Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।


कोटी कोटी प्रणाम !

श्री साईबाबा यांची आज पुण्यतिथी 
 

ऐन नवरात्रोत्सवात बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून श्री दुर्गादेवीच्या १७ मूर्तींची विटंबना !

पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदूंवर होणारे
अत्याचार रोखण्यासाठी शासनाने त्वरित पाऊले उचलावीत, ही हिंदूंची अपेक्षा !
     ढाका - बांगलादेशमध्ये या वर्षी दुर्गापूजा उत्सवात धर्मांधांकडून दुर्गामातेच्या मूर्तींची विटंबना करण्याच्या १७ घटना उघडकीस आल्या आहेत. नुकतेच दक्षिण बांगलादेशमध्ये धर्मांधांनी रात्रीच्या वेळी दुर्गामातेच्या तीन मूर्तींची तोडफोड केली आणि अंधाराचा लाभ उठवूत पळ काढला. घटनास्थळी पोलिसांनी त्वरित भेट दिली असून आरोपींना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन दिले.
      बांगलादेश पूजा उत्सव साजरा करणार्‍या परिषदेचे अध्यक्ष श्री. काजल देबनाथ यांनी श्रीदुर्गादेवीच्या मूर्तींच्या विटंबनेची माहिती दिली. अशाशुनी येथे ६ ऑक्टोबर या दिवशी ५ मूर्तींची विटंबना झाल्याचे त्यांनी सांगितले.

सत्त्वगुणी हिंदूंच्या रक्षणासाठी सीमोल्लंघन करा !

परात्पर गुरु डॉ. आठवले
     दसर्‍यानिमित्त परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा संदेश विजयादशमी म्हणजे दशभुजा दुर्गादेवी आणि प्रभु श्रीराम यांनी अनुक्रमे महिषासुर आणि रावण या दुष्प्रवृत्तींशी युद्ध करून त्यांचा नाश केला, तो दिवस ! दसरा हा हिंदु देवतांचा विजयदिन असला, तरी तो प्रतिवर्षी केवळ कर्मकांड म्हणून साजरा करणे यात कुठलाही पुरुषार्थ नाही. पूर्वीचे हिंदु राजे पुरुषार्थी असल्याने ते प्रतिवर्षी विजयादशमीला दुष्प्रवृत्तींच्या निर्मूलनासाठी सीमोल्लंघन करीत. सध्या मात्र दुष्प्रवृत्ती प्रतिदिन त्यांच्या मर्यादांचे उल्लंघन करत असून हिंदू प्रतिदिन पराभुतासारखे जीवन जगत आहेत. अशा स्थितीत खरी विजयादशमी साजरी करण्यासाठी आजपासून सत्त्वगुणी हिंदूंच्या रक्षणासाठी सीमोल्लंघन करण्यास आरंभ करा ! यासाठी अन्य मुहुर्ताची वाट पाहू नका; कारण वेळ थोडा आहे. दिसेल ते कर्तव्य या विचाराने तात्काळ कृती करणे, हीही साधनाच आहे !

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या वंदनीय उपस्थितीत ॐ आनन्दं हिमालयं संप्रदायाच्या अनुष्ठानास आजपासून प्रारंभ

       नाशिक, २१ ऑक्टोबर (वार्ता.) - योगतज्ञ दादाजी वैशंपायन ( वय ९५ वर्षे) हे अतिउग्र साधना करण्यासाठी विजयादशमीच्या मुहूर्तावर गुजरात राज्यातील सापुतारा येथील डोंगरावर जातील, तेव्हा विविध ठिकाणच्या ३२ उच्चविद्याविभूषित ज्येष्ठ साधकांबरोबर असतील. हे साधकही स्वतंत्रपणे कष्टप्रद होणारी साधना करतील. दिवसभर सूर्याकडे पाहून डोळे उघडझाप करीत सिद्धसूर्यनारायण स्तोत्रही म्हणतील. पुणे येथील उच्चविद्याविभूषित श्रेष्ठ साधक श्री. चिंतामण खेडकर हे अनुष्ठानाचे विशेष असतील. हे अनुष्ठान २२ आणि २३ ऑक्टोबर, असे दोन दिवस चालू राहील.
     या अनुष्ठानाचे मुख्य उद्दिष्ट हिमालयातील कुलू खोर्‍यातील गुहेत साधना करत असलेले महान तपस्वी श्री पूज्य आनंदस्वामीजी यांचा हस्तस्पर्श, तसेच महान दर्शन यांचा साधकांना लाभ व्हावा, हे आहे.

पोलिसांनी प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयात केले मान्य

मुंबई आणि नवी मुंबई येथील शेकडो अवैध भोंग्यांवर कारवाई नाही !
     मुंबई - येथील ९६५ धार्मिक स्थळांवर अवैध भोंगे आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही, असेही पोलिसांनी एका प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयाला सांगितले आहे. नवी मुंबई पोलिसांनी किती अवैध भोंगे आहेत, हे सांगितलेच नाही. केवळ १३ भोेंग्यांवर कारवाई केली, अशी आकडेवारी प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयाला दिली आहे. विशेष म्हणजे न्यायालयाने वर्षभरापूर्वी आदेश देऊनही मुंबई आणि नवी मुंबई येथील प्रार्थनास्थळांवरील अवैध भोंग्यांवर पोलिसांनी कारवाई केलेली नाही.

केरळमध्ये माकपच्या साडेचार लक्ष कार्यकर्त्यांवर अपराधी कृत्यांचे खटले !

असा माकप सत्तेवर आल्यास जनतेला कधीतरी कायद्याचे राज्य देऊ शकेल का ?
      कोची - केरळ राज्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ४ लक्ष ६० सहस्र कार्यकर्त्यांवर अपराधी कृत्यांचे खटले दाखल आहेत. केरळ राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. ज्यांच्यावर असे खटले चालू आहेत त्यांना उमेदवारी नाकारण्याचे ठरवले, तर कुणाला उमेदवारी द्यावी ?, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे, असे मार्क्सवादी कॅम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कोडीयेर बाळकृष्णन् यांनी म्हटले आहे. या पक्षाने कराई राजन आणि कराई चंद्रशेखरन् या २ गुन्हेगारांना उमेदवारी दिली आहे.

पाकिस्तानी शेफचा फूड फेस्टिव्हल उधळून लावू ! - शिवसेनेची चेतावणी

भारतातील गरीब मुलांच्या साहाय्यासाठी शत्रूराष्ट्र पाकशी हातमिळवणी करण्याची काय आवश्यकता ?
     पुणे - ७ नोव्हेंबरला पुण्यात आयोजित करण्यात आलेला भारत-पाक फूड फेस्टिव्हल उधळून लावण्याची चेतावणी शिवसेनेने दिली आहे. पुण्यातील एका नामांकित हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या फेस्टिव्हलमध्ये भारत आणि पाक यांचे शेफ सहभागी होणार आहेत.
     पाकिस्तानी गायक गुलाम अली, पाकचे माजी परराष्ट्रमंत्री कसुरी, पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांच्या कार्यक्रमांना विरोध केल्यानंतर शिवसेनेने पाकिस्तानी लोकांच्या भारतातील कार्यक्रमाला विरोध कायम ठेवून तिच्या प्रखर राष्ट्रनिष्ठेचे प्रदर्शन केले आहे.

कलेच्या नावाखाली अंगप्रदर्शन करून शरिरावर टॅटू रंगवल्यामुळे धार्मिक उत्सवांना आलेले बीभत्स स्वरूप !

ही चित्रे केवळ प्रबोधनाच्या हेतूने छापत आहोत.
     कला ही ईश्‍वराला साध्य करण्याचे एक माध्यम आहे. ज्या कलेतून ईश्‍वराशी अनुसंधान साधले जाते, ती खरी कला आहे. हिंदु धर्मामध्ये ६४ कला आहेत. त्यांपैकी दशनवसनांगराग (दात, कपडे आणि अंग रंगवणे) ही एक कला आहे. पूर्वीच्या काळी नाटकांमध्ये देवतेचे रूप साकारण्यासाठी कलाकारांचे चेहरे रंगवले जात असत आणि त्याद्वारे देवतांच्या कथा सादर केल्या जात. ओडिशामधील गोटीपुआ नृत्यकलेमध्ये १६ वर्षार्ंखालील मुलांचे चेहरे नैसर्गिक रंगांनी रंगवून त्यांना स्त्री वेशभूषा केली जातेे.

मलाला आली, तर तिचे स्वागतच !

मलाला आणि कसुरी यांच्यातील भेद न कळणारे सुधींद्र कुलकर्णी म्हणे विचारवंत !
सुधींद्र कुलकर्णी यांच्या प्रश्‍नाला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे प्रत्युत्तर !
     मुंबई - मलाला भारतात आली, तर शिवसेना तिचे स्वागतच करील. ती म्हणजे काही कसुरी नव्हे. कसुरी यांनी काश्मीरमधील फुटीरतावाद्यांशी हातमिळवणी करून त्यांना भारताच्या विरोधात भडकवले होते. कसुरी ज्या आतंकवाद्यांशी हातमिळवणी करत आहेत, त्या आतंकवाद्यांशी मलालाने लढा दिला होता, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते श्री. संजय राऊत यांनी दिली. पाकप्रेमी सुधींद्र कुलकर्णी यांनी एका वाहिनीवर आता आम्ही मलालाला बोलावणार आहोत, त्यालाही शिवसेना विरोध करणार का, अशी विधाने केली होती. त्यावर उत्तर देतांना ते बोलत होते. 
पाकिस्तानी कलाकारांनी भूमिका केलेल्या चित्रपटांना विरोध करणार ! - शिवसेना 
     पाक कलाकार फवाद खान यांचा दिल है मुश्किल आणि अभिनेत्री माहिरा खान यांचा रईस या आगामी चित्रपटांना शिवसेना विरोध करणार आहे. त्या संदर्भातील पत्र या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना पाठवण्यात आले आहे. या चित्रपटांमध्ये भारतीय कलाकारांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

हिंदूंनो, धर्मशिक्षणाचा अभाव किंवा धर्मद्रोह यांमुळे होणार्‍या अपप्रचाराला बळी पडू नका !

     अंनिसवाले आणि धर्मद्रोही यांना हिंदूंचे सण आणि उत्सव आले की, पर्यावरण रक्षणाचा उमाळा येतो. गणेशमूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जित करायची नाही, कारण प्रदूषण होते म्हणणारे मूर्ती मातीचीच करून नैसर्गिक रंग द्या असा कधी प्रचार करत नाहीत. तसेच आता दसरा आल्यावर सोनं लुटण्याच्या प्रथेमुळे आपट्याचे झाड ओरबाडले जाते असे सांगून निसर्गाच्या रक्षणाचे ठेकेदार असल्याप्रमाणे हे धर्मद्रोही सरसावले आहेत. असाच एक संदेश दसर्‍याच्या आदल्या दिवशीपासून व्हॉट्अ‍ॅपवर फिरत आहे. 

निवृत्ती वेतनधारकांनी नोव्हेंबर मासात अधिकोषाला 'लाईफ सर्टिफिकेट' द्यावे !

पू.(सौ.) बिंदा सिंगबाळ
     'शासकीय नोकरी करणार्‍यांना निवृत्तीनंतर प्रत्येक मासाला 'निवृत्ती वेतन' (पेन्शन) देण्यात येते. सर्व निवृत्ती वेतनधारकांनी आपण ज्या अधिकोषातून निवृत्ती वेतन घेतो, तेथे प्रतिवर्षी नोव्हेंबर मासात 'लाईफ सर्टिफिकेट' देणे अपेक्षित आहे. असे केल्यासच पुढील वर्षभर निवृत्ती वेतन चालू राहू शकते.' 
- (पू.) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.१०.२०१५) 

फलक प्रसिद्धीकरता

     गुन्हेगार कार्यकर्ते असलेला माकप कधी कायद्याचे राज्य देईल का ? 
     केरळ राज्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ४ लक्ष ६० सहस्र कार्यकर्त्यांवर अपराधी कृत्यांचे खटले दाखल झाले आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कुणाला उमेदवारी द्यावी ? असा प्रश्‍न पक्षाच्या तेथील नेत्यांना पडला आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! 
 keralme CPI(M) ke 4 lakh 60 sahastra 
karyakartaonpar hai aparadhi abhiyog ! 
 kya aisi party kabhi kanoon ka raj de sakti hai ?

जागो ! 
 केरलमें माकपाके ४ लाख ६० सहस्र 
कार्यकर्ताआेंपर है अपराधी अभियोग ! 
क्या ऐसी पार्टी कभी कानून का राज दे सकती है ?

लिपीक भरती परीक्षेत भ्रमणभाष आणणार्‍या २ विद्यार्थ्यांना अटक

शिक्षणक्षेत्रातील अराजक !
     पालघर - येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या लिपीक भरती परीक्षेत भ्रमणभाष घेऊन येणार्‍या २ विद्यार्थ्यांना अटक केली आहे. विशेष म्हणजे या अगोदरची प्रश्‍नपत्रिका फुटल्याने रविवारी पुनर्परीक्षा घेण्यात आली होती.

सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीच्या मागणीच्या विरोधात मुंबई उपनगर जिल्हाधिकारी आणि उप-जिल्हाधिकारी यांना निवेदने

बंदीच्या विरोधात ठोस भूमिका घेण्याची मुंबईतील विविध मंडळांतील हिंदुत्ववाद्यांची मागणी 
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी श्री. शेखर चन्ने
यांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी

हिंदूंनो, विजयादशमीला हिंदु राष्ट्राचा संकल्प करून सीमोल्लंघन करा ! - सुमित सागवेकर, हिंदु जनजागृती समिती

शंभूराजे प्रतिष्ठान, कोपरखैरणेच्या वतीने नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने राष्ट्र-धर्म जागृतीपर मार्गदर्शन

       कोपरखैरणे (नवी मुंबई) - धर्मासाठी कसे जगावे, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि धर्मासाठी कसे मरावे, हे आम्हाला धर्मवीर संभाजी महाराजांनी शिकवले. शिवाजी महाराजांनी श्री भवानीदेवीची भक्ती करून आणि संतांचे मार्गदर्शन घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आपल्यालाही हाच आदर्श घेऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करायची आहे. विजयादशमीला हिंदु राष्ट्राचा संकल्प करून सीमोल्लंघन करूया !, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुमित सागवेकर यांनी केले. येथील सेक्टर १६ येथे शंभुराजे प्रतिष्ठान आणि युवा मित्र सेना यांच्या वतीने नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने राष्ट्र-धर्म जागृतीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.

साहित्यिकांनी पुरस्कार परत करणे उचित नाही ! - ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. जयंत नारळीकर

     मुंबई - कायदा आणि सुवस्था राखण्याचे दायित्व शासनाचे आहे. त्यात साहित्य अकादमीचा काहीही संबंध नाही. त्यामुळे काही घटनांच्या निषेधार्थ साहित्य अकादमीचे पुरस्कार परत करणे उचित नाही, असे मत ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केले आहे. एका वृत्तवाहिनीवर बोलतांना डॉ. नारळीकर यांनी त्यांची भूमिका मांडली. 

दसरा साजरा करण्याची पद्धत

      हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजितापूजन आणि शस्त्रपूजा ही चार कृत्ये करायची असतात.
सीमोल्लंघन : अपराण्हकाली (तिसर्‍या प्रहरी, दुपारी) गावाच्या सीमेबाहेर ईशान्य दिशेकडे सीमोल्लंघनासाठी जातात. जिथे शमीचा किंवा आपट्याचा वृक्ष असेल, तिथे थांबतात.

विजयादशमीच्या दिवशी करावयाची कृत्ये आणि त्यामागील शास्त्र !

      आश्‍विन शुक्ल पक्ष दशमी या दिवशी येणार्‍या दसरा या सणाच्या शब्दाची एक व्युत्पत्ती दशहरा अशीही आहे. दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे हरल्या आहेत. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसर्‍याच्या आधीच्या नऊ दिवसांच्या नवरात्रात दाही दिशा देवीच्या शक्तीने भारलेल्या असतात. नियंत्रणात आलेल्या असतात, म्हणजेच दाही दिशांतील दिक्भव, गण इत्यादींवर नियंत्रण आलेले असते, दाही दिशांवर विजय मिळालेला असतो.

विजयादशमीचे ऐतिहासिक आणि धार्मिक माहात्म्य !

१. रामाचा पूर्वज रघु या अयोध्याधिशाने विश्‍वजित यज्ञ केला. त्याने सर्व संपत्तीचे दान केले. नंतर तो एका पर्णकुटीत राहिला. कौत्स नावाचा एक शिष्य तिथे आला. त्याला गुरुदक्षिणा म्हणून देण्यासाठी १४ कोटी सुवर्णमुद्रा हव्या होत्या. रघु कुबेरावर आक्रमण करण्याला सिद्ध झाला. कुबेराने आपटा आणि शमी या वृक्षांवर सुवर्णाचा वर्षाव केला. कौत्साने फक्त १४ कोटी सुवर्णमुद्रा घेतल्या. बाकीचे सुवर्ण प्रजाजनांनी नेले. (कौत्साने आवश्यक तेवढ्याच सुवर्णमुद्रा घेतल्या आणि रघूने कौत्साला नको असलेल्या सर्व सुवर्णमुद्रा वाटून टाकल्या. ही आहे हिंदु संस्कृती ! कुठे त्यागावर आधारलेली महान हिंदु संस्कृती, तर कुठे प्रत्येक गोष्टीचा हव्यास असलेले सध्याचे राज्यकर्ते आणि जनता ! - संकलक)

दसर्‍याच्या दिवशी आपट्याचे पान देण्यामागील कारणे

  • मुळाशी आकृष्ट झालेल्या निर्गुण तेजोलहरी पानांमध्ये कार्यरत होत असणे : ब्रह्मांडातील निर्गुण तेजोलहरी आकृष्ट होऊन आपट्याच्या झाडाच्या मुळाशी सामावून रहातात. तेजतत्त्वाचे अधिष्ठान लाभल्यामुळे कालांतराने त्या लहरी झाडाच्या पानांमध्ये कार्यरत होतात. या तेजोलहरी इच्छा-क्रिया शक्तीशी संबंधित असतात.

दसरा आणि आपट्याचे पान

  • दसर्‍याला ब्रह्मांडमंडलातून दैवी स्पंदने भूमंडलाकडे आकृष्ट होणे : दसर्‍याचा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे त्या दिवशी ब्रह्मांडमंडलातून दैवी स्पंदने भूमंडलाकडे आधक प्रमाणात आकृष्ट होतात आणि भूमंडलावर कार्यरत रहातात. दसर्‍याच्या दिवशी आपट्याच्या पानांमधील तेजतत्त्व अधिक प्रमाणात जागृत होत असल्याने या दिवशी आपट्याची पाने देण्याला विशेष महत्त्व आहे. 
  • आपट्याचे पान दिल्यामुळे त्याग आणि प्रीती वाढणे अन् विजयाचा दिवस म्हणून आनंदोत्सव साजरा होणे : एकमेकांना आपट्याचे पान दिल्यामुळे दोन्ही व्यक्तींतील त्याग आणि प्रीती यांत वाढ होते. आपट्याचे पान एकमेकांना देणे, हे आपल्याकडील सोन्याप्रमाणे मौल्यवान वस्तू दुसर्‍याला देण्यासारखे आहे. दसरा हा विजयाचा दिवस असल्यामुळे या दिवशी आपट्याचे मौल्यवान पान एकमेकांना देऊन आनंदोत्सव साजरा करण्यात येतो. 
     दसर्‍याच्या दिवशी आपट्याचे पान देणे, हे सौजन्यता, समृद्धता आणि संपन्नता दर्शवते. 
- कु. प्रियांका लोटलीकर, अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. २७.२.२०१३)

प्राचीन भारतीय शस्त्रास्त्रविद्या

      प्राचीन काळात कोणतीही गोष्ट जेव्हा विशिष्ट प्रकारे, विशिष्ट नियमांच्या आधाराने तर्कशुद्धरित्या मांडली जाते, तेव्हा त्याला शास्त्र अशी संज्ञा प्राप्त होते. आपल्या पूर्वजांनी पाकशास्त्र, वैद्यकशास्त्र, नाट्यशास्त्र, संगीतशास्त्र, चित्रशास्त्र, गंधशास्त्र इत्यादी अनेक शास्त्रांचा अभ्यास केलेला दिसतो. या अनेक शास्त्रांपैकी शस्त्रास्त्रविद्या हे एक शास्त्र होय. पूर्वी शल्यचिकित्सेसाठी अशा काही विशिष्ट शस्त्रांचा वापर होत असे. विजयादशमीच्या निमित्ताने राजे आणि सामंत, सरदार हे लोक आपापली शस्त्रे अन् उपकरणे स्वच्छ करून ती ओळीने मांडतात आणि त्यांची पूजा करतात. त्याचप्रमाणे शेतकरी आणि कारागीर हे आपापली आऊते आणि हत्यारे यांची पूजा करतात. त्यानिमित्ताने प्राचीन शस्त्रास्त्रांचे लिखाण देत आहोत. 

धर्माचा खर्‍या अर्थाने विजय व्हावा, यासाठी हिंदु राज्य स्थापनेच्या ध्येयाने कृतीशील व्हा !

१. हे आर्य, हे हिंदूंनो ! तुम्ही विसरू नका की, तुम्ही विश्‍वातील सर्वश्रेष्ठ, सर्वांत प्राचीन धर्माचे आहात, ज्या धर्माने संपूर्ण विश्‍वाला जगा आणि जगू द्या, हा संदेश सर्वप्रथम दिला, तसेच समानता, माणुसकी, सहजीवन यांसारखे मानवतेचे उच्च आदर्श जगाला दिले. आज जगामध्ये जी काही माणुसकी दिसते, तिचा मूळ स्रोत हिंदूंच्या वेदांपासून मिळालेले ज्ञान हा आहे आणि तो हिंदूंच्या एकतेचा मुख्य आधारपण आहे. 

पराभूतांप्रमाणे वावरणार्‍या हिंदू राजांसमोर विजयी युद्धनीतीचा आदर्श उभा करणारे शिवछत्रपती !

     छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापूर्वीच्या काळातील बहुतांश राजांना युद्धनीती आणि चाणक्यनीती यांचा विसर पडला होता. त्यामुळे युक्तीची जोड न देता केवळ शक्तीच्या साहाय्याने युद्धे झाली. परिणामी हिंदू राजांकडून स्वतःचीच हानी होत असे. काही राजांच्या युद्धविषयक कल्पनाही चुकीच्या होत्या. हिंदू राजांच्या यांसारख्या चुका पुढे दिल्या आहेत. हा सगळा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज यांनी शक्तीला युक्तीची जोड देऊन पालटला. त्यामुळेच त्यांना युगप्रवर्तक म्हणतात.
१. स्वराज्यातच युद्ध ! 
    इतिहासकाळापासून हिंदू राजे शत्रूसमवेत स्वतःच्या भूमीवर युद्ध करत. त्यामुळे आपोआप त्याचा लाभ नेहमी शत्रूलाच मिळे. शत्रूचा पराजय झाला, तरी विध्वंस हिंदू राजाच्या राज्यातील प्रजेचा होई. स्वतःच्या भूमीवर युद्ध केल्यामुळे हिंदू राजांना विजय मिळूनही त्यांचे राज्य मात्र विस्तारत नसे.

श्रीकृष्णनीती : भारताला अराजकापासून वाचवू शकणारी विजयनीती !

     पाकिस्तान आणि चीन यांची भारताच्या सीमाभागात होत असलेली घुसखोरी अन् तस्करी दिवसागणिक वाढत आहे. दुसरीकडे भारताची पूर्वोत्तर राज्ये भारतापासून तोडण्याचा डाव ख्रिस्ती पूर्णत्वास आणत आहेत. अशा प्रकारेे विश्‍वासघातकी शत्रूराष्ट्रे आणि पंथप्रसारक यांच्याकडून भारताचे लचके तोडले जात आहेत. अशा स्थितीत राष्ट्ररक्षणासाठी एकमेव उपाय म्हणजे कृष्णनीतीचा अवलंब करणे; पण निधर्मीपणाचा टेंभा मिरवणारे भारतीय राज्यकर्ते ती कशी अवलंबणार ? त्यासाठी हिंदूंनाच कृष्णनीती कृतीत आणून धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्रासाठी कटिबद्ध व्हावे लागेल ! 
१. विश्‍वासघातकींना जशास तसेच उत्तर !
   महाभारताच्या काळात कौरवांनी वेळोवेळी कुटिल कारवाया करत पांडवांचा विश्‍वासघात केला. तेव्हा कौरवांसारख्या विश्‍वासघातकींच्या कुटिल कारवायांवर मात करण्यासाठी प्रसंगी जशास तसे उत्तर देण्याचे धोरणच अवलंबले पाहिजे, असे मार्गदर्शन श्रीकृष्णाने पांडवांना केले. या नीतीला अनुसरून आणि सत्याची कास धरून कृती केल्यानेच पांडवांनी कौरवांसमवेतच्या युद्धामध्ये विजय संपादन केला. महाभारतातून स्पष्ट झालेली ही कृष्णनीती म्हणजेच विजयनीती आहे. अविश्‍वासाचा मार्ग म्हणजे पाप, अशी भावना हिंदूंच्या मनामध्ये रुजवली गेली आहे. असे नैतिक मूल्यवर्धित वर्तन विश्‍वासार्ह असणार्‍यांच्या समवेतच केले जाऊ शकते. विश्‍वासघातकी वृत्ती असलेल्यांशी असे वर्तन करणे म्हणजे आत्मघातच होय, हे या कृष्णनीतीतून शिकायला मिळते.

विद्यार्थी जीवनातील लेखणी, पुस्तके आणि वह्या रूपी शस्त्रांचे पूजन करणे अन् आपल्या वर्तनातून त्यांचा अवमान होऊ न देणे, हाच खरा दसरा होय !

    विद्यार्थीमित्रांनो, आपण अनेक सण साजरे करतो आणि प्रत्येक सणातून आपल्याला जीवनाची अनेक नैतिक मूल्ये शिकायला मिळतात. ही मूल्ये आपण आपल्या जीवनात उपयोगात आणल्यास आपले जीवन आनंदी आणि आदर्श बनते. आपला प्रत्येक सण म्हणजे प्रत्यक्ष आदर्श जीवनाचा पाठच आहे. आपण दसरा या सणाचे महत्त्व जाणून घेऊया.
विद्यार्थ्यांमधील दहा दुर्गुणांना हारवण्याचा निश्‍चय 
करण्याचा दिवस म्हणजे दसरा ! 
     दसर्‍याला दशहरा असेही म्हणतात. दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे हरल्या आहेत. दसर्‍याच्या आधीचे नऊ दिवस देवीने असुरांशी युद्ध करून दहाही दिशांवर नियंत्रण मिळवले. मित्रांनो, तोच हा दिवस ! जसे देवीने असुरांचा नाश केला, म्हणजे वाईट गोष्टींचे निर्मूलन केले, तसा आपणसुद्धा या दिवशी आपल्यातील कोणत्याही दहा दोषांचे निर्मूलन करण्याचा निश्‍चय करायला पाहिजे. आपणसुद्धा आपल्यातील दहा दोषांचे निर्दालन करायचे आणि दहा दुर्गुणांना हारवायचे. तोच आपल्यासाठी खरा दसरा होय. मग मित्रांनो, आपण असे करूया ना ?

हिंदूंनो, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सीमोल्लंघन करा !

सीमोल्लंघन करा 
आपल्या संकुचित वृत्तीचे 
आणि व्यापक व्हा कृण्वंतो विश्‍वं आर्यम् या ध्येयानेे !
सीमोल्लंघन करा 
आपल्या स्वार्थी वृत्तीचे 
आणि त्याग करा तन-मनाचा राष्ट्रासाठी समर्पण भावाने ! 
सीमोल्लंघन करा मी 
आणि माझे कुटुंब या भावनेचे 
आणि संघटित व्हा 
हिंदू सारा एक या भावनेने !
     सध्या देशात सर्वत्र होणारे बाँबस्फोट, दंगली, हिंदु नेत्यांच्या हत्या आणि हिंदूंची सर्व बाजूंनी होणारी कोंडी पहाता राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी आपला जन्म सार्थकी लावण्याचा निश्‍चय आज विजयश्री खेचून आणणार्‍या दसर्‍याच्या दिवशी करूया आणि धर्म आणि अधर्म यांच्या लढाईत आपला निर्णायक विजय होईपर्यंत लढण्याची प्रतिज्ञा आज करूया ! देशांच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी आपली नेभळट आणि निष्क्रीय मानसिकता बदलण्याचे सीमोल्लंघन करा !

हिंदूंच्या सणांच्या वेळी पर्यावरणरक्षणाच्या नावाखाली अपप्रचार करणार्‍यांपासून सावधान !

     केवळ हिंदूंच्या सणांच्या वेळीच पर्यावरणप्रेम आठवणार्‍यांकडून दसर्‍याच्या निमित्ताने आपट्याच्या पानांची देवाणघेवाण करणार्‍यावर आक्षेप घेतला जाऊ लागला आहे. सोनं लुटण्याच्या निमित्ताने आपट्याची पाने एकमेकांना देण्याने निसर्ग ओरबाडला जातो. त्यामुळे प्रथा टाळून केवळ शुभेच्छा द्या, असे सांगणारा संदेश व्हॉटस् अ‍ॅपवर पसरवला जात आहे.

सनातन संस्थेवर होणारे खोटे आरोप आणि वस्तुस्थिती यांविषयी जाहीर जनसंवाद सभा

ठाणे
वार आणि दिनांक : शनिवार, २४ ऑक्टोबर २०१५
वेळ : सायंकाळी ६ 
स्थळ : वसंतराव नाईक सभागृह, रेल्वे स्थानकाजवळ, वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या वर, गोखले मार्ग, ठाणे (प). 
मान्यवर वक्ते 
  • श्री. अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था
  • श्री. रमेश शिंदे, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती 
  • पू. (कु.) अनुराधा वाडेकर, प्रसारसेविका, सनातन संस्था
  • श्री. ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल, अध्यक्ष, लष्करएहिंद

हिंदूंनो, देश अराजकाने पेटलेला असतांना स्वतःला विजयोत्सव साजरा करण्यासाठी लायक बनवा !

    हिंदूंनो, हिंदुद्वेष्टे व धर्मद्रोही यांच्या पराभवासाठी विजिगिषू वृत्ती जागृत करून धर्मध्वजा उंच फडकवा !
     हिंदूंच्या संघटितपणाचा अधिक लाभ दलित, गरीब आणि तरुण वर्गाला होईल; कारण निधर्मी राजकीय नेते हिंदूंच्या विरोधात असल्याने होणारी लूट थांबून देशात चांगले शासन निर्माण होईल. सशक्त आणि सावध राष्ट्रातच भ्रष्टाचार संपू शकतो. 
- श्री. आनंद शंकर पंड्या (पाक्षिक पावन परिवार, १ ते १५ मे २०११)

सण साजरे का करावेत ?

     सण साजरे केल्यामुळे आपल्याला प्रसन्नता जाणवून आनंद मिळतो. देवतांचे सण साजरे केल्यामुळे त्यांची आपल्यावर कृपा होते. यामुळे आपले आरोग्य, व्यवसाय आणि इतर इच्छित गोष्टी चांगल्या होतात.

देवतांची तत्त्वे आकृष्ट करणार्‍या सात्त्विक रांगोळ्या

११ ठिपके ११ ओळी

धर्माभिमानी हिंदूंनो, आपले सण, उत्सव हे आपल्याला मांगल्य, चैतन्य आणि सात्त्विकता प्रदान करणारे आहेत. या दिवशी विशिष्ट देवतांची तत्त्व कार्यरत होऊन त्याचा आपल्याला आध्यात्मिक लाभ होतो, हे अध्यात्मशास्त्र आपण जाणून घेतले पाहिजे ! हा लाभ मिळवण्यासाठीच आपण त्यातील अपप्रकारांना विरोध करणं हे आपलं धर्मकर्तव्य ठरते. यासाठीच या दिवशी जास्तीतजास्त धार्मिक कृती भावपूर्ण करून आणि अयोग्य गोष्टी टाळून या पवित्र दिवसाच्या चैतन्याचा लाभ करून घेऊया अन् ईश्‍वराची कृपा संपादन करून घेऊया !!


हिंदू असंघटित असल्यामुळे देशात आतंकवाद, बांगलादेशियांची घुसखोरी, हिंदूंचे धर्मांतर, गायींची हत्या, हिंदूंवर अन्याय आणि अत्याचार, संत अन् देवता यांचा अवमान, मंदिरांची सततची लूट इत्यादी गोष्टी होत असून हिंदू संघटित झाले, तरच हा शाप नष्ट होईल !

    हिंदु असंघटित असल्यामुळे देशात आतंकवाद, ३ कोटींहून अधिक बांगलादेशियांची घुसखोरी, हिंदूंचे धर्मांतर, गायींची हत्या, देशद्रोह, हिंदूंवर अपरिमित अन्याय आणि अत्याचार, हिंदु स्त्रियांवर अत्याचार अन् बलात्कार, हिंदु संत आणि देवता यांचा अपमान, मंदिरांची लूट, असे अत्यंत अत्याचार हिंदूंवर होत आहेत. हिंदु समाज सहनशील आणि अहिंसक असल्याने हिंदु धर्म नष्ट करण्याची षड्यंत्रे रचण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. हिंदू संघटित झाले, तरच हा शाप नष्ट होईल.
- श्री. आनंद शंकर पंड्या (पाक्षिक पावन परिवार, १ ते १५ मे २०११)

देवतांचे विडंबन रोखणे, ही समष्टी स्तराची उपासना !

    देवतांच्या उपासनेच्या मुळाशी श्रद्धा असते. देवतांचे कोणत्याही प्रकारचे विडंबन हे श्रद्धेवर घाला घालतेे. यामुळे ही धर्महानी ठरते. धर्महानी रोखणे हे काळानुसार आवश्यक असे धर्मपालन आहे, ती देवतेची समष्टी स्तराची उपासनाच आहे. ही उपासना केल्याविना देवतेची उपासना पूर्ण होऊच शकत नाही. यास्तव देवीभक्तांनीही याविषयी जागरूक होऊन धर्महानी रोखायला हवी.

विजयादशमी साजरी करण्याचे महत्त्व !

     साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणार्‍या दसरा या सणाचे अनेक गुणधर्म आहेत. विजयाची प्रेरणा देणारा आणि क्षात्रवृत्ती जागृत करणारा हा सण परस्परांतील प्रेम वृद्धींगत करायलाही शिकवतो. या लेखाच्या माध्यमातून दसरा सण साजरा करण्यामागील काही महत्त्वाची कारणे समजून घेऊया.
सरस्वतीतत्त्व अप्रकटावस्थेत जाणे
   या दिवशी सरस्वतीतत्त्व सगुणाच्या अधिक्य भावाच्या निर्मितीतून बीजरूपी अप्रकटावस्था धारण करते; म्हणून या दिवशी तिचे क्रियात्मक पूजन आणि विसर्जन केले जाते.
अ. परिणाम आणि लाभ 
  या दिवशी सरस्वतीतत्त्वाच्या क्रियात्मक पूजनाने आणि विसर्जनाने व्यक्त भावाचे अव्यक्त भावात रूपांतर होऊन जिवाचा स्थिरतेत प्रवेश होण्यास साहाय्य होते.

संपूर्ण जहाज आगीच्या भक्ष्यस्थानी पडू नये, यासाठी स्वतःच्या जिवाची तमा न बाळगता संकटात उडी घेणारे शूर लढवय्ये साधक श्री. नितीन सहकारी !

आजारपणातही मनाची
असलेली आनंदावस्था
आजारपणात साधनारत
राहून मनाची
स्थिरता अनुभवणे
     मी नोकरीच्या निमित्ताने जहाजावर होतो. श्रीरामनवमीच्या (२८.३.२०१५) दिवशी सुमारे १२० - १३० डिग्री सेल्सियस तापमान असलेल्या इंधन गळतीमुळे झालेल्या अपघातात माझे दोन्ही पाय भाजले. पाय भाजल्यामुळे मला त्वरित रुग्णालयात भरती करून उपचार करणे आवश्यक होते. त्या वेळी अनेक अडचणी आल्या; पण श्रीकृष्णाच्या अखंड कृपेमुळे हे मोठे दुःख सोसता आले. 
      पुढे येणार्‍या आपत्काळात लाखो जणांना भाजल्यामुळे जखमा होऊन असह्य वेदना होतील. त्या प्रसंगाला तोंड कसे द्यायचे, याचे आदर्श उदाहरण श्री. नितीन सहकारी यांनी सर्वांपुढे ठेवले आहे. त्यांच्याप्रमाणे साधना केली, तरच जीव गेला, तर बरं, असा विचार न येता वेदना सहन करता येतील आणि साधनेतही प्रगती होईल. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

विदेशी गाय (होल्स्टिन फ्रिजियन) आणि देशी गाय (भारतीय गोमाता) यांतील आध्यात्मिक स्तरावरील भेद पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने स्पष्ट करणारी अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

     जेथे गाय संतोषपूर्वक निवास करते, तेथील धूळसुद्धा पवित्र होते अन् ते स्थान परमपावन तीर्थ बनते, असे ऋग्वेदात (मंडल १, सूक्त १५४, ऋचा ६) म्हटले आहे.
    प्रभु श्रीरामाचा पूर्वज सम्राट दिलीप याने गोरक्षणाकरता सिंहासमोर स्वतःला झोकून दिले होते, असा इतिहास आहे. गोरक्षणाकरता लक्षावधी हिंदूंनी बलीदान केले आहे. वाटेने जातांना गाय दिसली, तर तिला स्पर्श करून वंदन करणारे, तसेच गोग्रास दिल्याविना अन्न ग्रहण न करणारे अनेक श्रद्धाळू हिंदू आहेत. गाय भाकड झाल्यावर तिला विकण्याची कल्पनाही श्रद्धाळू हिंदूंच्या मनाला सहन होत नाही. गाय ही हिंदूंकरता अत्यंत पवित्र आहे.
    पुरातन काळापासून भारतात जसे देशी गायीला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे, तसे म्हशीला नाही. जर्सी गायीसारख्या विदेशी गायींचे पालन तर गेल्या काही वर्षांपासूनच भारतात होऊ लागले आहे. येथे विदेशी गाय (होल्स्टिन फ्रिजियन) आणि देशी गाय (भारतीय गोमाता) यांचा त्यांच्या भोवतीच्या वायूमंडलावर काय परिणाम होतो, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्याच्या उद्देशाने पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्यांच्या छायाचित्रांची चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे. या चाचणीतून भारतीय गोमातेचे महत्त्व वाचकांच्या लक्षात येवो, ही ईश्‍वरचरणी प्रार्थना !

धर्मशास्त्रविरोधी कृती करून पाखंड माजवणार्‍या धर्मद्रोह्यांनो, आतातरी जागे होऊन झालेल्या चुकांसाठी त्वरित आणि कठोर प्रायश्‍चित्त घ्या !

     'सध्या देवीचे नवरात्र चालू आहे. या दिवसांत जगन्मातेचे, जगदंबेचे तत्त्व सर्वाधिक प्रमाणात कार्यरत असते. भक्तांवर देवीची कृपा अखंड रहावी, यासाठी तिच्या कृपेने आपल्याकडे आदिशक्तीची साडेतीन जागृत पिठे आहेत. आपल्या ऐहिक जीवनात देवीचा आशीर्वाद मिळून त्यासमवेत पारमार्थिक उन्नतीही व्हावी, यासाठी या दिवसांत आपण देवीची उपासना करतो; पण पुढील घटना पहाता 'खरंच देवीची कृपा आपल्यावर होईल का ?', असा प्रश्‍न पडतो. 

॥ हरि ॐ तत्सत् ॥


संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
जिवात्मा आणि शिवात्मा म्हणजे काय ? 
बाबा : 'मी कशासाठी जन्माला आलो आहे आणि मला काय करायचे आहे', याचे ज्ञान जिवाला झाले, तर त्या आत्म्याला 'जिवात्मा' म्हणतात. 'कोणीतरी माझ्याकडून कार्य करवून घेत आहे', याचे ज्ञान झाले की, त्या आत्म्याला 'शिवात्मा' म्हणतात. शिवात्मा शोधणे, म्हणजे खरे ज्ञान. शिवात्मा कार्यकारणभावापुरता जन्माला येतो, तर जीव प्रारब्धभोगामुळे जन्माला येतो. 
 (संदर्भ : सनातनचे प्रकाशन 'संत भक्तराज महाराज यांची शिकवण.') 

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सर्वकाही परमेश्‍वराच्या इच्छेने होते ! 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     या पृथ्वीवरील सर्व प्राणीमात्र अन् मानव यांचा जन्म आणि त्यांचे प्राप्तकार्य हे परमेश्‍वरी इच्छेनेच नियंत्रित आहेत, हा विश्‍वास असला की, कुणाचाही द्वेष वाटत नाही. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

पाकदहन ही विजयादशमीच !

संपादकीय
आज दसरा ! साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणार्‍या दसरा या सणाचे अनेक गुणधर्म आहेत. विजयाची प्रेरणा देणारा हा सण परस्परांतील प्रेम वृद्धींगत करण्यासही शिकवतो. दशमीला शमीचे अन् शांततेचे पूजन करतात. हे पूजन गावाच्या सीमेबाहेर जाऊन करण्याची प्रथा आहे. गावाप्रमाणेच गावाबाहेरही शांतता राखून जिकडे तिकडे सुखसमृद्धी आणू, असा यामागचा अर्थ आहे. बाहेर सर्वत्र शांतता राखण्यासाठी शस्त्रे, अस्त्रे, सैन्य आदींचे प्रदर्शन करायचे असते आणि शत्रू असेल, तर त्याचे पारिपत्य करण्यासाठी या दिवशी निघायचे असते. शत्रूचे पारिपत्य करून शांतता प्रस्थापित केल्यानंतर सर्वांना सोने वाटायचे असते. या शास्त्राधारित माहितीची उजळणी एवढ्यासाठीच की, भारतानेही स्वत:च्या गौरवशाली इतिहासातून शिकून शत्रूचा सर्वंकष बीमोड करून सर्वत्र सुख-समृद्धी आणि शांतता प्रस्थापित करावी.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn