Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

अपहृत मुलीची सुटका करणार्या पोलिसांवर धर्मांधांकडून दगडफेक !

देशात असहिष्णुता वाढत असल्याचा कांगावा करणार्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
धर्मांधांचा उद्दामपणा ! पोलिसांवरील धर्मांधांची आक्रमणे दिवसेंदिवस वाढत चालली आहेत, 
यावरून धर्मांधांना पोलिसांचा धाक राहिला नाही, हेच सिद्ध होते. याचा पोलीस प्रशासन आणि शासन यांनी गांभीर्याने विचार करावा !
वडीगोद्री (जिल्हा लातूर) - लातूर येथील एका अपहरण प्रकरणातील मुलीच्या शोधासाठी आलेल्या पोलीस पथकावर गोंदी ते वडीगोद्री रस्त्यावर दगडफेक केल्याची घटना २ नोव्हेंबरला दुपारी घडली. (कायद्याच्या रक्षकांवरच आक्रमणे होत असतील, तर जनतेचे रक्षण कोणकरणार ? - संपादक)

पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांचे देहलीसह भारतातील कार्यक्रम रहित

राष्ट्रप्रेमी शिवसेनेच्या प्रखर विरोधामुळे कार्यक्रम रहित केल्याची चर्चा
शत्रूराष्ट्राचा एकही कार्यक्रम भारतात न होण्यासाठी भारतियांमध्ये प्रखर राष्ट्रप्रेम निर्माण होणे, ही काळाची आवश्यकता आहे अन्यथा 'शत्रूराष्ट्राचा कार्यक्रम होऊ देणारा जगातील एकमेव देश भारत', अशी देशाची नवी ओळख निर्माण होईल !
नवी  देहली - प्रसिद्ध पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांचा देहलीत ८ नोव्हेंबरला होणारा कार्यक्रम रहित करण्यात आला आहे. गुलाम अली यांनी प्रकृतीच्या कारणास्तव हा कार्यक्रम रहित केल्याचे सांगण्यात येत आहे. गुलाम अली यांचा मुंबईतील कार्यक्रम शिवसेनेच्या विरोधामुळे रहित करण्यात आला होता. त्यानंतर आता देहलीतीलही कार्यक्रम शिवसेनेच्या विरोधामुळे रहित झाल्याचे बोलले जात आहे. (शिवसेनेसारखे प्रखर राष्ट्रप्रेम अन्य राजकीय पक्ष आणि संघटना यांच्यामध्ये कधी निर्माण होणार ? - संपादक) गुलाम अली यांनी देहलीपाठोपाठ भारतातील अन्य ठिकाणचे कार्यक्रमही रहित केल्याचे समजते. यापूर्वी मुंबईतील कार्यक्रम रहित झाल्यानंतर गुलाम अली यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुलाम अलींना देहलीत कार्यक्रम घेण्यासाठी नुकतेच आमंत्रण दिले होते. (शत्रूराष्ट्राच्या गायकांचा कार्यक्रम आयोजित करणार्यांची मानसिकता तपासण्याची वेळ आता आली आहे ! - संपादक)

तालिबानविरोधी लिखाण करणार्याा पाक पत्रकाराची हत्या

कराची - तालिबानच्या विरोधात लिखाण करणार्या पाकमधील एका वरिष्ठ पत्रकाराची आतंकवाद्यांनी हत्या केली. डॉ. महंमद झमन मेहसूद असे या पत्रकाराचे नाव आहे. मेहसूद हे उत्तर वझिरीस्तान रस्त्यावरून प्रवास करत होते. या वेळी एका दुचाकीवरून आलेल्या बंदूकधारी व्यक्तींने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. गंभीर घायाळ झालेले मेहसूद यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र  उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले.

'पुरस्कार वापसी'च्या विरोधात अभिनेते अनुपम खेर राष्ट्र्रपती भवनावर मोर्चा काढणार

नवी देहली - 'पुरस्कार वापसी' ही चळवळ राजकीय हेतूने प्रेरित आहे, अशी टीका करत ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी ७ नोव्हेंबर या दिवशी देहलीत मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. काँग्रेसने वाढत्या असहिष्णुतेचा निषेध करण्याच्या नावाखाली राष्ट्र्रपती भवनावर मोर्चा काढून राष्ट्रपतींना या घटनांची दखल घेण्याची विनंती केली होती. या पार्श्वढभूमीवर अभिनेते अनुपम खेर हे पुरस्कार वापसीच्या विरोधात मोर्चा काढणार आहेत. त्यांच्या या मोर्च्यात पुरस्कार वापसीला विरोध करणार्या अनेक कलाकारांचा समावेश असणार आहे. पुरस्कार वापसी ही भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर मलीन करण्यासाठी केलेले षड्यंत्र आहे, असा आरोप खेर यांनी केला आहे.

३०० आतंकवादी भारतात घुसखोरी करण्याच्या सिद्धतेत

श्रीनगर - पाकव्याप्त काश्मीरमध्ये दबा धरून बसलेले ३०० आतंकवादी प्रत्यक्ष ताबा रेषेवरून भारतात घुसखोरी करण्याच्या सिद्धतेत आहेत. ते थंडी आणि हिमवृष्टी चालू होण्यापूर्वी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यासाठी त्यांच्यावर दबाव आहे. अनेकदा आतंकवादी भारताची ताबारेषा ओलांडून येऊन गोळीबार करून जातात, अशी माहिती लेफ्टनंट जनरल एस्.के. दुआ यांनी दिली. गुरेज येथील ताबा रेषेवर नुकतीच आतंकवादी आणि सुरक्षा दल यांच्यात चकमक उडाली होती. या चकमकीतील आतंकवाद्यांचा घुसखोरी करण्याचाच डाव होता. त्यांचे मनसुबे उधळवून लावण्यासाठीची यंत्रणा मजबूत असल्याने या वर्षात घुसखोरी झालेली नाही. गुरेज येथून घुसखोरी करता येत नाही; पण आतंकवाद्यांनी डावपेच पालटलेले असावेत, असेही दुआ यांनी सांगितले.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गोमांस खाल्ल्यास त्यांचे मुंडके उडवीन !

गोमांसावरून दर दिवशी कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची प्रकरणे होण्यापेक्षा 
केंद्रशासनाने गोवंशहत्या बंदी कायदा भारतभर लागू करावा, ही अपेक्षा !
भाजपचे नेते एस्.एन्. चनाबसप्पा यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना चेतावणी
     बेंगळुरू (कर्नाटक) - मला गोमांस (बीफ) खायचे असल्यास कोणीही रोखू शकत नाही, असे वक्तव्य कर्नाटकचे काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले होते. त्यावर भाजपचे नेते एस्.एन्. चनाबसप्पा यांनी सिद्धरामय्या यांचे मुंडके उडवण्याची चेतावणी दिली आहे. यामुळे आणखी नवा वाद उफाळून आला आहे. चनाबसप्पा हे भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांचे निकटवर्तीय आहेत. या धमकीच्या प्रकरणी पोलिसांनी चनाबसप्पा यांना ३ नोव्हेंबर या दिवशी अटक केली आहे. चनाबसप्पा यांनी दिलेलेल्या चेतावणीमध्ये असे म्हटले आहे की, जर सिद्धरामय्या यांच्यात धाडस असेल, तर त्यांनी शिमोगा येथे येऊन गोमांस (बीफ) खाऊन दाखवावे. आम्ही त्यांना सोडून देऊ, असे जर त्यांना वाटत असेल, तर ते चुकीचे आहे. त्यांनी एखाद्या गायीची हत्या केली, तर आम्ही त्यांच्या धडापासून त्यांचे शिर वेगळे करू. 

काँग्रेसचा असहिष्णुता मोर्चा रॉबर्ट वाड्रा यांच्या भूमी घोटाळा उघड होण्याची प्रतिक्रिया आहे ! - भाजप

     नवी देहली - सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांचा भूमी घोटाळा उघडकीस येण्याची वेळ जवळ आली आहे. त्याची प्रतिक्रिया म्हणजे काँग्रेस पक्षाने राष्ट्र्रपती भवनावर काढलेला असहिष्णुता मोर्चा आहे, अशी टीका भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा आणि जी.व्ही.एल्. नरसिंह राव यांनी एका पत्रकार परिषदेत केला. पात्रा म्हणाले, अंमलबजावणी संचनालयाने रॉबर्ट वाड्रा यांच्या मालकीच्या आस्थापनांवर नुकताच छापा टाकून अनेक महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत केली. त्यामुळे भूमी घोटाळ्याचे प्रकरण सोनिया गांधींच्या दारापर्यंत येऊन पोहोचले आहे. लवकरच जनतेसमोर काँग्रेसचा खरा तोंडवळा उघडकीस होईल.

पुणे येथील संत प.पू. आबा (नरसिंह) उपाध्ये यांचे देवद (पनवेल) येथील आश्रमात शुभागमन !

(बसलेले) प.पू. आबा (नरसिंह) उपाध्ये आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ. मंगला उपाध्ये (समोर बसलेले) प.पू. पांडे महाराज यांच्याशी संवाद साधतांना अन् समवेत (उभे)  पू. राजेंद्र शिंदे

रामनाथी येथील सनातनच्या आश्रमासमोरील फाटकाचे काम करणार्या साधकाला अर्वाच्च भाषेत धमकी दिल्यावरून सनातनची पोलिसांत तक्रार

  रामनाथी (गोवा) - येथील सनातनच्या आश्रमासमोरील मुख्य प्रवेशद्वारावरील फाटकाची (गेटची) दुरुस्ती करण्याचे काम चालू आहे. १.११.२०१५ या दिवशी दुपारी ३ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास दुरुस्तीचे काम चालू असतांना समोरील रस्त्यावरून रामनाथीहून कवळे येथे जाणारे चारचाकी वाहन क्रमांक जी ए ०५ - बी ५०५४ यातील एका व्यक्तीने 'तुम्हाला एक 'गेट' पुरत नाही का ? ही जागा तुमच्या बापाची आहे का ?', अशी अर्वाच्च भाषेत विचारणा करून धमकावले, अशी तक्रार सनातन संस्थेच्या वतीने फोंडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 

साधकांना महत्त्वाची सूचना

साधकांनो, आश्रम, सेवाकेंद्र किंवा निवासस्थान येथे येणार्या अनोळखी व्यक्तींविषयी सतर्कता बाळगा !
सनातन संस्थेचे विरोधक सनातन संस्था आणि संस्थेचे साधक यांच्यावर 'अवैध कारवायांत गुंतलेली' अथवा 'राष्ट्रविरोधी संघटना' असा ठपका ठेवून संस्थेवर बंदी घालण्याचा खटाटोप करत आहेत. विरोधकांचे हस्तक जिज्ञासू असल्याचा अथवा सनातनच्या कार्यात रस असल्याचा देखावा करून सनातनचे आश्रम, सेवाकेंद्र किंवा साधकांच्या निवासस्थानी येऊ शकतात आणि काही आक्षेपार्ह वस्तू तेथे ठेवून जाऊन पोलिसांकडे तक्रार करू शकतात. यामुळे संस्था आणि साधक अडचणीत येऊ शकतात. या पार्श्व भूमीवर साधकांनी सनातनचे आश्रम आणि सेवाकेंद्रे यांना भेट देण्यास येणार्या्, तसेच सनातनचे कार्य जाणून घेणे, उत्पादने घेणे आदींचे निमित्त करून साधकांच्या निवासस्थानी येणार्या अनोळखी व्यक्तींविषयी दक्षता बाळगावी आणि त्यांच्याशी सावधपणे व्यवहार करावा. एखाद्या अविश्वाषसार्ह व्यक्तीने आश्रम, सेवाकेंद्र अथवा साधकांचे निवासस्थान येथे काही काळासाठी स्वतःचे वैयक्तिक साहित्य ठेवण्याची विनंती केल्यास त्यास नम्रपणे नकार द्यावा.

भारतात असुरक्षित वाटत असेल, तर अभिनेता शाहरुख खान यांनी पाकमध्ये येण्याचा आतंकवादी हाफिज सईद याचा सल्ला !

भारतात असहिष्णुता वाढल्याचा कांगावा करणारे शाहरूख खान 
यांनी खुशाल पाकमध्ये चालते व्हावे !
     नवी देहली, ४ नोव्हेंबर - अभिनेता शाहरुख खान यांनी देशात असहिष्णुता वाढत असल्याचे म्हटले आहे. त्यावरून मुंबईत झालेल्या २६/११ च्या आतंकवादी आक्रमणाचा सूत्रधार आणि आतंकवादी हाफिज सईद याने ट्विटरवरून सल्ला देतांना असे म्हटले आहे की, क्रीडा, कला आणि संस्कृती या क्षेत्रांत काम करणार्‍या भारतीय मुसलमानांना भारतात अस्तित्वाची लढाई करावी लागत आहे. प्रत्येक मुसलमान व्यक्तीला भारतात सावत्र वागणूक मिळत आहे. याला अभिनेता शाहरुख खानदेखील अपवाद नाही. शाहरुखला भारतात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शाहरुख खानला भारतात असुरक्षित वाटत असेल, तर त्याने पाकिस्तानात येऊन रहावे.

शाहरुख खान हा पाकिस्तानचा दलाल असल्याने त्याला तिकडेच पाठवा ! - साध्वी प्राची

अशी सडेतोड भूमिका किती देशप्रेमी घेतात ?
     मुझफ्फरनगर, ४ नोव्हेंबर - अभिनेता शाहरुख खान हा पाकिस्तानच्या विचारसरणीचा प्रसार करत असल्याने तो त्यांचा दलाल (एजंट) आहे. अशा व्यक्तीने पाकिस्तानातच जावे. तो पाकिस्तानचा दलाल असल्यामुळे त्याला तिकडेच पाठवणे योग्य होईल, असे विधान हिंदू महासभेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी केले आहे. देशात असहिष्णुता वाढत असल्याचे मत शाहरुख खान यांनी ३ नोव्हेंबर या दिवशी व्यक्त केले होते. त्यावर साध्वी प्राची यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे. साध्वी प्राची यांनी यापूर्वी अभिनेते सलमान खान आणि आमीर खान यांच्यावरही सांस्कृतिक हिंसाचार पसरवत असल्याचा आरोप केला होता.

मध्यप्रदेशचे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अर्जुनसिंह यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसकडून भारत-पाकिस्तान मुशायरा कार्यक्रमाचे आयोजन

काँग्रेसींच्या पाकप्रेमाला पुन्हा ऊत !
देशात वारंवार आतंकवादी कारवाया करणार्‍या आणि सीमेवर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करून 
भारतीय सैनिकांचे बळी घेणार्‍या शत्रूराष्ट्र पाकशी मैत्री करणार्‍या काँग्रेसींचा हा देशद्रोह 
नव्हे का ? प्रखर राष्ट्रप्रेमींना ही कृती सहन कशी होणार ?
     भोपाळ (मध्यप्रदेश) - पाकिस्तानकडून प्रतीदिन भारताचे लचके तोडले जात असतांना पाकिस्तानवरच्या एकतर्फी प्रेमातून काही मंडळींकडून पाकिस्तानी कलाकारांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महेंद्रसिंह यांच्या पाकप्रेमाला असाच ऊत आला असून मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अर्जुनसिंह यांच्या जयंतीनिमित्त महेंद्रसिंह यांनी येथे भारत-पाक मुशायरा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ५ नोव्हेंबर या दिवशी अर्जुनसिंह यांची जयंती आहे. 

मुशर्रफ यांची पुन्हा गरळओक (म्हणे), मोदींपासून मुसलमान आणि पाकिस्तान यांना धोका !

कट्टर जिहादी आतंकवादी पाळणार्‍या पाकपासून केवळ भारतालाच नव्हे,
तर सबंध जगाला धोका आहे, याकडे मुशर्रफ सोयीस्करपणे दुर्लक्ष का करतात ?
      लाहोर - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुसलमान आणि पाकिस्तान यांच्या विरोधात आहेत. मोदी यांच्यापासून या दोघांनाही धोका आहे, अशी गरळओक पाकचे माजी अध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांनी केली. मुशर्रफ म्हणाले, अडचण भाजपमध्ये नसून मोदी यांच्यात आहे. भाजप किंवा काँग्रेस या पक्षांचा काही संबंध नाही. अटलबिहारी वाजपेयी भाजपचे पंतप्रधान असूनही ते एक उत्तम व्यक्तीमत्व होते. प्रश्‍न सोडवण्यासाठी ते गंभीर असत आणि त्यांना त्यात स्वारस्य असायचे; तथापि सध्या मोदी हीच अडचण आहे. भारतात गोहत्येच्या अफवेवरुन एका व्यक्तीला मारून टाकण्यात आले. ही कोणती मानवता झाली ? ज्यांनी कोणी हे केले असेल, त्यांना आतंकवादी ठरवले पाहिजे. असेच जर होत राहिले, तर भारतात मुसलमानांचे भविष्य चांगले दिसत नाही.

संभाजीनगर येथील एका पोलीस अधिकार्याकडून शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांना दमदाटी !

संभाजीनगर येथील मंदिरे पाडण्याच्या प्रकरणाचे पडसाद !
   संभाजीनगर येथील नरहरी सोनार यांचे मंदिरही पाडण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे येथे विश्वकर्मा पांचाळ सोनार समाजाच्या वतीने 'हे मंदिर पूर्ववत बांधून द्यावे अन्यथा आंदोलन करू', अशी चेतावणी देण्यात आली आहे. हे मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ समाजाच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
संभाजीनगर - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार बजाजनगर येथील मंदिरे पाडण्यात आली आहेत. तेथे कोणी मूर्ती ठेवून पूजा करणार असल्यास खपवून घेणार नाही. मंदिर बांधण्याचा विचारही कोणी मनात आणू नका. पाडापाडी केलेल्या जागेवर ठेवलेल्या मूर्ती घरी घेऊन जा आणि जागा मोकळ्या करा, अशा  शब्दांत येथील एका पोलीस अधिकार्याने निवेदन देण्यास गेलेल्या शिवसेना महिला आघाडीच्या शिष्टमंडळास दमदाटी केली. गेल्या आठवड्यात महसूल प्रशासनाने बुलडोझर लावून येथील चार मंदिरे पाडली; मात्र रस्त्यात येणारे दर्गे आणि मशिदी यांना धक्काही लावण्याचे धाडस त्यांना झाले नाही. उलट मंदिरे पाडणारे तहसीलदार मनुलोड यांना जाब विचारल्याच्या प्रकरणी शिवसेना उपनेते खासदार श्री. चंद्रकांत खैरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. (संदर्भ : दैनिक सामना)  
शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांचे पोलीस अधिकार्यांरना प्रश्न
१. सर्वोच्च न्यायालयाचा आधार घेत हिंदूंची मंदिरे का पाडली जात आहेत ?
२. सहा वर्षांनंतर या कायद्याची कार्यवाही करण्याची आठवण झाली का ?
३. संपूर्ण देशात हा कायदा लागू असतांना केवळ संभाजीनगरमध्येच मंदिरे का पाडली जात आहेत ?

देहलीतील उपाहारगृहांत मिळणार्या गोमांसावर बंदी घाला !

विहिंपचे उपराज्यपालांना पत्र
नवी देहली - 'केरळ हाऊस'मधील गोमांसावरून घडलेल्या प्रकरणानंतर देहलीतील उपाहारगृहांत मिळणार्या गोमांसावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र देहली क्षेत्रीय गोरक्षा प्रमुख श्री. राष्ट्रप्रकाश आणि विश्व हिंदु परिषदेचे देहलीचे सहसचिव श्री. रामपालसिंग यादव यांनी उपराज्यपाल नजीब जंग यांना लिहिले आहे.

राज्यस्तरावर विडंबनात्मक फटाक्यांची विक्री थांबवण्यासाठी प्रयत्न करू ! - पुणे जिल्हाधिकारी

पोलीस आयुक्त श्री. कौशल पाठक (मध्यभागी) यांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी
फटाक्यांच्या माध्यमातून होणारे देवता आणि क्रांतीकारक यांची विटंबना रोखण्याची चळवळ
      पुणे, ४ नोव्हेंबर (वार्ता.) - फटाक्यांच्या माध्यमांतून होणारी देवता आणि क्रांतीकारक यांची विटंबना थांबवण्यासाठी जिल्ह्यांमध्ये संबंधितांना सूचना देऊ, तसेच राज्यस्तरावर उद्योग संचालनालयाच्या माध्यमातून अशा प्रकारच्या फटाक्यांच्या विक्रीला प्रतिबंध घालता येईल का, ज्या तमिळनाडू राज्यात फटाक्यांची निर्मिती होते, त्यांच्याशी राज्यशासनाच्या माध्यमातून बोलून अशा फटाक्यांचे उत्पादन थांबवता येईल का, ते पाहू, असे आश्‍वासन पुणे जिल्हाधिकारी श्री. सौरभ राव यांनी दिले.

'आम्ही सारे फाऊंडेशन' संस्थेच्या वतीने १६ ते १८ नोव्हेंबर या काळात पणजी येथे 'गोव्यातल्या गप्पा' कार्यक्रमाचे आयोजन : धर्मद्रोह्यांचा सहभाग

  • डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या आठवणी यांसह विविध विषयांवर चर्चा 
  • कलबुर्गी यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकणार 
     पणजी - देशात असहिष्णुतेसंबंधी निषेध आणि 'पुरस्कारवापसी' सारखे कार्यक्रम होत आहेत; मात्र गोमंतकात सहिष्णुता हाच सामाजिक जीवनाचा एक मूलमंत्र बनला आहे आणि म्हणून गोमंतकात मोकळ्या विचारांच्या मित्रांची मोकळी चर्चा घडवून आणण्यासाठी 'आम्ही सारे फाऊंडेशन' या संस्थेच्या वतीने १६ ते १८ नोव्हेंबर या काळात कांपाल, पणजी येथील युथ हॉस्टेलच्या प्रांगणात 'गोव्यातल्या गप्पा' या अनोख्या साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

माझा प्रत्येक श्‍वास सनातन वैदिक धर्माच्या पुनरुत्थानासाठीच ! - भीष्माचार्य ह.भ.प. निवृत्ती महाराज वक्ते

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे सनातन संस्था आणि हिंदु 
जनजागृती समिती यांच्या वतीने ह.भ.प. निवृत्ती महाराज वक्ते यांचा सन्मान 
ह.भ.प. निवृत्ती महाराज यांचा
सन्मान करताना श्री. अरूण बट्टेवार आणि अन्य
     पंढरपूर (जिल्हा सोलापूर), ४ नोव्हेंबर (वार्ता.) - सध्या हिंदु धर्मावर धर्मद्रोही आणि पुरोगामीत्वाचा टेंभा मिरवणार्‍यांकडून आक्रमणे वाढत आहेत. मी आतापर्यंत सनातन वैदिक धर्माचे रक्षण आणि संवर्धन यांसाठी लढत आहे. माझ्याप्रमाणे धर्मासाठी झटणारे लक्षावधी कार्यकर्ते निर्माण होऊन आर्य सनातन वैदिक हिंदु धर्माच्या पुनरुत्थानाचे कार्य ईश्‍वरकृपेने व्हावे, तसेच माझा प्रत्येक श्‍वास, क्षण, सनातन वैदिक हिंदु धर्मासाठीच कारणी पडावा, असे भावपूर्ण उद्गार वारकरी संप्रदायाचे पितामह ह.भ.प. निवृत्ती महाराज वक्ते उपाख्य बाबा यांनी काढले. त्यांच्या ८२ व्या जन्मदिनाप्रीत्यर्थ हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने सनातनचे साधक श्री. अरूण बट्टेवार यांच्या हस्ते शाळ, श्रीफळ, हार आणि पेढे अर्पण करून त्यांचा सन्मान करण्यात आला. त्या वेळी महाराज बोलत होते. 

धर्मांधाकडून तीन गोणी भित्तीपत्रके कह्यात

बंगालीबाबा मोहम्मद फारुखला जादूटोणा कायद्याच्या अंतर्गत अटक !
      मुंबई - जादूटोणाविरोधी कायद्याखाली पोलिसांनी गुरु मिर्झाजी उपाख्य मोहम्मद फारुख याला अटक करण्यात आली आहे. पश्‍चिम रेल्वेच्या राज्य राखिव दलाच्या (आर्पीएफ्) पोलिसांनी ही कारवाई केली. राज्य राखीव दलाने रेल्वेचा परिसर विद्रूप करणार्‍यांवर सुद्धा कठोर कारवाई करण्याची चळवळ राबवली होती. त्या अंतर्गत भाईंदर ते बोरिवली या दरम्यान बंगालीबाबांची भित्तीपत्रके चिकटवणारी टोळी कार्यरत असल्याचे राज्य राखीव दलाला समजले.

जाणून घ्या दीपावलीचे धर्मशास्त्र !

दैनिक सनातन प्रभातचा 
रंगीत 
'दीपावली विशेषांक' !
      प्रसिद्धी दिनांक : ८ नोव्हेंबर २०१५ 
      मूल्य : ५ रूपये पृष्ठे : १० 
      या अंकात वाचा... 
  • १. दिवाळीतील सणांमागील अध्यात्मशास्त्र 
  • २. अंगाला उटणे लावण्याची पद्धत 
  • ३. नरकासुर प्रतिमादहन आणि फटाक्यांचे प्रदूषण नकोच ! 
  • ४. विविध सात्त्विक रांगोळ्यांच्या रंगीत कलाकृती ! 
  • ५. आकाशकंदिल खरेदी करतांना हे लक्षात घ्या ! 

त्वरा करा ! आपली प्रत आजच राखून ठेवा ! 

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ७ नोव्हेंबर 
या दिवशी दुपारी ३.३० पर्यंत 'ईआरपी प्रणाली'त भरावी !

या देशात रहायचे असेल, तर मुसलमानांनी देशाचा सन्मान राखावा ! - सलीम खान

      मुंबई - मोदी जराही धर्मांध नाहीत. जगात भारताएवढा चांगला देश दुसरा कोणताही नाही. मुसलमानांना या देशात राहायचे असेल, तर त्यांनी देशाचा सन्मान राखला पाहिजे. जगात अल्पसंख्यांकांना रहाण्यायोग्य भारतापेक्षा दुसरा कोणताही देश असू शकत नाही.
     भारतातील मुसलमान पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, इराकमध्ये रहायला इच्छुक असतील का ? जर भारतच एकमेव देश आहे, जिथे तुम्ही राहू इच्छिता, तर या देशाचा आणि येथील संस्कृतीचा तुम्ही आदर केला पाहिजे. आपसातील प्रेम वाढविले पाहिजे, असे प्रतिपादन लेखक आणि अभिनेता सलमान खान याचे वडील सलीम खान यांनी मुसलमानांना केले आहे. एका इंग्रजी दैनिकाला मुलाखत देतांना देशात उठलेल्या असहिष्णुतेच्या सूत्राविषयी ते बोलत होते.

कृष्णाजी भास्कर कुलकर्णी वध दिन साजरा करण्यास वाई येथील समस्त हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध

पत्रकार परिषदेला संबोधित करतांना हिंदुत्ववादी
      सातारा, ४ नोव्हेंबर (वार्ता.) - १० नोव्हेंबर या दिवशी प्रतापगडावर भारतीय रक्षक आघाडीच्या वतीने कृष्णाजी भास्कर कुलकर्णी वध दिन साजरा करण्यात येणार आहे. या जातीद्वेष पसरवणार्‍या जाहीर कार्यक्रमास वाई येथील समस्त हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध दर्शवला आहे. याविषयी ३ नोव्हेंबर या दिवशी श्रीमती विजयाताई भोसले यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने आज पुणे येथे स्नेह मेळावा

     पुणे - अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने ५ नोव्हेंबर २०१५ या दिवशी पुणे येथे स्नेह मेळाव्याचे आयोजन केले आहे. आयएम्ए (नीतू मांडके) सभागृह, टिळक रस्ता, पुणे येथे सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होईल. या मेळाव्याला महासंघाचे अध्यक्ष श्री. गोविंद कुलकर्णी आणि अन्य पदाधिकारी यांच्यासह शिवसेनेचे खासदार श्री. अरविंद सावंत यांची उपस्थिती असणार आहे.

पोलिसांवर आक्रमण करणार्‍या आणि युवकांना फूस लावणार्‍या मुसलमान धर्मगुरूला अटक !

हिंदू संतांच्या वृत्तांच्या वेळी 'ब्रेकींग न्यूज' 
देणारी माध्यमे हे वृत्तही देत नाहीत, हे लक्षात घ्या ! 
     यवतमाळ - युवकांना राष्ट्रविरोधी कारवायांसाठी उद्युक्त करत असल्याच्या कारणावरून महाराष्ट्र पोलिसांच्या आतंकवादविरोधी पथकाने मुसलमान धर्मगुरु मौलाना अब्दुल रजाक याला अटक केली आहे. येथील पुसाड भागातून मेंहदिया मशिदीतून त्याला अटक करण्यात आली. युवकांना सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून धार्मिक विधाने करून भडकवण्याचे काम करत असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. आतंकवादविरोधी पथकाने त्याला विशेष न्यायालयात उपस्थित केले. त्याला १२ नोव्हेंबरपर्यंत चौकशीसाठी कोठडीत ठेवण्यात आले आहे. मौलवीचे नाव अब्दुल मलिक अब्दुल रजाक आहे. मेंहदिया मशिदीबाहेर राज्याच्या विशेष पोलीस पथकावर त्याने धारधार शस्त्रांनी आक्रमण केले होते. या वेळी त्याने गोमांसबंदीच्या विरोधात घोषणा दिल्या होत्या. महाराष्ट्र आतंकवादविरोधी साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कोल्हे यांनी याप्रकारे लोक युवकांची दिशाभूल करत आहेत आणि त्यांना शासनाच्या विरोधात भडकवत आहेत.

दिवाळीच्या कालावधीत २० दिवसांसाठी १० टक्के भाडेवाढ

अन्य धर्मियांच्या सणांच्या कालावधीत अशी भाडेवाढ कधी लागू केली जाते का ?
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा हिंदुद्वेष्टेपणा !
     धुळे - दिवाळीच्या तोंडावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एस्टीने) हंगामी भाडेवाढ घोषित केली आहे. ४ नोव्हेंबरपासून १० टक्के भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून लागू होणारी ही भाडेवाढ २५ नोव्हेंबरपर्यंत म्हणजे २० दिवसांसाठी असेल. या भाडेवाढीचा फटका प्रवाशांना बसणार आहे. (हिंदूंनो, तुमच्या असंघटितपणामुळेच तुमच्या सणांच्या वेळी अशी भाडेवाढ लागू केली जात आहे, हे लक्षात घ्या आणि सनदशीर मार्गाने याविषयी राज्य परिवहन प्रशासनाला विचारा ! - संपादक)

गेट-वे ऑफ इंडिया येथे तिरंगा फडकवण्यात यावा ! - अभिषेक घोसाळकर, नगरसेवक

मुंबईच्या प्रवेशद्वारावर तिरंगा लावण्याची मागणी करणारे 
 राष्ट्रप्रेमी नगरसेवक श्री. अभिषेक घोसाळकर यांचे अभिनंदन ! 
     मुंबई - विधानभवन, मंत्रालय, महापालिका मुख्यालय आणि अन्य शासकीय इमारती यांवर भारताचा तिरंगाध्वज फडकवला जातो. त्याप्रमाणे भारताचे मुंबईतील प्रवेशद्वार गेट-वे ऑफ इंडिया येथेही तिरंगा फडकवण्यात यावा, अशी मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे नगरसेवक श्री. अभिषेक घोसाळकर यांनी केली आहे. 

कोकणकन्या एक्सप्रेसमध्ये लूटमार करणार्‍या टोळीला अटक

लूटमारीच्या वाढत्या घटना म्हणजे राज्यात अराजक वाढत असल्याचेच द्योतक ! 
     पनवेल - पहाटेच्या वेळी येथे आलेल्या कोकणकन्या एक्सप्रेसमधून जवळजवळ ७१ लाख ५६ सहस्र रुपयांचे सोने चोरणार्‍या टोळीला रेल्वेच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपींकडून २६ लाख ८० सहस्रांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. पनवेलजवळ गाडी येताच पाच जणांनी सुरा आणि पिस्तुल यांचा धाक दाखवत त्या दोघांकडे असलेल्या दागिन्यांच्या दोन बॅगा हिसकावून पळ काढला होता. याप्रकरणी पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट झाल्यानंतर वरील कारवाई करण्यात आली.

पुरस्कार परत करण्याने समाज सहिष्णु होणार का ? - अभिनेते विक्रम गोखले

पुरस्कार परत करणारे साहित्यिक, लेखक, कलाकार आदींकडे याचे उत्तर आहे का ?
     कोल्हापूर - ज्या तीन विचारवंतांची हत्या झाली, त्याचा मी कडक शब्दांत निषेधच करतो. गेल्या ६७ वर्षांत अशा घटना भारतामध्ये घडल्या नाहीत का ? मग या वाढत्या असहिष्णुतेविषयी मी काय करू शकतो, याचा विचार करून तशी कृती केली पाहिजे. मी लेखक असलो, तर लेख लिहिले पाहिजेत. अभिनेता, दिग्दर्शक असेन, तर तशी कलाकृती सादर केली पाहिजे. पुरस्कार परत करण्याने लगेच समाज सहिष्णु होतो का ? तुमच्या कामाप्रति आदरभाव व्यक्त करण्यासाठी पुरस्कार दिले जातात. ज्यांनी विचारपूर्वक हे पुरस्कार दिले आहेत, अशा व्यक्ती आणि संस्था यांना ते परत करुन त्यांचा अवमान करण्यासारखे आहे. त्यामुळे मी कोणताही पुरस्कार परत करणार नाही. कारण तो माझ्या परिश्रमामुळे मिळवला आहे, अशी स्पष्ट भूमिका ज्येष्ठ अभिनेते श्री. विक्रम गोखले यांनी मांडली. सध्या देशभरात असहिष्णुतेचे प्रमाण वाढल्याचा आरोप करत पुरस्कार परत केले जात आहेत. त्याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर श्री. गोखले यांनी वरील उत्तर दिले.

अनधिकृत बांधकाम करणार्‍या ३ नगरसेवकांचे पद रहित

ठाणे महानगरपालिका आयुक्तांची कारवाई 
     ठाणे - येथील महानगरपालिका आयुक्तांनी अनधिकृत बांधकाम करणार्‍या तीन नगरसेवकांचे पद रहित केले आहे. पद रहित झालेल्यांपैकी मनसेचे शैलेश पाटील यांनी स्वतःच्या राहत्या जागेवर, तर शिवसेनेचे राम येगडे यांनी पत्नीच्या नावे अनधिकृत बांधकाम केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर साळवी यांनी अनधिकृत बांधकाम तोडतांना अडथळा आणल्यामुळे त्यांचे पद रहित करण्यात आले आहे.

करणार्‍यांना वाईत पाऊल ठेवू देणार नाही ! - श्रीमती विजयाताई भोसले

मागील वर्षी प्रशासनाकडे दुर्लक्ष करून कार्यक्रम साजरा
      प्रतापगडावर होणारा कार्यक्रम हा केवळ जातीद्वेष पसरवणारा आहे. यामुळे समाजात जातीद्वेषाची पाळेमुळे रुजवली जात आहेत; मात्र यामुळे समाजाचे भले होणार नाही. पोलीस आणि शासनानेही या कार्यक्रमावर बंदी आणली पाहिजे. जातीय सलोखा बिघडवून समाजात अशांतता निर्माण करण्यासाठीच काही धर्मांध शक्तींकडून हे षड्यंत्र रचले जात आहे. अफजलखानाच्या थडग्याचे उदात्तीकरण होत असतांना पोलीस आणि प्रशासन बघ्याचे भूमिका घेते. शिवरायांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढलेला खरा इतिहास समाजाला दाखवण्यावर बंदी आणली जाते; मात्र असे वध दिन साजरा करण्यावर कोणीही आक्षेप घेत नाही. मागील वर्षी प्रशासनाकडे दुर्लक्ष करून प्रतापगडावर कार्यक्रम साजरा करणार्‍यांना वाईत पाऊल ठेवू देणार नाही, अशी चेतावणी श्रीमती विजयाताई भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

असहिष्णुता ही काँग्रेसने दिलेली देणगी ! - संजय राऊत, खासदार, शिवसेना

      मुंबई - असहिष्णुता ही आता निर्माण झालेली नाही. १९४७ पासून ती आहे. मोदी शासन ती दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. बहुतेक शहारूख यांना ते पसंत नाही. असहिष्णुता ही काँग्रेसने दिलेली देणगी आहे. कमल हसन यांनी काय म्हटले आहे, ते लक्षात घ्या, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार श्री. संजय राऊत यांनी दिली आहे. सध्या देशात असहिष्णुता वाढली आहे, या सूत्राची चर्चा चालू आहे. शहारूख खान यांनी तसे विधान केले होते. त्यानंतर कमल हसन यांनी ती १९४७ पासूनच असल्याचे म्हटले होते. शहारूख खान याच्या विधानावर भाजप नेत्यांच्या विविध प्रतिक्रिया येत असतांना हाफीज सईद यांनी त्याला पाकिस्तानात आमंत्रण दिले आहे. या पार्श्‍वभूमीवर श्री. संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईत मध्यम स्वरूपाच्या प्रदूषणात वाढ

श्‍वसन आणि फुप्फुस यांना अपाय होण्याची शक्यता !
अतिवृष्टि: अनावृष्टि: शलभा मूषका: शुका: ।
स्वचक्रं परचक्रं च सप्तैता ईतय: स्मृता: ॥ - कौशिकपद्धति

अर्थ : (राज्यकर्ता धर्मनिष्ठ नसला की, प्रजा धर्मपालन करत नाही. प्रजेने धर्माचे पालन न केल्यामुळे) अतीवृष्टी, अनावृष्टी (दुष्काळ), टोळधाड, उंदरांचा त्रास, पोपटांचा उपद्रव, आपापसांत लढाया आणि शत्रूचे आक्रमण, अशी सात प्रकारची संकटे (राष्ट्रावर) येतात. तात्पर्य, प्रजा आणि राजा, दोन्हीही धर्मपालक आणि साधना करणारे हवेत, तरच आपत्काळाची तीव्रता अल्प होईल किंवा तो सुसह्य होईल.

१ मासानंतर होणार्‍या एम्सीए-पार्ट १ विषयाची पुस्तकेच अजून छापली नाहीत !

मुंबई विद्यापिठाच्या दूर आणि मुक्त अध्ययन संस्थेचा भोंगळ कारभार
      मुंबई - मुंबई विद्यापिठाच्या दूर आणि मुक्त अध्ययन संस्थेच्या माध्यमातून (आयडॉल) घेतल्या जाणार्‍या एम्सीए-पार्ट १ विषयाची परीक्षा १८ डिसेंबर या दिवशी होणार आहे; मात्र विद्यार्थ्यांना अजून पुस्तकेच मिळालेली नाहीत. विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारूनही पुस्तके छापलेली नाहीत. (विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याची हानी करणार्‍या संस्थेतील संबंधित अधिकार्‍यांना याविषयी खडसवायला हवे ! - संपादक) विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी विद्यापिठाने तातडीने पुस्तके उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी युवा सेनेच्या वतीने माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी केली आहे. (युवा सेनेला हे का सांगावे लागते ? विद्यापिठाला याविषयी का कळत नाही ? - संपादक)

तुरडाळीचे भाव अद्याप दीडशेच्या पुढेच

शासनाने जीवनावश्यक वस्तूंचे भाव लवकरात लवकर नियंत्रणात आणणे अपेक्षित !
     मुंबई - तुरडाळीचे भाव आजपासून १२० रु. किलो होतील, अशी घोषणा सेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या आश्‍वासनानंतर केली होती; मात्र अद्यापही ती १७५ ते २२५ रु. किलोच असल्याचे लक्षात आले आहे. व्यापार्‍यांनी लातूरची तुरडाळ १७५, तर चांगल्या गुणवत्तेची तुरडाळ २०० रु.च्या पुढेच असल्याचे वृत्तवाहिन्यांशी बोलतांना सांगितले.

दिवाळीतील जीवघेण्या प्रदूषणकारी फटाक्यांची आतषबाजी टाळा ! - कु. रागेश्री देशपांडे

जळगाव येथे पत्रकार परिषद 

डावीकडून अधिवक्ता श्री. गोविंद तिवारी,
श्री. दत्तात्रय वाघुळदे आणि कु. रागेश्री देशपांडे
     जळगाव -
दिवाळी हा हिंदु धर्मातील महत्त्वाचा सण आहे; पण धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदु या सणाकडे मनोरंजन म्हणून पहात आहेत. या सणामध्ये इतर धार्मिक कृतींपेक्षा फटाक्यांनाच मुख्य प्राधान्य दिले जाते. फटाक्यांमुळे ध्वनीप्रदूषण, वायूप्रदूषण या दुष्परिणांमुळे मानवी आरोग्य धोक्यात येते; म्हणून दिवाळीतील जीवघेण्या प्रदूषणकारी फटाक्यांची आतषबाजी हद्दपार करा, असे उद्गार हिंदु जनजागृती समितीच्या कु. रागेश्री देशपांडे यांनी काढले. दिवाळीनिमित्त समितीच्या राबवण्यात येणार्‍या जनजागृती मोहिमेची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या वेळी सनातन संस्थेचे श्री. दत्तात्रय वाघुळदे आणि हिंदु महासभेचे प्रदेश संघटक अधिवक्ता श्री. गोविंद तिवारी उपस्थित होते. 

शिक्षिकेकडून पहिलीच्या विद्यार्थ्याला वळ उठेपर्यंत मारहाण

रोहा (जिल्हा रायगड) येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील प्रकार
     रोहा (जिल्हा रायगड) - गृहपाठ न केल्याने पहिलीच्या विद्यार्थ्याला शिक्षिकेने मारहाण केल्याची घटना येथील ग्रिगोरियन इंग्रजी शाळेत घडली. या प्रकरणी पालकांनी शिक्षिका प्राजक्ता मोरे यांच्या विरोधात तक्रार नोंदवली. या प्रकाराची नोंद घेत शाळा व्यवस्थापनाने मोरे यांना निलंबित केले आहे. (केवळ निलंबन नको, तर अशा शिक्षकांवर कठोर कारवाईच अपेक्षित आहे ! - संपादक) 

फलक प्रसिद्धीकरता

पाकचे एकेकाळचे सर्वेसर्वा जनरल मुशर्रफ यांना पंतप्रधान मोदी यांची भीती वाटते ! 
     भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुसलमान आणि पाकिस्तान यांच्या विरोधात आहेत. मोदी यांच्यापासून या दोघांनाही धोका आहे, अशी गरळओक पाकचे माजी अध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांनी केली आहे.

नागपूर येथे म्हशीचे १४० किलो मांस विकणारे ५ धर्मांध कह्यात

शासनाने गोवंशहत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी केल्याविना या घटनांना आळा बसणार नाही !
      नागपूर - येथील मोठा ताजबाग परिसरात गोमांस विकले जात आहे, अशी तक्रार विश्‍व हिंदू परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. सक्करदरा पोलिसांनी १४० किलो मांस शासनाधीन करून ते प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवले. पशुवैद्यकीय विभागाने हे मांस गायीचे नसून, म्हशीचे असल्याचे सांगितले, अशी माहिती साहाय्यक पोलीस आयुक्तांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी शेख राजा शेख यासिन, शेख गुलाम शेख कालू, शेख कालू शेख अनवर कुरेशी, शेख आबीद शेख युसूफ कुरेशी, शेख जमीर शेख कुरेशी या धर्मांधांना कह्यात घेतले आहे. (या धर्मांधांवर पोलिसांकडून कठोर कारवाईची अपेक्षा आहे ! - संपादक) ताजबाग परिसरात मोठ्या प्रमाणात गायीच्या मांसाची विक्री होत असल्याची माहिती विश्‍व हिंदू परिषदेचे पदाधिकारी जितेंद्र फुलवानी यांनी पोलिसांना दिली होती. (गोरक्षणासाठी कार्यरत असणार्‍या विश्‍व हिंदू परिषदेच्या पदाधिकार्‍यांचे अभिनंदन ! - संपादक)

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! 
 Pakke General Musharraf inko PM Modiji se Dar lagta hai ! 
 kya Pak ab is sutra ko bhi UNO me le jayega ? 

जागो ! 
 पाकके जनरल मुशर्रफ इनको प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी से डर लगता है ! 
 क्या पाक अब इस सूत्र को भी अब युनोमे ले जाएगा ?

हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता श्री. अरविंद पानसरे यांना मातृशोक

     घाटकोपर - हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता आणि सनातन संस्थेचे साधक श्री. अरविंद पानसरे यांच्या मातोश्री, तसेच रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणार्‍या सौ. मनीषा पानसरे यांच्या सासूबाई श्रीमती सिंधूबाई शंकर पानसरे (वय ५९ वर्षे) यांचे ४ नोव्हेंबर २०१५ या दिवशी पहाटे २.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्या सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत होत्या. सनातनच्या आश्रमात राहूनही त्यांनी काही काळ सेवा केली. त्यांच्या पश्‍चात श्री. अरविंद, श्री. महेंद्र ही दोन मुले, सुना, एक मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार पानसरे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.

तरुणांचे तेज आणि ओज नष्ट करणारे चित्रपट अन् दूरचित्रवाणी !

     आजचा मुलगा ? काय दुर्दशा झाली आहे त्याची ! पाश्‍चिमात्य सभ्यतेचा पुजारी बनलेला आजचा मुलगा २० ते ३० या वयातच म्हातारा दिसायला लागतो. ओजस्वी, तेजस्वी चेहरा, कसलेले बाहुदंड आणि सौष्ठवयुक्त शरिराऐवजी बसके गाल, बाहेर निघालेले डोळे आणि ढीले शरीर दिसते. याचे कारण काय आहे, ठाऊक आहे ? अश्‍लीलता आणि हिंसेचा प्रचार करणारे चित्रपट आणि दूरचित्रवाणी पाहून आजच्या मुलांचे ओज-तेज (ज्याच्यापासून ओज-तेज निर्माण होते, ते वीर्य) तारुण्यावस्थेपूर्वीच नष्ट झालेले असते.

विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्यांना उत्तरदायी कोण ?

१. जीवन जगण्यासाठी अपुरे असलेले आजचे शिक्षण
     १० ते १२ वर्षांचे वय हे कोणत्याही प्रकारे निर्णय घेण्याचे नसते किंवा तेवढे सक्षम नसते. यामुळे आत्महत्या ही परिणामांची काळजी न करता काही क्षणाचा बळी पडून उमटलेली प्रतिक्रिया असते; मात्र त्यासाठी कोणा एकालाच उत्तरदायी (जबाबदार) धरून चालणार नाही. 
   विद्यार्थ्याचे जागृतावस्थेतील ६ घंटे शाळेत असतात. जीवन जगण्यासाठी आजचे शिक्षण अपुरे आहे. आपले संरक्षण करायला शिक्षण अपात्र बनवत आहे. आत्महत्यांचे वाढलेले प्रमाण हेच सांगत नाही का ? पाठांतर, घोकंपट्टी, गुण यांच्या मागे धावता धावता विद्यार्थी जीवनच गमावून बसला आहे. आजच्या तथाकथित शिक्षणामागे धावता-धावता आपण शिक्षणच हरवून बसलो आहोत.

मराठी भाषा आणि हिंदु संस्कृती यांची थोरवी !

श्री. सागर निंबाळकर
     नाशिक येथील झोया नावाच्या लहान मुलीच्या अंगावरून मोटारीची दोन चाके गेली; मात्र तरीही ती जिवंत राहिली. या वृत्ताचे वार्तांकन करतांना सर्वच प्रसारमाध्यमांनी देव तारी, त्याला कोण मारी ! अशा मथळ्याखाली प्रसिद्धी दिली. प्रत्यक्षात ती मुलगी मुसलमान असली, तरी या घटनेचे एवढ्या नेमक्या शब्दांत वर्णन करणारा उर्दू, हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये वाक्प्रचार किंवा म्हण नाही. 
     अल्ला तारी त्याला कोण मारी, असे कुणी म्हणू शकत नसल्याने किंवा तशी बोली भाषेत कोणतीही वाक्यरचना नसल्याने सर्वांना एकच मथळा वापरणे अपरिहार्य होते. 
- श्री. सागर निंबाळकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.७.२०१५)

रिमोटचा कंट्रोल आपल्याकडेच हवा !

     समाजाला दिशा देण्यासाठी अथवा समाजप्रबोधन करण्यासाठी कोणत्याही कलाकृतीची निर्मिती झाली पाहिजे. मग ती कलाकृती म्हणजे चित्रपट असो, नाटक असो अथवा पुस्तक असो ! पण हा मूलभूत निकष सध्या सर्वच स्तरावर पार कोलमडलेला दिसतो. त्यामुळे योग्य काय आणि कसे हवे, हे दाखवण्यापेक्षा सध्या समाजात कशा चुकीच्या गोष्टी घडत आहेत, त्या अजून चुकीच्या कशा करता येऊ शकतात, याचेच दिशादर्शन चित्रपटांच्या माध्यमातून केले जात आहे कि काय, अशी शंका येते. हे केवळ तात्त्विक स्तरावरचे आरोप नसून प्रत्यक्षातही चित्रपटातील कथानकाने प्रेरित होऊन गुन्हेगारी कृत्ये अथवा स्टंटबाजी होण्याची अनेक उदाहरणे घडली आहेत.

अभ्यास कसा असावा, तर एक तरी ओवी अनुभवावी !

दीपावलीच्या सुट्टीनिमित्त प्रतिदिन वाचा बोधकथा !
      आता शाळांतील परीक्षा संपून विद्यार्थ्यांना सुट्टी लागणार आहे. या काळात मुलांना पुष्कळ वेळ उपलब्ध असतो. अशा वेळी या बोधकथांच्या माध्यमातून राष्ट्राचे भावी आधारस्तंभ असलेल्या या पिढीवर सुसंस्कार करण्याच्या दृष्टीने हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

माणसातील पशूचे उन्नयन करून त्याला देव करणे, हेच भारतभूमीचे ध्येय आहे !

     या राष्ट्राच्या जीवनातील असंख्य दैदिप्यमान शतकांपुढे मी आश्‍चर्यचकित होऊन उभा आहे. मधून-मधून या शृंखलेत काही काळे पट्टे दिसतात; पण या काळ्या पट्ट्यांनी त्यांना अधिकच उठावदारपणा दिला आहे आणि या पार्श्‍वभूमीवर माझी मातृभूमी आपली दमदार पावले टाकत चालली आहे. तिला तिचे दिव्य भवितव्य पूर्ण करायचे आहे. हे तिचे कतर्र्व्य करतांना तिच्यात कोणीही आडकाठी आणू शकणार नाही. तिचे भवितव्य एकच आहे. माणसातील पशूचे उन्नयन करणे, त्याला देव करणे. 
- स्वामी विवेकानंद (श्री. राजाभाऊ जोशी, मासिक लोकजागर, दिवाळी विशेषांक २००८)

कीटकनाशकांचा योग्य प्रमाणात वापर हितावह !

    शेती आणि कीटक नियंत्रण यांसाठी आपण कीटकनाशकांचा नियमितपणे वापर करत असतो आणि लोकसंख्या विस्तारामुळे त्यांचे प्रमाण वरचेवर वाढत रहाणार आहे. अमेरिकेत कीटकनाशकांचा वापर प्रति हेक्टर ३.७ किलोग्रॅम एवढा आहे, तर भारतात ०.५४ किलोग्रॅम प्रति हेक्टर इतका आहे. भारतात आज सर्व प्रकारची कीटकनाशके उपलब्ध आहेत. ती प्रमुखतः ऑर्ग्यानोक्लोरिन, ऑर्गेनिक फॉस्फेट, सिंथेटिक पायरेथ्रॉईड या गटाची आहेत. याविना पायरेथ्रमसारखी वनस्पतीजन्य कीटकनाशकेही उपलब्ध आहेत.

ऋषीमुनींचा आणि राजकारण्यांचा भारत !

     आज दुष्ट लोकांच्या कुटिल नीतीने, आमच्या अज्ञानाने आणि दैवी विचारांवर विश्‍वास न ठेवल्यामुळे भारत देश पूर्णपणे कर्जबाजारी झाला आहे. त्याला यातून कर्जमुक्त करावयाचे असेल, तर दैवी विचारांचा, ऋषींनी, वेदांनी दिलेल्या विचारांचा प्रसार अन् हृदयस्थ भगवंत आहे, तोच आमचे सर्व करतो, यावर विश्‍वास ठेवून सर्वांना जागे करणे, त्यांच्यात आत्मबल वाढवून स्वतःच्या पायांवर उभे रहाण्यास शिकवणे, भौतिक वादाच्या पाठीमागे न लागता, स्वावलंबन, निसर्गाशी एकरूपता आणि गरजा कमीतकमी करून जगण्याची प्रवृत्ती बाळगल्याशिवाय तरणोपाय नाही; म्हणून ब्रह्मणस्पतीला आवाहन करणे अन् त्याची उपासना करून त्याला समजून घेणे आवश्यक आहे.

आपण आपला इतिहास जपला पाहिजे ! - श्री. विद्याधर नारगोलकर, पुणे

     गेल्या आठवड्यात एका वृत्तपत्रातील वाचकांच्या पत्रव्यवहारात पुण्यातील एका आदरणीय संस्कृतप्रेमी विद्वानाने औरंगजेबाचे संस्कृतप्रेम नावाची गोष्ट सांगितली आहे. त्यात म्हटले आहे की, औरंगजेबाच्या मुलाने एकदा त्याला आंब्याची करंडी भेट म्हणून पाठवली आणि त्याला आंब्याला नाव देण्यास सुचवले. तेव्हा औरंगजेबाने त्यांची नावे संस्कृत अशी ठेवली; म्हणून औरंगजेबाचे संस्कृतप्रेम होते; परंतु त्या संस्कृतप्रेमी विद्वानास मला त्याचा मान राखून सुचवावेसे वाटते की, ते संस्कृतप्रेम नसून उर्दूमधील शब्दांचे दारिद्य्र होते. संस्कृतप्रेम असते, तर भारतात कित्येक शहरांची संस्कृत नावे त्याने का पालटली असती ? काशीच्या शंकराची अशी अवस्था का केली असती ? असो ! आपणच आपल्या मातेचा अभिमान आणि इतिहास सांभाळला पाहिजे.

मृताच्या टाळूवरचेही लोणी खाणारे रेल्वे खात्यातील अधिकारी !

     रेल्वे मार्गावरील सिग्नलचा गोंधळ आणि गर्दीतील ढकलाढकली यांमुळे जखमी झालेले बदलापूरचे सचिन समुद्रे यांचा अलीकडेच के.ई.एम्. रुग्णालयात मृत्यू झाला. तत्पूर्वी आदल्या दिवशी रेल्वेच्या काही अधिकार्‍यांनी के.ई.एम्. रुग्णालयात येऊन सचिन यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांनी सचिनचे वडील अरुण समुद्रे यांना दूरभाषद्वारे सांगितले, सचिन यांना रेल्वे खात्याकडून ४ लाख रुपये मिळतील. दुसर्‍याच दिवशी सचिन यांचा मृत्यू झाला. नंतर रेल्वे खात्याकडून मिळणार्‍या पैशांसाठी एका अधिवक्त्याची नेमणूक करण्यात आल्याचे समजले. त्याप्रमाणे अधिवक्त्याचा कारकून समुद्रे यांच्या घरी आला आणि त्याने एक अर्ज (फॉर्म) भरून द्यायला सांगितले. 

ध्वनीप्रदूषणाचे दुष्परिणाम

१. दारूगोळ्याच्या आवाजाने माणसाला पूर्ण बहिरेपणा येणे
     मोठ्या आवाजामुळे ऐकण्याची शक्ती अल्प होते आणि बहिरेपणा येतोे, यांसंबंधी नोंद इतिहासात सापडते. 
अ. वर्ष १७१३ मध्ये रॅमाझिनी यांनी डि मोर्बिस आर्टिमिक्युस या पुस्तकात लिहिले आहे, तांब्यावर घण घालणार्‍या लोकांना अल्प (कमी) ऐकू येते आणि तो धंदा जन्मभर केल्यास ते पूर्ण बहिरे होतात.
आ. वर्ष १७६१ मधील पानिपतच्या तिसर्‍या युद्धात तोफा विहिरीच्या शेजारी असायच्या; कारण तोफेला बत्ती दिली की, गोलंदाज विहिरीत बुडी मारायचा आणि तोफ उडाल्यावरच वर यायचा. असे केले नाही तर तो बहिरा व्हायचा. 

सनातन संस्थेच्या अथक प्रयत्नांनंतर हिंदु राष्ट्राची स्थापना पुढील ९ वर्षांनंतर होणार !

भृगु संहितेत स्पष्ट उल्लेख 
भृगु महर्षीं महर्षीमधील भृगु मीच आहे ! - भगवद्गीता
     रामनाथी, ४ नोव्हेंबर (वार्ता.) - सनातन संस्थेच्या अथक प्रयत्नांनंतर ९ वर्षांनी (म्हणजे २०२३ नंतर) हिंदु राष्ट्र येणार आहे, असे भविष्य भृगु संहितेच्या हस्तलिखितात नमूद आहे. भृगु महर्षींच्या मार्गदर्शनानुसार या हस्तलिखिताचे दुर्मिळ पृष्ठ सनातन संस्थेला देण्यात आले आहे, असे होशियारपूर (पंजाब) येथील पंडित लालदेव शास्त्री यांनी सांगितले. भृगु संहिता आणि रावण संहिता यांच्या ५ लक्ष हस्तलिखित पृष्ठांचा पुरातन हस्तलिखित संग्रह गुरुपरंपरेने लाभलेले आणि या हस्तलिखितांचा अर्थ सहज सांगू शकणारे पंडित लालदेव (भृगु शास्त्री) यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात साधकांना ३ नोव्हेंबर या दिवशी मार्गदर्शन करतांना ही माहिती दिली. 

सनातनचे साधक फार भाग्यवान आहेत. अध्यात्मात गुरुप्राप्ती होणे, हा महत्त्वाचा टप्पा आहे. सनातनच्या साधकांना मोक्षगुरु मिळाले आहेत ! - वेदाचार्य मोरेश्‍वर विनायक घैसास गुरुजी, पुणे


     

लपंडावाचा खेळ श्रीहरीचा आता सदाचाच संपला ।

श्रीमती भाग्यश्री आणेकर
सनातनच्या अंगणात
श्रीहरि लपंडाव खेळतो ।
सारे करूनी नामानिराळा असल्याचे सदा भासवतो ॥ १ ॥

साधकाला श्रेय देऊन, कर्तेपणाला न स्पर्श केला ।
असा हा लपंडाव खेळूनी
रंग रंगात रंगवला

मंगळुरू येथील कन्नड साप्ताहिक सनातन प्रभातचे जिज्ञासू श्री. रमेश हेब्बार दाते (वय ६९ वर्षे) यांनी गाठली ६२ टक्के आध्यात्मिक पातळी !

श्री. रमेश दाते
     मंगळुरू येथे रहाणारे श्री. रमेश दाते मागील ८ वर्षांपासून कन्नड साप्ताहिक सनातन प्रभातचे वाचक आहेत. त्यांच्यामध्ये जिज्ञासा, नम्रता, विचारून करणे, असे अनेक गुण आहेत. सनातनच्या साधिका सौ. सुकन्या आचार्य यांना दातेकाकांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
१. सेवाकेंद्रात येऊन सेवा करणे
      श्री. रमेशकाका यांनी साप्ताहिक कन्नड सनातन प्रभातचे नियमित वाचन करून साधनेला आरंभ केला. मागील ४ मासांपासून (महिन्यांपासून) ते आठवड्यातील ३ दिवस सेवेसाठी मंगळुरूच्या सेवाकेंद्रात येऊन साप्ताहिक सनातन प्रभातच्या अंकांच्या घड्या घालणे, त्यांवर वाचकांचे पत्ते चिकटवणे, अशा सेवा करतात.

भाग्यानेच मिळतो असा देव सखा ।

मेघांचे हे अश्रू असतात आनंदाचे ।
म्हणून त्याचे मोती बनतात साचे ॥ १ ॥
एक एक मोती देतो आनंद नेत्रांना ।
म्हणून वाटते अमूल्य भेट द्यावी मित्रांना ॥ २ ॥
भाग्यानेच मिळतो ना राणा देव सखा ।
सांग कोण करील मैत्रीचा लेखा-जोखा ॥ ३ ॥

गर्भात असतांना आईला नामजपाची आठवण करून देणारा ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला सोलापूर येथील चि. शुभंकर निषाद जोशी (वय ८ मास) !

चि. शुभंकर जोशी
१. जन्मापूर्वी
१ अ. दिवस गेल्यावर होणारा त्रास प्रार्थना केल्याने न्यून होणे
     मला दिवस गेल्यावर सातत्याने उलटी आणि चक्कर येत असे. या काळात मी आणि माझे यजमान सोलापूरला रहात होतो. तेव्हा मला सासूबाईंनी तुझी काळजी कृष्णच घेईल. तू प्रार्थना कर, असे सांगितले. तशी प्रार्थना केल्यावर त्रास थांबला.
१ आ. झोपेतही प्रार्थना होणे
     गर्भ २ - ३ मासांचा (महिन्यांचा) झाल्यावर मला रात्री झोप लागत नसे. त्या वेळी माझ्याकडून पुष्कळ नामजप आणि प्रार्थना व्हायची. या काळात झोपेतही प्रार्थना होत असे. गर्भ ५ मासांचा (महिन्यांचा) असतांना एकदा मी झोपेतच हे श्रीकृष्णा, प्रत्येक बाळ श्रीकृष्ण होऊ शकत नाही; पण हे बाळ तुझा एवढा चांगला भक्त होऊ दे की, त्याने बोलावल्यावर तू येशीलच. त्याची भक्ती पाहून आमची साधना आणि तुझ्यापर्यंत येण्याची तळमळ वाढू दे, अशी प्रार्थना केली.

अंगी स्वयंशिस्त आणि सहनशील वृत्ती असलेले कर्नाटक येथील श्री. शिवाप्पा गौडा (वय ७५ वर्षे) यांनी गाठली ६३ टक्के आध्यात्मिक पातळी !

श्री. शिवाप्पा गौडा
     कर्नाटकातील मंगळुरू येथे १.११.२०१५ या दिवशी झालेल्या प्रांतीय हिंदू अधिवेशनात श्री. शिवाप्पा गौडा यांनी ६३ टक्के आणि श्री. रमेश हेब्बार दाते यांनी ६२ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले. साधकांना त्यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
१. हसतमुख
     श्री. शिवाप्पा गौडा हे सनातन संस्थेच्या मार्गानुसार साधना करतात. त्यांना सनातन प्रभातचे महत्त्व ठाऊक असल्याने त्यांनी प्रत्येक अंक सांभाळून ठेवला आहे. ते सदैव हसतमुख असतात. ते अत्यंत सहनशील वृत्तीचे आहेत. व्यवस्थितपणा, स्वयंशिस्त, इतरांना साहाय्य करणे आणि वेळेचे पालन करणे हे त्यांच्यातील विशेष गुण आहेत. सेवेला जाण्यापूर्वी ते परिपूर्ण नियोजन करून जातात. त्यांची ईश्‍वरावर श्रद्धा आहे.

भक्ताला सिद्धींची आवश्यकता नसणे !

(परात्पर गुरु) डॉ. आठवले
     शक्तीउपासकांकडे सिद्धी असतात. त्यांच्या वापरासंदर्भात बुद्धी कार्यरत होते, तसेच सिद्धींमुळे अहंभाव वाढण्याचा धोकाही असतो. याउलट भक्ताला सिद्धीची आवश्यकता वाटत नाही; कारण त्याचे सर्व कार्य भगवंतच करून देतो. त्यामुळे त्याच्यात अहंभावही निर्माण होत नाही. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (११.९.२०१५)

व्यष्टी आणि समष्टी साधनेचे उत्तम माध्यम प्रसिद्धी फलक !

श्री. गणेश पेंढारकर
     फलक प्रसिद्धीच्या सेवेसंदर्भात मार्गदर्शक सूत्रांची एक चौकट दैनिक सनातन प्रभातमधून प्रसिद्ध झाली होती. ही चौकट वाचून मला फलक प्रसिद्धीच्या सेवेविषयी लिखाण करण्याची स्फूर्ती मिळाली. फलक प्रसिद्धी हा उपक्रम चालू होऊन जवळजवळ ९ ते १० वर्षे झाली असतील. या उपक्रमांतर्गत प्रबोधनात्मक लिखाण असलेलेे फलक मध्यवर्ती ठिकाणी ठेवले जातात. त्यानुसार सावंतवाडीच्या मध्यवर्ती आणि रहदारीच्या ठिकाणी असलेल्या आमच्या निवासस्थानीच हा उपक्रम चालू झाला. माझ्याकडून प्रारंभीपासून ते अगदी आतापर्यंत फलक प्रसिद्धीची सेवा समर्पणभावाने प्रतिदिन होत आहे. सेवेच्या प्रारंभापासून आतापर्यंत आमच्या मानसिकतेमध्ये कालांतराने झालेले विविधांगी पालट याविषयी श्रीकृष्णाने सुचवलेली चिंतन सूत्रे पुढे मांडत आहे.

साधकांनो, स्वतःत कृत्रिमता वाढवणार्‍या आणि भावनिर्मितीत अडथळा ठरणार्‍या स्वप्रतिमा जोपासणार्‍या विचारांवर मात करून स्वला विसरण्यातील खरा आनंद अनुभवा !

(पू.) सौ. बिंदा सिंगबाळ
१. इतरांच्या मनात स्वतःविषयी चांगले मत निर्माण करण्यासाठी
किंवा ते टिकवण्यासाठी अट्टाहासाने कृती करणे म्हणजे स्वप्रतिमा !  
     प्रतिमा जपणे या अहंच्या पैलूच्या मुळाशी इतरांचे माझ्याविषयीचे मत नेहमी चांगलेच असावे, अशी अयोग्य मानसिकता असते. या मानसिकतेमधून केल्या गेलेल्या कृती अर्थातच प्रतिमा जपण्यासाठी केल्या जातात. इतरांच्या मनात स्वतःविषयी चांगले मत निर्माण होण्यासाठी दिखाऊपणे वागणे आणि मी कसा श्रेष्ठ आहे, हे दाखवण्यासाठी प्रतिमा उंचावणे,

ईश्‍वराने सुचवण्याची पद्धत

पू. डॉ. मुकुल गाडगीळ
      साधनेमध्ये एखादी नवीन सेवा आपण करायला घेतली की, तिला आरंभ कसा करायचा ?, असा प्रश्‍न आपल्याला पडतो. आपल्याला शरणागत राहून ईश्‍वराचे साहाय्य घ्यायचे आहे, हे ठाऊक असते; पण ते घ्यायचे कसे ? ईश्‍वर कसा साहाय्य करतो ?, हे ठाऊक नसल्याने आपल्याला मार्ग दिसत नाही. या संदर्भात मला अनुभवास आलेल्या सूत्रांतून इतरांना त्याप्रमाणे प्रयत्न करता येतील आणि त्यांना ईश्‍वराचे साहाय्य घ्यायचा सराव होईल;

साधक-पालकांनो, पाल्याचे छायाचित्र आणि गुणवैशिष्ट्ये ग्रंथ विभागात पाठवतांना पुढील बारकावे लक्षात घ्या !

     आपले मूल उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला आले असल्याचे वाटत असल्यास अथवा त्याचा वाढदिवस असल्यास पालक त्याची गुणवैशिष्ट्ये आणि छायाचित्रे ग्रंथ विभागात पाठवतात. त्या वेळी पालकांनी पुढील सूत्रे लक्षात घेणे आवश्यक आहे.
१. पाल्याची छायाचित्रे काढतांना लक्षात घ्यावयाची सूत्रे
१ अ. पाल्याचे नेहमीच्या वेशातील छायाचित्र हवे ! : काही पालक पाल्याला मुद्दाम वेगळा पोशाख घालून त्याचे छायाचित्र काढतात, उदा. एका पालकाने आपल्या पाल्याचे पगडी घातलेले छायाचित्र पाठवले. एकाने पाल्याचे मुकुट आणि अलंकार घातलेले छायाचित्र पाठवले आणि एका पालकाने त्याच्या लहान मुलीला नऊवारी साडी नेसवून ते छायाचित्र पाठवले,

साधकांनो, कोणत्याही लिखाणाला प्रारंभ करतांना ॥ नारायणस्मृति ॥ असे लिहा !

     साधक कोणत्याही लिखाणाला प्रारंभ करतांना, उदा. स्वभावदोष-निर्मूलन सारणी लिहितांना किंवा पत्र लिहितांना ॥ श्री ॥ किंवा ॥ श्रीकृष्ण ॥ असे लिहितात. महर्षींनी सांगितल्याप्रमाणे येथून पुढे साधकांनी कोणत्याही लिखाणाला प्रारंभ करतांना ॥ नारायणस्मृति ॥ असे लिहावे. यातून साधकांना भगवान विष्णूची कृपा संपादन करायची आहे. 
- (पू.) सौ. अंजली गाडगीळ (९.१०.२०१५)

बोधचित्र


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
'धर्मशिक्षणाच्या अभावी आणि बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी निर्माण केलेल्या विकल्पांमुळे हिंदूंना हिंदु धर्माचे अद्वितीयत्व ज्ञात नसल्यामुळे त्यांना धर्माभिमान नाही; म्हणून त्यांची स्थिती जगातील सर्वधर्मियांत अत्यंत दयनीय झाली आहे !' - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२९.१.२०१५)

प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

राष्ट्रभाषा संस्कृत असती, तर राष्ट्रभाषेवरून भांडणे झाली नसती !

     राष्ट्रभाषा कोणती असावी, याकरता संसदेत वाद झाला. दक्षिण भारताने हिंदीला कडाडून विरोध केला. एक फ्रेंच तत्त्वज्ञ म्हणाला, अरे, तुम्ही कशाकरता भांडता ? संस्कृत ही तुमची राष्ट्रभाषा आहेच. तीच सुरू करा. संस्कृतसारखी पवित्र देवभाषा तुम्ही घालविली. मग भांडणे होणार नाहीत तर काय ? आज भारतभर कहर आहे. 
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी 

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सदाचाराचे महत्त्व ! 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     मानवाचे रूप अल्प काळाचे असते. रूपाला महत्त्व नसते, तर व्यक्तीचे आचार-विचार आणि वर्तन यांनाच खरे महत्त्व असते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
आनंद माझ्या मागे आहे. दुःख माझ्या 
पुढे आहे. माझ्या मागे जो आनंद आहे, तो 
तुमच्या मागे येईल, तेव्हा मी सुखी होईन. मी दुःखी आहे. 
भावार्थ : 'आनंद माझ्या मागे आहे', याचा अर्थ याप्रमाणे आहे. सुषुम्ना नाडीतून शक्तीप्रवाह जाऊ लागला की, आनंदाची अनुभूती येते. ही सुषुम्ना नाडी पाठीच्या मणक्यातून, म्हणजे शरीराच्या मागच्या भागातून जात असल्याने 'आनंद माझ्या मागे आहे', असे म्हटले आहे. 'दुःख माझ्या पुढे आहे' म्हणजे प्रकृतीमुळे निर्माण झालेले भोग समोर येतात, त्याचे दुःख होत असते. 'मी दुःखी आहे' म्हणजे तुम्ही नामजप करून आनंदी होत नाही, याचे मला दुःख आहे.
 (संदर्भ: सनातनचे प्रकाशन 'संत भक्तराज महाराज यांची शिकवण.')

नेपाळचा बोलविता धनी कोण ?

संपादकीय
    एखाद्या दुर्बल व्यक्तीला एखाद्या बलाढ्य आणि धनाढ्य व्यक्तीची साथ लाभली, तर त्या दुर्बल व्यक्तीत हत्तीचे बळ संचारते अन् तो जगालाही आव्हान देण्यास मागेपुढे पहात नाही. नेपाळने भारताला नुकतीच ज्या पद्धतीने चेतावणी दिली, ती पहाता या वाक्याची आठवण येईल.
     जगाच्या नकाशात नेपाळ हे एका बिंदूहून लहान असे राष्ट्र आहेे. नेपाळ बहुतांश गोष्टींसाठी भारतावर अवलंबून आहे. भारतही हे दायित्व नेटाने पार पाडत आहे. एक शेजारी राष्ट्र, नैसर्गिक मित्र आणि एक मूलत: हिंदु राष्ट्र म्हणूनही नेपाळ भारताला अगदी परवा परवा पर्यंत मोठा भाऊ मानत होता. शत्रूराष्ट्र आणि त्याचे मित्रराष्ट्र यांच्यात फूट पाडणे, हा आंतरराष्ट्रीय डावपेचांचा भाग असून उणे-अधिक प्रमाणात प्रत्येक धूर्त विचारसरणी असणारी राष्ट्रे हा खेळ अधूनमधून खेळतच असतात. मध्यंतरीच्या काळात नेपाळमध्ये विनाशकारी भूकंप आला. त्यात भारताने त्याची चोख भूमिका बजावली. त्याच वेळी धूर्त अन् संधीसाधू चीनने साहाय्य करण्याचे निमित्त साधून नेपाळशी सलगी वाढवण्याचा प्रयत्न केला. अर्थात् तो त्याच वेळी हाणून पाडला गेला. असे झाले असले, तरी या कृतीमुळे चीनच्या मनात काय चालू आहे, याची कल्पना भारताला आली.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn