Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

सनातनचे पू. सुदामराव शेंडेआजोबा 
यांचा आज वाढदिवस

कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचा भगवा, तर कोल्हापुरात भाजप-ताराराणीची सरशी !

महानगरपालिकांचा निकाल घोषित !
कल्याण-डोंबिवलीत भाजपचा ४८ जागांवर विजय, तर कोल्हापुरात त्रिशंकू स्थिती   
मुंबई, २ नोव्हेंबर -  संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर येथील महानगरपालिकांचा निकाल २ नोव्हेंबरला घोषित झाला. कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचा सर्वाधिक ५२ जागांवर, तर भाजपचा ४८ जागांवर विजय झाला. कोल्हापुरात भाजप-ताराराणी आघाडीला सर्वाधिक ३२ जागा मिळाल्या आहेत. कल्याण-डोंबिवलीत पूर्ण बहुमतासाठी ६२ जागा अपेक्षित होत्या; परंतु हा आकडा गाठता न आल्याने सत्तेपासून शिवसेना १० जागांनी दूर आहे. त्यामुळे सत्तेच्या समीकरणासाठी अन्य पक्षांशी युती करून सत्ता स्थापन करावी लागेल, असे चित्र आहे. त्यामुळे शिवसेना आता कुणाशी युती करते, ते पहावे लागेल. शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या जोरदार प्रचारामुळे ही निवडणूक चर्चेचा विषय झाली होती. कल्याण-डोंबिवली निवडणुकीत धक्कादायक गोष्ट म्हणजे 'मजलीस-ए-इत्तेहाद-उल्-मुसलमीन' (एम्आयएम्) या पक्षाला २ जागा मिळाल्या आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी धर्मांध नाहीत ! - मुफ्ती महंमद सईद, मुख्यमंत्री, जम्मू-काश्मीर

पंतप्रधान मोदी यांच्याकडून काश्मीरसाठी मिळणार्या आर्थिक 'पॅकेज'च्या 
पार्श्वभूमीवर सईद यांच्याकडून पंतप्रधानांची स्तुती !
मुफ्ती महंमद सईद हे काश्मीरमधील फुटीरतावादाला खतपाणी घालत असल्याचे यापूर्वीच्या अनेक घटनांतून सिद्ध झाले आहे. त्यामुळे राष्ट्रहितार्थ अशांना भाजपने चार हात दूर ठेवणे केव्हाही चांगले ठरेल !
श्रीनगर - गेल्या काही दिवसांत देशात घडलेल्या हिंसक घटनांविषयी काही साहित्यिक आणि कलावंत यांंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवली असतांना जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती महंमद सईद यांनी मात्र मोदींची पाठराखण केली आहे. 'नरेंद्र मोदी हे धर्मांध नाहीत. त्यांना वेळ द्यायला हवा,' असे वक्तव्य सईद यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील आठवड्यात काश्मीर दौर्याावर जात आहेत. या दौर्यांत ते काश्मीर खोर्यातसाठी आर्थिक पॅकेजची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वयभूमीवर सईद यांनी पंतप्रधानांची स्तुती केल्याचे बोलले जात आहे. या मुलाखतीत सईद यांनी गोमांस बंदी आणि जम्मू-काश्मीरमधील राजकारण यांवर भाष्य केले आहे. गोमांसावर बंदी घातल्याच्या निषेधार्थ जम्मू-काश्मीरमध्ये सध्या जोरदार निदर्शने केली जात आहेत. 

सातारा येथील श्रीशिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि हिंदुत्ववादी यांना नोटीस

इतिहासाचे विकृतीकरण असलेल्या 'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' 
या नाटकाला विरोध केल्याचे प्रकरण
इतिहासाचे विकृतीकरण करणार्यांना नव्हे, तर त्याविरोधात वैध मार्गाने आवाज उठवणार्या हिंदुत्ववाद्यांना पोलीस नोटीस पाठवतात ! हिंदुबहुल देशात हिंदुत्वनिष्ठांची अशी मुस्कटदाबी कधी थांबणार ? अन्य धर्मियांना अशा नोटिसा कधी पाठवल्याचे ऐकिवात नाही !
सातारा, २ नोव्हेंबर (वार्ता.) - 'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' हे नाटक म्हणजे इतिहासाचे विकृतीकरण करून खोटा इतिहास बिंबवण्यासाठी केलेले प्रचारनाट्य आहे. त्यामुळे या नाटकाचे सातारा आणि कराड येथे होणारे प्रयोग रहित करून नाटकाच्या प्रदर्शनावर सातारा जिल्ह्यात बंदी घालावी, अशी मागणी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीसप्रमुख यांच्याकडे केली होती; मात्र जिल्हा पोलीस प्रशासनाने निवेदन देणारे श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते आणि शहरातील हिंदुत्ववादी यांना '१४९ ची नोटीस' बजावली आहे. '१४९ ची नोटीस' म्हणजे नाटकाच्या ठिकाणी काही गडबड गोंधळ झाल्यास पोलीस हिंदुत्ववाद्यांवर खटला दाखल करू शकतात. श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. सुधन्वा गोंधळेकर, विहिंपचे शहरमंत्री श्री. जितेंद्र वाडेकर, हिंदु महासभेचे कार्यकारिणी सदस्य श्री. उमेश गांधी यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे.

(म्हणे) असहिष्णु वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर साहित्य अकादमीने आत्मशोध घ्यावा !

पुरस्कार वापसी टोळीचे नवनवे चाळे
आत्मशोधाची खरी आवश्यकता पुरोगाम्यांनाच !
     नवी देहली - देशात मोदी शासन आल्यापासून देशातील वातावरण असहिष्णु झाल्याचा कांगावा करत प्रसिद्धीच्या हव्यासापोटी अनेक साहित्यिक, विचारवंत आदींनी त्यांना मिळालेले पुरस्कार शासनाला परत केले. आता प्रसिद्धीची अजून एक युक्ती लढवत ४१ लेखकांनी साहित्य अकादमीच्या अध्यक्षांना एक पत्र लिहून साहित्य अकादमीने आत्मशोध घेण्याचा समादेश (सल्ला) दिला आहे. देशात घडणार्‍या जातीयवादी घटना आणि असहिष्णुतेचे वातावरण यांच्या पार्श्‍वभूमीवर साहित्य अकदमीने आत्मशोध घेत मानवतेच्या दृष्टीकोनातून ठोस भूमिका घोषित करावी, असे या पत्रात म्हटले आहे.

बिहार निवडणुकीतील २३ टक्के उमेदवार गुन्हेगारीचे खटले दाखल असलेले !

असे गुंड प्रवृत्तीचे उमेदवार जनतेला राज्यकर्ते म्हणून मिळणे, हे जनतेचे दुर्दैवच ! अशा लोकप्रतिनिधींच्या राजवटीत गुन्हेगारी थांबेल कि वाढेल ?
पाटलीपुत्र (पाटणा) - बिहार विधानसभा निवडणुकीत भाग घेण्यासाठी ज्या ३ सहस्र ४५० उमेदवारांनी नामनिर्देश पत्रे दाखल केली आहेत, त्यांपैकी २३ टक्के उमेदवारांची पार्श्वभूमी गुन्हेगारीची असून त्यांच्याविरुद्ध विविध न्यायालयांत गंभीर गुन्ह्यांविषयीचे खटले दाखल आहेत. ही माहिती सेवाभावी संस्था ए.डी.आर्. यांनी केलेल्या सर्वेक्षणातून उघड झाली आहे. सर्वांत अधिक गुन्हेगार उमेदवार भाजपचे असले, तरी टक्केवारीत संयुक्त जनता दल आणि राष्ट्रीय जनता दल या पक्षांचा क्रमांक सर्वांत वर लागतो. भाजपचे १५७ पैकी ६२  उमेदवार (३९ टक्के) गुन्हेगार आहेत, तर लालूप्रसाद यादव यांच्या राजदचे १०१ पैकी ४७ (४७ टक्के) आणि नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाचे १०१ पैकी ४१ (४१ टक्के) उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. बहुजन समाजवादी पक्ष (५१ उमेदवार) आणि समाजवादी पक्ष (४४ उमेदवार) या लहान पक्षांनी उभे केलेले बहुतेक उमेदवार गुन्हेगार या सदरातच मोडतात. काँग्रेस पक्षाचे ४१  पैकी १२, तर राम विलास पासवान यांच्या लोकजन शक्ती पक्षाचे ४२ पैकी १७ उमदेवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. मार्क्सवादी-लेनिनिस्ट पक्षाचे उमेदवार महबूब आलम यांच्यावर तर खुनाचे ३ खटले प्रलंबित आहेत.

आतंकवादाविरुद्ध आम्ही भारत आणि पाकिस्तान यांच्या समवेत आहोत...

बीजिंग - आतंकवादाविरुद्ध आम्ही भारत आणि पाकिस्तान यांच्या समवेत आहोत, असे वक्तव्य चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी येथे केले. (भारताच्या सतत कुरापती काढणार्या पाकला सर्वतोपरी साहाय्य करणार्या चीनचा धूर्तपणा जाणा ! - संपादक) चीन आणि भारत यांच्यात आतंकवादावर होणार्या चर्चेच्या पूर्वी चीनने घेतलेल्या या भूमिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

संपूर्ण देशालाच असहिष्णु दाखवण्याचे काँग्रेस आणि डावे यांचे षड्यंत्र ! - अरुण जेटली, अर्थमंत्री

वर्ष २००२ पासून नरेंद्र मोदीच असहिष्णुतेचे बळी ठरल्याचे प्रतिपादन
     नवी देहली - काँग्रेस आणि डाव्या विचारांच्या कार्यकर्त्यांकडून देशात असहिष्णु वातावरण असल्याचे कारण पुढे करत शासनाचा निषेध करण्यासाठी आंदोलनांपासून पुरस्कार वापसीपर्यंतचे मार्ग वापरले जात असतांना केंद्रीय अर्थमंत्री तथा भाजपचे नेते अरुण जेटली यांनी यामागे षड्यंत्र असल्याचा पलटवार केला आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदीच वर्ष २००२ पासून वैचारिक असहिष्णुतेचे बळी ठरले, अशी भूमिका जेटली यांनी मांडली आहे. इज ऑफ डुईंग बिझनेस (व्यवसायातील सुलभता) या शीर्षकाच्या लेखातून त्यांनी शासनावर होणार्‍या टीकेचा प्रतिवाद करतांना काँग्रेस आणि डावे विचारवंत यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले आहे.

उत्तरप्रदेशमधील जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव !

  • आणि अमेठीतील वर्चस्व संपुष्टात !
  • एम्.आय.एम्. शिरकाव !
      लक्ष्मणपुरी (लखनौ) - उत्तरप्रदेशमधील जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला. विशेष म्हणजे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या अनुक्रमे रायबरेली अन् अमेठी या मतदारसंघातही काँग्रेसला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे काँग्रेसची लोकसभेपासून चालू असलेली पराभवाची मालिका जिल्हा पंचायतीच्या निवडणुकांतही कायम राहिल्याचे चित्र पहावयास मिळाले. आजमगड येथे एम्.आय.एम्. पक्षाचा शिरकाव झाला आहे. सोनिया गांधी यांच्या रायबरेलीत काँग्रेसच्या २२ उमेदवारांपैकी२१ उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले, तर राहुल गांधी यांच्या अमेठीत ८ जागांपैकी काँग्रेसला एकही जागा मिळू शकली नाही. येथे समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांचे उमेदवार निवडून आले.

शिखांच्या हत्या करून काँग्रेसचे आता सहिष्णूतेवर व्याख्यान ! - पंतप्रधान नरेंद्र मोदी

पाटलीपुत्र (पटणा) - आज २ नोव्हेंबर आहे. २ नोव्हेंबर १९८४ हा दिवस आजही आठवणीत आहे. इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर शिखांचा 'कत्ल-ए-आम' करण्यात आला होता. काँग्रेसवर गंभीर आरोप झाले होते. आज या २ नोव्हेंबरलाच काँग्रेस सहिष्णुतेवर बोलत आहे. तथापि या दुर्घटनेमध्ये उद्ध्वस्त झालेल्या शीख कुटुंबियांचे अश्रू अजूनही सुकलेले नाहीत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचा समाचार घेतला. बिहारमधील पूर्णिया येथे आयोजित विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
पंतप्रधान पुढे म्हणाले, "मी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी येथे आलो होतो; मात्र त्या वेळी जी उणीव राहिली असेल, ती दूर करण्याचा निर्णय घेतला. बिहारमध्ये जंगलराजमुळे महिलांना सर्वाधिक त्रास होत आहे. त्यामुळेच आता महिला शांती आणि विकास यांसाठी मत देत आहेत. मला सत्तेत येऊन १५ मास झाले आहेत. तथापि १५ वर्षांत बिहारमध्ये लालूप्रसाद यांची, तर त्यानंतर १० वर्षे नितीशकुमार यांच्या खांद्यावर राज्याची धुरा होती. या २५ वर्षांचा हिशेब द्यायला ते तयार नाहीत; परंतु माझ्याकडे मात्र १५ मासांच्या कामाचा हिशेब मागत आहेत."

सर्वाधिक व्यापार मूल्य असलेल्या देशांच्या सूचीत भारत ८ व्या स्थानावरून ७ व्या स्थानावर आरूढ !

     नवी देहली - सर्वाधिक व्यापार मूल्य असलेल्या देशांच्या सूचित भारत पूर्वीच्या आठव्या क्रमांकावरून सातव्या क्रमांकावर आरुढ झाला आहे. भारताचे व्यापारमूल्य ३२ टक्क्यांनी वाढून ते २.१ अब्ज डॉलर झाले आहे. व्यापारमूल्यांमधील ही ३२ टक्के वाढ पहिल्या वीस देशांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. ब्रँड फायनान्स या आस्थापनाच्या अहवालात ही सूची प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारताला हे यश मिळण्यासाठी अतुलनीय भारत या घोषवाक्याचा फायदा झाल्याचे ब्रँड फायनान्सने म्हटले आहे.

बहुतांश शक्तीशाली भूकंप २६ तारखेलाच झाले !

बुद्धीप्रामाण्यवाद्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
     लखनौ - आतापर्यंत जगात झालेल बहुतांश शक्तीशाली भूकंप हे २६ तारखेलाच झाले आहेत. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारत या देशांतील काही भागांत २६ तारखेला भूकंप होऊन हानी झाली. २६ तारखेला झालेल्या भूकंपांची माहिती पुढे दिली आहे.

(म्हणे) भारत आणि चीन एकमेकांचे प्रतिस्पर्धी नसून मित्र !

भारताचाच भूभाग गिळंकृत करण्यासाठी टपलेल्या चीनचा साळसूदपणा ! 
     बीजिंग - भारत आणि चीन परस्परांचे प्रतिस्पर्धी असल्याच्या बातम्या येत असतात; मात्र दोन्ही देश एकमेकांचे मित्र आहेत आणि दोघांमध्येही सहकार्यात्मक संबंध आहेत, असे चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ता लू कंग यांनी स्पष्ट केले. अनेक आंतरराष्ट्रीय आणि क्षेत्रीय प्रकरणांमध्ये दोन्ही देशांचे सारखे हित असल्याने आमच्यात परस्पर पूरक भूमिका आहे, असेही कंग यांनी सांगितले. भारतात ५४ आफ्रिकी देशांच्या प्रतिनिधींची परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत लू कंग यांनी वरील विधान केले.

गोमांसावरील लघुपटाच्या प्रदर्शनास मंत्रालयाने अनुमती नाकारली !

     नवी देहली - देशभरात गोमांसावरून उठलेल्या गदारोळात आता गोमांसावर बनलेल्या एका लघुपटाची भर पडली आहे. या विषयावर बनलेल्या कास्ट ऑन द मेन्यू कार्ड या लघुपटाचे प्रदर्शन करण्यास सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने अनुमती नाकारली आहे. या चित्रपटात शहरी आणि ग्रामीण भागातील गरिबांच्या जीवनशैलीशी संबंधित आव्हानांचे चित्रण करण्यात आले आहे. अलीकडे देहली येथे घडलेल्या केरळ भवनातील गोमांस प्रकरणामुळे धास्ती घेऊन या लघुपटावर बंदी घालण्यात आल्याचे समजते.

संभाजीनगर येथे संत नरहरी महाराजांचे मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ सांगोल्यात सराफ व्यापार्‍यांचा कडकडीत बंद

     सांगोला (जिल्हा सोलापूर), २ नोव्हेंबर (वार्ता.) - शासनाने संभाजीनगर येथील संत शिरोमणी नरहरी महाराज यांचे मंदिर बुधवार, २८ ऑक्टोबर या दिवशी पाडल्याच्या निषेधार्थ सांगोला येथे ३० ऑक्टोबर या दिवशी सांगोला तालुका सराफ आणि सुवर्णकार असोसिएशनच्या वतीने बाजारपेठ बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. दिवसभर सराफ व्यवसाय बंद असल्याने बाजारपेठेत शुकशुकाट होता. सांगोला तालुका आणि सुवर्णकार असोसिएशनच्या वतीने तहसीलदार श्रीकांत पाटील यांना निवेदन देण्यात आले.

आकुर्डी (पुणे) येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा पुतळा आणि ध्वज जाळला

पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळा जाळतांना शिवसैनिक
     आकुर्डी, २ नोव्हेंबर - पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी शिवसेनेवर बंदी घाला असे वक्तव्य केले होते. तसेच शिवसेना ही दहशतवादी संघटना घोषित करावी, अशी मागणी काही दिवसांपूर्वी पाकिस्तान शासनाने संयुक्त राष्ट्र संघटनेकडे केली होती. या वक्तव्यांचा पिंपरी-चिंचवड शिवसेनेच्या वतीने आकुर्डीतील खंडोबामाळ चौकात निषेध करण्यात आला. या वेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजी करत पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारले आणि त्यांचा ध्वज जाळला.

फरिदाबाद येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदूसंघटन संमेलन गोवंशहत्या बंदी कायदा आणण्यासाठी हिंदूसंघटन आवश्यक ! - सतीश प्रधान, अध्यक्ष, पंजाब गोरक्षा दल

डावीकडून हिंदु जनजागृती समितीच्या कु. कृतिका खत्री,
हिन्दू फ्रंट फॉर जस्टिसचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन,
पंजाब गोरक्षा दलाचे अध्यक्ष श्री. सतीशजी प्रधान आणि
अखिल भारत हिन्दू युवक महासभेचे श्री. राकेश कौल गुरखा
वल्लभगड, २ नोव्हेंबर (वार्ता) - आज जी व्यक्ती धर्म आणि गोरक्षा यांसाठी कार्य करते, तिला प्रसारमाध्यमे 'गुंड' म्हणून संबोधतात. जे गोवंशियांची हत्या करतात, त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली जात नाही. गोवंशहत्या बंदी कायदा आणण्यासाठी प्रशासनाकडून आशा ठेवू शकत नाही. त्यासाठी आपण सर्व हिंदूंनी संघटन वाढवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पंजाब गोरक्षण दलाचे अध्यक्ष श्री. सतीश प्रधान यांनी येथे केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या कु. कृतिका खत्री, हिन्दू फ्रंट फॉर जस्टिसचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन आणि अखिल भारत हिन्दू युवक महासभेचे श्री. राकेश कौल गुरखा हे उपस्थित होते. 

अध्यात्मातील विज्ञान सांगण्याएवढे आधुनिक विज्ञान प्रगल्भ नाही ! - श्री. निमिष पानखेडकर

     पुणे, २ नोव्हेंबर (वार्ता.) - भारतीय ऋषीमुनींनी सहस्रो वर्षांपूर्वी प्रगत वैज्ञानिक शोध लावले आहेत. आता काही प्रयोगांच्या निष्कर्षांमधून आपल्या वैदिक आणि धार्मिक कृतींमागील विज्ञान समोर येत आहे; पण खरी गोष्ट ही आहे की, आपल्या धार्मिक आणि वैदिक कृती, कथा यांमागील वैज्ञानिक दृष्टीकोन सांगण्याएवढी आधुनिक विज्ञानाची पातळीच नाही, असे स्पष्ट प्रतिपादन श्री. निमिष पानखेडकर यांनी केले. 'आफळे अकादमी'च्या वतीने येथील भरत नाट्यमंदिर येथे ३० ऑक्टोबर या दिवशी 'विज्ञानाधिष्ठित अध्यात्म' या विषयावर त्यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. 

पुणे येथे 'नवनाथ भक्तिसार' ग्रंथाचे दुर्मिळ हस्तलिखित रस्त्यावर सापडले

समाजाला धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता दर्शवणारी घटना ! 
     पुणे, २ नोव्हेंबर - विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी आणि 'स्मार्ट सिटी'कडे वाटचाल करत असलेल्या पुण्यामध्ये नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे हस्तलिखित प्लास्टिकच्या पिशवीमध्ये गुंडाळून रस्त्यावर फेकलेल्या स्थितीत आढळून आले. हा ग्रंथ भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे माजी ग्रंथपाल श्री. वा.ल. मंजुळ यांना सापडला. 

शासकीय ग्रंथालयातील दुर्मिळ ग्रंथांचे डिजिटायझेशनचे काम वर्षभरापासून प्रलंबित

दुर्मिळ ग्रंथ हा अनमोल ठेवा असून त्यांचे भावी पिढीसाठी जतन व्हावेे, ही राज्य शासनाकडून अपेक्षा !
      पुणे, २ नोव्हेंबर - शासकीय ग्रंथालयातील दुर्मिळ ग्रंथांचे डिजिटायझेशनचे काम प्रलंबित आहे. शासकीय निधीचा अभावाच्या कारणामुळे हा महत्त्वाचा उपक्रम वर्षभरापासून अर्धवट स्थितीतच आहे. त्यामुळे अनेक ग्रंथप्रेमी अप्रसन्नता व्यक्त करत आहेत.
     येथील विश्रामबागवाड्यामध्ये शासकीय विभागीय ग्रंथालयात १८५०ची आणि त्याहून काही वर्षांपूर्वीची अनेक दुर्मिळ पुस्तके आहेत. त्यांचे जतन होण्यासाठी २०१२ मध्ये शासनाच्या वतीने डिजिटायझेशनचा उपक्रम हाती घेण्यात आला. त्यासाठी आरंभी महाराष्ट्र राज्य ज्ञान महामंडळाचे साहाय्यही घेण्यात आले.

शिक्षकांना परीक्षेच्या काळात आंदोलन करता येणार नाही ! - शिक्षणमंत्री

     अमरावती विद्यापीठातील बदलत्या शैक्षणिक क्षेत्राचा अभ्यास करून, तसेच विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून प्रस्तावित महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१५ सिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये परीक्षा प्रणालीत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे दायित्व निश्‍चित करण्यात येणार आहे. त्यामुळे परीक्षा काळात त्यांना आंदोलनाचा अधिकार रहाणार नाही, असे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री श्री. तावडे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्याच्या मसुद्यातील काही सूत्रांची माहिती त्यांनी दिली. यंदाच्या हिवाळी अधिवेशनात हा कायदा सभागृहासमोर मांडण्यात येणार आहे.

ऐतिहासिक वास्तू, इतिहास, परंपरा आपण जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे ! - अभिनेता सुबोध भावे

महाराष्ट्रात इतिहासाप्रती उदासीनता ! 
     सांगली, २ नोव्हेंबर (वार्ता.) - आपल्या पूर्वजांनी पुष्कळ कष्ट करून चांगल्या वास्तू बनवल्या, चांगले किल्ले, मंदिरे, घाट बनवले. दुर्दैवाने आपण मात्र या सर्व इतिहासाची वाट लावून टाकली. महाराष्ट्रातील हा सुंदर इतिहास आपण जसाच्या तसा ठेवला नाही. या सर्व वस्तू आपण अत्यंत बेफीकीरीने वापरल्या आणि त्यात मनानेच पालट करण्याचा प्रयत्न करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेले किल्ले असे होते की, त्यांना वरच्या मजल्यावर खाली असतांना माणूस काय बोलत आहे, ते कळत असे. त्यामुळे महाराष्ट्रातील ऐतिहासिक वास्तू, इतिहास, परंपरा आपण जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे परखड मत सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता श्री. सुबोध भावे याने व्यक्त केले. सुबोध भावे हे 'कट्यार काळजात घुसली' या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी सांगलीत आले असता झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. 
या वेळी सुबोध भावे म्हणाले.. 

सनातन संस्थेच्या नेमक्या कार्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी जनसंवाद सभेत सहभागी व्हा ! - अभय वर्तक, सनातन संस्था

बेळगाव येथे पत्रकार परिषद 
पत्रकार परिषदेत डावीकडून 
श्री. ह्रषिकेश गुर्जर, श्री. अभय वर्तक, श्री. गुरुप्रसाद
बेळगाव, २ नोव्हेंबर (वार्ता.) कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी सनातन संस्थेचा साधक आणि संशयित श्री. समीर गायकवाड यांच्याविषयी न्यायालयाने दिलेला निकाल आम्हाला मान्य असेल; मात्र त्याविषयी आताच तर्कवितर्क करण्यात काही तथ्य नाही. भोंगळ निधर्मी आणि धर्मनिरपेक्षवाल्यांनी हिंदु धर्म आणि हिंदुत्ववादी संघटना यांना लक्ष्य करून केवळ हिंदु धर्माच्या विरोधात षड्यंत्र रचलेले आहे; मात्र सनातन संस्थेच्या पाठीशी हिंदुत्ववादी संघटना आणि पक्ष यांचा भक्कम पाठिंबा असल्याने सनातनला धर्मद्रोह्यांची भीती नाही. या संदर्भात आणि सनातन संस्थेच्या नेमक्या कार्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी ३ नोव्हेंबरला बेळगाव येथे आयोजित केलेल्या जनसंवाद सभेला धर्माभिमान्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी आज पत्रकार परिषदेत केले. येथील कन्नड साहित्य भवन येथे ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. 

मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील ३६ सहस्र विद्यार्थ्यांना कुष्ठरोग, क्षयरोग आणि संधीवात

महानगरपालिकेचा आरोग्य विभाग या संदर्भात कठोर उपाययोजना काढणार का ?
      मुंबई - महानगरपालिकेच्या शाळेतील २ लाख २ सहस्र ७६ विद्यार्थ्यांपैकी ३६ सहस्र विद्यार्थ्यांना विविध आजारांची लागण झाली आहे. यांतील अनेक विद्यार्थ्यांना क्षयरोग, कुष्ठरोग आणि संधीवात झाला आहे. महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक अहवालातून ही माहिती उघडकीस आली आहे. या सर्व विद्यार्थ्यांवर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले, तर काही विद्यार्थ्यांवर शस्त्रकर्मही करण्यात आले. या आरोग्य तपासणीत पालिकेच्या १२८ विद्यार्थ्यांना क्षयरोगाची लागण झाल्याचे आढळून आले. त्यांपैकी सध्या २३ विद्यार्थ्यांवर उपचार चालू आहेत. तर तीन विद्यार्थ्यांना कुष्ठरोग झाल्याचे आढळून आले होते; मात्र उपचारानंतर त्यांचा कुष्ठरोग पूर्णपणे ठीक झाला. पाच विद्यार्थ्यांना संधिवाताचीही लागण झाली असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत.


जळगाव येथे अधिवक्त्यांच्या बैठकीचे आयोजन

बैठकीत उपस्थित अधिवक्ते आणि त्यांना मार्गदर्शन करतांना (उजवीकडून)
अधिवक्ता श्री. रामदास केसरकर आणि अधिवक्ता श्री. सुरेश कुलकर्णी
     जळगाव - येथे १ नोव्हेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अधिवक्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातन संस्थेचे कायदेशीर सल्लागार अधिवक्ता श्री. रामदास केसरकर, अधिवक्ता श्री. सुरेश कुलकर्णी उपस्थित होते. या बैठकीला सनातन संस्थेचे पू. नंदकुमार जाधव यांचीही वंदनीय उपस्थिती लाभली.
      कार्यक्रमाच्या प्रारंभी अधिवक्ता कुलकर्णी यांनी हिंदू विधिज्ञ परिषदेची ओळख आणि कार्य यांविषयी सांगितले. त्यानंतर अधिवक्ता केसरकर यांनी अधिवक्त्यांच्या संघटनाची आवश्यकता यात अधिवक्त्यांच्या सहभागाविषयी माहिती दिली. हिंदू संघटनाचे यशस्वी कार्य करतांना व्यष्टी साधनेचे महत्त्व, नामजपाचे महत्त्व सांगितले. या वेळी उपस्थित अधिवक्त्यांनी साधनाविषयीच्या शंकांचे निरसन केले. या बैठकीला १३ अधिवक् त्यांची उपस्थिती होती.

फलक प्रसिद्धीकरता

गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांना निवडणूक लढवण्याची संधी देणारे लोकराज्य नको ! 
     बिहार विधानसभा निवडणुकीत भाग घेण्यासाठी ज्या ३ सहस्र ४५० उमेदवारांनी नामनिर्देश पत्रे दाखल केली आहेत, त्यांपैकी २३ टक्के उमेदवारांची पार्श्‍वभूमी गुन्हेगारीची असून त्यांच्याविरुद्ध विविध न्यायालयांत गंभीर गुन्ह्यांविषयीचे खटले दाखल आहेत.

हिंदूंवरील अन्यायाच्या निषेधार्थ संघटित होण्याचा निर्धार करून प्रांतीय हिंदु अधिवेशनाची सांगता

      उल्हासनगर (जिल्हा ठाणे) - मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांतील हिंदुत्ववाद्यांसाठी ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर २०१५ या कालावधीत हिंदु राष्ट्र स्थापनेसाठीच्या उद्देशाने तृतीय प्रांतीय हिंदू अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनाचा सांगता समारोह १ नोव्हेंबर २०१५ या दिवशी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत पार पाडला. याचा वृत्तांत पुढीलप्रमाणे आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago : 
Bihar vidhansabha chunav ke 3 sahasra
 450 ummidwarome 23 pratishat ummidwar aparadhi prushtabhumike hai.
 Bihar rajya me koi layak ummidwar nahi kya ?

जागो :
बिहार विधानसभा चुनाव के ३ सहस्र 
४५० उम्मीदवारोंमे २३ प्रतीशत उम्मीदवार अपराधी पृष्ठभूमीके है.
 बिहार राज्यमे कोई लायक उम्मीदवार नही क्या ?

कारभार न सुधारल्यास आयुक्तांवर अविश्‍वास ठराव आणू ! - महापौर विवेक कांबळे

     सांगली, २ नोव्हेंबर (वार्ता.) - स्थानिक संस्था करामुळे महापालिकेची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. अशा स्थितीत आयुक्तांनी आर्थिक नियोजन करणे, उत्पन्नवाढीसाठी पर्यायी मार्ग अवलंबणे अशा मार्ग स्वीकारणे अपेक्षित होते; मात्र आयुक्तांनी त्याविषयी कोणतचे नियोजन केले नाही. स्थानिक संस्था कराची १५० कोटी रुपयांहून अधिक थकबाकी आहे. त्याच्या वसुलीसाठी आयुक्त काहीच प्रयत्न करत नाहीत. शहरात बांधकाम, भुयारी गटार, स्वच्छता यांसह अनेक कामांचा बोजवारा उडाला आहे. पाणी योजनेचे काम रखडले आहे. रस्त्यांची दुरावस्था आहे. याविषयी नागरिकांचे मोर्चे, तक्रारी होऊनही आयुक्तांकडून कोणता प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे आयुक्त अजिज कारचे यांनी कारभार न सुधाल्यास महासभेत ठराव करून त्यांना परत पाठवू, अशी चेतावणी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे महापौर विवेक कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिला. शुक्रवारी झालेल्या महासभेत आयुक्तांवर थेट अपकारभाराचे आरोप झाले. त्यामुळे आयुक्त दीर्घकाळाच्या आजारी रजेसाठी जाणार आहेत, अशी चर्चा महापालिकेच्या वर्तुळात आहे.

प्राचीन हिंदु संस्कृतीची महानता !

१. कुठे काही सहस्र (हजार) वर्षांचा इतिहास असणारी पाश्‍चात्त्य राष्ट्रे, तर कुठे अनेक आक्रमणे 
होऊनही टिकून राहिलेला अन् लक्षावधी वर्षांचा इतिहास असणारा हिंदुस्थान !
     विश्‍वातील अमेरिका, कॅनडा, दक्षिण अमेरिकेतील राष्टे्र, आफ्रिकेतील राष्टे्र, ऑस्ट्रेेलिया, न्यूझीलंड इत्यादी राष्ट्रांचा इतिहास दोन-तीनशे वर्षांचा आहे. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी इत्यादी युरोपीय राष्ट्रांचा इतिहास पाचशे ते एक सहस्र वर्षांचा आहे. मुसलमान राष्ट्रांचा इतिहास पंधराशे-सोळाशे वर्षांचा, ग्रीक आणि रोम यांचा इतिहास अडीच सहस्र वर्षार्ंचा, इजिप्त, बाबिलोन, असीरिया यांचा इतिहास तीन-चार सहस्र वर्षांचा आहे. हिंदुस्थानचा इतिहास मात्र लक्षावधी वर्षांचा आहे. आजपर्यंत अनेक राष्ट्रे उदयास आली आणि अस्त पावली; पण हिंदु राष्ट्र मात्र शेकडो आक्रमणे झेलून आणि पचवून लक्षावधी वर्षे उमेदीने उभे आहे !

भारत आणि हिंदू यांच्या विरोधातील दहा कारस्थाने !

     हिंदूंनी तीक्ष्ण बुद्धीमत्ता, नियोजनकौशल्य, मेहनत, सुसंस्कार आणि आध्यात्मिक बळ यांच्या जोरावर वैज्ञानिक, व्यावसायिक अन् अन्य क्षेत्रे यांत जगभर घेतलेली भरारी डोळ्यांत भरण्यासारखी आहे; परंतु परकीय शक्तींना समवेत घेऊन भारतातील निधर्मीवाल्यांच्या साथीने हिंदुद्वेष्ट्यांनी कारस्थाने करत हिंदु धर्मियांना खाली खेचण्याचा खटाटोप चालवला आहे. या कारस्थानांविषयी वेळीच जागृत न झाल्यास हिंदूंची अपरिमित हानी होण्याचा संभव आहे. ही कारस्थाने समस्त हिंदूंना कळावीत, यासाठी साप्ताहिक ऑर्गनायझरमधील श्री. आनंद शंकर पंड्या यांनी लिहिलेल्या लेखातील काही निवडक भाग वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.

भारताला मुसलमानांच्या लोकसंख्यावाढीचा विचार करणे आवश्यक असणे

     भारतात मुसलमानांची संख्या २९ टक्क्यांनी वाढत आहे, तर हिंदूंची १२ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे, म्हणजेच २०५० वर्षी भारत पूर्णपणे मुसलमान होईल, हेही स्पष्ट होत आहे. ५० हून अधिक देश आज मुसलमान आहेत आणि त्यांचे इतरांना मुसलमान करणेही चालू आहे. काळ कोणासाठीही थांबत नाही. म्हणून या मुसलमानांच्या लोकसंख्यावाढीकडे दुर्लक्ष करणे; म्हणजे आपलेच आजचे मरण उद्यावर ढकलण्यासारखे आहे. तेव्हा किमान भारतासारख्या सहस्रो वर्षे मुसलमानांचे आक्रमण झालेल्या देशात हा विचार होणे अत्यंत आवश्यक आहे.
- श्री. अशोक पाटील (मासिक लोकजागर, २९.५.२०११)

टंचाईग्रस्तांना लुबाडणारे टँकरमाफिया आणि भ्रष्ट प्रशासन !

    राज्यात पावसाने ओढ दिल्यामुळे अनेक जिल्ह्यांत पाणीकपातीचे संकट आले आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात ३० प्रतिशत पुणेकरांना पाणीकपात चालू असून दिवसेंदिवस पाण्याचा प्रश्‍न गंभीर होईल, अशी स्थिती आहे. शहरातील सर्वच भागांत सध्या त्याची फारशी झळ बसत नसली, तरी पुढील काही मासानंतर तीव्र पाणीटंचाईला निश्‍चितच तोंड द्यावे लागणार आहे. सध्या पुणे येथे एक दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना अडचणी येत आहेत. अवेळी आणि अपुर्‍या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांकडून पाण्याच्या टँकरची मागणी वाढत आहे. वेळेत आणि स्वस्तात पाणी पुरवणारे टँकरवाले याचा अपलाभ घेऊन मनमानी पैसे घेत स्वतःची तुंबडी भरत आहेत.

पवित्र ते कुळ, पावन तो देश । जेथे हरीचे दास जन्म घेती ।

ह.भ.प. निवृत्ती महाराज वक्ते पाटील यांच्या ८२ व्या जन्मदिनाप्रीत्यर्थ विशेष लेख 
ह.भ.प. निवृत्ती महाराज
वक्ते पाटील
परिचय 
     ह.भ.प. निवृत्ती महाराज वक्ते यांचा जन्म शके १८५६ युवा नामसंवत्सर, ३० ऑक्टोबर १९३४ या दिवशी खामगाव, जिल्हा बुलढाणा येथे मातृगृही झाला. त्यांचे प्राथमिक शालेय शिक्षण खामगाव येथे झाले. वयाच्या ९ व्या वर्षी त्यांनी आजीसमवेत ६४ किलोमीटरची मुक्ताईची पायी वारी चालू केली. १२ ते १८ वर्षांपर्यंत त्यांनी गायींची सेवा केली. गायी चरत असतांना त्यांनी अडीच सहस्र अभंग पाठ केले. वर्ष १९५२ मध्ये श्री. विश्‍वनाथ पाटील यांची कन्या सुभद्रा हिच्यासमवेत त्यांचा विवाह झाला. त्यांना ३ मुले आणि २ कन्या झाल्या. महाराजांमध्ये अभियंता, अधिवक्ता, आधुनिक वैद्य, शास्त्रज्ञ, तज्ञ, समाजसुधारक, राज्यकर्ते यांना सल्ला देण्याचे सामर्थ्य आहे.

हॉलंडवासियांची राष्ट्रनिष्ठा !

पीटर : स्वतःच्या देहाने समुद्राचे पाणी अडवून हॉलंड देशाला वाचवणारा तेथील आरुणी!
समुद्रसपाटीला हॉलंड नावाचे राष्ट्र वसलेले आहे. समुद्राचे पाणी शहरात येऊ नये, यासाठी देशाच्या चारही बाजूंना भिंती बांधण्यात आल्या आहेत. कधी पाणी शहरात आलेच, तर मोठे पंप लावून पाणी बाहेर काढावे लागते. एके दिवशी रात्री पीटर नावाचा मुलगा त्या भिंतीजवळून चालत जात होता. त्या वेळी त्याने भिंतीला तडा गेलेला पाहिले. त्यातून पाणी शहराच्या दिशेने जात होते. पीटरने स्काऊटचे शिक्षण घेतले होते आणि तो अनुशासनप्रिय होता. त्या वेळी देशाला वाचवण्याचा दुसरा कुठलाच उपाय न सुचल्यामुळे त्याने तडा गेलेल्या ठिकाणी स्वतःचा हात लावून पाणी अडवण्याचा प्रयत्न केला. तो सर्वांना साहाय्यासाठी हाका मारत होता; परंतु त्या निर्जनस्थळी कोणालाच त्याची हाक ऐकू आली नाही. बारा घंटे तो अत्यंत थंड वातावरणाशी झुंज देत होता. पाण्यात पूर्णपणे बुडालेला असल्याने तो मरणासन्न स्थितीत गेला होता. सकाळी काही लोक तेथून जात असतांना त्यांना एक बालक पाणी अडवण्यासाठी झोपलेल्या स्थितीत दृष्टीस पडला. त्यांनी त्याच्यावर उपचार केले आणि महत्प्रयत्नांनी त्याचा जीव वाचला. त्यामुळे हॉलंडला वाचवणारा हा बालक पीटर तेथील इतिहासात अजरामर झाला.
(संदर्भ : मासिक युग निर्माण योजना, एप्रिल २०१४)

दारिद्य्र आणि बेरोजगारी या समस्या वेळेत सोडवल्या नाहीत, तर भारतीय लोकशाहीचे भवितव्य चिंताजनक !

     विश्‍व अधिकोष आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्या दडपणामुळे डंकेल प्रस्तावावर स्वाक्षरी करून भारताने खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला असल्याने रोजगार निर्मितीचा समयबद्ध कार्यक्रम राबवण्यास अडचण निर्माण झाली आहे. खुल्या अर्थव्यवस्थेमुळे रोजगार वृद्धी होईल, हा खुल्या अर्थव्यवस्थेच्या समर्थकांनी निर्माण केलेला भ्रम आहे. प्रत्यक्षात खुल्या अर्थव्यवस्थेमुळे बेरोजगारी वाढण्याची शक्यता अधिक आहे. दारिद्य्र आणि बेरोजगारी हटवण्यासाठी या देशातील प्रमुख राजकीय पक्षांपाशी पुरेशी मानसिकता नसल्याने रोजगाराचा अधिकार मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीविषयी हे पक्ष उदासीन दिसतात; पण दारिद्य्र आणि बेरोजगारीची समस्या समयबद्ध कालावधीत सोडवण्यात आपण असमर्थ ठरलो, तर भारतीय लोकशाहीचे भवितव्य चिंताजनक आहे. 
- जयानंद मठकर (दैनिक तरुण भारत, २.२.२०००)

भारताचा खरा इतिहास दडपून टाकणारे ब्रिटिशांच्या प्रभावाखालील आधुनिक विचारवंत

ब्रिटिशांचा उदो उदो करणार्‍या विद्वानाने लिहिलेला इतिहास विद्यापिठांमधून 
क्रमिक पुस्तक म्हणून शिकवला जाणे
     मध्यंतरी महाविद्यालयाकरता अय्यर या विद्वानांचे College History of India, हे इतिहासाचे पाठ्यपुस्तक आम्हाला दाखवण्यात आले. हे पुस्तक क्रमिक पुस्तक म्हणून हिंदुस्थानात सर्व विद्यापिठांतून शिकवले जाते. 
(म्हणे) भारतियांना इतिहास म्हणजे काय, हे ठाऊक नाही !
      हे अति (दीड) शहाणे पंडित लिहितात, ब्रिटिशांचा काळ हा विकासाचा आणि ऐक्याचा होता. हिंदु (हिंदूंच्या विकासाचा) काळ अजून तसा प्रकटला नव्हता. जी काही थोडीफार माहिती मिळते ती धार्मिक ग्रंथांवरून मिळते. भारतियांना इतिहास काय असतो, ते ठाऊक नाही. धर्मग्रंथात इथे, तिथे अल्प, स्वल्प काहीशी माहिती मिळते.

अवघ्या जगाला तत्त्वज्ञान शिकवणारा भारत जगातील सर्वांत मोठा निरक्षरांचा देश, असा कलंकित होण्यास उत्तरदायी कोण ?

     आफ्रिका खंडातील आपल्या मागून स्वतंत्र झालेल्या देशांनी शिक्षणाच्या क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. आफ्रिकेतील केनिया आणि झांबिया देशांत साक्षरतेचे प्रमाण ७० टक्के आहे. भारतात साक्षरतेचे प्रमाण ५० टक्के आहे. स्वातंत्र्योत्तर ५० वर्षांच्या कालावधीत आपण देशातील निरक्षरता हटवू शकलो नाही, याचे मुख्य कारण शिक्षणावर सर्वांत अल्प व्यय करतो, हे आहे. आपल्यामागून स्वतंत्र झालेल्या आशिया अन् आफ्रिका या खंडातील देशांत शिक्षणावर आपल्या देशापेक्षा अधिक व्यय केला जात आहे. केनियामध्ये २० टक्के, तर कोरिया आणि फिलीपाईन्समध्ये १६ टक्के व्यय शिक्षणावर केला जात आहे. भारतात केवळ साडेतीन टक्के व्यय शिक्षणावर केला जात आहे. विकसनशील देश प्राथमिक शिक्षणावर अधिक व्यय करतात; पण आपल्या देशांत मात्र प्राथमिक शिक्षणापेक्षा उच्च शिक्षणावर अधिक व्यय करतात. जगातील सर्वांत मोठा निरक्षरांचा देश हा आपल्या देशावरील कलंक पुसून टाकण्यासाठी निरक्षरता हटवण्याचा ठोस कार्यक्रम राबवणे भारताला आता अनिवार्य झाले आहे. - जयानंद मठकर (दैनिक तरुण भारत, २.२.२०००) 
(१५ वर्षांपूर्वीची ही स्थिती आता आणखीनच भयावह झाली आहे. त्यासाठीच आता शासनाने शाळाबाह्य मुले शोधण्याची मोहीमही चालू केली आहे. - संपादक)

मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांच्या प्रांतीय हिंदू अधिवेशनाच्या प्रथम दिवसाचा संक्षिप्त वृत्तांत

     हिंदु राष्ट्र स्थापनेच्या व्यापक उद्देशाने हिंदूंचे संघटन करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उल्हासनगर (जिल्हा ठाणे) येथील चालिया सभागृहात ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर २०१५ असे २ दिवस प्रांतीय हिंदू अधिवेशन पार पडले. या अधिवेशनाला विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. ३१ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या विविध उद्बोधन सत्रांतील महत्त्वाच्या घडामोडींचा संक्षिप्त वृत्तांत येथे देत आहोत.

गांधीवादी शासनाने गांधीवादाचा खून करून नथुरामला फाशी दिली, तेव्हा मानवी हक्काचे डांगोरे पिटणारे तथाकथित पुरोगामी, साम्यवादी आणि समाजवादी कुठे गेले होते ?

      पंडित नथुराम गोडसे हा कट्टर देशभक्त, अग्रणी वृत्तपत्राचा संपादक, हिंदू महासभेचा कार्यकर्ता आणि हैद्राबाद मुक्तीसंग्रामात शिक्षा भोगलेला स्वातंत्र्यसैनिक होता. तो जिवंत असता, तर त्याला स्वातंत्र्यसैनिकाची पेन्शन मिळाली असती. 
     गांधीवधाच्या खटल्यात नथुरामने गुन्हा केला. त्याने न्यायालयास त्याची शिक्षा मी भोगण्यास सिद्ध (तयार) आहे, असे सांगितले. फाशीची शिक्षा झाल्यावर त्याने भेकड याकूबसारखा दयेचा अर्ज केला नाही. दयेची भीक मागितली नाही. ते हसत हसत फासावर गेले. गांधींच्या मुलाने शासनाकडे अर्ज केला, नथुरामला फाशी देऊ नका; कारण ते गांधींच्या अहिंसा तत्त्वाच्या विरोधात आहे. तरीही गांधीवादी शासनाने गांधीवादाचा खून करून नथुरामला फाशी दिली. त्या वेळी हे साम्यवादी, समाजवादी आणि मानवी हक्काचे डांगोरे पिटणारे तथाकथित पुरोगामी कुठे गेले होते ? 
- भागवताचार्य वा.ना. उत्पात (संदर्भ : मासिक, धर्मभास्कर, ऑक्टोबर २०१५)

आईप्रमाणे सर्व साधकांना आध्यात्मिक स्तरावर घडवण्यासाठी प्रयत्नरत असणारे पू. भगवंतकुमार आणि पू. (सौ.) सूरजकांता मेनराय !

पू. भगवंतकुमार मेनराय आणि
पू. (सौ.) सूरजकांता मेनराय
     पू. भगवंतकुमार मेनरायकाका, पू. (सौ.) सूरजकांता मेनरायकाकू यांच्याविषयी संत आणि साधक यांना जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.
१. प्रेमभाव
     पू. मेनरायआजी-आजोबा यांच्या खोलीत कधीही कुणीही गेले, तरी ते प्रत्येकाला खाऊ देतातच. ज्या साधकांना त्रास आहे, ते त्यांना वाटेत कधीही भेटले, तरीही ते त्यांना बरे वाटत आहे ना ?, याची विचारपूस करतात.
२. वेळेचे पालन करणे
     पू. आजी आणि पू. आजोबा ठरलेल्या वेळेत नामजपाला येतात. ते कधीही उशिरा येत नाहीत. एकदा पू. आजोबांना यायला काही कारणास्तव ५ मिनिटे विलंब झाला होता. तेव्हा ते म्हणाले, आज मलाच विलंब झाला. त्याच्या दुसर्‍या दिवशी ते नामजप चालू होण्याच्या आधी ५ मिनिटे खोलीत आले.

सनातन संस्थेवर होणारे खोटे आरोप आणि त्यांमागील वस्तुस्थिती यांविषयी ३ नोव्हेंबर या दिवशी बेळगाव येथे जाहीर जनसंवाद सभा

वार आणि दिनांक : मंगळवार, ३ नोव्हेंबर २०१५
वेळ : सायंकाळी ६        स्थळ : महावीर भवन, खानापूर रोड, बेळगाव
मान्यवर वक्ते
  • श्री. अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था
  • पू. (कु.) स्वाती खाडये, प्रसारसेविका, सनातन संस्था
  • अधिवक्ता श्री. चेतन मणेरीकर, हिंदु विधीज्ञ परिषद
  • श्री. गुरुप्रसाद, हिंदु जनजागृती समिती
संपर्कासाठी भ्रमणभाष क्रमांक : ७२०४०८२६७८
हिंदूंनो, मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित राहून तथाकथित पुरोगामीवाल्यांच्या विरोधात संघटित व्हा !

अनेक उपचारांतीही श्रीमती सत्यवती दळवीआजी (वय ८० वर्षे) यांची तीव्र गुडघेदुखी न्यून न होणे आणि सनातन प्रभातमध्ये दिलेला पू. मेनरायकाकांच्या सूक्ष्म-चित्राचा प्रयोग केल्यावर ती न्यून होणे

१. अनेक उपचार करूनही गुडघेदुखी ठीक न झाल्याने कोणत्याच स्थितीत स्वस्थता न मिळणे
     १५.७.२०१५ या दिवशी मी तळमजल्यावरून पहिल्या माळ्यावरील ध्यानमंदिरात गेलेे. त्यानंतर माझा डावा पाय पुष्कळ दुखू लागला आणि गुडघ्याला सूजही आली. गुडघ्यावर लाल रंगाचे २ - ३ डागही पडले होते. वेदनांची तीव्रता इतकी होती की, मला कोणत्याच स्थितीत आराम मिळत नव्हता आणि रात्रंदिवस झोपही लागत नव्हती. यावर मी औषधे घेणे, तेलाने मर्दन (मसाज) करणे, शेकणे, बिंदूदाबन करणे इत्यादी उपचार साधारण १ मास केले. हे सर्व करूनही कशाचाच लाभ होत नव्हता. त्यामुळे मी औषधे घेणे बंद केले.

पू. भगवंतकुमार मेनरायकाका आणि पू. (सौ.) सूरजकांता मेनरायकाकू यांच्या नामजपाच्या वेळी पू. (सौ.) योया वाले यांना जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये

पू. (सौ.) योया वाले
१. पू. काका आणि काकू यांची जाणवलेली सामायिक गुणवैशिष्ट्ये 
१ अ. पू. काका आणि पू. काकू यांच्यात आध्यात्मिक नाते असणे : पू. मेनरायकाका आणि पू. काकू एकमेकांशी बोलतांना पती-पत्नी म्हणून न बोलता साधक म्हणून बोलतात. आध्यात्मिकदृष्ट्या ते समानच असून त्यांच्यात एकमेकांविषयी जराही आसक्ती नाही. ते केवळ ईश्‍वराच्या अनुसंधानात असतात. 
१ आ. अहं अल्प असणे : त्यांच्यात अहं अतिशय अल्प आहे. ते लहान-मोठ्या प्रत्येक साधकाशी आदराने वागतात. 
१ इ. प्रत्येक साधकाकडे ते समान दृष्टीने पहातात. 
     त्यांच्यातील हे गुण मी स्वतःमध्ये आणण्याचा प्रयत्न केल्यावर मला पुष्कळ लाभ झाला. त्यांचे वागणे-बोलणे प्रत्येक साधकाने शिकायला हवे आणि त्यांच्यातील गुण स्वतःमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे मला वाटते.

पू. मेनरायकाका आणि पू. काकू यांच्यासमवेत नामजप करतांना नामजप एकाग्रतेने होऊन आनंद मिळणे अन् त्रास न्यून झाल्याची अनुभूती येणे

     पू. मेनरायकाका आणि पू. काकू नामजप करत असतांना आम्हीही त्यांच्यासमवेत नामजपाला बसतो. त्या वेळी पू. काका आम्हाला विचारतात, नामजपाकडे लक्ष द्या. नामजप होत आहे ना ? पू. (सौ.) मेनरायकाकू ईश्‍वराच्या चरणांना घट्ट धरून ठेवा, असे सांगतात. त्यामुळे नामजप एकाग्रतेने होऊन आनंद मिळतो आणि त्या वेळी त्रास न्यून होतो, असे लक्षात आले. अशी अनुभूती आतापर्यंत कधीच आली नाही आणि आता नामजपाच्या वेळी अशी अनुभूती सतत येते, तसेच नामजप केल्याने पुष्कळ आनंदही मिळत आहे. - सौ. सारिका आय्या, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.१०.२०१५)

चूक झाल्यावर अपराधीपणाच्या जाणिवेने संतांची क्षमा मागितल्यावर ते प्रेमाने जवळ घेतात, याची आलेली अनुभूती !

     पू. (सौ.) मेनरायआजींना दूध देण्याची सेवा माझ्याकडे होती. त्या वेळी दूध नेतांना माझ्याकडून ते ताटात थोडे सांडले. संतांना म्हणजे देवाला दूध देतांना व्यवस्थितच आणि त्यांना आवडेल, असे द्यायला हवे, असे मला वाटत होते. दूध सांडल्याची चूक मी पू. मेनरायआजींना सांगितली. त्या म्हणाल्या, असे काही नाही. असू दे. त्यानंतर मी त्यांचे चरण धरून रडले आणि त्यांची क्षमा मागितली. नंतर त्यांनी मला जवळ घेतले. तेव्हा आपण संतांकडे अपराधीभावाने गेलो की, संत आपल्याला कसे प्रेमाने जवळ करतात, हे मला शिकायला मिळाले. - कु. गौरी मुद्गल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.१०.२०१५)

संत असूनही सहजभावातरहाणार्‍या पू. (सौ.) मेनरायआजी !

     एके दिवशी मी चौथ्या मजल्यावरून दुसर्‍या मजल्यावर भोजनकक्षात धावत जात होते. पू. मेनरायआजी तिसर्‍या मजल्यावरून भोजनकक्षात जात होत्या. तेव्हा त्यांनी मला पाहून म्हटले, मीही तुझ्यासमवेत धावत येऊ का ? त्या वेळी मला त्या संत असल्याचे ज्ञात नव्हते. त्या आश्रमातील एक आजी आहेत, असे मला वाटले. आम्ही दोघी एकमेकींना धरून धावत भोजनकक्षात आलो. तेव्हा मला त्यांच्यासमवेत पुष्कळ आनंद मिळाला. त्यांच्या हातांचा माझ्या हाताला स्पर्श झाल्याने माझ्या हाताला सुगंध येत होता. त्यानंतर मला एका साधिकेने सांगितले, अगं, तू कुणासमवेत भोजनकक्षात आलीस, ते तुला ठाऊक आहे का ? त्या आजी संत आहेत. हे ऐकून मला धक्काच बसला; कारण आजी संत आहेत, असे न वाटता त्या आपल्यातील एक आहेत, असे वाटत होते. - कु. अमृता मुद्गल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.१०.२०१५) पू. मेनरायआजी यांनी सांगितल्याप्रमाणे नामजप करत सेवा केल्याने सेवा अल्प कालावधीत पूर्ण होणे

     एकदा मला तातडीची सेवा असल्याने मी सकाळी लवकर उठून फलकावर सूचना लिहित होते. त्या वेळी पू. (सौ.) मेनरायआजी माझ्याजवळ आल्या आणि त्यांनी विचारले, तुझा नामजप दिवसभर होतो का ? मी म्हटले, आजी, माझा नामजप दिवसभरात पुष्कळ अल्प होतो. त्या म्हणाल्या, नामजप केला पाहिजे. त्यामुळेच आपली साधना होणार आहे. माझी सेवा सुरू असतांना माझा नामजप अल्प होत होता. मला ती सेवा करण्यासही कंटाळा येत होता. त्यानंतर मी नामजप करत सेवा केली. त्यामुळे ५ घंट्यांची सेवा २ घंट्यांतच पूर्ण झाली. - कु. अमृता मुद्गल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.१०.२०१५)

पू. मेनरायकाकांसमवेत नामजप करतांना साधकाच्या उत्कट भावामुळे आलेली अनुभूती

     २७.९.२०१५ या दिवशी दुपारी मी रामनाथी आश्रमातून घरी परत जाणार होतो. त्यामुळे सकाळी अल्पाहारानंतर पू. मेनरायकाकांसह बसून १५ मिनिटे नामजप करण्याचे मी ठरवले. त्यानुसार मी नामजप करायला बसलो. तेव्हा मला एक आश्‍चर्यकारक अनुभूती आली. प्रारंभी माझ्या तोंडवळ्यावर थोडी उष्णता जाणवून ३ - ४ मिनिटे ढेकरा आल्या. थोड्या वेळाने माझ्या शरिराच्या मधोमध धूमकेतूप्रमाणे दिसणारा पांढरा प्रकाश मूलाधारचक्रापासून अनाहतचक्रापर्यंत नागमोडी आकारात जात असल्याचे जाणवले. त्या वेळी माझ्याभोवती जाणवणारे नकारात्मक आवरण न्यून होऊन मला पुष्कळ चांगले वाटत होते. मी दुपारी नामजपाला बसलो. या वेळी मला हलक्या आवाजात; परंतु स्पष्टपणे ॐ ऐकू येत होता. 
- श्री. राहुल कुलकर्णी, पुणे (२७.९.२०१५)

पू. मेनरायकाका आणि काकू करत असलेल्या नामजपाच्या वेळेत नामजप करायला बसल्यावर मनातील नकारात्मक विचार न्यून होऊन प्रार्थना सुचू लागणे

     माझ्या मनात प्रतिदिन सतत नकारात्मक विचार यायचे. कधी कधी मला कसे प्रयत्न करायचे आहेत ? कोणती प्रार्थना करायची आहे ?, हेही सुचत नसे. मी पू. मेनरायकाका आणि काकू करत असलेल्या नामजपाच्या वेळेत खोली क्र. ३२४ मध्ये नामजप करायला बसू लागले. तेव्हापासून माझ्या मनात नकारात्मक विचार येण्याचे प्रमाण अल्प झाले. मला प्रार्थना करायलाही सुचू लागले आहे.
     श्रीकृष्ण आमच्यावर किती कृपा करतो, त्याचे वर्णन करणे अवघड आहे. त्याच्या कृपेमुळे मला ही अनुभूती आली; म्हणून त्याच्या कोमल चरणी कृतज्ञ आहे. - सौ. कविता घाणेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.८.२०१५)

साधकांनो, स्वतःतील भक्ती वाढवून सनातनरूपी सूर्याचेे तेज संपूर्ण विश्‍वात पसरवण्यासाठी प्रयत्न करा !

प.पू. दिव्य जीवनदास महाराज
    अनादि काळापासून दैवी आणि आसुरी शक्तींमध्ये संघर्ष चालू आहे. आसुरी शक्तींना दैवी वातावरण किंवा दैवी प्रवृत्ती कधीच आवडत नाही. दैवी जीव साधना करून दिव्य सुखाची अनुभूती घेतात आणि जगात दिव्य तेज प्रसारित करतात; परंतु असुरांना ते कधीच सहन होत नाही. त्यामुळे ते दैवी (सात्त्विक) प्रवृत्ती आणि साधना यांमध्ये विघ्न आणतात; परंतु शेवटी दैवी शक्तीच विजयी होते, याची साक्ष हिंदूंचे धर्मशास्त्र देते. दैवी आणि आसुरी शक्तींच्या संघर्षाच्या कालावधीत आपल्याला साधना, भजन, भक्ती इत्यादींमध्ये वृद्धी केली पाहिजे. आसुरी वृत्तीच्या लोकांपासून दूर राहून दैवी जिवांच्या बळाने आपल्या साधनेत वृद्धी केली पाहिजे.

प.पू. वसंत (अण्णा) कर्वेगुरुजी यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

३.११.२०१५ या दिवशी यांच्या देहत्यागानंतरचा १३ वा दिवस आहे. त्यानिमित्ताने...
प.पू. वसंत (अण्णा) कर्वेगुरुजी
१. अन्यायाविषयी चीड
    समाजात जे काही चुकीचे प्रकार घडत आहेत, त्याविषयी प.पू. वसंत (अण्णा) कर्वेगुरुजी यांना मनस्वी चीड यायची. वेगवेगळ्या प्रकारे हिंदूंना कसे दडपले जात आहे ?, याविषयी तेे त्वेषाने बोलायचे.
२. सनातन संस्था आणि प.पू. डॉक्टर यांच्यावर श्रद्धा असणे
    सनातन संस्था आणि प.पू. (डॉ.) आठवले यांच्यावर त्यांची विशेष श्रद्धा होती. गुरुपौर्णिमेच्या दिवशी ते प्रकृती अस्वास्थ्यामुळे थोडाच वेळ कार्यक्रमाला येणार होते; मात्र त्या कार्यक्रमाला ते पूर्णवेळ थांबले. - श्री. निरंजन दाते, पुणे

राष्ट्र आणि धर्म कार्य करण्याची तळमळ असणारे गोळप (जिल्हा रत्नागिरी) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. गणेश गोगटे (वय ८३ वर्षे) !

श्री. गणेश गोगटे
    गोळप (जिल्हा रत्नागिरी) येथील श्री. माधव गणेश गोगटे यांच्याकडे साप्ताहिक सनातन प्रभातच्या नूतनीकरणासाठी मी गेलो होतो. तेव्हा श्री. माधव गोगटे घरी नसल्याने आम्हाला त्यांचे वडील ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. गणेश गोगटे (वय अनुमाने ८३ वर्षे) यांच्याशी चर्चा करण्याची संधी मिळाली. त्या वेळी त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे देत आहोत. 
१. शिकण्याची वृत्ती असणे
    श्री. गणेश गोगटेकाका सनातन प्रभातचे संपूर्ण वाचन करतात. ते म्हणाले, राष्ट्र आणि धर्म यांविषयी जे इतर वृत्तपत्रांत छापले जात नाही, ते केवळ सनातन प्रभातमध्ये वाचायला मिळते. या वयातही राष्ट्र आणि धर्म यांविषयी ते जिज्ञासेने प्रश्‍न विचारतात आणि त्याविषयी नम्रतेने ऐकूनही घेतात.

प.पू. दास महाराजांच्या सेवेत असतांना साधकांना आलेल्या अनुभूती आणि प.पू. महाराजांनी साधकाला केलेले मार्गदर्शन

प.पू. दास महाराज
प.पू. दास महाराज यांची सेवा करतांना साधिकेला चंदनाचा सुगंध येणे
     ३०.८.२०१५ या दिवशी प.पू. दास महाराज यांना महाप्रसाद वाढण्याची सेवा करतांना मला चंदनाचा पुष्कळ सुगंध येत होता. महाराजांचा महाप्रसाद झाल्यानंतर त्यांनी एका वाडग्यात हात धुतला. ते भांडे घासतांना मला चंदनाचा पुष्कळ सुगंध आला. माझी सर्व सेवा झाल्यावर सायंकाळपर्यंत माझ्या दोन्ही हातांना सुगंध येत होता.
कृष्णाची,
कु. गौरी मुद्गल (वय १५ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.८.२०१५)

बिंदूदाबनाचे उपाय केल्याने गुडघेदुखी काही प्रमाणात उणावणे

    १८.११.२०१४ या दिवशी वैद्यकीय विभागाने मला गुडघेदुखीसाठी बिंदूदाबनाचे काही उपाय करण्यास सांगितले. त्याप्रमाणे उपाय चालू केल्यावर गुडघेदुखी काही प्रमाणात न्यून झाली. - सौ. मधुरा धनंजय कर्वे, फोंडा, गोवा. (५.१२.२०१४)

प.पू. भक्तराज महाराजांवर दृढ श्रद्धा असणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या फोंडा, गोवा येथील श्रीमती सुधा सिंगबाळ (वय ७६ वर्षे)

श्रीमती सुधा सिंगबाळ
१. प्रतिदिन झोपण्यापूर्वी आजी तिच्या खोलीतील प.पू. भक्तराज महाराजांच्या छायाचित्राला भावपूर्ण प्रार्थना करून झोपते.
२. आजीला कधी एखाद्या गोष्टीची काळजी वाटली, तरी लगेच थोड्या वेळाने ती म्हणते, ते (प.पू. भक्तराज महाराज) काळजी घेतील आणि निश्‍चिंत होते.
३. तिला साधक पुष्कळ आवडतात. ती प्रत्येक साधकाशी आपुलकीने बोलते. साधकांमधील विविध गुण आणि कौशल्य यांचे ती सतत कौतुक करते.
- कु. सोहम सिंगबाळ, सनातन आश्रम, गोवा. (१८.७.२०१५)

स्वतःच्या मनाने मासिकाचे जुने अंक वाचकांकडून परत घेणारी आणि त्यांच्याशी अनावश्यक बोलण्यात वेळ वाया घालवणारी गुजरातमधील एक कार्यकर्ती !

    कर्णावती (अहमदाबाद) येथील एका कार्यकर्तीकडे गुजराती मासिकाचे वितरण करण्याची सेवा होती. ती कार्यकर्ती वाचकांना मासिकाचा नवीन अंक देऊन अगोदरचा अंक त्यांच्याकडून परत घ्यायची. त्यामुळे त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाल्याने त्यांनी एका साधिकेला तुमची संस्था नवीन अंक देऊन जुना अंक परत घेण्यास सांगते का ? असे विचारले.
    ही कार्यकर्ती एका वाचिकेच्या घरी जाऊन तिला कौटुंबिक प्रश्‍न विचारत असे. काही वेळा भ्रमणभाष करून ती त्या वाचिकेशी अनावश्यक आणि असंबद्ध बोलत असे. या कार्यकर्तीच्या अशा वागण्यामुळे तिचा भ्रमणभाष आल्यावर तो घेण्याचे वाचिका टाळू लागली.
    अशा प्रकारच्या किंवा अन्य गंभीर चुका कोणत्याही कार्यकर्त्याच्या संदर्भात लक्षात आल्यास साधकांनी त्या त्वरित रामनाथी आश्रमात dharmatej2023@gmail.com या संगणकीय पत्त्यावर पाठवाव्यात अन् संबंधित प्रसारसेवकांनाही कळवाव्यात.
- (पू.) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.१०.२०१५)

साधकांसाठी सूचना

पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ
कठीण प्रसंगांना किंवा दुर्धर आजारांना तोंड देण्याची क्षमता
केवळ साधनेद्वारेच मिळत असल्याने जिज्ञासूंच्या या संदर्भातील
प्रश्‍नांना साधनेचे महत्त्व विशद करणारी उत्तरे द्या !
१. अन्य रुग्णांच्या तुलनेत साधक-रुग्ण आजारपणातही स्थिर आणि सहनशील
दिसत असल्याने आधुनिक वैद्यांनी अन् इतरांनी जिज्ञासेने कारण विचारणे
    बर्‍याच वेळा साधकांना एखादी दुर्धर व्याधी होते अथवा त्यांचा अपघात होतो. तेव्हा रुग्णाईत स्थितीतही त्यांच्या तोंडवळ्यावर आजारपणाचे दुःख किंवा त्रासिक भाव दिसत नाहीत, तसेच साधनेमुळे अन्य रुग्णांच्या तुलनेत त्यांची सहनशीलताही अधिक असते. त्याचप्रमाणे ते अपेक्षित कालावधीपेक्षा अधिक लवकर बरे होतात, असेही काही वेळा लक्षात येते. अशा वेळी त्यांच्यावर उपचार करणारे आधुनिक वैद्य, तसेच समवेतचे रुग्ण वेदना होत असतांनाही तुम्ही एवढे शांत आणि स्थिर कसे राहू शकलात ? तुम्ही इतक्या लवकर कसे काय बरे झालात ? इत्यादी प्रश्‍न उत्सुकतेपोटी विचारतात.

निवृत्ती वेतनधारकांनी नोव्हेंबर मासात अधिकोषाला लाईफ सर्टिफिकेट द्यावे !

    ज्या शासकीय अथवा अन्य कर्मचार्‍यांना निवृत्तीनंतर प्रत्येक मासाला निवृत्ती वेतन (पेन्शन) देण्यात येते, त्यांनी ज्या अधिकोषातून आपण निवृत्ती वेतन घेतो, तेथे प्रतिवर्षी नोव्हेंबर मासात लाईफ सर्टिफिकेट द्यावे. असे केल्यासच पुढील वर्षभर निवृत्ती वेतन चालू राहू शकते. हे सर्टिफिकेट देण्यासाठी अधिकोषाच्या ज्या शाखेतून खाते उघडले आहे, तेथे प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता नाही. सध्याच्या वास्तव्याच्या ठिकाणी त्या अधिकोषाची शाखा असल्यास तेथे आपल्या आधारकार्डाची मूळ आणि झेरॉक्स प्रत, तसेच पासबूक दाखवून लाईफ सर्टिफिकेट देता येते. (उदा. एखाद्याने निवृत्त वेतनासाठी ठाणे येथील अधिकोषातून खाते उघडले असेल आणि सध्या तो देहलीला वास्तव्याला असेल, तर देहली येथील त्या अधिकोषाच्या शाखेतूनही तो सर्टिफिकेट देऊ शकतो.)
- (पू.) सौ. बिंदा सिंगबाळ (२५.१०.२०१५) 

सर्वांसाठीचे उपाय याविषयीची सूचना !

     ३ नोव्हेंबरपासून 'ॐ ॐ श्री आकाशदेवाय नमः ॐ ॐ ।' किंवा 'ॐ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ ॐ ।' हा नामजप करा ! 
१. 'सनातनचे साधक गत आठवड्यात एका संतांनी सांगितल्याप्रमाणे 'ॐ' हा नामजप करत होते. ३ नोव्हेंबरपासून साधकांनी 'ॐ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ ॐ ।' किंवा 'ॐ ॐ श्री आकाशदेवाय नमः ॐ ॐ ।' हा नामजप आवश्यकतेनुसार करावा. आपत्काळाची तीव्रता वाढत असल्याने सूक्ष्मातून होणारे त्रासही सर्वत्र वाढत आहेत. त्यासाठी ज्या साधकांना श्रीकृष्णाच्या नामजपाने लाभ होत नसेल, त्यांनी 'ॐ ॐ श्री आकाशदेवाय नमः ॐ ॐ ।' हा जप न्यास न करता करावा. हा जप करतांना अंगठ्याच्या मुळाशी तर्जनीचे टोक लावण्याची मुद्रा करून हात मांडीवर किंवा खुर्चीच्या हातांवर ठेवावेत. हा जप ५ - ६ दिवस करूनही लाभ न झाल्यास पुन्हा श्रीकृष्णाचा जप करावा. त्या वेळी मधले बोट आणि अंगठा यांची टोके एकमेकांना जोडून मणिपूरचक्रावर न्यास आणि मुद्रा करावी. अशा तर्‍हेने हे दोन्ही जप आलटून पालटून करावेत. 

बोधचित्र


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
'विज्ञानासारखे बुद्धीगम्य शिक्षण 'जीवन सुखाने कसे जगायचे', हे शिकवण्याचा प्रयत्न करते, तर अध्यात्म 'जीवन आनंदाने कसे जगायचे आणि जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून कसे सुटायचे', हे शिकवते. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१.११.२०१५) 

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
 सनातनचे श्रद्धास्थान 
प्रेम आणि प्रीती 
१. प्रेम असल्यावर सहवासाची ओढ लागते व मग प्रेम वृद्धींगत होते. ते केवळ प्रकृतीतीलच असते. 
२.  आपण अशाश्‍वतावर प्रेम करतो आणि ते सुटून जाईल म्हणून भितो. जे शाश्‍वत आहे, त्यावर प्रेम करीत नाही. 
३.  द्वैतात प्रेम असते; पण प्रेमात द्वैत नसते. प्रकृतीत प्रेम असते; पण ब्रह्मात द्वैत नसते. 
४. जर तुम्ही माझ्यावर प्रेम करीत असाल, तर मी प्रेमात आहे. 
भावार्थ : येथे 'प्रेम' हा शब्द प्रीती, म्हणजे पारमार्थिक प्रेम, या अर्थाने वापरला आहे.
 (संदर्भ : सनातनचे प्रकाशन 'संत भक्तराज महाराज यांची शिकवण.')

प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

चुकांकडे कसे पहावे ? 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      कालक्रमणा करतांना मनुष्याकडून चुका घडतातच; पण प्रत्येक चुकीपासून आपण काहीतरी शिकलो, तरच पुढील आयुष्य यशस्वी होते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

संयुक्त राष्ट्रांनाही चिनी विळखा ?

संपादकीय
     संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेचे माजी अध्यक्ष जॉन अ‍ॅश यांना लाच स्वीकारल्याच्या प्रकरणी अटक आणि जामिनावर सुटका होऊन आता बरेच दिवस लोटले आहेत; मात्र ही घटना भारतात म्हणावी तशी चर्चिली गेली नाही, याविषयी आश्‍चर्य वाटते. त्यांच्या अटकेमागील कारणही तसेच होते. या अ‍ॅश महाशयांना चिनी उद्योगपतींनी लाच दिली होती. अ‍ॅटीग्वे देशात चिनी उद्योजगांना शिरकाव करता यावा, यासाठी ही लाच चारल्याचे पुढे आले. इथपर्यंत ठीक होते; मात्र अ‍ॅश यांचे चिनी प्रेम भारताच्या मुळावर उठणारे होते, हे लक्षात आल्यावर जगाचे लक्ष या प्रकरणाकडे वेधले गेले. संयुक्त राष्ट्रांमध्ये कायमस्वरूपी सदस्यत्व मिळावे, यासाठी भारत प्रयत्नशील आहे. हे सदस्यत्व मिळण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत पालट करावा लागेल. असे पालट करण्याविषयीचा मसुदा संयुक्त राष्ट्रांच्या अभ्यासगटाने बनवला होता; मात्र वर्ष २०१३-१४ मध्ये तो आमसभेत मांडलाच गेला नाही. थोडक्यात तो दाबून ठेवला गेला.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn