Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

शिवसेनेच्या विरोधानंतर कार्यक्रमाची तिकीट विक्री थांबवली !

पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांचा कार्यक्रम रहित !
राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी कृतीसाठी नेहमीच पुढे असलेल्या शिवसेनेचे अभिनंदन !
      मुंबई - पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली याचा ९ ऑक्टोबरला षण्मुखानंद सभागृहात कार्यक्रम होणार आहे. तो रहित करा, अन्यथा उधळून लावू, अशी चेतावणी शिवसेनेच्या चित्रपटसेनेचे सचिव श्री. अक्षय बद्रापूरकर यांनी दिली होती. (शत्रूराष्ट्राच्या विरोधात भारतातील अन्य पक्ष अशी कणखर भूमिका का घेत नाहीत ? त्यांचा पाकला पाठिंबा आहे का ? - संपादक)

आझम खान यांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवावे ! - उद्धव ठाकरे

धर्मांधांच्या विरोधात शिवसेनाच इतके उघडपणे बोलू शकते !
     मुंबई - पाकिस्तानप्रमाणे आझम खान संयुक्त राष्ट्रसंघाकडे गेले आहेत आणि हा एक प्रकारे देशद्रोह आहे. हिंदुस्थानातील एक किरकोळ विषय मुसलमान म्हणून राष्ट्रसंघाकडे नेणे, हे देशाची अब्रू आंतरराष्ट्रीय चव्हाट्यावर नेण्याचा प्रकार आहे. अशा आझम खान यांना देशातील कुठल्याही घटनात्मक पदावर रहाण्याचा अधिकार नाही. निवडणूक आयोगाने त्यास निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवावे, म्हणजे सार्वभौम देशातील विधानसभेत त्याला बसता येणार नाही,

सनातनच्या विरोधात उगाचच ओरडू नका ! - संजय राऊत, खासदार, शिवसेना

श्री. संजय राऊत
पुरोगामी आणि निधर्मी यांना शिवसेनेचे खडे बोल !
सनातनच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाणार्‍या हिंदुत्ववाद्यांचे आभार !
मुंबई - सनातनच्या विरोधात या क्षणापर्यंत कोणताही पुरावा सापडलेला नाही. पुरोगामी आणि निधर्मीवादी उगाचच सनातनच्या विरोधात बोंबा मारत आहेत. सनातनच्या विरोधात कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरोधात उगाचच बोंबलू नका,

हिंदु समाज सनातनच्या पाठीशी ठामपणे उभा आहे ! - शरद पोंक्षे, अभिनेते

    
श्री. शरद पोंक्षे
 
     एखाद्या व्यक्तीने काही कृत्य केले, तर संपूर्ण संघटनेला त्यासाठी उत्तरदायी ठरवणे योग्य ठरणार नाही. समजा एखाद्या कलाकाराने बलात्कार केला, तर संपूर्ण नाट्यसंस्थेला दोषी ठरवून नाट्यसंस्थाच बंद करा, असे म्हणू शकत नाही. आमचा तुमच्या संघटनेला पाठिंबा आहे. हिंदु समाज तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.अखलाकच्या हत्येचा प्रतिशोध (बदला) घेण्याची आय.एस्.आय.एस्. आणि अल कैदा यांची धमकी !

दादरी (उत्तरप्रदेश) येथील हत्येचे प्रकरण !
     कुठे भारतातल्या एका कुठल्यातरी गावात मुसलमानाच्या झालेल्या हत्येचा प्रतिशोध घेण्यासाठी स्वतःचे वैर विसरून एकत्र येणार्‍या आतंकवादी संघटना आणि कुठे जगभरात हिंदूंचा अनन्वित छळ होत असतांना त्याविषयी चकार शब्दही न काढणारे जन्महिंदू !
     नवी देहली
- उत्तरप्रदेशातील दादरी येथील अखलाकच्या हत्येच्या प्रकरणाची दखल इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सिरिया (आयएस्आयएस्) या आतंकवादी संघटनेने घेतली आहे. महत्त्वाचे म्हणजे अल् कैदा आणि आय.एस्.आय.एस्. या दोन्ही संघटनांसाठी काम करणार्‍या आतंकवाद्यांनी अखलाकच्या हत्येचा प्रतिशोध घेऊ, अशी धमकी दिली

पोलिसांचे दोनदा लक्ष्य झालेले स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद यांनाही केले आरोपी !

संतांवर लाठीमार करण्याच्या उत्तरप्रदेशातील (अ)समाजवादी शासनाची मोगलाई !
हिंदुद्वेषी समाजवादी पक्षाला सत्तेत बसवल्यामुळेच त्याची शिक्षा आज 
हिंदूंनाच भोगावी लागत आहे. हिंदूंनो, हे जाणून आतातरी जागे व्हा !
      वाराणसी - येथे मूर्तीविसर्जनाच्या वेळी पोलिसांनी जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे उत्तराधिकारी स्वामी अविमुक्तेश्‍वरानंदजी आणि अन्य भक्तगण यांच्यावर अमानुष लाठीमार केला. तेव्हा चालू झालेली संतांवरील आक्रमणाची शृंखला आता हिंदु संतांचे दमन करण्यापर्यंत आली आहे. आता समाजवादी पक्षाच्या शासनाने स्वामी अविमुक्तेश्‍वरानंदजी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

गरब्यात सहभागी होणार्‍या मुसलमानांची घरवापसी करू ! - विश्‍व हिंदु परिषद

हिंदूंनो, मुसलमानांना योगात ॐ चालत नाही, शाळेत सूर्यनमस्कार चालत नाही, वन्दे मातरम् 
म्हटलेले चालत नाही; परंतु त्यांचा नवरात्रोत्सवातील गरब्यातच प्रवेश घेण्यासाठी 
अट्टाहास असतो, हे लक्षात घ्या ! 
       कर्णावती (अहमदाबाद) - गरब्यात सहभागी होणार्‍या मुसलमान तरुणाची घरवापसी (मुसलमानांना मूळ हिंदु धर्मात परत आणणे) करण्यात येईल, अशी चेतावणी नवरात्रोत्सव चालू होण्याच्या पार्श्‍वभूमीवर विश्‍व हिंदु परिषदेने नुकतीच दिली आहे. या संदर्भात गुजरातमधील विश्‍व हिंदु परिषदेचे अध्यक्ष रणछोड भरवाड म्हणाले, गरबा खेळण्यासाठी मुसलमान युवक आला, तर त्याला हिंदु बनण्याची इच्छा असल्याचे समजण्यात जाईल आणि सहभागी मुसलमान तरुणावर गोमूत्र आणि गंगाजल शिंपडून त्याला पवित्र बनवण्यात येईल. या संदर्भात अधिकृत घोषणा गरबा कार्यक्रमात केली जाईल. (धर्मशिक्षणाने धर्माभिमान निर्माण होतो. त्यामुळे हिंदु युवतींना धर्मशिक्षण दिल्यास त्या मुसलमान तरुणांपासून सावध रहातील आणि मुसलमानांचे षड्यंत्र हाणून पाडतील, तसेच कायमचा उपायही मिळेल ! - संपादक)
     पोलिसांनी गरबा कार्यक्रम रात्री बारा वाजण्यापूर्वी बंद केल्यास, मशिदीवरील ध्वनीक्षेपक उतरवण्यात येतील, असे ते म्हणाले. केवळ हिंदूंच्याच सणांमध्ये प्रशासनाकडून नियम लावले जातात. मशिदीवर ध्वनीक्षेपक लावल्यानंतर ध्वनीप्रदूषण होत नाही का ?, असा प्रश्‍नही उत्सवाच्या नियमांविषयी भरवाड यांनी उपस्थित केला.

एम्.आय.एम्.चे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांना अटक करण्याचे आदेश

आतापर्यंत आक्षेपार्ह भाषण केल्यावरून अकबरुद्दीन ओवैसी यांच्यावर कारवाई
केली असती, तर आज त्यांची पंतप्रधान मोदी यांना सैतान म्हणण्यापर्यंत मजल गेली नसती !
      पाटणा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केल्याच्या प्रकरणी एम्.आय.एम्.चे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांना अटक करण्याचे आदेश बिहारमधील किशनगंजचे पोलीस अधीक्षक राजीव रंजन यांनी दिले आहेत.
     एम्.आय.एम्.कडून बिहार विधानसभेच्या काही जागांवर उमेदवार उभे करण्यात आले आहेत. त्या निमित्ताने कोचाधामन विधानसभा क्षेत्रात सोंथा हाट येथील प्रचारसभेत ओवैसी यांनी गुजरात दंगलीवरून मोदी यांचा उल्लेख सैतान आणि क्रूर असा केला. त्यानंतर त्यांंच्या विरोधात किशनगंज पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला होता. गुजरात दंगलखोरांच्या हातात बेड्या असत्या, तर काँग्रेस मुसलमानांविषयी गंभीर असल्याचे स्पष्ट झाले असते, असेही त्यांनी म्हटले होते.

दबावापोटी सनातन संस्थेसारख्या आध्यात्मिक संघटनेवर कारवाई करू नये !

गोव्यातील कला सांस्कृतिक आणि प्रगती मंच या संघटनेची गोवा शासनाकडे मागणी
      फोंडा (गोवा) - देशविदेशातील अनेक जण गोव्यातील रामनाथी येथील सनातन संस्थेच्या आश्रमात येऊन सनातन धर्माचे महत्त्व समजून घेत आहेत. सनातन संस्था आणि संस्थेचा आश्रम हे आमच्या गोव्यासाठी भूषण आहे. आम्हाला संस्थेच्या कार्याचा अभिमान आहे. गोवा राज्यातील गावागावांत, वाड्यावाड्यांवर, देशभरात मोठे कार्य असलेल्या सनातन संस्थेसारख्या मोठ्या संस्थेवर दुर्दैवाने कोणत्याही पुराव्याविना खोटे आरोप केले जात आहेत. दबावापोटी सनातन संस्थेसारख्या चांगल्या संघटनेवर गोव्यात कोणतीही कारवाई करू नये, अशी मागणी करणारे निवेदन गांजे येथील कला सांस्कृतिक आणि प्रगती मंचने गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना फोंड्याच्या उपजिल्हाधिकार्‍यांकरवी पाठवून दिले आहे.

सिरियामध्ये ख्रिस्ती धर्मप्रसारकाच्या मुलाला आय.एस्.आय.एस्.ने वडील आणि अन्य ख्रिस्ती यांच्यासमोर सुळावर लटकवले

छोट्यामोठ्या घटनांवरून हिंदूंना आतंकवादी ठरवणारे धर्मनिरपेक्षवाले आणि प्रसिद्धीमाध्यमे 
क्रूरतेची परिसीमा गाठणार्‍या या घटनांविषयी गप्प का ? या जिहादविषयी प्रसिद्धीमाध्यमे 
चर्चा घडवून का आणत नाहीत ? त्यांवर बंदी घालण्याची मागणी करतांना 
त्यांचे ओठ का शिवले जातात ?
     रक्का - सिरियामध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणार्‍या एका ख्रिस्ती व्यक्तीच्या १२ वर्षांच्या मुलाला आय.एस्.आय.एस्. या आतंकवादी संघटनेने त्याच्या वडिलांसमोर आणि अन्य ख्रिस्त्यांसमोर सुळावर चढवले. अलेप्पोच्या जवळ असणार्‍या गावातील या मुलाला मारण्यापूर्वी जिहाद्यांनी त्याची बोटे कापली. त्याला अत्यंत क्रूरपणे मारहाण केली आणि त्यानंतर त्याला ठार मारून सुळावर लटकवले. आतंकवादी या ठिकाणी नागरिकांना बलपूर्वक ख्रिस्ती धर्म सोडून मुसलमान धर्म स्वीकारायला भाग पाडत आहेत. सुळावर लटकवण्यात आलेल्या १२ वर्षांच्या मुलाचे वडील सिरियाच्या मिनिस्ट्रीमध्ये टीम लीडर (प्रचारप्रमुख) आहेत. त्यांनी या परिसरात ९ चर्च उभारले आहेत. सर्व ख्रिस्ती लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी जिहाद्यांनी आधी या मुलाची बोटे कापली आणि त्या मुलाला बेदम मारहाण केली. त्यानंतर मुलाच्या वडिलांसमोर इस्लाम धर्म स्वीकारण्याची अट ठेवली. वडिलांनी धर्म पालटण्यास नकार दिल्यानंतर एकूण तीन जणांसह त्या मुलाची हत्या केल्यानंतर त्यांचे मृतदेह सुळावर लटकवण्यात आले.

इंग्लंडमधील श्री बालाजी मंदिराच्या आवारात सात धर्मांची स्मारके उभारण्याचा प्रकल्प

असे प्रकल्प मशीद किंवा चर्च यांनी राबवल्याचे कधी ऐकिवात आहे का ?
फोरम फॉर हिंदु अवेकनिंगचा विरोध
      लंडन - इंग्लंडमधील श्री बालाजी मंदिराच्या सेवन फेथ हिल्स (सात टेकड्यांचा समूह) प्रकल्पाला हिंदूंनी तीव्र विरोध दर्शवला आहे. सेवन फेथ हिल्स प्रकल्पानुसार बौद्ध, ख्रिस्ती, इस्लाम, जैन, ज्यू, शीख आणि झोरास्ट्रियन या धर्मांशी संबंधित ७ स्मारके श्री बालाजी मंदिराच्या आवारात उभारण्यात आली आहेत. (हिंदु धर्माशी संबंधित स्मारके चर्च किंवा मशीद यांमध्ये उभारण्यात आल्याचे एक तरी उदाहरण आहे का ? - संपादक) इंग्लंडमधील जागरूक हिंदूंनी फोरम फॉर हिंदु अवेकनिंगला पत्र पाठवून हा प्रकल्प हिंदू आणि हिंदु धर्म यांना हानीकारक असल्याचे कळवले होते. त्याला अनुसरून फोरम फॉर हिंदु अवेकनिंगने श्री बालाजी मंदिराचे अध्यक्ष डॉ. व्ही.पी. नारायण राव यांना पत्र पाठवून मंदिराच्या आवारात सेवन फेथ हिल्स प्रकल्प योग्य नसल्याचे कळवले होते; परंतु मंदिर व्यवस्थापनाने त्याकडे दुर्लक्ष केले. 
     धर्माभिमानी हिंदू पूजा-अर्चा करण्यासाठी मंदिरात एकत्र येतात. त्या ठिकाणी इतर धर्मांची स्मारके उभारणे, म्हणजे हिंदु मंदिराचा उद्देशच नष्ट करणे होय. हिंदु मंदिराच्या आवारात इतर धर्मांची स्मारके उभारणे, म्हणजे धर्मांतर, लव्ह जिहाद, लँड जिहाद, मांसाहार यांसारख्या हिंदुविरोधी कारवायांना निमंत्रण देण्यासारखे आहे, असे हिंदूंनी म्हटले आहे.

महिलांना गुलाम बनवून ठेवल्यानेच मुसलमान मागे ! - कुलगुरु झमीर शाह

महिला स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदु धर्माला लक्ष्य करणारे याविषयी मौन का बाळगतात ? 
    लखनऊ - इस्लाम धर्मात महिलांना गुलाम बनवून ठेवल्यानेच मुसलमान विकासात पिछाडीवर आहेत, असे परखड मत अलीगढ मुस्लिम विद्यापिठाचे कुलगुरु आणि निवृत्त लेफ्टनंट जनरल झमीर उद्दीन शाह यांनी व्यक्त केले आहे. 
    लखनौमधील एका कार्यक्रमात उपस्थित मुसलमानांना उद्देशून लेफ्टनंट जनरल झमीर उद्दीन शाह म्हणाले, तुम्ही तुमच्या अर्ध्याहून अधिक लोकसंख्येचा काहीच वापर करत नाही, महिलांना घरात गुलाम म्हणून ठेवले जाते. त्यामुळे तुम्हीदेखील गुलाम बनला आहात. इराण आणि तुर्की वगळता सर्वच मुसलमान देशांमध्ये महिलांना गुलाम बनवून ठेवले जाते आहे. मुसलमान हे वर्षातील ११ मासच काम करतात, रमझानच्या महिन्यात ते कामच करत नाहीत. तसेच साधारणतः आठवड्यातील अडीच दिवस ते काम करत नाहीत. शुक्रवारी ते नमाजच्या सिद्धतेत असतात. मुसलमानांनी शिक्षण सोडले. समाजातही अंतर्गत कलह आहे. धर्माच्या आधारे भेदभाव होत आहे आणि याचा फटका अलीगढ मुस्लिम विद्यापिठालाही बसतो आहे.

संमोहनक्षेत्रातील भोंदूबाबा श्याम मानव यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार !

कल्याण येथे संघटित झालेल्या आधुनिक वैद्यांची पत्रकार परिषद !
अधिवक्ता विवेक भावे, आधुनिक वैद्य उपेंद्र डहाके, आधुनिक वैद्य संदीप पगारे
     कल्याण - श्याम मानव हे संमोहनक्षेत्रातील बुवा आहेत, असे मी नव्हे, तर अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील अग्रेसर असलेले नरेंद्र दाभोलकर यांनीच त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवले आहे. श्याम मानव यांनी वैद्यकीय शास्त्राचा कोणताही अभ्यास केलेला नाही, तसेच ते या क्षेत्रातील स्वयंघोषित संमोहनतज्ञ म्हणून समाजामध्ये मिरवत आहेत. संमोहनाद्वारे व्यक्तीकडून खून करवून घेऊन नंतर त्याच्या मेंदूतील त्या घटनेशी निगडित स्मृती पुसून टाकता येऊ शकतात आणि आरोपीला कितीही मारले, तरी त्याला ती घटना आठवणार नाही,

साध्वी प्राची यांना दादरीत प्रवेश करण्यास पोलिसांची बंदी !

     दादरी (उत्तरप्रदेश) - विश्‍व हिंदु परिषदेच्या साध्वी प्राची यांना पोलिसांनी दादरी येथेे प्रवेश करण्यास बंदी घातली असून त्यांना तात्पुरते कह्यात घेतले आहे. महंमद अखलाक या मुसलमानाने गोमांस बाळगल्याच्या संशयावरून दादरीमधल्या बिसखेडा गावातील वातावरण कमालीचे तणावपूर्ण झाले असून त्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न होत आहे. सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी दादरीमधल्या या दुर्दैवी कुटुंबाला भेट दिली असून आधीच गावात धार्मिक दुही निर्माण होत आहे. त्यात भर म्हणून साध्वी प्राची यांनी दादरीला भेट देणार असल्याचे घोषित केले. धार्मिक तेढ निर्माण होऊ नये, यासाठी कुणाचीही गय करू नका, असे स्पष्ट निर्देश केंद्रशासनाने उत्तरप्रदेश शासनाला दिले आहेत. (दादरीत असदुद्दिन ओवैसी यांना प्रवेश देणारे उत्तरप्रदेश शासन हिंदुत्ववादी साध्वी प्राची यांना बंदी घालते. यावरून शासनाचा हिंदुद्रोह दिसून येतो !- संपादक)

देहली येथे संतकृपा प्रतिष्ठानच्या वतीने वह्यावाटप

डावीकडून शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ. ज्योती शर्मा,
मुख्याध्यापिका सौ. कृष्णा भाटी आणि वह्या वाटक
करतांना संतकृपा प्रतिष्ठानचे श्री. सुदर्शन गुप्ता
     देहली - संतकृपा प्रतिष्ठानच्या वतीने संगम विहारमधील आस्था पब्लिक स्कूल या शाळेत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी २८ सप्टेंबर या दिवशी वह्या वाटण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या वह्या शाळेच्या मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापिका आणि प्रतिष्ठानचे कार्यकर्ते श्री. सुदर्शन गुप्ता यांच्या हस्ते वाटण्यात आल्या. याबरोबरच स्वत:मध्ये राष्ट्राभिमान कसा निर्माण करावा ?, याविषयी श्री. गुप्ता यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

गोव्यात अमली पदार्थांच्या अतीसेवनाने युवती बेशुद्ध

शासन अमली पदार्थ विक्रेत्यांवर कठोर कारवाई का करत नाही ?
आरोपी शमीम महंमद आणि अमली पदार्थ पुरवणार्‍याला अटक
     म्हापसा - मूळची रायगड, महाराष्ट्र येथील आणि गोव्यात मित्रांसोबत आलेली २० वर्षीय युवती अमली पदार्थांच्या अतीसेवनाने बेशुद्ध झाल्याच्या प्रकरणी पोलिसांनी युवतीचा मित्र शमीम महंमद अन् अमली पदार्थ पुरवणारा तुकाराम यांना अटक केली आहे.
    पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उपरोल्लेखित युवती मित्रांसोबत हणजूण येथील एका गेस्ट हाऊसमध्ये रहात होती. शनिवारी युवतीने तिचा गोव्यातील मित्र तथा एक आरोपी शमीम महंमद (वय ३० वर्षे) याला संपर्क साधून गेस्ट हाऊसमध्ये भेटण्यास बोलावले. युवती आणि महंमद गेस्ट हाऊसमध्ये राहिले अन् तिचे अन्य मित्र एका पार्टीसाठी बाहेर गेले. या वेळी आरोपी महंमद याने हणजूण येथील अमली पदार्थांचा पुरवठा करणारा तुकाराम याला संपर्क साधला आणि त्याच्याकडून अमली पदार्थ विकत घेतले. युवतीने अमली पदार्थांचे अतिसेवन केल्याने ती बेशुद्ध पडली. युवतीचे मित्र पार्टी करून आल्यानंतर त्यांना हा प्रकार लक्षात आला. युवतीला यानंतर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले आणि युवतीच्या पालकांना बोलवण्यात आले आहे. पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली.

पैसे घेऊन मतदान करणे चुकीचे नाही ! - बिहारच्या ८० टक्के मतदारांचे मत

यथा राजा तथा प्रजा ही म्हण किती सार्थ आहे, हे या सर्वेक्षणावरून दिसून येते. 
ही स्थिती पालटण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे ! 
     पाटलीपुत्र (पाटणा) - बिहारमधील ८० टक्के मतदारांना पैसे घेऊन मतदान करणे चुकीचे वाटत नाही, असा निष्कर्ष एका सर्वेक्षणातून समोर आला आहे. बिहार निवडणूक आयोगाचे अतिरिक्त निवडणूक अधिकारी आर्. लक्ष्मणन् यांनी चंद्रगुप्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या साहाय्याने राज्यात नुकतेच एक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाकरिता विविध मतदारसंघातील साडे चार सहस्र मतदारांचे सर्वेक्षण करून त्यांची मते जाणून घेण्यात आली.

(म्हणे) सनातनचे शालेय उपक्रम घटनेच्या विरोधात !

शाळांमध्ये जातीयवादी आणि धर्मद्रोही उपक्रम राबवणार्‍या अंनिसचा कांगावा !
     सनातनने बालसंस्कार उपक्रमाच्या अंतर्गत रायगड जिल्ह्याच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना उपयुक्त असे अभ्यास कसा करावा ?, विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास कसा करावा ? आदी सूत्रांच्या अनुषंगाने शिक्षकांच्या प्रवचनासाठी जिल्हापरिषदेकडे निवेदन दिले होते. यात अंनिसला घटनाविरोधी काय दिसले ? प्रत्यक्षात अंनिस शाळांमध्ये वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प या नावाखाली सरस्वतीचे चित्र नको, सावित्रीबाई फुलेंचे चित्र ठेवा, विद्यार्थ्यांना स्मशानात घेऊन जा अशा प्रकारचे जातीयवादी आणि धर्मद्रोही उपक्रम राबवत असल्याने शासनाने ते उपक्रम राबवण्यास त्यांच्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे अंनिसला उठलेला हा पोटशूळ आहे, असे म्हटल्यास त्यात चूक ते काय ?

लवासा आस्थापनाला हस्तांतरित केलेली आदिवासींची १९१ एकर भूमी राज्य शासनाकडे परत देण्याचे आदेश

     पुणे - विविध कारणांमुळे वादग्रस्त ठरलेल्या लवासा कॉर्पोरेशनकडे हस्तांतरित करण्यात आलेली आदिवासींची मुळशी (जिल्हा पुणे) येथील १९१ एकर भूमी त्यांना परत करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी सुभाष बोरकर यांनी नुकतेच दिले. ही भूमी बेकायदेशीररीत्या हस्तांतरित झाल्याचेही या आदेशाने स्पष्ट झाले आहे. लवासासाठी हा मोठा धक्का आहे. (शितावरून भाताची परीक्षा यानुसार लवासात अन्य किती अनधिकृत गोष्टी असतील, हे देवच जाणे ! उघड झालेल्या या एका उदाहरणामधून लवासा प्रकल्पातील अन्य अनधिकृत गोष्टींची पाळेमुळे बाहेर काढण्याची धमक शासन दाखवणार का ? - संपादक)

बजरंग दलाचे संभाजी साळुंखे आणि महेश उरसाल यांची महापालिका निवडणुकीतून माघार !

     कोल्हापूर, ७ ऑक्टोबर (वार्ता.) - बजरंग दलाचे जिल्हाप्रमुख श्री. बंडा उपाख्य संभाजी साळुंखे आणि शहरप्रमुख श्री. महेश उरसाल यांनी त्यांच्या वरिष्ठ नेत्यांच्या विनंतीला मान देऊन महापालिकेच्या निवडणुकीतून माघात घेतली आहे. श्री. साळुंखे हे प्रभाग क्रमांक ४९ आणि श्री. महेश उरसाल हे प्रभाग क्रमांक ४८ मधून निवडणूक लढवणार होते. ३ ऑक्टोबर या दिवशी सर्व दैनिकांतून 'हिंदुत्ववादी संघटना निवडणुकीच्या रिंगणात' या प्रसिद्ध झालेल्या वृत्तात नजरचुकीने बजरंग दलाच्या पदाधिकार्‍यांची नावे प्रसिद्ध झाली आहेत. वास्तविक त्या पत्रकार परिषदेला बजरंग दलाचा कोणताही पदाधिकारी उपस्थित नव्हता, अशी माहिती श्री. संभाजी साळुंखे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. 

सनातन संस्थेला ठाणे येथील हिंदुत्ववाद्यांचा जाहीर पाठिंबा !

जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी
     ठाणे - सनातन संस्थेला पाठिंबा दर्शवण्यासाठी येथील हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. अश्‍विनी जोशी यांना निवेदन देण्यात आले. या वेळी भाजप, अखिल भारतीय हिंदु महासभा, श्री संत गाडगेबाबा ग्राम सफाई आणि व्यसन मुक्त केंद्र, योग वेदांत सेवा समिती, हिंदु जनजागृती समिती, वनवासी राम मंदिर, विजय नगर उत्सव समिती, विश्‍व हिंदु परिषद, आरसीएफ् कर्मचारी सेना, अखिल राष्ट्रीय मुन्सिपल कर्मचारी महासंघ, बास्फ कामगार संघटन, भाजप दक्षिण भारतीय संघ, शिवसम्राट मित्र मंडळ आणि संध्या छाया सेवाश्रम यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

नालासोपारा येथे हिंदुत्ववादी संघटनांकडून सनातन संस्थेला जाहीर पाठिंबा

प्रांताधिकार्‍यांना निवेदन देतांना हिंदु संघटनांचे कार्यकर्ते
सनातन संस्थेला पाठिंबा देणार्‍या हिंदुत्ववाद्यांचे आभार !
      नालासोपारा - सनातन संस्था अध्यात्मप्रसार करणारी आणि राष्ट्रप्रेमी संस्था असून कॉ. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी सनातन संस्थेचे साधक श्री. समीर गायकवाड यांना केवळ संशयावरून अटक केली आहे. त्यांच्या वरील आरोप सिद्ध होणे बाकी असतांना सनातनवर बंदी घाला, अशी मागणी स्वतःला पुरोगामी म्हणणारे आणि काही राजकीय पक्ष करत आहेत, या मागणीचा नालासोपारा येथील विविध हिंदुत्ववादी संघटनांनी निषेध केला आहे, तसेच सनातन संस्थेस जाहीर पाठिंबा दिला आहे. या संदर्भात ३ ऑक्टोबरला वसईचे प्रांत अधिकारी श्री. दातकर यांना निवेदन देण्यात आले.

पुणे येथे दिवाळीत मोठ्या आवाजाच्या फटाक्यांवर पोलिसांकडून बंदी !

  • राष्ट्र संकटात असतांना दिवाळीमध्ये फटाके वाजवणे, म्हणजे पैशांचा चुराडाच !
  • फटाक्यांचे शारीरिक आणि मानसिक भयावह दुष्परिणाम जाणून त्याच्या निर्मितीवरच बंदी घाला !
      पुणे, ७ ऑक्टोबर - आगामी दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर पुणे पोलिसांनी यंदाही मोठ्या आवाजाच्या फटाक्यांवर निर्बंध घातले आहेत. ध्वनीप्रदूषण करणार्‍या फटाक्यांवर रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत बंदी घालण्याचे आदेश पोलीस आयुक्त के.के. पाठक यांनी दिले आहेत.
     सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ध्वनीप्रदूषण करणार्‍या फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. १२५ डेसिबल आवाज निर्माण करणार्‍या फटाक्यांचे उत्पादन, विक्री आणि वापर यांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच १०० पेक्षा जास्त फटाके असलेल्या साखळी फटाक्यांची विक्री आणि वापर यांवर बंदी घालण्यात आली आहे. रुग्णालय, शैक्षणिक संस्था, न्यायालयाच्या १०० मीटर अंतराच्या आत फटाके उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. या नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी केले आहे.

छेडछाडीला कंटाळून अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

     बुलढाणा - दोन तरुण करीत असलेल्या सततच्या छेडछाडीला कंटाळून शेगाव येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणार्‍या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. विशेष म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी ऐश्‍वर्याने स्वतःचा एम्एम्एस्ही (चलचित्राचा लघुसंदेश) बनवून आरोपींना पाठवला होता.
१.आत्महत्या केलेल्या तरुणीच्या भ्रमणध्वनीवर वारंवार लघुसंदेश पाठवणे, छेडछाड करून त्रास देणे, असा या टोळक्याचा नित्यक्रम होता. यालाच कंटाळून या मुलीने गळफास घेण्याचा निर्णय घेतला.
२. पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले, तेव्हा तिचा गळफास लावतांनाचा एम्एम्एस् त्यांच्या हाती लागला.
३. आरोपी मुलीला सतत मानसिक त्रास देत असत, तिला अश्‍लील संदेश करत असत, तसेच एकदा तिला बलपूर्वक गाडीत बसवून त्रास दिल्याचा आरोपही तिच्या कुटुंबियांनी केला आहे.

पुरातन लेखी पुराव्यांनुसार 'अंबाबाई'पेक्षा 'श्री महालक्ष्मी' या नावाचा अनेकदा उल्लेख ! - राष्ट्रीय मोडी इतिहास प्रबोधिनीचे अध्यक्ष उदयसिंह राजेयादव

'करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीची मोडी 
कागदपत्रे (खंड १)' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा 
     कोल्हापूर, ७ ऑक्टोबर (वार्ता.) - पुरातन लेखी पुराव्यांमध्ये अंबाबाईपेक्षा 'श्री महालक्ष्मी' या नावाचा अनेकदा उल्लेख केला आहे. त्यामुळे 'श्री महालक्ष्मी' असाच उल्लेख करणे अपेक्षित आहे, असे मत राष्ट्रीय मोडी इतिहास प्रबोधिनीचे अध्यक्ष उदयसिंह राजेयादव यांनी सांगितले. श्री. उदयसिंह राजेयादव लिखित 'करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीची मोडी कागदपत्रे (खंड १)' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ३ ऑक्टोबर या दिवशी शिवाजी विद्यापिठात झाला. या वेळी ते बोलत होते. 

सांगली येथे सनातन प्रभातचा सत्यकथन विशेषांक पाहून व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया

१. श्री. राजू खुर्द, शिराळा - आम्हाला सामाजिक संकेतस्थळांवरून तुमचे संदेश मिळतात. दूरचित्रवाहिनीवर अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी चर्चासत्रात दिलेली उत्तरे पाहून मी प्रभावित झालो. एका हिंदूंच्या मागे ३१ अधिवक्ते उभे रहातात, हीच मोठी घटना आहे. आजपर्यंत असे झालेले नव्हतेे. 

तोंड आहे म्हणून फुकटचे सल्ले देत सुटलेले जातीयवादी प्रा. जोगेंद्र कवाडे (म्हणे) शासनाने सनातनची उच्चस्तरीय चौकशी करावी !

आझाद मैदानावरील दंगलीनंतर रझा अकादमीच्या
संदर्भात प्रा. कवाडे यांनी अशी मागणी केल्याचे ऐकिवात नाही !
      श्रीरामपूर (नगर), ७ ऑक्टोबर - सनातन संस्था सैतानी प्रवृत्तीची आहे कि नाही, याचा छडा लावण्याचे काम शासनाचे आहे. शासनाने उच्च पातळीवर सनातनची चौकशी करावी, अशी सनातनद्वेषी मागणी पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केली. (सनातन संस्थेच्या विरोधात एकही आरोपपत्र दाखल नाही आणि संस्थेचे कार्य पारदर्शी आहे. देशातील एकही पोलीस यंत्रणा अशी नाही, जिने आतापर्यंत सनातनची चौकशी केलेली नाही. त्यामुळे उच्चस्तरीय चौकशी करायची कि नाही, ते शासन ठरवेल. कवाडे यांचे फुकटचे सल्ले हवेत कुणाला ? - संपादक) येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी मंगल कार्यालयात पिपल्स रिपब्लिकन पक्षाचा जिल्हाव्यापी मेळावा पार पडला.

ग्रामस्थांनी गाड्या अडवल्यास पोलीस बंदोबस्तात कचरा टाकणार - महानगरपालिका आयुक्त

पुणे येथील कचर्‍याची समस्या 
     पुणे, ७ ऑक्टोबर - फुरसुंगी कचरा डेपोवर महानगरपालिकेच्या कचर्‍याच्या गाड्या अडवण्यास फुरसुंगी-उरळीदेवाची येथील ग्रामस्थांना राष्ट्रीय हरित लवादाने मज्जाव केला आहे. त्यानंतरही ग्रामस्थांनी महानगरपालिकेच्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न केल्यास शहरातील कचरा पोलीस बंदोबस्तात कचरा डेपोवर टाकला जाईल. त्यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांना पत्र पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. (आजपर्यंतच्या सर्वपक्षीय राज्यकर्त्यांना पुण्यातील कचर्‍याची समस्या सोडवता आली नाही. जे राज्यकर्ते ही समस्या सोडवू शकत नाहीत, ते आतंकवादासारख्या भीषण समस्या काय सोडवणार ? यावरूनच लोकशाहीची निरर्थकता स्पष्ट होते. - संपादक) 

(म्हणे) 'मोदी शासन हिंदु राष्ट्राचा कार्यक्रम राबवत आहे !'

हिंदु राष्ट्राचा पोटशूळ असलेले समाजवादी नेते भाई वैद्य यांचे वक्तव्य 
     पुणे, ७ ऑक्टोबर - इतिहासात या देशात औरंगजेबाने इस्लाम, सम्राट अशोकाने बौद्ध, छत्रपती शिवाजी महाराज यांनी 'हिंदु राष्ट्र' कधीही म्हटले नाही. (धादांत खोटे बोलणारे भाई वैद्य ! छत्रपती शिवाजी महाराज यांच्या खर्‍या चरित्राचा अभ्यास केल्यावरच वैद्य यांना कळेल की, महाराजांनी हिंदवी स्वराज्यच स्थापन केले होते. - संपादक) या देशात शांतता नादत होती, पण मोदी शासन सत्तेत आल्यापासून या देशाला धर्माच्या नावाने 'हिंदु राष्ट्र' निर्माण करण्यासाठी कार्यक्रम राबवत आहे. नेपाळमध्ये संसदेने धर्मनिरपेक्षता स्वीकारली आहे; परंतु मोदींनी नेपाळच्या जनतेला शुभेच्छा दिल्या नाहीत, याचा विचार आपण करावा. संविधानामुळेच देश एकसंध असून हे राष्ट्र धर्मनिरपेक्ष असल्याचे प्रतिपादन माजी गृहराज्यमंत्री आणि ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी व्यक्त केले. 

बेळगाव येथे समाजकंटकांकडून भगव्या ध्वजाची विटंबना

     बेळगाव - हुंचेनहट्टी रस्त्यावरील जयनगर मच्छे येथील बजरंग दलाचा फलक समाजकंटकांनी उखडून त्यावर लावलेल्या भगव्या ध्वजाची ४ ऑक्टोबरच्या पहाटे विटंबना केली. ग्रामीण पोलिसांनी शांततेचे आवाहन करत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. गेल्या २० वर्षांपासून हा फलक तेथे होता. 

उप कारागृहातील पोलिसांना मारहाण करून ३ बंदीवानांचे पलायन

      लातूर - उदगीरच्या उप कारागृहात पोलिसांना मारहाण करून तीन बंदीवानांनी पलायन केल्याचे समोर आले आहे. त्यापैकी मंगेश जाधव याला पकडण्यात आले असून दिनेश कांबळे आणि हसन शेख फरार आहेत. एका बंदीवानाने पोटात दुखत असल्याचे सांगून कारागृहातील खोलीचा दरवाजा उघडण्यास सांगितला. पोलिसांनी दरवाजा उघडताच त्यांना मारहाण करून ३ बंदीवान पळून गेले.

बालगुन्हेगारीमध्ये महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक !

बालगुन्हेगारी कठोरात कठोर शिक्षा आणि धर्मशिक्षण
दिल्यासच अल्प होऊ शकते. त्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक आहे. 
जय जय महाराष्ट्र माझा !
     पुणे, ७ ऑक्टोबर - देशातील गुन्हेगारीचा नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो २०१४ अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार गेल्या काही वर्षांत बालगुन्हेगारीचे प्रमाण वाढले असल्याचे आढळले आहे. त्याचसमवेत बालगुन्हेगारांवर प्रविष्ट झालेल्या एकूण गुन्ह्यांमध्ये बलात्काराचे गुन्हे सर्वाधिक असल्याचेही समोर आले आहे. देशात मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र येथे सर्वाधिक बालगुन्हेगारांवर गुन्हे प्रविष्ट झाले आहेत. मध्यप्रदेशात बालगुन्हेगारीचे ६ सहस्र ३४६, तर महाराष्ट्रात ५ सहस्र १७५ गुन्हे प्रविष्ट आहेत. एकूण गुन्हेगारीत बालगुन्ह्यांचे हे प्रमाण १.५ प्रतिशत आहे. बिहार आणि आणि उत्तरप्रदेश या राज्यांचा अनुक्रमे तिसरा आणि चौथा क्रमांक लागतो.

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंनो, स्वसंरक्षणासाठी संघटित व्हा ! 
     उत्तरप्रदेशातील दादरी येथील अखलाकच्या हत्येवरून अल् कैदा आणि आय.एस्.आय.एस्. या दोन्ही आतंकवादी संघटनांसाठी काम करणार्‍या आतंकवाद्यांनी 'अखलाकच्या हत्येचा प्रतिशोध घेऊ', अशी चेतावणी दिली आहे.

(म्हणे) याकूब मेमनवर कारागृहात झालेला व्यय राष्ट्रीय गुपित !

महाराष्ट्राच्या गृहखात्याकडून याकूबवरील खर्चाची माहिती देण्यास नकार 
     मुंबई - माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. अनिल गलगली यांनी फासावर गेलेला आतंकवादी याकूब मेमन याच्यावर त्याच्या अटकेपासून ते त्याला फासावर लटकवण्यापर्यंत कारागृहात झालेल्या व्ययाविषयीची माहिती महाराष्ट्र शासनाकडे माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागितली होती; मात्र गृहखात्याचे प्रधान माहिती अधिकारी दीपक झाड्ये यांनी राष्ट्रीय सार्वभौमत्व, अखंडता आणि सुरक्षा या कारणास्तव ही माहिती देता येणार नाही, असे श्री. गलगली यांना कळवले.
    या संदर्भात आश्‍चर्य व्यक्त करतांना श्री. गलगली म्हणाले, तत्कालीन काँग्रेस शासनाने आतंकवादी अजमल कसाब याच्याविषयी अशी माहिती बिनतक्रार दिली होती. यावरून केंद्रातील शासन पालटल्यावर कायदेही पालटतात, असे दिसून येते. कारागृहात झालेला व्यय हा जनतेच्या पैशातून केला जातो. त्याचा हिशेब देणे, हे शासनाचे कर्तव्य आहे. अजमल कसाबवर त्याच्या सुरक्षेसह २८ कोटी ५० लक्ष रुपये व्यय झाले होते. शासनाने समीर गायकवाडला निर्दोष ठरवू नये ! - राधाकृष्ण विखे-पाटील

      गृहराज्यमंत्र्यांनी समीर गायकवाड याला निदोॅष ठरविणे, ही धक्कादायक गोष्ट आहे. त्यामुळे गोपनीयतेच्या शपथीचा भंग झाला आहे. याद्वारे आरोपीला अभय देण्याचा प्रयत्न होत आहे. यामुळे पोलिसांचे मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न ही मंडळी करीत आहेत, असे विधान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.
समीर गायकवाड गुन्हेगार आहे कि नाही, हे ठरवणारे गृहराज्यमंत्री कोण ? - धनंजय मुंडे
      सनातनची हे उघडपणे बाजू घेत आहेत. यांच्या राज्यात पुरोगामी विचारवंत सुरक्षित रहातील, याची खात्री देता येऊ शकत नाही.

वाई येथील हिंदुत्ववाद्यांचा सनातनला एकमुखी पाठिंबा

प्रांताधिकार्‍यांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी
      सातारा, ७ ऑक्टोबर (वार्ता.) - वाई येथील समस्त हिंदुत्ववादी संघटनांनी राष्ट्रप्रेमी सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीच्या मागणीचा जाहीर निषेध व्यक्त करून सनातनला एकमुखी पाठिंबा जाहीर केला आहे. या वेळी वाई येथील प्रांताधिकारी श्री. रवींद्र खेबुडकर यांना निषेध निवेदन देण्यात आले.
    निवेदन देण्यासाठी भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष श्री. काशिनाथ शेलार, वाई शहराध्यक्ष श्री. वसंत शिंदे, प्रदेश सदस्य श्री. अविनाश फरांदे, श्री. सचिन घाटगे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. संदीप जायगुडे, श्री. अमित सोहनी, श्री. स्वप्नील भिलारे, प्रतापगड उत्सव समितीचे श्री. विवेक भोसले, श्री. संजय सणस, हिंदु जनजागृती समितीचे सौ. स्मिता भोज, श्री. सोपान साळुंखे, सौ. सुनीता वनारसे, सौ. शोभा सकुंडे, तेजस वनारसे आदी मान्यवर उपस्थित होते.

धर्मांध आरोपीने शिक्षा ऐकल्यावर न्यायाधिशांवर पुस्तक भिरकावले !

      पुणे, ७ ऑक्टोबर - हिंजवडी येथील एका व्यक्तीवर धारदार शस्त्राने वार आणि मारहाण करून खून केल्याप्रकरणी धर्मांध मुस्तफा शेख, रियाझ गयाज शेख, मुबारक पठाण यांना पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणी शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात अंतिम सुनावणी झाली. त्या वेळी सत्र न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांनी त्या सर्वांना जन्मठेप आणि प्रत्येकी २ सहस्र रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ही सुनावलेली शिक्षा ऐकताच धर्मांध आरोपी मुस्तफा शेख याने न्यायाधिशांच्या समोर असलेले पुस्तक उचलून त्यांच्या अंगावर भिरकावले. (चोर तो चोर वर शिरजोर असाच हा प्रकार झाला. - संपादक)

हिंदू तेजा जाग रे !

Jago : 

Dadri hatyaka pratishodh leneki ISIS aur Al-Kaidaki dhamki.
 - Hindu es atankionka samana kaise kar payenge ? 

जागो ! : 
दादरी हत्याका प्रतिशोध लेनेकी आय.एस्.आय.एस्. और अल् कैदाकी धमकी.
 - हिंदू इस आतंकिआेंका सामना कैसे कर पायेंगे ?

श्राद्धात पितरांना दिलेले अन्न त्यांच्यापर्यंत कसे पोहोचते ?

      हिंदु धर्माने सांगितलेल्या ईश्‍वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे देवऋण, ऋषिऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी श्राद्ध आवश्यक असते. माता-पिता, तसेच निकटवर्तीय यांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी, यांसाठीचा संस्कार म्हणजेच श्राद्ध. श्राद्धातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते. पितरांना हविर्भाग दिला गेल्याने ते संतुष्ट होतात. श्राद्ध न केल्यास पितरांच्या इच्छा अतृप्त राहिल्यामुळे, तसेच वासनायुक्त पितर वाईट शक्तींच्या नियंत्रणात जाऊन त्यांचे दास (गुलाम) झाल्याने वाईट शक्तींनी पितरांचा उपयोग करून कुटुंबियांना त्रास देण्याची शक्यता असते. श्राद्धामुळे पितरांची या त्रासांतून मुक्तता होऊन आपले जीवनही सुसह्य होते.
     २८ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर २०१५ या कालावधीत पितृपक्ष आहे. त्यानिमित्त आजच्या भागात श्राद्धविधी संदर्भातील काही माहिती पाहूया.

पत्रकारितेतील दोष

कु. स्नेहा जोशी
      १६ सप्टेंबर या दिवशी सांगलीतील श्री. समीर गायकवाड यांना अटक झाल्याची बातमी सर्व वृत्तवाहिन्यांवर विविध मथळ्यांखाली झळकली. या वृत्तांमधील ओळी अशा प्रकारे झळकत होत्या की, क्षणभर वाटावे न्यायालयाने श्री. समीर गायकवाड यांना दोषी असल्याचा निकाल दिला आहे आणि त्याला संस्थाही उत्तरदायी आहे. तसे पहायला गेले, तर कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता वृत्तवाहिन्यांवर वृत्ते प्रसिद्ध होत असलेली दिसतात. ही वृत्ते केवळ एका दिवसापुरती असतात. पुढे त्या घटनेचे काय झाले, याविषयी या वृत्तवाहिन्यांना काही देणे-घेणे नसते. त्यातच एखादी हिंदुत्ववादी, धार्मिक संस्था, संघटना असेल, तर काय विचारता ?

खरा खुनी सापडला नाही, तरी बेहत्तर ! अशी भूमिका असलेले पानसरे-दाभोलकर यांचे पाठीराखे !

श्री. भाऊ तोरसेकर
      लागोपाठ तीन डाव्या विचारवंत व्यक्तींची हत्या झाल्यामुळे अलीकडे सनातन या संस्थेवर पुरोगामी आक्रमणे सातत्याने चालू आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन कार्यात गुंतलेल्यांच्या विरोधात पहिल्यापासून सनातन ही एकमेव हिंदु संघटना मैदानात असल्याने त्यांच्याकडेच संशयाने बघितले जाणेही स्वाभाविकच आहे; पण नुसत्या संशयाच्या आधारावर कुठल्या कायदेशीर कारवाया होत नसतात. म्हणूनच या तिन्ही हत्याकांडांचा तपास बारगळला आहे; कारण त्यात पोलिसांचे काम अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांच्या मागणीनुसार तत्त्वानुसार व्हायला हवे, असा हट्ट आहे. मग भले खरा खुनी सापडला नाही, तरी बेहत्तर ! अशी पानसरे-दाभोलकर यांच्या पाठीराख्यांची भूमिका आहे. 

तणावमुक्तीसाठी साधना करा !

       जागतिक आरोग्य संघटनेने १० ऑक्टोबर या दिवशी साजर्‍या होणार्‍या मानसिक आरोग्य दिनानिमित्त चला मोकळेपणाने बोलूया, मानसिक आरोग्याला प्रतिष्ठा देऊया, असे घोषवाक्य ठरवले आहे. याविषयी जनजागृती होण्यासाठी महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या वतीने प्रबोधनपर चित्रपट दाखवणे, रांगोळी, चित्रपट स्पर्धा, व्याख्याने, पथनाट्य आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. भारत शासनाच्या आकडेवारीनुसार ६ ते ७ टक्के लोक मानसिक रोगाने त्रस्त आहेत आणि यांतील जवळजवळ ९० टक्के लोक उपचाराविना रहात आहेत. सध्याच्या दिवसेंदिवस वाढणार्‍या रॅट रेसमध्ये मानसिक ताणतणाव आणि त्यातून निर्माण होणारा मानसिक दुबळेपणा आबालवृद्धांमध्ये वाढतांना आढळून येत आहे. या विकाराकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर मानसिक दुर्बलता हा विश्‍वातील सर्वात मोठा आजार बनू शकेल, अशी भितीही अनेक तज्ञ व्यक्त करत आहेत.

भारताची सर्वच क्षेत्रांतील भयावह स्थिती

१. भारताची शिक्षण क्षेत्रातील भयानक स्थिती
     जगातल्या निरक्षरांपैकी ५० टक्के लोक भारतात आहेत. अधिकृत आकड्यानुसार ५०-६० टक्के मुले आठवीपर्यंत पोेहोचायच्या आतच शाळा सोडतात. आपल्याकडे आतापेक्षा ४ लक्ष शाळांची आणि १० पट शिक्षकांची आवश्यकता आहे. एका पहाणीत चौथीतल्या ५० टक्के मुलांना पहिलीतली साधी गणिते करता आली नाहीत. (आता दहावीपर्यंत परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलण्याच्या सरकारी नियमामुळे चौथीतल्या नाही, तर दहावीतल्या मुलांना पहिलीतली साधी गणिते सोडवता आली नाहीत, तरी आश्‍चर्य वाटू नये ! - संपादक) शासनाच्या अधिकृत आकड्यानुसार ७ वर्षांवरच्या जनतेतले ६५.४ टक्के लोक साक्षर आहेत. 

उज्जैनच्या महाकालेश्‍वरपासून इतर ११ ज्योतिर्लिंगांच्या अंतरात चमत्कारिक साम्य !

हिंदूंनो, हिंदु धर्म आणि संस्कृती जगात सर्वश्रेष्ठ अन् वैशिष्ट्यपूर्ण का आहे, 
हे जाणून घ्या आणि हिंदु संस्कृतीचा अभिमान बाळगा !
महाकालेश्‍वर ज्योतिर्लिंग
    उज्जैन - येथील महाकालेश्‍वर ज्योतिर्लिंग देवस्थान जगात प्रसिद्ध आहे. येथे वर्ष २०१६ मध्ये महाकुंभ सिंहस्थाचे आयोजन होणार आहे. या महाकालेश्‍वर ज्योतिर्लिंगासह देशात इतर ११ ज्योतिर्लिंगे आहेत. उज्जैनच्या महाकालेश्‍वरपासून या सर्व ज्योतिर्लिंगांच्या पूर्वीच्या अंतरावर लक्ष टाकल्यास त्यांच्या अंतरात एक चमत्कारिक साम्य आढळून येते. हे अंतर एक आकडी असल्याचे निदर्शनास आले आहे. अलीकडे नवीन मार्ग आणि वळणमार्ग यांची निर्मिती झाल्यामुळे त्यात अंशत: फरक पडला आहे.

फाईव्ह स्टार हॉटेल आवश्यक होण्याचे खरे कारण !

     तो काळ फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरण्याचा नव्हता. त्या वेळी घरातील आदरातिथ्य स्वीकारले जाई. आज ते नको असते; कारण हॉटेलमध्ये लेन-देन चालते. ती घरात कशी बरे चालणार ? बाई-बाटलीवाल्यांना तर नाहीच नाही ! - दादूमिया (संदर्भ : मासिक धर्मभास्कर, वर्षारंभ विशेषांक, मे २०१५) शासकीय सुट्यांमुळे होणारी हानी

शासकीय सुट्टीमुळे कर्मचार्‍यांच्या वेतनावर परिणाम न होणे; पण शासकीय कार्यालयावर
अवलंबून असलेल्यांना आर्थिक फटका बसणे
     केंद्र आणि राज्य शासनाच्या कार्यालयांजवळ असलेले चहाचे गाडे, लहान उपहारगृहे, फिरते स्टॉल, बुटपॉलीशवाले आदी व्यावसायिकांना प्रतिदिनच्या मिळकतीवर सायंकाळची चूल पेटवावी लागते; परंतु सलग अथवा एखाद-दुसरी सुटी आली, तर हा उद्योग बुडतो आणि उपासमारीची वेळ येते. शासनाच्या तिजोरीला झळ पोहोचली, तरी शासकीय नोकरांच्या वेतनावर काहीच परिणाम होत नाही; परंतु शासकीय कार्यालयावर अवलंबून असलेल्या कामगार, रिक्शा वाहतूक, कर्मचारी आदींना मात्र घरची चूल विझवण्याची पाळी येते. - विजय कलंत्री, अध्यक्ष, अखिल भारतीय उद्योग संघटना. (दैनिक गोमन्तक टाइम्स, २२.४.२०००) 
सुट्ट्यांविषयी हिंदु राष्ट्रातील दृष्टीकोन !
    हिंदु राष्ट्रात कौटुंबिक कामे करण्यासाठी साप्ताहिक सुटी असेल. इतर सुट्या नसतील. शासनाच्या कार्यालयांसह सर्व खाजगी आस्थापनांचे काम इतर सहा दिवस चालेल. काम / श्रम / सेवा, ही साधना आहे, हा दृष्टीकोन असल्याने अधिकारी अन् कर्मचारी केवळ आजार, मंगलकार्ये इत्यादी आवश्यक कारणांसाठी वैयक्तिक पातळीवर सुटी घेतील. तात्पर्य, सुटी हा अधिकार (हक्क) नसेल, तर सोय असेल.

भ्रष्ट राजकीय नेत्यांच्या सत्तापिपासू वृत्तीमुळे आपला देश आणि हिंदु धर्म यांची महाभीषण सद्यस्थिती निर्माण झालेली असणे

      अमेरिकी इन्स्टीट्यूट ऑफ वैदिक स्टडीजचे निर्देशक डेविड फ्रॉली यांनी लिहिले आहे, स्वातंत्र्यानंतर एकीकडे हिंदुविरोधी प्रचार वाढू लागला आणि दुसरीकडे साम्यवाद, इस्लाम, तसेच ख्रिस्ती या धर्माच्या प्रचाराद्वारे भारताचे तुकडे-तुकडे करण्याचे षड्यंत्र आखले गेले. यामुळे या देशाच्या समस्या बर्‍याच वाढल्या आहेत. भ्रष्ट राजकीय नेते हे तथाकथित उदार धर्मनिरपेक्षतावादी आहेत. आपले पद आणि सत्ता यांच्या लालसेने ते भारतीय हिंदु समाजाला जातीयवाद आणि धर्म यांच्या नावाखाली आपली मतपेढी वाढवण्यासाठी प्रेरित करतात अन् आपापसात द्वेष पसरवून आपला स्वार्थ साधतात.
    केरळमधील श्री गुरुवायूर देवस्थानातील निधी हा ४५ हिंदु मंदिरांच्या सुधारणेसाठी व्यय होण्याऐवजी शासनाच्या इतर योजनांवर व्यय करण्यात येतो. - स्टीफन नॅप (श्री नंदनानंद दास), लेखक, अमेरिका.

पेण (जिल्हा रायगड) येथे जनआंदोलन

विषय : सनातनवर होणारे अन्याय आणि बंदीची मागणी, तसेच स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद यांच्यावर आणि त्यांच्या भक्तांवर झालेला अन्यायकारक लाठीमार यांना विरोध करणे
वार : गुरुवार, दिनांक : ८ ऑक्टोबर
वेळ : सकाळी ११ ते दुपारी १
ठिकाण : पेण बस स्थानकासमोर, पेण
आयोजक : हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्ववादी संघटना
संपर्क क्रमांक : ८४५०९०७५३२

सनातनचे संत आणि साधक-साधिका यांचे आदर्श वर्तन पाहून रामनाथी आश्रम म्हणजे स्वर्गच असल्याचे अनुभवणारे कारंजा येथील श्री. संतोष परसवार !

श्री. संतोष परसवार
१. सनातनच्या संपर्कात आल्यानंतर धर्माचरण करू लागणे
     मी सनातनच्या संपर्कात आल्यानंतर मला धर्म म्हणजे काय ? ते समजले. धर्मशिक्षण वर्गात गेल्याने धर्माचरण कसे करावे ? हे समजून घेतले आणि ते कृतीत आणले. मी प्रतिदिन भारतीय पोषाख आणि टिळा लावू लागलो. तसेच भ्रमणभाषवर बोलतांना, हॅलो न म्हणता नमस्कार किंवा श्रीराम, असे म्हणू लागलो. इतरांनाही या कृती आचरणात आणण्यास सांगू लागलो.
२. मडगाव स्थानकावर उतरल्यानंतर साधकाने हसतमुखाने 
स्वागत केल्याने प्रवासाचा शीण निघून जाणे
     १८.६.२०१५ ते २६.६.२०१५ या कालावधीत ईश्‍वराच्या कृपेमुळे मला सनातन आश्रमात येण्याची संधी मिळाली. आम्हाला नेण्यासाठी मडगाव रेल्वे स्थानकावर एक साधक चारचाकी गाडी घेऊन आले होते. आमची गाडी मडगाव स्टेशनवर येण्यास ४५ मिनिटे विलंब झाला, तरीही ते आमची वाट बघत थांबले. आम्ही आल्यानंतर त्यांनी आमचे हसतमुखाने स्वागत केले आणि विचारले, दादा, प्रवासात त्रास झाला नाही ना ! त्यांच्या प्रेमळ बोलण्याने १८ घंटे प्रवास करून आलेला शीण निघून गेला.

सौ. राधा साळोखे यांनी त्यांची ६३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली आध्यात्मिक मैत्रीण कु. सोनाली गायकवाड हिची सांगितलेली गुणवैशिष्ट्ये

कु. सोनाली गायकवाड
१. जवळीक साधणे
१ अ. नवीन साधिकेला आध्यात्मिक त्रासात मोकळेपणाने सोनालीचे साहाय्य घेता येणे : मी जुलै २०१४ मध्ये देवद आश्रमात आले. तेव्हा माझे लग्न झाले नव्हते. तेव्हा माझी कु. सोनाली गायकवाड हिच्याशी मैत्री झाली. मी नवीन असतांना तिने मला पुष्कळ आधार दिला. मी आश्रमात आले, तेव्हा माझा आध्यात्मिक त्रास पुष्कळ वाढलेला होता आणि प्राणशक्तीसुद्धा अल्प असायची. सोनालीने अल्प कालावधीतच माझ्याशी जवळीक साधली. त्यामुळे त्रास वाढल्यावर मी मोकळेपणाने सोनालीला बोलवून तिचे साहाय्य घेत होते.
१ आ. सोनाली मितभाषी आहे; पण तरीही आश्रमातील प्रत्येक साधकाशी तिची जवळीक आहे.
२. गुणग्राहक
    सोनालीला कधी कोणतीही व्यक्ती आणि प्रसंग यांविषयी प्रतिक्रिया नसतात. याउलट कोणतीही व्यक्ती समोर आल्यानंतर सोनाली त्याचा गुण अचूकपणे हेरते. त्यामुळे समोरच्या व्यक्तीचा तो गुण आपल्यात येण्यासाठी आपल्याला अभ्यास करणे सोपे जाते.

आयुष्यभर इतरांसाठी चंदनाप्रमाणे झिजणार्‍या आणि रुग्णाईत असतांना ईश्‍वराच्या अनुसंधानात रहाणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सोलापूर येथील कै. (सौ.) सुभद्रा साळुंकेआजी !

कै.(सौ.) सुभद्रा
नागनाथ साळुंखे
    माझ्या आजीला (आईच्या आईला), साळुंकेआजीना आम्ही सर्व नातवंडे सुबाई म्हणून हाक मारायचो. तिने आम्हा सर्वांवर केलेल्या निरपेक्ष प्रेमातून आम्ही कसे घडलो ?, हे मी गुरुचरणी समर्पित करण्याचा प्रयत्न करते, तसेच माझ्या आजीची अंतःकाळातील भावमय अवस्था आणि नव्याने लक्षात आलेले तिच्यातील गुण येथे देत आहे. २९.७.२०१५ या दिवशी आजीचे वर्षश्राद्ध झाले. त्यानिमित्त तिच्या चरणी अर्पण केलेली भावसुमनांजली !
१. बालपण
१ अ. लहानपणापासून पुष्कळ कष्ट करून भावंडांना सांभाळणे : सुबाईचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील डोंबरजवळगे या एका लहानशा खेडेगावात झाला. तिची आई लहानपणीच वारली असल्याने जन्मापासून तिच्या वाट्याला दुःखच आले होते. तिने लहानपणापासून पुष्कळ कष्ट करून भावंडांना सांभाळले. तिच्या आयुष्यातील दुःखाचेे चटके तिने भावंडांना, तसेच नंतर आम्हाला कुणालाच जाणवू दिले नाहीत. तिला विश्रांती ठाऊकच नव्हती. सतत कार्यरत रहायचे, ही तिची सवय होती. कितीही कामे केली, तरी ती कधीच थकत नसे.

हिंदूंनो, हिंदु या शब्दाचा खरा अर्थ जाणून स्वतःतील हिंदुत्व जागृत करण्यासाठी साधना करा, तरच संभाव्य आपत्काळात भगवंत तुम्हाला तारून नेईल !

सौ. शालिनी मराठे
१. हिंदु समाजाची वैशिष्ट्ये
     हिंदू हीन, म्हणजे रज-तम गुणांचा त्याग करणारे असतात. ते सत्त्वाधिष्ठित असतात, तसेच ते त्यागी, विरक्त आणि दैवी गुणांनी युक्त असतात. हिंदू म्हणजेच सुसंस्कारित, सात्त्विक आणि साधना करणार्‍या व्यक्तींचा समुदाय ! हिंदू ईश्‍वराच्या निर्गुण रूपाची अनुभूती घेतात. 
२. भारतातील हिंदूंची दुःस्थिती !
     सध्या बहुतांश हिंदू रज-तमात बुडालेले, पैसा आणि नावलौकिक यांच्या मागे धावणारे, भ्रष्टाचारी अन् स्वार्थात आकंठ बुडलेले असे आहेत. संतांना ओळखण्याची क्षमता या जन्महिंदूंत नाही. भारतात बलाढ्य हिंदुत्ववादी संघटना आहेत; पण त्यांचे संघटन धर्माधिष्ठित नाही. त्यांच्याजवळ साधनाबळ नाही. ते सर्वधर्मसमभावाच्या भ्रमात वावरत आहेत. त्यामुळे ते निष्प्रभ आहेत आणि जेे हिंदु धर्माधिष्ठित आणि प्रखर हिंदुत्व असलेले आहेत, तेे संघटित नाहीत. हे सर्व पाहून हिंदु समाजातून मूळ हिंदुत्व लोप पावलेले आहे, असे वाटले.

ईश्‍वरी ज्ञान ग्रहण होण्यावर परिणाम करणारे घटक आणि साधनेने स्वयंप्रकाशी झालेल्या जिवाचे वैशिष्ट्य

१. ईश्‍वरी ज्ञानप्राप्ती, तिचा कालावधी, वेग
हे सर्व ईश्‍वरी कृपेच्या ओघावर अवलंबून असणे
    ईश्‍वरी ज्ञान प्राप्त होणे किंवा प्राप्त न होणे, ज्ञानप्राप्तीचा कालावधी आणि वेग हे सर्व ऊन आणि पाऊस पडण्याचे अनिश्‍चित असते, त्याप्रमाणे असते. कधी धो-धो पावसाप्रमाणे भरपूर ज्ञान मिळेल, अन्यथा अनेक वर्षे दुष्काळ पडल्याप्रमाणे काहीच ज्ञान मिळणार नाही; कारण सर्वकाही देवाच्याच हातात असते.
२. साधनेने स्वयंप्रकाशी झालेल्या जिवाला
ज्ञानप्राप्तीविषयी स्थळ, काळ आदींचे कोणतेच बंधन नसणे
    केवळ साधनेने स्वयंप्रकाशी झालेला जीव ज्यावर ईश्‍वरी कृपेचा ओघ सातत्याने चालू आहे, त्याला ज्ञान मिळण्याविषयी कोणतेच बंधन नाही.
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.५.२०१५)

मुळातच सात्त्विकतेची आवड असलेली ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली नागपूर येथील चि. कार्तिकी अश्‍विन ढाले (वय साडेतीन वर्षे) !

चि. कार्तिकी अश्‍विन ढाले
१. गर्भारपणात
१ अ. गीतावाचन पूर्ण झाल्यावरच कु. कार्तिकीचा जन्म होणे : गर्भारपणात मी गीता ग्रंथाचे वाचन चालू केले होते. मला ९ वा मास (महिना) चालू झाल्यावर मला वाटले, माझ्याकडून हे ग्रंथवाचन पूर्ण होईल का ? १८.१०.२०११ या दिवशी माझे ग्रंथवाचन पूर्ण झाले. मी पूजा करून नैवेद्य दाखवला. गोपालकाल्याचा प्रसाद ग्रहण केला आणि थोड्या वेळाने माझ्या पोटात दुखू लागले. दुसर्‍या दिवशी म्हणजे १९.१०.२०११ या दिवशी कार्तिकीचा जन्म झाला. डॉक्टरांनी १७ नोव्हेंबर हा प्रसूतीचा दिनांक दिला होता. असे असूनही माझी प्रसूती नैसर्गिक झाली. आणि श्रीकृष्णच्या कृपेमुळे सर्व व्यवस्थित झाले.

भक्तीयोगाचे महत्त्व

     येथे दिलेल्या सूत्रांवरून भक्तीयोगाचे महत्त्व लक्षात येईल.
१. दुसर्‍यांविषयी प्रीती
अ. याचे एक उदाहरण असे आहे. पू. दास महाराज आणि त्यांच्या पत्नी पू. (सौ.) माई रामनाथी आश्रमात आले असता त्यांची ओळख रामनाथी आश्रमात सध्या वास्तव्यास असलेले पू. मेनराय आणि पू. (सौ.) मेनराय यांच्याबरोबर झाली. त्या दिवसापासून नाश्ता आणि भोजन ते एकत्रच घ्यायचे. ५ दिवसांनी पू. दास महाराज त्यांच्या आश्रमात जाण्यास निघाल्यावर वय झाल्यामुळे प्रकृती ठीक नसतांनाही पू. मेनराय आणि पू. (सौ.) मेनराय त्यांना सोडायला दुसर्‍या मजल्यावरून गाडीपर्यंत आले. त्या वेळी पू. (सौ.) मेनराय यांनी पू. (सौ.) माई यांना मिठी मारली. तेव्हा सर्वांचा भाव जागृत झाला. आश्रमात एक ज्ञानमार्गी संत आहेत. ते पहिल्या भेटीनंतर पू. दास महाराज यांच्याशी एक शब्दही बोलले नाहीत.
आ. पू. मेनराय यांना चालतांना आधार म्हणून एक काठी दिली आहे. माझा थकव्यामुळे चालतांना तोल जात असल्याचे त्यांनी पाहिले आणि त्यांची काठी माझ्याकडे ठेवण्याचा आग्रह केला.

केवळ व्यावहारिक नव्हे, तर आध्यात्मिक जीवनातही आदर्श भावांची भूमिका बजावणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. विनयकुमार आणि श्री. उदयकुमार !

श्री. विनयकुमार
श्री. उदयकुमार
    ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. विनयकुमार आणि श्री. उदयकुमार हे दोघे सख्खे भाऊ आहेत. आध्यात्मिक जीवनात आदर्श असणारे श्री. विनयकुमार आणि श्री. उदयकुमार यांच्याविषयी श्री. स्वयंप्रकाश बंकापूर यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
१. श्री. विनयकुमार यांच्याकडून
शिकायला मिळालेली सूत्रे
    विनयदादा म्हणजे गुरूंची आज्ञा तंतोतंत पालन करणारा शिष्य ! हे गुरुदेवा, तुमच्या कृपेने तुमच्या या प्रिय शिष्यासमवेत मला सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल तुमच्या चरणी अनंतानंत कृतज्ञता.
१ अ. प्रतिकूल परिस्थितीत विचलित न होता सतत आनंदी आणि स्थिर असणे : विनयदादा सतत आनंदी आणि कोणत्याही प्रकारच्या प्रसंगात अत्यंत स्थिर असतात. ते देवाला अपेक्षित अशी कृती करतात. त्यांच्या घरची परिस्थिती आणि साधना यांच्यात मध्य साधून ते सतत साधनेचाच विचार करतात. एकदा काही अडचणीमुळे त्यांना घरी जावे लागले. तेव्हा घरी पुष्कळ वेगळेच वातावरण असणार, हे ठाऊक असूनही जराही विचलित न होता ते वर्तमानात राहून आनंदाने सेवा करत होते. कृष्णा, विनयदादासारखे माझेही मन स्थिर आणि दृढ कर.

जिल्हासेवक आणि साधक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना

साधकांनो, वर्ष २०१६ च्या सनातन पंचांगांचे वितरण १५.११.२०१५ या दिवसापर्यंत
पूर्ण करून त्याची येणे बाकी ३०.११.२०१५ या दिवसापर्यंत मुख्य कार्यालयात पाठवा !
    सनातन पंचांग केवळ पंचांग नव्हे, तर हिंदुत्वाचे सर्वांगच आहे. धर्मप्रसाराचे प्रभावी माध्यम असणारे पंचांग लवकरात लवकर सर्व जिज्ञासूंपर्यंत पोचवण्याची सेवा श्रीगुरूंनी साधकांना उपलब्ध करून दिली आहे.
    महाराष्ट्रातील सर्व जिल्हे, तसेच दक्षिण आणि उत्तर भारतातील काही राज्ये यांना वर्ष २०१६ च्या सनातन पंचांगांचा पुरवठा करण्यात आला आहे. उर्वरित ठिकाणी लवकरच त्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. पंचांग वितरण आणि येणे बाकी (वसुली) यांच्या संदर्भातील महत्त्वाच्या सूचना पुढे देत आहे.

दीपावलीच्या शुभेच्छापत्रांचेे अधिकाधिक वितरण करा !

साधकांना सूचना ! 
     दीपावलीच्या मंगलपर्वाच्या निमित्ताने या वर्षीही सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी सात्त्विक शुभेच्छापत्राची निर्मिती केली आहे. या शुभेच्छापत्रांमध्ये धर्मविषयक स्फूर्तीदायक लिखाण असल्याने अनेकांना धर्मकार्य करण्याची प्रेरणा मिळते. अनेक आस्थापने, प्रतिष्ठित नागरिक, लोकप्रतिनिधी आदी शुभेच्छापत्रांची देवाण-घेवाण करत असतात. अशा शुभेच्छापत्रात धर्माचरणाचा संदेश असेल, तर शुभेच्छापत्राचा खरा लाभ देवाण-घेवाण करणार्‍यांना होतो. साधकांनी या शुभेच्छापत्रांचे समाजामध्ये अधिकाधिक वितरण व्हावे, यासाठी प्रयत्न करावेत. 

साप्ताहिक 'सनातन प्रभात'च्या दिवाळी विशेषांकासाठी विज्ञापने घ्या !

साधकांना सूचना 
     अंक क्र. ५० (२९ ऑक्टोबर २०१५ ते ४ नोव्हेंबर २०१५) पासून साप्ताहिक 'सनातन प्रभात' १६ पानी (४ रंगीत + १२ कृष्णधवल) होत आहे, तसेच हा अंक दिवाळी विशेषांक (रंगीत) आहे. या अंकासाठी साधकांनी १८ ऑक्टोबर २०१५ पर्यंत विज्ञापने घ्यायची आहेत. या विशेषांकामध्ये दिवाळीच्या कालावधीत येणार्‍या सणांचे अध्यात्मशास्त्र, सात्त्विक रांगोळ्या, यांसह अन्य वाचनीय लिखाण असणार आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     शिक्षक, प्राध्यापक, अभियंता, वैद्य इत्यादी केवळ व्यवसाय करतात, तर मनापासून पौरोहित्य केल्यास व्यष्टी आणि समष्टी साधना होते. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (६.१०.२०१५)

बोधचित्र


॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
शिष्याचा विश्‍वास 
     गुरु विश्‍वासावर आहे. आपल्या विश्‍वासावर गुरूंची महती अवलंबून आहे. गुरु तुमच्यापण विश्‍वासावर आहे. तुमच्या विश्‍वासातच गुरु आहे. 
भावार्थ : 'गुरु विश्‍वासावर आहे. आपल्या विश्‍वासावर गुरूंची महती अवलंबून आहे', यातील 'गुरु' हा शब्द बाह्य गुरूविषयी वापरलेला आहे. गुरूवर विश्‍वास असेल, तरच गुरु 'गुरु' म्हणून कार्य करू शकतो. 'गुरु तुमच्यापण विश्‍वासावर आहे. तुमच्या विश्‍वासातच गुरु आहे', यातील 'गुरु' हा अंतर्यामी असलेला गुरु होय. 
 (संदर्भ : सनातनचे प्रकाशन 'संत भक्तराज महाराज यांची शिकवण.') 

प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

खरे दान 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
       खरे दान सत्पात्री असावे आणि त्याची वाच्यता दुसर्‍याजवळ होऊ नये. त्याची आठवणही क्षणार्धात विसरण्याचा प्रयत्न करावा. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बिहारी राजकारण !

संपादकीय
     १२ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत ५ टप्प्यांत बिहार येथील विधानसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे तेथील राजकीय वातावरण बरेच तापले असून नेहमीप्रमाणेच सर्वपक्षियांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तसे भारतीय जनतेसाठी यात विशेष काहीच नाही. एरव्ही राजकीय गरज म्हणून एकमेकांच्या गळ्यात गळे घालून फिरणारे हे राजकारणी निवडणुका जवळ आल्या की, स्वतः काय केले, हे न सांगता इतरांनी किती घोटाळे केले, ते पटवून देण्यात व्यस्त होतात. इतर राजकीय नेत्यांनी केलेले घोटाळे त्या त्या वेळीच जनतेसमोर मांडले आणि त्यावर कारवाई केली, तर मोठी राष्ट्रीय हानी होईल, असा अपसमज आपल्या नेत्यांचा झाला असावा. त्यामुळेच ते त्यांच्या राजकीय सोयीच्या वेळीच इतरांचे घोटाळे हत्यारासारखे बाहेर काढतात. त्यातील किती आरोपांमध्ये तथ्य असते आणि किती आरोप केवळ इतरांची अपकीर्ती करण्यासाठी केले जातात, हा एक वेगळाच प्रश्‍न असला, तरी त्यामुळे निवडणुकांचा काळ जनतेसाठी मनोरंजनाचा काळ होऊन बसतो.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn