Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आजचे दिनविशेष
बलीप्रतिपदा
पाडवा

बिहारमधील नवनिर्वाचित २४३ पैकी १४३ आमदारांवर फौजदारी गुन्हे नोंद !

हे लोकराज्याचे दारूण अपयशच म्हणावे लागेल ! असे गुंडप्रवृत्तीचे
लोकप्रतिनिधी कधीतरी कायद्याचे राज्य देऊ शकतील का ?
      पाटलीपुत्र (पाटणा) - बिहार विधानसभेतील नवनिर्वाचित २४३ आमदारांपैकी १४३ आमदारांवर फौजदारी गुन्हे नोंद असल्याचे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मस् (एडीआर्) या संस्थेने केलेल्या पहाणीत उघड झाले आहे. यातील ९६ आमदारांवर तर हत्या आणि अपहरण यांसारख्या गंभीर फौजदारी गुन्ह्यांची नोंद आहे.
१. गंभीर स्वरूपाचे फौजदारी गुन्हे दाखल असलेल्या नवनिर्वाचित आमदारांमध्ये १२ आमदारांविरुद्ध हत्येचा आरोप, २६ आमदारांविरुद्ध हत्येचा प्रयत्न करण्याचा आरोप, ९ आमदारांविरुद्ध अपहरणाचा आरोप

हिंदुत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी देशपातळीवर निवडणुका लढवणार ! - उद्धव ठाकरे

हिंदुत्वासाठी सातत्याने झटणार्‍या शिवसेनेचा
 म्हणूनच हिंदूंना आधार वाटतो !
      कल्याण - हिंदुत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी शिवसेना आता देशपातळीवर निवडणुका लढवणार आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी एका पत्रकार परिषदेत केले. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे महापौरपद शिवसेनेला मिळाल्याने त्या विजयाच्या आनंदानिमित्त या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी श्री. ठाकरे म्हणाले, मधल्या काळात शिवसेना महाराष्ट्राच्या बाहेर निवडणुका लढवत नव्हती; मात्र आता शिवसैनिकांनी आग्रह केल्यास अन्य राज्यांतही आम्ही निवडणुका लढवू. हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व हा आमचा बाणा आहे. सर्वांनी एकत्र येऊन आता एकमताने विकास साधायला हवा.

गोमांस बिर्याणी न दिल्याचा राग मनात धरून धर्मांधाकडून उपाहारगृहाच्या हिंदु मालकावर आक्रमण !

ढोंगी धर्मनिरपेक्षतावादी, तसेच असहिष्णुतेच्या नावाखाली पुरस्कार परत करणारे आता या घटनेविषयी 
मौन बाळगून आहेत; कारण घायाळ झालेला एक हिंदु आहे ! प्रसारमाध्यमेही आता गप्प का ?
     बेंगळुरू - गोमांस बिर्याणी न दिल्याचा राग मनात धरून सुल्तान पाशा याने एका उपाहारगृहाच्या हिंदु मालकावर चाकूने आक्रमण केले. सुंदर असे उपाहारगृहाच्या मालकाचे नाव असून ते या आक्रमणात गंभीररित्या घायाळ झाले आहेत. घटनेनंतर सुल्तान पाशा याने पोबारा केला. बेंगळुरूस्थित राजगोपालनगर येथील आंध्रहळ्ळी या भागात नुकतीच ही घटना घडली.

(म्हणे) गोहत्याबंदीमागे ब्राह्मणवादी षड्यंत्र !

प्रा. जावेद पाशा यांचे ब्राह्मणद्वेषी विधान
प्रत्येक गोष्ट जातीच्या आणि धर्माच्या चष्म्यातून पहाणारे असे जात्यंध अन् धर्मांध हेच देशात 
फूट पाडू पहात आहेत ? अशांवर शासनाने कठोर कारवाई करावी, अशी हिंदूंची मागणी आहे !
     नागपूर - वैदिक भारतात ब्राह्मण हेच गोहत्या समर्थक होते. मग आता ते गोहत्याबंदीचे समर्थक कसे झाले ? यामागे ब्राह्मणवादी षड्यंत्र आहे, असा आरोप प्रा. जावेद पाशा यांनी केला. (ब्राह्मणांनी गोहत्या केल्या, याचे कोणते पुरावे प्रा. पाशा यांच्याकडे आहेत ? - संपादक) निळाई सामाजिक सांस्कृतिक परिवाराच्या वतीने प्रबोधन अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

दक्षिण चिनी समुद्रातील सागरी सीमारेषेच्या वादाचे सूत्र आशिया पॅसिफिक आर्थिक परिषदेत उपस्थित करू नका ! - चीनची फिलिपाईन्सला चेतावणी !

चीनची दादागिरी !
काश्मीरच्या सूत्रावरून संयुक्त राष्ट्र्रसंघात भारताच्या विरोधात गरळओक 
करणार्‍या पाकला भारतीय राज्यकर्ते कधी असे खडसवतील का ?
     मनिला (फिलिपाईन्स) - दक्षिण चिनी समुद्रामधील सागरी सीमारेषेच्या वादाचे सूत्र आशिया पॅसिफिक आर्थिक परिषदेत (अपेक) उपस्थित करू नये, अशी चेतावणी चीनने फिलिपाईन्सला दिली आहे. ही परिषद पुढील आठवड्यात फिलिपाईन्सची राजधानी असलेल्या मनिला येथे होणार आहे. या परिषदेत हे सूत्र उपस्थित केल्यास त्यावरून अमेरिकासारखे प्रतिस्पर्धी देश लक्ष्य करण्याची भीती चीनला आहे. या सूत्रामुळे चीनचे राष्ट्र्राध्यक्ष शी जिनपिंग हे या संदर्भातील चर्चेमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे, असा चीनचा होरा आहे. महत्त्वाचे म्हणजे ३ वर्षांपूर्वी फिलिपाईन्सशी संबंध बिघडल्यानंतर दक्षिण चिनी समुद्रामधील सागरी सीमारेषेच्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर चीनचे परराष्ट्र्रमंत्री वांग यी यांनी नुकताच फिलिपाईन्सचा दौरा केला. अपेकमध्ये आता दक्षिण चिनी समुद्रामधील सागरी सीमारेषेच्या संदर्भातील वादग्रस्त सूत्र उपस्थित केले जाणार नाही, अशी आशा असल्याचे चीनच्या परराष्ट्र्र मंत्रालयाचे प्रवक्ते चार्ल्स जोस यांनी सांगितले.

नितीशकुमार यांचा शपथविधी २० नोव्हेंबरला होण्याची शक्यता

     बिहार - राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस या दोघांना समवेत घेऊन बिहार निवडणुकीत विजय संपादन करणारे संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार येत्या २० नोव्हेंबरला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर नितीशकुमार तिसर्‍यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होत आहेत. दिवाळी आणि त्यानंतर बिहारमध्ये साजर्‍या केल्या जाणार्‍या छटपूजेनंतर नितीशकुमार बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. पाटलीपुत्र येथे त्यांच्यासह मंत्रिमंडळातील निवडक मंत्री पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतील. मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रीय जनता दल, संयुक्त जनता दल आणि काँग्रेस यांचे किती मंत्री असतील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

उज्जैन (मध्यप्रदेश) येथील अखिल भारतीय कालिदास संमेलनात पाश्‍चात्त्य पद्धतीत ऐकवले जाणार संस्कृत श्‍लोक !

देवभाषा संस्कृतचे अशा पद्धतीने होणारे विडंबन करणारे हिंदूच हिंदु धर्माचे खरे वैरी होत ! कुठे संस्कृत 
भाषेचे महत्त्व जाणून त्यावर संशोधन करणारे पाश्‍चात्य, तर कुठे संस्कृतचे विडंबन 
करणारे भारतीय तरुण !
     उज्जैन - येथे २१ नोव्हेंबरपासून चालू होणार्‍या अखिल भारतीय कालिदास संमेलनामध्ये महाकवी कालिदास यांच्या साहित्यातील काही संस्कृत श्‍लोक पाश्‍चात्त्य पद्धतीत ऐकवले जाणार आहेत. काही राष्ट्रीय आणि युवा कलाकार संगीत, नृत्य आणि अभिनय यांद्वारे हा कार्यक्रम सादर करणार आहेत. या संमेलनाचा शुभारंभ ध्रुवा या देशाचा प्रथम संस्कृत बँडच्या वादनाने होणार आहे. त्यामध्ये अनेक युवा कलाकार काही संस्कृत श्‍लोक पाश्‍चात्त्य पद्धतीत ऐकवणार आहेत. संमेलनामध्ये ध्रुपद गायक गुंदेचा बंधू आणि फारुख लतीफ खाँ यांच्या सारंगी वादनाचा कार्यक्रमही होणार आहे.

तीन इराणी नागरिकांना फाशी दिल्याप्रकरणी सौदी राजदूताची इराणकडून कानउघडणी

पाकिस्तानकडून आतंकवाद्यांद्वारे सतत केल्या जाणार्‍या आक्रमणामध्ये भारताचे जवान प्रतिदिन 
मरत असतांना भारताने अशी कृती कधी केली आहे का ? भारतीय राज्यकर्ते इराणकडून शिकतील का ?
    तेहरान, ११ नोव्हेंबर - सौदी अरेबियाने ९ नोव्हेंबर या दिवशी ३ इराणी व्यक्तींना अमली पदार्थ तस्करी प्रकरणी फाशी दिले. दम्मम या ठिकाणी त्यांना फाशी देण्यात आले. या प्रकरणी इराणने सौदीच्या राजदूतास बोलावून त्यांची कानउघडणी केली. इस्लामिक प्रजासत्ताक असलेल्या इराणने सौदी अरेबियाचा निषेध केला असून आंतरराष्ट्रीय संकेतांचे पालन करायला हवे होते. सौदी अरेबियात इस्लामी विधी संहिता लागू असून हत्या, अमली पदार्थ तस्करी, सशस्त्र दरोडे, बलात्कार यासाठी फाशीची शिक्षा आहे. (भारतीय राज्यकर्ते अशा गुन्ह्यांसाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद करतील का ? - संपादक) सध्या इराण आणि सौदी यांच्यातील संबंध बिघडलेले आहेत. सप्टेंबरमध्ये मक्केतील हाज यात्रेत इराणचे ४६४ यात्रेकरू चेंगराचेंगरीत मरण पावल्याने त्याचा ठपका इराणने सौदी अरेबियावर ठेवला आहे.

पाकला आतंकवादी तथा शत्रूराष्ट्र घोषित करा !

महामंडलेश्‍वर स्वामी अच्युतानंद तीर्थजी महाराज यांचे केंद्रशासनाला आवाहन
       नवी देहली - आज जगभरात फैलावणार्‍या इस्लामी जिहादी आतंकवादाचे पाक हेच मुख्य केंद्र आहे. पाक भारताला सदैव शत्रू मानत होता, आहे आणि मानत राहील. अशा परिस्थितीत भारताने पाकला दिलेला प्राधान्य राष्ट्राचा दर्जा मागे घेऊन त्यास आतंकवादी तथा शत्रू राष्ट्र घोषित करावे, असे आवाहन महामंडलेश्‍वर स्वामी अच्युतानंद तीर्थजी महाराज यांनी केंद्रशासनाला केले आहे.
     विविध धार्मिक आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने कॉन्स्टिट्यूशन क्लब येथे आयोजित करण्यात आलेल्या २ दिवसीय हिंदु संसदेत ते अध्यक्ष म्हणून बोलत होते.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा एम्.के. नाझर ५ वर्षांनंतर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या न्यायालयासमोर शरण

सनातन संस्थेच्या एका साधकाला केवळ संशयावरून अटक झाल्यावर संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करणारे आता पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या बंदीची मागणी करणार का ?
                                          केरळमध्ये प्राध्यापकांचा हात छाटल्याचे प्रकरण !
      थिरुवअनंतपूरम् - केरळमध्ये महाविद्यालयाच्या एका प्रश्‍नपत्रिकेत महंमद पैगंबराचा अवमान केल्याच्या कथित आरोपावरून प्राध्यापकाचा हात छाटण्याच्या प्रकरणातील प्रमुख आरोपी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा कार्यकर्ता एम्.के. नाझर ५ वर्षांनंतर नुकताच राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या न्यायालयासमोर शरण आला. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी ४ जुलै २०१० या दिवशी प्राध्यापक टी.जे. जोसेफ यांचा उजवा हात छाटला होता. तेव्हापासून या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार नाझर बेपत्ता होता.

पाकच्या अण्वस्त्र संख्या वाढीला लगाम घालण्याची आवश्यकता ! - न्यूयॉर्क टाईम्स

पाकमधील अण्वस्त्रांपासून देशाला असलेल्या धोक्याविषयी किती भारतीय वृत्तपत्रे अशी जागरूकता दाखवतात ? त्यांना केवळ सहिष्णु वा असहिष्णुतेच्या चटपटीत बातम्याच द्यायला आवडतात का ?
     न्यूयॉर्क - पाकिस्तानच्या शस्त्रागारातील अणवस्त्रांची संख्या सर्वाधिक वेगाने वाढत असून त्याला प्राधान्याने लगाम घालण्याची आवश्यकता आहे; अन्यथा दक्षिण आशियासह संपूर्ण विश्‍वालाच त्याचा धोका उद्भवू शकतो, अशी भीती न्यूयॉर्क टाईम्स या वृत्तपत्राच्या अग्रलेखात व्यक्त करण्यात आली आहे. द पाकिस्तान न्यूक्लिअर नाईटमेअर या शीर्षकाखाली लिहिण्यात आलेल्या अग्रलेखात पाकिस्तानच्या अण्वस्त्रसज्जतेवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. पाकिस्तानकडे १२० अण्वस्त्रे असून अण्वस्त्रधारी देशांमध्ये अमेरिका, रशिया यांच्यानंतर पाकिस्तानचा क्रमांक लागतो. काश्मीरच्या सूत्रावरून भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये असलेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचे संकट अधिक असल्याचे लेखात नमूद करण्यात आले आहे, तसेच पाकने आण्विक प्रसारबंदी करारावर स्वाक्षरी करावी, असे आवाहनही या लेखात करण्यात आले आहे.

सर्वांत मोठी स्वदेशी बनावटीची गस्तीनौका समर्थ तटरक्षक दलात दाखल

     वास्को (गोवा) - स्वदेशी बनावटीची सर्वांत मोठी गस्तीनौका समर्थ भारतीय तटरक्षक दलात दाखल झाली. गोव्यात झालेल्या या कार्यक्रमात सरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर उपस्थित होते. समर्थच्या आगमनाने तटरक्षक दलाचे सामर्थ्य वाढले असून दलाच्या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेला चालना मिळाली, असे पर्रीकर यांनी या वेळी सांगितले.

केरळचे अर्थमंत्री असलेले काँग्रेसचे आमदार के.एम्. मणी यांच्या विरुद्धचा तपास चालू ठेवावा !

भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्या काँग्रेसच्याच मुशीतून निर्माण झालेल्या केरळ काँग्रेसच्या नेत्याने 
भ्रष्टाचार केल्यास नवल ते काय ? जनतेला लुटण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठीच सत्ता 
मिळवण्याचे ध्येय ठेवणार्‍या काँग्रेस पक्षाला आता जनतेने संपूर्ण देशभरात घरी बसवावे !
केरळमधील बार लाचलुचपत प्रकरणी उच्च न्यायालयाचा आदेश
     थिरुवअनंतपूरम् - बार लाचलुचपत प्रकरणी केरळ राज्याचे अर्थमंत्री के. एम्. मणी यांच्याविरुद्ध प्रथमदर्शी अहवाल (एफ्.आय.आर्.) दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात एक मंत्री आरोपी असल्यामुळे तपास होऊ शकत नाही, अशी सामान्य माणसाची भावना व्हायला नको, असे मत दक्षता न्यायालयाचा (व्हिजिलन्स कोर्ट) आदेश कायम ठेवतांना न्या. बी. केमाल पाशा यांनी व्यक्त केले. मणी यांच्याविरुद्धचा तपास चालू ठेवण्यास केरळ उच्च न्यायालयाने अनुमती दिल्यामुळे आता मणी चांगलेच अडचणीत आले आहेत.

मराठी भाषेचा वापर न करणार्‍या शासकीय कार्यालयांवर शिस्तभंगाची कारवाई ! - राज्यशासनाचा निर्णय

राज्यशासनाने आता प्रत्यक्ष कारवाई करून मराठी भाषेचे संवर्धन करावे, ही अपेक्षा !
       पुणे - महाराष्ट्र राजभाषा अधिनियमानुसार शासकीय कामकाज मराठीत करणे बंधनकारक आहे. शासकीय कार्यालयांसह वर्गीकृत कार्यालयांनाही मराठीतूनच कामकाज करण्याचे राज्यशासनाचे धोरण आहे. शासनाच्या कार्यालयीन कामकाजात राजभाषा मराठीचा योग्य पद्धतीने वापर होत नसल्याचे भाषा संचालनालयाने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. शासकीय कार्यालयांनी मराठीचा योग्य वापर न केल्यास आता शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.

आरक्षण सूत्राची व्यवहार्यता पटवून देण्यात भाजप नेते अपयशी - सरसंघचालक

     नवी देहली, ११ नोव्हेंबर - जातीय आरक्षणासंदर्भात मी केलेल्या वक्तव्यामुळे भाजपचा बिहार विधानसभा निवडणुकीत पराभव झाले, हे म्हणणे चुकीचे आहे. माझ्या आरक्षणाच्या संदर्भातल्या विधानाला केवळ सूत्र बनवले गेले. आरक्षण फेरमांडणीविषयी जे मी बोललो, त्याची व्यवहार्यता पटवून देण्यात भाजप नेते अपयशी ठरले. माझे विधान चुकीच्या पद्धतीने दाखवले गेले, असे वक्तव्य सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले आहे.

हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे अध्यात्मप्रसार करणार्‍या धर्मरथ ग्रंथप्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद

धर्मरथाला निरांजन ओवाळतांना
पं. समीर आचार्य कंठपल्ली
     हुब्बळ्ळी, ११ नोव्हेंबर (वार्ता) - अखिल मानवजातीच्या कल्याणार्थ सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लिहिलेल्या ग्रंथांचे प्रदर्शन धर्मरथावर लावण्यात आले आहे. ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन पं. समीर आचार्य कंठपल्ली यांच्या हस्ते ४ नोव्हेंबर या दिवशी अक्षय पार्क येथे करण्यात आले. या वेळी अनेक जिज्ञासूंनी सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचा लाभ घेतला. या प्रदर्शनाला समाजातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 
क्षणचित्रे 
१. एक जिज्ञासू म्हणाले की, मी सनातनविषयी केवळ ऐकले होते; परंतु आता मला चैतन्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. 
२. देवतांची चित्रे पाहून प्रभावित झालेल्या अनेक जिज्ञासूंनी ती विकत घेतली.

राममंदिर, गोहत्या, समान नागरी कायदा यांची वचनपूर्ती न केल्यानेच भाजपचा पराभव ! - अ.भा. हिंदु महासभा

पुढील निवडणुकीत यश मिळवण्यासाठी तरी भाजप या चुका सुधारेल, ही अपेक्षा !
     नवी देहली - भाजपने लोकसभा निवडणुकीच्या वेळी हिंदूंना राममंदिराची उभारणी करणे, गोहत्या रोखणे, समान नागरी कायदा आणणे आदी आश्‍वासने दिली होती. यांपैकी एकही आश्‍वसान न पाळल्यानेच बिहारमध्ये त्यांना पराभवास सामोरे जावे लागले, असे प्रतिपादन अखिल भारत हिंदु महासभेचे राष्ट्रीय महासचिव मुन्नाकुमार शर्मा यांनी येथे केले. ते पुढे म्हणाले, भाजपने लोकसभा निवडणुकीच्या वेळी हिंदूंना काळेधन परत आणणार, महागाई न्यून करणार, बेरोजगारी संपुष्टात आणणार, भ्रष्टाचाराला आळा घालणार, अशी अनेक आश्‍वासने दिली होती. माध्यमांकडून त्याचेही सर्वेक्षण करण्यात आले. भाजपने जर ही आश्‍वासने त्वरित पूर्ण केली नाहीत, तर केंद्रात दुसर्‍यांदा त्यांची सत्ता येणे अशक्य आहे. भाजपने हिंदूंना दिलेली वचने पूर्ण करावीत, अन्यथा देशाच्या राजकारणात त्यांचे अस्तित्व समाप्त होईल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन येथील घराच्या मालकाविषयी माहिती काढण्यात शासन अपयशी !

लंडन दौर्‍यासाठी २५ लाख ४५ सहस्र रुपयांचा व्यय
घरमालकाची माहितीही मिळवता येत नसेल, तर लाखो रुपये व्यय करून
केलेल्या दौर्‍याची नेमकी फलनिष्पत्ती काय, हेही जनतेला समजायला हवे !
     मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निवास केलेल्या घराच्या पाहणीच्या लंडन दौर्‍यासाठी २५ लाख ४५ सहस्र रुपयांचा व्यय झाला असून मेसर्स सेडॉन या सॉलिसीटर आस्थापनास ३ कोटी १० लाख रुपयांचे शुल्क दिले आहे; पण या घराच्या मालकाचे नाव अजूनही समजलेले नाही. सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी २ दिवस, तर प्रधान सचिव उज्वल कुमार उके यांनी १ वेळा लंडनदौरा करत अनुक्रमे १२ आणि ६ दिवस लंडन येथे निवास केला. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या भाग भांडवलाच्या रक्कमेतून सर्व व्यय करण्यात येत आहे,

आता दाऊद आणि अंडरवर्ल्ड डी गँगवर लक्ष्य केंद्रित - गृहराज्यमंत्री

     नगर - आतापर्यंत गुन्हेगारांना देशात आणण्याच्या फक्त घोषणाच झाल्या; मात्र भाजप शासनाच्या प्रयत्नांमुळे छोटा राजनला भारतात आणण्यात यश मिळाले. आता अंडरवर्ल्ड डी गँग आणि दाऊदवर लक्ष्य केंद्रित करून त्या संदर्भात स्पेशल ड्राईव घेतला आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री राम शिंदेंनी दिली आहे.
     छोटा राजनच्या आरोपांनुसार मुंबई पोलिसांचे दाऊदशी संबंध आहेत कि नाही,

तुळजाभवानी मंदिरातील लाडू अपहार प्रकरणात उपजिल्हाधिकार्‍यांद्वारे चौकशीचे आदेश !

  •         भ्रष्टाचाराने पोखरलेली तुळजापूर देवस्थान समिती 
  •         जिल्हाधिकार्‍यांकडून कारवाईचे आश्‍वासन धाराशिव  

     (उस्मानाबाद), ११ नोव्हेंबर (वार्ता.) - तुळजाभवानी मंदिरात प्रसादाच्या लाडूचा पुरवठा करणार्‍या निविदा प्रक्रियेमध्ये घोळ झाल्याप्रकरणी त्याची उपजिल्हाधिकार्‍याद्वारे स्वतंत्र चौकशी करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिला आहे. 'उस्मानाबाद लाईव्ह' या वृत्तवाहिनीने पुराव्यासह हे प्रकरण समोर आणल्यावर जिल्हाधिकार्‍यांनी याची गंभीर नोंद घेतली आहे. (उशिरा जागे होणारे प्रशासन ! केवळ कठोर कारवाईचे आश्‍वासन न देता दोषींवर कारवाई कधीपर्यंत करणार, हेही जिल्हाधिकार्‍यांनी सांगावे ! - संपादक)

बेळगावमध्ये धर्माभिमान्यांचा टिपू सुलतानविरोधी मोर्चा पोलिसांनी अडवला !

पोलिसांकडून प्रत्येक वेळी हिंदूंवरच केली जाणारी दडपशाही संतापजनक !
अन्य धर्मियांच्या संदर्भात पोलीस असे वागतात का ?
      बेळगाव - काँग्रेस शासनपुरस्कृत क्रूरकर्मा टिपू सुलतान जयंती साजरी करण्याच्या निषेधार्थ बजरंग दल आणि विश्‍व हिंदु परिषद या संघटनांच्या धर्माभिमान्यांनी मोर्चा काढून शासनाच्या प्रतिकृतीचे दहन करण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी विरोध केल्याने धर्माभिमान्यांना माघार घ्यावी लागली. (वैध मार्गाने आंदोलन करणार्‍या हिंदूंचीच प्रत्येक वेळी मुस्कटदाबी का ? हिंदूंनो, प्रशासनाचा असा विरोध मोडून काढण्यासाठी संघटित व्हा ! - संपादक)
१. काँग्रेस शासनाने जिल्हा पातळीवर टिपू सुलतान जयंती साजरी करण्याची अनुमती दिली होती.

प्राध्यापक पात्रता परीक्षेच्या वेळी (नेट) परीक्षार्थींना लेखणी नेण्यास बंदी !

केंद्रीय शिक्षण मंडळाचा अजब निर्णय ! परीक्षा केंद्रावर अपप्रकार करणार्‍या विद्यार्थ्यांना 
कठोर शिक्षा केल्यासच त्या अपप्रकारांना बहुतांश प्रमाणात आळा बसू शकतो.  
  • परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर लेखणी देणार
  • परीक्षेपूर्वी अडीच घंटे उपस्थित रहाणे बंधनकारक
      पुणे - गेल्या वर्षीपासून केंद्रीय शिक्षण मंडळाने (सीबीएस्ई) प्राध्यापकांसाठी राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणार्‍या पात्रता परीक्षेचे (नेट) दायित्व घेतले आहे. परीक्षेच्या प्रश्‍नपत्रिका फुटण्याबरोबरच परीक्षेच्या कालावधीत होणारे अपप्रकारही काही राज्यांमध्ये समोर आले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर मंडळाने आगामी परीक्षेपासून कडक धोरण अवलंबले आहे. त्याचा भाग म्हणून आता वर्गात लेखणी नेण्यासाठीही बंदी घालण्यात आली असून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वर्गातच लेखणी देण्यात येणार आहे.

दुष्काळामुळे राज्यातील शेकडो गावांमध्ये अभ्यंगस्नान टँकरच्या पाण्यावर करण्याची वेळ

      मुंबई - राज्यात ४८२ गावे आणि ८६७ वाड्यांसाठी ६५३ टँकरद्वारे पाणीपुरवठा चालू आहे. त्यामुळे दिवाळीतील पहिले अभ्यंगस्नान टँकरच्या पाण्यावर करण्याची वेळ आली.
१. मराठवाड्यात दुष्काळ असल्याने संभाजीनगर विभागातील सर्वाधिक ३४९ गावे आणि १७७ वाड्यांसाठी ४८७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.
२. नगर जिल्ह्यातील ५४ गावे आणि २६६ वाड्यांसाठी ६७ आणि नाशिक जिल्ह्यातील १४ गावे आणि ७८ गावांसाठी १९ टँकर पाणीपुरवठा करत आहेत.

लेखक आणि कलावंत यांनी कलेतूनच व्यक्त व्हावे ! - कादंबरीकार विश्‍वास पाटील

कादंबरीकार श्री. विश्‍वास पाटील
पुरस्कार परत करणारे 
साहित्यिक यातून काही बोध घेतील का ? 
     पुणे, ११ नोव्हेंबर - समाजातील वाढत्या असहिष्णुतेविरोधात पुरस्कार परत करणे, हा एकमेव मार्ग नाही. असहिष्णुतेचे वातावरण पूर्वीपासूनच आहे; पण त्या त्या वेळी कलाकारांनी आपल्या भावना या कलेद्वारेच समाजासमोर स्पष्टपणाने मांडल्या, हे आपल्याला विसरता येणार नाही. त्यामुळे लेखक आणि कलावंत यांनी आपल्या कलेतूनच व्यक्त व्हावे, असे प्रतिपादन प्रसिद्ध कादंबरीकार श्री. विश्‍वास पाटील यांनी केले. मॅजेस्टिक बुक गॅलरीतील दिवाळी अंकाच्या दालनाचे उद्घाटन विश्‍वास पाटील यांच्या हस्ते झाले. त्यानंतर संजय भास्कर जोशी आणि रेखा इनामदार-साने यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. 

(म्हणे) छत्रपती शिवाजी महाराज मुसलमानद्वेष्टे असल्याचा अपप्रचार करणार्‍या ग्रंथनिर्मार्त्यांचे राज्य शासनाकडून सन्मानाद्वारे उदात्तीकरण !

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना सन्मान प्रदान करून अनेक दिवस
लोटल्यानंतरही शरद पवारांचा दिसून आलेला ब्राह्मणद्वेष
       बारामती - हिंदवी स्वराज्याच्या उभारणीत मुसलमान समाजातील अनेक शूरवीर लोक महाराजांच्या खाद्याला खांदा लावून उभे राहिले. महाराजांचे अंगरक्षकही मुसलमान होते; मात्र सध्या महाराज मुस्लिमद्वेष्टे होते, असा अपप्रचार करून दोन समाजात अंतर पाडण्याचे काम केले जात असून अशा ग्रंथनिर्मार्त्यांचा सन्मान करून राज्य शासन त्यांचे उदात्तीकरण करते, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि फडणवीस शासन यांच्यावर टीका केली. एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्याक्रमाच्या वेळी ते बोलत होते.

कर्तव्यात कुचराई केल्याने पोलीस शिपाई गणेश तांबट बडतर्फ !

      कोल्हापूर - फसवणूक, अपहरण, खंडणी, दरोडा यांसह इतर गुन्हे प्रविष्ट असलेला पोलीस शिपाई गणेश बंडोपंत तांबट याला जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सेवेतून बडतर्फ केले आहे. सध्या तो पोलीस मुख्यालयातच नोकरीस होता. त्याच्यावर महिला पोलीस कर्मचार्‍याबरोबर अनैतिक संबंध ठेवल्याचाही ठपका आहे. त्याच्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली आहे. (पोलीस दलात असे गुन्हेगारी प्रवृत्तीचे पोलीस असल्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली आहे. असे पोलीस कर्मचारी जनतेशी कसे वागत असतील, याचा विचार न केलेलाच बरा. यासाठी पोलीस दल स्वच्छ होण्यासाठी कर्तव्यात कसूर करणार्‍या पोलिसांना बडतर्फ करून त्यांच्यावर फौजदारी खटले प्रविष्ट केले पाहिजेत. - संपादक)

शाळांना दप्तराचे ओझे अल्प करण्याच्या कार्यवाहीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत

* दप्तराचे ओझे अल्प न करणार्‍या शाळांवर कारवाई 
* मुख्याध्यापकांचा शालेय शिक्षणाच्या निर्णयाला विरोध 
     पुणे, ११ नोव्हेंबर - राज्य शासनाने दप्तराचे ओझे अल्प करण्याच्या कार्यवाहीसाठी शाळांना ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. त्यावर उपाययोजना न केल्यास संबंधित शाळेचे मुख्याध्यापक आणि नियामक मंडळाने ठरवलेले संचालक यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे परिपत्रक शालेय शिक्षण विभागाने काढले. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना दिवाळीची सुट्टी चालू झाली असून ती पुढील १५ दिवसांपर्यंत आहे. उरलेल्या आठवडाभरात दप्तराचे ओझे अल्प करण्यावर उपाययोजना करणे अशक्य असल्याने मुख्याध्यापकांनी शालेय शिक्षणाच्या निर्णयाला विरोध केला आहे. 

येरवडा मध्यवर्ती कारागृहात बंदीवानांच्या पायाभूत सुविधा मोडकळीस !

सत्र न्यायाधीश राजेश तिवारी यांचा उच्च न्यायालयास अहवाल 
बंदीवानांच्या पायाभूत सुविधांकडे कारागृह प्रशासन लक्ष देईल का ? 

     पुणे, ११ नोव्हेंबर - येरवडा मध्यवर्ती कारागृहातील स्वच्छतागृहे आणि स्नानगृहे मोडकळीस आली आहेत. बंदीवानांना अधिक वैद्यकीय सेवा पुरवण्याची व्यवस्था हवी. कारागृहाच्या ठिकाणी क्षमतेपेक्षा अधिक बंदीवान आणि कच्चे बंदीवान आहेत. त्यांना भेटण्यासाठी येणारे अधिवक्ते आणि नातेवाईक यांच्या मुलाखतीसाठी आणखी खिडक्यांची आवश्यकता आहे, असा अहवाल सत्र न्यायाधीश राजेश तिवारी यांनी उच्च न्यायालयास दिला आहे. 

ऐन दिवाळीत विजेच्या लपंडावामुळे हिंदू त्रस्त !

     सांगली, ११ नोव्हेंबर (वार्ता.) - ऐन दिवाळीत नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन या दोन महत्त्वाच्या दिवशी हिंदूंना विजेच्या लपंडावामुळे मानसिक त्रासास सामोरे जावे लागले. या दोन्ही दिवशी दिवसभर अनेक वेळा वीज जाण्या-येण्याचे प्रकार सातत्याने घडत होते. कालपासून शासकीय सुट्टी असल्याने या संदर्भात उत्तरे देण्यासाठी, तसेच माहिती देण्यासाठी वीज वितरण कार्यालयात कोणीच उपलब्ध नव्हते. (ईद-मोहरमला वीज नाही, नाताळला वीज नाही, असे कधी होत नाही; मात्र अशा घटना हिंदूंच्याच सणांच्या वेळी का घडतात ? - संपादक)

दुष्काळामुळे नाशिक जिल्ह्यातील १.४१ लक्ष लिटर दुधाचा पुरवठा घटला

      नाशिक - यंदा ऐन दिवाळीतच नाशिक जिल्ह्यात १.४१ लाख लिटर दुधाचा पुरवठा घटला आहे. अनेक सहकारी दूध संस्था आणि वितरकांचे आर्थिक गणित त्यामुळे बिघडले असून, उन्हाळ्यात शेतीच्या या पूरक व्यवसायाची काय स्थिती होणार ही चिंता सतावत आहे.
     दुष्काळामुळे पाण्याच्या अभावी खरीप, रब्बीच्या पिकांतून जनावरांना मिळणारा हक्काचा चारा कमी झाला आहे. त्याचा परिणाम म्हणजे जनावरांचा पान्हाही फुटेनासा झाला आहे.

पुणे शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांच्या नावाचे भेटकार्ड आणि पत्रलेखनाच्या कागदाचे देयक ४९ सहस्र रुपये

पुणे शिक्षण मंडळाचा कारभार हा आंधळ पीठ दळतंय आणि कुत्रे पीठ खातंय अशा पद्धतीचा
झाला आहे. भेटकार्ड आणि पत्रलेखनाच्या कागदासाठी झालेला व्यय संबंधितांकडून वसूल करावा !
     पुणे - पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा वासंती काकडे यांनी स्वतःच्या नावाचे भेटकार्ड (व्हिजिटिंग कार्ड) आणि पत्रलेखनाचा कागद (लेटरहेड) यांची छपाई केली आहे. त्याचे देयक ४९ सहस्र आहे. त्यांनी छपाई करून घेतलेला पत्रलेखनाचा एक कागद सुमारे ९ ते १० रुपयांना मिळाला आहे.

मुंबईत कुख्यात गुंड छोटा राजन याच्या नावाने फटाके विक्री !

अशा प्रकारे गुंडांचा उदो उदो करून गुन्हेगारीचे 
समर्थन करणार्‍यांवर पोलीस प्रशासन काही कारवाई करेल का ?
     मुंबई - सध्या बाजारात विविध राजकीय नेत्यांच्या नावांच्या फटाक्यांची विक्री मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. त्याच्या जोडीला कुख्यात गुंड छोटा राजन याचेही नाव फटाक्यांवर दिसून आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मोदी फुसफुस अनार', 'मोदी बम', काँग्रेसच्या प्रियांका गांधी यांच्या नावाने 'प्रियंका फुलबाजी', तर राहुल गांधी यांच्या नावाचे भुईचक्राची विक्री केली जात आहे.

मंत्रीमंडळात महादेव जानकर, सदाभाऊ खोत, राजेश क्षीरसागर, शिवाजीराव नाईक यांची वर्णी लागण्याची शक्यता !

     कोल्हापूर, ११ नोव्हेंबर (वार्ता.) - राज्य मंत्रीमंडळ विस्तारात राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांचा समावेश निश्‍चित झाला आहे. कोल्हापूर येथून शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर आणि सांगली येथून श्री. शिवाजीराव नाईक यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या २५ नोव्हेंबरला मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. शिवसेनेच्या वतीने जिल्ह्यातील एका आमदाराला मंत्रीपद मिळण्याची चिन्हे आहेत. यामध्ये शिवसेनेचे आमदार सर्वश्री राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके आणि डॉ. सुजित मिणचेकर यांच्यात चुरस निर्माण झाली आहे. 

फटाक्यांद्वारे क्षणिक आनंद उपभोगण्यापेक्षा समर्पण भावनेतून मिळणारा आध्यात्मिक आनंद घेऊन दिवाळी साजरी करा !

     दीपावलीच्या काळात सर्वत्र फटाके वाजवले जातात; मात्र धर्मसंस्कृतीत कुठेही फटाक्यांना स्थान नाही. फटाके वाजवल्यानंतर ध्वनी आणि वायू प्रदूषण होऊन शरीरस्वास्थ्य आणि वातावरण यांवर परिणाम होतो. काही फटाक्यांवर देवतांची चित्रे आणि आध्यात्मिकदृष्ट्या संवेदनशील चिन्हे छापली जातात.अशा प्रकारच्या फटाक्यांवर आपण सर्वांनी बंदी घालायला हवी ! फटाके उडवल्याचा आनंद क्षणिक आहे; पण तो उपभोगतांना आ वासून उभी असलेली राष्ट्रासमोरची अनेक आव्हाने, प्रश्‍न यांकडे मात्र आपण दुर्लक्ष करतो. तसेच पैशांनी भरून न निघणारी निसर्गाची हानी होते, ती वेगळीच ! 

फलक प्रसिद्धीकरता

असे राज्यकर्ते कधीतरी कायद्याचे राज्य देतील का ?
      बिहार विधानसभेतील नवनिर्वाचित १४३ आमदारांवर फौजदारी गुन्हे नोंद असल्याचे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मस् (एडीआर) या संस्थेने केलेल्या पहाणीत उघड झाले आहे. यातील ९६ आमदारांवर तर हत्या आणि अपहरण यांसारख्या गंभीर फौजदारी गुन्ह्यांची नोंद आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Biharme chunkar aye 96 MLA par hatya tatha apaharan jaise sangin gunah darj hai !
Aise neta kya Biharka vikas kar payenge ?
जागो ! : बिहार में चुनकर आए ९६ विधायकों पर हत्या एवं अपहरण जैसे संगीन गुनाह दर्ज है !
ऐसे नेता क्या बिहार का विकास कर पाएंगे ?


प्रशासन न पालटल्यास कारवाईचा बडगा ! - मुख्यमंत्री

     मुंबई, ११ नोव्हेंबर - राज्यात सत्ता परिवर्तन झाले, तरी प्रशासन अजूनही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी शासनाच्या मानसिकतेत वागत आहे. जिल्हाधिकारी पातळीपर्यंतच्या अधिकार्‍यांची मानसिकता पालटू लागली आहे; मात्र त्याखालील अधिकार्‍यांची मानसिकता तशीच आहे. त्यामुळे शासनाने चांगले निर्णय घेऊनही त्या निर्णयांच्या अंमलबजावणीवर मात्र परिणाम होत आहे. स्थानिक पातळीवर अधिकार्‍यांच्या कार्यशाळा घेऊन त्यांना योग्य ती समज देण्यात येईल; मात्र त्यातूनही त्यांच्यात पालट न झाल्यास कारवाईचा बगडा उगारला जाईल, अशी चेतावणी राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी ही चेतावणी दिली. (मुख्यमंत्र्यांनी यापुढील काळात केवळ चेतावणी न देता प्रत्यक्ष कारवाईस प्रारंभ करून जनतेला दिलासा द्यावा ! - संपादक) 

(म्हणे) 'टिपू सुलतान हा हिंदु असता, तर त्याला छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे सन्मान मिळाला असता !'

सुलतानप्रेमी गिरिश(मियाँ) कर्नाड यांची हिंदुद्वेषी गरळओक 
     बेंगळुरू - म्हैसूरचा राजा टिपू सुलतान हा हिंदु असता, तर त्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे सन्मान मिळाला असता. आज आपले विद्वान आणि राजकारणी एखाद्याची जात अन् धर्म प्रथम पहातात. चुकीचे मूल्यमापन झाल्यामुळे टिपूवर अन्याय झाला आहे, असा कांगावा टिपूप्रेमी गिरिश (मियाँ) कर्नाड यांनी केला. टिपू सुलतान जयंतीनिमित्त राज्यशासनाच्या वतीने सचिवालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. (लक्षावधी हिंदु पुरुष, स्त्रिया यांना बळजोरीने मुसलमान बनवणे, हिंदु स्त्रियांना जनानखान्यात कोंबणे, हिंदु तरुणींवर बलात्कार करणे, सहस्रावधी मंदिरे तोडून मशिदी उभारणे अशा हिंदुद्वेष्ट्या कृत्यांमुळे टिपू सुलतानाला विरोध होत आहे. असे असतांना टिपूची जयंती साजरी करू पहाणारे जनतेला नेमके काय संदेश देऊ पहात आहेत ? - संपादक) 'देवनहळ्ळीच्या विमानतळाला विजयनगर साम्राज्याचे अधिकारी केम्पेगौडा यांचे नाव देण्याऐवजी टिपू सुलतानचे नाव द्यायला हवे होते', असे नक्राश्रूही त्यांनी ढाळले. 

भीमाचे गर्वहरण

दीपावलीच्या सुट्टीनिमित्त प्रतिदिन वाचा बोधकथा !
‘एकदा भीम जंगलातून जात होता. वाटेत त्याला एक शेपटी आडवी पसरलेली दिसली. बाजूला झाडाखाली एक म्हातारे माकड बसले होते. त्याचीच ही लांबलचक शेपटी होती. भीम म्हणाला, ‘‘ए माकडा, तुझी शेपटी बाजूला घे. माकड म्हणाले, ‘‘मी म्हातारा झालो आहे. फार आजारी आहे. माझी शेपटी मलाच उचलता येत नाही. तेव्हा कृपा करून तूच शेपटी बाजूला कर. भीम म्हणाला, ‘‘घाणेरड्या शेपटीला मी हात लावू काय ? उचल ती लवकर. माकड म्हणाले, ‘‘बरं, मग असं कर, तुझ्या गदेने शेपटी बाजूला कर. भीम म्हणाला, ‘‘माझ्या गदेने तुझी शेपटी तुटली तर ? माकड किंचित हसून म्हणाले, ‘‘आणि तुझी गदाच तुटली तर ? एक म्हातारे माकड आपली थट्टा करत आहे, ते पाहून भिमाला राग आला. त्याने रागाने शेपटीला गदा लावली; पण शेपटी हलेना. त्याने शेपटीखाली गदा घातली; पण तो शेपटी उचलू शकेना. उडवून देऊ शकेना. त्याने सगळी शक्ती लावली. त्याला दम लागला. तो घामाघूम झाला; पण शेपटी हलेना. मग त्याने शेपटीखालून गदा काढून घेण्याचा प्रयत्न केला; पण त्याला गदा काढताही येईना.

अन्न सात्त्विक हवे !

     नुकतेच नेस्ले आस्थापनाने त्यांचे वादग्रस्त मॅगी हे उत्पादन बाजारात पुन्हा आणले. २ मिनिटांमध्ये बनवला जाऊ शकणारा पदार्थ म्हणून जाहिरातबाजी करणार्‍या मॅगीच्या काही नमुन्यांमध्ये शिसे या धातूचे प्रमाणापेक्षा अधिक आढळून आल्यानंतर मॅगीवर बंदी घालण्यात आली होती. भारतीय अन्न सुरक्षा आणि दर्जा प्राधिकरण, तसेच अन्न आणि औषध प्रशासन (महाराष्ट्र) यांनी मॅगीवर घातलेल्या बंदीच्या विरोधात नेस्ले आस्थापनाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. या वेळी न्यायालयाने काही अटी घालत ही बंदी उठवली. त्यानंतर ९ नोव्हेंबर या दिवशी नेस्लेने हे उत्पादन पुन्हा बाजारात आणले. अर्थात या सर्व प्रकारामुळे मॅगी काही सुतासारखी सरळ नाही, हे नागरिकांच्या लक्षात आले. 

बलिप्रतिपदा : धर्मशास्त्र आणि इतिहास

धर्मशास्त्र
वाईट शक्तींचा त्रास होऊ नये; म्हणून बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन !
१. वाईट शक्तींची निर्मिती : बलिप्रतिप्रदा हा दिवस वाईट शक्तींच्या निर्मितीचा दिवस मानला जातो. या दिवशी ब्रह्मांडात यमलहरी, विस्फुटित लहरी आणि तिर्यक् लहरी यांचे प्रमाण जास्त असते. या लहरींच्या संयोगातून बळीराजाच्या नेतृत्वाखाली वाईट शक्ती अघोरी विधीच्या आधारे कार्याला आवश्यक अशा वाईट शक्तींची निर्मिती करतात.

मोहरूपी विकाराचा नाश करण्याचा दिवस म्हणजेे बलिप्रतिपदा !

प.पू. पांडे महाराज
      बलि हा दानशूर होता. तो जरी राक्षसकुळात जन्माला आला होता, तरी सात्त्विक होता. त्याच्या राक्षसी कुलाप्रमाणे त्याच्या हातून वैदिक विचारांची उपेक्षा होत होती, तसेच त्याने वर्णाश्रमव्यवस्था नाहीशी केली होती. त्यामुळे वामनाने बलीचा पराभव करून त्याला योग्य धर्माचे ज्ञान दिले. बलीने आपले सर्वस्व वामनदेवाला अर्पण केले. तेव्हा पाताळातील दुष्ट शक्तींचा नाश करून त्यांना योग्य मार्गदर्शन कर, तसेच तुझ्या साहाय्यासाठी मी तुझ्यासमवेत आहे, असे वामनाने त्याला सांगितले. अशा या बलीसाठी हा दिवस ठेवला आहे. कनक आणि कांता यांच्या मोहात अंध बनलेला माणूस राक्षस बनत असतो. तेव्हा मोहरूपी विकाराचा नाश करण्याचा हा दिवस आहे. - प.पू. परशराम माधव पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२९.९.२००६)    

निवडणुकांत व्यावसायिक व्यवस्थापनाचा वापर योग्य आहे काय ?

श्री. शिरीष देशमुख
     नुकत्याच पार पडलेल्या बिहारच्या निवडणुकीत भाजपचा पराभव होऊन नितीशकुमार-लालू प्रसाद यादव यांच्या युतीचा दणदणीत विजय झाला. त्यामागे असलेल्या अनेक कारणांपैकी एक कारण व्यावसायिक प्रचार हे होते. नितीशकुमार-लालू प्रसाद यादव यांच्या प्रचाराची धुरा सांभाळणार्‍या प्रशांत किशोर नावाच्या व्यक्तीची जोरात चर्चा होत आहे. 
     प्रशांत किशोर हे व्यावसायिक व्यवस्थापक असून त्यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत श्री. नरेद्र मोदी यांच्या प्रचार यंत्रणेची धुरा सांभाळली होती. त्यासाठी त्यांनी एक सिटीझन्स फॉर अकाऊंटेबल गव्हर्नन्स (उत्तरदायी प्रशासनासाठी नागरिक संघटना) नावाचा कार्यकर्त्यांचा एक छोटा चमू सिद्ध केला होता. त्यात आय.आय.टी. आणि तशाच प्रकारच्या शैक्षणिक संस्थांतून उत्तीर्ण झालेल्या अथवा शिकत असलेल्या व्यक्तींचा समावेश केला होता. या चमूचे मुख्य कार्य देशातील सद्यपरिस्थितीचा अभ्यास करून श्री. नरेंद्र मोदी यांना व्यक्ती म्हणून आणि भाजपला एक पक्ष म्हणून लोकांसमोर आदर्श म्हणून कसे सादर करता येईल हे होते.

हिंदूंनो, दिवाळीपासून हिंदु धर्माच्या रक्षणासाठी संघटित होऊन धर्मकर्तव्य पार पाडा !

श्री. चेतन हरिहर
     हिंदूंनो, यावर्षीच्या दिवाळीपासून दीपावलीसह कोणताही सण साजरा करतांना हिंदु राष्ट्राचा दीपही प्रज्वलित करायचा आहे, हे ध्येय समोर ठेवा. हिंदु धर्म नष्ट करण्यासाठी धर्मद्रोही कसे आकाशपाताळ एक करत आहेत ?, या संदर्भातील पुढील काही घटनांकडे दृष्टीक्षेप टाकल्यास या ध्येयाचे महत्त्व लक्षात येईल. 
१. हिंदूंवरील अत्याचारांची काही उदाहरणे
१ अ. न्याय्य मागणीसाठी आंदोलन करणार्‍या साधू-संतांवर पोलिसांनी लाठीप्रहार करणे : गंगा नदीत गणेशमूर्तींचे विसर्जन करू द्यावे, या न्याय्य मागणीसाठी केलेल्या शांततामय आंदोलनात द्वारका पिठाधीश्‍वर शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी यांचे शिष्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद यांच्यासह अनेक साधू-संतांवर पोलिसांनी अमानुष लाठीप्रहार केला.

हिंदू असहिष्णु आणि कट्टर असते तर...

आजकाल काही लोक सामाजिक असहिष्णुता हे भाजपच्या पराभवामागील कारण असल्याचे सांगत बहुसंख्य हिंदूंची उदारता आणि सहनशीलता यांना अपमानीत करत आहेत. यात किती सत्य आहे, याविषयी कोणी सविस्तरपणे विचार केला, तर वस्तूस्थिती समजेल. जर हिंदू असहिष्णु आणि कट्टर असते तर....

आपत्काळ असल्याने दिवाळी साधेपणाने; पण आध्यात्मिकदृष्ट्या योग्य प्रकारे साजरी करा !

     सध्या आपत्काळ चालू आहे, तसेच गेल्या काही दिवसांत विविध भागांत हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार झाले. या हिंदूंप्रती आपली सहवेदना व्यक्त करण्यासाठी दिवाळी साधेपणाने साजरी करणे योग्य ठरते. दिवाळी साधेपणाने साजरी करतांना पुढील गोष्टी लक्षात घ्याव्यात. दिवाळीत पणत्या आणि आकाशकंदिल लावण्यामागे आध्यात्मिक कारण आहे. पणत्या आणि आकाशकंदिल लावल्याने देवतांचे तत्त्व आकृष्ट होण्यास साहाय्य होते. त्यामुळे साधकांनी दिवाळी साधेपणाने साजरी करतांना पणत्या आणि आकाशकंदिल लावून त्यापासून होणारा आध्यात्मिक लाभ मिळवावा.

वामनावताराचे दहन रोखण्यासाठी धर्मप्रबोधन आवश्यक !

     वर्ष २००४ मध्ये बलिप्रतिपदेच्या दिवशी एका शहरात हिंदुद्रोही संघटनांकडून हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या वामनाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. धर्माभिमान्यांनी या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. तेव्हा पोलिसांनी तो धार्मिक विधी असल्याने आम्ही त्याला रोखू शकत नाही, असे सांगितले. हे असेच चालू राहिले, तर काही जणांना तो धार्मिक विधी आहे, असे वाटू लागेल. आजही काही हिंदूंना वामनावताराबाबत हिंदुद्रोह्यांकडून सांगितली जाणारी कथा सत्य वाटू लागली आहे. त्यामुळे हिंदु धर्म महान असूनही अशा हिंदुद्रोह्यांच्या प्रचाराला फसून आपल्याच धर्माबद्दल त्यांचे गैरसमज वाढत आहेत. ही परिस्थिती दूर करण्यासाठी हिंदूंमध्ये धर्मप्रबोधन करणे अत्यावश्यक बनते. - एक साधक       भारत हे जगाचे देवघर आहे; मात्र इथला हिंदु विकलांग, भ्रष्ट आणि दुर्बल झाला आहे. स्वत्व, आत्मभान आणि राष्ट्रीयत्व गमावलेल्या हिंदूंना जागे करावे लागेल. हिंदुत्व हा आपला प्राण आहे. हिंदु समाजावरील आक्रमण थांबवण्यासाठी हिंदु समाज बलवान होण्याची आवश्यकता आहे. असे झाले, तरच भारत पुन्हा जगद्गुरुपदी विराजमान होईल !

व्यष्टी साधनेत अनेक कठीण प्रसंगांना तोंड देतांना गुरुमाऊलीने काळजी घेतल्याने पत्राद्वारे कृतज्ञता व्यक्त करणारी कु. पूनम चौधरी !

     प.पू. गुरुदेवांच्या चरणी साष्टांग नमस्कार.
    देहली सेवाकेंद्रात असतांना माझ्याकडून चुका झाल्यामुळे मला व्यष्टी साधना करण्यासाठी सांगितले होते. गुरुदेवांच्या कृपेमुळे मला आत्मनिवेदन करण्याची ही संधी मिळाली. यासाठी मी त्यांच्या सुकुमार कोमल चरणी कृतज्ञ आहे.

आध्यात्मिक, सौंदर्यशास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असणारी पारंपरिक रांगोळी !

रांगोळी ही ६४ कलांपैकी एक कला आहे. ही एक अशी कला आहे की, जी घरोघरी पोहचली आहे. सणा-समारंभांत, देवळात आणि घरोघरी रांगोळी काढली जाते. सौंदर्याचा साक्षात्कार आणि मांगल्य हे रांगोळीचे दोन उद्देश आहेत. ज्या ठिकाणी रांगोळी काढली जाते, त्या ठिकाणी आपोआपच मंगलदायी वातावरणाची निर्मिती होते. अंगणात काढली जाणारी रांगोळी घरातील सात्त्विकतेचे, सौंदर्याचे आणि स्नेहभावनेचे प्रतिबिंब असते.

विविध माध्यमांतून प्रसारसेवा करतांना देव अनेक रूपांत येऊन साहाय्य करत असल्याची साधिकेने घेतलेली अनुभूती !

     प.पू. गुरुदेवांच्या चरणी साष्टांग नमस्कार.
     हे दयाघना, आपल्या कृपेने सेवा करण्याची संधी मिळाल्यामुळे आपल्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता ! प्रसारसेवा करत असतांना मला अनेक अनुभूती येतात. गुरुदेवा, असे असूनही माझ्या मनात कर्तेपणाचे विचार येतात. यासाठी मी तुमची क्षमा मागते.
कु. पूनम चौधरी
१. समाजातील व्यक्तींच्या माध्यमातून देवच 
धावून येत असल्याचे दर्शवणारे प्रसंग !
१ अ. प्रसारासाठी सात्त्विक उत्पादनांसह प्रवास करतांना बसचालकाने बस थांबवून सगळे साहित्य बसमध्ये ठेवणे : मी प्रतीमास प्रसारासाठी देहलीपासून जवळजवळ ८ घंट्यांच्या अंतरावरील एका शहरात सनातन-निर्मित उत्पादने घेऊन जाते. तेथील धर्माभिमानी आणि जिज्ञासू यांच्याकडून सात्त्विक उत्पादनांना पुष्कळ मागणी आहे. प्रत्येक वेळी मी ८ ते १० पिशव्यांतून साहित्य नेते. एकदा मी आणि प्रणवदादा त्या शहरात जात असतांना माझ्याजवळ १० पिशव्या होत्या.

एकमेकांना साधनेसाठी पूरक असलेले मंगळुरू येथील श्रीमती अश्‍विनी प्रभु यांचे आध्यात्मिक कुटुंब

     २.५.२०१५ या दिवशी आम्ही सर्व जण रामनाथी आश्रमात गेल्यावर प.पू. गुरुदेवांची भेट झाली. तेव्हा त्यांनी आमच्या कुटुंबाची वैशिष्ट्ये लिहून देण्यास सांगितली; म्हणून त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या दिवशी तेथे उपस्थित असलेल्या आमच्या कुटुंबातील सदस्यांची गुणवैशिष्ट्ये थोडक्यात लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.

शांत, संयमी आणि सतत भगवंताच्या अनुसंधानात असणारी ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली रत्नागिरी येथील कु. रश्मी महेंद्र चाळके (वय ११ वर्षे) !

कु. रश्मी चाळके
१. संयमी
     माझा मुलगा योगेश्‍वर (वय अडीच वर्षे) तिला त्रास देत होता. तो तिची वेणी आणि ओढणी ओढत होता, तरीही तिने न चिडता शांतपणे असे करू नकोस, असे त्याला सांगितले.
२. इतरांना साहाय्य करणे
     दुपारी जेवण झाल्यावर तिने मला भांडी स्वयंपाकघरात नेऊन ठेवण्यास साहाय्य केले.
- सौ. साधना जरळी, चिपळूण

चक्रीवादळामुळे मुलीच्या घरावरील छत उडून गेले असतांना सनातन पंचांग लावलेला मेढा (खांब) मात्र सुरक्षित राहिल्याची आलेली अनुभूती !

प.पू. डॉक्टरांच्या चरणी,
साष्टांग नमस्कार.
     माझी मोठी मुलगी दादेगाव (ता. आष्टी, जि. बीड) या गावात रहाते. ती ज्या भागात रहाते, त्या भागात १४.३.२०१५ या दिवशी चक्रीवादळ आले होते. वेगवान वादळामुळे तिच्या घराचे छत उडून गेले. विशेष म्हणजे ज्या मेढ्याला (छताला आधार देणार्‍या लाकडाच्या उभ्या दुबेळक्या (शेंड्यास दोन फाटे असलेल्या) खांबाला) सनातन पंचांग लावले होते, तो मेढा मात्र सुस्थितीत राहिला आणि पंचांगही जागच्या जागी होते.

प.पू. डॉक्टरांना भेटण्यासाठी आतुर झालेल्या कु. ऐश्‍वर्या जोशी (वय १२ वर्षे) हिने प.पू. डॉक्टरांच्या चरणी केलेली पत्ररूपी विनवणी !

 
कु. ऐश्‍वर्या जोशी
   कु. ऐश्‍वर्याकडून प.पू. डॉक्टरबाबांना दीपावलीचा शिरसाष्टांग नमस्कार ! 
 प.पू. डॉक्टरबाबा,
नमस्कार.
कसे आहात ? मी छान आहे. मला तुमची आठवण येते. येथे (रामनाथीला) आल्यावर प्रयत्नांना दिशा आणि उभारी मिळाली. मी भावसत्संगाला बसले होते. त्या वेळी सूक्ष्मातून तुमच्या खोलीत येण्याची संधी मिळाली; पण ती स्थुलातून मिळावी, अशी इच्छा आहे. तुम्ही म्हणता, स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ ! पण तरीही तुम्हाला भेटावे, असे वाटते. मी पुष्कळ चुका करते; पण तरीही मला ही संधी द्याल का ? आज माझा दिनांकानुसार वाढदिवस आहे; म्हणून सतत भावाच्या स्थितीत राहून श्रीकृष्णाला अनुभवण्याचा संकल्प करत आहे.

उतारवयातही तळमळीने सेवा करणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे बेळगाव येथील श्री. माधव इनामदार (वय ७६ वर्षे) !

श्री. माधव इनामदार
     श्री. माधव इनामदार हे व्यवसायाने अधिवक्ता होते. ते १२ वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतात. त्यांंचे वय ७६ वर्षे असल्याने त्यांना बाहेर जाऊन सेवा करणे जमत नाही. पूर्वी काका धर्मजागृती सभा आणि गुरुपौर्णिमा या सेवांच्या बैठकांना सौ. माधुरी इनामदारकाकूंना (पत्नीला) दुचाकीवरून सोडणे, त्यांना घेऊन जाणे इत्यादी सेवा नियमितपणे करत, तसेच त्यांच्या घराच्या आसपासच्या भागांत पंचांग वितरण आणि सात्त्विक वस्तूंचे वितरण या माध्यमांतून प्रसार करत. काका विनोदी असल्याने ते प्रत्येकालाच हसवतात.

गुरुकृपायोगानुसार साधनेचे महत्त्व

 
कु. कल्याणी गांगण
     २५.२.२०१५ या दिवशी मी पू. सौरभ जोशी यांच्या खोलीत गेले होते. त्या वेळी त्यांच्या आईने मला सांगितले की, प.पू. डॉक्टर म्हणाले, सौरभ तुमचे गुरु आणि तुम्ही सौरभच्या शिष्य ! हे ऐकल्यावर माझ्या मनात विचार आले, प.पू. डॉक्टरांनी आध्यात्मिक स्तरावर नाती निर्माण करून जीवन जगण्यास शिकवले. इतर संप्रदायांमध्ये एक गुरु असतात आणि ते एखादा शिष्य सिद्ध करतात. याउलट सनातन संस्थेत प्रगती शीघ्र गतीने होत असल्याने आतापर्यंत अनेक साधक संत झाले आहेत. त्यांची सेवा करून नातेवाईक त्यांचे शिष्य बनले आहेत, म्हणजेच प.पू. डॉक्टरांनी गुरुकृपायोगाची निर्मिती करून अनेक घरांत गुरु-शिष्य परंपरा चालू केली. त्यामुळे मायेतील नाती दूर होऊन आध्यात्मिक नाते निर्माण झाले, तसेच तेथे आनंदाची अनुभूती येऊ लागली आहे. या नात्यात देवाण-घेवाण हिशोब निर्माण होत नाही. मनावर योग्य तेच संस्कार होतात. हे विचार मनात आल्यावर मला पुष्कळ आनंद झाला. मन शांत होऊन डोळ्यांसमोर ही परंपरा दिसली. श्रीकृष्णाने मला हा आनंद दिल्यासाठी कृतज्ञता व्यक्त करते.
- कु. कल्याणी गांगण, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

साधनेतील साधन आणि साध्य यांतील फरक

परात्पर गुरु डॉ. आठवले
     एका संतांनी एका जिज्ञासूला सांगितले, साधना केली पाहिजे; पण साधना करतांना ईश्‍वराचे आशीर्वाद असले पाहिजेत. इथे लक्षात घेण्यासारखे सूत्र म्हणजे ईश्‍वराचा आशीर्वाद मिळवणे, हे साध्य आहे. हे साध्य होण्यासाठीच साधना करण्याची आवश्यकता असते. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (४.११.२०१५)

सोमयागांचे वैज्ञानिक दृष्टीकोनातून संशोधन करण्यासाठी वाचकांचे साहाय्य हवे !

     सोमयाग केल्यानंतर मेघनिर्मिती होते. त्यामुळे सोमयाग केलेल्या ठिकाणापासून साधारण ३५० कि.मी. किंवा त्याहून अधिक दूरच्या प्रदेशात सूर्योदयापूर्वी १५ मिनिटांपर्यंत पूर्वेला आणि सूर्यास्तानंतर २० मिनिटांपर्यंत पश्‍चिमेला गडद लाल रंगाचे मेघ दिसतात. काही वेळा ते पिवळसर, गुलाबी किंवा केशरी रंगातही दिसू शकतात. त्या वेळी अभ्यासकांनी त्यांच्या स्थानिक ठिकाणाहून दिसणार्‍या ढगांचे निरीक्षण करावे आणि त्याच्या नोंदी पुढे दिलेल्या नमुन्यात मेल किंवा लघुसंदेश किंवा व्हॉटस्-अ‍ॅप यांद्वारे पाठवाव्यात.

नारळी पौर्णिमेला सिंहस्थपर्वातील भाविकांना लाभली राजयोगी स्नानाची पर्वणी, तर पू. (सौ.) माईंना संतपदप्राप्तीनंतरच्या वाढदिवसाला प्रत्यक्ष प.पू. गुरुदेवांचे दर्शन होऊन लाभलेली अनमोल पर्वणी !

पू. (सौ.) लक्ष्मी नाईक
१. नारळी पौर्णिमेच्या शुभदिनी, म्हणजेच वाढदिवसाच्या,
 तसेच राजयोगी (शाही) स्नानाच्या दिवशी रामनाथी 
आश्रमात जाण्याचा योग येऊन गुरुदेवांचे दर्शन होणे
      वर्ष २०१५ च्या गुरुपौर्णिमेला प.पू. दास महाराजांच्या पत्नी सौ. माई संतपदी विराजमान झाल्या. श्रावण पौर्णिमेला, म्हणजे नारळी पौर्णिमेला पू. (सौ.) माईंचा वाढदिवस असतो. या वर्षी त्याच दिवशी नाशिकला गोदावरीतीरी राजयोगी स्नान होते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे याच दिवशी प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) माई गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रामनाथीला आले.

एअरोसोल (Aerosol) तंत्रज्ञानातील तज्ञ आणि अभ्यासू, तसेच या विषयाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी यांना आवाहन !

     सोमयाग केल्यानंतर मेघनिर्मिती होऊन १९५ दिवसांनी सोमयाग केलेल्या परिसरात पाऊस पडतो, याचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करण्यासाठी एअरोसोल तंत्रज्ञानातील तज्ञ आणि अभ्यासू, तसेच या विषयाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी यांचे साहाय्य आवश्यक आहे. इच्छुकांनी खाली दिलेल्या पत्त्यांवर संपर्क करावा.
     (एअरोसोल(Aerosol) म्हणजे काय ? : सूक्ष्म ठोस कण किंवा द्रव बिंदू आणि हवा किंवा कोणत्याही प्रकारचे वायू यांच्या मिश्रणाला एअरोसोल म्हणतात.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
काल अमावास्या झाली.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान
खरे समजून घेणे
सुनो सोचो समझो ।
सुनो समझो सोचो ।
     भावार्थ : सुनो म्हणजे ऐका, सोचो म्हणजे विचार करा आणि समझो म्हणजे समजून घ्या. पहिल्या ओळीत सुनो सोचो समझो आहे. त्याचा अर्थ असा की, ऐकल्यावर मन आणि बुद्धी यांद्वारेे विचार करून काय ते समजून घ्या. यातील समजून घेणे मन आणि बुद्धी यांच्या माध्यमातून असल्याने ते मायेच्या संदर्भात आहे. अभिमन्यूला केवळ हीच ओळ ठाऊक होती, म्हणून तो चक्रव्यूहात अडकला. याउलट दुसर्‍या ओळीत सुनो समझो सोचो आहे.
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

ज्ञानाचा वापर सुयोग्य करायला हवा 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     नुसते ज्ञान संपादन केले, तर त्याचा उपयोग होईलच, असे नाही. त्याचा सुयोग्य वापर करण्याचा चाणाक्षपणा आणि हुशारी नसेल, तर ते ज्ञान म्हणजे इंजिनविना असलेली गाडी ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

हिंदु धर्माची यथार्थ बाजू लोकांना सांगण्याची आवश्यकता !

     आज आम्हाला सर्व बाजूंनी जमेल तसा, जमेल त्या प्रकारच्या साधनांचा अवलंब करावा लागेल. प्रसार-माध्यमांचा अवलंब करावा लागेल. तन, मन आणि धन वेचून सनातन हिंदु धर्माची यथार्थ बाजू आणि यथार्थ धर्म लोकांना सांगावा लागेल. - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (मासिक घनगर्जित, फेब्रुवारी २०१३)

अहंकारामुळे देवासाठी अश्रू ढाळता न येणे !

     रडणे ही मोठी शक्ती आहे. देवासाठी जे रडतात ते धन्य आहेत. अहंकारी माणूस रडत नाही. अहंकार अश्रू ढाळू देत नाही. अहंकार्‍याच्या वार्‍यालाही भाव उभा रहात नाही. भक्तीचा त्याला कधीच गंध येत नाही. - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (संदर्भ : मासिक घनगर्जित, मार्च २०१४) 

बोधचित्र


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
      सर्व गोष्टींचा कर्ता-करविता असलेल्या देवाचे अस्तित्व नाकारणारे बुद्धीप्रामाण्यवादी ! : कर्त्याने बनवलेली गोष्ट कर्त्यापेक्षा कधीच श्रेष्ठ असू शकत नाही, उदा. सुताराने बनवलेली आसंदी (खुर्ची) सुतारापेक्षा कधीच श्रेष्ठ असू शकत नाही. असे असतांना देवाने बनवलेले काही मानव मात्र सर्व गोष्टींचा कर्ता-करविता असलेल्या देवालाच क्षुल्लक समजतात !

हिंदूंना वाली कोण ?

राज्यकर्त्यांकडून हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अन्याय केल्या जाणार्‍या दोन मोठ्या घटना घडल्या. एका घटनेत ऐन दिवाळीच्या पहिल्या दिवशीच भारतातील कर्नाटक राज्यात बेंगळुरु येथे क्रूरकर्मा टिपू सुलतानच्या शासकीय जयंतीला विरोध करणारे विहिंपचे जिल्हा संयोजक सचिव श्री. सचिव कुटप्पा यांचा मृत्यू झाला, तर दुसरीकडे कुवेत येथे विष्णूची रूप मानल्या जाणार्‍या सत्यनारायणाची पूजा केल्यामुळे ११ भारतीय गेल्या १५ दिवसांपासून कारागृहात आहेत. वास्तविक क्रूरकर्मा टिपू काँग्रेस शासनाचा कोण लागतो ? मात्र मुसलमानांच्या मतपेटीचा दबावगटच एवढा आहे की, शासनाला तो शासकीय कार्यक्रम म्हणून करावा लागला. मुसलमान आक्रमकांचे अशा प्रकारे शासकीय पातळीवर उदात्तीकरण करण्याचा प्रकार अत्यंत धोकादायक असून उद्या औरंगजेब, अकबर, महंमद घौरी, अफझलखान यांच्याही जयंत्या साजर्‍या करा म्हणून धर्मांधांकडून सार्वत्रिक मागणी होऊ लागेल.

न्यायाधिशांच्या नियुक्त्यांमधून पारदर्शीपणा पुढे यावा !

संपादकीय
सध्या केंद्रशासन आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यात न्यायाधिशांच्या नियुक्तीवरून मतभेद निर्माण झाले आहेत. ज्या प्रकाराद्वारे उच्च आणि सर्वोच्च न्यायाधिशांची नियुक्ती करण्यात येते ती व्यवस्था म्हणजे कॉलेजियम होय ! यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयातील ४ वरिष्ठ न्यायाधिशांचा फोरम न्यायाधिशांची नियुक्ती आणि त्यांचे स्थानांतरण कसे असावे हे ठरवले जाते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn