Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आज लक्ष्मीपूजन

आज महावीर निर्वाणदिन


बेंगळुरू येथे क्रूरकर्मा टिपू सुलतानच्या शासकीय जयंतीला विरोध करणार्‍या विहिंपच्या जिल्हा संयोजकाचा मृत्यू

     हिंदूंवर अन्वन्वित अत्याचार करणार्‍या आणि हिंदूंची मंदिरे पाडणार्‍या क्रूरकर्मा टिपू सुलतान जयंतीला विरोध करणार्‍यांना हिंदूंच्याच देशात मज्जाव का ? टिपू सुलतानचे उदात्तीकरण करणार्‍यांना आता पाकमध्येच पाठवायला हवे !
कर्नाटकातील काँग्रेस शासनाच्या विरोधात आंदोलनाची श्रीराम सेनेची चेतावणी
      बेंगळुरू (कर्नाटक) - कर्नाटकातील कोडगू येथे टिपू सुलतान जयंतीच्या विरोधातील आंदोलनाच्या वेळी झालेल्या हिंसाचारात विश्‍व हिंदु परिषदेचे जिल्हा संयोजक सचिव कुटप्पा यांचा मृत्यू झाला आहे. (हिंदूंनो, धर्मबांधवांचा अशा प्रकारे नाहक बळी जाऊ न देण्यासाठी वेळीच हिंदूसंघटन करा ! - संपादक)

बिहारमधील पराभवाला पंतप्रधान मोदी उत्तरदायी नाहीत ! - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह

      नवी देहली - बिहार विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या झालेल्या पराभवाला पंतप्रधान मोदी उत्तरदायी नाहीत, असे स्पष्टीकरण भाजपचे नेते तथा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिले. उत्तरप्रदेश विधानसभेची आगामी निवडणूक तेथे भाजप जिंकेल, असा विश्‍वासही सिंह यांनी व्यक्त केला. बिहार निवडणुकीच्या निकालानंतर २ दिवसांनी प्रथमच माध्यमांपुढे येऊन भाजपने त्यांची अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे.
     सिंह यांनी पंतप्रधानांसह सरसंघचालक मोहन भागवत यांचाही बचाव केला.

१५ क्षेत्रांमध्ये १०० टक्के थेट विदेशी गुंतवणुकीचा प्रस्ताव केंद्राच्या विचाराधीन

     नवी देहली - १५ क्षेत्रांमध्ये १०० टक्के थेट विदेशी गुंतवणुकीला (फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट) संमती देण्याचा प्रस्ताव केंद्रशासनाच्या विचाराधीन असल्याचे वृत्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच इंग्लंड आणि तुर्कस्थान या राष्ट्रांच्या दौर्‍यांवर जाणार असून त्यापूर्वीच ही घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे. बांधकाम, संरक्षण, प्रसारमाध्यमे, बँकिंग, औषधनिर्मिती, प्लान्टेशन अशा सुमारे १५ क्षेत्रांमध्ये विदेशी कंपन्यांना थेट गुंतवणूक करायची असल्यास त्यांना शासकीय संमतीची आवश्यकता भासणार नाही

पुढील मासात पाकिस्तान क्रिकेट संघाला भारतात बोलावण्याची सिद्धता

शत्रूराष्ट्राला कुरवाळत आत्मघात करू पहाणारा जगातील एकमेव देश भारत !
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची राष्ट्रघातकी उठाठेव !
      क्रिकेटच्या सामन्यांमुळे भारत आणि पाक यांच्यातील संबंध सुधारतील, हा जावईशोध कुणाचा ? भारत-पाक यांच्या क्रिकेट सामन्यांतून मिळणार्‍या भरमसाठ उत्पन्नावर डोळा ठेवून भारतीय क्रिकेट नियामळ मंडळ हा राष्ट्रघातकी निर्णय घेत आहे, असे कुणी म्हटल्यास त्यात नवल ते काय ?
     मुंबई, १० नोव्हेंबर - भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये संयुक्त अरब अमिरातमध्ये होणारा क्रिकेट सामना मायभूमीतच होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी क्रिकेट संघाला डिसेंबरमध्ये भारतातच सामन्यासाठी पाचारण करण्याची सिद्धता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दर्शवली आहे. याविषयी मोदी शासनाकडे अद्याप अनुमती घेण्यात आलेली नाही. (प्रतिदिन शत्रूराष्ट्राकडून भारतावर आक्रमण होत असतांना सौहार्द वातावरण निर्माण होण्याच्या नावाखाली क्रिकेटचे सामने आयोजित करणे, हे आत्मघात करण्यासारखेच आहे ! - संपादक)

देहलीच्या शाही इमामांच्या मुलाचा हिंदु मुलीशी निकाह !

  •  इस्लामचा स्वीकार करण्याचे मान्य केल्यानंतरच बुखारींची निकाहाला मान्यता ? 
  • हिंदु मुलीने इस्लाम पंथ स्वीकारला !
     धर्मशिक्षणाअभावी हिंदूंची झालेली दयनीय स्थिती ! हिंदूंना प्रथमपासूनच धर्मशिक्षण मिळाले असते, तर ते भरकटले नसते ! धर्मांतर करणे, हे महापाप आहे ! एखादी मुसलमान मुलगी हिंदु मुलाशी विवाह करण्यास सिद्ध झाल्यास स्वत:च्या धर्माभिमानामुळे ती धर्मांतर करत नाही, असा इतिहास नाही का ? तसा धर्माभिमान हवा !
     नवी देहली - येथील जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांचा २० वर्षीय मुलगा शबन याने गाझियाबादमधील एका हिंदु मुलीशी निकाह केला आहे.

मध्यप्रदेश येथील पंचायती आखाडा बडा उदासीनचे महंत महेश्‍वर दास यांचे हिंदु जनजागृती समितीच्या कार्याला आशीर्वाद

समितीच्या कार्याचे माहितीपत्रक
वाचतांना महंत महेश्‍वर दास
      उज्जैन, १० नोव्हेंबर (वार्ता) येथील पंचायती आखाडा बडा उदासीनचे महंत महेश्‍वर दास यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यास आशीर्वाद दिले. समितीचे श्री. योगेश व्हनमारे यांनी महंत महेश्‍वर दास यांच्या आश्रमात त्यांची भेट घेतली. या वेळी महंत दास यांनी समितीचे कार्य जाणून घेतले आणि समितीचे कार्य योग्य दिशेने चालू असल्याचे सांगितले. याचबरोबर त्यांनी समितीच्या धर्मप्रसार कार्यात सहकार्य करू, असे सांगितले. महंत दास यांनी समितीने सिद्ध केलेले धर्मशिक्षण फलक आमच्या आश्रमात लावूया, असेही म्हटले आहे.

ट्रकमधील कांदे आणि बटाटे यांच्या पोत्यांमागे आढळले ४४ गोवंश !

गोतस्करीचा उघड झालेला हा भयानक प्रकार पहाता गोतस्कर किती क्रूर मानसिकतेचे 
असतात, हे लक्षात येते ! गोतस्करांना कठोर शिक्षा केल्यासच असे प्रकार थांबतील !
  • ९ गोवंशांचा गुदमरून मृत्यू !
  • आता कांदे-बटाटे यांच्या वाहतुकीच्या आडून गोतस्करी !
ट्रकमध्ये कांद्यांच्या पोत्यांच्या मागे कोंबलेले गोवंश
     सेंधवा (मध्येप्रदेश) - विविध मार्गांनी गोतस्करी करणार्‍यांकडून आता गोतस्करीचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी येथील जैन पाईप परिसरात अडवलेल्या एका ट्रकमध्ये चक्क कांद्यांच्या पोत्यांच्या मागे ४४ गोवंश कोंबून भरलेले आढळून आले. हा प्रकार पाहून पोलीसही चक्रावून गेले.
    एम्.पी. ०९ एच्.एफ्. ११६४ हा गोवंशांनी भरलेला ट्रक इंदूरहून येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावर सेंधवा पोलीस ठाण्याचे प्रमुख रमेश कोली यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या ट्रकचा शोध घेणे चालू केले.

कोहिनूर हिरा भारताला परत मिळण्यासाठी ब्रिटनमधील भारतीय वंशाच्या उद्योजकाचा न्यायालयीन लढा

भारतीय वंशाच्या नागरिकांकडून भारतीय नागरिक आणि शासन बोध घेतील का ?
     लंडन, १० नोव्हेंबर - साधारण ८०० वर्षांपूर्वी भारतातील खाणीत आढळलेला कोहिनूर हिरा १०५ कॅरेटचा आहे. तो इंग्रज राजवटीच्या कार्यकाळात ब्रिटनच्या महाराणी व्हिक्टोरिया यांना तो हिरा भेट म्हणून देण्यात आला होता. त्यानंतर तो हिरा महाराणी एलिझाबेथ यांच्या आईच्या मुकुटात बसवण्यात आला. सध्या कोहिनूर हिरा टॉवर ऑफ लंडनमधील प्रदर्शनात ठेवण्यात आला आहे. हा अमूल्य हिरा परत भारतात यावा, यासाठी ब्रिटनमधील भारतीय उद्योजक आणि अभिनेते यांनी ब्रिटनच्या महाराणीच्या विरोधात कायदेशीर लढाई चालू करण्याची सिद्धता केली आहे. या कायदेशीर लढ्यासाठी भारतीय वंशाचे उद्योजक डेव्हिड डिसोझा हे आर्थिक साहाय्य करणार आहेत. (देशाचा अमूल्य ठेवा परत मिळवण्यासाठी प्रयत्न करणारे डेव्हिड डिसोझा यांचे अभिनंदन ! - संपादक)

येत्या वर्षात ५ सहस्त्र कोटी रुपयांच्या वीज बचतीचे रेल्वेचे उद्दिष्ट

     नवी देहली, १० नोव्हेंबर - येत्या वर्षामध्ये एकूण वीज देयकांमध्ये ५ सहस्त्र कोटी रुपयांची बचत करण्याचे उद्दिष्ट रेल्वेच्या सर्व विभागांना देण्यात आले आहे. वेतन आणि निवृत्तीवेतन यानंतर रेल्वेचा सर्वाधिक व्यय वीज देयकावर होतो. त्यामुळे येत्या काही वर्षांत विजेचा वापर टप्प्याटप्प्याने अल्प करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी दिली.

गोरक्षकांना स्वरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याची अनुमती द्यावी !

जंतर-मंतर (देहली) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे हिंदुत्ववाद्यांची शासनाकडे मागणी
  • अशी मागणी करावी लागणे, हे शासनाला लज्जास्पद आहे ! 
  • गोमातेचे रक्षण होण्यासाठी शासनाने देशभरात गोहत्याबंदी कायदा लागू करावा आणि त्याची कठोरपणे कार्यवाही करावी, अशी गोप्रेमींची अपेक्षा आहे ! 
जंतर-मंतर येथे आंदोलनात सहभागी झालेले धर्माभिमानी
     नवी देहली, १० नोव्हेंबर देशभरामध्ये अवैधरित्या चालू असलेल्या गोहत्या रोखण्यासाठी अनेक गोप्रेमी आपले प्राण संकटात घालून गायींना पशूवधगृहामध्ये जाण्यापासून वाचवत आहेत. गोरक्षणाचे हे कार्य करत असतांना गो-तस्करांकडून गोरक्षकांवरच प्राणघातक आक्रमणे होत आहेत. काही दिवसांपूर्वी कर्नाटक येथील बजरंग दलाचे कार्यकर्ता श्री. प्रशांत पुजारी, हरियाणामध्ये राधाकृष्ण गोशाळेचे श्री. संदीप कटारिया, पुणे येथील गोरक्षक श्री. मिलींद एकबोटे यांच्यावर अशी आक्रमणे झाली. त्याचप्रमाणे पंजाब गोरक्षा दलाचे श्री. सतीश प्रधान यांच्यावरही गोळीबार करण्यात आला होता. गो-तस्करी रोखण्याचे कार्य करणार्‍या पोलिसांवरही कसायांनी प्राणघातक आक्रमणे आणि बंदुकीचा वापर करणेही चालू केले आहे. ही आक्रमणे म्हणजे एक षड्यंत्र असून गोरक्षकांना स्वतःच्या रक्षणासाठी स्वतःजवळ शस्त्र बाळगण्याची अनुमती देण्यात यावी, अशी एकमुखी मागणी धर्माभिमान्यांनी जंतर मंतर येथे आयोजित राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वेळी केली.

म्यानमारमध्ये स्यू की यांच्या पक्षाला स्पष्ट जनाधार

     म्यानमार - येथे झालेल्या निवडणुकांमध्ये आंग सान स्यू की यांच्या नॅशनल लीग ऑफ डेमोक्रसी या पक्षाने (एन्एल्डी) ७० टक्के जागा मिळवत विजयावर शिक्कामोर्तब केले. म्यानमारच्या राज्यघटनेनुसार देशामध्ये २५ टक्के जागा लष्कराच्या असतात. या निवडणुकीत सत्तास्थापनेसाठी ६७ टक्के जागा मिळवणे आवश्यक होते. स्यू की यांच्या पक्षाने ७० टक्के मते मिळवली आहेत. लष्कराचा पाठिंबा असलेल्या युनियन सॉलिडेटरी अ‍ॅन्ड डेव्हलपमेंट पक्षाच्या (युएस्डीपी) अध्यक्षांसह मोठ्या पदाधिकार्‍यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या निकालामुळे वर्षानुवर्षे लष्करशाही अनुभवणार्‍या जनतेने लोकशाहीच्या वाटेवर जाण्याचेच ठरवले आहे, असे सांगण्यात येत आहे.

गत ७० वर्षांत २ सहस्र विमान अपघातांत ३४ सहस्र प्रवासी ठार !

भारतात ९३ अपघातांत २ सहस्रांहून अधिक नागरिकांचा मृत्यू 
     न्यूयॉर्क - प्रवासी विमान वाहतुकीच्या इतिहासात गत ७० वर्षांत सुमारे २ सहस्र अपघात नोंदवले गेले असून सुमारे ३४ सहस्र लोकांनी प्राण गमावले आहेत. भारतात ९३ विमान अपघातांमध्ये २ सहस्र ३२९ नागरिकांनी प्राण गमावले आहेत, तर अमेरिकेत ७८८ अपघातांमध्ये १० सहस्र ६२५ लोकांना प्राणास मुकावे लागले आहे.
अन्य काही देशांतील विमान अपघात आणि त्यातील मृत्यूंची संख्या

(म्हणे) डॉ. आठवलेंच्या लिखाणावर गुन्हा दाखल करा !

विद्रोही नेते डॉ. भारत पाटणकर यांचा कांगावा !
      सांगली - सनातन प्रभात या वृत्तापत्रातून डॉ. जयंत आठवले यांनी भडक लिखाण केले आहे. त्यांनी धर्मद्रोही, देशद्रोही यांना संपवण्यासाठी आतंकवादी आणि नक्षलवादी बना, असे चिथावणी देणारे लिखाण युवकांसाठी केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे लिखाण तपासून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अन्यथा त्यांना क्लिन चीट दिल्याचे तरी घोषित करावे, असे विधान विद्रोही नेते डॉ. भारत पाटणकर यांनी केले. (असे कोणतेही लिखाण परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले नाही. आतापर्यंत केलेले सर्व लिखाण घटनेच्या अधीन राहूनच केलेले आहे.

चिनी फटाके शासनाधीन करण्यासंबंधी महसूल अन्वेषण विभागाचे पोलिसांना आदेश

फटाके आयात करण्यावर बंदी असतांनाही ते आयात करणार्‍या 
व्यावसायिकांवर कठोर दंडात्मक कारवाई करून व्यवसाय करण्याची अनुज्ञप्ती नाकारल्यास अशा घटनांना काही प्रमाणात आळा बसेल !
     पुणे - देशाच्या आयात धोरणानुसार फटाके आयात करण्यात येत नाहीत. महसूल अन्वेषण विभाग आणि सीमाशुल्क विभाग यांच्याकडून अनेकदा सूचना देऊनही अवैधरित्या चिनी फटाक्यांची आयात अर्थात एकप्रकारे तस्करी करण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. या फटाक्यांची विक्री रोखून ते शासनाधीन करण्याचे आदेश महसूल अन्वेषण विभागानेे पोलिसांना दिले आहेत.(चिनी ड्रॅगनचा घातक विळखा रोखण्यासाठी भाजप शासनाने इच्छाशक्ती दाखवावी, ही अपेक्षा ! - संपादक)      गेल्या वर्षी देशात दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर चिनी फटाक्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याचे उघडकीस आले होते.

स्थलांतरित जागेवरील अधिकोषाच्या उद्घाटनासाठी बी.जी. कोळसे पाटील यांना बोलावण्याचे रहित !

धर्माभिमान्यांनी केलेल्या प्रबोधनानंतर पुणे येथील एका अधिकोषाच्या अधिकार्‍यांचा निर्णय
      पुणे - येथील एका अधिकोषाचे नवीन जागेत स्थलांतर झाले होेते. अधिकोषाच्या तेथील शाखेच्या उद्घाटनासाठी माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांना बोलावण्यात येणार होते. बी.जी. कोळसे पाटील हिंदुद्वेष्टे असल्याने त्यांना बोलावण्यास स्थानिक धर्माभिमानी नागरिकांनी विरोध दर्शवला. त्यानंतर कोळसे-पाटील यांना बोलावण्याचे रहित करून अधिकोशाच्या संस्थापकांच्या हस्तेच शाखेचे उद्घाटन करण्यात आले.

मशीद बंदर (मुंबई) येथे फटाक्यांचे ५० हून अधिक अवैध गाळे

  • महानगरपालिका, पोलीस आणि अग्नीशमन दल यांची अनुमती नाही ! 
  • फटाक्यांमुळे आगीची दुर्घटना घडून अनर्थ ओढवल्यास त्याला उत्तरदायी कोण ? 
  •  अशा अवैध गाळ्यांवर कारवाई कधी होणार ? 
    मशीद बंदर (मुंबई) - महंमद अली मार्गावर दिवाळीनिमित्त फटाक्यांचे जवळजवळ ५० हून अधिक अवैध गाळे उभारण्यात आले आहेत; मात्र त्यांना महानगरपालिका, स्थानिक पोलीस ठाणे आणि अग्नीशमन दल यांच्याकडून कोणतीही अनुमती मिळालेली नाही, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. (अनुमती नसतांना मशीद बंदरच्या ठिकाणी गाळे उभारले जाणे, यामागे कुणाचा दबाव आहे, हे सांगणे न लगे ! - संपादक) रस्त्यावरच असलेले फटाक्यांचे कक्ष आणि ग्राहकांची गर्दी यांमुळे वाहतूक कोंडी होत आहे; मात्र सर्वच सरकारी आणि सुरक्षायंत्रणा यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. (दुर्लक्ष करणार्‍या संबंधितांवर कठोर कारवाईच व्हायला हवी ! - संपादक)

वडगाव शेरी येथील शिववंदना महासंघाच्या वतीने वसुबारस उत्साहात साजरी

     वडगाव-शेरी (जिल्हा पुणे) - येथील शिववंदना महासंघाच्या वतीने वसुबारस निमित्त आयोजित करण्यात आलेला गोपूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. देशी वंशाची गाय आणि वासरू यांचे पूजन करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. सनातनच्या संत पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांची कार्यक्रमाला वंदनीय उपस्थिती लाभली. या वेळी समस्त हिंदु आघाडीचे कार्याध्यक्ष श्री. मिलिंद एकबोटे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. नागेश जोशी यांनी देशी गोवंशाचे शारीरिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व उपस्थितांना अवगत केले.

पुणे महानगरपालिका आणि अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाच्या वतीने गोपूजन

     पुणे - प्रतिवर्षीप्रमाणे वसुबारसनिमित्त पुणे महानगरपालिका आणि अखिल भारतीय कृषी गोसेवा संघ यांच्या वतीने महानगरपालिकेच्या आवारात गोपूजन करण्यात आले. या प्रसंगी अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाचे श्री. मिलिंद एकबोटे, महापौर श्री. दत्तात्रय धनकवडे, उपमहापौर श्री. आबा बागुल,

फटाक्यांद्वारे होणारे देवता आणि राष्ट्रपुरुष यांचे विडंबन रोखा !

 निपाणी - फटाक्यांद्वारे होणारे देवता आणि राष्ट्रपुरुष यांचे विडंबन रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, या मागणीसाठी येथे विशेष तहसीलदार यांचे प्रभारी के.एल्. पुजारी यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री सुनील वाडकर, संदीप जाधव, श्रीराम सेनेचे श्री. उत्तम कमते, सनातन प्रभातचे वाचक श्री. रूपेश पटेल उपस्थित होते.
         या वेळी श्री. रुपेश पटेल म्हणाले, या वर्षी दीपावलीत फटाके न वाजवता तो निधी मी गोशाळेला देणार आहे. (श्री. रूपेश पटेल यांच्यासारखे हिंदु धर्माभिमानी सर्वत्र हवेत ! - संपादक)

एका गावातील प्राचार्यांचा प्राध्यापकाला कपाळावर नाम लावण्यास विरोध

हिंदूंना धर्माचरण करण्यास किती विरोध होतो, हे दर्शवणारी घटना
     एका गावात असणार्‍या फार्मसी महाविद्यालयात एक धर्माभिमानी प्राध्यापक प्रतिदिन कपाळावर नाम लावून येत असत. ते पाहून काही दिवसांनी महाविद्यालयाच्या जन्महिंदू प्राचार्यांनी सदर प्राध्यापकाला बोलावून घेतले आणि नाम न लावून येण्यास सांगितले. त्या महाविद्यालयात सर्व जातीधर्माचे लोक असल्याने कपाळाला टिळा नको, असे त्यांनी सांगितले.

गीतरामायण या विषयावरील स्वरप्रतिभा दिवाळी अंकाचे प्रकाशन

     पुणे - गीतरामायणाच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने गीतरामायण या विषयावर काढण्यात आलेल्या स्वरप्रतिभा या दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या वेळी अंकाचे संपादक श्री. प्रवीण वाळिंबे, ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग, श्रीधर फडके, श्रीधर माडगूळकर, उपमहापौर आबा बागुल उपस्थित होते. या प्रसंगी श्री. जोग यांनी गीतरामायणाच्या आठवणी सांगतांना त्यांच्यावर गीतरामायणाचाच प्रभाव असल्याचे सांगितले,

क्रूरकर्मा टिपू सुलतान जयंतीनिमित्ताने काढण्यात येणार्‍या मिरवणुकीला पोलीस प्रशासनाने अनुमती नाकारली !

मिरवणुकीला अनुमती नाकारणारे पोलीस आयुक्त एस्. रवि यांचे अभिनंदन ! 
     बेळगाव, १० नोव्हेंबर (वार्ता.) - हिंदुद्वेषी टिपू सुलतान जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासन आणि अल्पसंख्यांक कल्याण खाते यांच्या वतीने १० नोव्हेंबर या दिवशी सकाळी ११ वाजता कुमार गंधर्व रंगमंदिर येथे जयंती साजरी करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने मिरवणूक काढण्यात येणार होती; मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचे सूत्र उपस्थित करून पोलीस आयुक्त एस्.रवि यांनी मिरवणुकीला अनुमती नाकारली. 

लेखक डॉ. प्रमोद मुनघाटे यांच्याकडून राज्य साहित्य पुरस्कार परत

असहिष्णुतेचा कांगावा करणार्‍यांची पुरस्कार वापसी चालूच!
     नागपूर - देशात वाढणार्‍या असहिष्णुतेच्या विरोधात लेखक डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी स्वतःला मिळालेला राज्य साहित्य पुरस्कार १० सहस्र रुपयांच्या रकमेसह परत केला आहे. वर्ष १९९४ मध्ये सर्वोकृष्ट साहित्यामध्ये त्यांच्या १८५७ सत्य आणि अकल्पित या पुस्तकाला राज्यशासनाचा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. पुरस्कारासह त्यांना १० सहस्र रुपये अशी रक्कम मिळाली होती. त्यांनी हा पुरस्कार राज्यशासनाचे प्रतिनिधी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्याकडे परत केला, तसेच त्यासह मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिले आहे.

पिरंगुट (पुणे) येथील विद्याभवन शाळेकडून फटाकेविरोधी पत्रक विद्यार्थ्यांना वितरित

      पिरंगुट (जिल्हा पुणे) - फटाक्यांमुळे होणारी आर्थिक, तसेच पर्यावरणाची हानी रोखली जावी, या उद्देशाने येथील विद्याभवन माध्यमिक विद्यालयाच्या वतीने (इंग्रजी माध्यम) फटाके विरोधी प्रबोधनपर हस्तपत्रक काढून विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुचित्रा साठे यांनी या पत्रकाद्वारे धर्महानी आणि प्रदूषण रोखण्यासाठी दिवाळीमध्ये फटाके उडवूच नये, असे आवाहन विद्यार्थी आणि पालक यांना केले.

(म्हणे) 'आग्रा भेटीच्या वेळी औरंगजेबासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा आत्महत्येचा प्रयत्न !'

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या कला शाखेच्या 
इतिहासाच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक लिखाण
 हिंदुत्ववादी आणि शिवप्रेमी यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
     पुणे, १० नोव्हेंबर - येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या प्रथम वर्ष कला शाखेच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक लिखाण देण्यात आले आहे. पुस्तकाच्या लेखकांपैकी एक असणार्‍या डॉ. तांबोळी यांनी मात्र छत्रपती शिवरायांविषयी लिहिण्यात आलेल्या लिखाणाला संदर्भ असल्याचा दावा केला आहे. 
     या प्रकरणी संभाजी ब्रिगेडने पुस्तकाचे प्रकाशक आणि लेखक यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे. 

पोलीस दलाचे सर्व कामकाज संगणकीकृत करणार ! - विशेष पोलीस महानिरीक्षक संजय वर्मा

      सांगली - पोलीस दल अधिक सक्षम आणि कार्यक्षम बनवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. कोल्हापूर क्षेत्रातील सर्व पोलीस ठाण्यांचे कामकाज कागद विरहित करण्यासाठी सर्व कामकाजाचे संगणकीकरण करण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे, अशी माहिती कोल्हापूर क्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय वर्मा यांनी दिली. (पोलीस दलाचे कामकाज संगणकीकृत केले, तरी मूलत: वृत्ती जोपर्यंत पालटत नाही, तोपर्यंत याबाबींची परिणामकारकता अल्प असेल.

महापालिका क्षेत्रातील १८० अवैध धार्मिक स्थळांना नोटिसा !

      सांगली - सर्वोच्च न्यायालयाने अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याच्या संदर्भात दिलेल्या आदेशानुसार सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेने महापालिका क्षेत्रातील अनधिकृत धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. यात तिन्ही शहरांत मिळून १८० अनधिकृत धार्मिक स्थळे आढळून आली आहेत. त्यातील १३६ नियमितीकरण करण्यायोग्य असून उर्वरित ४४ धार्मिक स्थळांविषयी महापालिका प्रशासन काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

देवस्थानचे काही कर्मचारी मद्यपान करून कर्तव्य बजावण्यासाठी उपस्थित

मंदिर प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मंदिराचे पावित्र्य धोक्यात 
 धर्मशिक्षणाच्या अभावी श्री शनिशिंगणापूर मंदिर देवस्थानच्या कर्मचार्‍यांची अक्षम्य कृती ! 
     सोनई (जिल्हा नगर), १० नोव्हेंबर - येथील श्री शनिशिंगणापूर मंदिर देवस्थान हे हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. देवस्थानचे काही कर्मचारी रात्री-अपरात्री प्रवेशद्वाराचा आडोसा घेऊन मद्यपान करत कर्तव्य बजावत असल्याचे समोर आले आहे. परिणामी मंदिराचे पावित्र्य धोक्यात आले आहे; मात्र मंदिर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. या अपप्रकाराविषयी भाविकांमध्ये संताप व्यक्त होत असून देवस्थानची अपकीर्ती करणार्‍या कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. (मंदिर प्रशासनाने तत्काळ सखोल चौकशी करून संबंधित कर्मचार्‍यांना कर्तव्यच्युत करावे आणि मंदिराचे पावित्र्य नष्ट होत असल्याप्रकरणी त्यांना योग्य तो दंडही करावा. - संपादक) मद्यपींवर कठोर कारवाई करणार असल्याचेही पोलीस निरीक्षकांनी म्हटले आहे. 

अखेर दुसर्‍या दिवशी सूर्याची किरणे मूर्तीच्या चरणापर्यंत पोहोचली !

श्री महालक्ष्मीदेवी किरणोत्सव ! 
सूर्यकिरणांमुळे देवीच्या चरणांकडील
 प्रकाशमान झालेला भाग
    कोल्हापूर, १० नोव्हेंबर (वार्ता.) - आज किरणोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी मावळत्या सूर्याची सोनेरी किरणे ढगाळ वातावरण आणि अडथळे पार करत मूर्तीच्या चरणापर्यंत ५.४५ वाजण्याच्या सुमारास पोहोचली.
     पहिल्या दिवशी ढगाळ वातावरणामुळे श्री महालक्ष्मी मंदिरात किरणोत्सव झाला नाही. ९ नोव्हेंबर या दिवशी ५ वाजून ४८ मिनिटांत किरणांनी काही सेकंदासाठी दर्शन दिले; मात्र ढगाळ वातावरण आणि त्यातही किरणोत्सव मार्गातील अडथळे कायम राहिल्याने किरणोत्सव झाला नाही. या सार्‍या पार्श्‍वभूमीवर सलग ३ दिवसांच्या या सोहळ्याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. ११ नोव्हेंबरपर्यंत हा सोहळा होईल. अडथळ्यांविषयी महापालिका महाद्वार रोड, ताराबाई रोड ते रंकाळ्या पलीकडील काही भागासाठी बांधकाम विकास नियंत्रण नियमावली सिद्ध करणार आहे. (एवढ्या वैशिष्ट्यपूर्ण धार्मिक सोहळ्यासाठी येणारे अडथळे दूर करण्यासाठी अद्यापही महापालिकेने नियमावली का सिद्ध केली नाही ? - संपादक) त्यासाठीची समिती स्थापन झाली आहे. या समितीमधील सदस्यांनी किरणोत्सव मार्गाची पाहणी केली.

सनातन संस्थेवर बंदी आणण्याचा प्रयत्न झाल्यास रस्त्यावर उतरू ! - श्री. संभाजी भोकरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख, कोल्हापूर

संस्थेला पाठिंबा देणार्‍या शिवसेनेचे आभार !    
      सनातन संस्था राष्ट्र आणि धर्म रक्षणाचे कार्य अविरतपणे करत आहे. या संस्थेत राष्ट्रभक्तीची शिकवण दिली जात असल्याने संस्थेची तुलना 'सिमी'शी होऊ शकत नाही. जर कोणी तसे करत असेल, तर तो १०० कोटी हिंदूंचा अपमानच आहे. साम्यवाद्यांचा देशद्रोह प्रत्येक वेळी उघड झाला असतांना 'सनातनवर बंदी घाला', असे म्हणण्याचा त्यांना अधिकारच नाही. काश्मिरी पंडितांची हत्या, निर्वासित हिंदू या घटनांच्या वेळी पुरोमाग्यांची तोंडे शिवली होती का ? रशिया आणि चीन येथे पाऊस पडल्यावर भारतात छत्री उघडणार्‍या साम्यवाद्यांनी आम्हाला देशप्रेम शिकवू नये.

अवैध हुक्का पार्लरच्या उद्घाटनामुळे मुंबईच्या महापौर अडचणीत

     मुंबई - महापालिकेने तोडलेल्या अवैध हुक्का पार्लरचे मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनीच पुन्हा उद्घाटन केल्यामुळे त्या पुन्हा वादाच्या भोवर्‍यात सापडल्यात आहेत. डॉकयार्ड येथील उस्तादी हुक्का पार्लरचे ६ नोव्हेंबर या दिवशी महापौर आंबेकर यांनी उद्घाटन केले होते. 

फलक प्रसिद्धीकरता

     टिपू सुलतान काँग्रेसी शासनाचा कोण लागतो ? क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याच्या कर्नाटकातील काँग्रेस शासनाच्या निर्णयाच्या विरोधात हिंदुत्ववाद्यांनी आंदोलन केले. या वेळी विहिंपचे जिल्हा संयोजक कुटप्पा यांचा मृत्यू झाला.

हिंदू तेजा जाग रे !


जागो : कर्नाटकमें क्रूरकर्मा टिपू सुलतानकी जयंती मनानेके विरोध में हुए आंदोलनके समय विहिंपके नेता कुटप्पा इनकी मृत्यू हुई ! टिपू काँग्रेसी शासनका कौन लगता है ? 

Jago: Karnatakme Krurkarma Tipu Sultanki Jayanti Mananeke Virodhme huye andolanke samay VHP Neta Kutappa inki mrutyu hui ! - Tipu Congressi shasanka kon lagta hai ?

दरोडेखोरांकडून पॅसेंजर ट्रेनमध्ये विवाहितेची हत्या

दिवसेंदिवस असुरक्षित होत असलेला रेल्वेप्रवास ! 
     हिंगोली - दिवाळीनिमित्त माहेरी जाणार्‍या विवाहितेची पॅसेंजर ट्रेनमध्ये दरोडेखोरांनी गळा चिरून हत्या केली. अकोला-परळी पॅसेंजरमध्ये पिंगळी रेल्वेस्थानकावर ९ नोव्हेंबर या दिवशी ही घटना घडली. लुटमार करतांना प्रतिकार केल्याने महिलेची प्रवाशांदेखत गळा चिरून हत्या करण्यात आली. दोन दरोडेखोरांनी हल्ला केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. सविता कापसे असे मृत महिलेचे नाव असून त्या हिंगोलीच्या तहसील कार्यालयात कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत होत्या.

मुखेड (जिल्हा नांदेड) शहरात फटाक्यांच्या दुकानांना लागलेल्या आगीत लाखोंचे आर्थिक नुकसान

     मुखेड - शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात लावलेल्या फटाक्यांच्या २० दुकानांना ९ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी प्रचंड आग लागली. या आगीमध्ये सर्व फटाक्यांची दुकाने जळून खाक झाली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, ग्राहकांच्या सहा मोटारसायकलीही जळाल्या. ही आग 'शॉर्टसर्किट'मुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज असून स्थानिक शिवसैनिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. 

ठाणे महापालिका आयुक्तांकडून कामचुकारपणा करणार्‍या १४ स्वच्छता कर्मचार्‍यांचे निलंबन

    ठाणे - कामावर उपस्थित न रहाता हजेरी पत्रकांवर स्वाक्षर्‍या करणार्‍या १४ स्वच्छता कर्मचार्‍यांचे ठाणे महापालिका आयुक्तांनी निलंबन केले आहे. काही कर्मचारी काम न करता केवळ हजेरी पटावर स्वाक्षर्‍या करतात, अशा तक्रारी ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे आल्या होत्या. त्यानंतर स्वत: या गोष्टींत लक्ष घालत जयस्वाल यांनी प्रत्यक्ष पाहणीही केली होती. यामध्ये उथळसर प्रभाग समिती, नौपाडा प्रभाग समिती आणि माजिवडा - मानपाडा प्रभाग समितीमधील सफाई कर्मचार्‍यांचा समावेश आहे. याबाबतचा आदेश सामान्य प्रशासन विभागाने जारी केले.

चंद्रभागा नदीच्या वाळवंटातून वाळूच्या तस्करीसाठी वापरण्यात येणारी गाढवे पकडण्याची मोहीम चालू

गाढवे पकडण्यापेक्षाही प्रशासन ती चंद्रभागा नदीच्या 
 वाळवंटात सोडणार्‍या वाळू तस्करांच्या मुसक्या कधी आवळणार ? 
     पंढरपूर, १० नोव्हेंबर - येथील चंद्रभागा नदीच्या पात्रातील वाळू तस्करी अवैधरित्या चालू आहे. त्यामुळे तेथे मोठे खड्डे पडले होते आणि काही संतांच्या समाध्यांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. याचा परिणाम म्हणून चंद्रभागा नदी वाळवंटाचे विद्रूपीकरण झाल्याचे वृत्त दैनिक पुढारीने प्रसिद्ध केले होते. त्या वृत्ताची नोंद घेऊन महसूल प्रशासनाने वाळू वाहून नेणारी गाढवे पकडण्याची मोहीम ६ ऑक्टोबर या दिवशी हाती घेतली. तहसीलदार गजानन गुरव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ५० गाढवे पकडली आहेत. या कारवाईमुळे अनेक वारकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे.

खटल्याचा निकाल लवकर लावण्यासाठी लाच घेणार्‍या शरीफ हजरत मुजावर याला अटक !

     सांगली, १० नोव्हेंबर (वार्ता.) - अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांकडे चालू असलेल्या खटल्याचा निकाल लावण्यासाठी १० सहस्र रुपयांची लाच घेतांना खासगी दलाल शरीफ हजरत मुजावर (वय २२ वर्षे, राहणार समडोळी) याला अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ९ नोव्हेंबर या दिवशी ही कारवाई केली. (महाराष्ट्रातील वाढती लाचखोरी ! - संपादक)

बेळगाव येथे आकाशकंदिलांवर 'आम्ही मराठी'चा बाणा !

     बेळगाव, १० नोव्हेंबर (वार्ता.) - बापट गल्ली येथील तरुण आणि नागरिक यांनी आपापल्या घरांवर 'आम्ही मराठी' अशी माहिती असलेले आकाशकंदील लावून आपला मराठी बाणा जपला आहे. त्यामुळे संपूर्ण गल्लीतील घरांवर असलेले हे आकाशकंदिल सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. यापूर्वीही बापट गल्लीतील प्रत्येक घरावर मराठी पाटी लावण्यात आली होती. सध्या कर्नाटक शासन मराठी भाषिकांवर विविध प्रकारे अन्याय करीत आहे. काही दिवसांपूर्वीच श्री दुर्गामाता दौडीच्या वेळी गल्लोगल्ली लावण्यात आलेले भगवे ध्वज आणि भगव्या पताका काढण्यात आल्या होत्या. त्या वेळी मराठी भाषिकांतून शासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

पाकिस्तान अचानक शांततेसाठी उतावीळ का ?

श्री. भाऊ तोरसेकर
१. आजही आपल्या देशात उजळमाथ्याने वावरणारे 
शत्रूचे अनेक हस्तक असू शकतात !
     आठ महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. मुंबईत एका कार्यक्रमासाठी आलेले संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी एक वादग्रस्त विधान केले होते. तसे बघितले तर ते विधान वादग्रस्त नव्हते; पण मुद्दाम त्यावरून वाद उभा केला गेला होता. आपल्या देशाच्या दोन पंतप्रधानांनी देशाच्या महत्त्वाच्या डीप असेटना बळी दिले, (सुरक्षेशी संबंधित हलगर्जीपणा केला) असे ते विधान होते. मुळात माध्यमातल्या अनेकांना त्याचा नेमका अर्थ उमगलाच नाही. त्यातही पुन्हा पर्रीकर हा नेता भाजपा आणि संघाशी संबंधित, म्हणून त्यांनी इंदिराजी वा नेहरूंनाच दोषी ठरवण्यासाठी असे विधान केल्याचे गृहीतक त्यामागे होते.

लक्ष्मीपूजन

प.पू. पांडे महाराज 
     आश्‍विन मासाच्या कृष्ण पक्षातील अमावास्येला लक्ष्मीपूजन असते. या दिवशी दिव्यांची आरास करतात आणि दीप, लक्ष्मी अन् सरस्वती यांचे पूजन, तसेच केरसुणीचेही पूजन असते. 
१. द्वेष, वैर, मत्सर इत्यादी विसरून सर्वांविषयी प्रेमभाव वाढवणे, हा लक्ष्मीपूजनाचा उद्देश असणे : दीपपूजन म्हणजे अंधारमय अशा अज्ञानाचा नाश करून ज्ञानरूपी प्रकाश देणे. या दिवशी वैश्य समाज आतापर्यंत व्यापारातून झालेल्या जमा-खर्चाचा हिशोब लिहिलेल्या वह्यांचे पूजन करतो आणि पुढीलप्रमाणे प्रार्थना करतो, हे प्रभो, मी जमा केलेली संपत्ती ही वाईट मार्गाने जमा केलेली नसून ती सत्कर्माद्वारे जमा केलेली आहे. तुझ्या अस्तित्वामुळेच मी हे कार्य करू शकलो.

स्वामी विवेकानंदाच्या परदेशातील वेदांताच्या तुफानी प्रचाराने धर्मांतराला आळा बसला !

     स्वामी विवेकानंदांच्या काळात भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती. इंग्रजी शिक्षण आणि इंग्रजी संस्कृती यांचा प्रभाव, ख्रिस्ती धर्मगुरूंचे बुद्धीभेद करणारे डावपेच, तशा प्रकारचे वाङ्मय, यामुळे हिंदु धर्म आणि संस्कृती अत्यंत हीन, अमानुष, दयनीय आणि रानटी आहे, असा हीनगंड भारतातील श्रेष्ठ लोकांत जोपासला गेला. पुष्कळशा हिंदु वर्गाने बाप्तिस्माच घेतला असता आणि त्यांचे ख्रिश्‍चनीकरण झाले असते. स्वामी विवेकानंदांच्या परदेशातील वेदांताच्या तुफानी प्रचाराने त्याला आळा बसला यात संशय नाही. - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, २८ सप्टेंबर २००६, अंक ३७)

भारतात जिहादी आतंकवादाची समस्या वाढण्याची कारणे !

     गेले काही मास मुसलमान आणि इस्लाम या एकाच विषयाने आपल्या देशाचे राष्ट्रीय, सामाजिक आणि राजकीय जीवन व्यापून टाकले आहे. एका अर्थाने कलुषित झाले आहे. त्यामुळे देशहिताचा कुठलाही प्रश्‍न आला, तरी त्यात इस्लाममुळे येणार्‍या अडथळ्यांची दखल घ्यावीच लागते. नित्याच्या अन्नधान्याच्या प्रश्‍नाचा विचार करतांना लोकसंख्यावाढीचा प्रश्‍न अपरिहार्यपणे समोर उभा रहातो. प्रत्येक जनगणनेमध्ये मुसलमानांची संख्या वाढलेली दिसते आणि बांगलादेशातून येणार्‍या घुसखोरांची तोंडे अन्नासाठी सताड उघडी असतात. देशाचा अर्थसंकल्प घ्या.

स्वतःला अज्ञानी समजणे म्हणजे खरे ज्ञान

दीपावलीच्या सुट्टीनिमित्त प्रतिदिन वाचा बोधकथा !
     सॉक्रेटिस हा विश्‍वविख्यात तत्त्ववेत्ता अथेन्स नगरीत रहात होता. त्या वेळी त्या नगरीत आणखीही आठ-दहा विद्वान रहात होते. प्रत्येक विद्वानाचा वेगवेगळा शिष्यवर्ग होता. एकदा या सर्व विद्वानांचे शिष्य काही कारणानिमित्त एकत्र जमले. त्या वेळी त्यांच्यामधे अथेन्स नगरीत सर्वाधिक विद्वान कोण ? याबद्दल वाद सुरू झाला. प्रत्येक जण आपलेच गुरु सर्वात अधिक ज्ञानी असल्याचा हेका धरून बसला. बरीच वादावादी झाल्यानंतर अखेर असा सर्वमान्य तोडगा काढण्यात आला की, या प्रकरणी आपण नगरदेवतेचा कौल घ्यावा आणि तो सर्वांनी मान्य करावा. या निर्णयानुसार सगळे शिष्य नगरदेवतेच्या मंदिरात जमले.

लोकांच्या सवयी पालटल्याशिवाय राष्ट्र उभारले जात नाही !

      विकासाचे ध्येय ठेवलेल्या मोदी शासनाने निवडणूक काळात केलेल्या घोषणांमुळे जनतेच्या मनात अनेक अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. विकासाबरोबरच मोदी शासनाने स्वच्छ भारत अभियानही चालू केले आहे. राज्यकर्ते या नात्याने त्यांनी चालू केलेल्या मोहिमा यशस्वी व्हायच्या असतील, तर त्यासाठी जनतेचाही त्यात तेवढाच सहभाग असावा लागतो. भारतातील जनतेला स्वच्छता नको आहे, असे नाही; परंतु शिक्षणाचा अभाव, राष्ट्रप्रेमाचा अभाव, चुकीच्या सवयी यांमुळे स्वच्छतेच्या संदर्भात भारतात उदासीनताच दिसून येते. या अनुषंगाने राज्यकर्त्यांनी आणि जनतेने कोणती कठोर धोरणे अवलंबायला हवीत त्याचा उहापोह येथे करत आहोत. मुंबईचा सिंगापूर करू किंवा मुंबईचा शांघाय करू, अशा घोषणा राजकारण्यांनी यापूर्वी केल्या आहेत; परंतु त्यासाठी तेथील राज्यकर्ते आणि जनता यांनी काय केले, ते जाणून घेणे आवश्यक आहे.

अंधत्व नेमके कुणाचे ?

     वाशिम येथील जिल्हा रुग्णालयात १७४ रुग्णांचे मोतीबिंदूचे सदोष शस्त्रकर्म करण्यात आले; मात्र त्यातील २३ रुग्णांना अंधत्व आले होते. त्यांपैकी १० जणांवर जे.जे. रुग्णालयातील नेत्रविभागात पुन्हा शस्त्रकर्म करण्यात आले. त्यानंतर त्यांना दृष्टी मिळाली. चार रुग्णांवर दुसर्‍यांदा शस्त्रकर्म करण्यात येणार असून ९ जणांवर औषधोपचार चालू आहेत. या शस्त्रकर्माच्या कालावधीत निर्जंतुकीकरण न केल्याने अशा प्रकारे अंधत्व आले. जंतुसंसर्ग झाल्यानंतर त्याची माहिती तात्काळ वरिष्ठांना देऊन शस्त्रकर्मगृहात संपूर्ण निर्जंतुकीकरण करणे आवश्यक होते; मात्र तसे न करणार्‍या २ आधुनिक वैद्यांना निलंबित करण्यात आले. शासकीय रुग्णालयातील हलगर्जीपणामुळे ज्या रुग्णांना डोळे गमवावे लागले, त्यांना एक लाख रुपयांचे साहाय्य देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

नालंदा-तक्षशीलाचा दैदिप्यमान इतिहास धुळीस मिळवणार्‍या सध्याच्या विद्यापिठांची दुःस्थिती !

आज ११ नोव्हेंबर म्हणजे राष्ट्रीय शिक्षणदिन आहे. त्यानिमित्ताने...
     भारतात एकूण ४८० विद्यापिठे आहेत; पण जगातल्या १०० श्रेष्ठ विद्यापिठांमध्ये यातील एकाही विद्यापिठाचे नाव नाही, असे टॉप युनिव्हर्सिटीज डॉट कॉमचे वर्ष २०१०-२०११ मधील सर्वेक्षण सांगते. त्यानंतर लंडन येथील द टाइम्सने वर्ष २०१३ मध्ये केलेल्या वार्षिक सर्वेक्षणामध्येही ५० वर्षे आणि त्याहून अल्प जुन्या असणार्‍या जगातील १०० विद्यापिठांमध्ये जागतिक दर्जाचे एकही भारतीय विद्यापीठ नाही, ही बाब पुढे आली आहे. हा तोच देश आहे, जिथे प्राचीन काळात नालंदा, विक्रमशीला आणि तक्षशीला यांसारख्या विद्यापिठांच्या ज्ञानाचा प्रकाशझोत सार्‍या विश्‍वभर पसरला होता. एकेकाळी आर्य चाणक्यासारखे बुद्धीमान अध्यापक याच भारतात कसोशीने आपली भूमिका बजावत होते; पण सद्यस्थिती बिकट आहे. आज शिक्षण हा उद्योग, विद्यापीठ हा राजकारणाचा अड्डा आणि पदवी म्हणजे विक्रीसाठी सर्वत्र फडफडणारी पताका झाली आहे. विद्यापिठांच्या या दुःस्थितीविषयी आमच्या संग्राह्य कात्रणांच्या माध्यमातून संकलित केलेला हा लेख...

हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी धर्मशिक्षणाचे महत्त्व !

     धर्मशिक्षणाने कृती, म्हणजे साधना होईल, साधनेने अनुभूती येतील, अनुभूतींनी श्रद्धा वाढेल, श्रद्धेने अभिमान वाढेल, अभिमानाने संघटन वाढेल, संघटनाने संरक्षण निर्माण होईल आणि त्यानेच हिंदुराष्ट्राचे निर्माण अन् पोषण होईल ! 

समजूतदार, तत्त्वनिष्ठ आणि सात्त्विकतेची आवड असणारी उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली गोवा येथील ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. कार्तिकी समीर नाईक (वय १० वर्षे) !

कु. कार्तिकी नाईक
१. घरी कुणी पाहुणे आल्यास कार्तिकी त्यांना तत्परतेने पाणी आणि खाऊ आणून देते.
२. आम्ही बाहेरून आल्यावर ती आमच्यासाठी लिंबू सरबत बनवून देते.
३. नवीन गोष्टी शिकण्यात पुष्कळ उत्साह आणि जिज्ञासाही असते, उदा. संगणक, भ्रमणसंगणक इत्यादी.

४. समजूतदारपणा : कार्तिकी कोणत्याही गोष्टीसाठी फार हट्ट करत नाही. तिला त्याविषयी समजावून सांगितले, तर ते स्वीकारण्याचा भाग असतो. इमारतीतील बरीच मुले खेळतांनाही चांगले कपडे घालतात. प्रथम तिलाही खेळतांना त्यांच्यासारखे चांगले कपडे घालून जावे, असे वाटायचे; पण नंतर तिला

साधकाने भावपूर्ण अर्पण केलेल्या चॉकलेट्सना प.पू. डॉक्टरांनी शबरीच्या बोरांची उपमा देणे

     गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर घरून येतांना मी स्वतः प.पू. डॉक्टरांसाठी काही चॉकलेट्स बनवली होती. ती त्यांना देण्यापूर्वी मला पुढील ओळी सुचल्या.
द्वारकाधीश मित्राला सुदाम्याने दिले होते पोहे ।
ते पोहे होते भावभक्तीने चिंब भिजलेले ॥
आठवण झाली मला हा खाऊ देतांना त्या पोह्यांची ।
तशा भावभक्तीने मन चिंब भिजू दे, हीच प्रार्थना अंतरी ॥

वासंतिक वर्गातील सर्व मुलांना प.पू. डॉक्टरांचे अकस्मात् दर्शन होणे

     ३१.५.२०१४ या दिवशी वासंतिक वर्गाची सांगता होणार होती. मी सकाळी मुलांना उठवण्यास गेलो. बराच वेळ उठवूनही मुले उठली नाहीत; म्हणून मी त्यांना उठवण्यासाठी म्हटले, चला उठा ! प.पू. डॉक्टर आले आहेत ! माझे वाक्य ऐकताच झोपलेली सर्व मुले त्वरित उठून उभी राहिली आणि धावपळ करू लागली. त्यातील एका मुलाने मला विचारले, प.पू. डॉक्टर कुठे आले आहेत ? मी म्हटले, प.पू. डॉक्टर (सूक्ष्मरूपाने) इथेच आहेत.

ईश्‍वराच्या कृपेने सूक्ष्मातून महर्लोकाची अनुभूती घेणारे श्री. सिद्धेश करंदीकर !

श्री. सिद्धेश करंदीकर
१. साधकाचे महर्लोकात स्वागत करायचे असल्याने देवाने स्वागताचे मंत्र विचारणे
     १७.७.२०१४ या दिवशी सकाळपासून थकवा असल्याने मी झोपून होतो. त्या वेळी माझ्याकडून प.पू. गुरुदेव, मी झोपलेलो आहे; पण याही स्थितीत तुम्हीच माझ्याकडून साधना करवून घ्या, मला अखंड भावावस्थेत रहाता येऊ दे, अशी प्रार्थना होत होती. दुपारी ४ वाजता मला काहीसे ठीक वाटल्याने मी अंघोळीला गेलो. त्या वेळी माझा देवाशी पुढीलप्रमाणे संवाद झाला.
१ अ. सूक्ष्मातून देवाने स्वागताचे मंत्र म्हणण्यास सांगितल्यावरही
 प.पू. गुरुदेवांना विचारतो, असे म्हणणारे श्री. सिद्धेश करंदीकर !

सौ. माधवी घाटे यांना आलेल्या अनुभूती

सौ. माधवी घाटे
१. पूर्ण रामनाथी आश्रम चैतन्यमय दिसणे आणि या पिवळ्या रंगाने मनाला आकर्षित करणे
     गेल्या वर्षापासून मला आश्रम चैतन्यमय झाल्याचे दिसत आहे. जेथे दृष्टी जाते, तेथे आश्रमात पिवळा प्रकाश प्रक्षेपित होतांना दिसतो. नामजपाच्या खोलीत दोन मिनिटे डोळे मिटले, तरी संपूर्ण खोली पिवळी दिसते. हा पिवळा रंग मनाला आकर्षित करून घेतो आणि चांगले वाटते.
२. दिव्याचे दर्शन घ्यायला ध्यानमंदिरात गेले असता नमस्कार 
करतांना प.पू. भक्तराज महाराज आणि श्री महालक्ष्मीदेवी दिसणे
     गेले ९६ दिवस ध्यानमंदिरात २४ घंटे दिवा तेवत ठेवला होता.

कु. अमृता मुद्गल (वय १२ वर्षे) हिने अंतरात कृतज्ञताभाव निर्माण होण्यासाठी दीपावलीनिमित्त प.पू. डॉक्टरांच्या चरणी केलेली प्रार्थना !

प.पू. डॉक्टर, तुम्हाला सर्व साधकांकडून दीपावलीनिमित्त कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
प.पू. डॉक्टर,पू. बिंदाताईंनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आमच्या मनात कृतज्ञताभावाचे दिवे लावण्यास अल्प पडतो. या दिव्यात पुष्कळ तेल आहे; पण देव आमच्यासाठी किती करत होता, किती करत आहे आणि किती करणार आहे, याविषयी कृतज्ञता फार अल्प आहे. तेल आहे; पण ज्योत नाही. ती ज्योत आमच्यात निर्माण होण्यासाठी प्रयत्न करवून घ्या.
     सर्व मानवजातीकडून तुम्हाला दीपावलीचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
- कु. अमृता मुद्गल (वय १२ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.११.२०१५)

प्रारब्धानुसार येणार्‍या अडचणी स्थिर राहून स्वीकारणार्‍या आणि गुरूंप्रती दृढ श्रद्धा अन् भाव असणार्‍या जळगाव येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मीना निंबाळकर !

सौ. मीना निंबाळकर
      ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या सौ. मीना निंबाळकर यांच्याविषयी त्यांची मोठी बहीण सौ. नंदा नागणे यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
१. निरासक्त असणे
     मीनाचा स्वभाव आधीपासून भोळा आहे. तिचे घर लहान असल्यामुळे तिला भांडी ठेवायला अडचण व्हायची; म्हणून तिच्या लहान बहिणीने भांडी मागितली, तर तिने लगेच घेऊन जा, असे सांगितले. सोन्याची वस्तू असो वा खाण्याची ती कधीच स्वतःसाठी राखून ठेवत नाही. जेवढे आवश्यक आहे, तेवढेच ठेवते. देव आपल्याला देतोय ना ? मग जवळ अधिक कशाला ठेवायला हवे ? असे तिला वाटते.

गुरुदेवांची भेट व्हावी, अशी तळमळ लागल्यावर अधिवेशनाच्या निमित्ताने गोव्याला जाण्याची संधी मिळून अकल्पितपणे झालेली प.पू. गुरुदेवांशी भेट !

     जून २०१५ पासून प.पू. गुरुदेवांची एक क्षणभर तरी भेट व्हावी, अशी तीव्र इच्छा होत होती. त्या वेळी अपेक्षा करणे चुकीचे आहे, हेे लक्षात यायचे आणि प.पू. गुरुदेवांच्या इच्छेप्रमाणे होऊ दे, हा विचार यायचा. त्यानंतर रामनाथी, गोवा येथे प्रती वर्षीप्रमाणे अधिवेशन असल्याचे कळले. या अधिवेशनाच्या सेवेला जाण्याचे माझे नियोजन नव्हते; पण ईश्‍वरी नियोजन वेगळेच होते. या अधिवेशन कालावधीत मला सेवा देऊन प.पू. गुरुदेवांनी भेटीचा परमानंदही मिळवून दिला आणि देवाने माझी इच्छा पूर्ण केली. अधिवेशनाच्या स्थळी जणूकाही प.पू. गुरुदेव समोर आहेत आणि आम्ही सर्व साधक ते सांगतील, ती सेवा करत आहोत, असेच जाणवत होते.

प.पू. डॉक्टरांप्रती अपार भाव असलेल्या देवरुख, जि. रत्नागिरी येथील सौ. शुभदा श्रीराम साने (वय ६५ वर्षे) !

सौ. शुभदा श्रीराम साने
     माझी बहीण सौ. शुभदा श्रीराम साने (वय ६५ वर्षे) ही देवरुख, जि. रत्नागिरी येथे रहाते. म्हटले, तर ती साधनेत आहे; पण क्रियाशील नाही. म्हटले, तर हितचिंतक आहे; पण सेवेला येत नाही. तिची प.पू. डॉक्टरांवर अपार श्रद्धा आहे. अधिकाधिक नामजप करणे, साप्ताहिक सनातन प्रभात घेणे, गुरुपौर्णिमेच्या काळात विज्ञापन आणि अर्पण देणे, तसेच योग्य वेळी साधकांना आर्थिक, वस्तूरूपाने साहाय्य करणे, सनातन-निर्मित सर्व उत्पादने वापरणे, असा तिचा सहभाग असतो. तिची काही गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहे.

चैतन्यमय आेंकार !

कु. मधुरा भोसले
तू निर्गुण, निराकार,
निरामय अन् निर्विकार ।
तू सगुण, साकार,
चैतन्यमय आेंकार ॥ १ ॥
ब्रह्ममय अकार, विष्णुमय उकार ।
शिवस्वरूप मकार,
तत्त्वमय आेंकार ॥ २ ॥
सृष्टीचा रचनाकार,

मागणी-पुरवठा विभागात सेवा करतांना सौ. अंजली झरकर यांना शिकायला मिळालेली सूत्रे

सौ. अंजली झरकर
१. साधकांचे गट करून सेवांचे नियोजन केल्याने साधकांना समजून घेेेेऊन आनंदाने सेवा करण्यास शिकणे
     सेवा करतांना २-२ साधकांचे गट करून सेवांचे नियोजन केल्यावर सहसाधकांचा स्वभाव कसा आहे ? त्यांच्यासमवेत मिळूनमिसळून, त्यांना समजून घेऊन आनंदाने सेवा कशी करायची ?, हे शिकायला मिळाले.
२. सेवेत एकमेकांना साहाय्य करणे
     विभागातील सर्वच साधक मिळूनमिसळून रहातात आणि एकमेकांना सेवेत साहाय्य करतात.

श्रीकृष्णाने संतपुष्परूपे अर्पिले पू. जोशीआबांना गुरुचरणा ।

पू. जयराम जोशीआजोबा
श्रीकृष्णाच्या गोकुळातील आमचे लाडके आबा ।
कृष्णाच्या गोकुळात संत म्हणून तुम्ही घोषित झाला ।
अन् आम्ही गोकुळवासियांनी अतीव आनंद अनुभवला ॥ १ ॥
अखंड नाम, प्रार्थना, कृतज्ञता व्यक्त करूनी कृष्णाला ।
प्राप्त करूनी सत्-चित्-आनंद, संतपदी विराजमान झालात ॥ २ ॥
आम्हा साधकांना वेळोवेळी अनमोल मार्गदर्शन केले ।
सत्संगामुळे आम्हाला वाटचाल करण्या बळ लाभले ॥ ३ ॥
तत्त्वनिष्ठ राहूनी साधकांना दिली दिशा साधनेची ।

स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन आधी केल्यास काही महिन्यांनी नामजप करणे सुलभ होईल !

(परात्पर गुरु) डॉ. आठवले
    भक्तीमार्गातील सर्वच जण सांगतात, नाम घ्या; पण बहुतेकांना ते जमत नाही; कारण त्यांच्यात स्वभावदोष आणि अहं अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे त्यांची साधना होत नाही. नामजप होण्यासाठी त्यांनी आधी स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करणे आवश्यक आहे. ते झाल्यावर नामजप सहजतेने होऊ शकतो. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३०.१०.२०१५)

आश्रमात सेवा करण्याची संधी मिळाली; म्हणून सतत कृतज्ञताभावात रहाणार्‍या आणि आश्रमातील चैतन्य ग्रहण होण्यासाठी भावपूर्ण प्रयत्न करणार्‍या सौ. निवेदिता जोशी !

सौ. निवेदिता जोशी
१. देवद आश्रमात सेवेसाठी आल्यावर आश्रमात पुष्कळ चैतन्य
 जाणवणे आणि आनंदाच्या सागरात डुंबत असल्यासारखे वाटणे
     ५.३.२०१५ या दिवशी श्रीकृष्णाच्या कृपेने देवद आश्रमात येण्याची आणि सेवा करण्याची संधी मिळाली. देवद आश्रमात गेल्यावर प्रवेशद्वारातच मला सौ. जाधवकाकू भेटल्या. त्यांनी माझी पुष्कळ प्रेमाने चौकशी केली. तेव्हा आनंदाच्या लाटा मनात उसळत आहेत, असे आतून जाणवत होते. संपूर्ण देवद आश्रमात पुष्कळ चैतन्य जाणवत होते आणि या आनंदाच्या सागरात मी डुंबून जात आहे, असे जाणवत होते.

बोधचित्र


प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

पोलिसांनी मुळाशी जाऊन कृती करावी !

परात्पर गुरु डॉ. आठवले
     नरक चतुर्दशीच्या दिवशी सनातन आश्रमावर गुंडांनी आक्रमण करू नये; म्हणून पोलीस प्रशासनाने आश्रमाजवळ ३ - ४ दिवस पोलीस ठेवले होते. याबद्दल सनातन संस्था कृतज्ञ आहे; पण याऐवजी पोलिसांनी मुळाशी जाऊन आतापर्यंत आश्रमावर आक्रमण करणार्‍या गुंडांविरुद्ध कृती केली असती, तर त्यांना हे करावे लागले नसते. एवढेच नव्हे, तर आक्रमण करणारे सूड म्हणून इतर कोणत्याही दिवशी आक्रमण करतील,

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

खरा आनंद 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      आनंद हा कोणताही प्रसंग, वस्तू अथवा व्यक्ती यांच्याशी निगडित नसावा. ज्या गोष्टीमुळे दुःख होते वा होईल, असा कोणताही आनंद नसावा. आपला आनंद आपल्यात मिळावा, हा विचार प्रत्येकाने सांभाळून ठेवावा, म्हणजे कोणत्याही अवस्थेत शांती ढळणार नाही. तुझे आहे तुजपाशी या संतवाणीप्रमाणे ज्याचा त्याने शोध घेत जावा. मनाची स्थिती केवळ स्वतःशीच निगडित असावी. अन्य कुठेही संपर्क नसावा. हे प्रगत होऊ पहाणार्‍या साधकांना परत परत सांगू इच्छितो. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

सरकारची वर्षपूर्ती : अपेक्षा आणि आव्हाने !

गेली १५ वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्ट आणि हिंदुविरोधी राजवटीला हिंदूंनी उलथून टाकत भाजप-सेनेच्या पारड्यात महाराष्ट्राचे दान टाकले. नुकतेच भाजप शासनाने सत्तेची वर्षपूर्ती केली. गोहत्याबंदी कायद्याची कार्यवाही, उद्योगांच्या परवान्यांची संख्या ६० वरून ३५ वर आणणे, मेड इन महाराष्ट्र अंतर्गत उद्योगवाढीसाठी ६६ सहस्र कोटी रुपयांची महाराष्ट्रात गुंतवणूक, जलयुक्त शिवार योजना, यांसह अन्यही चांगले निर्णय युती शासनाने घेतले. प्रशासकीय पातळीवरही गतीमानता आणण्यासाठी मुख्यमंत्री स्वत: लक्ष घालत आहेत. त्यामुळे काही प्रमाणात का होईना शासन जनतेच्या अपेक्षापूर्तीकडे पाऊले टाकत आहे. दुसरीकडे सातत्याने महागाईवर नियंत्रण ठेवणे, हिंदूंना न्याय देणे, हिंदूंची मंदिरे न पाडली जातील याकडे लक्ष देणे, मंदिरे शासनमुक्त करणे यांसह अन्यही काही हिंदुहिताचे निर्णय शासनाला यापुढील काळात घ्यावे लागतील.

बिहारचा पराभव आणि आरक्षणाचे राजकारण !

संपादकीय
सध्या बिहारमधील भाजपच्या पराभवाची कारणमीमांसा केली जात आहे. यात श्री. मोहन भागवत यांच्या आरक्षणाच्या सूत्रामुळे पराभव झाला, असाही मतप्रवाह हिंदुद्रोह्यांकडून तर येत आहे; पण दुर्दैवाने भाजपमध्येही तोच मतप्रवाह पुढे येत आहे. वास्तविक ज्या बाबींमुळे आज देश मागे आहे, त्यातील प्रमुख कारणांपैकी एक सूत्र म्हणजे आरक्षण होय ! जगात अन्यत्र कुठेही नसेल, अशी आरक्षण व्यवस्था भारतात आहे. स्वातंत्र्यानंतर एकाही राजकीय पक्षाने मतांच्या लालसेपोटी ही व्यवस्था योग्य का अयोग्य यावर कधीच भाष्य केले नाही. काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी तर ही व्यवस्था अधिक भक्कम कशी होईल आणि आपली मतपेढी अधिकाधिक कशी सुरक्षित होईल, याचाच विचार केला. यामुळे देशाच्या प्रगतीवर कोणता परिणाम होत आहे, याचा कोणीच विचार केला नाही. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. मोहन भागवत यांनी आरक्षणाच्या भूमिकाचा फेरविचार झाला पाहिजे, असे अत्यंत योग्य आणि परखड मत मांडले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn