Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

नवरात्रोत्सव (आज दुसरा दिवस)

सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तुते ॥
एका मतानुसार नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण कमी करण्यासाठी तमोगुणी महाकालीची, पुढील तीन दिवस रजोगुण वाढवण्यासाठी रजोगुणी महालक्ष्मीची आणि शेवटचे तीन दिवस साधना तीव्र होण्यासाठी सत्त्वगुणी महासरस्वतीची पूजा करतात. 
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ शक्ती) 
नवरात्र विषयक माहितीसाठी संकेतस्थळावरील मार्गिका

समाजकंटकांकडून सनातनच्या साधकांच्या वाहनांवर आक्रमणे करून दहशत माजवण्याचा प्रयत्न !

रामनाथी (गोवा) - येथील काही समाजकंटकांनी सनातनच्या साधकांना रात्री निवासस्थानी पोहोचवणार्या वाहनांवर आक्रमणे करून दहशत माजवण्याचा प्रयत्न चालू केला आहे. १२ ऑक्टोबर या दिवशी साधकांना निवासस्थानी पोहोचवणारे चारचाकी वाहन रात्री ९.४५ वाजता साधकांना पोहोचवून रामनाथी बसथांब्याजवळ पोहोचले असता त्यावर दगड आणि एक बाटली मारण्यात आली, तसेच अन्य एका प्रसंगात रात्री १०.३० वाजताही सनातनच्या वाहनावर पेट्रोल बॉम्ब फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुदैवाने पेट्रोल बॉम्ब वाहनाच्या समोर पडला. वाहनचालकाने प्रसंगावधान राखून वाहन तात्काळ थांबवल्याने अनर्थ टळला. पेट्रोल बॉम्ब फेकणारे समाजकंटक काळोखाचा लाभ उठवत पळून गेले. वाहनातील साधकांनी पेट्रोल बॉम्ब फेकलेल्या बाजूने पाहिले असता दोघे जण पळून जातांना दिसले.
सनातन संस्थेच्या वतीने पोलिसात तक्रार ! 
या दोन्ही घटनांच्या संदर्भात फोंडा पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. पेट्रोल बॉम्बसाठी वापरण्यात आलेली बाटली जप्त केली. तसेच पोलीस निरीक्षक सुदेश नाईक यांनी रात्री स्वतः जातीने घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीची पाहणी केली. समाजकंटकांच्या या दहशतीमुळे रात्री पोलीस वाहनासोबत आश्रमातील वाहने पाठवून साधकांना निवासस्थानी 
सोडण्यात आले. 
सनातन संस्थेकडून सौरभ लोटलीकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी
११ ऑक्टोबर २०१५ ला रामनाथी येथे झालेल्या सभेत रामनाथ युवा संघाचे सौरभ लोटलीकर यांनी सावईवेरे येथील नायलॉन ६,६ प्रमाणे हिंसक आंदोलन करू, अशी धमकी दिली होती. याच पार्श्वभूमीवर वरील दहशत निर्माण करणारी कृत्ये करण्यात आल्याची शक्यता आहे. पोलिसांनी याची दखल घेऊन साधकांच्या जिवावर उठलेले सौरभ लोटलीकर आणि अन्य समाजकंटक यांच्यावर प्रथमदर्शनी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करणारा तक्रार अर्ज सनातन संस्थेच्या वतीने फोंडा पोलीस ठाण्यात देण्यात आला आहे.

शिवसेना पाकिस्तानविषयीच्या भूमिकेत पालट करणार नाही ! - उद्धव ठाकरे

राष्ट्रभक्तीशी प्रामाणिकपणा दाखवणार्या आणि घरभेद्यांशी 
वेळप्रसंगी दोन हात करण्याची सिद्धता करणार्या शिवसेनेचे अभिनंदन !
  मुंबई, १३ ऑक्टोबर - मूठभर विचारवंतांना संतुष्ट करण्यासाठी तुम्ही आमच्या देशात पाकड्यांसाठी पायघड्या घालणार असाल, तर या पायघड्यांत देशाभिमानाचा श्वास गुदमरल्याविना रहाणार नाही. खुर्शीद कसुरी म्हणजे कोणी शांतीदूत किंवा महात्मा आहेत आणि त्यांना विरोध करून शिवसेनेने भयंकर अपराध केला आहे, अशी आपटाआपटी चालू आहे. आपटून कितीही चपटी झाली, तरी शिवसेना पाकिस्तानविषयीच्या भूमिकेत पालट करणार नाही. आमचा प्रामाणिकपणा (इमान) राष्ट्रभक्तीशी आहे. सत्ता आणि राजकारण यांपलीकडचे हे विषय आहेत, असे राष्ट्रभक्ती दर्शवणारे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी १३ ऑक्टोबरच्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून केले.

(म्हणे) 'मी पाकिस्तानचा 'दलाल' नसून मी शांततेचा 'दलाल' आहे !'

पाकिस्तानचे गुणगान करणारे सुधींद्र कुलकर्णी यांचे वक्तव्य
  मुंबई, १३ ऑक्टोबर - दोन्ही देशांमधील जनतेमध्ये संवाद घडला, तरच संबंध सुधारतील आणि यासाठीच आमचे प्रयत्न चालू आहेत. पंतप्रधान सत्तेवर आल्याच्या पहिल्या दिवसापासूनच दक्षिण आशियातील देशांशी चांगले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी पाकिस्तानचा 'दलाल' नसून मी शांततेचा 'दलाल' आहे, असे विधान 'ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन'चे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी यांनी केले. 'लोकशाहीत प्रत्येकाला त्याचे मत आणि विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. मी शिवसेना आणि दैनिक 'सामना'च्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा आदर करतो; पण त्यांनीही दुसर्याांंच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा आदर केला पाहिजे', असेही ते म्हणाले.
सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर झालेल्या शाईफेक आक्रमणाचा निषेध करण्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार ऋषी कपूर, महेश भट्ट आणि सोना महापात्रा यांनीही निषेध नोंदवला आहे. (पाकप्रेमाचा एवढा पुळका आलेल्यांनी पाकिस्तानात चालते व्हावे ! - संपादक)

केंद्रशासन स्वत:हून सनातनवर बंदी घालणार नाही ! केंद्रीय गृहमंत्रालय

नवी देहली - केंद्रशासन स्वत:हून सनातनवर बंदी घालणार नाही; कारण असे करणे केंद्राच्या अखत्यारित येत नाही. गोवा किंवा महाराष्ट्र या राज्यशासनांनी सनातन संस्थेला आतंकवादी संघटना म्हणून घोषित करावे, असा प्रस्ताव केंद्राकडे पाठवल्यास केंद्रशासन यावर विचार करू शकते, अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयातील सूत्रांनी दिल्याचे वृत्त 'दी हिंदू' या वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे.
या वृत्तात पुढे म्हटले आहे की, २००९ या वर्षी केंद्रीय गृहमंत्रालयाने महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांना सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि अभिनव भारत या संघटनांना 'अनधिकृत कारवाया (प्रतिबंध) सुधारित कायद्या'च्या (युएपीए) अंतर्गत आतंकवादी संघटना घोषित करण्याविषयी सूचना मागवल्या होत्या आणि या सूचनेला अनुसरून तीनही राज्यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे उत्तर पाठवले होते; मात्र उपरोल्लेखित एकाही शासनाने सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला नाही.

कर्णावती येथील 'भारत-पाक रॉक बॅण्ड'चा कार्यक्रम शिवसेनेच्या विरोधानंतर रहित

शत्रूूराष्ट्र पाकच्या कलाकारांचे कार्यक्रम रहित करणार्याव शिवसेनेचे अभिनंदन ! शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीतून घडलेले शिवसैनिकच राष्ट्रविरोधी कार्यक्रमांना विरोध करतात !
कर्णावती (अहमदाबाद) - काही दिवसांपूर्वी मुंबई आणि पुणे येथे होणारे पाकिस्तानी गायक गुलाम अली यांचे कार्यक्रम शिवसेनेच्या प्रखर विरोधामुळे रहित करावे लागले होते. त्याचप्रमाणे ११ ऑक्टोबरच्या रात्री गुजरातमधील कर्णावती येथे नियोजित 'भारत-पाक सूफी रॉक बॅण्ड'चा कार्यक्रमही रहित करण्यात शिवसेना यशस्वी ठरली. हा कार्यक्रम चालू होण्यापूर्वी शिवसेनेचे नेते श्री. अशोक शर्मा यांच्या नेतृत्वाखाली ११ शिवसैनिक कार्यक्रमस्थळी एकत्र आले आणि त्यांनी पाकिस्तानी कलाकारांच्या विरोधात घोषणाबाजी चालू केली. त्यामुळे आयोजकांनी कार्यक्रम रहित केला. या प्रकरणी पोलिसांनी शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यावरून अटक केली; मात्र नंतर जामिनावर सोडले. पोलिसांकडून पकडण्यात येण्यापूर्वी शिवसेना नेते श्री. शर्मा म्हणाले, "पाकिस्तान आमच्या सैनिकांना ठार मारत असतांना आणि आतंकवादाला प्रोत्साहन देत असतांना त्यांच्या कलाकारांनी आमच्या भूमीवर गाणे म्हणणे आम्हाला मान्य नाही."

अकादमी पारितोषिक विजेत्या गुजराथी लेखिकेचा राजीनामा देणार्‍या साहित्यिकांना प्रश्‍न !

साहित्य अकादमीला शासनाशी समान का लेखता ?
      कर्णावती (अहमदाबाद) - ख्रिस्ताब्द २०१३मध्ये मिलजुल मान या कादंबरीसाठी साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळालेल्या गुजराथी लेखिका श्रीमती मृदुला गर्ग यांनी अकादमीच्या पारितोषिक विजेत्यांनी त्यांची पारितोषिके परत करणार्‍या तसेच अकादमीच्या पदांची त्यागपत्रे देणार्‍या साहित्यिकांना तुम्ही साहित्य अकादमीला शासनाशी समान का लेखता ? असा प्रश्‍न विचारला आहे. साहित्य अकादमी एक स्वायत्त संस्था आहे. शासनाला त्यात हस्तक्षेप करता येत नाही, असेही त्या म्हणाल्या.

सौदी अरेबियात डुक्कराचे मांस खायला मागा आणि जिवंत परत येऊन दाखवा !

त्यागपत्रे देणार्‍या तथाकथित पुरोगामी साहित्यिकांना विश्‍व हिंदु परिषदेचे आव्हान
     लक्ष्मणपुरी (लखनौ) - जे पुरोगामी साहित्यिक साहित्य अकादमी पुरस्कार परत करत आहेत, त्यांनी सौदी अरेबियात जाऊन डुक्कराचे मांस खायला मागावे आणि तेथून जिवंत परत येऊन दाखवावे; त्यांचा विश्‍व हिंदु परिषद सार्वजनिक सत्कार करील, या शब्दांत विश्‍व हिंदु परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. सुरेंद्र जैन यांनी तथाकथित पुरोगामी लेखकांना आव्हान दिले आहे. परिषदेच्या वतीने येथे आयोजित दोन दिवसीय संमेलनात ते उपस्थितांना संबोधित करत होते. 

पाकिस्तानने बसवले आतंकवाद्यांच्या सोयीसाठी खाजगी संगणक सर्व्हर !

आतंकवाद्यांना सोयीसुविधा पुरवणार्‍या पाकला दम भरून नव्हे, तर शस्त्रांचा 
वापर करूनच वठणीवर आणणे शक्य आहे, हे भारतीय राज्यकर्त्यांनी जाणावे !
     श्रीनगर - जम्मूमधील उधमपूर येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणांची चौकशी करतांना भारतीय गुप्तहेर संस्थांना पाकिस्तानने आतंकवाद्यांच्या सोयीसाठी खाजगी संगणक सर्व्हर बसवले असल्याची माहिती मिळाली आहे. सर्व्हर केवळ काही व्यक्तींनाच संपर्कासाठी उपलब्ध होतात. एकदा त्यांचा वापर संपल्यावर ते काढून टाकण्यात येतात. त्यामुळे आतंकवाद्यांचा मागमूस लागणे अत्यंत कठीण जाते.
    पाकिस्तानने असे सर्व्हर त्यांच्या देशात बसवून ते लष्कर-ए-तोयबा आणि इतर आतंकवाद्यांना उपलब्ध करून दिले आहेत. या सर्व्हरवरून पाकिस्तानातील सूत्रधार या आतंकवाद्यांना मार्गदर्शन करतात आणि त्यांच्याशी संपर्क ठेवतात. उधमपूर येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणात महंमद नावेद नावाचा आतंकवादी पकडला गेला होता. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या सर्व्हरचा शोध लागला. अशा सर्व्हरचा उपयोग केवळ १० जणच करू शकतील, अशी त्यांची रचना असते. पाकिस्तानमध्ये बसवलेले हे सर्व्हर आतंकवादी आक्रमणानंतर त्वरित काढण्यात येतात. त्यामुळे आक्रमकांच्या सूत्रधाराचा पत्ता लागत नाही. अशा अडचणीवर मात करण्याचे उपाय भारतीय सुरक्षा संस्था शोधत आहेत.

लढाऊ जेट विमान तेजस युद्धासाठी लवकरच होणार सज्ज

  • भारतीय वायूदलाचा १०० तेजस जेट विमानांमध्ये सुधारणा करण्याचा आदेश
  • पाकच्या जेजेेएफ्एफ्-१७ थंडर विमानाला क्षणात नष्ट करण्याची क्षमता
     नवी देहली - भारतीय बनावटीचे पहिले लढाऊ जेट विमान तेजस युद्धासाठी सज्ज करण्यात येत आहे. या लढाऊ विमानाची मारक क्षमता आणि सुखरूप परत येण्याचे तंत्रज्ञान अधिक चांगले आहे, तसेच या विमानात पाकच्या जेजेेएफ्एफ् - १७ थंडर विमानाला क्षणात नष्ट करण्याची क्षमता आहे. तेजसमध्ये काही सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत. त्यासाठी काही दिवसांपूर्वीच भारतीय वायूदलाने १०० तेजस जेट विमानांमध्ये पालट करण्याचा आदेश दिला होता. त्यातील २० तेजस विमाने दाखल करून घेण्यात आली आहेत.

३७० कलम रहित केले जाऊ शकत नाही ! - उच्च न्यायालय

काश्मीरचा विशेष दर्जा कायम रहाणार ?
    श्रीनगर - काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील अनुच्छेद ३७० आणि काश्मीरच्या प्रचलित कायद्यांना अबाधित ठेवणारे अनुच्छेद ३५ अ ही कलमे कायमस्वरूपी आहेत, असा निकाल जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने दिला आहे. या तरतुदी काढणे, रहित करणे किंवा त्यात पालट करणे शक्य नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. ३७० कलम रहित करण्याच्या मागणीच्या पार्श्‍वभूमीवर हा निकाल महत्त्वपूर्ण मानला जात आहे. न्या. हसनैन मसुदी आणि न्या. राज कोटवाल यांच्या द्विसदस्यीय खंडपिठाने हा निर्णय दिला. कलम ३७० (३)च्या तरतुदीसंदर्भात संविधान सभा राष्ट्रपतींना कलम ३७० रहित करण्याची किंवा त्यात सुधारणा करण्याची शिफारस करू शकते; मात्र २५ जानेवारी १९५७ या दिवशी विसर्जित होण्यापूर्वी संविधान सभेने अशी कुठलीही शिफारस केलेली नाही. त्यामुळे कलम ३७० चा तात्पुरती तरतूद असा उल्लेख असला, तरी आता ती राज्यघटनेतील कायमस्वरूपी तरतूद झाली आहे. कलम ३५ अ हे कलम राज्यातील विद्यमान कायदे, तसेच वर्ष १९५४ नंतर राज्य विधीमंडळाने लागू केलेल्या सर्व कायद्यांना संरक्षण देते, असेही न्यायालयाने यावेळी एका याचिकेवर निकाल देतांना स्पष्ट केले. 
     जम्मू काश्मीरच्या जनतेने पाकिस्तानात जाण्याऐवजी भारतासह राहण्याचा निर्णय घेतला आणि विशेष परिस्थितीत जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणार्‍या ३७० कलमाची निर्मिती झाली. या कलमामुळे जम्मू काश्मीर राज्याला अन्य राज्यांच्या तुलनेत विशेष स्थान आणि दर्जा प्राप्त झाला आहे.

सनातनविरोधातील सभा फसली ! - श्री. सुदिन ढवळीकर

श्री. सुदिन ढवळीकर
      पणजी - सनातनच्या विरोधातील बोलवलेली सभा एकदम अपयशी ठरली आहे. या सभेला कोणीच आले नाहीत, असे गोव्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि रामनाथी येथील सनातन आश्रम असलेल्या मडकई मतदारसंघाचे आमदार श्री. सुदिन ढवळीकर यांनी सांगितलेे. सनातनच्या विरोधकांनी ११ ऑक्टोबर या दिवशी श्री रामनाथ देवाच्या मंदिराच्या समोर असलेल्या मैदानात सनातनच्या विरोधात अट्टहासाने सभा घेतली. या सभेच्या पार्श्‍वभूमीवर ते बोलत होते.

विद्रोही कवयित्री प्रज्ञा पवार यांच्याकडून पुरस्कार परत

मुंबई - 'बलुतं'कार दया पवार यांच्या कन्या आणि विद्रोही कवयित्री-लेखिका प्रज्ञा दया पवार यांनी त्यांना मिळालेले पुरस्कार शासनाला परत केले आहेत. वाढती असहिष्णुता, जातीय तणाव आणि हिंसक घटना यांच्या पार्श्वेभूमीवर देशातील अघोषित आणीबाणीच्या निषेधार्थ हे पुरस्कार परत करत असल्याचे त्यांनी सांगितले. या पुरस्काराचा १ लाख १३ सहस्र रुपयांच्या रकमेचा धनादेशही त्यांनी मुख्यमंत्र्यांना परत पाठवला आहे. प्रज्ञा पवार यांनी त्या पत्रात म्हटले आहे की, १९७५ मधील आणीबाणीपेक्षा आजची अघोषित आणीबाणी अधिक भीषण आहे. सामान्य माणसेही जीव मुठीत घेऊन जगत आहेत. पुरोगामी विचारवंतांच्या हत्या, दादरी, मुसलमान युवकांना गरबा-बंदी, दलितांच्या हत्या, लव्ह जिहाद, घरवापसीच्या मोहिमा, हे विषय उद्विग्न करणारे आहेत. राज्यघटनेच्या मूल्यांवरच घाव घालण्याचा चौफेर प्रयत्न चालू असतांना मी निषेधाचा आवाज घुमवू इच्छिते. 

विद्रोही कवयित्री प्रज्ञा पवार यांच्याकडून पुरस्कार परत

मुंबई - 'बलुतं'कार दया पवार यांच्या कन्या आणि विद्रोही कवयित्री-लेखिका प्रज्ञा दया पवार यांनी त्यांना मिळालेले पुरस्कार शासनाला परत केले आहेत. वाढती असहिष्णुता, जातीय तणाव आणि हिंसक घटना यांच्या पार्श्वेभूमीवर देशातील अघोषित आणीबाणीच्या निषेधार्थ हे पुरस्कार परत करत असल्याचे त्यांनी सांगितले. या पुरस्काराचा १ लाख १३ सहस्र रुपयांच्या रकमेचा धनादेशही त्यांनी मुख्यमंत्र्यांना परत पाठवला आहे. प्रज्ञा पवार यांनी त्या पत्रात म्हटले आहे की, १९७५ मधील आणीबाणीपेक्षा आजची अघोषित आणीबाणी अधिक भीषण आहे. सामान्य माणसेही जीव मुठीत घेऊन जगत आहेत. पुरोगामी विचारवंतांच्या हत्या, दादरी, मुसलमान युवकांना गरबा-बंदी, दलितांच्या हत्या, लव्ह जिहाद, घरवापसीच्या मोहिमा, हे विषय उद्विग्न करणारे आहेत. राज्यघटनेच्या मूल्यांवरच घाव घालण्याचा चौफेर प्रयत्न चालू असतांना मी निषेधाचा आवाज घुमवू इच्छिते. 

ठोस पुरावे मिळाल्याशिवाय सनातनवर बंदी घालता येणार नाही ! - संरक्षणमंत्री

     पणजी, १३ ऑक्टोबर (वार्ता.) - कोणी मागणी केली; म्हणून केवळ समाधानासाठी एखाद्या संघटनेवर बंदी घालता येत नाही. ही बंदी कायद्याच्या कसोटीवर सर्व स्तरांवरील न्यायालयांत टिकली पाहिजे. एका सदस्याने गुन्हा केला, तर एखादी संघटना गुन्हेगार ठरत नाही. कुठल्याही संघटनेवर बंदी घालायची असेल, तर त्यासाठी चौकशीच्या लेखी अहवालाचे ठोस पाठबळ असायला हवे, अन्यथा ही बंदी कायद्याच्या कसोटीवर टीकणार नाही, असे मत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी प्रकट मुलाखतीत सनातन संस्थेवरील बंदीविषयी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देतांना व्यक्त केले.

गोव्याचे साहित्यिक एन्. शिवदास यांनी प्रत्यक्षात पुरस्कार परत केलाच नाही !

     पणजी, १३ ऑक्टोबर (वार्ता.) - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येच्या संदर्भात निषेध करण्यासाठी साहित्य पुरस्कार १२ ऑक्टोबर या दिवशी परत करणार, अशी घोषणा केलेले तथाकथित पुरोगामी साहित्यिक एन्. शिवदास यांनी प्रत्यक्षात १२ ऑक्टोबरला पुरस्कार परत केला नाही. गोव्यातील साहित्य पुरस्कार विजेत्या अन्य कोकणी साहित्यिकांनी एकत्रितपणे पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेण्यासाठी १४ ऑक्टोबर या दिवशी बैठक बोलावली आहे. या बैठकीत पुरस्कार परत करण्याविषयी निर्णय घेण्यात येईल, असे एन्. शिवदास यांनी पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी कोकणी लेखिका सुफला गायतोंडे उपस्थित होत्या.

प्रसारमाध्यमांकडून हिंदूंच्या श्रद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न !

देहली येथील राष्ट्रीय आंदोलनाच्या वेळी मान्यवरांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया
     देहली, १३ ऑक्टोबर - कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी पुरोगाम्यांच्या दबावाला बळी पडू नये, राष्ट्रप्रेमी सनातन संस्थेला बळीचा बकरा करू नये, तसेच स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद यांच्यासह लहान बटूंवर लाठीमार करणार्‍या उत्तरप्रदेश पोलिसांवर त्वरित कारवाई करावी, या मागण्यांसाठी ११ ऑक्टोबर या दिवशी देहली येथील जंतरमंतरवर राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हिंदु जनजागृती समिती, वैदिक उपासना पीठ, पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू सेवा समिती, विश्‍व हिंदु परिषद, हिंदु सेना, हिंदु लीगल सेल, गोरक्षा दल आणि सनातन संस्था यांचे कार्यकर्ते आणि स्वामी अविमुक्तेश्‍वरानंदजी यांचे अनुयायी सहभागी झाले होते. त्या वेळी संत-महंत आणि काही हिंदुत्ववादी यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया येथे दिल्या आहेत. 

रशियाच्या सैन्याच्या साहाय्याने सिरियाच्या सैन्याकडून बंडखोरांवर बॉम्बवर्षाव चालू

     बैरूत - सिरियात सैन्य आणि बंडखोर यांच्यातील संघर्ष १२ ऑक्टोबरपासून मोठ्या प्रमाणावर पेटला आहे. रशियाच्या साहाय्याने सैन्याने बंडखोरांना लक्ष्य केले. बंडखोरांच्या अड्ड्यांवर बॉम्बवर्षाव केला जात आहे. त्यामुळे सिरियातील अनेक प्रदेशांच्या सीमांवर घनघोर युद्धासारखी परिस्थिती निर्माण आहे.
    सैन्याने केलेल्या कारवाईत हमा प्रांतातील काफ्र नाबुदा हे गाव शासनाने पुन्हा स्वत:च्या कह्यात घेतले आहे. हे गाव दमास्कस आणि अलेप्पो महामार्गावरील सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. सैन्याने गावात प्रवेश केल्यानंतर हा संघर्ष वाढला, अशी माहिती मानवी हक्क विभागाकडून देण्यात आली. रशियाने या परिसरात २० हून अधिक हवाई आक्रमणे केली. आता सैन्याने कान शेखुन या महत्त्वाच्या शहराला पुन्हा कह्यात घेण्याची योजना आखली आहे. हमा, इडलिब आणि लटाकिया प्रांतांच्या सीमेवरही रशियाच्या हवाई दलाकडून आक्रमणे चालू आहेत. इडलिब प्रांतावर बंडखोर गटाचा कब्जा आहे. ही शासनासाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून काही राज्यांवर बंडखोरांचे साम्राज्य असल्याने सामान्य नागरिकांना गावे सोडून जावे लागत आहे.

हिंदुस्थानने जगाचे पालकत्व सोडल्यानेच आज जगात धर्म, सत्य, मानवता यांची फरपट ! - पू. संभाजीराव भिडे (गुरुजी)

श्री दुर्गामाता दौडीत मार्गक्रमण करणारे धारकरी
     सांगली, १३ ऑक्टोबर (वार्ता.) - अन्य देश केवळ त्यांच्यापुरता विचार करतात. केवळ भारत हा एकमेव असा देश आहे की जो अन्य राष्ट्रांचाही विचार करतो. त्यामुळेच एकेकाळी हिंदुस्थानकडेच विश्‍वाचे पालकत्व होते. दुर्दैवाने हिंदु समाजाची आता ती स्थिती राहिली नाही. हिंदु समाज सध्या दुबळा झाला आहे, अपंग झाला आहे. हिंदुस्थानने जगाचे पालकत्व सोडल्यानेच आज जगात मानवता, माणुसकी, धर्म, न्याय, नीती, सत्य यांची फरफट चालू आहे, असे परखड मत श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक पू. संभाजीराव (भिडे) गुरुजी यांनी व्यक्त केले. ते श्री शिवप्रतिशष्ठानच्या वतीने आयोजित श्री दुर्गामाता दौडीच्या पहिल्या दिवशी धारकर्‍यांना मार्गदर्शन करतांना श्री दुर्गामाता मंदिरासमोर बोलत होते. या वेळी धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रसिद्धीच्या हव्यासापोटी असणारी पुरोगामी साहित्यिकांची दुटप्पी नीती निषेधार्ह ! - रमेश शिंदे, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

श्री. रमेश शिंदे
मुंबई, १३ ऑक्टोबर - देशात जातीय दंगलींमध्ये वाढ झाल्याचा कांगावा करत, तसेच कॉ. पानसरे, डॉ. दाभोलकर आणि कलबुर्गी यांच्या हत्यांचे कारण पुढे करून तथाकथित पुरोगामी साहित्यिक त्यांचे पुरस्कार परत करत आहेत. काश्मीरमध्ये हिंदूंचे शिरकाण झाले, तर ईशान्येकडील ज्यांत मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्याकडून हिंदूंचे शिरकाण चालू आहे, तसेच गेल्या १५ वर्षांत शेकडो हिंदुत्ववाद्यांच्या हत्या झाल्या, तेव्हा त्या निषेधार्थ पुरस्कार परत करावेत, असा विचार या साहित्यिकांच्या मनात का आला नाही ? नक्षलवाद्यांकडून अनेक वेळा निरपराध नागरिकांची हत्या होते. सीमेवर देशाचे रक्षण करणार्याा सैनिकांचीही पाकिस्तान-बांगलादेश यांच्यासारख्या राष्ट्रांकडून हत्या होते, तेव्हा या साहित्यिकांनी कधी साधा निषेधही केल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे साहित्यक्षेत्राची वैचारिक उंचीच खुंटत आहे असेच या पुरस्कार परत करण्याच्या मालिकेमुळे म्हणावे लागेल. हिंदूंच्या जिवापेक्षा पुरोगाम्यांच्या जिवाचे मूल्य अधिक आहे का ? ही तथाकथित पुरोगामी साहित्यिकांची दुटप्पी नीती आहे. ती निषेधार्ह आहे, असे मत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे. 

(म्हणे) 'भाजपचे शासन सनातनला पाठीशी घालत आहे !'

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा मिथ्या आरोप 
     पाटस (पुणे), १३ ऑक्टोबर - कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येत संशयित आरोपी म्हणून सनातन संस्थेच्या साधकाला पोलिसांनी अटक केली. सनातन संस्थेचा या हत्येत हात असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत; मात्र भाजपचे शासन सनातनला 'क्लीन चिट' देत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. खुटबाव (तालुका दौंड) येथे विविध विकासकामांचा उद्घाटन कार्यक्रम पार पडला. त्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मुंडे बोलत होते. (पोलिसांनी अजून कोठेही पुरावा मिळाल्याचा उल्लेख केलेला नसतांना असे आरोप करणे कितपत योग्य आहे - संपादक)

श्री महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ !

     कोल्हापूर, १३ ऑक्टोबर (वार्ता.) - साडेतीन शक्तीपिठांपैकी एक प्रमुख पीठ असलेल्या येथील श्री महालक्ष्मी मंदिरात १३ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रोत्सवाला पारंपरिक उत्साहात प्रारंभ झाला. सकाळी ८.३० वाजता तोफेची सलामी दिल्यानंतर मंदिरात घटस्थापना झाली. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या हस्ते शासकीय पूजा झाली. उत्सवमूर्ती गर्भकुटीत आणण्यात आली. खातेदार पुजारी श्री. शेखर मुनीश्‍वर यांच्या हस्ते घटस्थापनेचा विधी झाला. दुपारी देवीची पूजा बांधण्यात आली.

चतुःश्रृंगी (पुणे) येथे सनातनच्या भव्य ग्रंथप्रदर्शनास प्रारंभ !

श्री. अजय भोसले (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना श्री. कृष्णाजी पाटील
     पुणे, १३ ऑक्टोबर (वार्ता.) - नवरात्रोत्सवानिमित्त चतुःश्रृंगी देवी मंदिराच्या आवारात लावण्यात आलेल्या सनातनच्या भव्य ग्रंथप्रदर्शनाचे १३ ऑक्टोबर या दिवशी उद्घाटन करण्यात आले. धार्मिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र समाजाला अवगत व्हावे, धर्मशिक्षण मिळावे, या उद्देशाने प्रतीवर्षी नवरात्रीच्या काळात सनातन-निर्मित ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. शिवसेनेचे शहर संघटक श्री. अजय भोसले यांनी नारळ वाढवून आणि चतुःश्रृंगी देवस्थान समितीचे कार्यकारिणी सदस्य श्री. सुहास सदाशिव अनगळ, श्री. बाळासाहेब अनगळ यांनी श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करून प्रदर्शनाचे उद्घाटन केले. या प्रसंगी श्री. भोसले यांनी सनातनच्या कार्याचे कौतुक केले.

सनातन संस्थेवर बंदी आणण्याचा प्रयत्न केल्यास हिंदुत्ववादी रस्त्यावर उतरतील ! - समस्त हिंदुत्ववादी संघटनांची शासनाला चेतावणी

कागल येथे तहसीलदार यांना निवेदन सादर 
     कागल (जिल्हा कोल्हापूर), १३ ऑक्टोबर (वार्ता.) - केरळमध्ये साम्यवाद्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील २५० स्वयंसेवकांच्या हत्या केल्या आहेत. त्याविषयी 'सनातनवर बंदी घाला', असे म्हणणारे पुरोगामी काहीच बोलत नाहीत. खरे तर वेळोवेळी साम्यवाद्यांचा देशद्रोह उघड झाला आहे. त्यामुळे सनातनवर बंदी आणा, असे म्हणण्याचा साम्यवाद्यांना अधिकार नाही. लक्षावधी काश्मिरी पंडितांची हत्या झाली. ४ लक्ष ५० सहस्र हिंदूंना निर्वासित व्हावे लागले. त्या वेळी पुरोगाम्यांची तोंडे शिवली होती का ? कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी पोलीस यंत्रणेने कोणत्याही दबावास बळी न पडता चौकशी करावी, तसेच राष्ट्रप्रेमी सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीच्या विरोधात ठोस भूमिका घेण्यात यावी, अशी मागणी करून कॉ. गोविंद पानसरे प्रकरणी सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा शासनाने प्रयत्न केल्यास हिंदुत्ववादी रस्त्यावर उतरतील, अशी चेतावणी समस्त हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने आज नायब तहसीलादार सरस्वती पाटील-शिंदे यांना एका निवेदनाद्वारे देण्यात आली.

नवरात्रीनिमित्त देवीचा जागर

     
    पुणे, १३ ऑक्टोबर (वार्ता.) - नवरात्रीनिमित्त राज्यभर मोठ्या उत्साहात विविध घरांमध्ये घटस्थापना करण्यात आली. नवरात्रीचे ९ दिवस देवीचा जागर चालू रहाणार असून देवीभक्तांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. देवीच्या मंदिरांमध्ये देवीची आकर्षक पूजा बांधण्यात येत आहे.
कपड्यांच्या नवरंगापेक्षा भक्तीचे नवरंग श्रेष्ठ !
     नवरात्रोत्सवानिमित्त गेली काही वर्षे नवरंग उत्सव साजरे करण्याची प्रथा पडली आहे. नवरंग उत्सवामध्ये प्रत्येक दिवशीचा एक रंग ठरवून त्या रंगाची वेशभूषा केली जाते. याचा प्रसारमाध्यमांतून व्यापक प्रसार झाल्याने त्या त्या रंगांचे कपडे त्या त्या दिवशी घालणे, हा उत्सवाचाच एक भाग आहे, असे वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि भाजप युती तुटली !

     कल्याण - कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि भाजप यांची युती तुटली आहे. शिवसेना नेत्यांच्या बैठकीत युती तोडण्यावर निश्‍चिती करण्यात आली आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढणार आहे. शिवसेनेच्या नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेसाठी रविवारी १ नोव्हेंबर या दिवशी मतदान होणार असून २ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

सोलापूर येथे श्री दुर्गामाता दौडीस उत्साहात प्रारंभ !

   
     सोलापूर १३ ऑक्टोबर (वार्ता.) - श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने सोलापूर येथे श्री दुर्गामाता दौडीचा उत्साहात प्रारंभ करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भगव्या ध्वजाचे पूजन करून श्री दुर्गामाता दौडीचे उद्घाटन करण्यात आले. ही दौड बालीवेस, टिळक चौक, मधला मारुति, सराफ कट्टा, बलीदान चौक यामागे श्री रूपभवानी देवी मंदिरात पोहोचली. या वेळी देवीची आरती करून ध्येयमंत्र म्हणून दौडीची सांगता करण्यात आली. ही दौड प्रतिदिन सकाळी ६.४५ वाजता छत्रपती शिवाजी चौकातून प्रतिदिन वेगवेगळ्या मार्गांनी रूपभवानी मंदिरात जाणार आहे. तरी सोलापूरकरांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.


नवरात्रोत्सवात डॉल्बी लावल्यास कारवाई; पोलिसांकडून ७० मंडळांना नोटिसा !

अन्य धर्मियांच्या सणाला अशा नोटिसा पोलिसांनी कधी पाठवल्या आहेत का ?
      कोल्हापूर, १३ ऑक्टोबर (वार्ता.) - नवरात्रोत्सवात डॉल्बी यंत्रणा लावून ध्वनीप्रदूषण करू नयेे, अन्यथा मंडळांना ५ वर्षे शिक्षा आणि एक लक्ष रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल, अशी चेतावणी पोलिसांनी शहरातील ७० नवरात्रोत्सव मंडळांना नोटिसा पाठवून दिली आहे.
      ध्वनीप्रदूषणाचे तोटे मंडळांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांना ठाऊक असल्याने कोणत्याही परिस्थितीत डॉल्बी लावू नये, अशी चेतावणी पोलिसांनी दिली आहे. सध्या महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता चालू आहे. नवरात्रोत्सव साजरा करणार्‍या मंडळांनी आचारसंहिता भंग होऊ नये, याची काळजी घ्यावी, अशी सूचना केली आहे. आचारसंहितेचा भंग करणार्‍या मंडळांवर कारवाई केली जाईल, अशीही चेतावणी नोटिसीद्वारे देण्यात आली आहे.

सनातन प्रभातच्या वाचकांनी सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीच्या संदर्भात पाठवलेली पत्रे

सनातन नक्कीच संकटातून बाहेर पडेल ! - श्री. महेश शरद जोशी, डोंबिवली 
     सनातन संस्था आणि सनातन प्रभात हे हिंदु धर्मरक्षण, हिंदुजागृती आणि हिंदूसंघटन यांचे चांगले कार्य करत आहे. सर्व हिंदू, तसेच हिंदुत्ववादी संघटना, संघ परिवार, भाजप, शिवसेना यांच्या कार्यकर्त्यांनी सनातन प्रभात अवश्य वाचावा. देव आणि साधू-संत यांचे आशीर्वाद पाठीशी असल्याने सनातन लवकरच या कठीण प्रसंगातून बाहेर पडेल. हिंदुद्वेष्टे, समाजवादी, साम्यवादी, बुद्धीवादी, नास्तिक आणि पुरोगामी कितीही ओरडले, तरी सनातनला संपवू शकणार नाहीत. सनातनला नम्र विनंती आहे की, महाराष्ट्र्रातील अधिकाधिक मराठी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व मराठी दूरचित्रवाहिन्यांवर चर्चेच्या वेळी सनातन आणि हिंदु धर्म यांची माहिती द्यावी.

फलक प्रसिद्धीकरता

     अशा कार्यक्रमाचे आयोजन करणार्‍यांवर देेेशद्रोहाचा खटला भरा ! 
     ११ ऑक्टोबरच्या रात्री गुजरातच्या कर्णावती (अहमदाबाद) येथे नियोजित करण्यात आलेला भारत-पाक सूफी रॉक बॅन्डचा कार्यक्रम चालू होण्यापूर्वीच शिवसेनेने बंद पाडला.

मुख्यमंत्र्यांच्या बोटचेप्या भूमिकेमुळे महाराष्ट्राची अपकीर्ती ! - संजय राऊत, खासदार, शिवसेना

      मुंबई - शिवसेनेच्या कृत्याने नव्हे, तर मुख्यमंत्र्यांच्या बोटचेप्या भूमिकेनेच छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आणि पोलीस विभाग यांची अपकीर्ती झाली, असे रोखठोक प्रतिपादन शिवसेनेचे खासदार श्री. संजय राऊत यांनी केले आहे. शिवसेनेच्या या कृत्यामुळे महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिमा मलिन झाली असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते, त्यावर ते बोलत होते.
     शिवसेनेने पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांच्या मुंबईतील पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला शिवसेनेने जोरदार विरोध केला होता. हा विरोध दर्शवतांना शिवसेनेने आयोजक सुधींद्र कुलकर्णी यांना काळे फासले. त्यानंतर श्री. राऊत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते की, मुख्यमंत्र्यांना कसुरी यांच्या भारतद्वेषाचे पुरावे पाठवले असल्याने त्यांनीच योग्य तो निर्णय घ्यावा.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : 
shivsenane Gujratke Karnavati me 
Bharat-Pak rock band ka karyakram kiya nirast. 
- kya aise karyakram rakhna rastradhroha nahi ? 

जागो ! : 
शिवसेना ने गुजरातके कर्णावती में
भारत-पाक रॉक बैंड का कार्यक्रम किया निरस्त.
 - क्या एैसे कार्यक्रम रखना राष्ट्रद्रोह नही ?

सध्याच्या व्यावहारिक शिक्षणाची निरर्थकता आणि आध्यात्मिक शिक्षणाची आवश्यकता !

कु. अजिंक्य वांडरे
१. अत्याचारांना स्वाभिमानाने सामोरे जाणार्‍या भारतियांची संस्कृती अभ्यासण्यासाठी इंग्लंडच्या राणीने मेकॉलेला भारतात पाठवणे 
     इंग्रजांनी भारतावर १५० वर्षे राज्य केले आणि संपूर्ण भारताला लुटले. त्यांनी इतके भयंकर अत्याचार केले की, इतर कोणताही देश असता, तर आजही इंग्रजांचा दास (गुलाम) बनून राहिला असता. एवढे अत्याचार होत असतांनाही भारतियांनी इंग्रजांविरुद्ध वर्ष १८५७ मध्ये मोठा उठाव केला. एवढेच नव्हे, तर शिक्षा म्हणून सुळावर जातांना प्रत्येक जण वन्दे मातरम् म्हणून आनंदाने जात होता. बंदुकीच्या गोळ्यांनी मरणारेही आनंदाने बंदुकीच्या गोळ्या खात होते. काही राष्ट्रप्रेमी इंग्रजांच्या गोळीने मृत्यू येऊ नयेे; म्हणून स्वतःच्या गोळीनेच स्वतःची हत्या करत होते. राष्ट्राभिमान असलेल्या अशा अनेक गोष्टींचे इंग्रजांना पुष्कळ आश्‍चर्य वाटत होते. या राष्ट्रभक्तीमागे असलेल्या भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडच्या राणीने लॉर्ड मेकॉलेला भारतात पाठवले.

हिंदु जनजागृती समितीच्या देहली, फरिदाबाद आणि पश्‍चिम उत्तर प्रदेश येथील धर्मप्रसाराच्या कार्याचा ऑगस्ट २०१५ मधील आढावा

१. बैठकांचे आयोजन 
१ अ. श्री. गौरव राणा यांच्या पुढाकाराने बैठकीचे आयोजन : २.८.२०१५ या दिवशी समितीच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून संपर्कात आलेले श्री. गौरव राणा यांनी उत्तर प्रदेशातील सिंभावली येथे एका बैठकीचे आयोजन केले होते. यात १५ युवक सहभागी झाले होते. या सर्वांनी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करण्याचा निर्णय घेतला.
१ आ. बैठकीसाठी विनामूल्य कार्यालय उपलब्ध करून देणारे श्री. सतीश बन्सल ! : ३०.८.२०१५ या दिवशी फरिदाबाद येथील सेक्टर ४ मधील बंसल ब्रदर्सच्या कार्यालयात समिती आणि सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत व्यष्टी साधनेचे महत्त्व विशद करण्यात आले. या बैठकीसाठी श्री. सतीश बन्सल यांनी तत्परतेने त्यांचे कार्यालय विनामूल्य उपलब्ध करून दिले.

सीता हीच भारतीय स्त्रीत्वाचा आदर्श आहे ! - स्वामी विवेकानंद

स्त्रीस्वातंत्र्यवाल्यांनो, हे लक्षात घ्या ! 
१. स्त्री-शिक्षण देतांना धर्म केंद्रस्थानी ठेवल्यास स्त्रियांमध्ये शील 
निर्माण होणे आणि वेळ प्रसंगी शीलभ्रष्ट होण्यापेक्षा 
स्वतःच्या जीविताचाही स्वाहाकार करण्यात त्यांना 
काडीचेही भय न वाटू शकणे
     स्त्री-शिक्षणाचा प्रचार हा धर्माला केंद्र करूनच व्हावयास हवा. इतर सर्व शिक्षण, वळण धर्माच्या तुलनेत गौणच असावयास हवे. धर्मशिक्षण, शीलसंवर्धन आणि कठोर ब्रह्मचर्यपालन यांकडे लक्ष पुरवावयास हवे. सतीत्वाचा अर्थ हिंदु स्त्रियांना सहज समजू शकतो; कारण त्याचा वारसा घेऊनच त्या जन्मास येत असतात. इतर कोणत्याही गोष्टीवर भर देण्यापेक्षा आधी त्यांच्यात हा आदर्श सुप्रतिष्ठित करण्याचा कसून प्रयत्न करा. त्यायोगे त्यांच्यात असे अत्युन्नत शील निर्माण होईल की, ज्याच्या बळावर जीवनाच्या विवाहित किंवा अविवाहित (अविवाहित रहाण्याचे त्यांनी ठरवल्यास) अवस्थेत शीलभ्रष्ट होण्यापेक्षा आपल्या जीविताचाही स्वाहाकार करण्यात त्यांना काडीचेही भय वाटणार नाही.

देहातील प्राणाप्रमाणे राष्ट्राच्या संदर्भात धर्माच्या अधिष्ठानाचे महत्त्व असणे

     धर्म आणि सद्धर्म यांचे स्वरूप या प्राणासारखे आहे. मंत्री, पुढारी, निवडणुका लागतात. व्यापार, पाण्याचे पाट, रस्ते चांगले असावे लागतात. सार्वजनिक वाहनांचीही सोय पुरेशी असावी लागते. आरक्षक (पोलीस) लागतात, सचिवालयापासून चपराश्यापर्यंत अधिकारी, सेवक लागतात. सैन्य लागते. हे सगळे खरे आहे; पण यांची कार्यक्षमता टिकवण्यासाठी त्यांना भ्रष्ट, स्वार्थी न होऊ देण्यासाठी पाठीमागे धर्माचे अधिष्ठान असावे लागते. एक वेळ यापैकी कुणीही नसला, तरी चालेल, यांच्यावाचूनही समाजाची धारणा होऊ शकेल. एकेकाळी राजा नाही, राज्य नाही, अशी अवस्था होती. धर्मच सगळ्यांचे रक्षण करत होता. आज धार्मिकतेचा खरा अर्थ विसरून वर्तनामध्येे जे सद्वर्तन, अंत:करणात जी शुद्धता असावयास पाहिजे, ती राहिली नाही, तसेच कृती शुद्ध राहिली नाही. - स्वामी वरदानंद भारती (मातृवाणी, फेब्रुवारी २०१०)

तिसर्‍या महायुद्धाला आमंत्रण देणार्‍या शिया-सुन्नी संघर्षाची भयानकता !

श्री. भाऊ तोरसेकर
     ज्या सिरियातून चाळीस लाखांहून अधिक निर्वासित युरोपकडे पळत सुटले आहेत, त्याच देशावर सध्या रशियाने हवाई आक्रमणे चालू केली आहेत; मात्र त्याच देशाचा राष्ट्रप्रमुख बशर असद त्या आक्रमणाचे स्वागत करतो आहे. किती चमत्कारीक बाब आहे ना ? एका बाजूला देशातील अस्थिरतेने अराजक माजले आहे आणि त्याच वेळी परदेशी हवाई आक्रमणाचे देशाच्या प्रमुखाने स्वागत कशाला करावे ? तर जे लोक असद यांची सत्ता उलथून पाडायला बंड करून उठले आहेत, त्यांनाच रशियाचे बॉम्बहल्ले निकामी करतील, अशी असद यांना आशा आहे. त्यात रशियाला यश मिळावे, अशी असद यांची प्रार्थना आहे. तेवढ्यावर असद थांबत नाहीत. रशिया अपयशी ठरला, तर मध्य-पश्‍चिम आशियात यादवी अंदाधुंदी माजेल अशीही चेतावणी असद यांनी दिली आहे. खरे तर अशी आक्रमणे नवीन नाहीत.

गुलाम अलीसाठी मुलायम बनायला नको !

     शिवसेनेने राजकीय पातळीवर घेतलेल्या राष्ट्रप्रेमी भूमिकेमुळे चर्चेला उधाण आले. पाकिस्तान सीमाभागात सतत गोळीबार करत आहे, उघडउघडपणे शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. त्यात प्रतिदिन सैन्यांचे बळी जात आहेत. सीमाभागातील जनतेचे नाहक बळी जात आहेत. राजकीय पातळीवर भारत तरीही सतत सामंजस्याने भूमिका घेत आहे. एका टेबलावर चर्चा करण्यासाठी सतत अवताण देत आहे. मात्र मुजोर पाकिस्तान भारताच्या भूमिकेला धुडकावून लावत आहे, तसेच सतत युद्धाची भाषा करत आहे, भारताने जरा प्रत्युत्तर दिले, तर अण्वस्त्रांनी आक्रमण करण्याची धमकी देत आहे. पाकिस्तानातील राज्यकर्ते अशा प्रकारे भारताकडे क्रमांक १ चा शत्रू म्हणून सतत पहात आहेत. येनकेन प्रकारेण काश्मीर भारतापासून तोडण्यासाठी विघटनवादी शक्तींना प्रोत्साहन देत आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे पोलिसांचा वाढता ससेमिरा !

राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांची वारंवार तीच तीच चौकशी करून त्यांचा अमूल्य वेळ 
घालवण्यापेक्षा आतंकवाद्यांच्या शोधार्थ पोलिसांनी वेळ दिला असता, तर एव्हाना 
देश आतंकवादमुक्त झाला असता !
     एका शहरातील हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्याची एका पोलीस हवालदाराने नुकतीच चौकशी केली. त्या वेळी झालेले संभाषण येथे देत आहोत.
पोलीस हवालदार : मला आपल्याला भेटायचे आहे. येताय का ? 
कार्यकर्ता : ठीक आहे. 
पोलीस : तुमच्याकडून काही माहिती हवी आहे. माझ्याकडे तालुक्याचे दायित्व आहे.
कार्यकर्ता : तुमच्याकडे ओळखपत्र आहे का ? (हवालदाराने आपले ओळखपत्र दाखवले.) तुम्ही माझ्याकडून माहिती विचारून का घेत आहात ? कारण ४ - ५ दिवसांपूर्वी शहर पोलीस ठाण्यातून गोपनीय विभागाच्या अधिकार्‍यांनी माझी माहिती घेतली होती.

गरबोत्सव मंडळांना आवाहन !

नवरात्रीनिमित्त
     उत्सवांना आलेले हिडीस स्वरूप आपण पालटू शकता ! यासाठी आपण पुढील प्रकारे कृती करू शकता !
अ. अनुचित प्रकार घडू देऊ नका.
आ. पूजास्थानी अन् उत्सव मंडपात शिस्त आणि पावित्र्य राखा.
इ. प्रबोधन करणे : सार्वजनिकरित्या साजर्‍या होणार्‍या उत्सवाच्या निमित्ताने समाज मोठ्या प्रमाणावर एकत्रित होत असतो. हे लक्षात घेऊन समाजसाहाय्य, धर्मजागृती अन् राष्ट्रजागृती या उद्देशांच्या पूर्तीसाठी कार्य करता येऊ शकते. 
    यासाठी धर्म, अध्यात्म, साधना यांसारख्या विषयांवरील व्याख्याने, मद्यपान, एड्स इत्यादी संबंधी जनजागृती करणारी व्याख्याने, तसेच भ्रष्टाचार आणि जातीयवाद यांची जनतेला जाणीव करून देणारी प्रवचने, जनहिताशी निगडीत विविध विषयांवरील एक किंवा अधिक तज्ञांची चर्चासत्रे आयोजित करावीत.

एकतेचा मूलाधार असलेल्या हिंदूंना सामर्थ्यशाली करणारे नेतृत्वच भारतास वाचवू शकते !

     जवाहरलाल नेहरूंनी एकता टिकवण्याऐवजी तो प्रश्‍न अधिक जटील केला. त्यांनी काश्मीर, ईशान्य भारत, नेपाळ आणि नक्षलवादी यांच्या दिवसेंदिवस अधिक गुंतागुतीच्या होत जाणार्‍या समस्या निर्माण झाल्या आहेत. भारताचे ऐक्य आणि सार्वभौमत्व धोक्यात असून राष्ट्रवाद अन् धर्मनिरपेक्षतावाद यांविषयी ज्याच्या मनात गोंधळ नाही, असे नेतृत्वच भारतास वाचवू शकते. एकतेचा मूलाधार हिंदु आहेत. 
- श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार, मुंबई.

अध्यात्मावर आधारीत व्यवमस्थाच देशाला वाचवू शकते !

     गीतेचे ज्ञानच या देशाला वाचवू शकते. उच्च न्यायालयानेही भगवद्गीता हा राष्ट्रीय ग्रंथ व्हावा, असे म्हटले आहे. अध्यात्मावर आधारीत व्यवस्था निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावयास हवेत. 
- ह.भ.प. राजेश्‍वर महाराज रामदासी

पू. ताई का जन्मदिन, रामनाथी ने हर्षोल्लास से मनाया ।

गोकुल में करे जो निवास ।
गोपियों संग रचाए रास ।
देवकी यशोदा जिनकी मैया ।
ऐसे नटखट हमारे कृष्ण कन्हैया ॥ १ ॥
माखन चुराकर जिसने खाया ।
बन्सी बजाकर जिसने नचाया ।
जयजयकार करो उस कृष्ण की ।
जिसने दुनिया को प्रेम सिखाया ।
ऐसे कृष्ण की पू. बिंदाताई का ।
जन्मदिन, रामनाथी ने हर्षोल्लास से मनाया ॥ २ ॥
- कु. प्रियांका जोशी, कु. मयुरी डगवार आणि कु. स्वाती गायकवाड, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.९.२०१४)

हीच प्रार्थना पू. बिंदाईच्या चरणी ।

गुरूंनी दावियली मोक्षाची वाट ।
वाटेवरी चालतांना अडथळे बघून मन घाबरले ।
गुरुमाऊलीचे चरण घट्ट हृदयाशी धरले ।
त्यांचेच सगुण रूप पू. बिंदाईच्या रूपात साकारले ॥ १ ॥
तिने बाळा घाबरू नको,
पुढे जाण्याचे बळ तुझ्यात आहे,
असे सांगून चालण्यास शिकवले ।

पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना वाढदिवसानिमित्त दिलेले शुभेच्छापत्र !


आपल्या लेकरांवर निखळ प्रेमाचा वर्षाव करून साधना करण्यासाठी त्यांना बळ देणार्‍या पू. बिंदाताई आणि असह्य वेदना होत असतांनाही कृतज्ञताभावात रहाणारी कु. मयुरी डगवार !

कु. मयुरी डगवार
    रामनाथी आश्रमातील व्यवस्थापन विभागात सेवा करणारी कु. मयुरी डगवार हिला विविध शारीरिक व्याधी आहेत, तसेच तिला तीव्र त्रासही आहे. शारीरिक त्रासामुळे तीव्र वेदना होत असतांना तिने पू. बिंदाताईंना पाठवलेला भावमय लघुसंदेश पुढे देत आहे. - संकलक
    पूज्य ताई, आयुष्यातील प्रत्येक आनंद मला तुमच्या अमूल्य प्रीतीमुळेच मिळत आहे. माझ्यात काही गुण नाहीत आणि क्षमताही नाही.जे काही आहे, ते सर्व श्रीकृष्ण आणि तुमच्यामुळे ! आज मला होणारा त्रास तुमच्यामुळेच सहन करता आला.
    शिष्याला साधनेत पुढे घेऊन जाण्यासाठी शिखरस्थानी राहून गुरु त्याची दोरी ओढत असतात. दोरी पकडून राहिल्यामुळे शिष्याची साधनेत घसरण होत नाही; पण पूज्य ताई, दोरी पकडण्याचीही माझी क्षमता नाही. त्यामुळे दोरीची गाठ घालून तुम्ही मला एका छानशा पिशवीत ठेवले आहे. त्यामुळे मी जरी काही प्रयत्न केले नाहीत, तरी मातेच्या (तुमच्या) प्रीतीमुळे मी साधनारत राहू शकत आहे. अशा मातेसाठी गुरुचरणी किती जरी कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती थोडीच आहे.
- कु. मयुरी डगवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (जुलै २०१५)

एका साधकाच्या घरातील साहित्य गोव्याला पाठवण्याच्या निमित्ताने पू. बिंदाताईंच्या साधकांवर असलेल्या अपार प्रीतीचा आलेला अनुभव !

    मुंबईतील एक साधक रामनाथी आश्रमात राहून पूर्णवेळ सेवा करतात. त्यांनी नुकतेच गोव्यात घर घेतल्याने त्यांचे मुंबईतील साहित्य गोव्यात न्यायचे होते. देवद आश्रमातून आपले वाहन तेथील वितरकांना सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ देण्यासाठी आवश्यकतेनुसार मासातून एकदा अथवा दोनदा रामनाथी येथे जात असते. यास्तव पू. बिंदाताई यांनी श्री. शंकर नरूटे यांच्याकडून जाणून घेतले की, आपले वाहन येते, त्या वेळी त्यातून या साधकांचे साहित्य रामनाथी आश्रमापर्यंत आणू शकतो का ? आम्ही त्या साधकांच्या साहित्याचा अभ्यास करून तसे शंकरदादांकडून पू. बिंदाताईंना कळवले होते, तरीही २६.८.२०१५ या दिवशी दुपारी पू. बिंदाताईंचा भ्रमणभाष आला. त्या वेळी त्यांनी त्या साधकांचे कोणकोणते साहित्य आहे ? ते कशा प्रकारे आणि कोणकोणत्या माध्यमांतून आणू शकतो ? असे सखोलपणे विचारून घेतले. त्या वेळी एवढा अभ्यास कदाचित् त्या साधकानेही केला नसावा, असे मला वाटले. पू. बिंदाताईंच्या बोलण्यातून त्या साधकाचे साहित्य व्यवस्थित पोचले पाहिजे, याची तळमळ जाणवत होती. एखाद्या साधकाचे घरातील वैयक्तिक साहित्य हालवण्यासाठी पू. ताईंनी स्वतःच्या व्यस्त नियोजनातून वेळ काढला. यातून त्यांची साधकांप्रतीची अपार प्रीती आणि दायित्वाची जाणीव पाहून पू. ताईंप्रती कृतज्ञताभाव जागृत झाला. - कु. नलिनी राऊत, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२८.८.२०१५)

अनेक सेवांचे दायित्व लीलया सांभाळतांनाच साधकांचे मन अचूकपणे जाणून साधकरूपी मूर्तींना सुबक आकार देणारे एक अलौकिक संतरत्न पू. बिंदाताई !

कु. सई कुलकर्णी
    खरेतर अखंड सेवारत रहाणार्‍या, प्रत्येक क्षणी देवाला अपेक्षित अशी सेवा करण्यासाठी धडपडणार्‍या पू. बिंदाताईंचे गुणवर्णन करणे माझ्या क्षमतेच्या पलीकडचे आहे, तरीही त्यांनी दिलेली शिकवण समष्टीसमोर मांडण्याचा हा अल्पसा प्रयत्न करत आहे.
१. पू. बिंदाताईंमधील सूक्ष्मातील, तसेच साधकांच्या
अंतरातील जाणण्याची अफाट क्षमता दर्शवणारे काही प्रसंग
१ अ. साधिकेने न सांगताही तिच्या मनातील अयोग्य विचारप्रक्रिया ओळखून तिला जाणीव करून देणे, तसेच भावाचे प्रयत्न होत असल्याचे सूक्ष्मातून जाणून तिला प्रेरणा देणे : बर्‍याचदा माझे सेवेतील गांभीर्य अल्प पडू लागते, तसेच माझ्या मनातील अहंचे विचार उफाळून येतात. अशा वेळी माझ्या मनाची ती प्रक्रिया मी न सांगताच पू. ताईंना समजते. तेव्हा त्या मला माझ्या चुकांची कठोरपणे जाणीव करून देतात. त्यामुळे मनाच्या प्रक्रियेचा अभ्यास करणे सुलभ जाते.
    काही वेळा भगवंताच्या कृपेने माझे भावजागृतीचे प्रयत्न होतात आणि त्यामुळे मला सेवेतून आनंद मिळत असतो. अशा वेळी पू. ताईंना ते लगेच लक्षात येते आणि त्या मला म्हणतात, आज तुझा तोंडवळा जरा चांगला दिसतो. त्या वेळी मला आपले या संदर्भात पू. ताईंशी काहीच बोलणे झाले नसूनही त्यांना कसे कळले ? याचे आश्‍चर्य वाटते आणि प्रत्येक क्षणी मनाची प्रक्रिया जाणणार्‍या पू. ताईंविषयी कृतज्ञता वाटते.

पू.(सौ.) बिंदा सिंगबाळ यांना वाढदिवसानिमित्त दिलेली शुभेच्छापत्रे आणि काव्यसुमने अन् त्यांची साधकांना लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये !

          सनातनच्या ३०व्या संत पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा वाढदिवस १२.१०.२०१५ या दिवशी झाला. त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी व्यवस्थापन विभागातील साधक आतुर झाले होते. पू. (सौ.) बिंदाताईंना दाखवण्यासाठी एक संगणकीय शुभेच्छापत्र सिद्ध करून ठेवले होते. यानंतर पू. ताईंच्या वाढदिवसानिमित्त श्रीकृष्णाने घडवलेला भावसोहळा साधकांना अनुभवायला मिळाला. पू. ताईंसमवेत काढण्यात आलेले छायाचित्र आणि त्यांना दिलेले शुभेच्छापत्र येथे प्रसिद्ध करत आहोत.

डावीकडून सौ. कीर्ती जाधव, कु. मयुरी डगवार, बालसाधिका कु. वैभवी झरकर, कु. कौमुदी जेवळीकर,
कु. अमृता मुद्गल, कु. मेघा चव्हाण, सौ. पार्वती जनार्दन, कु. स्वाती गायकवाड, कु. माधुरी दुसे आणि कु. सई कुलकर्णी

साधक-पालकांनो, पाल्याचे छायाचित्र आणि गुणवैशिष्ट्ये ग्रंथ विभागात पाठवतांना पुढील बारकावे लक्षात घ्या !

अयोग्य छायाचित्र
    आपले मूल उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला आले असल्याचे वाटत असल्यास अथवा त्याचा वाढदिवस असल्यास पालक त्याची गुणवैशिष्ट्ये आणि छायाचित्रे ग्रंथ विभागात पाठवतात. त्या वेळी पालकांनी पुढील सूत्रे लक्षात घेणे आवश्यक आहे.
१. पाल्याची छायाचित्रे काढतांना लक्षात घ्यावयाची सूत्रे
१ अ. पाल्याचे नेहमीच्या वेशातील छायाचित्र हवे ! : काही पालक पाल्याला मुद्दाम वेगळा पोशाख घालून त्याचे छायाचित्र काढतात, उदा. एका पालकाने आपल्या पाल्याचे पगडी घातलेले छायाचित्र पाठवले. एकाने पाल्याचे मुकुट आणि अलंकार घातलेले छायाचित्र पाठवले आणि एका पालकाने त्याच्या लहान मुलीला नऊवारी साडी नेसवून ते छायाचित्र पाठवले, तसेच काही पालक असात्त्विक कपडे परिधान केलेल्या पाल्याचे छायाचित्र पाठवतात. यापुढे पालकांनी पाल्यांचे नेहमीच्या वेशातीलच छायाचित्र पाठवावे.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीची मुंबई येथील चि. नैवेद्या संदीप वैती (वय ५ मास) !

१. पत्नीचे गरोदरपण
१ अ. नियमितपणे स्तोत्रपठण अन् नामजप केल्याने गरोदरपणात कोणत्याही प्रकारचे शारीरिक त्रास न होणे : आम्ही दिवसभरात नियमित नामजप आणि स्तोत्रे म्हणत असू. प्रतिदिन रात्री झोपण्याआधी रामरक्षा आणि मारुतिस्तोत्र म्हणून उदबत्तीचे उपाय करत असू. याचा परिणाम असा झाला की, पत्नीला गरोदरपणात उलट्या, अंगाला सूज येणे इत्यादी कोणताही त्रास झाला नाही.
१ आ. आधुनिक वैद्यांकडून घरी येतांना अचानक गाडीचे चाक फाटणे; परंतु गुरूंच्या कृपेने गाडी नियंत्रणात राहून सर्वांचे रक्षण होणे : पत्नी साधारणपणे तीन मासांची गरोदर असतांना आम्ही आधुनिक वैद्यांकडून तपासणी करून चारचाकीने घरी येत होतो. वाटेत अचानक मोठा आवाज झाला. गाडीला थोडासा झटका बसला आणि गाडीचा वेग अल्प झाला. तेव्हा पाहिले असता गाडीचे एक चाक पुष्कळ फाटल्याचे लक्षात आले. चाक फाटण्यासारखी रस्त्यावर कोणतीही जागा किंवा तीक्ष्ण वस्तू नव्हती. चाकाची अवस्था पाहून मेकॅनिक म्हणाला, अशा वेळी गाडीवर नियंत्रण रहात नाही आणि गाडी मार्ग सोडून कडेला जाते. गाडी मार्गाच्या कडेला न जाता नियंत्रणात राहिल्याविषयी त्याने आश्‍चर्य व्यक्त केले. देवाच्या कृपेनेच या प्रसंगात आमचे रक्षण झाल्याचे लक्षात आले आणि कृतज्ञता वाटली. 

रामनाथी आश्रमातील ९० पेक्षा अधिक साधक व्हायरल फीव्हरने (रोगाणू तापाने) रुग्णाईत होणे, हे आपत्काळाची तीव्रता वाढत असल्याचेच दर्शक !

    १०.९.२०१५ या दिवसापासून रामनाथी आश्रमातील ९० पेक्षा अधिक साधक व्हायरल फीव्हरने (रोगाणू तापाने) रुग्णाईत झालेे. या अंतर्गत त्यांना सर्दी होणे, खोकला, शिंका, तसेच ताप येणे, घसा दुखणे असे त्रास न्यूनतम ८ दिवस तरी होत होते. या कालावधीत बर्‍याच साधकांना पुष्कळ थकवा येणे, भूक न लागणे, निरुत्साही वाटणे, मनाच्या स्तरावरील संघर्ष वाढणे, सेवा अन् साधना नकोशी वाटणे आदी त्रासांनाही सामोरे जावे लागले. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक कारणांमुळे होणारे त्रास दिवसागणिक वाढत जाणे, हे संभाव्य आपत्काळ समीप येत असल्याचेच दर्शक आहे.
    सर्वत्रच्या साधकांनो, आपत्काळातून तरून जाण्यासाठी अखंड सेवारत राहून विहंगम गतीने साधना वाढवा !
- (पू.) सौ. बिंदा सिंगबाळ (१२.१०.२०१५)

रामनाथी आश्रमातील ९० पेक्षा अधिक साधक व्हायरल फीव्हरने (रोगाणू तापाने) रुग्णाईत होणे, हे आपत्काळाची तीव्रता वाढत असल्याचेच दर्शक !

    १०.९.२०१५ या दिवसापासून रामनाथी आश्रमातील ९० पेक्षा अधिक साधक व्हायरल फीव्हरने (रोगाणू तापाने) रुग्णाईत झालेे. या अंतर्गत त्यांना सर्दी होणे, खोकला, शिंका, तसेच ताप येणे, घसा दुखणे असे त्रास न्यूनतम ८ दिवस तरी होत होते. या कालावधीत बर्‍याच साधकांना पुष्कळ थकवा येणे, भूक न लागणे, निरुत्साही वाटणे, मनाच्या स्तरावरील संघर्ष वाढणे, सेवा अन् साधना नकोशी वाटणे आदी त्रासांनाही सामोरे जावे लागले. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक कारणांमुळे होणारे त्रास दिवसागणिक वाढत जाणे, हे संभाव्य आपत्काळ समीप येत असल्याचेच दर्शक आहे.
    सर्वत्रच्या साधकांनो, आपत्काळातून तरून जाण्यासाठी अखंड सेवारत राहून विहंगम गतीने साधना वाढवा !
- (पू.) सौ. बिंदा सिंगबाळ (१२.१०.२०१५)

शक्ती आणि आनंद

    शक्तीमुळे कार्य घडते. जितकी शक्ती अधिक तितके अधिक कार्य घडते. यामध्ये साधकात अहं निर्माण होण्याची शक्यता असते. आनंदाच्या स्थितीला साधक अंतरंगात परमेश्‍वरी सत्ता अनुभवत असल्याने त्याचा अहं अल्प रहाण्यास साहाय्य होते आणि त्याच्या माध्यमातून कार्यही आपोआप घडते. त्यामुळे शक्तीचा पुढील स्तर आनंद आहे. - श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.६.२०१५)

साधकांनो, दीपावलीपर्यंत कृतज्ञताभाव वाढवा !

    रामनाथी आश्रमाच्या भोजनकक्षातील फलकावर  पुढील भावओळी लिहिल्या आहेत.
जलद आध्यात्मिक उन्नती होण्याकरता ।
गुरुदेवांनी ध्येय दिले आहे, ते भावाचे ॥
दीपावलीपर्यंत करूया यथार्थ प्रयत्न ।
अन् अंतरात लावूया दीप कृतज्ञतेचे ॥

    सजीव-निर्जीव वस्तूंप्रती, देवाजवळ जाण्यासाठी साहाय्य करणार्‍या साधकांप्रती, श्री गुरूंनी आपल्यावर केलेल्या कृपेसाठी आणि प्रीतीसाठी अखंड कृतज्ञताभावात राहूया. या दीपावलीपर्यंत गुरूंच्या संकल्पानुसार तळमळीने कृतज्ञताभाव वाढवण्यासाठी ध्येय ठेवून प्रयत्न करूया !
- सौ. पार्वती जनार्दन, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.१०.२०१५)

सौ. पार्वती जनार्दन यांनी केलेल्या रचनांची चित्रे पाहिल्यावर त्या रचनांचे कौतुक करणारे साधक

सौ. पार्वती जनार्दन
    ५.१०.२०१५ या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमध्ये सौ. पार्वती जनार्दन यांनी दैनंदिन वापरातील वस्तूंपासून सिद्ध केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण रचना हा लेख छापून आला होता. दैनिक सनातन प्रभातमधील पत्रकार परिषदेचे छायाचित्र बघून त्यांनी दैनंदिन वापरातील वस्तूंपासून २ रचना केल्या होत्या आणि त्याचा अर्थही सांगितला होता. हा लेख वाचून साधकांनी केलेले कौतुक अन् त्यांचे कौतुकोद्गार पुढे देत आहे.
अ. आश्रमातील काही साधकांनी दैनिक सनातन प्रभातमधील लेख पुष्कळ छान आहे. केलेल्या रचना पुष्कळ सुंदर होत्या. त्या रचना बघून आनंद झाला, असे सांगितले.
आ. पुण्यातील साधक श्री. अरविंद सहस्रबुद्धेकाकांनी भ्रमणभाषवरून माझे कौतुक केले.
गुरुचरणी समर्पित,                   
- सौ. पार्वती जनार्दन (७.१०.२०१५)

प्रसिद्धीच्या झोतात असूनही कृतज्ञताभाव जागृत ठेवल्याविषयी साधकाने गुरुमाऊलीला वाहिलेली कृतज्ञतारूपी शब्दसुमनांजली !

श्री. अभय वर्तक
    श्री. अभय वर्तक यांनी केलेले पुढील लिखाण सर्वच साधकांना मार्गदर्शक आहे. सर्वांनी नेहमीच असे विचार ठेवले, तर सर्वांचीच प्रगती जलद होईल आणि हिंदु राष्ट्राची स्थापना या आपल्या ध्येयाची पूर्ती होईल.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

प.पू. गुरुमाऊली,
    आपल्या चरणांवर शरणागत होऊन लिहित आहे.
१. महर्षींनी नाडीपट्टीत सांगितल्याप्रमाणे प्रारंभी सनातनवर
तुटून पडणारी प्रसिद्धीमाध्यमे आता संस्थेविषयी सकारात्मक होऊ लागणे
    गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र सनातन संस्थेचीच चर्चा सातत्याने चालू आहे. आरंभीचे काही दिवस सर्व जण आपल्यावर तुटून पडले होते. त्या वेळी महर्षींनी नाडीपट्टीत ही चर्चा ९ दिवसांनी आपल्या बाजूने व्हायला लागेल, असे सांगितले होते. त्यांच्या आशीर्वादाप्रमाणे आता प्रसिद्धीमाध्यमांमध्ये सनातनविषयी सकारात्मक चर्चा चालू झाली आहे. वृत्तवाहिन्यांवर ६१ टक्के आध्यात्मिक पातळी म्हणजे काय ? आश्रमाची दिनचर्या कशी असते ?, अशा प्रकारचे स्वप्नवत् वाटावेत, असे प्रश्‍न विचारले जाऊ लागले आहेत. या निमित्ताने आपली चांगली बाजू मांडण्याची संधी मिळत आहे.

प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन !

प.पू. परशराम पांडे
भगवंताची रसस्वादन करण्याची प्रक्रिया म्हणजे रासलीला !
    वास्तविक गोपी भगवंतस्वरूप झाल्या होत्या. तेव्हा अद्वैतातील भगवंत म्हणतात, तू देव मी भक्त ऐसे करी । मी भक्त होऊन भक्तीचे आस्वादन घेईन. गुलाबाच्या झाडाला गुलाबाच्या अस्तित्वाचा आनंद घेता येत नाही. दुसरे त्याच्या आनंदाचे आस्वादन घेऊ शकतात; म्हणून भगवंताने लीला करून राधेचे अस्तित्व निर्माण केले आणि त्याद्वारे भगवद्भक्तीच्या आनंदाचे आस्वादन घेतले. आपल्याच भक्तीतून त्याने राधा निर्माण केली. श्रीकृष्णाला रसो वै सः । म्हणजे आनंदघन म्हणतात. त्याने संकल्पाने या मायावी जगाची निर्मिती केली. संकल्पाने ती प्रवाहित झाली. तिला गती आली. ईश्‍वर निर्माण झाला. काळ निर्माण झाला. त्या गतीची धारा निर्माण झाली. अशी धारा, धारा वाढत वाढत ती राधा झाली. अशी राधास्वरूप त्याच्याच अंतरंगाची प्रतिकृती ! तिच्याशी समरस होण्याची क्रीडा ती रासलीला, म्हणजे स्वतः रसस्वादन करण्याची प्रक्रिया !! - प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

आपल्या बालपणी आपले सर्व करणार्‍या आई-वडिलांविषयी आपल्याला कृतज्ञता वाटते, तर आयुष्यभर आपले सर्व करणार्‍या ईश्‍वराविषयी किती वाटली पाहिजे ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले


हरिद्वार येथील अर्धकुंभमेळ्यातील धर्मप्रसारातर्गंत विविध सेवांमध्ये सहभागी व्हा !

वाचक, हितचिंतक, धर्मप्रेमी, तसेच साधक यांना सेवेची अमूल्य संधी ! 
१. अर्धकुंभमेळ्याचे महत्त्व 
     'उत्तराखंड राज्यातील हरिद्वार येथे प्रत्येक १२ वर्षांनी महाकुंभमेळा आयोजित केला जातो. या १२ वर्षांच्या कालावधीत ६ वर्षांनी अर्धकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. 'हरिद्वार येथील अर्धकुंभपर्वातील यात्रेचे फळ मोक्ष देणारे असते', असे धर्मशास्त्रामध्ये सांगितले आहे. त्यामुळे कुंभमेळ्याप्रमाणे या अर्धकुंभमेळ्यातही लक्षावधी भाविक यात्राविधी आणि गंगास्नान करतात. अर्धकुंभमेळ्यातील विशेष पर्वकाळांना गंगास्नानाचे महत्त्व असल्याने त्या वेळी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. 

'सनातन पंचांग २०१६' ची मागणी लवकरात लवकर कळवून आपली प्रत आजच राखून ठेवावी !

वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती ! 
     'सनातन पंचांग केवळ पंचांग नव्हे, तर हिंदुत्वाचे सर्वांगच आहे. राष्ट्र-धर्म कार्यासाठी कृतीशील करणारे आणि धर्मशिक्षण देणारे प्रभावी माध्यम असणारे हे पंचांग जिज्ञासूंना साधनेसाठी अमूल्य मार्गदर्शनही करते. सनातन पंचांगाला सर्वच स्तरांवरून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत आहे. पंचांगाच्या संदर्भात समाजाकडून लाभणारा वाढता प्रतिसाद आणि अपुरी साधकसंख्या यांमुळे 'वर्ष २०१५ चे पंचांग काही जिज्ञासूंना वेळेत मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांनी वर्ष २०१५ चे सनातन पंचांग देण्यासाठी आमच्याकडे कोणीच आले नाही. आम्ही साधकांची वाट पहात होतो. या वर्षी आम्हाला आठवणीने पंचांग आणून द्या', असे स्वतःहून साधकांना कळवले आहे. 

साधकांना सूचना

     पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा. 
दोन दिवसांपूर्वी अमावास्या झाली.

वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

'सनातन पंचांग २०१६' ची मागणी लवकरात लवकर कळवून आपली प्रत आजच राखून ठेवावी ! 
     'सनातन पंचांग केवळ पंचांग नव्हे, तर हिंदुत्वाचे सर्वांगच आहे. राष्ट्र-धर्म कार्यासाठी कृतीशील करणारे आणि धर्मशिक्षण देणारे प्रभावी माध्यम असणारे हे पंचांग जिज्ञासूंना साधनेसाठी अमूल्य मार्गदर्शनही करते. सनातन पंचांगाला सर्वच स्तरांवरून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत आहे. पंचांगाच्या संदर्भात समाजाकडून लाभणारा वाढता प्रतिसाद आणि अपुरी साधकसंख्या यांमुळे वर्ष २०१५ चे पंचांग काही जिज्ञासूंना वेळेत मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांनी 'वर्ष २०१५ चे सनातन पंचांग देण्यासाठी आमच्याकडे कोणीच आले नाही. आम्ही साधकांची वाट पहात होतो. या वर्षी आम्हाला आठवणीने पंचांग आणून द्या', असे स्वतःहून साधकांना कळवले आहे. 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
हिंदूंचा कल्पनातीत सर्वधर्मसमभाव 
'विष्णूचा अवतार असलेल्या रामाने रावणाला युद्धात मारले. त्या रावणाची 'रावण महाराज' या नावाची भारतात २ - ३ ठिकाणी मंदिरे आहेत ! म्हणूनच हिंदूंना कोणी सर्वधर्मसमभाव शिकवायला नको !'
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२६.६.२०१४)
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
गुरूंकडे काय मागावे ? 
 माझ्याकडेसुख मागू नका, दुःख सहन करण्याचे बळ मागा. 
भावार्थ : सुख हे प्रकृतीतील असल्याने अशाश्‍वत असते, म्हणून गुरूंकडे मागू नये. तसेच हेही लक्षात ठेवले पाहिजे की, शाश्‍वत आनंद मिळवून देणे, हेच गुरूंचे खरे कार्य असते. प्रारब्धामुळे दुःख भोगावे लागणार असल्यास, त्या दुःखदायक प्रसंगांमुळे होणारे दुःख सहन करण्याची शक्ती मात्र गुरु निश्‍चित (नक्कीच) देतात; म्हणून ती मागायला आडकाठी (हरकत) नाही 
 (संदर्भ : सनातनचे प्रकाशन 'संत भक्तराज महाराज यांची शिकवण.') 

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

खरा ज्ञानी 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      खरा ज्ञानी निरिच्छ असतो. त्याने षड्रिपूही जिंकलेले असतात. त्याच्या प्रत्येक कृतीला कार्यकारणभाव असतो. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

भारतीय तरुणांचे चिंताजनक अध:पतन !

देहली पोलिसांनी बलात्काराविषयी नुकतेच काही निष्कर्ष घोषित केले आहेत. यात वर्ष २०१५ मध्ये बलात्कार प्रकरणात अटक केलेले अधिकाधिक आरोपी हे १८ ते २५ या वयोगटातील असल्याची धक्कादायक माहिती दिली आहे. एकूण अटक केलेल्या आरोपींमध्ये १०५ आरोपी हे १८ वर्षांच्या आतील आहेत, तर ४८७ आरोपी २५ वर्षांहून अधिक वय असलेले आहेत. एकूण आरोपींच्या ५३ प्रतिशत आरोपी हे युवागटातील आहेत. कोणत्याही देशासाठी तरुण पिढी हेच खरे भांडवल असते. ज्या वयात काहीतरी करून दाखवण्यासाठी प्रयत्न करायचे असतात त्या वयात हे तरुण बलात्कारांसारख्या प्रकारांकडे वळणे हे भारतासाठी निश्‍चितच चिंताजनक आहे. ही केवळ देहलीतील आकडेवारी आहे. एकूण देशातील आकडेवारी जर गोळा केली, तर ती निश्‍चित सहस्रोमध्ये जाईल.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn