Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आज नवरात्रोत्सवारंभ (घटस्थापना)

एका मतानुसार नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण कमी करण्यासाठी तमोगुणी महाकालीची, पुढील तीन दिवस रजोगुण वाढवण्यासाठी रजोगुणी महालक्ष्मीची आणि शेवटचे तीन दिवस साधना तीव्र होण्यासाठी सत्त्वगुणी महासरस्वतीची पूजा करतात.         
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ शक्ती) 
नवरात्र विषयक माहितीसाठी संकेतस्थळावरील मार्गिका

सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर राष्ट्रप्रेमींनी ओतली शाई !

राष्ट्रभक्तीचा खरा आविष्कार केवळ शिवसेनाच दाखवू शकते, असे म्हणतात, ते यामुळेच !
शिवसेनेच्या प्रखर विरोधानंतरही पाकचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद महमूद कसौरी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
मुंबई  - पाकचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद महमूद कसौरी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करायला निघालेले ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी यांना काळ्या शाईने अंघोळ घालून शिवसैनिकांनी त्यांचा निषेध नोंदवला. १२ ऑक्टोबर या दिवशी सकाळी सुधींद्र त्यांच्या निवासस्थानाबाहेर पडले असता ही घटना घडली. (शिवसेनेने वारंवार चेतावणी देऊनही सुधींद्र कुळकर्णी यांनी शत्रूराष्ट्र पाकच्या माजी परराष्ट्रमंत्र्यांच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम ठेवण्याचा चंग बांधला होता. याच खुर्शीद यांच्याकाळात भारतावर पाकने सर्वाधिक आक्रमणे केली, एवढेच नव्हे तर ३ रे युद्धही छेडले. पाकच्या कुठल्याही नेत्याची नीती ही भारतद्वेषीच असणार, हे कोणी वेगळे सांगायला हवे का ? अशा राष्ट्रविघातकांचा कार्यक्रम भारतात होतांना पहाणे कोणत्या खर्या  राष्ट्रप्रेमीला रुचेल ? - संपादक) 

कसाबपेक्षाही सुधींद्र कुलकर्णी यांच्यासारखे पाकचे हस्तक भयानक ! - संजय राऊत

पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या प्रखर विरोधाचा पुनरुच्चार आणि कसौरींच्या भारतद्वेषाचे पुरावे सादर !
मुंबई - भारतद्वेषी खुर्शीद कसौरी आणि त्यांना आमंत्रित करणारे पाकचे एजंट सुधींद्र कुलकर्णी हे देशद्रोही आहेत कि नाही, हे ठरवावे आणि त्यांना कार्यक्रम करू देण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनीच या कार्यक्रमात हस्तक्षेप करावा. सुधींद्र कुलकर्णी हे पाकचे एजंट (हस्तक) आहेत. एकवेळ कसाब परवडला. त्याला मारता तरी आले; मात्र सुधींद्र कुलकर्णी यांच्यासारखे एजंट हे त्याच्यापेक्षाही भयानक आहेत. कार्यक्रमात भारतविरोधी भूमिकेला थारा देणार नाही, तशी वक्तव्ये होऊ देणार नाही, हा मुख्यमंत्र्याचा शब्द होता. तो त्यांनी खरा करावा, अशी भूमिका संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मांडली. श्री. राऊत यांनी पत्रकार परिषदेत कसौरी यांच्या भारतद्वेषाचे काही पुरावे सादर केले. 

आय.एस्.आय.एस्.च्या आतंकवाद्यांपासून उत्तरप्रदेशातील सहारनपूरला सर्वाधिक धोका

  • हिंदूंनो, उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षाच्या हाती सत्ता दिल्याने तुम्हाला असे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत !
  • हिंदूंनो, आय.एस्.आय.एस्.च्या माध्यमातून आतंकवाद तुमच्या दाराशी येऊन पोहोचला असल्याने त्याला सामोरे जाण्यासाठी तुम्ही काय सिद्धता केली आहे ?
     नवी देहली - देहलीत आय.एस्.आय.एस्.शी संबंधित एक संशयित आतंकवादी पकडल्यानंतर आणि तो उत्तरप्रदेशातील सहारनपूर येथे सक्रीय होता, हे लक्षात घेता सहारनपूर येथील पोलिसांसह गुप्तचर विभागही सतर्क झाला आहे.
    सहारनपूर येथे जैश-ए-महंमद, लष्कर-ए-तोयबा आणि इंडियन मुजाहिदीन यांसारख्या आतंकवादी संघटनांच्या संशयित हालचाली समोर आल्या आहेत. अशा परिस्थितीत देहलीमध्ये पकडल्या गेलेल्या संशयित आतंकवाद्याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीवरून पुढील स्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. सहारनपूर जिल्हा आतंकवादी संघटनांच्या स्लीपर सेलच्या सक्रीयतेसाठीही चर्चेत राहिला आहे.

गुजराती लेखक अनिल जोशी आणि गुलाम नबी खयाल यांच्याकडून साहित्य अकादमी पुरस्कार परत !

शिखांचे काँग्रेसवाल्यांनी केलेले शिरकाण, काश्मीरमधील हिंदूंचे शिरकाण, गोध्रा येथे कारसेवकांवर आक्रमण, धर्मांध आतंकवाद्यांचे देशावरील आक्रमण, ८४ वर्षीय स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांची ख्रिस्ती मिशनर्यांनी केलेली हत्या या घटनांच्या वेळी यातील एकाही लेखकाला निधर्मीपणाची उबग का आली नाही ? त्यांना केवळ कलबुर्गींच्या हत्येचे निमित्त सापडते; मात्र सतीश शेट्टींची हत्या झाली, तेव्हा यांनी काय केले ? देशात अल्पसंख्य असुरक्षित आहेत म्हणणारे साहित्यिक 'देशातील बहुसंख्य हिंदू सुरक्षित आहेत', असे विश्वासपूर्वक सांगू शकतात का ?
मुंबई - देशातील अल्पसंख्यांकांना येथे असुरक्षित आणि धोकादायक वाटत असूून त्यांचे भवितव्य अंधारात असल्याचे त्यांना वाटते, असे सांगत काश्मिरी लेखक आणि कवी गुलाम नबी खयाल यांनी त्यांचा साहित्य अकादमीचा पुरस्कार परत केला आहे. त्याचप्रमाणे गुजराती लेखक अनिल जोशी यांनीही त्यांचा पुरस्कार परत केला आहे.  या वेळी पुरस्काराची रक्कम आणि तांब्याचे पदक आपण लवकरच परत करणार असल्याचेही खयाल यांनी स्पष्ट केले. 

रामनाथी येथील सनातनविरोधी सभेला अत्यल्प प्रतिसाद !

यापुढे नायलॉन ६,६ प्रमाणे हिंसक आंदोलन करणार ! - सौरभ लोटलीकर यांची सनातनला धमकी
 नायलॉन ६,६ आंदोलन काय आहे ? 
काही वर्षांपूर्वी नायलॉन ६,६ नावाचे आस्थापन सावईवेरे गावात उद्योग चालू करणार होते. त्यामुळे प्रदूषण होणार म्हणून त्याला विरोध दर्शवण्यासाठी ग्रामस्थांनी उभारलेल्या आंदोलनाला नंतर हिंसक वळण लागले होते. त्यात एकाचा मृत्यूही झाला होता.
अशा प्रकारचे आंदोलन करण्याची चेतावणी सौरभ लोटलीकर यांनी दिली आहे.
  • ध्वनीक्षेपक यंत्रणा पोलिसांनी बंद केली
  • पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

रामनाथी, १२ ऑक्टोबर (वार्ता.) - आम्हाला सभेला अनुमती देण्यास अन् ध्वनीयंत्रणा वापरण्यास अटकाव केला जातो आणि सनातनला हे (शिवी देऊन) ध्वनीक्षेपक देतात. यापुढे मोर्चा होणार नाही, सभा होणार नाही, तर 'नायलॉन ६,६' प्रमाणे हिंसक आंदोलन करणार, अशी धमकी रामनाथ युवा संघाचे अध्यक्ष सौरभ लोटलीकर यांनी सभेत दिली. सनातन संस्थेवर बंदी घालावी आणि सनातन संस्थेचा रामनाथी (गोवा) येथील आश्रम बंद करावा, या मागणीसाठी रामनाथ युवा संघाचे अध्यक्ष सौरभ लोटलीकर यांनी ११ ऑक्टोबर या दिवशी अट्टाहासाने भरवलेल्या सभेला ग्रामस्थांचा अत्यल्प प्रतिसाद लाभला. 

हिंदुद्वेषापोटी सनातन संस्थेला बळीचा बकरा करू नये ! - देहली येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात हिंदुत्ववाद्यांची मागणी

  • स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद यांच्यावर लाठीमार करणार्‍या उत्तरप्रदेश पोलिसांवर त्वरित कारवाई करा !
देहली येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलन
    देहली, १२ ऑक्टोबर - कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी केंद्रशासनाने पुरोगाम्यांच्या दबावाला बळी पडून राष्ट्रप्रेमी सनातन संस्थेला बळीचा बकरा करू नये, तसेच स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद यांच्यासह लहान बटूंवर लाठीमार करणार्‍या उत्तरप्रदेश पोलिसांवर त्वरीत कारवाई करून उत्तरप्रदेश शासनाला स्पष्टीकरण मागावे, या मागण्यांसाठी ११ ऑक्टोबर या दिवशी देहली येथील जंतरमंतर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हिंदु जनजागृती समिती, वैदिक उपासना पीठ, संत आसारामजी बापू सेवा समिती, विश्‍व हिंदु परिषद, हिंदु सेना, हिंदु लीगल सेल, गोरक्षा दल आणि सनातन संस्था यांचे कार्यकर्ते आणि स्वामी अविमुक्तेश्‍वरानंदजी यांचे अनुयायी यांनी सहभाग घेतला. 

'अभिनव भारत'च्या अध्यक्षा हिमानीताई सावरकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

पुणे, १२ ऑक्टोबर (वार्ता.) - स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नातसून, तसेच हिंदु महासभा आणि अभिनव भारत या संघटनांच्या राष्ट्रीय अध्यक्षा हिंदु रणरागिणी श्रीमती हिमानीताई सावरकर (वय ६८ वर्षे) यांचे ११ ऑक्टोबर या दिवशी पुणे येथे त्यांच्या घरी देहावसान झाले. १२ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 
भाजपच्या आमदार प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी, हिंदुत्ववादी श्री. विद्याधर नारगोलकर, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. सुरेंद्र महाजन आदी अनेक हिंदुत्ववादी आणि मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट आणि सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी सकाळी हिमानीताईंच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. 

ऋषीमुनींनी कधीच गोमांस खाल्ले नाही ! - महंत ज्ञानदास महाराज, अध्यक्ष, अखिल भारतीय आखाडा परिषद

 महंत ज्ञानदास महाराज
     अयोध्या (उत्तरप्रदेश) प्राचीन काळी ऋषीमुनींनी गोमांस खाल्ल्याचा कुठलाही दाखला कोणत्याही अधिकृत धर्मग्रंथात नाही. त्यामुळे हा दावा अत्यंत खोटा आहे. राष्ट्रीय जनता दल पक्षाचे नेते, तसेच माजी केंद्रीयमंत्री रघुवंश प्रसाद यादव यांनी ऋषीमुनींनीही प्राचीन काळी गोमांस खाल्ले आहे, असे विधान नुकतेच केले होते. यादव यांनी केलेल्या या विधानावर महंत ज्ञानदास महाराज यांनी तीव्र आक्षेप घेतला. सत्तेसाठी रघुवंश यादव यांच्यासारखे नेते कितीही खालच्या पातळीला जाऊ शकतात, असे महंत ज्ञानदास महाराज यांनी सांगितले. (सत्तेसाठी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी विधाने करणार्‍यांवर कठोर कारवाई करायला हवी. समाजात अस्थिरता, अशांतता निर्माण करण्यास असे राज्यकर्तेच उत्तरदायी नाहीत का ? संपादक)

पाकिस्तानमधील माहिती अधिकार कायद्यातून हिंदूंना वगळले !

     इस्लामाबाद - पाकिस्तानातील हिंदूंनी त्यांना माहिती अधिकार कायद्यातून वगळल्याविरुद्ध खैबर पख्तुन्ख्वा येथील प्रेस क्लब समोर निदर्शने केली. या निदर्शनाचे आयोजन पाकिस्तानातील हिंदु हक्क परिषदेने केले होते. पाकिस्तानात नुकताच माहिती अधिकार कायदा पारित करण्यात आला; मात्र त्यातून माहिती मागण्याच्या संदर्भात हिंदूंना वगळण्यात आले आहे. पाकिस्तानातील हिंदु हक्क परिषदेचे अध्यक्ष हरून सरब दियाल यांनी हिंदूंना माहिती अधिकार कायद्यातून वगळून त्यांना सामाजिक आणि राजकीय हक्कांपासून बाधित करण्यात आले आहे, असे म्हटले आहे.

देशात रहायचे असेल, तर रशियाच्या नागरिकांप्रमाणे रहा, अन्यथा चालते व्हा !

राष्ट्राच्या सुरक्षेला प्राधान्य कसे द्यावे, हे भारताने रशियाकडून शिकावे !
रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची मुसलमानांना चेतावणी
      मॉस्को (रशिया) - रशियामध्ये रहायचे असल्यास रशियाच्या नागरिकांप्रमाणे राहिले पाहिजे, रशियन भाषा बोलली पाहिजे. रशियाच्या कायद्याचा आदर केला पाहिजे. ते शरियत कायद्याला प्राधान्य देत असतील, मुसलमानांप्रमाणे जीवन जगत असतील, तर आमचा त्यांना सल्ला आहे की, त्यांनी हा देश सोडावा आणि इस्लाम राष्ट्रामध्ये जावे, अशी स्पष्ट चेतावणी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी रशियातील मुसलमानांना दिली आहे. दंगलखोर मुसलमानांमुळे रशियामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर देशाच्या संसदेला (दुमा) संबोधित करतांना त्यांनी ही चेतावणी दिली. पुतीन दुमामधील सर्व राजकारण्यांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्यांच्या भाषणाचे स्वागत केले.

समस्त हिदुत्ववादी संघटना सनातन संस्थेला खंबीर पाठिंबा देणार !

फोंडा (गोवा) आणि सावंतवाडी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे हिंदुत्ववादी 
संघटनांचा राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे निर्धार
गांधी चौक, सावंतवाडी येथे आंदोलन करतांना राष्ट्र अन् धर्मप्रेमी हिंदू
       फोंडा / सावंतवाडी - कॉ. पानसरे हत्या प्रकरणी पोलिसांकडून चौकशी चालू आहे; मात्र हिंदूविरोधी शक्ती, पुरोगामी मंडळी आणि राजकीय पक्ष यांनी पोलिसांची चौकशी अन् न्याययंत्रणेचे न्यायदान होण्याआधी सनातनवर बंदी घालण्याची मागणी करण्यास प्रारंभ केला आहे. राष्ट्रप्रेमी सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीच्या विरोधात शासनाच्या वतीने ठोस भूमिका घेण्यात यावी, काले येथील फार्ममध्ये स्ट्रे कॅटल मॅनेजमेंट योजना राबवणे बंद करावे, तसेच स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद यांच्यासह लहान बालकांवर लाठीमार करणार्‍या उत्तर प्रदेश पोलिसांवर केंद्रशासनाने त्वरित कारवाई करावी आणि हिंदु संघटना अन् हिंदू संत यांना अपकीर्त करण्याचे षड्यंत्र रोखावे, या मागण्यांसाठी जुना बसस्थानक, फोंडा आणि गांधी चौक, सावंतवाडी येथे ११ ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.

सीमेवर ५५ कोटींचे हेरॉईन जप्त

     नवी देहली - पाकिस्तान सीमेवरील फिरोजपूर आणि अमृतसर क्षेत्रांत सीमा सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत ११ किलो हेरॉइन जप्त केले असून त्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ५५ कोटी रुपये आहे. सीमा सुरक्षा दलाच्या अधिकार्‍यांनी त्याला दुजोरा दिला आहे. अट्टारी सीमेवरील मोरान छावणीनजीक एका शेतात हेरॉइनची ९ पाकिटे सापडली. पाकिस्तानने राजताल या गावात हेरॉइन पाठवले होते. (पाकिस्तानचे अमली पदार्थांच्या माध्यमातून भारतीय तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे षड्यंत्र जाणा ! - संपादक)

काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदाच्या निषेधार्थ पुरस्कार परत का केले नाहीत ? - अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

डावीकडून श्री. विजय गावडे, पू. (कु.) स्वाती खाडये, श्री. अभय वर्तक, श्री. सुनील घनवट
पुरोगाम्यांच्या हत्यांनंतर साहित्य पुरस्कार परत करणार्या साहित्यिकांना रोखठोक प्रश्न
 पुणे, १२ ऑक्टोबर (वार्ता.) - कॉ. पानसरे, डॉ. दाभोलकर आणि कलबुर्गी यांच्या हत्यांचे कारण पुढे करून तथाकथित पुरोगामी साहित्यिक त्यांचे पुरस्कार परत करत आहेत; मात्र ज्या वेळी काश्मीरमध्ये हिंदूंचे शिरकाण झाले, तेव्हा त्या निषेधार्थ पुरस्कार परत करावेत, असा विचार या साहित्यिकांच्या मनात का आला नाही ? हिंदूंच्या जिवापेक्षा पुरोगाम्यांच्या जिवाचे मूल्य अधिक आहे का ? ही तथाकथित पुरोगामी साहित्यिकांची दुटप्पी नीती आहे. ती निषेधार्ह आहे, असे रोखठोक प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी केले. १२ ऑक्टोबर या दिवशी येथील श्रमिक पत्रकार संघात आयोजित    पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी सनातनच्या पू. (कु.) स्वाती खाडये, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक श्री. सुनील घनवट, पतित पावन संघटनेचे श्री. विजय गावडे उपस्थित होते. श्री. वर्तक यांनी सनातनविरोधी अपप्रचार रोखण्यासाठी चालू करण्यात आलेल्या जनसंपर्क अभियानाची माहिती दिली. या वेळी विविध वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्या यांचे ३१ प्रतिनिधी उपस्थित होते. 

खडक गल्ली दंगलीची न्यायालयीन चौकशी करावी ! - विविध संघटनांची मागणी

पोलीस अधिकार्‍याला निवेदन देतांना विविध संघटनांचे पदाधिकारी
     बेळगाव - सततच्या जातीय दंगलीमुळे बेळगावकर भयभयीत झाले आहेत. सामान्य माणूस अशांततेच्या वातावणात वावरत आहे. खडक गल्ली येथे ८ दिवसांपूर्वी झालेल्या जातीय दंगलीची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे. दंगल आटोक्यात आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार्‍या रमेश गोकाक यांच्यावरील निलंबनाची कारवाई रहित करून त्यांना सन्मानाने सेवेत रुजू करून घ्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. (न्याय हक्क मागणीसाठी संघटित होणार्‍या विविध संघटनांचे अभिनंदन ! इतरांवर होणार्‍या अन्यायाच्या विरोधात संघटनांनी असा लढा दिल्यास धर्मद्रोह्यांच्या कारवायांना वचक बसेल ! - संपादक) 

पोलीस निरीक्षक रमेश गोकाक यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घ्या ! - बेळगाव अधिवक्ता संघटनेची मागणी

      बेळगाव - मार्केटचे निष्पाप पोलीस निरीक्षक रमेश गोकाक यांच्यावर केलेली निलंबनाची कारवाई त्वरित मागे घ्यावी आणि पोलिसांवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी ९ ऑक्टोबर या दिवशी बेळगाव बार असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, 'गोकाक यांच्यावर केवळ राजकीय दबावातून कारवाई केली गेली आहे. ही कारवाई त्वरित मागे घ्यावी'.

राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम जागृत करणार्‍या श्री दुर्गामाता दौडीत सहभागी व्हा ! - श्री शिवप्रतिष्ठान

      सांगली, १२ ऑक्टोबर (वार्ता.) - छत्रपती शिवाजी महाराज क्षणाचाही विसावा न घेता केवळ हिंदु धर्म आणि हिंदु समाज यांसाठी लढले. देश आणि धर्म यांसाठी मुसलमान सत्ताधिशांशी शेकडो वेळा रणसंग्राम केला. शिवछत्रपतींच्या रक्तातील धर्मविषयक पोटतिडकी त्यांच्या दौडण्यातून आणि झगडण्यातून दिसून येते. तीच वृत्ती आजच्या तरुणांमध्ये येण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठानच्या श्री दुर्गामाता दौड आयोजित करण्यात येते. अशा राष्ट्र आणि धर्मप्रेम जागृत करणार्‍या दौडीत सहभागी व्हा, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. 

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या श्री दुर्गामाता दौडीला आजपासून प्रारंभ ! - सतीश ओतारी

     सातारा, १२ ऑक्टोबर (वार्ता.) - छत्रपती शिवाजी महाराजांनी ५० वर्षांच्या जीवनात देव, देश आणि धर्म यांसाठी शेकडो रणसंग्राम केले. एका क्षणाचीही उसंत न घेता ते अखंड दौडले, लढले, झगडले. त्यांच्या रक्तातील उकळी, आग, रग, धग त्यांच्या जीवनाच्या रणसंग्राममय जीवनात प्रतिक्षण जाणवतो. त्यांच्या रक्तातील ती पोटतिडीक, तळमळ त्यांच्या दौडण्यातून आणि झगडण्यातून दिसून येते. तीच वृत्ती आजच्या तरुण पिढीच्या रक्तात येणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने संपूर्ण सातारा जिल्ह्यात श्री दुर्गामाता दौडीला १३ ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे, अशी माहिती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख श्री. सतीश ओतारी यांनी दिली. 

सोलापूर येथील निषेध मोर्च्यातील वैशिष्ट्यपूर्ण घटना

      सोलापूर येथे ११ ऑक्टोबर या दिवशी सनातनवरील संभाव्य बंदीच्या विरोधात निषेध मोर्च्या काढण्यात आला. त्यातील वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी पुढीलप्रमाणे आहेत.
१. या फेरीत ह.भ.प. वीर महाराज आणि ह.भ.प. तुनतुने महाराज यांच्यासोबत ३० बाल वारकरी सहभागी झाले होते.
२. ज्यांना मोर्च्यात सहभागी होण्याचा निरोप दिला होता; मात्र काही अडचणींमुळे मोर्च्यात सहभागी होऊ शकले नाहीत, अशा धर्माभिमान्यांनी वृत्तवाहिनी आणि वर्तमानपत्रातील बातम्या पाहून समितीच्या अन् सनातनच्या साधकांचे कौतुक करून सहभागी होऊ न शकल्याविषयी खंत व्यक्त केली.

नटराज मंदिरात श्री शारदीय नवरात्रोत्सवाचे आयोजन

     सातारा, १२ ऑक्टोबर (वार्ता.) - १३ ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबर २०१५ या कालावधीत येथील नटराज मंदिरात श्री शारदीय नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती नटराज मंदिराजे वेदमूर्ती श्री. जगदीश भट यांनी दिली. 
     श्री शारदीय नवरात्रोत्सवामध्ये श्री दुर्गा सप्तशती पारायण, ललिता सहस्रनामार्चन, सुवासिनींची पूजा, सौंदर्यलहरी पारायण, संण्डिहोम, दीपपूजन होणार आहे. तरी सातारा आणि पंचक्रोशीतील अधिकाधिक शिवभक्तांनी या आध्यात्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

मुंबईवर आतंकवादी आक्रमणाचे सावट

     मुंबई - मुंबईत ३ आतंकवादी घुसले असल्याची माहिती मिळाली आहे. काही संशयित आतंकवादी ऊर्दूमिश्रित पंजाबीमध्ये बोलत असतांना एका रिक्शाचालकाने त्यांचा संवाद ऐकला. ते म्हणत होते, काम होनेको बाद फॅमिली को संभालना पडेगा । कसाब (२६/११ च्या आक्रमणातील आतंकवादी) की फॅमिली को भी संभाल रहे हैं ना ।

फलक प्रसिद्धीकरता

साहित्यिकांना अल्पसंख्यांकांचा आलेला पुळका ! 
     दादरी प्रकरणानंतर अल्पसंख्यांक असुरक्षित असल्याचा कांगावा करत देशातील १५ हून अधिक साहित्यिकांनी त्यांना मिळालेला प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी पुरस्कार परत केला.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! dadri ke nampar abtak15 se adhik sahittikone Sahitya akadami puraskar vapas kiye. 
Kashmirme sahastro Hinduoki hatyae hui tab ye sahittik kaha the ?
जागो ! दादरी के नामपर अबतक १५ से अधिक साहित्यिकोने साहित्य अकादमी पुरस्कार वापस किये. 
कश्मीरमें सहस्रो हिंदूआेंकी हत्याए हुयी, तब ये साहित्यिक कहा थे ?

सनातनवर मिथ्यारोप करणार्‍यांचा पंढरपूर येथील विश्‍वप्रार्थना साधक मंडळाकडून निषेध

     पंढरपूर - येथील विश्‍वप्रार्थना साधक मंडळाने सनातन प्रभातच्या संपादकांना मंडळाच्या सदस्यांनी स्वाक्षर्‍या केलेले आणि सनातन संस्थेस पाठिंबा देणारे अन् विरोधकांचे निषेध करणारे पत्र पाठवले आहे. या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, सनातन संस्था समाजात अनेक वर्षांपासून अखिल मानव समाजात शुद्ध ज्ञान, ईश्‍वर भक्ती, उपासना आणि अध्यात्म-विज्ञान यांतील सत्य आणि उपयुक्त ज्ञान यांचे शिक्षण देत आहे. समाजातील काही लोकांच्या दूषित दृष्टीमुळे सनातनसारख्या आध्यात्मिक संस्थेवर मिथ्यारोप होत आहेत. तरी सनातन संस्थेवर चुकीचे आरोप करणार्‍यांचा आणि अशा प्रकारच्या अज्ञानजनांचा आम्ही समस्त विश्‍वप्रार्थना साधक मंडळ निषेध करतो. हिंदु धर्मासाठी कार्य करणार्‍या सनातन संस्थेला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे.

हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने सनातनवरील संभाव्य बंदीच्या विरोधात जिल्हाधिकार्‍यांंना निवेदन

मोर्च्यानंतर घोषणा देण्यासाठी जमलेले हिंदुत्ववादी
     सोलापूर, १२ ऑक्टोबर (वार्ता.) - कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पोलीस यंत्रणेने कोणत्याही दबावास बळी न पडता चौकशी करावी, तसेच राष्ट्रप्रेमी सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीच्या विरोधात ठोस भूमिका घ्यावी, या मागणीसाठी सोलापूर येथे ११ ऑक्टोबर २०१५ या दिवशी दुपारी ४ ते ६ या वेळेत मोर्चा काढण्यात आला होता. याविषयीचे निवेदन आज दुपारी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी सौ. रेश्मा माळी यांनी निवेदन स्वीकारले.

हिंदुत्वाविषयी सडेतोड विचार मांडून सावरकर आडनाव सार्थ करणार्‍या हिमानी सावरकर यांचा समस्त हिंदूंना अभिमान वाटतो !

श्रीमती हिमानी सावरकर यांचे जाज्वल्य विचार !
श्रीमती हिमानी सावरकर
     देशात हिंदूंकडून बॉम्बस्फोट होत असतील, तर ती इस्लामी आतंकवादाच्या विरोधातील हिंदूंची प्रतिक्रियाच आहे. हिंदूंना तुम्ही आतंकवादी म्हणणार असाल, तर स्वातंत्र्यलढ्यातील सशस्त्र क्रांतीकारकांनाही तुम्हाला आतंकवादी म्हणावे लागेल. यापुढे हिंदू शिवाजी महाराज आणि क्रांतीकारक यांच्या इतिहासातून धडे घेऊन कार्य करतील. (३०.१०.२००८)) 
    हे हिंदु राष्ट्र घोषित करा अन्यथा सर्व देशभक्त हिंदूंना कापून टाका त्यामुळे एकतर अखंड हिंदुस्थान निर्माण होईल अन्यथा अखंड पाकिस्तान निर्माण होईल ! (२९.११.२००८) 
     मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात मी माझ्या कार्यकर्त्यांची बाजू मांडणार नाही का ? राष्ट्र आणि धर्म यांवर प्रेम करणे, हा अपराध असेल, तर मला जरूर अटक करा. गृहमंत्री श्री. रा.रा. पाटील यांनीही म्हटले होते की, गोळीचे प्रत्युत्तर गोळीने देऊ. त्यांनाही अटक करा. आम्हाला बॉम्बस्फोट करायचेच असते, तर आम्ही ते पाकिस्तानात केले असते.
- श्रीमती हिमानी सावरकर, राष्ट्रीय अध्यक्षा, अभिनव भारत.

श्रीमती हिमानी सावरकर यांनी सनातन संस्था, सनातन प्रभात आणि सनातनचे साधक यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार !

श्रीमती हिमानीताई आणि सनातन यांच्यातील जिव्हाळा !
    अडचणीत असलेल्या हिंदूंना साहाय्य करणे, हा सनातन संस्थेचा बाणा आहे. संस्था समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी अहोरात्र कार्यरत असते. खर्‍या अर्थाने ही हिंदूंची संस्था आहे. (१८.११.२००९) 
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा दिशादर्शक 
सनातन प्रभात !
१. सनातन प्रभातमधील प्रत्येक वृत्ताखाली असलेले संपादकीय मत अन्य वृत्तपत्रांत नसते. या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्ताशी आम्ही सहमत आहोत असे नाही, असे सनातन प्रभात सांगत नाही, तर प्रत्येक मताविषयी सनातन प्रभातने ठाम आणि स्वच्छ भूमिका घेतली आहे. 

इथे पुण्य दुर्दैवी अन् पाप भाग्यशाली । अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली ॥

हिंदू आणि राष्ट्रभक्त यांना प्रेरित करणारे श्रीमती हिमानी सावरकर यांचे विचार 
श्रीमती हिमानी सावरकर
      अभिनव भारतच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती हिमानीताई सावरकर यांचे ११ ऑक्टोबर या दिवशी पुणे येथे निधन झाले. वर्ष १९४७ मध्ये जन्म झाल्यानंतर नथुराम गोडसे यांची पुतणी ओळखल्या जाऊ लागलेल्या हिमानीताई पुढे प्रखर हिंदुत्ववादी सावरकर घराण्याच्या सूनबाई झाल्या. त्यांचे पूर्ण आयुष्य त्या हिंदुत्वासाठी जगल्या. एक महिला असूनही एखाद्या रणझुंजार योद्ध्याप्रमाणे त्या धर्मद्रोह्यांवर हल्लाबोल चढवत असत. हिंदूविरोधकांकडून होणार्‍या भगव्या आतंकवादाच्या टीकेला प्रथम प्रत्युत्तर श्रीमती हिमानीताईंनी दिले, हे सांगतांना अभिमान वाटतो. 

मंदिरांच्या रक्षणाचे काय ?

    महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांच्या साहाय्यासाठी १ कोटी रुपये देण्याचा पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने निर्णय नुकताच घेतला. निधी देण्यासाठी घेण्यात येणार्‍या बैठकीस देखावा नाही, तर अजून काय म्हणावे ? हिंदूंच्या मंदिरांत जमा होणारी संपत्ती, दागिने यांवर नास्तिकांचा डोळा असल्याने ते नेहमीच मंदिरांत जमा होणार्‍या अर्पणाविषयी सतत बोलत असतात. 

भारतीय स्त्री - कोण होतीस तू, काय झालीस तू ?

       प्राचीन इतिहासात भारतीय स्त्रियांना बरोबरीचे स्थान दिले गेल्याने वेद निर्मितीपासून राज्यकर्त्यांमध्ये महिलांची नावे कर्तृत्वाने झळकलेली आहेत; मात्र बाराव्या शतकानंतर भारतात इस्लामी आक्रमकांची सुमारे ६०० वर्षे राजवट राहिल्याने त्या काळात स्त्रियांच्या मोकळेपणावर बंधने आली. आज ३ टक्के आधुनिक भारतीय स्त्रिया करिअरप्रधान झाल्या असून बाकी स्त्रिया गृहिणीची भूमिका योग्य प्रकारे पार पाडत आहेत. त्यांच्यावरच आपली कुटुंबव्यवस्था आणि देश यांचे भविष्य अवलंबून आहे. त्यांना आपण यथोचित मान दिला पाहिजे. या लेखाचा काही भाग ९, १० आणि १२ ऑक्टोबर या दिवशी प्रसिद्ध करण्यात आला. आज त्या लेखाचा अंतिम भाग पाहूया.

हिंदु देवतांचे विडंबन करण्यास भाग पाडणारे कला महाविद्यालयांमध्ये दिले जाणारे धर्मद्रोही शिक्षण !

      मी २००१ मध्ये कला महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. पहिले काही दिवस मी मुंबई, महालक्ष्मी येथील एका कला महाविद्यालयामध्ये होते. मुळात हे महाविद्यालय ख्रिस्ती पंथीय असल्यामुळे तेथे हिंदु धर्माची शिकवण मिळणे कठीणच होते. या महाविद्यालयामध्ये पहिला धडाच धर्मविरोधी शिक्षण देणारा होता. आम्हाला एक इंच लांबी आणि एक इंच रुंंदीच्या चौकोनात एक चित्र काढायला सांगितले होते. त्यासाठी तीन विषय देण्यात आले होते. त्यामध्ये सूर्य, गणपति आणि चंद्र असे विषय होते. सूर्य आणि चंद्र यांवर फार काही करता येण्यासारखे नसल्यामुळे वर्गातील ९५ टक्के मुलींनी गणपति हा विषय घेतला. त्या वेळी धर्माच्या संदर्भात एवढे काही ठाऊक नव्हते. त्यामुळे मीही गणपती या विषयावर चित्रे काढली; परंतु आता कळते की, कलेच्या नावाखाली कला महाविद्यालयातील हिंदु मुलांकडून नकळत स्वतःच्या धर्माच्या संदर्भात विडंबनात्मक कृती करवून घेतली जाते. १०० चित्रांपैकी ५० चित्रांची निवड होणार होती; पण प्रत्येक जण आपले चित्र अधिक चांगले व्हावे, यासाठी हव्या त्या प्रकारे गणपतीचे विडंबन करण्यास सिद्ध होता आणि या संदर्भात मुलांना काहीच वाटत नव्हते, उलट आपण सिद्ध केलेली कलाकृती किती चांगली आहे, याचे त्यांना कौतुकच असते. या महाविद्यालयांमध्ये जीजस, क्रॉस, चांद-तारा असे विषय दिले गेले नाहीत ?, याचा कधी विचार केला आहे का? 

हिंदुस्थानात अनेक हिंदु राजे असले, तरी ते हिंदु राष्ट्र होते !

      काही विद्वान असे म्हणतात, संपूर्ण हिंदुस्थान कधीही एका राजसत्तेखाली नव्हता. येथे अनेक राज्ये आणि अनेक राजे होते. तेसुद्धा अनेक वेळा एकमेकांवर चढाया करीत. एकमेकांचे मुलूख जिंकून घेत. हा संपूर्ण देश एका सत्तेच्या हाती फक्त इंग्रजांच्या कारकीर्दीत आला आणि नंतर भारत स्वतंत्र झाल्यावर पाकिस्तान-विरहित संफूर्ण भारत एका छत्राखाली आला. काही अंशाने हे खरे असले, तरी या खंडप्राय देशातील देशांचे राजे हिंदू होते. ते हिंदु धर्म मानीत होते. त्यांची राज्ये हिंदुराजनीतीनुसार चालली होती. त्यांचे कायदे हिंदू कायदे होते. त्यांच्या सर्व परंपरा हिंदुत्वाधिष्ठित होत्या. ते राजे कायदे करीत नसत. कायदे कृतीत आणीत असत. तेथे विधीमंडळ (legislature) नव्हते, अंमलबजावणी (execution) होती. न्याययंत्रणा समान कायद्यांनी चालत होती. त्यामुळे जरी राजे आणि त्यांची राज्ये भिन्न असली, तरी ती राज्ये एकाच राज्यघटनेनुसार कारभार करीत. या अर्थाने हिंदु राष्ट्र्र एक होते. सध्या जगात इस्लामी कायद्यांनुसार चालणारे अनेक मुसलमानी देश आहेत. देश अनेक आहेत; पण त्यांचे कायदे ज्या मूलतत्त्वांवर आधारित आहेत ती एकच आहेत. 
- प्रा. सु.ग. शेवडे (भारतीय संस्कृती) वाहिन्यांच्या आततायीपणाचे लाभ !

        सुतावरून स्वर्ग गाठायला निघालेले पोलीस आता समीर गायकवाडच्या प्रकरणात सपशेल उताणे पडण्याच्या बेतात आहेत. डोंगर पोखरून येथेतर उंदीरही मिळेना, अशी त्यांची स्थिती झाली आहे. एकवेळ खरा खुनी नाही मिळाला, तरी चालेल; पण सनातन संस्था गोत्यात आली पाहिजे, हा एककलमी अजेंडा घेतलेले सर्व चॅनेलवीर सरसावले आणि महाराष्ट्राच्या काना कोपर्‍यात दबा धरून बसलेल्या पुरोगाम्यांच्या घोड्यावर स्वार होऊन सनातनवर स्वारी करायला निघाले; पण हाय रे दुर्दैव ! भ्रमणभाषवरील एक दोन संभाषणांव्यतिरिक्त अक्षेपार्ह असे काहीच न सापडल्याने साप समजून भुई थोपटली, अशी अवस्था पोलिसांची झाली. आता वेळ काढण्यासाठी ब्रेन मॅपिंग करा, नार्को करा, असा टाईमपास पोलसांनी चालू केलाय.
     हे हिंदुराष्ट्र घोषित करा अन्यथा सर्व देशभक्त हिंदूंना कापून टाका त्यामुळे एकतर अखंड हिंदुस्थान निर्माण होईल अन्यथा अखंड पाकिस्तान निर्माण होईल ! - श्रीमती हिमानी सावरकर, अध्यक्षा, अभिनव भारत.

नवरात्रोत्सवानंतर कुमारी मातांच्या गर्भपाताच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होणे

     अनेक पोलीस अधिकार्‍यांच्या म्हणण्याप्रमाणे गरब्याच्या निमित्ताने बाहेर असणारी मुले-मुली मद्यपान करून रात्रभर बाहेर फिरत असतात अन् रस्त्यावर गोंधळ घालतात. गरबा संपल्यानंतरही ती आपापल्या घरी न जाता रस्त्यावरच भटकत असतात. मुंबईत अन् गुजरातमध्ये नवरात्रोत्सवानंतर काही मासात कुमारी मातांच्या गर्भपाताच्या प्रकारांमध्ये लक्षणीय वाढ होते.

नवरात्रोत्सवातील गरब्याच्या दुष्परिणामाचे उदाहरण

     कल्याण (पश्‍चिम) येथील मिलिंदनगर परिसरात रहाणार्‍या संतोष वाघचौरे या तरुणाने गरबा नृत्य करतांना त्याच परिसरात रहाणार्‍या एका १७ वर्षीय मुलीशी मैत्री करून तिच्याशी प्रेमसंबंध जुळवले होते. १९.११.२००३ या दिवशी सायंकाळी ६ वाजता संतोष वाघचौरे याने या मुलीला एका रिक्शातून उल्हासनगर कॅम्प क्रमांक ५मध्ये रहात असलेल्या त्याच्या बहिणीच्या घरी नेले. तेथे थम्स अप मधून गुंगीचे औषध देऊन आरोपी वाघचौरे याने या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. शुद्धीवर येताच त्या मुलीला वेदना जाणवू लागल्या. आपल्यासंबंधी काहीतरी विपरीत प्रकार घडल्याचे लक्षात येताच या संपूर्ण प्रकाराची माहिती तिने कल्याण (प.), महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र मानधने यांना दिली. (लोकसत्ता, २२.११.२००३)
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे
      जग दुर्जनांच्या दुष्कृत्यांनी इतके पीडित नाही, जितके सज्जनांच्या निष्क्रीयतेने पीडित आहे. - स्वामी तद्रूपानंद सरस्वती

भाजपच्या राज्यात समाजकंटकांचे सनातन आश्रमावरील आक्रमणांचे घृणास्पद कृत्य चालूच !

शिवीगाळ करणे, धमक्या देणे, अश्‍लील बोलणे आणि दगडफेक करणे
या गोष्टी अदखलपात्र
ठरवणारे दंडविधान आणि पोलीस हिंदु राष्ट्रात नसतील !
      सनातनच्या रामनाथी आश्रमातील साधकांना धमक्या देण्याचा, अश्‍लील बोलण्याचा आणि आश्रमावर दगड फेकण्यास आरंभ केल्याचा कालचा ५ वर्षे ३२९ वा (२१५४ वा) दिवस !
११.१०.२०१५ रात्री १० वाजून ४५ मिनिटांनी दुचाकीवरून काही युवक आश्रमासमोरून बॉम्ब बॉम्ब म्हणून ओरडत गेले.
हिंदु राष्ट्रात हे दखलपात्र अपराध असतील !

पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना कोल्हापूर येथील श्री. संजय माने यांनी दिलेले कृतज्ञतापत्र

      कोल्हापूर येथील श्री. संजय माने यांनी पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना पाठवलेल्या कृतज्ञतापत्रातील पृष्ठ १ ते ५ वरील लिखाण येथे देत आहोत.
१. शुभेच्छापत्राचे मुखपृष्ठ
     पू. बिंदाताईंना सर्व साधकांचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

२. शुभेच्छापत्राचे पृष्ठ क्र. २
पू. बिंदाईचा वात्सल्यभाव !
घेईल कुशीत सर्व समष्टीला ।
देईल मातृप्रेम सर्व जिवांना ॥ १ ॥
आम्ही सर्व जिवांनी अनुभवले आहे ।
तुझ्या वात्सल्यभावाला ।
तू कुशीत घेतलेस वैभवी नावाच्या जिवाला ।
तुझे आशीर्वादरूपी हात ।
तू डोक्यावरून फिरवतेस बालसाधकांच्या ॥ २ ॥

पू. (सौ.) बिंदाताईंच्या वाढदिवसानिमित्त दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध झालेले लिखाण वाचून पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांची शब्दसुमने !

पू. (सौ.) अंजली गाडगीळ
रामनाथी आश्रमाच्या पवित्र गुरुमंदिर शिखराच्या सर्वोच्च स्थानावरील
बिंदुरूपी मुकुटमणी म्हणजे आमच्या श्रद्धेय पू. (सौ.) बिंदाताई !
      रामनाथी आश्रम पू. बिंदाताईंविना अपूर्णच आहे. रामनाथी आश्रमाला परिपूर्णत्व प्राप्त करून देणारे आम्हा सर्व साधकांचे आणि संतांचे आदर्श असे श्रद्धास्थान म्हणजे पू. बिंदाताई !
     पू. बिंदाताईंच्या चरणी वाढदिवसानिमित्त सर्व साधकांचा आणि आम्हा सर्व संतांचा कोटी कोटी प्रणाम !
- (पू.) सौ. अंजली गाडगीळ, तिरुचिरापल्ली (त्रिची), तामिळनाडू. (१२.१०.२०१५)

पू. (सौ.) बिंदाताईंच्या भेटीनंतर साधकाला साधनेच्या स्थितीच्या संदर्भात जाणवलेले सकारात्मक पालट

१. सात मासांपासून (महिन्यांपासून) नकारात्मक विचार येऊन अस्वस्थ वाटणे
आणि पू. ताईंना ही समस्या सांगितल्यानंतर त्यांनी नामजप करण्यास सांगणे
    गेल्या ७ मासांपासून (महिन्यांपासून) माझी साधना होत नाही. व्यष्टी साधना होत नाही. सेवेत आणि साधनेतही रुची नाही, असे नकारात्मक विचार मनात येऊन मन पुष्कळ अस्वस्थ होत होते. नंतर २३.६.२०१५ या दिवशी पू. (सौ.) बिंदाताई यांना माझी समस्या सांगितली. तेव्हा त्यांनी सांगितले, तू ७ दिवस प्रतिदिन ३ घंटे नामजप कर.
२. पू. ताईंच्या भेटीनंतर जाणवलेले पालट
२ अ. सेवेतील आनंद आणि चैतन्य अनुभवता येणे : त्यानंतर मी  एका सेवेला गेलो. तेव्हा ७ मासांनंतर  मला प्रथम आनंद जाणवला. मला पुष्कळ चैतन्य मिळाल्याचे जाणवले, तसेच मन पुष्कळ हलके झाले, असे वाटले.

पू. (सौ.) बिंदाताईंनी घेतलेल्या सत्संगामुळे अंतर्मुखता वाढून प्रयत्नांना दिशा लाभल्याविषयी साधिकेने व्यक्त केलेली कृतज्ञता !

    फेब्रुवारी २०१५ मध्ये पू. (सौ.) बिंदाताई यांनी देवद आश्रमात स्वभावदोष आणि अहं निर्मूलनाचे गांभीर्य वाढण्यासाठी  सत्संग घेतला होता. त्या वेळी सर्वच साधकांमध्ये अंतर्मुखता येण्यास साहाय्य झाले. एका साधिकेने सत्संगामुळे झालेल्या लाभाविषयी दिलेली सूत्रे पुढे देत आहे.
१. पू. बिंदाताई आणि आश्रमातील अन्य
संत यांच्या उपस्थितीमुळे आत्मपरीक्षण होऊ लागणे
    सत्संगात साधकांना त्यांचे दोष सांगत असतांना यामधील कोणते दोष आपल्यात आहेत, याकडे लक्ष जात होते. दोष असलेल्या साधकांप्रमाणे आपल्याकडून कोणत्या अयोग्य कृती होतात, याचेही आत्मपरीक्षण केले जात होते. यामुळे त्या साधकांविषयी पूर्वग्रह निर्माण होण्याचा भाग पुष्कळ उणावल्याचे जाणवले. पू. बिंदाताईंच्या सत्संग घेण्याच्या आणि दृष्टीकोन देण्याच्या पद्धतीमुळेच हे घडू शकले. पू. बिंदाताई आणि आश्रमातील अन्य संत यांच्या उपस्थितीमुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाल्याने मनात सकारात्मकता जागृत राहिली आहे, असे जाणवले.

नवरात्रीचे व्रत आणि पूजन

नवरात्रीनिमित्त...
     १३ ऑक्टोबर पासून नवरात्री चालू होत असल्याने नवरात्रीच्या व्रताविषयीची माहिती येथे देत आहोत.
१. नवरात्रीचे व्रत आणि पूजन 
     नवरात्रारंभाच्या तिथीविषयी देवीपुराणात पुढील संदर्भ दिला आहे, 
     अमायुक्ता न कर्तव्या प्रतिपत्पूजने मम ।
     मुहूर्तमात्रा कर्तव्या द्वितीयादिगुणान्विता ॥ 
अर्थ : नवरात्रीचे व्रत आणि पूजन अमावास्यायुक्त प्रतिपदेस करू नये. अशा वेळी प्रतिपदायुक्त द्वितीयेस व्रताचा प्रारंभ आणि पूजन करणे श्रेयस्कर असते.

अवघ्या मानवजातीच्या उद्धारासाठी धडपडणार्‍या पू. (सौ.) बिंदाताईंच्या वाढदिनी असा साजरा झाला अद्वितीय भावसोहळा !

      १२.१०.२०१५ या दिवशी पू. बिंदाताईंचा वाढदिवस होता. त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आम्ही सर्वच जण आतुर झालो होतो. त्यांना दाखवण्यासाठी एक सुंदर संगणकीय शुभेच्छापत्र सिद्ध करून ठेवले होते. साधिका कु. मयुरी आगावणे हिने बनवलेली पारिजातकाची कागदी फुले पू. बिंदाताईंच्या खोलीतील पटलावरील परडीत सुरेख मांडणी करून ठेवली होती.
     पू. बिंदाताईंना डोळे भरून पहाण्यासाठी ती फुलेही जणूकाही आसुसली होती. पू. ताईंचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आम्ही त्यांच्या खोलीत गेलो आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीकृष्णाने घडवलेला भावसोहळा आम्हाला अनुभवायला मिळाला.

रामनाथी आश्रमातील व्यवस्थापन हे श्रीकृष्णाचे विश्‍वरूप असल्याची अनुभूती घेणार्‍या साधिकेने पू. (सौ.) बिंदाताईंना लिहिलेले पत्र

पू. सौ. बिंदाताई यांना,
अनेक साष्टांग नमस्कार.
    तुम्हाला सनातनच्या व्यवस्थापनाविषयी काय सांगू आणि काय नको ?, असे मला झाले आहे. व्यवस्थापनातील साधकांना पाहिल्यावर मन तृप्त होते. एवढ्या सेवांच्या अवाक्यात प्रत्येक सूत्र बारकाईने सोडवणे, ही खरीच कमाल आहे. पू. ताई, कुणाचे कौतुक करावे, तेच कळत नाही. १०० टक्के फलनिष्पत्ती सनातनच्या रामनाथी आश्रमात पहाता येईल. पू. ताई, तुम्ही हे दैवी कार्य पहाण्याची आणि अनुभवण्याची मला संधी दिलीत. हिंदु राष्ट्र कसे असेल ?, ते मी (सर्व साधक) प्रत्यक्ष अनुभवते. मला वाटते, व्यवस्थापन हे श्रीकृष्णाचे विश्‍वरूप आहे, जे साधकांच्या चुकांना गिळते, अहं नष्ट करून निर्मळता देते आणि साधकांची आध्यात्मिक उन्नती करून घेते. हे कार्य आश्रमापुरते मर्यादित नसून ते संपूर्ण ब्रह्मांड व्यापते आणि सर्व अशुद्धता नष्ट करते.
    जसे श्रीकृष्णाने अर्जुनाला महाभारताच्या वेळी विश्‍वरूप दाखवले, तेच दृश्य मला हे पत्र लिहितांना दिसत असून ते मी अनुभवत आहे. पू. ताई, कसे हो तुम्ही जादूची कांडी फिरविल्याप्रमाणे साधकांना घडवता ? मलाही घडवा ना ! आम्हा सर्व साधकांना घडवा. एक क्षणही वाया घालवायला नको, असे वाटते. गुरुकार्यात झिजावेसे वाटते.
तृप्त जीवन जगणारी,
सौ. नेहा प्रभु, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.६.२०१५)

पू. (सौ.) बिंदाताईंनी अपेक्षा करणे या अहंच्या पैलूची जाणीव करून दिल्यानंतर पत्राद्वारे खंत व्यक्त करून साधनेसाठी प्रीतीचा आधार मागणारी साधिका !

निरपेक्ष प्रेमाचा झरा असणार्‍या पू. बिंदाताईंना,
शिरसाष्टांग नमस्कार.
     पू. ताई, आपल्याला माझ्यातील अपेक्षा करणे या तीव्र अहंची जाणीव करून देण्यासाठी सेवेचा अमूल्य वेळ द्यावा लागला, याची मला अतिशय लाज आणि खंत वाटली. पतींनी साधना करावी, ही अपेक्षा म्हणून न वाटता माझे त्यांच्यावर असलेले प्रेम वाटले; परंतु ते प्रेम किती अपेक्षेचे होते, याची जाणीव आपण मला करून दिलेल्या निरपेक्ष प्रेमातून झाली. यातूनच अपेक्षा करणे या अहंच्या पैैलूवर मात करून श्रीकृष्णाच्या जवळ रहाण्यातील आनंद अनुभवायचे, असे ठरवले आहे. पू. ताई, मलाही असे निरपेक्ष प्रेेम करायला शिकायचे आहे. माझ्यातील असंख्य दोष आणि अहं घालवून श्रीकृष्णाच्या चरणी समर्पित व्हायचे आहे. शब्दांत असलेली माहिती कृतीत आणायची आहे. यासाठी पू. आई, मला तुझ्या या प्रीतीचा आधार आणि आशीर्वादही हवा आहे. तूच मजला गुुरुमाऊलींच्या चरणी समर्पित करणार आहेेस गं आई !

सर्वच साधकांची साधना सुलभरित्या होण्यासाठी ईश्‍वराने साधकांना दिलेली एक अनुपम भेट म्हणजे पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ !

श्री. शंकर नरुटे
१. सर्व गुणांचा समुच्चय
    सर्व बिंदू एकत्रित केल्यावर जसा एक गोळा सिद्ध होतो, तसे सर्व गुण एकत्र केल्यावर सर्व गुणांच्या समावेशक असलेल्या पू. (सौ.) बिंदाताई यांचेच नाव समोर येते.
२. सखोल अभ्यासामुळे आलेली अचूकता
    आश्रम स्तरावर कोणत्याही विभागाचे कोणत्याही स्तरावरील सूत्र असो किंवा देश-विदेशांतील प्रसारांतर्गत कोणतेही सूत्र असो, पू. ताईंचा सर्व सूत्रांचा बारकाव्यानिशी अभ्यास आहे आणि त्या सतत अभ्यासही करत असतात. त्यामुळे त्यांचा प्रत्येक निर्णय अचूकच असतो. त्या साधकांनाही अचूक सेवा करायला शिकवून सिद्ध करतात.

पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

१. सतत भावावस्थेत असल्याचे जाणवणे : पू. ताईंच्या बोलण्यात सतत भाव जाणवतो; म्हणून त्या भावावस्थेत आहेत, असे वाटते.
२. इतरांचा विचार करणे : माझ्याकडे पू. ताईंना जेवण आणि काढा देण्याचे दायित्व आहे. पू. ताईंचे जेवण-खाण पुष्कळ अल्प आहे. त्या रात्री जेवत नाहीत. एकदा त्यांना भूक लागली आणि त्यांनी मला बोलावून सांगितले, मला भूक लागली आहे. काही खायला आणून देतेस का ? मी हो म्हणाले आणि ताईंसाठी पाव भाजून त्यासमवेत भाजी दिली. त्या वेळी ताई म्हणाल्या, यापुढे पाव भाजू नकोस. त्यात तुझा वेळ जाईल.
३. त्या आमच्यावर आईची मायाही करतात आणि चुकल्यावर तेवढ्याच कठोरपणे आमच्या चुका सांगतात.
४. त्या प्रत्येक क्षण देवाचरणी अर्पण करतांना दिसतात.
५. पू. ताई प्रत्येक परिस्थितीमध्ये आनंद घेतात आणि तो इतरांना देतात.
    हे श्रीकृष्णा तू आम्हाला पू. ताईंसारखी समष्टी आई दिलीस; म्हणून तुझ्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !
- कु. अमृता मुद्गल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

साधना

६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती आंभोरेआजी (वय ८१ वर्षे)
यांना प्रेमभराने आलिंगन देतांना पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ

प्रत्येक सूत्राचा लय करणार्‍या (मुक्त करणार्‍या) पू. बिंदाताई !

    प्रत्येक सूत्र पू. बिंदाताईंकडे गेल्यावरच ते पूर्ण होते, अशी श्रद्धा सर्व साधकांच्या मनात निर्माण झाली आहे. पू. ताई प्रत्येक सूत्राचा पूर्ण अभ्यास करून ते सूत्र पूर्ण करतात. त्यामुळे ते १०० टक्के पूर्ण होते आणि नंतर त्याच्याकडे कधीच पहावे लागत नाही, म्हणजे त्याचा पूर्ण लय होतो. (शेवट होतो.) - श्री. शंकर नरुटे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (९.१०.२०१५)

पू. बिंदाताईंच्या नावाचा बालसाधिकेला समजलेला अर्थ

पू. - पूजनीय संत
बिं - बिंदाई
दा - दास्यभाव असणारी
ता - ताईसारखी माया करणारी
ई - ईश्‍वराची ती बिंदाई
- कु. अमृता मुद्गल (वय १२ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

देवाला अपेक्षित अशी सेवा करण्यासाठी अविश्रांत धडपडणार्‍या आणि अनेक गुणांची खाण असलेल्या सनातनच्या अष्टपैलू संतरत्न पू. (सौ.) बिंदाताई !

    ७ जून ते १ जुलै २०१५ या कालावधीत मी रामनाथी आश्रमात हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्रीय शिबिराच्या सेवेसाठी गेलो होतो. या कालावधीत पू. (सौ.) बिंदाताईंकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांच्यातील व्यष्टी-समष्टी गुण, तत्परता, इतरांचा विचार, इतरांना घडवण्याची तळमळ आदी गुणांचे निरीक्षण झाले. त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे देत आहे.
१. तत्परता आणि त्वरित उपाययोजना काढणे
१ अ. कोणत्याही प्रसंगात त्वरित चुकीच्या मुळाशी जाऊन उपाययोजना करणे : पू. ताई कोणत्याही प्रसंगात मूळ चुकीकडे त्वरित पोचतात आणि मूळ समस्येवरच उपाययोजना काढतात. एकदा आम्ही संगणकीय सेवा करत असतांना त्या आल्या. त्या वेळी आमची प्रार्थना होत नाही, हे त्यांच्या लक्षात आले. आम्हाला प्रार्थनेचे महत्त्व सांगतांना त्यांना त्या खोलीतील प्रार्थनेची आठवण करणार्‍या ध्वनीवर्धकावरून (स्पीकरवरून) हळू आवाज येतो, असे लक्षात आले. त्यांनी आवाज वाढवण्याची त्वरित सूचना दिली. यामुळे नित्यस्वरूपी आम्हाला प्रार्थनेची आठवण होत राहिली. आश्रमात कोणत्याच ठिकाणी कोणालाही अडचण येऊ नये, हा विचार करून स्थायी स्वरूपात उपाययोजना केली आहे, असे सर्वत्र दिसून येते.

वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

'सनातन पंचांग २०१६'ची मागणी लवकरात लवकर कळवून आपली प्रत आजच राखून ठेवावी ! 
     सनातन पंचांग केवळ पंचांग नव्हे, तर हिंदुत्वाचे सर्वांगच आहे. राष्ट्र-धर्म कार्यासाठी कृतीशील करणारे आणि धर्मशिक्षण देणारे प्रभावी माध्यम असणारे हे पंचांग जिज्ञासूंना साधनेसाठी अमूल्य मार्गदर्शनही करते. सनातन पंचांगाला सर्वच स्तरांवरून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत आहे. पंचांगाच्या संदर्भात समाजाकडून लाभणारा वाढता प्रतिसाद आणि अपुरी साधकसंख्या यांमुळे वर्ष २०१५ चे पंचांग काही जिज्ञासूंना वेळेत मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांनी 'वर्ष २०१५ चे सनातन पंचांग देण्यासाठी आमच्याकडे कोणीच आले नाही. आम्ही साधकांची वाट पहात होतो. या वर्षी आम्हाला आठवणीने पंचांग आणून द्या,' असे स्वतःहून साधकांना कळवले आहे. 

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना सूचना !

हिंदु धर्मजागृती सभांच्या प्रचारासाठी कलाकृती उपलब्ध ! 
     हिंदु जनजागृती समितीच्या वतीने लवकरच हिंदु धर्मजागृती सभांचे आयोजन करण्यात येणार आहे. या सभांना संत, हिंदुत्वनिष्ठ, मान्यवर, प्रतिष्ठित आदींना निमंत्रित करण्यासाठी निमंत्रणपत्रिका सिद्ध करण्यात आली आहे. ती वक्त्यांच्या नावांसह आणि नावांविना अशा दोन्ही प्रकारांत उपलब्ध आहे. त्यासमवेतच प्रसारासाठी होर्डींगच्या पुढील आकारातील कलाकृतीही सिद्ध करण्यात आल्या असून त्या नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध आहेत.

बालसाधकांपासून वृद्धसाधकांपर्यंत सर्वांची काळजी घेणार्‍या पू.(सौ.) बिंदा सिंगबाळ यांना दिलेली शुभेच्छापत्रे आणि काव्यसुमने !

रामनाथी आश्रमातील बालसाधकांनी पू. बिंदाताई यांना दिलेले शुभेच्छापत्र !
समष्टी ध्येय घडवणारी आई ।
पू. ताई, पू. ताई, येणार का ? ।
सर्वांना पुढे घेऊन जाणार का ? ॥ १ ॥
पू. ताई, पू. ताई सांगणार का ? ।
तुमच्या सोबत आम्हाला नेणार का ? ॥ २ ॥
पू. ताई, पू. ताई, बोलणार का ? ।
याचे उत्तर आम्हाला मिळणार का ? ॥ ३ ॥
- कु. वैभवी झरकर (वय ९ वर्षे) आणि अन्य बालसाधक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.९.२०१४)
      (सर्व बालसाधक आपल्या कुटुंबियांच्या अनुमतीने साधना करण्यासाठी आश्रमात रहात असून त्यांच्या शब्दांतूनही त्यांची आध्यात्मिक प्रगतीची तळमळ प्रत्ययास येते. या बालसाधकांचे वैशिष्ट्य म्हणजे साधनेसाठी ही मुले आपल्या माता-पित्यापासून दूर रहात असून त्यांना बालवयात देवाप्रती तीव्र ओढ लागली आहे. - संकलक)

जिल्हासेवक आणि साधक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती निर्मित धर्मसत्संगांचे केबल अथवा दूरचित्रवाणी यांवरून प्रसारण करण्याचे नियोजन करावे !
     आजपासून 'नवरात्र' चालू होत आहे. त्या निमित्ताने या संदर्भातील महत्त्व विशद करणारा हिंदी विशेष धर्मसत्संग सिद्ध करण्यात आला आहे. या धर्मसत्संगांतर्गत धार्मिक कृतियोंका शास्त्र या विषयाचे ६ धर्मसत्संग असून दसर्‍याच्या संदर्भातील १ धर्मसत्संग आहे. त्याचप्रमाणे अध्यात्मशास्त्र या विषयाचे ८ धर्मसत्संग आहेत. या सत्संगांचा कालावधी २८ मिनिटे आहे. या धर्मसत्संगांच्या माध्यमातून अधिकाधिक धर्मप्रसार होण्यासाठी साधकांनी पुढील प्रयत्न करावेत. 
१. स्थानिक केबल अथवा दूरचित्रवाणी यांवरून या धर्मसत्संगांचे प्रसारण करण्याचे नियोजन करावे. 
२. गावोगावी चालू असणार्‍या धर्मशिक्षणवर्गात आवश्यकतेनुसार हे धर्मसत्संग दाखवावेत. 
३. सध्या सर्वत्र चालू असलेल्या सभा, अधिवेशने यांमधून जोडल्या जाणार्‍या धर्माभिमान्यांना हे धर्मसत्संग आसपासच्या गावांत दाखवण्याची सेेवा द्यावी. 

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा. 
काल अमावास्या झाली.

बोधचित्र


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
'कुठे आई-वडिलांनाही वृद्धाश्रमात अडगळीप्रमाणे टाकून देणारी पाश्चात्त्य वळणाची हल्लीची पिढी, तर कुठे 'हे विश्वचि माझे घर', असे शिकवणार्या हिंदु धर्मातील आतापर्यंतच्या पिढ्या !' - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३०.८.२०१५)


॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
आश्रमाविषयीचा दृष्टीकोन आश्रम माझा नाही; पण मी आश्रमाचा आहे. 
भावार्थ : 'आश्रम माझा नाही' म्हणजे आश्रमावर माझे स्वामित्व (मालकी) किंवा अधिकार (हक्क) नाही; कारण तो गुरूंचा आहे. 'मी आश्रमाचा आहे' म्हणजे मी गुरूंच्या आश्रमाचा असल्याने आश्रमाची, आश्रमात आलेल्यांची काळजी घेणार व सेवा करणार. या दृष्टीकोनामुळेच आश्रमातील कामे करूनही आश्रमाविषयी प्रेम निर्माण होत नाही, तर प्रीती निर्माण होते. 
 (संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.) 

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

शिष्याने नेहमी सद्गुरूंशी एकनिष्ठ रहावे !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      भाग्याने सद्गुरु लाभल्यास शिष्याने एकनिष्ठ रहावे, म्हणजे त्याच्याही नकळत त्याचा आध्यात्मिक विकास होत जाईल. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

संस्काराने राष्ट्र तेजस्वी होणे

      पिढ्यान्पिढ्या जेव्हा चांगले संस्कार होत असतात, तेव्हा ती आत्मशक्ती जागृत रहाते आणि चांगले नियोजन करून जीवन सुखदायी आणि समृद्ध करते. मध्येच जर संस्कार बंद पडले, तर ते पुन्हा प्रस्थापित करण्यास वेळ लागतो. तेथपर्यंत राक्षसीवृत्ती बोकाळून विघटनकारी कृत्ये सुरू होतात. त्याचे परिणाम समाजाला आणि राष्ट्राला परिणाम भोगावे लागतात. आज भारताचे असेच झाले आहे. सुसंस्कार नाहीसे झाले आहेत आणि विघटनकारी कृत्ये बोकाळली आहेत. भौतिक वाद पुढे येत आहे. तेव्हा नवीन पिढीवर परत सुसंस्कार करणे आवश्यक आहे. - प.पू. परशराम माधव पांडे (श्री गणेश-अध्यात्म दर्शन, पृष्ठ ७८)

द्रमुकचे भगवेकरण ?

संपादकीय
       तामिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कळघम् पक्षाचे सर्वेसर्वा एम्. करुणानिधी यांचा हिंदुद्वेष सर्वज्ञात आहे. त्यांचा मुलगा एम्.के. स्टॅलिन हे त्यांचे राजकीय वारसदार म्हणून ओळखले जातात. मी चालू केलेली हिंदुविरोधी परंपरा माझ्या मुलाने पुढे चालू ठेवावी, अशी करुणानिधी यांची इच्छा आहे. मागील वर्षी स्टॅलिन यांनी फेसबूकवरून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या. याची माहिती मिळताच करुणानिधी यांनी स्टॅलिन यांना दम भरला. यामुळे स्टॅलिन यांनी ती पोस्टच काढून टाकली. करुणानिधी यांचा हिंदुद्वेष किती पराकोटीचा आहे, हे यातून दिसून येते. करुणानिधी हे स्वतःला निरीश्‍वरवादी म्हणवून घेतात. ते स्वतः मंदिरात जात नाहीत आणि दुसरे कोणी मंदिरात गेलेलेही त्यांना खपत नाही. त्यामुळे सत्ताधारी अण्णाद्रमुक पक्षाच्या मंत्र्यांनी एखाद्या मंदिराला भेट दिल्यावर करुणानिधी थयथयाट करतात. एवढेच काय तर काही वर्षांपूर्वी त्यांच्या पक्षाचे सदस्य असलेले प्रख्यात अभिनेते शिवाजी गणेशन यांनी तिरुपतीला जाऊन बालाजीचे दर्शन घेतल्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn