Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

नवरात्रोत्सव (आज नववा दिवस)

सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तुते ॥
एका मतानुसार नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण कमी करण्यासाठी तमोगुणी महाकालीची, पुढील तीन दिवस रजोगुण वाढवण्यासाठी रजोगुणी महालक्ष्मीची आणि शेवटचे तीन दिवस साधना तीव्र होण्यासाठी सत्त्वगुणी महासरस्वतीची पूजा करतात. 
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ शक्ती) 
नवरात्र विषयक माहितीसाठी संकेतस्थळावरील मार्गिका

आय.एस्.आय.एस्.च्या विरोधात देशभरातील ४० हिंदुत्ववादी संघटना एकत्र !

डावीकडून श्री. रमेश शिंदे, श्री. प्रमोद मुतालिक, बोलतांना श्री. अर्जुन संपथ
 'इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेट' या संकेतस्थळाचे उद्घाटन 
कोइम्बत्तुर - इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅथण्ड सिरिया अर्थात् आय.एस्.आय.एस्. या जिहादी आतंकवादी संघटनेच्या विरोधात देशभरातील ४० हिंदुत्ववादी संघटना संघटित झाल्या आहेत. या सर्वांच्या उपस्थितीत www.IndiaagainstIslamicstate.com या संकेतस्थळाचे उद्घाटन नुकतेच कोइम्बत्तुर येथे एका पत्रकार परिषदेत करण्यात आले. या प्रसंगी हिंदु मक्कल कच्छी (हिंदु जनता पक्ष) या संघटनेचे नेते श्री. अर्जुन संपथ, श्रीराम सेनेचे अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुराव्यांशिवाय 'सनातन'वर बंदी नाही ! - के.पी. बक्षी, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव

ऊठसूट सनातनवर बंदीची मागणी करणार्यार सनातनद्वेष्ट्यांना सणसणीत चपराक !
पंढरपूर - प्रसारमाध्यमांचा दबाव आणि लोकांनी मागणी केली; म्हणून एखाद्या संस्थेवर बंदी घालता येणार नाही. बंदी घालण्यापूर्वी त्या संस्थेत गैरकृत्य चालते, याचे पुरावे हवेत. पुराव्यांशिवाय कारवाई होणार नाही. पुरावे मिळाले, तर सनातनवरदेखील बंदी घालू, असे प्रतिपादन राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव के.पी. बक्षी यांनी येथे केले. दैनिक सामनाच्या १९ ऑक्टोबरच्या अंकात हे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

(म्हणे) 'विदेशी खेळाडूंना रोखणे योग्य नाही !'

मुसलमानप्रेमी अखिलेश यादव 
यांच्याकडून पाकच्या खेळाडूंची पाठराखण
लक्ष्मणपुरी (लखनौ) - समाजवादी पक्षाने कधीही क्रिकेट या खेळाची पाठराखण केलेली नाही; परंतु इतर देशांतील खेळाडूंना येथे खेळण्यापासून रोखणे आम्हाला मान्य नाही, असे सांगत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी शिवसेनेवर टीका करत पाकच्या खेळाडूंची पाठराखण केली. भारत-पाक क्रिकेट चर्चेला विरोध करत शिवसेनेने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या मुंबईतील मुख्यालयात निदर्शने केल्याच्या पार्श्वकभूमीवर यादव यांना विचारले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

(म्हणे) 'शिवसेनेला आतंकवादी संघटना म्हणून घोषित करा !'

आतंकवाद पोसणार्या पाकमधील पंजाब प्रांताच्या विधानसभेचा कांगावा !
सीमेवर अनेक वर्षांपासून पाकिस्तानकडून भारतीय सैनिक तथा निरपराध नागरिक मारले जात असतांना त्यांचा भारतातील किती विधानसभांनी निषेध केला किंवा संयुक्त राष्ट्रांकडे पाकला आतंकवादी देश म्हणून घोषित करण्याची मागणी केली ?
इस्लामाबाद - पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष शहरयार खान किंवा त्याआधी पाकिस्तानचे माजी परराष्ट्र्रमंत्री खुर्शीद कसुरी यांना शिवसेनेने केलेल्या विरोधाचा पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या विधानसभेत तीव्र निषेध नोंदवण्यात आला असून शिवसेनेला आतंकवादी संघटना म्हणून घोषित करावे, असा कांगावा करणारी विनंती  संयुक्त राष्ट्रांकडे करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेने प्रसिद्ध गझलकार गुलाम अली आणि पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांच्या मुंबईतील कार्यक्रमांना आक्रमकपणे विरोध केला होता. त्यानंतर भारत-पाक क्रिकेट सामना खेळवला जाऊ शकतो का ? यावरील चर्चेसाठी आलेल्या पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष शहरयार खान यांना शिवसेनेने आक्रमकपणे विरोध करून नियोजित चर्चा उधळून लावली. त्यानंतर पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या विधानसभेत एक प्रस्ताव संमत करण्यात आला. त्यात पाकिस्तानच्या कार्यक्रमांवर भारतात शिवसेनेकडून होणार्या् आक्रमणांचा निषेध व्यक्त करण्यात आला. शिवसेनेला आतंकवादी  संघटना म्हणून घोषित करण्याची मागणी या प्रस्तावातून संयुक्त राष्ट्रांकडे करण्यात आली आहे.

अग्नीची चाचणी लांबणीवर टाकण्यासाठी अमेरिका आणि नाटो राष्ट्रांचा होता दबाव !

दिवंगत माजी राष्ट्र्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या पुस्तकातून उघड झालेली माहिती
     नवी देहली - वर्ष १९८९ मध्ये अग्नी या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याची सिद्धता पूर्ण झाली असतांनाच ही चाचणी पुढे ढकलण्यासाठी अमेरिकेसह नाटो राष्ट्रांचा दबाव असल्याचा निरोप माजी राष्ट्र्रपती आणि वैज्ञानिक दिवंगत ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना एका वरिष्ठ शासकीय अधिकार्‍याने हॉटलाईनवरून दिला; मात्र कलाम यांनी हा दबाव झुगारला आणि नियोजित चाचणी यशस्वीपणे पार पाडली, असे वर्णन त्यांनी लिहिलेल्या अ‍ॅडव्हान्टेज इंडिया फ्रॉम चॅलेंज टू अपॉरच्युनिटी या पुस्तकात दिली आहे.

हिंदु जनजागृती समितीचे धर्मकार्य सद्यस्थितीत अत्यंत महत्त्वाचे !

उज्जैन कुंभपर्वाच्या निमित्ताने...
उज्जैन कुंभपर्वाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी दिवाकर नातू यांचे प्रतिपादन
डावीकडून श्री. दिवाकर नातू आणि
पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
     उज्जैन (मध्यप्रदेश) - नाशिक सिंहस्थपर्वात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने लावण्यात आलेल्या राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती या प्रदर्शनाला मी भेट दिली असून समितीचे कार्य समजून घेतले आहे. सद्यस्थितीत हे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. उज्जैन कुंभपर्वाला भारतातून, तसेच विदेशातून सर्वत्रचे हिंदू येतात. प्रदर्शन लावल्यास या सर्वांना हे धर्मशिक्षण मिळेल. त्यांच्यात जागृती होण्यासाठी हे प्रदर्शन अत्यंत उपयुक्त असून या प्रदर्शनकरता आम्ही तुम्हाला योग्य ठिकाणी जागा देऊन सहकार्य करू, असे प्रतिपादन उज्जैन येथील कुंभपर्वाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी श्री. दिवाकर नातू यांनी काढले. उज्जैन येथील कुंभपर्वाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी १७ ऑक्टोबर या दिवशी श्री. नातू यांची सदिच्छा भेट घेतली.

चाणक्यनीतीनुसार पाकसमवेत शत्रूराष्ट्र्राप्रमाणेच व्यवहार करावा ! - अभय वर्तक

डावीकडून श्री. नीलेश सांगोलकर, श्री. अभय वर्तक आणि सौ. राजश्री तिवारी
सोलापूर येथे सनातन संस्थेची पत्रकार परिषद
सोलापूर, २० ऑक्टोबर (वार्ता.) - गेल्या ६७ वर्षांच्या अनुभवातून पाकिस्तानशी कितीही चर्चा करून, गाणी गाऊन वा क्रिकेट खेळून त्यांचे वाकडे शेपूट सरळ झालेले नाही. त्यामुळे पाकिस्तानमधील लोकांचे कार्यक्रम ठेवणे याचा दुसरा अर्थ पाकिस्तान करत असलेले सर्व गुन्हे भारतियांना क्षम्य वाटतात, असे आहे का ? वास्तविक आर्य चाणक्य यांनी सांगितल्याप्रमाणे शत्रूसमवेत शत्रूप्रमाणेच व्यवहार करणे अपेक्षित आहे, तसेच ज्या कौटिल्याने जगाला राजधर्म शिकवला, त्यांच्याकडून आपले राज्यकर्ते काही शिकणार आहेत कि नाही ? मोदी शासनाला जनतेने मोठ्या अपेक्षेने निवडून दिले असल्याने इस्रायलप्रमाणे भारताने आता पाकिस्ताशी कठोरपणे वागण्यास प्रारंभ करावा.

गुजरातमधील पटेल समाजाचे नेतेे हार्दिक पटेल यांना अटक

देशद्रोहाचा आणि हत्येची धमकी देण्याचा गुन्हा दाखल
     सुरत (गुजरात) - पटेल आरक्षण आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांच्याविरुद्ध पोलिसांना ठार मारण्याचे आक्षेपार्ह आवाहन केल्याच्या प्रकरणी शहरातील अमरोली पोलीस ठाण्यातील पोलिसांनी १८ ऑक्टोबर या दिवशी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे.
     हार्दिक पटेल यांनी ३ ऑक्टोबर या दिवशी सुरत येथे आत्महत्या केलेल्या पटेल समाजातील युवकाच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. त्यावेळी स्वतः आत्महत्या करण्यापेक्षा पोलिसांना ठार मारा, असे आक्षेपार्ह आवाहन हार्दिक पटेल यांनी आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांना केले होते.

कर्नाटक आणि गुजरात शासनांनी मॅगीवरील बंदी उठवली !

     कर्नाटक - ४ मासांच्या बंदीनंतर कर्नाटक आणि गुजरात शासनांनी मॅगी नूडल्सवरील बंदी हटवली आहे. लीड आणि मोनोसोडियम ग्लुटामेटचे अंश आढळल्यावरून फूड सेफ्टी स्टँडर्ड ऍथोरिटी ऑफ इंडियाने देशभरात मॅगी नूडल्सची निर्मिती आणि विक्री यांवर बंदी घातली होती. वादग्रस्त ठरलेल्या मॅगीची कोलकाता येथील प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत आवश्यकतेहून अधिक लीड आणि मोनोसोडियम ग्लुटामेटचे प्रमाण आढळून आल्याचा अहवाल देण्यात आला होता. त्यामुळे त्याची पुन्हा तपासणी करण्यात आली. या तपासणीनंतर काहीही न आढळल्याने कर्नाटक शासनाने मॅगीवरील बंदी हटवली आहे.

बलात्कारविरोधी कायद्यासाठी देहलीत मंत्रीगटाची स्थापना

बलात्काराच्या इतक्या घटना घडत असतांना हे आधीच का केले नाही ? बलात्कार रोखण्यासाठी 
आम्ही काहीतरी करत आहोत, असे दाखवण्याचा आप शासनाचा खटाटोप !
     नवी देहली - अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणार्‍या नराधमांना फाशी अथवा जन्मठेपेची शिक्षा देण्यासाठी आणि अशा प्रकारचे गुन्हे करणार्‍या बालगुन्हेगारांची वयोमर्यादा न्यून करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यात सुधारणा करता येईल का, याचा अभ्यास करण्यासाठी देहली शासनाने एका मंत्रीगटाची स्थापना केली. 

हिंदूंच्या धर्मभावना जपण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापन करण्याची आवश्यकता ! - अभय वर्तक

पंढरपूर हिंदु महासभेकडून सनातन संस्थेचे प्रवक्ता अभय वर्तक हिंदुत्व शौर्य पुरस्काराने सन्मानित
पंढरपूर (जिल्हा सोलापूर), २० ऑक्टोबर (वार्ता.) - या देशात मुसलमान, ख्रिस्ती आणि बौद्ध यांच्या त्या भावना आणि हिंदूंच्या धर्मभावना म्हणजे पालापाचोळा ? हिंदूंच्या धर्मभावना जपण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापन करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी केले. पंढरपूर येथे हिंदू महासभेच्या वतीने थोर देशभक्त क्रांतीवीर वसंतदादा बडवे यांच्या ३० व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी त्यांना ह.भ.प. शंकर महाराज बडवे यांच्या हस्ते क्रांतीवीर वसंतदादा बडवे शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, हार, मानपत्र आणि
११ सहस्र रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी मानपत्रावरील मजकूरही वाचून दाखवण्यात आला.

प्राणघातक आक्रमणातून पंजाब गोरक्षा दलाचे अध्यक्ष सतीशकुमार प्रधान थोडक्यात बचावले !

श्री. सतीशकुमार प्रधान
दादरी प्रकणावरून हिंदूंना आरोपीच्या पिंजर्या!त उभे करणारी निधर्मी प्रसारमाध्यमे गोरक्षकांवरील आक्रमणाविषयी काही बोलतील का ? 
अमृतसर - गोरक्षण करतांना पंजाब गोरक्षा दलाचे अध्यक्ष श्री. सतीशकुमार प्रधान यांच्यावर अज्ञाताने गोळीबार केल्याची घटना खन्ना येथे घडली. या घटनेत श्री. प्रधान बचावले. याविषयी माहिती देतांना पंजाब गोरक्षा दलाचे राष्ट्रीय महामंत्री श्री. गुरप्रीत सिंह म्हणाले, एका ट्रकमधून गोवंशांची वाहतूक केली जात असल्याची बातमी श्री. प्रधान यांना समजली. त्यावर त्यांनी त्यांच्या एका  सहकार्यामसह गाडीचा पाठलाग केला. त्या वेळी ट्रकमधून श्री. प्रधान यांच्या दिशेने ४ ते ५ गोळया झाडल्या. त्या त्यांनी भूमीवर लोळण घेत चुकवल्या. त्यानंतर सदर चालक ट्रक घेऊन पळून गेला. या ट्रकमध्ये १८ गोवंश होते. त्यातील ३ गोवंश गुदमरून मेले होते. उर्वरित १५ गोवंशांना खन्ना येथील गोशाळेत आम्ही पाठवले.

पनवेल तालुक्यातील ११४ अंगणवाड्या इमारतीविना !

ही दु:स्थिती शासनाने त्वरित दूर करणे अपेक्षित आहे ! 
     पनवेल - येथील ११४ अंगणवाडी केंद्रांना वेगळी इमारत नाही. महिला व बालकल्याण विभागाच्या अखत्यारित अंगणवाडी केंद्रे चालवली जातात. त्यामुळे जिल्हा परिषदेचा महिला आणि बालविकास विभाग या आघाडीवर अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. 

गुणपत्रिकेतील चुकांमुळे नागपूर विद्यापिठाने विद्यार्थ्यांचा निकाल दिला तीन वेळा!

भोंगळ कारभार करून विद्यार्थ्यांना मन:स्ताप देणारे विद्यापीठ ! 
     नागपूर - येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या लोकप्रशासन विभागातील विद्यार्थ्यांचा निकाल विविध घोळांमुळे तीन वेळा पालटण्यात आला. सुरुवातीला सर्व विद्यार्थ्यांना नापास ठरवण्यात आले. त्यानंतर गुणपत्रिकेत सुधारणा करून उत्तीर्ण केले. तरीही दोन विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत अजूनही चुका आहेत. 

चोहोबाजूंनी आक्रमणे होत असतांना केवळ संत आणि श्रीकृष्ण यांच्या कृपेमुळेच सनातन संस्था तरली ! - अभय वर्तक

सनातन संस्थेवर होणारे मिथ्यारोप आणि बंदीची मागणी
 यांविरोधात कल्याण येथे हिंदुत्ववाद्यांची विशेष बैठक
कल्याण, २० ऑक्टोबर (वार्ता.) - जरी पुरोगामी संघटना विदेशातील पैशांच्या आधारे सनातन संस्थेवर बंदी घालण्यासाठी प्रयत्न करत असल्या, तरी संस्था लहान असूनही आज तिचे कार्य सर्वदूर पसरत आहे. समीर गायकवाड याला अटक झाल्यावर काही कालावधीतच आंतरराष्ट्रीय स्तरावरील वृत्तसंस्थांवरून आम्हाला विचारणा व्हायला लागली. तेव्हा हिंदुत्ववादी संघटनांना दाबून टाकण्याचे किती मोठे षड्यंत्र चालू आहे, हे लक्षात आले. सनातनवर चोहोबाजूंनी आक्रमणे होत असतांना केवळ संत आणि श्रीकृष्ण यांच्या कृपेमुळेच सनातन संस्था तरून गेली. यामध्ये हिंदुत्वाची बाजू समाजासमोर योग्य पद्धतीने मांडण्याची आवश्यकता आहे, असे वक्तव्य सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी केले. कल्याण येथे सनातन संस्थेवर होत असलेले मिथ्यारोप आणि बंदीची मागणी यांविरोधात हिंदुत्ववाद्यांच्या विशेष बैठकीचे आयोजन केले होते. त्या वेळी ते बोलत होते.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात सुनील तटकरे यांची चौकशी

    मुंबई - सिंचन घोटाळा प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २० ऑक्टोबर या दिवशी सुनील तटकरेंना मुख्यालयात चौकशीसाठी बोलावून घेतले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यापूर्वी १० मे या दिवशी तटकरे आणि पवार यांना मुख्यालयात चौकशीसाठी उपस्थित रहाण्यासाठी समन्स बजावले होते; मात्र त्या दोघांनी ते अमान्य केले होते. त्यानंतर त्यांना लेखी स्वरूपात म्हणणे मांडण्याची अनुमती देण्यात आली होती.
कोकण पाटबंधारे मंडळात झालेल्या गैरव्यवहाराविषयी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी चालू आहे. या चौकशीअंतर्गत येणार्‍या रायगड येथील बाळगंगा प्रकल्पातील गैरव्यवहाराच्या प्रकरणी गुन्हे नोंद करून पाटबंधारे विभागातील अभियंत्यांसह संबंधित कंत्राटदारांना अटक केली होती.

आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी करणार ! - जे.एस्. सहारिया

    कोल्हापूर, २० ऑक्टोबर (वार्ता.) - महापालिका निवडणूक निर्भय, मुक्त आणि पारदर्शी होण्यासाठी प्रशासनाने सर्व सिद्धता केली आहे. संवेदनशील प्रभागात अधिक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी करण्यात येईल. मतदारांना प्रलोभन, दहशत अशा गैरकृत्याचा अवलंब करण्याचा कुणी प्रयत्न केला, तर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत, अशी माहिती निवडणूक आयुक्त जे.एस्. सहारिया यांनी १९ ऑक्टोबर या दिवशी पत्रकार बैठकीत दिली.

नगरच्या जिल्हाधिकार्‍यांची खुर्ची आणि २ संगणक जप्त

                                                     संपादित जमिनीचा मोबदला न दिल्याचे प्रकरण
    नगर, २० ऑक्टोबर - शिर्डी येथील विमानतळासाठी संपादित केलेल्या जमिनीचा वाढीव मोबदला शेतकर्‍याला वेळेत न दिल्यामुळे जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यालयातील खुर्ची आणि २ संगणक शासनाधीन करण्यात आले आहेत. (न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणारे प्रशासकीय अधिकारी सर्वसामान्यांच्या तक्रारीला कशी वागणूक देत असतील, याचा विचारच न केलेला बरा ! - संपादक) कोपरगावचे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश व्ही.ए. पाटील यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली.

लोहगाव विमानतळ (पुणे) येथे धर्मांध महिलांकडून २१ लक्ष रुपयांचे सोने शासनाधीन

गुन्हेगारीत धर्मांध महिलाही अग्रेसर !
पुणे, २० ऑक्टोबर - दुबईहून दोन धर्मांध महिला विमानाद्वारे सोने घेऊन लोहगाव विमानतळावर उतरल्याची माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार सीमाशुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी सापळा रचून नाजिया अल्बार हुसेन (रा. ट्रॉम्बे) आणि झरीना बानू अली अब्बास मन्सुरी (रा. मुंबई) यांना ७९५ ग्रॅम सोने दडवून आणण्याच्या प्रकरणी अटक केली. नाजिया हिने अंतर्वस्त्रामध्ये सोन्याच्या तारा लपवल्या होत्या, तर झरीना हिने बनावट दूरचित्रवाणी संचामध्ये सोन्याचा पत्रा दडवला होता. त्या सोन्याची किंमत २१ लक्ष ९६ सहस्र रुपये असून ते शासनाधीन करण्यात आले.

ठाणे येथे शिवसेना नगरसेवकाला गँगस्टर रवी पुजारीकडून खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी

वाढते अराजक थांबवण्यासाठी शासनाने कृती करावी, अशी जनतेचर अपेक्षा आहे !
   ठाणे - येथील शिवसेना नगरसेवक रवींद्र फाटक यांना कुख्यात गँगस्टर रवी पुजारी याने १० कोटी रुपयांच्या खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी फाटक यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. खंडणीसाठी त्याने ४ वेळा संपर्क केल्याचे फाटक यांनी सांगितले आहे. बोरीवली येथील त्यांच्या बांधकाम साईटवरील सुरक्षारक्षकांनाही त्याच्या गुंडांनी धमकावले होते.

पुणे येथे श्री दुर्गामाता दौडीचे हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्याकडून स्वागत

समितीचे कार्यकर्ते ध्वजाचे स्वागत करतांना
     पुणे, २० ऑक्टोबर (वार्ता.) - हिंदूसंघटन व्हावे आणि भवानीमातेचा आशीर्वाद प्राप्त व्हावा, या उद्देशाने शिवप्रतिष्ठानच्या वतीने नवरात्रोत्सवाच्या कालावधीत जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये श्री दुर्गामाता दौड आयोजित केली जाते. येथील भोसरी आणि सिंहगड रस्ता परिसरात काढण्यात आलेल्या दौडीचे अनुक्रमे हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. 

बेंगळुरू येथे श्री यल्लमा देवीचा 'टॅटू' पायावर कोरणार्‍या ऑस्ट्रेलियन तरुणाला हिंदूंनी क्षमा मागण्यास भाग पाडले !

देवतांच्या विडंबनाच्या विरोधात संघटितपणे कृती करणार्‍या हिंदूंचे अभिनंदन ! 
सर्वत्रच्या हिंदूंनी असाच संघटितपणा दाखवल्यास देवतांचे विडंबन कुणी करू धजावणार नाही ! 
     बेंगळुरू - बेंगळुरू येथे पायावर श्री यल्लमा देवीचा 'टॅटू' कोरणार्‍या ऑस्ट्रेलियन तरुणाला हिंदूंनी क्षमा मागायला लावल्याची घटना घडली. 

नथुराम गोडसे यांची पुण्यतिथी 'बलिदान दिवस' म्हणून साजरी करणार ! - हिंदू महासभा

     नवी देहली - नथुराम गोडसे यांची पुण्यतिथी 'बलिदान दिवस' म्हणून साजरी करण्याचा निर्णय हिंदू महासभेने घेतला आहे. हिंदू महासभेने गेल्या वर्षी नथुराम गोडसे यांचे मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला होता. नथुराम गोडसे यांची १५ नोव्हेंबरला पुण्यतिथी आहे. या दिवशी गोडसे यांना फाशी देण्यात आली होती. 

संभाजीनगर महानगरपालिका आयुक्तांच्या विरोधात अविश्‍वास ठराव संमत

    संभाजीनगर, २० ऑक्टोबर - संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त पी.एम्. महाजन यांच्या विरोधात अविश्‍वास ठराव प्रविष्ट करण्यात आला होता. हा ठराव २० ऑक्टोबर या दिवशी ९५ मतांनी संमत झाला, तर ठरावाच्या विरोधात १३ मते पडली. मजलिस- ए-इत्तेहाद-उल-मुस्लमीन (एम्आयएम्)च्या नगरसेवकांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. महानगरपालिका आयुक्तांनी सदस्यांना सकारात्मक प्रतिसाद न देणे, विकासकामांच्या संचिका लवकर निकाली न काढणे, नगरसेवक आणि सर्वसामान्य नागरिकांना भेटण्यासाठी उपलब्ध न होणे या आणि अन्य कारणांमुळे त्यांच्यावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवण्यात आला होता. भाजप आणि शिवसेना यांच्याकडून हा अविश्‍वास प्रस्ताव आणला होता.

केबलद्वारे धर्मशिक्षण सप्टेंबर २०१५ मधील प्रसारणाचा अवहाल (नियमित सत्संग + विशेष )
गोमांस मेजवानी देणारे जम्मूतील आमदार इंजिनीअर रशीद यांच्यावर शाई ओतली !

     नवी देहली - काही दिवसांपूर्वी गोमांस मेजवानीचे आयोजन करणारे जम्मू-काश्मीरमधील अपक्ष आमदार इंजिनीअर रशीद यांच्यावर १९ ऑक्टोबर या दिवशी देहली येथे शाई ओतण्यात आली. हिंदू सेनेचे श्री. विष्णु गुप्ता यांनी या घटनेचे दायित्व स्वीकारले आहे. गोमांस बंदीच्या जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या निकालानंतर अपक्ष आमदार इंजिनीअर रशीद यांनी काही दिवसांपूर्वी गोमांस मेजवानीचे आयोजन केले होते. या मेजवानीनंतर भाजपच्या आमदारांनी रशीद यांना विधानसभेतच मारहाण केली होती. आता पुन्हा एकदा रशीद यांच्यावर शाई ओतून रोष प्रकट करण्यात आला आहे. सोमवार, १९ ऑक्टोबर या दिवशी दुपारी रशीद हे देहलीत पत्रकार परिषद आटोपून निघत असतांना त्यांच्यावर शाई ओतण्यात आली.

भाजपच्या राज्यात समाजकंटकांचे सनातन आश्रमावरील आक्रमणांचे घृणास्पद कृत्य चालूच !

शिवीगाळ करणे, धमक्या देणे, अश्‍लील  बोलणे आणि दगडफेक करणे
 या गोष्टी अदखलपात्र ठरवणारे दंडविधान आणि पोलीस हिंदु राष्ट्रात नसतील ! 
     सनातनच्या रामनाथी आश्रमातील साधकांना धमक्या देण्याचा, अश्‍लील बोलण्याचा आणि आश्रमावर दगड फेकण्यास आरंभ केल्याचा कालचा ५ वर्षे ३३८ वा (२१६३ वा) दिवस ! 
१९.१०.२०१५ : रात्री १० वाजून १५ मिनिटांनी दुचाकीवरून एक युवक आश्रमासमोरून ओरडत गेला. 
२०.१०.२०१५ : रात्री ७ वाजून १५ मिनिटांनी दुचाकीवरून काही युवक आश्रमासमोरून 'बॉम्ब बॉम्ब' म्हणून ओरडत गेले. हिंदु राष्ट्रात हे दखलपात्र अपराध असतील !

कामवासनेचा साम्राज्यवाद उत्पन्न करणारे दांडिया बंद झाले पाहिजेत ! - पू. संभाजीराव भिडेगुरुजी

सांगली, २० ऑक्टोबर (वार्ता.) - श्री दुर्गादेवीच्या हातात शस्त्र आणि आपल्या हातात मात्र दांडिया आहे. ही देवीच्या भक्तीशी प्रतारणा आहे. जी दुर्गामाता आपली आराध्य आहे, त्या देवीसमोर तन्मयता, भक्ती उत्पन्न होण्यापेक्षा अनैतिकता वाढीस प्रोत्साहन देणार्‍या गोष्टी घडत आहेत. मुंबईतील एका आधुनिक वैद्यांनी नवरात्रीनंतर दोन मासांत गर्भपाताच्या सहस्रो घटना घडत असल्याचे सांगितले. त्यामुळे कामवासनेचा साम्राज्यवाद उत्पन्न करणारे दांडिया बंद झाले पाहिजेत. त्याचसमवेत डान्स बारही परत चालू होता कामा नयेत, असे परखड मत श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक पू. संभाजीराव (भिडे) गुरुजी यांनी व्यक्त केले. ते श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने आयोजित श्री दुर्गामाता दौडीच्या सातव्या दिवशी धारकर्‍यांना मार्गदर्शन करतांना श्री दुर्गामाता मंदिरासमोर बोलत होते. या वेळी धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक सनातन प्रभातचा दसर्‍यानिमित्त रंगीत

धर्मविजय विशेषांक 
 प्रसिद्धी दिनांक : २२ ऑक्टोबर
 विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २१ ऑक्टोबरच्या 
दुपारी ३ पर्यंत 'ईआरपी' प्रणालीत भरावी !

फलक प्रसिद्धीकरता

भारताला चेतावणी देण्याचे धाडस होणार नाही, असा धडा पाकला शिकवणार का ? 
     भारताच्या आक्रमणांना प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही छोटी अण्वस्त्रे निर्माण केली आहेत, अशी चेतावणी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याबरोबर अमेरिकेच्या दौर्‍यावर गेलेले परराष्ट्र सचिव एजाज चौधरी यांनी दिली.

डाळी, खाद्यतेलांच्या साठेबाजांवर शासनाकडून निर्बंध, पुण्यात कारवाई

मुंबई - डाळी, खाद्यतेले आणि खाद्य तेलबियांची साठेबाजी आणि काळाबाजार यांस आळा घालण्यासाठी आज राज्यशासनाने कडक पावले उचलली असून केंद्र शासनाने या वस्तूंसाठी लागू केलेल्या साठा निर्बंधाला अनुसरून राज्यात डाळी, खाद्यतेले आणि खाद्य तेलबिया यांच्या साठवणुकीवर निर्बंध लागू केले आहेत. राज्यात हे निर्बंध ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत लागू असणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साठेबाजी आणि काळाबाजार यांस आळा घालण्याचे आदेश देताच पुण्यातील मार्केट यार्ड येथील २०० व्यापार्‍यांच्या दुकानांवर धाडी घालण्यात आल्या. ही सर्व दुकाने सील केली आहेत.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! 
 Panjab Gauraksha dal ke adhyaksha
 Shri Satish kumar Pradhan par janleva Hamla, bal bal bache. 
 Hamle hindutvavadi netaoparhi kyo hote hai ? 

 जागो ! 
 पंजाब गौरक्षा दल के अध्यक्ष 
श्री. सतीश कुमार प्रधान पर जानलेवा हमला, बाल बाल बचे. 
 हमले हिंदुत्ववादी नेताआेंपरही क्यो होते है ?

हाजी अली दर्ग्यातील कबरीजवळ मुसलमान महिलांना घातलेली बंदी योग्यच ! - हाजी अली ट्रस्ट

सर्वधर्मसमभाववाले किंवा महिला स्वातंत्र्याचा उदोउदो करणारे यावर काही बोलणार का ?
मुंबई - येथील हाजी अली दर्ग्यातील कबरीजवळ जाण्यास मुसलमान महिलांना घातलेली बंदी योग्यच आहे. महिलांनी दर्ग्याच्या अंतर्गत असलेल्या मजारपर्यंत जाणे म्हणजे इस्लामनुसार पाप आहे. आमचा ट्रस्ट अल्पसंख्यांक आहे. त्याला स्वत:ची कार्यपद्धत आणि अधिकार आहेत. संविधानाने दिलेल्या अधिकारांनुसारच तो चालवला जात आहे. त्यामुळे आम्ही आमचे प्रश्‍न सोडवू. त्यात इतर कोणालाही हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही. आम्ही आमचे निर्णय घेण्यास समर्थ आहोत, अशी आडमुठी भूमिका हाजी अली ट्रस्टने १९ ऑक्टोबरला उच्च न्यायालयात मांडली.

शत्रूराष्ट्र पाकचा कैवार घेणार्‍यांनो, पाकमधील हिंदूंचे न्याय्य अधिकार आणि हिंदूंची मंदिरे यांचे होणारे हनन जाणा !

     आज पाकिस्तानात असलेले पेशावर एकेकाळी हिंदु संस्कृतीचा बालेकिल्ला होता. त्यामुळे तिथे अनेक मंदिरे असणे, यात आश्‍चर्य नाही. पेशावरमधील एक प्राचीन तीर्थक्षेत्र गोरखटडी हे पुरातन मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. फाळणीनंतर मात्र ही प्राचीन मंदिरे जवळपास बंदच करण्यात आली. आता ४ वर्षांनंतर पाकिस्तानातील हिंदूंची स्थिती सर्वाधिक बिकट झाली आहे. 
     या प्रकरणी पाकिस्तानातील आपल्या हिंदु बांधवांना न्याय्य अधिकार मिळवून देण्यासाठी मोदी शासनाने सर्वतोपरी साहाय्य करावे आणि वेळ प्रसंगी इच्छुकांना भारताचे नागरिकत्वही द्यावे, यासाठी भारतातील राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्ववादी जनतेने पत्र, इ-मेल आदी मार्गांनी आग्रही मागणी केली, तर हा लेख छापल्याचे सार्थक होईल !

इस्लामसाठी मरणे आणि मारणे हीच मुसलमानांची जगण्याची मूलभूत प्रेरणा असणे !

अ‍ॅथनी पॉल : हा पत्रकार १९७८ ते १९८२ च्या अफगाणिस्तानात होता. तो एशिया वीकसाठी युद्धवार्ता पाठवत असे. तो म्हणतो, सईद नईद मजरुह हा केमिकल इंजिनियर; पण आता जिहादी झालेल्या या एका युवकाशी कंदहार येथे माझे बोलणे चालले होते. सईद नईद मजरुह म्हणाला की, जर मी एका रशियन सैनिकाला ठार मारले आणि वाचलो, तर मी गाझी होईन (गाझी म्हणजे धर्मयोद्धा) आणि जर रशियनांकडून मारला गेलो, तर मी हुतात्मा ठरेन अन् मला लगेचच स्वर्गात प्रवेश मिळेल. मी कोणाला मारले काय किंवा मेलो काय ? माझा स्वर्गातील भविष्यकाळ हा निश्‍चित झाला आहे. 

भारताला लागलेले इस्लामी ग्रहण !

मुसलमान आणि इस्लाम या एकाच विषयाने देशाचे राष्ट्रीय, 
सामाजिक आणि राजकीय जीवन कलुषित झाले असणे
     गेले काही काही मास (महिने) मुसलमान आणि इस्लाम या एकाच विषयाने आपल्या देशाचे राष्ट्रीय, सामाजिक आणि राजकीय जीवन व्यापून टाकले आहे. एका अर्थाने कलुषित झाले आहे. त्यामुळे देशहिताचा कुठलाही प्रश्‍न आला, तरी त्यात इस्लाममुळे येणार्‍या अडथळ्यांची दखल घ्यावीच लागते.

सनातन संस्थेवर बंदी घालणे, हा निवळ मूर्खपणा !

अधिवक्ता सुधाकर भावे
     डॉ. प्र.न. जोशी यांनी वर्ष १९७० मध्ये प्रसिद्ध केलेला आदर्श मराठी शब्दकोश पाहिला असता, सनातन या शब्दाचा अर्थ शाश्‍वत, चिरकाल, अनादिसिद्ध कर्म, परंपरागत धर्म असे अर्थ शब्दकोशात दिलेले आहेत. ज्यांना सनातन या शब्दाचा अर्थ समजत नाही, तो समजून घेण्याची ज्यांची इच्छा आणि सिद्धता नाही, असे अर्धवट विचारांचे लोक सनातनवर बंदी आणण्यासाठी कोल्हेकुई करत आहेत.
     महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत काही विचारवंतांच्या हत्या झाल्या. या दुर्दैवी घटनांचा आधार घेऊन सनातन संस्थेला जाणीवपूर्वक अपकीर्त करण्यासाठीच सनातन संस्थेच्या साधकांना त्या नेत्यांच्या हत्येच्या कटात गुंतवण्याचे दुष्ट कारस्थान सध्या चालू आहे. अर्थात काहीही झाले, तरी सनातनच्या साधकांवर केलेले आरोप सिद्ध करता येणार नाहीत, याची कोल्हेकुई करणार्‍या तथाकथित विद्वानांना पूर्ण कल्पना आहे.

महाराष्ट्रातील शक्तीपिठे

नवरात्रीच्या निमित्ताने...
कोल्हापूरची श्री महालक्ष्मीदेवी
तुळजापूरची श्री भवानीदेवी

अन्नधान्याच्या तुटवड्यामागील वास्तव

कालच नागपूर येथे २५ लक्ष रुपयांची तूरडाळ चोरीला गेल्याची घटना घडली. आतापर्यंत सोने, चांदी, रोख रक्कम चोरीच्या बातम्या होत्या; पण अलीकडे कांदा, तूरडाळ यांच्या चोरीच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. वास्तविक आपला देश शेतीप्रधान आहे, आपल्या अर्थव्यवस्थेचा मुख्य भर शेती आणि शेतीजन्य उत्पादने यांवर आहे, पर्यायाने शेतकर्‍यांवरच आहे.

भारतीय संस्कृतीत नारीशक्तीला असलेले विशेष महत्त्व !

श्रीमती रजनी नगरकर
     ५.९.२०१५ या दिवशी श्रावण कृष्ण पक्ष अष्टमी, म्हणजेच गोकुळाष्टमी होती. या दिवशी रामनाथी गोकुळातील गोपी विशेष नटल्या होत्या. कुणी घागरा-ओढणी, कुणी गुजराती पद्धतीच्या साड्या, कुणी नऊवारी आणि त्याला अनुषंगून विविध अलंकार धारण केले होते. त्यात नथ, मेखला, बिंदी असे अनेक प्रकार बघायला मिळत होते. त्या दिवशी एक संत म्हणाले, बघा, मुलींना कसे विविध प्रकारे नटता येते; पण मुलांना काहीच नाही ! हे समजल्यावर माझ्या मनात पुढील विचार आले. 
१. हिंदु धर्मात विविध ठिकाणी देवी म्हणून 
पूजली जाणारी भारतीय स्त्री ! 
     यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः । (मनुस्मृति, अध्याय ३, श्‍लोक ५६)
अर्थ : जेथे नारीची पूजा होते, तेथे देवता रममाण होतात.

देवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करण्याच्या पद्धती आणि त्यांमागील शास्त्र

पद्धत १ : देवीचा नामजप करत एक-एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत वहावे अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकवाने स्नान घालावे.
- सौ. कविता पाटील
पद्धत २ : काही ठिकाणी देवीला कुंकुमार्चन करतांना कुंकू केवळ चरणांवर वाहिले जाते. 
शास्त्र : मूळ कार्यरत शक्तीतत्त्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झालेली असल्याने शक्तीतत्त्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात.

पुरस्कार परत देणार्‍या लेखकांनी साहित्याला काय योगदान दिले ? - एस्.एल्.भैरप्पा, ज्येष्ठ साहित्यिक, कर्नाटक.

    उत्तरप्रदेशमधील दादरी प्रकरण, पुरोगामी विचारवंतांची हत्या आणि देशात असहिष्णुता वाढत असणे आदी कारणे पुढे करत देशातील विविध भागातील साहित्यिक पुरस्कार परत करत आहेत. या मागील कारणे, परिणाम आदींविषयी कर्नाटकातील ज्येष्ठ साहित्यिक श्री. एस्.एल्. भैरप्पा यांनी कन्नड दैनिक विजयवाणी या नियतकालिकाशी संवाद साधला. या वेळी त्यांनी उधृत केलेली मते येथे देत आहोत.

पोलिसांची पंचाईत !

डॉ. संजय सामंत
      एकवेळ खरा खुनी नाही मिळाला, तरी चालेल; पण सनातन संस्था गोत्यात आली पाहिजे, हा एककलमी अजेंडा घेतलेले सर्व चॅनलवीर सरसावले आणि महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात दबा धरून बसलेल्या पुरोगाम्यांच्या घोड्यावर स्वार होऊन सनातनवर स्वारी करायला निघाले; पण हाय रे दुर्दैव ! आक्षेपार्ह असे काहीच न सापडल्याने साप समजून भुई थोपटली, अशी अवस्था पोलिसांची झाली. 
- डॉ. संजय सामंत, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. (१३.१०.२०१५)

कलियुगाचे कर्तृत्व दर्शवणारी स्त्रीची हतबलता !

     कलियुगात स्त्रीला येणारी हतबलता कलियुगाचे कर्तृत्व दर्शवते. स्त्री मिळवती असेल, तर तिला अधिक मान मिळतो; मात्र मुलगी जन्माला आली, म्हणजेच कन्यारत्न प्राप्त झाल्यास आई-वडिलांपासून सर्वांच्या कपाळावर आठ्या पडतात. कन्यादान करतांना आई-बाबांना एकटेपणा तर जाणवतोच; पण आता आपल्याला कोण बघणार ?, या विचाराने ते हतबल झालेले असतात. यावरून मला एक म्हण आठवली, एक पुती रडते, सात पुतीही रडते. सात मुलांच्या घरी आई-वडिलांना कुणीही सांभाळेल, असे वाटते; पण खरी परिस्थिती त्या आई-वडिलांनाच ठाऊक असते. मुलगा किंवा मुलगी असली, तर ती म्हातारपणी सांभाळेल, याची निश्‍चिती कुणीच देऊ शकत नाही. - श्रीमती रजनी नगरकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.९.२०१५)

शक्तीची उपासना

देवीच्या उपासनेमागील शास्त्र सांगून भक्तीभाव वृद्धींगत करणारे सनातनचा ग्रंथ !
  • कुलदेवतेच्या उपासनेचे महत्त्व काय ? 
  • नवरात्रीचा इतिहास अन् नवरात्रीतील पूजाविधींमागील शास्त्र काय ?
  • नवार्ण मंत्र आणि नवार्ण यंत्र यांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये कोणती ?
  • श्रीयंत्र आणि श्रीचक्र म्हणजे काय ? त्याची वैशिष्ट्ये कोणती ?
संपर्क : ९३२२३ १५३१७
सनातनची ग्रंथसंपदा आता SanatanShop.com वर उपलब्ध !

सेवेची तीव्र तळमळ असलेले पुणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. रवींद्र धांडे !

श्री. रवींद्र धांडे
१. कु. तृप्ती गावडे
१ अ. सेवेची तीव्र तळमळ
१ अ १. वेळ वाया जाऊ न देता अखंड सेवारत असणे आणि कोणत्याही सेवेला नकार न देणे : नाशिक कुंभमेळ्यानिमित्त धांडेकाका सेवेसाठी आले होते. ते अखंड सेवारत असतात. सकाळी लवकर उठून रात्री झोपेपर्यंत कुठेही वेळ वाया जाऊ न देता स्वयंपाकघरात न थकता आनंदाने शारीरिक सेवा करत असतात. सेवा करण्याविषयी त्यांना सांगावे लागत नाही. कोणतीही सेवा

सनातन संस्थेवर होणारे खोटे आरोप आणि वस्तुस्थिती यांविषयी जाहीर जनसंवाद सभा

कॉ. पानसरे हत्या प्रकरणी जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती, जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज, संत-महंत, हिंदुत्ववादी संघटना यांनी सनातन संस्थेला जाहीर पाठींबा दिला. यामध्ये मा. शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनीही पुढाकार घेत सनातनच्या पाठीशी उभे रहात हिंदुत्वविरोधकांचे तोंड बंद केले. या काळात तथाकथित पुरोगाम्यांकडून बेछूट आणि विद्वेषी आरोप करत सनातन संस्थेवर बंदीची मागणीही करण्यात आली. या खोट्या आरोपांमागील वस्तुस्थिती समाजाला कळावी, या हेतूने ठाणे आणि मुंबई येथे एका जाहीर जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

विवाहसोहळ्याला आलेल्या नातेवाइकांना सनातनचा आश्रम पाहून साधना करावीशी वाटणे

      रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात १५ मे २०१५ या दिवशी आश्रमातील ध्वनीचित्रीकरण विभागात सेवा करणारे मूळचे सोलापूर येथील श्री. प्रतीक जाधव आणि व्यवस्थापन विभागात सेवा करणार्‍या मूळच्या तुळजापूर येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. कीर्ती जाधव यांचा विवाह झाला. या विवाहसोहळ्याला आलेल्या त्यांच्या कुटुंबियांना आश्रम पाहून

सनातन पंचांग २०१६ची विक्री आतापासूनच करण्याचे कारण समजून घेऊन सहकार्य करावे !

पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ
वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
     सध्या बहुतांश सर्व जिल्ह्यांतील साधकांनी सनातन पंचांग २०१६च्या विक्रीला आरंभ केला आहे. पंचांगाची विक्री करतांना काही वाचक आणि हितचिंतक वर्ष २०१६ चालू व्हायला बराच अवधी असूनही तुम्ही एवढ्या लवकर पंचांगांची विक्री का करत आहात ? आम्ही आता पंचांगाचे

हासन (कर्नाटक) येथील धर्माभिमानी श्री. ज्ञानेश्‍वर राव आणि सनातनच्या साधिका श्रीमती पार्वतम्म यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

धर्माभिमानी श्री. ज्ञानेश्‍वर राव यांचा
सत्कार करतांना सौ. तारा शेट्टी

विद्यार्थी-साधकांना दीपावलीच्या सुटीच्या काळात चैतन्यदायी आश्रमजीवन अनुभवण्याची सुवर्ण संधी !

     साधकांनो, हिंदु राष्ट्राची स्थापना हे श्रीगुरूंचे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणार्‍या सेवांमध्ये सहभागी होऊन या व्यापक कार्यात खारीचा वाटा उचला !
१. राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी वेळ देणे ही काळाची आवश्यकता !
     भावी आपत्कालीन स्थिती निर्माण होण्यापूर्वी धर्मप्रसार आणि सनातनच्या संशोधनाचे कार्य समाजापर्यंत अधिकाधिक पोचवणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकाने स्वतःचे शिक्षण, तसेच अन्य व्यावहारिक कामे सांभाळून अधिकाधिक वेळ राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी देणे काळाची

आई-वडिलांना साधनेस प्रवृत्त करणारी, आवडीने नामजप आणि सेवा करणारी ५१ टक्के आध्यात्मिक पातळी असणारी चिपळूण, रत्नागिरी येथील कु. दुर्गा सुहास नलावडे (वय ११ वर्षे) !

कु. दुर्गा नलावडे
१. प्रथम बोलायला लागल्यावर या गुरुराया मम मंदिरा हे भजन म्हणणे
      कु. दुर्गा ही बोलायला लागल्यावर पहिल्यांदा या गुरुराया मम मंदिरा हे भजन म्हणायला शिकली.
२. सातत्य असणे
      ती आधी ॐ गं गणपतये नमः । हा जप करायची. आता ॐ नमो भगवते वासुदेवाय । हा जप १ - २ माळा केल्याविना ती झोपत नाही. ती प्रतिदिन शाळेत जातांना देवासमोर हात जोडून तू माझ्या सोबत सतत रहा, अशी प्रार्थना

पू. भगवंतकुमार मेनराय आणि पू. (सौ.) सूरजकांता मेनराय नामजप करत असतांना रामनाथी आश्रमातील साधकांना आलेल्या अनुभूती

     पू. भगवंतकुमार मेनराय आणि पू. (सौ.) सूरजकांता मेनराय हे प्रतिदिन रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात सकाळी, दुपारी आणि सायंकाळी नामजपला बसतात. या नामजपातील चैतन्याचा आध्यात्मिक लाभ मिळावा यासाठी साधकही याच वेळेत नामजपाला बसतात. या नामजपाच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
पू. भगवंतकुमार आणि पू. (सौ.) सूरजकांता मेनराय

१. पू. भगवंतकुमार मेनरायकाकांचे नामजपाच्या वेळी झालेले आध्यात्मिक लाभ
अ. पू. मेनरायकाका नामजप करतांना वातावरणात पुष्कळ गारवा जाणवतो.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
'हिंदु राष्ट्रात अहंभाव जोपासणार्या व्यक्तीस्वातंत्र्यावर बंधन असेल आणि समाजस्वास्थ्य अन् राष्ट्ररक्षण जोपासणार्या आणि त्याद्वारे अहं नष्ट करून ईश्वरप्राप्ती करून देणार्याण समष्टी साधनेला प्राधान्य असेल.' - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२७.२.२०१५) 
'कठीण समय येता कोण कामास येतो ?' या प्रश्नाचे उत्तर आहे, 'कठीण समय येता देवच कामास येतो !' - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१६.३.२०१५) 

बोधचित्र


प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
मी कोणाचा नाही. माझा कुणी नाही. 
 ज्याचा त्याचा तोच मी; म्हणून मी सर्वांचा आहे. 
भावार्थ : मी सर्वस्व गुरुचरणांवर वाहिल्यानंतर मी दुसर्‍या कुणाचा होऊच शकत नाही. गुरूंना अर्पण झाल्यानंतर माझा कुणी असायला मी शिल्लक राहिलोच कुठे ? परंतु सर्वांचा खरा 'मी' एकच आणि सर्वव्यापी असल्यामुळे आता मी सर्वांचा आहे. 
 (संदर्भ: सनातनचे प्रकाशन 'संत भक्तराज महाराज यांची शिकवण.') 

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

संतांचा आदर करा !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     सत्पुरुष आणि संत यांच्याविषयी आदर बाळगावा. ते परमेश्‍वराचे प्रेषित आणि प्रतिनिधी असतात. त्यांचा जन्म मानवी कल्याणासाठी आणि शोषितांच्या उद्वारासाठी असतो. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

शिवसेनेची राष्ट्रनिष्ठा !

संपादकीय
     दैत्यांचे हनन करणार्‍या श्री दुर्गामातेचा नवरात्रोत्सव सध्या चालू आहे. भारताच्या दृष्टीने सध्याचे दैत्य म्हणजे पाकिस्तान आहे, हे शेंबडे पोरही सांगेल. प्रतिदिन भारतावर आक्रमण करणार्‍या पाकड्यांना विरोध दर्शवून शिवसेना खरा नवरात्रोत्सव साजरा करत आहे, असेच म्हणावे लागले. हिंदुत्व हा शिवसेनेचा प्राण आहे आणि हिंदुबहुल भारताला सातत्याने पाण्यात पहाणार्‍या, नव्हे पाण्यात डुबवू पहाणार्‍या पाकला नाक घासायला लावण्याचे धैर्य शूर भारतीय सैनिकांनंतर शिवसेनेतच आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळात ३० कोटी भारतीय इंग्रजांवर नुसते थुंकले असते, तरी इंग्रज पळून गेले असते, असे म्हटले जाते. याचा भावार्थ लक्षात घ्यायला हवा. दुर्दैवाने तशीच काहीशी स्थिती सध्या पाकला विरोध करण्याच्या संदर्भात आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn