Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

हिंदु धर्मप्रसार करणार्‍यांना संपवण्यासाठी श्याम मानव यांनी उचलला अफझलखानी विडा ! - उद्धव ठाकरे

  • दैनिक सामनामधील संपादकीयमधून तथाकथित पुरोगाम्यांना सणसणीत चपराक !
  • कठीण काळात सनातन संस्थेच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या रहाणार्‍या शिवसेनेचे जाहीर आभार !
श्री उद्धव ठाकरे
      मुंबई - हिंदु धर्माचा प्रसार करणार्‍या संस्था अन् व्यक्ती यांना नष्ट करायचे, असा अफझलखानी विडा उचलणार्‍यांची मोठी सूची आहे. त्या सूचीत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रा. श्याम मानव यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. हिंदु संत-महात्मे किंवा सनातन संस्था यांच्या निमित्ताने जे चालले आहे, तो सर्व प्रकार हिंदुत्वाच्या प्रचारकांचा कोंडमारा करणारा आहे. सनातन संस्थेवर वेळीच बंदी न घातल्यास महाराष्ट्राचा अफगाणिस्तान होईल, अशी भीती या श्याम मानव नामक भुतास वाटत आहे. अशा भुतांची पैदास सध्या वाढू लागली आहे.

मुंबई येथील पत्रकार परिषदेत सनातन संस्थेवर तरुणींच्या संमोहनाचा आरोप करणार्‍या एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीचा बुरखा फाडला !

डावीकडून अधिवक्ता श्री. पुनाळेकर, डॉ. (सौ.) दीक्षा पेंडभाजे, प्रीती
आणि प्रिया चौरसिया आणि श्री. खंडेलवाल
सनातनला अपकीर्त करू नका ! - डॉ. (सौ.) दीक्षा पेंडभाजे, प्रीती आणि प्रिया
     दादर (मुंबई) - सनातन संस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचे संमोहन केले जात नाही. आम्ही संस्थेच्या माध्यमातून साधना करत आहोत. घरातून बाहेर पडून स्वतःचे आयुष्य आनंदाने जगत आहोत. अशा वेळी प्रसारमाध्यमांनी आमच्या नातेवाइकांकडून माहिती घेऊन गेले ४ दिवस आमची अपकीर्ती केली. त्यामुळे आमचे वैयक्तिक जीवन ढवळून गेले आहे. आम्हाला लोक विचारतात, तुमच्याविषयी जे माध्यमांमध्ये दाखवले जात आहे, ते खरे आहे का ? अशा प्रश्‍नांमुळे आम्हाला जो त्रास झाला, त्याचे दायित्व कोण घेणार ? आम्ही आमच्या घरच्यांच्या छळाला कंटाळून निघून आलो आहोत.

सनातन हिंसेचे समर्थन करत नाही, तर साधनेद्वारे दुर्जन वृत्ती नष्ट करण्यास सांगते !

पणजी येथील पत्रकार परिषदेत डॉ. दुर्गेश सामंत यांनी केले आरोपांचे खंडण !
डावीकडून शिवसेनेचे माजी गोवा राज्य प्रमुख श्री. रमेश नाईक, सनातन 
प्रभात नियतकालिक समूहाचे माजी संपादक डॉ. दुर्गेश सामंत, हिंदु जनजागृती 
समितीचे डॉ. मनोज सोलंकी आणि गोव्यातील धर्माभिमानी श्री. महेश पारकर
       रामनाथी, गोवा येथील सौरभ लोटलीकर यांनी गावातील सनातनचा आश्रम ७ दिवसांच्या आत बंद करा अन्यथा मोर्चा काढू आणि त्या वेळी काही गैर घडल्यास त्याला शासन उत्तरदायी राहील, अशी धमकी दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर सनातन संस्थेच्या वतीने १ ऑक्टोबर या दिवशी पणजी येथे पत्रकार परिषद घेऊन संस्थेची बाजू मांडण्यात आली. या परिषदेत शिवसेनेचे माजी गोवा राज्य प्रमुख श्री. रमेश नाईक, हिंदु जनजागृती समितीचे राज्य समन्वयक डॉ. मनोज सोलंकी आणि धर्माभिमानी तसेच समाजसेवक श्री. महेश पारकर आदी सहभागी झाले होते. त्यांच्यासमवेत सनातनचा आश्रम असलेल्या रामनाथी परिसरातील श्री. नरसिंह नाईक, श्री. गुरुदास नाईक, सौ. सुमन नाईक आणि श्री. श्रीराम खेडेकर आदी ग्रामस्थही या परिषदेला उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत डॉ. दुर्गेश सामंत आणि डॉ. मनोज सोलंकी यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नांना दिलेली समर्पक उत्तरे आणि महत्त्वाची सूत्रे येथे देत आहोत.

जनाची, मनाची आणि कशाचीच लाज न बाळगणार्‍या शोभा डे म्हणतात, मी गोमांस खाल्ले आहे, मग मलाही मारा !

     नवी देहली - दादरी (उत्तरप्रदेश) येथे गोहत्येच्या संबंधाने एका मुसलमान व्यक्तीला मारहाण करण्यात आली. त्यातच तिचा मृत्यू झाला. हे प्रकरण राजकीयदृष्ट्या तापत असतांनाच शोभा डे यांनी त्यांच्या ट्विटरवरून मी गोमांस खाल्ले आहे, माझीही हत्या करा, असे ट्विट करून स्वतःची बौद्धिक दिवाळखोरीच सिद्ध केली आहे.
     दादरी येथील प्रकरणाचा संबंध गोहत्येच्या विषयाशी असल्याचे समोर येत आहे. प्रत्यक्षात मृत इखलाक यांच्या पत्नीने पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीत जरी गोहत्येच्या संशयावरून मारहाण झाल्याचा उल्लेख केला नसला, तरी गोहत्येच्या कारणावरूनच हे प्रकरण घडल्याचे काही प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध होत आहे. या पार्श्‍वभूमीवर शोभा डे यांनी त्यांच्या ट्विटरवरून ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनीही त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी अनेकदा गोमांस खाल्ले आहे. कुणामध्ये ताकद असेल, तर मला मारून दाखवावे...

सनातन संस्थेवर बंदी आणण्याचे षड्यंत्र यशस्वी होऊ देणार नाही ! - जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री स्वरूपानंद सरस्वती

जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री स्वरूपानंद सरस्वती
     नाशिक - सनातन संस्था सनातन धर्म आणि संस्कृती यांचा प्रचार आणि रक्षण गेल्या २६ वर्षांपासून सातत्याने करत आहे. संस्था श्रद्धाळूंना सनातन धर्माचे सिद्धांत वैज्ञानिक भाषेत सांगण्याचा प्रयत्न करत आहे. सनातन संस्कृती अर्थात आचार-विचार, आहार-विहार, वेशभूषा, केशभूषा इत्यादींचे महत्त्व धर्मसत्संग, संस्कारवर्ग, ग्रंथसंपदा आदिंच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. सनातन संस्था हिंदुत्वाच्या रक्षणासाठी हिंदु धर्मातील विविध पंथ, संप्रदाय, आध्यात्मिक संस्था आणि संपूर्ण भारतातील हिंदुत्ववादी संघटनांना संघटित करण्याचे अथक प्रयत्न करत आहे. हिंदु देवता आणि धर्म यांचा अवमान थांबवण्याचे कार्य करत आहे. त्यामुळे संपूर्ण देशात धर्मावर श्रद्धा ठेवणार्‍या लाखो श्रद्धाळू समाजासाठी सनातन संस्था एक मार्गदर्शक केंद्र बनली आहे, असे प्रतिपादन जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री स्वरूपानंद सरस्वती यांनी येथील पत्रकार परिषदेत केले. शासनाने गोदावरीत मानसरोवरातील जल सोडण्याची कृती अशास्त्रीय होती, अशीही टीका त्यांनी केली.

सनातन संस्थेवर बेछूट आरोप करून मानहानी करणार्‍या एबीपी न्यूजला नोटीस जारी !

सनातन संस्थेची अपकीर्ती करणार्‍यांच्या विरोधात सनातनचा न्यायालयीन लढा !
     पणजी, ३ ऑक्टोबर (वार्ता.) - एबीपी न्यूज या हिंदी वृत्तवाहिनीवरून अपकीर्ती करणारे आणि खोटे वृत्त प्रदर्शित करून सनातन संस्थेची अपकीर्ती केल्याच्या प्रकरणात संस्थेने वाहिनीला कायदेशीर नोटीस बजावली आहे. संस्थेची मानहानी केल्यामुळे संस्थेला २५ कोटी रुपयांची हानीभरपाई द्यावी. ती न दिल्यास एबीपी न्यूज वाहिनीवर फौजदारी आणि दिवाणी खटला भरण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. 
वाहिनीकडून सनातन संस्था मुलींना आश्रमात डांबत असल्याचे धादांत खोटे वृत्त प्रसारित
    ३० स्पटेंबर २०१५ च्या रात्री ८ ते १० या कालावधीत एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीचे ऑपरेशन संमोहन या नावाने एक विशेष वृत्त प्रसारित केले. या वृत्ताद्वारे सनातन संस्था आणि सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या विरोधात चुकीची आणि मानहानीकारक माहिती प्रसारित करण्यात आली. या कार्यक्रमाच्या माध्यामातून सनातन संस्था मुलींचे संमोहन करते आणि त्यांना आश्रमात डांबून ठेवते, असे वांरंवार सांगितले जात होते. 

संमोहनाद्वारे कोणतेही अवैध कृत्य करवून घेता येत नाही !

संमोहनतज्ञ डॉ. चंद्रशेखर देशमुख यांनी 'टीव्ही ९' मराठी वृत्तवाहिनीवर प्रात्यक्षिकांसह केले सिद्ध !
समाजमनातील संभ्रम दूर करणारे संमोहनतज्ञ डॉ. चंद्रशेखर देशमुख यांचे अभिनंदन !
संमोहनतज्ञ
डॉ. चंद्रशेखर देशमुख
     मुंबई - गेेले काही दिवस प्रा. श्याम मानव यांनी सनातन संस्थेने संमोहनाद्वारे काही साधकांकडून हत्या घडवून आणल्या, असा आरोप करत आहेत. त्याविषयी जनतेमध्ये संमोहनाविषयी संभ्रम पसरल्याचे लक्षात घेऊन टीव्ही ९ मराठीने संमोहनतज्ञ डॉ. चंद्रशेखर देशमुख यांनी काही तरुणांवर संमोहनाचे प्रात्यक्षिक दाखवले. त्यांनी १० तरुणांना निरनिराळ्या सूचना देऊन त्यांच्या जुन्या स्मृतींना उजाळाही दिला. सर्व प्रात्यक्षिके झाल्यावर डॉ. देशमुख म्हणाले, संमोहन हे एक वैद्यकीय शास्त्र आहे. त्याचा विधायक वापर केला जाऊ शकतो. संमोहनाद्वारे कोणत्याही प्रकारचे अवैध कृत्य, गुन्हा, हत्या यांसारख्या गोष्टी कुणाकडून करून घेतल्या जाऊ शकत नाहीत. डॉ. देशमुख यांनी केलेल्या विधानांमुळे प्रा. श्याम मानव यांनी सनातनवर केलेले सर्व आरोपांतील फोलपणा सोदाहरण स्पष्ट झाला.

गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा निर्वाळा !

सनातन संस्था ही आतंकवादी संघटना असल्याचा कोणताही पुरावा आमच्याकडे नाही !
श्री. लक्ष्मीकांत पार्सेकर
    पणजी - सनातन संस्था ही आतंकवादी संघटना असल्याचा कोणताही पुरावा आमच्याकडे नाही. गोव्यातील मागील काँग्रेस शासनाने या संस्थेवर बंदी घालण्यासाठी बनवलेल्या प्रस्तावातील आरोपांत चौकशीअंती तथ्य आढळून आलेले नाही, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सनातनवर बंदी घालण्याची प्रसारमाध्यमांची अट्टहासी मागणी पुन्हा एकदा फेटाळून लावली आणि सनातन संस्थेवर बंदी घालू शकत नाही, असा निर्वाळा दिला. 
   देशातील काही राष्ट्रीय वृत्तवाहिनी आणि इंग्रजी प्रसारमाध्यमे वारंवार सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करत आहे. सनातन संस्थेचा मुख्य आश्रम रामनाथी, गोवा येथे असल्याने सनातनवर बंदी घालण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर प्रसिद्धीमाध्यमांकडून दबाव आणला जात आहे. राजभवनवर १ ऑक्टोबर या दिवशी राजेंद्र आर्लेकर यांच्या मंत्रीपदाचा शपथग्रहण समारंभ झाल्यानंतर पत्रकारांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांना गाठून सनातन संस्थेवर बंदी घालणार का ? असे विचारले.

शासन स्थानिक आंदोलकांच्या चेतावण्यांवरून चालत नाही, गोव्यातील सनातनचा आश्रम बंद करणार नाही ! - मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर

      गोवा शासन स्थानिक आंदोलकांच्या चेतावण्यांवर चालत नाही. कोणी मागणी केली म्हणून रामनाथी, गोवा येथील सनातन संस्थेच्या आश्रमावर बंदी घालणार नाही, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी व्यक्त केले आहे, असे वृत्त आयबीएन् लोकमत या वृत्तवाहिनीवरून प्रसारित करण्यात आले. सनातनवर खोटे आरोप करून रामनाथी गोवा येथील सनातनचा आश्रम ७ दिवसांच्या आत बंद करावा, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, अशी चेतावणी रामनाथ युवा संघाचे अध्यक्ष सौरभ लोटलीकर यांनी दोन दिवसांपूर्वी दिली होती.

प्रा. श्याम मानव यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे डॉ. हमीद दाभोलकर यांचे प्रतिपादन !

     आयबीएन् लोकमत वाहिनीवरील बेधडक कार्यक्रमातील सनातनवर कारवाई करण्यात कायदेशीर अडचणी आहेेत का ? या विषयावर १ ऑक्टोबरला रात्री ९ ते १०.३० या वेळेत आयोजित करण्यात आले होते. यात चर्चेत माजी पोलीस अधिकारी शिरीष इनामदार, अंनिसचे डॉ. हमीद दाभोलकर, डॉ. आशिष देशपांडे, सनातनच्या साधिका कु. प्रियांका स्वामी यांचे वडील राजेंद्र स्वामी आदी उपस्थित होते. या वेळी डॉ. हमीद दाभोलकर आणि कु. प्रियांका स्वामी यांनी मांडलेली सूत्रे  रविवारच्या वाचकांसाठी थोडक्यात पुनर्प्रसिद्ध करत आहोत.
    गेले काही दिवस प्रा. श्याम मानव प्रसारमाध्यमांतून परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांची अपकीर्ती करत आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांना संमोहित करून त्यांच्याकडून गुन्हे करवून घेतात आणि त्यानंतर त्यांच्या स्मृतीतून सदर भाग पुसून टाकतात, असा आरोप ते सातत्याने करत आहेत. या संदर्भात मानसोपचारतज्ञ असलेले डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, कुणाचेही संमोहन करून त्यांच्याकडून गुन्हे करवून घेता येत नाही. प्रा. श्याम मानव यांच्या विचारांशी आमची संघटना असहमत आहे. अशा प्रकारचा आरोप करून हत्येच्या मूळ अन्वेषणावरून लक्ष विचलित करण्याचा हा डाव आहे. (डॉ. हमीद दाभोलकर यांच्या या विधानांवरून तरी बोध घेऊन स्वतःला चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणणारे प्रा. श्याम मानव आपली मनमानी विधाने मागे घेतील का ? - संपादक)

(म्हणे) आठवलेंच्या चरित्रातील चमत्कार सिद्ध करा !

जादूटोणाविरोधी कायद्याचे सामान्य
ज्ञानही नसणार्‍या अंनिसचे हास्यास्पद आव्हान !
    सांगली, ३ ऑक्टोबर (वार्ता.) - सनातन संस्थेचे प्रमुख डॉ. जयंत आठवले यांनी त्यांच्या चरित्रात केलेले चमत्काराचे दावे करण्यासाठी पुढे यावे. त्यांनी ते आव्हान न स्वीकारल्यास भविष्यात आम्ही त्यांच्या विरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करू, अशी चेतावणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. प्रदीप पाटील आणि अधिवक्ता चंद्रकांत शिंदे यांनी १ ऑक्टोबर या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. (मुळात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरित्रात करण्यात आलेले दावे हे त्यांनी केलेलेच नाहीत.  साधकांना आलेल्या अनुभूती या वैयक्तिक स्वरूपाच्या आहेत. त्यातून कोणत्याही अर्थलाभाची अपेक्षा कुणीही केलेली नाही. त्यामुळे या चरित्राला जादूटोणा कायदाच लागूच होत नाही. अंनिसच्या लोकांनी अगोदर कायद्याचा अभ्यास करावा, मग परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आव्हान द्यावे ! - संपादक)

(म्हणे) सनातन संस्था देशविघातक !

हिंदुद्रोहाचा चष्मा घातलेले भारतीय रिपब्लिकन पक्षाचे विधान
    सातारा, ३ ऑक्टोबर (वार्ता.) - आमचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अनेक वर्षांपूर्वी सनातनवर बंदी आणण्याचे प्रयत्न केले होते; मात्र त्या वेळच्या शासनाने याकडे दुर्लक्ष केले. सनातन संस्था देशविघातक आहे, असे प्रतिपादन भारतीय रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी केले. (या संदर्भातील पुरावे सादर करण्याचे सौजन्य भारिप का दाखवत नाही ? - संपादक) भारतीय रिपब्लिकन पक्ष आणि विविध संघटना यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आंदोलन करण्यात आले. तसेच सनातनवर बंदी घालावी, या आशयाचे निवेदनही जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. 

पूज्यपाद संतश्री आसारामबापूंच्या भक्तांचा सनातनला पाठिंबा

    दांभिक विवेकवादी शक्तींनी सनातन संस्थेवर बंदी घालण्यासाठी चालवलेले दबावतंत्र अत्यंत चिंताजनक आहे. संतश्री आसारामजी समाज कल्याण आणि समाज परिवर्तन संस्थानाच्या वतीने बापूंचे सर्व भक्त आणि अनुयायी राष्ट्रानिर्मितीस वाहून घेतलेल्या सनातन संस्थेवर करण्यात येत असलेल्या टीकेचा तीव्र शब्दात विरोध करत आहोत. आम्ही शासनाला खोट्या आरोपांच्या दबावात न येता सनातनवर बंदीचा कोणताही निर्णय घेऊ नये, तसेच सनातनवर टीका करणार्‍या तथाकथित सेवाभावी संस्थांच्या आर्थिक घोटाळ्यांची निःस्पृहपणे चौकशी करून आरोपींना कडक शिक्षा करावी, अशी मागणीही आम्ही करत आहोत.

जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात श्री. दिलीप अलोणी यांनी मांडली सनातनच्या बाजूने भूमिका !

प्रखर धर्माभिमानी श्री. दिलीप अलोणी यांचे सनातन संस्थेकडून आभार !
     मुंबई - कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणात संशयित म्हणून सनातन संस्थेच्या समीर गायकवाड याला अटक केल्यावर अनेकांनी सनातनवर बंदी आणण्याची मागणी केली. यासंदर्भात अनेक चर्चासत्रेही वृत्तवाहिन्यांवर घेण्यात आली. त्यांपैकी १६ सप्टेंबरला जय महाराष्ट्र या वाहिनीवर घेण्यात आलेल्या चर्चासत्रात ब्राह्मण स्वाभिमान मंचचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय एकात्मता रक्षा अभियानचे श्री. दिलीप अलोणी यांनी सनातन संस्थेच्या समर्थनार्थ भूमिका बजावली. कठीण काळात सनातनच्या बाजू खंबीरपणे मांडणार्‍या श्री. अलोणी यांची सनातन संस्था आभारी आहे.
(यासंदर्भातील चर्चासत्र लवकरच प्रसिद्ध करत आहोत.)

काफिरांना ठार मारणार्‍यांविषयी शोभा डे का बोलत नाहीत ?

फलक प्रसिद्धीकरता
      दादरी (उत्तरप्रदेश) येथे गोहत्या केल्याच्या संशयावरून एका मुसलमान व्यक्तीला मारहाण करण्यात आली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणावरून शोभा डे यांनी त्यांच्या ट्विटरवरून मी गोमांस खाल्ले आहे, माझीही हत्या करा, असे म्हटले आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : 
UPme yek musalmanki hatyake bad Shobha De ne kaha, maine gomans khaya hai, meribhi hatya karo. - kya Kaphironki hatya karnevaloke bareme Shobha De ne kabhi kuch kaha hai ?
जागो ! : 
    युपीमें एक मुसलमानकी हत्याके बाद शोभा डे ने कहा, मैने गोमांस खाया है, मेेरीभी हत्या करो. - क्या काफिरोंकी हत्या करनेवालोंके बारेमें शोभा डेने कभी कुछ कहा है ?

आज ठाणे येथे भव्य निषेध फेरी

     विषय - कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पोलीस यंत्रणेने कोणत्याही दबावास बळी न पडता चौकशी करावी, तसेच राष्ट्र्रप्रेमी सनातन संस्थेवर होत असलेला अन्याय आणि बंदीच्या विरोधात ठोस भूमिका घेण्यात यावी. 
वेळ : दुपारी ४ ते ६
फेरीचे ठिकाण : गडकरी रंगायतन, ठाणे 
संपर्क : ९३२४८६८९०६ / ९९२०२०८९५८

आदेशानंतर साडेतीन वर्षांनी श्री भवानीदेवी मंदिराच्या विश्‍वस्तांची चौकशी चालू !

    धाराशिव (उस्मानाबाद) - श्रीक्षेत्र तुळजापूर येथील सुप्रसिद्ध श्री भवानीदेवीच्या मंदिराच्या विश्‍वस्तांची चौकशी चालू केली आहे. पुजारी मंडळाचे अध्यक्ष श्री. किशोर गंगणे यांनी हा घोटाळा बाहेर आणला होता. १९९१ ते २००९ या कालावधीत देवस्थानात २०० कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले होते. या संदर्भात १४ मे २०१२ या दिवशी सीआयडी चौकशीचे आदेश दिले होते; मात्र कारवाई झाली नव्हती. आता गृहविभागाने सीआयडी विभागाला घोटाळ्याची २ मासांत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार २ ऑक्टोबरला एका विश्‍वस्ताची चौकशी झाल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजले आहे; मात्र त्यांनी या संदर्भात नकार दिला आहे.

समीर गायकवाड यांच्यावरील ब्रेन मॅपिंग चाचणीची सुनावणी ६ ऑक्टोबरला

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण
    कोल्हापूर, ३ ऑक्टोबर (वार्ता.) - कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी संशयित श्री. समीर गायकवाड यांच्यावर ब्रेप मॅपिंग करण्यासंदर्भातील अर्जावर आता ६ ऑक्टोबर या दिवशी सुनावणी होणार आहे. येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री.आर्.डी. डांगे यांच्यासमोर ३ ऑक्टोबरला श्री. समीर गायकवाड याच्या बाजूने अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन आणि अधिवक्ता श्री. एम्.एम्. सुहासे यांनी जोरदार आणि कणखर युक्तीवाद मांडतांना श्री. समीर गायकवाड यांच्या ब्रेन मॅपिंग चाचणीला कडाडून विरोध दर्शवला. त्यानंतर सुनावणी पुढे ढकलण्यात आली.

सनातन प्रभात मधील विचार विषारी, तर मग हे काय ?

'धार्मिक नक्षलवादा'चा अर्थ आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याचा सनातनचा हेतू लक्षात घ्या !

  
'सनातन संस्थेला स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता काय आहे ?', 'तुम्ही प्रशिक्षण का देता ?', अशी टीका सनातनवर वारंवार केली जात आहे. या टीकेचे समर्थन करण्यासाठी टीकाकार दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले 'नक्षलवादी बना !' अशा आशयाच्या लिखाणाची उदाहरणे दिली जातात. याविषयी सनातनची भूमिका येथे मांडत आहोत.
१. सनातनला अपेक्षित असलेला नक्षलवाद म्हणजे ईश्वरभक्तीचा ठाम विचार !
    नक्षलवाद या शब्दाचा अर्थ कट्टर किंवा ठाम विचारांचा असा आहे. आपल्या सर्वांना ठाऊक असलेला नक्षलवाद हा शासन आणि जमीनदार यांच्या विरोधातील आहे. सनातनने नक्षलवाद हा शब्द शासनविरोधी कृत्ये करणारा या अर्थाने वापरलेला नाही, तर शासनविरोधी कृत्ये करणार्यांच्या विरोधातील कट्टर विचारांचा या अर्थानेच वापरला आहे. एका संदेशात तर स्पष्टपणे पोलिसांचे आणि जनतेचे संरक्षण व्हावे, याच हेतूने हे विचार मांडले आहेत. सनातनने कधीही 'बंदूक किंवा बॉम्ब यांच्या आधारे नक्षलवादी बना !', असे म्हटलेले नाही. सनातनला अभिप्रेत असलेला धार्मिक नक्षलवाद म्हणजे ईश्वरभक्तीचा ठाम विचार होय.

परभणी जिल्हा ब्राह्मण महासंघाच्या वतीने सनातन संस्थेला पाठिंबा

      परभणी - परभणी जिल्हा ब्राह्मण महासंघाच्या वतीने सनातन संस्थेला जाहीर पाठिंबा देण्याचे बैठकीमध्ये ठराव पारीत करण्यात आला. जिल्हा ब्राह्मण महासंघ परभणीच्या वतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. यामध्ये विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सध्याच्या स्थितीला सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी काही पुरोगामी म्हणवणार्‍या लोकांकडून केली जात आहे

विरोधक म्हणून सनातनने खून केल्याचे घोषित करणे, हे देशात कायदा सुव्यवस्था नसल्याचे द्योतक ! - रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

    १ ऑक्टोबर या दिवशी एबीपी माझा या वृत्तवाहिनीवरील झालेल्या चर्चासत्रात करवीरपिठाचे शंकराचार्य नृसिंह सरस्वती, प्रवचनकार आणि लेखक डॉ. सच्चिदानंद शेवडे,  लेखक जयराज साळगावकर, काँग्रसचे प्रवक्ता रत्नाकर महाजन आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता श्री. रमेश शिंदे सहभागी झाले होते. या चर्चासत्रातील सूत्रे आज आपण पहाणार आहोत.
करवीर पिठाचे शंकराचार्य नृसिंह सरस्वती यांनी धर्माचा दाखला देत मांडलेली सूत्रे
१. तपास चालू असेपर्यंत चर्चा होऊ नयेत.
२. संमोहन एवढे प्रगल्भ आहे, तर त्याद्वारे पानसरे यांनाच आश्रमात आणता आले असते. जसे अंधश्रद्धेचे स्वातंत्र्य आहे तसे श्रद्धेचे स्वातंत्र्य आहे. त्यात वावगे काय ?
३. सनातन धर्मात युगानुसार वेगवेगळे पालट दाखवले आहेत. त्यानुसार कलियुगामध्ये याहून काही वेगळे पालट होतील, असे नाही. ऋषीमुनींनी सांगून ठेवले आहे की, दर २०-२५ मैलाला भाषा, धर्म बदलतो. ऋषीमुनींनी सर्च केला आहे, रिचर्स नव्हे. त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या धर्माचे पालन करायला हवे. आचार प्रभो धर्मः । आचारातून धर्म सिद्ध झाला आहे. त्यामुळे त्यात पालट करणे शक्य नाही. ते चुकीचे आहे. त्याचे अनुकरण करावे.

साधकांनो, न डगमगता धैर्याने साधना चालू ठेवा ! - प.पू. दास महाराज

प.पू. दास महाराज
१. धर्मसंस्थापनेचे कार्य बंद पाडण्यासाठीच सनातन संस्थेची अपकीर्ती !
       हिंदु धर्म, देवता आणि संत यांच्या विरोधात काम करणार्‍या तीन नेत्यांची हत्या झाली. याचे अवडंबर करून हिंदुद्वेष्टे, राजकारणी, पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी सनातन संस्थेच्या विरोधात जोरदार मोहीम उघडली. यात खोट्या आरोपांखाली साधकांना गोवणे, पत्रकार परिषद घेऊन मानहानीकारक आरोप करणे, खोट्या बातम्या पेरून सनातन संस्थेची अपकीर्ती करणे, अशी रूपरेषा आखूनच सनातनविरोधी कार्यक्रम करण्यात आले. या कारस्थानांमागे उद्देश एकच आहे, तो म्हणजे साधकांमध्ये भय निर्माण होऊन त्यांनी साधना सोडून द्यावी आणि समाजात सनातन संस्थेची अपकीर्ती होऊन धर्मसंस्थापनेचे कार्य बंद पडावे.

सनातनच्या कु. प्रियांका स्वामी यांच्या भ्रमणभाषवरील संपर्कामुळे वृत्तवाहिन्यांचे पितळ पडले उघडे !

कु. प्रियांका स्वामी
    गेले २ दिवस एबीपी माझा, आयबीएन् लोकमत आणि टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिन्या कु. प्रियांका स्वामी यांचे वडील श्री. राजेंद्र स्वामी यांची मुलाखत दाखवत होत्या. कु. स्वामी यांना सनातनच्या साधकांनी संमोहित केल्याचे या वृत्तवाहिन्यांचे पत्रकार वदवून घेत होते. तेही या चर्चेत सहभागी झाले होते. त्यांनीही सनातन संस्थेवर अनेक आरोप केले; मात्र या कार्यक्रमात कु. प्रियांका स्वामी या भ्रमणभाषवरून सहभागी झाल्या. कु. स्वामी यांनी सांगितले, मला समाजकार्याची आवड होती. मी सज्ञान आणि सुशिक्षित आहे. मला आश्रमात राहून पूर्णवेळ समाजकार्य करण्याची संधी मिळते. मी माझ्या पालकांशी भ्रमणभाषवरून संपर्कात असते. सनातन संस्थेत काहीही चुकीचे सांगितले जात नाही. तेथे अयोग्य काही चालत नाही. त्यामुळे श्री. राजेंद्र स्वामी यांनी मी समाजकार्यासाठी कु. स्वामी यांना अटकाव करणार नाही, असे सांगितले. त्यामुळे सनातनवर होत असलेल्या तरुणींच्या संमोहनाच्या आरोपाचेही खंडण झाले.

दैनिक सकाळच्या संकेतस्थळ वाचकांनी प्रा. श्याम मानव यांच्याविषयी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया !

अखिल भारतीय अंनिसचे प्रा. श्याम मानव यांनी १ ऑक्टोबर या दिवशी पत्रकार परिषदेत सनातनवर आरोप करतांना सनातनच्या कारवायांमुळे भारताचा अफगाणिस्तान होण्यास वेळ लागणार नाही, असे वक्तव्य केले होते. याविषयी सकाळ संकेतस्थळाच्या वाचकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया जशा आहेत तशा येथे देत आहोत.
१. श्याम मानव साहेब, खोटे बोलून लोकांचा बुद्धीभेद करणे ठीक नाही ! - अमोल कोदे
श्याम मानव साहेब, तुम्ही खोटे बोलत आहात. संमोहन शास्त्राबद्दल जे काही वाचले, त्यानुसार एखाद्याच्या इच्छेविरुद्ध काही करून घेता येत नाही. तुम्ही त्यातले तज्ञ असूनदेखील खोटे बोलत आहात. तुमचे आणि सनातनचे काही व्यक्तीगत शत्रुत्व दिसते; पण त्यामुळे तुम्ही असे खोटे बोलून लोकांचा बुद्धीभेद करणे ठीक नाही. अंनिसच्या कामाबद्दल कौतुक वाटते; पण अंनिस काही ठिकाणी अती वागते. लोकांच्या धार्मिक भावनांशी खेळते, असे वाटत नाही का ? अंनिस केवळ हिंदूंच्याच मागे लागली आहे, हे बरोबर नाही. सनातनच्या साधिकांविषयी केवळ प्रसिद्धीसाठी ब्रेकिंग न्यूज म्हणून सरळ सरळ नावे घोषित केली. हा प्रकार प्रसारमाध्यमांनी चुकीचा केला. त्यांच्या व्यक्तीगत जीवनात यामुळे काय वादळ उठले असेल, याची त्यांनी कल्पना केली आहे का ?

सनातनची पत्रकारिता

    लौकिक अर्थाने व्यावसायिकता म्हणून वृत्तपत्रांकरता लिखाण किंवा संकलन करणे याला पत्रकारिता असे म्हणतात; परंतु सनातन पत्रकारितेची व्याख्या पुढीलप्रमाणे करते - समाजजागृति आणि समाजपरिवर्तन या मार्गांन्वये राष्ट्र्राच्या सर्वांगीण उत्कर्षाचे ध्येय जनमानसापुढे आपल्या विचारांतून मांडण्याच्या आणि सफल करण्याच्या सांघिक प्रयत्नास पत्रकारिता असे म्हणतात.
   समाजातील वस्तूस्थिती, त्यामागील कार्यकारणभाव, त्यावरील उपाययोजना या गोष्टी समाजमनाला समजावणे, हा समाज सुस्थितीत करण्यातील पहिला टप्पा आहे. या संदर्भातील समाजातील वास्तव योग्य प्रकारे व्यक्तीपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे ठरते. प्रसारमाध्यमे हे या कार्यासाठीचे महत्त्वाचे माध्यम आहे. या माध्यमाची गुणवैशिष्ट्ये कोणती असावीत आणि नसावीत याचा विचार होणे त्यासाठीच आवश्यक ठरते.
साधक ईश्‍वरनिष्ठ असतो. त्याची ईश्‍वरनिष्ठा त्याच्या प्रत्येक कृतीमधून व्यक्त होत असते. विचारांची व्यापकता, विवेक, निर्भीडपणा यांच्याबरोबरच द्रष्टेपणा हे ईश्‍वरनिष्ठ मनाचे गुणधर्म होत. समाजमन सुसंस्कारित करण्यासाठी आवश्यक असणार्‍या पत्रकारितेमध्ये या गुणांचे कसे आविष्करण केले जाऊ शकते याची शिकवण सनातनच्या पत्रकारितेत दिली आहे, हे सनातनच्या पत्रकारितेच्या काही वैशिष्ट्यावरून स्पष्ट होईल.

क्षात्रधर्म साधना म्हणजे हिंसक कारवाया नव्हे !

    २७ सप्टेंबर या दिवशी दैनिक लोकसत्तामध्ये श्रीकांत पटवर्धन यांचा सनातनची विचारप्रणाली आणि हिंसा हा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यात सनातन संस्थेच्या क्षात्रधर्म साधना या ग्रंथातील संदर्भांच्या आधारे सनातन संस्थेला हिंसक विचारसरणीची असे ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. सत्य समाजासमोर यावे, यासाठी सनातनचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक  यांनी पटवर्धन यांच्या विचारांचे खंडण केले आहे. श्री. वर्तक यांच्या पत्राला दैनिक लोकसत्तानेही ३ ऑक्टोबर या दिवशी प्रसिद्धी दिली. आमच्याही वाचकांसाठी श्री. अभय वर्तक यांचे विचार येथे प्रसिद्ध करत आहोत.

साधनेसाठी संसाराचा त्याग करणार्‍यांना व्यक्तीस्वातंत्र्य नाही का ?

    एखादी व्यक्ती सज्ञान असेल, तर तिला साधनेसाठी जायचे कि नाही ? आश्रमात रहायचे कि घरी रहायचे ? यांसारखे निर्णय स्वतः घेण्याचा अधिकार कायद्याने दिला आहे; मात्र प्रसारमाध्यमे साधनेसाठी घर सोडून गेलेल्यांच्या केवळ नातेवाइकांच्या प्रतिक्रिया दाखवून टीआर्पीच्या मागे लागली आहेत. हा साधनेसाठी संसाराचा त्याग करून आलेल्या व्यक्तींच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा किंवा मतस्वातंत्र्याचा संकोच नव्हे का ?

प्रसारमाध्यमांची एकांगी पत्रकारिता !

    सनातन संस्थेच्या नादाला लागून आमचा मुलगा/ मुलगी घर सोडून निघून गेला/गेली, अशी तक्रार करणार्‍या नातेवाइकांच्या भावनांचे भांडवल करून काही प्रसारमाध्यमे सनातनची अपकीर्ती करत आहेत. ही प्रसारमाध्यमे जे लोक साधनेसाठी घर सोडून गेले, त्यांची भूमिका का ऐकून घेत नाहीत ? न्यायालय दोन्ही बाजू ऐकून घेते आणि त्यानंतर निर्णय देते. प्रसारमाध्यमांना मात्र एकांगी भूमिका घेणेच आवडते.

समाजात तेढ निर्माण करण्यासाठी दैनिक 'सनातन प्रभात' विषारी प्रचार करते का ?

अ. समाजात तेढ निर्माण करणे हा दैनिक सनातन प्रभातचा उद्देश नाही. कोणताही समाज असो त्याची निष्ठा या देशाशी असली पाहिजे, एवढेच सनातन प्रभातचे म्हणणे असते. अल्पसंख्यांक समुदायातील व्यक्तींनी दुष्कृत्य केले, तर आम्ही अवश्य त्यांनी केले असे लिहितो. कुठलीही राष्ट्रप्रेमी संघटना आणि व्यक्ती यांचे ते कर्तव्यच ठरते. तसेच सत्य मांडू नये, असा कुठलाही कायदा सद्यस्थितीत भारतात नाही.
आ. आम्ही अल्पसंख्यांकांनी न केलेले गुन्हे त्यांच्या नावावर छापतो, असे एकही उदाहरण किंवा प्रकरण पोलिसांनी अथवा शासनाने दाखवलेेले नाही.
इ. सनातन प्रभातच्या लिखाणाने अथवा सनातन संस्थेने सांगितलेल्या राष्ट्र आणि धर्म यांविषयक गोष्टींमुळे तेढ निर्माण होऊन बंदच काय; पण साधी मारामारी झाली असे एकही उदाहरण नाही.

विविध प्रसारमाध्यमांनी घेतलेल्या चर्चासत्रात सनातन संस्थेची बाजू खंबीरपणे मांडणारे स्वामी चक्रपाणी, श्री. जितेंद्र खुराना, अधिवक्ता अमृतेश एन्.पी., अधिवक्ता नवीन चोमल आणि श्री. सुरेश चव्हाणके यांचे आभार !

    कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना निवळ संशयावरून १६ सप्टेंबरला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर गेले काही दिवस अनेक वृत्तवाहिन्यांवरून सनातन संस्थेवर विविध आरोप करण्यात आले. त्या अनुषंगाने अनेक वृत्तवाहिन्यांनी चर्चासत्राचे कार्यक्रम आयोजित केले होते. यातील काही कार्यक्रमांत स्वामी चक्रपाणी, श्री. जितेंद्र खुराना, अधिवक्ता अमृतेश एन्.पी., अधिवक्ता नवीन चोमल आदी हिंदुत्ववादीही सहभागी झाले होते. या सर्वांनी सनातन संस्थेला खंबीरपणे पाठिंबा देत सनातनची बाजू परखडपणे मांडली. त्यांनी मांडलेली बाजू थोडक्यात येथे देत आहोत.
श्याम मानव हे तर्कशास्त्री नव्हे, तर कुतर्कशास्त्री ! - सुरेश चव्हाणके, प्रमुख संपादक, सुदर्शन वाहिनी
सनातन संस्थेचे कार्य मी जवळून पाहिले. सनातन संस्था हिंदु धर्माचे कार्य अत्यंत तळमळीने आणि प्रामाणिकपणे करणारी अशी ही एक संस्था आहे. तिच्यावर होत असलेले हे आरोप अत्यंत चुकीचे आहेत. ते राजकीय लाभ डोळ्यांसमोर ठेवून होत आहेत. सनातनवर आरोप करणारे श्याम मानव हे तर्कशास्त्री नसून कुतर्कशास्त्री आहेत. 

या छायाचित्रातील साधकाकडे पाहून ते गुन्हेगार असतील, असे तुम्हाला वाटते का ?

श्री. विनायक पाटील
     मडगाव, गोवा येथील वर्ष २००९ च्या स्फोट प्रकरणात ६ साधकांना पोलिसांनी अटक करून खटले भरले होते; मात्र त्यांच्या विरोधात कोणताही पुरावा न मिळाल्याने त्यांची ३१ डिसेंबर २०१३ या दिवशी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. या ६ निर्दोष साधकांपैकी एका साधकाचे छायाचित्र येथे दिले आहे.
पोलिसांनो, खरे गुन्हेगार ओळखण्यासाठी साधना 
करण्याशिवाय पर्याय नाही ! 
    या छायाचित्राकडे पाहून सर्वसामान्य व्यक्तीही सांगू शकेल की, ते गुन्हेगार नाहीत; मात्र पोलीस ते ओळखू शकले नाहीत. त्यामुळे या साधकाला ४ वर्षे अकारण कारागृहात खितपत पडावे लागले. एखाद्याच्या मनात चिंता असेल, तर ती चिंता त्याच्या चेहर्‍यावर दिसते. इंग्रजीत चेहरा हा मनाचा आरसा आहे. (Face is mirror of mind.) त्यानुसार एखाद्याने गुन्हा केला असेल, तर त्याच्या चेहर्‍यावर तसे जाणवते; मात्र पोलीस निरपराध साधकांना नाहक अटक करून त्यांचा छळ करतात, म्हणजेच पोलिसांना गुन्हेगार ओळखता येत नाहीत. खरे गुन्हेगार ओळखण्यासाठी साधनेशिवाय पर्याय नाही, हेच यातून सिद्ध होते; कारण साधनेमुळे सूक्ष्मातून जाणण्याची क्षमता व्यक्तीत निर्माण होते आणि अशी सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असलेली व्यक्तीच एखादी व्यक्ती कशी आहे, हे लगेच ओळखू शकते. यावरून साधना करण्याचे महत्त्व लक्षात येते. 

साप्ताहिक सनातन प्रभातच्या पृष्ठसंख्येत वाढ !

दीपावलीच्या शुभमुहुर्तावर... वाचक आणि विज्ञापनदाते यांना आनंदवार्ता !
     राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची संख्या वाढत असल्याने सध्या या आघातांची वृत्ते येण्याचा ओघ प्रचंड आहे. हिंदु राष्ट्र निर्मितीला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्र आणि धर्म यासंदर्भात स्फूर्तीदायक प्रसंग घडतांना दिसत आहेत. या सर्व गोष्टींविषयी हिंदूंना अवगत करणे आवश्यक आहे. यासाठीच साप्ताहिक सनातन प्रभातची पृष्ठसंख्या वाढवत आहोत.
वर्ष १७ अंक क्र. ५० (२९ ऑक्टोबर २०१५ ते ४ नोव्हेंबर २०१५) पासून प्रत्येक अंक १६ पानी ! 
मूल्य ८ रुपये (वार्षिक वर्गणी : ४०० रुपये)
साधकांना सूचना : साप्ताहिकाच्या वर्गणीदारांचे नूतनीकरण करतांना साधकांनी वर्ष १७ अंक क्र. ५० (२९ ऑक्टोबर २०१५ ते ४ नोव्हेंबर २०१५) पासून लागू होणार्‍या वाढीव मूल्याप्रमाणे वर्गणीदारांकडून वर्गणी घ्यावी.
राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात आपला अमूल्य सहभाग प्रार्थनीय आहे !

केवळ रविवारच्या दैनिक सनातन प्रभातचे वाचन करणार्‍या राष्ट्र-धर्म प्रेमी आणि जिज्ञासू वाचकांना नम्र विनंती !

राष्ट्ररक्षण, धर्मजागृती यांचा वसा घेतलेल्या दैनिक सनातन प्रभातचे नियमित वाचक व्हा !
१. राष्ट्र, धर्म आणि अध्यात्म यांचा सुरेख संगम असल्याने वाचकांना चौकस 
ज्ञानसंपदा उपलब्ध करून देणारे अनोखे दैनिक सनातन प्रभात ! 
      दैनिक सनातन प्रभात म्हणजे राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत असलेले एकमेव नियतकालिक ! अध्यात्म, राष्ट्र, धर्म, आचारधर्म, कायदा, आर्थिक उलाढाल, राजकारण आदी विषयांवरील लेख योग्य संपादकीय दृष्टीकोनासह या नियतकालिकातून प्रसिद्ध केले जातात. वाचकांच्या मनातील देशप्रेम वृद्धींगत करण्यासाठी, तसेच हिंदु धर्मावर होणार्‍या आघांताविषयी त्यांना अवगत करण्यासाठी हे नियतकालिक सदैव कटीबद्ध आहे. 
       देवतांविषयी भावभक्ती वाढवणारी, साधनेची अपरिहार्यता सांगणारी नानाविध सदरेही यामध्ये प्रसिद्ध केली जातात.

रत्नागिरी येथील विहिंपचे दिगंबर साठे यांनी समीर गायकवाड यांचा न्यायालयीन खटला लढण्यासाठी स्वत:हून आर्थिक साहाय्य करणे

    येथील विश्‍व हिंदु परिषदेचे माजी प्रखंडप्रमुख श्री. दिगंबर साठे यांनी हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय जोशी यांना दूरभाष करून घरी बोलावून घेतले. कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करणार्‍या सनातन संस्थेला नाहक गोवण्यात येत आहे, असे सांगून श्री. समीर गायकवाड यांचा न्यायालयीन खटला लढण्यासाठी त्यांनी ५ सहस्र रुपयांचे आर्थिक साहाय्य दिले.

दापोली येथील दैनिक सनातन प्रभातचे वाचक विजय गोळे यांनी अन्य वृत्तपत्रात सनातनविरोधी लेख आल्याचे कळवून त्याचा वैचारिक प्रतिवाद करण्याविषयी सांगणे

    येथील दैनिक सनातन प्रभात चे वाचक श्री. विजय गोळे यांनी २७ सप्टेंबर २०१५ या दिवशीच्या लोकसत्ता मध्ये पृष्ठ क्र. ६ वर श्रीकांत पटवर्धन यांनी प.पू. डॉ. आठवले यांच्या क्षात्रधर्म साधना या ग्रंथामध्ये दिलेल्या माहितीचा विपर्यास करून लिहिलेल्या सनातनची विचारप्रणाली आणि हिंसा हा लेख प्रसिद्ध झाल्याचे दैनिक सनातन प्रभात च्या कार्यालयात दूरध्वनी करून सांगितले. या वेळी श्री. गोळे यांनी याकूब याच्या फाशीच्या वेळी त्याची बाजू घेणारे बापट, पटवर्धन हेच होते. हिंदूच हिंदूंचे कसे वैरी आहेत, ते बघा, असे सांगून सनातनच्या साधनेविषयीच्या मार्गदर्शचा लेखाद्वारे करण्यात आलेल्या विपर्यासाविषयी संताप व्यक्त केला आणि या लेखाला दैनिक सनातन प्रभातमधून वैचारिक प्रतिवाद देण्यास सांगितले.

कॉ. पानसरे यांच्या हत्येनंतर संशयित म्हणून सनातनच्या साधकाला अटक केल्यावर वृत्तवाहिन्यांनी आयोजित केलेल्या चर्चासत्रात सनातनचा सहभाग


सनातन संस्थेने घेतलेल्या पत्रकार परिषदांची वृत्ते प्रसिद्ध करण्यासंदर्भातील आढावा

मराठी वृत्तपत्रे
मृतवत (प्रसिद्धी न देणारे) : संध्याकाळ, रत्नागिरी टाइम्स, प्रहार
विचारशून्य : आपल महानगर, सकाळ, लोकमत, पुढारी, मी मराठी, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सागर,पुण्यनगरी, वृत्तमानस, वृत्तदिनांक, नव शक्ति, बेळगाव तरुण भारत, मुंबई तरुण भारत, मुंबई लक्षदीप, मुंबई चौफेर
विचारी : आपला वार्ताहर, सामना, मुंबई मित्र, नवा काळ, प्रात: काल, पुण्यनगरी
हिंदी वृत्तपत्रे
मृतवत (प्रसिद्धी न देणारे) : प्रात: काल (हिं), यशोभूमि
विचारशून्य : दबंग दुनिया, नवभारत टाइम्स, नवभारत, हमारा महानगर, दक्षिण मुंबई, खबरे आज तक, पूर्णविराम   
विचारी : जागरुक टाइम्स, अ‍ॅबसोल्यूट इंडिया (हिं)

प्रसारमाध्यमांचा अयोग्य व्यवहार...!

गाझियाबाद, उत्तरप्रदेश येथील धर्माभिमानी श्री. विनोदकुमार सर्वोदय यांनी प्रसारमाध्यमांना पाठवलेले पत्र
वन्दे मातरम्
    'एबीपी न्यूज' या वृत्तवाहिनीवर सनातन संस्थेविषयी चालू असलेले अपप्रचाराचे षड्यंत्र पाहून मन अतिशय विषण्ण झाले. आमच्या देशात अशा प्रकारचा नकारात्मक प्रचार करून राष्ट्र आणि धर्म यांना अंधारात ढकलण्याचे कार्य करणार्यांना एवढे प्रोत्साहन मिळत आहे की, ते अशा संस्थेला आरोपीच्या पिंजर्यात उभे करण्याचे धाडस करत आहेत, जी त्यांच्या मर्यादित साधनांद्वारे धर्म आणि राष्ट्र यांच्या रक्षणासाठी अथक परिश्रम करत आहे ? जिचा एक-एक साधक समर्पण आणि त्याग यांच्या भावनेतून राष्ट्र-धर्मरक्षण या एकाच ध्येयासाठी समाजाला प्रोत्साहित करत आहे.

पानसरे हत्या प्रकरणात संमोहनाच्या सूत्रावरून वृत्तवाहिन्यांवर विनोदाची मालिका !


१. एका वृत्तवाहिनीवर प्रा. श्याम मानव यांनी सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक हे स्वतःच संमोहित झालेले आहेत, असे विधान केले. वस्तूतः संमोहित झालेली व्यक्ती ज्याने तिचे संमोहन केले आहे, तिचे सोडून अन्य कुणाच्याही प्रश्‍नांची उत्तरे देत नाही. प्रत्यक्षात श्री. वर्तक मात्र नियमितपणे पत्रकार परिषदा घेतात, तसेच सर्व पत्रकारांच्या प्रश्‍नांची उत्तरेही देत असतात.

सनातनचे साधक निर्दोष ठरल्यानंतरही प्रसारमाध्यमे समाजमनावर ठसणारी चर्चासत्रे घेतील का ? - अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

माझा कट्टा कार्यक्रमात अभय वर्तक यांचा माध्यमांना अंतर्मुख करणारा प्रश्‍न !
* माझा कट्ट्यावरील कार्यक्रमात श्री. वर्तक यांनी केले सर्व शंकांचे निरसन !
* प्रा. मानव यांच्यापेक्षा श्री. वर्तक यांनाच पत्रकारांनी जिज्ञासेने विचारले अधिक प्रश्‍न !
मुंबई - आज सनातन संस्थेचे साधक श्री. समीर गायकवाड यांना केवळ संशयित म्हणून पकडल्यानंतर सनातनवर नैतिकतेपासून बंदी घालण्यापर्यंत बेछूट आरोप केले गेले. मडगाव येथेही वर्ष २००९ मध्ये स्फोट झाल्यानंतर त्या प्रकरणात सनातनच्या ६ साधकांना अकारण गोवण्यात आले. १४ दिवस सनातनच्या विरोधात सर्व प्रकारच्या माध्यमांनी आजच्या सारखेच गलिच्छ आरोप केले. ४ वर्षे त्या साधकांनी कारावास भोगल्यानंतर त्यांची निर्दोष मुक्तता झाली. या प्रकरणाचे दोषारोपपत्र साधकांना गोवण्यासाठीच निर्माण केले होते का ?, असे ताशेरे न्यायालयाने ओढले.

आमचा सनातनला भक्कम पाठिंबा ! - हिंदुत्ववादी अन् विचारवंत

   अनेक हिंदुत्ववादी, हिंदु संघटनांचे नेते, प्रवचनकार, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, लेखक, संपादक इत्यादींनी सनातनच्या कार्यावर विश्‍वास व्यक्त करत सनातन संस्थेला पाठिंबा दिला. तसेच संस्थेचे कार्य अधिक प्रमाणात वाढण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सनातन संस्थेवर बंदीची मागणी मूर्खपणाची ! - पी. दैवमुथ्थू, संपादक, हिंदु व्हॉईस
    सनातन संस्थेवर बंदीची मागणी करणे, हे शुद्ध मूर्खपणाचे लक्षण आहे. त्यांचा केवळ एक साधक पानसरेंच्या हत्येत संशयित आहे, एवढा पुरावा संस्थेवर बंदी घालण्यासाठी पुरेसा नाही. कायद्याला आपले काम करू द्या आणि न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वाट बघा. जर एका हत्येच्या प्रकरणात सनातनवर बंदी टाकायची म्हटली, तर अनेक धर्मांध अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट घडवून, तसेच भोसकून कित्येक लोकांची हत्या केली आहे, त्या सर्वांवर बंदी घालावी लागेल. मी सनातन संस्थेला चांगले ओळखतो, अनेक वेळा त्यांच्या गोवा आश्रमाला भेटही दिली आहे. त्यांचे साधक अतिशय नम्र आणि विनयशील आहेत. सनातन हिंदुत्वाचे कार्य कायद्याच्या बंधनात राहून केले जाते. सनातन एक राष्ट्र्रप्रेमी संघटना आहे आणि तिला हिंसेचे वावडे आहे.
सनातनला गोवण्याचे हे षड्यंत्र आहे ! - अनंत गुढे, माजी खासदार, शिवसेना, अमरावती
हिंदूंना नेहमीच अपकीर्त करून हिंदु समाजावर दबाव आणला जातो. कॉ. पानसरे आणि डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातनला प्रथमपासूनच दोषी ठरवले गेले. ज्याप्रमाणे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याकडून पोलिसांना काहीच पुरावे सापडले नाहीत, त्याप्रमाणे संशयित समीर गायकवाड आणि सनातन संस्था निर्दोष आहेत. माझा सनातनला नेहमीच पाठिंबा होता आणि भविष्यातही मी सनातनच्या पाठीशी आहे.


पुराव्याशिवाय सनातनवर बंदी घालण्याची मागणी करणे, 
हा आततायीपणा ! - अधिवक्ता नरेंद्र सावईकर, खासदार भाजप
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातनच्या एका साधकाला महाराष्ट्र राज्यात संशयावरून अटक करण्यात आली आहे. अजून तपास पूर्ण व्हायचा आहे. सनातन ही आंतकवादी संघटना असल्याचा कोणताही पुरावा नाही. त्यामुळे सनातनवर आताच बंदीची मागणी करणे, हा आततायीपणा ठरेल. ते न्यायाच्या दृष्टीनेही अयोग्य ठरेल. त्यामुळे काँग्रेसने असा आततायीपणा करण्याचा प्रयत्न मागे केला असला, तरी पुराव्याशिवाय सनातनवर बंदी घालण्याचा आततायीपणा भाजपचे शासन करणार नाही, याचा मला विश्‍वास आहे.

वस्तूनिष्ठतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारे वृत्तवाहिन्यांचे वार्तांकन !

श्री. भूषण केरकर
कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणात सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना अटक करण्यात आली. त्यानंतर सलग १५ दिवस वृत्तवाहिन्यांनी केलेल्या वार्तांकनामुळे समाजमन ढवळून निघाले. आज माहिती गतीने मिळण्याचे तंत्रज्ञान निर्माण झाले; पण मिळणारी माहिती वस्तूनिष्ठ नसेल, तर समाजाची दिशाभूल कशी होते, याचाच एक वस्तूपाठ या प्रकरणातून निर्माण झाला. समाज, राष्ट्र आणि धर्म विरोधी कार्य करणारे लोकप्रतिनिधी, पोलीस, अधिकारी यांच्या चुका सनातन प्रभातमधून दाखवल्या तर त्या का दाखवल्या ? असा प्रश्‍न करणारा एक वर्ग माध्यमक्षेत्रात आहे. मागील १५ दिवस माध्यमांनी सनातनची मानहानी कशी केली हे आम्ही मांडले, तर आम्हाला सांगणारे तुम्ही कोण ? असा प्रश्‍न माध्यमविरांकडून कदाचित् निर्माण होईल. अर्थात् असे प्रश्‍न निर्माण होतात म्हणून प्रबोधनाचे कार्य थांबवायचे का ? प्रसारमाध्यमेही चुकतात, त्यांच्या चुकांमुळे व्यक्तीचे जीवन उद्ध्वस्त होते, हे नाकारायचे कसे ? निकोप समाज निर्माण करण्यासाठी असे प्रश्‍न टाळता येण्यासारखे नाहीत. म्हणून मागील १५ दिवसांत प्रसारमाध्यमांच्या खटकलेल्या कृती आम्ही वाचकांसमोर ठेवत आहोत. वर्ष २००० मध्ये सनातनची पत्रकारिता या ग्रंथात पत्रकारितेतील चुकीच्या गोष्टी मांडल्या होत्या. पत्रकारितेत आज होत असलेल्या चुकांची तुलना करता परिस्थितीत काही सुधारणा झाली नाही, किंबहुना ती अधिक बिघडली असे म्हणावे लागते. थोडक्यात प्रबोधनाचे कार्य थांबवणे योग्य होणार नाही. त्यासाठीच सनातनच्या संदर्भातील वृत्ते प्रसिद्ध करतांना प्रसारमाध्यमे चुकली कि त्या चुकांची जाणीव करून देणारे सनातन प्रभात चुकत आहे, याचा निर्णय सूज्ञ वाचकांनी खालील उदाहरणांतून घ्यावा, ही अपेक्षा !

सनातनची हिशोब पत्रके जगात एकमेवाद्वितीय असणे ! - आनंद अंबुसा गांगजी, सोलापूर

श्री. आनंद गांगजी
    मी व्यवसायाने सनदी लेखापरीक्षक (सीए) आहे. आर्थिक वर्ष २०१३ मध्ये सनातन संस्थेशी तीन लेखापरीक्षण करण्याची संधी मिळाली. प्रथमच संस्थेची हिशोब पत्रके माझ्या पहाण्यात येत होती. हिशोब पत्रके, तत्सम कागदपत्रे आणि पावती पुस्तके बघून आश्‍चर्याने मी थक्क झालो. इतकी अचून, व्यवस्थित आणि निटनेटके हिशोबपत्रके कुठल्याच धर्मादाय संस्थेने ठेवलेले आजपर्यंत माझ्या लेखापरीक्षणात पहाण्यात आलेले नाही. संस्थेची हिशोबपत्रके ऊचकपणा आणि व्यवस्थितपणा यांसाठी जगात अव्वल क्रमांकावर येईल, याची मला निश्‍चिती आहे. संस्थेचे लेखा विभागाचे साधक अत्यंत तळमळीने आणि भावपूर्णपणे हे कार्य सेवा म्हणून करतात. एक पै चीही चूक राहू नये, यांसाठी सर्वतोपरी काळजी घेतात. एखादी चूक झाली, तर ती सहज स्वीकारतात आणि प्रायश्‍चित्त घेतात.

'सनातनचे जयंत आठवले यांना देशद्रोही ठरवा', अशी मागणी करणार्यांवर ते देशद्रोही असल्याचे सिद्ध करण्याचे उत्तरदायित्व येते !

    पुरोगामी विचारांनी कार्य करणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे आणि डॉ. एम्.एम्. कलबुर्गी यांची हत्या ही पुरोगामी महाराष्ट्रासाठी निंदनीय आहे. या घटनांचे समर्थन आणि पोलिसांनी संशयित म्हणून कह्यात घेतलेल्यांना पाठीशी घालणार्या अन् माहिती प्रसारित करणार्या सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. डॉ. जयंत आठवले यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे प्रविष्ट करावेत, असा ठराव कोल्हापूर येथे २५.९.२०१५ या दिवशी झालेल्या 'जाहीर प्रतिरोध परिषदेत' करण्यात आला.
    कांची कामकोटी पिठाचे शंकराचार्य श्री स्वामी जयेंद्र सरस्वती, योगऋषी रामदेवबाबा, पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्यासारख्या थोर धर्माधिकार्यांवर अत्याचार करणार्या धर्मद्रोह्यांप्रमाणे विद्रोहींनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना 'देशद्रोही' म्हटले, यात आश्चर्य ते काय ? विद्रोहींनो, समाज सत्त्वगुणी बनवण्यासाठी अहोरात्र झटणार्या  संतांना 'देशद्रोही' ठरवण्याचे पाप करू नका ! 

पोलिसांनी केलेल्या चौकशीची माहिती त्वरित दैनिक सनातन प्रभातला कळवा !

सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना सूचना
    कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातनच्या साधकांची आणि हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांची ठिकठिकाणी पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी प्रत्यक्ष बोलावून, घरी येऊन किंवा भ्रमणभाषवर संपर्क करून चौकशी केल्यास त्या चौकशीची माहिती (कोणत्या दिवशी चौकशी झाली ? काय प्रश्नस विचारले ? पोलिसांचे नाव, पोलीस ठाणे, किती वेळा चौकशी केली ? आदी सर्व तपशील) नजीकच्या दैनिक सनातन प्रभातच्या कार्यालयात त्वरित पाठवावा. आपल्या जिल्ह्यातील साधक किंवा कार्यकर्ते यांनी झालेल्या चौकशीचा तपशील पाठवला आहे कि नाही, याचा जिल्हा समन्वयकांनी आढावा घ्यावा.
इ-मेल : panveldainik@gmail.com
संपर्क : ९४०४९ ५६०८७

सनातन संस्थेची मानहानी करणारी वृत्ते प्रसिद्ध करणाऱ्या वृत्तपत्रांची माहिती कळवा !

    कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणावरून काही वृत्तपत्रे सनातन संस्थेची मानहानी करणारी वृत्ते प्रसिद्ध करत आहेत. अशा वृत्तपत्रांच्या विरोधात मानहानीचे न्यायालयीन दावे लावण्याची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. आपल्या जिल्ह्यात प्रसिद्ध होणार्याे वृत्तपत्रांमध्ये अशी मानहानीची वृत्ते प्रसिद्ध झाल्यास त्या वृत्ताची स्कॅन कॉपी vidhisangh@gmail.com या इ-मेल पत्त्यावर पाठवावी. जेणेकरून अशा वृत्तपत्रांवर मानहानीचे दावे घालण्याची प्रक्रिया त्याच दिवशी चालू करता येईल. तसेच या वृत्तपत्राचे ५ अंक हिंदु विधीज्ञ परिषदेचे गोवा राज्य सचिव अधिवक्ते नागेश ताकभाते यांच्या नावे सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथे पाठवावेत.
-----------------------------------------------------
सनातन संस्थेची मानहानी
करणारी वृत्ते प्रसिद्ध करणार्याम वृत्तवाहिन्यांची माहिती कळवा !
    कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणावरून सनातन संस्थेविषयी मानहानीकारक वृत्ते वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित होत असल्यास त्याविषयी त्वरित दैनिक सनातन प्रभातच्या कार्यालयात (०८३२) २३१२६६४ या दूरध्वनी क्रमांकावर कळवावे. ज्यांच्याकडे वृत्तवाहिन्यांवरील कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग करण्याची सुविधा उपलब्ध आहे, त्यांनी त्या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग करून ते vidhisangh@gmail.com या इ-मेल पत्त्यावर पाठवावे आणि त्याविषयी अधिवक्ते नागेश ताकभाते
(दू.क्र. ८४५१००६०५८) यांना कळवावे.

धर्मसत्संग आणि विविध माहितीपट यांच्या निर्मितीतील विविध सेवांमध्ये सहभागी होऊन समाजमनात राष्ट्र अन् धर्म प्रेमाचे बीज रोवण्यास कटीबद्ध व्हा !

साधकांना सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् राष्ट्रप्रेमी हिंदु यांना नम्र विनंती
     समाजाला धर्मशिक्षण देऊन धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती सदैव प्रयत्नरत आहेत. संस्था आणि समिती यांच्या वतीने दर्शकांना विविध विषयांचे ज्ञानामृत पाजणारे ३७० दृक्श्राव्य धर्मसत्संग सिद्ध करण्यात आले असून विविध विषयांवरील दृकश्राव्य माहितीपटही (ऑडिओ-व्हिडिओ डॉक्युमेन्टरीसुद्धा) बनवण्यात आले आहेत. 
    सार्‍या मानवजातीसाठी एकमेव बोधामृत असणारे धर्मसत्संग, तसेच समाजाला दिशादर्शन करणारे दृकश्राव्य माहितीपट विविध भाषांमध्ये सादर करून ते सार्‍या भारतभरात पोचवण्याच्या सेवेत सहभागी होण्याची सुवर्णसंधी श्रीकृष्णकृपेने सर्वांना लाभत आहे.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

कुळाचाराचे पालन करा !
    ईश्वरावर श्रद्धा ठेवा. घरातील वातावरण आधुनिक असले, तरी देवघर असावे. कुळधर्म-कुळाचार यांचे पालन करा. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

मायेचे प्रकार

॥ हरि ॐ तत्सत् ॥
संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
      मायेचे दोन प्रकार आहेत. एक अविद्यामाया आणि दुसरी गुरुमाया. अविद्यामाया जिवाला अज्ञानात अडकवते, तर गुरुमाया अविद्येतून जिवाची सुटका करते. गुरुमायेलाच प्रभुमाया किंवा हरिमाया असेही म्हणतात.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

स्वतःला सर्व कळते, असा अहंभाव असणार्‍या बुद्धीप्रामाण्यवाद्यांमुळे समाजाची होणारी हानी !

      स्वतःला सर्व कळते, असा अहंभाव असणार्‍या बुद्धीप्रामाण्यवाद्यांना नवीन विषय जाणून घेण्याची जिज्ञासा नसते. त्यांना कोणी एखादा नाविन्यपूर्ण चमत्कार दाखवला, तर तुम्ही तो केला, असे ते म्हणतात. त्यामुळे त्यांना चमत्काराच्या मुळाशी जाता येत नाही; म्हणून त्यामागील अध्यात्मशास्त्र कळत नाही. ते मात्र चमत्कारच खोटा, असा डंका पिटून समाजाचा बुद्धीभ्रम करतात. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३.१०.२०१५)
       धर्मद्रोही अंनिसवर बंदी घाला !, अशी हिंदूंनी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटणार नाही !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३.१०.२०१५)

संमोहनशास्त्रापेक्षा अध्यात्मशास्त्र श्रेष्ठ !

 परात्पर गुरु डॉ. आठवले
     संमोहनापेक्षा अध्यात्मशास्त्र श्रेष्ठ आहे; कारण अध्यात्माद्वारे चिरंतन आनंद मिळवता येतो, तर संमोहनाद्वारे त्या आनंदाच्या जवळपासही पोहोचता येत नाही, तर केवळ काही जणांत काही काळापुरते दुःखनिवारण होऊ शकते, हे माझ्या लक्षात आले. त्यामुळे वर्ष १९९० मध्ये, म्हणजे २५ वर्षांपूर्वीच मी संमोहनाचे उपचार करणे, त्या शास्त्राचे पुढच्या टप्प्याचे संशोधन करणे किंवा ते शास्त्र इतरांना शिकवणे सोडून दिले आणि सर्व भर अध्यात्मानुसार आचरण करणे, साधना करणे, आध्यात्मिक संशोधन करणे आणि इतरांना अध्यात्म आणि साधना शिकवणे यांवर दिला. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३.१०.२०१५)

१६ सप्टेंबर २०१५ ते ...

१६ सप्टेंबर या दिवशी समीर गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली. कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाचा शोध घेणार्या तपास पथकाने दूरभाषवरील संभाषणाच्या आधारावर समीर गायकवाड यांना अटक केली. या प्रकरणातील संशयित म्हणून त्यांना कह्यात घेण्यात आले, असे सांगण्यात येत आहे. विघ्नहर्त्या श्री गणेशाचे आगमन दुसर्या दिवशी म्हणजे १७ सप्टेंबर या दिवशी होणार होते. सनातनच्या विरोधकांच्या हातात आयतेच कोलीत मिळाले आणि त्यांनी सनातनवरील बंदीचा थेट आग्रह धरायला आरंभ केला. दूरचित्रवाहिन्यांना दिवसभर चघळायला विषय मिळाला. त्यांना खर्या-खोट्याची पडताळणी करायची जणू आवश्यकताच भासली नाही. सनातनवरील बंदी हा विषय दिवसभर परत परत लावून धरून लोकांच्या मनात सनातनविरोधी भूमिका निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अर्थात् हे सर्व विघ्नहर्त्या श्री गणेशांच्या उपस्थितीत होत होते, हे लक्षात घ्यायला हवे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn