Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

'लव्ह जिहाद' आणि हत्या यांमुळे भारताच्या विकासात अडथळा ! - रघुराम राजन, गव्हर्नर, रिझर्व्ह बँक

'लव्ह जिहाद'च्या विरोधात शासन आतातरी काही कृती करील, अशी आशा आहे !
नवी देहली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांना देशाला विकासाच्या वाटेवर न्यायचे असून यासाठी ते प्रयत्नही करत आहेत; मात्र 'लव्ह जिहाद' आणि 'हत्या' यांसारख्या घटनांमुळे त्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ शकत नाहीत; कारण कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होतो, असे विधान रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना केले आहे.
दादरीतील घटनेच्या पार्श्व्भूमीवर गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले, "अराजक तत्त्व विकासात नेहमीच अडथळे आणत असते. अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही अशा तत्त्वांनी विकासात अडथळे आणण्याऐवजी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. असे अराजक तत्त्व भारतासाठी चिंतेचा विषय असून कायद्याच्या आधारेच यावर तोडगा निघू शकेल." अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी आपले कोणतेही मतभेद नाहीत, असेही राजन यांनी स्पष्ट करून या संदर्भातील चर्चेला पूर्णविराम दिला.

गरबा खेळणार्यो मुलींना 'लव्ह जिहाद'चा धोका ! - मुंबई पोलीस

'लव्ह जिहाद'चा विळखा कायमचा दूर करण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
'लव्ह जिहाद' अस्तित्वात नाही, असे म्हणणार्यां ना पोलिसांचीच चपराक !
  मुंबई - नवरात्रात गरबा खेळण्यासाठी जाणार्या मुलींना 'लव्ह जिहाद'चा धोका आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (तथाकथित मुसलमानप्रेमी निधर्मी, साम्यवादी आणि पुरोगामी यांना यावर काय म्हणायचे आहे ? - संपादक) यासाठी सर्वच पोलीस ठाण्यांना सतर्क रहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गरब्याच्या आयोजकांनी गुप्तहेर नेमून मुलींवर, तसेच साध्या वेषात गरब्यात सहभागी होणार्या अहिंदूंवरही लक्ष ठेवावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.  
  अहिंदू तरुण गरब्यात सहभागी होऊन असा काही प्रकार घडल्यास कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, तसेच सामाजिक संकेतस्थळांवरून तरुणांना 'लव्ह जिहाद'साठी भडकवले जाते. त्यामुळे अशा संकेतस्थळांवर लक्ष ठेवण्यासाठी सायबर पोलिसांचे साहाय्य घेतले जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

सनातन संस्थेवर चिखलफेक करणार्यांच्या भूलथापांना स्थानिकांनी बळी पडू नये !

जिल्हा पंचायत सदस्य आणि बांदोडा (गोवा)
ग्रामपंचायतीचे पंचसदस्य यांचे ग्रामस्थांना आवाहन
फोंडा (गोवा) - सनातन संस्था हिंदु धर्माचे कार्य पुढे नेण्याचे स्तुत्य कार्य करत आहे. प्रसिद्धीसाठी हपापलेल्या काही व्यक्ती सनातनला अपकीर्त करण्यासाठी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमावर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. लोकांनी गेल्या अनेक वर्षांत सनातनचे कार्य जवळून पाहिले आहे. सनातनला अपकीर्त करण्यासाठी नाहक चिखलफेक करणार्याांच्या भूलथापांना स्थानिकांनी बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा पंचायत सदस्य आणि बांदोडा ग्रामपंचायतीचे पंचसदस्य यांनी ७ ऑक्टोबरला बांदोडा येथील पत्रकार परिषदेत केले. (एक साधा ग्रामस्थ असलेल्या सनातनच्या विरोधकाचे वृत्त तात्काळ प्रसारित करणार्या  राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी बांदोडा पंचायतीच्या पंच सदस्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचे वृत्त दाखवले नाही, यातून त्यांचा सनातनद्वेष जाणा ! - संपादक)

मुंबईच्या पाठोपाठ पुणे येथील कार्यक्रमही रहित !

श्री. आदित्य ठाकरे
शत्रूराष्ट्र पाकचे गायक गुलाम अली यांना शिवसेनेचा पुन्हा दणका !
प्रखर राष्ट्रप्रेमी शिवसेनाच हे करू शकते, हे लक्षात घ्या !
सीमेवर जवान हुतात्मा होत असतांना आपण 
गझलेचा आनंद घेऊ शकत नाही ! - आदित्य ठाकरे, युवा सेना
मुंबई, ८ ऑक्टोबर - सीमेवर प्रतिदिन होणार्या चकमकी आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन यात शेकडो जवान हुतात्मा होत आहेत. असे असतांना आपण शत्रूराष्ट्राच्या गायकाच्या गझल कार्यक्रमांचा आनंद घेणे अयोग्य आहे. गुलाम अली खान यांच्या गझला सर्वांनाच आवडतात; पण आपण जवानांप्रतीही थोडीशी संवेदनशीलता दाखवली पाहिजे, असे राष्ट्रप्रेमी प्रतिपादन शिवसेनेचे युवा नेते श्री. आदित्य ठाकरे यांनी केले आहे. शत्रूराष्ट्र पाकचे गझल गायक गुलाम अली खान यांचा मुंबईनंतर पुण्यात १० ऑक्टोबर या दिवशी होणारा कार्यक्रमही शिवसेनेच्या दबावामुळे रहित झाला आहे. 

गोमांसाच्या मेजवानीवरून भाजपच्या आमदारांनी अपक्ष आमदाराला बदडले

जम्मू-काश्मीरच्या विधानसभेतील घटना
श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील अपक्ष आमदार शेख अब्दुल रशीद यांनी गोमांस मेजवानीचे आयोजन केल्यावरून भाजपच्या आमदारांनी त्यांना विधानसभेच्या सभागृहातच बदडून काढल्याची घटना घडली.
जम्मू-काश्मीरमधील लंगते मतदारसंघातील आमदार रशीद यांनी ७ ऑक्टोबर या दिवशी आमदार निवासस्थान परिसरात गोमांस मेजवानीचे आयोजन केले होते. या मेजवानीच्या दुसर्याप दिवशी रशीद यांनी विधानसभेच्या सभागृहात प्रवेश करताच संतप्त भाजप आमदारांनी त्यांना घेरले आणि चोप देण्यास प्रारंभ केला. यातून विरोधी पक्षाच्या आमदारांनी रशीद यांची सुटका केली. या घटनेचा मुख्यमंत्री मुफ्ती महंमद सईद आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी तीव्र निषेध केला आहे. या आठवड्यात गोमांस बंदीच्या विषयावरून काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स या पक्षांच्या आमदारांनी सभागृहामध्ये निदर्शने करून अनेकदा सभागृहाचे कामकाज बंद पाडले होते. राज्यात सध्या गोमांस प्रकरण गाजत आहे.

कर्नाटकात सनातन संस्थेवरील बंदीच्या मागणीच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटित

आंदोलकांना संबोधित करतांना भाजप नेते
श्री. टी. महेंद्र (उजवीकडून दुसरे)
 
डावीकडून श्री. तारानाथ, श्री. तिम्मप्पा गौड, श्री. दिनकर जयराज,
श्री. भास्कर डी, श्री. उदय कुमार, श्री. उमेश कुलाल, श्री. आनंद गौडा

नक्षलवाद्यांकडून तेलगु देसमच्या ३ स्थानिक नेत्यांचे अपहरण

नक्षलवादग्रस्त भारत 
भाग्यनगर (हैदराबाद) - आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम् जिल्ह्यातील तेलगु देसम पक्षाच्या जी.के. विधी मंडळाचे अध्यक्ष एम्. बालैहया, एम्. महेश आणि व्ही. बालैहया या तीन स्थानिक नेत्यांचे नक्षलवाद्यांकडून अपहरण करण्यात आले, अशी माहिती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक के. प्रवीण यांनी दिली आहे. नक्षलवाद्यांनी त्यांच्या खबर्याच्या साहाय्याने या तिन्ही नेत्यांना ५ ऑक्टोबर या दिवशी दुपारी धारकोंडा येथे बोलावले, तसेच त्यांना कोणतीही इजा न पोहचवण्याची हमीही दिली होती; परंतु नक्षलवाद्यांनी त्यांना कैद केले, असे पोलीस अधीक्षक के. प्रवीण यांनी सांगितले. या नेत्यांना नक्षलवाद्यांनी पूर्व गोदावरी जिल्ह्याजवळील घनदाट जंगलात नेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या नेत्यांच्या सुटकेसाठी नक्षलवादी कशाची मागणी करत आहेत, याची आपण प्रतिक्षा करत आहोत, असे प्रवीण यांनी सांगितले. जिल्ह्यातील बॉक्साईटच्या खाणी चालू करण्यात आल्याच्या निषेधात नक्षलवाद्यांनी या नेत्यांचे अपहरण केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हिंदु जनजागृती समितीकडून भारताची प्राचीन परंपरा आणि संस्कृती यांना वैभव प्राप्त करून देण्याचे कार्य ! - अधिवक्ता मोतिसिंहजी राजपुरोहित

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जोधपूर (राजस्थान) येथील छात्रालयात कार्यक्रम
राजपुरोहित छात्रालयातील विद्यार्थी
मार्गदर्शन ऐकतांना
    जोधपूर - भारताची प्राचीन परंपरा आणि संस्कृती यांना पुनर्वैभव प्राप्त करून देण्याचे कार्य हिंदु जनजागृती समिती करत आहे. विद्यार्थीदशेत अध्यात्म अतिशय आवश्यक आहे; म्हणून विद्यार्थ्यांनी भगवद्गीतेचे प्रतिदिन वाचन केले पाहिजे. गीता वाचल्यामुळे त्यांना प्रत्येक अडचणीवर मात करण्यासाठी उपाय मिळेल, असे प्रतिपादन अधिवक्ता मोतीसिंहजी राजपुरोहित यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करतांना केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ५ ऑक्टोबर या दिवशी येथील राजपुरोहित छात्रालयात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी छात्रालयाचे व्यवस्थापक श्री. करणसिंहजी राजपुरोहित, श्री. नरसिंहजी राजपुरोहित आणि अधिवक्ता श्री. मोतीसिंहजी राजपुरोहित, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. गजानन केसकर आणि श्री. आनंद जाखोटिया उपस्थित होते. 
     या वेळी श्री. केसकर म्हणाले, भौतिक वस्तूंची प्राप्ती करणे, म्हणजे यशस्वी जीवन नाही. भौतिकतेमध्ये सुख आणि यश असते, तर आज विदेशातील लाखो लोक मोठ्या संख्येने भारतात सुखाच्या शोधासाठी आले नसते.
क्षणचित्र : कार्यक्रमाच्या सभागृहात आदर्श नवरात्रोत्सव, गोरक्षा आणि संस्कृतीचे महत्त्व, या विषयांवर प्रदर्शन लावण्यात आले होते.

भारतीय बनावटीची संगणकीय व्यवस्था वापरण्यास उदासीन असणार्‍या महाराष्ट्र शासनाच्या विरोधात याचिका दाखल !

शासनाला हे कळत कसे नाही ? त्यासाठी न्यायालयात याचिका का दाखल करावी लागते ?
     मुंबई - मायक्रोसॉफ्ट किंवा अन्य खाजगी आस्थापनांच्या संगणकीय आपरेटिंग सिस्टम आणि सॉफ्टवेअर यांसाठी प्रचंड पैसे मोजावे लागतात. तसे होऊ नये, यासाठी भारताने सी-डॅकच्या माध्यमातून अथक परिश्रमानंतर स्वत:ची भारत आपरेटिंग सिस्टम सोल्युशन्स अर्थात बॉस ही ऑपरेटिंग सिस्टम वर्ष २००७ मध्ये निर्माण केली. तमिळनाडूसह अन्य काही राज्यांमध्ये त्याचा उपयोगही होत आहे; मात्र महाराष्ट्रात तसे होत नसल्याने श्री. मिलिंद ओक यांनी एका जनहित याचिकेद्वारे हा विषय मुंबई उच्च न्यायालयासमोर आणला आहे. 

आंध्रप्रदेशमधील शासकीय संस्कृत महाविद्यालयात ३ विद्यार्थी आणि १ अध्यापक !

जगातील विविध देश त्यांच्या विद्यापिठांमध्ये संस्कृत भाषा शिकवत असतांना देवभाषा 
संस्कृतविषयी सर्वपक्षीय भारतीय राज्यकर्ते उदासीन असल्यामुळे ही स्थिती उद्भवली आहे !
भारतात देवभाषा संस्कृतची दयनीय स्थिती !
      विजयनगर (आंध्रप्रदेश) - विजयनगर जिल्ह्यातील १५५ वषेर्र् प्राचीन असणार्‍या संस्कृत महाविद्यालयात केवळ ३ विद्यार्थी आणि १ अध्यापक शिल्लक राहले आहेत. हे अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्यही आहेत. पदवीपूर्व वर्गात दोन, तर पद्व्युत्तर प्रथम वर्षात १ विद्यार्थी आहे.
     या विद्यालयाची स्थापना ख्रिस्ताब्द १८६०मध्ये विजयनगरच्या महाराजांनी केली होती. केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री अशोक गजपती याच गावचे आहेत. या महाविद्यालयात ५ वर्षांच्या अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर संस्कृत विषयाची पदवी दिली जाते. या शिवाय तेलुगु आणि इंग्रजी हे ऐच्छिक विषय आहेत. प्रत्येक विषयासाठी ३० जागा आहेत; मात्र त्यात प्रवेश घेण्यास कुणीही पुढे येत नाहीत. महाविद्यालयाची इमारत मोडकळीस आली असून त्यावर वर्ष २००३ पासून इमारतीची रंगरंगोटी अथवा डागडुजी झालेली नाही. या महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बाहेर नोकर्‍या मिळत नाहीत. त्यामुळेच प्रवेश घेण्यास कुणी सिद्ध नसते. शासनानेही या महाविद्यालयास आर्थिक साहाय्य, शिष्यवृत्ती, अथवा नोकरीत प्राधान्य अशा सोयी उपलब्ध करून दिल्या नाहीत.

पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अन्नछत्राच्या दानपेटीतील रकमेची चोरी

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! हिंदूंनो, तुमची मंदिरे सुरक्षित रहाण्यासाठी 
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही !
मशीद अथवा चर्च या ठिकाणी चोरी झाल्याचे कधी ऐकले आहे का ?
पंढरपूर, ८ ऑक्टोबर - श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अन्नछत्रामध्ये ठेवलेली दानपेटी तोडून अज्ञात चोरट्यांनी १ सहस्र ५०० रुपयांची चोरी केली आहे. ७ ऑक्टोबरला सकाळी अन्नछत्र उघडल्यानंतर हे लक्षात आले. (श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे ६० सहस्र रुपयांचे लोखंडी साहित्य नुकतेच चोरीला गेले आणि आता अन्नछत्राची दानपेटी तोडून रक्कम चोरीला गेली. यावरून शासकीय देवस्थान समितीचा कारभार कशा प्रकारे चालतो आहे, ते लक्षात येते. यासाठीच मंदिरे भक्तांच्या कह्यात द्यायला हवीत ! - संपादक)

सप्तश्रृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी पायी जाणार्यांवरील २ रुपये कराची सक्ती अखेर रहित !

सप्तश्रृंगीदेवी
  नाशिक - नवरात्रीनिमित्त सप्तश्रृंगीदेवीच्या दर्शनासाठी पायी गडावर जाणार्या भाविकांना प्रत्येकी २ रुपये कर भरावे लागणार होता; परंतु तो आता रहित करण्यात आला आहे. कर आकारण्याचा निर्णय सप्तश्रृंगी गड ग्रामपंचायतीने घेतला होता. या निर्णयाला पंचायत समितीनेही मान्यता दर्शवली होती. 
प्रतीवर्षी एक कोटीहून अधिक भाविक गडावर देवीच्या दर्शनासाठी येतात. त्यांनी दिलेले दान आणि देणगी यांतून मंदिर न्यासाला वर्षाला १५ कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळते. असे असतांना 'भाविकांकडून यात्रा कर वसूल का करायचा', असा प्रश्न विचारल्यावर पंचायतीने न्यासाकडे बोट दाखवले होते. 'उत्पन्न न्यासाला आणि खर्च ग्रामपंचायतीने करायचा', हे कसे चालणार', असा प्रश्न ग्रामपंचायतीने विचारला होता. सहा लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेली ग्रामपंचायत भाविकांना सुविधा कशा पुरवणार, असा प्रश्न करत पंचायतीने करवसुलीचे समर्थन केले होते. 

पाक आणि बांगलादेश येथील मुसलमान मूळचे हिंदूच असल्याचे पाकिस्तानी अभ्यासकाचे मत !

स्वतःची हिंदु पाळेमुळे विसरू पहाणार्‍या बांगलादेश आणि पाक येथील मुसलमानांना घरचा अहेर !
      नवी देहली - पाक आणि बांगलादेश या देशांमध्ये रहात असलेले बहुतांश मुसलमान हे मूळचे हिंदूच आहेत; मात्र मोगलांच्या काळात तलवारीच्या धाकावर त्यांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले होते, असा दावा पाकिस्तानच्या महिला अभ्यासक फौजिया सईद यांनी इंडिया टूमॉरो डॉट कॉम या वृत्तवाहिनीशी बोलतांना केला आहे. 
१. या वेळी फौजिया सईद म्हणाल्या, पाकिस्तानमधील बहुतांश मुसलमान स्वत:ला आशिया उपखंडात आक्रमण करणार्‍या आणि अनेक वर्षे राज्य करणार्‍या अरबांचे वंशज समजतात; पण ते खरे नाही. वास्तविक पाक आणि भारत या देशांत जे मुसलमान आहेत, त्यांचे पूर्वज जन्माने हिंदू होते आणि सुफी संतांनी मृत्यूची भीती दाखवून त्यांचे धर्मांतर केले होते. 

राहुल गांधी यांना सुटीच्या काळात वेतन आणि भत्ता मिळाल्याचा संघाचा आरोप !

या आरोपांची शहानिशा करा ! संसदेच्या कामकाजाच्या वेळी दांड्या मारून आर्थिक सुविधा 
लाटणारे लोकप्रतिनिधी जनतेचे प्रतिनिधित्व करण्यास लायक आहेत का ?
    नवी देहली - काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी फेब्रुवारी मासात दीर्घ सुटीवर होते. त्या काळातही त्यांना संसदेकडून खासदारांना मिळणारा भत्ता आणि वेतन यांचा लाभ मिळाला असल्याचा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्याच्या मुखपत्रात केला आहे. 
     चालू वर्षाच्या प्रारंभी २३ फेब्रुवारीला सुटीवर गेलेले राहुल गांधी १६ एप्रिल या दिवशी देशात परतले होते. या कालावधीत झालेल्या संसद अधिवेशनाच्या वेळी खासदार गांधी अनुपस्थित होते. त्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती. या संदर्भात संघाचे मुखपत्र ऑर्गनाझरच्या आवृत्तीत खासदार राहुल गांधी अधिवेशनाच्या काळात सुटीवर असतांनाही त्यांनी संसदेतील सर्व आर्थिक सुविधांचा लाभ घेतल्याचे म्हटले आहे.

प.पू. आसारामबापूंच्या भक्तांद्वारे आयोजित दिव्य ज्ञान परीक्षा उपक्रम भाजप शासनाकडून रहित

काँग्रेस आणि सेक्युलरवादी यांच्या विरोधापुढे छत्तीसगडमधील शासन झुकले
     भोपाळ (छत्तीसगड) - काँग्रेससह काही निधर्म्यांनी आक्षेप घेतल्यामुळे छत्तीसगडच्या भाजप शासनाने प.पू. आसारामबापू यांच्या भक्तांद्वारा शासकीय शाळांमध्ये आयोजित दिव्य ज्ञान परीक्षा उपक्रम रहित केला. मुलांनी ब्रह्मचर्याचे पालन करावे. ब्रह्मचर्याने बल, तेज यांची प्राप्ती होते. मुलांनी पाश्‍चात्त्य संस्कृतीला बळी पडून भोगवादाकडे झुकू नये, असा संदेश देणारे प्रश्‍न या प्रश्‍नपत्रिकेत होते.
      राज्यातील शिक्षण विभाग अधिकार्‍यांच्या अधिकृत लेखी अनुमतीने एकूण १२ जिल्हांतील सहस्रो शासकीय शाळांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार होती. या विषयाशी संबंधित एक पुस्तिकाही शाळांमध्ये वितरित करण्यात आली होती. याविषयी वृत्तपत्रात विपर्यस्त वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आणि विरोधकांकडून विरोध झाल्यानंतर या विरोधासमोर झुकून शासनाने परीक्षा रहित केली असून सर्व पुस्तके जप्त करण्याचा आदेश दिला आहे. धार्मिक शिक्षण देणार्‍या या परीक्षेला विरोध करण्यास काँग्रेस आघाडीवर होती. काँग्रेसने याविरोधात निदर्शने करून शासनावर दबाव निर्माण केला.

७५ प्रतिशतहून अधिक विद्यार्थ्यांना दप्तराचे ओझे !

शिक्षण खात्याचे आदेश न जुमानणार्‍या शिक्षणसंस्थांवर कारवाई का होत नाही ? 
     पुणे, ८ ऑक्टोबर - शालेय शिक्षण खात्याने विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे अल्प करण्यासाठी २७ जुलै या दिवशी आदेश काढला होता. त्यानंतरही पुण्यातील ७५ प्रतिशतहून अधिक विद्यार्थी दप्तरात अपेक्षित वजनापेक्षा अधिक वजन वाहून नेत असल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या पुढाकारातून झालेल्या शासकीय पाहणीतून उघड झाले. यापुढे दप्तराचे वजन जास्त आढळल्यास मुख्याध्यापकांना त्यासाठी उत्तरदायी ठरवण्यात येणार आहे. (मुख्याध्यापकाच्या समवेत शिक्षणसंस्थांचे संचालक हे शाळांचे धोरण राबवत असतात. त्यामुळे त्यांच्यावरही या प्रकरणी कारवाई करणे अपेक्षित आहे. - संपादक) 

२८ ऑक्टोबरपर्यंत अहवाल देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

डॉ. दाभोलकर हत्या अन्वेषणविषयक याचिकेचे प्रकरण
मुंबई - २० ऑगस्ट २०१३ या दिवशी हत्या झालेले डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी अद्याप न सापडल्याने दाभोलकर कुटुंबियांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्या संदर्भातील सुनावणी ७ ऑक्टोबरला झाली. तेव्हा उच्च न्यायालयात दाभोलकर यांच्या अधिवक्त्याने युक्तीवाद केला की, कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी संशयित म्हणून अटक केलेल्या श्री. समीर गायकवाड यांच्या संभाषणावरून डॉ. दाभोलकर यांच्या हत्येविषयी श्री. रुद्र पाटील यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे त्या संदर्भात चौकशीचे आदेश न्यायालयाने द्यावेत. या संदर्भात विशेष अन्वेषण पथकाने बंद पाकिटातील अहवाल न्यायालयाला सादर केला. त्यानंतर न्यायालयाने रुद्र पाटील यांना शोधण्यासाठी पोलिसांनी काय केले, या संदर्भातील अहवाल २८ ऑक्टोबरपर्यंत सादर करा, असे सांगितले.

आष्टी (जिल्हा बीड) येथे २५० किलो गोवंशाचे मांस शासनाधीन गोमांस भरलेले एक वाहन पसार

शासनाने गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोरात कठोर अंमलबजावणी करावी !
      आष्टी, ८ ऑक्टोबर - येथील तालुक्यातील खडकत येथील मातंग समाजाच्या वस्तीच्या शेजारी गोवंशाच्या हत्या चालू होत्या. त्याची दुर्गंधी पसरून रक्ताचे पाटही वहात होते. (रक्ताचे वहाणारे पाट पोलिसांना कधीच कसे दिसले नाहीत, हे संशयास्पद आहे. - संपादक) ही माहिती पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांना एका अज्ञात व्यक्तीने दूरध्वनीवरून दिल्यानंतर पारसकर यांनी तातडीने आष्टी पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार घटनास्थळी साहाय्यक पोलीस निरीक्षक हमीद शेख यांचे पथक पोहोचण्यापूर्वीच आरोपी गोवंशीय मांस असलेले दोन मालवाहू चारचाकी वाहन (टेम्पो) घेऊन पसार झाले.
     मुंबई - पुढील आठवड्याच्या १५ ऑक्टोबर या दिवशी विद्यार्थ्यांना दप्तराशिवाय शाळेत जाण्याची मुभा असणार आहे. राज्यभरात १५ ऑक्टोबर हा दिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी याविषयीची घोषणा केली आहे. शासकीय परिपत्रकही काढण्यात आले आहे.
      १५ ऑक्टोबर हा भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन आहे. अब्दुल कलाम यांच्या निधनानंतर विनोद तावडे यांनी शाळांमध्ये वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणा केली होती. हा उपक्रम यशस्वी ठरला, तर प्रतिवर्षी वाचन प्रेरणा दिवसाला राज्यात २० कोटी पुस्तके वाचली जातील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सनातन संस्थेवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी रामनाथ युवा संघाकडून ११ ऑक्टोबर या दिवशी रामनाथी येथे मोर्चा आणि सभा

     फोंडा - सनातन संस्थेवर शासनाने बंदी घालावी, या मागणीसाठी रामनाथ युवा संघ या संघटनेच्या वतीने ११ ऑक्टोबर या दिवशी दुपारी ३.३० वाजता रामनाथी येथे मोर्चा आणि जाहीर सभा यांचे आयोजन केले आहे. मोर्चा रामनाथी येथील श्री रामनाथ मंदिराजवळून प्रारंभ होऊन दोन खांब कवळे इथपर्यंत पोहोचल्यानंतर पुन्हा श्री रामनाथ मंदिराजवळ येईल आणि या मंदिराच्या ठिकाणी सभा होणार आहे, अशी माहिती या वेळी देण्यात आली आहे. या मोर्च्यामध्ये काही राजकीय नेत्यांसह विविध संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित असतील, अशी माहिती रामनाथ युवा संघाचे अध्यक्ष सौरभ लोटलीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

भाजपच्या हिंदु नेत्याची धर्मांध मुसलमानांकडून किरकोळ कारणावरून हत्या !

हिंदूंचा प्रक्षोभ 
 हिंदूंनो, अशा किती हिंदु नेत्यांच्या हत्या 
झाल्यावर संघटित व्हायचे, ते एकदा कायमचे ठरवून टाका ! 
     सिवनी (मध्य प्रदेश) - येथील बरघाट येथे ३ ऑक्टोबरला भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री. कपूरचंद ठाकरे यांचे चारचाकी वाहन धर्मांधाच्या दुचाकीला धडकले. त्यानंतर श्री. ठाकरे निघून गेले; मात्र त्यानंतर धर्मांध नासिर खान (वय २२ वर्षे) आणि रझा खान (वय २८ वर्षे) यांनी पाठलाग करून श्री. ठाकरे यांना अडवले. त्यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर श्री. ठाकरे यांना रुग्णालयात नेले; मात्र ४ ऑक्टोबरच्या रात्री त्यांचा मृत्यू झाला. (किरकोळ कारणावरून हिंदूचा जीव जाईपर्यंत होणारी मारहाण, हे धर्मांध मुसलमानांमध्ये हिंदूंप्रती ठासून भरलेल्या द्वेषाचेच प्रतीक होय ! हा द्वेष संपवण्यासाठी शासन कोणते प्रयत्न करणार आहे ? - संपादक) 

दादरी प्रकरणी कथित पुरोगाम्यांची निदर्शने !

हिंदुद्वेषाच्या उमाळ्यातून हिंदुत्ववाद्यांवर मनमानी आरोप 
     पुणे, ८ ऑक्टोबर (वार्ता.) - २८ सप्टेंबर या दिवशी दादरी तालुक्यातील महंमद अखलाख याची घरी गोमांस शिजवण्यावरून हत्या झाली. या घटनेचा कांगावा करत आणि या प्रकरणाला सोयीस्कर राजकीय रंग देत लोकायत, सोशलिस्ट पार्टी, भारिप, लाल निषाण पक्ष आदी कथित पुरोगाम्यांनी ६ ऑक्टोबर या दिवशी मंडई येथील टिळक चौकात निदर्शने केली. या वेळी 'हिंदु राष्ट्र नाही चालणार, राज्यघटनेची पायमल्ली बंद करा' अशा मथळ्याखाली हिंदुत्ववाद्यांवर अकारण टीका करणारी हस्तपत्रके वितरित करण्यात येत होती. (हिंदु राष्ट्राच्या संवैधानिक मागणीला नकार देऊन कथित पुरोगामी स्वत:च राज्यघटनेची पायमल्ली करीत आहेत. ते त्यांनी आधी थांबवावे. - संपादक) 

स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद यांच्यासह साधू-संत यांच्यावर लाठीमार करणार्‍या उत्तरप्रदेश पोलिसांवर कारवाई करण्यासाठी अपर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

अपर जिल्हाधिकारी श्री. संजयसिंह चव्हाण (बसलेले) यांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी
    सांगली, ८ ऑक्टोबर (वार्ता.) - उत्तरप्रदेश येथे गंगा नदीत गणेशमूर्ती विसर्जनाच्या मागणीसाठी येथील गोदोैलिया चौकात धरणे आंदोलन करणार्‍या हिंदूंवर पोलिसांनी २२ सप्टेंबर या दिवशी रात्री २ वाजता अमानुष लाठीमार केला. या लाठीमारात द्वारका पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे शिष्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद आणि सनातन धर्म इंटर महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. हरेंद्र राय यांच्यासह श्रीविद्यामहाचे अनेक बटू, सामान्य हिंदू हेही घायाळ झाले. यानंतर दोन दिवसांपूर्वी काढलेल्या साधू-संत यांच्या मोर्च्यावर परत एकदा लाठीमार करून अनेक साधू-संत यांच्यावर खोटे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

पोलीस निरीक्षक रमेश गोकाक निलंबित

बेळगाव खडक गल्ली दंगल प्रकरण
      बेळगाव - ८ दिवसांपूर्वी खडक गल्ली येथे उसळलेल्या दंगलीत घायाळ झालेले मार्केटचे पोलीस निरीक्षक रमेश गोकाक यांना निलंबित करण्यात आले आहे. दंगल हाताळण्यात चूक केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दंगल आटोक्यात आणण्यासाठी जिवाची पर्वा न करता कामगिरी बजावणार्‍या पोलीस अधिकार्‍यावरच ही कारवाई झाली आहे. त्यामुळे पोलिसांचे मनोधैर्य खचत असून अनेक पोलीस अधिकारी स्थानांतर करून घेण्याच्या सिद्धतेत आहेत.
     २८ सप्टेंबरच्या रात्री झालेल्या दंगलीत घायाळ झालेले पोलीस निरीक्षक रमेश गोकाक घायाळ यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. दुसर्‍या दिवशी त्यांनी पोलीस स्थानकात शासनाद्वारे तक्रारही प्रविष्ट केली होती. दंगलीच्या वेळी गळा दाबून आपली हत्या करण्याचा प्रयत्न झाला, असे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. अल्पशा विश्रांतीनंतर ते कामावर रूजू झाले होते.

पुरोगामी लेखिका नयनतारा सहगल यांच्याकडून साहित्य अकादमी पुरस्कार परत !

दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि दादरी प्रकरणावरून पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका 
     काश्मीरमध्ये साडेतीन लाखांहून अधिक हिंदूंचे शिरकाण करण्यात आले, गोध्रा येथे मुसलमानांनी ५३ करसेवकांना रेल्वेच्या डब्यात कोंडून जाळून मारले, केरळमध्ये साम्यवाद्यांनी २५० स्वयंसेवकांच्या हत्या केल्या, तेव्हा या लेखकांना काहीच का वाटले नाही ? 'हिंदूंच्या विरोधात लिहा आणि पुरस्कार मिळवा', अशा प्रकारेच यांनी साहित्य पुरस्कार मिळवले, असे का म्हणू नये ? 
     नवी देहली - माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची पुतणी नयनतारा सहगल यांनी साहित्य अकादमी पुरस्कार परत केला आहे. दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्या, तसेच उत्तरप्रदेशातील दादरी प्रकरण यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन बाळगल्याची टीका सहगल यांनी केली आहे. (नेहरूंच्या वारसदार असणार्‍या लेखिकेने अशी टीका करणे यात नवल काही नाही. मोदींमुळे नेहरू घराण्याच्या हातातून सत्ता गेली याबद्दल त्यांना पोटशूळ उठणे साहजिक आहे. - संपादक) 

पोखरणमध्ये ४० सहस्र सैनिकांचा सर्वांत मोठा युद्ध सराव !

३५० रेल्वेगाड्यांतून मोठा शस्त्रसाठा दाखल 
     केवळ सरावासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा वाया घालवण्याऐवजी सीमेवरील आतंकवाद्यांची तळे नष्ट करणे, हाच सराव समजून शस्त्रसाठ्याचा वापर तेथेच का करत नाही ? 
     नवी देहली - सर्वांत मोठ्या युद्ध सरावासाठी राजस्थानातील पोखरणमध्ये ४० सहस्र सैनिकांचा मोठा ताफा दाखल होत आहे. आतापर्यंत शंभर रेल्वेगाड्यांमधून सैन्याच्या अनेक तुकड्या, तसेच ३५० रेल्वेगाड्यांतून मोठा शस्त्रसाठाही पोखरणमध्ये दाखल झाला आहे. पोखरणमधील 'फिल्ड फायरिंग रेंज'मध्ये हा सराव करण्यात येणार आहे. सरावादरम्यान परिसरातील नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी सैन्याधिकार्‍यांकडून स्थानिक ग्रामपंचायती आणि सरपंच यांच्या भेटी घेतल्या जात आहेत. या भेटीत त्यांना खबरदारीचे उपाय योजण्यासाठी सांगण्यात येत आहे. हा सराव २ मास चालू रहाणार आहे, अशी माहिती सेनेच्या प्रवक्त्याने दिली.

(म्हणे) 'हिंदू गोमांस खातात, हे माझ्याकडून भुताने वदवले !'

मतांच्या लालसेने झपाटलेले लालूप्रसाद यादव यांचे विधान 
     लालूप्रसाद यादव यांचे नशीब बलवत्तर म्हणून प्रा. श्याम मानव बिहारमध्ये नाहीत, अन्यथा प्रा. मानव यांनी 'सनातनने लालूप्रसाद यादव यांच्यावरही संमोहन केले', असा आरोप केला असता ! 
पाटणा (बिहार) - वादग्रस्त नेते लालूप्रसाद यादव यांनी नुकतेच 'हिंदूही गोमांस खातात', असे विधान केले होते; मात्र 'आपण असे बोलल्याने हिंदूंची मते मिळणार नाहीत', याची जाणीव त्यांना झाली असावी. त्यामुळे स्पष्टीकरण देतांना लालूप्रसाद यादव यांनी सांगितले की, सदर विधान माझ्याकडून भुताने वदवले होते. 

लालू कृष्णाचे नव्हे, कंसाचे वंशज - बाबा रामदेव

     नवी देहली - राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना लक्ष्य करत 'लालू हे कृष्णाचे नव्हे, तर कंसाचे वंशज आहेत', अशी टीका योगगुरू रामदेव बाबा यांनी केली आहे. लालू प्रसाद यादव यांनी अलीकडेच 'हिंदूही गोमांस खातात', असे म्हटले होते. या पार्श्‍वभूमीवर बोलतांना रामदेव बाबा म्हणाले, "यादव जातीत जन्मले आहेत; मात्र ते गोमांस तसेच गायीच्या हत्येवरून हिंदू, मुस्लिम, ख्रिस्त्यांमध्ये द्वेष पसरवण्याचे राजकारण करत आहेत, तसेच अशा प्रकारे वक्तव्य करून त्यांनी यदुवंशाचा अपमान केला आहे. ते म्हणतात, की ते यादव आहेत. मात्र यापुढे ते यदुवंशी असल्याचा दावा करू शकणार नाहीत. अशा प्रकारचा व्यक्ती कृष्णाचा वंशज असू शकत नाहीत. मात्र तो कंसाचा वंशज नक्कीच असू शकेल." या वेळी गोमांसावर बंदी घालण्याच्या उत्तर प्रदेश सरकारच्या निर्णयावर रामदेव बाबा यांनी समाजवादी पक्षाची स्तुती केली. जर उत्तर प्रदेशचे शासन गोमांसावर बंदी घालू शकत असेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभर बंदी का घालत नाहीत ? असा प्रश्‍नही रामदेव बाबांनी या वेळी उपस्थित केला.

सनातनद्वेषाने पछाडलेल्या प्रकाश आंबेडकर यांचा हास्यास्पद आरोप (म्हणे) सनातनला शासनाचा पाठिंबा !

सनातनला शासनाचा पाठिंबा असता, तर सनातनच्या साधकाला
अटक होऊन सनातनची इतक्या मोठ्या प्रमाणात अपकीर्ती झाली असती का ?
      नांदेड, ८ ऑक्टोबर - महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आता शिल्लक राहिले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासन फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. पानसरे हत्या प्रकरणी कट्टर हिंदुत्ववादी संघटना असलेला सनातनचा कार्यकर्ता पोलिसांच्या जाळ्यात सापडला. सनातनवर बंदी घालण्याची मागणी जोर धरत आहे. सनातनवर बंदी घालण्याचे धैर्य फडणवीस शासनामध्ये नाही. बंदी घालणे दूरच; पण भाजप बंदीची मागणीही करू शकत नाही. सनातनला शासनाचा पाठिंबा आहे, असा आरोप भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष आणि माजी खासदार अधिवक्ता प्रकाश आंबेडकर यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना केला.

श्री महालक्ष्मी मंदिरात पंढरपूरच्या धर्तीवर पुजार्‍यांची नियुक्ती करावी ! - अंबाबाई भक्त मंडळाचा धर्मविरोधी ठराव

हिंदूंनो, तुमच्यात फूट पाडण्याचा हा डाव ओळखा !
      कोल्हापूर, ८ ऑक्टोबर (वार्ता.) - कोल्हापूरची अंबाबाई ही दिग्विजय करणारी, मातृसत्ताक राज्य राखणारी, जनतेचे रक्षण करणारी राणी आणि देवता आहे. हे क्षेत्र शाक्त आणि शैव संप्रदायाचे असून ही बहुजनांची देवता आहे. कोणत्याही पुराणग्रंथात ही देवी विष्णुपत्नी लक्ष्मी असल्याचा उल्लेख नाही. उलट विष्णु हा अंबाभक्त असल्याचे पुरावे आहेत. या देवीचे ब्राह्मणीकरण करण्याचा कट केला जात आहे. तिला लक्ष्मीच्या गौडबंगालातून आणि भुंग्याप्रमाणे बसलेल्या पुजार्‍यांच्या तावडीतून मुक्त करूया, अशी मुक्ताफळे प्रा. डॉ. राजेंद्र कुंभार यांनी शोध अंबाबाई या विषयावरील व्याख्यानात उधळली.

नवरात्रोत्सवात तोरण मिरवणुकांवर पुणे पोलिसांकडून यंदाही बंदी

हिंदूंच्या प्रभावी संघटनाच्या अभावी पोलीस प्रशासनाकडून असे
निर्णय घेतले जातात. यासाठी हिंदूंचे प्रभावी संघटन बनवणे आवश्यक आहे.
     पुणे, ८ ऑक्टोबर - गेल्या ५ वर्षांपासून पुण्यात नवरात्रोत्सवात काढण्यात येणार्‍या तोरण मिरवणुकांवर पुणे पोलिसांनी बंदी घातली आहे. यंदाच्या वर्षीही मंडळाच्या तोरण मिरवणुकांवर बंदी असल्याची माहिती पोलीस सहआयुक्त सुनील रामानंद यांनी दिली. (पोलिसांनी अल्पसंख्यांकांच्या ताबूत मिरवणुकीवर बंदी घातल्याचे कधी ऐकले आहे का ? - संपादक)
     या तोरण मिरवणुकांवरून काही वर्षांपूर्वी पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे हत्या होण्याचे प्रकारही घडले होते. त्या पार्श्‍वभूमीवर तत्कालीन पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी या तोरण मिरवणुकांवर बंदी घातली होती.

फलक प्रसिद्धीकरता

शिवसेनेसारखे राष्ट्रप्रेम इतरही पक्षांनी दाखवावे ! 
     शत्रूराष्ट्र पाकचे गझल गायक गुलाम अली खान यांचे मुंबई आणि पुणे येथे होणारे कार्यक्रम शिवसेनेच्या विरोधानंतर रहित करण्यात आले. त्यामुळे सीमेवर प्रतिदिन होणार्‍या चकमकीत भारताचे शेकडो सैनिक हुतात्मा होत असतांना अशा कार्यक्रमांचे आयोजन करणार्‍यांना दणका बसला आहे.

कॉ. पानसरे हत्या प्रकरणी खरे मारेकरी शोधायचेच नाहीत, असे वाटते ! - मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे

     मुंबई, ८ ऑक्टोबर (वार्ता.) - कॉ. पानसरे हत्या प्रकरणी विशेष अन्वेषण पथकाने त्याचा अहवाल सादर केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. न्यायालयाने म्हटले आहे, या प्रकरणी वरिष्ठ शासकीय वकिलांची नेमणूक का करण्यात आली नाही ? वरिष्ठ शासकीय वकिलांच्या अभावी शासनाची बाजू कमकुवत झाली. या प्रकरणी स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर या विशेष अधिकार्‍याची नियुक्ती का करण्यात आली नाही ? त्यामुळे या प्रकरणाचे दायित्व कुणाचे ? या सर्व स्थितीवरून शासनाला खरे मारेकरी शोधायचेच नाहीत, असे वाटते.


हिंदू तेजा जाग रे !

Jago ! :

Shivsenake virodhke bad pak ke 
gajalgayak Gulam Alike Mumbai aur Puneke karyakram radda. 
- Aisa rashtraprem anya partiya kyo nahi dikhati ?

जागो ! :
शिवसेनाके विरोधके बाद पाकके 
गजलगायक गुलाम अली के मुंबई और पुणेके कार्यक्रम रद्द. 
- एैसा राष्ट्रप्रेम अन्य पार्टीया क्यो नही दिखाती ?

आतंकवादाविरुद्ध लढण्यासाठी व्यावहारिक स्तरावर अपयशी ठरलेला महान भारत !

      आतंकवादी आक्रमणाचा सामना करण्यासाठीच्या आमच्या सिद्धतेत काहीच पालट झालेला नाही. हा पालट पोलीस प्रशासनास कार्यक्षम करूनच शक्य आहे आणि यासाठी राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता आहे, जी आमच्या राज्यकर्त्यांकडे नाही. आम्ही मानसिकरित्या आतंकवादी आक्रमणाचा सामना करण्यास सिद्ध आहोत; मात्र व्यावहारिक स्तरावर आमची सिद्धता अपुरी आहे. - किरण बेदी, निवृत्त पोलीस अधिकारी (२८.११.२०१०)) 

पुरोगामी सज्जनांनो, काही तरी पटेल असे बोला बुवा !

      कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येसंदर्भात पुरोगाम्यांकडून सनातन संस्थेवर बेछूट आरोप केले जात आहे. पुरोगाम्यांच्या आततायी तर्कांचा समाचार घेणारा साहित्यिक श्री. ह.मो. मराठे यांचा दैनिक तरुण भारतच्या गोवा आवृत्तीत ५ ऑक्टोबर या दिवशी प्रसिद्ध झालेला लेख वाचकांसाठी देत आहोत. 
      वर्ष २००६ मधील मुंबईतील रेल्वगाडीत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या खटल्याचा निकाल विशेष मोक्का न्यायालयाने ३० सप्टेंबर २०१५ या दिवशी घोषित केला. संघटितपणे कटकारस्थान करून १८९ माणसांचे खून करणे आणि असंख्य माणसांना जखमी करणे, इत्यादी आरोप सिद्ध झाल्याने या स्फोटांना उत्तरदायी धरण्यात आलेल्या आरोपींपैकी ५ जणांना फाशी आणि काहींना मरेपर्यंत जन्मठेप अशा शिक्षा न्यायालयाने ठोठावल्या. या खटल्यातही शासकीय पक्षाची बाजू न्यायालयात मांडण्याचे काम अधिवक्ता उज्ज्वल निकम यांनीच केले. जरी आरोपींना वरीष्ठ न्यायालयात शिक्षेविरुद्ध अपील करण्याची सवलत असली, तरी त्या पातळीवरही वेगळा निकाल लागण्याची शक्यता तूर्त तरी वाटत नाही. हे स्फोट हाही पाकिस्तान पुरस्कृत आतंकवादाचा एक भाग होता आणि भारतात घातपाती कृत्ये करून भारतीय जनतेत घबराट निर्माण करणे हाच वरील बॉम्बस्फोटांमागचा हेतू होता, असे त्या वेळीही सर्वसाधारण माणसाचे मत बनले होते, तेच खरे ठरले. अपिलातही याच मतावर शिक्कामोर्तब होईल, असेच सामान्य माणसाचे मत आहे.

सणांचा अन्वयार्थ अन् हिंदूंचा (?) स्वार्थ

     कोजागरी पौर्णिमेला दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि दूध प्राशन करतात. उत्तररात्री साक्षात लक्ष्मीदेवी येऊन को जागर्ति ? (कोण जागे आहे ?) असे विचारते; म्हणून या दिवसाला कोजागरी पौर्णिमा असे म्हणतात. एके वर्षी कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी एका कुटुंबातील सदस्यांना सुट्टी नसल्याने त्यांनी कोजागरी २ दिवसांनी साजरी केल्याचे वाचनात आले. कोजागरीचे निमित्त करून त्या कुटुंबियांना केवळ एकत्र येऊन मौजमजा करायची होती. त्यामुळे त्यांनी पौर्णिमेच्या दिवशी ती साजरी करण्यास तिलांजली दिली; मात्र २ दिवसांनंतर त्यांच्या दुधात पूर्ण चंद्राची किरणे पडली असतील का ? खरंच का लक्ष्मीदेवी त्यांच्यावर प्रसन्न झाली असेल ? त्या दिवसाचे विशेष महत्त्व असल्याने २ दिवसांनी उत्सव साजरा करून काहीतरी लाभ होईल का ? आज हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने त्यांच्या सर्वच सण-उत्सवाच्या संदर्भात सर्वत्रच अशी काही ना काही शोकांतिका दिसून येते. 

हिंदुत्व हेच राष्ट्र्रीयत्व आणि भारतीय हा आमचा पत्ता !

      त्याचप्रमाणे अनेक लोक जेथे रहातात, तो भूभाग म्हणजे केवळ देश असतो; पण एक संस्कृती, एक भाषा, एक धर्म, एक इतिहास, एक आदर्श असे असणारा जनसमुदाय, म्हणजे एक राष्ट्र असते. हिंदुस्थानात हिंदु हा धर्म, संस्कृत हीच मुख्य भाषा, भारतीय संस्कृती हा सर्वांचा समान इतिहास आणि समान पूज्यस्थाने असणारे हिंदू हेच राष्ट्र आहे. हिंदुत्व हेच येथील राष्ट्र्रीयत्व आहे. भारतीय हा आमचा पत्ता झाला. हिंदुही आमची ओळख आहे. हिंदुत्व हेच आमचे राष्ट्र्रीयत्व आहे. असा एकजिनसी आणि स्वाभिमानी समाज अत्यंत शक्तीमान असतो. मात्र त्याला राष्ट्र्रीयत्वाची जाण हवी. तो लहान का असेना ! इस्त्रायलमधील ज्यू लोक हे काही लाखांच्या संख्येनेच आहेत; पण ते एक भक्कम राष्ट्र आहे. - प्रा. सु.ग. शेवडे (भारतीय संस्कृती, पृष्ठ क्र. ३३) भारतीय स्त्री - कोण होतीस तू, काय झालीस तू ?

      प्राचीन इतिहासात भारतीय स्त्रियांना बरोबरीचे स्थान दिले गेल्याने वेद निर्मितीपासून राज्यकर्त्यांमध्ये महिलांची नावे कर्तृत्वाने झळकलेली आहेत; मात्र बाराव्या शतकानंतर भारतात इस्लामी आक्रमकांची सुमारे ६०० वर्षे राजवट राहिल्याने त्या काळात स्त्रियांच्या मोकळेपणावर बंधने आली.
      आज ३ टक्के आधुनिक भारतीय स्त्रिया करिअरप्रधान झाल्या असून बाकी स्त्रिया गृहिणीची भूमिका योग्य प्रकारे पार पाडत आहेत. त्यांच्यावरच आपली कुटुंबव्यवस्था आणि देश यांचे भविष्य अवलंबून आहे. त्यांना आपण यथोचित मान दिला पाहिजे.
१. हिंदु धर्मामध्येच वैज्ञानिक सत्यावर आधारित 
स्त्री-पुरुषांना समान मान !
     जगामधील सर्व धर्मांपैकी केवळ आपल्या हिंदु धर्मात स्त्रीला शक्ती (प्रकृती), तर पुरुषाला शिव मानून त्यांच्या मीलनातून सृष्टीची निर्मिती झाल्याचा सिद्धांत मांडला आहे. याउलट अन्य धर्मांत स्त्रियांचा विचारही करण्यात आला नाही. मानवासह सर्व सृष्टीच्या निर्मितीसाठी स्त्री आणि पुरुष यांच्या बीजाचा संयोग होणे अपरिहार्य असल्याचे वैज्ञानिक सत्य हिंदु धर्मानेच मान्य करून दोघांना समान दर्जा दिला आहे.
  देशाच्या राजकारणात सज्जन, सत्त्वशील, देशभक्त, त्यागी नेते आणि प्रतिनिधी यांची संख्या अत्यंत नगण्य आहे. अभ्यासपूर्ण भाषण करून आपली छाप पाडणारे संसदपटू हा संशोधनाचा विषय आहे. 
- श्री. दुर्गेश परूळकर (धर्मभास्कर वर्षारंभ विशेषांक, मे २०११)

स्वकर्म त्यागरूपी वर्णसंकराने राज्यकर्ते आणि समाज दिशाहीन होणे

      स्वकर्म त्यागरूपी वर्णसंकराने आज जगाला ग्रासले आहे. असा वर्णसंकर होऊ लागला म्हणजे सर्व व्यक्तींची दृष्टी, अर्थ-कामावर केंद्रित होते. मग वंशसंकर फैलावतो. आज ज्ञानग्रहणाची मुळीच इच्छा नसलेले लोक नोकरी मिळेल, या आशेने विद्याग्रहण करत आहेत ! विद्यादान करण्याची इच्छा वा शक्ती नसलेले शिक्षक पैसा मिळतो; म्हणून ज्ञानदान करत आहेत. प्रजारक्षणाकरता नेमलेले अधिकारी प्रजाभक्षण करत आहेत. आपणच लिहिलेली राज्यघटना आपणच जाळू, अशा घोषणा नेते करत आहेत. सगळ्यांचे कारण ज्या कार्याला जे गुण लागतात, त्यांचा अभाव ! गुणहीन असूनही माणसे काम करत आहेत. - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, जून २००९)

धर्मद्रोह्यांच्या आणि सनातनद्वेष्ट्यांच्या थयथयाटाचा परिणाम एकच होणार आहे अन् तो म्हणजे त्यांचे पितळ लवकर उघडे पडणार !

      धर्मद्रोह्यांच्या वृत्तीतच प्रचंड विखार आणि विद्रोह भरला असल्याने त्यांनी आतापर्यंत सातत्याने हिंदु धर्माविषयी लोकांचे मन कलुषित केले आहे. सनातन संस्थेमुळे लोकांमध्ये हिंदु धर्माभिमान पुनःश्‍च वाढू लागल्याने त्यांचा थयथयाट शिगेला पोचला आहे आणि वृत्तवाहिन्या हाच थयथयाट दिवस-रात्र दाखवून समाजाची अनेक प्रकारे हानी करत आहेत. समाजमनातील धर्मश्रद्धांचे मूळ उखडून टाकत आहेत. हिंदु धर्माला संपवू पहाणार्‍या धर्मद्रोह्यांनो, तुम्ही जंगजंग पछाडले, तरी चिरंतन सनातन धर्म संपू शकत नाही, हे लक्षात ठेवा. तुम्ही कितीही आणि कोणतेही आरोप केले, तरी ईश्‍वरी प्रेमाने (संमोहनाने नव्हे) भारलेले साधक-जीव सनातनपासून तसूभरही दूर जाणार नाहीत अन् त्यांची ईश्‍वरावरील श्रद्धा कणभरही न्यून होणार नाही, हे लक्षात घ्या ! ईश्‍वरावरील दृढ श्रद्धेमुळे सनातनचे साधक या सार्‍या अग्नीदिव्यातून झळाळून निघणारच आहेत; पण तुमचे काय ? तुमचे लवकरच पितळ उघडे पडणार आहे, हे नक्कीच ! त्यापासून तुम्हाला कोणीही वाचवू शकत नाही.
- वैद्या (सौ.) सुजाता मधुसूदन कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.१०.२०१५)

भौतिकतावादाच्या अतिरेकी प्रचारामुळे नव्हे, तर समाजात श्रद्धाभाव निर्माण केला, तरच भारत खर्‍या अर्थाने जागतिक महासत्ता बनेल !

      आज भारतातून श्रद्धाभाव जवळजवळ लुप्त झाला आहे. एखादा माणूस महान बनतो आणि दुसरा दुबळा रहातो, याचे कारणही श्रद्धाच आहे. माझे गुरुदेव म्हणत, जो स्वत:ला दुबळा समजतो, तो दुर्बळच राहील. हे अगदी खरे आहे. आपल्यामध्ये श्रद्धा उत्पन्न झाली पाहिजे. पाश्‍चात्त्यांचा स्वत:च्या बाहुबलावर, स्वत:च्या शक्तीवर विश्‍वास आहे. त्यांनी जी ऐहिक प्रगती केली, तो त्यांच्या श्रद्धेचाच परिणाम आहे. तुम्ही जर तुमच्या आत्मबलावर विश्‍वास ठेवलात, तर तुम्ही कितीतरी जास्त प्रगती करू शकाल. हा श्रद्धाभाव निर्माण करण्याचे महत्कार्य तुमच्यापुढे आहे !
- स्वामी विवेकानंद (सिलेक्शन फ्रॉम द वर्क्स ऑफ स्वामी विवेकानंद)

वेगवेगळ्या क्लृप्त्या काढून पोलिसांकडून सनातनविषयी माहिती काढण्याचा प्रयत्न

सनातनच्या साधकांच्या मागे चौकशीचा वाढता ससेमिरा !
१. साधकाच्या भावाची चौकशी ! 
     एका गावातील एका साधकाच्या भावाच्या घरी तेथील पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी चौकशीसाठी येऊन गेले. या वेळी साधकाच्या भावास मडगाव स्फोटातील एक संशयित इकडे येतो का ? येत नसेल, तर किती वर्षांपासून येत नाही ? तुमच्याशी कधी त्याचे बोलणे होते का ? तुम्हाला कधी दूरभाष येतात का ?, असे प्रश्‍न विचारले. साधकाचा भाऊ पोलीस पाटील असल्याने त्याच्याकडून हा संशयित वर्ष २०१० नंतर कधीही आमच्याकडे आला नाही, असे लिहून घेतले, तसेच गावातील सरपंचांकडूनही तशाच प्रकारचे पत्र लिहून घेतले आणि ते निघून गेले.

दत्ताच्या नामजपाने पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण कसे होते ?

     हिंदु धर्माने सांगितलेल्या ईश्‍वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे देवऋण, ऋषिऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी श्राद्ध आवश्यक असते. माता-पिता, तसेच निकटवर्तीय यांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी, यांसाठीचा संस्कार म्हणजेच श्राद्ध. श्राद्धातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते. पितरांना हविर्भाग दिला गेल्याने ते संतुष्ट होतात.
     २८ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर २०१५ या कालावधीत पितृपक्ष आहे. त्यानिमित्त आजच्या भागात श्राद्धविधी संदर्भातील काही माहिती पाहूया.
१. पूर्वजांना गती मिळणे 
     कलीयुगातील बहुतेक जण साधना करत नसल्यामुळे ते मायेत खूप गुरफटलेले असतात. यामुळे मृत्यूनंतर अशांचा लिंगदेह अतृप्त रहातो. असे अतृप्त लिंगदेह मर्त्यलोकात अडकतात. (मर्त्यलोक हा भूलोक आणि भुवर्लोक यांच्या मध्ये आहे.) दत्ताच्या नामजपामुळे मर्त्यलोकात अडकलेल्या पूर्वजांना गती मिळतेे. त्यामुळे पुढे ते त्यांच्या कर्मानुसार पुढच्या पुढच्या लोकात गेल्याने साहजिकच त्यांच्यापासून व्यक्तीला होणार्‍या त्रासाचे प्रमाण कमी होते.

एका दूरचित्रवाहिनीवरील चर्चासत्रात निवेदकांनी इतिहासाचे पुनर्लेखन करायला सांगितल्याचे कळल्यावर देवाने सुचवलेले विचार !

श्री. परेश गुजराथी
     एका दूरचित्रवाहिनीवरील चर्चासत्रात निवेदक म्हणाले, काळ पालटला आहे. नवीन पिढीचे विचारही नवे आहेत. त्यामुळे इतिहासाचे पुनर्लेखन व्हायला हवे. आधुनिक विचारांतून शिवरायांची मांडणी व्हायला हवी. या विचित्र वक्तव्यावर देवाने मला पुढील विचार सुचवले.
१. इतिहासाची व्याख्या 
    इतिहास म्हणजे पुढील पिढ्यांना आपल्या गौरवशाली परंपरा, राष्ट्रभक्तांनी केलेला त्याग, त्यांचे पराक्रम आणि त्यांनी केलेले समर्पण कळण्यासाठी जतन केलेले लिखाण होय.
२. उद्दिष्ट 
   इतिहासातून प्रेरणा घेऊन त्याप्रमाणे पराक्रम गाजवणे आणि आपली अस्मिता अन् स्वाभिमान जपणे, हे इतिहासलेखनाचे उद्दिष्ट असते.

हिंदु धर्मातील एक महत्त्वाचा विधी - पितृपक्षातील महालय श्राद्धविधी करतांना सनातनच्या साधिका डॉ. (सौ.) कस्तुरी भोसले यांना आलेल्या अनुभूती

डॉ. (सौ.) कस्तुरी भोसले
    रामनाथी आश्रमात ३०.९.२०१५ ते २.१०.२०१५ या तीन दिवशी साधकांच्या मृत कुटुंबियांसाठी सामूहिक महालय श्राद्ध करण्यात आले. १.१०.२०१५ या दिवशी महालय श्राद्ध करण्याच्या गटात डॉ. भोसलेंचे नाव होते. त्यांना वयोमानानुसार नीट ऐकू येत नाही. ते मोठ्या सभागृहात लांब कुठेतरी बसले, तर त्यांना नीट ऐकू न आल्यामुळे विधी नीट करणे कठीण होईल, अशी चिंता मला वाटत होती. मी डॉ. भोसलेंना ऐकू येत नाही, तरी आपणच त्यांना नीट ऐकू येईल, अशा ठिकाणी त्यांचे बसण्याचे नियोजन करावे, अशी श्रीकृष्णाला मनात प्रार्थना केली. माझी प्रार्थना श्रीकृष्णानी ऐकली आणि त्यांची बसण्याची व्यवस्था श्री दत्तगुरूंच्या चित्राजवळ वेदमूर्ती केतन गुरुजींच्या समोरच केली होती. ते पाहून माझा कृतज्ञताभाव जागृत झाला. श्रीकृष्णाचे साधकांच्या मनातील विचारांकडे किती बारकाईने लक्ष असते, याची अनुभूती आली. आमच्या कुटुंबाला पूर्वजांचा तीव्र त्रास असल्यामुळे आमच्यासाठी हा महालय श्राद्धविधी अत्यंत महत्त्वाचा होता. श्राद्धविधीच्या वेळी आलेल्या अनुभूती पुढे देत आहे.

सनातनच्या रामनाथी आश्रमात झालेल्या सामूहिक महालय श्राद्धविधीच्या वेळी श्री दत्तगुरूंचे अस्तित्व जाणवून आलेल्या अनुभूती !

श्री. सिद्धेश करंदीकर
    सनातनच्या रामनाथी आश्रमात ३०.९.२०१५ ते ३.१०.२०१५ या कालावधीत पितृपक्षातील सामूहिक महालय श्राद्धाचे विधी करण्यात आले. त्या वेळी सनातन साधक-पुरोहित पाठशाळेतील विद्यार्थी श्री. सिद्धेश करंदीकर यांना आलेले अनुभूती आणि झालेला त्रास येथे देत आहोत.   
१. ९.९.२०१५
१ अ. श्राद्धविधीच्या आदल्या दिवशी श्री दत्तगुरूंचे अस्तित्व जाणवून झालेली प्रार्थना आणि श्री दत्तगुरूंचे आश्‍वस्त करणारे बोल ऐकल्यावर देवाच्या कृपेची झालेली जाणीव ! : विधीच्या आदल्या दिवशी नामजप करत असतांना श्री दत्तगुरूंचे अस्तित्व जाणवले. ते अत्यंत प्रसन्न होऊन म्हणाले, तुला काय हवे ते माग ! त्या वेळी देवाकडे काय मागायचे ? माझी पात्रताच नाही, असे वाटले. त्यानंतर काय मागायला हवे ? हे श्री दत्तगुरूंनीच सुचवले अन् माझ्याकडून म्हटले गेले, तुमचा कधीही विसर पडू नये. देवाने ज्या उद्देशाने वेदपाठशाळेत आणले, तो सफल होऊ दे. सर्व साधकांकडून साधना करून घेऊन त्यांना पुढे घेऊन जावे ! त्या वेळी श्री दत्तगुरूंनी स्मितहास्य करून तथास्तु म्हटले. पुढे ते म्हणाले, एखाद्या जिवामध्ये गुणांचे प्रमाण अल्प असले, त्रासाचा भाग अधिक असला, तरी तो जीव किती आर्त भावाने मला हाक मारतो, हे मी पहातो आणि कृपा करतो. माझे मुख्य कार्य जिवांना जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त करणे, हे आहे. तू काही काळजी करू नकोस. मी तुला पुढे घेऊन जाईन. हे सर्व ऐकल्यावर देवाची आपल्यावर किती कृपा आहे, याची जाणीव होऊन कशी कृतज्ञता व्यक्त करावी, हेच लक्षात येत नव्हते. 

सनातनच्या रामनाथी आश्रमात साधकांच्या पितरांचे महालय श्राद्ध करण्यापूर्वी आणि श्राद्धाच्या वेळी झालेले त्रास अन् आलेली अनुभूती

वेदमूर्ती केतन शहाणे
    ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०१५ या कालावधीत सनातनच्या रामनाथी आश्रमात सनातन साधक-पुरोहित पाठशाळेतील साधकांनी आश्रमातील काही साधकांच्या पितरांचे श्राद्ध केले. त्या कालावधीत सनातन साधक-पुरोहित पाठशाळेचे अध्यापक वेदमूर्ती केतन शहाणे यांना श्राद्धविधीच्या आधी आणि श्राद्धविधीच्या दिवशी झालेले त्रास अन् आलेल्या अनुभूती पुढे देत आहोत.
१. श्राद्धविधीच्या आदल्या दिवशी झालेले त्रास
अ. श्राद्धाच्या आदल्या दिवशी (२९.९.२०१५ या दिवशी) सायंकाळनंतर माझ्या तोंडात अकस्मात् उष्णतेचे फोड आले.
आ. मला येणार्‍या थकव्याचे प्रमाण थोडे वाढले.
इ. माझ्या शरिराभोवती उष्णतेचे प्रमाण वाढल्याचे जाणवले. मला ताप जाणवत नव्हता; परंतु धावून आल्यावर जसे अंग तापल्यासारखे वाटते, तसे श्राद्धाच्या आदल्या दिवसापासून (२९.९.२०१५ या दिवसापासून) मला जाणवत होते.
ई. पू. (सौ.) बिंदाताई यांच्याकडे रात्री नियोजन सांगण्यासाठी गेल्यावर त्यांच्याशी माझे साधारण ५ मिनिटे बोलणे झाले. त्यानंतर माझे थकव्याचे प्रमाण उणावले.

उत्तम स्मरणशक्ती असणारा आणि देवतांच्या विडंबनाविषयी दक्ष असणारा ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला नागपूर येथील कु. अद्वैत महेश परांजपे (वय १३ वर्षे) !

कु. अद्वैत परांजपे
१. गर्भारपणात क्षात्रधर्म साधना हा विषय
सांगतांना बाळाने आतून प्रतिसाद देणे
    गर्भारपणात माझी सेवा चालू होती. त्या वेळी अनेक वेळा मला क्षात्रधर्म साधना हा विषय सांगण्याची सेवा मिळायची. तेव्हा बाळसुद्धा त्याला प्रतिसाद देत आहे, असे मला जाणवायचे.
२. जन्म ते ३ वर्षे
२ अ. पहिल्या भेटीतच आजोबा म्हणत गुरुदेवांकडे जाणे : श्रीकृष्णाच्या कृपेने गुरुदेवांचा सत्संग अद्वैतला लहानपणी मिळाला. त्या वेळी तो दीड वर्षाचा होता. आम्ही गुरुदेवांच्या दर्शनाला गेलो असता तो लगेच आजोबा म्हणत त्यांच्याजवळ गेला आणि त्यांच्याकडे चॉकलेट मागितले. तो गुरुदेवांशी दाराआड लपून खेळत असे.
२ आ. ध्वजाविषयी प्रेम असणे : अद्वैताला एकदा गुरुदेवांच्या वाहनातून जाण्याची संधी मिळाली. त्या वेळी अद्वैत ज्या ज्या ठिकाणी झेंडे दिसले, त्या वेळी तो झंडा उंचा रहे हमारा, असे म्हणत होता. गुरुदेव म्हणाले, बघा, याला ध्वजाविषयी किती प्रेम आहे !
- सौ. वैशाली परांजपे (आई), नागपूर

६२ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या श्री. प्रशांत हरिहर यांनी साधनेचे केलेले प्रयत्न आणि श्रीकृष्णाने पदोपदी साहाय्य केल्याची त्यांना आलेली अनुभूती

श्री. प्रशांत हरिहर
१. श्रीकृष्णाच्या कृपेने झालेले साधनेचे प्रयत्न
१ अ. सेवेकडे जास्त लक्ष देत असल्याने देवाचा विसर पडणे, रात्री त्याविषयी खंत वाटल्याने श्रीकृष्णाशी बोलल्यावर त्याने दोष अन् अहं यांचे पैलू सांगणे आणि व्यष्टी, तसेच समष्टी यांची सांगड घालणे जमू लागल्याने मन आनंदी होणे : मी सेवेकडे जास्त लक्ष देत असल्याने मला देवाचाच विसर पडायचा. त्यामुळे रात्री मला खंत वाटायची, आज माझी सेवा झाली; पण मी देवाला विसरलो. झोपतांना मी याविषयी श्रीकृष्णाला रडत सांगत होतो. आजचा दिवस वाया गेला; पण श्रीकृष्णाच्या कृपेने मनात निराशा किंवा नकारात्मक विचार येत नव्हते. नंतर असे काही दिवस झाल्यावर श्रीकृष्ण माझ्याशी बोलायला लागल्याचे आणि मला माझे दोष अन् अहंचे पैलू सांगत असल्याचे जाणवले. अशा प्रकारे दिवसभरात माझ्या मनाच्या स्थितीकडे माझे लक्ष असायचे. त्यामुळे व्यष्टी आणि समष्टी यांची सांगड घालणे काही प्रमाणात जमू लागल्याने मन आनंदी झाले.

दादरी प्रकरणी मोदींकडून राष्ट्रपतींच्या भूमिकेचे समर्थन !

      नवादा (बिहार) - एका मुसलमानाची हत्या झाल्यानंतर त्याला गोमांसबंदीचे कारण जोडून जातीयवादी विधाने केली जात आहेत. त्याविषयी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी एका प्रचारसभेत म्हणाले की, दादरीच्या संदर्भात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा संदेश सर्वांत मोलाचा आहे. धर्मनिरपेक्षता हा भारतीय घटनेचा पाया असून धार्मिक सहिष्णुता राखणे, हे आपले कर्तव्य आहे. या संदर्भात जी काही प्रक्षोभक विधाने होत आहेत, ती थांबवली पाहिजेत.

साधकांना सूचना आणि वाचक, हितचिंतक हिंदुत्ववादी यांना आवाहन !

दूरचित्रवाहिनीवरील एखादा कार्यक्रम अयोग्य
वाटल्यास त्याविषयी न्यूज ब्रॉडकास्टिंग अथॉरिटीकडे तक्रार करा !
     दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित होणार्‍या एखाद्या कार्यक्रमाविषयी वा वृत्ताविषयी कोणाला आक्षेप असल्यास त्याविषयी न्यूज ब्रॉडकास्टिंग अथॉरिटीकडे तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध आहे. बर्‍याच वाहिन्यांवरून हिंदु धर्माची अपकीर्ती करणारे, हिंदुत्ववाद्यांवर अकारण टीका करणारे कार्यक्रम किंवा वृत्त प्रसारित केली जातात. त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावतात. अशा कार्यक्रमांविषयी न्यूज ब्रॉडकास्टिंग अ‍ॅथोरिटीला खालील पत्त्यावर तक्रार नोंदवता येईल. वरील सूत्रांव्यतिरिक्त संस्कृतीविरोधी, अश्‍लाघ्य चित्रण अशा अन्य सूत्रांविषयीही तक्रार नोंदवता येऊ शकते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
'मी गोमांस खातो, हे सांगायला सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि भारतीय प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांच्यासारख्या हिंदूंना लाज वाटत नाही, तर अभिमान (गर्व) वाटतो !'
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (५.१०.२०१५)

बोधचित्र


प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

श्रमाची कास धरा !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      ईश्‍वरी शक्ती अगाध आहे. तुमच्या साधनेने तुमची दुःखे निश्‍चितच पळून जातील; पण त्यासाठी श्रमाची कास धरा. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
वाटाड्या 
     देव वाटाड्या आहे. मार्गात ठेच लागते; कारण मार्गात खाचखळगे असतात. आपण वाटाड्यावर संतापतो, तरी तो सांगतो, "पुढे मार्ग चांगला आहे." 
भावार्थ : येथे 'वाटाड्या' म्हणजे मोक्षाचा मार्ग दाखविणारे गुरु. 'ठेच लागते' म्हणजे त्रास होतो, आध्यात्मिक प्रगती खुंटते. 'मार्गात खाचखळगे असतात' म्हणजे साधनेत अडचणी असतात. 'पुढे मार्ग चांगला आहे' म्हणजे आध्यात्मिक प्रगती चांगली होणार आहे. 
 (संदर्भ : सनातनचे प्रकाशन 'संत भक्तराज महाराज यांची शिकवण.')


१ अखलाख आणि कोट्यवधी गोवंश !

संपादकीय
     उत्तरप्रदेशमधील गोमांस बाळगल्याच्या अखलाख याच्या हत्येनंतर मुसलमान कसे संघटित आहेत, याचा पुनःप्रत्यय येत आहे. या घटनेनंतर विविध सलमानधार्जिण्या वाचाळवीरांची जीभ सुटली. शोभा डे आणि लालूप्रसाद यांनी हिंदूंच्या गोमांस खाण्याचा पुरस्कार केला, तर आझम खान थेट संयुक्त राष्ट्रसंघाकडे गेले आणि त्यांच्या निष्ठा भारताशी नसल्याचे त्यांनी सिद्ध केले. माविया अली हिंदु संतांच्या हत्या करण्याचे आव्हान द्यायला लागले आणि आता तर आयएस्आयएस्च्या भारतातील प्रतिनिधींनी त्याचा प्रतिशोध घेण्याची धमकी दिली. हा कहर झाला आहे. एखादी घटना कुठल्या क्रांतीची किंवा बंडाचे निमित्त ठरेल, हे सांगू शकत नाही. असो. इथे एक सूत्र प्रकर्षाने लक्षात येते की, गोहत्येच्या सूत्रावर आता प्रथमच कोणा मुसलमानाची हत्या झाल्याचे समोर आले आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn