Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

सनातनच्या पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ 
यांचा आज वाढदिवस

सनातनवरील बंदीच्या मागणीच्या विरोधात भव्य मोर्चे आणि आंदोलने यांद्वारे जोरदार निषेध !


पुणे येथे धर्माभिमानी हिंदूंना संबोधित करतांना
सनातनचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक
पुणे, सोलापूर, नंदुरबार येथील मोर्च्यात आणि अमरावती अन् अकोला येथे सनातनच्या समर्थनार्थ हिंदुशक्ती एकवटली ! 
सनातनद्वेषातून कितीही आरोप केले जरी । सत्याचाच विजय होणार आहे निश्चिती ॥ 
त्या निमित्ताने झाले प्रभावी संघटन हिंदूंचे । हिंदूसंघशक्तीने सनातनसूर्य तेजाने तळपे ॥ 
'तथाकथित पुरोगामी आणि हिंदुद्वेष्टे यांच्या दबावाला बळी पडून सनातन संस्थेला बळीचा बकरा बनवू नका !', 'सनातन संस्थेवर बंदी घालण्याची काव-काव करणार्यांचा निषेध असो !' या आणि अशा मागण्या करत ११ ऑक्टोबर या दिवशी महाराष्ट्रात ५ जिल्ह्यांत हिंदुत्ववाद्यांनी संघटित होऊन सनातनला भक्कम पाठिंबा देऊन आश्वस्त केले. पुणे, सोलापूर आणि नंदुरबार येथे भव्य मोर्चा काढण्यात आला. तसेच अकोला आणि अमरावती येथे राष्ट्रीय हिंदु आंदोलन झाले.

माहिती अधिकार अर्जावर परराष्ट्र मंत्रालयाचे सोयीस्कर मौन नेताजींवर लागलेला युद्ध गुन्हेगार हा शिक्का हटवण्याचे प्रकरण

देश स्वतंत्र होऊन ६८ वर्षे झाल्यानंतरही नेताजींसारख्या स्वातंत्र्यसेनानींची अहवेलना थांबत नसेल, 
तर हा देश खरच स्वतंत्र झाला आहे का, अशी शंका जनतेने घेतल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !
     कोलकाता - थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर स्वातंत्र्यपूर्व ब्रिटीश शासनाने लावलेला युद्ध गुन्हेगार हा शिक्का अजूनही कायम आहे का ? अशी विचारणा करणार्‍या माहिती अर्जावर परराष्ट्र व्यवहार खात्याच्या माहिती अधिकार्‍यांनी सोयीस्कर मौन पाळले आहे. 
१. दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जर्मनी आणि जपान यांच्याशी संपर्क साधून आझाद हिंद सेनेची स्थापना केली आणि त्याद्वारे भारतातील ब्रिटीश साम्राज्याशी सशस्त्र लढा दिला. त्यामुळे ब्रिटीश शासनाने त्यांना युद्ध गुन्हेगार म्हणून घोषित केले होते. राष्ट्रसंघाच्या कागदपत्रांमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा उल्लेख युद्ध गुन्हेगार असाच आहे.
२. बेंंगळुरू येथील एक पत्रकार श्रीमती चूडामणी नागेंद्र यांनी परराष्ट्र व्यवहार खात्याकडे माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत अर्ज केला. यात इंग्रजांनी नेताजींवर लावलेला युद्ध गुन्हेगार हा शिक्का हटवण्यासाठी भारत शासनाने काय प्रयत्न केले ? या प्रश्‍नासह अधिक ५ प्रश्‍न विचारले होते.

सनातनवर बंदी घालण्याचे कोणाचे धाडस नाही ! - आमदार राजन साळवी

आंदोलनात उजवीकडून नगरसेवक राहुल पंडित, भास्कर खडपे,
बोलतांना आमदार श्री. राजन साळवी, श्री. महेश मयेकर,
आमदार श्री. उदय सामंत आणि अन्य धर्माभिमानी
रत्नागिरी येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात सनातनवरील बंदीचे
कारस्थान हाणून पाडण्याचा हिंदु धर्माभिमान्यांचा निर्धार !
 आंदोलनाला शिवसेनेच्या २ आमदारांसह १७५ धर्माभिमानी उपस्थित
सनातन संस्थेवरील बंदीचे कारस्थान विधानसभेत हाणून पाडू ! - शिवसेनेचे आमदार उदय सामंत
     रत्नागिरी, ११ ऑक्टोबर (वार्ता.) - या देशात सनातन संस्था अशी एकमात्र संस्था आहे की, जी मागील २५ वर्षे हिंदु धर्म, रितीरिवाज आणि संस्कार यांचा प्रसार करण्याचे कार्य प्रामाणिकपणे करत आहे. आम्हा हिंदु बांधवांना याचा अभिमान आहे. काही समाजकंटक मात्र सनातन संस्थेवर बंदी आणण्याचा प्रयत्न करत आहेत; मात्र या समाजकंटकांनी लक्षात घ्यावे की, सनातन संस्थेवर बंदी आणण्याचे कोणाचे धाडस नाही. शिवसेना सनातन संस्थेच्या पाठीशी ठामपणे उभी आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे आमदार श्री. राजन साळवी यांनी केले. सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीच्या विरोधात विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने १० ऑक्टोबर या दिवशी शहरातील जयस्तंभ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सनातनला पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेचे रत्नागिरी आणि राजापूर येथील आमदार अन् विविध हिंदुत्ववादी संघटनांचे १७५ धर्माभिमानी सहभागी झाले होते.

(म्हणे) डीएम्के हिंदूंचा पक्ष आहे !

रावणाला भजणारे, रामसेतू तोडण्याच्या कृतीचे समर्थन करणारे आणि हिंदु 
धर्मावर आघात करणार्‍या डीएम्केपक्षाचे नेते एम्.के. स्टॅलिन यांचे वक्तव्य !
     चेन्नई - तमिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कळघम् या पक्षाचे संस्थापक अण्णादुराई यांनी ७० वर्षांपूर्वी द्रविड नाडू या वृत्तपत्रात अनेक लेख लिहून तमिळ लोकांचा धर्म हिंदु नाही, असे प्रतिपादन केले होते. आता या पक्षाचे ज्येष्ठ नेते एम्. करुणानिधी यांचे पुत्र आणि त्यांचे राजकीय वारस एम्.के. स्टॅलिन यांनी डीएम्के हा हिंदूंचा पक्ष आहे, असे उद्गार काढले आहेत. (सातत्याने हिंदूंच्या विरोधात गरळओक करणार्‍या द्रमुकवाल्यांना हिंदुविरोधी भूमिका घेतल्यामुळे राजकारणात स्वतःची डाळ शिजणार नाही, हे पटल्यामुळे त्यांना असे बोलण्याची उपरती झाली आहे, हे न ओळखण्याइतपत हिंदू दूधखुळे नाहीत ! - संपादक) द्रमुक पक्ष हा द्रविडी संस्कृती मानणारा आहे. हिंदुद्वेषी लिखाण करणारे पेरियर आणि अण्णादुराई या नेत्यांचा या पक्षावर प्रभाव आहे. त्यामुळे स्टॅलिन यांनी घेतलेल्या या कोलांटी उडीमुळे सर्वत्र आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

हिंदुत्ववाद्यांकडून पुत्तूरू (कर्नाटक) येथे शासनाला निवेदन

सनातन संस्थेवरील बंदीच्या मागणीला विरोध
पुत्तूरू येथील तहसीलदार सण्ण रंगय्या
यांना निवेदेन देतांना हिंदुत्ववादी
     पुत्तूरू (कर्नाटक) - सनातन संस्थेवरील बंदीच्या मागणीच्या विरोधात समाजातील सर्व समविचारी संस्था आणि संघटनांच्या वतीने ९ ऑक्टोबर या दिवशी येथील तहसीलदार सण्ण रंगय्या यांच्या माध्यमातून गृहसचिवांना निवेदन देण्यात आले. या वेळी श्रीराम सेवा समिती, मठंतबेट्टु श्री राजराजेश्‍वरी देवस्थान, विश्‍व हिंदु परिषद-बजरंग दल सेवा समिती, श्री दुर्गा भजन मंदिर, श्री महाविष्णु देवस्थान, युवाशक्ती गेळेयर बळग (मित्रमंडळ) श्री लक्ष्मी देवी बेट्ट, सविता समाज उप्पीनंगडी शुभोदय स्व सहाय संघ, श्रीगंध स्व सहाय संघ, श्रीकृष्ण भजन मंदीर, श्री पंचलिंगेश्‍वर स्वामी समुदाय भवन आडळित (प्रशासन) समिती, बेळ्ळीप्पाडी दूध उत्पादक सहकारी संघ या संघटना आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, तसेच हिंदुत्ववादी नेते श्री. हरिप्रसाद शेट्टी आणि श्री. जनार्दन उपस्थित होते.

ओळख लपवून गरब्यात प्रवेश करणार्‍या अहिंदूंवर प्रतिबंध लावावा !

हिंदु धर्मसेनेचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
पोलीस अधीक्षकांशी चर्चा करतांना
हिंदू धर्मसेनेचे श्री. योगेश अग्रवाल
   जबलपूर (मध्यप्रदेश) - नवरात्रोत्सवातील गरब्यांमध्ये प्रवेश करून मुसलमान युवक हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढतात. या पार्श्‍वभूमीवर होणार्‍या अप्रिय घटना टाळण्यासाठी पोलिसांकडून गरब्यांच्या कार्यक्रमांना कडक बंदोबस्त पुरवण्यात यावा, या मागणीसाठी हिंदु धर्मसेनेच्या वतीने पोलीस अधीक्षक गुरुप्रसाद पराशर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु धर्मसेनेचे श्री. योगेश अग्रवाल, श्री. अतुल जैसवानी, श्री. आयुष महावर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी यांच्या काशीत ३१५ ख्रिस्त्यांची घरवापसी

देशात आतापर्यंत कोट्यवधी हिंदूचे धर्मांतर झाले आहे. त्यामुळे प्रतिदिन 
सहस्रावधींच्या संख्येने घरवापसी होणे आवश्यक आहे ! 
     काशी (बनारस) - पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रतिनिधित्व करत असलेल्या काशीमधील हरहुआ तालुक्यातील ४ गावांतील ३८ ख्रिस्ती परिवारांनी हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला. ग्रामदेवता पूजन समितीचे संयोजक चंद्रमा बिंद यांच्या नेतृत्वाखाली ११ नोव्हेंबर या दिवशी औसापूर येथे घरवापसीचा हा कार्यक्रम पार पडला. ग्राम पुरोहित धीरज चौबे आणि नागेश चौबे यांनी हवन-पूजन करून पवित्रकरणाचा विधी केला. सनातन धर्मापासून लांब गेलेल्या ३१५ लोकांची त्यांच्या सहमतीने घरवापसी करण्यात आली, असे या कार्यक्रमाचे संयोजक चंद्रमा बिंद यांनी सांगितले.

सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीचे षड्यंत्र हाणून पाडू ! - हिंदुत्ववाद्यांचा एल्गार

पुणे, सोलापूर आणि नंदुरबार येथे भव्य मोर्चा, तर अकोला अन् अमरावती येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !
      ११ ऑक्टोबर या दिवशी महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, नंदुरबार आणि अकोला अन् अमरावती या शहरात मोर्चे आणि आंदोलने यांद्वारे हिंदुत्ववाद्यांनी संघटितपणे सनातन संस्थेला पाठिंबा देऊन आम्ही सारे एक याचा अनुभव दिला.
नंदुरबार
      शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर येथून भव्य निषेध मोर्च्याला आरंभ झाला. शहराच्या प्रमुख मार्गांवरून हा मोर्चा तहसील कार्यालयासमोरील मैदानात आल्यावर त्याचे रुपांतर छोटेखानी सभेत झाले. मोर्च्यात साडेचारशेहून अधिक धर्माभिमानी सहभागी झाले होते.

कर्नाटकातील मुडबिदरे येथे बजरंग दल कार्यकर्त्याची निर्घृण हत्या !

हिंदूंनो, स्वरक्षणासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
हत्येमुळे संतप्त जमावाने दगडफेक केली आणि दुकाने पेटवली !
मुसलमान व्यक्तीची हत्या झाल्यावर आकाश पाताळ एक करणारे धर्मनिरपेक्षतावादी, नेते, पुरोगामी आणि प्रसारमाध्यमे हिंदु नेत्यांच्या हत्या होत असतांना 'ब्र'ही काढत नाहीत !
मंगळुरू (कर्नाटक) - मुडबिदरे येथील सामागारागुंडी भागात समाज मंदिराजवळ ९ ऑक्टोबर या दिवशी सकाळी ६ अज्ञात मारेकर्यां नी हसबेत्तू येथील रहिवासी आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते असलेले २९ वर्षीय प्रशांत पुजारी यांची तीक्ष्ण शस्त्रांनी निर्घृण हत्या केली. ही घटना घडताच मुडबिदरे गावात तणाव निर्माण झाला. त्यानंतर संतप्त जमावाने ५ दुकानांवर दगडफेक केली आणि काही दुकानांना आग लावली, तसेच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही धक्काबुक्की केली. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास चालू आहे. 

मध्यप्रदेशात प्रतिदिन होतात २३ मुले बेपत्ता !

देशात मंत्र्यांच्या म्हशी शोधण्यासाठी यंत्रणा राबवली जाते, तेवढे तरी कष्ट 
लोकांची बेपत्ता मुले शोधण्यासाठी त्यांच्याकडून घेतले जातात का ?
१० मुलांपैकी एका मुलाचा शोध लागत नाही !
     भोपाळ (मध्यप्रदेश) - मध्यप्रदेशात प्रतिदिन २३ मुले बेपत्ता होत असल्याची धक्कादायक माहिती एका अहवालातून समोर आली आहे. वर्ष २००७ ते २०१४ या ७ वर्षांच्या काळात ६६ सहस्र ४६२ मुले बेपत्ता झाली असून यात ३३ सहस्र ९२५ मुली आहेत. विकास संवाद या स्वयंसेवी संस्थेने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या बेपत्ता मुलांपैकी ६ सहस्र २८५ मुलांचा अद्याप शोध लागलेला नाही. एकूण १० मुलांपैकी एका मुलाचा शोध लागत नाही. शोध न लागलेल्या मुलांमध्ये ७२ टक्के मुली आहेत, अशी माहिती संस्थेचे सचिन जैन यांनी दिली. गुन्हे अन्वेषण विभागाकडून मिळालेल्या नोंदीनुसार या अहवालात माहिती देण्यात आली आहे.

गोव्यातील हिंदुत्ववादी संघटना आणि हिंदुत्ववादी यांचा सनातनच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाण्याचा निर्णय

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने डिचोली येथे हिंदु धर्माभिमान्यांची बैठक
डिचोली येथे हिंदु धर्माभिमान्यांच्या बैठकीत उपस्थितांना
मार्गदर्शन करतांना ह.भ.प. रामकृष्णबुवा गर्दे
       डिचोली, ११ ऑक्टोबर (वार्ता.) - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने डिचोली येथील दिनदयाळ सभागृहात आयोजित हिंदु धर्माभिमान्यांच्या बैठकीत उपस्थित हिंदुत्ववादी संघटना आणि हिंदुत्ववादी यांनी सनातनच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाण्याचा निर्णय घेतला. बैठकीला राजीव दीक्षित विचार मंच, पतंजली योग समिती, गोवंश रक्षा अभियान, वाळपई येथील अखिल विश्‍व जय श्रीराम गोसंवर्धन केंद्र, बजरंग दल, विश्‍व हिंदू परिषद, संस्कृत भारती, भारत स्वाभिमान, किसान पंचायत, मये येथील ग्राम रक्षक दल, रणरागिणी, शिरसई येथील धर्माभिमानी, डिचोलीतील धर्माभिमानी महिला, डिचोलीतील माजी नगरसेवक, पत्रकार, तसेच हिंदु जनजागृती समितीचे उत्तर गोवा समन्वयक श्री. गोविंद चोडणकर, सनातन संस्थेच्या सौ. शुभा सावंत आदी मिळून ५० मान्यवर उपस्थित होते. कॉ. पानसरे हत्या प्रकरणी सनातनच्या साधकाला कह्यात घेतल्यानंतर सनातनद्वेष्ट्यांनी सनातन संस्थेचे नाव अपकीर्त करण्याचे षड्यंत्र चालवले असून सनातन संस्थेवर बंदी आणण्याची मागणी केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर उपरोल्लेखित बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

पाकव्याप्त काश्मीरनंतर आता पाकिस्तानातील मुहाजीर आणि बलूच नागरिकांनीही पाकपासून वेगळे होण्याची मागणी रेटली !

काश्मीरवर हक्क सांगणार्‍या पाकला घरचा अहेर !
     वॉशिंग्टन (अमेरिका) - पाकव्याप्त काश्मीरमधील मुसलमानांनी पाकिस्तानपासून वेगळे होण्यासाठी आंदोलन आरंभले आहे. या आंदोलनातील नागरिकांवर तेथील शासनाने चालू केलेले दमनसत्र एका दूरचित्रवाहिनीने उघड केल्यानंतर आता सिंध प्रांतातील मुहाजीर आणि बलुचिस्तानातील बलूच नागरिकांनीही पाकिस्तानच्या जोखडापासून मुक्त होण्यासाठी आंदोलने चालू केली आहेत. त्यामुळे काश्मीरवर हक्क सांगणार्‍या पाकिस्तानची स्थिती आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत केविलवाणी झाली असून भारताने त्याचा लाभ उचलणे आवश्यक आहे, असे मत संरक्षण तज्ञांनी व्यक्त केले आहे.

बडोदा बँकेत ६ सहस्र १७२ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा काँग्रेसचा दावा

      नवी देहली - 'शासकीय उपक्रम म्हणजेच राष्ट्रीयकृत बँक असलेल्या बँक ऑफ बडोदाच्या एका शाखेत आयातीच्या नावावर बनावट आस्थापनांच्या माध्यमातून ६ सहस्र १७२ कोटी रुपये हाँगकाँगला पाठवण्यात आले आणि ही देवाणघेवाण मोदी शासन सत्तेत आल्यानंतर जून-जुलै २०१४ च्या काळात झाली', असा आरोप काँग्रेसने केला आहे. 
१. बँकेच्या ऑडिट अहवालाच्या आधारे काँग्रेसने हा दावा केला. या दाव्यानुसार ६ सहस्र १७२ कोटी रुपये एवढी मोठी रक्कम पॅन क्रमांकाशिवाय बँकेत रोख जमा करण्यात आली आणि त्याच दिवशी त्या खात्यांमधून ही रक्कम विदेशी खात्यात वळती झाली. 
२. काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आर्.पी.एन्.सिंग यांच्या म्हणण्यानुसार केंद्र शासनातील एका मोठ्या नेत्याच्या सांगण्यावरून ही देवाणघेवाण चालू होती. सिंग यांनी भाजपच्या या नेत्याचे नाव उघड केले नसले, तरी पुराव्यादाखल कागदपत्र सादर करून ६ सहस्र १७२ कोटीची रक्कम कुठलीही औपचारिकता पूर्ण केल्याशिवाय देशाबाहेर गेल्याचे सांगितले. 

कोळसा घोटाळ्यातील याचिका त्वरित निकालात काढावी ! - माजी पंतप्रधान मनमोहन सिंह

     नवी देहली - 'सर्वोच्च न्यायालयात केलेली कोळसा घोटाळ्यातील याचिका त्वरित निकालात काढावी', अशी विनंती माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी केली आहे. त्यांच्यावर बसलेला कोळसा घोटाळ्यातील अपराधी हा शिक्का त्यांना अस्वस्थ करत आहे.

मौलानांच्या शिकवणीमुळेच मी आतंकवादी बनलो !

नवी देहली येथे पकडलेल्या आतंकवाद्याने दिली माहिती
आता शाम मानव मौलानांच्या कार्यपद्धतीविषयी वृत्तवाहिन्यांवरून ओरड करण्याचे धैर्य दाखवतील का ?
नवी देहली - येथील विशेष अन्वेषण पथकाने रहमत नावाच्या आतंकवाद्याला रेल्वेस्थानकावर नुकतेच जेरबंद केले. त्याची चौकशी केली असता, त्याने सांगितले की, तो एका गरीब घरातून आला आहे. आर्थिक चणचणीमुळे मौलानांचा सल्ला घेण्यासाठी गेल्यावर त्यांनी रहमतच्या डोक्यात विष कालवले. मूळचा भाग्यनगर (हैद्राबाद) येथील असलेला रहमत मौलाना झाकीर यांच्याकडे प्रथम गेला होता. त्यांनी त्याला मौलाना अहमद हुसेनकडे पाठवले. या दोघांनी मिळून त्याचे 'ब्रेनवॉशिंग' केले. 'मुसलमान समाजावर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत', असे त्याला विविध मार्गांनी पटवून दिले. त्याला धर्मासाठी देशाविरुद्ध आतंकवादी बनण्यासाठी बाध्य (मजबूर) केले. त्यामुळे तो भारताविरुद्ध लढण्यास सिद्ध झाला. तेव्हा त्यांनी भाग्यनगर (हैद्राबाद) येथील एका नामवंत आधुनिक वैद्याचे अपहरण केल्यानंतर त्याद्वारे येणारी रक्कम तुझ्या घरच्यांसाठी आणि इस्लामसाठी वापरता येईल, असे त्याला सांगण्यात आले. ('मुसलमानांच्या राष्ट्रभक्तीवर प्रश्नन उपस्थित करू नका', असे म्हणणारे एम्आयएम्चे खासदार असदुद्दीन ओवैसी आणि मुसलमानांची बाजू घेणारे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांना या मौलानांविषयी काय म्हणायचे आहे ? ओवैसी यांच्याच मतदारसंघांतील या मौलानांवर कारवाई होण्यासाठी प्रयत्न करून ओवैसी त्यांच्या राष्ट्रभक्तीची पावती देतील का ? - संपादक)

नाट्यसंहितेला असलेली परिनिरीक्षण मंडळाची अनुमती पाहूनच नाट्यप्रयोगला अनुमती द्यावी !

रंगभूमी आणि प्रयोग परीनिरीक्षण मंडळाचे पोलिसांना निवेदन 
      मुंबई - 'नाट्यसंहितेला परिनिरीक्षण मंडळाची दिलेली अनुमती पडताळूनच नाट्यप्रयोगला अनुमती द्यावी, अशा आशयाचे निवेदन परिनिरीक्षण मंडळाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना देण्यात येणार आहे', असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. सोलापूरमध्ये असे दोन-तीन प्रयोग मंडळाने बंद करायला लावले होते, या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे अध्यक्ष अरुण नलावडे यांनी सांगितले, असे या वृत्तात पुढे म्हटले आहे. 
     प्रत्यक्षात मात्र २ आणि ४ सप्टेंबर या दिवशी अनुक्रमे कागल (कोल्हापूर) आणि इचलकरंजी (सोलापूर) या जिल्ह्यांमध्ये 'सॉक्रेटिस ते दाभोलकर पानसरे व्हाया तुकाराम' हे अंनिसचे धर्मद्रोही नाटक वारकरी आणि हिंदुत्ववादी यांनी बंद पाडले होते. या नाटकाला परिनिरीक्षण मंडळ, तसेच पोलीस या दोघांचीही अनुमती घेतलेली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी त्यांना हे नाटक बंद करणे भाग पाडले होते.

कोल्हापूर येथील पाच पदाधिकार्‍यांना अपात्रतेचा धोका !

महापालिका निवडणूक २०१५ ही आहे लोकराज्याची निरर्थकता !
     कोल्हापूर, ११ ऑक्टोबर (वार्ता.) - जातीचा खोटा दाखला, लाच प्रकरण आणि अवैध बांधकाम प्रकरणात अडकलेल्या ५ विद्यमान नगरसेवकांना यंदाची महापालिका निवडणूक लढवण्यास अडचणी येण्याची शक्यता आहे. माजी महापौर तृप्ती माळवी, काँग्रेस नगरसेवक सचिन चव्हाण, दिगंबर फराकटे, सरस्वती दिलीप पोवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आदिल फरास यांचा त्यात समावेश आहे. (असे लोकप्रतिनिधी देणार्‍या पक्षांवर कुणी बंदी घालण्याची मागणी केल्यास त्यात नवल काय ? - संपादक) उमेदवारी अर्जाच्या छाननीच्या वेळी हरकती आल्यास या नगरसेवकांविषयी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी निर्णय घ्यावेत, अशा लेखी सूचना मुख्य निवडणूक अधिकारी पी. शिवशंकर यांनी दिल्या आहेत. 

हिंदु रणरागिणी हिमानीताई सावरकर यांचे निधन !

हिमानी सावरकर
    हिंदु महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि हिंदु रणरागिणी हिमानीताई सावरकर यांचे ११ ऑक्टोबर या दिवशी पुणे येथे त्यांच्या घरी निधन झाले. हिंदुत्वाच्या कार्याची अत्यंतिक तळमळ असणार्‍या त्या धडाधडीच्या नेत्या होत्या. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या त्या नातसून होत्या. त्या गोपाळ गोडसे यांची कन्या आणि नथुराम गोडसे यांची पुतणी होत्या.
      तथाकथित हिंदु दहशतवादाच्या विरोधात त्यांनी सर्वप्रथम आवाज उठवला. सावरकरांच्या साहित्याचे सर्व हक्क त्यांच्याकडे होते. हिंदु महिला नवरात्र महोत्सव गेली १० वर्षे आयोजित करत होत्या आणि त्याच्या अध्यक्षा होत्या.

चोरीची रक्कम आणि ऐवज परत मिळवून देण्यात महाराष्ट्राचा देशात २५ वा क्रमांक !

सर्वच स्तरांत मागे पडलेला पोलीस विभाग नावलौकिक पुन्हा मिळवण्यासाठी कोणती उपाययोजना करणार आहे ? 
      पुणे, ११ ऑक्टोबर - चोरीला गेलेली रक्कम आणि ऐवज परत मिळवून देण्यात बिहार आणि उत्तरप्रदेश या राज्यानंतर महाराष्ट्राचा देशात २५ वा क्रमांक आहे. चोरीला गेलेला ऐवज परत मिळवण्याचे प्रमाण देशभरामध्ये २१ प्रतिशत असून महाराष्ट्रात ते राष्ट्रीय सरासरीच्या निम्मे म्हणजेच फक्त १०.५ प्रतिशत आहे. देशातील गुन्हेगारीच्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो २०१४ या प्रसिद्ध झालेल्या अहवालातून ही माहिती उघड झाली आहे. 

गुलाम अलीच नव्हे, तर पाकचे सर्व क्रिकेटपटू आणि कलाकार यांच्यावर बंदी हवी ! - राज ठाकरे

     डोंबिवली - येथे मनसेचे प्रमुख श्री. राज ठाकरे यांची पत्राकर परिषद झाली. त्या वेळी ते म्हणाले की, 
१. भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांचे प्रश्‍न वेगळे आहेत. 
२. भारतात कलेला कमी नाही. या देशात अनेक दिग्गज कलाकार आहेत. त्यामुळे बाहेरच्या देशातील कलाकार इकडे आणून कला सादर करण्याची आवश्यकताच काय ? 
३. हे कलाकार म्हणून यांच्या कलेकलेने घ्यायचे का ? हे लोक लाचारांसारखे का वागत आहेत ? 
४. पाकिस्तानने जगजित सिंह, लतादीदींचे कार्यक्रम होऊ दिले नव्हते. त्यामुळे त्यांच्या कलाकारांचे कार्यक्रम भारतात का ? 
५. गुलाम अलीच नव्हे, तर पाकिस्तानी क्रिकेटपटू वासिम आक्रम असो वा अन्य टीव्ही कलाकार, सर्वांनाच भारतात बंदी घालायला हवी.

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंनो, जीवघेण्या आक्रमणांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! 
      कर्नाटकातील मुडबिदरे येथील सामागारागुंडी भागात ९ ऑक्टोबर या दिवशी अज्ञात मारेकर्‍यांनी हसबेत्तू येथील २९ वर्षीय प्रशांत पुजारी या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची निर्घृण हत्या केली.

८ दिवसांत थडगे न हटवल्यास ते आंदोलनाद्वारे हटवणार ! - खासदार सुरेश अंगडी यांची चेतावणी

बेळगाव खडक गल्ली दंगल प्रकरण
हिंदूंच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणारे धर्मद्रोही प्रशासन आणि पोलीस !
प्रशासनाला अंतिम समयमर्यादा
      बेळगाव - महानगरपालिका अधिकार्‍यांच्या चुकीमुळे कथित थडग्याचे प्रकरण धगधगत आहे. अधिकार्‍यांनी हेस्कॉमचे फाऊंडेशन असलेला दगड वेळीच काढला असता, तर हे प्रकरण शमले असते. यामुळे महापालिका अधिकार्‍यांवरच कठोर कारवाई करावी. याचसमवेत ते कथित थडगे त्वरित हटवावे, अन्यथा हे थडगे हटवण्यासाठी तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी जनता देत आहे. शहराची शांतता बिघडू नये, यासाठी त्वरित पाऊल उचलावे. कथित थडगे हटवण्यासाठी ८ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

कोल्हापूर बार असोसिएशनला म्हणणे मांडण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश !

माजी न्यायमूर्तींच्या विरोधात आंदोलन केल्याचे प्रकरण 
      कोल्हापूर, ११ ऑक्टोबर (वार्ता.) - 'जिल्हा बार असोसिएशनवर का कारवाई करू नये ?' याविषयी २४ नोव्हेंबरपर्यंत म्हणणे मांडण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री. अभय ओक आणि न्यायमूर्ती अचलिया यांनी खंडपीठ कृती समितीमधील अधिवक्त्यांना दिला आहे. याची पुढील सुनावणी २८ नोव्हेंबर या दिवशी होणार आहे. 'बार असोसिएशनवर काय कारवाई केली, याचा अहवाल द्या', अशीही मागणी न्यायमूर्तींनी महाराष्ट्र-गोवा कौन्सिलकडे केली आहे. यासंदर्भातील माहिती कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अधिवक्ता प्रशांत चिटणीस यांनी दिली. 

२६ नोव्हेंबर संविधान दिवस म्हणून साजरा करणार ! - पंतप्रधान

    मुंबई - २६ नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून साजरा करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केली. पंतप्रधानांच्या हस्ते इंदु मील येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमीपूजन करण्यात आले. त्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते. याशिवाय पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रो रेल्वेच्या फेज २ आणि ७ या मार्गांचे भूमीपूजन, तसेच उरणजवळ जे.एन्.पी.टी. टर्मिनल ४ च्या कोनशिलेचेही अनावरण करण्यात आले. या वेळी महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आदी उपस्थित होते.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Karnatak ke Mudbidre gaome Agnyatone Bajrang dal karyakartaki hatya ki. 
 kya es hatyaka arop ham purogamiopar lagaye ? 
जागो ! : कर्नाटकके मुडबिदरे गावमें अज्ञातोनेे बजरंग दल कार्यकर्ताकी हत्या की. 
 क्या इस हत्याका आरोप हम पुरोगामीआेंपर लगाए ?

शासकीय बाबूंची दुष्कर्मे !

     काम करा, अन्यथा स्वेच्छानिवृत्ती घ्या ! अशी चेतावणी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी कामचुकार अधिकार्‍यांना दिली आहे. शासकीय बाबूंना काम करा, असे सांगावे लागते आणि या उलट भत्ते, पगारवाढ, कामाचे घंटे न्यून करणे यांविषयी संप करण्यासाठी कोणी काही सांगण्याची आवश्यकताच भासत नाही. संपाचे हत्यार उपसून स्वतःच्या मागण्या मान्य करून घेण्यात भलतीच हुशारी ही मंडळी दाखवतात. यांची हुशारी ज्या कामाचे ते गलेलट्ठ वेतन घेतात, त्याचे सार्थक करण्यासाठी कधी उपयोगी येणार, हा प्रश्‍न देशवासियांना सतावत आहे. असे कर, असे करू नको, असे लहान बालकांना सांगावे लागते. ही वयाने मोठी; पण बुद्धीने खोटी असणारी कामचुकार मंडळी म्हणजे देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा आहेत.

दादरी प्रकरणी आकांडतांडव करणार्‍यांना मुसलमानांनी मंदिरावर केलेल्या गोळीबारात १५ वर्षीय हिंदु मुलगा ठार झाल्याचे दिसले नव्हते का ? - श्री. उपानंद ब्रह्मचारी, संपादक, हिंदु एक्झिस्टन्स संकेतस्थळ

श्री. उपानंद ब्रह्मचारी
      मांस शिजवून खाल्ल्याच्या संशयावरून उत्तरप्रदेशच्या दादरी येथील महंमद अखलाख नावाच्या एका ५२ वर्षीय व्यक्तीला ठेचून ठार मारण्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली. या संदर्भातील वृत्त भारतीय प्रसारमाध्यमांसाठी मुख्य वृत्त ठरले, तसेच आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनीही या प्रकरणाचा मोठ्या प्रमाणात बाऊ केला आहे; मात्र गेल्या ३० जुलै या दिवशी उत्तरप्रदेशमधील रामपूर येथे मुसलमानांनी एका १५ वर्षीय हिंदु मुलाची गोळ्या घालून हत्या केली. त्यावर प्रसारमाध्यमांनी चर्चा घडवून आणली नाही. राहुल, ओवैसी, केजरीवाल यांनी पीडित मुलाच्या कुटुंबियांची भेट घेतली नव्हती, तसेच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पीडिताच्या कुटुंबाला कोणतीच हानीभरपाईही घोषित केली नव्हती.

भारतीय स्त्री - कोण होतीस तू, काय झालीस तू ?

       प्राचीन इतिहासात भारतीय स्त्रियांना बरोबरीचे स्थान दिले गेल्याने वेद निर्मितीपासून राज्यकर्त्यांमध्ये महिलांची नावे कर्तृत्वाने झळकलेली आहेत; मात्र बाराव्या शतकानंतर भारतात इस्लामी आक्रमकांची सुमारे ६०० वर्षे राजवट राहिल्याने त्या काळात स्त्रियांच्या मोकळेपणावर बंधने आली. आज ३ टक्के आधुनिक भारतीय स्त्रिया करिअरप्रधान झाल्या असून बाकी स्त्रिया गृहिणीची भूमिका योग्य प्रकारे पार पाडत आहेत. त्यांच्यावरच आपली कुटुंबव्यवस्था आणि देश यांचे भविष्य अवलंबून आहे. त्यांना आपण यथोचित मान दिला पाहिजे. या लेखाचा काही भाग ९ आणि १० ऑक्टोबर या दिवशी प्रसिद्ध करण्यात आला. आज त्यापुढील सूत्रे पाहूया.

कुटुंबातील कोणी मृत झाले असल्यास, त्या वर्षात महालय श्राद्ध करू नये

आज सर्वपित्री अमावास्या...
     कुटुंबातील ज्या व्यक्तीचे वडील किंवा आई मृत झाली असेल, त्या श्राद्धकर्त्याने त्यांच्यासाठी ते गेल्यापासून वर्षभरात महालय श्राद्ध करण्याची गरज नसते; कारण त्यांच्यासाठी वर्षभरात श्राद्धविधी केले जातातच. श्राद्धकतार्र् मुलगा सोडून इतरांनी, उदा. श्राद्धकर्त्याचा चुलत भाऊ आणि ज्यांना सुतक लागते, त्या इतरांनी स्वतःच्या वडिलांसाठी वगैरे दरवर्षीप्रमाणेच महालय श्राद्ध करावे. मात्र सुतकाच्या दिवसांत महालयपक्ष आल्यास श्राद्ध करू नये. सुतक संपल्यानंतर येणार्‍या अमावास्येला ते करावे.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ श्राद्ध : महत्त्व आणि शास्त्रीय विवेचन)

आध्यात्मिकतेचा वारसा असेपर्यंत जगातील कोणत्याही शक्तीला भारताचा विनाश करणे अशक्य !

      भारताचा आत्मा म्हणजे धर्म आहे. आध्यात्मिकता आहे म्हणूनच भारताचे पुनरुत्थानसुद्धा धर्माद्वारेच होईल. भारताचे प्राण धर्मातच सामावले आहेत. हिंंदु लोक जोपर्यंत आपल्या पूर्वजांचा महान वारसा विसरत नाहीत, तोपर्यंत या जगातील कोणतीही शक्ती त्यांचा विनाश करू शकत नाही. जोपर्यंत शरीरातील रक्त शुद्ध आणि शक्तीसंपन्न आहे, तोपर्यंत त्या देहात कुठल्याही रोगाचे जंतू जिवंत राहू शकत नाहीत. आपले जीवनरक्त म्हणजे आध्यात्मिकता होय. जर ते आपल्या अंगातून स्पष्टपणे, जोरदार, शुद्ध आणि बलसंपन्न असे वहात असेल, तर सर्वकाही सुरळीत होईल. जर ते रक्त शुद्ध असेल, तर राजकीय, सामाजिक आणि अन्य भौतिक दोष अगदी या भूमीची गरिबीसुद्धा सर्व काही सुधारले जाईल. - श्री. राजाभाऊ जोशी (मासिक लोकजागर, दिवाळी विशेषांक २००८)

आतंकवादी देश युद्धात नष्ट होतात !

     काही देश विनाशकारी प्रवृत्तींची जोपासना करतात आणि इतर देशांमध्ये आतंकवाद घडवून आणतात. दहशत निर्माण करतात. अशा प्रकारे जे देश आसुरी मार्गाचा अवलंब करतात, असे देश एकतर समुद्रात बुडतात किंवा युद्धात नष्ट होतात. - स्वामी दत्तावधूत

देवतांची चित्रे आणि संतांची छायाचित्रे ओळखणारी कणकवली, जि. सिंधुदुर्ग येथील उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची चि. मोक्षदा पारकर (वय १ वर्ष) !

चि. मोक्षदा पारकर
     भाद्रपद अमावास्या (१२.१०.२०१५) या दिवशी कणकवली, जि. सिंधुदुर्ग येथील चि. मोक्षदा पारकर हिचा पहिला वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिची आई आणि आजी यांना तिच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे पुढे देत आहोत.
चि. मोक्षदा पारकर हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून शुभ आशीर्वाद 
१. समंजसपणा 
     एकदा मोक्षदाची आई तिला झोपवून बाजारात गेली. थोड्या वेळाने मोक्षदा जागी झाली आणि आई नाही; म्हणून रडू लागली. मी तिला म्हटले, आई खाऊ आणायला गेली. आपण श्रीकृष्णासमवेत खेळूया. त्या वेळी ती लगेच रडायची थांबली आणि माझ्यासमवेत खेळू लागली. - श्रीमती वैशाली पारकर (मोक्षदाची आजी), कणकवली 
२. मोक्षदाला गोंगाट किंवा मोठा आवाज आवडत नाही. 
३. तिला लहान मुले आवडतात. संगीताच्या तालावर ती डोलते. 

रामनाथी आश्रम हिंदु राष्ट्रासम आदर्श होण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणार्‍या आणि अंतरातील प्रीतीने साधकांना स्वभावदोष-निर्मूलन करण्यासाठी प्रेरणा देऊन त्यांना घडवणार्‍या पू. (सौ.) बिंदाताई !

कु. प्रियांका जगताप
१. रामनाथी आश्रम हा हिंदु राष्ट्राची प्रतिकृती होण्याला
पू. (सौ.) बिंदाताईंची तळमळ कारणीभूत असणे
    रामनाथी आश्रम म्हणजे जणूकाही हिंदु राष्ट्राचीच प्रतिकृती !, असे आपण सर्वच जण म्हणतो. आश्रम हिंदु राष्ट्र वाटावा, यामागे पू. (सौ.) बिंदाताईंची तळमळ कारणीभूत आहे. लहानातील लहान सूत्रही देवाला अपेक्षित असेच पूर्ण व्हायला हवे, असे पू. ताईंकडून मला शिकायला मिळाले. गृहव्यवस्थापन विभागाच्या सेवेअंतर्गत मला पू. ताईंचा सत्संग मिळतो. त्या वेळी पू. ताईंमधील साधकांच्या सोयीचा विचार, गुरुधन योग्य ठिकाणी वापरणे आणि तत्परता हे गुण शिकायला मिळाले.

प्रीती आणि तत्वनिष्ठता यांचा सुरेख संगम असलेल्या पू. (सौ.) बिंदाताई !

 १. प्रीती
    पू. (सौ.) बिंदाताईंमुळे सेवा करण्यातला आनंद मिळाला. पू. ताई सणांच्या दिवशी आमच्यासाठी (व्यवस्थापन विभागातील साधकांसाठी) खाऊ घेऊन येतात. पू. ताईंचे सर्व साधकांवर पुष्कळ प्रेम आहे. त्या सर्वांवर सारखेच प्रेम करतात.
२. तत्त्वनिष्ठ राहून साधनेसाठी प्रोत्साहन देणे
    आमच्याकडून काही चुका झाल्यास त्या तेवढ्याच तत्त्वनिष्ठतेने आम्हाला चुकांची जाणीवही करून देतात. साधकांकडून चुकांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी योग्य दृष्टीकोन देऊन त्या साधकांना साधनेसाठी प्रोत्साहन देतात.

सनातनच्या रामनाथी आश्रमातील साधिका कु. समृद्धी जोशी यांनी पू. (सौ.) बिंदाताईंना दिलेले शुभेच्छा पत्र


रामनाथी आश्रमात केलेल्या महालय श्राद्धविधीच्या संदर्भात कु. मधुरा भोसले यांना आलेल्या अनुभूती

कु. मधुरा भोसले
     पितृपक्षातील भाद्रपद कृष्ण पक्ष चतुर्थी (१.१०.२०१५) या दिवशी सकाळी १०.३० ते सायं. ५ या कालावधीत सनातनच्या रामनाथी आश्रमातील सभागृहात ११ साधकांनी पिंडदानादी महालय श्राद्धाचे विधी केले. माझ्या वडिलांनीही पितरांसाठी पिंडदान केले. मला अशक्तपणा असल्याने मी संपूर्ण श्राद्धविधीला उपस्थित राहू शकले नाही. दुपारी ३.१५ ते सायं. ४.४५ या वेळेत मी श्राद्धविधीच्या ठिकाणी उपस्थित होते. मी श्राद्धविधीला अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष रीत्या उपस्थित असतांना भगवान दत्तात्रेयांच्या कृपेने आलेल्या अनुभूती आणि सूक्ष्मातील परिणामांविषयी जाणवलेली सूत्रे दत्तगुरूंना वंदन करून लेखबद्ध करत आहे. 

श्राद्ध म्हणजे सर्व मृत व्यक्तींविषयी आपुलकी आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी श्रद्धेने केलेला हिंदु धर्मातील एक महान विधी !

१. व्याख्या
    श्राद्ध म्हणजे श्रद्धया कृतं कार्यम् ।, म्हणजे श्रद्धेने केलेली कृती. श्राद्धामधील मूळ तत्त्व आणि मूळ संकल्पना श्रद्धा ही आहे. मृत व्यक्तीसाठी त्यांच्या हयात असलेल्या वंशजांनी श्रद्धेने आणि धर्मशास्त्रानुसार केलेल्या विधींना श्राद्ध असे म्हणतात.
२. श्राद्धाविषयी अपसमज आणि श्राद्धाचा खरा अर्थ
     सर्वसाधारणपणे श्राद्ध हा शब्द उच्चारताच काहीतरी अशुभ, नको असणारे, अनिच्छेने आणि नाईलाजाने करावे लागणारे कर्म, अशी समजूत असते. वास्तविक हयात असलेल्या व्यक्तीला आपण ज्याप्रमाणे एखादी वस्तू भेट देऊन किंवा प्रसंगी त्या व्यक्तीला साहाय्य करून तिच्या प्रती आदर, आपुलकी आणि प्रेम व्यक्त करतो, त्याचप्रमाणे मृत व्यक्तीविषयी श्राद्धादी कर्मातून आदर अन् जिव्हाळा व्यक्त करता येतो.

पू. (सौ.) बिंदाताईंचे केवळ अस्तित्व हाच आधार असून त्यामुळे सेवा चांगल्या प्रकारे होत असल्याचे जाणवणे

कु. प्रियांका लोटलीकर
    चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाची सेवा करतांना मला पू. (सौ.) बिंदाताईंसमवेत सेवा करण्याची संधी मिळाली. त्या वेळी पू. बिंदाताईंचे केवळ अस्तित्व हाच आधार असून त्यांच्या अस्तित्वानेच सेवा अधिक चांगल्या प्रकारे होत आहे, असे मला जाणवले. - कु. प्रियांका लोटलीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(१२.७.२०१५)
चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात संवाद साधतांना
सौ. सुनिता खेमका आणि पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ (उजवीकडे)

सनातनच्या पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याविषयी साधकांना सुचलेली काव्यसुमने !

पू. बिंदाई असे आम्हा सर्वांची राधाई ।
    २४.९.२०१४ या दिवशी सनातनच्या ३० व्या समष्टी संत पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा वाढदिवस होता. त्या दिवशी कु. स्नेहा झरकर हिने लघुसंदेशाद्वारे त्यांना पाठवलेले भावकाव्य पुढे देत आहे.
सर्वांच्या पालनकर्त्या श्रीकृष्णाप्रमाणे ।
पू. बिंदाई असे आम्हा सर्वांची राधाई ॥ १ ॥
आई, कळत नाही या जिवा ।
तुझ्या अनंत प्रीतीला कशी होऊ उतराई ॥ २ ॥

पू. (सौ.) बिंदाताईंनी अंतर्मनात साधनेचे बीज रुजवल्याविषयी त्यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता !

प्रिय पू. बिंदाआई,
शिरसाष्टांग नमस्कार.
    तू कशी आहेस ? मला तुझी पुष्कळ आठवण येते. या मासात (महिन्यात) अशी पुष्कळ वेळा आठवण आली; पण आपण सेवाच करूया, असा विचार करून मी शांत झाले.
पू. माऊली, आज (१२.७.२०१५ या दिवशी) मला तुझी आठवण आली. तुम्ही देवद आश्रमात सत्संग घेऊन अंतर्मनात साधनेचे बीज रुजवलेत. त्यामुळे दिशा मिळून मी पुष्कळ आनंदात आहे.
      पू. ताई, स्वयंपाक विभागात पाय ठेवताच देवाला अपेक्षित असेच करायचे, असे वाटून आणि तुमची आठवण येऊन कृती होते. देवाला अपेक्षित असलेल्या गतीने मला शिकायचे आहे; पण ते मला जमत नाही. तुम्हीच मला पुढे घेऊन चला.  

सार्‍यांना आनंद देण्यासाठी तळमळणार्‍या पू. (सौ.) बिंदाताई यांचे ६३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या कु. स्वाती गायकवाड यांनी वेचलेले गुणमोती !

पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी प्रेमभराने
कु. स्वाती गायकवाड यांना दिलेले आलिंगन
    माझी पात्रता, क्षमता नसतांना देवाने मला पू. (सौ.) बिंदाताईंच्या सहवासात ठेवले आणि त्यांच्यासमवेत व्यवस्थापन विभागात सेवा करण्याची संधी दिली. त्यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहे.
१. पू. ताईंच्या प्रत्येक कृतीतून मिळते
इतरांना आनंद देण्याची शिकवण !
    त्यांची प्रत्येक कृती इतरांना अधिकाधिक आनंद कसा द्यायचा ? हे शिकवते. त्या अखंडपणे इतक्या सेवा करत असतात; पण तरी अत्यंत स्थिर, आनंदी आणि सहजभावात असतात. त्यांनी आम्हा सर्व मुलींना सांगितले, व्यवस्थापन विभाग हा आनंदी विभाग आहे. त्यामुळे इथे सेवा करतांना प्रत्येकाच्या तोंडवळ्यावर आनंद दिसायला हवा ! आम्हाला आनंदी रहाता यावे, ही त्यांचीच तळमळ आहे !
२. पू. बिंदाताईंचे वेगळेपण
    पू. ताईंचे वेगळेपण म्हणजे, त्या गुरुमाऊलीच्या सत्संगात असतांना लहान-लहान कृती शिकतात आणि त्या कृती नित्यस्वरूपी स्वतःच्या आचरणात आणतात. मला मात्र सार्‍या कृती प्रयत्नपूर्वक कराव्या लागतात.

साधकांना साधनेत सर्वतोपरी साहाय्य करणार्‍या पू. (सौ.) बिंदाताई !

कु. माधुरी दुसे
१. नावेला गती देणार्‍या पू. ताईच आहेत !
    रात्री सत्संग संपला. एक साधिका ताईंना भेटायला आली आणि म्हणाली, तुमच्यामुळे हे सर्व झाले. तेव्हा पू. ताईंनी सांगितले, देवाच्या कृपेमुळे हे सर्व होते. आपण सर्व एकाच नावेतील आहोत आणि नाव चालवणारे परम पूज्य आहेत. तेव्हा माझ्या मनात विचार आला, नाव चालवणारे प.पू. डॉक्टरच आहेत; पण त्या नावेला गती देणार्‍या पू. ताईच आहेत ना !
२. साधकांच्या साधनेला गती देणे
    पू. ताई साधकांना सत्संग आणि बैठका यांच्या माध्यमातून साधनेत कुठे न्यून पडतो ? काय प्रयत्न करायला पाहिजेत ?, हे सांगतात आणि त्यांच्या साधनेला गती देतात.

पू. बिंदा सिंगबाळ या नावाचा भावार्थ !

पू. : पूजनीय सार्‍या लहान-थोर साधकांना
बिं : बिंबवला आम्हा साधकांमध्ये गुरुकार्याचा ध्यास
दा : दायित्व देऊनी आम्हा छोट्या छोट्या जिवांस
सिं : सिंहासारखे घडवले आम्हा साधकांस
ग : गती दिली आम्हाला साधनेची आणि आध्यात्मिक उन्नतीची
बाळ : बाळ आहोत आम्ही सर्व जण या गुरुमाऊलीचे
- श्री. शंकर नरुटे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (९.१०.२०१५)

कमळासम असणार्‍या आमच्या पू. (सौ.) बिंदाताई !

पू. संदीप आळशी
    कमळ चिखलात उगवते, तरी ते सर्वांना आनंद अन् सात्त्विकता देऊन देवाच्या चरणी अर्पण होते. पू. बिंदाताईंचा जन्म सर्वपित्री अमावास्या या सर्वाधिक त्रास असणार्‍या तिथीला झाला असला, तरी त्या आनंददायी आणि साधकांना मार्गदर्शनातून ज्ञान अन् चैतन्य देणार्‍या असून अंतःकरणातून श्रीकृष्णाच्या चरणी समर्पित झाल्या आहेत !
- (पू.) श्री. संदीप आळशी (६.१०.२०१५)

व्यष्टी आणि समष्टी साधनेचा आदर्श असणार्‍या अन् प्रीतीचे मूर्तीमंत प्रतीक पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ !

    सनातनच्या ३०व्या संत पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा आज भाद्रपद अमावास्येला (१२ ऑक्टोबरला) वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने संत आणि साधक यांनी त्यांची लिहिलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
सनातन परिवाराच्या वतीने पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना
वाढदिवसानिमित्त साष्टांग नमस्कार !
    प्रेमळ आई आणि साधकांच्या सर्वांगीण प्रगतीची तीव्र तळमळ असलेले मार्गदर्शक गुरु या दोघांचे गुण एकत्र असल्याचे अन् व्यापक स्तरावर कार्यरत असलेले माझ्या पहाण्यातील एकमेव उदाहरण म्हणजे पू. (सौ.) बिंदाताई
सिंगबाळ ! त्या सर्व साधक आणि संत यांच्यापुढे व्यष्टी अन् समष्टी साधनेचा आदर्श आहेत. त्यांच्या उदाहरणातून स्फूर्ती आणि दिशा घेऊन सर्वांनीच स्वतःसह इतरांचीही प्रगती करवून घ्यावी, अशी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (११.१०.२०१५)

१. प्रेमभाव
१ अ. व्यस्त असूनही प्रत्येक साधकाची काळजी घेणे : सेवा असल्यामुळे आम्हाला दुपारी जेवायला विलंब झाला होता. हे पू. बिंदाताईंना समजले आणि जेवण केले असेल, तरच सेवा करायची, असे त्यांनी सांगितले. मी जेवायला गेले आणि जेवतांना मला एक सेवा आठवली; म्हणून मी ताट झाकून खाली स्वागतकक्षात गेले. तेव्हा पू. ताईंनी मला पाहून जेवलीस का ?, असे विचारले. मी ताट झाकून आले आहे, असे सांगितले. तेव्हा काय सेवा आहे, ते मला सांग. मी करते, असे त्या मला म्हणाल्या. मी नको म्हणाले. त्या वेळी त्यांनी एका साधिकेला ती सेवा सांगण्यास सांगितले आणि मला जेवायला पाठवले. पू. ताई एवढ्या व्यस्त असतात, तरी त्या प्रत्येक साधकाची लहान-लहान गोष्टीत काळजी घेतात.

बोधचित्र


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
शिक्षेने नाही, तर साधनेनेच दुर्गुण जातात
'शिक्षेने दुर्गुण जात नाहीत, तर साधनेनेच जातात, हे न कळणारे सर्वपक्षीय राज्यकर्ते राज्य करण्याच्या क्षमतेचे आहेत का ? यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा. त्यात सर्वांकडून साधना करवून घेतली जाईल.' - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३.७.२०१५)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
 जीवात्मा आणि शिवात्मा म्हणजे काय ? 
बाबा : मी कशासाठी जन्माला आलो आहे आणि मला काय करायचे आहे, याचे ज्ञान जीवाला झाले, तर त्या आत्म्याला 'जीवात्मा' म्हणतात. कोणीतरी माझ्याकडून कार्य करवून घेत आहे, याचे ज्ञान झाले की, त्या आत्म्याला 'शिवात्मा' म्हणतात. शिवात्मा शोधणे, म्हणजे खरे ज्ञान. शिवात्मा कार्यकारणभावापुरता जन्माला येतो, तर जीव प्रारब्धभोगामुळे जन्माला येतो. 
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.) 
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

न्यूनगंड बाळगू नका !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      आपल्या उणिवांची जाणीव ठेवून त्यांविषयी न्यूनगंड न बाळगता त्यांवर मात करण्यासाठी सदैव प्रयत्नशील रहा. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

पुरस्कार साहित्याचा कि कथित धर्मनिरपेक्षतेचा ?

संपादकीय
    देशात जातीय दंगलींमध्ये वाढ झाल्याचा कांगावा करत मल्याळम् लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या (?) सारा जोसेफ यांनी त्यांना मिळालेला प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी पुरस्कार परत केला आहे. जोसेफ यांच्यापूर्वी हिंदी कवी अशोक वाजपेयी आणि लेखिका नयनतारा सेहगल यांनी साहित्य अकादमी पुरस्कार परत केला आहे. यापूर्वी ९ ऑक्टोबर या दिवशी कन्नड लेखिका शशी देशपांडे यांनी कलबुर्गी यांच्या हत्येचा निषेध नोंदवत साहित्य अकादमी समितीच्या पदाचे त्यागपत्र दिले होते. एकूणच साम्यवादी, पुरोगामी यांच्या आतंकवादापाठोपाठ आता देशाला साहित्यिक आतंकवाद कि असत्यवादाला सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तसेही यापूर्वी भालचंद्र नेमाडेंसारख्या साहित्यिकाने उधळलेल्या मुक्ताफळांमुळे साहित्यक्षेत्राची वैचारिक उंचीच खुंटत आहे, याची जाणीव होऊ लागली होती. आता या पुरस्कार परत करण्याच्या मालिकेमुळे ते प्रकर्षाने जाणवू लागले आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn