Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

दसर्‍याच्या दिवशी महाराष्ट्र, उत्तरप्रदेश आणि राजस्थान येथे धर्मांधांकडून १३ ठिकाणी हिंसाचार !

देशभरात धर्मांधांचा वाढता उन्माद पहाता
शासन अस्तित्वात आहे का, असा प्रश्‍न पडतो !
      नवी देहली - दसर्‍याच्या कालावधीत महाराष्ट्रात २ ठिकाणी, मध्यप्रदेशमध्ये १, उत्तरप्रदेशमध्ये ९ आणि राजस्थानमध्ये १ अशा प्रकारे ४ राज्यांमध्ये १३ ठिकाणी हिंसाचार झाला. यातील बहुतेक घटनांत धर्मांधांचा हात असल्याचे समोर आले आहे. या घटनांमध्ये एकूण २ जण ठार, तर अनेकजण घायाळ झाले. 
------
महाराष्ट्र 
कारंजा (वाशिम) येथे दुर्गामूर्ती विसर्जन मिरवणुकीवर धर्मांधांकडून दगडफेक !
विटंबना ! ६ घंटे मिरवणूक थांबली ! ३ हिंदू घायाळ !
      कारंजा - वाद्य वाजवण्याच्या कारणावरून धर्मांधांनी येथील नवदुर्गा विसर्जन मंडळाच्या मिरवणुकीवर दगडफेक केली. यात श्री नवदुर्गादेवीच्या मूर्तीची विटंबना झाली, तसेच ३ हिंदू घायाळ झाले. ही घटना शुक्रवार, २३ ऑक्टोबरला रात्री ८.३० च्या सुमारास स्थानिक बिबीसाबपुरा परिसरात घडली. (हिंदूंनो, धार्मिक सणांच्या वेळी होणार्‍या दंगली टाळण्यासाठी मिरवणुकींना सरंक्षण देणारी सक्षम तरुणांची पथके हवीत ! - संपादक) मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आरोपींना अटक होईपर्यंत दुर्गामूर्ती विसर्जन न करण्याचा आग्रही निर्णय घेतल्याने ६ घंटे विसर्जन मिरवणूक जागेवरच थांबली होती. (दंगलखोरांना अटक होण्यासाठी हिंदूंना देवतेचे विसर्जन सहा घंटे थांबवावे लागणे, हे लज्जास्पद आहे ! भाजप शासनाने धर्मांधांवर कठोर कारवाई करावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे ! - संपादक) अखेर पोलीस, महसूल प्रशासन, लोकप्रतिनिधी आदींनी मंडळाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि एका धर्मांधास अटक केली. त्यानंतर दुसर्‍या दिवशी पहाटे मिरवणूक परत चालू झाली. या प्रकरणी चौदा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गुडगाव (हरियाणा) येथे शिवसैनिकांनी पाक कलाकारांचा कार्यक्रम उधळला

 • घोषणा दिल्या !  
 •  झेंडा फेकून दिला !
शत्रूदेशाशी संबंधित कार्यक्रमांना देशात होत असलेला राष्ट्रप्रेमीचा
विरोध
विचारात घेऊन शासनाने देशहितकारी धोरण ठरवले पाहिजे !

      नवी देेहली - गुडगाव (हरियाणा) येथे आयोजित करण्यात आलेला पाकिस्तानी कलाकारांचा कार्यक्रम शिवसैनिकांकडून उधळून लावला गेला. या वेळी शिवसैनिकांनी पाकविरोधात जोरदार घोषणा देऊन सभागृह दणाणून सोडले, तसेच व्यासपिठावरील पाकचा झेंडा उचलून फेकून दिला. शिवसैनिक निघून गेल्यानंतर आयोजकांकडून पोलीस बंदोबस्तात पुन्हा कार्यक्रम चालू करण्यात आला.
     येथील एम्.सी.जी. खुल्या नाट्यगृहामध्ये २४ ऑक्टोबरच्या रात्री पाकिस्तानी कलाकारांच्या नाटकाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम चालू असतांनाच पाकविरोधात घोषणा देत काही शिवसैनिक व्यासपिठावर गेले आणि कार्यक्रम बंद पाडला. काही वेळाने हा कार्यक्रम पुन्हा चालू झाला. व्यासपिठावर भारत आणि पाक यांचे ध्वज लावण्यात आले होते. शिवसैनिकांनी यातील पाकचा ध्वज उचलून फेकून दिला.

पाककडून सलग दुसर्‍या दिवशीही गोळीबार; २ भारतीय नागरिक घायाळ

शासनाने आता पाकशी मैत्रीचे स्वप्न न पहाता त्याच्यावर
आक्रमण करून ही डोकेदुखी कायमची संपवावी, अशी समस्त जनतेची अपेक्षा आहे !
     नवी देहली - कुरापतखोर पाकने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय सीमेत सलग दुसर्‍या दिवशी गोळीबार केला. या आक्रणात २ भारतीय नागरिक घायाळ झाले. पाकने २४ ऑक्टोबर या दिवशी रात्री ९ ते ते पहाटे ५ या कालावधीत सांबामधील १४ ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोळीबार केला. पाकच्या या गोळीबाराला सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिले. पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यास आरंभ झाल्यामुळे सीमेवरील सैन्य दलांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.

(म्हणे) सनातनला मान दिला जातो, याचे वाईट वाटते !

पणजी (गोवा) येथील मराठी साहित्य संमेलनात अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विषयावर चर्चासत्र
दैनिक गोवादूतचे संपादक सचिन परब यांचा सनातनद्वेष उघड !
     पणजी, २५ ऑक्टोबर (वार्ता.) आज डॉ. दाभोलकर, प्रा. कलबुर्गी आणि पानसरे सरांना मारले. त्या-त्या वेळेस सनातन संस्थेवर बोट ठेवले गेले. विचार पटत नाहीत; म्हणून काय त्यांचा खून करायचा ? इतकी नीच विचारसरणी ? आणि त्याला धर्म आणि संस्कृती यांचा आधार द्यायचा ? आमच्या संस्कृतीबद्दल बोलण्याचा अधिकार तरी आहे का ? अक्कल तरी आहे का ? हे सनातन आपल्याकडे आहे, आपल्या बरोबर आहे, आपल्या सोबत वावरत आहे. याच्याविषयी मला तरी अत्यंत वाईट वाटते. मी इथे जगतो आहे, जिथे सनातनला मान दिला जातो, त्याच्याबद्दल मला खूप वाईट वाटते, अशा शब्दांत दैनिक गोवा दूतचे संपादक सचिन परब यांनी सनातनवर गरळओक केली.

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवणारी पुरोगामी विचारवंतांची वक्तव्ये !

     पुरोगामी विचारवंतांच्या हत्या झाल्यावरून सनातन संस्था आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्यावर दोषारोप होत आहेत. याविषयी कोणताही पुरावा नाही, तरीही धर्मभावना दुखावल्यावरून चिडून हिंदुत्ववाद्यांनी या विचारवंतांच्या हत्या केल्या आहेत, असे काही पुरोगाम्यांना अजूनही वाटते. त्यात तथ्य आहे, असे क्षणभर गहीत धरले, तरी त्यामागील मूळ कारणेही शोधणे आवश्यक आहे. कट्टर हिंदूंना विचारस्वातंत्र्य मान्य नाही, ते धर्मांध आहेत, असे एकतर्फी आरोप करणारे या घटनांचा सर्वांगांनी विचार करत नाहीत. प्रसारमाध्यमेही विचारवंतांच्या कोणत्या विचारांवरून हिंदू भडकले असतील, ते समोर आणत नाहीत. त्यासाठी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी पुरोगामी विचारवंतांची वक्तव्ये धर्मश्रद्ध हिंदूंसाठी किती दुखरी असतात, याची उदाहरणे खाली दिली आहेत. या वक्तव्यांचे समर्थन विचारस्वातंत्र्य म्हणून करता येईल का, हे हिंदूंनी ठरवावे.
१. भगवद्गीता हा जाळून टाकण्याचाच ग्रंथ ! - अग्नी श्रीधर, कार्याध्यक्ष, न्यायक्कागी संघटना, बेंगळुरू, कर्नाटक. (दैनिक सनातन प्रभात, ४.३.१५)
२. गर्भवती पत्नीला वनात पाठवणारा राम एक खुनी (हत्यारा) आहे ! - प्रा. के.एस्. भगवान, मंगळुरू, कर्नाटक (दैनिक सनातन प्रभात, १९.८.२०१५) (क्रमश: )

सनातन अपकीर्तीच्या षड्यंत्राच्या बाहेर येऊन हिंदुत्वाचा भगवा ध्वज फडकवेलच ! - अभय वर्तक, प्रवक्ते

उपस्थितांशी संवाद साधतांना श्री. अभय वर्तक
मुंबई येथे जाहीर जनसंवाद सभा
     दादर (मुंबई), २५ ऑक्टोबर (वार्ता.) - सनातनला गुन्हेगार ठरवण्यासाठी आंतरराष्ट्रीय षड्यंत्र रचले गेले. समीर गायकवाडला पकडल्यावर सनातनच्या आश्रमाबाहेर आंतरराष्ट्रीय माध्यमांचे प्रतिनिधी आले, तेव्हा आम्हाला आश्‍चर्य वाटले. काँग्रेस, राष्ट्रवादी यांचे गुन्हेगार कार्यकर्ते मोकाट फिरत आहेत. माध्यमे त्यांच्यावर बंदी आणण्याविषयी काही बोलत नाहीत. माध्यमांनी त्यांचा विश्‍वास गमावला आहे. सनातनला फासावर चढवायचे, हेच यांचे एकमेव ध्येय होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर सनातनला पूर्णतः नष्ट करण्याचे षड्यंत्र रचले जाऊनही सनातन ईश्‍वराच्या कृपेने त्या षड्यंत्राच्या बाहेर पडून हिंदुत्वाचा भगवा ध्वज फडकवेलच, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी येथील जनसंवाद सभेत केले.

सनातनवरील संभाव्य बंदीच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर !

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते
     नंदुरबार, २५ ऑक्टोबर (वार्ता.) - येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २३ ऑक्टोबर या दिवशी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना सनातनवरील संभाव्य बंदीच्या विरोधात निवदेन देण्यात आले. याचबरोबर नंदुरबार शहरातील काही घरांमधून चालणार्‍या गोवंशाच्या कत्तली थांबवणे आणि शहरातील बागवान गल्लीतील टीपू सुलतान चौक नावाचा वादग्रस्त फलक हटवणे, या मागण्यांचेही निवेदन समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.

श्रीराम सेनेच्या १० धर्माभिमान्यांना विनाकारण, तर केवळ ४ दंगलखोर धर्मांधांना अटक

लोंढा येथे श्रीराम सेनेच्या सभेत दगडफेक केल्याचे प्रकरण
पोलिसांनी काठी तुटेपर्यंत केलेल्या मारहाणीत एक धर्माभिमानी हिंदु गंभीर घायाळ !
     लोंढा/खानापूर (कर्नाटक) - २१ ऑक्टोबर या दिवशी लोंढा येथे श्रीराम सेनेने आयोजित केलेल्या धर्मजागरण सभेत एका वक्त्याच्या भाषणाच्या वेळी सुमारे २०० धर्मांधांनी दगडफेक केलेली असतांनाही पोलिसांनी श्रीराम सेनेच्या १० धर्माभिमान्यांना अटक करून त्यांच्यावर विविध गुन्हे प्रविष्ट केले आहेत. या प्रकरणी केवळ ४ धर्मांधांना पोलिसांनी अटक केल्यामुळे हिंदूंमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

इराक युद्धाच्या प्रकरणी ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी क्षमा मागितली !

किती भारतीय राज्यकर्ते त्यांनी केलेल्या चुकांविषयी अशी जाहीर क्षमा मागतात ?
     लंडन - एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी इराक युद्धाच्या प्रकरणात क्षमा मागितली आहे. (आता क्षमा मागून काय उपयोग ? आय.एस्.आय.एस्. अस्तित्वात येण्यास हे युद्ध कारणीभूत ठरले. हे युद्ध टाळले असते, तर आज जगाची स्थिती वेगळी असती ! - संपादक) वर्ष २००३ मध्ये पुकारण्यात आलेल्या युद्धाचे नियोजन योग्य प्रकारे करण्यात आले नव्हते. आम्हाला गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेली माहिती चुकीची होती. या नियोजनातील काही चुकांसाठी मी क्षमा मागतो. सद्दाम हुसेन यांची राजवट उलथवून टाकल्यावर तेथे काय होईल, हे समजण्यास आम्ही अल्प पडलो, असेही ते म्हणाले. आय.एस्.आय.एस्.च्या उदयाला इराक युद्ध हे मुख्य कारण होते का ?, असा प्रश्‍नही ब्लेअर यांना सूत्रसंचालकाने विचारला. त्या वेळी त्यांनी यात थोडे तथ्य आहेे. ज्यांनी सद्दाम हुसेन यांना २००३ मध्ये हटवले, ते वर्ष २०१५ च्या परिस्थितीला कारणीभूत नाहीत, असे तुम्ही म्हणू शकत नाही, असे त्यांनी सांगितले.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेचे माजी अध्यक्ष जॉन अ‍ॅश यांना अटक

भारताला रोखण्यासाठी चीन कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतो, याचे हे उदाहरण ! अ
शा चीनशी दोन हात करण्यास सत्ताधारी सिद्ध आहेत का ?
सुरक्षा परिषदेत भारताला रोखण्यासाठी चीनने दिली होती १३ लाख डॉलर्सची लाच !
     नवी देहली - सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळू नये, यासाठी चीनकडून सुमारे १३ लाख डॉलर्सची लाच दिली गेली. लाच घेणारे संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेचे माजी अध्यक्ष जॉन अ‍ॅश यांना नुकतीच अटक करण्यात आली.
१. संयुक्त राष्ट्र्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी सदस्यत्व मिळावे, अशी मागणी भारताने केली आहे. 
२. भारताच्या मागणीला अनेक राष्ट्रांनी पाठिंबा दर्शवला असला, तरी चीन आणि पाकिस्तान यांनी विरोध केला आहे. 

अल्पवयीन मुलींवरील बलात्कारांना भ्रमणभाष कारणीभूत ! - आझम खान

उत्तरप्रदेशच्या समाजवादी शासनाने बलात्कार्‍यांना शिक्षा होण्यासाठी 
काय प्रयत्न केेले ?, हेही मंत्री आझम खान यांनी सांगावे !
    नवी देहली - अल्पवयीन मुलींवर होणार्‍या बलात्कारांना भ्रमणभाष कारणीभूत आहेत, असे विधान समाजवादी पक्षाचे नेते तथा उत्तरप्रदेशचे मंत्री आझम खान यांनी केले आहे. तरुणांकडून या वस्तूंचा चुकीचा वापर होत असल्यामुळेच या घटनांमध्ये वाढ होत आहे, असेही ते म्हणाले. खान म्हणाले, आज अडीच वर्षांच्या मुलीवरही बलात्कार होतो. यास भ्रमणभाष हेच कारण आहे. गावागावांत आज नको त्या गोष्टी या भ्रमणभाषवर डाऊनलोड केल्या जात आहेत. तरुणांकडून या भ्रमणभाषवर अश्‍लील चित्रपट पाहिले जातात. त्यामुळे तरुणांचे लक्ष चांगल्या गोष्टींकडे वळवण्यासाठी केंद्रशासनाने पावले उचलावीत.

महिलांनी माध्यमांत काम करणे इस्लामविरोधी ! - अन्सरुल्लाह बांगला टीमचा फतवा

हिंदु धर्म स्त्रीविरोधी आहे, अशी टीका करणारे स्त्रीमुक्तीवाले या फतव्याविषयी बोलतील का ? 
     ढाका - इस्लामी कायद्यामध्ये महिलांना प्रसारमाध्यमांत काम करण्याची अनुमती नाही. त्यामुळे येथील माध्यम क्षेत्रात कार्यरत असलेल्या आस्थापनांनी त्यांच्याकडील महिला कर्मचार्‍यांना तात्काळ कामावरून काढून टाकावे, असा फतवा बांगलादेशमधील बंदी घालण्यात आलेल्या अन्सरुल्लाह बांगला टीम या मूलतत्त्ववादी संघटनेने काढला आहे. या फतव्यामुळे बांगलादेशमधील महिला पत्रकारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बांगलादेशमध्ये झालेल्या चारही ब्लॉगर्सच्या हत्येचे दायित्व स्वीकारलेली ही संघटना आहे.

गोरक्षक प्रशांत पुजारी हत्येप्रकरणी आणखी एका धर्मांधास अटक !

लोकहो, दादरी प्रकरण लावून धरणार्‍या वृत्तवाहिन्यांपैकी
एकही वृत्तवाहिनी याविषयीचे वृत्त दाखवत नाही, हे लक्षात घ्या !
आतापर्यंत ९ धर्मांधांना अटक
      मंगळुरू - मुडबिद्री येथील बजरंग दलाचे २९ वर्षीय कार्यकर्ते तथा गोरक्षक प्रशांत पुजारी यांच्या निर्घृण हत्येच्या प्रकरणी महंमद इम्तियाझ गन्तालाकत्ते या धर्मांधास अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या एकूण आरोपीची संख्य ९ झाली आहे. महंमद हा दुबईला पळून जात होता. मुंबई विमानतळावर तो दुबईला जाणार्‍या विमानात चढत असतांना पोलिसांनी त्यास अटक केली. तत्पूर्वी पोलिसांनी त्याच्या विरुद्ध देशातील सर्व विमानतळांवर अतीदक्षतेची चेतावणी दिली होती. अतिरिक्त पोलीस संचालक आलोक मोहन यांनी ही माहिती पत्रकारांना दिली.

मुंबई येथील जनसंवाद सभेतील मान्यवरांचे विचार

जनसंवाद सभेची वैशिष्ट्ये
 • सनातनचे आश्रम आणि संस्थेचे कार्य यांविषयी धर्माभिमान्यांचे गौरवोद्गार
 • पॉवरपॉईंटद्वारे प्रोजेक्टरवर उपस्थितांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाविषयीची माहिती आणि 
 •  वक्त्यांच्या ओजस्वी भाषणांना उपस्थितांकडून टाळ्यांद्वारे प्रतिसाद
ईश्‍वरप्राप्तीच्या माध्यमातून एकसंध समाजाची निर्मिती
करणारे सनातनचे आश्रम !
- पू. (कु.) अनुराधा वाडेकर, सनातन संस्था
     सनातनच्या आश्रमातील विविध सेवांच्या माध्यमातून साधक तन-मनाचा त्याग आणि अहं-निर्मूलन करून ईश्‍वराच्या समीप जाण्याचा प्रयत्न करतात. ईश्‍वरप्राप्तीच्या माध्यमातून एकसंध समाज निर्माण करता येतो, याचे उदाहरण सनातनच्या आश्रमात पहायला मिळते. सनातनच्या रामनाथी आश्रमाला भेट दिल्यामुळे आतापर्यंत अध्यात्मप्रसार, राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती यांविषयी केलेल्या कार्याची कल्पना अधिक स्पष्ट होईल. ही पवित्र वास्तू पहाण्यासाठी आपण अवश्य यावे, ही नम्र विनंती !

कल्याणमध्ये धर्मांधांकडून नवरात्र उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांवर दगडफेक आणि मारहाण !

 • दोन दिवसांनंतरही पोलिसांकडून गुन्हा न नोंदवला गेल्याने हिंदू संतप्त !
 • ध्वनीक्षेपक यंत्रणेची मोडतोड !
      कल्याण, २५ ऑक्टोंबर (वार्ता.) - स्वामी सहजानंद मित्र मंडळाचे कार्यकर्ते श्री दुर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी जाण्यापूर्वी मंडपात मंदिर वही बनाऐंगे हे गाणे लावून ऐकत होते. त्या वेळी काही धर्मांधांनी या कार्यकत्यांवर आक्रमण केले आणि त्यांच्यावर दगडफेक केली. येथील सहजानंद चौक परिसरात ही घटना घडली; मात्र एवढा गंभीर प्रकार घडूनही या प्रकरणी तक्रार दाखल करण्यास पोलिसांकडून दिरंगाई होत असल्यामुळे हिंदूंंमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
१. काळी मशीद परिसरातील काही धर्मांधांनी या गाण्यावर आक्षेप घेत हे गाणे बंद करण्यास भाग पाडले.
२. त्यानंतर धर्मांधांनी ध्वनीक्षेपक यंत्रणेेची मोडतोड केली.

केंद्रशासनाच्या नोकर्‍यांतील छोट्या पदांसाठी मुलाखतीची अट रहित ! - पंतप्रधान

    नवी देहली - केंद्रशासनाच्या नोकर्‍यांतील छोट्या पदांसाठी यापुढे मुलाखत न घेण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात केली. या आदेशाची १ जानेवारी २०१६ पासून अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. एक किंवा दोन मिनिटांच्या मुलाखतीत समोरील व्यक्तीची संपूर्णपणे पारख झाल्याचे माझ्यातरी ऐकीवात नाही, असे सांगत कोणाच्याही शिफारसीवरून या नोकर्‍या देण्यात येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भारत हे हिंदु राष्ट्र व्हायला हवे ! - १००८ महामंडलेश्‍वर रघुनाथ महाराज (देवबाप्पा)

सन्मान स्वीकारतांना डावीकडून पाचवे १००८ महामंडलेश्‍वर रघुनाथ महाराज (देवबाप्पा)
हिंदु महासभेचा शताब्दी महोत्सव आणि पुरस्कार प्रदान सोहळ्याचा कार्यक्रम
      जळगाव, २५ ऑक्टोबर (वार्ता.) - भारत हे हिंदु राष्ट्र व्हायला हवे, कारण ही वैकुंठ भूमी आहे. हिंदु राष्ट्र हे भारतातच व्हायला हवे कारण संपूर्ण जगाला भारताने मार्गदर्शन केले आहे. चंद्र-सूर्य निर्माण झाले, तेव्हा हिंदु होते आणि ते असेपर्यंत हिंदु रहाणार आहेत, असे मार्गदर्शन १००८ महामंडलेश्‍वर रघुनाथ महाराज (देवबाप्पा) तथा फरशिवाले बाबा यांनी येथे केले. या वर्षी हिंदु महासभेच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाली त्या निमित्ताने जळगाव येथे हिंदु महासभेच्या वतीने शताब्दी सोहळा आयोजित करण्यात आला होता.

हिमानीताईंचा हिंदुत्वाचा वारसा नेटाने पुढे चालवण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !

डावीकडून सर्वश्री अनिल पवार, उमाकांत केंढे,
दीपक टिळक, श्रीहर्ष सावरकर, सात्यकी सावरकर
 • रणरागिणी हिमानीताई सावरकर यांची शोकसभा
 • हिंदुत्वनिष्ठांकडून हिंदु राष्ट्राची स्थापना अन् अखंड भारताची निर्मिती यांसाठी कृतीशील होण्याचे अभिवचन !
     पुणे, २५ ऑक्टोबर (वार्ता.) - हिंदुत्वाची पताका अविरत खांद्यावर घेऊन हिंदु राष्ट्र अन् अखंड भारत यांच्या निर्माणासाठी कार्यरत असणार्‍या श्रीमती हिमानीताई सावरकर म्हणजे खरोखर रणरागिणीच होत्या. दुर्धर आजाराशी झुंज देत ११ ऑक्टोबर या दिवशी वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. श्रीमती हिमानीताईंच्या स्मृतीप्रीत्यर्थ येथील भारत इतिहास संशोधन मंडळामध्ये २५ ऑक्टोबर या दिवशी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या श्रद्धांजली सभेत उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनी हिंंदुत्वाचा वारसा नेटाने पुढे चालवण्याचा निर्धार करून हिमानीताईंना श्रद्धांजली अर्पित केली. या प्रसंगी व्यासपिठावर टिळक महाराष्ट्र विद्यापिठाचे दीपक टिळक, महाराष्ट्र प्रदेश हिंदु महासभेचे श्री. अनिल पवार, पुणे नगर हिंदु महासभेचे अध्यक्ष श्री. उमाकांत केंढे, नारायण दामोदर सावरकर यांचे कनिष्ठ पुत्र श्रीहर्ष सावरकर, हिमानीताई यांचे पुत्र सात्यकी सावरकर उपस्थित होते. शांतीमंत्र म्हणून श्रद्धांजली सभेची सांगता करण्यात आली.

भगुर (नाशिक) येथील यात्रोत्सवात पोलिसांकडून भाविक आणि विक्रेते यांना मारहाण !

यात्रोत्सव अन् दुकाने बलपूर्वक बंद करणे भाग पाडले !
      नाशिक - विजयादशमीच्या दिवशी भगुर येथील देवीच्या यात्रोत्सवात रात्री साडेअकराच्या सुमारास देवळाली कॅम्प येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी भाविक, तसेच विक्रेते यांना मारहाण करून यात्रोत्सव आणि दुकाने बलपूर्वक अर्धा घंटा आधीच बंद करण्यास भाग पाडले.
१. भगूर येथील श्री रेणुका माता मंदिराच्या यात्रेसाठी विजयादशमीच्या दिवशी जिल्हाभरातूून भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
२. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास उशीर झाल्याचे कारण पुढे करून वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी शांतपणे, रांगेत दर्शन घेणार्‍या भाविकांवरही विनाकरण दंडुके चालवून त्यांना मारहाण केली.

कोंढवा (पुणे) येथील एम्आयएम्चे आमदार अकबरुद्दीन ओवैसींच्या सभेला पोलिसांनी अनुमती नाकारली !

राष्ट्रद्रोह्यांचे उदात्तीकरण करणारे आणि हिंदूंना संपवण्याची भाषा करणारे
नेते असणार्‍या एम्आयएम् पक्षावर भाजप शासनाने बंदी घालावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
     पुणे, २५ ऑक्टोबर - महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी कोंढवा भागामध्ये मजलिस-ए-इत्तेहादुल-मुस्लिमीनचे (एम्आयएम्चे) नेते आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांची सभा आणि रॅली आयोजित करण्यात आली होती. या दोन्हीला पोलिसांनी कायदा-सुव्यवस्थेला बाधा निर्माण होण्याची शक्यता असल्याचे कारण देत अनुमती नाकारली आहे.
     शिवसेनेचे भरत चौधरी यांचे जात प्रमाणपत्र न्यायालयाने अवैध ठरवल्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रहित करण्यात आले होते. त्यामुळे येथील प्रभाग क्रमांक ६३ मध्ये पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी एम्आयएम्नेही उमेदवार उभा केला आहे.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने श्री दुर्गामाता दौडच्या माध्यमातून मुंबई, ठाणे आणि पालघर येथे जनजागृती

राष्ट्र आणि धर्मकार्यात युवक अन् हिंदु बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन
      मुंबई - श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने मुंबई आणि ठाणे येथील विविध भागांत दादर, कांजुरमार्ग, चुनाभट्टी, वडाळा, कल्याण, बांद्रा, शिवडी, नालासोपारा आदी ठिकाणी नवरात्र आणि दसर्‍याच्या निमित्ताने दुर्गादौडी घेण्यात आल्या. या श्री दुर्गादौडीमध्ये पांढरे सदरे आणि भगवा फेटा हा पारंपारिक पोषाख परिधान करत, तलवार अन् अन्य शस्त्रांचे प्रदर्शन करून प्राचीन काळातील युद्ध कौशल्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यात आली. या वेळी शिवचरित्रातील प्रेरणादायी प्रसंग आणि प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. श्री तुळजा भवानीचा उदो उदो करीत या श्री दुर्गामाता दौडमध्ये सहभागी होणार्‍या तरुणांनी हातात भगवा ध्वज घेऊन संचलनही केले. श्री शिवरायांनी संपूर्ण आयुष्यात देव, देश आणि धर्म यांसाठी मुसलमान सत्ताधीशांशी शेकडो रणसंग्राम केले. क्षणाचाही विसावा न घेता केवळ हिंदु धर्म आणि हिंदु समाजासाठी अखंड दौडले, लढले, झगडले. त्यामुळे नियमितपणे राष्ट्र आणि धर्मकार्यात युवक अन् हिंदु बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विविध ठिकाणी झालेल्या या दौडीमध्ये करण्यात आले.

(म्हणे) नथुराम गोडसे हे देशातील प्रथम अतिरेकी !

नथुराम गोडसे यांची पुण्यतिथी साजरी करण्यास हिंदुद्वेषी काँग्रेसचा विरोध 
     मुंबई - नथुराम गोडसे यांची पुण्यतिथी १५ नोव्हेंबर या दिवशी आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाने महात्मा गांधीचा वध करणारे नथुराम गोडसे यांची पुण्यतिथी साजरी करण्यास विरोध करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. महाराष्ट्र विधानसभेतील काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते श्री. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, काँग्रेस महात्मा गांधींचा अनादर सहन करणार नाही. नथुराम गोडसे हे देशातील प्रथम अतिरेकी होते. (गांधींचा वध केला; म्हणून नथुराम गोडसे यांना अतिरेकी म्हणणार्‍या काँग्रेसवाल्यांनी कधी गोडसे यांच्या देशभक्तीविषयी जाणून घेतले आहे का ? सत्ता हाती होती, त्या वेळी काँग्रेसच्या राज्यकर्त्यांनी धर्मांध अतिरेक्यांना पोसण्याचेच काम केले. अशा काँग्रेसवाल्यांना गोडसे अतिरेकी वाटतात, यातून त्यांचा हिंदुद्वेषच प्रकट होतो ! - संपादक)

३० ग्रॅमचा प्रसादरूपी लाडू ५० ग्रॅम दाखवून भक्तांची फसवणूक !

 • पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा आणखी एक घोटाळा उघड !
 • भाविकांनो, मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम जाणा !
 • हिंदूंनो, प्रसादाच्या माध्यमातूनही भाविकांना लुबाडू पहाणार्‍यांना खडसवण्यासाठी संघटित व्हा !
    कोल्हापूर, २५ ऑक्टोबर (वार्ता.) - पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीद्वारे दिल्या जाणार्‍या लाडूच्या प्रसादात संबंधित ठेकेदाराकडून भक्तांची फसवणूक केली जात आहे. ३० ग्रॅमचा लाडू ५० ग्रॅम वजनाचा म्हणून विकला जात आहे. (देवाच्या प्रसादातही भ्रष्टाचार करून भक्तांची फसवणूक करणारी शासकीय मंदिर समिती किती दिवस चालू देणार ? - संपादक)
      लाडूत काजू-बेदाण्याचे तुकडेही दिसत नाहीत, तसेच सिद्ध झालेल्या कळ्या आणून तो लाडू केला जात आहे. लाडू फुटून अनेक पाकिटांत केवळ कळ्या राहिल्या आहेत. याविषयी देवस्थानाकडे भक्तांच्या तक्रारी प्रविष्ट झाल्या आहेत. या कारणास्तव १९ ऑक्टोबर या दिवशी देवस्थान समितीने ठेकेदाराला नोटीस दिली आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने चोपडा (जिल्हा जळगाव) येथे शस्त्रपूजन

श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करतांना हिंदुत्ववादी
     चोपडा - येथील शिवाजी चौकात प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही दसर्‍यानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शस्त्रपूजन करण्यात आले. नगरपालिका उपनगराध्यक्ष श्री. जीवनभाऊ चौधरी यांच्या हस्ते श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन आणि माल्यार्पण, तसेच शस्त्रपूजन करण्यात आले. या वेळी एकमेकांना दसर्‍याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
     या वेळी चोपडा उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक कैलास वाघ, गिरीराज ग्रुपचे दीपक पाटील, शिवसेना युवा उपजिल्हाप्रमुख दीपक चौधरी, अशोक पाटील, भाजपचे माजी शहराध्यक्ष राजू शर्मा, युवा शक्ती फाऊंडेशनचे सागर औतारी, जितेंद्र शिंपी, डॉ. शेखर वारके, स्वराज्य निर्माण सेनेचे महेंद्र भामरे, सुनील सोनगिरे, गजेंद्र जैस्वाल, विवेक जैस्वाल, चोपडा तालुका पत्रकार संघाचे मनोज जाधव, श्रीकांत नेवे, शाम जाधव, तुषार सूर्यवंशी, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि अन्य यांनीही या वेळी शस्त्रपूजन केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आपट्याची पाने देऊन एकमेकांना दसर्‍याच्या शुभेच्छाही देण्यात आल्या.

आज लेखक-व्याख्याते शेवडे कुटुंबियांच्या तीन पिढ्यांचा सत्कार

     मुंबई - येथील चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या हीरक महोत्सवानिमित्त एका कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते शेवडे घराण्याच्या तीन पिढ्यांचा आज २६ ऑक्टोबरला सत्कार होणार आहे. २७ ऑक्टोबर या दिवशी भारताचार्य प्रा. सु.ग.शेवडे हे शहाजीराजांची चातुर्यनीती, २८ ऑक्टोबर या दिवशी डॉ. सच्चिदानंद शेवड़े हे शिवरायांची युद्धनीती आणि २९ ऑक्टोबर या दिवशी डॉ. परीक्षित शेवडे हे शंभूराजांची राजनीती या विषयांवर व्याख्याने देणार आहेत.

फलक प्रसिद्धीकरता

देशाच्या विकासातील अडथळे !
    गेल्या काही दिवसांमध्ये उत्तरप्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांमध्ये धर्मांधांकडून एकूण १३ ठिकाणी हिंसाचार माजवण्यात आला. यात खाजगी मालमत्तेची हानी करण्यात आली, तसेच २ जण ठार, तर अनेक जण घायाळ झाले.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
    Uttarpradesh, Maharashtra aur Rajasthan in rajyome
dharmandhone 13 jagahapar dangal machai.  
    yah kab tak chalega?
जागो !
    उत्तरप्रदेश, महाराष्ट्र और राजस्थान इन राज्योमें धर्मांधोंसे १३ जगहपर दंगल. 
    यह कब तक चलेगा ?

हिंदु जनजागृती समितीकडून १००८ महामंडलेश्‍वर रघुनाथ महाराज (देवबाप्पा) आणि प.पू. रत्नदेव सूरीजी महाराज यांची भेट

डावीकडून दूसरे १००८ महामंडलेश्‍वर रघुनाथ महाराज
(देवबाप्पा) आणि प.पू. रत्नदेव सूरीजी महाराज
     जळगाव - १००८ महामंडलेश्‍वर रघुनाथ महाराज (देवबाप्पा) उपाख्य फरशीवाले बाबा आणि प.पू. रत्नदेव सूरीजी महाराज उपाख्य अद्भुत बाबाजी यांची हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक श्री. विजय पाटील, कु. प्रतिक्षा कोरगावकर आणि श्री. किरण दुसे यांनी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. त्या वेळी हार, श्रीफळ आणि भेटवस्तू आणि दैनिक, साप्ताहिक सनातन प्रभात भेट देण्यात आले. त्या वेळी त्यांना समितीच्या कार्याविषयी माहिती देण्यात आली. या प्रसंगी प.पू. रत्नदेव सूरीजी महाराज तथा अद्भूत बाबाजी यांनी तुम्ही राजस्थानला या, त्या ठिकाणी मी तुम्हाला सहकार्य करीन, असे सांगून आशिर्वाद दिले. १००८ महामंडलेश्‍वर रघुनाथ महाराज (देवबाप्पा) तथा फरशीवाले बाबा आणि प.पू. रत्नदेव सूरीजी महाराज तथा अद्भुत बाबाजी हे हिंदु महासभेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त जळगाव येथे आले होते.

आताच्या स्पर्धात्मक युगात जगात सर्व प्रकारच्या क्षेत्रात अग्रेसर होण्यासाठी भारताने नुसत्या घोषणा देऊन चालणार नाही, तर आत्मचिंतन करायला हवे !

     हिंदुस्थानमधल्या बुद्धीवान वर्गाने युरोपीय वैचारिक प्रवाहावर लक्ष देऊन त्याचा अभ्यास केला पाहिजे. बहुसांस्कृतीकरणाचा अस्त कशाने झाला ? हा अभ्यासाचा विषय आहे. काँग्रेसच्या हिंदी राष्ट्रवादाचे आकर्षण अल्पसंख्यांकांना का वाटले नाही ? तुष्टीकरणाच्या धोरणाचे काय परिणाम होतात ? राखीव स्थानांची मागणी १९०६ मध्ये झाली. तिने विभाजनाचा मार्ग निर्माण केला. राखीव स्थानांचे राजकारण अजून आवश्यक आहे का ? या विषयावर राष्ट्रीय भावनिक नाही, तर बौद्धीक पातळीवर चर्चा झाली पाहिजे. निवडणुकीचे राजकारण मनात ठेवून दोन टक्क्यांच्या कोट्यामधून पाव टक्का स्थाने घोषित करायच्या, हा हास्यास्पद खेळ आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या ओडिशा राज्यातील प्रसारकार्याचा सप्टेंबर २०१५ मधील आढावा

१. गणेशोत्सवानिमित्त शाळांमध्ये श्री गणपतीची वैशिष्ट्ये आणि 
उपासना या विषयावर प्रवचने अन् प्रश्‍नमंजुषा 
अ. सरस्वती विद्यालय, बिरमित्रापूर येथे इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी श्री गणपतीची वैशिष्ट्ये आणि उपासना या विषयावर प्रवचन अन् प्रश्‍नमंजुषा हे कार्यक्रम घेण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापकांनी इतर वर्गांमध्येही प्रवचन आणि प्रश्‍नमंजुषा हे कार्यक्रम अन्य शिक्षकांच्या साहाय्याने घेणार असल्याचे सांगितले.
आ. साई वर्ल्ड इंटरनॅशनल स्कूल, राऊरकेला येथे इयत्ता ४ थी ते ८ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी वरील प्रमाणेच प्रवचन आणि प्रश्‍नमंजुषा आयोजित करण्यात आली आहे.

देशी गायीवर अर्थव्यवस्था असणारे गाव रामणवाडी (जिल्हा कोल्हापूर) !

१. गायींचे महत्त्व कळल्यामुळे गावकर्‍यांनी 
पाळल्या ८० देशी गायी !
    देशी गायी भरपूर होत्या, त्या वेळी गोमूत्र आणि शेणाचे महत्त्व कोणाला ठाऊक नव्हते; पण आता गायी कमी झाल्या आणि गोमूत्राचे महत्त्व कळले. त्यामुळे चक्क देशी गायींच्या गोमूत्राची डेअरी चालू करावी लागली आहे. किटलीतून डेअरीत दूध घालायला यावे, तशा पद्धतीने किटलीतूनच गोमूत्र प्रतिदिन जमा केले जात आहे. प्रायोगिक तत्त्वावर गायींच्या पालनाची सामुदायिक शक्ती दिसावी, यासाठी रामणवाडी (ता. राधानगरी, जिल्हा कोल्हापूर) गावात सत्तर ते ऐंशी गायी गावकर्‍यांच्या साहाय्याने पाळल्या. त्या गावाने डेअरी चालू केली आहे. आठ रुपये प्रतिलिटर दराने गोमूत्राची खरेदी केली जात आहे. या गोमूत्राचा औषधी अर्क आणि आयुर्वेद साबणांसाठी वापर होत आहे.

सायबर गुन्ह्यांना आवर घाला !

एखाद्या व्यक्तीच्या भ्रमणभाषवर अचानक पैसे काढण्याच्या यंत्रामधून, तर काहींना खात्यातून सहस्रो किंवा लाखो रुपये काढल्याचा संदेश येतो. ही गोष्ट लक्षात येताच कोणतीही व्यक्ती ते खाते गोठवण्यासाठी अधिकोषात गेली की, तिला तेथील कर्मचारी तक्रारदार व्यक्तीला पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार प्रविष्ट करून त्याची प्रत आणण्यास सांगतात. तक्रारदार व्यक्ती पोलीस ठाण्यात गेल्यावर तेथील पोलीस सायबर गुन्हे शाखेत जाण्याचा सल्ला देतात. तेथे गेल्यानंतर पुन्हा पोलीस ठाण्यात जाण्यास सांगण्यात येते. या प्रकरणात पोलीस तांत्रिक कारणे पुढे करून गुन्हा प्रविष्ट करण्यास टाळाटाळ करतात. सामान्य लोकांना फारशी माहिती नसल्यानेच असे गुन्हे घडत आहेत.

कोजागरी पौर्णिमा (शरद पौर्णिमा)

१. इतिहास : या दिवशी भगवान श्रीकृष्णाने व्रजमंडळात रासोत्सव साजरा केला, असे श्रीमद्भागवतात म्हटले आहे.
२. महत्त्व :
अ. वर्षातील या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वांत जवळ असतो आणि त्यामुळे तो मोठा दिसतो. मूळ चंद्रतत्त्वाचे म्हणजे चंद्रमाचे प्रतिनिधित्व करणारा आणि आपल्याला दिसणारा चंद्र चंद्रमाप्रमाणेच शीतल आणि आल्हाददायक आहे. साधकांना चंद्रासारखी शीतलता ईश्‍वराच्या अवतारांपासून अनुभवता येते, म्हणूनच रामचंद्र, कृष्णचंद्र अशीही नावे राम-कृष्णांना दिली गेली. चंद्राच्या या गुणांमुळेच नक्षत्राणामहं शशी म्हणजे नक्षत्रांमध्ये मी चंद्र आहे, असे भगवान श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्गीतेत (अध्याय १०, श्‍लोक २१) सांगितले आहे.

भारतातील प्रगत प्राचीन तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट नमुना असलेले शहर : मोहेंजोदडो !

उत्खननात सापडलेले मोहेंजोदडो शहराचे अवशेष
     तंत्रज्ञानाच्या या युगातील झगमगीत शहरांनाही मागे टाकेल, अशी सुपरक्लास सिटी सहस्रो वर्षांपूर्वी भारतात होती, ते शहर होते मोहेंजोदडो ! सिंधू संस्कृतीमधील मोहेंजोदडो शहरात हडाप्पा संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत, याची माहिती इतिहासाच्या पुस्तकातून मिळते; परंतु त्यापेक्षा अधिक वैशिष्ट्ये मोहेंजोदडोत प्रत्यक्षात होती. सहस्रो वर्षांपूर्वीचे हे शहर नियोजनपूर्ण उभे करण्यात आले होते. मुंबईतील ट्रॅफिक जॅम आणि खड्ड्यांंच्या रस्त्यांनाही लाजवेल, असे प्रशस्त रस्ते मोहेंजोदडोत होते.

पुरस्कार नाकारणार्‍या पुरोगामी लेखकांनो, पुरस्काराची रक्कम सव्याज परत करा !

अधिवक्ता योगेश जलतारे
     सध्या पुरोगामी लेखकांमध्ये त्यांना विशिष्ट लिखाणासाठी मिळालेले पुरस्कार परत करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. अकस्मात् त्यांना ही उपरती कशी झाली ?, हा संशोधनाचा विषय आहे; पण सामाजिक बांधिलकी म्हणून ते पुरस्कार परत करत आहेत, तर आपण त्याचे कौतुक केले पाहिजे. त्यांच्या पुरस्काराच्या रकमेचा वापरही समाजासाठीच झाला पाहिजे; कारण ती रक्कमही जनतेकडून कररूपाने मिळालेल्या रकमेपैकी आहे. पुरोगाम्यांनी ती रक्कम शासनाला परत करतांना ती चक्रवाढ व्याजाचा दर लावून सव्याज परत करायला हवी. जर त्यांनी तशी केली नाही, तर शासनाने त्यांना बाध्य करायला हवे. नंतर ती रक्कम देशातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकर्‍यांना साहाय्यतानिधी म्हणून देता येईल. त्यामुळे मंदिरांचा पैसा त्या कामी न वापरता केवळ धार्मिक कार्यासाठी वापरता येईल ! - अधिवक्ता योगेश जलतारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.१०.२०१५)

प्रतिकूल परिस्थितीत सनातनच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाणारे जळगाव जिल्ह्यातील वारकरी आणि हिंदुत्ववादी !

या सर्वांचे सनातन संस्थेने आभार मानले आहेत !
१. सनातन संस्था जर बंद पडली, तर हिंदूंना धर्मशिक्षण कोण देणार ? 
- ह.भ.प. प्रसाद महाराज, चोपडा, जळगाव
     जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील ह.भ.प. प्रसाद महाराज यांनी त्यांचे मंगळूर या गावामध्ये कीर्तन चालू असतांना सनातनच्या बाजूने विषय मांडला. ते म्हणाले, सनातन संस्था जर बंद पडली, तर हिंदूंना धर्मशिक्षण कोण देणार ? आज एकमेव सनातन संस्था आहे की, जी हिंदूंना धर्मशिक्षण देते. अशी संस्था बंद पडता कामा नये. त्यासाठी आपण सर्वांनी संस्थेच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.

राष्ट्र धर्माधिष्ठित जीवनप्रणाली स्वीकारलेले पाहिजे - स्वामी विवेकानंद

    तरुणांनो, जर हे राष्ट्र जिवंत रहावं अशी आपली धडपड असेल, तर हे राष्ट्र पूर्णपणे हिंदुधर्मधिष्ठीत जीवनप्रणाली स्वीकारलेले असले पाहिजे.
      तरुणांनो, माझा भार, माझा विश्‍वास तुमच्यावर आहे. भावनाशील युवकांनो, माझा कार्यभार तुम्ही उचला, वीर व्हा, श्रद्धासंपन्न व्हा, चारित्र्याचं तेज आणि वीर्य जागृत करून उत्साहानं कार्यप्रवृत्त व्हा. त्यासाठी.... 
     कुठलंही मोठं काम करण्यासाठी पहिली आणि सर्वात मोठी गरज असते ती बलशाली संघटनेची. आपली अशी एक संघटना स्थापन व्हावी अशी माझी कल्पना आहे. हिंदुधर्मतत्त्वांचा प्रसार आणि सेवाकार्य हाच तिचा प्रमुख उद्देश असेल. तुम्ही काय केवळ स्वतःसाठीच जगावं ? जगाच्या-समाजाच्या कल्याणासाठीही त्याग करायला तुम्हीच पुढं आलं पाहिजे.

लोकसंख्या नियंत्रण आणि लव्ह जिहाद या समस्यांचे निवारण न केल्यास राष्ट्र आणि धर्म यांची अपरिमित हानी निश्‍चित !

     भारतात विनाविलंब कठोर लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करावा, तसेच लव्ह जिहादच्या प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी. या मागण्या त्वरित अमलात आणल्या गेल्या नाहीत, तर राष्ट्र आणि धर्म यांची अपरिमित हानी होईल.- स्वामी ब्रह्मानंद सरस्वती, रामजन्मभूमी आंदोलनाचे जनक, हिंदू जागरण मंचाचे संस्थापक संघटनमंत्री
     संस्कृतीद्वेष्टे अंधश्रद्धा अशी शिवी हासडून स्वतःला कृतार्थ मानतात. अंधश्रद्ध अशी श्रद्धावानाची हेटाळणी करणारे हे कॉन्व्हेंट, पॉप संस्कृतीचे पोषक नि संवर्धक स्वतः मात्र अंधश्रद्धेने पछाडलेले असतात !
- प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामी

कु. माधुरी दुसे यांच्याविषयी त्यांची थोरली बहीण सौ. वसुधा राठीवडेकर यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

कु. माधुरी दुसे
१. चुकीतून शिकणे
     माधुरी बालवाडीत असतांना एकदा शाळेतून ती एकटी घरी पळून आली होती. त्या वेळी बाबांनी तिला दोरीने बांधून शिक्षा केली. त्यानंतर तिने कधीच शाळेत जाण्याचे टाळले नाही.
२. प्रांजळपणा
      लहानपणी ती शाळा आणि महाविद्यालयातून घरी आल्यावर कोण काय बोलले ? कसे वागले ? यांविषयी आम्हाला जसेच्या तसे सांगायची.

लहानपणापासूनच देवाची ओढ असलेला ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला देवद, पनवेल येथील चि. कृष्ण महेश लोंढे (वय २ वर्षे) !

चि. कृष्ण लोंढे
      सनातन संकुल, देवद, पनवेल येथील बालसाधक चि. कृष्ण महेश लोंढे याचा २६.१०.२०१५ या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या कुटुंबियांना त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
चि. कृष्ण महेश लोंढे याला सनातन परिवाराच्या 
वतीने वाढदिवसानिमित्त शुभाशीर्वाद !
१. सौ. कोमल महेश लोंढे (कृष्णची आई)
अ. आम्ही घराबाहेर गेल्यानंतर कुठेही त्याला मंदिर किंवा देवतेचे चित्र दिसले की, तो नमस्कार करतो आणि त्याच्यासमवेत असणार्‍यांनाही तो नमस्कार करण्यास सांगतो.

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कालावधीत सेवा करतांना साधकांना आलेल्या अनुभूती

     नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कालावधीत सनातन संस्थेने राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती या विषयावर मोठे प्रदर्शन लावले होते. या वेळी लक्षावधी लोकांपर्यंत संस्थेचे कार्य पोेचले आणि धर्मप्रसार झाला. या कालावधीत सेवा करत असतांना आम्हाला आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
१. मनात विचार आल्याप्रमाणेच प्रदर्शनाचे निमंत्रण देण्याची सेवा मिळणे
     प्रदर्शन कक्षाबाहेर मार्गामध्ये उभे राहून जिज्ञासूंना प्रदर्शनाची थोडक्यात माहिती सांगणे आणि त्यांना प्रदर्शन बघण्याचे निमंत्रण देणे, ही सेवा मिळायला हवी,

प्रेमभाव, सेवेची तळमळ आणि कोणत्याही कठीण प्रसंगाला देवावरील श्रद्धेच्या बळावर तोंड देणार्‍या सांगलीतील साधिका सौ. कस्तुरी पट्टणशेट्टी यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

सौ. कस्तुरी पट्टणशेट्टी (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना पू. (कु.) स्वाती खाडये
      सांगली - प्रेमभाव आणि कोणत्याही कठीण प्रसंगाला देवावरील श्रद्धेच्या आधारे तोंड देणार्‍या सांगली येथील साधिका सौ. कस्तुरी पट्टणशेट्टी यांनी २४ ऑक्टोबर या दिवशी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे. विश्रामबाग येथील साधकांच्या झालेल्या एका सत्संगात सनातनच्या पू. (कु.) स्वाती खाडये यांनी ही घोषणा केली. पू. (कु.) स्वाती खाडये यांच्या हस्ते श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन सौ. पट्टणशेट्टी यांचा सत्कार करण्यात आला. सौ. पट्टणशेट्टी यांचे पती श्री. चंद्रशेखर पट्टणशेट्टी यांचीही आध्यात्मिक पातळी ६३ टक्के आहे,

मायेपासून पूर्णपणे अलिप्त असलेली आणि देहभान विसरून अविश्रांत सेवा करणारी कु. प्रियांका जोशी !

कु. प्रियांका जोशी
     कु. प्रियांका जोशी (वय २८ वर्षे) रामनाथी आश्रमातील व्यवस्थापन विभागात सेवा करते. ती महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आली असून तिने ६३ टक्के आध्यात्मिक स्तर प्राप्त केला आहे. काल आश्‍विन शुक्ल पक्ष त्रयोदशी (२५ ऑक्टोबर) या दिवशी तिचा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने तिच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे देत आहे.
प.पू. डॉक्टरांचा प्रियांकावरील विश्‍वास
     एकदा प.पू. डॉक्टरांनी एक सूत्र पू. बिंदाताईंना सांगण्यासाठी मला त्यांना भ्रमणभाष लावण्यास सांगितला; पण तेवढ्यात लगेच ते म्हणाले, बिंदाताई व्यस्त असतात. त्यामुळे प्रियांकाला सांगतो.

रामनाथी आश्रमातील अतुलनीय अशा व्यवस्थापन विभागातील बहुगुणी साधकरत्ने !

श्री. चेतन हरिहर
    रामनाथी आश्रमातील व्यवस्थापन विभागातील साधक हे वयाने लहान असले, तरीही त्यांच्यात त्यांच्या वयाच्या मानाने पुष्कळ निर्णयक्षमता आणि तत्त्वनिष्ठता आहे. ते केवळ इतरांसाठी कार्यपद्धती न घालता त्या कार्यपद्धतीचे स्वतः पालन करतात. एखाद्या दिवशी पू. (सौ.) बिंदाताई आश्रमात नसल्या, तरी ते समर्थपणे आश्रमाच्या व्यवस्थापन विभागाची सेवा सांभाळतात. त्यांचा साधकांना आधार वाटतो. व्यवस्थापन विभागातील साधकांचा एक विशेष गुण म्हणजे त्यांना कितीही सेवा असली, तरीही त्यांच्या तोंडवळ्यावर सतत प्रसन्नता असते.

भारताची सद्यःस्थिती पालटण्यासाठी संत आणि खरे हिंदू यांना महत्त्वाच्या वाटलेल्या हिंदु राष्ट्राच्या पर्यायात चूक ते काय ?

     कपडा अनेक ठिकाणी फाटल्यास मनुष्य नवीन कपडा घेण्याचा पर्याय निवडतो. भारत देशाची आतापर्यंत सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अपरिमित हानी झाली आहे. एकेक घटक दुरुस्त केल्यास त्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतील.

ग्रंथाची पुनर्मुद्रणाची सेवा करतांना स्वत:मध्ये गुण वाढवून स्वत:चे पुनर्मुद्रण केल्यास सेवा परिपूर्ण होईल, असे वाटणे

डॉ. प्रवीण मेहता
     पुनर्मुद्रणाचे ग्रंथ सिद्ध करतांना नवीन भाग ठेवणे आणि काही भाग वगळणे, असे करावे लागते. त्या वेळी प्रथम आपल्यामध्ये गुण वाढवणे आणि स्वभावदोष वगळणे ही प्रक्रिया करून स्वत:चे पुनर्मुद्रण करणे आवश्यक आहे,

अंतर्मुखता, प्रगल्भता आणि स्वतःला पालटण्याची तीव्र तळमळ असल्याने गुरुमाऊलीला अपेक्षित अशी रेखीव साधक-मूर्ती घडण्यासाठी कठोर घाव सोसण्यास सिद्ध झालेली कु. वैष्णवी जाधव !


कु. वैष्णवी जाधव
     कु. वैष्णवी जाधव (वय १७ वर्षे) रामनाथी आश्रमातील व्यवस्थापन विभागात सेवा करते. काल आश्‍विन शुक्ल पक्ष त्रयोदशी (२५ ऑक्टोबर) या दिवशी तिचा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने तिच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे देत आहे.
संत होण्याचे ध्येय ठेवणारी कु. वैष्णवी जाधव !
     कु. वैष्णवी जाधव तिचा भाऊ प्रतीक याचा विवाह झाल्यावर कुटुंबासह भेटायला आली होती. तेव्हा मी तिला विचारले, आता तुझे लग्न कधी ?, त्यावर ती म्हणाली, मला लग्न करायचे नाही.

हरिद्वार येथील अर्धकुंभमेळ्यातील धर्मप्रसारांतर्गत विविध सेवांमध्ये सहभागी व्हा !

वाचक, हितचिंतक, धर्मप्रेमी, तसेच साधक यांना सेवेची अमूल्य संधी !
१. अर्धकुंभमेळ्याचे महत्त्व
     उत्तराखंड राज्यातील हरिद्वार येथे प्रत्येक १२ वर्षांनी महाकुंभमेळा आयोजित केला जातो. या १२ वर्षांच्या कालावधीत ६ वर्षांनी अर्धकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. हरिद्वार येथील अर्धकुंभपर्वातील यात्रेचे फळ मोक्ष देणारे असते, असे धर्मशास्त्रामध्ये सांगितले आहे. त्यामुळे कुंभमेळ्याप्रमाणे या अर्धकुंभमेळ्यातही लक्षावधी भाविक यात्राविधी आणि गंगास्नान करतात. अर्धकुंभमेळ्यातील विशेष पर्वकाळांना गंगास्नानाचे महत्त्व असल्याने त्या वेळी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.
२. अर्धकुंभमेळ्याचा कालावधी आणि धर्मप्रसाराचे स्वरूप
     अर्धकुंभमेळ्यातील विशेष पर्वकाळ, तसेच सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने करण्यात येणार्‍या धर्मप्रसाराचे स्वरूप पुढे देत आहे.
३. अर्धकुंभपर्वाच्या कालावधीत धर्मप्रसारासाठी
मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता !
     १४.१.२०१६ ते २२.४.२०१६ या कालावधीत अर्धकुंभमेळा असणार आहे. या सेवेसाठी संपूर्ण ३ मास वेळ देण्यास इच्छुक असणारे पूर्ण कालावधी देेऊ शकतात. त्यापेक्षा अल्प कालावधी सेवेसाठी देऊ शकणार्‍यांना कोणत्या कालावधीत सेवेत सहभागी होऊ शकतो, हे समजण्याकरिता गटानुसार सेवेची विस्तृत माहिती खाली दिली आहे.
     ५ मार्च ते १० एप्रिल २०१६ या काळात अर्धकुंभमेळ्याचा मुख्य पर्वकाळ असल्याने त्या कालावधीत सर्वाधिक मनुष्यबळाची आवश्यकता आहे.
४. इच्छुकांना सेवेला येण्याचे स्वतःचे नियोजन करण्यासाठी सुलभ व्हावे,
यासाठी गटानुसार सेवेच्या कालावधीची माहिती
     वाचक, हितचिंतक, धर्मप्रेमी, तसेच साधक स्वतःच्या सोयीने वरील गटांनुसार कालावधी निवडून सेवेत सहभागी होऊ शकतात. शक्य असल्यास कार्यालयातून (ऑफिसमधून) रजा काढून या संधीचा लाभ अवश्य करून घ्यावा. कुंभसेवेत सहभागी होण्यास इच्छुक असलेले वाचक, हितचिंतक, धर्मप्रेमी यांनी वितरक अथवा स्थानिक साधकांशी, तसेच इच्छुक साधकांनी संबंधित उत्तरदायी साधकांशी संपर्क करावा. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या आणि त्रासाचे प्रकटीकरण होणार्‍या साधकांना या सेेवेसाठी पाठवण्याचे नियोजन करू नये. जिल्हासेवक अथवा राज्यसेवक यांनी सर्व इच्छुकांची या संदर्भातील माहिती गूगल स्प्रेडशीटमध्ये भरावी. काही शंका असल्यास श्री. कार्तिक साळुंखे यांच्याशी ०८४५०९५०४८९ या क्रमांकावर संपर्क करावा. - (पू.) सौ. बिंदा सिंगबाळ, (११.१०.२०१५)
     या अर्धकुंभमेळ्याला भाविकांची अलोट गर्दी असते. आरक्षणात अडचण येऊ नये, यासाठी सेवेत सहभागी होणार्‍यांनी आगगाडीचे तिकीट आधीच आरक्षित करावे. सर्वांनी जिल्हासेवक अथवा राज्यसेवक यांच्याशी बोलूनच आरक्षण करावे.

सनातन पंचांग २०१६ची विक्री आतापासूनच करण्याचे कारण समजून घेऊन सहकार्य करावे !

वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
     सध्या बहुतांश सर्व जिल्ह्यांतील साधकांनी सनातन पंचांग २०१६च्या विक्रीला आरंभ केला आहे. पंचांगाची विक्री करतांना काही वाचक आणि हितचिंतक वर्ष २०१६ चालू व्हायला बराच अवधी असूनही तुम्ही एवढ्या लवकर पंचांगांची विक्री का करत आहात ? आम्ही आता पंचांगाचे पैसे देतो; पण तुम्ही आम्हाला नंतरच पंचांग देऊ शकता का ? असे साधकांना विचारत आहेत.
     सनातन पंचांगाला सर्वच स्तरांवरून मोठ्या प्रमाणावर मागणी येत असते.

साधकांना सूचना

     पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - आश्‍विन शुक्ल पक्ष चतुर्दशी (२६.१०.२०१५) रात्री ९.१० वाजता
समाप्ती - आश्‍विन पौर्णिमा (२७.१०.२०१५) सायं ५.३५ वाजता
उद्या पौर्णिमा आहे.

बोधचित्र


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
हिंदूंनो, राष्ट्र आणि धर्म कार्य करतांना संतांनाच विचारूनच कार्य करा !
     आपण वैयक्तिक जीवनात विविध प्रसंगांत योग्य निर्णय कोणता हे कुटुंबीय, नातेवाईक, मित्र, वैद्य, अधिवक्ता, लेखा परिक्षक इत्यादींना विचारून घेतो. तसेच राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भातील निर्णय राष्ट्र आणि धर्म प्रेमी संतांनाच विचारून घेतले पाहिजेत. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१२.६.२०१५)
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

खरे यश !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     स्वतःच्या यशाच्या धुंदीत रहाणार्‍यांपेक्षा जो दीन-दुबळे, दरिद्री आणि गरजू अशा व्यक्तींच्या साहाय्याला धावून जातो अन् यालाच कर्तव्य मानतो, तोच खरा यशस्वी माणूस ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
हे असे आहे का ? ते तसे आहे का ? हे असेही नाही, तसेही नाही.
ते कशात नाही ? मग ते असेही आहे आणि तसेही आहे.
भावार्थ : हे असे आहे का ? मधील हे मायेविषयी आहे. ते तसे आहे का ? मधील ते ब्रह्मासंबंधी आहे. हे असेही नाही, तसेही नाही, म्हणजे म्हटले तर ही म्हणजे माया, असेही नाही म्हणजे दिसते तशी नसून ब्रह्म आहे आणि तशीही नाही म्हणजे ब्रह्म म्हटले तर ब्रह्मस्वरूपातही नाही. ते कशात नाही ? म्हणजे ब्रह्म सर्वत्र आहे, मायेतही आहे. मग ते असेही आहे आणि तसेही आहे म्हणजे माया व ब्रह्म दोन्ही एकच आहेत.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

इराकचे गुन्हेगार !

      वर्ष २००३ मध्ये झालेले युद्ध आणि इराकचे तत्कालीन सर्वेसर्वा सद्दाम हुसेन यांचा पाडाव यांविषयी ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी क्षमा मागितली आहे. या युद्धामुळेच आय.एस्.आय.एस्.चा उदय झाला, असे तुम्ही मानता का ?, या प्रश्‍नाला मात्र त्यांनी थेट उत्तर द्यायचे टाळले असले, तरी असे म्हणण्यात थोडे तथ्य आहे, हे त्यांनी मान्य केले. स्वतः राज्यकारभार करतांना केलेल्या चुकांची उघड स्वीकृती देऊन त्याविषयी क्षमा मागण्याचा मोठेपणा ब्लेअर यांनी दाखवला. भारतीय राज्यकर्त्यांना त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. असो !
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn