Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

देहलीत फटाक्यांवर बंदी आणण्यास केंद्रशासनाचा नकार !

देशाच्या भावी पिढीच्या आरोग्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने फटाक्यांवर बंदी घालण्यास दिलेल्या नकाराविषयी पुनर्विचार करावा !
नवी देहली - देहलीत फटाक्यांवर बंदी आणण्यास केंद्रशासनाने नकार दिला आहे. प्रदूषणाचे आणि लहान मुलांच्या अवयवांच्या विकासाचे कारण देऊन दसरा अन् दिवाळी यांसारख्या सणांच्या कालावधीत राजधानी देहलीत फटाक्यांवर संपूर्ण बंदी आणण्यासाठी देहलीस्थित ६ मासांच्या २, तर १४ मासांचा १, अशा एकूण ३ बालकांच्या वतीने त्यांच्या पालकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. 
१. याविषयी केंद्रशासनाच्या पर्यावरण मंत्रालयाने विविध परिसरांत ध्वनीप्रदूषणाच्या मर्यादेवर अंकुश ठेवणारा ध्वनीप्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) कायदा २००० न्यायालयात सादर केला आहे. 

तमिळनाडू शासन चिनी फटाक्यांची आयात रोखणार !

चेन्नई - चिनी फटाक्यांची आयात रोखण्यास  सज्ज असल्याची माहिती येथील प्रशासनाने उच्च न्यायालयात दिली. राज्याच्या महसूल गुप्तचर संचालनालयाने चिनी फटाक्यांची आयात अवैध ठरवणारे परिपत्रक काढले असून प्रशासनाकडून चिनी फटाक्यांच्या आयातीवर कडक लक्ष ठेवले जात आहे. सीमा शुल्क आणि इतर खात्यांच्या मुख्य आयुक्तांना हे परिपत्रक पाठवून चीनमधून आयात होणार्याि फटाक्यांना प्रतिबंध करण्यास सांगितले आहे. 
१. न्यायमूर्ती एन्. किरूबाकरन् यांनी आयात फटाके पकडण्यासाठी भरारी पथके नेमण्याचा आदेश दिला होता. त्यावर अतिरिक्त महाधिवक्ता पी.एच्. अरविंद पांडियन् यांनी शासनाची बाजू मांडली.

पवित्र गुरुग्रंथसाहिबच्या अवमानाच्या निषेधार्थ यंदा सुवर्ण मंदिरात दिवाळी नाही !

अमृतसर - काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये शिखांच्या पवित्र गुरुग्रंथसाहिब या धर्मग्रंथांचा अवमान करण्यात आला होता. या घटनेवरून संपूर्ण पंजाब अद्यापही पेटला आहे. त्यामुळे धर्मग्रंथाच्या अवमानाच्या निषेधार्थ येथील जगप्रसिद्ध सुवर्ण मंदिराने यंदा दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष अवतारसिंह मक्कर यांनी ही माहिती दिली. ही समिती पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यांतील शिखांच्या धार्मिक समस्या सोडवणारी शिखर संघटना आहे. 

पुरोगामी साहित्यिक डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येच्या प्रकरणातील संशयित आरोपीची हत्या ?

बेळगाव (कर्नाटक) - कर्नाटकातील पुरोगामी विचारवंत तथा साहित्यिक डॉ. एम्.एम्. कलबुर्गी यांच्या हत्येच्या प्रकरणातील संशयित आरोपीची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या संशयित आरोपीच्या चेहर्याशी साधर्म्य असलेल्या व्यक्तीचा मृतदेह १८ ऑक्टोबरला खानापूर येथील जंगलात आढळला आहे. हा मृतदेह रुद्र पाटील यांचा असल्याचा संशय असल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांवरून प्रसारीत झाले आहे; मात्र याविषयी पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.

भारतातील जिहादी आतंकवाद्यांची माहिती मिळवण्यासाठी भारत ऑस्ट्रेलियाचे साहाय्य घेणार !

     नवी देहली - कुख्यात गुंड छोटा राजन याला पकडण्यात ऑस्ट्रेलियाचे साहाय्य मिळाले. तोच धागा पकडून आरीफ मजीद या आय.एस्.आय.एस्.च्या भारतातील आतंकवाद्याची माहिती मिळवण्यासाठी भारत ऑस्ट्रेलियाचे साहाय्य घेणार असल्याचे वृत्त आहे.
१. ऑस्ट्रेलियाचे मुख्य शासकीय अधिवक्ता (अ‍ॅटर्नी जनरल) जॉर्ज ब्रान्डीस सध्या भारत दौर्‍यावर आहेत. 
२. आरीफ मजीद हा भारतातील आतंकवादी आय.एस्.आय.एस्.च्या सैन्यात भरती होण्यासाठी इराक आणि सिरिया येथे जाऊन भारतात परत आला. 

डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणाचा तपास संथगतीने ! - न्यायालयाचे ताशेरे

मुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणाचा तपास अत्यंत संथगतीने होत आहे. यावरून न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत आणि अप्रसन्नता व्यक्त केली आहे. याविषयी ठोस काहीच माहिती मिळाली नसल्याने दोन्ही प्रकरणांची सुनावणी चार आठवड्यांसाठी स्थगित केली आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. 'संपूर्ण पश्चिम भारतासाठी आमच्याकडे अवघे ११ अधिकारी असून कामाचा प्रचंड ताण आहे', असे कारण डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणाचे अन्वेषण करणार्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) न्यायालयाला दिले होते. त्यावर न्यायालयाने हे ताशेरे ओढले आहेत. कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी विशेष अन्वेषण विभागाने (एस्आयटीने) न्यायालयाला अहवाल सादर केला होता. दाभोलकर यांच्या हत्येतील दोन संशयितांची नावे केंद्रीय अन्वेषण विभागाने मुंबई उच्च न्यायालयाला बंद लिफाफ्यात दिली आहेत.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या वंदनीय उपस्थित सापुतारा (गुजरात) येथे अनुष्ठान

सूर्याकडे पाहून 'सिद्धसूर्यनारायण स्तोत्र' पठण करतांना
योगतज्ञ दादाजी वैशंपायन आणि साधक
नाशिक - योगतज्ञ दादाजी वैशंपायन हे आपल्या संकल्प उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्न म्हणून आपल्या 'ॐ आनंदं हिमालयं' या संप्रदायातील उच्च विद्याविभूषित ३० साधकांसोबत गुजरात राज्यातील सापुतारा येथे उंच पर्वतावरील शिखरावर गेले आणि साधकांसमवेत दोन दिवसांत साडेबावीस तास सूर्याकडे पाहून डोळे उघडझाप करत 'सिद्धसूर्यनारायण स्तोत्र' पठण केले. यासाठी कष्टावर मात करत सर्व बंधने पाळली, हे विशेष. या वेळी सनातन संस्थेचे साधक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासाठी नामजप आणि 'सिद्धसूर्यनारायण स्तोत्र' पठण करत अतिमौलिक सुरक्षाकवचावर संस्कार करत होते. याचे योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांना कौतुक वाटत होते. कोणतीही अतिशयोक्ती होऊ नये; म्हणून सर्व प्रकारची काळजी सर्वजण घेत होते. दोन दिवसांचा कार्यक्रम संपवून सर्व जण आपापल्या घरी परतले.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान आतंकवादाची केंद्रे ! - भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल

पाकपुरस्कृत जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी त्वरित कडक
उपाययोजना करावी, अशी राष्ट्रप्रेमी जनतेची केंद्रशासनाकडून अपेक्षा आहे !
     नवी देहली - जिहादी आतंकवादाने आशियातील सर्वच देशांमध्ये पाय रोवले आहेत. हे आतंकवादी दक्षिण आशियातील असल्यामुळे सर्वाधिक धोका याच देशांकडून आहे. या आतंकवादाने बांगलादेश, अफगानिस्तान, भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका यांना ग्रासले असून त्यांनी या समस्येवर एकत्र येण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे; मात्र दुर्दैवाने अफगाणिस्तान आणि पाकिस्तान हे देश आतंकवादाची केंद्रे बनत चालले आहेत, असे प्रतिपादन भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी केले आहे.

चिनी समुद्रात अमेरिकेची युद्धनौका !

युद्धाचा भडका उडण्याची शक्यता
     वॉशिंग्टन - अमेरिकेने चीनला आव्हान देण्यासाठी चीन दावा करत असलेल्या विवादित दक्षिण चिनी समुद्रक्षेत्रात क्षेपणास्त्ररोधक क्षमता असलेली यूएस्एस् लासेन ही मोठी युद्धनौका टेहळणीसाठी पाठवली आहे. चीनने याला जोरदार आक्षेप घेतला आहे. अमेरिका टेहाळणीसाठी आणखी युद्धनौका पाठवणार आहे. यामुळे अमेरिका आणि चीन या देशांमध्ये युद्धाचा भडका उडण्याची भीती निर्माण झाली आहे.

गुडगाव (देहली) येथील पोलिसाने पीडित महिलेला स्वत:शी शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले !

कुंपणच शेत खात असेल, तर जनतेने गार्‍हाणे करायचे कुणाकडे ?
     गुडगाव (देहली) - सासरच्या जाचाला कंटाळून पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात गेलेल्या एका २५ वर्षीय महिलेला पोलिसाने स्वत:शी शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. त्यानंतर या पोलिसाला त्वरित निलंबित करण्यात आलेे. येथील फारूखनगर पोलीस ठाण्यात ही घटना घडली. 
    पिडीत महिला तिच्या लहान मुलासह तक्रार देण्यासाठी आली असता तिला एका खोलीत बसवण्यात आले. काही वेळाने सुभाष कुमार नावाचा एक पोलीस तिच्या जवळ आला. त्याने त्या महिलेकडे शारीरिक संबंधाची मागणी करून तुझ्या सासरच्या मंडळींना चांगला धडा शिकवतो, असे आश्‍वासन दिले. त्या महिलेने या घटनेची तक्रार वरिष्ठांकडे केल्यावर सुभाष कुमार याला निलंबित करण्यात आले. विशेष म्हणजे महिलेने सासरच्या विरोधात केलेल्या तक्रारीची चौकशी या पोलिसाकडे देण्यात आली नव्हती.

उप्पिनांगडी (कर्नाटक) येथे मंगळवारी केश कर्तनालय बंद ठेवण्याची प्रथा न पाळणार्‍या मुसलमानाच्या विरोधात बजरंग दल आक्रमक !

     बेंगळुरू (कर्नाटक) - कर्नाटकातील उप्पिनांगडी येथे दर मंगळवारी केश कर्तनालय बंद ठेवण्याची प्रथा आहे; मात्र एका मुसलमानाने त्याच्या मालकीचे केस कर्तनालय मंगळवारी बंद न ठेवल्याने बजरंग दलाने शायीमा केश कर्तनालयावर मोर्चा काढला. या वेळी वादावादी होऊन धार्मिक दंगल होण्याची शक्यता निर्माण झाली होती; मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून स्थिती नियंत्रणात आणली. या घटनेत ३ जण घायाळ झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जागतिक अमूल्य सांस्कृतिक ठेव्याच्या सूचीत कुंभपर्वाचा समावेश होण्यासाठी प्रयत्न करणार !

युनेस्कोलो पत्र पाठवण्यासाठी केंद्रशासनाची सिद्धता !
     नवी देहली - योगानंतर प्रसिद्ध कुंभपर्वही जगाचे लक्ष वेधून घेऊ शकतो, हे लक्षात घेऊन कुंभपर्वाचा युनेस्कोच्या जागतिक अमुल्य सांस्कृतिक ठेवा सूचीत समावेश करावा, यासाठी त्र्यंबकेश्‍वर देवस्थानाच्या विश्‍वस्तांनी एक औपचारिक प्रस्ताव सांस्कृतिक मंत्रालयाला पाठवला आहे. या संदर्भात भारत शासन लवकरच युनेस्कोला शिफारस करू शकते, असे संकेत केंद्रीय सांस्कृतिकमंत्री महेश शर्मा यांनी दिले आहेत.

आता शास्त्रज्ञ शोधणार गंगा नदीचा उगम !

     नवी देहली - रुडकी येथील राष्ट्रीय जलविज्ञान संस्थेचे शास्त्रज्ञ आता गंगा नदीच्या उगमाचा शोध लावणार आहेत, अशा आशयाचे निर्देश केंद्रीय जलसंसाधन मंत्री उमा भारती यांनी नुकत्याच झालेल्या शास्त्रज्ञांच्या एका बैठकीत दिले. उमा भारती म्हणाल्या, नमामि गंगा योजनेच्या माध्यमातून हा शोध घेण्यात यावा. गंगेशिवाय इतर नद्यांची स्वच्छता, हिमालयाची सुरक्षा आणि सिंचन क्षेत्रातही शोधकार्य करणे आवश्यक आहे.

उच्चपदांवरील ओबीसी व्यक्तींच्या मुलांना आरक्षणाचा लाभ नको ! - इतर मागासवर्गीय आयोगाची महत्त्वपूर्ण शिफारस

    नवी देहली - केंद्र, तसेच राज्यातील मंत्री, खासदार, सचिव, तसेच अ श्रेणीतील शासकीय अधिकारी आदी उच्चपदांवर असलेल्या इतर मागासवर्गातील (ओबीसी) व्यक्तींच्या मुलांना शासकीय नोकर्‍या आणि शिक्षण यांमध्ये आरक्षणाचे लाभ देण्यात येऊ नयेत, अशी महत्त्वपूर्ण शिफारस राष्ट्रीय ओबीसी आयोगाने केंद्रशासनाला केली आहे. (अशी शिफारस करणार्‍या आयोगाचे अभिनंदन ! - संपादक)

काश्मीरमधील आतंकवादी पाकपुरस्कृतच ! - मुशर्रफ यांची स्पष्टोक्ती

आता पाकशी चर्चा करणार कि त्याच्यावर आक्रमण ?
लादेन आणि हाफीज सईद यांना आतंकवादी प्रशिक्षण दिल्याची स्वीकृती !
इस्लामाबाद - पाकने आतंकवादी सिद्ध केले असून ते काश्मीरमध्ये पाठवले आहेत. पाकनेच ओसामा बिन लादेन आणि हाफीज या दोघांना आतंकवादी प्रशिक्षण दिले आहे. काश्मीरसाठी लढणारा हाफीज सईद हा पाकचा हिरो आहे, अशी स्पष्टोक्ती पाकचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केली.  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे जसे भारताचे 'हिरो' आहेत, तसेच हाफीज सईद आणि ओसामा बिन लादेन आमचे 'हिरो' आहेत, अशी गरळओकही मुशर्रफ यांनी केली. मुशर्रफ पुढे म्हणाले, "पाकिस्ताननेच अल्-कायदा या आतंकवादी संघटनांसारख्या अनेक आतंकवादी संघटनांना साहाय्य केले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये आक्रमण करण्यासाठी पाककडूनच युवकांना आतंकवादी प्रशिक्षण देण्यात आले आहे. परिस्थिती पालटल्यामुळे जगभरात पाकिस्तानची अपकीर्ती होऊ लागली आहे. पाकने सिद्ध केलेले आतंकवादीच पाकमध्येच आक्रमण करू लागले आहेत. यामुळे आमचे 'हिरो'च आमच्यासाठी 'व्हिलन' ठरू लागले आहेत. पाकिस्तानच पीडित देश होऊ लागला आहे."

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवणारी पुरोगामी विचारवंतांची वक्तव्ये !

पुरोगामी विचारवंतांच्या हत्या झाल्यावरून सनातन संस्था आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्यावर दोषारोप होत आहेत. याविषयी कोणताही पुरावा नाही, तरीही 'धर्मभावना दुखावल्यावरून चिडून हिंदुत्ववाद्यांनी या विचारवंतांच्या हत्या केल्या आहेत', असे काही पुरोगाम्यांना अजूनही वाटते. 'त्यात तथ्य आहे', असे क्षणभर गृहीत धरले, तरी त्यामागील मूळ कारणेही शोधणे आवश्यक आहे. 'कट्टर हिंदूंना विचारस्वातंत्र्य मान्य नाही, ते धर्मांध आहेत', असे एकतर्फी आरोप करणारे या घटनांचा सर्वांगांनी विचार करत नाहीत. प्रसारमाध्यमेही विचारवंतांच्या कोणत्या विचारांवरून हिंदू भडकले असतील, ते समोर आणत नाहीत. त्यासाठी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी पुरोगामी विचारवंतांची वक्तव्ये धर्मश्रद्ध हिंदूंसाठी किती दुखरी असतात, याची उदाहरणे खाली दिली आहेत. या वक्तव्यांचे समर्थन विचारस्वातंत्र्य म्हणून करता येईल का, हे हिंदूंनी ठरवावे.
धर्मनिष्ठेच्या दलदलीतून मानवाची मुक्तता होणे, ही काळाची आवश्यकता आहे. दैवी चमत्कार मुळी अस्तित्वातच नाही, तसेच सिद्धीप्राप्त मनुष्यही नाही ! - शाम मानव, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती (गोमन्तक, १९.५.१९९०)(क्रमश:)

गाय खाणारे पशू होत ! - विश्‍व हिंदु परिषदेचे मुखपत्र गोसंपदा

      नवी देहली - गोमांस खाणारे पशू आहेत, असे विश्‍व हिंदु परिषदेने त्यांचे मुखपत्र असलेल्या गोसंपदा या मासिकाच्या संपादकीय लेखात म्हटले आहेत. न्यायालयाने देशात गाय, बैल आणि वासरू यांच्या हत्येवर बंदी आणण्यासाठी राष्ट्रीय कायदा करावा, असेही मत यात व्यक्त केले आहे. दुसरीकडे पांचजन्य या मासिकाच्या संपादकीयमध्ये दुसर्‍यांच्या धार्मिक भावनांचा आदर करणे भारताच्या राज्यघटनेतील मुलभूत बाबींमधील एक असल्याचे म्हटले आहे.

गोव्यात न्यायालयाची बंदी डावलून धिर्यो आयोजित केल्याविषयी अवमान याचिका दाखल

  • वारंवार तक्रारी करूनही पोलीस कारवाई करत नाहीत, याचा अर्थ पोलीस निष्क्रीय आहेत कि    अकार्यक्षम ?
  • मुक्या प्राण्यांना क्रूर वागणूक देणार्‍या धिर्योच्या आयोजकांना न्यायालयाने कठोर शिक्षा द्यावी ! 
     पणजी, २८ ऑक्टोबर - पालये, हरमल येथे २० सप्टेंबर या दिवशी झालेल्या बैलांच्या झुंजीच्या (धिर्यो) विरोधात पीपल्स फॉर अ‍ॅनिमल्स या संघटनेकडून उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. पीपल्स फॉर अ‍ॅनिमल्स या संघटनेने वर्ष १९९६ मध्ये न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळेच धिर्योवर बंदी घालण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ट्रोजन डिमेलो यांनी याचसंदर्भात दाखल केलेली अन्य एक याचिका न्यायाधिशांनी फेटाळली आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मुरुगर मंदिरात सत्संग

     चेन्नई - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नवरात्रोत्सवातील आयुधपूजनाच्या वेळी तामिळनाडूतील गुरुवनेथ येथील मुरुगर मंदिरात सत्संग घेण्यात आला. हिंदु जनजागृती समितीच्या सौ. सुगंथी जयकुमार यांनी या वेळी धर्माचरण आणि शक्तीतत्त्व यांचे महत्त्व विशद केले. या वेळी समितीच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. श्री. श्रीराम लुकतुके यांनी ग्रंथप्रदर्शनाची सेवा केली. मंदिराच्या मुख्य विश्‍वस्तांनी मंदिरात प्रत्येक महिन्याला हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सत्संग आयोजित करण्यात येणार असल्याचे घोषित केले. भाविकांनी या सत्संगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विश्‍वस्तांनी केले. या वेळी सौ. सुगंथी जयकुमार यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी सुमारे १२० भाविक उपस्थित होते.

मूर्तीविसर्जनावरील बंदी हटवण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या ओजस्वी पक्षाच्या याचिकेवर न्यायालयाची शासनाला नोटीस

     नवी देहली - पूजा साहित्य, निर्माल्य आणि मूर्तीविसर्जन यांच्यावरील बंदी हटवण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या ओजस्वी पक्षाच्या याचिकेवर राष्ट्रीय हरित प्राधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती स्वतंत्र कुमार यांच्या मुख्य पिठाकडून केंद्रीय पर्यावरण मंत्रालय आणि देहली शासन यांना नोटीस पाठवण्यात आली आहे, अशी माहिती पक्षाने प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.

कोल्हापूर महापालिका निवडणुकीत जेवणावळी, भेटवस्तू आणि सहली यांद्वारे मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न !

मतदारांनो, उमेदवारांच्या लालूच दाखवण्याला न भुलता योग्य उमेदवारांनाच मते द्या ! 
 निवडणूक आयोग निवडणुकीतील अपप्रकार रोखण्यासाठी काय करणार आहे ? 
     कोल्हापूर, २८ ऑक्टोबर (वार्ता.) - महापालिका निवडणुकीत उमेदवारांकडूनही साम, दाम, दंड आणि भेद या नीतीचा वापर चालू झाला आहे. याचाच अपलाभ घेऊन काही मंडळींनी एकगठ्ठा मतदानाचे गाजर दाखवून एकप्रकारे उमेदवारांची लूट चालू केली आहे. परिणामी सर्वच प्रभागांत मतदारांना जेवणावळीसह सहलींचे आयोजन आणि भेटवस्तूंचेे मोठ्या प्रमाणात वाटप केले जात आहे. प्रतिदिन ८१ प्रभागांत लक्षावधी रुपयांचा चुराडा केला जात आहे. 

अपकीर्ती करणार्या 'मी मराठी वाहिनी'च्या विरोधात सनातनचे साधक प्रशांत जुवेकर यांचा न्यायालयीन लढा !

पणजी, २८ ऑक्टोबर (वार्ता.) - 'मी मराठी' या वृत्तवाहिनीवरून अपकीर्ती करणारे आणि खोटे वृत्त प्रदर्शित करून अपकीर्ती केल्याने सनातन संस्थेचे साधक श्री. प्रशांत जुवेकर यांनी त्यांचे अधिवक्ता श्री. गजानन नाईक यांच्या वतीने या वाहिनीचे संपादक आणि संचालक यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. मानहानी केल्यामुळे १ कोटी रुपयांची हानीभरपाई द्यावी अन्यथा फौजदारी आणि दिवाणी खटला दाखल करण्यात येईल, असे या नोटीसद्वारे सांगण्यात आले आहे. 

धुळे येथे फटाक्यांचे दुष्परिणाम थांबवण्यासाठी पत्रकार परिषद

डावीकडून सर्वश्री सुनील पाटील, कपिल शर्मा, पंकज बागुल, डॉ. योगेश पाटील, श्री. विनोद लहामगे
    धुळे - येथील पत्रकार भवनामध्ये २८ ऑक्टोबर या दिवशी फटाक्यांचे दुष्परिणाम, फटाक्यांवरील देवतांच्या चित्रांमुळे होणारा देवतांचा अवमान आणि दिवाळीचे आध्यात्मिक महत्त्व यांची माहिती देण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली.
     या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. पंकज बागुल म्हणाले की, दिवाळीत फटाके फोडून हिंदू करोडो रुपयांची राख रांगोळी करीत आहेत. फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण अन् जीवितहानी होते. धुळ्याजवळ असलेल्या पारोळा तालुक्यात फटाके उत्पादनांच्या ठिकाणी आग लागून ५० हून अधिक कामगार ठार झाले होते. देवता आणि राष्ट्रपुरुष यांंची चित्रे असलेले फटाके फोडल्यामुळे त्यांचा अवमान होतो.

दाऊदला कह्यात घेण्याच्या हालचाली गतिमान करणार !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषदेत माहिती
सांगली - कुख्यात गुंड छोटा राजनला चौकशीसाठी लवकरच महाराष्ट्र पोलिसांच्या कह्यात घेतले जाईल. गुन्हेगारी जगतातील दुसरा कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम यालाही कह्यात घेण्यासाठीच्या हालचाली गतिमान केल्या जातील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, 
१. इंटरपोलने 'रेड कॉर्नर' नोटीस जारी केल्यानंतर २६ ऑक्टोबरला राजनला इंडोनेशियातून अटक करण्यात आली. 'रेड कॉर्नर' जारी करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी पाठपुरावा केला होता. अनेक प्रकरणांत छोटा राजन हवा होता. 

मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना एस्टीचा पास विनामूल्य

परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची घोषणा
      मुंबई - दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांतील इयत्ता ११ वीपासून पुढे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना राज्य परिवहन मंडळाकडून विनामूल्य पास देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे. याचा लाभ मराठवाड्यातील ४ लाख ६० सहस्र विद्यार्थ्यांना होणार आहे. या योजनेला स्वाती अभय योजना असे नाव देण्यात येणार आहे. पास काढण्यासाठी २६० रुपये नसल्याने लातूरच्या स्वाती पिटले या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेनंतर राज्यशासनाने ही विनामूल्य पास देण्याची घोषणा केली. यापूर्वीही राज्य परिवहन महामंडळाने विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या दरात पास दिले होते.

इचलकरंजी येथे ९ सहस्र ४३५ लिटर अनधिकृत खाद्यतेलाचा साठा शासनाधीन !

संबंधितांवर कठोर कारवाई झाल्यासच अशा घटनांना आळा बसेल ! 
     इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर), २८ ऑक्टोबर (वार्ता.) - येथील सरस्वती मार्केटमध्ये अजय ट्रेडर्स या दुकानावर सकाळी प्रांताधिकार्‍यांनी धाड टाकून सुमारे ९ सहस्र ४३५ रुपयांचे खाद्यतेल शासनाधीन केले. याची बाजारभावानुसार सुमारे ६ लक्ष ५० सहस्र रुपये किंमत होते. या व्यापार्‍याने अनधिकृतपणे खाद्यतेलाचा साठा केल्याचे वृत्त समजताच प्रांताधिकार्‍यांनी ही कारवाई केली. जिल्हा पुरवठा विभागाने गेल्या ६ दिवसांत ३९५ ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. केंद्र शासनाने लागू केलेल्या नियंत्रण आदेशामुळे जिल्ह्यात डाळ, तेल आणि तेलबियांच्या साठ्यांवरील कारवाई अजूनही चालूच आहे. 

धर्मरक्षणार्थ धर्मजागृती सभांचे आयोजन करणार !

मंचर येथील हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार 
     पुणे, २८ ऑक्टोबर (वार्ता.) - हिंदु धर्म आणि संस्कृती यांवरील आक्रमणे केवळ शहरी भागापुरती मर्यादित न रहाता गावपातळीवरही होत आहेत. ती परतवून लावण्यासाठी ग्रामस्थांमध्ये जागृती निर्माण व्हावी अन् हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी हिंदूंचे संघटन निर्माण व्हावे, या उद्देशाने धर्मजागृती सभांचे आयोजन करण्याचा निर्धार हिंदुत्ववाद्यांनी केला. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २५ ऑक्टोबर या दिवशी मंचर येथे हिंदुत्ववाद्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नारायणगाव, भावडी, पेठ, वडगाव-काशिंबे, मंचर येथील १५ हून अधिक हिंदुत्ववादी बैठकीला उपस्थित होते. 

लोकप्रतिनिधींची भ्रष्टाचार न करण्याची शपथ !

भ्रष्टाचार निर्मूलनासाठी शपथेपेक्षाही कठोर अंमलबजावणीची आवश्यकता !
     पुणे, २८ ऑक्टोबर - भ्रष्टाचारविरोधी दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त महानगरपालिकेच्या मुख्य भवनात भ्रष्टाचाराच्या विरोधात शपथ घेण्याचा कार्यक्रम पार पडला. या वेळी महापौर श्री. दत्तात्रय धनकवडे, उपमहापौर श्री. आबा बागुल, महापालिका आयुक्त (विशेष) श्री. ओमप्रकाश बकोरिया यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होेते. (शालेय जीवनात सर्वजण भारतियांशी सौजन्याने वागण्याची, वडीलधार्‍यांचा मान राखण्याची प्रतिदिन प्रतिज्ञा घेतात. असे असूनही गुन्हे घडण्याचे आणि समाजामध्ये कलह होण्याचे प्रमाण उणावत नाही. यातून शिकून लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी केवळ भ्रष्टाचाराविरोधात शपथ न घेता हाती असलेल्या अधिकारांचा वापर करून भ्रष्टाचार्‍यांना कठोर शासन होण्यासाठी भरीव प्रयत्न करणे अपेक्षित आहे. - संपादक)

पुण्यात विक्रीकर साहाय्यक आयुक्तांसह दोन जण लाच घेतांना अटकेत

भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लाचखोरांना कठोर शासन करणे आवश्यक !
      पुणे, २८ ऑक्टोबर - थकीत व्यावसायिक करामध्ये तडजोड करण्यासाठी एका व्यावसायिकाकडून १३ लक्ष रुपयांची लाच घेणारे विक्रीकर विभागातील साहाय्यक आयुक्त सोमनाथ नलावडे यांच्यासह दोन जणांना लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई २७ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी नलावडे यांच्या निवासस्थानी करण्यात आली.
      या प्रकरणी सोमनाथ मधुकर नलावडे आणि शिवाजी कृष्णा गुजर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पुण्यात रहाणार्‍या एका तरुणाचा घरगुती कामे करण्याचा (हाऊसकीपिंग) व्यवसाय असून त्याच्याकडून १ कोटी ६० लक्ष रुपयांचा कर थकीत होता.

ठाण्यात १२ सहस्र टन डाळ कह्यात !

      ठाणे - ठाण्यातल्या शीळ डायघर भागात गुन्हे अन्वेषण विभागाने १२० कोटींची १२ सहस्र टन डाळ कह्यात घेतली आहे. तूर डाळ, मसूर डाळ, चणा डाळ आणि वाटाणा डाळींचा यात समावेश आहे. गुन्हे अन्वेषण विभागाने एकूण ३८ गोदामांवर छापे टाकले. या छापेमारीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही डाळ सापडली. कायद्याच्या कलम ३ आणि ७ अंतर्गत ही कारवाई केल्याची माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिली.

एफ्टीआयआयच्या विद्यार्थ्यांचा १३९ दिवसांनंतर संप मागे !

      पुणे, २८ ऑक्टोबर - फिल्म अ‍ॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये (एफ्टीआयआय) गेल्या १३९ दिवसांपासून अनुचित कारणासाठी चालू असलेला संप विद्यार्थ्यांनी अखेर मागे घेतला. संप मागे घेतला असला, तरी लोकशाही पद्धतीने आंदोलन चालूच ठेवणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
      एफ्टीआयआयच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी अभिनेता गजेंद्र चौहान यांची नियुक्ती झाली होती. चौहान यांच्यामध्ये त्या पदासाठीची क्षमता नसल्याचे, तसेच ते हिंदुत्ववादी विचारसरणीचे असल्याचे कारण सांगत विद्यार्थ्यांनी आंदोलन करण्यास प्रारंभ केला होता. यामुळे प्रसिद्धी मिळत असल्यामुळे गेल्या ४ महिन्यांमध्ये विविध युक्त्या काढून हा विषय विद्यार्थ्यांकडून चिघळत ठेवण्यात आला होता.

वारंवार डिवचणार्‍या पाकिस्तानला उत्तर देण्याची सिद्धता भारताने दाखवावी ! - सुमित्रा महाजन, अध्यक्ष, लोकसभा

लोकसभेच्या अध्यक्षांच्या या विधानाचा शासन गांभीर्याने विचार करेल, हीच अपेक्षा ! 
     नागपूर - काश्मीरचे भिजत घोंगडे कुठवर कायम ठेवायचे ? त्यामुळेच आज आपला शेजारी आंतरराष्ट्रीय पातळीवर टिमकी वाजवतो. काश्मीरच्या सूत्रावर भारताला युद्ध नको; पण पाकिस्तान वारंवार डिवचत असेल, तर त्याला उत्तर देण्याची सिद्धता भारताने दाखवायलाच हवी, असे सांगत जनतेने योग्य निर्णय घेणार्‍यांच्या पाठीशी उभे रहावे, आवाहनही लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी केले. येथे एका सत्कार सोहळ्याच्या वेळी त्या बोलत होत्या.

भजनांच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्याचा शासकीय अधिकार्‍याचा प्रयत्न !

     संभाजीनगर - येथील शासकीय अधिकारी विजयकुमार फाड वारकर्‍यांच्या वेषात भजने म्हणून आत्महत्या न करण्याविषयी वारकर्‍यांचे प्रबोधन करतात. वीणा हातात घेत भजने म्हणणे, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. ज्या गावात आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांचे प्रमाण अधिक असते, तेथे ते भजने म्हणतात. ते भजनांच्या जोडीला अभंग म्हणतात किंवा प्रवचनेही देतात. 

४ मासांच्या प्रतिक्षेनंतर अंगणवाडी सेविकांना मानधन मिळणार

अंगणवाडी सेविकांची दुःस्थिती संपणार तरी कधी ?
     सांगोला (जिल्हा सोलापूर) - गेल्या ४ मासांंपासून मानधनापासून वंचित असलेल्या अंगणवाडी सेविकांना दिवाळी अगोदर मानधन मिळणार आहे. राज्यशासनाचे मानधन येत असतांना केंद्रशासनाचे ३ सहस्र रुपये मानधन ४ मास मिळाले नव्हते. केंद्रशासनाकडून नियमित मानधन मिळावे, अशी अपेक्षा अंगणवाडी सेविकांनी व्यक्त केली आहे.

क्षेत्रोपाध्ये परंपरेचा इतिहास सांगणार्‍या घटनेचे साक्षीदार ठरलेले विठ्ठल मंदिर

श्री विठ्ठल मंदिराची हुबेहूब प्रतिकृती 
श्री. नाझरकर यांनी पुन्हा साकारलेली श्री विठ्ठल मंदिराची प्रतिकृती
     पंढरपूर - सन १८६० मध्ये बनवलेल्या विठ्ठल मंदिराच्या प्रतिकृतीचे भाग जोडून येथील गणेश नाझरकर यांनी हुबेहूब मंदिराची रचना सादर केली आहे. या कलाकृतीला एका वास्तवदर्शी कथेची जोड आहे. देवाची सेवा करणारे क्षेत्रोपाध्ये, सेवेकरी, मानकरी, पुजारी यांच्याभोवती फिरणारे समाजकारण आणि अर्थकारण असणारा तो काळ. १८६० सालचा विठ्ठल मंदिराचा इतिहास जितका जुना, तसेच येथील वादसुद्धा जुने आहेत. १८६० मध्ये मुंबई उच्च न्यायालयात क्षेत्रोपाध्यांच्या हक्काविषयी एक खटला चालू होता. या खटल्यात हरिदास वेस येथे रहाणारे कै. रंगोबा नाझरकर यांनी क्षेत्रोपाध्ये म्हणून स्वत:ची बाजू मांडली होती. स्वत: पंढरीचे क्षेत्रोपाध्ये आहोत असा त्यांचा दावा होता. तो मान कायम रहावा, यासाठी न्यायालयात प्रकरण चालू होते. त्यांनी न्यायमूर्तींना पंढरपूरची एकूण रचना, या रचनेमध्ये मंदिराकडे जाणारे रस्ते, या रस्त्यावरील संरक्षण म्हणून स्वत: बजावत असलेली सेवा यांविषयीची माहिती दिली; परंतु न्यायमूर्तींनी, 'स्वत: पंढरपूर आणि विठ्ठल मंदिर कधीच पाहिले नाही. त्यामुळे मला कल्पना कशी येणार....' असे मोकळेपणाने सांगितले. त्यावर कै. रंगोबा नाझरकर यांनी पंढरपूरच्या मंदिराची आणि परिसराची हुबेहूब प्रतिकृती तयार करून न्यायालयात सादर करण्याची सिद्धता दाखवली. पुढच्या दिनांकाला नाझरकर यांनी अशी हुबेहूब प्रतिकृती तयार केली आणि ती मुंबई उच्च न्यायालयात दाखवली. यावरून त्यांच्या म्हणण्याला आधार मिळाला. न्यायमूर्तींनी त्यांचे म्हणणे मान्य करून त्यांचा क्षेत्रोपाध्ये पदाचा मान कायम ठेवला. राजकीय हस्तक्षेप, 'मिडीया ट्रायल' अशा सामाजिक प्रदूषणापासुन दूर असलेला तो काळ संस्कृती, परंपरा आणि इतिहास यांच्या अभ्यासातून सामाजिक जडणघडण जोपासणारा होता. त्यामुळे हा दावा त्या काळच्या कसोटीवर खरा ठरला आणि नाझरकरांना स्वत:चे हक्क मिळाले. 

पुणे येथे सायबर पोलीस ठाणे स्थापण्याचा अहवाल राज्य शासनाकडे ५ वर्षे प्रलंबित

गृहविभागाचा कारभार असा कूर्मगतीने चालला, 
तर सायबर गुन्हेगारांच्या मुसक्या कधी आवळणार ? 
     पुणे, २८ ऑक्टोबर - सायबर गुन्ह्यामध्ये पुण्याचा देशात दुसरा क्रमांक आहे. पुण्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी स्वतंत्र सायबर विभाग, सायबर पोलीस ठाणे आणि संगणकाच्या आयपी पत्त्याद्वारे गुन्ह्याचा तात्काळ शोध घेणारे पथक अशा ३ स्तरांवर प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे पुणे पोलिसांकडून सांगण्यात येते. यासाठी पुणे पोलिसांकडून पाठवण्यात आलेला अहवाल राज्य शासनाकडे ५ वर्षे प्रलंबित आहे. (असा होता आघाडी शासनाचा भोंगळ कारभार ! भाजप शासनाने उपरोक्त अहवाल पाहून तात्काळ सायबर गुन्हे रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाला गतीमान करावे, ही अपेक्षा ! - संपादक) 

श्री महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा राबवून कोल्हापूर हे देशाचे आकर्षण केंद्र करणार ! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

     कोल्हापूर, २८ ऑक्टोबर (वार्ता.) - श्री महालक्ष्मी मंदिर तीर्थक्षेत्र विकासाच्या माध्यमातून कोल्हापूर हे देशाच्या आकर्षणाचे केंद्र करू. देशभरातील लक्षावधी भाविक येथे येतात. श्री महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा सिद्ध असून त्याची अंमलबजावणी करून कोल्हापूरमध्ये विविध योजनांच्या माध्यमातून सर्वाधिक सोयीसुविधा देऊ, असे आश्‍वासन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले. २७ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी ७ वाजता येथील प्रायव्हेट हायस्कूलच्या पटांगणावर महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजप-ताराराणी महायुतीच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते.

सातारा येथील लाचखोर तहसीलदाराला ३ वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा !

लाचखोरांना कठोर शासन केल्यावरच अशा घटनांना आळा बसेल !
      सातारा - लाच घेतांना अटक करण्यात आलेल्या येथील तहसीलदार सुप्रिया बागवडे यांना ३ वर्षांची सक्तमजुरी आणि १० सहस्र रुपये दंड अशी शिक्षा झाली आहे. (महिलाही लाचखोरीत आता पुढे ! - संपादक)
१. पारगाव खंडाळा येथील एका आधुनिक वैद्यांची २८ गुंठे भूमी ही बिगर शेती करायची होती. याविषयी संबंधित आधुनिक वैद्यांनी भूमी बिगरशेती करण्यासाठी इतर कार्यालयांसमवेत तहसील कार्यालयात प्रस्ताव प्रविष्ट केला होता.
२. तहसीलदारांनी संबंधित भूमी ही शेती करण्यासाठी अनुकूल असल्याचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करणे आवश्यक होते. त्यासाठी तहसीलदारांनी २० सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी केली. आधुनिक वैद्यांनी याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली.

मीरा-भाईंदर येथील शिवसेनेच्या उपविभागप्रमुखांवर अज्ञातांकडून गोळीबार

      मुंबई - शिवसेनेचे उपविभागप्रमुख श्री. अनिल चव्हाण यांच्यावर २७ ऑक्टोबरच्या रात्री अज्ञातांनी गोळीबार केला आहे. मीरा-भाईंदरच्या काशीमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जनतानगरच्या साईकृपा कॉम्प्लेक्समध्ये दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला. चव्हाण यांच्या मानेला एक गोळी लागली असून दुसरी मिसफायर झाली. गोळीबार करणारे आरोपी पळून गेले. चव्हाण यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन अज्ञातांवर गुन्हा नोंदवला असून अन्वेषण चालू आहे.

हे प्रशासनाला लज्जास्पद ! नुसत्या बातम्या देणारे नव्हे, तर अपघात होऊ न देणारे शासन हवे !

     'महाराष्ट्रात वर्षभरात एकूण ६१ सहस्र ६२७ अपघात झाले. त्यात १२ सहस्र ८६३ जणांचा बळी गेला. मृत्यूच्या संख्येत राज्य तिसर्‍या स्थानावर आहे. रस्त्यांची दूरवस्था, गतीरोधकांवर पांढरे पट्टे नसणे, धोक्याच्या ठिकाणी दुभाजक असणे, अतिवेगामुळे वाहनावरचे नियंत्रण सुटणे, दारू पिऊन गाडी चालवणे, समोरून गाडी येत असूनही ओव्हरटेक करणे, धोकादायक वळणावर वेगाने गाडी चालवणे, पार्किंग लाईट न लावता महामार्गावर गाडी थांबवणे अशा अनेक कारणांमुळे अपघात होतात.'

निवृत्ती वेतनधारकांनी नोव्हेंबर मासात अधिकोषाला 'लाईफ सर्टिफिकेट' द्यावे !

     'ज्या शासकीय अथवा अन्य कर्मचार्‍यांना निवृत्तीनंतर प्रत्येक मासाला 'निवृत्ती वेतन' (पेन्शन) देण्यात येते, त्यांनी ज्या अधिकोषातून आपण निवृत्ती वेतन घेतो, तेथे प्रतिवर्षी नोव्हेंबर मासात 'लाईफ सर्टिफिकेट ' द्यावे. असे केल्यासच पुढील वर्षभर निवृत्ती वेतन चालू राहू शकते. हे सर्टिफिकेट देण्यासाठी अधिकोषाच्या ज्या शाखेतून खाते उघडले आहे, तेथे प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता नाही. सध्याच्या वास्तव्याच्या ठिकाणी त्या अधिकोषाची शाखा असल्यास तेथे आपल्या आधारकार्डाची मूळ आणि झेरॉक्स प्रत, तसेच पासबूक दाखवून 'लाईफ सर्टिफिकेट' देता येते. (उदा. एखाद्याने निवृत्त वेतनासाठी ठाणे येथील अधिकोषातून खाते उघडले असेल आणि सध्या तो देहलीला वास्तव्याला असेल, तर देहली येथील त्या अधिकोषाच्या शाखेतूनही तो सर्टिफिकेट देऊ शकतो.)'
- (पू.) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.१०.२०१५)
     'शिवसेनाप्रमुखांनी मनामनांत पेटवलेली हिंदुत्वाची ठिणगी जिवंत आहे आणि ती कधीही वणवा बनू शकते. देशात समान नागरी कायदा लागू करा. हिंदुस्थानला हिंदु राष्ट्र घोषित करा, मग कोण गाय कापतो ते बघून घेऊ.'  - शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे

हिंदु सेनेचे प्रमुख विष्णु गुप्ता पोलिसांच्या कह्यात !

केरळ भवनमध्ये गोमांस मिळत असल्याचे प्रकरण
     नवी देहली - राजधानी देहलीतील केरळ भवनमध्ये गोमांस मिळत असल्याची तक्रार करणारे हिंदु सेनेचे प्रमुख विष्णु गुप्ता यांनाच पोलिसांनी कह्यात घेतले आहे. २६ ऑक्टोबर या दिवशी श्री. गुप्ता यांनी पोलीस नियंत्रण कक्षात दूरध्वनी करून केरळ भवनमध्ये गोमांस मिळत असल्याची तक्रार केली होती. त्यावर पोलिसांनी केरळ भवनमध्ये धाव घेतली होती. पोलिसांच्या केरळ भवनातील प्रवेशाला 'धाड' ठरवत केरळ शासन, तसेच केरळच्या खासदारांनी पोलिसांनाच खलनायक ठरवले.

संभाजीनगर विभागीय महसूल आयुक्तालयाचे संकेतस्थळ हॅक

वाढत्या सायबरच्या गुन्ह्यांना प्रशासन कसे तोंड देणार आहे ?
      संभाजीनगर, २८ ऑक्टोबर - येथील विभागीय महसूल आयुक्तालयाचे संकेतस्थळ २६ ऑक्टोबर या दिवशी रात्री हॅक करण्यात आले आहे. त्या संकेतस्थळावर आमच्या समाजावर अन्याय होत आहे अशी माहिती अरबी भाषेत लिहिण्यात आली आहे, तसेच फालेगा टीमने हे संकेतस्थळ हॅक केल्याचे माहितीत म्हटले आहे. विभागीय आयुक्तांना ही गोष्ट समजल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या सायबर विभागाला तोंडी कळवले. सामान्य प्रशासन विभागाचे तहसीलदार विजयकुमार राऊत यांनी २७ ऑक्टोबर या दिवशी सिटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

शासकीय (अ)कार्यक्षमता ! ही योजना ३ मासात का बनवता आली नाही ?

     'गोवा राज्यात 'दीनदयाल आरोग्य विमा योजना' बनवण्याची प्रक्रिया गेली ३ वर्षे चालू होती.'
 - आरोग्यमंत्री अधिवक्ता फ्रान्सिस डिसोझा

पुणे महानगरपालिकेत सादर करावयाचे ४१ अहवाल प्रलंबित

चौकशी समिती नेमण्याचा निव्वळ फार्स केला जातो आणि त्यामध्ये दिरंगाई केली जाते, असे
वाटल्यास वावगे काय ? चौकशी समिती नेमणे आणि त्यावर झालेला व्यय संबंधितांकडून वसूल करावा !
     पुणे, २८ ऑक्टोबर - महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर संबंधित खात्याच्या प्रमुखांना विविध अहवाल सादर करण्याच्या सूचना करतात. त्यानंतर त्या अधिकार्‍यांनी सभागृह कामकाज नियमावलीनुसार पुढच्या सभेत तो अहवाल सादर करणे अपेक्षित असते; परंतु अनेकदा तसे घडत नाही. त्या वेळी अधिकारी मुदतवाढ मागतात. अशा प्रलंबित अहवालांची संख्या ४१ आहे. (यावरून अहवालाविषयीची प्रशासनाच्या स्तरावर असलेली उदासीनता दिसून येते. हे प्रलंबित अहवाल सादर न केल्याविषयी महापौर किंवा पालिका आयुक्त संबंधितांवर कोणती कारवाई करणार आहेत ? तसेच प्रलंबित अहवाल वेळेत पूर्ण होण्यासाठी कोणती उपाययोजना करणार आहेत, याविषयी पालिका आयुक्त उत्तर देतील का ? - संपादक)

फलक प्रसिद्धीकरता

आता पाकशी चर्चा करणार कि त्याच्यावर आक्रमण ? 
     पाकनेच ओसामा बिन लादेन आणि हाफीज या दोघांना आतंकवादी प्रशिक्षण दिले आणि पाकनेच आतंकवाद्यांना सिद्ध करून काश्मीरमध्ये पाठवले आहे, असे पाकचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी म्हटले आहे.

सूरज परमार यांच्या आत्महत्येच्या प्रकरणी जामिनासाठी नगरसेवक न्यायालयात

      ठाणे - बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येच्या प्रकरणी फॉरेन्सिक अहवालातील चार नगरसेवकांची नावे पोलिसांनी २८ ऑक्टोबर या दिवशी अधिकृतरीत्या जाहीर केली. या नगरसेवकांनी जामीन अर्जासाठी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली असून या जामीन अर्जावर २९ आणि ३१ ऑक्टोबर या दिवशी सुनावणी होणार आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष नजीब मुल्ला, ठाणे महापालिकेचे विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, काँग्रेसचे विक्रांत चव्हाण आणि सुधाकर चव्हाण यांचा समावेश आहे.

पिंपरी (पुणे) येथे अज्ञात टोळक्याने चारचाकी वाहने फोडली

शासन कायदा-सुव्यवस्थेची स्थिती सुधारण्यासाठी काय करणार आहे ?
     पिंपरी, २८ ऑक्टोबर - तीन दुचाकींवरून आलेल्या एका अज्ञात टोळक्याने येथील साने चौक, संभाजीनगर, शाहूनगर परिसरातील १५ हून अधिक चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्या. ही घटना २७ ऑक्टोबर या दिवशी रात्री ८.३० ते ९ या वेळेत घडली. रात्री उशिरा निगडी पोलिसांनी एका संशयिताला कह्यात घेतले आहे. (वाहनांची नासधुस करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून त्यांचा उद्देशही अद्याप समजलेला नाही; तसेच यामुळे नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. याकडे शासनाने लक्ष द्यावे, अपेक्षा ! - संपादक)

नजरकैदेत असतांना १० रोहिंग्या मुसलमानांचे पलायन

नाटे पोलिसांचा संशयास्पद कारभार !
     रत्नागिरी, २८ ऑक्टोबर - म्यानमारमधून राजापूर तालुक्यातील नाटे येथे ४३ रोहिंग्या मुसलमान आल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी आठ बोट मालकांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. आता ४३ पैकी १० रोहिंग्या मुसलमान पोलिसांच्या नजरकैदेतून पळून गेले आहेत. (पोलिसांनी लक्ष ठेवलेले रोहिंग्या मुसलमान पळून जातात, ही पोलिसांची निष्क्रीयताच होय !- संपादक) 
   नाटे पोलिसांनी खलाशी म्हणून काम करणार्‍या रोहिंग्यांना चौकशीसाठी कह्यात घेतले होते. काही रोहिंग्यांकडे भारतात तात्पुरत्या शरणागती रहिवाशाचे प्रमाणपत्र आढळले, तर उर्वरित रोहिंग्यांनी युनोकडे भारतीय नागरिकत्व मिळावे, यासाठी प्रस्ताव दाखल केला होता.

फटाक्यांवर सहस्रो कोटी रुपयांची उधळपट्टी करणे देशहिताच्या विरोधात ! - हिंदु जनजागृती समिती

धर्मशास्त्राचा आधार नसलेल्या फटाक्यांच्या उत्पादनांवर बंदी घालण्याची मागणी 
मालवण तहसीलदार श्रीमती वनिता पाटील यांना
निवेदन देतांना सौ. शिलादेवी गावडे आणि अन्य
     मालवण (सिंधुदुर्ग) - फटाके फोडणे ही विदेशी प्रथा असून हिंदु धर्मात फटाके फोडण्याला कुठलाही शास्त्राचा वा धर्माचा आधार नाही, तसेच फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणावर वायू आणि ध्वनी यांचे प्रदूषण होऊन समाजाचे आरोग्य आणि पर्यावरण धोक्यात येत आहे. भारतात तर दिवाळीच्या कालावधीत सुमारे ४ सहस्र कोटी रुपयांचे फटाके फोडले जातात, तर वर्षभरात ही संख्या कितीतरी पटीने अधिक आहे. आपला देश आर्थिक संकटात असतांना, कोट्यवधी जनतेला एक वेळचे अन्न मिळत नसतांना अशा प्रकारे प्रतिवर्षी सहस्रो कोटी रुपयांची होणारी उधळपट्टी करणे देशहिताच्या विरोधात आहे. हा पैसा राष्ट्रकार्यासाठी वापरल्यास अनेक समस्या सुटण्यास साहाय्य होईल; म्हणून शासनाने अशा प्रदूषणकारी फटाक्यांवर पूर्णपणे बंदी आणावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. या मागणीचे निवेदन मालवण तहसीलदार श्रीमती वनिता पाटील यांना देण्यात आले.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! 
 Pak ke purva rashtrapati Parvez Musharaf ne kaha,
 Paknehi kashmirme atankvadi bheje hai. 
kya ab Bharat pakse pratishodh lega ?

 जागो ! 
 पाक के पूर्व राष्ट्रपति परवेज मुशर्रफ ने कहा, 
पाक ने ही कश्मीर में आतंकवादी भेजे है. 
क्या अब भारत पाक से प्रतिशोध लेगा ?

राज्यातील पाणी योजना रखडल्या

     नाशिक - राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत राज्यभरातील नवीन पाणीपुरवठा योजनांचे आराखडे शासनाला सादर करण्यात आलेत; मात्र शासनाने २९ जून २०१५ पूर्वीचा कार्यारंभ आदेश दिलेल्या योजनांसाठी निधी देण्याचे सूत्र स्वीकारले. त्यामुळे राज्यातील ८ सहस्रांंहून अधिक नवीन पाणी योजना रखडल्या आहेत. त्यातच पुन्हा एक सहस्र कोटींची मुख्यमंत्री पेयजल योजना प्रस्तावित करण्यात आली असली, तरीही त्या संबंधीची नियमावली अद्याप निश्‍चित झालेली नाही.

उत्तरप्रदेशमधील हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्‍न !

उत्तरप्रदेशमध्ये धर्मांधांनी हिंदूंच्या सणांत दंगली घडवून आणल्याच्या 
पार्श्‍वभूमीवर हिंदूंना वस्तूस्थितीची जाणीव करून देणारा लेख !
श्री. विनोद कुमार सर्वोदय
     राष्ट्राला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही राज्यकर्त्यांच्या डोक्यातून मुसलमानांच्या लांगूलचालनाविषयीचे विचार जाणे दूरच; पण ते अधिक घट्ट होत गेले. धर्माच्या आधारावर देशाचे तुकडे झाल्यावरसुद्धा राज्यकर्त्यांच्या या विचारसरणीने ढोंगी धर्मनिरपेक्षतेच्या शिकवणीतून हिंदूंना त्यांचे अस्तित्व संपण्याच्या मार्गावर उभे केले आहे. १ सहस्र ४०० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या इस्लाम धर्माच्या तुलनेत सहस्रो वर्षे जुन्या असलेल्या हिंदु धर्माचा पुन:पुन्हा अपमान करण्याने हिंदु-मुसलमान ऐक्य होऊ शकत नाही, हे आमचे राजकीय नेते आणि बुद्धीजीवी का समजून घेत नाहीत ? गेल्या ६७ वर्षांत मुसलमानांची धर्मांधता आणि सत्तेसाठी त्यांना जवळ करण्याचे परिणाम एवढ्या स्तराला पोहोचले आहेत की, त्यामुळे हिंदूंच्या अस्तित्वाचे वर्तमान अणि भविष्य दोन्ही धोक्यात आले आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने केरळ येथे सप्टेंबर २०१५ मध्ये झालेले धर्मप्रसाराचे कार्य !

१. एका समुदायाच्या कार्यक्रमात सनातनच्या ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन 
     साधिका श्रीमती माया यांच्या घरी एका समुदायाचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाच्या वेळी त्यांनी सनातन संस्थेचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावले होते. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांनी प्रदर्शन आवडल्याचे सांगून जिज्ञासेने प्रश्‍न विचारून शंकानिरसन करून घेतले.

सर्वच जाती-धर्मांत असलेल्या उच्च-नीच भेदाकडे दुर्लक्ष करून केवळ ब्राह्मण वर्गावर टीका करणार्‍यांनो, हे लक्षात घ्या !

१. जातीभेदाला ब्राह्मण्य हा रोग कारणीभूत असल्याचा कांगावा करणारे कॉ. पानसरे !
     ब्राह्मण्य हा महाभयंकर संसर्गजन्य रोग आहे. त्याची उत्पत्ती ब्राह्मण वर्गात झाली. आपल्यापेक्षा खालच्या जातीतील लोकांना तुच्छतेने वागवले जातात. ही कॉम्रेड गोविंद पानसरेंनी लिहिलेली ब्राह्मण्य या रोगाची लक्षणे रवींद्र गोळे यांनी एका लेखात उद्धृत केली आहेत.

बायका-मुलांसाठी आश्रय मागण्याचे नाटक करून हिंदु राजाचा निर्वंश करणारा मुसलमान आक्रमक जहांगीर नासीरखान !

     वर्ष १३९९ मध्ये राजा फारूखी मणिकखाननंतर त्याचा मुलगा जहांगीर नासीरखान हा खानदेशच्या गादीवर बसला. नासिरखानने त्याच्या भावाशी भांडण झाल्याचे सांगून बायका-मुलांसाठी अभेद्य असीरगड वर आश्रय मागितला. पहिल्या दिवशी २०० पालख्यांतून ही मंडळी आली. दुसर्‍या दिवशी पुन्हा २०० मेणे आले. त्यांच्या स्वागतासाठी या किल्ल्यांचा हिंदु राजा आसा सहकुटुंब पुढे आला आणि तेथेच घात झाला. या मेण्यातून अचानक सैनिक बाहेर आले आणि त्यांनी राजा अन् त्याचे सर्व वंशज यांना कंठस्नान घालून असीरगड सर केला. हिंदूंना कसेही करून मारणारा मुसलमान सुफींना प्रिय होता. (महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या धुळे जिल्हा गॅझेटिअर (पृ. ८५ आणि ८६ वर आधारित) - श्री. सुरेश वावदे, कांदिवली

आता न्यायमूर्तींना काय म्हणणार ?

भारतात महिला आणि मुलांवरील अत्याचारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत, याला पाश्‍चात्त्य संस्कृतीचे आक्रमण हे एक कारण झाले; पण अन्य कारणेही तितकीच महत्त्वाची आहेत. आपण महिलांवरील अत्याचारांविषयी पुरुषांच्या वासनांध वृत्तीला दोष देत असलो, तरी ती वासना चाळवण्यास महिलाही तितक्याच कारणीभूत आहेत, हे नाकारून चालणार नाही, तसेच चित्रपट, दूरचित्रवाहिन्यांवरून दाखवल्या जाणार्‍या कार्यक्रमांतून अश्‍लील दृश्य, तोकडे कपडे घालून अंगप्रदर्शन करणार्‍या नटनट्या समाजात अश्‍लीलता पसरवण्यात आणखी भर घालतात.

इंग्रजांनी चालू केलेली जीवनपद्धत आचरणात आणल्याने स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अजूनही त्यांच्या दास्यात असलेले भारतीय !

सौ. नीलिमा सप्तर्षी
      व्यापार करण्यासाठी आलेल्या इंग्रजांनी भारतावर १५० वर्षे राज्य केले आणि येथील जनतेला कधी प्रलोभने दाखवून, कधी गोड बोलून, तर कधी रागावून आणि अधिकार गाजवून स्वतःचा कार्यभाग साध्य करून घेतला. स्वतंत्र भारतात राहून पारतंत्र्यातील जीवनाचा विचार करणे कठीणच आहे; परंतु ज्यांनी पारतंत्र्याचा अनुभव घेतला, त्यांचे अनुभव सर्वांना समजण्यासाठी हा लेखप्रपंच !
१. चहा
     त्या काळात चहा हा शब्दही ठाऊक नव्हता. इंग्रजांचे नोकर त्या वेळी धगधगती शेगडी (बालदीची केलेली दगडी कोळशाची शेगडी) आणि चहाची मोठी किटली हातात घेऊन रस्त्यांवरून फिरायचे. त्या वेळी ते लोकांना विनामूल्य चहा द्यायचे. लोकांना चहा विनामूल्य मिळत आहे, असे समजल्यावर चहावाला आल्यावर घरातील सर्व जण त्याच्याकडून चहा घ्यायचे. प्रत्येकाला घरून स्वतःचा पेला न्यावा लागायचा.
राष्ट्रच आमुचा देव जनार्दन, त्याच्या चरणी जीवन अर्पण ।
व्यष्टी-समष्टी एक चिरंतन, या तत्त्वाचे सदैव चिंतन ॥ 
(राष्ट्रपर्व, १३.१०.२००८)

धर्मच खरा राष्ट्राचा आधार !

    धर्मच खरा राष्ट्राचा आधार, धर्म बाजूला सारला, तर जगायचे कशाच्या जीवावर ? धर्म म्हणजे समाजकल्याण, धर्म म्हणजे सामाजिक बांधीलकी, धर्म म्हणजे समाजनियंत्रण, धर्म म्हणजे एका विशाल परिवारात प्रेम आणि आपुलकीने राहण्याची हमी, धर्म म्हणजे आत्मविकास, समाजविकास आणि राष्ट्राचा उत्कर्ष करण्याची अनुज्ञाप्ती !

राजदंडाचा अंकुश नसल्याने समाजाची स्थिती अराजकाची झाली आहे !

     मनुष्य हा मूलतः आणि स्वभावतः स्वार्थी, लोभी असतो. त्याच्या वर्तनावर राजदंडाचा अंकुश नसेल, तर तो अनिर्बंध होण्यास विलंब लागत नाही. अशा मनुष्याला नियंत्रित करणे, हे धर्माचे आणि दंडाचे कर्तव्य आहे. जर राजदंडाने ते कार्य पार पाडले नाही, तर समाजात मात्स्य न्याय (मोठा मासा लहान माशाला गिळंकृत करतो.) माजेल. - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, ६.१.२०११)

या देशाला जे आपली मातृभूमी आणि पितृभूमी मानतात, ते सर्व हिंदू होत, असे सावरकरांनी सांगणे

      या देशाला जे आपली मातृभूमी आणि पितृभूमी मानतात, ते सर्व हिंदू होते, असे स्वा. सावरकरांनी म्हटले आहे. हिंदुस्थानला हिंदु राष्ट्र म्हणणे म्हणजे संकुचितपणा आहे, असे म्हणणार्‍यांना स्वा. सावरकर विचारत की, सबंध मानवतेच्या दृष्टीकोनातून आपण म्हणता ते इंडियन नेशन हीसुद्धा संकुचित कल्पना नाही का ? अधिक व्यापक दृष्टीतून विचार केला, तर संपूर्ण पृथ्वी हीच आपली मातृभूमी आणि जग हे आपले राष्ट्र म्हणता येईल. एवढेच नव्हे, तर पृथ्वीच्याही पलीकडे जाऊन सबंध विश्‍व हे आपले राष्ट्र मानता येईल; परंतु राष्ट्राच्या व्यापक विचाराला असणार्‍या व्यवहाराच्या मर्यादेची जाणीवही स्वा. सावरकरांनी करून दिली. जोपर्यंत एक राष्ट्र दुसर्‍या राष्ट्रावर आक्रमण करत आहे, तोपर्यंत मानवतेच्याच हितासाठी सबंध जगाला एक राष्ट्र म्हणता येणार नाही. 
- केशव आचार्य (स्वातंत्र्यवीर शतकोेत्तर रौप्य जन्मोत्सव विशेषांक २००८)

स्वधर्म, स्वदेश, स्वभाषा आणि संस्कृती यांची पाळेमुळे खोलवर रुजण्यासाठी सबळ आणि सावधान नेतृत्व हवे !

     राष्ट्रीय शोकांतिका टाळण्यासाठी समर्थांच्या राजकारणाचा परिस उपयोगात आणणे अगत्याचे आहे. स्वधर्म (कर्तव्याचरण), स्वदेश, स्वभाषा आणि संस्कृती यांची पाळेमुळे खोलवर रुजण्यासाठी सबळ आणि सावधान नेतृत्व हवे !
      म्लेंच्छ दुर्जन उदंड । बहुत दिसांचे मानले बंड ॥
      या कारणे अखंड । सावध असावे ॥
- श्री. विनायक महादेव दाते (स्वातंत्र्यवीर शतकोत्तर रौप्य जन्मोत्सव विशेषांक एप्रिल-जून २००८, पृष्ठ ३६)

त्रेतायुगापासून श्रीरामाला पूजणारे हिंदू मूर्ख असल्याचे लेखणीच्या एका फटकार्‍याने सांगणारे निधर्म्यांचे पुरातत्व खाते !

     सेतूसमुद्रम प्रकल्पाच्या ठिकाणी रामसेतू अस्तित्वात असल्याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही, असे भारतीय पुरातत्व खात्याने म्हटले होते !

आईच्या आध्यात्मिक प्रगतीच्या आनंदाने कृतकृत्य झाल्याची अनुभूती घेणारे कु. कुशल उत्तम गुरव !

श्री. कुशल गुरव
      २७.१०.२०१५ या दिवशी रामनाथी आश्रमात सेवा करणारे श्री. कुशल गुरव यांची आई सौ. उज्ज्वला गुरव (नंदीहळ्ळी, बेळगाव) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. त्या दिवशी आईच्या प्रगतीची वार्ता ऐकून देवाने दिलेला आनंद श्री. कुशल यांनी अनुभवला. त्या आनंदाचे त्यांनी केलेले वर्णन पुढे देत आहोत.
१. आईच्या बोलण्यातून चांगली स्पंदने येत असल्याचे जाणवणे
 आणि घरी पू. स्वातीताईंचा सत्संग असल्याने आईने त्या
 सत्संगाची भावपूर्ण सिद्धता करणे
     २७.१०.२०१५ या दिवशी सकाळी घरी भ्रमणभाष केला होता. तेव्हा आईच्या बोलण्यातून चांगली स्पंदने येत असल्याचे जाणवत होते. बोलता बोलता आईने सांगितले, आज घरी पू. स्वातीताईंचा सत्संग आहे. त्याची सिद्धता चालू आहे.

ईश्‍वराप्रती भोळा भाव असलेल्या आणि मुलांवर साधनेचे उत्तम संस्कार करणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या नंदिहळ्ळी, जिल्हा बेळगाव येथील सौ. उज्ज्वला उत्तम गुरव (वय ४६ वर्षे) !

      बेळगाव - प्रेमभाव, त्यागी वृत्ती आणि सहनशील असलेल्या सनातनच्या साधिका सौ. उज्ज्वला गुरव यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे, अशी घोषणा सनातनच्या ३४ व्या संत पू. (कु.) स्वाती खाडये यांनी २७ ऑक्टोबर या दिवशी येथे केली. या वेळी पू. (कु.) स्वातीताई यांच्या हस्ते सौ. उज्ज्वला गुरव यांचा श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी बेळगाव येथील सनातनचे साधक उपस्थित होते.

साधकांनो, नियतकालिक सनातन प्रभातच्या वाचकांच्या नोंदी करतांना होणार्‍या अक्षम्य चुका टाळून परिपूर्ण सेवा करा !

पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ
     सनातन प्रभात नियतकालिकांच्या वाचकांच्या नोंदी करतांना विविध जिल्ह्यातील साधकांकडून चुका होत आहेत. ऑगस्ट आणि सप्टेंबर मासांतील नोंदी करतांना साधकांकडून झालेल्या गंभीर चुका पुढे देत आहे.
१. नोंदी करतांना लक्षात आलेला साधकांमधील निष्काळजीपणा !
१ अ. वाचकांची नावे चुकीची टंकलिखित करणे : गोवा राज्यातील सौ. स्नेहा नाडकर्णी आणि सौ. अमिता प्रभू यांच्याकडून हिंदी मासिकाच्या एका वाचकाचे नाव ई.आर.पी. प्रणालीमध्ये चुकीचे टंकलिखित केले गेले. पावती केंद्रात पाठवल्यावर ही चूक लक्षात आली. त्यामुळे सुधारित पावती पाठवण्यात आणि त्याविषयी समन्वय करण्यात ४ साधकांचा २ - ३ घंटे वेळ वाया गेला.

निद्रादेवीने केलेल्या कृपेविषयी साधक कृतज्ञता व्यक्त करत नसल्याची तिने जाणीव करून देणे आणि क्षमायाचना करून रात्री झोपतांना प्रार्थना अन् सकाळी उठल्यावर कृतज्ञता व्यक्त करणार असल्याचे साधिकेने निद्रादेवीला सांगणे

     १८.१०.२०१५ या दिवशी आम्ही श्री शांतादुर्गादेवीच्या देवळात रात्री देवीचा मखरोत्सव बघायला गेलो. परत येऊन झोपायला रात्रीचे ११.५० वाजले. झोप येईना. झोपेची वाट बघता बघता आणि श्री दुर्गादेवीचे चिंतन करता-करता रात्रीचे अडीच वाजले. अकस्मात् निद्रादेवी माझ्यासमोर येऊन प्रत्यक्ष बोलत आहे, असे वाटले. त्या वेळी तिला सूक्ष्मातून म्हटले, का गं ताई, रागावलीस का माझ्यावर ? किती वाट बघू तुझी ! ती म्हणाली, हो. मला रागच आला आहे तुम्हा सर्वांचा ! मी प्रत्येक रात्री येते. न बोलता तुमची सेवा करते.

सामूहिक नामजपासाठी घरातील ध्यानकक्षाच्या शुद्धीकरणासाठी ताजे गोमूत्र अकस्मात् उपलब्ध होण्याच्या संदर्भात साधिकेला आलेली अनुभूती !

     वर्ष २००७ मध्ये आमच्या घरी साधक सकाळी ७ वाजता सामूहिक नामजपासाठी यायचे. तेव्हा घरच्या एका खोलीत देवतांची चित्रे ठेवून ध्यानकक्ष केला होता. पहिल्याच दिवशी सामूहिक नामजप आरंभ करण्यापूर्वी सर्व सिद्धता झाली; पण ध्यानकक्षाच्या शुद्धीकरणासाठी शुद्ध गोमूत्र उपलब्ध होत नव्हते. तेव्हा माझे मन अस्वस्थ झाले होते.

अनंताचे कोडे मज सुटेना ।

कैसे तुला प्राणांनी ओवाळू मज कळेना ।
कृष्णा, कैसे तुझे रूप वर्णू मज जमेना ॥ १ ॥
कैसे तुजसाठी स्वतःला अर्पू मज समजेना ।
कैसा तुझा आनंद अंतरात कोंडू मज जमेना ॥ २ ॥

ईश्‍वरी कृपेचे महत्त्व

श्री. राम होनप
     जेव्हा प्रारब्धाची प्रतिकूलता अधिक असते, तेव्हा मनुष्याला दशदिशांतील दशद्वारांतून मिळणारे साहाय्य थांबते. अशा परिस्थितीत मनुष्य हतबल होतो; परंतु ही वेळ साधकावर आल्यास त्याच्याकरता ईश्‍वरी कृपेचे अकरावे द्वार उघडते. येथे ईश्‍वरी कृपा म्हणजे साधकाला प्रारब्धभोग सहन करण्याची शक्ती मिळणे होय. - श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.६.२०१५)

निर्मळता, सहजता आणि प्रीती या गुणांचा समुच्चय असलेल्या पू. (श्रीमती) शालिनी नेनेआजी (वय ९२ वर्षे) !

पू. (श्रीमती) नेनेआजी
पू. राजेंद्र शिंदे
     पू. नेनेआजी देवद आश्रमात एका खोलीतच असतात. वयोमानानुसार त्यांना बाहेर फिरता येत नाही. मागील साधारण एक वर्षापासून आठवड्यातून २ वेळा आश्रमातील संत त्यांच्या सत्संगाचा लाभ घेण्यासाठी त्यांना भेटायला जात असतात. त्यांच्याशी बोलतांना त्यांची अनेक गुणवैशिष्ट्ये जाणवली. ती कृष्णकृपेने येथे मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

साधकांना सूचना

     पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा. 
दोन दिवसांपूर्वी पौर्णिमा झाली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
'बर्याच संप्रदायांत साधना म्हणून भजने म्हटली जातात. भजन म्हणतांना भावजागृती झाली, तरच ती साधना होते, नाहीतर एखाद्या आवडीच्या कृतीप्रमाणे भजन म्हणणे होते.' - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२४.१०.२०१५)  

बोधचित्र


॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान 
दिशा माझ्याकडे उत्तर आहे; 
कारण मी दक्षिणेकडे पाठ फिरविली आहे. 
भावार्थ अ : दक्षिण दिशा यमलोकाची आहे. तिच्याकडे 'पाठ फिरविली आहे' म्हणजे मी उत्तरेकडे, यमलोकापासून दूर जात आहे. 'माझ्याकडे यमलोक कसा चुकवायचा, या प्रश्‍नाचे उत्तर आहे', या अर्थी 'माझ्याकडे उत्तर आहे', हे वाक्य आहे. 
भावार्थ आ : पूर्व दिशा ज्ञानयोगाची, पश्‍चिम कर्मयोगाची, दक्षिण शक्तीयोगाची आणि उत्तर भक्तीयोगाची आहे. या संदर्भात मी शक्ती-उपासक नसून भक्तीमार्गी आहे, हे सुचविले आहे. 
 (संदर्भ : सनातनचे प्रकाशन 'संत भक्तराज महाराज यांची शिकवण.')

प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

इच्छांवर मर्यादा हवी ! 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      मनात निर्माण होणार्‍या इच्छा कशा पूर्ण होतील, याचा सतत विचार करून त्या पूर्ण करण्यापेक्षा इच्छा मर्यादित केल्या, तरच मानसिक शांतीचा लाभ होईल ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

फेसबूक : अमूल्य मनुष्यवेळ दवडणारी अनियंत्रित शक्ती !

संपादकीय
     फेसबूकचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा त्याचे सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्ग सध्या भारत दौर्‍यावर आले आहेत. भारतातील तरुणांशी त्यांनी संवाद साधला. फेसबूकचे जगभरात ९० कोटी सदस्य आहेत. त्यात एकट्या भारतात त्याचे १२ कोटींहून अधिक सदस्य आहेत. म्हणजे फेसबूक सर्वाधिक प्रमाणात वापरणार्‍यांमध्ये अमेरिकेनंतर भारत हा जगातील दुसर्‍या क्रमांकाचा देश आहे. त्या पार्श्‍वभूमीवर झुकेरबर्ग यांच्या भारत भेटीकडे पहावे लागेल. या भेटीत त्यांनी भारताशिवाय जगाला जोडू शकत नाही, अशी उधळलेली स्तुतीसुमने प्रेमापोटी निश्‍चितच नाही.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn