Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

(म्हणे) रामाचा जन्म पाकमधील !

  • ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे वरिष्ठ सदस्य अब्दुल रहीम कुरेशी यांची गरळओक !
  • कुणा हिंदु व्यक्तीने अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानाविषयी असे विधान केले असते, तर एव्हना किती कठोर शब्दांचे फतवे निघाले असते, याची कल्पनाच न केलेली बरी, असे आतापर्यंतच्या विविध घटनांतून कुणीही सांगेल ! हिंदु सहिष्णू असल्यानेच कुणीही असे विधान करू धजावतो.
नवी देहली - भगवान रामाचा जन्म अयोध्येत नव्हे, तर पाकमधील डेरा इस्माइल खान येथे झाला होता, अशी गरळओक ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे वरिष्ठ सदस्य अब्दुल रहीम कुरेशी यांनी त्यांच्या फॅक्ट्स ऑफ अयोध्या एपिसोड (मिथ ऑफ राम जन्मभूमी) या पुस्तकात केली. या पुस्तकात भगवान श्रीरामाचा जन्म १ कोटी ८० लाख वर्षांपूर्वी झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
या पुस्तकात त्यांनी म्हटले आहे,
१. रामाचा जन्म डेरा इस्माइल खान येथे झाला होता. फाळणीनंतर हा भाग पाकमध्ये गेला.
२. भगवान रामाचा जन्म वा त्यांचे साम्राज्य गंगेच्या मैदानी क्षेत्रात होते. रामाच्या साम्राज्याची ओळख सप्त सिंधुद्वारे केली गेली आणि ते क्षेत्र तर हरियाणा-पंजाबपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानपर्यंत पसरले आहे.

होशियारपूर (पंजाब) येथील भृगु संहितेचे वाचक पंडित लालदेव शास्त्री यांचे धर्मपत्नीसह रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आगमन !

भृगु महर्षींची प्रतिमा आणि भृगु संहिता यांच्यासह आगमन करतांना (डावीकडून) सौ. धारोहरदेवी शास्त्री,
पंडित लालदेव शास्त्री आणि त्यांचे स्वागत करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले (सर्वांत उजवीकडे) आणि अन्य
संत भृगु महर्षींच्या प्रतिमेला भावपूर्ण वंदन करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले (उजवीकडे)
 नाडी भविष्यात महर्षींनी केलेले कथन
   रामनाथी - होशियारपूर (पंजाब) येथील भृगु संहिता आणि तिचे वाचक पंडित लालदेव शास्त्री आणि त्यांच्या पत्नी सौ. धारोहरदेवी लालदेव शास्त्री यांचे २ नोव्हेंबरला सायंकाळी ७.३५ वाजता रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आगमन झाले. या वेळी सनातनच्या साधक पुरोहित पाठशाळेतील पुरोहित साधकांनी मंत्रोच्चार करून त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. या वेळी सनातनचे साधक श्री. भूषण पुराणिक आणि त्यांच्या पत्नी सौ. आरती पुराणिक यांनी पंडित लालदेव शास्त्री अन् सौ. धारोहरदेवी यांची पाद्यपूजा करून पंचारतीने ओवाळले. परात्पर गुरु प.पू. (डॉ.) जयंत बाळाजी आठवले यांनी भृगु महर्षींच्या प्रतिमेला आणि भृगु संहितेला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले.

भारतीय संस्कृती आणि योग यांवरील अभ्यासक्रमास नेहरू विद्यापिठाचा नकार

कुठे विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीसह सर्व प्रकारचे शिक्षण देऊन त्यांचे सर्वांगीण हित साधणारी 
गुरुकुल शिक्षणपद्धत, तर कुठे भारतीय संस्कृतीची शिकवण नाकारणारी मॅकॉलेप्रणित शिक्षणपद्धत !
जवाहरलाल नेहरू विद्यापिठाचा हिंदुद्वेषी निर्णय !
     नवी देहली - भारतीय संस्कृती आणि योग यांवर लघु मुदतीचे अभ्यासक्रम चालू करण्यास जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या कार्यकारिणीने नकार दिला आहे. भारतीय मूल्ये रुजवणे, आध्यात्मिक आणि पौराणिक परंपरांची माहिती करून देणे, यांसाठी हे अभ्यासक्रम चालू करण्याची सूचना केंद्राने केली होती. 
    विद्यापीठ अनुदान आयोग आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जवाहरलाल नेहरू विद्यापिठाला त्याविषयी कळवले होते; पण हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. विद्यापिठाच्या शैक्षणिक परिषदेने ३० ऑक्टोबर या दिवशी घेतलेल्या बैठकीत हा प्रस्ताव फेटाळला. लघु मुदतीचे अभ्यासक्रम चालू करण्याच्या प्रस्तावावर विद्यापिठाच्या विविध विभागांचा प्रतिसाद मागवला होता. त्याआधारे हा प्रस्ताव फेटाळण्यात आला.

पाक सैन्याच्या गोळीबारात २ भारतीय सैनिक हुतात्मा

कुरापतखोर पाकला धडा शिकवण्यासाठी भारत आणखी किती सैनिकांचे बळी जाऊ देणार आहे ?
पाकने सीमेवरील गोळीबार थांबवण्याच्या आश्‍वासनाला एका आठवड्यातच हरताळ फासला
श्रीनगर - कुरापतखोर पाकने २ नोव्हेंबरला दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गुरेज सीमा सुरक्षा दलाच्या चौक्यांवर अंदाधुंद गोळीबार केला. यात २ भारतीय सैनिक हुतात्मा झाले. २७ ऑक्टोबरला सीमा सुरक्षा दलाचे सैनिक आणि पाकचे सैनिक यांच्यात शस्त्रसंधीचे उल्लंंघन करण्याच्या सूत्रावर चर्चा (फ्लॅग मिटींग) झाली होती. या चर्चेत पाकने सीमेवरील गोळीबार थांबवणे आणि शस्त्रसंधीच्या नियमांचे पालन करण्याचे वचन दिले होते. मागील चर्चेत पाकिस्तानकडून वारंवार होणार्‍या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाविषयी भारताने पाककडे निषेध नोंदवला होता. सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी राकेश कुमार म्हणाले, पाकिस्तान वारंवार सीमेवर गोळीबार करून शस्त्रसंधीच्या नियमांचे उल्लंघन करत आहे. पाकिस्तानने सीमेवरील घुसखोरी आणि गोळीबार थांबवावा, असे स्पष्ट शब्दात सांगण्यात आले आहे; मात्र तरीही पाकच्या सैन्याने २ नोव्हेंबर या दिवशी सीमेवर अंदाधुंद गोळीबार केला. यात २ सैनिक हुतात्मा झाले.

मुंबईचे काही पोलीस दाऊदला मिळाले आहेत ! - गुंड छोटा राजन

जनतेचे रक्षक भक्षक तर बनत चालले नाहीत ना ? अशी शंका कुणाला आल्यास त्यात नवल काय ?
बाली (इंडोनिशिया) - मुंबई पोलीस दलातील काही पोलीस कुख्यात गुंड दाऊद इब्राहीम याला मिळालेले असून ते त्याच्या इशार्‍यावर काम करतात, असा धक्कादायक आरोप नुकताच बाली येथे पकडला गेलेला कुख्यात गुंड छोटा राजन याने वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींशी बोलतांना केला. तो पुढे म्हणाला, मुंबई पोलिसांवर माझा अजिबात विश्‍वास नाही. त्यांनी माझ्यावर पुष्कळ अत्याचार केले आहेत. मुंबईतील काही पोलीस दाऊदला मिळालेले आहेत. केंद्रशासनाने याची दखल घ्यावी. शासन मला जेथे ठेवेल तेथे मी रहायला तयार आहे; मात्र माझ्यावर अन्याय होऊ देऊ नये. माझ्यावर दाखल असलेले गुन्हे खोटे आहेत. मी दाऊदला अजिबात घाबरत नाही. मी २२ वर्षांपासून आतंकवाद आणि दाऊद यांच्याविरुद्ध लढत होतो आणि यापुढेही लढत राहीन.

काश्मिरी नागरिकांकडून कर्जाची वसुली करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाची सर्वोेच्च न्यायालयात धाव !

     नवी देहली - सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक असलेल्यास्टेट बँक ऑफ इंडियाने काश्मिरी नागरिकांकडून कर्जाची वसुली करण्यासाठी सर्वोेच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या कर्जाच्या वसुलीसाठी बँकेने सर्वोेच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
१. स्टेट बँक ऑफ इंडियाने काश्मीरमधील अनेक उद्योगांना, व्यापार्‍यांना आणि वैयक्तिक स्तरावर कर्ज वाटप केले आहे. कर्ज वसुलीची हमी म्हणून कर्जदारांनी कायद्याप्रमाणे त्यांची मालमत्ता बँकेकडे गहाण ठेवली आहे.
२. काही कर्जदार बँकेकडून घेतलेले कार्य निर्धारित वेळेत फेडू शकलेले नाहीत; म्हणून त्यांच्या मालमत्तेवर बँकेने टाच आणून ती कह्यात घेण्याचे प्रयत्न केले होते.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ म्हणजे राष्ट्र्रविरोधी कारवाया करणार्‍यांचा अड्डा ! - रा.स्व. संघ

     जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, म्हणजे राष्ट्र्रविरोधी कारवाया करणार्‍यांचा अड्डा आहे. त्याचसह तेथे शिकणारे विद्यार्थी हे नक्षलसमर्थक आहेत, असा आरोप पांचजन्य या राष्ट्र्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रात प्रसिद्ध झालेल्या एका लेखात करण्यात आला आहे. (केंद्रातील भाजप शासनाने या प्रकरणी लक्ष देऊन अशा राष्ट्रविरोधी कारवाया करणार्‍या विद्यार्थी संघटना आणि प्राध्यापक यांच्यावर कारवाई करावी, ही अपेक्षा ! - संपादक)

संपूर्ण मद्यबंदीसाठी उपोषणाला बसलेले राजस्थानचे माजी आमदार गुरशरण छाब्रा यांचे निधन

जनहिताच्या मागण्यांसाठी प्राणाची किंमत मोजावी लागणारा जगातील एकमेव देश भारत !
संपूर्ण मद्यबंदी आणि लोकपाल नियुक्ती यांविषयी केंद्र अन् राज्य 
शासन यांनी गांभीर्याने विचार करावा, ही अपेक्षा !
     जयपूर - राजस्थान राज्यात संपूर्ण मद्यबंदी करणे आणि सशक्त लोकपाल नियुक्ती करणे, या मागण्यांसाठी उपोषणाला बसलेले माजी आमदार गुरशरण छाब्रा यांचे निधन झाले. राजस्थानमध्ये जनहिताच्या मागणीसाठी उपोषणाला बसल्यावर अशा प्रकारे निधन होण्याची ही पहिलीच घटना आहे. (अशा मागण्यांसाठी आंदोलन का करावे लागते ? शासनाने स्वत:हूनच यावर कार्यवाही करणे अपेक्षित आहे ! - संपादक)

लष्कर-ए-तोयबा, जमात-उद-दावा यांसह ७२ आतंकवादी संघटनांच्या कार्यक्रमांच्या प्रसारणावर बंदी !

पाकिस्तानची तोंडदेखली कारवाई ! केवळ कार्यक्रमांच्या प्रसारणावर बंदी घालून 
या संघटनांच्या आतंकवादी कारवाया थांबणार आहेत का ?
    इस्लामाबाद - पाकिस्तान माध्यम नियामक मंडळाने लष्कर-ए-तोयबा, जमात-उद-दावा, फलाह-ए-इन्सानियत फाऊंडेशन (एफ्आयएफ्) यांसारख्या ७२ आतंकवादी संघटनांच्या कार्यक्रमांचे प्रसारण रोखण्याचा निर्णय घेतला आहे. २ नोव्हेंबरपासून आकाशवाणी अथवा दूरचित्रवाणी यांवरून आतंकवादी संघटनांच्या कार्यक्रमांच्या प्रसारणावर बंदी घालण्यात आली आहे.

पुरस्कार परत करणार्‍यांशी चर्चेस सिद्ध ! - राजनाथ सिंह

     नवी देहली - देशातील प्रत्येक गोष्टीसाठी थेट पंतप्रधानांना लक्ष्य करणे अयोग्य आहे. याआधीच्या शासनाच्या काळात अनेक मोठ्या दंगली झाल्या. त्या वेळी कुणी पुरस्कार परत केल्याचे दिसले नाही. तरीही आता कुणी तशी भूमिका घेत असेल, तर असहिष्णुतेच्या सूत्रावर त्यांच्याशी संपूर्ण दिवस बसून चर्चा करण्याची सिद्धता आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केले. देशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे दायित्व माझे आहे. त्यांनी माझ्यावर टीका करायला हवी. पंतप्रधान ही एक संस्था आहे. ऊठसूट त्यांना लक्ष्य करणे देशाच्या हिताचे नाही, असेही श्री. सिंह यांनी सांगितले.

राजस्थान शासनाच्या शिपायांच्या ५ जागांसाठी २३ सहस्र ६०० आवेदने प्राप्त

     जयपूर (राजस्थान) - येथील राजभवनात रिक्त झालेल्या शिपायांच्या ५ जागांसाठी २३ सहस्र ६०० अर्ज प्राप्त झाले असून पुढील दीड मास त्यांच्या मुलाखती चालणार आहेत, अशी माहिती राजभवनाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. लोकेशचंद्र शर्मा यांनी दिली आहे. या जागांसाठी शैक्षणिक पात्रता इयत्ता ५ वी उत्तीर्ण अशी आहे; मात्र आवेदन भरणार्‍यांमध्ये वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी (एम्. कॉम.) घेतलेले, अभियंते, तसेच अन्य उच्चशिक्षित उमेदवारांचाही समावेश आहे. (यावरून राज्यात सुशिक्षित बेरोजगारांची समस्या किती भीषण आहे, हे लक्षात येते! एका राज्यात इतकी भीषण स्थिती असेल, तर संपूर्ण देशात किती असेल, याचा विचारच न केलेला बरा ! - संपादक)

हिंदूंनो, हिंदुद्वेष्ट्यांना वेळीच रोखा ! - अभय वर्तक, सनातन संस्था

बेळगाव येथे जनसंवाद सभा
बेळगाव, ३ नोव्हेंबर (वार्ता.) - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी अटक करण्यात आलेल्या साध्वी प्रज्ञासिंह आणि अन्य हिंदुत्ववादी यांंच्यावर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने आरोपपत्र प्रविष्ट केलेले नाही. त्यांना अटक करून ४ वर्षे लोटली, तरी आरोपपत्र प्रविष्ट करता आले नाही. असे असेल, तर त्यांना न्याय कधी मिळणार आणि एवढ्या विलंबाने न्याय मिळाला, तर त्याला न्याय तरी कसे म्हणायचे ? अटकेच्या कालावधीत साध्वी प्रज्ञासिंह यांना अर्वाच्च शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. त्यांना अश्‍लील चित्रफिती दाखवण्यात आल्या. हिंदूंवर अत्याचार करणार्‍या अधिकार्‍यांना बढती देण्यात आली.

बिहारमधील आमदारांच्या संपत्तीत ५ वर्षांत प्रचंड वाढ !

लोकसेवकांच्या संपत्तीत एवढी वाढ होते कशी, हे जनतेला कळले पाहिजे !
पाटलीपुत्र (पाटणा) - बिहारमधील आमदारांच्या संपत्तीत ५ वर्षात लक्षणीय वाढ झाल्याचे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटीक रिफॉर्म्स या सेवाभावी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात उघड झाले आहे. या संस्थेने बिहारमधील १६० आमदारांनी गेल्या ५ वर्षांत कमावलेल्या संपत्तीचे आकडे घोषित केले आहेत. ही आकडेवारी सर्वसामान्य जनतेला आश्‍चर्यचकीत करून सोडणारी आहे. त्यातील काहींचा तपशील देण्यात आला आहे.
१. संयुक्त जनता दल पक्षाच्या आमदार पूनम देवी यांनी वर्ष २०१० मध्ये त्यांची संपत्ती १ कोटी ८७ लाख आहे, असे शपथपत्र निवडणूक अधिकार्‍यांकडेे सादर केले होते. वर्ष २०१५ मध्ये सादर केलेल्या शपथपत्रानुसार त्यांची संपत्ती ४१ कोटी ३४ लाख झाली आहे. ही वाढ २ सहस्र १०३ टक्के इतकी प्रचंड आहे.
२. याच पक्षाच्या नावडा येथील आमदार पूर्णिमा यादव यांची संपत्ती गेल्या ५ वर्षांत २ कोटी ७८ लाखावरून १६ कोटी १४ लाख झाली आहे.

(म्हणे) आमच्या देशाच्या अंतर्गत गोष्टीत लक्ष घालू नका !

अनेक गोष्टींसाठी भारतावर अवलंबून असणार्‍या नेपाळची भारताला चेतावणी
    काठमांडू - आमच्या देशाच्या अंतर्गत गोष्टीत लक्ष घालू नका, अशी गर्भीत चेतावणी छोट्याशा नेपाळने बलाढ्य भारताला दिली आहे. (साम्यवाद्यांचा प्रभाव कसा अधर्मी असतो, ते दाखवणारे उदाहरण ! एप्रिल २०१५ मध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपाच्या वेळी भारत शासन आणि भारतातील हिंदुत्ववादी संघटना नेपाळच्या साहाय्यासाठी तातडीने धावले होते. आज त्याच नेपाळमधील साम्यवादी शासन भारताला वाकुल्या दाखवत आहे. हा कृतघ्नपणा क्षम्य नाही, हे नेपाळच्या शासनाला कधी कळेल का ? - संपादक) नेपाळमधील नव्या राज्यघटनेच्या विरोधात मधेशी या समुदायाने केलेल्या आंदोलनात एका भारतीय युवकाचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या काही वेळानंतरच नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी एका कार्यक्रमात भारताच्या नेपाळविषयी असलेल्या धोरणावर टीका केली. ते म्हणाले, भारत मधेशी लोकांना भारत-नेपाळच्या सीमेवर नाकाबंदी करण्यास चिथावणी देत आहे. आमचे संविधान कोणत्याही देशाच्या विरेाधात नाही.

पुरस्कार वापसी हा शासन आणि जनता यांचा अपमान ! - अभिनेते कमल हसन

देशात असहिष्णुता वाढत असल्याचा कांगावा करत पुरस्कार परत करणार्‍यांना चपराक !
      नवी देहली, ३ नोव्हेंबर - पुरस्कार परत करणे, हा शासन आणि जनता यांचा अपमान होय, असे सांगत ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांनी आपण पुरस्कार परत करणार नसल्याचे स्पष्ट केले. देशात असहिष्णुता वाढत असल्याचे कारण पुढे करत काही लेखक, कलाकार, वैज्ञानिक, साहित्यिक, दिग्दर्शक आदींनी आपले पुरस्कार शासनाकडे परत केले आहेत. या पार्श्‍वभूमीवर कमल हसन प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
श्री. कमल हसन पुढे म्हणाले,
१. पुरस्कार परत करणे, हा मार्ग योग्य वाटत नाही. ज्यांनी ज्यांनी पुरस्कार परत केले आहेत, त्यांनी ते स्वीकारावेत आणि स्वतःची भावना वेगळ्या प्रकारे व्यक्त करावी. ते एखादा लेख लिहू शकतात आणि जनतेचे लक्ष वेधू शकतात.

गोमांस भक्षणाचे समर्थन निंदनीय ! - श्रीशैल पिठाचे जगद्गुरु

     गुलबर्गा - देशात शाकाहारी अन्न मुबलक असून मांसाहार सेवनाची आवश्यकता नाही. या देशात गोमांस अनिवार्य नाही. एखाद्या धर्माच्या भावना दुखवत गोमांस सेवन करण्याच्या घटना आणि त्याचे समर्थन करणार्‍यांची नीती निंदनीय आहे, असे परखड प्रतिपादन श्रीशैल पिठाचे जगद्गुरु डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य यांनी केले. आळंद तालुक्यातील किणीसुल्तान येथे शांतलिंगेश्‍वर हिरेमठाचे शिवशांतलिंग शिवाचार्य यांच्या पट्टाधिकार कार्यक्रमानिमित्त आयोजित धर्मसभेत ते बोलत होते. वीरशैव धर्म हे हिंदु धर्माचेच अविभाज्य अंग असल्याचे त्यांनी सांगितले.

बेळगाव येथे मराठी भाषिकांनी काळा दिन पाळला !

संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या घोषणा
     कोल्हापूर - बेळगावसह कर्नाटकातील सीमाभागात प्रतीवर्षी १ नोव्हेंबर हा काळा दिन पाळण्यात येतो. या वर्षीही १ नोव्हेंबरला काळा दिन पाळण्यात आला. या दिवशी सहस्रोंच्या संख्येने मराठी भाषिक रस्त्यावर उतरले होते. यात युवकांची संख्या लक्षणीय होती. या वेळी काढण्यात आलेल्या सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तेथे झालेल्या बैठकीला शिवसेनेचे जालना येथील आमदार श्री. अर्जुन खोतकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कर्नाटक येथील राष्ट्र आणि धर्म यांच्या आघातांच्या विरोधात लढण्याचा हिंदुत्ववाद्यांचा निर्धार

मंगळुरू (कर्नाटक) येथे प्रांतीय हिंदू अधिवेशन
डावीकडून पू. सत्यवान कदम, श्री. धर्मेंद्र,
श्री. सुब्रह्मण्य अगर्त, श्री. गुरुप्रसाद
आणि सौ. लक्ष्मी पै
    मंगळुरू, ३ नोव्हेंबर (वार्ता.) - येथील शारदा महाविद्यालयात १ नोव्हेंबर या दिवशी प्रांतीय हिंदू अधिवेशन घेण्यात आले. या वेळी राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होणारे आघात आणि त्यांच्या रक्षणार्थ संघटित होऊन लढण्याचा मानस उपस्थित हिंदुत्ववाद्यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर सर्व हिंदु संघटनांनी आपापसांतले मतभेद बाजूला ठेवून हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य संघटितपणे करण्याचा निर्धारही केला.
    या अधिवेशनाचा प्रारंभ सनातनचे संत पू. सत्यवान कदम यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आला. या वेळी अधिवक्ता श्री. सुब्रह्मण्य अगर्त, हिंदु महासभेचे श्री. धर्मेंद्र, हिंदु जनजागृती समितीचे राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद, सनातन संस्थेच्या सौ. लक्ष्मी पै हे उपस्थित होते. सदर अधिवेशनात दक्षिण कन्नड जिल्ह्यातील १३ विविध हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी, अधिवक्ते आणि हितचिंतक मिळून ७५ हिंदुत्ववादी सहभागी झाले होते. 

महागाई अल्प करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन ! - उद्धव ठाकरे

 डाळीचे भाव १२० रुपये किलो होणार !     
मुंबई - महागाई अल्प करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना दिले आहे, अशी माहिती शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांना दिली. ३ नोव्हेंबर या दिवशी शिवसेना भवनात शिवसेनेच्या नेत्यांसमवेत त्यांची बैठक झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. डाळीचे भावही १२० रुपये किलो करणार, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे श्री. ठाकरे यांनी या वेळी सांगितले.

सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता पाणी सोडल्यामुळे इंद्रायणी नदीला गटारीचे स्वरूप

हिंदूंनो, तीर्थ म्हणून ओळखले जाणार्‍या इंद्रायणी
नदीच्या पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाला जाब विचारा !
      आळंदी (पुणे), ३ नोव्हेंबर - पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि आळंदी नगरपालिका हद्दीतील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी नदीच्या पात्रात सोडले जाते. गेली अनेक वर्षे सांडपाण्यावर प्रक्रिया करू, अशी उत्तरे दिली जात आहेत; परंतु प्रत्यक्षात काहीच होत नाही. पिंपरी औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखाने रसायनमिश्रित पाणी थेट नदीत सोडतात. महानगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळ त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. (तीर्थस्वरूप नदीची दु:स्थिती पालटण्यासाठी शासनाने या प्रकरणी लक्ष घालून प्रदूषण करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, ही अपेक्षा ! - संपादक)

दलाई लामा यांचे चित्र असलेला अमली पदार्थ गोव्यात विक्रीस

गोवा अमली पदार्थाच्या विळख्यात ! 
धर्मगुरूंच्या नावे अमली पदार्थ विकणे, 
हा धर्मगुरूंचा अवमानच आहे ! अशा प्रकारांचा निषेध करा ! 
     पणजी - 'गोव्यातील अमली पदार्थ सेवनाच्या पार्ट्यांमध्ये सहभागी झालेल्यांसाठी दलाई लामा यांचे तिबेट येथून आगमन झाले आहे', असा संदेश हणजूण, वागातोर, मोरजी, मांद्रे आणि हरमल या उत्तर गोव्यातील समुद्रकिनारपट्टी भागांत अमली पदार्थ सेवनाच्या पार्ट्यांमध्ये सहभागी होत असलेल्यांमध्ये पोहोचवला जात आहे. २७ ऑक्टोबरपासून प्रारंभ झालेल्या पर्यटन हंगामासाठी बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांचे चित्र असलेला नवीन 'एल्एसडी' अमली पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर उपरोल्लेखित संदेश उत्तर गोव्यातील समुद्रकिनारपट्टी भागांत पोहोचवला जात आहे. (परशुरामभूमी असलेल्या गोमंतकातअसे प्रकार घडणे लांच्छनास्पद आहे ! झपाट्याने वाढणार्‍या अमली पदार्थ व्यवसायावर शासनाने कठोर कारवाई करणे आवश्यक ! - संपादक) 

सनातन आश्रमासारखी पवित्र वास्तू पहाण्यासाठी अवश्य यावे ! - पू. (कु.) स्वाती खाडये, सनातन संस्था

पू. कु. स्वाती खाडये
बेळगाव येथे जनसंवाद सभा
      सनातनच्या रामनाथी आश्रमाला भेट दिल्यास अध्यात्मप्रसार, राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती यांविषयी केलेल्या कार्याची कल्पना अधिक स्पष्ट होईल. सनातनचे आश्रम म्हणजे रामराज्याची म्हणजे हिंदु राष्ट्राची छोटी प्रतिकृती आहे. त्यामुळे ही पवित्र वास्तू पहाण्यासाठी अवश्य यावे.

महानगरपालिकेच्या शेकडो जागा आणि मिळकती यांची नोंद पालिकेकडे नाही !

पुणे महानगरपालिकेचा दायित्वशून्य आणि भोंगळ कारभार !
      पुणे, ३ नोव्हेंबर - महानगरपालिकेच्या मालकीच्या सहस्रो मिळकती आणि जागा आहेत. त्या पालिकेकडे कशा प्रकारे स्वाधीन करण्यात आल्या, याचा एक दस्ताऐवज असतो; परंतु त्यांची नोंदच पालिकेकडे नाही. त्यामुळे पालिकेच्या कोट्यवधी रुपये किमतीच्या जागा अक्षरश: धूळखात पडल्या आहेत. (पालिकेकडे अशा नोंदी नसणे, हे अतिशय गंभीर आहे. या प्रकरणातील संबंधितांवर आयुक्त कठोर कारवाई करतील का ? - संपादक) सर्व जागा आणि मिळकती यांची माहिती देण्यासाठी संगणकीय प्रणाली सिद्ध करण्यात आली होती; मात्र ती अद्ययावत नाही. याकडे पालिका प्रशासन लक्ष देणार कि नाही, असा प्रश्‍न उपमहापौर आबा बागुल यांनी केला आहे.

श्री तुळजाभवानी मंदिराच्या दानपेटीत १ कोटी ६९ लक्ष रुपये जमा

या पैशांचा विनियोग केवळ धार्मिक कार्यासाठी होणे अपेक्षित !
      तुळजापूर - तुळजाभवानी मातेच्या नवरात्रात देवीच्या सिंहासन पेटीत एक कोटी ६९ लक्ष ७ सहस्र ५२ रुपये जमा झालेले आहेत. तुळजाभवानी मंदिर समितीने बँक ऑफ महाराष्ट्र, मंदिर समिती आणि धर्मादाय खात्याचे प्रतिनिधी यांच्या समक्ष पैशांची मोजणी करण्याचे नियोजन यात्रेच्या आरंभी केले होते. देवीच्या मंदिरात असणार्‍या सिंहासन पेटीशिवाय मंदिरातील वेगवेगळ्या दानपेट्यांत ३५ लक्ष ८९ सहस्र १६५ आणि न्हाणीगृहात २ लक्ष ९८ सहस्र ३५५ रुपये भाविकांनी दान केलेले आहेत.

देशात असहिष्णुता वाढत आहे ! - शाहरुख खान

ग्रोधा हत्याकांड झाले, स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांची
निर्घृण हत्या झाली, आसाममध्ये सहस्रो बोडो आदिवासी आणि जनतेवर धर्मांधांकडून
अत्याचार झाले, भिवंडीत दोन पोलिसांना जाळण्यात आले, तेव्हा असहिष्णुता वाढली नव्हती का ?
      मुंबई - देशात असहिष्णुतेचे वातावरण दिवसेंदिवस वाढत आहे. पुरस्कार परत करणार्‍यांचा मी सन्मान करतो, असे मत बॉलिवूडचा अभिनेता शाहरूख खानने व्यक्त केले आहे. शाहरूख खानने २ नोव्हेंबर या दिवशी स्वत:चा ५० वा वाढदिवस साजरा केला. या वेळी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना शाहरुखने स्वत:चे मत व्यक्त केले.
      शाहरूख म्हणाला की, देशातील अनेक लेखक, वैज्ञानिक, कलावंत यांनी पुरस्कार परत केले असून माझा त्यांना पाठिंबा आहे; मात्र मी माझे पुरस्कार परत करणार नाही.

प्रत्येक तीन व्यक्तींमधील एकाला उच्च रक्तदाबाचा त्रास - डॉ. जगदीश हिरेमठ

     पुणे, ३ नोव्हेंबर - देशात ३२ ते ३५ प्रतिशत व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. प्रत्येक ३ व्यक्तींमधील एक व्यक्ती उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहे. वजन अल्प करणे, तणावरहित जगणे, प्रामुख्याने शाकाहारी आणि स्निग्ध पदार्थांचे प्रमाण अल्प असलेले अन्न सेवन करणे आवश्यक आहे. मद्य आणि सिगारेट ही व्यसने उच्च रक्तदाबाच्या दृष्टीने त्रासदायक आहेत. जीवनशैलीत सकारात्मक पालट केल्यास त्रास टाळता येऊ शकेल, असे मत प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांनी व्यक्त केले. द्वारिका संगमनेरकर मेडिकल फाउंडेशनतर्फे १ नोव्हेंबर या दिवशी आयोजित कार्यक्रमात रक्तदाबाविषयी सर्वकाही या विषयावर ते बोलत होते. संस्थेचे प्रमुख डॉ. अरविंद संगमनेरकर या वेळी उपस्थित होते.

हिंदूंच्या देवता, राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेल्या फटाक्यांची विक्री रोखा ! - मिरज येथे निवेदन

     मिरज, ३ नोव्हेंबर (वार्ता.) - प्रदूषण करणार्‍या, तसेच हिंदूंच्या देवता, राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेल्या फटाक्यांची निर्मिती आणि विक्री रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पाऊले उचलावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने मिरज येथील प्रांत कार्यालयात निवेदन देण्यात आले. या वेळी शिवसेनेचे व्यापारी सेनेचे मिरज शहराध्यक्ष श्री. तात्या कराडे, शिवसेनेचे सर्वश्री गजानन मोरे, चंद्रकांत मैगुरे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री चिदंबर कारकल, गिरीश पुजारी उपस्थित होते. स्थानिक सी न्यूजने या वेळी मुलाखत घेतली.

पुणे येथे बलात्कारप्रकरणी एका धर्मांधासह महिलेला अटक

अशा वासनांधांवर शासनाने कठोर कारवाई करावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
गर्भपात करणार्‍या धर्मांध डॉक्टरवरही गुन्हा प्रविष्ट
       पुणे, ३ नोव्हेंबर - दुकानात नोकरी करणार्‍या १९ वर्षीय युवतीवर बलात्कार करून तिला गर्भपात करण्यास भाग पाडणार्‍या मुस्ताक महंमद हुसेन कुरेशी आणि योगिता पवार यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्या दोघांना न्यायालयाने ९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. गर्भपात केल्याप्रकरणी आनंद नर्सिंग होममधील डॉ. शेख यांच्याविरुद्धही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
१. आरोपी कुरेशी याचे येथील गणेश पेठेत खेळणी, गोळ्या आणि बिस्कीट यांच्या विक्रीचे दुकान आहे. आरोपी योगिताने पीडित मुलीला त्याच्या दुकानात नोकरी दिली होती.
२. योगिताने तिला पैशांचे आमिष दाखवून कुरेशी याच्या समवेत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले, तसेच कुरेशीने अनेक वेळा तिला धमकावून तिच्यावर बलात्कार केला होता. ती गर्भवती राहिल्यामुळे दोन्ही आरोपींनी तिला गर्भपात करण्यास भाग पाडले होते.

अमली पदार्थांच्या तस्करीच्या प्रकरणी ९ नायजेरियन नागरिक अटकेत

     नवी मुंबई - अमली पदार्थांची तस्करी करणार्‍या ९ नायजेरियन नागरिकांना नवी मुंबई पोलिसांनी १ नोव्हेंबर या दिवशी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या नायजेरिन टोळीने जुहुगावातील इमारतीत तळ ठोकला होता. त्याच ठिकाणी अमली पदार्थाचा मोठा साठा दडवला असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी छापा मारून अमली पदार्थांच्या साठ्यासोबत २१ भ्रमणध्वनी संच, भ्रमणसंगणक आणि टॅबही कह्यात घेतले आहेत.

१८ ते २३ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत मिरज ते सज्जनगड पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन - पू. कौस्तुभबुवा रामदासी

      मिरज, ३ नोव्हेंबर (वार्ता.) - माघ शुद्ध गुरुवार, १८ फेब्रुवारी ते माघ कृष्ण १, मंगळवार, २३ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत मिरज ते सज्जनगड असा सहा दिवसांचा पायी दिंडी सोहळा आयोजित केला आहे. हा सोहळा मिरज, सांगली, आष्टा, ईश्‍वरपूर, कासेगाव, कराड, खोडशी, उंब्रज, शिरगाव, नागठाणे, सातारा मार्गे सज्जनगड असा होईल. या काळात सांप्रदायिक उपासना, कीर्तन, भजन आदी आनंद घेण्याची संधी प्राप्त होत आहे, तसेच समर्थ रामदासस्वामी आणि समर्थ वेणास्वामी यांच्या चरण पादुकांसमवेत चालण्याची ही संधी आहे. यात तन, मन, धन यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मिरज येथील वेणास्वामी मठाचे मठाधिपती पू. कौस्तुभबुवा रामदासी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ०२३३ -२२२७९१४, २२२५०४०, ९४०४७०६०६९ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

मातृभाषा ही प्राथमिक शिक्षणाचे माध्यम होण्यासाठी शासनाच्या विरोधात निर्णायक लढा देण्याची वेळ ! प्रा. सुभाष वेलिंगकर

गोव्यातील प्राथमिक शिक्षणातील माध्यमप्रश्‍न ! 
     मोरजी - मातृभाषा ही प्राथमिक शिक्षणाचे माध्यम होण्यासाठी शासनाच्या विरोधात निर्णायक लढा देण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन भारतीय भाषा सुरक्षा मंचाचे नेते प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केले. मोरजी येथील विद्याप्रसारक समाजाच्या सभागृहात भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या (भाभासुमं) मांद्रे शाखेच्या बैठकीत बोलतांना प्रा. वेलिंगकर यांनी हे प्रतिपादन केले. या वेळी 'भाभासुमं'चे मांद्रे विभागाचे अध्यक्ष अशोक मांद्रेकर, रत्नाकर लेले, खजिनदार सुभाष देसाई, तरणी गावकर, प्रा. गजानन मांद्रेकर, दिलीप मेथर आदींची उपस्थिती होती.

गोव्याला 'पुण्यभूमी' असे नाव शासकीय स्तरावर द्या !

लेखक, स्वातंत्र्यसैनिक आणि शिक्षणतज्ञ यांची मुख्यमंत्री पार्सेकर यांच्याकडे स्तुत्य मागणी 
 'थँक्यू' ऐवजी 'देव बरे करू' या वाक्प्रचाराचा वापर करा ! 
     पणजी - केरळ राज्याला ज्याप्रमाणे 'गॉड्स ओन कन्ट्री' (gods own country) (देवभूमी) असे संबोधले जाते, तसे गोव्याला शासकीय स्तरावर 'पुण्यभूमी' असे संबोधण्यात यावे, अशी मागणी 'गोयां तुझ्या मोगाखातीर' (गोवा तुझ्या प्रेमासाठी) या शीर्षकाखाली संघटित झालेले गोव्यातील लेखक, स्वातंत्र्यसैनिक आणि शिक्षणतज्ञ यांनी मुख्यमंत्री पार्सेकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. लेखक, स्वातंत्र्यसैनिक आणि शिक्षणतज्ञ यांच्या शिष्टमंडळाने या वेळी गोव्यातील स्वातंत्रलढ्यावर आधारित वस्तूसंग्रहालय उघडावे आणि शासकीय स्तरावर 'थँक्यू' असे म्हणण्याऐवजी 'देव बरे करू' (देव तुझे भले करो) हा वाक्प्रचार वापरण्यात यावा, या मागण्याही केल्या आहेत. या शिष्टमंडळामध्ये 'गोयां तुझ्या मोगाखातीर'या संघटनेचे समन्वयक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक गुरुनाथ केळेकर, कलानंद मणी, स्वा.सै. नागेश करमली, दिलीप बोरकर, फादर माऊझेनि आथाडे आणि मार्टीन फर्नांडिस यांचा समावेश होता. 

काणकोण येथील नगरसेवकाने करून घेतला स्वत:वरच दुधाचा अभिषेक !

सामाजिक प्रसारमाध्यमांतून टीकेची झोड 
     काणकोण-  काणकोण नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत निवडून आलेले किशोर शेट यांनी नवस बोलल्याप्रमाणे स्वत:वर दुधाचा अभिषेक घातल्याच्या घटनेचे 'व्हिडिओ' सामाजिक संकेतस्थळांवर प्रसारित झाल्यानंतर या कृतीवर विविध स्तरांतून टीका करण्यात आली. 

कौशल्य विकास प्रशिक्षण प्रसिद्धी रथ पुण्यात

     पुणे, ३ नोव्हेंबर - रोजगारासाठी उपयुक्त ठरणार्‍या विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती व्हावी, या हेतूने हुनर एक्स्प्रेस हा प्रसिद्धी रथ येथून मार्गस्थ झाला.'हुनर है तो कदर है ' असे घोषवाक्य असणारा चित्ररथ राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये जाणार आहे. 

मुंब्रा (ठाणे) येथे गोवंशियांना हत्येसाठी नेणार्‍या दोघांना अटक

गोवंशियांची सुटका करतांना श्री. चेतन शर्मा
शासनाने गोवंशहत्या बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे अपेक्षित !
गोरक्षक श्री. चेतन शर्मा यांनी केली गोवंशियांची सुटका
      मुंब्रा - येथे हत्येसाठी आणलेली १ गाय आणि २ बैल यांची गोरक्षक श्री. चेतन शर्मा यांनी कसायांच्या कह्यातून सुटका केली. (गोवंशियांची सुटका करणारे गोप्रेमी श्री. शर्मा यांचे अभिनंदन ! - संपादक) या प्रकरणी गुन्हा प्रविष्ट करण्यात आला असून पाच पैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. राजू उंगली, इक्बाल कुरेशी, मुन्ना, मुन्नावार, अमिन डोळे अशी त्यांची नावे आहेत. गोवंशियांना कळंबोली आसूडगाव येथील गोशाळेत पाठवण्यात आले आहे. पूर्णपणे झाकलेल्या एका चारचाकी वाहनातून त्यांची वाहतूक करण्यात येत होती. हे लक्षात येताच गोरक्षक श्री. चेतन शर्मा यांनी पोलिसांच्या साहाय्याने त्यांची सुटका केली आहे.

दोन वर्षे उलटली, तरी ५१ आरोपींविरुद्ध कारवाई नाही !

पर्वरी येथे नायजेरियातील नागरिकांनी हैदोस घातल्याचे प्रकरण 
 असे अकार्यक्षम पोलीस काय कामाचे ? पर्यटनाच्या 
नावाखाली गोव्यात येऊन येथीलकायदा-सुव्यवस्था  बिघडवणार्‍या 
नायजेरियन नागरिकांना त्यांच्या मायदेशात हाकलून लावले पाहिजे ! 
     पर्वरी - येथे नायजेरियातील नागरिकांनी महामार्ग अडवून हैदोस घातल्याच्या प्रकरणाला २ वर्षे उलटली, तरी सर्व ५१ आरोपींविरुद्ध पर्वरी पोलिसांनी आरोपपत्र सादर केलेले नाही. त्यामुळे सर्व आरोपींना देशाबाहेर हाकलले जाईल, या शासनाकडून त्या वेळी देण्यात आलेल्या आश्‍वासनाची अजून पूर्तता झालेली नाही. या प्रकरणातील एकाही आरोपीला देशातून हाकलण्यात आलेले नाही. 

दिवाळीच्या निमित्ताने मिठाईतील भेसळ टाळण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन संचालनालय सक्रीय

     पणजी - दिवाळीच्या निमित्ताने मिठाईतील भेसळ टाळण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन संचालनालयाने विविध पावले उचलली आहेत. खात्याने परराज्यांतून गोव्यात आयात होत असलेला भेसळयुक्त खवा आणि मावा यांच्यावर रोख लावण्यासाठी योजना आखली आहे. अन्न आणि औषध प्रशासन संचालनालयाचे संचालक सलीम वेलजी यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली आहे.

फलक प्रसिद्धीकरता

हा आर्थिक जिहाद नव्हे का ? 
     'स्टेट बँक ऑफ इंडिया'ने काश्मीरमधील नागरिकांकडून कर्जाची वसुली करण्यासाठी सर्वोेच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कर्जवसुलीसाठी बँकेने कर्जबुडव्यांच्या मालमत्तेवर टाच आणली; परंतु तेथील नागरिकांनी 'बिगर काश्मिरींना काश्मीरमधील मालमत्ता कह्यात घेता येत नाही', असा पवित्रा घेतला.

(म्हणे) कोणत्याही कलेला धर्म नसतो !

शाहरूख खान यांचे फुकाचे बोल !
     मुंबई - कोणत्याही कलेला धर्म नसतो. कलाकारापेक्षा त्याच्या कलेला आपण अधिक महत्त्व द्यायला हवे, असे हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता शाहरूख खान यांनी म्हटले आहे. शाहरूख खान यांचा ५० वा वाढदिवस २ नोव्हेंबरला साजरा करण्यात आला. त्यानिमित्त ते पत्रकारांशी बोलत होते. गुलाम अली यांच्या मुंबईतील रहित झालेल्या कार्यक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी हे विधान केले.

आमदार बच्चू कडू यांची पोलीस उपअधीक्षकाला शिवीगाळ

     धाराशिव - अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अपंगांसाठीच्या एका आंदोलनात पोलीस उपअधीक्षकांना शिवीगाळ केली. अपंगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी उस्मानाबाद जिल्हा परिषदेवर २ नोव्हेंबर या दिवशी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्च्यानंतर बच्चू कडू यांनी काही कार्यकर्त्यांसह मुख्याधिकार्‍यांच्या कक्षेत जाऊन पटलावर चढत घोषणा दिल्या. यामुळे पोलीस आणि कडूं यांच्यामध्ये मोठी बाचाबाची झाली.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
 Nepali PM ne Bharatse kaha, "hamare gharelu mamlome dakhal na de !" 
- Bhukampaki madad ko ye 6 mahinome bhul gaye !
 Ye hai Samyavad ka Nidharmi Prabhav ! 

जागो ! 
नेपाळी पी.एम्.ने भारतसे कहा, "हमारे घरेलू मामलोंमें दखल न दे !" 
- भूकंपकी मदद को ये ६ महिनोंमें भूल गये ! 
ये है साम्यवाद का निधर्मी प्रभाव !

समाजकंटकांचे सनातन आश्रमावरील आक्रमणांचे घृणास्पद कृत्य चालूच !

शिवीगाळ करणे, धमक्या देणे, अश्‍लील बोलणे आणि दगडफेक
करणे या गोष्टी दखलपात्र ठरवणारे दंडविधान हिंदु राष्ट्रात असेल !
सनातनच्या रामनाथी आश्रमातील साधकांना धमक्या देण्याचा, अश्‍लील बोलण्याचा आणि आश्रमावर दगड फेकण्यास आरंभ केल्याचा कालचा ५ वर्षे ३५० वा (२१७५ वा) दिवस !
२.११.२०१५
  • ८.२० वाजता आश्रमासमोरील रस्त्यावरून दुचाकीवरून तिघे जण हातवारे करत सनातन बॉम्ब असे ओरडत गेले.
  • १.३० वाजता आश्रमासमोरील रस्त्यावरून दुचाकीवरून एक व्यक्ती शिवीगाळ करून सनातन बॉम्ब असे ओरडत गेली.

अल्पसंख्य असणे सुखदायी-जीवघेणे !

पाकमधील ८८ हिंदूंविषयी मानवतावादी भूमिका हवी ! 
Add caption
एखाद्या शब्दाचे दोन अर्थ असू शकतात; मात्र ते कमालीचे परस्परविरोधी असू शकतात, असे प्रथमच दिसत आहे. हे वेदनादायक चित्र आहे भारत आणि पाकिस्तान यांतील ! निमित्त झाले, ते पाकिस्तानातून आलेल्या ८८ हिंदूंमुळे. सहा कुटुंबातील या ८८ व्यक्ती देवदर्शनासाठी ६ मासांपूर्वी भारतात आल्या. त्यांच्या व्हिसाची मुदत संपली आहे; मात्र त्या परत जाण्यास सिद्ध नाहीत. तिथे आमची केव्हाही हत्या होईल. आमच्या स्त्रिया कधीच सुरक्षित नसतात. घरात घुसून बायकांना घेऊन जातात. इस्लाम कबूल करा, मग हा त्रास होणार नाही, असे आम्हाला सांगण्यात येते. त्या नरकात परत जाण्यापेक्षा इथे आम्ही कसेही सुरक्षित राहू, असे सर्वांचे म्हणणे आहे. शासनाने उदार होऊन त्यांच्या व्हिसाची मुदत १५ दिवसांनी वाढवली. तीही आता संपत आली आहे. आता शासन कठोरपणे या ८८ हिंदूंना नरकात ढकलून देते कि मानवतावादी भूमिकांतून आश्रय देते, हे पहायचे.

मुसलमानाच्या हत्येनंतर देशभरात रान उठवणारे; पण हिंदूचा खून झाल्यावर काही न बोलणारे तथाकथित सेक्युलरवादी कि फेक्युलर (ढोंगी) ?

एकीकडे निधर्मीपणाचे ढोल पिटायचे आणि दुसरीकडे केवळ जातीयवादी वृत्तीने रहायचे, असा ढोंगीपणा 
या फेक्युलर मंडळींचा असल्याचे दिसते. त्याला मुलामा मात्र निधर्मीपणाचा द्यायचा, हा दुटप्पीपणा 
आता सर्वांना कळून चुकला आहे !
डॉ. सच्चिदानंद शेवडे
     कर्नाटकातील मुडबिद्री येथील प्रशांत पुजारीचा अत्यंत निर्घृणपणे खून झाल्यावर सेक्युलर (धर्मनिरपेक्षतावादी) मंडळी आपली सद्सद्विवेकबुद्धी शाबूत ठेवून दादरी (उत्तरप्रदेश) येथील अखलाखच्या खुनासारखेच सर्वत्र रान माजवून आवाज उठवतील, अशा खुळ्या समजुतीत आम्ही होतो. खून हा शेवटी खूनच असतो, असे या सेक्युलरांना वाटत नाही, हेच खरे. पुजारीचा खून हा बहुधा वृत्तमूल्य मिळवून देणारा नव्हता; पण अखलाखचा मात्र होता. एकीकडे निधर्मीपणाचे ढोल पिटायचे आणि दुसरीकडे केवळ जातीयवादी वृत्तीने रहायचे, असा ढोंगीपणा या फेक्युलर मंडळींचा असल्याचे दिसते. त्याला मुलामा मात्र निधर्मीपणाचा द्यायचा, हा दुटप्पीपणा आता सर्वांना कळून चुकला आहे.

समाज आणि राष्ट्र यांची भयावह स्थिती

     समाजजीवनात जीवनमूल्यांवरील निष्ठा फार क्षीण होत आहे. गुंडगिरी, भ्रष्टाचार, धर्म, श्रद्धा आणि संस्कृती यांचा उच्छाद करणारी मानसिकता, दैदीप्यमान इतिहासाचे विकृतीकरण करण्याची धडपड, परधर्मियांचे आक्रमण, त्यांचा सर्वत्र मुक्त संचार, जातीयतेचे भयानक विष, त्याचाही उपयोग स्वार्थासाठी करवून घेण्याची निंदास्पद मनोवृत्ती, प्रान्त-भाषा-शिक्षण-प्रादेशिक सीमा यांमुळे राष्ट्रीयतेवर फुटीरतेचे सावट, विचारवंतांची समाजपराङ्मुख उदासीन मनोवृत्ती, बेधुंद फंदफितुरी, राजकारणाचे गुन्हेगारीकरण, कर्तव्यांकडे पाठ फिरविण्याची वृत्ती, निष्क्रीय उदासीनता इत्यादी समस्या राक्षसी तांडव करीत आहेत. हिंदुस्थानात समाजजीवनाची ही स्थिती फार फार भयावह आहे. स्वतःला हिंदू म्हणविणारे आम्ही, संघटित होऊन प्रतिकार करण्याऐवजी अगतिक आणि हताश होऊन निष्क्रीयपणे पहात आहोत, सोसत आहोत. 
- श्री. अनिरुद्ध (संपादकीय, ज्ञानेश्‍वरी स्वर्णिमा, १३.५.२००७, वर्ष १, अंक ९, पृ. २, ३)

पानसरे, कलबुर्गी आणि छोटा राजन

श्री. भाऊ तोरसेकर
     तिकडे इंडोनेशियात छोटा राजनला पकडण्यात यश आलेले आहे आणि इथे त्याला आणल्यावर कोणकोणत्या रहस्यांचा पडदा उठेल, याची चर्चा रंगली आहे; पण त्यातील एक महत्त्वाचा दुवा या रंगार्‍यांच्या दृष्टीस आलेला दिसत नाही. बरोबर एक महिन्यापूर्वी एका इंग्रजी दैनिकाने कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येमध्ये राजन टोळीचा हात असल्याची बातमी दिली होती; पण त्याची आठवण कोणाला नाही. राजनला अशी कोणी सुपारी दिली असेल, तरच त्याने पानसरेंच्या हत्येचा उद्योग आपल्या हस्तकांकरवी करून घेतला असेल. त्याविषयी माहिती देतांना संबंधित तपास अधिकार्‍यांनी कोठडीत असलेला समीर गायकवाड याचा हत्येशी संबंधही नसू शकतो, असे म्हटलेले होते; कारण त्याच्याशी सतत संपर्कात असलेला एक शंकास्पद माणूस राजन टोळीचा होता. यापूर्वीही अनेक गुन्ह्यांसाठी पोलिसांनी त्याला कह्यात घेतल्याचे बातमीत म्हटलेले होते. तसे असेल तर पानसरे हत्येवरही राजन प्रकाश टाकू शकेल.

(म्हणे) एखाद्या मित्राला आपले विचार पटत नसल्यास त्याला क्षमा करा !

एका ज्येष्ठ ख्रिस्ती महिलेचा पत्राद्वारे हिंदु जनजागृती समितीचे 
डॉ. मनोज सोलंकी यांना पूर्वग्रहदूषित मनाने सल्ला !
     सैतानाचा विचार बाजूला ठेवा. एखाद्या मित्राला आपले विचार पटत नसल्यास त्याला क्षमा करा, असा पूर्वग्रहदूषित सल्ला एका ज्येष्ठ ख्रिस्ती महिलेने यांनी हिंदु जनजागृती समितीचे राज्य समन्वयक डॉ. मनोज सोलंकी यांना एका पत्राद्वारे दिला आहे. (ख्रिस्त्यांनी हिंदूंना सहिष्णुता शिकवण्याची आवश्यकता नाही. गोव्यातील हिंदूंना ख्रिस्त्यांचे विचार पटत नव्हते, तेव्हा त्यांना जाळून मारणारे ख्रिस्तीच होते. तुळशी वृंदावन तोडणारे, देवतांच्या मूर्ती पायाखाली तुडवणारे हिंदू पाहून मला आनंद होत आहे, असे पत्र स्पेनच्या राजाला लिहिणारा तथाकथित सेंट फ्रान्सिस झेवियर या सैतानाच्या शवाचे बहुसंख्य हिंदू असलेल्या याच गोव्यात प्रदर्शन भरते, ते हिंदूंनी ख्रिस्त्यांच्या अज्ञानाला, हट्टाग्रहाला, अंधश्रद्धेला आणि धर्मांधतेला क्षमा केल्यामुळेच ! ख्रिस्त्यांनी हे विसरू नये ! - संपादक) 

मोदींनी ही संधी दवडू नये !

आपला देश जरी धर्मनिरपेक्ष असला, तरी देशाचे राजकारण धर्माभोवतीच फिरत राहिले. देशावर साडेपाच दशके राज्य करणार्‍या काँग्रेसने आमचा पक्ष धर्मनिरपेक्ष चौकटीचे पालन करणारा असल्याचे कितीही ओरडून सांगितले आणि भाजप-शिवसेना या हिंदुत्ववादी पक्षांवर धर्मांधतेचे शिक्के मारले, तरी काँग्रेसनेच सर्वप्रथम धर्मनिरपेक्षतेच्या बुरख्याआड धर्मांधतेचे राजकारण करण्यास प्रारंभ केला, ही वस्तूस्थिती आहे. अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आणि बहुसंख्यांकांकडे दुर्लक्ष करणे, ही यांची धर्मनिरपेक्षता ! काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी देशाच्या स्वातंत्र्यापासून धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली विशिष्ट जाती-धर्मांच्या तुष्टीकरणाचे राजकारण चालू ठेवले आणि त्याचा परिणाम देशाच्या विकासावर झाला.

संकुचित वातावरणात कोंडलेले महाविद्यालयीन जीवन आणि विद्यार्थ्यांचे एकसुरी व्यक्तीत्व !

१. महाविद्यालयांतील वातावरणामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तीत्व एकसुरी होणे : महाविद्यालयीन निवडणुका, सांस्कृतिक मंडळांची उद्घाटने, वाद, स्पर्धा, टॅलेंट कॉन्टेस्ट, स्पोर्टस् मीट या सार्‍यांनी गाजलेले हे शिक्षणसत्र संपायला आले आहे. अशा वेळी यांतील घडामोडींकडे थोडे चिकित्सकपणे पहायला हवे, असे मला वाटते. आजचे महाविद्यालयीन वातावरण आणि पर्यायाने तुमचे व्यक्तीत्व कमालीचे एकसुरी होऊ पहात आहे. शिक्षण सोडून अवांतर चळवळींचा विचार केल्यास त्यांचे स्वरूप हे नेमेची येणार्‍या गोष्टीप्रमाणे हंगामी झाले आहे. निवडणुका, सभा, उद्घाटने, भाषणे आणि स्पर्धा प्रतिवर्षी तेच. सहभागी होणारे विद्यार्थी पालटतात, हाच काय तो भेद आहे. इतर सारे जणू एखाद्या आखिव साच्यासारखे तेच आणि केवळ तेच आहे. या पद्धतीच्या अवांतर चळवळीमधील माझ्या मते अत्यंत आक्षेपार्ह भाग म्हणजे निवडणुका ! कारण त्याचे विकृत स्वरूप ! येथून चालू झालेले हे दुष्टचक्र त्याच ठराविक चाकोरीतून वर्षांमागून वर्षे फिरतांना दिसते.

संभाजीनगर येथील ५१ टक्के पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कु. मेघ भावेश सराफ (वय १३ वर्षे) !

कु. मेघ सराफ
१. जन्म ते १ वर्ष
१ अ. काचेच्या पेटीत ठेवलेल्या मेघला गणपतीचा नामजप करत दूध पाजणे : मेघचा जन्म नवव्या मासाच्या आरंभी झाल्यामुळे जन्मतः तो पुष्कळ अशक्त असून त्याचे वजन अल्प होते. त्यामुळे त्याला जन्म झाल्यानंतर काचेच्या पेटीत आणि प्राणवायूवर ठेवले होते. जेव्हा त्याला आईचे दूध चमच्याने पाजण्यास सांगितले. तेव्हा त्याच्या आईला गणपतीचा नामजप करत दूध द्यायला सांगितले. त्याप्रमाणे केल्यानंतर त्याची वाढ उत्तम होऊ लागली. ८ दिवसांतच त्याला रुग्णालयातून घरी जाण्याची अनुमती देण्यात आली. त्याची वाढ पाहून आधुनिक वैद्यांनासुद्धा पुष्कळ आश्‍चर्य वाटले.

साधकांना घडवण्याची तळमळ असणारे आणि प.पू. डॉक्टरांप्रती अपार भाव असणारे ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे मंगळुरू येथील श्री. रमानंद गौडा !

श्री. रमानंद गौडा
     श्रीकृष्णाच्या कृपेमुळे मला श्री. रमानंद गौडा यांचा सत्संग मिळाला. देवाने मला दादांसमवेत शिकण्याची संधी दिल्यामुळे मी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. देवाने जे शिकवले, त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करून लिहिण्याचा प्रयत्न करते.
१. नम्रता
      रमानंददादा म्हणजे मूर्तीमंत नम्रता ! ते सर्व साधकांशी नम्रतेने बोलतात. त्यांचे चालणे आणि बोलणे यांत नम्रता दिसून येते. ते कधीही मोठ्या आवाजात बोलत नाहीत.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी सापुतारा, गुजरात येथे केलेल्या अनुष्ठानाच्या वेळी आलेल्या अनुभूती

    
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी त्यांच्या सर्व भक्तांना स्वतःच्या गुरूंचे दर्शन व्हावे, तसेच प.पू. डॉक्टरांचे स्वास्थ्य चांगले रहावे, यासाठी २२ आणि २३.१०.२०१५ असे दोन दिवस अनुष्ठान केले. योगतज्ञ दादाजी वैशंपायन हे आपल्या संकल्प उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्न म्हणून आपल्या ॐ आनंदं हिमालयं या संप्रदायातील उच्च विद्याविभूषित ३० साधकांसोबत गुजरात राज्यातील सापुतारा येथे उंच पर्वतावरील शिखरावर गेले आणि साधकांसमवेत दोन दिवसांत साडेबावीस तास सूर्याकडे पाहून डोळे उघडझाप करत सिद्धसूर्यनारायण स्तोत्र पठण केले. या वेळी योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या सांगण्यानुसार तेथे आलेले सनातन संस्थेचे साधक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासाठी नामजप आणि सिद्धसूर्यनारायण स्तोत्र पठण करत अतिमौलिक सुरक्षाकवचावर संस्कार करत होते.

कर्नाटकातील दोन धर्माभिमानी जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

धर्माभिमानी श्री. शिवप्पा गौडा (वय ७५ वर्षे) यांचा
सत्कार करतांना पू. सत्यवान कदम

सप्तर्षींच्या आज्ञेने गुरुपौर्णिमेच्या दिवसापर्यंत सर्व साधकांना श्रीराम पंचायतनची लॅमिनेशन चित्रे पाठवण्याची सेवा करतांना अनुभवलेला बुद्धीअगम्य घटनाक्रम !

श्रीराम पंचायतन
     या वर्षी ३१.७.२०१५ या दिवशी गुरुपौर्णिमा महोत्सव होता. गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रभु रामचंद्राच्या पंचायतनाची लॅमिनेशन चित्रे प.पू. डॉक्टरांची आशीर्वादरूपी भेट म्हणून पाठवायची होती. हा निरोप आम्हाला २७.७.२०१५ च्या रात्री ९ वाजता मिळाला. गुरुपौर्णिमेला ही चित्रे सर्व साधकांच्या हाती देण्यासाठी ती किमान एक दिवस आधी त्यांना पोेचणे अपेक्षित होते. मुंबई येथे छापण्यास दिलेली चित्रे २८.७.२०१५ या दिवशी दुपारी ४.३० वाजता मिळणार होती. तेव्हा समोरच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळून सर्व सेवा सुरळीत होऊ देत, अशी प्रार्थना केली. सप्तर्षींच्या नियोजनानुसार गुरुपौर्णिमेला ही चित्रे सर्व साधकांना मिळावीत, असे असल्याने काहीही करून ती सर्वांपर्यंत पोेचणारच होती. त्यामुळे आम्ही केवळ देवाचे नियोजन साक्षीभावाने पहात राहिलोे. या सेवेत पुष्कळ गोष्टी शिकायला मिळून देवाच्या अद्भुत लीलेची क्षणोक्षणी अनुभूती घेता आली.

पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे मार्गदर्शन करत असतांना त्यांचे डोळे शांत आणि सुंदर वाटणे

पू. (डॉ. ) चारुदत्त पिंगळे
      रामनाथी आश्रमात झालेल्या हिंदु जनजागृती समितीच्या शिबिराच्या तिसर्‍या दिवशी, म्हणजे २१.६.२०१५ या दिवशी पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे व्यष्टी साधनेविषयी मार्गदर्शन होते. त्या वेळी आनंद जाणवत होता. पू. काकांच्या डोळ्यांकडे पाहिल्यावर त्यांचे डोळे शांत आणि अतिशय सुंदर वाटले. ते सौंदर्य शब्दांत सांगता येत नाही आहे. दिवसभर त्यांच्या सान्निध्यात पुष्कळ उत्साहही जाणवत होता. - श्री. के.जी. तंगच्चन, कोट्टायम्, केरळ.
प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन

प.पू. पांडे महाराज
१. कर्म ही परीक्षा असणे
     प्रत्येक कर्म ही आपली परीक्षा असते. महाविद्यालयातील शिक्षण हा अभ्यास नसून प्रत्येक कर्म परिपूर्ण करणे, हा अभ्यास आहे.
२. नारळ ओला असतांना करवंटीला चिकटलेला असतो. सुकल्यावर तो विलग होतो, तसे आपल्याला मायेतून सुटायचे आहे.
३. अनावश्यक गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका !
      आपला वेळ आपण कसा वापरतो ?, याचा अभ्यास करावा. भ्रमणभाषवर किंवा अनावश्यक कारणांनी आपला वेळ वाया घालवू नये.

हिंदूंनो, दिवाळीसाठी चीनहून येणार्‍या आकाशकंदिलांवर बहिष्कार घाला !

     'हिंदूंनो, आता चीनहून भारतात आकाशकंदिल आले आहेत. आपण जर त्यांच्यावर बहिष्कार घातला नाही, तर उद्या चीनमधील पूर्वीच्या देवता आणि चीनचा साम्यवादही आपल्या घरात यायला वेळ लागणार नाही. प्रथम चीनहून हसणारा बाहुला (म्हातारा) आला होता. तो घरात ठेवल्यास वास्तूशुद्धी होते, अशी हाकाटी देऊन प्रत्येक घरात तो बाहुला पोहोचवला गेला. त्यानंतर चीनमधील काही उत्पादने अत्यंत अल्प दरात मिळतात; म्हणून प्रत्येकाच्या घरात पोहोचली. आता आपल्या मंगलमय दिवाळीच्या सणातील महत्त्वाचे आकाशकंदिलही चीनहून यायला आरंभ झाला, तरीही त्या विरोधात कुणीही चकार शब्द काढत नाही. अशा प्रकारे जर आपण हाताची घडी घालून बसलो, चीनहून आलेली प्रत्येक वस्तू घेत गेलो, तर पुढे त्यांच्या पूर्वीच्या देवताही आपल्या घरात, देवघरात यायला वेळ लागणार नाही. आताच आपण जागृत झालो, तर पुढे चीनहून येणार्‍या अन्य वस्तूंवर आळा बसेल. यासाठी आपण सर्वांनी आताच जागृत होऊया. हे केवळ राष्ट्रावरचेच संकट नाही, तर आपल्या धर्मावरचेही संकट आहे. उत्तिष्ठ !' - एक साधक, बेंगळुरू

साधकांसाठी महत्त्वाची सूचना

पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ
प्रवासातील प्रत्येक क्षण म्हणजे देवाने
धर्मप्रसारासाठी दिलेली सुवर्णसंधी असल्याने प्रवासात विविध समष्टी सेवा करून श्रीगुरूंच्या कृपाप्रसादास पात्र व्हा !
१. तीर्थाटन आणि देशाटन करून धर्मप्रसार
करणारे, तसेच सर्वसामान्यांच्या मनावर साधनेचे महत्त्व
बिंबवणारे महान हिंदु धर्मप्रसारक !
       पूर्वीच्या काळी आद्य शंकराचार्य, श्री चैतन्य महाप्रभु, स्वामी विवेकानंद आदी हिंदु धर्मप्रसारक महान हिंदु धर्माची पताका सार्‍या विश्‍वात फडकवण्यासाठी, तसेच सर्वसामान्यांच्या मनावर साधनेचे महत्त्व बिंबवण्यासाठी निरनिराळ्या प्रकारे प्रयत्न करत असत. तीर्थाटन, तसेच देशाटन करतांना ते सहप्रवाशांना हिंदु धर्म, साधना आदींचे महत्त्व सांगत असत.

साधकांसाठी सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

सर्व ई-मेल खातेधारकांनी खात्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुढील महत्त्वाची सूत्रे लक्षात घ्यावीत !
      बरेच जण मजकूर (टेक्स्ट), छायाचित्रे आदींच्या देवाण-घेवाणीसाठी ई-मेलचा वापर करतात. या संदर्भातील महत्त्वाची माहिती पुढे देत आहे.
१. खात्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने घ्यावयाची काळजी
अ. आपल्या खात्याचा संकेतांक (पासवर्ड) कोणत्याही अनोळखी व्यक्तीला देऊ नये.
आ. password, 12345678 असे कॅरॅक्टर्स असलेला अथवा स्वतःचा जन्मदिनांक किंवा भ्रमणभाष क्रमांक अंतर्भूत असणारा संकेतांक ओळखता येणे सोपे असल्याने तसे संकेतांक निवडू नयेत.

बोधचित्र


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
वापरा आणि टाकून द्या या पाश्‍चात्त्यांकडून शिकलेल्या वृत्तीमुळे आता हिंदूही नोकरी लागेपर्यंत आई-वडिलांचा वापर (लाभ) करून घेतात आणि नोकरी लागल्यावर त्यांना टाकून देतात, म्हणजे त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतात. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२९.५.२०१५)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान 
योगी आणि भक्त 
अ. मेणबत्तीचा प्रकाश म्हणजे भक्ती आणि मोठा प्रकाश म्हणजे योग. योग्याचे तेजही सहन होत नाही आणि भक्तीच्या मिणमिणत्या प्रकाशामुळे तिचे मूल्य कळत नाही. योग्याचे तेज दिसते; पण भक्तीचे सामर्थ्य लपलेले असते. 
आ. ज्याच्याकडे श्‍वासोच्छ्वासाचे अनुसंधान आहे, तो खरा योगी. 
भावार्थ : ध्यानयोग्याचे ध्यान संपले की, त्याचे अनुसंधान खंडित होते. ज्याचा नामजप श्‍वासोच्छ्वासावर होत असतो, म्हणजे नामाच्या ठिकाणी केवळ श्‍वासाची जाणीव असते, त्याचे श्‍वासाप्रमाणेच अखंड अनुसंधान असते. 
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन 'संत भक्तराज महाराज यांची शिकवण.')

प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

चुकांकडे कसे पहावे ?
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     इतरांच्या चुका दाखवणेे सोपे असते; पण इतरजन सुधारावेत, असे खरोखरच वाटत असेल, तर नुसत्या चुका न दाखवता त्या कशा सुधारायच्या, तेही सांगावे ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

खानसाहेब बरळले !

भारतात असहिष्णूता टोकाला पोहोचली आहे, असे वक्तव्य अभिनेता शाहरूख खान यांनी नुकतेच केले. साहित्यिक आणि अभिनेते यांनी पुरस्कार परत करणे, दादरी प्रकरण, शिवसेनेचा पाकला विरोध या घटनांची पार्श्‍वभूमी त्यांच्या वक्तव्याला होती. तेही प्रतिकात्मक निषेध व्यक्त करण्यासाठी पुरस्कार परत करू शकतात, असे त्यांनी सांगितले. सध्या सामाजिक प्रसारमाध्यमांतून एक अगदी बोलकी आणि मार्मिक पोस्ट व्हायरल झाली आहे. एका माकडाला पाहून सर्व माकडे त्यांच्या डोक्यावरच्या टोप्या खाली टाकतात...; पण ही गोष्ट पुरस्कार वापसीच्या संदर्भात लागू करू नका., अशी ती पोस्ट आहे. ते असो... येथे शाहरूख खान यांची वक्तव्ये केवळ प्रसिद्धीसाठीच आहेत, यात काही शंका नाही; मात्र निधर्मी पत्रकारांनी खोदून हा प्रश्‍न शाहरूख यांना विचारल्यावर त्याचीच री त्यांनी पुढे ओढली.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn