Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

सनातनचे प्रेरणास्थान प.पू. रामानंद महाराज, 
इंदूर (मध्यप्रदेश) यांची आज जयंती

खरगौन (मध्यप्रदेश) येथे हिंदूंवर धर्मांधांचे भीषण आक्रमण

देशात सामाजिक असहिष्णुता वाढल्याचे कारण सांगत साहित्य अकादमीचा पुरस्कार 
परत करणार्यांना हिंदूंवरील हे धर्मांधांचे नियोजित आणि जीवघेणे आक्रमण दिसेल का ?

हिंदूंवरील भीषण आक्रमणे पाहता मध्यप्रदेशमध्ये शासन अस्तित्वात आहे का, असा प्रश्न पडतो !
  • दुकाने आणि वाहने जाळली : पोलिसांच्याही वाहनांची नासधूस
  • १०० जणांना अटक : संचारबंदी लागू, दिसताक्षणी गोळ्या घालण्याचा आदेश 

खरगौन (मध्यप्रदेश) - दसर्याच्या दिवशी येथील स्टेडियम मैदानावर आयोजित करण्यात आलेला रावणदहनाचा कार्यक्रम आटोपून परतणार्या् हिंदूंवर धर्मांधांनी भीषण आक्रमण केले. या आक्रमणात अनेक हिंदू घायाळ झाले. २२ ऑक्टोबर या दिवशी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर खरगौन येथे अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली असून दिसताक्षणी गोळ्या घालण्याचा आदेश देण्यात आला आहे.

पुजारी यांच्या मारेकर्याांची नावे कळवूनही त्यांना अटक करण्यास पोलिसांकडून १० दिवस विलंब ! - भाजपचा आरोप

बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येचे प्रकरण
मंगळुरू - बजरंग दलाचे कार्यकर्ते प्रशांत पुजारी यांच्या मारेकर्यांची नावे पोलिसांना कळवूनही त्यांना अटक करण्यास पोलिसांनी १० दिवस विलंब केल्याचा आरोप कर्नाटकमधील भाजपचे नेते प्रल्हाद जोशी यांनी केला. पुजारी यांच्या हत्येच्या प्रकरणी मंगळुरूचे पोलीस आयुक्त मुरुगन यांनी पूर्वग्रहदूषितपणे तपास केला असून निष्पक्षपाती चौकशी होण्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्यांची त्वरित बदली करावी, अशीही मागणी जोशी यांनी केली. प्रशांत पुजारी यांनी एका धर्मांधाचे पशुवधगृह बंद पाडल्याचा सूड उगवण्यासाठी ८ धर्मांधांनी पुजारी यांची काही दिवसांपूर्वी हत्या केली होती. 

विजयादशमीच्या मुहुर्तावर उद्धव ठाकरे यांच्याकडून हिंदु राष्ट्र स्थापनेची गर्जना !

शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातील दसरा मेळाव्याला लाखो हिंदूंची उपस्थिती !
मुंबई - शिवसेनाप्रमुखांनी मनामनांत पेटवलेली हिंदुत्वाची ठिणगी जिवंत आहे आणि ती कधीही वणवा बनू शकते. देशात समान नागरी कायदा लागू करा. हिंदुस्थानला हिंदु राष्ट्र घोषित करा, मग कोण गाय कापतो ते बघून घेऊ, अशी ज्वलज्जहाल हिंदुत्वाची गर्जना शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या जगप्रसिद्ध विराट दसरा मेळाव्यात केली. शत्रूराष्ट्र पाकचीही दृष्टी असलेल्या या दसर्या मेळाव्यात लाखो हिंदूंची उपस्थिती होती. यंदाच्या मेळाव्यात शिवसैनिकांच्या उपस्थितीचा उच्चांक गाठला गेला.

(म्हणे) पाक वर्ष २०२५ पर्यंत जगातील पाचव्या क्रमांकाचा अण्वस्त्रधारी देश बनणार

अमेरिका पाकला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करून भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न तर करत नाही ना ? याकडे भारतीय जनतेने लक्ष दिले पाहिजे आणि अमेरिकेला धडा मिळेल, अशा उत्तराची सिद्धता ठेवली पाहिजे.
     वॉशिंग्टन - पाकच्या अण्वस्त्रांच्या साठ्यात लक्षणीय वाढ झाली असून वर्ष २०२५ पर्यंत तो अण्वस्त्रधारी देशांमध्ये पाचव्या स्थानी असेल, असे अमेरिकेतील एका संस्थेने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. पाकच्या ताफ्यातील अण्वस्त्रांचा साठा सध्या ११० ते १३० इतका आहे. वर्ष २०११ मध्ये हा साठा ९० ते ११० इतका होता. पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या अमेरिका भेटीच्या वेळी अणूशास्त्रज्ञांनी घोषित केलेल्या पाकिस्तानी अण्वस्त्र २०१५ च्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. प्लुटोनियम आणि युरेनियम निर्मितीच्या ४ अद्ययावत सुविधांच्या उपलब्धतेमुळे पुढील १० वर्षांत पाकच्या अण्वस्त्र साठ्यात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. हा वेग पहाता वर्ष २०२५ पर्यंत पाककडे २२० ते २५० अण्वस्त्रांचा साठा होऊ शकेल. असे झाल्यास पाक जगातील पाचव्या क्रमांकाचा अण्वस्त्रधारी देश होईल, असा दावा अहवालात करण्यात आला आहे.

(म्हणे) गोमांस खा; पण इतरांच्या भावना दुखावू नका ! - केंद्रीय मंत्री कलराज मिश्र

गोमांसाच्या सूत्रावरून सत्ताधार्‍यांनी सुस्पष्ट भूमिका 
घेऊन हिंदूंना आश्‍वस्त करणे अपेक्षित आहे !
     नवी देहली - वैयक्तिकदृष्ट्या गोमांस खाणे ठीक आहे; पण त्यामुळे इतरांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत, असे वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री कलराज मिश्र यांनी केले आहे. (गोमांस खायचे असेल, तर गाय आणि गोवंश यांची हत्या करावी लागेल. अशाने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारच ! त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावनांचा उद्रेक होऊन त्यांनी कायदा हातात घेतल्यास त्यास उत्तरदायी कोण ? - संपादक) गोमांसाच्या सूत्रावरून होणारे ध्रुवीकरण सगळ्यांसाठीच हानीकारक ठरेल. केवळ विकासाचे राजकारणच भाजपला पुढे नेऊ शकते, असेही ते एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलतांना त्यांनी सांगितले.

सनातनविषयीचे अपसमज दूर करण्यासाठी जाहीर जनसंवाद सभा ! - अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

 श्री. अभय वर्तक (बोलतांना) आणि श्री. रमेश शिंदे
मुंबई, २३ ऑक्टोबर (वार्ता.) - सनातन संस्थेवर इतके खोटे आरोप होऊनही हिंदुत्ववादी संघटना, संत, विविध संप्रदाय सनातन संस्थेच्या पाठीशी ठाम उभे राहिले; मात्र या सर्व घटनाक्रमामुळे सनातन संस्थेविषयी समाजमन काही प्रमाणात कलुषित झाले आहे. काही माध्यमांनीही आमची चांगली भूमिका मांडली. काही लोक सनातनला जोडले जाऊन त्यांचे समर्थनही मिळाले; पण काहींना सनातनचे कार्य जाणून घ्यायचे आहे, काही जणांपर्यंत योग्य आणि पूर्ण वृत्ते पोहोचू शकली नाहीत. त्यांच्या मनातील शंका आणि अपसमज दूर करण्यासाठी आम्ही थेट जनतेपर्यंत पोहोचून जनसंवाद साधणार आहोत. त्यासाठी २४ आणि २५ ऑक्टोबरला अनुक्रमे ठाण्यात अन् मुंबईत, तसेच नंतर अन्य शहरांत जाहीर 'जनसंवाद सभा' घेत आहोत, अशी माहिती सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी दिली. मुंबई मराठी पत्रकार संघात ते पत्रकारांशी संवाद साधत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे हेही उपस्थित होते.

मंगळुरूच्या पोलीस आयुक्तांच्या बदलीची भाजपकडून मागणी

   बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येचे प्रकरण 
     मंगळुरू - धर्मांधांनी बजरंग दलाचे कार्यकर्ते श्री. प्रशांत पुजारी यांची हत्या केल्याच्या प्रकरणी मंगळुरूचे पोलीस आयुक्त मुरुगन यांनी पूर्वग्रहदूषितपणे तपास केला असून निष्पक्षपाती चौकशी होण्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आयुक्तांची त्वरित बदली करावी, अशी मागणी कर्नाटकमधील भाजपचे नेते प्रल्हाद जोशी यांनी केली आहे. पुजारी यांनी एका धर्मांधाचा कत्तलखाना बंद केल्याचा सूड उगवण्यासाठी ८ धर्मांधांनी पुजारी यांची नुकतीच हत्या केली.

रायपूर (छत्तीसगड) येथे हिंदी भाषेतील सनातन पंचांग २०१६ चे प्रकाशन

सनातन पंचांग (हिंदी)चे प्रकाशन करतांना डावीकडून
पू. बालयोगेश्‍वर रामबालकदासजी महाराज, हिंदु
जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक
पू. डॉ. चारुदत्त पिंगळे आणि
संत पू. युधिष्ठिरलालजी महाराज
     दुर्ग (छत्तीसगड) - हिंदी भाषेतील सनातन पंचांग २०१६चे पाटेश्‍वरधाम (छत्तीसगड) येथील संत पू. बालयोगेश्‍वर रामबालकदासजी महाराज, शदाणी दरबार रायपूरचे संत पू. युधिष्ठिरलालजी महाराज आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या शुभहस्ते २० ऑक्टोबर या दिवशी एका कार्यक्रमात प्रकाशन करण्यात आले. रायपूरमधील बोरियाकला येथील शदाणी दरबार येथे हा कार्यक्रम पार पडला. 
क्षणचित्रे
१. शदाणी दरबार रायपूरचे संत पू. युधिष्ठिरलालजी महाराज यांनी त्यांच्या अ‍ॅण्ड्रॉईड भ्रमणभाषमध्ये डाऊनलोड केलेले सनातन पंचांग दाखवले.
२. पू. युधिष्ठिरलालजी महाराज यांनी पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा सत्कार केला.
३. पंचांगच्या प्रकाशन कार्यक्रमानंतर पू. बालयोगेश्‍वर रामबालकदासजी महाराज संत पू. युधिष्ठिरलालजी महाराज यांना सनातन पंचांगाचे वैशिष्ट्य सांगतांना म्हणाले, हे केवळ पंचांग नाही, तर शास्त्र सांगणारा ग्रंथच आहे.

पंजाबमधील हिंसाचारामागे पाकची गुप्तचर संस्था आयएस्आय ?

भारत पाकिस्तानला कायमचा धडा कधी शिकवणार ?
     नवी देहली - शिखांचा पवित्र गुरु ग्रंथ साहिबच्या अवमानावरून पंजाबमध्ये पसरलेल्या हिंसाचारामागे पंजाबमधील खलिस्तान चळवळीला पुन्हा उठाव देण्याचे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएस्आयचे षड्यंत्र असल्याचे ठोस पुरावे भारतीय गुप्तचर यंत्रणांना मिळाले आहेत.
१. फरीदकोटमध्ये गुरु ग्रंथ साहिबचा अवमान करण्यात आल्यानंतर पोलिसांनी जसविंदर सिंह आणि रूपिंदर सिंह या संशयितांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीनंतर त्यांनी ऑस्ट्रेलियात दूरध्वनी केल्याचे निष्पन्न झाले होते. 

बिहारमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण करणार्‍या मौलवीस अटक

कथित लैंगिक अत्याचारांच्या आरोपांवरून हिंदूंच्या संतांची अपकीर्ती 
करणारी प्रसारमाध्यमे याविषयी चर्चासत्रे घेतील का ?
      किशनगंज (बिहार) - दीड मासापूर्वी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आल्याच्या प्रकरणी ३५ वर्षीय मौलवी मुसर्रफ याला अररिया जिल्ह्यातील जोकिहाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या चकाई गावात पोलिसांनी अटक केली. त्याची चौकशी केल्यानंतर त्याला कारागृहात पाठवण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार टेढागाछ येथील एका १३ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आले होते. चकाई गावात आरोपी सदर मुलीला घेऊन आला आहे, अशी माहिती या मुलीच्या नातेवाइकांना मिळताच त्यांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.

लंडनमध्ये फरीदकोट हिंसाचाराचा निषेध करणार्‍या २० शीख आंदोलकांना पोलिसांकडून अटक

भारतातील शिखांच्या धर्मग्रंथाची विटंबना झाल्यावर लंडनमधील शीख बांधव निदर्शने करतात, 
यातून हिंदूंनी संघटनवृत्ती शिकणे आवश्यक ! 
     लंडन - पंजाबमधील फरीदकोटमध्ये शिखांच्या धर्मग्रंथाची फाटलेली पाने आढळल्यावरून उसळलेल्या हिंसाचारात पोलीस कारवाईत दोन शीख ठार झाले होते. याच्या निषेधार्थ येथील मध्यवर्ती भागातील भारतीय दूतावासाच्या बाहेर शीख लाइव्स मॅटर्स या संघटनेकडून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या वेळी झालेल्या हिंसेच्या प्रकरणी पोलिसांनी २० शिखांना अटक केली. आंदोलन चालू असतांना अचानक पोलिसांनी आंदोलन स्थळाला चारही बाजूने घेराव घातला. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार आंदोलक रस्ता बंद करण्याच्या सिद्धतेत होते. त्यामुळे त्यांना कारवाई करावी लागली. पंजाबमधील घटनेच्या संदर्भात ब्रिटनमधील शीख संघटित आहेत, हेच आम्हाला सांगायचे होते, असे शीख लाइव्स मॅटर्सचे प्रवक्ता जसवीरसिंह गिल यांनी सांगितले.

(म्हणे) संबंध सुधारण्यासाठी भारताचा प्रतिसाद निराशाजनक !

प्रतिदिन कुरापत काढून भारताला अस्थिर ठेवणारे नवाज शरीफ यांचा खोटारडेपणा !
     वॉशिंग्टन - काश्मीर प्रश्‍न हा भारत आणि पाकिस्तान संबंधांमधील मुख्य अडचण असून व्दिपक्षीय संबंध सुधारण्यासाठी पाकच्या प्रयत्नांवर भारताचा प्रतिसाद निराशाजनक आहे, असे खोटारडे विधान पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी येथे केले. अमेरिका दौर्‍यावर असलेले नवाझ शरीफ यांनी अमेरिकेतील पाकिस्तानी वंशाच्या नागरिकांना संबोधित केले. यामध्ये त्यांनी उभय राष्ट्रांतील तणावासाठी भारतालाच उत्तरदायी ठरवले. शरीफ म्हणाले, दोन्ही देशांमधील भांडणासाठी काश्मीर प्रश्‍न हे मुख्य सूत्र आहे. शांतता निर्माण करण्यासाठी हा प्रश्‍न निकाली काढणे आवश्यक आहे. गेल्या अडीच वर्षांत आम्ही पाकमधील परिस्थितीत सुधारणा घडवली आहे.

कॉ. पानसरे हत्या प्रकरण समीर गायकवाड यांच्या न्यायालयीन कोठडीत ७ नोव्हेंबरपर्यंत वाढ !

कोल्हापूर, २३ ऑक्टोबर (वार्ता.) - कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयावरून अटक करण्यात आलेले सनातन संस्थेचे साधक श्री. समीर गायकवाड यांच्या न्यायालयीन कोठडीत ७ नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली. येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री. आर्.डी. डांगे यांनी हा आदेश दिला. या वेळी न्यायालयात श्री. समीर गायकवाड यांचे अधिवक्ता श्री. एम्.एम्. सुहासे, अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन, अधिवक्ता श्री. आनंद देशपांडे हे उपस्थित होते. शासकीय पक्षाच्या बाजूने अधिवक्ता चंद्रकांत बुधले, खाजगी अधिवक्ता विवेक घाडगे उपस्थित होते. 
श्री. समीर गायकवाड यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत २३ ऑक्टोबर या दिवशी संपल्याने त्यांना न्यायालयात आणले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्या अनुषंगाने २३ ऑक्टोबरला न्यायालयाच्या आवारात आणि न्यायालयात प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी अन् छायाचित्रकार यांनी गर्दी केली होती. प्रत्यक्षात पोलिसांनी श्री. गायकवाड यांना न्यायालयात उपस्थित केलेच नाही. 

पाकचे धूर्त पंतप्रधान नवाझ शरीफ यांची अमेरिकेत गरळओक

(म्हणे) काश्मीर प्रश्‍न सोडवण्यासाठी तिसर्‍या राष्ट्राच्या मध्यस्थीची आवश्यकता !
      वॉशिंग्टन - भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या दृष्टीने काश्मीर हे महत्त्वाचे सूत्र असून त्यावर तोडगा काढायचा असल्यास तिसर्‍या देशाच्या मध्यस्थीची आवश्यकता आहे, अशी गरळओक पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी येथे केली. शरीफ सध्या अमेरिका दौर्‍यावर असून अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
     शरीफ पुढे म्हणाले, सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात काश्मीर प्रश्‍न सोडवण्याच्या संदर्भात कोणतीही बोलणी चालू नाहीत. त्यामुळे हा प्रश्‍न सोडवण्यासाठी एका मध्यस्थाची आवश्यकता आहे. भारताला मध्यस्थीचा पर्याय मान्य नसेल, तर द्विपक्षीय संवादाचे गाडे अडून राहील. याविषयी मी बराक ओबामा यांना या सर्व गोष्टींची कल्पना दिली आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील काश्मीर प्रश्‍न लवकरात लवकर सुटला पाहिजे, यावर ओबामाही सहमत आहेत.


भारत, अमेरिका आणि जपान यांच्या संयुक्त सागरी कवायतीमुळे चीनला पोटशूळ !

भारताच्या विरोधात कांगावा करण्याची एकही संधी न सोडणारा चीन !
    नवी देहली - चेन्नई जवळील मलबार समुद्रात पार पडलेल्या भारत, अमेरिका आणि जपान या देशांच्या आरमारांच्या संयुक्त कवायतीचा चीनने निषेध व्यक्त केला आहे. चीनला ही कवायत त्याच्या हिंदी महासागरातील वर्चस्वाला आव्हान देणारी वाटते.
१. भारत आणि जपान या देशांना चीनकडून धोका संभवत आहे. तशातच व्हिएतनाम आणि फिलिपाईन्स या लहान देशांवरही चीन वर्चस्व गाजवत आहे.
२. चीनला व्हिएतनाम हा देश तिबेटप्रमाणे गिळंकृत करायचा होता; मात्र तेथील जनतेच्या कडव्या राष्ट्रप्रेमापुढे बलाढ्य चीनला माघार घ्यावी लागली होती.

दक्षिण सुदानमध्ये कुपोषणामुळे ३० सहस्र नागरिक मृत्यूच्या उंबरठ्यावर

हिंदूंनो, ही स्थिती भारतातही येण्यास वेळ लागणार नाही. या भीषण स्थितीला 
सामोरे जाण्यासाठी साधनेविना पर्याय नाही !
     नैरोबी (सुदान) - युद्धामुळे दक्षिण सुदानमध्ये भीषण स्थिती उद्भवली असून तब्बल ३० सहस्र नागरिक कुपोषणामुळे मृत्यूच्या उंबरठ्यावर आहेत, असा इशारा संयुक्त राष्ट्रांंनी दिला आहे. एवढेच नव्हे, तर भीषण दुष्काळामुळे आणखी सहस्रो नागरिकही याच मार्गावर आहेत, असेही संयुक्त राष्ट्राच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

आय.एस्.आय.एस्.च्या हिंसाचारात प्रचंड वाढ !

     लंडन - आय.एस्.आय.एस्.च्या जगभरातील हिंसाचारात अलीकडे प्रचंड वाढ झाली आहे. या जिहादी आतंकवादी संघटनेकडून गेल्या ३ मासांत १ सहस्राहून अधिक आक्रमणे करण्यात आली असून त्यात ३ सहस्रांहून अधिक लोक मृत्यूमूखी पडले आहेत. मृतांंमध्ये सामान्य नागरिक आणि शासकीय कर्मचारी यांचा समावेश आहे. आय.एच्.एस्. जेनस् या संस्थेने सार्वजनिक स्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही आकडेवारी सिद्ध केली आहे.

पुणे येथील प.पू. वसंत कर्वेगुरुजी (अण्णा) यांचा देहत्याग

प.पू. वसंत कर्वेगुरुजी यांच्या पार्थिवावर
अग्नीसंस्काराच्या वेळी नमस्कार करतांना
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी,
श्री. प्रवीण कर्वे (उजवीकडून दुसरे)
आणि अन्य

     पुणे - अध्यात्मातील अधिकारी संत प.पू. वसंत गोपीनाथ कर्वेगुरुजी (अण्णा) यांनी विजयादशमीच्या दिवशी, म्हणजे २२ ऑक्टोबर २०१५ या दिवशी रात्री ८.५५ वाजता त्यांच्या निवासस्थानी देहत्याग केला. ते ९० वर्षांचे होते. २३ ऑक्टोबर या दिवशी येथील वैकुंठ स्मशानभूमीत सकाळी १०.३० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात १ मुलगा, सून, ४ मुली, ४ जावई आणि नातवंडे, असा परिवार आहे. प.पू. श्रीकृष्ण कर्वे गुरुजी यांचे ते ज्येष्ठ बंधू आणि पुणे येथील ६० टक्के आध्यात्मिक पातळी असलेले साधक श्री. प्रवीण कर्वे यांचे ते काका होते. प.पू. अण्णा यांना अग्नी दिल्यानंतर प.पू. श्रीकृष्ण कर्वे गुरुजी यांनी विश्वकल्याणाची प्रार्थना म्हटली.

श्री साईबाबा मंदिर संस्थानने निमंत्रण पत्रिकांवर व्यय करू नये - उच्च न्यायालय

     संभाजीनगर, २३ ऑक्टोबर - दसर्‍याच्या निमित्ताने करण्यात येणार्‍या समारंभासाठी मान्यवरांना निमंत्रणपत्रिका पाठवण्याची योजना श्री साईबाबा मंदिर संस्थानने आखली होती. त्यावर १४ लक्ष ९४ सहस्र रुपयांचा व्यय करण्याचा संस्थानचा विचार होता. यावर संभाजीनगर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे न्या. ए.बी. चौधरी आणि न्या. इंदिरा जैन यांनी तसा व्यय करण्यास मनाई केली, तसेच संस्थानने निमंत्रण पत्रिकांवर व्यय करू नये, असे मत व्यक्त केले. (निमंत्रण पत्रिकांवरील एवढा मोठा व्यय अनावश्यक असल्याचे संस्थानचे कार्यकारी अधिकारी आणि समितीचे सदस्य यांच्या लक्षात येणे अपेक्षित होते. - संपादक)

(म्हणे) शिवसेनेकडून दसरा मेळाव्यात आवाजाच्या नियमांचे उल्लंघन !

आतापर्यंत अनेक मशिदींवरील भोंग्यांनी आवाजाची मर्यादा
ओलांडल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात न्यायालयाने आदेश काढले असतांना त्याविषयी ब्रही न
काढणारे आणि केवळ हिंदुद्वेषापोटी शिवसेनेला विरोध करू पहाणारे आवाज फाऊंडेशन !
आवाज फाऊंडेशनकडून शिवसेनेच्या विरोधात तक्रार
      मुंबई - शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त येथील शिवाजी पार्कवर पार पडलेल्या दसरा मेळाव्यात उच्च न्यायालयाने मर्यादित केलेल्या आवाज डेसिबल नियमांचे उल्लंघन झाले आहे, अशी तक्रार आवाज फाऊंडेशनच्या सुमायरा अब्दुलाली यांनी केली आहे.
      शिवसेना नेते पर्यावरणमंत्री श्री. रामदास कदम यांचा आवाज सर्वाधिक म्हणजे ९६ डेसिबल, तर शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा ८६ डेसिबल आवाज ध्वनीमुद्रित झाला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिवाजी पार्कवर ६८ डेसिबलपर्यंत आवाजाची मर्यादा आहे, असे फाऊंडेशनने म्हटले आहे.

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी पुरोगामी विचारवंतांची वक्तव्ये !

पुरोगामी विचारवंतांच्या हत्या झाल्यावरून सनातन संस्था आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्यावर दोषारोप होत आहे. याविषयी कोणताही पुरावा नाही, तरीही 'धर्मभावना दुखावल्यावरून चिडून हिंदुत्ववाद्यांनी या विचारवंतांच्या हत्या केल्या आहेत', असे काही पुरोगाम्यांना अजूनही वाटते. 'त्यात तथ्य आहे', असे क्षणभर गृहित धरले, तरी त्यामागील मूळ कारणेही शोधणे आवश्यक आहे. 'कट्टर हिंदूंना विचारस्वातंत्र्य मान्य नाही, ते धर्मांध आहेत', असे एकतर्फी आरोप करणारे या घटनांचा सर्वांगांनी विचार करत नाहीत. प्रसारमाध्यमेही विचारवंतांच्या कोणत्या विचारांवरून हिंदू भडकले असतील, ते समोर आणत नाहीत. त्यासाठी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी पुरोगामी विचारवंतांची वक्तव्ये धर्मश्रद्ध हिंदूंसाठी किती दुखरी असतात, याची उदाहरणे खाली दिली आहेत. या वक्तव्यांचे समर्थन विचारस्वातंत्र्य म्हणून करता येईल का, हे हिंदूंनी ठरवावे.
१. 'देवांच्या मूर्तीवर लघवी केली, तरी देव काही करणार नाहीत !' - डॉ. एम्.एम्. कलबुर्गी, ज्येष्ठ कन्नड साहित्यिक, कर्नाटक
२. महाभारत आणि रामायण हे धार्मिक ग्रंथ नसून ते पापाने भरलेले ग्रंथ आहेत ! - प्रा. के.एस्. भगवान, मंगळुरू (दैनिक सनातन प्रभात, १९.८.२०१५)                  क्रमश:

हिंदु संघटनांना अपकीर्त करण्याचे षड्यंत्र उघड करून वास्तव समाजासमोर मांडू ! - रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

श्री. रमेश शिंदे
     मुंबई - हिंदु संघटनांना जाणीवपूर्वक अपकीर्त करण्याचे षड्यंत्र चालू आहे. आम्ही हिंदु संघटनांना एकत्र करत आहोत, त्यांच्याशी चर्चा करत आहोत. त्यांच्यासह आम्ही लोकांसमोर जाऊन हे षड्यंत्र उघड करणार आहोत. सनातनच्या या जनसंवादात अनेक हिंदुत्ववादी संघटना सहभागी होत आहेत. लोकांच्या शंकाचे समाधान करून आम्ही वास्तव मांडू, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी या वेळी केले.

(म्हणे) हिंदुस्थान येस, हिंदु राष्ट्र नो ! - सुधींद्र कुलकर्णी

हिंदुद्वेषाची कावीळ झालेल्यांकडून आणखी कोणत्या विधानाची अपेक्षा करणार ?
      मुंबई - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि शिवसेना यांना भारत देश हिंदु राष्ट्र्र व्हावे, असे वाटते; मात्र भारत कधीही हिंदु राष्ट्र नव्हता आणि होणारही नाही. हिंदुस्थान येस, हिंदु राष्ट्र नो !, असे ट्विट ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी यांनी केले आहे. (हिंदुस्थानाची मागणीही इंग्रजीतून करणार्‍यांना भारतात रहाण्याचा अधिकार तरी उरतो का ? - संपादक)

सिंचन घोटाळ्यासाठी ३०८ खोटी आस्थापने स्थापन केली ! - किरीट सोमय्या

आता राष्ट्रवादीवर बंदी आणण्याची मागणी का करू नये ?
      मुंबई - सिंचन घोटाळ्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी जवळजवळ ३०८ खोटी आस्थापने स्थापन केली, असे भाजपचे खासदार श्री. किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. अर्थखात्याचे सचिव आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर यांच्या पत्राद्वारे किरीट सोमय्या यांनी अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
     कोंढाणे धरणाच्या कामात एफ्ए कन्स्ट्रक्शनने नेत्यांना लाच देण्यासाठी युनियन बँकेतून ८०० कोटी रुपये काढले. हा भ्रष्टाचार उघडकीस येऊ नये, यासाठी कोट्यवधीची खोटी देयक सादर करण्यात आली. तसेच कोंढाणे धरणाची किंमतही वारंवार वाढवली, असे त्यांनी सदर पत्रात म्हटले आहे.

मिड्ब्रेन अ‍ॅक्टिव्हेशनला अंनिसचा विरोधासाठी विरोध

     पुणे, २३ ऑक्टोबर - विरोधाला विरोध करण्यासाठीच अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून मिड्ब्रेन अ‍ॅक्टिव्हेशनला विरोध केला जात असल्याचा दावा फ्रीडम ऑफ रिसर्च असोसिएशन्स फॉर माईंड अ‍ॅन्ड ब्रेन एज्युकेशन (फ्राम्बी) या संस्थेने केला आहे.
     तीन मासांचे (महिन्यांचे) प्रशिक्षण दिल्यानंतर ६ ते १६ या वयोगटातील विद्यार्थ्यांच्या डोळ्याला पट्टी बांधल्यानंतरही ते समोरचे पाहू शकतात. मुलांची स्मरणशक्ती आणि आकलनशक्ती यांमध्ये त्यामुळे वाढ होत असल्याचे फ्राम्बीचे अतुल टकले आणि राजेश खेले यांनी सांगितले; परंतु ही अंधश्रद्धा आणि फसवेगिरी असल्याचा आरोप अंनिसकडून केला जात होता. त्यामुळे फोरम फॉर रिसर्च इन ओरिएन्टल सायन्स अ‍ॅन्ड टेक्नोलॉजी या त्रयस्थ संस्थेच्या माध्यमांतून प्रात्यक्षिकांद्वारे हा दावा सिद्ध करण्याचा निर्णय फ्राम्बी या संघटनेने घेतला.

अनधिकृत बांधकामांच्या कारवाईची माहिती देण्यास टाळाटाळ करणार्‍यांना ६० सहस्र रुपये दंड

प्रत्येक वेळी असे कठोर शासन दिले गेले, तर
अनधिकृत बांधकामांचा विळखा अल्प होण्यास वेळ लागणार नाही !
      घाटकोपर - येथील परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतरही पालिकेने काहीच कृती केली नाही. या संदर्भात माहितीच्या अधिकाराखाली कारवाईविषयी माहितीची विचारणा करण्यात आली; परंतु अधिकार्‍यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे माहिती आयोगाने संबंधित पालिका अधिकार्‍यांना ६० सहस्र रुपये दंड ठोठावला आहे.
१. घाटकोपर परिसरातील अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी महानगरपालिकेने ठोस उपाययोजना करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी पालिका आयुक्तांनी समितीची स्थापना केली.

वादग्रस्त वक्तव्ये करणार्‍या मंत्र्यांची केंद्रीय गृहमंत्र्यांकडून कानउघाडणी

      नवी देहली - वादग्रस्त विधाने करून जनतेचा रोष ओढवून घेणार्‍या मंत्र्यांची गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी कानउघाडणी केली आहे. फरिदाबाद दलित जळीतकांडाविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के. सिंह यांनी एखाद्याने कुत्र्याला दगड मारल्यास त्यासाठी शासनाला दोषी ठरवता येऊ शकणार नाही, असे वक्तव्य केले होते, तर केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी उत्तर भारतियांना कायदे तोडायला मजा येते, असे वक्तव्य केले होते.


सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून युवतींच्या ऑनलाईन छेडछाडीच्या तक्रारींत वाढ

गुन्ह्याच्या या नव्या आव्हानाला शासन कसे सामोरे जाणार आहे ?
     पुणे, २३ ऑक्टोबर - व्हॉट्स अ‍ॅप, फेसबूक या सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून युवतींच्या ऑनलाईन छेडछाडीच्या तक्रारी वाढल्या आहेत. सायबर गुन्हे विभागाकडे यंदाच्या वर्षी अशा प्रकारच्या ८२ तक्रारी आल्या आहेत. त्यात अल्पवयीन मुलींकडून आलेल्या तक्रारींचे प्रमाण जास्त आहे. (सामाजिक संकेतस्थळांचा वापर करतांना मुलींनीही सतर्कता बाळगणे आवश्यक ! - संपादक)
      सायबर गुन्हे विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वायकर म्हणाले, सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून अनेक युवती अनोळखी व्यक्तीशी संदेशाद्वारे चर्चा करणे, खासगी आणि इतर छायाचित्रे पाठवणे, समोरच्याकडून दिल्या जाणार्‍या प्रलोभनांना बळी पडून स्वतःची गुपिते सांगणे आदी अनेक प्रकार घडतात. अनोळखी व्यक्ती कंड्या पिकवण्याची धमकी देऊन वेळप्रसंगी धमकावते. पुणे शहरात सामाजिक संकेतस्थळांमुळे त्रास किंवा फसवणूक झाल्याच्या ७७ घटना घडल्या आहेत. या सर्वच गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी सामाजिक संकेतस्थळांकडून येणार्‍या माहितीच्या आधारावर अवलंबून रहावे लागते.

मानवीय जीवनाच्या शरीर स्वच्छतेसाठी गोमय उटणे उपयुक्त ! - दिलीप कुलकर्णी

गो विज्ञान परिषदेत पुरस्कार स्वीकारतांना श्री. दिलीप कुलकर्णी (उजवीकडे)
२०२२ कृषी भारती संशोधनाने केले सिद्ध
     उदगीर (जिल्हा लातूर) - २०२२ कृषी भारती संशोधनातून गोमय उटणे हे मानवीय जीवनाच्या शरीर स्वच्छतेसाठी उपयुक्त असल्याचे सिद्ध झालेले आहे. गोवंश आधारित शेतकर्‍यांना या संशोधनाचा पूरक व्ययसाय म्हणून लाभ होऊ शकतो, तसेच उपभोक्ता ग्राहकांना रसायनमुक्त जीवन जगण्यासाठीही वापर करता येऊ शकतो, असे प्रतिपादन २०२२ कृषी भारतीचे कृषी कीर्तनकार श्री. दिलीप कुलकर्णी यांनी केले. सार्वत्रिक प्रचार-प्रसारासाठी ते बनवण्याचे तंत्रज्ञानही आम्ही विनामूल्य सांगू, आवश्यकता वाटल्यास प्रशिक्षणही देऊ, असेही त्यांनी सांगितले. श्री. कुलकर्णी यांच्या या कार्याविषयी इस्कॉन आणि कमलनयन बजाज ट्रस्टच्या वतीने गो विज्ञान परिषदेत त्यांच्या सत्कारही करण्यात आला.
     गोवंश र्‍हास थांबवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील शालेय अभ्यासक्रमात प्राचीन भारतीय शेतीशास्त्र शिकवण्यात यावे, गोमय उटणे निर्मिती आणि विक्री यांच्यातून गोपालकांना अर्थसाधन उपलब्ध व्हावे, गोमय उटणे निर्मितीचे उद्योग गावोगावी चालू व्हावेत, त्याचा प्रचार-प्रसार वाढवावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

हिंदु समाजाची शक्ती सज्जनांना आश्‍वस्त करणारी - श्री. भैय्याजी जोशी

    पुणे, २३ ऑक्टोबर - जेव्हा सज्जन शक्ति उभी रहाते, तेव्हाच दुर्जनता संपते. गेल्या ९० वर्षांपासून रा.स्व. संघ समाजामध्ये सज्जन शक्ती उभी करण्याचे काम करत आहे. संघाचे कार्य समाजातील सर्व स्तरांमध्ये पोहोचले आहे. हीच संघटित शक्ती देशापुढील सर्व समस्यांना उत्तर आहे. हिंदू समाजाची शक्ती ही कधीच विध्वंसक नसून ती सज्जनांना आश्‍वस्त करणारी आहे आणि दुर्जनांनी सज्जन व्हावे, अशी प्रेरणा देणारी आहे. अशा सज्जनशक्तीचे दर्शन म्हणजेच शिवशक्ति संगम असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह श्री. भैय्याजी जोशी यांनी केले.

मुंबई येथील शताब्दी रुग्णालयातील शस्त्रकर्म विभागात सांडपाण्याची गळती

हा आहे रुग्णालय प्रशासनाचा गलथानपणा !
     मुंबई - गोवंडी येथील महानगरपालिकेच्या पं. मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालयातील शस्त्रकर्म विभागाच्या छतातून सांडपाणी गळत आहे. यामुळे शस्त्रकर्म झालेल्या रुग्णांना संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला आहे. (रुग्णांच्या आरोग्याशी खेळणार्‍या संबंधितांना कठोर शासनच करायला हवे ! - संपादक) सांडपाण्याची गळती आणि छताच्या प्लास्टरचे काम त्वरित न केल्यास तीव्र आंदोलन करू, असे राष्ट्र्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.
१. या रुग्णालयात आधुनिक वैद्य, कर्मचारी आणि वैद्यकीय साधने यांचाही पुष्कळ वेळा अभाव असतो.
२. शस्त्रकर्म विभागाच्या वर पहिल्या मजल्यावर बालरुग्ण विभाग असून त्याच्या स्नानगृहातूनही सांडपाण्याची गळती होत आहे. सांडपाणी जमिनीवर साचू नये यासाठी कर्मचार्‍यांनी तेथे बादली ठेवली आहे. साचलेल्या सांडपाण्यातून रुग्णाला शस्त्रकर्म खोलीमध्ये नेले जाते.
३. शस्त्रकर्म विभागातील छपरावरील अनेक ठिकाणचे प्लास्टर कोसळलेले आहे अन् तेथील पंखेही बंद आहेत.

अंतर्वस्त्रांमध्ये सोने लपवून आणणार्‍या चौघांना मुंबई विमानतळावर अटक

शासनाने कठोर कारवाई केल्याविना सोने तस्करीच्या घटना थांबणार नाहीत !
    मुंबई - येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर अंतर्वस्त्रांमध्ये सोने लपवून आणणार्‍या चौघांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून सव्वा कोटी रुपयांचे सोने हस्तगत करण्यात आले.
१. बँकॉकहून आलेल्या बन्सी कोठारी या महिलेने साडेबारा लाख रुपयांचे सोने अंतर्वस्त्रात दडवून आणले होते. मलेशियाच्या क्वालालंपूरहून आलेल्या विमानातून अमिनातूझ बिंती अमरी हिने एक किलो वजनाच्या सोन्याच्या दोन लगडी आणल्या होत्या. मंगना सुंथेरी व्हीव्हीएन वासू आणि मोहम्मद अशरफ यांच्याकडूनही ७५ लाख रुपयांचे सोने हस्तगत करण्यात आले.
२. मोहम्मद शाहील या एअर इंडियाच्या विमानाने आलेल्या प्रवाशाने हँडबॅगमेमध्ये दडवून ९.६४ लाख रुपयांचे सोने आणल्याचे उघड झाले. चौथ्या घटनेत नूरजहाँ मुहम्मद उमेर शेख या महिलेने ८.७१ लाख रुपयांचे सोने अंतर्वस्त्रात दडवून आणले होते. तिच्याकडूनही सोने हस्तगत करण्यात आले.


सनातन संस्थेवर होणारे खोटे आरोप आणि त्यामागील वस्तुस्थिती यांविषयी जाहीर जनसंवाद सभा

     कॉ. पानसरे हत्या प्रकरणी सनातन संस्थेच्या साधकाला संशयित म्हणून अटक केल्यावर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती, जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज, संत-महंत, हिंदुत्ववादी संघटना यांनी सनातनला जाहीर पाठींबा दिला. यामध्ये मा. शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनीही पुढाकार घेत सनातनच्या पाठीशी उभे रहात हिंदुत्वविरोधकांचे तोंड बंद केले. या काळात तथाकथित पुरोगाम्यांकडून बेछूट आणि विद्वेषी आरोप करत सनातन संस्थेवर बंदीची मागणीही करण्यात आली. या खोट्या आरोपांमागील वस्तुस्थिती समाजाला कळावी, या हेतूने मुंबई येथे एका जाहीर जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

शासकीय संकेतस्थळांवरील जुन्या माहितीविषयी तक्रार

    पुणे, २३ ऑक्टोबर - राज्य शासनाच्या संकेतस्थळावर अनेक मंत्रालयांची माहिती अद्ययावत केलेली नसल्यामुळे जुनीच माहिती दिसत आहे. याबाबत सजग नागरिक मंचाच्या वतीने राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्याकडे तक्रार केली आहे. (ही गोष्ट संबंधित विभागांना लक्षात आली नाही का ? जनहितासाठी संकेतस्थळावरील माहिती अद्ययावत करण्याची मागणी करणार्‍या सजग नागरिक मंचचे अभिनंदन ! - संपादक)

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंचे खरे सण-उत्सव साजरे करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
    मध्यप्रदेशमधील खरगौन येथील स्टेडियम मैदानावर दसर्‍याच्या दिवशी आयोजित करण्यात आलेला रावणदहनाचा कार्यक्रम आटोपून परतणार्‍या हिंदूंवर धर्मांधांनी आक्रमण केले. या आक्रमणात अनेक हिंदू घायाळ झाले आहेत.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Madhyapradeshke Khargounme Dasahare ke din dharmandone kiya Hinduopar aakraman.
Hinduoke deshme Hindu asurkshit kyo ?
जागो !
मध्यप्रदेशके खरगौनमें दसहरे के दिन धर्मांधोने किया हिंदूआेंपर आक्रमण.
हिंदूओके देशमें हिंदू असुरक्षित क्यो ?

चीनकडून येणारे नवे संकट !

     तिबेटमधून भारतात येणार्‍या ब्रह्मपुत्रा नदीवर चीनने ६ मोठे प्रकल्प उभारून ते कार्यान्वित केले आहेत. या प्रकल्पांवर चीनच्या वतीने दीड अब्ज डॉलर एवढी मोठी रक्कम व्यय करण्यात आली आहे. चीन ब्रह्मपुत्रेच्या पाण्यावर मोठी वीजनिर्मिती करणार आहे. ब्रह्मपुत्रा नदीने अरुणाचल प्रदेश, बिहार, ओरिसा आदी राज्यांचा बराचसा भाग सुपीक केला आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षणवर्गात आल्यावर अल्पावधीतच परिवर्तन झाल्याचे अनुभवणारे पुण्यातील श्री. रोहित दोशी !

श्री. रोहित दोशी
     पुणे येथील धर्माभिमानी श्री. युवराज पवळे स्थानिक स्तरावर धर्मशिक्षणवर्ग घेतात. वर्गाला येणार्‍या श्री. रोहित दोशी या युवकाविषयी त्यांनी सांगितलेला वैशिष्ट्यपूर्ण प्रसंग पुढे देत आहे.
१. वर्गाला येऊ लागल्यावर श्री. रोहित दोशी यांच्यात झालेले परिवर्तन !
     गेल्या १० - १५ दिवसांपासून श्री. रोहित दोशी प्रतिदिन धर्मशिक्षणवर्गामध्ये येत आहेत. अगोदर ते मांसाहार करायचे आणि दारू प्यायचे. वर्गाला नियमितपणे येऊ लागल्यापासून त्यांनी मांसाहार करणे अन् दारू पिणे बंद केले आहे. 
२. युवकामध्ये झालेल्या चांगल्या पालटांविषयी 
कुटुंबियांनी जिज्ञासेने विचारणा करणे
     काही दिवसांपासून श्री. दोशी यांच्या कुटुंबियांना त्यांच्यात पुष्कळ परिवर्तन जाणवू लागले. त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांकडे समितीच्या संपर्कात आल्यापासून श्री. रोहित यांच्यात एवढे चांगले पालट कसे झाले ? तुमच्याकडे येऊन तो नक्की काय करतो ?, अशी विचारणा केली आणि साधनेतील प्रयत्न जाणून घेतले.

हिंदूंनो, लोकहितवादी (गोपाळ हरि देशमुख) यांनी १६३ वर्षांपूर्वी भारतीय समाजाच्या लाचखोर वृत्तीविषयी सांगितलेले सत्य आजही तितकेच खरे आहे, हे जाणा !

       स्वातंत्र्यपूर्व काळात लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरि देशमुख यांनी प्रभाकर या साप्ताहिकातून समाजाला उद्देशून १०८ पत्रे लिहिली. त्यातून तत्कालीन समाजाचे दुर्गुण लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. भारतियांच्या लाचखोरवृत्तीमुळे त्यांच्या देशाचा कारभार इंग्रजांच्या हाती गेला. लोकहितवादी यांना याचे खूप दुःख आणि चीडही वाटे. २२ ऑक्टोबर १८४८ या दिवशी लाच या शीर्षकाखाली लिहिलेल्या पत्रात ते लिहितात, हिंदू लोक लाच खातात, यात संशय नाही. कंपनी सरकारच्या चाकरांमध्ये सहस्रोंमध्ये लाच न खाणारा आणि ईश्‍वरास भिऊन चालणारा क्वचित असतो ! बाकी सर्व शिपायांपासून प्रिन्सिपल सदर अमीनपर्यंत शपथेचा व्याभिचार करतात. इंग्रजांनी भगीरथ प्रयत्न केला, तरी हे लोक अडून अडून लाच खातात. हिंदू लोक हुशार आहेत, तरी या दुर्गुणाने त्यांची माती झाली आणि अब्रू गेली, याची कोणी लाज बाळगीत नाही. कामावर गेले म्हणजे त्यांच्याकडे कोणी पहातदेखील नाही; कारण त्यांची योग्यता सर्वांस ठाऊक असते. जे लोक लाच देतात, ते तर मूर्खच असतात. जर सर्वांनी कट केला की, सरकारच्या अंमलदारास लाच द्यावयाची नाही, तर त्यांची खोड जाईल; पण असे चांगले कट करण्यापुरते शहाणपण जर या लोकांत असते, तर मग राज्य का जाते बरे ?

भारतातील सुशिक्षितांची निरक्षरता !

वाचनसंस्कृतीच्या र्‍हासाचे मुख्य कारण 
१. वाचनसंस्कृतीच्या र्‍हासाला दूरदर्शन नव्हे, तर सुशिक्षितांनी नियमितपणे आणि 
अभ्यासपूर्ण वाचन न करणे, ही गोष्ट कारणीभूत असणे 
     दूरदर्शनवरील सवंग कार्यक्रमांमुळे सुशिक्षित व्यक्ती पुस्तकांकडे, म्हणजेच वाचनाकडे पाठ फिरवू लागल्या आहेत, असा आक्षेप नोंदवला जात आहे. दूरदर्शनमुळे वाचनाची सवय न्यून (कमी) होत जाणार, ही गोष्ट तर खरीच आहे; परंतु याविषयी केवळ दूरदर्शनवर ठपका ठेवून चालणार नाही. दूरदर्शनचा प्रसार होण्यापूर्वीही आमच्यातील किती टक्के सुशिक्षित मंडळी नियमितपणे आणि अभ्यासपूर्ण वाचन करत होती ?, याचे उत्तर प्रत्येकाने प्रामाणिकपणे दिले पाहिजे !

मिथ्या निधर्मीवादामुळे सर्वत्र गुंडगिरी फोफावली जाऊन भारताला जगणे अशक्य झाले असणे

     भारतात मिथ्या निधर्मीवाद चालू झाला आणि त्रिखंडातल्या गुंडांना येथे आश्रय मिळाला. आज या निधर्मीवादाचे मोल सर्वाधिक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळी देशभक्ती गंगाप्रवाहासारखी धो धो वहात होती. देशभक्तांचे ते आश्रयस्थान होते. त्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक हा खोटा निधर्मीवाद सर्व प्रकारच्या, सर्व क्षेत्रांतल्या गुंडांचा प्रथम आणि अंतिम आश्रय झाला आहे. महत्त्वाकांक्षी धूर्त राजकारणी या निधर्मीवादाचा वाफर मतफेटी भक्कम करण्याकरिता करतात. आधुनिक बुद्धीमान फुरोगामित्वाचे रंग देतात. हिंसक, आक्रमक आणि अल्फसंख्य जमाती स्वतःच्या भरभराटीकरिता याचा वापर करतात. हिंसक, व्रूर आणि आक्रमक गुंडांना सत्ता देऊन या मिथ्या निधर्मीवादाने भारताला जगणे हैराण केले. - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, २१.४.२०११) अराजकता, संस्कृतीहीनता, स्वैराचार, स्वेच्छाचार आणि अशास्त्रीय पद्धती यांना समूळ नष्ट करण्यासाठी वैदिक मार्गक्रमण करण्याची आवश्यकता !

     आपल्या संस्कृतीतत्त्वांना विसरून कुठलेही राष्ट्र जिवंत राहू शकत नाही. आज आमच्या देशात वाढत असलेली अराजकता, संस्कृतीहीनता, स्वैराचार, स्वेच्छाचार आणि अशास्त्रीय पद्धती यांना समूळ नष्ट करण्यासाठी वैदिक मार्गक्रमण करण्याची आवश्यकता आहे. संपूर्ण व्यवस्था इतकी अस्पष्ट, अर्धवट, बिनबुडाची आणि भ्रष्ट झाली आहे की, संसद, विधानसभा इतकेच नव्हे, तर न्यायालयेसुद्धा असक्षम सिद्ध होत आहेत.

सनातन गेली १० वर्षे सांगत होते, ते आता करणारे महाराष्ट्र शासन !

    तपासयंत्रणा किंवा शासकीय अधिवक्ता यांनी कर्तव्यात कसूर ठेवल्यामुळे न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्यास त्यासाठी संबंधितांवर दायित्व निश्‍चित करून कारवाई करण्याचे महाराष्ट्र शासनाने ठरवले आहे.

प्रक्रियेला भावाची जोड दिल्यास अल्प कालावधीत साधनेचे ध्येय साध्य होणार, याविषयी साधिकेचे झालेले चिंतन

कु. शर्वरी बाकरे
१. नामजपाला बसल्यावर श्रीकृष्ण हृदयात येणार; म्हणून त्याच्या मार्गावर नामजपाच्यापायघड्या घालूया, असा विचार येणे आणि प्रत्येक नाम म्हणजे पायघड्यांवरील एक-एकफूल आहे, असा भाव ठेवून नामजप करणे
      १३.३.२०१५ या दिवशी माझे सकाळी लवकर आवरून झाले. प्रार्थना करून नामजप करण्यास बसूया, असा माझ्या मनात विचार आल्याने मी नामजपाला बसले. मी श्रीकृष्णाला प्रार्थना केली. हे श्रीकृष्णा, तूच माझ्या हृदयात ये. तुझे अस्तित्व मला अनुभवता येऊ दे. त्यानंतर माझ्या मनात विचार आला, श्रीकृष्णाने हृदयात यावे, हे माझे ध्येय आहे. तो येणारच आहे.

शांत, सहनशील आणि ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची अन् उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली देवद आश्रमातील चि. वर्षा सिद्धेश पुजारी (वय ८ मास) !

सौ. लक्ष्मी पुजारी आणि चि. वर्षा
१. सौ. लक्ष्मी सिद्धेश पुजारी (वर्षाची आई)
१ अ. भजने म्हणण्याची गोडी लागून 
अध्यात्माचे बीज रुजणे
     विवाहानंतर मी रामनाथी आश्रमात आले. तेव्हा मला साधना म्हणजे काय ? हेच ठाऊक नव्हते. माझ्या लहानपणी आमच्या गावात एका संस्थेचा सत्संग होत असे. तेथे भजन म्हणायला शिकवत. तेव्हापासून मला भजने म्हणण्याची गोडी लागली आणि त्यातूनच माझ्यात अध्यात्माचे

प्रतिकूल परिस्थितीला ईश्‍वराच्या श्रद्धेच्या बळावर तोंड देणार्‍या आणि मुलीला साधनेत सर्वतोपरी साहाय्य करणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या शिरोडा, सिंधुदुर्ग येथील श्रीमती वैशाली शशिकांत हाडये !


श्रीमती वैशाली हाडये
     शिरोडा, सिंधुदुर्ग येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या श्रीमती वैशाली शशिकांत हाडये यांच्याविषयी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारी त्यांची मुलगी कु. कविता यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे पाहूया.
१. सेवेची तळमळ
     दैनिक सनातन प्रभात चालू झाल्यापासून आई प्रसारात सेवेला जायची. बाबा घरी असायचे. त्या वेळी त्यांचे जेवण बनवून आणि घरची सगळी कामे करून आई बाहेर जायची. प्रसारातून येऊन परत जेवण बनवायला लागायचे,

अत्यंत संयमी, शारीरिक त्रासांना शांतपणे तोंड देणारे आणि सतत देवाच्या अनुसंधानात असलेले पुणे येथील प.पू. वसंत (अण्णा) कर्वे !

प.पू. वसंत (आण्णा) कर्वेगुरुजी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !
प.पू. वसंत कर्वेगुरुजी
     पुणे येथील संत प.पू. वसंत (अण्णा) कर्वेगुरुजी यांनी २२ ऑक्टोबर या दिवशी रात्री देहत्याग केला. ते नाथ संप्रदायानुसार साधना करत असत. सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. डॉ. आठवले, तसेच सनातन संस्था यांच्यावरील अरिष्ट दूर व्हावे, यासाठी वयाच्या ९० व्या वर्षीही ते कानिफगडावर जाऊन प्रार्थना करत असत. तसेच त्यांनी विविध आध्यात्मिक स्तरावरील उपायही करण्यास सांगितले होते. हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला त्यांनी आशीर्वाद दिले होते. त्यांनी सनातनचे कार्य, सर्व आश्रम आणि साधक यांच्यावर त्यांचे कृपाछत्र धरले होते. अशा संतांच्या चरणी सनातन परिवार अखंड कृतज्ञ आहे. त्यांच्या देहत्यागाच्या निमित्ताने येथे लेखरूपी शब्दसुमनांजली अर्पण करण्याचा प्रयत्न करत आहोत ! 
(टीप : हे लिखाण प.पू. अण्णा कर्वेगुरुजी यांनी देहत्याग करण्यापूर्वीचे आहे. ते जसे आहे तसे प्रसिद्ध करत आहोत.)

देवाला शरणागत भावाने प्रार्थना केल्यावर देव प्रत्येक गोष्टीत साहाय्य करतो, याची श्री. वाल्मिक भुकन यांनी घेतलेली प्रचीती

श्री. वाल्मिक भुकन
     भ्रमणभाषची बॅटरी काढली की, गजर होऊ शकत नाही. असेच घड्याळाचेही आहे; परंतु देवाने दिलेला आवाज कधीच संपू शकत नाही. आपण झोपतांना देवाला शरणागत भावाने प्रार्थना केली की, देव आपल्याला त्या त्या वेळी नक्की उठवतो. जसे सूर्य १ मिनिट उशिरा उगवला किंवा ५ मिनिटे आधी मावळला, असे होत नाही, तसेच देव त्याच्या कार्यात कधीही मागे-पुढे करत नाही. यासंदर्भात मला आलेल्या अनुभूती येथे देत आहे. १. मला १२.१.२०१५ या दिवशी पहारा सेवा होती. त्यामुळे मी रात्री ९.३० वाजता झोपण्यापूर्वी रात्री ११ वाजता उठण्यासाठी गजर लावला आणि मला देवाने अचानक १०.५९ मिनिटांनी उठवले. मला अप्रूप वाटले. हे केवळ

अहंभावाने ग्रस्त असल्याने आणि मायेत गुरफटल्याने ईश्‍वराचे सगुण रूप असलेल्या संतांप्रती आदरभावाने न वागता उपहासाने वागणारे कर्मदरिद्री हिंदू !

सौ. शालिनी मराठे
     सूर्य कितीही तेजस्वी असला, तरी मातीच्या गोळ्यावर त्याचे प्रतिबिंब पडत नाही. त्याच्या तेजाची धारणा करण्यासाठी आरसा किंवा स्फटीकच असायला हवा. देवा, आपला भारत देश आता मातीचा गोळा बनला आहे. त्याचे हिंदुत्व हरवले आहे. आजच्या स्थितीला हिंदु समाज इतका रसातळाला गेला आहे की, त्याला संत तर ओळखता येत नाहीतच; पण कुणी सांगितले, संतांची ओळख करून दिली, तर त्यांच्याशी कसे बोलावे, कसे वागावे, त्यांचा कसा लाभ करून घ्यावा, हेही कळत नाही. पुढील काही प्रसंगांतून हे लक्षात येते. तेव्हा संताचे महत्त्व समाजाला सांगायला हवे, असे वाटले; म्हणून हा खटाटोप !

सर्व जिल्हासेवक अथवा आश्रमसेवक यांच्यासाठी सूचना दीर्घ कालावधीपासून शारीरिक व्याधी असलेल्या साधकांना प.पू. पांडे महाराजांच्या उपायांचा लाभ होण्यासाठी त्यांची माहिती कळवा !

     काही साधक दीर्घ कालावधीपासून एखाद्या शारीरिक व्याधीने ग्रस्त असतात. सर्व प्रकारची औषधे घेऊनही, तसेच उपचार करूनही ती व्याधी सुधारण्याची लक्षणे दिसत नाहीत. अशा वेळी त्यांना प.पू. पांडे महाराजांच्या उपायांचा लाभ घेता येण्याच्या दृष्टीने जिल्हासेवक अथवा आश्रमसेवक यांनी बाजूच्या सारणीनुसार त्यांची माहिती भरून घ्यावी आणि ज्यांची साधना चांगली चालू आहे, अशाच साधकांची माहिती smvdevad@gmail.com या संगणकीय पत्त्यावर पाठवावी. साधकांच्या त्रासानुसार

निवृत्ती वेतनधारकांनी नोव्हेंबर मासात अधिकोषाला लाईफ सर्टिफिकेट द्यावे !


      शासकीय नोकरी करणार्‍यांना निवृत्तीनंतर प्रत्येक मासाला निवृत्ती वेतन (पेन्शन) देण्यात येते. सर्व निवृत्ती वेतनधारकांनी आपण ज्या अधिकोषातून निवृत्ती वेतन घेतो, तेथे प्रतिवर्षी नोव्हेंबर मासात लाईफ सर्टिफिकेट देणे अपेक्षित आहे. असे केल्यासच पुढील वर्षभर निवृत्ती वेतन

कर्नाटकमध्ये दोन साधक जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

कुणिगल येथील सनातनच्या साधिका सौ. सरळा मुनिराज यांनी गाठली ६१ टक्के पातळी !
डावीकडून सौ. तारा शेट्टी सौ. सरळा मुनिराज यांचा सत्कार करतांना
      बेंगळुरू - तळमळ, प्रेमभाव, मनमोकळेपणा आणि भाव आदी गुणांनी युक्त असलेल्या कुणिगल येथील सनातन संस्थेच्या साधिका सौ. सरळा मुनिराज यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे १९ ऑक्टोबर या दिवशी घोषित करण्यात आले. या निमित्ताने भगवान श्रीकृष्णाची प्रतिमा आणि भेटवस्तू देऊन ६२ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या बेंगळुरू येथील जिल्हासेविका सौ. तारा शेट्टी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

देवाच्या कृपेने अपघातात डोळा सुरक्षित राहिल्याची आलेली अनुभूती

     ११.५.२०१५ या दिवशी सकाळी मी नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी गेले होते. तेव्हा आंब्याच्या झाडावर माकडाने उडी घेतली आणि झाडावरची कैरी माझ्या डोक्यावर पडून माझा उजवा डोळा बंद झाला. त्या वेळी मला काहीच सुचत नव्हते. त्या वेळी देवाने मला सुचवल्याप्रमाणे मी डोळ्यांवर एक घंटा बर्फ ठेवला आणि नामजप चालू केला. त्या वेळी मला थोडे बरे वाटले. त्यानंतर आम्ही आधुनिक वैद्यांकडे गेलो. त्यांंनी तपासून १५ दिवसांचे औषध दिले आणि सांगितले, जर १५ दिवसांत डोळा उघडला नाही, तर शस्त्रकर्म

गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपूजन चालू असतांना हात दुखू लागणे आणि प्रार्थना केल्यावर दुखणे अल्प होणे

     ३१.७.२०१५ या गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपूजन चालू असतांना गुरुचरणी सतत कृतज्ञता व्यक्त होत होती आणि माझा नामजप आपोआप होत होता. अकस्मात् माझ्या उजव्या हाताचा दंड गरम झाला आणि दंडातून वाफा बाहेर पडत आहेत, याची मला जाणीव झाली. त्या वेळी देवाला प्रार्थना केली, बरेच दिवस माझा उजवा हात दुखत आहे. देवा, काही त्रास असेल, तर तूच त्याचे निवारण कर. थोड्या वेळाने माझ्या दंडातील

तीव्र प्रारब्धामुळे अनेक दुर्धर आजारांना तोंड देतांनाच आंतरिक साधनेने ६५ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त करणारा सांगलीतील विकलांग साधक श्री. संकेत गुरुदास कुलकर्णी !


       सांगलीतील कुलकर्णी दांपत्याचे संकेत हे तिसरे अपत्य. ९.१.१९९० या दिवशी संकेतचा जन्म झाला. त्याला जन्मजातच कंबरेजवळ आवाळू (गाठ) असल्याने त्याच दिवशी दुसर्‍या रुग्णालयात उपचारांकरता भरती करण्यात आले. त्यानंतर वयाच्या २२ वर्षांपर्यंत त्याच्यावर अनेक गुंतागुतीची शस्त्रकर्मे करावी लागली. अशा अपंग अवस्थेतही तो गेल्या १४ वर्षांपासून सनातन संस्थेच्या माध्यमातून नामजपादी साधना करत आहे. गुरुपौर्णिमा २०१५ ला त्याची आध्यात्मिक पातळी ६५ प्रतिशत झाल्याचे घोषित करण्यात आले. त्याच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी सांगितलेल्या त्याच्या व्याधी, तसेच त्याच्या वर्गशिक्षिकांनी सांगितलेली त्याची गुणवैशिष्ट्ये आणि त्याच्या आईला आलेल्या अनुभूती यांविषयीची माहिती पुढे देत आहोत. 
१. तीव्र प्रारब्धामुळे अनेक दुर्धर आजारांना तोंड द्यावे लागणे
१ अ. जन्माच्या दुसर्‍या दिवशी मज्जारज्जूला संरक्षण देण्यासाठी पाठीवर शस्त्रकर्म
     संकेतला जन्मजातच कंबरेजवळ आवाळू (गाठ) होते. जन्माच्या दुसर्‍या दिवशी संकेतच्या पाठीवर शस्त्रकर्म करून तेथील मज्जारज्जूला संरक्षण देण्यात आले; कारण पाठीच्या मणक्यांची वाढ अपूर्ण झाल्यामुळे मज्जारज्जूचा भाग त्यातून बाहेर आला होता. त्यावर केवळ पापुद्य्रासारखे आवरण होते. गर्भाशयात असल्यापासूनच या भागाला संरक्षण नसल्यामुळे त्यातील नसांना दुखापत झाली होती. दुखापत झाल्यामुळे मेंदूकडून पायांना आणि मल-मूत्र विसर्जन करणार्‍या स्नायूंना संदेश पोचत नाहीत. साहजिकच मल-मूत्रावरील नियंत्रण आणि पायातील शक्ती न्यून होते. यामध्ये काहींची शक्ती पूर्णपणेही जाऊ शकते.
१ आ. वय - ४ वर्षे - अपंगत्व वाढू नये, यासाठी शस्त्रकर्म
     संकेतच्या मेंदूची क्षमता मंदावली होती. तो ४ वर्षांचा झाला, तरी तो चालत नव्हता; म्हणून मणक्याची एम्.आर्.आय. चाचणी करण्यात आली. त्याचे अपंगत्व वाढू नये; म्हणून आणखी एक शस्त्रकर्म केले.
१ इ. वय - १० वर्षे - पायांचे आखडलेले सांधे सरळ करण्यासाठी शस्त्रकमर्र्
     वयाच्या १० व्या वर्षी संकेतच्या दोन्ही पायांत असलेल्या व्यंगावर अस्थितज्ञांकडून शस्त्रकर्म करून घेतले. त्यामुळे काही प्रमाणात पायांचे आखडलेले सांधे सरळ झाले; परंतु स्नायूत पुरेशी शक्ती नसल्यामुळे तो चालू शकला नाही. मल-मूत्रावर नियंत्रण नसल्याने त्याचे सर्व करणे आणि सेवा करणे कठीण होते.

पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्यामधील प्रेमभावामुळे धर्माभिमान्यांनी त्यांना आलिंगन देणे

  
पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
   ११.६.२०१५ या दिवशी चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनासाठी सुरतचे श्री. शिवओम मिश्रा आले होते. जेव्हा मी त्यांना पू. पिंगळेकाकांकडे भेटण्यासाठी घेऊन गेलो, तेव्हा त्यांनी पू. पिंगळेकाकांना एकदम आलिंगन दिले. मी एरव्ही त्यांना बरेचदा भेटतो; परंतु ते सहसा कुणाला आलिंगन देतांना

सनातनच्या प्रसारातील टप्पे

      १. जिज्ञासू, २. हितचिंतक, ३. साधक, ४. संत, ५. देहधारी ऋषी योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन ६. आणि आता नाडी अन् संहिता भविष्यांच्या माध्यमांतून सूक्ष्म-जगतातील ऋषींचा आशीर्वाद आणि त्यांनी

साधकांनो, साधनेतील आनंद हिरावून घेणार्‍या अपेक्षांच्या विचारांवर मात करून निरपेक्षतेला आपली आध्यात्मिक सखी बनवा !

पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ
     बहुतांश सर्व साधकांंमध्ये अपेक्षा करणे हा अहंचा पैलू अधिक प्रमाणात असतो. अपेक्षायुक्त विचारांत राहिल्याने साधकांच्या साधनेची कशी हानी होते, तसेच निरपेक्षता असल्यास कसा आनंद मिळतो, ते पुढे देत आहे.
१. साधना चालू केल्यावर आरंभी असलेली साधकाची निरपेक्ष स्थिती !
     शिक्षण, नोकरी, तसेच घर-दार यांचा त्याग करून

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
देवतेच्या मूर्तींचे विसर्जन खड्डयात होऊ देणार्या हिंदूंवर देवतेची अवकृपा होईल हे निश्चित !
 'आपल्या नातेवाईकाचे प्रेत कचर्याच्या गाडीतून कुठच्या तरी खड्डयात नेऊन टाकलेले कोणालाच सहन होणार नाही; पण प्रशासनाने धर्मद्रोही कृत्य करून कचर्योच्या गाडीतून देवतेच्या मूर्ती कुठच्या तरी खड्डयात नेऊन टाकल्या, तर हिंदूंना काही वाटत नाही ! अशा हिंदूंवर देवता कृपा करील कि तिची अवकृपा होईल ?' - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१५.१०.२०१५)  

बोधचित्र


प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

साधकाचे शत्रू 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
         द्वेष, मत्सर आणि अहंकार हे साधकाचे प्रमुख शत्रू आहेत. त्यांच्यावर विजय मिळवला की, प्रगती झालीच ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
आश्रमाविषयीचा दृष्टीकोन
आश्रम माझा नाही; पण मी आश्रमाचा आहे.
भावार्थ : आश्रम माझा नाही म्हणजे आश्रमावर माझे स्वामित्व (मालकी) किंवा अधिकार (हक्क) नाही; कारण तो गुरूंचा आहे. मी आश्रमाचा आहे म्हणजे मी गुरूंच्या आश्रमाचा असल्याने आश्रमाची, आश्रमात आलेल्यांची काळजी घेणार आणि सेवा करणार. या दृष्टीकोनामुळेच आश्रमातील कामे करूनही आश्रमाविषयी प्रेम निर्माण होत नाही, तर प्रीती निर्माण होते.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

भारतीय संस्कृतीची महती !

संपादकीय
    युगप्रवर्तक, देशप्रेमी, शिक्षक, पत्रकार अशा विविध उपाध्यांनी नटलेले लोकमान्य टिळक वर्ष १९०८ मध्ये नाशिक येथे गेले होते. राममूर्ती सर्कसचे तेथे खेळ चालले होते. लोकमान्य टिळक त्यांना मिळालेल्या निमंत्रणावरून तेथे गेले. त्यांचा सर्कसतर्फे सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात कुणा एका वक्त्याने श्री. राममूर्ती यांचा उल्लेख इंडियन सँडो असा केला. युरोपमध्ये त्या सुमारास सँडो नावाचा एक मल्ल प्रसिद्धीच्या झोतात होता; या सूत्राचा आधार घेऊन संबंधित वक्त्याने श्री. राममूर्ती यांचे तशा अर्थाने कौतुक केले होते; कारण श्री. राममूर्ती एक कर्तबगार व्यक्ती म्हणून प्रसिद्ध पावलेले होते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn