Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

अखलाकच्या हत्येचा प्रतिशोध (बदला) घेण्याची आय.एस्.आय.एस्. आणि अल कैदा यांची धमकी !
दादरी (उत्तरप्रदेश) येथील हत्येचे प्रकरण !

कुठे भारतातल्या एका कुठल्यातरी गावात मुसलमानाच्या

झालेल्या हत्येचा प्रतिशोध घेण्यासाठी स्वतःचे वैर विसरून एकत्र येणार्‍या आतंकवादी संघटना आणि कुठे जगभरात हिंदूंचा अनन्वित छळ होत असतांना त्याविषयी चकार शब्दही न काढणारे जन्महिंदू !

नवी देहली - उत्तरप्रदेशातील दादरी येथील अखलाकच्या हत्येच्या प्रकरणाची दखल इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सिरिया (आयएस्आयएस्) या आतंकवादी संघटनेने घेतली आहे. महत्त्वाचे म्हणजे अल् कैदा आणि आय.एस्.आय.एस्. या दोन्ही संघटनांसाठी काम करणार्‍या आतंकवाद्यांनी अखलाकच्या हत्येचा प्रतिशोध घेऊ, अशी धमकी दिली आहे.

१. इंग्रजी संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार सिरियामध्ये अल् कैदाचाच भाग असलेल्या अल-नुसरा या संघटनेच्या अबू ताहिर अब्दुल रहमान याने फेसबूकवर म्हटले आहे की, गोमांस खाणार्‍या तुमच्या भावाला ठार मारले आहे. तुम्ही केवळ वृत्त वाचून थंड कसे बसला आहात ?

२. आय.एस्.आय.एस्.ला पाठिंबा देणार्‍या मॅग्नेट गॅस या ट्विटरवरील खाते फहाद शेख चालवतो. हा फहाद शेख कल्याणमधून सिरियाला गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

३. त्याने रहमानविषयी म्हटले आहे, भले तुम्ही आमचा तिरस्कार करत असाल; मात्र आम्ही तुमच्यावरही प्रेम करतो. लवकरच आय.एस्.आय.एस्. गुजरात, काश्मीर आणि मुजफ्फरनगर येथील प्रतिशोध (बदला) घेईल.

४. त्यांनी #revenge_soon हा हॅश टॅग काढून प्रतिक्रिया मिळवल्या होत्या; मात्र ट्विटरवरून हा टॅग हटवण्यात आला आहे.

अन्य घडामोडी !

१. आझम खान यांची हकालपट्टी करण्याची भाजपची मागणी !

२. अखलाकच्या कुटुंबाला ४५ लाख रुपये देणारे मुख्यमंत्री अखिलेश यादव म्हणाले की, हा उत्तरप्रदेश शासनाला अपकीर्त करण्याचा डाव !

उत्तरप्रदेश शासनाच्या अहवालात

गोमांसाचा उल्लेेख नाही !

हिंदूंची अपर्कीती करणारे आता हिंदूंची क्षमा मागतील का ? नवी देहली - दादरी गावात गोमांस खाल्ल्यावरून एकाची हत्या झाल्याच्या कथित प्रकरणाचा अहवाल उत्तरप्रदेश शासनाने केंद्रशासनाला पाठवला आहे. या अहवालात गोमांसाचा उल्लेखच नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. दक्षिण भारतातील एका इंग्रजी दैनिकाने याविषयीचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. हत्येवर बंदी घालण्यात आलेल्या प्राण्याचे मांस खाल्ल्याची अफवा उठल्याने पीडित व्यक्तीची हत्या झाली आहे. तसेच या प्रकरणात संबंधित व्यक्तीची हत्या करण्याचा हेतू नव्हता, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

केवळ संशयावरून सनातनवर बंदी अशक्य !

डॉ. रणजित पाटील
कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण
गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांची सनातनबंदीची 
मागणी करणार्‍यांना सणसणीत चपराक !
शासनाच्या प्रतिनिधींनी आणखी किती वेळा
 सांगितल्यावर सनातनबंदीची काव-काव बंद होणार ?
जळगाव - कुणाच्याही हत्येविषयी भाजप शासन हलगर्जीपणा करणार नाही. जे दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. केवळ सनातनच्या एका साधकाला संशयित म्हणून अटक केल्यानंतर सनातन संस्थेवर बंदी घालणे अशक्य आहे. आपण एखाद्याला दूरभाषवरून सहज म्हणतो, मी तुला बघून घेईन. त्यानंतर त्या व्यक्तीची हत्या झाली, तर ती हत्या आम्ही केली, असे होत नाही.

सनातनच्या विरोधात पुरावा नसल्यास कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही ! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्री. देवेंद्र फडणवीस
      मुंबई - पोलीस चौकशीचा अहवाल आल्यानंतरच सनातनवरील कारवाईच्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल. जर संस्थेच्या विरोधात पुरावे आढळले, तर शासन सनातनच्या विरोधात कारवाई करेल; मात्र तसे न आढळल्यास आम्ही कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी वृत्तपत्राला दिले आहे. कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या आरोपाखाली सनातनचे साधक समीर गायकवाड यांना अटक केल्यानंतर सनातनवर बंदी

गायीसाठी मरायला आणि मारायलाही सिद्ध आहोत !

खासदार साक्षी महाराज
भाजपचे खासदार साक्षी महाराज यांची उत्तरप्रदेशच्या
समाजवादी पक्षाच्या शासनाला चेतावणी !
     नवी देहली - जशी आमची स्वत:ची आई आहे, तशीच आमची भारतमाता आहे आणि तशीच गायही माता आहे. जर कोणी आमच्या आईला मारण्याचा प्रयत्न करत असेल, तर आम्ही शांत बसणार नाही. आम्ही मरण्यासाठी आणि मारण्यासाठी सिद्ध आहोत, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे खासदार साक्षी महाराज यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
     उत्तरप्रदेशातील दादरी येथे अखलाख यांची हत्या झाली. या संदर्भात पोलिसांनी अद्याप कारण स्पष्ट केलेले नसतांना अखलाख यांची हत्या गोमांस खाल्ल्याने झाली,

संमोहन करून किंवा प्रभाव टाकून गुन्हे घडवून आणणे शक्य नाही ! - संमोहनतज्ञ मनोहर नाईक

श्री. मनोहर नाईक
जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवरील चर्चासत्र
सनातन मानवी बॉम्ब बनवते, असे म्हणणारे प्रा. मानव यांना चपराक !
      मुंबई - माणसाचा सुपर इगो जागा असल्याने कोणताही प्रभाव टाकून किंवा संमोहन करून बेकायदेशीर गुन्हे किंवा अनैतिक कृत्य त्याच्याकडून घडवता येऊ शकत नाहीत. मानव त्यांची मते वारंवार पालटतात, असे अनेकदा लक्षात आले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवले आहे की, अशा प्रकारे संमोहन करून गुन्हा घडवता येऊ शकत नाही. हमीद दाभोलकर हे मानसोपचारतज्ञ आहेत. त्यांनीही त्यांचे असेच मत वाहिन्यांवरून आणि पत्रकार परिषदेत सांगितले आहे. मी १२ संमोहनतज्ञांशी बोलून आलो आहे. त्यांनी सांगितले की, आम्ही जाहीरपणे पुढे येऊन हे सांगायला सिद्ध आहोत की, संमोहनाने अशा प्रकारे गुन्हे घडवून आणता येणे शक्य नाही.

शासनाने तंत्रशिक्षण संस्थांमध्येही संस्कृत भाषा अनिवार्य करावी !

दुसर्‍या संस्कृत आयोगाची शिफारस
    नवी देहली - प्राचीन भारतीय संस्कृतीच्या अध्ययनाने विद्यार्थ्यार्ंमध्ये आत्मविश्‍वास निर्माण होतो. यासाठी आपल्या पुरातन संस्कृतीसह जुन्या काळातील तांत्रिक आणि वैज्ञानिक ज्ञानसाधनेचा विद्यार्थ्यांना परिचय व्हावा, यासाठी इयत्ता सहावीपासून दहावीपर्यंत संस्कृत भाषा अनिवार्य असावी, तसेच तंत्रशिक्षण संस्थांमधेही संस्कृत शिकवले जावे, अशी शिफारस दुसर्‍या संस्कृत आयोगाने केली आहे.( या शिफारसीची दखल भाजप शासनाने घेणे, अपेक्षित आहे ! - संपादक)

भाज्या, फळे, दूध आणि अन्नघटक यांच्या १८.७ टक्के नमुन्यांमध्ये विषारी कीटकनाशके ! - केंद्रीय कृषी मंत्रालयाचा अहवाल

देश स्वतंत्र झाल्यापासून नैसर्गिक शेतीवर भर दिला असता, तर जनतेवर विष खाण्याची वेळ आली 
नसती ! जनतेला विषारी अन्नपदार्थांपासून वाचवण्यासाठी शासन काय पावले उचलणार आहे ?
 
   नवी देहली - देशभरातील घाऊक आणि किरकोळ दुकानांमधून गोळा केलेल्या भाज्या, फळे, दूध आणि अन्नघटक यांच्या १८.७ टक्के नमुन्यांमध्ये विषारी कीटकनाशकांचे अंश आढळले आहेत. यांतील बहुतेक कीटकनाशकांचा वापर करण्यास अनुमती नाही, असे केंद्रीय कृषी मंत्रालयाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आपण प्रतिदिन सेवन करत असलेले अन्नपदार्थ किती धोकादायक असतात, हे उघड झाले आहे. 
१. केंद्रशासनाने वर्ष २००५मध्ये लागू केलेल्या कीटकनाशके अंश तपासणी योजनेच्या अंतर्गत वर्ष २०१४-१५मध्ये देशभरातील विविध अन्नपदार्थांचे २० सहस्र ६१८ नमुने गोळा करण्यात आले. देशभरातील २५ प्रयोगशाळांमध्ये या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यांपैकी १८.७ टक्के नमुन्यांमध्ये कीटकनाशकांचे अंश आढळून आले. यांपैकी १२.५ टक्के अन्नपदार्थांमध्ये वापरात नसलेली कीटकनाशके, तर ५४३ म्हणजे २.६ टक्के नमुन्यांमध्ये कीटकनाशकांचे प्रमाण कमाल निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आढळून आले आहे.

विदेशातील पैसा घोषित न करणार्‍यांना परिणाम भोगावे लागणार ! - अर्थमंत्र्यांची चेतावणी

     नवी देहली - देशात अजूनही मोठ्या प्रमाणावर काळा पैसा आहे. त्याला आळा घालण्यासाठी शासन विशिष्ट रकमेच्या पलीकडे पॅन कार्ड सक्तीचे करणार आहे.
   विदेशातील काळा पैसा ३० सप्टेंबरपर्यंत घोषित न करणार्‍यांना परिणाम भोगावे लागतील, असे देशाचे अर्थमंत्री श्री. अरुण जेटली यांनी स्पष्ट केले आहे. 
१. एच्एस्बीसी आणि लिशटेनस्टेन येथील एल्जीटी बँकेत ६ सहस्र ५०० कोटी रुपयांचा काळा पैसा आहे; पण एकदम काळा पैसा घोषित करण्याच्या योजनेत केवळ ६३८ लोकांनी ३ सहस्र ७७० कोटी रुपयांचा काळा पैसा उघड केला आहे. 
२. ज्यांनी ३० सप्टेंबरपर्यंत काळा पैसा घोषित केला नाही त्यांना ३० टक्के कर आणि ९० टक्के दंड भरावा लागेल आणि १० वर्षे कारागृहाची शिक्षा होईल.

(म्हणे) भारतीय मुसलमानांच्या दुर्दशेकडे संयुक्त राष्ट्राने लक्ष द्यावे !

आझम खान यांचा संयुक्त राष्ट्राकडे कांगावा 
     लक्ष्मणपुरी (लखनौ) - दादरी प्रकरणी उत्तरप्रदेशचे वादग्रस्त मंत्री आझम खान यांनी थेट संयुक्त राष्टाला (युनो) पत्र लिहून भारतातील अल्पसंख्यांकांच्या दुर्दशेवर लक्ष घालण्याची विनंती केली आहे. युनोचे सरचिटणीस बान की मून यांना लिहिलेल्या पत्रात आझम खान यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून धर्मनिरपेक्ष आणि विविधतेने नटलेल्या भारताला बहुसंख्यांकांची राजवट असलेले हिंदु राष्ट्र करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे, असा आरोप केला आहे. या पत्रात खान म्हणाले, 

गोव्यात माध्यमप्रश्‍नी ८ ऑक्टोबरपासून आंदोलन तीव्र करणार !

भारतीय भाषा सुरक्षा मंचची शासनाला चेतावणी
     पणजी - फोर्स या संघटनेच्या दादागिरीला बळी पडून इंग्रजी माध्यमाला झुकते माप देणार्‍या भाजप शासनाच्या विरोधातील आंदोलन तीव्र करण्याची चेतावणी भारतीय भाषा सुरक्षा मंचने दिली आहे. या आंदोलनाचा प्रारंभ येत्या ८ ऑक्टोबरपासून होणार असून या दिवशी पणजीतील फेरीबोट धक्क्याजवळ एकदिवसीय धरणे करण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र करण्यात येईल, अशी माहिती 
५ ऑक्टोबर या दिवशी मंचच्या पदाधिकार्‍यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सर्व हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन धर्मपालन केले पाहिजे ! - डॉ. अमरजित कदम, संचालक, स्वयम् आय क्लिनिक, बडोदा

बडोदा (गुजरात) येथे हिंदूसंघटन मेळावा उत्साहात साजरा 
हिंदूसंघटन मेळाव्याला मार्गदर्शन करतांना 
डॉ. अमरजित कदम, व्यासपिठावर डावीकडून 
सौ. अंशू संत, श्री. वैभव आफळे आणि सौ. रेखा बर्वे
    बडोदा, ६ ऑक्टोबर - गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव यांसारख्या उत्सवांमध्ये होणारे धर्महानीचे प्रकार, तसेच जन्मदिनाच्या निमित्ताने हिंदूंकडून होणारे पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण थांबणे आवश्यक आहे. त्याकरता सर्व हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन धर्मपालन केले पाहिजे, तसेच युनायटेड वी स्डॅँड आणि डिवायडेड वी फॉल (एकी हेच बळ आणि बेकी हाच नाश) हे लक्षात ठेवून सवार्र्ंनी संघटित झाले पाहिजे, असे प्रतिपादन बडोदा येथील सुप्रसिद्ध स्वयम् आय क्लिनिकचे संचालक डॉ. अमरजित कदम यांनी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित हिंदु संघटन मेळाव्यात केले.

हिंदु सेवा परिषदेच्या बैठकांमध्ये हिंदु जनजागृती समितीचे मार्गदर्शन

      जबलपूर (मध्यप्रदेश) - हिंदु सेवा परिषदेच्या वतीने येथील सोनपूर, आधारतल, दिनदयालनगर या गावांमध्ये ४ ऑक्टोबर या दिवशी खंडप्रमुखांच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले. या बैठकांना परिषदेचे अध्यक्ष श्री. अतुल जैसवानी, तसेच हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे उपस्थित होते. या वेळी पू. डॉ. पिंगळे यांनी येणार्‍या भीषण आपत्काळात धर्माच्या बाजूने टिकून रहाण्यासाठी साधना कशी करायची, याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

आतंकवादाशी संबंध असल्याच्या संशयावरून दोन पाकिस्तानी नागरिकांची कॅनडामधून हकालपट्टी !

भारताचे राज्यकर्ते यातून काही शिकतील का ? जे कॅनडाला जमते, ते भारताला का जमत नाही ?
     टोरंटो - आतंकवादाशी संबंध असल्याच्या संशयावरून कॅनडाने त्या देशात कायमस्वरूपी रहाणार्‍या २ पाकिस्तानी नागरिकांची पाकिस्तानात रवानगी केल्याची घटना उघडकीस आली आहे. 
     या प्रकरणातील जहांजजेब मलिक आणि महंमद अकिक अन्सारी हे दोघेही कायमस्वरूपी कॅनडात रहात होते. या नागरिकांकडून देशाला मोठा धोका निर्माण झाल्याचा संशय कॅनडा शासनाला आला. त्यांची कॅनडातून झालेली ही हकालपट्टी असाधारण नाही; कारण जवळपास याच काळात जगाच्या विविध भागांतून पाकिस्तानी नागरिकांवर अशी कारवाई करण्यात आली आहे. या दोघांना येथे वास्तव्यासाठी देण्यात आलेला व्हिसा रहित करून त्यांना अक्षरश: इस्लामाबादला जाणार्‍या विमानात कोंबण्यात आले, असे कॅनडाच्या नॅशनल पोस्ट या दैनिकाने म्हटले आहे. कॅनडातील स्टिफन हार्पर शासनाने आतंकवादाशी संबंधित एक कायदा संमत केला आहे. त्या कायद्यानुसार प्रथमच अशी कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानातील आतंकवादाच्या वाढत्या कारवायांमुळे तेथील अनेक नागरिक अमेरिका आणि कॅनडा या देशांत वास्तव्यासाठी आले आहेत.

आतापर्यंत १२ नोबेल सुवर्णपदकांची लिलावात विक्री !

     ऑस्लो - जगातील सर्वोच्च पुरस्कारादाखल दिल्या जाणार्‍या नोबेल पदकासाठी योग्य किंमत मोजायची सिद्धता असेल, तर ते कोणालाही मिळू शकते ! यात धक्कादायक असे काही नाही. दानशूर स्वीडिश वैज्ञानिक आल्फ्रेड नोबेल यांनी वर्ष १८९५ मध्ये त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये अशा प्रकारे पुरस्कार देण्याचे नमूद केले होते. या पुरस्कारांची स्थापना केल्यापासून गेल्या ११४ वर्षांमध्ये शांतता, साहित्य, वैद्यकशास्त्र, पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र आणि वर्ष १९६९ पासून अर्थशास्त्रातील अद्वितीय कामगिरीसाठी एकूण ८८९ नोबेल पुरस्कार बहाल करण्यात आले आहेत; परंतु कालपरत्वे पुरस्कार विजेत्यांना आर्थिक विपन्नावस्था आल्याने किंवा त्यांच्या वारसदारांमधील वादांमुळे यांपैकी किमान १२ नोबेल सुवर्णपदकांची लिलावात विक्री करण्यात आली आहे. लिलाव होत असलेले नोबेल पदक कोणाला आणि कशासाठी दिलेले होते, यावर त्याची किंमत ठरतांना दिसून येते. फ्रान्सच्या अ‍ॅरिस्टाईड ब्रियांद यांना १९२६ मध्ये शांततेसाठी दिले गेलेले नोबेल पदक आजवर लिलावात सर्वांत अल्प किमतीला विकले गेलेले नोबेल पदक आहे. पहिल्या महायुद्धानंतर फ्रान्स आणि जर्मनी या परस्पर शत्रू राष्ट्रांमध्ये सलोखा घडवून आणल्याविषयी ब्रियांद यांना नोबेल देऊन गौरवण्यात आले होते; पण कालांतराने परिस्थिती पालटली असून आता या पदकांच्या लिलावातील किमतीही गगनाला भिडत आहेत. परिणामी पुरस्कार विजेते अथवा त्यांचे कुटुंबीय त्यांचा अमूल्य ठेवा विकण्यासाठी अधिक संख्येने पुढे येत आहेत.

स्वामी अविमुक्तेश्‍वरानंदजी, महंत बालकदासजी महाराज आणि साध्वी प्राची यांच्यासह ५० हून अधिक साधू-संतांवर पोलिसांचे अमानुष आक्रमण !

वाराणसी येथील संतांच्या नेतृत्वाखालील मोर्च्यावर
पोलिसांनी अमानुषपणे केलेल्या आक्रमणाचे प्रकरण !
शेकडो हिंदू घायाळ ! प्रसारमाध्यमेही पोलिसांचे लक्ष्य ! मंगळवारी दिवसभर संचारबंदी
देशाच्या फाळणीची भाषा करणार्‍या धर्मांधांच्या धर्मगुरूंवर कधी पोलिसांची लाठी उगारली
 जाते का ? हिंदूंनो, ही दुःस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
व्यासपीठावर उपस्थित असलेले संत-महंत
हिंदूंवर अमानुष लाठीमार आणि रबरी गोळीबार करतांना पोलीस
     वाराणसी - गेल्या आठवड्यात मूर्तीविसर्जनाच्या मध्यरात्री वाराणसीच्या पोलिसांनी जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे उत्तराधिकारी स्वामी अविमुक्तेश्‍वरानंदजी यांच्यासह साधू आणि सामान्य हिंदू यांच्यावर अमानुष लाठीमार केला. त्यांना मूर्तीविसर्जनाचे धर्मकर्तव्य पार पाडू दिले नाही. याच्या निषेधार्थ ५ ऑक्टोबरला साधू-संतांनी अन्याय प्रतिकार मोर्चा काढला;

नदीत फेकलेल्या मूर्तींच्या प्रकरणी संबंधित अधिकार्‍यांना खुलासा करण्यास वाढीव मुदत

हौदामध्ये विसर्जित केलेल्या श्री गणेशमूर्ती पुन्हा नदीत विसर्जन केल्याचे प्रकरण
हिंदूंच्या प्रभावी संघटनाच्या अभावी दोषी अधिकार्‍यांवर
तत्परतेने कारवाई केली जात नाही. यासाठी हिंदूंनी संघटितपणे आवाज उठवावा !
      पुणे, ६ ऑक्टोबर - हौदामध्ये विसर्जित केलेल्या श्री गणेशमूर्ती नदीमध्ये फेकून दिल्याच्या प्रकरणी महानगरपालिका आयुक्तांनी केवळ २ चतुर्थश्रेणी कामगारांवर कारवाई केली. वरिष्ठ अधिकार्‍यांना २४ घंट्यांमध्ये खुलासा करण्याचे आदेश दिल्यानंतर आता त्या अधिकार्‍यांना पुन्हा ७ दिवसांची मुदत दिली आहे. यावरून वरिष्ठ अधिकार्‍यांना मोकळीक दिली आहे, अशी चर्चा नागरिकांमध्ये चालू आहे.
     श्री गणेशमूर्तीचे विसर्जन संपल्यानंतर ओंकारेश्‍वर घाट, नटेश्‍वर घाटासह अन्य घाटांवर विसर्जन केलेल्या मूर्ती मध्यरात्री ट्रकमध्ये भरून त्या वाकड येथे राष्ट्रीय महामार्गावरून थेट नदीमध्ये फेकून दिल्याची घटना उघड झाली होती.

हिंदूंचा अजून किती अंत पाहिला जाणार आहे ? - योग वेदांत सेवा समिती

धुळे येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
      धुळे - सनातनच्या साधकांना ज्या प्रकारे खोट्या आरोपाखाली गोवण्यात आले आहे, त्याच प्रकारे साध्वी प्रज्ञा सिंग या गेली ७ वर्षांपासून कारागृहात आहेत, पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू हे गेली २ वर्षांहून अधिक काळ हिंदु राष्ट्र सेनेचे श्री. धनंजय देसाई गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ कारागृहात आहेत. या सर्वांवर आजपर्यंत कोणताही आरोप सिद्ध झालेला नसतांना त्यांना जामीन मिळालेला नाही. हिंदूंचा अंत अजून किती पाहिला जाणार आहे ? हिंदू आता जागृत होत आहेत, असे प्रतिपादन योग वेदांत सेवा समितीच्या सौ. पूनम मलकर यांनी केले. येथे ५ ऑक्टोबरला घेण्यात आलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात त्या बोलत होत्या. आंदोलनानंतर निवासी उप जिल्हाधिकारी श्री. भारदे यांना निवेदन देण्यात आले.

पाकिस्तानच्या विरोधात अशी कडवी भाषा केवळ पाकमध्ये सैन्य घुसवून त्यांचा कायमचा बंदोबस्त करा ! - श्री. उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरेच वापरतात !
      मुंबई, ६ ऑक्टोबर - पाकिस्तान आतंकवादावर चर्चा करायला तयार नाही आणि त्यामुळे पाकिस्तानची कोंडी झाली, असे आपण मानतो, पण त्या कोंडीची पर्वा न करता पाकिस्तान भारताला अतिरेक्यांशी लढायला भाग पाडत आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये हिंदुस्थानविरोधी आतंकवादी शिबिरे चालवली जातात. आपल्या लष्कराने म्यानमारमध्ये घुसून जशी कारवाई केली, तशी कारवाई पाकव्याप्त काश्मीरमध्ये करायला आपले लष्कर समर्थ आहे. फक्त राजकीय आज्ञा मिळायला हवी, असे आमच्या हवाई दलप्रमुखांनी स्पष्ट केले आहे. यासाठी आपल्याच शासनाची मने आणि मनगटे पेटून उठली पाहिजेत. सैनिकांचे बळी आम्हाला आणि देशवासियांना अस्वस्थ करत आहेत. शासनालासुद्धा ते नक्कीच अस्वस्थ करत असतील. शहीद जवानांच्या शवपेट्यांवर पुष्पचक्रे वाहण्यात मर्दुमकी ती कसली ? पाकिस्तानात सैन्य घुसवा आणि एकदाच काय तो बंदोबस्त होऊ द्या, असे राष्ट्राभिमानी प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी दैनिक सामनाच्या अग्रलेखातून केले आहे.

व्ही.पी. सिंग यांनी मंडल आयोग आणून हिंदूंमध्ये फूट पाडली ! - द्वारका ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती

     जळगाव - वेदशास्त्र मानणारा खरा हिंदु असतो, ते मानत नसाल, तर हिंदु नावाला अर्थ उरत नाही. भविष्यात हिंदु धर्म राहिला, तरच भारतात एकता राहील. आपल्या देशात सर्व हिंदू एकोप्याने नांदत असतांना गद्दार व्ही.पी. सिंग यांनी मंडल आयोग आणून त्यांच्यात फूट पाडली अन् दलित आणि सवर्ण असे भेद निर्माण केले, असा आरोप द्वारका ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केला. आध्यात्मिक उत्थान मंडळाच्या वतीने शंकराचार्य यांच्या ९२व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या पाद्यपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी ते बोलत होते. 

गोमांस खाण्याविषयी उद्दाम विधाने करणार्‍या काटजूंना धर्माभिमानी विद्यार्थ्यांचा चाप !

गोमांस प्रकरणावरून हिंदूंना चिथवण्याचा प्रयत्न 
 करणार्‍या शोभा डे या प्रकरणातून तरी धडा घेतील का ? 
     वाराणसी - गाय फक्त एक प्राणी आहे. कोणताही प्राणी माता असू शकत नाही. जर मला गोमांस खाण्यास आवडत असेल, तर त्यात चुकीचे काय आहे ? जगभरातील लोक गोमांस खातात. मला जर ते खाण्यास आवडत असेल, तर मला कुणी रोखू शकत नाही, अशी हिंदुद्रोही विधाने 'बार काऊन्सिल ऑफ इंडिया'चे माजी अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी येथील काशी हिंदु विश्‍वविद्यालयात केली. धर्मभावना दुखावल्याने या वेळी विद्यार्थ्यांचा उद्रेक झाला. कार्यक्रमानंतर काही विद्यार्थ्यांनी काटजू यांना घेराव घातला. 

काँग्रेस, भाजप, समाजवादी पक्ष, एम्.आय.एम्. या राजकीय पक्षांवर प्रथम बंदी घाला, नंतर सनातन संस्थेविषयी बोला ! - अधिवक्ता प्रताप यादव, बेळगाव

     कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर देशभरातून अनेक तर्क-वितर्क यांना उधाण आले आहे. सध्यातरी निष्पाप समीर गायकवाड यांच्या अटकेनंतर समीर हा सनातनचा साधक असल्याने सर्व राजकीय पक्ष सनातनवर बंदी घालण्याची दर्पोक्ती करत आहेत. सनातन संस्थेवर बंदीची मागणी करण्याच्या अगोदर जे राजकीय पक्ष घोटाळे, अपहार यांच्यात सामील आहेत, त्यांच्याविषयी मौन का ? टू जी स्पेक्ट्रम घोटाळा, रॉबर्ट वडेरा यांच्यावर असलेले आरोप, चारा घोटाळा, महाराष्ट्रातील आदर्श सदनिका घोटाळा, कर्नाटकातील जमीन घोटाळा यांत सर्वच राजकीय पक्षांचे मंत्री, आमदार, खासदार, तसेच राजकीय नेते सहभागी आहेत. ज्यांनी भारत देशाचा पैसा स्वत:च्या स्वार्थासाठी वापरला, त्यांच्याविषयी मौन आणि ज्यांनी घोटाळे केले, तेच लोक आता सनातन संस्थेवर बंदीची भाषा करत आहेत. या संदर्भात काही गोष्टी निदर्शनास आणून द्यावयाच्या आहेत. 

सनातनला सर्वतोपरी साहाय्य करण्यास सिद्ध !

सनातनला पाठिंबा देण्यासाठी हिंदुत्ववाद्यांची बैठक
पुण्यातील हिंदुत्ववाद्यांचे आश्‍वासन
      पुणे, ६ ऑक्टोबर (वार्ता.) - कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातनच्या साधकाला अटक केल्यानंतर चोहोबाजूंनी सनातनच्या विरोधात टीकेचे रान उठवले जात आहे. प्रसिद्धीमाध्यमांतूनही एकांगी पत्रकारिता करून सनातन संस्थेवर चिखलफेक करण्यात येत आहे. असे असूनही सनातनला सर्वतोपरी सहकार्य करण्याचा, एवढेच नव्हे, तर सनातनची सत्य भूमिका लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून प्रसार करण्याचा हिंदुत्ववाद्यांनी निर्धार केला. ४ ऑक्टोबर या दिवशी येथील आेंकारेश्‍वर मंदिरात आयोजित केलेल्या बैठकीत उपस्थित ३० हून अधिक हिंदुत्ववाद्यांनी सनातनला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला.

बारामती येथे सनातन संस्थेच्या वतीने गणेशोत्सवात प्रवचनाद्वारे प्रबोधन

सनातन संस्थेच्या आदर्श पद्धतीने गणेशोत्सव साजरा
 करावा, या मोहिमेस गणेश मंडळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद 
     बारामती (जिल्हा पुणे) - गणेशोत्सवाच्या कालावधीत समाजात आदर्श पद्धतीने गणेशोत्सव साजरा व्हावा, याकरिता सनातन संस्थेच्या वतीने बारामती येथील इच्छापूर्ती गणेश मंडळ, संघवीनगर, माऊली गणेश मंडळ, माऊलीनगर, शनैश्‍वर गणेश मंडळ, संभाजीनगर येथे संस्थेच्या सौ. सुधा घाटगे यांनी मार्गदर्शन केले. आदर्श मिरवणूक कशी असावी, गणेशोत्सवाच्या काळात धर्मशास्त्रानुसार कशी करावी, गणेशाची उपासना याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या मार्गदर्शनाचा लाभ १२५ धर्माभिमान्यांनी घेतला. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. कोरटकर, सौ. संगीता बुरुडे उपस्थित होत्या. 

सावखेड गंगा (संभाजीनगर) येथे गोमांस वाहतूक करणारे वाहन अज्ञातांनी जाळले

शासनाने गोवंशहत्या बंदी कायद्याची कठोरात 
कठोर अंमलबजावणी केल्यास अशा घटनांना आळा बसेल ! 
     संभाजीनगर, ६ ऑक्टोबर - श्रीरामपूर (जिल्हा नगर) येथून वैजापूरकडे गोमांस घेऊन जाणारा एक छोटे मालवाहू चारचाकी वाहन वैजापूरच्या दिशेने जात होते. जाफराबादपासून या गाडीतील गोमांस रस्त्यावर पडत असल्याने गाडीत मांस असल्याचे काही अज्ञातांच्या लक्षात आले. त्यांनी पाठलाग करत सावखेड गंगा येथे गाडी अडवली. तिच्यातून दुर्गंधी येत असल्याने उपस्थितांनी ही गाडी पेटवून दिली आणि पसार झाले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाल्यावर गाडी विझवली. या प्रकरणी पुढील चौकशी वीरगाव पोलीस करत आहेत.

मध्यप्रदेशात धर्मांतराच्या आरोपावरून ३ मिशनर्‍यांना अटक

     भोपाळ - मध्यप्रदेशातील सतना जिल्ह्यात १२ हिंदूंचे धर्मांतर केल्याप्रकरणी मध्यप्रदेश धर्मस्वातंत्र्य अधिनियम १९६८ आणि भारतीय दंडविधानाच्या कलम २९५ अ आणि इतर कलमांतर्गत स्टीफन राजकुमार, अनिल कुमार आणि हरीलाल या ख्रिस्ती धर्मप्रसार करणार्‍या सेवाभावी संस्थेच्या ३ मिशनर्‍यांना पोलिसांनी नुकतीच अटक केली. (हिंदूंनी इतर धर्मियांची घरवापसी केली, तर आकाशपाताळ एक करणारे धर्मनिरपेक्षवाले आणि प्रसारमाध्यमे आता बोलत का नाहीत ? - संपादक)

सनातन संस्थेला हिंदुद्वेषापोटी बळीचा बकरा बनवून बंदी लादू नये ! - हिंदुत्ववादी संघटनांचे निवेदन

खासदार श्री. संजयकाका पाटील (बसलेले) आणि
निवेदन देतांना हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते
सनातनच्या पाठीशी ठामपणे उभ्या रहाणार्‍या हिंदुत्ववादी संघटनांचे आभार !
      तासगाव (सांगली), ६ ऑक्टोबर (वार्ता.) - कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातनचे श्री. समीर गायकवाड यांना संशयित म्हणून अटक करण्यात आली; मात्र अटक केल्यापासून मागील २० दिवसांत कोणतेही पुरावे पोलिसांनी सादर केलेले नाहीत. यावरून समीर गायकवाड यांचे निर्दोषत्व स्पष्टपणे दिसत असतांनाही तथाकथित पुरोगामी आणि राजकीय पक्ष योग्य तपासापेक्षा थेट सनातनवर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. सनातन संस्थेचे आध्यात्मिक, सामाजिक आणि राष्ट्रहिताचे कार्य लक्षात न घेता पुरोगाम्यांच्या दबावापोटी संस्थेवर बंदी घालण्याचा निर्णय घेणे म्हणजे सनातनवर मोठा अन्याय करणे आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे ६० सहस्र रुपये किमतीचे लोखंडी साहित्य चोरीला

हिंदूंनो, मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम जाणा !
      पंढरपूर, ६ ऑक्टोबर - येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात अनेक भाविक दर्शनाला येतात. त्या वेळी दर्शन रांगेतील भाविकांसाठी पत्र्याचा निवारा (शेड) उभारण्यात येतो. त्यासाठी आणलेले सुमारे ६० सहस्र रुपये किमतीचे लोखंडी साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ३ ऑक्टोबर या दिवशी उघडकीस आली. या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात ५ ऑक्टोबर या दिवशी मंदिर समितीचे कर्मचारी पृथ्वीराज राऊत यांनी तक्रार दिली आहे. (याविषयी पोलिसांकडे तत्काळ तक्रार का केली नाही, याचे उत्तर मंदिर समितीचे व्यवस्थापन देईलका ? - संपादक)

सनातनवरील संभाव्य बंदीच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी नुकताच ठाणे येथे भव्य निषेध मोर्चा काढला. या वेळी उपस्थित काही हिंदुत्ववाद्यांचे अभिप्राय

१. युवासेनेचे संदीप सिंग - कमी वेळात इतके धर्माभिमानी जमणे ही कौतुकास्पद बाब आहे. सनातन संस्था सर्वांना एकत्र घेऊन कार्य करते आणि लहान लहान संघटनांना संघटित करून हिंदु धर्माचे कार्य करते. म्हणून हे सनातनची अपकीर्ती करण्याचे कारस्थान आहे. आज़ाद मैदानात काय झाले हे पोलीस आणि प्रशासन विसरले; पण तुमच्यासाठी सनातन संस्था जे करते ते दिसत नाही. आम्ही गांधींचे नाही नथुराम गोडसेंचे समर्थक आहोत.
२. श्री. विक्रम भोईर, विश्‍व हिंदू परिषद - जिथे हिंदू आहे तिथे मंदिर आहे, तिथे सनातन आहे. आमची निर्मिती महादेवापासून झाली आहे. सनातनचे साधक शिवशंभुचे त्रिशूल आहेत, त्यांना त्रास देऊ नका.

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंनो, पोलिसांची मोगलाई जाणा ! 
     काशी येथे संतांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ ५ ऑक्टोबरला मोर्चा काढण्यात आला. त्या वेळी उत्तरप्रदेश पोलिसांनी लाठीमार करून स्वामी अविमुक्तेश्‍वरानंदजी महाराज, महंत बालकदासजी महाराज, साध्वी प्राची, स्वामी चक्रपाणी महाराज यांच्यासह ५० हून अधिक साधू-संतांना घायाळ केले.

सार्वजनिक नवरात्रोत्सवातील अपप्रकार थांबवण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत - तासगाव येथे प्रशासनास निवेदन

नायब तहसीलदार सुनील ढाले (उजवीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी
     तासगाव (सांगली), ६ ऑक्टोबर (वार्ता.) - डॉल्बी, ऑर्केस्ट्रा, यांच्या तालावर दांडिया खेळणे, अश्‍लील अंगविक्षेप करत नाचणे, महिलांची छेड काढणे हे तसेच अन्य अपप्रकार सध्या नवरात्रोत्सवात होत आहेत. यामुळे उत्सवाचे पावित्र्य भंग होत आहेत, तरी हे प्रकार थांबवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने योग्य ती पावले उचलली जावीत या मागणीसाठी नायब तहसीलदार सुनील ढाले यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी श्रीशिवप्रतिष्ठानचे सर्वश्री अभिजित घुले, ऋषीकेश पेटकर, सिद्धेश्‍वर लांब, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री सचिन गुरव, गजानन खेराडकर, सचिन कुलकर्णी, विनय सपकाळ, पंकज पाटील, संजय पाटील, पुरण मलमे, सत्यवान पाटील, शंकर राजमाने, जगन्नाथ पाटील, तसेच अन्य उपस्थित होते.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! 
 UP police ne lathichargse Swami 
Avimukteshwaranand aur 50 santoko ko bhi kiya ghayal. 
 Kya ye Police ahinduoke dharmaguruosebhi aisahi bartav karege ? 

जागो ! 
 युपी पोलिसने लाठीचार्ज कर स्वामी 
अविमुक्तेश्‍वरानंद और ५० संतोंकोभी घायल किया । 
 क्या यह पोलीस अहिंदूआेंके धर्मगुरुआेंसेभी ऐसाही बर्ताव करेगी ?

व्ही.पी. सिंग यांनी मंडल आयोग आणून हिंदूंमध्ये फूट पाडली ! - द्वारका ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती

जळगाव - वेदशास्त्र मानणारा खरा हिंदु असतो, ते मानत नसाल, तर हिंदु नावाला अर्थ उरत नाही. भविष्यात हिंदु धर्म राहिला, तरच भारतात एकता राहील. आपल्या देशात सर्व हिंदू एकोप्याने नांदत असतांना गद्दार व्ही.पी. सिंग यांनी मंडल आयोग आणून त्यांच्यात फूट पाडली अन् दलित आणि सवर्ण असे भेद निर्माण केले, असा आरोप द्वारका ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केला. आध्यात्मिक उत्थान मंडळाच्या वतीने शंकराचार्य यांच्या ९२व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या पाद्यपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी ते बोलत होते. 
     पुढे ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्याचे नेतृत्व करायचे असेल, तर त्यांनी देश अन् संस्कृती समजून घ्यावी. तुम्ही केवळ पाच वर्षांसाठी आहात. आम्ही कायमस्वरूपी आहोत. काही शंका असल्यास त्यांनी विचारावी, असे विधानही शंकराचार्यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून केले.

दादरी प्रकरण आणि प्रसारमाध्यमे !

      गोमांस खाणे आणि ते घरी ठेवणे या शंकेवरून दादरी (उत्तरप्रदेश) येथे १ ऑक्टोबर या दिवशी इकलाख या मुसलमान व्यक्तीची हत्या झाली. प्रसारमाध्यमे एम्आयएम्चे असदुद्दिन ओवैसी यांनी इकलाख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. प्रसारमाध्यमांनी याचे वृत्त लावून धरले. ओवैसींनी संतप्त जमावाने इकलाख यांची केलेली हत्या हा पूर्वनियोजित कट होता, एका धर्माला लक्ष केले गेले आहे, ही काही अचानक घडलेली घटना नाही, अशी अर्थातच अपेक्षित असलेली एकांगी प्रतिक्रिया दिली. हत्या होणे नक्कीच समर्थनीय नाही; पण हत्या झाल्यानंतर ज्या प्रकारे धर्माच्या नावे राजकारण चालू झाले आहे. ते कदापी समर्थनीय नाही. अशा प्रकारे राजकारण करणारे दिशाभूल करणार्‍या प्रतिक्रिया देऊन आगीत तेल ओतण्याचे दुष्कर्म करत आहेत. राजकारण्यांनी स्वतःच्या लाभासाठी देशात जाती-धर्माच्या भिंती निर्माण केल्या आणि त्या मजबूत कशा रहातील, याकडे नीट लक्ष ठेवले आहे.

हुंडाबळी

१. ब्रिटीश शासनापूर्वी, म्हणजे १८ व्या शतकापर्यंत हुंडाबळी अस्तित्वात नसणे आणि पुढे तरुणांनी 
सनातन हिंदु धर्म नाकारून पाश्‍चात्त्य संस्कृती स्वीकारल्याने भोगलोलुपता वाढणे
     आजचे अर्थप्रधान आणि भोगलोलुप तरुण हुंडा प्रथेला भयानक राक्षसी रूप देत आहेत. वास्तविक ब्रिटीश शासनापूर्वी, म्हणजे १८ व्या शतकापर्यंत कुठे एकही हुंडाबळी दाखवता यायचा नाही. नंतर पाश्‍चात्त्य संस्कृतीसमोर तरुणांनी पूर्णतः शरणागती पत्करली आणि सनातन हिंदु धर्म नाकारला, ते भोगलोलुप बनले अन् अनर्थाला निमंत्रण दिले.

सनातन संस्थेचा पुणे जिल्ह्याच्या अध्यात्मप्रसाराच्या कार्यातील वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

१. अधिक मासानिमित्त आयोजित केलेल्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात सनातनची सात्त्विक 
उत्पादने आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन अन् ध्वनी-चित्रचकत्या दाखवून धर्मप्रसार 
करणारे वाचक श्री. नंदकिशोर कुलकर्णी !
      २८.६.२०१५ या दिवशी पुणे येथील सनातन प्रभातचे वाचक आणि हितचिंतक श्री. नंदकिशोर कुलकर्णी यांनी अधिक मासानिमित्त ३३ दांपत्यांसाठी ना. सी. फडके सभागृहात आयोजित केलेल्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात सनातनची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन लावले. अनुमाने १२५ जणांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला. कार्यक्रमस्थळी भ्रमणसंगणकावर सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची माहिती देणार्‍या, तसेच सनातनची धार्मिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र या ध्वनी-चित्रचकत्याही दाखवण्यात आल्या. या ध्वनी-चित्रचकत्या पाहून अनेक जणांनी सांगितले की, आम्हाला यातून पुष्कळ उपयुक्त माहिती मिळाली. देवघरातील देवतांची आणि देवपूजेतील उपकरणांची मांडणी शास्त्रीय पद्धतीने कशी करावी ?, याचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले. या वेळी जिज्ञासूंनी सनातनची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ खरेदी केले.

सनातनवरील बंदीच्या मागणीच्या संदर्भातील गोवा आणि महाराष्ट्र राज्यांतील धर्माभिमानी हिंदूंच्या प्रतिक्रिया

केवळ सनातन संस्थाच राष्ट्र आणि धर्म यांना वाचवू शकते ! 
- श्री. सदानंद काणेकर, उद्योजक, वाळपई, गोवा.
      राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी झटणार्‍या अन् अध्यात्म जाणून कृती करा, असे सातत्याने शिकवणार्‍या सनातन संस्थेवर बंदीची मागणी कशासाठी ? सनातन संस्थाच राष्ट्र आणि धर्म यांचे खरे हित करू शकते, अशी माझी निश्‍चिती आहे. संस्थेचे कार्य मी जवळून पाहिले आहे, अनुभवले आहे. इतर अनेक संघटना, संस्था आहेत, त्या स्वत:च्या स्वार्थासाठी या देशात वावरत आहेत, त्यांची तपासणी का होत नाही ? त्यांनी राष्ट्रहानी-धर्महानी केली, तर त्यांना मोकाट सोडले जाते. त्यांच्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई होत नाही; म्हणूनच संपूर्ण राष्ट्र आज संकटात आहे. आज राष्ट्र आणि धर्माची स्थिती पहाता एकमेव सनातन संस्थाच राष्ट्र आणि धर्माला वाचवू शकते; म्हणून या संस्थेवर बंदी कधीच येऊ शकत नाही.

जात्यंधांनो, हे लक्षात घ्या !

१. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य स्थापनेसाठी सर्व जातीचे निष्ठावंत मावळे मिळवलेले असणे
     छत्रपती शिवाजी महाराजांनी निष्ठावंत मावळे जे सर्व जातींतून मिळवले होते, त्यांची नावेही पहाणे महत्त्वाचे आहे. त्यामध्ये दादोजी कोंडदेव, बाजीप्रभू देशपांडे, मोरारजी देशपांडे ही ब्राह्मण नावे तर होतीच, तसेच शिवा काशीद, जिवा महाले, अशी कितीतरी नावे ही सर्व अठरा पगड जातीची होती. 
२. केवळ विशिष्ट जातीचे नको, तर देश आणि धर्म यांसाठी प्राणार्पण करणारे कार्यकर्ते हवेत !
     जात महत्त्वाची नसून त्या काळी देश आणि धर्म यांसाठी प्राणपणाने लढणारे मावळे हे शिवाजी महाराजांना आवश्यक होते. तीच वेळ आजही आलेली आहे. कोणत्याही पक्षामध्ये केवळ जातीला प्राधान्य न देता, त्या व्यक्तीचा प्रामाणिकपणा, पारदर्शीपणा आणि लोकांमध्ये समर्पण होऊन काम करण्याची वृत्तीही आवश्यक आहे. तरच ते चांगला कारभार करू शकतील. 
- श्री. अशोक पाटील (साप्ताहिक लोकजागर, २.१.२०११)

भारत विनाशाच्या ज्वालामुखीच्या पाठीवर बसला आहे !

     या क्रांतीकारकांना कल्पनाही नव्हती की, स्वातंत्र्यानंतर एक दिवस असाही येईल की, या देशाचे राज्यकर्ते देशातील जनतेचे रक्त पितील आणि भारतवासियांचा शोक अन् आक्रोश यांनी भारत देशाचे आकाश थरथर कापेल. आज आपली भूमी आणि आकाश कोठे आहे ? आता ही भूमी आणि आकाश लुटारू अन् भांडवलदार यांचे आहे. राजकारण हा एक व्यवसाय झाला आहे. येथे घराणेशाहीचा झेंडा फडकत आहे. घराणेशाही लोकशाहीला ठेचून काढत आहे. देशभक्त, निष्काम कर्मयोगी, जनतेचे सेवक, प्रामाणिक आणि निष्ठावान इत्यादी लोकांना राजकारणात कोणतेही महत्त्व नाही.
(आर्य नीति, १०.११.२००९)      आपल्या धर्मात कृतघ्नपणा सोडून प्रत्येक चुकीला प्रायश्‍चित सांगितले आहे. राष्ट्रपुरुषांना विसरणे, हा त्यांच्याप्रती कृतघ्नपणा दाखवणे असून हे महापाप आहे आणि याला प्रायश्‍चित्त नाही.- इतिहास अभ्यासक तथा साहित्यिक डॉ. सच्चिदानंद शेवडे
     हिंदूंमध्ये केवळ अस्तित्व आणि जाणीव उरली आहे; पण जागृती नसल्याने हिंदु धर्मावर निरंतर आक्रमणे होत आहेत.- श्री श्री गुरुनागभूषण शिवाचार्य महास्वामी, कर्नाटक
     ज्या देशात हिंदु संतांना कारागृहात ठेवले जाते आणि धर्माचा सातत्याने अपमान केला जातो, त्या देशाला स्वतंत्र म्हणावे का ? - श्री. संदीप मिश्रा, भारतीय युवा शक्ती

धर्मो रक्षति रक्षितः ! - अधिवक्त्या (सौ.) अपर्णा रामतीर्थकर (सौ.) अपर्णा रामतीर्थकर

सौ. अपर्णा रामतीर्थकर
      मी हे सर्व (हिंदु महिलांना जागृत करण्याचे कार्य) सनातनसाठीच करत आहे. मी परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्याशी मानसरित्या बोलत असते. सनातन आध्यात्मिक स्तरावर कार्य करते. धर्मशिक्षण देऊन धर्माभिमान निर्माण करण्याचे कार्य करते. हिंसाचार, मारामारी असे प्रकार संस्थेत शिकवले जात नाहीत. संस्थेचा पायाच मुळात धर्म हा आहे. आता चाललेला अपप्रचार म्हणजे संस्थेविरुद्ध रचलेले षड्यंत्र आहे. कोणी कुठल्याही स्वरूपात कधीही सनातनवर बंदी आणू शकत नाही.
धर्मो रक्षति रक्षितः ।


देवभूमी नेपाळ साहाय्यता अभियानाच्या वेळी सेवा करतांना जवळून अनुभवलेली आपत्कालीन स्थिती !

श्री. गुरुराज प्रभु
१. ११.५.२०१५
१ अ. नेपाळ राष्ट्रीय धर्मसभेचेे श्री. अरुणकुमार शर्मा यांनी जिल्हा कार्यालयातून सेवा करण्याची अनुमती मिळवून देणे : नेपाळ राष्ट्रीय धर्मसभेचेे श्री. अरुणकुमार शर्मा यांनी आम्हाला भक्तुपुर दरबार येथे शारीरिक स्तरावर भूकंपग्रस्तांना साहाय्य करण्याची अनुमती जिल्हा कार्यालयातून मिळवून दिली. त्यांनी भूकंपाने पडलेल्या जवळच्या शिवमंदिराचा मलबा (पडलेला ढिगारा) हटवत असलेल्या नेपाळच्या सशस्त्र सैनिकांंना आम्हाला जोडून दिले आणि आमच्यासह सेवाही केली. 
१ आ. भूकंपामुळे ३ - ४ मजली घरांची झालेली पडझड आणि मृत्यूचे थैमान !
१ आ १. पुष्कळ घरांची पडझड होऊन गल्ली पूर्णपणे दगड, माती आणि विटा यांनी भरून जाणे : दुुपारनंतर आम्ही भारतीय आणि नेपाळी सेना जेथे पडलेल्या घरांचा ढिगारा हटवण्याचे काम करत होती, तेथे गेलो अन् त्यांची अनुमती घेऊन त्यांना साहाय्य करू लागलो. इथे पुष्कळ घरांची पडझड झाली होती. हा घनदाट लोकवस्तीचा भाग होता. तेथील सर्व घरे ३ - ४ मजली आणि जुनी होती. काही मोठी घरे बाहेरून उभी असलेली दिसत होती; मात्र त्यांची आतून पूर्णपणे पडझड झाली होती. इथले सर्वच लोक पुनर्वसन शिबिरात (रिलिफ कॅम्पमध्येे) रहात होते. ८ फूट रूंदीची गल्ली पूर्णपणे दगड, माती आणि विटा यांनी भरून गेली होती. साधारणपणे ८ - ९ फूट उंचीचा हा माती-विटांचा ढिगारा काढून ती गल्ली मोकळी केली जात होती.

एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. लोला वेझिलिच यांच्या लेखाच्या भाषांतराची सेवा करतांना आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे

१. सेवा करतांना भाव, प्रीती आणि शांती अनुभवता येऊन संतांच्या छायाचित्रांतून 
दैवी पारदर्शक पांढरा प्रकाश प्रक्षेपित होत असल्याचे दिसणे 
     १०.१०.२०१४ या दिवशी एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. लोला वेझिलिच यांचा साधनेचा प्रवास आणि त्यांची गुणवैशिष्ट्ये हा इंग्रजीतील लेख स्पॅनिश भाषेत भाषांतर करण्याची विशेष सेवा मला मिळाली. ही सेवा करत असतांना भाव, प्रीती आणि शांती अनुभवता आल्याने मी भारावून गेलो, तसेच या लेखातील संतांच्या छायाचित्रांतून दैवी पारदर्शक पांढरा प्रकाश प्रक्षेपित होत आहे, असे मला दिसले.

प्लास्टर घातल्यामुळे हाताची झालेली स्थिती पाहून स्वतःला अध्यात्मातील भिकारी म्हणणारे श्री. राम होनप !

श्री. राम होनप
    काही मासांपूर्वी माझा अपघात झाल्याने माझा डावा हात दुखावला गेला. आठवड्यापूर्वी काही कारणास्तव डाव्या हाताच्या सुलट स्थितीत (तळहात आकाशाच्या दिशेने - Supine position मध्ये) कोपरापासून प्लास्टर घालावे लागले. त्यामुळे त्या हाताची स्थिती सतत काहीतरी मागितल्याप्रमाणे रहाते. या संदर्भात मनात पुढील विचार आले, दैवाने मला अध्यात्मातील भिकारी बनवले आहे. भूक आहे मोक्षाची आणि भीक हवी आहे कृपाप्रसादाची ! - श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.६.२०१५)

आईची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचा आनंद स्वतःपेक्षा इतर साधकांना झाल्याचे अनुभवणे

१. आईची अध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली असल्याचे
घरी झालेल्या समारंभात घोषित होणे आणि ही बातमी
आश्रमात कळताच अनेक साधकांनी लगेच दूरभाषद्वारे अभिनंदन करणे
    १०.६.२०१५ या दिवशी सकाळी आमच्या घरी आयोजित केलेल्या एका अनौपचारिक समारंभात डॉ. मनोज सोलंकी यांनी श्रीकृष्णाच्या कृपेने श्रीमती प्रतिमा ठक्कर यांची (माझी आई) आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली असल्याची सुवार्ता सांगितली. या बातमीने आम्ही कुटुंबीय आनंदी आणि भावविभोर झालो. थोड्याच वेळात ही वार्ता रामनाथी आश्रमातील साधकांना कळली आणि काही घंट्यांतच त्यांचे दूरभाष आले, तर काही जणांनी अभिनंदनाचे लघुसंदेश (एस्.एम्.एस्.) पाठवले.

जन्मापूर्वीपासून संतांचा सत्संग लाभलेला आणि सात्त्विक गोष्टींची आवड असणारा ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चि. प्रद्युम्न ठाकरे (वय २ वर्षे) !

चि. प्रद्युम्न ठाकरे
    अमरावती येथील बालसाधक चि. प्रद्युम्न ठाकरे (वय २ वर्षे) याची त्याच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
१. जन्मापूर्वी
१ अ. जप करत असतांना बाळही जप करत आहे, असे जाणवणे : मी गरोदर राहिल्यापासून आई (सासूबाई) मला अधिकाधिक जप करायला सांगायच्या. तेव्हा पोटावर हात ठेवून जप करत असतांना बाळही जप करत आहे, असे मला जाणवायचे. मी जप करत असतांनाच पोटामध्ये अधिकाधिक हालचाल व्हायची. मी देवद आश्रमात गेले असतांना तेथे जप करायला बसायचे. त्या वेळी बाळ पुष्कळ आनंदात जप करत आहे, असे मला जाणवायचे. देवद आश्रमातील आजी मला प्रतिदिन म्हणायच्या, तुझ्या पोटी कृष्णच जन्माला येईल.
१ आ. मी मानसपूजा करत असतांना बाळाची हालचाल होऊन ते मानसपूजा करत आहे, असे मला जाणवायचे.

सनातनचे पू. उमेश शेणै यांनी साधकांच्या मनाचा खोलवर अभ्यास करून सनातन संस्थेच्या साधनेचा गाभा असलेली स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया राबवण्याविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

पू. उमेश शेणै
    सनातनचे पू. उमेश शेणै यांनी साधकांच्या मनाचा खोलवर विचार करून विचारांची अयोग्य प्रक्रिया आणि त्यावरील योग्य दृष्टीकोन यांविषयी केलेले सविस्तर विवेचन पुढे देत आहे. यामागे अयोग्य विचारप्रक्रियेमुळे त्याच्या साधनेची हानी होऊ नये, तसेच विचारांत सुस्पष्टता येऊन त्याची साधना अधिकाधिक गतीने व्हावी, ही तळमळ शब्दाशब्दांतून प्रत्ययास येते. या सूत्रांचा साधकांनी गांभीर्याने अभ्यास केल्यास साधनेतील अडथळेदूर होतील ! या लेखाचा पहिला भाग ६ ऑक्टोबरला  प्रसिद्ध झाला. त्यापुढील भाग आज पाहूया. ( भाग २)
२ अ ८. चुका सर्वांकडूनच होतात, त्यात काय विशेष ? चुकीमुळे हानी झाली नाही ना ?, असे विचार करणे : स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया, हेच आपल्या संस्थेचे वैशिष्ट्य आहे; म्हणून हा दृष्टीकोन चुकीचा आहे. प्रत्येक चूक ही आपल्या साधनेतील काळा डाग आहे. देवाशी एकरूप होण्याच्या मार्गातील हे दगडधोंडे आणि काटे आहेत. देव दोष आणि अहं रहित आहे. त्यामुळे आपण अहं, तसेच दोषमुक्त झाल्यासच देवाशी एकरूप होऊ शकतो. सर्व साधक मोक्षप्राप्ती हे ध्येय ठेवून आलेे आहेत; म्हणून साधनेत साहाय्य करून त्यांना पुढच्या पुढच्या स्तरावर घेऊन जाणे, ही साधना आहे. आपण धृतराष्ट्र-गांधारी वृत्तीने राहिलो, तर दोघांची हानी होऊन साधनेत अवनती होईल, हे विसरून चालणार नाही. आपण सदैव स्थुलातील हानीपेक्षा सूक्ष्मातील हानीकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. ती प्रबळ असते आणि आपले मन, बुद्धी अन् अहं यांवर तीव्र परिणाम करते, हे लक्षात घेतले पाहिजे. आपल्या दोषांचा संस्कार प्रबळ झाल्यानंतर त्याचे निर्मूलन करणे पुष्कळ कठीण जाते. आपल्याला सदोष संस्कार नष्ट करून मन स्वच्छ, बुद्धी सात्त्विक आणि अहं नष्ट करायचा आहे; म्हणूनच प्रत्येक साधकाने चुका सांगून त्याला होणार्‍या सूक्ष्म हानीपासून मुक्त व्हायला हवे. एक वेळ स्थुलातील हानी भरून काढता येईल; परंतु सूक्ष्मातील हानी पुष्कळ मोठी असून ती साधनेची पुष्कळ हानी करते.

५.१०.२०१५ या दिनांकाची गंमत !

    काल म्हणजे सोमवारी ५.१०.२०१५ असा दिनांक होता.
त्या दिनांकातील अंक उलट्या क्रमाने लिहिले तरी त्यांचा क्रम पालटत नाही.
नेहमीच्या क्रमातील दिनांक : ५.१०.२०१५
उलट्या क्रमातील दिनांक   : ५१०२.०१.५

पितृपक्षात श्राद्धविधी केल्यानंतर एस्.एस्.आर्.एफ्.च्या दक्षिण अमेरिकेतील साधकाने अनुभवलेली शांती आणि त्याला आलेल्या अनुभूती


      हिंदु धर्माने सांगितलेल्या ईश्‍वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे देवऋण, ऋषिऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी श्राद्ध आवश्यक असते. माता-पिता, तसेच निकटवर्तीय यांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी, यांसाठीचा संस्कार म्हणजेच श्राद्ध. श्राद्धातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते. पितरांना हविर्भाग दिला गेल्याने ते संतुष्ट होतात. श्राद्ध न केल्यास पितरांच्या इच्छा अतृप्त राहिल्यामुळे, तसेच वासनायुक्त पितर वाईट शक्तींच्या नियंत्रणात जाऊन त्यांचे दास (गुलाम) झाल्याने वाईट शक्तींनी पितरांचा उपयोग करून कुटुंबियांना त्रास देण्याची शक्यता असते. श्राद्धामुळे पितरांची या त्रासांतून मुक्तता होऊन आपले जीवनही सुसह्य होते.
     २८ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर २०१५ या कालावधीत पितृपक्ष आहे. त्यानिमित्त आजच्या भागात श्राद्धविधी केल्यानंतर आलेल्या अनुभूती पाहू.

साधकांच्या संघटितपणामुळे सांगली येथील गोसंमेलनाच्या वेळी लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनाला लाभलेला उदंड प्रतिसाद !

     सांगली जिल्ह्यात एक गोसंमेलन झाले. त्या ठिकाणी अनेक धर्मप्रेमी उपस्थित होते. त्या संमेलनात सनातनच्या साधकांना ग्रंथप्रदर्शन लावण्याची संधी मिळाली आणि साधकांनीही तिचा लाभ करून घेतला.
१. सेवा परिपूर्ण होण्यासाठी साधक आधीपासूनच सिद्धता करत होते. 
२. काही साधक रात्री जागून आणि पहाटे लवकर उठून देवाला आवडेल अशी सेवा करण्याचा अन्  फलनिष्पत्ती वाढवण्याचा प्रयत्न करत होते.
३. ग्रंथप्रदर्शनाच्या ठिकाणी पटले अल्प पडत होती. साधकांना तेथेच बाजूला दोन पुष्कळ खराब झालेली पटले पडलेली दिसली. साधकांनी ती दोन पटले स्वच्छ करून घेतली आणि त्यांवर रद्दी कागद घालून  ग्रंथांची मांडणी केली.

पृथ्वीवर श्रीकृष्ण आणि श्रीराम या दोन्ही तत्त्वांचा संगम होऊन रामराज्य येण्याच्या वाटचालीचा शुभारंभ २०१५ च्या गुरुपौर्णिमेला झाल्याचे संकेत मिळणे

श्री. श्रीकांत भट
१. देवघरातील श्रीकृष्णाच्या चित्राचा उजवा भाग
श्रीकृष्णाचा आणि डावा भाग प्रभु श्रीरामचंद्रांचा असल्याचे जाणवणे
    ३.८.२०१५ या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता मी देवघरातील श्रीकृष्णाच्या (सनातन-निर्मित मोठ्या रंगीत चित्राला) प्रतिमेला नमस्कार केला. तेव्हा ती प्रतिमा निराळीच भासली; म्हणून मी प्रतिमेचे निरीक्षण करू लागलो. तेव्हा श्रीकृष्णाच्या चित्रातील उजवा भाग हा श्रीकृष्णाचा आणि डावा भाग प्रभु रामचंद्रांचा आहे, असे मला जाणवले. या चित्रात पुढील पालट जाणवले.
१ अ. श्रीकृष्णाच्या प्रतिमेचा श्रीकृष्णमय झालेला उजवा भाग !
१. उजव्या भागाकडील श्रीकृष्णाच्या हातात सुदर्शनचक्र दिसले.
२. मुकुटाचा अर्धा भाग श्रीकृष्णाचा असून त्यावर मोरपीस होते.

आंतरिक वात्सल्याने मुलांवर जन्मदात्या आईपेक्षाही अधिक माया करणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त केलेल्या कै.(सौ.) सुभद्रा नागनाथ साळुंखे (वय ८० वर्षे) !

कै.(सौ.) सुभद्रा
नागनाथ साळुंखे
     सोलापूर येथील साधिका सौ. मीना महादेव नकाते (पू. नकातेकाका यांच्या पत्नी) यांची आई कै.(सौ.) सुभद्रा नागनाथ साळुंखे (वय ८० वर्षे) यांचे १०.७.२०१४ या दिवशी निधन झाले. मृत्यूपूर्वी काही दिवस त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली होती. त्यांची सेवा करतांना, त्यांच्या मृत्यूपूर्वी आणि मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती येथे देत आहे.
    भगवान श्रीकृष्ण आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्या चरणी प्रार्थना करते. देवाने वादळातही चैतन्याचा दिवा तेवत ठेवला. आमच्या कुटुंबावर एक अतिशय मोठे चक्रीवादळ आले होते. गेले ७ मास विविध प्रसंगांतून या वादळाचा तडाखा आम्हाला बसत होता; पण या संकटामध्ये देवाने आम्हाला शिंपल्यातील मोत्याप्रमाणे ठेवले. मला आणि माझ्या कुटुंबाला देवाने तळहातावरील फोडाप्रमाणे जपलेे. देवा, कसे होऊ आम्ही उतराई ? तूच सुचवलेल्या शब्दांची पुष्पांजली तुझ्या चरणी अर्पण !

वातावरणातील रज-तमाच्या आघातापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी प.पू. पांडे महाराज यांनी सांगितलेली युक्ती ! संरक्षककवच निर्माण करणे

    प्रभु रामचंद्र एकाच बाणाने अनेक राक्षसांचा संहार करत असे. त्याच्या एका बाणापासून सहस्रो बाण निर्माण होत असत. अशा प्रकारे स्वतःभोवती कवच निर्माण केले की, बाहेरून होणारे आघात (दुष्ट शक्तींपासून होणारे आघात) त्या शक्तींनाच लागतात. आपल्याला त्यांचा त्रास होत नाही. यासाठी रामरक्षेतील शिरो मे राघवः पातु.. या ४ थ्या श्‍लोकातील दुसर्‍या ओळीपासून आरंभ करून विजयी विनयी भवेत् । या १० व्या श्‍लोकापर्यंत उच्चारण करावे. त्या वेळी मनातून त्या त्या अवयवाकडे लक्ष द्यावे आणि स्वतःभोवती संरक्षण कवच निर्माण करावे !
- सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (मे २०१५)

साधनेविषयीचे दृष्टीकोन !

पू. संदीप आळशी
१. साधनेतील पूर्णत्व आणि अपूर्णत्व !
    स्वतःचा देह, मन आणि बुद्धी ईश्‍वरचरणी अर्पण करणे, हे आपल्या साधनेतील ध्येय असते. देहाचे भोग विसरून साधना करणारा, मनाची सुख-दुःखे त्यागून साधना करणारा आणि सर्व देवाच्या इच्छेनेच घडत आहे, असा भाव असणारा एखादा साधक जरी पूर्णवेळ साधक नसला, तरी त्याच्या साधनेत पूर्णत्व येते. याउलट वरीलप्रमाणे देह, मन आणि बुद्धी अर्पण न करणारा एखादा साधक पूर्णवेळ असला, तरी त्याच्या साधनेत अपूर्णत्व रहाते.

स्थुलातील कार्यासाठी सगुण आवश्यक असते आणि ते यशस्वी होण्यासाठी शक्ती मिळावी; म्हणून निर्गुण आवश्यक असते, म्हणजेच दोघेही एकमेकांना पूरक आहेत. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१.१०.२०१५)


साधकांसाठी सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्माभिमानी यांना नम्र विनंती !

भारतीय रिझर्व्ह बँकेने क्लीन नोट पॉलिसीच्या अंतर्गत
दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे !
     भारतीय रिझर्व्ह बँकेने चलनात वापरत असलेल्या नोटांवर पेनने लिहिलेले असल्यास त्या स्वीकारल्या जाणार नाहीत, असे क्लीन नोट पॉलिसीच्या अंतर्गत सूचित केले होते. अशा नोटा बँकेच्या दृष्टीने कागदासमान असल्याने बाजारात त्या कोणी स्वीकारणार नाही, अशी सूचनाही बँकेने २ वर्षांपूर्वी काढली होती.
    आतापर्यंत लोकांकडून या सूचनेचे पालन झालेले नसल्याने या संदर्भात कडक धोरण अवलंबण्याचे बँकेने ठरवले आहे. अशा नोटा चलनात चालणार नाहीत, यासाठी दक्षता घेण्यास बँकेने आरंभ केला आहे. या संदर्भात सर्वांनी पुढीलप्रमाणे कृती करणे आवश्यक आहे.

सर्वत्रच्या साधकांना गुरुसेवेची सुवर्णसंधी !

धर्मरथांवर ग्रंथप्रदर्शनाच्या सेवेसाठी,
तसेच चालक-साधकांची तातडीने आवश्यकता ! 
    सनातन-निर्मित ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने समाजात अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचून त्यांना त्यातील चैतन्य अन् सात्त्विकता यांचा लाभ व्हावा, यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न चालू आहेत. याचाच एक भाग म्हणून काही जिल्ह्यांमध्ये धर्मरथाद्वारे उत्पादने आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन लावण्यात येते. यामध्ये ग्रंथ आणि उत्पादने यांची माहिती सांगणे, हिशोब ठेवणे, तसेच ग्रंथप्रदर्शनाचे नियोजन पहाणे आदी सेवांसाठी साधकांची तातडीने आवश्यकता आहे.

बोधचित्र


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

(परात्पर गुरु) डॉ. आठवले
 महाविद्यालयांत रामायण, महाभारत आणि गीता शिकवण्याबरोबरच
विद्यार्थ्यांकडून साधनाही करून घेणे आवश्यक !
     केंद्रातील भाजप शासनाचे सांस्कृतिक राज्यमंत्री महेश शर्मा १०.९.२०१५ या दिवशी म्हणाले, महाविद्यालयांत रामायण, महाभारत आणि गीता शिकवणार ! त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, हे विषय केवळ तात्त्विकदृष्ट्या न शिकवता विद्यार्थ्यांकडून व्यायाम
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सद्गुरूंना आपल्यापेक्षा वेगळे समजू नका !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
       जो सद्गुरूंना आपल्यापेक्षा वेगळा आणि दूर समजतो, तो त्यांच्यापासून पूर्ण लाभ मिळवू शकत नाही. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
गुरु-शिष्य नात्याविषयी गुरूंचा दृष्टीकोन 
मी कोणाचा गुरु नाही; पण शिष्य केल्याविना सोडणार नाही. 
भावार्थ १ : 'मी कोणाचा गुरु नाही', यातील 'मी' प्रकृतीतील 'मी'विषयी आहे. 'शिष्य केल्याविना सोडणार नाही', म्हणजे पुरुषतत्त्वाचा किंवा बाबांच्या गुरूंचा, म्हणजे प.पू. अनंतानंद साईश यांचा शिष्य केल्याविना सोडणार नाही किंवा असा नामजप चालू करून देईन की, सर्वजण नामाचे शिष्य होतील. 
भावार्थ २ : गुरु म्हणजे शिव. शिवदशेत मनात विचार येत नाहीत; म्हणूनच 'मी गुरु आहे' हा विचार मनात येऊ शकत नाही. जीवदशेत आल्यावर 'मी शिष्य आहे' एवढाच विचार मनात येतो; म्हणूूनच 'माझ्या गुरूंकडे मी साधकांना घेऊन जाईन, त्यांना माझ्या गुरूंचे शिष्य करीन'.
 (संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.) 

प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन !

प.पू. पांडे महाराज
साधनेसाठी मिळालेल्या अमूल्य संधीचा लाभ करून घ्या !
    सहस्रो वर्षांपूर्वी ज्या वेळी काळ चांगला होता, तेव्हाही भगवत्प्राप्तीसाठी कठोर तपस्या करावी लागत असे. आज आपल्याला साधनेची अमूल्य संधी मिळाली आहे, म्हणजेच गुरुप्रसाद मिळाला आहे. त्याचा लाभ करून घ्या ! - प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२३.३.२०१५, सकाळी ११.५३)

यांच्या जिभेला हाड नाही !

संपादकीय
      घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद्रासभरोहणम् । येन केन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषो भवेत् ॥, असे आपल्याकडे एक संस्कृत सुभाषित आहे. त्याचा अर्थ आहे, (रस्त्यावर येऊन) मडकी फोडा, कपडे फाडा अथवा गाढवावर बसा ! पण काहीही करून प्रसिद्धी मिळवा ! या वचनाप्रमाणे जगणारे अनेक मान्यवर (?), विचारवंत (?) मंडळी आपल्याकडे आहेत. त्यातीलच एक सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश मार्कंडेय काटजू ! काटजू हे त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे कमी आणि वारंवार घसरणार्‍या जीभेमुळे अधिक प्रसिद्ध आहेत. कदाचित् कार्यरत असतांना कार्यकाळ गाजवून प्रसिद्धीच्या झोतात रहाता न आल्याचे शल्य त्यांना सलत असावे. त्यामुळेच एकापेक्षा एक बेताल विधाने ते करत आहेत. दादरी येथील हत्याकांडानंतर स्वतःला पुरोगामी म्हणवणार्‍या अधोगाम्यांची टीवटीव नेहमीप्रमाणे चालू झाली. हिंदु धर्मावर विधाने करणे उच्चभ्रूपणाचे समजणार्‍या शोभा डे त्यात अग्रणी होत्या. माजी सरन्यायाधीश आणि प्रेस कॉन्सिल ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनीही त्या वादात उडी घेतली. मी गोमांस खातो. गाय ही माता नव्हे, तर केवळ एक प्राणी आहे, असे वक्तव्य करून त्यांनी गोमातेला पूज्य मानणार्‍या कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावल्या. काशी हिंदु विद्यापिठातील विद्यार्थ्यांनी त्यांचा निषेध केला, हे या वेळचे विशेष ! तसे त्यांचे हे वक्तव्य काही नवीन नाही. यापूर्वीच्या त्यांच्या विधानांचे अवलोकन केले असता संतापजनक विधानांची मालिकाच समोर येते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn