Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

नवरात्रोत्सव (आज पाचवा दिवस)

सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तुते ॥
      एका मतानुसार नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण कमी करण्यासाठी तमोगुणी महाकालीची, पुढील तीन दिवस रजोगुण वाढवण्यासाठी रजोगुणी महालक्ष्मीची आणि शेवटचे तीन दिवस साधना तीव्र होण्यासाठी सत्त्वगुणी महासरस्वतीची पूजा करतात.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ शक्ती)
नवरात्र विषयक माहितीसाठी संकेतस्थळावरील मार्गिका
http://www.sanatan.org/mr/a/cid_289.html

दिनविशेष

धर्ममार्तण्ड काशीनाथ वामन लेले (वाई, सातारा) यांची आज पुण्यतिथी

महाराष्ट्रातील १४ सहस्र ७०८ गावांत दुष्काळ घोषित !

अतिवृष्टि: अनावृष्टि: शलभा मूषका: शुका: । 
स्वचक्रं परचक्रं च सप्तैता ईतय: स्मृता: ॥ - कौशिकपद्धति
अर्थ : धर्माचे पालन न केल्यामुळे अतीवृष्टी, अनावृष्टी (दुष्काळ), टोळधाड, उंदरांचा त्रास, पोपटांचा उपद्रव, आपापसांत लढाया आणि शत्रूचे आक्रमण, अशी सात प्रकारची संकटे (राष्ट्रावर) येतात. तात्पर्य, साधना केल्यावरच आपत्काळाची तीव्रता अल्प होईल किंवा तो सुसह्य होईल.
     मुंबई, १६ ऑक्टोबर - महाराष्ट्रातील ५० टक्क्यांपेक्षा अल्प पैसेवारी असणार्‍या १४ सहस्र ७०८ गावांमध्ये अखेर दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. मंत्रीमंडळाच्या उपसमितीने ही घोषणा केली आहे. या घोषणेमुळे टंचाई कि दुष्काळ हा प्रश्‍न संपला आहे. दुष्काळाच्या उपाययोजनाही सांगण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे राज्यात दुष्काळावर कर लावण्यात आल्यानंतर हा दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. पैसेवारी ५० टक्क्यांच्या वर असलेल्या २५ सहस्र ३४५ गावांमध्येही खरीपाच्या संदर्भात दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. दुष्काळ घोषित केलेल्या आणि दुष्काळसदृश अशा गावांतील शेतकर्‍यांना काही साहाय्य आणि सवलती देण्यात येणार आहेत. गाव हा घटक मानून हे साहाय्य करण्यात येईल.

या देशात मुसलमानांना गोमांस खाता येणार नाही ! - हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर

     चंदीगड - भारतात गाय ही श्रद्धा आणि आस्थेचे प्रतीक आहे. ख्रिस्ती आणि मुसलमान यांच्या धर्मग्रंथांत गायीचे मांस खायला हवे, असा उल्लेख नाही. मुसलमानांना या देशात गोमांस खाता येणार नाही; कारण गोमांस हा बहुसंख्य हिंदूंच्या आस्थेचा विषय आहे, असे विधान हरियाणाचे भाजपचे मुख्यमंत्री श्री. मनोहरलाल खट्टर यांनी केले आहे. या विधानावरून मनोहर लाल खट्टर यांना लक्ष्य करून विरोधकांनी खट्टर यांच्यावर टीका करण्यास प्रारंभ केला आहे. माझ्या विधानाचा विपर्यास केला जात आहे. या वृत्तामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी क्षमा मागायला तयार आहे, असे मुख्यमंत्री खट्टर यांनी म्हटले आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये एका बुरखाधारी आतंकवाद्यास अटक

आतंकवादग्रस्त भारत !
     श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये पोलिसांवर गोळीबार करून पळ काढणार्‍या एका बुरखाधारी आतंकवाद्याला १६ ऑक्टोबर या दिवशी अटक करण्यात आली. पोलीस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पेशल ऑपरेशन ग्रुपच्या सैनिकांना या बुरखाधारी आतंकवाद्याविषयी माहिती मिळाली. त्यानंतर सैनिकांनी त्याचा पाठलाग केला. सैनिकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्याने सैनिकांवर गोळीबार केला. यात २ सैनिक घायाळ झाले. या घटनेनंतर या आतंकवाद्याला सैनिकांनी अटक केली. या परिसरात आणखी एक आतंकवादी लपून बसला असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बंगालचे इस्लामीस्तान होत असतांना त्यास मूक संमती देणारे ममताबानो शासन भारताचे कि पाकचे ?

बंगालमध्ये आय.एस्.आय.एस्. सक्रीय; मात्र राज्यशासनाचे दुर्लक्ष !
     एकेकाळी भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्‍या बंगालचे सध्या जलद गतीने इस्लामीकरण चालू आहे. बंगाल पूर्वेकडील भाग काश्मीर होण्याच्या मार्गावर आहे. बंगालच्या इस्लामीकरणाविषयी सहमती दर्शवतांना नुकतेच बंगालला भेट दिलेल्या एका व्यक्तीने सांगितले, कोलकातामध्ये पोलीस दुचाकीस्वारांना शिरस्त्राण (हेल्मेट) सक्तीच्या कायद्याची अंमलबजावणी करतांना पोेलिसांकडून शीरस्त्राण न वापरणार्‍या दुचाकीस्वारांना दंड ठोठावण्यात येत होता; मात्र पांढर्‍या टोपीवाल्या मुसलमानांना त्यातून सूट दिली जात होती.

आतंकवादी कसाबच्या सुटकेसाठी विमानाचे प्रवाशांसह अपहरण करण्याची धमकी देणार्‍यास न्यायालयाकडून अखेर शिक्षा

     मुंबई -  २६/११ च्या आतंकवादी आक्रमणाच्या वेळी पोलिसांनी पकडलेला आतंकवादी कसाब याची सुटका न केल्यास जेट एअरवेजच्या विमानाचे प्रवाशांसह अपहरण करण्याची धमकी देणारा विकास यादव (वय १९ वर्षे) याला न्यायालयाने १५ मास कारावास आणि १ सहस्र रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास आणखी एक मासाची कैदेची शिक्षा दिली जाईल. सिव्हील एव्हिएशन कायद्याखाली सिद्ध झालेला हा देशातील पहिलाच गुन्हा आहे.
     जेट एअरवेजच्या कॉल सेंटरवर २२ ऑक्टोबर २०१२ या दिवशी भ्रमणभाषवरून धमकी आली होती. प्रारंभी सदर भ्रमणभाष बंद होता. यानंतर वर्षभर वेगवेगळ्या भ्रमणभाष क्रमांकांवरून कसाबच्या सुटकेची मागणी करण्यासाठी जेटच्या विमानाच्या अपहरणाची धमकी याच भ्रमणभाषवरून देण्यात येत होती. अधिक शोध घेतल्यावर यादव याला १८ जानेवारी २०१३ या दिवशी अटक करण्यात आली.

गुलाम अली हे भारतात कमावलेला पैसा हवालाने विदेशात पाठवतात ! - गायक पंकज उधास

शिवसेनेने गुलाम अलींना विरोध केल्याने गळे काढणारे
भारतातील पाकप्रेमी याविषयी काही बोलतील का ?

पंकज उधास यांना पाकने ३ वेळा व्हिसा नाकारला !
     नवी देहली - पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली हे भारतात कमावलेला पैसा हवालाने विदेशात पाठवतात, असा गंभीर आरोप प्रसिद्ध गायक पंकज उधास यांनी एका गुजराती दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत केला.
पंकज उधास पुढे म्हणाले,
१. गुलाम अली गेल्या अनेक वर्षांपासून भारतात कार्यक्रम करत आहेत. या काळात त्यांनी एक पैसाही कर म्हणून भरलेला नाही. अशा कलाकारांना रेड कार्पेट (स्वागत) का घालायचे ?
२. यावरून विदेशातील कलाकार हे भारताविषयीचे प्रेम आणि आदर म्हणून येथे येत नाहीत, तर केवळ पैसे कमवण्यासाठी येतात, हे स्पष्ट होते.
३. भारतात पाकिस्तानी कलाकारांचा सन्मान होतो. ते मुक्तपणे वावरतात, तसेच बक्कळ पैसा कमवतात; पण अशाप्रकारची वागणूक भारतीय कलाकारांना पाकिस्तानात मिळत नाही. व्हिसाची विनंतीदेखील मान्य केली जात नाही. मला स्वत:ला ३ वेळा पाकचा व्हिसा नाकारण्यात आला आहे.

अमेरिकी हिंदु महिलेवर जादूटोण्याचा आरोप करून वायूदलाच्या नोकरीतून काढले !

     अमेरिकेचा दुदोंडीपणा ! अमेरिकेत केवळ हिंदु धर्माचे आचरण केल्याच्या कारणावरून नोकरीतून काढून टाकले जाते. असे असतांना भारतात धर्मापासूनच्या प्रेरणेमुळे असहिष्णुता वाढत असल्याचा आरोप अमेरिका कोणत्या तोंडाने करते ?
     वाशिंग्टन - अमेरिकेच्या वायूदलात कार्यरत असलेल्या अमेरिकी हिंदु महिलेवर तिच्या सहकर्मचार्‍यांनी जादूटोण्याचा आरोप केल्याने तिला नोकरीवरून काढून टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. श्रीमती डेबोरा शुनफिल्ड गेली १५ वर्षे हिंदु धर्माप्रमाणे आचरण करत आहे. या अन्यायाविरुद्ध अमेरिकेतील अमेरिकन हिंदु फाऊंडेशन या हिंदुत्ववादी संघटनेने चौकशीची मागणी केली आहे.
     डेबोरा शुनफिल्ड यांनी हिंदु धर्माचा स्वीकार केला असून त्या हिंदु धर्माप्रमाणे आचरण करतात. हे त्यांच्या ख्रिस्ती सहकर्मचार्‍यांच्या डोळ्यांत खुपत होते. त्या जेव्हा ध्यानधारणा करत असत तेव्हा त्यांचे सहकारी त्या सैतानाला निमंत्रण देत आहेत, असा आरोप करत होते. डेबोरा शुनफिल्ड यांना नोकरीवरून काढून त्यांच्या जागी एका ख्रिस्ती कर्मचार्‍याची नेमणूक केली, तेव्हा या कर्मचार्‍यांनी जल्लोष व्यक्त केला. अमेरिकी हिंदु फाऊंडेशन या संघटनेचे संचालक श्री. हर्ष वरुगंती म्हणाले, श्रीमती डेबोरा शुनफिल्ड यांची बडतर्फी त्यांच्या कामाच्या गुणवत्तेवर अवलंबून झाली नाही, तर ती धार्मिक भेदभावातून झाली आहे. आम्ही अमेरिकेच्या वायूदलाला कर्मचार्‍यांचे धार्मिक स्वातंत्र्य अबाधित राखण्याची मागणी करत आहोत.

सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांच्या न्यायाधिशांच्या नियुक्त्या करणारा राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग-२०१४ घटनाबाह्य !

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
     नवी देहली - सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांच्या न्यायाधिशांच्या नियुक्त्या करण्यासाठी राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग -२०१४ (एन्.जे.ए.सी.) ची स्थापना करणारे एक दूरगामी विधेयक ऑगस्ट २०१४ मध्ये संसदेत पारित करण्यात आले होते. हे नवीन विधेयक घटनाबाह्य असल्याचा निर्णय १६ ऑक्टोबर या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. कॉलेजियम पद्धती (ठराविक न्यायाधिशांद्वारे उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधिशांची नेमणूक करणे) नुसारच न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

नेताजींच्या संदर्भातील दस्तावेज लवकरच उघड होणार !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
     नवी देहली - भारतीय इतिहासात अजरामर झालेले नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अखेरच्या जीवनाविषयीचे गूढ लवकरच उकलले जाणार आहे. त्यांच्या सदर्भातील केंद्रशासनाच्या कह्यात असलेले दस्तावेज जनतेसाठी उघड करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच केली आहे. 
       नेताजींच्या ३५ वंशजांनी १४ ऑक्टोबर या दिवशी पंतप्रधान मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्या वेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, हे दस्तावेज उघड करण्याची प्रक्रिया नेताजींच्या जन्मदिनापासून म्हणजे २३ जानेवारी २०१६ प्रारंभ करण्यात येईल. त्याचबरोबर जगभरात ज्या देशांकडे नेताजींच्या संदर्भातील दस्तावेज आहेत, त्यांनीही ते उघड करावेत, असेही आवाहन करण्यात येईल. सर्वप्रथम आपल्याकडून येेत्या डिसेंबरमध्ये रशियाला विनंती करण्यात येईल, असेही मोदी म्हणाले. बंगाल शासनाने नेताजींच्या संदर्भातील दस्तावेज गेल्या मासात उघड केले होते. त्यानंतर केंद्राकडूनही अशी कृती करण्यात येण्याची आशा बळावली होती.

तेरगांव (कर्नाटक) येथे नवरात्राचे ९ दिवस धर्मशिक्षणविषयक कार्यक्रम !

नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीचा अभिनव उपक्रम 
हातात ध्वज घेऊन मध्यभागी श्री. विठोबा
म्हाळसेकर आणि उपस्थित ग्रामस्थ
     हळियाळ (कर्नाटक) - १३ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. या पार्श्‍वभूमीवर समाजाला धर्मशिक्षण मिळावे, याकरता हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील हळियाळ तालुक्यातील तेरगांव येथे घटस्थापनेला म्हणजे १३ ऑक्टोबरला सकाळी ६ वाजता प्रभातफेरी काढण्यात आली. या फेरीत गावातील धर्माभिमानी ग्रामस्थ सहभागी झाले होते. या फेेरीनंतर येथील श्री मारुति मंदिरात समितीचे तालुका समन्वयक श्री. विठोबा म्हाळसेकर यांनी श्री दुर्गादेवीच्या उपासनेविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. समितीच्या वतीने चालू करण्यात आलेला हा मार्गदर्शनाचा कार्यक्रम नवरात्रातील नऊही दिवस चालणार आहे. या अंतर्गत समितीच्या वतीने आदर्श नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन प्रतिदिन करण्यात येणार आहे.

रिव्हर्स ओस्मोसीस पद्धतीने शुद्ध झालेले पाणी आरोग्यास अपायकारक

     नवी देहली - रिव्हर्स ओस्मोसीस पद्धतीने शुद्ध केलेले आणि डीस्टील्ड केलेले पाणी अधिक काळ प्राशन केल्यास शरीर लवकर रोगग्रस्त होते आणि मृत्यू जवळ येतो, असे डॉ. झोल्तन पी. रोमा यांनी म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यू.एच्.ओ.) या विषयावर शास्त्रीय अभ्यास करून असे पाणी मानव आणि पशू यांच्या आरोग्याला घातक आहे, असा निष्कर्ष काढला आहे. शास्त्रज्ञ आणि संशोधकांच्या प्रयोगांनुसार रिव्हर्स ओस्मोसीस (विरुद्ध द्रवाभिसरण) पद्धतीने शुद्ध झालेले पाणी आरोग्यास अपायकारक असल्याचे उघड झाले आहे. जरी रिव्हर्स ओस्मोसीस पद्धत पाण्यातील अशुद्ध घटक दूर करत असली, तरी या पद्धतीत शरिराला आवश्यक असे क्षारही नष्ट होतात. अशा पाण्यात आणि डीस्टील्ड (उर्ध्वपातन) केलेल्या पाण्यात अधिक फरक नाही. या दोन्ही प्रकारच्या पाण्यात नैसर्गिक क्षार नष्ट होतात. यालाच मृत पाणी म्हटले जाते. 
    शरिराच्या पोषणाला आवश्यक असे कॅल्शियम आणि मॅग्नेेशियम ही खनिजे रिव्हर्स ओस्मोसीस पद्धतीने शुद्ध केलेल्या पाण्यात ९२ ते ९९ टक्के काढून टाकण्यात येतात.

२६/११ च्या आक्रमणात घायाळ अधिकारी आणि कर्मचारी यांच्या अनुपस्थितीची रजा संमत !

उशिरा सुचलेले शहाणपण !
     मुंबई - २६/११ च्या आक्रमणात घायाळ झालेले १८ अधिकारी आणि कर्मचारी यांच्या औषधोपचारासाठी व्यतित झालेल्या कालावधीची रजा विशेष बाब म्हणून ६ वर्षे आणि ११ मासांनंतर संमत करण्यात आली आहे. याविषयीचे आदेश गृह विभागाकडून नुकतेच बजावण्यात आले आहेत.
१. या सर्वांवर विविध रुग्णालयांत उपचार करण्यात आले होते. त्यानंतर पूर्ववत होऊन त्यांना कामावर उपस्थित होण्यासाठी कित्येक मासांचा कालावधी लागला. प्रशासनाने त्यांच्या अनुपस्थितीचे दिवस अर्जित रजेमधून कापलेे होते. उपचारासाठी व्यतित केलेला कालावधी विशेष रजा म्हणून गृहित धरावा, अर्जित रजेमधून तो कालावधी वगळू नये, अशी मागणी त्यांच्याकडून वारंवार होत होती.
२. मुंबईचे तत्कालीन आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी याविषयी ३ नोव्हेंबर २०१३ या दिवशी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. आता २०१५ मध्ये विशेष रजेची मागणी संमत झाली आहे.

देहली येथे संतकृपा प्रतिष्ठानच्या वतीने वृद्धांना फळांचे वाटप

डावीकडून संतकृपा प्रतिष्ठानच्या सौ. टुपूर भट्टाचार्य
वृद्धांना फळे आणि बिस्किटे यांचे वाटप करतांना
     देहली - येथील फ्रीडम फायटर एन्क्लेव मार्गावरील ज्येष्ठ नागरिक गृहामध्ये संतकृपा प्रतिष्ठानच्या वतीने १० ऑक्टोबर या दिवशी फळे आणि बिस्किटे यांचे वाटप करण्यात आले. या वितरणाचा अनेकांनी लाभ घेतला. आजारी आणि वृद्ध लोकांविषयी समाजात आपुलकी वाढवणे आणि बेघर झालेल्या लोकांना आधार देणे, या दृष्टीकोनातून हा कार्यक्रम करण्यात आला.

उज्जैन येथे हिंदु शौर्य जागरण अभियानकडून हिंदुत्ववाद्यांच्या बैठकीचे आयोजन

बैठकीला संबोधित करतांना श्री. सूर्यकांत केळकर,
डावीकडून दुसरे पू. डॉ. चारुदत्त पिंगळे,
तसेच इतर हिंदुत्ववादी
     उज्जैन (मध्यप्रदेश) - हिंदु शौर्य जागरण अभियान या प्रखर हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने १४ ऑक्टोबर या दिवशी उज्जैन येथील हॉटेल श्रीमाया येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत भारत रक्षा मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. सूर्यकांत केळकर आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी संबोधित केले, तसेच भाजप गोरक्षा दलाचे अध्यक्ष श्री. राकेश वनवट, अधिवक्ता विवेक गर्ग, हिंदु एकता मंच, इंदूरचे श्री. राजवीर सिंह, श्री. धन्ना, श्री. वीरेंद्र काळे, श्री. महेश तिवारी यांनीही त्यांचे विचार मांडले.

म्यानमारच्या निवडणुकीत कट्टर बौद्धमतवादी पक्षाला चीनचा पाठिंबा

     रंगून (म्यानमार) - म्यानमारमध्ये पुढील मासात होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये चीनने रस घेण्यास प्रारंभ केला असून येथील कट्टर बौद्धमतवादी पक्षाला त्यांनी उघड पाठिंबा दिला आहे. अराकन नॅशनल पार्टी या पक्षाचे प्रमुख अये माँग यांच्याशी चीनने संपर्क साधून कोणतेही सहकार्य करण्याची सिद्धता दाखवली आहे. म्यानमारमधील आपली गुंतवणूक सुरक्षित रहावी, यासाठीच चीनचे प्रयत्न चालू असल्याचे समजते.

सनातन संस्थेकडून पितृपक्ष या विषयावर एफ्.एम्. रेडिओवर माहिती सादर

एफ्.एम्. रेडिओवर माहिती सांगतांना सौ. सुमा मंजेश
     तुमकुरू (कर्नाटक) - येथील सिद्धार्थ एफ्.एम्. रेडिओ ९०.८वर १२ ऑक्टोबर या दिवशी सनातन संस्थेच्या कुणिगल येथील सौ. सुमा मंजेश यांनी पितृपक्ष या विषयावर माहिती सादर केली.

ओडिशात माओवाद्यांकडून २ आदिवासींची हत्या

नक्षलग्रस्त भारत !
     मलकनगिरी (ओडिशा) - पोलिसांचे खबरे असल्याच्या संशयावरून माओवाद्यांनी २ आदिवासींना ठार मारल्याची घटना घडली. पोलिसांच्या माहितीनुसार कानागुडा या गावातील सोमा मडकामी आणि रामा माधी या दोघांना १५ ऑक्टोबरच्या रात्री त्यांच्या घरातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना गोळ्या घालण्यात आले. मागील आठवड्यातही ३ ऑक्टोबर या दिवशी दोघांची हत्या करण्यात आली होती.

शेंदुर्णी (जळगाव) येथे घटस्थापनेच्या आदल्या रात्री मम्मादेवीच्या मंदिराच्या परिसरात गोमांस टाकले !

धर्मांध मुद्दामहून हिंदूंच्या सण-उत्सवांच्या वेळी काही ना काही कुरापती
काढून तेढ माजवतात. अशी कृत्ये पुन्हा घडणार नाहीत, याची प्रशासनाने काळजी घ्यावी !
पोलिसांनी हिंदुत्ववाद्यांशी खोटे बोलून आणि १ दिवस त्यांना पोलीस
ठाण्यात डांबून मारहाण करून धमकावले आणि चॅप्टर केस दाखल केली !
     जळगाव, १४ ऑक्टो. (वार्ता.) - शेंदुर्णी गावातील मम्मादेवी मंदिराच्या परिसरात १२ ऑक्टोबरला रात्री १ वाजल्यानंतर अज्ञात व्यक्तींनी गोमांस आणून टाकले. त्यामुळे शेंदुर्णी गावात १३ ऑक्टोबरला सकाळपासून तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली; परंतु पोलिसांनी पंचनामा न करताच मंदिराच्या परिसराची स्वछता केली आणि गुन्हा दाखल न करता केवळ आम्ही तपास करू असे तोंडी आश्‍वासन दिले. यानंतर स्थानिक हिंदुत्ववाद्यांना पोलिसांनी खोटे बोलून पोलीस ठाण्यात नेऊन १ दिवस डांबून ठेवून आणि मारहाण करून धमक्या दिल्या.

लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा प्रविष्ट असलेले २०३ शासकीय कर्मचारी कामावर

निलंबनाची कारवाई नाही
असे कर्मचारी कामावर असतील, तर पारदर्शी कारभार आणि स्वच्छ प्रशासन कसे मिळेल ?
     पुणे, १६ ऑक्टोबर - लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा प्रविष्ट असलेले २०३ अधिकारी आणि कर्मचारी यांचे निलंबन न केल्याने ते अजूनही कामावर येत आहेत. या २०३ कर्मचार्‍यांमध्ये महसूल, भूमी अभिलेख आणि नोंदणी विभागातील सर्वाधिक ४७ जणांचा समावेश आहे. त्या खालोखाल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतील अधिकार्‍यांची संख्या ४०, शिक्षण विभागातील ३३; तर पोलीस खात्यातील १६ जणांचाही यामध्ये समावेश आहे.

सनातन संस्थेवर बंदी म्हणजे हिंदुत्वावर बंदी ! - श्री. धनसिंह सूर्यवंशी, महाराणा ब्रिगेड

जालना येथे आंदोलन
     जालना - सनातनसारख्या राष्ट्रप्रेमी संघटनेवर बंदी घालणे म्हणजे हिंदुत्व दडपण्यासारखे आहे. स्वत:ला बुद्धीजीवी समजणारे तथाकथित पुरोगामी आज सनातनवर बंदीची मागणी करत आहेत. तथाकथित पुरोगामी आणि धर्मद्रोही यांनी आरडाओरड करत सनातनवर बंदीची मागणी चालू केली आहे. त्याचा आम्ही जालन्यातील हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने विरोध करत आहोत. हिंदुत्वरक्षणाचे कार्य करणार्‍या राष्ट्र्रप्रेमी आणि धर्मप्रेमी सनातन संस्थेला आमचा खंबीर पाठिंबा आहे, असे प्रतिपादन श्री. धनसिंह सूर्यवंशी यांनी केले.

सुधींद्र कुलकर्णी यांच्या तोंडाला काळे फासणार्‍या शिवसैनिकांचा अभिमान ! - हुतात्मा गोहील यांच्या मातोश्री

       मुंबई - पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद महमूद कसुरी यांच्यासाठी पायघड्या अंथरणार्‍या सुधींद्र कुलकर्णी यांच्या तोंडाला काळे फासणार्‍या शिवसैनिकांचा मला सार्थ अभिमान आहे, असे गौरवोद्गार २६/११ च्या आतंकवादी आक्रमणात ठार झालेले हरीश गोहील यांच्या मातोश्री दमयंती गोहील यांनी काढले. महापालिकेसमोरच्या स्वातंत्र्ययुद्ध स्मृती स्मारकाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले. या वेळी दमयंती गोहील यांनी उद्धव ठाकरे यांना निवेदन देऊन सुधींद्र कुलकर्णी यांना काळे फासणार्‍या शिवसैनिकांचे आभार मानले.

मुसलमान संघटनांकडून सुधींद्र कुलकर्णींवर गुलाबपुष्पांची वृष्टी

      मुंबई, १६ ऑक्टोबर - पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करणारे ऑॅब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर शिवसैनिकांनी १२ ऑक्टोबर या दिवशी शाईफेक केली होती. त्या घटनेचा निषेध करण्यासाठी काही मुसलमान संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी १५ ऑक्टोबर या दिवशी मुंबईमध्ये एका कार्यक्रमात कुलकर्णी यांच्यावर गुलाबपुष्पांची वृष्टी केली. (पाकिस्तान्यांविषयी कणव वाटणार्‍या कुलकर्णींवर पुष्पवृष्टी करणार्‍या मुसलमान संघटना पाकधार्जिण्या आहेत, हेच यातून स्पष्ट होते. अशा संघटनांविषयी शासन आणि जनतेने सतर्क रहाणे आवश्यक आहे. - संपादक)

नवरात्रोत्सवातील अपप्रकार रोखण्यासाठी धुळे येथे निवेदन

निवेदनाविषयी जाणून घेतांना उपजिल्हाधिकारी
      धुळे - नवरात्रोत्सवातील अपप्रकार रोखण्यासाठी येथील उपजिल्हाधिकारी सौ. शुभांगी भारदे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी योग वेदांत सेवा समितीचे डॉ. योगेश पाटील, स्वदेशी जागरण मंचचे श्री. विलास राजपूत, सनातन संस्थेच्या सौ. राधिका बागुल, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पंकज बागुल उपस्थित होते. आमच्या बैठकीत हिंदु जनजागृती समितीला बोलवू. आपल्या सूचना वरिष्ठांना कळवू, असे उपजिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

भुकटीच्या (पावडर) डब्यातून सोन्याची तस्करी करणार्‍या धर्मांधास पुणे येथे अटक

    पुणे, १६ ऑक्टोबर - चेहर्‍याला लावायच्या भुकटीच्या (पावडर) डब्यातून २४ लक्ष रुपये किमतीचे अंदाजे ८८२ ग्रॅम सोने तस्करी करणारा इमामुद्दीन मोतीमियॉ कादरी याला सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. कादरी हा दुबई ते पुणे विमानातून प्रवास करत होता. तो येथील लोहगाव विमानतळावर उतरल्यानंतर त्याच्या हालचाली सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांना संशयास्पद वाटल्या. त्या वेळी त्याच्याकडील सामानाची पडताळणी केली असता त्याच्याजवळ असलेल्या भुकटीच्या डब्याचे वजन छापील वजनापेक्षा अधिक असल्याचे आढळले. तो डबा कटरच्या साहाय्याने कापला असता त्यात वितळलेले सोने आढळून आले. त्यानंतर सीमा शुल्क अधिकार्‍यांनी पोलिसांना पाचारण करून कादरीला अटक केली आणि त्याच्याकडील सोने शासनाधीन (जप्त) केले.

आधुनिक वैद्यांच्या संपामुळे ससून रुग्णालयातील रुग्णांचे हाल

    पुणे, १६ ऑक्टोबर - पोलीस कर्मचार्‍याने निवासी आधुनिक वैद्याला मारहाण केल्याच्या निषेधार्थ येथील ससून रुग्णालयातील मार्डच्या ४०० आधुनिक वैद्यांनी १५ ऑक्टोबर या दिवशी दिवसभर संप केला. ससूनमध्ये प्रतिदिन पुणे जिल्हा परिसरातून २-३ सहस्र रुग्ण उपचारांसाठी येतात. अचानक पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील बाहेरगावाहून आलेल्या अनेक रुग्णांची मोठ्या प्रमाणात असुविधा झाली. बर्‍याच रुग्णांना उपचारांसाठी ताटकळत थांबावे लागले, तर अनेक रुग्ण उपचारांशिवाय घरी परत गेले. (रुग्णांचे झालेले हाल आणि हानी हे भरून काढण्यासारखे नाही. या प्रकरणी प्रशासनाने मार्डच्या आधुनिक वैद्यांवर दंडात्मक करावी, ही अपेक्षा आहे ! - संपादक)

हिंदु धर्माची बाजू मांडण्यासाठी प्रत्येकाला प्रवक्ता व्हावे लागेल ! - श्री. अभय वर्तक

 बैठकीत बोलतांना श्री. अभय वर्तक
      सनातन संस्थेवरील मिथ्यारोप आणि बंदीची मागणी यांविरोधात हिंदुत्ववाद्यांची विशेष बैठक 
     मुंबई - सनातन संस्था ही एक छोटी संस्था आहे. संस्थेचे कार्य संकेतस्थळाच्या माध्यमातून सर्वदूर पसरले आहे, तर दुसरीकडे पुरोगामी संघटनांना विदेशातून सर्व पैसा येत आहे. काँग्रेस सत्तेवर असताना त्यांनी सनातनवर बंदी घालण्यासाठी सर्व प्रयत्न केले होते. देशातील पुरोगामी गिधाडासारखी सनातनवर तुटून पडले होते. त्यांना वाटत होते की, आम्ही सनातनला एका महिन्यात संपवून टाकू. आंतरराष्ट्रीय स्तरावरील वृत्तवाहिन्यांकडून आम्हाला दूरध्वनी यायला लागले. बीबीसीसारख्या वाहिनीकडून दूरध्वनी यायला लागले. त्या वेळी लक्षात आले की, सनातन एवढी छोटी संस्था असूनसुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर यांना या बातम्या का हव्यात ?

राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे राज्याचे रक्त शोषणारे गोचीड ! - उद्धव ठाकरे

     मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे राज्याचे रक्त शोषणारे गोचीड आहे, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधतांना सत्तेच्या गुळाची चव जिभेवर आहे, तोपर्यंत मुंगळे गुळाच्या ढेपेला चिकटून रहातात, असे विधान केले होते. त्याला प्रत्युत्तर देतांना श्री. ठाकरे यांनी सामना वृत्तपत्रातून ही टीका केली आहे.

दैनिक सनातन प्रभातचा दसर्‍यानिमित्त रंगीत धर्मविजय विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : २२ ऑक्टोबर
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २१ ऑक्टोबरच्या
दुपारी ३ पर्यंत ईआर्पी प्रणालीत भरावी !

फलक प्रसिद्धीकरता

शिवसेनेने गुलाम अलींना विरोध केल्याने
गळे काढणारे भारतातील पाकप्रेमी आता गप्प का ?
    पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली हे भारतात कमावलेला पैसा हवालाने विदेशात पाठवतात, असा गंभीर आरोप प्रसिद्ध गायक पंकज उधास यांनी एका गुजराती दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत केला.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Gulam Ali Bharatme kamaya dhan havalase videshme bhejte hai,
aisa Pankaj Udhasne kaha. - Bharat sthit Pakpremi ab chup kyo ?
जागो !
गुलाम अली भारत में कमाया धन हवालासे विदेश में भेजते है,
एैसा पंकज उधासने कहा. - भारत स्थित पाकप्रेमी अब चुप क्यो ?

अनधिकृत धरणे कॅप्सूल बॉम्बने उडवा ! - प्रशांत बंब, आमदार, भाजप

     मुंबई - मराठवाड्याला पाणी मिळण्यासाठी नगर आणि नाशिक येथील अनधिकृत धरणे कॅप्सूल बॉम्बने उडवा. मराठवाड्यातील शेतकरी नक्षलवादाकडे वळत आहेत. धरणे पाडून राज्यातील, तसेच देशातील जनतेला घटना आणि कायदा सर्वश्रेष्ठ असल्याचे दाखवून द्यावे, अशी मागणी भाजप आमदार प्रशांत बंब यांनी केली आहे. प्रशांत बंब यांनी जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षांना पत्राद्वारे ही मागणी केली आहे. (मुळात अनधिकृत धरणे बांधलीच कशी गेली, याचा शोध घेऊन याला उत्तरदायी असणार्‍यांवर भाजप शासनाने कारवाई केली पाहिजे. - संपादक) बंब यांनी पत्रात पुढे म्हटले आहे, शहरातील मोठ्या इमारती पाडतांना अधिकृतपणे कॅप्सूल बॉम्बचा वापर होतो, त्याचप्रमाणे गोदावरी नदीत जायकवाडी धरणाच्या वरच्या भागात अनधिकृतरित्या बांधलेली जवळजवळ ४८ टीएम्सी क्षमतेची निळवंडेसह १३ धरणे कॅप्सूल बॉम्बने उडवा. यामुळे मराठवाड्यातील जनतेला समान पाण्याचे वाटप होईल. 
     या संदर्भात माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले की, प्रशांत बंब यांच्या भावना योग्य असल्या, तरी अशा प्रकारे धरणे उडवणे चुकीचे ठरेल. 

कोल्हापूर येथे उत्साहात दौड !

   
दौडीत सहभागी झालेले धर्माभिमानी
      कोल्हापूर, १६ ऑक्टोबर (वार्ता.) - समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने शहरात श्री दुर्गामाता दौड काढण्यात आली. या दौडीचा प्रारंभ श्री भवानी मंडप येथून प्रेरणा मंत्र म्हणून करण्यात आला. या दौडीत भगवा ध्वज हाती घेऊन धर्माभिमान्यांनी पारंपरिक वेश परिधान केला होता. तसेच हातात तलवारही घेतली होती. जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव, अशा घोषणा देत दौड काढण्यात आली. या दौडीमध्ये बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष श्री. संभाजी साळुंखे, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री विठ्ठलतात्या पाटील, सुरेश यादव, शरद माळी, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, धारकरी, शिवभक्त असे ५० धर्माभिमानी उपस्थित होते. भवानी मंडप, करवीर वाचनालय, आझाद गल्ली, छत्रपती शिवाजी चौक, भेंडे गल्ली, महाद्वार रोड, भवानी मंडप या मार्गाने दौड काढण्यात आली. या सर्व मार्गावर सुवासिनींनी रस्त्यावर रांगोळ्या काढून आणि भगव्या ध्वजाचे औक्षण करून दौडीचे स्वागत केले. दौडीची सांगता ध्येय मंत्राने अन् प्रतिज्ञा घेऊन झाली.

भगवंतप्राप्तीसाठी वासनांचा त्याग करणे आवश्यक ! - पू. संभाजीराव भिडेगुरुजी

श्री दुर्गामाता दौडीचा ४ था दिवस
      सांगली, १६ ऑक्टोबर (वार्ता.) - आपण सर्वजण नेहमी भूक, तहान, झोप तीन गोष्टींचे दास असतो. त्यांच्यावर विजय मिळवल्याविना आपल्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. संत तुकाराम महाराज, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांनी या तिन्हीवर विजय मिळवला असल्याने ते अत्युच्च असे कार्य करू शकले. आपण सर्वांनीही तोच आदर्श समोर ठेवून भगवंतप्राप्तीसाठी वासनांचा त्याग करणे आवश्यक आहे. आपण श्री दुर्गादेवीकडे त्यासाठी शक्ती मागितली पाहिजे, असे मार्गदर्शन पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांनी केले. ते श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने आयोजित श्री दुर्गामाता दौडीच्या चौथ्या दिवशी धारकर्‍यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.

सुधींद्र कुलकर्णी कोणासाठी शहीद झाले ?

श्री. भाऊ तोरसेकर,
ज्येष्ठ पत्रकार, मुंबई
     तोंडाला काळे फासले म्हणून आज मिरवणारे सुधींद्र कुलकर्णी कोण आहेत ? गेल्या वर्षी पाकिस्तानात सईद हाफीजला जाऊन वेदप्रकाश वैदिक भेटल्याने जो गदारोळ उठला होता, त्यातले एक भागीदार, अशी या कुलकर्णींची ओळख आहे. अर्थात तितकीच त्यांची ओळख नाही. तसे त्यांचे अनेक चेहरे आहेत. वेळोवेळी त्यांनी नवा मुखवटा लावून केलेली कामगिरी खरे तर पाकिस्तानने त्यांचा सन्मान करावा, अशीच आहे. निशाने पाकिस्तान द्यावा इतकी गौरवास्पद कामगिरी करणार्‍यांमध्ये सुधींद्र कुलकर्णी यांचा समावेश होऊ शकतो. कसुरीला त्यांनी इथे आमंत्रित करून सन्मान करावा हे स्वाभाविकच आहे. कारण वेळोवेळी आय.एस.आय.च्या पैशावर ज्या मुठभर भारतियांना पाकिस्तान मौजमजा करायला आमंत्रण देत असते, ती जबाबदारी तिकडून कसुरीच उचलत असतात. इथे कुठल्या तरी संस्थेचे नाव पुढे करून कुलकर्णी यांनी ती कामगिरी पार पाडली. मात्र आपल्या चेहर्‍यावर माखलेले काळे पुसून टाकण्यापेक्षा हा माणूस तसाच कशाला मिरवत होता ? असा प्रश्‍न अनेकांना पडला असेल, तर त्याचेही उत्तर शोधणे भाग आहे.

देशहित सर्वोच्च, मनोरंजन दुय्यम !

श्री. अरुण रामतीर्थकर
देशहित आणि ३ वर्ग 
     देशहित सर्वोच्च आहे, याविषयी दुमत होण्याचे कारणच नाही. काही लोक मात्र देशहिताला तुच्छ लेखतात. त्यांचे श्रद्धास्थान वेगळेच असते. कॅनडाने कायम वास्तव्याची अनुज्ञप्ती असलेल्या चार पाकिस्तान्यांना नुकतेच देशाबाहेर हाकलले. जिथे कायम रहायचे, त्या मातीशी इमान न ठेवता त्यांनी गद्दारी केली. काही जणांची गद्दारी वेगळ्या प्रकारची असते. एका सीरियन लेखिकेचे गॉड ऑफ हेट्स नावाचे पुस्तक आहे. त्यातील हे दोन प्रसंग. एकदा ती मोटारीत गॅस भरण्यासाठी पंपावर गेली होती. तेथे दोघे जण अरबी भाषेत बोलत होते. लेखिकेला अरबी समजत होते. त्यातील एक जण दुसर्‍याला म्हणाला, मला ग्रीनकार्ड (अमेरिकेत कायम रहाण्याची अनुज्ञप्ती) मिळाले. त्यावर दुसरा म्हणाला, मला ते पूर्वीच मिळाले आहे. या नागरिकत्वावर मी थुंकतो. दुसरा प्रसंग. लेखिका रहाते, त्या शेजारी एक अरबी कुटुंब होते. कचरा घन आणि ओला, अशी विभागणी करून ती बाहेर ठेवायची. कर्मचारी तो घेऊन जायचा. अरबी कुटुंबातील महिला एकत्रित कचरा ठेवायची. एकदा कर्मचार्‍याने तक्रार करताच ती म्हणाली, मी असेच करणार. तुला काय करायचे, ते कर.

विकास आराखडा : अंधारात नेमबाजीचा प्रकार

    गेली ८-१० वर्षे पुण्याच्या विकास आराखड्याचे घोंगडे भिजत आहे. नुकताच शहराचा प्रारूप विकास आराखडा सिद्ध करणार्‍या त्रिसदस्यीय समितीने ३५० भूखंडाची आरक्षणे वगळण्याचा विषय चर्चिला गेला. थोडक्यात त्रिसदस्यीय समितीने सादर केलेल्या आराखड्यामध्येही त्रुटी असल्याचा आक्षेप घेतला गेला. 

अनेक दैवी गुणांमुळे प्रपंचाचा डोलारा सहजतेने सांभाळणारी घराची स्वामिनी !

१. देवतांनी आपल्यातील अंश गृहिणीकडे दिला असल्याने 
ती प्रपंच समर्थपणे सांभाळू शकणे
    देवाच्या शासनात चार महत्त्वाची खाती स्त्रीदेवतांकडेच सदासाठी देण्यात आली आहेत आणि त्या आपापली खाती समर्थपणे आणि उत्तम रितीने सांभाळत आहेत. आपल्या शक्तीने दुष्टांचा संहार करण्याचे संरक्षण खाते कालिकादेवीकडे, अर्थ खाते श्री लक्ष्मीदेवीकडे, शिक्षण खाते सरस्वतीकडे, तर अन्न खाते अन्नपूर्णादेवीकडे आहे. या देवतांनी आपल्यातील अंश गृहिणीकडे दिला आहे; म्हणून ती सारे घर आणि प्रपंच समर्थपणे सांभाळू शकते, तसेच स्वसामर्थ्यावर तोलून धरू शकते.

वृत्तवाहिन्यांवरील चर्चासत्रांतून सनातनच्या प्रवक्त्यांनी मांडलेल्या सूत्रांमुळे सनातनविषयीचे अपसमज दूर झाले ! - जिज्ञासूंचा अभिप्राय

     गेल्या काही दिवसांपासून विविध वृत्तवाहिन्यांवर सनातन संस्था आणि तिच्या कार्याविषयी अनेक चर्चासत्रे होत आहेत. त्यामध्ये सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक हे सहभागी होत असतात. ही चर्चासत्रे सनातनचे अनेक वाचक, हितचिंतक, हिंदुत्ववादी आणि जिज्ञासू पहात आहेत. ती चर्चासत्रे पाहून काही जणांनी कळवलेल्या प्रतिक्रिया येथे देत आहोत. 
वृत्तवाहिन्यांवरील चर्चासत्रातून समाजाला खरे हिंदुत्व कळेल ! 
- श्री. गिरीश एक्त्यार, सनातन संस्थेचे हितचिंतक, कोथरूड, पुणे.
     सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक हे सध्या विविध वृत्तवाहिन्यांवर सडेतोड आणि परखडपणे हिंदु धर्माची बाजू मांडत आहेत, त्याविषयी त्यांचे अभिनंदन ! या चर्चासत्रातून समाजाला खरे हिंदुत्व कळेल.

निःस्वार्थी राष्ट्रप्रेम प्रज्वलित झाल्यास एकजूट होऊन राष्ट्र बलवान आणि सामर्थ्यशाली होणे

     जोपर्यंत प्रत्येक व्यक्तीच्या मनात राष्ट्रीयत्वाची भावना जिवंत असते, तोपर्यंत ते राष्ट्र मानाने जगू शकते. जेव्हा व्यक्ती देशहितापेक्षा स्वहिताकडेच लक्ष देऊ लागतात, त्या वेळी तो समाज आणि देश अधोगतीस जातो. जर प्रत्येकजण स्वार्थामुळे समाज लुटावयास लागला, लाच घेऊ लागला, तर असा समाज खिळखिळा होण्यास आणि मोडकळीस यावयास कितीसा वेळ लागणार ? प्रत्येकाचा स्वार्थ बळावला की, माणसे एकमेकांची डोकी फोडतात; पण निःस्वार्थी राष्ट्रप्रेम प्रज्वलित झाल्यास सर्वांची एकजूट होऊन राष्ट्र बलवान आणि सामर्थ्यशाली होते.

पाचही पुत्रांना युद्धात वीरमरण आल्यामुळे देशाला अर्पण करण्यास आणखी पुत्र नसल्याचे दुःख वाटणारी वीरमाता !

     स्वातंत्र्यासाठी आत्मबलीदान करणारे बाबू गेनू, भगतसिंग आणि राजगुरु अमर झाले. भारत-पाकिस्तान युद्धातीलच ही घटना आहे. एका आईचे पाचही मुलगे लढाईत कामास आले. शेजारील मंडळी आणि देशातील पुढारी त्या माऊलीचे सांत्वन करावयास गेले असतांना तिला रडू कोसळले. तिने लोकांना सांगितले, माझी पाचही मुले युद्धात मेली, याचे मला दुःख वाटत नसून राष्ट्रासाठी लढणारा आणखी एक मुलगा मला राष्ट्राला अर्पण करता येत नाही, याचे मला दुःख होत आहे. 

मंदिरांचा पैसा घेऊन मदरसे आणि हज यांच्यावर खैरात करणारी औरंगी काँग्रेस !

     कर्नाटकातील २ लक्ष मंदिरांतून शासनास प्रतिवर्षी ७९ कोटी रुपये मिळतात. त्यांपैकी केवळ ७ कोटी रुपये मंदिराच्या देखभालीवर व्यय होतो. याशिवाय मदरसे आणि हज यांना अनुदानापोटी ५९ कोटी रुपये, तर चर्चला १३ कोटी रुपयांचा निधी दिला जातो ! याचे पर्यावसन कर्नाटकातील २५ टक्के (म्हणजे ५० सहस्र) मंदिरे अर्थसाहाय्याच्या अभावी बंद करण्यात येत आहेत. - स्टीफन नॅप, लेखक, अमेरिका. (ते आता श्रीनंदनानंद दास या नावाने ओळखले जातात)

धर्माभिमानी हिंदूला साहाय्य न करणारे जन्महिंदू येथे असणे दुर्दैवी !

     २०१४ च्या मार्च मासात न्यायालयाचे कार्य चालू असतांना न्यायालयासमोरून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या वतीने अतिशय बेशिस्त रितीने, हिंदूंच्या विरुद्ध तोंडाला येईल ते अश्‍लाघ्य बरळत मिरवणूक निघाली होती. न्यायालय चालू असतांना मिरवणूक काढणे, घोषणा देणे हा अपराध आहे; म्हणून त्यांच्या विरुद्ध एफ्.आय.आर्. दाखल केला. त्यामुळे मला धमकी देण्यात आली आहे. माझ्यासह इतर कोणीच न आल्याने वाईट वाटले. 
- अधिवक्ता श्री. प्रभाकर नायक, उडुपी, कर्नाटक.

देवावरील दृढ श्रद्धेमुळे कठीण परिस्थितीतही स्थिर रहाणारे श्री. राकेश पाध्ये !

श्री. राकेश पाध्ये
     आंब्याचे पीक भरपूर आले, तर ते आंबा बागधारकाचे वर्षाचे उत्पन्न असते. या वर्षी आंब्याचे पीक उणावले आणि त्यातच अवेळी पाऊस पडल्यामुळे आंबा बागधारकांचे धाबे दणाणले होते. सनातनच्या गुरुकृपायोगानुसार साधना करणारे रत्नागिरी जिल्ह्यातील पाध्ये कुटुंब, अशा परिस्थितीतही शांत होते. त्यांची देवावर, देव आपल्याला आवश्यक तेवढे पैसे देईलच, अशी दृढ श्रद्धा होती. अशा प्रसंगात स्थिर रहाणारे श्री. राकेश पाध्ये यांच्या

लहानपणापासून राष्ट्र आणि धर्म यांविषयी अभिमान असलेली ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली डोंबिवली येथील कु. मृण्मयी शैलेश कोथमिरे (वय १४ वर्षे) !

कु. मृण्मयी कोथमिरे
१. जन्मापूर्वी
१ अ. पोटावर न्यास करून दत्ताचा नामजप करतांना
 बाळाने हालचाल करून प्रतिसाद देणे
      गरोदर असतांना मी नुकताच साधनेला आरंभ केला होता. मला माझ्या यजमानांनी पोटावर न्यास करून दत्ताचा नामजप करण्यास सांगितला होता. ज्या वेळी मी नामजप करत असे, त्या वेळी बाळ पुष्कळ हालचाल करत असे. त्या वेळी बाळाच्या हालचालीचा वेग अधिक असल्याने मला भीती वाटत असे.
१ आ. पांढर्‍या रंगाचे आकर्षण निर्माण होणे
     त्या दिवसांत मला दही खावेसे वाटायचे. माझ्या दोन्ही वेळच्या जेवणात दही असायचे. याच कालावधीत मला पांढर्‍या रंगाची आवड निर्माण झाली होती.

तळमळीने सेवा करणारी आणि इतरांना साधनेत साहाय्य करणारी रत्नागिरी येेथील कु. स्नेहा प्रताप जोशी !

कु. स्नेहा जोशी
१. कु. स्नेहा प्रतिदिन सेवाकेंद्रात दैनिक आणि विज्ञापने यांच्या सेवेसाठी येते.
२. तिचा स्वभाव शांत आहे. कुणाकडून काही चूक झाल्यास ती त्यांना शांतपणे सांगते.
३. तिला साधनेविषयी एखादे सूत्र समजले की, ती ते इतरांनाही सांगते.
४. कुणी निराश झाल्यास किंवा रुग्णाईत असल्यास ती त्यांची काळजी घेते. त्यांना आनंद देण्यासाठी प्रयत्न

साधिकांनो, नवीन पोशाख किंवा ब्लाऊज शिवतांना सात्त्विकतेच्या दृष्टीकोनातून पुढील सूत्रे लक्षात घ्या !

 
पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ
    सध्या समाजात मोठ्या गळ्याचे, उंचीला अल्प असलेले पोशाख शिवणे प्रचलित आहे. त्यामुळे आपण शिंप्याला ज्या पद्धतीने पोशाख किंवा ब्लाऊज शिवायला सांगतो, त्या पद्धतीने न शिवता तो समाजात हल्ली रुढ असलेल्या फॅशननुसारच शिवतो. त्यामुळे साधिकांनी शिंप्याकडे कपडे शिवायला देतांना योग्य पद्धतीने शिवलेला जुना पोशाख किंवा ब्लाऊज द्यावे, तसेच पोशाख किंवा ब्लाऊज शिवण्यासंदर्भात आपण सांगितलेली सूत्रे शिंप्याला समजली आहेत

अशी करूनी शक्ती उपासना वाढवूया आपुली साधना ।

नवरात्रीनिमित्त...
 रजनी नगरकर
आला गं आश्‍विन मास ।
बैसली देवी आसनी नवरात्रीस ॥ १ ॥

पहिल्या दिवशी घेऊया देवीचे नाम ।
जाऊ द्या उद्धारून आपुले जीवन ॥ २ ॥

दुसरी माळ ती द्वितीयेची ।
करूया प्रार्थना भावभक्तीची ॥ ३ ॥ 

तिसर्‍या माळेला बोलवू कुमारिकेला ।
घेऊया अप्रकट शक्ती अपुल्या साधनेला ॥ ४ ॥

ईश्‍वरी ज्ञानात मनुष्याने पालट न करण्याचे कारण

     ईश्‍वरी ज्ञान मिळाल्यानंतर त्यात पालट करणे म्हणजे त्यात वाक्य अधिक अथवा अल्प करणे मनुष्याच्या क्षमतेबाहेरचे असते. मिळालेले ज्ञान अलौकिक असते. ज्याप्रमाणे रसायनांचा वापर केल्याने फळांची गोडी न्यून होते, त्याप्रमाणे ज्ञानात बुद्धीने हस्तक्षेप केल्यास ज्ञानाचा गोडवा

पू. (कु.) स्वाती खाडये यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

१. पू. ताई संत असूनही सहजतेने इतर साधकांमध्ये मिसळून जातात.
२. प्रेमभाव
       पू. ताई घरी आल्यानंतर त्यांनी कुटुंबियांची प्रेमाने विचारपूस केली.
३. तत्परता आणि निरीक्षणक्षमता
     उपवनमध्ये गणपतीच्या मूर्ती ठेवल्या होत्या. तेथे वरच्या माळ्यावरील वाळू आणि सिमेंट खाली पडत होते. पू. ताईंनी त्या मूर्ती खराब होऊ नयेत; म्हणून बाजूला ठेवायला सांगितल्यावर ते आमच्या लक्षात आले. त्या वेळी पू. ताईंमधील तत्परता आणि निरीक्षणक्षमता

गुरुपौर्णिमा शिबिरात श्रीकृष्णाच्या कृपेने विषय मांडता आल्याची साधिकेला आलेली अनुभूती

सौ. योगिता सावंत
१. पू. (कु.) अनुराधा वाडेकर आणि सौ. घोंगाणेकाकू यांनी छोटे छोटे विषय 
घेऊन बोलण्याचा प्रयत्न करण्यास सांगणे आणि साधकांना पुढे नेण्याची त्यां
ची तळमळ पाहून रायगडच्या शिबिरात विषय मांडण्याची सिद्धता दर्शवणे
    गुरुपौर्णिमा शिबिरात गुरुपौर्णिमेचे महत्त्व यांविषयी बोलायचे होते. मुंबईला शिबीर झाले. तेव्हा पू. अनुताई (पू. (कु.) अनुराधा वाडेकर) आणि सौ. घोंगाणेकाकू म्हणाल्या, छोटे छोटे विषय घेऊन बोलण्याचा प्रयत्न करू शकता. तेव्हा जाणीव झाली की, आपल्यासाठी पू. अनुताई आणि सौ. घोंगाणेकाकू किती तळमळीने प्रयत्न करत आहेत ! आपण पुढे जावे, याची त्यांनाच तळमळ असते. तेव्हा आपण प्रयत्न करायला हवेत. जेव्हा मला विचारले, रायगडमध्ये शिबिरात तुम्ही बोलू शकता का ? तेव्हा मी लगेच हो, म्हणाले. 

दोन्ही हातांनी उचललेल्या उष्ण कुकरचा हातात स्फोट होऊनही कोणतीही दुखापत न होणे आणि स्फोटाची भीषणता पाहिल्यावर श्रीकृष्णाच्या अगाध सामर्थ्याची प्रचीती येणे

अधिवक्त्या (सौ.) कावेरी सुधीर राणे
१. कुकरची केवळ एक शिट्टी होणे आणि गॅसवरील कुकर दोन्ही हातांनी पकडून उचलतांना क्षणात हातातच कुकरचा स्फोट होणे : ६.१०.२०१४ या दिवशी दुपारी मी नेहमीप्रमाणे प्रेशरकुकरमध्ये तांदूळ, डाळ आणि चणे शिजायला ठेवून तो गॅसवर ठेवला. त्यानंतर कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत खाली बसून पोळ्या करू लागले. तोपर्यंत कुकरची केवळ एक शिट्टी झाली आणि नंतर शिट्ट्या झाल्या नाहीत. त्यामुळे मी उठून गॅस बंद केला. नंतर खाली बसून उरलेल्या पोळ्या केल्या. पोळ्या करत असतांना सत्र करण्याचा विचार आला. पोळ्या करतांना सत्र कसे करणार ?, असा नकारात्मक विचार आला; पण त्याकडे दुर्लक्ष करून सत्र पूर्ण केले.

पू. स्वातीताई म्हणजे आनंदाचा वर्षाव !

पू. (कु.) स्वाती खाडये
पू. ताई म्हणजे समष्टीचे रूप ।
पू. ताई म्हणजे
गुरुकार्याची तळमळ ॥ १ ॥

पू. ताई म्हणजे
शिस्तीचा निखारा ।
पू. ताई म्हणजे
साधकांना घडवणारी आई ॥ २ ॥

साधनेमुळे पालटणार्‍या ओळखी

     साधना न करणार्‍या मुलीची ओळख .....यांची मुलगी अशी करून दिली जाते, तर साधना करणार्‍या मुलीच्या बाबांची ओळख .....हिचे बाबा अशी करून दिली जाते !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (७.१०.२०१५)

पू. पात्रीकरकाकांच्या आवाजातील आकाशदेवाचा नामजप ऐकतांना उच्च लोकांत असल्याचे जाणवून अनाहत चक्रातून चैतन्याचे कारंजे बाहेर येत आहेत, असेेे जाणवणे

श्रीमती मीरा करी
        रामनाथी आश्रमात सनातनचे पू. अशोक पात्रीकर यांच्या आवाजातील ॐ ॐ श्री आकाशदेवाय नमः ॐ ॐ । हा नामजप ध्वनीवर्धकावरून लावण्यात येतो. पहिल्या दिवशी हा नामजप ऐकतांना मी या लोकात नसून उच्च लोकांत, म्हणजे महर्, जन, तप आदी लोकांत असल्याप्रमाणे जाणवले. त्याच वेळी सर्वत्र निर्वात पोकळी निर्माण झाली आहे आणि माझे अस्तित्व नाहीसे होऊन नामजपातील नादामुळे माझ्या हृदयातून (अनाहत चक्रातून) चैतन्याचे कारंजे बाहेर येत आहेत, असे जाणवले. हा नामजप देवतांच्या मुखातूनच बाहेर पडत आहे,

ॐ ॐ श्री आकाशदेवाय नमः ॐ ॐ । हा नामजप ऐकून आलेली अनुभूती

 रामनाथी आश्रमातील ध्वनीवर्धकावर चालू असलेला ॐ ॐ श्री आकाशदेवाय नमः
ॐ ॐ । हा नामजप भ्रमणभाषमधून ऐकतांना आलेली अनुभूती
कु. कनकमहालक्ष्मी देवकर
पू. अशोक पात्रीकर
१. रामनाथी आश्रमातील ध्वनीवर्धकावर चालू असलेला नामजप भ्रमणभाषवर ऐकल्यानंतर मनाची अस्वस्थता दूर होऊन मन हलके होणे आणि नामजपातील सकारात्मक ऊर्जेची अनुभूती घेता येणे : २३.९.२०१५ या दिवशी सायंकाळी सेवेच्या निमित्ताने बोलण्यासाठी श्री. प्रसन्नदादा वेंकटापूर यांचा रामनाथीहून भ्रमणभाष आला होता. केवळ २ मिनिटे बोलणे झाले

विद्यार्थी-साधकांना दीपावलीच्या सुटीच्या काळात चैतन्यदायी आश्रमजीवन अनुभवण्याची सुवर्णसंधी !

साधकांनो, हिंदु राष्ट्राची स्थापना हे श्रीगुरूंचे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी विद्यार्थ्यांचा
सर्वांगीण विकास साधणार्‍या सेवांमध्ये सहभागी होऊन या व्यापक कार्यात खारीचा वाटा उचला !
१. राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी वेळ देणे ही काळाची आवश्यकता ! : भावी आपत्कालीन स्थिती निर्माण होण्यापूर्वी धर्मप्रसार आणि सनातनच्या संशोधनाचे कार्य समाजापर्यंत अधिकाधिक पोचवणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकाने स्वतःचे शिक्षण, तसेच अन्य व्यावहारिक कामे सांभाळून अधिकाधिक वेळ राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी देणे काळाची आवश्यकता आहे.
२. पालकांनो, १३ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या साधक-पाल्यांना सुटीत रामनाथी किंवा देवद येथील आश्रमांमध्ये अथवा मंगळुरू सेवाकेंद्रात पाठवा ! : थोड्याच दिवसांत शाळा आणि महाविद्यालये यांमधील विद्यार्थ्यांना दिपावलीची सुटी लागेल. या कालावधीत १३ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या साधक-पाल्यांना सेवेत सहभागी होण्यासाठी सनातनच्या रामनाथी (गोवा), देवद (पनवेल) येथील आश्रमात अथवा मंगळुरू (कर्नाटक) सेवाकेंद्रात पाठवता येईल. या साधक-मुलांची आवड आणि कौशल्य यांनुसार आश्रमात विविध विभागांमधील सेवा त्यांना शिकवल्या जातील.

बोधचित्र


॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
मायेचे आकर्षण
    सततच्या दिव्याकडे कोणाचे लक्ष नसते. लुकलुकणार्‍या दिव्याकडे लक्ष जाते.
भावार्थ : सततचा दिवा म्हणजे आत्मज्योत (ब्रह्म). ही स्थिर असते. लुकलुकणारा दिवा म्हणजे माया. तिच्याकडे सर्वांचे लक्ष चटकन वेधले जाते.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     अधोगतीला गेलेल्या समाजाचे प्रतिबिंब कथा, नाटके, कादंबर्‍या, चित्रपट, दूरदर्शनवरील मालिका इत्यादींत न दाखवता त्यांत समाजाला दिशा देणारा आदर्श समाज दाखवणे सर्वांकडून अपेक्षित आहे. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२५.२.२०१५) 
 प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सद्गुरूंचे महत्त्व 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     परमेश्‍वराशी संपर्क साधण्याएवढी पुण्याई अभावनेच आढळते; म्हणूनच सद्गुरु आवश्यक आहेत; मात्र त्यांच्याशी संपूर्णपणे एकनिष्ठ रहावे. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

शासनावरच उलटणारे धोरण !

आतंकवादाच्या आरोपाखाली वर्ष १९९० मध्ये अटक करण्यात आलेले वारयाम सिंह या ७० वर्षीय व्यक्तीला कारावासातील चांगल्या वागणुकीमुळे जन्मठेपेच्या शिक्षेतून मुक्त करण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी घेतला आहे. कारागृहातील चांगल्या वर्तणुकीमुळे गुन्हेगाराला लवकर कारागृहाबाहेर काढून सुस्वभावी नागरिकाचे जीवन जगण्याची संधी देणे, हा विचार गैर नाही. प्रश्‍न उरतो तो म्हणजे अशा गुन्हेगाराच्या वृत्तीत खरोखरच पालट झाला आहे, असे सर्वंकश विचारांनी ठरवण्याचा ! अलीकडेच गोव्याचे माजी मंत्री मिकी पाशेको कारागृहात त्यांची वर्तणूक चांगली होती या कारणामुळेच दोन मास अगोदरच कारागृहातून मुक्त झाले. वीज अभियंत्याला मारहाण केल्याच्या प्रकरणी त्यांना सहा मासांच्या कारावासाची शिक्षा झाली होती, ही गोष्ट ते विसरले आणि कॅसिनोचालकांना धमकी दिल्याचे प्रकरण त्यांच्या नावावर लागले. न्यायिक आतंकवाद असे शब्दप्रयोग करून त्यांनी न्यायालयाच्या कामकाजावर भाष्य केले. या दोन प्रकारांमुळे पाशेको परत वादाच्या भोवर्‍यात आले.

मूलभूत अधिकारांचे अज्ञान !

१५ऑक्टोबर २०१५ या दिवशी गोवा राज्याची राजधानी असलेल्या पणजी शहरातील आझाद मैदान येथे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संस्थेने निषेध धरणे आंदोलन केले. या संस्थेने आयोजित केलेल्या ९ ते १८ ऑक्टोबर या कालावधीतील धर्मवेड्यांच्या विरोधातील आंदोलनाचाच हा भाग होता. या आंदोलनाच्या नेत्यांनी विधान केले, देशातील ८० टक्के नागरिकांचा गोमांस खाणे हा मूलभूत अधिकार आहे. गोमांस आणि तेही देशातील बहुसंख्य म्हणजेच ८० टक्के असलेल्या हिंदूंनी खाणे, असाच त्याचा अर्थ काढला जात आहे. या नेत्यांचे त्याविषयी वेगळे काही स्पष्टीकरण असू शकते. त्यांनी ते सार्वजनिक करेपर्यंत बहुसंख्य हिंदूंचा गोमांस खाणे, हा मूलभूत अधिकार असल्याचा चुकीचा संदेश लोकांपर्यंत जाईल, यात दुमत नाही. देशात सध्या गोहत्याबंदी हा विषय अधिकाधिक लोकांमधील चर्चेचा विषय आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn