Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

नवरात्रोत्सव (आज चौथा दिवस)

सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तुते ॥
      एका मतानुसार नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण कमी करण्यासाठी तमोगुणी महाकालीची, पुढील तीन दिवस रजोगुण वाढवण्यासाठी रजोगुणी महालक्ष्मीची आणि शेवटचे तीन दिवस साधना तीव्र होण्यासाठी सत्त्वगुणी महासरस्वतीची पूजा करतात.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ शक्ती)
नवरात्र विषयक माहितीसाठी संकेतस्थळावरील मार्गिका
http://www.sanatan.org/mr/a/cid_289.html

(म्हणे) भारतात धर्मापासून प्रेरणा घेऊन हिंसाचार !

जगाचा कैवार घेतल्याच्या तोर्‍यात वावरणारी अमेरिका
     फाळणीच्या वेळी पाकमधील हिंदूंची संख्या २२ टक्के होती; मात्र तेथील हिंदूंचे धर्मांतर आणि हत्या यांमुळे तेथे आता केवळ २ टक्केच हिंदू उरले आहेत. हीच स्थिती बांगलादेशातील हिंदूंची झाली आहे. याविषयी अमेरिका का बोलत नाही ?      २५ वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये ९० सहस्रांहून अधिक हिंदूंना ठार करण्यात आले. साडे तीन लाख हिंदूंना घरदार सोडावे लागले आणि बंगाल, केरळ आदी राज्यांत हिंदूंवर प्रतिदिन

देशात गोहत्येवर पूर्णपणे बंदी आणण्यासाठी येत्या ३ मासांत निर्णय घ्या !

हिमाचलप्रदेश उच्च न्यायालयाचे केंद्रशासनाला निर्देश
न्यायालयाच्या निर्देशानुसार भाजप शासनाने त्वरित निर्णय
घेऊन संपूर्ण देशात गोहत्याबंदी करावी, हीच हिंदूंची अपेक्षा आहे !
      शिमला - देशात गोहत्येवर पूर्णपणे बंदी आणण्यासाठी केंद्रशासनाने येत्या ३ मासांत निर्णय घ्यावा, असे निर्देश हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. गोहत्या, गोमांसाची आयात-निर्यात, मांस आणि मांसापासून बनलेले पदार्थ यांच्या विक्रीवर देशभर बंदी येण्यासाठी प्रभावी उपाययोजना आखण्याची आवश्यकता आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
     हिमाचलप्रदेशमधील बेवारस जनावरांच्या प्रश्‍नाविषयी हिमाचलप्रदेश

सर्वोच्च न्यायालयाकडून डान्स बारवरील बंदीला स्थगिती

डान्स बार बंद असावेत, हीच शासनाची भूमिका ! - मुख्यमंत्री फडणवीस
      नवी देहली - सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील डान्स बारवर बंदी आणण्याच्या शासनाच्या कायद्यावर १५ ऑक्टोबरला स्थगिती आणली. या वेळी न्यायालयाने डान्स बारमध्ये असभ्य प्रकार टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. डान्स बार बंद असावेत, ही शासनाची भूमिका आहे. या डान्स बारवर शासनाचेच नियंत्रण असेल, असे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयाच्या निर्णयानंतर स्पष्ट केले आहेे. (डान्स बारच्या संदर्भात योग्य भूमिका घेणार्‍या श्री. देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन !

संयुक्त राष्ट्र संघात पाकने उठवलेल्या काश्मीर प्रश्‍नाला भारताचे सडेतोड उत्तर !

      संयुक्त राष्ट्र - संयुक्त राष्ट्र संघात (युनोमध्ये) पाकच्या राजदूत मलिहा लोधी यांनी काश्मीरविषयी प्रश्‍न निर्माण केला होता. त्या १४ ऑक्टोबरला म्हणाल्या होत्या की, काश्मीरविषयी तोडगा काढण्यासाठी तेथील लोकांचे मत जाणून घेतले पाहिजे. भारत याविषयी चर्चेसाठीच सिद्ध नाही. त्याला भारताचे प्रधान सचिव श्री. अभिषेक सिंह यांनी सडेतोड उत्तर दिले. सिंह यांनी सांगितले, युनो हे काही काश्मीर प्रश्‍न सोडवण्याचे व्यासपीठ नाही.

आरक्षणाच्या भूमिकेचा फेरविचार व्हावा !

सरसंघचालक मोहन भागवत यांचा पुनरुच्चार
     नवी देेहली - देशाच्या आरक्षण धोरणाचा फेरविचार व्हावा, या विधानाचा सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुनरुच्चार केला आहे. आपण आरक्षणाच्या विरोधात नाही; मात्र आरक्षणाचा लाभ खर्‍या लाभार्थ्यांना मिळत नाही. त्यामुळे आरक्षण धोरणाचा फेरविचार व्हावा, त्याच्यावर चर्चा व्हावी आणि ज्यांना आरक्षणाची खरी आवश्यकता आहे त्यांनाच ते मिळेल, याची काळजी घेण्यात यावी, असे सरसंघचालक भागवत यांनी गोरखपूर येथे संघाच्या स्वयंसेवकांशी बोलतांना सांगितले.

विशेष पोलीस अधिकारी असलेल्या दोन धर्मांध आतंकवाद्यांना कंठस्नान !

आत्मसमर्पित आतंकवाद्यांना विशेष पोलीस अधिकारीपदाची
भेट देणार्‍यांवरच उलटले आतंकवादी !
     दोडा (जम्मू काश्मीर) - येथे सुरक्षारक्षक आणि आतंकवादी यांच्यामध्ये १४ ऑक्टोबरला रात्री चकमक झाली. या चकमकीत दोघांना कंठस्नान घालण्यात आले. विशेष म्हणजे हे दोघेही वर्ष २०१० पूर्वी आतंकवादी संघटनांत कार्यरत होते. त्यांच्या आत्मसमर्पणानंतर त्यांना विशेष पोलीस अधिकारी म्हणून कार्यभार दिला होता. गेल्या महिन्यात ते पुन्हा फरार झाले होते. (यावरून कुत्र्याचे शेपूट वाकडेच कसे रहाते, तेच स्पष्ट होते ! आता या दोघांनी पोलीस अधिकारी पदावर असतांना

दादरी आणि मैनपुरी हत्या पार्श्‍वभूमीवर बॉम्बस्फोटांचे संकेत

आतंकवादग्रस्त भारत ! देशातील आतंकवाद समूळ नष्ट करण्यासाठी 
आतंकवादाला पाठिंबा असणार्‍या पाकला संपवणे आवश्यक !
      लक्ष्मणपुरी (लखनौ) - दादरी आणि मैनपुरी गोमांस हत्या प्रकरणाचा सूड घेण्यासाठी उत्तरप्रदेशमधील काही जिल्ह्यांमध्ये बॉम्बस्फोट होऊ शकतात, अशी चेतावणी गुप्तचर विभागाकडून देण्यात आली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राज्यात अतिदक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
     मिळालेल्या माहितीनुसार, विश्‍व हिंदु परिषदेचे नेते अशोक सिंघल, डॉ. प्रवीण तोगाडिया यांच्यावर आक्रमण केले जाण्याची शक्यता आहे. काशी विश्‍वनाथाचे मंदिर आणि अयोध्येतील राममंदिर

क्रांतीकारक भगतसिंह यांच्या संदर्भातील कागदपत्रे खुली करण्याची मागणी !

राष्ट्रासाठी बलीदान देणार्‍या क्रांतीकारकांची माहिती लपवून ठेवणारा जगातील एकमेव
देश भारत ! देशात सर्वाधिक काळ सत्तेत राहिलेली काँग्रेस याला उत्तरदायी आहे.
      मोहाली (पंजाब) - देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणार्‍या स्वातंत्र्यसैनिकांच्या संदर्भातील कागदपत्रे केंद्रशासन उघड करत असतांना आता थोर क्रांतीकारक भगतसिंह यांच्या कुटुंबियांनीही भगतसिंह यांच्या संदर्भातील कागदपत्रे खुली करण्याची मागणी केली आहे.
१. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ ऑक्टोबरला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन बोस यांच्या संदर्भातील काही कागदपत्रे खुली करण्याचे

सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीच्या विरोधात बेळ्तंगडी (कर्नाटक) येथे हिंदुत्ववादी संघटनांचा निषेध मोर्चा आणि आंदोलन

३५० हून अधिक धर्माभिमानी हिंदूंचा उत्स्फूर्त सहभाग
आंदोलनात सहभागी झालेले हिंदुत्ववादी
     बेळ्तंगडी - सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीच्या विरोधात विविध हिंदुत्ववादी संघटनांनी येथील आंबेडकर भवनानजीक आंदोलन करून तेथून मोर्चा काढला आणि तहसीलदारांना निवेदन दिले. या आंदोलनात विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल, धर्मजागरण, चिरंजिवी युवक मंडळ, धर्मरक्षा समिती, हिंदु जनजागृती समिती यांच्यासह इतर विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह सुमारे ३५० हून अधिक धर्माभिमानी हिंदू सहभागी झाले होते. 

गोव्यात मटका जुगाराचे क्रमांक प्रसिद्ध केल्याविषयी दैनिक पुढारी आणि तरुण भारत या दैनिकांच्या व्यवस्थापनाची चौकशी होणार

     पणजी - गोव्यात मटका हा जुगार चालवणारे चालक, तसेच मटक्याचे आकडे प्रसिद्ध करणारे दैनिक पुढारी आणि दैनिक तरुण भारत या दैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी या दैनिकांमध्ये छापून आलेल्या मटका क्रमांकांची माहिती मिळवण्यासाठी या वृत्तपत्रांच्या व्यवस्थापनाला येत्या काही दिवसांत चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे.
    गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांकडून यासंबंधीच्या पुराव्यांची पडताळणी केली जात आहे. या दैनिकांनी मटका जुगाराचे क्रमांक प्रसिद्ध करून गुन्हा केला आहे. काही मंत्री, राजकारणी आणि पोलीस अधिकारी यांनी राज्यातील मटका जुगाराला आळा घालण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली नाहीत, तसेच हप्ते घेऊन मटका दलालांना संरक्षण दिले. चौकशी करण्यास पोलीस अपयशी ठरले, अशी तक्रार घेऊन याचिकादार न्यायालयात गेल्याने या प्रकरणाला वाचा फुटली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हे शाखेने या संदर्भात चौकशी चालू केली आहे. मटका जुगारातील स्रोतांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेचे पोलीस पथक पुढील आठवड्यात गुजरातला जाणार आहे. 

केवळ हिंदूंनाच गरब्यात प्रवेश !

गुजरातमधील गरबा स्थळांवर झळकले कापडी फलक
     गरब्याच्या माध्यमातून अहिंदू मुले असंख्य हिंदु मुलींना लव्ह जिहादमध्ये अडकवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गुजरातमध्ये नवरात्र मंडळांकडून घेण्यात येत असलेली काळजी देशातील इतरही मंडळांनी घेतल्यास मोठ्या प्रमाणात हिंदु मुलींचे लव्ह जिहाद पासून रक्षण होईल !
    कर्णावती (अहमदाबाद) - गरबा केवळ हिंदूंसाठी असल्यामुळे अहिंदूनी गरबा नृत्यात सहभागी होऊ नये, एवढेच नव्हे, तर त्यांना कार्यक्रमस्थळीही प्रवेश मिळणार नाही, असे कापडी फलक गुजरातमधील १०० हून अधिक गरबा स्थळांवर लावण्यात आले आहेत. कर्णावतीमध्ये सर्वप्रथम राजपथ क्लब या गरब्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी अहिंंदूंना प्रवेश नाकारणारे कापडी फलक लागले. त्यानंतर असे फलक सर्वत्र झळकू लागले आहेत. मुसलमान मुले गरब्याचा अपलाभ घेऊन हिंदु मुलींना त्यांच्या जाळ्यात ओढतात. या लव्ह जिहादच्या षड्यंत्रापासून हिंदु मुलींचे रक्षण करण्यासाठी काही दिवसांपूर्वी राज्यातील विहिंपचे सरचिटणीस रणछोडदास भारवाड यांनी अहिंदु मुलांना गरब्यात प्रवेश नाकारण्याची घोषणा केली होती.

सनातन संस्थेमुळे हिंदूंमध्ये जागृती होत आहे ! - श्री. राकेश वानवत, गोरक्षा दल

डावीकडून श्री. राकेश वानवत, पू. डॉ. चारुदत्त
पिंगळे आणि श्री. राजपुरोहित
   उज्जैन - सिंहस्थपर्वामध्ये धर्मप्रसार करण्याविषयी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी येथील गोरक्षा दलाचे श्री. राकेश वनवत आणि श्री. राजपुरोहित यांच्याशी नुकतीच चर्चा केली. या वेळी त्यांनी सर्व प्रकारचे साहाय्य करण्याचे आश्‍वासन दिले. श्री. वानवत म्हणाले, सनातनचे धर्मकार्य अतिशय चांगले असून या काळात त्याची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे हिंदूंमध्ये जागृती होत आहे. तुम्हाला आमचा सक्रीय पाठिंबा आहे.

ज्येष्ठ पत्रकार हबीब खान यांचा प्रश्‍न

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना कारावास का ?
     नवी देहली - पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या खटल्याच्या संदर्भात वृत्तवाहिन्यांवर दाखवण्यात आलेल्या जोधपूर डीसीपी अजय पाल लांबा यांच्या वक्तव्यानुसार प्रथमदर्शनी अहवालात पीडित मुलीने कलम ३७६ (बलात्कार)चा आरोप लावलेला नाही. आम्ही वारंवार हेच सांगत आलो आहे की, वैद्यकीय अहवालातही याविषयी काही पुरावा नाही, तरीही पू. बापूंना कारावास का दिला जात आहे ? एकामागोमाग एक खोटे आरोप लावले जाणे, हे षड्यंत्र नाही का ? सत्य हे आहे की, जेही ख्रिस्त्यांकडून चालवण्यात येणार्‍या धर्मांतराच्या आड येतात, त्यांना जनतेत अपमानित केले जाते. त्यामुळे पू. बापू यांच्या विरोधातील षड्यंत्र लवकर उघड होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार हबीब खान यांनी केले आहे. (जे एका मुसलमान पत्रकाराला कळते, ते हिंदु पत्रकार, राज्यकर्ते यांना का कळत नाही ? - संपादक)

इराणच्या संसदेची आण्विक करारास मान्यता

जाचक आर्थिक निर्बंधांमधून इराणला मिळणार दिलासा !
     तेहरान (इराण) - इराणच्या आण्विक कार्यक्रमाच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवर करण्यात आलेल्या ऐतिहासिक करारास इराणच्या संसदेकडून १३ ऑक्टोबर या दिवशी मान्यता देण्यात आली. तत्पूर्वी इराणच्या संसदेत वादळी चर्चा झाली. या मान्यतेमुळे इराणवर लादण्यात आलेल्या जाचक आर्थिक निर्बंधांमधून त्याला दिलासा मिळणार आहे, तसेच इराणवरील निर्बंध या वर्षाच्या अखेरपर्यंत उठवले जाण्याची शक्यता आहे.

श्रीमती हिमानीताई सावरकर यांच्या जाण्याने हिंदुत्ववाद्यांचे मातृतुल्य छत्र हरवले ! - सागर श्रीखंडे, श्रीराम सेना

     गायकवाडी (निपाणी, जिल्हा बेळगाव), १५ ऑक्टोबर (वार्ता.) - श्रीमती हिमानीताई सावरकर यांनी हिंदुत्वाचे कार्य नेटाने केले. त्यांनी पुणे येथे हिंदु महिला सभेची स्थापना करून हिंदुत्वाचे कार्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिला कार्यकर्त्या सिद्ध केल्या. कथित आरोपांखाली अटक केलेले कर्नल पुरोहित आणि साध्वी प्रज्ञासिंह यांची बाजू सर्वप्रथम त्यांनी ठामपणे मांडली. त्यांच्या जाण्याने सर्व हिंदुत्ववाद्यांचे मातृतुल्य छत्र हरवले, असे मत श्रीराम सेनेचे श्री. सागर श्रीखंडे यांनी व्यक्त केले. १२ ऑक्टोबर या दिवशी हिमानीताई सावरकर यांच्यासाठी श्रीराम सेनेच्या वतीने श्रद्धांजली सभा आयोजित केली होती. त्या वेळी ते बोलत होते.

पिंपरी (पुणे) येथे पशूवधगृह उभारण्यास राज्यशासनाची स्थगिती

भाजप शासनाने पशूवधगृहांवर कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
      पिंपरी, १५ ऑक्टोबर - येथील डाल्को आस्थापनाच्या जागेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने मांस प्रक्रिया केंद्र या गोंडस नावाखाली २५ कोटी खर्चून अत्याधुनिक पशूवधगृह उभारण्याच्या निविदा प्रक्रियेलाही आरंभ केला आहे. या प्रकरणी हिंदुत्ववादी संघटना, सामाजिक संस्था आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी महानगरपालिकेला विरोध दर्शवला होता. हा प्रकल्प उभारण्याचा अट्टहास करणार्‍या महानगरपालिकेला आता राज्यशासनानेच चपराक लगावली आहे. पशूवधगृह उभारण्यासाठी महानगरपालिकेने केलेल्या जागा फेरपालटाच्या कार्यवाहीला राज्याच्या नगरविकास विभागाने स्थगिती दिली आहे.

पिंपरी (पुणे) येथील यशवंतराव चव्हाण मेमोरीयल रुग्णालयाच्या पहिल्या मजल्याला आग

      पिंपरी, १५ ऑक्टोबर - येथील यशवंतराव चव्हाण मेमोरीयल (वायसीएम्) या शासकीय रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील रुबी अलकेअर युनिटच्या अतिविशेष हृदयरोग सेवा विभागाला १५ ऑक्टोबर या दिवशी भीषण आग लागली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली आहे.
     मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या ४ गाड्यांच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली. आग लागलेल्या विभागातील रुग्णांना रुग्णालयातील अतिदक्षता विभागात, तर आधुनिक वैद्य, कर्मचारी आणि रुग्णांचे नातेवाईक यांना रुग्णालयाच्या वाहनतळाच्या मैदानात हालवण्यात आले आहे.

पुण्यातील ससून रुग्णालयातील 'मार्ड'चे आधुनिक वैद्य संपावर

     पुणे, १५ ऑक्टोबर - येथील ससून रुग्णालयात आधुनिक वैद्य आणि पोलीस यांच्यामध्ये हाणामारी झाली. या मारहाणीच्या निषेधार्थ रुग्णालयातील 'मार्ड'चे आधुनिक वैद्य १५ ऑक्टोबर या दिवशी सकाळी १० वाजल्यापासून संपावर गेले आहेत. (यामुळे रुग्णांचे जे हाल होणार आहेत, त्याला उत्तरदायी कोण ? निषेध व्यक्त करण्यासाठी अन्य सनदशीर मार्गांचा अवलंब करता येऊ शकला असता. याचा आधुनिक वैद्य विचार करतील का ? - संपादक) 

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त निवेदन !

     
उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी
जळगाव -
नवरात्रोत्सवामध्ये होणारे अपप्रकार थांबवण्याच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले. उपजिल्हाधिकारी श्री. खरात यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने निवेदन स्वीकारले, तर पोलीस अधीक्षक जालिंदर सुपेकर यांनी निवेदन स्वीकारले. 

कालमापन आणि दशमानपद्धत भारताने जगाला दिली ! - पू. संभाजीराव भिडेगुरुजी

   
धारकर्‍यांना मार्गदर्शन करतांना पू. भिडेगुरुजी
     सांगली,
१५ ऑक्टोबर (वार्ता.) - भारताचा इतिहास अतिप्राचीन असून भारताचे क्षेत्र आता आहे, त्यापेक्षा कैकपटीने अधिक होते. १४० सहस्र वर्षांचा इतिहास असलेला आपला देश आहे. याचे सर्व दाखले पुराणांत दिले आहेत. पुराणे ही अत्यंत श्रेष्ठ माहिती देणारे ग्रंथ आहेत. ब्रिटिशांनी पुराणे, तसेच अन्य ग्रंथांविषयी समाजात अपसमज पसरवले. कालमापन, दशमानपद्धती भारताने जगाला दिली. भारताचे जगावर असंख्य उपकार आहेत, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.

नवरात्रोत्सवानिमित्त सनातनच्या ग्रंथ प्रदर्शनाचे उत्साहात उद्घाटन !

     कोल्हापूर, १५ ऑक्टोबर (वार्ता.) - नवरात्रोत्सवानिमित्त येथील बिनखांबी गणेश मंदिराजवळील श्री महालक्ष्मी अधिकोषाजवळ सनातन-निर्मित ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन सनातनचे ६१ टक्के पातळीचे साधक डॉ. निवृत्ती चव्हाण यांच्या हस्ते श्रीकृष्णाच्या चित्राचे पूजन करून करण्यात आले. या वेळी तुलसी गॅस एजन्सीचे मालक श्री. किशोर ठोमके यांच्या हस्ते नारळ वाढवण्यात आला. या प्रदर्शनात सनातनचे ग्रंथ, ध्वनीचित्र-चकत्या आणि उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. प्रदर्शनाचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. या वेळी सनातनच्या आधुनिक वैद्या सौ. शिल्पा कोठावळे, आधुनिक वैद्य श्री. मानसिंग शिंदे, सौ. विजया वेसणेकर, सौ. अंजना चव्हाण, सौ. चारूशिला हावळ, कु. स्वाती शिंदे उपस्थित होत्या.

धर्मकार्यासाठी सनातनच्या साधकांचा त्याग वाखाणण्याजोगा ! - अधिवक्ता समीर पटवर्धन

     सांगली, १५ ऑक्टोबर (वार्ता.) - धर्मकार्यासाठी सनातनचे साधक करत असलेला त्याग वाखाणण्यासारखा आहे. सनातनच्या ग्रंथांमध्ये अमूल्य ज्ञान आहे, असे मत अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन यांनी व्यक्त केले. येथील माधवनगर रस्त्यावर असलेल्या श्री दुर्गामाता मंदिरासमोर लावलेल्या सनातनच्या ग्रंथ प्रदर्शनाचे श्री. पटवर्धन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. हे प्रदर्शन सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत उपलब्ध आहे. मिरज शहरात ब्राह्मणपुरी येथे अंबाबाई देवळाच्या परिसरात लावलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन सनातनचे संत पू. जयराम जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. 

हिंदुविरोधी आणि देवतांचे विडंबनात्मक लेखन करणार्‍या पूनावाला यांच्यावर कारवाई करण्याची शिवसेनेची मागणी

हिंदूंनो, देवतांचा अवमान आणि विडंबन रोखण्यासाठी कायदा करण्याची मागणी करा !
     पुणे, १५ ऑक्टोबर - येथील बंडगार्डन रस्ता भागातील तेहसीन सर्फराज पूनावाला हे फेसबुक आणि ट्विटर या सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून सातत्याने हिंदु धर्म, देवता आणि शिवसेना यांच्या विरोधात लेखन करत आहेत. त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना भडकत असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने एका निवेदनाद्वारे पोलिसांकडे करण्यात आली. (हिंदु धर्म आणि देवता यांच्या विडंबनाच्या विरोधात आवाज उठवणार्‍या शिवसेनेचे अभिनंदन ! - संपादक)

शिवछत्रपतींसारखी विलक्षण निष्ठा निर्माण करा ! - पू. संभाजीराव भिडेगुरुजी

    सांगली, १५ ऑक्टोबर (वार्ता.) - शिवछत्रपती ज्या काळात जन्माला आले, त्या काळात पूर्ण भारत देश पारतंत्र्यात होता. असे असतांना त्या सर्वांनी यशस्वी लढा देऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले. आपण सर्व काही देवीच्या आशीर्वादानेच करू शकतो, अशी त्यांची ठाम श्रद्धा-निष्ठा होती. शिवछत्रपतींसारखी विलक्षण निष्ठा आणि श्रद्धा आमच्यात निर्माण कर, असे मागणे आपण देवीकडे मागितले पाहिजे, असे मार्गदर्शन पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांनी केले. ते श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने आयोजित श्री दुर्गामाता दौडीच्या तिसर्‍या दिवशी धारकर्‍यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.

नवरात्रोत्सवानिमित्त सनातनच्या ग्रंथ प्रदर्शनाचे उत्साहात उद्घाटन !

     कोल्हापूर, १५ ऑक्टोबर (वार्ता.) - नवरात्रोत्सवानिमित्त येथील बिनखांबी गणेश मंदिराजवळील श्री महालक्ष्मी अधिकोषाजवळ सनातन-निर्मित ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन सनातनचे ६१ टक्के पातळीचे साधक डॉ. निवृत्ती चव्हाण यांच्या हस्ते श्रीकृष्णाच्या चित्राचे पूजन करून करण्यात आले. या वेळी तुलसी गॅस एजन्सीचे मालक श्री. किशोर ठोमके यांच्या हस्ते नारळ वाढवण्यात आला. या प्रदर्शनात सनातनचे ग्रंथ, ध्वनीचित्र-चकत्या आणि उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. प्रदर्शनाचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. या वेळी सनातनच्या आधुनिक वैद्या सौ. शिल्पा कोठावळे, आधुनिक वैद्य श्री. मानसिंग शिंदे, सौ. विजया वेसणेकर, सौ. अंजना चव्हाण, सौ. चारूशिला हावळ, कु. स्वाती शिंदे उपस्थित होत्या.

(म्हणे) 'अन्य भाषांपेक्षा केवळ कन्नड भाषेलाच प्राधान्य द्यावे !'

बेळगाव जिल्हाधिकार्‍यांचा फतवा 
 महाराष्ट्रातच होणारी मराठीची ही गळचेपी 
रोखण्यासाठी आतातरी मराठीप्रेमी संघटित होतील का ? 
     बेळगाव - मराठी, इंग्रजी, हिंदी किंवा इतर भाषांपेक्षा केवळ कन्नड भाषेलाच प्राधान्य देण्यात यावे. सर्व शासकीय कार्यालयावरील फलक प्रथम कानडीत लिहावे. कागदपत्रे कानडीमध्येच द्यावीत. बेळगाव किंवा बेलगाम लिहिलेले फलक तातडीने 'बेळगावी' करावेत, कन्नड भाषा येणार्‍यांनाच कंत्राटी पद्धतीने कामावर घ्यावे, ग्रामपंचायतीवरही कानडीतूनच फलक लिहावेत, असे आदेश बेळगावचे जिल्हाधिकारी एन्. जयराम यांनी अधिकार्‍यांच्या बैठकीत दिले आहेत. (बेळगावमधील मराठीजनांनी या आदेशाला विरोध दर्शवल्यासच मराठीची अस्मिता टिकेल ! - संपादक)

वर्धा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

आंदोलनात सहभागी कार्यकर्ते
    वर्धा - कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणी सनातन संस्थेवर झालेले खोटे आरोप, तसेच स्वामी अविमुक्तेश्‍वरानंदजी यांना झालेली मारहाण यांविषयी वर्धा येथे १५ ऑक्टोबर २०१५ या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन घेण्यात आले.
    या वेळी बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष श्री. अटल पांडे आणि ५ कार्यकर्ते, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शशीकांत पाध्ये, सौ. भक्ति चौधरी आणि सनातन संस्थेच्या सौ.भार्गवी क्षीरसागर, सौ. रत्ना हस्ती असे एकूण २५ कार्यकर्ते उपस्थित होते.

बेळगाव येथे श्री दुर्गामाता दौडीला धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; दौडीमध्ये ३० सहस्र शिवप्रेमींचा सहभाग !

दौडीमध्ये सहभागी धर्माभिमानी
    बेळगाव, १५ ऑक्टोबर (वार्ता.) - बेळगावकरांनी श्री दुर्गामाता दौडीला १४ ऑक्टोबर या दिवशी प्रचंड गर्दी केली होती. ३० सहस्रांहून अधिक शिवप्रेमींच्या गगनभेदी घोषणांनी आसमंत दणाणून सोडला. श्री दुर्गामाता दौडीमध्ये तरुण-तरुणी यांसह बालचमू, अबालवृद्ध हे प्रचंड संख्येने सहभागी झाले होते. असाच प्रकार शिवाजीनगर आणि गांधीनगर येथे दिसून आला.

कुंभमेळ्यासाठी पाणी सोडण्याच्या जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाची वैधता पडताळण्याचे न्यायालयाचे आदेश

     मुंबई - राज्यात दुष्काळी परिस्थिती असतांना नाशिक कुंभमेळ्याच्या शाही स्नानासाठी गंगापूर धरणातून एक टीएम्सी पाणी सोडण्याच्या जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाची वैधता तपासा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी मुख्य सचिवांना दिला.
१. कुंभमेळ्यात शाही स्नानासाठी गंगापूर धरणातून पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले होते; मात्र शासनाच्या जल धोरणानुसार पिण्यासाठी सर्वप्रथम पाणी सोडता येते.
२. धार्मिक कारणांसाठी पाणी सोडण्याची वर्गवारी यात शेवटी म्हणजे ड वर्गात आहे. राज्यावर दुष्काळाचे सावट असतांना आणि लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी झगडावे लागत असताना अशा प्रकारचा निर्णय घेणे प्रथमदर्शनी शासनाच्या धोरणाच्या विरोधात असल्याचे दिसते, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.

आतंकवादाचे शिक्षण घेऊन भारतात परतण्यासाठी आतंकवादी भ्रमनिरासाचे कारण पुढे करत नाही ना, याची निश्‍चिती करा !

     'आय.एस्.आय.एस्.सह लढण्यासाठी सिरियात गेलेल्या आझमगडमधील एका २० वर्षांच्या तरुणाचा भ्रमनिरास झाला असून त्याला पुन्हा भारतात घरी परतण्याचे वेध लागले आहेत. भारतीय सुरक्षा यंत्रणा या तरुणाला परत आणण्यासंदर्भात पुढाकार घेत आहे, तसेच त्याला या आतंकवादी संघटनेकडे ओढणार्‍याचा तपास सुरक्षा यंत्रणांकडून करण्यात येत आहे.'

आज राष्ट्रप्रेमाविषयी पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार अशी स्थिती ! - दैनिक सामना

दैनिक सामनामधून पाकप्रेमी सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर टीका
      मुंबई - आज सत्तेपुढे देशभक्तीने लोटांगण घातले आहे. (त्यास शिवसेना अपवाद) सध्या जे चालू आहे त्यातले नेमके दुर्भाग्यपूर्ण काय आणि गौरवपूर्ण काय याचा निर्णय जनतेलाच करावा लागेल; पण आज तरी राष्ट्रभक्तीच्या बाबतीत वेश्येच्या गळ्यात मणिहार आणि पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा बांधण्याचा खतरनाक खेळ चालू आहे; म्हणूनच अतिरेकी म्हणून घुसलेल्या मोहम्मद ऐजाजुद्दीन, अमजद खान आणि मेहबूब गुडू हे तीन शांतिदूतांच्या आगतस्वागतात, आतिथ्यात काही कमतरता राहू नये. तेव्हा राज्यकर्त्यांनो, होशियार ! तीन पाकडे शांतीदूत पधारत आहेत. पायघड्या घाला !, अशी बोचरी टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या १५ ऑक्टोबरच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

विनाअनुमती मंडप उभारणार्‍या ४५ नवरात्रोत्सव मंडळांना मंडप हटवण्याच्या नोटिसा

अशाच नोटिसा अन्य धर्मियांच्या विनाअनुमती कार्यक्रमांनाही प्रशासनाने द्याव्यात, ही अपेक्षा !
मंडप न हटवल्यास फौजदारी कारवाईची चेतावणी
      नवी मुंबई - अनुमती न घेता मंडप उभारणार्‍या ४५ नवरात्रोत्सव मंडळांना नवी मुंबई पालिकेने मंडप हटवण्यासाठी नोटीसा बजावल्या आहेत. २ दिवसात मंडप न हटवल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची चेतावणी दिली आहे.
१. मुंबई उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्देशांनुसार रस्त्यावर मंडप टाकणे आणि ध्वनीप्रदूषण यांवर र्निबध घातले आहेत. या दोन अटींचे उल्लंघन करणार्‍या मंडळांवर देखरेख ठेवण्याचे दायित्व महसूल विभागावर सोपवण्यात आले आहे; मात्र कारवाईचे आदेश स्थानिक प्राधिकरणांना देण्यात आले आहेत.

बोको हरामविरुद्ध अमेरिकन सैन्य कॅमेरूनमध्ये

   
     वॉशिंग्टन - बोको हराम या आतंकवादी संघटनेच्या विरोधात लढण्यासाठी अमेरिकेच्या सैन्याची एक तुकडी कॅमरून या देशामध्ये तैनात करण्यात येणार असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केली आहे.
     बोको हरामचा प्रभाव असलेल्या भागांमध्ये हवाईमार्गाच्या माध्यमामधून देखरेख ठेवण्यासाठी आणि संवेदनशील माहिती गोळा करण्यासाठी ३०० सैनिकांचा समावेश असलेली तुकडी तैनात करण्यात आली आहे. उत्तर नायजेरियामध्ये मुख्य प्रभावक्षेत्र असलेल्या बोको हरामने कॅमेरून आणि चाड येथेही आतंकवादी आक्रमणे केली आहेत. या पार्श्‍वभूमीवर कॅमेरूनमध्ये अमेरिकन सैन्य आवश्यकता असेपर्यंत राहील, असे ओबामा यांनी स्पष्ट केले आहे. 

फलक प्रसिद्धीकरता

न्यायालयाच्या निर्देशानुसार भाजप शासनाने 
संपूर्ण देशात गोहत्याबंदी करावी, हीच हिंदूंची अपेक्षा आहे ! 
     देशात गोहत्येवर पूर्णपणे बंदी आणण्यासाठी केंद्रशासनाने येत्या ३ मासांत निर्णय घ्यावा, असे निर्देश हिमाचलप्रदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

कुडाळ, सिंधुदुर्ग येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे शासनाला चेतावणी

पुरोगाम्यांच्या दबावापोटी हिंदूंवरील दडपशाही खपवून घेतली जाणार नाही !
कुडाळ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
करणारे धर्मप्रेमी नागरिक
    कुडाळ - कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातनचे श्री. समीर गायकवाड यांस संशयित म्हणून अटक करण्यात आली; मात्र अटक केल्यापासून मागील २० दिवसांत कोणतेही पुरावे पोलिसांनी सादर केलेले नाहीत. यावरून समीर गायकवाड यांचे निर्दोषत्व स्पष्टपणे दिसत असतांनाही, तथाकथित पुरोगामी आणि राजकीय पक्ष योग्य तपासाऐवजी थेट सनातनवर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणेने कोणत्याही दबावास बळी न पडता चौकशी करावी, राष्ट्र्रप्रेमी सनातन संस्थेला बळीचा बकरा न बनवता संभाव्य बंदीच्या विरोधात शासनाच्या वतीने ठोस भूमिका घेण्यात यावी, तसेच स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद यांच्यासह लहान बालकांवर लाठीमार करणार्‍या उत्तरप्रदेश पोलिसांवर त्वरित कारवाई करून राज्यशासनाला खडसवावे, या मागण्यांसाठी १४ ऑक्टोबर या दिवशी जिजामाता चौक, कुडाळ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.

वाहतूक पोलीस आणि पुणे महानगर परिवहन महामंडळ मर्यादितच्या विरोधात पतित पावन संघटनेचे आंदोलन

      पुणे, १५ ऑक्टोबर - येथील गंगाधाम चौक ते मार्केटयार्ड या रस्त्यावर रात्रीच्या वेळेत पुणे महानगर परिवहन महामंडळ मर्यादितच्या बस अनेक वसाहतींच्या बाहेर लावल्या जातात. त्यामुळे रस्ता बंद होऊन नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. बसचालकांना विचारणा केल्यावर ते दमदाटी करतात. त्या विरोधात पतित पावन संघटनेच्या वतीने १ मासापूर्वी वाहतूक पोलीस आणि पुणे महानगर परिवहन महामंडळ यांना पत्र देण्यात आले होते. त्या वेळी या दोन्ही विभागांनी आश्‍वासन दिले होते. (आश्‍वासन देऊनही पोलीस प्रशासन आणि पुणे महानगर परिवहन महामंडळ प्रशासन कारवाई का करीत नाही ? - संपादक) प्रत्यक्षात कोणतीही कारवाई न झाल्यामुळे ११ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता मार्केटयार्ड बस स्थानकासमोर पतित पावन संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! 
 Himachalpradesh high courtne kendra sarkar se kaha, 
Gomans par pratibandha laganeka nirnay 3 mahineme kare. 
- kya shasan gohatya bandi kanoon banayegi ? 

जागो ! 
 हिमाचलप्रदेश हायकोर्टने केंद्र सरकार से कहा, 
'गोमांस पर प्रतिबंध लगाने का निर्णय ३ महीने में करें!'
 - क्या शासन गोहत्या बंदी कानून बनाएगी ?

नांदेडमध्ये ५०० वर्षांची जुनी मूर्ती चोरीला

असुरक्षित मंदिरे !
      नांदेड, १५ ऑक्टोबर - येथील प्राचीन हेमाडपंथी मंदिरातून ५०० वर्षे जुन्या असलेल्या श्री लक्ष्मी नरसिंह या मूर्तीची चोरी झाली आहे. जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील बेळकोणी गावात हे प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे. या मूर्तीचे वजन सुमारे १२ किलो इतके आहे. ही मूर्ती अज्ञात चोरट्यांनी चोरली असून हा प्रकार १५ ऑक्टोबर या दिवशी सकाळी लक्षात आला. या प्रकरणी गुन्हा प्रविष्ट करण्याची प्रक्रिया चालू आहे.

यथा राजा तथा प्रजा ।

     एका राजाने नगरातील वयोवृद्ध मंडळींची सभा भरवली आणि त्यांना विचारले, सांगा पाहू माझे राज्य कसे आहे ? माझ्या वडिलांच्या राज्यात आणि माझ्या राज्यात काय फरक आहे ? वडिलांच्या अगोदर माझ्या आजोबांचे राज्य होते. आमचे पूर्वज अनेक पिढ्यांपासून या राज्याचे राजे आहेत.
    आता कोण सत्य सांगणार ? कोणात असे धाडस आहे ? त्या वेळी उतावीळपणे प्रशंसा करून वाहवा करणारे लबाड लोक अल्प होते; परंतु तरीही राजाला खरे सांगितले, तर संकट येईल; म्हणून ते सर्व गप्प राहिले. एक वृद्ध उठला. तो म्हणाला, महाराज, आपले राज्य कसे आहे, हे मी सांगू शकत नाही; परंतु मी आपल्या आजोबांचे, तसेच आपल्या वडिलांचेही राज्य पाहिले आहे आणि आपल्या राज्यात तर मी जगत आहे. देव करो, तुमची हिंमत आणि यश वाढो. मी तिघांच्याही राज्यातील माझ्या स्थितीचे वर्णन करू शकतो.

पोलिसांची (अ)नैतिकता !

      नवी मुंबईतील कामोठे येथे पोलिसांना एका पान टपरीवाल्याकडून गुटखा विकण्याच्या कारणावरून लाच घेतांना नागरिकांनी पाहिले आणि दगडफेक केल्यामुळे पोलिसांना पळून जाण्याची वेळ आल्याची घटना घडली आहे. या पान टपरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी समाजसेवा शाखेचे बिनागणवेशातील पोलीस आले होते. त्याला पकडून नेत असतांना त्यांनी अर्ध्या वाटेत आल्यावर त्याच्याशी तडजोड चालू केली. ते परत त्याच्या पानाच्या टपरीवर आले. या काळात त्या पानवाल्याच्या मित्राने कामोठे पोलिसांना माहिती दिल्याने त्यांच्या गाड्या तिथे आल्या होत्या. या पोलिसांना पाहून समाजसेवा शाखेचे पोलीस पळून जात असतांना पानवाला चोर, चोर असे ओरडू लागला, त्यामुळे रस्त्यावरील नागरिकांना ते चोर आहेत, असे वाटले आणि त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. नवी मुंबईतील स्पा पार्लर, हुक्का पार्लर, सीडी पायरसी, अश्‍लील चित्रफिती, लेडीज बार, पत्त्यांचा क्लब आदींवर कारवाई करण्यासाठी समाजसेवा विभागाची स्थापना करण्यात आली आहे.

आतंकवाद्यांना फाशी कधी ?

    काही दिवसांपूर्वी मुंबईतील विशेष मोक्का न्यायालयाने रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणातील ५ आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. वास्तविक या प्रकरणातील १२ आरोपींपैकी ८ आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी शासकीय अधिवक्त्यांनी केली होती. त्यातील फक्त ५ आरोपींना फाशीची शिक्षा दिली, तर उर्वरित ७ जणांना जन्मठेपेची शिक्षा दिली आहे.

ध्येयनिष्ठा या शब्दाशी दुरूनही संबंध नसल्याने साधकांच्या ध्येयनिष्ठेला ब्रेनवॉश असे हिणवून अजब तर्कट करत आरोप करणारी (अ)मानवी बुद्धी !

श्री. नंदू मुळ्ये
     एखाद्या व्यक्तीला कुणाचे विचार पटले की, ती त्या विचारांनुसार चालू लागते. तिला आपल्या जीवनाचे ध्येय साध्य होईल, याची निश्‍चिती झाली की, ती संबंधित कार्यात स्वतःला झोकून देते. यालाच ध्येयनिष्ठा असे म्हणतात. असे सहस्रो ध्येयनिष्ठ कार्यकर्ते प्रत्येक चांगल्या संघटनेत पहायला मिळतात, तसेच ते सनातन संस्थेतही आहेत. त्यांना सनातन संस्थेने सांगितलेली व्यष्टी-समष्टी साधना करत असतांना शांती, समाधान अनुभवायला मिळाले. या स्वानुभवाच्या पायावर त्यांची निष्ठा दृढ झाली. सनातनमध्येच आपल्या जीवनाचे कल्याण होईल, याची त्यांना शंभर टक्के निश्‍चिती झाली. त्यांनी गेली अनेक वर्षे कुठल्याही आर्थिक लाभाची अपेक्षा ठेवली नाही. असे हे साधक सेवा-साधना करत तिथे टिकून आहेत; परंतु प्रा. मानव यांच्या अजब तर्कटानुसार मात्र ते या वस्तूस्थितीवर सनातनने साधकांना संमोहित करून, त्यांचा ब्रेनवॉश करून त्यांना कुमार्गाला लावले, असा दोषारोप करतात. शेवटी म्हणतात ना, बेडकाचे डबके, हेच त्याचे विश्‍व आणि सरड्याची धाव कुंपणापर्यंतच, म्हणून प्राध्यापक महाशयांना यासाठी दोष देता येत नाही.
- श्री. नंदू मुळ्ये, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (९.१०.२०१५)

सनातन संस्था आतंकवादी नाही, हे सिद्ध करणारे रामनाथी येथील सौरभ लोटलीकर !

श्री. विक्रम डोंगरे
     एखादी संघटना आतंकवादी असल्यास तिच्या विरोधात बोलायच्या आधी १० वेळा विचार करावा लागतो. हे पुढील उदाहरणावरून लक्षात येईल. रझा अकादमीने ए.आर्. रहमानच्या विरोधात एक फतवा काढला. या वेळी सदैव हिंदूंच्या विरोधात बोलणार्‍या बॉलीवूडने चकार शब्दही काढला नाही. यावरून रझा अकादमी आणि तिच्या पाठीशी असलेल्या लोकांची मानसिकता स्पष्ट होते.
    याच पार्श्‍वभूमीवर रामनाथी येथील सौरभ लोटलीकर यांनी सनातनवर केलेल्या आरोपांकडे पहाता येऊ शकते. श्री. सौरभ लोटलीकर आश्रमापासून ५०० मीटर अंतरावर राहून त्यांच्या रहात्या घरात पत्रकार परिषद घेऊ शकतात आणि त्यांनी आश्रमासमोरील रस्त्यावर उभे राहून आश्रमाच्या विरोधात केलेली गरळओक राष्ट्रीय स्तरावरील प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध होते. यातूनच सर्वकाही स्पष्ट होते. सनातन संस्था आतंकवादी संघटना असूच शकत नाही, हे यावरून सिद्ध होते. नाहीतर सौरभ लोटलीकरच काय; परंतु शाम मानवांनी सनातन विरोधात बोलायच्या आधी दहादा विचार केला असता. सनातन संस्था वैचारिक प्रतिवादावर विश्‍वास ठेवते, हेही ते करत असलेल्या सनातन विरोधातील बेताल वक्तव्यांवरून सिद्ध होते.
- श्री. विक्रम डोंगरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.१०.२०१५)

साहित्यिक, सेक्युलर कांगावा ! (कि देशद्रोह?)

श्री. अविनाश धर्माधिकारी
१. पुरस्कार परत करणार्‍यांकडून लेखी खुलासा घ्यावा !
     सकाळी उठून बघतो तर काय सारा जोसेफ आणि रहमान अब्बास या साहित्यिकांनीही सरकारी पुरस्कार परत केलेले. त्या निमित्ताने काही संकल्पना सहज सुचल्या. एक म्हणजे, कायदेशीर विषयांना टाईम बार (समयमर्यादा) ही संकल्पना लागू असते. तुम्हाला केस किंवा अपील दाखल करायचे तर मूळ तारखेपासून विशिष्ट मुदतीत दाखल केले पाहिजे. तसा सरकारी पुरस्कार परत करण्याला काही टाईम बार नाही का ? कि बुवा, पारितोषिक मिळाल्यापासून पाच वर्षांत परत केल्यासच ते परत घेतले जाईल, त्यानंतर कोणत्याही सबबीवर ते परत घेतले जाणार नाही. किंवा ज्या पक्षाचे, विचारधारेचे सरकार असतांना आपणांस सदरचे पारितोषिक देण्यात आले, त्याच पक्षाचे सरकार असतांना ते परत केल्यास, विचार केला जाईल, किंवा विरुद्ध पक्षाचे, विचारधारेचे सरकार सत्तेत आल्यास पारितोषिक परत करण्याचा आपला हक्क राखून ठेवण्यात आलेला आहे, वगैरे. आता नयनतारा सहगल किंवा अशोक वाजपेयी बघा ना, पारितोषिके केव्हा मिळाली ? परत केव्हा करतायत ? नयनतारा सहगल यांचा साहित्य पुरस्कार १९८६ चा आहे. परत करण्याला टाईम बारच्या तत्त्वाचा विचार व्हावा किंवा एक नवी प्रक्रिया चालू करावी - की बुवा, पारितोषिक परत केल्यास आपला लेखी खुलासा मागितला जाईल. त्यावर समाधान झाल्यासच पारितोषिक परत घेण्याविषयी निर्णय घेतला जाईल.

परमभाग्यशाली आर्यभू तू कधीच पतित नव्हतीस !

स्वामी विवेकानंद
      आपण सर्वच जण भारताच्या अधःपतनाविषयी बरेच ऐकतो. एक काळ असा होता की, मीही यावर विश्‍वास ठेवायचो; पण आज अनुभवाच्या योग्य संधीमुळे आणि पूर्वग्रहदूषित दृष्टी स्वच्छ झाल्यामुळे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे परकीय देशांच्या चित्रातील भडक उठावदार रंग त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्कामुळे त्यातील छायाप्रकाश योग्य त्या प्रमाणात कमी झाल्यामुळे मी आता अतिशय नम्रपणे कबूल करतो की, ती माझी चूक झाली. हे परमभाग्यशाली आर्यभू तू कधीच पतित नव्हतीस.- स्वामी विवेकानंद (श्री. राजाभाऊ जोशी, मासिक लोकजागर, दिवाळी विशेषांक २००८)

सनातनचे प्रवक्ता अभय वर्तक हे वृत्तवाहिन्यांवर मांडत असलेली परखड बाजू आणि प्रसारमाध्यमांची भूमिका यांविषयी वाचकांच्या प्रतिक्रिया !

कौतुक आणि अभिनंदन यांस पात्र असणारे सनातनचे प्रवक्ता अभय वर्तक ! 
     गेले काही दिवस नियमितपणे वृत्तवाहिन्यांवरील कार्यक्रम पाहिले, विरोधक आणि सोबत निःपक्षपाताची झूल पांघरून बसलेले सूत्रसंचालक यांच्याशी ज्या संयमाने सनातनचे प्रवक्ता अभय वर्तक तोंड देतात, ते अप्रतिम. मुद्देसूदपणा आणि बिनतोड प्रतिवाद ही त्यांची वैशिष्ट्येे वाटली. एबीपीच्या माझा कट्ट्याच्या कार्यक्रमात तरुण पत्रकारांच्या झुंडीला निरुत्तर केले, तेव्हा पत्रकार किती किडके असतात, हेच पत्रकारांनी नकळतपणे दाखवून दिले. प्रसारमाध्यमांना त्यांना घटनेने दिलेल्या अधिकारांचा उन्माद चढला आहे, हे त्यांच्या देहबोलीतून महाराष्ट्राला दाखवून दिले. मी कोल्हापूरला रहातो. इथे निरीक्षण केल्यानंतर जाणवते की, सामान्यांना पानसरे हत्येच्या प्रकरणात स्वारस्य नाही. तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा ! - श्री. मिलिंद वेल्लाळ, कोल्हापूर 

पुणे येथील शक्ती-उपासक श्री. अनिल गोविंद बोकील यांना नवरात्रीच्या कालावधीत चंडीपाठ करतांना आलेल्या विविध अनुभूती

श्री. अनिल बोकील
१. प्रारंभ 
१ अ. नवरात्रीच्या काळात १५ बिजांच्या संपुटाने चंडीचा पाठ करण्याचे ठरवणे : ५ ते १३.१०.२०१३ या नवरात्रीच्या काळात प्रतिदिनच्या शक्ती-उपासनेव्यतिरिक्त अधिक काहीतरी करावे, असे मनात होते. विचार करून भगवती श्री ललिता-त्रिपुरसुंदरीच्या तीन कुटांचे (वाग्भव कूट = ५ बिजे) + (कामराज कूट = ६ बिजे) + (शक्ति कूट = ४ बिजे) म्हणजे एकूण १५ बिजांच्या संपुटाने चंडीचा पाठ करावा, असे ठरवले. त्यासाठी श्रीयंत्र आणले. त्यावर पुढे विजयादशमीपर्यंतचे सर्व अर्चन मजकडून झाले. अशा पद्धतीने चंडीपाठ अत्यंत प्रभावी आणि त्वरित फलप्रद होतात, हे मला ठाऊक होते. 

स्वभावदोष आणि अहं निर्मूलनासाठी तळमळीने प्रयत्न करून स्वतःमध्ये आमूलाग्र पालट घडवणारे कोल्हापूर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे डॉ. निवृत्ती रामचंद्र चव्हाण यांचा साधनाप्रवास

डॉ. निवृत्ती चव्हाण
    कोल्हापूर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे डॉ. निवृत्ती रामचंद्र चव्हाण यांच्याविषयी त्यांच्या मुलांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत. साधनेने स्वत:त कसा पालट घडवून आणता येतो, तसेच मुलांनाही साधनेसाठी कसे साहाय्य करावे  याचा आदर्श श्री. चव्हाण यांनी सर्वांपुढे ठेवला आहे.
    ६० टक्के आणि त्यापुढील पातळी साध्य झालेल्या साधकांच्या गुणवैशिष्ट्यांचे लिखाण केवळ न वाचता त्यात दिलेली गुणवैशिष्ट्ये स्वतःत आहेत का ?, याचा अभ्यास करावा आणि स्वतःमध्ये नसतील, ती गुणवैशिष्ट्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. असे केले, तरच गुणवैशिष्ट्ये छापण्याचे सार्थक होईल. - (प.पू.) डॉ. आठवले (१५.९.२०१४)
१. साधनेपूर्वीचे जीवन
१ अ. हालाखीच्या परिस्थितीत स्वबळावर शालेय शिक्षण पूर्ण करणे
     बाबांचा जन्म सांगली जिल्ह्यातील सिद्धेवाडी या खेडेगावात झाला. त्यांच्या घरची परिस्थिती बेताची होती. बाबांना लहानपणापासून शिक्षणाची पुष्कळ आवड होती. प्राथमिक शिक्षण झाल्यावर पुढच्या शिक्षणासाठी गावापासून काही मैल अंतरावर जावे लागे. पायात चप्पल नाही, एकच पोशाख, जुनी पुस्तके, खायला चटणी-भाकरी, बाहेरच्या दिव्याखाली अभ्यास करणे, असे करून त्यांनी स्वबळावर शालेय शिक्षण पूर्ण केले. अभ्यासात हुशार असल्याने त्यांना चांगले गुण मिळत. आर्थिक अडचणींमुळे त्यांना वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घ्यायची इच्छा असूनही वैद्यकीय शिक्षण घेता आले नाही. त्यांनी कृषी क्षेत्र निवडले. विवाहानंतर याच क्षेत्रात त्यांनी पी.एच्.डी पूर्ण केली. शिष्यवृत्ती मिळाल्याने त्यांना ८ - ९ मास (महिने) इंग्लंड येथे जाण्याची संधी मिळाली. वर्ष १९८९ मध्येे युरोप पहाण्याचीही संधी मिळाली.

रामनाथी आश्रमाला भेट दिल्यानंतर आम्ही सर्व साधक पुष्कळ भाग्यवान आहोत, असे वाटणारे रत्नागिरी येथील श्री. अमित आैंधकर !

१. आश्रमात आल्यावर आनंद होणे
    १.५.२०१५ या दिवशी मी प्रथमच सनातन संस्थेच्या रामनाथी आश्रमात आलो. त्या वेळी माझ्या मनात आश्रमाविषयी अनेक प्रश्‍न आणि शंका होत्या; पण मला आश्रमात आल्यावर पुष्कळ आनंद झाला. त्यामुळे मी आणि आलेले सर्व साधक पुष्कळ भाग्यवान आहोत, असे वाटले.
२. आश्रम परिसरातील लागवड विभागातील झाडे बघतांना पुष्कळ आनंद होणे
    आम्ही आश्रम परिसर आणि गोव्यातील अप्रतिम मंदिरे पाहिली. आश्रम परिसरातील लागवड विभागातील झाडे बघतांना पुष्कळ आनंद झाला. काही साधकांची ओळखही झाली. येथील सर्व साधक चारित्र्यवान आहेत, असे जाणवले.

साधकांसाठी सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्माभिमानी यांना नम्र विनंती !

भारतीय रिझर्व्ह बँकेने क्लीन नोट पॉलिसीच्या अंतर्गत
दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे !
     भारतीय रिझर्व्ह बँकेने चलनात वापरत असलेल्या नोटांवर पेनने लिहिलेले असल्यास त्या स्वीकारल्या जाणार नाहीत, असे क्लीन नोट पॉलिसीच्या अंतर्गत सूचित केले होते. अशा नोटा बँकेच्या दृष्टीने कागदासमान असल्याने बाजारात त्या कोणी स्वीकारणार नाही, अशी सूचनाही बँकेने २ वर्षांपूर्वी काढली होती.
    आतापर्यंत लोकांकडून या सूचनेचे पालन झालेले नसल्याने या संदर्भात कडक धोरण अवलंबण्याचे बँकेने ठरवले आहे. अशा नोटा चलनात चालणार नाहीत, यासाठी दक्षता घेण्यास बँकेने आरंभ केला आहे. या संदर्भात सर्वांनी पुढीलप्रमाणे कृती करणे आवश्यक आहे.
१. यापुढे नोटांवर पेन किंवा पेन्सिलने काहीही लिहू नये. नोटांवर संख्या लिहायची असल्यास वेगळ्या कागदाचा वापर करून तो रबरबँडने नोटांना गुंडाळावा. कागद लावण्यासाठी स्टेपलर किंवा टाचणी यांचा वापर करू नये.

सतत देवाच्या अनुसंधानात असणारी आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची कोल्हापूर येथील चि. वेदिका रवींद्र पालकर (वय ३ वर्षे ४ मास) !

चि. वेदिका पालकर
पालकांनो, हे लक्षात घ्या !
    तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल. - (प.पू.) डॉ. आठवले (१६.१०.२०१४)
१. जन्मापूर्वी
१ अ. नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवास करावा लागत असल्याने शारीरिक त्रास होणे : माझे सासर कोल्हापूरपासून एक ते दीड घंट्यांच्या अंतरावर आहे. मी कोल्हापूरमध्ये चाकरी करत असल्याने आठ मासांपर्यंत (महिन्यांपर्यंत) प्रतिदिन किमान अडीच घंटे इतका प्रवास करावा लागत असे, तसेच मला (तपासणीसाठी) ऑडीटसाठी बाहेरगावी जावे लागले, तर प्रवास आणखी वाढत असे. प्रवासामुळे शारीरिक त्रास होत असल्याने मला रात्री झोप लागत नसे. तेव्हा रात्रभर भ्रमणभाषवर प.पू. बाबांची (भक्तराज महाराज यांची) भजने ऐकत असे.

रामनाथी आश्रमात आल्यानंतर भूक अल्प झाल्याने खाणे न्यून होणे; परंतु त्याचा वजनावर पालट न होणे

    आश्रमात आल्यापासून भूक लागत नाही, तसेच आहाराचे प्रमाण अल्प झाले आहे. उपाशी राहू नये; म्हणून थोडेसे खाणे होते. खाणे अल्प होऊनही त्याचा परिणाम वजनावर झालेला दिसून येत नाही. पूर्वी माझ्या पायावर सूज येऊन अंग जड होत असे. त्याचे प्रमाण अल्प झाले आहे. - आधुनिक वैद्य प्रवीण मेहता, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (२१.६.२०१५)

सांग सख्या, कधी येतील ते सुवर्णक्षण मम जीवनी ?

कु. अश्‍विनी विभांडीक
जीव जडला तव चरणी केशवा ।
म्हणूनी सोडूनी आले मी सर्वस्वा ॥ १ ॥
नको सोडूस तू मला एकटे कधी रे ।
जगणे मरणे कठीण होते तुजविण रे ॥ २ ॥
कृष्णा, तव कृपेने हा श्‍वास चालू आहे ।
तू नसशील संगे, त्याच क्षणी हा थांबव रे ॥ ३ ॥
घे ना मनमोहना मज तव चरणी ।
तुजपाशी येण्या किती आतूरले मी मनी ॥ ४ ॥

प.पू. पांडे महाराजांनी कथन केलेली मौलिक सूत्रे

प.पू. पांडे महाराज
१. आपल्या विचारधारेचा आपल्यावर परिणाम होत असल्याने ती योग्य असावी !
    आपला जन्म कशासाठी झाला आहे ? आपली एकमेकांकडे पहाण्याची दृष्टी कशी आहे ? आपली विचारधारा कशी
आहे ?, याच्याकडे लक्ष असावे. जशी विचारधारा असेल, तसा आपल्यावर परिणाम होतो. आपली विचारधारा पालटली पाहिजे. आपल्यात दोष कसे निर्माण होतात ? त्यांचे मूळ शोधावे. भगवंताच्या नियोजनाप्रमाणे घडत असलेल्या गोष्टींत शांत रहावे. आपण त्याग केला आहे; पण आपण त्याचा लाभ करून घेत नाही.
२. बैठकीत सर्व सूक्ष्म जिवांचाही विचार करावा !
    नुसत्या बैठका घेऊन उपयोग नाही, तर सत्संगाचे महत्त्व वाटून शुद्धीकरण झाले पाहिजे. आपण बैठकीला येतो, तेव्हा तेथे केवळ साधकच नसतात, तर इतर जीवही बैठकीला उपस्थित असतात, उदा. भिंती, वस्तू, झाडे आणि तेथील वस्तू हे सर्व जीव आहेत. या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करून आणि त्यांचा विचार करून बैठकीला बसले पाहिजे. तेव्हा ती खरी बैठक असते.
- श्री. सचिन हाके, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (ऑगस्ट २०१५)

संत रोहिदासांची क्षमाशीलता

पू. भैयाजी
पू. भैय्याजी, गोवा यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन
१. संत रोहिदासांनी गंगामातेला देण्यासाठी
एका परिचिताला एक पैसा देणे आणि प्रसाद घेऊन येण्यास सांगणे
    संत रोहिदास यांचा चामड्याचा व्यवसाय होता. त्यांचा एक परिचित गंगास्नानासाठी जात होता. तेव्हा त्यांनी गंगेमध्ये समर्पित करण्यासाठी त्यांना एक पैसा दिला आणि सांगितले, हा एक पैसा गंगामातेच्या हातात दे आणि तिला सांग, रोहिदासने या एक पैशासोबत आपले समर्पण आणि प्रेम पाठवले आहे. तिच्याकडून माझ्यासाठी आठवणीने प्रसाद घेऊन ये. पैसा गंगेमध्ये फेकून येऊ नकोस. तिचा हात आला नाही, तर पैसा परत आण.
२. व्यक्तीला संत रोहिदासांचे माहात्म्य लक्षात न आल्याने विकल्प येणे
    त्या परिचिताला वाटले, काय हा विचित्र आहे. याचा एक पैसा घेण्यासाठी गंगामाता येईल का ? पण याच्याबरोबर वाद करण्यापेक्षा त्याचा एक पैसा परत आणून देऊया.

झोपमोड होण्याच्या संदर्भात तडजोड !

    कोणी झोपले असेल, तर आवाज करणार्‍या व्यक्तीला वाटते की, झोपणार्‍याने तडजोड करावी. झोपलेल्या व्यक्तीला असे करणे अशक्य असते; कारण व्यक्ती जागृत अवस्थेत असतांना परिस्थिती किंवा भिन्न प्रकृतींशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करू शकते; परंतु झोपेत व्यक्तीचा बाह्य जगाशी संबंध तुटलेला असतो, तसेच स्वतःच्या शरिराचीही तिला जाणीव नसते. अशा स्थितीत ती व्यक्ती आवाजाशी तडजोड कशी करणार ? व्यक्ती आवाजाने जागी झाल्यावर मनाने स्थिर रहाणे, आवाज करण्याविषयी प्रतिक्रिया मनात उमटू न देणे, नामजपाकडे लक्ष देणे, असे प्रयत्न मात्र करू शकते. - श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.७.२०१५)

ईश्‍वरेच्छेने कृती करणे, म्हणजे ईश्‍वराला अपेक्षित अशी कृती करणे

पू. डॉ. मुकुल गाडगीळ
    मला एका साधकाने प्रश्‍न विचारला, जर आपण म्हणतो की, ईश्‍वरेच्छेने सर्व कृती करा, तर मग हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रार्थना करणे योग्य आहे का ? यासंदर्भात साधकांनी लक्षात घ्यावे की, स्वतःच्या लाभासाठी, म्हणजे सकाम प्रार्थना करणे, ही स्वेच्छा झाली. याचे एक उदाहरण म्हणजे मला नोकरी मिळू दे, अशी प्रार्थना करणे ही स्वेच्छा आहे. याउलट हिंदु राष्ट्र स्थापन होण्यासाठी किंवा गुरुकार्यासाठी प्रार्थना करणे, ही स्वेच्छा होत नाही. ती ईश्‍वरनियोजित सत्कार्ये असल्याने त्यासाठी प्रार्थना करणे, हे साधकाचे कर्तव्य आहे. ते त्या कार्यात खारीचा वाटा उचलणे आहे. साधकाची ती साधना आहे. त्यामध्येही हिंदु राष्ट्र स्थापन व्हावे, ही ईश्‍वराची इच्छा आहे. त्यासाठी प्रयत्न केल्याने माझी साधना होणार आहे. समजा हिंदु राष्ट्र स्थापन झाले नाही, तरीही ती ईश्‍वराचीच इच्छा आहे, असा भाव हवा. अशा प्रकारे निष्काम साधना आपल्याला करायची आहे. ईश्‍वरेच्छेने कृती करा याचा गर्भितार्थ आहे, ईश्‍वराला अपेक्षित अशी कृती करा !
- (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.९.२०१५)

दैनिक सनातन प्रभातचा दसर्‍यानिमित्त रंगीत

धर्मविजय विशेषांक 
प्रसिद्धी दिनांक : २२ ऑक्टोबर 
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २१ ऑक्टोबरच्या
 दुपारी ३ पर्यंत 'ईआरपी प्रणाली'त भरावी !

प.पू. दास महाराज यांच्या आश्रमात सेवा करण्यासाठी सेवक दाम्पत्याची आवश्यकता !

संतसेवेची सुवर्णसंधी ! 
     पानवळ-बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील संत प.पू. दास महाराज यांचे निवासस्थान आणि मंदिर परिसर येथील देखभाल करण्यासाठी, तसेच स्वयंपाक करण्यासाठी सेवाभावी वृत्तीने कार्य करणार्‍या सेवक दाम्पत्याची आवश्यकता आहे. जे सेवक दाम्पत्य या संतसेवेच्या सुवर्णसंधीचा लाभ घेऊ इच्छितात, त्यांनी श्री. रूपेश रेडकर यांच्याशी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा. 

वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

'सनातन पंचांग २०१६' ची मागणी लवकरात लवकर कळवून आपली प्रत आजच राखून ठेवावी ! 
     'सनातन पंचांग केवळ पंचांग नव्हे, तर हिंदुत्वाचे सर्वांगच आहे. राष्ट्र-धर्म कार्यासाठी कृतीशील करणारे आणि धर्मशिक्षण देणारे प्रभावी माध्यम असणारे हे पंचांग जिज्ञासूंना साधनेसाठी अमूल्य मार्गदर्शनही करते. सनातन पंचांगाला सर्वच स्तरांवरून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत आहे. पंचांगाच्या संदर्भात समाजाकडून लाभणारा वाढता प्रतिसाद आणि अपुरी साधकसंख्या यांमुळे वर्ष २०१५ चे पंचांग काही जिज्ञासूंना वेळेत मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांनी 'वर्ष २०१५ चे सनातन पंचांग देण्यासाठी आमच्याकडे कोणीच आले नाही. आम्ही साधकांची वाट पहात होतो. या वर्षी आम्हाला आठवणीने पंचांग आणून द्या', असे स्वतःहून साधकांना कळवले आहे. 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

    
परात्पर गुरु डॉ. आठवले
     पश्‍चात्ताप वाटून स्वतः प्रायश्‍चित्त घेणे हे शिक्षेपेक्षा परिणामकारक असते. असे असतांना पश्‍चात्ताप वाटून कोणी घरवापसी (घरी परतणे) करत असेल, तर त्याला विरोध का ? - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (५.३.२०१५)

बोधचित्र


प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

साधकांनी अहंकार बाळगू नये !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     साधकांनी मी, माझे, माझ्यासाठी हा अहंकार न ठेवल्यास हितावह ठरते. अहंकार हा साधकांच्या प्रगतीमधील फार मोठा अडथळा आहे. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
गुरूंकडे काय मागावे ? 
 माझ्याकडे सुख मागू नका, दुःख सहन करण्याचे बळ मागा. 
भावार्थ : सुख हे प्रकृतीतील असल्याने अशाश्‍वत असते, म्हणून गुरूंकडे मागू नये. तसेच हेही लक्षात ठेवले पाहिजे की, शाश्‍वत आनंद मिळवून देणे, हेच गुरूंचे खरे कार्य असते. प्रारब्धामुळे दुःख भोगावे लागणार असल्यास, त्या दुःखदायक प्रसंगांमुळे होणारे दुःख सहन करण्याची शक्ती मात्र गुरु निश्‍चित (नक्कीच) देतात; म्हणून ती मागायला आडकाठी (हरकत) नाही
 (संदर्भ : सनातनचे प्रकाशन 'संत भक्तराज महाराज यांची शिकवण.') 

साहित्यिकांची ढोंगी सामाजिक बांधिलकी !

संपादकीय
     पुरोगामी विचारवंतांच्या हत्या, दादरी प्रकरण आणि आदी काहीबाही कारणांमुळे स्वतःला सुधारणावादी म्हणवणार्‍या साहित्यिकांनी त्यांना मिळालेले पुरस्कार परत केले. अन्य राज्यांतील साहित्यिकांनंतर महाराष्ट्रात विद्रोही कवयित्री प्रज्ञा दया पवार यांनी त्यांचा पुरस्कार परत केल्यावर अन्य तत्सम साहित्यिकही पुढे सरसावले. राज्यातील स्थिती अत्यंत भयावह आणीबाणीची आहे, अशा आशयाची पत्रे शासनाला पाठवून ते अप्रत्यक्षरित्या हिंदुवादी शासनावर दबाव आणत आहेत आणि सध्याच्या घटना या हुकूमशाहीकडे वाटचाल करणार्‍या आहेत, असे आभासी चित्र निर्माण करत आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn