Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आज वसुबारस


कर्नाटकातील काँग्रेस शासन क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती साजरी करणार !

  • लाखो हिंदूंना ठार करणार्‍या, हिंदूंची असंख्य मंदिरे उद्ध्वस्त करणार्‍या आणि हिंदु स्त्रियांवर बलात्कार करणार्‍या क्रूरकर्मा टिपू सूलतानची जयंती साजरी करण्याच्या टिपूप्रेमी कर्नाटक शासनाच्या निर्णयाला कडाडून विरोध करा !
कार्यक्रम उधळून लावण्याची विश्‍व हिंदु परिषदेची चेतावणी
बेंगळुरू - कर्नाटकातील काँग्रेस शासनाकडून १० नोव्हेंबर या दिवशी क्रूरकर्मा टिपू सुलतानची २६६ वी जयंती साजरी करण्यात येणार आहे. शासनाच्या या भूमिकेचा समाजातील सर्व स्तरांतून विरोध होत असून हा कार्यक्रम उधळून लावण्याची चेतावणी विश्‍व हिंदु परिषदेने दिली आहे. शासनाकडून ऐन दिवाळीतच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्यानेही त्याच्यावर आरोप होत आहेत.
१. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते करण्यात येणार आहेे. या कार्यक्रमास साहित्यिक गिरीश कर्नाड, बारगूर रामचंद्रप्पा आणि इतिहासकार शेख अली, तालकड चिकरांगे गोवडा आणि एन्.व्ही. नरसिंह उपस्थित रहाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
२. शासनाच्या या निर्णयाच्या विरोधात विहिंपने मंगळुरू आणि चित्रदुर्ग येथे निदर्शने केली. संपूर्ण राज्यात १० नोव्हेंबरपर्यंत निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती विहिंपचे राज्य सचिव टी.ए.पी. शेणॉय यांनी सांगितले.

गोमांस उत्पादनाच्या विक्रीवर बंदी घालणारा कायदा करू शकत नाही - देहली न्यायालय

   नवी देहली - गोमांसाच्या उत्पादनांच्या विक्रीवर बंदी आणण्यासाठी कायदा करण्याची मागणी करणारी याचिका देहलीतील न्यायालयाने फेटाळून लावली. स्वामी सत्यानंद चक्रधारी यांनी ही याचिका दाखल केली होती. यामध्ये गोहत्या करणार्‍यांना १० वर्षांच्या कारागृहवासाच्या शिक्षेची मागणी करण्यात आली होती.

ह.भ.प. मधुसूदन पाटील महाराज यांचे अपहरण आणि सुटका !

अशा घटनांमुळे देशात शासन अस्तित्वात आहे का, असा प्रश्‍न पडतो ! राज्यातील वेगवेगळ्या 
माफियांचा वाढलेला सुळसुळाट पोलीस प्रशासन आणि शासन केव्हा थांबवणार ?
    पिंपरी, ६ नोव्हेंबर - जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची तपोभूमी असलेला भामचंद्र आणि भंडारा डोंगर भूमाफियांच्या तावडीतून वाचवणारे ह.भ.प. मधुसूदन पाटील महाराज यांचे अपहरण करून नंतर त्यांची सुटका करण्यात आली. हे अपहरण खाण आणि भूमाफियांनी केले होते. तसेच ह.भ.प. पाटील महाराजांना जीवे मारण्याची धमकीही अपहरणकर्त्यांनी दिली आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.
ह.भ.प. पाटील महाराज यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,
१. मला २७ ऑक्टोबर या दिवशी खेड (जिल्हा पुणे) मधून तिघा जणांनी मोटारीतून पळवून नेले.

मुसलमान पुरुषांकडून कुराणाचा गैरवापर ! - गुजरात उच्च न्यायालयाचे ताशेरे

  • समान नागरी कायदा लागू करण्याची आवश्यकता असल्याचेही मत न्यायालयाने व्यक्त केले
  • न्यायालयाने मांडलेले मत विचारात घेऊन शासनाने आतातरी देशात समान नागरी कायदा लागू करावा, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
    अहमदाबाद, ६ नोव्हेंबर - एकापेक्षा अधिक विवाह करण्याची प्रथा जिवंत ठेवण्यासाठी मुसलमान पुरुष कुराणाचा गैरवापर करत आहेत, असे मत गुजरात उच्च न्यायालयाने मांडले आहे. अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी देशात समान नागरी कायदा लागू करण्याची आवश्यकता आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे
गुजरातमध्ये रहाणारे जफर अब्बास यांच्या विरोधात त्यांच्या पत्नीने भारतीय दंड विधान (आय.पी.सी.) कलम ४९४ अंतर्गत तक्रार दाखल केली होती. जफर यांनी माझ्या सहमतीशिवाय दुसरा विवाह केल्याचे त्यांच्या पत्नीचे म्हणणे होते. भा.दं.वि. कलम ४९४ मध्ये एकापेक्षा अधिक पत्नी ठेवणे, हा गुन्हा आहे. जफर यांनी स्वतःच्या बचावासाठी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा दाखला दिला होता.

गुंड छोटा राजनला भारतात आणले !

मुंबईचे १८ पोलीस दाऊदच्या संपर्कात असल्याचा राजनचा गौप्यस्फोट
   नवी देहली - गत २७ वर्षांपासून भारताला हवा असलेला कुख्यात गुंड छोटा राजन याला केंद्रीय अन्वेषण विभागाने कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ६ नोव्हेंबर या दिवशी सकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास भारतात आणले. राजनला चौकशीसाठी देहलीतील केंद्रीय अन्वेषण विभागाच्या मुख्यालयात नेण्यात आले आहे. राजन यास ऑक्टोबर मासात इंडोनेशियातील बाली येथे अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया ३ नोव्हेंबरला पूूर्ण झाली होती. तथापि बाली नजिकच्या एका बेटावर ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे तेथील विमानसेवा बंद ठेवण्यात आल्याने राजनला भारतात आणण्याचे लांबणीवर पडले. ५ नोव्हेंबर या दिवशी बालीतील विमानसेवा पूर्ववत झाल्यानंतर तेथील पोलिसांनी राजनला केंद्रीय अन्वेषण विभागाच्या कह्यात दिले.

पाकचे गझल गायक गुलाम अली यांनी लखनौ येथे कार्यक्रम केल्यास तो उधळण्याची शिवसेनेची चेतावणी !

उत्तरप्रदेश शासनाकडून गुलाम अलींना निमंत्रण !
केवळ शिवसेनाच शत्रूराष्ट्र पाकला सातत्याने कडाडून विरोध करते, हे लक्षात घ्या !
    लक्ष्मणपुरी (लखनौ) - येथे ३ डिसेंबर या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या एका महोत्सवात पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली सहभागी होणार आहेत. त्यांचा तेथे गायनाचा कार्यक्रम झाल्यास तो उधळून लावण्याची चेतावणी शिवसेनेच्या उत्तरप्रदेशमधील नेत्यांनी दिली आहे. जर गुलाम अली या कार्यक्रमासाठी येथे आले, तर आम्ही केवळ त्यांचा तोंडवळाच काळा करणार नाही, तर त्यापेक्षाही गंभीर कारवाई करू, अशी चेतावणी शिवसेनेचे उत्तरप्रदेशमधील प्रमुख श्री. अनिल सिंह यांनी दिली. ते म्हणाले, केवळ मुसलमानांच्या तुष्टीकरणासाठी उत्तरप्रदेश राज्यशासनाने गुलाम अलींना या कार्यक्रमासाठी बोलावले आहे. गुलाम अली देहलीत आल्यापासून ते काय काय करतात, यावर आमचे लक्ष राहील आणि त्यांना लक्ष्मणपुरीमध्ये येण्यापासून रोखले जाईल. त्यातूनही जर ते सुरक्षा घेऊन कार्यक्रम स्थळापर्यंत पोहोचले, तर तेथेही शिवसैनिक त्यांना विरोध करतील आणि त्यांचा कार्यक्रम उधळून लावतील.

(म्हणे) काश्मिरींचा स्वयंनिर्णयाचा हक्क मान्य करावा !

पाकिस्तानचा संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत पुन्हा कांगावा
      वॉशिंग्टन - दक्षिण आशियात शांतता आणि स्थिरता नांदण्यासाठी काश्मीर प्रश्‍न सोडवणे आवश्यक आहे. सुरक्षा मंडळाने काश्मीरच्या संदर्भात केलेल्या ठरावांची कार्यवाही करतांना काश्मिरी लोकांचा स्वयंनिर्णयाचा हक्क मान्य करावा, असा कांगावा पाकिस्तानच्या राजदूत मलिहा लोधी यांनी केला. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या तिसर्‍या समितीच्या स्वयंनिर्णयावरच्या बैठकीमध्ये काश्मीरच्या संदर्भात त्या बोलत होत्या.

अमेरिकेतील प्रखर हिंदुत्ववादी नरेन कटारिया कालवश !

      न्यूयॉर्क - अमेरिकेतील भारतीय अमेरिकन बुद्धीवादी संघटनेचे अध्यक्ष आणि प्रखर हिंदुत्ववादी नरेन कटारिया यांचे अमेरिकेत २ नोव्हेंबर या दिवशी हृदयविकाराने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांनी त्यांचे जीवन हिंदूंच्या हितासाठी वाहून घेतले होते.
      श्री. नरेन कटारिया यांनी अमेरिकेतील हिंदूंसाठी एका दीपस्तंभासारखे कार्य केले. अमेरिकेत प्रत्येक वर्षी हिंदु एकता दिवस साजरा करण्याची परंपरा त्यांनी १९ वर्ष पाळली होती. ते अमेरिकेतील विश्‍व हिंदु परिषदेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य होते. तसेच हिंदु स्वयंसेवक संघाचे संघटन सचिव होते. काश्मिरी हिंदू आणि पाकिस्तानातील हिंदू यांना न्याय मिळावा म्हणून त्यांनी अनेक चाळवळी राबवल्या.

अभिवादन करतांना जय हिंद म्हणणे बंधनकारक करावे !

राष्ट्रीय सैनिक संस्थेची राष्ट्रपतींना पत्राद्वारे मागणी
     गाझियाबाद (उत्तरप्रदेश) - भारतियांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना रुजावी आणि राष्ट्रीय चारित्र्य निर्माण व्हावे, यासाठी सार्वजनिक ठिकाणी एकमेकांना अभिवादन करतांना जय हिंद म्हणणे बंधनकारक करावे, अशी मागणी राष्ट्रीय सैनिक संस्थेने एका निवेदनाद्वारे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना केली आहे. आज भारतातील प्रत्येक राज्याने स्वतःची वेगळी अस्मिता बनवली आहे; पण सर्वांमध्येच देशप्रेमाची भावना वृध्दींगत व्हावी, यासाठी सार्वजनिक ठिकाणी एकमेकांना अभिवादन करतांना जय हिंद म्हणावे. लोकसभा, राज्यसभा, शाळा, शासकीय आणि बिगर शासकीय संस्था आदी सर्वच ठिकाणी हा नियम लागू करावा, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष कर्नल तेजेन्द्र पाल त्यागी आणि माजी निवडणुक आयुक्त जी.वी.जी. कृष्णमूर्ती यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. सर्व राज्यांच्या राज्यपालांनाही या मागणीचे निवेदन पाठवण्यात आले आहे.

अमेरिकेत बोलल्या जाणार्‍या भारतीय भाषांमध्ये हिंदी भाषेचा वापर सर्वाधिक !

इंग्रजीचे एकप्रकारे उगमस्थान असलेल्या देशांमध्येच इंग्रजी नाकारली 
जात असतांना भारतात त्याचे स्तोम का माजवले जाते ?

      वॉशिंग्टन - अमेरिकेत बोलल्या जाणार्‍या भारतीय भाषांमध्ये हिंदी भाषेचा सर्वाधिक वापर केला जातो. ६ लक्ष ५० सहस्र भारतीय हिंदीत संभाषण करतात. संवाद-भाषा सर्वेक्षणामध्ये ही आकडेवारी समोर आली आहे. अमेरिकेच्या सांख्यिकी विभागाने वर्ष २००९ ते २०१३ या कालावधीत ही पाहणी केली. अमेरिकेतील ६० दशलक्ष नागरिक घरात संवाद साधण्यासाठी बोलण्यासाठी इंग्रजीऐवजी इतर भाषा, तर २५ दशलक्ष नागरिक घरात इंग्रजीचाच वापर करत असल्याचे असल्याचे यात दिसून आले.

देहलीत भारतीय सैन्य फटाके न फोडता दिवाळी साजरी करणार !

वायू आणि ध्वनी प्रदूषणाचा प्रश्‍न संपूर्ण भारतातच अस्तित्वात आहे. त्यामुळे सीमेवर जिवाची 
बाजी लावून देशाचे संरक्षण करणार्‍या सैन्यापासून स्फूर्ती घेऊन सर्वांनी दिवाळीत फटाके न 
फोडण्याचा संकल्प करूया !
     नवी देहली - देहलीत भारतीय सैन्याने यंदाची दिवाळी फटाके न फोडता साजरी करण्याचे ठरवले आहे. देहली छावणी भागात असलेल्या भारतीय सैन्याच्या मुख्य कार्यालयाने या बाबतीत पुढाकार घेतला आहे. देहलीत आधीच वायू आणि ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे. या प्रदूषणात अधिक वाढ होऊ नये म्हणून सैन्याने हा निर्णय घेतला आहे. सैन्याधिकार्‍यांच्या पत्नींची संघटना यंदा हरित दिवाळी साजरी करण्याचे नियोजन करत आहे.

अदोनी (आंध्रप्रदेश) येथे निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर

     अदोनी देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे छापून त्यांचा अवमान करणारी त्याचबरोबर प्रदूषण निर्माण करणार्‍या फटाक्यांवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन हिंदु जनजागृती समितीद्वारे येथील निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना नुकतेच दिले. या वेळी समितीचे सर्वश्री अंजानेयुलू, दयाकर, रामू आणि विनय आदी उपस्थित होते.

केसरी वृत्तपत्राचे माजी उपसंपादक तथा ज्येष्ठ पत्रकार अरुण रामतीर्थकर यांचे निधन

अरुण रामतीर्थकर
सोलापूर -
केसरी वृत्तपत्राचे माजी उपसंपादक तथा ज्येष्ठ पत्रकार अरुण रामतीर्थकर (वय ६६ वर्षे) यांचे ६ नोव्हेंबर २०१५ च्या रात्री ९.३० वाजता येथील रुग्णालयात आजारपणाने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी अधिवक्ता अपर्णा रामतीर्थकर, मुलगा, सून आणि नातू असा परिवार आहे. सनातन प्रभात नियतकालिकांसाठीही अरुण रामतीर्थकर राष्ट्र-धर्म विषयांवर सडेतोड लिखाण करत असत. सनातन परिवार रामतीर्थकर कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आंध्रप्रदेशमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन

     विशाखापट्टणम् सध्या प्रदूषण निर्माण करणारे आणि फटाक्यांच्या वेष्टनावर देवतांची चित्रे असलेल्या फटांक्याची निर्मिती केली जात आहे. राष्ट्र चोहोबाजूंनी संकटात असतांना फटाक्यांवर असे कोट्यवधी रुपये उधळणे चुकीचे आहे, तसेच देवता आणि राष्ट्रभक्त यांची चित्रे छापून त्यांचा अवमान केला जात आहे. त्यामुळे प्रदूषण निर्माण करणार्‍या फटाक्यांवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी, अशी मागणी ३१ ऑक्टोबर या दिवशी एका पत्रकार परिषदेद्वारे करण्यात आली. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या विशाखापट्टणम् येथील कायकर्त्या सौ. मीना कदम आणि सनातन संस्थेच्या कु. तेजस्विनी यांनी पत्रकारांना संबोधित केले. 
     या वेळी विविध वृत्तपत्र आणि स्थानिक दूरचित्रवाहिन्यांचे १८ पत्रकार उपस्थित होते. या वृत्ताला त्यांनी उत्तम प्रसिद्धी दिली.

फटाक्यांद्वारे होणारे देवतांचे विडंबन आणि प्रदूषण रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरप्रदेश आणि आंध्रप्रदेश येथे प्रशासनाला निवेदन सादर !

फटाक्यांच्या विरोधात समितीची राष्ट्रव्यापी मोहीम
आग्रा (उत्तरप्रदेश) येथील अप्पर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर
डावीकडून अप्पर जिल्हाधिकारी श्री. अरुण कुमार, श्री. संजीव शर्मा,
श्री. ठाकुर सिंह, श्री. शुभम वर्मा आणि श्री. अजय अग्रवाल
     आग्रा - दिवाळीच्या कालावधीत फोडण्यात येणार्‍या फटाक्यांवर देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असतात. त्यामुळे देवता आणि राष्ट्रपुरुष यांचा अवमान होतो. हा अवमान रोखणे आणि अशा फटाक्यांची विक्री थांबवणे, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील अप्पर जिल्हाधिकारी श्री. अरुण कुमार यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन ५ नोव्हेंबर या दिवशी देण्यात आले. या वेळी समितीचे सर्वश्री संजीव शर्मा, ठाकुर सिंह, शुभम वर्मा, अजय अग्रवाल आदी उपस्थित होते.

म्हणे) पोर्तुगालच्या संस्कृतीशी मिळत्याजुळत्या गोव्यातील संस्कृतीला चालना देण्यासाठी गोव्यात समाना दी कल्चुरा इंडो-पोर्तुगीज महोत्सव !

पोर्तुगीजधार्जिण्या समाना दी कल्चुराच्या अध्यक्षांकडून गोमंतकियांची दिशाभूल !
गोमंतकियांनो, या पोर्तुगीजधार्जिण्यांना हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणारे 
इन्क्विझिशन ही पोर्तुगिजांची (कु) संस्कृती आहे, याची जाणीव करून द्या !
     पणजी - पोर्तुगालच्या संस्कृतीशी मिळत्याजुळत्या गोव्यातील संस्कृतीला चालना देण्यासाठी समाना दी कल्चुरा या पोर्तुगीजधार्जिण्या संस्थेने गोव्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन मासांत द समाना दी कल्चुरा इंडो-पोर्तुगीज महोत्सवाचे आयोजन केले आहे, असे समाना दी कल्चुरा या संघटनेच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष जोश परेरा यांनी म्हटले आहे. पोर्तुगालच्या गोव्याशी असलेल्या नात्याला अनुसरून आनंद व्यक्त करण्यासाठी महोत्सवांतर्गत मद्य, चित्रपट, गाणे आणि पोर्तुगीजकालीन छायाचित्रे यांचे प्रदर्शन भरवले जाणार आहे. गोव्यात महोत्सव साजरे करण्याचे यंदाचे आठवे वर्ष आहे. विशेष म्हणजे आयोजकांना राज्याचा सांस्कृतिक वारसा हरपत असल्याची भीती वाटत असून या पार्श्‍वभूमीवर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. (पोर्तुगीज गोव्यात येण्यापूर्वी गोव्यात हिंदु संस्कृती होती. त्यामुळे गोव्याला पोेर्तुगीज वारसा नसून हिंदु संस्कृतीचा आहे. पोर्तुगिजांनी अनन्वित अत्याचार करून पाश्‍चात्त्य संस्कृती गोमंतकियांवर लादली. त्या संस्कृतीचे जतन नव्हे, तर त्याचे उच्चाटन होऊन हिंदु संस्कृतीचे संवर्धन व्हायला हवे. त्यामुळे या महोत्सवाचे आयोजन म्हणजे राष्ट्राभिमान नसल्याचेच द्योतक होय ! संपादक)

छेडछाडीचा प्रकार महिलांच्या जगण्याच्या अधिकारावर गदा आणणारा ! - देहली न्यायालय

महिलांची छेडछाड करणार्‍यांना न्यायालयाने कठोर शिक्षा ठोठवावी, अशी जनतेची अपेक्षा आहे !
    नवी देहली - महिलांची छेडछाड आणि पाठलाग करण्याचा प्रकार हा महिलांच्या शारीरिक अन् मानसिक छळाचाच भाग आहे. असा प्रकार महिलांच्या स्वातंत्र्यावर आणि जगण्याच्या अधिकारावरही गदा आणणारा आहे, असे मत देहली महानगर दंडाधिकारी सुशील बाला डगर यांनी एका प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी व्यक्त केले. 

वेगळा विचार मांडणारा आवाज दाबून टाकणे, हे लोकराज्यावरचे आक्रमण ! - डॉ. मनमोहन सिंह

    सर्वांत अपयशी पंतप्रधान म्हणून इतिहासात नाव झालेले आणि स्वत:च्या कार्यकाळात हिंदूंवरील आक्रमणांच्या विरोधात निष्क्रीय राहिल्याने हिंदूंनी नाकारलेले पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनाही आता व्यक्तीस्वातंत्र्याचा उमाळा !
    नवी देहली - वेगळा विचार मांडणारा आवाज दाबून टाकण्याचा प्रकार हा एक प्रकारे लोकराज्यावरच्या तत्त्वांवरील आक्रमण आहे. ही बाब देशाच्या आर्थिक विकासासाठी घातक आहे, अशी प्रतिक्रिया माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी व्यक्त केली. नेहरूंच्या १२५ व्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्याशिवाय शांतता नाही आणि शांततेशिवाय स्वातंत्र्य नाही, या विषयावरील व्याख्यानात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
    सिंह पुढे म्हणाले, गेल्या काही मासांपासून हिंसक कडव्या संघटनांकडून आचार-विचार आणि बोलण्यावर बंधन आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली जात आहे. या संघटनांशी मतभिन्नता असणार्‍यांवर जीवघेणी आक्रमणे केली जात आहेत. काही विचावंतांची हत्याही झाली आहे. ही बाब चिंता वाढवणारी आहे. धर्म ही वैयक्तिक बाब आहे. त्यात शासन वा दुसर्‍या कुणाचाही हस्तक्षेप असता कामा नये. आपला धर्म दुसर्‍यावर लादणेही चुकीचे आहे. एखाद्या धर्मनिरपेक्ष देशाची धोरणे धर्माच्या आधारावर ठरवली जाऊ शकत नाहीत. राष्ट्र्रीय एकात्मता, धर्मनिरपेक्षता आणि विविधता ही आपल्या देशाची वैशिष्ट्ये आहेत आणि देशाच्या आर्थिक विकासासाठी त्यांचे काटेकोर पालन व्हायलाच हवे.

इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी भाषा विषय पर्यायी ठेवण्याचा शिक्षण मंडळाचा विचार

     भाषा विषयातून केवळ भाषा आणि व्याकरण शिकता येते, असे नव्हे, तर त्या भाषेसमवेत येणारी संस्कृती आणि तत्त्वज्ञान त्यातून शिकता येते. यापासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवणे म्हणजे त्यांना स्वधर्म, संस्कार, संस्कृती यांपासून वंचित ठेवणे होय !
    मुंबई, ६ नोव्हेंबर - इयत्ता नववी आणि दहावीच्या अभ्यासक्रमातून भाषा विषयच हद्दपार करण्याचा घाट महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने घातला असून मराठी, हिंदी, इंग्रजी या विषयांसाठी व्यवसाय अभ्यासक्रमाचा पर्याय मंडळाने आणला आहे. त्याऐवजी पर्याय म्हणून ऑटोमोबाईल्स, रिटेल, मल्टी स्किल कोर्स, हेल्थकेअर, ब्युटी अ‍ॅण्ड वेलनेस यांसारख्या व्यावसायिक कोर्सेसचा समावेश शालेय अभ्यासक्रमात झाला आहे. (विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण द्यायला हवे, हे योग्य आहे; परंतु त्यात ब्युटी अ‍ॅण्ड वेलनेस यांसारखे अभ्यासक्रम ठेवणे म्हणजे चंगळवादी प्रवृत्तीला प्रोत्साहन देण्यासारखे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची हानीच होईल ! - संपादक) राज्यातील ७०० माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर राष्ट्र्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाच्या अंतर्गत व्यवसाय अभ्यासक्रमाचे धडे दिले जाणार आहेत.

पंढरपूर येथील चंद्रभागा नदीच्या वाळवंटातून वाळूची तस्करी !

ह.भ.प. शंकरबुवा शेटे महाराज यांच्या वर्तुळातील समाधीभोवतीची वाळू काढलेली छायाचित्रात दिसत आहे.
संत आणि सत्पुरुष यांंच्या समाध्यांचे पावित्र्य आणि अस्तित्व धोक्यात
वाळू तस्करीच्या किती घटना उघडकीला आल्यावर प्रशासन कारवाई करणार आहे ? हिंदूंनो, सत्पुरुषांच्या समाधीचे अस्तित्व धोक्यात आणणार्‍या वाळू तस्करांना वैध मार्गाने धडा शिकवा !
पंढरपूर, ६ नोव्हेंबर - येथील चंद्रभागा नदीचे पात्र आणि वाळवंट स्वच्छ अन् प्रदूषणमुक्त रहावे, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने अनेक निर्बंध लादले आहेत. त्यामध्ये वारकरी संप्रदायींना राहुट्या उभारणे, वाहने आणि जनावरे धुणे, श्री गणेशमूर्ती आणि निर्माल्य यांचे विसर्जन करणे यांस मज्जाव केला आहे; मात्र चंद्रभागेच्या पात्रात अवैध वाळूउपसा मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्यामुळे तेथील काही संत आणि सत्पुरुष यांच्या समाधी मंदिरांच्या भोवतालची वाळू खोदल्यामुळे त्यांचे अस्तित्व आणि पावित्र्यही धोक्यात आले आहे. (ही परिस्थिती उद्भवण्यास हिंदूसंघटनाचा अभावच कारणीभूत आहे, याकडे हिंदू जागृत होऊन लक्ष देतील का ? - संपादक) सद्गुरु दिगंबर महाराज तुकाराम देशपांडे, सद्गुरु तुकाराम महाराज पांडुरंग देशपांडे, ह.भ.प. शंकरबुवा शेटे महाराज आणि ह.भ.प. शांतारामबुवा गुरुजी वेंगुर्लेकर यांच्या समाध्या या ठिकाणी चंद्रभागेच्या वाळवंटात आहेत.

पोलीस अधिकार्‍यांच्या घरकामात कार्यरत पोलीस (ऑर्डली) बंदोबस्तासाठी उपलब्ध होणार

    नाशिक - पोलीस अधिकार्‍यांच्या घरी अक्षरशः घरगडी म्हणून अनेक वर्षांपासून काम करणार्‍या पोलिसांचा (ऑर्डली) आता बंदोबस्तासाठी उपयोग होणार आहे. राज्याचे नूतन पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी पोलीस अधिकार्‍यांना तत्काळ अतिरिक्त ऑर्डली अल्प करण्याचे आणि ऑर्डलींना सन्मानाने वागवण्याचे आदेश दिले आहेत.
१. पोलीस दलात महासंचालकापासून ते पोलीस उपअधीक्षकांना घरकामासाठी दोन-चार पोलीस ठेवण्याची मुभा होती. त्यांना ऑर्डली असे म्हटले जाते.
२. कालांतराने ऑर्डलींची संख्या वाढली आणि विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे ३०-४० पोलीस कामाला दिसू लागले. कोणत्याही अधिकार्‍याकडे जाऊन पाहिल्यास किमान आठ-दहा पोलीस रात्रंदिवस दिमतीला असतात.

पिंपरी (पुणे) येथे होणार्‍या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. श्रीपाल सबनीस यांची निवड

    पुणे, ६ नोव्हेंबर - पिंपरी-चिंचवड येथे होणार्‍या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी डॉ. श्रीपाल सबनीस यांची निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये सबनीस यांना ४८५ मते, तर त्यांचे प्रतिस्पर्धी विठ्ठल वाघ यांना ३७३ मते मिळाली आहेत. पुढील वर्षी जानेवारी २०१६ मध्ये पिंपरी-चिंचवडमध्ये हे संमेलन पार पडणार आहे.

गोरक्षकांच्या संरक्षणार्थ वर्धा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

 आंदोलनात सहभागी धर्माभिमानी
     वर्धा - कर्नाटकमधील बजरंग दलाचे कार्यकर्ता, तसेच गोरक्षक श्री. प्रशांत पुजारी यांच्या हत्येचा निषेध करणे, तसेच फटाक्यांचे दुष्परिणाम रोखणे या मागण्यांसाठी येथे ६ नोव्हेंबर २०१५ या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन घेण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. शशिकांत पाध्ये, सौ. भक्ती चौधरी आणि सनातन संस्थेच्या सौ. स्मिता हरदास, सौ. रत्ना हस्ती उपस्थित होत्या. वरील निवेदन निवासी जिल्हाधिकारी श्री. वैभव नावडकर यांना देण्यात आले.

प्रथमदर्शनी माहिती अहवालाची (एफ्आयआर्) छायांकित प्रत व्हॉटस् अ‍ॅपवर देण्याचे पोलीस महासंचालकांचे आदेश !

     पुणे, ६ नोव्हेंबर - गुन्हा प्रविष्ट केल्यानंतर प्रथमदर्शनी माहिती अहवालाची (एफ्आयआर्) प्रत पोलिसांनी देणे बंधनकारक आहे. असे असतांनाही अनेकदा पोलीस काही ना काही कारणाने तक्रारदाराला ती प्रत देण्यास टाळाटाळ करतात. याविषयी अनेक तक्रारी आल्यावर पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी त्याची नोंद घेतली. त्यांनी आदेश दिले आहेत की, तक्रारदाराला प्रथमदर्शनी माहिती अहवालाची प्रत द्यावी. ती देणे शक्य नसल्यास त्याचे छायाचित्र काढून शक्य तितक्या लवकर व्हॉटस् अ‍ॅप या सामाजिक संकेतस्थळावर पाठवावे. प्रत्येक पोलीस अधिकार्‍याला संगणकीय पत्ता असणेही बंधनकारक करण्यात आले आहे.

मायक्रोसॉफ्टच्या सहकार्याने मेळघाटचे होणार डिजिटल व्हिलेज

मेळघाटच्या अशा विकासापूर्वी तेथील कुपोषित बालकांचे प्रमाण
घटवण्यासाठी  शासन काय प्रयत्न करणार आहे, हेही सांगायला हवे !
    मुंबई - महाराष्ट्रातील कुपोषित बालकांसाठी प्रसिद्ध असलेल्या मेळघाटातील हरिसाल हे खेडे मायक्रोसॉफ्ट आस्थापनाच्या सहकार्याने देशातील पहिले डिजिटल व्हिलेज होणार आहे. मुंबईत मायक्रोसॉफ्टच्या वतीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात आस्थापनाचे सीईओ सत्या नाडेला यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. वर्षभरात अशा पन्नास खेडी-वस्त्यांना डिजिटल करण्याची शासनाचीच योजना आहे. मुख्यमंत्र्यांच्या अमेरिका दौर्‍यात भारतातील गाव डिजिटल करण्याची घोषणा मायक्रोसॉफ्टने केली होती. मेळघाटातील अमरावती बैतुल रस्त्यावरील हरिसालची त्यासाठी निवड झाली होती. १०० दिवसांत हा कायापालट होणार आहे.

पुरस्कार वापसीऐवजी लेखणीचे हत्यार वापरा ! - विनोद तावडे

पुरस्कार परत करणारे तथाकथित साहित्यिक याचा विचार करतील का ?
     पुणे, ६ नोव्हेंबर - लेखकांनी लेखणीच्या मार्गाने समाजातील चुकीचे वातावरण पालटावे. ते सामर्थ्य त्यांचेच आहे. त्यांनी ते ओळखून वापरावे. लेखकांची लेखणी आणि प्रतिभा यांच्यात ऊर्जा असते. ती लेखणी आणि ऊर्जा लेखकांनी हत्यारासारखी वापरावी. त्यातून समाजाला मार्गदर्शन करावे. पुरस्कार परत करणे, हा मार्ग योग्य नव्हे, असा सल्ला सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. विनोद तावडे यांनी दिला.
     पिंपरी येथे होणार्‍या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन ५ नोव्हेंबर या दिवशी केल्यावर ते बोलत होते. या वेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी.डी. पाटील, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, विद्यमान संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

काळेवाडी (पिंपरी) येथे सराफाच्या दुकानात दरोड्याचा प्रयत्न

दुकानदाराच्या ओरडण्यामुळे चोर पसार
     पिंपरी (जिल्हा पुणे) - येथील काळेवाडी बाजारपेठेतील एका सराफाच्या दुकानात तीन व्यक्ती गेल्या. त्यांनी सोने गहाण ठेवण्याच्या निमित्ताने बंदूक आणि चाकू यांच्या धाकावर दुकान लुटण्याचा प्रयत्न केला; मात्र दुकानदाराने आरडाओरडा करताच आजूबाजूचे व्यापारी आले. दरोडेखारांनी या कालावधीत व्यापार्‍यावर चाकूने आक्रमण केले आणि दागिने तिथेच सोडून ते पसार झाले. (दिवसाढवळ्या पडणारे दरोडे म्हणजे कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे लक्षण ! - संपादक)
    ही घटना ५ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता घडली. दिनेश भंवरलाल सोनी असे जखमी व्यापार्‍याचे नाव आहे. हा सर्व प्रकार क्लोज्ड सर्किट टीव्हीमध्ये छायांकित झाला आहे. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. (जनतेला सुरक्षित जीवन जगण्यासाठी शासनाने चांगले दिवस (अच्छे दिन) दाखवावेत, ही अपेक्षा ! - संपादक)

कल्याण-डोंबिवलीत सत्तास्थापनेसाठी शिवसेना-भाजप एकत्र येण्याचे संकेत

    ठाणे - कल्याण-डोंबिवलीमध्ये सत्तास्थापनेसाठी शिवसेना-भाजप एकत्र येण्याचे संकेत आहेत. याविषयी भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्री. रावसाहेब दानवे आणि शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री श्री. सुभाष देसाई यांच्यात चर्चा पार पडली; मात्र महापौर, स्थायी समिती सभापती कोण होणार, हे अद्याप ठरलेले नाही. भाजपच्या वतीने श्री. सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेनेकडून श्री. एकनाथ शिंदे पुढील चर्चा करणार आहेत, अशीही माहिती मिळते आहे.

अकोला येथे विद्यार्थ्यांना डबाबंद खिचडी देण्याचे नियोजन

     अकोला - येथील विद्यार्थ्यांना सेंट्रलाइज किचन सिस्टिमच्या माध्यमातून गरम डबाबंद खिचडी देण्यात येणार आहे, अशी माहिती अमरावती विभागाचे शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांनी दिली.
     राज्यात खिचडीच्या तांदळाची खुल्या बाजारात विक्री करून होणारा अपहार, खिचडीत निघालेल्या पाली, कीटकांमुळे विद्यार्थ्यांना झालेली विषबाधा यांसारखे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. या घटनेला मुख्याध्यापक, शिक्षकांना उत्तरदायी धरून त्यांच्यावर शासनाकडून कडक कारवाई करण्यात आली आहे. खिचडीच्या व्यापातून मुख्याध्यापकांना मुक्त करण्याची मागणी अनेक शिक्षक संघटना आणि आमदार यांनी शासनाकडे वारंवार केली, तसेच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडेही ती मागणी लावून धरली. त्यांनी स्वाक्षरीद्वारे सहमती दिली असून त्यासंदर्भातील पुढील प्रक्रिया लवकरच चालू करणे आत्तश्यक आहे.

नगर येथील लेंडी नदीवरील बेंदच्या ओढ्यात अज्ञात

आस्थापनाने घातक रसायन ओतले जनतेच्या आरोग्याशी खेळणारी आस्थापने !
     नगर, ६ नोव्हेंबर - येथील कामरगावमधील नागरिकांसाठी तलावाजवळ असलेल्या सामुदायिक विहिरीत एका अज्ञात आस्थापनाने ५ दिवसांपूर्वी मध्यरात्री घातक रसायन वहात्या पाण्यात ओतले. दूषित पाणी प्यायल्यामुळे एका ग्रामस्थाची म्हैस मरण पावली असून ग्रामस्थांच्या आरोग्याचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे.
    ग्रामस्थांनी या प्रकरणी अज्ञात आस्थापनाचा शोध घेण्याची मागणी केली असून नगर-पुणे रस्ता बंद करण्याची चेतावणी दिली आहे. या विहिरीतून पाणीपुरवठा केला जातो. हे पाणी लेंडी नदीवरील बेंदच्या ओढ्यातून नदीत जाते.

धर्मप्रचार सभा न्यासाच्या वतीने विनामूल्य योग शिबिर

योग शिबिरात योगासनांची प्रात्यक्षिके
करतांना सहभागी स्त्रिया 
   वर्धा - समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती यांसाठी कार्यरत धर्मप्रचार सभा न्यासाच्या वतीने वर्धा येथे पोद्दार बगीचा, शास्त्री चौक येथील श्री. रमेश चिमुरकर यांच्याकडे ४ नोव्हेंबर या दिवशी विनामूल्य योग शिबिर घेण्यात आले. 
    धर्मप्रचार सभा न्यासाच्या वेळी नियमितपणे समाजोपयोगी उपक्रम, उदा. फळेवाटप, खाऊवाटप, गणवेश वाटप, सार्वजनिक उत्सवातील अपप्रकारांच्या विरोधातील प्रबोधन, बालसंस्कार शिबिर, विनामूल्य वैद्यकीय तपासणी इत्यादी उपक्रम राबवण्यात येतात.

अपहृत युवकाला मारहाण केल्याप्रकरणी भाजपच्या नगरसेवकांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट

यासंदर्भात भाजप शासनाला काय म्हणायचे आहे ? 
     नागपूर - अपहरण करून युवकाला मारहाण केल्याप्रकरणी भाजपचे नगरसेवक आणि राज्य शासनाच्या कामगार कल्याण महामंडळाचे अध्यक्ष मुन्ना यादव यांच्या पत्नी लक्ष्मी, मुलगा, भाऊ आणि अन्य पाच जणांविरुद्ध धंतोली पोलिसांनी गुन्हा प्रविष्ट केला आहे. राहुल बुधबावरे असे घायाळ युवकाचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार वरील सर्वांनी राहुलचे अपहरण केले. त्याचे हातपाय बांधून त्याला मारहाण केली. नातेवाइकांनी राहुलला सोडण्याची विनंती केल्यावर त्याला सोडण्यात आले. नगरसेवकांच्या विरोधात याआधीही पोलीस ठाण्यात सहा गुन्हे प्रविष्ट आहेत.

सहा मासांत ठाणे वायफाययुक्त करू ! - मुख्यमंत्री

     ठाणे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे शहराला येत्या सहा मासांत वायफाययुक्त करू, अशी घोषणा केली. वाहतूक पोलिसांच्या डिजिटल वाहतूक नियंत्रण कक्षाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ५ नोव्हेंबर या दिवशी झाला. त्या वेळी ते बोलत होते.
    मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, येत्या काळात ठाणे शहरातील विविध भागांत पोलीस आणि महापालिका यांच्या माध्यमातून सुमारे १,५०० सीसीटीव्ही छायाचित्रक बसवून हे संपूर्ण शहर पोलिसांच्या नियंत्रणाखाली आणले जाईल. देशातील सर्वांत मोठे पोलीस बळ आपल्या राज्याकडे असून सुमारे दोन लक्ष पोलिसांचा फौजफाटा आहे. पोलिसांची संख्या वाढवण्यासंबंधी काही मर्यादा आहेत. त्यामुळे नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग गुन्ह्यांची उकल, तसेच पोलिसांवरील ताण अल्प करावा लागेल. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाणे पोलिसांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमावर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या आमदार आणि पदाधिकारी यांनी अघोषित बहिष्कार टाकला होता.

संभाजीनगर येथील १ सहस्र ७५ अनधिकृत धार्मिक स्थळांची सूची सिद्ध

केवळ धार्मिक स्थळेच का ? मुंबईतील कॅम्पा कोलासारख्या अनधिकृत 
इमारती पाडण्याची कारवाई तत्परतेने का झाली नाही ?
     संभाजीनगर - शहरात १ सहस्र ७५ धार्मिक स्थळे अनधिकृत असून महानगरपालिकेने त्यांची सूची सिद्ध केली आहे. या धार्मिक स्थळांना ७ डिसेंबरपर्यंत म्हणणे सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. रस्ता रुंदीकरणाआड येणार्‍या आणि अतिक्रमित धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यानुसार २६ ऑक्टोबरला झालेल्या पोलीस आयुक्तांच्या बैठकीनंतर ही सूची करण्यात आली. यासंदर्भात ९ डिसेंबरला सुनावणी होणार असून त्यानंतर निर्णय घेतला जाईल.

मुंबईत २ सहस्र अनधिकृत सिलेंडर कह्यात

    मुंबई - मुंबई महापालिकेने काही उपाहारगृहांवरील कारवाईचा सपाटाच लावला आहे. या अंतर्गत १९ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत सुमारे २ सहस्र ५९६ उपाहारगृहांची तपासणी करण्यात आली असून या कारवाईच्या अंतर्गत १ सहस्र ९३६ अनधिकृत सिलेंडर कह्यात घेण्यात आले आहेत. २ सहस्र १३३ उपाहारगृहांवर महापालिकेच्या नियम आणि पद्धतींनुसार कार्यवाही करण्यात येत आहे, असेही प्रशासनाने गुरुवारी स्पष्ट केले आहे.
    काहीच दिवसांपूर्वी कुर्ला पश्‍चिमेकडील सिटी किनारा उपाहारगृहात झालेल्या सिलेंडर स्फोटाच्या दुर्घटनेत आठ जण ठार झाले होते. त्यानंतर महापालिकेकडून ही कारवाई करण्यात येत आहे.

देवता आणि राष्ट्रपुरुष यांच्या चित्रांचे फटाके विक्री करणार्‍यांवर कडक कारवाई करू - उपजिल्हाधिकारी

संभाजीनगर येथे उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन
    संभाजीनगर - फटाक्यांवर देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे छापून, ऐन दिवाळीच्या काळात असे फटाके फोडून देवता आणि राष्ट्रपुरुष यांची विटंबना करणार्‍या विक्रेत्यांवर कडक कारवाई करू, असे आश्‍वासन उपजिल्हाधिकारी श्री. रविंद्र राजपूत यांनी दिले. तसेच या विषयीचे पत्र पोलीस आयुक्त यांना पाठवतो असेही त्यांनी सांगितले. उपजिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांना याविषयीचे निवेदन देण्यात आले. त्या वेळी त्यांनी हे सांगितले. या वेळी सनातन संस्थेचे श्री. शरद चावडा, श्री. अशोक कुलकर्णी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. गणेश देशपांडे, सौ. छाया देशपांडे आणि सौ. सुवर्णा निकम उपस्थित होते.

बेस्ट कर्मचार्‍यांसाठी ५ सहस्र सानुग्रह अनुदान (बोनस)

     मुंबई - बेस्टच्या कर्मचार्‍यांनाही महानगरपालिका कर्मचार्‍यांइतकेच १३ सहस्र ५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान दिवाळीनिमित्त मिळायला हवे, ही मनसेच्या सदस्यांनी मांडलेली उपसूचना सेना-भाजपच्या नगरसेवकांनी एकमुखाने फेटाळली. त्यामुळे बेस्ट कर्मचार्‍यांना ५ सहस्र रुपयेच अनुदान मिळणार आहे.

राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

१. बजरंग दलाचे कार्यकर्ते श्री. प्रशांत पुजारी यांची हत्या करणार्‍यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी
२. सर्व गोरक्षकांना पोलिसांचे संरक्षण मिळावे
३. दिवाळीत देवता, राष्ट्रपुरुष यांची चित्र असलेल्या फटाक्यांवर बंदी, तसेच फटाके विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी
४. आयएस्आयएस् या दहशतवादी संघटनेमध्ये सहभागी होऊ इच्छिणार्‍या २० बांगलादेशी मुसलमानांना भिवंडी येथे अटक करण्यात आली. या आतंकवादाचा निषेध करणे
...यासाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलनात सहभागी व्हा !
७ नोव्हेंबर २०१५
विक्रोळी (पूर्व) : बस डेपोजवळ, रेल्वे फाटक रिक्शा स्टॅण्डसमोर, स्टेशन मार्ग,
वेळ : सायं. ५.३० वाजता
संपर्क : ९७६९६९४७६९

संभाजीनगर येथील ३४ नगरसेवकांचे पद धोक्यात येण्याची शक्यता

हे लोकशाहीचे अपयश नव्हे का ?
     संभाजीनगर - येथे सात मासांपूर्वी झालेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या ३४ नगरसेवकांचे पद धोक्यात येणार असल्याचे समजते. दोनपेक्षा अधिक अपत्य असलेल्या आणि जात प्रमाणपत्र संशयाच्या भोवर्‍यात सापडलेल्या ३४ नगरसेवकांच्याविरोधात महानगरपालिकेने शासनाकडे अहवाल पाठवला आहे. आयुक्त प्रकाश महाजन यांनी नगरसेवक गजानन बारवाल यांनाही अतिक्रमण करून घर बांधल्याच्या आरोपावरून नोटीस बजावली आहे. त्यामुळे त्यांचेही नगरसेवकपद धोक्यात येऊ शकते. यासंदर्भात नगरसेवकाला नोटीस दिल्याचे किंवा शासनाकडे अहवाल पाठवल्याचे आयुक्त प्रकाश महाजन यांनी मान्य केले नाही.

रात्रीच्या वेळी भ्रमणभाष वापरण्यास प्रतिबंध केल्याने तरुणीची गळफास लावून आत्महत्या

धर्मशिक्षणाच्या अभावी छोट्या गोष्टींसाठी स्वत:चे जीवन संपवणारी भारताची तरुण पिढी ! 
    सोलापूर - रात्रीच्या वेळी भ्रमणभाष वापरण्यास भावाने प्रतिबंध केल्याने चिडून दीक्षा पुरुषोत्तम कुरापाटी (वय २१ वर्षे) या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दीक्षा ही रात्रंदिवस भ्रमणभाषवर खेळ खेळत असे. याविषयी सिव्हील पोलीस चौकीत घटनेची नोंद करण्यात आली आहे.

फटाके न उडवता विद्यार्थ्यांना कपडे देऊन शिवाजी मराठा हायस्कूलमधील विद्यार्थ्यांची अशीही दिवाळी...!

शिवाजी मराठा हायस्कूलमधील विद्यार्थ्यांचा आदर्श उपक्रम !
      कोल्हापूर, ६ नोव्हेंबर (वार्ता.) - येथील शिवाजी पेठेतील शिवाजी मराठा हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी अवघ्या १५ रुपयांत चांगला आकाश कंदील बनवला आहे. तसेच शाळेतील विद्यार्थी प्रतीवर्षी दीपावलीत फटाके न उडवता ते पैसे एकत्र करतात आणि शाळेतील गरजू मित्र आणि मैत्रिणी यांना कपडे खरेदी करण्यासाठी देतात. आपल्यासमवेत आपल्या मित्र-मैत्रिणींची दिवाळीही आनंदी बनवण्याचा हा उपक्रम विद्यार्थ्यातील माणूसपणा जपणार आहे. कलाशिक्षक श्री. मिलिंद यादव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. (शिवाजी मराठा हायस्कूलप्रमाणे इतर सर्व शाळांतील विद्यार्थ्यांनी फटाके न उडविता फटाके खरेदी करण्यासाठी लागणारे पैसे एकत्र करून असा उपक्रम राबवल्यास सर्व गरजू विद्यार्थी आनंदाने दिवाळी साजरी करतील. तसेच मुलांकडून सणांमध्ये फटाके उडवण्याची अशास्त्रीय कृतीही होणार नाही. शिवाजी मराठा हायस्कूलमधील विद्यार्थ्यांचा आदर्श सर्व शाळांतील विद्यार्थ्यांनी घेणे आवश्यक आहे. - संपादक) 

नवी मुंबईत नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार करणार्‍यास अटक

स्त्रिया आणि तरुणींसाठी असुरक्षित नवी मुंबई !
     नवी मुंबई - प्रसिद्ध आस्थापनात नोकरी देण्याचे आमिष दाखूवन अल्पवयीन मुलीला लॉजवर नेऊन बलात्कार करणार्‍या आरोपीला रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचे नाव विजय बनसोडे आहे. ही घटना २४ ऑक्टोबर या दिवशी घडली होती.
    ऐरोली सेक्टर क्र. १ परिसरात राहणार्‍या अल्पवयीन मुलीला माइंड स्पेस आस्थापनात नोकरी देण्याचे आमिष दाखवून वाशीतील लॉजवर नेऊन बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणी फरार तरुणाचा शोध घेऊन त्याला रबाळे पोलिसांनी तुर्भे स्टोअर येथून अटक केली आहे. आरोपीवर तुर्भे पोलीस ठाण्यामध्ये चार गुन्हे नोंद असून त्याला हद्दपार करण्यात आले आहे.

मराठी भाषा आणि हिंदु संस्कृती यांची थोरवी !

श्री. सागर निंबाळकर
     एकदा स्वच्छता करतांना एका साधकाची आठवण काढली आणि त्याच वेळी तो साधक तेथे उपस्थित झाला. तेव्हा पटकन् सर्व जण म्हणाले, बघा ! नाव काढले अन् तू आलास. तुला १०० वर्षे आयुष्य आहे !
    त्याच वेळी मला अशा प्रसंगात इंग्रजी आणि हिंदी भाषेमध्ये वापरल्या जाणार्‍या म्हणी आठवल्या. इंग्रजीत म्हणतात, Think of the devil and there he is ! आणि हिंदीमध्ये म्हणतात, शैतानका नाम लिया और शैतान हाजिर । (भुताचे नाव घेतले आणि भूत आले.) 
     आठवण काढल्यावर येणार्‍यास आम्ही मराठी माणसे दीर्घायुष्य चिंतितो, याउलट इंग्रजी आणि हिंदी भाषिक त्याला भुताची उपमा देतात. ही आहे आमच्या मराठी संस्कृतीची महानता !
- श्री. सागर निंबाळकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

श्री स्वामी समर्थांचा हितोपदेश : लोभाऐवजी धर्माने वागा !

१. लोभी पुजार्‍याने स्वामी समर्थांना पुण्यस्नान करण्यासाठी धन मागितल्याने त्यांनी निघून जाणे
     सेतुबंध रामेश्‍वरला पापविनाशक तीर्थकुंडे आहेत. तेथील एक पुजारी अतिशय धनलोभी होता. द्रव्याविना स्नान न घडे असे तो तीर्थावर स्नानाला येणार्‍या प्रत्येकाला सांगत असे. एकदा अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ तेथे आले असता त्या पुजार्‍याने त्यांनाही हेच सांगितले. श्री स्वामी म्हणाले, आम्ही निर्धन संन्यासी दिगंबर, कोठुनि द्यावा तुम्हासी कर, व्यर्थ किरकिर करू नका. त्यावर पुजारी म्हणाला, धनाविना कोरडे ब्रह्मज्ञान, विद्वत्ता सर्व निरर्थक त्याच्या म्हणण्याचा अर्थ होता ज्याच्या जवळ धन, त्यालाच पुण्यस्नान घडेल. हे ऐकून श्री स्वामी समर्थ तात्काळ निघून गेले.

विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि स्फूर्ती देणार्‍या गोष्टी श्री दत्तगुरूंनी गोरक्षनाथांच्या सिद्धीचे गर्वहरण करणे

दीपावलीच्या सुट्टीनिमित्त प्रतिदिन वाचा बोधकथा !
     परीक्षा संपून आता विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागल्या आहेत. सुट्ट्यांचा सदुपयोग व्हावा आणि सद्गुण, राष्ट्रभक्ती यांचे महत्त्व कळावे, यासाठी हे सदर प्रसिद्ध करत आहोत. पुढील गोष्टीतून वृथा अहंकार का बाळगू नये, हे लक्षात येईल.
     गोरक्षनाथांना स्वतःच्या सिद्धी-सामर्थ्याचा गर्व होता. त्या गर्वाचे परिहरण करण्यासाठीच ही दत्तभगवानांची योजना असावी की, जेणेकरून त्यांची भेट व्हावी अन् त्यातून त्यांचे प्रबोधन करून त्यांना अहंकारविरहित सिद्ध बनवावे.

भरकटलेली प्रसारमाध्यमे !

नुकतीच जन्माने भारतीय असलेल्या एका कुख्यात गुंडाला अन्य देशात अटक झाली. त्याविषयीचे वृत्त प्रसारमाध्यमांनी उचलून धरले आणि दिवसभर ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली त्या गुंडाला अटक झाल्याचे वृत्त वाहिन्यांनी चर्चेत आणले. एका वृत्तवाहिनीने तर कहरच केला ! जणू काही हा गुंड म्हणजे समाजमनाचा आदर्शच आहे, अशा आविर्भावात थेट त्याच्या गावात पोहोचून तेथील त्याचे घर, कुटुंबीय यांच्याविषयी ग्रामस्थांकडून जाणून घेतले आणि त्याची वैयक्तिक माहिती समाजासमोर आणली. एखाद्या गुंडाचे बालपण, त्याचे आयुष्य यांविषयी प्रसारमाध्यमांना जाणून घ्यावेसे वाटणे आणि ते प्रसारित करणे, हेच त्यांची वैचारिक पातळी दर्शवते.

परदेशी निधीचे नाक दाबल्यावर सहिष्णुतेचे तोंड उघडले !

खोटेपणाच्या आधारावर मोदींना बारा वर्षे आरोपी बनवणार्‍यांनी साधी माफी तरी मागितली का ?
श्री. भाऊ तोरसेकर
     आपण नेहमी कशाच्या तरी आधारे बोलत असतो. म्हणजे आपल्या हाती जी किंवा जेवढी माहिती आलेली असते, ती सत्य आहे, अशा आधारे आपली विविध विधाने चालू असतात; म्हणून ते दावे खरे असतात, असे अजिबात नाही. आपल्या हाती आलेली माहिती अपुरी वा संपूर्ण खोटी असू शकते; पण ती अपुरी वा खोटी असल्याचे कोणी सिद्ध करू शकत नसल्याने ही खरी ठरवली जाऊ शकते, उदाहरणार्थ गुजरातच्या दंगली मोदींनी मुख्यमंत्री म्हणून होऊ दिल्या वा त्यांना प्रोत्साहन दिले, असा आरोप सातत्याने होत राहिला; कारण गोध्रा येथे एका रेलडब्यातून प्रवास करणार्‍या ६० कारसेवकांना मुसलमान जमावाने जिवंत जाळले होते. त्यामुळे गुजरातमध्ये लोकमत प्रक्षुब्ध झाले होते.

दिवसेंदिवस दूरचित्रवाहिन्यांचे प्रस्थ वाढत असतांना त्यांचे समाजजीवनावर होत असलेले दुष्परिणाम

अत्यंत विलंबाने का होईना, आपल्या समाजातील विचार करणार्‍या लोकांना दूरदर्शनच्या दुरुपयोगाने कोवळी पिढी नासण्याची चिंता वाटू लागली; कारण याच लोकांनी प्रथम हौसेने आणि किंचित् अविचारीपणाने आपल्या दिवाणखान्यातच समाजाला अधोगतीस नेणारी साधने आणून ठेवली. जणू काही घरात दूरदर्शन आणि व्हीसीआर् असणे, हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले गेले. या दूरचित्रवाहिन्यांचे कुटुंब आणि समाज यांच्या जीवनावर कोणते दुष्परिणाम होत आहेत, ते पाहूया.
१. कुटुंब जीवनावरील दुष्परिणाम
अ. लेकी, सुना, आया, बहिणी, तसेच बाप-लेक आणि लहान मुले, तसेच अन्य कुटुंबीय आदींनी एकत्रितपणे दूरदर्शनवरील एरवी असभ्य वाटणारे कार्यक्रम पहाणे, हे पुरोगामित्वाचे लक्षण मानले जाऊ लागले.
आ. आपणच निर्माण केलेला हा राक्षस आपल्या भावी पिढीलाच नष्ट करणार आहे, याची सुतराम कल्पना या मनोरंजनमय झालेल्या ज्येेष्ठ पिढीला आली नाही.
इ. दूरदर्शनचा घरात प्रवेश झाल्यानंतर त्याच्या प्रथम आहारी गेली, ती घरात अधिक काळ रहाणारी मंडळी, म्हणजेच घरातील गृहिणी आणि निवृत्त किंवा वृद्ध स्त्री-पुरुष. तसेच गृहिणीला सहज दिसू शकेल, अशा ठिकाणीच बाहेरच्या खोलीत दूरदर्शन ठेवला जाई.

ब्रिटीश, मुसलमान, हिंदू आणि गाय !

     वर्ष १८५७ चे बंड किंवा क्रांतीयुद्धाच्या वेळी काडतुसाला गायीची चरबी लावल्याने काडतुसाचे बंद दाताने काढावे लागतात, ही वार्ता सैनिकांत पसरल्यावर इंग्रज आपणाला बाटविणार असून धर्म बुडवत आहेत, या श्रद्धेने सर्व सैनिक पेटून उठले आणि त्यांनी ब्रिटिशांना दे माय धरणी ठाय केले. १८५७ च्या युद्धाआधी ४ हिंदी शिपायांमागे १ इंग्रज शिपाई असे प्रमाण होते; परंतु ब्रिटिशांना इतकी धास्ती वाटू लागली की, त्यांचा हिंदी शिपायांवरील विश्‍वासच उडून गेला आणि त्यांनी दोन हिंदी शिपायांमागे १ इंग्रजी शिपाई असे प्रमाण ठेवले.

गायीचे पाप आणि पुण्य यांच्या संदर्भातील महत्त्व

१. गोदानाचे महत्त्व
१ अ. सुवर्णदानं गोदानं भूमिदानं तथैव च ।
नाशयन्त्यायु पापानि अन्यजन्मकृतान्यपि ॥ - संवर्तस्मृति २१४  
अर्थ : सुवर्णदान, गोदान, त्याचप्रमाणे भूमीदान ही दाने अन्य जन्मी केलेल्या पापांचाही सत्वर नाश करतात.

गोमातेचे महत्त्व जाणून घेण्यासाठी वाचा सनातन-प्रकाशित ग्रंथ !

गोसंवर्धन
(सेंद्रिय शेती आणि पंचगव्य चिकित्सा यांच्या लाभांसह)
  • सर्व पशूंमध्ये गायीलाच माता का म्हणतात ? 
  • निरोगी जीवनासाठी सेंद्रिय शेतीचे महत्त्व !
  • पंचगव्यांची वैशिष्ट्ये आणि त्यांचे औषधी गुणधर्म !
  • एका भारतीय गायीपासून वार्षिक ३ लक्ष रुपयांचे उत्पन्न कसे मिळवता येऊ शकते, याचे गणित !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची किंमत भारतियांना कळली नाही !

     स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी १२ सहस्र पानांच्या साहित्याची निर्मिती केली आहे, तर अन्य लेखकांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर १२ सहस्र पाने साहित्याचे लिखाण केले आहे. असा जगातील हा एकमेव नेता आहे. 
- श्री. शरद पोंक्षे, सुप्रसिद्ध अभिनेते आणि प्रखर हिंदुत्ववादी विचारवंत
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे आणि राष्ट्रीयत्व हेच भारतीयत्व !

जाणून घ्या दीपावलीचे धर्मशास्त्र !

दैनिक सनातन प्रभातचा 
रंगीत 
'दीपावली' विशेषांक !
प्रसिद्धी दिनांक : ८ नोव्हेंबर २०१५ 
मूल्य : ५ रूपये पृष्ठे : १० 
या अंकात वाचा...
१. दिवाळीतील सणांमागील अध्यात्मशास्त्र
२. अंगाला उटणे लावण्याची पद्धत
३. नरकासुर प्रतिमादहन आणि फटाक्यांचे प्रदूषण नकोच !
४. विविध सात्त्विक रांगोळ्यांच्या रंगीत कलाकृती !
५. आकाशकंदिल खरेदी करतांना हे लक्षात घ्या !
त्वरा करा ! आपली प्रत आजच राखून ठेवा !
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ७ नोव्हेंबर 
या दिवशी दुपारी ३.३० पर्यंत ईआर्पी प्रणालीत भरावी !
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
     या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

वसुबारस म्हणजेच दीपोत्सवास खर्‍या अर्थाने प्रारंभ

वसुबारस (गोवत्स द्वादशी)
     इतिहास : समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या, अशी कथा आहे. त्यातील नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे.
     उद्देश : या अन् पुढील अनेक जन्मांतील कामना पूर्ण व्हाव्यात आणि पूजा करत असलेल्या गायीच्या शरिरावर जितके केस आहेत, तितकी वर्षे स्वर्गात रहायला मिळावे.

समजंस आणि आज्ञापालन करणारा ५६ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला गोवा येथील कु. मोहित मिलिंद बोकाडे (वय १५ वर्षे) !


कु. मोहित बोकाडे
१. समंजसपणा
अ. कु. मोहित लहानपणापासूनच मित्रांसमवेत खेळतांना कधीच भांडत नाही. मित्र चिडून त्याला काही बोलल्यास तो शांत रहातो.
आ. अमुक एक खेळ किंवा वस्तू आणलीच पाहिजे, असा त्याने कधीच हट्ट केला नाही.
ई. आम्हाला सेवेला जायचे असल्यास तो कधीच अडवत नाही. खेळायला मित्र नसल्यास आपणच काहीतरी करत बसतो; पण चिडत नाही.
२. आज्ञापालन
      काही वर्षांपूर्वी प.पू. परूळेकर महाराजांनी त्याला सांगितले, विकतचे पदार्थ खाऊ नकोस.

आनंदी आणि उत्साही असणार्‍या, उतारवयातही तळमळीने साधना करणार्‍या अन् त्यागी वृत्ती असलेल्या ६१ टक्के पातळीच्या श्रीमती प्रतिमा ठक्कर (वय ७७ वर्षे) !

श्रीमती प्रतिमा ठक्कर
      श्रीमती प्रतिमा ठक्कर (वय ७७ वर्षे) यांची त्यांचा मुलगा, सून आणि साधक यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये, जाणवलेले पालट आणि त्यांना आलेल्या अनुभूती पुढे देत आहोत.
१. नीटनेटकेपणा
     आई स्वतःच्या सर्व वस्तू, कपाट, कपडे, ग्रंथ आणि स्वयंपाकघर व्यवस्थित अन् नीटनेटके ठेवते. प्रतिदिन ती वस्तूंची स्वच्छता करते आणि त्या जागच्या जागी ठेवते.

भृगुसंहिता आणि भृगुसंहितेचे वाचन करणारे पंडित लालदेव शास्त्री यांचे रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात शुभागमन होण्यापूर्वी अन् झाल्यानंतर केलेले सूक्ष्म-परीक्षण

कु. मधुरा भोसले
१. पंडित श्री. लालदेव शास्त्री आणि भृगुसंहिता
 यांचे आश्रमात आगमन होण्यापूर्वी
१ अ. सूक्ष्म-युद्धाची तीव्रता वाढल्याचे आणि नाडीपट्टीतील ज्ञानाची स्पंदने वातावरणात कार्यरत झाल्याचे जाणवणे : पू. लालदेव शास्त्री यांच्या आगमनाच्या तीन दिवस आधीपासून, म्हणजे ३१.१०.२०१५ पासून सूक्ष्म-युद्धाची तीव्रता वाढल्याचे जाणवत होते, तसेच सप्तर्षींच्या नाडीपट्टीतील चैतन्यमय ज्ञानाची स्पंदने पुष्कळ प्रमाणात वातावरणात कार्यरत झाल्याचे जाणवत होते.

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्याची गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकार्‍यांकडून चौकशी !

    हिंदु जनजागृती समितीच्या एका कार्यकर्त्याची गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकार्‍यांनी नुकतीच भ्रमणभाषद्वारे चौकशी केली. या वेळी त्यांनी समितीचे जिल्ह्यातील पदाधिकारी, समितीची सदस्यसंख्या, कार्यालय आदी माहिती विचारली. विशेष म्हणजे याआधीही अनेक वेळा समितीच्या या कार्यकर्त्याला ही माहिती विचारून झाली आहे. (वारंवार तीच तीच माहिती विचारून धर्मप्रेमींना नाहक त्रास देणारे, तसेच त्यांचा आणि स्वतःचा वेळ वाया घालवणारे पोलीस ! - संपादक) 

भृगुसंहितेसह होशियारपूर, पंजाब येथील पंडित लालदेव शास्त्री यांचे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आगमन झाल्यावर साधिकेला आलेल्या अनुभूती आणि तिने केलेले सूक्ष्म-परीक्षण

कु. कल्याणी गांगण
     आश्‍विन कृष्ण पक्ष सप्तमी, कलियुग वर्ष ५११७ (२.११.२०१५) या दिवशी सायं. ७.३० वाजता भृगुसंहिता आणि भृगुसंहितेचे वाचन करणारे होशियारपूर, पंजाब येथील पंडित लालदेव शास्त्री अन् त्यांची धर्मपत्नी सौ. धरोहर शास्त्री यांचे रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात शुभागमन झाले. त्या दिवशी मला आलेल्या अनुभूती आणि केलेले सूक्ष्म-परीक्षण पुढे देत आहे.
१. आगमनाच्या दिवशी आलेल्या अनुभूती
१ अ. सकाळी नवीन पंजाबी पोशाख घातल्यावर त्रास होणे, एका संतांच्या देव्हार्‍यातील विभूती लावल्यावर प्रसन्न वाटणे; परंतु सेवा करतांना उत्साह न वाटणे : आश्रमात भृगुमहर्षींचे आगमन होणार; म्हणून मी सकाळी ९ वाजता नवीन पंजाबी पोशाख घातला होता.

भृगुसंहितेचे रामनाथी आश्रमात आगमनहोण्यापूर्वी आणि नंतर आलेल्या अनुभूती

श्री. निमिष म्हात्रे
१. आगमन होण्यापूर्वी
१ अ. भृगुसंहितेच्या रूपात साक्षात् श्रीकृष्णच आश्रमात येणार असल्याचा विचार मनात येताच ध्यानमंदिरातील दिव्याला वाहिलेले फूल आनंदात डोलू लागणे आणि ते पाहून आनंद होणे : २.११.२०१५ या दिवशी भृगुसंहिता आणि भृगुसंहितेचे वाचक पंडित लालदेव शास्त्री यांचे आश्रमात आगमन होणार असल्याचे कळले. त्यानंतर ध्यानमंदिरात नामजप करतांना माझ्या मनात विचार आला, भगवान श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्गीतेत सांगितले आहे, महर्षींमधील भृगु मीच आहे. म्हणजे भृगुसंहितेच्या रूपात साक्षात् भगवान श्रीकृष्णच आश्रमात येणार आहे.

कर्नाटकच्या काँग्रेसी शासनाचा हिंदुद्वेष जाणा !

फलक प्रसिद्धीकरता
     कर्नाटक राज्यशासनाकडून १० नोव्हेंेबर या दिवशी क्रूरकर्मा टिपू सुलतानची २६६ वी जयंती साजरी करण्यात येणार आहे. शासनाने ऐन दिवाळीतच हा कार्यक्रम आयोजित केला असून तो उधळून लावण्याची चेतावणी विश्‍व हिंदु परिषदेने दिली आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Karnatak Shasan 10 November ko Hinduonpar atyachar karnewale Tipu Sulatan ki Jayanti Manayegi ! 
Tipupremi Karnatak Shasanka Hindudwesh Jano !
जागो ! 
कर्नाटक शासन १० नव्हंबरको हिंदूंआेंपर अत्याचार करनेवाले टिपू सुलतानकी जयंती मनाएगी !
टिपूप्रेमी कर्नाटक शासनका हिंदुद्वेष जानो !

भृगुसंहितेचे वाचक पंडित लालदेव शास्त्री आणि त्यांची धर्मपत्नी सौ. धरोहरदेवी शास्त्री यांच्या सत्संगातून शिकायला मिळालेली सूत्रे

     भृगुसंहिता आणि भृगुसंहितेचे वाचन करणारे होशियारपूर, पंजाब येथील पंडित लालदेव शास्त्री अन् त्यांची धर्मपत्नी सौ. धरोहर शास्त्री यांचे रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात शुभागमन झाले आहे. त्यांच्याविषयीे साधिकांना जाणवलेली सूत्रे आणि साधकांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत. 

साधकांना महत्त्वाची सूचना

साधकांनो, आश्रम, सेवाकेंद्र किंवा निवासस्थान येथे येणार्‍या अनोळखी व्यक्तींविषयी सतर्कता बाळगा !
    सनातन संस्थेचे विरोधक सनातन संस्था आणि संस्थेचे साधक यांच्यावर अवैध कारवायांत गुंतलेली अथवा राष्ट्रविरोधी संघटना असा ठपका ठेवून संस्थेवर बंदी घालण्याचा खटाटोप करत आहेत. विरोधकांचे हस्तक जिज्ञासू असल्याचा अथवा सनातनच्या कार्यात रस असल्याचा देखावा करून सनातनचे आश्रम, सेवाकेंद्र किंवा साधकांच्या निवासस्थानी येऊ शकतात आणि काही आक्षेपार्ह वस्तू तेथे ठेवून जाऊन पोलिसांकडे तक्रार करू शकतात. यामुळे संस्था आणि साधक अडचणीत येऊ शकतात. या पार्श्‍वभूमीवर साधकांनी सनातनचे आश्रम आणि सेवाकेंद्रे यांना भेट देण्यास येणार्‍या, तसेच सनातनचे कार्य जाणून घेणे, उत्पादने घेणे आदींचे निमित्त करून साधकांच्या निवासस्थानी येणार्‍या अनोळखी व्यक्तींविषयी दक्षता बाळगावी आणि त्यांच्याशी सावधपणे व्यवहार करावा. एखाद्या अविश्‍वासार्ह व्यक्तीने आश्रम, सेवाकेंद्र अथवा साधकांचे निवासस्थान येथे काही काळासाठी स्वतःचे वैयक्तिक साहित्य ठेवण्याची विनंती केल्यास त्यास नम्रपणे नकार द्यावा.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
मानसिक स्तरावरचा हिंदु धर्माचा प्रसार केवळ हिंदूंनाच एकत्र करू शकतो, तर आध्यात्मिक स्तरावरचा हिंदु धर्माचा प्रसार जगभरच्या सर्व मानवांना एक करून सर्वांना आनंद देऊ शकतो. - (परात्पर गुरु)
डॉ. आठवले (५.११.२०१५)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मनुष्याची बलवान शस्त्रे ! 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     जीवनसंग्राम यशस्वी करण्याकरता अनेक शस्त्रांची आवश्यकता असते; पण सर्वात बलवान शस्त्रे म्हणजे धैर्य आणि योग्य वेळ हीच होत ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र


इतरांकडे बघण्याचा दृष्टीकोन

॥ हरि ॐ तत्सत् ॥
संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
१. तुम्ही माझ्याकडे ज्या भावनेने पहाता, त्याच भावनेने मी तुमच्याकडे पहातो.
२. आपल्याकरिता कुणी नाही, आपण सर्वांकरिता आहोत.
३. दरिद्रका मुंह नहीं 
देखता । गरीबका साथ नहीं 
देता । लखपतीके घर नहीं 
जाता । धनवानके घर रहता हूं ।
     भावार्थ : दरिद्र, गरीब हे शब्द नाम न घेणार्‍याच्या संदर्भातील आहेत. लखपती हा मायेसंबंधातील, तर धनवान हा नाम घेणार्‍या साधकाला उद्देशून आहे. 
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

पुरस्काराचे खरे आणि खोटे मानकरी !

संपादकीय
     पुरस्कार वापसी, हे राष्ट्रीय पातळीवरील सूत्र सध्या सर्वत्र गाजत आहे. देशात असहिष्णुतेचे प्रमाण वाढत आहे, असा कांगावा करत हे पुरस्कार विजेते पुढे आले अन् स्वतःचा पुरस्कार परत करत असल्याचे त्यांनी घोषित केले. विविध क्षेत्रांत वैशिष्टपूर्ण कामगिरी बजावल्याच्या सन्मानार्थ त्यांना हे पुरस्कार बहाल करण्यात आले, असे थोडक्यात म्हणता येते. अशांचा मान-सन्मान करणे आणि ही मंडळी म्हणजे देशाचे अ‍ॅसेट्स आहेत, या भावनेने शासनाने त्यांच्याकडे पहाणे, अशी आपली शासकीय व्यवस्था आहे. देश त्यांच्याकडे गौरवाने पहातो.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn