Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

पंत बाळेकुंद्री महाराज यांची 
आज पुण्यतिथी (बेळगाव)

लष्कर-ए-तोयबाचा काश्मीरमधील प्रमुख अबू कासिम चकमकीत ठार

आतंकवाद्यांचे उगमस्थान असलेल्या पाकवरच आता थेट आक्रमण 
करून आतंकवादाचे एकदाच समूळ उच्चाटन करण्याला पर्याय नाही !
श्रीनगर - लष्कर-ए-तोयबा या जिहादी आतंकवादी संघटनेच्या काश्मीर  खोर्यातील कारवायांचा प्रमुख अबू कासिम हा काश्मीरमध्ये भारतीय सैन्यामवेत झालेल्या चकमकीत ठार झाला. २८ ऑक्टोबर या दिवशी काश्मीरमधील खुडपोरा या गावात सुरक्षादलाच्या सैनिकांकडून शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. त्या वेळी झालेल्या चकमकीत रात्री २ वाजता भारतीय सैनिकांच्या गोळीबारात कासिम ठार झाल्याची माहिती सैन्यदलाच्या प्रवक्त्यांनी दिली. या ठिकाणी अजूनही शोधमोहीम चालू असून अबू कासिमचा मृत्यू सैन्यदलाच्या दृष्टीने मोठे यश मानले जात आहे. अबू कासिम हा पाकिस्तानी नागरिक असून तो गेली ६ वर्षे काश्मीर खोर्यातील आतंकवादी कारवायांची सूत्रे हाताळत होता. स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार अबू कासिमनेच सप्टेंबर मासात उधमपूर येथे लष्करी बसवर झालेल्या आक्रमणाचा कट आखला होता. या आक्रमणात २ भारतीय सैनिकांचा मृत्यू झाला होता, तर १६ सैनिक घायाळ झाले होते. याशिवाय वर्ष २०१३ मध्ये हैदरपोरा येथे सैनिकांवर करण्यात आलेल्या आक्रमणातही त्याचा सहभाग होता. काही दिवसांपूर्वीच कासिमच्या मागावर असतांना आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात जम्मू-काश्मीर पोलीसदलातील उपनिरीक्षक अल्ताफ अहमद यांचा मृत्यू झाला होता.

शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी मंदिर पाडण्यापासून तहसीलदारांना थांबवले !

 हिंदूंवरील आघातांच्या विरोधात शिवसेनाच सातत्याने आवाज उठवते; 
म्हणून हिंदूंना शिवसेनेचा आधार वाटतो !
संभाजीनगर - वळुंज येथे अतिक्रमण मोहिमेच्या अंतर्गत एक मंदिर पाडण्यासाठी आलेले तहसीलदार रमेश मनुलोड यांना शिवसेनेचे खासदार श्री. चंद्रकांत खैरे यांनी दरडावून थांबवले. याविषयी श्री. खैरे म्हणाले, "येथील महिलांनी प्रत्येकी १०० रुपये जमवून हे मंदिर उभारले आहे. देहलीत एक मशीद १५ वर्षे रस्त्याच्या मध्यभागी आहे. ती पाडायचे धैर्य  पोलिसांमध्ये नाही. हे भ्रष्ट अधिकारी अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी वर्षानुवर्षे जात नाहीत. हे मोदींचे राज्य आहे, मोगलांचे नव्हे. एम्आयडीसी आणि मंदिराचे प्रशासन यांची या संदर्भात चर्चा चालू आहे. ही चर्चा चालू असतांनाच जिल्हाधिकार्यांनी मंदिर पाडण्याचे आदेश कसे काय दिले ? या कारवाईसाठी जिल्हाधिकारी स्वतः न येता त्यांनी तहसीलदारांना का पाठवले ?"

धर्मांधांच्या विरोधामुळे बंगालमधील नलहाटी या गावात ४ वर्षांपासून नवरात्रोत्सव बंद !

कोलकाता - येथील वीरभूमी जिल्ह्यातील नलहाटी गावात वर्ष २०१२ पासून हिंदूंना नवरात्रोत्सव साजरा करण्यास अनुमती दिली जात नाही. (हिंदूंच्या धर्मस्वातंत्र्यावरील या आघातावर प्रसारमाध्यमे गप्प का ? - संपादक) एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, या गावातील धर्मांधांंनी प्रशासनाकडे मागितलेली गोहत्येची अनुमती त्यांना नाकारण्यात आली होती. तेव्हा त्यांनी प्रशासनाकडे हिंदूंनाही नवरात्रोत्सव साजरा करण्याची अनुमती देण्यात येऊ नये, अशी मागणी केली. त्यामुळे गावात तणाव निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनानेही नवरात्रोत्सवाला अनुमती नाकारली. परिणामी आजपर्यंत तेथे या उत्सवापासून हिंदूंना वंचित ठेवण्यात येत आहे. या प्रकरणी अनेक लोकांकडून 'दादरी हत्या आणि गोमांस बंदीवर उघडपणे बोलणार्या बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आता गप्प का ?' असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बीजिंग - चीनने प्रत्येक जोडप्याला १ मूल होऊ देण्याच्या धोरणात पालट करत त्यांना आता २ मुले होऊ देण्यास अनुमती दिली आहे. लोकसंख्येचा भस्मासूर रोखण्यासाठी चीनने काही वर्षांपूर्वी एका मुलाचे धोरण अवलंबले होते. 

शास्त्रज्ञ पी.एम्. भार्गव यांच्याकडून पद्मभूषण पुरस्कार परत करण्याची घोषणा

लेखकांपाठोपाठ आता वैज्ञानिकांनाही जडला पुरस्कार वापसीचा आजार !
     चेन्नई - गेल्या काही दिवसांपासून देशातील असहिष्णू वातावारणाचा निषेध म्हणून लेखक आणि कलाकार यांच्याकडून चालू असणार्‍या पुरस्कार वापसी आंदोलनात आता शास्त्रज्ञही सहभागी झाले आहेत. देशातील बुद्धीप्रामाण्यावाद, तर्क आणि विज्ञानाच्या गळचेपीचा निषेध म्हणून शास्त्रज्ञ तथा पेशीय आणि आण्विक जीवशास्त्र केंद्राचे (सीसीएम्बी) संस्थापक-संचालक पी.एम्. भार्गव यांनी त्यांना मिळालेला पद्मभूषण पुरस्कार शासनाला परत करण्याची घोषणा केली. (दादरी प्रकरण होऊन आता बराच कालावधी लोटला. आताच्या घडीला देशातील धार्मिक वातावरण कलुषित झाले आहे, असे नाही. असे असतांना भार्गव यांनी दिलेली कारणे तकलादू वाटतात. त्यांच्या या कृतीवरूनच त्यांचा बोलविता धनी वेगळा आहे, हे दिसून येते ! - संपादक)

भारतीय उच्चायुक्तांना पाकच्या क्लबमध्ये प्रवेश नाकारला !

  • पाकच्या कलाकारांना भारतात पायघड्या घालणारे तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी याविषयी काही बोलतील का ?
  • पाकचे शेपूट वाकडे ते वाकडेच !
     नवी देहली - पाकमधील एका क्लबने भारताचे उच्चायुक्त टी.सी.ए. राघवन् यांना प्रवेश देण्यास नकार दिला. या क्लबमध्ये होणार्‍या एका कार्यक्रमाचे अधिकृत निमंत्रण मिळालेले असतांनाही राघवन् आणि त्यांच्या कुटुंबाला या क्लबच्या प्रवेशास अधिकार्‍यांनी ऐनवेळेस नकार दर्शवला. या घटनेला देहली आणि कराची येथील सूत्रांनीही दुजोरा दिल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्राने म्हटले आहे. महंमद अली जीना यांचा नातू लिकायत मर्चंट सहअध्यक्ष असलेल्या पाकिस्तान-इंडिया सिटिझन्स फ्रेंडशिप फोरमच्या वतीने २६ ऑक्टोबर या दिवशी कराची येथील सिंध क्लबमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी आयोजकांनी राघवन् यांनाही निमंत्रित केले होते. या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्यासाठी ते कुटुंबियांसह कराचीतील एका हॉटेलमध्ये उतरले होते. तेव्हा त्यांना या क्लबकडून प्रवेश न देण्याचा निर्णय घेतल्याचा अधिकृत संदेश प्राप्त झाला; मात्र त्यामागील नेमके कारण स्पष्ट करण्यात आले नाही. या प्रकरणाची परराष्ट्र मंत्रालयाने गंभीर दखल घेतली आहे.

खानापूर येथे सापडलेल्या मृतदेहाविषयी गुन्हे अन्वेषण विभाग चौकशी करणार !

मृतदेह रुद्रगौडा पाटील यांचा नसल्याचे नातेवाइकांकडून स्पष्ट
बेळगाव (कर्नाटक) - येथील खानापूरजवळील जंगलात आढळलेल्या मृतदेहाचा तोंडवळा कर्नाटकातील धर्मद्रोही पुरोगामी साहित्यिक डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येच्या प्रकरणातील संशयित आरोपीच्या तोंडवळ्याशी मिळताजुळता असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमधून प्रसारित झाले. धारवाड पोलिसांनी या मृतदेहाला २६ ऑक्टोबरला दफन केल्याचे पुढे आले आहे. तत्पूर्वी ९ दिवस हा मृतदेह तेथील शवागरात होता. तो कह्यात घेण्यासाठी कोणी पुढे आले नव्हते. हा मृतदेह रुद्र पाटील यांचा असल्याचा संशय असल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित झाले होते; मात्र हा मृतदेह रुद्र पाटील यांचा नसल्याचे त्यांच्या नातेवाइकांनी स्पष्ट केले आहे. दफन केलेला हा मृतदेह पोलिसांनी उकरून काढला असून या मृतदेहाविषयी अधिक चौकशी करण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक येथे दाखल झाले आहे, असे वृत्त काही वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित झाले आहे. 

पोलिसांच्या मारहाणीविरुद्ध रवि कामलिंग यांची मानवाधिकार आयोगाकडे तक्रार !

खानापूर येथील हिंसाचाराचे प्रकरण
बेळगाव - खानापूर येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या हिंसाचाराच्या कालावधीत पोलीस उपनिरीक्षक उस्मानगणी अवटी यांनी श्री. रवि सोमेश्वर कामलिंग यांना बेदम मारहाण केली. यात श्री. रवि कामलिंग गंभीररित्या घायाळ झाले. याविरोधात श्री. कामलिंग यांनी देहली येथील राष्ट्र्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करून 'पोलीस उपनिरीक्षक उस्मानगणी अवटी यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करावी आणि त्यांच्याकडून २ लाख ५० सहस्र रुपयांची हानी भरपाई मिळावी', अशी मागणी केली आहे.

पाकिस्तानी लेखिकेला भारताने व्हिसा नाकारला; मात्र पाकप्रेमींकडून त्यांच्या पुस्तकाचे स्काईपवरून अनावरण !

     शत्रूराष्ट्र पाककडून प्रतिदिन सीमेवर गोळीबार करून भारतीय सैनिक आणि जनता यांचे बळी घेतले जात आहेत, तसेच भारतीय कलाकारांच्या कार्यक्रमांना पाकमध्ये अनुमती नाकारली जाते; मात्र भारतातील राष्ट्राभिमानशून्य पाकप्रेमींकडून पाकिस्तान्यांचे तुष्टीकरण केले जाते !
    धानाचुली (उत्तराखंड) - पाकिस्तानी लेखिका कान्झा जावेद यांना कुमांव साहित्य महोत्सवात भाग घेण्यासाठी भारताकडून व्हिसा नाकारण्यात आला; मात्र त्यांच्या पुस्तकाचे अनावरण येथून स्काईप या संगणकीय प्रणालीवरून करण्यात आले. साहित्य महोत्सवाचे संचालक सुमंत बत्रा यांनी जावेद यांच्या अ‍ॅशिस, व्हाइन अ‍ॅण्ड डस्ट या पुस्तकाचे अनावरण केले. कान्झा जावेद यांनी स्काईपवरून या सोहळ्यात भाग घेतला. कान्झा जावेद भारतात येऊ न शकल्याने वाईट वाटते; मात्र आम्ही त्यांच्या पुस्तकाचे अनावरण केले, असे बत्रा यांनी सांगितले. (शत्रूराष्ट्र पाकच्या कलाकारांचा पुळका येणार्‍यांनी पाकमध्ये चालते व्हावे, अशी राष्ट्रप्रेमींची मागणी आहे ! - संपादक) कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तारा प्रकाशच्या आंचल मल्होत्रा यांनी केले.

कर्नाटक शासनाने २५ लक्ष रुपये हानीभरपाई द्यावी ! - बजरंग दल

प्रशांत पुजारी हत्या प्रकरण
     मंगळुरू (कर्नाटक) - येथील अवैध पशूवधगृहे बंद करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले प्रशांत पुजारी यांची ९ ऑक्टोबर या दिवशी धर्मांधांनी निर्घृण हत्या केली. या प्रकरणी पुजारी यांच्या कुटुंबियांना कर्नाटक शासनाने २५ लक्ष रुपये हानीभरपाई द्यावी आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या आतंकवादी संघटनेवर बंदी घालावी, अशी मागणी बजरंग दलाचे विभागीय संयोजक श्री. सूर्यनारायण यांनी एका पत्रकार परिषदेत केली. राज्यशासन हिंदूंना संरक्षण नाकारून दंगली आणि अन्य गुन्ह्यांच्या प्रकरणात धर्मांधांना संरक्षण देत आहे, असा आरोपही त्यांनी या वेळी केला.

मठाधिपतींच्या विरोधात साक्षीदारांची दबावापोटी खोटी साक्ष ! - रामचंद्रपूर मठाचे पदाधिकारी

श्री राघवेश्‍वर भारती स्वामी यांच्यावरील कथित बलात्काराच्या आरोपाचे प्रकरण
     बेंगळुरू (कर्नाटक) - एका गायिकेवर बलात्कार केल्याच्या कथित आरोपांच्या प्रकरणी रामचंद्रपूर मठाचे मठाधिपती श्री राघवेश्‍वर भारती स्वामी यांच्या विरोधातील साक्षीदारांनी दबावापोटी खोटी साक्ष दिल्याचा दावा मठाच्या पदाधिकार्‍यांनी केला आहे. या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अनेकांची साक्ष नोंद करून घेतली होती. साक्षीदारांनी त्यांच्या पूर्वीच्या आणि आताच्या साक्षीमध्ये केलेल्या विधानांमध्ये विरोधाभास आहे. यावरून साक्षीदार दबावाखाली साक्ष देत असल्याचे सिद्ध होते, असे रामचंद्रपूर मठाचे समन्वयक श्री. गजानन शर्मा यांनी सांगितले. आमच्या गुरूंच्या विरोधातील आरोप खोटे आहेत. ते एक मोठे षड्यंत्र आहे, असेही श्री. शर्मा यांनी सांगितले.

तेलंगणची महत्त्वाची कागदपत्रे गहाळ

उत्तरदायी अधिकार्‍यांना कायमचे निलंबित करा !
     भाग्यनगर (हैद्राबाद) - तेलंगण राज्याच्या महसूल खात्याने तपासणी केली असता शासनाची काही महत्त्वाची कागदपत्रे गहाळ झाल्याचे लक्षात आले आहे. तेलंगण राज्याच्या १० जिल्ह्यांतील सुमारे ११ सहस्र ९९० कागदपत्रे गहाळ झाल्याचे उघडकीस आले आहे. रंगा रेड्डी जिल्ह्यातील सर्वांधिक ३ सहस्र ९९५ कागदपत्रे गहाळ झाली आहेत. करीमनगर २ सहस्र ४५०, निझामाबाद २ सहस्र ३६०, नालगोंडा ९९०, वारंगल ६५०, खम्माम ४००, मेडक ३००, महबूबनगर २५०, भाग्यनगर ११० आणि आदिलाबाद १५ अशी कागदपत्रे गहाळ झाली आहेत. राज्यात मालमत्ता नोंदणी चालू असल्याने गहाळ झालेली सर्व कागदपत्रे सापडणे आवश्यक आहे. कागदपत्रांविना नोंदणी प्रक्रिया पुढे नेणे कठीण होणार आहे, असे महसूल खात्याच्या एका अधिकार्‍याने सांगितले.

डॉ. कलाम यांचे निवासस्थान केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांना देण्यावरून आपची टीका

     नवी देहली - माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे निवासस्थान पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांना दिल्याने आम आदमी पक्षाने टीका केली आहे.
    डॉ. कलाम यांनी वास्तव्य केलेला राजाजी मार्गावरील बंगला महेश शर्मा यांना रहाण्यासाठी देण्यात आला आहे. राजधानीच्या ल्युटन्स भागातील बंगल्याचे स्मृतीस्थळात रुपांतर न करण्याचे शासनाचे धोरण असल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले आहे. यावर टीका करतांना आपचे मंत्री कपिल मिश्रा म्हणाले, डॉ. कलाम यांचे कार्य केवळ रामेश्‍वरम्पुरतेच मर्यादित ठेवणे, तसेच त्यांचे सर्व साहित्य, पुस्तके आणि अगदी त्यांची वीणाही रामेश्‍वरम्ला पाठवणे हा त्यांचा अवमान आहे. या महान व्यक्तीच्या स्मृती जपण्यासाठी हे निवास्थान ज्ञान केंद्र करायला हवे होते.

हिंदु जनजागृती समितीला पू. पंडित जगदीश जोशी यांचे आशीर्वाद

हिंदु जनजागृती समितीकडून उज्जैन येथील संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांची भेट 
     उज्जैन - हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी येथील संत पू. पंडित जगदीश जोशी यांचे त्यांच्या द्वारिका आश्रमात दर्शन घेऊन धर्मकार्यासाठी आशीर्वाद घेतले. या आश्रमाच्या वतीने जिज्ञासूला साधनेचे महत्त्व सांगून त्याच्याकडून साधना करवून घेतली जाते. 
प्रसिद्ध सनदी लेखापाल श्री. नितीन गरूड यांची भेट 
     हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी उज्जैन येथील प्रसिद्ध सनदी लेखापाल श्री. नितीन गरूड यांची भेट घेतली. या भेटीत श्री. गरूड यांनी पू. डॉ. पिंगळे यांच्याशी साधनेविषयी चर्चा केली. या वेळी त्यांनी कुंभपर्वाच्या वेळी आवश्यक सहकार्य करण्याचे समितीला आश्‍वासन दिले.

हिंदु सेनेचे प्रमुख विष्णु गुप्ता यांना अटक

केरळ भवनमध्ये गोमांस मिळत असल्याच्या तक्रारीचे प्रकरण
     नवी देहली - देहलीतील केरळ हाऊसमध्ये गोमांस मिळत असल्याविषयी दिलेली तक्रार खोटी असल्याचे सांगत हिंदु सेनेेचे प्रमुख श्री. विष्णु गुप्ता यांना पोलिसांनी अटक केली. श्री. गुप्ता यांना काल पोलिसांनी कह्यात घेतले होते.
      देहलीचे पोलीस आयुक्त बी.एस्. बस्सी म्हणाले, पोलिसांना दूरध्वनीवर खोटी माहिती देणार्‍या विष्णु गुप्ता यांच्यावर भादंविच्या कलम १८२ (खोटी माहिती देणे) अन्वये कारवाई करण्याचा विचार आहे. शासकीय कर्मचार्‍यांना त्यांचे अधिकार निरपराध व्यक्तींच्या विरोधात वापरण्यास भाग पाडण्याचाही आरोप त्यांच्यावर आहे. गुप्ता यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून केरळ अतिथिगृहात गाईचे मांस दिले जात असल्याची माहिती दिली होती; परंतु गुप्ता यांनी दिलेली माहिती खोटी होती.

निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याच्या प्रकरणी असदुद्दिन ओवैसी यांना अटक आणि सुटका

स्वत:च कायदा न पाळणारे असे लोकप्रतिनिधी जनतेला कायद्याचे राज्य कधी देतील का ?
पूर्णिया (बिहार) - बिहार राज्यात सध्या चालू असलेल्या निवडणुकांच्या वेळी एम्.आय.एम्. पक्षाचे प्रमुख तथा खासदार असदुद्दिन ओवैसी यांनी कुठलीही पूर्वानुमती न घेता, तसेच ध्वनिक्षेपकाचा वापर करून धार्मिकस्थळी सभा घेतली. यामुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग झाल्याने बैसी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी त्यांना अटक केली. ओवैसी यांनी 'मी धार्मिकस्थळी प्रार्थना करण्यास गेलो होतो', असे कारण पुढे करत सर्व आरोप फेटाळले. ओवैसी यांना पोलीस ठाण्यात १ घंटा बसवून १० सहस्र रुपयांच्या वैयक्तिक 'बॉण्ड'वर सोडून देण्यात आले.

दादर, मुंबई येथील वेदमूर्ती पंकज रामचंद्र जोशी यांचे आकस्मिक निधन !

वेदमूर्ती पंकज जोशी
दादर, २९ ऑक्टोबर (वार्ता.) - सनातन प्रभातचे वाचक आणि सनातन संस्थेचे हितचिंतक, हिंदु धर्मशास्त्राचे गाढे अभ्यासक वेदमूर्ती पंकज रामचंद्र जोशी (वय ३८ वर्षे) यांचे २८ ऑक्टोबरच्या रात्री ८.३० वाजता हृदयविकाराने आकस्मिक निधन झाले. त्यांच्यावर २९ ऑक्टोबरला सकाळी ९.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात त्यांची आई आणि काकू आहेत. सनातन परिवार जोशी कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.

भारत आणि आफ्रिका येथील युवक उद्याचे भविष्य ! - पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारत-आफ्रिका परिषद
     नवी देहली - भारत आणि आफ्रिका येथील दोन तृतीयांश जनता ३५ वर्षांहून अल्प वयाची आहे. हेच लोक येणार्‍या काळात देशाला नवी दिशा देणार आहेत. त्यामुळे या दोन्ही देशांत तेथील युवक हेच उद्याचे भविष्य आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे चालू असलेल्या आफ्रिकी देशांच्या परिषदेच्या शेवटच्या दिवशी केले. या संमेलनात आफ्रिकेच्या ५४ देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या सर्वाधिक हत्या महाराष्ट्रात !

या हत्या थांबवण्यासाठी आतापर्यंत काय उपाययोजना केल्या गेल्या, हे जनतेला कळले पाहिजे !
माहिती अधिकार खात्याच्या कार्यालयांमध्ये २ लाखांवर माहिती अर्ज प्रलंबित
    नवी देहली - देशातील २३ माहिती अधिकार खात्याची कार्यालये आहेत. त्यांत ख्रिस्ताब्द २०१३ अखेर २ लाखाहून अधिक माहिती मागवलेले अर्ज प्रलंबित आहेत. ही माहिती राग आणि साम्य केंद्र या सेवाभावी संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणात उघड झाली आहे. वरील परिस्थिती अशीच राहिली, तर मध्यप्रदेश राज्य माहिती आयोगाकडे दाखल केलेले अपील ६० वर्षांनंतर सुनावणीस येईल, तर बंगालमध्ये त्यालाच १७ वर्षे लागतील.

फटाक्यांवरील प्रतिबंध काळात वाढ नाही ! - सर्वोच्च न्यायालय

     नवी देहली - दिवाळीच्या कालावधीत फटाके वाजवण्याचा रात्रीचा प्रतिबंधित काळ वाढवण्यास सर्वोच्च न्यायालायाने नकार दिला. रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत फटाके वाजवण्यास २००१च्या आदेशानुसार बंदी आहे; मात्र त्यात वाढ करण्यासाठी आलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना २८ ऑक्टोबर या दिवशी न्यायालयाने शासनावर ताशेरे ओढले. फटाके घातक असून त्याचे दुष्परिणामही आहेत; मात्र फटाक्यांच्या दुष्परिणामांविषयी जागृती करण्यात शासन अपयशी ठरल्याचे सरन्यायाधीश एच. एल्. दत्तू आणि न्या. अरुण मिश्रा म्हणाले.

जागतिक क्रमवारीत भारताच्या मानांकनात सुधारणा

जागतिक बँकेकडून डूईंग बिझनेस २०१६ हा वार्षिक अहवाल प्रसिद्ध
     वॉशिंग्टन - भारतात उद्योग चालू करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होत असल्याचे जागतिक बँकेने म्हटले आहे. ईझ ऑफ डुईंग बिझनेसच्या जागतिक क्रमावारीत भारताच्या मानांकनात सुधारणा झाली आहे. तो १२ स्थानांनी वर गेला असून आता १८९ देशांच्या सूचीत भारत १३० व्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारताच्या मानांकनात इतक्या अल्पावधीत झालेली सुधारणा ही अत्यंत कौतुकास्पद कामगिरी आहे, असे मत जागतिक बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ आणि वरिष्ठ उपाध्यक्ष कौशिक बसू यांनी व्यक्त केले.

विमानातून २ टन अमली पदार्थ नेल्याच्या प्रकरणी सौदीच्या युवराजाला अटक

     बैरूत - लेबनॉनची राजधानी बैरूतमधील विमानतळावर २ टन अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या तस्करीच्या प्रकरणी सौदीचा युवराज आणि इतर ४ जणांना अटक करण्यात आली आहे. 
    अमली पदार्थांचा एवढा प्रचंड साठा उजेडात येण्याची बैरूतच्या रफिक हरीरी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. सौदीचे युवराज अब्देल मोहसेन बिन वालिद बिन अब्दुल अझीज यांच्या खाजगी विमानात हा साठा आढळून आला. युवराज अब्देल मोहसेन याच विमानाने सौदी अरेबियाला जाणार होते. पश्‍चिम आशियातील लढवय्ये नशेसाठी या गोळ्यांचे सेवन करतात. यापूर्वी सौदी राजघराण्याच्या सदस्यांच्या कुकृत्यांमुळे सौदीच्या राजघराण्याचे विविध देशांतील प्रशासनाशी तंटे झाले आहेत.

अंतराळातील एक मोठा तुकडा पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता ! - शास्त्रज्ञांची चेतावणी

     वॉशिंग्टन - अंतराळातील एक मोठा तुकडा १३ नोव्हेंबर या दिवशी सकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी पृथ्वीवर कोसळेल, अशी चेतावणी शास्त्रज्ञांनी दिली आहे. या मानवनिर्मित तुकड्याचे डब्ल्यूटी ११९० एफ् असे नामकरण करण्यात आले आहे. हा तुकडा पोकळ असून तो रॉकेटचा वापरलेला अवशेष किंवा अलीकडील चांद्र मोहिमेचे पॅनेलिंग शेड असू शकतो. भविष्यात अवकाशातून एखादी विध्वंसक वस्तू पृथ्वीवर आदळणार असेल, तर काय करता येईल ?, याचीही चाचणी म्हणून या घटनेचा शास्त्रज्ञांकडून अभ्यास करण्यात येत आहे. हा तुकडा हिंद महासागरात कोसळण्याची शक्यता आहे. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर हा तुकडा जळणे अपेक्षित आहे; मात्र तसे न झाल्यास त्याचे उर्वरित अवशेष बॉम्बसारखे आदळू शकतात, असेही शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

हिंदूंच्या कल्याणासाठी हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही ! - रमाकांत कोंडुस्कर, जिल्हाध्यक्ष, श्रीराम सेना

सभेत मार्गदर्शन करतांना श्री. रमाकांत कोंडुस्कर
गायकवाडी (निपाणी) येथे हिंदु धर्मजागृती सभा आणि श्रीराम सेना शाखेचा उद्घाटन सोहळा सभारंभ
      निपाणी (जिल्हा बेळगाव), २९ ऑक्टोबर (वार्ता.) - हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे रक्षण होण्यासाठी, हिंदु समाज सुशिक्षित आणि आनंदित रहाण्यासाठी आज हिंदु धर्मजागृतीची आवश्यकता आहे. यासाठी श्रीराम सेनेच्या वतीने प्रत्येक गावागावात धर्मजागृती सभा घेत आहोत. हिंदूंच्या कल्याणासाठी हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही, असे परखड मत श्रीराम सेनेचे बेळगाव जिल्हाध्यक्ष श्री. रमाकांत कोंडुस्कर यांनी व्यक्त केले. गायकवाडी येथे २६ ऑक्टोबर या दिवशी श्रीराम सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्रीराम सेनेच्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी आणि हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. या कार्यक्रमास १ सहस्र ५०० जिज्ञासूंची उपस्थिती होती.

साहित्यिकांनी एकच पक्ष किंवा विचारसरणीला 'टार्गेट' करू नये !

भाजपचे गोवा येथील आमदार कवी विष्णु सूर्या वाघ यांचा साहित्यिकांना सल्ला 
     कुडाळ - देशातील असहिष्णूतेचे वातावरण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत असल्याच्या भावनेतून महाराष्ट्रासह देशभरातील साहित्यिक आपले पुरस्कार परत करत आहेत; परंतु समाजात ज्या अप्रिय घटना घडतात, त्यावर हे साहित्यिक आवाज का उठवत नाहीत ? कोणाला कोणतीही विचारसरणी प्रिय असू शकते. एकच विचार सगळ्यांना मान्य असेल, असे नाही. साहित्यिकांनी प्रत्येक अन्यायाविरोधात आवाज उठवायलाच हवा; पण त्यांनी एकाच पक्षाला आणि एकाच विचाराला 'टार्गेट' करू नये; मात्र देशहितासाठी प्रत्येकाचे मतस्वातंत्र्य जपलेच पाहिजे, असे मत भाजपचे गोवा येथील आमदार कवी विष्णु सूर्या वाघ यांनी येथे आयोजित कोकण मराठी साहित्य परिषदेच्या संमेलनात व्यक्त केले. 

सांगली-मिरजेत गॅस दाहिनी उभारणार - स्थायी समिती सभापती

सांगली महापालिकेचा हिंदु धर्मशास्त्रविरोधी निर्णय !
     सांगली, २९ ऑक्टोबर (वार्ता.) - अंत्यसंस्कारासाठी सांगली-मिरज शहरात गॅस दाहिनी उभारण्यात येणार आहे. शहरात मध्यभागी असणार्‍या स्मशानभूमीत प्रदूषण टाळण्यासाठी, तसेच वनसंपदा वाचवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे स्थायी समिती सभापती संतोष पाटील यांनी पत्रकारांना दिली. (हिंदु धर्मशास्त्रानुसार मृतदेहाचे दहन हे पारंपरिक पद्धतीने मृतदेहाला अग्नी देऊनच होणे अपेक्षित आहे ! महापालिकेला प्रदूषणाची एवढीच काळजी आहे, तर कृष्णा नदीत मिसळणारा शेरीनाला, साखर कारखान्यांचे सांडपाणी, शहरात होणारी वृक्षतोड यांवर महापालिकेने काय केले, ते अगोदर स्पष्ट करावे ! - संपादक)

फेसबूकवरील अपकीर्तीमुळे अल्पवयीन मुलीची आत्महत्या

या घटनेवरुन स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता स्पष्ट होते !
      मुंबई - फेसबूकवरील खोट्या खात्यावर अपकीर्ती झाल्याने १४ वर्षांच्या एका मुलीने मीरा रोड येथे आत्महत्या केली आहे. तिच्या वर्गात शिकणार्‍या एका मुलाने फेसबूकवर तिची अपकीर्ती करणारा संदेश पाहून ती निराश झाली आणि तिने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारली. या प्रकरणी पोलिसांनी मुलाला अटक केली असून त्याला बालसुधारगृहात पाठवले आहे.
हा मुलगा अनेक दिवसांपासून तिचा पाठलाग करायचा. मुलीच्या पालकांनी याची तक्रार पोलिसांकडे केली होती. पोलिसांनी मुलाला समज देऊन सोडले होते; मात्र पोलिसांकडे तक्रार केल्याचा राग मनात धरून त्याने तिच्या नावाचे खोटे फेसबूक खाते उघडून त्यावर संदेश टाकले.

राष्ट्रीय हिताच्या दृष्टीकोनातून उच्च शैक्षणिक संस्थांमधील आरक्षण रहित होणे आवश्यक ! - सर्वोच्च न्यायालय

सर्वच गोष्टी जर न्यायालयाला सांगाव्या लागत असतील, तर शासन स्वतः करते काय ?
नवी देहली - राष्ट्रीय हिताच्या दृष्टीकोनातून उच्च शैक्षणिक संस्थांमधील आरक्षण रहित होणे आवश्यक आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले. या संदर्भात परिणामकारक पावले उचलण्याचे आवाहन केंद्रशासनाला केले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे होऊनही अद्याप काही अधिकारांमध्ये पालट करण्यात आलेले नाहीत, अशी खंतही न्यायालयाने व्यक्त केली.

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवणारी पुरोगामी विचारवंतांची वक्तव्ये !

पुरोगामी विचारवंतांच्या हत्या झाल्यावरून सनातन संस्था आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्यावर दोषारोप होत आहेत. याविषयी कोणताही पुरावा नाही, तरीही 'धर्मभावना दुखावल्यावरून चिडून हिंदुत्ववाद्यांनी या विचारवंतांच्या हत्या केल्या आहेत', असे काही पुरोगाम्यांना अजूनही वाटते. 'त्यात तथ्य आहे', असे क्षणभर गृहीत धरले, तरी त्यामागील मूळ कारणेही शोधणे आवश्यक आहे. 'कट्टर हिंदूंना विचारस्वातंत्र्य मान्य नाही, ते धर्मांध आहेत', असे एकतर्फी आरोप करणारे या घटनांचा सर्वांगांनी विचार करत नाहीत. प्रसारमाध्यमेही विचारवंतांच्या कोणत्या विचारांवरून हिंदू भडकले असतील, ते समोर आणत नाहीत. त्यासाठी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी पुरोगामी विचारवंतांची वक्तव्ये धर्मश्रद्ध हिंदूंसाठी किती दुखरी असतात, याची उदाहरणे खाली दिली आहेत. या वक्तव्यांचे समर्थन विचारस्वातंत्र्य म्हणून करता येईल का, हे हिंदूंनी ठरवावे.
ज्ञानेश्वरांनी कधी भिंत चालवली नाही, तुकारामाची गाथा आपोआप पाण्यातून वर आली नाही अथवा ते सदेह वैकुंठाला गेले नाहीत. ज्ञानेश्वरांनी खरोखरच भिंत चालविली असती अथवा रेड्याच्या तोंडून वेद म्हणून घेतले असते, तर ज्ञानेश्वंरीमध्ये तसा उल्लेख झाला असता, निदान चमत्कार करण्याचे सामर्थ्य सिद्धपुरुषांच्या अंगी असते, असे म्हटले असते ! - शाम मानव, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती  (गोमन्तक, ३०.५. १९९०)                   (क्रमश:)

भारताशी जोडले गेल्याविना जगाशी जोडले जाणे अशक्य ! - मार्क झुकेरबर्ग

     नवी देहली - जगातील प्रत्येक व्यक्तीशी जोडले जाणे, हे आमचे उद्दिष्ट आहे; मात्र भारताशी जोडले गेल्याविना जगाशी जोडले जाणे अशक्य आहे. भारत ही अतिशय मोठी आणि महत्त्वपूर्ण बाजारपेठ असून जगात वेगाने विस्तार करायचा असेल, तर भारतात जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचणेही महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन फेसबूकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी केले. येथील आयआयटीच्या विद्यार्थ्यांशी ते बोलत होते. 
     ते पुढे म्हणाले, "भारतात कोट्यवधी लोक इंटरनेट आणि फेसबूक वापरतात; मात्र अनेक लोक अजूनही नेटवर्क, किंमत आणि जागरूकता या तीन गोष्टींमुळे इंटरनेट सुविधेपासून वंचित आहेत. हे तीन अडथळे मोडून काढण्यासाठी आम्ही काम करत आहोत. इंटरनेटप्रती लोकांची जाणीव वाढवण्यासाठी न्यूनतम डेटा वापरणारी 'अ‍ॅप्लिकेशन्स' आणण्यावर आम्ही भर देत आहोत."

श्रीक्षेत्र सज्जनगड येथे 'श्री समर्थ मल्ल सम्राट कुस्ती मैदान २०१५' चे आयोजन

     सातारा, २९ ऑक्टोबर (वार्ता.) - सातारा तालीम संघ, सातारा यांच्या मान्यतेने, श्री रामदासस्वामी संस्थान, सज्जनगड आणि श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीक्षेत्र सज्जनगड येथे 'श्री समर्थ मल्ल सम्राट कुस्ती मैदान २०१५' चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती समर्थभक्त शहाजीबुवा रामदासी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. राजवाडा येथील पत्रकार भवन येथे ही पत्रकार परिषद पार पडली. या वेळी सातारा तालीस संघाचे आणि कार्यक्रमाचे संकल्पक आणि संयोजक पैलवान सुधीर पुंडेकर, श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख श्री. सतीशबापू ओतारी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. राहुल कोल्हापुरे आदी मान्यवर उपस्थित होते. 

पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील ५० ठिकाणे महिलांसाठी संवेदनशील !

रामराज्यात कोणत्याही वेळी निर्जनस्थळी महिला
एकटी फिरू शकत असे. आताचे राज्यकर्ते हे लक्षात घेतील का ?
      पुणे, २९ ऑक्टोबर - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात महिला आणि मुली यांच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या ५० ठिकाणांची सूची सिद्ध करण्यात आली आहे. त्या ठिकाणी उपाययोजना चालू केली असल्याची माहिती महिला साहाय्य कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी दिली. (विद्या आणि संस्कृती यांचे माहेरघर म्हणवणार्‍या पुण्यासाठी महिलांच्या सुरक्षेसाठी हे करावे लागणे, लज्जास्पद नव्हे का ? - संपादक)
     पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली महिला सुरक्षा समितीने सारसबाग, लक्ष्मी रस्ता, कर्वे रस्ता, आपटे रस्ता अशा विविध ५० ठिकाणांची सूची केली आहे.

नागपूर येथे गुंडांकडून दुकानदारावर तलवारीने आक्रमण

      नागपूर - येथील तेलीपुरा इलेक्ट्रॉनिक्स बाजारात पेन ड्राइव्ह नादुरुस्त निघाल्याने ६ जणांनी थेट दुकानदारावर तलवारीने आक्रमण केले. ही संपूर्ण घटना क्लोज्ड सर्किट कॅमेर्‍यात बंदिस्त झाली आहे. या वेळी गुंडांनी दुकानातील अन्य वस्तूंचीही तोडफोड केली. या प्रकरणी अजून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. (राज्यातील वाढते अराजक रोखण्यासाठी शासन कोणते प्रयत्न करणार आहे ? - संपादक)

कसुरींना दिलेली सुरक्षा म्हणजे त्यांची मते मान्य असणे नव्हे ! - मुख्यमंत्री

     मुंबई - कसुरींना दिलेली सुरक्षा म्हणजे त्यांची मते मान्य असणे नव्हे. राजधर्माचे पालन करण्यासाठी आम्ही सुरक्षा दिली. अजूनही गझलसम्राट गुलाम अली यांनी मुंबईत कार्यक्रम करण्याची इच्छा व्यक्त केली, तर त्यांना कडेकोट सुरक्षा पुरवण्यात येईल, याची हमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते. पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम पोलिसांनी सुरळीत पार पाडून दाखवला, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

निर्धारणा आदेश पारित केल्याशिवाय स्थानिक संस्था कराची वसुली करता येणार नाही ! - उच्च न्यायालय

      सांगली, २९ ऑक्टोबर (वार्ता.) - महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यातील नियम ३३ नुसार निर्धारणा आदेश पारित केल्याशिवाय व्यापार्‍यांकडून स्थानिक संस्था कर वसूल करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने मे. हरिओम डेपो या खटल्यात दिला आहे. हा निकाल उल्हासनगर महापालिकेच्या विरोधात दिला आहे. संबंधित व्यापार्‍याने विवरणपत्रे दाखल केल्यानंतर परताव्याकरिता आवेदन सादर केल्यावर आयुक्तांनी परतावा न देता व्यापार्‍याकडेच वसुलीची नोटीस काढली. यावर उच्च न्यायालयाने व्यापार्‍यांच्या बाजूने निकाल देत राज्यातील व्यापार्‍यांना दिलासा दिला आहे, अशी माहिती सांगली येथील कर सल्लागार श्री. किशोर लुल्ला यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवली आहे.

नागपूर आतंकवादविरोधी पथकाकडून आयएस्आयएस्शी संबंधित तरुणाची चौकशी

भारताभोवतीचा आयएस्आयएस्चा वाढता विळखा वेळीच
दूर करण्यासाठी शासन तत्परतेने कठोर पावले उचलेल, ही अपेक्षा !
      नागपूर - आयएस्आयएस् या आतंकवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून येथील आतंकवादविरोधी पथक मध्यप्रदेशात रायपूर येथील तरुणाची कसून चौकशी करत असल्याचे कळते. नागपुरातील काही युवकही त्या संघटनेच्या संपर्कात होते. त्यामुळे पोलीस अन्वेषण करत आहेत.
       सप्टेंबर २०१५ मध्ये यवतमाळमधील पुसद येथे काही तरुणांनी तीन पोलिसांवर चाकूने आक्रमण केले होते. अन्वेषण करतांना रायपूर येथील एका तरुणाने सामाजिक संकेतस्थळावर चिथावणीखोर पोस्ट टाकल्याचे आतंकवादविरोधी पथकाला आढळले. त्याला कह्यात घेतल्यावर त्याचे आयएस्आयएस्शी संबंध असल्याचे समजले.

नागपुरात प्लास्टीक थाळ्या, ग्लास आणि पिशव्या यांवर बंदी

       नागपूर - येथे प्लास्टीक पिशव्या, थाळ्या, ग्लास आणि कप यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली असून, ५० मायक्रॉन अथवा त्याहून अधिक जाडीच्या प्लास्टीक पिशवीसाठी ग्राहकांना १० रुपये मोजावे लागतील. याविषयीची अधिसूचना महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी जारी केली आहे. महिनाभरानंतर या कायद्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. (अन्य महापालिका नागपूर महापालिकेप्रमाणे असा निर्णय घेणार का ? - संपादक)
     या अधिसूचनेनुसार प्रत्येक व्यावसायिक आणि विक्रेते यांना कोणतेही साहित्य, वस्तू भाजीपाला, अन्नधान्य आदी ग्राहकांना प्लास्टीकच्या पिशवीतून देता येणार नाही. ग्राहकाला ५० मायक्रॉन अथवा त्याहून अधिक जाडीच्या पिशवीचे देयक आणि पावती देणे बंधनकारक आहे.


इयत्ता ११ वी प्रवेशाची पाहणी करण्यासाठी नेमलेली भरारी पथके कागदोपत्री

पथकांकडून कारवाई केली जात नसेल, तर ती नेमण्याचा दिखावा कशाला 
करायचा ? ज्या पथकांनी कारवाई केली नाही, त्यांच्यावरच कारवाई करणे अपेक्षित आहे ! 
 पथकांवरच कारवाईची मागणी 
     पुणे, २९ ऑक्टोबर - इयत्ता ११ वीची प्रवेश प्रक्रिया झाल्यानंतर काही महाविद्यालयांमध्ये नियमबाह्य पद्धतीने प्रवेश केल्याचे उघडकीस आले होते. ते प्रवेश रहितही करण्यात आले होते. महाविद्यालयांमधील रिक्त जागा, झालेले प्रवेश याचा नेमका अंदाज विभागीय संचालक कार्यालयालाही येत नव्हता. या सर्व पार्श्‍वभूमीवर झालेल्या प्रवेशांची पडताळणी करण्याची घोषणा विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून करण्यात आली. प्रवेशाच्या पडताळणीसाठी भरारी पथकेही नेमण्यात आली. या पडताळणीनंतर एखाद्या महाविद्यालयात नियमबाह्य प्रवेश सापडल्यास कारवाई करण्यात येणार होती. प्रत्यक्षात आता पथकावरच कारवाई करण्याच्या मागणीमुळे अनेक महाविद्यालयातील प्रवेशांची पडताळणी झालीच नसल्याचे दिसत आहे. 

लोहगाव विमानतळ (पुणे) येथे ४ किलो सोने सीमाशुल्क विभागाकडून शासनाधीन

शासनाने सोने तस्करीचे समूळ उच्चाटन करावे, ही अपेक्षा ! 
     पुणे, २९ ऑक्टोबर - दुबई येथून तस्करी करून आणलेली ४ किलो २० ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्किटे सीमाशुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी येथील लोहगाव विमानतळावर २८ ऑक्टोबर या दिवशी पकडली. या प्रकरणी २ महिलांना अटक करण्यात आली आहे. सीमाशुल्क विभागाच्या वतीने सध्याच्या काळात करण्यात आलेली ही सर्वांत मोठी कारवाई आहे. 

भ्रष्टाचाराच्या प्रकरणी अटक केलेल्या साहाय्यक विक्रीकर आयुक्तांंची मालमत्ता २ कोटींहून अधिक रुपयांची

भ्रष्ट अधिकार्‍यांची सर्वत्र छी थू होईल, असे करा !
     पुणे, २९ ऑक्टोबर - एका व्यावसायिकाच्या थकीत व्यवसाय करात तडजोड करण्यासाठी १३ लक्ष रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने साहाय्यक विक्रीकर आयुक्त सोमनाथ नलावडे यांना पकडले होते. या प्रकरणी नलावडे यांचे घर आणि इतर मालमत्ता यांची पडताळणी विभागाकडून करण्यात आली. त्यांच्या घराची किंमत २ कोटी रुपये असून अधिकोषाच्या डेक्कन जिमखाना येथील लॉकरमध्ये १ किलो ५६ ग्रॅम सोन्याचे दागिने, ३ किलो चांदी मिळाल्याची माहिती अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिली. न्यायालयाने सोमनाथ नलावडे आणि त्यांचा खासगी नोकर शिवाजी गुजर या दोघांना ३० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

ठाण्यात १२७ अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई होणार

     ठाणे - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ठाणे महापालिका १२७ अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करणार आहे. यामध्ये केवळ ८ मशिदी, ५ बुद्धविहार आणि ३ चर्च यांचा समावेश आहे. अन्य सर्व धार्मिक स्थळे हिंदूंची आहेत.
     ठाण्यात ७०४ अनधिकृत धार्मिक स्थळे असल्याचे उघड झाले आहे. त्यांपैकी ५८७ धार्मिक स्थळे नियमित करण्यात येणार असून ज्यांचे नियमितीकरण शक्य नाही, ती पाडण्यात येणार आहेत. १२७ पैकी ज्या अनधिकृत धार्मिक स्थळांचे नियमितीकरण शक्य आहे, त्या संदर्भातील कागदपत्रांद्वारे दावा करणार्‍या सूचनांचीही नोंद घेतली जाणार आहे. तसेच प्रसिद्ध देवस्थाने, लोकमान्यता असलेली देवस्थाने निष्कासित न करण्याच्या संदर्भातही सूचना आल्यास त्यांचा योग्य विचार केला जाणार आहे.

राज्यातील असुरक्षित मंदिरे !

निघोज (जिल्हा पुणे) येथील श्री मळगंगादेवीच्या मंदिरातील दानपेटी चोरण्याचा प्रयत्न 
     निघोज, २९ ऑक्टोबर - पारनेर तालुक्यातील निघोज येथील कुंडावर श्री मळगंगादेवीचे मंदिर आहे. त्या मंदिराच्या गाभार्‍याचा दरवाजा तोडता न आल्याने मंदिरातील दानपेटी चोरून नेण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला. ही घटना २७ ऑक्टोबर या रात्री घडली होती. यापूर्वीही जुन्या दानपेट्या दोन वेळा फोडून त्यातील रक्कम चोरट्यांनी चोरून नेली होती. (मंदिरातील चोरीच्या वारंवार होणार्‍या घटना रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच आवश्यक ! - संपादक) यानंतर आता मंदिराच्या विश्‍वस्तांनी दणकट आणि वजनाने पुष्कळ जड अशा दानपेट्या बनवल्या आहेत.

सांगोला (जिल्हा सोलापूर) येथे अंबिकादेवी मंदिराचा कळसारोहण सोहळा उत्साहात !

     सांगोला (जिल्हा सोलापूर), २९ ऑक्टोबर (वार्ता.) - येथील ग्रामदैवत श्री अंबिकादेवी मंदिराचा कळसारोहण समारंभ २७ ऑक्टोबर या दिवशी गोंधळी गल्ली येथे सायंकाळी ५.३० वाजता श्री श्री श्री १०८ रुद्रपशुपती कोळेकर महाराज यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पाडला. सकाळी ९ वाजता नवचंडी यज्ञ करण्यात आला. दुपारी १.३० वाजता कळसाची मिरवणूक काढण्यात आली होती. कळस घेऊन सुवासिनीही मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. सायंकाळी ६ वाजता प्रसादाचे वाटप करण्यात आले. आमदार साळुंखे यांच्या स्थानिक विकास निधी आणि लोकवर्गणीतून मंदिराच्या सभा मंडप आणि शिखर यांचे बांधकाम झाले आहे. या वेळी व्यासपिठावर श्री महादेव महाराज, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील, आमदार गणपतराव देशमुख यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. 

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंच्या धर्मस्वातंत्र्यावरील या आघातावर प्रसारमाध्यमे गप्प का ? 
     बंगालमधील वीरभूमी जिल्ह्यातील नलहाटी गावात नवरात्रोत्सवाला धर्मांधांचा विरोध असल्यामुळे तेथे वर्ष २०१२ पासून हिंदूंना नवरात्रोत्सव साजरा करण्यास प्रशासनाकडून अनुमती नाकारण्यात येत आहे. परिणामी आजपर्यंत तेथील हिंदू या उत्सवापासून वंचित आहेत.

पंढरपूर येथे आज श्री नामदेव पायरी येथे सामूहिक पुरुषसूक्त पठणाचे आयोजन

      पंढरपूर (जिल्हा सोलापूर), २९ ऑक्टोबर (वार्ता.) - येथील नामदेव पायरी येथे ह.भ.प. बाबूराव महाराज वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार, ३० ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी ५ वाजता सामूहिक पुरुषसूक्त पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. निधर्मी, पुरोगामी, तसेच नास्तिक यांच्याकडून हिंदु धर्म, वारकरी संप्रदाय, रूढी-परंपरा, चालीरीती यांसंदर्भात अपप्रचार करून धर्महानी केली जाते. त्याविरोधात, तसेच सनातन वैदिक धर्म वारकरी संप्रदाय यांच्या रक्षणार्थ आणि धर्मवृद्धीसाठी आयोजित सामूहिक पुरुषसूक्त पठण कार्यक्रमास सर्व धर्मप्रेमी नागरिक, हिंदुत्ववादी आणि भाविक यांनी उपस्थित राहून धर्मसेवा करावी, असे आवाहन ह.भ.प. बाबूराव महाराज वाघ यांनी केले आहे.

शिवरायांची युद्धनीती आजही प्रेरक ! - डॉ. सच्चिदानंद शेवडे

     चेंबूर - शिवरायांची युद्धनीती ही आजसुद्धा युद्धशास्त्राच्या अभ्यासकाला आणि राजकीय लोकांना प्रेरणा देणारी आहे. अनुकूल आणि प्रतिकूल असलेल्या रणक्षेत्रात युद्ध कसे करावे, याचा धडा शिवरायांनी घालून दिला. रणक्षेत्राची निवडसुद्धा तेच करीत असत आणि ती योग्य ठरत असे. अफझलखानाला जावळीच्या जंगलात त्यांनी उतरायला लावले आणि मग त्याचा नाश केला. त्यांनी स्वतःचे असे त्या काळाच्या पुढे असलेले युद्धतंत्र निर्माण केले. एकच युक्ती अथवा तंत्र सर्व लढायांत वापरले नाही, कारण ते तंत्र लक्षात घेऊन शत्रू हालचाल करू शकतो. प्रत्येक युद्धागणिक वेगळे तंत्र त्यांनी निर्माण केले, हेच विशेष आहे, असे प्रतिपादन प्रख्यात लेखक आणि व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केले. चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या हीरक महोत्सवानिमित्त आयोजित महाराष्ट्र धर्म व्याख्यानमालेत ते २८ ऑक्टोबर या दिवशी बोलत होते.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! 
 Bangal ke Nalhati gaome Musalmano ke virodh
 ke karan 4 varshonse nahi manai ja rahi Durgapuja. 
 - kya yaha Hinduoke Dharmaswatantrya par aghat nahi ? 

जागो ! 
 बंगाल के नलहाटी गाव में मुसलमानों के विरोध
 के कारण ४ वर्ष से नहीं मनाई जा रही दुर्गा पूजा !
- क्या यह हिंदूओके धर्मस्वातंत्र्यपर आघात नही?

सनातनचे प्रसारकार्य वाढवण्याचे ईश्‍वराचे नियोजन आणि सनातनद्वेष्ट्यांना चपराक !

     आज सनातनचे साधक सनातनचे प्रसारकार्य वाढवण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत असतांना त्यांचे कार्य सुलभ करण्यासाठी ईश्‍वरानेच नियोजन केले आहे. ईश्‍वर आता सनातनद्वेष्टे, देशद्रोही आणि धर्मद्रोही यांच्या माध्यमातूनच सनातनच्या प्रसाराचे कार्य करत आहे. 
१. चर्चासत्रांमध्ये साधकांना नको ते प्रश्‍न विचारून संस्थेची अपकीर्ती 
करण्याचा प्रयत्न करणारी प्रसारमाध्यमे !
     सर्व प्रसारमाध्यमांनी सनातनचा अवमान व्हावा, यासाठी जणू मोहीमच चालू केली आहे, असे दिसून येते. त्यात सहभागी होण्यासाठी त्या सनातनच्या साधकांना निमंत्रित करतात. त्या वेळी शेंडा-बुडखा नसलेले (नको नको ते) प्रश्‍न विचारून साधकांचा अवमान करून संस्थेची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न करतात.

धर्मानुसार संवेदना जाणवणार्‍या बुद्धीवाद्यांसाठी बिरबलाची खिचडी !

श्री. भाऊ तोरसेकर
     गेले दोन आठवडे देहली नजिकच्या नोएडात झालेल्या अखलाख महंमदच्या हत्याकांडाने अवघ्या बुद्धीवादी जगताला हैराण करून सोडले आहे. तमाम बुद्धीवादी रडकुंडीला आले आहेत. एका मुसलमानाला जमावाने जिवंत जाळले मारले म्हणताच, अवघ्या बुद्धीवादाचा पुरोगामी धर्म बुडायची वेळ आलेली आहे. अर्थात प्रत्येक साहित्यिक शहाण्याचा दावा असा आहे की, ते कुणा मुसलमानासाठी मातम करत नसून माणुसकीसाठी आक्रोश करत आहेत; म्हणजे जणू अखलाखच्या जागी एखाद्या अभिषेकवर अशी पाळी आली असती, तरी त्यांनी इतकाच आक्रोश मांडला असता, असेच कुणाला वाटावे.

साधना म्हणून पौरोहित्य करणारे आणि धर्मशास्त्राचे काटेकोरपणे पालन करणारे वेदमूर्ती पंकज जोशी !

वेदमूर्ती पंकज जोशी
     दादर येथील वेदमूर्ती पंकज जोशी यांचे २८ ऑक्टोबर २०१५ या दिवशी अकस्मात निधन झाले. ते वेळोवेळी धर्माशास्त्राधारित लिखाण सनातन प्रभात नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध करण्यासाठी पाठवत असत. सनातन प्रभातची त्यांच्याशी तशी जवळीक निर्माण झाली होती. शास्त्रविरोधी कृतींचे परखडपणे खंडण करणे, हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य होते. धर्मशास्त्र सांगणारे अनेक असतात; मात्र त्याबरोबरच धर्मविरोधकांचे सडेतोड खंडण करण्याचे कौशल्य असणार्‍यांमध्ये वेदमूर्ती पंकज जोशी हे होते. ते धर्माचरणी होते. केवळ उदरनिर्वाहासाठी पौरोहित्य न करता, त्यांनी त्याकडे साधनेच्याच अंगाने पाहिले. त्यामुळेच विद्वान असूनही त्यांच्या लिखाणात कधी अहं डोकावत नसे. त्यांनी रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमालाही भेट दिली होती. त्यांनी सनातनला केलेल्या सहकार्याप्रती सनातन परिवार त्यांचा नेहमीच ऋणी राहील. सनातनचे प्रवक्ता श्री. संदीप शिंदे आणि सनातनच्या साधक-पुरोहित पाठशाळेतील विद्यार्थी श्री. सिद्धेश करंदीकर यांनी त्यांच्याविषयी लिहिलेल्या गुणवैशिष्ट्यांतून वेदमूर्ती पंकज जोशी यांच्याशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांना उजाळा देण्याचा प्रयत्न करत आहोत.

बेशिस्तपणाची सवय हानीकारक !

एखादी कृती वारंवार केल्यानंतर त्याची सवय होते आणि नंतर तीच सवय मनुष्याचा स्वभाव आणि वृत्ती बनते. हे तत्त्व केवळ एकट्या व्यक्तीला नाही, तर समूहालाही लागू पडते आणि त्यावरूनच त्या त्या समूहांची गुणवैशिष्ट्ये तयार होतात. उदाहरणार्थ अमेरिकेचे नागरिक स्वच्छतेसाठी, तर जपानचे नागरिक कष्टाळूपणा आणि वक्तशीरपणा यांसाठी प्रसिद्ध आहेत. दुर्दैवाने भारतियांना बेशिस्तपणाचे विशेषण जोडले गेले आहे आणि सर्वसामान्यांपासून ते उच्चपदस्थापर्यंत ते अगदी ठासून मुरले आहे. अर्थात याला अपवाद आहेतच; मात्र या अपवादात्मक आणि शिस्तप्रिय व्यक्तींचे प्रमाण तुलनेत अत्यल्प आहे.

राजकारणामध्ये कौटिल्याचाच आदर्श घ्यायला हवा !

     पेट्रोलच्या माध्यमातून मिळवलेला प्रचंड पैसा अरब राष्ट्रे आमच्या प्रत्येक प्रमुख शहरात असलेल्या मदरशांमध्ये गुंतवत आहेत आणि त्यांतून अनेक मुसलमान तरुण अतिरेकी बनत आहेत. या समस्येच्या विरोधात काही कृती करावी, असे काँग्रेस शासनाला वाटत नाही. गांधींचा आदर्श समोर ठेवणे आम्हाला स्फूर्तीदायक नाही. आम्ही दुर्बल झालो, तर नक्कीच आम्हाला आक्रमणाला, अपमानाला आणि छळाला सामोरे जावे लागेल. आमच्या देशाची लोकसंख्या १०० कोटींहून अधिक आहे; पण एवढे मनुष्यबळ असूनही आपण त्याचा योग्य वापर करत नाहीत, हा खेदाचा विषय आहे. राजकारणामध्ये आम्हाला कौटिल्याचाच आदर्श घ्यायला हवा. आपल्याच लोकांवर ओरडून आणि स्वतःच्या खर्‍या शत्रूला न ओळखल्यामुळे आम्ही स्वतःसाठी एक दुबळे अन् कमकुवत राष्ट्र बनवत आहोत. दुसर्‍यावर चाल करून जाण्याचे तत्त्वज्ञान आपण स्वकियांसाठी नव्हे, तर परकियांसाठी वापरणे आवश्यक आहे. योग्य तत्त्वज्ञान योग्य जागी वापरले, तरच देशाचे कल्याण होईल, हे भारतीय जनता आणि राज्यकर्ते यांनी लक्षात घ्यावे ! 
- श्री. गो.रा. सारंग, संचालक, अध्यात्म संशोधन मंदिर

हिंदु जनजागृती समितीच्या हिंदुजागृती डॉट ऑर्ग (Hindujagruti.org) या संकेतस्थळाच्या प्रसारकार्याचा सप्टेंबर २०१५ मधील आढावा

१. विविध माध्यमांतून संकेतस्थळाला भेट देणार्‍यांची संख्या
२. संकेतस्थळावरील राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांविषयीच्या मोहिमा
२ अ. लघुचित्रपटातून श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या केलेल्या विडंबनाच्या निषेधार्थ मोहीम : आशीमा थिएटर ग्रुप निर्मित अ फ्रस्ट्रेटेड सॉफ्टवेअर इंजिनियर या लघुचित्रपटात श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचे विडंबन केले आहे. आधुनिक युगातील राजकारण आणि राजकारणातील स्पर्धा यांची तुलना महाभारत अन् भगवद्गीता यांमध्ये दिलेल्या शिकवणीशी करतांना तिचा विपर्यास करण्यात आला आहे. या संदर्भात संकेतस्थळावर जनजागृती आणि निषेध मोहीम राबवण्यात आली.

नेहरू पितापुत्रीचे मुसलमानप्रेम !

     सरदार पटेलांनी मोठ्या कौशल्याने सर्व संस्थानांचे भारतात विलीनीकरण केले. संस्थानिकांना त्या त्या प्रांतातील सरकारने तनखे द्यायचे, असे ठरले असता शेख अब्दुल्लांनी राजे हरिसिंग यांना तनखा कधीही दिला नाही. त्यांना पाठीशी घालणारे नेहरूच. आरडाओरडा टाळण्यासाठी केंद्र सरकारच्या कोषातून हरिसिंग यांना तनखा देण्याचे ठरले. म्हणजे जे काश्मीरचे राज्य एका हिंदु राजाचे, त्याची मुसलमान प्रेमापायी नेहरूंनी अशी वाट लावली आणि भारत शासनाला कायमची डोकेदुखी उत्पन्न करून ठेवली. त्यांच्याच लाडक्या कन्येने अर्थात् इंदिरा गांधी यांनी वर्ष १९७१ मध्ये बांगलादेश निर्माण केला खरा; परंतु ९० सहस्र पाकचे सैन्य बंदीवान म्हणून कह्यात आले असता पाकसमवेतचे कोणतेही प्रश्‍न न सोडवता, तसेच आपले बंदीवानही परत न मिळवता ९० सहस्र पाक सैन्य सोडून दिले. हे पितापुत्रीचे वागणे मुसलमानप्रेमाचे दर्शक नाही का ? 
(संदर्भ : प्रज्वलंत)
समाजाची क्रियाशक्ती ही नेहमी राजसत्तेपेक्षा प्रभावी असते ! - श्री अरविंद 

अखंड सेवारत असणार्‍या चिंचवड, पुणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. पद्मा लोणे (वय ५४ वर्षे) !

सौ. पद्मा लोणे
     ६० टक्के आणि त्यापुढील पातळी साध्य झालेल्या साधकांच्या गुणवैशिष्ट्यांचे लिखाण केवळ न वाचता त्यात दिलेली गुणवैशिष्ट्ये स्वतःत आहेत का ?, याचा अभ्यास करावा आणि स्वतःमध्ये नसतील, ती गुणवैशिष्ट्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. असे केले, तरच गुणवैशिष्ट्ये छापण्याचे सार्थक होईल. - (प.पू.) डॉ. आठवले (१५.९.२०१४)
१. कु. वैभवी भोवर
१ अ. अखंड सेवारत असणे : लोणेकाकूंचे वय ५४ वर्षे आहे, तरीही त्या पुष्कळ तळमळीने स्वयंपाकघरात सेवा करतात.

व्यष्टी-समष्टी भावामुळे प्रत्येक कृतीचा अध्यात्माच्या अंगाने विचार करून ती सेवा देवाला आवडेल, अशा प्रकारे करणारे देहली सेवाकेंद्रातील श्री. प्रणव मणेरीकर !

  
श्री. प्रणव मणेरीकर
  आश्‍विन कृष्ण पक्ष चतुर्थी (३० ऑक्टोबर २०१५) या दिवशी श्री. प्रणव मणेरीकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त देहली सेवाकेंद्रातील साधकांना त्यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
श्री. प्रणव मणेरीकर यांना वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !
१. सौ. केतकी येळेगावकर
१ अ. सहजता : श्री. प्रणव मणेरीकरदादा यांच्या वागण्या-बोलण्यात कृत्रिमता नसते. ते कुठलीही सेवा ओढून-ताणून किंवा गडबडीत पूर्ण करत नाहीत, संयम बाळगून सहजतेने पूर्ण करतात. ते साधकांचे कौतुकही अगदी सहजतेने करतात.

हे श्रीकृष्ण आओ ।

 
कु. नंदिता वर्मा
   ५.९.२०१५ या गोकुळाष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला दोष आणि अहं घालवण्यासाठी प्रार्थना केल्यावर श्रीकृष्णाने मला पुढील कवितारूपी प्रार्थना सुचवली.

प्रेमळ, सेवेची आवड असणारी आणि आईला घरकामात साहाय्य करणारी उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची कुडाळ, सिंधुदुर्ग येथील कु. वैदेही खाडये (वय ९ वर्षे) !


कु. वैदेही खाडये
    आश्‍विन कृष्ण पक्ष चतुर्थी (३०.१०.२०१५) या दिवशी कुडाळ, सिंधुदुर्ग येथील कु. वैदेही खाडये हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
कु. वैदेही खाडये हिला वाढदिवसानिमित्त
 सनातन परिवाराकडून आशीर्वाद !
१. जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१ अ. प्रेमळपणा १. कधी मी दमलेली असेन, तर वैदेही स्वतःहून हात-पाय दाबून देते. मी विश्रांती घ्यावी, माझी प्रकृती सुधारावी, असे तिला वाटते.

श्रीकृष्णाच्या कृपेने संतरत्नांचा सहवास मिळाल्याने मनोमन कृतज्ञता वाटणे

     १६.६.२०१५ या दिवशी सकाळी मला पू. संदीपदादा भेटले. नंतर मी अल्पाहार करण्यासाठी बसलो. काही क्षणांतच तेथे पू. भावेकाका आले. त्यांनी पटलावर पाण्याची बाटली ठेवली. माझ्याशी बोलले आणि गेले. ते गेल्यानंतर लगेच पू. स्वातीताई तेथे अल्पाहार करण्यासाठी आल्या आणि त्या माझ्यासमोरील आसंदीवर बसल्या. तेवढ्यातच पू. अनुताईही त्याच पटलावर माझ्या बाजूला अल्पाहारासाठी येऊन बसल्या. अशा प्रकारे मला देवाच्या कृपेने संतांच्या सहवासात अल्पाहार करण्याची संधी मिळाली.

साधकांनो, अंतरातील भाव-भक्तीचा दीप कृतज्ञतेच्या ज्योतीने प्रज्वलित करून खरी दीपावली साजरी करा !

पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ
१. कृतज्ञताभावाविषयी प.पू. डॉक्टरांनी सांगितलेली मार्गदर्शक सूत्रे !
     काही दिवसांपूर्वी दैनिक सनातन प्रभातमध्ये प.पू. डॉक्टरांची एक चौकट प्रसिद्ध झाली होती. त्यामध्ये त्यांनी साधकांना पुढील संदेश दिला होता, साधनेत प्रगती होण्यासाठी साधकांनी कृतज्ञताभावात रहावे. कुटुंबीय घेत असलेली आपली काळजी, तसेच करत असलेले प्रेम, आपल्याला इतरांकडून मिळणारे साहाय्य, भगवंताने दिलेले जीवन आदी दैनंदिन जीवनातील उदाहरणे पावलोपावली आठवल्यास कृतज्ञताभाव निर्माण होण्यास ५ - ६ आठवड्यांतच आरंभ होतो. पुढे तो वाढत जातो. त्यामुळे साधनेत प्रगती होऊ लागते.

रामनाथी आश्रमात झालेल्या राष्ट्रीय शिबिरात संतांकडून शिकायला मिळालेली सूत्रे

सौ. पूर्णिमा प्रभु
भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने शिबिरामधून
 पुष्कळ बारकावे शिकायला मिळाले, उदा.
१. व्यष्टी आणि समष्टी साधनेचे नियोजन, मासिक नियोजन, दूरचित्रवाणीवर मुलाखत घेण्यासाठी करावा लागणारा सखोल अभ्यास.
२. पराभूत मानसिकता असू नये.
३. सेवेचे विकेंद्रीकरण.
४. समाजात कशा प्रकारे धर्माभिमानी सिद्ध होत आहेत आणि त्यांना निवडून त्यांना साधनेची दिशा कशी द्यावी ? कोणाला आश्रमात शिबिरासाठी पाठवावे ?
५. धर्मसभा आणि हिंदू अधिवेशन यांची फलनिष्पत्ती कशी वाढवावी ?

पू. स्वाती खाडये यांच्या नावाचा साधिकेला समजलेला अर्थ

      ५.१०.२०१५ या दिवशी पू. स्वातीताईंची (पू. (कु.) स्वाती खाडये यांची) देवद आश्रमात भेट झाली. त्या वेळी त्यांच्या नावातील प्रत्येक अक्षराचा देवाने पुढीलप्रमाणे अर्थ सुचवला.
पू. - पूजनीय ताई
स्वा - स्वचा पूर्णपणे त्याग करणारी, वात्सल्यभाव असणारी
ती - तिन्ही-त्रिकाळ केवळ समष्टीचा ध्यास असणारी
ता - ताण न घेता निरंतर सेवा करणारी

पू. स्वातीताई खाडये सद्गुरुपदी विराजमान झाल्याचे समजल्यावर भाव जागृत होऊन साधिकेने त्यांचा सूक्ष्मातून केलेला भावपूर्ण सन्मान !

     पू. स्वातीताईंची (पू. (कु.) स्वाती खाडये यांची) आध्यात्मिक पातळी ८० टक्के होऊन त्या सद्गुरुपदी विराजमान झाल्याचे समजल्यावर मला पुष्कळ आनंद झाला आणि माझी भावजागृती झाली. त्यांच्यासाठी काय करू अन् काय नको ?, असे मला वाटू लागले. तेव्हा देवाने माझ्याकडून सूक्ष्मातून पुढील कृतींसह त्यांचा सन्मान करून घेतला.

सिंहस्थपर्वाच्या सेवेचा कर्तेपणा एकमेकांना देणारे पू.(कु.) स्वाती खाडये, पू. नंदकुमार जाधवकाका आणि पू. डॉ. चारुदत्त पिंगळेकाका !

   
श्री. श्रेयस पिसोळकर
   पू. स्वाती खाडये यांची आध्यात्मिक पातळी ८० टक्के होऊन त्या सद्गुरुपदी विराजमान झाल्या. त्या सोहळ्याच्या वेळी पू. स्वातीताई, पू. जाधवकाका आणि पू. पिंगळेकाका एकमेकांनाच कर्तेपणा देत होते. पू. ताई म्हणाल्या, पू. जाधवकाका आणि पू. पिंगळेकाका आले; म्हणून सिंहस्थ पर्वाचे नियोजन झाले. पू. जाधवकाका म्हणत होते, पू. ताईंकडून पुढाकार घेणे शिकता आले. पू. पिंगळेकाका म्हणत होते, पू. ताईंकडून साधकांमध्ये कुटुंबभाव कसा निर्माण करायचा ?, ते शिकलो.
      हे ऐकतांना असे वाटत होते, आपण केर काढण्याची सेवा जरी केली, तरी त्याविषयीचासुद्धा कर्तेपणा पूर्ण जात नाही. येथे तर पूर्ण सिंहस्थपर्व झाले !

सनातनच्या संतांमधील सहजता !

     पू. जाधवकाका आणि पू. पिंगळेकाका यांच्याकडून एक भाग शिकायला मिळाला की, दोघेही एकमेकांकडे संत म्हणून पहायचे आणि स्वतः साधक म्हणून रहायचे. त्यामुळे मर्दन करतांना नेहमी आधी प्राधान्य एकमेकांनाच द्यायचे. या प्रसंगातून एकमेकांविषयीचा आदरभाव, स्वतःकडे न्यूनपणा घेणे, स्वतःकडे साधक याच दृष्टीने पहाणे अशा अनेक गोष्टी देवाने शिकवल्या. सनातनच्या संतांचे वेगळेपण अशा प्रसंगांमधून विशेष करून जाणवायचे. - श्री. श्रेयस पिसोळकर, जळगाव (३.१०.२०१५)

नाशिक येथील सिंहस्थपर्वाच्या कालावधीत संतसत्संगातून शिकायला मिळालेली सूत्रे

पू. (कु.) स्वाती खाडये
१. पू. (कु.) स्वाती खाडये
१ अ. पू. ताईंच्या निर्मळ आणि मोकळ्या हास्यामुळे मनावरील मरगळ आणि ताण निघून जातो, हा अनुभव मी अनेक वेळा घेतला आहे; पण सिंहस्थपर्वाच्या वेेळी प्रथम भेटीतही तो घेता आला.
१ आ. पू. ताईंनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे आत्मविश्‍वास वाढण्यास साहाय्य होणे
: मी चार दिवसांसाठीच सेवेला गेलो होतो. त्यानंतर मला पुन्हा येण्याची संधी मिळाली. माझ्याकडून झालेल्या चुकांमुळे माझा आत्मविश्‍वास उणावला होता. तो पू. ताईंनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे वाढण्यास साहाय्य झाले.

साधकांना सूचना

'ॐ' हा नामजप करण्यासह प्रार्थना करणे 
     २८.१०.२०१५ या दिवशी 'साधकांनो, आपत्काळाची तीव्रता वाढलेली असल्यामुळे 'ॐ' हा नामजप दिवसभर करा !, अशी चौकट प्रसिद्ध झाली आहे. या चौकटीत दिल्याप्रमाणे 'ॐ' हा नामजप करण्याबरोबरच विश्‍वातील वाईट शक्ती नष्ट होऊ दे, अशी सदाशिव, आदीशक्ती आणि त्यांची कन्या यांना प्रार्थना करावी.'

निवृत्ती वेतनधारकांनी नोव्हेंबर मासात अधिकोषाला 'लाईफ सर्टिफिकेट' द्यावे !

     ' शासकीय अथवा अन्य कर्मचार्‍यांना निवृत्तीनंतर प्रत्येक मासाला 'निवृत्ती वेतन' (पेन्शन) देण्यात येते, त्यांनी ज्या अधिकोषातून आपण निवृत्ती वेतन घेतो, तेथे प्रतिवर्षी नोव्हेंबर मासात 'लाईफ सर्टिफिकेट' द्यावे. असे केल्यासच पुढील वर्षभर निवृत्ती वेतन चालू राहू शकते. हे सर्टिफिकेट देण्यासाठी अधिकोषाच्या ज्या शाखेतून खाते उघडले आहे, तेथे प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता नाही. सध्याच्या वास्तव्याच्या ठिकाणी त्या अधिकोषाची शाखा असल्यास तेथे आपल्या आधारकार्डाची मूळ आणि झेरॉक्स प्रत, तसेच पासबूक दाखवून 'लाईफ सर्टिफिकेट' देता येते. (उदा. एखाद्याने निवृत्त वेतनासाठी ठाणे येथील अधिकोषातून खाते उघडले असेल आणि सध्या तो देहलीला वास्तव्याला असेल, तर देहली येथील त्या अधिकोषाच्या शाखेतूनही तो सर्टिफिकेट देऊ शकतो.)' 
- (पू.) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.१०.२०१५)

बोधचित्र


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
विज्ञानाचा खरा लाभ करून न घेतल्याने मानव झपाट्याने पराकोटीच्या अधोगतीला जाणे !
'विज्ञानाने विविध कामे करण्यात वापरावा लागणारा मानवाचा वेळ वाचवला आहे. त्या वेळेचे काय करायचे, हे विज्ञानाने न शिकवल्याने मानव सुखलोलुप झाला. तो वेळ मानवाने साधनेसाठी वापरला असता, तर त्याला खरा लाभ झाला असता. तसे न केल्यामुळे मानव झपाट्याने पराकोटीच्या अधोगतीला गेला आहे !' - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२२.११.२०१३)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
 सनातनचे श्रद्धास्थान
दुसरा आणि स्वतः 
दुसर्‍याला उमजू न देणे, स्वतःचे स्वतःला
 न उमजणे, स्वतःचे दुसर्‍याला उमजू न देणे, ही अवस्था 
आल्यास तो जीव ईश्‍वराच्या अगदी निकट आला आहे, असे समजावे. 
भावार्थ : 'दुसर्‍याला उमजू न देणे' म्हणजे आपल्यातील शक्ती दुसर्‍याला समजणार नाही, असे वागणे. 'स्वतःचे स्वतःला न उमजणे' म्हणजे अद्वैतात गेल्यावर स्वतःचे स्वतःला उमजण्यासारखे काही उरत नाही; कारण तो स्वतःला विसरूनच गेलेला असतो. 'स्वतःचे दुसर्‍याला उमजू न देणे' म्हणजे 'आपण स्वतः ब्रह्मस्थितीत आहोत', हे प्रकृतीतील दुसर्‍याला उमजून येत नाही. ही ईश्‍वराची, ब्रह्माची लक्षणे असल्याने तशा स्थितीत जो असेल, तो साहजिकच ईश्‍वराच्या निकट आलेला असतो. 
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन 'संत भक्तराज महाराज यांची शिकवण.')

प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सदा प्रयत्नरत रहाण्याचे महत्त्व !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     निष्क्रीय रहाण्याची सवय लागली की, कोणतीही गोष्ट करण्याचा कंटाळा येतो आणि अंगीभूत गुणांवरही गंज चढतो; म्हणून नेहमी कार्यरत रहावे ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

फटाक्यांचा कटू प्रश्‍न !

संपादकीय
    फटाके फोडण्यास संपूर्ण बंदी घालणे व्यवहार्य नाही, असा निर्णय देहली सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने दिलेला निर्णय असल्याने त्याविषयी आम्ही भाष्य करू इच्छित नाही; परंतु सामाजिक, आर्थिक, राष्ट्रीय आणि आध्यात्मिक दृष्टीने योग्य अन् अयोग्य काय ते सांगून जनप्रबोधन करण्याचे व्रत आम्ही अंगीकारले आहे. त्यामुळे या निर्णयाच्या निमित्ताने विविध सूत्रांचा उहापोह करणे, आम्ही आमचे कर्तव्य समजतो.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn