Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

नवरात्रोत्सव (आज आठवा दिवस)

सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तुते ॥
      एका मतानुसार नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण कमी करण्यासाठी तमोगुणी महाकालीची, पुढील तीन दिवस रजोगुण वाढवण्यासाठी रजोगुणी महालक्ष्मीची आणि शेवटचे तीन दिवस साधना तीव्र होण्यासाठी सत्त्वगुणी महासरस्वतीची पूजा करतात.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ शक्ती)
नवरात्र विषयक माहितीसाठी संकेतस्थळावरील मार्गिका
http://www.sanatan.org/mr/a/cid_289.html

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कार्यालयात शिवसैनिकांची निदर्शने !

सीमेवर आतंकवाद पसरवणार्‍या पाकिस्तानच्या विरोधात वेळोवेळी
खंबीर आणि राष्ट्रप्रेमी भूमिका घेऊन देशप्रेमाचे प्रात्यक्षिक दाखवणारे शिवसैनिक !
भारत-पाक यांच्यातील क्रिकेटविषयीच्या चर्चेला शिवसेनेचा विरोध
शशांक मनोहर यांच्या समोर निदर्शन करणारे शिवसैनिक
  • चर्चा रहित
  • घोषणाबाजी
  • हून अधिक शिवसैनिकांना अटक आणि सुटका
     मुंबई, १९ ऑक्टोबर - भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने सुरळीत पार पडण्यासाठी येथे आयोजित करण्यात आलेली चर्चा १९ ऑक्टोबरला शिवसेनेच्या तीव्र विरोधानंतर रहित करण्यात आली. पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबीचे) अध्यक्ष शहरयार खान आणि कार्यकारी समितीचे अध्यक्ष निजाम सेठी यांच्या विरोधात सकाळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआयच्या) कार्यालयात घुसून शिवसैनिकांनी तीव्र निदर्शने केली. (शिवसैनिकांप्रमाणे अशी राष्ट्रनिष्ठा सर्वच पक्ष आणि राज्यकर्ते का दाखवत नाहीत ? - संपादक) यानंतर १०० हून अधिक शिवसैनिकांना पोलिसांनी कह्यात घेतले.

सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांना हिंदुत्व शौर्य पुरस्कार प्रदान

 श्री. अभय वर्तक यांना पुरस्कार प्रदान करतांना डावीकडे ह.भ.प. शंकर महाराज
बडवे आणि श्री. वर्तक यांच्या डाव्या बाजूला ह.भ.प. रामकृष्ण वीर महाराज
क्रांतीवीर वसंतदादा बडवे न्यासाचा कार्यक्रम
     पंढरपूर, १९ ऑक्टोबर (वार्ता.) - येथील क्रांतीवीर वसंतदादा बडवे न्यासाच्या वतीने सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांना १९ ऑक्टोबर या दिवशी ह.भ.प. शंकर महाराज बडवे यांच्या हस्ते हिंदुत्व शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम येथील क्रांतीवीर वसंतदादा बडवे पुतळा, रुक्मिणी पटांगणात पार पडला. या कार्यक्रमाला संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांची उपस्थिती लाभली.

सांगली येथे सनातन संस्थेची पत्रकार परिषद शाम मानव यांच्या संस्थेची राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी करा ! - अभय वर्तक

डावीकडून श्री. सचिन पवार, अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन, श्री. अभय वर्तक आणि श्री. राजन बुणगे
      सांगली, १९ ऑक्टोबर (वार्ता.) - शाम मानव यांच्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संस्थेच्या संपूर्ण व्यवहाराची शासनाने राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी केली पाहिजे; कारण शाम मानव, तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या संस्थेला विदेशातून मोठ्या प्रमाणात निधी मिळत होता. मानव हे जिभेला हाड नसल्यासारखे वल्गना करून सनातन संस्थेवर चुकीच्या पद्धतीने आरोप करत आहेत. ते प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आरोप करत असल्याने प्रसिद्धीमाध्यमांनी, तसेच समाजाने त्यांच्या विधानांकडे दुर्लक्ष करावे.

आय.एस्.आय.एस्. मध्ये सहभागी होण्यासाठी जाणार्‍या २० संशयित बांगलादेशींना भिवंडी येथून अटक

हे आहे बांगलादेशी तरुणांचे भीषण वास्तव !
     भिवंडी, १९ ऑक्टोबर - आय.एस्.आय.एस्. या आतंकवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी निघालेल्या २० संशयित बांगलादेशी तरुणांना आतंकवादविरोधी पथकाने येथून अटक केली आहे. हे तरुण अधिकृतरित्या भारतात आले असून भिवंडी येथील कारखान्यांत काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. त्या सर्वांना ५ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

पुरस्कार वापसी (पुरस्कार परत करणे) म्हणजे चोरीची तक्रार टपाल खात्यात नोंदवणे !

  • अखिल भारतीय संगीत नाटक अकादमीचे अध्यक्ष शेखर सेन यांचा टोला
  • बोरूबहाद्दरांचे खरे स्वरूप जाणून न घेता त्यांना पाठिंबा देणारी विदेशातील लेखकांची संघटना, भारतात पोसल्या जाणार्‍या वैचारिक आतंकवादाविषयी बोलत नाही !
     नागपूर - एखाद्या घटनेचा तुमच्या मनावर परिणाम होत नसेल, तर तुम्ही कलाकारच नाही. त्यामुळे विरोध करणे हा कलाकाराचा जन्मसिद्ध अधिकारच असल्याचे मी मानतो; पण त्याची दिशा योग्य असायला हवी. सध्या चालू असलेला पुरस्कार वापसीचा प्रकार अत्यंत अयोग्य आहे. हा प्रकार म्हणजे चोरी झाल्यावर टपाल कार्यालयाकडे तक्रार करण्यासारखा प्रकार झाला, असे परखड मत अखिल भारतीय संगीत नाटक अकादमीचे अध्यक्ष, सुप्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक आणि संगीतकार शेखर सेन यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.

राममंदिर आणि समान नागरी कायदा गुंडाळून ठेवणार्‍या शासनाने कसुरीचा कार्यक्रम गुंडाळला असता, तर अणुबॉम्ब पडला असता का ? - शिवसेना

     मुंबई - देहली शासन चालवण्यासाठी राममंदिर आणि समान नागरी कायदा यांसारखे विषय गुंडाळून ठेवण्यात आले. जर खुर्शीद कसुरीचा एक कार्यक्रम गुंडाळला असता, तर पाकने मुंबईवर अणूबॉम्ब फेकला असता का, असा प्रश्‍न शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या एका लेखात खासदार संजय राऊत यांनी भाजपला केला आहे. 
     या लेखात राऊत म्हणाले, पाकिस्तान विरुद्ध हिंदुस्थान असे युद्ध देशाला अपेक्षित आहे. दोन राष्ट्रवादी विचारधारेचे पक्ष एकमेकांच्या विरोधात लढतांना पाहून पाकिस्तान आनंदाने टाळ्या वाजवत असेल. पाकिस्तानच्या संदर्भात शिवसेनेची भूमिका ज्ञात असतांना कसुरीच्या कार्यक्रमासाठी अनुमती देण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेेशी चर्चा करायला हवी होती; मात्र अशी चर्चा करण्यात आली नाही. शिवसेेनेच्या पाकविरोधी आंदोलनामुळे महाराष्ट्राची अपकीर्ती झाली आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी करणे, हे दुर्दैवी आहे. हे जसे छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाशी लढले; म्हणून महाराष्ट्राची अपकीर्ती झाली आहे, असे म्हणण्यासारखे आहे.

उत्तरप्रदेशात रामलीलेत मांसभक्षक मुसलमानांना राम, सीता आणि हनुमान यांची भूमिका देण्यास बंदी

असा निर्णय घेण्यामागील हिंदूंची रास्त भूमिका जाणून न घेता त्यांना 
असहिष्णु म्हणून हिणवण्यास निधर्मीवादी मागेपुढे पहाणार नाहीत !
     फैजाबाद - उत्तरप्रदेशात मांस खाणार्‍या मुसलमानांना रामलीलेत राम, सीता, हनुमान आदी प्रमुख भूमिका देणे बंद करण्यात आले आहे. (हिंदूंच्या देवतांविषयी भाव असणार्‍या कलाकाराने देवतांची भूमिका केल्यास त्याचा लाभ त्याला होतोच, तसेच रामलीला श्रद्धेने पहाणार्‍या भाविकांनाही होतो. मुसलमानांना हिंदूंच्या देवतांविषयी असा भाव असतो का ? त्यामुळे त्यांना भूमिका देणे बंद करणे योग्यच आहे ! - संपादक) गेली ५० वर्षे रामलीला होत असलेल्या मुमताजनगर या मुसलमानबहुल भागात तेथील हिंदूंनी मांसाहर करणार्‍यांना अशा भूमिका देण्यास आक्षेप घेतला आहे. त्यामुळे नवरात्र काळात शाकाहार पाळणारे हिंदूच या भूमिका करतात.

पाकिस्तानी गुप्तचर संस्थेने भारतीय गझल गायक जगजीत सिंह यांची हेरगिरी केल्याचे उघड

पाकच्या कलाकारांची बाजू घेऊन कंठशोष करणारे भारतीय अभिव्यक्ती 
स्वातंत्र्यवाले याविषयी कधीच का बोलत नाहीत ?
     नवी देहली - पाकिस्तान गुप्तचर संस्थेने भारतातील प्रसिद्ध गझल गायक जगजीतसिंह हे वर्ष १९७९ मध्ये पाकिस्तानमध्ये गेले असता त्यांची हेरगिरी केली होती. यासंदर्भातील उल्लेख सत्य सरन लिखित बात निकलेगी तो फिर... द लाइफ अँड म्युझिक ऑफ जगजीत सिंह या पुस्तकात आहे.
   जगजीत सिंह पाकिस्तान दौर्‍यावर गेले होते, तेव्हा त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सौ. चित्रा याही होत्या. जगजीत सिंह यांच्या पत्नी चित्रा सिंह यांनी पुस्तकाचे लेखक सत्य सरन यांना यासंदर्भात माहिती दिल्याचा उल्लेख पुस्तकात आहे. जेव्हा ते दोघे पाकिस्तानात गेले, तेव्हा राजकीय परिस्थिती तणावपूर्ण होती. एक गुप्तचर अधिकारी त्या दोघांचा सतत पाठलाग करत होता. त्यांच्या खोलीतही त्यांच्यावर नजर ठेवली जात होती. हा गुप्तचर अधिकारी जगजीत सिंह यांचा चाहता असल्याचे सांगत ते रहात असलेल्या हॉटेलच्या खोलीतही आला होता.
पाकिस्तानने जगजीतसिंह यांच्या कार्यक्रमावर घातली होती बंदी !
    त्या वेळी पाकिस्तानने जगजीत सिंह यांच्या कार्यक्रमावर बंदी घातली होती; मात्र त्यांना प्रेसक्लबकडून मिळालेल्या निमंत्रणानतर तिथेच त्यांचा कार्यक्रम झाला होता.

दोषी खासदार आणि आमदार यांना सात दिवसांत अपात्र ठरवा ! - निवडणूक आयोगाचे निर्देश

हे का सांगावे लागते ? दोषी लोकप्रतिनिधींना निवडून देणारी निरर्थक लोकशाही आता पुरे !
     नवी देहली - दोषी खासदार अन् आमदार यांना सात दिवसांच्या आत अपात्र ठरवण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने संसद आणि विधानसभा यांना दिले आहेत. आयोगाने लोकसभा, राज्यसभा, विधानसभा सचिवालयांना जारी केलेल्या निर्देशात म्हटले की, खासदार आणि आमदार यांना अपात्र ठरवण्याबाबत अकारण विलंब केला जाते. वास्तविक अशा प्रकरणात न्यायालयाच्या निर्णयानंतर संसद, विधानसभा यांच्याकडून अधिसूचना काढण्यास सात दिवसांपेक्षा अधिक अवधी लागता कामा नये.

मोगपाय्यर, तमिळनाडू येथील श्री पेरुमल मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने मार्गदर्शन

     चेन्नई - मोगपाय्यर, तमिळनाडू येथील श्री सन्थाना श्रीनिवास पेरुमल मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने नुकतेच आनंदी जीवनासाठी अध्यात्म या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. सनातनच्या साधिका सौ. उमा रविचंद्रन् यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 
    मंदिरात उत्सव चालू असल्याने मंदिर भाविकांनी भरले होते. मार्गदर्शन चालू होण्यापूर्वी श्री पेरुमल मंदिराच्या मुख्य आचार्यांनी सौ. उमा रविचंद्रन् यांना पुष्पहार अर्पण करून त्यांचे स्वागत केले. त्यानंतर धार्मिक आचारांविषयीची ध्वनीचित्र-चकती या वेळी दाखवण्यात आली, तसेच शास्त्रानुसार वाढदिवस साजरा कसा करावा याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. नमस्काराचे महत्त्व, सात्त्विक केशरचना, वेशभूषा, उद्घाटन सोहळा शास्त्रीयदृष्ट्या कसा साजरा करावा ? यांविषयी, तसेच अध्यात्म विश्‍वविद्यालयाविषयी माहिती देणारी ध्वनीचित्र-चकती दाखवण्यात आली. सौ. उमा रविचंद्रन् यांनी गुरुकृपायोगानुसार साधना कशी करावी, याविषयी माहिती दिली. या वेळी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. याचा लाभ उपस्थित जिज्ञासूंनी घेतला.

घायाळ ट्रकचालकाचा मृत्यू, काश्मीरमध्ये हिंसाचार

जम्मू-काश्मीरला हिंसाचारमुक्त करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न व्हावेत !
गोमांस असल्याच्या संशयावरून ट्रकवर आक्रमण केल्याचे प्रकरण
     श्रीनगर - गोमांस असल्याच्या संशयावरून १० दिवसांपूर्वी एका ट्रकवर पेट्रोलबॉम्बने आक्रमण करण्यात आले होते. या आक्रमणात घायाळ झालेल्या झाहिद नावाच्या ट्रकचालकाचे देहलीच्या इस्पितळात नुकतेच निधन झाले. त्यावरून काश्मीरमध्ये लोकांनी हिंसाचार माजवला. त्यांनी टायर जाळून जम्मू-श्रीनगर महामार्ग रोखून धरला, तसेच पोलिसांवर दगडफेक केली. काही भागांमध्ये संचारबंदी लागू आली असून ट्रकचालकावर आक्रमण करणार्‍या ७ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

भाग्यनगर येथील हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांच्या वाहनावर अज्ञातांकडून दगडफेक

हिंदूंनो, तुमच्या नेत्यांवरील वाढती आक्रमणे रोखण्यासाठी संघटित होऊन त्यांच्या मागे उभे रहा !
     भाग्यनगर - येथील भाजपचे आमदार श्री. टी. राजासिंह यांच्या वाहनावर १८ ऑक्टोबरला मध्यरात्री अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना घडली. याविषयी माहिती देतांना श्री. टी. राजासिंह म्हणाले, नवरात्रीनिमित्त माझ्या प्रभागात अनेक ठिकाणी देवीच्या जागरणाचे कार्यक्रम होते. या कार्यक्रमांना मी उपस्थित होतो. त्यानंतर मध्यरात्री ३ वाजता मी घरी परत येत असतांना काही नपुंसक लोकांनी माझ्या वाहनावर दगडफेक केली. पाठीमागून आक्रमण नपुंसक लोक करतात. समोरासमोर येऊन लढले पाहिजे. मी त्या नपुंसकांना सांगू इच्छितो की, केलेल्या गुन्ह्यासाठी त्यांनी त्वरित स्वत:हून पोलिसांना शरण जावे; अन्यथा त्यांच्या घरात घुसून त्यांना उचलून पोलिसांच्या कह्यात दिले जाईल.

(म्हणे) धार्मिक उन्माद लोक खपवून घेणार नाहीत !

काँग्रेसचे तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे फुकाचे बोल !
काँग्रेस शासनाच्या काळात धर्मांधांच्या उन्मादाने टोक गाठले आणि दंगली झाल्या, तसेच 
काश्मीरमधील हिंदूंचा वंशविच्छेद झाला, याविषयी सुशीलकुमार शिंदे यांना काय म्हणायचे आहे ?
     नागपूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर लोकांचा विश्‍वास आहे. त्यामुळे देशात धार्मिक उन्माद माजवण्याचे प्रयत्न होणार असतील, तर येथील जनता ते खपवून घेणार नाही, हे राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे, असे मत काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री आणि नेते सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.

ऑस्ट्रेलियातील प्राणीसंग्रहालयात पुरातन गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना !

भारतात बर्‍याच निर्जन स्थळी अशा कित्येक मूर्ती पडून असतात. त्यांचे महत्त्व जाणून त्यांचे 
संवर्धन करण्यासाठी पुरातत्व विभागाला भाग पाडण्यासाठी भारतातील 
हिंदूंनी पुढाकार घेणे आवश्यक !
     ऍडलेड - येथील प्राणी संग्रहालयामध्ये अनेक वर्षे दुर्लक्षित असलेल्या गणपतीच्या पुरातन मूर्तीची गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रतिष्ठापना करण्यात आली. 
     येथील भारतीय रहिवासी श्री. मुनीष सारडा हे त्यांच्या कुटुबियांसह येथील प्राणीसंग्रहालयामध्ये फिरायला गेले असता त्यांना कोपर्‍यात एक मूर्ती पडलेली आढळली. ही गणपतीची मूर्ती असल्याचे लक्षात येताच त्यांनी या संदर्भात स्थानिक हिंदुत्ववादी कार्यकर्ते श्री. चिराग त्रिवेदी यांना माहिती दिली. (धर्महानी रोखण्यासाठी तत्परतेने कृती करणारे श्री. सारडा यांचे अभिनंदन ! यातून इतर हिंदुत्ववाद्यांनीही बोध घ्यावा ! - संपादक) या मूर्तीच्या संदर्भात फ्लिंडर्स विद्यापिठाच्या पुरातत्व विभागाकडे विचारणा केली असता ही मूर्ती १३ व्या शतकातील ब्लीतार, पूर्व जावा येथे असलेल्या जावनीज बोरो गणेशमूर्तीची प्रतिकृती असल्याचे लक्षात आले.

निवडणूक तिकिटासाठी महिलांना वरिष्ठ नेत्यांशी तडजोड करावी लागते !

अशा संस्कृतीहिन पक्षाने देशावर दीर्घकाळ राज्य करावे, हे या देशाचे दुर्दैव !
केेरळचे माजी काँग्रेस नेते चेरियन फिलिप यांचा आरोप
     थिरुवनंतपूरम् (केरळ) - राजकारणात महिलांना अनेक तडजोडी कराव्या लागत असून निवडणुकीचे तिकीट हवे असल्यास त्यांना वरिष्ठ नेत्यांशी शारीरिक संबंधही ठेवावे लागतात, असा आरोप माजी काँग्रेस नेते चेरियन फिलिप यांनी त्यांच्या पक्षातील नेत्यांवर केला आहे. 
    फिलिप कधीकाळी पक्षाचे ज्येष्ठ नेते ए.के. अँथनी आणि मुख्यमंत्री सी.एम्. ओमान चंडी यांचे निकटवर्तीय होते. काही दिवसांपूर्वी स्थानिक निवडणुकीत युवक काँग्रेसच्या कार्यकत्यांना तिकीट मिळाले नव्हते. त्याचा निषेध व्यक्त करत कार्यकर्त्यांनी अंगावरील अंगरखे उतरून आंदोलन केले होते. त्याचा हवाला देत फिलिप यांनी फेसबूक वर लिहिले की, युवक काँग्रेसने शर्ट उतरवून जे आंदोलन केले ते मॉडेल आंदोलन होते. यापूर्वी ज्या महिलांनी गुपचूप असे आंदोलन केले, त्यांना काँग्रेसचे तिकीट मिळाले आहे. फिलिप यांच्या या वक्तव्याने गदारोळ माजल्यानंतर काँग्रेसच्या प्रदेश समितीने त्यांना हे वक्तव्य परत घेण्याची मागणी केली आहे.

वारकरी संप्रदाय सनातनच्या पाठीशी खंबीरपणे उभा ! ह.भ.प. अर्जुन महाराज पांचाळ

सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीच्या विरोधात संभाजीनगर येथे भव्य मोर्चा 
मोर्च्यात उपस्थित हिंदुत्ववादी
     संभाजीनगर, १९ ऑक्टोबर (वार्ता.) - सनातन संस्थेच्या पाठिंब्यासाठी जर यापुढेही कधी मोर्चा काढला गेला, तर वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येने दिंडीसह उपस्थित राहून सनातनला पाठिंबा देईल. सनातनवर बंदी येणे शक्यच नाही, असे आश्‍वासक उद्गार मराठवाडा वारकरी संप्रदायाचे सचिव ह.भ.प. अर्जुन महाराज पांचाळ यांनी काढले. कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी सनातनच्या साधकाला अटक केल्याच्या कारणावरून सनातनला आतंकवादी संघटना ठरवून तिच्यावर बंदी घालण्यात यावी; म्हणून तथाकथित पुरोगाम्यांनी आकांडतांडव चालू केले आहे. या पार्श्‍वभूमीवर येथे १८ ऑक्टोबर या दिवशी सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीच्या विरोधात विविध हिंदुत्ववादी संघटना आणि धार्मिक संघटना यांसह भव्य मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. मोर्च्यामध्ये २५० धर्माभिमानी उपस्थित होते. सनातन संस्थेचे पू. नंदकुमार जाधव यांचीही मोर्च्याला वंदनीय उपस्थिती लाभली. 

केजरीवाल यांच्याकडून गुलाम अलींना संरक्षण मिळू शकते, तर देहलीतील महिलांना का नाही ? - शिवसेना

     मुंबई - देहली ही बलात्कार्‍यांची राजधानी बनली आहे. नुकतेच तेथे दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाले. मुख्यमंत्री केजरीवाल देहलीतील महिलांना संरक्षण पुरवू शकत नाहीत; मात्र गुलाम अली यांसारख्या शत्रूराष्ट्राच्या गझल गायकास संरक्षण पुरवण्याचे प्रयत्न कसे करतात ? असा प्रश्‍न शिवसेनेच्या 'सामना ' मुखपत्रात विचारण्यात आला आहे. 

बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी ४ धर्मांधांना अटक

     बेंगळुरू - कर्नाटक राज्यातील बजरंग दलाचे कार्यकर्ते प्रशांत पुजारी यांच्या हत्येच्या प्रकरणी मंगळुरू पोलिसांनी ४ धर्मांधांना अटक केली. महंमद अनीस, महंमद इब्राहिम, महंमद इलियास आणि महंमद अब्दुल रशीद अशी त्यांची नावे आहेत. मंगळुरूचे पोलीस आयुक्त एस्. मुरुगन यांनी ही माहिती दिली. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, "प्रशांत पुजारी हे गायींची तस्करी त्यांची हत्या यांच्या विरोधात कार्य करत होते. ८ ऑक्टोबर २०१५ या दिवशी ते त्यांच्या फुलांच्या दुकानात बसले असतांना वरील ४ धर्मांधांनी त्यांची हत्या केली होती. या प्रकरणी आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे."

न्यायालयाचा निर्णय विरोधात जाण्यास उत्तरदायी असणार्‍या संबंधित अधिकार्‍यांवर महाराष्ट्र शासन कारवाई करणार !

हा निर्णय पूर्वीच घेतला असता, तर आतापर्यंत निर्दोष सुटलेल्या गुन्हेगारांवर वचक बसला असता ! 
     मुंबई - तपासयंत्रणा किंवा शासकीय अधिवक्ता यांनी कर्तव्यात कसूर ठेवल्यामुळे न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्यास त्यासाठी संबंधितांवर दायित्व निश्‍चित करून कारवाई करण्याचे महाराष्ट्र शासनाने ठरवले आहे. त्यासाठी गृह खात्याकडून अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

ज्योतिषाचार्य अतुल छाजेड यांना अज्ञातांकडून धमकी, गुन्हा दाखल

धमकी देणारे अंनिसचे कार्यकर्ते असल्याचा ज्योतिषाचार्य छाजेड यांचा आरोप ! 
हिंदुत्ववादी संघटनांना आतंकवादी ठरवणार्‍या नास्तिकतावाद्यांचे अविवेकी वर्तन ! 
     पुणे, १९ ऑक्टोबर (वार्ता.) - अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विरोधात काम करत असल्याच्या प्रकरणी अंनिसवाल्यांनी भ्रमणभाषद्वारे धमकी दिल्याचा दावा ज्योतिषाचार्य श्री. अतुल छाजेड यांनी केला आहे. या प्रकरणी अनोळखी व्यक्तीच्या विरोधात फरासखाना पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्हा पोलिसांनी नोंदवला आहे. अंनिसची बुवाबाजी उघड करत असल्यानेच अंनिसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना धमकी दिल्याचा आरोप ज्योतिषाचार्य श्री. छाजेड यांनी केला आहे. 

टिळक महाराष्ट्र विद्यापिठाच्या कुलसचिवांना विनयभंग प्रकरणी अटक

विद्येच्या माहेरघरातील अविद्या ! 
     पुणे, १९ ऑक्टोबर (वार्ता.) - टिळक महाराष्ट्र विद्यापिठाचे कुलसचिव उमेश केसकर (वय ५३ वर्षे) यांना महिला रेक्टरचा विनयभंग केल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी अटक केली. घटना घडतांना केसकर नशेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. कार्यालयीन कामानिमित्त केसकर यांच्या कार्यालयात गेल्यावर त्यांनी हात हातात घेऊन रात्री एकटी घरी येण्यास सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून लैंगिक छळ चालू आहे, असा आरोप ४० वर्षीय महिला रेक्टरने आरोप केला आहे. (उच्चभ्रू समाजातील गुन्हेगारी ! यावरून समाजात नीतीमत्ता किती खालावली आहे, हे स्पष्ट होते. तसेच यावरून धर्मशिक्षणाची आवश्यकता स्पष्ट होते. - संपादक)

सांगली येथील पत्रकार परिषदेत झालेली प्रश्‍नोत्तरे

१. प्रश्‍न : डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणी सनातन संस्थेवर संशय का घेतला जातो ? 
श्री. अभय वर्तक : डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे हे सतत हिंदुविरोधी लिखाण करून ते हिंदु देवता, संत, हिंदु धर्म यांवर टीका करत होते. त्यामुळे आमचा त्यांना वैचारिक विरोध होता. एकप्रकारे त्यांनी हिंदु धर्म संपवण्याचा विडाच उचलला होता. अंनिसने विविध शाळांमध्ये कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांकडूनही २७ लक्ष १३ सहस्र रुपये उकळले होते. विदेशातूनही त्यांना लक्षावधी रुपये मिळत होते. आतापर्यंत या दोघांच्या संस्थांनी धर्मादाय आयुक्तांना कोणताही हिशेब, ताळेबंद सादर केलेला नाही. त्यामुळे दोघांच्याही संस्थांमधील अपहार आम्ही बाहेर काढले ! हे पुरोगामी संघटनांना सहन न झाल्याने ते सातत्याने सनातन संस्थेवर खोटे आरोप करतात. 

शहरातील मैलापाणी शुद्धीकरण केंद्रातील विजेचे परीक्षण होणार

पुणे महानगरपालिकेने महावितरण समवेत केलेल्या कराराचे प्रकरण 
     पुणे - शहरातील मैलापाणी शुद्धीकरण केंद्रातील वीज वापराचे परीक्षण (ऑडिट) करण्यात येणार आहे. या परीक्षणामुळे आवश्यक वीज लक्षात घेऊन महावितरणकडे विजेची मागणी करून महावितरणशी केलेल्या करारामध्ये पालट केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात राजाराम पूल, कसबा पेठ (कुंभारवाडा), म्हात्रे पूल येथील केंद्रातील विजेच्या वापराचा नव्याने अभ्यास करण्याच्या सूचना पालिका प्रशासनाने दिल्या आहेत. (हे परीक्षण करण्याचा निर्णय आधीच का घेतला नाही ? या सर्व अपप्रकाराला उत्तरदायी कोण, याविषयी पालिका प्रशासनाने उत्तर द्यावे. - संपादक)

पुण्यामध्ये ६५ लक्ष रुपयांच्या वीजचोरीची ६ प्रकरणे उघडकीस

अशा वीजचोरांवर अंकुश ठेवण्यासाठी उद्योग व्यवसाय करण्यास कायमची अनुज्ञप्ती 
नाकारल्यास आणि कठोर शासन केल्यास वीज चोरी अल्प होऊ शकते !
     पुणे, १९ ऑक्टोबर - वडगाव धायरी येथील एका बर्फाच्या कारखान्यामध्ये २७ लक्ष रुपयांची सर्वांत मोठी वीज चोरी उघड झाली आहे. ही चोरी रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने मीटरमधील विजेची नोंद थांबवून करण्यात येत होती. आतापर्यंतच्या मोहिमेमध्ये ६ प्रकरणांमध्ये एकूण ६५ लक्ष रुपयांची वीज चोरी उघड झाली आहे. वीजचोरांच्या विरोधात सध्या महावितरण आस्थापनाने उघडलेल्या मोहिमेतून या गोष्टी उघड होत आहेत.

हिंदुत्व ही सत्याधारित विचारसरणी ! - राष्ट्रसंत प.पू. भय्यूजी महाराज

डावीकडून पं. धर्मवीर आर्य, खासदार अनिल शिरोळे,
सत्यजित चौधरी (पुरस्कार स्वीकारतांना),
प.पू. भय्यूजी महाराज, कृष्णकुमार गोयल, श्रीरंग बारणे
     चिंचवड, १९ ऑक्टोबर (वार्ता.) - हिंदु धर्म म्हणजे सहिष्णूता ! अहंकार आणि वासना यांचे आवरण असल्याने आपल्याला सत्य सापडत नाही. सत्य केवळ वाणीत नाही, तर आचरणातही असावे लागते. जो सत्याचे पालन करतो, तो हिंदु ! हिंदु धर्म ही सत्यावर आधारित विचारसरणी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रसंत प.पू. भय्यूजी महाराज यांनी केले. हिंदु स्वाभिमान प्रतिष्ठानच्या वतीने विजयादशमीनिमित्त १८ ऑक्टोबर या दिवशी येथील रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या हिंदु शौर्य दिन या कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, अनिल शिरोळे, आमदार लक्ष्मण जगताप, हिंदु स्वाभिमान प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. कृष्णकुमार गोयल, पंडित धर्मवीर आर्य, अधिवक्ता देवदास शिंदे, उत्तम दंडिमे, राहुल कलाटे आदी उपस्थित होते. 

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांचा सत्कार !

     

श्री. अभय वर्तक यांचा सत्कार करतांना
श्री. रणजित सावरकर आणि सौ. मंजिरी मराठे
 
     मुंबई - सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांचा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये नुकताच सत्कार करण्यात आला. या वेळी स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर आणि स्मारकाच्या विश्‍वस्त सौ. मंजिरी मराठे उपस्थित होत्या. 

हिंदूंनो, तुमच्या नेत्यांवरील वाढती आक्रमणे रोखण्यासाठी संघटित होऊन त्यांच्या पाठीशी उभे रहा !

फलक प्रसिद्धीकरता
     भाग्यनगर (हैद्राबाद) येथील हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह नवरात्रोत्वाच्या कार्यक्रमावरून घरी परतत असतांना त्यांच्या वाहनावर १८ ऑक्टोबर या दिवशी मध्यरात्री अज्ञातांनी दगडफेक केली.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : 
Bhagyanagar ke BJP vidhayak T. Rajasinhake gadipar dharmandho dwara pathrav. - 
aise akraman kabhi dusre dharmiyonke netaopar huye hai kya ? 
जागो ! : 
भाग्यनगर के भाजपा विधायक टी. राजा सिंह के गाडी पर धर्माधों द्वारा पथराव ! - एैसे आक्रमण कभी 
दुसरे धर्मियोंके नेताआेंपर हुए है क्या ?

श्री. अभय वर्तक यांनी शौर्य पुरस्कार मिळाल्यानंतर उत्तर देतांना व्यक्त केलेले विचार !

श्री. अभय वर्तक
हिंदु समाजामध्ये शौर्याचे जागरण व्हावे !
१. पुरस्काराचे महत्त्व ! 
     हिंदु धर्माचा प्रसार करतांना मला जाणवले की, भारतियांमध्ये शौर्याची न्यूनता नाही. गेल्या मासात एकीकडे भारतातील काही जण राष्ट्रपतींना याकूबला फासावर देऊ नये, असे (अमानुष) मानवतेचे गार्‍हाणे घालत होते, तर तिकडे जम्मू-काश्मीरमध्ये दोन शेतकरी तरुणांनी निःशस्त्र असतांना एके ४७ हाती असलेल्या कासीम खान या कसाबसारख्या खतरनाक आतंकवाद्याला जिवंत पकडून दिले. हे खरे शौर्य ! आज गोवंशहत्या बंदी कायदा असतांनाही राज्यात गोवंशाची आणि गोमांसाची तस्करी चालू आहे. ती प्राणपणाने रोखणारे गोरक्षक शौर्यशाली आहेत. यांच्या शौर्याचा आदर्श हिंदु समाजाने घेतला पाहिजे. हिंदूंमधील शूरतेचा विकास होण्याची आज नितांत आवश्यकता आहे. आपण देत असलेला पुरस्कार खरे तर हिंदु समाजात शौर्याचे जागरण करणारा आहे. निस्तेज होत चाललेल्या हिंदु समाजाला त्याच्यातील तेजत्वाची जाणीव करून देणारा आहे. आणि म्हणून हा पुरस्कार आमच्यासाठी अनमोल आहे. हिंदु धर्म आणि समाज यांच्या जागृतीच्या कर्तव्याचे आमचे दायित्व वाढवणारा हा पुरस्कार आहे. हे उत्तरदायित्व ईश्‍वराने आमच्याकडून यशस्वीरित्या पार पाडून घ्यावे, ही माझी ईश्‍वरचरणी प्रार्थना आहे.

देवीच्या पूजनातील काही सर्वसाधारण कृती करण्याच्या अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य पद्धती

नवरात्रीच्या निमित्ताने...
    प्रत्येक देवतेचे विशिष्ट उपासनाशास्त्र आहे. याचा अर्थ असा की, प्रत्येक देवतेच्या उपासनेच्या अंतर्गत प्रत्येक कृती विशिष्ट प्रकारे करण्यामागे शास्त्र आहे. आदिशक्ती श्री दुर्गादेवी आणि तिची सर्व रूपे (सर्व देवी) यांच्या पूजनाशी संबंधित सर्वसाधारण कृतींविषयी माहिती येथे दिली आहे. ही माहिती वाचून भाविकांनी धर्मशास्त्राप्रमाणे उपासना करावी आणि आनंद मिळवावा.

नकारात्मक विचारांमुळे हृदयविकाराचा धोका ?

     कामाचा ताण, कामाच्या वेळा पाळणे, दिलेली उद्दिष्टे पूर्ण करणे अशा विविध कारणांमुळे अनेक तरुणांच्या मनावर सतत एक प्रकारचा ताण असतो. या ताणाचे रूपांतर अनेकदा नकारात्मक विचारांत होत असते; पण हे नकारात्मक विचार आणि ताण सातत्याने राहिल्यास त्यामुळे हृदयविकाराचा धोका संभवत असतो, असे हृदयरोगतज्ञांचे मत आहे.
     हिंदुजा रुग्णालयातील इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. सी.के. पोंडे यांनी या संदर्भातील एक निरीक्षण नोंदवले. ते म्हणाले, मुंबईतील एक ३८ वर्षीय व्यक्ती श्‍वसनाचा त्रास होत असल्याने माझ्याकडे आली. या व्यक्तीचा रक्तदाब वाढलेला होता. त्याचा ईसीजी काढल्यानंतर हृदयाच्या दोन प्रमुख धमन्यांमध्ये ब्लॉकेज असल्याचे आढळून आले. त्याच्यावर तात्काळ अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्यात आली. ही व्यक्ती व्यसनी नव्हती; पण त्याला कामानिमित्त अनेकदा बाहेरगावी जावे लागायचे. कामाच्या अतिरिक्त ताणामुळे त्याची विचारसरणी नकारात्मक झाली होती.

समाजहिताची चिंता आहे कोणाला ?

आपल्या देशात व्यापक समाज आणि राष्ट्र हितापेक्षा एखाद्या जातीचे, गटाचे नेतृत्व करून पुढारी म्हणून मिरवण्यात अधिक धन्यता मानली जाते. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि तत्कालीन गृहमंत्री रा.रा. पाटील यांनी २००५ मध्ये संस्कृती, संस्कार आणि नैतिकतेच्या सूत्रावर व्यापक समाजहिताचा विचार करून डान्सबार बंदीचा धाडसी निर्णय घेतला होता; मात्र या बंदीमुळे बारमध्ये काम करणार्‍या सहस्रोे बारबाला, वेटर यांच्या पोटावर पाय आल्याची ओरड डान्स बारवाल्यांशी हितसंबंधी असलेले तथाकथित पुढारी, राजकारणी, समाजकारणी यांनी करण्यास आरंभ केला. या डान्सबार बंदीच्या विरोधात बारमालकांनीही न्यायालयात धाव घेऊन बंदी उठवण्याची मागणी केली. ही बंदी घातली गेली, तेव्हा काँग्रेस आघाडीचे शासन राज्यात होते आणि आता बंदी उठली, तेव्हा युतीचे शासन आहे.

मानवा, थोर तुझे उपकार !

डॉ. संजय सामंत
     गायकवाड प्रकरणात सनातनची एवढी अपकीर्ती करून ठेवली, आता फासे पलटले, तर आपली उलट अपकीर्ती होईल कि काय, याची वाहिन्यांना भीती वाटू लागली. वाईटातून काहीतरी चांगले घडते, तसे या वाहिन्यांमुळे सनातन घराघरात पोहोचले. शाम मानवांच्या प.पू. डॉ. आठवले यांच्यावरील विरोधी भक्तीने (पाहिजेतर असूया म्हणा) हे शक्य झाले; म्हणूनच सनातन धर्माचा एक साधक म्हणून म्हणावे असे वाटते मानवा, थोर तुझे उपकार ! 
- डॉ. संजय सामंत, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. (१३.१०.२०१५)

हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांना एकही माध्यम जगभर प्रसिद्धी देत नाही, हे लक्षात घ्या ! म्हणून हिंदू वाहिनी हवी !

     आखाती राष्ट्रात इंडिया फ्रॅटर्निटी फोरम नावाची संघटना आहे. भारतात अल्पसंख्यांक असलेल्या मुसलमानांवर सतत आक्रमणे होतात, असा कांगावा करणारे तेजसचे अहवाल, लेख दाखवून ही संघटना आखाती देशात पैसा गोळा करते.

साधकांनो, हिंदु राष्ट्राची स्थापना हे श्रीगुरूंचे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणार्‍या सेवांमध्ये सहभागी होऊन या व्यापक कार्यात खारीचा वाटा उचला !

विद्यार्थी-साधकांना दीपावलीच्या सुटीच्या काळात चैतन्यदायी 
आश्रमजीवन अनुभवण्याची सुवर्णसंधी !
१. राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी वेळ देणे ही काळाची आवश्यकता ! 
    भावी आपत्कालीन स्थिती निर्माण होण्यापूर्वी धर्मप्रसार आणि सनातनच्या संशोधनाचे कार्य समाजापर्यंत अधिकाधिक पोचवणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकाने स्वतःचे शिक्षण, तसेच अन्य व्यावहारिक कामे सांभाळून अधिकाधिक वेळ राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी देणे काळाची आवश्यकता आहे.

दीपावलीच्या शुभ मुहुर्तावर... वाचक आणि विज्ञापनदाते यांना आनंदवार्ता !

या अंकापासून साप्ताहिक सनातन प्रभात १६ पानी !
दिवाळी विशेषांक (रंगीत)
साप्ताहिक सनातन प्रभातचा अंक क्र. ५० 
(२९ ऑक्टोबर २०१५ ते ४ नोव्हेंबर २०१५)
या अंकात वाचा...
  • दीपावली कशी साजरी कराल ?
  • दिवाळीच्या कालावधीत साजर्‍या होणार्‍या सणांचे अध्यात्मशास्त्र
  • दीपावलीच्या मंगल प्रसंगी काढावयाच्या सात्त्विक रांगोळ्या
यांसह अन्य वाचनीय लिखाण...
     सर्व वितरकांनी अतिरिक्त अंकांची मागणी मंगळवार २० ऑक्टोबर २०१५ या दिवशी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ईआरपी प्रणालीत भरावी.
आपली मागणी आजच नोंदवा !

दैनिक सनातन प्रभातचा दसर्‍यानिमित्त रंगीत

धर्मविजय विशेषांक 
प्रसिद्धी दिनांक : २२ ऑक्टोबर
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २१ ऑक्टोबरच्या 
दुपारी ३ पर्यंत ईआर्पी प्रणालीत भरावी !

नियतकालिकांची सेवा करतांना साधिकेने अनुभवलेला सेवेचा अर्थ

     हे श्रीकृष्णा, नियतकालिकांची सेवा ही खारीच्या वाट्याप्रमाणे आहे. ती करता-करता, त्या सेवेच्या माध्यमांतून सेवा म्हणजे काय ? हे मी अनुभवले.
१. सेवा देणे : ईश्‍वराचा संकल्प असणे, म्हणजे ईश्‍वर सदैव समवेत आहे, याची जाणीव होणे
२. सेवा घेणे : ईश्‍वराचा आशीर्वाद असणे, म्हणजे ईश्‍वराची सदैव कृपा असणे
३. सेवा करणे : ईश्‍वरी कृपा सदैव असणे, म्हणजे ईश्‍वराच्या नामामध्ये

प्रसारसेवकांच्या राष्ट्रीय शिबिराच्या वेळी हे शिबीर माझ्या व्यष्टी साधनेसाठीच होते, असे वाटणे

१. १० वर्षांपासून साधनेत असूनही अहं निर्मूलनाचे प्रयत्न केवळ वरवरचे चालले असल्याचे जाणवणे : माझ्या व्यष्टी साधनेची देवालाच काळजी आहे. मी गेल्या १० वर्षांपासून साधनेत आहे. मनातील प्रत्येक विचारामागे अहं असायचा; पण त्यावर मात करण्यासंदर्भात प्रयत्न करूनही विचार अल्प होत नव्हते आणि कृती होत नव्हती. सर्व प्रयत्न वरवरचे

प्रसिद्धीसाठी हपापलेली माणसे वाटेल ते करतात !, हे संस्कृतमधील सुभाषित सिद्ध करणारे शाम मानव !

सनातन संस्थेच्या विरोधात सातत्याने बोलत असल्याने मी संस्थेचे पहिले लक्ष्य आहे ! - शाम मानव, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय संघटक (दैनिक सनातन प्रभात, १९.१०.२०१५)
संस्कृतमधील सुभाषित
घटं भिन्द्यात्पटं छिन्द्यात्कुर्याद् वा रासभस्वनम् ।
येन केन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषो भवेत् ॥
अर्थ : मडके फोडावे, कपडे फाडावेत किंवा गाढवासारखे ओरडावे. या ना त्या प्रकारे प्रसिद्ध पुरुष व्हावे !
      प्रसिद्धीसाठी माणसे हपापलेली असतात. सध्या वर्तमानपत्रांत आणि दूरचित्रवाहिन्यांवर आपले नाव यावे; म्हणून माणसे वाटेल त्या क्प्त्या करतात. त्याचे एक उदाहरण म्हणून पुढे शाम मानव यांचे नाव घेतले जाईल !

देवतांंप्रती भाव असणारा ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कांदिवली, मुंबई येथील बालसाधक चि. गौरांग तुषार पवार (वय २ वर्षे) !

     कांदिवली, मुंबई येथील बालसाधक चि. गौरांग तुषार पवार (वय २ वर्षे) याच्याविषयी आई, आजी-आजोबा आणि काकू यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत. पवार कुटुंबीय वर्ष १९९९ पासून सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहे.
१. सौ. वृषाली पवार (आई)
१ अ. स्तोत्रे ऐकण्याची आवड : गर्भारपणाच्या काळात मारुतिस्तोत्र आणि रामरक्षास्तोत्र यांची ध्वनीफित लावल्यानंतर गर्भाची हालचाल होत असे. जन्मानंतर बाळाचे (चि. गौरांगचे) रडणे चालू झाल्यानंतर मारुतिस्तोत्र आणि रामरक्षास्तोत्र

शीतकपाटातील फ्रिझरमध्ये बर्फाच्या शिवलिंगासारखी आकृती निर्माण होणे

डीप फ्रिजरमध्ये शिवलिंगासारखी निर्माण झालेली आकृती
      नाशिक जिल्ह्यातील पिंपळगांव बसवंत येथील सौ. नीलम राठी या मागील अनेक वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतात. संस्थेच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग असतो. त्यांची साधनेची प्रत्येक कृती परिपूर्ण आणि भावपूर्ण असते. त्या अनेक वर्षांपासून सोमवारी शिवाची मनोभावे पूजा करून उपवास

पती हा परमेश्‍वर मानून पतीची एकनिष्ठतेने सेवा करणार्‍या आणि मुलांवरही साधनेचे संस्कार करणार्‍या सावर्डे, जि. रत्नागिरी येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. चन्नबसम्मा ईरण्णा जंगम (वय ६१ वर्षे) !

सौ. चन्नबसम्मा जंगम
      ६० टक्के आणि त्यापुढील पातळी साध्य झालेल्या साधकांच्या गुणवैशिष्ट्यांचे लिखाण केवळ न वाचता त्यात दिलेली गुणवैशिष्ट्ये स्वतःत आहेत का ?, याचा अभ्यास करावा आणि स्वतःमध्ये नसतील, ती गुणवैशिष्ट्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. असे केले, तरच गुणवैशिष्ट्ये छापण्याचे सार्थक होईल. - (प.पू.) डॉ. आठवले (१५.९.२०१४)
    सावर्डे ता. चिपळूण येथील सौ. चन्नबसम्मा जंगम (वय ६१ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे नुकतेच घोषित करण्यात आले. त्यांच्याविषयी त्यांची मुलगी कु. शांता यांनी लिहिलेली सूत्रे येथे देत आहोत !

१. आई करत असलेली साधना
     आईचे वडील म्हणजे माझे आजोबा संत होते. त्यांना पुढे घडणार्‍या गोष्टींविषयी आधीच समजायचे. आईही लहानपणापासून देवाची भक्ती करायची. ती कीर्तन आणि भजने ऐकायची. तिला देवाची पुष्कळ आवड होती. आईने पुष्कळ उपवास आणि व्रते केली अन् अजूनही करत आहे. ती आठवड्यातून ४ दिवस उपवासच करते. आई देवाची पूजा सोवळ्याने करायची.

धर्मसत्संग आणि विविध माहितीपट यांच्या निर्मितीतील विविध सेवांमध्ये सहभागी होऊन समाजमनात राष्ट्र अन् धर्म प्रेमाचे बीज रोवण्यास कटीबद्ध व्हा !

साधकांना सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् राष्ट्रप्रेमी हिंदू यांना नम्र विनंती
     समाजाला धर्मशिक्षण देऊन धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती सदैव प्रयत्नरत आहेत. संस्था आणि समिती यांच्या वतीने दर्शकांना विविध विषयांचे ज्ञानामृत पाजणारे ३७० दृक्श्राव्य धर्मसत्संग सिद्ध करण्यात आले असून विविध विषयांवरील दृकश्राव्य माहितीपटही (ऑडिओ-व्हिडिओ डॉक्युमेन्टरीसुद्धा) बनवण्यात आले आहेत.
     सार्‍या मानवजातीसाठी एकमेव बोधामृत असणारे धर्मसत्संग, तसेच समाजाला दिशादर्शन

हरिद्वार येथील अर्धकुंभमेळ्यातील धर्मप्रसारांतर्गत विविध सेवांमध्ये सहभागी व्हा !

वाचक, हितचिंतक, धर्मप्रेमी, तसेच साधक यांना सेवेची अमूल्य संधी !
१. अर्धकुंभमेळ्याचे महत्त्व
     उत्तराखंड राज्यातील हरिद्वार येथे प्रत्येक १२ वर्षांनी महाकुंभमेळा आयोजित केला जातो. या १२ वर्षांच्या कालावधीत ६ वर्षांनी अर्धकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. हरिद्वार येथील अर्धकुंभपर्वातील यात्रेचे फळ मोक्ष देणारे असते, असे धर्मशास्त्रामध्ये सांगितले आहे. त्यामुळे कुंभमेळ्याप्रमाणे या अर्धकुंभमेळ्यातही लक्षावधी भाविक यात्राविधी आणि गंगास्नान करतात. अर्धकुंभमेळ्यातील विशेष पर्वकाळांना गंगास्नानाचे

महालय श्राद्धाच्या वेळी भावपूर्ण प्रार्थना केल्यामुळे त्रास उणावल्याची आणि पितरांना गती मिळाल्याची आलेली अनुभूती

सौ. प्राची मेहता
१. श्राद्धविधी चालू झाल्यानंतर प्रथम त्रास होणे 
आणि प्रार्थना केल्यानंतर त्रास न्यून होणे
     भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने रामनाथी आश्रमात महालय श्राद्धविधी करण्याची संधी मिळाली. या विधीच्या वेळी सर्व पितरांना प्रार्थना करून त्यांना आमंत्रण दिले. तेव्हा मला तीव्र वेदना होऊन अकस्मात् पाठदुखीचा त्रास चालू झाला, तसेच डोके जड होऊन मळमळू लागले आणि माझ्याकडून दत्तगुरूंना आणि श्रीकृष्णाला प्रार्थना झाली, माझ्या पितरांना पुढील गती मिळून आमच्या सर्वांच्या साधनेतील अडथळे दूर होऊ देत ! त्यानंतर माझा त्रास उणावला. मी श्रीकृष्णाच्या चरणी आणि पितरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

रामनाथी आश्रमात महालय श्राद्धविधीच्या वेळी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

श्री. प्रकाश करंदीकर
१. श्री. प्रकाश करंदीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.१०.२०१५)
. १.१०.२०१५ या दिवशी सकाळी उठल्यापासून विधी आरंभ होईपर्यंत श्री गुरुदेव दत्त हा जप आपोआप होत होता.
. विधींच्या आरंभी स्थानाची शुद्धी केल्यावर श्राद्धविधीचे पौरोहित्य करणारे वेदमूर्ती केतन शहाणेगुरुजी म्हणाले, आता हे स्थान काशी आणि गया या तीर्थक्षेत्रांप्रमाणे झाले आहे. त्या वेळी सर्व पितर त्या जागी येण्यास
अतिशय उत्सुक आहेत, असे वाटत होते.
इ. श्राद्धविधी ज्या सभागृहात चालू होता, तेथे दत्तगुरु आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे सूक्ष्मातील अस्तित्व सतत जाणवत होते.
. वातावरणात साधकांचे अनेक पितर सूक्ष्म रूपात उपस्थित असल्याचे जाणवत होते. श्राद्धस्थळी चैतन्य जाणवत होते.

शब्दांचे जडत्व नाहीसे करून त्यातून भावपुष्पे निर्माण करणार्‍या आणि त्याद्वारे साधकांमध्ये शरणागत भाव अन् आनंदाची उधळण करणार्‍या दैनिक सनातन प्रभातमधील पू. डॉ. मुकुल गाडगीळकाकांच्या चौकटी !

पू. डॉ. मुकुल गाडगीळ
     दैनिक सनातन प्रभातमधून प्रकाशित होणार्‍या पू. संतांच्या चैतन्यमय वाणीतील चौकटी वाचून मनाला एक उच्च कोटीतील आनंद मिळू लागला आहे. त्यांच्या मुखातून बाहेर पडणार्‍या शब्दांची भावपुष्पे निर्माण होत असून त्यातील सहजता, चैतन्य आणि भावपातळी या त्रिवेणी संगमाचा लाभ सर्व ठिकाणच्या साधकांना मिळत आहे. ईश्‍वराच्या कृपाशीर्वादामुळेच पूजनीय संतांच्या मार्गदर्शनपर चौकटी साधकांसाठी कुंभमेळ्यातील देव-देवतांच्या अवतरणासारख्या आशीर्वादपर ठरत आहेत. त्या कृपाशीर्वादांसाठी आम्ही सर्व साधक प.पू. गुरुदेवांच्या आणि चौकटीतून उच्च कोटीचा सत्संग अन् आनंद देणार्‍या पू. संतांच्या चरणी कृतज्ञ आहोत.

रामनाथी आश्रमात श्राद्धविधी करतांना डॉ. अजय जोशी यांना आलेल्या अनुभूती

डॉ. अजय जोशी
३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०१५ या कालावधीत रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात काही साधकांच्या पितरांचे श्राद्ध केले. या वेळी साधकांना त्यांच्या उत्कट भावामुळे आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
१. स्थानमाहात्म्यामुळे आलेल्या अनुभूती
१ अ. चैतन्य जाणवणे : श्राद्ध करतांना दाब न जाणवता चैतन्य जाणवले; कारण रामनाथी आश्रमात श्राद्ध केल्याने पितरांना स्थानमहात्म्याचा लाभ झाला, असे वाटले.
१ आ. गया या तीर्थक्षेत्रासारखेच वातावरण रामनाथी आश्रमात निर्माण झाल्याचे जाणवणे आणि विष्णु पदांंना सतत वंदन होऊन कृतज्ञता व्यक्त होणे : श्राद्ध करतांना गया या स्थानी श्राद्ध करत आहोत, असा भाव ठेवल्याने लाभ होतो, हे मी जाणून होतो; पण विलक्षण गोष्ट घडली. गया या तीर्थक्षेत्रासारखेच वातावरण रामनाथी आश्रमात निर्माण झाल्याचे जाणवले. गया हीच त्या वेळी रामनाथी येथे येऊन समस्त सनातन परिवारातील साधकांच्या पूर्वजांना मुक्ती देऊन त्यांना गती देण्यास उत्सुक झाली आहे, असे वाटत होते. गया येथील विष्णु पदांना सतत वंदन होऊन कृतज्ञता व्यक्त होत होती. दत्तात्रेयांमुळे हे सर्व अनुभवायला मिळत आहे, असे वाटून उत्कट भाव निर्माण होत होता.

दिवाळीच्या निमित्ताने प्रबोधनासाठी हस्तपत्रक आणि फलक उपलब्ध !

साधकांना सूचना 
     दिवाळीच्या निमित्ताने पुढील प्रसारसाहित्य नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहे. या प्रसारसाहित्यासाठी प्रायोजक मिळवून त्याचा सुयोग्य ठिकाणी वापर करावा. 
१. दीपावली सणामागील अध्यात्मशास्त्र सांगणारे ए-४ आकारातील पाठपोट हस्तपत्रक
२. फटाक्यांद्वारे होणारी राष्ट्र आणि धर्म यांची हानी टाळा ! या विषयावरील ए-५ या आकारातील पाठपोट प्रबोधनपर हस्तपत्रक
३. सनातनच्या उत्पादनांचे महत्त्व सांगणारे ए-५ आकारातील ४ पानी पाठपोट हस्तपत्रक
४. दीपावलीला हिंदु संस्कृती जोपासा हा १२ फूट x ११ फूट या आकारातील प्रबोधनपर फलक

वायरलेस माऊसचा वापर झाल्यावर त्याचे डोंगल माऊसमध्ये अथवा पिशवीत घालून ठेवावे !

साधकांसाठी सूचना
     काही साधक भ्रमणसंगणकासाठी वायरलेस माऊसचा वापर करतात. वापर झाल्यानंतर भ्रमणसंगणक पुन्हा लॅपटॉप बॅगेत ठेवतांना माऊसचे डोंगल न काढता ते यूएसबी पोर्टला लावूनच ठेवतात. यामुळे भ्रमणसंगणक बॅगेत ठेवतांना किंवा काढतांना डोंगलला धक्का लागू शकतो आणि भ्रमणसंगणकाचे यूएसबी पोर्ट खराब होऊन आर्थिक हानी होऊ शकते. यापुढे साधकांनी वायरलेस माऊसचा वापर झाल्यानंतर डोंगल माऊसमध्ये ठेवण्याची सोय असल्यास तेथे अथवा लॅपटॉप बॅगेत व्यवस्थित ठेवावे. 
- (पू.) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.१०.२०१५) 

बोधचित्र


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     कुठे बंगालमधील साम्यवादी आणि मुसलमानांचे लांगूलचालन करणारे हल्लीचे हिंदू, तर कुठे बंगालमधीलच रामकृष्ण परमहंस यांचे हिंदु धर्माला जगात सर्वोच्च स्थान मिळवून देणारे शिष्य स्वामी विवेकानंद !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३०.३.२०१४)
     देशाची सर्वच क्षेत्रांत अतिशय वेगाने होणारी अधोगती रोखली नाही, तर देशाबरोबर सर्व हिंदूही रसातळाला जातील ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२.२.२०१५)
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

परमेश्‍वराची उपासना सोडू नये
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     कितीही संकटांशी सामना करावा लागला, तरी परमेश्‍वरी उपासना सोडू नये. हताश होऊ नये. उपासनाच आपल्याला तारते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

दुसर्‍याला उमजू न देणे, स्वतःचे स्वतःला न उमजणे, स्वतःचे दुसर्‍याला उमजू न देणे, ही अवस्था आल्यास तो जीव ईश्‍वराच्या अगदी निकट आला आहे, असे समजावे.

॥ हरि ॐ तत्सत् ॥
संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
    भावार्थ : दुसर्‍याला उमजू न देणे म्हणजे आपल्यातील शक्ती दुसर्‍याला समजणार नाही, असे वागणे. स्वतःचे स्वतःला न उमजणे म्हणजे अद्वैतात गेल्यावर स्वतःचे स्वतःला उमजण्यासारखे काही उरत नाही; कारण तो स्वतःला विसरूनच गेलेला असतो. स्वतःचे दुसर्‍याला उमजू न देणे म्हणजे आपण स्वतः ब्रह्मस्थितीत आहोत, हे प्रकृतीतील दुसर्‍याला उमजून येत नाही. ही ईश्‍वराची, ब्रह्माची लक्षणे असल्याने तशा स्थितीत जो असेल, तो साहजिकच ईश्‍वराच्या निकट आलेला असतो. 
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)

-


निधर्मी दणका !

     सोनाराने कान टोचलेले बरे असतात ! भारतातील निधर्मीवाद्यांचे तसेच झाले. बांगलादेशच्या प्रख्यात लेखिका तस्लीमा नसरीन यांनी भारतातील निधर्मीवाद्यांचा बेगडी निधर्मीवाद उघडा पाडला. भारतातील निधर्मीवादी हिंदूंवर टीका करतात; मात्र धर्मांध मुसलमानांचे समर्थन करतात !, असेे त्यांचे स्पष्ट मत आहे. हे मत सुस्पष्ट व्हावे, यासाठी भारतीय लेखकांच्या दुटप्पीपणाविषयी आलेले अनुभव त्यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामागील कारण समजून घ्यायला हवे. भारतात सध्या आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, असे भारतातील काही पुरोगामी लेखकांचे मत आहे. त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी शासनाला पुरस्कार परत करण्याची साथ लेखक विश्‍वात पसरली आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn