Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

प.पू. ढेकणे महाराज यांची 
आज पुण्यतिथी

२५ वर्षांत काश्मिरी हिंदूंचे केवळ १ कुटुंब काश्मीरमध्ये परतले !

  • राज्यशासनाची सर्वोच्च न्यायालयात स्वीकृती !   
  • १ सहस्र ६०० कोटी रुपये पाण्यात !

काश्मिरी हिंदूंंच्या गत २ दशकांपासूनच्या या दु:स्थितीचा 
निषेध म्हणून किती जण आता पुरस्कार वापसी करणार आहेत ?
हिंदुबहुल भागांत मुसलमानांची अशी दु:स्थिती झाल्याचे कधी ऐकिवात आहे का ?
नवी देहली - काश्मीरमध्ये आतंकवाद शिगेला पोचल्यावर काश्मीरमधून ४ लाख ४० सहस्र काश्मिरी हिंदू विस्थापित झाले. त्यांचे काश्मीरमध्ये पुनर्वसन करण्यासाठी केंद्रशासनाने वर्ष २००८ मध्ये १ सहस्र ६०० कोटी रुपयांची योजना प्रस्तावित केली; मात्र आतापर्यंत काश्मिरी हिंदूंचे केवळ १ कुटुंब काश्मीरमध्ये परत आले आहे. इतर काश्मिरी हिंदू काश्मीरमध्ये परतण्यास घाबरत आहेत, अशी माहिती जम्मू-काश्मीर राज्यशासनाने सर्वोच्च न्यायालयात एका शपथपत्राद्वारे दिली.   

सर्वधर्मियांसाठी समान लोकसंख्या धोरण राबवा ! - रा.स्व. संघ

मुसलमानांच्या वाढत्या लोकसंख्येवरही चिंता व्यक्त 
रांची (झारखंड) - मुसलमानांच्या वाढत्या लोकसंख्येमुळे देशात लोकसंख्येचा  असमतोल निर्माण झाला आहे. असमतोल रोखायचा असेल, तर सर्वधर्मियांसाठी समान लोकसंख्या धोरण राबवण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे धर्माच्या नावाखाली कुटुंब नियोजनाला होणारा विरोध पहाता राष्ट्र्रवादी भावनेतून लोकसंख्या धोरण ठरवले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह कृष्ण गोपाल यांनी केले.
१. रांची येथे संघाची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मुसलमानांच्या लोकसंख्यावाढीवर चिंता व्यक्त करण्यात आली, तसेच देशातील धर्मनिहाय लोकसंख्या वाढीवर ठराव पारीत करण्यात आला.

फटाक्यांची आतषबाजी आरोग्य आणि पर्यावरण यांसाठी धोकादायक !

शास्त्रज्ञांनी घेतलेल्या चाचण्यांमधील निष्कर्ष
फटाक्यांचे हे दुष्परिणाम जाणून शासनाने आतातरी जनहितार्थ त्यावर त्वरित बंदी आणावी, अशी जनतेची अपेक्षा आहे !
मुंबई - फटाक्यांमध्ये शिसे आणि पारा यांसारखी धोकादायक रसायने मोठ्या प्रमाणात असून त्यांची आतषबाजी ही मानवाचे आरोग्य आणि पर्यावरण यांसाठी धोकादायक आहे, असे शास्त्रज्ञांनी केलेल्या चाचण्यांतून उघड झाले आहे. 
१. सण आणि उत्सव साजरे करतांना फटाक्यांच्या आवाजाची मर्यादा कुठवर असावी, याकरता  देशातील १० सर्वाधिक वापर केल्या जाणार्या फटाक्यांवर मुंबईतील प्रतिष्ठित टाटा प्रयोगशाळेत चाचण्या घेण्यात आल्या. यातूून फटाक्यातील रसायनांचा व्यक्तीचे आरोग्य आणि पर्यावरण यांवर काय परिणाम होतो, याचा अभ्यास करण्यात आला.

सैन्यात ब्राह्मणांसाठी रेजिमेंट स्थापण्याची अखिल भारतीय ब्राह्मण आरक्षण संघर्ष समितीची मागणी

प्रत्येक क्षेत्रात जातीनिहाय आरक्षण लागू केले जात असल्यामुळे त्याचे गंभीर परिणाम आज आरक्षण 
लागू नसलेल्यांना भोगावे लागत आहेत. आरक्षण म्हणजे एखाद्या पदावर पात्र व्यक्तीला डावलून अपात्र व्यक्तीची नेमणूक करणे होय. त्यामुळे सर्वच क्षेत्रांतील आरक्षणाची पद्धतच रहित झाली पाहिजे !
ब्राह्मण रेजिमेंटच्या मागणीसाठी बारा राज्यांतील ब्राह्मण आरक्षण समर्थक आंदोलनाच्या पावित्र्यात
      नवी देहली - सैन्यातील राजपूत, जाट, मराठा रेजिमेंटप्रमाणे ब्राह्मणांसाठी स्वतंत्र रेजिमेंट स्थापण्याची मागणी अखिल भारतीय ब्राह्मण आरक्षण संघर्ष समितीने केली आहे. गुजरातमध्ये हार्दिक पटेल यांनी पटेल समुदायाला आरक्षण मिळण्यासाठी केलेल्या आंदोलनानंतर, तसेच सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या आरक्षण समीक्षणाच्या मागणीनंतर बारा राज्यांतील समर्थकांनी ब्राह्मण रेजिमेंट स्थापण्यासाठी केंद्रशासनावर दबाव टाकण्यास आरंभ केला आहे. या मागणीसाठी महाराष्ट्र, हरियाणा, उत्तरप्रदेश, देहली, गुजरात, बिहार, पंजाब, उत्तराखंड, राजस्थान, मध्यप्रदेश आणि हिमाचल प्रदेश येथील ब्राह्मण आरक्षण समर्थक येत्या २९ नोव्हेंबरला देहलीतील जंतर-मंतरवर आंदोलन करणार आहेत. जाट, गुज्जर, धनगर, पटेल समुदायांनी केलेल्या आरक्षणाच्या मागणीनंतर आता ब्राह्मण समुदायानेदेखील शक्तीप्रदर्शन करण्याची रणनीती आखली आहे. ब्राह्मण समुदायाच्या मागणीची दखल घेतल्यास ब्राह्मणेतर समुदायावर नकारात्मक परिणाम होण्याची भीती केंद्रशासनाला वाटत आहे.

सिमीचा आतंकवादी अबू फैजल यास जन्मठेप

 देश खिळखिळा करणार्या जिहादी आतंकवादाला शासनाने वेळीच पायबंद घालावा, अशी जनतेची अपेक्षा आहे !
पोलिसाच्या हत्येचे प्रकरण
भोपाळ (मध्यप्रदेश) - नोव्हेंबर २००९ मध्ये मध्यप्रदेश आतंकवादविरोधी पथकाचे पोलीस कर्मचारी सीताराम यादव यांच्या हत्या प्रकरणात सिमीचा आतंकवादी अबू फैजल याला भोपाळ येथील विशेष न्यायाधीश बी.एस्. भदोरिया यांनी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फैजल, ऐजाझुद्दिन आणि महंमद असलम यांनी खांडवा येथील जातीय तणावाच्या भागात सीताराम यादव यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या केली होती, तसेच नंतर अन्य दोघांचीही हत्या केली होती. ऐजाझुद्दिन आणि महंमद असलम यांना वर्ष २०१५च्या एप्रिलमध्ये तेलंगण राज्यात झालेल्या चकमकीत पोलिसांनी ठार केले. वरील घटनेनंतर फैजल याला २ मासांनी अटक करण्यात आली. सीताराम यादव यांनी खांडवा शहरातील सिमीची यंत्रणा उद्ध्वस्त करण्यामागे मोठी कामगिरी केली होती; म्हणून फैजल याने त्यांच्या हत्येचा कट रचला होता.

वर्ष १९८४ मधील शिखांच्या हत्याकांडाच्या वेळी हे साहित्यिक कुठे होते ? - शिख समाज

पुरस्कार परत करणार्‍या साहित्यिकांचा शिख समाजाकडून निषेध
     नवी देहली - व्यक्तीस्वातंत्र्य आणि देशातील वाढती धार्मिक असहिष्णुता, अशी कारणे देऊन पुरस्कार परत करणार्‍या साहित्यिकांच्या विरोधात शीख समुदाय उतरला असून त्याने येथील जंतर-मंतरवर एकत्र येऊन या साहित्यिकांची पुस्तके जाळून रोष प्रकट केला.
   जेव्हा वर्ष १९८४ मध्ये शिखांचे हत्याकांड झाले, तेव्हा हे साहित्यिक कुठे होते ?, असा प्रश्‍न आंदोलनाचे नेतृत्व करणारे गुरुचरणसिंह बब्बर यांनी उपस्थित केला. या वेळी त्यांनी शिखांच्या दंगलीवर लिहिलेल्या सरकारी कत्लेआम (शासकीय हत्याकांड) या पुस्तकाच्या ५०० प्रती जाळल्या. या साहित्यिकांवर आरोप करतांना गुरुचरण यांनी विचारलेे, शिखांवर झालेल्या अत्याचारांच्या विरोधात आजपर्यंत कुणीही पुरस्कार का परत केले नाही ? साहित्यिकांकडून अशी दुटप्पी भूमिका का स्वीकारली जात आहे ? आम्ही अजूनही वर्ष १९८४ मधील दंगलीविषयी न्याय मागत आहोत. जर साहित्यिक खरोखरच धार्मिक सद्भावना मानत असतील, तर त्यांनी आमच्या समर्थनार्थही काही करावे, असेही गुरुचरण या वेळी म्हणाले.

विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधींचा हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या ध्येयाने कृतीशील होण्याचा निर्धार

म्हापसा (गोवा) येथे हिंदूसंघटन मेळावा
हिंदूंचे व्यापक संघटन करण्यावर भर देण्याचा निर्णय
व्यासपिठावर डावीकडून सनातन संस्थेच्या सौ. शुभा सावंत, गोवंश रक्षा अभियानचे श्री. हनुमंत परब, शिवसेनेचे माजी गोवा राज्यप्रमुख श्री. रमेश नाईक, हिंदु महासभेचे श्री. शिवप्रसाद जोशी, हिंदु जनजागृती समितीचे गोवा राज्य समन्वयक डॉ. मनोज सोलंकी आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता नागेश ताकभाते 
म्हापसा, १ नोव्हेंबर (वार्ता.) - हिंदुत्ववादी संघटना आणि हिंदु धर्माभिमानी यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या ध्येयाने कृतीशील होण्याचा अन् यासाठी हिंदूंचे व्यापक संघटन करण्यावर भर देण्याचा निर्णय हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्ववादी संघटना यांनी १ नोव्हेंबर या दिवशी श्री साई सेवाधाम सभागृह, काणका बांध, म्हापसा येथे आयोजित केलेल्या हिंदूसंघटन मेळाव्यात केला. या मेळाव्याला महिला आश्रम मठ, आसगाव; अम्मा भगवान संप्रदाय; भारत स्वाभिमान; शिवसेना; सनातन संस्था; हिंदु जनजागृती समिती; रणरागिणी गट; हिंदु महासभा; गोवंश रक्षा अभियान; अखिल विश्व जय श्रीराम गोसंवर्धन केंद्र, वाळपई; हिंदु विधीज्ञ परिषद; अ‍ॅनिमल रेस्क्यु स्कॉड; पेडणे नवनिर्माण समिती; इस्कॉन; राजीव दीक्षित विचारमंच; देवस्थान समितीचे पदाधिकारी; विशाल गोमंतक सेना; गोमंतक मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघ; महिला स्वयंसाहाय्यता गट, आदी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. हिंदूसंघटन मेळाव्याच्या प्रारंभी हिंदु जनजागृती समितीचे राज्य समन्वयक डॉ. मनोज सोलंकी यांनी हिंदूसंघटन मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला. यानंतर 'सनातन संस्थेची अपकीर्ती रोखणे', 'न्यायालयीन लढा देण्यासाठी अधिवक्त्यांचे संघटन', 'गोवंश रक्षा', 'लव्ह जिहाद', 'राष्ट्रीय हिंदू आंदोलन', मंदिरे, प्रसारमाध्यमे, हिंदू वार्ता, या माध्यमांतून 'जनसंपर्क आणि हिंदूसंघटन', या विषयांवर गटचर्चा घेण्यात आली.

सैन्याला म्हशींचा बळी देण्याची प्रथा थांबवण्याचे आदेश

भारतीय सैन्याच्या काही तुकड्यांमध्ये म्हशींचा बळी देण्याची प्रथा शासनाने बळी 
देण्यामागील धर्मशास्त्र समजून घ्यावे, अशी जनतेची अपेक्षा आहे !
     नवी देहली - भारतीय सैन्यात केवळ प्रथा-परंपरा म्हणून केल्या जाणार्‍या म्हशींच्या अवैध हत्या बंद करा, असा आदेश संरक्षण मंत्रालयाकडून सैन्याला देण्यात आला आहे, असे संरक्षण खात्यातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने इकॉनॉमिक टाइम्सशी बोलतांना सांगितले. 
     या अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, गोरखा समाजात दसर्‍याच्या दिवशी म्हशींचा बळी देण्याची पूर्वापार प्रथा आहे. भारतीय सैन्याच्या काही तुकड्यांमध्ये या प्रथेचे पालन केले जाते. भारतात पशूवध करण्यासंबंधी काही कायदे आहेत. केवळ बळी म्हणून पशूवध करणे कायद्याच्या विरोधात असून ही क्रूरता असल्याचे शासनाचे मत आहे. या पार्श्‍वभूमीवर सैन्याला म्हशींच्या हत्या बंद करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. या वर्षी दसर्‍यात म्हशींच्या हत्या होऊ नयेत; म्हणून मासापूर्वीच शासनाने हा निर्णय घेतला होता. गोरखा रेजिमेंटमध्ये सेवा बजावलेले निवृत्त मेजर जनरल अशोक के. मेहता यांनी शासनाच्या या सूचनेचे स्वागत केले आहे.

राष्ट्रीय एकतेची शपथ देण्यासाठी चालू राष्ट्रगीत मध्येच थांबवले !

राष्ट्रगीताचा वारंवार अवमान होऊ देणारा एकमेव देश भारत ! राज्यपालांमध्येच जर 
राष्ट्रप्रेमाचा अभाव असेल, तर ते जनतेच्या मनात राष्ट्रप्रेम काय रुजवणार ?
उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्याकडून राष्ट्रगीताचा अवमान
     लक्ष्मणपुरी (लक्ष्मणपुरी) - उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी चालू असलेले राष्ट्रगीत मध्येच थांबवले. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या मंत्रीमंडळातील नव्या मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याच्या वेळी ही घटना घडली. खुद्द राज्यपालांकडून राष्ट्रगीताचा अवमान झाल्यामुळे देशात खळबळ निर्माण झाली आहे.

शासनाकडून १४ सहस्र कोटी रुपयांच्या संरक्षण व्यवहारांना मान्यता

     नवी देहली - सैन्याच्या दारूगोळ्यात वाढ करण्यासाठी केंद्रशासनाकडून सुमारे १४ सहस्र कोटी रुपयांहून अधिक व्यवहारांना मान्यता देण्यात आली आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संरक्षण खरेदी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या अंतर्गत हवाईदलासाठी सुमारे ६ सहस्र कोटी, नौदलासाठी ४ सहस्र ३०० कोटी रुपये यांसह ४ सहस्र कोटी रुपयांच्या अन्य संरक्षण व्यवहारांचा अंतर्भाव आहे. 

चिक्कमंगळुरू (कर्नाटक) येथील दत्तपिठात हिंदूंना पूजा करण्याची संधी मिळावी, यासाठी श्रीराम सेनेची मोहीम

हिंदुबहुल देशात देवालयात पूजा करण्यास मिळण्यासाठी हिंदूंना मोहीम राबवावी लागते, हे दुर्दैवी ! 
पाकमध्ये मुसलमानांना कधी त्यांच्या मागण्यासाठी आंदोलन करावे लागल्याचे ऐकले आहे 
का ? अशा स्थितीत हिंदूंनी घटनेनुसार हिंंदु राष्ट्राची मागणी केल्यास त्यात चूक ते काय ?
दत्तपिठात पूजा करण्याची संधी मिळावी, यासाठी आंदोलन करतांना हिंदुत्ववादी
     चिक्कमंगळुरू - दत्तपिठात हिंदूंना पूजा करण्याची संधी मिळावी, याकरिता येथील दत्तपिठात श्रीराम सेनेच्या वतीने २५ ऑक्टोबर या दिवशी श्रीराम सेनेचे अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांच्या नेतृत्वाखाली दत्तमाला अभियान यशस्वीपणे राबवण्यात आले. या अभियानाचे हे १० वे वर्ष होते. या अभियानासाठी राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणांहून दत्तमालाधारी उपस्थित होेते. या बरोबरच अयोध्येहून २४ नागा साधूंनाही आमंत्रित करण्यात आले होते. या अभियानात हिंदु जनजागृती समितीच्या हासन आणि चिक्कमंगळुरू येथील कार्यकर्त्यांनी सक्रीय सहभाग घेतला.

आय.एस्.आय.एस्.कडून ४ इराकी युवकांचा शिरच्छेद !

जगभरात डोकेदुखी ठरलेला जिहादी आतंकवाद !
     बगदाद - अमेरिकेकडून आय.एस्.आय.एस्.च्या विरोधात चालू असलेल्या कारवाईचा सूड उगवण्यासाठी आय.एस्.आय.एस्.ने ४ इराकी युवकांचा शिरच्छेद केला. आय.एस्.आय.एस्.ने याविषयीची चित्रफीत प्रसारित केली आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेने आय.एस्.आय.एस्.च्या कह्यातून ७० कुर्द नागरिकांची मुक्तता केली होती. हे चारही जण कुर्द सैनिक असल्याचेही सांगितले जात आहे. या चित्रफितीत चारही जण नारंगी रंगाच्या वस्त्रात बसले असून त्यांच्या मागे काळे कपडे घातलेले आणि तोंड झाकलेले ४ जण चाकू घेऊन उभे असल्याचे दाखवण्यात आले आहे. तथापि ही घटना कधी झाली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

आतंकवादाच्या विरोधात मरेपर्यंत लढा देईन ! - कुख्यात गुंड छोटा राजन

     बाली (इंडोनेशिया) - आयुष्यभर मी आतंकवादाच्या विरोधात लढलो असून हा लढा मी मरेपर्यंत देत राहीन, असे वक्तव्य कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिमचा प्रतिस्पर्धी समजला जाणारा कुख्यात गुंड छोटा राजन याने एका वृत्तवाहिनीशी बोलतांना केले. छोटा राजनला इंडोनेशियात अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला भारतात आणण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर बालीतील भारतीय दुतावासातील वरिष्ठ अधिकारी संजीवकुमार अग्रवाल यांनी छोटा राजनची नुकतीच भेट घेतली. ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी झाली ?, या भेटीत नेमके काय घडले ?, याविषयीचा तपशील मिळू शकलेला नाही. अटकेनंतर राजनची अधिकृतरित्या भेट घेणारे अग्रवाल हे पहिले भारतीय अधिकारी आहेत. त्यानंतर वरील वृत्तवाहिनीने राजनशी संवाद साधला होता. भारताच्या मोस्ट वॉण्टेड गुन्हेगारांच्या सूचीत असलेल्या छोटा राजनला २४ ऑक्टोबर या दिवशी बाली इथे कह्यात घेण्यात आले होते. राजनवर २० हत्यांसह ६८ गुन्हे दाखल आहेत. त्यात मोक्का, पोटा आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांचा समावेश आहे.

(म्हणे) कॉ. पानसरे यांच्या खुनाचा नथुरामी प्रवृत्तीवर संशय !

निवडणुकीच्या तोंडावर जितेंद्र आव्हाड यांची मुक्ताफळे !
    कोल्हापूर, १ नोव्हेंबर (वार्ता.) - कॉ. गोविंद पानसरे यांच्या खुनाचा नथुरामी प्रवृत्तीवर संशय आहे. त्या प्रवृत्तीला भाजपच्या मंत्रीमंडळाचा पाठिंबा आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी येथे केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ २९ ऑक्टोबरला रात्री जवाहरनगरमधील सिरत मोहल्ल्यामध्ये आयोजित केलेल्या सभेत आव्हाड बोलत होते. (केवळ मतांची भीक मागण्यासाठी हिंदुत्ववादी पक्ष आणि संघटना यांच्यावर आरोप करण्यापूर्वी विधानसभेत जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसला का नाकारले, याचा विचार प्रथम करावा ! - संपादक)
आव्हाड पुढे म्हणाले,
१. भाजपसारखे पक्ष भावनिक वातावरण सिद्ध करून सत्तेवर येतील, राज्य करतील; मात्र देशाचा यामध्ये बट्ट्याबोळ होणार आहे. अशा लोकांच्या हातात कोल्हापूरची सत्ता जाऊ नये, यासाठी कॉ. पानसरे यांच्यावर झाडलेल्या प्रत्येक गोळीचा बदला मतपेटीतून घ्या. (ज्या पक्षातील नेत्यांवर घोटाळे, हत्या, बलात्कार आदी गंभीर आरोप आहेत आणि ज्यांनी या देशाला रसातळाला नेले, अशा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना भाजपवर आरोप करण्याचा काय अधिकार ? - संपादक) पुरोगामी विचार संपवण्यास निघालेल्या या लोकांना जोरदार उत्तर देऊन शाहूंचे विचार जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करा.

गोध्रा हत्याकांड प्रकरणी एका आरोपीला अटक

    कर्णावती (अहमदाबाद) - गोध्रा हत्याकांडातील एका फारूक मोहंमद धांतिया या आरोपीला राज्यातील पंचमहलमध्ये अटक करण्यात आली. २७ फेब्रुवारी २००२ पासून तो फरार होता. या प्रकरणातील आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपीला विशेष तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आले आहे. आरोपीला त्याच्या घरातून कह्यात घेतल्याचे उपनिरीक्षक एच.बी. जाला यांनी सागितले. यापूर्वी कादिर अब्दुल गनी आणि सुलेमान मोहन यांना पकडण्यात आले होते. (गेल्या १३ वर्षांपासून आरोपी पकडणे चालू आहे, हे सुरक्षा यंत्रणांचे अपयश ! - संपादक)

पुरस्कार परत करणे चुकीचे ! - सौ. मृदुला सिन्हा, राज्यपाल, गोवा.

रामनाथी (गोवा) येथील प.प. श्री वासुदेवानंद 
सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराज प्रबोधिनीचे अधिवेशन
रामनाथी, १ नोव्हेंबर (वार्ता.) - लेखकांना दिलेला पुरस्कार हा देशाने लेखकांचा केलेला सन्मान असतो. एकदा केलेला सन्मान परत करता येत नसतो. सन्मानाप्रती आपण केवळ कृतज्ञता व्यक्त करू शकतो, असे प्रतिपादन गोव्याच्या राज्यपाल सौ. मृदुला सिन्हा यांनी रामनाथी येथे प.प. श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराज प्रबोधिनीच्या अधिवेशनात केले. या वेळी व्यासपिठावर केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, डॉ. प्रदीप तराणेकर, प्रबोधिनीचे अध्यक्ष हरिप्रसाद (धीरुभाई) जोशी, महासचिव श्री. तुषार काळे उपस्थित होते. या वेळी राज्यपाल सौ. मृदुला सिन्हा यांच्या हस्ते 'निष्काम योगी' या ग्रंथाच्या हिंदी अनुवादग्रंथाचे अनावरण झाले.

समाजकंटकांचे सनातन आश्रमावरील आक्रमणांचे घृणास्पद कृत्य चालूच !

शिवीगाळ करणे, धमक्या देणे, अश्लील बोलणे आणि दगडफेक करणे 
या गोष्टी दखलपात्र ठरवणारे दंडविधान हिंदु राष्ट्रात असेल ! 
सनातनच्या रामनाथी आश्रमातील साधकांना धमक्या देण्याचा, अश्लील बोलण्याचा आणि आश्रमावर दगड फेकण्यास आरंभ केल्याचा कालचा ५ वर्षे ३४९ वा (२१७४ वा) दिवस ! 
१.११.२०१५ : दु. ३.१५ वा. आश्रमासमोरील रस्त्यावरून चारचाकी वाहनातून जातांना एक व्यक्ती साधकांना उद्देशून अर्वाच्य भाषेत बोलली.

पुणे महानगरपालिका हद्दीजवळच्या गावांमध्ये अवैध बांधकामे चालूच !

  • पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासन अवैध बांधकामे रोखणे आणि त्याची निर्मिती न होणे, यासाठी काय प्रयत्न करणार आहेत ?
  • अवैध बांधकामांच्या सर्वेक्षणाची मोहीम थंडावली
पुणे, १ नोव्हेंबर - महानगरपालिका हद्दीजवळच्या गावांमध्ये चालू असलेल्या अवैध बांधकामांवर कोणाचेच नियंत्रण नसल्याने ती बांधकामे जोमाने चालू आहेत. पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाची (पीएम्आर्डीए) स्थापना झाल्याने जिल्हा प्रशासनासह हवेली तालुका प्रशासनाचे या बांधकामांकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. गेल्या वर्षी जिल्हा प्रशासनाने चालू केलेली अवैध बांधकामाच्या सर्वेक्षणाची मोहीम पूर्णत: थंडावली आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामांना पुन्हा गती आली आहे.

पोलिसांची अनुमती नसतांनाही कडक सुरक्षाव्यवस्थेत डाव्यांकडून भर रस्त्यात बीफ पार्टी साजरी !

बीफ पार्टीवर ताव मारून दादरी हत्याकांडाचा निषेध करणार्‍या डाव्यांना कर्नाटकमधील
गोरक्षक प्रशांत पुजारी यांची झालेली हत्या दिसत नाही का ? त्यावर ते काही बोलत का नाहीत ?
कोलकाता - गोमांसावरून घडलेले दादरी हत्या प्रकरण आणि केरळ भवन प्रकरण या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ डाव्या पक्षांनी पोलिसांच्या अनुमतीविना धर्मतल्ला येथील रस्त्यात गोमांस पार्टी केली. विशेष म्हणजे भररस्त्यात झालेल्या या पार्टीला अनुमती नसतांनाही पोलिसांनी कडक सुरक्षाव्यवस्था पुरवली होती. या वेळी माकपचे नेते तथा माजी महापौर विकासरंजन भट्टाचार्य आणि त्यांच्या सहकार्‍यांनी गोमांस खाल्ले. विहिंपने या पार्टीचा निषेध केला.

शहरातून ६६ गुंड ४ दिवसांसाठी हद्दपार !

    कोल्हापूर, १ नोव्हेंबर (वार्ता.) - महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील ६६ गुंडांना ४ दिवस कोल्हापूर शहरासह करवीर तालुक्यातून हद्दपार करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. २९ ऑक्टोबर या दिवशी ४५ जणांना हद्दापरीची नोटीस बजावण्यात आली होती. आता दोन्ही मिळून ती संख्या १११ इतकी झाली आहे. (केवळ निवडणुकीपुरते हद्दपार न करता वारंवार गुन्हे करणार्‍या गुंडांवना पोलीस कायमचे हद्दपार का करत नाहीत ? - संपादक)

अवैध धार्मिक स्थळांवर दिवाळीनंतर कारवाई - राज्यशासन

    मुंबई - मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात राज्य शासनाला २९ सप्टेंबर २००९ नंतर उभारण्यात आलेली अवैध धार्मिक स्थळे पुढील ९ मासांमध्ये हटवावीत, असा आदेश दिला होता. या विषयी अवैध धार्मिक स्थळे दिवाळीनंतर हटवण्याची कारवाई करण्यात येईल, अशी हमी ३० ऑक्टोबर या दिवशी महाराष्ट्र शासनाने मुंबई उच्च न्यायालयाला दिली आहे.
१. सप्टेंबर २००९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना बेकायदेशीर धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचा आणि ती हटवण्याचा आदेश दिला होता.
२. या संदर्भात राज्याचे महाधिवक्ता (अ‍ॅडव्होकेट जनरल) श्रीहरी अणे यांनी दिवाळीनंतर ही कारवाई चालू करून नऊ महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, असे सांगितले.

हिंदु असून धर्माचरण न करणे, हे सर्वांत मोठे दुर्दैव ! - ह.भ.प. दशरथ महाराज भोपतकर, कोकण प्रांत धर्माचारी, विश्‍व हिंदू परिषद

मुंबई, ठाणे आणि रायगड येथील
प्रांतीय हिंदु अधिवेशनाचा दुसरा दिवस !

ह.भ.प. दशरथ महाराज भोपतकर
   उल्हासनगर - सनातन संस्था ही हिंदु धर्माचे कार्य करते. त्यामुळे सनातन जेव्हा बोलवेल, तेव्हा त्यांच्यासाठी उपस्थित राहीन. आज हिंदु धर्मावर मोठ्या प्रमाणात आघात होत आहेत. आम्हीही कीर्तन आणि प्रवचन यांद्वारे धर्मशिक्षणाचे महत्त्व पटवून देतो. एखादा हिंदूच धर्माचरण करत नसेल, तर ते सर्वांत दुर्दैवी आहे. केवळ वरून चांगले असून उपयोग नाही, तर देह आतून शुद्ध होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन विश्‍व हिंदू परिषदेचे कोकण प्रांत धर्माचारी ह.भ.प. दशरथ महाराज भोपतकर यांनी केले. येथे झालेल्या प्रांतीय हिंदु अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी ते धर्माचरण आणि साधना केल्याने होणारे लाभ या सत्रात बोलत होते. या वेळी झालेली अन्य सत्रे आणि मान्यवरांची भाषणे येथे देत आहोत.

महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आणि कार्यकर्ते यांची न्यायालयाकडून निर्दोष सुटका !

मोर्च्याच्या वेळी लाल-पिवळा ध्वज काढून भगवा ध्वज लावल्याचे प्रकरण
     बेळगाव, १ नोव्हेंबर (वार्ता.) - जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्च्याच्या वेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी लाल-पिवळ्या रंगाचा ध्वज काढून भगवा ध्वज लावण्याचा प्रयत्न केला होता. तसेच पोलिसांवर दगडफेक केल्याचा आरोप करत नेत्यांसह १८ जणांवर पोलिसांनी गुन्हे प्रविष्ट केले होते. या खटल्याची सुनावणी होऊन समितीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना मुख्य जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष ठरवले आहे. पोलिसांना गुन्हे सिद्ध करण्यात अपयश आल्याने न्यायालयाने या सर्वांची निर्दोष मुक्तता केली आहे.

कोल्हापूर येथे ६४ टक्के, तर कल्याण-डोंबिवली येथे ४८ टक्के मतदान

    मुंबई, १ नोव्हेंबर (विशेष प्रतिनिधी) - संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत आज सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला उत्साहात प्रारंभ झाला. केंद्रात आणि राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या भाजपा-शिवसेनेसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. कोल्हापूर येथे ६४ टक्के , तर कल्याण-डोंबिवली येथे ४८ टक्के मतदान झाले. तरुणांसह वयोवृद्ध नागरिकांनीही सकाळच्या वेळी मतदानाचा हक्क बजावला.
    वरील दोन्ही ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा अधिक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कल्याण-डोंबिवलीत महापालिका क्षेत्रातील २७ गावांपैकी उम्बरोली, भाल आणि दावडी या गावांतील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला. त्यांनी मतदान करावे, यासाठी प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र क्षपणभूमीच्या विरोधात आपली ही भूमिका असून त्यावर ठाम रहाण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.

आतंकवाद रोखण्यासाठी संतांचे विचार आचरणात आणण्याची आवश्यकता ! - डॉ. कामत

ध्वजारोहणाला उपस्थित मान्यवर
पंढरपूर येथे पहिल्या संत नामदेव साहित्य संमेलनास उत्साहात प्रारंभ
     पंढरपूर - संत शिरोमणी नामदेव महाराजांनी भागवत धर्माची पताका संपूर्ण भारतात फडकवली. संत नामदेवांसह सकल संत-महात्म्यांनी जगाला शांतीची आणि समानतेची शिकवण दिली. सध्या संपूर्ण जगामध्ये आतंकवाद मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या आतंकवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी संतांचे विचार, हेच प्रभावी माध्यम ठरतात. त्यामुळे आतंकवाद रोखण्यासाठी संतांची शांतीची आणि समानतेची शिकवण आचरणात आणणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन संत साहित्याचे ज्येेष्ठ अभ्यासक डॉ. अशोक कामत यांनी केले.
    भागवत धर्माचे प्रसारक संत शिरोमणी नामदेव महाराज आणि समकालीन संत मंडळी यांच्या जीवनावर आधारित असलेल्या पहिल्या संत नामदेव साहित्य संमेलनाचे उद्घाटन संत तनपुरे महाराज मठ येथे ३१ ऑक्टोबर या दिवशी करण्यात आले. या वेळी आयोजित उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.

कर्तव्य बजावत असतांना गुंडांनी पळवून नेलेला वाहतूक पोलीस अद्याप बेपत्ता !

  • महाराष्ट्राचा बिहार झाल्याचे उदाहरण !
  • पोलिसांनाच पळवून नेण्याच्या घटना घडू लागणे, हे अराजकाचे द्योतकच !
     शिर्डी, १ नोव्हेंबर - एक अपघात केलेले चारचाकी वाहन पोलीस ठाण्यात नेत असतांना वाहनातील लोकांनी वाहतूक पोलिसालाच पळवून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना ३१ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी ५ वाजता घडली असून रात्री उशिरापर्यंत हे वाहन आणि पोलीस कर्मचारी यांचा तपास चालू होता. हा सगळा प्रकार क्लोज्ड सर्किट टीव्हीमध्ये चित्रीत झाला आहे; मात्र त्यात चारचाकी वाहनाचा क्रमांक व्यवस्थित दिसत नाही.
१. शिर्डी शहराच्या पिंपळवाडी रस्त्याच्या मुख्य चौकात वाहतूक पोलीस कर्मचारी गोपीनाथ बाचकर आणि आणखी एका कर्मचारी हे कर्तव्य बजावत होते. तेव्हा एका चारचाकीचा दुचाकीवाल्याला धक्का लागला. दुचाकीवरील महिला आणि चारचाकी वाहनचालक यांच्यात वाद झाला.

अल्पवयीन मुलांनी चित्रपटातील अपप्रकार पाहून पिंपरी (पुणे) येथे केली तोडफोड

     चित्रपटाच्या माध्यमातून बालमनावर असे कुसंस्कार होत असतील, तर अशा चित्रपटांवर बंदीच घातली पाहिजे. चित्रपटांमुळे देशाची भावी पिढी उद्ध्वस्त झाल्यास त्याला उत्तरदायी कोण ? या प्रकरणी चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने ठोस भूमिका घ्यावी, ही अपेक्षा !
    पिंपरी, १ नोव्हेंबर - येथील साने चौकात २८ ऑक्टोबर या दिवशी रात्री काही अज्ञातांनी अनेक वाहने फोडली होती. या प्रकरणी पहारा देणारे आणि निगडी पोलीस यांनी ३ अल्पवयीन मुलांना पाठलाग करून अटक केली होती. त्या मुलांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अन्य अल्पवयीन मुलांनाही अटक केली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्या मुलांनी अशी कबुली दिली की, दगडी चाळ या चित्रपटातील चुकीला माफी नाही, या संवादामुळे भाईगिरी करण्याच्या आविर्भावात ही तोडफोड केली. (शासन या अपप्रकाराला कसा आळा घालणार ? सुसंस्कारित आणि राष्ट्रभक्त पिढी घडवण्यासाठी धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे. - संपादक)

लोहगाव विमानतळ येथे धर्मांधांकडून ६ लक्ष रुपयांची सोन्याची बिस्किटे शासनाधीन

    सोने तस्करीमध्ये होत असलेली वाढ आणि त्यामध्ये धर्मांधांचा वाढता सहभाग हे दोन्ही चिंताजनक आहे. तरी शासनाने या प्रकरणी पाळेमुळे खोदून काढावी, ही अपेक्षा !
    पुणे, १ नोव्हेंबर - दुबईहून तस्करी करून आणलेले ६ लक्ष रुपये किमतीची सोन्याची दोन बिस्किटे सीमा शुल्क विभागाने लोहगाव विमानतळावर शासनाधीन केली. ही घटना ३१ ऑक्टोबर या दिवशी पहाटे घडली असून या प्रकरणी वसीम शेख याला अटक करण्यात आली आहे. (लोकसंख्येत अल्पसंख्यांक तस्करीच्या गुन्ह्यात मात्र अग्रेसर ! - संपादक)
      सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी सापळा रचून शेखला अटक केली. त्याने ही बिस्किटे अंतर्वस्त्रामध्ये लपवली होती. दुबईहून पुण्यात सोन्याची तस्करी होण्याचे प्रमाण वाढले आहे. तीन दिवसांपूर्वी लोहगाव विमानतळावर मुंबईतील दोन महिलांकडून ४ किलो सोने शासनाधीन केले होते.

भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेमध्ये विद्यार्थ्यांची ओली मेजवानी (पार्टी)

विद्येच्या माहेरघरात विद्यार्थ्यांनी अशी मेजवानी करणे, हे लज्जास्पद !
     पुणे, १ नोव्हेंबर - भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी २८ ऑक्टोबर या दिवशी संप मागे घेतला. त्याच रात्री संस्थेमध्ये ओली मेजवानी (पार्टी) करून धुडगूस घालण्यात आला. संस्थेच्या रेडिओ विभागातील फलक फाडण्यात आल्याचा आरोप विभागाचे केंद्र व्यवस्थापक संजय चांदेकर यांनी केला. चांदेकर यांनी या अपप्रकाराची तक्रार प्रशासनाकडे केली असून प्रशासनाने संबंधित विभागांना नोटीस बजावली आहे. आंदोलक विद्यार्थ्यांनी मात्र आमचा या प्रकाराशी संबंध नसून प्रशासनाने चौकशी करावी, असे सांगितले आहे.

श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे पोलिसांकडून परराज्यातील वाहनांवर प्रवेश शुल्क आकारून भाविकांची लूट !

पोलीस सातत्याने हिंदुविरोधी कारवाया करत असल्यामुळेच हिंदूंना पोलिसांविषयी आपुलकी वाटत नाही ! 
असे प्रवेश शुल्क मुसलमान अथवा ख्रिस्ती यांच्याकडून आकारण्याचे धारिष्ट्य 
पोलीस करतील का ? भाविकांना लुटणार्‍या अशा पोलिसांवर शासनानेच 
कठोर कारवाई करावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
     अक्कलकोट (सोलापूर), १ नोव्हेंबर - तीर्थक्षेत्र अक्कलकोट हे श्री स्वामी समर्थ महाराज यांचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश आदी राज्यांतून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. अनेक वाहने ही परराज्यातील असल्याने अक्कलकोट शहर आणि ग्रामीण पोलीस वाहन तपासणीच्या नावाखाली प्रवेश शुल्क आकारत आहेत. यामुळे भाविकांना नाहक भुर्दंड पडत असल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. (हिंदूंनी संघटित होऊन याविषयी वैध मार्गाने लढा द्यावा ! - संपादक) 

यवतमाळ येथे फटाक्यांद्वारे होणारी देवता आणि राष्ट्रपुरुष यांची विटंबना थांबवण्यासाठी निवेदन !

     यवतमाळ - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने दिवाळीला फटांक्याद्वारे होणारी देवता आणि राष्ट्रपुरुष यांची विटंबना रोखण्यासाठी आणि फटाक्यांची विक्री थांबवण्यासाठी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना रामजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष श्री. मनोज औदार्य, सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सनातन संस्थेवर होणारे खोटे आरोप आणि त्यांमागील वस्तुस्थिती यांविषयी ३ नोव्हेंबर या दिवशी बेळगाव येथे जाहीर जनसंवाद सभा

वार आणि दिनांक : मंगळवार, ३ नोव्हेंबर २०१५
वेळ : सायंकाळी ६  
स्थळ : महावीर भवन, खानापूर रोड, बेळगाव
मान्यवर वक्ते
* श्री. अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था
* पू. (कु.) स्वाती खाडये, प्रसारसेविका, सनातन संस्था
* अधिवक्ता श्री. चेतन मणेरीकर, हिंदु विधीज्ञ परिषद
* श्री. गुरुप्रसाद, हिंदु जनजागृती समिती
संपर्कासाठी भ्रमणभाष क्रमांक : ७२०४०८२६७८
     हिंदूंनो, मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित राहून तथाकथित पुरोगामीवाल्यांच्या विरोधात संघटित व्हा ! 

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Kashmirme jihadi atankvadke karan 25 varshome laut paya keval 1 Hindu parivar.
kya es asaphalata ke liye koi sahityakar puraskar lautayega ?
जागो ! : कश्मीर में जिहादी आतंकवाद के कारण २५ वर्षों में लौट पाया केवल १ हिन्दू परिवार !
क्या इस असफलता के लिए कोई साहित्यकार पुरस्कार लौटाएगा ?

इस्लामची राष्ट्रघातकी शिकवण आणि त्याविषयीचे मान्यवरांचे मत

श्री. अरविंद कुळकर्णी
      अपराध्याला शोधून काढण्यासाठी त्याला तो अपराध करण्यास कोण प्रवृत्त करते, याचा शोध मुंबई पोलिसांनी घ्यायचे ठरवले आहे. ११.७.२००६ या दिवशी मुंबईत धावत्या लोकल रेल्वेमध्ये बॉम्बस्फोट झाले. हे अधम आणि राक्षसी कृत्य पाकिस्तानी मनोवृत्तीने केले होते, याविषयी कोणाच्याही मनात शंका नव्हती; पण संशयावरून पकडलेल्या आरोपींकडून तसा गुन्हा मान्य करून घेणे, हे मुंबई पोलिसांसारख्या अतीपारंगत पोलिसांनाही शक्य होत नव्हते; कारण मुसलमानांची कुराणनिष्ठा ! कुराण जसे सांगते, तसे आम्ही वागतो; म्हणून आम्ही काही वाईट करत नाही. आमच्या हातून अपराध घडत नाहीत. आम्हाला स्वर्ग वरदान म्हणून मिळालेलाच आहे. मग तुमच्या शिक्षेला कोण विचारतो ?, अशी धारणा आतंकवादी म्हणून पकडलेल्या मुसलमानांची झाली असेल, तर ही धारणा त्यांच्या रक्तात भिनवणारा इस्लाम आहे तरी कसा ? याचा मुंबई पोलिसांना शोध घ्यावासा वाटला, हे भारतावर एक प्रकारे उपकारच झाले, असे म्हणता येईल. वाटेत येणार्‍या माणसांना कीडामुंगीसारखे चिरडून टाका. तुम्ही पापणी न हलवता जर या गोष्टी केल्या, तर त्याचे फळ म्हणून तुम्हाला स्वर्गात पर्‍यांसमवेत रतीसुख मिळेल, असे आमीष दाखवणारा धर्म कसा आहे ? याचा मुंबई पोलिसांना अभ्यास करावासा वाटला.

भारताचा भीषण भविष्यकाळ !

     मुसलमानंाचे आक्रमण हे आजचे नाही. १४०० वर्षे मुसलमानांचे आक्रमण चालू आहे. पाकिस्तान, बांगलादेश यांची निर्मिती ही तर आता शेवटाची, टोकाची आहे; कारण इतकी वर्षे वेगवेगळ्या हिंदू राजांनी त्यांचा पराभव केला; पण तेही आता संख्येने प्रचंड वाढले आहेत. भारतांतर्गत आणखी एक मुसलमानांचे स्थान तयार होत आहे. 
     पुढचा काळ हा संघर्षाचा आहे. यामध्ये राजकीय पक्ष, पोलीस, लष्कर यांची भूमिका ही नगण्यच ठरणार आहे. पुढील १५ ते १६ वर्षांमध्ये सर्वत्र यादवीच माजणार आहे. कोणी कोणाचे रहाणार नाही. या देशातील सर्वसामान्य माणूस जो आतापर्यंत कोणत्याच भूमिकेत नव्हता आणि आजही नाही, त्याला उद्या निश्‍चितच भूमिका घ्यावी लागणार आहे; कारण त्याच्या अस्तित्वाचा प्रश्‍न शिल्लक रहाणार आहे. शेकडो वर्षांच्या इतिहासात अनेक वेळा निर्णायक महाभारत घडत असते. तोच हा काळ आता आला आहे. हिंदु म्हणून जगायचे असेल, तर हा निर्णायक संघर्ष होणारच आहे. - अशोकराव पाटील (लोकजागर, संपादक आणि प्रकाशक : प्रवीण कवठेकर, सांगली, पृष्ठ ३०-३१) 

समर्थांच्या चतुःसूत्रीतील हरिकथा निरुपण आणि राजकारण

       समाजकारण आणि राजकारण निरुपणामध्ये महत्त्वाचा संदेश म्हणजे, 
मुख्य ते हरिकथा निरुपण । दुसरे ते राजकारण । 
तिसरे ते सावधपण सर्व विषयी । चौथा अत्यंत साक्षेप । 
      या महत्त्वाच्या चतु:सूत्रीत सामाजिक आणि राजकीय तत्त्वचिंतन आढळते.
१. हरिकथा निरुपण (म्हणजे प्रत्येक संघटनात्मक कार्य यशस्वी होण्यासाठी 
हरिभक्तीचा आधार आवश्यक असणे)
     पाकिस्तानचे राष्ट्रीयत्व इस्लाममध्ये साठवलेले आहे. अमेरिकेचे राष्ट्रीयत्व भांडवलवादी कडव्या स्वातंत्र्यामध्ये आहे. जपानचे राष्ट्रीयत्व उद्यमशीलतेत आहे. भारताचे राष्ट्रीयत्व वैदिक संस्कृतीमध्येच आहे. आज त्याला हिंदु धर्म असे नाव आहे. हरिकथा निरुपण हे पहिले सूत्र अध्यात्माचे प्रतिनिधी आहे. 
      सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे । 
      परंतु तेथे भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे ॥ 

दाऊदच्या मुसक्या आवळणार ?

दाऊदच्या मुसक्या आवळू, हे वाक्य विविध पक्षांच्या नेत्यांनी आतापर्यंत निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलून दाखवले. त्यानंतर दाऊद निवडणुकीतील प्रचाराचा एक मुद्दाच बनून गेला. प्रत्यक्षात तसे कोणत्याच राजकीय पक्षाने केलेले नाही. त्यामुळे दाऊद भारतातील कारागृहात असेल, यावर आता भारतियांना तीळमात्र विश्‍वास बसत नाही. अशीच घोषणा पंतप्रधान नरंेंद्र मोदी यांनीही निवडणुकीच्या प्रचारात केली. काल छोटा राजनला परदेशात जाऊन अटक करण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आणि त्यामुळे मोदींनी केलेली घोषणा ते आता वास्तवात उतरवतील, अशी शक्यता वाढली आहे.

साधना करणारे आणि न करणारे अशा दोन पुरोहितांच्या विचारसरणीतील लक्षात आलेला भेद !

१. गुरूंचे आज्ञापालन म्हणून न्यूनतम दक्षिणा घेऊन शास्त्रशुद्ध 
आणि भावपूर्ण विधी करणारे एक पुरोहित
     प्रत्येक वर्षी आमच्याकडे महालय श्राद्ध करण्यासाठी एक गुरुजी येतात. ते शास्त्रशुद्ध आणि भावपूर्ण श्राद्धविधी करतात. दक्षिणा विचारल्यावर तुम्ही स्वखुषीने द्याल, तेवढी चालेल, असे म्हणतात. 
      मागील वर्षी आम्ही स्वखुषीने त्यांना ६०० रुपये द्यायला लागलो. तेव्हा त्यांनी ती रक्कम घेतली नाही. ते म्हणाले, पैसे अधिक आहेत. एवढे नकोे. नंतर आम्ही १०० रुपये अल्प करून त्यांना ५०० रुपये दक्षिणा दिली. तेव्हा त्यांनी ५०१ रुपये घेतले. 

गेल्या दोन पिढ्यांनी पुढच्या पिढ्यांना हे दिले !

      ग्रीष्माचा ताप शांत करायला जागोजागी मोठ्या नद्या आणि अगदी अलीकडेपर्यंत बाराही मास वाहणार्‍या अन् स्वच्छ पाण्याच्या नद्या प्रौढ आणि वृद्ध यांना अजूनही आठवत असतील. आज त्या नद्या केव्हाच आटून गेल्या आहेत; पण पावसाळ्यात आणि हिवाळ्याच्या काही दिवसांत त्या वाहत असता त्यात पाय बुडवणे तर सोडाच, जवळून जाणेही नाकाला रूमाल लावल्याविना अशक्य होऊन जाते. आपल्या बालपणीच्या आठवणींनी हुरळून जाऊन आपल्या नातवाला जेव्हा मोठ्या तन्मयतने सांगतो, इथेच आम्ही लहानपणी पोहत असू. नातू उद्गारतो, इतक्या घाण पाण्यात ! बालपणीच्या आठवणीत रमलेले मन टाचणी लागताच फुगा फुटावा तसे एकदम वास्तवतेवर आदळते आणि आक्रंदून म्हणते, आज ती नदी नाही, ते पाणी नाही, ती माणुसकी जपणारी माणसे नाहीत आणि मायेची पाखर घालणारी ती खेडी नाहीत. आहे, केवळ देखावा बिनामायेचा (प्रेमाचा) मायाबाजार ! हेच आजचे वास्तव आहे. 
(संदर्भ : प्रज्ञालोक, अंक २२२, ४.६.२०१२) 

भाजपचे स्वबळावर सत्तेवर येणे, हाच तथाकथित विचारस्वातंत्र्यवाल्यांचा पोटशूळ !

१. चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला 
शासनाने भीक घातली नाही, ते योग्यच !
     पुण्यातील चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेतील विद्यार्थ्यांना आपला १३९ दिवसांचा संप मागे घ्यावा लागला त्याच दिवशी, त्याच वेळी पुरस्कारवापसीची दुसरी लाट उसळून आली, हा योगायोग खचितच नाही. चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेतील विद्यार्थ्यांचा संप मोडून काढला गेला, ते उत्तम झाले. गजेंद्र सिंग चौहान या अगदीच दुय्यमाच्या हाती या संस्थेची सूत्रे दिली म्हणून विद्यार्थी नाराज होते. हे कारण पूर्णसत्य नाही. म्हणजे चौहान हे दुय्यम आहेत हे सत्य; परंतु म्हणून विद्यार्थी नाराज होते, हे असत्य. चौहान हे गुणवंत नाहीत; म्हणून आपण आंदोलन करत आहोत, हे त्यांचे म्हणणे खरे मानले, तर मोहन आगाशे हे संस्थेच्या प्रमुखपदी असतांनाही या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते, ते का ? असे विचारावे लागेल.

श्री शांतादुर्गादेवीचा मखरोत्सव पहातांना युरोपमधील चि. सर्गेयने (वय ५ वर्षे) १५ मिनिटांपर्यंत प्रार्थनेच्या मुद्रेत रहाणे आणि ४५ मिनिटांपेक्षा अधिक काळापर्यंत मंदिरातील मखरोत्सव शांतपणे पहाणे

१५ मिनिटे प्रार्थनेच्या मुद्रेत रहाणारा चि. सर्गेय
चि. सर्गेय यास वाढदिवसानिमित्त लहानथोरांकडून आशीर्वाद !
    २०.१०.२०१५ या दिवशी आम्ही नवरात्रोत्सवानिमित्तचा मखरोत्सव पहाण्यासाठी श्री शांतादुर्गा मंदिरात गेलो होतो. तेथे चालू असलेली श्री दुर्गादेवीची पालखीतून काढण्यात आलेली मिरवणूक पाहून माझा मुलगा चि. सर्गेय (वय ५ वर्षे) उत्सुकतेने देवीविषयी पुष्कळ प्रश्‍न विचारत होता. आम्ही मंदिरात गेल्यावर सजवलेल्या श्री शांतादुर्गादेवीला झोपाळ्यावर बसवून झोका देत होते. त्या वेळी आम्ही देवीला प्रार्थना करू लागलो. माझी प्रार्थना झाल्यावर मी सर्गेयकडे पाहिले. तेव्हा तो अजूनही प्रार्थना करत होता. बराच काळ तो प्रार्थना करत आहे, हे पाहून आता प्रार्थना थांबवली, तरी चालेल, असे मी त्याला सांगितले. त्यावर मला अजून प्रार्थना करायची आहेे, असे तो म्हणाला. जवळजवळ १५ मिनिटांपर्यंत तो प्रार्थनेच्या मुद्रेत होता. प्रथमच त्याने इतका वेळ प्रार्थना केली. त्यानंतर सर्गेय सलग ४५ मिनिटांपेक्षा अधिक काळापर्यंत मंदिरातील मखरोत्सव कोणतीही तक्रार न करता आणि जाण्याची घाई न करता शांतपणे बसून पहात होता. या अनुभूतीसाठी मी श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. - श्री. व्लादीमीर चिरकॉविच (चि. सर्गेयचे वडील), युरोप (२१.१०.२०१५)

हृदयाचे बायपास शस्त्रकर्म होऊनही तळमळीने सेवा करणार्‍या आणि सकारात्मक राहून प्रयत्न करणार्‍या संभाजीनगरच्या सौ. आशा कदम (वय ६४ वर्षे) !

सौ. आशा कदम
मूळच्या संभाजीनगर येथील सौ. आशा अरविंद कदम सध्या ग्रंथप्रदर्शन लावणे आणि अन्य प्रासंगिक सेवा करतात. त्यांना साधनेत येऊन १० वर्षे झाली आहेत. संभाजीनगर येथील साधिकांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे देत आहोत.
१. सेवेची तळमळ
१ अ. गुरुपौर्णिमेच्या सेवेची संधी मिळावी, यासाठी शस्त्रकर्म पुढे ढकलणे : वर्ष २०१३ मध्ये डॉक्टरांनी काकूंच्या हृदयरोगासाठी शस्त्रकर्म करावे लागेल, असे सांगितले होते. गुरुपौर्णिमा समीप असल्याने ती झाल्यावर शस्त्रकर्म करू, असे त्यांनी कुटुंबियांना सांगितले आणि गुरुपौर्णिमेच्या सर्व सेवा केल्या. त्यानंतर शस्त्रकर्म केले.
१ आ. शस्त्रकर्म झाल्यावर दुसर्‍या-तिसर्‍या माळ्यावर जाऊनही प्रसार करणे : शस्त्रकर्म झाल्यामुळे त्यांच्या अधिक चालण्यावर बंधने आहेत, तरीही गुरुपौर्णिमेच्या काळात काकू घरोघरी प्रसाराच्या सेवेला नियमित येत असत. जिना चढून दुसर्‍या-तिसर्‍या माळ्यावर जाऊनही त्यांनी प्रसार केला.
१ इ. ३ घंटे पायी चालून सेवा करणे : १८.७.२०१४ या दिवशी पू. (कु.) स्वातीताईंचे मार्गदर्शन होते. त्यानंतर १९ आणि २० जुलै असे २ दिवस दैनिक अन् साप्ताहिक सनातन प्रभातच्या वर्गणीदारांची नूतनीकरण मोहीम होती. त्या वेळी काकू केंद्रसेविका सौ. चित्रा नाकील यांच्यासमवेत ३ घंटे पायी चालत या सेवेत सहभागी झाल्या. त्या वेळी वाहन असावे, अशी त्यांची अपेक्षाही नव्हती.
- कु. चैताली डुबे

प.पू. वसंत (अण्णा) कर्वेगुरुजी यांच्या देहत्यागाच्या संदर्भात मिळालेली पूर्वसूचना आणि जाणवलेली सूत्रे

प.पू. वसंत (अण्णा) कर्वेगुरुजी
प.पू. वसंत (अण्णा) कर्वेगुरुजी यांच्या देहत्यागाच्या संदर्भात मिळालेली पूर्वसूचना
     सकाळपासून काहीतरी अप्रिय घडणार आहे, असे वाटणे आणि दैनिक सनातन प्रभातमधील प.पू. वसंत (अण्णा) कर्वेगुरुजी यांच्या देहत्यागाची वार्ता ऐकून त्याचा उलगडा होणे : २२.१०.२०१५ या दिवशी दसरा हा महत्त्वाचा सण असूनही मला सकाळपासूनच उत्साह आणि आनंद जाणवत नव्हता. मला असे का होत आहे ?, हे समजत नव्हते. मी सूक्ष्मातून श्रीकृष्णाला सांगितलेे, आज मला काहीच उत्साह जाणवत नाही. काहीतरी अप्रिय घडणार आहे, असे वाटत आहे

अकोला येथील साधिका सौ. मेघा जोशी यांना रामनाथी आश्रमात आल्यावर आलेल्या अनुभूती

१. नामजपात अडथळा करणार्‍या माश्यांना प्रार्थना केल्यावर त्यांनी त्रास न देणे : ध्यानमंदिरात नामजप करायला बसले असता माझ्या अंगावर माशा बसून नामजपात सारखा अडथळा निर्माण होत होता. मी त्यांना अगदी नम्रतेने प्रार्थना केली, तुम्ही देवाच्या चरणांशी जायला धडपडत आहात आणि आम्ही सर्व साधकही तेच करत आहोत. देवाकडे जायच्या मार्गात अडथळा आणून पाप ओढवून घेऊ नका. असे म्हटल्यावर माशा पुन्हा अंगावर बसल्या नाहीत.

देहली येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती पारूल भट्टाचार्य यांची त्यांच्या मुलीला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

श्रीमती पारूल भट्टाचार्य
१. प्रेमभाव
१ अ. आईची अनेकांशी जवळीक आहे. इतरांना अडचणी आल्यावर आईने त्यांना निरपेक्षपणे पुष्कळ साहाय्य केले आहे.
१ आ. सर्व वयाच्या व्यक्तींशी मैत्री असणे : जेव्हा माझ्या मित्र-मैत्रिणी माझ्या घरी येतात, तेव्हा ते माझ्यापेक्षा आईशीच अधिक वेळ बोलतात. आई त्यांच्या वयाची होऊन त्यांच्याशी बोलते. लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयाच्या व्यक्तींशी आईची मैत्री आहे. समष्टीत कसे रहायला हवे ?, हे मला आईकडून शिकायला मिळाले.
२. मधुमेह असूनही एक घंटा पूजा केल्याविना काहीही न खाणे : आईला मधुमेह असल्यामुळे ती वेळच्या वेळी जेवण करण्याचा प्रयत्न करते; परंतु सकाळी न्यूनतम एक घंटा पूजा केल्याविना ती काहीच खात नाही, तसेच झोपण्यापूर्वीही आवर्जून नामजप करते.
ती चैतन्य महाप्रभु यांच्या वंशातील आहे. त्यामुळे तिची श्रीकृष्णावर पुष्कळ श्रद्धा आहे. मनाचा ठाम निश्‍चय असेल, तर आपण काहीही साध्य करू शकतो, हे मला आईकडून शिकायला मिळाले.
३. जीवनात जे प्रसंग घडतात, ते स्वीकारून आई आनंदी रहाते. ती सतत वर्तमानकाळात रहाते.

साधकांना साधनेत सर्वतोपरी साहाय्य करणारे ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शंकर नरुटे !

श्री. शंकर नरुटे
१. साधक आनंदी असावेत, यासाठी प्रयत्न करणे
     दादा जेव्हा मिरज आश्रमात सेवेसाठी यायचे, तेव्हा या आश्रमातील साधक आनंदी होण्यासाठी काय करायला हवे ?, असा ध्यास त्यांच्या मनात सतत असायचा. तेव्हा ते साधकांना वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा द्यायचे, तसेच साधकांना प्रसाराच्या सेवेत सहभागी करून घेत असत. ते साधकांचा सतत विचार करायचे.
२. बालसाधकांनाही सेवेत सहभागी करून घेणे
     आश्रमातील बालसाधकांना ते स्वतःसमवेत सेवेत सहभागी करून घ्यायचे आणि त्यांना सेवेतील बारकावे सांगून साधक म्हणून घडवण्यासाठी प्रयत्न करायचे. त्यांना सेवेतून आनंद कसा मिळेल ?, हाच दादांचा विचार असायचा.

हरिद्वार येथील अर्धकुंभमेळ्यातील धर्मप्रसारांतर्गत विविध सेवांमध्ये सहभागी व्हा !

वाचक, हितचिंतक, धर्मप्रेमी, तसेच साधक यांना सेवेची अमूल्य संधी !
१. अर्धकुंभमेळ्याचे महत्त्व
     उत्तराखंड राज्यातील हरिद्वार येथे प्रत्येक १२ वर्षांनी महाकुंभमेळा आयोजित केला जातो. या १२ वर्षांच्या कालावधीत ६ वर्षांनी अर्धकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. हरिद्वार येथील अर्धकुंभपर्वातील यात्रेचे फळ मोक्ष देणारे असते, असे धर्मशास्त्रामध्ये सांगितले आहे. त्यामुळे कुंभमेळ्याप्रमाणे या अर्धकुंभमेळ्यातही लक्षावधी भाविक यात्राविधी आणि गंगास्नान करतात. अर्धकुंभमेळ्यातील विशेष पर्वकाळांना गंगास्नानाचे महत्त्व असल्याने त्या वेळी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती निर्मित धर्मसत्संगांचे केबल अथवा दूरचित्रवाणी यांवरून प्रसारण करण्याचे नियोजन करावे !

जिल्हासेवक आणि साधक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना
     ९ ते १३ नोव्हेंबर २०१५ या कालावधीत दीपावली आहे. त्या निमित्ताने या संदर्भातील महत्त्व विशद करणारा हिंदी विशेष धर्मसत्संग सिद्ध करण्यात आला आहे. या धर्मसत्संगांतर्गत धार्मिक कृतियोंका शास्त्र या विषयाचे ६ धर्मसत्संग आहेत आणि अध्यात्मशास्त्र या विषयाचे ३ धर्मसत्संग आहेत. या सत्संगांचा कालावधी २८ मिनिटे आहे.

कार्कळ (कर्नाटक) येथील श्री. किशोर आचार्य (वय ६० वर्षे) यांनी गाठली ६३ टक्के आध्यात्मिक पातळी

श्री. किशोर आचार्य (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना
६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. रमानंद गौडा

पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या सत्संगातून त्यांच्या गुणवैशिष्ट्यांचे उलगडलेले विविध पैलू !

१५.१०.२०१५ या दिवशी पू. गाडगीळकाकू यांच्याशी एका सेवेनिमित्त संपर्क झाला. त्या वेळी आमच्यात झालेले संभाषण पुढे देत आहे.
१. पू. काकूंचे साधकांवरील प्रेम !
मी : सर्व साधकांना इकडे तुमची आठवण येते. प्रतिदिन कुठल्या ना कुठल्या साधकाकडून तुमचे नाव आठवणीने निघते.
पू. काकू (हसून) : अरे, मलाही साधकांची पुष्कळ आठवण येते. सर्व साधक माझ्या समवेतच असल्याचे मला जाणवते.

भावी पिढीसाठी देशातील समृद्धीचा ठेवा जतन करण्यासाठी अपार कष्ट सोसणार्‍या पू. (सौ.) अंजली गाडगीळ !

पू. (सौ.) अंजली गाडगीळ
     हे श्रीकृष्णा, दौर्‍याच्या छायाचित्रांचे कोडिंग करण्याची सेवा करतांना पू. (सौ.) अंजली गाडगीळकाकू यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे तूच तुला अपेक्षित अशी मांडून घे, हीच तुझ्या चरणी कळकळीची प्रार्थना आहे.
१. समष्टी भाव असल्याने विविध प्रकारची 
छायाचित्रे काढण्यास सांगणार्‍या पू. काकू !
अ. दौर्‍याच्या काळात पू. (सौ.) अंजली गाडगीळकाकू विविध ठिकाणची मंदिरे, महाल, राजवाडे इत्यादी ठिकाणी जातात. तेथील शिल्पकला आणि पुरातन चित्रकला यांची छायाचित्रे काढण्यास सांगतात.

स्वतः आनंदी राहून इतरांना आनंद देणारी देवद, पनवेल येथील उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची चि. मैत्रेयी मिलिंद पोशे (वय २ वर्षेे) !

चि. मैत्रेयी पोशे
आश्‍विन कृष्ण पक्ष सप्तमी (२.११.२०१५) या दिवशी देवद, पनवेल येथे रहाणारे श्री. मिलिंद पोशे आणि सौ. शीतल मिलिंद पोशे यांची कन्या चि. मैत्रेयी (वय २ वर्षेे) हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्याविषयी तिचे आई-वडील आणि साधक यांना जाणवलेली वैशिष्ट्ये देत आहोत.
चि. मैत्रेयी मिलिंद पोशे हिला 
वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून आशीर्वाद !
१. सौ. शीतल मिलिंद पोशे (मैत्रेयीची आई)
१ अ. सात्त्विक गोष्टींची आवड असणे
१. भातकुलीचा खेळ खेळतांना ती स्वामीआजोबांना (ती अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थांना स्वामीआजोबा म्हणते.) चहा करून देते. अन्य खेळ तिला आवडत नाहीत.
२. ती बालसंस्कार वर्गाला नियमित जाते. तेथे सांगितलेल्या गोष्टी ती अगदी शांतपणे श्रवण करते आणि काही मार्गदर्शन आचरणात आणते.
३. ती नित्यनेमाने देवतांच्या चित्रांचे उपाय करते. तिला गोमूत्राचा वापर करणे, तसेच पंचगव्य घालून अंघोळ करणे आवडते. मी पाण्यात पंचगव्य घालायला विसरले, तर ती मला आठवण करून देते.
१ आ. मठातील सेवेकरी आणि साधक यांच्याशी तिची लवकर जवळीक होते. स्वामींच्या मठात, तसेच सनातनच्या आश्रमात मी सेवा करतांना ती कधीच त्रास देत नाही.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
'कुठे आपल्या पूर्णपणे नियंत्रणात असलेल्या आपल्या १ - २ मुलांवरही सुसंस्कार करता न येणारे हल्लीचे पालक, तर कुठे आपल्या सहस्रो भक्तांवर साधनेचे संस्कार करणारे संत आणि गुरु !' - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (४.९.२०१५)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
प्रकृती आणि पुरुष
१ प्रकृतीचे भय गेले म्हणजे तो पुरुष झाला. मी कर्ता आहे, याचे ज्ञान पाहिजे. मी म्हणजे अहंकार धरला, तर ती प्रकृती.
भावार्थ : मी कर्ता आहे यातील मी हा पुरुषतत्त्वासंबंधी आहे.
२. प्रकृतीधर्माप्रमाणे वृत्ती, याला प्रवृत्ती म्हणतात. निवृत्तीची प्रतिक्रिया प्रवृत्ती. निवृत्ती ही स्वयंसिद्ध आहे.
३. पुरुषाचे लक्ष आणि स्त्रीची दृष्टी : पुरुषाचे लक्ष हे त्याचे ध्येय असते, तर स्त्रीची दृष्टी परपुरुषाचे लक्ष आकृष्ट करते, म्हणजे प्रकृतीमुळे विकार येतात. लक्ष, रस इत्यादी म्हणजे विकार.

फलक प्रसिद्धीकरता

काश्मीरसारखी हिंदूंची दु:स्थिती भारतात सर्वत्र होऊ द्यायची नसेल, तर राष्ट्रहितार्थ संघटित व्हा !
काश्मीरमधील आतंकवादामुळे तेथून ४ लाख ४० सहस्र काश्मिरी हिंदू विस्थापित झाले. त्यांचे काश्मीरमध्ये पुनर्वसन करण्यासाठी केंद्रशासनाने वर्ष २००८ मध्ये १ सहस्र ६०० कोटी रुपयांची योजना प्रस्तावित केली; मात्र आतापर्यंत केवळ १ काश्मिरी हिंदु कुटुंब काश्मीरमध्ये परतले.

बोधचित्र


प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे 

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

खरा हितचिंतक !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     अहो रूपम् अहो ध्वनिः । म्हणजे (गाढवाने उंटाला म्हणावे) वा ! काय रूप आहे आणि (उंटाने गाढवाला म्हणावे) वा ! काय आवाज आहे, असे म्हणणारा कधीही मित्र नसतो. तुम्हाला तुमच्यातील दोष सांगणाराच तुमचा खरा मित्र आणि खरा हितचिंतक असतो. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

भळभळती जखम

संपादकीय
भारत स्वतंत्र होऊन आता ६७ वर्षे लोटली असली, तरी त्या वेळच्या काही जखमा अजूनही भळभळत आहेत. त्यातील एक म्हणजे काँग्रेसचे विसर्जन आणि दुसरी म्हणजे काश्मीरचे विलिनीकरण ! स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचे विसर्जन व्हावे, अशी गांधींची इच्छा होती. बाकी काँग्रेसजनांना राजकारणच करायचे असल्यामुळे गांधींची ती इच्छा अपूर्ण राहिली आणि भारताचे अक्षरशः वाटोळे झाले. आता भारत खरोखरच काँग्रेसमुक्त होऊ लागला असला, तरी गत ६७ वर्षांत झालेली हानी कधीही भरून न निघणारी आहे. तशीच एक भळभळणारी जखम म्हणजे काश्मीर प्रश्‍न ! काश्मीरचा प्रश्‍न स्वबळावर सोडवण्याऐवजी नेहरूंनी तो युनोत नेला आणि ते घोंगडे आतापर्यंत भिजत पडले आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn