Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

नवरात्रोत्सव (आज तिसरा दिवस)

सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तुते ॥
एका मतानुसार नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण कमी करण्यासाठी तमोगुणी महाकालीची, पुढील तीन दिवस रजोगुण वाढवण्यासाठी रजोगुणी महालक्ष्मीची आणि शेवटचे तीन दिवस साधना तीव्र होण्यासाठी सत्त्वगुणी महासरस्वतीची पूजा करतात. 
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ शक्ती) 
नवरात्र विषयक माहितीसाठी संकेतस्थळावरील मार्गिका

गंगा नदीतील मूर्तीविसर्जन बंदीमुळे काशीतील सुप्रसिद्ध दुर्गोत्सवात मूर्तीस्थापनाच नाही !

समाजवादी शासनाच्या नाकर्तेपणामुळे हिंदूंचे एक-एक उत्सव बंद 
पडत आहेत, याविषयी केंद्रशासनाने काहीतरी करावे, ही हिंदूंची अपेक्षा आहे ! 
वाराणसी (उत्तरप्रदेश) - उच्च न्यायालयाने गंगा नदीच्या प्रदूषणाच्या कारणावरून येथील गंगेत मूर्तीविसर्जन करण्यास प्रतिबंध केला आहे. त्यामुळे ४९ वर्षांची परंपरा असलेल्या टाऊनहॉल येथील सुप्रसिद्ध श्री दुर्गोत्सवाच्या ठिकाणी श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आलेली नाही. पर्याय म्हणून तेथे प्रथमच कलश स्थापना करण्यात आली आहे; मात्र यामुळे हिंदुंच्या धर्मभावना दुखावल्या आहेत. श्री गणेशोत्सवाच्या वेळी दोनदा हिंदु संतांवर लाठीमार झाल्यानंतर पुन्हा नवरात्रातील या मुस्कटदाबीमुळे हिंदूंमध्ये असंतोष धुमसत आहे. 

शिखांचा धार्मिक ग्रंथ फाडल्याच्या आरोपावरून पंजाबमधील फरीदकोट येथे हिंसाचार

पोलिसांवर दगडफेक, तोडफोड 
चंदीगड - पंजाबातील फरीदकोट जिल्ह्यात शिखांच्या गुरुग्रंथ साहिब या ग्रंथाची पाने फाडण्यात आल्यावरून फरीदकोटसह आसपासच्या गावांमध्ये सलग दोन दिवस तणावाचे वातावरण असून मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरले आहेत. शेजारील मोगा जिल्ह्यातील बुट्टर कला, तसेच फरीदकोटच्या कोटकपुरा भागात आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली, तसेच पोलिसांच्या वाहनांसह इतरही वाहनांची मोठ्या प्रमाणात हानी केली. जमावावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. या धुमश्चनक्रीत अनेक आंदोलकांसह पोलीसही घायाळ झाले. फरीदकोटच्या बरगाडी गावामध्ये १३ ऑक्टोबर या दिवशी गुरुग्रंथ साहिबची फाटलेली पाने सापडली. त्यानंतर या परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत फाटलेली पाने गोळा केली; मात्र तोपर्यंत ही बातमी वार्यािसारखी पसरली आणि लोक रस्त्यावर उतरले. मोगा जिल्ह्यातील बुट्टर कला या गावात संतप्त जमावाने मोगा-बरनाला रस्ता बंद केला. या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला, तसेच हवेत गोळीबार केला; परंतु जमावाला नियंत्रित करण्यात पोलीस अपयशी ठरले. त्यानंतर जमावाकडून पोलिसांवर जीवघेणे आक्रमण करण्यात आले. यात पोलीस  अधिकार्यांंसह इतर पोलिसांनी घटनास्थळाहून पळ काढल्यामुळे त्यांचा जीव वाचला.

दिग्विजय सिंह यांची पोपटपंची चालू !

नवी देहली - काँग्रेसचे दिग्विजय सिंह यांनी ट्विटरवरून मोदींवर टीका केली आहे. सिंह म्हणतात, 'दादरी घटनेविषयी दुःख व्यक्त करणारे मोदी आरोपीच्या पिंजर्यात अडकलेल्या भाजप कार्यकर्त्यांवर कारवाई करणार 
का ? गुलाम अलींच्या कार्यक्रमाला विरोध करणार्या शिवसेनेसोबतची युती तोडणार का ?' 

आमच्या 'प्रिय मोदीं'ची ही भावना असूच शकत नाही !

मोदींच्या दुःखाविषयी शिवसेनेची स्पष्टोक्ती
मुंबई - गोध्रा येथील कारसेवकांचे हत्याकांड आणि त्याच्या प्रत्युत्तरासाठी कर्णावती (अहमदाबाद) येथे झालेल्या दंगली, यांमुळे गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री. नरेंद्र मोदी जगभरात पोहोचले. त्यांची खरी ओळख सर्वदूर पोहोचली. त्याविषयी त्यांचा आम्ही आजही आदर करतो. त्याच मोदींनी आज गुलाम अली आणि कसुरी यांना झालेल्या विरोधाविषयी दुःख व्यक्त करावे, हे दुर्दैवी आहे. मोदी जे बोलले, ते 'पंतप्रधान मोदीं'चे मत असेल; पण आमच्या 'प्रिय मोदीं'ची ही भावना असूच शकत नाही, अशा मार्मिक शब्दांत शिवसेनेचे खासदार श्री. संजय राऊत यांनी शिवसेनेच्या वतीने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.   

दादरी, गुलाम अली, सुधींद्र कुलकर्णी प्रकरणे दुःखद; पण केंद्रशासनाचा काय दोष ? - पंतप्रधान मोदी

वरील तिन्ही प्रकरणांच्या संदर्भात पंतप्रधानांनी अलिप्तपणाच्या भावनेने प्रतिक्रिया द्यायला नको. दादरीपेक्षा भयावह अशी घटना भिवंडीमध्ये पोलिसांना जाळण्यात आले, तेव्हा घडली होती. गुलाम अलींचा कार्यक्रम रहित करण्यात आला; मात्र पाकचे शासन अनुपम खेरांसारख्या हिंदु कलाकारांना पारपत्रच (व्हिसाच) देत नाही. खुर्शीद कसुरीमुळे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना आरपारच्या लढाईची चेतावणी द्यावी लागली. या सर्व प्रश्नां विषयी पंतप्रधानांनी त्यांची मते कणखरपणे मांडले पाहिजेत, अशी हिंदूंची मागणी असल्यास त्यात वावगे काय ?
नवी देहली - आनंद बझार या बंगाली वृत्तपत्राला पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी मुलाखत दिली आहे. त्यात त्यांनी दादरी, गुलाम अली आणि सुधींद्र कुलकर्णी यांच्या प्रकरणांविषयी दुःख व्यक्त केले आहे; मात्र त्याच वेळी या प्रकरणांत केंद्रशासनाचा दोष काय ?, असा प्रश्नही केला आहे.

हॉलीवूड अभिनेते सिल्वेस्टर स्टॅलोन (रॅम्बो) यांनी त्यांच्या मुलाचे हरिद्वार येथे श्राद्ध केले !

कुठे हिंदु धर्माचे पालन करणारे हॉलीवूडचे अभिनेते सिल्वेस्टर स्टॅलोन आणि कुठे श्राद्धावरून विनोद करणारे भारतातील नागरिक अन् श्राद्धाचे शास्त्र नाकारणारे तथाकथित पुरोगामी  !
हरिद्वार - हॉलीवूड चित्रपटसृष्टीत 'रॅम्बो' म्हणून प्रख्यात असलेले अभिनेते सिल्वेस्टर स्टॅलोन यांनी त्यांच्या मरण पावलेल्या मुलाचे श्राद्ध हरिद्वार येथे गंगेच्या किनार्यावर केले. या वेळी त्यांनी श्राद्धाचे सर्व विधी पार पाडले. त्यात गोदानाच्या विधीचाही समावेश होता. श्राद्धाचा विधी केल्याने 'मृताच्या आत्म्याला शांती मिळते', अशी धारणा ठेवून हा विधी केल्याचे स्टॅलोन यांनी सांगितले. स्टॅलोन यांचा मुलगा सेज याचा ३८ व्या वर्षी मृत्यू झाला. त्यामुळे सिल्वेस्टर स्टॅलोन निराशेत होते. तसेच ते अनेक दिवस अभिनयाच्या क्षेत्रापासूनही लांब गेले होते. या श्राद्धाच्यावेळी स्टॅलोन कुटुंबियांसह हॉलीवूड आणि रशियाचे अनेक कलाकार उपस्थित होते. या वेळी सिल्वेस्टर स्टॅलोन यांनी मनाला शांत वाटल्याचे सांगितले.

नवरात्रोत्सवात मांसविक्री बंद न केल्यास जामा मशिदीमध्ये डुकरे सोडू !

अशी चेतावणी देण्यामागील हिंदूंचा हेतू लक्षात न घेता आता पुरोगाम्यांनी 
थयथयाट केल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !
धर्म जागरण मंचाची चेतावणी
      आग्रा - येथे नवरात्रोत्सवाच्या काळात मांस खरेदी आणि विक्री बंद न केल्यास शहरातील जामा मशिदीत १०० डुकरे सोडू, अशी चेतावणी धर्म जागरण मंचाच्या वतीने देण्यात आली आहे, असे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे. (हिंदुबहुल भारतात हिंदूंच्या उत्सवकाळात मांसविक्री बंद करण्याची मागणी का करावी लागते ? हिंदूंच्या धर्मभावना लक्षात घेऊन प्रशासन आधीच कारवाई का करत नाही ? - संपादक)

इराणच्या कारागृहातून ९ भारतीय खलाशांची सुटका

     नवी देहली - तस्करीच्या आरोपावरून कारागृहात असलेल्या ९ भारतीय नागरिकांची इराणने सुटका केली असून ते सर्वजण आज मायदेशी परतणार आहेत. या सुटकेविषयी भारताच्या परराष्ट्र्रमंत्री सुषमा स्वराज यांनी इराणचे आभार मानले आहेत. इराणने भारताच्या विनंतीला मान देऊन इराणचे परराष्ट्र्रमंत्री जावेद झरीफ यांनी तात्काळ कारवाई केली. सुशील कपूर यांच्यासह ८ जणांची इराणमधील कारागृहातून सुखरुप सुटका झाली आहे. ते लवकरच देहली येथे पोहोचतील, असे परराष्ट्र्रमंत्री स्वराज यांनी सांगितले. स्वराज ऑगस्ट मासात इराण येथे गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी हे सूत्र उपस्थित केले होते.

आम्ही राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही यांचा कर्दनकाळ बनून सनातन संस्थेच्या पाठीशी उभे राहू !

सनातन संस्थेवरील बंदीच्या मागणीला सिंधुदुर्गातील शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांचे उत्तर
श्री वैभव नाईक
    कणकवली - सध्या सर्वच स्तरांवरील तथाकथित पुरोगाम्यांनी सनातनच्या विरोधात जी काव-काव चालू केली आहे, त्याविषयी मी एवढेच म्हणेन कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. कधी नव्हे; एवढी हिंदू ऐक्याची आवश्यकता असतांना, हिंदूंंच्या कृतीशील ऐक्यासाठी सनातन संस्था निस्वार्थीपणे कार्य करत आहे, त्याला तोड नाही. आतापर्यंत सनातनवर अनेक आरोप झाले, पण त्या सर्व आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे न्यायालयीन प्रक्रियेत सिद्ध झाले आहे. यापुढेही त्याची पुनरावृत्ती होईल. या निमित्ताने मी एवढेच सांगू इच्छितो, सनातन संस्थेच्या पाठीशी आम्ही राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही यांचा कर्दनकाळ बनून उभे राहू !

कळंबोली (नवी मुंबई) येथे ४० अल्पवयीन मुला-मुलींवर लैंगिक अत्याचार करणार्या ख्रिस्त्याला अटक !

पुरस्कार परत करणार्या साहित्यिकांची 
संवेदनशीलता अशा घटनांच्या वेळी कुठे जाते ?
  कळंबोली (नवी मुंबई) - वडापाव आणि इडली यांमध्ये गुंगीचे औषध घालून येथील गरीब कुटुंबातील ४० अल्पवयीन मुला-मुलींवर लैंगिक अत्याचार करणार्या मॅथ्यू नाडर (वय ४८ वर्षे) या ख्रिस्त्याला पोलिसांनी अटक केली आहे. (हिंदूंनो, तुमच्या संतांच्या विरोधात गरळओक करणारी निधर्मी प्रसारमाध्यमे याविषयी तोंडही उघडत नाहीत, हे जाणा ! - संपादक) नाडर हा कळंबोली वसाहतीत वडापाव आणि इडल्या विकण्याचा व्यवसाय करतो. नाडर याने मुला-मुलींवर अत्याचार करून त्याचे भ्रमणभाषमध्ये चित्रीकरणही करून ठेवले होते; मात्र या संदर्भात मुलांनी भीतीपोटी त्यांच्या पालकांना काहीच सांगितले नाही. एका बालिकेवर अत्याचार करतांना एका ग्रामस्थाने नाडरला पाहिल्याने त्याने याविषयी पोलिसांना कळवले. त्यानंतर इतरही प्रकरणे उघडकीस आली.

हिंदूंच्या सणांवर जिहादी आतंकवादाचे सावट

आतंकवादाच्या सावटाखाली सण आणि उत्सव साजरे करावा लागणारा जगातील एकमेव देश भारत !
सतर्कता बाळगण्याविषयी केंद्रशासनाच्या राज्यांना सूचना !
      नवी देहली - जिहादी आतंकवादी येत्या सणासुदीच्या दिवसांत देशातील शांतता भंग करण्याच्या आणि जातीय तणाव निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत, त्यासंदर्भात राज्यांनी सतर्कता बाळगावी, अशा सूचना केंद्रशासनाने सर्व राज्यांना दिल्या आहेत. पाकिस्तानातून ५ धर्मांध आतंकवादी भारतात शिरले आहेत आणि ते कुठल्याही मोठ्या शहरात आक्रमण करतील, अशी आशंका व्यक्त करण्यात आली आहे.
      याशिवाय लष्कर-ए-तोयबाचे २ आतंकवादी भारतात उधमपूर आक्रमणात पकडला गेलेला महंमद नावेद याच्यासह भारतात शिरले होते, ते अद्याप सापडले नाहीत, तसेच खांडवा कारागृहातून पळून गेलेले सिमीचे ३ आतंकवादी फरारच आहेत.

न्यायालयाच्या आदेशानंतर मटका प्रकरणी अकराशेहून अधिक जणांच्या विरोधात एफ्आयआर्!

जे न्यायालयाला दिसते, ते पोलिसांना का दिसत नाही ?
उघडपणे घडणारे गुन्हे रोखू न शकणार्‍या अकार्यक्षम पोलिसांवरही वरिष्ठांनी कारवाई करायला हवी !
     पणजी गोव्यात मटका प्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाने मटका व्यवसाय चालवणारे, अकराशे बुकी, काही निनावी मंत्री, पोलीस अधिकारी, आमदार आणि काही वृत्तपत्रे यांच्या विरोधात प्रथमदर्शी अहवाल (एफ्आयआर्) नोंदवला आहे. मटकाप्रकरणी तक्रार नोंद करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपिठाने दिल्यानंतर गुन्हा अन्वेषण विभागाने ही कारवाई केली आहे.

समाजाला धर्मशिक्षण देणार्‍या सनातन संस्थेवर बंदी घालू नका !

मामलेदार श्री. गुरुदास देसाई यांना
निवेदन देताना धर्माभिमानी 
     डिचोली शास्त्रीय परिभाषेत हिंदु समाजाला धर्मशिक्षण देणार्‍या सनातन संस्थेवर बंदी घालू नये, अशी मागणी डिचोली येथील हिंदु धर्माभिमान्यांनी येथील मामलेदार श्री. गुरुदास देसाई यांच्याकडे १३ ऑक्टोबर या दिवशी एका निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन देतांना हिंदु धर्माभिमान्यांच्या शिष्टमंडळामध्ये भारत स्वाभिमानचे श्री. भरतेश गुळण्णवर, ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर देसाई, हिंदु धर्माभिमानी श्री. भगवान हरमलकर, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री माधव पराडकर आणि मंगेश मांद्रेकर, कु. संगीता नाईक, सनातन संस्थेचे श्री. कृष्णा सावंत आणि श्री. दिलीप माणगावकर हे उपस्थित होते.

रशियाकडून एस्-४०० क्षेपणास्त्र खरेदी करण्याचा भारताचा विचार

      नवी देहली - ४०० किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर असलेली शत्रूची विमाने, क्षेपणास्त्रे आणि ड्रोन विमाने यांंना उद्ध्वस्त करू शकेल, एवढी क्षमता असलेले एस् - ४०० त्रिउम्फ एअर डिफेंस क्षेपणास्त्र रशियाकडून खरेदी करण्याचा विचार भारत शासन करत आहे. वेगवेगळी क्षमता असलेल्या तीन प्रकारच्या क्षेपणास्त्रांचा एस् -४०० या क्षेपणास्त्रात समावेश आहे. एस्- ४०० क्षेपणास्त्र भूमीवरून हवेत मारल्यास स्टील्थ मोडच्या फिफ्थ जनरेशन (अमेरिकन एफ-३५ लढाऊ जेट) लढाऊ जेटला देखील पराभूत करू शकते, असा दावा रशियाच्या विशेषज्ञांनी केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारत आणि रशिया यांच्यात एक करार होणार आहे. या करारानंतर हे क्षेपणास्त्र काही वर्षार्ंमध्ये भारतीय हवाई दलात सामील होईल.

राजस्थानमध्ये सनातन संस्थेवरील बंदीच्या मागणीला विरोध

जोधपूर येथे हिंदुत्ववाद्यांकडून शासनाला निवेदन सादर
निवेदनाची प्रत हातात धरून उभे असलेले धर्माभिमानी
    जोधपूर (राजस्थान) - कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येेेेप्रकरणी पोलिसांकडून सनातनच्या एका साधकाला संशयित म्हणून पकडण्यात आले. त्यानंतर पोलीस अन्वेषण आणि न्यायदान होण्यापूर्वीच हिंदुविरोधी संघटना आणि रागकीय पक्ष यांच्याकडून सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे. संस्थेचे कार्य जाणून न घेता बंदी आणण्याची मागणी करणे अन्यायकारक आहे. या प्रकरणात संस्थेला बळीचा बकरा करू नये, तसेच शासनाने संभावित बंदीच्या विरोधात ठोस भूमिका घ्यावी, यासाठी १२ ऑक्टोबर या दिवशी जोधपूर येथील समस्त हिंदुत्ववादी संघटनांनी उपजिल्हाधिकारी अजरा परवीन यांना निवेदन सादर केले. या वेळी अखिल भारतीय हिंदु महासभेचे महासचिव कन्हैयालाल शर्मा, हिंदु महासभा युवा मोर्च्याचे राष्ट्रीय अध्यक्ष महेश जांगला, श्रीराम सेनेचे सचिव लालपतजी परिहार, योग वेदांत सेवा समितीचे अभिषेक भाई, अखिल भारतीय हिंदु क्रांती सेनेचे मनीष जैन, हिंदु जनजागृती समितीचे राजस्थान समन्वयक गजानन केसकर, खिंबराज सोनी, जगदीश राजपुरोहित आदी उपस्थित होते.

जयपूर येथील हिंदु सर्व्हिस अ‍ॅन्ड स्पिरिच्युअल फेअरमध्ये सनातन संस्थेच्या वतीने धर्मप्रसार !

सनातनच्या ग्रंथ प्रदर्शनाला भेट देणारे हिंदू
     जयपूर, १४ ऑक्टोबर (वार्ता.) - सनातन संस्थेच्या वतीने येथे ८ ते ११ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या हिंदु सर्व्हिस अ‍ॅन्ड स्पिरिच्युअल फेअरमध्ये धर्मप्रसार करण्यात आला. येथील स्टॉल क्रमांक १७४-१७५ मध्ये सनातन संस्थेचा कक्ष उभारण्यात आला होता. येथे सनातन संस्थेची अनमोल ग्रंथसंपदा, सात्त्विक पूजनोपयोगी साहित्य आणि धर्मशिक्षा देणार्‍या फलकांचे प्रदर्शन लावण्यात आलेे होते. या कार्यक्रमात राजस्थानसह संपूर्ण देशातून आलेल्या २०० हून अधिक संघटनांनी सहभाग घेतला. 

नगर येथे महानगरपालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे विसर्जित केलेल्या श्री गणेशमूर्तींची विटंबना

     नगर, १४ ऑक्टोबर - अनंत चतुर्दशीला येथील बाळाजी बुवाच्या बारवेमध्ये (एकप्रकारचा पाण्याचा स्रोत) श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यानंतर महानगरपालिने बारवेतील श्री गणेशमूर्ती काढून त्या प्रवरा संगम येथील नदीपात्रात नेऊन सोडल्या. या मूर्ती काढताना अनेक हिंदूंच्या धार्मिक भावनांना ठेच पोहोचली. (हिंदूंनो, तुम्ही भक्तीभावाने पूजन केलेल्या श्री गणेशमूर्तींची ही विटंबना आणखी किती काळ सहन करणार ? - संपादक) श्री गणेशमूर्ती कारखानदारही अवयव दुखावलेल्या मूर्ती विसर्जित न करता कारखान्याच्या परिसरात सोडून देत असल्याचे समोर आले आहे. (अशी अधार्मिक कृती केल्याने मूर्तीकार आणि कारखानदार या दोहोंना पाप लागते. धर्मशिक्षणाच्या अभावी मूर्तीकार आणि कारखानदार यांच्याकडून अशी अक्षम्य चूक होते. यासाठी जन्महिंदूंना धर्मशिक्षण मिळणे आवश्यक आहे ! - संपादक) 

राष्ट्रीय एकात्मतेसाठी समान नागरी कायदा आवश्यक असला, तरी एकमतही आवश्यक ! - कायदामंत्री सदानंद गौडा

सर्वोच्च न्यायालयाच्या प्रश्नावर केंद्रशासनाचे उत्तर
नवी देहली - राष्ट्रीय एकात्मतेसाठी समान नागरी कायदा आवश्यक आहे; पण त्याविषयी एकमत झाले पाहिजे, असे भाजपचे केंद्रीय कायदामंत्री सदानंद गौडा यांनी १४ ऑक्टोबरला स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाने १३ ऑक्टोबरला केंद्रशासनाला समान नागरी कायद्याविषयी प्रश्न केला होता. त्यानंतर केंद्राची भूमिका गौडा यांनी मांडली.
गौडा म्हणाले की, शासनाकडून या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र प्रविष्ट करणार आहोत. तत्पूर्वी त्याला पंतप्रधान, मंत्रीमंडळ आणि ज्येष्ठ अधिवक्ते यांची मान्यता घेण्यात येईल.  या कायद्याच्या सहमतीसाठी पर्सनल लॉ बोर्ड आणि अन्य अहिंदूंशी चर्चा करण्यात येईल. (अहिंदूंना घटनेने दिलेल्या सवलती हव्या असतात, त्यात पालट करून आपल्याला हवे तसे नियम बनवण्यास त्यांची मान्यता असते, मग डॉ. आंबेडकर यांना अभिप्रेत असणारा समान नागरी कायदा त्यांना अमान्य होण्याचा प्रश्न येतो का ? हे म्हणजे सवलती हव्या आणि कर्तव्य नको, असे झाले ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्र हवे ! - संपादक) घटनेच्या प्रास्ताविकात आणि घटनेच्या ४४ व्या कलमात समान नागरी कायदा असला पाहिजे, असे नमूद केले आहे. राष्ट्राच्या एकात्मतेसाठी तो आवश्यक आहे. हा अतिशय संवेदनशील विषय आहे. त्यावर व्यापक चर्चा झाली पाहिजे. त्यासाठी काही काळ लागेल.

भाजपच्या राज्यात समाजकंटकांचे सनातन आश्रमावरील आक्रमणांचे घृणास्पद कृत्य चालूच !

शिवीगाळ करणे, धमक्या देणे, अश्लील बोलणे आणि दगडफेक करणे या गोष्टी अदखलपात्र
ठरवणारे दंडविधान आणि पोलीस हिंदु राष्ट्रात नसतील ! 
सनातनच्या रामनाथी आश्रमातील साधकांना धमक्या देण्याचा, अश्लील बोलण्याचा आणि आश्रमावर दगड फेकण्यास आरंभ केल्याचा कालचा ५ वर्षे ३३१ वा (२१५६ वा) दिवस ! 
१३.१०.२०१५
रात्री ११.१० वाजता दुचाकीवरून २ - ३ युवक आश्रमासमोरून किंचाळत गेले.
रात्री ११.३० वाजता दुचाकीवरून काही युवक आश्रमासमोरून सनातन मुर्दाबाद असे ओरडत गेले.
हिंदु राष्ट्रात हे दखलपात्र अपराध असतील !

खानिवडे (जिल्हा पालघर) येथे गायींची चोरी करण्याचा प्रयत्न गावकर्‍यांच्या सतर्कतेमुळे फसला

असे सतर्क नागरिक हीच राष्ट्राची शक्ती आहेत !
गाडीत कोंबून ठेवलेली गाय
     विरार - खानिवडे येथे गो-तस्करांनी गुंगीचे इंजेक्शन देऊन गायींना चारचाकी वाहनांच्या डिक्कीत कोंबून पळ काढण्याचा प्रयत्न केला होता; मात्र गावकर्‍यांच्या सतर्कतेमुळे तो फसला. संबंधित गो-तस्कर फरार झाले असून या प्रकरणी पोलिसांनी गोवंंशहत्या बंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. (शासनाने आतातरी गोवंशहत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी. - संपादक)
१. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील खानिवडे येथे पूर्व बाजूस असलेल्या जुन्या टोल नाक्याच्या ठिकाणी पिरांच्या देवळाला लागूनच गुरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून पूर्वीपासूनचा येथे तलाव आहे.

अवैध मांस विक्रेत्यांवर कारवाई करा ! - अमोल पाटील, शिवसेना

     कुपवाड, १४ ऑक्टोबर (वार्ता.) - कत्तलीची अनुमती नसतांना मटण विक्रीच्या नावखाली गुरांची अवैध कत्तल करून सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेची फसवणूक आणि प्रदूषण निर्माण करणार्‍या कुपवाडमधील मटण विक्रेत्यांवर कडक कारवाई करावी, अन्यथा महापालिका प्रशासनाच्या विरोधात शिवसेना पद्धतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी कुपवाड शहरप्रमुख श्री. अमोल पाटील यांनी निवेदनाद्वारे महापालिका आरोग्य अधिकार्‍यांना दिले आहे. हे निवेदन पर्यावरणमंत्री श्री. रामदास कदम आणि कुपवाड पोलीस ठाणे यांना पाठवण्यात आले आहे. (सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या महापालिका प्रशासनाकडे अशी कारवाई करा, अशी मागणी का करावी लागते ? - संपादक) 

सांगली जिल्ह्यात दैनिक सनातन प्रभातचा 'सत्यकथन' विशेषांक वितरीत करतांना आलेले अनुभव

१. ४५ मिनिटांत २०० अंकांचे वितरण झाले. श्री शिवप्रतिष्ठाचे श्री. अमित गुळवणी यांनी विशेषांकाचे वितरण केले. त्यांचे सहकारी श्री. हजारे यांनी 'सनातनची बाजू सत्याची आहे आणि त्यांना ईश्‍वराचे आशीर्वाद असल्याने कुणाला घाबरण्याचे कारण नाही', अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. एका व्यक्तीने सनातनला पहिल्यांदा साहाय्य केले पाहिजे, असे मत व्यक्त केले. - श्री. राहुल कदम, विटा 

बंगाली कवी मंदाक्रांता सेन यांच्याकडून पुरस्कार परत

     कोलकाता - अल्पसंख्यांकांची असुरक्षितता आणि पुरोगाम्यांच्या हत्येच्या निषेधार्थ देशातील १५ हून अधिक साहित्यिकांनी साहित्य अकादमी पुरस्कार परत केल्यानंतर आता प्रसिद्ध बंगाली कवी मंदाक्रांता सेन यांनीही त्यांचा पुरस्कार परत केला आहे. त्यामुळे या सूचीत त्यांचेही नाव समाविष्ट झाले आहे. सेन यांना वर्ष २००४ मध्ये स्वर्णजयंती विशेष साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. कलबुर्गी यांची हत्या आणि दादरी येथील हत्याकांडाच्या निषेधार्थ मी पुरस्कार परत देण्याचा निर्णय घेतला आहे, असे सेन यांनी या वेळी सांगितले. उत्तरप्रदेशातील दादरी येथे गोमांस सेवन केल्याच्या संशयावरून एका अखलाक नावाच्या मुसलमान व्यक्तीची हत्या करण्यात आली, तसेच यापूर्वी गोविंद पानसरे आणि कर्नाटकातील साहित्यिक कलबुर्गी यांची हत्या करण्यात आली होती. (एका विशिष्ट समाजाशी बांधिलकी ठेवणारे साहित्यिक समाजासाठी काय योगदान देणार ? - संपादक)

वाढत्या जनरेट्यामुळे पोलीस निरीक्षक रमेश गोकाक यांना पुन्हा सेवेत रुजू करण्याचा पोलीस आयुक्तांचा आदेश !

हिंदूंनो, संघटितपणे असा लढा दिल्यास प्रशासनाला तुमच्यासमोर झुकावे लागते हे लक्षात घ्या !
खडक गल्ली दंगल प्रकरण
      बेळगाव, १४ ऑक्टोबर (वार्ता.) - खडक गल्ली येथील उसळलेल्या दंगलीत घायाळ झालेले मार्केटचे पोलीस निरीक्षक श्री. रमेश गोकाक यांच्यावर पोलीस आयुक्त एस्. रवी यांनी निलंबनाची कारवाई केली होती. यामुळे विविध संघटना, बार असोसिएशन आणि राजकीय नेते यांनी श्री. गोकाक यांना त्वरित कामावर रुजू करावे, अशी मागणी केली होती. या कारणास्तव आणि वाढत्या जनरेट्यासमोर पोलीस आयुक्त एस्. रवी यांनी श्री. गोकाक यांना पुन्हा सेवेत रुजू होण्याचा आदेश दिला आहे. १३ ऑक्टोबरपासून श्री. गोकाक हे कामावर रुजू झाले असून याविषयी जनतेतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रचे १ सहस्र ८९ कोटी रुपयांचे ८९ घोटाळे उघड

     नागपूर - वर्ष २०१४ मध्ये दीड वर्षांत बँक ऑफ महाराष्ट्रशी संबंधित १ सहस्र ८९ कोटी रुपयांचे ८९ घोटाळे समोर आले आहेत. यापैकी अधिकोषाचेे कर्मचारी सव्वाकोटी रुपयांच्या १४ घोटाळ्यांमध्ये सहभागी आहेत. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी बँक ऑफ महाराष्ट्रशी संबंधित घोटाळे, एटीएम्ची संख्या, तेथील सुरक्षा, एकूण खात्यांची संख्या इत्यादींच्या संदर्भात विचारणा केली होती.

शहरातील वाहनधारकांकडून प्रतिदिन ५० रुपये दंडाची आकारणी करू नये ! बजरंग दल

वाहनांचे वेळेत 'पासिंग' करून न देता प्रशासनाकडून वाहनधारकांची लूट चालूच !

     कोल्हापूर, १४ ऑक्टोबर (वार्ता.) - 'पासिंग' वेळेत न केल्यामुळे शहरातील चारचाकी वाहनधारकांना प्रतिदिन ५० रुपये दंड आकारून उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून त्यांच्यावर अन्याय करण्यात येत आहे. यामुळे वाहनधारकांना तिष्ठत ठेवल्यामुळे त्यांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. शासकीय कार्यालयात 'पासिंग' करण्यासाठी गेल्यानंतर शासकीय कर्मचारी अनुपस्थित असतात. त्यामुळे वाहनचालकांना 'पासिंग' करता येत नाही. 'पासिंग' न केलेल्या वाहनधारकांकडून प्रतीदिन ५० रुपये दंड न आकारता संबंधित शासकीय खात्यात कर्मचार्‍यांची उपस्थिती ठेवून वाहनधारकांचे वेळेत 'पासिंग' करून घ्यावे, अशी मागणी बजरंग दलाच्या वतीने आज राज्य उपप्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे यांच्याकडे आज करण्यात आली आहे, अशी माहिती बजरंग दलाचे जिल्हाप्रमुख सर्वश्री संभाजी साळुंखे आणि शहरप्रमुख महेश उरसाल यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. (पासिंग करण्यासाठी येणार्‍या वाहनधारकांना वेळेत पासिंग करून देणे हे परिवहन अधिकार्‍यांचे कामच आहे. तसेच अधिकारी उपस्थित असतांना पासिंग न करणार्‍या वाहनचालकांवर नियमाप्रमाणे दंड वसूल केला पाहिजे. कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी अनुपस्थित रहात असतील, तर त्याला वाहनधारक उत्तरदायी नाही. कारण नसतांना वाहनधारकांची लूट करणार्‍या अशा अधिकार्‍यांना शासनाने कारवाई करावी. - संपादक) 

राज्यात गोवंशहत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याचे भाजपचे संकेत

     मुंबई - महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाने गोवंशहत्या बंदी कायद्याची अंमलबजावणी तीव्र करण्यासाठी पावले टाकली असून राज्यभरात १०० हून अधिक गुन्हे नोंद झाले आहेत, तर २५०-३०० धर्मांधांना गोवंशाची कत्तल केल्याविषयी अटक झाली आहे, तर गोमांसाची होणारी चोरटी निर्यात रोखण्यासाठी केंद्रशासन मुंबईत तपासणीसाठी प्रयोगशाळा उघडणार असून भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी त्यासाठी प्रयत्न केले आहेत. 

राज्यात डुक्कर ज्वराचे (स्वाइन फ्लू) आठवड्यात ३३ बळी

     मुंबई - राज्यात आठवडाभरात डुक्कर ज्वराने (स्वाइन फ्लू) ३३ जणांचा बळी घेतला आहे. त्यात मुंबई (३), ठाणे (४), पुणे (४), नाशिक (५), नागपूर (४) येथील रुग्ण आहेत. यांत ७ जणांचा मृत्यू झाला. या आजाराने १ जानेवारीपासून ८०७ जण मृत्युमुखी पडले. ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक आणि चंद्रपूर जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. डुक्कर ज्वराच्या २२ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, रुग्णालयात दाखल केलेल्या १८६ रुग्णांपैकी २० अत्यवस्थ आहेत.

लातूरला आता दहा दिवसांतून एकवेळ पाणी

     लातूर - शहराला पाणीपुरवठा करणार्‍या मांजरा आणि नागझरी बंधार्‍यात अल्प साठा असल्याने महापालिकेने दहा दिवसांतून एकदा शहरात पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहराला महिन्यातून केवळ दोनदा पाणीपुरवठा केला जात होता. आता महिन्यातून तीन वेळेस पाणीपुरवठा होणार आहे. शहरात घरोघरी बोअर असल्याने लातूरकरांची तहान त्यावर भागते आहे. शहराला दहा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जाणार आहे.

उत्तराखंडची द्वितीय अधिकृत भाषा म्हणून संस्कृतला मान्यता

     डेहराडून (उत्तराखंड) - उत्तराखंड शासनाने संस्कृत भाषेला द्वितीय अधिकृत भाषा म्हणून मान्यता देण्याची घोषणा केली आहे. असे पाऊल उचलणारे हे भारतातील पहिलेच राज्य आहे. या संबंधीचे विधेयक विधानसभेत नुकतेच पारित करण्यात आले आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री रमेश पोखरीयाल निशंक म्हणाले, "या निर्णयाने भारताच्या प्राचीन भाषेला तिचे उचित स्थान दिले आहे. यामुळे मुलांना संस्कृतचे ज्ञान मिळेल. ते संस्कृतमध्ये भाषांतर करू शकतील, तसेच त्यांना परंपरागत वैदीक ज्ञान, आधुनिक शास्त्र, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या शास्त्रांशी संबंध जोडता येईल. याद्वारे आम्हाला केवळ 'पुरोहित'च नव्हे, तर 'पंडित' सिद्ध करायचे आहेत. संस्कृतचा वापर मानवाच्या सर्वांगीण कल्याणासाठीच नव्हे, तर महसूल उत्पन्नाच्या वाढीसाठीही करता येईल."

ऐन नवरात्रीत चिपरी (जिल्हा कोल्हापूर) कापलेल्या गायींसह २ टन मांस पकडले : ५ धर्मांधांना अटक

सांगली येथील गोरक्षकांचे अभिनंदन !
      जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर), १४ ऑक्टोबर (वार्ता.) - जयसिंगपूरजवळ असलेल्या चिपरी गावात १४ ऑक्टोबर या दिवशी पहाटे तीन वाजता गायी कापल्या जात असल्याची माहिती सांगली येथील मानद प्राणीकल्याण अधिकारी श्री. अंकुश गोडसे आणि डॉ. नितेश ओझा यांना मिळाली. त्यांनी पोलिसांच्या साहाय्याने रफीक बेपारी यांच्या घरी धाड टाकली असता तिथे नुकत्याच कापलेल्या अवस्थेतील ३ गायी आणि १ जिवंत बैल सापडला. बेपारी यांच्या घरातून २ टन मांस जप्त करण्यात आले असून सुमारे १२ लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बैलाची पाठवणी गोशाळेत करण्यात आली आहे.

पुरस्कार परतीचे साहित्यिकी राजकारण ! - अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

     सध्या पुरोगामी साहित्यिकांना अचानक फुटलेले समाजभान आणि त्यांच्या पुरस्कार परतीचा वेग पहाता, लवकरच शासनाला इबेसारख्या वापरलेल्या वस्तूंची ऑनलाईन विक्री करणार्‍या संकेतस्थळांवर येथे सेकण्डहॅण्ड पुरस्कार मिळतील, म्हणून जाहिरातच करावी लागेल ! इतकी वर्षे अस्तंगत झालेले साहित्यिकांचे समाजभान विद्यमान भाजप शासनाच्या कार्यकाळातच, तेही विशिष्ट मानवसमूहावरील अन्यायामुळे जागे झाले, नव्हे नव्हे, ते लेप्टो किंवा डेंग्यूच्या साथी पेक्षाही जलदगतीने देशभरात पसरू लागले. महत्त्वाचे म्हणजे या साहित्यिकांनी पुरस्कारासोबत मिळालेली रक्कम, सोहळ्यावर झालेला खर्चही सोबत परत करत आहोत, हे सांगण्याची तसदी घेतलेली नाही, असे सनातन संस्थने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी म्हटले आहे.

खुर्शीद कसुरी यांच्या कार्यक्रमासाठी राज्य शासनाने दिलेला पोलीस बंदोबस्त संतापजनक ! - वीरमाता कविता गाडगीळ

      मुंबई - पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांच्या कार्यक्रमात राज्य शासनाने दिलेला पोलीस बंदोबस्त संतापजनक आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया वीरमाता कविता गाडगीळ यांनी व्यक्त केली आहे. (याविषयी राज्य शासनाला काय म्हणायचे आहे ?- संपादक) त्या शहीद कॅप्टन अभिजित गाडगीळ यांच्या मातोश्री आहेत. कसुरींच्या कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी शिवसेनेने केलेले प्रखर आंदोलन, त्यांचा राष्ट्रवाद आणि राष्ट्रभक्ती यांनाही गाडगीळ यांनी पाठिंबा दिला आहे. शिवसेनेने कसुरींच्या कार्यक्रमाला केलेला विरोध योग्यच होता; पण राज्यशासनाची याविषयी भूमिका चीड आणणारी होती, असेही त्यांनी म्हटले आहे.

भारत सौदी अरेबियाकडून हे शिकेल का ?

     'सौदी अरेबियामध्ये मूलभूत कायद्यानुसार देशातील सुरक्षेवर परिणाम करणार्‍या किंवा लोकांमध्ये दरी निर्माण होईल, अशा बाबींना बंदी आहे.'

फलक प्रसिद्धीकरता

कुठे स्वत:च्या मुलाचे श्राद्ध करणारे हॉलीवूडचे 
अभिनेते सिल्वेस्टर स्टॅलोन, तर कुठे श्राद्धाला कालबाह्य ठरवणारे भारतीय ! 
     हॉलीवूड चित्रपटसृष्टीत 'रॅम्बो' म्हणून प्रख्यात असलेले अभिनेते सिल्वेस्टर स्टॅलोन यांनी त्यांच्या दिवंगत मुलाच्या आत्म्याला शांती मिळावी, यासाठी हरिद्वार येथे गंगानदीच्या किनार्‍यावर नुकतेच श्राद्ध केले.

सुधींद्र कुलकर्णी यांच्या मुलीची शेजार्‍यांनी छेड काढली, तर त्यांना ते चहाला बोलावणार का ? - अनुपम खेर, प्रसिद्ध अभिनेते

पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित केल्याचे प्रकरण
      मुंबई - पाकिस्तानशी आपले असलेले संबंध सर्वांना माहिती आहेत. मग अशा वेळी पुस्तक प्रकाशनाचा हा कार्यक्रम मुंबईत आयोजित करण्याची आवश्यकता काय होती ? ते काही आपले मित्र नाहीत. पाकिस्तानकडून सातत्याने भारतविरोधी कुरापती चालू असतात. उद्या जर सुधींद्र कुलकर्णी यांच्या शेजारी रहाणार्‍यांनी त्यांच्या पत्नीची, मुलीची, मुलाची छेड काढली, त्यांना मारले, त्यांच्यावर कचरा फेकला, तरीसुद्धा सुधींद्र कुलकर्णी त्या शेजार्‍यांना आपल्या घरी चहा पिण्यासाठी बोलावणार का, असा सडेतोड प्रश्‍न अनुपम खेर यांनी उपस्थित केला. प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी वरील वक्तव्य केले.

दबावापोटीच पोलिसांकडून समीर गायकवाड यांच्यावर कारवाई ! - दिलीप अलोणी

जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात धर्माभिमानी 
दिलीप अलोणी यांनी पुरोगाम्यांचा बुरखा फाडला !
     मुंबई - डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणांत पोलिसांना काहीही धागेदोरे सापडले नाहीत. परिणामी पोलिसांवर दबाव असल्यानेच समीर गायकवाड यांच्यावर कारवाई करण्यात आली, असे प्रतिपादन राष्ट्रीय एकात्मता रक्षा अभियानाचे अध्यक्ष श्री. दिलीप अलोणी यांनी केले.
    पानसरे हत्या प्रकरणात सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना संशयित म्हणून अटक केल्यानंतर जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीवर नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या लक्ष्यवेधी या चर्चासत्राच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या चर्चासत्रात हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, भाजपचे प्रवक्ते शिरीष बोराळकर, राष्ट्रीय पत्रकार हेमंत कर्णिक आणि निवृत्त पोलीस अधिकारी शमशुद्दीन मुश्रीफ सहभागी झाले होते.

दैनिक सनातन प्रभातचा दसर्‍यानिमित्त रंगीत धर्मविजय विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : २२ ऑक्टोबर 
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी 
२१ ऑक्टोबरच्या दुपारी ३ पर्यंत 'ईआरपी'  प्रणालीत भरावी !

हिंदू तेजा जाग रे !

Jago :
 Holywood superstar Silvestar styalon 
ne Haridwarme karaya beteka shradha 
- Tathakathit purogamionka es par kya kahana hai ? 

जागो ! : 
हॉलीवुड सुपरस्टार सिल्वेस्टर स्टॅलोन 
ने हरिद्वार मे कराया बेटे का श्राद्ध ! 
- तथाकथित पुरोगामीआेंका इस पर क्या कहना है ?

१५ दिवसांनंतरही हौदातील गणेशमूर्ती हौदातच !

हौदात अस्ताव्यस्त पडलेल्या गणेशमूर्ती
(हे छायाचित्र कुणाच्या भावना दुखावण्याच्या हेतूने नव्हे, तर प्रबोधनाकरीता छापत आहोत.) 
थेरगाव घाट (चिंचवड) येथील कृत्रिम हौदातील गणेशमूर्तींची विटंबना
      चिंचवड, १४ ऑक्टोबर (वार्ता.) - अनंतचतुर्दशी होऊन १५ दिवस उलटले, तरी अद्याप थेरगाव घाट येथे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या कृत्रिम हौदातील श्री गणेशमूर्ती हौदातच अस्ताव्यस्त पडल्याचे आढळून आले. ११ ऑक्टोबर या दिवशी हौदातील पाण्याला अत्यंत दुर्गंधीही येत असल्याचे निदर्शनास आले. १२ ऑक्टोबर या दिवशी काही गणेशमूर्ती हौदातील गाळात रुतून बसल्याचे, तर काही गणेशमूर्तींचे अवयव दुखावल्याचे आढळून आले. काही गणेशमूर्ती विरघळल्याने हौदातच गाळ निर्माण झाला होता, तर अनेक गणेशमूर्ती पाण्यात विरघळल्याही नव्हत्या.

साहित्य आखाडा-मी

श्री. भाऊ तोरसेकर,
ज्येष्ठ पत्रकार, मुंबई
१. साहित्य पुरस्कार राजकीय निष्ठेपोटीच !
      सध्या साहित्य अकादमी पुरस्कार नेहमीपेक्षा वेगळ्या कारणाने गाजत आहेत. नेहमी कुणा साहित्यिकाला या संस्थेचा पुरस्कार मिळाला, मग त्याचे कौतुक चालू होते. अलीकडील काळात हे पुरस्कार मिळण्यामुळे गाजावाजा होण्यापेक्षा तो मिळवलेल्या साहित्यिकांच्या राजकीय भूमिकेमुळे त्या पुरस्काराच्या बातम्या येत असतात. दोन वर्षांपूर्वी त्याचा आरंभ अनंतमूर्तीनामक कन्नड साहित्यिकाने केला होता. नरेंद्र मोदी तेव्हा भाजपकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून प्रचारार्थ फिरत होते आणि मोठमोठ्या सभा गाजवत होते. अशा वेळी अनंतमूर्ती यांनी मोदींना अपशकुन करण्यासाठीच जाहीरपणे म्हटले की, मोदी पंतप्रधान झाले, तर आपण देश सोडून निघून जाऊ.

महिला लढाऊ वैमानिक - एक आव्हान !

      भारतीय हवाईदलातील महिला वैमानिकांना लढाऊ विमाने देण्याचा निर्णय भारत घेत आहे. भारतात महिला वैमानिक आहेत; मात्र त्यांच्या सुरक्षेचा विचार करता त्यांना लढाऊ विमाने चालवण्याची अनुमती देण्यात आली नव्हती. आता ती देण्यात येणार आहे. महिलांना सुरक्षेचे कारण समोर करून त्यांना दुबळे ठरवले जात होते. प्रवासी विमाने उडवणे आणि लढाऊ विमाने उडवणे या दोन्हींमध्ये बराच भेद आहे. प्रशिक्षणापासून ते तंत्रज्ञानापर्यंत ही दोन प्रकारची विमाने अत्यंत भिन्न स्वरूपाची असतात.

येनकेन प्रकारेण प्रसिद्धीच्या झोतात रहाणारे लोटलीकर माय-लेक अन् शाम मानव !

कु. नीलिमा कुलकर्णी
     उचलली जीभ अन् लावली टाळ्याला आणि जशी दृष्टी तशी सृष्टी, या दोन्ही म्हणी खर्‍या ठरवणारे शाम मानव, सौरभ लोटलीकर, शर्मिला लोटलीकर, तसेच सनातनचे काही विरोधक हे सनातन संस्थेविरुद्ध अकारण गरळओक करत आहेत. या सर्वांचे असंबद्ध बोलणे ऐकल्यावर शाम मानवांसह सार्‍यांनाच कुणी संमोहित करून असे बडबडण्यास प्रवृत केले आहे का ?, असा प्रश्‍न पडत आहे. 
१. शर्मिला लोटलीकर यांना धादांत असत्यकथन केल्याविषयी 
मोठे (?) पारितोषिक द्यायला हवे !
     गोव्यातील श्री रामनाथ मंदिराच्या परिसरात रहाणार्‍या शर्मिला लोटलीकर यांनी तर कहरच केला आहे. त्यांनी सनातनच्या आश्रमात अनैतिक कृत्ये चालतात, असा निखालस खोटा आरोप केला. असा आरोेेप करायला त्यांची जीभ वळतेच कशी ? त्यांचेे हे वक्तव्य ऐकून उचलली जीभ अन् लावली टाळ्याला या म्हणीचाच प्रत्यय येतो. त्यांना धादांत असत्यकथन केल्यासाठी मोठे पारितोषिकच द्यायला हवे.

विधवा विचारवंत

     दादरी प्रकरणाच्या आधीही भीषण हत्याकांडे देशात घडली होती. विचारस्वातंत्र्यावर अव्यभिचारी निष्ठा असेल, तर सत्ताधीश कोणीही असो तिचे रक्षण करणे, हे विचारांना मानणार्‍यांचे कर्तव्य ठरते. ही विचारनिष्ठेची कसोटी असते. आपले विचारवंत तीत सातत्याने अनुत्तीर्ण ठरतात. आताही तेच दिसून येत आहे.
१. नैतिक अधिष्ठान नसल्यास शासनाचा निषेध करणे, ही वरवरची घटना ! 
      गोमांस बाळगल्याच्या संशयावरून दादरी येथे एकाची हत्या झाल्याने अनेकांच्या इतके दिवस कुंठित झालेल्या विचारशक्तीस पान्हा फुटलेला दिसतो. या हत्येनंतर ज्या पद्धतीने लेखक, कलावंत यांनी शासनाचा निषेध करण्यासाठी आपापले पुरस्कार परत करण्याचा सपाटा लावला आहे, ते पहाता असे मानावयास जागा आहे. राजकीय शक्तीचा मद सत्ताधार्‍यांना नसला, तरी सत्तेच्या आसर्‍याने आपले समाजकारण करणार्‍यांच्या डोक्यात जाण्याची शक्यता असते. सूर्यापेक्षा वाळूच अधिक तापावी, तसे प्रत्यक्ष सत्ताधार्‍यांपेक्षा त्यांच्या आसपासचेच अधिक सत्ता गाजवू लागत असतात. अशा वेळी शासनाला खडसवण्याचे कर्तव्य शासनबाह्य घटकांना पार पाडावे लागते. ते पार पाडावयाचे असेल, तर असे करू इच्छिणार्‍यांत एक नैतिक अधिष्ठान आवश्यक असते. ते नसेल, तर शासनाचा निषेध करणे, ही केवळ वरवरची घटना ठरते.

पुरोगामी आतंकवादाचे वास्तव !

लोकमतमधील कुमार सप्तर्षी यांच्या लेखास उत्तर
      १३ सप्टेंबर २०१५ च्या लोकमत (मंथन) मध्ये कुमार सप्तर्षी यांचा बरे झाले, शेषराव बरळले ! हा लेख वाचला. शीर्षक वाचूनच या लेखात सप्तर्षी काय बरळले असतील, याची कल्पना आली. स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा. शेषराव मोरे हे विश्‍व मराठी साहित्य संमेलनाचे (निर्विवादपणे) अध्यक्ष झालेच कसे ? हीच मुळात या पुरोगामी आणि निधर्मीवादी इत्यादी मंडळींची पोटदुखी होती. त्याहून अधिक प्रा. मोरे यांनी गांधीवधाच्या खटल्यात सावरकर निर्दोष असल्याच्या न्यायालयीन निर्णयाचा पुनरुच्चार स्पष्टपणे केला. त्यामुळे ही पोटदुखी द्विगुणित झाली असेल.

शारदीय नवरात्रीमागील शास्त्र आणि त्या काळात केले जाणारे धार्मिक आचार !

नवरात्रीनिमित्त...
      एका मतानुसार नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी तमोगुणी महाकालीची, दुसरे तीन दिवस रजोगुण वाढवण्यासाठी रजोगुणी महालक्ष्मीची आणि शेवटचे तीन दिवस साधना तीव्र होण्यासाठी सत्त्वगुणी महासरस्वतीची पूजा करतात. रात्री म्हणजे होत असलेला पालट. देवीचे एक नाव कालरात्री असे आहे. कालरात्री म्हणजे कालपुरुषात पालट घडवणारी. फिरणे हा पृथ्वीचा गुणधर्म आहे. पृथ्वीच्या फिरण्यामुळे पालट होत असतात, म्हणजे रात्र आणि दिवस होतात. अशा पालटांना सहन करण्याची क्षमता शरिरात असावी म्हणून व्रते करतात. आश्‍विन शुक्ल पक्ष प्रतिपदा ते आश्‍विन शुक्ल पक्ष नवमीपर्यंत शारदीय नवरात्रात भगवतीदेवीची विशेष आराधना केली जाते.

माणसाच्या मनाच्या प्रगतीच्या संदर्भात भारताने जे कार्य केले, तसे जगातील एकाही देशाने केले नाही !

     मी जेव्हा माझ्या देशाच्या इतिहासाकडे वळून पहातो, तेव्हा मला असे दिसते की, संपूर्ण जगामध्ये असा एकही देश नाही की, ज्या देशाने माणसाच्या मनाच्या प्रगतीच्या संदर्भात एवढे मोठे कार्य केले असेल. 
- स्वामी विवेकानंद (श्री. राजाभाऊ जोशी, मासिक लोकजागर, दिवाळी विशेषांक २००८)

हिंदु मुलांना वाघ न बनवता शेळी बनवणारे शिक्षण दिल्यास ५ मुलेच काय, ५० मुले जन्माला घातली, तरी हिंदू असुरक्षितच रहातील !

     देशातील हिंदूंचे होणारे धर्मांतराचे प्रकार तातडीने थांबवले नाहीत, तर या देशात हिंदू अल्पसंख्यांक होतील आणि तो दिवस दूर नाही. ते रोखण्यासाठी प्रत्येक हिंदु दांपत्याने ५ मुलांना जन्म देण्याची आवश्यकता आहे, असे विधान एका हिंदुत्ववादी नेत्याने केले आहे.

समजूतदार आणि सहनशील असलेले ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचे अन् उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले ठाणे येथील चि. अनय आणि चि. अन्वी अमित हरेर (वय १ वर्ष) !

चि. अनय हरेर
चि. अन्वी हरेर
१. सौ. स्वाती अमित हरेर (बाळांची आई), ठाणे (पूर्व)
१ अ. गर्भधारणेपूर्वी
    मला पुष्कळ त्रास होत होते. त्यावर उपाय म्हणून साधकांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे मी उपाय आणि प्रार्थना यांत वाढ केली. त्यामुळे माझे त्रास उणावले.
१ आ. गर्भारपणात
१ आ १. अखंड नामजप होणे
अ. मला गर्भारपणी पहाटे ३ ते ३.३० या कालावधीत जाग येऊ लागली आणि मी तेव्हापासून ६.३० वाजेपर्यंत श्रीकृष्ण आणि दत्त यांचा नामजप करू लागले. त्यात खंड पडला नाही.
आ. पाचव्या मासात माझा सातत्याने श्रीरामाचा तारक भावात नामजप होत असे. नामजप संथ गतीने होऊ लागल्यावर श्रीरामाचा माझ्यावर प्रेमाचा वर्षाव होत आहे, असे जाणवायचे.

महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. गार्गी दिघे हिच्याविषयी जाणवलेली सूत्रे

    कु. गार्गी दिघे आरंभीच्या काळात पुष्कळ अबोल होती. प्रथम ती मोजक्या साधकांशीच बोलत होती. आता ती सर्वांशी हसतमुख राहून बोलते. तिचा अबोल स्वभाव आता पुष्कळ न्यून झाल्याचे वाटते. ती सतत श्रीकृष्णाच्या अनुसंधानात असते. अधिक सेवा झाल्यावर काही जण लगेच थकतात; पण गार्गी व्यवस्थापन विभागात आल्यापासून सतत धावपळीची सेवा करूनही तिला मी कधीच आजारी पडलेले, निराशा झालेले किंवा थकलेले पाहिले नाही. - कु. नंदा सदानंद नाईक, रामनाथी आश्रम, फोंडा, गोवा.

चुकांविरहित आणि परिपूर्ण सेवा होण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणारी कु. गार्गी दिघे (वय १३ वर्षे)

कु. गार्गी दिघे
    २०.४.२०१५ या रात्री १२ वाजता कु. गार्गी आणि एक साधिका या दोघी मिळून बालसाधकांकडून झालेल्या अक्षम्य चुका आश्रमातील भोजनकक्षाच्या फलकावर लिहित होत्या. पुष्कळ मजकूर लिहायचा असल्याने त्यांना ती सेवा पूर्ण करायला पहाटे ३.३० वाजले. पहाटे ४ वाजता कु. गार्गी झोपायला गेल्यावर तिला स्वप्नात आपण लिहिलेल्या सूचनांमध्ये एक वाक्य लिहायचे राहिले आहे, याची जाणीव झाली. ती चूक सुधारण्यासाठी झोपेतून उठून तिने भोजनकक्षात येऊन पाहिले, तेव्हा एक वाक्य न लिहिल्याचे तिच्या लक्षात आले आणि तिने ते वाक्य सुधारले. यावरून तिची सेवा परिपूर्ण आणि चुकांंविरहीत करण्याची तळमळ मला शिकायला मिळाली.
    देवा, मला तिच्याकडून हा गुण शिकून तशी कृती करायला शिकव, हीच तुझ्या चरणी प्रार्थना ! - कु. शायरी मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.५.२०१५)

देवा, शिकव प्रगतीची वाटचाल चालाया !

    एकदा एक प्रसंग घडला. त्यात माझी चूक होती; पण माझा हेतू वाईट नसतांना सहसाधक दुखावले गेले. त्या वेळी मला पुष्कळ वाईट वाटले आणि पुढील ओळी सुचल्या.
चुकले रे देवा चुकले ।
क्षमा करशील ना रे मला ।
ध्यानीमनी नव्हते दुखवावे कुणाला ।
कसे काय घडले कळेना मला ॥ १ ॥
देवा, खरे सांगते ।
आकस नाही रे मनात माझ्या ।
पण तरी समष्टीला तसे वाटले ।
याचे वाईट वाटते मला ॥ २ ॥

कवितांच्या माध्यमातून साधिकेने अनुभवलेली देवाची कृपा !

    २३.२.२०१४ या दिवशी पू. बिंदाताईंनी कला विभागातील साधकांचा सत्संग घेतला आणि साधकांना त्यांच्या चुकांची जाणीव करून दिली. त्या दिवशी मी ध्यानमंदिरात बसले असतांना मला पुढील ओळी आपोआप सुचल्या.
देवा, कशी येऊ तुझ्या चरणी ? ।
देवा, कशी येऊ तुझ्या चरणी ।
अनंत अपराधी मी ॥ १ ॥
दाविलीस वाट पू. ताईंच्या माध्यमातून ।
जिंकावे मन त्यांचे स्वप्रयत्नांतून ॥ २ ॥

रामनाथी आश्रमात राहून स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया करतांना अंतर्मुखता येऊन पालट करण्याची मिळालेली उभारी !

१. पू. बिंदाताई म्हणजे गुरुमाऊलीने समष्टीसाठी दिलेली माऊली आहे, असे वाटणे
    मी संस्थेत आल्यापासून दोष आणि अहं यांमुळे माझ्याकडून व्यष्टी, तसेच समष्टी स्तरावर काही चुका झाल्या. त्या वेळी देवाने मला आश्रमात स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेसाठी पाठवून माझ्यासारख्या जिवाला त्याच्या चरणांकडे येण्याची एक संधी दिली. आश्रमात आल्यानंतर मला अनेकदा वाटायचे, पू. बिंदाताई म्हणजे गुरुमाऊलीने समष्टीसाठी दिलेली एक माऊली आहे. हळूहळू माझ्या मनात आता स्वतःत पालट करायलाच पाहिजे, असे वाटू लागले. नंतर मात्र उत्साह निर्माण होऊन मनाला उभारी यायची. मला सकारात्मक दृष्टीकोन मिळून व्यष्टी प्रयत्नही चालू व्हायचे.

पू. सौरभदादांनी दैनिक सनातन प्रभातमधील पू. (सौ.) बिंदाताईंचेे छायाचित्र पाहून श्री असे संबोधल्यावर पू. बिंदाताई प.पू. गुरुदेवांशी तत्त्वरूपाने एकरूप झाल्याचे जाणवणे

१. पू. सौरभदादांना दैनिक सनातन प्रभातमध्ये आलेला
पू. (सौ.) बिंदाताई यांचे छायाचित्र दाखवल्यावर त्यांनी श्री असे संबोधणे
    पू. बिंदाताई यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दैनिक सनातन प्रभातमध्ये साधकांनी लिहिलेले त्यांच्या संदर्भातील लेख आणि कविता प्रसिद्ध झाल्या. नेहमीप्रमाणे मी पू. सौरभदादा यांना सकाळी दैनिक वाचण्यासाठी दिले. तत्पूर्वी मी ते केवळ चाळून बघितले होते. त्यात पू. बिंदाताईंच्या संदर्भातील लेख आल्याचे बघितल्याने दैनिकातील ते पान काढून मी पू. सौरभदादांना दाखवले. त्या वेळी आमच्यात पुढील संभाषण झाले.
मी : पू. दादा, या कोण आहेत, हे ओळखलं का ?
पू. दादा : श्री, श्री (पू. सौरभदादा प.पू. डॉक्टरांना श्री म्हणतात.)

छोट्या-छोट्या गोष्टींत साधकांचा विचार करून त्यांच्यावर प्रीतीचा वर्षाव करणार्‍या पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ !

पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ
    मी १३.१.२०१५ या दिवशी फोंडा, गोवा येथील श्री शांतादुर्गा मंदिरात गेले होते. मला शहाळ्याचे पाणी पुष्कळ आवडत असल्याने मी स्वतःसाठी एक आणि अन्य एका साधकासाठी एक अशी दोन शहाळी विकत घेतली. सनातनच्या रामनाथी येथील आश्रमाकडे चालत जात असतांना पू. (सौ.) बिंदाताईंनी त्यांची गाडी माझ्याजवळ थांबवली आणि मला गाडीत बसायला सांगितले. शहाळ्याचे पाणी इतर साधकांनाही आवडते का ?, याची त्यांनी विचारपूस केली. आश्रमात आल्यानंतर आम्ही आपापल्या ठिकाणी निघून गेलो.
    जेवणाच्या वेळी मी आश्रमातील भोजनकक्षात गेले. तेव्हा साधकांसाठी ठेवण्यात येणार्‍या जेवणाच्या पटलावर एका मोठ्या भांड्यात शहाळ्याचे पाणी आणि आतील कोवळे खोबरे ठेवल्याचे मला दिसले.

शीघ्र आध्यात्मिक उन्नती होण्याच्या दृष्टीने कृतज्ञताभाव वाढवण्याचे महत्त्व स्पष्ट करणारी केरळ येथील एका साधकाची अनुभूती

१. दैनिकातील चौकटीनुसार एका साधकाने कृतज्ञताभाव वाढवण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर त्याच्या त्रासात वाढ होणे आणि पू. राधा प्रभु यांच्या सांगण्यानुसार आध्यात्मिक उपाय केल्यावर साधकाचा त्रास न्यून होणे : साधकांनी कृतज्ञताभाव वाढवायला प्रयत्न करावेत, जेणेकरून त्यांची प्रगती लवकर होईल, या आशयाची एक चौकट दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यानुसार केरळ येथील तीव्र त्रास असणार्‍या एका साधकाने कृतज्ञताभाव वाढवण्यासाठी प्रयत्न केले. तेव्हा तीव्र त्रास झाला. त्यामुळे त्याला दिवसभर झोपून रहावे लागले.

दैनिक सनातन प्रभातमधील प.पू. दास महाराज यांचे छायाचित्र पाहिल्यावर आलेल्या अनुभूती

प्रा. श्रीकांत भट
१. प.पू. दास महाराजांच्या छायाचित्रातील पांढरी प्रभा गडद झालेली दिसणे
    मी ७.९.२०१५ या दिवशी दैनिक सनातन प्रभात वाचत होतो. त्या वेळी माझे लक्ष हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी प.पू. दास महाराज जप करत असलेल्या छायाचित्राकडे गेले. त्यांच्या भावमुद्रेकडे लक्ष वेधले जाऊन छायाचित्रातील पांढरी प्रभा गडद झालेली दिसली.
२. प.पू. दास महाराजांच्या जागी हनुमंत दिसून हिंदु राष्ट्राच्या निर्मितीचा
संकल्प लवकर पूर्ण करा, असे तो रामरायांना सांगत असल्याचे जाणवणे
    मला प.पू. दास महाराजांच्या जागी हनुमंत प्रगट झाल्याचे जाणवले. हनुमंताला ही जपमाळ (१ सहस्र ८० मण्यांची) मिळाल्याचा अत्यानंद झाल्याचे जाणवले. प्रभु, तुम्ही हिंदु राष्ट्राच्या निर्मितीचा संकल्प लवकर पूर्ण करा, असेही तो मनातून सांगत असल्याचे मला जाणवले. हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी आणि सेवेसाठी हनुमंत अगतिक झाला असून तो रामरायांना अंतर्मनापासून दास्यभक्तीच्या जोरावर पुष्कळ आळवत असल्याचे स्पष्ट जाणवत होते. ही जपमाळ उत्कट भावात घेऊन जाणारी आहे; म्हणून मला माझ्या प्रभु रामरायांच्या सहवासाचा (सत्संगाचा) आनंद पुन्हा मिळत आहे, असे हनुमंताचे मनोगत या वेळी मला ऐकू येत असल्याचे जाणवत होते.
    ही माळच रामराज्याच्या निर्मितीसाठी साधकांची साखळी (वानरसेना) सिद्ध करण्याचा संकल्प करत आहे, तसेच प.पू. दास महाराज यांच्या माध्यमातून भक्तीरूपी साधक (वानर) संघटित होत आहेत, असे मला जाणवत होते.
- प्रा. श्रीकांत भट, अकोला (७.९.२०१५)

शाम मानव यांनी साधना करून अध्यात्म समजून घ्यावे आणि मगच त्याविषयी बोलावे !

श्री. प्रशांत हरिहर
     आमच्या परम पावन, पूजनीय परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी शाम मानवांचे बेताल आणि बालीश वक्तव्य ऐकून माझ्या मनात पुढील विचार आले. 
१. अध्यात्माचा काही अभ्यास नसतांना शाम मानवांना 
त्याविषयी बोलायचा अधिकार काय ?
     एखाद्या मुलाचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला आधुनिक वैद्य असे संबोधले जाते. वकिलीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर वकील (अधिवक्ता), असे म्हटले जाते. मग साधना करून कुणी गुरु, सद्गुरु, परात्पर गुरु पदावर आरूढ झाले, तर त्यांना तसे संबोधले पाहिजे. हेही शाम मानव यांना ठाऊक नाही. त्यांना संमोहन उपचार तज्ञ म्हणतात. तसे यांच्याकडे कुठलेही प्रमाणपत्र नाही. ज्या व्यक्तीला आध्यात्मिक क्षेत्रातील काही ज्ञान नाही, तिला त्याविषयी बोलायचा अधिकार आहे का ? मुळीच नाही. हेच समजू न शकणारे मानव म्हणे, परात्पर गुरु डॉ. आठवले यांचाशी चर्चा करणार !

आपल्यात क्षमता निर्माण करणार्‍या आणि अशक्यही साध्य करणार्‍या देवाने सेवा करवून घेतल्याची साधकाला आलेली अनुभूती

श्री. अशोक सारंगधर
१. शेकडोंच्या संख्येने आलेल्या भाविकांनी राजयोगी
स्नानाला जाण्यासाठी गर्दी करणे आणि परिस्थिती
पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलीस यंत्रणा हतबल होणे
    सिंहस्थ कुंभपर्वाच्या प्रथम राजयोगी (शाही) स्नानाच्या दिवशी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्‍वर येथे मला धर्मरथावर सेवा मिळाली. ज्या ठिकाणी धर्मरथ उभा केला होता, त्याच्याजवळूनच शाहीमार्ग जात होता. संत-महंतांच्या पवित्र स्नानासाठी भाविकांना अडवण्यात येत होते. त्या ठिकाणी ८ ते १० पोलीस आणि एक महिला पोलीस उपनिरीक्षक येणार्‍या भाविकांना शांत रहाण्यास आणि पुढे न जाण्याविषयी सांगत होती; परंतु शेकडोंच्या संख्येने असलेले भाविक ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. परिस्थिती सर्वांच्या नियंत्रणाबाहेर जात होती. पोलीस यंत्रणाही हतबल झाली होती.

अनेक गुणांनी नटलेल्या आणि भोळ्या भावाने भगवंतालाच प्रसन्न करून घेऊन रामनाथी आश्रमाचा अन्नपूर्णा विभाग समर्थपणे सांभाळणार्‍या ६८ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या कु. रेखा काणकोणकर !

कु. रेखा काणकोणकर
    कु. रेखा काणकोणकर रामनाथी आश्रमातील स्वयंपाक विभागात १५ - १६ वर्षांपासून सेवा करत आहे. ती प्रत्येक सेवा त्याच उत्साहाने आणि न कंटाळता करते. ती मनापासून आणि भावपूर्ण सेवा करत असल्याने या सेवेतील आनंद अखंडपणे अनुभवू शकते. स्वयंपाक विभागाची विभागसेविका म्हणून दायित्व पहाणार्‍या आणि विभागातील साधकांच्या व्यष्टी-समष्टी साधनेचा आधारस्तंभ बनलेल्या रेखाताईविषयी सहसाधिका ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. सायली मुकुल गाडगीळ हिला जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.
    केवळ विविध आश्रमांतील स्वयंपाक विभागातील साधकांसमोरच नाही, तर रेखाने सर्वच साधकांसमोर व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या संदर्भात आदर्श ठेवला आहे. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले
१. नीटनेटकेपणा
    ताईमध्ये नीटनेटकेपणा पुष्कळ आहे. तिची खोली आणि खोलीतील खण नेहमीच नीटनेटका अन् टापटीप असतो; म्हणून तेथून चांगली स्पंदने येतात, असे वाटते. खोलीतील इतर साधिकांकडूनही ती सर्व साहित्य नीटनेटकेपणाने लावून घेते; म्हणून ताईची खोली सात्त्विक वाटते.

देव आवश्यक तो नामजप करवून घेतो, याची साधकाला आलेली अनुभूती

    २५.९.२०१५ या दिवशी मी श्रीरामाला प्रार्थना केल्यावर येणार्‍या अनुभूतींविषयी प.पू. डॉक्टरांना सांगून श्रीरामाची उपासना केली, तर चालेल का ?, असे विचारले. त्यावर त्यांनी तत्त्व एकच असल्याने सारखाच लाभ होईल, असे सांगितले. तेव्हापासून मी श्रीरामाच्या उपासनेवर भर देऊ लागलो. २८.९.२०१५ या दिवशी सकाळी झोपेतून उठल्यावर श्रीकृष्णाचा नामजप आपोआप होत असल्याचे माझ्या लक्षात आले. तो जप थांबत नव्हता. याविषयी मी
प.पू. डॉक्टरांना सांगितल्यावर त्यांनी देव आवश्यक तो नामजप कसा करवून घेतो ?, हे यावरून लक्षात येते, असे सांगितले. - श्री. धैवत वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.१०.२०१५)

साधकांनो, कोणत्याही लिखाणाला प्रारंभ करतांना ॥ नारायणस्मृति ॥ असे लिहा !

    साधक कोणत्याही लिखाणाला प्रारंभ करतांना, उदा. स्वभावदोष-निर्मूलन सारणी लिहितांना किंवा पत्र लिहितांना श्री किंवा श्रीकृष्ण असे लिहितात. महर्षींनी सांगितल्याप्रमाणे येथून पुढे साधकांनी कोणत्याही लिखाणाला प्रारंभ करतांना ॥ नारायणस्मृति ॥ असे लिहावे. (लिहितांना अवतरणचिन्हे लिहू नयेत.) यातून साधकांना भगवान विष्णूची कृपा संपादन करायची आहे. - (पू.) सौ. अंजली गाडगीळ (९.१०.२०१५)

उपाय सांगणारे ६० टक्क्यांहून अधिक पातळीचे साधक आणि संत यांच्यासाठी माहिती

    तीव्र त्रास असलेल्या साधकांना सांगितलेले उपाय करून त्यांचे त्रास अल्प न झाल्यास ते काही वेळाने पुन्हा उपाय विचारतात. यामध्ये साधक आणि उपाय करणारा या दोघांचाही वेळ जातो. तो वेळ वाचावा म्हणून पहिल्या वेळी उपाय सांगतांना उपाय बदलावा लागेल का याचाही विचार करून उपाय बदलावा लागणार असल्यास किती वेळाने सांगितलेला उपाय बदलावा लागेल आणि नवीन उपाय कोणता असेल, हेही सांगावे.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१३.१०.२०१५)

प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन !

प.पू. परशराम पांडे
मनुुष्याला उदारहस्ते सर्वकाही देणारा भगवंत
आणि सर्व वस्तूंचा सर्वनाश करणारा कृतघ्न मनुष्य !
    भगवंताने आपल्याला निसर्गतः शुद्ध पाणी दिले. तोच पाण्याचे बाष्पीभवन करतो. या पाण्याचे ढग होतात. याच ढगातून आपल्याला पुन्हा पाणी मिळते. हे ढगातून येणारे पाणी शुद्ध पाणी असते ! भगवंताने आपल्यासाठी आणखी काय करायचे ? या शुद्ध पाण्याचे माणसाने गटार करून टाकले. भगवंताने जे जे जगण्यासाठी दिले, त्याचा मनुष्याने सर्वनाश करून टाकला. त्यामुळे आता ग्लोबल वॉर्मिंगसारखी संकटे उद्भवली आहेत. ही भगवंताची चूक आहे का ? त्याने विज्ञान दिले ही त्याने चूक केली का ? - प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (५.४.२०१५)

वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

'सनातन पंचांग २०१६' ची मागणी लवकरात लवकर कळवून आपली प्रत आजच राखून ठेवावी ! 
     'सनातन पंचांग केवळ पंचांग नव्हे, तर हिंदुत्वाचे सर्वांगच आहे. राष्ट्र-धर्म कार्यासाठी कृतीशील करणारे आणि धर्मशिक्षण देणारे प्रभावी माध्यम असणारे हे पंचांग जिज्ञासूंना साधनेसाठी अमूल्य मार्गदर्शनही करते. सनातन पंचांगाला सर्वच स्तरांवरून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत आहे. पंचांगाच्या संदर्भात समाजाकडून लाभणारा वाढता प्रतिसाद आणि अपुरी साधकसंख्या यांमुळे वर्ष २०१५ चे पंचांग काही जिज्ञासूंना वेळेत मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांनी 'वर्ष २०१५ चे सनातन पंचांग देण्यासाठी आमच्याकडे कोणीच आले नाही. आम्ही साधकांची वाट पहात होतो. या वर्षी आम्हाला आठवणीने पंचांग आणून द्या', असे स्वतःहून साधकांना कळवले आहे. 

बोधचित्र


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
'मातृदेवो भव । पितृदेवो भव ।' (तैत्तिरीयोपनिषद्, शीक्षा, अनुवाक ११, वाक्य २) म्हणजे 'आई आणि वडील यांना देव मानावे', असे मुलांवर बालपणी संस्कार न करणार्या आई-वडिलांसंदर्भात मोठ्या झालेल्या मुलांची वृत्ती 'गरज सरो वैद्य मरो ।' अशी होते. त्यामुळे ती आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात, यात आश्चर्य ते काय ?' - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१९.१२.२०१४)
'पाश्चात्त्य संस्कृती स्वेच्छेला प्रोत्साहन देणार्या व्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्कार करते आणि दुःखाला निमंत्रण देते, तर हिंदु संस्कृती 'स्वेच्छा नष्ट करून सत्-चित्-आनंदावस्था कशी प्राप्त करायची', हे शिकवते.' - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (७.७.२०१५) 

॥ हरि ॐ तत्सत् ॥

 संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
मी कोणाचा नाही. माझा कुणी नाही. 
ज्याचा त्याचा तोच मी; म्हणून मी सर्वांचा आहे. 
भावार्थ : मी सर्वस्व गुरुचरणांवर वाहिल्यानंतर मी दुसर्‍या कुणाचा होऊच शकत नाही. गुरूंना अर्पण झाल्यानंतर माझा कुणी असायला मी शिल्लक राहिलोच कुठे ? परंतु सर्वांचा खरा 'मी' एकच आणि सर्वव्यापी असल्यामुळे आता मी सर्वांचा आहे. 

(संदर्भ : सनातनचे प्रकाशन 'संत भक्तराज महाराज यांची शिकवण.')
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

व्यक्तीच्या सद्गुणाकडे लक्ष द्या 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      प्रत्येक व्यक्तीमध्ये कुठला ना कुठला सद्गुण असतोच. त्याच्याकडेच लक्ष द्यावे. दोष दृष्टीआड करावेत, म्हणजे जग सुंदर दिसते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

राष्ट्र आणि विश्‍व यांच्या उत्कर्षाकरिता समर्पित व्हा !

गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
     साड्या, सोफासेट, टी.व्ही., गाडी यातच गुदमरून एक दिवस जीवनयात्रा संपवायची नाही. समाज आणि धर्म यांचे काही कर्तव्य आणि ऋण आहे. प्रत्येकानेच ते बजावले पाहिजे. उपेक्षिले तर सर्वनाश अटळ आहे. धर्माकरिता समर्पित झाले पाहिजे. सर्वस्व वाहिले पाहिजे. त्यातच त्याचा, तसेच राष्ट्र आणि विश्‍व यांचाही उत्कर्ष आहे. कल्याण आहे आणि मुक्तीही ! धर्माकरिता बाजी लावण्याचा आजचा प्रसंग आहे. धर्माकरिता जीवन वेचण्याचा हा काळ आहे. - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

समान नागरी कायदा आणि राजकारण

संपादकीय
      आपल्या देशात काही प्रश्‍न वर्षांनुवर्षे कुजत ठेवले गेले आहेत. त्यावर तात्काळ तोडगा काढून समस्या सोडवणे, ही खरे तर मुळीच अशक्य बाब नाही. तरीही त्या सूत्राचे भांडवल करून पुन:पुन्हा निवडणुका लढवता आणि जिंकता याव्यात, याकरता अनेक समस्यांचे घोंगडे जाणीवपूर्वक भिजत ठेवले गेले आहे. त्यातीलच एक प्रश्‍न म्हणजे समान नागरी कायदा ! धार्मिक परंपरांचे नियमन करणार्‍या वैयक्तिक कायद्यांमुळे नुसता गोंधळ होत असल्याकडे लक्ष वेधून, देशात समान नागरी कायदा आणण्याची शासनाची इच्छा आहे काय, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच केली. कायद्याच्या प्रकरणांमध्ये सर्व धर्मांचे नियमन एकाच मापदंडाने व्हावे, यासाठी समान नागरी कायदा लागू करण्याविषयी शासनाचे काय मत आहे ? तुम्ही समान नागरी कायदा तयार करून तो अमलात का आणत नाही, असा प्रश्‍न न्या. विक्रमजित सेन आणि न्या. शिव कीर्ती सिंह यांच्या खंडपिठाने विचारला आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn