बिहारमध्ये जनतादल महाआघाडीला स्पष्ट बहुमत, भाजपचा दारूण पराभव
नितीश कुमार तिसर्यांदा मुख्यमंत्री बनणार
पाटलीपुत्र (पाटणा) - सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत मतदारांनी नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्या महाआघाडीच्या पारड्यात १७९ जागा टाकून सत्तेच्या चाव्या त्यांच्या कह्यात दिल्या. दुसरीकडे मतदारांनी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी मात्र स्पष्टपणे नाकारल्याने त्यांना केवळ ५८ जागांवरच समाधान मानावे लागले. या विजयामुळे नितीश कुमार सलग तिसर्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणार आहेत. एकूण २४३ जागा असलेल्या बिहारच्या विधानसभेत सत्तास्थापनेसाठी १२२ जागांचा टप्पा ओलांडणे आवश्यक होते.
हिंदुत्ववादी संघटना असल्याने सनातनला संपवण्याचे षड्यंत्र ! - श्री. अभय वर्तक, सनातन संस्था
फोंडा (गोवा) येथे सनातन संस्थेची जनसंवाद सभा
![]() |
डावीकडून श्री. सुनील घनवट, श्री. रमेश नाईक, श्री. शिवप्रसाद जोशी (दीपप्रज्वलन करतांना) आणि श्री. अभय वर्तक |
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या संदर्भातील धमकीची पत्रे ३ मासांनंतर उघड
नाशिक - येथील त्र्यंबकेश्वर ट्रस्टच्या विश्वस्तांना कुंभपर्वात रसायन टाकून मंदिराचे स्मशान करू. याचे दायित्व देवस्थानचे राहील, अशा प्रकारच्या धमक्यांची पत्रे ऑगस्ट २०१५ मध्ये आली होती; मात्र त्र्यंबकेश्वर विश्वस्तांनी ती ३ मासांनंतर उघड केली आहेत. (त्र्यंबकेश्वर ट्रस्टच्या विश्वस्तांचा अक्षम्य निष्काळजीपणा ! - संपादक) या पत्रांविषयी आम्ही गंभीरपणे घेतलेले नाही, तसेच याची कोणतीही तक्रार पोलीस ठाण्यात केलेली नाही, असे त्र्यंबकेश्वर देवस्थानचे सत्यप्रिय शुक्ल यांनी म्हटले आहे.
भाग्यनगर येथील दोघा धर्मांधांनी अल्-कायदाला केले आर्थिक साहाय्य !
देशद्रोह्यांनी पोखरलेला भारत !
भारतात आतंकवादी आक्रमण करण्याविषयीही केली होती चर्चा
अमेरिकेत आरोप निश्चित
वॉशिंग्टन - भाग्यनगर येथील दोघा धर्मांध भावांनी अल्-कायदा या जिहादी आतंकवादी संघटनेला निधी दिल्याचे उघडकीस आले आहे. फारूख महंमद (वय ३७ वर्षे) आणि इब्राहिम जुबेर महंमद (वय ३६ वर्षे) अशी त्यांची नावे असून या प्रकरणी अमेरिकेतील फेडरल न्यायालयात त्यांच्यावर आरोप निश्चित झाले आहे. या दोघा भावांसह अन्य आसिफ अहमद सलीम (वय ३५ वर्षे) आणि त्याचा भाऊ सुल्तान रूम सलीम (वय ४० वर्षे) यांनाही दोषी ठरवण्यात आले आहे. १. एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार या चौघा धर्मांधांनी अल्-कायदाचा प्रमुख अनवर अल् अवलाकी यास आर्थिक साहाय्य केले होते.
(म्हणे) सनातन संस्थेवर बंदी न घातल्यास शासनाला मोठी किंमत मोजावी लागेल !
सनातनद्वेषातून पुन्हा एकदा शाम मानव यांची गरळओक !
सोलापूर - भारतात वर्ष २०२३ ते २०२५ पर्यंत ईश्वरीय सत्ता प्रस्थापित होईल. त्यासाठी साधकांनी दुर्जनांचा विनाश केला पाहिजे. यामध्ये पोलीस आणि सैनिक यांचाही समावेश आहे, असे उघड वक्तव्य करणार्या सनातन संस्थेवर बंदी घातली पाहिजे, अन्यथा राज्यातील देवेंद्र फडणवीस आणि केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या शासनाला भविष्यात मोठी किंमत मोजावी लागेल, असा कांगावा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय संघटक शाम मानव यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत केला.बिहारमध्ये निवडणुकीच्या काळात ३९ कोटी रुपये आणि १ लक्ष ६७ सहस्र लिटर दारू जप्त !
राज्यकर्त्यांनी जर राजधर्माचे पालन करत प्रजेचे हित जपले, तर त्यांना निवडणुकीच्या
वेळी मते मिळवण्यासाठी असे गैरप्रकार करावे लागतील का ?
पाटलीपुत्र (पाटणा) - बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या काळात निवडणूक आयुक्तांनी नेमलेल्या विशेष भरारी पथकांनी ३९ कोटी रुपये आणि १ लक्ष ६७ सहस्र लिटर दारू जप्त केली आहे. मतदारांना खुष करून त्यांची मते विकत करण्यासाठी हा साठा वापरण्यात येत होता.
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जप्त केलेल्या एकूण रकमेत ७० लक्ष ४० सहस्र रुपयांचे नेपाळी चलन, २४ लक्ष ५१ सहस्र रुपयांचे बनावट भारतीय चलन, ६० लक्ष ३ सहस्र रुपयांचे विदेशी चलन, १९ लक्ष ८९ सहस्र रुपयांचे भारतीय चलन यांचा समावेश आहे. उर्वरित १९ कोटी रुपये आयकर खात्याने देहली आणि मुझफ्फरपूर येथे छापे घालून जप्त केले. ही कोट्यवधीची रक्कम आणि १ लक्ष ६७ सहस्र लिटर दारू याव्यतिरिक्त ८५७ किलो गांजा, ३३६ ग्रॅम हेरोईन आणि ८ किलोपेक्षा अधिक सोने आणि दागिने यांचाही जप्त केलेल्या साहित्यात समावेश आहे.
भारतात धार्मिक दंगली घडवून आणण्याचे आय.एस्.आय.चे षड्यंत्र
- धार्मिक स्थळांवर आक्रमण करण्यासाठी इंडियन मुजाहिदीनचे साहाय्य
- काँग्रेसमुक्त भारताप्रमाणेच आतंकवादमुक्त भारत बनवण्यासाठी भाजप शासनाने कठोर पावले उचलावीत, अशी भारतियांची अपेक्षा !
नवी देहली - भारतात धार्मिक तेढ वाढवून येथील वातावरण कलुषित करण्याचे षड्यंत्र पाकची गुप्तचर यंत्रणा आय.एस्.आय.ने आखले आहे. देशातील विविध धार्मिक स्थळांवर आक्रमण करण्यासाठी इंडियन मुजाहिदीन या आतंकवादी संघटनेचे साहाय्य आय.एस्.आय.ला होणार आहे, असा दावा भारतीय गुप्तचर संस्थेच्या आधारे एका इंग्रजी वृत्तपत्राने केला आहे. या वृत्तानुसार पंजाब हे राज्य आय.एस्.आय.चे मुख्य लक्ष्य आहे. मागील मासात धार्मिक ग्रंथांची पाने फाडल्याने पंजाबमध्ये दंगल उसळून अस्थिरता निर्माण झाली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकच्या सीमेला लागून असलेल्या राज्यातील धार्मिक स्थळांवर आक्रमण करून तेथे धार्मिक दंगली पेटवण्याची योजना आय.एस्.आय. आखत आहे. पंजाबप्रमाणे जम्मू-काश्मीर, हरियाणा आणि उत्तरप्रदेश या राज्यांतही अशा कारवाया करण्याची सिद्धता आय.एस्.आय. करत आहे.
महिला आणि बालकल्याणमंत्री सौ. पंकजा मुंडे-पालवे यांची वाजपेय सोमयागाला उपस्थिती
![]() |
सौ. पंकजा मुंडे-पालवे यांचे भेटवस्तू देऊन स्वागत करतांना अश्वमेधयाजी प.पू. नाना काळेगुरुजी |
परळी-वैजनाथ येथील वाजपेय
सोमयागाचा दुसरा दिवस
परळी - वर्ष २०१६ मध्ये भारतात विपुल सुवृष्टी आणि आपत्काळ निवारण व्हावे, यासाठी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील श्री योगराज वेद विज्ञान आश्रमाच्या वतीने अश्वमेधयाजी प.पू. नाना काळेगुरुजी यांच्या चैतन्यमय मार्गदर्शनाखाली तिसर्या वाजपेय सोमयागास (शरद ऋतूत होणार्या सोमयागास वाजपेय सोमयाग म्हणतात.असहिष्णुता काँग्रेस राज्यातही होती ! - अभिनेते अनिल कपूर
असहिष्णुतेची आरोळी ठोकत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा मलीन करणार्या
कलाकारांच्या विरोधात अधिकाधिक कलाकारांनी पुढे येऊन बोलणे अपेक्षित आहे !
मुंबई - कमल हसन, अनुपम खेर, मधुर भांडारकर अशा हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनी भारतातील असहिष्णुतेचा कांगावा करत राष्ट्रीय पुरस्कार परत करणार्यांचा समाचार घेतल्यावर आता अनिल कपूर या ज्येष्ठ अभिनेत्यानेही पुरस्कार वापसीच्या कृतीचा तीव्र निषेध केला आहे. अभिनेता शाहरूख खान याने, भारतात असहिष्णुता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, असे काही दिवसांपूर्वी म्हटले होते. त्यावर असहिष्णुता काँग्रेस राज्यातही होती ! या शब्दांत अनिल कपूर यांनी शाहरूख खानला प्रत्युत्तर दिले.
देवतांची चित्रे असलेल्या फटाक्यांवर बंदी घाला !
पंजाबमधील भारतीय हिंदु सुरक्षा समितीची मागणी
देशभरातून देवतांची चित्रे असलेल्या फटाक्यांवर बंदी घालण्याची मागणी होत असल्याने शासनाने आता तरी त्यावर त्वरित बंदी आणावी, अशी जनतेची अपेक्षा आहे ! अन्य पंथियांना कधी अशी मागणी करावी लागते का ?
फगवारा (पंजाब) - राज्यात देवतांची चित्रे असलेल्या फटाक्यांवर बंदी घालावी, अशी मागणी पंजाबमधील अखिल भारतीय हिंदु सुरक्षा समिती या हिंदुत्ववादी संघटनेने केली आहे. संघटनेचे अध्यक्ष श्री. दीपक भारद्वाज म्हणाले, दिवाळीत देवतांची चित्रे असलेल्या फटाक्यांची मोठ्या प्रमाणा विक्री करण्यात येते. तथापि फटाक्यांचे उत्पादन आणि त्यांची विक्री करणार्यांनी या वर्षीच्या दिवाळीत मात्र देवतांची चित्रे असलेल्या फटाक्यांची विक्री करू नये. असे फटाके बाजारात विक्रीसाठी आलेच, तर अखिल भारतीय हिंदु सुरक्षा समिती त्यांची विक्री कदापि होऊ देणार नाही. राज्य शासनाने अशा फटाक्यांच्या विक्रीला पायबंद घालावा अन्यथा त्यासाठी आम्हाला वेगळा मार्ग अवलंबावा लागेल.
उज्जैन येथे होणार्या कुंभपर्वामध्ये शासनाने भोंदू शंकराचार्यांना रोखावे ! - जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती
![]() |
जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती |
भोपाळ - पुढील वर्षी उज्जैन येथे होणार्या सिंहस्थपर्वामध्ये भोंदू शंकराचार्यांना शासनाने रोखावे. त्याचबरोबर जे खरे शंकराचार्य आहेत, त्यांना कुंभपर्वाच्या ४ किलोमीटरच्या परिसरात सुरक्षित ठिकाणी ठेवावे, असे आवाहन जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी केले आहे.
येथील नागरी सभागृहामध्ये ३ नोव्हेंबर या दिवशी आयोजित वेद आणि विज्ञान परिसंवादात शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती मार्गदर्शन करत होते. या परिसंवादामध्ये मध्यप्रदेशचे गृहमंत्री बाबुलाल गौर, आरोग्यमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही ३ नोव्हेंबर या दिवशी जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले आणि कुंभपर्वामध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रणही दिले. या वेळी चौहान यांनी संत, भाविक आणि सिंहस्थपर्वाची करण्यात येणारी सिद्धता यांविषयी शंकराचार्यांना माहिती दिली.
गोरक्षकांना स्वसंरक्षणार्थ शस्त्र बाळगण्यास अनुमती द्या ! - समस्त हिंदुत्वनिष्ठांची मागणी
विक्रोळी, डोंबिवली, पेण आणि कोल्हापूर येथे हिंदुत्ववादी संघटनांचे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !
गोरक्षकांवरील वाढती आक्रमणे पहाता नियोजनबद्धरित्या त्यांना संपवण्याचेच षड्यंत्र रचले जात आहे. कसायांकडून आक्रमणे होत असतांना गोरक्षकांचे रक्षण करण्यास पोलीस पुरेसे पडत नाहीत. कायद्यानुसार गोमातेच्या रक्षणासाठी जीव धोक्यात घालणार्या गोरक्षकांना स्वत:चे रक्षण करता यावे, यासाठी त्यांना स्वसंरक्षणार्थ शस्त्र बाळण्यास अनुमती मिळावी, ही आक्रमणे रोखण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, तसेच देवतांची चित्रे छापून त्यांचा अवमान करणार्या आणि प्रदूषण करणार्या फटाक्यांवर बंदी आणावी, या मागणीसाठी ७ आणि ८ नोव्हेंबर या दिवशी अनुक्रमे डोंबिवली (पूर्व) आणि विक्रोळी पूर्व रेल्वेस्थानकाच्या बाहेर, तसेच पेण आणि कोल्हापूर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या वेळी विविध हिंदू संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रदूषण निर्माण करणार्या आणि श्रद्धास्थानांचा अवमान करणार्या फटाक्यांवर केंद्रशासनाने कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी चेतावणीही या वेळी देण्यात आली.
डोंबिवली (जिल्हा ठाणे)
...त्या वेळी प्रसारमाध्यमे कुठे होती ? - सुशील तिवारी, स्वराज्य हिंदू सेना, कल्याण
दादरी हत्याकांडाची चर्चा घराघरात चालू आहे. दादरीचे सूत्र प्रसारमाध्यमांनी पुष्कळ प्रमाणात प्रसारीत केले; पण प्रशांत पुजारी यांच्या हत्येच्या वेळी प्रसारमाध्यमे कुठे होती ? प्रसारमाध्यमांनी दाखवलेले सर्वच खरे नसते; म्हणून त्याची पडताळणी केली पाहिजे. धर्माच्या पायावर उभे असलेले सनातन संस्थेचे कार्य वाढेल ! - स्वामी गंभीरानंद महाराज
![]() |
डावीकडून स्वामी प्रेम स्वरूपानंद, ब्रह्मचारी सुबोध आणि स्वामी गंभीरानंद
महाराज यांना सनातन प्रभातच्या वाटचालीविषयी सांगतांना श्री. आनंद जाखोटिया, मागे सनातनचे साधक श्री. विश्वनाथ कुलकर्णी |
देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाला भेट
देवद (पनवेल), ८ नोव्हेंबर (वार्ता.) - सनातन संस्थेने हिंदु धर्म आणि अध्यात्म या संबंधीच्या विविध विषयांवर सचित्र आणि सोप्या भाषेत ग्रंथांचे उत्तम सादरीकरण केले आहे. आजच्या युवा पिढीसमोर हिंदु धर्माचे हे ज्ञान वैज्ञानिक भाषेत पोहोचवणे आवश्यक आहे. हेच कार्य सनातन संस्था प्रामाणिकपणाने करत आहे. मुळात संस्थेचे कार्य सनातन धर्माच्या पायावर उभे असल्याने ते वाढेल आणि टिकेल. तुम्ही आमचेच कार्य करत आहात, असे प्रतिपादन भिवंडी येथील स्वामी गंभीरानंद महाराज यांनी केले. येथील सनातन आश्रमाला दिलेल्या सदिच्छा भेटीच्या वेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत स्वामी गंभीरानंद आश्रमाचे व्यवस्थापक स्वामी प्रेम स्वरूपानंद, ब्रह्मचारी सुबोध आणि ११ साधक उपस्थित होते. सनातनचे पू. राजेंद्र शिंदे यांनी पुष्पहार आणि भेटवस्तू देऊन संतगणांचा सन्मान केला, तसेच त्यांच्याशी वार्तालापही केला. या वेळी सनातनचे साधक श्री. आनंद जाखोटिया यांनी त्यांना आश्रमातील दिनचर्या आणि सेवा यांची माहिती दिली. मंदिरे वाचवण्यासाठी सर्वांनी पेटून उठावे ! - चंद्रकांत खैरे, खासदार, शिवसेना
संभाजीनगर येथे मंदिर बचाव परिषद
मंदिरांविषयी रोखठोक भूमिका घेऊन हिंदुत्व
जपणारे खासदार श्री. चंद्रकांत खैरे यांचे अभिनंदन !
संभाजीनगर - अनधिकृत ठरवण्यात आलेली अनेक मंदिरे पिढ्यानपिढ्या संस्कृतीचा वारसा चालवत आहेत. नव्याने येणार्या अधिकार्यांना मंदिरांचा इतिहास काय ठाऊक ? हिंमत असेल, तर मंदिर पाडून दाखवा ! क्रांतीचौकातील मशिदीच्या संदर्भातही न्यायालयाचा आदेश आहे. मग हटवण्याची कारवाई करण्याची हिंमत आहे का ? ऐतिहासिक वारसा असणारी मंदिरे वाचवण्यासाठी सर्वांनी पेटून उठावे, असे आवाहन शिवसेनेचे खासदार श्री. चंद्रकांत खैरे यांनी केले आहे.मंदिरांविषयी रोखठोक भूमिका घेऊन हिंदुत्व
जपणारे खासदार श्री. चंद्रकांत खैरे यांचे अभिनंदन !
होशंगाबाद (मध्यप्रदेश) येथील श्रीमद्भागवत ज्ञानयज्ञ दिव्य सत्संगामध्ये हिंदु जनजागृती समितीचा सहभाग
होशंगाबाद - येथील पालीया पिप्रिया या गावामध्ये पू. नित्यानंदस्वामीजी यांनी २९ ऑक्टोबर या दिवशी श्रीमद्भागवत ज्ञानयज्ञ दिव्य सत्संगाचे आयोजन केले होते. या सत्संगामध्ये हिंदु जनजागृती समितीचे श्री. योगेश व्हनमारे यांनी हिंदु राष्ट्राची आवश्यकता आणि साधना या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या सत्संगानंतर समितीने लावलेल्या धर्मशिक्षण फलकांचे प्रदर्शन पू. नित्यानंदस्वामीजी यांनी पाहिले. स्वामीजींनी या वेळी उपस्थित भाविकांना समितीद्वारे सांगण्यात येणारी साधनाही सांगितली. या वेळी स्वामीजींनी समितीच्या कार्याला आशीर्वाद दिले. या प्रदर्शनाला ७ सहस्र भाविकांचा उत्सफूर्त प्रतिसाद लाभला.
तुमकुर (कर्नाटक) येथील सिद्धार्थ एफ्.एम्. रेडिओ ९०.८वर दीपावली सणाची माहिती देण्यासाठी सनातन संस्थेला निमंत्रण
![]() |
नभोवाणीवर माहिती सांगतांना सौ. सुमा मंजेश |
तुमकुर येथील सिद्धार्थ एफ्.एम्. रेडिओ ९०.८वर दीपावली सणाची माहिती देण्यासाठी सनातन संस्थेला ४ नोव्हेंबर या दिवशी निमंत्रित करण्यात आले. संस्थेच्या सौ. सुमा मंजेश यांच्याकडून दीपावली सणाची माहिती जाणून घेऊन ती ध्वनीमुद्रितही करण्यात आली. (दीपावली सणाची माहिती जाणून ती ध्वनीमुद्रित करण्यासाठी सनातन संस्थेला निमंत्रण देणार्या सिद्धार्थ एफ्.एम्. रेडिओचे सनातन संस्थेने आभार व्यक्त केले आहेत ! संपादक) या माहितीचे दिवाळीच्या ३ दिवसांत ३ वेळा प्रसारण करण्यात येईल, असे आयोजकांनी सांगितले आहे.
चेन्नई येथे सनातन संस्थेच्या वतीने झालेल्या सत्संग महोत्सवात साधना आणि धर्माचरण यांविषयी प्रबोधन
चेन्नई - सनातन संस्थेच्या वतीने चेन्नईमधील मोगाप्पेर येथे १ नोव्हेंबर या दिवशी सत्संग महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. भगवान श्रीकृष्णाचा श्लोक म्हणून सत्संग महोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. सनातनच्या सौ. रागिणी यांनी दीपावलीचे महत्त्व विषद केले. सौ. रागिणी यांनी हिंदु देवतांची चित्रे असलेले फटाके फोडल्यामुळे देवतांची विटंबना कशी होते, याविषयी उपस्थित जिज्ञासूंचे प्रबाधन केले.
ख्रिस्ती मिशनर्यांचा वानवा असल्याने केरळ राज्यात ख्रिस्ती धर्माला उतरती कळा ! - सारा जोसेफ, लेखिका
कोची - एकेकाळी केरळ राज्यातून जगभर ख्रिस्ती मिशनरी आणि नन यांना प्रचंड मागणी होती; मात्र आता देशातील पालटलेल्या सामाजिक परिस्थितीमुळे केरळ राज्यात ख्रिस्त्यांच्या धार्मिकतेला ओहोटी लागली आहे. ख्रिस्ती मिशनरी आणि नन यांची संख्या झपाट्याने न्यून होत आहे. त्यामुळे ख्रिस्ती धर्माची २ दशकांपूर्वी युरोपमध्ये जशी बिकट स्थिती होती, तशी परिस्थिती आज केरळमध्ये निर्माण झाली आहे, अशी खंत साहित्य अकादमी पुरस्कार परत केलेल्या लेखिका सारा जोसेफ यांनी व्यक्त केली आहे.
विस्थापित असल्याचे भासवत आय.एस्.आय.एस्.चे सहस्रो आतंकवादी युरोपमध्ये घुसले !
दमास्कस (सिरिया) - सिरीया आणि इतर मध्य पूर्व आशियातील युद्धक्षेत्रातून विस्थापित झालेले लक्षावधी मुसलमान नागरिक युरोपमधील अनेक देशांत आश्रय घेण्यासाठी आले आहेत; मात्र विस्थापिताच्या नावाखाली आय.एस्.आय.एस्. या जिहादी आतंकवादी संघटनेचे आतंकवादी युरोपमध्ये प्रवेश करू शकतात अशी अनेकांनी वर्तवलेली शंका खरी ठरली आहे. सिरियातील इतिहासतज्ञ सामी मौबयेद यांनी लिहिलेल्या पुस्तकातून वरील बाब उघड झाली आहे.
भारताकडे पाकिस्तानपेक्षा अल्प अण्वस्त्रे !
युद्धसज्ज पाकला सामोरे जाण्यासाठी भारताने काय सिद्धता केली आहे ?
अमेरिकेतील विचारवंतांच्या एका गटाचा दावा
वॉशिंग्टन - भारताकडे वर्ष २०१४ मध्ये ११० ते १७५ अण्वस्त्रे बनवण्यास उपयुक्त प्लुटोनियम होते, असे अमेरिकेतील विचारवंतांच्या एका गटाने (थिंक टँकने) म्हटले आहे. या दाव्यानुसार भारताकडे पाकिस्तानपेक्षा खूपच अल्प अण्वस्त्रे आहेत.
भारत हा जगातील विकसनशील राष्ट्रांपैकी मोठा आण्विक कार्यक्रम राबवणारा देश असून भारताकडे अण्वस्त्रे बनवण्यासाठी प्लुटोनियमचा पुरेसा साठा होता. भारताकडे असणार्या अण्वस्त्रांची संख्या ७५ ते १२५ इतकी असू शकते. प्लुटोनियमचे जे साठे होते, त्यातील ७० टक्के साठे अण्वस्त्रांसाठी वापरले गेले. सगळ्या प्लुटोनियमची अण्वस्त्रे बनवलेली नाहीत, असे डेव्हिड अल्ब्राईट आणि सेरेन केलहर-व्हेरगानटिनी यांनी सांगितले आहे. इन्स्टिट्यूट फॉर सायन्स अॅण्ड इंटरनॅशनल सेक्युरिटीने यांसंबंधीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
प्रियकरासमवेत पळून जाणार्या विवाहितेला तालिबानने दगडांनी ठेचून मारले !
तालिबान्यांचे विकृत स्वरूप ! हिंदु धर्माच्या विरोधात गरळओक करणारी
प्रसारमाध्यमे आता यावर चर्चासत्रे घेतील का ?
काबुल - प्रियकरासमवेत पळून जाणार्या अफगानी महिलेला लोकांनी १९ ते २१ ऑक्टोबर या कालावधीमध्ये दगड मारून तिची हत्या केली. तिचा विवाह (निकाह) तिच्या इच्छेविरुद्ध करण्यात आला होता; परंतु ती दुसर्याच व्यक्तीसोबत पळून गेली होती. या भयावह घटनेची ध्वनीचित्रफीत सामाजिक संकेतस्थळावर दिसते आहे.
बुरखा आणि आतंकवादी पोशाख घालण्यासाठी दुसर्यांवर दबाव आणणे, हा गुन्हा ! - चीन
कुठल्याही बाबतीत राष्ट्रहिताला प्राधान्य देणार्या चीनकडून भारतीय
राज्यकर्त्यांना बरेच काही शिकण्यासारखे आहे !
बीजिंग - चीनमधील मुसलमानबहुल आणि अशांत असलेल्या झिनजियांग प्रांतामध्ये बुरख्यावर बंदी घातल्यानंतर आता तेथील शासनाने त्याविषयीच्या फौजदारी कायद्यामध्ये दुरुस्ती केली आहे. त्यांतर्गत इतरांना आतंकवाद, आतंकवादी साहित्य, त्यांचा पोशाख घालणे आणि त्यांचे प्रतीक ठेवण्यासाठी दुसर्यांवर दबाव आणणे, हा गुन्हा करण्यात आला आहे. अशा नागरिकांवर लक्ष ठेवून त्यांना अटक केली जाईल आणि शिक्षा म्हणून किमान ३ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली जाईल.
रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात हिंदु राष्ट्रासाठीच्या जपअनुष्ठानाची यज्ञाद्वारे सांगता !
![]() |
डावीकडून पंडित लालदेव शास्त्री, पू. डॉ. मुकुल गाडगीळ,
पू. (सौ.) अंजली गाडगीळ, श्री. गौरव सेठी आणि श्री. विनायक शानभाग
|
रामनाथी - हिंदु राष्ट्र-स्थापनेतील सर्व विघ्ने दूर होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, यासाठी भृगुसंहितेच्या माध्यमातून भृगुमहिर्षींनी केलेल्या मार्गदर्शनानुसार रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ३ नोव्हेंबरपासून चालू असलेल्या जपअनुष्ठानाची सांगता ७ नोेव्हेंबर या दिवशी यज्ञाद्वारे झाली. भृगुसंहितेचे वाचक होशियारपूर (पंजाब) येथील पंडित लालदेव शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली हा यज्ञ करण्यात आला.
समाजकंटकांचे सनातन आश्रमावरील आक्रमणांचे घृणास्पद कृत्य चालूच !
शिवीगाळ करणे, धमक्या देणे, अश्लील बोलणे आणि दगडफेक करणे
या गोष्टी दखलपात्र ठरवणारे दंडविधान हिंदु राष्ट्रात असेल !
सनातनच्या रामनाथी आश्रमातील साधकांना धमक्या देण्याचा, अश्लील बोलण्याचा आणि आश्रमावर दगड फेकण्यास आरंभ केल्याचा कालचा ५ वर्षे ३५६ वा (२१८१ वा) दिवस ! या गोष्टी दखलपात्र ठरवणारे दंडविधान हिंदु राष्ट्रात असेल !
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पुणे जिल्हाप्रमुखपदी आनंद दवे यांची नियुक्ती
पुणे - अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पुणे जिल्हाप्रमुखपदी श्री. आनंद दवे यांची नियुुक्ती करण्यात आली आहे. महासंघाच्या वतीने दिवाळीच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यात पदाधिकार्यांच्या नियुक्त्या घोषित करण्यात आल्या. ५ नोव्हेंबर या दिवशी हा कार्यक्रम पार पडला. या वेळी महासंघाचे श्री. गोविंद कुलकर्णी, शिवसेनेेचे खासदार श्री. अरविंद सावंत, विप्र फाऊंडेशनचे श्री. सुनील शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.
(म्हणे) सनातन संस्थेवर कायदेशीर कारवाई आणि तिच्या व्यवहाराची चौकशी करण्यासाठी संघर्ष यात्रा काढणार !
अधिवक्ता प्रकाश आंबेडकर यांचा कंठशोष
पुणे, ८ नोव्हेंबर - स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवणार्यांनीच समाजातील वेगवेगळ्या प्रश्नांसाठी लढणार्यांवर आक्रमणे करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या हिंसेला प्रोत्साहन आणि त्याचा उपदेश देणार्या पद्धतीचे लिखाण करणार्या सनातन प्रभात संस्थेवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच त्यांच्या व्यवहाराची चौकशी करण्याच्या उद्देशाने संघर्ष यात्रा आणि सभा होणार आहे, अशी माहिती सामाजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळ आणि जातीमुक्ती आंदोलन चळवळ याचे राज्य नियंत्रक अधिवक्ता प्रकाश आंबेडकर यांनी येथे एका पत्रकार परिषदेत दिली. (सनातन प्रभात ही संस्था नसून वृत्तपत्र आहे. हेही ठाऊक नसलेले प्रकाश आंबेडकर म्हणे अधिवक्ता ! संस्थेचे व्यवहार पारदर्शी असतांना आंबेडकर यांनी असे आरोप करणे, हा केवळ सनातनद्वेषच ! - संपादक) ही यात्रा डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे आणि एम्.एम्. कलबुर्गी यांच्या हत्येच्या निषेधार्थ जवळजवळ ५० डाव्या आणि पुरोगामी संघटना यांनी एकत्रित आयोजित केली आहे. राज्यात २१ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत पुणे ते कोल्हापूर ही संघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे. ही यात्रा २१ नोव्हेंबर या दिवशीपासून डॉ. दाभोळकर यांची हत्या झालेल्या विठ्ठल रामजी शिंदे पुलावरून चालू होणार आहे. यात्रेच्या शेवटी कोल्हापूरमध्ये सभा घेण्याचे नियोजन आहे.
धुळे येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन आणि वसुबारसनिमित्त गोपूजन
धुळे येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
धुळे - गोरक्षकांवरील वाढती आक्रमणे आणि त्यांचे रक्षण करण्याविषयी पोलिसांची असमर्थता यांमुळे मालेगाव येथील महिला कार्यकर्तीला जीव गमवावा लागला. गोरक्षकांवरील आक्रमणे पहाता त्यांना शस्त्रे बाळगण्याची अनुमती द्यावी, अशी मागणी प्रखर हिंदुत्ववादी श्री. नाना भाऊ जोशी यांनी राष्ट्र्रीय हिंदू आंदोलनात केली. येथील श्री महाराणा प्रताप पुतळ्याजवळ ७ नोव्हेंबरला हे आंदोलन करण्यात आले.मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित साध्वी प्रज्ञासिंह यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला !
मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी संशयित म्हणून अटक करण्यात आलेल्या साध्वी प्रज्ञासिंह यांचा जामीन अर्ज विशेष मोक्का न्यायालयाने ७ नोव्हेंबर या दिवशी पुन्हा फेटाळला. साध्वींविरुद्ध प्रथमदर्शनी पुरेसा भक्कम पुरावा असल्याने त्यांना जामिनावर सोडता येणार नाही, असे विशेष मोक्का न्यायमूर्ती टेकाळे यांनी सांगितले. (वर्ष १९९३ मधील मुंबई बाँबस्फोट प्रकरणात अवैध शस्त्रास्त्रे बाळगल्याच्या प्रकरणी शिक्षा भोगणारा अभिनेता संजय दत्त याला वारंवार फर्लो रजेवर घरी जायला दिले जाते; मात्र साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावरील आरोप अजून सिद्ध झाले नसतांनाही त्यांना वर्षांनुवर्षे कारागृहात खितपत ठेवले जाते, हे संतापजनक ! - संपादक)
पंढरी संचारच्या दीपावली विशेषांकाचे प्रकाशन
पुणे - पंढरपूर येथील सुप्रसिद्ध दैनिक पंढरी संचारच्या दिवाळी अंकाचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री श्री. गिरीश बापट आणि एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे संपादक श्री. राजीव खांडेकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. एम्आयटी महाविद्यालयाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात ६ नोव्हेंबर या दिवशी हा कार्यक्रम पार पडला. या वेळी अमेरिकेत झालेल्या जागतिक धर्मपरिषदेत सहभाग घेऊन भारतीय संस्कृतीचा गौरव पुन्हा एका सातासमुद्रापार पोहोचवल्याविषयी एम्आयटीचे प्रा. विश्वनाथ कराड यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
महत्त्वाची माहिती देण्यासाठी समीर गायकवाड यांना न्यायालयात उपस्थित करावे ! - समीर गायकवाड यांच्या अधिवक्त्यांची अर्जाद्वारे मागणी
- कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरण
- अधिवक्त्यांनी सादर केलेल्या अर्जावर १७ नोव्हेंबरला सुनावणी, तर न्यायालयीन कोठडीत २१ नोव्हेंबरपर्यंत वाढ
या वेळी न्यायालयात श्री. समीर गायकवाड यांचे अधिवक्ता श्री. एम्.एम्. सुहासे, श्री. समीर पटवर्धन, हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर उपस्थित होते, तर शासकीय पक्षाच्या बाजूने अधिवक्ता चंद्रकांत बुधले, खाजगी अधिवक्ता विवेक घाडगे उपस्थित होते.
तरुणीचा विनयभंग करणारा मद्यधुंद पोलीस हवालदार निलंबित
- महिलांवर अत्याचार करणार्या अशा वासनांध पोलिसांना शासनाने कठोर शिक्षा करावी, ही जनतेची अपेक्षा !
- पोलिसांच्या अशा वर्तनावरून ते जनतेचे रक्षक आहेत कि भक्षक, असा प्रश्न पडतो ! पोलिसांच्या अशा वर्तनामुळेच जनतेचा त्यांच्यावरील विश्वास उणावत चालला आहे !
मुंबई - मद्यधुंद पोलीस हवालदार प्रवीण नलावडे यांनी पवईहून रिक्शातून जाणार्या एका २१ वर्षीय तरुणीचा विनयभंग करून तिला मारहाण आणि शिवीगाळ केली. या प्रकरण त्यांना निलंबित करण्यात आले आहे. पीडित तरुणी रात्री रिक्शामधून पवईहून जात होती; मात्र त्याच वेळी पोलीस हवालदाराने रिक्शा रस्त्यावर रोखून तिच्यासमवेत बळजोरी केली. तिला धक्के देऊन रिक्शातून खाली फेकले. तेथे उपस्थित जमावाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला; पण हवालदार थांबला नाही. एका प्रत्यक्षदर्शीने पोलीस नियंत्रण कक्षात दूरभाष करून या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी आलेल्या पवई पोलिसांनी हवालदार प्रवीण नलावडे यांना अटक केली.
फलक प्रसिद्धीकरता
अपप्रकारांद्वारे निवडणुका जिंकणे, हे सर्वपक्षीय राज्यकर्त्यांसाठी लज्जास्पद !
बिहारमधील विधानसभा निवडणूक काळात निवडणूक आयुक्तांनी नेमलेल्या विशेष भरारी पथकांनी ३९ कोटी रुपये आणि १ लक्ष ६७ सहस्र लिटर दारू जप्त केली. मतदारांना खूष करून त्यांची मते विकत करण्यासाठी हा साठा वापरण्यात येत होता. हिंदू तेजा जाग रे !
Jago !
Biharme chunavke dauran 39 crore cash tatha 1.5 lakh litrese bhi adhik daru japt ki gayi !
Is prakar chhunav jitkar anevale Rajneta deshka vikas kya karenge ?
जागो !
बिहार में चुनाव के दौरान ३९ करोड रुपये तथा देड लाख लिटर से भी अधिक दारु जप्त की गई !
इस प्रकार चुनाव जितकर आनेवाले राजनेता देश का विकास क्या करेंगे ?
धनत्रयोदशी (आश्विन वद्य त्रयोदशी)
यालाच बोली भाषेत धनतेरस असे म्हटले जाते. या दिवशी व्यापारी तिजोरीचे पूजन करतात. व्यापारी वर्ष दिवाळी ते दिवाळी असे असते. नव्या वर्षाच्या हिशोबाच्या वह्या या दिवशीच आणतात.
धन्वंतरि जयंती
धनत्रयोदशीच्या दिवशीच धन्वंतरि जयंती साजरी करण्यामागील शास्त्र
श्री महालक्ष्मीदेवीच्या प्रकट धनात्मक स्वरूपाच्या ऊर्जेतून श्रीविष्णूची क्रियाशक्ती कनिष्ठ स्वरूपातून धन्वंतरीच्या नावाने कार्यरत होणे : धनत्रयोदशीच्या दिवशी श्रीविष्णूच्या अप्रकट ऊर्जास्वरूपातून कार्यरत होऊन अप्रमेयातून प्रमेयतेकडे होत असलेल्या श्री लक्ष्मीतत्त्वाच्या घनीकरणाबरोबर श्रीविष्णूची, म्हणजेच पुरुषदर्शक क्रियाशक्तीमय ऊर्जेची अंशस्वरूपात स्वरूपतेच्या कारकतेमुळे घनीकरण होण्यास प्रारंभ होतो. श्री महालक्ष्मीच्या प्रकट रूपात्मक तत्त्वातील घनीकरणामुळे पुरुषदर्शात्मक क्रियाशक्तीतील बीजकताही कनिष्ठ स्वरूपातून श्री महालक्ष्मीदेवीच्या प्रकट धनात्मक स्वरूपाच्या ऊर्जेतून धन्वंतरीच्या नावाने कार्यरत होते; म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करण्याचे शास्त्र आहे. - श्री. निषाद देशमुख (७.१०.२००६)
अहंकार आणि गुरुद्रोह यांमुळे रसातळाला गेलेला बैजू बावरा यांचा शिष्य गोपाल !
दीपावलीच्या सुट्टीनिमित्त प्रतिदिन वाचा बोधकथा !
१. बैजू गुरूंची कृपा आत्मसात करण्यात यशस्वी होणे आणि गुरूंकडून संगीत-विद्या शिकून एकांतात निघून जाणे : हरिदास महाराजांचे बैजू बावरा आणि तानसेन, असे दोन शिष्य होते. दोन्ही गुरुबंधू महान संगीततज्ञ होऊन गेले. बैजू बावरा यांचा जन्म १५४२ मध्ये चंदेरी (ग्वाल्हेर क्षेत्र, मध्य प्रदेश) येथे झाला होता. बैजूचे संगीत आणि व्यवहार अत्यंत सुखद होता. तो गुरूंची कृपा आत्मसात करण्यात यशस्वी झाला. गुरूंकडून संगीत-विद्या शिकून बैजू एकांतात निघून गेला आणि झोपडी तयार करून संयमी जीवन जगत संगीताचा अभ्यास करू लागला.
२. गोपालने बैजूची प्रसन्नता मिळवणे आणि कित्येक वर्षे अभ्यास करून संगीत-विद्येत नैपुण्य मिळवणे : बैजू अभ्यासात असा एकाग्र झाला की, संगीताची कला शिकणारे कित्येक जण त्याचे शिष्य बनले. त्यांच्यापैकी गोपाल नायक नावाचा एक शिष्य अत्यंत प्रतिभावान होता. जसे बैजूने आपले गुरु हरिदास महाराज यांना प्रसन्न केले होते, तसेच गोपालनेही बैजूला प्रसन्न केले होते. सप्ताह, मास होता होता कित्येक वर्षे अभ्यास करून गोपालने संगीत-विद्येत नैपुण्य मिळवले.
सोन्याच्या वाढत्या तस्करीला आळा घालणार का ?
गेल्या काही दिवसांत आणि दिवाळीच्या तोंडावर दुबईहून सोन्याची तस्करी होण्याचे प्रमाण वाढले आहे. मुंबई आणि पुणे येथे काही धर्मांध महिला अन् पुरुष यांना अटकही झाली आहे. लोहगाव विमानतळावर पकडण्यात आलेला एक जण पुण्यातील लष्कर परिसरातील आहे. उर्वरित ४ महिला मूळच्या मुंबईतील आहेत. त्यांपैकी दोघींनी अंतर्वस्रात १ कोटी रुपयांची सोन्याची बिस्किटे लपवली होती. दुबईहून सोने आणणार्यांना केंद्रीय सीमाशुल्क विभागाने (कस्टम) लोहगाव विमानतळावर पकडले. अवघ्या १० ते २० सहस्र रुपयांत सोन्याची तस्करी करणारे सीमाशुल्क विभागाच्या जाळ्यात सापडले. राजकीय इच्छाशक्ती, अपुरे मनुष्यबळ आणि निर्णयक्षमतेचा अभाव यांमुळे सीमाशुल्क विभागाच्या तपासावर मर्यादा येत आहेत. त्यामुळे सोन्याची तस्करी करणारा मुख्य सूत्रधार मोकाटच आहे.
आतंकवादाचे भयंकर स्वरूप !
आतंकवादाची समस्या मुळासकट संपवण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
१. सर्वाधिक आतंकवादी घटना घडणार्या देशांमध्ये
भारताचा क्रमांक तिसरा
१ अ. आपल्या देशात आतंकवाद्यांविरुद्ध लढण्यासाठी कोणतेही निश्चित धोरण आखले गेलेले नसणे : पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराक यांनंतर सर्वाधिक आतंकवादाच्या घटना भारतातच घडतात. या समस्यांशी आपण ५० वर्षे संघर्ष करत आहोत; परंतु दुर्दैवाने आपल्या देशात आतापर्यंत आतंकवाद्यांविरुद्ध लढण्यासाठी कोणतेही निश्चित धोरणच आखले गेले नाही.
धर्मांतराविषयी निधर्म्यांचे वेगळे निकष
वास्तविक मतांतर, धर्मांतर आणि पुन्हा स्वगृही परतणे (घर वापसी), हे आमच्या देशात गेल्या १०० वर्षांपासून अखंडपणे चालले आहे ! एवढे की, देशाच्या स्वातंत्र्यानंतरही (वर्ष १९४७ नंतर) देशात सातत्याने धर्मांतर चालूच आहे ! याचा परिणाम असा झाला आहे की, देशातील बहुसंख्य हिंदु समाज आज देशाच्या अनेक भागांतून घटत चालला आहे; पण आजपर्यंत एकाही तथाकथित निधर्मीवाद्यांने यावर भाष्य केलेले नाही.
डॉक्टर आणि वैद्याचार्य पू. वसंत बाळाजी आठवले लिखित सनातनची ग्रंथमालिका : निरोगी जीवनासाठी आयुर्वेद
- आयुर्वेदाची मूलतत्त्वे
- विकार आणि उपचार यांविषयी मूलभूत आयुर्वेदीय दृष्टीकोन
- आयुर्वेदानुसार दिनचर्या (२ भाग) आहारशास्त्राची मूलतत्त्वे
- अन्नाचे घटक आणि अन्नाशी संबंधित विकार
- अन्नपदार्थांचे औषधी गुणधर्म ! (२ भाग) आयुर्वेदीय औषधी
- वनस्पतींचे गुण आणि कार्य (२ भाग)
- आयुर्वेदातील खनिज आणि प्राणिज औषध
- तापावरील आयुर्वेदीय उपचार
जीवनाचे सार्थक !
अर्धशतकभर मी आनंदच लुटला ।
आशीर्वादांचा कुबेर झालो ॥
आयुष्यभर केवळ प्रेमाची उधळण केली ।
मला कोणताच पश्चात्ताप कधीच झाला नाही ।
आनंद हीच माझी दैवी धनदौलत आहे ॥
- जीवन किर्लोस्कर (संदर्भ : रूद्रवाणी, डिसेंबर २०००)
शाब्दिक बुडबुडे म्हणजे काय याचे उदाहरण !
एका राजकीय नेत्याचे निधन झाले. त्याच्याविषयी शोकसंदेश देतांना त्यांच्या विरोधकाने शब्दांचे अश्रू ढाळले, ते असे, माझे सदरहू मित्र गेल्यामुळे देशाची पुष्कळ मोठी हानी झाली आहे. असा माणूस समाजाचे भूषण असते. त्यांची उणीव समाजाला पदोपदी भासेल. एका धैर्यवान, त्यागी आणि कर्तबगार व्यक्तीमत्त्वाला आपण मुकलो आहोत; पण हे सगळे, जर या पुढार्याचे खरोखरच निधन झाले असेल, तर...! (संदर्भ : मासिक मनशक्ती, फेब्रुवारी २०००)
संतांचे आज्ञापालन केल्याने प.पू. भक्तराज महाराज यांच्या गाडीमध्ये प्रत्यक्ष प.पू. भक्तराज महाराज बसले आहेत, असे दिसणे
प.पू. पांडे महाराजांनी माझा मुलगा कु. वेदांत याला देवद आश्रमातील प.पू. भक्तराज महाराज यांच्या गाडीला प्रदक्षिणा घालण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे त्याने प्रदक्षिणा घालण्यास आरंभ केला; परंतु निम्म्या प्रदक्षिणा घातल्यानंतर त्याला आता थांबूया, असे वाटले. नंतर त्याला वाटले, नको. प.पू. पांडे महाराजांनी सांगितल्याप्रमाणे प्रदक्षिणा पूर्ण करूया. पुढच्या प्रदक्षिणा घालतांना त्याच्या मित्राने त्याला गाडीचे दार उघडून प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र दाखवले. तेव्हा वेदांतला प्रत्यक्ष प.पू. भक्तराज महाराजच गाडीत बसले आहेत, असे दिसले. प्रदक्षिणा पूर्ण केल्यावर त्याला चांगले वाटले आणि पुष्कळ आनंदही झाला. - सौ. गीता उमेश लांजेकर (कु. वेदांतची आई), अलोरे, चिपळूण. (जसा भाव तसा देव, या उक्तीप्रमाणे देवाप्रती असलेल्या भावामुळे साधकाला आलेली ही वैयक्तिक अनुभूती आहे. ती सर्वांनाच येईल, असे नाही - संपादक)
नरक चतुर्दशीच्या दिवशी केल्या जाणार्या विविध कृती आणि त्यांमागील कारणे
१. नरकचतुर्दशीच्या दिवशी प्रक्षेपित होणार्या आपमय आणि
त्रासदायक कंपनात्मक अधोगामी लहरींचे तेजतत्त्वाने विघटन
होण्यासाठी दीप प्रज्वलित करणे
नरक चतुर्दशीच्या आदल्या दिवसापासून पुरुषदर्शकात्मक क्रियाशक्तीचे स्थिर स्वरूपाचे ऊर्जामय आणि प्रकृतीमय ऊर्जादर्शकात होत असलेल्या रूपांतरामुळे सुप्त स्वरूपात असलेल्या वाईट शक्तीचे स्त्रोत आपमय आणि त्रासदायक कंपनात्मक अधोगामी लहरींच्या स्वरूपात कार्यरत होऊन त्यांचे प्रक्षेपण होण्यास प्रारंभ होतो. या लहरींमुळे जिवाला अधिक त्रास होऊ नये, तसेच वायूमंडलात वाढत असलेल्या दाबाचे विघटन व्हावे; म्हणून तेजतत्त्वावर आधारित दीपज्योतीच्या साहाय्याने, म्हणजेच ऊर्जामय स्वरूपात्मक प्रकृतीदर्शकतेच्या, मारकतेच्या आणि निर्गुणाच्या आधारे वायूमंडलात संचारत असलेल्या आपमय त्रासदायक लहरींचा व्यापक स्तरावर विघटन होण्यास आरंभ होतो.
बालपणापासूनच सात्त्विकतेची ओढ असलेला ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पुणे येथील चि. राघव राकेश देशमाने (वय १ वर्ष) !
![]() |
चि. राघव देशमाने |
८.११.२०१५ (आश्विन कृष्ण पक्ष द्वादशी) या दिवशी पुणे येथील बालसाधक चि. राघव राकेश देशमाने (वय १ वर्ष) याचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्याच्या आईला गर्भारपणात आणि त्याच्या जन्मानंतर जाणवलेली सूत्रे, तसेच त्याची मावशी अन् आजी यांना त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
१. जन्मापूर्वी
१ अ. गर्भारपणात झालेले त्रास आणि त्यावर आध्यत्मिक स्तरावर केलेले प्रयत्न
१ अ १. उलट्यांचा त्रास होऊन थकवा येणे, चिडचिड होणे आणि प्रार्थना आणि नामस्मरण करावेसे न वाटणेमुळातच सहनशील आणि देवाची ओढ असलेली महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची ठाणे येथील चि. मैथिली स्वप्नील नाटे (वय २ वर्षे) !
![]() |
चि. मैथिली नाटे |
चि. मैथिली स्वप्नील नाटे हिला सनातन परिवाराच्या
वतीने वाढदिवसानिमित्त शुभाशीर्वाद !
१. सौ. ऋतुजा स्वप्नील नाटे (मैथिलीची आई)
१ अ. साधकाने मैथिली सात्त्विक वाटते, असे सांगणे : आम्ही कुलदेवतेच्या दर्शनाला तुळजापूरला गेल्यावर तेथील साधक आणि पुजारी श्री. अमित कदम यांनी मैथिलीला पाहिले. तेव्हा त्यांना तिच्यात तेज जाणवले आणि ते म्हणाले,देवद आश्रमातील संस्था व्यवस्थापन विभागात सेवा करणारे श्री. अनिल (अप्पा) कुलकर्णी यांच्याविषयी त्यांच्या मुलीला सुचलेले काव्य पुढे देत आहोत.
![]() |
श्री. अनिल कुलकर्णी |
साधक बाबांविषयी आपला भाव कसा असला पाहिजे, हे कु. लीना
अनिल कुलकर्णी यांनी या कवितेतून चांगल्या रितीने शिकवले आहे.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले
कळेना माझ्या या अल्पमतीला ।
किती प्रसंग त्यांनी झेलले ।
आमच्यासाठी कष्ट सोसले ॥ १ ॥
जन्म देऊनी कृतार्थ केले ।
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले
किती लिहू बाबांविषयी ?
किती लिहू बाबांविषयी ? । कळेना माझ्या या अल्पमतीला ।
किती प्रसंग त्यांनी झेलले ।
आमच्यासाठी कष्ट सोसले ॥ १ ॥
जन्म देऊनी कृतार्थ केले ।
लोभ आणि क्रोध या अवगुणांचा नाश होण्यासाठी प्रार्थना करणे आवश्यक !
धनत्रयोदशी
![]() |
प.पू. पांडे महाराज |
धनत्रयोदशी म्हणजे लक्ष्मीची पूजा. जी सुवर्णकांतीस्वरूप, जीवनदायी, चांदीच्या स्वरूपाप्रमाणे प्रकाशमय आणि अग्नीप्रमाणे तेजोमय आहे, अशा लक्ष्मीला आपण आवाहन करतो की, ती आमच्याकडे आल्यावर तिने आमच्यापासून कधीही जाऊ नये, तसेच तिच्यामुळे आमच्याकडे जी सुबत्ता आणि समृद्धी येईल, तिचा आम्ही ईश्वराच्या सेवेसाठी उपयोग करू. या दिवशी ज्यामुळे आमच्याकडे अलक्ष्मी येते, अशा आमच्यातील लोभ आणि क्रोध या अवगुणांचा या स्वच्छ लक्ष्मीने नाश करावा, अशी प्रार्थना करावी.
भोपाळ येथील सौ. क्षिप्रा देशमुख यांना आलेल्या अनुभूती
![]() | |
सौ. क्षिप्रा देशमुख |
१. सेवानिवृत्त झाल्यावर प.पू. भक्तराज महाराजांचे भजन
म्हणणे, ते सर्वांना पुष्कळ आवडणे, तेव्हा जिथे जे आवश्यक
आहे, ते सर्वकाही देव करवून घेत असल्याचे शिकायला मिळणे
३०.९.२०१४ या दिवशी मी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त माझ्या कार्यालयातील सहकार्यांनी एका लहानशा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. काही मैत्रिणींनी गाणी आणि भजने म्हटली. शेवटी त्यांनी मलाच काहीतरी म्हणण्याचा आग्रह केला. यापूर्वी मी असे कधीच काही म्हटले नव्हते. त्यामुळे मी काय करावे ? काय म्हणावे ? हे मला कळत नव्हते. काहीच सुचत नव्हते.
साधकांनो, विदेशातही साधनारत राहून स्वतःची आध्यात्मिक उन्नती करून घ्या !
१. एक साधक विदेशात गेल्यावर जिल्ह्यातून संबंधित उत्तरदायींना
कल्पना दिली न गेल्याने तो साधक १० मास साधनेपासून वंचित रहाणे
काही साधकांना स्वतःच्या, तसेच कुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठी विदेशात राहून नोकरी करावी लागते. भारतातील एका जिल्ह्यामधील एक क्रियाशील साधक नोकरीसाठी विदेशात गेल्यावर त्याच्या जाण्याविषयी त्या जिल्ह्यातून संबंधित उत्तरदायींना कळवले गेले नव्हते. परिणामी त्या साधकाला १० मास एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधकांच्या संपर्कात राहून साधनेची पुढील दिशा घेता आली नाही. अशीच चूक बर्याच साधकांच्या संदर्भातही होत असल्याचे लक्षात आले आहे. वात्सल्यसिंधू गुरुमाऊलीने धरलेल्या प्रीतीमय कृपाछत्राची साधकांनी वेळोवेळी घेतलेली अनुभूती !
![]() |
सौ. उमा रविचंद्रन |
१. स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रजेची काळजी
घेणारा श्रीराम हा आदर्श जगत्पिता !
रामावतारात भगवान श्रीराम हा आदर्श जगत्पिता होता. रामराज्य हे पितृशाहीचे उत्कृष्ट उदाहरण होते. श्रीराम स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रजेची काळजी घेत असे. तो स्वतःही आदर्श होता आणि रामराज्याचे आदर्श नागरिक बनण्यासाठी त्याने आपल्या प्रजेलाही त्याप्रमाणे सिद्ध केले होते. जगत्पिता असल्याने रामाने स्वतःच्या मुलांना इतरांपेक्षा अधिक प्रेम कधीच दिले नाही. याचे उदाहरण म्हणजे सीतामाई गर्भवती असतांनाही रामाने तिला वनात पाठवण्याचा कठोर निर्णय घेतला. घेणारा श्रीराम हा आदर्श जगत्पिता !
रामनाथी आश्रमाचे छायाचित्र पाहिल्यावर निर्विचार स्थिती अन् अव्यक्त आनंद अनुभवणे आणि सायंकाळी हिंदु राष्ट्र असा जप ऐकू येणे
२०.५.२०१५ या दिवशी सत्संगासाठी संगणकाची जोडणी पडताळत होतो. त्या वेळी अचानक संगणकावर रामनाथी आश्रमाचे छायाचित्र दिसले. आश्रमाचे चित्र पहाताच मन काही सेकंद निर्विचार झाले. जसे श्रीकृष्णाचे चित्र पाहिल्यावर भाव जाणवतो, त्याप्रमाणे आश्रमाचे चित्र पाहिल्यावर मी रामनाथी आश्रमात असल्याचे जाणवले. यासंबंधी विचार केल्यावर लक्षात आले, की, प.पू. डॉक्टरांच्या वाढदिवशी सप्तर्षींनी त्यांना श्रीविष्णूचे कलियुगातील अंशावतार, असल्याचे सांगितल्याने मनाला काही क्षण विष्णुलोकातील स्पंदने जाणवली असतील. केवळ काही सेकंद ही निर्विचार स्थिती आणि अव्यक्त आनंद अनुभवू शकलो.
हिंदुत्वाचे कार्य करणार्या जैन धर्मियांना हिंदुत्वाचे कार्य करण्याची प्रेरणा कशी मिळाली हे जाणून घ्या !
साधकांना सूचना
अनेक जैन धर्मीय हिंदुत्वाचे कार्य धडाडीने करतांना सर्रास आढळतात. जैन धर्म हिंदु धर्माहून वेगळा आहे, असा विचारप्रवाह निर्माण होत असतांना जैन धर्मियांनी हिंदुत्वाचे कार्य करणे, हे कौतुकास्पद आणि एकसंध समाजनिर्मितीच्या दृष्टीने आशादायक आहे. हिंदुत्वाचे कार्य करणार्या जैन धर्मियांना हिंदुत्वाचे कार्य करण्याची प्रेरणा कशी मिळाली, याविषयी अनौपचारिकपणे विचारावे, तसेच हे कार्य करत असतांना त्यांना आलेले बरे-वाईट अनुभवही विचारावेत. ही माहिती संक्षिप्त स्वरूपात नजिकच्या दैनिक कार्यालयात पाठवावी. आश्रमात भृगुसंहितेचे आगमन होणार असल्याचे फलकावर वाचल्यानंतर शरिरावर रोमांच येऊन शब्दातीत आनंद जाणवणे
२.११.२०१५ या दिवशी आश्रमातील भोजनकक्षातील फलकावर लिहिले होते, भृगुसंहिता आणि होशियारपूर, पंजाब येथील तिचे वाचक पंडित लालदेव शास्त्री यांचे आश्रमात आगमन होणार आहे. हे वाचल्यावर माझ्या शरिरावर रोमांच (काटा) येऊन मला मनातून पुष्कळ आनंद जाणवत होता. त्याचे मी शब्दांत वर्णन करू शकत नाही. - श्रीमती शर्मिला पळणीटकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.११.२०१५)
सनातनमध्ये सर्व प्रकारचे विक्रम करणार्या संतरत्न पू. स्वातीताई !
१. पू. स्वातीताई लहान वयात संतपदी आणि आता सद्गुरुपदी विराजमान झालेल्या पहिल्या अन् एकमेव संत आहेत.
२. केवळ १ वर्ष आणि ११ मास (महिने) या अल्प कालावधीत गुरु ते सद्गुरुपद अशी गरुडझेप घेणार्या त्या पहिल्या अन् एकमेव संत आहेत.
२. केवळ १ वर्ष आणि ११ मास (महिने) या अल्प कालावधीत गुरु ते सद्गुरुपद अशी गरुडझेप घेणार्या त्या पहिल्या अन् एकमेव संत आहेत.
पू. (कु.) स्वाती खाडये यांच्या नाशिक येथील सिंहस्थपर्वाच्या कालावधीतील आध्यात्मिक उन्नतीचे गमक
![]() |
पू. (कु.) स्वाती खाडये |
![]() |
पू. डॉ. मुकुल गाडगीळ |
साधकांना सूचना !
सनातनवरील बिनबुडाच्या आरोपांचे खंडण करणारी
सनातनचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांची मुलाखत उपलब्ध !
१६ सप्टेंबर २०१५ या दिवशी सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना पोलिसांनी कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येच्या संदर्भात संशयित म्हणून कह्यात घेतले. त्यानंतर लगेचच सनातन विरोधकांनी सनातनवर टीका करण्यास प्रारंभ केला. त्यांपैकी काहींनी सनातनवर बंदी घालावी, अशी मागणी केली. प्रसारमाध्यमांनी या काळात या सर्व घटनांना पुष्कळ प्रसिद्धी देत सनातनची मिडिया ट्रायल (प्रसारमाध्यमांतून चालवण्यात आलेला अभियोग) चालवली.साधकांना सूचना
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - आश्विन कृष्ण पक्ष चतुर्दशी (१०.११.२०१५) रात्री ९.२३ वाजता समाप्ती - आश्विन अमावास्या (११.११.२०१५) रात्री ११.१७ वाजता
दोन दिवसांनी अमावास्या आहे.
॥ हरि ॐ तत्सत् ॥
![]() |
संत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान |
वेळ न मिळणे
जे व्यय (खर्च) करायचे आहे, ते तुम्ही गोळा (जमा) करता व जे गोळा करायचे आहे, ते व्यय करता. याउलट कसे करायचे ते शिका.भावार्थ : जे व्यय करायचे आहे, ते तुम्ही गोळा करता म्हणजे पैसा गोळा करता आणि जे गोळा करायचे आहे, ते व्यय करता म्हणजे साधना करण्याचा बहुमूल्य वेळ वाया घालविता. याउलट कसे करायचे ते शिका म्हणजे वेळेचा जास्तीतजास्त वापर साधना करण्यासाठी करा.
योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !
सकारात्मक रहा !
![]() |
योगतज्ञ दादाजी वैशंपायन |
जगात यशाचीच पूजा केली जाते. मी यशस्वी होणारच, असे म्हणणारी आणि सकारात्मक वागणारी व्यक्तीच सर्वांना हवीहवीशी वाटते.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)
परंपरांच्या विरोधात जाऊन समाजसुधारणा करणारे पुरोगामी आणि साम्यवादी पापाच्या पायावर उभे असणे
हे साम्यवादी आम्हा परपंरावाद्यांचा जड, यांत्रिक आणि निर्जीव असा उपहास करतात. आम्हाला कालप्रवाहाची उपेक्षा करणारे आहोत, अशा शिव्याही हासडतात. खरे तर हे पुरोगामी, हे साम्यवादीच त्या अर्थाने परंपरावादी आहेत. गोरगरीबांच्या या कैवार्यांनी वरकरणी कितीही समाजकल्याण आणि लोकहित यांच्या गोष्टी करू देत, योजना बनवू देत, ते सर्व पापाच्या पायावरच उभे आहेत. पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळणारे आहेत. - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, १७.११.२०११)
भाजपचा पराभव : वस्तूनिष्ठ आत्मचिंतनाची आवश्यकता !
संपादकीय
कुठल्याही राजकीय पक्षाला जय-पराजय हा नवखा नसतो. कुणीही सदाचा विजयी होत नाही आणि सदाचा पराभूतही होत नाही. तथापि विजयी झाल्यावर पाय भूमीवरच राहू देणे आणि पराभूत झाल्यावर आत्मचिंतन करून चुका सुधारणे, यातच पक्षहित असते. हे दोन्हीही केले नाही तर काय होते, हे भाजपने बिहारमध्ये अनुभवले. लोकसभेच्या निवडणुकीत देशातील सर्व राजकीय पक्षांची दाणादाण उडावणार्या भाजपला जनतेने देहली पाठोपाठ बिहारमध्येही अगदी स्पष्टपणे नाकारले. बिहारमधील भाजपचा झालेला दारूण पराभव हा भल्याभल्यांच्या भुवया उंचावणारा तर आहेच; पण त्याहीपेक्षा अधिक तो भाजपच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा आहे. या पराभवानंतर तरी भाजपने वस्तूनिष्ठ आत्मचिंतन करणे आवश्यक आहे.
Subscribe to:
Posts (Atom)