Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

सनातनच्या पू. (सौ.) मालिनी सीताराम देसाई 
यांचा आज वाढदिवस

सनातनवरील संभाव्य बंदीच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा ठाणे येथे भव्य निषेध मोर्चा !

१ सहस्र २०० हून अधिक धर्मप्रेमींचा सहभाग !
ठाणे, ४ ऑक्टोबर (वार्ता.) - कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी तथाकथित पुरोगाम्यांकडून राष्ट्र आणि धर्म प्रेमी सनातन संस्थेवर बिनबुडाचे आरोप करून, निष्पाप आध्यात्मिक संघटनेला आतंकवादी ठरवून बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. त्याला तीव्र विरोध करण्यासाठी ४ ऑक्टोबरला अनेक हिंदुत्वनिष्ठ, धार्मिक, सामाजिक आणि राजकीय संघटना रस्त्यावर उतरल्या. ठाणे शहरात गडकरी रंगायतन, राम-मारुति मार्ग, गोखले मार्ग ते तलावपाळी असा भव्य निषेध मोर्चा काढून हिंदुत्वनिष्ठांनी दांभिक पुरोगाम्यांच्या विरोधात हिंदुत्वाची वज्रमूठ आवळली ! या मोर्च्यास १ सहस्र २०० हून अधिक राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी उपस्थित होते. या वेळी सनातनच्या संत पू (कु.) अनुराधा वाडेकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली. मोर्च्याचे रूपांतर जांभळी नाक्यावर सभेमध्ये झाले. 

युरोपीय देशांत पळून जाणार्या लक्षावधी धर्मांधांच्या माध्यमातून.....

युरोपीय देशांत पळून जाणार्या लक्षावधी धर्मांधांच्या माध्यमातून आय.एस्.आय.एस्. या जिहादी आतंकवादी संघटनेने सहस्रो जिहादींना युरोपमध्ये घुसवल्यास आश्चयर्य वाटायला नको.

मुसलमान मृत्यू पावला, तर २० लाख रुपयांचे साहाय्य आणि हिंदूंना २० सहस्रपण नाहीत !

भाजपचे खासदार साक्षी महाराज यांची मुसलमानधार्जिण्या सपा शासनावर टीका
नवी देहली - मुसलमान व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याला २० लाखांचे अर्थसाहाय्य करणारे समाजवादी शासन हिंदूंना मात्र २० सहस्र रुपयेसुद्धा देणार नाही, या शब्दांत भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी उत्तरप्रदेशच्या मुसलमानधार्जिण्या समाजवादी पक्षाच्या शासनाचा समाचार घेतला.
उत्तरप्रदेशमधील दादरी येथे गोमांस खाल्ल्याच्या संशयातून हिंदुत्ववाद्यांनी एका मुसलमानाच्या घरावर आक्रमण करून त्याची हत्या केल्याचे बोलले जात आहे. या मुसलमानाला अखिलेश यादव शासनाने १० लाख रुपयांचे अर्थसाहाय्य देण्याचे घोषित केले होते. ते आता ४५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे, तसेच त्या कुटुंबाच्या संरक्षणाची हमीही शासनाने दिली आहे.

निर्भया प्रकरणातील आरोपीला सुधारगृहात जिहादचे प्रशिक्षण !

सुधारगृहे आरोपींना सुधारतात कि बिघडवतात ?
     नवी देहली - देहली येथील निर्भया बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला बॉम्बस्फोटातील आरोपीकडून जिहादचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे भारतीय गुप्तचर संस्थेच्या सर्वेक्षणात उघड झाले आहे. देहली येथील उच्च न्यायालयात वर्ष २०११ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील अल्पवयीन आरोपी आणि निर्भया बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपी यांना बालसुधारगृहातील एकाच खोलीमध्ये ठेवण्यात आले होते. या ठिकाणी बॉम्बस्फोटातील आरोपी हा बलात्कारातील आरोपीला जिहादचे प्रशिक्षण देत असल्याचे उघड झाले. त्यानंतर या दोघांनाही वेगवेगळ्या खोल्यांत ठेवण्यात आले. गुन्हा घडला त्या वेळी दोघेही अल्पवयीन होते; मात्र आता दोघेही २० वर्षांचे झाले आहेत. यापैकी निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या शिक्षेला तीन वर्षे पूर्ण झाले असून त्याची २१ डिसेंबर या दिवशी शिक्षा पूर्ण होणार आहे.

गोवंश हत्येची अनुमती नसतांनाही पशूवधगृहांमध्ये त्यांची हत्या होते ! - आमदार टी. राजासिंह, भाग्यनगर

      भाग्यनगर (हैद्राबाद) - तेलंगण शासनाने ज्या पशूवधगृहांना मांस निर्यात करण्यासाठी परवाने दिले आहेत, त्यात केवळ म्हशी, बकरी आणि मेंढी या जनावरांची हत्या करण्याचीच अनुमती आहे. तरीही या पशूवधगृहांमध्ये सर्रास गोवंशाची कत्तल केली जात आहे, असे हिंदुत्ववादी नेते आणि भाजपचे आमदार टी. राजासिंह यांच्या निदर्शनास आले असून त्यांनी हे निरीक्षण त्यांच्या ट्विटर वर ठेवले आहे. (तेलंगण राज्याचे शासन नियमबाह्य कृती करणार्‍यांवर कारवाई करणार कि नाही ? - संपादक)

संमोहनाची सूत्रे उपस्थित करून अन्वेषण भरकटवण्याचा प्रयत्न करू नये !

प्रा. श्याम मानव यांचे नाव न घेता महाराष्ट्र अंनिसचे डॉ. हमीद दाभोलकर यांची टीका
संमोहनाच्या सूत्रावरून सनातनवर अश्लाघ्य 
आरोप करणारे प्रा. श्याम मानव यांना घरचा अहेर !
पुणे, ४ ऑक्टोबर (वार्ता.) - डॉ. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी समीर गायकवाड यांना संशयित म्हणून अटक करण्यात आले आहे. या संदर्भात हत्येच्या अन्वेषणावर लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता असतांना जाणीवपूर्वक इतर अप्रस्तुत विषयांवर चर्चा उपस्थित करून लक्ष्य विचलित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मंत्र टाकल्यासारखे एखाद्या व्यक्तीला संमोहित करता येत नाही. कुठल्याही व्यक्तीच्या इच्छेविरुद्ध तिच्याकडून गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य करवून घेणे, अशक्य आहे. हा अशास्त्रीय भाग असून अन्वेषण यंत्रणांचे लक्ष्य दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी श्याम मानव यांचे नाव न घेता केली. ३ ऑक्टोबर या दिवशी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (धादांत खोटे आरोप करून सनातनची अपकीर्ती केल्याविषयी आता तरी प्रा. श्याम मानव जाहीर क्षमायाचना करून प्रायश्चित्त घेतील का ? संमोहनाच्या नावाखाली श्याम मानव यांच्याकडून पसरवल्या जाणार्या् वैज्ञानिक अंधश्रद्धा डॉ. हमीद दाभोलकर जाहीरपणे सांगतील का ? - संपादक) 

चिनी उत्पादने पर्यावरणास घातक ! - अभ्यास गट

गणेशमूर्तीचे नदीत विसर्जन केल्यास पर्यावरणाची हानी होते, अशी ओरड करणार्‍या पुरो(अधो)गाम्यांनी 
चिनी वस्तूंपासून होणारी पर्यावरणाची हानी कधी अभ्यासली आहे का ? अशा पुरोगाम्यांच्या नादी 
लागलेल्या शासनाने चिनी उत्पादनांवर बंदी घालावी !
      बीजिंग (चीन) - चिनी बनावटीची उत्पादने स्वस्त असली, तरी त्यांच्यामुळे पर्यावरणाची अत्यंत हानी होत असल्याचे एका अभ्यास गटाला आढळून आले आहे. चीनमधील उद्योग पर्यावरण रक्षणासाठी काहीच प्रयत्न करत नसल्याने या उद्योगातून फार मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड हा पर्यावरणास अत्यंत घातक असलेला वायू बाहेर पडतो, असे अर्थ सिस्टिम्स या संशोधन संस्थेचे स्टीव्हन डेव्हीस यांनी केलेल्या संशोधनातून उघड झाले आहे.
     इतर देशांत पर्यावरण रक्षणासाठी अनेक कायदे असून राष्ट्र्रसंघानेही काही निर्बंध घालून दिले आहेत. चीनमध्ये एकछत्री अंमल असल्याने तेथे या कायद्यांची सर्रास पायमल्ली केली जाते. त्यामुळे इतर देशांत सिद्ध होणारी उत्पादने थोडी महाग असली, तरी त्यामुळे पर्यावरणास होणारी हानी न्यून होते. चीनमधील उत्पादन पद्धत कोळशावर आधारित असल्याने त्यातून फार मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साइड हा वायू उत्सर्जित होतो. त्यातही पोलाद उद्योगात हे प्रमाण अधिक आढळते; मात्र सर्व साधारण जनता याविषयी अनभिज्ञ असल्याने आणि चीनमधील उत्पादने स्वस्त असल्याने ती निकृष्ट असली, तरी त्यांचा खप अधिक असतो.

सनातन धर्मातील शिकवण हिंदूंपर्यंत पोहचवण्याचे कार्य सनातन संस्था करते !

सनातनची मानहानी करणार्‍या समय न्यूज या कन्नड वाहिनीला 
डॉ. संतोष भारती स्वामीजी (संतोष गुरुजी) यांचे सडेतोड प्रत्युत्तर !
डावीकडून श्री. महेश, अधिवक्ता निसार साब,
सूत्रसंचालक आणि डॉ. संतोष गुरुजी
मंगळुरू - सनातन संस्थेवर केवळ संशय व्यक्त करण्यात आला आहे, ते काही सत्य नाही. हिंदूंवरील अत्याचारांमध्ये वाढ होत असल्याने त्याविषयी जागृती करण्यासाठी आणि सनातन धर्मामध्ये असलेली शिकवण हिंदूंपर्यंत पोहोचवण्यासाठी सनातन संस्था निर्माण झाली आहे. संस्थेचे अनेक ग्रंथ असून त्यांचे सनातन प्रभात हे नियतकालिकही प्रसिद्ध केले जाते. त्यात उदबत्ती का लावावी ? आरती का करावी ? आदींविषयी कृतींविषयी शास्त्रीय माहिती दिली असते.

धर्मद्रोही, पुरोगामी आणि प्रसिद्धीमाध्यमे यांचे षड्यंत्र हाणून पाडू !- सनातन संस्था

मोर्च्याचे सभेत रूपांतर होतांना एकत्र जमलेले धर्माभिमानी !
दुष्ट शक्ती कितीही बलवान असली, तरी सनातनच्या
मागे ईश्‍वर आहे !
- अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था
     या वेळी सनातन संस्थेचे प्रवक्त श्री. अभय वर्तक म्हणाले, धर्मद्रोही, साम्यवादी, पुरोगामी, काँग्रेस आणि काही प्रसिद्धीमाध्यमे यांनी एकत्र येऊन सनातन संस्थेच्या विरोधात मोठे षड्यंत्र रचले आहे; मात्र आम्ही संत आणि ईश्‍वर यांच्या कृपेमुळे वाचलो आहोत. दुष्ट शक्तींना सनातन संस्था नष्ट करायची होती; मात्र या शक्ती कितीही बलवान असल्या, तरी आम्हा सर्वांच्या मागे ईश्‍वर आहे. त्यामुळे काळजी करायला नको. शेवटी विजय आपलाच होणार आहे. आता हिंदुविरोधी शक्ती ही वैचारिक पातळीवर लढायला लागली आहे.

सनातनविषयीचे आमचे गैरसमज दूर झाले, आम्ही सनातनच्या पाठीशी आहोत ! - जनतेची उत्स्फूर्त प्रतिक्रिया

विविध वृत्तवाहिन्यांवर चालू असलेल्या चर्चासत्रांतील 
सनातनची भूमिका ऐकून सनातनला समाजातून वाढता पाठिंबा !
कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातनचा साधक श्री. समीर गायकवाड यांना नुकतीच अटक करण्यात आली आणि सर्वच वृत्तवाहिन्यांवर 'सनातनवर बंदी घाला', याविषयी अनेक चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले. सनातनची अपकीर्ती करण्याच्या प्रसारमाध्यमांच्या या षड्यंत्राचा समाजावर विपरित परिणाम न होता, सनातनला वाढता पाठिंबाच मिळत असल्याचे दिसून येत आहे. सनातनचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांना केवळ गेल्या १-२ दिवसांत मिळालेला प्रतिसाद येथे देत आहोत. 
१. रेल्वेतून प्रवास करण्यासाठी श्री. अभय वर्तक नुकतेच दादर रेल्वेस्थानकावर आले असता त्यांना पाहून एक अनोळखी व्यक्ती म्हणाली, "सनातन संस्थेवर कितीही आरोप केले, तरी काही हरकत नाही, संस्थेचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे, हे महत्त्वाचे ! तुम्ही निर्दोष आहात. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत."

फोंडा (गोवा) येथील सौरभ लोटलीकर यांच्याविरोधात सनातन संस्थेकडून पोलीस ठाण्यात तक्रार

फोंडा - सौरभ लोटलीकर यांनी उघडपणे 'सनातन आश्रम ७ दिवसांत बंद करा अन्यथा आंदोलन करू', अशी धमकी दिल्यामुळे त्यांच्या विरोधात त्वरित गुन्हा नोंद करावा आणि सौरभ लोटलीकर आणि त्यांचे समर्थक यांना आश्रम परिसराजवळ येण्यास प्रतिबंध करणारा आदेश जारी करावा, अशी तक्रार ३ ऑक्टोबर या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने फोंडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 
सनातनच्या विरोधात सातत्याने प्रचार करणारे रामनाथ युवा संघाचे अध्यक्ष सौरभ लोटलीकर यांनी ३० सप्टेंबर २०१५ या दिवशी त्यांच्या घरी पत्रकारांना संबोधित करतांना 'रामनाथी येथील सनातन आश्रम बंद करा अन्यथा आंदोलन करू आणि या वेळी काही घडल्यास त्याला शासन उत्तरदायी राहील', अशी धमकी पत्रकार परिषदेत दिली होती. 

इंग्लंडमध्ये इस्लाम सोडणार्‍यास कडक शिक्षा

मुसलमानांची धर्मांधता !
      लंडन - इंग्लंडमधील शहरी भागांत रहाणार्‍या मुसलमानांच्या मते इस्लाम सोडणे गुन्हा होऊ शकतो आणि याची शिक्षा मृत्यूदंडही असू शकते. बीबीसीच्या सर्वेक्षणानुसार इंग्लंडमध्ये इस्लाम सोडणे आणि सोडण्याचा विचार करणार्‍यांना चेतावणी मिळत आहे आणि त्यांना समाजातून बहिष्कृत करण्यात येत आहे. लँकशायर येथील एका २५ वर्षीय मुसलमान तरुणीने पदवी शिक्षणाच्या काळात धर्म सोडला. हा निर्णय घेण्यापूर्वी तिने घरी कळवले, तेव्हा तिच्या वडिलांनी तिला धर्म सोडल्यास ठार करीन, अशी चेतावणी दिली, तसेच प्रचंड मारहाणही केली होती; परंतु पोलिसांच्या साहाय्यामुळे तिने कशीबशी सुटका करून घेतली होती. १४ वर्षांची असतांनाच तिने इस्लामविषयी प्रश्‍न उपस्थित करणे चालू केले होते. तिने हिजाब (डोके झाकण्यासाठी वापरण्यात आलेले कापड) घालण्यास नकार दिला होता.

जम्मू-काश्मीरमध्ये जनमताचा कौल घेण्याच्या पाकच्या प्रस्तावाला ५७ मुसलमान राष्ट्रांच्या संघटनेचा पाठिंबा

     न्यूयॉर्क - जम्मू-काश्मीरमध्ये जनमताचा कौल घेण्याच्या प्रस्तावावर ५७ इस्लामी राष्ट्रांच्या संघटनेचा पाठिंबा मिळवण्यात पाकिस्तानला यश मिळाले आहे. (पाकच्या मागे इस्लामी राष्ट्रे उभी रहातात, भारताच्या मागे असे खंबीरपणे कोण उभे रहाते ? - संपादक) संयुक्त राष्ट्रांच्या ७० व्या आमसभेनंतर २ ऑक्टोबर या दिवशी इस्लामी राष्ट्रांची शिखर बैठक पार पडली. या बैठकीत पाकिस्तानने जम्मू-काश्मीरचा प्रस्ताव ठेवला होता. या बैठकीत जम्मू-काश्मीरमधील नागरिकांच्या स्वयंनिर्णयाच्या हक्काचे समर्थनही करण्यात आले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कुवेतचे परराष्ट्रमंत्री शेख सबह अल् खालेद अल् सबह होते. या वेळी भारत पाकिस्तानच्या सद्भावना संदेशाला प्रतिसाद देण्याऐवजी आंतरिक पातळीवर हस्तक्षेप करत आहे, असा आरोप पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अजीज यांनी केला.

बांगलादेशमध्ये जपानी नागरिकाची हत्या

  • घेतले दायित्व !
  • आठवड्यात दोन विदेशी नागरिकांची हत्या !
शेजारच्या बांगलादेशमधील आय.एस्.आय.एस्.चे वाढते प्रस्थ ही भारतासाठी धोक्याची चेतावणी !
      ढाका (बांगलादेश) - नियो होशी (वय ६५ वर्षे) या जपानी नागरिकाची ढाक्यापासून ३३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या रंगपूर जिल्ह्यातील कोवनियात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. बांगलादेशात एका आठवड्यात विदेशी नागरिकाची हत्या होण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी २८ सप्टेंबरला इटलीच्या एका नागरिकाची अशीच गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. विशेष म्हणजे जपानी नागरिकाच्या हत्येचेही दायित्व आय.एस्.आय.एस्. या जिहादी आतंकवादी संघटनेने स्वीकारले आहे आणि अशाच घटना भविष्यातही घडणार असल्याचे सांगितले आहे.

नक्षलवाद्यांकडून आता शाळकरी विद्यार्थी लक्ष्य !

  • हिंदुत्ववादी संघटनांना आतंकवादी म्हणून हिणवणारे नक्षलवादाच्या प्रभावाकडे दुर्लक्ष का करतात ?
गडचिरोली - येथील नक्षलवाद्यांनी विद्यार्थ्यांना लक्ष्य केल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात नक्षली चळवळीत सहभागी केले आहे. या संदर्भातील पत्रकही त्यांनी प्रसिद्ध केले असून पोलिसांनी त्याला दुजोरा दिला. (केवळ दुजोरा देणारे नकोत, तर नक्षलवाद ही समस्या मुळापासून उखडण्यासाठी प्रयत्न करणारे पोलीस हवेत ! - संपादक)
जानेवारी २०१५ मध्ये भामरागड तालुक्यातील लाहेरी येथील शासकीय आश्रमशाळेतील तीन मुली अचानक हरवल्या. पुष्कळ शोध घेतल्यावर त्या नक्षली चळवळीत दाखल झाल्याचे भूमकाल संघटनेला दिसून आले होते; मात्र पोलिसांनी त्याला नकार दिला.

मुंबईतील ७/११ च्या लोकल बॉम्बस्फोट निकालानंतर पोलीस बंदोबस्तात वाढ

  • धर्मांधांना शिक्षा झाल्यानंतर अल्पसंख्य समाज पेटून उठेल, या भीतीपोटी बंदोबस्तात वाढ करणारे पोलीस धर्मांधांचा आतंकवाद समूळ नष्ट करण्यासाठीच का प्रयत्न करत नाहीत ?
     मुंबई - येथे लोकलमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा निकाल लागताच पोलिसांनी चोख बंदोबस्त वाढवला आहे. तसेच केंद्रीय अन्वेषण विभागाने सतर्कतेची चेतावणी दिल्याने राज्य आतंकवाद विरोधी पथक सतर्क झाले आहे. संशयित असलेल्या एस्आयओने (स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशनने) जाहीर पत्रकार परिषद घेतल्याने पोलीसही सतर्क झाले आहेत.

भारतात ४ ऑक्टोबर २०१५ या दिवशी ट्विटरवर चर्चिल्या गेलेल्या विषयांमध्ये सनातन संस्थेचा विषय प्रथम क्रमांकावर !

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांचे देशभरातील भक्त, हिंदु डिफेन्स लिग, 
हिंदु जनजागृती समिती, अन्य हिंदुत्ववादी संघटना आणि धर्माभिमानी हिंदू 
यांनी संघटितपणे ट्विटरवर केला सनातन संस्थेच्या समर्थनार्थ व्यापक प्रसार !
मुंबई - सध्या भारतात चोहोबाजूंनी सनातन संस्थेवर पुरोगामी विचारवंत आणि प्रसारमाध्यमे यांच्या माध्यमातून टीका होत आहे. तसेच सनातनवर बंदी आणण्याची देखील मागणी होत आहे. दुसरीकडे अनेक संत-महंत, हिंदुत्वनिष्ठ नेते, धर्माभिमानी संघटना यांच्याकडून सनातनला समर्थन मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून ४ ऑक्टोबर २०१५ या दिवशी पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांचे देशभरातील भक्त, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, हिंदु डिफेन्स लिग या हिंदुत्वनिष्ठ संघटनांसह अन्य धर्माभिमानी हिंदूंनी एकत्र येऊन 'ट्विटर' या सामाजिक संकेतस्थळावर सनातनच्या समर्थनार्थ व्यापक प्रमाणात प्रसार केला.

सनातनची बालसाधिका कु. विदुला निशिकांत पाटील हिला सुवर्णपदक

स्टुडंट ऑलिम्पिक असोसिएशन ऑफ महाराष्ट्र्रची राज्यस्तरीय स्पर्धा
कु. विदुला पाटील
पुणे, ४ ऑक्टोबर - स्टुडंट ऑलिम्पिक असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संस्थेने २६ सप्टेंबर या दिवशी राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये रिदमिक जिम्नॅस्टिक या खेळ प्रकारातील ८ वर्षांखालील गटामध्ये सनातनची बालसाधिका कु. विदुला निशिकांत पाटील (वय ७ वर्षे) हिने सुवर्ण पदक पटकावले. यापूर्वी तिने याच खेळ प्रकारामध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेमध्येही तिने सुवर्ण पदक मिळवले होते.
पाटील कुटुंबीय सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत असून कु. विदुला सध्या दुसर्‍या इयत्तेत शिकते. ती खेळाचा सराव करण्यापूर्वी खेळ चांगला होण्यासाठी श्रीकृष्णाला प्रार्थना करत असे. या यशाविषयी कु. विदुला हिने सांगितले की, भगवान श्रीकृष्णाला केलेल्या प्रार्थनेमुळेच माझा खेळ चांगला झाला आणि मला सुवर्ण पदक मिळाले.

महावितरणाच्या उचगाव शाखेतील अधिकार्‍यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी ! - राजू यादव, शिवसेना

उपकार्यकारी अभियंता अमित पाटणकर यांना निवेदन
देतांना श्री. राजू यादव (डावीकडे) आणि अन्य शिवसैनिक
कोल्हापूर, ४ ऑक्टोबर (वार्ता.) - उचगाव गावाचा विस्तार मोठा आहे. येथील अनेक नागरिकांना विविध कामासाठी उचगाव महावितरण कार्यालयात जावे लागते; मात्र या शाखेतील साहाय्यक अभियंता, तसेच अन्य अधिकारी नागरिकांशी उद्धट बोलतात. कामासाठी अनेक वेळा नागरिकांना कार्यालयात हेलपाटेही मारणे भाग पडते. यंदाच्या वर्षी उचगाव गावातील सार्वजनिक श्री गणेश मिरवणुकीच्या कालावधीत सहस्रो नागरिक जमले होते. यात वयोवृद्ध, महिला, लहान मुले यांचाही समावेश होता. मिरवणूक चालू असतांना अचानक महावितरण कार्यालयाने या रस्त्यावरील वीज बंद केली. त्यामुळे सर्वांचे हाल झाले. तरी या सर्व बाबींची चौकशी करून संबंधित अधिकार्‍याचे तातडीने स्थानांतर करण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांच्या नेतृत्वाखाली महावितरणचे उपकार्यकारी अभियंता श्री. अमित पाटणकर यांना निवेदन देण्यात आले.

(म्हणे) सनातनचा रशियन माफियांशी संबंध !

उचलली जीभ लावली टाळ्याला ही म्हण सार्थ करणारे राष्ट्रवादीचे नवाब मलिक !
   मुंबई - सनातनचा रशियन माफियाशी संबंध असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांनी केला आहे. आयबीएन् लोकमतच्या संकेतस्थळावर मलिक यांचे हे वक्तव्य प्रसिद्ध झाले आहे. (राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांच्याकडे या संदर्भात कोणता पुरावा आहे. उलट गोव्यात रशियाच्या नागरिकांनी मांद्रे गावात शासकीय जमिनीवर त्यांची वसाहन स्थापन करून त्या ठिकाणी त्यांचा झेंडा लावला आहे. तेथे स्थानिक टॅक्सीवाल्यांना प्रवेश नाही, तर रशियाचा टॅक्सी ड्रायव्हरच पर्यटकांना घेऊन जाऊ शकतो, अशी स्थिती निर्माण झाली आहे. या विरोधात सनातन प्रभातमधून आवाज उठवण्यात येतो. मलिक यांना हे माहिती आहे का ? - संपादक)

अकोला येथे महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणार्‍या तीन शिक्षकांविरुद्ध गुन्हा

अशा वासनांधांवर कठोर कारवाईच होणे आवश्यक !
    अकोला - महाविद्यालयात ११ वीत शिकणार्‍या विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणार्‍या तीन शिक्षकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा प्रविष्ट केल्यानंतर तीनही शिक्षक शहरातून पळून गेले आहेत. (शिक्षकांच्या पेशाला कलंक लावणारे शिक्षक ! - संपादक) पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पीडित विद्यार्थिनीशी एका शिक्षकाने शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. (तरुणींनो, यासाठीच स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! - संपादक) यासंदर्भात तिने शिक्षकाला खडसवले. त्यानंतर अन्य २ शिक्षकांनी तिला परीक्षेत अनुत्तीर्ण करण्याची धमकी दिली. विद्यार्थिनीने राज्य महिला आयोगाच्या सदस्य डॉ. आशा मिरगे यांच्या साहाय्याने पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.

सनातन संस्थेवर कोणतीही कारवाई करण्याचे टाळावे !

जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना संघटनेचे कार्यकर्ते
छत्रपती युवा संघटनेची जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे मागणी
     नाशिक - हिंदु धार्मिक आणि आध्यात्मिक संस्था असलेल्या सनातन संस्थेवर कुठलीही कारवाई करण्याचे टाळावे, अशी मागणी छत्रपती युवा संघटनेचे अध्यक्ष श्री. प्रदीप काळे आणि सचिव श्री. आदेश पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात केली. या निवेदनात पुढे म्हटले आहे की, सनातन संस्था हिंदु धर्म प्रचारक आणि प्रसारक म्हणून देशभरात कार्य करते. संस्थेवर कारवाई केल्यास हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्या जातील, याचा प्रशासन आणि शासन यांना त्रास होऊ शकतो. ( सनातन संस्थेच्या पाठीशी उभ्या रहाणार्‍या छत्रपती युवा संघटनेस संस्थेने आभार कळवले आहेत ! - संपादक)

लाचखोर शिरीष यादवला ५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी !

पुणे, ४ ऑक्टोबर - एस्आर्ए प्रकल्प चालू असलेल्या एका जागेतील प्रार्थनास्थळाची मोजणी करून ते अवैध असल्याचे दाखवण्यासाठी ५ लक्ष रुपयांची लाच घेतांना झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे उपमुख्य अधिकारी शिरीष यादव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. त्यांना ५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. लाचखोर यादव यांचे घर आणि अधिकोष यांमधून लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने १ किलो सोने, ३ किलो चांदी आणि एकूण १ कोटी रुपये शासनाधीन केलेे आहेत.
१. सेनापती बापट रस्त्यावरील एस्आर्ए प्रकल्पाच्या कार्यालयात ही कारवाई करण्यात आली होती.
२. यादव यांनी तक्रारदारांकडे २५ लक्ष रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी ५ लक्ष रुपये स्वीकारले होते, तर उर्वरित रकमेची मागणी ते तक्रारदारांकडे करत होते. त्यामुळे तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

सनातन संस्थेच्या विरोधात कोणतेही पुरावे नसतांना छत्रपती युवराज संभाजीराजे यांची मागणी (म्हणे) सनातन संघटनेवर शासनाने कायमची बंदी घालावी !

      कुर्डूवाडी (सोलापूर), ४ ऑक्टोबर - कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणात अटक करण्यात आलेला सनातनचा साधक समीर गायकवाड याच्या विरोधात सबळ पुरावे मिळाले आहेत. त्याच्या विरोधात कडक कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती युवराज संभाजीराजे भोसले यांनी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली. (समीर गायकवाडच्या विरोधात अजून कोणताही ठोस पुरावा मिळाल्याचे पोलिसांनी जाहीर केलेले नसतांना छत्रपती युवराज संभाजीराजे यांनी अशी मागणी करणे कितपत योग्य ? - संपादक)

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंनो, उत्तरप्रदेश शासनाची धर्मनिरपेक्षता लक्षात घ्या !
उत्तरप्रदेशमधील दादरी येथे गोमांस खाल्ल्याच्या संशयातून हिंदुत्ववाद्यांनी एका मुसलमानाच्या घरावर आक्रमण करून त्याची हत्या केल्याचे बोलले जात आहे. या मृताच्या नातेवाईकांना उत्तरप्रदेशच्या समाजवादी पक्षाच्या शासनाने एकूण ४५ लाखांचे अर्थसाहाय्य घोषित केले.

कोल्हापूर येथे अज्ञात समाजकंटकाकडून सनातनच्या धर्मरथात दगड टाकून दहशत माजवण्याचा प्रयत्न !

समाजकंटकाने धर्मरथात टाकलेला दगड (वर्तूळात)
विचारांचा लढा विचारांनी देण्यावर विश्‍वास ठेवणार्‍या सनातनच्या धर्मरथावर दगडफेक !
      कोल्हापूर, ४ ऑक्टोबर (वार्ता.) - १ ऑक्टोबर या दिवशी संकष्ट चतुर्थीनिमित्त येथील प्रतिभानगरमधील गणपति मंदिर येथे सनातन-निर्मित ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन असलेला धर्मरथाचा कक्ष लावण्यात आला होता. संकष्टीनिमित्त गणपति मंदिराजवळ हे प्रदर्शन लावण्यात येते. सनातनचे साधक श्री. दिलीप सातपुते रात्री ९ वाजता धर्मरथावरील ग्रंथांचे प्रदर्शन बंद करत असतांना अज्ञात समाजकंटकाने धर्मरथाच्या पाठीमागून मोठा दगड टाकून पलायन केले. दगड टाकल्याने मोठा ध्वनी निर्माण झाल्यानेे श्री. सातपुते यांनी धर्मरथाच्या पाठीमागे जाऊन पाहिले.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
UPke samajvadi shasan ne 1 musalmanke marnepar uske parijanoko 45 lakhki madat ki.
kya yahi hamari Dharm nirapekshata hai ?
जागो !
युपी के समाजवादी शासनने एक मुसलमानके मरने पर उसके परिजनको ४५ लाख की मदत की.
क्या यही हमारी धर्मनिरपेक्षता है ?

हिंदूंनो, पत्रकारिता धर्माचे पालन न करणार्‍या वृत्तवाहिन्यांचा हिंदु धर्माला समूळ नष्ट करणे, हा कुटील हेतू लक्षात घ्या !

श्री. चेतन हरिहर
      २१.९.२०१५ या दिवशी दूरचित्रवाणीवरील एका वाहिनीवर एक चर्चासत्र चालू होते. त्या वेळी वाहिनीच्या निवेदकाने सनातन संस्थेच्या एका साधकाला प्रश्‍न विचारला, तुम्ही पत्रकारिता धर्म मानता कि हिंदु धर्म मानता ? हे ऐकल्यावर देवाने पुढील विचार सुचवले.
१. स्वतःच्या वाहिनीला क्रमांक एकवर ठेवण्यासाठी चर्चासत्रांत न्यायाधिशाप्रमाणे वागणारे वाहिन्यांचे निवेदक स्वतः 
कोणता धर्म पाळतात ?
     निवेदकाने हा प्रश्‍न विचारण्यापूर्वी ते स्वतः कोणता धर्म मानतात किंवा पाळतात, हे स्पष्ट करायला हवे होते; कारण आजकाल वाहिन्यांचे निवेदक चर्चासत्रांमध्ये न्यायाधिशाप्रमाणे वागतात. एक व्यक्ती संशयित म्हणून पकडली गेली, तर लगेच सर्व वाहिन्यांचे निवेदक आणि अन्य प्रसारमाध्यमे आरोपी सापडला, असा डांगोरा पिटतात. एखाद्या निरिश्‍वरवाद्याची हत्या झाली की, ती हिंदुत्ववाद्यांनी केली, असे वाहिनीवाले सांगत सुटतात. यामागे स्वतःची वाहिनी क्रमांक एकवर कशी राहील, हा एकमेव स्वार्थी हेतू ठेवून धडपड केलेली असते.

श्राद्ध म्हणजे श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलेली पितृपूजा !

      हिंदु धर्माने सांगितलेल्या ईश्‍वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे देवऋण, ऋषिऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी श्राद्ध आवश्यक असते. माता-पिता, तसेच निकटवर्तीय यांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी, यांसाठीचा संस्कार म्हणजेच श्राद्ध. श्राद्धातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते. पितरांना हविर्भाग दिला गेल्याने ते संतुष्ट होतात. श्राद्ध न केल्यास पितरांच्या इच्छा अतृप्त राहिल्यामुळे, तसेच वासनायुक्त पितर वाईट शक्तींच्या नियंत्रणात जाऊन त्यांचे दास (गुलाम) झाल्याने वाईट शक्तींनी पितरांचा उपयोग करून कुटुंबियांना त्रास देण्याची शक्यता असते. श्राद्धामुळे पितरांची या त्रासांतून मुक्तता होऊन आपले जीवनही सुसह्य होते.

सनातन या अग्नीदिव्यातूनही पार होईल !

पू. संदीप आळशी
     आदिमाया सीतेवर चारित्र्यभंगाचा आरोप झाला. भगवान श्रीकृष्णावर स्यमंंतक मणि चोरल्याचा आरोप झाला. साक्षात भगवंतावर खोटे आरोप झाले, तर मग प.पू. डॉ. जयंत आठवले आणि सनातन संस्था यांच्यावर या कलियुगात खोटे आरोप होत आहेत, यात आश्‍चर्य काय ? भगवंतावर झालेले आरोप जसे पुढे असत्य असल्याचे सिद्ध झाले, तसेच प.पू. डॉक्टर आणि सनातन संस्था यांच्यावर होत असलेले आरोप असत्य असल्याचे लवकरच सिद्ध होईल. याचे कारण म्हणजे सत्यापुढे असत्य कधीच टिकू शकत नाही; कारण सत्य हे सत्य आणि सत्यच असते ! यापूर्वीही सनातन संस्था दोषारोप आणि बंदी या संकटांच्या अग्नीदिव्यातून पार झाली होती, तशीच आताही पार पडेल !

श्रद्धा, अंधश्रद्धा आणि दंभश्रद्धा !

श्री. भारतकुमार राऊत
     सध्या महाराष्ट्रात सनातन नावाचे वादळ घोंघावू लगले आहे. तशा या वादळाच्या फेर्‍या महाराष्ट्रात अधूनमधून होतच असतात. कुठेही कुणाचा, विशेषत: तथाकथित पुरोगामी मंडळींची हत्या झाली, कोणतीही जातीय दंगल उसळली की, सनातन संस्थेवर बंदी घाला, ही मागणी कुठल्याशा कोपर्‍यातून पुढे येते. तातडीने वर्तमानपत्रे आणि टीव्ही वाहिन्यांवरून त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळते. सनातन विरुद्ध पुरावे सापडल्यास आम्ही नक्की कारवाई करू, अशी आश्‍वासने मुख्यमंत्र्यांपासून गल्लीबोळातल्या पुढार्‍यांपर्यंत सर्वांकडून बिनदिक्कत दिली जातात. पुढे सारे काही शांत शांत होते. पुन्हा काही दिवसांत काहीतरी विपरीत घडते आणि पुन्हा तीच ओरड चालू होते. त्याच मागण्या आणि तीच आश्‍वासने. पुढे काय ?

श्री गणेशमूर्तीदानाच्या आकडेवारीची साशंकता !

     पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमाच्या अंतर्गत आरंभी काही सेवाभावी संस्थांनी आणि नंतर नाशिक महापालिकेसारख्या निमशासकीय संस्थांनी पुढाकार घेतला. त्यामुळे धार्मिकता जोपासण्यापेक्षा पर्यावरणाचे भान (?) राखणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात अथवा नदीपात्रात विसर्जन करण्याऐवजी औपचारिकता म्हणून नदीपात्रात बुडवलेली मूर्ती स्वयंसेवी संस्था किंवा महानगरपालिकेकडे दिली जाते. या मूर्तींचे उत्तरदायित्व (?) पालिकाच स्वीकारते. पालिकेच्या धर्मद्रोही आवाहनाला साथ मिळावी; म्हणून दिवसेंदिवस कृत्रिम हौदांची संख्याही वाढत आहे.

समीर गायकवाड यांची ब्रेन मॅपिंग चाचणी करणे; म्हणजे त्यांच्या मूलभूत अधिकारांचा भंग करून अन्याय करणे होय ! - अधिवक्ता समीर पटवर्धन आणि अधिवक्ता एम्.एम्. सुहासे यांचा कणखर युक्तीवाद

समीर गायकवाड यांची ब्रेन मॅपिंग चाचणी करण्याच्या मागणीचे प्रकरण
अधिवक्ता
श्री. समीर पटवर्धन
अधिवक्ता
श्री. एम्.एम्. सुहासे
    कोल्हापूर, ४ ऑक्टोबर (वार्ता.) - कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी संशयित श्री. समीर गायकवाड यांचे ब्रेन मॅपिंग करण्याच्या संदर्भातील अर्जावर आता ६ ऑक्टोबर या दिवशी सुनावणी होणार आहे. येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री.आर्.डी. डांगे यांच्यासमोर ३ ऑक्टोबरला श्री. समीर गायकवाड यांच्या बाजूने अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन आणि अधिवक्ता श्री. एम्.एम्. सुहासे यांनी जोरदार आणि कणखर युक्तीवाद मांडतांना श्री. समीर गायकवाड यांच्या ब्रेन मॅपिंग चाचणीला कडाडून विरोध दर्शवला. या प्रकरणात श्री. समीर गायकवाड दोषी नसतांनाही त्यांच्या इच्छेविरोधात आणि बळजोरीने ब्रेन मॅपिंग करणे म्हणजे श्री. गायकवाड यांच्यावर अन्याय करून त्यांच्या मूलभूत अधिकारांचा भंग केल्यासारखे होईल, असे सांगून श्री. समीर यांची ब्रेन मॅपिंग चाचणी करण्याविषयीचा अर्ज फेटाळून लावण्याची मागणी अधिवक्ता श्री. पटवर्धन आणि श्री. सुहासे यांनी केली. 

भारतियांनो, इंग्रजांच्या विरोधात लढलो त्याप्रमाणे आता लढलो नाही, तर काही वर्षांतच स्वप्नातही तिरंगा फडकवता येणार नाही, हे लक्षात घ्या !- प्रशांत हरिहर, मंगळुरू, कर्नाटक.


प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

श्याम मानव यांना करा संरक्षणमंत्री (?) ।

श्री. अनिल कुलकर्णी
मोदी शासनाला भारतीय जनतेकडून एकच आहे विनंती ।
संरक्षणमंत्री म्हणून संमोहनतज्ञ श्याम मानव यांची करा नियुक्ती ॥ 
संमोहनाने ते पाक आणि नक्षलवादी यांना घ्यायला लावतील शरणागती ।
खर्च न करता जनता आणि पोलीस यांचे प्राण वाचून ते आनंदी होती ॥ 
- श्री. अनिल कुलकर्णी, सनातन आश्रम, देवद,पनवेल. 

श्रीराम सेनेच्या गोवा शाखेला विरोध करणारे गोवेकर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाला विरोध करत नाहीत, हे लक्षात घ्या !

      देशातील हिंदुत्वविरोधी शक्तींनी एकत्र येऊन हिंदुत्ववादी संघटनांना नष्ट करावे !, असे विखारी फुत्कार केरळ शासनाने धर्मांध इस्लामी संघटना म्हणून घोषित केलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या कर्नाटक राज्य कार्यकारी समितीचे सदस्य मौलाना कलीमुल्ला खान या नेत्याने हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधात १७.२.२०१४ या दिवशी मडगाव (गोवा) येथील एका सभेत काढले.

देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात व्यवस्थापन विभागात सेवा करणार्‍या ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. अश्‍विनी पवार यांनी साधनेविषयी केलेले सहजसुलभ मार्गदर्शन !

 सौ. अश्‍विनी पवार
श्री. सागर निंबाळकर
    सनातनच्या देवद, पनवेल येथील आश्रमात व्यवस्थापन विभागात सेवा करणार्‍या सौ. अश्‍विनी पवार यांनी आजवर अनेकदा दैनिक कार्यालयात सेवा करणार्‍या आम्हा साधकांच्या स्वभावदोष-निर्मूलन विषयीच्या बैठका घेतल्या. या वेळी त्यांनी दिलेले दृष्टीकोन हे सहज आणि आचरण्यास अत्यंत सोपे असे आहेत. अध्यात्म सोपे करून सांगणे आणि साधकाला त्याची चूक नेमकेपणाने समजून त्याच्या प्रगतीसाठी आवश्यक ते सर्व मिळावे, यासाठीच्या त्यांच्या तळमळीतून हे दृष्टीकोन त्यांना देवच सुचवत असल्याचे अनेकदा लक्षात आले. आम्ही आमच्या चुका सांगतांना अहंच्या बंधनात राहून सांगत असल्याने आम्हाला त्यांच्या मुळाशी जाणे शक्य होत नसे किंवा अनेकदा त्याविषयी आम्हाला काहीही सुचत नसे; मात्र सौ. अश्‍विनीताई त्याविषयी अत्यंत मार्मिकपणे, सहजतेने आणि आकलन होण्यायोग्य दृष्टीकोन सांगतात. त्यामुळे एका वाक्यातील त्या दृष्टीकोनाला सुवचनाचेच स्वरूप आलेले असायचे. ती सुवचने साधकांना उपयोगी ठरावीत, ही श्रीकृष्णचरणी प्रार्थना !

गर्भात असल्यापासूनच देवांची स्तोत्रे म्हटल्यावर प्रतिसाद देणारा ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कुडाळ येथील चि. ऐश्‍वर्य विशाल पारकर (वय ९ मास) !

१. जन्मापूर्वी
१ अ. कोल्हापूर येथे ज्या वैद्यांनी सौ. वैष्णवी हिची प्रथम तपासणी केली होती, तेच वैद्य देवरुख येथे तपासणीसाठी उपलब्ध होणे : बाळाच्या जन्मापूर्वी आम्ही कोल्हापूर येथे वास्तव्यास होतो. सौ. वैष्णवी हिची गर्भारपणासंदर्भात तपासणी कोल्हापूर येथील आधुनिक वैद्य (डॉक्टर) करत होते. आम्ही कालांतराने देवरुख येथे स्थलांतर केले. तेव्हा कोल्हापूर येथील आधुनिक वैद्यांचे देवरुखला स्थलांतर झाले आणि तेच तपासणीसाठी देवरुख येथे उपलब्ध झाले.
- श्री. विशाल विजयकुमार पारकर (ऐश्‍वर्यचे वडील), कुडाळ.

साधकांना प्रेमाच्या वर्षावात न्हाऊ घालणारे आणि सेवेतून त्यांना घडवणारे पू. नंदकुमार जाधवकाका !

पू. नंदकुमार जाधव
१. पू. काकांच्या माध्यमातून देवच भेटला, असे वाटणे
    पू. काकांचा आमच्या कुटुंबातील सर्वांना आधार वाटतो. त्यांच्या माध्यमातून देवच भेटला, असे मला वाटते. आम्ही साधनेत नवीन होतो. पू. काकांची भेट झाल्यावर ज्यांच्या शोधात आम्ही होतो, तेच भेटले, असे मला वाटले.
२. आम्हाला साधनेत टप्प्याटप्प्याने घडवणार्‍या पू. काकांचे बोलणे ऐकतच रहावे, असे वाटायचे.
३. पू. काकांच्या सत्संगात सेवेविना दुसरे काहीच नको, असे वाटणे
    पू. काका घरी यायचे. त्यांच्या सहवासात असल्यावर सेवेविना दुसरे काहीच नको, असे मला वाटायचे. मी पूर्णवेळ साधिका कशी झाले ?, हेच मला समजले नाही.

मंगळुरू सेवाकेंद्रातील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. प्रशांत हरिहर यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

श्री. प्रशांत हरिहर
१. हसतमुख आणि नम्र
    दादा संपादकीय विभागात असल्यामुळे सातत्याने सेवेत असतात. सेवेत असूनही तणावरहित राहून ते आनंदात असतात. ते नेहमी नम्रतेने बोलतात आणि ऐकतात. त्यामुळे दूरभाषवरून त्यांनी कोणतेही वृत्त अथवा अहवाल यांविषयी विचारल्यास चांगले वाटते.
२. सहजता
    दादांशी बोलतांना पुष्कळ आत्मीयता वाटते. दादा अगदी सहजतेने बोलत असल्याने त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलता येते.
३. इतरांना साहाय्य करणे
    दादा सेवेत कितीही व्यस्त असले, तरी कुणीही विचारताच तत्परतेने साहाय्य करतात. एकदा नियतकालिकाच्या छपाईचा दिवस होता. त्या दिवशी विजेची अडचण होती. शिबिराची माहिती पाठवायची असल्याने आम्हाला संगणकाची आवश्यकता होती. अशा वेळी त्यांनी आम्हाला तत्परतेने संगणकाची व्यवस्था करून दिली.

पू. स्वातीताई सद्गुरु झाल्याचे समजल्यावर पूर्वीची स्वाती आणि आताच्या पू. स्वातीताई हा आध्यात्मिक प्रवास आठवून अनुभवलेली भावस्थिती !

पू. (कु.) स्वाती खाडये
    २४.९.२०१५ या दिवशी पू. स्वाती खाडये या सद्गुरु (आध्यात्मिक स्तर ८० टक्के) झाल्याचे समजले. त्या वेळी त्यांच्या समवेत घालवलेले काही क्षण आठवून मला गहिवरून आले आणि माझी भावजागृती झाली. त्यांच्या प्रथम भेटीपासूनच्या काही आठवणी पुढे देत आहे.
१. प्रथम भेट
मनमोकळे बोलणे आणि खळखळून
निर्मळ हसणे यांमुळे सहजतेने झालेली जवळीक !
    वर्ष २००५ मध्ये मी रामनाथी आश्रमात आले. त्या वेळी पू. स्वातीताईंशी माझी भेट स्वागतकक्षात झाली. त्यांचे मनमोकळे बोलणे आणि खळखळून निर्मळ हसणे यांमुळे पहिल्या भेटीतच त्यांची माझ्याशी सहजतेने जवळीक झाली आणि त्या आपल्यातीलच आहेत, असे जाणवले. त्या आश्रमात जवळपास कुठेही असतांना हसल्या की, त्यांच्या हास्यामुळे त्यांना सर्व जण, तसेच प.पू. डॉक्टरही त्वरित ओळखायचे आणि म्हणायचे, हा स्वातीचाच आवाज ना !

पशू-पक्ष्यांवरही जिवापाड प्रेम करणारे आणि विश्‍वकल्याणासाठी धडपडणारे प.पू. डॉ. आठवले देशद्रोही कसे असतील ?

      २८.९.२०१५ या दिवशी दैनिक सनातन प्रभातमध्ये कोल्हापूर येथील जाहीर प्रतिरोध परिषदेत विद्रोहींचा ठराव - (म्हणे) सनातनचे जयंत आठवले यांना देशद्रोही ठरवा ! या मथळ्याखालील लेख वाचून झालेली विचारप्रक्रिया पुढे देत आहे. 
    हल्लीच्या काळात आई-वडिलांनाही स्वतःच्या मुलांची चांगली-वाईट वागणूक लक्षात येत नाही. असे असतांना जाहीर प्रतिरोध परिषदेत बोलणार्‍यांनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना जवळून पाहिले आणि अनुभवले नसतांनाही ते अभ्यास न करता असे वक्तव्य कसे करू शकतात ? यावरून त्यांची मानसिकता किती खालच्या स्तराची आहे, हे लक्षात येते.

सौ. पार्वती जर्नादन यांनी दैनंदिन वापरातील वस्तूंपासून सिद्ध केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण रचना

पत्रकार परिषदेच्या संदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण रचना
सौ. पार्वती जनार्दन
      रामनाथी आश्रमात सेवा करणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. पार्वती जनार्दन यांचे एक वैशिष्ट्य, म्हणजे त्या दैनंदिन वापरातील वस्तू, तसेच इतर लहानसहान वस्तू घेऊन अशी रचना करतात की, त्या रचनेतून व्यष्टी किंवा समष्टी साधनेचा एक दृष्टीकोन मिळतो. 
     २.१०.२०१५ या दिवशी दैनिक सनातन प्रभातमध्ये मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेचे छायाचित्र छापले होते. छायाचित्रात अनुक्रमे हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर, सनातच्या साधिका डॉ. (सौ.) दीक्षा पेंडभाजे (पूर्वाश्रमीच्या डॉ. (कु.) स्वाती आडभाई), कु. प्रीती चौरसिया, कु. प्रिया चौरसिया आणि लष्कर-ए-हिंद संघटनेचे संस्थापक श्री. ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल हे होते. सौ. पार्वती जनार्दन यांनी हे छायाचित्र पाहून एक रचना केली. रचना करतांना त्यांनी त्या संदर्भात लेख वाचला नव्हता. रचनेचा आकृतीबंध पुढीलप्रमाणे आहे.

आयुर्वेदीय उपचारांनी विकार लवकर बरे होतात, याविषयीचे पू. सुदामराव शेंडेआजोबा यांचे अनुभव

पू. सुदामराव शेंडे
     २.११.२०१४ या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमध्ये अनेक वर्षे अ‍ॅलोपॅथीच्या उपचारांनी विकार ठीक झाला नाही; पण आयुर्वेदाच्या उपचारांनी अल्पावधीत बरा झाला, याविषयी लेख प्रसिद्ध झाला होता. माझ्या व्याधी आणि त्यांवर केलेले आयुर्वेदीय उपचार यांमुळे झालेला पालट पुढे देत आहे.
१. पोटाच्या व्याधी
    ऑगस्ट १९९५ मध्ये मी सेवानिवृत्त झाल्यापासून मार्च २०१४ पर्यंत मला पोटदुखीचा त्रास चालू होता. पोटदुखीसमवेत मला पित्त, शौचाला साफ न होणे आणि मूळव्याध यांचा त्रास होता. त्यामुळे अपुरी झोप, अपचन, भूक न लागणे इत्यादी त्रास होत असत.
१ अ. अ‍ॅलोपॅथीचे उपचार : यासाठी मी अनेक औषधे घेत होतो. काही वेळा तात्पुरता १५ ते २० दिवस आराम मिळत असे; पण परत त्रास चालू व्हायचा. शौचाला साफ होण्यासाठी अ‍ॅलोपॅथीची अनेक औषधे आणि पित्तासाठी गोळ्या चालू होत्या.

ज्ञानग्रहणाची वैशिष्ट्ये

१. एकाच विषयाचे ज्ञान वेगवेगळ्या वेळी भिन्न स्वरूपात प्राप्त होत असले, तरीही विषयातील सारांश आणि आकडेवारी एकच असणे : एकाच विषयाचे ज्ञान वेगवेगळ्या वेळी भिन्न स्वरूपात प्राप्त होत असले, तरीही विषयातील सारांश आणि आकडेवारी एकच असते, उदा. चंद्रदर्शन डोळ्यांनी घेणे, दुर्बिणीतून बघणे किंवा यानाने प्रत्यक्ष चंद्रावर पोचणे यांमध्ये दर्शन घेण्याची क्रिया एकच असली, तरीही चंद्राला अनुभवण्याचे स्वरूप भिन्न असते.
२. वैराग्य या एकाच विषयावर एकाच दिवशी तीन वेळी भिन्न भाषाशैलीत प्राप्त झालेल्या ज्ञानाचे उदाहरण
अ. मायेची ओढ ईश्‍वराकडे लागणे, ही वैराग्याची प्राथमिक अवस्था, तर ही अवस्था कायम टिकून रहाणे म्हणजे पूर्ण वैराग्य. (सकाळी ९)
आ. चराचरात नित्य ईश्‍वर अनुभवणे; म्हणजे पूर्ण वैराग्य. या स्थितीला मायेचा त्याग आपोआपच झालेला असतो. (दुपारी २)
इ. मनात सतत देव अथवा साधनेविषयी विचार असणे; म्हणजे वैराग्य. (रात्री ८)
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.६.२०१५)

एखाद्या देवतेचे कोणते नाम घ्यावे ?

    प्रत्येक देवतेची अनेक नावे असली, उदा. विष्णुसहस्रनाम, तरी प्रत्येक नाव देवतेच्या विशिष्ट गुणाशी संबंधित असते. त्यामुळे आवश्यक असलेल्या देवतेचे एखादे निराळे नाव न घेता सर्वसाधारणतः प्रचलित असलेले नाम घ्यावे. कुलदेवतेचे किंवा उपास्यदेवतेचे विशिष्ट नाव त्या तत्त्वाशी संबंधित असेल, तर ते घ्यावे. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१.१०.२०१५)

देवद आश्रमातील साधकांची प्रगती व्हावी, यासाठी तळमळणारे आणि साधकांवर निरतिशय प्रेम करणारे प.पू. पांडे महाराज !

प.पू. पांडे महाराज
१. प.पू. पांडे महाराज पुष्कळ प्रेमळ आहेत. त्यांचे हसणे लहान बाळासारखे निरागस आहे.
२. साधकांना कळेपर्यंत एखादे सूत्र समजावून सांगणे
    प.पू. महाराज साधकांना काही सूत्रे सांगत असतात. तेव्हा ते मध्ये मध्ये त्या साधकांना समजले का ?, असे विचारतात आणि समजले नसेल, तर परत सांगतात.
३. साधकांना चुकांची जाणीव करून देणे
अ. सेवेच्या वेळी झालेल्या चुका प.पू. महाराज त्याच वेळी सांगून चुकांची जाणीव करून देतात. साधकांची साधना व्यय न होता त्यांनी प्रसंगात न अडकता, त्यांची लवकर प्रगती व्हावी, असे त्यांना वाटते.
आ. दैनिक वाचतांना लक्षात आलेल्या चुका प.पू. महाराज लगेच संबंधित साधकांना बोलावून त्यांना दाखवून देतात आणि चुका कशामुळे होतात ?, हे सांगून त्यावर उपायही काढतात.

वाचक, हितचिंतक, राष्ट्रप्रेमी हिंदु आणि साधक यांना सत्सेवेची अमूल्य संधी !

बिंदूदाबनाचे लाकडी उपकरण बनवण्याकरता
सुतारकामाचे कौशल्य असणार्‍यांच्या साहाय्याची आवश्यकता !
    सनातनच्या विविध आश्रमांमध्ये अनेक साधक पूर्णवेळ सेवा करतात. साधकांना असणार्‍या रोगांंसाठी नानाविध उपचारपद्धतींचा अवलंब करावा लागतो. बिंदूदाबन या औषधविरहित उपचारपद्धतीमुळे बरेच साधक स्वतःच्या शारीरिक त्रासांची तीव्रता उणावत असल्याचे अनुभवत आहेत. अपेक्षित तेवढ्या जोराने बिंदूदाबन केल्यास अल्प कालावधीत तो रोग सहजरित्या बरा होऊ शकतो. हे उपचार प्रभावीपणे होण्याकरता बिंदूदाबनाचे लाकडी उपकरण उपयुक्त ठरते.
    बिंदूदाबनाचे लाकडी उपकरण मोठ्या संख्येत बनवण्याकरता सुतारकामाचे कौशल्य असणार्‍यांची आवश्यकता आहे. एक उपकरण बनवण्यासाठी एका सुताराला १.३० ते २ घंटे वेळ द्यावा लागतो. ही सेवा घरी राहूनही करता येईल.

सर्वत्रच्या साधकांना गुरुसेवेची सुवर्णसंधी !

विविध सेवांसाठी वाराणसी आणि देहली
सेवाकेंद्रांत साधकांची तातडीने आवश्यकता !
    वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील सनातनच्या सेवाकेंद्रात वाहन, संगणक देखभाल आणि दुरुस्ती, लेखा, प्रसार आदी सेवा, तसेच शारीरिक श्रमांच्या अन्य सेवा यांसाठी साधकांची आवश्यकता आहे. यासमवेतच विद्युत्-जोडणी, सुतारकाम, रंगकाम आदी बांधकामाच्या संदर्भातील कौशल्य असलेल्या सेवा, तसेच बांधकामाचे पर्यवेक्षण (सुपरविझन) करू शकणारे साधकही हवे आहेत.
    देहली सेवाकेंद्रात वाहन, स्वयंपाक, लेखा आदी विभागांमध्ये, तसेच शारीरिक श्रमांच्या अन्य सेवा करण्यासाठी साधकांची आवश्यकता आहे.
    जे साधक पूर्णवेळ किंवा काही कालावधीसाठी वाराणसी अथवा देहली सेवाकेंद्रात राहून या सेवा करू इच्छितात, त्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून रामनाथी आश्रमात कु. प्रियांका जोशी यांच्याशी ०८४५१००६०६३ या क्रमांकावर अथवा vishwadeep2023@gmail.com या संगणकीय पत्त्यावर संपर्क साधावा.
- (पू.) सौ. बिंदा सिंगबाळ (४.५.२०१५)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
जिसने पायो उसने छिपायो । वो नर सच्चा, वोही गुरुका बच्चा ।
भावार्थ : पायो म्हणजे आत्मानुभूती झाली. छिपायो म्हणजे आत्मानुभूती झाल्याचे कोणाला सांगितले नाही. (अर्थात ती शब्दांत सांगताही येत नाही.) गुरुका बच्चा म्हणजे गुरूचा खरा शिष्य. एखाद्याकडे अनमोल हिरा असला, तर तो काही सर्वांना त्याविषयी सांगत नाही. तसेच अनमोल आत्मानुभूती आलेला त्याविषयी कोणाला काही सांगत नाही. अहंभाव नसल्यामुळेच त्याला ती अनुभूती आलेली असते व म्हणूनच तो तिच्याविषयी बोलत नाही.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
'लाखो दर्शक असणार्या दूरचित्रवाहिन्या आणि लाखो वाचक असलेली वृत्तपत्रे यांनी पानसरे हत्या आणि संमोहन या विषयांच्या संदर्भात सनातन संस्थेविरुद्ध कितीही आरडाओरड केली, तरी शेवटी 'सत्यमेव जयते ।' हेच सिद्ध होणार आहे.' 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (४.१०.२०१५)
प्रा. श्याम मानव यांना 'सनातन संमोहित करते', असा आरोप करण्यासाठी आणखीन विषय ! 
सनातन संस्था करत असलेला धर्मप्रसार देश-विदेशांत भरपूर प्रमाणात वाढत आहे. हजारो लोक साधना करू लागले आहेत. सनातनने आतापर्यंत २७३ ग्रंथांच्या १४ भाषांत ६१ लक्ष प्रती प्रकाशित केल्या आहेत. यासंदर्भात 'डॉ. आठवले यांनी त्या सगळ्यांना संमोहित केले आहे', असे प्रा. श्याम मानव यांनी म्हटले, तर आश्चर्य वाटणार नाही. 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२.१०.२०१५) 

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मनाची एकाग्रता 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      मनाची एकाग्रता ही अशी शक्ती आहे की, जी प्रत्येक गोष्टीत यश प्राप्त करून देते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

इकलाख महंमद प्रकरण आणि प्रसिद्धीमाध्यमे !

      या देशात अल्पसंख्यांक समाजातील कुणालाही जरासे काही झाले की काँग्रेस, समाजवादी पक्ष, आप यांसह सर्व पुरोगामी मंडळींचा संबंधित व्यक्तीप्रती लगेच उमाळा दाटून येतो. असाच काहीसा प्रकार उत्तरप्रदेश येथील बिसरा गावातील इकलाख महंमद प्रकरणी झाला आहे. इकलाख याने घरी गोमांसाचा साठा केला आणि गोमांस खाल्ले असा संशय निर्माण झाल्याने हिंदूंचा जमाव प्रक्षुब्ध झाला आणि त्यांनी केलेल्या मारहाणीत इकलाखचा मृत्यू झाला. २८ सप्टेंबरला ही घटना झाल्यानंतर इकलाख याच्या घरी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करणार्‍यांची रीघच लागली.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn