Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

पोर्न संकेतस्थळे शोधणार्या जगातील पहिल्या १० शहरांत भारतातील ६ शहरे !

विश्वगुरु असणार्या भारताची पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे झालेली दुःस्थिती पालटण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !
  मुंबई - पोर्न संकेतस्थळे शोधण्यात जगभरातील पहिल्या १० शहरांच्या सूचीत ६ शहरे भारतातील आहेत, अशी माहिती 'गुगल ट्रेण्ड'ने प्रसिद्ध केली आहे. त्यात मुंबई आणि पुणे यांचाही समावेश आहे. (अशा संकेतस्थळांवर बंदी आणण्याचा मोदी शासनाचा निर्णय योग्यच कसा होता, हे तथाकथित पुरोगाम्यांच्या आता तरी लक्षात यईल का ? - संपादक)
१. देशाची राजधानी असलेल्या देहलीतील लोक ही संकेतस्थळे पहाण्यात सर्वांत पुढे आहेत. त्यानंतर पुणे, मुंबई, हावडा (बंगाल), उन्नाव (उत्तरप्रदेश) आणि बेंगळुरू यांचा क्रमांक आहे. 
२. 'अ‍ॅनिमल पोर्न' (प्राण्यांशी लैंगिक संबंध) संकेतस्थळे शोधणार्या शहरांच्या सूचीत पुण्याचा दुसरा क्रमांक आहे.

शिवसेना सनातनच्या पाठीशी खंबीरपणे उभी ! - उद्योगमंत्री सुभाष देसाई

श्री. सुभाष देसाई (डावीकडे) यांना निवेदन देतांना श्री. राहुल कोल्हापुरे
आणि हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी
सनातनच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाणारे श्री. सुभाष देसाई यांचे आभार !
सातारा, ९ ऑक्टोबर (वार्ता.) - काहीही सिद्ध झाल्याविना आणि केवळ कुणाच्या तरी मागणीवरून सनातन संस्थेवर कोणीही बंदी लादू शकत नाही. सनातनशी आमचे जिव्हाळ्याचे संबंध असून संपूर्ण शिवसेना सनातनच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री श्री. सुभाष देसाई यांनी केले. 
ते एका कार्यक्रमासाठी आले असता, शहरातील हिंदुत्ववादी संघटनांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. या वेळी शिवसेनेचे सातारा जिल्हाप्रमुख श्री. चंद्रकांत जाधव, वीरशैव समाजाचे श्री. सिद्धराज शेटे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. राहुल कोल्हापुरे यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी सनातनवरील बंदीच्या मागणीच्या विरोधातील निवेदन त्यांना देण्यात आले.

२ धर्मांधांना सौदीमध्ये अटक !

जर्मन बेकरी बाँबस्फोटाचे प्रकरण
जर्मन बेकरी बाँबस्फोटांना हिंदु आतंकवादाचा रंग देऊ पहाणारे तत्कालीन काँग्रेसी नेते आता हा स्फोट कुठल्या रंगाच्या आतंकवादाचा होता, हे स्पष्ट करतील का ?
बेंगळुरू - भारतात झालेल्या विविध आतंकवादी आक्रमणांशी संबंधित दोन संशयित धर्मांधांना सौदी अरेबियामध्ये अटक करण्यात आली आहे. अबू सुफिया उपाख्य असदुल्ला खान आणि झैनुल अबिदिन उपाख्य झाहीद शेख अशी या दोघांची नावे आहेत. पुढील काही आठवड्यांमध्ये या दोघांना भारताकडे प्रत्यार्पण करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. झैनुल अबिदिन यानेच पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटासाठी स्फोटके पुरवली होती.

'ब्रेन मॅपिंग'ची मागणी समीर गायकवाड यांच्या नकारामुळे न्यायालयाने फेटाळली !

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण
समीर गायकवाड यांच्या न्यायालयीन कोठडीत २३ ऑक्टोबरपर्यंत वाढ
कोल्हापूर, ९ ऑक्टोबर (वार्ता.) - कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी संशयित श्री. समीर गायकवाड यांचे 'ब्रेन मॅपिंग' करण्याची मागणी शासकीय अधिवक्त्यांनी केली होती; मात्र श्री. गायकवाड यांनी त्याला स्पष्ट नकार दिल्याने ९ ऑक्टोबरला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री. आर्.डी. डांगे यांनी ती मागणी फेटाळून लावली. 
१. श्री. डांगे यांनी श्री. गायकवाड यांना विचारले की, 'ब्रेन मॅपिंग'ला तुझी संमती आहे का ?
२. श्री. गायकवाड यांनी त्याला नकार दिला. कोणत्याही संशयिताच्या संमतीविना अशा प्रकारची कोणतीही चाचणी करता येत नाही.
३. 'ब्रेन मॅपिंग'साठी पानसरे कुटुंबियांनी उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे सांगितले आहे.
४. श्री. गायकवाड यांना २३ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेशही न्यायदंडाधिकारी डांगे यांनी दिले.

प्रसारमाध्यमांवर मानहानीचा दावा लावून सनातनने योग्य पाऊल उचलले ! - अधिवक्ता मधु मुकुल त्रिपाठी, नवी देहली

अधिवक्ता मधु मुकुल त्रिपाठी
     नवी देहली - सनातन संस्था हिंदु धर्मासाठी अतिशय चांगले कार्य करत आहे. आजची प्रसारमाध्यमे हिंदु धर्माला चुकीचे ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत; कारण ती ख्रिस्त्यांकडून पोसली जात आहेत. संस्थेची मानहानी करण्याचा प्रयत्न करणार्‍या प्रसारमाध्यमांवर मानहानीचा दावा लावून सनातन संस्थेने योग्य पाऊल उचलले आहे. या प्रसंगात मी तुमच्या बरोबर आहे. तुम्हाला जे कायदेशीर साहाय्य लागेल, ते देण्यासाठी मी सिद्ध आहे.

सनातन संस्थेवरील आरोपांच्या विरोधात सर्व संत मिळून आंदोलन करू ! - श्री ष.ब्र.डॉ. महेश्‍वर शिवाचार्य स्वामीजी, कर्नाटक

श्री ष.ब्र.डॉ. महेश्‍वर
शिवाचार्य स्वामीजी
       ऋषीमुनींच्या काळापासून आतापर्यंत सनातन धर्माकडून अन्य धर्मांवर टीका-टिप्पणी अथवा हिंसा आदी काही झाले असेल, तर समोर आणा, आपण बोलूया. हिंदु धर्म श्रेष्ठ आहे. नाचता येईना अंंगण वाकडे, या म्हणीप्रमाणे सनातन धर्माच्या अनुयायांवर आरोप लावणे, म्हणजे आकाशाशी मुष्टीयुद्ध खेळल्यासारखेच आहे. संत हे शांतीप्रिय आणि शांती पूजक आहेत; परंतु सनातन धर्मावर काही संकट आल्यास ते क्रांतीकारक होतील, हे सत्य जाणा. सनातन संस्थेवर आरोप लादल्यास सर्व संत मिळून आंदोलन करू !

आम्ही सनातन संस्थेवर बंदी घालू देणार नाही ! - भाजपचे ज्येष्ठ नेते श्री. ईश्‍वरप्पा, कर्नाटक

भाजपचे ज्येष्ठ नेते श्री. ईश्‍वरप्पा यांना निवेदन देतांना 
(डावीकडून) श्री. प्रभाकर पडियार आणि सौ. प्रभा कामत
       कोणत्याही आध्यात्मिक संस्थेवर बंदी घालणे शक्य नाही. आम्ही अशी बंदी घालू देणार नाही. संस्थेच्या पाठीशी आम्ही उभे राहू, असे आश्‍वासन कर्नाटकातील भाजपचे ज्येष्ठ नेते श्री. ईश्‍वरप्पा यांनी सनातनच्या साधकांना दिले. या वेळी सनातन संस्थेचे साधक श्री. प्रभाकर पडियार आणि सौ. प्रभा कामत उपस्थित होत्या.

सनातन संस्थेला संत-महंत, अधिवक्ता आणि लोकप्रतिनिधी यांचा वाढता पाठिंबा !

मडिकेरी (कर्नाटक) येथे सनातनला हिंदुत्ववादी संघटनांचा पाठिंबा : तहसीलदारांना निवेदन सादर
     मडिकेरी (कर्नाटक) - सनातन संस्थेवरील बंदीच्या मागणीच्या विरोधात भाजपसह येथील हिंदू महासभा, बजरंग दल, कुशालनगर वक्कलिगर संघ (शेतकरी संघ), कोडव समाज, विश्‍व हिंदु परिषद, आदी संघटनांनी ७ ऑक्टोबर या दिवशी मडिकेरी (जिल्हा कोडगु) येथील तहसीलदारांना निवेदन दिले. या वेळी सर्व संघटनांचे एकूण ४७ हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते. 
     या वेळी चित्तार वृत्तवाहिनीशी बोलतांना भाजपचे कार्यकर्ते श्री. एम्.पी. देवय्य यांनी मी सनातन संस्थेच्या पाठीशी आहे, असे सांगितले. 
    हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. भार्गव म्हणाले, हल्ली आपल्या देशात धार्मिकता, तसेच धर्माविषयी अभ्यास नसल्यानेच सर्व समस्या निर्माण झाल्या आहेत. सनातन संस्था धर्मशिक्षण आणि जागृतीचे कार्य करत असल्यामुळे तिला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे.

'गरबा' कार्यक्रमांमध्ये अहिंदूंच्या प्रवेशावर बंदी घालावी !

श्री. टी. राजासिंह
गोशामहल (तेलंगण) येथील भाजपचे आमदार आणि धर्माभिमानी श्री. टी. राजासिंह यांचे आवाहन 
भाग्यनगर (हैद्राबाद) - नवरात्रोत्सवाच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणात आयोजित होणार्या 'गरबा' कार्यक्रमांमध्ये अहिंदूंच्या प्रवेशावर बंदी घालावी, असे आवाहन गोशामहल येथील भाजपचे आमदार आणि धर्माभिमानी श्री. टी. राजासिंह यांनी केले असून गरब्यात अहिंदु युवक आढळून आल्यास त्याची घरवापसी (हिंदु धर्मात पुनर्प्रवेश) करण्यात येईल, अशी चेतावणी दिली आहे.
राजासिंह म्हणाले, "नवरात्रीचे दिवस अत्यंत पवित्र असतात. हिंदु भाविक या काळात व्रत ठेवून माँ दुर्गादेवीकडे सुख-समाधानाची कामना करतात. या पर्वात अनेक संघटनांकडून गरब्यांचे आयोजन करण्यात येते; परंतु या गरब्यांमधून हिंदु युवतींना षड्यंत्राच्या माध्यमातून फसवले जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या असून मागील ३ वर्षांत नवरात्रीच्या काळात लव्ह जिहादच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत. एका युवतीला फसवून तिला 'ब्लॅकमेल' करण्यात आल्याच्या प्रकरणी एका पीडित कुटुंंबाने तत्कालीन शहर पोलीस आयुक्त आणि सध्याचे 'डीजीपी' अनुराग शर्मा यांच्याकडे तक्रारही केली होती. या पार्श्वभूमीवर हिंदु महिलांच्या रक्षणाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मागील वर्षीही श्री. राजासिंह यांनी अशा प्रकारचे आवाहन केले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावली होती. 

आध्यात्मिक, सामाजिक आणि राष्ट्रहित यांचे कार्य करणार्‍या सनातन संस्थेला पाठिंबा दर्शवणार !

गोव्यात ११ ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन
      फोंडा - कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातनचे श्री. समीर गायकवाड यांस संशयित म्हणून अटक करण्यात आली; मात्र अटक केल्यापासून मागील २० दिवसांत कोणतेही पुरावे पोलिसांनी सादर केलेले नाहीत. यावरून समीर गायकवाड यांचे निर्दोषत्व स्पष्टपणे दिसत असतांनाही, तथाकथित पुरोगामी आणि राजकीय पक्ष योग्य तपासाऐवजी थेट सनातनवर बंदी घालण्याची, तसेच काही जण सनातनचा रामनाथी येथील आश्रम बंद करण्याची किंवा तो अन्यत्र हालवण्याची मागणी करत आहेत. हे त्यांचा न्याययंत्रणेवरील अविश्‍वास आणि अपरिपक्वतेचे लक्षण आहे.

सनातनवर लावण्यात आलेले आरोप निराधार !

विश्‍व हिंदु संत महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष पूज्य स्वामी रत्नदेवसुरी यांचे उद्गार
     भाग्यनगर (हैद्राबाद) - सनातन संस्थेविषयी जो अपप्रचार करण्यात येत आहे, तो अयोग्य आहे. संमोहन आणि हत्या या संदर्भात सनातनवर लावण्यात आलेले आरोप पूर्णत: निराधार आहेत. या गोष्टींचे मी खंडण करत असून सनातन संस्थेला माझा पूर्ण पाठिंबा आहे, असे उद्गार विश्‍व हिंदु संत महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष पूज्य स्वामी रत्नदेवसुरी यांनी काढले. येथे नुकतेच हिंदुत्ववादी संघटनांचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. या निमित्ताने पूज्य स्वामीजींचे शहरात आगमन झाले होते.

लोकसभेत आम्ही सनातन संस्थेच्या बाजूने उभे राहू ! - बी.एस्.यडीयुरप्पा, खासदार, भाजप, कर्नाटक

     सनातन संस्थेवर बंदी घालण्यासंदर्भात लोकसभेत सूत्र आल्यास आम्ही सनातन संस्थेच्या बाजूने उभे राहू, असे आश्‍वासन कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार श्री. बी.एस्.यडीयुरप्पा यांनी सनातनच्या साधकांना दिले.

(म्हणे) सनातन आश्रम आणि सनातन संस्था यांची गोवा शासनाने चौकशी करावी !

फोंडा विकास समितीचे मिलिंद म्हाडगूत आणि राम कुंकळ्ळकर यांची मागणी
आतापर्यंत अनेक अन्वेषणयंत्रणांनी सनातन संस्थेची चौकशी केली असूनही, 
त्यातून काही निष्पन्न झालेले नाही, हे विरोधकांनी लक्षात घ्यावे !
      फोंडा, ९ ऑक्टोबर - सनातन संस्था आणि सनातन आश्रम यांची गोवा शासनाने चौकशी करायला हवी. सनातनचा आश्रम गोव्यात आहे. महाराष्ट्र राज्यातील चौकशीवर गोवा शासनाने अवलंबून न रहाता सनातनची चौकशी करावी, असे फोंडा विकास समितीचे अध्यक्ष मिलिंद म्हाडगूत पत्रकार परिषदेत म्हणाले.
     या वेळी मिलिंद म्हाडगूत पुढे म्हणाले, बांदोडा पंचायतीच्या पंचांमध्ये २ गट पडले आहेत. सनातनला विरोध करणार्‍या पंचसदस्य सौ. शर्मिला लोटलीकर यांचे म्हणणे शासनाने ऐकून घेऊन कारवाई करायला हवी. राम कुंकळ्ळकर म्हणाले, मडगाव स्फोट झाला, तेव्हा सनातनचे साधक त्या ठिकाणी कसे पोहोचले ? पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातनवर संशय आहे. गोव्यात येऊन सर्व तपासयंत्रणा चौकशी करत आहेत. सनातन संस्था हिंदु धर्मविरोधी कार्य करत आहे. अंत्रूज महाल हा शांत प्रदेश आहे. या प्रदेशात सनातन संस्था जातीय तेढ निर्माण करत आहे. सनातनच्या विचारांविरुद्ध कार्य करणारे, ते दुर्जन अशीच सनातनची दुर्जन शब्दाची व्याख्या आहे. (असे सनातनच्या कोणत्याही प्रकाशनात म्हटलेले नाही ! केवळ सनातनची अपकीर्ती करण्यासाठी धादांत खोटे आरोप करणारे विकास काय साधणार ? - संपादक) सनातनच्या रामनाथी आश्रमात १० ते १५ डॉक्टर काय करतात ? (एखाद्या संघटनेत डॉक्टर कार्यरत असणे, यात गैर काय ? - संपादक)

भारतात ४ वर्षांत ११ अणूशास्त्रज्ञांचा गूढ मृत्यू

     नवी देहली - देशभरात वर्ष २००९ ते २०१३ या ४ वर्षांमध्ये ११ अणूशास्त्रज्ञांचा गूढ मृत्यू झाल्याची माहिती अणुऊर्जा विभागाच्या आकडेवारीतून उघड झाली आहे. हरियाणातील राहुल सेहरावत यांनी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत यासंदर्भात माहिती मागितली होती. (शास्त्रज्ञांच्या या गूढ मृत्यूमागील शोध घेण्याचा प्रयत्न भाजप शासन करणार का ? - संपादक)
     अणूऊर्जा विभागाच्या माहितीनुसार अणूऊर्जा विभागाच्या प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्रांमध्ये कार्यरत असलेल्या ८ शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचा स्फोटात, समुद्रात बुडून किंवा गळफास लावून मृत्यू झाला आहे. या बरोबरच या कालावधीमध्ये अणुऊर्जा मंडळाच्या ३ अधिकार्‍यांचाही संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यांपैकी २ अधिकार्‍यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले, तसेच एकाचा रस्ता अपघातात मृत्यू झाला होता. वर्ष २०१० मध्ये एफ् श्रेणीच्या एका शास्त्रज्ञाची मुंबईतील त्याच्या घरी हत्या करण्यात आली होती, तसेच बार्क ट्रॉम्बे येथील रसायन शास्त्रज्ञाच्या प्रयोगशाळेमध्ये दोन संशोधन सहायकांचा अचानक लागलेल्या आगीत मृत्यू झाला होता. कल्पकममध्ये कार्यरत आणखी एका शास्त्रज्ञाने वर्ष २०१३ मध्ये कथितरीत्या समुद्रात उडी मारून आत्महत्या केली होती.

संतांना अटक केल्यास भाजपचे कार्यकर्ते स्वत:ला अटक करवून घेतील ! - भाजपची चेतावणी

साधू-संत आणि हिंदू यांच्या सन्मानासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
काशी (वाराणसी) - शांततेने काढलेल्या मोर्च्यावर पोलिसांनी ५ ऑक्टोबर या दिवशी अमानुष लाठीमार करून हिंसाचारास उत्तेजन दिले; मात्र त्यासाठी अनेक संतांवर खोटे गुन्हे दाखल केले. जर एकाही संतांना अटक झाली, तर भाजपचे कार्यकर्ते स्वत:ला अटक करवून घेतील, अशी चेतावणी काशी येथील भाजपच्या नेत्यांनी उत्तरप्रदेश शासनास दिली आहे. भाजपकडून एक पत्रकार परिषद घेण्यात आली. या परिषदेत आमदार लक्ष्मण आचार्य, आमदार शाम देव रॉय चौधरी, आमदार ज्योत्स्ना श्रीवास्तव आणि भाजप प्रवक्ते संजय भारद्वाज उपस्थित होते. या परिषदेत त्यांनी संत आणि इतर धर्माभिमानी यांच्या विरुद्ध लावलेले खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. संतांना अटक झाली, तर भाजप कार्यकर्ते कोणत्याही स्तराला जातील, असेही या वेळी त्यांनी सांगितले.

'बीफ फेस्ट'ला पाठिंबा न देणारे राहुल ईश्‍वर यांच्यावर विद्यार्थ्यांचे आक्रमण

      कोची (केरळ) - 'बीफ'वरून केरळमध्ये वातावरण चांगलेच तापत असून आता राहुल ईश्‍वर या हिंदु सामाजिक कार्यकर्त्याला लक्ष्य करण्यात आले आहे. कयामकुलम्मधील एका महाविद्यालयामध्ये कार्यक्रमासाठी गेलेले राहुल यांच्या गाडीची विद्यार्थ्यांनी तोडफोड केली. महाविद्यालयातील 'बीफ फेस्ट'ला राहुल यांनी पाठिंबा द्यावा, अशी विद्यार्थ्यांनी मागणी केली. या मागणीला त्यांनी नकार देताच विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. या विरोधात ईश्‍वर यांनी कोल्लम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. राहुल ईश्‍वर म्हणाले, "विवाहपूर्व शिक्षण यावर वर्ग घेण्यासाठी मी त्या महाविद्यालयात गेलो होतो. त्या वेळी २५ ते ३० विद्यार्थ्यांनी माझी गाडी अडवली. केरळमधील महाविद्यालयातील 'बीफ फेस्ट'ना मी पाठिंबा द्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी मला केली. या मागणीला मी नकार देताच त्यांच्याकडून माझ्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

सौदी अरेबियामध्ये आक्षेपार्ह पोस्टसाठी होणार मृत्यूदंड

     रियाध (सौदी अरेबिया) - सामाजिक संकेतस्थळावर (सोशल मीडियावर) पोस्ट करतांना सौदी अरेबियामधील नेटिझन्सना आता अधिक सतर्क राहावे लागणार आहे. आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करणार्‍या व्यक्तीला मृत्यूदंडही देण्याचे प्रावधान (तरतूद) सौदी शासनाने काढलेल्या नव्या आदेशानुसार करण्यात आले आहे. एका शासकीय संकेतस्थळाने या नव्या निर्णयाबाबत माहिती दिली आहे.
        येथील कायदा मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयानुसार मृत्यूदंडाबरोबरच आरोपींना चाबकाचे फटके, कारावास, प्रवासावर बंदी आणि सामाजिक संकेतस्थळावर बंदीसारख्या शिक्षाही दिल्या जाऊ शकतात. आरोपीच्या शिक्षेबाबत वरिष्ठ न्यायाधीश निर्णय घेणार आहेत. एखाद्या आखाती देशाने ट्विटर किंवा फेसबूकसारख्या सामाजिक संकेतस्थळाचा वापर करणार्‍यांसाठी अशा प्रकारचा आदेश देण्याची ही पहिलीच वेळ आहे. 
      कोणत्या प्रकारच्या पोस्टसाठी मृत्यूदंड दिला जाऊ शकतो, हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. सौदीमध्ये याआधीच मास मीडिया सेन्सरशीपसाठी अनेक कडक कायदे आहेत. सौदीच्या मूलभूत कायद्यानुसार येथे देशातील सुरक्षेवर परिणाम करणार्‍या किंवा लोकांमध्ये दरी निर्माण करील, अशा बाबींना आधीच बंदी आहे.

पाक सैन्याच्या हेराला ठार केल्याचा तालिबानचा दावा

     काबुल (अफगानिस्तान) - तालिबानी आतंकवाद्यांनी एका व्यक्तीला फाशी देण्यात आल्याची ध्वनीचित्रफीत प्रसिद्ध करून ती व्यक्ती पाक गुप्तचर यंत्रणेचा अधिकारी असल्याचा दावा केला असला, तरी पाकिस्तानच्या सैन्याने हा दावा फेटाळला आहे. आतंकवाद्यांनी ज्या व्यक्तीला फासावर लटकवले ती व्यक्ती सैनिक अथवा गुप्तचर यंत्रणेची अधिकारी नाही, असे सैन्याचे प्रवक्ते आसिम बाजवा यांनी स्पष्ट केले आहे. या चित्रफितीत आतंकवादी एका व्यक्तीला फासावर लटकवत असल्याचे दिसत आहे. पाकिस्तान सैन्याचा प्रतिनिधी आहे आणि हेरगिरी करत होतो, असा दावा त्या व्यक्तीने केल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानाने आतंकवाद्यांना फाशी देण्याच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यास प्रारंभ करण्यात आला असून त्याचा सूड घेण्यासाठी या व्यक्तीला फाशी देण्यात आल्याचे आतंकवाद्यांनी म्हटले आहे.

राजस्थानच्या मंत्र्यांचे गो-अर्थव्यवस्था पुनर्प्रस्थापित करण्याचे प्रयत्न

सर्वच राज्यातील मंत्र्यांनी याचा आदर्श घेऊन गोसंवर्धन करावे !
   जयपूर - राजस्थान शासनाने देशातील प्रथम गो-मंत्रालयाची स्थापना केली. या विभागाचे मंत्रीपद ओताराम देवासी यांना बहाल केले. त्यांच्या मंत्रालयाला अर्थसंकल्पात केवळ ५ कोटी रुपयांचे प्रावधान केले गेले. त्यातील अर्धी रक्कम गायींना पशूवधगृहात जाण्यापासून रोखण्यावर व्यय होते. तरीही श्री. देवासी यांनी खचून न जाता राज्यात गो-अर्थव्यवस्था पुनर्प्रस्थापित करण्याचे प्रयत्न चालू केले आहेत.
     श्री. देवासी यांनी प्रथम गोमुत्राची व्यावहारिक स्तरावर विक्री करण्यास प्रारंभ केला. त्यानंतर हरियाणातील गोरक्षकांशी संपर्क साधून डासांपासून मुक्त होण्याची औषधी, तसेच इतर साहित्य आणि शेण मिसळून यज्ञात आहुती देण्यासाठी उपयुक्त कांड्या उत्पादित करण्याचे प्रयत्न चालू आहेत. याप्रमाणे गोमूत्र विकणार्‍यास २०० रुपये, तर इतर उत्पादने विकणार्‍यास १०० रुपये असे प्रतिदिन ३०० रुपये उत्पन्न होऊ शकते. असे झाल्यास भाकड गायींना पाळणारे त्यांच्या गायी कत्तलखान्यात पाठवणार नाहीत, असा श्री. देवासी यांचा होरा आहे. याशिवाय बिकानेर येथे गायींसाठी अभयारण्य उभारण्याचीही त्यांची योजना आहे. श्री. देवासी राज्यातील सर्व गोशाळा आधुनिक करण्यासाठी राज्यशासनाकडून निधी मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत.

वायपिन, एर्नाकुलम (केरळ) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु धर्मावरील आघातांविषयी मार्गदर्शन

     एर्नाकुलम (केरळ) - देशभरात हिंदूंवर होणारे आघात या विषयावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने केरळ राज्यातील वायपिन, एर्नाकुलम येथील स्थानिक हिंदूंना मार्गदर्शन करण्यात आले. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्या कु. प्रणीता सुखटणकर यांनी उपस्थित हिंदूंना या ज्वलंत विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी मोठ्या संख्येने स्थानिक हिंदू उपस्थित होते. 
    धर्माभिमानाच्या अभावामुळे हिंदूंची दयनीय स्थिती झाली आहे. हिंदु धर्माचे महत्त्व हिंदूंनी जाणून धर्माचरण केले, तरच हिंदूंचे रक्षण होणार आहे. युवा पिढीला हिंदु धर्माचे शिक्षण आपण दिले पाहिजे. मार्गदर्शनाच्या शेेवटी सर्वांनी सामूहिक नामस्मरण केले. 
क्षणचित्रे 
१. आयोजकांनी देवळात दर्शन कसे घ्यावे आणि आचारधर्म यांविषयी धर्मशिक्षण देणारे फलक स्वत:हून लावले. 
२. मुलांसाठी आम्ही तुमचे मार्गदर्शन आयोजित करणार, असे मार्गदर्शनाला उपस्थित असलेल्या एका हिंदूने सांगितले.

अमेरिकेच्या नाशासाठी रशियातील टोळ्या इस्लामिक स्टेटला (आयएस्आयएस्ला) विकणार होत्या अणूबॉम्ब !

आयएस्आयएस्ला सामोरे जाण्यासाठी भारतातील हिंदू सिद्ध आहेत का ?
    लंडन - रशियाशी संबंध असल्याचा संशय असलेल्या कुख्यात टोळ्यांनी इस्लामिक स्टेटला (आयएस्आयएस्ला) अणूबॉम्ब बनवण्यासाठी लागणारे साहित्य विकण्याचा प्रयत्न केल्याचे एफ्बीआयच्या अन्वेषणात आढळले आहे. या टोळ्यांनी मध्यपूर्वेतील कट्टरतावाद्यांना अणूबॉम्ब बनवण्यासाठी लागणारे साहित्य विकण्याचा चार वेळा केलेला केलेला प्रयत्न अमेरिकेच्या एफ्बीआयने गेल्या पाच वर्षांत उधळल्याचे वृत्त असोसिएटेड प्रेसने दिले आहे.

कृत्रिम हौदात न विरघळलेल्या मानाच्या श्री गणेशमूर्तींचे मंडळांकडूनच धरणात पुनर्विसर्जन !

पुण्यातील मानाच्या श्री गणेशमूर्ती कृत्रिम हौदात विसर्जित केल्याचे प्रकरण ! 
आता पुनर्विसर्जन केले असले, तरी हौदातील विसर्जनाची अधार्मिक कृती 
केल्याने लागलेल्या पापाचे क्षालन व्हावे, यासाठी मंडळाच्या पदाधिकार्यांनी येथून 
पुढे विधीवत् वहात्या पाण्यातील विसर्जनाची परंपरा पाळू, अशी प्रतिज्ञा करावी !
पुणे, ९ ऑक्टोबर - तथाकथित पर्यावरणवाद्यांच्या कांगाव्याला बळी पडत मानाच्या ५ गणेशोत्सव मंडळांसह सुप्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ गणेशमंडळ, अखिल मंडई गणपति मंडळ यांनी श्री गणेशमूर्तींचे कृत्रिम हौदात विसर्जन केले. धर्मशास्त्राशी विसंगत या कृतीनंतर श्री गणेशमूर्तीची विटंबना करणारी अजून एक घटना समोर आली आहे. अनंत चतुर्दशी होऊन ८ दिवस उलटून गेले तरी, कृत्रिम हौदात विसर्जित केलेल्या मानाच्या गणेश मंडळांच्या गणेशमूर्ती पूर्णपणे विरघळल्या नाहीत. परिणामी त्या मंडळांच्या पदाधिकार्यांनी पुन्हा कह्यात घेतल्या असून आता त्या अन्यत्र विसर्जित करण्यात येणार आहेत. 

(म्हणे) 'भारताला हिंदु राष्ट्र बनू देणार नाही !'

हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या विरोधात आता मायावतींनाही पोटशूळ
लक्ष्मणपुरी (लखनऊ) - धर्मांध नेते आझम खान यांच्यानंतर आता बहुजन समाज पक्षाच्या नेत्या आणि स्वतःचे पुतळे उभे करून मोठी माया जमवल्याच्या प्रकरणी आरोप असणार्यास उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनाही हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या विरोधात पोटशूळ उठला आहे. कांशीराम यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित इको गार्डन येथील सभेत त्या म्हणाल्या की, 
१. भाजप या देशाला हिंदु राष्ट्र बनवू इच्छित आहे. (असे आजवर भाजपच्या एकाही नेत्याने म्हटलेले नाही ! - संपादक)
२. ती इच्छा आम्ही पूर्ण होऊ देणार नाही. (हिंदु राष्ट्र म्हणजे विश्वकल्याणार्थ कार्यरत सात्त्विक लोकांचे राष्ट्र ! अशा राष्ट्राला मायावती यांचा विरोध काय दर्शवतो ? - संपादक) 

केरळमध्ये महाविद्यालयांत 'बीफ फेस्टिव्हल' आयोजित केल्यामुळे १६ विद्यार्थ्यांवर कारवाई !

     कोट्टायम् (केरळ) - दादरी प्रकरणाचा निषेध करण्यासाठी येथील एका प्रख्यात ख्रिस्ती महाविद्यालयातील साम्यवादी विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांनी ७ ऑक्टोबर या दिवशी सार्वजनिक गोमांस भक्षण करण्यासाठी पूर्वानुमती नाकारल्यावरही 'बीफ फेस्टिव्हल' (गोमांस उत्सव)आयोजित केल्यावरून महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने १० विद्यार्थ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. येथील सी.एम्.एस्. महाविद्यालयाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार या विद्यार्थ्यांवर शिस्तीचा भंग केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. 

संभाव्य बंदीला वारकरी संप्रदायाचा तीव्र विरोध ! - ह.भ.प. वरसाळेकर महाराज

डावीकडून कु. प्रतिक्षा कोरगावकर, ह.भ.प. वरसाळेकर
महाराज, पू. नंदकुमार जाधव आणि अधिवक्ता गोविंद तिवारी
सनातनवरील बंदीच्या विरोधातील मोर्च्यानिमित्त जळगाव येथे पत्रकार परिषद
      जळगाव - सनातनवर बंदी आल्यास वारकरी संप्रदाय घराघरापर्यंत जाऊन निषेध पोहोचवेल. मुंगी मेली, तरी क्षमायाचना करणारे साधक हत्येसारखे कृत्य करूच शकत नाही. साधकांची वृत्ती पुष्कळ सात्त्विक आहे. साधू-संतानी जे करायला हवे, ते महान कार्य सनातनचे साधक करत आहेत, असे प्रतिपादन ह.भ.प. वरसाळेकर महाराज यांनी केले. १० ऑक्टोबर या दिवशी होणार असलेल्या भव्य निषेध मोर्च्याच्या संदर्भात ८ ऑक्टोबरला आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी सनातन संस्थेचे प्रसारसेवक पू. नंदकुमार जाधव, हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रतिक्षा कोरगावकर आणि अधिवक्ता गोविंद तिवारी हेही उपस्थित होते.

नंदुरबार येथे पत्रकार परिषद !

पत्रकार परिषदेत डावीकडून दिलीप ढाकणे-पाटील,
दिपक गवते, किरण दुसे आणि डॉ. नरेंद्र पाटील
सनातनवरील संभाव्य बंदीचा निषेध मोर्च्याच्या माध्यमातून नोंदवणार !
      नंदुरबार - सनातन संस्थेची अपकीर्ती आणि संभाव्य बंदी यांविरोधात हिंदु संघटनांच्या वतीने नंदुरबार येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी सनातनच्या अपकीर्तीचा निषेध करण्यात आला, तसेच मोर्च्याच्या माध्यमातूनही संघटीतपणे निषेध नोंदवणार असल्याचे सांगण्यात आले. यासाठी भाजप, भारतीय जनता युवा मोर्चा, शिवसेना, वारकरी संप्रदाय, यांच्यासह हिंदुत्ववादी संघटना, संप्रदाय, व्यापारी संघटना, गणेश मंडळे, विविध संस्था आणि समाजिक संघटना यांचा सनातन संस्थेला पाठिंबा मिळत आहे. निषेध मोर्चा नंतर सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येईल.

दादरी येथील अखलाकच्या घरात गोमांस नव्हे, मांस बनवल्याचे सिद्ध !

     लक्ष्मणपुरी (लखनऊ) - नोएडा येथील दादरी परिसरातील बिसाहडा गावात मोहम्मद अखलाक यांची हत्या ही गोमांसभक्षणामुळे झाल्याचा कांगावा करण्यात आला. त्यामुळे उत्तरप्रदेश शासनाने अखलाक कुटुंबियांना ४५ लक्ष रुपयेही दिले; मात्र आता अखलाकच्या घरात शिजलेले गोमांस नसून मांस होते, हे फॉरेन्सिक लॅबने दिलेल्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सदर हत्येवरून हिंदू-मुसलमान राजकारण करणार्‍या समाजवादी पक्षाला सणसणीत चपराक बसली आहे. पोलिसांच्या अहवालात सदर हत्या गोमांसामुळे झाल्याचे कुठेही म्हटलेले नव्हते, तरीही माध्यमे, काही राजकीय पक्ष आणि तथाकथित निधर्म्यांनी कांगावा करून केंद्रातील भाजप शासनाच्या विरोधात कांगावा चालू केला होता.

पाकड्यांना कठोर विरोध आणि त्यांना रोखणे, हीच खरी हुतात्म्यांना श्रद्धांजली ! - श्री. उद्धव ठाकरे

पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांना शिवसेनेने विरोध केल्याचे प्रकरण
शत्रूराष्ट्र पाकिस्तानच्या विरोधात सर्वच स्तरांवर उघडपणे
विरोधी भूमिका केवळ शिवसेनाच घेते, त्याविषयी त्यांचे अभिनंदन !
      मुंबई, ९ ऑक्टोबर - शौर्य आणि राष्ट्रभक्ती या दोन गुणांची खाण म्हणजे महाराष्ट्र ! त्यामुळे कोणत्याही राष्ट्रीय विचारांची ठिणगी आधी महाराष्ट्रात पडते आणि नंतर त्याचा वणवा देशभरात भडकतो, हा शतकानुशतकांचा इतिहास आहे. म्हणूनच पाकिस्तानी गझल गायक गुलाम अलींच्या मुंबईतील कार्यक्रमास शिवसेनेने केवळ विरोध केला नाही, तर वाघाच्या राष्ट्रवादी डरकाळीने हा कार्यक्रमच रहित झाला आहे. आता यावर काही पाकपुरस्कृत मानवतावाद्यांनी आपली बेसूर नरडी उघडली आहेत, पण आम्ही जे केले ते केले.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ११ ऑक्टोबरला सनातनवरील संभाव्य बंदीच्या विरोधात राष्ट्रीय हिंदू आंदोलन आणि भव्य मोर्चा यांचे आयोजन

      सनातन संस्थेचे धर्मप्रसार आणि धर्मरक्षण यांचे कार्य पचनी पडत नसल्याने कथित पुरोगाम्यांकडून सनातनविषयी अपसमज पसरवून संस्थेवर बंदीची मागणी करण्यात येत आहे. सनातन संस्था आतंकवादी संघटना असल्याचा मनमानी आरोप करण्यात येत आहे. वास्तविक सनातन संस्था ही प्रखर हिंदुत्ववादी आणि राष्ट्र्रभक्त संघटना असून संस्थेचे कार्य अत्यंत पारदर्शी आहे. ज्याप्रमाणे कावीळ झालेल्यांना जग पिवळे दिसते, त्याप्रमाणे सनातनद्वेष आणि हिंदुत्वद्वेष यांच्या चष्म्यामुळे सनातनमध्ये आतंकवादाचा भास होत आहे. पुरोगाम्यांच्या या षड्यंत्राच्या विरोधात हिंदुत्ववाद्यांनी ११ ऑक्टोबरला अनेक ठिकाणी राष्ट्रीय हिंदू आंदोलन आणि विशाल मोर्चा यांचे आयोजन केले आहे.

खबरदार ! जर सनातन संस्थेवर बंदी घालाल, तर.....! - सौ. दीपश्री पोटफोडे, शिवसेना संघटक

आंदोलनात सहभागी हिंदुत्ववादी
सनातन संस्थेवरील बंदीच्या मागणीच्या विरोधात पेणमधील हिंदुत्ववादी संघटित !
      पेण, ९ ऑक्टोबर (वार्ता.) - खबरदार ! जर सनातन संस्थेवर बंदी घालाल, तर गाठ शिवसेनेशी पडेल. शिवसैनिक विरोध करतील आणि करणारच !, असे क्षात्रवृत्तीवर्धक उद्गार येथील शिवसेना संघटक सौ. दीपश्री पोटफोडे यांनी काढले. त्या ८ ऑक्टोबर येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वेळी बोलत होत्या. या वेळी सर्वच हिंदुत्ववाद्यांनी सनातन संस्थेवर बंदी घालण्याचे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी संघटित होणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. यानंतर हिंदुत्ववाद्यांनी तहसीलदारांना आपल्या मागण्यांचे निवेदनही दिले.

रामनाथी, गोवा येथे सनातनच्या विरोधात आणि सनातनच्या समर्थनार्थ होणार्‍या दोन्ही मोर्च्यांना पोलिसांनी अनुमती नाकारली !

      फोंडा - ११ ऑक्टोबर या दिवशी रामनाथी येथील सनातन आश्रमाच्या विरोधात रामनाथ युवा संघाने रामनाथी गावात आयोजित केलेला निषेध मोर्चा आणि सभा यांना फोंडा पोलिसांनी अनुमती नाकारली, त्याबरोबरच त्याच दिवशी सनातनच्या समर्थनार्थ विविध हिंदुत्ववादी संघटनांनी आयोजित केलेल्या समर्थन फेरीलाही पोलिसांनी अनुमती नाकारली आहे.
      फातोर्डा येथे एफ्सी गोवा फूटबॉल स्पर्धेतील महत्त्वाचा सामना ११ ऑक्टोबर या दिवशी असल्याने बहुतांश पोलीस कर्मचारी या सामन्यासाठी बंदोबस्त ठेवण्यात व्यस्त असणार आहेत. त्यामुळे फोंड्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास तो हाताळण्यास पोलीस यंत्रणा उपलब्ध होऊ शकणार नाही, यासाठी या मोर्च्याला अनुमती पोलिसांनी नाकारली, असे कारण पोलिसांनी ही अनुमती नाकारतांना दिले आहे.

मुंबईत १५ ऑक्टोबर या दिवशी दप्तराविना शाळा

     मुंबई - येथे १५ ऑक्टोबर या दिवशी विद्यार्थ्यांना दप्तराविना शाळेत जाण्याची मुभा असणार आहे. राज्यभरात १५ ऑक्टोबर हा दिवस 'वाचन प्रेरणा दिवस' म्हणून साजरा करण्यात येणार आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी याविषयीची घोषणा केली आहे. शासकीय परिपत्रकही काढण्यात आले आहे. 
     १५ ऑक्टोबर हा भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन आहे. अब्दुल कलाम यांच्या निधनानंतर विनोद तावडे यांनी शाळांमध्ये 'वाचन प्रेरणा दिवस' म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणा केली होती. सध्या राज्यातील शाळांमध्ये २.५ कोटी विद्यार्थी आहेत, त्यातील १.८५ कोटी विद्यार्थी हे तिसरी ते आठवी इयत्तेमधील आहेत. त्यामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला, तर प्रतिवर्षी वाचन प्रेरणा दिवसाला राज्यात २० कोटी पुस्तके वाचली जातील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आष्टा येथील चव्हाण वसाहत भागातील देशी मद्याचे दुकान स्थलांतरित करा ! - महिलांची अपर जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे मागणी

      सांगली, ९ ऑक्टोबर (वार्ता.) - आष्टा येथील चव्हाण वसाहत भागात देशी मद्याचे दुकान असून या दुकानामुळे महिलांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो. महिलांकडे बघून अश्‍लील संभाषण करणे, रस्ता अडवणे असे प्रकार सर्रास होत आहेत. या दुकानामुळे दंगा आणि मारामार्‍या होत असल्याने लहान मुलांना परिसरातून जातांना भीती वाटते. त्यांना शाळेला जाणेही अशक्य होत आहे. तरी या बाबींचा शासनाने गांभीर्याने विचार करून हे मद्याचे दुकान त्वरित स्थलांतरित करावे, असे निवेदन आष्टा येथील महिलांनी अपर जिल्हाधिकारी श्री. संजयसिंह चव्हाण यांना ८ ऑक्टोबर या दिवशी दिले. या वेळी गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यांच्यासमवेत शिवसेनेचे शहरप्रमुख श्री. पोपट भानुसे, उपशहरप्रमुख श्री. दादा गावडे, अधिवक्ता मोहन पाटील, उर्मिला पाटील, सर्वश्री खंडू शिंदे, अजित पाचोरे, विजय भानुसे यांसह अन्य शिवसैनिकही उपस्थित होते.

सनातन संस्था कोणतेही देशविघातक कार्य करणार नाही ! - शिव समर्थ गोरक्षक संघ फलटण

      सातारा - सनातन संस्था कोणतेही देशविघातक कार्य करणार नाही. स्वयंघोषित ढोंगी पुरोगामी लोकांच्या खोटे बोला, पण रेटून बोला या म्हणीनुसार सनातन संस्थेवर बंदीची मागणी करीत आहे. जी तरुण मुले समाजसुधारणेचे काम सनातन संस्थेच्या वतीने करून साधक झाले, ते भारत देशाच्या दिव्याची ज्योत झाले आहेत. त्यांच्यावर खोटेनाटे आरोप करता, ते खपवून घेतले जाणार नाही, अशा आशयाचे लिखाण असलेले पत्रक शिव समर्थ गोरक्षक संघ, फलटण यांनी काढून सनातनला जाहीर पाठिंबा दिला आहे.

सनातन संस्थेची अपकीर्ती आणि संस्थेवरील संभाव्य बंदीचे संकट यांविरुद्ध नाशिक येथे निवेदन

निवेदन देतांना पोलिसांच्या डावीकडे श्री. महेशकुमार राठी आणि अन्य हिंदुत्ववादी
     नाशिक, ९ ऑक्टोबर (वार्ता.) - कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातनच्या साधकाला संशयित म्हणून अटक करून संस्थेची अपकीर्ती कुंभाड रचले जात आहे. त्या विरोधात नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील पोलीस ठाण्याला अनेक धार्मिक संघटना आणि संप्रदाय यांच्या वतीने एक निवेदन देण्यात आले.
     पोलीस निरीक्षक श्री. दिलीप भागवत यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी एक संशयित म्हणून अटक केलेली असतांनासुद्धा प्रसारमाध्यमांद्वारे केवळ या साधकालाच नव्हे, तर संपूर्ण संस्थेची अपकीर्ती करून शासनावर आणि न्याययंत्रणेवर दबाव टाकत आहेत. हे कटकारस्थान रचले जात आहे. यामध्ये प्रसारमाध्यमे, पुरोगामी आणि निधर्मी संघटना यांच्यासमवेत अनेक पक्ष अन् राज्यकर्ते यांचाही समावेश आहे.

जातीचा दाखला बोगस आढळल्यास निवडणूक लढवण्यास ६ वर्षे बंदी

     पुणे, ९ ऑक्टोबर - राखीव जागेवर निवडणूक लढवून निवडून आलेल्या उमेदवाराच्या जातीचा दाखला पडताळणी समितीने अवैध ठरवल्यास त्या उमेदवाराचे नगरसेकपद रहीत होणारच आहे. त्याचसमवेत त्याला ६ वर्षांच्या कालावधीकरता महानगरपालिका किंवा नगरपरिषद यांची निवडणूक लढवण्यासही बंदी घातली आहे. महानगरपालिका कायद्यातच तशी सुधारणा करण्यात आली आहे. बनावट जातीचा दाखला सिद्ध करून राखीव जागांवर निवडणूक लढवणार्‍यांना धाक वाटावा, यासाठी राज्य शासनाने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुंबई महापालिका अधिनियम १८८८, महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी १९६५ या अधिनियमांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. (उशिरा सुचलेले शहाणपण ! एवढ्यावरच न थांबता शासनाने त्या उमेदवाराला कोणत्याही प्रकारची निवडणूक लढण्यास आजीवन बंदी करावी ! - संपादक)

दर्जाहीन संगीत लोकप्रिय होणे, हे कलियुगातील हीन अभिरुचीचे द्योतक !

      चंगळवादाचा परिपाक झालेल्या सध्याच्या हिंदूंच्या सार्वजनिक उत्सवांचा 'कर्णकर्कश आवाजात संगीत लावून त्यावर अश्‍लील अंगविक्षेप करत नाचणे' हा एक अविभाज्य भाग झाला आहे. यंदाच्या गणेशोत्सवामध्ये 'शांताबाई' नावाचे अत्यंत सुमार दर्जाचा अर्थ असणारे गाणे लोकप्रिय झाले. याआधी 'चिकनी चमेली', 'मुन्नी बदनाम हुई', 'लुंगी डान्स', 'कोंबडी पळाली', 'कोलावरी डे' ही अशीच अर्थहीन गाणी लोकांच्या पसंतीस उतरली होती. वास्तविक ही गाणी गेयता, काव्य, संगीत अशी सर्वार्थाने अत्यंत निरस आणि सुमार दर्जाची आहेत. त्यामुळे सध्या गाण्यांच्या लोकप्रियतेसाठी त्यांतील शब्दांचा भावार्थ आणि संगीत यांचे निकष केव्हाच गळून पडल्याचे सिद्ध होत आहे. 

पुणे शहरात मद्यधुंद अवस्थेत ट्रेलरचालकाने ८ वाहनांना उडवले

" जखमी " जणांची प्रकृती गंभीर
      पुणे, १० ऑक्टोबर - मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका ट्रेलर चालकाने ९ ऑक्टोबर या दिवशी रात्री उशिरा ८ वाहने उडवली. यामध्ये ६ जण जखमी झाले असून त्यांपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. खडक, विश्रामबाग, फरासखाना पोलिसांनी ट्रेलरला अडवण्याचा प्रयत्न केला; परंतु या ट्रेलरने पोलिसांच्या वाहनांनाही उडवले. या प्रकरणी जितेंद्र बसाई सिंग (लखनऊ) याला पोलिसांनी अटक केले आहे. यापूर्वीही स्वारगेट येथे राज्य परिवहन महामंडळाचा चालक संतोष माने याच्याकडूनही असाच वाहनांचा अपघात करण्याचा अपप्रकार झाला होता.

पत्नीचे शिर आणि कुर्‍हाड हातात घेऊन रस्त्यावर फिरणारा अटकेत !

घोर कलियुग म्हणतात, ते हेच !
      कात्रज (पुणे) - पहारेकर्‍याची चाकरी करणार्‍या रामू चव्हाण (वय ६० वर्षे) या गृहस्थाने पत्नीचे चारित्र्याच्या संशयावरून शिर कापले. ते शिर एका हातात आणि दुसर्‍या हातात कुर्‍हाड घेऊन तो येथील रस्त्यावरून फिरत होता. ते पाहून रस्त्यावरील आणि इमारतीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यांनी पोलिसांना संपर्क साधल्यावर पोलिसांनी येऊन त्याला कह्यात घेतले.


फलक प्रसिद्धीकरता

पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण नव्हे, तर हिंदु संस्कृतीच देशाला तारेल !
पोर्न संकेतस्थळे शोधणार्‍या जगभरातील पहिल्या १० शहरांच्या सूचीत ६ शहरे भारतातील आहेत, अशी माहिती गुगल ट्रेण्डने प्रसिद्ध केली आहे. त्यात मुंबई आणि पुणे यांचा समावेश आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! 
Porn websites dhundnewale duniyake pahale 10 shaharome Bharatke 6 shahar. 
Make in India ka Make in Bharat kab hoga ? 
जागो !
 पोर्न वेबसाईट ढूंडनेवाले दुनियाके पहले १० शहरोेमें भारतके ६ शहर. 
 मेक इन इंडिया का मेक इन भारत कब होगा ?

सनातनच्या अपकीर्तीची सुपारी कोणी दिली ? याचा शासनाने शोध घ्यावा !

श्री. प्रसाद म्हैसकर
     वेगवेगळ्या वृत्तवाहिन्या, वर्तमानपत्रे यांमधून सनातनला संपवण्याचे जिकिरीचे प्रयत्न चालू असलेले पाहिले. ही सर्व वृत्ते पहातांना मनामध्ये काही प्रश्‍न उपस्थित झाले.
१. चर्चासत्रांची बैठक पूर्वग्रहदूषित आणि द्वेषमूलक !
     सर्व वृत्तांमध्ये एक गोष्ट समान दिसत होती, ती म्हणजे झालेले खून सनातनने केले आहेत, या विचारावरच सर्व चर्चासत्रांचे आयोजन केले गेले. त्यामुळे सनातनची बाजू मांडताना आपोआप बचावात्मक स्थितीत ढकलणे सोपे गेले. या वाहिन्यांनी या घटनांमध्ये न्यायाधिशाच्या भूमिकेतून आधीच सनातनला दोषी ठरवून तिला फासावर लटकवण्याचा निर्णय देऊन टाकला. अशी पत्रकारिता करणार्‍यांना न्यायालयाचा अवमान आणि अधिक्षेप केल्याबद्दल शासन कधी केले जाणार ?

अपघातांचे चिंतन !

      रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा २०१४ चा रस्ते अपघात अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. या एका वर्षात १५ ते ३४ वयोगटातील ७५ सहस्र तरुण नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत, असे त्यात म्हटले आहे. यामध्ये पुरुषांचे प्रमाण अधिक म्हणजे ८२ प्रतिशत इतके आहे. या अहवालानुसार २०१३ मध्ये ४ लक्ष ८६ सहस्र, तर २०१४ मध्ये ४ लक्ष ८९ सहस्र रस्ते अपघात झाले, तसेच त्यात बळी गेलेल्यांची संख्याही दीड प्रतिशतने वाढली आहे.

अतीनील किरणांपासून सजीव सृष्टीचे रक्षण होण्यासाठी ओझोन वायूचे रक्षण करा !

१. शेतात अन् कारखान्यात वापरली जाणारी ९० रसायने, विशेषत: वातानुकूलित यंत्रांतून बाहेर येणारे वायू आणि आग विझवण्यासाठी वापरले जाणारे वायू यांमुळे ओझोनच्या थराला हानी पोचणे : ओझोन वायूचे रेणू अत्यंत अस्थिर असतात. ते ऑक्सिजनच्या तीन अणूंपासून बनलेले असतात. पृथ्वीच्या वातावरणापासून १५ कि.मी. ते ५० कि.मी. अंतरावर हा ओझोनचा थर पसरलेला असतो आणि तो सूर्यापासून येणार्‍या अतीनील किरणांपासून पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे रक्षण करतो.

प्रसारमाध्यमांनी आपली सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून आणि नीतीनियम पाळून प्रसिद्धीकरणाच्या सामाजिक मर्यादा पाळव्या !

      भारतातील इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या गैरवापरांचा उल्लेख वेळोवेळी होतो. एक म्हणजे तहेलका आणि दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे स्टिंग ऑपरेशन, आँखो देखा हाल या नावाखाली पत्रकारितेचा देखावा करून प्रख्यात नट शक्ती कपूर, अमन वर्मा आणि महाराष्ट्र्राचे गृहमंत्री मा. श्री. आर्.आर्. पाटील यांच्या घरात घुसून, खोल पोल या नावाखाली इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांनी जे प्रकार केले, त्यामुळे या प्रसारमाध्यमांचा विषय अतिशय वादग्रस्त बनलेला आहे. इलेक्ट्रॉनिक आणि एकूणच प्रसारमाध्यमांना गैरवापर करता येऊ नये; म्हणून शेवटी सरकारने स्टिंग ऑपरेशन या नावाखाली आदेश काढून प्रसारमाध्यमांना कोणत्या गोष्टी करता येणार नाहीत, याचे निर्देश जाहीर केले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने 
१. कोणत्याही व्यक्तीचे खाजगी जीवन उघड्यावर आणता येणार नाही. 
२. नागरिकांची वैयक्तिक आणि कौटुंबिक उणीदुणी यांची चर्चा चव्हाट्यावर मांडता येणार नाही. 
३. इलेक्ट्रॉनिक माध्यमाने केवळ सनसनाटी निर्माण करणे आणि खोलपोल या नावाखाली अनैतिक मार्गाचा वापर करणे, जनहिताऐवजी कोणत्याही मार्गाने लोकप्रियता मिळविणे, या गोष्टी करू नयेत.
४. प्रसारमाध्यमांनी आपली सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून आणि प्रसारमाध्यमांचे नीतीनियम पाळून प्रसिद्धीकरणाच्या सामाजिक मर्यादा पाळाव्या. (श्री. बा.भा. पुजारी यांच्या प्रसारमाध्यमे खरोखरीच भारतीय आहेत का ? या लेखातून) (धर्मभास्कर, जून २००७, पृ. २२ व २३)

भारतीय स्त्री - कोण होतीस तू, काय झालीस तू ?

     प्राचीन इतिहासात भारतीय स्त्रियांना बरोबरीचे स्थान दिले गेल्याने वेद निर्मितीपासून राज्यकर्त्यांमध्ये महिलांची नावे कर्तृत्वाने झळकलेली आहेत; मात्र बाराव्या शतकानंतर भारतात इस्लामी आक्रमकांची सुमारे ६०० वर्षे राजवट राहिल्याने त्या काळात स्त्रियांच्या मोकळेपणावर बंधने आली. आज ३ टक्के आधुनिक भारतीय स्त्रिया करिअरप्रधान झाल्या असून बाकी स्त्रिया गृहिणीची भूमिका योग्य प्रकारे पार पाडत आहेत. त्यांच्यावरच आपली कुटुंबव्यवस्था आणि देश यांचे भविष्य अवलंबून आहे. त्यांना आपण यथोचित मान दिला पाहिजे. या लेखाचा काही भाग ९ ऑक्टोबर या दिवशी प्रसिद्ध करण्यात आला. आज त्यापुढील सूत्रे पाहूया.
     भौतिकदृष्ट्या संपन्न नव्हे, तर आध्यात्मिकदृष्ट्या संपन्न म्हणजे महासत्ता ! - प्रा. अनिल सामंत, माजी अध्यक्ष, विद्याभारती (१३.१.२००८)

आपण भारतात जन्मलो, या संस्कृतीत वाढलो, याचा प्रत्येक भारतियाला अभिमान असला पाहिजे !

     जगाला पहिली भाषा, अर्थव्यवस्था, न्यायव्यवस्था, शिक्षणव्यवस्था, गणित, संस्कृती, आरोग्यशास्त्र आणि सर्वच भारताने शिकवले. आपली संस्कृती एवढी प्राचीन असतांना आपण मात्र सध्या इतर देशांकडे पहातो. २०० वर्षांपूर्वी ‘अ‍ॅलोपथी अस्तित्वात नव्हती, तेव्हा कोणते उपचार केले जात होते ? जग आपल्याकडे शिकायला येते. त्यामुळे आपण या देशात जन्मलो, या संस्कृतीत वाढलो, याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे.
- योगऋषी रामदेवबाबा (२९.४.२०११)
       लोक जागे होण्यासाठी लोकांचे सर्व प्रश्‍नांवर लोकजागर केले पाहिजे. (लोकजागर, १९.८.२०११)

मानसिक आरोग्य बिघडवणार्‍या समस्यांवर साधना करणे, हाच शाश्‍वत उपाय !

१० ऑक्टोबर या जागतिक मानसिक आरोग्यदिनाच्या निमित्ताने...
      आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये तणाव ही समाजाला भेडसवणारी एक प्रमुख समस्या बनली आहे. लहान-थोर, पुरुष-स्त्रिया सर्वांनाच कमी जास्त प्रमाणात तणाव हा असतोच. त्यामुळे आज मोठमोठ्या आस्थापनांमध्ये तणावमुक्तीसाठी व्याख्याने, कार्यशाळा आदींचे आयोजन केले जाते; मात्र त्याचा परिणाम अत्यल्प किंवा नगण्य स्वरूपाचा असतो.
      आपल्यावरील तणाव आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर अनिष्ट परिणाम तर करतोच; पण त्याचबरोबर समाजातील बर्‍याच समस्या अन् विकृती यांनाही तो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या उत्तरदायी असतोे. सकाळी वेळेवर गाडी पकडण्यापासून ते मुलांच्या शाळा प्रवेशापर्यंत अनेक समस्या आपल्या मनावर कळत नकळत ताण निर्माण करत असतात. सतत तणावाखाली राहिल्याने आपल्याला त्याचे अनिष्ट परिणामही भोगावे लागतात. त्यामुळेच आज अबालवृद्ध सर्वांनाच ताण सहन करावा लागत आहे.

निसर्गातील प्रत्येक गोष्टीकडून शिकण्याचा दृष्टीकोन ठेेवणारी आणि इतरांनाही त्याची जाणीव करून देणारी ६४ टक्के आध्यात्मिक पातळीची चि. पूर्ती लोटलीकर (वय ५ वर्षे) !

 चि. पूर्ती लोटलीकर
    एकदा रामनाथी आश्रमातील सर्व बालसाधक आणि काही मोठे साधक आगाशीत उभे राहून समोरच्या शेतातील दृश्य पहात होते. त्यामध्ये चि. पूर्ती लोटलीकरही होती. प्रत्येक जण वेगवेगळी दृश्ये पाहून त्याविषयी आपापसात चर्चा करत होते. तेव्हा चि. पूर्तीने सर्वांना विचारले, तुम्हाला समोरील शेतात बगळा दिसतो का ? मग आता सांगा पाहू या बगळ्याकडून आपल्याला काय शिकायला मिळते ? तिचा हा प्रश्‍न ऐकून सर्वच जण विचार करू लागले. मलाही वाटले की, खरंच आपण असा कधी विचारच केला नाही. तेवढ्यात एका काकूंनी चि. पूर्तीला विचारले, तूच सांग पाहू काय शिकले पाहिजे बगळ्याकडून ? तेव्हा चि. पूर्ती पटकन म्हणाली, बगळा जसा एका जागी शांत उभा रहातो, तसे आपल्यालाही जमले पाहिजे. हे आपण बगळ्याकडून शिकले पाहिजे.
    त्या वेळी चि. पूर्तीचे विचार आणि बोलणे मला एखाद्या १७ - १८ वर्षांच्या समजूतदार मुलीप्रमाणे वाटले. चि. पूर्तीला मी प्रथमच प्रत्यक्ष भेटत होते. पहिल्या भेटीतच मला तिच्यात मोठ्या व्यक्तीप्रमाणे उत्तम नेतृत्वगुण, चांगले वक्तृत्व हे गुण दिसून आले.
- सौ. रसिका सुदेश दळवी, फोंडा, गोवा. (२४.६.२०१५)

जन्मापासूनच सात्त्विक गोष्टींची आवड असणारा ५१ टक्के पातळीचा संभाजीनगर येथील चि. श्रीकृष्ण देशमुख (वय १ वर्ष ८ मास) !

चि. श्रीकृष्ण देशमुख
१. जन्मापूर्वी
१ अ. सेवा करावी, असे वाटणे :
मला दिवस राहिल्यानंतर सेवा करावी, सत्त्वगुण वाढवावा, असे मनात विचार येऊ लागले. त्या आधी मी नाम, सत्संग आणि सेवा यांपैकी काहीच करत नव्हते. मला फॅशन करावीशी वाटायची. माझा साधना आणि धर्माचरण यांच्याशी काहीच संबंध नव्हता.
१ आ. गुरुपौर्णिमेची सेवा करतांना त्रास दूर होणे : गर्भारपणातील आरंभीचे दोन मास मला पुष्कळ त्रास होत होता. मला औषधाचाही काही लाभ झाला नाही. मला तिसरा मास चालू असतांना गुरुपौणिमेच्या सेवेसाठी गेल्यानंतर सर्व त्रास थांबले. त्यानंतर आता सेवा कधीच सोडायची नाही, असा निश्‍चय केला. देवाच्या कृपेने बाळाच्या माध्यमातून हा निश्‍चय करून घेतला, असे मला वाटले. प्रसूती होईपर्यंत देवाने माझ्याकडून सेवा करवून घेतली. मला कोणताही त्रास झाला नाही.

सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी उन्हात ठेवलेला खाऊ कावळ्याने खाल्ल्याचे समजल्यावर कावळ्याच्या माध्यमातून पूर्वजांनीच खाऊ खाल्ला, असे वाटून कृतज्ञता वाटणे

    २३.९.२०१४ या दिवशी आम्ही रहात असलेल्या रामनाथी आश्रमातील खोलीची स्वच्छता होती. ती झाल्यावर साहित्य आत नेत असतांना लक्षात आले की, माझ्याकडे असलेल्या खाऊला मुंग्या लागल्या आहेत. त्यामुळे मी तो खाऊ उन्हात ठेवला. त्या वेळी दुपारचे १२.१५ वाजले होते. त्यानंतर थोड्याच वेळात निरोप आला की, आज सर्वपित्री अमावास्या असल्याने सर्व साधकांच्या वतीने पिंडदान केले जाणार आहे आणि त्यासाठी सर्वांनी १२.४५ वाजता प्रार्थना करायची आहे. थोड्या वेळाने मला एका साधिकेने सांगितले की, तू उन्हात ठेवलेला खाऊ कावळ्याने खाल्ला. ती म्हणाली, एक प्रकारे चांगलेच झाले. कावळ्याच्या माध्यमातून पूर्वजांनीच तो खाल्ला असावा ! हा प्रसंग घडल्यावर मला गुरूंप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली; कारण त्यांच्याच कृपेने पिंडदान झाले आणि कावळ्याच्या माध्यमातून येऊन पूर्वजांनीच अन्नग्रहण केले. देवच आपल्यासाठी हे सर्व करू शकतो. माझे डोळे कृतज्ञताभावाने भरून आले.
- कु. आरती सुतार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.९.२०१४)

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या महालय श्राद्धाविषयी आलेल्या अनुभूती

    ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०१५ या कालावधीत सनातनच्या रामनाथी आश्रमात सनातन साधक-पुरोहित पाठशाळेतील साधकांनी आश्रमातील काही साधकांच्या पितरांचे श्राद्ध केले. त्या कालावधीत साधकांना श्राद्धविधीच्या आधी आणि श्राद्धविधीच्या दिवशी झालेले त्रास अन् आलेल्या अनुभूती पुढे देत आहोत.
सनातनच्या रामनाथी आश्रमात साधकांच्या पितरांचे
महालय श्राद्ध करतांना झालेला त्रास आणि आलेल्या अनुभूती
श्री. सौरभ सप्रे
१. झालेला त्रास : श्राद्धविधी संपल्यानंतर दुसर्‍या दिवशी माझ्या दोन्ही पायांच्या पोटर्‍यांमध्ये दुखायला लागले.
२. आलेल्या अनुभूती
२ अ. श्राद्ध चालू असतांना पूजा किंवा यज्ञ करत असल्याचे जाणवणे : प्रत्यक्ष श्राद्ध चालू असले, तरी पौरोहित्य करतांना एखाद्या देवतेची पूजा, शांतीविधी किंवा यज्ञ करत आहोत, असे मला वाटत होते. मला त्यातून आनंद मिळत होता.
२ आ. मनातील विचारांचे प्रमाण अल्प असणे : श्राद्धविधी कसा करायचा ?, हे मला शिकायचे आहे, याची जाणीव मला सतत होती. गुरुजी जे काही सांगतील, त्याप्रमाणे मी यजमानांना व्यवस्थित कृती सांगत होतो. त्यामुळे माझ्या मनात इतर विचार अल्प प्रमाणात येत होते.

कृतज्ञताभावात राहिल्यामुळे श्राद्धविधीसारख्या कार्यातही ऋषीमुनी, महर्षि आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे अस्तित्व जाणवणे अन् विधीच्या वेळी होणार्‍या त्रासासाठी प्रार्थना केल्यावर त्रास पूर्णपणे थांबणे

श्री. संतोष गांधी
    १.१०.२०१५ या दिवशी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.४५ या वेळेत रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात महालय श्राद्धविधी करण्यात आला. या वेळी आलेल्या अनुभूती आणि जाणवलेले त्रास देत आहे.
१. श्राद्ध होण्यापूर्वी कृतज्ञताभावात वाढ होणे
    आश्रमात श्राद्ध होणार, हे समजल्यापासूनच कृतज्ञताभावात वाढ झाली. ईश्‍वराच्या कृपेमुळे मला रामनाथी आश्रमात श्राद्ध करण्याची संधी मिळून शास्त्रोक्त पद्धतीने श्राद्ध करायला मिळणार, असे वाटून अनेक वेळा आपोआप कृतज्ञता व्यक्त झाली.
२. श्राद्धविधीच्या दिवशी
२ अ. दाब न जाणवणे : अन्य ठिकाणी वा घरी श्राद्धविधी करतांना एक प्रकारचा दाब जाणवतो. येथे तो थोडासुद्धा जाणवला नाही.

पितृपक्षात श्राद्धविधी करतांना पाळावयाचे नियम

१. श्राद्ध : श्रद्धा अणि मंत्र यांच्या संयोगाने पितरांच्या तृप्तीसाठी जो विधी केला जातो, त्याला श्राद्ध म्हणतात.
२. पिंडदान : ज्या आप्तजनांचे देहावसान झालेले असते आणि ज्यांना दुसरे शरीर मिळालेले नसते, ते सर्व जण पितृलोकात इकडे तिकडे विहार करत असतात. त्यांच्यासाठी पिंडदान केले जाते.
२ अ. लहान मुले आणि संन्यासी यांच्यासाठी पिंडदान केले जात नाही.
२ आ. श्रद्धायुक्त व्यक्तीकडून नाव आणि गोत्र यांचा उच्चार करून दिलेले अन्न पितरांना, ते ज्या आहारासाठी योग्य असतात, त्या स्वरूपात होऊन ते त्यांना मिळते. (विष्णुपुराण ३.१६.१६)
३. श्राद्ध करतांना लक्षात घ्यावयाची सूत्रे
३ अ. विचारशील पुरुषाने, ज्या दिवशी श्राद्ध करायचे आहे, त्या दिवसाच्या एक दिवस अगोदरच संयमी आणि श्रेष्ठ ब्राह्मणास आमंत्रण द्यावे.
३ आ. श्राद्धाच्या दिवशीच आमंत्रण न देताही एखादा तपस्वी ब्राह्मण घरी आला, तर त्या ब्राह्मणालाही भोजन द्यावे.

भोळ्या भावामुळे प्रतिकूल परिस्थितीतही आनंदाने रहाणारे आणि भावपूर्ण सेवा करणारे ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचेे मंगळुरू सेवाकेंद्र, कर्नाटक येथील श्री. जगदीश पाटील !

श्री. जगदीश पाटील
    लहानपणापासून मला देवाची ओढ होती, तसेच चित्रकलेची आवड होती. शाळेत असतांना मी देवतांची चित्रे काढत असे. वर्ष १९९९ मध्ये वयाच्या १९ व्या वर्षी मी साधनेत आलो. मला आणि भावाला सनातनच्या सत्संगाविषयी कळल्यावर जिज्ञासा निर्माण झाली. नंतर लगेचच मी सेवेस आरंभ केला. सार्वजनिक सभेच्या वेळी १५ दिवस मी व्यासपिठाची सेवा करण्यासाठी अन्य जिल्ह्यांत गेलोे. त्या वेळी सेवाच करत रहावे, घरी जाऊ नये, असे वाटत होते. मला शिक्षण आणि नोकरी यांत रस नव्हता. या कालावधीत घरी आर्थिक अडचण होती. भावाचे शिक्षण चालू होते. त्यामुळे नोकरीसाठी मी नाशिकला गेलो. देवाला प्रार्थना करत होतो, गुरुदेवा, तुम्ही मला कुठेही न्या; पण माझी साधना व्हायला हवी. काही दिवसांनंतर मी सेवाकेंद्रात रहायला गेलो. हळूहळू पूर्णवेळ सेवा करण्याचा झालेला विचार, विरोधाला तोंड देऊन केलेली साधना आणि प.पू. डॉक्टरांनी करून घेेतलेली आध्यात्मिक उन्नती, यांविषयीची माहिती पुढे देत आहे.

प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन !

प.पू. पांडे महाराज
भगवंताने मनुष्याला सुखोपभोग देण्याचे कारण
    भगवंताने आपल्याला सर्व सुखोपभोग कशाकरता दिलेले आहेत ? त्या जिवाने सुखोपभोग घेऊन मोक्ष गाठावा, ईश्‍वरप्राप्ती करावी, आनंदाने जगून ईश्‍वरप्राप्ती करावी, यासाठी. त्या दृष्टीने त्याचे नियोजन आहे. त्या नियोजनाप्रमाणे जर प्रत्येक मनुष्य वागला, तर तो सर्व उपभोग घेऊन गुरुकृपेद्वारे मोक्षपद गाठू शकतो. - प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१९.५.२०१५)

नामजपामुळे मनोलय होण्याची प्रक्रिया

    मनात सतत विचार येत असतात. त्या विचारांचे अंतर्मनावर सतत संस्कार होतात आणि ते वाढत जातात. असे होऊ नये; म्हणून नामजपात मन गुंतवून ठेवले, तर मनात विचार येत नाहीत. त्यामुळे अंतर्मनावर संस्कार होत नाहीत आणि त्यामुळे मनोलय होण्यास साहाय्य होते. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (७.१०.२०१५

जिल्हासेवक आणि साधक यांच्यासाठी सूचना

दीपावली आणि कार्तिकी एकादशी यांच्या निमित्ताने सनातनचे ग्रंथ, सात्त्विक उत्पादने, तसेच ध्वनीचित्र-चकत्या यांचे अधिकाधिक वितरण करा ! 
     नोव्हेंबर २०१५ मध्ये दीपावली आणि कार्तिकी एकादशी असणार आहे. त्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ, सात्त्विक उत्पादने, तसेच ध्वनीचित्र-चकत्या अधिकाधिक लोकांपर्यंत पोेचवण्याची सुवर्णसंधी गुरुकृपेमुळे लाभत आहे. या संधीचा लाभ करून घेण्यासाठी साधकांनी पुढे नमूद केलेल्या प्रसारसाहित्याचे अधिकाधिक वितरण करावे. 
१. ग्रंथ 
१. पंचोपचार आणि षोडशोपचार पूजनामागील शास्त्र 
२. पूजेपूर्वी करावयाची वैयक्तिक तयारी 
३. देवपूजेपूर्वीची तयारी 
४. पूजासाहित्याचे महत्त्व 
५. सण, धार्मिक उत्सव आणि व्रते 
६. देवालय दर्शन (पद्धत आणि शास्त्र) 
७. श्री गणपति 
८. अलंकारशास्त्र 

संतसेवेची सुवर्णसंधी !

प.पू. दास महाराज यांच्या आश्रमात सेवा करण्यासाठी सेवक दाम्पत्याची आवश्यकता ! 
     पानवळ-बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील संत प.पू. दास महाराज यांचे निवासस्थान आणि मंदिर परिसर येथील देखभाल करण्यासाठी, तसेच स्वयंपाक करण्यासाठी सेवाभावी वृत्तीने कार्य करणार्‍या सेवक दाम्पत्याची आवश्यकता आहे. जे सेवक दाम्पत्य या संतसेवेच्या सुवर्णसंधीचा लाभ घेऊ इच्छितात, त्यांनी श्री. रूपेश रेडकर यांच्याशी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा. 
भ्रमणभाष : ८४५१००६०७० 
इ-मेल : hinducoordination@gmail.com 
प.पू. दास महाराजांच्या आश्रमात दिवसभरात करावयाच्या सेवांचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे. 
१. आश्रम आणि मंदिर यांची, तसेच परिसराची स्वच्छता 
२. स्वयंपाक आणि स्वयंपाकघराशी संबंधित सेवा करणे 

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा. 
प्रारंभ - भाद्रपद कृष्ण पक्ष चतुर्दशी (११.१०.२०१५) उत्तररात्री २.५९ वाजता 
समाप्ती - आश्‍विन शुक्ल पक्ष प्रतिपदा (१३.१०.२०१५) पहाटे ५.३६ वाजता 
दोन दिवसांनी अमावास्या आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
'कुठे पृथ्वीवर राज्य करण्याचे ध्येय असणारे इतर धर्म, तर 'कुठे प्रत्येकाला ईश्वरप्राप्ती व्हावी', हे ध्येय असणारा हिंदु धर्म ! '
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१५.६.२०१५)  

बोधचित्र


प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मन आणि इंद्रिय यांच्या आधीन होऊ नका !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
        जो मन आणि इंद्रिये यांच्या आधीन नसतो, तोच खर्‍या अर्थाने स्वतंत्र होय. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
ईश्‍वरालाच जिंकणे विषयांपेक्षा विषयांच्या निर्मात्यालाच का जिंकू नये ?
भावार्थ : एकेक विषय जिंकत जायचे म्हटले तर वासना, आवडी-निवडी, स्वभावातील दोष, असे लाखो विषय जिंकायला, म्हणजे त्यांच्यावर नियंत्रण मिळवायला लाखो जन्म लागतील. त्यापेक्षा त्या सर्वांच्या निर्मात्यालाच भक्तीने या जन्मात जिंकले, तर त्या सर्वांवर या जन्मातच नियंत्रण मिळविता येईल; म्हणूनच म्हटले आहे, 'एक साधै सब साधै । सब साधै सब जाय ॥' म्हणजे एका नामाला, भगवंताला (नाम आणि भगवंत एकच आहेत.) साध्य केले म्हणजे सर्वच साध्य होते. सर्व साध्य करायला गेलो, तर काहीच साध्य होत नाही. 
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

थोरांचा सन्मान !

संपादकीय
      केंद्रीय प्रसारण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी प्रसिद्ध नेत्यांची छायाचित्रे असणारे टपाल खात्याचे स्टॅम्प काढण्यासाठी संमती दिली आहे. अर्थात् ही काही नवीन योजना नाही. आजपर्यंतच्या शासनांनी वापरलेली ही पद्धत आहे. काहीतरी निमित्त साधून संबंधित नेत्याचे चित्र असलेले स्टॅम्प प्रसिद्ध करणे, हे नित्याचेच आहे. मोहनदास करमचंद गांधी दक्षिण अफ्रिकेतून माघारी आल्याच्या प्रसंगाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच गांधी यांचे चित्र असलेला स्टॅम्प प्रकाशित केला. यापूर्वी अनेक प्रसंगांचे निमित्त साधून गांधी यांचे चित्र असलेले स्टॅम्प प्रकाशित झाल्याचे भारतियांनी पाहिले आहे. विद्यमान केंद्रीय शासनाने ज्या सूत्रावर बोट ठेवले आहे, ते सूत्र म्हणजे टपाल कचेरीत दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या छायाचित्रांचे अगणित स्टॅम्प पडून आहेत. काँग्रेसी शासनाच्या काळात प्रकाशित झालेले हे स्टॅम्प असेच पडून आहेत, याचा अर्थ ही अनावश्यक गुंतवणूक आहे. शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी त्यात अडकून पडला आहे. कुरियर सेवा प्रचलित झाल्यानंतर टपाल खात्याचे कामकाज प्रचंड प्रमाणात उणावले आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn