Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

नवरात्रोत्सव (आज सहावा दिवस)

सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तुते ॥
     एका मतानुसार नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण कमी करण्यासाठी तमोगुणी महाकालीची, पुढील तीन दिवस रजोगुण वाढवण्यासाठी रजोगुणी महालक्ष्मीची आणि शेवटचे तीन दिवस साधना तीव्र होण्यासाठी सत्त्वगुणी महासरस्वतीची

हिमाचल प्रदेशमध्ये जमावाच्या मारहाणीत धर्मांध गोतस्कर ठार

हिंदूंच्या भावना समजून घेऊन शासन देशभर गोहत्या बंदी कायदा लागू करेल, अशी आशा आहे !
      नाहन (हिमाचल प्रदेश) - गोतस्कर नोमान या २८ वर्षीय धर्मांध तरुणाला जमावाने मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची घटना १६ ऑक्टोबर या दिवशी हिमाचलप्रदेशमध्ये घडली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
१. हिमाचलमधील सिरमौर जिल्ह्यात अवैधपणे एका ट्रकमधून ५ गायी आणि १० बैल यांची वाहतूक होत असल्याचे स्थानिक

अखलाखला मारणारे हिंदू असूच शकत नाहीत ! - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

      मुंबई - दादरी (उत्तरप्रदेश) येथील अखलाखला मारणारे हिंदू असूच शकत नाहीत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया टीव्ही या वाहिनीवर ठासून सांगितले. दादरीमध्ये घरात गोमांस असल्याच्या संशयावरून भडकलेल्या काही लोकांनी अखलाखची हत्या केली. त्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली होती. असे कृत्य करणारे हिंदु आहेत, हेच मी मान्य करणार नाही. हिंदु हा केवळ एक धर्म नसून ती एक संस्कृती, एक विचार परंपरा आहे. या परंपरेने आम्हाला सहिष्णुता शिकवली आहे

सनातनचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांना हिंदुत्व शौर्य पुरस्कार घोषित !

   
श्री. अभय वर्तक
  पंढरपूरच्या क्रांतीवीर वसंतदादा बडवे न्यासाच्या वतीने सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांना हिंदुत्व शौर्य पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा सोमवार, १९ ऑक्टोबर २०१५ या दिवशी सायंकाळी ६ वाजता पंढरपूर येथील क्रांतीवीर वसंतदादा बडवे पुतळा, रुक्मिणी पटांगण

सनातनच्या कार्याला सदैव आशीर्वाद ! - राष्ट्रसंत प.पू. भय्यूजी महाराज

सनातनवर बंदी घालण्याची मागणी केल्याचे प्रसारमाध्यमांनी प्रसारित केलेले वृत्त विपर्यस्त !
   
प.पू. भय्यूजी महाराज
   पुणे
- सनातनचे कार्य चांगले असून माझे सनातनच्या कार्याला सदैव आशीर्वाद आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रसंत प.पू. भय्यूजी महाराज यांनी केले. हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी त्यांच्याशी भ्रमणभाषद्वारे संवाद साधला असता त्यांनी हे उद्गार काढले.
      काही दिवसांपूर्वी धर्माच्या नावाखाली राज्यघटनेला नाकारून कट्टरतावाद जोपासणार्‍या सनातनी,

देशद्रोह्यांचा भरणा असलेली साहित्य अकादमी विसर्जित करा !

तमिळनाडूतील हिंदु मक्कल कत्छीचे अध्यक्ष अर्जुन संपथ 
यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी
  
श्री. अर्जुन संपथ
   नवी देहली
- सध्याचे देशद्रोही साहित्य अकादमी मंडळ विसर्जित करून राष्ट्रप्रेमी सदस्य असलेल्या मंडळाची स्थापना करा आणि पुरस्कार परत करणार्‍या लेखकांना दिलेल्या शासकीय सुविधा आणि त्यांच्यावर व्यय केलेले शासकीय अनुदानही परत घ्या, अशी मागणी तमिळनाडूतील हिन्दू मक्कल कत्छी (हिंदु जनता दल)चे अध्यक्ष श्री. अर्जुन संपत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. कॉ. गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर, कलबुर्गी यांच्या हत्येचे निमित्त करून भाजप शासनावर

केंद्रीय निरीक्षकाचा संशयास्पद मृत्यू

व्यापमं घोटाळा प्रकरण
      भोपाळ - मध्यप्रदेशातील व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) गैरव्यवहार संदर्भातील केंद्रीय निरीक्षक विजय बहादूर या अधिकार्‍याचा मृतदेह ओडिशातील झारसुगुडा येथील रेल्वे रुळावर आढळून आला आहे. त्यामुळे या घोटाळ्याशी संबंधित मृतकांमध्ये आणखी एका संशयास्पद मृत्यूची भर पडली आहे. भारतीय विदेश सेवेतील निवृत्त अधिकारी असलेले बहादूर या प्रकरणातील दोन परीक्षांची चौकशी

देहलीत २ बालिकांवर सामूहिक बलात्कार

बलात्कार्‍यांना भरचौकात फासावर लटकवल्यासच असे प्रकार थांबतील !
      नवी देहली - राजधानी देहली येथे दोन वेगवेगळ्या घटनांत २ बालिकांवर बलात्कार झाल्याची घटना घडली.   
     येथील नांगलोई परिसरात एका अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला. ही मुलगी रामलीला पहायला गेली होती. रामलीला पहात असतांना मध्येच दिवे गेले. त्या वेळी नराधमांनी तिचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला. या चिमुरडीच्या शरिरावर चावा घेतल्याच्याही अनेक खुणा आहेत.

बालेवाडी (पुणे) येथील मटका अड्ड्यावर भाजपच्या आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांची धाड

भाजपच्या पुणे येथील आमदार प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी यांची
जनहितासाठी धाडसी आणि अभिनंदनीय कृती !
      पुणे - येथील बालेवाडी भागातील ब्राउरिया वसाहतीच्या समोरील पत्र्याच्या निवार्‍यामध्ये मटका व्यवसाय चालू होता. या अपप्रकाराची स्थानिक नागरिकांनी भाजपच्या आमदार प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी यांच्याकडे तक्रार केली होती. सौ. कुलकर्णी यांनी पोलिसांकडे तक्रार करूनही त्यांनी त्याची गांभीर्याने दखल घेतली नाही. (जेथे आमदारांच्याच तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात असेल, तेथे सर्वसामान्यांच्या तक्रारींची कशाप्रकारे दखल घेत असतील, याचा विचारच न केलेला बरा.

भारतातील निधर्मीवादी हिंदूंवर टीका करतात; मात्र धर्मांध मुसलमानांचे समर्थन करतात ! - तस्लीमा नसरीन

बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांनी भारतातील बेगडी निधर्मीवाद्यांचा बुरखा फाडला !
    नवी देहली - कडवट हिंदूंवर टीका करणारे भारतातील बहुतांश निधर्मी लोक कडवट मुसलमानांना पाठीशी घालतात. भारतातील बहुतांश निधर्मी लोक हे मुसलमान समाजाचे समर्थक असतात. त्याच वेळी ते हिंदु समाजाचे विरोधक असतात, असे स्पष्ट मत बांगलादेशातील प्रसिद्ध लेखिका तस्लीमा नसरीन यांनी व्यक्त केले आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हे मत लेखिका नसरीन यांनी व्यक्त केले आहे.

विरुधीनगर (तमिळनाडू) जिल्ह्यात फटाक्यांवर देवतांची चित्रे वापरण्यास बंदी

इतर जिल्हा आणि राज्य प्रशासनांनी यांतून बोध घेऊन असे निर्णय घेणे अपेक्षित आहे ! 
     विरुधीनगर (तमिळनाडू) - विरुधीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व्ही. राजारामन् यांनी फटाके निर्मिती महासंघाला फटाक्यांच्या बांधणीसाठी देवतांची चित्रे न वापरण्याचे निर्देश जारी केले आहेत. फटाके सिद्ध करण्यासाठी आणि त्यांची पुडक्यात बांधणी करतांना वापरलेली देवतांची चित्रे रस्त्यावर टाकली गेल्यामुळे ती पायांखाली तुडवली जातात. अशा तर्‍हेने देवतांचे विडंबन होऊन हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात, अशा तक्रारी अखिल भारत हिंदु महासभा आणि इतर अनेक हिंदुत्ववादी संघटन यांनी केल्या होत्या. (धर्महानी रोखण्यासाठी तत्परतेने कृती करणार्‍या हिंदुत्ववादी संघटनांचे अभिनंदन ! - संपादक) त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी वरील आदेश निर्गमित केले आहेत. 
    फटाके निर्मिती महासंघाचे अध्यक्ष जी. अबुरीबन म्हणाले, फटाक्यांसाठी देवतांची चित्रे वापरण्याची पद्धत ख्रिस्ताब्द १९२४ पासून प्रचलित होती; मात्र आता आम्ही फटाके उत्पादकांना अशी चित्रे न वापरण्यास सांगितले आहे. (याचे काटेकोर पालन होते का ?, हे पहाण्यासाठी महासंघाने सतर्क रहावे ! - संपादक)

प्रसारमाध्यमांनी प्रसिद्धीकरणाच्या सामाजिक मर्यादा न ओलांडण्याचे केंद्रशासनाचे निर्देश !

१. खोलपोल या नावाखाली अनैतिक मार्गाचा वापर करणे, जनहिताऐवजी कोणत्याही मार्गाने लोकप्रियता मिळविणे, या गोष्टी करू नयेत.
२. प्रसारमाध्यमांनी आपली सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून आणि प्रसारमाध्यमांचे नीतीनियम पाळून प्रसिद्धीकरणाच्या सामाजिक मर्यादा ओलांडू नयेत. (धर्मभास्कर, जून २००७, पृ. २२ व २३)

शासनाला समान नागरी कायदा करण्याची इच्छा आहे का ? - सर्वोच्च न्यायालय

असा प्रश्‍न न्यायालयाला विचारावा का लागतो ? शासन हा कायदा अमलात 
आणण्यासाठी काय प्रयत्न करणार ?
     नवी देहली - कायद्यापुढे सर्व नागरिक समान असावेत आणि सर्व धर्माचे नियमन एकाच मापदंडानुसार होण्याची आवश्यकता असतांना शासन समान नागरी कायदा करून तो अमलात का आणत नाही ? असा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रमजित सिंह आणि न्या. शिवा कीर्ती सिंह यांच्या खंडपिठाने शासनाला विचारला आहे. शासनाला देशात समान नागरी कायदा करण्याची इच्छा आहे का ? असा प्रश्‍नही न्यायालयाने या वेळी केला, तसेच या संदर्भात शासनाचे मत जाणून घेण्यासाठी महाधिवक्त्यांना निर्देशही दिले. 

सभेच्या व्यासपिठावर लावलेला पंखा खाली कोसळल्यामुळे लालूप्रसाद यादव यांना किरकोळ दुखापत

बिहार विधानसभा निवडणूक प्रचाराच्या वेळी घडलेली घटना
     मोतिहारी - बिहारच्या चौथ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. याचाच एक भाग म्हणून मोतिहारी विधानसभेच्या लखौरामध्ये राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांची सभा चालू होती. सभेच्या व्यासपिठावरील खुर्चीत बसून लालूप्रसाद यादव चहा पित होते. तेवढ्यातच अचानक छतावर लावलेला पंखा (सिलींग फॅन) त्यांच्या हातावर पडला. त्यामुळे त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे. या घटनेतून लालूप्रसाद यादव थोडक्यात वाचले अन्यथा त्यांना गंभीर दुखापत झाली असती. पंखा लालूप्रसाद यादव यांच्या हातावर पडल्यानंतर एक गोधळ उडाला होता. या वेळी लालू यादव यांनी व्यासपिठाची देखरेख करणार्‍यांबरोबर तेथे सुरक्षेसाठी असणार्‍या पोलिसांचीही चांगलीच खरडपट्टी काढली. या घटनेनंतर त्यांनी सभेला संबोधित केले.

सौदी अरेबियात हात तोडलेल्या भारतीय महिलेची मानसिक स्थिती ठीक नसल्याचा पोलिसांचा दावा

कुठे स्त्रीला देवी मानून तिचा आदर करणारी हिंदु संस्कृती, तर कुठे स्त्रीवर अत्याचार 
करून तिला अपमानीत करणारी इस्लामी संस्कृती !
     रियाध (सौदी अरेबिया) - भारतातून नोकरीसाठी सौदी अरेबिया देशात गेलेल्या ५५ वर्षीय कस्तुरी मणीरत्नम् या मोलकरणीने तिच्या मालकाच्या विरोधात पगार न दिल्याची, तसेच वाईट वर्तणूक दिल्याची तक्रार केली होती. ही तक्रार केल्याच्या रागातून मालकाने तिचा उजवा हात तोडला, असा आरोप या भारतीय महिलेने केला आहे. या घटनेची दखल केंद्रशासनाने घेऊन परराष्ट्र्रमंत्री श्रीमती सुषमा स्वराज यांनी सौदी अरेबिया शासनाला चोकशी करण्यास भाग पाडले होते. आता या प्रकरणास सौदी अरेबिया पोलिसांनी निराळेच वळण दिले आहे. या मोलकरणीची मानसिक स्थिती खराब असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे, तसेच ही मोलकरीण घरमालकाच्या घरातून पळून जातांना तिसर्‍या मजल्यावरून खाली पडल्याने तिचा हात मोडला, असे सांगितले आहे. कस्तुरी मणीरत्नम् या दोन मासांपूर्वी सौदी अरेबियात नोकरीनिमित्त आल्या होत्या. अशा अनेक जणी भारतातून सौदी अरेबियात मोलकरणीच्या नोकरीसाठी चांगल्या वेतनाच्या आमिषाने जातात; मात्र प्रत्यक्ष अनुभव वेगळाच येतो. त्यामुळे अशा निर्यातीवर बंदी घालण्याचा गंभीर विचार भारतीय शासन करत असल्याचे समजते.

देहलीतील आयआयटीत प्रश्‍नोत्तराच्या कार्यक्रमाचे आयोजन

फेसबूकचे संस्थापक झुकेरबर्ग साधणार भारतियांशी संवाद 
    वॉशिंग्टन - सामाजिक संकेतस्थळ फेसबूकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांचा येत्या २८ ऑक्टोबर या दिवशी देहली येथील आयआयटी (इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नालॉजी) च्या सभागृहात प्रश्‍नोत्तराचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात ते भारतीयांशी संवाद साधणार आहेत. या दौर्‍याविषयी झुकेरबर्ग म्हणाले, सामाजिक संकेतस्थळांवर भारतीय मोठ्या प्रमाणावर सक्रीय आहेत. त्यामुळे भारतीयांना भेटण्यासाठी मी उत्सुक आहे.

पूंछमध्ये शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त

आतंकवादाने पोखरलेला भारत !
     श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात १७ ऑक्टोबरला भारतीय सैनिक आणि पोलीस यांनी संयुक्तरित्या कारवाई करत मोठा आतंकवादी कट उधळून लावून शस्त्रास्त्रांचा साठा जप्त केला आहे. संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार पूंछ जिल्ह्यातील चपरीयान जंगल क्षेत्रात ही कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या शस्त्रसाठ्यामध्ये ८ बंदुका, ६ आयईडी स्फोटके आणि २० किलो आर्डीएक्स यांचा समावेश आहे. या परिसरात आतंकवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे. पूंछमध्ये सतत आतंकवादी कारवाया होत असतात. शस्त्रास्त्रांचा साठा पाहून युद्धासारखी परिस्थिती निर्माण करण्याचा आतंकवाद्यांचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. जप्त करण्यात आलेल्या साठ्यामध्ये दोन चिनी बनावटीच्या ग्रेनेडचाही समावेश आहे.

लोकशाहीच्या नावाखाली हिंदूंच्या श्रद्धांना धक्का लावल्याचा प्रकार सहन करणार नाही, असे आवाहन पंतप्रधानांनी करावे ! - पू. संभाजीराव भिडेगुरुजी

श्री दुर्गामाता दौडीचे स्वागत करतांना सनातनच्या साधिका सौ. अर्चना तांबडे
     सांगली, १७ ऑक्टोबर (वार्ता.) - लोकशाहीच्या नावाखाली हिंदूंच्या श्रद्धांना धक्का लावल्याचा प्रकार सहन करणार नाही. गोमाता, भारतमाता यांसह सर्व मातांच्या रक्षणासाठीच हिंदु समाज आहे, असे पंतप्रधानांनी सांगणे अपेक्षित आहे. आज प्रत्येक जण दादरी प्रकरणावरून आरडा-ओरडा करत आहेत; मात्र गायीला कापले जात असतांना कोणत्या हिंदूंना संताप येणारच, हे कुणीही का लक्षात घेत नाही. शिवछत्रपतींनी गायीला बळजोरीने नेणार्‍या कसायाचा हात छाटून त्याला धडा शिकवला होता, असे प्रतिपादन पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले. ते श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने आयोजित श्री दुर्गामाता दौडीच्या पाचव्या दिवशी धारकर्‍यांना मार्गदर्शन करतांना श्री दुर्गामाता मंदिरासमोर बोलत होते. या वेळी धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विक्रोळीत गॅस सिलेंडरच्या स्फोटात ८ घायाळ

      मुंबई - विक्रोळीत पार्कसाइट येथे १७ ऑक्टोबर या दिवशी सकाळी घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन ८ जण घायाळ झाले असून सर्व घायाळ व्यक्तींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुर्ला येथील सिटी किनारा या उपाहारगृहामध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन आठ जण ठार झाल्याची दुर्घटना काही घंट्यांपूर्वीच झाली होती.
     विक्रोळी येथे जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दोन बंब, तसेच जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीत फसलेल्या सर्वांना बाहेर काढतानाच आगीवर थोड्या वेळातच नियंत्रण मिळवले. त्यामुळे मोठी हानी टळली.

शासकीय कार्यालयातील कर्मचार्‍यांनी किमान अर्धा घंटा वाचन करण्याचा आदेश केवळ एक दिवस अगोदर दिला

योजनांची अंमलबजावणी परिणामकारकरीत्या होण्यासाठी
 आणि त्याचे पूर्वनियोजन नीट नको का ?
       पुणे - माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा वाढदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याचे धोरण ठरले होते. त्यानुसार शाळा आणि महाविद्यालय यांमधील विद्यार्थ्यांना १५ ऑक्टोबर या दिवशी अवांतर वाचन करण्यास प्रवृत्त करावे, असा आदेश शालेय शिक्षण आणि उच्चशिक्षण विभागाने काढला होता. या उपक्रमाची व्याप्ती वाढवण्यासाठी शासकीय कार्यालयातील कर्मचार्‍यांनीही किमान अर्धा घंटा वाचन करावे आणि पुस्तके भेट देण्याविषयी विविध कार्यक्रम आयोजित

भारतीय संघाला मैदानात पाय ठेवू देणार नाही ! - हार्दिक पटेल

      कर्णावती - राजकोट येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार्‍या तिसर्‍या एकदिवसीय सामन्याची विशेष तिकिटे पटेल समुदायाला देण्यात आलेली नाहीत. ही तिकिटे न मिळाल्यास भारतीय संघाला मैदानात पाय ठेवू देणार नाही, अशी चेतावणी हार्दिक पटेल यांनी दिली आहे. या सामन्यास मोठ्या प्रमाणात प्रेक्षकवर्ग उपस्थित रहाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी सुरक्षाव्यवस्थेत वाढ केली

कासारवाडी (पुणे) येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी वर्गातच फटाके उडवून वाढदिवस साजरा केला

    पिंपरी, १७ ऑक्टोबर - येथील कासारवाडी भागातील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक शाळेत इयत्ता १० वीच्या वर्गात शिकणार्‍या एका विद्यार्थ्याचा वाढदिवस त्याच्या मित्रांनी वर्गातच सुतळी बॉम्ब आणि अन्य फटाके फोडून साजरा केला. (विद्यार्थ्यांचे वर्गात फटाके फोडण्याचे धैर्य होतेच कसे ? याचा अर्थ विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापक यांचा काहीच धाकच नाही, असा होतो. - संपादक) हा अपप्रकार १६ ऑक्टोबर या दिवशी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकारामुळे वर्गात उपस्थित असणार्‍या १४ विद्यार्थिनी घाबरलेल्या स्थितीत आहेत. (योग्य संस्कारांच्या अभावी विद्यार्थ्यांकडून अशा अयोग्य कृती घडतात. चांगले संस्कार मिळण्यासाठी गुरुकुल शिक्षण पद्धतीद्वारे शिक्षण मिळणे आवश्यक ! - संपादक)

जेएन्पीटीच्या प्रवेशद्वारावर आता शिवराय-समर्थ भेटीचे शिल्पचित्र

     उरण - जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएन्पीटी)च्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदासस्वामी यांच्या भेटीवर आधारित शिल्पचित्र तयार करण्याचा निर्णय जेएनपीटी विश्‍वस्त मंडळाच्या बैठकीत नुकताच घेण्यात आला.
     सरकार नियुक्त विश्‍वस्त महेश बालदी यांच्या पुढाकाराने हा निर्णय झाला. हा प्रकल्प राबवण्याचे दायित्व बालदी यांच्यासह सुरेश हावरे आणि पीपीडी विभागाचे अधिकारी लोखंडे यांच्यावर सोपवण्यात आले आहे. डॉ. नानासाहेब प्रतिष्ठान, रेवदंडाचे सर्वेसर्वा डॉ. दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या संकल्पनेतून हे चित्र साकारले जाणार आहे. त्याच्याभोवती उद्यान आणि विद्युत रोषणाई असेल. या प्रकल्पाला आता प्रशासकीय आणि आर्थिक मान्यता देण्यात आली आहे. लवकरच शिल्प उभारण्याच्या कामाला आरंभ होणार आहे.

कोल्हापूर महापालिका निवडणुकीत भाजपचे आर्.डी. पाटील यांची याचिका फेटाळली !

       कोल्हापूर - भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक श्री. राम दादोबा उपाख्य आर्.डी. पाटील यांचा अर्ज छाननीत अवैध ठरवल्याने त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. या अर्जाची सुनावणी न्यायालयात करण्यात आली असून त्यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. या निकालावर श्री. पाटील हे सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. प्रभाग क्रमांक ३४ मधील भाजपचे उमेदवार श्री. आर्.डी. पाटील यांनी वेळेत नामनिर्देशन पत्रासमवेत इतर मतदारसंघातील मतदार असल्याचा पुरावा न जोडल्याने त्यांचा अर्ज अवैध

चिंचवड गाव (पुणे) येथील क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या स्मारकाचे काम रखडलेल्या स्थितीत

भाजप शासनाने राज्यातील क्रांतिवीरांची स्मारके लवकरात लवकर
पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावेत, ही अपेक्षा !
      चिंचवड - देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिवीर चापेकर बंधूंनी दिलेले बलीदान ही स्फूर्तिदायक घटना आहे. त्यांचे कायम स्मरण रहावे, यासाठी चिंचवड गावात भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय पिंपरी महानगरपालिकेने घेतला. त्या कामाचे भूमीपूजन २०१० मध्ये झाले आणि आता ४ वर्षांने चौथर्‍याचे भूमिपूजन करण्यात आले. आरंभापासून संथपणे चालू असलेले हे काम अजूनही रखडलेल्या अवस्थेत

पोर्न संकेतस्थळे शोधणार्‍या जगातील पहिल्या १० शहरांत भारतातील ६ शहरे !

विश्‍वगुरु असणार्‍या भारताची पाश्‍चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे झालेली 
दुःस्थिती पालटण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !
     पोर्न संकेतस्थळे शोधण्यात जगभरातील पहिल्या १० शहरांच्या सूचीत ६ शहरे भारतातील आहेत, अशी माहिती गूगल ट्रेण्डने प्रसिद्ध केली आहे. त्यात मुंबई आणि पुणे यांचाही समावेश आहे.

माहिती अधिकार अर्जावर परराष्ट्र मंत्रालयाचे सोयीस्कर मौन

देश स्वतंत्र होऊन ६८ वर्षे झाल्यानंतरही नेताजींसारख्या स्वातंत्र्यसेनानींची अवहेलना थांबत नसेल, तर 
हा देश खरंच स्वतंत्र झाला आहे का, अशी शंका जनतेने घेतल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !
नेताजींवर लागलेला युद्ध गुन्हेगार हा शिक्का हटवण्याचे प्रकरण
    दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जर्मनी आणि जपान यांच्याशी संपर्क साधून आझाद हिंद सेनेची स्थापना केली आणि त्याद्वारे भारतातील ब्रिटीश साम्राज्याशी सशस्त्र लढा दिला. त्यामुळे ब्रिटीश शासनाने त्यांना युद्ध गुन्हेगार म्हणून घोषित केले होते. राष्ट्रसंघाच्या कागदपत्रांमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा उल्लेख युद्ध गुन्हेगार असाच आहे. बेंंगळुरू येथील एक पत्रकार श्रीमती चूडामणी नागेंद्र यांनी परराष्ट्र व्यवहार खात्याकडे माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत अर्ज करून नेताजींवरील युद्ध गुन्हेगार हा शिक्का हटवण्याविषयी भारत शासनाने केेलेल्या प्रयत्नांविषयी माहिती विचारली. त्यांच्या माहिती अर्जावर परराष्ट्र व्यवहार खात्याच्या माहिती अधिकार्‍यांनी सोयीस्कर मौन पाळले आहे.

हिंदूंनो, मंदिर सरकारीकरणाचा परिणाम लक्षात घ्या !

खालील वृत्ते रविवारच्या वाचकांसाठी पुन्हा प्रसिद्ध करत आहोत. 
    संत नामदेवांचे समकालीन शिष्य, श्री रुक्मिणीमातेचे पुजारी आणि भक्त संत परिसा भागवत यांच्या वेळेपासून गेली ७०० वर्षे चालू असलेली चातुर्मासातील श्रीमद्भागवत प्रवचनाची श्री रुक्मिणी मंदिरातील परंपरा शासकीय मंदिर समितीने यंदा बंद केली.
मंदिर समितीने बंद पाडलेल्या अन्य प्रथा अन् परंपरा 
१. नवरात्रोत्सवात श्री रुक्मिणी मंदिरात गेल्या ११५ वर्षांपासून चालू असलेली संतकवी दासगणू महाराज यांची कीर्तन परंपरा, तसेच उत्पात मंडळाची भजन परंपरा
२. गोकुळाष्टमीच्या उत्सवात बडवे मंडळींची परंपरेने होणारी कीर्तने
३. सभामंडपातील हरिदासाचे कीर्तन, श्री रुक्मिणी मंदिराच्या वतीने निघणारी गौर विसर्जन मिरवणूक, गणेशोत्सव, होळीचा उत्सव 

श्री गणेशमूर्ती पुन्हा नदीमध्येच फेकल्याप्रकरणी शिवाजीनगर फौजदारी न्यायालयात तक्रार प्रविष्ट

हौदामध्ये विसर्जित केलेल्या श्री गणेशमूर्ती पुन्हा नदीत विसर्जन केल्याचे प्रकरण
      पुणे, १७ ऑक्टोबर - अनंत चतुर्दशीच्या दिवशी, म्हणजेच २७ सप्टेंबर या दिवशी अनेकांनी पुणे महानगरपालिकेने बनवलेल्या कृत्रिम हौदामध्ये श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केले होते. प्रत्यक्षात हौदामध्ये विसर्जित केलेल्या श्री गणेशमूर्ती महानगरपालिकेने २८ सप्टेंबरच्या रात्री उशिरा पुणे-मुंबई महामार्गावरील वाकड येथील पुलावरून मालवाहू डंपरमधून नदीमध्ये फेकल्या. याविषयीचे सविस्तर वृत्त पुणे मिरर या इंग्रजी वृत्तपत्रामध्ये आले होते.

धैर्य असेल, तर जय भवानी, जय शिवाजी घोषणेवर बंदी घालून दाखवाच ! - महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत चेतावणी

जिल्हाधिकारी एन् जयराम यांच्या वक्तव्याचा निषेध !
      बेळगाव, १७ ऑक्टोबर (वार्ता.) - धैर्य असेल, तर जय भवानी जय शिवाजी घोषणेवर बंदी घालून दाखवाच, अशी चेतावणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या १५ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या बैठकीत देण्यात आली. अन्य भाषांपेक्षा केवळ कन्नड भाषेलाच प्राधान्य द्या या जिल्हाधिकारी एन्. जयराम यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला.
      मराठा मंदिर येथे काळा दिन आणि इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक पार पडली. अध्यक्षस्थानी श्री. वसंतराव पाटील होते. कोणत्याही माणसांचे ऐकून मराठी भाषिकांच्या विरोधात आगपाखड करू नये. तसेच प्रशासनाने मराठी भाषिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. कळसा-भांडुरा महाजन अहवालाप्रमाणे महाराष्ट्रात आहे. त्यामुळे कळसा-भांडुरावर कर्नाटक न्यायालयाबाहेर महाराष्ट्र, गोवा शासनाशी चर्चा करणार आहे; मात्र अगोदर सीमाप्रश्‍नावर चर्चा करा, असा पवित्रा घ्यावा, अशी मागणीही बैठकीत करण्यात आली.

निलंबित पोलीस निरीक्षकाची नाशिकमध्ये आत्महत्या, तिघांच्या विरोधात गुन्हा नोंद

नाशिक - जळगावचे पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (शेतकर्‍यांच्या पाठोपाठ आता पोलीसही आत्महत्या करू लागले आहेत. याविषयी शासन ठोस पावले उचलेल का ? - संपादक) दोन पोलीस अधिकारी आणि वाळू व्यापारी यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सादरे यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये त्यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी पैसे आणण्यासाठी पुष्कळ मानसिक त्रास दिला होता, असे लिहिले आहे. (पोलीस दलातील भ्रष्टाचाराकडे गृहमंत्र्यांनी लक्ष देणे अपेक्षित आहे. - संपादक)

प्रशासनाने कारवाई न केल्यास पशूवधगृह बंद पाडू ! - विहिंपची चेतावणी

इचलकरंजी येथे प्रशासन आणि पोलीस यांच्याकडून अनधिकृत पशूवधगृह पाडण्यास टाळाटाळ !
      इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर), १७ ऑक्टोबर (वार्ता.) - शहरातील मॉडर्न हायस्कूलच्या शेजारी अनधिकृतपणे विनापरवाना पशूवधगृह चालू आहे. ते बंद करावे, यासाठी विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने अनेकदा निवेदने देण्यात आली; मात्र प्रशासन आणि पोलीस यांनी पशूवधगृह पाडण्यास टाळाटाळ करून ते चालवणार्‍यांना पाठीशी घातले आहे. त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अन्यथा विहिंप आणि बजरंग दल यांच्या वतीने पशूवधगृह बंद पाडण्यात येईल, अशी चेतावणी विहिंपने प्रांताधिकारी अश्‍विनी जिरंगे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिली आहे.
     पुणे, १७ ऑक्टोबर - गंभीर चोरीच्या गुन्ह्यातील पसार झालेल्या मानु इराणी या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या हडपसर पोलिसांच्या पथकावरच चोरट्याने आणि त्याच्या नातेवाइकांनी दगडफेक केली. ही घटना येथील खडकी भागातील इराणी वस्तीत १५ ऑक्टोबरच्या रात्री १०.३० वाजता घडली.
     या दगडफेकीत हडपसर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक बाळासाहेब सकटे आणि शिपाई मुंढे यांच्यासह ५ पोलीस कर्मचारी घायाळ झाले आहेत. या प्रकरणी मानु इराणी, सिदा मानवली ईराणी यांच्यासह ७ जणांविरुद्ध खडकी पोलीस ठाण्यात गुन्हे प्रविष्ट करण्यात आले आहेत.

पुणे महानगरपालिकेच्या शाळांतील शिक्षकांना भ्रमणभाष वापरावर बंदीचा आदेश

      पुणे - महानगरपालिकेच्या शाळांमधील शिक्षक शाळेत शिकवत असतांना भ्रमणभाषचा सर्रास वापर करत असल्याने पालकांनी त्याविषयी तक्रारी केल्या होत्या, तसेच उपमहापौर आबा बागुल यांनी शिक्षण आयुक्त आणि शिक्षण मंडळ यांना पत्र लिहून भ्रमणभाष वापरावर बंदी आणण्याविषयी पत्र लिहिले होते. (शिक्षण मंडळाच्या प्रशासनाने पालकांच्या तक्रारीनंतर तात्काळ असा निर्णय का घेतला नाही ?- संपादक) त्यानंतर प्रशासनाकडून या प्रकाराची दखल घेण्यात आली असून शिक्षकांना शाळेत भ्रमणभाष

शिवसैनिकांनो, राष्ट्रभक्तीचा निखारा (अंगार) असाच पेटता ठेवा ! - खासदार श्री. संजय राऊत, संपादक, सामना

     पाकचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद महमूद कसुरी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करायला निघालेले ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी त्यांच्यावरील आक्रमणासाठी शिवसैनिकांना उत्तरदायी धरत असतील, तर माझे शिवसैनिकांना एवढेच सांगणे आहे की, त्यांनी राष्ट्रभक्तीचा निखारा (अंगार) असाच पेटता ठेवला पाहिजे. हीच शिवसेनेची रग आहे. ही अतिशय सौम्य, सनदशीर आणि लोकशाहीवादी प्रतिक्रिया आहे. हे धैर्य केवळ शिवसैनिकांतच आहे आणि असे पौरुषत्वाचे काम तेच करू शकतात.

बेळगाव येथे शासकीय कार्यालयांतील कामकाज कन्नड भाषेत करण्याचा फतवा !

मराठीद्रोही निर्णय घेणारे जिल्हाधिकारी प्रशासन काय चालवणार ?
जिल्हाधिकार्‍यांकडून उच्च न्यायालयाचा आदेश धाब्यावर !
      बेळगाव, १७ ऑक्टोबर (वार्ता.) - शासकीय कार्यालयांतील कामकाज कन्नड भाषेत करण्याचा आदेश काढून कागदपत्रांवर बेळगावी असा उल्लेख करण्याचा फतवा जिल्हाधिकार्‍यांनी काढला आहे. यामुळे महापालिकेच्या कौन्सिल विभागाने असे रबरी शिक्के करण्याचे काम हाती घेतले आहे; मात्र इतिवृत्त केवळ कन्नड भाषेमध्येच सिद्ध करण्याचा कोणताच लेखी आदेश दिला नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. (उच्च न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवणार्‍या जिल्हाधिकार्‍यांवर शासन कारवाई करणार का ? केवळ कन्नड भाषेचा आग्रह धरणार्‍या शासकीय अधिकार्‍यांविरुद्ध मराठीप्रेमी संघटित झाल्यास नवल ते काय ! - संपादक)

शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार

     मुंबई - शिवसेनेचा यंदाचा सुवर्णमहोत्सवी दसरा मेळावा शांतता क्षेत्र असलेल्या शिवाजी पार्कवर घेण्यास १६ ऑक्टोबर या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त अनुमती दिली. कार्यकर्त्यांनी अतिउत्साह टाळावा, तसेच ध्वनीप्रदूषणाशी संबंधित २०१३ मधील न्यायालयाच्या आदेशांचे पालन करावे, असे आदेशही न्यायालयाने दिले.
     राज्यशासन आणि शिवसेनेचे विभागप्रमुख अनिल परब यांनी केलेल्या दोन स्वतंत्र अर्जांत दसर्‍याला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास अनुमती देण्याची मागणी केली होती. स्थानिक रहिवाशांच्या वीकॉम ट्रस्ट आणि आवाज फाउंडेशनने या अर्जांना विरोध केला होता. मनसेचे महापालिकेतील गटनेते संदीप देशपांडे यांनीही मेळाव्याच्या अर्जांना विरोध केला.

कोथरूड (पुणे) येथील एका शाळेतील शिक्षकाकडून विद्यार्थिनींना अमानुष मारहाण

    पुणे, १७ ऑक्टोबर - शाळेत दिलेला गृहपाठ केला नाही आणि पुस्तक घरी विसरले, या कारणामुळे एका शिक्षकाने इयत्ता ६ वीतील १० ते १५ विद्यार्थ्यांनींना हातावर सूज आणि वळ येईपर्यंत छडीने मारल्याची घटना घडली. त्यातच पुस्तके घरी विसरलात, तर पुन्हा छडीने चोप दिला जाईल, अशी धमकी या शिक्षकाने विद्यार्थिनींना दिली आहे. (विद्यार्थिनींना असे अमानुषपणे मारहाण करणारे आणि धमकी देणारे शिक्षक विद्यार्थ्यांवर संस्कार काय करणार ? - संपादक) येथील कोथरूड भागातील पी. जोग शाळेमध्ये १६ ऑक्टोबर या दिवशी ही घटना घडली आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
     Taslima Nasreen ne kaha, Bharatke adhiktar secular Hinduvirodhi aur musalman samarthak hai. espar tathakathit secular kya kahenge ?

जागो !
तस्लीमा नसरीन ने कहा, भारत के अधिकतर सेक्युलर हिन्दूविरोधी और मुसलमान समर्थक हैं !
इसपर तथाकथित सेक्युलर क्या कहेंेंगे ?

फलक प्रसिद्धीकरता

जे तस्लीमा नसरीन यांना कळते, ते प्रसारमाध्यमांना का कळत नाही ?
     भारतातील बहुतांश निधर्मी लोक हे हिंदुविरोधी आणि मुसलमान समर्थक असतात. ते कडवट हिंदूंच्या कामावर टीका करतात; मात्र कडवट मुसलमानांना पाठीशी घालतात,

चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिलपासून मद्यबंदी

     मुंबई - राज्य शासनाने चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिलपासून मद्यबंदी लागू केली आहे. या निर्णयाला आव्हान देणारी याचिका चंद्रपूर जिल्हा लिकर असोसिएशनने नागपूर खंडपीठासमोर सादर केली होती. या याचिकेवर निर्णय देतांना सर्वोच्च न्यायालयाने मद्यबंदीच्या निर्णयास स्थगिती देण्यास नकार दिला. तसेच धोरणात्मक हस्तक्षेप करण्यास नकार दिला. त्यामुळे मद्यबंदीचा निर्णय लागू होणार आहे.
     त्यासोबतच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चंद्रपूर मद्यविक्रेत्या संघटनेच्या याचिकेवर एका महिन्यात निर्णय घ्यावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
     मद्यनिर्मिती कारखानदारांना विचारात न घेता दारूबंदी लागू केली असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला होता.
     आव्हान देणारी याचिका चंद्रपूर जिल्हा लिकर असोसिएशनने नागपूर खंडपीठासमोर सादर केली होती. या याचिकेवर निर्णय देतांना सर्वोच्च न्यायालयाने मद्यबंदीच्या निर्णयास स्थगिती देण्यास नकार दिला. तसेच धोरणात्मक हस्तक्षेप करण्यास नकार दिला. त्यामुळे मद्यबंदीचा निर्णय लागू होणार आहे.

सर्वत्र घडणार्‍या अत्याचारांकडे डोळेझाक करून केवळ सनातन संस्थेवर आगपाखड होत असल्याने व्यथित झालेल्या बालसाधिकेने मार्मिकपणे आणि निर्भयपणे विचारलेले प्रश्‍न

कु. मानसी प्रभु
१. पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी 
१ अ. गोहत्या करणारे, तसेच सनातन संस्थेवर आक्रमणे करणारे यांना मोकळीक का ? : धर्मांध गोमातेला कापून गोमांस विकतात किंवा गायीचे अर्धे मस्तक कापून तिला उलटे लटकवतात. हे कोणालाच दिसत नाही. असे करणार्‍यांवर कोणती कारवाईसुद्धा केली जात नाही. पोलीस या सर्व प्रकारांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. याचा अर्थ इतरांना काय हवे ते करण्याची मोकळीक आहे का ? सनातन संस्थेने धर्मप्रसार केला, हिंदु धर्मजागृती सभा घेतल्या, हिंदूंना धर्माचरण शिकवले, तर अनेकांना राग येऊन सनातनवर आक्रमणे केली जातात. हे सर्व घडूनही हिंदू गप्पच रहातात आणि पोलीस बघ्याची भूमिका घेतात.

धर्मद्रोह्यांनो, सनातन प्रभात सनदशीर मार्गाने निषेध करायला शिकवते, हे लक्षात घ्या !

अधिवक्ता
श्री. योगेश जलतारे
१. सनातनवर केले जाणारे आरोप अत्यंत हास्यास्पद असून सनातन 
सनदशीर मार्गाने अन्यायाचा प्रतिकार करायला शिकवते !
     मागील एक मासापासून सनातन प्रभात या नियतकालिकावर सनातन प्रभातची विचारसरणी विखारी आहे. सनातन प्रभात समाजात विद्वेष पसरवते. युवकांना भडकवते, त्यांचा ब्रेनवॉश करते, असे नानाविध आरोप पुरोगाम्यांकडून केले जात आहेत. हे आरोप अत्यंत हास्यास्पद आहेत; कारण सनातन प्रभात मागील १५ वर्षांपासून नियोजित धोरणांनुसारच प्रसिद्ध केले जात आहे आणि पुरोगाम्यांच्या हत्या या एक किंवा दोन वर्षांतील आहेत. सनातन प्रभात वाचून जर कोणी हत्या करू लागला, तर तो १२ - १३ वर्षे वाट का पहात राहील ? याउलट कर्नाटकमधील एक धर्माभिमानी म्हणाले, सनातनमुळेच आम्ही सनदशीर मार्गाने निषेध करायला शिकलो. आधी धर्माविरुद्ध काही झाले, तर आम्ही मारझोड करणे, शिवीगाळ करणे अशा माध्यमांतून निषेध करायचो.

साधू-संतांना मारहाण करणारे पोलीस आणि त्याकडे दुर्लक्ष करणारी धर्मद्रोही प्रसारमाध्यमे !

१. हिंदूूंच्या सहिष्णू वृत्तीचा लाभ घेत त्यांना घायाळ करणारे पोलीस 
     अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या गणेशमूर्तींचे गंगा नदीत विसर्जन करू नये, या निर्णयाच्या विरोधात २२ सप्टेंबर २०१५ या दिवशी गंगेमध्ये मूर्तीविसर्जन करू द्यावे, या न्याय्य मागणीसाठी हिंदू शांततेने आंदोलन करत असतांना पोलिसांनी हिंदूंवर लाठीमार केला. उत्तरप्रदेशचे पोलीस उच्च न्यायालयाच्या कोणत्याही निर्णयावर सहसा तत्परतेने कार्यवाही करतांना दिसत नाहीत; परंतु हे प्रकरण हिंदूंविषयी असल्याने त्यांना चेव आला होता. या लाठीमारात त्यांनी द्वारकापिठाधीश्‍वर शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी यांचे शिष्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद यांनाही मारहाण केली. या प्रकरणात माझी हत्या घडवून आणण्याचा पोलिसांचा डाव होता, असा गंभीर आरोप स्वामींनी स्वतः केला आहे. पोलिसांनी काही साधूंनाही फरफटत नेले. यांत अनेक हिंदू घायाळ झाले. अशा हिंदुद्रोही पोलिसांचा निषेध करावा, तेवढा थोडाच आहे.

सप्टेंबर २०१५ मासातील हिंदूंवरील आघात !

धर्मांधांचे हिंदूंवरील अत्याचार !
सप्टेंबर १ : रासई, लोटली, गोवा येथे भाड्याने रहाणार्‍या मूळ आसाम येथील जैरुल इस्लाम, खैरुल इस्लाम आणि रब्बुल इस्लाम या कामगारांनी शेजारी रहाणार्‍या ११ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण केलेे.
सप्टेंबर ३ : आग्रा येथून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या शमशाबाद भागात आकाश गुप्ता याने व्हॉट्स अ‍ॅप वरून महंमद पैगंबर यांच्यावर कथिक टिप्पणी केल्यावरून धर्मांधांनी त्याला भर रस्त्यात फाशी देण्याचा प्रयत्न केला.
सप्टेंबर ७ : मेरठ (उत्तरप्रदेश) येथील हंडिया भागातील बडा बाजारमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्त देखावा सिद्ध करणार्‍या हिंदूंना पोलीस अधिकारी राहुल कुमार यांच्या समक्ष इरशाद, माजिद, सन्नी, माजी आमदार अजमल कमाल, पपल आदी धर्मांधांनी मारहाण केली, तसेच देखावा लावण्यासाठी ठेवण्यात आलेले पटल आणि आसंद्या यांची नासधूस केली. तसेच मारहाण करणार्‍यांनी या वेळी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणाही दिल्या.

बालबुद्धीलाही जे समजते, ते बुद्धीवादी म्हणवणार्‍या पुरोगाम्यांना का कळत नाही ?

कु. रमणी गडकरी हिने वर्ष २००३ मध्ये
रेखाटलेले चित्र
    कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी संशयित म्हणून सनातनच्या एका साधकाला पोलिसांनी चौकशीसाठी कह्यात घेतल्यानंतर स्वतःला पुरोगामी म्हणवणार्‍या अधोगाम्यांनी सनातनवर बंदी घालण्याची आततायी मागणी वारंवार केली. वृत्तवाहिन्या आणि वर्तमानपत्रे यांतून प्रतिदिन सनातनवर वेगवेगळे आरोप करणार्‍या बातम्या प्रसारित होऊ लागल्या. सनातनच्या आध्यात्मिक कार्याने भारावून जाऊन सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधना करणार्‍या साधिकांच्या संदर्भात सनातन संस्थेमध्ये मुलींना संमोहित केले जाते, असाही एक आरोप होऊ लागला. या पार्श्‍वभूमीवर हे चित्र प्रसिद्ध करत आहोत. साधिका संमोहनामुळे नाही, तर नामजपामुळे देवाप्रती श्रद्धा वाढल्यामुळे सेवा करत आहे. देवावरील श्रद्धेमुळेच ती विरोधकाला निर्भयतेने उत्तरही देऊ शकते, हे यातून दर्शवायचे आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे पोलिसांचा वाढता ससेमिरा !

राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांची वारंवार तीच तीच चौकशी करून त्यांचा अमूल्य वेळ घालवण्यापेक्षा 
आतंकवाद्यांच्या शोधार्थ पोलिसांनी वेळ दिला असता, तर एव्हाना देश आतंकवादमुक्त झाला असता !
    एका शहरातील हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्याची एका पोलीस हवालदाराने नुकतीच चौकशी केली. त्या वेळी झालेले संभाषण येथे देत आहोत.
पोलीस हवालदार : मला आपल्याला भेटायचे आहे. येताय का ? 
कार्यकर्ता : ठीक आहे. 
पोलीस : तुमच्याकडून काही माहिती हवी आहे. माझ्याकडे तालुक्याचे दायित्व आहे.
कार्यकर्ता : तुमच्याकडे ओळखपत्र आहे का ? (हवालदाराने आपले ओळखपत्र दाखवले.) तुम्ही माझ्याकडून माहिती विचारून का घेत आहात ? कारण ४ - ५ दिवसांपूर्वी शहर पोलीस ठाण्यातून गोपनीय विभागाच्या अधिकार्‍यांनी माझी माहिती घेतली होती.

एका रुग्णालयातील रुग्णांना त्रासदायक ठरणारा मोकाट प्राण्यांचा सुळसुळाट !

    एका शहरातील एका रुग्णालयाच्या परिसरात आणि रुग्णालयात काही कुत्री मोकाट फिरतांना दिसतात. १४.६.२०१५ या दिवशी मी एका शस्त्रकर्मासाठी रुग्णालयात भरती झालो होतो. दुसर्‍या दिवशी मला एका कक्षामधून दुसरीकडे चाकांच्या आसंदीवरून नेत होते. त्या वेळी वाटेत दोन कुत्री बसली होती. सुदैवाने कुत्र्यांनी आम्हाला बघून आमची जाण्याची वाट मोकळी करून दिली. काही कुत्री एका कडेला झोपली होती. रुग्णालयात भरती असतांना मध्यरात्री मला मोठे उंदीर फिरतांना दिसले. एकदा कार्डिओलॉजीच्या वातानुकूलित विभागात एक कोंबडी २ घंटे फिरत होती.
हे वेळीच न रोखल्यास रुग्णाला अन्य प्राण्यांमुळे येणार्‍या अडचणींना प्रथम सामोरे जावे लागून त्यानंतर स्वतःला झालेल्या आजाराच्या औषधोपचाराकडे लक्ष द्यावे लागेल. - श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.६.२०१५)
(वाचकांनो, आपल्याला असे कुठे आढळून आल्यास उत्तरदायींकडे तक्रार करा आणि त्याची एक प्रत सनातन प्रभातला पाठवा. - संपादक)

स्वतःला पुरोगामी म्हणवणारी प्रसारमाध्यमे हे करतील का ?

१. सनातन प्रभातमधील लिखाणाचे खंडण करून दाखवा ! : हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी कटिबद्ध असलेल्या सनातन प्रभातमधील लेखांना काही प्रसारमाध्यमे प्रक्षोभक म्हणत आहेत. प्रतिदिन हिंदूंमधील हिंदुत्व जागवणार्‍या तत्त्वनिष्ठ सनातन प्रभातमधील धर्म आणि राष्ट्र यांविषयीच्या कोणत्याही लेखाचे किंवा अन्य लिखाणाचे या प्रसारमाध्यमांनी खंडण करून दाखवावे. 
२. सनातनचे निर्दोषत्व सिद्ध झाल्यावर ते वृत्त दाखवणार का ? : कॉ. पानसरे प्रकरणातही काळानुसार सनातनचे निर्दोषत्व समाजासमोर येईलच. तेव्हा मात्र ही सर्व प्रसारमाध्यमे मूग गिळून बसतील; कारण यापूर्वी प्रकारच्या विविध प्रकरणांत सनातनला न्यायालयाने निर्दोष ठरवूनही कोणत्याही प्रसारमाध्यमांनी हे वृत्त जनतेसमोर चर्चेच्या माध्यमातून आणण्याचे कष्ट घेतले नाही. यालाच म्हणतात पीतपत्रकारिता !
- श्री. विक्रम डोंगरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

सनातनवर बंदीची भाषा केली, तर उलट देशातील हिंदू अधिकाधिक संघटित होतील ! - सुनील घनवट, महाराष्ट्र संघटक, हिंदु जनजागृती समिती

    जसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळी मोगलांना संताजी-धनाजी दिसायचे, तसे तथाकथित पुरोगाम्यांना सतत सनातनवर बंदी घालण्याचे स्वप्न पडते. बंदी घालायची, तर अवश्य घाला; पण कुणावर ? तर १५ मिनिटांत देशातील हिंदूंना संपवण्याची भाषा करणारे ओवैसी आणि त्यांच्या पक्षावर ! केरळमध्ये संघाच्या २५० कार्यकर्त्यांची हत्या करणार्‍या साम्यवादी पक्षावर ! आज सहस्रो शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्याला उत्तरदायी असणार्‍या काँग्रेसवर ! आज शेकडो संस्थांना धर्मशिक्षण देण्याचे कार्य सनातन संस्था करत आहे. 
      सनातनवर बंदीची घालण्याची भाषा केली, तर ती कदापि सहन केली जाणार नाहीच, उलट त्या निमित्ताने देशातील अधिकाधिक हिंदू संघटित होतील !

सनातन आश्रम पाहिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

आश्रमातील वातावरण अत्यंत आनंददायी असून तो अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने चालतो !
     आश्रम पाहून आनंद वाटला. हिंदु समाजाच्या जागृतीसाठी अत्यंत सुरेख आणि नियोजनबद्ध आश्रम बांधलेला आहे. आश्रमामधील कारभार अत्यंत नियोजित पद्धतीने चालतो. सर्व साधकांना अतिशय शिस्त आहे. आश्रमातील वातावरण अत्यंत आनंददायी आहे. पुढील वेळी येतांना आश्रमात सेवा करण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षा ठेवतो. - अधिवक्ता उत्तम शिवाजीराव कदम, लासलगाव, ता. निफाड, जि. नाशिक. (१४.६.२०१५)              

सर्वोच्च न्यायालयात अधिवक्त्यांच्या ज्ञानाचा विचार न करता फेस व्हॅल्यू या एकमेव निकषावर निकाल दिला जाणे, हा न्याय नसून अन्याय !

   सर्वोच्च न्यायालयात वकिली व्यवसाय करणार्‍या माझ्या परिचयातील एका तरुण हिंदुत्ववादी अधिवक्त्याने माझ्या सांगण्यावरून सर्वोच्च न्यायालयात अन्याय झालेल्या एका हिंदुत्ववाद्याची याचिका प्रविष्ट केली. ती याचिका पुढील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयापुढे अंतिम सुनावणीसाठी येणार असल्याचे त्या अधिवक्त्यांनी मला भ्रमणभाषवर कळवले. त्या वेळी आमच्यात पुढील संभाषण झाले.
१. तरुण अधिवक्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणीसाठी स्वतःच्या वडिलांना बोलवणे
मी : याचिका पुढील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणीसाठी येणार, तर तुम्ही स्वतः हिंदुत्ववादी याचिकाकर्त्यासाठी युक्तीवाद करणार ना ?
अधिवक्ता : मी स्वतः युक्तीवाद करणार नाही.
मी : अहो, आपण याचिकाकर्त्या हिंदुत्ववाद्याला विनामूल्य सेवा म्हणून ही याचिका प्रविष्ट करून न्याय मिळवून देईन, असे वचन दिले आहे. त्याचे काय ?
अधिवक्ता : होय. मी तसे वचन दिले आहे आणि मी ते पूर्ण करणार आहे.

जगात एकाही देशाने शत्रूराष्ट्राच्या नेत्याच्या एखाद्या समारंभाला अनुमतीच दिली नसती !

     पाकचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद महमूद कसुरी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करायला निघालेले ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी यांना १२ ऑक्टोबर २०१५ या दिवशी काळ्या शाईने अंघोळ घालून राष्ट्रप्रेमींनी त्यांचा निषेध नोंदवला.
     पानसरे कोण होते ? १९६५ च्या युद्धात त्यांनी चीनचे समर्थन केले आणि ते पडीक जमीन चीनला द्यायला सांगत होते. अशा चीनच्या समर्थकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल व्हायला हवे होते. - ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज जळकेकर, जि. जळगाव

कर्नाटकातील मुडबिदरे येथे बजरंग दल कार्यकर्त्याची निर्घृण हत्या !

    मुसलमान व्यक्तीची हत्या झाल्यावर आकाश पाताळ एक करणारे धर्मनिरपेक्षतावादी, राजकीय नेते, पुरोगामी आणि प्रसारमाध्यमे हिंदु नेत्यांच्या हत्या होत असतांना ब्रही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

भारतियांनो, उच्च सांस्कृतिक मूल्ये असलेल्या भारताचे अधःपतन होण्यास उत्तरदायी कोण ?

     वास्तविक १९५० मध्ये भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनले, तेव्हा प्रगत राष्ट्र बनण्यास अनुकूल असे अनेक मुद्दे होते. पाच सहस्र वर्षांच्या संस्कृतीची परंपरा होती. सार्‍या मानवतेला मार्गदर्शक ठरणारे स्वामी विवेकानंद आणि रवींद्रनाथ टागोर यांच्यासारखे नैतिक गुरु लाभले होते. गोपाळकृष्ण गोखले आणि लोकमान्य टिळक यांनी सांगितलेली उच्च नैतिक मूल्ये मार्गदर्शक होती; पण आजच्या नेत्यांमध्ये नैतिकता राहिलेली नाही. राजकीय स्वार्थासाठी ते देशाच्या भवितव्याचीही काळजी करत नाहीत. संसदेत आपले प्रतिनिधी ज्या पद्धतीने वागतात, ती वागणूक संपूर्ण देशाला लाजेने मान खाली घालायला लावणारी असते. तेथे मेंदूच्या नाही, तर शारीरिक शक्तीच्या जोरावर मुद्दे मांडले जातात. मेेंदूच्या वापराची त्यांना आवश्यकता वाटत नाही. कसे वागावे, बोलावे हे आता शिकवावे लागते. 
- प्रसिद्ध घटनातज्ञ नानी पालखीवाला (वर्ष २००७)

एक साधा ग्रामस्थ करत असलेल्या सनातनच्या विरोधकाचे वृत्त तात्काळ प्रसारित करणार्‍या राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी बांदोडा पंचायतीच्या पंच सदस्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचे वृत्त दाखवले नाही. यातून त्यांचा सनातनद्वेष जाणा !

    सनातनला अपकीर्त करण्यासाठी नाहक चिखलफेक करणार्‍यांच्या भूलथापांना स्थानिकांनी बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा पंचायत सदस्य आणि बांदोडा ग्रामपंचायतीचे पंचसदस्य यांनी ७ ऑक्टोबर २०१५ या दिवशी बांदोडा येथील पत्रकार परिषदेत केले.

चूक आणि सुधारणा

     ३ सप्टेंबर २०१५ या दिवशी पृष्ठ ६ वरील राजस्थान येथील संत प.पू. श्रीराम महाराज....प.पू. दास महाराजांना लागलेली तळमळ ! या प्रसिद्ध करण्यात आलेल्या लेखातील मथळ्यात राजस्थान येथील संत प.पू. श्रीराम महाराज ऐवजी मध्यप्रदेश मधील सद्गुरु श्री श्रीराम महाराज .., असे वाचावे, तसेच याच लेखातील १अ. सूत्रामध्ये १२.१२.२०१४ या दिवशी नांदोडा, तालुका फोंडा, जिल्हा सिंधुदुर्ग येथील एक जुने साधक श्री. प्रकाश जोशी हे पानवळ, बांदा येथील गौतमारण्य आश्रमात आणि श्रीराम मंदिरात आले. ते प.पू. श्रीराम महाराज (राजस्थान) यांनी दिलेली नामजपाची १०८० मण्यांची माळ मला देण्यासाठी आले होते. या ऐवजी १२.१२.२०१४ या दिवशी नाधवडे, तालुका वैभववाडी, जिल्हा सिंधुदुर्ग येथील एक जुने साधक श्री. प्रकाश जोशी हे पानवळ, बांदा येथील गौतमारण्य आश्रमात आणि श्रीराम मंदिरात आले. ते ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य सद्गुरु श्री श्रीराम महाराज (सद्गुरु श्री श्रीराम महाराज संस्थान, नावघाट, खेडी, बडवाह, मध्यप्रदेश, नर्मदा उत्तरतट) यांनी दिलेली नामजपाची १०८० मण्यांची माळ मला देण्यासाठी आले होते, असे वाचावे. या चुकीसाठी क्षमस्व ! याला उत्तरदायी असलेले कार्यकर्ते प्रायश्‍चित्त घेत आहेत. - संपादक

माणसातील पशूचे उन्नयन करून त्याला देव करणे, हेच भारतभूमीचे ध्येय आहेे !

    या राष्ट्राच्या जीवनातील असंख्य दैदिप्यमान शतकांपुढे मी आश्‍चर्यचकीत होऊन उभा आहे. मधून-मधून या शृंखलेत काही काळे पट्टे दिसतात; पण या काळ्या पट्ट्यांनी त्यांना अधिकच उठावदारपणा दिला आहे आणि या पार्श्‍वभूमीवर माझी मातृभूमी आपली दमदार पावले टाकीत चालली आहे. तिला तिचे दिव्य भवितव्य पूर्ण करायचे आहे. हे तिचे कतर्र्व्य करतांना तिच्यात कोणीही आडकाठी आणू शकणार नाही. तिचे भवितव्य एकच आहे. माणसातील पशूचे उन्नयन करणे, त्याला देव करणे. - स्वामी विवेकानंद (श्री. राजाभाऊ जोशी, मासिक लोकजागर, दिवाळी विशेषांक २००८) 

बांगलादेशात हिंदूंचा वंशविच्छेद होत असतांना त्याविषयी भारतातील निधर्मी राज्यकर्ते आणि मानवाधिकार संघटना ब्रही काढत नाहीत !

    बांगलादेशात जानेवारी २०१४ मध्ये नातोरे जिल्ह्यातील बागदोम मंडलपाडा येथे वास्तव्य करणार्‍या एका हिंदु शेतकर्‍यावर धर्मांधांनी आक्रमण करून हत्या केली. आक्रमणकर्त्यांनी या शेतकर्‍याची पत्नी आणि इतर नातेवाईक यांनाही गंभीर घायाळ केले होते. दुसर्‍या एका घटनेत धर्मांधांनी दोन मंदिरांना आग लावण्याचा प्रयत्न केला होता.

हिंदूंनो, धर्मांधांकडून मार खाण्यापेक्षा धर्मांधांना धडकी भरेल, असे संघटन उभारा !

     श्रीरामनवमीच्या निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे वर्ष २०१४ मध्येही भाग्यनगर (हैद्राबाद) येथे प्रखर हिंदुत्ववादी आणि भाजपचे आमदार श्री. टी. राजासिंह लोध यांनी आयोजित केलेल्या मिरवणुकीत अडीच लाख हिंदूंनी सहभाग घेतला. जय श्रीरामच्या गजरात जुने भाग्यनगरातील ढुलपेट ते हनुमान व्यायामशाळेपर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली. या वेळी मिरवणुकीच्या मार्गातील मशीद मुसलमानांकडून झाकण्यात आली होती.

हिंदूंनी स्वत:चे रक्षण स्वत:च करायला शिकले पाहिजे !

     अकबरुद्दीन ओवैसी यांच्यासारखे १५ मिनिटांत १०० कोटी हिंदूंना संपवण्याची भाषा करतात; मात्र याविरोधात कुणीही ब्र काढत नाही. हिंदूंनी आक्रमणाचा प्रतिकार केला, तर त्याला जातीय तेढ म्हणतात आणि त्यांचे रक्षण करण्यासाठी कोणतेही राजकारणी किंवा पोलीस धावून येत नाहीत. त्यामुळे आपले रक्षण आपणच करायला शिकले पाहिजे.- श्री. प्रमोद मुतालिक, अध्यक्ष, श्रीराम सेना.

वर्षभरात ७२ दिवस भावनेपोटी निरर्थक दिन संस्कृती जोपासणारा भारत !

पू. अशोक पात्रीकर
१. भारतात वर्षातील २० टक्के दिवस विविध दिन म्हणून साजरे होत असणे
    सनातन पंचांगांची सेवा करतांना अन्य दिनदर्शिकांमधील संदभर्र् पडताळत होतो. तेव्हा प्रत्येक मासात कोणते तरी दिन असल्याचे लक्षात येत होते. प्रत्यक्ष संख्या मोजल्यावर एका वर्षात, म्हणजे ३६५ दिवसांपैकी ७२ दिनांकांना विविध दिन (डे) साजरे केले जातात. हे प्रमाण २० टक्के आहे.
    मदर्स डे, फादर्स डे, व्हॅलेंटाईन डे, टीचर्स डे हे डे या इंग्रजी शब्दांनी ओळखले जातात आणि हुतात्मादिन, स्वच्छतादिन, शांतीदिन आदी डेना दिन असे संबोधले जाते; पण शेवटी ही डे संस्कृतीच झाली !
 २. एखाद्या दिवसाचेे महत्त्व त्या दिवसापुरता काही तरी उपक्रम हे असणे
    कोणताही दिन म्हटला की, त्या दिवसापुरता काही तरी उपक्रम असा अर्थ अभिप्रेत असतो, उदा. महाराष्ट्रदिन म्हणजे ज्या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, तो दिवस आदी.

निरपराध सनातन संस्थेचे एका साधिकेने अनुभवलेले वास्तव !

वैद्या (कु.) माया पाटील
     ४ ऑक्टोबर २०१५ च्या रात्री झी २४ तास या वाहिनीवर सनातनचे वास्तव या शीर्षकाखाली काही मिनिटांची एक चित्रफीत दाखवण्यात आली. यामध्ये सर्व विषय नेहमीचेच होता. सनातनने कुठे कुठे बॉम्बस्फोट केले ?, कुणाला अटक झाली ? कॉ. पानसरे आणि डॉ. दाभोलकर यांच्या हत्याकांडामध्ये सनातनचा हात असण्याची शक्यता आहे, त्यामुळे सनातन संस्थेवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी सर्वत्र होत आहे. इत्यादी इत्यादी. सनातनवर गेल्या ६ वर्षांपासून सातत्याने तथ्यहीन आरोप होत आहेत; मात्र सनातन संस्था खंबीरपणे सर्व आरोपांचे खंडण करून राष्ट्र आणि धर्म रक्षणाचे आपले कार्य जोमाने करत आहे !
     हा कार्यक्रम पाहिल्यानंतर सनातनचे मी अनुभवलेले वास्तव डोळ्यांसमोर आले आणि या लेखाच्या माध्यमातून ते मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे.

नामजप श्‍वासाला जोडण्याचा प्रयत्न केल्यावर टप्प्याटप्प्याने एकेक चक्र जागृत होऊन निर्विचार अवस्थेची साधकाला आलेली अनुभूती

आधुनिक वैद्य प्रवीण मेहता
    नामजपासंदर्भात सांगितलेली तात्त्विक माहिती कठोर साधना करून अनुभवणारे आधुनिक वैद्य प्रवीण मेहता यांचे कौतुक करावे, तेवढे थोडे. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले
१. नामजप श्‍वासाला जोडण्याचे महत्त्व लक्षात आल्यावर झोपेतही नाम चालू रहाण्यासाठी प्रयत्न करणे, त्यानंतर २ वर्षांनी नाम श्‍वासाला जोडले गेल्याचे जाणवणे आणि एकेक चक्र जागृत होत असल्याची अनुभूती येणे : वर्ष १९९८ मध्ये प.पू. डॉक्टरांचे मार्गदर्शन ऐकून मी साधना चालू केली. एक दिवस सनातनचा नामसंकीर्तन हा ग्रंथ वाचत असतांना आपला नामजप २४ घंटे चालू असणे आवश्यक आहे आणि तो तसा चालू रहाण्यासाठी श्‍वासाला जोडणे आवश्यक आहे; कारण आपला श्‍वास २४ घंटे चालू असतो, याची मला जाणीव झाली. त्यानंतर मी श्‍वासाला जोडून नामजप करण्यास आरंभ केला. तो झोपेतसुद्धा चालू रहावा, यासाठी मी प्रारंभीची साधारणतः २ वर्षे न झोपता नाम श्‍वासाला जोडण्याचे प्रयत्न चालू ठेवले, जेणेकरून झोपेतसुद्धा नाम चालू रहावे. असे प्रयत्न केल्यानंतर सुमारे २ वर्षांनंतर माझे नाम श्‍वासाला जोडले गेले आहे, याची मला जाणीव झाली आणि नामजप सातत्याने होऊ लागला. असे करत असतांना मला मूलाधारचक्रापासून एकेक चक्र जागृत होत आहे, असे जाणवू लागले.

रामनाथी आश्रमातील चैतन्यदायी वातावरणाचा प्रभाव पडल्यामुळे आश्रमात असतांना सात्त्विक पोशाख परिधान करण्याची इच्छा दर्शवणारी एक जिज्ञासू युवती !

    काही दिवसांपूर्वी एक युवती तिच्या यजमानांसमवेत सनातनचा रामनाथी आश्रम पहाण्यासाठी आली होती. आश्रमात येतांना तिने पाश्‍चात्त्य पोशाख परिधान केला होता. आश्रमात आल्यावर येथील साधिकांची सात्त्विक वेशभूषा पाहून आश्रमदर्शन करणार्‍या साधिकेला ती महिला म्हणाली, आश्रमात असेपर्यंत परिधान करण्यासाठी मला सात्त्विक पोशाख मिळू शकेल का ? त्यानंतर तिला तसा पोशाख उपलब्ध करून देण्यात आला आणि तो परिधान करून तिने आश्रम पाहिला.
    सनातनचा रामनाथी आश्रम म्हणजे चैतन्यदायी स्थान ! प.पू. गुरुदेवांचे अस्तित्व आणि साधनारत असणारे शेकडो साधक यांमुळे आश्रमातील वातावरण चैतन्याने भारीत झालेले असते. या चैतन्यमय वातावरणामुळे जिज्ञासू सात्त्विकतेकडे प्रभावित होत असल्याचे यावरून लक्षात येते.
- (पू.) सौ. बिंदा सिंगबाळ (२४.९.२०१५) 

शारदीय ऋतूचर्या - शरद ऋतूत निरोगी रहाण्यासाठी आयुर्वेदीय उपाय !

१. विकारांची संख्या अधिक असलेला शरद ऋतू
वैद्य मेघराज पराडकर
पावसाळा संपल्या संपल्या सूर्याचे प्रखर किरण धरणीवर पडू लागतात, तेव्हा शरद ऋतूला आरंभ होतो. पावसाळ्यामध्ये शरिराने सततच्या थंड वातावरणाशी जुळवून घेतलेले असते. शरद ऋतूचा आरंभ झाल्यावर एकाएकी उष्णता वाढल्याने नैसर्गिकपणे पित्तदोष वाढतो आणि डोळे येणे, गळू होणे, मूळव्याधीचा त्रास बळावणे, ताप येणे यांसारख्या विकारांची शृंखलाच निर्माण होते. शरद ऋतूमध्ये सर्वाधिक विकार होण्यास वाव असतो; म्हणूनच वैद्यानां शारदी माता । म्हणजे (रुग्णांची संख्या वाढवणारा) शरद ऋतू वैद्यांची आईच आहे, असे गमतीत म्हटले जाते. 

अनादि आणि सर्वसमावेशक हिंदु धर्म अन् हिंदु धर्मियांच्या हिंदु राष्ट्राचे महत्त्व आणि आवश्यकता

पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ
    सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, अनेक हिंदुत्ववादी संघटना अन् हिंदु धर्माभिमानी हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी संघटित होऊन प्रयत्नरत होत आहेत. नेपाळला हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करण्यात यावे, यासाठीही बरीच आंदोलने झाली; पण ती अयशस्वी ठरली. भारतातही हिंदु राष्ट्र या संकल्पनेला काही राजकीय पक्ष आणि लोक स्वतः हिंदु असूनही विरोध करत आहेत. त्यांनी हिंदु धर्माचे महत्त्व समजून घेतले, तर त्यांच्यातही धर्माभिमान निर्माण होईल आणि त्यांची हिंदु राष्ट्रात इतर धर्मियांचे (पंथियांचे) काय होईल ?, ही भीती दूर होईल, तसेच आपली ती भीती अनाठायी होती, हेही त्यांना समजेल. इतर धर्मियांनीही हिंदु राष्ट्र स्थापन होणार, याचा बागुलबुवा न करता भारतातील हिंदु राष्ट्राची आवश्यकता आणि महत्त्व शुद्ध मनाने जाणून घेतले, तर त्यांच्याही मनातील भीती दूर होईल आणि तेही गुण्यागोविंदाने हिंदु राष्ट्रात नांदू शकतील.

साधूसंतांनी तन-मन-धनाने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी व्हावे ! - पू. स्वामी आैंकारानंद

पू. स्वामी आैंकारानंद
१. श्रद्धेय श्री रामसुखदास स्वामींच्या आज्ञेनुसार केलेले कार्य 
    श्रद्धेय स्वामी श्री रामसुखदास यांच्याकडून मला वर्ष २००० पूर्वी कुंभमेळ्यास जाण्याच्या सूचना मिळाल्या होत्या. मी नाशिक सोडून भारतात इतरत्र होणार्‍या कुंभमेळ्यांमध्ये गेलो. स्वामी महाराजांना अपेक्षित असे अनेक दिवस तेथे राहून मी अनेक संतमहंत आणि भक्त यांना भेटून तेथील मोठ्या सभा-संमेलनांत उद्बोधनाचे, तसेच विचारविनिमयाचे कार्य केले. स्वामीजींची प्रत्येक प्रेरणा आणि सूचना यांचे पालन करत मी जवळजवळ २५ वर्षे त्यांच्या सान्निध्यात व्यष्टी अन् समष्टी यांचे पालन करण्याचा प्रयत्न केला आणि भगवद्कृपेने मला त्यामध्ये पुष्कळ यश मिळाले.
१ अ. गोरक्षा आंदोलन : देहलीतील रामलीला मैदानात झालेल्या केंद्र पातळीवरील गोरक्षा आंदोलनाच्या वेळी मी अनेक संत-महंत, भक्त आणि श्री शंकराचार्य यांच्या उपस्थितीत सहस्रो गोभक्तांपुढे विचार मांडून त्यांना प्रेरित केले. अनेक राज्यांमध्ये भव्य मोर्चे आणि ऐतिहासिक पत्रकार परिषदा घेतल्या.

सत्संगामुळे साधनेतील प्रयत्नांविषयी सुस्पष्टता येऊ लागल्यानंतर धर्माभिमान्यांनी व्यक्त केलेल्या मनोगतातून त्यांच्यातील साधकत्व, गुरुनिष्ठा अन् भाव यांचे घडलेले दर्शन !

पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ
    हिंदु जनजागृती समितीने आजपावेतो १ सहस्रापेक्षा अधिक हिंदु धर्मजागृती सभांचे यशस्वीरित्या आयोजन केले. त्यामुळे लक्षावधी लोकांना समितीचे धर्मकार्य अवगत झाले. सभेतील स्फूर्तीप्रद विचार ऐकून अनेकांच्या मनातील हिंदूतेज जागृत झाले आणि समितीच्या राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती यांच्या कार्यात सहभागी होण्याची उत्कंठा त्यांच्यात निर्माण झाली.
    त्यांना साधना समजावी यासाठी घेण्यात येणार्‍या सत्संगात धर्मरक्षणाच्या निरनिराळ्या कृती करतांना कार्याची हानी होऊ नये, यासाठी त्यामध्ये झालेल्या चुकांचा अभ्यास केला जातो आणि पुन्हा या चुका होऊ नयेत, यासाठी परिणामकारक उपाययोजना कशी काढता येईल, यावर चर्चात्मक चिंतन केले जाते. त्यामुळे सर्वांनाच योग्य-अयोग्य कृती आणि त्यामुळे होणारी हानी, तसेच कार्याची फलनिष्पत्ती वाढवण्याच्या दृष्टीने करावयाचे प्रयत्न यांची अचूक दिशा मिळत आहे. त्याचप्रमाणे अंतर्मुखता वाढून चुका होण्यामागील दोष आणि अहंचे पैलू यांचे चिंतन होऊन त्या टाळण्याची अन् स्वतःच्या अंतरात हिंदु राष्ट्र निर्माण करण्याची प्रक्रिया चालू झाली आहे.

मुलाकडून चुका झाल्यानंतर त्याला भावनिक स्तरावर न हाताळता त्याच्याकडून दोष-निर्मूलनासाठी कठोरपणे प्रयत्न करून घेणार्‍या कर्णावती, गुजरात येथील सौ. शिल्पा पाटील !

सौ. शिल्पा पाटील
     काही मासांंपूर्वी कर्णावती (अहमदाबाद), गुजरात येथील कु. देवेन पाटील हा सनातनच्या रामनाथी आश्रमात रहाण्यासाठी आला होता. त्या वेळी त्याच्याकडून काही चुका झाल्या. या चुका त्याची आई सौ. शिल्पा पाटील यांनाही सांगण्यात आल्या. कु. देवेन काही दिवसांनी घरी गेला. तो घरी गेल्यानंतर त्याची आई सौ. शिल्पा पाटील कशा प्रकारे आध्यात्मिक दृष्टीकोन ठेवून त्याला घडवत आहेत ? अशा स्थितीत पालकांनी स्वतःच्या भावना बाजूला ठेवून कसे वागायला हवे ? आपल्या पाल्याला मानसिक स्तरावर न हाताळता आध्यात्मिक स्तरावर कसे हाताळायला हवे ? ते पुढील उदाहरणांवरून शिकायला मिळेल.
 १. पतीचा विशेष पाठिंबा नसतांनाही पुढील
साधना आणि सेवा यांसाठी मुलाला आश्रमात पाठवणे
    देवेनला पूर्ण वेळ सेवेसाठी आश्रमात पाठवण्यासाठी त्याच्या वडिलांचा विशेष पाठिंबा नव्हता; परंतु त्याला लहानपणापासून कृष्णभक्ती आणि सेवा करण्याचा ध्यास असल्यामुळे पतीच्या विरोधाकडे लक्ष न देता सौ. पाटील यांनी त्याला गोव्यातील रामनाथी आश्रमात पुढील साधना आणि सेवा यांसाठी पाठवले.
    मुलांच्या केवळ व्यावहारिक उत्कर्षापेक्षा त्यांच्या आध्यात्मिक स्तरावरील प्रगतीचा विचार करणे, हे पालकांचे प्रथम कर्तव्य आहे. अन्यथा मुले व्यावहारिक दृष्ट्या कितीही मोठी झाली, डॉक्टर, इंजिनियर आदी झाली; पण त्यांच्यावर चांगले संस्कारच झाले नाहीत, तर अशा उत्कर्षाला कोणताच अर्थ रहाणार नाही. सौ. पाटील यांनी असे करून सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे.

मुंग्या साखरेकडे आपोआप आकृष्ट होतात, याप्रमाणे साधना करणारे जीव सनातनकडे आपोआप आकृष्ट होतात ! - श्री. राम होनप (४.५.२०१५)


राष्ट्ररक्षण, धर्मजागृती यांचा वसा घेतलेल्या दैनिक सनातन प्रभातचे नियमित वाचक व्हा !

केवळ रविवारच्या दैनिक सनातन प्रभातचे वाचन करणार्‍या
राष्ट्र-धर्म प्रेमी आणि जिज्ञासू वाचकांना नम्र विनंती !
१. राष्ट्र, धर्म आणि अध्यात्म यांचा सुरेख संगम असल्याने वाचकांना
 चौकस ज्ञानसंपदा उपलब्ध करून देणारे अनोखे दैनिक सनातन प्रभात !
     दैनिक सनातन प्रभात म्हणजे राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत असलेले एकमेव नियतकालिक ! अध्यात्म, राष्ट्र, धर्म, आचारधर्म, कायदा, आर्थिक उलाढाल, राजकारण आदी विषयांवरील लेख योग्य संपादकीय दृष्टीकोनासह या नियतकालिकातून प्रसिद्ध केले जातात. वाचकांच्या मनातील देशप्रेम वृद्धींगत करण्यासाठी, तसेच हिंदु धर्मावर होणार्‍या आघांताविषयी त्यांना अवगत करण्यासाठी हे नियतकालिक सदैव कटीबद्ध आहे.

उज्जैन सिंहस्थ कुंभपर्वातील धर्मप्रसारांतर्गत विविध सेवांमध्ये सहभागी व्हा !

१. क्षिप्रा नदीतील मोक्षदायी स्नानाचा लाभ करून देणारे उज्जैन कुंभपर्व !
     २२.४.२०१६ ते २१.५.२०१६ या कालावधीत उज्जैन येथे सिंहस्थ कुंभपर्व असणार आहे. या सिंहस्थ कुंभपर्वाच्या वेळी क्षिप्रा नदीतील स्नान मोक्षदायी असते. या पर्वाला ५ कोटी संत-महंत आणि भाविक येण्याची शक्यता आहे. नुकत्याच पार पडलेल्या नाशिक सिंहस्थ कुंभपर्वाच्या ५ पट क्षेत्रात या कुंभपर्वाचे आयोजन होत आहे.

दैनिक सनातन प्रभातचा दसर्‍यानिमित्त रंगीत धर्मविजय विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : २२ ऑक्टोबर
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २१ ऑक्टोबरच्या दुपारी ३ पर्यंत ईआर्पी प्रणालीत भरावी !


साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना विनंती !

धर्मप्रसार गतीने करण्यासाठी संगणकीय भाषा आणि प्रणाली शिकवणार्‍यांची आवश्यकता !
      सनातन संस्था सत्संग, प्रवचने, ग्रंथ अशा विविध माध्यमांतून तळमळीने अध्यात्मप्रसार करत आहे. या सर्व माध्यमांबरोबरच सध्याच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे जगभरात अध्यात्मप्रसार मोठ्या प्रमाणात आणि जलद गतीने करणे शक्य झाले आहे. या तंत्रज्ञानाचा विविध सेवांमधे वापर करता यावा, यासाठी पुढील संगणकीय भाषा आणि प्रणाली शिकवणार्‍यांची तातडीने आवश्यकता

॥ हरि ॐ तत्सत् ॥

देवाकडे ऐहिक सुख मागू नये !
संत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान
    मुलाने विष मागितले, तरी आई आणि डॉक्टर त्याला विष देत नाहीत. तसेच देवही ऐहिक सुख देत नाही; कारण त्याला ठाऊक असते की, हे त्याला पेलवणार नाही. म्हणून देवाकडे भीक (ऐहिक सुख) मागण्यात अर्थ नाही.
भावार्थ : देव, म्हणजे गुरु, हे देवापासून दूर नेणारे ऐहिक

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     सनातन संस्थेच्या विरोधकांनी पोलीस अधिकारी, राजकारणी, आमदार, खासदार, यांच्या ओळखी वापरून सनातनला कितीही विरोध केला, तरी सनातनला असलेल्या ईश्‍वराच्या आशीर्वादाने
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

परमेश्‍वरावर दृढ श्रद्धा ठेवा 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     परमेश्‍वरावरील दृढ श्रद्धा कोणत्याही संकटाशी सामना करण्याचे बळ देते. परमेश्‍वराने कितीही परीक्षा घेतली, तरी श्रद्धा स्थिर असावी. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

गुजरात आरक्षणाच्या आंदोलनामागील धागेदोरे !

सध्या गुजरातमध्ये पटेलांच्या आरक्षणावरून चालू असलेला वाद दिवसेंदिवस उग्र रूप धारण करू पहात आहे. या आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी १८ ऑक्टोबर या दिवशी राजकोट येथे होणारा भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा एक दिवसीय सामना होऊ न देण्याची चेतावणी दिली आहे. का ? तर म्हणे या सामन्याची विशेष तिकिटे पटेल समुदायाला देण्यात आलेली नाहीत ! ती तिकिटे न मिळाल्यास भारतीय संघाला मैदानातही घुसू देणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. असे केल्याने अर्थात्च आरक्षणाच्या आंदोलनास आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वस्त प्रसिद्धी मिळेल आणि गुजरातचे पर्यायाने पंतप्रधान मोदी यांचे नावही खराब होईल, अशी ही कात्री आहे. या आंदोलनाच्या निमित्ताने हार्दिक पटेल कोण ? त्यांचा एकाएकी उदय कसा झाला ? त्यांनी थेट पंतप्रधान मोदी यांच्या विरोधातच दंड थोपटल्याने त्यांचा बोलवता धनी कुणी आहे का ? असल्यास कोण ? या सर्वांचा लेखाजोखा समोर येणे आवश्यक आहे.

उपहास आणि उदात्तीकरण !

सध्या महाराष्ट्रात एका नव्या वादाने डोके वर काढले आहे. काही दिवसांपूर्वी पाकचे गझल गायक गुलाम अली यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यास राष्ट्रभक्त शिवसेनेने प्रखर विरोध दर्शवल्याने तो रहित झाला. त्यामुळे भारतातील पाकप्रेमींचे पित्त खवळले. त्यानंतर सुधींद्र कुलकर्णी यांनी पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद कसुरी यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम मुंबईत आयोजित केला. यासही शिवसेनेने प्रखर विरोध केला.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn