Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

सनातनचे पू. बाबा (सदानंद) नाईक यांचा आज वाढदिवस

नवरात्रोत्सव (आज सातवा दिवस)

सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तुते ॥
      एका मतानुसार नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण कमी करण्यासाठी तमोगुणी महाकालीची, पुढील तीन दिवस रजोगुण वाढवण्यासाठी रजोगुणी महालक्ष्मीची आणि शेवटचे तीन दिवस साधना तीव्र होण्यासाठी सत्त्वगुणी महासरस्वतीची पूजा करतात.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ शक्ती)
नवरात्र विषयक माहितीसाठी संकेतस्थळावरील मार्गिका
http://www.sanatan.org/mr/a/cid_289.html

सनातन संस्थेच्या समर्थनार्थ सांगली आणि संभाजीनगर येथील हिंदुत्ववादी रस्त्यावर !

कठीण काळात सनातनच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाणार्‍या समस्त हिंदुत्ववाद्यांचे आभार !
     सांगली - सनातनवरील संभाव्य बंदीच्या मागणीच्या विरोधात सांगली आणि संभाजीननगर येथील हिंदुत्ववादी निषेध मोर्च्याद्वारे रस्त्यावर उतरले. सांगली येथे काढण्यात आलेल्या मोर्च्यात ५५० हून अधिक, तर संभाजीनगर येथे २५० हून अधिक हिंदुत्ववादी सहभागी झाले होते.

 सांगली येथील मोर्च्यात ५५० हून अधिक हिंदुत्ववाद्यांचा सहभाग

सोलापूर येथे धर्मांधांकडून हिंदूंना मारहाण आणि दगडफेक !

हिंदूंना नाहक छळणार्‍या धर्मांधांवर शासनाने कठोर कारवाई करावी, हीच हिंदूंची अपेक्षा !
      सोलापूर - येथील दमाणीनगर भागातील शेटे वस्तीमध्ये किरकोळ कारणावरून धर्मांधांनी हिंदूंना मारहाण करून त्यांच्या घरावर दगडफेक केली. (धर्मांधांनी हिंदूंवर दगडफेक करणे, ही नित्याची बाब आहे. या आपत्तीपासून रक्षण होण्यासाठी हिंदूंनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक नाही का ? - संपादक) या दगडफेकीत ९ जण घायाळ झाले असून ३३ जणांवर परस्परांच्या
विरोधात गुन्हे प्रविष्ट करण्यात आले आहेत. या प्रकरणी १४ जणांना अटकही करण्यात आली आहे.
१. १६ ऑक्टोबरच्या रात्री ८.३० वाजता एक हिंदु वडापाव आणण्यासाठी घोडेपीर दर्ग्याजवळ गेला होता. तेथील धर्मांध मुबारक गोलंदाज याने त्या हिंदूला लंंगड्या असे म्हणून चिडवले.

(म्हणे) सनातनचे पुढचे लक्ष्य मी आणि मुख्यमंत्री !

सनातनच्या द्वेषापोटी विविध जावईशोध लावून भ्रमित झालेल्या 
शाम मानव यांचे आणखी एक हास्यास्पद विधान !
सवंग लोकप्रियतेसाठी अशी विधाने करून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न 
करणार्‍या शाम मानव यांच्यावर पोलीस कारवाई करतील का ?
      नाशिक - सनातन संस्थेच्या विरोधात सातत्याने बोलत असल्याने मी संस्थेचे पहिले लक्ष्य आहे, तसेच समीर गायकवाड याच्या अटकेसाठी अनुमती दिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही त्यांचे लक्ष्य ठरू शकतात, असे मत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय संघटक शाम मानव यांनी व्यक्त केले. (अजूनही शाम मानव यांचा प्रसिद्धीचा कंड शमलेला नाही.

फटाक्यांवर देवतांची चित्रे न छापण्याविषयी शिवकाशी येथील फटाके निर्मिती महासंघाला प्रशासनाकडून पत्र

हिंदु जनजागृती समितीच्या प्रयत्नांना यश
     विरुधीनगर (तमिळनाडू) - तमिळनाडू राज्यातील शिवकाशी भागातील फटाके निर्मिती करणार्‍या कारखानदारांच्या महासंघाला पत्र पाठवून विरुधीनगर जिल्ह्याच्या महसूल अधिकार्‍यांनी फटाक्यांच्या वेष्टनावर देवतांची चित्रे न वापरण्याविषयी कळवले आहे. शिवकाशी हे देशातील मुख्य फटाके उत्पादन केंद्र आहे. फटाके निर्माता महासंघानेही यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेऊन तसे फटाके निर्मिती करणार्‍या कारखान्यांना कळवले आहे.
     विरुधीनगर जिल्ह्यात भारतातील सर्वात मोठे फटाके उत्पादन करणारे उद्योग शिवकाशी येथे अस्तित्वात असून तेथे गेली अनेक वर्षे लक्ष्मी नावाच्या फटाक्यांची निर्मित होत आहेत. फटाक्यांच्या वेष्टनांवर आणि त्यांची बांधणी (पॅकिंग)करतांना देवतांची चित्रे वापरली जातात. फटाके फोडल्यावर ही चित्रे रस्त्यावर पादचार्‍यांकडून तुडवली जातात. अशा तर्‍हेने देवतांचे विडंबन होऊन त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. देवतांच्या या अवमानाच्या विरोधात हिंदु जनजागृती समिती गेल्या १० वर्षांपासून चळवळ राबवत आहे. समितीच्या तमिळनाडू शाखेच्या वतीने आणि अखिल भारत हिंदु महासभेच्या स्थानिक विभागाने देवतांच्या या अवमानाच्या विरोधात विरुधीनगर जिल्हाधिकार्‍यांना नुकतेच निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेऊन विरुधीनगर जिल्ह्याचे महसूल अधिकारी सी. मुथुकुमारन् यांनी फटक्यांच्या वेष्टनावर देवतांची चित्रे वापरू नयेत, असे फटाके निर्मिती महासंघाला पत्र लिहून कळवले. यासंदर्भात सी. मुथुकुमारन् म्हणाले, आम्ही पाठवलेल्या पत्राला फटाके निर्मिती महासंघाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. महासंघाच्या सदस्यांना त्यांनी यासंदर्भात कळवले आहे.

फटाक्यांच्या दुष्परिणामाविषयी जनतेचे प्रबोधन करा !

शासनाने जे करायला हवे, ते न्यायालयाला सांगावे लागणे, हे अनाकलनीय आहे !
 सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र आणि राज्य शासन यांना निर्देश 
     नवी देहली - फटाक्यांच्या दुष्परिणामाविषयी जनतेचे प्रबोधन करा आणि त्यांना फटाक्यांचा वापर न करण्यासंबंधी आग्रह धरा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने १८ ऑक्टोबर या दिवशी एका याचिकेवर सुनावणी करतांना केंद्र आणि सर्व राज्य शासनांना दिले. त्यासाठी वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाहिन्या या प्रसारमाध्यमांचा उपयोग करा, असेही सांगितले आहे. सरन्यायाधीश न्या. एच्.एल. दत्तु आणि न्या. अमिताव राय यांच्या खंडपिठाने हे निर्देश दिले. देहलीतील ६ ते १४ मासांच्या

लक्ष्मणपुरीमध्ये मुसलमान धर्मगुरूंकडून गो मिल्क पार्टी

गोमांस सेवन करणार्‍यांची वकिली करणारे कथित धर्मनिरपेक्षतावादी 
या मुसलमान धर्मगुरूंकडून काही शिकतील का ?
गोमांस सेवन न करण्याचा धर्मगुरूंचा मुसलमानांना सल्ला
     लक्ष्मणपुरी (लखनौ) - येथील मुसलमान धर्मगुरूंनी गोमांस न खाण्याचे आवाहन करत गो मिल्क पार्टी (दूधसेवन समारंभ) आयोजित केली. या समारंभाच्या माध्यमातून सामाजिक सद्भावनेचा संदेश देण्यात आला. या समारंभात सहभागी मुसलमान धर्मगुरु आणि नागरिक यांनी गायीचे दूध प्राशन केले, तसेच इतरांनाही वाटप केले. या कार्यक्रमात सुन्नी धर्मगुरु मौलाना खालिद रशीद फरंगी महली आणि सी.डी.आर्.आय.चे माजी अध्यक्ष डॉ. नित्यानंद उपस्थित होते.

उत्तरप्रदेशमध्ये ३ धर्मांधांकडून गोमांसाच्या दुकानातच गायीची हत्या !

नेहमी हिंदूंना झोडपण्यात धन्यता मानणारे पुरोगामी आणि निधर्मीवादी जाणूनबुजून हिंदूंच्या 
धर्मभावना दुखावणार्‍या धर्मांधांच्या विरोधात बोलण्याचे धारिष्ट्य दाखवतील का ?
    लक्ष्मणपुरी (लखनौ, उत्तरप्रदेश) - दुकानात गोहत्या करणार्‍या तिघा धर्मांधांना शहरात अटक करण्यात आली. (उत्तरप्रदेशमधील समाजवादी पक्षाचे शासन या धर्मांधांवर कठोर कारवाई करणार कि मुसलमानांच्या एकगठ्ठा मतांसाठी गप्प बसणार ? - संपादक) झैद कुरेशी, ओवैद कुरेशी आणि फारूख अशी त्यांची नावे आहेत. झैद आणि ओवैद हे भाऊ आहेत. या युवकांकडून तब्बल ४५० किलो गोमांस हस्तगत करण्यात आले आहे. पोलिसांनी घातलेल्या या धाडीच्या वेळी झैद आणि ओवैद यांचे वडील बाबर कुरेशी मात्र पळून गेले. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. (उत्तरप्रदेशचे मंत्री आझम खान यांची गुरे चोरल्यावर त्यांना शोधण्यासाठी पोलिसांना दावणीला बांधले गेले; मात्र याच शासनाचे पोलीस धर्मांध गायीला दुकानात नेऊन तिची हत्या करेपर्यंत काहीही करत नाहीत. याला काय म्हणायचे ? - संपादक)

देशातील ४ प्रमुख शहरांमध्ये आय.एस्.आय.एस्.चे सक्रीय सदस्य !

भारतात आय.एस्.आय.एस्.चे वाढत चाललेले जाळे नष्ट करण्यासाठी भाजप शासनाने 
ठोस पावले उचलावीत, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
आय.एस्.आय.एस्.ची सक्रीय सदस्य अफशा जबीनची माहिती
    नवी देहली - देशात सध्या आय.एस्.आय.एस्.चे ९ सक्रीय सदस्य असून ते देहली, मुंबई, भाग्यनगर (हैद्राबाद), बेंगळुरू या शहरांसह काश्मीरमध्ये संघटनेच्या विचारधारेचा प्रचार-प्रसार करत आहेत, अशी माहिती आय.एस्.आय.एस्. या क्रूर आतंकवादी संघटनेसाठी भारतात ऑनलाइन (संकेतस्थळाच्या माध्यमातून) भरती चालू करण्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या अफशा जबीनच्या अन्वेषरातून समोर आली आहे. 

रेल नीर घोटाळ्याच्या प्रकरणात २ रेल्वे अधिकारी निलंबित, २० कोटी रुपये जप्त

पिण्याच्या पाण्यात भ्रष्टाचार करून जनतेच्या आरोग्याशी खेळणार्‍या 
अधिकार्‍यांना आजन्म कारागृहात टाका !
     नवी देहली - रेल्वेत पिण्याच्या पाणाच्या बाटल्यांच्या पुरवठ्यात अपव्यवहार केल्याच्या प्रकरणी उत्तर रेल्वेचे मुख्य वाणिज्य व्यवस्थापक एम्.एस्. छालिया आणि संदीप सिलास या दोन रेल्वे अधिकार्‍यांना केंद्रीय अन्वेषण विभागाच्या अधिकार्‍यांनी निलंबित केले, तसेच त्यांच्याकडून अपव्यवहाराशी संबंधित २० कोटी रुपयेही जप्त केले आहेत. 

(म्हणे) मोदींचे शासन आल्यानंतर असहिष्णुतेत वाढ !

सोनिया गांधी यांची मुक्ताफळे !
     बक्सर (बिहार) - नरेंद्र मोदी यांचे शासन त्यांची विचारसरणी लोकांवर लादू पाहत असून ते सत्तेत आल्यानंतरच समाजातील असहिष्णुतेत वाढ झाली आहे. त्यातूनच निष्पाप व्यक्तींच्या हत्या होत आहेत, असा आरोप काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला. येथे झालेल्या एका जाहीर सभेत त्या बोलत होत्या.
गांधी पुढे म्हणाल्या, 
१. केंद्रशासनच लोकशाहीच्या मुळावर उठले आहे. त्याचा परिणाम लोकशाही आणि समाजाच्या एकसंधतेवर होत आहे.

राजकोटमध्ये दिवसभरासाठी इंटरनेट सेवा बंद

     राजकोट (गुजरात) - पटेल (पाटीदार) समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी भारतीय क्रिकेट संघाला येथील मैदानात खेळू न देण्याची चेतावणी दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून १८ ऑक्टोबरला शहरातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या दिवशी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना होता. या सामन्याची विशेष तिकिटे पटेल समुदायाला देण्यात आली नसल्याचा आरोप पटेल यांनी केला होता.

गोमातेला मारणार्‍यांना वेदांनुसारच मृत्यूदंड ! - संघाचे मुखपत्र पाञ्चजन्यमधील उल्लेख

जनतेला प्रश्‍न पडतो की, इतकी वर्षे हे कोणाच्याही लक्षात का आले नाही ?
नवी देहली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या पाञ्चजन्य या साप्ताहिकातील एका लेखात गोहत्या करणारा दुष्ट असतो. त्यामुळे त्याला ठार करा, असा आदेश वेदांमध्ये दिला आहे, असे लिहिल्याने एकच वादंग निर्माण झाला. यावरून विरोधकांनी संघ दादरी हत्याकांडाचे समर्थन करत असल्याचा आरोप करत संघाला लक्ष्य केले. इस उत्पात के उस पार या शीर्षकाखालील लेखात म्हटले आहे, मुसलमान नेते भारतीय मुसलमानांना देशातील परंपरेला विरोध करण्याविषयी शिकवत आहेत. इखलाखने याच्याच प्रभावातून गायीला ठार मारले. देशातील सर्व मदरशांमधील मौलवी विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीविषयी द्वेषभावना निर्माण होईल, याचीच शिकवण देतात.

स्मृती इराणी यांच्या हस्ते पदवी स्वीकारण्यास विद्यार्थ्याचा नकार

     श्रीनगर - देशभरात सध्या साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखकांकडून पुरस्कार परत करण्याचे वारे वहात असतांना पदवीधर विद्यार्थ्यांनीही पदवी न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीनगरमधील एका विद्यार्थ्याने केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते पदवी स्वीकारण्यास नकार दिला आहे.
     श्रीनगरमधील इस्लामिक युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयातून समीर गोजवारी या तरुणाने एम्बीए केले आहे. या महाविद्यालयात १९ ऑक्टोबर या दिवशी दीक्षांत सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी उपस्थित रहाणार असून या कार्यक्रमात सहभागी होण्यास समीरने नकार दिला आहे. देशातील नागरिकांकडून स्वातंत्र्य हिरावण्याचा शासनाकडून प्रयत्न होत असल्याचे सांगत स्मृती इराणींच्या हस्ते पदवी स्वीकारण्यास त्याने नकार दिला आहे. समीरने फेसबुकवर ही माहिती दिली आहे.

राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाला काँग्रेसचा पाठिंबा नाही ! - अभिषेक मनु सिंघवी, प्रवक्ता, काँग्रेस

     नवी देहली - सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायाधिशांची निवड करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाचे कोणतेही नवे स्वरूप काँग्रेसला मान्य नाही, तसेच त्यासाठी पाठिंबा देण्याचा पक्षाचा विचार नाही, असे काँग्रेसचे प्रवक्ता अभिषेक मनु सिंघवी यांनी स्पष्ट केले.
     काँग्रेसने यापूर्वी राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाला विरोध न करता संसदेत हा कायदा संमत करण्याच्या बाजूने मत दिले होते. त्यामुळे या स्थितीत काँग्रेसची काय भूमिका असेल, असा प्रश्‍न पत्रकारांनी विचारला असता प्रवक्ता सिंघवी यांनी पक्षाची बाजू स्पष्ट केली. नव्या आयोगामुळे उच्च न्यायालयातील न्यायाधिशांच्या निवडीत शासनाला हस्तक्षेप करता येणार आहे. आपल्याला भूतकाळ विसरून आता पुढे पहायला हवे, असे सिंघवी म्हणाले.

सनातन संस्थेवरील बंदीच्या मागणीच्या विरोधात हिंदुत्ववाद्यांकडून सुळ्या (कर्नाटक) येथे शासनाला निवेदने सादर

उपतहसीलदार बी. रामन्ना नायक (डावीकडे) यांना
निवेदन देतांना श्री. बी. रामभट पटवर्धन
आणि इतर हिंदुत्ववादी
     सुळ्या (कर्नाटक) - डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येच्या प्रकरणात सनातन संस्थेला गोवून तिच्यावर बंदी घालण्यासाठी काही लोक शासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याविरोधात सुळ्या तालुक्यातील विविध हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येऊन केंद्रीय गृहसचिवांना पाठवण्यासाठी येथील उपतहसीलदार बी. रामन्ना नायक यांना २० निवेदने सादर केली. या वेळी सुळ्या येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी तथा व्यंकटरमण देवमंदिराचे विश्‍वस्त श्री. जी.जी. नायक, हिंदुत्ववादी श्री. लक्ष्मीश गब्लड्क, वीरमाचीदेव सेवा ट्रस्टचे अध्यक्ष श्री. के.एन्. बसवराज, हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण कन्नड जिल्हा समन्वयक श्री. विजयकुमार, तालुका समन्वयक श्री. बी. रामभट पटवर्धन यांच्यासह इतर संघटनांचे पदाधिकरी उपस्थित होते.

कोलथूर (तमिळनाडू) येथील मार्गदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त धर्मप्रसार
     कोलथूर (तमिळनाडू) - नवरात्रोत्सवानिमित्त येथील गुरुवनिता मुर्गर मंदिरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले. समितीच्या सौ. सुगंधी जयकुमार यांनी साधना, तसेच नवरात्र आणि नवरात्रातील धार्मिक कृतींमागील शास्त्र यांविषयी माहिती दिली. धार्मिक कृतींमागील शास्त्राविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मंदिरात सनातन संस्थेचे ग्रंथही ठेवण्यात आले आहेत, असेही सौ. जयकुमार यांनी सांगितले. या मार्गदर्शनाचा १५० हून अधिक भाविकांनी लाभ घेतला. या वेळी मंदिराच्या पुजार्‍यांकडून समितीच्या सौ. सुगंधी जयकुमार यांचा सत्कार करण्यात आला.

अच्छे दिन सोडा, मागचे दिवस तरी परत आणा ! - नितीश कुमार

नितीश कुमार यांनी महागाईच्या सूत्रावरून पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करण्याबरोबरच बिहारची जंगलराजच्या दिशेने होणारी वाटचाल थांबवण्यासाठी ते काय करणार आहेत, हेही जनतेला सांगावे !
    पाटलीपुत्र (पाटणा) - अच्छे दिन सोडा, मागील दिवस तरी परत आणा, अशा खोचक शब्दांत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महागाईच्या सूत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
    नितीश कुमार पुढे म्हणाले, गेल्या १० मासांपासून निर्यातीत घट होत आहे. आता पुन्हा निर्यातीत घट पहायला मिळत आहे. ही घट गेल्या वर्षभरातील सर्वांत नीचांकी स्तरावरील आहे. त्यामुळे महागाईत प्रचंड वाढ झाली आहे. मोदीजी अच्छे दिन आणण्याचे सोडून द्या. किमान मागील दिवस तरी परत येऊ द्या. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक होत आहे. सभांमधून हे दोन्ही नेते एकमेकांवर टीका करत आहेत. याचाच एक भाग म्हणून नितीशकुमार यांनी ट्विटरवरून पंतप्रधानांवर शरसंधान केले.

आय.एस्.आय.एस्.च्या तावडीतून सुटण्याची किंमत १५ कोटी रुपये !

     लंडन - आतंकवादी संघटना आय.एस्.आय.एस्.च्या तावडीतून डेन्मार्कच्या २६ वर्षीय डेनियल रे ओट्टोसनची सुटका करण्यासाठी त्याच्या कुटुंबियांना १५ कोटी रुपये द्यावे लागले होते. त्याची बहीण अनीताने फेसबूकच्या माध्यमातून चळवळ राबवून हे पैसे गोळा केले होते. अशी रक्कम न मिळाल्यामुळे जिहादी जॉन याने ओट्टोसनचे सहकारी अमेरिकी पत्रकार जेम्स फोले, स्टीवन सोटलॉफ आणि ब्रिटिश नागरिक डेविड हैन्स आणि ऐलन हेनिंग यांची हत्या केली होती.

अमेरिकेत हिंदू संहतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात फोरम फॉर हिंदू अवेकनिंग (एफ्.एच्.ए.)चा सहभाग !

    कॅलिफोर्निया - २५.९.२०१५ या दिवशी हिंदू संहती या बंगालमध्ये हिंदूंसाठी कार्यरत असणार्‍या संघटनेच्या वतीने फ्रिमाँट (कॅलिफोर्निया) येथील फ्रिमाँट हिंदू मंदिरामध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संघटनेचे संस्थापक श्री. तपन घोष या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांमध्ये बंगाल येथील हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांविषयी जागृती निर्माण केली, तसेच हिंदूंच्या हितासाठी लढा देतांना त्यांना आलेले अनुभवही कथन केले. या कार्यक्रमात फोरम फॉर हिंदू अवेकनिंग (एफ्.एच्.ए.)चे श्री. जीतेंद्र धवस उपस्थित होते. एफ्.एच्.ए.च्या वतीने लव्ह-जिहाद, धर्मांतर आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता या ग्रंथांचे प्रदर्शन, तसेच गणेशमूर्ती कशी हाताळावी ? याविषयी माहिती देणारे फलक लावण्यात आले.

अभय वर्तक यांच्या वृत्तपत्रांच्या संपादकांशी भेटी !

श्री. अभय वर्तक (डावीकडून दुसरे) यांना पुष्पगुच्छ भेट देतांना दैनिक पुण्यनगरीच्या संपादक राही भिडे
      पुणे - सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक पुणे दौर्‍यावर असतांना १२ आणि १३ ऑक्टोबर या दिवशी त्यांनी विविध वृत्तपत्रांचे संपादक अन् वरिष्ठ पत्रकार यांच्या भेटी घेतल्या. त्या वेळी झालेल्या चर्चेत कॉ. पानसरे हत्या प्रकरणी संशयित म्हणून साधक समीर गायकवाड

भाजपच्या नेत्यांना जीभेवर नियंत्रण ठेवण्याचा अमित शहा यांचा आदेश

      नवी देहली - गोहत्या, दादरी हत्याकांड आणि गोमांस यासंदर्भात भाजपच्या नेत्यांकडून करण्यात येत असलेल्या वक्तव्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी १८ ऑक्टोबर या दिवशी एक बैठक घेतली. या बैठकीत हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, खासदार साक्षी महाराज, मुजफ्फरनगर येथील सरधनाचे आमदार

संपूर्ण देशात गोहत्याबंदी कायदा व्हावा ! - योगऋषी रामदेव बाबा

     नवी देहली - देशात आता ना गायीचे रक्त सांडेल, ना गायीच्या नावावर हिंदु-मुसलमान यांचे रक्त वाहील, असे वक्तव्य योगऋषी रामदेव बाबा यांनी केले. नोएडा येथील भारतीय नौदलाच्या मैदानावर योगऋषी यांनी सैनिकांकडून योगाभ्यास करवून घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना योगऋषी म्हणाले, गायीची हत्या करणे हिंसा आहे, तसेच गायीच्या नावावर माणसाचे रक्त सांडवणेही विशुद्ध स्वरूपात हिंसाच आहे.
     उत्तरप्रदेशसारख्या धार्मिक दृष्टीने संवेदनशील राज्यात गोहत्येवर पूर्ण बंदी असू शकते, तर संपूर्ण देशात का नाही ? जर मोदी यांनी ठरवले, तर संपूर्ण देशात गोहत्येवर बंदी येईल.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची काही कागदपत्रेच उघड का करणार ? सर्वच उघड करा !

     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ ऑक्टोबर २०१५ या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन बोस यांच्या संदर्भातील काही कागदपत्रे उघड करण्याचे आश्‍वासन दिले.


आरोपी निर्दोष सुटल्यास अधिकारी किंवा शासकीय अधिवक्ता यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार

     नगर, १८ ऑक्टोबर - ज्या गुन्ह्यातील आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे, त्या खटल्यातील न्यायालयीन आदेशाचा अभ्यास करून संबंधित तपास अधिकारी किंवा शासकीय अधिवक्ता यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. या विषयीचे उत्तरदायित्व निश्‍चित करण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्य समिती स्थापन करण्याचा आदेश राज्यशासनाने १७ ऑक्टोबर या दिवशी काढला आहे.
     तपास यंत्रणा सक्षम करणे आणि अधिवक्त्यांंची न्यायालयीन खटल्यातील कार्यक्षमता वाढावी, यासाठी परिणामकारक धोरण राबवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिला होता. त्यानुसार ही समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आणि साहाय्यक शासकीय अधिवक्ता यांचा सदस्य म्हणून समावेश असेल.

खंडाळा (जिल्हा पुणे) येथील प्रसिद्ध श्री शनि मंदिरात चोरी

राज्यातील असुरक्षित मंदिरे !
      पुणे, १८ ऑक्टोबर - खंडाळा येथील प्रसिद्ध श्री शनि मंदिरात श्री शनिदेवाच्या मुकुटाची १८ ऑक्टोबर या दिवशी दिवसाढवळ्या चोरी झाली. त्या चोरट्याची प्रतिमा मंदिराच्या क्लोज सर्किट टीव्हीमध्ये मुद्रित झाली आहे. या चोरीविषयी मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने पोलीस ठाण्यामध्ये कोणतीही तक्रार प्रविष्ट केलेली नाही. खंडाळा पोलिसांनी ही घटना घडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, जरी तक्रार प्रविष्ट केलेली नसली, तरी क्लोज सर्किट टीव्हीमधील मुद्रणाच्या आधारे चोरट्याची ओळख पटली आहे. पोलीस त्याच्या मागावर आहेत.

आतंकवाद्यांना विशेष पोलीस अधिकारी म्हणून नेमणार्‍यांना देशद्रोहासाठी फाशी द्या !

     दोडा (जम्मू काश्मीर) येथे सुरक्षारक्षक आणि दोन आतंकवादी यांच्यामध्ये १४ ऑक्टोबर २०१५ या दिवशी रात्री चकमक झाली. या चकमकीत दोन्ही आतंकवाद्यांना ठार मारण्यात आले. विशेष म्हणजे हे दोघेही वर्ष २०१० पूर्वी आतंकवादी संघटनांमध्ये सामील होते. त्यांच्या आत्मसमर्पणानंतर

चोरी करणे, हे उपजीविकेचे साधन आहे, असे उद्या चोरही म्हणतील. समाजात नीती आचरणात आणण्यास शिकवणारी न्यायप्रणाली हिंदु राष्ट्रात असेल !

     सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील डान्स बारवर बंदी आणण्याच्या शासनाच्या कायद्यावर १५ ऑक्टोबर २०१५ या दिवशी स्थगिती आणली. या वेळी न्यायालयाने सांगितले की,

भोसरी (जिल्हा पुणे) गरब्याच्या ठिकाणी टेहळणी करणार्‍या धर्मांध विक्रेत्याला हिंदूंनी हुसकावले !

हिंदूंनो, तुमच्या उत्सवांमध्ये सहभागी होण्याचा धर्मांधांचा कुटिल डाव जाणा !
    भोसरी (जिल्हा पुणे), १८ ऑक्टोबर (वार्ता.) - येथील इंद्रायणीनगर परिसरातील वैष्णवीमाता मंदिराच्या ठिकाणी नवरात्रोत्सवात गरब्याचे आयोजन करण्यात आले होते. मंदिराच्या बाहेर खाद्यपदार्थ विक्रीच्या नावाखाली गाडी लावून हिंदु युवतींची टेहळणी करणार्‍या धर्मांधाला जागृत हिंदूंनी तेथून हुसकावले. (हिंदूंनो, लव्ह जिहाद करण्यासाठी विविध क्लृप्त्या वापरणार्‍या धर्मांधाचे प्रयत्न हाणून पाडणार्‍या हिंदूंचे अभिनंदन ! - संपादक)

पुणे येथे अवैधरित्या वास्तव्य करणार्‍या दोन बांगलादेशींना अटक

देशामध्ये असलेल्या बांगलादेशी घुसखोरांना
हुसकावून लावण्यासाठी केंद्रशासनाने प्रयत्न करणे अपेक्षित आहे !
     पुणे, १८ ऑक्टोबर - शहरात अवैधरित्या वास्तव्य करणार्‍या अब्दुल काशिम मुन्शी आणि मैनू अब्दुल करीम शरदार या दोन बांगलादेशी नागरिकांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने अटक केली. हे दोघे वेश्या व्यवसायासाठी मुली पुरवणार्‍याचा व्यवसाय करत होते. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.
     वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते दोघे मूळ बांगलादेश येथील नोडाईल जिल्ह्यातील अंबाडिया येथील रहिवासी आहेत. मिळालेल्या माहितीवरून धनकवडी येथील तीन हत्ती चौकात १५ ऑक्टोबर या दिवशी छापा टाकण्यात आला. त्या वेळी त्या दोघांना अटक करण्यात आली. या वेळी त्यांच्या तावडीतून एका बांगलादेशी तरुणीची सुटका करण्यात आली. त्यांच्याकडे भारतात प्रवेश करण्यासाठी पारपत्र अथवा कोणतीही कायदेशीर अनुज्ञप्ती नसल्याचे आढळून आले.

विद्यार्थिनींना मारहाण केल्याप्रकरणी शिक्षकाला अटक आणि जामिनावर सुटका

गृहपाठ न केल्याच्या प्रकरणी शिक्षकाने विद्यार्थिनींना मारहाण केल्याचे प्रकरण
शिक्षकाचे निलंबन
      पुणे, १८ ऑक्टोबर - गृहपाठ केला नाही आणि पुस्तक घरी विसरले म्हणून विद्यार्थिनींना हात सुजेपर्यंत छडीने मारणार्‍या जयदीप लक्ष्मण भोसले या शिक्षकाला कोथरूड पोलिसांनी अटक केली. त्याला १७ ऑक्टोबर या दिवशी न्यायालयात उपस्थित करण्यात आल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्याने जामिनासाठी अर्ज केल्यामुळे त्याला जामीन मंजूर करण्यात आला. या प्रकरणी त्या शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.
     स्नेहा जोगळेकर यांच्या मुलीसह शाळेतील इतरही काही मुलींना जयदीप भोसले या शिक्षकाने १६ ऑक्टोबर या दिवशी छडीने मारले होते. या प्रकरणी जोगळेकर यांनी शाळेकडे तक्रार केली होती; परंतु त्या शिक्षकावर कोणतीही कारवाई झाली नव्हती.

रायफल आसनावर आणि स्वतः मात्र लोकलच्या दारात !

      मुंबई - येथील लोकलमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी आलेल्या पोलीस हवालदाराने त्याची लोडेड रायफल खिडकीजवळील आसनावर ठेवली आणि स्वतः दारात जाऊन उभा राहिला. (महिलांच्या डब्यातील पोलीस हवालदाराचा गलथानपणा ! - संपादक) जवळजवळ ९ स्थानके येऊन गेल्यावर त्याला कुणीतरी छायाचित्रे काढत असल्याचे लक्षात येताच त्याने महिला प्रवाशांकडून

पाकपुरस्कृत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधात कांगावा ! (म्हणे) हिंदुत्ववादी संघटना, बजरंग दल आणि सनातन संस्था यांच्यावर बंदी घाला !

हिंदूंनो, देशभर लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद, बॉम्बस्फोट, हिंदूंच्या हत्या आदींद्वारे आतंकवादी
कारवाया करणार्‍या राष्ट्रद्रोही पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घालण्याची मागणी करा !
     नांदेड - हिंदुत्ववादी संघटना, बजरंग दल आणि सनातन संस्था यांच्यावर बंदी घालावी, अशी मागणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाद्वारे करण्यात आली. या संघटनेकडून काही मागण्यांचे निवेदनही राष्ट्रपतींना पाठवण्यात आले आहे. संविधानाने दिलेल्या अधिकारांचे रक्षण करा. सांप्रदायिक हिंसा कायदा त्वरित बनवा, अशा मागण्या त्यात करण्यात आल्या आहेत. लोकशाहीद्रोही कृत्ये करणार्‍या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या वतीने देशभर लोकशाहीच्या अधिकारांच्या रक्षणाच्या नावाखाली मोहीम राबवली जात आहे.

गोहत्येसाठी फाशी देण्याविषयी कायदा करा ! - खासदार साक्षी महाराज

      भुवनेश्‍वर - भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी गोमांसाविषयी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन करत गोहत्या करणार्‍याला फाशीची शिक्षा देण्याविषयी कायदा करण्याची मागणी केली आहे. साक्षी महाराज पुढे म्हणाले, गोहत्या करून नागरिकांच्या धार्मिक भावनांशी खेळण्याचा अधिकार कुणालाही नाही. गोहत्येला उत्तरदायी असलेल्या व्यक्तीस फाशीची शिक्षा दिली पाहिजे. खट्टर यांनी केलेल्या वक्तव्यात काहीही चुकीचे नाही. काश्मीरच्या विधानसभेत गोमांस आणणार्‍या आमदाराविषयी उमटलेली प्रतिक्रिया स्वाभाविक होती. ओडिशामध्ये धर्मांतराची संख्या वाढत असून, ओडिशा शासनाने या प्रकरणात वेळीच लक्ष घालावे.

मराठी विषय अन्य बोर्डांच्या शाळांत सक्तीचा, महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोलही शिकवणार

      मुंबई - राज्यातील सीबीएस्ई, आयसीएस्ई, आयजीसीएस्ई, आयबी या केंद्रीय आणि आंतरराष्ट्रीय बोर्डांच्या शाळांना यापुढे इयत्ता आठवीपर्यंत मराठी भाषा शिकवावी लागणार आहे. या बोर्डांनी महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवावा, असेही ठरले आहे. या शाळांच्या प्रतिनिधींसोबत अनेक प्रश्‍नांविषयी सुसूत्रता आणण्यासाठी शासकीय समन्वय समिती स्थापन करणार आहोत, असेही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी १६ ऑक्टोबर या दिवशी येथे सांगितले.

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंनो, स्वरक्षणासाठी धर्माचरण करून संघटित व्हा !
     सोलापूर येथील दमाणीनगर भागात किरकोळ कारणावरून धर्मांधांनी हिंदूंना मारहाण करून त्यांच्या घरावर दगडफेक केली. या दगडफेकीत ९ जण घायाळ झाले आहेत.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Maharashtrake Solapurme dharmandhone Hinduoko marpeet kar pathrao kiya.
Hinduoke deshme Hinduoparhi attyachar kyo?
जागो !
महाराष्ट्रके सोलापूरमें धर्मांधोंने हिंदूआको मारपीट कर पथराव किया ।
हिंदूआके देशमें हिंदूओपरही अत्याचार क्यो ?

सांगली येथील मोर्च्यात हिंदुत्ववाद्यांचा उत्स्फूर्त सहभाग !

वाहिन्यांना प्रतिक्रिया देतांना श्री. अभय वर्तक
      सनातनवरील संभाव्य बंदीला तीव्र विरोध करण्यासाठी राजवाडा चौक येथून या मोर्च्याचा प्रारंभ झाला. हा मोर्चा कापड पेठ, गणपती मंदिर, टिळक चौक, हरभट रस्ता, बसस्थानक परिसर, संत कोटणीस पथ मार्गे मारुती चौक येथे समाप्त झाला.
सहभागी पक्ष, संघटना, संप्रदाय
पक्ष : भाजप, शिवसेना
संघटना : श्री शिवप्रतिष्ठान, हिंदु एकता आंदोलन, गोल्ला समाज, माळी समाज, हिंदु महासभा, सांगली जिल्हा वारकरी संप्रदाय सेवा संघटना, भारत स्वाभिमान, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, ब्राह्मण सभा, यांसह अनेक संस्था, सामाजिक संघटना यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिडिस, किळसवाणे, पाताळयंत्री !

श्री. भाऊ तोरसेकर
     You can fool all the people some of the time, and some of the people all the time, but you cannot fool all the people all the time. - Abraham Lincoln 
    सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच संजीव भट्ट नामक माजी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याची एक याचिका फेटाळून लावली. त्यात नुसती त्याची मागणीच नाकारलेली नाही, तर या माणसाने कायदा, न्याय आणि न्यायालयाचीही दिशाभूल करण्याचा किती हिडिस खेळ केला, त्याचीही लक्तरे वेशीवर टांगली आहेत. अर्थात त्यात एकटा संजीव भट्ट उघडा पडलेला नाही, तर मागल्या चौदा वर्षांत मोदीद्वेषाने भारावलेले जे पाताळयंत्री पुरोगामी कारस्थान या देशात मोठ्या उजळमाथ्याने राबवले गेले, त्याचाच या एका निकालातून देशातील सर्वोच्च न्यायपिठाने पर्दाफाश करून टाकला आहे; पण कोडग्या लोकांना लाज नसते, म्हणून कि काय हे लोक आता संजीव भट्टला सोडून अखलाख महंमद नावाच्या नव्या शिकारीवर तुटून पडले आहेत.

हिंदु संस्कृतीतील नैवेद्याच्या परंपरेची थट्टा उडवणार्‍या धर्मांध मित्राला तर्कशुद्ध पद्धतीने उत्तरे देणारा हिंदू !

श्री. सुरेश चिपळूणकर
आजकाल पाश्‍चिमात्य शिक्षण तथा डाव्यांचा अपप्रचार, त्याचप्रमाणे धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली होणारे ब्रेनवॉश यामुळे संतांच्या विरोधात बोलणे आणि त्यांची खिल्ली उडवणे सर्वसाधारण गोष्ट झाली आहे. सर्वसाधारणपणे कुणीही हिंदु अशा वेडगळ गोष्टींनी लगेच उत्तेजित होत नाही; परंतु हळूहळू हे प्रमाण वाढत आहे. नुकतीच अशी एक घटना घडली, जेव्हा सामाजिक संकेतस्थळा (सोशल मीडिया)वर हिंदु संस्कृतीची थट्टा उडवणार्‍या एका मित्रासमवेत चर्चा झाली.
देवतांना नैवेद्य दाखवणे, ही वायफळ परंपरा 
असल्याचे मुसलमान मित्राने म्हणणे
     एका मित्राच्या फेसबूकवर त्याचा दुसरा मित्र सलीमने त्याला एक चित्र दाखवून थट्टा करण्याच्या उद्देशाने म्हटले, तुमच्या देवाला नेहमीच अपचनाची तक्रार असेल ना ? ढीगभर मंदिरे आणि घरांमध्ये कोट्यवधी लोक देवाला नैवेद्य अर्पण करतात. एका सहिष्णु हिंदूप्रमाणे प्रारंभी आपल्या मित्राच्या या टिपणीला थट्टेच्या स्वरूपात घेऊन सांगितले, हो ना ! आजकाल पदार्थांमध्ये रासायनिक घटकांचे प्रमाण खूपच वाढले आहे, अशा परिस्थितीत प्रामुख्याने !; परंतु वाटत होते की, सलीम गोष्ट पुढे वाढवण्याच्या मन:स्थितीत आहे.
त्याने सांगितले, नाही बंधू, थट्टा करत नाही. जेव्हा मी लक्षावधी हिंदूंना देवतांच्या मूर्तींच्या पुढे नैवेद्य आणि प्रसाद अर्पण करतांना बघतो, तेव्हा विचार करतो की, या निष्प्राण मूर्ती कधी हे पदार्थ खाऊ शकतात का ? देवता हा नैवेद्य खाऊ शकतात का ? कसली ही वेडेपणाची आणि वायफळ परंपरा आहे.

औषध विक्रेत्यांची समस्या बनलेली ऑनलाईन औषधविक्री !

       ऑनलाइन औषधविक्री बंद करण्याच्या मागणीसाठी देशभरातील सुमारे ८ लक्ष औषध विक्रेत्यांनी १४ ऑक्टोबर या दिवशी एक दिवसाचा संप पुकारला होता. त्यामुळे देशातील औषध विक्री पूर्णपणे ठप्प झाली होती. ऑनलाइन औषध विक्रीने किरकोळ विक्री औषध उद्योगाला चांगलाच हादरा दिला असून नियम डावलून होत असलेली विक्री रुग्णांसाठी जोखमीची ठरू शकते, अशी चेतावणी ऑल इंडिया केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट या संघटनेने दिली आहे. त्यामुळेच देशातील औषध विक्रेते संपात सहभागी झाले आणि संप दुकाने बंद ठेवणे आणि शासनाचे लक्ष वेधणे, यासाठी १०० प्रतिशत यशस्वी झाला.

कठीण काळात सनातनच्या पाठीशी उभे रहाणार्‍या लोकप्रतिनिधींचे आभार !

सनातन संस्थेचा संस्कृती रक्षणात महत्त्वाचा वाटा ! 
- नलिनकुमार कटील, खासदार, भाजप, दक्षिण कन्नड, कर्नाटक.
 २५ वर्षांपासून सनातन संस्थेचे कार्य चालू आहे. तेव्हापासून आतापर्यंत संस्थेने भारतीय संस्कृतीच्या रक्षणाच्या कार्यात महत्त्वाचा वाटा उचललेला आहे. आता अशा संस्थेवर नको ते आरोप करून बंदी घालण्याचा विचार करणे दुर्भाग्यपूर्ण आहे. एवढेच नव्हे, तर कोणताही आरोप सिद्ध झाला नसूनही बंदीची भाषा बोलणे अन्यायकारक आहे. याचा तीव्र शब्दांत निषेध करून सनातन संस्थेला माझा पूर्ण पाठींबा आहे. 
      ग्रंथ तसेच नियतकालिकांच्या माध्यमातून सनातन संस्था संस्कृती रक्षणाच्या कार्यात कार्यरत असून समाजाला योग्य दिशा दाखवत आहे. एवढेच नव्हे, तर विविध सण-उत्सवांच्या वेळी शास्त्रीय पद्धतीने उत्सव साजरे करण्याविषयी प्रबोधन करते, तसेच शाळा-महाविद्यालयांतील मुलांना राष्ट्र आणि संस्कृतीविषयी प्रबोधन करते.

हिंदु संस्कृतीचे रक्षण करणारा सनातन आश्रम प्रत्येकाने पहावा ! श्री. रामा उसपकर, हिंदु धर्माभिमानी, वास्को.

     देशात अनेक धर्मांचे आश्रम किंवा मदरसे आहेत; मात्र सध्या हिंदूंच्याच आश्रमाला लक्ष्य केले जात आहे आणि अशा आश्रमांना अनुसरून कारवाईसुद्धा जलदगतीने होत असते. शासन कोणतेही असो. याला प्रसारमाध्यमे उत्तरदायी आहेत. प्रसारमाध्यमे इतर धर्मियांचे धर्मगुरु कितीही मोठ्या गुन्ह्यात सापडलेले असूनही त्यांच्यासंदर्भात लिहिण्यास धजावत नाहीत.

नवरात्रीत देवीपूजनाशी निगडीत करावयाच्या काही कृतींमागील शास्त्र

नवरात्रीनिमित्त...
१. मालाबंधन (देवीच्या मूर्तीवर फुलांच्या माळा टांगणे)
    मालाबंधनामुळे फुलांतील रंग आणि गंध कणांकडे आकृष्ट झालेल्या वायूमंडलातील तेजतत्त्वात्मक शक्तीलहरी देवीच्या मूर्तीकडे पटकन संक्रमित होण्यास साहाय्य होऊन त्यांच्या स्पर्शाने मूर्तीतील देवीतत्त्व अल्प कालावधीत जागृत होते. कालांतराने हे देवीतत्त्व वास्तूत प्रक्षेपित होण्यास प्रारंभ झाल्याने वास्तूशुद्धी होऊन जिवांनाही या चैतन्याचा लाभ होण्यास साहाय्य होते.

देवीच्या उपासनेचे शास्त्र सांगून भक्तीभाव वाढवणारे सनातनचे लघुग्रंथ !

श्री सरस्वतीदेवी
  • श्री सरस्वतीदेवीची निर्मिती कशी झाली ?
  • श्री सरस्वतीदेवीच्या वीणेचे महत्त्व काय ? 
  • श्री सरस्वतीच्या उपासनेने कोणते लाभ होतात ?
  • दसर्‍याला श्री महासरस्वतीची पूजा का करावी ?
  • श्री सरस्वतीयंत्राचे महत्त्व काय अन् लाभ कोणते ?

६८ वर्षांच्या स्वातंत्र्योत्तर सर्वपक्षीय राज्यकर्त्यांच्या राज्यकारभाराचे फळ ! त्यांना यासंदर्भात जराही लाज वाटत नाही, हे लक्षात घ्या !

    प्रतिदिन आम्ही महिलांना बरोेबरीचा अधिकार देण्याच्या गोष्टी करतो; मात्र शाळेत शौचालय नसल्यामुळे देशातील ६० टक्के मुली शाळेत जाणे टाळतात, अशी धक्कादायक माहिती ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्सशी (मानवी विकास निर्देंशांक) संबंधित एका अहवालात देण्यात आली आहे.

देवाने आपल्याला स्वीकारून घडवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा आवश्यक !

श्री. संदेश नाणोसकर
१. मी देवाचा चाकर आहे, असा भाव ठेवायला हवा !
     आपल्या मनात असे व्हायला पाहिजे असा विचार आला आणि खरोखर तसे झाले, तर आपल्याला जेवढा आनंद वाटतो, त्याहून अधिक आपल्याला ईश्‍वराविषयी कृतज्ञता वाटली पाहिजे. देव या क्षुल्लक जिवाचेही ऐकतो. देव सर्वांची किती काळजी घेतो. देव माझे ऐकतो अन् मला आनंद देतो, तर समष्टीतील प्रत्येक व्यक्तीमध्ये असणार्‍या ईश्‍वराचे मी किती ऐकले पाहिजे. मी देवाचा चाकर आहे ! असा आपला दृष्टीकोन असला पाहिजे.
२. प्रयत्नांवरच भगवंताची कृपा अवलंबून असणे
    देव आपल्याला स्वीकारतो, तेव्हा तो आपल्याला घडवत असतो आणि आपण देवाला स्वीकारतो, म्हणजे प्रत्येक प्रसंग त्याने माझ्या साधनेसाठीच घडवला आहे, असा आपला भाव असतो, तेव्हा आपण घडत असतो. देवाने आपल्याला स्वीकारण्यासाठी, म्हणजेच त्याची कृपा अखंड होण्यासाठी तळमळीने, चिकाटीने, सातत्याने आणि संपूर्ण शरणागतीने प्रयत्न करणे, म्हणजेच देवासाठी घडणे. दोन्ही प्रक्रिया एकाच वेळी होतात. यामध्ये आरंभ हा देवाच्या कृपेमुळेच होतो आणि शेवट म्हणजे ईश्‍वराशी एकरूप होणे, हेसुद्धा देवाच्या कृपेमुळेच होणार असते आणि त्यासाठी करायचे असतात, ते केवळ प्रयत्न ! भगवंताच्या कृपेच्या तुलनेत त्या प्रयत्नांना पुष्कळ महत्त्व आहे; कारण त्या प्रयत्नांवरच भगवंताची कृपा अवलंबून आहे.

आनंदी, हसरा, सर्वांना हवाहवासा वाटणारा आणि ५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा रायगड येथील चि. आर्यन राहुल पाचपुते (वय १ वर्ष) !

    ५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला रायगड येथील चि. आर्यन राहुल पाचपुते (वय १ वर्ष) याचा आज आश्‍विन शुक्ल पक्ष षष्ठीला वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची आई सौ. राणी पाचपुते यांनी दिलेले लिखाण येथे देत आहोत.
पहिल्या वाढदिवसानिमित्त चि. आर्यन राहुल पाचपुते
याला सनातन परिवाराकडून अनेक शुभाशीर्वाद !
१. गर्भधारणा झाल्यानंतर
१ अ. गर्भातील बाळावर केलेले सात्त्विक संस्कार
१ अ १. प्रार्थना आणि आध्यात्मिक उपाय करणे : गर्भधारणा झाल्यानंतर माझी भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना होऊ लागली, तूच या जिवावर आतापासूनच साधनेचे संस्कार करून घे. आरंभी माझ्याकडून केवळ प्रार्थना होत असत. २ - ३ मासांनंतर मी पोटातील बाळाशी बोलू लागले. त्याच्यावर आध्यात्मिक उपाय करू लागले. मी प्रतिदिन कापूर, अत्तर आणि विभूती पोटाला लावून चैतन्य मिळू दे, अशी प्रार्थना करायचे.

पांडुरंगावर नितांत श्रद्धा असलेल्या आणि प्रत्येकातील ईश्‍वराला पाहून साहाय्य करण्यासाठी धडपडणार्‍या पंढरपूर येथील श्रीमती सुशीला पंढरीनाथ नगरकर (वय ८४ वर्षे) यांनी गाठली ६५ टक्के आध्यात्मिक पातळी !

 श्रीमती सुशीला नगरकरआजी यांचा सत्कार
करतांना पू. (कु.) स्वाती खाडये (डावीकडे)
    श्रीमती सुशीला पंढरीनाथ नगरकर (वय ८४ वर्षे) या पहिल्यापासूनच श्रद्धाळू स्वभावाच्या असून त्यांची पांडुरंगावर नितांत श्रद्धा आहे. त्या घरातील कुळधर्म, कुलाचार अगदी मनापासून करत असत. अंतःकरणात असलेल्या जिव्हाळ्यामुळे त्या सर्वांशी प्रेमाने वागतात आणि इतरांच्या साहाय्याला त्वरित धावून जातात. त्यांच्या हाताला विलक्षण हातगुणही असल्याचे जाणवते. त्यांच्या दोन मुली, सौ. चित्रा दीपक पंढरी आणि सौ. मंजुषा जोशी, तसेच जावईश्री. शशिधर जोशी अन् पंढरपूर येथील साधक यांनी लिहून दिलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढे देत आहोत.
१. मूर्तीमंत प्रेमभाव
१ अ. मुलांना प्रेमाने सांभाळणे : आम्ही लहान असतांना आजी, आई-वडील, आम्ही पाच बहिणी, एक भाऊ आणि काकांची तीन मुले असे सर्व जण एकत्र रहात होतो. तेव्हा आई सर्व मुलांचे संगोपन सारख्याच प्रकारे करायची. आताही कोणाचे वागणे कसेही असो, ती सर्वांशी प्रेमानेच बोलते. - सौ. चित्रा दीपक पंढरी, पंढरपूर (मुलगी)

जिल्हासेवक, लेखासेवक आणि साधक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना

साधकांनो, ३१.१०.२०१५ पर्यंत जिल्ह्यातील सर्व प्रलंबित येणे बाकी पूर्ण करा !
      संस्था स्तरावर सर्व जिल्ह्यांची येणे बाकी मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहे. येणे बाकी वेळेत पूर्ण न झाल्यामुळे ती रक्कम, तसेच त्या रकमेवरील व्याज यांची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यांनी विशेष प्रयत्न करून ३१.१०.२०१५ या दिवसापर्यंत येणे बाकी पूर्ण करावी.    
    प्रलंबित येणे बाकीचा जिल्हानिहाय आढावा पुढे देत आहे.
१. नियतकालिक सनातन प्रभातच्या विज्ञापनांची येणे बाकी

साधकांनो, शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित करण्यात येणार्‍या वार्षिक स्नेहसंमेलनात वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरण करणार्‍या विद्यार्थ्यांना सनातनचे संस्कारविषयक आणि अन्य ग्रंथ पारितोषिके म्हणून देण्यासाठी मुख्याध्यापकांना उद्युक्त करा !

    प्रत्येक वर्षी डिसेंबर मासात सर्व शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनांचे आयोजन करण्यात येते. त्या वेळी विद्यार्थी त्यांचे कौशल्य आणि आवड यांनुसार गायन, नृत्य, नाटक, एकांकिका आदी सादर करतात. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या सादरीकरणानुसार त्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ अशी विविध पारितोषिके दिली जातात.
    यासमवेतच वर्षभरातही शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये वक्तृत्व, गायन, वादन, मैदानी खेळ आदी निरनिराळ्या स्पर्धा आयोजित केल्या जात असतात आणि त्यासाठीही विद्यार्थ्यांना विविध पारितोषिके दिली जातात.

विज्ञानाप्रमाणे बहुधा (Probably), असे शब्द आपल्या धर्मग्रंथांत नाहीत. ठामपणे सर्व सत्य मांडले आहे. - श्री. शिवकुमार ओझा, हिंदु संस्कृतीचे अभ्यासक आणि लेखक, ठाणे.


साधकांनो, अंतरातील भाव-भक्तीचा दीप कृतज्ञतेच्या ज्योतीने प्रज्वलित करून खरी दीपावली साजरी करा !

पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ
१. कृतज्ञताभावाविषयी प.पू. डॉक्टरांनी
सांगितलेली मार्गदर्शक सूत्रे !
     काही दिवसांपूर्वी दैनिक सनातन प्रभातमध्ये प.पू. डॉक्टरांची एक चौकट प्रसिद्ध झाली होती. त्यामध्ये त्यांनी साधकांना पुढील संदेश दिला होता, साधनेत प्रगती होण्यासाठी साधकांनी कृतज्ञताभावात रहावे. कुटुंबीय घेत असलेली आपली काळजी, तसेच करत असलेले प्रेम, आपल्याला इतरांकडून मिळणारे साहाय्य, भगवंताने दिलेले जीवन आदी दैनंदिन जीवनातील उदाहरणे पावलोपावली आठवल्यास कृतज्ञताभाव निर्माण होण्यास ५ - ६ आठवड्यांतच आरंभ होतो. पुढे तो वाढत जातो. त्यामुळे साधनेत प्रगती होऊ लागते.

२. कृतज्ञताभावात राहिल्याने कार्यकर्ते आणि धर्मप्रेमी यांनी अनुभवलेले स्वतःतील पालट !
    धर्माभिमान्यांच्या सत्संगात उपस्थित असणारे धर्मप्रेमी, तसेच समितीच्या सत्संगात सहभागी होणारे कार्यकर्ते यांना अखंड कृतज्ञताभावात रहाण्याचे महत्त्व सांगण्यात आले होते. त्यानुसार प्रयत्न केल्यावर काही दिवसांतच त्यांना स्वतःमध्ये पुढील पालट जाणवले.

पू. स्वातीताई असती गुणांची खाण ।

आनंदाची वार्ता कानावर आली ।
सर्वांची लाडकी पू. स्वातीताई,
सद्गुरुपदी विराजमान झाली ।
अवघी साधकनगरी आनंदली ।
वार्ता ऐकून धन्य झाली ॥ १ ॥

अनेक अग्निदिव्यांतून झळाळून निघालेले आणि सद्गुरुपदी विराजमान झालेले पू. स्वातीताईंसम अलौकिक संतरत्न भारतभूमीवर जन्माला येणे, ही अभिमानाची गोष्ट ! - प.पू. दास महाराज

प.पू. दास महाराज
पू. (कु.) स्वाती खाडये
    साधारणतः ४०० वर्षांपूर्वी पवित्र भारतभूमीला क्रूर यवनासूरांनी ग्रासले होते. त्या वेळी समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवरायांच्या माध्यमातून हिंदु धर्माला पुनर्वैैभव प्राप्त करून दिले. त्या काळात समर्थांच्या दोन शिष्या अक्काबाई आणि वेण्णाबाई यांनी जनसामान्यांत जाऊन मोठे कार्य केले. वेण्णाबाईंनी तर संपूर्ण भारतभर कीर्तनांच्या माध्यमातून धर्मजागृती करून निद्रिस्त हिंदु समाजाला जागृत केले.
     पू. स्वातीताई असेच कार्य करून आज सद्गुरुपदी विराजमान झाल्या आहेत. त्यांच्याविषयी शब्दांतून वर्णन करणे कठीणच ! त्यांच्याविषयी लिहिण्याचे सामर्थ्य मला प्रदान करावे, हीच श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !
१. विहंगम साधना करून दीड तपात सद्गुरुपदी विराजमान होणार्‍या
पू. स्वातीताईंनी सनातनच्या सर्व संतांसमोरही मोठा आदर्श ठेवला आहे !
    पू. स्वातीताई वर्ष २००० मध्ये कुडाळ सेवाकेंद्रात सेवा करायच्या. तेव्हापासून आम्ही त्यांच्यातील गुरुसेवेची तळमळ पहात आहोत. याच तळमळीमुळे त्यांना फोंड्यातील सुखसागर आश्रमात सेवेची संधी लाभली. नंतर त्यांनी रामनाथी आश्रमात स्वागत कक्षातील, तसेच आश्रम व्यवस्थापनातील सेवा अतिशय उत्तम रितीने सांभाळल्या. याच कालावधीत त्यांनी ६० टक्के आध्यात्मिक पातळीही गाठली. पुढे त्या प्रसार सेवेसाठी जिल्ह्याजिल्ह्यांत गेल्या. तेथेही तळमळीने सेवा करत ७० टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त करून त्या संत झाल्या. आता तर त्यांनी अवघ्या तीन मासांत ३ टक्के आध्यात्मिक पातळी वाढवून (गुरुपौर्णिमेला त्यांचा आध्यात्मिक स्तर ७७ टक्के होता.) ८० टक्क्यांचा टप्पा गाठला आणि सद्गुरुपदी विराजमान होण्याची किमया साधली. विहंगम साधना करून अवघ्या दीड तपात उन्नती करून पू. बिंदाताई यांच्यानंतर पू. स्वातीताईंनी सनातनच्या सर्व संतांसमोर मोठा आदर्श ठेवला आहे. याचा आम्हा सर्व संतांना अभिमान वाटतो. दीड तप खडतर साधना करून अनेक अग्निदिव्यातून हे संतरत्न झळाळून निघाले आहे. अशा प्रकारे सद्गुरुपदावर विराजमान होणार्‍या पू. स्वातीताई या पहिल्या साधिका आहेत.

हिंदूंंवर अनेक संकटे येऊनही देव वाचवायला येत नाही, याचे कारण हिंदू देवाची भक्ती करत नाहीत. भक्ती हीच आपली शक्ती आहे ! - परात्पर गुरु डॉ. आठवले (२२.५.२०१५)


साधकांनो, हिंदु राष्ट्राची स्थापना हे श्रीगुरूंचे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणार्‍या सेवांमध्ये सहभागी होऊन या व्यापक कार्यात खारीचा वाटा उचला !

विद्यार्थी-साधकांना दीपावलीच्या सुटीच्या काळात
चैतन्यदायी आश्रमजीवन अनुभवण्याची सुवर्णसंधी !
१. राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी वेळ देणे ही काळाची आवश्यकता !
     भावी आपत्कालीन स्थिती निर्माण होण्यापूर्वी धर्मप्रसार आणि सनातनच्या संशोधनाचे कार्य समाजापर्यंत अधिकाधिक पोचवणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकाने स्वतःचे शिक्षण, तसेच अन्य व्यावहारिक कामे सांभाळून अधिकाधिक वेळ राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी देणे काळाची

दीपावलीच्या शुभ मुहुर्तावर... वाचक आणि विज्ञापनदाते यांना आनंदवार्ता !

या अंकापासून साप्ताहिक सनातन प्रभात १६ पानी !
दिवाळी विशेषांक (रंगीत)
साप्ताहिक सनातन प्रभातचा अंक क्र. ५० (२९ ऑक्टोबर २०१५ ते ४ नोव्हेंबर २०१५)
या अंकात वाचा...
  • दीपावली कशी साजरी कराल ?
  • दिवाळीच्या कालावधीत साजर्‍या होणार्‍या सणांचे अध्यात्मशास्त्र
  • दीपावलीच्या मंगल प्रसंगी काढावयाच्या सात्त्विक रांगोळ्या

दैनिक सनातन प्रभातचा दसर्‍यानिमित्त रंगीत धर्मविजय विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : २२ ऑक्टोबर
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २१ ऑक्टोबरच्या दुपारी ३ पर्यंत ईआर्पी प्रणालीत भरावी !

जिल्हासेवक आणि साधक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना !

पंचांगाचे अधिकाधिक घाऊक वितरण करून वेेळ आणि श्रम वाचवा !
      सध्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पंचांग शिल्लक आहेत. पंचांग वितरित करण्यासाठी साधकांचे प्रयत्नही अपुरे पडत आहेत. अनेक ठिकाणी घरोघरी पंचांग वितरण करण्याकडे साधकांचा कल वाढत आहे. असे किरकोळ वितरण करण्यासाठी वेळेचा अपव्यय आणि साधक संख्याही अधिक लागत आहे, तसेच साधकांची क्षमताही अधिक खर्च होत आहे. साधकांनी केवळ किरकोळ वितरण करण्याची

समष्टीसाठी नामजप करणारे संत आणि साधक यांच्यासाठी सूचना !

पू. संदीप आळशी
    काही संत, ६० टक्के अन् त्याहून अधिक पातळी असलेले काही साधक आणि भाव असलेले काही साधक प्रतिदिन समष्टीसाठी नामजप करतात. अशांनी त्यांना असलेल्या आध्यात्मिक त्रासाच्या तीव्र्रतेप्रमाणे पुढीलप्रमाणे नामजप करावा.
१. तीव्र त्रास असणार्‍यांंनी समष्टीसाठी नामजप करू नये.
२. मध्यम त्रास असणार्‍यांंनी नामजपातील २५ टक्के वेळ समष्टीसाठीच्या नामजपासाठी आणि ७५ टक्के वेळ स्वतःच्या उपायांसाठी द्यावा.
३. मंद त्रास असणार्‍यांंनी नामजपातील ५० टक्के वेळ समष्टीसाठीच्या नामजपासाठी आणि ५० टक्के वेळ स्वतःच्या उपायांसाठी द्यावा.
४. त्रास नसणार्‍यांंनी नामजपाचा पूर्ण वेळ समष्टीसाठीच्या नामजपासाठी वापरावा.
- पू. (श्री.) संदीप आळशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.१०.२०१५)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

(परात्पर गुरु) डॉ. आठवले
       कुठे अर्थ आणि काम यांवर आधारित पाश्‍चात्त्य संस्कृती, तर कुठे धर्म आणि मोक्ष यांवर आधारित हिंदु संस्कृती ! हिंदू पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करत असल्यामुळे त्यांचीही झपाट्याने विनाशाकडे वाटचाल होत आहे! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (६.८.२०१२)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान
कितीही कल्पनातीत आनंदलहरी असल्या, तरी 
त्यांची शीतलताच त्यांचा दाब उसळेल.
     भावार्थ : आनंदलहरी कल्पनातीत आहेत; कारण साधारण व्यक्तीला आध्यात्मिक आनंदाची, आत्मानंदाची अनुभूती नसतेच, केवळ व्यावहारिक सुखाची असते. त्यांची शीतलताच त्यांचा दाब उसळेल म्हणजे आनंदाची अनुभूती घ्यावी, अशी प्रत्येक जिवाला नैसर्गिक

बोधचित्र


प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

नेहमी सत्संगात रहावे
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      व्यक्तीचा मित्रपरिवार कसा आहे, यावरून त्याची ओळख ठरते; म्हणूनच आपल्याभोवती सात्त्विक वृत्तीच्या व्यक्तींचा वावर असेल, याची दक्षता कटाक्षाने घ्यावी. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

राजा कसा असावा आणि कसा असू नये !

       जे नाही ते प्राप्त करण्यासाठी; जे प्राप्त झालेले आहे, ते वर्धिष्णू होण्यासाठी; जे वर्धित झाले आहे त्याचे संरक्षण करण्यासाठी; जेे वर्धित आणि संरक्षित असे संचित आहे, त्याचे समाजात सर्वत्र समप्रमाणात वितरित करण्यासाठी राजा आणि दंडसत्ता हवी. अट एकच, दंडाचा स्वामी निर्मोही आणि इंद्रियजित असावा; पण तोच जर मोहित आणि भ्याड (कर्तव्यच्युत) असेल, तर तो स्वतःसह त्या राज्याचा विनाश घडवून आणतो. 
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, ६.१.२०११)

आय.एस्.आय.एस्.चे संकट दाराशी !

आय.एस्.आय.एस्. या क्रूर आतंकवादी संघटनेसाठी भारतात ऑनलाइन भरती चालू करण्याच्या आरोपाखाली अफशां जबीन या मुसलमान महिलेला पोलिसांनी अटक केली. तिच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. देशात सध्या आय.एस्.आय.एस्.चे नऊ सक्रीय सदस्य असून, ते देहली, मुंबई, हैद्राबाद आणि बेंगळुरू या शहरांसह काश्मीरमध्ये बसून संघटनेच्या विचारधारेचा प्रचार अन् प्रसार करत आहेत.
कालपर्यंत आपण अशा भ्रमात वावरत होतो की, जळते ते इराक-सिरियाचे आपल्याला काय ? पण हा जिहादी सूडाग्नी आता आपल्या दारापर्यंत येऊन ठेपला आहे. कदाचित् आपल्या पहाण्यातीलच कुणीतरी उद्या आपल्यासमोर आय.एस्.आय.एस्.चा जिहादी म्हणून कापाकापी करू लागला, तर आश्‍चर्य वाटायला नको ! यापूर्वी कल्याण येथील चार धर्मांध तरुण आय.एस्.आय.एस्.मध्ये सहभागी होण्यासाठी गेले होते, तसेच बेंगळुरू येथे आय.एस्.आय.एस्.च्या फेसबूकचे पान चालवणार्‍या धर्मांधाला अटक करण्यात आली होती. आता अफशां जबीनची चौकशी करतांना समोर आले आहे की, आय.एस्.आय.एस्.च्या भारतातील ग्रुपच्या अ‍ॅडमिनिस्ट्रेटरमध्ये मुंबईची एक महिलासुद्धा सहभागी आहे. येथील महिलाही या जिहादी कार्यात सक्रीय झाल्या आहेत, त्या इतरांची भरतीही करून घेत आहेत, यावरूनच आपण आय.एस्.आय.एस्.ची पाळेमुळे भारतात किती खोलवर रुजली आहेत, याची कल्पना करू शकतो.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn