्ये विशेषतः मोठ्या प्रमाणात अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अभ्यंगस्नान झाल्यानंतर दिवाळी पहाटच्या अंतर्गत हिंदी-मराठी गाण्यांची मैफिल ऐकण्यासाठी आबालवृद्धांची गर्दी होेते.

फटाक्यांचे दुष्परिणाम आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना द्याव्यात !

हिंदु जनजागृती समितीच्या 
फटाकेविरोधी अभियानाचा परिणाम
पुणे येथे शिक्षण विभागाकडून परिपत्रक घोषित 
     पुणे, १२ नोव्हेंबर - फटाक्यांमुळे होणारे ध्वनी आणि वायू यांचे प्रदूषण टाळण्यासाठी गेली अनेक वर्षे स्वयंसेवी संस्थांकडून जनजागृती करण्यात येत आहे. फटाक्यांचे सर्वाधिक आकर्षण असणार्‍या लहान मुलांमध्येच जनजागृती करण्याच्या मोहिमेला आता यश मिळत आहे. या मोहिमेला शाळांनी हातभार लावला आहे. शिक्षण विभागानेही शाळा आणि महाविद्यालये यांना फटाक्यांचा वापर अल्प करण्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 'फटाक्यांचा वापर आणि दुष्परिणाम यांची माहिती विद्यार्थ्यांना द्यावी, तसेच दिवाळी पर्यावरणपूरक साजरी करण्याविषयी सूचना द्याव्यात', असे परिपत्रकच शिक्षण विभागाने काढले आहे. 

शाहरुख खान यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी

     मुंबई - अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अभिनेता शाहरुख खानची १० नोव्हेंबर या दिवशी तीन घंटे चौकशी केली आहे. परकीय चलन नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही चौकशी करण्यात आली आहे. 
१. आयपीएल्चा संघ 'कोलकाता नाईट रायडर्स'च्या समभागांच्या विक्री प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने शाहरुख खान यांच्या विरोधात समन्स बजावले होते. तर ऑक्टोबरमध्ये संचालनालयाने शाहरुख यांना तिसरे समन्स बजावले होते. त्यानंतर या प्रकरणी अं. संचालनालयानेे शाहरुख यांची चौकशी केली. 

महानगरपालिका कर्मचार्‍यांसाठी हिवाळ्यात पावसाळी गमबूट खरेदी करण्याचा घाट

     पिंपरी, १२ नोव्हेंबर - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील कर्मचार्‍यांसाठी २ सहस्र ४७० जोड पावसाळ्यात वापरण्यात येणारे पूर्ण आकाराचे गमबूट खरेदी करण्यात येणार आहेत. डकबँक या आस्थापनाच्या गमबूट खरेदीसाठी लघुत्तम दराने १८ लक्ष २७ सहस्र रुपये व्यय करण्यात येणार आहेत. ही खरेदी पावसाळा झाल्यानंतर करण्यात येत असल्यामुळे आता नेमके कशासाठी खरेदी केले जात आहेत, असा प्रश्‍न विचारला जात आहे. (पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा अजब कारभार !- संपादक)

यवतमाळ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

   
आंदोलनात सहभागी हिंदुत्ववादी
 यवतमाळ -
देवता, राष्ट्रपुरुष यांची चित्रे असणार्‍या फटाक्यांवर कायमस्वरूपी बंदी आणावी, तसेच गोरक्षकांना स्वसंरक्षणार्थ शस्त्र बाळगण्याचे परवाने द्यावे, या मागण्यासाठी येथे नुकतेच हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले. 

त्रिपुरातील ‘सेक्स रॅकेट’मध्ये विद्यार्थिनींचा समावेश : समाजातील नीतीमत्तेचा कडेलोट !

     दोनच दिवसांपूर्वी त्रिपुरा येथे वेश्या व्यवसाय करणार्‍या ३४ जणांची एक टोळी पोलिसांनी पकडली. यातील धक्कादायक माहिती म्हणजे अटक करण्यात आलेल्यांपैकी २० जण हे विद्यार्थी असून यातील काही मुली नामांकित अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत. यातील एक मुलगी राष्ट्रीय तंत्रज्ञान महाविद्यालयात शिक्षण घेते, तर दोन मुली १७ वर्षांच्या आहेत. ज्या वयात आपल्या पाल्याने भविष्यात पुढे जाऊन काही तरी करावे, या अपेक्षेने शिक्षणासाठी मोठा व्यय करून पाल्यांना अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणासाठी पाठवलेले असते, ते पाल्य उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी न धडपडता अशा कृत्यांमध्ये भाग घेतांना सापडणे, हे निश्‍चितच लाजीरवाणे आहे. दूरचित्रवाहिनीवरील प्रसिद्ध अभिनेत्रींना वेश्या व्यवसाय करतांना पकडले, अशा आशयाची वृत्ते नुकतीच काही दिवसांपूर्वी आली होती. आता तेथे विद्यार्थिनींची अटक म्हणजे समाजातील उरलीसुरली नीतीमत्ताही संपत चालली असून समाज झपाट्याने रसातळाला चालल्याचे चित्र आहे. 

फलक प्रसिद्धीकरता

घुसखोरीची समस्या सोडवण्यासाठी हिंदु राष्ट्र हाच एकमात्र उपाय आहे !
     बांगलादेशमधून आलेल्या धर्मांध घुसखोरांमुळे बंगालची स्थिती इतकी भीषण झाली आहे की, ती देश आणि हिंदू यांसाठी अत्यंत घातक बनली आहे, असे मत परराष्ट्र धोरणाचे अभ्यासक जयंतकुमार रे यांनी मांडले.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Bangalme badhte ghuskhorise Hinduonka jina mushkil ban gaya hai !
Hinduo, Bengal bhi Kashmir bane, is se pahele jago !
जागो ! : बंगाल में बढते घुसखोरी से हिन्दुआें का जिना मुश्कील बन गया है !
हिन्दुओ, बंगाल भी कश्मीर बने इससे पहले जागो !

वाळू माफियांचा सोलापूर महसूल कर्मचार्‍यांवर खुनी हल्ला

मंडल अधिकार्‍याच्या डोक्यात दगड घातला, तलाठ्यासह चालकाला मारहाण 
     पंढरपूर (जिल्हा सोलापूर), १२ नोव्हेंबर- येथील तहसीलदार गुरव यांना अज्ञाताने दिलेल्या माहितीवरून तालक्यातील पटवर्धन कुरोली येथे भीमा नदीच्या पात्रात चालू असलेल्या अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी १० नोव्हेंबर या दिवशी सकाळी १०.३० वाजता गेलेले महसूलचे प्रभारी मंडल अधिकारी एस.यू. माने यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना गंभीर घायाळ केले, तर तलाठी नीलेश कुंभार आणि विजय घाडगे यांनाही जबर मारहाण केली. या विषयी करकंब पोलीस ठाण्यात हल्लेखोरांवर गुन्हा नोंद केला आहे.

तक्रारदाराच्या हस्ताक्षरातच तक्रार प्रविष्ट करून घेण्याचे पोलीस महासंचालकांचे आदेश

     नगर, १२ नोव्हेंबर - आरोपी निर्दोष सुटण्याच्या वाढत्या प्रमाणाला आळा घालण्याचा एक भाग म्हणून पोलीस ठाण्यात तक्रारदाराच्या हस्ताक्षरातच फिर्याद प्रविष्ट करून घ्यावी आणि त्याचे ध्वनीचित्रीकरणही करावे, असे आदेश पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी दिले आहेत. हा आदेश राज्यातील पोलीस आयुक्त, अधीक्षक या सर्वांना पाठवण्यात आला असून त्याची सूचना सर्व पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकार्‍यांना दिल्या आहेत. 

महापौरपदासाठी ३ स्वतंत्र अर्ज प्रविष्ट

     कोल्हापूर, १२ नोव्हेंबर (वार्ता.) - कोल्हापूरच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी आतापर्यंत प्रत्येकी ३ उमेदवारी अर्ज प्रविष्ट झाले आहेत. या पदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी विरुद्ध भाजप-ताराराणी आघाडी यांच्यात लढत होणार आहे. महापौरपदासाठी काँग्रेसकडून अश्‍विनी रामाणे, भाजपकडून सविता भालकर आणि ताराराणी आघाडीकडून स्मिता माने यांनी उमेदवारी अर्ज प्रविष्ट केले आहेत. भाजप ताराराणी आघाडी यांनी एकत्रितपणे निवडणूक लढविली असली, तरी महापौरपदासाठी मात्र त्यांनी स्वतंत्र अर्ज प्रविष्ट केले आहेत. त्यामुळे त्यांची खेळी काय आहे, हा चर्चेचा विषय आहे. उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शमा मुल्ला, ताराराणी आघाडीकडून राजसिंह शेळके, भाजपकडून संतोष गायकवाड यांचे अर्ज प्रविष्ट केले आहेत. उमेदवारी अर्ज प्रविष्ट केल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजीने महापालिकेचा परिसर दणाणून गेला.

समाजकंटकांचे सनातन आश्रमावरील आक्रमणांचे घृणास्पद कृत्य चालूच !

शिवीगाळ करणे, धमक्या देणे, अश्‍लील बोलणे आणि 
दगडफेक करणे या गोष्टी दखलपात्र ठरवणारे दंडविधान हिंदु राष्ट्रात असेल ! 
     सनातनच्या रामनाथी आश्रमातील साधकांना धमक्या देण्याचा, अश्‍लील बोलण्याचा आणि आश्रमावर दगड फेकण्यास आरंभ केल्याचा कालचा ५ वर्षे ३५७ वा दिवस ! 
 ९.११.२०१५ 
     रात्री १०.४३ वा. आश्रमासमोरील रस्त्यावरून दोन विद्यार्थी 'बॉम्ब बॉम्ब', असे ओरडत गेले.

सनातन संस्था एक हिंदु संघटना असल्याने तिला अपकीर्त करण्याचे आंतरराष्ट्रीय षडयंत्र !

प्रूडंट मिडीया या वृत्तवाहिनीवरील हेड ऑन कार्यक्रमात सनातन संस्थेचे 
प्रवक्ता अभय वर्तक यांचे प्रतिपादन
     पणजी (गोवा) कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातनचे साधक समीर गायकवाड यांना अटक झाल्यानंतर राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात आले. सनातनचे साधक समीर गायकवाड यांना अटक झाल्याची घटना महाराष्ट्रातील प्रसारमाध्यमांसाठी एक वृत्त होऊ शकते; पण आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे या प्रकरणी रामनाथी येथील आश्रमात येणे ही आश्‍चर्याची गोष्ट आहे. कर्नाटक येथे बजरंग दलाचे कार्यकर्ते तथा गोप्रेमी प्रशांत पुजारी यांची हत्या झाली आणि या प्रकरणी चार मुसलमानांना अटक झाली, तेव्हा किंवा काश्मीरमध्ये वर्ष १९८९ पासून सहस्रो हिंदूंची हत्या झाली, तेव्हा स्थानिक, राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे त्या ठिकाणी वृत्तसंकलनासाठी पोचली नाहीत. हिंदु आतंकवाद सिद्ध करण्यासाठी हिंदु संघटनांना अपकीर्त करण्याचे हे एक आतंरराष्ट्रीय कारस्थान आहे, असे रोखठोक प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी प्रूडंट मिडीया या वृत्तवाहिनीवर हेड ऑन कार्यक्रमात मुलाखत देतांना केले. प्रूडंट मिडीयाचे संपादक श्री. प्रमोद आचार्य यांनी ही मुलाखत घेतली. सनातन संस्थेच्या साधकांना वारंवार अटक केली जाते, सनातन संस्थेवर उग्रवादी असल्याचा वारंवार आरोप होत आहे आणि सनातनला वारंवार लक्ष्य केले जाते, या सूत्रांवर उत्तर देतांना श्री. वर्तक यांनी हे प्रतिपादन केले.

भाऊबीज (यमद्वितीया)

     कार्तिक शुद्ध द्वितीयेला यमद्वितीया हे नाव आहे. हा दिवस भाऊबीज या नावानेही प्रसिद्ध आहे. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला, म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे नाव मिळाले. या दिवशी कोणत्याही पुरुषाने स्वतःच्या घरी पत्नीच्या हातचे अन्न घ्यायचे नसते. त्याने बहिणीच्या घरी जावे आणि तिला वस्त्रालंकार वगैरे देऊन तिच्या घरी भोजन करावे. सख्खी बहीण नसेल तर कोणत्याही बहिणीकडे किंवा अन्य कोणत्याही स्त्रीला भगिनी मानून तिच्याकडे जेवावे, असे सांगितले आहे. या दिवशी यमराज आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला जातो आणि त्या दिवशी नरकात पिचत पडलेल्या जीवांना त्या दिवसापुरते मोकळे करतो.

पुरुषांना आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे स्मरण करून देणारा दिवस म्हणजे भाऊबीज !

प.पू. पांडे महाराज 
     स्त्रीजातीला केवळ भोग्य वस्तू न समजता तिच्याकडे पवित्र दृष्टीने आणि बहिणीच्या स्वरूपसंधानातून पाहून तिला भाऊबीजेच्या दिवशी भेटवस्तू देतात. तीही बंधूप्रेमापोटी भावाला ओवाळते. हे बंधू-भगिनीचे नाते अतूट रहावे आणि स्त्री संरक्षणासाठी प्रत्येक स्त्रीला वेळप्रसंगी माझा बंधू माझ्या पाठीशी उभा आहे, ही धारणा जागृत करण्याचा हा दिवस आहे. त्या आधारावर ती स्वतःचे जीवन निर्धास्तपणे जगू शकते. प्रत्येक पुरुष आपल्या भगिनीच्या साहाय्यार्थ उभा राहिला, तर स्त्रियांना ताठ मानेने जगता येईल. आज वाईट शक्तींद्वारे तिची अवहेलना होऊन तिला त्रास होत आहे. तेव्हा अशा बंधूजनांनी एकत्र येऊन दुष्ट शक्तींचे निर्मूलन करायला पाहिजे, तरच तिला आपण प्रेमाने भगिनी म्हणू शकू. - प.पू. परशराम माधव पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२९.९.२००६)

हिंदूंनो, तुम्ही तुमचा आत्मविश्‍वास सोडला नाही, तर अद्यापही आपल्याला सर्वकाही मिळवता येईल !

Add caption
हिंदूंनो, तुम्ही तुमचा आत्मविश्‍वास सोडला नाही, तर अद्यापही आपल्याला सर्वकाही मिळवता येईल; कारण हिंदु धर्मात पुनरुत्थानाची एक अद्भूत शक्ती सामावलेली आहे. जगातील अनेक मोठमोठे देश, जाती आणि राज्ये नष्ट झाली; परंतु आपण अद्याप टिकून आहोत; कारण आपल्यामध्ये तसे अमर चैतन्य आहे. आपल्यावर आलेली अनेक संकटे आपण नष्ट केली. या देशावर चालून आलेल्या, स्वतःला विश्‍वविजेता म्हणवणार्‍या ग्रीक अलेक्झांडरला चंद्रगुप्ताने सैनिकी आणि सांस्कृतिक क्षेत्रात पूर्णपणे पराभूत केले. त्यानंतर ३०० वर्षांनी युरोप आणि आशिया जिंकून हिंदुस्थानात आलेल्या विजयी हुणांना थोर विक्रमादित्याने नामशेष करून टाकले. त्यानंतर आलेल्या शकांची शालीवाहन आणि यशोवर्मा यांनी तीच स्थिती केली.

मराठी लुप्त होण्याच्या मार्गावर...

दिवाळीनिमित्त एका वयस्क व्यक्तीने एका परिचिताला (वयाने लहान असलेल्या) शुभेच्छा देण्यासाठी नुकताच संपर्क केला होता. तिने परिचिताला म्हटले, दिवाळीच्या शुभेच्छा ! परिचिताला त्यावर काय बोलावे, तेच सुचेना; कारण same to u, well wishes, Happy diwali अशा शब्दांत शुभेच्छा देणार्‍या इंग्रजाळलेल्यांना मराठीतून दिलेल्या शुभेच्छांना प्रतिसाद कसा द्यावा, ते अर्थातच कसे सुचणार ? शेवटी काहीही न सुचल्याने दोन क्षण थांबून त्यांनी हो. तुम्हाला प्रणाम ! असे म्हटले आणि तुम्ही मराठीतून शुभेच्छा दिल्यात; मात्र मला तुम्हाला काय म्हणायला हवे, हे न आठवल्याने मी प्रणाम म्हटलेे, असेही सांगितले. खरे तर नमस्कार म्हणणे आवश्यक होते. सदर परिचिताचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले असतांनाही नमस्कार हा शब्द न आठवणे फारच दुर्भाग्यपूर्ण वाटले ! ज्या मराठीतून शिक्षण घेऊन आपण लहानाचे मोठे झालो, त्याच भाषेत आपल्याला दिवाळीच्या साध्या शुभेच्छाही देण्यासाठी शब्द आठवावे लागणे, ही खरोखरच मराठीची झालेली दुःस्थिती म्हणावी लागेल !

अतिथीचा प्राण वाचावा; म्हणून प्रयत्नशील यजमान आणि यजमानाच्या कुटुंबातील एकाचा प्राण वाचावा; म्हणून प्रयत्नशील अतिथी (कुंती)

दीपावलीच्या सुट्टीनिमित्त प्रतिदिन वाचा बोधकथा !
‘एकचक्रा नगरीत पांडव ब्राह्मण वेशात एका ब्राह्मणाच्या घरी रहात होते. माता कुंतीही त्यांच्यासोबत होती. एकदा त्या ब्राह्मणाच्या घरात कुंतीने रडारड ऐकली. तिने विचारले, तेव्हा ब्राह्मण म्हणाला, ‘‘जवळच्या डोंगरावर बकासुर नावाचा राक्षस रहातो. त्याला प्रतिदिन ३ मण भात, २ रेडे आणि १ माणूस एवढे अन्न लागते. एकेका घरातून एकेक दिवस हे अन्न त्याला द्यावे, असे ठरले आहे. आज ही पाळी माझ्यावर आली आहे; म्हणून आम्ही फार दुःखात आहोत. कुंती म्हणाली, ‘‘तुम्ही काळजी करू नका. माझा मुलगा भीम बकासुराकडे अन्न घेऊन जाईल. ब्राह्मण म्हणाला, ‘‘नाही नाही, तुम्ही आमचे पाहुणे आहात. आमच्यासाठी तुमच्या मुलाचा वध मी होऊ देणार नाही. कुंती म्हणाली, ‘‘माझा मुलगा पराक्रमी आहे. बळकट आहे. अनेक राक्षसांना त्याने मारले आहे. बकासुर माझ्या मुलाचा नाश करू शकणार नाही. उलट तोच बकासुराला ठार करील.

शिक्षणपद्धतीत परिवर्तन अत्यावश्यक !

      पूर्वी कधीतरी अन्याय झाला, असे इंग्रज साहेबाने ठरवले आणि त्याच्या आधारे आपण शिक्षकांच्या राखीव नोकर्‍या चालू केल्या अन् तेथे दलित-मराठा यांची गर्दी झाली. मराठ्यांनी सेनेत भरती न होता इतर उद्योग चालू केले. थोडक्यात राष्ट्रीय एकात्मतेच्या जागी आपल्या शासनाने राष्ट्रीय विषमता वाढवण्याचा उद्योग चालू केला. ही विषमता प्रच्छन्नपणे अविरत चालू आहे. त्याचा परिणाम आज आपण अनुभवत आहोत. आपल्या शिक्षणव्यवस्थेत अशी विषमता प्रामुख्याने टाळण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला जात होता. आजच्या व्यवस्थेत ते शक्य नाही. राजकीय पुढारी, शासकीय अधिकारी, त्यांच्याशी संबंधित असलेला अधिकारीवर्ग (उदा. पोलीस) आणि शिक्षणसम्राट अन् त्यांचे आश्रित, अशा लोकांची एक जबरदस्त टोळी गावोगाव निर्माण झाली आहे. त्यामुळे ही शिक्षणव्यवस्था पालटणे आता शक्य नाही. बी.एड्. आणि एम्.एड्. किंवा प्रौढ किंवा प्राथमिक शिक्षण यांच्या संशोधनाप्रमाणे निर्माण केलेल्या नियमांचा आजच्या व्यावहारिक शिक्षणव्यवस्थेशी सूतराम संबंध नाही, हे सत्य सर्वांना माहीत आहे. तरीही शिक्षणपद्धतीत परिवर्तन करण्यास कोणी सिद्ध नाही. - दादूमिया (धर्मभास्कर, ऑगस्ट २००९) 

नेमाडेसाहेब पुरस्कार कधी परत करताय ?

     घाबरू नका. ही धमकी नव्हे. हल्ली पुरोगाम्यांविरुद्ध काही लिहायलाही भीती वाटते; पण नागरिक म्हणून मलाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. खटकणार्‍या गोष्टी मीही लिहू शकतो.
     दुसरे म्हणजे मी असे लिहितो याचा अर्थ पुरस्कार परत केलेल्यांची टिंगल करतोय असे नव्हे; तेवढा मी असंस्कृत नाही. कर्मठही नाही. तुम्ही बंडखोर विचारवंत, पुरोगामी, धाडसी लेखक, वाघाच्या काळजाने बोलणारे, त्यामुळे एवढ्या जणांनी पुरस्कार परत केल्यावरही तुम्ही मात्र मागे कसे ? घाई करा, नाहीतर अडगळीत पडाल. (कि ज्ञानपीठ पुरस्काराचा मोह सुटत नाही ?) हिंदु संस्कृतीला समृद्ध अडगळ म्हणून जनजाहीर करून टाकलत. (भालचंद्र नेमाडे यांनी हिंदु - एक समृद्ध अडगळ ही कादंबरी लिहिली आहे.) अडगळ ही बाहेर फेकतात किंवा भंगारात विकतात. परक्या माणसाला कादंबरीचे शीर्षक वाचताच शिसारी यावी, जशी आज सनातन या सात्त्विक शब्दाची काहींना शिसारी येते. तुमच्या लिखाणाचा प्रतिवाद करणारे माझे पुढील मुद्दे वाचा.

सत्ययुगापासून झालेली हिंदूंची अधोगती आणि त्यावर उपाय

श्री. कुलभूषण गावडे
१. सत्ययुगापासून कलियुगापर्यंतचा प्रवास
१ अ. सत्ययुग : या युगात सर्व लोक अंगी दैवी गुण असणारे, सत्य बोलणारे आणि सत्याने वागणारे होते. सर्वत्र आनंद होता. या काळात धर्माची आवश्यकता नव्हती. त्यामुळे धर्म नव्हता; परंतु त्यामुळे कालांतराने सर्वत्र क्षत्रिय उन्मत झाले. अशा वेळी परशुरामांचा अवतार झाला. त्यांच्या ठिकाणी ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचा संगम होता. त्यांनी पृथ्वीवरून क्षत्रियांना १०० वेळा नष्ट केले. समुद्र मागे सारून कोकणभूमीची निर्मिती केली. धर्माची स्थापना केली. भारतीय संस्कृतीने सुसंस्कृतपणाचा पहिला टप्पा गाठला.

तोडगे, यंत्रे, मंत्र इत्यादी उपायांना काळाप्रमाणे महत्त्व

परात्पर गुरु डॉ. आठवले
साधनेत आल्यापासून साधना ही केवळ ईश्‍वरप्राप्तीसाठी आहे, व्यावहारिक अडचणी सोडवण्यासाठी नाही, असे मला वाटायचे. त्यामुळे साधकांनाही व्यावहारिक अडचणींचा विचार करू नका, तर साधनेचाच करा. साधनेने अडचणी दूर होतील, असे मी सांगायचो. आता जसा आपत्काळ जवळ येत आहे, तसे लक्षात आले की, अडचणींमुळे साधक साधना करू शकत नाहीत. त्यांना अडचणी दूर होण्यासाठी सोपे उपाय सांगणे आवश्यक आहे. त्यासंदर्भात मला तोडगे, यंत्रे, मंत्र इत्यादी उपाय महत्त्वाचे आहेत, हे लक्षात आले.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (५.१०.२०१५)

नंदुरबार येथील धर्मप्रेमी युवकांना आलेल्या अनुभूती

१. श्री. आकाश मुकेश गावीत 
१ अ. अनुभूती  
१. 'रामनाथी आश्रमात जाण्याचा निरोप मिळाल्यावर माझा भाव जागृत झाला. २.४.२०१५ या दिवशी आश्रमात आल्यावर पुन्हा भाव जागृत झाला.
२. २.४.२०१५ या दिवशी सकाळी प.पू. डॉक्टरांचे दर्शन झाले आणि 'जणू काही भगवान श्रीकृष्णाच्या समोर मी उभा आहे', असे मला जाणवले.
१ आ. आश्रमातील साधकांचा प्रेमभाव 
आरंभी 'साधकांशी काय बोलावे ? कसे बोलावे ?', असे विचार मनात येत होते. काही साधक स्वतःहून त्यांचा परिचय करून देत होते. तेव्हा 'आश्रमात कुणीही कुणाला परके समजत नाही. सर्व जण एकमेकांशी आपलुकीने वागतात आणि रहातात', हे लक्षात आले.

बाह्य पोशाखापेक्षा अंगी पुरुषार्थ बाणवणे महत्त्वाचे !

     एक दिवस मी गाडीतून बाहेर जात होते. त्या वेळी रस्यावरून काही मुली शर्ट पँट घातलेल्या दिसल्या. त्यांना पाहून मनात आले, मुली पुरुषांप्रमाणे शर्ट पँट घालतात, ती एक पद्धत दिखावा म्हणून रूढ झाली आहे. प्रत्यक्षात त्यांच्यामध्ये खरा पुरुषार्थ निर्माण होणे महत्त्वाचे आहे. केवळ दिखाऊ पोशाख नको, तर त्यांच्यावर वाईट प्रसंग आल्यास त्यांना प्रतिकारही करता आला पाहिजेे. - कु. कल्याणी गांगण, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.३.२०१५)

प्रसंगी स्वतः मुलाला सांभाळून साधनेत आणि सेवेत साहाय्य करणारा श्री. अजित संत (बडोदा, गुजरात) यांच्यासारखा प्रेमळ जोडीदार पती म्हणून लाभल्यामुळे साधिकेनेे प.पू. गुरुदेवांप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता !

सौ. अंशु अजित संत
श्री. अजित संत
सद्यस्थितीत असे आदर्श जोडपे असू शकते, याची कल्पनाही करता येत नाही. श्री. आणि सौ. संत यांची प्रगती जलद होवो, अशी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले
 
प.पू. गुरुदेव,
शिरसाष्टांग नमस्कार.
गुरुदेवा, पुष्कळ दिवसांपासून माझ्या मनात विचार येत होते, ते आपल्यासमोर मांडत आहे. आज मला ही संधी दिलीत; म्हणून कृतज्ञता व्यक्त करून सांगते की, आपल्या कृपेने माझ्या आयुष्यात मला एक उत्तम जोडीदार मिळाला. मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये मी आपल्याला सांगू इच्छिते.
१. सरळ व्यक्तीमत्व
श्री. अजित हे सरळ व्यक्तीमत्वाचे आहेत. आमचे लग्न अर्ध्या घंट्याच्या भेटीतच ठरले; कारण आमच्या प्रथम भेटीतच श्रीकृष्णाने हीच व्यक्ती तुझा जोडीदार म्हणून योग्य आहे, असा विचार माझ्या मनात घातला.
. साधना करण्यास पाठिंबा देणे
अजित पूर्वी सनातनच्या संपर्कात आले नव्हते; पण तरीही ते साधना करण्यासाठी मला नेहमीच पाठिंबा देतात. माझ्या साधनेस पूरक होईल, असेच त्यांचे वागणे असते. आमच्या लग्नानंतर लगेचच त्यांनी मला घरात नामपट्टीचे वास्तूछत लावण्यास अनुमती दिली, तसेच त्यांनी त्यांच्या कामाच्या ठिकाणी पटलावर श्रीकृष्णाचे चित्रही ठेवले. बडोदा येथे नवरात्रीच्या कालावधीत ग्रंथ प्रदर्शन लावले जाते. प्रदर्शनाचे साहित्य घरात ठेवण्यासाठी त्यांनी अनुमती तर दिलीच आणि प्रदर्शनाच्या सेवेलाही ते वेळ काढून येतात.
३. मुलाला प्रेमाने समजावणे
त्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ आहे. आमचा मुलगा मोक्ष (वय दीड वर्ष) याला न रागावता सर्व गोष्टी ते प्रेमाने समजावून सांगतात; म्हणून तो त्यांच्याजवळच अधिक काळ रहातो.

एप्रिल २०१५ मध्ये रामनाथी आश्रमात झालेल्या शिबिराच्या निमित्ताने जळगाव येथील साधकांनी अनुभवलेले आश्रमातील चैतन्यमय जीवन आणि प.पू. गुरुदेवांचे भाव जागृत करणारे दर्शन !

एप्रिल २०१५ च्या पहिल्या आठवड्यात जळगाव आणि नंदुरबार येथील धर्मशिक्षण वर्गातील धर्माभिमानी रामनाथी आश्रमाला भेट देण्यासाठी आले होते. त्यांच्यासाठी एका शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते. आलेल्या सर्वच युवकांची शिकण्याची स्थिती चांगली असल्याने आणि त्यांचा प.पू. गुरुदेवांप्रती भाव असल्याने त्यांना अनेक प्रकारच्या अनुभूती आल्या. त्यांना जाणवलेली सूत्रे पुढे देत आहोत. 
१. श्री. राहुल मराठे, जळगाव सेवाकेंद्र
१ अ. रामनाथी आश्रमात येतांना 
१ अ १. गाडीत जागा मिळणे अशक्य असतांना देवाला प्रार्थना केल्यावर बसावयास जागा उपलब्ध होणे : 'आम्ही २३ हिंदुत्ववादी विदर्भ एक्सप्रेसने जळगाव येथून मुंबईला जाण्यासाठी निघालो. तेथून आम्हाला रामनाथी आश्रमात शिबिरासाठी जायचे होते. आमच्याकडे केवळ ५ जागांचे आरक्षण होते आणि रामनाथी, तसेच देवद आश्रमात देण्यासाठी पुष्कळ खोकी होती. जागा मिळणे अशक्य असतांना आम्ही सर्वांनी देवाला प्रार्थना करणे, आळवणे चालू ठेवले. थोड्या वेळानंतर तेथे तिकीट तपासनीस आले. त्यांना मी समिती करत असलेले राष्ट्ररक्षण आणि धर्माचे कार्य यांविषयी सांगितले असता त्यांनी ते नीट ऐकून घेतले. त्यांनी माझ्याकडील ग्रंथ दाखवण्याची मागणी केली. मी लगेच त्यांना काही ग्रंथ दाखवले. त्यातील 'स्वभावदोष-निर्मूलन' हा ग्रंथ त्यांनी अभ्यासासाठी घेतला आणि १३ जागा उपलब्ध करून दिल्या. 

गोकुळाष्टमीच्या दिवशी स्वतःतील तळमळ, प्रेम आणि विश्‍वास या गुणांनी युक्त असा भाव-लाडू बनवून तो प्रेमरूपी तुपाने बांधून प.पू. डॉक्टरांना भरवणार्‍या अन् स्वतःतील न्यूनता दूर करण्यासाठी प्रार्थना करणार्‍या सौ. प्राची मेहता !

सौ. प्राची रोहन मेहता
गोकुळाष्टमीच्या दिवशी मी नामजपाला बसले असतांना श्रीकृष्णाला विचारले, तुला आज काय खाऊ देऊ ? लोणी भरवू का ? तेव्हा मनात विचार आला, प.पू. डॉक्टरांना लोणी आवडते का ? हे ठाऊक नाही. मग त्यांना काय भरवू ? प.पू. डॉक्टरांना भाव आवडतो; म्हणून मी माझ्यात किंचित् असलेला भाव, तळमळ, प.पू. डॉक्टरांप्रती असलेले प्रेम आणि विश्‍वास या गुणांनी युक्त असा लाडू बनवायला घेतला. नंतर माझ्या मनात विचार आला, लाडवातील हे सर्व पदार्थ बांधून ठेवायला माझ्याजवळ तूप नाही. मी पुष्कळ न्यून पडते. तेव्हा पुन्हा दुसरा विचार आला, जसे प.पू. डॉक्टरांनी आणि श्रीकृष्णाने मला त्रास असूनही प्रेम दिले. त्याच प्रेमरूपी तुपात सर्व पदार्थ मिसळून त्याचा लाडू बनवावा. मग मी तसा लाडू बनवला आणि प.पू. डॉक्टरांना (सूक्ष्मातून) भरवून प्रार्थना केली, प.पू. डॉक्टर, या लाडूत नक्कीच काहीतरी उणीव आहे; कारण मी पुष्कळ न्यून पडते. तुम्हीच तुम्हाला आवडेल असा लाडू बनवण्यात न्यून पडलेलेे पदार्थ (गुण) वाढवा आणि ते सर्व गुण माझ्यातही येऊ द्या !
प.पू. डॉक्टर, मी तुमच्या चरणी शरण आले आहे. आपल्याला अपेक्षित असे मला घडवा !
- सौ. प्राची रोहन मेहता, सनातन आश्रम, गोवा. (५.९.२०१५)


नम्र, गुरुकार्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्याग करण्यास सिद्ध असलेले आणि स्वकौतुकापासून दूर रहाणारे ६२ टक्के आध्यात्मिक स्तर असलेले हासन (कर्नाटक) येथील श्री. नवीनकुमार जैन (वय ४४ वर्षे) !

श्री. नवीनकुमार जैन
१. गुरुकार्यासाठी धनाचा त्याग करणे
   प.पू. डॉक्टरांनी साधनेत त्याग या गुणाला पुष्कळ महत्त्व आहे, असे सांगितले आहे. सर्व साधक साधना करून त्याग हा गुण वाढवत आहेत; पण श्री. नवीनअण्णा यांच्यात साधनेत येतांनाच हा गुण असल्याचे लक्षात येतेे. त्यांनी गुरुकार्यासाठी धनाचा त्याग करण्यास कधीही मागेपुढे पाहिले नाही. हासन येथील गुरुकार्य चांगल्या प्रकारे व्हायला हवे, म्हणून सेवाकेंद्र आणि सेवा यांसाठी ते त्यांचे वाहन द्यायचे. कितीही रात्र झाली असली आणि त्यांना साधकांना आणायला जाण्याविषयी सांगितल्यास ते लगेच साधकांना घेऊन यायचे. त्यांनी सेवा केंद्रासाठी नवीन ध्वनीवर्धक उपलब्ध करून दिला आहे.
२. अहं अल्प असणे 
     साधनेत आपण काही चांगली कृती केल्यास कुणीतरी चांगले म्हणावे, असे वाटते किंवा आपण स्वतःच स्वकौतुक करून घेतो; पण गेल्या ७ वर्षांत श्री. नवीनअण्णांंनी कोणत्याही प्रसंगात स्वतःचे कौतुक केल्याचे किंवा त्यांचा अहं वाढल्याचे मला आठवत नाही. स्वतःला न्यून लेखूनच त्यांचे बोलणे आणि वागणे असते. त्यांच्यात अहं पुष्कळ न्यून असल्याचे जाणवते.

सासूबाईंची सेवा पूर्वग्रहविरहित आणि भावपूर्ण करवून घेतल्याबद्दल साधिकेने प.पू. डॉक्टरांच्या चरणी व्यक्त केलेली पत्ररूपी कृतज्ञता !

सौ. मीरा कुलकर्णी
प.पू. डॉक्टरांच्या चरणी, 
शिरसाष्टांग नमस्कार.
पत्ररूपाने आपल्याशी संवाद साधावा, असा विचार माझ्या मनात पुष्कळ वेळा आला; परंतु तशी कृती होऊ शकली नाही. वर्ष १९९९ मध्ये तुम्ही पुणे येथे घरी रहायला आला होता. त्या वेळी आम्ही लहानपणी देवासमोर बसून म्हणत असलेली मानसपूजारूपी कविता मला आठवली होती. त्यामध्ये देवीची स्तुती केलेली आहे. या पूजेतील देवीचे वर्णन म्हणजे तुम्हीच आहात, असा विचार त्या वेळी मनात आला होता. हे तुम्हाला सांगायचे होते; परंतु त्या वेळी लिखाण करून पाठवण्याची कृती झाली नाही; परंतु आता सासूबाईंना देवद येथील आश्रमात घेऊन गेल्यावर आणि त्या रुग्णाईत असतांना शिकायला मिळालेली सूत्रे पाठवत आहे.
१. पूर्णवेळ सेवा करता यावी, यासाठी नोकरी सोडल्याचे न आवडल्याने सासू-सासर्‍यांनी
संबंध न ठेवणे, पूर्वग्रहामुळे रुग्णाईत सासूबाईंची सेवा करतांना मनाचा पुष्कळ संघर्ष होणे
    मी आणि माझे यजमान आम्ही उभयतांनीही सनातन संस्थेच्या माध्यमातून पूर्णवेळ सेवा करता यावी; म्हणून नोकरी सोडली. माझे यजमान बरीच वर्षे सेवेनिमित्त घराबाहेर होते. हे आमच्या घरी कुणालाही मान्य नव्हते. त्यामुळे वर्ष २००१ ते २००७ या काळात सासू-सासर्‍यांनी आमच्याशी कोणताही संबंध ठेवला नाही. त्यानंतर त्या दोघांच्याही प्रकृतीची गार्‍हाणी तक्रारी चालू झाल्यामुळे त्यांचा आमच्याशी संबंध येऊ लागला. वर्ष २००९ मध्ये सासर्‍यांना देवाज्ञा झाली. त्यानंतर सासूबाई कधी आमच्याकडे, तर कधी दिरांकडे राहू लागल्या; परंतु पूर्वग्रहामुळे त्यांच्याशी जुळवून घेणे मला अवघड जात होते. मी आणि माझी मुलगी कु. रेणुका सेवेसाठी बाहेर गेलेले त्यांना आवडत नसे. या पार्श्‍वभूमीवर त्या रुग्णाईत असतांना त्यांची सेवा करतांना मनाचा पुष्कळ संघर्ष होत असे; परंतु डोळ्यांसमोर केवळ श्रीकृष्णाला आणायचे, असे ठरवले होते. त्यामुळे मनाच्या संघर्षाच्या स्थितीतून मला लवकर बाहेर येता आले.

शरीररूपी पणती स्नेहवर्धक प्रेमभावाच्या तेलात ज्ञानरूपी वातीने प्रज्वलीत करून दीपावली आनंदाने साजरी करा !

      असतो मा सद्गमय । तमसो मा ज्योतिर्गमय । 
      मृत्योर्माऽमृतं गमय । ॐ शांतिः शांतिः शांतिः ॥
अर्थ : हे प्रभो, आम्हाला असत्याकडून सत्याकडे ने. (अज्ञानरूपी) अंधःकारातून (ज्ञानरूपी) प्रकाशाकडे ने. मृत्यूपासून अमरत्वाकडे ने. 
१. बाह्य गोष्टींकडे लक्ष न देता चैतन्यमय असणार्‍या भगवंताकडे लक्ष केंद्रित केले, तर जीवन आनंदमय होईल ! : आतील कार्य करणारी शक्ती ही सत्य आहे. कायमस्वरूपाची आहे. ती ज्ञानमय आणि प्रकाशमय असून आनंदमय आहे, अमर आहे. तुम्ही जगताच्या आवरणावर लक्ष केंद्रित न करता कायमस्वरूपी सत्यमय, चैतन्यमय, ज्ञानमय आणि आनंदमय असणार्‍याकडे जर लक्ष केंद्रित केले, तर मन स्थिर होऊन चैतन्याचा स्रोत शरिरात कार्यान्वित होईल आणि जीवन आनंदमय होईल. या आनंदमय जीवनासाठी श्रीसूक्तात ज्योतिर्मय लक्ष्मीचे वर्णन आहे.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
दोन दिवसांपूर्वी अमावास्या झाली.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान
गुरूंनी दिलेले नाव
लक्षणांवरून दिलेले नाव निर्गुणातील,
 तर बाकीची नावे सगुणातील असतात.
     भावार्थ : लक्षणांवरून दिलेले नाव निर्गुणातील, यातील निर्गुणातील म्हणजे आध्यात्मिक प्रगतीच्या लक्षणांवरून किंवा संप्रदायाप्रमाणे गुरूंनी शिष्याचे नाव ठेवलेले असते. याउलट आई-वडील सगुणातील लक्षणांवरून किंवा त्यांच्या प्रकृतीनुसार मुलाचे नाव ठेवतात.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
    जन्मांधाने दृष्टी, दिसणे असे काही आहे, असे मानणे ही अंधश्रद्धा आहे, असे म्हणावे, तसे बुद्धीप्रामाण्यवादी सूक्ष्म दृष्टी असे काही आहे, असे मानणे, ही अंधश्रद्धा आहे, असे म्हणतात. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२९.१०.२०१५)


बोधचित्र


संयमी मनच परिस्थितीचे स्वामी असणे

     आजचे मानवतावादी, समाजवादी, साम्यवादी आणि सेक्युलरवादी तत्त्वज्ञान सांगते, परिस्थिती पालटा, म्हणजे माणूस पालटेेल. परिस्थिती कशी पालटेेल ? मन शक्तीशाली करता येईल. संयमी मन (असणाराच) परिस्थितीचा स्वामी होईल. - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (मासिक घनगर्जित, मे २०१३)
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

कुणाचेही वाईट चिंतू नये !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
    वाईट बोलणे हे केव्हाही अयोग्यच; पण कुणाचेही वाईट चिंतणे आणि त्याच्या र्‍हासाची इच्छा करणे, हे अधिक अयोग्य !
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

हे आधुनिक आक्रमक !

संपादकीय
आपला भारत हा एक अजब देश आहे. सामान्यतः देशात देशभक्तांचा गौरव केला जातो, तर देशद्रोह्यांची सर्वत्र छी-थू होऊन जनतेच्या मनात त्यांच्याविषयी कायम सूडाग्नी धगधगत असतो. अलीकडे भारतात मात्र तसे होत नाही. येथे मुंबईवर आक्रमण करून देशाविरुद्ध युद्ध पुकारणार्‍या कसाबला कसाबजी तर आतंकवादी लादेनला लादेनजी म्हणून संबोधले जाते, फाशी दिलेल्या यासिनच्या जनाजाला सहस्रो मुसलमान उपस्थित रहातात. आता तर त्याहीपुढे जाऊन मुसलमान आक्रमकांची जयंती-पुण्यतिथी साजरी करण्यापर्यंत कहर झाला आहे. अनेक हिंदूंची अत्यंत क्रूरपणे हिंसा करणार्‍या टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यावरून त्याच्या आधुनिक वंशजांनी सध्या रणकंदन माजवले आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn