Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

विनम्र अभिवादन !

क्रांतीवीर नानासाहेब पेशवे 
यांचा आज स्मृतीदिन

सनातन बंदीच्या आवईच्या विरोधात जळगाव येथे भव्य निषेध मोर्चा !

मोर्च्यात सहभागी हिंदू
१ सहस्रहून अधिक धर्माभिमानी हिंदूंची उपस्थिती !
जळगाव - कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी सनातनच्या साधकाला अटक केल्याच्या कारणावरून सनातनला आतंकवादी संघटना ठरवून तिच्यावर बंदी घालण्यात यावी; म्हणून तथाकथित पुरोगाम्यांनी रान उठवले आहे. या पार्श्व भूमीवर सनातनला विविध पक्ष, संघटना आणि संप्रदाय आदींकडून मोठा पाठिंबा मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून जळगाव येथे १० ऑक्टोबर या दिवशी सनातनवरील संभाव्य बंदीच्या निषेधार्थ विविध हिंदुत्ववादी आणि धार्मिक संघटना यांसह भव्य मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्च्यात १ सहस्रहून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते. सनातन संस्थेचे पू. नंदकुमार जाधव यांची वंदनीय उपस्थिती या वेळी लाभली. 

एका १४ वर्षीय मुलाचे तोडले हात-पाय !

 • आय.एस्.आय.एस्.मध्ये सहभागी न झाल्याची शिक्षा
 • हिंदूंनो, आय.एस्.आय.एस्.ची क्रूरता जाणा !
 • आय.एस्.आय.एस्.चे पुढील लक्ष्य भारत आहे. तेव्हा या संघटनेच्या आतंकवाद्यांशी भारतीय कसा लढा देणार आहेत ?
    इराक - आय.एस्.आय.एस्. या जिहादी आतंकवादी संघटनेत सहभागी होण्यास नकार दिल्यावरून मागील आठवड्यात सिरियाच्या एका १४ वर्षीय मुलाचे हात-पाय तोडण्यात आले. हे क्रूर कृत्य एका बुलडोझर नावाच्या कसायाने केले. हा रक्तरंजित खेळ पहाण्यासाठी परिसरातील मुलांना मोठ्या संख्येने एकत्र करण्यात आले होते. एका लाकडी पट्टीवर त्याचे हात ठेवण्यात आले. त्यानंतर कसायाच्या चाकूने ते कापण्यात आले, नंतर पायसुद्धा तोडण्यात आले, अशी माहिती पीडित ओमर याने दिली. हा बुलडोझर स्वत:जवळ एक धारदार शस्त्र ठेवतो. त्याद्वारे तो तरुणांना अपंग करतो.

पुरोगाम्यांच्या वैचारिक आतंकवादाला पायबंद घाला ! - अधिवक्ता देवदास शिंदे, हिंदु स्वाभिमान प्रतिष्ठान

डावीकडून सर्वश्री कुणाल साठे, नितीन घोटकुले, अधिवक्ता देवदास शिंदे,
अधिवक्ता राजीव देशपांडे, श्री. विजय गावडे, श्री. संजय शेळके
पुणे येथील हिंदुत्ववादी संघटनांचा सनातनला भक्कम पाठिंबा !
     पुणे, १० ऑक्टोबर (वार्ता.) - कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातनच्या साधकाला पोलिसांनी अटक केल्यानंतर सर्व पुरोगाम्यांनी आणि प्रसिद्धीमाध्यमांनी सनातन संस्थेवर आरोपांची राळ उठवत संस्थेवर बंदी आणण्याची मागणी केली. अद्याप समीर गायकवाड यांच्यावरचे आरोप सिद्ध झाले नसतांना 'सनातन, सनातन' असे म्हणणे, हे 'सनातन फोबिया' झाल्याचे लक्षण आहे. पुरोगामी मंडळी अशा प्रकारे सनातनवर विनाकारण आरोप करून खर्यात गुन्हेगारांना लपवण्याचेच कार्य तर करत नाहीत ना ? पुरोगाम्यांच्या या वैचारिक आतंकवादाला पायबंद घालण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन करत हिंदु स्वाभिमान प्रतिष्ठानचे सचिव अधिवक्ता श्री. देवदास शिंदे यांनी सनातन संस्थेला भक्कम पाठिंबा घोषित केला. सनातनच्या समर्थनार्थ १० ऑक्टोबर या दिवशी झालेल्या या पत्रकार परिषदेस हिंदु एकता आंदोलन पक्षाचे अधिवक्ता श्री. राजीव देशपांडे, मावळ गोरक्षा समितीचे श्री. नितीन घोटुकले, पिंपरी-चिंचवड येथील अखिल शिवजयंती महोत्सव समितीचे श्री. कुणाल साठे, पतित पावन संघटनेचे श्री. विजय गावडे, राष्ट्र सेनेचे श्री. हनुमंत मोहिते, पिंपरी-चिंचवड येथील शिववंदना प्रतिष्ठानचे श्री. संजय शेळके, हिंदु एकता आंदोलनचे श्री. सुबोध घाटगे उपस्थित होते. या वेळी एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने काही खोचक प्रश्न. विचारले. त्याची अधिवक्ता शिंदे आणि अधिवक्ता देशपांडे यांनी बाणेदारपणे उत्तर दिली.

अयोध्या येथे श्रीराम जन्मभूमी मंदिर उभारण्याचे काम चालू करा ! - विहिंप

हिंदूंच्या धार्मिक भावनांचा आदर करा !
    नवी देहली - शासनाने अयोध्या येथील वादग्रस्त भूमी कह्यात घ्यावी आणि श्रीराम जन्मभूमी मंदिर उभारण्याचे काम चालू करावे, अशी मागणी भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांच्यासह नवी देहली येथे घेतलेल्या एका संयुक्त पत्रकार परिषदेत विहिंपने केली. शासन मुसलमानांना मशीद उभारण्यासाठी शरयू नदीच्या दुसर्या बाजूला भूमी देऊ शकतो, अशी सूचनाही विहिंपच्या वतीने या वेळी करण्यात आली.
    राममंदिर उभारण्याला कोणाचाच विरोध नाही, असे विहिंपचे ज्येष्ठ नेते श्री. अशोक सिंघल यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. या सूत्रावर कायदेशीर तोडगा काढण्याविषयी चर्चा करण्यासाठी ९ आणि १० जानेवारी या दिवशी नवी देहली येथे राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात येणार असल्याचे श्री. सिंघल म्हणाले. डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी या वेळी म्हणाले, "भाजपने वर्ष २०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रम पत्रिकेत अयोध्या येथे राममंदिर उभारण्याचे आश्वा्सन दिले होते. मोदी शासनाने त्या दृष्टीने पावले उचलली पाहिजेत. शासनाच्या वतीने यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये उत्खनन अहवालात रामजन्मभूमीत श्रीराम मंदिर अस्तित्वात होते", असे म्हटल्याचा दावाही डॉ. स्वामी यांनी या वेळी केला.


मुसलमानांनो, हिंदुत्ववादी शक्तींविरुद्ध लढा ! - आझम खान

आझम खान यांचे चिथावणीखोर विधान !
    नवी देहली - देशाला हिंदु राष्ट्र बनवू पहाणार्या काही हिंदुत्ववादी शक्तींविरुद्ध मुसलमान समुदायाने उठून लढण्याची वेळ आली असल्याचे वक्तव्य समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तरप्रदेशचे मंत्री आझम खान यांनी केले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार आझम खान म्हणाले, "स्वातंत्र्यानंतर येथील मुसलमान इस्लामी देशात गेले नाहीत; कारण त्यांचा भारतातील धर्मनिरपेक्षतेवर विश्वा्स होता; (देशात धर्मनिरपेक्षता १९७५-७६ पासून चालू झाली. १९४७ मध्ये स्वातंत्र्याच्या वेळी ती नव्हती, ही गोष्ट माहीत नसलेले लोकप्रतिनिधी देशात आहेत, ही दुर्दैवाची गोष्ट आहे - संपादक)  मात्र काही शक्ती या व्यवस्थेत पालट करण्याचा प्रयत्न करत आहेत. देशाच्या धर्मनिरपेक्षतेला बाधा पोचवण्याचा प्रयत्न करणार्या शक्तींना आम्ही काम करू देणार नाही. बाबरीपासून दादरीपर्यंत घडणार्या घटना जग पहात आहे. दादरी येथील प्रकार हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांनी वर्ष १९९२ साली बाबरी मशीद पाडल्यापेक्षा अल्प हिंसक नाही," असेही खान म्हणाले.


(म्हणे) 'ऋषिमुनीही खायचे गोमांस !'

राजदचे रघुवंश सिंह यांचे धर्मद्रोही विधान
हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यानेच जन्महिंदू राज्यकर्ते हिंदु धर्माविषयी अशी अयोग्य 
विधाने करून देशात खळबळ माजवतात ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
मुजफ्फरपूर (बिहार) - गोमांस ऋषिमुनीही खात होते, असे वेद आणि पुराणांत लिहिले आहे, असे धर्मद्रोही विधान राष्ट्रीय जनता दलाचे रघुवंश प्रसाद सिंह यांनी केले. बरूराज विधानसभा मतदारसंघात ९ ऑक्टोबर या दिवशी आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. 

'आय.एस्.आय.एस्.'मध्ये गेलेल्या आझमगडच्या तरुणाला लागले भारतात परतण्याचे वेध

आझमगडच्या तरुणाला भारतात आणल्यानंतर त्याला शिक्षा करणार का ?
    आझमगड (उत्तरप्रदेश) - आय.एस्.आय.एस्.सह लढण्यासाठी सिरीयात गेलेल्या आझमगडमधील एका २० वर्षांच्या तरुणाचा भ्रमनिरास झाला असून त्याला पुन्हा भारतात घरी परतण्याचे वेध लागले आहेत. भारतीय सुरक्षा यंत्रणा या तरुणाला परत आणण्यासंदर्भात पुढाकार घेत आहे, तसेच त्याला या आतंकवादी संघटनेकडे ओढणार्यादचा तपास सुरक्षा यंत्रणांकडून करण्यात येत आहे. आझमगडचा हा तरुण प्रारंभी सामाजिक प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आय.एस्.आय.एस्.कडे आकर्षित झाला. त्यानंतर तो ६ मासांपूर्वी दुबईमार्गे टर्कीला आणि नंतर सिरीयामध्ये गेला होता. आतामात्र त्याचा भ्रमनिरास झाल्याचे सांगण्यात येते. त्याने काही दिवसांपूर्वी भारतात परतण्याची इच्छा व्यक्त केली.राजदचे रघुवंश प्रसाद सिंह यांच्या तोंडातून सैतान बोलत आहे काय ? - हिंदु जनजागृती समिती

धर्मशास्त्रांमधील 'गो मांस भक्षण' या शब्दाचा अर्थ समजून घेण्यासाठी साधनाच हवी !
मुंबई, १० ऑक्टोबर - राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रघुवंश प्रसाद सिंह यांनी वेद-पुराणांमध्ये ऋषीही गोमांस खात असल्याचे अत्यंत खोटे आणि आधारहीन वक्तव्य केले आहे. वास्तविक धर्मशास्त्र, वेद-पुराणे यांमध्ये ऋषी-मुनी कुठेही गोमांस खात असल्याचा उल्लेख नाही. 'हठयोगप्रदीपिका' (३.४८) या ग्रंथामध्ये म्हटले आहे,
'गोशब्देनोच्यते जिव्हा तत्प्रवेशो ही तालुनि 
गोमांसभक्षणं तत्तु महापातकनाशनम् ॥', 
अर्थ : 'गो'या शब्दाचा अर्थ जिव्हा (जीभ) असा आहे. जीभ तालूप्रदेशामध्ये म्हणजे टाळूला उलट दुमडून ध्यान करणे म्हणजे 'गो मांस भक्षण' होय. या क्रियेने महापातकांचा नाश होतो. रघुवंश हे धर्मग्रंथांमधील श्लोदकांचा दिशाभूल करणारा अर्थ लोकांना सांगत आहेत. त्यामुळे धर्मग्रंथांमधील कोणत्याही गोष्टींचा अर्थ समजून घेण्यासाठी साधनाच आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वी राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनीही देशातील अनेक भागांत हिंदू गायीचे मांस खातात, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. देशभरातून याला तीव्र विरोध झाल्यानंतर हे वक्तव्य माझे नसून ते माझ्याकडून सैतानाने वदवून घेतले होते, असे स्पष्टीकरण दिले होते. त्यामुळे लालू यांच्याच म्हणण्यानुसार आता रघुवंश यांचे वक्तव्यही सैतानाने केले आहे, असेच त्यांना म्हणायचे काय ? असा प्रश्न हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.

सनातनवर बंदी आणण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही ! - हिंदुत्ववादी संघटना, आंध्रप्रदेश

आंदोलनाच्या वेळी डावीकडून बोलतांना श्री श्री श्री त्रिदंडी व्रतधर स्वामीजी, बाजूला श्री ज्ञानेंद्र सरस्वती आणि उपस्थित धर्माभिमानी हिंदू
भाग्यनगर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
    भाग्यनगर (हैद्राबाद) - येथे हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने ४ ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रीय आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला शिवसेनेचे तेलंगण आणि आंध्रप्रदेश या राज्यांच प्रमुख श्री. टी.एन्. मुरारी, हिंदु धर्म रक्षा समन्वय समितीचे आंध्रप्रदेश राज्य सचिव श्री. रामांजनेयलू, हिंदु महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री श्री श्री त्रिदंडी व्रतधर स्वामीजी, हिंदु महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री ज्ञानेंद्र सरस्वती, हिंदु एकता मंचाचे श्री. जगतय्या, गोरक्षा दलाचे श्री. विजय, पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू आश्रमाचे श्री. देवी सिंह, हिंदु जनजागृती समितीचे आंध्रप्रदेश समन्वयक श्री. चंद्रु मोगेर, सनातन संस्थेच्या राज्य समन्वयक कु. तेजस्वी यांच्यासह अनेक धर्माभिमानी उपस्थित होते. यावेळी हिंदुत्ववाद्यांनी सनातनवर बंदी आणण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, अशी चेतावणी दिली.

पाकचे माजी विदेश मंत्री खुर्शीद यांचा कार्यक्रमही उधळणार ! - संजय राऊत, खासदार, शिवसेना

पाकप्रेमी निधर्म्यांना शिवसेनेचे 'प्रखर राष्ट्रप्रेम' 'दहशत'
वाटते आणि 'पाकचा आतंकवाद' प्रेमाचे प्रतीक वाटते का ?
मुंबई - १२ ऑक्टोबरला पाकचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांच्या एका पुस्तकाचे प्रकाशन वरळी (मुंबई) येथे करण्याचा काही पाकवाद्यांनी घातलेला घाटही शिवसेना उधळून लावणार आहे. जे गुलाम अलीचे होईल, तेच खुर्शीद कसुरीचे होईल. सुधींद्र कुलकर्णींसारख्या अतिशहाण्यांचा खटाटोप आम्ही येथे चालू देणार नाही, असे खासदार श्री. संजय राऊत यांनी घोषित केले आहे. (राष्ट्रप्रेमी शिवसेनेने पाकला विरोध करण्याचे धोरण चिकाटीने पुढे चालू ठेवले आहे. देशहितार्थ कृती करणार्‍या शिवसेनेकडून इतर पक्ष राष्ट्रप्रेम शिकतील का ? - संपादक) 

संमोहन करून किंवा प्रभाव टाकून गुन्हे घडवून आणणे शक्य नाही ! - मनोहर नाईक, संमोहनतज्ञ

      माणसाचा सुपर इगो जागा असल्याने कोणताही प्रभाव टाकून किंवा संमोहन करून बेकायदेशीर गुन्हे किंवा अनैतिक कृत्ये त्याच्याकडून घडवता येऊ शकत नाहीत. मानव त्यांची मते वारंवार पालटतात, असे अनेकदा लक्षात आले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवले आहे की, अशा प्रकारे संमोहन करून गुन्हा घडवता येऊ शकत नाही. डॉ. हमीद दाभोलकर हे मानसोपचारतज्ञ आहेत. त्यांनीही त्यांचे असेच मत वाहिन्यांवरून आणि पत्रकार परिषदेत सांगितले आहे. मी १२ संमोहनतज्ञांशी बोलून आलो आहे. त्यांनी सांगितले की, आम्ही जाहीरपणे पुढे येऊन हे सांगायला सिद्ध आहोत की, संमोहनाने अशा प्रकारे गुन्हे घडवून आणता येणे शक्य नाही. मानव म्हणतात त्याप्रमाणे कंडिशनिंग करता येत नाही.  
       पोलीस खाते मूर्ख आहे का ? सध्या लाय डिटेक्टर, नार्को या परीक्षा उपलब्ध आहेत.
     संमोहनात नीती-अनीती या कल्पना जाग्या असतात. त्यामुळे नैतिकतेविरुद्ध कोणीही कृती करू शकत नाही. श्याम मानव मांडत असलेले अजब तर्कशास्त्र हा बकवास आहे. - श्री. मनोहर नाईक, संमोहनतज्ञ

हिंदूंना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणे बंद करा !

राष्ट्रपतींच्या विधानांवर विहिंपचे चोख उत्तर
      नवी देहली - सहिष्णूता हे हिंदु धर्माचे मुख्य लक्षण आहे. गोमातेप्रती असणारा हिंदूंचा भाव सगळ्या विश्‍वाला ठाऊक आहे. अशा वेळी राष्ट्रपती गोमांस भक्षणाविषयी हिंदु समाजाची खिल्ली उडवत आहेत. गोहत्येच्या आडून हिंदूंच्या धर्मभावनांचा खेळ करणे बंद झाले पाहिजे. तसेच सातत्याने केवळ हिंदूंना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणे बंद करा, असे चोख प्रत्युत्तर विश्‍व हिंदू परिषदेचे संयुक्त महासचिव श्री. सुरेंद्र जैन यांनी दिले आहे.
श्री. जैन म्हणाले की,
१. जम्मू-काश्मीरचा आमदार गोमांसावरून हिंदूंना डिवचत असतांना सहिष्णूता बाळगण्याचे कारण नाही.
२. त्या आमदाराची विधाने लोकशाहीच्या व्याख्येत बसणारी नव्हती. गोहत्या करणे काय आणि त्यावरून चिडवणे काय, दोन्ही हिंदूंसाठी अवमानास्पद आहे.

अमेरिकेतील संशोधक डॉ. श्रीकांत पाटील यांची सनातन आश्रमाला भेट !

डॉ. श्रीकांत पाटील
     रामनाथी, १० ऑक्टोबर (वार्ता.) - अमेरिकेतील ‘त्रिवेदी ग्लोबल इनकॉर्पोरेशन’ (Trivedi Global Inc.,USA) या संस्थेचे संशोधन विभागाचे संचालक (‘डायरेक्टर रिसर्च’) डॉ. श्रीकांत पाटील यांनी सनातन आश्रमाला भेट दिली. या भेटीत त्यांनी सनातन आश्रमातील साधकांना आध्यात्मिक ऊर्जेसंदर्भात भारत, अमेरिका आणि कॅनडा येथील विद्यापिठे अन् संशोधन केंद्रे यांमध्ये केलेल्या प्रयोगांविषयी अवगत केले. या प्रयोगांमध्ये विविध द्रव्ये (मटेरिअल्स), जिवाणू, वनस्पती, प्राणी आणि मानवी पेशी या सर्वांवरच प.पू. महेंद्र त्रिवेदी गुरुजींनी संचलीत केलल्या आध्यात्मिक ऊर्जेचा कसा परिणाम होतो, यासंदर्भात केलेल्या वैज्ञानिक प्रयोगांविषयी माहिती दिली.
 सनातनच्या साधकांना संशोधनाविषयी माहिती देतांना डॉ. श्रीकांत पाटील
(अमेरिकेतील त्रिवेदी ग्लोबल इनकॉर्पोरेशन या संस्थेचे संशोधन विभागाचे संचालक)
     या प्रयोगांत मिळालेले निष्कर्ष आधुनिक वैज्ञानिकांसाठी अभूतपूर्व होते. याविषयी बोलतांना डॉ. श्रीकांत पाटील म्हणाले, ‘‘रात्री झोप चांगली येणे, सकाळी पोट साफ होणे आणि स्वतःच्या आरोग्यात सुधारणा करणे आदी गोष्टीही मानव स्वतः ठरवूनही प्रत्येक वेळी करू शकत नाही. सर्वोच्च शक्तीच (‘सुप्रिम पावर’) सर्व काही नियंत्रित करत असते. या शक्तीसंदर्भातील अनेक वैज्ञानिक प्रयोग आम्ही भारत, अमेरिका आणि कॅनडा येथे केले आहेत. या प्रयोगांत मिळालेले निष्कर्ष आधुनिक वैज्ञानिकांसाठीही अभूतपूर्व आहेत. आम्ही केलेले सर्व वैज्ञानिक प्रयोग आधुनिक, मान्यताप्राप्त आणि सुप्रतिष्ठित प्रयोगशाळा, संशोधन केंद्र अन् विद्यापिठे यातील तज्ञ संशोधकांनी केलेले आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या शंकेला (‘प्लासिबो रिस्पॉन्स (Placebo Response)’लाही) जागाच उरत नाही. या सर्व प्रयोगांविषयी माहिती www.trivediscience.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.’’

तुर्कस्तानमध्ये बॉम्बस्फोट; २० जणांचा मृत्यू

     अंकारा - तुर्कस्तानची राजधानी अंकारामध्ये रेल्वे स्थानकाबाहेर १० ऑक्टोबरला झालेल्या शक्तीशाली बॉम्बस्फोटात २० जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, अंकारातील प्रमुख रेल्वेस्थानकाबाहेर शांतता मोर्चासाठी नागरिक एकत्र जमले असतांना स्फोट घडवून आणण्यात आला. स्फोटाच्या ठिकाणी नागरिकांचे मृतदेह पडले होते. या स्फोटात अनेक जण घायाळ झाले असून, घायाळांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अजून कोणत्याही आतंकवादी संघटनेने या आक्रमणाचे दायित्व स्वीकारलेले नाही. तुर्कस्तानमधील मानवाधिकार संघटनांनी हिंसा आणि कुर्दिश आतंकवाद्यांकडून होत असलेल्या आक्रमणांच्या विरोधात शांतता मोर्च्याचे आयोजन केले होते. याच वेळी हा स्फोट झाला.

ट्युनिशियाच्या द क्वार्टलेट या संस्थेला शांततेचे नोबेल घोषित

     ऑस्लो - ट्युनिशियामध्ये वर्ष २०११ मध्ये झालेल्या मोठ्या आंदोलनानंतर अराजकतेच्या उंबरठ्यावर असलेल्या या देशात लोकशाही टिकवण्यासाठी विशेष योगदान दिलेल्या द क्वार्टलेट या संस्थेला या वर्षीचे शांततेचे नोबेल पोरतोषिक घोषित करण्यात आले आहे. या संस्थेसह इतर क्षेत्रातील नोबेल मिळालेल्या सर्व विजेत्यांना १० डिसेंबर या दिवशी पारितोषिक वितरण होणार आहे.

मैनपुरी (उत्तरप्रदेश) येथे गोहत्येमुळे हिंदूंचा उद्रेक !

हिंदूंच्या उद्रेकामुळे तैनात करण्यात आलेला पोलिसांचा फौजफाटा
दादरी प्रकरण ताजे असतांना अशा प्रकारची गोहत्या हिंदूंच्या धर्मभावना दुखावण्यासाठी जाणीवपूर्वकच करण्यात आली, असे हिंदूंना वाटले, तर त्यात वावगे काय ?
आग्रा - दादरी येथील घटना ताजी असतानांच आग्यापासून १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या मैनपुरी जिल्ह्यातील करहल नगरिया येथे ९ ऑक्टोबरला काही धर्मांधांनी गायीची हत्या केली. त्यामुळे हिंसक झालेल्या जमावाने दोघांना बेदम मारहाण केली. या वेळी पोलिसांनी दोन्ही तरुणांची जमावाच्या तावडीतून सुटका करून त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त आहे. 

देशात जातीयवाद वाढल्याच्या कथित कारणावरून सारा जोसेफ यांच्याकडून साहित्य अकादमी पुरस्कार परत !

काश्मीरमध्ये लक्षावधी हिंदूंचे शिरकाण झाले, साडेचार लक्ष हिंदूंना त्यांच्याच देशात निर्वासित होऊन परागंदा व्हावे लागले, तेव्हा सारा जोसेफ यांच्यासारख्यांनी कधी विरोध नोंदवला आहे का ?
नवी देहली - देशात जातीय दंगलींमध्ये वाढ झाल्याचा कांगावा करत मल्याळम् लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या (?) सारा जोसेफ यांनी त्यांना मिळालेला प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी पुरस्कार परत केला आहे. जोसेफ यांच्यापूर्वी हिंदी कवी अशोक वाजपेयी आणि लेखिका नयनतारा सेहगल यांनी साहित्य अकादमी पुरस्कार परत केला आहे. यापूर्वी शुक्रवारी कन्नड लेखक शशी देशपांडे यांनी कलबुर्गी यांच्या हत्येचा निषेध नोंदवत साहित्य अकादमी समितीच्या पदाचे त्यागपत्र दिले होते.

धर्मकार्य करणार्या संस्थेला होत असलेला त्रास पाहून ब्रिटिशांचे राज्य आल्यासारखे वाटते ! - डॉ. ब्र श्री उमेश शर्मा गुरुजी, प्रमुख पुजारी, श्री संकष्टहर गणपती देवालय

डॉ. ब्र श्री उमेश शर्मा गुरुजी
सनातन संस्था चांगले कार्य करत आहे. धर्माची सेवा करणार्यांना सर्व बाजूंनी त्रास देणारे असतात. भारतात प्रत्येकाला धर्मकार्य करण्याचे स्वातंत्र्य आहे. धर्माविषयी, देवाविषयी बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. सनातन जे बोलत आहे ते चुकीचे आहे, असे म्हणून त्यावर बंदी घालणे योग्य नाही. त्यासाठी सर्व हिंदूंनी वैध मार्गाने लढा दिला पाहिजे. धर्मकार्य करणार्या संस्थेला होत असलेला त्रास पाहून ब्रिटिशांचे राज्य असल्यासारखे वाटते. हिंदू समाजाने जागृत झाले पाहिजे. सनातनवर बंदी घालणे चुकीचे आहे.

सनातनवर बंदी आणणे म्हणजे ईश्वराच्या सत्यतेवर बंदी आणण्यासारखे आहे ! - डॉ. आय. ए. खान अनजाना, संस्थापक अध्यक्ष, खानकाह सूफी दीदार शाह चिश्ती, कल्याण

डॉ. आय्.ए.खान दैनिक सनातन प्रभात वाचतांना
सनातन संस्थेची कार्यपद्धत आणि त्यांनी केलेला विश्वाातील मानवजातीच्या सेवेचा संकल्प अभिनंदनीय आहे. सनातन म्हणजे ईश्वर आणि सृष्टी आहे. सनातन म्हणजे ईश्वराचे एक नाव आहे. अनिष्ट प्रथा आणि चालीरिती, मानवताविरोधी कुकृत्ये यांचाही सनातनने विरोध केला आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आपले जीवन विश्वशांतीसाठी अर्पित केलेले आहे. आध्यात्मिक विश्वविद्यालय हे त्याचे ज्वलंत प्रमाण आहे. संस्थेचे साधक सातत्याने ईशसेवेत मग्न असतात. अशा साधकांकडून अधर्माचे कार्य कधीच होणार नाही.
     स्वतः सनातनच्या नियमांवर जिवंत आहेत, असे लोक सनातन संस्थेवर बंदी आणण्याची चर्चा करत आहे. सनातन संस्था विश्वात परमेश्वराची जागृती करत आहे. सनातनवर बंदी आणणे म्हणजे ईश्वराच्या सत्यतेवर बंदी आणण्यासारखे आहे. महाराष्ट्र शासन बंदी आणण्याच्या विचारात नाही, याचे आम्ही स्वागत करतो. सनातनचा उद्देश पूर्ण होऊ दे. ईश्वराने सनातनच्या साधकांचे जीवन सुदृढ करावे, हीच शुभेच्छा !                         

आरोपी निर्दोष असेल, तर माध्यमांनी त्याला पुनःप्रतिष्ठा मिळवून दिली पाहिजे ! - जय महाराष्ट्र वाहिनीवरील चर्चासत्रात संपादकांनी स्वीकारले सनातनचे आव्हान !

श्री. अभय वर्तक
     कुठल्याचे संशयिताचेही निर्दोषत्व सिद्ध झाले, तर प्रतिष्ठा मिळवून देणे, हे माध्यमांचे कर्तव्य आहे. जय महाराष्ट्रची संपादकीय भूमिका म्हणून आम्ही तसे करू. फक्त ते सर्वोच्च न्यायालयात सिद्ध झाले पाहिजे, असे जय महाराष्ट्र वाहिनीचे संपादक श्री. समीरण वाळवेकर यांनी त्यांच्या वाहिनीवरील एका विशेष कार्यक्रमात सांगितले. कॉ. पानसरे हत्याप्रकरणी सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शाम मानव यांच्याशी वाहिनीच्या संपादक मंडळाने प्रदीर्घ चर्चा केली. त्यावेळी समीर गायकवाड निर्दोष सुटले, तर आपली वाहिनी असा कार्यक्रम त्यासाठी करणार का, असे विचारल्यावर श्री. वाळवेकर यांनी ते आवाहन स्वीकारले. त्यांतील काही भाग येथे देत आहोत.

(म्हणे) मी पालटलेला कायदाच आता संमत झाला आहे !

मानव यांनी मारलेली आणखी एक थाप !
     मानव म्हणाले की, माझे जादूटोणा कायद्याविषयी दाभोलकरांशी मतभेद होते. त्याविषयी मी दैनिकांतून लेख लिहिले. मी कायदा आमुलाग्र बदलून घेतला. त्यानंतर आता जो कायदा संमत झाला आहे, तो मी पालटलेला कायदाच संमत झाला आहे. (वास्तविक हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे, की जाचक जादूटोणा कायद्याच्या विरोधात अनेक वर्षे हिंदुत्ववादी संघटना आणि वारकरी यांनी केलेल्या आंदोलनांमुळे शासन त्यातील एक एक जाचक कलम वगळत गेले ! - संपादक)

सनातन संस्थेचा अभिमान आहे ! - पूज्य श्री श्री श्री त्रिदण्डी व्रतधर नारायण रामानुज स्वामीजी, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारत हिंदु महासभा

    मी जवळपास गेल्या २० वर्षांपासून सनातन संस्थेला पुष्कळ जवळून जाणतो. संस्थेच्या प्रत्येक कार्यक्रमात मी भाग घेतो. संस्थेने प्रकाशित केलेले बरेच ग्रंथ मी वाचलेले आहेत. संस्था हिंदु धर्माचे उत्तम कार्य करत आहे. या संस्थेचे साधक आणि ही संस्था यांचा मला अभिमान आहे. मी प्रसारमाध्यमांना विनंती करतो की, त्यांनी हिंदु धर्म आणि धर्माचे कार्य करणारी सनातन संस्था यांच्याविरूद्धचा अपप्रचार त्वरित थांबवावा.

खालील वृत्ते रविवारच्या वाचकांसाठी पुन्हा प्रसिद्ध करत आहोत

हत्या झालेल्या मुसलमान व्यक्तीच्या कुटुंबाला ४५ लाख रुपये देणारे उत्तरप्रदेश शासन हिंदूंना कधी काही देते का ?      

गोमांस खाल्ल्यावरून उत्तरप्रदेशच्या दादरी गावातील अखलाख नावाच्या मुसलमानाची हत्या झाल्यावर समाजवादी पक्षाच्या अखिलेश सिंह यादव शासनाने त्याच्या कुटुंबाला ४५ लाख रुपये हानीभरपाई दिली.
--------------------------------------------------------------------
  
  'वेदशास्त्र मानणारा खरा हिंदु असतो. ते मानत नसाल; तर 'हिंदु' नावाला अर्थ उरत नाही. भविष्यात हिंदु धर्म राहिला, तरच भारतात एकता राहील. - द्वारका ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती
--------------------------------------------------------------------

सप्टेंबर २०१५ मध्ये सनातन संस्थेच्या 'सनातन डॉट ऑर्ग' (Sanatan.Org) या संकेतस्थळाला भेट देणार्यांसच्या संख्येत लक्षणीय वाढ

    कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणात सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना संशयित म्हणून अटक करण्यात आली. त्यानंतर प्रसारमाध्यमे आणि सनातनचे विरोधक यांनी सनातनवर चिखलफेक करण्यास आरंभ केला. या पार्श्वभूमीवर 'सनातन संस्था नेमके काय कार्य करते', हे जाणून घेण्यासाठी लोकांनी सनातनच्या संकेतस्थळाला भेट देऊन विषय जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सप्टेंबर मासात सनातनच्या वाचकसंख्येत वाढ झाल्याचे दिसून येते. त्याचबरोबर चातुर्मास, श्राद्ध, नवरात्र यांविषयी वैशिष्ट्यपूर्ण माहितीला चांगला प्रतिसाद लाभला.  
कॉ. पानसरे हत्येच्या प्रकरणात सनातन संस्थेवर दोषारोप होत असतांना संकेतस्थळाच्या वाचकसंख्येत वाढ !

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Dharmashikshanke abhavse RJD neta
Raghuvansh Sinhane kaha, rishimunibhi gomans khate the.
- kya Lalu Prasad Yadav isebhi saitanki boli kahenge ?
जागो !
धर्मशिक्षणके अभावसे राजद नेता रघुवंश सिंहने कहा,
ऋषिमुनि भी गोमांस खाते थे ! - क्या लालू प्रसाद यादव इसेभी सैतान की बोली कहेंगे ?

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंनो, धर्मशास्त्रांमधील शब्दांचा अर्थ समजून घेण्यासाठी साधना करा !
     गोमांस ऋषीमुनीही खात होते, असे वेद आणि पुराणांत लिहिले आहे, असे धर्मद्रोही विधान राष्ट्रीय जनता दलाचे रघुवंश प्रसाद सिंह यांनी बरूराज विधानसभा मतदारसंघात आयोजित प्रचारसभेत केले.

सनातन संस्थेच्या हिंदु धर्मकार्यास पंढरपूर तालुका शिवसेनेचा पाठिंबा ! - दत्ता भोसले, शिवसेना पंढरपूर तालुका संपर्कप्रमुख

     सध्या प्रसारमाध्यमांनी हिंदुत्ववादी संघटनांना अपकीर्त करण्याची सुपारी घेतली आहे कि काय, अशी शंका येते, नव्हे खात्री होते. सनातन संस्थेला अपकीर्त करण्यासाठी सर्व पुरोगामी आणि निधर्मीवादी नास्तिक लोकांची एकजूट झालेली दिसते. अशा वेळी हिंदुत्ववादी संघटनांनी सनातनच्या पाठीशी उभे रहाण्याची आवश्यकता आहे. एखाद्याने चुकीचे कृत्य केले, तर त्यालाच उत्तरदायी धरायला हवे. त्यासाठी संघटना किंवा पक्ष यांना उत्तरदायी कसे म्हणणार ? इंदिरा गांधींच्या हत्येनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी देहली आणि अन्य ठिकाणी सहस्रो शीख बांधवांची हत्या केली, मग तेव्हा काँग्रेसवर बंदी घातली का ? प्रसारमाध्यमांनी तशी मागणी तरी केली होती का ? मग काँग्रेसला एक न्याय आणि सनातनला वेगळा न्याय असे का ? सनातन संस्थेच्या हिंदु धर्मकार्यास पंढरपूर तालुका शिवसेनेचा पाठिंबा आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे पंढरपूर तालुका संपर्कप्रमुख दत्ता भोसले यांनी केले आहे आणि सनातनला पाठिंबा दर्शवला आहे.

शौर्य, धैर्य, त्याग आणि पराक्रम या सद्गुणांचे संदर्भच पालटल्याने आज भ्रष्टाचार, काळा बाजार करणारे लोक देशभक्त ठरले आहेत !

      देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊनही त्या स्वातंत्र्यासाठी आत्मयज्ञ करणार्‍या या महान मृत्यूंजयांचा, स्वातंत्र्यावीर सावरकरांचा गौरव करण्याची इच्छा आजच्या नतद्र्रष्ट, भ्रष्टाचारी आणि अनीतीमान राज्यकर्त्यांना होत नाही, ही मोठ्या दुःखाची गोष्ट आहे किंबहुना या हुतात्म्यांच्या क्रांतीकार्याकडे बघण्याची आजच्या राज्यकर्त्यांची दृष्टी इतकी कोती आणि कृतघ्नपणाची आहे की, ती पाहून कोणाही स्वातंत्र्यभक्ताचा संताप अनावर झाल्यावाचून रहाणार नाही. किंबहुना रक्ताचा थेंब न सांडता आम्ही देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, असा दावा करण्यापर्यंत या काँग्रेसवाल्यांची मजल गेलेली आहे. सत्य आणि नीती यांची विटंबना झाली आहे आणि अनैसर्गिक तत्त्वज्ञानाचा राजकारणावर पगडा बसला आहे. स्वातंत्र्य मिळून आज ६१ वर्षे झाली; पण राष्ट्रीय जीवनाचा जो झपाट्याने अधःपात झालेला दिसतो तो याचमुळे ! शौर्य, धैर्य, त्याग आणि पराक्रम या सद्गुणांचे संदर्भच पालटले आहेत.
      स्वराज्यात अधिकाराचा भ्रष्टाचार, काळा बाजार करणारे लोक आज देशभक्त ठरावेत अन् मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आत्यंतिक त्याग करणारे, सर्वस्व देणारे मृत्यूंजय, हुतात्मे, देशद्रोही समजले जावेत, यापेक्षा राष्ट्रीय जीवनाचा अधिक अधःपात होणे शक्य आहे का ? 
- श्री. शंकर द. गोखले (स्वातंत्र्यवीर, दिवाळी विशेषांक २००८) 
(आज ७ वर्षांनीही देशाच्या स्थितीत कोणताही पालट झालेला नाही. - संपादक)

अभियांत्रिकी महाविद्यालयात झालेले शिक्षणाचे बाजारीकरण, जे हुशार आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांचे करते आहे मानसिक खच्चीकरण !

      अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेच्या निमित्ताने एका प्रामाणिकपणाने अभ्यास करणार्‍या विद्यार्थिनीने अनुभवलेली शासकीय कामातील दिरंगाई, कर्मचार्‍यांची कामाप्रतीची उदासीन वृत्ती, आरक्षणाचा अन्यायकारी भस्मासूर आणि महाविद्यालयातील शिक्षकांचे केवळ पोटार्थी जिणे ! या सगळ्या चरकातून पिळून निघतांना विद्यार्थ्यांनी शिक्षण घेण्याच्या मूळ हेतूचा आणि महाविद्यालयाचा आता दूरान्वयानेही संबंध राहिला नाही का ?, असे म्हणावेसे वाटते. भरमसाठ शुल्क भरून आणि बराच मन:स्ताप सहन करून महाविद्यालयात जायचे कशासाठी ? केवळ नावापुढे एक पदवी लागण्यासाठीच का ? सध्याचे शिक्षणक्षेत्र खर्‍या विद्येला (जी अविद्येचा नाश करते.) जाणतच नाही; पण मग पोटार्थी शिक्षण तरी शास्त्रशुद्धपणे द्यावे ! शिक्षणाचे बाजारीकरण करून विद्यार्थ्यांचे उभरते आयुष्य तणावात आणि अस्थिरतेत घालवणारे सध्याचे शिक्षण घेणार्‍या महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीचे अनुभव आपण आता पहाणार आहोत. 

सनातनचा आश्रम सर्वांसाठी उघडा असून सनातनची कार्यपद्धत पारदर्शक आहे !

 • सनातनविषयीच्या प्रश्‍नांचे शंकानिरसन !
 • सनातनचे गूढ या संकल्पनेचा अभय वर्तक यांनी फाडलेला बुरखा !
१. प्रश्‍न : सनातनविषयी काहीतरी गूढ निर्माण केले जाते !
उत्तर : सनातनच्या आश्रमात सर्वसामान्य व्यक्तींपासून पत्रकार, राजकीय नेत्यांपर्यंत सर्व जण येऊन गेले आहेत. कुमार केतकरही येऊन गेले आहेत. सनातनविषयी गूढ म्हणून काही तरी निर्माण केले जाते, उदा. स्वसंरक्षण प्रशिक्षण यात काय गूढ आहे ? आमचे म्हणणे आहे की, सर्वच ठिकाणी ते दिले गेले पाहिजे. आपल्या कार्यालयातही दिले गेले पाहिजे. शासनाने ते सर्व मुलींना दिले पाहिजे. प्रत्येकाला ज्युडो, कराटे, लाठीकाठी, तलवार, बंदूक चालवायला शिकवा.

हिंदु संघटना म्हणूनच सनातनची अपकीर्ती !

श्री. वर्तक यांनी फोडली हिंदूंवरील अन्यायाला वाचा !
१. प्रश्‍न : प्रत्येक वेळी संशयाची सुई सनातनवरच का ?
उत्तर : डॉ. दाभोलकर आणि मानव दोघांच्या संघटनांचे भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढले. मानवांनी प्रतिवर्षी लेखा अहवाल दिला आहे का ? डॉ. दाभोलकरांच्या अंनिसच्या विरोधात आम्ही माहितीच्या अधिकारात अर्ज केले. आम्ही याचिका दाखल केली. सनदशीर मार्गाने लढा दिला. आम्ही विरोधक होतो; म्हणून आमची चौकशी झाली. यांची चौकशी का नाही झाली ? हे पण त्यांचे स्पर्धक होते, हेही त्यांच्यामधील एक लाभ उठवणारे होते. यांची चौकशी का नाही झाली ? एकट्या सनातनला सातत्याने हिणवले गेले. एक हिंदु संघटना म्हणूनच तिच्यावर सातत्याने दबाव टाकला गेला.

सनातनवर सातत्याने होणार्‍या ब्रेन वॉशच्या आरोपाचे श्री. वर्तक यांच्याकडून खंडण !

संपादक : कसाबप्रमाणे ब्रेन वॉशिंग होऊ शकते.
श्री. वर्तक : ब्रेन वॉशिंग प्रक्रिया करण्यासाठी त्या व्यक्तीचे हाल करावे लागतात, उपाशी ठेवावे लागते. तसे संस्कार करावे लागतात; पण या खटल्यात असे काहीच झालेले नाही. अभय वर्तकही ब्रेन वॉश आहेत, असे हे म्हणतात. 
संपादक : ते सनातनच्या कार्यपद्धतीविषयी बोलतात.

अखिल भारतीय हिंदू अधिवेशन आणि गुरुपौर्णिमा यांसाठी विज्ञापनदात्यांकडून मिळालेला प्रतिसाद !

    श्रीगुरुकृपेने आम्हाला वर्ष २०१५ चे अखिल भारतीय हिंदू अधिवेशन आणि गुरुपौर्णिमा यांसाठी विज्ञापने आणण्याची सेवा मिळाली. आम्ही समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींची सूची सिद्ध केली आणि नियोजन करून त्याप्रमाणे संपर्क केले. काही आधुनिक वैद्यांना संपर्क केल्यावर त्यांनी कार्याची प्रशंसा केली आणि सहकार्य केले. प्रत्येक ठिकाणी प्रार्थना केल्यावर विज्ञापनदात्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. ज्या ठिकाणी काही प्रमाणात नकारात्मकता जाणवली, तेथे देवाने संवाद साधण्याची संधी दिली आणि त्या व्यक्तीला सकारात्मक केले. याविषयी आलेले अनुभव येथे देत आहोत.
१. प्रथितयश स्त्रीरोगतज्ञांकडे विज्ञापन आणण्यास गेल्यावर आलेले अनुभव
१ अ. शहरातील एका स्त्रीरोगतज्ञांना अधिवेशनाविषयी सांगितल्यावर प्रभावित होऊन विज्ञापन देणे : आम्ही अधिवेशनासाठी विज्ञापन घेण्यासाठी वर्ष २०१४ मध्ये स्मरणिकेत विज्ञापन दिलेल्या एका स्त्रीरोगतज्ञाकडे गेलो. त्यांना भेटल्यावर ते लगेच म्हणाले, गुरुपौर्णिमा जवळ आली ना ! प्रतिवर्षीप्रमाणे माझे विज्ञापन घ्या. तेव्हा आमच्या मनात अधिवेशनाविषयी सांगावे कि नको, असा संभ्रम निर्माण झाला. आम्ही श्रीकृष्णाला प्रार्थना करून अधिवेशनाचा विषय, ध्येय आणि होणारा व्यय हे त्यांना थोडक्यात सांगितले. हे ऐकल्यावर ते म्हणाले, तुमचे कार्य खरेच मोठे आहे. मी खारीचा वाटा म्हणून विज्ञापन देतो.

वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

सनातन पंचांग २०१६ची मागणी लवकरात
लवकर कळवून आपली प्रत आजच राखून ठेवावी !
     सनातन पंचांग केवळ पंचांग नव्हे, तर हिंदुत्वाचे सर्वांगच आहे. राष्ट्र-धर्म कार्यासाठी कृतीशील करणारे आणि धर्मशिक्षण देणारे प्रभावी माध्यम असणारे हे पंचांग जिज्ञासूंना साधनेसाठी अमूल्य मार्गदर्शनही करते. सनातन पंचांगाला सर्वच स्तरांवरून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत आहे. पंचांगाच्या संदर्भात समाजाकडून लाभणारा वाढता प्रतिसाद आणि अपुरी साधकसंख्या यांमुळे वर्ष २०१५ चे पंचांग काही जिज्ञासूंना वेळेत मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांनी वर्ष २०१५ चे सनातन पंचांग देण्यासाठी आमच्याकडे कोणीच आले नाही. आम्ही साधकांची वाट पहात होतो. या वर्षी आम्हाला आठवणीने पंचांग आणून द्या, असे स्वतःहून साधकांना कळवले आहे.

प्रतिवर्षीचा संस्थेचा लेखाजोखा सादर न करणारे मानव म्हणे बक्षिसासाठी पैसे ठेवले आहेत !

     मानव या वेळी म्हणाले, आम्ही कोणाकडून विशेष पैसे घेतले नाही. शासनाकडून थोडेफार घेतले. काही पैसे बक्षिसाची रक्कम म्हणून वेगळे ठेवले आहेत. (आतापर्यंत अध्यात्मातील काही अधिकारी व्यक्तींनी मानव यांच्या आव्हानांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता; परंतु कोणाचेही आव्हान न स्वीकारणारे मानव यांना खरे म्हणजे कुणाला बक्षीस द्यायचेच नाही. नाहीतर त्यांनी उत्तरे स्वीकारली असती ! म्हणून बक्षिसासाठी ठेवलेले पैसे कधी वापरलेच गेलेले नाहीत, तर त्यासाठी ते वेगळे ठेवले आहेत, हे म्हणणे हे शुद्ध ढोंग नव्हे का ? - संपादक)

शाम मानव यांचे हास्यास्पद विचार !

     वरपांगी संमोहनाने गुन्हा घडवता येऊ शकत नाही, हे मीही मान्य करतो. त्यामुळे सगळे संमोहनतज्ञ तसे सांगत असले, तरी ते चुकीचे नाही. सनातनमध्ये केलेले संमोहन हे वेगळ्या प्रकारचे आहे. येथे सत्संगात माणसे येतात. त्यांच्या निष्ठा पूर्णपणे त्यांच्याशी निगडित असतात. त्यांना अनुभूती येत असतात. त्यातून माणसे निवडली जातात.
     प.पू. डॉ. आठवले यांनी स्वत:ची अशी वेगळी पद्धत शोधून काढली आहे. ती संमोहनाच्या सामान्य रूपात बसत नाही आणि सामान्य संमोहनतज्ञांना ती समजणार नाही.

शाम मानव यांचे अजब तर्कट !

     संमोहन करण्याचे अनेक प्रकार असल्याने संमोहन नामजपाच्या माध्यमातूनही करता येते. त्यांना ते संमोहनाद्वारे स्वर्गात वगैरे गेल्याचा अनुभवही देऊ शकतात. अमृत पिण्याचा अनुभव आल्याचेही संमोहित झालेली व्यक्ती सांगू शकते. इथे संमोहनाच्या ज्ञानाचा दुरुपयोग करण्यात आला आहे. अनेक डॉक्टर त्यांच्या ज्ञानाचा उपयोग माणसे मारण्यासाठीही करतात. येथे येणारी माणसे निष्ठावान असल्याने नीती-अनीतीचा मुद्दा उरत नाही. ही मोठी प्रक्रिया आहे. त्यांना कंडिशनिंग केले जाते, त्यांच्यावर विचारांचा प्रभाव टाकला जातो. हे सर्व मांत्रिकांचे राज्य असून आपल्याला ईश्‍वरी राज्य आणायचे आहे, हे त्यांच्या मनावर बिंबवले जाते. ही सनातनची कार्यपद्धत आहे.

धर्माप्रती अनास्था असल्याने सर्व गोष्टींची टर उडवणारे नातेवाईक आणि अध्यात्माची ओढ असल्याने आदराने अन् प्रेमाने वागणारे आप्त !

एका लग्न समारंभाच्या निमित्ताने अनुभवलेल्या २ प्रकारच्या टोकाच्या मानसिकता
    १४.४.२०१५ या दिवशी मी माझ्या चुलत भावाच्या लग्नानिमित्त त्यांच्या घरी गेलो होतो. मी सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करत असल्याचे कुटुंबात सर्वांना ठाऊक आहे. लग्नघरात घडलेल्या काही प्रसंगातून दोन टोकाचे अनुभव आले. मी भगव्या रंगाचा झब्बा घालून गेला होतो. तिथे पोचताच एक आत्या म्हणाली, आता स्वामीजी झालात का ? यावर मी काहीच उत्तर दिले नाही. वेगवेगळ्या प्रसंगातून जवळच्या वाटणार्‍या नातेवाइकांची विचारसरणी लक्षात आली. या वेळचे काही प्रसंग आणि त्यातून लक्षात आलेली मानसिकता पुढे देत आहे.

शासकीय सोयी-सुविधांच्या अभावी रुग्णांना अल्प कालावधीत अधिकाधिक त्रास भोगावे लागण्याचे ठिकाण म्हणजे काही शासकीय रुग्णालये ! - श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.५.२०१५)


जे लहान मुलांना कळते, तेही पुरोगाम्यांना का कळत नाही ?

'कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातनच्या साधकाला पोलिसांनी चौकशीसाठी कह्यात घेतल्यानंतर स्वतःला पुरोगामी म्हणवणार्या अधोगाम्यांनी सनातनवर बंदी घालण्याची आततायी मागणी वारंवार केली. वृत्तवाहिन्या आणि वर्तमानपत्रे यांतून प्रतिदिन सनातनवर वेगवेगळे आरोप करणार्याप बातम्या प्रसारित होऊ लागल्या. सनातनच्या आध्यात्मिक कार्याने भारावून जाऊन सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधना करणार्या साधिकांच्या संदर्भात 'सनातन संस्थेमध्ये मुलींना संमोहित केले जाते', असाही एक आरोप होऊ लागला. त्या पार्श्वलभूमीवर हे चित्र प्रसिद्ध करत आहोत.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ११ ऑक्टोबरला सनातनवरील संभाव्य बंदीच्या विरोधात राष्ट्रीय हिंदू आंदोलन आणि भव्य मोर्चा यांचे आयोजन

     सनातन संस्थेचे धर्मप्रसार आणि धर्मरक्षण यांचे कार्य पचनी पडत नसल्याने कथित पुरोगाम्यांकडून सनातनविषयी अपसमज पसरवून संस्थेवर बंदीची मागणी करण्यात येत आहे. सनातन संस्था आतंकवादी संघटना असल्याचा मनमानी आरोप करण्यात येत आहे. वास्तविक सनातन संस्था ही प्रखर हिंदुत्ववादी आणि राष्ट्र्रभक्त संघटना असून संस्थेचे कार्य अत्यंत पारदर्शी आहे. ज्याप्रमाणे कावीळ झालेल्यांना जग पिवळे दिसते, त्याप्रमाणे सनातनद्वेष आणि हिंदुत्वद्वेष यांच्या चष्म्यामुळे सनातनमध्ये आतंकवादाचा भास होत आहे. पुरोगाम्यांच्या या षड्यंत्राच्या विरोधात हिंदुत्ववाद्यांनी ११ ऑक्टोबरला अनेक ठिकाणी राष्ट्रीय हिंदू आंदोलन आणि विशाल मोर्चा यांचे आयोजन केले आहे.

स्त्रियांनी नऊवारी साडी नेसण्याचे आध्यात्मिक महत्त्व ठाऊक नसलेल्या एका पुरोहित-पत्नीने केलेले चुकीचे वक्तव्य आणि त्याद्वारे लक्षात येणारी धर्मशिक्षणाची अनिवार्यता !

     गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या कार्यक्रमात एका जिल्ह्यात काही साधिका नऊवारी साडी नेसल्या होत्या. ते पाहून एका पुरोहिताच्या पत्नीने २ ठुमके लावले, तर लावणी होऊन जाईल, अशी अतिशय अयोग्य प्रतिक्रिया व्यक्त केली आणि तेथे उपस्थित असलेल्या अन्य साधिकांनी हसून त्या महिलेला प्रतिसाद दिला. त्यांचे हे वक्तव्य अयोग्य असल्याची कोणीही त्यांना जाणीव करून दिली नाही. गुरुपौर्णिमा काळात गुरुतत्त्व १ सहस्र पटीने कार्यरत असते. अशा चैतन्ययुक्त वातावरणात आणि तेही पुरोहिताच्या पत्नीने असे वक्तव्य करणे, यातूनच हिंदूंना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे आणि त्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना होण्याविना पर्याय नाही, हेही लक्षात येते.
- (पू.) श्री. नंदकुमार जाधव, जळगाव (२४.८.२०१५)

सनातन संस्थेचे मानद कायदेविषयक सल्लागार अधिवक्ता रामदास केसरकर यांनी देहली दौर्‍याच्या वेळी अनुभवलेली गुरुकृपा !

अधिवक्ता रामदास केसरकर
१. देहली दौर्‍याचे नियोजन आणि प्रारंभ
१ अ. देहली येथील हिंदुत्ववादी अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्त्यांच्या बैठकीची सिद्धता करून त्या बैठकीला येण्याचे निमंत्रण देणे : सर्वोच्च न्यायालयात वकिली व्यवसाय करणारे अधिवक्ता विष्णु जैन यांनी १९.८.२०१५ या दिवशी मला भ्रमणभाष करून कळवले की, त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील काही निवडक अधिवक्त्यांची बैठक २५.८.२०१५ या दिवशी दुपारी ४ वाजता ठेवली आहे, आपण या बैठकीत मार्गदर्शनासाठी यावे. त्यांची सेवेची तळमळ लक्षात घेऊन मी त्यांना येतो, असे सांगितले. त्यानंतर माझी दौर्‍याच्या संदर्भात विचारांची प्रक्रिया चालू झाली. 

धर्मांधांकडून मार खाणारे पोलीस निरपराध हिंदूंवर दादागिरी करतात !

    संभाजीनगर येथे वाहन न लावण्याच्या परिक्षेत्रात धर्मांधांकडून रिक्शा लावण्यात आली होती. ती काढण्याविषयी सांगण्यास गेलेले वाहतूक पोलीस आणि धर्मांध रिक्शाचालक यांच्यातील वाद विकोपास गेला. त्यामुळे त्याने रिक्शा पेटवून पोलिसांवरच दगडफेक केली. यामध्ये दोन पोलीस कर्मचारी गंभीर घायाळ झाले. ही घटना रेल्वेस्थानक परिसरात २९ सप्टेंबर २०१५ च्या रात्री घडली असून क्रांतीचौक पोलिसांनी शेख गफ्फार शेख जब्बार याला अटक केली आहे.        


साधनेची तृप्ती, जिवंतपणीच मुक्तीपेक्षाही अधिक आनंद आणि अद्वैत अवस्था साधून देणारी सनातन संस्था !

१. लहानपणापासून देवाविषयीची धारणा
१ अ. देवासाठी सर्व करायचे एवढेच ज्ञात असणे : मला लहानपणापासूनच देवाधर्माची, कीर्तन, पूजा, आरती, पारायण करणे इत्यादींची आवड होती. देवासाठी जे काही करता येईल, ते मी करत असे. देव प्रत्यक्ष दिसला पाहिजे, त्याने आपल्याशी बोलावे, आपल्याला एखादे वरदान मिळावे, यासाठी माझी धडपड चालू असे. त्यासाठी एखाद्या मंदिरात कोणताही धार्मिक कार्यक्रम असल्यास कार्यक्रम स्थळाची स्वच्छता करून सतरंज्या घालणे, व्यासपिठावरची सर्व व्यवस्था, विद्युत रोषणाई करणे, प्रसाद वाटणे आणि कार्यक्रमाची सांगता होईपर्यंत पहिल्या दिवसापासून समाप्तीच्या दिवसापर्यंतची कुठलीही सेवा किंवा एखादा कीर्तनाचा कार्यक्रम असल्यास कीर्तनकार यांच्यासोबत त्यांची तबला-पेटी डोक्यावरून नेणे-आणणे इत्यादीपर्यंतच्या सेवा मी नियमित करत असे. तेव्हा सेवा या शब्दाचा खरा अर्थही मला समजला नव्हता. देवासाठी सर्व करायचे एवढेच ज्ञात होते.

विज्ञानाद्वारे अध्यात्मातील संशोधन का करायचे ?

पू. डॉ. मुकुल गाडगीळ
   गोव्यातील सनातन संस्थेच्या आश्रमात कार्यरत झालेले अध्यात्म विश्‍वविद्यालय साधना करतांना अनुभवास आलेल्या आध्यात्मिक गोष्टींविषयी वैज्ञानिक संशोधन करत आहे. कोणी म्हणेल, अध्यात्म आणि संशोधन यांचा काय संबंध आहे ? अध्यात्मात आलेल्या अनुभूती तर दुसर्‍यांना सांगायच्या नसतात; पण अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे यामागे पुढील दृष्टीकोन आहेत.
१. अनुभूतींमागील शास्त्र समजणे सोपे जाते आणि 
अध्यात्मावर लोकांची श्रद्धा बसते !
     साधना करतांना स्वतःला आलेल्या अनुभूती इतरांना सांगायच्या नसतात, हा दृष्टीकोन व्यष्टी साधनेअंतर्गत योग्य आहे; कारण अनुभूती सांगितल्यास अहंभाव निर्माण होऊ शकतो. समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीचा उद्देश समोर ठेवून केलेल्या समष्टी साधनेत मात्र आपल्याला अनुभूतीद्वारे जे ज्ञान मिळते, ते इतरांना सांगून त्या ज्ञानाचा लोकांच्या पारमार्थिक कल्याणासाठी प्रसार करणे, हा दृष्टीकोन असतो. त्यामुळे अनुभूतींमागील शास्त्र समजणे सोपे जाते आणि अध्यात्मावर लोकांची श्रद्धा बसते; म्हणून अध्यात्म विश्‍वविद्यालय संशोधन करत आहे.

मथुरा येथील कथाकार पं. अजय कृष्ण शास्त्री यांनी सनातन संस्थेविषयी काढलेले गौरवोद्गार !

सनातन संस्था म्हणजे अधर्माच्या चिखलात फुललेले एक कमळ आहे !
    सिंहस्थ कुंभपर्वानिमित्त नाशिक येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती या विषयावरील प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला मथुरा येथील कथाकार पं. अजय कृष्ण शास्त्री यांनी भेट दिली. त्यांनी प्रदर्शन बघितल्यानंतर सांगितले, हे प्रदर्शन पाहून मला माझी यात्रा सफल झाली, असे वाटते. या आधी मी नाशिकमधील सर्वच तीर्थस्थळांना भेटी दिल्या आहेत; परंतु येथे आल्यानंतर मला यात्रा पूर्ण केल्याचे समाधान मिळत आहे. तुमचे कार्य बघून या अधर्माच्या चिखलात एक कमळ फुललेले आहे, असे वाटते. आम्ही तुमच्या सर्व कार्यांत सहभागी होऊ. तुमच्यासमवेत कार्य करण्यास आम्हाला आनंद वाटेल.
- श्री. नीलेश बोरा, लासलगाव, नाशिक. (२७.९.२०१५)

सत्संगामुळे साधनेतील प्रयत्नांविषयी सुस्पष्टता येऊ लागल्यानंतर धर्माभिमान्यांनी व्यक्त केलेल्या मनोगतातून त्यांच्यातील साधकत्व, गुरुनिष्ठा अन् भाव यांचे घडलेले दर्शन !

पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ
    हिंदु जनजागृती समितीने आजपावेतो १ सहस्रापेक्षा अधिक हिंदु धर्मजागृती सभांचे यशस्वीरित्या आयोजन केले. त्यामुळे लक्षावधी लोकांना समितीचे धर्मकार्य अवगत झाले. सभेतील स्फूर्तीप्रद विचार ऐकून अनेकांच्या मनातील हिंदूतेज जागृत झाले आणि समितीच्या राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती यांच्या कार्यात सहभागी होण्याची उत्कंठा त्यांच्यात निर्माण झाली.
    त्यांना साधना समजावी यासाठी घेण्यात येणार्‍या सत्संगात धर्मरक्षणाच्या निरनिराळ्या कृती करतांना कार्याची हानी होऊ नये, यासाठी त्यामध्ये झालेल्या चुकांचा अभ्यास केला जातो आणि पुन्हा या चुका होऊ नयेत, यासाठी परिणामकारक उपाययोजना कशी काढता येईल, यावर चर्चात्मक चिंतन केले जाते. त्यामुळे सर्वांनाच योग्य-अयोग्य कृती आणि त्यामुळे होणारी हानी, तसेच कार्याची फलनिष्पत्ती वाढवण्याच्या दृष्टीने करावयाचे प्रयत्न यांची अचूक दिशा मिळत आहे. त्याचप्रमाणे अंतर्मुखता वाढून चुका होण्यामागील दोष आणि अहंचे पैलू यांचे चिंतन होऊन त्या टाळण्याची अन् स्वतःच्या अंतरात हिंदु राष्ट्र निर्माण करण्याची प्रक्रिया चालू झाली आहे.

उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला आलेल्या बालकांच्या माता-पित्यांनो, दैवी बालकातील अध्यात्माची आवड टिकवून ठेवण्यात तुमचा वाटा मोलाचा असल्याने त्यांचे कसोशीने संगोपन करा ! - पू. अशोक पात्रीकर

पू. अशोक पात्रीकर
    आपल्या पोटी जन्म घेतलेले बालक दैवी बालक आहे आणि ते महर् किंवा स्वर्ग लोकातून जन्माला आले आहे, हे आई-वडिलांना देवाच्या कृपेमुळे कळते. याविषयी सतत मनी कृतज्ञताभाव असू द्यावा. या बाळाचा जन्म ही त्या आई-वडिलांची आणि त्या बालकाच्या पूर्वजन्मीच्या साधनेची फलनिष्पत्ती आहे, तरी त्याचा कर्तेपणा घेणे टाळावे.
    त्या दैवी बालकाचे पुढील पालनपोषण आई-वडिलांनी कृतज्ञतेच्या भावात राहूनच करायचे आहे. त्याची अध्यात्मात प्रगती व्हावी, यासाठी पुढील काही कृती आई-वडिलांना कराव्या लागतील, तसेच काही पथ्ये पाळावी लागतील !
पू. पात्रीकर यांच्या लेखाचे वैशिष्ट्य
    अशा तर्‍हेचा लेख लिहावा, असे बरेच महिने माझ्या मनात होते; पण इतर लिखाणांमुळे मी या विषयाचा लेख लिहिला नाही. पू. पात्रीकर यांनी लिहिलेला लेख वाचून लक्षात आले की, मी लिहिला असता त्यापेक्षा सुंदर लेख पू. पात्रीकर यांनी लिहिला आहे. लेखामुळे कृष्णाने माझ्याकडून लेख का लिहून घेतला नाही, याचाही मला उलगडा झाला.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

साधकांना सूचना

     पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - भाद्रपद कृष्ण पक्ष चतुर्दशी (११.१०.२०१५) उत्तररात्री २.५९ वाजता
समाप्ती - आश्‍विन शुक्ल पक्ष प्रतिपदा (१३.१०.२०१५) पहाटे ५.३६ वाजता
उद्या अमावास्या आहे.

दीपावलीच्या शुभमुहुर्तावर... वाचक आणि विज्ञापनदाते यांना आनंदवार्ता !

साप्ताहिक सनातन प्रभातच्या पृष्ठसंख्येत वाढ !
    राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची संख्या वाढत असल्याने सध्या या आघातांची वृत्ते येण्याचा ओघ प्रचंड आहे. हिंदु राष्ट्र निर्मितीला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्र आणि धर्म यासंदर्भात स्फूर्तीदायक प्रसंग घडतांना दिसत आहेत. या सर्व गोष्टींविषयी हिंदूंना अवगत करणे आवश्यक आहे. यासाठीच साप्ताहिक सनातन प्रभातची पृष्ठसंख्या वाढवत आहोत.
 • वर्ष १७ अंक क्र. ५० (२९ ऑक्टोबर २०१५ ते ४ नोव्हेंबर २०१५) पासून प्रत्येक अंक १६ पानी !
 • मूल्य ८ रुपये (वार्षिक वर्गणी : ४०० रुपये)
 • प्रती आठवड्याला वाचकांना मिळणारे लिखाण
 • हिंदु धर्मावरील संकटांची वृत्ते / राष्ट्र आणि धर्म विषयक विविध लेखांची पर्वणी !
 • राष्ट्र आणि धर्माविषयी संतांचे मार्गदर्शन अन् हिंदु राष्ट्र स्थापनाविषयक दिशादर्शन
 • भावी पिढी सुसंस्कारीत होण्यासाठी संस्कारविषयक मार्गदर्शन
 • ईश्‍वरप्राप्तीसाठी साधना आणि धर्मशिक्षण, साधकांचे प्रयत्न/ अनुभूती
 • सनातन आश्रमभेटीच्या वेळी संत, हिंदुत्ववादी, जिज्ञासू यांनी दिलेले अभिप्राय
 • याशिवाय दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरतील, अशी चौफेर विषयांवरील विविध सदरे !
    वाचकांना विशेष विनंती ! : वर्ष १७ अंक क्रमांक ५० (२९ ऑक्टोबर २०१५ ते ४ नोव्हेंबर २०१५)पासून साप्ताहिकाच्या मूल्यात वाढ होत आहे. विज्ञापने क्वचितच मिळणे आणि छपाईचा खर्च यांची नीट सांगड बसत नसल्यामुळे अंकाच्या मूल्यातील वाढ अपरिहार्य झाली आहे, याची वाचकांनी नोंद घ्यावी आणि कृपया वाढीव मूल्य भरून सहकार्य करावे. साप्ताहिकाच्या मूल्यात ३ रुपयाने वाढ होणार असली, तरी वाचकांनी राष्ट्रोत्थानाच्या कार्यासाठी केलेला तो त्यागच असेल ! वाचकांनी आतापर्यंत सनातन प्रभातला ज्या प्रकारे सहकार्य केले, तसाच उदंड प्रतिसाद याहीपुढे मिळत राहील, याची आम्हाला निश्‍चिती आहे ! - संपादक
   साधकांना सूचना : साप्ताहिकाच्या वर्गणीदारांचे नूतनीकरण करतांना साधकांनी वर्ष १७ अंक क्र. ५० (२९ ऑक्टोबर २०१५ ते ४ नोव्हेंबर २०१५) पासून लागू होणार्‍या वाढीव मूल्याप्रमाणे वर्गणीदारांकडून वर्गणी घ्यावी.
राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात आपला अमूल्य सहभाग प्रार्थनीय आहे !
     स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करण्यासाठी; म्हणजेच रामराज्याची अनुभूती देणार्‍या हिंदु राष्ट्राची निर्मिती करण्यासाठी आजच वर्गणीदार व्हा !

केवळ रविवारच्या दैनिक सनातन प्रभातचे वाचन करणार्‍या राष्ट्र-धर्म प्रेमी आणि जिज्ञासू वाचकांना नम्र विनंती !

राष्ट्ररक्षण, धर्मजागृती यांचा वसा घेतलेल्या दैनिक सनातन प्रभातचे नियमित वाचक व्हा !
१. राष्ट्र, धर्म आणि अध्यात्म यांचा सुरेख संगम असल्याने वाचकांना
चौकस ज्ञानसंपदा उपलब्ध करून देणारे अनोखे दैनिक सनातन प्रभात !
     दैनिक सनातन प्रभात म्हणजे राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत असलेले एकमेव नियतकालिक ! अध्यात्म, राष्ट्र, धर्म, आचारधर्म, कायदा, आर्थिक उलाढाल, राजकारण आदी विषयांवरील लेख योग्य संपादकीय दृष्टीकोनासह या नियतकालिकातून प्रसिद्ध केले जातात. वाचकांच्या मनातील देशप्रेम वृद्धींगत करण्यासाठी, तसेच हिंदु धर्मावर होणार्‍या आघांताविषयी त्यांना अवगत करण्यासाठी हे नियतकालिक सदैव कटीबद्ध आहे. देवतांविषयी भावभक्ती वाढवणारी, साधनेची अपरिहार्यता सांगणारी नानाविध सदरेही यामध्ये प्रसिद्ध केली जातात.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

दुसर्याच्या चांगल्या गुणाचा अंगीकार करा !
    गुणग्राहकता हा सद्गुण अंगिकारून दुसर्यााच्या चांगल्या गुणाचा अंगीकार करावा.  
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
ईश्‍वरालाच जिंकणे
विषयांपेक्षा विषयांच्या निर्मात्यालाच का जिंकू नये ?
भावार्थ : एकेक विषय जिंकत जायचे म्हटले तर वासना, आवडी-निवडी, स्वभावातील दोष, असे लाखो विषय जिंकायला, म्हणजे त्यांच्यावर नियंत्रण मिळवायला लाखो जन्म लागतील. त्यापेक्षा त्या सर्वांच्या निर्मात्यालाच भक्तीने या जन्मात जिंकले, तर त्या सर्वांवर या जन्मातच नियंत्रण मिळविता येईल; म्हणूनच म्हटले आहे, एक साधै सब साधै । सब साधै सब जाय ॥ म्हणजे एका नामाला, भगवंताला (नाम आणि भगवंत एकच आहेत.) साध्य केले म्हणजे सर्वच साध्य होते. सर्व साध्य करायला गेलो, तर काहीच साध्य होत नाही.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

बोधचित्र


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
'एखाद्या जातीचे किंवा पंथाचे कार्य करणार्यांसचे, म्हणजे जात्यंधांचे, पंथांधांचे कार्य तात्कालिक असते. धर्माचे मानवजातीसाठीचे कार्य स्थळ आणि काळ यांची मर्यादा ओलांडून पुढे जाते.' - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३.९.२०१५)

प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

अ‍ॅलोपॅथीच्या औषधांपेक्षा आयुर्वेदातील औषधे अधिक प्रभावी आणि दुष्परिणामविरहित असणे

     अ‍ॅलोपॅथीची औषधे रासायनिक द्रव्यांपासून बनवलेली असतात, तर शास्त्रानुसार बनवलेली आयुर्वेदातील औषधे नैसर्गिक असतात. यामुळे योग्य पद्धतीने वापरलेली आयुर्वेदीय औषधे अ‍ॅलोपॅथीच्या औषधांपेक्षा अधिक प्रभावी आणि दुष्परिणामविरहित असतात. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३०.७.२०१५)

अध्यात्मात धार्मिक ग्रंथांचे वाचन किंवा पठण ही साधना नसून ग्रंथांत सांगितलेले कृतीत आणणे, ही साधना आहे !

    काही शाळांत गीतेचा एखादा अध्याय पाठ करण्याच्या स्पर्धा असतात. गीतेसारखा ग्रंथ पदव्युत्तर शिक्षणातील पाठ्यपुस्तकाप्रमाणे आहे. गीता समजायला आयुष्यातील अनेक वर्षे साधना करावी लागते. असे असतांना मुलांसाठी अशी स्पर्धा ठेवण्यात काय अर्थ आहे ?, तसेच बरेच जण गुरुचरित्र, दासबोध इत्यादींचे व्यक्तीगत किंवा सामूहिक वाचन करतात.
     येथे हे लक्षात घेतले पाहिजे की, अध्यात्मात धार्मिक ग्रंथांचे केवळ वाचन किंवा पठण ही साधना नसून ग्रंथांत सांगितलेले कृतीत आणणे, ही साधना आहे. शिकवण कृतीत न आणल्याने बहुतेकांची साधनेत प्रगती होत नाही, उलट ते भ्रमात असतात की, आपली साधना चालू आहे. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२०.९.२०१५)

हिंदु धर्मातील मूल्यांचे पुनरावलोकन करणे नव्हे, तर अभ्यास करून धर्म समजून घेणे आणि धर्माचरण करणे आवश्यक !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे अमूल्य विचारधन !
परात्पर गुरु डॉ. आठवले
अयोग्य विचार : हिंदु धर्मातील रूढ धार्मिक मूल्यांचे पुनर्वलोकन करण्याची आवश्यकता असून विज्ञानाच्या कसोटीवर न टिकणारी मूल्ये सोडून द्यायला हवीत. - श्री. मोहन भागवत, सरसंघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
खंडण
१. अधिकार तैसा करू उपदेश । (तुकारामगाथा), म्हणजे जो ज्या विषयातील तज्ञ असतो, त्यानेच त्याच्या संबंधित विषयावर अधिकाराने मार्गदर्शन करावे. एखाद्या रुग्णाने कुठले औषध घ्यायला हवे, हे अभियंता सांगू शकत नाही, तर त्याविषयी आधुनिक वैद्यांनी मार्गदर्शन करायला हवे. सरसंघचालक मोहन भागवत हे समाजसंघटन क्षेत्रातील तज्ञ असले, तरी धर्माधिकारी नाहीत. त्यामुळे धर्मातील तत्त्वे आणि मूल्ये यांच्याविषयी बोलण्याचा त्यांना अधिकार नाही. 

नवरात्रोत्सव आला !

  
नवरात्रोत्सव जवळ येत आहे. या उत्सवाचे गरबा हे मुख्य आकर्षण असते. अबालवृद्ध गरबा खेळात सहभागी होऊन खेळाला रंगत चढवतात, त्यामुळे गरबा आकर्षणाचा विषय होतो. श्रीकृष्णाच्या गोकुळात गोप-गोपी तालबद्धतेने गरबा खेळून त्यातून निर्माण होणार्याह भावरसात न्हावून जात होते. आनंदाचा परमोच्च क्षण गाठण्याचा तो प्रयास असायचा. आजही श्रीकृष्णाच्या प्रती अनन्य भक्तीभाव ठेवून गरबा खेळला, तर त्यातून आनंदाचा परमोच्च क्षण गाठता येतो, असे अनुभवणारे आणि त्याविषयी सांगणारे धर्मनिष्ठ अन् श्रीकृष्णभक्त आहेत. गरबा खेळामागील ही धार्मिक आणि सांस्कृतिक भावना विचारात घेता, आज ही भावना भोगवादाच्या पडद्याआड होत आहे कि काय, अशी भीती वाटायला लागते. गरबा खेळात विकृती फोफावत आहे, व्यसनाधीनता वाढत आहे, तरुण पिढी लयाला जात आहे. वासनांधतेला बळी पडणारी तरुण पिढी, ही आजची मोठी समस्या होऊन बसली आहे. लव्ह जिहाद या विकृतीला अधिक जोर चढत असतो. हिंदूंच्या तरुणींना प्रेमाच्या पाशात अडकवणे, यांचे अपहरण करणे, त्यांच्याशी लग्न करून मुलांना जन्म दिल्यानंतर या हिंदु महिलांचा त्याग करणे किंवा घटस्फोट देेणे, हे धर्मांधांचे षड्यंत्र चालू आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn